✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23 जून 2025💠 वार - सोमवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1AscTrdpp6/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 इतिहासातील घटना:• १७५७ – प्लासीची लढाई झाली. इंग्रजांनी सिराज-उद-दौला याला पराभूत करून बंगालमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले. हा लढा भारताच्या इतिहासात निर्णायक ठरला.• १९८० – भारतात संजय गांधी यांचे विमान अपघातात निधन झाले.• १९८५ – एअर इंडिया फ्लाइट 182 ही विमानसेवा आयरिश समुद्रात कोसळली. यात ३२९ लोक मृत्युमुखी पडले. हे भारताच्या नागरी उड्डाण इतिहासातील एक मोठे अपघात होते.🔹 जन्मदिवस:• १८९४ – एडवर्ड VIII, इंग्लंडचा राजा (राजीनामा दिल्यामुळे कधीच प्रत्यक्ष राजा म्हणून राज्य करत नाही).• १९१२ – अलन ट्यूरिंग, संगणकशास्त्राचा जनक व गणितज्ञ.• १९३७ – राज बब्बर, हिंदी चित्रपट अभिनेते व राजकारणी.🔹 स्मृतिदिन:• १९८० – संजय गांधी, भारतीय राजकारणी व इंदिरा गांधींचे सुपुत्र.• २००६ – अरुणा आसफ अली, स्वातंत्र्यसैनिक व समाजसेविका.🔹 महत्त्वाचे दिवस:संयुक्त राष्ट्र सार्वजनिक सेवा दिन (United Nations Public Service Day)– प्रशासनात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सेवा सुधारण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गृहपाठ आणि मुले*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *अमेरिकेने इराणच्या तीन अणुस्थळांवर हल्ला केल्ल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी साधला संवाद*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *कर्जमाफीचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा, फडणवीसांचा विचार लवकरच कार्यान्वित होईल, पण शेतकऱ्यांनी कर्ज भरलीच पाहिजेत - कृषिमंत्री कोकाटे*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *एअर इंडियाचा परवाना रद्द करण्याचा DGCAचा इशारा, म्हणाले- ऑपरेशन नियमांकडे सतत दुर्लक्ष केले जातेय; काल एअरलाइनच्या 3 अधिकाऱ्यांना काढून टाकले*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *गोव्यातून 2000 वारकऱ्याची पंढरपूर वारी, मुख्यमंत्री प्रमोद सावंत सहभागी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा जनता दरबार, जनतेच्या समस्या थेट ऐकल्या.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महाराष्ट्रासह गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, वायव्य भारतात आणि ईशान्य भारतात 22 ते 26 जूनदरम्यान तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी इंग्लंड चांगल्या स्थितीत*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गोपाळ कौरवार, नांदेड 👤 संजय कदम, शिक्षक, नांदेड 👤 पोषट्टी कोषकेवार, शिक्षक, कुंडलवाडी 👤 प्रभाकर माळगे👤 विजय पाटील डांगे, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद👤 गंगाधर साळवे, शिक्षक, नांदेड 👤 देवेंद्र शिरूरकर, साहित्यिक, पुणे 👤 राजेश भिसे, शिक्षक, लातूर 👤 संदीप नजारे, पक्षीमित्र, सांगली *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 07*वाचणे लिहिणे दोन्ही ठिकाणी असते माझे काम, कागद नाही पेन नाही, सांगा माझे नाव.*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - चप्पल••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पॅरिस डायमंड लीग २०२५ चा किताब कोणी जिंकला ?२) आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५ साठी यजमान शहर म्हणून कोणत्या शहराची निवड करण्यात आली ?३) इराण व इस्त्रायलमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन राबविले ?४) 'पहाटेपूर्वीची वेळ' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी ! असे कोणते संत म्हणाले ? *उत्तरे :-* १) नीरज चोप्रा, भारत, ८८.१६ मी. भालाफेक २) विशाखापट्टणम ३) ऑपरेशन सिंधू ४) उषःकाल ५) संत सावता माळी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *अवयव दान कोण करू शकतो ?* 📙 ************************खरं तर या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी दुसराच एक प्रश्न विचारायला हवा. हे दान केव्हा करायचं आहे ? जिवंतपणी की मृत्यूनंतर ? मृत्यूनंतर करायचं असेल तर कोणीही असं दान करू शकतो. तसंच कोणताही अवयव दान करू शकतो. तो जर योग्य त्या अवस्थेत असेल आणि कोणा गरजूला त्याचा उपयोग होणार असेल तर डॉक्टर अशा दानाचा स्वीकार करू शकतात. एवढेच काय विंदा करंदीकरसारख्या ज्ञानपीठ विजेत्या कवीनं तर मरणोत्तर आपल्या देहाचं मेडिकल कॉलेजला दान केलं होतं. तेव्हा अशा प्रकारच्या दानाची कोणालाही मुभा असते. मात्र ते स्वेच्छेने केलं जायला हवं. त्यासाठी कोणाचंही किंवा कशाचंही दडपण असत कामा नये. शिवाय अशा दानाची इच्छा व्यक्तीनं जिवंतपणी धडधाकट असताना नोंदवलेली असणं आवश्यक आहे. आपल्या शरीरातले कित्येक अवयव एकांडे आहेत. आपल्याला एकच हृदय असतं, यकृत, स्वादूपिंड, प्लीहा हेही अवयव एकेकच असतात. त्यामुळे त्यांचं दान करणं कोणालाही शक्य नसतं. नाही म्हणायला यकृताचा एक तुकडा दान करता येतो. कारण त्यामुळे झालेली झीज भरून येण्याची शक्यता असते. अर्थात घेता आणि दाता दोघांनाही त्याचा फायदा होतो. तरीही या दोघांच्या शरीरातील पेशी वर असलेले, त्यांची निर्विवाद ओळख पटवणारे आणि रेणूंचे गट व्यवस्थित जुळणे आवश्यक असतं. अशी जुळणी सहसा आई वडील, मुलं, भावंडं किंवा त्यांच्यासारख्या जवळच्या नातेवाईकांमध्ये शक्य असते. इतरांच्या बाबतीत अशी जुळणी होण्याची शक्यता फार कमी असते. पण काही अवयवांच्या जोड्या शरीरात वास करून असतात. दोन मूत्रपिंड असतात, फुफ्फुसंही दोन असतात. स्त्रियांच्या शरीरात बीजकोशही दोन दोन असतात. त्यांच्यापैकी एकाचं दान केलं तरी उरलेल्या एकाच अवयवाला साऱ्या शरीराचा भार पेलणं अशक्य नसतं. अशा वेळी जिवंतपणीच जोडीपैकी एकाचं दान करणं शक्य असतं. त्यासाठीही पेशीगटांची तंतोतंत जुळणी होणं गरजेचं असतंच. तसं पाहिलं तर कान, डोळे, हात, पाय या बाह्यांगावरच्या अवयवांच्याही जोड्या असतात; पण यापैकी एकाचं दान आपण करू शकत नाही. अपघातामुळे एक डोळा गमवावा लागल्यावर एकाच डोळ्यावर व्यक्ती आपला कारभार चालवू शकते. पण काही बाबतीत तिला अडचणींचा सामना करावा लागतोच. कारण दोन डोळ्यांमुळे आपल्याला समोरच्या दृश्यातल्या खोलीची जाणीव होते. एकच डोळा असेल तर त्यात काही प्रमाणात तरी अडचण उद्भवते. तीच बाब इतर अवयवांनाही लागू पडते. शिवाय यामुळे जी विद्रुपता येते तिचा सामना करणंही सोपं नसतं.परंतु एक अवयव असा आहे की ज्याचं दान आपण निःशंक करू शकतो. तो अवयव आहे रक्त. रक्तदान आज आपण जिवंतपणी करू शकतो. एकदा नाही तर अनेकदा. अर्थात त्याचेही काही निकष आहेत; आणि त्यांचं काटेकोर पालन करणं आवश्यक असतं. म्हणूनच रक्तदानापुर्वी डॉक्टर आपली तपासणी करून, आपण ते निकष पूर्ण करू शकतो की नाही, याचा अंदाज घेतात. त्यानंतरच आपल्या रक्ताचं दान स्वीकारलं जातं.*बाळ फोंडके यांच्या 'कोण ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विठू माऊली तू माऊली जगाचीमाऊलीच मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा || धृ ||काय तुझी माया सांगू श्रीरंगासंसाराची पंढरी तू केली पांडुरंगाडोळ्यातून वाहे माय चंद्रभागाअमृताची गोडी आज आलीया अभंगा विठ्ठलाअभंगाला जोड टाळ चीपल्याचीमाऊलीच मूर्ती विठ्ठलाची … || १ ||लेकरांची सेवा केलीस तू आईआ आ आ लेकरांची सेवाकस पांग फेडू आता कस उतराईतुझ्या उपकारा जगी तोड नाहीओवाळूनी जीव माझा सावळे विठ्ठाईजन्मभरी पूजा तुझ्या पाउलाचीमाऊलीच मूर्ती विठ्ठलाची … || २ ||पांडुरंग पांडुरंग विठू माउली तू••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपली ओळख कितीही मोठ्या माणसांशी जरी असेल तरी ती ओळख आणि आपल्या कार्याची किंमत आपली आर्थिक परिस्थिती किंवा आपले आरोग्य चांगले राहते तोपर्यंतच असते. जेव्हा आपले आरोग्य आणि आर्थिक स्थिती हळूहळू कमी व्हायला लागते तेव्हा, कितीही जवळचे लोक का असेनात क्षणात अनोळखी होऊन जातात. म्हणून ह्या सर्व व्यर्थ गोष्टींच्या भ्रमात किंवा गर्वाच्या भोवऱ्यात पडून कोणाचा अपमान करू नये. वेळ आल्यावर गरीबाच्याच घरी प्यायला पाणी मिळते आणि तिथेच आपले कितीही ओळखीचे जरी लोक असतील तरी आपल्याला कमी लेखतात असे अनेक चित्र याच समाजात बघायला मिळत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्राप्त परिस्थितीत समाधान मानने.एकदा एक भुंगा गुंजारव करत फिरत होता. तेव्हा त्याला एक चिमणी म्हणाली, 'मूर्खा, तू जो एकसारखा एकच आवाज काढत बसतो तो कशासाठी? वसंतऋतूत गाणारी कोकिळा, हिरव्यागार झाडाच्या फांदीवर बसून गाणारा तो पक्षी बघ यांची बरोबरी तुला कधीतरी करता येईल का? तसे जमत नाही तर भिकार सूर एकसारखा काढून तू लोकांना कंटाळा का आणतोस?' भुंगा म्हणाला, 'अगं चिमणे, परमेश्वराने या जगात प्रत्येक व्यक्तीत निराळेपणा ठेवला आहे. वैचित्र्य असणे हा जगाचा नियम आहे, दुसर्याचा हेवा न करता ज्याने त्याने आपापल्या शक्तीचा उपयोग केला तर त्यात वाईट काय? जेव्हा कोकिळेचे गाणे बंद पडते तेव्हा एखाद्या सुंदर बागेत निर्जनता भासू न देण्यात माझ्या गरीबाचा उपयोग होतो.'तात्पर्य :- सर्व मनासारखे होत नाही, तर जे असेल त्यात समाधानी असावे.प्राप्त परिस्थितीत समाधानी राहणे हेच उत्तम.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment