✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 07 मार्च 2025💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2024/03/world-womens-day.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔰 *_ या वर्षातील ६६ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🔰 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔰•••••••••••••••••••••••••••••••••••• *२००९: केपलर स्पेस ऑब्झर्व्हेटरी या संशोधन संस्थेची स्थापना.**२००६: लष्कर-ए-तैय्यबा या आतंकवादी संघटनेने वाराणसी येथे बॉम्बस्फोट घडवून आणले.**२००५: महिलांना मताधिकार मिळावा म्हणून कुवेत मध्ये संसदेसमोर प्रदर्शन* *१९४७: जयप्रकाश नारायण यांनी काँग्रेस कार्यकरणीचा राजीनामा दिला**१९३६: दुसरे महायुद्ध – व्हर्सायचा तह धुडकावून जर्मनीने र्हाईनलँडमधे सैन्य घुसवले**१८७६: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल याला टेलिफोनचे पेटंट मिळाले.* 🔰 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🔰••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९२: रोहन बेनोडेकर -- लेखक* *१९८८: आदर्श आनंद शिंदे -- मराठी गायक, भीमगीतांसाठी प्रसिद्ध* *१९८४: नितीन अरुण थोरात -- प्रसिद्ध कादंबरीकार, बालसाहित्यिक, स्तंभलेखक, पत्रकार, उपसंपादक, कथालेखक* *१९८२: नितीन साहेबराव वायाळ -- लेखक**१९७६: गणेश शिवाजी मरकड -- प्रसिद्ध कवी, लेखक तथा उपजिल्हाधिकारी* *१९६९: साधना सरगम -- भारतीय प्रसिद्ध पार्श्वगायिका**१९६४: छाया भालचंद्र उंब्रजकर -- कवयित्री, लेखिका* *१९५८: अनिल शर्मा -- प्रसिद्ध दिग्दर्शक**१९५५: अनुपम खेर – प्रसिद्ध चित्रपट अभिनेता**१९५५: ज्योत्स्ना आफळे --कवयित्री, लेखिका* *१९५२: सर विवियन रिचर्ड्स – वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू**१९४९: गुलाम नबी आझाद -- राजकारणी माजी केंद्रीय मंत्री* *१९४२: वसंत काशिनाथ गोडबोले -- संत साहित्याचे व्यासंगी अभ्यासक, हस्ताक्षरतज्ञ* *१९४०: प्रा. वसंत सुदाम वाघमारे -- कवी* *१९३८: मुरलीधर अनंता उर्फ बाबा शिंगोटे -- दैनिक 'पुण्यनगरी'चे संस्थापक-संपादक (मृत्यू: ६ ऑगस्ट २०२० )* *१९३४: नरी कॉन्ट्रॅक्टर – भारताचा यष्टिरक्षक**१९३३: आत्माराम कृष्णाजी सावंत -- मराठीतले लेखक, नट,नाटककार, दिग्दर्शक, पत्रकार (मृत्यू: ४ मार्च १९९६ )* *१९३१: प्राचार्य डॉ. मधुकर सुदाम पाटील -- समीक्षक* *१९२८: डॉ. केशव रामराव जोशी -- संस्कृत पंडित, तत्त्वचिंतक (मृत्यू: १२ जून २०१३ )**१९२५: रवींद्र केळेकर -- कोकणी भाषेतील प्रसिद्ध साहित्यिक,२००६ सालच्या ज्ञानपीठ पुरस्कार विजेते(मृत्यू: २७ ऑगस्ट, २०१० )**१९१८: स्नेहलता दसनूरकर -- मराठी लेखिका, शिक्षणतज्ज्ञ (मृत्यू: ३ जुलै २००३ )**१९१३: डॉ. सुमती बाळकृष्ण क्षेत्रमाडे -- व्यवसायाने डॉक्टर असतानाही,मराठीत कादंबरीलेखन करणाऱ्या लेखिका (मृत्यू: ८ ऑगस्ट १९९८ )**१९११: सच्चिदानंद हिरानंद वात्स्यायन तथा ’अज्ञेय’ – ज्ञानपीठ पारितोषिक (१९७८) व साहित्य अकादमी पुरस्कार (१९६४) विजेते हिन्दी लेखक व वृत्तपत्रकार (मृत्यू: ४ एप्रिल १९८७ )**१९०३: रामचंद्रशास्त्री दत्तात्रेय किंजवडेकर -- संस्कृत पंडित (मृत्यू: २० एप्रिल १९४१ )**१९०२: शंकर भास्कर जोंधळेकर -- लेखक* *१८९६: यशवंत गंगाधर लेले -- नाटककार, नाट्यसमीक्षक**१८७०: नारायण कृष्ण गद्रे -- मराठी लेखक आणि चरित्रकार ह्यांनी नाटक,कविता, कादंबरी, चरित्र, इतिहास अशा विविध साहित्यप्रकारांत लेखन केले आहे (मृत्यू: १४ जुलै १९३३ )**१८४९: ल्यूथर बरबँक – महान वनस्पतीतज्ञ (मृत्यू: ११ एप्रिल १९२६ )**१७९२: सर जॉन विल्यम हर्षेल – ब्रिटिश गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ, रॉयल अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचा संस्थापक (मृत्यू: ११ मे १८७१ )*🔰 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🔰••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१२: रवि शंकर शर्मा ऊर्फ ’रवि’ – संगीतकार (जन्म: ३ मार्च १९२६ )**२००३: योगीराज मनोहर हरकरे -- अध्यात्मिक क्षेत्रातील योगी पुरुष व वैदिक विश्वचे संपादक (जन्म: २२ डिसेंबर१९१४ )**२०००: प्रभाकर तामणे – साहित्यिक व पटकथालेखक (जन्म: २९ ऑक्टोबर १९३१ )**१९९६: नीळकंठ जनार्दन कीर्तने -- मराठ्यांच्या इतिहासाचे आद्य टीकाकार, चिकित्सक आणि साक्षेपी संशोधक (जन्म: १ जानेवारी १८४४ )**१९९३: इर्झा मीर – माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक (जन्म: २६ ऑक्टोबर १९०० )**१९६१: गोविंद वल्लभ पंत – स्वातंत्र्यसैनिक, भारताचे दुसरे गृहमंत्री व उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री,भारतरत्न (१९५७)(जन्म: १० सप्टेंबर १८८७ )**१९२२: गणपतराव जोशी – रंगभूमीवरील असामान्य अभिनेते, शेक्सपियरच्या नाटकांतील त्यांच्या भूमिका अतिशय गाजल्या होत्या (जन्म: १५ ऑगस्ट १८६७ )**१६४७: दादोजी कोंडदेव -- शिवाजी महाराजांचे बालपणाचे पालक, शिक्षक व मार्गदर्शक (जन्म: १५७७ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जागतिक महिला दिनानिमित्त* कर्तृत्ववान महिलांची संघर्षगाथाभारतातील पहिल्या महिला न्यायाधीश - फातिमा बीबी तसेचभारतातील दुसरी महिला राष्ट्रपती - महामहिम द्रौपदी मुर्मु ..... यासह विविध लेख व कविता वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर्षिल ट्रेकला दाखवला हिरवा झेंडा!*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *'नमो ड्रोन दीदी' योजनेचा लाभ नलिनी देवरे बनल्या आत्मनिर्भर शेतकरी मदतनीस !*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *महिला दिनानिमित्त राजस्थानमध्ये राहणाऱ्या महिलांना राज्य सरकारने दिले मोठे गिफ्ट, राजस्थान सरकारने संपूर्ण राजस्थानमध्ये रोडवेज बसमध्ये महिलांसाठी मोफत प्रवासाची केली घोषणा *•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सपा आमदार अबू आझमी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव आज विधानसभेत मंजूर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पशुधन आरोग्य आणि आजार नियंत्रण अभियानाला केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीत मुदतवाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बेल्जियमच्या राजकन्या अॅस्ट्रीड यांची भारत भेट । व्यावसायिक शिष्टमंडळासोबत महत्त्वपूर्ण करार!*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गोवर्धन शिंदे, शिक्षक, नांदेड👤 विश्वनाथ स्वामी👤 मारोती लोणेकर👤 मनोज घोगरे👤 शिवम जाधव👤 अविनाश मोटकोलू*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 12*मी सर्वत्र आहे, पण कोणाला दिसत नाही**माझ्याशिवाय कुणाचे पान ही हलत नाही**मी कोण ओळखा पाहू*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - सौ. लिना सुपारेजि. प. प्रा. शाळा सुरजखोड जि. नांदेडकालच्या कोड्याचे उत्तर - श्वास••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आत्मस्तुतीने माणूस स्वतःचीच फसवणूक करून घेत असतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आजचा क्रमांक - 1800 वा१) भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता ?२) भारतातील कोणत्या राज्यातील नद्यांमध्ये सर्वाधिक डॉल्फिन आहेत ?३) नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात भारतीय नद्यांमध्ये असणाऱ्या डॉल्फिनची संख्या किती आहे ?४) प्रसिद्ध गीर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ?५) तिबेटी भाषेत माऊंट एव्हरेस्टला काय म्हटले जाते ? *उत्तरे :-* १) डॉल्फिन २) उत्तरप्रदेश ३) ६,३२७ डॉल्फिन ४) गुजरात ५) माऊंट ऊमोलांग्मा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••⏰ *वेळ* ⏰ **************वेळ पाळणे, घड्याळाबरहुकूम चालणे, दिवसाच्या चोवीस तासांतील वेळेचा नेमकेपणा साधणे याची खरी गरज जगामधील संपर्कसाधने वाढली, त्यावेळीच वाटू लागली. अन्यथा तोपर्यंत स्वतःचे गाव, पंचक्रोशीतला परिसर व तेथील घडामोडी या एकमेकांच्या सोयीनेच व्हायच्या. गावातील, देवळातील वा चर्चमधील टोले हेच घड्याळ, आसपासच्या लोकांना मारलेल्या हाका व केलेली सामुदायिक कामे हेच दिवसातील वेळ पाळण्याचे बंधन शतकानुशतके चालू होते. घड्याळाची निर्मिती, वापर सुरू झाला, तरी त्याची गरज फारच मोजक्यांना वाटे. या गावाहून त्या गावाला जाणारी गाडी, तिच्या सुटण्याच्या व पोहोचण्याच्या वेळा यांतील अंतर कमी होत गेले; दूरध्वनी,, दूरचित्रवाणी, विमाने यांचा वापर सुरू झाला आणि वेळेबाबत जागरुकता वाढली गेली. याआधी जागरुकता होती; नव्हती, असेही नाही; पण त्याची गरज मोजक्यांनाच वाटत होती. त्यावर उपाय शोधला गेला १८८४ साली. सुर्याचे उगवणे मावळणे हे पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यावर अवलंबून आहे व त्याचे समान भाग केले, तर (दर पंधरा रेखांशांनंतर एक) एकूण चोवीस वेगवेगळ्या वेळांचे भाग निश्चित केले गेले. शून्य अंश रेखांशाची रेघ म्हणजे जागतिक वेळेचा भाग. 'ग्रीनविच मीन टाईम' (GMT) या नावाने हा स्टॅंडर्ड वेळेचा भाग ओळखला जातो. तर तेथपासून दोन्ही बाजूंना म्हणजे पूर्वेला जावे, तसे दर पंधरा रेखांशांनंतर एक तास घड्याळ पुढे जाते. याउलट पश्चिमेला प्रवास करताना एक तास घडय़ाळ मागे केले जाते. या पद्धतीने प्रवास कसाही केला - चालत, मोटारने, विमानाने, अंतराळयानाने पण रेखांशांची मर्यादा बदलली की, तेथील माणूस काय वेळ वापरत असेल, याचा नेमका अंदाज आपल्या स्वतःच्या हातातील घडाळ्यावरूनच बांधता येतो. भारतातील वेळ व पाकिस्तानातील वेळ यांत एक तासाचा फरक आहे. तसेच म्यानमार व बांगलादेश यांच्या वेळेत व भारताच्या वेळेतही एक तासाचा फरक आहे. आता एखादा विमानाने पृथ्वीप्रदक्षिणेलाच निघाला, तर त्याच्यासाठी आणखीन एक प्रश्न उभा राहत होता, तो म्हणजे केवळ घड्याळ मागे पुढे करून भागत नव्हते, तर दिवसच बदलत होता. हा प्रश्न सोडवायला १८० अंश रेखांशावर सोय करण्यात आली. येथे जमीन नव्हती, म्हणजे समुद्रावर कोणी राहण्याचा प्रश्नच नव्हता. या प्रदेशात पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवास करताना तारीख मागे करण्याची पद्धत पडली आहे किंवा याउलट केले जाते. घडाळ्यातील काटे दिवसातून दोनदा बाराची वेळ दर्शवतात; पण हा गोंधळ टाळण्यासाठी रेल्वे, विमाने ही एक ते चोवीस तासांची पद्धत वापरतात. म्हणजे सकाळचे आठ वा रात्रीचे आठ असा गोंधळ न होता आठ व वीस या पद्धतीनेच वेळ सांगितली जाते. इंग्रजीत ए.एम. व पी.एम. असे म्हटले जाते. याचा अर्थ अँटीमेरिडीयम व पोस्टमेरिडियम म्हणजे सूर्य मध्यान्हाला येण्यापूर्वी वा नंतर असा आहे. हल्ली दूरचित्रवाणीवरून क्षणार्धात प्रक्षेपण जगभर दिसू शकते. यामुळे वेळेचे भान अधिकच आवश्यक आहे. ऑलिम्पिक खेळ, फुटबॉलची मॅच. महत्त्वाचा प्रसंग कोणत्या देशात किती वाजता होणार आहे, ते कळते; तरीही त्याची आपल्या इथली वेळ जर आपण ठरवू शकलो नाही, तर त्याला साक्षीदार होण्याची संधी कायम घालवून बसू. दुपारी तीन वाजता आई अमेरिकेतील मुलीला फोन करून तिची चौकशी करू लागली, तर झोपमोड झालेली, पहाटे तीन वाजता फोन वाजल्याने त्रासलेली मुलगीच आईशी फोनवर बोलू लागेल. वेळेचे भान हे घराघरात यामुळेच आवश्यक होत चालले आहे. स्वनातीत विमानाने प्रवास केल्यास दुपारच्या जेवणानंतर लंडन सोडले, तर त्याच दिवशी सकाळच्या नाष्ट्याला न्यूयॉर्क गाठता येते. जागतिक प्रवाशाला वेळेचे भान राखणे त्यामुळेच अत्यावश्यक ठरते.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुझें प्रेम माझे ह्रदाय आवडी । चरण मी न सोडी पांडुरंगा ॥१॥ कशासाठीं शीण थोडक्याकारणें । काय तुज उणें होय देवा ॥२॥ चंद्र चकोराचा पुरवी सोहळा । काय त्याच्या कळा न्यून होती ॥३॥ नामा म्हणे मज अनाथा सांभाळी । ह्रदयकमळीं स्थिर राहे ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हवा अंगाला स्पर्शून जातो आणि त्याच्यामुळे आपण जिवंत आहोत. तरीही आपण त्याला बघू शकत नाही. कारण त्याला बघण्यासाठी आपल्याकडे तशी दूरदृष्टी नसते. तसंच समोर दिसणाऱ्या व्यक्तीच्या प्रती आपल्या मनात किती आदर, सन्मान आहे हे जाणून न घेता कोणाच्या सांगण्यावरून त्याचा अपमान करणे आपल्याला सहजपणे जमत असते.ही आजची वास्तविकता आहे. जसं वाऱ्याला बघण्यासाठी आपल्याकडे दूरदृष्टी नसते तशीच दूरदृष्टी त्या व्यक्तीला जाणून घेण्याची नसते.हीच कमतरता आपल्यातील काही गुणांचा अंत करत असते. म्हणून जीवन जगत असताना आपल्यातही तेवढीच सत्यात ठेवणे गरजेचे आहे कारण, सत्याच्या वाटेवर चालणारी व्यक्ती कोणाचाही अपमान करत नाही हेच त्याच्यात महत्वाचे गुण असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• जांभूळ आख्यान ही गोष्ट आहे द्रौपदीची..तिने आपद्धर्म म्हणुन पाच पतींशी विवाह केला..पण तरीही तिला पतिव्रता हा दर्जा दिला गेला..तिच्या पाच पतींनी आणखी वेगवेगळे विवाह केलेच..पण ते पुरुष होते त्यामुळे बहुपत्नीकत्व त्यांना परंपरेने बहाल केलं होतं.तर गोष्ट आहे द्रौपदीची..कुठल्या तरी समारंभाच्या वेळी कर्ण द्रौपदीच्या नजरेस पडला..तेव्हा तो पांडव आहे हे अर्थातच तिला माहिती नसणार.पण तरीही त्याचं देखणेपण पाहुन ती क्षणभर मोहीत झाली..आख्यानकार म्हणतात,” कर्णाला पाहुन द्रौपदीचं मन पाकुळलं ( पाघळलं).आख्यानकार आणखी पुढे म्हणतात की द्रौपदीला क्षणभर वाटुन गेलं की हा देखणा युवक सहावा पांडव असता तर?????आत्ता बारा महिन्यांची जशी विषम विभागणी झाली आहे त्याऐवजी ती सहा जणात दोन दोन महिने अशी झाली असती..अंतर्ज्ञानी कृष्णाच्या ही गोष्ट लक्षात आली..द्रौपदीच्या मनात परपुरुषाचा विचार येणं ही गोष्ट पांडवांच्या दृष्टीने धोक्याची होती..कारण द्रौपदी हे पांडवांना एकत्र बांधुन ठेवणारं सुत्र होतं.मग कृष्णाने वनविहाराचा बेत आखला..वनविहार झाल्यावर सर्वांना भूक लागली म्हणुन भीम फळं शोधण्यासाठी गेला..परंतु कृष्णाने आपल्या मायेने रानातली सर्व फळं नाहिशी केली..एका वृक्षावर एकुलतं एक जांभूळ शिल्लक होतं.भीमाने तेच तोडुन आणलं..त्या वनात कोणी एक ऋषी तप करीत होते..आणि बारा वर्षाचं तप पुर्ण झाल्यानंतर खाण्यासाठी म्हणुन त्यांनी ते जांभूळ राखुन ठेवलं होतं असं शुभ वर्तमान कृष्णाने सर्वांच्या कानी घातलं..आता पांडवांच्यात घबराट पसरली..जांभूळ जाग्यावर दिसलं नाही तर ऋषींचा कोप होणार..कृष्णाने सांगितलं,की तुमच्यापैकी ज्याचं मन स्वच्छ आहे ,ज्याच्या मनात कधीच परपुरुषाचा/परस्त्रीचा विचार आलेला नसेल त्याने मनापासुन प्रार्थना करावी.जांभूळ आपोआप झाडाला जाऊन चिकटेल..म्हणजे आता तिथे द्रौपदीपेक्षा योग्य व्यक्ती नाहीच कोणी.सगळ्यांच्या नजरा आता द्रौपदीकडे..द्रौपदी मनातुन खजील.भयभीत.जांभूळ चिकटलं नाही तर तिच्या पातिव्रत्यावरच घाला..कारण काही क्षणापुरता का होईना पण कर्णाचा विचार तिच्या मनात आलाच होता..तिने मनोमन कृष्णाची करुणा भाकली,पुन्हा अशी चूक होणार नाही अशी मनोमन कबुली दिली आणि हात जोडुन प्रार्थना केली आणि काय आश्चर्य ?जांभूळ परत झाडाला चिकटलं..पण उलट्या बाजुने..द्रौपदीला तिच्या चुकीची सतत आठवण रहावी यासाठी कृष्णाने केलेली ही योजना..म्हणजे एका अर्थी उलटं जांभूळ हे पापाचं प्रतीक..म्हणुन त्याला देवाच्या पुजेत ,उपासाच्या फळामधे स्थान नाही..आख्यानकार आणखीही सांगतो, की जांभूळ खाल्लेलं लपवता येत नाही..जीभ जांभळी करुन सोडतं ते..थोडक्यात - केलेलं पाप लपत नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment