✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 10 मार्च 2025💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://chat.whatsapp.com/DaK0QvLfzbe6E1coFTHAsC••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🛟 *_केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF) स्थापना दिवस_*••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🛟 *_ या वर्षातील ६९ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🛟 *_महत्त्वाच्या घटना:_* 🛟••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९८: भारतीय ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याला लिनारेस सुपर ग्रँडमास्टर बुद्धीबळ स्पर्धेत विजेतेपद**१९७७: सूर्यमालेतील युरेनस ग्रहाला शनीसारखी कडी असल्याचा शोध लागला.**१९७२: वेलकम थिएटर निर्मित, विजय तेंडुलकर लिखित व कमलाकर सारंग दिग्दर्शित ’सखाराम बाईंडर’ या नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर येथे झाला.**१९५२: केंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगीळ यांच्या हस्ते पिंपरी येथील हिंदुस्थान अ‍ॅंटिबायोटिक्स या पेनिसिलीन कारखान्याचा पायाभरणी समारंभ झाला**१९२२: प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल महात्मा गांधींना शिक्षा झाली.**१९१५: गांधीजींनी शांतिनिकेतन मध्ये स्वावलंबनाचे धडे सुरू केले* 🛟 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🛟 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९६: मंगेश गंगाधर सावंत -- कवी* *१९९४: गायत्री दातार -- मराठी टेलिव्हिजन अभिनेत्री**१९९३: प्रनूतन मोहनीस बहल -- अभिनेत्री* *१९९०: प्रितम सोन्याबापू पवळ(प्रेमकवी)-- प्रसिद्ध कवी, पत्रकार* *१९८७: चिराग संदीप पाटील -- अभिनेता**१९८६: गुलाब रमेश बिसेन -- लेखक**१९८२: कृष्णा प्रल्हाद शिंदे -- कवी**१९८१: प्रा. डॉ. सुधाकर पंडितराव बोथीकर -- लेखक**१९८१: सतीश दराडे -- मराठीचे प्रसिद्ध कवी आणि गझलकार (मृत्यू: ८ सप्टेंबर २०२४ )**१९७९: उत्तम भास्कर चारोस्कर -- लेखक**१९७८: चिन्मय कोल्हटकर -- हार्मोनियम वादक आणि संगीतकार*. *१९७७: शिल्पा तुळसकर --- मराठी आणि हिंदी चित्रपट तसेच दूरचित्रवाणी अभिनेत्री* *१९७६: रमेश शिवाजी इंगवले -- कवी* *१९७५: अजित परब -- भारतीय संगीत दिग्दर्शक आणि संगीतकार* *१९७४: प्रा. डॉ. घ.ना.पांचाळ -- कवी**१९७४: वीरभद्र गणपती मिरेवाड -- कवी लेखक* *१९७२: किरण विश्वनाथ भावसार -- कवी, बालसाहित्यिक**१९६६: संदिपान एकनाथ पवार -- कवी, लेखक**१९६६: डॉ. मुरारी सोपानराव काळे -- लेखक* *१९६४: प्रा. डॉ. विद्याधर देवदास बन्सोड -- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९५८: राजाराम सूर्यवंशी -- लेखक**१९५४: सदानंद भणगे -- प्रसिद्ध मराठी लेखक**१९५२: प्रा. अशोक बागवे -- मराठी भाषेतील सुप्रसिद्ध कवी, गीतकार लेखक* *१९४९: पदमा खन्ना -- भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना* *१९४९: न्यायमूर्ति हेमंत लक्ष्मण गोखले -- पूर्व मुख्य न्यायाधीश**१९४९: मनोहर सदाशिव नाईक -- लेखक व्याख्याते (मृत्यू: १९ ऑक्टोबर २०२० )**१९४५: माधवराव शिवाजीराव शिंदे – केन्द्रीय रेल्वे मंत्री, नागरी हवाई वाहतूक मंत्री, काँग्रेसचे नेते व ग्वाल्हेरच्या राजघराण्याचे वंशज (मृत्यू: ३० सप्टेंबर २००१ )**१९४४: स्वाती बाळकृष्ण सामक -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका* *१९३९: असगरअली इंजिनिअर -- ज्येष्ठ लेखक प्रख्यात विचारवंत (मृत्यू: १४ मे २०१३ )* *१९३६:अ‍ॅड. सूर्यकांत जागोबाजी डोंगरे -- महाराष्ट्र विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते ( मृत्यू: १९ जुलै २०१४ )**१९२९: कविवर्य मंगेश पाडगावकर -- मराठीतील नामवंत कवी (मृत्यू: ३० डिसेंबर २०१५ )**१९२६: सखाराम कृष्ण देवधर -- ज्ञानेश्वरीचे अभ्यासक (मृत्यू: ४ जानेवारी १९९७ )**१९१८: ’स्वरराज’ छोटा गंधर्व (मृत्यू: ३१ डिसेंबर १९९७ )**१९१६: शरदचंद्र गोपाळराव टोंगो -- विदर्भातील लेखक तसेच पत्रकार (मृत्यू: ५ नोव्हेंबर २००९ )* *१९१३: माधव गोपाळ देशमुख -- समीक्षक( मृत्यू: २४ जून १९७१ )**१९१०: मोहंमद सादिक -- ब्रिटिशकालीन भारतातले हिंदी चित्रपट दिग्दर्शक(मृत्यू: ३ ऑक्टोबर १९७१ )**१९०४: रघुनाथशास्त्री गोपाळ कोकजे-- लेखक (मृत्यू: १९७६ )**१८७१: नारायण दाजीबा वाडेगावकर -- संस्कृत, व्याकरणशास्त्राचे भाष्यकार (मृत्यू: १२ फेब्रुवारी १९५० )**१८६३: सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) – बडोद्याचे महाराज,सुधारणावादी संस्थानिक, पडदा पद्धती,विधवा विवाहाला संमती दिली.(मृत्यू: ६ फेब्रुवारी १९३९ )*🛟 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🛟 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३: श्रीकृष्ण बेडेकर -- ज्येष्ठ पत्रकार, लेखक संपादक (जन्म: ६ डिसेंबर १९४४ )* *_१९९९: विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ 'कुसुमाग्रज' – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, कवी व नाटककार (जन्म: २७ फेब्रुवारी १९१२ )_**१९९०: प्रा. बा. र. देवधर -- संगीत तज्ज्ञ, गुरुवर्य (जन्म: ११ सप्टेंबर १९०१ )* *१९८५: कॉन्स्टंटिन चेरेनेन्को – सोविएत रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सचिव (जन्म: २४ सप्टेंबर १९११ )**१९८४: इंदर सेन जोहर(आयएस जोहर) -- भारतीय अभिनेता, लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक (जन्म: १६ फेब्रुवारी १९२० )* *१९७१: सीताराम पुरुषोत्तम तथा कर्मवीर अप्पासाहेब पटवर्धन – कोकण गांधी (जन्म: ४ नोव्हेंबर १८९४ )**१९५९: बॅ. मुकुंद रामराव जयकर – कायदेपंडित, पं.मोतीलाल नेहरूंचे सहकारी, संसदपटू आणि पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू (जन्म: १३ नोव्हेंबर १८७३ )**_१८९७: सावित्रीबाई फुले –भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री, भारतातील पहिल्या महिला शिक्षिका (जन्म: ३ जानेवारी १८३१ )_**१८७२: जोसेफ मॅझिनी – इटालियन स्वातंत्र्यवीर (जन्म: २२ जून १८०५ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*फ्रेश मॉर्निंग बुलेटिन* समुहात join..... होण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट, २ कोटी ५२ लाख महिलांना हप्त्याचे वाटप*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *दिल्लीत पहिले ब्राह्मण भवन आणि वसतिगृह, गुढीपाडव्याला होणार समाजार्पण; 500 विद्यार्थ्यांसाठी राहण्याची सोय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *देशात पहिलं विवाहपूर्व समुपदेशन व संवाद केंद्र नाशिक मध्ये सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कुंभमेळ्यात खादी उत्पादनाची विक्रमी विक्री, 12 कोटीपेक्षा अधिक व्यवसाय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबई - राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मसूर डाळीवर 10 टक्के आयात शुल्क लागू, पिवळ्या वाटण्यास मुदतवाढ - केंद्र सरकारचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अंतिम सामन्यात न्यूझीलंडला 4 विकेट्स ने हरवून भारताने ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, कर्णधार रोहित शर्मा ठरला मॅन ऑफ दि मॅच*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   👤 दत्तप्रसाद पांडागळे, नांदेड जिल्हाध्यक्ष, शिक्षक परिषद👤 शिवराज विठ्ठल सावंत, शिक्षक, सिंधुदुर्ग👤 वीरभद्र मिरेवाड, शिक्षक तथा कवी,नायगाव👤 तुळशीराम सिरमलवार, शिक्षक, धर्माबाद👤 विठ्ठल नवाथे, शिक्षक, बिलोली👤 नागनाथ लाड, शिक्षक, कुंडलवाडी👤 गायत्री यनगंदलवार, शिक्षिका, धर्माबाद👤 साईनाथ शिरपुरे, भाजपा कार्यकर्ते, धर्माबाद👤 शिवप्रसाद जाधव👤 माधव आप्पा पडोळे👤 ऍड. शिवाजी जाधव👤 रमेश यंगे👤 संतोष पवार👤 उमाकांत बनगडकर👤 पवन पाटील ढगे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  ⚧🍃  *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 13*बत्तीस सैनिक तुटून पडतात**बारीक तुकड्यात पाणी मिसळते**एक महाराणी मात्र मजेत**आस्वाद त्यांचा आनंदाने घेते*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - दात••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अज्ञान , आळस आणि अंधश्रद्धा या तीन गोष्टीमुळे माणसाची अधोगती होते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) खाजगी क्षेत्रातील फेडरल बँकेने कोणाला पहिले 'ब्रँड ॲम्बेसेडर' नियुक्त केले आहे ?२) जगात सर्वात जास्त खजूर कोणत्या देशात पिकतो ?३) बीड जिल्ह्यातील कोणते गाव पूर्वी मोमिनाबाद म्हणून ओळखले जाई ?४) 'क्षय' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) 'जहागीर आर्ट गॅलरी' कोणत्या शहरात आहे ? *उत्तरे :-* १) विद्या बालन, अभिनेत्री २) इजिप्त ३) अंबाजोगाई ४) झीज, ऱ्हास ५) मुंबई*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *टेस्ट ट्युब बेबी म्हणजे काय ?* 📙**************************गर्भाशयाबाहेर कृत्रिम गर्भधारणा घडवुन आणल्याने वंध्यत्व असलेल्या बर्‍याच स्त्रियांना व त्यांच्या कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. कृत्रिम गर्भधारणा होऊन मुल जन्माला आले ते सर्वप्रथम इंग्लंडमध्ये. १९७८ मध्ये इंग्लंड येथे एडवर्ड आणि स्टेप्टो यांनी कृत्रिम गर्भधारणेने मुल जन्मल्याची माहिती जगाला दिली. १९८६ पर्यंत जगात ११००० मातांमध्ये यापद्धतीने गर्भधारणा झाली होती. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अशा पद्धतीने जन्माला येणार्‍या मुलांना टेस्ट ट्युब बेबी असे म्हटले जाते. या पद्धतीत काय करतात ते अाता पाहु. सर्वप्रथम स्त्रीच्या बिजांडातुन बीज काढले जाते. तिच्या पतीच्या शुक्राणुबरोबर नियंत्रित अशा प्रयोगशाळेतील परिस्थितीत त्या बीजाचा संयोग घडवुन आणला जातो. नंतर हे फलन झालेले अंडे स्त्रीच्या गर्भाशयात सोडले जाते. तेथे ते रुजते व त्यानंतर नैसर्गिकरीत्या जशी वाढ होते, त्याप्रमाणेच गर्भाची वाढ होते. प्रसूतीही नेहमीप्रमाणे होते. मूल ९ महिने ९ दिवस परीक्षानळीत वाढत नाही; हे आता तुमच्या लक्षात आले असेलच.मासिक पाळीच्या चक्रात बीजांडातुन स्त्रीबीज बाहेर येते. ते गर्भाशयाच्या दोन नलिकांद्वारे ओढुन घेतले जाते. नंतर या नलिकांमध्ये शुक्राणु व स्त्रिबीज यांचे मिलन होते. या नलिका जर रोगग्रस्त वा खराब झालेल्या असतील, तर स्त्रीला वंध्यत्व येते. अशा वंध्यत्वात टेस्ट ट्युब बेबी या पद्धतीचा खुपच उपयोग होतो व मातृत्वाला पारख्या होणार्‍या स्त्रियाही मुलाला जन्म देऊ शकतात.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुझ्या पायीं चित्त रंगलेसें माझें । नाहीं केशिराजें ऐसें केलें ॥१॥ उठवितां काय होईल संतोष । मज अभाग्यास मोकलीलें ॥२॥ प्रपंच कावाडी न घाली मज दृढ । नको वाडें कोड झणीं देवा ॥३॥ नामा म्हणे भावें विनंति समस्तां । नको भंगू आतां प्रेमपान्हा ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण करत असलेल्या नि:स्वार्थ  कार्याविषयी  व परखडपणे मत व्यक्त करताना  आपल्या मागे, पुढे निंदा, चुगली,टिंगल, टवाळी होत असेल  किंवा आपल्यावर मोठ्याने हसत असतील तर तो, आपल्यासाठी आशीर्वाद समजावा. कारण ते, सर्व कार्य करण्याची तसेच  ह्या फालतू गोष्टी  कडे लक्ष न देण्याची  आपल्याला योग्य ती कला जमलेली  असते. आणि  एका अर्थाने बघितले तर..ते काम पाहिजे  तेवढे  सोपे नाही. आणि ती कला प्रत्येकाला  जमेलच  असेही नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *चोर आणि राजा*गौतम बुद्धा सोबत एक लहान मुलगा बसलेला असतांना त्यावेळेस तिथून एका चोराला काही शिपाई पकडून नेत होते, त्या मुलाने गौतम बुद्धाना विचारले "तो कोण आहे आणि त्याच्या भोवती शिपाई का आहेत?" बुद्ध म्हणाले"तो चोर आहे, त्याला पकडले आहे, त्याला आता शिक्षा होईल व तो तुरुंगात जाईल". थोड्या वेळा नंतर त्या नगरीचा राजा येत होता आणि त्याच्या भोवती पण शिपाई होते, त्यावेळेस मुलगा लगेच गौतम बुद्धानां म्हणाला " तो बघा आजून एक चोर आला", गौतम बुद्ध म्हणाले "तो राजा आहे." मुलगा गौतम बुद्धाना म्हणाला "काय फरक आहे? राजा भोवती पण शिपाई आहे आणि चोरा भोवती पण शिपाई आहे." गौतम बुद्ध म्हणाले "जमीन आसमानचा फरक आहे, त्या चोराच्या भोवती जे शिपाई होते त्यांच्या ताब्यात तो चोर होता, त्याला काहीही करायचे स्वतंत्र नाही, जिकडे नेतील तिकडे जायचं, जिथे ठेवतील तिथे राहायचे, देतील ते खायचं, त्याला स्वतच्या मनाच काहीच करता येत नाही." राजाच्या भोवती जे शिपाई आहेत ते राजाच्या ताब्यात आहेत, राजा सांगेन तिकडे नेतील, जे सांगणार ते करणार, राजा बोलला कि तुम्ही जा मला एकटे राहू देत, राजा मुक्त आहे." "आपले मन, आपल्या भावना आणि आपले विकार हे शिपाई आहेत', आपण त्यांच्या ताब्यात असलो तर आपण 'चोर' आहोत, ते आपल्या ताब्यात असले तर आपण 'राजा' आहोत. निवड तुमची आहे."•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment