✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 03 मार्च 2025💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟣 *_जागतिक वन्यजीव दिन_* 🟣•••••••••••••••••••••••••••••••••••• 🟣 *_ या वर्षातील ६२ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🟣 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟣••••••••••••••••••••••••••••••••••••*२००५: स्टीव्ह फॉसेट यांनी ’ग्लोबल फायर’ या मुलुखावेगळ्या विमानातून एकट्याने आणि पुन्हा इंधन न भरता ६७ तासात पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली**२००३: महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणार्‍या 'शरच्‍चंद्र चटोपाध्याय' पुरस्कारासाठी ज्येष्ठ लेखिका डॉ.सरोजिनी वैद्य यांची निवड**१९९४: जयपूर येथील गिटारवादक पंडित विश्वमोहन भट यांना ’ग्रॅमी पुरस्कार’ प्रदान**१९९१: रेल्वे कर्मचाऱ्यांचे पहिले मराठी साहित्य संमेलन दया पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे भरले**१९७३: ओरिसात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.**१९६६: डॉ. धनंजयराव गाडगीळ पुणे विद्यापीठाचे सहावे कुलगुरू झाले.**१९४३: दुसरे महायुद्ध – लंडनमधे बॉम्बविरोधी आश्रयस्थानात घुसताना झालेल्या चेंगराचेंगरीत १४३ ठार**१८८५: अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनी (AT &T) ची स्थापना झाली.**१८६५: हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कार्पोरेशन (HSBC) ची स्थापना झाली.**१८४५: फ्लोरिडा हे अमेरिकेचे २७ वे राज्य बनले.*🟣 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟣 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८९: श्रद्धा कपूर -- भारतीय सिने-अभिनेत्री**१९८९: मिलन ज्ञानेश्वर बडगे -- लेखक* *१९८६: सुरजकुमारी गौरीशंकर गोस्वामी -- कवयित्री**१९८१: मेघराज यादवराव मेश्राम -- कवी, लेखक**१९७७: अभिजीत कुंटे – भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रँडमास्टर**१९७७: अंकुश रा. शिंगाडे -- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९७५: लोकेश गुप्ते -- मराठी फिल्म अभिनेता, दिग्दर्शक* *१९७०: इंझमाम उल हक – पाकिस्तानी क्रिकेटपटू**१९६७: शंकर महादेवन – गायक व संगीतकार**१९६२: प्रा. डॉ. प्रकाश नारायण मोगले -- लेखक, कवी* *१९६१: प्रमोद पांडुरंग काकडे -- लेखक, कवी**१९५८: शुभांगी चंद्रशेखर पासेबंद -- प्रसिद्ध लेखिका* *१९५५: जसपाल भट्टी – विनोदी अभिनेते (मृत्यू: २५ ऑक्टोबर २०१२ )**१९५४: डॉ. प्रल्हाद गोविंदराव लुलेकर -- प्रसिद्ध साहित्यिक, ज्येष्ठ विचारवंत, व्याख्याते* *१९५३: सुधाकर विठ्ठल दिक्षीत -- प्रसिद्ध कथाकार**१९५१: डॉ. दिलीप गणेश देवधर -- आरोग्य विषयक लेखन करणारे लेखक**१९५०: अर्चना विनोद अलोणी -- लेखिका (मृत्यू: २९ जुलै २०२४ )* *१९४९: उत्तम धोंडू कोळगांवकर -- प्रसिद्ध कवी, बालसाहित्यिक* *१९४७: मृणालिनी माधव केळकर -- लेखिका, अनुवादक**१९४७: शंकर ऊर्फ काका बडे -- ज्येष्ठ मराठी कवी (मृत्यू:१ सप्टेंबर २०१६ )* *१९४३: माधवराव खाडिलकर -- लेखक, निर्माता, दिग्दर्शक, अभिनेते ( मृत्यू: ३ फेब्रुवारी २०२४)**१९४१: भालचंद्र शंकर देशपांडे -- प्रसिद्ध लेखक (मृत्यू: १३ ऑक्टोबर २०२४ )**१९४१: अनिल मेहता -- मेहता पब्लिकेशनचे संस्थापक**१९४१: गोविंद दिवाकर ठेंगडी -- कवी* *१९३९: एम. एल. जयसिंहा – कसोटी क्रिकेटपटू,शैलीदार फलंदाज (मृत्यू: ६ जुलै १९९९ )**१९३३: वामन गणपतराव इंगळे -- कवी, लेखक**१९३१: उस्ताद गुलाम मुस्तफा खान-- भारतीय शास्त्रीय संगीतकार (मृत्यू: १७ जानेवारी २०२१ )**१९२८: पुरुषोत्तम पाटील -- मराठी साहित्यातील ख्यातनाम कवी आणि संपादक. (मृत्यू: १६ जानेवारी २०१७ )**१९२६: रवि शंकर शर्मा ऊर्फ ’रवि’ – संगीतकार (मृत्यू: ७ मार्च २०१२ )**१९२३: सदाशिव नथोबा आठवले -- ललितलेखक, इतिहासकार (मृत्यू: ८ डिसेंबर २००१ )**१९०८: यज्ञेश्वरशास्त्री माधव कस्तुरे -- वेदान्ततीर्थ, संपादक, संस्कृत आचार्य, लेखक (मृत्यू: २४ ऑगस्ट २००६ )**१९०३: विनायक सदाशिव सुखटणकर -- कथाकार,संपादक (मृत्यू: १८ सप्टेंबर १९७७ )**१८४७: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल – स्कॉटिश - अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक, टेलिफोनचा संशोधक (मृत्यू: २ ऑगस्ट १९२२ )**१८४५: जी. कँटर – जर्मन गणितज्ञ (मृत्यू: ६ जानेवारी १९१८)**१८३९: जमशेदजी नसरवानजी टाटा – आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार व टाटा उद्योग समुहाचे संस्थापक (मृत्यू: १९ मे १९०४ )*🟣 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟣 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१४: विजय हरी वाडेकर -- लेखक (जन्म: २७ सप्टेंबर १९३९ )**२०११: रविंदर कपूर (गोगा कपूर) --भारतीय अभिनेता (जन्म: १५ डिसेंबर १९४० )**२०११: अनंत लाल -- भारतीय शास्त्रीय संगीतकार (जन्म: १९२७ )**२०००: रंजना देशमुख -- लोकप्रिय मराठी अभिनेत्री (जन्म:२३ जुलै १९५५ )**१९९५: पं. निखिल घोष – तबलावादक (जन्म: १९१९ )**१९८९: नारायण गोविंद कालेलकर -- प्रसिद्ध मराठी भाषाशास्त्रज्ञ(जन्म: ११ डिसेंबर १९०९ )**१९८२: रघुपती सहाय ऊर्फ फिराक गोरखपुरी – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू शायर (जन्म:२ ८ ऑगस्ट १८९६ )**१९६५: अमीरबाई कर्नाटकी – पार्श्वगायिका व अभिनेत्री (जन्म: १९०६ )**१९४८: बाळकृष्ण शिवराम मुंजे -- भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक नेते,हिंदुमहासभेचे अध्यक्ष आणि निष्ठावान टिळकानुयायी.(जन्म: १२ डिसेंबर १८७२ )**१९१९: हरी नारायण आपटे – कादंबरीकार (जन्म: ८ मार्च १८६४ )**१७०७: औरंगजेब – सहावा मोगल सम्राट (जन्म: ४ नोव्हेंबर १६१८ )**१७०३: रॉबर्ट हूक – इंग्लिश वैज्ञानिक (जन्म: १८ जुलै १६३५ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी, नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••**फ्रेश मॉर्निंग बुलेटिन* समुहात join ..... होण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नवी दिल्ली  : वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी दिल्लीतील १५ वर्षांपेक्षा जुन्या वाहनांना ३१ मार्चनंतर पेट्रोल व डिझेल मिळणार नाही, अशी घोषणा पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी केली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *जुन्नर : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, ता. अलिबाग जि. रायगड यांच्या वतीने नारायणगाव परिसरात स्वच्छता अभियानातून काढला १४ टन कचरा !*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून होणार सुरू, 26 मार्चपर्यंत चालणार अधिवेशन, 10 मार्च रोजी अर्थसंकल्प सादर होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्य सरकारने केल्या १३ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, मनोज कुमार शर्मा यांची कायदा-सुव्यवस्था विभागाच्या विशेष महानिरीक्षकपदी नियुक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुणे : राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ( ITI ) शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून डिजिटल लायब्ररी सुरू करण्याचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबई : सुप्रसिद्ध कलावंत व व्याख्याते शरद पोंक्षे यांना ‘अभिनय कौस्तुभ’ पुरस्कार प्रदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ICC चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये भारताने न्यूझीलंडला 45 धावाने हरविले, 04 मार्च रोजी दुबईत ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार सेमी फायनल*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 दादाराव कदम, सहशिक्षक, धर्माबाद👤 दया घोडगे, सहशिक्षक, उमरी👤 सायन्ना नरावाड, सहशिक्षक, बिलोली👤 युनूस अली, सेवानिवृत्त मुख्याध्यापक, धर्माबाद👤 कैलास कासराळीकर👤 सुरज कुमारी गोस्वामी, साहित्यिक, हैद्राबाद👤 किशन जाधव👤 एकनाथ पाटील👤 जयश्री उमरीकर👤 अनिल गड्डम*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  ⚧🍃  *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 08*बेडूकराव जमिनीत झोपतात**आठ महिने तेथेच राहतात**सांगा मुलांनो या निद्रेला**विज्ञानप्रेमी काय म्हणतात?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - साप••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पाणी तप्त लोखंडाची संगत धरतं. कमळाच्या पानाची सोबत धरणारे पाणी, मोत्यासारखं चमकतं जे शिंपल्यांची संगत धरतं त्याचं मोती होतं.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *जगातील दुसरे पुस्तकाचे गाव* कोणते ?२) महाराष्ट्रातील 'जंगल रेशीमचे गाव' कोणते ?३) प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात किती सफाई कर्मचाऱ्यांनी परिसर स्वच्छ करून वर्ल्ड रेकॉर्ड केले ?४) 'हिम' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) भारतातली सर्वात मोठी जीवनदायिनी नदी कोणती ? *उत्तरे :-* १) भिलार, सातारा २) उचाट, सातारा ३) १५ हजार ४) बर्फ ५) गंगा ( २,५२५ किमी )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 क्लोन म्हणजे काय ? 📙 आरशातील प्रतिमाच जर आपल्यासमोर उभी राहिली, तर ? असे प्रत्यक्ष घडणे अजून तरी शक्य नाही. पण त्या दिशेने अनुवंशशास्त्राचे प्रयत्न मात्र सतत चालू आहेत. स्वतःचे बीज पुनरुत्पादनासाठी राखून ठेवावे व अनंत काळाने त्यापासून वंश निर्माण करावा इथपर्यंतच आपली प्रगती थाटलेली आहे.क्लोन म्हणजे हुबेहूब जुळणारी, तंतोतंत तशीच निर्मिती. अनेकदा जुळी भावंडे आपल्याला वेगळी ओळखता येत नाहीत, अगदी तशीच एखाद्याची जुळी आकृती प्रत्यक्षात तयार करता आली तर त्याला क्लोन असे म्हणता येईल. यालाच प्रतिकृती म्हणता येईल काय ? निदान इथे तरी आपण तसे म्हणू यात.विश्वामित्राचा प्रतिसृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न फसल्याची पुराणात नोंद आहे. अद्यापतरी सर्व प्रयत्न तसेच फसत आहेत. मात्र वनस्पतींमध्ये तंतोतंत प्रकृत प्रतिकृती निर्माण करण्यात अनेक बाबतीत यश मिळालेले आहे. झाडाच्या फांदीचा छाट, झाडाचा कलमासाठी बांधलेला डोळा, पानफुटीचा तोडलेला तुकडा ज्याप्रमाणे झपाट्याने अगदी हुबेहूब मूळ प्रतिकृती तयार करतो, तसे प्राण्यांच्या बाबतीत करायचा मानवाचा प्रयत्न आहे. प्रयोगशाळेत या दिशेने यश बेडकांच्या बाबतीत मिळाले आहे. डॉक्टर गार्डन यांनी ऑक्सफर्डमध्ये १९६२ मध्ये बेडकांच्या अंड्यातील केंद्रक काढून घेतला व त्या जागी दुसऱ्या बेडकाच्या आतड्यातील अंतस्त्वचेच्या पेशी घातल्या. या पद्धतीने त्यांनी काही लहान लहान बेडूक तयार करण्यात यश मिळवले आहे. हे लहान लहान बेडूक अगदी एकसारखे व मोठ्या मूळ बेडकाची आठवण करून देणारे होते, कारण त्याच्याच जनुकांपासून त्यांची निर्मिती झाली होती.प्रतिकृती निर्माण करण्यातला मुख्य टप्पा म्हणजे मूळ आकृतीचे जीन्स व जनुके मिळवणे व त्यांची कृत्रिमरित्या वाढ करून त्यांपासून प्रतिकृती तयार करणे हा आहे. बीजांड फलित झाल्यावर निर्माण होणारा वंश एकतर स्त्री व पुरुष या दोघांपैकी एकासारखा असेल व दोघांचे थोडे थोडे रंगरूप घेतलेला असेल; पण प्रतिकृती निर्माण करताना फलित बीजांड वापरण्याची कल्पनाच मुळात नसते ! डॉली या नावाने प्रसिद्ध झालेल्या मेंढीची या पद्धतीने निर्मिती करण्यात शास्त्रज्ञांना यश आले. सस्तन प्राणिवर्गातील क्लोन पद्धतीच्या निर्मितीचा हा पहिला यशस्वी प्रयोग मानला जातो. मानवी निर्मिती अशाच पद्धतीने शक्य आहे, असे त्यानंतर अनेक शास्त्रज्ञांना वाटू लागले आहे. मात्र याच डाॅलीला काही वर्षांतच संधिवाताच्या आजाराने पछाडले. त्यामुळे अशा क्लोननिर्मिती प्राण्याच्या सक्षम जीवन जगण्याबद्दल प्रश्न उभे राहिले आहेत.निसर्गतः झाडांवर वाढणारे, पंख असलेले काही मोजके किडे (Aphids) या प्रकाराने स्वतःची निर्मिती करू शकतात. ही गोष्ट तशी अपघातानेच लक्षात आली आहे. या किटकातील एकाच वेळी निर्मितीसाठी नर वा मादी हे भेद अस्तित्वात नाहीत, हे लक्षात आले. तरीपण एकाच कीटकापासून जवळपास शंभर शंभर कीटक जन्माला येत असल्याचे नोंदले गेले आहे. यातूनच ही प्रतिकृती निर्माणाची बाब लक्षात आली. मानव सध्या जेनेटिक इंजिनिअरच्या साहाय्याने क्लोनची निर्मिती करू पाहत आहे.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  तूं माझी जननी काय गे साजणी । विठ्ठले धांवोनि भेट देई ॥१॥ डोळे माझे शिणले पाहतां वाटोली । अवस्था दाटली ह्रदयामाजीं ॥२॥ मी तुझें पाडस गुंतलों भवपाशीं । माते धीर तुजसी कैसा धरवला ॥३॥ तूं माझी पक्षिणी मी तुझें अंडज । क्षुधें पीडिलों मज विसरशी ॥४॥ तूं माझी माउली मी तुझें वोरस । पुढती पुढती वास पाहतसे ॥५॥ नामा म्हणे विठ्ठले आस पुरवीं माझी । ओरसे वेळां पाजीं प्रेमपान्हा ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तीनही ऋतूमध्ये थंडी, पाऊस आणि ऊन जर सारखेच पडत राहिले तर पाहिजे तसं शेतात पीक निघणार नाही. एवढेच नाही तर मानवी जीवनाला व पशुपक्ष्यांना देखील धोका होऊ शकतो म्हणून ते तीनही ऋतू आपापल्या योग्य वेळेत बदलत असतात आणि ते सर्वांना फायदेशीर ठरत असतात. तसंच माणसानी सुद्धा परिस्थिती बघून आपल्यात थोडाफार बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण हे सर्व काही करताना मात्र आपले सकारात्मक विचार व आपला स्वाभिमान कधीच सोडू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *मदत*शंकर एक गरीब घरातील मुलगा होता. एके दिवशी जंगलातून लाकडे गोळा करून तो परत येत असताना त्याला झाडाखाली एक म्हातारा माणूस बसलेला दिसला. तो खूप थकलेला आणि भुकेलेला होता. शंकरने त्याची विचारपूस केली. पण त्याच्याकडे त्या म्हातार्‍याला द्यायला अन्न द्यायला नव्हते. तो तसाच पुढे गेला. पुढे एक हरिण दिसले. त्याला तहान लागलेली होती. पण शंकरकडे पाणीही नव्हते. शंकरला खूप वाईट वाटले पण त्याचा नाईलाज होता. तो तसाच पुढे गेला. पुढे गेल्यावर त्याला एक माणूस भेटला. त्याला शेकोटी पेटवायची होती पण त्याच्याकडे लाकडे नव्हती. शंकरने त्याला आपल्याकडची थोडी लाकडे दिली. त्या माणसाने त्याला आपल्याकडचे थोडे अन्न आणि पाणी दिले. शंकर ते घेऊन मागे फिरला. त्याने हरणाला पाणी पाजले आणि उरलेले पाणी आणि अन्न घेऊन तो भुकेलेल्या म्हातार्‍या माणसाकडे आला. त्याला अन्न दिले. काही दिवस गेले. शंकर असाच लाकडे गोळा करायला जंगलात गेला. अचानक वाघ समोर आला. वाघ झेप घेणार इतक्यात एका हरणाकडे त्याचे लक्ष गेले. त्या हरणाला शंकरने पाणी पाजले होते. वाघ हरणाकडे पाहतो आहे हे पाहून शंकर उठू लागला तेवढ्यात तेथे एक वृद्ध माणूस आला. त्याने शंकरला उचलून सुरक्षित ठिकाणी नेले आणि त्याचे प्राण वाचवले*तात्पर्य - आपण दुसर्‍याला मदत केली की आपल्यालाही मदत मिळते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment