✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 01 जुलै 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://kathamaala.blogspot.com/2023/11/ek-tarikh.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_महाराष्ट्र कृषी दिन_**_राष्ट्रीय डॉक्टर दिन_* ••••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील १८३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९९७:शतकातील सर्वोत्कृष्ट वेटलिफ्टर्सच्या यादीत भारताच्या कुंजरानी देवीचा समावेश करण्यात आला.**१९६४:न.वि.गाडगीळ पुणे विद्यापीठाचे पाचवे कुलगुरू झाले.**१९६२:सोमालिया व घाना हे देश स्वतंत्र झाले.**१९६०:रवांडा व बुरुंडी हे देश स्वतंत्र झाले.**१९५५:’स्टेट बँक ऑफ इंडिया अ‍ॅक्ट १९५५’ अन्वये स्टेट बँक ऑफ इंडिया अस्तित्त्वात आली.**१९४९:त्रावणकोर व कोचीन ही दोन संस्थाने एकत्र करुन ’थिरुकोची’ संस्थान निर्माण करण्यात आले.याचेच पुढे केरळ राज्य बनले.**१९४८:बाजारपेठेतील व्यापार्‍यांचे नेतृत्त्व करणार्‍या ’पूना मर्चंट्स चेंबर’ या संस्थेची स्थापना**१९४७:फिलिपाइन्सच्या वायूदलाची स्थापना झाली.**१९०९:क्रांतिकारक मदनलाल धिंग्राने भारतमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक कर्नल विल्यम कर्झन वायली यांची इंपिरिअल इन्स्टिट्युटच्या ’जहांगिर हाऊस’मधे इंडियन नॅशनल असोसिएशनच्या सभेच्या वेळी गोळ्या झाडून हत्या केली.**१८८१:कॅनडातुन अमेरिकेत जगातील पहिला आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल करण्यात आला.**१८३७:जन्म,मृत्यू व विवाह यांच्या सरकारी नोंदणीस इंग्लंडमधे सुरूवात झाली.**_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८६:बाळासाहेब साहेबराव चन्ने -- लेखक कवी**१९८५:सहादेव पुरासे-- कवी**१९७९:विशाल सुधाकरराव कन्हेरकर-- कवी,लेखक* *१९७९:सुरेश मारोतराव हिवाळे-- कवी, लेखक* *१९७९:लीना भुसारी-खैरकर-- कवयित्री* *१९७८:रवींद्र उद्धवराव भयवाळ-- लेखक,समीक्षक,संपादक* *१९७८:लीलाधर रामेश्वरजी दवंडे--कवी, लेखक**१९७६:प्रा.डॉ प्रवीण श्रीकृष्ण बनसोड-- लेखक**१९७५:प्रा.डॉ.अनंता सूर-- प्रसिद्ध कवी लेखक,समीक्षक,संपादक* *१९७४:प्रा.डॉ.शिवाजी भिकाजीराव हुसे-- कवी,लेखक,संपादक* *१९७३:अशोक गोविंदरावजी इंजेगांवकर -- कवी,लेखक* *१९७३:गणेश शिवराम भाकरे -- प्रसिद्ध कवी* *१९७२:काशिनाथ (का.रा.) चव्हाण -- प्रसिद्ध कवी* *१९७२:अशोक पवार -- प्रसिद्ध लेखक* *१९७१:श्रीकांत बापूराव पेठकर-- लेखक कवी**१९७१:पंडित दिंगाबर कांबळे -- कवी, लेखक* *१९७१:सीमा गजानन भसारकर -- कवयित्री* *१९७०:परसराम रामा आंबी-- लेखक**१९६९:सुरेश महादेवराव देशमुख -- लेखक**१९६८:प्रा.धनंजय श्रीकृष्ण पटोकार -- कवी**१९६८:गौतम रामराव कांबळे-- कवी* *१९६७:विठ्ठल नागेश गावडे परवाडकर -- नाटककार,लेखक,कवी* *१९६७:संजय महिपती पाटील-- कवी,लेखक**१९६७:गोविंद चव्हाण-- नाट्य निर्माते (मृत्यू:१३ जुलै २०२०)**१९६६:उस्ताद राशिद खान – रामपूर- साहसवान घराण्याचे शास्त्रीय गायक**१९६५:उत्तम अमरसिंग राठोड-- कवी* *१९६४:अशोक सीतारामजी कोसरे - कवी, लेखक* *१९६३:रेखा अशोक ढोले-- कवयित्री* *१९६३:परमेश्वर श्रीराम व्यवहारे-- कवी, लेखक* *१९६३:अनिल मनोहर खोब्रागडे- प्रसिद्ध लेखक,कवी* *१९६३:डॉ सतीश पावडे-- लेखक,समीक्षक, नाट्यलेखक**१९६२:बा.बा.कोटंबे -- लेखक* *१९६२:जयकुमार चर्जन-- लेखक* *१९६२:गजानन श्रीराम निमकर्डे-- लेखक* *१९६१: वसंत नारायण चंन्ने-- कवी,लेखक* *१९६१:कल्पना चावला–भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर(मृत्यू:१ फेब्रुवारी २००३)**१९६०:सुदेश भोसले-- मिमिक्री आर्टिस्ट, प्रसिद्ध गायक* *१९६०:डॉ.किरण कृष्णराव नागतोडे-- प्रसिद्ध लेखिका* *१९६०:चुडाराम हिरामण बल्हारपुरे -- लेखक**१९६०:युवराज गंगाराम-- समीक्षक,लेखक, कवी* *१९५९:अमर हरसिंग राठोड -- लेखक तथा निवृत्त उपविभागीय अभियंता* *१९५८:रामचंद्र गोविंद कुलकर्णी- प्रसिद्ध कवी,लेखक तथा निवृत्त सनदी अधिकारी**१९५८:प्रा.डॉ.अविनाश आवलगावकर-- सुप्रसिद्ध साहित्यिक,समीक्षक* *१९५७:प्रा.डॉ.दिलीप व्यंकटेश अलोणे -- प्रसिद्ध लेखक,निवेदक* *१९५६:आदित्य राज कपूर-- अभिनेता,चित्रपट निर्माता,लेखक**१९५४:सुधीर जाधव -- लेखक* *१९५४:प्रा.डॉ.राम बोडेवार -- लेखक* *१९५३:डॉ.युवराज सोनटक्के--प्रसिद्ध कवी, लेखक**१९५३:नंदू होनप-- मराठी संगीतकार आणि व्हायोलिनवादक (मृत्यू:१७ सप्टेंबर २०१६)**१९५२:नरेश नारायण चव्हाण-- कवी* *१९५२:विठ्ठल पांडुरंग पाटील-- लेखक,कवी तथा निवृत्त शिक्षणाधिकारी* *१९५१:विठ्ठल उंदराची घोडे -- कवी,लेखक* *१९५०:प्रा.डॉ.सुभाष जगन्नाथ गढीकर -- लेखक,समीक्षक* *१९५०:डॉ श्रीपाल सबनीस-- सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष* *१९४९:वेंकय्या नायडू – माजी.उपराष्ट्रपती, भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष**१९४९:प्रा.यशवंत माळी-- सुप्रसिद्ध कथाकार**१९४९:मेहुल कुमार-- भारतीय चित्रपट निर्माता,चित्रपट दिग्दर्शक आणि कथा लेखक**१९४८:अनंत प्रभाकर देशमुख--समीक्षक**१९४८:उद्धव पिठूजी नारनवरे-- लेखक**१९४६:हिरामण लांजे-- प्रसिद्ध कवी, लेखक,झाडी बोली साहित्याचे गाढे अभ्यासक* *१९४५:विजय पुरूषोत्तम नाईक-- प्रसिद्ध लेखक,अनुवादक,सकाळ वृत्त समूहाचे दिल्लीस्थित सल्लागार संपादक**१९३९:दौलतभाई आयुब खा पठाण-- कवी, लेखक* *१९३८:पंडित हरिप्रसाद चौरसिया – बासरीवादक,पद्मविभूषण**१९३७:शामराव गोविंदराव लाघवे-- लेखक* *_१९१३:वसंतराव नाईक – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री,रोजगार हमी योजनेचे जनक,हरित क्रांतीचे प्रणेते राज्यात १९७२ साली पडलेल्या भीषण दुष्काळाला त्यांनी समर्थपणे तोंड दिले. राज्याला स्थैर्य दिले.रोजगार हमी योजना महाराष्ट्रात सुरू केली आणि नंतर ती देशपातळीवरही सुरू करण्यात आली  (मृत्यू:१८ऑगस्ट १९७९)_**१९०७:प्रा.पा.कृ.सावळापूरकर -- लेखक,जुन्या पिढीतील संशोधक (मृत्यू:२७ फेब्रुवारी १९९५)**१८८७:कविवर्य एकनाथ पांडुरंग रेंदाळकर (मृत्यू:१९२०)**_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९९४:राजाभाऊ नातू – दिग्दर्शक, नेपथ्यकार,प्रकाशयोजक व नाट्य संघटक* *१९८९:प्राचार्य गणेश हरी पाटील – कवी, शिक्षणतज्ञ,बालगीतकार (जन्म:१९ आगस्ट १९०६)**१९६९:मुरलीधरबुवा निजामपूरकर – कीर्तनकार**१९६२:पुरुषोत्तम दास टंडन – स्वातंत्र्यसेनानी,भारतरत्‍न (१९६१), राष्ट्रभाषा हिन्दीचे समर्थक, (जन्म:१ ऑगस्ट १८८२)**१९३८:गणेश श्रीकृष्ण तथा 'दादासाहेब’ खापर्डे – प्रख्यात कायदेपंडित, विद्वान आणि राजकीय नेते,’वर्‍हाडचे नबाब’ (जन्म:२७ ऑगस्ट १८५४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लघुकथा - एक तारीख*गौरी आणि शंकर यांचा सुखाचा असा संसार होता. ना कोणाची कटकट ना कोणाची झिकझिक. महिन्याच्या एक तारखेला पगार झाला की शंकर घरी परत येत असताना बायकोसाठी गजरा घ्यायचा, लेकरांसाठी काही तरी खाऊ घ्यायचा आणि स्वतःसाठी .................. पूर्ण कथा वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्याच्या मुख्य सचिव पदी पहिल्या महिला अधिकारी सुजाता सौनिक यांची नियुक्ती *•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *भुशी धरणावर पर्यटनासाठी गेलेले ५ जण गेले वाहून त्यात ४ मुलं आणि एका महिलेचा समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नवीमुबंईतील बेलापूर व्हीलेज स्मार्ट होणार – आ. मंदा म्हात्रे*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *ओबीसी बांधवानो शांतता बाळगा – मनोज जरांगे यांचे आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *आरोग्य वारीच्या माध्यमातून वारकऱ्यांना पुणे ते पंढरपूर आरोग्य सुविधा पुरवण्यात येणार, महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे आणि रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत शुभारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *विराट कोहली आणि रोहित शर्मा पाठोपाठ रवींद्र जडेजानं देखील टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची केली घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *द. आफ्रिकेला 7 धावाने हरवून भारताने T20 वर्ल्ड कप केले आपल्या नावावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *ढगांचं बारसं कोणी केलं ?* 📙 *************************मे १७८३ पासून त्या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यापर्यंत बहुसंख्य युरोपीय देशांच्या आकाशात एक विलक्षण दृश्य पाहायला मिळत होतं. आईसलँडमधील एल्डेयार इथं तसंच जपानमधील असामा यामा इथं ज्वालामुखींचे उद्रेक झाले होते. त्यातून बाहेर पडलेली राख आणि राळ यांचं मिश्रण साऱ्या उत्तर गोलार्धामधील आकाशात पसरलेलं होतं. त्या दृश्यानं अनेकांना विस्मयचकित केलं होतं. कलाकारांनी त्याची चित्रं रंगवली होती. नियमित रोजनिशी लिहिणाऱ्यांनी त्याची तपशीलवार वर्णनं नोंदवून ठेवली होती. साहित्यिकांनी आपल्या कथा कादंबऱ्यांसाठी त्या आकाशदर्शनाची पार्श्वभूमी वापरली होती. त्यात भर पडली ती १८ ऑगस्टच्या रात्री एक धगधगता तेजस्वी अशनी त्या आकाशात चमकून गेला तेव्हा. सर्वांच्याच डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या त्या दृश्यानं एका अकरा वर्षांच्या मुलाच्या मनावर कायमची मोहिनी घातली नसती तरच नवल. त्या दिवसांपासून ल्युक हार्वर्डला आकाशदर्शनाचा छंद जडला. वास्तविक पुढील आयुष्यात त्यानं खगोलशास्त्राचा व्यवसाय म्हणून स्वीकार केला नव्हता वा त्या विषयाचा अभ्यासही केला नव्हता. वनस्पतीशास्त्रातली पदवी त्यानं मिळवली होती. तरीही आकाशदर्शनाचं त्याचं वेड काही कमी झालं नाही.त्याच सुमारास डेन्मार्कमधील वनस्पतीशास्त्रज्ञ कार्ल लिनायस यानं वनस्पतीचं वर्गीकरण करणारी एक प्रणाली विकसित केली होती. ती सर्वत्र गाजली होती. आजतागायत त्याच प्रणालीचा वापर होतो आहे. तरुण ल्युकवरही त्याचा प्रभाव पडला होता. त्या भरात त्यानंही त्या वर्गीकरणामध्ये आपल्या परीनं थोडी भरही घातली होती. वनस्पतीचं वर्गीकरण करता येतं, तर मग आकाशात नेहमीच दिसून येणाऱ्या ढगांचं वर्गीकरण का करता येऊ नये, असा विचार त्याच्या मनात घोळू लागला होता. त्याच सुमारास फ्रेंच वैज्ञानिक ज्याँ बातिस्त लमार्क यानं आकाशात दिसणाऱ्या ढगांची पाच ढोबळ वर्गांमध्ये विभागणी केली होती. तशी ती जुजबीच होती; पण तोवर तसा प्रयत्न कोणीच केला नसल्यानं लमार्कच्या वर्गीकरणालाही मान्यता मिळाली. त्यामुळे ल्युक हाॅवर्डला अधिक प्रोत्साहन मिळालं आहे आणि मग त्यानं अधिक तर्कसंगत अशी आपली प्रणाली सादर केली.त्याने एकंदरीत चार मार्ग प्रतिपादित केले होते. एक *क्युम्युलस* म्हणजे एखाद्या ढिगासारखे दिसणारे, दोन *स्ट्रॅटस* म्हणजे एकावर एक थर असणारे, तीन *सिर्रस* म्हणजे कुरळ्या केसांसारखे वेटोळेदार आणि लांबलचक असणारे आणि चौथे *निम्बस* म्हणजे पाण्याचा साठा असणारे पावसाळी ढग. या चार वर्गांमध्ये संकर होण्याची शक्यताही त्यानं वर्तवली होती. त्यानुसार पावसाळी पण ढिगासारखे असणारे ते *क्युम्युलोनिम्बस* कुरळ्या केसांचे थरावर थर असणारे सिर्रोस्ट्रॅटस वगैरे. अठराव्या शतकाची अखेर होता होता हाॅवर्डच्या या वर्गीकरणाला सर्व स्तरांमधून विस्तृत मान्यता मिळत गेली. आजही यांच वर्गीकरणाचा वापर केला जात आहे. ढगांचे गुणधर्मही या वर्गीकरणातून प्रतीत होतात याचीही प्रचिती आता मिळालेली असल्यामुळे तर या वर्गीकरणावर शिक्कामोर्तबच झाले आहे. म्हणून ल्युक हॉवर्डलाच ढगांचं बारसं केल्याचं श्रेय द्यायला हवं.*बाळ फोंडके यांच्या 'कोण ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" साथ देणारी माणसं कधी कारण सांगत नाहीत आणि कारण सांगणारी माणसं कधीही साथ देत नाहीत."* *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) टी - २० वर्ल्ड कप - २०२४ चा किताब कोणत्या संघाने जिंकला ?२) टी - २० वर्ल्ड कप - २०२४ च्या अंतिम सामन्याचा 'सामनावीर' कोण ?३) टी - २० वर्ल्ड कप - २०२४ चा 'मालिकावीर'चा किताब कोणी जिंकला ?४) टी - २० चा वर्ल्ड कप भारताने कितव्यांदा जिंकला ?५) टी - २० वर्ल्ड कप - २०२४ चा उपविजेता संघ कोणता ? *उत्तरे :-* १) भारत २) विराट कोहली ३) जसप्रीत बुमराह ४) दुसऱ्यांदा ५) दक्षिण आफ्रिका*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 श्रीमती प्रमिला सेनकुडे, उपक्रमशील शिक्षिका, हदगाव👤 लक्ष्मणराव मुपडे, शिक्षक, धर्माबाद👤 श्री. मोहन पवार, राळेगाव जि. यवतमाळ👤 गजानन कवळे, शिक्षक, उमरी👤 विशाल कन्हेरकर, साहित्यिक👤 श्रीकांत चरलेवार, मुख्याध्यापक, धर्माबाद👤 मारोती कांडले, शिक्षक, किनवट👤 पंढरीनाथ खांड्रे, करखेली👤 बालाजी भगनूरे, शिक्षक, देगलूर👤 दिगंबर नागलवाड, शिक्षक, उमरी👤 डॉ. हनुमंत भोपाळे, समुपदेशक, नांदेड👤 भूमन्ना अबुलकोड, विमा प्रतिनिधी, धर्माबाद👤 नागोराव रायकोड, धर्माबाद👤 विलास नंदूरकर👤 मधुसूदन पांचाळ, शिक्षक, धर्माबाद👤 विजय निलंगेकर, पत्रकार तथा गायक, नांदेड👤 सय्यद इलियास जुक्कलकर, देगलूर👤 व्यंकटेश बतुलवार, शिक्षक, धर्माबाद👤 तुकाराम मुंगरे, मुख्याध्यापक, नांदेड👤 संजीव वाठोरे, शिक्षक, नांदेड👤 हणमंतु देसाई, संपादक, धर्माबाद👤 मोरेश्वर गायधने, शिक्षक, भंडारा👤 रघुनाथ नोरलावार, धर्माबाद👤 चंद्रकांत कदम, शिक्षक तथा कवी, नांदेड👤 बाबासाहेब डोळे👤 मारोती आर. भुसेवार👤 राजू पांचाळ👤 बालाजी भाऊराव डाके पाटील👤 अशोक तुळशीराम कांबळे, सेवानिवृत्त शिक्षक, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बड़ा हुआ तो क्या हुआजैसे पेड़ खजूर। पंथी को छाया नहींफल लागे अति दूर।।(अर्थ-  जिस प्रकार खजूर का पेड़ इतना ऊंचा होने के बावजूद आते-जाते राही को छाया नहीं दे सकता है और उसके फल तो इतने ऊपर लगते हैं कि आसानी से तोड़े भी नहीं जा सकते हैं। उसी प्रकार आप कितने भी बड़े आदमी क्यों न बन जाए लेकिन आपके अंदर विनम्रता नहीं है और किसी की मदद नहीं करते हैं तो आपका बड़ा होने का कोई अर्थ नहीं है।)।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समोरासमोर उभे राहून सत्य बोलण्याची, सत्य ऐकण्याची किंवा सत्य वाचण्याची ज्याच्यात हिंमत नसते. तीच व्यक्ती मागे राहून पाठीवर वार करण्यासाठी नेहमीच तरबेज असते. मग ते कशाच्याही माध्यमातून का असेना ? त्याला ते कार्य पूर्ण केल्याशिवाय चैन पडत नाही. असेही काही बोलते, चालते माणसे समाजात असतात. ते मुक्या प्राण्यांपेक्षा सुद्धा घातक असतात. त्यांना कधीही घाबरू नये. तसेच याच समाजात सुद्धा काही चांगलेही माणसं असतात ज्याच्याच खरी सत्यता असते. तीच व्यक्ती, सत्याला समर्पित असते अशा व्यक्तीच्या कायम सहवासात रहावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वकष्टाची प्रचिती मौलिक*एक श्रमिक होता. तो पर्वतावर दगड फोडत होता. फोडता फोडता त्याच्या मनात विचार आला. श्रम कमी आणि दाम भरपूर असा काही जीवनाचा मार्ग सापडला तर! डोंगरावर एक देवाची मूर्ती होती तिची तो रोज त्यासाठी पूजा, प्रार्थना करू लागला. त्याचा काही फायदा झाला नाही, या देवापेक्षाही श्रेष्ठ देवतांची पूजा करावी, असे त्याला वाटू लागले. आकाशात त्याने सूर्य पहिला. सूर्याची तो उपासना करू लागला. एके दिवशी त्याच्या लक्षात आले की, सूर्याला ढग झाकून टाकू शकतात,मग ढगाची आराधना करू लागला. त्यानंतर त्याच्या पाहण्यात असे आले की ढग पर्वताने अडवले जातात आणि पाऊस पडतो, पाऊस श्रेष्ठ असे त्याला वाटू लागले. परंतु पाऊस पडल्यानंतरही पर्वतावरचे दगड जसेच्या तसे असतात ते  फोडण्याची शक्ती त्याच्यात नाही. ती शक्ती माझ्यात आहे. तेव्हा श्रमिकच सर्वात श्रेष्ठ! मला स्वतःलाच पुरुषार्थ जागवून महान बनले पाहिजे, याची त्याला जाणीव झाली. आत्मबल, आत्मश्रद्धा व् आत्मजागृती यांच्यामुळे पुरुषार्थाची प्रेरणा  लाभते.  पुरुषार्थ प्राप्त झालेला मनुष्य दुःखाला, संकटाला घाबरत नाही. सुखासाठी अधीर उतावळा बनत नाही*तात्पर्य* :- श्रमाचे, प्रयत्नाचे जीवन जगणे ही मनुष्य जीवनाची सार्थकता आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment