✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 25 फेब्रुवारी 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link -https://www.facebook.com/share/p/15RdQwpUDQ/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 📘 *_ या वर्षातील ५६ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 📘 *_महत्त्वाच्या घटना:_* 📘••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९६: ’स्वर्गदारा’तील तार्याला (Star in the gate of heavens) वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कविवर्य कुसुमाग्रज यांचे नाव देण्यात आले.**स्वित्झर्लंडमधील ’इंटरनॅशनल स्टार रजिस्ट्री' या आंतरराष्ट्रीय संस्थेने हा गौरव केला. मिथुन तारकासमुहातील कॅस्टर (पुनर्वसू) व पोलक्स जवळच्या तार्याचे ’कुसुमाग्रज तारा’ असे नामकरण केले.**१९८६: जनआंदोलनाच्या रेट्यामुळे २० वर्षे राज्य केल्यानंतर फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांनी सत्ता सोडुन देशातुन पलायन केले.**१९६८: मोहम्मद हिदायतुल्लाह यांनी भारताचे ११ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९४५: दुसरे महायुद्ध – अमेरिकन विमानवाहू नौकांनी टोकियोवर बॉम्बहल्ला केला.**१९४५: दुसरे महायुद्ध – तुर्कस्तानने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.**१९३५: ’फॉक्स मॉथ’ विमानाद्वारे मुंबई - नागपूर - जमशेदपूर या मार्गावरील हवाई टपाल सेवेला प्रारंभ झाला.**१८१८: ले. कर्नल डिफनने चाकणचा किल्ला उध्वस्त केला.दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतील बहुतेक सर्व किल्ल्यांची मोडतोड केली.**१५१०: पोर्तुगीज सरदार अल्बुकर्क याने अकस्मात हल्ला करुन पणजीचा किल्ला जिंकला.* 📘 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 📘••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९२: सान्या मल्होत्रा -- भारतीय अभिनेत्री* *१९८२: नागेश सोपान हुलवळे -- कवी, लेखक* *१९८१: शाहीद कपूर -- प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेता* *१९८०: श्वेता शिंदे -- भारतीय अभिनेत्री आणि निर्माती**१९७५: छाया गुलाबराव पाटील -- कवयित्री* *१९७४: दिव्या भारती – हिन्दी,तामिळ आणि तेलगु चित्रपट अभिनेत्री (मृत्यू: ५ एप्रिल १९९३ )**१९५८: प्रा. डॉ. एकनाथ श्रावण पगार -- प्रसिद्ध कवी, समीक्षक, संपादक**१९५७: डॉ. प्रमदा उज्ज्वल गांवस-देसाई -- लेखिका, अनुवादिका* *१९५७: प्रा. डॉ. प्रकाश खांडगे -- लोकसाहित्य व लोककलेचे अभ्यासक**१९५४: माधुरी आशिरगडे -- कवयित्री, लेखिका**१९५१: श. ल. नाईक -- ज्येष्ठ बालसाहित्यिक**१९५०: डॉ. वर्षा सगदेव -- लेखिका* *१९४८: डॅनी डेंग्झोप्पा – प्रसिद्ध चित्रपट अभिनेते**१९४३: जॉर्ज हॅरिसन– ’बीटल्स’चा गिटारवादक, संगीतकार, गायक आणि गीतलेखक (मृत्यू: २९ नोव्हेंबर २००१ )**१९३८:फारुख इंजिनियर--- प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू**१९३३: डॉ. पद्माकर विष्णू वर्तक --- नामवंत वैद्यकीय तज्ञ, संशोधक, लेखक (मृत्यू: २९ मार्च २०१९ )* *१९२८: बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ -- राजकारणी राज्यसभा व लोकसभेचे खासदार आणि सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील(मृत्यू: ६ फेब्रुवारी २००१ )**१९२६: राजाभाऊ केशव कोगजे -- गायक (मृत्यू: २६ एप्रिल १९९३ )**१९२१: नीलकंठ रघुनाथ वऱ्हाडपांडे -- पुरातत्त्वीय इतिहासतज्ज्ञ, संशोधक (मृत्यू: २१ ऑगस्ट २०१५ )**१८४०: विनायक कोंडदेव ओक – बालवाङ्मयकार.मुलांसाठी ’बालबोध’ हे मासिक काढून त्यांनी चरित्रे, कविता, निबंध, शास्त्रीय विषयांवरील लेख इ.लेखन केले (मृत्यू: ९ ऑक्टोबर १९१४ )*📘 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 📘 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१६: भवरलाल हिरालाल जैन (पद्मश्री) जैन इरिगेशन सिस्टम लिमिटेड (जेआयएसएल) चे संस्थापक उद्योजक (जन्म: १२ डिसेंबर १९३७ )**२००७: पुल्लुट्टुपदथु भास्करन उर्फ पी. भास्करन -- भारतीय मल्याळम भाषेतील कवी, मल्याळम चित्रपट गाण्यांचे गीतकार आणि चित्रपट निर्माते (जन्म:२१ एप्रिल १९२४)**२००१: सर डोनाल्ड ब्रॅडमन – ऑस्ट्रेलियन फलंदाज, संघनायक व विक्रमवीर.१९४९ मध्ये त्यांना ’सर’ हा किताब देण्यात आला. (जन्म: २७ ऑगस्ट १९०८ )**१९९९: ग्लेन सीबोर्ग – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: १९ एप्रिल १९१२ )**१९८०: गिरजाबाई महादेव केळकर – लेखिका व नाटककार(जन्म: सप्टेंबर १८८६ )**१९७८: अप्पाजी विष्णू कुलकर्णी -- लेखक, निंबधकार (जन्म: १८६९ )**१९७८: डॉ. प. ल. वैद्य – प्राच्यविद्यासंशोधक (जन्म: २९ जून १८९१ )**१९६४: शांता आपटे – चित्रपट अभिनेत्री (कुंकू,दुनिया ना माने,अमृत मंथन इ.) (जन्म: १९१६ )**१९२४: जमखिंडीचे संस्थानिक सर परशुरामभाऊ पटवर्धन यांना त्यांच्याच मस्तवाल हत्तीने चिरडून ठार केले. त्यांच्या स्मरणार्थ दिलेल्या देणगीनंतर पुण्यातील न्यू पूना कॉलेजचे नाव ’एस.पी.कॉलेज’ असे करण्यात आले.* *१५९९: संत एकनाथ महाराज -- भारतीय संत, तत्त्वज्ञ आणि कवी(जन्म: १५३३ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*महाशिवरात्री विशेष*माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात. भगवान शिवाची आराधना करतात. .......... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्रात ग्रामीण भागातील घरकुलांना आता 50 हजार रुपयांचं अतिरीक्त अनुदान मिळणार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अधिवेशन काळात मराठा समाजाचा आंदोलनाचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठचा दीक्षांत समारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *लठ्ठपणा बाबत जनजागृती साठी पंतप्रधानाकडून 10 व्यक्तींची निवड*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *प्रधानमंत्री किसान योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *शेतकऱ्यांना आता वर्षाला 15 हजार रु. मिळणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ICC चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये न्यूझीलंडने बांगलादेश ला 5 विकेटने हरवून सेमी फायनल मध्ये केला प्रवेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 साईनाथ डिब्बेवाड, शिक्षक, धर्माबाद👤 नईमोद्दीन सय्यद, शिक्षक नेते, धर्माबाद👤 प्रदीप पद्मावार👤 बालाजी चिंतावार, धर्माबाद👤 दिलीप वाघमारे👤 अनुराग आठवले बारडकर👤 बालाजी आगोड👤 प्रदीप येवतीकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 05*छाया पडते कधी चंद्राची**राहू , केतू ना दैवी खेळ**अंधश्रद्धा नको डोळस व्हा**विज्ञानाशी घाला याचा मेळ*उत्तर - उद्याच्या पोस्ट मध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालचे उत्तर - तुळस••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••परिस्थिति गरीब असली तरी चालेल, पण विचार ‘भिकारी’ नसावेत…*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतके ( ५१ शतके ) कोणी ठोकले ?२) दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता या कितव्या महिला मुख्यमंत्री आहेत ?३) दिल्ली येथील ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले ?४) 'मृग' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) ७२ वी मिस वर्ल्ड स्पर्धा कोठे आयोजित होणार आहे ? *उत्तरे :-* १) विराट कोहली, भारत २) चौथ्या ३) नरेंद्र मोदी ४) हरिण, सारंग, कुरंग ५) तेलंगणा, भारत*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 चक्रीवादळे का येतात ? 📙 उन्हाळ्याचे दिवस चालू असतात. भर दुपारी उन्हाचा कडाका अंगाची लाहीलाही करत असतो. जमीन अगदी चटके बसतील, अशी तापलेली व हवा अजिबात पडलेली. झाडाचे तर पानही हलत नाही आणि बघता बघता लांबवर कुठेतरी जमिनीवरची पडलेली पाने वाऱ्याने गोलगोल भिरभिरताना दिसू लागतात. बघता बघता तीच पाने उंचावर उचलली जातात. त्यांच्याबरोबरच धुळीचा लोटही उफाळताना, गरगरताना दिसतो. काही सेकंदातच वाऱ्याची वावटळ आपल्यालाही घेरून टाकते. हेलकावणारी झाडे, वाऱ्याचा सोसाट्याचा आवाज, नाकातोंडात जाणारी धूळमाती यांमुळे सारेच कसे भीषण वाटत असते. ही असते चक्रीवादळाची सुरुवात.चक्रीवादळ म्हणजे वातावरणातील एखाद्या विवक्षित ठिकाणी हवेचा दाब आसपासच्या काही मैलांच्या परिसरापेक्षा कमी अथवा जास्त झाल्याने दिसून येणारे वातावरणातील बदल. हे बदल फार मोठ्या वेगाने घडतात, त्यात वाऱ्याची फार मोठी ताकद सामावलेली असते. त्या विवक्षित ठिकाणी हवेचा दाब कमी होतो वाह वाढतो. तो चक्रीवादळाचा केंद्रबिंदूच असतो. दाब कमी झाल्यास तेथील हवेची पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न म्हणून वातावरणातील हवेत एक प्रकारचे भोवरे तयार होतात. याउलट दाब वाढला असल्यास त्या पट्टय़ातील हवा दाबामुळे केंद्राकडे खाली दाबली जात असते. याही क्रियेमध्ये वारे वाहणे वेगाने सुरू होते, पण त्यांची तीव्रता खूपच कमी असते. बहुतेक चक्रीवादळांचा केंद्रबिंदू समुद्रावरच सुरू होतो. कसलाही अडथळा वाटेत नसल्याने हे वादळ स्वतःभोवती फिरत वेगाने घोंगावत इकडे तिकडे हेलकावत राहते. पण समुद्री वार्यांमुळे हलके हलके जमिनीकडे येऊ लागते. सुरुवातीला जमिनीवरचा मोठा पट्टा त्यामुळे त्याच्या तडाख्यात सापडतो, पण त्याचबरोबर त्याचा वेग हळूहळू कमी होत पसरत जातो व काही काळाने ते संपूनही जाते. समुद्रपातळीपेक्षा जमिनीची वाढलेली उंची, वाटेत येणारे अडथळे व जमिनीवरील बरेचसे स्थिर तापमान यांमुळे या चक्रीवादळांचा वेग मंदावतो.चक्रीवादळ बहुधा स्वतःबरोबर सोसाटयाचा पाऊसही आणते. खूप मोठ्या आकारमानात हे पसरलेले असल्याने (चारशे ते सहाशे किलोमीटर) या सर्व भागातील निरनिराळे ढग यात ओढले गेलेले असतात. या ढगांचे एकत्रीकरण होताच त्यातील बाष्पही एकत्र येऊन त्यापासून पाऊस पडेल, असे मोठे बाष्पकण तयार होतात. सुरुवातीला प्रचंड वेगाने वाहणारे वारे, धुळीचे वातावरण व नंतरच्या पावसाचे तडाखे ही चक्रीवादळाची खासियतच म्हणायला हवी. चक्रीवादळांचा वेग जमिनीवर पोहोचल्यावर अनेकदा ताशी साठ ते ऐंशी किलोमीटर इतका असतो. समुद्रावरील वेग मोजण्याची पद्धत नाही, पण तो कदाचित यापेक्षाही जास्त असू शकतो. समुद्रावरील बोटी या वादळात सापडल्यास अनेकदा त्यांचे गंभीर नुकसान होण्याइतका त्यांना तडाखा बसलेला असतो. वादळाचा पट्टा ओलांडण्यास त्यांना एक ते चार दिवस लागत असल्याने तोवर राक्षसी लाटांचे तांडव असहाय्यपणे बघणे एवढेच त्यांच्या हातात असते. अनेकदा या लाटांची उंची तीस ते पस्तीस फुटांपर्यंतही असू शकते. ही वादळे सागरी अपघात व दुर्घटना यांचे एक मुख्य कारण असल्याने या वादळी टापूंची सतत माहिती घेऊन त्याप्रमाणे मार्ग आखणे, बदलणे बोटीच्या कप्तानाने कामच राहते. किनाऱ्यावर जेव्हा ही वादळे येतात, तेव्हा उंच झाडे उन्मळून पडणे, सागरी लाटा खोलवर घुसून त्यामुळे नुकसान होणे, घरांचे पत्रे उडणे या गोष्टी होतात. चक्रीवादळांची सूचना हल्ली उपग्रहांमुळे खूपच लवकर मिळू शकते. उपग्रहांमधून या सर्व वादळांचा नेमका प्रवास, हवेतील घडत जाणारे बदल यांचे फोटो मिळतात. या खेरीच एक मोठी विलक्षण पद्धत चक्रीवादळांच्या अभ्यासासाठी गेली २० वर्षे वापरली जात आहे. अत्यंत धोकादायक अशा पद्धतीत लष्करी जेट विमानातून संशोधक या चक्रीवादळाच्या केंद्रबिंदूकडेच प्रवास सुरू करतात. थेट केंद्रबिंदूचा वेध घेऊन विमान वर न्यावयाचे व त्या दरम्यान विविध शास्त्रीय निरीक्षणे करायची, अशी ही पद्धत आहे. निष्णात वैमानिक व जिवावर उदार झालेले संशोधक यांचा चमू हे काम करतो. या प्रकारात विमान पार वेडेवाकडे होऊन दोन तीन हजार फूट लांबवर एखाद्या खेळण्याप्रमाणे भिरकावलेही गेले आहे. तरीही सुखरूप उतरल्यावर नवीन चक्रीवादळाची सूचना कधी मिळते, इकडेच या चमूचे लक्ष असते. धाडस व जिज्ञासा यांचा संगम काय करू शकतो, याचे हे एक थरारक उदाहरण आहे.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुझे पायीं माझ्या मनें दिली बुडी । इंद्रियें बापुडीं वेडावलीं ॥१॥ आतां विषयसुख जाणावें कवणें । जाणोनि भोगणें कवणें स्वामी ॥२॥ देह सहज स्थिति राहिले निष्काम । ह्रदयीं सदा प्रेम ओसंडत ॥३॥ नामा म्हणे देवा भक्तजनवत्सला । क्षण जीवावेगळा न करींज मज ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आनंदाचे क्षण तर कधी चांगले वाईट प्रसंग जीवनात येत असतात. ते, खूप काही शिकवण देऊन जातात. फरक एवढाच की, त्यांना ओळखण्याची आपण संधी गमावून बसतो त्यामुळे ते सहसा कळत नाही. म्हणून आलेल्या प्रत्येक चांगले, वाईट, प्रसंगाला ओळखावे व त्यांना गुरू मानून त्यांचा सन्मान करावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सल्ला* एकदा एका माणसाला त्याच्या घोड्यासमवेत एक नदी पार करायची असते. परंतु त्याला नदीची खोली माहीत नसल्याने तो तिथेच काठावर विचार करत बसतो. मदतीसाठी आजुबाजुला पाहत असताना त्याला तेथे एक लहान मुलगा दिसतो. तेव्हा त्या माणसाने लहान मुलाला नदीच्या खोलीबद्दल विचारले.मुलाने घोड्याकडे एकदा पाहीले आणि क्षणभर थांबुन तो विश्वासाने म्हणाला, " निश्चींतपणे जा, तुमचा घोडा नदी सहज पार करु शकेल".मुलाचा सल्ला मानुन त्या माणसाने नदी पार करण्यास सुरुवात केली. परंतु नदीच्या मध्यावर पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले की नदी खुप खोल आहे. आणि तो जवळ जवळ बुडायलाच आला.कसाबसा तो त्यातून सावरला आणि बाहेर येउन त्या मुलावर जोरात खेकसला. मुलगा पुरता घाबरला होता आणि घाबरत घाबरतच बोलला, "पण माझी बदके तर खुप लहान आहेत आणि ते दररोज नदी पार करतात. त्यांचे पाय तर तुमच्या घोड्यापेक्षा खुप लहान आहेत."*उगाच कोणाचाही सल्ला ऐकण्याआधी त्यांना खरोखरच काही माहीती आहे का ते जाणुन घ्या....* •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment