✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 01 मार्च 2025💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2025/02/vasantdada-patil.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔵 *_जागतिक नागरी संरक्षण दिन_* 🔵•••••••••••••••••••••••••••••••••••• 🔵 *_ या वर्षातील ६० वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🔵 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔵•••••••••••••••••••••••••••••••••••• *१९९८: दाक्षिणात्य गायिका एम.एस. सुब्बलक्ष्मी यांना ’भारतरत्‍न’ हा सर्वोच्‍च नागरी सन्मान राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला.**१९९२: बोस्‍निया व हेर्झेगोविनाला युगोस्लाव्हियापासून स्वातंत्र्य मिळाले.**१९५४: प्रशांत महासागरातील बिकिनी अटोल येथे अमेरिकेने हायड्रोजन बॉम्बची दुसरी चाचणी घेतली. हा स्फोट हिरोशिमाच्या स्फोटापेक्षा ६०० पट जास्त शक्तिशाली होता.* *१९४८: गुवाहाटी उच्‍च न्यायालयाची स्थापना**१९४७: आंतरराष्ट्रीय नाणे निधिच्या कामकाजास सुरूवात झाली.**१९४६: ’बँक ऑफ इंग्लंड’चे राष्ट्रीयीकरण झाले**१९३६: अमेरिकेतील महाकाय ’हूव्हर धरण’ बांधून पूर्ण झाले.**१९२७: रत्‍नागिरीस गांधीजींनी सावरकरांची भेट घेउन चर्चा केली.**१९०७: ’टाटा आयर्न अँड स्टील कंपनी’ची स्थापना**१८७२: ’यलो स्टोन नॅशनल पार्क’ या जगातील पहिल्या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झाली**१८०३:ओहायो हे अमेरिकेचे १७ वे राज्य बनले* 🔵 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🔵 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९१: ओम् भुतकर -- मराठी नाट्य-चित्र अभिनेते, नाटककार आणि कवी**१९८८: संदीप लहू राठोड -- कवी**१९८७: चैतन्य ताम्हाणे -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक, लेखक* *१९८४: चंद्रकांत भोपाळकर -- लेखक**१९८४: विशाल भा. मोहोड -- प्रसिद्ध लेखक, कवी* *१९८३: मंगते चुंगनेजंग मेरी कोम -- सुप्रसिद्ध भारतीय बॉक्सिंगपटू* *१९८२: नंदिता पाटकर -- अभिनेत्री* *१९८०: विक्रम सोनबा अडसूळ -- राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक, लेखक**१९८०: शाहिद अफ्रिदी – पाकिस्तानी क्रिकेटपटू**१९७५: मनिषा टीकारामसिंग पाटील -- कवयित्री, लेखिका* *१९६८: सलील अशोक अंकोला -- भारतीय क्रिकेटपटू**१९६८: चित्रा क्षीरसागर -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका* *१९६३: यशोधन बाळ -- मराठी अभिनेते* *१९५६: डॉ. सुरेश काशिनाथ हावरे -- प्रसिद्ध लेखक, विविध पुरस्कारांनी सन्मानित* *१९५१: अमित खन्ना -- भारतीय चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, लेखक आणि पत्रकार* *१९५१: नितिशकुमार -- मुख्यमंत्री बिहार**१९५०: डॉ छाया प्रकाश कावळे -- प्रसिद्ध कथाकार**१९४७: प्रा. रणजित मेश्राम -- प्रसिद्ध लेखक, पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते**१९४७: शांताराम राजाराम हिवराळे -- प्रसिद्ध कवी,समीक्षक* *१९४७: बशीर मोमीन कवठेकर --- साहित्यिक ज्यांनी मराठी भाषेत लावणी, नाटक,धार्मिक भक्तिगीते, देशभक्तीपर गीते याबरोबरच विविध प्रकारची लोक गीते लिहिली (मृत्यू: १२ नोव्हेंबर २०२१ )**१९४६: इलाही जमादार --- सुप्रसिद्ध गझलकार (मृत्यू: ३१ जानेवारी २०२१ )**१९४५: जनार्दन शां. संखे -- लेखक**१९४५: शोभा फडणवीस -- माजी मंत्री तथा लेखिका* *१९४४: भाऊ पंचभाई -- मराठी भाषेतील प्रसिद्ध कवी, लेखक (मृत्यू: २१ जानेवारी २०१६)**१९४३: मोहन जोती देशपांडे -- लेखक**१९४३: प्रल्हाद केशव वकारे -- लेखक**१९४३: प्रा. डॉ. गजकुमार बाबुलाल शहा -- इतिहासतज्ज्ञ, संशोधक, साहित्यिक**१९४२: इंद्राणी मुखर्जी -- भारतीय चित्रपट अभिनेत्री* *१९४०: श्याम एकनाथराव दाभाडे -- लेखक**१९३९: प्रा. विलास वाघ -- मराठी लेखक, संपादक, प्रकाशक तसेच सामाजिक कार्यकर्ते (मृत्यू: २५ मार्च २०२१ )* *१९३०: राम प्रसाद गोएंका – उद्योगपती (मृत्यू: १४ एप्रिल २०१३ )**१९२३: शांताबाई कृष्णाजी कांबळे -- लेखिका (मृत्यू: २५ जानेवारी २०२३ )**१९२२: नारायण विष्णू धर्माधिकारी ऊर्फ नानासाहेब धर्माधिकारी -- दासबोधाचे निरूपणकार (मृत्यू :८ जुलै २००८)**१९२२: यित्झॅक राबिन – इस्त्रायलचे ५ वे पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: ४ नोव्हेंबर १९९५ )**१९१४: भानुदास श्रीधर परांजपे -- कवी आणि नाटककार**१९१९: मधुकर(मधू) शंकर आपटे -- अभिनेता (मृत्यू: १३ मार्च १९९३ )**१९११: जयशंकर दानवे -- नटश्रेष्ठ आणि नाट्य दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध (मृत्यू: ३ सप्टेंबर १९८६ )**१९०१: बालाजी देवराव पाटील बोरकर -- संस्थापक, सामाजिक कार्यकर्ते (मृत्यू: ३० ऑगस्ट १९८० )**१८९६: श्रीधर बळवंत टिळक -- श्रीधरपंत म्हणून ओळखले जाणारे पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि मराठी लेखक (मृत्यू: २५ मे १९२८ )*🔵 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🔵 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१७: तारक मेहता -- गुजराती विनोदी लेखक, नाटककार व सदरलेखक (जन्म: २६ डिसेंबर १९२९ )* *२०१४: प्रफुल्ला दिलीप डहाणूकर -- मराठी चित्रकार (जन्म: १ जानेवारी १९३४ )**२००३: गौरी देशपांडे – कादंबरीकार, लघुकथालेखिका आणि कवयित्री (जन्म: ११ फेब्रुवारी १९४२ )**१९९९: दत्तात्रयशास्त्री धुंडिराज तथा ’दत्तमहाराज’ कवीश्वर – वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, वेदांती पंडित (जन्म: १३ फेब्रुवारी १९१० )**१९९४: मनमोहन देसाई -- निर्माते, दिग्दर्शक (जन्म: २६ फेब्रुवारी १९३७ )**१९९३: मनोहर शंकर ओक -- कवी, कादंबरीकार (जन्म: २७ मे १९३३ )**१९८९: वसंतदादा पाटील – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री,सहकारी साखर कारखानदारीचे आधारस्तंभ (जन्म: १३ नोव्हेंबर १९१७ )**१९५५: नारायण सदाशिव मराठे तथा ’केवलानंद सरस्वती’ – महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी श्रेष्ठ संस्कृत पंडित, संस्कृतमीमांसाकोशाचे संपादक (जन्म: ८ डिसेंबर १८७७ )~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सहकार महर्षी वसंतदादा पाटील*महाराष्ट्र राज्याचे पाचवे मुख्यमंत्री. वसंतदादांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. ते पदमाळे, जिल्हा सांगली येथील शेतकरी कुटुंबातील होते. वडील बंडूजी व आई रुक्मिणीबाई. दादांचे शिक्षण जेमतेम सातवीपर्यंत झाले. १९३७ मध्ये वसंतदादांनी राजकारणात प्रवेश केला. १९४० मध्ये महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रहाचा आदेश दिला. त्यात दादांनी भाग घेतला. त्यांना सहा महिन्यांची शिक्षा झाली. ........... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्य सरकारच्या 500 सेवा आता व्हॉट्सॲप वर, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा; मुंबईच TECH HUB असल्याचा दावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *‘देशाला आर्थिक महासत्ता बनविण्याच्या दिशेने वाढवण बंदर एक महत्त्वाचे पाऊल’ - मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *धुळे : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धुळ्याचे सीईओ विशाल नरवाडे यांचा गौरव, विविध नाविण्यपूर्ण उपक्रमांबद्दल ते राज्यातील उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी ठरले*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नवी दिल्ली : यंदा मार्च महिन्यात इतर वर्षांच्या तुलनेत अधिक उष्णतेची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाच्या अधिकाऱ्याने दिली*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नागपूर : वीजबिल ऑनलाइन भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढविण्यासाठी महावितरणने सुरू केली लकी डिजिटल ग्राहक योजना*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *RTE 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी 10 मार्च पर्यंत मुदतवाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने आपल्या पदाचा दिला राजीनामा, हॅरी ब्रुक्स इंग्लंडचा नवा कर्णधार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 आशा तेलंगे, मुंबई👤 साहेबराव बोने, देगलुर👤 अमोल अलगुडे, उमरगा👤 राहुल मॅडमवार👤 साहेबराव गुंजाळ👤 नरेश सुरकूटलावार👤 संजय रामराव पाटील कदम, धर्माबाद👤 संतोष चिद्रावार👤 प्रभाकर गोरे👤 सौ. मीनल भाऊसाहेब चासकर👤 रुद्र व्यंकटेश पुलकंठवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  ⚧🍃  *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 07*हा आहे शेतक-यांचा मित्र**नागपंचमीला काढतात चित्र**पाय नसतात सरपटत जातो**तो जमीन भुसभुशीत करतो*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - प्रकाश संश्लेषण••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••धनाचा लोभ हा माणुसकीला लागलेला कलंक आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'छावा' या चित्रपटाचे लेखन कोणी केले ?२) महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार कोणत्या गीताला देण्यात आला ?३) रणजी करंडकाचा अंतिम सामना कोणत्या दोन संघात सुरू आहे ?४) 'हिंमत' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) जगात सगळ्यात दुःखी असलेला देश कोणता ? *उत्तरे :-* १) ओंकार महाजन २) अनादी मी अनंत मी ( स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर ) ३) विदर्भ व केरळ ४) धाडस, धैर्य ५) अफगाणिस्तान*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *गरम पाण्याचे झरे* 📙हिमालयात प्रवासाला जाणारे परतल्यावर नेहमीच एक आश्चर्याचा किस्सा सांगतात. गंगोत्रीच्या वाटेवर वाटेत काही कुंडे लागतात. कुडकुडणारी थंडी, दूरवर डोंगरमाथ्यावर सफेद बर्फाचे थर आणि या कुंडातून मात्र पाण्यातून चक्क वाफा निघत असतात. हात बुडवला तर चटका बसतो. एवढेच नवे अनेक जण जवळचे तांदूळ त्या पाण्यात काहीवेळा कापडी पुरचुंडी बांधून धरतात व आयता शिजलेला भात खातात. हे पाणी काढून मनसोक्त आंघोळ करण्याचा मोहही कोणी आवरून धरत नाही. असाच पण जरा वेगळा अनुभव वज्रेश्वरीला महाराष्ट्रात येतो. पण येथील झऱ्यांचे पाणी गंधक मिश्रित उग्र वासाचे आहे. येथील उष्ण पाण्यात अंघोळ करून निसर्गोपचार करून घेणाऱ्यांचीही कायम गर्दी उसळलेली असते. जगात असे गरम पाण्याचे कित्येक झरे आहेत. तसेच फक्त वाफेचेही झरे आहेत. वाफेच्या झर्‍यातून फक्त जोरात वाफ उसळून एखाद्या प्रेशरकुकरप्रमाणे तेथे शिट्टीचा आवाजही येत राहतो. या सगळ्या प्रकाराचे मूळ भूगर्भात खोलवर घडणाऱ्या घडामोडीत आहे. सुमारे तीस एक किलोमीटर खोलीवर तप्त मध्यावरणाचा पाण्याच्या वाहत्या साठ्याशी संबंध येतो. तिथे वाफ कोंडू लागते. या वाफेच्या दाबाने जमिनीतील खडकातील काही भेगांतून मार्ग काढला जाऊ शकतो. त्यातूनच हे झरे निर्माण होतात. काही ठिकाणी ज्वालामुखीच्या मुखापासून काही ठराविक अंतरावर प्रथम वाफेचे व नंतर गरम पाण्याचे झरे सलगपणे आढळतात. पण अनेक ठिकाणी ज्वालामुखीचा अलीकडच्या ज्ञात काळात कधीच संबंध आलेला नसतो. हेही लक्षात घ्यायला लागेल. यातही एक मोठा फरक आहे. वाफेचे झरे मधूनमधून नाहीसे होतात, पण गरम पाण्याचे झरे मात्र सलगपणे वर्षानुवर्षे उकळताना दिसतात. काही झर्‍यांत गंधकाचा अंश सापडतो. ते नक्कीच ज्वालामुखीच्या उगमाशी संबंधित असावेत असा संशय घ्यायला जागा आहे.पृथ्वीचा गाभा अत्यंत गरम आहे मध्यावरणही अतितप्त आहे. पण बाह्यावरणाचा काही भाग बऱ्याच ठिकाणी भरपूर गरम आहे असेही लक्षात आले आहे. आईसलँड, न्यूझीलंड येथील काही भागात जेमतेम एक ते तीन किलोमीटर अंतर खोलवर बोअरिंगचे छिद्र पाडले असता भूगर्भातील गरम पाणी व वाफ मिळवता येते असा अनुभव आहे. जरी एवढे खोल छिद्र पाडणे अत्यंत महागडे असले तरी यातून मिळणारी ऊर्जा ही अनेक वर्षे पुरणार असल्याने हा खर्च परवडतो. हे गरम पाणी वा वाफ वापरून घरे उष्ण ठेवण्याचा वा विद्युतनिर्मिती उद्योग यातूनच केला जातो. येथेही गमतीचा भाग कसा आहे बघा. आइसलँड व न्यूझीलंडसारख्या थंड प्रदेशातही निसर्गाने ही सोय करून ठेवली आहे.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुवां येथें यावेम कीं मज तेथें न्यावें । खंती माझ्या जीवें मांडियेली ॥१॥ माझें तुजविण येथें नाहीं कोणी । विचारावें मनीं पांडुरंगा ॥२॥ नामा म्हणे वेगीं यावें करुणाघना । जातो माझा प्राण तुजलागीं ॥३॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जे आपल्याला हवे असते तेच मिळविण्यासाठी आपण रात्रंदिवस धावपड करत असतो. आणि एकदा ते मिळाले की, मनाला विशेष समाधान मिळत असते.पण, ज्यांना माणसाची व त्याकडून मिळणाऱ्या मदतीची खरी गरज असते, त्यांच्याकडे मात्र आपली लक्ष जात नाही. ही आजची वास्तविकता आहे. म्हणून स्वतः साठी जगण्याआधी जरा आजूबाजूला ही थोडी लक्ष देऊन बघण्याचा प्रयत्न करून बघावा. जेणेकरून आपल्या एका सहकार्याने आणि माणुसकीच्या नात्याने एखाद्याला खूप मोठी मदत मिळू शकते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *आयुष्याची खरी किंमत*एका नातवाने आपल्या आजोबांना प्रश्न विचारला आयुष्याची खरी  किंमत काय असते हो? आजोबांनी त्याला एक दगड दिला आणि म्हणाले  ह्या अगोदर तू ह्या दगडाची खरी किंमत कळावी अशी माझी इच्छा आहे. दगडाची फक्त किंमत काढून ये , विकू नकोस सर्वप्रथम नातवाने एका फळवाल्याला त्या दगडाची किंमत विचारली .तो त्या चकाकणाऱ्या दगडाला बघून  म्हणाला -.या दगडाचा मोबदला म्हणून मी तुला एक डझन सफरचंदे देऊ शकतो. नातवाने  आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला, वाटेत त्याला एक भाजीवाला दिसला आणि त्याने त्याला त्या चकाकणाऱ्या दगडाची किंमत विचारली- मी तुम्हाला याच्या बदल्यात एक पूर्ण पोते भरून बटाटे देऊ शकतो. पुन्हा एकदा नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्या बद्दल त्याची माफी मागितली व निघाला. आता त्याला एका सराफाचे दुकान लागले. आत जाऊन त्याने तो चमकणारा दगड सराफाला दाखवून त्याची किंमत विचारली. आपल्या भिंगातून त्या खड्याचे निरीक्षण करताच तो सराफ उत्तरला -या खड्यासाठी मी तुम्हाला  दश लक्ष रुपये देऊ शकतो. नातवंडाला फार आश्चर्य वाटले पण नातवाने  आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्या बद्दल  त्याची माफी मागितली व निघाला. थोडे पुढे आल्यावर त्याला अतिशय दुर्मिळ रत्न आणि मणी विकणारे दुकान दिसले. त्याने तो दगड तिथल्या रत्नपारख्यास दाखवला. तो रत्नपारखी ह्या विषयात अतिशय निष्णात होता.त्याने अलगद तो दगड एका मखमली कापडावर ठेवला. त्या दगडाच्या अवती भोवती प्रदक्षिणा घालत तो म्हणाला -अहो, एवढा अमूल्य दुर्मिळ अनघड हिरा तुम्ही कुठून बरे आणला? मी माझे अख्खे दुकान जरी विकले तरी सुध्दा ह्या हिऱ्याची किंमत तुम्हाला देऊ नाही शकणार, आता मात्र नातू अतिशय चकित झाला आणि गोंधळलेल्या मनःस्तिथीत तो आजोबांकडे परतला, त्याचे सर्व अनुभव ऐकून आजोबा म्हणाले - मला वाटते फळवाला, भाजीवाला, सराफ आणि रत्नपारखी ह्यांच्या उत्तरावरून तुला आयुष्याच्या मोलाविषयी कळले असेल. तुम्ही जरी अतिशय दुर्मिळ अमूल्य हिरा असलात तरी सुध्दा लोक तुमची किंमत त्यांच्या सीमित समजुती, आकलनशक्ती,हेतू आणि कुवती नुसारच करणार. त्यामुळे आयुष्यात स्वतःची किंमत जाणून घेणे सर्वात महत्वाचे असते. स्वतःचा आदर करा.इतरांबरोबर कोण्यात्याही निरर्थक तुलने मध्ये गुंतू नका, कारण तुम्ही या विश्वातील एक अभिनव आणि अद्वितीय निर्मिती आहेत.*तात्पर्य - तुमच्या सारखे फक्त तुम्हीच आहात. हीच तुमच्या आयुष्याची खरी किंमत आहे. आपल्या सर्वांनाही स्वतःची खरी किंमत कळून स्वतःवर प्रेम करायला शिकू.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment