✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 01/08/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती* *लोकमान्य टिळक पुण्यतिथी* 💥 ठळक घडामोडी :- ■ १९९४- भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी विमा योजना लागू झाली.जगातील अशा तऱ्हेची पहिली योजना. ■ २००१-सोलापूर विद्यापीठाची स्थापना. ■१९९६ - मायकेल जॉन्सनने २०० मीटर अंतर १९.३२ सेकंदात धावून विश्वविक्रम रचला. 💥 *जन्म* :- ◆ १८९९-कमला नेहरू, जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी. ◆ १९१० - मोहम्मद निसार, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९२० - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ◆ १९५२ - यजुर्वेन्द्रसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू. ◆ १९५५ - अरूणलाल, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 *मृत्यू* :- ● १९२० - बाळ गंगाधर टिळक, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक, वृत्तपत्र संपादक. ●२००८-हर किशन सिंग सुरजित, मार्क्सवादी नेते. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई - महाविद्यालयीन निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर; मुंबई विद्यापीठाच्या निवडणूक प्रक्रियेला 19 ऑगस्टपासून सुरुवात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मोदी सरकारचे मोठे निर्णय, जम्मू-काश्मीरमध्येही 10 टक्के आरक्षण लागू, सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांच्या संख्येत वाढ, 31 वरुन 34 होणार* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *शेतकऱ्यांच्या खात्यात आता थेट पोहोचणार भरघोस सबसिडीचा फायदा; पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *जिल्हा नियोजन समितीअंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेसाठी नागपूर जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांना ६२ कोटी ४६ लक्ष रुपयांचा निधी वितरित* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई : मुंबई विद्यापीठाचा दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या अभ्याक्रमास विद्यापीठ अनुदान आयोगाने दिली मान्यता काल जाहीर झालेल्या यूजीसीच्या यावर्षीच्या दुसऱ्या यादीत मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलचे नाव समाविष्ट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पीक विम्याची नुकसान भरपाई न मिळाल्याच्या बहुसंख्य शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी राज्य सरकारने गावोगावी शिबिरांचे आयोजन करावे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची मागणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारतीय संघाचा माजी फलंदाज आणि आंध्र प्रदेश संघाचा कर्णधार वेणुगोपाळ राव याने मंगळवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• श्रावण मासारंभ निमित्ताने प्रासंगिक लेख *श्रावण पाळा ; आजार टाळा* हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अनन्यसाधारण असे महत्व आहे. या महिन्यात बहुतांश लोकं देव देव करण्याकडे वळतात. मांसाहार खाणारे ह्या महिन्यात वर्ज्य करतात. काही लोकं या महिन्यात केस कापणे देखील टाळतात. पूर्ण महिनाभर हिंदू धर्मातील मंडळी कोणतेही अधर्म होऊ नये याची काळजी घेतात. यामागे धार्मिकसोबत काही वैज्ञानिक कारणे आहेत. जसे की या महिन्यात मांसाहार वर्ज्य करणे........ https://nasayeotikar.blogspot.com/2019/07/blog-post_31.html वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *औषधांनी स्मरणशक्ती वाढते का ?* 📙 आजकाल अनेक वृत्तपत्रांमध्ये व केबल चॅनल्सवर स्मरणशक्ती / बुद्धी वाढवणाऱ्या औषधांचे पेव फुटले आहे. आमचे औषध घेतल्याने नापास होणारा मुलगा मेरिटमध्ये आला असे दाखलेही दिलेले असतात. साहजिकच मुले व त्यांचे पालक या दोहोंनाही अशा औषधांचे आकर्षण वाटू लागते. स्मरणशक्ती तसेच बुद्धिमत्ता हे मोठ्या मेंदूचे कार्य आहे. सर्व व्यक्तींच्या मेंदूचा आकार व वजन जवळपास सारखेच असतात. तरीही काही व्यक्ती हुशार तर काही मठ्ठ का बरे असाव्यात ? बुद्धिमत्ता म्हणजे एखाद्या विशिष्ट परिस्थितीचे यथायोग्य आकलन करून, प्राप्त परिस्थितीत जास्तीत जास्त प्रभावी, उपयुक्त असा निर्णय घेण्याची क्षमता. म्हणूनच औपचारिक शिक्षण न घेतलेला निरीक्षर शेतकरीही पढीक पंडितापेक्षा बुद्धिवान असू शकतो. माहिती व ज्ञान मिळवणे, जीवनात विविध अनुभव घेता येणे, मार्गदर्शन मिळणे या सर्वांवर बुद्धिमत्ता अवलंबून असते. मेंदू हा एखाद्या संगणकाप्रमाणे काम करतो. खरे तर संगणक मेंदूप्रमाणे काम करण्याचा प्रयत्न करतो असे म्हणायला हवे ! दोन वस्तूंचा परस्पर संबंध जोडून तर्काद्वारे मेंदू त्या लक्षात ठेवतो. दोन असंबद्ध गोष्टी लक्षात राहत नाहीत ते याचमुळे. त्यामुळे स्मरणशक्ती वाढवायची असेल, तर दोन गोष्टीत संबंध तर्क लढवून निर्माण करावा लागेल व एकात एक अशी त्यांची साखळी तयार करून कोणतीही क्लिष्ट गोष्ट लक्षात ठेवता येईल. म्हणजे स्मरणशक्ती वाढवणे आपल्या हातात आहे. वाचन वाढवणेही आपल्या हातात आहे. मग दररोज २५० मिलिग्रॅम गोळी वा औषधे खाऊन एखाद्या शॉर्टकटने बुद्धी वा स्मरणशक्ती वाढवणे शक्य आहे का याचा विचार तुम्हीच करायचा आहे ! *डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" एक मिनिट उशिरा येण्यापेक्षा तीन तास लवकर येणे चांगले.”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *राज्यपालाची नेमणूक कोण करतो ?* राष्ट्रपती 2) *ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते ?* 7 ते 17 3) *ग्रामपंचायतीचा सचिव कोणाला म्हणतात ?* ग्रामसेवक 4) *तलाठयाच्या कार्यालयास काय म्हणतात ?* सज्जा / साजा 5) *गावात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतो ?* पोलीस पाटील *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  सौ.कुसुम कवठाळे मॅडम कै.गं.पो.सब्बनवार मा.विद्यालय. ●  गोविंद पाटील जाधव रोशनगावकर ●  एकनाथ डुमणे, मुखेड ●  मंगेश हनवत्ते, नरसी ●  साईनाथ पाटील मोकलीकर ●  दिलीप साळुंके ●  नागेश टिपरे ●  विश्वनाथ चन्ने, कळमनुरी ● बालाजी गायकवाड ● शिवसांब गणाचार्य, नांदेड ● यादव एकाले ● पवनकुमार भाले, धर्माबाद ● आनंद पेंडकर, माहूर ● बंडू पाटील मोरे ● संजीवकुमार हामंद, करखेली ● मुखीत अहमद, नांदेड ● सतीश दरबस्तेवार, कुंडलवाडी ● शिनू दर्शनवाड, येवती *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *'दिवा' हा अशी एक शक्ती आहे ज्याशिवाय जग उजळून निघूच शकत नाही आणि उजाडल्याशिवाय वास्तवाचा प्रकाश पडत नाही. 'दिवा' हा वास्तवाची लख्ख जाणीव करून देणारा दृष्टीदाता, घनघोर अंधारातला विश्वासाचा सोबती असतो. तो प्रकाश देऊन सत्य उजागर करीत असतो. उजेडालाच एकमेव सत्याचा चेहरा लाभलेला आहे म्हणून प्रत्येकजण त्याचा याचक बनून आराधना करतो. सर्वच चांगल्या कार्याचा आरंभ करताना दिवे लावले जातात. ही गोष्ट हेच प्रतीत करते की, अजूनही आमच्या जगण्यातला अंधार पूर्णत्वाने नाहीसा झालेला नाहीये.., पण तो आम्हाला निश्चितपणे दूर करायचा आहे, या निश्चयाचे हे प्रतीक.* *प्रत्येकाच्या मनातही असा उजेड निर्माण होण्यासाठी म्हणून माणुसकीचा दिप लावायला मात्र आम्ही सपशेल विसरून जातो. तशी तर प्रत्येकाला उजेडाची आस असते, पण डोक्यात कुठल्या न कुठल्या प्रकारचा अंधार असतो. जेव्हा हा अंधार पूर्णत्वाने दूर होतो, त्यावेळी ती व्यक्ती तेजाने उजळते आणि अनेक पिढ्यांना प्रकाशमान करते..आपल्या मेंदूतले असे सारे अंधारकोपरे उजळून निघावेत नि आपल्यातला माणूस तेजाने तळपू लागावा, यासाठी आपण 'दिपपूजन' का करू नये? जळणं वा तेवणं हे जिवंत असल्याचं द्योतक, परंतु दिव्याचं जळणं हे कधी स्वत:साठी नसतं. ते इतरांना प्रकाश देण्यासाठीच जळत असतात. इतरांना उजाळण्यातच त्यांच्या जळण्याची सार्थकता असते. आज-उद्या 'दिप अमावस्या आहे. व्यसनाधीन होऊन बेशुद्ध होण्यापलीकडेही आयुष्य असतं हे ठळकपणे दर्शवणारी 'दर्श-अमावस्या'! आपल्या ह्रदयात निरंतर ज्ञानाचा दिवा तेवत ठेवायला याहून उत्तम दिवस नाही..शुभेच्छा!* *॥ रामकृष्णहरी ॥* 💡💡💡💡💡💡💡💡💡 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाईल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सज्जनहो,* *तुम्हीच ठरवा, कसं जगायचं।* *कण्हत कण्हत की गाणं म्हणत।* *त्यासाठी* *मनात काही भरून* *जगू नका* *नाहीतर मन भरून जगता* *येणार नाही...!* *वळून कुणी पाहिलं नाही म्हणून* *माळरानावरच्या चाफ्याचं अडलं नाही* *शेवटी पानांनीही साथ सोडली* *पण पठ्ठ्यानं बहरणं सोडलं नाही !* *तुमच्या आयुष्यातही असेच बळ* *साठवा जेणे करून एक दिवस तुम्ही* *जगाचे आकर्षण व्हाल.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते* ) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जी व्यक्ती सातत्याने कष्ट करते त्या व्यक्तीमध्ये प्रामाणिकपणा, जिद्द, चिकाटी, नम्रता, आपल्या माणसांविषयी व इतराविषयी आत्मियता हे गुण नक्कीच असतात. तो कधीही इतरांची बरोबरी करत नाही. ती आपली सारी स्वप्ने आपल्या हातातच आहेत आणि त्या हातातून जे काही घडते तेच आपले प्रारब्ध आणि तेच आपले विश्व समजते. अशा व्यक्तीच्या मनामध्ये कधीही कुणाचे वाईट व्हावे आणि आपलेच चांगले व्हावे असे विचार आणत नाही. म्हणून अशा व्यक्ती जीवनात पूर्णतः समाधानी असतात. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०. 🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 ••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *तिहेरी फिल्टर* एके दिवशी एक व्यक्ती महान चाणक्याला भेटली आणि म्हणाली, 'मी तुमच्या मित्राबद्दल जे काय ऐकले ते तुम्हाला मी सांगूं का? 'एक मिनिट थांबा' चाणक्यने उत्तर दिले. 'काही सांगण्यापूर्वी मी थोडीशी तुमची परीक्षा घेतो, परीक्षेत उत्तीर्ण झालात तरच सांगा, आपण याला.' ट्रिपल फिल्टर चाचणी असे म्हणू...... चालेल? ती व्यक्ती म्हणाली, 'तिहेरी फिल्टर?'ठीक आहे. चाणक्य पुढे म्हणाला. 'माझ्या मित्राबद्दल माझ्याशी बोलण्यापूर्वी, तुम्ही जे काय म्हणणार आहात, ते फिल्टर करणे चांगले आहे, म्हणूनच मी त्याला तिहेरी फिल्टर चाचणी म्हणतो, आता पहिला फिल्टर, तुम्ही जे सांगणार आहात, ते सत्य आहे का? ' थोडस थांबून ती व्यक्ती म्हणाली 'नाही,' 'खरंच मी त्याबद्दल ऐकले आणि .......' 'ठीक आहे,' चाणक्य म्हणाले तुम्ही जे मला सांगणार आहात ते खर आहे, याची खात्री नाही तुम्हाला?, आता दुसरा फिल्टर, आता चांगुलपणाचे फिल्टर वापरून पाहूया. आपण माझ्या मित्राबद्दल काहीतरी सांगणार आहात ते त्याच्या बद्दलचे चांगले विचार आहेत काय?' ती व्यक्ती म्हणाली 'नाही, उलट ........' 'मग, मधेच तोडत चाणक्य पुढे म्हणाले,' तू मला त्याच्याबद्दल काहीतरी वाईट सांगू इच्छित आहेस आणि ते खरे आहे की नाही याची शाश्वती नाही, ठीक आहे, आता उपयुक्तता फिल्टर हा शेवटचा फिल्टर..... जे तू मला माझ्या मित्राबद्दल सांगणार आहेस ती माहिती मला उपयोगी असणार आहे काय?' 'नाही, तशी तुम्हाला ती उपयुक्त खरंच नाही' ती व्यक्ती ओशाळत म्हणाली. 'ठीक आहे,' म्हणजे 'जर तुम्ही मला सांगू इच्छिता, ते ना सत्य आहे,ना चांगले आहे , ना मला उपयोगी देखील आहे, तर मला ते का सांगता आहात?' प्रत्येक वेळी आपल्या जवळच्या प्रिय जनाबद्दल, मित्रा बद्दल ऐकताना या तिहेरी फिल्टरचा वापर करा. मैत्रीवर भरवसा ठेवा, हे तिहेरी फिल्टरचे शास्त्र खरोखर खूप उपयुक्त आहे. आपसातील गैरसमज दूर ठेवायचे असतील तर प्रत्येक व्यक्तीने हे तिहेरी फिल्टर आचरणात आणायला पाहिजे . हीच आहे चाणक्य-नीती. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बुलेटीन विषयी वाचकांची प्रतिक्रिया* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सप्रेम नमस्कार, मी मधुकर चिंतामण पवार, प्रेरणा विद्यालय सोनावळे, ता.मुरबाड, जिल्हा ठाणे. सर्वप्रथम चार वर्षांचा प्रवास अविरत पूर्ण केल्या बद्दल "फ्रेश मॉर्निंग बुलेटीन "टिमचे मनपुर्वक अभिनंदन 🌹🌹 2 सप्टेंबर 2018 रोजी "फ्रेश मॉर्निंग बुलेटीन "गृपला जोडलो गेलो आणि वाचक बनलो."सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट".या वाक्याच्या अक्षरशः प्रेमात पडलो.शालेय परिपाठासाठी वाहून घेतलेल्या या गृपच्या सहवासात परिपाठाचं महत्व खर्या अर्थाने कळलं.गृपमधलं सर्व संकलन,निवेदन अगदी प्रमाणबद्ध व अर्थपुर्ण. नासाजिंच वृत्त निवेदन व स्तंभलेखन अप्रतीम. संतोषजिंच दिनविशेष संकलन, कुणालजिंच्या बातम्या संकलन, राजेंद्रजींची विशेष माहिती. सौ.भारतीजींचा फ्रेश सुविचार. संगीताजींची प्रश्नमंजुषा , वाढदिवसाच्या शुभेच्छा.. एकनाथजींच कबिरांचे बोल, व्यंकटेशजिंच विचारधन, प्रमिलाताईंची बोधकथा सारं सारं अप्रतीम.माझं महतभाग्य मी आपल्या गृपचा सदस्य आहे. पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 🙏💐🍫❤🌹🌷💛💚🧡👍 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 31/07/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ■ १९७५ - अमेरिकेतील टीम्स्टर युनियन चा नेता जिमी हॉफा गायब. ■ १९८१ - पनामाचा हुकुमशहा ओमर तोरिहोसचा विमान अपघातात मृत्यू. ■ १९८७ - कॅनडातील एडमंटन शहरात एफ.४ टोर्नेडो. २७ ठार, ३३ कोटी डॉलरपेक्षा जास्त मिळकतीचे नुकसान. 💥 *जन्म* :- ◆ १९१२ - मिल्टन फ्रीडमन, अमेरिकन अर्थतज्ञ. ◆ १९१९ - लेफ्टनंट कर्नल हेमु अधिकारी, भारतीय क्रिकेट खेळाडू. ◆ १९५३ - जिमी कूक, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू. ◆ १९४१ - अमरसिंह चौधरी, गुजरातचे मुख्यमंत्री. 💥 *मृत्यू* :- ● १९७२ - पॉल-हेन्री स्पाक, बेल्जियमचा पंतप्रधान. ● १९८० - मोहम्मद रफी, भारतीय पार्श्वगायक. ● १९९३ - बॉद्वां पहिला, बेल्जियमचा राजा. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा चौथा विशेष पदवी प्रदान समारंभ; डॉ. अभय बंग, डॉ. राणी बंग यांना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते डी. लिट पदवी प्रदान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *इस्रोच्या मंगळयान, चांद्रयान आणि गगनयान यांसारख्या एकामोगामाग एक यशस्वी मोहीमा, तरीही सरकारकडून वैज्ञानिक, इंजिनीअर्सच्या पगारात कपात * •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *तात्काळ तिहेरी तलाक विधेयक लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही मंजूर, मुस्लिम महिलांना न्याय, शरद पवार, प्रफुल्ल पटेल अनुपस्थित तर AIDMK चा सभात्याग* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारचा धनगर समाजाला खूश करण्याचा प्रयत्न, एसटी प्रवर्गाच्या सर्व सवलती धनगर समाजालाही लागू होणार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पावसाची हजेरी, पुणे, नाशिकमध्ये नद्यांना पूर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *कृत्रिम पावसासाठी सुकाणू समिती स्थापन; १ ऑगस्टपासून मराठवाड्यात प्रयोग शक्य, विभागीय महसूल उपायुक्त हे प्रयोगासाठी नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *नागपूर : आर्थिक दुर्बलांना मिळणार थेट अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षात प्रवेश, 10 टक्के आरक्षण लागू करण्याचा हायकोर्टाचा आदेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अन्न म्हणजे पूर्णब्रह्म* अन्न , वस्त्र आणि निवारा या माणसाच्या तीन मूलभूत गरजा आहेत. यातील अन्नाची गरज पूर्ण करण्यासाठी प्रत्येक सजीव धडपडत असतो. अश्मयुगीन काळातील लोक अन्नाच्या भटकंतीत अनेक वर्षे घातली. या अन्नाच्या शोधातच त्यांनी अग्निचा शोध लावला असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही......... पूर्ण लेख खालील लिंकवर वाचण्यास मिळेल. https://nasayeotikar.blogspot.com/2019/05/blog-post_69.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *अन्नाशिवाय माणूस किती काळ जगेल ?* 📙 या प्रश्नाचं एकच एक असं उत्तर देता येणं कठीण आहे. व्यक्ती व्यक्तीनुसार त्यात फरक पडू शकतो. कारण मुळात त्या व्यक्तीचं वजन किती होतं, त्याचं सर्वसाधारण आरोग्य कसं होतं, मधुमेह, रक्तदाब यांसारख्या विकारांचा प्रादुर्भाव होता की काय व मुख्य म्हणजे शरीरात कितपत पाणी होतं यावर हा काळ अवलंबून असतो. जोवर शरीरातील पाण्याचं प्रमाण योग्य राखलं जात आहे तोवर केवळ अन्नत्यागापोटी किती काळ काढता येईल, याविषयीची विश्वासार्ह आकडेवारी उपलब्ध नाही. वयाच्या ७४ व्या वर्षी महात्मा गांधींनी केवळ पाणी घेऊन २१ दिवस उपोषण केलं होतं. त्यापायी त्यांचं वजन जरी घटलं तरी आरोग्यावर तितकासा अनिष्ट परिणाम झाला नव्हता. मायकेल पील यांनी १९९७ साली 'ब्रिटिश मेडिकल जर्नल' मध्ये प्रकाशित केलेल्या एका शोधनिबंधात आणि २८,३६,३८ आणि ४० दिवस अन्नावाचून काढलेल्या व्यक्तींविषयीचा विश्वासार्ह अहवाल दिला होता. एवढे दिवस शरीर अन्नावाचून कसं काढू शकतं, याचं कारणही त्यात त्यांनी नमूद केलं होतं. शरीराचं नेहमीचं कार्य चालतं त्याला चयापचय म्हणतात. त्याचा कार्यवेग राखण्यासाठी आपल्याला पोषणाची म्हणजेच अन्नाची गरज भासते; पण जेव्हा या पोषणाची कमतरता भासते तेव्हा शरीर चयापचयाच्या कार्यवेगातही योग्य ते बदल करतं असं दिसून आलं आहे. थायरॉईड ग्रंथीतून होणार्‍या स्रावांचा वापर करून शरीर हे साध्य करतं. या बदलाचं प्रमाण प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळं असू शकतं. साहजिकच अन्नावाचून किती काळ काढता येईल हे या घटकावरही अवलंबून असतं. जोवर पाण्याच्या प्रमाणात लक्षणीय फरक पडलेला नाही तोवर अतिशय अल्प अन्नसेवनावर दीर्घकाळ काढल्याची कितीतरी उदाहरणं आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरच्या छळछावणीतील कित्येक जणांना जवळजवळ उपाशी अवस्थेत दिवस काढावे लागले होते. हा काळ काही महिन्यांपासून तीन चार वर्षांपर्यंतही होता. त्यापायी त्यांच्या शरीराचा जवळजवळ हाडांचा सापळा झाला होता. तरीही त्या स्थितीत त्यांच्या अंतर्गत अवयवांचं काम व्यवस्थित चालून ती मंडळी जिवंत राहिली होती. एवढेच नाही तर तिथून सुटका झाल्यानंतर ती पूर्वावस्थेत येऊ शकली होती. 'अॅनोरेक्सिया नर्वोसा' या रोगानं पछाडलेल्या व्यक्ती जाणूनबुजून स्वतःची उपासमार करून घेतात. आपलं वजन कमी करण्याच्या अतिरेकी हट्टापायी काहीजणांना ही व्याधी जडते. अशा मंडळींचं वजन तब्बल ४० टक्क्यांनी घटतं. त्याहून अधिक घट मात्र ते सहन करू शकत नाहीत. कर्करोगाची बाधा झालेल्या व्यक्तींनी नेहमीइतकंच अन्नसेवन केलं तरी त्यातलं पोषण कर्करोगग्रस्त पेशी पळवत असल्यामुळे इतर शरीराला योग्य तितके उष्मांक मिळत नाहीत. त्यांच्याही बाबतीत वजन ४० टक्क्यांहून अधिक घटलं तर मृत्यू ओढवतो. वजनात तितकी घट होण्यास किती वेळ लागेल हे अर्थात व्यक्ती व्यक्तीवर अवलंबून असतं. *बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *Well beginning is the half done.* *( चांगली सुरूवात म्हणजे अर्धे काम झाल्यासारखे आहे. )* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *संत तुकाराम महाराज यांचे जन्मस्थळ व समाधी स्थळ कोठे आहे ?* देहू 2) *मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?* अमरावती 3) *मराठीचे आद्यकवी कोण ?* मुकुंदराज 4) *साने गुरुजीचे पूर्ण नाव काय ?* पांडुरंग सदाशिव साने 5) *'श्यामची आई' या ग्रंथाचे लेखक कोण ?* साने गुरुजी *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  बालासाहेब कच्छवे, नांदेड ●  प्रशिक नंदुरकर, उमरखेड ●  प्रीतम नावंदीकर, नांदेड ●  मनोज बुंदेले, धर्माबाद ●  कैलाश गायकवाड, तेलंगणा ●  दिलीप सोळंखे, भोकर ●  नागनाथ इळेगावे, बिलोली *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माणूस बर्‍याचदा ऐकीव आणि भ्रामक बाबींच्या मागे लागून जीवनातला अनमोल वेळ वाया घालवत असतो. अमृत प्राशन करणे, अमर होणे, संजीवनी अशा काही बाबी वारंवार चर्चेत येतात. या सर्व बाबींचा भौतिक विचार करून माणूस दमछाक करून घेतो. सर्व काही आपल्याच ठायी असणार्‍या कर्तृत्त्व, चिंतन, शांती व समाधानातून प्राप्त होणार्‍या या लौकिक  बाबी ! मात्र माणूस वरवरचा विचार करून स्वतःची दमछाक करून घेतो. 'तुझं आहे तुजपाशी परि जागा चुकलाशी.' अशीच ही गत म्हणावी लागेल. कस्तुरी मृग कस्तुरीच्या सुगंधाने ऊर फुटेतो धाव धाव धावतो. 'कस्तुरी' स्वतःजवळ असूनही त्याचा अंत मात्र तिच्याच शोधात  होतो. तसंच माणसाचं झालंय.* *थोडसं पूर्वजांकडं डोकावून पाहिलं तर कोणीही अमरत्व गाठू शकले नाहीत. ज्यांनी ध्येयासाठी झपाटून आपल्या कर्तृत्तवाचा ठसा उमटवला. खरं तर त्यांनाच अमृताचा खर्‍या अर्थानं कुंभ सापडला! त्यांनी तो कर्माच्या रूपानं प्राशन केला. आज हजारो-शेकडो वर्षे लोटली. ते देहाने नसले तरी कार्य रूपानं अमर आहेत. त्यांच्या हयातीत कधी त्यांनी भ्रामक अमृताचा शोध घेतला नाही. त्यांनी कधी वेगळ्या स्वर्गाचा विचार केल्याचे ऐकीवात नाही. आपल्या कार्य क्षेत्रातच मनोभावे स्वर्ग निर्माण केला. ज्यांनी लौकिकता व नैसर्गिकपण नाकारलं. ते सर्व अवहेलनेचे धनी ठरले आहेत. प्रतिकांचा उथळ अर्थ घेवून धावपळ करून चालत नाही. चिंतन व मननातून शाश्वत सत्ये बाहेर पडतात. ती शोधली की माणूस अजरामर होतो. हे त्या मागचं रहस्य सांगताना संत कबीर म्हणतात, पर्वता पर्वतावर फिरून थकलो, दमलो, प्रसंगी रडलोही परंतु सहज अमर करणारी संजीवनी काही प्राप्त झालीच नाही. कर्मच माणसाला अमर करते. हे जीवनाचे फलित आहे. कर्मभूमीत हृदय आणि हृदयात कर्मभूमीला  आसरा दिला की जीवनाचं नंदनवन होवून जातं.*  *॥ रामकृष्णहरी ॥* 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाईल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खरे जीवन समजून घ्या.* *एकदा एक काम करा, स्वतःलाच फोन लावून बघा, स्विच ऑफ, नो रेंज, व्यस्त असे अनेक प्रकार होतील पण फोन लागणार नाही.* *या जगात आपण सगळ्यांसाठी आहोत, वेळ पण देतो आणि स्वतःसाठी, बघा स्वतःसाठी आपण नेहमी व्यस्त आहोत, जगून घ्या,* *वागणं चांगल नसेल तर, साधी उचकीही लागत नाही. बोलणं गोड़ नसेल तर, महागडया मोबाइलवर घंटी पण वाजत नाही.* *आणि घर मोठ असो वा लहान जर गोड़वा नसेल तर, माणूसच काय, मुंगीसुद्धा जवळ येत नाही. मग एवढा अभिमान कशापायी, खरे जीवन जगा ।* *अशोक कुमावत* *(राष्ट्रपती पुरस्कार विजेते*) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येकाच्या जीवनात निराशा ही सवतीसारखी नेहमी मनाला छळत असते.ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने मनाला विचलीत करते.अशा स्थितीतून तिला हद्दपार करण्यासाठी काही ना काहीतरी करण्यासाठी तो आशेकडे धावतो आणि त्यातुन सुटका करून घेतो.अर्थात जीवनात निराशेने घर केले तर नक्कीच आशेचा शोध घेऊन निराशेला बाजूला सारतो आणि जीवन निराशेतून मुक्त करतो.निराशा जरी जीवनात आली तरी घाबरायचे नाही तिला हिमतीने तोंड देत आशेचा शोध घ्यायला शिकले पाहिजे आणि त्यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजे.हीच आपल्या जीवनाची खरी परीक्षा आहे. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रलोभनापासुन सावधपणे वागणे.* एका जंगलात मोठ्या संख्‍येने हरणांचा वावर होता. परंतु आपल्‍या सहका-यांची संख्‍या कमी होत चालल्‍याचे एका हरणाच्‍या लक्षात आले. त्‍याने आपल्‍या इतर सहका-यांना सावध केले परंतु कोणीच त्‍याच्‍याकडे लक्ष दिले नाही. त्‍या हरणाने आपल्‍या मित्राला सांगितले की डेरेदार व गच्च पानांनी भरलेल्‍या वृक्षांच्‍या फांद्यावर दडून शिकारी मचाण बांधतात. यासाठी आपण या वृक्षाखाली जाणेच न बरे. त्‍याचा मित्र त्‍याची गोष्‍ट ऐकून तेथेच थांबला. तिकडे त्‍या पानाआड दडलेल्‍या शिका-याने दोघांकडे फळे फेकण्‍यास सुरुवात केली. चतुर हरणास समजले की, झाडावर शिकारी बसलेला आहे. त्‍याने मित्राला सावध केले पण मित्र हरीण लोभाच्‍या बळी पडून फळे खाण्‍यासाठी पुढे गेला आणि शिका-याने त्‍याची लगेचच शिकार केली. चतुर हरणाला वाईट वाटले. पण मित्राने त्‍याचे म्‍हणणे ऐकायला हवे होते हे ही खरेच की नाही. *तात्‍पर्य :- आजच्‍या काळात कोणी जर आपल्‍याला प्रलोभन दाखवून जर फसवत असेल तर आपण सावध राहायला हवे किंवा कोणी जर सावध करत असेल तर त्‍याचे ऐकायला हवे.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 30/07/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ■ २०१४ - पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळून ५० पेक्षा अधिक ठार. ■ २००१- राजस्थानातील अलवर येथील राजेंद्रसिंग यांना 'रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.छोटे बंधारे बांधून पाणी साठवण्यासाठी त्यांनी लोकसहभागातून काम केले आहे. ■ २०००-चंदन तस्कर वीरप्पनने डॉ राजकुमार यांचे अपहरण केले. ■ १९९७- गानकोकिळा लता मंगेशकर यांना 'राजीव गांधी राष्ट्रीय सदभावना पुरस्कार' जाहीर. 💥 *जन्म* :- ● १९४७ - आर्नोल्ड श्वार्झनेगर, ऑस्ट्रियाचा अभिनेता व कॅलिफोर्नियाचा गव्हर्नर. ● १९७३ - सोनू निगम, पार्श्वगायक. 💥 *मृत्यू* :- ● १९४७ - जोसेफ कूक, ऑस्ट्रेलियाचा सहावा पंतप्रधान. ● १९९४ - शंकर पाटील, मराठी लेखक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *कर्नाटकातील राजकीय नाट्य संपलं, येडियुरप्पा यांनी केलं बहुमत सिद्ध, सरकारला 106 आमदारांचा पाठिंबा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई : आषाढ संपत असताना संपूर्ण राज्यात पावसाने धरला जोर, मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, नाशिक, खान्देश, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर, धरणांंमधील साठ्यात समाधानकारक वाढ होत असून खोळंबलेल्या पेरण्यांना आला वेग* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *नवी दिल्ली : ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काँग्रेस करणार नवीन अध्यक्षांची निवड. नवीन अध्यक्ष गांधी घराण्याबाहेरची व्यक्ती असेल, असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दाेन सीएनजी बसेस सुरु करण्यात आल्या असून त्याचा विद्यार्थ्यांना फायदा हाेणार आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *दिल्लीः लोकसभेत राष्ट्रीय चिकित्सा आयोग विधेयक मंजूर करण्यात आले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नांदेड : येथील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांनी पक्ष सोडल्याची केली घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *बुलडाण्याच्या अनंता चोपडेला इंडोनेशियातील प्रेसिडेंट कप बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक, 52 किलो गटात अफगाणिस्तानच्या रेहमानी रमीशचा केला पराभव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *ऑफरचा भुलभुलैय्या* * कमी श्रमात जास्त संपत्ती मिळावी असे प्रत्येक मनुष्याला वाटणे म्हणजे आपल्या अंगात असलेल्या आळशीपणाला उत्तेजन देणे होय. ज्या ज्या वेळी मनुष्य असे प्रयत्न करत आला आहे त्या त्यावेळी त्याला उदासीनते शिवाय काहीही मिळाले नाही. तरी सुद्धा माणूस अश्या घटनेतून काही बोध न घेता पुन्हा तश्याच काही बाबीच्या शोधात राहतो. मी गोष्ट करतोय ऑफरची.......... पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करावे. https://nasayeotikar.blogspot.com/2019/01/blog-post_28.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *कृष्णविवराचा शोध कोणी लावला ?* 📙 तारे अमर नाहीत, त्यांचीही जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होत नाही. अर्थातच तार्‍यांची अखेर झाल्यानंतर त्यांची काय अवस्था होते, याविषयीच्या संशोधनाला चालना मिळाली. अंतरंगात धडधडत असणाऱ्या अणुमीलनाच्या भट्ट्यांपायी तारे स्वयंप्रकाशित होतात. हायड्रोजनच्या अणुंचं मीलन होऊन त्यापासून हेलियमचे अणू तयार होत असताना फार मोठ्या प्रमाणावर ऊर्जा बाहेर पडते. तीच प्रकाशाच्या रूपाने आपल्या नजरेला पडते. पण हायड्रोजनचं इंधन अमर्यादित नसतं. ते संपल्यावर हेलियम त्याचं स्थान घेतं. ते संपल्यानंतर चढत्या भाजणीनं कार्बन, नायट्रोजन यासारख्या अधिकाधिक जड मूलतत्त्वांचा इंधन म्हणून वापर होतो. एकदा का या प्रक्रियेतून लोहाची निर्मिती झाली, की ही प्रक्रिया थंडावते. आता कोणतंच इंधन शिल्लक राहिलेलं नसतं. त्यामुळे त्या ताऱ्यांच्या अंतरंगातून ऊर्जा बाहेर पडत नाही. सहाजिकच त्या ताऱ्यावर आतल्या दिशेनं आकुंचन पावायला लावणाऱ्या गुरुत्वाकर्षणाच्या बलाचा पगडा बसतो आणि तारा आकसायला सुरुवात होते. त्याचीच परिणती त्या ताऱ्यांचं अतिशय फिकुटलेला प्रकाश असणाऱ्या श्वेतबटूंमध्ये रूपांतर होतं, याची प्रचिती काही प्रमाणात मिळाली होती. कारण अवकाशात अशा प्रकारच्या श्वेतबटूंच्या अस्तित्वाचा पुरावा मिळालेला होता. त्यानंतर काय होतं याविषयी मात्र निश्चित सांगता येणे शक्य होत नव्हतं. पण ज्या अर्थी हे श्वेतबटू ताऱ्यांसारखेच स्थिर असल्याचं दिसतं त्यावरून हीच तार्‍यांची अंतिम अवस्था असावी, असा तर्क केला जात होता. मृत तार्‍यांचं कलेवर म्हणजेच श्वेतबटू, असाच समज प्रचलित होत होता. तरीही ते स्थिर कसे होतात ? हा प्रश्न अनुत्तरितच होता. कारण जर अंतरंगातल्या भट्ट्या थंड पडल्या असतील तर मग गुरुत्वाकर्षणाच्या ओढीला विरोध करणारं दुसरं बल असण्याची शक्यताच मावळते. पण क्वांटम मेकॅनिक्सच्या सूत्रांचा अवलंब करून डॉ. राल्फ फाउलर यांनी त्याचं तर्कसंगत स्पष्टीकरण दिलं होतं; पण ते पर्याप्त नाही, अशी भूमिका एका विशीतल्या भारतीय तरुणानं घेतली. त्यानं त्यावेळी नुकत्याच प्रकाशात आलेल्या आईन्स्टाइनच्या सापेक्षतावादाचा अवलंब करत, जर श्वेतबटू बनलेला तारा महाकाय असेल, म्हणजेच त्याचं वस्तुमान आपल्या सूर्याच्या दीडपटीहून जास्त असेल, तर श्वेतबटूही आतल्या आत कोसळतच राहील आणि त्याचं रूपांतर अपरिमित गुरुत्वाकर्षणाची ओढ असलेल्या एका सूक्ष्म अवस्थेत होईल, असं भाकीत केलं. त्या अवस्थेत गुरुत्वाकर्षणाची ओढ इतकी प्रचंड असेल की त्यातून प्रकाशकिरणही बाहेर पडू शकणार नाहीत, असा दावा त्यानं केला होता. त्यावेळचे खगोलमहर्षी त्या तरुणाचे गुरू अार्थर एडिन्गटन यांनी त्या प्रबंधाची जाहीर टिंगल केली. त्या तरुणाची हेटाळणीही केली. पण कालांतराने इतर प्रख्यात खगोलविदांनी त्या तरुणाचा सिद्धांतच बरोबर असल्याचं सप्रमाण दाखवून दिलं. त्या अवस्थेला मग इतर काहीजणांनी कृष्णविवर असं नाव दिलं. कृष्णविवरांच्या अस्तित्वाची प्रचिती देणारे असंख्य अप्रत्यक्ष पुरावे आता मिळाले आहेत. त्यामुळे कृष्णविवर केवळ कल्पनेचा खेळ नसून आपल्या विश्वातील एक सत्य घटक आहे हे सिद्ध झालं. कृष्णविवराचं भाकीत करणारा तो तरुण होता सुब्रह्मण्यम चंद्रशेखर. त्यांना या शोधाबद्दल १९८३ सालचा नोबेल पुरस्कार दिला गेला. *बाळ फोंडके यांच्या 'कोण ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• “संभाषणाचा सर्वात वाईट प्रकार म्हणजे वादविवाद.” *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?* श्री भुपेश बघेल 2) *संत गाडगेबाबा यांचे आवडते भजन कोणते ?* गोपाला गोपाला , देवकी नंदन गोपाला 3) *स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय होते ?* नरेंद्रनाथ दत्त 4) *आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ?* सिंधुदुर्ग 5) *संत ज्ञानेश्वर महाराज यांचे समाधी स्थळ कोठे आहे ?* आळंदी *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  नागनाथ इळेगावे ●  सचिन गादेवार ●  प्रवीण चातरवाड ●  विजय कुऱ्हाडे ●  प्रियंका घुमडे ●  शेख नवाज ●  निलेश कोरडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रत्येक अस्वस्थ माणसाने थोड आत डोकावून पहावं. तिथं त्याला एक अतृप्त जीव येरझारा घालतांना सापडेल. माणूस लहान असो, मोठा असो, त्याला जे काही हवं आहे, ते मिळत नसल्याची नांगी सतत डंख मारीत असते. जी काही आपली पात्रता आहे, त्यानुसार आपल्याला जे हवं आहे, ते मिळत नाहीये, ही भावना त्याला छळत असते. शांतपणे जगू देत नाही. प्रत्येक छोट्यामोठ्या गोष्टींमागे एक सुप्त अहंकार असतो आणि जोपर्यंत हा असा अहंकाराचा जागता पहारा आहे, तोपर्यंत कुणाच्याही आशीर्वादाने कोणतीही शांती मिळणार नाही? औदासीन्य नाहीसं कसं होणार? अहंकारानं मन काठोकाठ भरलेलं असलं, तर आशीर्वादानं आत उतरायचं कसं? भांड रिकाम हवं, तरच ते भरता येईल.* *कवी शांताराम आठवले यांनी एका ओळीत जे सांगितलंय, “जो हसला, तो अमृत प्याला” हे अत्यंत सार्थ आहे. अहंकार संपला रे.. संपला की स्वास्थ्य आणि आनंदा व्यतिरिक्त उरतं काय? आपल्या शांततेच्या आड आपण स्वतः च येतो. हा अडथळा दूर होणं महत्वाचं. कबीर यालाच 'सहजयोग' म्हणतात. हा अहंकार मिटला, तर जीवन प्रतिक्षणी पूज्य भावाने व्यापून जाईल. राहत्या वास्तूत प्रतिदिन गंगास्नान घडेल. तुम्ही जिथं जिथं विहार कराल, ते ते तीर्थस्थळ घडेल. अर्थात ही प्रचिती येण्यासाठी मुळ अहंकार गेला नाही तर.. प्रार्थना, पूजा, तीर्थयात्रा सगळं व्यर्थ आहे!* *॥ रामकृष्णहरी ॥* 🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाईल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रेमभाव  एक  चाहिए ,  भेष  अनेक  बनाय  | चाहे  घर  में  वास  कर ,  चाहे  बन  को  जाए  ||   अर्थ        मानवाचा धर्म मानवता . मानवता जपायची तर मानवाच्या अंतरात प्रेमभावनेचे अधिष्ठान महत्वाचे आहे. त्या शिवाय मानवता व मानव्य कसं प्रवाहित होणार ?  भौगोलिक व भौतिक परिस्थितीशी समायोजन साधण्यासाठी भिन्न वेष परिधान करा .   विभिन्र प्रकारच्या (उपलब्धतेनुसार महालापासून झोपडीपर्यंत) वास्तूत  किवा वनात वास्तव्य करा ते परिस्थितीनुरूप स्वाभाविक आहे. परंतु त्यात अवडंबर असता कामा नये. सत्य  व प्रेमभाव हाच खर्‍या जीवनाचा मुलाधार आहे. त्यामुळे जीवनाची गोडी व सुंदरता वाढते  म्हणून माणसाने  अशाश्वत अवडंबराच्या व बुवाबाजीच्या नादी लागून जगण्याला  विनाकारणच अंधानुकरणी व भंपक बणवू नये . ते मानवतेला पूरक असू शकत नाही.      एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जिद्द,मेहनत आणि प्रयत्न हे तुमच्या हाती घेतलेल्या कामासाठी वापरलेले कौशल्य आहे.यामुळे तुमचे काम अधिक चांगले व उत्कृष्ट दर्जाचे होण्यास मदत करते. कोणतेही काम जेव्हा हाती घ्याल तेव्हा  ह्या तीन गोष्टी आपल्या अंगी बाळगणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामध्येच आपली प्रगती  सामावलेली असेल. - व्यंकटेश काटकर,नांदेड.   संवाद..9421839590. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अनमोल क्षण* प्रसिध्द लेखक कै. वि. स. खांडेकरांकडे अलोट गर्दी जमली होती. लोक हार घेऊन अभिनंदनासाठी तिष्ठत उभे होते. कॅमेरे सरसावुन फोटोग्राफर धावपळ करत होते. खांडेकरांना साहित्य ऍकेडमीचे पारितोषिक मिळाले तेव्हांचा प्रसंग. एका पत्रकाराने विचारले, 'आपल्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण कोणता ?' खांडेकरांनी दोन क्षण डोळे मिटले. प्रसंग त्यांच्या डोळयासमोर दिसु लागला. ते म्हणाले, 'आज सकाळीच एका अपरिचिताने येऊन माझ्या गळयात हार घातला. माझ्या पायावर डोकं ठेवलं मी विचारलं, 'कोण आपण? मी ओळखलं नाही'. 'साहेब, आज मी आहे तो आपल्यामुळेच. फार फार वार्षापुर्वी मी एका तळयाच्या शेजारून फिरत असता अचानक तोल जाऊन मी पाण्यात पडलो. मला पोहता येत नव्हतं, मी गटांगळया खाऊ लागलो. माझी ती अवस्था आपण पाहिलीत आणि ताबडतोब पाण्यात उडी घेतलीत. घाबरलेला मी गळयाला मिठी मारली. आपण जोरात हिसका देऊन मिठी सोडवलीत व ओढतच मला पाण्याबाहेर काढलंत. कुठलीही ओळख न देता उपकाराची भावना प्रगट न करता आपण निघून गेलात. मागून मला कळले मला वाचवणारे सुप्रसिध्द लेखक खांडेकर होते. तेव्हांपासुन आपल्याकडे यायचे होते तो योग आज आला'. खांडेकर म्हणाले, 'कोणालातरी जगायला आपण मदत करू शकतो ही गोष्ट माझ्या दृष्टीने फार मोठी आहे. तोच क्षण माझ्या जीवनातला अनमोल क्षण होय'. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 29/07/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ◆ १९८७- भारताचे पंतप्रधान राजीव गांधी व श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष जे.आर.जयवर्धने यांनी भारत-श्रीलंका करारावर सह्या केल्या. ◆ १९८५-मल्याळम लेखक टी. एस. यांना ज्ञानपीठ पुरस्कार. ◆ १९५७- 'इंटरनॅशनल अँटॉमिक एनर्जी एजन्सी(IAEA) ची स्थापना. ◆ १९४६-टाटा एयरलाइन्सचे 'एयर इंडिया' असे नामकरण करण्यात आले. 💥 *जन्म* :- ● १९२२ - बळवंत मोरेश्वर पुरंदरे, मराठी इतिहाससंशोधक, लेखक. ● १९२५ - शिवराम दत्तात्रेय फडणीस, मराठी व्यंगचित्रकार. ● १९५९ - संजय दत्त, हिंदी चित्रपट अभिनेता. 💥 *मृत्यू* :- ● २००८ - इश्मीत सिंग सोधी, भारतीय पार्श्वगायक. ● २००९- महाराणी गायत्री देवी ,जयपूरच्या राजमाता *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे बेनीन येथील विमानतळावर आगमन, पश्चिम आफ्रिकेतील 3 देशांचा दौरा.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *१७ आमदार अपात्र; कर्नाटकात आज दुसऱ्यांदा होणार शक्तिप्रदर्शन* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *उत्तर प्रदेश बनणार देशातील पहिले ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे राज्य, फ्लिपकार्टच्या सीईओंचे प्रतिपादन : ६५ हजार कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *श्रीनगर - जम्मू आणि काश्मीर येथे मध्यरात्री 12.54 वाजता भूकंपाचा सौम्य धक्का, 3.2 एवढ्या रिश्टर स्केलची तीव्रता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *पुणे - मराठा क्रांती सेना विधानसभा निवडणुकीत राज्यात 100 जागा लढवणार, पुण्यातील बैठकीत झाला निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *सोलापूर : कामिका एकादशी निमित्त पंढरपुरात भाविकांची गर्दी, आषाढी नंतरची पहिली १५ दिवसाची एकादशी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ * दिल्ली : बॅँकॉक येथे सुरू असलेल्या थायलंड ओपन मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या आशिष कुमारने ७५ किलो गटात मिळविले सुवर्णपदक, आशिषचे हे पहिलेच आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक आहे. या स्पर्धेत भारताने एक सुवर्ण, चार रौप्य व तीन कांस्यपदकांसह आठ पदके पटकावली आहेत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मृत्यू : एक अटळ सत्य* मृत्यू हे कोणाच्या हातात नाही आणि ते कोणाला सांगून देखील येत नाही. म्हणून मानवाला सर्वात जास्त भीती कोणाची वाटत असेल तर ते मृत्यूची. प्रत्येकाला वाटते की मृत्यू येऊच नये मात्र जन्म घेतलेल्या प्रत्येकाचा मृत्यू अटळ आहे. त्यात काही बदल करता येत नाही. स्त्री असो पुरुष असो, गरीब असो असो श्रीमंत असो, राजा असो वा रंक असो प्रत्येकांचा एक ना एक दिवस मृत्यू होणार हे निश्चित........... पूर्ण लेख खालील लिंकवर वाचन करता येईल. https://nasayeotikar.blogspot.com/2019/03/blog-post_12.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *ढगांचं बारसं कोणी केलं ?* 📙 मे १७८३ पासून त्या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यापर्यंत बहुसंख्य युरोपीय देशांच्या आकाशात एक विलक्षण दृश्य पाहायला मिळत होतं. आईसलँडमधील एल्डेयार इथं तसंच जपानमधील असामा यामा इथं ज्वालामुखींचे उद्रेक झाले होते. त्यातून बाहेर पडलेली राख आणि राळ यांचं मिश्रण साऱ्या उत्तर गोलार्धामधील आकाशात पसरलेलं होतं. त्या दृश्यानं अनेकांना विस्मयचकित केलं होतं. कलाकारांनी त्याची चित्रं रंगवली होती. नियमित रोजनिशी लिहिणाऱ्यांनी त्याची तपशीलवार वर्णनं नोंदवून ठेवली होती. साहित्यिकांनी आपल्या कथा कादंबऱ्यांसाठी त्या आकाशदर्शनाची पार्श्वभूमी वापरली होती. त्यात भर पडली ती १८ ऑगस्टच्या रात्री एक धगधगता तेजस्वी अशनी त्या आकाशात चमकून गेला तेव्हा. सर्वांच्याच डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या त्या दृश्यानं एका अकरा वर्षांच्या मुलाच्या मनावर कायमची मोहिनी घातली नसती तरच नवल. त्या दिवसांपासून ल्युक हार्वर्डला आकाशदर्शनाचा छंद जडला. वास्तविक पुढील आयुष्यात त्यानं खगोलशास्त्राचा व्यवसाय म्हणून स्वीकार केला नव्हता वा त्या विषयाचा अभ्यासही केला नव्हता. वनस्पतीशास्त्रातली पदवी त्यानं मिळवली होती. तरीही आकाशदर्शनाचं त्याचं वेड काही कमी झालं नाही. त्याच सुमारास डेन्मार्कमधील वनस्पतीशास्त्रज्ञ कार्ल लिनायस यानं वनस्पतीचं वर्गीकरण करणारी एक प्रणाली विकसित केली होती. ती सर्वत्र गाजली होती. आजतागायत त्याच प्रणालीचा वापर होतो आहे. तरुण ल्युकवरही त्याचा प्रभाव पडला होता. त्या भरात त्यानंही त्या वर्गीकरणामध्ये आपल्या परीनं थोडी भरही घातली होती. वनस्पतीचं वर्गीकरण करता येतं, तर मग आकाशात नेहमीच दिसून येणाऱ्या ढगांचं वर्गीकरण का करता येऊ नये, असा विचार त्याच्या मनात घोळू लागला होता. त्याच सुमारास फ्रेंच वैज्ञानिक ज्याँ बातिस्त लमार्क यानं आकाशात दिसणाऱ्या ढगांची पाच ढोबळ वर्गांमध्ये विभागणी केली होती. तशी ती जुजबीच होती; पण तोवर तसा प्रयत्न कोणीच केला नसल्यानं लमार्कच्या वर्गीकरणालाही मान्यता मिळाली. त्यामुळे ल्युक हाॅवर्डला अधिक प्रोत्साहन मिळालं आहे आणि मग त्यानं अधिक तर्कसंगत अशी आपली प्रणाली सादर केली. त्याने एकंदरीत चार मार्ग प्रतिपादित केले होते. एक *क्युम्युलस* म्हणजे एखाद्या ढिगासारखे दिसणारे, दोन *स्ट्रॅटस* म्हणजे एकावर एक थर असणारे, तीन *सिर्रस* म्हणजे कुरळ्या केसांसारखे वेटोळेदार आणि लांबलचक असणारे आणि चौथे *निम्बस* म्हणजे पाण्याचा साठा असणारे पावसाळी ढग. या चार वर्गांमध्ये संकर होण्याची शक्यताही त्यानं वर्तवली होती. त्यानुसार पावसाळी पण ढिगासारखे असणारे ते *क्युम्युलोनिम्बस* कुरळ्या केसांचे थरावर थर असणारे सिर्रोस्ट्रॅटस वगैरे. अठराव्या शतकाची अखेर होता होता हाॅवर्डच्या या वर्गीकरणाला सर्व स्तरांमधून विस्तृत मान्यता मिळत गेली. आजही यांच वर्गीकरणाचा वापर केला जात आहे. ढगांचे गुणधर्मही या वर्गीकरणातून प्रतीत होतात याचीही प्रचिती आता मिळालेली असल्यामुळे तर या वर्गीकरणावर शिक्कामोर्तबच झाले आहे. म्हणून ल्युक हॉवर्डलाच ढगांचं बारसं केल्याचं श्रेय द्यायला हवं. *बाळ फोंडके यांच्या 'कोण ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• “संकटात सापडल्यावरच माणूस स्वतःला ओळखतो.” *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *जंगलातला सर्वात मोठा प्राणी कोणता ?* हत्ती 2) *सर्वात वेगवान प्राणी कोणता ?* चित्ता 3) *मध्यप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?* श्री कमलनाथ 4) *संत गाडगेबाबा यांचे पूर्ण नाव काय होते ?* डेबूजी झिंगराजी जानोरकर 5) *राजस्थान राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?* श्री अशोक गहलोत *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  सुनील कोल्हे ●  सुदीप दहीफळे ●  दलित सोनकांबळे ●  माधव मुस्तापुरे ●  संजय पंचलिंग *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *'घराच्या, शहराच्या आणि देशाच्या दुरवस्थेला दुसरा-तिसरा कोणी जबाबदार नसून, माझ्यातल्या 'मी' जबाबदार आहे. ' असे बाबासाहेब पुरंदरे एकदा म्हणाले होते. 'मी' हा एवढा मोठा असतो, की त्याचे सहजासहजी समाधान होत नाही. त्याला अहंकाराचा स्पर्श असतो. तो दुखावू नये, म्हणून काळजी घेतली जाते. 'मी हे का करावे','माझा याच्याशी काय संबंध' यासारखे प्रश्न विचारून आपल्यातला 'मी' अनेक सामाजिक कर्तव्यांपासून दूर जातो. एकदा का होईना 'मी'ने 'मी'चे ऐकले, तर व्यक्तीमत्वात सकारात्मक बदल होईल.* *वाल्याने 'मी'चा खरा आवाज ऐकला. वाटमारी सोडली आणि तो वाल्याचा वाल्मिकी झाला. वाटमारी करणारा वाल्या पुढे भारतीय संस्कृतीचा वाटाड्या बनला. मी कोणाला दोष देणार नाही. माझ्याकडून होईल तेवढे सत्कार्य मी करेन माझ्या हातून चांगले होण्याची शक्यता नसेल, तेंव्हा मी कोणाचे वाईट करणार नाही. यासारखी छोटी छोटी सूत्रे प्रत्येकाने आचरणात आणली, तर समाजस्वास्थ्य सुधारेल. यात शंका नाही. 'मी' चूक करतो म्हणून 'आम्ही' चूक करायला धजावतो. 'मी' सुधारलो तर जग सुधारेल. सकल जीवन समृद्ध करण्यासाठी 'मी'वर चांगले संस्कार होणे आवश्यक आहे.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माणूस हा परिवर्तनशील जीव आहे. त्याच्यावर जेव्हढ्या लवकर परिणाम होईल तेव्हढा कुणावरही होणार नाही. म्हणून फक्त सकारात्मक विचार करावा. त्यातून 100% परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही.* *बाणभट्ट गुरुकुल आश्रमात शिक्षण घेतांना त्याला काहीच येत नव्हते, तो अभ्यासात सर्वात मागे असायचा, त्यामुळे एक दिवस तो आत्महत्या करायला निघाला.* *एका विहिरीजवळ आल्यावर त्याच्या असे लक्षात आले की पाण्याची बादली जिथून खाली वर येते तिथे एक चरा म्हणजे खोल जागा तयार झालेली दिसली.चमत्कार झाला--जर दगड साध्या दोराच्या सततच्या घर्षणाने झिजू शकतो तर जिवंत माणूस का नाही? आणि या प्रश्नाने हर्षाच्या राजवटीत बाणभट्ट हा प्रसिध्द कादंबरीकार जन्माला आला.* *ज्याला त्यावेळचा आणि आजचा समाज विद्वान म्हणून संबोधतो.* *आपणही जरा विचार करा जर सातत्याने एखादी अशक्य गोष्ट घडू शकते मग आपण प्रयत्न का सोडायचे?* *शेवटी म्हणतात ना ,प्रयत्ने वाळूचे कण रगडीता ,तेलही गळे* *अशोक कुमावत* *( राष्ट्रपती पुरस्कार विजेते )* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जीवनातले सगळेच प्रश्न सहज मिटतील असे नाही.काही प्रश्न सहज प्रयत्न केल्यावर मिटतात तर काही अथक प्रयत्न करुनही मिटत नाहीत.अशावेळी मनुष्य आपला स्वत:चा आत्मविश्वास गमावून बसतो आणि आपलं नशिबच तसे आहे आता आपण काय करू शकतो अशा नकारात्मक विचारावर विश्वास ठेवतो.असे केल्याने प्रश्न मिटत नाहीत तर त्या प्रश्नांना ठामपणे समोर उभे राहून मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करुन जे काही आपल्यासमोर संकटं किंवा प्रश्न उभे राहतील त्याला तोंड देऊ आणि समर्थपणे जीवन जगू.असे विचार आणले तर जीवनाचा कोणताही प्रवास आनंदाने करु शकतो.कारण जीवनच संघर्ष आहे त्याला सामोरे गेलेच पाहिजे.हतबल होऊन किंवा विश्र्वास गमावून चालणार नाही. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *महती आईची* एकदा एका व्‍यक्तीने स्‍वामी विवेकानंदांना प्रश्‍न विचारला,'' स्‍वामीजी, संसारामध्‍ये जेवढी आईची महती गायली जाते तेवढे महत्व पित्‍याला का दिले जात नाही?मातेइतकाच पितासुद्धा महत्‍वाचा असूनसुद्धा पित्‍याला फारसे का महत्‍व दिले जात नाही याचा कृपया उलगडा करावा.'' स्‍वामीजी यावर काहीच बोलले नाही. ते त्‍या व्‍यक्तिपासून थोडे दूर गेले आणि एक मोठा दगड त्‍यांनी उचलला व त्‍या व्‍यक्तिच्‍या हाती देत ते म्‍हणाले,'' बंधू, हा दगड उद्या सकाळपासून तू पोटाला बांध आणि तुझी नित्‍यनेमाची सर्व कामे करत जा. तुझ्या प्रश्‍नाचे उत्तर तुला मिळून जाईल.'' दुस-या दिवशी सकाळी ओरडतच तो माणूस स्‍वामी विवेकानंदांकडे आला,'' स्‍वामीजी माझी कंबर, पोट दोन्‍हीही खूप दुखत आहे. एक प्रश्‍न काय विचारला मी, तुम्‍ही असे काय विचित्र उत्तर दिले त्‍याचे. माझी कंबर, पोट अगदी दुखून मी हैराण झालो आहे.'' स्‍वामी मंद स्मित करत म्‍हणाले,'' बंधू, तुझ्या प्रश्‍नाचे उत्तर तुला मिळाले नाही काय? अरे जिने नऊ महिने तुला पोटात घेऊन तुला वाढवले, तुझे कधीही तिला ओझे झाले नाही, तिने कधीही कंटाळा केला नाही. त्‍या मातेची महती ही तिन्‍ही लोकांत सर्वश्रेष्‍ठच आहे. '' *तात्‍पर्य :-* *आईसारखे दैवत सा-या जगतामध्‍ये नाही.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 27/07/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ■ १९९९- द्रव खनिज तेल वायूचा (LPG)वाहनांसाठी इंधन म्हणून वापर करण्याचा प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयाने मंजूर केला. ■ २००१- सार्वजनिक ठिकाणी सिगारेट, तंबाखू व गुटखा सेवनावर व जाहिरातीवर बंदी चा महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा निर्णय. ■ २०१२-लंडन येथे ३० व्या ओलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली. 💥 *जन्म* ● १८९९- पर्सी हॉर्नीब्रूक, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू. ● १९१५- जॅक आयव्हरसन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू. 💥 *मृत्यू°* ● २००२ - कृष्णकांत, भारताचे उपराष्ट्रपती. ● २००३ - बॉब होप, इंग्लिश अभिनेता. ● २०१५ - डॉ. अब्दुल कलाम यांचा स्मृतिदिन *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *कल्याण - मुंबईसह उपनगरात जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर परिसरात पावसानं थैमान घातलं आहे. अनेक सखल भागात पाणी साचलं असून बदलापूर स्टेशन येथील रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्याने लोकल सेवा ठप्प झाली आहे, पुन्हा एकदा 26 जुलैची आठवण झाली ताजी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *बंगळुरु: प्रचंड राजकीय उलथापालथीनंतर भाजपाचेवरिष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *मुंबई - मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, शाळेला सुट्टी देण्याचा निर्णय मुख्याध्यापकांनी ठरवावा, शालेय शिक्षण मंत्र्याची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *घोट येथील जवाहर नवोदय विद्यालयात शैक्षणिक व भौतिक सोयीसुविधा पुरवाव्यात, अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी केंद्रीय मानव संसाधन विभागाचे सचिव बी. के. सिंग यांच्याकडे केली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *आरक्षणाचा अध्यादेश काढा, नाहीतर आधीच्या आरक्षणानुसार निवडणूक घ्या, सुप्रीम कोर्टाचा आदेश : नागपूर, अकोला, वाशिम, नंदुरबार, धुळे जि.प. निवडणूक अटळ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *लंडन : इंग्लंडचे 182 धावांचे माफक लक्ष्य आयर्लंड संघाला पेलवले नाही आणि त्यांचा संपूर्ण संघ 38 धावांत तंबूत परतला, इंग्लंडने हा सामना 143 धावांनी जिंकला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *अमरावती : राज्यस्तरीय रायफल व पिस्टल स्पर्धेमध्ये एअर रायफल शूटिंग या क्रीडाप्रकारात १४ वर्षे वयोगटातून अमरावतीची मुनमुन राजेश तायडे हिने अव्वल स्थान पटकावले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रश्न कमी पटसंख्येच्या शाळेचा ...* दोन वर्षाखाली दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जवळपास एक हजार चारशे शाळा बंद करण्यात आल्या होत्या आणि त्यात जास्तीत जास्त सरकारी शाळांचा समावेश होता. या शाळा बंद झाल्यामुळे या शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी यांचे जवळच्या शाळेत समायोजन करण्यात आले. शिक्षक काय कोठे ही जाऊन नोकरी करू शकतो ? त्याला त्याचे तेवढे दुःख नाही मात्र इयत्ता पहिली ते चौथी वर्गात शिकणाऱ्या सहा ते दहा वयोगटातील मुलांचे काय हाल होतात ? याचा जरा देखील विचार केला जात नाही याचे फार मोठे दुःख आहे. ...... पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे. https://nasayeotikar.blogspot.com/2019/05/blog-post.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *इंटरनेटची मालकी कोणाकडे आहे ?* 📙 अमेरिकेच्या संरक्षण खात्यासाठी संशोधन करणाऱ्या काही वैज्ञानिकांना सतत संपर्कात राहणं आणि एकमेकांना आपण वाचलेल्या किंवा लिहिलेल्या लेखांची, अहवालांची साद्यंत माहिती सतत देणं आवश्यक वाटलं. त्यावेळी उपलब्ध असलेल्या साधनांनी त्यांना समाधान मिळत नव्हतं, म्हणून त्यांनी आपापले संगणक एकमेकांना बिनतारी पद्धतीनं जोडून एक जाळं निर्माण केलं. याला त्यांनी 'अर्पानेट' असं नाव दिलं. त्याचा वापर त्यावेळी तरी मर्यादित होता; पण ती संकल्पना एका क्रांतीची उद्गाती ठरली. ही संकल्पनाच आजच्या इंटरनेटचा आत्मा आहे. त्यावेळी फक्त त्या संशोधकांचेच संगणक एकमेकांशी जोडले गेले होते. ते संशोधकही एकमेकांपासून फार दूर नव्हते; पण एकदा अशा प्रकारे बिनतारी पद्धतीने संगणक एकमेकांशी जोडता येतात हे समजल्यावर त्याचं एक जगड्व्याळ जाळं तयार व्हायला फार वेळ लागला नाही. ते जाळ बांधण्यासाठीच्या पायाभूत सुविधा प्रस्थापित करायला काय वेळ लागला असेल तेवढाच. त्या पायाभूत सुविधांमध्ये अनेक प्रणालींचा समावेश आहे. संगणक एकमेकांशी जोडता येण्यासाठी संगणकांमध्ये काही विशिष्ट इलेक्ट्रॉनिक घटकांचा अंतर्भाव करावा लागला. यांना इथरनेट कार्ड म्हणतात. पूर्वी ते स्वतंत्रपणे घेऊन संगणकाशी जोडावं लागत असे. आता ते संगणकातच अंतर्भुत केलेलं असतं. टेलिफोनद्वारे संगणकांची जोडणी करण्यासाठी काही व्यवस्था करावी लागते. आता तर राऊटर वापरून संपूर्ण घरात किंवा मोठ्या परिसरात इंटरनेट प्रमाण उपलब्ध होण्यात होईल अशी 'वायफाय' प्रणाली विकसित केली गेली आहे. संगणकातले संदेश एका ठिकाणाहून दुसरीकडे नेण्यासाठी उपग्रहांचा वापर होतो. आणि या सर्व प्रणाली व्यवस्थित आपापलं काम करतील यासाठी काही खास मंत्रावळी म्हणजेच सॉफ्टवेअरचीही निर्मिती केली गेली आहे. ही मंत्रावली वापराच्या दृष्टीने अधिकाधिक सुलभ व्हावी सर्व गरजांसाठी ती उपयोगी पडावी आणि संदेशवहन वेगवान व्हावं यासाठी नवनव्या सुधारित मंत्रावलीही सतत तयार होत असतात. त्याशिवाय जगभरची विविध प्रकारची माहिती साठवून ठेवण्यासाठीची व्यवस्थाही करावी लागते. पूर्वी अशा प्रकारची माहिती कागदावर लिहिली जाऊन त्याचं दप्तर कपाटांमध्ये साठवून ठेवलं जात असे. आता ते संगणकाद्वारे दृकश्राव्य फितींवर साठवून ठेवलं जातं. 'क्लाऊड कॉम्प्युटिंग' या नव्या संकल्पनाद्वारे तर ते आभासी साठवणुकीद्वारे सुरक्षित ठेवलं जातं. यापैकी प्रत्येक सुविधा महत्त्वाची असली तरी ती संपूर्ण जाळ्याचा एक छोटासा भागच आहे. त्या त्या भागांपुरती मालकी निरनिराळ्या व्यक्ती, उद्योग, संस्था, सेवाभावी संस्था, सरकारी यंत्रणा यांच्याकडे असली तरी संपूर्ण इंटरनेटवर कोणाचीही मालकी नाही. कोणी एक संस्था वा उद्योग इंटरनेटचा मालक नाही. त्यामुळे बलवान राष्ट्रांनाही इंटरनेट संपूर्णपणे बंद करण्यात यश मिळत नाही. इंटरनेट सुविधा आपल्याला पुरवणाऱ्या संस्थांवर बंदी घालून आपापल्या राज्यापुरती ती यंत्रणा बंद केली जाऊ शकते. इंटरनेटच्या वापरात सुसूत्रता आणणाऱ्या काही नियंत्रक संस्था आहेत. त्या आपल्याला निरनिराळे पत्ते किंवा ओळखपत्र मिळवून देण्याची व्यवस्था करतात; पण त्यांच्याकडेही संपूर्ण इंटरनेटची मालकी नाही. कोणीही मालक नसलेली आणि तरीही सुरळीत चाललेली 'इंटरनेट' ही एकमेव बहुपयोगी यंत्रणा आज अस्तित्वात आहे. *बाळ फोंडके यांचा 'कोण ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• “ज्या माणसाजवळ संयम आहे तो प्रत्येक गोष्टीचा धनी असतो.” *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारताचा पहिला हिंदी बोलपट कोणता ?* आलमआरा 2) *पृथ्वीवर सूर्याचा प्रकाश पोहचण्यासाठी किती वेळ लागतो ?* 8 मिनिटे 3) *कोणत्या ग्रहावर सजीवसृष्टी आहे ?* पृथ्वी 4) *सर्वात मोठा ग्रह कोणता ?* गुरू 5) *सर्वात उंच प्राणी कोणता ?* जिराफ *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  हणमंत पडवळ, उस्मानाबाद ●  उत्कर्ष मादसवार ●  शशिकला बनकर ●  मारोती ताकलोर ●  श्रीकांत क्यादरवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपला चालताना तोल जातो, उठताना तोल जातो, बसताना तोल जातो, बोलताना तोल जातो, वागताना तर नेहमीच तोल जातो. कोणताही ताल नसताना तोल जातो. तोल सांभाळत जगण्याच्या प्रयत्नात आपण कधी बेताल होतो समजत नाही. खोटे आणि दिखाऊ वागणे नेहमीच धडपडते. खरे आणि अस्सल राहणे ठामपणे चालत जाते. कळपातील मेंढी वाघाचे कातडे अंगावर पडल्याने वाघासोबत चालू लागते, पण जेंव्हा डरकाळी फोडण्याची वेळ येते तेंव्हा ती मेंढी बें बें असाच आवाज करते. मग वाघांना तिचा फडशा पाडायला वेळ लागत नाही. तोलहीन आणि खोटेनाटे व्यवहार आपला केंव्हा फडशा पाडतील हे सांगता येत नाही.* *माणसाच्या खोट्यानाट्या व्यवहारांनी बोरी-बाभळीच्या अंगावरसुद्धा काटे येतात,असे बहिणाबाई चौधरी लिहितात. 'जगण्यात हरवलेले जीवन कुठे आहे?' हे जीवन स्वत:शी प्रतारणा करून खोटेनाटे वागण्यात, स्वत:चा खोटा अहंभाव जपण्यात हरवून गेले आहे. दुस-याच्या समस्यांमध्ये स्वत:ला नि:स्वार्थीपणे गुंतवून घेणारा आणि त्या सोडविण्याची धडपड करणारा साहित्यिक असे कुसुमाग्रजांनी वि.स. खांडेकरांबद्दल लिहिले होते. आपण दुस-याच्या समस्यांमध्ये स्वत:ला गुंतवून घेतो का? ते करत असू तर जगण्यातले जीवन हरवले जाणार नाही. 'बुडती हे जन, न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणवुनी' असा तुकारामांनी सांगितलेला कळवळा जेंव्हा ह्रदयातून वाहत राहील तेव्हा जीवन जगण्यात हरवले जाणार नाही.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 *श्री. संजय नलावडे, मुंबई* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• हरिया जांणे रूखड़ा,  उस पाणी का नेह । सूका काठ न जानई, कबहूँ बरसा मेंह ॥ सारांश      वृक्षास कळे सिंचन      जया प्रिय ते जीवन      शुष्क काष्ठ काय जाणे ?       थेंब मोतिया समान महात्मा कबीर पटवून देतात की मनाच्या तयारीवर सर्वकाही अवलंबून असतं.  पाण्याचं महत्त्व , त्याचा स्नेह व सिंचन केवळ हिरव्या वृक्षाला समजू शकतात. वाळलेल्या लाकडाला जवळून जाणारा जल प्रवाह किवा अमृतरूपी जलधारांच्या वर्षावाचं काय अप्रुप वाटणार आहे बरं ! मोत्यासम थेंबाचं त्याला काहीच महत्व नसतं. कारण त्याच्या ठायी असणारं भावनाशिल मन कधीच मेलेलं असतं. मुर्दाड मनाच्या माणसाला बाग, हिरवळ, प्रेम, आपुलकी, सहानुभुती संवेदना आदि भावना काय कळणार ? ते खरं तर दगडा समान निगर गट्ठ बनलेले असतं. त्याच्यावर कितीही जलधारांचा अभिषेक केला तरी दगड द्रवत नाही. तसे दगणडासमान निष्ठूर निर्दयी माणसासोबत एकतर्फी कितीही प्रेमळ वागलात तरी त्याच्या मुळ स्वभावात तीळमात्र स्नेहार्द्र भाव निर्माण होण्याची सुतराम शक्यता नसते. . त्यांचा स्वार्थ साधला की संपलं . खरं तर यांचं असणं नसणं नसण्यातंच जमा असतं. ओसाड निर्दयी मनामध्ये दयेचे निर्झर प्रवाहित होणं अशक्य आहे.      एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• काहीवेळा काहींच्या बाबतीत मनुष्याचा स्वभाव समोरची परिस्थिती पाहून बदलत असतो.कधी कधी असेही वाटते की,आपण कमी वेळेत खूप काही करुन धनाढ्य व्हावे आणि आनंदाने जीवन जगावे.या वाईट मोहासाठी तो वेगवेगळ्या गैरमार्गाचा अवलंब करतो आणि संपत्ती अर्थात माया जमवण्याच्या मोहात पडतो.जी माया जमवली त्यात त्याला समाधान तर नसतेच अजूनही त्याच्यापेक्षा अधिक माया जमवण्यात वेळ खर्च करतो.परंतु हे त्याच्या लक्षात येत नाही की,आपण वाममार्गाला लागलो आहोत, दुस-याला लुटलो आहोत ही जी काही वाईट सवय लागली आहे ती आपल्या मनाला समाधान देणारी नाही.केवळ आपल्या मोहापायी, आपल्या स्वार्थासाठी इतरांच्या जीवाला त्रास देऊन आपल्या नको त्या गोष्टीच्या नादाला लागलो आणि हावरटपणाचा कहर केला. त्यामुळे आपले जीवन हे जीवन राहिले नसून आपण इतरांच्या नजरेत एक गुन्हेगार ठरलो आहोत आणि ते ही आपल्या स्वार्थी मोहापायी ? हा मोह काहीच कामाचा नाही.ज्यामुळे माणसातील माणुसकी नष्ट झाली.त्यापेक्षा मनाचा हावरटपणा सोडून द्यावा, भरपूर मेहनत करावी,आपल्या कृत्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी आणि आपले जीवन सुखासमाधात जावे.यापेक्षा आपल्या कोणत्याही अपेक्षा असू नयेत.हाच मंत्र चांगले जीवन जगण्यासाठी पुरेसा आहे.नाही तर नको त्या मोहात जाणे आणि आपल्याच हाताने  जीवन दु:खमय जगणे यापेक्षा जीवनाचे वाईट चित्र काय असू शकेल ? © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कुत्रा आणि लांडगा* एक लांडगा फार दिवस उपाशी राहिल्यामुळे रोड झाला होता. काहीतरी खायला मिळाले तर पहावे म्हणून तो चांदण्या रात्री फिरत होता. तेव्हा त्याला एका झोपडीजवळ दारावर एक लठ्ठ कुत्रा बसलेला दिसला. त्याने त्याला रामराम करून त्याचा आदरसत्कार केल्यावर लांडगा त्याला म्हणाला, ''तू फार चांगला दिसतोस, तुझ्यासारखा देखणा व धष्टपुष्ट प्राणी आजपर्यंत मी पाहिला नाही. याचे कारण तरी काय? मी तुझ्यापेक्षा जास्त उद्योग करतो, पण मला पोटभर खायला मिळत नाही.'' कुत्रा म्हणाला, ''अरे, मी करतो ते तू करशील तर माझ्यासारखाच तूही सुखी होशील.''त्यावर लांडग्याने विचारले, ''तू काय करतोस?'' कुत्रा म्हणाला, ''दुसरे काही नाही. रात्रीच्या वेळी मालकाच्या दारापुढे पाहारा करून मी चोराला येऊ देत नाही.'' लांडगा म्हणाला, ''एवढंच ना? ते मी मनापासून करीन बाबा. अरे मी रानात भटकत थंडीवारा सोसतो तर मला घराच्या सावलीत बसून पोटभर अन्न मिळाल्यास दुसरे काय पाहिजे?'' याप्रमाणे दोघांमध्ये बोलणे चालले असता कुत्र्याच्या गळ्याला दोरीचा करकोचा पडलेला लांडग्याने पाहिला. तेव्हा तो कुत्र्याला म्हणाला, ''मित्रा, तुझ्या गळ्यात काय रे हे?'' कुत्रा म्हणाला, ''अं हं. ते काही नाही.'' लांडगा म्हणाला, ''तरी पण काय ते मला कळू देत.'' कुत्रा म्हणाला, ''अरे, मी थोडासा द्वाड आहे, लोकांना चावतो, म्हणून मी दिवसा झोपलो तर रात्री चांगला पहारा करीन म्हणून माझा मालक मला दोरीने बंधून ठेवतो पण दिवस मावळला की तो मला सोडतोच. मग मी वाटेल ते करतो, वाटेल तिकडे फिरतो. खाण्यापिण्याविषयी विचारशील तर माझा मालक आपल्या हाताने मला भाकरी खाऊ घालतो. घरची सगळीच माणसं मला मायेने वागवतात. पानावर उरलेली भाकरी माझ्याशिवाय दुसर्‍या कोणाला देत नाहीत. तेव्हा तू पहा, माझ्यासारखा वागशील तर तही सुखी होशील.'' ते ऐकताच लांडगा मागच्यामागे पळू लागला. त्याला हाका मारीत कुत्रा म्हणाला, ''अरे, असा पळतोस काय?'' लांडगा दुरूनच म्हणाला, ''नको रे बाबा मला ते सुख, ते तुझे तुलाच लाभो. स्वतंत्रपणे वाटेल तसे वागता येत असेल तर तसली गोष्ट मला सांग, तुझ्यासारखे बांधून ठेऊन जर मला कोणी राजा केले तर ते राजेपणदेखील मला नको!'' तात्पर्य : स्वतंत्रपणा असताना गरिबीही चांगली. पण परतंत्रपणा असेल तर श्रीमंतीचाही काही उपयोग नाही. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

*सहशालेय उपक्रम* *👭👬बालसभा👬👭* 〰〰〰〰〰〰〰 आज दिनांक २५-०७-२०१९ रोजी जि.प.प्रा.शाळा गोजेगाव येथे बालसभा घेण्यात आली. 👉 बालसभेचा विषयः *माझी सृष्टी* 🌳🌴☘🌸🌴☘🌸 💐💐💐💐💐💐 आजच्या बालसभेतुन विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातुन कविता गायन ,पाऊस पाणी,वृक्ष लागवड संदेश ,आरोग्याचे संदेश व स्वच्छतेचे महत्त्व सांगण्यात आले.विद्यार्थ्यांनी माझी सृष्टी स्वच्छ , हिरवळ कशी राहील याबद्दल माहिती बालसभेत सांगितली. 〰〰〰〰〰〰〰

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 26/07/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *विजय दिन - भारत* (कारगिल युद्धाची समाप्ती) 💥 ठळक घडामोडी :- ◆ १९६५ - मालदीवला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य. ◆ २००५ - मुंबई व परिसरात २४ तासात जवळजवळ १ मीटर (९९५ मिलीमीटर) पाउस. महापूरात शेकडो मृत्युमुखी. ◆ २००८-अहमदाबाद शहरात २१ बॉम्बस्फोटात ५६ मृत्युमुखी तर २०० जखमी. ◆ २०११ - मोरोक्कोमध्ये सी.१३० प्रकारचे विमान कोसळले. ७८ ठार. 💥 *जन्म* ◆१८८५-मुग्धा गोडसे,अभिनेत्री व मॉडेल. ◆ १९२७ - जी.एस. रामचंद, भारतीय क्रिकेट खेळाडू. ◆ १९४३ - मिक जॅगर, इंग्लिश संगीतकार, गायक. ◆ १९४९ - थक्शिन शिनावत्र, थायलंडचा पंतप्रधान. 💥 *मृत्यू* ◆ १८६७ - ओट्टो, ग्रीसचा राजा. ◆ १९५२ - एव्हा पेरोन, आर्जेन्टिनाची गायिका. ◆ २००९ - भास्कर चंदावरकर, मराठी संगीतकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली : काश्मीरच्या कारगिल भागात पाकिस्तानी लष्कराने केलेली घुसखोरी उधळून लावताना पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या युद्धाला आज २० वर्षे पूर्ण होत असून, त्याच्या आदल्याच दिवशी पुन्हा ‘कारगिल’सारखी घुसखोरी करण्याची हिम्मत करू नका असे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी पाकला ठणकावले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत तिसऱ्यांदा मंजूर; काँग्रेसचा सभात्याग, तिहेरी तलाक विधेयकाच्या बाजूनं ३०३ मतं* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात काल ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा मारा सुरूच होता. कुलाबा येथे ५२.२ तर सांताक्रुझ येथे ३८.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली, आज कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला असून, मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार पावसाच्या सरी कोसळतील, अशी शक्यता वर्तवली आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *औरंगाबादमधील सुमारे २ हजार उद्योगांवर मंदीचे संकट, जीएसटीचा फटका, दुष्काळाची छाया : लाखांहून अधिक कामगार, कर्मचाऱ्यांवर गंडांतराची भीती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *किन्हवली : शहापूर तालुक्यातील दुर्गम गाव असलेल्या वाऱ्याचापाडा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक प्रमोद आणि शर्मिला पाटोळे यांनी स्वखर्चाने एका वर्गात बसवल्या दोन एसी.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *विद्यार्थी निवडणुकांच्या खर्चाचा भार पडणार महाविद्यालयांवर ? नवीन विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार तब्बल २५ वर्षांनंतर विद्यापीठ व महाविद्यालयात विद्यार्थी निवडणुका घेतल्या जाणार आहेत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *हैदराबाद : अखेरच्या चार मिनिटांमध्ये भक्कम बचाव करतानाच निर्णायक चढाया करत दबंग दिल्लीने गमावलेल्या सामन्यात पुनरागमन करत तामिळ थलाइवासचा प्रो कबड्डी लीगमध्ये अवघ्या एका गुणाने ३०-२९ असा केला थरारक पराभव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - भूक* https://storymirror.com/read/story/marathi/yk8b6w78/bhuuk/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *रक्तदान कोण करू शकत नाही ?* 📙 रक्तदान हे श्रेष्ठदान आहे यात शंकाच नाही. त्यामुळे रक्तदान करणाऱ्या कोणाचंही कौतुक करायला हवं. पण आपण एखादं दान देतो ते तेव्हा ते सत्पात्री असावं अशी खबरदारी जशी आपण घेतो तशीच ते दानही 'योग्य' आहे याचीही खातरजमा करून घेणं आवश्यक असतं. त्यामुळेच इच्छा असली तरी काही जणांना तात्पुरत्या काळाकरता तसंच इतर काही जणांना कायमचं रक्तदान करण्यापासून रोखलं जातं. ही नकारघंटा वाजवली जाणार्यांची यादी दात्याच्या आरोग्याची काळजी वाहण्यासाठी जशी बनवली जाते तशीच घेत्याच्याही आरोग्यावर लक्ष ठेवून बनवली जाते. म्हणूनच रक्तदान केल्यामुळे दात्याला कोणत्याही प्रकारच्या आरोग्यविषयक अडचणींचा सामना करावा लागू नये, याची काळजी घेणं आवश्यक ठरतं. त्या तत्त्वानुसारच, ज्यांच्यामध्ये सर्दी, पडसे, खोकला किंवा ताप यासारख्या कोणत्यातरी रोगजंतूचा उपसर्गाची लक्षणं दिसत आहेत त्यांना ती लक्षणं नाहीशी होईपर्यंत रक्तदान करता येत नाही. त्या रोगावर उपचारासाठी प्रतिजैविकांसारखी काही औषध दिली असतील तर त्यांचा असर नाहीसा होईपर्यंत रक्तदानाला मनाई करण्यात येते. एखाद्याला स्वतःलाच जर रक्त दिलं गेलं असेल तर त्या दानापासून एक वर्षांपर्यंत त्याला रक्तदान करता येत नाही. बाळंत झालेल्या स्त्रीला पुढचे सहा आठवडे रक्त देता येत नाही. ज्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे, ज्या स्त्रीला पाळी आलेली आहे, ज्या व्यक्तीने पुरुष अथवा स्त्री वेश्येशी समागम केला आहे, जिचा गर्भपात झाला आहे, अशांनाही काही काळापुरतं रक्तदानावरच्या बंदीला सामोरं जावं लागतं. पण ही झाली तात्पुरती बंदी. बंदीचा काळ उलटून गेल्यावर त्यांना रक्तदान करता येतं; पण काही व्यक्तींना तर रक्तदानापासून कायमचं दूर ठेवण्यात येतं. यात ज्यांनी रक्तवाहिनीवाटे नशील्या पदार्थांचं सेवन केलं आहे अशांचा समावेश होतो. मग ते त्यांनी एकदाच का केलेलं असेना. तसंच ज्यांना एड्सला कारक असलेल्या एचआयव्ही या विषाणूंची बाधा झालेली आहे, अशांचंही रक्त घेतलं जात नाही. हिमोफेलिया, थॅलेसेमियासारख्या रक्ताच्याच रोगांची लागण ज्यांना झालेली आहे अशांनाही रक्तदान करता येत नाही. वयाच्या अकराव्या वर्षांनंतर ज्यांना विशिष्ट प्रकारची कावीळ झालेली आहे, कर्करोग किंवा मल्टिपल स्क्लेरॉसिस या रोगांनी ग्रासले आहे, अशांनाही रक्तदान करण्यापासून परावृत्त केलं जातं. वेश्याव्यवसाय करणाऱ्या कोणालाही मग ती व्यक्ती स्त्री असो वा पुरुष रक्तदान करता येत नाही. ज्यांना हृदयविकाराचा झटका येऊन गेलेला आहे किंवा तो येऊ नये यासाठी ज्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, अशांनाही रक्तदान करता येत नाही. तीच बाब पक्षाघाताचा झटका येऊन गेलेल्यांनाही लागू होते. ही बंदी दात्यापेक्षा हे रक्त ज्याला दिलं जाण्याची शक्यता आहे अशा व्यक्तीच्या आरोग्याच्या काळजीतून घेतली जाते. कारण त्या व्यक्तीवर हे दान घेतल्यानंतर अनवस्था प्रसंग ओढवू शकतो. 'भीक नको पण कुत्रा आवर' अशी त्यांची परिस्थिती होऊन जाते. ही एवढी लांबलचक यादी असली तरी रक्तदानास पात्र असतात अशांची यादी याच्या कितीतरी पटींनी मोठी आहे. म्हणून रक्तपेढ्यांमध्ये सहसा रक्ताचा तुटवडा नसतो. *बाळ फोंडके यांच्या 'कोण ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• एका चुकीच्या शब्दाकडे लक्ष देण्याऐवजी केलेल्या हजार चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या. नात्यामध्ये आणि मैत्रीमध्ये कधीच दुरावा येणार नाही. *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *विद्युत बल्बमध्ये भरला जाणारा वायू कोणता ?* नायट्रोजन 2) *इंद्र धनुष्यात किती रंग असतात ?* 7 3) *वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता ?* 22 डिसेंबर 4) *भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोण ?* दादासाहेब फाळके 5) *पहिला भारतीय चित्रपट ( मुकपट ) कोणता ?* राजा हरिश्चंद्र (1913) *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  वैभव पाटील भोसले ●  रमेश मस्के ●  उदयकुमार केंद्रे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *डाॅ. राधाकृष्णन् यांनी आपल्या बोलण्यातून जगभर ख-या आणि शाश्वत धर्माची मूल्ये सांगितली. या निमित्ताने ते बोलत राहिले आणि सरोवरात कमलपुष्पे फुलत जावीत तसे त्यांचे बोलणे फुलत गेले. सत्ताधीशांचे स्तुतीपाठक खूप असतात. पण राजा तू चुकतो आहेस, असे बोलण्याची धमक असणारे क्वचित असतात. इष्ट असेल ते बोलणार, शक्य असेल ते करणार, असे म्हणणा-या गोपाळ गणेश आगरकरांना केवळ ३९ वर्षांचे आयुष्य लाभले. दारिद्र्य, दमा यांच्याशी झुंज देत धिक्कार व अपमान सोसूनही त्यांनी प्रबोधनाचा ध्यास घेतला आणि त्यासाठी काम केले.* *ज्ञानी माणसाने जगाला मार्ग दाखवावा. आपण वेगळे आहोत असे वागू नये. आपले अलौकिकत्व लोकांसाठी असावे. असा मार्ग दाखिवण्याचे काम जसे संतांच्या लेखनातून होते, वर्तनातून होते तसे बोलण्यातूनही होते. मूर्ख व कृतिहीनांचा वाचाळपणा आणि शहाण्या व कर्मवीरांचे मौन समाजाला घातक असते. रामदासांनी मूर्खांची लक्षणे सांगितली आहेत. त्यामध्ये 'दुर्जनांचेनि बोलणारा, मर्यादा सांडून चालणारा' त्याचप्रमाणे 'आदरेविण बोलणारा, न पुसता साक्ष देणारा' मूर्ख म्हटला आहे. तर उत्तम लक्षणांमध्ये 'विचारेविण बोलो नये, विवंचणेविण चालो नये' हेही सांगितले आहे. आपल्याला आयुष्यात गोडी निर्माण करायची असेल तर आपले बोलणे मधुर हवे. त्यासाठी आपले अंतरंग मधुर हवे. मग सर्वच मधुर होऊन जाईल.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🐚🐚🐚🐚🐚🐚🐚🐚🐚 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल -9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• पत्ता  बोला  वृक्ष  से , सुनो  वृक्ष  बनराय  | अब  के  बिछड़े  न  मिले ,  दूर  पड़ेंगे  जाय  || अर्थ :      संघटनेचं विघटन झालं की उभारी घेणं अवघडच असतं. हे पटवून देताना महात्मा कबीरांनी निसर्गातला किती समर्पक दृष्टांत दिलेला आहे.  पान झाडाला म्हणतं, ' हे तरूवर  वृक्षराज तुम्ही ऐका तर खरं ! आज तुम्ही  भक्कमपणे उभे आहात. या तुमच्या भक्कम पणासाठी आम्ही लक्षावधी पानांनी स्वतःला ऊन्हात सूर्यासोबत टक्कर देत  त्याला न घाबरता अंगावर घेतलं. ऊन्हात राबून स्वतःचं नाजूकपण तुझ्या संगोपणात साकारण्यात विसरूनच गेलो. अन राठ होवून पिकत गेलो. आम्ही जुन्या दमाची परंतु अनुभवी तुझ्या स्वछंद बागडण्याला मुरड घालून ताळ्यावर आणू पाहाणारी तुला नकोशे वाटतोय. नव्या दमाची फौज तुला हवी. तिला जशी फुस दिली तशी ती उधळते. भूत भविष्याचा विचार न करता वर्तमानाच्या क्षणिक फसव्या मोहात पाडून तू त्या नव्या नाजूक पात्यांना फसवून स्वतःच वैभव आभाळी मिरवू पाहात आहेस. तुझे पाय त्या वटवृक्षावाणी मजबुतीनं कुठं घट्ट रोवलेले आहेत ? त्याच्या सोबतीला जुने नवे असे पानाचे अक्षौहिनी सैन्य खोडाआधी भक्कमपणे ऊन, वारा थंडीशी टकरायला तयार आहे. म्हणून तर वडाचं राज्य दीर्घकाल चालतं. तो आधार असणार्‍या पान अन  मातीची नाळ वड तुटू देत नाही. तू मात्र "विद्या आली हाता  अन गुरूला लाथा" असं वागून नवीन पिढी बिघडवत आहेस. ती पिढी बायका पोरं झाली की मायबापा पासून दुरावून स्वतःचा अधःपात करून ऊर फोडून घेत आहेत. तुला वैभव उंच आभाळी नेल्यासारखं वाटत असलं तरी वादळं वावटळी मध्ये सर्वात आधी ताडमाड उंचीची  दिखाऊपणा करणारी भक्कम आधार नसलेलीच झाडंच आधी आडवी होतात. दुरावलेलं गळालेलं पान पुन्हा आधाराला कधीच जवळ येत नाही. ते नव निर्माणासाठी मातीशीच एकरूप होवून जातं ! सोबत्यांना (जनतेला) मारून नव्हे तर सोबत घेवून मोठं होता येतं. हे झाडांनी विसरता कामा नये.      एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जेव्हा एकाच बिंदूतून कितीतरी रेषा काढलेल्या आपण पाहिलेल्या आहेत तरीही त्या एकमेकांना एकाच बिंदूत छेदून पुढे सरळ मार्गाने निघून जातात आणि त्याच रेषा परत एकाच बिंदूत एकत्रीत येऊन मिळतानाही पाहिले आहे.असा जर आपण विचार केला तर आपले हृदय आणि मनही एकच आहे.आपणच आपल्या हृदयातून आणि मनातून अनेक माणसांना जोडण्याचे काम करत असतो.त्यात काहींना काही कारणाने जवळ करतो तर काही माणसे आपल्यापासूनच जवळ येऊन दूर जातात.जे दूर जातात त्यांचा विचार करु नका,कारण त्यांना स्वातंत्र्य आहे.परंतु जी माणसे तुमच्याजवळ येण्याचा प्रयत्न करतात त्यांना दूर करु नका कारण त्यांना तुमचे मन आणि हृदय कळलेले असते.तुम्ही त्यांचे केंद्रस्थानी आणि बिंदूस्थानी आहात.तुम्हीच त्यांचे आधारही आहात आणि त्यांची प्रेरणाही.सा-यांना जवळ करण्याचे बिंदूसारखेच काम करायला शिकले पाहिजे तरच जीवन समृद्ध होईल. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०./८०८७९१७०६३. 🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपल्या माणसाकडून मिळालेले दुःख* एक सोनार होता. त्याच्या दुकानासमोरच एका लोहाराचे दुकान होते. सोनार जेव्हा काम करत असे तेंव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज होत असे पण जेंव्हा लोहार काम करत असे तेंव्हा मात्र लोखंडाचे काम होत असल्याने मोठा आवाज होत असे. तो आवाज मोठा कर्णकर्कश असे. एके दिवशी सोनाराच्या दुकानातील एक सोन्याचा कण कसा कोण जाणे पण लोहाराच्या दुकानात जावून पडला. त्या सोन्याच्या कणाची भेट एका लोखंडाच्या कणाशी झाली. खूप दिवसांची ओळख असल्यासारखे ते एकमेकांशी बोलू लागले. सोन्याच्या कणाने लोखंडाच्या कणाला म्हंटले,"दादा, आपले दुःख तर खरे एकसमान आहे. दोघानाही आगीत तापवले जाते आणि हातोड्याने ठोकले जाते. मी तर बाबा चुपचाप हे सहन करतो, पण तुझे काय?" लोखंडाचा कण सोन्याच्या कणाकडे पाहून दुःखी स्वरात म्हणाला,"अरे ! तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. दोघानाही तापवणारी आग एकच आहे आणि ठोकणारा हातोडाहि एकाच धातूचा आहे. पण खरे दुःख याचे आहे कि तुला ठोकणारा हातोडा हा तुझा कोणीच लागत नाही पण मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा हा नात्याने माझा भाऊच लागतो. दुसऱ्याने दिलेल्या दुःखापेक्षा स्वकीयांनी दिलेला त्रास हा अगदी हृदयात वार करून जातो." *तात्पर्य- आपल्या माणसांकडून होणारा त्रास हा कायमच दुःखदायक वाटतो.*  *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 25/07/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ★ *गॅलिशिया दिन - गॅलिशिया(स्पेन)* ★ *संविधान दिन - पोर्तोरिको* ★ *प्रजासत्ताक दिन - ट्युनिसीया* 💥 ठळक घडामोडी :- ◆ १९७८ - जगातील प्रथम टेस्ट ट्यूब बेबी लुईझ जॉय ब्राऊन चा इंग्लंडमधील लँकेशायर येथे जन्म. ◆ १९९७ - के.आर. नारायणन भारताच्या राष्ट्राध्यक्षपदी. ◆ २००७ - प्रतिभा पाटील भारताच्या राष्ट्रपतीपदी. 💥 *जन्म* ◆ १९२९ - सोमनाथ चटर्जी, भारतीय राजकारणी. ◆ १९७८ - लुईस ब्राऊन, पहिली मानव टेस्टट्यूब बेबी 💥 *मृत्यू* ◆ १८८०-गणेश वासुदेव जोशी उर्फ 'सार्वजनिक काका' समाजसुधारक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *अभिनव देशमुख यांना राज्य निवडणूक आयोगाचा "लोकशाही पुरस्कार"* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *व्यक्तीलाही दहशतवादी घोषित करण्याची कायदादुरुस्ती मंजूर, लोकसभेची संमती : विरोधकांच्या टीकेला गृहमंत्र्यांचे उत्तर* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री करणार ४,३८४ किमीचा प्रवास, अमरावती येथून प्रारंभ : पाच वर्षांतील कामांचा हिशोब जनतेसमोर ठेवणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये भीषण दुष्काळाचे संकट, ५४ टक्के पावसाची तूट जलसाठे अद्याप कोरडे, पेरण्यांवरही संक्रांत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *एसटी बसचे आरक्षण ३० ऐवजी आता ६० दिवस आधीच मिळणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली, गणेशोत्सवात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी २,२०० जादा गाड्या* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पोलिसांच्या गणवेश भत्त्याचा प्रस्ताव अडकला लालफितीत, अधिकाऱ्यांत नाराजीचा सूर : गृहविभागाकडे फाइल सहा महिने धूळखात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *प्रो कबड्डी : बेंगाल वॉरियर्स संघाची विजयी कामगिरी, यूपी योद्धाचा ४८-१७ असा पराभव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - लिफ्ट* https://storymirror.com/read/story/marathi/rlufif6t/liphtt/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *पृथ्वीवरून पाठविलेला संदेश मंगळावर पोहोचायला किती वेळ लागेल ?* 📙 भारताने चंद्राभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी पाठवलेल्या 'चंद्रयान' या अवकाशयानाशी संपर्क तुटल्यामुळे तो प्रकल्प अर्धवट सोडून द्यावा लागला होता. तरीही जे नऊ महिने ते यान आपलं आखून दिलेलं काम इमानेइतबारे पार पाडत होतं, त्या काळात निर्धारित कामापैकी ९० टक्के काम पार पडल्याचं आपल्या अंतराळविज्ञान विभागानं जाहीर केलं आहे. साहजिकच त्या यानाशी संपर्क साधण्याची, दळणवळणाची व्यवस्था कार्यक्षम होती यात शंका नाही. तरीही अशा यानाला जमिनीवरच्या नियंत्रण कक्षातून विशिष्ट कामगिरी पार पाडायचा आदेश त्याला मिळायला किती वेळ लागत असेल, हा एक उत्कंठा लावणारा प्रश्न मनात उभा राहतो. कारण एखादी कामगिरी त्या यानानं तात्काळ पार पाडावी असं वाटत असेल तर हा संदेश किती वेगाने त्याच्यापर्यंत पोहोचतो याला महत्त्व येतं. चंद्र त्या मानाने पृथ्वीच्या जवळ आहे. पण मानवांनं आता मंगळ, शुक्र, गुरू, शनी एवढंच काय, पण नेपच्यूनसारख्या अतिदूर असणाऱ्या ग्रहांवरसुद्धा यानं पाठवली आहेत. त्यांचं नियंत्रण जमिनीवरूनच केलं जात आहे आणि त्या यानांनी मिळवलेली माहिती नियंत्रण कक्षाकडे संग्रहितही होत आहे. या साऱ्या दळणवळणाला किती वेळ लागतो ? या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याला दोन बाबींची माहिती हवी. या संदेशांच्या प्रवासाचा वेग आणि त्या याना किंवा ग्रहापर्यंतच अंतर. जमिनीवरून संदेश पाठवले जातात ते रेडिओलहरींच्या माध्यमातून. उलट दिशेने येणारी माहितीही त्याच रूपात मिळवली जाते. आपल्या नजरेला भावणारा 'तानापिहिनिपाजा' या पट्टय़ातला दृश्य प्रकाश किंवा क्ष-किरणं किंवा मोबाइल फोनच्या दळणवळणासाठी वापरलं जाणारं मायक्रोवेव्ह प्रारण ही सर्व विद्युतचुंबकीय वर्णपटाचाच एक भाग आहेत. रेडिओलहरीही याच वर्णपटात मोडतात. त्यामुळे या सर्वांचा वेग सारखाच आहे. प्रकाशाचा वेग अचूक मोजला गेला आहे. तोच मग रेडिओलहरींचाही वेग ठरेल. तो आहे एका सेकंदाला तीन लाख किलोमीटर. त्या वेगाने हे संदेश आपली वाटचाल करत असतात. पृथ्वी आणि मंगळ दोन्हीही सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. या भ्रमणाचा दोन्हींचा वेगही वेगवेगळा आहे. त्यामुळे कधी हे दोन ग्रह सूर्याच्या दोन बाजूंना असतात, त्या वेळी त्यांच्यामधलं अंतर सर्वात जास्त असतं. इतर वेळेला तो ते सूर्याच्या एकाच बाजूला असतात, त्या वेळी त्यांच्यामधलं अंतर किमान असतं. मंगळ आणि पृथ्वी यांच्यामधलं किमान अंतर आहे ७.८ कोटी किलोमीटर. प्रकाशाच्या वेगाने पार करायला केवळ ४.३ मिनिटं लागतात; पण त्या दोघांमधलं कमाल अंतर आहे ३७.८ कोटी किलोमीटर. ते पार करायला मात्र रेडिओसंदेशांना तब्बल २१ मिनिटं लागतात. *बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सूर्याच्या किरणांनी जशा बर्फाच्या राशी कोसळतात, तशाअहंकाराच्या राशी प्रेमाच्या ओलाव्याने विरघळतात. *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *C M चे विस्तारित रूप लिहा ?* Chief Minister 2) *रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर कोण आहेत ?* शक्तीकांत दास 3) *जंगलाचा राजा कोणाला म्हणतात ?* सिंह 4) *भारताचे नंदनवन कोणते ?* काश्मीर 5) *पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेला ग्रह कोणता ?* शुक्र *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  संगीता भालसिंग ●  साईनाथ कामीनवर ●  रामकुमारचिलकेवार ●  श्यामकुमार चिलकेवार ● श्रीधर चिंचोलकर ●  अभिषेक येरावार ●  नरेंद्र राठोड ●  गजानन महाजन ●  रुचली चंदेल बायस ● ज्ञानेश्वर पाटील ● साईनाथ भोरे ● गंगाधर मानगुर्ले ● नागेश कोलोड ● लक्ष्मण सुरकार ● संतोष श्रीखंडी ● गोविंद मानेमोड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपण जे बोलायला हवे ते बोलत नाही. जे बोलू नये ते बोलून जातो. जे पोटी असते ते ओठी येते असे म्हणतात. काही वेळा पोटी काही नसताना भलतेच ओठी येते. अनवधानाचे ते बोलणे सावरण्यासाठी मग खूपच बोलणे सोसावे लागते. काही लोक खूपच बडबडतात. काहींचे मौन बोलके असते. शांतपणे अविरत श्रमाची कास धरणा-यांचे यशच खूप काही बोलून जाते. नाहीतर बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात असणा-यांची संख्या बरीच आहे. न्यायालयातील उलटतपासात साक्षीदाराने काय बोलावे यापेक्षा काय बोलू नये याला खूप महत्व आहे.* *रामदासांनी शिवरायांचे मोठेपण सांगताना 'शिवरायांचे कैसे बोलणे' असा शब्दप्रयोग करून, त्यांच्या पदपथावर चालण्यास सांगितले. संतांच्या बोलण्याला अनुभूतीचा आधार असतो. महापुरूषांच्या बोलण्याला त्यांच्या जीवनकार्याची धार असते. चर्चिलच्या प्रभावी बोलण्याने दुस-या महायुद्धात ब्रिटनच्या लोकांना लढण्याचे धैर्य वाढले. अब्राहम लिंकनच्या बोलण्याने अमेरिकेची फाळणी टाळली गेली. मार्टिन ल्यूथर किंगच्या ''गुणवत्ता त्वचेच्या रंगावर नाही तर चारित्र्यावर ठरेल' या वक्तव्याने जगभर प्रभाव पाडला. गांधीजीचा 'चले जाव' , सुभाषबाबूंचा 'जयहिंद' आणि क्रांतीकारकांचा 'वंदे मातरम' ह्या एकाच शब्दाने इंग्रजांना पळता भुई थोडी झाली. नाहीतर,'बालिश बहु बायकात बडबडला' असे बडबडणारे तर अनेक असतात.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• नहाये  धोये  क्या  हुआ ,  जो  मन  मेल  न  जाय  | मीन  सदा  जल  में  रही ,  धोये  बॉस  न  जाय  || अर्थ :  नहाणे धुणे देखावा गेला न मनीचा मळ सदा पाण्यात मासळी दुर्गंध न काढी जळ       महात्मा कबीर दिखाऊ पणाला फटकारतात. नहाणे , धुणे  व सुंगधाने सजणे हा  तर केवळ बाह्य देखावा आहे. जर मनाचीच सफाई झाली नाही तर विवेकी व  निरामय जीवनशैली  विकसित होणार नाही व त्याशिवाय विश्वात्मक भाव दृढ कसा होणार ? मासा सदा सर्वकाळ पाण्यात राहूनही अंगीचा दुर्गंध त्यागीत नाही. तिथे पाण्याचा काय दोष असणार आहे. बाह्य बदलापेक्षा आंतरिक बदल महत्त्वाचा असतो. तो अवगुण कायमचे दूर करतो.       एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• दररोज एक चांगला विचार मनात आणला तर जीवनाला एका नव्या विचारांची संजीवनी भेटते.त्या एका चांगल्या विचारांमुळे आयुष्यात होणा-या चुका तर टळतीलच पण चांगला विचार केल्यामुळे वाईट विचारांची पुनरावृत्ती होणार नाही.जीवन चांगल्या विचारांमुळे अधिक समृद्ध बनते आणि त्यामुळेच ख-या जीवनाचे सार काय आहे ते कळते.आचार आणि विचारांमध्येही स्वत:च्या माणसातला माणूस घडवताना सतत प्रयत्न करताना दिसतो.म्हणून रोजच्या जीवनात एका चांगल्या विचारांची माणसाला भूक आणि गरजही असायला हवी.ती गरज सज्जनांच्या सहवासातून,ग्रंथ आणि पुस्तकांच्या सहवासातून पूर्ण करता येते. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९० 🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आशेची थोरवी* एक भुकेलेला डोमकावळा एका उंबराच्या झाडावर बसला होता. तो वाट पाहात होता. उंबराची फळे अजून पिकली नाहीत. ती कधीतरी पिकतील याची वाट पाहात तो तिथेच बसून होता. हा डोमकावळा बराच काळ तिथेच बसला आहे, असे एका कोल्ह्याच्या लक्षात आले. तेंव्हा त्याने त्याला कारण विचारले. डोमकावळयाने कारण सांगितल्यावर कोल्हा त्याला म्हणाला, 'अरे वेडया, आशेने असा वाहून जाऊ नकोस. आशेमुळे माणसाला भ्रम तेवढा होतो. अशाने वाट पाहून कुणाचेच पोट भरत नाही. तात्पर्य - केवळ आशा करणे व्यर्थ आहे. प्रयत्न हवा. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 24/07/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ■ १९९७- माजी हंगामी प्रधानमंत्री गुलजारीलाल नंदा व स्वातंत्र सैनिक अरुणा असफ अली यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान. ●१९४३ - दुसरे महायुद्ध - दोस्त राष्ट्रांच्या विमानांनी जर्मनीतील हांबुर्ग शहरावर तुफान बॉम्बफेक सुरू केली. ● १९६५ - व्हियेतनाम युद्ध - उत्तर व्हियेतनामने अमेरिकेचे लढाउ विमान पाडले. 💥 जन्म :- ◆१९१७ - जॅक मोरोनी, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू. ◆ १९४५ - अझीम प्रेमजी, भारतीय उद्योगपती. 💥 मृत्यू :- ◆१९७० - पीटर दि नरोन्हा, भारतीय उद्योगपती. ◆१९८० - पीटर सेलर्स, ब्रिटीश अभिनेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *आंध्रप्रदेशात भूमिपुत्रांना खासगी क्षेत्रात 75% आरक्षण, जगनमोहन रेड्डी सरकारचा निर्णय, देशातील पहिली घटना* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *बंगळुरु: कर्नाटकमधील एच. डी. कुमारस्वामी यांचं सरकार कोसळलं, यामुळे काँग्रेस, जेडीएसला बसला मोठा धक्का, कुमारस्वामी यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *आता महापालिका, नगरपरिषदा, नगर पंचायत कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू, मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय, 2 सप्टेंबरपासून सातवा वेतन आयोग होणार लागू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *सोलापुरात कृत्रिम पावसासाठी पहिलं विमान झेपावलं, पावसासाठी अनुकूल ढगांचा शोध सुरु, पुढचे काही दिवस विमानाद्वारे निरीक्षण सुरुच राहणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची माळ पुन्हा मिलिंद देवरांच्या गळ्यात पडण्याची शक्यता, तर दोन कार्याध्यक्ष म्हणून हुसेन दलवाई आणि एकनाथ गायकवाडांची चर्चा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्यासाठी सरकारकडून 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ, केंद्र सरकारने आयकर कायद्यात २३४ F या नव्या नियमाची घातली भर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच पांढऱ्या जर्सीवर खेळाडूंची नावं आणि क्रमांक पाहायला मिळणार, इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलियांच्या अ‍ॅशेस मालिकेपासून सुरुवात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - भिजवणारा पाऊस* https://storymirror.com/read/story/marathi/y4627myp/bhijvnnaaraa-paauus/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *फ्ल्यू म्हणजे काय ?* 📙 कोणी शिंकले, खोकले, ताप आला की 'फ्ल्यू' झाला असेल, असा सरसकट निष्कर्ष काढला जातो; पण तो खरोखर फ्ल्यू नसतोच. फ्ल्यू म्हणजे एन्फ्ल्युएंझा हा भयंकर रोग. एन्फ्लूएन्झा विषाणूंमुळे होतो. या विषाणूंचे तीन प्रकार असतात. दर काही वर्षांनी या रोगाच्या साथी येतात व त्या जगभर पसरतात. १९१८ मध्ये या रोगाने २ कोटींहून जास्त लोकांचे बळी घेतले. याच काळात भारतात ६० लाख लोक मृत्यूमुखी पडले. विषाणूच्या संरचनेत सदोदित होणाऱ्या बदलांमुळे या विषाणूसाठी प्रतिबंधक लस तयार करता येत नाही वा केलीच तर ती फार काळ उपयुक्त ठरत नाही. या रोगात थंडी वाजून ताप येणे, हातपाय दुखणे व खोकला अशी लक्षणे दिसतात. न्यूमोनिया नावाचा भयानक गुंतागुंतीमुळे अनेकजण मृत्युमुखी पडतात. या विषाणूवर औषधे उपलब्ध नाहीत व जी आहेत ती प्रभावी नाहीत. लस उपलब्ध आहेत, पण त्या वापरात येण्यापूर्वीच बऱ्याचदा बऱ्याच जणांना हा रोग झालेला असतो. श्वसनाच्या मार्गाने हा रोग एकापासून दुसऱ्याला होतो. एन्फ्लूएन्झाचा प्रतिबंध करण्याच्या उपायांना आजवर फार मर्यादित यश मिळाले आहे. लसीकरण हे सर्वात प्रभावी शस्त्र असले तरी प्रत्यक्षात त्याचा परिणामकारक उपयोग करण्यातच अडचणी येतात. त्यामुळे साथीच्या काळात घरातील वायूवीजन चांगले राखणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे, रुग्णांना रुमालाने चेहरा झाकण्यास सांगणे व घराबाहेर न पडण्याचा सल्ला देणे, हे उपाय करावे लागतात. असा हा महाभयंकर एन्फ्लूएन्झा. तुम्ही ज्याला चुकून फ्ल्यू म्हणता ते असते साधे सर्दी पडसे. उपचार घेतल्यास आठवड्यात व न घेतल्यास सात दिवसांत बरे होते ते ! *डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून, मनोविकास प्रकाशन *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *Confidence is a key to success.* *( आत्मविश्वास ही यशाची गुरूकिल्ली आहे. )* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?* डॉ बाबासाहेब आंबेडकर 2) *विदर्भातील एकूण जिल्हे किती ?* 11 3) *संत ज्ञानेश्वर महाराज यांनी 'ज्ञानेश्वरी' हा ग्रंथ कोठे लिहिला ?* नेवासे ( अहमदनगर ) 4) *'चंदीगड' ही कोणत्या दोन राज्यांची राजधानी आहे ?* पंजाब व हरियाणा 5) *P M चे विस्तारित रूप सांगा ?* Prime Minister *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  गोविंद तुळशीराम कोकुलवार ●  सचिन सुरेश टेकाळे ●  विष्णू रामोड ●  संतोष लवांडे ●  राजेश पाटील मनूरकर ●  संतोष मुलकोड ●  धीरजसिंह चौहान ●  मारोती गुंटूकवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *उद्योगी पुरूषालाच लक्ष्मी पसंत करते. दुबळी माणसे दैवात नाही असे म्हणत राहतात. नशीबात नव्हते असे रडगाणे गात राहतात. दैवावर, नशीबावर मात करून आपल्या स्वकर्तृत्वाने सामर्थ्य गाजविणे त्यांना कधीच जमत नाही. प्रयत्न करूनही जर काहीही यश मिळाले नाही तर दोष कुणाचा ? अशावेळी तो तुझा दोष नाही असे संस्कृत सुभाषितकार सांगतात. बरेच लोक अपयशाचे खापर दुस-यावर फोडतात. स्वत:च्या चुकांकडे पहात नाही. प्रत्येकाने रोज आत्मपरीक्षण करावे. प्रत्येक दिवशी आपले वर्तन कसे झाले याचा विचार करावा. आज मी पशूसारखा तर वागलो नाही ना? आज माझे वर्तन सज्जन माणसासारखे झाले आहे ना? हे तपासून पहावे.* *प्रत्येकाचे हातून कळत-नकळत चुका होत असतात. पण तारुण्याच्या उन्मादात, सत्तेच्या-पैशाच्या कैफात माणसाला त्याची जाणीव होत नाही. तसेच माणसाला आपल्यातील अवगुणांचीही जाणीव होत नाही. "कासया वर्णू इतरांचे दोष, माझे ठायी काय वाण असे?"असे संत तुकारामांनीही म्हटले आहे. वाईट माणसांच्या संगतीमुळे चांगली माणसे बिघडल्याची अनेक उदाहरणे आपणांस सांगता येतील. वाईट संगतीमुळे काही व्यसनाधीन होतात तर कधी कधी नैराश्याने आपले जीवनच संपवितात. धोक्याच्या वळणावर जागं करणारे फार क्वचितच भेटतात. 'जीवन कसं जगावं' याचं मार्गदर्शन करणारे 'दिपस्तंभ'सारखे असतात.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रेमभाव  एक  चाहिए ,  भेष  अनेक  बनाय  | चाहे  घर  में  वास  कर ,  चाहे  बन  को  जाए  ||   अर्थ        मानवाचा धर्म मानवता . मानवता जपायची तर मानवाच्या अंतरात प्रेमभावनेचे अधिष्ठान महत्वाचे आहे. त्या शिवाय मानवता व मानव्य कसं प्रवाहित होणार ?  भौगोलिक व भौतिक परिस्थितीशी समायोजन साधण्यासाठी भिन्न वेष परिधान करा .   विभिन्र प्रकारच्या (उपलब्धतेनुसार महालापासून झोपडीपर्यंत) वास्तूत  किवा वनात वास्तव्य करा ते परिस्थितीनुरूप स्वाभाविक आहे. परंतु त्यात अवडंबर असता कामा नये. सत्य  व प्रेमभाव हाच खर्‍या जीवनाचा मुलाधार आहे. त्यामुळे जीवनाची गोडी व सुंदरता वाढते  म्हणून माणसाने  अशाश्वत अवडंबराच्या व बुवाबाजीच्या नादी लागून जगण्याला  विनाकारणच अंधानुकरणी व भंपक बणवू नये . ते मानवतेला पूरक असू शकत नाही.      एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जिद्द,मेहनत आणि प्रयत्न हे तुमच्या हाती घेतलेल्या कामासाठी वापरलेले कौशल्य आहे.यामुळे तुमचे काम अधिक चांगले व उत्कृष्ट दर्जाचे होण्यास मदत करते. कोणतेही काम जेव्हा हाती घ्याल तेव्हा  ह्या तीन गोष्टी आपल्या अंगी बाळगणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामध्येच आपली प्रगती  सामावलेली असेल. - व्यंकटेश काटकर,नांदेड.   संवाद..9421839590. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मदतीचा हात* भगवान बुद्ध त्या काळात आपल्या शिष्यगणांसह गावोगावी जात होते. एका गावाच्या वेशीवर एक वृद्ध आपल्या मोठ्या टोपलीतून भाजी विकण्यास बसला होता. ती टोपली जड होती व त्याला तेथून दुसरीकडे जायचे होते म्हणून येणार्‍या - जाणार्‍या वाटसरुंना तो आपल्या डोक्यावर टोपली ठेवण्यास मदत करण्याची याचना करत होता. पण कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. ते शिष्यगणही मजा बघत होते. हे पाहताच भगवान बुद्ध स्वतः पुढे झाले व त्यांनी वृद्धाच्या डोक्यावर टोपली उचलून दिली. त्या वृद्धाने त्यांना ओळखले होते. तो म्हणाला, सार्‍या जगाच्या दृष्टीने ते कोणीही असोत, पण माझ्या दृष्टीने माझ्या मुलासारखे आहेत ! त्याचे बोलणे ऐकून शिष्य आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले, हे कसे शक्य आहे ? तो वृद्ध उत्तरला, जगात प्रत्येक मुलगा हा आपल्या मातापित्यांचा आधार असतो. त्यांचे कष्ट उपसण्यास नेहमीच मदत करत असतो. आज त्यांनीही मला मदत केली आहे. माझे कष्ट हलके केले आहेत. मग ते माझ्या मुलासमानच नाहीत का ? सार्‍या शिष्यांनी त्या वृद्धाचे पाय धरले व क्षमा मागितली.  *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 23/07/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लोकमान्य टिळक जयंती* 💥 ठळक घडामोडी :- ● १९६८ - अल ऍलच्या बोईंग ७०७ प्रकारच्या विमानाचे रोममधून अपहरण. ●१९७० - ओमानमध्ये राजकुमार काबूस इब्न सैदने आपल्या वडिल, सैद इब्न तैमूरला पदच्युत करून सत्ता बळकावली. 💥 जन्म :- ◆१८५६ - बाळ गंगाधर टिळक, भारतीय स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी. ◆१९०६ - चंद्रशेखर आझाद, भारतीय क्रांतिकारक. ◆ १९१७ - लक्ष्मीबाई यशवंत भिडे (ऊर्फ माई भिडे), मराठी नाट्य-चित्रपट अभिनेत्री. ◆१९७३ - मोनिका लेविन्स्की, व्हाइट हाउसमध्ये काम करणारी स्त्री. ◆ १९७५ - सूर्य शिवकुमार, तमिळ अभिनेता. 💥 मृत्यू :- ■ १९९७ - वसुंधरा पंडित, भारतीय गायिका. ■ २००४ - मेहमूद, हिंदी चित्रपट अभिनेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *कर्नाटक विधानसभेत आज बहुमत चाचणी होण्याची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई : उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या लवादाच्या मध्यस्थीनंतरही बेस्ट कामगारांच्या मागण्यांवरील वाटाघाटी अयशस्वी ठरल्या आहेत म्हणून बेस्टकामगार संघटनांनी ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा संपावर जाण्याचा घेतला निर्णय* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *मुंबईत २६ जुलैला होणार अतिवृष्टी; स्कायमेटचा अंदाज, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी होणार जोरदार पाऊस* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *130 कोटी देशवासीयांसह संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या इस्रोच्या चांद्रयान-2 ने काल दुपारी 2.43 मिनिटांनी चंद्राच्या दिशेने झेपावले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *औरंगाबाद - 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे रंगणार, साहित्य परिषदेची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *कटक : हरमीत देसाई आणि आहिका मुखर्जी यांनी ऐतिहासिक कामगिरी करताना २१व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अनुक्रमे पुरुष व महिला एकेरीचे सुवर्ण पदक पटकावले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई: भारतीय क्रिकेट संघाच्या 'अ' संघाने वेस्टइंडीज 'अ' संघाचा पाच सामनांच्या मालिकेत ४-१ अशा फरकाने धुव्वा उडवला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - ब्लू व्हेल* https://storymirror.com/read/story/marathi/p5b2dmy2/blu-vhel/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌍 *पृथ्वीच्या पोटात किती उष्णता असते ?* 🌍 पृथ्वीचा जन्म झाला तेव्हा तो एक धगधगता तापलेला वायूचा गोळा होता, असं आपण नेहमी ऐकतो. ते खरंही आहे. वैज्ञानिकांच्या मनात त्याबद्दल दुमत नाही. जोवर तो असा तापलेल्या वायूंचा गोळा होता तोवर त्याला कोणतंही ठोस रूप नव्हतं ; पण जसजसा काळ उलटत गेला तो तापलेला गोळा थंड होत गेला. त्या गोळ्याला रूप येऊ लागलं. उंच सखल भूप्रदेश तयार झाले. सतत वाफेच्या रूपात असलेलं पाणी द्रवरूप झालं. त्याचे सागर झाले. हळूहळू पृथ्वीचा पृष्ठभाग निवला. इतका की सजीव सृष्टी त्यावर अवतरली, रुजली, फोफावली. तरीही पृथ्वीचा गाभा मात्र तापलेला राहिला आहे. तिथं असले उष्णता अजूनही कायम आहे. उन्हाळ्यात धरती तापते तेव्हा उन्हाच्या काहिलीपासून आपलं रक्षण करण्यासाठी काही प्राणी बिळात जाऊन बसतात. विशेषत: वाळवंटी प्रदेशात हे दिसून येतं. त्यामुळे पृथ्वीच्या पोटात थंडावा आहे असा समज होतो. पण तो खरा नाही. पृष्ठभागाला तापवणारा सूर्यप्रकाश मातीच्या काही थरांमुळे झाकला गेला की तापमान काहीसं घसरतं. पृथ्वीच्या पोटात जसजसे आपण शिरत जाऊ तसतसा तो भाग उष्णच असल्याचं स्पष्ट होतं. पृथ्वीच्या पोटात किती उष्णता आहे, याची माहिती वैज्ञानिकांनी मिळवलेली आहे. त्यानुसार पृथ्वीच्या गाभ्याचं तापमान ४०००अंश सेल्सिअस आहे. याचं नीट आकलन होण्यासाठी आपण काही तुलनात्मक आकड्यांचा विचार करू शकतो. सूर्याच्या पृष्ठभागाचं तापमान ५००० अंश सेल्सिअस आहे. म्हणजे पृथ्वीचा गाभाही साधारण तेवढाच तापलेला आहे. आपल्या नेहमीच्या अनुभवातले आकडे सांगायचे तर पाणी समुद्रसपाटीवर १०० अंश सेल्सिअसला उकळतं. साठ अंश सेल्सियसपेक्षा जास्त गरम असलेल्या पाण्यानं अंग भाजून निघू शकतं. आजवर पृथ्वीवर सर्वात जास्त नोंद झालेलं तापमान ५८ अंश सेल्सिअस आहे. १९२२ मध्ये लिबियामध्ये त्याची नोंद झाली होती. पृथ्वीचा गाभा लोह आणि निकेल या धातूंचा बनलेला आहे. लोहही साधारण १५३५ अंश सेल्सियसला वितळतं. मग पृथ्वीचा गाभा संपूर्णपणे द्रवरूप लोहाचा आहे, असा समज होईल; पण त्या लोहाला प्रचंड दाबही सहन करावा लागतो. जसजसा दाब वाढत जातो तसतसा कोणत्याही पदार्थाचा उत्कलनबिंदू चढत जातो, त्यामुळे ४००० अंश तापमान असूनही लोह वितळत नाही. मात्र ते अतिशय तापलेलं असतं. त्या गाभ्याच्या वरच्या थरातलं तापमान तुलनेने कमी असतं. त्यामुळे ४००० अंश तापमान हे सरासरी तापमान असावं आणि अगदी केंद्रबिंदूजवळ गेल्यास ते त्याहूनही अधिक असावं असं काही वैज्ञानिकांचं मत आहे. *बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• दुसऱ्याच्या चुकामधुन शिका, कारण स्वत:च्या चुकांमधुन शिकायला आयुष्य फार थोड असत - आर्य चाणक्य *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळनाव काय होते ?* भीमराव 2) *डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला ?* महू (मध्यप्रदेश) 3) *स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते ?* डॉ बाबासाहेब आंबेडकर 4) *डॉ बाबासाहेब आंबेडकर हे कितवे अपत्य होते ?* 14 वे 5) *डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ आडनाव काय होते ?* सकपाळ *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  उदयकुमार शिल्लारे ●  प्रदीप दळवी ●  संतोषसुवर्णकार ●  लक्ष्मण मलगिरे ●  जितेंद्र पाटील ●  वैभव पाटील ●  विक्की पाटील ●  अविनाश धुप्पे ● शंकर बोईनवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माणूस जोवर जिवंत असतो, तेंव्हा त्याच्या अपेक्षा असतात. इच्छा असतात. त्या कुणाच्या गावाला पोहचत नाहीत. त्याच्या आकान्तहाका कुणाला ऐकू येत नाहीत. नंतर मात्र त्याच्या कौतुकाचे पाढे सुरू होतात, पोवाडे गायले जातात. जिवंतपणी त्याच्या हाकांचा कानोसा घेतला असता, तर नक्कीच त्याच्या जगण्याचे काही दिवस वाढले असते. भुकेल्याची अपेक्षा फार नसते, त्यास भाकर हवी असते, तहानलेल्याला पाणी, कष्टक-याला त्याच्या घामाचा मोबदला, कलाकाराला त्याच्या कलेची दाद, एवढीच तर अपेक्षा असते... फक्त एक सेकंद जगण्याची... पण त्याच्या हयातीत आपल्याला पकडता येत नाही त्याचा जिवंत सेकंद..* *सोनं तोळ्यात मापतात. मात्र, त्याहीपेक्षा माणसाचा माणसासाठीचा कौतुकाचा, जिव्हाळ्याचा शब्द महागला आहे. माणसाचं अपयश हे की तो पैसे मिळविण्याचं तंत्र तर शिकलाच; तंत्रज्ञानालाही त्याने असे आत्मसात केले की तंत्रमानव म्हणून कुशल झाला. पृथ्वीवर तर त्याने सत्ता काबीज केलीच, पण आज तो इतर ग्रहावरही चढाई करतोय. मात्र जिवंत राहण्याचं तंत्र तो शिकू शकला नाही. जगण्या-मरण्यातल्या एका श्वासांचं अंतर जेव्हा माणसास कळेल तेव्हा त्याच्या आत माणुसकीचा दीप तेवून उठेल.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कबीर हरि सो हेत कर, कोरै चित ना लाये बंधियो बारि खटीक के, ता पशु केतिक आये। सारांश कबीरा हरी स्मरण कर नको मनी कचर्‍याचा भर कसाया दारी बांधला पशू तया आयुष्याचा विचार कर          महात्मा कबीर म्हणतात की ईश्वराशी नाते जोड. जो सर्वत्र भरून उरला आहे. तो वार्‍याच्या रूपाने तुझ्याशी संवाद साधतो. पाण्याच्या रूपाने तुझे तन मन शितल करतो. प्रकाशाच्या रुपाने तुझं अंतरंग उजळून टाकतो. मात्र तू तर वरवरच्या बाह्य प्रतिक रुपालाच भुलतो आहेस. तू स्वार्थाने अंध होऊन ईश्वराचं सर्वव्यापी रूपंच विसरून गेला आहेस. अशा वरवरच्या ढोंगी भक्तीने तुला ईश्वराचं सत्य स्वरूप कसं काय कळणार आहे? शिवरूप तर सर्वत्र भरून आहे. निसर्गाच्या आविष्कारात ते सामावलेलं आहे. ते कळलंच नाही तर  सुंदराचा कसा साक्षात्कार होईल बरे ! पळापळाने आयुष्य मृत्यूकडे धाव घेत आहे. मानवी जन्म जणू कसायाच्या दारी बांधलेल्या पशूसमान आहे. त्या पशूवर कसाई कोणत्या क्षणी सुरी चालवील काय माहित ? आयुष्याची क्षणभंगुरताही तशीच आहे. तुझ्याकडे उपलब्ध वेळेचा सदुपयोग करून घे. तो सत्कारणी लाव. से प्रेम करो। अपने चित्तात भरलेला विकारांचा कचरा भिरकावून दे. शिवस्वरूप सत्याचा अंगिकार कर. जीवनातल्या सुंदरतेच्या जागा परमानंदाने भरून  घे .      एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुम्ही हाती घेतलेल्या कोणत्याही कामात सातत्याने करत असलेले प्रयत्न आणि त्यात मिळालेले यश हे तुमच्या मनाला समाधान देणारे आहे.प्रयत्नातून मिळालेला आनंद हा तुमच्या जीवनात अधिक महत्वाचा आहे. - व्यंकटेश काटकर,नांदेड.   संवाद.9421839590 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मनशांती* एकदा संत एकनाथांना कोणी दोन प्रश्न विचारले. एक, त्याच्या स्वत:च्या भविष्याबध्दल, आणि दुसरा, एकनाथ स्वभावाने एवढे शांत आणि निर्द्वेषी कसे राहू शकतात याच्याबद्दल . एकनाथ हसले; आणि, 'केंव्हातरी याची उत्तरे देईन', म्हणून त्यांनी सांगीतले. काही दिवसांनी, एकनाथांची त्या गृहस्थाशी भेट झाली. तेंव्हा त्याला बाजूला नेऊन एकनाथ म्हणाले, "तुझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची वेळ आली आहे, कारण, दुर्दैवाने, तू आता आठ दिवसांच्या आत मरणार आहेस." तो गृहस्थ सुन्न झाला, गोठला ! एकनाथ समोरून निघून गेले, तेंव्हा तो बधीर मनाने परतला.  जगलो तर एकनाथांसारख्या संतांच्या सदिच्छेने जगू, अशी त्याला भावना निर्माण झाली. ती त्याने सार्थ केली. आयुष्यातले आठ दिवस पूर्ण करून नवव्या दिवशी, एकनाथांच्या दर्शनाला तो गेला. एकनाथांना हात जोडून म्हणाला, "तुमच्या कृपेने वाचलो." एकनाथ मान डोलवित म्हणाले, "आता मी तुम्हाला दुस-या प्रश्नाचे उत्तर देणार आहे. गेले आठ दिवस तुम्ही कसे वागलात ? इतरांच्यावर किती रागावलात?" तो गृहस्थ उत्साहाने म्हणाला, "कसला हो रागावतो? अगदी छान, शांत आठ दिवस गेले. शांत म्हणजे, मरणाच्या भितीने बेचैन होतो, पण दुस-यावर रागावण्यासाठी ती बेचैनी नव्हती. घरात बायकोशी कधी भांडलो नाही. मुलांना मारले नाही. वाटायचे की, आता अखेरचे आठ दिवस उरले. बायका-मुले पुन्हा दिसणार नाहीत; त्यांना का दुखवावे? अहो, शेजा-याचे जमिनीवरून चार पिढयांचे भांडण होते. त्याला स्वत:च्या हाताने हवा तो तुकडा तोडून दिला. देणे होते ते देऊन टाकले. ज्यांच्याकडून येणे होते, त्यांच्यापैकी जे गरीब होते, त्यांचे येणे सोडून दिले. काही पैसे गमावले, पण शांती कमावली. खूप खूप शांत असे आठ दिवस त्या दृष्टीने गेले." एकनाथ समोरच्या माणसाच्या पाठीवर हात थोपटून म्हणाले,  "हे तुझ्या दुस-या प्रश्नाचे उत्तर. आठ दिवसांत जग सोडून जायचे आहे, अशा कल्पनेने मी सदाच वावरतो. म्हणून मी शांत वाटतो."  *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 22/07/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पाय दिन (२२/७ =पाय π)* 💥 ठळक घडामोडी :- १९४२ - दुसरे महायुद्ध - अमेरिकेत पेट्रोलचे रेशनिंग सुरू करावे लागले. १९४२ - ज्यूंचे शिरकाण - वॉर्सोतून ज्यूंना तडीपार करणे सुरू झाले. १९४३ - दोस्त राष्ट्रांनी इटलीचे पालेर्मो शहर जिंकले. 💥 जन्म :- १९१८ - गोपाळराव बळवंतराव कांबळे, मराठी चित्रकार. १९२३ - मुकेश, पार्श्वगायक. १९३७ - वसंत रांजणे, भारताचा कसोटी क्रिकेट खेळाडू. *१९७० - देवेंद्र गंगाधर फडणवीस, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री* 💥 मृत्यू :- १९१८ - ईंद्रलाल रॉय, भारतीय वैमानिक. २००३- उदय हुसेन,कुसे हुसेन ,सद्दाम हुसेन ची मुले. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *श्रीहरीकोटा : भारताची ‘चांद्रयान-२’ ही महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहीम आज दुपारी होणाऱ्या प्रक्षेपणासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) केले जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *राज्यात मान्सून आठवडाभर सक्रिय राहणार; हवामान विभागाचा अंदाज, कोकण, गोव्यात मुसळधार; मराठवाड्यात समाधानकारक* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *मराठी अनिवार्य नसणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई! मराठी शिक्षण कायद्याचा मसुदा तयार : हरकती, सूचना नोंदविण्याचे आवाहन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *महामार्गासाठी एलआयसी देणार १.२५ लाख कोटी रुपयांचे कर्ज, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *टीम इंडियाचे नेतृत्व विराट कोहलीकडेच! शिखर धवनचे पुनरागमन, आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित अनंतात विलीन, अंत्यसंस्काराला अनेक नेत्यांची उपस्थिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *जकार्ता - भारताच्या पी.व्ही. सिंधूचे इंडोनेशियन ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगले. एकतर्फी झालेल्या अंतिम लढतीत सिंधूला जपानच्या अकाने यामागुचीकडून 15-21, 16-21 असा सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - सरपंच* https://storymirror.com/read/story/marathi/baeglro2/srpnc/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🐝 *मधमाशा गुंजारव का करतात ?* 🐝 मधमाशा अवतीभवती घोंघावयाला लागल्या की त्यांचा गूं गूं असा आवाज येत राहतो. इंग्रजीत यालाच 'बझिंग साऊंड' असं म्हणतात. जणू त्या तोंडानेच तसा आवाज करत राहतात, असं आपल्याला वाटतं. पक्षीही तोंडांनं आवाज करतात. प्रत्येक पक्ष्याचा आवाज वेगवेगळा असतो. त्या आवाजावरून पक्ष्याची ओळखही पटते; आणि तसा आवाज पक्षी का काढतात, याचीही माहिती आता मिळालेली आहे. एकमेकांशी दळणवळण साधण्यासाठी, संवादासाठी पक्षी आवाज काढतात. मधमाशाही तसाच एकमेकींशी संवाद साधण्यासाठी हा गुंजारव करत असतील, अशीच समजूत झाल्यास मग नवल नाही. प्रत्यक्षात मात्र मधमाशांचा हा आवाज त्यांच्या तोंडातून येत नाही. तो त्यांच्या पंखांचा फडफडाट असतो. त्या एकाच जागी स्थिर असताना, मोहोळात राहुन आपापलं काम करत असताना हा गुंजारव आपल्याला ऐकू येत नाही. त्या जेव्हा मोहोळातून बाहेर पडून उडायला लागतात तेव्हाच त्यांचा गुंजारव ऐकू येतो. त्यावरून हा त्यांच्या पंखांचा फडफडाट असावा, हे ध्यानात यायला हवं. उडणाऱ्या सर्वच कीटकांना आपले पंख फडफडावे लागतात. त्यामुळे तिथल्या हवेत कंपनं सुरू होतात. हवेच्या कंपन्यांमुळेच ध्वनी निर्माण होत असल्याने पंखांच्या या फडफडाटाचं रुपांतर आवाजात होत असतं. मात्र, तो आवाज आपल्याला ऐकू येणं हे त्या कंपनांच्या वेगावर आणि त्यात असलेल्या ऊर्जेवर अवलंबून असतं. निरनिराळ्या कीटकांच्या पंखांच्या फडफडण्याचा वेग मात्र वेगवेगळा असतो. फुलपाखरंही उडताना आपले पंख फडफडवत असतात. मात्र त्यांचा वेग मंद असतो. एका सेकंदाला फार फार तर सहा ते दहा वेळा त्यांचे पंख फडफडतात. त्यामुळे होणाऱ्या हवेच्या कंपनापोटी आपल्याला ऐकू येईल एवढा आवाज निर्माण होत नाही. डासांच्या पंखांचं फडफडणं मात्र वेगात होतं; पण ते अतिशय लहान असल्यामुळे त्यापोटी निर्माण होणाऱ्या हवेच्या कंपनांचा आवाज जर ते डास आपल्या कानाच्या अगदी जवळ असतील तरच ऐकू येतो. मधमाश्यांचे पंख त्या मानाने मोठे असतात आणि त्यांच्या फडफडण्याचा वेगही जास्त असतो. एका सेकंदात ३०० ते ४०० वेळा हे पंख फडफडतात. साहजिकच त्यापोटी हवेत उठणारी कंपनंही जोमदार असतात. त्यांचाच आवाज गुंजारवाच्या स्वरूपात आपल्या कानी पडतो. *डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• “आयुष्य सहज सोप जगायला शिका, तरच ते सुंदर होईल.” *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *1 सेमी म्हणजे किती मिमी ?* 10 मिमी 2) *आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी कोणती ?* धारावी, मुंबई 3) *आंतरराष्ट्रीय भाषा कोणती ?* इंग्रजी 4) *मानवी मेंदूचे वजन किती असते ?* 1350 ग्रॅम(1300 ते 1400 ग्रॅम) 5) *शिक्षकाला संस्कृत भाषेत काय म्हणतात ?* गुरू *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  मा. श्री सुमंत भांगे, ●  प्रल्हाद तुमेदवार ●  दामोदर साळुंखे ●  संजय कदम ●  अनुराधा हवेलीकर ●  धनराज वाघ ●  विश्वनाथ चित्रलवार ●  संतोषकुमार दुरगुडे ● पद्माकर मुळे ● अमोल गायकवाड ● अल्ताफ शेख ● श्रीनिवास वाघमारे ● संतोष जाधव *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *या जगात संपूर्ण निष्पाप कोण? तर एकही नाही. या पृथ्वीवर कोणीही नाही. उलट, पापालाच सुखाचे साधन मानणारे सर्वत्र आहेत. सर्व प्रार्थना मंदिरात रोज तथाकथित पुण्यचिंतनात वेळ घालवणारे किंवा भक्तीचे भस्म अंगाला फासणारे यापैकी कुणीही पूर्ण शुद्ध नाही. म्हणूनच की काय गीतापुरूष कृष्ण म्हणतात..... ब-या-वाईटासह अर्थात शिव-अशिवासह जो असतो तो पुर्ण पुरूष. प्रत्येकामध्ये काही ना काही दोष आहेतच, संपूर्ण निर्दोष असा माणूस सापडणे शक्य नाही. या दोषांनाच आपण पाप समजतो. बहुजनांच्या हितासाठी प्रसंगी खोटं बोलावं लागत असेल तर ते पाप नाही, असं सांगितलं जातं.* *राष्ट्रभक्त सैनिकालाही शत्रूच्या तावडीत असताना सतत खोटं बोलून खरी माहिती लपवायची असते. त्यासाठी तो वाट्टेल ते हाल भोगायला सिद्ध असतो. पांडव ज्येष्ठ बंधू धर्मराजाला 'नरो वा कुंजरो वा' असे मोघम उत्तर हेतुपूर्वक द्यावे लागले. युद्धात आणि प्रेमात सारं काही माफ असतं म्हणतात. असो, आपला मुद्दा आहे जगी सर्व निर्दोष असा कोण आहे? कुणीही नाही. काही अतिजागृत देवस्थाने संपत्तीने तुडुंब भरत आहेत. दानातील नोटा आणि सुवर्ण मोजायला यंत्रे लावावी लागत आहेत. कुठून आला हा पैसा, देवळाबाहेर भुकेलं तान्हं घेऊन माय पेलाभर दूधासाठी लोकांच्या पायापोटी पडत आहे. तिला बाजूला हाकलून दगडाच्या देवाचे शुद्ध दूधाने अभिषेकांवर अभिषेक होत आहेत. माझ्या मते हेच महापाप आहे..*   ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 💥💥💥💥💥💥💥💥💥 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• हिन्दू कहें मोहि राम पियारा, तुर्क कहें रहमाना,  आपस में दोउ लड़ी-लड़ी मुए,  मरम न कोउ जाना। सारांश         महात्मा कबीर चराचरात ईश्वर पाहतात. सर्वांठायी परमात्म्याचा अधिवास असतो. मानवाठायी असणारं चैतन्य म्हणजेच परमात्म्याचं रूप नाही का ? आमच्या उपासनेच्या पद्धती भिन्न आहेत. कोणत्याही धर्म पंथाचा माणूस असो त्याचा जन्म आणि मृत्यू भिन्न असतो का ? माणूस जन्माला आल्यानंतर त्याच्यावर त्या त्या धर्म पंथाचे संस्कार बिंबवले जातात. खरे तर माणूस जन्माला येतो माणूस म्हणूनच परंतु त्याच्यावर जाती, धर्माचे,  पंथाचे जे संस्कार केले जातात ती सर्व कृत्रिमता आहे. ती कुठल्या तरी भितीपोटी,  समुहाच्या वेगळेपणासाठी निर्माण केलेली ही वरवरची व्यवस्था आहे. तिला कुठलाही शाश्वत आधार नाही आहे. शाश्वत व अंतिम सत्य माणूस हा माणूस व मानवता हाच त्याचा धर्म आहे. सर्वांच्या निर्मिती पासून विसर्जनापर्यंत त्याचा माती हाच आधार आहे. हे   शाश्वत सत्य सर्वांना कळतंय पण वळत नाही. अशी वास्तविकता आहे.          जे स्वतःला हिंदू  म्हणवून घेतात त्यांना राम प्रिय आहे. जे स्वतःस मुसलमान मानतात त्यांना रहिम प्यारा आहे. राम आणि रहिम हे दोन्ही मानव कल्याणासाठी झिजले. त्यांच्या  कृर्तृत्वातून आदर्श जीवनाचा बोध मिळतो. त्यांनी माणसामाणसात भेदभाव केल्याचे इतिहास सांगत नाही. तरी त्यांच्या नावावरून दंगली घडणे मानवतेला अशोभनीय आहे. त्यांची नावं घेवून लढाया करणार्‍यांना विशाल अशा मानवता धर्माचं खरं स्वरूप व मानव कल्याणाचं मर्मच कळलेलं नाही. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• धनाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती अधिक महत्वाची आहे.कारण धनाच्या श्रीमंतीने त्याच्यामध्ये जगातल्या उपभोग्य वस्तू खरेदी करुन तात्पुरता आनंद मिळवता येतो आणि तोही स्वत:साठी.दुसरे असे की,माणसे जोडण्याऐवजी तोडण्यातच तो यशस्वी होतो.एखादी कुणीजरी व्यक्ती आली तरी त्यांच्या मनात फक्त पैसे मागण्यासाठीच आला आहे अशी शंका निर्माण होते.त्यामुळे नातेसंबंध जोडण्याऐवजी तोडण्याचीच भूमिका त्यांच्या अंगी असते. अशा श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती ही सदैव इतरांच्या मनावर राज्य करत जीवन व्यवहार करण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण काम करते.एकमेकांची मने ओळखण्याचे काम, सुखदुःख जाणणे, संकटकाळी धाऊन जाणे,आपले मन कुठेतरी मोकळे करणे, नातेसंबंध दृढ करणे ह्या सा-या गोष्टी मनाच्या श्रीमंती असणा-यामध्ये सदैव वास करत असतात.अशी माणसे सदैव नवीन काहीतरी शोधत असतात की जे आपले आणि इतरांचे नाते दृढ करतात.अशा माणसांमध्ये स्वार्थ,मतभेद,दुरावा,गर्व,अशा प्रवृत्ती कधीही वास करत नाहीत.म्हणून मनाची श्रीमंती ही सर्वमान्य असून एक सशक्त समाज घडविण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चतुर बिरबल* बिरबलच्या चातुर्याची कीर्ती सर्वदूर पसरली होती. तेव्हा त्याला पाहण्यासाठी दरबारात एक पंडित आला होता. बादशहाच्या परवानगीने त्याने दोन प्रश्न बिरबलाला विचारले पंडित : खरा ज्ञानी कोण व अज्ञानी कोण? बिरबल : ज्याच्याशी केलेली चर्चा फलदायी ठरते, तो ज्ञानी आणि निरर्थक ठरते तो अज्ञानी असतो. पंडित : सर्वांत उत्तम ऋतू आणि सर्वात वाईट ऋतू कोणती? बिरबल : पोटभर खायला, अंगभर ल्यायला आणि आपली जवळची माणसे प्रेम करायला असतील, तर सर्वच ऋतू उत्तम असतात. परंतु खायला अन्न नाही, ल्यायला वस्त्र नाही आणि कोणी प्रेम करणारेही नाही, अशी ज्याची स्थिती असेल, त्याला सर्वच ऋतू वाईट असतात. बिरबलाने दिलेली अशी उत्तरे ऐकताच तो पंडित बादशहाला म्हणाला, ''खाविंद, मला वाटले होते, त्यापेक्षा कितीतरी पटींनी बिरबलजी अधिक चतुर आहेत.'' *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🌹जीवन विचार*🌹 〰〰〰〰〰〰〰 http://www. pramilasenkude.blogspot.in ➖➖➖➖➖➖➖ *जो मनन करु शकतो त्याला मनुष्य म्हणतात.आपल्याला मननामुळेच सर्व ज्ञान प्राप्त होते.मनन हा जसा मनाचा गुण आहे.त्याप्रमाणेच माणसाच्या जीवनात प्रसन्नता ही मानवाला मिळालेली दैवी देणगी आहे.ज्या मानवात प्रसन्न वृत्ती आहे अशा प्रसन्न असणाऱ्या व्यक्तीची बुद्धी लवकर स्थिर होत असते.प्रसन्नतेमुळे आत्म्याला शक्ती मिळते.म्हणूनच कोणतेही कार्य हाती घेतले असता त्यात प्रसन्नता असले की ते कार्य हलके वाटते.* *प्रसन्नता ही माणसाच्या मनातून निर्माण होणारी क्रिया आहे.जसा दिव्यान दिवा लावता येतो तशी एका माणसाच्या मनातील प्रसन्नता अनेकांना हर्षउल्हासित करते.* smt.pramila senkude *यशस्वी जीवनासाठी प्रथमतः आपले मन आनंदी व प्रसन्न असायला हवे.ज्याप्रमाणे पारिजातक आपल्या फुलांच्या पडलेल्या सडा सुगंधाने सुगंधीत करून दुसऱ्याला आनंदी करतो त्याप्रमाणे माणसाच्या चेहऱ्यावरील झळकणार निर्मळ हास्य हे मन जिंकून घेत.* *म्हणूनच आपल्या जीवनातील जीवन जगण्यासाठीच ध्येयवाक्य असाव.' प्रसन्नतेचा एक एक क्षण पुरेसा,जोपासावा '.* *〰〰〰〰〰〰〰* ✍ शब्दांकन / संकलन श्रीमती प्रमिला सेनकुडे. जि.प.प्रा.शाळा गोजेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰〰

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 20/07/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन* 💥 ठळक घडामोडी :- २०००-अभिनेते दिलीपकुमार यांना 'राजीव गांधी राष्ट्रीय सदभावना पुरस्कार' जाहीर. १९०३ - फोर्ड मोटर कंपनीने आपली पहिली कार विकायला पाठवली. १९६९-अपोलो -११या अंतराळयानातून गेलेला नील आर्मस्ट्राँग हा चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव बनला. १९४७ - भारतीय व्हाइसरॉय लुई माउंटबॅटनने जाहीर वक्तव्य दिले की वायव्य सरहद्दी प्रांतातील निवडणुकीत जनतेने पाकिस्तानात विलीन होण्याचा कौल दिला आहे. १९९२ - टी.यु. १५४ प्रकारचे विमान त्ब्लिसीजवळ कोसळले. ४० ठार. १९९६ - स्पेनमध्ये विमानतळावर दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला. ३५ ठार. 💥 जन्म :- १९११ - बाका जिलानी, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९१९ - सर एडमंड हिलरी, गिर्यारोहक. १९२९ - राजेंद्र कुमार, भारतीय अभिनेता. १९५० - नसीरुद्दीन शाह, भारतीय अभिनेता. १९७६ - देबाशिष मोहंती, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९२३ - पांचो व्हिया, मेक्सिकन क्रांतीकारी. १९२७ - फर्डिनांड, रोमेनियाचा राजा. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *केरळात ८ जून रोजी दाखल झालेल्या मान्सूनने १९ जुलै रोजी संपूर्ण देश व्यापल्याची घोषणा भारतीय हवामान शास्त्र विभागाने केली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना पत्र लिहून संध्याकाळी सहापर्यंत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे.* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *रात्र गस्त घालणार्‍या पोलीसांच्या खांद्यावर एलईडी दिवे लावण्याचा अनोखा प्रयोग लोणावळा शहरात करण्यात येणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *गणेशोत्सवासाठी एसटीच्या २२०० जादा बसेस, २७ जुलैपासून आरक्षणाला सुरुवात, यंदा मुंबई व उपनगरातील चाकरमान्यांना त्यांच्या थेट कोकणातील घराच्या दारात सुखरूप सोडण्यासाठी एसटीने तब्बल २२०० जादा बसेसची केली सोय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *यवतमाळ : वणी पोलीस ठाण्यातील खांबावर गुरुवारी रात्री कोसळली वीज, तीन संगणक निकामी, महिला पोलीस शिपायाला बसला विजेचा धक्का.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा रविवारी होणार असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) जाहीर केले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *लंडन : महिला क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाच्या एलिसे पेरीनं इतिहास रचला. ऑस्ट्रेलियाची ही खेळाडू जवळपास चार वर्षांनंतर बाद झाली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - साहस* https://storymirror.com/read/story/marathi/0gnisi1w/saahs/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ⏰ *एक सेकंद म्हणजे किती काळ ?* ⏰ काळ मोठी अजब चीज आहे. ती एक अमूर्त कल्पना आहे. तरीही आपण तिचं मोजमाप करत असतो. वास्तविक दोन निरनिराळ्या घटनांमध्ये काही अवधी जावा लागतो आणि हा नेहमीच एकसारखा नसतो, हे ध्यानात आल्यानंतर त्या अवधीचं मोजमाप करण्याचं काहीतरी साधन असावं, असं वाटायला लागतं. त्यातूनच काळ या संकल्पनेचा उगम झाला. आपण मोजतो तो दोन नैसर्गिक घटनांमधला अवधी. त्या मोजमापाला काळ म्हणतो. म्हणजे मोजमाप होतं ते त्या अवधीचं, काळाचं नाही. तरीही काळ नावाची एक मोजपट्टी अमलात आणल्यानंतर त्याचं प्रमाणीकरण करणं आवश्यक झालं. दोन अवधीतल्या काळाची मात्रा किती हे समजणं आवश्यक होतं. त्यासाठी मग वरचेवर होणाऱ्या एका आवर्तनातून जाणाऱ्या घटनेची निवड करण्यात आली. त्या दोन आवर्तनातील अवधीला काळाचं एकक मानण्यात आलं. त्यातून मग सूर्योदयापासून सूर्यास्तपर्यंतच्या अवधीला एक दिवस मानण्यात येऊ लागलं. एकदा पूर्णचंद्र दिसल्यानंतर परत त्याचं दर्शन होईपर्यंत असे कितीतरी दिवस जावे लागतात, हे समजल्यानंतर त्या दिवसांचा एक महिना मानण्यात आला. त्याच सुत्राचं बोट धरत वर्ष या एककाची मात्रा ठरवण्यात आली. नंतर असं दिसून आलं, की आपल्या नेहमीच्या आयुष्यात अशा काही घटना घडतात, की त्यांच्यामधल्या अवधीचं मोजमाप करण्यासाठी दिवस हे एकक फार मोठं होतं. त्यापेक्षा लहान एककाची त्यासाठी गरज आहे. मग दिवसाचे लहान लहान भाग करून त्यांची एककं करण्याची कल्पना पुढे आली. त्यातूनच मग घटिका, तास, पळं किंवा तास, मिनिटं आणि सेकंद वगैरे एककांची निश्चिती करण्यात आली. तरीही एक तास म्हणजे नेमका किती अवधी किंवा एक सेकंद म्हणजे नेमका किती काळ, हे प्रमाणित करणं गरजेचं होतंच. तसं करायचं तर मग वरचेवर चक्राकार रितीनं होणाऱ्या घटनेचा शोध घ्यायला हवा होता. दिवसाचं प्रमाण ठरवताना पृथ्वीचं स्वतःभोवती होणारं चक्राकार परिभ्रमण विचारात घेण्यात आलं होतं. अशीच काही दिवसांत कितीतरी वेळा होणारी आवर्तनं आहेत काय, याचा शोध सुरू झाला. अणूंच्या अंतरंगातल्या रचनेचा उलगडा झाल्यानंतर त्यांची रचनाही सौरमालिकेसारखी असल्याचं स्पष्ट झालं. अणुकेंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन प्रदक्षिणा घालत असतात, हे दिसून आलं. त्यामुळे मग अणूंमधील आवर्तनांचा विचार होऊ लागला. त्यातूनच हे दिसून आलं की काही अणू आपल्या निरनिराळय़ा ऊर्जापातळींमध्ये सतत वर खाली जात असतात. एखाद्या नटखट मुलानं एक पायरी चढावं मग एक पायरी उतरावं, परत एक पायरी चढावं असा खेळ खेळावा तसे हे अणू एका ऊर्जा पातळीतून वरच्या पातळीत उडी घेतात आणि परत खालच्या पातळीत येतात. त्यांची ही आवर्तनं अविरत चालू असतात. त्या आवर्तनांवर थंडीवार्‍याचा हवेच्या दाबाचा कशाचाही परिणाम होत नाही. त्यामुळे मग त्यांचाच आधार सेकंदाचं प्रमाणीकरण करण्यासाठी घेण्यात आला. सिझियम या मूलद्रव्याचे अणू एका सेकंदात ९ अब्ज आवर्तनं पूरी करतात आणि त्यात काहीही बदल होत नाही, हे दिसून आल्यानंतर सेकंदाची व्याख्या त्या संदर्भातच करण्यात आली. अचूकपणे बोलायचं तर सीझियमच्या अणूची ९,१९२,६३१,७७० आवर्तनं पूर्ण होण्यासाठी लागणारा काळ म्हणजे एक सेकंद, हे आता जगभर मान्य झालं आहे. *बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• दुसऱ्याचे ओझे उतरविण्यासाठी जेव्हा तुम्ही पुढे होता तेव्हा तुमचे ओझे पुर्वीपेक्षा हलके होईल हे नक्की. *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *माणसाच्या शरीरात एकूण हाडे किती ?* 206 2) *माणसाच्या शरीरातील सर्वात मोठा हाड कोणता ?* फिमर (मांडीचे हाड) 3) *माणसाच्या शरीरातील सर्वात लहान हाड कोणता ?* स्टेप्स (कानातील हाड) 4) *1 मीटर म्हणजे किती सेमी ?* 100 सेमी 5) *'ज्ञानेश्वरी' हा ग्रंथ कोणी लिहिला ?* संत ज्ञानेश्वर महाराज *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● साईनाथ माळगे ● गंगाधर पालकृतवार ●  लक्ष्मण दावणकर ●  मोहन कुलकर्णी ●  दत्तात्रय तोटावाड ●  व्यंकट चिलवरवार ●  श्रीराम भंडारे ●  राहूल लोखंडे ●  दिनेश राठोड ●  सचिन पिसाळ ● साईकुमार ईबीतवार ● बजरंग अरगेलू ● करुणा खंडेलोटे ● ज्ञानेश्वर कोकरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *'नकार' साधा नसतो. त्याची एक किमंत असते. ती कधी अत्यंत स्वस्त असते तर कधी अत्यंत महाग. रामायण आणि महाभारताने असे अनेक नकार आपल्यासाठी उदाहरणे म्हणून ठेवले आहेत. रामायणात न दिलेले 'नकार' आदर्श निर्माण करतात. तर महाभारतात 'नकार' दु:ख आणि विध्वंस घडवतात.* *रामाने वनवासात जाण्यास नकार दिला असता तर पितृवचनी राम असा आदर्श राहिला नसता. एका धोब्याच्या टिकेवर रामाने विश्वास ठेवण्यास नकार दिला असता, तर जनहित जपणारा 'राजा' म्हणून रामाचे नाव झाले नसते. या प्रत्येक नकाराने पुढे अनंत यातनांना जन्म दिला, पण शेकडो वर्ष टिकणारे 'आदर्श' जन्माला घातले.* *महाभारतात पावलोपावली शक्तिशाली नकार दिसतात व सामान्यांना आधार देणारे आदर्श निर्माण करतात. कुंतीचा कर्णाला स्विकारण्यास नकार, दुर्योधनाचा पांडवांना राज्य देण्यास नकार, द्रौपदीचा दुर्योधनास नकार हे सर्व विध्वंसक ठरले.* *"अर्जुनाने युद्धाला नकार दिला नसता तर 'भगवद्-गीता' जन्माला आली नसती. आम्ही 'गीते'ला मुकलो असतो."*     ••●🔻‼ *रामकृष्णहरी* ‼🔻●••               ⚜⚜⚜⚜⚜ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    ज्ञान भक्ति वैराग्य सुख पीव ब्रह्म लौ ध़ाये आतम अनुभव सेज सुख, तहन ना दूजा जाये।      ज्ञान भक्ति वैराग्य सुख जलद ब्रम्हानंद दायी आत्मानुभव प्राप्तीची सर अन्यत्र कुणा न येई         महात्मा कबीर अनुभव ज्ञानाची महत्ती विषद करताना म्हणतात , 'ज्ञान,भक्ति,वैराग्य सुख प्राप्तीद्वारे जलद गतीने ईश्वराचा साक्षात्कार होईल. ईश्वराची दिव्यताही अनुभवता येईल. हा मार्ग ईश्वरी लिला जाणून घेण्यासाठी महत्वपूर्ण ठरणारा आहे.  मात्र आत्मानुभव आत्मा आणि परमात्म्याचंं  मिलन घडवून आणतो.  जेव्हा आत्माच परमात्म्याच्या रुपाशी एकरूप होऊन जातो. तिथे अन्य कुणाला प्रवेश कसा मिळणार बरे ! जीव आणि शिवाच्या एकरूपतेत मनाचाच मनाशी संवाद घडून येतो. विश्वातील नश्वरता व विकारांना त्याठायी यत्किंचितही स्थान उरत नाही. निसर्गाची सर्वव्यापकता व समदृष्टी त्या जीवात्म्याच्या ठायी स्थापित होते. हा स्थितप्रज्ञतेचा सर्वोत्कट आविष्कार असतो. त्याच्यावर कोणत्याही प्रलोभनाचा प्रभाव पडत नाही . कारण तो स्वतःच अविनाशी विश्वरूपाशी तादात्म्य पावलेला असतो.       एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जो माणूस जसा विचार करतो त्याच विचारानुसार जीवनात वागतो. जर चांगले विचार असतील तर त्यांचे परिणाम त्याच्या जीवनात आणि इतरांराच्याही जीवनात चांगलेच होतील. आपल्याला आणि इतरांना त्रास होणार नसतील, उपदेशात्मक असतील तर ते नक्कीच जीवनात फलदायी ठरु शकते.अशी माणसे स्वत:च्या आणि इतरांच्याही जीवनात नवे चैतन्य आणू शकतात.ते कधीही वाईट विचारांना आपल्या जीवनात थारा देत नाहीत,त्यांना कुणाचेही नुकसान होऊ नये असेच वाटते. परंतू वाईट विचार करणारी माणसे कधीच आपल्या जीवनात यशस्वी होत नाहीत आणि इतरांच्या चांगल्या चाललेल्या जीवनात बाधा आणल्याशिवाय राहत नाहीत.अशी माणसे दुष्ट प्रवृतीची असतात.त्यांना स्वत:चे आणि इतरांचे काय आणि किती नुकसान होत आहे याचे भान देखील राहत नाही.अशावृत्तीच्या माणसांपासून केव्हाही दूरच राहिलेले बरे. © व्यंकटेश काटकर,नांदेड. 📲 9421839590 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *परोपकारी वृत्ती अंगी बाळगणे* एका गावात एक निर्धन मनुष्‍य राहत होता. परिस्थिती गरीबीची असूनही तो मनाने उदार होता. आपल्‍या घासातील घास देण्‍यासही तो कमी पडत नसे. एकदा एका शेठजीकडे तो जेवावयास गेला असताना त्‍या शेठजीने त्‍याला पंचपक्‍वान्‍नाचे ताट वाढून दिले. ती भरगच्‍च पदार्थांनी भरलेली थाळी बघून त्‍या गरीबाला वाटले की यातून किमान तीन माणसांची भूक भागू शकेल. त्‍याने शेठजीची परवानगी मागितली व त्‍यातील अन्‍न त्‍याने बरोबर घेतले व घराकडे जाण्‍यास निघाला. रस्‍त्‍यात त्‍याला एक भिकारी भेटला त्‍याला त्‍याने खायला दिले. त्‍यातून उरलेले अन्‍न घेऊन तो घरी आला, तो जेवायला बसणार इतक्‍यात एक भिक्षुक या माणसाच्‍या घरी आला व त्‍याने त्‍याला अन्‍नदान करण्‍याची विनंती केली. गरीबाने त्‍याच्‍यासमोरील ताट त्‍या भिक्षुकाच्‍या स्‍वाधीन केले. त्‍यानंतर अजून एक अपंग व्‍यक्ती दाराशी आली त्‍यानेही या गरीबाकडे अन्न मागितले त्‍यालाही याने आपल्‍या थाळीतील अन्न खायला दिले. आता याच्‍याकडे देण्‍यासारखे काहीच शिल्लक राहिले नाही तेव्‍हा याने स्‍वत:ची भूक भागविण्‍यासाठी एक भांडेभर पाणी घेतले तर समोरून एक वृद्ध व्‍यक्ती आली व तिने ते पाणी पिण्‍यासाठी मागितले. याला आता खाण्‍यापिण्‍यासारखे काहीच उरले नाही तरीही ही व्‍यक्ती समाधानात होती आजचा दिवस आपल्‍यामुळे किमान चार लोकांना तरी खाण्‍यापिण्‍यास मिळाले. तो ह्याच विचारात असताना तेथे देव प्रगटले व म्‍हणाले,'मी तुझी परीक्षा घेण्‍यासाठीच भिकारी, भिक्षुक, अपंग आणि वृद्ध व्यक्तिचे रूप घेतले होते व तुझ्याकडून काही ना काही मिळते का नाही हे पाहिले आणि तु स्‍वत:चा विचार न करता दुस-याचा जीव जाणून घेतलास व देत राहिलास. आता या पुढे तुला काहीच कमी पडणार नाही असा मी तुला वर देतो.'' इतके बोलून देव अंतर्धान पावले. *तात्‍पर्य: देण्‍यातच खरे सुख लपलेले आहे. कुणाचाही घास हिरावून घेण्‍यापेक्षा कुणाला तरी एखादा घास देता कसा येईल याचा विचार करणे यातच खरे सुख लपलेले आहे.* *माणसाने आपला जन्म घेण्यासाठी नाहीतर देण्यासाठी झाला ही सदभावना बाळगून परोपकार करीत जावे यातच खरा आनंद आहे.समाधान आहे.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 19/07/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शहीद दिन - म्यानमार* 💥 ठळक घडामोडी :- १९९९-'मैत्रेयी एक्सप्रेस' या कोलकाता ते ढाका बससेवेचे तत्कालीन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी उदघाटन केले. १९६६-'शिवसेना'या राजकीय पक्षाची स्थापना झाली. १९८५ - ईटलीतील व्हाल दि स्लाव्हा धरण फुटले. पुरात २६८ ठार. १९८९ - युनायटेड एरलाइन्स फ्लाइट २३२ हे डी.सी. १० प्रकारचे विमान अमेरिकेतील सू सिटी शहराजवळ कोसळले. वैमानिकांच्या कौशल्यामुळे १८४ प्रवासी वाचले परंतु ११२ अन्य प्रवासी मृत्युमुखी. 💥 जन्म :- १८९६ - ए.जे. क्रोनिन, स्कॉटिश लेखक. १९३४ - फ्रांसिस्को से कमेरो, पोर्तुगालचा पंतप्रधान. १९३८ - डॉ. जयंत विष्णू नारळीकर, भारतीय अंतराळ-भौतिकशास्त्रज्ञ. १९४७-सलमान रश्दी ,ब्रिटिश लेखक 💥 मृत्यू :- १९४७ - ऑँग सान, म्यानमारचा स्वातंत्र्यसैनिक. १९६५ - सिंगमन र्‍ही, दक्षिण कोरियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष. १९८० - निहात एरिम, तुर्कस्तानचा पंतप्रधान. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानने फाशीची शिक्षा सुनावलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांची तात्काळ मुक्तता करावी, अशी मागणी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानकडे केली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *आजपासून मान्सूनचा मध्य-महाराष्ट्र, विदर्भात जोर, मुंबई, ठाण्यातही वाढणार तीव्रता, देश व्यापत चाललेला मान्सून ठिकठिकाणी मनसोक्त बरसत असतानाच मराठवाडा आणि विदर्भाकडे मात्र वरुण राजाने फिरवली आहे पाठ.* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *सर्वोच्च न्यायालयाची निवडक निकालपत्रे मराठीसह सात प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करण्याची सोय कालपासून झाली सुरू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *समृद्धी महामार्गावर वन्यजीवांसाठी विशेष उपाययोजना, प्रस्तावित असलेल्या मुंबई-नागपूर महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर वन्यजीवांसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे विशेष उपाययोजना करण्यात येणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *३१ जुलै रोजी शिर्डी येथे राज्यातील ४० हजार सरपंच, उपसरपंचांचा जंगी मेळावा आयोजित करण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि भाजपचे अन्य काही मंत्री प्रामुख्याने उपस्थित राहणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *श्रीमंतांच्या यादीत मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकत अरनॉल्ट दुसऱ्या क्रमांकावर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *नवी दिल्ली : भारताची आघाडीची धावपटू हिमा दास हिने आपली सुवर्ण धाव कायम राखताना गेल्या १५ दिवसांत तब्बल चौथे सुवर्ण पदक जिंकण्याचा केला पराक्रम* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - जादूची पिशवी* https://storymirror.com/read/story/marathi/epuemarh/jaaduucii-pishvii/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *वादळाचं बारसं कोण करतं ?* 📙 २००९ हे वर्ष सरता सरता महाराष्ट्राच्या किनारपट्टीला उद्ध्वस्त करणारं वादळ आठवतं ? त्यानं केलेल्या विध्वंसाच्या खुणा आजही तिथं जागोजागी दिसतात. त्या वादळाचं 'फयान' हे नाव तर तिथल्या नागरिकांच्या मनावर कायमचं कोरलेलं आहे. तीच गत अमेरिकेच्या दक्षिण किनाऱ्यावरील न्यू आॅर्लियान्स या शहराची. 'कत्रिना' हे नाव उच्चारलं तरी मंडळी चळाचळा कापायला लागतात. कारण २००५ साली त्या तुफानानं त्या शहराची केविलवाणी अवस्था करून सोडली होती. वादळ, तुफान, झंझावात, चक्रावर्त अशा अनेक नावांनी ही वादळं ओळखली जातात. इंग्रजीतही सायक्लॉन, टायफून, हरिकेन, स्टाॅर्म अशी नावं आहेत. तरीही त्यांना 'फयान' किंवा 'कत्रिना' याच्यासारखी विलक्षण नावं देतं कोण ? असा प्रश्न मनात येतोच. भूकंप हाही एक नैसर्गिक प्रकोपच आहे; पण भूकंपांना कधी अशी नावे दिलेली आढळत नाहीत. तर मग वादळांचंच असं बारसं कोण करतं ? जसजशी हवामान अंदाजाची यंत्रणा अधिक कार्यक्षम होत गेली, तसतशी वादळांची पूर्वसूचना मिळणे अधिक शक्य होत गेलं. त्यात हंगामामध्ये एकाहून अधिक वादळं एकाच प्रदेशात एकापाठोपाठ येऊन थडकत असतात. अशा वेळी त्यांची वेगवेगळी ओळख पटवण्याची गरज भासू लागली. त्यातूनच मग त्यांचं नामकरण करण्याची प्रथा अस्तित्वात आली. त्याची जबाबदारी मुख्यत्वे 'वर्ल्ड मीटिआॅराॅलॉजिकल ऑर्गनायझेशन' या संस्थेने उचललेली आहे. त्या संस्थेने जगातील तीन वेगवेगळ्या वादळप्रवण क्षेत्रांमध्ये विभागणी केली आहे. उत्तर हिंदी महासागर, उत्तर अटलांटिक महासागर आणि ईशान्य पॅसिफिक महासागर अशी ही ढोबळ विभागणी आहे. उत्तर हिंदी महासागरात उठणाऱ्या वादळांचं बारसं करण्याची जबाबदारी आठ देशांनी उचलेली आहे. यात भारत, पाकिस्तान, म्यानमार, बांगलादेश, मालदीव, श्रीलंका, थायलंड आणि ओमान हे देश येतात. त्यांनी सर्वांनी मिळून प्रत्येक देशाने आठ अशी चौसष्ट नावांची यादी बनवलेली आहे. त्यातून अनुक्रमाने भारतीय हवामान खाते या वादळाचे नामकरण करतं. 'फयान' हे नाव म्यानमारने सुचवलेलं होतं. यानंतर येणाऱ्या वादळाला ओमानने सुचवलेले 'वार्द' त्यानंतरच्या वादळाला पाकिस्ताननं सुचवलेलं 'लैला' अशी नावं यादीवर आहेत. यापूर्वीच्या वादळांना दिलेली नर्गिस (पाकिस्तान), रश्मी (श्रीलंका), कायमुख (थायलंड), बिजली (भारत), निशा (बांगलादेश) व ऐला (मालदीव) ही नावे होती. कोणाही व्यक्तीवरून ही नावे दिली जात नाहीत. एकदा एक नाव वापरल्यावर त्याचा परत वापर केला जात नाही. ही यादी संपायच्या आधी पुढची यादी तयार केली जाईल. इतर क्षेत्रांसाठी काही तपशील वगळता अशाच प्रकारची पद्धत वापर अवलंबली जाते. उदाहरणार्थ उत्तर अटलांटिक प्रदेशासाठी तीन वेगवेगळ्या याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत. अनुक्रमाने त्यांच्यामधील नावं वापरली जातात. तिथे एकाआड एक पुरुषी नाव तर एका आड एक बायकी नाव दिले जाते. पॅसिफिक महासागरातल्या वादळांना नावं देण्यासाठीही संबंधित राष्ट्रांनी अशाच प्रकारची यादी तयार केलेली आहे. तेव्हा वादळांचं बारसं मुख्यत्वे 'वर्ल्ड मीटियोरोलॉजिकल ऑर्गनायझेशन' संबंधित देशांच्या हवामान खात्यांच्या सहकार्यानं करत असते. *बाळ फोंडके यांच्या 'कोण ?' या पुस्तकातुन* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• संकटांना भिऊ नका, संकटांना संधी मानून त्यावर मात करा. *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *राष्ट्रसंत तुकडोजीला 'तुकड्या' हे नाव कोणी दिले ?* आडकोजी महाराज 2) *'ग्रामगिता' हा ग्रंथ कोणी लिहिला ?* राष्ट्रसंत तुकडोजी महाराज 3) *तुकडोजीचा 'राष्ट्रसंत' या पदवीने कोणी गौरव केला ?* डॉ राजेंद्र प्रसाद 4) *राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म कोठे झाला ?* मोझरी 5) *श्री गुरुदेव मंडळाची स्थापना कोणी केली ?* राष्ट्रसंत तुकडोजी महाराज *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  रविकिरण बलूले ●  मनोज बडे ●  अमोल पाटील सावंत ●  अनिकेत पडघन ●  गजानन शिराळे ●  श्रीनिवास मुरके *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत संघर्ष आहे. हा संघर्ष आतल्या श्वासांबरोबर सुरू होतो आणि श्वासांबरोबरच संपतो. मी खूप दगदग केली आहे. तेलाच्या घाण्याला बैलाला जुंपावे तसे आयुष्याला जुंपलो आहे. आता थोडे आरामाचे क्षण आले आहेत. थोडा विश्राम करतो असे जर कुणी म्हणाले, तर हा विचार आयुष्याला पूर्णविरामाकडे नेतो. माणूस उद्यमशिल राहिला नाही तर त्याचे अस्तित्व संपते. बुद्धिने श्रमाचा ठेका धरला तर आयुष्याचे सप्तसुरात न्हाणे होईल.* *कु-हाडीने लाकडे फोडणारा प्रचंड शारीरीक श्रम करीत असतो. रस्त्याकडेला झाडाखाली बसलेला चर्मकार दिवसभर अखंड कामात असतो. या कामाला बुद्धीची जोड मिळाली, तर श्रम कमी होतील, उत्पन्न वाढेल आणि कामात आनंद निर्माण करता येईल. त्यामुळे उद्योगशिल राहणे जितके गरजेचे असते तितकेच त्या उद्योगशिलतेला बुद्धिने दिशादर्शन करणेही आवश्यक असते. प्रतिकूलतेचे आव्हान स्विकारून ते अनुकूल करणारे श्रमर्षि थेट ब्रम्हांडनायक भास्करांनी नाते सांगतात. प्रतिभेला परिश्रमाची साथ मिळाली तर वाळवंटातही नंदनवन फुलत असेल, तर ही साथ घेऊन नंदनवनी असणारे आपण बहरून यायलाच हवे ना !* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल-9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• परबत परबत मै फिरया,  नैन गवाए रोई | सो  बूटी पौ नहीं ,  जताई जीवनी होई  ||      अर्थ           माणूस बर्‍याचशा ऐकीव आणि भ्रामक बाबींच्या मागे लागून जीवनातला अनमोल वेळ वाया घालवत असतो. अमृत प्राशन करणे, अमर होणे, संजीवनी व बर्‍याच  अशा काही बाबी वारंवार चर्चेत येतात. या सर्व बाबींचा भौतिक विचार करून माणूस दमछाक करून घेतो. सर्व काही आपल्याच ठायी असणार्‍या कर्तृत्त्व , चिंतन ,  शांती व समाधानातून प्राप्त होणार्‍या या लौकिक  बाबी ! मात्र माणूस वरवरचा विचार  करून स्वतःची दमछाक करून घेतो. 'तुझं आहे तुजपाशी पण जागा विसरलाशी.' अशीच ही गत म्हणावी लागेल. कस्तुरी मृग कस्तुरीच्या सुगंधानं ऊर फुटेतो धाव धाव धावतो. कस्तुरी स्वतःजवळ असूनही त्याचा अंत मात्र तिच्याच शोधात  होतो.  तसंच माणसाचं झालंय. थोडसं पूर्वजांकडं डोकावून पाहिलं तर सर्वच जण अमरत्व गाठू शकले नाहीत. ज्यांनी ध्येयासाठी झपाटून आपल्या कर्तृत्तवाचा ठसा उमटवला. खरं तर त्यांनाच अमृताचा खर्‍या अर्थानं कुंभ सापडलेला ! त्यांनी तो कर्माच्या रूपानं प्राशन केला. आज हजारो शेकडो वर्षे लोटली.  ते देहाने नसले तरी कार्य रूपानं अमर आहेत. त्यांच्या हयातीत कधी त्यांनी भ्रामक अमृताचा शोध घेतला नाही. त्यांनी कधी वेगळ्या स्वर्गाचा विचार केल्याचे ऐकिवात नाही. आपल्या कार्य क्षेत्रातंच मनोभावे स्वर्ग निर्माण केला. 'नर करणी करे सो नारायण होय ।' याची प्रचिती दिली. ज्यांनी लौकिकता व नैसर्गिकपण नाकारलं. ते सर्व अवहेलनेचे धनी ठरले आहेत. प्रतिकांचा उथळ अर्थ घेवून धावपळ करून चालत नाही. चिंतन व मननातून शाश्वत सत्ये बाहेर पडतात. ती शोधली की माणूस अजरामर होतो. हे त्या मागचं रहस्य सांगताना महात्मा कबीर म्हणतात, पर्वता पर्वतावर फिरून थकलो , दमलो, प्रसंगी रडलोही परंतु सहज अमर करणारी संजीवनी काही प्राप्त झालीच नाही. कर्म गुटिकाच माणसाला अमर करते. हे जीवनातून  फलित निघालं.       कर्मभूमीत हृदय आणि हृदयात कर्मभूमीला  आसरा दिला की जीवनच नंदनवन होवून जातं.  एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• चांगल्या विचाराने आणि चांगल्या संगतीने खरा माणूस घडतो. आपल्या जीवनात नेहमी चांगला विचार करत राहिल्यास आपल्या प्रत्येक कामात यश मिळते आणि मनस्वी आनंद मिळतो.तो आनंद इतरांचे वाईट व्हावे आणि माझेच भले व्हावे असे विचार सतत आपल्या मनात असतील तर आपणच आपल्या पायावर दगड पाडून घेतल्यासारखे होईल.त्यात आपली प्रगती होण्यापेक्षा अधोगतीच होईल. तसेच चांगल्यांच्या सहवासात राहिले तर आपल्या मनातील वाईट विचारांना कधीच संधी मिळणार नाही.चांगली माणसे स्वत:साठी आणि इतरांसाठी नेहमी चांगलाच विचार करत असतात.सुसंगती सदा जोडावी ती म्हणजे चांगल्या सज्जनांची आणि पुस्तकांची तसेच ग्रंथांची.यांच्या सानिध्यात राहिल्यावर देखील आपले जीवन सुखी व समृद्ध बनेल.त्यामुळे आपण इतरांसमोर एक आदर्श म्हणून उभे राहू. © व्यंकटेश काटकर, नांदेड. 📱९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 📚🌱📚🌱📚🌱📚🌱📚 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खोड मोडली* सखाराम नावाचा एक ‍मीठाचा व्यापारी होता. त्याच्याजवळ एक गाढव होते. ते फार आळशी होते. रोज सकाळी सखाराम गाढवाच्या पाठीवर मीठाच्या पिशव्या लादत असे. मग तो गाढवाला घेऊन शेजारच्या गावात मीठ विकायला जात असे. जाताना एक ओढा लागत असे. एके दिवशी ओढा ओलांडत असताना गाढवाचा पाय अचानक घसरला व ते पाण्यात पडले. त्यामुळे त्याच्या पाठीवरचे मीठाचे पोते पाण्यात भिजले. त्यातील मीठ विरघळल्याने ते हलके झाले. त्यामुळे गाढवाचे ओझे कमी झाले. त्याला चांगलाच आराम मिळाला. दुसर्‍या दिवशी गाढवाने मुद्दाम पाण्यात पडल्याचे नाटक केले. मीठ पुन्हा पाण्यात भिजल्याने त्यादिवशीही गाढवाला आराम मिळाला. मग तो सारखेच असे करू लागला. पण लवकरच सखारामला ही युक्ती लक्षात आली. त्याची खोड मोडण्यासाठी मग त्याने एके दिवशी त्याच्या पाठीवर कापसाचे ओझे ठेवले. ओढा लागताच गाढवाने पुन्हा पडल्याचे नाटक केले. मात्र, या वेळी पाटीवर मीठाऐवजी कापूस असल्याने तो भिजल्यावर चांगलाच जड झाला. त्यामुळे गाढवाला लवकर उठता येईना. त्याला त्या दिवशी अधिकच ओझे वाहावे लागले. त्याला चांगलीच अद्दल घडली. तेव्हापासून गाढवाने कधीच पाण्यात पडल्याचे नाटक केले नाही व कामचुकारपणा केला नाही. *तात्‍पर्य: कामातून पळवाट शोधणे केव्हाही वाईट.आळस,कामचुकारपणा केल्यास स्वतःचेच नुकसान होते.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

माझा परिचय नावः श्रीमती प्रमिला कुंडलीक सेनकुडे पदः सहशिक्षिका कार्यरत शाळाः जि.प.गोजेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड. शिक्षणः B.A.(Ded ) छंद व आवडः सामाजिक कार्याची आवड,वाचणाची आवड, संघटणात्मक कार्याची आवड, (काव्य , चारोळी, लेख) लिखाणाचीआवड, शालेय स्तरावर शैक्षणिक विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्याची आवड. रोटरी क्लब हदगाव तर्फे विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबविणे. (वैयक्तिक पातळीवर सामाजिक उपक्रम राबविते दरवर्षी.आई-बाबाची पुण्यतिथी) 〰〰〰〰〰〰〰 *तंत्रज्ञानात्मक वाटचाल* *ब्लाॕग निर्मितीतुन , आणि युटुब चॕनल च्या माध्यमातून शैक्षणिक माहिती व उपक्रम राबविणे.* *प्रकाशित साहीत्य* *'वास्तव एक......सत्य' काव्यसंग्रह* विविध मासिके आणि वृतपञात कविता ,लेख प्रकाशित. *भुषवित असलेले पदः* १) म.रा.प्रा.शिक्षक महिला आघाडी संघ जिल्हासरचिटणीस नांदेड. २) रोटरी क्लब सदस्या हदगाव. ३) जिजाऊ ब्रिगेड कार्याध्यक्षा (ता.हदगाव जिल्हा नांदेड) ४) काव्यप्रेमी शिक्षकमंच जिल्हाध्यक्षा नांदेड. 〰〰〰〰〰〰 *मिळालेले पुरस्कार व सन्मानः* १) प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम शिक्षणाची वारी सन्मानपञ २) तालुकास्तरीय 'गुणी' शिक्षक गौरव पुरस्कार ३) आई गौरव पुरस्कार ४)कै.देवराव प्रभुजी पाटील सेवाभावी संस्था तर्फे शिष्यवृत्ती पुरस्कार ५) 'गौरव गुणवंताचा' पुरस्कार (सहकारी पतपेढी शिक्षण विभाग मर्यादित जिल्हा परिषद नांदेड.) ६) मुलींची १००% पटनोंदणी पुरस्कार ७) कुसुमताई चव्हाण 'महिला भूषण' पुरस्कार ८) म.अॕ.पॕनल(MAP) तर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार (संमेलन नाशीक) ९) रोटरी क्लब, हदगाव तर्फे (Nation Builder Award) १०) गुरुकुल महाराष्ट्र समूहातर्फे सन्मानपञक व गौरवचिन्ह ११) मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर तर्फे राज्यस्तरीय काव्य पुरस्कार १२) 'आम्ही सावित्रीचा लेकी' आयोजित राज्यस्तरीय उपक्रमशिल शिक्षिका पुरस्कार १३) 'माझी शाळा माझे उपक्रम' शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती सहभाग प्रमाणपत्र १४) स्वामी विवेकानंद शिक्षक पतसंस्था हदगाव/हिमायतनगर तर्फे दोनवेळेस सत्कार व सन्मानचिन्ह (२०१७ तसेच २०१८ ला) १५) मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर तर्फे 'गुरू गौरव' पुरस्कार १६) 'आस शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना' तर्फे ' राज्यस्तरीय अध्यापक पुरस्कार' १७) नांदेड भारत स्काऊटस आणि गाईडस सन्मानचिन्ह १८) गुरुगोविंदसिंघजी प्रेरणा पुरस्कार नांदेड १९) राज्यस्तरीय हिरकणी साहित्यगौरव पुरस्कार जालना २०) महाराष्ट्र शिक्षक पॕनल तर्फे 'राज्यस्तरीय सेवासन्मान आदर्श शिक्षिका'पुरस्कार. 〰〰〰〰〰〰〰 मो.नं 9403046894. 〰〰〰〰〰〰

*लालपरी* तुझ्या उदरी जन्माला मी येईन लालपरी तुझी ग मी होईन तुझ्या सुखदुखाःची साथी मी होईन आनंदात तुझ्या भारावून मी जाईन 〰〰〰〰〰〰 प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव जिल्हा नांदेड.

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 18/07/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन* 💥 ठळक घडामोडी :- १९९६-उद्योगपती गोदरेज यांना जापान सरकार तर्फे 'ऑर्डर ऑफ रायझिंग सन' पुरस्कार प्रदान. १९६८ - इंटेल कंपनीची स्थापना. १९२५-अडाल्फ हिटलर ने 'माईन काम्फ'हे आत्म चरित्रात्मक पुस्तक प्रकाशित केले. १८५७-मुंबई विद्यापीठाची स्थापना 💥 जन्म :- १९१८-नेल्सन मंडेला तथा 'मदीबा' ,दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते. १९६७ - व्हिन डीझेल, अमेरिकन अभिनेता. १९८२ - प्रियांका चोप्रा, भारतीय अभिनेत्री. 💥 मृत्यू :- १९६९- 'लोकशाहीर' अण्णाभाऊ साठे,लेखक,कवी व समाजसुधारक २०१२ - सुपरस्टार राजेश खन्ना, हिंदी चित्रपट अभिनेते. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई - डोंगरी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत तर जखमींना 50 हजार रुपये देणार - मुख्यमंत्री* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *चांद्रयान-२ या अवकाशयानाचे २१ जुलै रोजी दुपारी किंवा २२ जुलै पहाटे पुनर्प्रक्षेपण करण्याचा विचार भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) करत आहे.* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *नागपूरसह अकोला, वाशीम, धुळे आणि नंदूरबार जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *कुलभूषण जाधव प्रकरणी भारताला मोठं यश ; पाकिस्तानला चपराक - विशेष सरकारी वकील उज्वल निकम* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *गोव्यात विरोधी पक्षनेतेपदी दिगंबर कामतनिवड, मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या दिगंबर कामत यांना पहिल्यांदाच विरोधी पक्षनेतेपद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *'मेड इन इंडिया' कादंबरीफेम साहित्यिक पुरुषोत्तम बोरकर यांचे निधन, खामगाव येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनात त्यांनी पूर्णवेळ उपस्थिती दर्शविली होती.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *१६ वर्षीय अनिष बनवालाने जर्मनीत सुरू असलेल्या कनिष्ठ वर्ल्ड कप स्पर्धेत 25 मीटर रॅपिड फायर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - अमर रहे* https://storymirror.com/read/story/marathi/re186hy4/amr-rhe/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *ज्वालामुखीचा उद्रेक केव्हा होतो ?* 📙 आपल्या पृथ्वीचा पृष्ठभाग टणक आणि स्थिर वाटला तरी हे धरतीचं कवच अनेक खंडांमध्ये विभागलं गेलेलं आहे. हे खंड पृथ्वीच्या पोटात असलेल्या द्रव पदार्थावर तरंगत असतात. पृथ्वीच्या गाभ्यामधलं तापमान अतिशय चढं असतं. त्यापायी तिथले कातळ, दगड वितळतात आणि त्यांचं द्रवरूप मॅग्मामध्ये रूपांतर होतं. हा मॅग्माही अतिशय तप्त अवस्थेत असतो. त्यापायी त्याचा दबाव वरच्या खंडांवर पडत असतो. ज्या वेळी हा दबाव एका मर्यादेपलीकडे जातो तेव्हा तो मॅग्मा वरवर चढू लागतो. ज्वालामुखीच्या पोटातल्या या मॅग्माला वर चढण्यासाठी एक नळीसारखी मोकळी जागा सापडते. हिलाच व्हेन्ट म्हणतात. व्हेंटचं वरचं टोक ज्वालामुखीच्या उघड्या तोंडाशी जोडलेलं असतं. हा तापलेला मॅग्मा वरवर चढत असताना वाटेत आलेल्या खडकांनाही वितळवतो. त्यामुळे त्यांचं प्रमाण व दबाव वाढत जातो. वरवर जातानाच त्याचं लाव्हामध्ये रूपांतर होतं. हा लाव्हा त्या मुखाशी पोचला की जोराने बाहेर फेकला जातो. यालाच ज्वालामुखीचा उद्रेक म्हणतात. असा स्फोट झाल्यासारखा उद्रेक झाला की राख, धूळ आणि न वितळलेले खडकांचे तुकडे वातावरणात उंच फेकले जातात. राख व खडक परत जमिनीकडे ओढले जातात. पण बाहेर पडलेला लाव्हा मात्र द्रवरूप असल्यामुळे बहुतेक वेळा ज्वालामुखीच्या बाहेरच्या बाजुवरून ओघळत खाली उतरतो. त्याचा वेग जास्त असला तर तो झपाट्याने आसपासच्या प्रदेशात पसरतो. वाटेत आलेल्या सगळ्यालाच वितळवत, जाळत तो दूरदूरवर पसरत जातो. पुरातन पॉम्पे शहराजवळच्या व्हेसुव्हियस या ज्वालामुखीचा उद्रेक झाला तेव्हा ते सर्व शहर बेचिराख होऊन त्या लाव्हाखाली गाडलं गेलं होतं. हा लाव्हा जसा थंड होतो तसं त्याचं अग्निजन्य खडकांमध्ये रूपांतर होतं. जर उद्रेक झालेला ज्वालामुखी सागराच्या पोटात असेल तर अशा थंड झालेल्या लाव्हापासून बेटं तयार होतात. हवाई बेटांचा उगम असा झाला आहे. ज्वालामुखीचा उद्रेक एकाएकी काहीही पूर्वसूचना न देता होऊ शकतो. पण उद्रेक होण्यासाठी पुरेसा मॅग्मा तयार होऊन व्हेन्टवाटे वरवर चढत जाण्याची आवश्यकता असते. ते होण्यासाठी काही कालावधी निश्चितच जातो. त्यामुळे काही पूर्वसूचना मिळू शकतात. त्यातल्या बहुतेक भूकंपाच्या छोट्या छोट्या धक्क्यांच्या स्वरूपातल्या असतात. तर काही वेळा तापलेल्या मॅग्माच्या हालचालीमुळे जमिनीचं तापमान वाढत जातं किंवा तिथं असलेल्या तसेच गरम पाण्याच्या झऱ्यांचं तापमानही वाढत जातं. काही वेळा जमिनीला फुगवटाही येतो. पण या सर्वांवर लक्ष ठेवण्यासाठी संवेदनशील उपकरणांची गरज असते. सुप्त ज्वालामुखींच्या आसपासच्या प्रदेशात ठेवलेल्या अशा उपकरणांद्वारे पूर्वसूचना मिळाल्यास तेथील नागरिकांचं स्थलांतर करून जीवितहानी टाळता येते. *बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• अनुभवाने आलेले शहाणपण हे हजारो पुस्तकं वाचुन आलेल्या शहाणपणापेक्षा किती तरी पटीने श्रेष्ठ असते. *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारतात सहारा हे राष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?* मुंबई 2) *लांबी मोजण्याचे प्रमाणित एकक कोणते ?* मीटर 3) *दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत ?* अरविंद केजरीवाल 4) *तुकडोजी महाराज यांचे नाव काय होते ?* माणिक बंडोजी ठाकूर 5) *राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुचे नाव काय होते ?* आडकोजी महाराज *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  श्रीनिवास पुसा ●  राज राठोड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संपर्क, नातं व संबंध या गोष्टी नीट समजून घ्यायला हव्यात. संपर्कात असणे म्हणजे संबंधात असणे. हा संबंध कधी इतर नात्यांतून निर्माण झालेला असतो, कधी वैचारिक असतो, कधी भावनिक असतो. ते प्रेम आणि आदरातून निर्माण झालेलं असतं. सामाजिक संबंध हे घालून दिलेल्या मानदंडातून निर्माण झालेले असतात. पती आणि पत्नी यांच्यात भावनिक, बौद्धिक, आत्मिक संबंध असतोच का ? फार कमी 'आहे' असे उत्तर येऊ शकेल, कधी कधी नसतो देखील ! केवळ सामाजिक व्यवस्थेप्रमाणे तो संपर्क किंवा संबंध असतो.* *एखाद्या व्यक्तिविषयी आपण जेंव्हा विचार करतो तो ती व्यक्ती कालपर्यंत कशी होती, यावरून तिच्याबाबत आपल्या मनात एक प्रतिमा तयार झालेली असते. त्यातूनच आपण त्या व्यक्तिकडे बघत असतो. पण, आज ती व्यक्ती वेगळी असू शकते. म्हणून केवळ भूतकाळाच्या प्रतिमेवरून विचार करून चालणार नाही. खरा संपर्क, संबंध, प्रेम असणार असेल तर ते भूतकाळात आणि भविष्यकाळात असत नाही; ते असतं वर्तमानकाळात..या क्षणात आणि आता ! जेंव्हा आपल्यातलं मनुष्यत्व वाढत राहतं, पुढे जात राहतं आणि असं होत राहिलं की मग कालचा मनुष्य आणि आजचा मनुष्य यात तफावत आढळते.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कबीर  सतगुर  ना  मिल्या , रही  अधूरी  सीश  | स्वांग जाति का पहरी कर ,  घरी  घरी  मांगे  भीष  || अर्थ :       महात्मा कबीर गुरूचे जीवनातील अनन्य साधारण असणारे महत्त्व सांगताना म्हणतात की, जीवन जगताना असो की शिक्षण घेताना असो गुरू असलाच पाहिजे.  गुरू (मार्गदर्शक) भेटला नाही ज्ञानाची अर्धवट प्राप्ती होते. अर्धवट ज्ञान  आत्मघातकी ठरतं.  ते जीवनाच्या वाटेवर सर्वात घातक ठरू शकते. महाभारतातील अभिमन्यूचा प्रसंग समजून घेतला तरी अर्धवट ज्ञान किती धोकादायक ठरतं हे पुढील पिढ्यांच्या ध्यानी यायला वेळ लागणार नाही. अभिमन्यू कुशल योद्धा होता. चक्रव्युहात घुसणे जाणत होता परंतु चक्रव्पुह भेदण्याची कला त्याला जमत नव्हती. त्यातच त्याला प्राण गमवावा लागला.        अर्धवट ज्ञानी पारंगत असल्याचं ढोंग करतो. या ढोंगापायी त्याला नकल करावी लागते. नकल करणारा परिपूर्ण असत नाही. अशा व्यक्तींच्या माध्यमातूनच अंधश्रद्धा व चुकीच्या रुढी समाजात पसरवल्या जातात. ही अर्धशिक्षित फौजच समाजाला चुकीच्या दिशेनं नेते. संभ्रम निर्माण करीत असतात. स्वतःच्या मार्गाला विवेकाची जोड नसल्याने स्वतःचीच फसगत करून घेतात.  प्रसंगी पथ भरकटून भीक मागण्याचेही त्यांच्या नशिबी येते. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण आपल्या दररोजच्या जीवनात एक चांगला विचार केला आणि आचरणात आणला तर अनेक चांगल्या गोष्टींवर विजय मिळवू शकतो.तो विचार आपल्यासाठी प्रेरणा व इतरांसाठी प्रेरणादायी ठरु शकते.आपल्या एका चांगल्या विचारांमुळे इतरांच्या जीवनात जे वाईट विचार सदैव घोळत असतात आणि त्या विचारांमुळे त्यांच्या प्रगतीऐवजी दिवसेंदिवस अधोगती व्हायला लागते ती अधोगती आपल्या सानिध्यात आल्यामुळे व आपल्या चांगले विचार ऐकल्यामुळे थांबू शकते.आपल्या एका चांगल्या विचारांमुळे इतरांच्या जीवनात चांगली प्रगती होत असेल तर आपण आपल्यासाठीच नाही तर इतरांसाठी व समाजासाठी काहीतरी चांगले केल्याचे समाधान वाटेल.चांगल्या विचारातून केव्हाही चांगलेच उगवले जाते हे मात्र नक्की आहे. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌱🍃🌱🍃🌱🍃🌱🍃🌱 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गरुड आणि डोमकावळा* एका गरूडाने कुरणात चरत असलेल्‍या मेंढ्यांच्‍या कळपातील एका कोकरावर झडप घातली व त्‍या कोकराला पळवून नेले. त्‍याचे हे धाडस आणि सामर्थ्‍य पाहून रानातले सर्व पशुपक्षी त्‍या गरूडाकडे भीतीयुक्‍त आदराने पाहू लागले. 'गरूडाने पळवले त्‍यापेक्षाही मोठे कोकरू जर आपण पळवले तर गरूडापेक्षाही आपला मानसन्‍मान वाढेल, त्‍याच्‍याइतकीच प्रतिष्‍ठा आपल्‍याला लाभेल असे एका डोमकावळ्याला वाटले.  त्‍यासाठी त्‍याने नजर ठेवून एका मोठ्या थोराड अशा कोकराच्‍या पाठीवर बसून त्‍याला उचलण्‍याचा प्रयत्‍न केला पण ते कोकरू उचलले जाण्‍याऐवजी, डोमकावळ्याचेच पाय कोकराच्‍या पाठीवरील लोकरीमध्‍ये अडकले व तिथून सुटण्‍यासाठी त्‍याने पंखांची केलेली फडफड व आरडाओरड मेंढपाळाच्‍या कानी गेली. तो तिथे आला व त्‍याने डोमकावळ्याला सोडविले व पिंज-यात कैद केले व त्‍याला स्‍वत:च्‍या मुलांच्‍या स्‍वाधीन केले. मुलांनी मेंढपाळाला विचारले,''बाबा या पक्ष्‍याचे नाव काय हो'' यावर तो मेंढपाळ हसून म्‍हणाला,'' या मूर्ख पक्ष्‍याला जर तुम्‍ही याचे नाव विचारले तर हा स्‍वत:ला गरूडापेक्षाही श्रेष्‍ठ असा पक्षी म्‍हणून स्‍वत:ची ओळख करून देईल पण प्रत्‍यक्षात हा मोठेपणाचा आव आणणारा एक भिकार डोमकावळा आहे.''  *तात्पर्यः प्रत्यक्षात वेगळे आणि अप्रत्यक्षपणे वेगळा मोठेपणाचा आव काही लोक आणत असतात.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

🌹 *जीवन विचार*🌹 〰〰〰〰〰〰〰 माणसाने आपल्या बाह्य सौंदर्यापेक्षा त्याच्या आंतरिक सौंदर्यावर लुब्ध झालेले अतिउत्तम. कारण सौंदर्य हे सत्य शोधण्याच्या दृष्टीत असते. आणि ही सौंदर्यात सत्य शोधण्याची दृष्टी आपण सामान्य माणसात उपजत करू शकत नाही. म्हणून त्यांना सत्य दाखवावे; म्हणजे सौंदर्याची परिभाषा आपोआपच समजेल, दिसेल. मानवी जीवन सामर्थ्यानं आणि सौंदर्यानं पुलकित झालेलं आहे. या सामर्थ्यमय जीवनाच्या वाटेवर संकटाचे आभाळ कोसळले तर ते मोठ्या हिंमतीने सामर्थ्यशालीपणाने दूर सारावे. आणि सौंदर्याचे क्षण आले तर ते आनंदानं हर्षमय मनाने उल्हासीतपणे जगावेत, अनुभवावेत. असे म्हणतात "सौंदर्य हे स्त्रीचे सामर्थ्य आहे, तर सामर्थ्य हे पुरुषाचे सौंदर्य आहे." या जगातील सर्वश्रेष्ठ प्राणी मानव आहे. स्त्री आणि पुरुष ही त्याची दोन भाग आहेत, रुपं आहे. माणसाने फुलासारखे आपले जीवन जगावे या smt.pramila senkude 'या जगण्यावर या जन्मावर शतदः प्रेम करावे'........ *"सौंदर्य ही परमेश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीतील श्रेष्ठ सर्जन आहे."* असे मनू ह्या विचारवंताने आपल्या विचारातून स्पष्ट केले आहे. गवताच्या पात्यावर पडलेल्या मोत्यासारखं दवबिंदू हे सौंदर्याचं लेणं आहे.श्रावणातील सौंदर्य मनाला खुदकन हसवत असत. कितीही झालं तरी सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते. 'जशी दृष्टी तशी 'सृष्टी. *तरीही आणखी पुन्हा एकदा सांगावस वाटतं...* माणसाने बाह्य सौंदर्य पाहण्यापेक्षा त्याचे आंतरिक सौंदर्य पाहणे आवश्यक आहे. 〰〰〰〰〰〰 शब्दांकन / संकलन ✍ प्रमिलाताई सेनकुडे जि.प.प्रा.शाळा गोजेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड.

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 17/07/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आंतराष्ट्रीय न्यायासाठी दिन* *बाथ क्रांती दिन - इराक* *लुइस मुनोझ रिव्हेरा जन्मदिन - पोर्तो रिको* संविधान दिन - दक्षिण कोरिया. 💥 ठळक घडामोडी :- २०००-अभिनेत्री व नृत्यांगना वैजयंतीमाला बाली यांना 'भरतनाट्यम शिखरमणी'पुरस्कार जाहीर १९८४ - लॉरें फाबियस फ्रांसच्या पंतप्रधानपदी. १९९४ - फुटबॉल विश्वकप अंतिम सामन्यात ब्राझिलने इटलीला पेनल्टी शूट-आउटमध्ये हरवले. २००४ - भारतातील तामिळनाडू राज्यातील कुंभकोणम शहरात शाळेला आग लागली. ९० विद्यार्थी ठार. 💥 जन्म :- १९५४-अँजेला मेर्केल,जर्मनीच्या चान्सलर १९२० - हुआन अँतोनियो समारांच, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचा अध्यक्ष. १९३०-बाबुराव बागुल,दलित साहित्यिक १९४१ - बॉब टेलर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९४९ - स्नायडर रिनी, सोलोमन द्वीपांचा राष्ट्राध्यक्ष. 💥 मृत्यू :- २००५ - सर एडवर्ड हीथ, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान. २०१२ - मृणाल गोरे, सहाव्या लोकसभेच्या सदस्य, समाजवादी कार्यकर्त्या *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी विश्वभुषण हरिचंदन तर छत्तीसगडच्या राज्यपालपदी अनुसया उकी यांची नियुक्ती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई - आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, मुंबईतील जीर्ण इमारतींबाबत कायदा करण्याची मागणी* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांची नंदुरबारच्या जिल्हाधिकारीपदी बदली, त्यांच्या जागी प्रकाश वायचळ यांची नियुक्ती, वायचळ हे अहमदनगर येथे जात पडताळणी समितीचे अध्यक्ष म्हणून काम पहात होते.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नाशिक : पावसाने दडी मारल्यामुळे कोथिंबीरची आवक घटल्याने बाजारसमितीत कोथिंबीर च्या भावाने गाठला ऐतिहासिक उच्चांक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *लंडन - केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी घेतली ब्रिटनच्या पंतप्रधान टेरेसा मे याची भेट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *येत्या महिन्यात 1 हजार 300 पोलिसांची भरती करण्यासाठी जाहिरात दिली जाईल, भरतीवेळी वयाची अटही थोडी शिथिल केली जाईल, असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले जाहीर.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *नवी दिल्ली : भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि टेनिसपटू रोहन बोपण्णा यांना भारताचे क्रीडा मंत्रा किरेन रिजिजू यांच्या हस्ते अर्जुन पुरस्कार प्रदान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - कुस्ती* https://storymirror.com/read/story/marathi/iaysl897/kustii/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ⛈ *गार किती मोठी असते ?* ⛈ 'वज्रादपि कठोराणि मृदूनि कुसुमादपि' ही कवीकल्पना जरूर आहे; पण प्रत्यक्षात असे परस्परविरोधी गुणधर्म असणारा कोणताही पदार्थ नाही, असं मानण्याचं कारण नाही. आपल्या अतिशय परिचयाच्या, ज्याचं दुसरं नावच मुळी जीवन आहे अशा, पाण्याकडे पाहा ना ! अधिक नेमकेपणाने बोलायचं तर या पाण्याच्या घनरुपाकडे लक्ष केंद्रित करा ना ! हिवाळ्याच्या ऐन भरात जेव्हा हिमपाताच्या रूपात हे घन पाणी सामोर येतं, तेव्हा अतिशय हलक्या वाऱ्याच्या मंद झुळकीनंही इतस्तत: फेकल्या जाणाऱ्या हिमाच्या त्या पात्यांनी मन मोहरून येतं. अंगावर संक्रांतीच्या हलव्यासारखा सुखद काटा उभा राहतो; पण सरत्या हिवाळ्यात किंवा त्यानंतरही जेव्हा हेच घन पाणी गारांच्या रुपात वर्षाव करतं तेव्हा अक्षरश: ब्रह्मांड आठवतं. उघड्यावर जर गारपीटीच्या मारत सापडला तर हेच 'जीवन' अक्षरश: जीवावर उठतं. हिमाची हलकी पाती अाणि गारांचे वजनदार गोळे यात एक साम्य जरूर आहे. त्यांचा नेमका आकार कोणता आणि तो त्यांना कसा मिळतो, हे एक न सुटलेलं कोडं आहे. साधारण गारा आपण पाहतो त्या सामान्य गोलाकार किंवा फार फार तर अंड्याच्या आकाराच्या असतात. वाटाण्यापेक्षा त्यांचं आकारमान सहसा मोठं नसतं. म्हणजेच साधारणत: दीड ते दोन सेंटिमीटर व्यासाच्या या गारांचं वजन असतं दहा बारा ग्रॅम. वरून ओबडधोबड दिसणाऱ्या या गाराची अंतर्गत रचना तशी आतल्या गाठीची नसते. हळुवारपणे एखादी गार उभी कापली तर आता एखाद्या कांद्याप्रमाणे एकाआड एक पापुद्र्यांचे थर दिसतील. एक पापुद्रा स्वच्छ, नितळ बर्फाचा, त्यावर एक पापुद्रा धुसर दुधी बर्फाचा, परत एक स्वच्छ नितळ पापुद्रा. असे एकावर एक थर. तरीही ९ जून १८६७ साली ४५०० मीटर उंचीवरच्या बेलाईक्लिच गावात झालेल्या गारांच्या वर्षावात प्रा. अाबिच यांना एक गार मिळाली होती. तिचा आकार चक्क एखाद्या तार्यासारखा किंवा हिऱ्यामाणकांच्या हारातलं मध्यवर्ती पदकच जणू असा होता. ज्यांनी या गारांचा साग्रसंगीत अभ्यास केला आहे, त्यांना शंकूच्या, लाटण्याच्या, इतरही अनेक आकारांच्या गारा पाहावयास मिळाल्या आहेत. आकारमानही चक्क पंधरा सेंटिमीटर व्यासपर्यंत आढळलं आहे. अमेरिकेतील नेब्रास्का या मध्यवर्ती राज्यातील वॉटर या समर्पक नावाच्या गावात ६ जुलै १९२८ रोजी गारपीट झाली. त्यातल्या एका गारेचं वजन तब्बल साडेसहाशे ग्रॅम होतं. त्या गोलाकार गारेचा व्यास होता १५ सेंटीमीटर; पण उच्चांक वगैरेच्या गोष्टी करायच्या तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये एक नोंद आढळते. अमेरिकेतील तिथल्या कॉफव्हील नामक गावात तीन सप्टेंबर १९७० या दिवशी एक गार पडली होती. एकोणीस सेंटिमीटर व्यास आणि ४५ सेंटीमीटर परीघ असलेल्या या गारेचं वजन होतं साडेसातशे ग्रॅम. पाऊण किलो ! *बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *Confidence is a key to success.* ( आत्मविश्वास ही यशाची गुरूकिल्ली आहे. ) *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?* पुणे 2) *शिवाजी महाराज यांच्या वडिलाचे नाव काय होते ?* शहाजी राजे 3) *भारताच्या पहिल्या स्त्री शिक्षिका कोण ?* सावित्रीबाई फुले 4) *'स्त्री मुक्ती दिन' केव्हा पाळला जातो ?* 3 जानेवारी 5) *भारतात पालम हे राष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?* दिल्ली *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  माधव गैनवार ●  अनिलकुमार बिंगेवार ●  पुरुषोत्तम केसरे ●  मधुकर फुलारी ●  अरिफा शेख ●  आनंद पंगेवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खरेपणा, प्रामाणिकपणा, वास्तवता, अस्सलपणा आणि यथार्थपणा अशी आपल्या व्यक्तिमत्वाची ओळख ठेवणं चांगलं. हीच तर आपल्या जीवनाची खरीखुरी गुणसंपदा असते. माणसाने आपल्या ठायी असलेल्या गुणांची जाणीव विसरली तरी चालेल; परंतु आपल्या ठायी असलेल्या दोषांची चांगली जाणीव ठेवावी. जसं दगडातील नको असलेला भाग काढून टाकला की, सुंदर मूर्ती तयार होते, तसं आपल्या स्वभावातील दोष काढून टाकले की, निखळ आणि सुंदर व्यक्तिमत्व झळकत असतं. खरंतर गुणी माणसं लोखंडाचं सोनं बनविणा-या परिसासारखी असतात, ओसाड जमिनीचं नंदनवन करणारी असतात. म्हणून जीवनात यश मिळविण्यासाठी सत्य, पामाणिकपणा, कठोर परिश्रम, न्याय आणि चारित्र्याची गरज असते हे विसरता येणार नाही.* *सत्य म्हणजे सत्यवाणी, सत्य विचार, सत्य आचार आणि सत्य उच्चार होय. सत्य म्हणजे जीवन. असत्य म्हणजे मरण. अनेक माणसं अशी जगता जगता मरत असतात आणि अनेक माणसं मरूनदेखील जगत असतात. यासाठी आपण स्वत: सत्यभाषी झाले पाहिजे. समाज सत्याचा आदर करतो. प्रामाणिकपणाची कदर करतो. न्यायची चाड बाळगतो. श्रमाची महती गातो आणि चारित्र्याची पूजा करतो. आज 'सत्यमेव जयते' हाच आपल्या जीवनाचा मंत्र बनला पाहिजे. यासाठी सत्याचे महत्व आपल्या मनाच्या पाटीवर कायमचे कोरून ठेवले पाहिजे.*   ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• राम  पियारा  छड़ी  करी ,  करे  आन   का  जाप  | बेस्या  कर  पूत  ज्यू , कहै  कौन  सू  बाप  || अर्थ       महात्मा कबीर जीवनात कृतज्ञतेवर भर देतात. आपल्यावर ज्यांनी ज्यांनी उपकार केले त्यांना माणसानं कधीच विसरू नये. आई, वडिल, गुरूंसह अवतीभोवतीच्या सर्व घटकांनी आपल्या जडणघडणीत योगदान दिलेलंच असतं. त्यामुळे त्यांना विसरून कसं चालणार बरं ! वरील बाबी  मानवी कक्षेतल्या आहेत. त्याही पलीकडील काही अलौकिक , अमानवीय शक्ती आपल्या जीवनाला साकारण्यामध्ये फार मोठ्या सहभागी आहेत. त्यांना पंचमहाभूते म्हणतात. पृथ्वी, आप, तेज , आकाश व वायू या पाच महाशक्तींना विश्वचालक शक्ती माणले गेले आहे. या शक्ती नसत्या तर सजीवांचं अस्तित्वंच राहिलं नसतं. या सर्वांचं नियंत्रण करणारी जी शक्ती आहे तिलाच आपण विधाता किवा ईश्वर माणतो. अलिकडे स्वार्थापायी दगडधोंडे पुजणे. पशू पक्ष्यांची देवाच्या नावावर हत्त्या करणे. हे सारं कळत्यांचं ढोंगीपण अज्ञानी लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा उठवणारं असतं. अंधरूढी व अंधश्रद्भा वाढवतात. अशा लोकांबाबत कबीरजीच सांगतात,  'जत्रा में बिठाया फतरा,  तीरथ बनाया पानी।  दुनिया भयी दीवानी,  ये सब है पैसे की धुलधानी॥'      अशा ढोंगांच्या मागं न लागता खर्‍या विधात्याप्रति कृतज्ञभाव जपला पाहिजे. खर्‍या विधात्याला सोडून जे इत्तरांना त्या मार्गावरून भरकटवतात व नको त्याच ढोंगाच्या मागे लागतात. त्यांबाबतीत कबीर म्हणतात , वेस्येच्या लेकानं खर्‍या बापाला विसरावं. तशी  त्यांची गत झालेली असते.      एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••• तुमच्याजवळ जे आहे ते इतराजवळ नाही किंवा इतरांजवळ जे आहे ते तुमच्याजवळ नाही. असे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुम्हाला कदाचित वाटेलही आपल्या जीवनात असं का बरं होतं आणि त्याबाबतीत नसल्याचीही मनाला खंत वाटते. खंत वाटून घ्यायचेही कारण नाही. पहिल्यांदा तुम्ही थोडा विचार करा असे जर सगळ्यांना सारखेच मिळाले असते तर आपण काहीच प्रयत्नही केले नसते. इतरांच्यासोबतही आपण तुलना करु नये. ज्याच्या त्याच्या कर्माचा आणि ज्याला आपण कधी कधी नशिब म्हणतो कदाचित नशिबाचाही भाग असू शकते. पण एक लक्षात असू द्यावे पहिल्यांदा आपण इतरांची बरोबरी करु नये आणि जर करायचीच असेल तर आपण आपल्या कामात आणि प्रयत्नात कसूर करायची नाही. इतर जर पुढे जात असतील तर आपण त्यांना प्रोत्साहन द्यावे आणि आपणही आपल्या प्रयत्नाने कसल्याही प्रकारचे मन खचून जाऊ न देता समोरच्या परिस्थितीला सामोरे जाऊन यशस्वी होण्याचा संकल्प करायचा. अशा कृतीमुळे आपलेही जीवन इतरांपेक्षा सुखी व समाधानी होऊ शकेल. इतरांबरोबर स्पर्धा करायची काही गरज नाही किंवा इतरांसोबत तुलनाही करायची गरज नाही. आपल्यालाही आपल्या कर्माने आणि आत्मविश्वासाने प्रयत्न केल्यामुळे आपणही आपल्या जीवनात खूप पुढे जाऊ शकतो हे निश्चित. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मनाची एकाग्रता* पांडुरंग *' मनाची एकाग्रता कशी करावी '* या विषयाचा अभ्यास करत बसला होता. त्याला जो कोणी भेटावयास येई, त्याच्याकडे तो दुर्लक्ष करायचा. आपल्याच चिंतनात मग्न असायचा. एकदा त्याचे गुरु सहदेव महाराज त्याच्याकडे आले. पाहतात तर पांडुरंग शून्यात नजर लावून बसलेला ! पांडुरंगाचे आपल्या गुरुकडे लक्षही नव्हते. सहदेव महाराज मात्र न रागावता तेथेच थांबले. त्यांनी एक वीट आणली आणि दिवसभर ती वीट एका दगडावर घासत बसले. शेवटी न राहवून पांडुरंगाने महाराजांना विचारले, '' महाराज आपण हे काय करता आहात ? '' सहदेव म्हणाले, '' मला या विटेचा आरसा बनवायचा आहे.'' पांडुरंग म्हणाला, '' महाराज, या विटेला घासून कधी आरसा होईल का ? जीवनभर घासत बसले तरीही विटेचा आरसा होणार नाही.'' ते ऐकून सहदेव हसले. म्हणाले, '' मग तू तरी काय करत आहेस ? वीट जर आरसा होत नसेल, तर मनाचे तरी काय ? मनावरील धूळ जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत साधना करुन तरी काय उपयोग? मनाची एकाग्रता साधून जे कार्य केले जाते ते सर्वोत्तम असते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 〰〰〰〰〰〰〰 🌺🍁जीवन विचार🍁🌺 〰〰〰〰〰〰〰 ज्ञान आणि कर्म हे जीवनाचे पंख आहेत.त्यामुळे सुखरुपी आकाशात मनुष्य सहजतेने उडू शकतो. जो आपणास ज्ञानाशी एकरुप करून टाकतो त्यास गुरू म्हणतात.गुरू म्हणजे सतत उचंबळणारा ज्ञानसागर होय. नम्रता आणि सेवा हे ज्ञानप्राप्तीचे खरे मार्ग आहेत. जो सर्व भूतकाळ दाखवितो वर्तमानकाळाची ओळख करून देतो, भविष्यकाळाची दिशा सांगतो, 🙏गुरू म्हणजे संपूर्ण ज्ञानाचं आगरच होय. आपल्या जीवनाचे भांडे जेवढं मोठं असेल त्या मानानं गुरूकडून ज्ञान घेता येईल. ज्ञान अनंत असतं हे ओळखूनच न्यूटन म्हणतो , ' माझ ज्ञान सिंधूत बिंदू आहे .' सॉक्रेटिस म्हणतो , ' मला काय समजत नाही एवढच मला समजतं.' 🙏 गुरू म्हणजे अनंत ज्ञानाची मूर्तीच , तळमळ , सत्याचा प्रयोगाची उत्कटता असते.ज्ञानाशिवाय बुद्धीचे समाधान होत नाही.ज्ञान हे मानवी जीवनाचे सार आहे व हेच खरे सुवर्णरत्न आहे.विनम्र होऊन येणाऱ्या ज्ञानोपासकास गुरू ज्ञान देतो.अशा सर्व गुरूजणांस शतशः वंदन शतशः नमन! 🙏🙏 ================== 🙏🏼शब्दांकन /संकलन🙏🏼 ✍ प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे) जि.प.प्रा.शा. गोजेगाव, ता.हदगाव, जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰〰

🔸📚 *शिक्षण परिषद व* *निरोप समारंभ सोहळा*🎁💐 केंद्र: भानेगाव ता.हदगाव जि.नांदेड *-:स्थळ: जि.प.प्रा.शाळा गोजेगाव:-* आज दि १६.०७.२०१९ रोजी भानेगाव केंद्राची शिक्षण परिषद जि.प.प्रा.शाळा गोजेगाव येथे संपन्न झाली. आजच्या या खास *गुरुपौर्णिमा* दिवशी दुहेरी संगमच या परिषदेत पार पडला. आजच्या या कार्यक्रमाचे *अध्यक्ष* : मा.लोणे सर कें.मु.अ. *प्रमुख पाहुणे :* मा.सोनटक्के साहेब कें.प्र.,मा.जामगडे साहेब,व गोजेगाव व वाकोडा शाळेचे शा.व्य.स.अध्यक्ष *निरोपमूर्ती*: श्रीमती कुलकर्णी मॅडम 🔸कार्यक्रमाची सुरुवात *श्रीमती सेनकुडे मॅडम* यांनी आपल्या उत्तम सूत्र संचलनाने केली. प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले व शालेय मुलांनी छान असे स्वागत गीत सादर केले व त्यानंतर श्रीमती कुलकर्णी मॅडम यांना निरोप देण्यात आला त्या प्रसंगी गोजेगाव, रुई, करोडी शाळे तर्फे सत्कार करण्यात आले. 🔸त्या प्रसंगी शाळेचे *मुख्याध्यापक श्री कर्जतकर सर, श्री पतंगे सर यांनी मनोगत व्यक्त करत असतांना त्यांचा कंठ दाटून आला...व सेनकुडे मॅडम नी स्वयंलिखित 'निरोप' ही कविता सादर केली व त्याद्वारे त्यांनी आपले मनोगत सादर केले..* 🔸त्या नंतर सर्व शाळेतर्फे मॅडम चे सत्कार करून निरोप देण्यात आले व प्रमुख पाहुणे व अध्यक्षांनी आपले मनोगत व्यक्त केले. व निरोपमुर्ती कुलकर्णी मॅडमनी जुन्या आठवणीला उजाळा देत आपले मनोगत व्यक्त केलं.. त्या नंतर वेळापत्रकाप्रमाणे शिक्षण परिषद पार पाडण्यात आली.. 🖥 श्री कुंवर सरांनी अध्ययन निष्पती वर आधारित सर्व विषयांचे pdf कृतीपुस्तिका या बद्दल माहिती दिली व QR code स्कॅनिंग, व youtube links बद्दल सविस्तर माहिती दिली..📱 ✒ *शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती आडगावकर मॅडम यांनी प्रशासकीय सूचना दिल्या व विविध उपक्रम यांचा आढावा घेतला.*🗒 😋मध्यान्ह वेळेत छान असे सुरुची जेवणाचा आनंद सर्वांनी घेतला.. त्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक *श्री कर्जतकर सर व सर्व टीमचे विशेष आभार..🙏🏻* व नंतर दुपारच्या सत्रात विविध विषयावर अध्यापनात येणाऱ्या विविध कल्पना, समस्या, व उपाय यावर चर्चा घेण्यात आली.. अश्या प्रकारे आनंददायी वातावरणात शिक्षण परिषद संपन्न झाली.🙏🏻 ✒ *वृत्त संकलन* *श्रीमती सेनकुडे मॅडम*

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 16/07/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागतिक सर्प दिन* *गुरुपौर्णिमा* 💥 ठळक घडामोडी :- १९९८- गुजरातमध्ये शाळा प्रवेश करताना पाल्याच्या नावानंतर आईचे नाव लावण्याचा अधिकार असल्याचे शिक्षणमंत्री आनंदीबेन पटेल यांनी विधानसभेत माहिती दिली. १९९२-भारताचे ९वे राष्ट्रपती म्हणून डॉ शंकरदयाल शर्मा यांनी निवड ,झाली. १९६९-चंद्रावर पहिला मानव उतरवणाऱ्या'अपोलो-११'अंतराळायानाचे फ्लोरिडा येथून प्रक्षेपण. 💥 जन्म :- १९०९ - अरुणा असफ अली,स्वातंत्रसेनानी १९६८ - लॅरी सँगर, विकिपीडियाचा सह-संस्थापक. १९७१ - महमद मकसूद् इनामदार नान्देड १९७३ - शॉन पोलॉक, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू. १९८४ - कॅटरिना कैफ, हिंदी चित्रपट अभिनेत्री. 💥 मृत्यू :- १८८२ - मेरी टॉड लिंकन, अब्राहम लिंकनची पत्नी. १९१६ - इल्या मेक्निकोव, नोबेल पारितोषिक विजेता रशियन जीवशास्त्रज्ञ. १९९३-उस्ताद निसार हुसेन खां-पदमभूषण *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *रस्ते अपघात रोखण्यासाठी केंद्राचे कडक पाऊल, लोकसभेत मोटार वाहन दुरुस्ती विधेयक सादर, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास अधिक कठोर शिक्षेची तरतूद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *शिर्डीतल्या साईबाबा मंदिरात कालपासून तीन दिवसीय गुरूपौर्णिमा उत्सवाला सुरूवात, खंडग्रास चंद्रग्रहणामुळे आज रात्री मंदिर बंद* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *पावसाळ्याचा दीड महिना उलटून गेल्यानंतरही कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्हे व नाशिक वगळता राज्यातील तब्बल २४ जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी झालेला आहे़* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 'नीट' नको, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा नवा प्रस्ताव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *तळकोकणाला पावसानं झोडपलं, रस्ते-बाजारपेठा बंद, 18 जुलैदरम्यान विदर्भ-मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *औरंगाबाद : लाचलुचपत प्रतिबंधक औरंगाबाद परीक्षेत्राच्या विभागाच्या अधीक्षकपदी अरविंद चावरिया यांची नियुक्ती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *विश्वचषकातील पराभवानंतर आता भारतीय संघामध्ये होऊ शकतात काही बदल, विश्वचषक उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी भारतीय संघात समाविष्ट होणार की नाही, ही गोष्ट येत्या शुक्रवारी साऱ्यांना समजू शकेल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - एक मत* https://storymirror.com/read/story/marathi/kpeg22xr/ek-mt/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌊 *भरती केव्हा येते ?* 🌊 खरं तर प्रत्येक क्षणी जगात कुठे ना कुठे भरती येतच असते. आणि त्याच वेळेला दुसरीकडे कुठेतरी ओहोटीचा खेळ चालू असतो. त्यामुळे प्रश्न विचारायचाच झाला तर कोणत्याही एका विवक्षित ठिकाणी भरती केव्हा येते असा विचारायला हवा. म्हणजे मुंबईला किंवा रत्नागिरीला किंवा चेन्नईला भरती केव्हा येते असा. पण त्याआधी हे भरती ओहोटीचं चक्र का चालू असतं याचा विचार करायला हवा. जर आपल्याला चंद्र हा उपग्रह नसता तर भरती ओहोटी आली नसती. निदान आज जसा जाणवण्याइतका समुद्राच्या पातळीत जो चढउतार होतो तो झाला नसता. चंद्र पृथ्वीच्या मानानं आकारमानाने लहान आहे. पण तो सूर्यापेक्षा कितीतरी जवळ आहे. न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे कोणत्याही दोन वस्तूंमध्ये गुरुत्वाकर्षणाचं बल असतं. ते त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराच्या समप्रमाणात आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या अंतराच्या वर्गाच्या विषम प्रमाणात असतं. म्हणजेच जेवढं वस्तुमान जास्त तेवढं हे बलही जास्त. आणि जवळ अंतर कमी तेवढंही आकर्षण जास्त. पृथ्वीचं आकर्षण चंद्राला जाणवतं. आणि म्हणून तो पृथ्वीभोवती एका ठराविक कक्षेत प्रदक्षिणा घालत राहतो. तसंच चंद्राच्या आकर्षणाचाही प्रभाव पृथ्वीवर पडतो. पण चंद्राचं वस्तुमान पृथ्वीपेक्षा कमी असल्यामुळे पृथ्वीची भूमी तेवढी चंद्राकडे खेचली जात नाही. पृथ्वीवरचं पाणी मात्र द्रवरूप असल्यामुळे चंद्राच्या दिशेने खेचले जाते. साहजिकच त्या बाजूला समुद्राची पातळी वाढते. त्याचवेळी त्याच्या विरुद्ध बाजूला म्हणजेच १८० अंशावरच्या ठिकाणचे पाणी चंद्रापासून दूर असते. त्यामुळे चंद्राच्या आकर्षणाचे बल कमी होते. तिथले पाणी चंद्राकडे तसं खेचलं जात नाही. पण जमीन थोडीशी का होईना खेचली जाते. त्यामुळे तिथल्या समुद्राचीही पातळी वाढते. या दोन्ही ठिकाणी समुद्राच्या पाण्याला आलेल्या फुगवट्यामुळे त्याच्या काटकोनात म्हणजेच त्यापासून ९० अंशांवर असणाऱ्या ठिकाणचे पाणी किनाऱ्याच्या दिशेने खेचले जाते. सहाजिकच तिथे समुद्राच्या पाण्याची पातळी घटते. ओहोटीचा अंमल सुरू होतो. अशा रीतीने कोणत्याही क्षणी जगाच्या पाठीवर दोन ठिकाणी भरती तर दोन ठिकाणी ओहोटी येत असते. पण पृथ्वी स्वतःभोवती गिरकी मारत असते. त्यामुळे तिच्या पृष्ठभागावरचे वेगवेगळे प्रदेश चंद्राकडे मोहरा फिरवुन राहत असतात. साहजिकच भरती, आणि अर्थातच ओहोटी, येण्याच्या ठिकाणात बदल होत जातो. पृथ्वीची स्वतःभोवतीची गिरकी चोवीस तासात पूर्ण होत असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी दिवसातून दोन वेळा भरती येते, तर दोन वेळा ओहोटी येते. *बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• यशाचे शिखर गाठण्यासाठी काही वेळेला अपयशाच्या पायऱ्या चढाव्या लागतात. *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *1 ते 10 पर्यंतच्या अंकाची बेरीज किती ?* 55 2) *डोंगरी किल्ह्यांचा जिल्हा कोणता ?* रायगड 3) *माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ?* रायगड 4) *संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?* बोरिवली , मुंबई 5) *जागतिक एड्स दिन केव्हा साजरा केला जातो ?* 1 डिसेंबर *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  जयवंत हंगरगे ●  मारोती गाडेकर ●  सुरेश भाग्यवंत *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एक भिकारी आयुष्यभर भीक मागत राहिला. भीक मागून मागून जमा करत राहिला. हे नाही ते नाही करत करत आधिक मागत राहिला. देवाला त्याची दया यायची. त्याने कधी कोणाला आयुष्यात काही दिले नाही तर त्याला आनंद व समाधान कसे मिळणार? देवही चिंतेत पडला. देण्याचा आनंद काय असतो हे प्रत्यक्ष समजावून सांगण्यासाठी देवच एक दिवस भिका-याच्या दारावर भीक मागायला उभा राहिला. त्याने आरोळी ठोकली. 'देssरे बाssबाss भिका-याला काहीतरी.' भिका-याच्याच घरी भीक मागायला भिकारी? त्याने कानाडोळा केला, नंतर त्याला समजावण्याचा व धमकावण्याचाही प्रयत्न केला. पण दारावरचा भिकारी हटला नाही. देssरे बाssबा च्या आरोळ्या काही थांबत नव्हत्या.* *भिका-याचीही भीक मागायला निघायची वेळ झालेली. परंतु दारावरचा भिकारी हटायला तयार नव्हता. त्यापासून सुटका व्हावी म्हणून शेवटी भीक मागून जमा केलेल्या धान्याच्या ढिगातील एक दाणा उचलून तो भिका-याच्या कटो-यात टाकतो. एक दाणा का होईना भीक मिळाली म्हणून दारातील भिकारी निघून जातो. एक दाणा कमी झाला म्हणून भिकारी हळहळत ढिगा-याकडे बघतो. ढिगा-यावर काहीतरी चमकत आहे हे पाहून तो जवळ जातो. ती चमकणारी वस्तू सोन्याचा दाणा असतो. भीक दिलेला ढिगावरचा एक दाणा कमी न होता सोन्याचा झाला. संपूर्ण धान्याचा ढिगच भिका-याच्या कटो-यात टाकला असता तर..? आता भिका-याने संपूर्ण आयुष्यच देऊन टाकले आहे. पण माझ्यातल्या भिका-याचे काय? त्याला कळले आहे पण अजूनही 'वळले' मात्र नाही.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     कबीर  कलि  खोटी  भाई ,  मुनियर  मिली  न  कोय  |  लालच  लोभी  मस्कारा ,  टिंकू  आदर  होई  ||      अर्थ :           हल्लीच्या सामाजिक भानाचं वर्णन करताना  महात्मा कबीर   ढोंगाला भुलणार्‍या अर्थात वास्तव न पाहता वरवरच्या सोंगालाच सत्य मानणार्‍या समाजमनाचं निरीक्षण नोंदवतात.        भूगोल सांगतं पृथ्वीचं वय साडे चार अब्ज वर्षापेक्षा जास्त जास्त.  भारतीयांच्या मानण्याप्रमाणे गतकाळ ते सांप्रत असे चार युग . १ कृत युग, २ त्रेता युग , ३ द्वापार युग, व  ४ कली युग अशी काल विभागणी सांगितली जाते.  हल्ली म्हणजे कलीयुगी पूर्वीपेक्षा खोटारडेपणा खूपच वाढलाय. हे युग महाभारताच्या लढाईपासून ते सांप्रतपर्यंत चालूच आहे. या युगी खरे खुरे मुनी , ऋषी , संत भेटणे कठीण झाले आहे. स्वार्थासाठी त्यांची नाटकं करणारे अनेक जण भेटतील. लालचीपणा, मोह यांनी ग्रासलेल्यांना हेच ढोंगी , पाखंडी , खरंं अध्यात्म सोडून थट्टा मस्करी करणारे, द्रव्य लुटणारे, वासनांधच साधू, मुनी म्हणून मिरवत आहेत. अन भक्तजण त्यांनाच डोक्यावर घेवून मिरवतात अन फसगत झाली की वैफल्यग्रस्त होतात. तेव्हा खरा साधून ओळखून त्याच्या ठायी लिन व्हायला सांगितलेला संतांचा कानमंत्र विसरू नये. म्हणजे झालं.      एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुमची वाणी स्पष्ट, चारित्र्य पवित्र ,जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि जीवन व्यवहार चोख असतील तर तुम्ही इतरांच्या हृदयावर साम्राज्य सहजपणे करु शकाल. अन्यथा ह्या गोष्टी तुमच्या जीवनात नसतील तर तुम्हाला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकारही राहणार नाही.आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो आणि मनुष्य म्हणूनच जगणार आहोत हा विचार समोर ठेवून जगण्यासाठी वरील महत्वाच्या चार गोष्टींना जीवनात प्राधान्य द्यायलाच हवे आणि त्या गोष्टी सहज करता येऊ शकतात. सुरुवातीला कठीण जाईल एकदा का सराव झाला की,मग आपोआपच व्हायला लागतात. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नैतिकतेचा आदर्श* आयुर्वेदाचे प्रणेते महर्षी चरक औषधी वनस्पतींच्या शोधात आपल्या शिष्यासह रानावनांत, जंगलात च दर्‍या डोंगरावरुन हिंडत चालले होते. चालता चालता अचानक त्यांची दृष्टी समोर हिरव्यागार शेतात उगवलेल्या एका सुंदर फुलाकडे गेली. आजपर्यंत त्यांनी असे आगळेवेगळे अनुपमेय सुंदर फूल कधी पाहिलेच नव्हते. त्यांना फूल स्वतःजवळ हवेसे वाटू लागले. पण संस्कारामुळे मन तसे करण्यास धजावत नव्हते. मनात चलबिचल होत होती. त्यांची ही अवस्था शिष्याच्या लक्षात आली. शिष्य त्यामना विनम्रपणे म्हणाला, गुरुवर्य आपली आज्ञा झाली तर ते फूल मी आपल्या सेवेस अर्पण करु? महर्षी चरक म्हणाले, वत्सा ! त्या फुलाची मला निश्चितच गरज आहे. पण या शेताच्या मालकाच्या परवानगीशिवाय ते घेणे म्हणजे चोरी करणे ठरेल. महर्षीच्या या उच्च आदर्शवाद व नैतिकतेपुढे शिष्यांनी मान खाली घातली. ते पुढे म्हणाले, शिष्यांनो, नैतिक जीवन व राजाज्ञा यात कोणतेच साम्य नाही. जर त्याने आपल्या प्रजाजनांची संपत्ती स्वच्छंदपणे व मनमानी करुन स्वतःकरता वापरली तर नैतिकतेचा आदर्श तो काय राहणार ? यानंतर महर्षी आपल्या शिष्यांसह तेथून तीन मैल अंतरावरील त्या शेतकर्‍याच्या घरी पायी गेले व त्याची परवानगी घेऊनच त्यांनी ते फूल तोडले. *तात्पर्यः नैतिकतेचा आदर्श ठेवून जीवन जगले तर हे जीवन खूप सुंदर आहे.* *आज गुरुपौर्णिमा त्यानिमित्ताने समस्त गुरू मंडळींना सादर प्रणाम* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 15/07/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९९७-पर्यावरणवादी कार्यकर्ते महेशचंद्र मेहता यांची रॅमन मॅगॅसेसे पुरस्कारासाठी निवड. १९५५-भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना 'भारतरत्न'हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर. 💥 जन्म :- १९४९-माधव कोंडविलकर,दलित साहित्यिक. १९३२-नरहर कुरुंदकर,विद्वान,टीकाकार आणि लेखक. १९२७-प्रा.शिवाजीरावभोसले, विचारवंत,कुलगुरू (डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) १९०३-के.कामराज, स्वातंत्रसैनिक,खासदार व तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री. १६११-मिर्झा राजे जयसिंग. 💥 मृत्यू :- २००४-डॉ बानू कोयाजी, सामाजिक कार्यकर्त्या. १९९९-इंदूताई टिळक,सामाजिक कार्यकर्त्या. १९९९-जगदीश गोडबोले,पर्यावरणवादी लेखकव सामाजिक कार्यकर्ते. १९७९ - गुस्तावो दियाझ ओर्दाझ, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्लीः इस्रोनं चांद्रयान-2 ही मोहीम तात्पुरती केली स्थगित, तांत्रिक कारणास्तव आता नियोजित वेळेत चांद्रयान 2चे उड्डाण करणार नाही. आंध्र प्रदेशातील श्रीहरी कोटा येथील धवन स्पेस सेंटरमधून चांद्रयान 2चे उड्डाण होणार होते. इस्रोनं पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात दिली माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *पाऊस बेपत्ता झाल्याने वृक्षलागवडीला ‘ब्रेक’, 33 कोटी वृक्षलागवड कार्यक्रमावर संकट, रोपांना टँकरने पाणीपुरवठा* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *चांद्रयान-2 मोहिमेला हॉलिवूड चित्रपटापेक्षाही कमी खर्च, जगभरातून भारताचे कौतुक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *जम्मू-काश्मीरला रात्री 9.56 वाजता 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *औरंगाबाद : विधानसभेला एमआयएम 100 जागा लढवण्यास इच्छुक, जागा वाटपाबाबत प्रकाश आंबेडकर लवकरच बैठक घेऊन निर्णय घेणार, सूत्रांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *भारताची सुपरस्टार धावपटून हिमा दासनं झेक प्रजासत्ताक येथे सुरु असलेल्या क्लांदो स्मृती अॅथलेटिक्स स्पर्धेत 200 मीटर शर्यतीत सुवर्णपदकाची केली कमाई* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *ICC World Cup - इंग्लंड ठरला 2019 चा विश्वविजेता. अंतीम सामन्यात न्यूझीलंडचा सुपर ओव्हर मध्ये पराभव करत इंग्लंड ठरला पहिल्यांदाच विश्वविजेता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - आईचे घर* https://storymirror.com/read/story/marathi/zv24dxqu/aaiice-ghr/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *इसीजी म्हणजे काय ?* 📙 ईसीजी म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राम, याला आपण 'हृदयस्पंदनालेख' असेही म्हणू शकू. आजकाल एखाद्या व्यक्तीला अचानक चक्कर आली, डोळ्यासमोर अंधारी आली वा छातीत धडधडले, तर इसीजी काढून घेण्याचा सल्ला दिला जातो. चाळीशी ओलांडल्यानंतर दर दोन वर्षांनी इसीजी काढून घेणे श्रेयस्कर, असेही म्हणतात. इसीजी काढण्याच्या या वाढत्या प्रमाणामुळे, हृदयाबद्दलच्या जिज्ञासेमुळे, हृदयविकाराच्या भीतीमुळे आपल्याला इसीजी म्हणजे नेमके काय प्रकरण आहे, हे जाणून घेण्याची जिज्ञासा असेल. इसीजी म्हणजे काय हे आता पाहू. हृदयाच्या स्नायूंच्या आकुंचन प्रसारणात विद्युतलाटा व विद्युत प्रवाह तयार होतात. याची नोंद शरीराच्या विविध भागांवर (छाती, पाय इ.) संवेदनशील असे इलेक्ट्रोड ठेवून करता येते. कारण हे विद्युतप्रवाह हृदयापासून सर्व ठिकाणी पसरवले जातात. या विद्युतप्रवाहाच्या शक्तीनुसार एका यांत्रिक उपकरणांच्या सहाय्याने हृदयाच्या स्पंदनाचा आलेख काढता येतो. इसीजी हे डॉक्टरांसाठी वरदानच ठरले आहे. सर्वसामान्यपणे व्यक्तीच्या हृदयस्पंदनालेखात P,Q,R,S व T या विद्युतलाटा (Waves) असतात. त्यांचे निरोगी लोकांसाठीचे आकार (उंची, रुंदी इ.) तसेच एकमेकांतील (त्या लाटांचे) अंतर ठरलेले असते. हृदयाच्या वेगवेगळ्या विकारांवरून या आलेखात बदल घडून येतात व त्यावरून रोगाचे निदान करता येते. हृदयाचा आकार, हृदयाची गती, जास्तीचे ठोके वा न पडणारे ठोके, हृदयातील जवनिका, कर्णिका या कप्प्यांमधील सुसंवाद, हृदयाच्या स्नायूंचा रक्तपुरवठा इत्यादी अनेक गोष्टींची माहिती यामुळे मिळू शकते. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी काही बदल इसीजीमध्ये सापडू शकतात. अशा व्यक्तींनी वेळीच आहार, विहार यावर नियंत्रण ठेवले; तर पुढील अनर्थ टाळता येऊ शकेल. यावरून इसीजीचे महत्त्व आपल्या लक्षात येईल. इसीजी काढण्यासाठी येणारा खर्च लक्षात घेता तो काढण्यापूर्वी खरेच तो काढण्याची गरज आहे काय, याचा साधकबाधक विचार तज्ज्ञांच्या सल्ल्याने करणे श्रेयस्कर ठरते. *डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्ञानी डोळ्याने जगतो, तर अज्ञानी कानाने जगतो. *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *गोवर रुबेला ही लस कोणत्या वयोगटातील बालकांना दिली जाते ?* 9 महिने ते 15 वर्ष 2) *महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत ?* अहमदनगर 3) *चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ?* अमरावती 4) *पाच अंकी सर्वात लहान संख्या कोणती ?* 10,000 5) *1 तास म्हणजे किती सेकंद ?* 3600 *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● श्रीकांत जोशी ● राजेश्वर डोमशेर ● गंगाधर बिजेवार ●  बालाजी हिवराळे ●  शुभम बतुलवार ●  शंकर हांड्रे ●  संतोष ईबीतवार ●  आनंद गाजेवार ●  विष्णू शिंदे ●  नवाज शेख ●  वसंत सिरसाट ● राजू कदम ● उत्तम पाटील चोळाखेकर ● विष्णुराज कदम ● विजयकुमार पाटील घुळेकर ● सचिन खंडगावे ● पांडुरंग चंदवाड ● प्रणित राखोंडे ● वसंत बोनगिरे ● सुनील बेंडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सारा अंधारच प्यावा* *अशी लागावी तहान ॥* *एका साध्या सत्यासाठी* *देता यावे पंचप्राण ॥* *असं जगावेगळ पसायदान कवी म.म.देशपांडे यांनी 'तहान' या कवितेत मागितलं आहे. त्याचं तीव्रतेने स्मरण व्हावं अशी परिस्थिती आज आपल्या देशात आहे. कोणत्याही क्षेत्राकडे जा सारा अंधार आहे. अपवाद वगळले तर वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातून सत्य हद्दपार झालेलं आहे. असत्याच्या अंधारात संवेदनशील मनाची घुसमट होत आहे. 'सत्यमेव जयते' ही या देशाची घोषमुद्रा आहे. तथापि समाजाचं, देशाचं नेतृत्व करणा-यांपासून तर रूग्णांची सेवा करण्याची शपथ घेतलेल्या डाॅक्टरांपर्यत सर्वांनी तिचे पदोपदी धिंडवडे काढले आहेत. सर्वच क्षेत्रात असत्यानं, अप्रमाणिक वृत्तीनं थैमान घातलं आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतमातेची दु:स्थिती आधिकच चिंतनीय झाली आहे. 'सत्य हे जीवनमूल्य लोप पावत आहे. 'असत्य' उजळ माथ्यानं वावरत आहे.* *खरंतर सत्य, सत्याचा शोध, सत्याचा उद्धार आणि आचरण, सत्याचा पुरस्कार याला वैभवशाली परंपरा आहे. भीष्मनिती सांगते, 'सत्य हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे. माणसाचा सर्वश्रेष्ठ आधार आहे. शाश्वत कर्तव्य आहे. आसक्तीचं जाळ फक्त सत्यच तोडू शकतं. सत्य म्हणजेच अमरत्व. सत्यासाठी केलेला त्याग मानवी जीवनात सर्वश्रेष्ठ आनंदाचा उगम असतो. सदाचरणी माणूसच इतरांच्या हितासाठी दक्ष असतो आणि या मार्गानंच त्याचं स्वत:चही हित साधलं जातं. सत्यासारखं तप, पुण्य नाही. असत्यासारखं पाप नाही. ज्याच्या ह्रदयात सत्य असतं त्याच्या ह्रदयात परमशक्ती वास करते.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆 संजय नलावडे, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कबीर जीवन कुछ नहीं, खिन खारा खिन मीठ कलहि अलहजा मारिया, आज मसाना ठीठ। सारांश जीवन क्षणभंगूर आहे. क्षणापूर्वी ते होते अन क्षणानंतर ते असेल अशी कोणीही खात्री देवू शकत नाही. जीवनाची नश्वरता पटवून देताना महात्मा कबीर म्हणतात, जीवन म्हणजे काहीही नाही. या क्षणाला ते खारट अनुभव देत असेल तर दुसर्‍या क्षणी ते कडवटपणाला गोडीमध्ये बदलू शकते. जीवनाचा मधूर अनुभव देवु शकतं. जो वीरयोद्भा काल युद्धामध्वे आपलं नैपुण्य पणाला लावून बाजी प्राणपणाने लढून आपल्या बाजूने ओढून आणण्यामध्ये यशस्वी झाला म्हणून त्याचे सर्वत्र कौतुक सोहळे साजरे झाले. सर्वांनी जयमाला गळ्यात घालून त्याचा जय जयकार केला गेला. ज्याने काल मैदान मारले तो स्वतःच आज चितेवर स्मशानी निपचित अचेतन पडला आहे. मृत्यूने भल्याभल्यांना सोडलेले नाही. तिथे सामान्य जीवांचं काय खरं आहे. घारीने भक्ष्यावर झडप घालावी तशी काळ कोणत्याही क्षणी झडप घालू शकतो, म्हणून माणसानं आपल्या हाती जे काही आयुष्य शिल्तक राहिले आहे. त्याचा सदुपयोग करून घ्यायला हवा व जीवन सत्कारणी लावायला हवे , म्हणजे सत्कर्माच्या किर्तीने मृत्यू पश्चातही जीवनाचा परिमल दरवळत राहातो. मृत्यू साक्षात पुढ्यात उभा राहिला तरी त्याचे भय राहात नाही एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• काळजी केल्याने कोणतेच प्रश्न मिटत नसतात तर अनेक प्रश्न तुमच्यासमोर उभे टाकतात.त्या काळजीमध्ये तुमच्या आजच्या कामावर लक्ष नसल्यामुळे तुमचे काम निकृष्ट दर्जाचे होऊ शकेल.त्यामुळे तुम्ही अधिक काळजी करायला लागाल.त्यापेक्षा काळजी न करणे सर्वात मोठा शहाणपणा आहे.ज्याची तुम्हाला काळजी वाटते त्याकडे लक्ष न घालणे सगळ्यात चांगले.आजच्या कामात अधिक लक्ष घातले आणि मन लावून काम केले तर त्या कामात गढून जाल.चांगले काम झाल्याचे समाधान तर वाटेलच आणि काळजी पण दूर होईल.काळजी कोणतीही असो.आजची असो की उद्याची.तो काळ तुमच्या काळजीमुळे थांबणार का ? नाही ना.मग आपले मन प्रसन्न ठेवा.येणा-या आणि हाती असलेल्या कामात अधिक लक्ष घाला मग तुम्हाला तुमचे समाधान मिळेल.समाधान हे काळजीला उत्तम पर्याय आहे हे कधीही विसरु नका. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०. 💠🌹💠🌹💠🌹💠🌹💠 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हे विश्वची माझे घर, प्रेमातील व्यापकता* ‘संत तुकाराम महाराजांनी देहू गावाबाहेरच्या एका ऊसाच्या मळ्याची काही दिवस राखण केली; म्हणून त्या मळ्याच्या मालकाने त्यांना पंचवीस-तीस उसांची एक मोळी दिली. दोरखंडाने बांधलेली ती मोळी खांद्यावर घेऊन संत तुकाराम महाराज घराकडे चालले असता वाटेत खेळणारी मुले त्यांना विचारू लागली, ‘‘तुकोबा, एवढे ऊस तुम्ही कोणासाठी घेतले हो ?’’ ते म्हणाले, ‘‘बाळांनो, अरे तुमच्यासाठीच. बंडू हा ऊस घे तुला, गुंडू हा तुला, धोंडू हा घे, तू पण.. हा, तू घे… हा, तू घे.’’ असे म्हणत तुकोबा ज्या वेळी त्यांच्या घरी पोहोचले, त्या वेळी त्यांच्या खांद्यावर एकच ऊस आणि त्याच्या भोवतीचे दोरखंडाचे भले मोठे वेटोळे एवढेच काय ते शिल्लक राहिले होते. तो प्रकार पाहून तुकाराम महाराजांची पत्नी आवळी भरपूर रागावली. आपल्याला मिळालेला सर्व ऊस लोकांच्या मुलांना देऊन आपल्या मुलांना काही आणले नाही; म्हणून ती तुकाराम महाराजांना नको नको, ते बोलली आणि रागाच्या झपाट्यात तिने तो उसाचा तुकडा खाली आपटला. त्यावेळी त्याचे तीन तुकडे होऊन एक तुकडा तिच्या हातात राहिला आणि दोन तुकडे जमिनीवर पडले. तेव्हा संत तुकाराम महाराज शांतपणे तिला म्हणाले, ‘‘आवळे, किती ग धोरणी तू ? आता तू सारखे वाटे केलेस. जो तुकडा तुझ्या हातात राहिला, तो तुझा आणि खाली जे पडले त्यांतील एक माझा अन् दुसरा मुलांचा !’’ ही त्यांची शांत वृत्ती पाहून बायकोला फार पश्चात्ताप झाला. तात्पर्य :- ‘हे विश्वची माझे घर’, असे वाटत असल्यामुळे संत तुकाराम महाराजांनी आपली आणि लोकांची मुले असा भेदभाव कधीच केला नाही *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 13/07/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- २०११-मुंबई शहरात झालेल्या ३ बॉम्बस्फोटात २६ ठार १३० जण जखमी १९८३ - श्रीलंकेत वांशिक हत्याकांड. ३,००० तमिळ व्यक्तींची हत्या. ४,००,०००हून अधिक तमिळ व्यक्तींचे युरोप व कॅनडा व भारतात पलायन. २००५ - पाकिस्तानच्या घोट्की रेल्वे स्थानकात तीन रेल्वे गाड्या एकमेकांवर आदळल्या. १५० ठार. २००६ - इस्रायेलने बैरुत विमानतळावर हल्ला चढवला. 💥 जन्म :- १९०४ - जे.आर.डी. टाटा, भारतीय उद्योगपती. १९६४ - उत्पल चटर्जी, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- २००९-निळू फुले,मराठी चित्रपट अभिनेता १६६० - बाजीप्रभू देशपांडे. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मराठा आरक्षणाला तूर्त स्थगिती नाही; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा, दोन आठवड्यांनी सुनावणी : मात्र, पूर्वलक्षी प्रभावाने लागू करू नये; न्यायालयाचे मत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *पुणे/मुंबई : मराठवाडा, विदर्भ, खान्देशात पुरेशा पावसाअभावी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असताना राज्यात १७ जुलैपर्यंत म्हणजे पाच दिवस पाऊस हुलकावणीच देईल, असा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *अकरावी प्रवेशाची पहिली यादी नव्वदीपार, वाणिज्य, कलेकडे विद्यार्थ्यांचा ओढा : विज्ञानाकडे फिरवली पाठ, विज्ञान शाखेच्या कट आॅफमध्ये घसरण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नवी दिल्ली : सरकारी कर्मचाऱ्यांनी समाजमाध्यमे व इंटरनेटचा कसा वापर करावा यासंदर्भात केंद्र सरकारने पहिलेवहिले धोरण तयार केले त्यानुसार कार्यालयीन कामासाठी सरकारने कर्मचाऱ्यांना दिलेले मोबाईल, संगणक यांचा समाजमाध्यमांकरिता पूर्वपरवानगी असल्याशिवाय वापर करू नये असे केंद्रीय गृह मंत्रालयाने बजावले आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नवव्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ मूर्तिशास्त्र अभ्यासक डॉ गो. बं देगलूरकर यांची निवड.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *लंडन : राफेल नदालला नमवत रॉजर फेडररची विंम्बल्डनच्या फायनलमध्ये धडक; नोवाक ज्योकोवीचसोबत होणार सामना* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई : विराटच्या अनुपस्थितीत वन डे संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे, तर कसोटी संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे सोपविण्याची शक्यता.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - काटकसर* https://storymirror.com/read/story/marathi/6ffavxie/kaattksr/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 😵 *जांभई केव्हा येते ?* 😵 झोप आली की जांभई येते अशी सर्वसाधारण समजूत आहे. पण ती खरी नाही. कारण दिवसाढवळ्याही एखादं व्याख्यान ऐकत असताना किंवा चक्क एखादा सिनेमा पाहत असतानाही जांभई येते. त्यामुळेच जेव्हा थकवा येतो किंवा कंटाळा येतो तेव्हा जांभई येते असं म्हटलं तर ते अधिक संयुक्तिक होईल. जांभई येते तेव्हा आपला जबडा सताड उघडा पडतो. त्याच्याशी जोडलेले स्नायू ताणले जातात आणि हवा जोराने आत खेचली जाते. या सर्वांशी जांभई येण्याचा संबंध आहे. जांभई सर्वांनाच येते. लहान मुलांना येते, मोठ्या माणसांना येते, जनावरांना येते आणि पक्षांनाही येते. एवढंच काय पण अजून न जन्मलेल्या आईच्या पोटात वाढणाऱ्या मुलालाही जांभई येते. ती का येते हे जरी अजून कोडंच असलं तरी तिच्यासंबंधी पुष्कळ माहिती मिळालेली आहे. जांभई साधारणपणे ६ सेकंद टिकते. मनुष्यप्राण्यामध्ये बीजफलन होऊन नव्या जीवाची नांदी म्हटली गेल्यानंतर जेमतेम ११ आठवडे होतात न होतात तो जांभई येते. आपल्या मेंदूमधील हायपोथॅलॅमसमध्ये जांभईचं नियंत्रण केंद्र आहे. थकवा किंवा कंटाळा आल्यानंतर जांभई येते याचा शोध एका अनोख्या प्रयोगातून लागला. वैज्ञानिकांनी १७ ते १९ वर्षे वयाच्या मुलामुलींची दोन गटांमध्ये विभागणी केली. एका गटाला त्यांनी एमटीव्हीवर दाखवतात तसे गाण्यांचे व्हिडीओ दाखवले. तर दुसऱ्या गटाला निरनिराळ्या रंगांचे बारकोड्स दाखवले. एकूण तीस मिनिटं हा कार्यक्रम चालला होता. त्या दरम्यान त्या दोन्ही गटातल्या मुलांनी किती जांभया दिल्या याची मोजदात केली गेली. त्यावरून असं दिसून आलं की पहिल्या म्हणजे गाण्याचे व्हिडिओ पाहणाऱ्या गटातल्या मुलांनी सरासरी ३.४ जांभया दिल्या तर दुसऱ्या म्हणजे कंटाळवाणे बारकोड्स पाहणाऱ्या गटातल्या मुलांना त्याच वेळात ५.८ जांभया आल्या. असा कंटाळा आला की हायपोथॅलॅमसमध्ये मेंदूतल्या संदेशवाहक रसायनांचा तसंच काही संप्रेरकांचा पाझर सुरू होतो. त्याचा प्रभाव पडून जांभयांचं नियंत्रण करणारं केंद्र कार्यान्वित होतं. येणारी जांभई दाबुन टाकण्याचा प्रयत्न केला तर त्यातून समाधान मिळत नाही. उलट आणखी जांभया येतात. कारण जांभई येताना जबडय़ाचे स्नायू जोवर पूर्णपणे ताणले जात नाहीत तोवर जांभईच्या कारणाचं समाधान होत नाही. थकवा येतो तेव्हा आपला श्वासोच्छवास मंद गतीने होत असतो. त्यामुळे शरीरातल्या ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं. त्याची नोंद घेऊन हायपोथॅलॅमस कार्यान्वित होतो असाही दावा काही वैज्ञानिकांनी केला आहे. या उलट शरीरात कार्बनडाय ऑक्साइडचं प्रमाण वाढलं म्हणजेही जांभई येते असंही मत प्रदर्शित केलं गेलं आहे. पण यालाही वैज्ञानिक प्रमाण मिळालेले नाही. त्यामुळे थकवा किंवा कंटाळा आला की जांभई येते हे मान्य असलं तरी त्यामुळे नेमकं काय साधलं जातं हे अजूनही कोडंच आहे. *बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सुखाला सोबत असते पण दु:खाला एकटेपणाने जगावे लागते. *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?* सातारा 2) *महाराष्ट्रात सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती ?* महाराष्ट्र एक्सप्रेस 3) *महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते ?* आंबोली (सिंधुदुर्ग) 4) *भाताचे कोठार असे कोणत्या जिल्ह्याला म्हणतात ?* गोंदिया 5) *भारताचे प्रवेशद्वार कोणते ?* मुंबई *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  अनुराधा पहाडे राजूरकर ●  रवी यलमोड ●  शेख अहमद ●  सुनील जवंजाल *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼🚩 *विचार धन*‼ 🚩● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *तुळस, तुळशीची माळ, गोपीचंदन, टाळ, भगवी पताका आणि एकादशी या गोष्टींना वारक-यांमध्ये अतिशय महत्व आहे. भागवत संप्रदायात तुळशीला फार महत्व आहे. गळ्यात तुळशीची माळ घातल्यानंतर दारू आणि मासांहार सोडून निर्व्यसनी झालेली लाखो माणसं सापडतील. वैष्णवांचा जत्था टाळ मृदंगाच्या निनादात व हरीनामाच्या गजरात चालू लागला की तो पंढरपुरलाच चालला आहे हे ओळखण्याची खूण म्हणजे महिलांच्या डोईवरील लहानसे 'तुळशी वृंदावन.'* *वारक-याच्या गळ्यात तुळशी माळ व दारी तुळशी वृंदावन. 'तुळस' म्हणजे मुर्तिमंत सात्विकता, तिचे दर्शनही सुखावह असते. तुळशीची माळ ही समर्पित आणि प्रासादिक जीवनाचे प्रतीक आहे. पवित्र तुळशी वृंदावनाला डोक्यावर घेऊन पंढरीच्या वारीत महिला सहभागी होतात. सावळ्या पांडुरंग परब्रम्हाला तुळस अतिप्रिय आहे. गळ्यात तुळशीहार घालून तो उभा आहे.* *होईन भिकारी। पंढरीचा वारकरी ॥* *हाचि माझा नेमधर्म। अवघे विठोबाचे नांव॥* 💥 *॥ रामकृष्णहरी ॥* 💥 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कोइ एक राखै सावधां, चेतनि पहरै जागि । बस्तर बासन सूं खिसै, चोर न सकई लागि ॥ भौतिकाच्या नादे काढी जागुनिया सारी रात जे देई परमानंद त्याची सांग काय बात अर्थ : जो सर्वकाळ दक्ष व तत्पर म्हणजेच जागा असतो. त्याच्या घरी चोरी होणे. कपडे भांडी कुंडी चोरीला जाणे असा प्रकार घडत नाही. माणूस भौतिक क्षणिक बाबींना जपण्याचा किती आटापिटा करत असतो. नाशीवंत वस्तुंच्या मोहासाठी माणसाची केवढी मोठी धडपड चाललेली असते. मानसाचं जीवन व शरीरही नश्वर व क्षणभंगूर आहे. कोणत्याही क्षणी ते नष्ट होऊ शकतं. म्हणून माणसानं तत्पर असावं. सत्कर्म व सन्मार्ग सोडू नये. विकारांपासून अलिप्त राहण्यासाठी वाईट संगती, वाईट विचार व वाईट प्रवृत्तीं सोडून दिल्या पाहिजेत व सदैव दक्षता बाळगली पाहिजे. सद्गुण व सत्संगतीचा मार्ग अाचरावा लागेल - एकनाथ डुमणे, मुखेड ९०९६७१४३१७ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जीवनातील कोणत्याही व्यवहारात दोन बाजू असतात आणि जेव्हा मनुष्य दोन्ही बाजूंचा विचार करतो तेव्हा त्याला ख-या व्यवहाराचे ज्ञान अवगत झाले आहे असे समजावे.जर एकाच बाजूने विचार करायला लागला तर कधी कधी कमी फायदा होतो तर जास्त नुकसान.नुकसान जेव्हा व्हायला लागते तेव्हा त्याला ख-या व्यवहाराचे ज्ञान अत्यल्प आहे असे समजावे.कुठेतरी त्याची बाजू कमी आहे.अशावेळी त्याच्या मनात नकाराची,नैराश्याची,परिस्थितीशी टक्कर देण्याची क्षमता अधिक वृद्धिंगत झाली आहे.त्यामुळेच वेळोवेळी अपयशाला सामोरे जाण्याची वेळ येत आहे.ह्या अशा नकारात्मक उर्जेचा त्याग करायचा असेल तर उलट विचार करायला हवे.जीवनात येणा-या कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्याची तयारी ठेवायला हवी.मन स्थिर ठेवून कृती करण्याची तयारी,ठाम विश्वास, कामात एकाग्रता आणि सातत्य ह्यावर जर अधिक भर दिला तर कोणतेही जीवनव्यवहारातले प्रश्र्न सोडवायला तत्पर व्हाल.तुमच्या मनातला नकार हा तुमच्या जीवनातला सदैव अपयशाकडे घेऊन जाणारा आहे की,त्यातून काहीच साध्य होणार नाही.त्यापेक्षा सकारात्मक बाजूने जर नेहमी जीवनात विचार करून मार्गक्रमण केले तर जीवनातले कितिही बिकट प्रश्न असले तरी सहजपणे सोडवता येतील.तेव्हा जीवनात ह्या दोन्ही बाजूने विचार करुन योग्य अयोग्य, चांगले वाईट ह्याचे ज्ञान असणे केव्हाही चांगले. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लोभी प्रवृत्ती* एक भिकारी दिवसभर पुष्कळ नामजप करायचा. देवाला त्याची दया आली. एक दिवस देव प्रगट झाला आणि त्याने भिका-याला ‘काय हवे ते माग’, असे सांगितले.  भिका-याने सोन्याच्या मोहरा मागितल्या. देव म्हणाला, ‘‘मोहरा कशात घेणार ?’’ भिका-याने झोळी पुढे केली. मोहरा ओतण्यापूर्वी देव म्हणाला, ‘‘तू ‘पुरे’म्हणेपर्यंत मी मोहरा ओतत राहीन; पण एक अट – मोहरा झोळीतून भूमीवर पडता कामा नयेत. भूमीवर पडलेल्या मोहरेची माती होईल.’’ भिका-याने अट मान्य केली. देव भिका-याच्या झोळीत मोहरा ओतू लागला. हळूहळू झोळी भरत आली. भिका-याला सोन्याचा मोह आवरेनासा झाला. मोह-यांच्या भाराने आता झोळी फाटू शकते, हे लक्षात येऊनही भिकारी ‘पुरे’ म्हणेना. शेवटी व्हायचे तेच झाले. झोळी फाटली आणि सर्व मोहरा मातीमोल झाल्या !समाधानी वृत्ती नसलेला भिकारी दुर्दैवी ठरला. हावरटपणामुळे नुकसानच होते.लोभी प्रवृत्ती अंगी बाळगणे चांगली नसते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

*दवबिंदू* खुलली वसुंधरा चमकले पर्ण दवबिंदूचा सड्यांनी सृष्टी हिरवी सजली जशी हिरव्या हिरव्या गालीच्यांनी. 🌱☘🌱☘🌱☘ 〰〰〰〰〰〰 ✍ प्रमिला सेनकुडे नांदेड

🌳झाडांची लागवड करूया🌳 🌱 झाडांची लागवड करूया लावली झाडे वाढवूया 🌱 पर्यावरणाचे रक्षण करूया झाडेच झाडे लावूया 🌱झाडांची लागवड करूया लावली झाडे वाढवूया🌱 जिकडे तिकडे झाडेच झाडे जंगल सारे सजवूया 🌱झाडांची लागवड करूया लावली झाडे वाढवूया🌱 फुला फळांनी झाडे बहरूया हिरवी शेते पाहूया 🌱झाडांची लागवड करूया लावली झाडे वाढवूया🌱 पावसाचे पाणी अडवू या नाल्यांना बंधारे घालू या 🌱झाडांची लागवड करूया लावली झाडे वाढवूया🌱 निसर्ग सहल काढूया मज्जाच मज्जा करूया 🌱झाडांची लागवड करूया लावली झाडे वाढवूया🌱 🌳🌴🌲🌱☘🌴🌳 〰〰〰〰〰〰〰 ✍श्रीमती प्रमिला सेनकुडे. ता.हदगाव जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰〰

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 12/07/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जागतिक बाल कामगार निषेध दिन *आषाढी एकादशी निमित्ताने सर्वाना हार्दीक शुभेच्छा* 💥 ठळक घडामोडी :- १९८२-NABARD ची स्थापना १९९९- 'महाराष्ट्र भूषण 'हा महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च पुरस्कार सुनील गावस्कर यांना प्रदान २००१-कृषीशास्त्रज्ञ डॉ एम एस स्वामिनाथन यांना 'टिळक पुरस्कार'जाहीर २००५ - आल्बर्ट दुसरा मोनॅकोच्या राजेपदी. 💥 जन्म :- १८६४ - इतिहासाचार्य वि.का.राजवाडे, मराठी इतिहास संशोधक १८६४ - जॉर्ज वॉशिंगटन कार्व्हर, अमेरिकन शास्त्रज्ञ. (चित्रीत) १९२० - यशवंत विष्णू चंद्रचूड, भारताचे माजी सरन्यायाधीश. १९४७ - पूचिया कृष्णमुर्ती, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९६५ - संजय मांजरेकर, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- २००० - इंदिरा संत , मराठी कवयित्री. २०१२-दारा सिंग ,मुष्टियोद्द्धा व अभिनेता २०१३-प्राण ,हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *चंद्रभागेच्या काठी जमला वैष्णवांचा मेळा; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न, विठ्ठलाच्या मूर्तीला चंदनाचा लेप लावून अभिषेक घालण्यात आला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई : यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू करण्यास विरोध करणारी याचिका उच्च न्यायालयाने काल फेटाळून लावली. या निर्णयामुळे एमबीबीएससाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांना मिळाला मोठा दिलासा* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *कर्करोगाला प्रतिकार करणाऱ्या औषधांचा अत्यावश्यक औषधांच्या यादीत समावेश, जागतिक आरोग्य संघटनेने केली यादी जाहीर, कर्करोगाचे उपचार सुरू असताना रुग्णांची प्रतिकारकशक्ती वाढविण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *अहमदाबाद : माहिती अधिकार कार्यकर्ते अमित जेठवा यांच्या हत्येप्रकरणी भाजपचे माजी खासदार दिनू बोघा सोळंकी आणि सहा अन्य जणांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *20 जुलै ते सप्टेंबर अखेरपर्यंत राज्यात पुन्हा एकदा कृत्रिम पावसाचे प्रयोग* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *युवा राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग चॅम्पियनशीप स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी १६ वर्षीय जेरेमीने सुरेख कामगिरी करताना ६७ किलो वजन गटात स्नॅचमध्ये १३६ किलो वजन उचलताना युवा विश्व, आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील विक्रम मोडला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *ICC World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाची दाणादाण उडवत इंग्लंड अंतिम फेरीत; आता अंतिम फेरीत रविवारी इंग्लंड व न्यूझीलंड यांच्यात सामना* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - फेसबुक मैत्री* https://storymirror.com/read/story/marathi/fn07z43i/phesbuk-maitrii/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌺 *फुल केव्हा फुलतं ?* 🌺 ************************** फुलांनी केवळ कवींनाच वेड लावलंय असं नाही; आपल्या सर्वांच्याच चित्तवृत्ती फुलांना पाहून फुलतात. त्यांचे मनमोहक रंग, त्यांचे आकार, त्यांची रचना, त्यांचा डौल खरोखरंच मोहून टाकणारे असतात. म्हणूनच असावं कदाचित, पण आपल्या आयुष्याच्या प्रत्यक क्षणाची साथ फुलं करतात. जन्म झाला म्हणून जशी फुलांची उधळण होते तशीच शेवटच्या प्रवासाला निघतानाही फुलांच्या माळांनी निरोप दिला जातो. प्रेयसीला भेट म्हणून गुलाब देता देताच त्या प्रणयाचं आयुष्याच्या साथीत रुपांतर करतानाही फुलांच्या माळांची देवाणघेवाण करून त्यावर शिक्कामोर्तब करण्यात येतं. हे असे आनंदाचे दिवस वर्षात केव्हाही येऊ शकतात. तरीही प्रत्येक वेळी आपल्याला फुलं मिळत राहतात. म्हणजे ती सदासर्वकाळ फुलतात असं समजायचं का ? तसं नाही. कारण काही फुलं ठराविक हंगामातच मिळतात. काही दिवसाउजेडीच उमलतात तर रातराणीसारखी काही रात्रीच्या वेळीच आपल्या सुगंधाने आसमंत दरवळून टाकतात. ब्रह्मकमळ तर एकदाच आणि तेही मध्यरात्रीच फुलतं. मग हे फुलं नेमकी फुलतात तरी कधी ? हे समजून घ्यायचं असेल तर आधी ती फुलतातच का, हे ध्यानात घ्यायला हवं. ती फुलतात ते आपल्याला आनंद देण्यासाठी नाही, तर वनस्पतींच्या पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेत फुलांचं उमलणं एक कळीची भूमिका बजावत असतं. फुलांमध्ये पुंकेसर आणि स्त्रीकेसर असे परागकण असतात. त्यांच्या मिलनातूनच बी तयार होतं आणि पुढच्या पिढीची नांदी म्हटली जाते. हे मिलन होण्यात कीटक आणि पक्षी मोलाची मदत करतात. त्या मदतगारांना त्यांचं काम करण्यासाठी प्रवृत्त करायचं तर काही आमिष दाखवायला हवं. त्यांना आधी आकर्षित करायला हवं. ते करण्यासाठीच फुलं फुलत असतात. त्यांची ती रंगीबेरंगी छबीही तेच काम करत असते. त्यामुळे ते जेव्हा आकर्षित होतील तेव्हा फुलण्यानेच कार्यभाग साधत असतो. तरीही निरनिराळ्या वनस्पतींची वर्गवारी करणाऱ्या कार्ल लिनैस यानं फुलांचीही त्यांच्या उमलण्यावरून तीन गटात विभागणी केली आहे. काही फुलं हवामानानुसार उमलतात काही कोमेजतात. त्यांना लिनैसनं 'मिटिअाॅरिची' असं म्हटलं आहे. काही दिवसाच्या लांबीनुसार आणि कार्यक्रम आखतात. म्हणजे हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात या वेळा बदलतात. त्यांना त्यानं 'ट्रॉपिची' हे नाव दिले आहे. उरलेली सगळी तिसऱ्या म्हणजेच इक्निनोक्टेल्स या गटात घातलेली आहेत. ती हवामानाची किंवा दिवसरात्रीच्या लांबीची पर्वा न करता दिवसाच्या ठरावीक वेळी फुलतात आणि ठरावीक वेळी कोमेजतात. ज्याँ बातिस्त लमार्क या फ्रेंच वैज्ञानिकाला असं दिसून आलं की फुलण्याच्या वेळी फुलांची उष्णता वाढलेली असते. आपल्या गंधाचा दूरदूरवर फैलाव करण्यासाठी ही वाढीव उष्णता कामी येते, असे त्यानं दाखवलं आहे. काही फुलं तर आसमंताच्या तापमानापेक्षा आपलं तापमान ३५-४० अंशांनीही वाढवू शकतात. तेव्हा फुलांचं तापमान वाढू लागलं की ती फुलतात असंही म्हणता येईल. *बाळ फोंडके यांचा 'केव्हा ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रार्थना करणाऱ्या हातापेक्षा मदत करणारे हात जास्त पवित्र असतात. *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणते ?* मुंबई (1972) 2) *महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते ?* मुंबई (1857) 3) *महाराष्ट्रात पहिली कापड गिरणी कोठे सुरू झाली ?* मुंबई 4) *महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती ?* मुंबई 5) *भारतातील सात बेटांचे शहर कोणते ?* मुंबई *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● दिलीप इंगळे ●  हरिहर धुतमल ●  हितेश माधवी ●  साई गाडगे ●  प्रवीण दबडे पाटील ●  शिल्पा जोशी ●  नागेश पडकूटलावार ●  अविनाश पांडे ●  नमन यादव ● सुनील देवकरे ● अमरजुल हुसैन ● दादाराव जाधव ● नंदकुमार कौठकर ● अभिजित राजपूत ● माधव उमरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ●🚩🚩 ‼ *विचार धन*‼ ● 🚩🚩••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *टाळ वाजे....मृदंग वाजे..* *वाजे हरीची वीणा.....!* *माऊली निघाले पंढरपुरा..* *मुखाने विठ्ठल- विठ्ठल म्हणा.!* *हा सगळा भक्तीसागर, विठु नामाच्या गजरात तल्लीन होऊन, नाचत-गाजत एकजीव होऊन माऊलीं सोबत दिवसभर पायी चालत संत स्वरूप वारकरी, आपल्या विठुच्या दर्शनाला पंढरीकडे चालत असतात. क्षणभर वाटतं की अथांग सागर संथ झाला. ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष करीत हा आषाढी वारी पालखी सोहळा पुढे सरकत असतो.* *या वारीमध्ये असेही काही क्षण असतात जे मनाला सुखद प्रसन्नता देतात. विठ्ठल-विठ्ठल नामाचा अखंड गजर...भागवत धर्माचे प्रतीक असलेली आसमंतात फडकणारी पताका...चहूबाजूंनी उत्साहीत वैष्णवांचा भक्तीसागर... आणि वायुवेगाने धावणारा अश्व...अशा भक्तीमय वातावरणात लक्षावधी भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा एक क्षण म्हणजे...' रिंगण ' सोहळा..!* *दिंड्या गरूड टके पताकांचे भार ।* *होतो जयजयकार.... नामघोष ॥* 🚩 *॥ रामकृष्णहरी ॥*🚩 *विठ्ठल ॥ विठ्ठल ॥ विठ्ठल ॥* 🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल-9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• पाहन पूजै हरि मिलै तो मै पूजूँ पहार । ताते तो चक्की भली पीसि खाय संसार । सारांश : दगड-धोंडे पूजणार्‍यांचा समाचार घेताना महात्मा कबीर म्हणतात की दगाड-धोंडे पूजल्यामुळे इच्छित साध्य झालं असं होईल, मनोकामना पूर्ण होतील किवा देवाची प्राप्ती होणार असेल तर मी अख्खा पर्वतच पूजायला तयार आहे. त्यापेक्षा दगडापासून बनलेल्या जात्याची काळजी घ्यायला मला आवडेल. कारण हे जातं धान्य भरडण्याच्या कामी येतं. त्यापासून पीठ मिळतं. त्यामुळे जगातील जीवांची भूक तरी भागते. श्रद्धेच्या नावाखाली लोक दगडा-धोंड्याला पूजत राहातात. काही जण रंग फासलेले किंवा हळदी-कुंकू लावलेले दगड दिसताच हात जोडतात. गाडीवरून जाताना मंदिर येताच गाडीचा भोंगा वाजवतात. जसा काही मंदिरातला देव झोपलाय अन आवाज देवून हे त्याला जागं करित आहेत. पहावं ते नवलंच ! एकाचं बघून दुसरा करणार अन ती प्रथाच होणार. आज संगणक युगात वावरताना आंतरजालात दडलेलं जगाचं ज्ञान संगणकावर एका क्लिक मध्ये आपल्यासमोर येतं. संगणक माहिती आदान प्रदानाचं यंत्र आहे. .हे माहित असून सुद्धा त्याला चालू करण्यापूर्वी त्याची पूजा अर्चा करणारे . त्यावर धर्माचे सांकेतिक ठसे उमटवणारे, अज्ञानाचं जोखड वाहणारे ढोंगी बुवा, मौलवी यांचं विज्ञानानंच बणवलेल्या माईकवरून 'ये विज्ञान फिज्ञान सब झुट है । म्हणनं अन विज्ञान शिकलेल्या श्रोतृ समुदायाकडून माना हलवून प्रतिसाद देणं किती ढोंगी व भंकस पणाचा कळस आहे बरं हा ! अशी मानसिकता पाहिली की दया यायला लागते. कोणता संस्कार व शिकवण देत आहेत बरं आपल्या वर्तन अन करणीतून भावी पिढ्यांसाठी ! खरंच का जगू शकत नाही माणूस ढोंगाशिवाय ! का झिडकारत नाही अज्ञानाची काजळी ? विज्ञान आणि मानवतावादाचा मेळ घालत विचारचनं विवेकाचे दीप प्रज्वलित करता आले तर जीवनात दररोजच दिवाळी साजरी होईल. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण आपले सुखी जीवन जगण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतो आणि सुखी जीवन जगण्यासाठी पैसा कमवतो.तो पैसा एवढा कमवतो की,त्या पैशापायी आपण काय करत आहोत हा समजायला मार्ग सापडत नाही.ज्या गोष्टींसाठी आपण पैसा मिळवला आहे त्यासाठी तर जरुर वापरायला पाहिजे.आपल्या सुखासाठी तर आपण कमवतोच पण आपल्यासारखे सुख इतरांनाही मिळावे असे वाटत असेल तर आपल्या कर्तृत्वाचे हात अशांसाठी पुढे करा की, त्यातून तुमम्हालाही समाधान वाटले पाहिजे.जे अनाथ,अपंग,अंध,निराधार,वृध्द आहेत त्यांना तुमच्याकडून कशाची तरी अपेक्षा आहे अशांना आपण आपल्या केलेल्या कमाईतून काहीतरी मदत करुन जीवनाचे सार्थक करावे.याही व्यतिरिक्त समाजकार्य, देशकार्यासाठीही जे शक्य आहे ते आपल्या परीने करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या आपण कमवलेल्या कमाईचे सार्थक होईल.केवळ आपण आपलाच स्वार्थ साधण्यासाठी पैसा कमावला तर त्यात आत्मिक समाधान लाभणार नाही.वेळ निघून गेल्यावर असे होऊ नये की,आपण एवढे कमावले आहे त्यातून आपण आपल्या स्वार्थासाठीच केले आहे पण इतरांसाठी काहीच केले नाही.अशा पश्चातापात पडण्यापेक्षा आपला हात अशांसाठी साठी पुढे करा की,खरी गरज त्यांना आहे.एक आपला हात पुढे केला तर अनेक तीर्थयात्रा करुनही पुण्य मिळणार नाही तेवढे पुण्य आणि समाधान मिळेल. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌹🌱🌹🌱🌹🌱🌹🌱 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गरुडाने घुबडाशी केलेली मैत्री* एक गरुड आणि एक घुबड, फार दिवस एकमेकांशी भांडत असत. शेवटी त्यांनी परस्परांशी मित्रत्वाने वागण्याची शपथ घेतली व एकमेकांच्या पिल्लांस खाऊ नये असे ठरविले. घुबड गरुडास म्हणाले, ‘गडया ! पण माझी पिल्ले कशी असतात, हे तुला ठाऊक आहे ना? ठाऊक नसेल, तर ती दुसऱ्या एखादया पक्ष्याची आहेत असे समजून तू त्यांना गट्ट करशील, अशी मला भीति वाटते,’ गरुड म्हणाला, ‘खरेच, तुझी पिल्ले कशी असतात, हे मला मुळीच ठाऊक नाही.’ घुबड म्हणाले, ‘ऐक तर. माझी पिल्ले फार सुंदर असतात. त्यांचे डोळे सुंदर, पिसे सुंदर, सगळेच काही सुंदर असते. या वर्णनावरून माझी पिल्ले कोणती हे तुला सहज समजेल.’ पुढे एके दिवशी, एका झाडाच्या ढोलीत, गरुडास घुबडाची पिल्ले सापडली. त्यांजकडे पाहून तो म्हणाला, ‘किती घाणेरडी, कंटाळवाणी आणि कुरूप पिल्ले ही ! आपली पिल्ले फार सुंदर असतात, म्हणून घुबडाने सांगितले आहे. तेव्हा, ही घुबडाची पिल्ले खास नव्हते. यास मारून खाण्यास काही हरकत नाही.’ असे म्हणून त्याने त्या पिलांचा फडशा उडविला ! आपली पिल्ले नाहीशी झालेली पाहून घुबड गरुडाला म्हणाले, ‘गडया ! माझी पिल्ले तूच मारून खाल्लीस, असे मला वाटते.’ गरुड म्हणाला, ‘मी खाल्ली खरी, पण तो माझा दोष नव्हे.  तू आपल्या पिल्लाचे जे खोटेचे वर्णन केलेस, त्यामुळे ती मला ओळखिता आली नाहीत. इतकी कुरूप पिल्ले घुबडाची नसतील, दुसऱ्या एखादया पक्ष्याची असतील, असे समजून मी ती मारून खाल्ली, यात माझा काय अपराध आहे बरे?’  तात्पर्य - स्वतःसंबंधाची खरी हकीकत लपवून ठेवून, भलतीच हकीकत सांगणारा मनुष्य शेवटी आपणास संकटात पाडून घेतो. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 11/07/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागतिक लोकसंख्या दिन* 💥 ठळक घडामोडी :- १९९४- दिल्लीच्या माजी पोलीस महानिरीक्षक किरण बेदी (तुरुंग) यांना ' रॅमन मॅगॅसेसे पुरस्कार' जाहीर. २००१-आगरताळा ते ढाका या शहरादरम्यान बससेवा सुरू झाली. २००३ - १८ महिने बंद असलेली लाहोर-दिल्ली बस सेवा पुनः सुरू. २००४ - सी.आय.ए.च्या निदेशक जॉर्ज टेनेटने राजीनामा दिला. २००६ - मुंबईत उपनगरी रेल्वे गाड्यांमध्ये स्फोट. १००हून अधिक ठार. 💥 जन्म :- १९२२-शंकरराव खरात, दलित साहित्यिक, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू. १९१६ - गॉफ व्हिटलॅम, ऑस्ट्रेलियाचा २१वा पंतप्रधान. १९३० - जॅक अलाबास्टर, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू. १९५० - जिम हिग्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू. १९५३-सुरेश प्रभू, माजी केंद्रीय मंत्री 💥 मृत्यू :- १८०४ - अलेक्झांडर हॅमिल्टन, अमेरिकेचा अर्थमंत्री. १९५९ - चार्ली पार्कर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९८९ - सर लॉरेंस ऑलिव्हिये, ब्रिटीश अभिनेता. २००९-शांताराम नांदगावकर-गीतकार *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पाच वर्षांपूर्वी सुरू केलेल्या प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत उघडण्यात आलेल्या बँक खात्यांतील ठेवींचा आकडा आता १ लाख कोटी रुपयांपेक्षा झाला अधिक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मध्यान्ह भोजनात विद्यार्थ्यांना आता स्थानिक पौष्टिक आहार, ज्वारी, बाजरी, नाचणीच्या पदार्थांचा समावेश : तांदूळ २५ टक्क्यांनी कमी* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *नवी दिल्ली : यंदाच्या १ जून रोजीच्या आकडेवारीनुसार, रेल्वेमधील २.९८ लाख पदे रिक्त असून, त्यातील २.९४ लाख पदांच्या भरतीची प्रक्रिया रेल्वेने सुरू केली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पुणे : सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करावी, याबाबतच्या कायद्याचा मसुदा १५ जुलै रोजी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या संकेतस्थळावर खुला करण्यात येणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नेपोली : राष्ट्रीय विक्रमाची मानकरी असलेली धावपटू द्युतीचंदने इटलीमध्ये सुवर्णपदक पटकवून ऐतिहासिक कामगिरी केली. नेपोली शहरात सुरू असलेल्या विश्व विद्यापीठ स्पर्धेच्या शंभर मीटर शर्यतीत २३ वर्षांच्या द्युतीचंदने ११.३२ सेकंद वेळेची नोंद करीत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *लंडन : सर्बियाच्या अग्रमानांकित टेनिसपटू नोवाक जोकोविच याने बेल्जियमच्या डेव्हिड गॉफीन याला पराभूत करत बुधवारी विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्यफेरी गाठली. जोकोविच नवव्यांदा विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत पोहचला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत विश्वकप स्पर्धेच्याबाहेर, काल झालेल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 18 धावांनी केला पराभव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - कानमंत्र* https://storymirror.com/read/story/marathi/ohy3fxfi/kaanmntr/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌍 *पृथ्वीचा परीघ किती आहे ?* 🌍 या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी आपल्याला आपली पृथ्वी एखाद्या चेंडूसारखी गोल, गरगरीत, वाटोळी आहे हे गृहित धरायला हवं. वास्तवात ती तशी नाही. दोन्ही ध्रुवांच्या इथे ती जराशी दबल्यासारखी आहे. उलट विषुववृत्ताच्या ठिकाणी ती जराशी फुगल्यासारखी आहे. स्वतःभोवती सतत ती गरगर फिरत असते, त्यामुळे तिच्या आकारात हा फरक झालेला आहे. तरीही तिचा परीघ किती आहे हे समजून घेण्यासाठी आपण ती गरगरीत आहे, असं समजल्यास फारसा फरक पडणार नाही. आता परीघ म्हणजे कोणत्याही एका ठिकाणाहून आपण पृथ्वीच्या पृष्ठभागाला धरून सरळ प्रवास करत निघालो तर परत त्याच ठिकाणी पोहोचेपर्यंत आपण किती मजल मारली असेल, याचं गणित आहे. तेव्हा अशा प्रवासासाठी असलेल्या साधनांवरूनच आपण या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू शकतो. पृथ्वीच्या काळी समुद्रावर प्रवास करणाऱ्या नावाड्यांना आपण कुठे आहोत, कुठे चाललो आहोत हे समजण्यासाठी फारशी साधने नव्हती. त्यामुळे आकाशातल्या ग्रहगोलांनाच विचारात त्यांची वाटचाल होत असे. उत्तर गोलार्धात ध्रुवतारा उत्तर दिशा दाखवत असे. त्याच्यानुसार मग इतर दिशा ओळखल्या जात. तसंच आपण किती मजल मारली आहे हे समजण्यासाठीही अशाच गणताची मदत घेतली जात असे. त्यातूनच नॉटिकल माईल म्हणजेच 'नौकायानातला मैल' मैल ही संकल्पना पुढे आली. याचंच संक्षिप्तीकरण होऊन 'नाॅट' हे एकक रूढ झालं आहे. त्यामुळे जहाजांचा वेग हा दर ताशी अमुक इतके नाॅट असा मोजला जातो. जमिनीवरून प्रवास करत असतानाही आपण मैल हे अंतर मोजण्याचे एक एकक पाळतो; पण नॉटिकल माईल आणि आपल्या नेहमीच्या ओळखीचा मैल यांच्यात फरक आहे, कारण त्या एककांची व्याख्याच वेगळी आहे. पृथ्वी गोलाकार असल्यामुळे त्या गोलाचे ३६० अंश संभवतात. या वर्तुळापैकी एक मिनिटाची आर्क म्हणजे एक नॉटिकल माईल अशी त्याची व्याख्या केली गेली आहे. म्हणजेच या वर्तुळाच्या एक अंशाच्या एक-साठांश इतक्या भागाचा प्रवास केल्यास एक नॉटिकल माईल अंतर कापलं जातं. तेव्हा संपूर्ण ३६० अंशांचा प्रवास करायचा झाल्यास ६० x ३६० म्हणजेच २१६०० नॉटिकल माईल इतकं अंतर होतं ; पण एक नॉटिकल मैल हा आपल्या जमिनीवरच्या मैलापेक्षा मोठा असल्यामुळे हेच अंतर २४८५७ मैल किंवा ४०००३ किलोमीटर इतकं भरतं. *डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातुन* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जगात दुसऱ्याला हसणे सोपे पण, दुसऱ्यासाठी रडणे फार कठीण. *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारताचे पहिले शिक्षणमंत्री कोण होते ?* मौलाना आझाद 2) *दोन अंकी सर्वात मोठी संख्या कोणती ?* 99 3) *'सत्याचे प्रयोग' या पुस्तकाचे लेखक कोण ?* महात्मा गांधी 4) *महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते ?* श्री प्रकाश 5) *महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते ?* मुंबई (1927) *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  शिवाजी सूर्यवंशी ●  अनुपमा अजय मुंजे ●  प्रभुनाथ देशमुख ●  प्रमोद मंगनाळे ●  संतोष चव्हाण ●  नरेश गोट्टम ●  साईकिरण अवधूतवार ●  प्रकाश नाईक *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गाण्याचा रियाज करावा तसा दु:खाचा रियाज करता येईल का? गाण्याच्या रियाजाने गायकांस त्याचा आवाज टिकवून धरता येतो. आवाजाची धार शाबूत राहते. त्याचं गाणं दिवसेंदिवस खुलत जातं. दु:खाच्या रियाजाने असं काही होईल का? दु:ख जर आणखीनच टोकदार होणार असेल तर दु:खाचा रियाज करायला कुणी धजणार नाही. कुणाला हवं आहे दु:खं ! नकोच आहे दु:खं. त्याच्यापासून सुटका व्हावी म्हणून पृथ्वीभर जेवढे काही देव आहे, त्यांना साकडे घालून होते. खुद्द देवालाच दु:खाच्या संदर्भात जाब विचारणा-या माणसाची कथा आपण ऐकलीच आहे.* *माणूस देवाला म्हणतो की, 'देवा तू सुखात माझ्याबरोबर असतो. कारण तेंव्हा दोन माझी अन् दोन तुझी पावलं उमटलेली असतात. मात्र दु:खात तू माझ्यासोबत नसतोस, कारण तेंव्हा माझी एकट्याचीच पावलं उमटलेली असतात !' तेंव्हा देव त्यास म्हणतो,'अरे दु:खातही मी तुझ्याबरोबरच होतो! ज्या दोन पावलांची गोष्ट तू करतो आहेस, ती पावलं तुझी नसून माझीच आहे. मी तुला कडेवर उचलून घेतलं होतं.' तरी माणूस मान्य करणार नाही. हीच माणसाची मोठी समस्या आहे. माणूस दु:खाचा बाऊ फार करतो. दु:खाची सवय करून घ्यायची ..ही गोष्ट फार लांब राहिली. सुख पाहता जवापाडे । दु:ख पर्वताएवढे ॥ तुकाराम महाराजांनी सुखाचे आणि दु:खाचे माप आपल्यासमोर ठेवले आहे. सुख जवसाच्या 'बी' इतके लहान, तर दु:ख पर्वताएवढे विशाल आहे. जवसाच्या बी इतक्या छोट्या असलेल्या सुखाचे व्यवस्थापण आपण करीत असतो. मात्र, पर्वताएवढ्या दु:खाचे व्यवस्थापण आपण बिलकुलही करीत नाही. म्हणून ते कमी व्हायच्या ऐवजी वाढत जाते..इतके की जवसा एवढ्या सुखाचाही तेच चट्टामट्टा करून टाकते.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡ *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• नागिन के तो दोये फन, नारी के फन बीस जाका डसा ना फिर जीये, मरि है बिसबा बीस। सारांश महात्मा कबीर व्यभिचारी व दुराचारी स्त्री-लंपटाना वरील दोह्यातून सचेत करतात. सापिनीला तर केवळ दोनच दात असतात. तिचा दंश झाला तर वैद्याकडून विष उतरवून टाकता येईल. परंतु स्त्रिला वीस दात असतात. तिचा दंश ज्याला झाला त्यातला कोणीही जीवित सुरक्षित राहू शकत नाही. तिचा दंश जर वीस लोकांना झाला तर वीसचे वीस मरून जातील. काम भावना सीमित असली पाहिजे. तिचं संतुलन राखता आलं पाहिजे. काम भावनेचं संतुलन बिघडलं की ती माणसाच्या आवाक्यात राहात नाही. ती त्याला मन मानेल तशी नाचवते. परिणाम स्वरूप माणूस अधःपतित होतो. लोक लज्जेचा , हेटाळणीचा विषय होतो. मग ती ईश्वरांची रूप मानलेली पात्र असोत की सामान्य जण साबुत राहात नाहीत. शंकर , इंद्र, चंद्र, रावणाचे चारित्र्य या माया मोहिणीने डागाळून टाकले. तिथं सामान्यांची काय बात घेऊन बसला आहात. यावर चांगदेवांच्या पुढील ओळी फारच बोलक्या आहेत. वासनेच्या मागे नको धावू मना पहा त्या रावणा काय झाले चंद्रा पडली भगे इंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा अगदी अलीकडे समाजानं ज्यांना डोक्यावर घेतलं होतं अशा संत म्हणवून घेणार्‍यांनी स्व-संतुलन हरवून वासनेच्या आहारी जावून आज ते गजाआड दुर्दशेचे भोग भोगत आहेत. भल्या भल्यांची मायेनं अशी वासलात लावून टाकलीय. मात्र ज्यांनी स्वतः वरील नियंत्रण ढळू दिलं नाही. अशी पात्रंही कमी नाहीत की जी अनुकरणास पात्र ठरलीत. शुक, भीष्म हे निश्चयाचे महामेरूच होते. जगद्गुरू तुकोबारायही माया मोहात गुरफटलेल्या जीवांना पाहून हताश होवून म्हणतात बुडती हे जण न देखवे डोळा । येतो कळवळा म्हणोनिया । तेव्हा माणसानं आपण अवहेलनेचे धनी होणार नाहीत . याची जाणीव ठेवून वागण्याचा प्रयत्न करावयास हवा. तुकोबांनी सांगितलेलं 'पराविया नारी माऊली समान...' हे सुत्र कायम जपलं जपायला हवं. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्याप्रमाणे विद्यार्थीजीवनात विद्यार्थी मन लावून जिद्दीने आणि अभ्यासात सातत्य ठेवून परीक्षेत यश मिळवतो.त्याचप्रमाणे माणसाने जीवनात कोणत्याही कठीण प्रसंगावर विजय मिळवायचा असेल तर आपल्या मनाची तयारी,त्यासाठी लागणारी मनातून जिद्द आणि यश मिळेपर्यंत सातत्य ठेवायला हवे.समजा पहिल्याच प्रयत्नात अयशस्वी झाले तर तिथेच माघार न घेता आपण त्यात कुठे कमी पडलो याचा शोध घेऊन त्यात सुधारणा करण्याची तयारी करावी आणि आपले मन खचू न देता तेवढ्याच जोमाने तोंड देण्यासाठी सज्ज रहावे मग तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. मग तुमच्यासमोर कितीही आणि कोणताही कठीण प्रसंग असला तरी तुम्ही माघार घेणार नाहीत. ©व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मनोरथ पूर्ण करण्याचा कल्पना* देशातील सर्वात मोठ्या वेड्यांच्या दवाखान्याला देशमुखांनी भेट दिली. तेव्हा एका खोलीकडे हात करुन डॉक्टर म्हणाले, '' साहेब, येथे या खोलीत विमान चालविण्याचे, ते वेगाने पळविण्याचे स्वप्न पाहणारे वेडे आहेत.'' देशमुखांनी उत्सुकतेने खिडकीतून आत पाहिले तर त्यांना तेथे कोणीही दिसेना. तसे त्यांनी डॉक्टरांना विचारले. तेव्हा डॉक्टर म्हणाले, '' साहेब, ते सर्व वेडे खोलीतच आहेत. कदाचित पलंगाखाली झोपून, आपण विमानाच्या खालीच झोपलो आहोत, अशी कल्पना करुन विमान दुरुस्त करत असतील.'' आपण सामान्य माणसेही असेच कल्पनांचे, मनोरथांचे विमान पळविण्याच्या आहारी गेलो आहोत. परंतु त्या खोलीत जसे वेडे दिसत नव्हते, तसाच स्वतःचा वेडेपणाही आपल्याला दिसत नाही. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

https://youtu.be/AUeIRzyWN-Y

वर्गः पहिली

https://youtu.be/xo-AOlwXzrI

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 10/07/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १८०० - कोलकाता येथे फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना. १९९२-आर्वी येथील 'विक्रम इनसट भू-केंद्र' राष्ट्राला अर्पण २००० - नायजेरियात फुटलेल्या तेलवाहिकेत स्फोट. त्यातून गळणारे पेट्रोल भरण्यासाठी जमलेल्यांपैकी २५० व्यक्ती ठार. 💥 जन्म :- १९१३ - पद्मा गोळे, आधुनिक मराठी कवियत्री. १९२३ - गुरूनाथ आबाजी कुलकर्णी, कथाकार. १९४९ - सुनील गावसकर, विक्रमवीर, माजी कर्णधार 💥 मृत्यू :- १९६९ - डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर, गोव्याचे इतिहास संशोधक. २००५ - जयवंत कुलकर्णी, मराठी पार्श्वगायक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ * राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन बंद करण्यावर पुनर्विचार करण्यासाठी शासनाची समिती गठीत. 10 दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नोकरीत स्थानिक युवकांना 70 टक्के आरक्षण, देणार असल्याचं राज्याचे जनसंपर्क मंत्री पीसी शर्मा यांनी केलं स्पष्ट* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बीए द्वितीय वर्षाच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात देश उभारणीत संघाचे स्थान यावर विद्यार्थ्यांना चौथ्या सत्रात धडे शिकविण्यात येणार आहे. त्यावरून उफाळला वाद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात तीन टक्के वाढ, महागाई भत्ता नऊ टक्यावरून बारा टक्यावर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *खूशखबर! राज्यभरात म्हाडाच्या १४,६२१ घरांची लॉटरी लवकरच, मुंबईकरांच्या पदरी मात्र निराशा; गिरणी कामगारांसाठी ५ हजार ९० घरे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *आता खातेधारकाच्या परवानगीशिवाय त्याच्या बँक खात्यात पैसे जमा करता येणार नाहीत!* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भुवनेश्वर-बुमराह यांनी किवींना रोखले, पण पावसाने सर्वांना लटकवले, उर्वरीत सामना आज खेळविणार : न्यूझीलंडच्या संथ वाटचालीत विलियम्सन व टेलर यांचे अर्धशतक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - सायकल* https://storymirror.com/read/story/marathi/3xqk1aq5/saaykl/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *केस का गळतात ?* 📙 दररोज थोड्या प्रमाणात केस गळणे नैसर्गिक आहे ; परंतु काही वेळेस अचानक केस गळावयास लागतात. आजारपणानंतर स्त्रियांमध्ये प्रसूतीनंतर असे केस गळायला लागतात. पुरुषांमध्ये प्रौढावस्थेत केस विरळ होत जाऊन टक्कल पडण्याचे प्रमाण जास्त असते. केस गळण्याची अनेक कारणे आहेत. लहान मुलांमध्ये कुपोषणामुळे केस गळतात. केसांच्या व केस ज्या त्वचेत असतात तेथील त्वचेच्या पोषणासाठी प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्व अ, इ यांची आवश्यकता असते. लहान मुलात प्रथिनांच्या अभावामुळे प्रथम केसांचा रंग भुरकट होतो. कुपोषण होतच राहिल्यास असे केस थोडे ओढल्यास लगेच उपटले जातात. यात केसांची मुळे कमकुवत झाल्याने असे होते. मोठ्या आजारांमध्ये आहार नीट घेतला जात नाही, तसेच रोगांच्या प्रतिकारासाठी शरीरातील पोषक घटक वापरले जातात. यामुळे केसांचे पोषण होत नाही व आजारानंतर केस गळावयास लागतात. त्वचेचे आजार झाल्यास असे जसे खूप कोंडा होणे, चाई लागणे, उवा होणे यामुळेही केस गळतात. केस विंचरताना खूप ओढाताण झाल्यासही केस गळतात. यकृताच्या आजारांमध्ये गलगंड या आजारात केस गळतात. पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन या संप्रेरकामुळे व अनुवंशिकतेमुळे टक्कल पडण्याचे प्रमाण स्त्रियांपेक्षा अधिक असते. स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन हे संप्रेरक अधिक असल्याने व या संप्रेरकांवर केसांची वाढ अवलंबून असल्याने टक्कल पडण्याचे प्रमाण कमी असते. जसे वय वाढते तसे चयापेक्षा अपचयाचे प्रमाण वाढत जाते. साहजिकच पेशींच्या निर्मितीपेक्षा नाशाची प्रक्रिया वाढते. केसांचे पोषणही कमी होते. ते लवकर गळतात व नवीन केस येण्याची प्रक्रिया मंदावते यामुळे प्रौढावस्थेनंतर केस विरळ होत जातात. *डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌹 *" फ्रेश मराठी - इंग्रजी सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *Haste makes waste* ( घाईने कामात चुका होतात. ) *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'राष्ट्रीय एकता दिन' केव्हा साजरा केला जातो ?* 31 ऑक्टोबर 2) *जगातील सर्वात उंच पुतळा कोणत्या देशात आहे ?* भारत 3) *महात्मा गांधी यांना कोणत्या नावाने ओळखले जाते ?* बापूजी 4) *'गुरुदेव' ही उपाधी कोणास दिलेली आहे ?* रविंद्रनाथ टागोर 5) *'नेताजी' या नावाने कोणास ओळखले जाते ?* सुभाषचंद्र बोस *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  महेश पांडुरंग लबडे ●  मिलिंद चवरे ● नागनाथ वाढवणे ●  डी बी जगताप ● लक्ष्मण मुंडकर ●  प्रकाश एलमे ●  संतोषकुमार यशवंतकर ●  शिवाजी वासरे ●  चरणसिंग चौहाण ●  विठ्ठल रामलू चिंचलोड ● साईनाथ गायकवाड ● गणेश अंगरवार ● कृष्णा चिंचलोड ● बालाजी दुसेवार ● युवराज माने ● पिराजी चन्नावर ● प्रियंका घुमडे ● लक्ष्मीकांत पोलादे ● अभिजित वऱ्हाडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वत:वर खुश असणा-यांना लोक खूप घाबरतात. त्यांना या लोकांबद्दल खूप आसूया वाटते. सर्वसामान्य माणसे जगात सर्वाधिक नाराज जर कोणावर असतील, तर ती स्वत:वरच असतात. त्यांच्या हातुन चुका होतात. कधी कधी तर त्याच त्याच चुका परत परत होतात. नियतीचे फासे सततच असे पडत राहतात, की सारखेच हस्यास्पद व्हायची वेळ यावी. इतरांच्या हातात कायम राजे, एक्के आणि यांच्या हातात दुर्री-तिर्री, हे तर नेहमीचेच. यांनी चुका सुधारायच्या ठरविल्या तरी पटापट यांना त्या सुधारता येत नाही. त्याच त्याच बाॅलवर परत परत विकेट जात राहते.* *काय केले म्हणजे आपल्याला प्रतिष्ठा मिळेल ? लोक आपल्याला महत्वाचे आणि सन्माननीय समजतील? याचा विचार करण्यात यांचे तासन् तास जातात. तरीही त्यांना असाच निष्कर्ष काढावा लागतो, की अजून आपल्याला खूपच मेहनत करावी लागेल. आणि मग स्वत:ला दोष देत, स्वत:ला सुधारण्याचा पुन:पुन्हा प्रयत्न करत ते जगत राहतात. अशा खचलेल्या आणि जगाच्या गणितात हुकलेल्या लोकांनी सगळा परिसर भरलेला असताना जर एखादा नखशिखांत स्वत:वर खुश असेल तर जगाला त्रास होणारच.* *"परंतु जो स्वत:वर प्रेम करीत नाही, त्याच्यावर जग प्रेम करीत नाही."* संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• नागिन के तो दोये फन, नारी के फन बीस जाका डसा ना फिर जीये, मरि है बिसबा बीस। सारांश महात्मा कबीर व्यभिचारी व दुराचारी स्त्री-लंपटाना वरील दोह्यातून सचेत करतात. सापिनीला तर केवळ दोनच दात असतात. तिचा दंश झाला तर वैद्याकडून विष उतरवून टाकता येईल. परंतु स्त्रिला वीस दात असतात. तिचा दंश ज्याला झाला त्यातला कोणीही जीवित सुरक्षित राहू शकत नाही. तिचा दंश जर वीस लोकांना झाला तर वीसचे वीस मरून जातील. काम भावना सीमित असली पाहिजे. तिचं संतुलन राखता आलं पाहिजे. काम भावनेचं संतुलन बिघडलं की ती माणसाच्या आवाक्यात राहात नाही. ती त्याला मन मानेल तशी नाचवते. परिणाम स्वरूप माणूस अधःपतित होतो. लोक लज्जेचा , हेटाळणीचा विषय होतो. मग ती ईश्वरांची रूप मानलेली पात्र असोत की सामान्य जण साबुत राहात नाहीत. शंकर , इंद्र, चंद्र, रावणाचे चारित्र्य या माया मोहिणीने डागाळून टाकले. तिथं सामान्यांची काय बात घेऊन बसला आहात. यावर चांगदेवांच्या पुढील ओळी फारच बोलक्या आहेत. वासनेच्या मागे नको धावू मना पहा त्या रावणा काय झाले चंद्रा पडली भगे इंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा अगदी अलीकडे समाजानं ज्यांना डोक्यावर घेतलं होतं अशा संत म्हणवून घेणार्‍यांनी स्व-संतुलन हरवून वासनेच्या आहारी जावून आज ते गजाआड दुर्दशेचे भोग भोगत आहेत. भल्या भल्यांची मायेनं अशी वासलात लावून टाकलीय. मात्र ज्यांनी स्वतः वरील नियंत्रण ढळू दिलं नाही. अशी पात्रंही कमी नाहीत की जी अनुकरणास पात्र ठरलीत. शुक, भीष्म हे निश्चयाचे महामेरूच होते. जगद्गुरू तुकोबारायही माया मोहात गुरफटलेल्या जीवांना पाहून हताश होवून म्हणतात बुडती हे जण न देखवे डोळा । येतो कळवळा म्हणोनिया । तेव्हा माणसानं आपण अवहेलनेचे धनी होणार नाहीत . याची जाणीव ठेवून वागण्याचा प्रयत्न करावयास हवा. तुकोबांनी सांगितलेलं 'पराविया नारी माऊली समान...' हे सुत्र कायम जपलं जपायला हवं. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येकजण आपल्या जीवनाच्या चित्रशाळेत स्वत:चे एक सुंदर जीवनाचे चित्र काढून रंगवण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो.जीवनाच्या चित्राचा आकार कसाही असला तरी त्यात रंग मात्र आपल्या कल्पक बुध्दीने भरण्याचा प्रयत्न करतो.त्यात असणारे रंग जरी वेगवेगळे असले तरी भरण्याचे कौशल्य ज्याला आहे तो आपल्या वेगळ्या पद्धतीने,कलेने भरुन जीवनाला आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करतो.ज्याला ही कला अवगत झाली नाही त्याच्या जीवनचित्रात रंगही भरता येत नसल्यामुळे जीवनचित्र रंगहिन व आकारहिन बनते.म्हणून जीवनाच्या जीवनचित्रशाळेत यशस्वी व्हायचे असेल,जीवनाला रंगरुप आकार द्यायचा असेल तर आपल्यातील कल्पकतेला,कौशल्याला आणि नवनिर्माण शिलतेला जागृत ठेवून जीवन सुंदर आणि आनंददायी निर्माण करायला शिकले पाहिजे.त्यातून स्वत:ला आणि इतरांना जगण्यासाठी एक नाविण्यपूर्ण कला अवगत होईल आणि आनंदाने जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळेल यात शंकाच नाही. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌱🎨🌱🎨🌱🎨🌱🎨🌱 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सवयीचा परिणाम* एका माणसाने त्‍याच्‍या घरी एक पोपट पाळला होता. पिंज-यात ठेवलेल्‍या पोपटाला चांगले खायलाप्‍यायला मिळत असे व पोपट बोलका असल्‍याने घरातील लोकांकडून त्‍याचे फार कौतुकही केले जाई. पण पोपटाच्‍या मनात मात्र पारतंत्र्याचे शल्‍य दाटून येई. अखेर एकेदिवशी पोपटाला संधी चालून आली. त्‍या माणसाने पोपटाला खाणे देण्‍यासाठी पिंज-याचे दार उघडले होते व त्‍याच्‍याहातून ते तसेच उघडे राहिले होते. माणसाला अचानक काही काम आल्‍याने तो ते दार उघडे टाकून निघून गेला असता पोपट पिंज-याच्‍या बाहेर निघून गेला. पण लहानपणापासूनच पिंज-यात राहिला असल्‍याने त्‍याला फारसे नीट उडताच येत नव्‍हते. एका झाडावर गेला असता त्‍याला इतर पोपटांशी बोलता येईना कारण लहानपणापासूनच तो परकी भाषा शिकत असल्‍याने त्‍याला पोपटांची भाषा येत नव्‍हती म्‍हणून इतर पोपटही त्‍याला सहकारी मानत नव्‍हते.  पिंज-यात आयते खायची सवय असल्‍याने त्‍याला अन्न मिळवणे अवघड जाऊ लागले व ऊन वारा पाऊस यांची कधीच सवय नसल्‍याने तो आजारी पडला व मरून गेला. तात्‍पर्य: जास्‍त काळ पारतंत्र्यात(गुलामगिरीत) राहिल्‍याने तशीच गुलामगिरीची सवय अंगात मुरुन राहते. मग परक्याची भाषा, संस्‍कृतीच आपली वाटू लागते आणि मिळालेले स्‍वातंत्र्य टिकवण्‍यासाठीची जिद्द अंगी राहत नाही. परक्‍या संस्‍कृतीचे चांगले काही घेताना आपल्‍या संस्‍कृतीचे विस्‍मरण होऊ न देणे हाच खरा शहाणपणा. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 09/07/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १८७३ - मुंबई शेअर बाजार एका वडाच्या झाडाखाली सुरू झाला. १९५१ - भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली १९६९ - वाघाला भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यात आले. 💥 जन्म :- १९२५ - गुरू दत्त, हिंदी चित्रपट अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक. १९३८ - संजीव कुमार, हिंदी चित्रपट अभिनेता. 💥 मृत्यू :- २००५-डॉ रफिक झकारिया, महाराष्ट्राचे माजी नगरविकास मंत्री आणि लोकसभा सदस्य *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक घटली. फक्त 253 वाहनांची आवक. शनिवारच्या तुलनेत 50 % आवक घटली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई - येत्या 24 तासांत मुंबईमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवर ५,४00 कोटींचा खर्च* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई - आज रिक्षाचालकांच्या होणाऱ्या संपाच्या पार्श्वभूमीवर बेस्ट चालवणार अतिरिक्त बस, बेस्ट प्रशासनाची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *कन्येच्या विवाहावरील अनावश्यक खर्च टाळत राज्याचे माजी मुख्य सचिव तथा लोकपाल सदस्य दिनेश कुमार जैन यांनी मुख्यमंत्री मदत निधीला दिली पाच लाखांची रक्कम* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबई : विलेपार्लेच्या सिया देवरुखकर हिने नुकत्याच राजकोट येथे झालेल्या ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली. राष्ट्रीय स्तरावरील सियाचे हे पहिले पदक ठरले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *आय सी सी विश्वकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज होणाऱ्या सामन्यावर पावसाचे सावट आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - रेल्वेतील शाळा* https://storymirror.com/read/story/marathi/n96hoqhe/relvetiil-shaalaa/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *माणूस जास्तीत जास्त किती जगू शकतो ?* 📙 'जीवेत शरद: शतम्' असा आशीर्वाद किंवा शुभेच्छा कोणालाही दिल्या जातात. माणसाचं आयुष्य शंभर वर्षांचं आहे अशी जी एक सर्वसाधारण समजूत आहे त्याचीच ही परिणती आहे; पण माणूस जास्तीत जास्त शंभर वर्षे जगू शकतो या समजुतीला कोणता आधार आहे ? कारण आजही शंभरी गाठलेल्या व्यक्तींची संख्या पूर्वीपेक्षा जास्त असली तरी एकूण लोकसंख्येच्या मानाने नगण्यच आहे. म्हणून तर शंभरी ओलांडलेल्या आलेल्या व्यक्तीकडे नवलाईने पाहिलं जातं. तेव्हा खरा प्रश्न हा आहे की माणसाचं सरासरी आयुर्मान किती आहे ? त्याला काही नैसर्गिक मर्यादा आहेत की नाही ? इतिहास पाहिला तर याचं उत्तर दे़ सोपं होत नाही. कारण माणसाचं सरासरी आयुर्मान वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या भौगोलिक स्थानी वेगवेगळं राहिलं आहे. अश्मयुगात ते जेमतेम २५ ते ३० वर्षांचं होतं. ब्राँझयुगात तर ते अठरापर्यंत घसरलं होतं. पण त्याच युगात स्वीडनसारख्या ठिकाणी ते त्याहून दुप्पट ते तिप्पट होतं. सिकंदर वयाच्या बत्तिसाव्या वर्षी निधन पावल्याचं इतिहास सांगतो; आणि आपण त्याला अल्पवयातच मृत्यू आल्याचं निदान करतो. पण ग्रीक संस्कृतीत काय किंवा रोमन संस्कृतीत काय सरासरी आयुर्मानच तिशीपेक्षा जास्त नव्हतं. विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाही पंचवीस ते तीस हीच सीमा त्यानं गाठली होती. आज जगातलं सरासरी आयुर्मान ७० वर्षांचं आहे. आपल्या देशातही परिस्थिती वेगळी नाही. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा म्हणजेच उण्यापुऱ्या साठ वर्षांपूर्वी देशातलं सरासरी आयुर्मान ३५ वर्षांचं होतं. आज ते ६७ झालं आहे. याचं कारणही स्पष्ट आहे. मृत्यूदरात झालेली लक्षणीय घट. ती तशी झाली कारण सार्वजनिक आरोग्यसुविधांमध्ये फार मोठा फरक पडला आहे. ज्या सांसर्गिक रोगाला माणूस बळी पडत असे त्यापैकी बहुतेक रोगांना आळा घालण्यात आपण यशस्वी झालो आहोत. त्या रोगांचा उपसर्ग होण्यास अटकाव करणाऱ्या प्रभावी लसी उपलब्ध झाल्या आहेत, तसंच लागण झाल्यानंतरही त्यावर मात करणारी शक्तिशाली औषधंही सहजगत्या मिळत आहेत. आहारात आणि त्यामुळे उपोषणातही वेगाने प्रगती झाली आहे. वाढत्या वयात मिळणाऱ्या सकस आणि पर्याप्त अन्नापायी माणूस सुदृढ बनत चालला आहे. उतारवयातही त्याचं स्वास्थ्य टिकून रहत आहे. ही जी वाढ झालेली आहे ती नैसर्गिक मर्यादा गाठण्यात ज्या काही अडचणी येत होत्या त्यांचं निराकरण झाल्यामुळे आलेली आहे. माणसाच्या जनुकीय साठय़ामध्येच त्याच्या एकंदर आयुर्मर्यादेचं इंगित दडलेलं आहे. २००९ सालचं नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या वैज्ञानिकांनी केलेले संशोधन या विषयाशीच निगडित आहे. त्यानुसार आपल्या यच्चयावत शारीरिक, शरीरक्रियाविषयक तसंच वर्तणुकीबाबतचेही गुणधर्म निर्धारित करणारी जनुकं च्या गुणसूत्रांमध्ये लपलेली असतात, त्या गुणसूत्रांच्या एका टोकाला असलेल्या टोपीमध्ये, टेलोमिअरमध्ये, आयुर्मर्यादा निश्चित करणाऱ्या जनुकांचा साठा असतो. ती जनुकं कार्यान्वित करणारं एक विकरही, टेलोमरेझ शोधुन काढलं गेलेलं आहे. तेच आयुर्मर्यादेची निश्चिती करत असतं. त्याचं कार्य नेमकं कसं चालतं याचं गुढ उकललं की मग माणूस जास्तीत जास्त किती जगू शकतो ? या प्रश्नाचं नेटकं उत्तर देणं शक्य होईल. *बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• वेळ आल्यावर आपल्या गरजा बदला पण आपल्या गरजेसाठी आपली माणसं बदलू नका. *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'गरबा' कोणत्या राज्याचा नृत्यप्रकार आहे ?* गुजरात 2) *'पोंगल' उत्सव कोणत्या राज्यात साजरा करतात ?* तामिळनाडू 3) *महाराष्ट्रात कुंभमेळ्याचे आयोजन कोठे केले जाते ?* नाशिक 4) *भारताचे पितामह असे कोणाला म्हटले जाते ?* दादाभाई नौरोजी 5) *भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते ?* सरदार पटेल *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  श्रीकृष्ण राचमाळे ●  पंडीत पवळे ●  बालाजी अनमूलवाड बेळकोणीकर ●  घनश्याम सोनवणे ●  महेश जाधव ●  साईनाथ विश्वब्रम्ह *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एकदा पंक्चर काढणा-याकडे उभा असताना एका टायरमधली हवा फस्सकन गेली. वाटले 'मृत्यू' असाच होत असणार. मृत्यूविषयी एक ऑब्सेशन अनेकांच्या मनात खोल असते. एका मित्राला सतत एक विचित्र समस्या छळत असते. त्याच्या अंत्यदर्शनाला येणारे लोक गाड्या कुठे लावतील ? त्या दिवशी पाऊस असेल का ? आता याची काळजी मागे राहिलेले घेतील की ! अशी सत्वहीन माणसं जगण्याला काही देत नाहीत आणि घेतही नाहीत.* *दु:ख घेता येत नाही तर देऊ नये. 'सुख द्यावे आणि घ्यावे' हे सूत्र जगण्याचा 'तोल आणि ताल' संभाळते. कविराज विंदा करंदीकर यांनी कुणाकडून काय घ्यावे याची यादी दिलीय, पण.... असे घेता येते का ? काही जिंदादिल माणसे सतत देत राहतात, घेणे त्यांच्या गावी नसते. जिंदगी घोटा-घोटाने पिण्याचा 'अमृतरस' आहे. या रसाचे भोक्ते किती राहिलयं ते चुकूनही पहात नसले तरी त्यामुळे त्यांचे 'अक्षयपात्र' भरलेले राहते. तसे तुमचेही राहो, हिच आज 'अक्षयतृतीया'ची सर्वांना शुभेच्छा !* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ☀☀☀☀☀☀☀☀☀ *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जहाँ न जाको गुन लहै, तहाँ न ताको ठाँव । धोबी बसके क्या करे, दीगम्बर के गाँव ॥ अर्थ : जिथे आपल्याला पात्रता व योग्यतेनुसार गुण व कौशल्य दाखवण्यासाठी कार्य कर्तृत्त्व करण्यास वावच नसेल तिथे राहून काय हशील होणार आहे ? तिथे राहाणे व्यर्थच आहे. ही बाब पटवून देताना महात्मा कबीर म्हणतात की, ज्या गावात सर्व दिगंबरच (कपडे विरहित लोक) राहातात तिथे राहून धोब्याला काय उपयोग होणार आहे ? कला ही जीवनाची सावली मानली जाते. 'कलेनेच माणसाची ओळख । एरव्ही कोण पुसतो आणिक ? तुम्ही आहात राव की रंक । आता कोणी पुसेना ।' असे राष्ट्रसंत तुकडोजी ग्रामगीतेत म्हणतात. कलावंतानं आपली कला जीवनाचा आधार केली व कलेचा अहंकार अंगी न बाळगता तिला विनयशीलतेची जोड दिली की सर्व जग आपलंस होवून जातं. आपलं कसब व कौशल्य अशा ठिकाणी दाखवायला हवं की ते आपल्या जीवनाला स्वावलंबनाकडे नेईल. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जेव्हा आपली वेळ वाईट असते तेव्हा आपल्याकडे लोक पाठ फिरवतात आणि जेव्हा आपली वेळ चांगली असते तेव्हा सगळेच जवळ येतात. परिस्थिती कशीही असली तरी प्रत्येकवेळी सुखदुःखात जे आपल्या पाठीशी असतात आणि आपण प्रत्येकवेळी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता पाठीशी असतो तीच खरी माणुसकी असते आणि तीच खरी अंत:करणातून एकमेकांबद्दलची खरी आत्मियता असते. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्राप्त ज्ञानास आत्मसात करणे* राजा जनक राजा असूनही त्‍यांना राज वैभवात आसक्ती नव्‍हती. लोभ मोहापासून ते सदैव दूर राहत. विनम्रता त्‍यांच्‍या स्‍वभावात होती. त्‍यामुळे ते आपले दोष दूर करण्‍याचा प्रयत्‍न करत असत. आत्‍मशोध घेण्‍याचा त्‍यांचा सदैव प्रयत्‍न सुरुच असे.  एकदा ते नदीकाठावर एकांतात बसून ‘सोऽहम’ चा जप करत होते. मोठ्या आवाजात त्‍यांचा जप सुरु होता.  तेवढ्यात तेथून अष्‍टावक्र ऋषि चालले होते. ते परमज्ञानी असल्‍याने त्‍यांना राजा जनकाचा जप ऐकून ते जागेवरच थांबले व एका हातात छडी घेऊन थोडे दूर अंतरावर उभे राहिले. मग मोठ्या आवाजात तेही बोलू लागले,’’माझ्या हातात कमंडलू आहे आणि माझ्या हातात छडी आहे’’ राजा जनकाच्‍या कानात ऋषींच्‍या बोलण्‍याचा आवाज गेला पण त्‍याने आपला जप सुरुच ठेवला.  अष्‍टावक्रही ही गोष्‍ट जोरजोरात बोलत राहिले. शेवटी जनकाने जप थांबवून विचारले,’’मुनिवर, हे तुम्‍ही मोठमोठ्याने काय सांगत आहात’’ अष्‍टावक्र जनकाकडे पाहून हसले आणि म्‍हणाले,’’माझ्या हातात पाण्‍याचा कमंडलू आहे, माझ्या हातात छडी आहे’’  राजा जनक आश्‍चर्यात पडला व विचारू लागला,’’ महाराज अहो हे तर मलाही दिसत आहे की तुमच्‍याजवळ छडी आणि कमंडलू आहे पण हे दिसत असतानासुद्धा तुम्‍ही मोठ्याने ओरडून का सांगत आहात.’’  तेव्‍हा अष्‍टावक्रांनी जनक राजांना समजाविले,’’ राजन, माझ्याजवळ असणारा कमंडलू आणि छडी दिसत असतानासुद्धा ओरडून सांगणे हे जसे मूर्खपणाचे आहे तसेच तुमचे सोऽहम उंच आवाजात म्‍हणणे आहे.  मंत्राला घोकण्‍याने काहीच फळ मिळत नाही. मंत्र आत्‍मसात करणे किंवा त्‍याला आतल्‍या चेतनेशी जोडल्‍यावरच त्‍याचे फळ मिळते.’’  तात्‍पर्य: कोणतेही ज्ञान घोकंपट्टी करून मिळवण्‍यापेक्षा ते आत्‍मसात करण्‍याचा प्रयत्‍न झाला पाहिजे. कोरडे पाठांतर काहीच कामाचे नसते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 08/07/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- २०११-रुपयाचे नवीन चिन्ह (Rs.)असलेली नाणी प्रथमच चलनात आली. २००६-मुख्य निवडणूक आयुक्त असतांना केलेल्या कामगिरीबद्दल टी. एन.शेषन यांना" रॅमन मॅगॅसेसे पुरस्कार" जाहीर. १९९७-बीजिंग आशियाई महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत ४६किलो वजनी गटात कुंजुरांनी देवीने रौप्य पदक पटकावले १४९७ - वास्को दा गामाने भारताकडे समुद्रमार्गे प्रयाण केले. 💥 जन्म :- १९०८ - वी. के. आर. वी. राव, भारतीय अर्थशास्त्रज्ञ. १९१६ - गोपाळ नीळकंठ दांडेकर, मराठी कादंबरीकार, चरित्रकार. १९५८ - नीतू सिंग, हिंदी चित्रपट अभिनेत्री. १९७२ - सौरव गांगुली, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- २००६-प्रा.राजा राव,तत्वज्ञानाचे प्राध्यापक. २००१ - उस्ताद बाळासाहेब मिरजकर, तबला विभूषण. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबईत पावसाने विश्रांती घेतल्यानंतर राज्यात नाशिक, नगर, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस, यंदा पहिल्यांदाच गोदावरी नदीला आला पूर, गोदावरी नदीपात्रात ८ हजार क्सुसेसने पाणी सोडण्यात येत असून ते पाणी मराठवाड्याकडे झेपावले आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवी दिल्ली : संपूर्ण देशात पोलिसांच्या ५ लाख जागा रिक्त आहेत व त्यातील जवळपास सवा लाख जागा एकट्या उत्तर प्रदेशात, बिहारमध्ये ५० हजार आणि पश्चिम बंगालमध्ये ४९ हजार तर महाराष्ट्रात २६ हजार जागा रिक्त आहेत.असे गृह मंत्रालयाकडील आकडेवारीत म्हटले आहे.* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *इंडोनेशिया - इंडोनेशियामध्ये जाणवले 6.9 मॅग्निट्युट तीव्रतेचे भूकंपाचे धक्के, किनारी भागात त्सुनामीचा इशारा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नवी दिल्ली - काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिला पक्षाच्या महासचिव पदाचा राजीनामा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई : राज्यातील रिक्षाचालक मंगळवारपासून संपावर, ओला, उबेरची बेकायदेशीर टॅक्सी सेवा बंद करण्याची मागणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *लंडन : आठ वेळेसचा विम्बल्डन पुरुष एकेरीतील चॅम्पियन रॉजर फेडरर याने विजयासह रचला आणखी एक विक्रम* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मॅन्चेस्टर : आयसीसी विश्वकप स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य लढतीत टीम इंडिया उद्या न्यूझीलंडविरुद्ध खेळेल, तर यजमान इंग्लंडची लढत गुरुवारी गत चॅम्पियन आॅस्ट्रेलियाविरुद्ध होणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - हाताची जादू ओळखणारा शिक्षक* Audio ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करावे. https://youtu.be/-R9ZpCSvOok लघुकथा वाचण्या साठी खालील लिंक वर क्लीक करावे https://storymirror.com/read/story/marathi/19r6650g/haataacii-jaaduu/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *सलाईन लावण्याचे काय फायदे होतात ?* 'डागदर साहेब, दोन तरी सलाईन लावा बघा' किंवा 'एक बाटली सलाईन तरी लावावीच लागेल' अशी रुग्ण डॉक्टरांची वाक्ये नेहमीच ऐकायला मिळतात. सामान्य लोकांना सलाईन म्हणजे जणू संजीवनीच आहे असे वाटायला लागले आहे आणि साध्या इंजेक्शनपेक्षा सलाईन लावल्यावर जास्त पैसे मिळत असल्याने वैद्यक व्यावसायिकही सलाईनचा वापर सढळ हाताने करू लागले आहेत. सलाईन लावावे असे रुग्णांना व डॉक्टरांना दोघांनाही वाटत असले, तरी पण खरेच का सलाईन आवश्यक असते ? सलाईन म्हणजे सोडियम क्लोराइडचे मिठाचे पाण्यातील द्रावण ! हे शिरेतून द्यावे लागते. त्यामुळे ते लगेच रक्तात मिसळले जाते, एवढ्यात त्याचा फायदा. याउलट ते पोटातून दिले, तर रक्तात शोषण व्हायला एक ते दीड तास लागतो. मग सलाईन केव्हा द्यावे लागते ? संडास वा उलट्या जास्त झाल्यास शरीरातील पाणी खूप कमी होते. व्यक्ती बेशुद्धही होतो. अशा काही वेळेला सततच्या मळमळ व उलट्यांमुळे तोंडाने काहीच देता येत नाही. पोटाच्या शस्त्रक्रियेनंतरही तोंडावाटे काही काळ काहीच देता येत नाही. अशा काही विशिष्ट परिस्थितीमध्येच सलाइन लावणे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असते. इतर वेळी मात्र तोंडावाटे द्रवपदार्थ देणेच चांगले. कारण शिरेतून काहीही दिल्यास काही जणांना ताप येऊ शकतो. गंभीर वावड्याने रिअॅक्शन येऊ शकते. तसेच सुई वगैरे निर्जंतुक केलेली नसल्यास कावीळ, एड्स यासारखे रोगही होऊ शकतात. त्यामुळे होता होईस्तोवर सलाईन न घेणेच चांगले. सलाईन म्हणजे शिरेतून दिली जाणारी कोणतेही द्रवरूपातील औषधे असा साधारणत: अर्थ लोक घेतात पण प्रत्यक्षात सलाईनचा अर्थ मिठाचे पाणी असाच आहे ! सलाईन लावणे काही अवस्थांमध्ये प्राण वाचवू शकते, हे जरी खरे असले तरी उठसूट सलाईन लावणे आर्थिक दृष्ट्या पडण्याजोगी नसते व कधी कधी ते जीवावरही बेतू शकते. *डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कुणाच्या नादात किंवा वादात पडण्यापेक्षा उद्योगात पडा, खुप प्रगती होईल *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *प्रदीप नरवाल हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?* कबड्डी 2) *नोबेल पुरस्कार कोणाच्या स्मरणार्थ दिला जातो ?* वैज्ञानिक आल्फ्रेड बर्नहार्ड नोबेल 3) *भारताची प्रथम महिला IPS अधिकारी कोण ?* किरण बेदी 4) *वैशाखी कोणत्या राज्याचा उत्सव आहे ?* पंजाब 5) *ओणम कोणत्या राज्याचा उत्सव आहे ?* केरळ *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  सुरेश तायडे ●  अनिल बेद्रे ●  मलेश भूमन्ना बियानवाड ●  आनंदराव नारायणराव सूर्यवंशी ●  लालू शिरगिरे ●  श्रद्धा कळसकर ●  अशोक पवार ●  दीपक वानखेडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *तसे आयुष्यभर मागतच असतो या अर्थाने आपण भिकारीच असतो. हातात भिकेचा कटोरा दिसत नाही, म्हणून तो नसतोच असे नाही. अपेक्षेचे छोटे-मोठे कटोरे घेऊनच आपण फिरत असतो. या अपेक्षेचा कटोरा घेऊन भीक मागण्याची सुरूवात होते घरापासून, घराकडून अपेक्षा असते. आई-वडिल, बायको, मूल, बहिण, भाऊ सर्वांकडून अपेक्षा आहेत. उलटपक्षी त्यांनाही माझ्याकडून तेवढ्याच अपेक्षा आहेत. म्हणजे चित्र दिसत नसले, तरीही अपेक्षेच्या भिकेचे कटोरे घेऊन परस्परांसमोर उभे आहोत. एक भिकारी दुस-या भिका-यासमोर उभा आहे आणि दोघेही आरोळ्या ठोकताहेत,'देssरेss...बाssबा... काहीतरी.* *मला त्यांच्याकडून प्रेम हवे आहे. स्नेह, विश्वास, माझ्या दुखल्या-खुपल्याबद्दलची विचारपुस हवी आहे. आस्था हवी आहे. सर्वच हवे आहे. ज्यांच्याकडून मला हे सर्व पाहिजे आहे, त्यांनाही माझ्याकडून हेच हवे आहे. अपेक्षेच्या कटो-यात त्यापैकी काही पडतही आहे. त्याने मी आनंदी नाही उलट जे नेमके त्यात पडले नाही त्यानेच आधिक दु:खी आहे. जे मिळाले त्याचा आनंद नाही पण जे मिळाले नाही त्याचा दु:खभारच आधिक आहे. मी फक्त मागतोच आहे. याच्याकडून, त्याच्याकडून, घराकडून-दाराकडून, नात्यांकडून-नात्याबाहेरच्या गणगोतांकडून, ओळखी-पाळखीकडून, एवढेच काय अनोळख्यांकडूनसुद्धा.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🥀🥀🥀🥀 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कलि मंह कनक कामिनि, ये दौ बार फांद इनते जो ना बंधा बहि, तिनका हूॅ अमै बंद । सारांश महात्मा कबीर सांगतात कलीयुगात जो माया मोहात अडकणार नाही. स्त्रियांच्या फंदात पडून जो स्वतःला बिघडवून घेणार नाही तोच या मायावी जगातून सुखरूप सुटेल. तो सर्वांच्या आदरास पात्र होईल. अन्यथा लोक टिकेला सामोरे जावे लागणार. अपमानाचे बोल सहन करावे लागणार. हे ठरलेलेच. म्हणून सन्मार्गावर चालणार्‍या माणसानं माया आणि कामिनी यांच्या मोहात पडणं म्हणजे स्वतःला अधोगतिच्या मार्गाला नेणं होय. रामायण घडण्यामागील मुख्य कारण स्त्री लालसेत सापडते, आर्य अनार्य संघर्षाच्या काळात आर्य पुत्र लक्ष्मणाकडून अनार्य कन्या शुर्पनखा या महाबली राजा रावनाच्या बहिणीला तपमानित केलं जाणं. तिला विद्रुप केलं जाणं. दुर्लक्षित कसं होणार ? ती काय गोरगरीबा घरची पोर थोडीच होती ? फूल हुंगून फेकून दिलं किवा तसाच त्याचा चोळामोळा केला तरी त्याची दखल कोण घेतंय ! मात्र इथ राज कुलाच्या इज्जतीचा पेच. सुडाग्निनं पेटलेल्या एका मानिनीनं दुसरीला संघर्षात ओढलं नाही तरंच नवल ! तिथं दोन्ही पैकी एका बाजुची राख रांगोळी होणं स्वाभाविकंच होतं. नेमकी न्यायाची बाजू कोणाची ? चिकित्सा करणारे करत राहतील .मात्र दोन स्त्रियांच्या पात्राभोवतीच हा महासंग्राम फिरत राहतो. महाभारत म्हणजे सत्ता, संपत्ती आणि सुंदरी यांच्या भोवती फिरणारी भावबंदकीच नव्हती का ! त्यातही अपरीमित हानी झालेली. महारती योद्धे माया, मोहिनीतच गारद केल्या गेलेले. आजही जागोजागी त्या बाबींची पूनरावर्त्ती होताना दिसते. अशा प्रकारापासून सावध व्हायला हवे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्यांना जीवन जगण्याची कला अवगत झाली तो कधीच कुणासमोर जीवन कसे जगावे असं विचारत नाही किंवा कोणतीच तक्रार कुणाकडे करीत नाही.तो कसेही आणि कोणतेही संकट असो त्याला तो आपल्या कलेने तोंड देऊन यशस्वी होतो.परंतु ज्यांना जीवन कसे जगावे किंवा जीवनात आलेल्या प्रसंगाला कसे आणि कोणत्या पध्दतीने तोंड द्यावे हे जमत नाही तो कधीच जीवनात यशस्वी होत नाही आणि होणारही नाही.तो दरवेळी काहीना काही बहाणे करुन आपल्या जीवनाला व जगण्याला दोष देत बसतो. आपल्या नशीबाला दोष देण्यापेक्षा हातपाय हलवून जीवन जगायला शिकले पाहिजे हा सकारात्मक विचार आपल्या डोळ्यांसमोर नेहमी ठेवायला शिकले पाहिजे तरच जीवन जगणे आनंददायी होईल अन्यथा दु:खच भोगावे लागतील यांत तीळमात्र शंकाच नाही . © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद ...‌9421839590/8087917063. 🌹🌱🌹🌱🌹🌱🌹🌱🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *इसापची समयसुचकता* ग्रीस देशात झांथस या नावाचा एक मोठा माणूस होऊन गेला. त्याच्या घरी इसाप स्वैपाकी होता. एके दिवशी झांथसच्या घरी मेजवानी होती. म्हणून त्याने इसापला आज्ञा केली की, ‘सर्वांत उत्तम असे जे पक्वान्न असेल ते आज पाहुण्यांसाठी कर !’ रात्री ठरलेल्या वेळी पाहुणे जमल्यावर सर्वजण जेवावयास बसले. इसापने नुसत्या बोकडाच्या जीभांचे निरनिराळे पुष्कळ पदार्थ तयार केले होते. ते खाऊन पाहुणे फार खूष झाले. तरीही जिभांशिवाय दुसरा कोणताही पदार्थ ताटात नसल्यामुळे झांथस यास थोडेसे आश्चर्य वाटले व रागही आला. तो इसापला म्हणाला, ‘अरे, सर्वांत उत्तम असं पक्वान्न तयार करायला सांगितलं असता तू नुसत्या जिभेचेच निरनिराळे पदार्थ काय तयार करून ठेवलेस ?’ त्यावर इसापने उत्तर दिले, ‘जिभेपेक्षा चांगला असा दुसरा पदार्थ आहे का?’विद्या, तत्त्वज्ञान यांचा उगम जिभेपासून झाला आहे. व्याख्यान, अभिनंदन, लग्न, व्यापार इत्यादी मोठमोठ्या घडामोडी, प्रतिज्ञा या सर्वांचे मुख्य साधन जीभच होय, तिची बरोबरी करणारा दुसरा पदार्थ नाही.’ इसापचे हे समयसूचक भाषण लोकांना इतके आवडले की, त्यांनी त्याची फारच तारीफ केली. त्यावेळी झांथस पाहूण्यास म्हणाला, ‘अहो, आजच्याप्रमाणे उद्यासुद्धा रात्री तुम्ही माझ्याकडे जेवावयास यावं, अशी माझी विनंती आहे.’ मग तो इसापकडे पाहून म्हणाला, ‘अरे, आज जसे तू सर्वात उत्तम पक्वान्न तयार केलेस, तसे उद्या तुझ्या मते जे सर्वात वाईट पक्वान्न असेल ते तयार कर.’ दुसरे दिवशी सर्वजण जेवायला बसले असता आदल्या दिवशीचेच सर्व पदार्थ जेवणात होते. तेच पदार्थ पाहून पाहुण्यास व झांथस यांना फार आश्चर्य वाटले. मग झांथस इसापला रागाने म्हणाला, ‘अरे, काल जे पदार्थ चांगले होते तेच आज सर्वात वाईट कसे काय झाले?’ त्यावर इसाप उत्तरला, ‘जिभांपेक्षा वाईट असा दुसरा कोणता पदार्थ आहे ? जगात तितकी म्हणून नीचपणाची कृत्ये होतात, त्या सर्वांच्या मुळाशी जीभच कारणीभूत असते. बंड, मारामारी, लबाड्या नि अन्याय यांच्या संबंधाच्या गुप्त बोलाचाली जिभेनेच होतात. त्याचे इशारेही जिभेनेच दिले जातात. मोठमोठी राज्यं, प्रचंड नगरं इतकं नव्हे तर फार दिवसांचे मित्रत्वाचे संबंधसुद्धा जिभेमुळेच नाश पावतात.’ इसापचे हे चातुर्याचे बोलणे ऐकून लोक अगदी चकित झाले. तात्पर्य: कोणत्याही वस्तूकडे निरनिराळ्या दृष्टीने पाहिले असता ती निरनिराळ्या प्रकारची दिसू लागते. त्याचप्रमाणे कोणत्याही वस्तूचा उपयोग जसा चांगल्या कामास होतो तसाच वाईट कामातही करता येतो. चांगले शोधून काढणे ही आपली सचोटी. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 06/07/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १८८५-लुई पाश्चर याने रेबीज या रोगावरील लसीची यशस्वी चाचणी केली १८९२ - दादाभाई नौरोजींची ब्रिटीश संसदेचे सर्वप्रथम भारतीय सभासद म्हणून निवड. १९४७-रशियात ए के ४७ या बंदुकीच्या उत्पादनास सुरुवात झाले २००६- चीन युद्धापासून बंद असलेली भारत व तिबेट यांना जोडणारी 'नाथु ला' खिंड ४४ वर्षानंतर व्यापारासाठी खुली करण्यात आली. 💥 जन्म :- १८३७ - डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, थोर प्राच्यविद्या संशोधक, संस्कृत पंडित भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक. १८८१ - गुलाबराव महाराज, विदर्भातील संतपुरूष. १८९७ - व्यंकटेश दिगंबर माडगूळकर, मराठी कथाकार आणि कादंबरीकार. १९०१ - डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, भारतीय जनसंघाचे पहिले नेते . १९०५ - लक्ष्मीबाई केळकर, भारतीय समाजसेविका, राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका. १९३९ - मन सूद, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९८६ - जगजीवनराम, भारतीय राजकारणी. २००२ - धीरूभाई अंबानी, भारतीय उद्योगपती. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *गरिबांचे सबलीकरण, युवकांना उज्ज्वल भविष्य देणारा, या अर्थसंकल्पामुळे उद्योग व उद्योजक या दोघांनाही बळ मिळेल आणि देशाच्या विकासात महिलांचा सहभागही वाढेल - पंतप्रधान मोदी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *Budget नवी दिल्ली - नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण राबवणार, उच्च शिक्षणासाठी परदेशी विद्यार्थ्यांना भारतात संधी उपलब्ध करणार* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *Union Budget: पेट्रोल-डिझेलची दरवाढ मध्यरात्रीपासून लागू; बजेटमधील करवाढीचा पहिला झटका* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *आधार कार्डच्या मदतीनं आयकर भरता येणार; पॅन कार्डची सक्ती नाही* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *ICC World Cup 2019 : पाकिस्तानचा विजयी निरोप; बांगलादेशवर 94 धावांनी मात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *आज भारताची लढत श्रीलंकेसोबत, भारत यापूर्वीच उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - संशय* https://storymirror.com/read/story/marathi/4yp3ta6e/snshy/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *निरनिराळ्या रोगांचे जंतू कसे ओळखतात ?* 📙 अनेक प्रकारचे जीवजंतू आपल्या स्वभोवतालच्या पर्यावरणात असतात. काही आपल्या शरीरातही असतात. यात काही रोगकारक तर काही अपाय न करणारे असतात. जीवजंतूंचे जीवाणू, विषाणू, एकपेशीय व बहुपेशीय परजीवी जंतु, रिकेटशीये असे अनेक प्रकार असतात. या जंतूंमुळे अनेक रोग होतात. कोणत्या जंतूपासून रोग झाला आहे हे ओळखण्यासाठी प्रयोगशाळेत तपासण्या उपलब्ध आहेत. जंतूंचा आकार, त्याच्या पेशीतील व पेशीच्या आवरणातील घटक, पेशीची रंग स्वीकारण्याची प्रवृत्ती, कृत्रिम माध्यमात त्यांची होणारी वाढ व या वाढीची वैशिष्ट्ये इत्यादी अनेक बाबींवरून वेगवेगळे जंतू ओळखू येतात. संडासवाटे बाहेर येणारे कृमी साध्या डोळ्यांनाही दिसतात व ओळखता येतात. जीवाणू सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तर विषाणू इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाखाली बघावे लागतात. जंतूंच्या हालचाल करण्याच्या पद्धतीवरूनही ते ओळखता येतात. रोग झाल्यानंतर रुग्णाची थुंकी (बेडका), लघवी, विष्ठा, रक्त, त्वचा इत्यादींची (रोगानुसार) तपासणी करतात व त्यातील जंतूंचा शोध घेतात. या नमुन्याचा सुरुवातीला काचपट्टीवर थर तयार करतात व नंतर या थरावर इओसीन, मेथीलीन ब्लू वा इतर रंगद्रव्याची क्रिया करतात. यामुळे जंतूंना त्यांच्या गुणधर्मानुसार रंग येतात. या काचपट्ट्यांची सूक्ष्मदर्शकाखाली तपासणी करून जंतू ओळखतात. काही वेळा कृत्रिम माध्यमांमध्ये जंतू वाढवतात व नंतर काचपट्टीवर उपरोक्त पद्धतीने तपासणी करतात. विषाणूंची तपासणी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाखाली करावी लागते. कारण ते फार सूक्ष्म असतात. काही वेळा जंतू सापडत नाहीत. त्यामुळे त्यांच्या विरोधात शरीराने तयार केलेली प्रतिद्रव्ये शोधून त्यांच्यानुसार जंतुसंसर्ग झाला होता वा नाही हे अनुमानाने ठरवले जाते. यासाठी रक्ताची तपासणी करतात. जंतू ओळखणे हे रोगनिदानासाठी, परिणामकारक उपचारासाठी अत्यंत आवश्यक असते; त्यामुळे वर सांगितलेल्या पद्धतींचे महत्त्व अजूनच वाढते. *डॉ. जगन्नाथ दीक्षितव डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेला पावसाळा जास्त महत्वाचा असतो *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *शिवाजी महाराजाच्या आईचे नाव काय होते ?* जिजाबाई 2) *भारताची प्रथम महिला लोकसभा अध्यक्ष कोण ?* मीरा कुमार 3) *भारताची प्रथम महिला राज्यपाल कोण ?* सरोजिनी नायडू 4) *भारताची प्रथम महिला IAS अधिकारी कोण ?* अण्णा जार्ज 5) *बांगलादेशचे चलन कोणते ?* टका *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  संतोष मानेलू ● मोहन भूमकर ●  साजिद शेख ●  अतुल बागडे ● अशोक इमनेलू ●  शंकर सोनटक्के ●  आबासाहेब उसकलवार ●  श्रीकांत पुलकंठवार ●  शिवाजी जिंदमवार ● मधुकर कांबळे ●  शंकर स्वामी ● व्यंकट चन्नावार ● नारायण वानोळे ● सुभाष इमनेलू ● अर्फत इनामदार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शिका-याने टाकलेल्या जाळ्यात पक्षांचा थवा सापडतो. प्रत्येक पक्षी त्यातून सुटका करण्याचा प्रयत्न करू लागतो. प्रत्येकाचे प्रयत्न त्या जाळ्याची पकड आधिक घट्ट करत जातात. परंतु सर्वच पक्षी एकत्रितपणे उडण्याचा प्रयत्न करतात तेंव्हा त्या जाळ्यासह उडून जातात. आपल्या आजूबाजूला संकटात सापडलेल्या मंडळींकडे न पाहता आपण आपल्या संकटापुरता विचार करू लागतो. तेंव्हा सारेच संकटाच्या गर्तेत जातो. पण सर्वांच्या हिताचा दृष्टीकोन ठेवून एकसंधपणे एकविचाराने जेंव्हा संकटाचा सामना करतो तेंव्हा संकटे पळून जातात. त्यामुळे माणसांनी एकत्र येणे, एका मंगल विचारांनी राहणे, एका महन्मधुर विचारांनी कार्यरत होणे हा यशामागचा मोठा मंत्र असतो.* *रामकृष्णांचा सहवास मिळाल्यावर नरेंद्राचे विवेकानंद होतात. विवेकानंदांच्या सानिध्यामुळे लंडनमधील एका शाळेची संचालिका असणारी मार्गारेट नोबेल ही भगिनी निवेदिता होते. गोपाळकृष्ण गोखले यांच्या सहवासामुळे मोहनदास गांधी यांचा महात्मा गांधी होण्याकडे प्रवास सुरू होतो. संतांचा म्हणजे चांगल्या माणसांचा सहवास आपले भ्रम दूर करून मन निर्मळ करतो. 'परिसाच्या संगे सोने झाला विळा' असे तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. नाही तर तुकारामांनीच म्हटले आहे,'कर्कशे संगती, दु:ख उदंड फजिती.'* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कबीर जीवन कुछ नहीं, खिन खारा खिन मीठ कलहि अलहजा मारिया, आज मसाना ठीठ। सारांश जीवन क्षणभंगूर आहे. क्षणापूर्वी ते होते अन क्षणानंतर ते असेल अशी कोणीही खात्री देवू शकत नाही. जीवनाची नश्वरता पटवून देताना महात्मा कबीर म्हणतात, जीवन म्हणजे काहीही नाही. या क्षणाला ते खारट अनुभव देत असेल तर दुसर्‍या क्षणी ते कडवटपणाला गोडीमध्ये बदलू शकते. जीवनाचा मधूर अनुभव देवु शकतं. जो वीरयोद्भा काल युद्धामध्वे आपलं नैपुण्य पणाला लावून बाजी प्राणपणाने लढून आपल्या बाजूने ओढून आणण्यामध्ये यशस्वी झाला म्हणून त्याचे सर्वत्र कौतुक सोहळे साजरे झाले. सर्वांनी जयमाला गळ्यात घालून त्याचा जय जयकार केला गेला. ज्याने काल मैदान मारले तो स्वतःच आज चितेवर स्मशानी निपचित अचेतन पडला आहे. मृत्यूने भल्याभल्यांना सोडलेले नाही. तिथे सामान्य जीवांचं काय खरं आहे. घारीने भक्ष्यावर झडप घालावी तशी काळ कोणत्याही क्षणी झडप घालू शकतो, म्हणून माणसानं आपल्या हाती जे काही आयुष्य शिल्तक राहिले आहे. त्याचा सदुपयोग करून घ्यायला हवा व जीवन सत्कारणी लावायला हवे , म्हणजे सत्कर्माच्या किर्तीने मृत्यू पश्चातही जीवनाचा परिमल दरवळत राहातो. मृत्यू साक्षात पुढ्यात उभा राहिला तरी त्याचे भय राहात नाही एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• काळजी केल्याने कोणतेच प्रश्न मिटत नसतात तर अनेक प्रश्न तुमच्यासमोर उभे टाकतात.त्या काळजीमध्ये तुमच्या आजच्या कामावर लक्ष नसल्यामुळे तुमचे काम निकृष्ट दर्जाचे होऊ शकेल.त्यामुळे तुम्ही अधिक काळजी करायला लागाल.त्यापेक्षा काळजी न करणे सर्वात मोठा शहाणपणा आहे.ज्याची तुम्हाला काळजी वाटते त्याकडे लक्ष न घालणे सगळ्यात चांगले.आजच्या कामात अधिक लक्ष घातले आणि मन लावून काम केले तर त्या कामात गढून जाल.चांगले काम झाल्याचे समाधान तर वाटेलच आणि काळजी पण दूर होईल.काळजी कोणतीही असो.आजची असो की उद्याची.तो काळ तुमच्या काळजीमुळे थांबणार का ? नाही ना.मग आपले मन प्रसन्न ठेवा.येणा-या आणि हाती असलेल्या कामात अधिक लक्ष घाला मग तुम्हाला तुमचे समाधान मिळेल.समाधान हे काळजीला उत्तम पर्याय आहे हे कधीही विसरु नका. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०. 💠🌹💠🌹💠🌹💠🌹💠 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मानवता हाच धर्म* एकदा *एका उंदराने हिरा* गिळला. हिऱ्याच्या मालकाने त्या *उंदिराला मारण्यासाठी* एका शिकाऱ्याला कंत्राट दिले. शिकारी जेव्हा त्या उंदिराला मारण्यास पोहचला तेव्हा *सगळे उंदिर एक घोळका* करून एका दुसऱ्यावर *चढून दाटीवाटीने* बसले होते, पण एक उंदिर त्यांच्यापासून *वेगळा बसला* होता. शिकाऱ्याने सरळ जाऊन त्या वेगळ्या बसलेल्या त्याच *उंदिराला पकडले ज्याने हिरा गिळला होता.* हिरामालक आश्चर्यचकित झाला त्याने शिकाऱ्यास विचारले, तुम्ही हजारो उंदरातून ज्याने हिरा गिळलाय त्याच *उंदराला कसे काय ओळखले?* शिकाऱ्याने उत्तर दिले खूप सोपं काम होत, *जेव्हा मूर्ख धनवान बनतो तेव्हा तो इतरांशी संपर्क तोडतो..!* आयुष्यात *धन, दौलत, ऐश्वर्य, संपत्ती,नाव आणि सगळं काही कमवा* पण *आपण ज्या समाजात वाढलो, जगलो, मोठे झालो, त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो.* *आपण ह्या* *समाजामुळेच मोठे झालो हे कधीच विसरू नका..* *माणसे जोडा🏻मानवता हाच धर्म* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 05/07/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९७५- 'देवी' या रोगाचे भारतातून समूळ उच्चाटन झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जाहीर केले. १९९६- संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार डॉ ए पी जे अब्दुल कलाम व अवकाश आयोगाचे सदस्य एन. पंत यांना 'आर्यभट्ट पुरस्कार'जाहीर २००४ - इंडोनेशियात प्रथमतः राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणुका. २००६ - उत्तर कोरियाने प्रतिबंधांना न जुमानता नोडाँग-२, स्कड व तेपोडाँग-२ ही क्षेपणास्त्रे प्रक्षेपित केली 💥 जन्म :- १८८२ - हजरत इनायत खान, शास्त्रीय गायक. १९१६ - आर्चिक वेंकटेश गोपाळकृष्ण, कवि, वक्ते. धारवाड मध्ये. १९१६-के. करूणाकरन,केरळचे माजी माजी मुख्यमंत्री १९४६-रामविलास पासवान,केंद्रीय मंत्री 💥 मृत्यू :- १६६६ - आल्बर्ट सहावा, बव्हारियाचा राजा. १९४५ - जॉन कर्टीन, ऑस्ट्रेलियाचा १४वा पंतप्रधान. २००४ - ह्यू शियरर, जमैकाचा पंतप्रधान. २००५-बाळू गुप्ते,लेग स्पिन गोलंदाज *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *निर्मला सीतारामन आज मांडणार अर्थसंकल्प, आर्थिक सर्वेक्षणात विदेश व्यापार तोटा जीडीपीच्या २.६ टक्के म्हणजे ४.९४ लाख कोटी असल्याचे नमूद आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *पावसाळा सुरू झाल्यानंतरही अर्धा महाराष्ट्र तहानलेलाच; अनेक ठिकाणी तीव्र पाणीटंचाई* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *जीवन सरल’ पॉलिसीची विक्री बंद करा, सुप्रीम कोर्टात याचिका, ग्राहकांची लूट होत असल्याचा आरोप, गुंतवणुकदारांना सुजाण करण्याचे काम करणाऱ्या मुंबईतील ‘मनीलाईफ फौंडेशन’ने केलेली ही याचिका* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *बोरीवली पश्चिमेतील शिपोली येथे एकेकाळी डम्पिंग ग्राउंड असलेल्या मैदानावर तब्बल साडेचार एकर परिसरातील अटल स्मृती उद्यानाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत उद्घाटन.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *वैद्यकीय पदवी प्रवेशाच्या मूळ कागदपत्र पडताळणीची मुदत वाढविली; नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांनाही आणखी एक संधी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबई : राज्यात सध्या आठ अनुसूचित जमाती जात पडताळणी प्रमाणपत्र कार्यालये असून आणखी पाच कार्यालये निर्माण करण्यासाठी विभागाने मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिल्या.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *ICC World Cup 2019 : पाकिस्तानपुढे अशक्यला शक्य करण्याचे आव्हान, आज बांगलादेशविरुद्ध निर्णायक लढत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *विशेष सूचना - चिखलवाडी नांदेड येथील सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ञ अविनाश अमृतवाड यांची निरोगी राहण्यासाठी दिनचर्या या विषयावर आज डी. डी. सह्याद्री वाहिनीवर सकाळी 08 ते 09:30 या वेळांत मुलाखत प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - आठवण गावाची* https://storymirror.com/read/story/marathi/li2r4x05/aatthvnn-gaavaacii/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🦅 *पक्षी केव्हा स्थलांतर करतात ?* 🦅 रोटी, कपडा और मकान या मनुष्यप्राण्याच्या मूलभूत गरजा मानल्या जातात. यातला कपडा ही केवळ मनुष्यप्राण्याचीच गरज आहे. पण रोटी व मकान यांच्या गरजा मात्र प्राणिसृष्टीच्या प्रत्येक सदस्याला भासतात. त्यामुळे त्यांची जिथे चांगली सोय होईल तिथेच जास्तीत जास्त वास्तव्य करण्याकडे प्रत्येक प्राण्याचा कल असतो. तो प्रदेश हा त्या प्राण्याचा नैसर्गिक अधिवास बनतो. त्या क्षेत्रात त्याला मुबलक अन्न मिळतं, पाण्याची सोय होते, राहण्याची गुहा मिळतात किंवा घरटी बांधता येतात. आपलं पुनरूत्पादन करून पुढची पिढी जन्माला घालण्यासाठी सर्व प्रकारे योग्य वातावरण लाभतं. आपला कळप वाढवता येतो. पक्षी हे प्राणीसृष्टीचाच अविभाज्य भाग असल्यामुळे त्यांनाही हे लागू पडतं. परंतु या अधिवासातील पर्यावरण सतत तसंच राहत नाही. ऋतुमानानुसार त्यात फरक पडत जातो. तापमान बदलतं. पावसाचं प्रमाण कमी जास्त होतं. फळांचाही हंगाम असतो. तो ओसरला की तीही मिळेनाशी होतात. किडामुंगीही या बदलत्या पर्यावरणाला अनुसरुन आपल्या बिळात गडप होण्याची धडपड करतात. अन्नाची चणचण भासू लागते. तापमानही सुसह्य राहत नाही. अशा परिस्थितीला तोंड देत तगून राहण्यासाठी काही व्यवस्था करावी लागते. अशा वेळी ते स्थलांतर करतात. तरीही या स्थलांतरासाठी इतर काही घटना घडण्याची आवश्यकता भासते. पर्यावरण प्रतिकूल होत चाललं की पक्ष्यांच्या शरीरात काही विशिष्ट संप्रेरकांचा स्त्राव होऊ लागतो. तो त्यांना उडत जात दूरचा पल्ला गाठण्यासाठी आवश्यक ती प्रेरणा आणि ताकद देतो. तसंच हा दूरचा पल्ला गाठण्यासाठी शरीरही बळकट करावं लागतं. दीर्घ काळपर्यंत उडत राहण्यासाठी स्नायूंना बळकटी यावी लागते. त्यासाठी जेव्हा अन्न मुबलक प्रमाणात मिळत असतं तेव्हा ते खाउन शरीर लठ्ठ करावं लागतं. चरबीचा साठा करावा लागतो. तो पर्याप्त झाल्याशिवाय स्थलांतर करता येत नाही. बहुतांश पक्षी स्थलांतर करताना सहा ते आठ हजार मीटर उंचीवरुन उडत राहणं पसंत करतात. कारण त्या उंचीवरचं घसरलेलं तापमान सतत उडत राहण्यामुळं शरीरात जी उष्णता निर्माण होते तिचा निचरा करण्यासाठी उपयोगी पडतं. तसंच पक्षी एकेकटे कधीच स्थलांतर करत नाहीत. त्यांचा कळपच्या कळप या प्रवासावर निघतो. काही पक्षी तर हजारो किलोमीटर दूरवरच्या तात्पुरत्या अधिवासाच्या प्रदेशात स्थलांतर करतात. तो आपल्या विणीच्या हंगामासाठीही उपयुक्त आहे याची खातरजमा त्यांनी करून घेतलेली असते. त्याचा शोध त्यांनी पूर्वीच घेतलेला असतो व तिथं जाण्याची वाटही त्यांच्या आठवणीत साठवून ठेवलेली असते. त्यामुळं नेहमीच्या नैसर्गिक अधिवासातली परिस्थिती प्रतिकूल बनली, शरीरातल्या चरबीचं प्रमाण पुरेसं वाढलं, अंगात संप्रेरकांचा पाझर पर्याप्त झाला आणि सगळ्या कळपाची तयारी झाली की पक्षी स्थलांतर करतात. *बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *Health is wealth.* (चांगले आरोग्य हीच खरी संपत्ती आहे.) *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *लोणार सरोवर कोणत्या राज्यात आहे ?* महाराष्ट्र 2) *दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे ?* जम्मु काश्मीर 3) *चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे ?* उडीसा 4) *सांभर सरोवर कोणत्या राज्यात आहे ?* राजस्थान 5) *वुलर सरोवर कोणत्या राज्यात आहे ?* जम्मू काश्मीर *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  डॉ. मनोज तानुरकर ●  गंगाधर कांबळे ●  गिरीश कहाळेकर ●  संतोष शेळके ●  फारुख शेख ●  नरेश शिलरवार ●  अजय चव्हाण ●  गजानन बुद्रुक ● बालकिशन कौलासकर ● रमेश अबुलकोड ● किशन कवडे ● सुधाकर चिलकेवार ● बबलू दबडे ● परमेश्वर अनिल कवडेवार ● सुदर्शन पाटील ● मोतीराम तोटलोड ● नागनाथ भत्ते ● मारोती कदम ● अनिल गायकांबळे ● चक्रधर ढगे ● सुभाष कुलकर्णी ● राजरेड्डी बोमनवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वत:वर खुश असणा-यांना लोक खूप घाबरतात. त्यांना या लोकांबद्दल खूप आसूया वाटते. सर्वसामान्य माणसे जगात सर्वाधिक नाराज जर कोणावर असतील, तर ती स्वत:वरच असतात. त्यांच्या हातुन चुका होतात. कधी कधी तर त्याच त्याच चुका परत परत होतात. नियतीचे फासे सततच असे पडत राहतात, की सारखेच हस्यास्पद व्हायची वेळ यावी. इतरांच्या हातात कायम राजे, एक्के आणि यांच्या हातात दुर्री-तिर्री, हे तर नेहमीचेच. यांनी चुका सुधारायच्या ठरविल्या तरी पटापट यांना त्या सुधारता येत नाही. त्याच त्याच बाॅलवर परत परत विकेट जात राहते.* *काय केले म्हणजे आपल्याला प्रतिष्ठा मिळेल ? लोक आपल्याला महत्वाचे आणि सन्माननीय समजतील? याचा विचार करण्यात यांचे तासन् तास जातात. तरीही त्यांना असाच निष्कर्ष काढावा लागतो, की अजून आपल्याला खूपच मेहनत करावी लागेल. आणि मग स्वत:ला दोष देत, स्वत:ला सुधारण्याचा पुन:पुन्हा प्रयत्न करत ते जगत राहतात. अशा खचलेल्या आणि जगाच्या गणितात हुकलेल्या लोकांनी सगळा परिसर भरलेला असताना जर एखादा नखशिखांत स्वत:वर खुश असेल तर जगाला त्रास होणारच.* *"परंतु जो स्वत:वर प्रेम करीत नाही, त्याच्यावर जग प्रेम करीत नाही."* संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• नागिन के तो दोये फन, नारी के फन बीस जाका डसा ना फिर जीये, मरि है बिसबा बीस। सारांश महात्मा कबीर व्यभिचारी व दुराचारी स्त्री-लंपटाना वरील दोह्यातून सचेत करतात. सापिनीला तर केवळ दोनच दात असतात. तिचा दंश झाला तर वैद्याकडून विष उतरवून टाकता येईल. परंतु स्त्रिला वीस दात असतात. तिचा दंश ज्याला झाला त्यातला कोणीही जीवित सुरक्षित राहू शकत नाही. तिचा दंश जर वीस लोकांना झाला तर वीसचे वीस मरून जातील. काम भावना सीमित असली पाहिजे. तिचं संतुलन राखता आलं पाहिजे. काम भावनेचं संतुलन बिघडलं की ती माणसाच्या आवाक्यात राहात नाही. ती त्याला मन मानेल तशी नाचवते. परिणाम स्वरूप माणूस अधःपतित होतो. लोक लज्जेचा , हेटाळणीचा विषय होतो. मग ती ईश्वरांची रूप मानलेली पात्र असोत की सामान्य जण साबुत राहात नाहीत. शंकर , इंद्र, चंद्र, रावणाचे चारित्र्य या माया मोहिणीने डागाळून टाकले. तिथं सामान्यांची काय बात घेऊन बसला आहात. यावर चांगदेवांच्या पुढील ओळी फारच बोलक्या आहेत. वासनेच्या मागे नको धावू मना पहा त्या रावणा काय झाले चंद्रा पडली भगे इंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा अगदी अलीकडे समाजानं ज्यांना डोक्यावर घेतलं होतं अशा संत म्हणवून घेणार्‍यांनी स्व-संतुलन हरवून वासनेच्या आहारी जावून आज ते गजाआड दुर्दशेचे भोग भोगत आहेत. भल्या भल्यांची मायेनं अशी वासलात लावून टाकलीय. मात्र ज्यांनी स्वतः वरील नियंत्रण ढळू दिलं नाही. अशी पात्रंही कमी नाहीत की जी अनुकरणास पात्र ठरलीत. शुक, भीष्म हे निश्चयाचे महामेरूच होते. जगद्गुरू तुकोबारायही माया मोहात गुरफटलेल्या जीवांना पाहून हताश होवून म्हणतात बुडती हे जण न देखवे डोळा । येतो कळवळा म्हणोनिया । तेव्हा माणसानं आपण अवहेलनेचे धनी होणार नाहीत . याची जाणीव ठेवून वागण्याचा प्रयत्न करावयास हवा. तुकोबांनी सांगितलेलं 'पराविया नारी माऊली समान...' हे सुत्र कायम जपलं जपायला हवं. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• पैसा काहीवेळी कामाला येतो आणि त्यातून उपभोगण्यासाठी वस्तू खरेदी करता येतात परंतु आशीर्वाद हा आयुष्यभर पुरत असतो आणि कोणत्याही संकटातून दूर करण्यासाठी देवासारखा पाठीशी असतो... म्हणून कुणाच्या पैशाची अपेक्षा करु नका तर कुणाच्या आशीर्वादाची अपेक्षा करा यातच खरे समाधान आहे.... ©व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद...९४२१८३९५९०. 🌹🌱🌹🌱🌹🌱🌹🌱🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बिरबलाची युक्ती* एकदा दरबार चालू असताना बादशहाच्या मनात एक विचार आला. त्याने दरबालातील सर्व कामे बाजूला ठेऊन बिरबलला विचारले, बिरबल एखाद्या नालायक माणसाशी गाठ पडली तर काय करावे? बिरबल खूप कामात होता. कामाच्या वेळी बादशाहाने असा विचित्र प्रश्न विचारलेले बिरबलला आवडले नाही. परंतु काहीही न बोलता त्याला गप्प बसून आपले कामही करता येण्या सारखे नव्हते. “महाराज आपल्या या प्रश्नाचे उत्तर आपल्याला ह्याच वेळी मिळेल. बिरबल दरबारातील आपल काम उरकून घरी गेला आणि आपल्या एका मित्राला घरी बोलवलं. तो म्हणाला उद्या तू माझ्या बरोबर बादशहाच्या दरबारात ये. बादशहा तुला प्रश्न विचारतील तू काही बोलू नकोस. बादशहाने कितीही प्रयत्न केले तरी तू तोंड उघडू नकोस. घरी आल्यावर मी तुला इनाम देईन. दुसऱ्या दिवशी मित्राला घेऊन बिरबल बादशहाच्या दरबारात गेला. बादशहाला मुजरा करून तो म्हणाला खाविंद आपल्या कालच्या प्रश्नाच उत्तर माझा हा मित्र देईन. विचारा त्याला प्रश्न. बादशाहने त्याला प्रश्न विचारला एखादया नालायक माणसाशी गाठ पडली तर शहाण्या माणसाने काय करावे? बिरबलचा मित्र काही न बोलता चुळबुळ करत राहिला. बादशहाने आपला प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला. परंतु बिरबलचा मित्र गप्पच. शेवटी बादशहा चिडला तो बिरबलाला म्हणाला, काय मूर्ख पणा चालवला आहे. तुझा मित्र तर काहीच बोलत नाही. बिरबल नम्र पणे म्हणाला खाविंद, माझ्या मित्राने आपल उत्तर दिले आहे. नालायक माणसाबरोबर गाठ पडली तर गप्प राहावे. बादशहाला उत्तर मिळाले. परंतु बिरबलने आपलयाला नालायक ठरविल्या मुळे तो मनातून खजील झाला. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 04/07/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९९९-लष्कराच्या१८व्या बटालियन ने कारगिलमधील द्रास सेक्टर मधील टायगर हिल्स हा लष्करीदृष्ट्या महत्त्वाचा टापू घुसकरांच्या तावडीतून मुक्त केला. १९९७-नासाचे 'पाथफाईंडर' हे मानवविरहीत यां मंगळावर उतरले. १७७६ - अमेरिकेने स्वतःला इंग्लंडपासून स्वतंत्र जाहीर केले. 💥 जन्म :- १८९८ - गुलजारीलाल नंदा, भारतीय पंतप्रधान. १९३० - जॉर्ज स्टाइनब्रेनर, अमेरिकन उद्योगपती. १९४३ - हराल्डो रिव्हेरा, अमेरिकन पत्रकार. 💥 मृत्यू :- १९०२ - स्वामी विवेकानंद, भारतीय तत्त्वज्ञ. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या घटनेनुसार हंगामी अध्यक्षपदी काँग्रेसचे सर्वात जेष्ठ सरचिटणीस मोतीलाल व्होरा यांची झाली निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *'दूध अन् अन्नभेसळीचा 'फैसला ऑन दी स्पॉट', राज्यातील पहिल्या "मोबाईल फूड टेस्टींग लॅब"चा शुभारंभ राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले.* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *नवी दिल्ली : डबघाईला आलेल्या बीएसएनएल आणि एमटीएनएल या सरकारी दूरसंचार कंपन्यांसाठी ७४ हजार कोटी रुपयांच्या बेलआऊट पॅकेजवर सरकार विचार करीत आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *देशद्रोहाचा कायदा गरजेचा, तो रद्द करणार नाही, नरेंद्र मोदी सरकारचं ठाम उत्तर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *Budget 2019: यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प बांधकाम क्षेत्रासाठी असणार 'स्पेशल'; 2022 पर्यंत सर्वांना घरं देण्याचं उद्दिष्ट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *भारतीय संघातील मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडूचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *ICC World Cup 2019 : न्यूझीलंडवर विजय मिळवत इंग्लंड उपांत्य फेरीत दाखल, इंग्लंडचा 119 धावांनी दणदणीत विजय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - मुलगी* https://storymirror.com/read/story/marathi/ah72vg9p/mulgii/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *डायनासोरचा विनाश केव्हा झाला ?* पृथ्वीचं पर्यावरण सतत बदलत असतं. निसर्गाचा तो नियमच आहे. सजीवसृष्टीवर या बदलांचा प्रभाव पडतच असतो. त्यामुळे या बदलांशी मिळतंजुळतं घेत तगून राहण्याची क्षमता या सजीवांच्या प्रजातींमध्ये असते त्यांची वाढ होते, विकास होतो. ती प्रजाती तगडी होते. नैसर्गिक साधनसंपत्तीचा जास्त वापर तिच्याकडून होतो. सहाजिकच तुलनेने दुबळ्या असणाऱ्या प्रजातींची हळूहळू पिछेहाट होत कालांतराने ती प्रजाती नष्ट पावते. आजवर अशा अनेक प्रजातींचा उदय झाला, विकास झाला, काही काळ या पृथ्वीतलावर नांदल्या आणि हळूहळू विनाश पावल्या. आपण ज्या मनुष्यजातीत मोडतो त्या होमो सपायन्स या प्रजातीचा उदय होण्यापूर्वीही होमो इरेक्ट्स, निआनडर्थल वगैरे मानवासारख्या प्रजाती या भूमितलावर नांदत होत्या. पण त्या होमो सपायन्सइतक्या पर्यावरणाशी जुळवून घेण्याच्या बाबतीत तगड्या नसल्यामुळे विनाश पावल्या. निरनिराळ्या प्रजातींची उत्क्रांती करण्याचे असे प्रयोग निसर्गाकडून नेहमीच होत आले आहेत. त्यातले जे यशस्वी झाले त्या प्रजाती आज आपल्याला सभोवार दिसतात. जे प्रयोग अयशस्वी झाले त्या प्रजाती आता नष्ट झाल्या आहेत. डायनोसॉर ही अशीच एक प्रजाती होती. तिचा उदय निसर्ग नियमांनुसार झाला. तब्बल साडेसोळा कोटी वर्ष ती प्रजाती या भूमितलावर नांदली. त्या वेळेची ती सर्वात प्रबळ प्रजाती होती. पण कालांतराने तिचा विनाश झाला तो मात्र उत्क्रांतीच्या नियमानुसार झाला नव्हता. एका विलक्षण अपघातापोटी ती दुर्घटना झाली. अवकाशातून एक अजस्त्र लघुग्रह पृथ्वीवर येऊन आदळला. आज जिथे मेक्सिको आहे साधारण त्या प्रदेशात हा अाघात झाला. तो आघात इतका भयानक होता की तो लघुग्रह पृथ्वीचं कवच फोडून तिच्या पोटात घुसला. त्यातून मोठ्या प्रमाणावर धूळ, कचरा आकाशात फेकला गेला, आगी लागल्या, ज्वालामुखींचे उद्रेक झाले, त्सुनामी आली, प्रचंड वादळं झाली, तीव्र अाम्लवर्षा कोसळली. पृथ्वीच्या पर्यावरणात उलथापालथ होत सल्फ्युरिक आम्ल, नायट्रिक आम्ल यांचं प्रमाण वाढलं. स्फोटासारख्या त्या आघातामुळे उष्णतेची लाट पसरली. तिच्या मार्‍यात सापडलेले सजीव वाचू शकले नाहीत. त्याचबरोबर आकाशात पसरलेल्या धुळीच्या आवरणामुळे सूर्यप्रकाश अडवला गेला. पृथ्वीवरचं सरासरी तापमान घसरलं. वनस्पतींना वाढीसाठी सूर्यप्रकाशाची अत्यंत गरज असल्यामुळे त्यांचा विनाश होत गेला. पर्यावरणातल्या या अचानक आलेल्या बदलांशी मिळतेजुळते घेण्यासाठी आवश्यक तितका वेळही मिळाला नाही. त्यामुळे त्यात तगून राहण्याची क्षमता असलेले सजीवही नष्ट होत गेले. या अस्मानीसुलतानीपुढे डायनासाॅरसारख्या तगड्या प्रजातीचा टिकाव लागला नाही. ही घटना धरतीच्या इतिहासातील क्रेटेशियस कालखंडाच्या अखेरीस आणि टर्शरी कालखंडाच्या आरंभाच्या सुमारास म्हणजे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी झाली. *बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जो संपुर्ण वर्षाचा विचार करतो,तो धान्य पेरतो. जो पुढील दहा वर्षाचा विचार करतो, तो झाडे लावतो..जो आयुष्यभराचा विचार करतो, तो माणूस जोडतो..आणि जो माणसं जोडतो, तोच आयुष्यात यशस्वी होतो.... *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *कार्यक्रमाच्या शेवटी वंदे मातरम गाण्याची प्रथा कोणी सुरू केली ?* विष्णू दिगंबर पळसकर 2) *राष्ट्रगीत प्रथम कोणत्या भाषेत लिहिले गेले ?* बंगाली 3) *'चले जाव' ही घोषणा कोणी दिली ?* महात्मा गांधी 4) *'आराम हराम है' ही घोषणा कोणी दिली ?* पं जवाहरलाल नेहरू 5) *'शिका,संघटित व्हा,संघर्ष करा ' ही घोषणा कोणी दिली ?* डॉ बाबासाहेब आंबेडकर *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● बंडू अंबटकर ● बंडोपंत लोखंडे ● गोविंद कवळे ● वृषाली सानप काळे ● कमलाकर जमदाडे ● प्रदीप यादव ● अविनाश खोकले ● श्याम उपरे ● उदय स्वामी ● प्रभाकर शेळके ● परमेश्वर म्हेत्रे ● श्रीधर जोशी ● नवनाथ मुसळे ● राजकुमार बिरादार ● बालाजी मंडाळेकर ● गणेश मंडाळे ● प्रकाश भादेकर ● शहेबास खुरेशी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कुटुंब संस्थेचा मध्यवर्ती केंद्रबिंदू म्हणजे घर. घराचे आकर्षण फक्त मानवालाच असते असे नाही, तर पहाटेपूर्वी आकाशात भरारी घेतलेले पक्षी, माळरानावर चरण्यासाठी गेलेली जनावरे सायंकाळी आपल्या घराकडे वळतात. घर हे माणसांइतकेच पशुपक्षी, जनावरांना हक्काचा निवारा वाटते. पूर्वीची घरे एकत्र कुटुंबपद्धतीला सामावून घेणारी होती. दोन-तीन पिढ्यांचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र रहायचे. लहान मुला-मुलींच्या किलबिलाटाने घराचे गोकुळ होऊन जात असे. घराच्या भिंती फक्त दगड मातीच्या नव्हत्या, तर त्या प्रेम, जिव्हाळ्याने रसरसलेल्या होत्या. नातेसंबंध नुसते नातेसंबंध नव्हते, तर नात्यात मायेची ऊब होती.* *आज वृद्धांच्या समस्या 'आ' वासून उभ्या आहेत. मुलं परमुलखात गेल्यामुळे एकाकी पडलेली वृद्ध मंडळी एका बाजूला दिसतात, तर दुसरीकडे घरात मुलं, सुना, नातवंडे असूनही अवहेलनेने भरलेले एकाकीपण जगणारी वृद्ध मंडळी दिसत आहेत. समृद्ध संसारातील एक अडगळ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातंय. मुला-लेकरांच्या सुखासाठी तुफान होऊन झगडलेल्या माता पित्यांना 'थकलेल्या तुफानाला कुणी घर देता का घर...?' असं म्हणत भटकायची वेळ येते. अशी अनेक झुंजलेली तुफानवादळे रस्त्याकडेला, पुलाखाली, किंवा वृध्दाश्रमात नशिबाला दोष देत कण्हत पडलेली दिसतात.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जहाँ न जाको गुन लहै, तहाँ न ताको ठाँव । धोबी बसके क्या करे, दीगम्बर के गाँव ॥ अर्थ : जिथे आपल्याला पात्रता व योग्यतेनुसार गुण व कौशल्य दाखवण्यासाठी कार्य कर्तृत्त्व करण्यास वावच नसेल तिथे राहून काय हशील होणार आहे ? तिथे राहाणे व्यर्थच आहे. ही बाब पटवून देताना महात्मा कबीर म्हणतात की, ज्या गावात सर्व दिगंबरच (कपडे विरहित लोक) राहातात तिथे राहून धोब्याला काय उपयोग होणार आहे ? कला ही जीवनाची सावली मानली जाते. 'कलेनेच माणसाची ओळख । एरव्ही कोण पुसतो आणिक ? तुम्ही आहात राव की रंक । आता कोणी पुसेना ।' असे राष्ट्रसंत तुकडोजी ग्रामगीतेत म्हणतात. कलावंतानं आपली कला जीवनाचा आधार केली व कलेचा अहंकार अंगी न बाळगता तिला विनयशीलतेची जोड दिली की सर्व जग आपलंस होवून जातं. आपलं कसब व कौशल्य अशा ठिकाणी दाखवायला हवं की ते आपल्या जीवनाला स्वावलंबनाकडे नेईल. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जेव्हा आपली वेळ वाईट असते तेव्हा आपल्याकडे लोक पाठ फिरवतात आणि जेव्हा आपली वेळ चांगली असते तेव्हा सगळेच जवळ येतात. परिस्थिती कशीही असली तरी प्रत्येकवेळी सुखदुःखात जे आपल्या पाठीशी असतात आणि आपण प्रत्येकवेळी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता पाठीशी असतो तीच खरी माणुसकी असते आणि तीच खरी अंत:करणातून एकमेकांबद्दलची खरी आत्मियता असते. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *रेघ लहान झाली.* अकबर आणि बिरबल एकदा फिरायला गेले होते. चालता चालता बादशाह अचानक थांबला. बादशहाने वाळूत बोटाने एक रेघ मारली आणि बिरबलाला विचारले. “ही रेघ पाहिलीस? ही रेघ लहान करायची, पण पुसायची नाही, जमेल तुला?” बिरबलाने एकवेळ बादशहाकडे व एकवेळ रेघेकडे पाहिले.  थोडा विचार केला. पटकन खाली वाकला. रेघेशेजारी दुसरी लांब रेघ मारली आणि म्हणाला, “झाली की नाही महाराज तुमची रेघ लहान?” बादशाह चकित होऊन पाहतच राहिला! *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 03/07/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *महाकवी कालिदास जयंती* 💥 ठळक घडामोडी :- १८५२ - महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली. २००४ - थायलंडची राजधानी बँगकॉकची भुयारी रेल्वे सुरू. २००६ - २००४ एक्स.पी.१४ हा लघुग्रह पृथ्वीच्या जवळून (साधारण चंद्राइतक्या अंतरावरून) गेला. 💥 जन्म :- १९०९ - भाऊसाहेब तारकुडे, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, कायदेतज्ज्ञ. १९२४ - सेल्लप्पन रामनाथन, तमिळवंशीय सिंगापुरी राजकारणी, सिंगापुराच्या प्रजासत्ताकाचा ६वा राष्ट्राध्यक्ष. १९८० - हरभजनसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १३५० - संत नामदेव (पंढरपूर येथे समाधिस्थ). १९१८ - महमद पाचवा, ओट्टोमन सम्राट. १९३३ - हिपोलितो य्रिगोयेन, आर्जेन्टीनाचा राष्ट्राध्यक्ष. १९३५ - आंद्रे सिट्रोएन, फ्रेंच अभियंता. १९९६-कुलभूषण पंडित तथा राजकुमार हिंदी चित्रपट अभिनेता *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई : जुन्या पेन्शन योजनेत बाबत नवीन अध्यादेश काढून शिक्षकांना पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूणमधील तिवरे धरण फुटले; २३ जण वाहून गेल्याची भीती, एनडीआरएफची टीम दाखल, बचावकार्य सुरु* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *मुंबई : राज्यात सात नवीन सरकारी वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यास केंद्र सरकारने दिली मंजुरी, उस्मानाबाद, परभणी, रायगड, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत दिली माहिती.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नवी दिल्ली - लोकसभेत भारतीय वैद्यकीय परिषद सुधारणा विधेयक मंजूर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *बीड : थकीत वेतनासाठी परळी नगर पालिकेच्या 250 कंत्राटी सफाई कामगाराचे काम बंद आंदोलन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *बर्मिंगहॅम : रोहित शर्माचे शतक आणि दमदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने बांगलादेशला 28 धावांनी पराभूत केले. या विजयासह भारताने उपांत्य फेरीत केला प्रवेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *ICC World Cup 2019 : आज इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार सामना* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - वाढदिवसाची भेट* https://storymirror.com/read/story/marathi/989bz200/vaaddhdivsaacii-bhett/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌧 *पाऊस केव्हा पडतो ?* 🌧 पाऊस आपल्याला हवाहवासाही वाटतो आणि नकोनकोसाही वाटतो. वैशाखवणव्यापायी धरती सुकून गेलेली असली, पावसाविना डोळ्यांना पाणी येऊ लागलं की आपण 'येरे येरे पावसा' अशी त्याची आळवणी करतो. आणि तोच पाऊस रुद्रावतार धारण करत आला की नको नको रे पावसा, असा धिंगाणा म्हणून त्याला दटावतोही. जगाच्या पाठीवर आपल्या उपखंडांसारखे इतरही काही प्रदेश आहेत की जिथलं सारं जीवनचक्र, सारं अर्थकारण पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलं तरी तो वर्षभरातून तीन चार महिनेच आपली हजेरी लावून जातो. उलट काही प्रदेशांत वर्षभर त्याची उपस्थिती असते. त्यामुळं पाऊस केव्हा पडणार आहे, याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं असतं. धरतीवर असलेलं एकूण पाणी कायम असतं. त्यात वाढही होत नाही की घटही होत नाही. पण त्याचं सतत अवस्थांतर सुरू असतं. समुद्र तसंच नद्या नाले यांच्यामधलं पाणी प्रदूषित झालेलं असतं. सूर्याच्या उष्णतेनं त्याची वाफ होते. तापलेल्या पाण्याच्या जवळ असलेली हवाही तापते. तापलेली हवा आणि वाफ हलकी असल्यामुळे ती आकाशात वरवर जाते. वर गेल्यावर तिथलं तापमान थंड असतं. त्यामुळे त्या वाफेचं पाण्याच्या छोट्या छोट्या थेंबामध्ये अवस्थांतर होतं. हे थेंब हवेत तरंगत राहतात. वाफ आणि हे जलबिंदू मिळून ढग तयार होतात. वाऱ्याने हे ढग इकडेतिकडे फिरत राहतात. त्यांना थंड हवा लागली की त्यातल्या आणखी वाफेचे जलबिंदूंमध्ये अवस्थांतर होते. हे जलबिंदूही वेडेवाकडे फिरत असतात. एकमेकांवर आपटतात. त्यातले काही एकत्र येऊन त्यांचं आकारमान वाढतं. असे ते मोठे आणि जड झाले की तरंगू शकत नाहीत. जमिनीच्या दिशेने झेपावतात. वारे त्यातल्या काही बिंदूंना परत वरच्या दिशेने ढगांमध्ये ढकलतात. ही चढाओढ चालू राहत ते जलबिंदू आणखी मोठे होतात. आता ते हवेत तरंगू शकत नाहीत. जमिनीकडे खेचले जातात. पाऊस पडतो. हे पावसाचं पाणी शुद्ध झालेलं असतं. त्यातले प्रदूषण नाहीसे झालेले असतात. परत एकदा शुद्ध आणि गोड्या पाण्याचे साठे पूर्ववत होतात. असं हे जलचक्र अव्याहत चालूच असतं. उत्तर गोलार्धात विषुववृत्ताच्या जवळपास असणारा प्रदेश जास्त तापमानाचा असतो. जसजसं अधिकाधिक उत्तरेला जावं तसतसं तापमान घसरत जातं. त्यामुळे दक्षिणेकडून उबदार हवेचे झोत उत्तरेकडे आणि उत्तरेकडून थंड हवेचे झोत दक्षिणेकडे प्रवास करत असतात. त्यांच्या तापमानांमध्ये लक्षणीय फरक असल्यामुळे जिथं ते दोन एकमेकांना भिडतात तिथं ते एकमेकांमध्ये मिसळू शकत नाहीत. त्यांच्या सीमेवर फ्रंटल सिस्टम तयार होते. पुढे पुढे सरकत राहते. गरम हवा हलकी असल्यामुळे तिला पुढे पुढे येऊ पाहणाऱ्या थंड हवेच्या झोतावर चढावं लागतं. तसं झालं की ती थंड होते. तिच्यातल्या वाफेचं पाण्यात अवस्थांतर होऊन पाऊस पडतो. *बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?" या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्वभावातील गोडीने व जिभेवरील माधुर्याने माणसं जोडली जातात. *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'झेंडा उंचा रहे हमारा' हे झेंडागीत कोणी लिहिले ?* श्यामलाल गुप्त 2) *'खरा तो एकची धर्म' ही प्रार्थना कोणी लिहिली ?* साने गुरुजी 3) *'सारे जहाँ से अच्छा' हे गीत कोणी लिहिले ?* डॉ महम्मद इकबाल 4) *'बलसागर भारत होवो' ह्या गीताचे रचनाकार कोण ?* साने गुरुजी 5) *भारताचे दोन राष्ट्रगीते कोणते ?* जन गण मन , वंदे मातरम *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● विजय लंके ● सुनील रेगुलवाड ● श्रीराम पाटील ● कुलदीप महाराज ● बालाजी मुंडलोड ● उत्तमराव नरवाडे ● सविता सावंत ● संतोष नलबलवार ● दिगंबर माने ● साहेबराव कांबळे ● लक्ष्मीकांत गिरोड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *तसं पाहिलं तर आपल्यापैकी बहुतेकांचं जीवन साचेबद्ध असतं. घर आणि नोकरी किंवा घर आणि व्यवसाय अशा दोन विश्वांतलं आपलं जीवन. त्यामधील माणसांभोवती फेर धरणारं जगणं. आपण स्वत:साठी जगत असतो; परंतु आई-वडिल, भावंडे, पती-पत्नी आणि मुलं, मित्र-मैत्रिणी, सहकारी यांच्यासाठीही जगत असतो. शिकत असतो त्यावेळी उत्तम गुण मिळवून परिक्षा उत्तिर्ण होण्याचं स्वप्न असतं आपलं. शिक्षणानंतर स्वप्न असतं ते करिअरचं. नोकरी वा व्यवसायात स्थिरावण्याचं आणि त्यानंतर स्वत:च्या कुटुंबाचं, घराचं. लग्नाचं आणि मग मुला-मुलींना वाढवण्याचं. म्हटलं तर हे चक्रच. त्या-त्या काळातील आपली महत्वकांक्षा हे चक्र फिरवित असते.* *महत्वकांक्षा हे एक मानवी मूल्य आहे. विद्यार्जनासाठी, कर्तृत्वासाठी, स्वयंप्रेरणेसाठी ते आवश्यकच असते. महत्वाकांक्षा नसेल तर मग आपण कशाचा ध्यास घेणार आणि त्याच्या मागे धावणार? आपली इच्छा असो वा नसो, आपण स्पर्धेत ओढलो जातोच. महत्वाकांक्षा आपल्यामधील स्पर्धात्मकता वाढविते, कष्ट करायला प्रेरणा देते, चिकाटी निर्माण करते. निसर्गाकडून आपल्या प्रत्येकाला कमी'-आधिक प्रमाणात प्रतिभाशक्ती मिळालेली असते. वैयक्तिक जीवनात महत्वाकांक्षा जशी आवश्यक, तशी ती समाजजीवनातही गरजेची आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी, गांधीजींनी, नेहरूंनी देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्याची आकांक्षा बाळगली. देशवासियांना एकत्र करून त्यांनी त्याची पूर्ताताही केली. महत्वाकांक्षा समाजासाठी अशा प्रकारे उपयुक्त ठरते.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ⭐🔹🔹🔹🔹🔹🔹⭐ *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कबीर जीवन कुछ नहीं, खिन खारा खिन मीठ कलहि अलहजा मारिया, आज मसाना ठीठ। सारांश जीवन क्षणभंगूर आहे. क्षणापूर्वी ते होते अन क्षणानंतर ते असेल अशी कोणीही खात्री देवू शकत नाही. जीवनाची नश्वरता पटवून देताना महात्मा कबीर म्हणतात, जीवन म्हणजे काहीही नाही. या क्षणाला ते खारट अनुभव देत असेल तर दुसर्‍या क्षणी ते कडवटपणाला गोडीमध्ये बदलू शकते. जीवनाचा मधूर अनुभव देवु शकतं. जो वीरयोद्भा काल युद्धामध्वे आपलं नैपुण्य पणाला लावून बाजी प्राणपणाने लढून आपल्या बाजूने ओढून आणण्यामध्ये यशस्वी झाला म्हणून त्याचे सर्वत्र कौतुक सोहळे साजरे झाले. सर्वांनी जयमाला गळ्यात घालून त्याचा जय जयकार केला गेला. ज्याने काल मैदान मारले तो स्वतःच आज चितेवर स्मशानी निपचित अचेतन पडला आहे. मृत्यूने भल्याभल्यांना सोडलेले नाही. तिथे सामान्य जीवांचं काय खरं आहे. घारीने भक्ष्यावर झडप घालावी तशी काळ कोणत्याही क्षणी झडप घालू शकतो, म्हणून माणसानं आपल्या हाती जे काही आयुष्य शिल्तक राहिले आहे. त्याचा सदुपयोग करून घ्यायला हवा व जीवन सत्कारणी लावायला हवे , म्हणजे सत्कर्माच्या किर्तीने मृत्यू पश्चातही जीवनाचा परिमल दरवळत राहातो. मृत्यू साक्षात पुढ्यात उभा राहिला तरी त्याचे भय राहात नाही एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• काळजी केल्याने कोणतेच प्रश्न मिटत नसतात तर अनेक प्रश्न तुमच्यासमोर उभे टाकतात.त्या काळजीमध्ये तुमच्या आजच्या कामावर लक्ष नसल्यामुळे तुमचे काम निकृष्ट दर्जाचे होऊ शकेल.त्यामुळे तुम्ही अधिक काळजी करायला लागाल.त्यापेक्षा काळजी न करणे सर्वात मोठा शहाणपणा आहे.ज्याची तुम्हाला काळजी वाटते त्याकडे लक्ष न घालणे सगळ्यात चांगले.आजच्या कामात अधिक लक्ष घातले आणि मन लावून काम केले तर त्या कामात गढून जाल.चांगले काम झाल्याचे समाधान तर वाटेलच आणि काळजी पण दूर होईल.काळजी कोणतीही असो.आजची असो की उद्याची.तो काळ तुमच्या काळजीमुळे थांबणार का ? नाही ना.मग आपले मन प्रसन्न ठेवा.येणा-या आणि हाती असलेल्या कामात अधिक लक्ष घाला मग तुम्हाला तुमचे समाधान मिळेल.समाधान हे काळजीला उत्तम पर्याय आहे हे कधीही विसरु नका. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०. 💠🌹💠🌹💠🌹💠🌹💠 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चोरीची कबुली* एके दिवशी एक श्रीमंत व्यापारी बिरबलाकडे आला आणि म्हणाला, माझ्या घरी कोणीतरी चोरी केली आहे. माझे दागिने चोरले आहेत. माझ्या घरी दहा नोकर आहेत. त्यांच्यापैकीच कोणीतरी ते चोरले असल्याचा माझा संशय आहे. मी त्यांच्यापैकी सगळ्यांना विचारले पण त्यातील एकजणही कबूल झाला नाही. कृपा करून तुम्ही यातून काहीतरी मार्ग काढा. बिरबल त्या व्यापार्‍याच्या घरी गेला. त्याने त्या दहाही नोकरांना एकत्र बोलावले व त्यांना म्हणाला, की माझ्याकडे दहा जादूच्या काठ्या आहेत. त्या मी तुम्हाला देत आहे. या काठ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व काठ्या समान आहेत. मी त्या तुम्हाला देत आहे. आज तुमच्याकडे ठेवा व उद्या मला परत करा. ज्याने चोरी केली असेल, त्याची काठी रात्रीत एक इंचाने वाढेल. दागिने चोरणारा नोकर घाबरला. आपली चोरी पकडली जाईल म्हणून तो काठी एक इंचाने कापतो. त्याला वाटते की सकाळी ती परत एक इंचाने वाढेल व कुणाला काही कळणार नाही. दुसर्‍या दिवशी बिरबलाने नोकरांच्या हातातील काठ्या पाहिल्या. त्याला एका नोकराची काठी छोटी झाल्याचे आढळले. त्याच्याकडे बोट दाखवत बिरबल म्हणाला, 'हा नोकर चोर आहे. त्यानेच तुमचे दागिने चोरले.' शेवटी त्या नोकरानेही ते कबूल केले व त्या व्यापार्‍याचे दागिने परत केले. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 02/07/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- २००० - मेक्सिकोमध्ये ७० वर्षे पार्तिदो रेव्होल्युसियोनारियो इन्स्तित्युसियोनाल या पक्षाच्या सत्तेचा अंत होउन पार्तिदो ॲक्सियाँ नॅसियोनाल पक्षातर्फे व्हिसेंते फॉक्सची राष्ट्राध्यक्षपदी निवड. २००१ - ॲबिकोर स्वयंचलित हृदयाचे सर्वप्रथम आरोपण. २००२ - स्टीव फॉसेट हा उष्णहवेच्या फुग्याद्वारे पृथ्वीप्रदक्षिणा करणारा सर्वप्रथम व्यक्ती झाला. २०१० - काँगोच्या लोकशाही प्रजासत्ताकात ट्रकचा स्फोट होउन किमान २३० व्यक्ती ठार 💥 जन्म :- १८८० - गणपतराव बोडस, मराठी संगीत नाटकांतील गायक-अभिनेता १०२९ - अल-मुस्तांसिर, कैरोचा खलिफा. १८२१ - चार्ल्स टपर, ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान. १८६२ - विल्यम हेन्री ब्रॅग, नोबेल पारितोषिक विजेता इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ. १८७६ - विल्हेल्म कुनो, जर्मनीचा चान्सेलर. १८७७ - हेर्मान हेस, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन लेखक. 💥 मृत्यू :- १९२८ - नंदकिशोर बल, उडिया भाषेतील कवी, कादंबरीकार १९३२ - मनुएल दुसरा, पोर्तुगालचा राजा १९६३ - सेट बार्नेस निकोल्सन, अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ. १९९६ - राजकुमार, हिंदी अभिनेता *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* *जि प शाळा बिरसी* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मराठा समाजास शिक्षणात १२, तर नोकऱ्यांत १३ टक्के आरक्षण; विधिमंडळात सुधारणा विधेयक एकमताने मंजूर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *पावसाच्या धिंगाण्याने मुंबईकरांचे हाल; पालघरमध्ये नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, ठाण्यात संततधार* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *राहुल गांधींनीच राजीनामा मागे घ्यावा, या मागणीसाठी सुशीलकुमार शिंदे यांचीच आघाडी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबईतल्या ५०० फुटांच्या औद्योगिक, व्यापारी आणि निवासी गाळ्यांचा मालमत्ता कर माफ करण्याचे विधेयक आज विधान परिषदेत एकमताने झाले मंजूर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *आता कॉलेज मध्येच मिळणार लर्निंग लायसन्स; परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *ICC World Cup 2019: टीम इंडिया उपांत्य फेरीसाठी आज बांगलादेशविरुद्ध भिडणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : ऐन वेळी कच खाल्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या लढतीत वेस्ट इंडिजला पत्करावा लागला पराभव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - परतफेड* https://storymirror.com/read/story/marathi/ddi4xdrw/prtphedd/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• "म्हसवे'' च्या वटवृक्षाची महती सातारा जिल्ह्यातील म्हसवे (ता. जावळी) येथील वटवृक्षाचा "वंश‘ तब्बल अडीच एकर परिसरात विस्तारला असून, तो विस्ताराने आशिया खंडात दुसऱ्या क्रमांकाचा आहे. पाचवड-कुडाळ रस्त्यावर पाचवडपासून पाच किलोमीटर अंतरावर म्हसवे गावानजीक हे वडाचे झाड आहे. या गावात देशातील सर्वांत जुने आणि विस्ताराने मोठे असे वडाचे झाड आहे. या वटवृक्षामुळेच गावाला "वडाचे म्हसवे‘ या नावाने ओळखले जाते. या वटवृक्षाची ब्रिटिशकालीन "फ्लोरा ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी‘मध्ये प्रथम क्रमांकाचा वटवृक्ष म्हणून नोंद आहे. 1882 मध्ये ली वॉर्नर या ब्रिटिश अधिकाऱ्याने सातारा जिल्ह्यातील या वडाच्या झाडाचा उल्लेख केला आहे. 1903 मध्ये पुण्याच्या सायन्स कॉलेजचे प्राचार्य असलेल्या कूक थिओडोर या ब्रिटिशाने पश्चि्म घाटावरील वृक्षाची नोंद असलेले पुस्तक लिहिले आहे. त्यातही या वृक्षाची नोंद आहे. विस्ताराने मोठ्या असलेल्या या वटवृक्षावर पशुपक्ष्यांचे मोठ्या संख्येने वास्तव्य असते. वटवाघूळ, बुलबुल, सातभाई, भारद्वाज आदी 28 प्रजातींचे वास्तव्य आढळते. झाडाच्या सुमारे शंभर पारंब्यांचे खोडात रूपांतर झाले आहे. त्यामुळेच सुमारे दोनशे वर्षांहून अधिक काळाचे हे झाड अद्याप टिकून आहे. वडच का लावावा? -एक परिपूर्ण वड सुमारे 35 हजार जिवांना अभय-आश्रय देतो. -पाच वातानुकूल यंत्रे उघड्या वातावरणात 24 तास चालू ठेवल्यावर त्याचा वातावरणावर जो परिणाम दिसून येईल तो परिणाम एक पूर्ण वाढ झालेले वडाचे झाड देते. -जिथे वड, तेथील एक किलोमीटर परिसरात हमखास पाणी सापडते. *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *Work is worship.* ( कर्म हीच पूजा आहे. ) *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारताची अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे ?* मिश्र 2) *'दक्षिण भारताची गंगा' असे कोणत्या नदीला म्हणतात ?* गोदावरी (1498 km) 3) *गोदावरी नदीचा उगम कोठे झाला ?* नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक गावामागे सह्यांद्रीतील ब्रह्मगिरी डोंगरावर 4) *'तुम मुझे खून दो, मै तुमे आझादी दुगा' असे कोणी म्हटले ?* सुभाष चंद्र बोस 5) *राष्ट्रगीताला अधिकृत मान्यता केव्हा मिळाली ?* 24 जानेवारी 1950 *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● विक्रांत दलाल ● शिवानंद चौगुले ● पंडीत दगडगावे ● शैलेश तरले ● वसंत पाटील घोगरे ● श्रीनिवास पुलावार ● जेजेराव सोनकांबळे ● चिमणाजी हिवराळे ● लक्ष्मण कुमार ● मारोती जाधव ● साईनाथ सावंत ● बाबू हतोडे ● शिवा पांचाळ ● गोपाळ पामसकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सारा अंधारच प्यावा* *अशी लागावी तहान ॥* *एका साध्या सत्यासाठी* *देता यावे पंचप्राण ॥* *असं जगावेगळ पसायदान कवी म.म.देशपांडे यांनी 'तहान' या कवितेत मागितलं आहे. त्याचं तीव्रतेने स्मरण व्हावं अशी परिस्थिती आज आपल्या देशात आहे. कोणत्याही क्षेत्राकडे जा सारा अंधार आहे. अपवाद वगळले तर वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातून सत्य हद्दपार झालेलं आहे. असत्याच्या अंधारात संवेदनशील मनाची घुसमट होत आहे. 'सत्यमेव जयते' ही या देशाची घोषमुद्रा आहे. तथापि समाजाचं, देशाचं नेतृत्व करणा-यांपासून तर रूग्णांची सेवा करण्याची शपथ घेतलेल्या डाॅक्टरांपर्यत सर्वांनी तिचे पदोपदी धिंडवडे काढले आहेत. सर्वच क्षेत्रात असत्यानं, अप्रमाणिक वृत्तीनं थैमान घातलं आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतमातेची दु:स्थिती आधिकच चिंतनीय झाली आहे. 'सत्य हे जीवनमूल्य लोप पावत आहे. 'असत्य' उजळ माथ्यानं वावरत आहे.* *खरंतर सत्य, सत्याचा शोध, सत्याचा उद्धार आणि आचरण, सत्याचा पुरस्कार याला वैभवशाली परंपरा आहे. भीष्मनिती सांगते, 'सत्य हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे. माणसाचा सर्वश्रेष्ठ आधार आहे. शाश्वत कर्तव्य आहे. आसक्तीचं जाळ फक्त सत्यच तोडू शकतं. सत्य म्हणजेच अमरत्व. सत्यासाठी केलेला त्याग मानवी जीवनात सर्वश्रेष्ठ आनंदाचा उगम असतो. सदाचरणी माणूसच इतरांच्या हितासाठी दक्ष असतो आणि या मार्गानंच त्याचं स्वत:चही हित साधलं जातं. सत्यासारखं तप, पुण्य नाही. असत्यासारखं पाप नाही. ज्याच्या ह्रदयात सत्य असतं त्याच्या ह्रदयात परमशक्ती वास करते.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆 *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कबीर गाफील क्यों फिरय, क्या सोता घनघोर तेरे सिराने जाम खड़ा, ज्यों अंधियारे चोर । सारांश महात्मा कबीर मृत्यूची आठवण करून देतात. हे मानवा तुला असा दुर्मिळ मनुष्य जन्म मिळालेला असताना तू असा गाफिलासारखा का फिरत आहेस ? कोणत्या घणघोर अंधार्‍या काळ कोठडीत तू स्वतःला जखडून घेत आहेस ? कुठल्याही संपत्तीच मोल देवूनही हा जन्म परत मिळणारा नाही . तुला मिळालेले ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये तुझ्या मुक्तीसाठीच विधात्याने दिलेली सर्वात महान भेट आहे. इत्तर प्राण्यांपेक्षा तू विधात्याला अधिक प्रिय म्हणून बुद्धी व बोलीचं अधिकचं वरदान तुला दिलं तर तू त्या वैभवाचा वापर करून या सृष्टीचा स्वर्ग करण्यासाठी धडपडायला पाहिजेस ! स्वर्ग निर्माणाचं जाऊ दे , किमाण या सृष्टीला तरी विद्रुप करण्याचं कुकर्म करू नकोस ! हे वैविध्पाने भरलेले जग तुझ्याचसाठी आहे .याच्याकडे डोळे उघडे ठेवून पाहिलेस. त्याच्या रचनेला धक्क् न देता त्याचा मानव कल्याणासाठी वापर करून घेतलंस तर भविष्य सुंदर नाही तर निसर्ग प्रकोप ठरलेलाच. तू कितीही सावध वागण्याचा प्रयत्न करीत असलास तरी हा मृत्यू रूपी चोर तुझ्यावर सारखी पाळत ठेवून आहे. तू भौतिक सुखसोयींचा कितीही इधार घेतलास तरी काचाच्या बंदिस्त महालातूनही तुझ्यातल्या चैतन्यरूपी आत्म्याला तो कोणत्याही क्षणी उचलल्याशिवाय राहाणार नाही. तेव्हा तू ज्या शरीर व रूपाला मोहवून हुरळून जातोस त्यापेक्षा सृष्टीकडं पाहाण्याची दिव्य दृष्टी देणार्‍या आत्मदृष्टीची जडणघडण चांगली होण्यासाठी मनाचा निकोप विकास होणे गरजेचे आहे. सुंदर मनेच सुंदर सुष्टी देवू शकतात. तेव्हा अज्ञानाचा अंधःकार दूर करून सत्यरूपी ज्ञान जाणून घे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• व्यक्ती कितीही मोठी असेल परंतु संस्कार आणि ज्ञान नसेल तर त्याच्या मोठेपणाचा काहीच अर्थ नाही. कोणतीही व्यक्ती लहान असो किंवा मोठी असो ज्यांच्याजवळ संस्कार,नम्रता, सहनशीलता आणि ज्ञान आहे तीच व्यक्ती सर्वश्रेष्ठ ठरु शकते आणि तीच व्यक्ती जगाला प्रिय असते. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 📚🌸📚🌸📚🌸📚🌸📚 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *उपकाराचे स्मरण ठेवावे* एकदा एक श्रीमंत माणूस नदीकाठावरील मारूती मंदिरात देवदर्शनासाठी गेला. अचानक त्याच्या मनात आले, नदीत जाऊन हात-पाय धुवावेत व मग मंदिरात देवदर्शनासाठी जावे. तो नदीवर गेला. हात-पाय धूत असताना त्याच्या तोल गेला आणि तो नदीत पडला. त्याला पोहता येत नव्हते. त्याची धडपड सुरू झाली. तो ओरडू लागला पण त्याला वाचविण्यासाठी कुणीही पुढे येईना.  अखेर एका साधूने नदीत उडी घेतली. त्या साधूने त्याला वाचविले. काठावर आणले. काही वेळाने तो श्रीमंत गृहस्थ भानावर आला. त्याने खिशातून खूप नोटा बाहेर काढल्या. पण त्यातील फक्त एक रूपयाची नोट साधूच्या हातावर ठेवली. हे पाहून काठावर जमलेले लोक संतापले. चिडून त्यांना थांबविले. त्यांनी त्या व्यापार्‍याला उचलले व नदीत टाकणार इतक्यात साधूने त्यांना थांबविले. साधू म्हणाला, ‘थांबा, त्यांने स्वत:च किंमतीएवढीच बक्षिसी दिली. यात त्याची का चूक? त्याची किंमत एवढीच आहे.’ तात्पर्य - माणसाची खरी किंमत प्रसंगानेच कळते. उपकारकर्त्याचे उपकार स्मरणे हे माणसाचे पवित्र कर्तव्य आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~