✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28 फेब्रुवारी 2025💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://m.facebook.com/story.php?story_fbid=3514819611978121&id=100003503492582&mibextid=Nif5oz/2018/02/03.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚛️ *_राष्ट्रीय विज्ञान दिन_* ⚛️•••••••••••••••••••••••••••••••••••• ⚛️ *_ या वर्षातील ५९ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ⚛️ *_महत्त्वाच्या घटना:_* ⚛️••••••••••••••••••••••••••••••••••••*२००२: महाराष्ट्र शासनाचे महात्मा फुले जलभूमी संधारण अभियान सुरू* *१९३५: वॅलेस कॅरोथर्स या शास्त्रज्ञाने नायलॉनचा शोध लावला.**_१९२८: डॉ. सी. व्ही. रामन यांनी भौतिकशास्त्रातील एका परिणामाचा शोध लावला.त्याला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले. यामुळे हा दिवस 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणुन साजरा करण्यात येतो_**१९२२: इजिप्तला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१८४९: अमेरिकेच्या पूर्व आणि पश्चिम किनार्‍यांमध्ये नियमित जहाजसेवा सुरू झाली. न्यूयॉर्कहुन निघालेले एस.एस.कॅलिफोर्निया हे जहाज ४ महिने व २१ दिवसांनी सॅनफ्रान्सिस्कोला पोहोचले.* ⚛️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ⚛️••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१: प्रा. डॉ. दिपक सुभाषराव सूर्यवंशी -- लेखक* *१९७५: डॉ. बलवंत जेऊरकर -- साहित्य अकॅडेमी पुरस्कारप्राप्त अनुवादक,वक्ते, लेखक**१९७५: रत्ना यशवंत मनवरे -- कवयित्री* *१९६९: अनधा नितीन दिघे -- लेखिका, अनुवादक**१९६९: निर्मला सोनी -- कवयित्री* *१९६८: वर्षा उसगांवकर -- मराठी, हिंदी चित्रपटातील अभिनेत्री**१९६६: क्षितीज झारापकर -- अभिनेता, लेखक, दिग्दर्शक (मृत्यू: ५ मे २०२४)**१९६५: सिद्धार्थ कुलकर्णी-- कवी, लेखक* *१९६४: डॉ. अशोक गोविंदराव काळे -- प्रसिद्ध लेखक* *१९६२: अशोक सदाशिव चोपडे -- लेखक, संपादक**१९६०: प्रमोद जोशी -- कवी, लेखक* *१९५१: करसन घावरी – भारतीय क्रिकेटपटू**१९४९: पद्मा तळवलकर -- भारतीय शास्त्रीय गायिका**१९४८: विदुषी पद्मा तळवलकर – ग्वाल्हेर/किराणा/जयपूर घराण्याच्या ख्याल गायिका**१९४७: दिग्विजय सिंग --- मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री**१९४४: रविन्द्र जैन – संगीतकार व गीतकार (मृत्यू: ९ ऑक्टोबर २०१५ )**१९४४: प्रा. सुरेश द्वादशीवार -- मराठी पत्रकार आणि प्रसिद्ध कादंबरीकार**१९४२: प्रा. डॉ. कुमुद दिनकर गोसावी -- प्रसिद्ध लेखिका* *१९४२: ब्रायन जोन्स – ‘द रोलिंग स्टोन्स‘चे संस्थापक, गिटार, हार्मोनिका आणि पियानो वादक (मृत्यू: ३ जुलै १९६९ )**१९३६: कुसुम रामचंद्र अभ्यंकर -- कादंबरीकार (मृत्यू: ५ एप्रिल १९८४ )**१९३४: जेनिफर केंडल-- इंग्लिश अभिनेत्री आणि पृथ्वी थिएटरची संस्थापक(मृत्यू: ७ सप्टेंबर १९८४ )**१९२७: कृष्णकांत – भारताचे १० वे उपराष्ट्रपती (मृत्यू: २७ जुलै २००२ )**१९२४: वसंत वैकुंठ कामत --- नाटककार (मृत्यू:३ जुलै १९९४)**१९१४: त्रिंबक कृष्णराव टोपे -- चरित्रकार, लेखक (मृत्यू: २० फेब्रुवारी १९९४ )* *१९१३: पंडित नरेंद्र शर्मा -- हिंदी भाषेतील भारतीय लेखक, कवी आणि गीतकार (मृत्यू: १२ फेब्रुवारी १९८९ )**१९०९: जयंत देसाई (जयंतीलाल झिनाभाई देसाई) -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता (मृत्यू: १९ एप्रिल १९७६ )**१९०२: त्र्यंबक विष्णू पर्वते -- चरित्रकार, कवी, पत्रकार* *१९०१: लिनस कार्ल पॉलिंग – रसायनशास्त्रज्ञ आणि अण्वस्त्रांच्या विरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते,नोबेल पारितोषिकाचे दोनदा विजेते (१९५४ - रसायनशास्त्र, १९६२ - शांतता) (मृत्यू: १९ ऑगस्ट १९९४ )**१९००: मोरेश्वर दिनकर जोशी -- शिक्षक, संस्थापक, संपादक (मृत्यू: ३ फेब्रुवारी १९७९ )**१८९७: डॉ. शंकर दामोदर पेंडसे – मराठी ग्रंथकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक. पंढरपूर येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे (१९५५) ते अध्यक्ष होते. (मृत्यू: २३ ऑगस्ट १९७४ )**१८९६: केशव वामन साठे -- नाट्यसमीक्षक (मृत्यू: ८ ऑगस्ट १९७५ )* *१८७३: सर जॉन सायमन – स्वातंत्र्यपूर्व काळात भारताला राजकीय सुधारणा देण्यासाठी नेमलेल्या ’सायमन कमिशन’ या आयोगाचे अध्यक्ष.क्लेमंट अ‍ॅटली हे देखील या आयोगाचे एक सदस्य होते, जे पुढे इंग्लंडचे पंतप्रधान झाले. (मृत्यू: ११ जानेवारी १९५४ )* ⚛️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ⚛️••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९५: कॄष्ण गंगाधर दिक्षीत ऊर्फ कवी संजीव –’सासरमाहेर’,’भाऊबीज’,’चाळ माझ्या पायांत’ या चित्रपटांचे त्यांनी कथा,संवाद व गीतलेखन केले होते.(जन्म: १२ एप्रिल १९१४ )**१९८६: स्वीडनचे २६ वे पंतप्रधान ओलोफ पाल्मे यांची हत्या (जन्म: ३० जानेवारी १९२७ )**१९६६: उदयशंकर भट्ट – आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी आणि कादंबरीकार.(जन्म: ३ ऑगस्ट १८९८ )**१९६३: डॉ. राजेन्द्र प्रसाद – भारताचे पहिले राष्ट्रपती (जन्म: ३ डिसेंबर १८८४ )**१९३६: कमला नेहरू – पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पत्‍नी (जन्म: १ ऑगस्ट १८९९ )**१९२६: स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद – लहानपणीच तापामुळे कमरेखालील सर्व अंग लुळे पडून त्यांना कायमचे अपंगत्व आले,त्यामुळे त्यांचे शिक्षणही होऊ शकले नाही.कविता मात्र बालपणापासून करीत होते. स्वातंत्रवीर सावरकरांशी निकटचे संबंध आल्यानंतर त्यांच्या कवितेला उत्कट राष्ट्रभक्तीची आणि तीव्र स्वातंत्र्याकांक्षेची दिशा गवसली. (जन्म: ९ फेब्रुवारी १८७४ )* *_राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा_*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रासंगिक लेख*दुर्लक्षित विज्ञान विषय*..... डॉक्टर वा इंजिनिअर व्हायचे असेल तर विज्ञान शाखा निवडावी लागते त्याशिवाय डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होत नाहीत. तसं पाहिलं तर सर्वानाच विज्ञान या विषयाची आवड असतेच अशातला ही भाग नाही मात्र आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे या हेतूने अनेक विद्यार्थी दहावीनंतर अकरावी-बारावीसाठी विज्ञान निवड करतात. त्यातल्या त्यात या विज्ञान शाखेची शिकवण्याची भाषा ही इंग्रजी असल्याने ग्रामीण भागातील अनेक मुलांना अडचणी ला तोंड द्यावे लागत आहे, हे ही विशेष नोंद घेण्यासारखी आहे........... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाकुंभ 2025 संपन्न, 66 कोटी भाविकांचा पवित्र स्नान, मुख्यमंत्री योगी यांची विशेष स्वच्छता मोहीम*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *उपमुख्यमंत्री अजित पवार आज नांदेड दौऱ्यावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *गिरगाव आरोग्य संस्थेला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन पुरस्कार, मराठवाड्यातील एकमेव प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राप्त केले 95 टक्के गुण*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *न्यूयॉर्क : हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मिशेल ट्रॅचटेनबर्गचा वयाच्या 39 व्या वर्षी निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *दक्षिण कोरियाच्या एचएस ह्युसंग कंपनीची नागपूरमध्ये १७४० कोटींची गुंतणवणूक*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबई - रवींद्र नाट्य मंदिर, लघु नाट्यगृह नव्या स्वरूपात, आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ **•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 इंजि. साईनाथ सुरेश येवतीकर, विजय नगर, नांदेड👤 राजेश्वर भंडारे, सहशिक्षक, धर्माबाद👤 आनंद आनेमवाड, लोकमत पुरस्कार प्राप्त शिक्षक👤 मारुती पाटील👤 प्रशांत चिखलीकर, सहशिक्षक, लातूर👤 शंकर गर्दसवार👤 श्रीकांत आदमवाड, सहशिक्षक👤 निर्मला सोनी, साहित्यिक, अमरावती👤 मुरलीधर राजूरकर, सहशिक्षक*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  ⚧🍃  *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 07*ही एक क्रिया वनस्पतींची**सूर्यप्रकाश शोषून घेतात**पानांच्या साहाय्याने मग**अन्न आपले तयार करतात*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - लाजाळूचे झाड••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••महत्वाकांक्षेला किल्ली द्या, म्हणजे पराक्रमाचे काटे आपोआप फिरू लागतील.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) विदर्भात 'स्टेट ऑफ आर्ट सेतू' कोठे आहे ?२) श्रीक्षेत्र आंभोरा येथे कोणत्या पाच नद्यांचा संगम होतो ?३) 'राष्ट्रीय विज्ञान दिवस' केव्हा साजरा केला जातो ?४) 'क्षीर' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) प्रयागराज येथील कुंभमेळ्यात जन्म झालेल्या पहिल्या बाळाचे नाव काय ठेवण्यात आले ? *उत्तरे :-* १) श्रीक्षेत्र आंभोरा, ता. कुही, नागपूर २) वैनगंगा, आम, कन्हान, मुरजा, कोलार ३) २८ फेब्रुवारी ४) दूध ५) कुंभ*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••👨🏼‍⚕ *स्टेथोस्कोपमुळे डॉक्टरांना काय समजते ?* 👨🏼‍⚕ **************************स्टेथोस्कोप नसलेल्या डॉक्टरची कल्पनाही आपण करू शकत नाही. किंबहुना एखाद्या डॉक्टराने रुग्णाची तपासणी करताना स्टेथोस्कोप वापरला नाही तर रुग्णाच्या कपाळावर नक्कीच आठ्या पडतात व "काहीच तर तपासले नाही" असे उद्गारही तो काढतो. याचाच गंमतशीर प्रकार खेड्यात बघायला मिळतो. गुडघा दुखला तर गुडघ्यालाही स्टेथोस्कोप लावण्याची बिकट अवस्था डॉक्टरवर येऊ शकते वा क्वचित व्यवसायाच्या दृष्टीनेही तो तसे मुद्दाम करतो. या स्टेथोस्कोपमुळे डॉक्टरांना नेमके काय कळते, असा प्रश्न अनेकदा तुम्हाला पडला असेल. स्टेथोस्कोपमुळे डॉक्टरांना खूप काही कळते, हे जरी खरे असले तरी सगळेच काही कळते असे नाही.स्टेथोस्कोपचा छातीला लावण्याचा भाग, नळ्या व कानात ठेवायचे प्लग्ज असे तीन भाग पाडता येतील. छातीला लावण्याच्या भागास धातूची एक उघडी चपटी डबी व त्यावर एक पातळसा पडदा बसवलेला असतो. हा पातळ पडदा आवाजाची तीव्रता अनेक पटींनी वाढतो व त्यामुळे शरीरात निर्माण होणारे आवाज डॉक्टरांना ऐकू येतात. हृदय आकुंचन प्रसरण पावत असताना येणारे हृदयाचे ठोके, श्वास घेताना व सोडताना येणाऱ्या श्वसनाचे आवाज स्टेथोस्कोपच्या सहाय्याने ऐकता येतात. त्यांच्याच झालेल्या बदलामुळे हृदयाच्या झडपांचे आजार, फुप्फुसाचा न्युमोनिया, क्षयरोग, दमा अशा आजारांचे निदान करता येते. याखेरीज पोटाला स्टेथोस्कोप लावल्यास आतड्यांच्या आकुंचन प्रसरणामुळे येणारे आवाज ऐकता येतात. या आवाजामुळे आतडय़ांत अडथळा (obstruction) निर्माण झाला असल्यास त्याचे निदान होऊ शकते. गर्भवती स्त्रीच्या पोटावर स्टेथोस्कोप ठेवून तिच्या गर्भाशयातील बाळाच्या हृदयाचे ठोकेही मोजता येतात. मूल जिवंत आहे वा नाही, त्याला पुरेसा रक्तपुरवठा होतोय वा नाही हेही स्टेथोस्कोप ने कळू शकते. यावरून लक्षात येईल की स्टेथोस्कोपने अनेक रोगांचे निदान करता येते; पण डोके दुखण्यास डोक्याला, गुडघा दुखल्यास गुडघ्याला वा मान लचकल्यास मानेला स्टेथोस्कोप लावून काहीच उपयोग होणार नाही !*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन०२० ६५२६२९५०👆🏼*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुझें प्रेम माझे ह्रदाय आवडी । चरण मी न सोडी पांडुरंगा ॥१॥ कशासाठीं शीण थोडक्याकारणें । काय तुज उणें होय देवा ॥२॥ चंद्र चकोराचा पुरवी सोहळा । काय त्याच्या कळा न्यून होती ॥३॥ नामा म्हणे मज अनाथा सांभाळी । ह्रदयकमळीं स्थिर राहे ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मनात नको त्या विकारांचा ओझा धरून फिरत राहल्याने नेहमीच अस्वस्थता, चिंता जाणवत असते आणि एक सेंकद सुध्दा मनमोकळ्या पणाने जगता येत नाही. अशा प्रकारच्या परिस्थितीत व्यक्तीला समाधान मिळत नाही. म्हणून जीवन जगत असतांना कितीही दुःख, संकटे आले तरी हसतमुखाने रहावे व मनमोकळेपणाने जगणे स्वीकारावे. कारण हसत राहल्याने चेहरा खुलून दिसतो सोबतच मनावरचा ताण, तणाव कमी होतो.म्हणून म्हणतात की, हसणे सुद्धा एकप्रकारचे जीवन आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *संगत*एक गोसावी रानातून आपल्या गुहेकडे चालला होता. वाटेत त्याला एक अस्वल कण्हताना दिसले. गोसावी त्याच्या जवळ गेला, त्याने पाहिले, अस्वलाच्या पायात काटा रुतला होता. त्याने तो काढला तेव्हा अस्वल म्हणाले, "महाराज मला वेदनेतून मुक्त करून माझ्यावर फारच उपकार केलेत. मला त्याची परतफेड म्हणून तुमच्याबरोबर राहून तुमच्या सेवेची संधी द्या. गोसावी म्हणाला, "अरे मी काही उपकार केले नाहीत, माझा धर्मच आहे तो. तरीही अस्वल आपला हट्ट सोडेना. शेवटी गोसावी त्याला आपल्याबरोबर गुहेत घेऊन गेला. गोसावी विश्रांतीसाठी झोपला तेव्हा त्याच्या तोंडावर माशा बसत होत्या. गोसाव्याची सेवा करावी म्हणून ते अस्वल या माशांना मारू लागले, हाकलू लागले. पण एक धटींगण माशी गोसाव्याच्या नाकावर पुन्हा पुन्हा बसत होती. त्या माशीचा राग येऊन अस्वलाने आपला पंजा माशीला एवढ्या जोराने मारला की माशीचा चेंदामेंदा झाला, पण गोसाव्याचे नाकही तुटले व त्याचा चेहरा विद्रूप झाला!तात्पर्य : शहाण्याचे सेवक व्हावे, पण मूर्खाचे मालक होऊ नये. काही वेळा चांगल्या संगतीचा वेगळाच परिणाम होतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment