✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 08 मार्च 2025💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1R3G1XFbNg/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🏵️ *_आंतरराष्ट्रीय महिला दिन_* 🏵️•••••••••••••••••••••••••••••••••••• 🏵️ *_ या वर्षातील ६७ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🏵️ *_महत्त्वाच्या घटना:_* 🏵️••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९३: दमानिया एअरवेज या खाजगी विमानवाहतुक कंपनीने आपल्या पहिल्या विमानाला ‘स्पिरीट ऑफ जे. आर. डी.’ असे नाव देण्याचे ठरविले**१९५७: घानाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९४८: फलटण संस्थान भारतीय गणराज्यात विलीन झाले**१९४२: जपानने म्यानमारची राजधानी रंगून जिंकली**१९११: आंतरराष्ट्रीय महिला दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.**१८१७: न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजची (NYSE)स्थापना**१६७३: शिवाजी महाराजांनी पन्हाळ्याचा किल्ला ताब्यात घेतला*🏵️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🏵️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८९: हरमनप्रीत कौर -- प्रसिद्ध भारतीय महिला क्रिकेट खेळाडू* *१९८०: सुनिता झाडे -- लेखिका, संपादिका* *१९७४: फरदीन खान – हिन्दी चित्रपट कलाकार**१९७२: सारिका राजेंद्र सोनजे -- कवयित्री, नाट्यकलावंत* *१९७१: वंदना निशिकांत ढवळे -- बाल साहित्यावर विपुल लेखन करणा-या लेखिका**१९६१: मालविका यशवंत देखणे -- प्रसिद्ध लेखिका* *१९५५: प्रा. डॉ. श्रीधर (राजा) दीक्षित -- प्रसिद्ध लेखक, ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ आणि विचारवंत, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे पूर्व अध्यक्ष व प्रमुख संपादक**१९५४: गणपत बलवंत व्यास -- कवी, लेखक* *१९५४: दिगंबर कामत -- गोव्याचे माजी मुख्यमंत्री* *१९५३: प्रा. गंगाधर गिते -- लेखक* *१९५३: वसुंधरा राजे शिंदे -- राजस्थान राज्याच्या पूर्व मुख्यमंत्री* *१९५३: विठ्ठल साठे -- लेखक, कादंबरीकार**१९५१: माधवी ओंकार घारपुरे -- प्रसिद्ध लेखिका* *१९३१: मनोहारी सिंग – पट्टीचे सॅक्सोफोन वादक (मृत्यू: १३ जुलै २०१० )**१९३०: चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ ’आरती प्रभू’ – साहित्यिक (मृत्यू: २६ एप्रिल १९७६ )**१९२८: प्रा. वसंत अनंत कुंभोजकर -- शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत आणि लेखक**१९२१: अब्दूल हयी ऊर्फ ’साहिर लुधियानवी’ – शायर व गीतकार (मृत्यू: २५ ऑक्टोबर १९८० )**१९१८: इंदुमती पारीख -- व्यवसायाने डॉक्टर , बुद्धिवादी सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका (मृत्यू: १७ जून २००४ )**१८९३: दामूअण्णा बापूशेठ मालवणकर -- मराठी चित्रपट-नाटकांतून विनोदी भूमिका करणारे नट(मृत्यू: १४ मे १९७५ )* *१८८१: पंडित अनंत(अंतुबुवा) मनोहर जोशी -- हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या ख्याल -शैलीचे भारतीय गायक (मृत्यू: १२ सप्टेंबर १९६७ )**१८७९: ऑटो हान – नोबेल पारितोषिकविजेते जर्मन शात्रज्ञ (मृत्यू: २८ जुलै १९६८ )**१८६४: हरी नारायण आपटे – प्रसिद्ध कादंबरीकार (मृत्यू: ३ मार्च १९१९ )**१८३३: विश्वनाथ मंडलिक -- मुंबईतील प्रख्यात, वकील, लेखक (मृत्यू: ९ मे १८९९ )* 🏵️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🏵️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१६: सर जॉर्ज मार्टिन -- संगीत निर्माते (जन्म: ३ जानेवारी १९२६ )**२०१५: प्रा. मधुकर नारायण लोही -- ज्येष्ठ साहित्यिक (जन्म: २४ मे १९२३ )**२००४: सुशांत रे तथा सिद्धार्थ रे - मराठी सिने-नाटकातील एक अभिनेता (जन्म: १९ जुलै १९६३ )**१९९४: देविका रानी -- हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री(जन्म: ३० मार्च १९०८ )**१९५७: बाळ गंगाधर तथा ’बाळासाहेब’ खेर – स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री (जन्म: २४ ऑगस्ट १८८८ )**१९४२: जोस रॉल कॅपाब्लांका – क्यूबाचा बुद्धीबळपटू (जन्म: १९ नोव्हेंबर १८८८ )**१७०२: विल्यम (तिसरा) – इंग्लंडचा राजा (जन्म: १४ नोव्हेंबर १६५० )* *_जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा_*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागतिक महिला दिनानिमित्त प्रासंगिक लेख*जागतिक महिला दिन आणि ग्रामीण महिला*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शेतकऱ्यांना दिवसा वीज, 1 कोटी 34 लाख ग्राहकांना मोफत घरगुती लाईट; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *शाहिरा सीमा पाटील यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील माता रमाई आंबेडकर पुरस्कार जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राहुल गांधींचा गुजरात दौरा, काँग्रेस कार्यालयात बैठक, नेते आणि वॉर्ड अध्यक्षांसोबत 9 तासांत 5 बैठका घेणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान विद्या लक्ष्मी शिक्षण योजनेला दिली मंजुरी, योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला दिले जाईल शैक्षणिक कर्ज*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *लाडक्या बहिणींना महिला दिनाच्या पूर्वसंध्येला योजनेची रक्कम मिळणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महाराष्ट्रात एक लाखा हुन अधिक होर्डिंग्ज हटवले - उदय सामंत यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *प्लेअर ऑफ दि मंथ पुरस्कारासाठी भारतीय खेळाडू शुभमन गिल यांना नॉमिनेशन*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 साहेबराव बोणे, विशेष शिक्षक, धर्माबाद👤 बालाजी पा. कदम चिरलीकर👤 विकास खानापूरकर, शिक्षक, धर्माबाद👤 श्रीनिवास पा. भुतावळे👤 शरणप्पा नागठाणे, साहित्यिक, लातुर👤 संभाजी पाटील , शिक्षक,चाळीसगाव👤 मारोती भोसले, शिक्षक, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 13*मी जन्मानंतर येतो**मृत्यूसोबत जातो**जेवताना मदत करतो**रागात घासला जातो**ओळखा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - सौ. लिना सुपारेजि. प. प्रा. शाळा सुरजखोड जि. नांदेडकालच्या कोड्याचे उत्तर - हवा, वायू••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या कोणत्याही गोष्टींचा त्रास इतरांना होणार नाही याची जाणीव सतत असावी.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) अनंत मुकेश अंबानी यांचा ड्रीम प्रोजेक्ट *वनतारा ( वन्यजीव संरक्षण केंद्र )* कोठे आहे ?२) नुकतेच वन्यजीव संरक्षण केंद्र 'वनतारा'चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले ?३) वन्यजीव संरक्षण केंद्र 'वनतारा' किती एकरमध्ये पसरलेला आहे ?४) अमेरिका या देशाची कोणती अधिकृत भाषा होणार आहे ?५) 'जागतिक महिला दिवस केव्हा साजरा केला जातो ? *उत्तरे :-* १) जामनगर, गुजरात २) नरेंद्र मोदी ३) ३००० एकर ४) इंग्रजी ५) ८ मार्च*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *समतोल आहार म्हणजे काय ?* 📙 **************************आपला आहार समतोल असावा, चौरस असावा हा उपदेश ऐकून आपले कान किटले असतील. 'समतोल' म्हणजे काय हा प्रश्न आपल्याला पडणे स्वाभाविक आहे.समतोल आहार म्हणजे काय ? हे समजण्यासाठी प्रथम आहारात कोणते घटक असणे आवश्यक असते, हे आपण पाहू. कार्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वे, क्षार, पाणी हे अन्नातील सहा प्रमुख घटक होत. कार्बोदके शरीराला ऊर्जा पुरवितात. प्रथिने शरीराच्या जडणघडणीसाठी आवश्यक असतात. स्निग्ध पदार्थांपासून ऊर्जा मिळते, तसेच शरीराच्या महत्त्वाच्या क्रियाप्रक्रियांना मदत होते. अ, ब, क, ड, इ तसेच के ही जीवनसत्त्वे आपल्याला अत्यंत अल्प प्रमाणात लागतात. पण ती मिळाली नाही तर अनेक आजारांना आपल्याला सामोरे जावे लागते. त्याचप्रमाणे सोडियम क्लोराइड सारखे हे क्षारही जगण्यासाठी आवश्यक असतात. पाणी हे तर साक्षात जीवनच ! शरीराच्या वचनांपैकी सुमारे ६४% वजन पाण्याचेच असते. हे सर्व घटक शरीराला योग्य प्रमाणात मिळाले नाही तर कुपोषण, रातांधळेपणा, मुडदूस, रोगप्रतिकारशक्तीचा अभाव, अशक्तपणा, गलगंड, रक्तक्षय इ. कमी पोषणामुळे होणारे आजार वा लठ्ठपणासारखे अतिपोषणामुळे होणारे आजार होऊ शकतात. हे टाळावयाचे असल्यास समतोल आहार घेणे आवश्यक ठरेल. ज्या आहारात वर वर्णन केलेले सर्व घटक योग्य प्रमाणात असतील त्यास समतोल आहार असे म्हणतात. योग्य प्रमाणात म्हणजे व्यक्तीला आवश्यक असलेली ऊर्जा त्यातून मिळाली पाहिजे. जीवनसत्वे, क्षार, पाणी मिळाले पाहिजे. खेरीज अनपेक्षित वा आकस्मित प्रसंगासाठी जसे आजार, अपघात यासाठी अतिरिक्त पोषणही त्याद्वारे मिळायला हवे. एकूण ऊर्जेपैकी ६५ ते ७०% कार्बोदकातून, १५ ते २५ % स्निग्ध पदार्थांतून तर ५ ते १५% प्रथिनांपासून मिळावी. समतोल आहाराचा आपण अंगीकार केला तर निरोगी जीवनाकडे आपली वाटचाल सुरू राहील.आपण रोजचा आपला आहार बघितला तर ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, नाचणी अशा कार्बोदके अधिक असलेल्या अन्नपदार्थांसोबत डाळी, भाजीपाला, तेल, तूप या गोष्टी; तसेच मांस, मासे, दूध, अंडी असे प्राणीज पदार्थ आपण वापरात आणत असतो. हे सर्व अन्नपदार्थ वेगवेगळे परिपूर्ण नसतात. परंतु यातील दोन तीन पदार्थ एकत्र वापरले तर या मिश्रणाचे पोषणमूल्य वाढते. उदाहरणार्थ नुसत्या भाताऐवजी वरण-भात, डाळ-तांदळाची खिचडी, वरण- भाकरी, इडली-सांबार इत्यादी पदार्थांमुळे आहार परिपूर्ण होतो.*डाॅ. अंजली दिक्षित व डाॅ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुझें प्रेम माझ्या दाखवीं मनातें । मग तुझ्या चरणातें न विसंबें ॥१॥ कासया शिणविसी थोडिया कारणें । काय तुझें उणें होईल देवा ॥२॥ चातकाची तहान पुरवी जळधर । काय त्याची थोरी जाऊ पाहे ॥३॥ चंद्र चकोराचा पुरवी सोहोळा । काय त्याच्या कळा न्य़ून होती ॥४॥ कूर्मीं अवलोकीं आपुलिया बाळा । काय तिच्या डोळां दृष्टि नासे ॥५॥ नामा म्हणे देवा तुझाचि भरंवसा । अनाथा कुंवसा होसी तूंचि ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखादी व्यक्ती, फार मोठ्या आजारातून बाहेर येते तेव्हा ती म्हणते की, मला पुनर्जन्म मिळाला आहे. कदाचित हे विचार योग्य असू शकतात. पण माणसाचा पुनर्जन्म खऱ्या अर्थाने त्याच दिवशी होतो ज्या वेळी त्याच्यासोबत धोका होतो आणि एवढेच नाही तर त्याला बाजूला करण्यासाठी कटकारस्थान रचले जाते ही सर्व परिस्थिती जाणून ती व्यक्ती, पुन्हा एकदा मोठ्या हिंमतीने जगून आपले विचार असोत किंवा कार्य नित्यनेमाने करत सत्याला समर्पीत होऊन जगत असते. आणि त्याच्या याच पुनर्जन्मामुळे आणि जगण्यातून अनेकांना नवी दिशा मिळत असते.म्हणून माणसाने प्रत्येक परिस्थितीचा सामना करायला शिकले पाहिजे. शेवटी फुलांवरून चालायला अनेकजण असतात मात्र काटेरी वाटेवर एकट्यालाच चालावे लागते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *हरिण व कोल्हा*एका कोल्हयाला फिरण्याचा फार नाद होता, तो या गावाहून त्या गावाला सारखा फिरत राही, प्रवास करता करता तो एका गावाला आला. तिथे त्याला एका तलावात पाणी पीत असलेली काही हरणे दिसली. ती पाणी पितापिता मधेच अकाशाकडे पहात होती हे पाहून कोल्हयाने त्यांना असे करण्याचे कारण विचारले, तेव्हा हरणे म्हणाली, 'आम्ही देवाचे आभार मानतो देवाच्याच दयेनं हे पाणी प्यायला मिळतं आहे.' हरणांचे हे बोलणे ऐकून कोल्हयाला हसू आले व तो त्यांची टिंगल करू लागला. यावर त्यातले एक स्पष्टवक्ते हरीण कोल्हयाला म्हणाले, 'अरे कोल्होबा ज्याची त्याची श्रध्दा असते, अशी दुसऱ्याची टिंगल उडविणे वाईट आहे. आपले वागणे वाईट अशा विकृत दृष्टिकोन असलेल्या तुझ्याकडून समंजसपणाची अपेक्षा का करावी.'तात्पर्यः 'दुसऱ्याच्या श्रध्देविषयी टिंगल करणे हे असभ्यपणाचे लक्षण आहे.'•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment