✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 29 मार्च 2025💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post_12.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚥 *_राष्ट्रीय नौका दिन_* 🚥•••••••••••••••••••••••••••••••••••• 🚥 *_ या वर्षातील ८८ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🚥 *_महत्त्वाच्या घटना:_* 🚥•••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८२: एन. टी. रामाराव यांनी तेलगू देसम पक्षाची स्थापना केली.**१९७६: महाराष्ट्र विधान परिषदेत सक्तीच्या कुटुंब नियोजनाचा ठराव मंजूर* *१९७३: व्हिएतनाम युद्ध – व्हिएतनाममधुन शेवटचा अमेरिकन सैनिक बाहेर पडला.**१९६८: महात्मा फुले कृषी विद्यापीठाची (MPKV) राहुरी येथे स्थापना**१९३०: ’प्रभात’चा ’खूनी खंजिर’ हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.**१८५७: बेंगाल नेटिव्ह इन्फंट्रीच्या ३४ व्या तुकडीतील शिपाई मंगल पांडे याने इस्ट इंडिया कंपनीतील ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या. या घटनेतुनच १८५७ च्या राष्ट्रीय उठावाची सुरूवात झाली.**१८४९: ब्रिटिश साम्राज्याने पंजाब ताब्यात घेतले.*🚥 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🚥••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००५: कार्तिक रामदास झेंडे -- कवी, लेखक,वक्ता, विविध पुरस्कारांनी सन्मानित**१९८६: अक्षय मुकुंद जोग -- लेखक**१९७८: भार्गवी चिरमुले -- मराठी अभिनेत्री**१९७७: प्रज्ञा कुलकर्णी -- कवयित्री* *१९७४: प्रा. डॉ. मृदुला हेमंत बेळे -- कथाकार विविध वृत्तपत्रांतून लिखाण* *१९७१:डॉ.मिलिंद यादव धांडे -- कवी* *१९६६: गणेश रामदासी -- कवी, लेखक, संचालक,माहिती व जनसंपर्क म.रा.**१९४८: नागनाथ कोतापल्ले – प्रसिद्ध साहित्यिक,शिक्षणतज्ञ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू(मृत्यू: ३० नोव्हेंबर २०२२ )**१९३९: जगदीप -- हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध विनोदी नट होते.जगदीप यांचे खरे नाव सैयद इश्तियाक जाफरी(मृत्यू: ८ जुलै २०२० )**१९३६: मधुसूदन रामचंद्र कोल्हटकर --- शिक्षणतज्ज्ञ,पूर्व सचिव शिक्षण विभाग,महाराष्ट्र राज्य**१९३५: श्रीनिवास हवालदार -- ज्येष्ठ कवी, लेखक**१९३०: विश्वनाथ खैरे -- लोकसंस्कृतीचे आणि भारतविद्येचे (इंडॉलॉजी) प्रतिभावंत अभ्यासक* *१९३०: सर अनिरुद्ध जगन्नाथ -- मॉरिशसचे माजी राष्ट्रपती आणि पंतप्रधान(मृत्यू: ३ जून २०२१ )**१९२९: उत्पल दत्त – रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही माध्यमात आपला ठसा उमटवणारे कलाकार (मृत्यू: १९ ऑगस्ट १९९३ )**१९२६: पांडुरंग लक्ष्मण तथा ’बाळ’ गाडगीळ – अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक (मृत्यू: २१ मार्च २०१० )**१९१८: सॅम वॉल्टन -- वॉलमार्टचे संस्थापक (मृत्यू: ५ एप्रिल १९९२ )* *१९१४: धुमाळ उर्फ अनंत बळवंत धुमाळ -- भारतीय चित्रपटसृष्टीतील एक विनोदी अभिनेता (मृत्यू: १३ फेब्रुवारी १९८७ )**१९०५: पुरुषोत्तम मंगेश लाड -- संतसाहित्याचे गाढे अभ्यासक,अर्थशास्त्रज्ञ (मृत्यू: २४ मार्च १९५७ )**१८६९: सर एडविन लुटेन्स – दिल्लीचे नगररचनाकार (मृत्यू: १ जानेवारी १९४४ )* 🚥 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🚥••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३: गिरीश बापट -- माजी मंत्री,माजी खासदार (जन्म: ३ सप्टेंबर १९५० )**२०१९: डॉ.पद्माकर विष्णू वर्तक -- ज्येष्ठ वैद्यकीय तज्ञ संशोधक व लेखक (जन्म: २५ फेब्रुवारी १९३३ )**१९९७: पुपुल जयकर – सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या (जन्म: ११ सप्टेंबर १९१५ )**१९७१: धीरेंद्रनाथ दत्ता – बांगलादेशी राजकारणी (जन्म: २ नोव्हेंबर १८८६ )**१९६४: शंकर नारायण तथा ’वत्स’ जोशी – इतिहास संशोधक* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••30 मार्च रविवारी गुढीपाडवा त्यानिमित्ताने विशेष लेख*विकारी विचारांवर विजयाचा दिवस*चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे हिंदू पंचांगातील मराठी महिन्यातील नववर्षाचा पहिला दिवस. हा दिवस सर्वत्र गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. साडेतीन मुहुर्तापैकी हा एक शुभ मुहूर्त म्हणून समजल्या जाते. आजच्या दिवशी सोने, घर, फ्लॅट, वाहन इत्यादी नवीन वस्तू खरेदी करण्याचा प्रघात आहे. आजच्या मुहूर्तावर अनेक जण आपल्या नव्या व्यवसायाचा शुभारंभ देखील करतात ............ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *अनेक गगनचुंबी इमारती, बंगले क्षणार्धात जमीनदोस्त, 7.7 रिश्टर स्केल शक्तीशाली भूकंपाने बँकॉकमध्ये हाहाकार; पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *शाळेतील विद्यार्थ्यांच्या पुस्तकाला वह्यांची पानं जोडण्याचा नियोजन शून्य निर्णय; राज्य सरकारला 65 कोटी रुपयांचा फटका*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरुच राहणार, महावितरण विभागाला कोट्यावधी रुपयांचा निधी वर्ग, लाखो शेतकऱ्यांना दिलासा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नाशिकच्या त्र्यंबकमध्ये गोदावरी मोकळा श्वास घेणार, कुशावर्तासारखे पवित्र कुंड तयार करणार; कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *शेतकऱ्यांचा गुढीपाडवा जोरात, नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये आजपासून येणार खात्यात !*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांना आता 100 रुपयांऐवजी एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार, 1 एप्रिलपासून अंमलबजावणी होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ **•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 पंकजकुमार पालीवाल, शिक्षक नेते, पाचोरा 👤 धीरज कोयले👤 पिराजी शेळके 👤 प्रदीप मनुरकर, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 29*थंड प्रदेशातील छोटेसे हे फळ**माणसाला देतो प्रचंड बळ**कठीण कवच फोडा पटकन**चव कळण्यासाठी खावे चटकन*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - मासा ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जो परिस्थितीशी जितका जास्त जुळवून घेऊ शकतो तोच तितका जास्त टिकतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'प्रेमाचे प्रतीक'* म्हणून कोणत्या पक्ष्याकडे पाहिले जाते ?२) आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार कोठे आहे ?३) भारत सरकारने लोकशिक्षण देण्याच्या हेतूने 'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया' ( FTII ) या संस्थेची स्थापना कोठे केली ?४) 'ईश्वर आहे असे मानणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) नोटा छापण्याचे काम कोण करते ? *उत्तरे :-* १) पांढरे कबूतर २) नवी दिल्ली ३) पुणे ( १९६० ) ४) आस्तिक ५) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*महाराष्ट्रातील सात आश्चर्ये* :जगात जशी सात आश्चर्ये आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्रात राज्यातील काही अद्भुत आणि सुंदर स्थळांना जून २०१३ रोजी आश्चर्यांचा दर्जा दिला आहे. जगभरातून साधारणपणे २२ लाख मतांच्या आधारे ही सात आश्चर्ये निवडण्यात आलेली आहेत. चला तर बघूया कोणती आहेत ती आश्चर्ये :१) *विश्व विपश्यना पॅगोडा(स्तूप)* :हा पॅगोडा जगातील सर्वात मोठा खांब-विरहित पॅगोडा आहे, जो मुंबईतील गोराई येथे उभारण्यात आलेला आहे. गौतम बुद्धांच्या स्मृतींची जपणूक करण्यासाठी हा पॅगोडा बांधण्यात आलेला आहे. या पॅगोडाचे उद्घाटन माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पती यांच्या हस्ते ८ फेब्रुवारी २००९ साली करण्यात आले. हा पॅगोडा शांती आणि ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. दररोज येथे दीड ते दोन हजार पर्यटक भेट देत असतात. स्तूपाच्या कळसाची उंची २९ मी. असून भूकंपरोधक आहे. एकावेळी ८ ते १० हजार लोक बसू शकतील अशी व्यवस्था केली आहे.२) *छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT)* :हे रेल्वे स्थानक व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्णजयंतीनिमित्त १८८७ मध्ये बांधले गेले आहे. मुंबई शहरातील ऐतिहासिक व सर्वात मोठे रेल्वे स्थानक व मध्य रेल्वेचे मुख्यालय अशी याची ओळख आहे. सर्वात व्यस्त व गजबजलेले स्थानक अशीही याची ख्याती आहे. या स्थानकावर एकूण १८ फलाट आहेत. २००८ साली अतिरेक्यांनी याच स्थानकावर अतिरेकी हल्ला केला होता.३) *अजिंठा लेणी* :इसवी सन पूर्व दुसरे शतक ते इसवी सन चौथे शतक या काळात या बौद्धलेण्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे. यामध्ये एकूण २९ लेणी आहेत. औरंगाबाद जिल्ह्याच्या वाघुर नदीच्या परिसरात ही लेणी अस्तित्वात आहेत. ही लेणी नदीपात्रापासून ४० ते १०० फुट उंचीवर डोंगररांगांमध्ये कोरलेली आहेत. या लेण्यांत गौतम बुद्धांच्या विविध भावमुद्र तसेच बौद्ध तत्वज्ञान चित्रशिल्प रुपात तयार केले आहे. ४) *कास पठार* :या पठारावर पावसाळ्यात असंख्य रानफुले फुलतात. या फुलांमध्ये अनेक दुर्मिळ प्रकारची फुले आढळून येतात. हे पठार विविध प्रकारची फुले आणि फुलपाखरांसाठी प्रसिद्ध आहे. पठाराचे क्षेत्रफळ १० चौ.कि.मी. असून पठारावर २८० फुलांच्या जाती व वनस्पती, वेली, झुडपे आणि इतर प्रजाती मिळून ८५० प्रजाती आढळतात. रंगीबेरंगी फुले व फुलपाखरे पाहण्यासाठी पर्यटकांची येथे तुडुंब गर्दी असते.५) *रायगड किल्ला* :स्वराज्याची राजधानी असलेला किल्ला म्हणजे रायगड होय. या डोंगरी किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची ८२० मीटर आहे. या किल्ल्याला अजून १५ नावानी संबोधले जाते. गडाला १४३५ पायऱ्या आहेत. अवघड व दुर्गम भागातील भागातील हा गड एक पर्यटनस्थळ म्हणून नावाजलेला आहे. गडावर एकूण २५ हून अधिक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.६) *लोणार सरोवर* :एका उल्कापातामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणून हे सरोवर पूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. या सरोवराचे पाणी अल्कधर्मी आहे. सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी लोणार सरोवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. या परिसारत बाराशे वर्षांपूर्वीची १५ मंदिरे अस्तित्वात आहेत. या सरोवराचे क्षेत्रफळ १.१३ चौ.कि.मी. इतके असून सरासरी खोली १३७ मीटर आहे. अमेरिकेतील अनेक संस्थांनी येथे येऊन संशोधन केलेले आहे.७) *दौलताबादचा किल्ला* :हा गड यादवकालीन ऐतिहासिक किल्ला आहे. देवगिरी किल्ल्याला २८ नोव्हेंबर १९५१ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. या किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे मेंढातोफ होय. या तोफेत एकाच माऱ्यात पूर्ण गड उध्वस्त करण्याची क्षमता होती. ती तोफ पंचधातूंपासून बनवलेली आहे. प्राचीन काळातील गड म्हणून हा गड प्रेक्षणीय स्थळ म्हणून नावाजला गेला आहे. या गडावर लोक भरपूर प्रमाणात भेट देतात.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दाविसी अनंता स्वरूपें अनेक । वाउगाचि शोक वाढविसी ॥१॥ आपुल्या मानसीं विचारूनि पाहे । सावधान होये तुझे पाई ॥२॥ नामा म्हणे नाम विर्वाणीचें बीज । मजसाठीं गुज दावियेलें ॥३॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कागद आणि पेनीचे नाते हे जगावेगळ असते त्यांच्या आधाराने कितीही लिहिले तरी ते, दोघे कधीच कंटाळत नाही हीच त्यांच्यातील खरी महानता आणि त्याग असते. म्हणून या दोघांकडे बघून माणसाने जगण्याचा प्रयत्न केले पाहिजे. ते, दोघेही एकदाचे संपून जातात मात्र त्यांचे मोलाचे योगदान, सहनशीलता अनेक पिढ्यांना मार्गदर्शक बनून नव्याने जगायला प्रेरणा देत असतात. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *चंदनाची बाग**एकदा एका राजाने खुश होऊन लोहाराला चंदनाची बाग भेट दिली. लोहाराला चंदनाच्या झाडांच्या किंमतीचे ज्ञान नव्हते. त्यामुळे त्याने त्या झाडांना कापून त्यांचा कोळसा करून विकला. हळूहळू संपूर्ण बाग रिकामी झाली.**एक दिवस असेच राजा त्याच्या घरा जवळून जात होता, राजाला वाटले लोहार आता खुप श्रीमंत झाला असेल. परंतु प्रत्यक्षात पाहिल्यावर लोहाराची परिस्थिती पहिल्या सारखीच आहे असे दिसले, राजाला आश्चर्य वाटले.**सत्य समजल्यानंतर राजाने त्याला विचारले, तुझ्याकडे एखादे लाकुड़ शिल्लक आहे का.? तेव्हा लोहाराने कुऱ्हाडीचा दांडा दाखविला.**राजाने त्याला चंदनाच्या व्यापाऱ्या कडे पाठवले. तेंव्हां त्या छोटयाश्या तुकडयाचे त्याला खुप पैसे मिळाले. लोहार खुप रडू लागला, त्याने राजाला अजुन एक बाग देण्याची विनंती केली, तेंव्हा राजा म्हणाला "अशी भेट वारंवार भेटत नाही."**मित्रांनो आपले आयुष्य त्या लोहारासारखेच आहे. मानवी जीवनाच्या मुल्यांचे महत्व, आपल्याला जीवनाचे शेवटचे श्वास चालू असताना समजते. पण... त्यावेळेस आपण म्हणतो देवा मला अजुन थोड़ा वेळ दे, परंतु त्यावेळी वेळ मिळणे अशक्य असते. मानवी जीवन अनमोल आहे. असे सुंदर जीवन परत मिळणार नाही.**तात्पर्य - या जगात दुर्लभ गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे, मनुष्य देह त्या देहाचा कोळसा करायचा की, चंदन हे आपले आपण ठरवायचे.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment