✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 12 मार्च 2025💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1Y1ueW6qbu/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🛞 *_ या वर्षातील ७१ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🛞 *_महत्त्वाच्या घटना:_* 🛞•••••••••••••••••••••••••••••••••••• *२००१: राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही मूल्ये, सामाजिक आणि आर्थिक विकास या क्षेत्रांतील बहुमोल कामगिरीबद्दल देण्यात येणारा ’यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार’ ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व पर्यावरणवादी नेते सुंदरलाल बहुगुणा यांना प्रदान करण्यात आला**१९९९: सरकारी नोटांवर यापुढे महात्मा गांधींचेच चित्र असेल असा सरकारतर्फे निर्णय घेण्यात आला**१९९९: चेक प्रजासत्ताक, हंगेरी व पोलंड ’नाटो’ (NATO) मधे सामील झाले.**१९९३: मुंबई येथे झालेल्या १२ स्फोटांच्या मालिकेत ३०० हून अधिक जण ठार तर हजारो लोक जखमी**१९९२: स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २४ वर्षांनी ब्रिटिश सत्तेची सर्व जोखडे झुगारुन देऊन मॉरिशस प्रजासत्ताक बनले.**१९८६: केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देऊन शंकराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली**१९६८: मॉरिशस (इंग्लंडपासून) स्वतंत्र झाला**१९५४:साहित्य अकादमीची स्थापना**१९३०: ब्रिटिश सरकारने भारतात तयार केलेल्या मिठावर बसवलेल्या अन्यायकारक करामुळे महात्मा गांधी यांनी २०० मैलाच्या दांडीयात्रेला सुरूवात केली**१९१८: रशियाची राजधानी सेंट पीट्सबर्ग येथून मास्को येथे हलविण्यात आली.**१९१२: कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी लिहीलेल्या ’संगीत मानापमान’ या नाटकाचा पहिला प्रयोग किर्लोस्कर नाटक मंडळीने मुंबईतील रिपन नाट्यगृहात केला.* 🛞 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🛞 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८६: डॉ. राजकुमार बबन शेलार -- लेखक**१९८४: श्रेया घोषाल -- हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची पार्श्वगायिका**१९८२: मनोज कुलकर्णी -- लेखक* *१९८१: अनधा विनय तांबोळी -- कवयित्री, लेखिका**१९८१: बाळासाहेब धोंगडे -- प्रकाशक, संपादक**१९७३: राम पांडुरंग गायकवाड -- कवी* *१९६९: प्रा. कल्याण पांडुरंग राऊत -- कवी* *१९६९: फाल्गुनी पाठक -- भारतीय गायिका आणि संगीतकार**१९६१: डॉ.मालिनी अनिल अंबाडेकर -- कवयित्री* *१९५६: चंदन दास -- लोकप्रिय भारतीय गझल गायक**१९४३: डॉ.अविनाश बिनीवाले -- भाषाभ्यासक आणि बहुभाषाविद् लेखक* *१९४१: प्रा. जवाहर प्रेमराज मुथा -- ज्येष्ठ कवी, प्रसिद्ध लेखक, संपादक**१९४०: डॉ. श्रीकांत वामन चोरघडे -- बालरोगतज्ज्ञ व बालमानसशास्त्रज्ञ, लेखक, संपादक**१९३३: कविता विश्वनाथ नरवणे -- ज्येष्ठ मराठी लेखिका (मृत्यू २८ ऑगस्ट २०२०)**१९२६: सुमन पुरुषोत्तम बेहरे -- लेखिका**१९२३: गजानन रामचंद्र कामत -- मराठी साहित्यिक व हिंदी-मराठी चित्रपटकथालेखक (मृत्यु: ६ ऑक्टोबर २०१५ )**१९१५: डॉ. अ. ना.देशपांडे (अच्चुत नारायण देशपांडे) -- मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचे सिद्धहस्त लेखक वाङ्मयेतिहासकार (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९९० )**१९१३: यशवंतराव चव्हाण – भारताचे ५ वे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९८४ )**१९११: दयानंद बाळकृष्ण ऊर्फ ’भाऊसाहेब’ बांदोडकर – गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे संस्थापक, उद्योगपती (जन्म: १२ ऑगस्ट १९७३ )**१९०४: जगन्नाथ जनार्दन पुरोहित -- महाराष्ट्रातील एक प्रतिभावंत व नामवंत यशस्वी गायक व संगीताचार्य.(मृत्यू: २० ऑक्टोबर१९६८ )* *१८९१: ’नटवर्य’ चिंतामणराव कोल्हटकर – अभिनेते व निर्माते (मृत्यू: २३ नोव्हेंबर १९५९ )**१८२४: गुस्ताव किरचॉफ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: १७ ऑक्टोबर १८८७)* 🛞 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🛞 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: प्रा.मधुकर शंकर वाबगावकर (म.श.)-- लेखक, समीक्षक (जन्म:२३ जानेवारी १९३५ )**२००१: रॉबर्ट लुडलुम – अमेरिकन लेखक (जन्म:२५ मे १९२७)**१९९९: यहुदी मेनुहिन – प्रसिद्ध व्हायोलिनवादक व वाद्यवृंदसंचालक (जन्म: २२ एप्रिल १९१६ )**१९८१: मारुतीराव परब -- भारतीय अभिनेता आणि दिग्दर्शक (जन्म: १२ फेब्रुवारी १९२७ )**१९६०: विठ्ठल वामन हडप -- ऐतिहासिक कादंबरीकार,नाटककार(जन्म: १८ नोव्हेंबर १८९९ )**१९५९: जनार्दन सखाराम करंदीकर -- संपादक (जन्म: १५ फेब्रुवारी १८७५ )**१९४२: रॉबर्ट बॉश – जर्मन अभियंते आणि उद्योजक (जन्म: २३ सप्टेंबर १८६१ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शाळेची वेळ वाढविल्याने गुणवत्ता वाढेल का ?*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *स्त्रियांनी शिक्षणाच्या माध्यमातून आपले अस्तित्व निर्माण करावे, कळवण महाविद्यालयातडॉ. पगार यांचे आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *परीक्षा वेळापत्रकात बदल करण्यात यावा, भंडारा मुख्याध्यापक संघाची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुणे महसूल विभागाची कार्यशाळा, नागरिकांच्या हिताचे निर्णय वेळेत घ्या, तंत्रज्ञानाचा वापर वाढवा - विभागीय आयुक्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अकोला - जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; जि.प.च्या कर्मचाऱ्यांचे घंटानाद आंदोलन:काळ्याफिती लावून निषेध; मिनी मंत्रालयासमोर आंदोलन, 11 मागण्यांचा आग्रह*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *आता प्रार्थना स्थळ, मशिदीवरील भोंग्यावर होणार कारवाई; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा स्पष्ट इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *यावर्षी एप्रिल, मे महिन्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *सरकारने कुस्ती महासंघावरील निलंबन घेतले मागे, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी संघ निवड शक्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संजय भोसले, नांदेड👤 डॉ. प्रशांत मुदकोंडवार, नांदेड👤 किरण सोनटक्के👤 उत्तम सोनकांबळे👤 पार्थ पवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 15*रंग माझा लाल तांबडा**वाघ असो वा कोंबडा**प्रत्येक सजीवात राहतो**शरीराला मी उर्जा देतो*मी कोण ओळखा पाहू उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्ञानाची भूक ही माणसाची मूलभूत गरज आहे , ती माणसास पशू कोटीतून वर काढते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताने कितव्यांदा ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली ?२) ICC चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातील 'सामनावीर'चा किताब कोणी पटकावला ?३) जगात सर्वात जास्त वाघ असणारे प्रथम तीन देश कोणते ?४) 'क्षुधा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) भारतातील व्याघ्र प्रकल्पाची संख्या किती आहे ? *उत्तरे :-* १) तिसऱ्यांदा ( २००२, २०१३, २०२५ ) २) रोहीत शर्मा ( ७६ धावा ) ३) भारत ( ३,२६५ ), रशिया ( ५०८ ), बांगलादेश ( ४०० ) ४) भूक ५) ५८*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••☀ *उष्माघात म्हणजे काय ?* ☀ भारतामध्ये काही भागात तापमान ४९ सेल्सियस इतके जास्त असू शकते. उन्हाळ्यामध्ये दरवर्षी अनेक लोक उष्माघाताने वा या उच्च तापमानामुळे मरण पावतात. राजस्थान, ओरिसा तसेच महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाड्यातही उष्माघाताने मृत्यू होतात. उष्माघात याचा सोपा अर्थ उष्णतेचा आघात वा त्रास असा होतो. यात खूप ताप येणे, घाम न येणे, चक्कर येणे, लघवी न होणे, बेशुद्धी येणे अशी लक्षणे दिसून येतात. प्रसंगी मृत्यूही होतो. अति उष्णतेने शरीरातील प्रथिनांवर दुष्परिणाम होतात व पेशीमधील जीवनप्रक्रिया थांबते. शरीरातील सर्व पेशींमध्ये असेच होते व बहुतेक वेळा मेंदू सूज होऊन व्यक्ती मरते. आधी रुग्णास चक्कर येते, झटके येतात व दम लागतो. कधी कधी हृदयविकाराचा झटकाही येतो.उष्माघातावर तात्काळ उपचार करणे आवश्यक ठरते. रुग्णाला सावलीत नेऊन त्याच्या अंगावर ओली चादर टाकावी व त्याला वारा घालावा. थंडगार पाण्यात त्याला उभे केले तर फारच चांगले. रक्ताभिसरण सुधारण्यासाठी त्याचे हातपाय चोळावेत. त्याला क्षार व पाणी द्यावे. (लिंबू सरबत वैगरे पदार्थ) असे उपचार लवकर सुरू झाल्यास व्यक्ती बचावते. अन्यथा मृत्यू येण्याची शक्यता खूप जास्त असते. उष्माघात टाळण्यासाठी उन्हात जास्त वेळ फिरू नये, फिरायचे असल्यास डोक्यावर टोपी घालावी व पांढरे फडके बांधावे, थंडगार पाणी वारंवार प्यावे, वारंवार तोंड गार पाण्याने धुवावे. असे केल्याने उष्माघाताची शक्यता कमी करता येईल.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन 👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• तूं आकाश मी शामिका । तूं लिंग मी साळूंका । तूं समुद्र मी चंद्रिका । स्वयें दोन्ही ॥१॥ तूं वृंदावन मी चिरी । तूं तुळशी मी मंजिरी । तूं पांवा मी मोहरी । स्वयें दोन्ही ॥२॥ तूं चांद मी चांदणी । तूं नाग मी पद्मिणी । तूं कृष्ण मी रुक्मिणी । स्वयें दोन्ही ॥३॥ तूं नदी मी थडी । तूं तारूं मी सांगडी । तूं धनुष्य मी स्तविता । तूं शास्त्र मी गीता । तूं गंध मी अक्षता । स्वयें दोन्ही ॥५॥ नामा म्हणे पुरुषोत्तमा । स्वयें जडलों तुझ्या प्रेमा । मी कुडि तूं आत्मा । स्वयें दोन्ही ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जी व्यक्ती परिस्थितीवर मात करून हिंमतीने जगत असते तिला कशाचीही भीती वाटत नाही व कोणासमोरही न घाबरता परखडपणे बोलण्याचा प्रयत्न करत असते. कारण त्या परिस्थितीत असताना सुद्धा तिला जे, अनुभव आलेले असतात तेच अनुभव आधार बनून मार्गदर्शन करत असतात म्हणूनच म्हणतात ना की, अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो. आपणही त्या गुरूचे सदैव स्मरण करावे व पुन्हा एकदा नव्याने जगण्याचा प्रयत्न करावे कारण जीवन हे अनमोल आहे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *निश्चय*एका राजाजवळ एक हत्ती होता. तो त्याला अत्यंत प्रिय होता. तो हत्ती स्वामीभक्त असण्याबरोबरच चांगला योद्धा होता. जेंव्हा केंव्हा राजाने त्याच्यावर बसून युद्ध केले तेंव्हा राजा त्यात विजयी झाला. काही काळ लोटल्यानंतर हत्ती वृद्ध होत चालला त्यामुळे राजाने त्याला युद्धात घेवून जाणे बंद केले. मात्र राजाचे त्या हत्तीवरचे प्रेम काही कमी झाले नाही. एके दिवशी तो हत्ती सरोवरामध्ये पाणी पीत होता. सरोवरामध्ये पाणी कमी होते त्यामुळे हत्ती पुढेपुढे गेला आणि दलदलीत फसला.वृद्धावस्थेमुळे हत्तीला दलदलीतून निघणे शक्य नव्हते, त्यामुळे तो जोरजोरात ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून माहूत त्याच्याकडे धावत आले, परंतु सरोवरातून त्याला बाहेर काढणे कुणालाही जमेना. तेंव्हा त्यांनी त्याच्या शरीराला भाले टोचायला सुरुवात केली. कारण भाल्याच्या टोचण्याने तो सर्व शक्तीनिशी प्रयत्न करेल आणि बाहेर येईल, पण हत्ती बाहेर येऊ शकला नाही. भाल्याच्या टोचण्याने हत्तीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. राजापर्यंत हि वार्ता गेली. त्याने तत्काळ त्या हत्तीच्या जुन्या आणि अनुभवी माहुताला बोलावणे पाठविले. माहूत आला, राजा शेजारीच उभा होता.त्याने राजाला असा सल्ला दिला, ”महाराज! तत्काळ युद्धाचे नगारे वाजवा, सैन्य या सरोवराभोवती गोळा करा, आक्रमणाच्या घोषणा सैनिकांना द्यायला सांगा.” राजाने त्याचे म्हणणे ऐकले आणि युद्धाचे नगारे वाजविण्याचा हुकुम दिला. मग काय म्हणता, नगारे वाजू लागले, सैनिकांच्या रांगा शिस्तबद्धपणे लागल्या, आक्रमणाच्या घोषणा ऐकू येवू लागल्या. त्याबरोबर हत्तीच्या अंगात वीरश्री संचारली आणि तो त्या दलदलीतून बाहेर पडला. त्याचे मनोबल हे युद्धासाठी तयार झाले होते. राजाने जुन्या माहुताचे आभार मानले आणि बक्षीस दिले.नशीब जर काही ‘अप्रतिम’ देणार असेल तर त्याची सुरुवात ‘अशक्य’ गोष्टीने होते….!🚀•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment