✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 20 जून 2025💠 वार - शुक्रवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1An9yVxvnA/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩महत्त्वाच्या घटना :• १९४८ – "सीनिफ" (CINEF) या भारतीय चित्रपट समाजाची स्थापना झाली.• १९७७ – तेलगू देशम पक्षाचे संस्थापक आणि अभिनेते एन. टी. रामाराव यांनी अंध्रप्रदेशचे मुख्यमंत्रीपद स्वीकारले.• १९९१ – जर्मनीची राजधानी बर्लिन घोषित करण्यात आली.• २०१२ – जगातील सर्वात उंच व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे सुलतान कोसेन (टर्की) यांचा विक्रम अधिकृतपणे नोंदवला गेला.🎂 जन्मदिवस :• १९२४ – चेतन आनंद, प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक.• १९२८ – रॉबर्ट रोझन, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ.• १९६७ – निकोल किडमन, ऑस्ट्रेलियन अभिनेत्री आणि ऑस्कर विजेती.• १९७९ – फ्रँक लँपार्ड, इंग्लंडचा फुटबॉलपटू.🕯️ मृत्यू :• १८३७ – विल्यम चतुर्थ, इंग्लंडचा राजा.• १९९६ – सुशील कुमार धरणी, भारतीय सैन्याचे अधिकारी, "परमवीर चक्र" विजेते.🌍 जागतिक/राष्ट्रीय दिन :🌱 जागतिक शरणार्थी दिवस (World Refugee Day)→ संयुक्त राष्ट्रसंघाने शरणार्थ्यांच्या हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी २० जून हा दिवस पाळण्याचे ठरवले (२००१ पासून).••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शाळा प्रवेशोत्सव*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 मध्ये IIT दिल्ली सर्वोत्तम, IIT मुंबई दुसऱ्या स्थानी, DU चा क्रमांक अबाधित; देशातील 54 विद्यापीठांच्या यादीत समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महाराष्ट्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय स्टार्टअप्सना माहिती क्षेत्रातील जागतिक कंपनी गुगलचे बळ मिळणार - कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *निवडणूक आयोगाचा नवीन नियम ! आता 15 दिवसांत नोंदवले जाणार मतदार यादीत नाव, तसेच पंधरा दिवसांच्या आत मतदार छायाचित्र ओळखपत्र (EPIC) ही मिळेल.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना ‘एचएसआरपी’ बसवण्याची प्रक्रियेला १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नाशकात मुसळधार पावसाने गोदावरीला पूर, नदीपात्राजवळ कार पाण्यात अडकली, बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान:पुणे जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांच्या उपस्थितीत शासकीय महापूजा संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत - इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्याला आजपासून प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 रमेश मुनेश्वर, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक, किनवट 👤 भरत सोनवणे, उपक्रमशील शिक्षक, निलंगा, जि. लातूर👤 विनोद गुम्मलवार, नांदेड 👤 शंकर उषापोड, शिक्षक, धर्माबाद 👤 शंकर पाटील कदम, धर्माबाद👤 संभाजी आटोळकर 👤 लक्ष्मण तुरेराव, लोकमत धर्माबाद तालुका प्रतिनिधी👤 लक्ष्मण चन्नावार, नायगाव👤 किरण पाटील बेंद्रे, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद👤 भगवान बकवाड, शिक्षक नेते, नांदेड 👤 गणेश येमेवार, धर्माबाद 👤 शादूल चौधरी, शिक्षक, नायगाव 👤 नरसिंग नाईक, शिक्षक, नांदेड 👤 दौलतराव वारले, शिक्षक, धर्माबाद 👤 गणेश अंगरोड, धर्माबाद *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 04*प्रश्न असा आहे की उत्तर काय आहे ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - भाग्य / नशीब ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मनुष्य निसर्गाचा अनुचर आणि नियतीचा दास आहे. - जयशंकर प्रसाद*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'संविधानाचा हृदय व आत्मा' असे कोणत्या कलमाला म्हटले जाते ?२) वाघाचा पायाचा ठसा काय दर्शवतो ?३) महाराष्ट्र राज्याचे एकूण प्राकृतिक विभाग किती व कोणते ?४) 'नाटक लिहिणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) साइप्रस या देशाची राजधानी कोणती ? *उत्तरे :-* १) कलम ३२ २) लिंग, वय, आकार, आरोग्य, जंगलातील हालचाल ३) तीन - कोकण किनारपट्टी, सह्याद्री ( पर्वतरांगा ), महाराष्ट्र पठार ( दख्खन पठार ) ४) नाटककार ५) निकोसिया*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••☀ *उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहिल्यास काय होईल ?* ☀ **********************थोडक्यात सांगायचं तर, ते डोळे कायमचे मिटतील. कारण सूर्यकिरणांची तीव्रता इतकी असते, की त्यापायी डोळ्यांच्या पडद्याला कायमस्वरूपी इजा होऊ शकते. त्यांची तशी कारणंही आहेत. सामान्यत: अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून दिवसाच्या तळपत्या सूर्याकडे पाहवणार नाही आशीच योजना निसर्गानं करून ठेवली आहे. त्यापायी सूर्याकडे नजर वळवली की त्याचं तेज डोळ्यांना सहन न होऊन ते टाळण्यासाठी डोळ्यातली बाहुली कमालीची आकुंचन पावते. ते करण्यासाठी डोळ्यांभोवती स्नायूंना कमाल क्षमतेबाहेर काम करावं लागतं. सहाजिकच त्याचा ताण पडून स्नायु दुखू लागतात. ती वेदना सहन न झाल्यामुळेच मग नजर आपोआप सूर्यापासून दूर वळते.पण सूर्यग्रहणाच्या वेळेस चंद्राची सावली पृथ्वीवर पडल्यामुळे सूर्य काजळल्यासारखा दिसतो. सहाजिकच त्याच्या किरणांची तीव्रता कमी झाल्याची भावना होते. पण ही चुकीची कल्पना असते. साधारणपणे सूर्यकिरणांमध्ये जंबुपार विकीरणांपासून ते रेडिओलहरीपर्यंतची प्रारणं अस्तित्वात असतात. यापैकी जंबुपार किरणं जास्त धोकादायक असतात. शिवाय डोळ्यातील भिंग या किरणांचं डोळ्याच्या पडद्याच्या पेशींवर केंद्रीकरण करतं. या पेशी दोन प्रकारच्या असतात. दंडपेशी आणि शंकूपेशी. यांच्यावर प्रकाश पडताच तो शोषला जातो व विशिष्ट रासायनिक अभिक्रिया होऊन एक विद्युतरासायनिक संदेश मेंदूकडे पाठवला जातो. आपण एखाद्या वस्तूकडे पाहातो तेव्हा त्या वस्तूवरुन परावर्तित झालेला सूर्याचा प्रकाश या पेशींवर पडतो. तो सौम्य असतो. शिवाय या रासायनिक अभिक्रियेचा प्रभाव कायमस्वरूपी नसतो. त्यामुळं या पेशी पूर्वपदावर येतात. पण जेव्हा आपण थेट सूर्याकडे पाहतो तेव्हा त्या प्रखरता कितीतरी पट अधिक असते. त्यामुळे होणारी रासायनिक अभिक्रिया अपरिवर्तनीय स्वरूपाची ठरून पेशी कायमच्या निकामी होण्याची शक्यता असते.जेव्हा आपण एखाद्या भिंगातून सूर्यकिरण कागदावर केंद्रीत करतो तेव्हा काही वेळाने तो कागद जळू लागतो. आपल्या डोळ्यातल्या भिंगातून केंद्रीकरण झालेले सूर्याचे प्रखर किरणही अशाच तर्हेने या पडद्याच्या पेशी जाळून टाकू शकतात. त्यामुळे पडद्याचा तेवढा भाग जळून जातो. असे अनेक ठिपके पडद्यावर जमा झाल्यास संपूर्ण पडदाही जळून जाऊन कायमस्वरूपाचं आंधळेपण येऊ शकतं.खंडग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेस सूर्याची लहानशी कोर जरी दिसत राहिली, तरी तिची प्रखरताही अशा प्रकारचं अंशिक किंवा संपूर्ण आंधळेपण आणण्यास पुरेसं ठरतं. खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेसही संपूर्ण खग्रास अवस्था काही सेकंद किंवा मिनिटंच राहते. त्या वेळी कदाचित सूर्याकडे पाहणे शक्य होतं. पण या खग्रास अवस्थेच्या अलीकडच्या पलीकडच्या स्थितीतली सूर्यकोरही दाहक ठरू शकते. म्हणूनच कोणत्याही सूर्यग्रहणाच्या वेळेस डोळ्यांवर काळ्या काचेचं किंवा खास चष्म्याचं संरक्षण असल्याशिवाय सूर्याकडे पाहणे अतिशय धोकादायक असतं.*बाळ फोंडके यांचा 'काय ?' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वनमाळी वनमाळी वनमाळीराधे तुला बोलावितो वनमाळी || धृ ||वेणी फुलाची जाई जुईची, वर मोत्याची माळ || १ ||साडी जरीची चोळी बुटयाची, नेसुनी चंद्रावर || २ ||एका जनार्दनी पूर्ण कृपेने, भक्ती माझी भोळी || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अपमान करण्याचे ठरवणारा अपमानच करत असते. निंदा करणाऱ्याला कोणतेही मुहूर्त बघावे लागत नाही, मदत करणारा आपला माणुसकी धर्म पूर्णपणे निभावत असतो आणि माणूस म्हणून जन्म मिळाला त्यासाठी काहीतरी देणं लागतं यासाठी जो कार्य करत असते ही त्याला लागलेली चांगली सवय आणि आवड असते. या चौघांकडे समाज कोणत्या दृष्टीने बघते हे त्यांच्या कर्मावर अवलंबून असते म्हणून कर्मालाच श्रेष्ठ म्हटले गेले आहे आपणही त्याचे महत्व जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_बोधकथा :_* शब्द व आश्वासन_हाडे गोठवून टाकणाऱ्या एका कडाक्याच्या थंडीच्या रात्री,एक अब्जाधीश रस्त्यावर एका वृद्ध गरीब माणसाला भेटला. त्याने त्याला विचारले, "तुम्हाला बाहेर थंडी वाटत नाही का? तूम्ही तर थंडीचे स्वेटरही घातलेले नाहीये?"_ _तेव्हा त्या गरीब म्हाताऱ्याने उत्तर दिले, "माझ्याकडे गरम स्वेटर नाही परंतु मला थंडीची सवय आहे."अब्जाधीश म्हणाला,"थांबा मी आता घरी जातो आणि तुमच्यासाठी एक चांगले गरम स्वेटर घेऊन येतो"_ _थंडीपासून संरक्षण देणारे स्वेटर मिळणार या विचाराने तो गरीब म्हातारा खूप आनंदित झाला आणि म्हणाला की "साहेब खूप उपकार होतील" अब्जाधीश घरी गेल्यावर काही तरी कामात स्वेटर चे विसरून गेल._ _सकाळी त्याला त्या गरीब म्हातार्याची आठवण झाल्यावर तो स्वेटर घेऊन तो म्हातारा रात्री ज्या जागी भेटला तिथे गेला.परंतु म्हातारा जीवघेण्या थंडीने कडकडून मरण पावला होता._ _अब्जाधीश माणसाला त्याच्या प्रेताजवळ एक चिट्ठी दिसली. त्याने ती चिठ्ठी वाचली.त्यात लिहिले होते, “ साहेब जेव्हा माझ्याजवळ गरम कपडे,स्वेटर नव्हते तेव्हा माझ्याकडे थंडीविरुद्ध लढण्याचे मानसिक शक्ती होती.परंतु जेव्हा तुम्ही मला गरम स्वेटर देण्याचे आश्वासन दिले तेव्हा आता थंडी पासुन संरक्षणासाठी एक छान गरम स्वेटर मिळणार या आशेने माझी थंडी विरुद्ध लढण्याची मानसिक शक्ती संपली"._👉 *_तात्पर्य :_**_जर आपण एखाद्याला दिलेला शब्द,आश्वासन,वचन पाळू शकत नसू तर ते देऊ नका.त्याला आशेवर ठेऊ नका.दिलेला शब्द आपल्यासाठी जरी महत्वाचा नसला तरी तो दुसर्या एखाद्या व्यक्तीसाठी बरंच काही असू शकतो....!_*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment