✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 17/02/2023💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :- १९९६ - महासंगणक डीप ब्ल्यू बुद्धिबळात गॅरी कास्पारोव्हकडून पराभूत.१९२७ : ’रणदुंदुभि’ नाटकाचा पहिला प्रयोग झाला.💥 जन्म :-१८१७ - विल्यम तिसरा, नेदरलँड्सचा राजा.१८९९ - बंगालचे प्रसिद्ध कवी जीवनानंद दास१९५४: तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चन्द्रशेखर राव 💥 मृत्यू :- १८८१: लहुजी राघोजी साळवे ऊर्फ ’लहुजी वस्ताद’ – क्रांतीवीर, समाजसेवक१८८३ - क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके१९६८: मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कैलाश नाथ काटजू १९७८: पुरुषोत्तम शिवराम रेगे – कादंबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक१९८६ - जे. कृष्णमूर्ती, भारतीय तत्त्वज्ञ *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिक्षक अधिवेशनात घोषणा; जुन्या पेन्शन योजनेवरही शिक्षण विभाग काम करत असल्याची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *विद्यापीठातील महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा एकदिवसीय लाक्षणिक संप, मागण्या पूर्ण न झाल्यास बेमुदत संपाचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *बंगळुरु जगातील दुसरं सर्वाधिक वाहतूक कोंडीचं शहर, तर पुणे सहाव्या क्रमांकावर; टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सची यादी जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *उस्मानाबादचं नामांतर 'धाराशिव' करण्यास हरकत नाही, मात्र औरंगाबादचा विचार सुरु; केंद्र सरकारची न्यायालयात माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *एसटी कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगार 24 तासात होण्याची शक्यता, एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी सरकारकडून 223 कोटी रुपये*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला, पुढील तारीख मात्र अद्याप निश्चित नाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मध्ये आजपासून भारत वि. ऑस्ट्रेलिया मध्ये दिल्लीत दुसरा कसोटी सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हर हर महादेव ! भारतातील 12 ज्योर्तिलिंगाचं घरबसल्या दर्शन.. खालील लिंकवरhttps://marathi.abplive.com/photo-gallery/news/india-mahashivratri-2023-12-jyotirlingas-in-india-twelve-jyotirlinga-images-with-name-and-place-1152141शनिवार, 18 फेब्रुवारी 2023 रोजी महाशिवरात्रीचा उत्सव संपूर्ण भारतात साजरा केला जाणार आहे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *आपले नशीब आपल्या हाती*वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/12.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/BgjVNBSFkuE~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जेंव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची..! *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतातील पहिला माळढोक पक्ष्यासाठी प्रजनन केंद्र कोठे सुरू करण्यात येणार आहे ?२) खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेचे थीम काय आहे ?३) ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आदर्श गावाचे नाव काय आहे ?४) शालेय पोषण आहार योजना केव्हा सुरू झाली ?५) भारतात प्रथमच कोणत्या ठिकाणी लिथियमचा साठा सापडलेला आहे ?*उत्तरे :-* १) जैसलमेर, राजस्थान २) हिंदुस्थान का दिल धडका दो ३) राळेगण सिद्धी ४) २२ नोव्हेंबर १९९५ ५) रियासी जिल्हा, जम्मू काश्मीर*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुनील सामंत, ई साहित्य प्रकाशन, पुणे👤 साईनाथ अवधूतवार, धर्माबाद👤 रविकिरण एडके👤 विकास गायकवाड👤 लक्ष्मण गंगाराम होरके*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना प्रार्थना तूजला एक आहे। रघूराज थक्कीत होऊनि पाहे॥ अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे। मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥३८॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*प्रत्येकालाच वाटतं की, माझ्यावर कुणीतरी प्रेम करावं, आपल्याशी चांगले संबंध ठेवावेत ; परंतु आपल्यावर प्रेम करणारं कुणीच नाही असं जेव्हा आपल्याला कळायला लागतं तेव्हा थोडा तुम्ही तुमच्याच मनाला एकांतात प्रश्न विचारा की, असं काय झालं की, मला आपुलकीनं विचारणारी, माझ्यावर प्रेम करणारी माणसं मला का भेटत नाहीत ? याचं उत्तर तुम्हाला तुमचं मनच देऊ शकेल. मग मनच सांगायला लागेल की, तू तुझ्या आतल्या अंतःकरणात डोकावून पहा.**आपण जर थोडा स्वार्थ सोडला आणि इतरांना आपलसं केलं, त्यांच्याशी आपुलकीचं नातं जोडलं, त्यांच्याशी प्रेमानं नातं जोडून त्यांच्या सुखदुःखाशी जवळीकता साधली आणि निस्वार्थपणे त्यांच्याशी प्रामाणिकपणे व्यवहार केला तर सारेच आपल्यावर प्रेम करायला लागतील. हे जेव्हा तुमच्या मनाला पटेल तेव्हा सारेच लोक तुमच्यावरही प्रेम करायला लागतील. तुमचा तो एकाकीपणाही दूर होईल, संबंधही दृढ होतील आणि नातेही अगदी घट्ट व्हायला लागतील यात शंका येण्याचे कारणही राहणार नाही.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••इतरांना त्रास देऊन जर आपण आपले जीवन चांगल्याप्रकारे जगू म्हटले तर ते अयोग्यच आहे.कारण त्यांनी परिश्रमातून जे काही मिळवलेले असते ते गुण्यागोविंदाने जगण्याचे स्वप्न साकारत असतात.हे त्यांचे बघवत नाही आणि आपल्याने होत नाही म्हणून इतरांना त्रास देऊन त्यांचे सुख हिरावून घेणे हे वामवृत्तीचे लक्षणच म्हणावे.त्यामध्ये आपण सुखी होऊ शकतो का ? आपल्या बाबतीत इतरांनी असे केले तर आपणास कसे वाटेल ? ते आपल्या मनाला समाधान देते का ? ह्या सा-या गोष्टीचा आपण विचार केला तर नक्कीच त्याचे उत्तर सापडेल आणि पुन्हा आपण ती चूक करणार नाही याची नक्कीच जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.इतरांच्याही सुखस्वप्नात आपणही सहभागी व्हावे हाच आपला माणुसकीचा खरा धर्म आहे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*इमानदारीचं फळ*सकाळची वेळ.शिल्पाने भाजीबाजाराच्या कडेला गाडी लावायला ड्रायव्हरला सागितलं आणि गाडीतून उतरुन ती एका भाजीच्या गाडीकडे निघाली.तिला असं सकाळी भाजी घ्यायला फार आवडायचं. कलेक्टर झाल्यापासून तिला वेळ फार कमी मिळायचा पण जमेल तेव्हा ती भाजी आणायला निघायची.भाजीच्या गाडीवर एक नऊ-दहा वर्षाची गोड चेहऱ्याची मुलगी बसली होती.भाजी घेऊन शिल्पाने तिला पर्समधून पैसे दिले.तेवढ्यात फोन वाजला तशी मोबाईलवर बोलता बोलता ती आपल्या गाडीकडे आली.बोलणं संपल्यावर ती गाडीत बसणार तेवढ्यात तिला मागून कोणीतरी स्पर्श केल्यासारखं जाणवलं.चमकून तिने मागे वळून पाहीलं तर भाजीवाली मुलगी उभी होती."काय झालं?पैसे तर दिलेना मी तुला?"त्यामुलीने काही न बोलता पर्स पुढे केली."तुमची पर्स.गाडीवर राहीली होती."शिल्पाने ती पर्स हातात घेऊन पाहीली.पैसे,क्रेडिट कार्ड्स, बँकेचे कार्ड्स जागच्या जागी होती.तिला त्या मुलीच्या इमानदारीचं कौतुक वाटलं."थँक्स बेटा.काय नाव तुझं?""सोनाली"तेवढ्यात फोन वाजला आणि शिल्पा बोलता बोलता गाडीत बसली.त्या मुलीने दुर जाणाऱ्या गाडीकडे क्षणभर बघितलं आणि मग ती आपल्या भाजीच्या गाडीकडे निघाली.संध्याकाळी आँफिसमधून परत आल्यावर चहाचे घोट घेता घेता शिल्पाला त्या भाजीवाल्या मुलीची आठवण झाली आणि दुसऱ्या क्षणाला तिला तिचा भुतकाळ आठवला.होय असंच तर घडलं होतं तिच्याबाबतीत! आणि तिच्या इमानदारीचं जे बक्षीस मिळालं होतं त्यामुळेच तर ती इथपर्यंत पोहोचली होती.सगळा जीवनपट शिल्पाच्या डोळ्यासमोरुन सरकू लागला. अठरा वर्षांपुर्वीची ती गोष्ट.शिल्पा तेव्हा पाचवीत होती.दुपारची वेळ.शाळा आटोपून शिल्पा आपल्या घराकडे चालली होती.चालता चालता अचानक तिला आपल्या पायाने काहीतरी उडाल्याचं जाणवलं.पुढे जाऊन पहाते तर एक पाकिट पडलेलं दिसलं.उत्सुकतेने तिने ते उचललं आणि उघडून पाहीलं.नोटांनी गच्च भरलेलं होतं ते पाकिट.तिचं ह्रदय धडधडू लागलं.आजच शाळेत बाई सांगत होत्या.ईमानदारीचं फळ गोड असतं म्हणून!ते पाकिट तिथंच टाकून द्यावं असं तिला वाटू लागलं.काय करावं काय नाही या संभ्रमात तिनं आजुबाजुला पाहीलं.एक माणूस आपल्या आलिशान कारला टेकून फोनवर बोलत होता.नक्कीच!नक्की त्याचंच असावं हे पाकिट.शिल्पा विचारातच त्याच्याजवळ पोहोचली.त्याच्या हाताला स्पर्श करुन तिने त्याचं लक्ष वेधून घेतलं."काय आहे?" बोलण्यात व्यत्यय आल्यामुळे त्याने थोडं चिडूनच विचारलं."हे पाकिट तुमचं आहे?"शिल्पाने पाकिट पुढे करत विचारलं.पाकिट पाहून तो चमकला.झटकन त्याचा हात पँटच्या मागच्या खिशाकडे गेला."हो माझंच आहे ते.कुठं सापडलं?""त्या तिथे पडलं होतं" शिल्पा पाकिट सापडलेल्या जागेकडे बोट दाखवत म्हणाली.त्याने पाकिट उघडून पाहीलं.सगळं जागच्या जागी असलेलं पाहून एक दिर्घ निश्वास सोडला.तेवढ्यात मागून दुसऱ्या गाडीचा हाँर्न वाजला.त्या माणसाने पटकन पाकिट खिशात कोंबलं आणि गाडीत बसून गाडी पुढे नेली.शिल्पाही आपल्या रस्त्याने पुढे निघाली.घरी पोहोचतांना शिल्पा खुप आनंदात होतीआपल्या इमानदारीचा तिला अभिमान वाटत होता.घरी जाऊन कधी एकदा आईला ही घटना सांगते असं तिला झालं होतं.ती घरी आली तेव्हा आई चुलीवर पोळ्या करत होती.तिचं ते झोपडीवजा घर धुराने भरलं होतं.शिल्पाने दप्तर एका बाजुला टाकून आईला मोठ्या अभिमानाने झालेली घटना सांगितली.तिला वाटलं आई तिला शाबासकी देईल.पण पोळ्या करणं सोडून आई उठली.शिल्पाला धरुन हातातल्या लाटण्यानेच तिला मारु लागली."कारटे.इथे खायला काही नाहीये आणि तू हातातली लक्ष्मी फेकून दिली.काय गरज होती तुला ते पाकीट परत करायची.टाकून द्यायचं होतं दप्तरात! तुझ्यावर कोणाला संशय आला असता?" बोलता बोलता आई शिल्पाला मारत होती.शिल्पा जोरजोरात रडत होती,आईला 'नको ना मारु आई'अशी विनवण्या करत होती.आईच्या हातातल्या बांगड्या फुटल्या तेव्हाच शिल्पाची सुटका झाली.संध्याकाळी तिचा बाप दारु पिऊन आला.शिल्पाचा रडवेला चेहरा पाहून त्याने काय झालं विचारलं.शिल्पा काही बोलायच्या आतच तिच्या आईने सगळी कहाणी त्याला सांगितली.शिल्पाला वाटलं बाप तरी तिला सहानभुती दाखवेल.पण त्याने तिच्याच दप्तरातील पट्टी काढून तिला मारायला सुरुवात केली.सोबतीला शिव्या होत्याच.शिल्पाला मारणं चालू असतांना तिचा लहान भाऊ एका कोपऱ्यात थरथर कापत रडत होता.इमानदारी दाखवली की काय होतं याची जणू शिकवणच त्याचे आईबाप त्याला देत होते.शिल्पाला मारुन थकल्यावर तिचा बाप दारुच्या नशेत बडबडत बसला.मार खाऊन थकलेली शिल्पा न जेवताच झोपून गेली.दुसऱ्या दिवशी झालेली घटना शिल्पाने शाळेतल्या मैत्रिणींना सागितली.तिच्यासारख्याच झोपडपट्टीत रहाणाऱ्या त्या मुली.त्यांनी शिल्पालाच दोषी ठरवलं. दोन दिवसांनी संध्याकाळी शिल्पा आपल्या झोपडीत ग्रुहपाठ करत असतांना तिला बाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला.पाठोपाठ दारावर टकटक ऐकू आली.तिची आई दार उघडून बाहेर गेली."शिल्पा बाहेर ये.हे कोण आलेत बघ"धडधडत्या छातीने शिल्पा बाहेर आली.समोर एका आलिशान कारजवळ एक माणूस उभा होता.होय.तोच तो माणूस ज्याला तिने पाकिट उचलून दिलं होतं.तिला पाहून तो हसला."हीच ती मुलगी."तो शिल्पाच्या आईला म्हणाला." बेटा त्या दिवशी तुला थँक्यू म्हणायचं आणि तुला बक्षीस द्यायचंही राहून गेलं.बोल काय पाहीजे तुला?"शिल्पा भांबावली.काय बक्षीस मागावं ते तिला कळेना." आईस्क्रीम चालेल?""हो आईस्क्रीम. मला आईस्क्रीम पाहीजे" शिल्पाच्या आधी तिचा बाहेर आलेला भाऊच आनंदाने ओरडला.शिल्पानेही मान डोलावली."चला तर मग.बसा गाडीत"त्या आलिशान गाडीत बसायच्या कल्पनेनेच दोघं हुरळून गेले आणि पटकन गाडीत जाऊन बसले.शिल्पाच्या आईने नाराजीनेच त्यांच्याकडे पाहीलं.या आईस्क्रीम ऐवजी या शेठजीने पाचशे हजार बक्षीस म्हणून दिले असते तर साचलेली उधारी कमी तरी करता आली असती असं तिला वाटून गेलंं.शेठजीने त्या दोघांना अगोदर भेळ,पाणीपुरी खाऊ घातली.मग नंतर पोट भरुन आईस्क्रीम.ते घरी परत आले तेव्हा शिल्पाचा बाप घरात बसला होता.एका मोडक्या खुर्चीवर शेठजी बसले." तुमची मुलगी खुप इमानदार आणि हुशारही आहे.आता गाडीत बसल्या बसल्या मी तिला बरेच प्रश्न विचारले.खुप छान उत्तरं दिलीत तिने.मला वाटतं तुम्ही तिला एखाद्या चांगल्या शाळेत टाकावं"" शेठजी आम्ही बांधकामावर मजुरी करणारी माणसं.आम्हाला ते कसं परवडणार?"शिल्पाचा बाप हात जोडत म्हणाला." तुम्ही काही काळजी करु नका.ते काम माझ्याकडे लागलं.तिच्या सर्व शिक्षणाचा खर्च मी करेन.मात्र एक गोष्ट. तिला या वस्तीवर ठेवता येणार नाही.आपण तिला होस्टेलवर ठेवू.त्याचाही खर्च मीच करेन."शिल्पाच्या बापाला हायसं वाटलं.खाणारं एक तोंड कमी होणार होतं.तो म्हणाला."मग तर आम्हाला काहीच अडचण नाही.पोरीचं भलं होतंय त्यातच आमचं सुख!" शेठजींनी चक्र फिरवली.नगरपालिकेच्या शाळेतून शिल्पा उच्चभ्रूंच्या शाळेत गेली.फाटके कपडे आणि तुटक्या चपलांच्या जागी कोराकरीत युनिफॉर्म आणि चकचकीत बुट आले.नवीकोरी पुस्तकं, आधुनिक स्कुलबँग आली.त्या इंग्लिश बोलणाऱ्या मुलांमध्ये गरीब शिल्पा अवघडून,बावचळून गेली.ती झोपडपट्टीतली आहे हे कळल्यावर बाकीची मुलंमुली तिला टोमणे मारायचे,टिंगलटवाळी करायचे.शिल्पा कोपऱ्यात जाऊन रडत बसायची.हे प्रकार तेव्हाच थांबले जेव्हा वार्षिक परीक्षेत शिल्पा वर्गातून पहीली आली . त्यानंतर शिल्पाने मागे वळून पाहीलं नाही.सातवीत स्काँलरशिप मिळवून तिने शेठजींवरचा आपला भार थोडा हलका केला.दहावीच्या परीक्षेत ती जिल्ह्यात पहीली आली तेव्हा तिच्या आईवडिलांसोबत शेठजींनाही खुप आनंद झाला.एका नामांकित काँलेजमध्ये त्यांनी तिचा प्रवेश करुन दिला.बारावीत तर शिल्पाने कमालच केली.राज्यात ती पहीली आली.ते कळताच शेठजींनी तिला मेडिकल काँलेजमध्ये प्रवेश घेण्याविषयी सुचवलं.पण तिला आय.ए.एस.करायचं होतं.तिचा निर्णय ऐकून शेठजींनी तिला विरोध केला नाही.पदवी मिळवल्यावर शिल्पाने युपीएससीचा अभ्यास सुरु केला.कोणतेही कोचिंग क्लासेस न लावता ती पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाली.एक झोपडपट्टीतील मुलगी कलेक्टर झाली. निकाल कळाल्यावर शेठजी तिला सन्मानाने आपल्या घरी घेऊन गेले.त्यांचा आलिशान बंगला पाहून तिचे डोळे दिपून गेले.बंगल्यापेक्षाही विशाल असलेल्या त्यांच्या मनाने शिल्पा भारावून गेली.शेठजींनी तिची सगळ्या परिवाराशी ओळख करुन दिली.' शिल्पा माझी मुलगीच आहे' असे ते सारखे म्हणत असतांना शिल्पाला अश्रु अनावर होत होते.तिच्या इमानदारीचं केवढं मोठं बक्षीस शेठजींनी तिला दिलं होतं.तिच्या कलेक्टर बनण्याच्या आनंदाप्रित्यर्थ शेठजींनी अख्ख्या झोपडपट्टीला जेवण दिलं.शिल्पाच्या आईवडिलांच्या तर आनंदाला पारावर उरला नव्हता. एक मुलगी शिकली की घरादाराचा स्वर्ग बनवते हे शिल्पाने सिध्द केलं.नोकरीला रुजू झाल्यानंतर एका वर्षातच तिने आईवडिल आणि भावाला झोपडपट्टीतून बाहेर काढून एका चांगल्या घरात हलवलं.भावाला चांगल्या काँलेजमध्ये घातलं.वयस्कर वडिलांना मजूरी सोडायला लावून दुकान उघडून दिलं. सकाळी शिल्पा परत बाहेर निघालेली पाहून तिच्या पोलिस अधिक्षक असलेल्या नवऱ्याला आश्चर्य वाटलं."आज परत सकाळी कुठे ?"त्याने विचारलं."काल माझी पर्स इमानदारीने परत करणाऱ्या त्या मुलीला आयुष्यभराचं बक्षीस द्यायला निघालेय" हे सांगतांना शिल्पाच्या चेहऱ्यावर आनंदासोबतच एक ठाम निश्चय दिसत होता.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment