✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13 मार्च 2025💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2025/03/holi-dhulivandan.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ☣️ *_ या वर्षातील ७२ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ☣️ *_महत्त्वाच्या घटना:_* ☣️•••••••••••••••••••••••••••••••••••• *२००७: वेस्ट इंडीजमधे ९ व्या क्रिकेट विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धेचे उद्घाटन झाले.**१९९९: जलाशयाच्या तळाला भोक पाडून त्यातील पाणी बोगद्याच्या साह्याने भूमिगत जलविद्युतगृअहात नेऊन त्याद्वारे वीजनिर्मिती करणार्या (Lake Tapping) आशिया खंडातील पहिल्या प्रयोगाच्या कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याचे उद्घाटन**१९९७: मदर तेरेसा यांचे वारस म्हणून कोलकात्यातील ’मिशनरीज ऑफ चॅरिटीज’ ने सिस्टर निर्मला यांची नियुक्ती केली.**१९६३: असामान्य क्रीडा नैपुण्यासाठी अर्जुन अवार्ड देणे सुरू* *१९४०: अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांडाचे समर्थन करणारे पंजाबचे गव्हर्नर मायकेल ओडवायर यांची उधमसिंग यांनी गोळया घालून हत्या केली.**१९३०: क्लाईड डब्ल्यू. टॉमबॉग या शास्त्रज्ञाने प्लूटो ग्रह शोधल्याचे हारवर्ड कॉलेज येथील वेधशाळेला कळवले. मात्र या ग्रहाचा शोध त्याला १८ फेब्रुवारी १९३० या दिवशीच लागला होता.**१९१०: पॅरिसहुन लंडनला येताच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अटक झाली.**१७८१: विल्यम हर्षेल याने युरेनसचा शोध लावला.* ☣️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ☣️••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७९: रवींद्र भास्कर सोनवणे -- लेखक, कवी**१९७८: अनुषा रिझवी -- चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक**१९७४: नितीन राजेंद्र देशमुख -- प्रसिद्ध कवी, गझलकार, लेखक**१९६८: श्रीकांत पांडुरंग चौगुले -- प्रसिद्ध लेखक**१९५८: अश्विनी अनिल कुलकर्णी -- लेखिका* *१९५७: ऋतुजा चैतन्य माने -- कवयित्री, लेखिका* *१९५६: लोकनाथ यशवंत -- मराठी भाषेतील प्रसिद्ध कवी, लेखक**१९५१: यशोधरा पोतदार-साठे -- मराठी कवयित्री* *१९४६: जनार्दन कृष्णाजी पाटील (मगर) -- लेखक, समाजकार्य**१९४६: शकुंतला गंगाधर सोनार -- कवयित्री, लेखिका* *१९४६: अभिलाष -- सुप्रसिद्ध गीतकार 'इतनी शक्ति हमें देना दाता' (मृत्यू: २७ सप्टेंबर २०२० )**१९४६: श्रीराम विनायक साठे -- ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आणि लेखक (मृत्यू: २५ सप्टेंबर २०२३ )**१९४३: प्रा. वामन सुदामा निंबाळकर -- कवी विचारवंत व लेखक (मृत्यू: ३ डिसेंबर २०१० )**१९४०: प्रा. डॉ. हेमालता दत्तात्रय साने -- लेखिका* *१९३६: डॉ. वनमाला पानसे -- कवयित्री, लेखिका* *१९३३: सुलोचना चव्हाण --- मराठी गायिका, लेखिका (मृत्यू: १० डिसेंबर २०२२ )**१९२६: रविन्द्र पिंगे – ललित लेखक (मृत्यू: १७ ऑक्टोबर २००८)**१९२६: लीला भालचंद्र गोळे -- संतांवर परिचयात्मक पुस्तके लिहिणाऱ्या मराठी लेखिका**१९०१: केशव बाबूराव लेले -- मूर्तिकार, हलत्या चित्रांचे प्रदर्शनकार व कलाप्रसार.(मृत्यू: ५ जानेवारी १९४५ )**१८९३: डॉ.वासुदेव विष्णू मिराशी – महामहोपाध्याय, संस्कृत विद्वान, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय प्राच्यविद्यासंशोधक (मृत्यू: ३ एप्रिल १९८५ )**१८८१: दत्तात्रय विष्णू आपटे -- इतिहास संशोधक,संपादक(मृत्यू: २७ ऑक्टोबर १९४३ )**१७३३: जोसेफ प्रिस्टले – इंग्लिश रसायनशास्रज्ञ (मृत्यू: ६ फेब्रुवारी १८०४ )*☣️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ☣️••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८: सदानंद चांदेकर -- ज्येष्ठ रंगकर्मी (जन्म: ५ सप्टेंबर १९४९)**२०१७: प्रा. मालतीबाई किर्लोस्कर -- प्रसिद्ध लेखिका (जन्म: १९२३ )**२००४: उस्ताद विलायत खाँ – सतारवादक (जन्म: २८ ऑगस्ट १९२८ )**१९९६: शफी इनामदार –अभिनेते व नाट्यनिर्माते (जन्म: २३ ऑक्टोबर १९४५ )**१९९३: डॉ. मधुकर(मधू) शंकर आपटे -- ज्येष्ठ रंगकर्मी व चित्रपट अभिनेते (जन्म: १ मार्च १९१९ )**१९९४: श्रीपाद यशवंत कोल्हटकर – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व 'सिटू' या कामगार संघटनेचे लढवय्ये नेते**१९६७: सर फँक वॉरेल – वेस्ट इंडिजचे क्रिकेट खेळाडू (जन्म: १ ऑगस्ट १९२४ )**१९५९: गंगाधर भाऊराव निरंतर -- कादंबरीकार,ललित लेखक(जन्म: १५ जून १९०६ )**१९५५: वीर विक्रम शाह ’त्रिभुवन’ – नेपाळचे राजे (जन्म: २३ जून १९०६ )**१९०१: बेंजामिन हॅरिसन – अमेरिकेचे ३३वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २० ऑगस्ट १८३३ )**१८९९: दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ ’कवी दत्त’-- अर्वाचीन मराठी कवी(जन्म: २७ जून १८७५ )**१८००: बाळाजी जनार्दन भानू उर्फ 'नाना फडणवीस' (जन्म: १२ फेब्रुवारी १७४२ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*होळी व धुलीवंदन* निमित्ताने खास लेख आणि कविता ..... वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुंबई : जनतेने जास्त व्याज देणाऱ्या योजनांच्या अमिषास बळी पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेमध्ये केले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *जन्म-मृत्यूच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधिमंडळाच्या उभय सभागृहात निवेदन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *1 एप्रिलपासून लागू होणार नवीन टीडीएस नियम ! FD-RD मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना होणार मोठा फायदा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *लवकरच 100 व 200 ₹ च्या नोटा येणार, RBI ची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सर्वसामान्यांना मोठा दिलासा, तब्बल २१ महिन्यांनी खाद्यपदार्थांच्या किंमती घसरल्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *‘एअरटेल’ पाठोपाठ ‘जिओ’चा स्टारलिंकसाठी अँलन मस्कच्या ‘स्पेस एक्स’शी करार; मोबाईल टॉवरशिवाय मिळेल इंटरनेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ICC क्रमवारीत शुभमन गिल ठरला प्लेअर ऑफ दि मंथ पुरस्काराचा मानकरी, कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 भगवान शंकरराव कांबळे, पत्रकार, धर्माबाद👤 शेख रुस्तुम, जि. प. नांदेड 👤 सुरेश बोईनवाड👤 साईनाथ बोंबले 👤 लक्ष्मण वडजे 👤 कामाजी धूतुरे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 16*लांबी याची खूप मोठी**तरी म्हणतात याला लहान**नाव जरी लहान असले तरी**शरीरात कार्य याचे आहे महान*ओळखा पाहू कोण ...?उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - रक्त ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखादे कार्य आपण न्यायबुद्धीने करत आहोत, असा आपला विश्वास असेल तर त्यात अपयश आले तरीही आपला संघर्ष चालू ठेवावा.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताने कितव्यांदा ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली ?२) ICC चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातील 'सामनावीर'चा किताब कोणी पटकावला ?३) जगात सर्वात जास्त वाघ असणारे प्रथम तीन देश कोणते ?४) 'क्षुधा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) भारतातील व्याघ्र प्रकल्पाची संख्या किती आहे ? *उत्तरे :-* १) तिसऱ्यांदा ( २००२, २०१३, २०२५ ) २) रोहीत शर्मा ( ७६ धावा ) ३) भारत ( ३,२६५ ), रशिया ( ५०८ ), बांगलादेश ( ४०० ) ४) भूक ५) ५८*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 📙 *बर्फ* 📙 बर्फाची गंमत भारतीयांना विसाव्या शतकात सहज समजू लागली. त्याआधी देवदर्शनाला हिमालयात जाणाऱ्यांनाच बर्फ ज्ञात होता. एकोणीसाव्या शतकात मोठाच आटापिटा करून बोट भरून बंदिस्त अवस्थेत बर्फ युरोपातून प्रथम आयात केला गेला. त्या नाविन्याचे वर्णन आजही इतिहासात कुठे कुठे वाचायला मिळते. येथे पोहोचेपर्यंत त्यातील फक्त एक तृतीयांश बर्फ मूळ स्वरूपात शिल्लक होता. आज मात्र सहजगत्या बर्फ व बर्फाचे पदार्थ कोणालाही खायला वा हाताळायला मिळतात. बर्फाची इतकी सवय झाली आहे की, उन्हाळ्यात सरबतात बर्फ नसला तर ते पिववत नाही, अशी आपली स्थिती झाली आहे. शुद्ध पाणी शून्य डिग्री सेंटीग्रेडला पूर्णपणे गोठते. या घन पदार्थाला आपण 'बर्फ' म्हणतो. पाणी गोठताना आकाराने प्रसरण पावते. त्यामुळे बर्फाचा आकार नेहमीच्या मूळ पाण्याच्या आकारमानापेक्षा मोठा राहतो. बर्फ नेहमीच पाण्यावर तरंगतो, त्याचेही कारण हेच. याचा फार मोठा फायदा निसर्गतः सजीवांना झाला आहे. पृथ्वीवर गोड्या पाण्याचा साठा फारच मर्यादित आहे. त्यातील जवळजवळ दहा टक्के पाणी हे फक्त बर्फाच्या स्वरूपात आहे. हे जर उपलब्ध नसते तर बर्फाळ प्रदेशात मानवच काय पण अन्य कोणाही सजीव प्राण्यांची वस्ती शक्यच झाली नसती. आर्क्टिक प्रदेशात अनेक ठिकाणी समुद्राच्या खार्या पाण्याने वेढलेला भाग असून नद्या, तळी, सरोवरे यांचा फारसा मागमूस नसूनही वस्ती आहे; याचे कारण बर्फ पाण्यावर तरंगते व हे बर्फरुप पाणी सहज वापरता येते. बर्फाचे जगभर व्यापारी उत्पादन केले जाते. फ्रिझरमध्ये पाण्याचे तापमान कमी केले जाऊन बर्फ बनवतात. या बर्फाचा वापर मुख्यतः सर्व प्रकारचे मांस, मासे, भाजीपाला, दूध असे नाशवंत पदार्थ टिकवण्यासाठी केला जातो. पूर्णतः एअरकंडिशन शीत खोली बांधणे फार खर्चाचे काम असल्याने बर्फाच्या लाद्या वापरून हा सर्व माल हाताळला जातो. समुद्रावर गेलेला मोठा ट्रॉलर दुसऱ्या दिवसांपासून मासेमारी करत, गोळा करत पाचव्या दिवशी परततो. त्यानंतर हा माल म्हणजे मासे गावोगावी जातात. थेट सातव्या दिवशी ते लोकांच्या हातात पडून मग वापरले जातात, ते या बर्फाच्या लाद्यांमुळेच. बर्फाचा सरसकट वापर व उपलब्धी ही नाशवंत माल टिकवणारे वरदानच आहे.पाणी गोठताना प्रसरण पावते, याचे काही फायदे, तर काही तोटे आहेत. फायदे म्हणजे गोठवलेले बर्फ पाण्यावर तरंगत राहते. या संपर्कात आलेले पाणी, प्रथम चार डिग्री सेंटिग्रेड तापमान आल्यावर जड होते. हे जड पाणी तळाला जाते. खालचे हलके पाणी वर येते. बर्फ पाण्यापेक्षा हलका असल्याने तो पाण्यावर तरंगतो. म्हणून जीवसृष्टी अस्तित्वात आहे. कारण बर्फ जड असता, तर हिवाळ्यात तयार झालेला बर्फ समुद्राच्या तळाशी जाऊन बसला असता. उन्हाळ्यात तो काही पूर्णपणे वितळला नसता; कारण सूर्याची उष्णता समुद्राच्या तळापर्यंत पुरेशी पोहोचत नाही. पुन्हा हिवाळ्यात गोठलेले बर्फ तळाशी गेले असते. असे होता होता सारे महासागर हिवाळ्यात वरपासून खालपर्यंत बर्फाचे, तर उन्हाळ्यात वरवरचा बर्फ वितळून उथळ तळी झाली असती. अशा परिस्थितीत जीवसृष्टी तगणार कशी ? हे चित्र जरा तपशिलाने पाहण्यासारखे आहे. ऑक्सिजनचा एक अणू आणि हायड्रोजनचे दोन अणू मिळून पाण्याचा एक रेणू तयार होतो. हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन बहुधा ऑक्सिजनच्याच जवळपास असतात. म्हणून ऑक्सिजनजवळ ऋणभार, तर त्या दोन पायांच्या व धनभार तयार होतो. म्हणूनच मीठ विरघळते, तेव्हा धनविद्युतभार असलेला सोडियम आणि ऋणविद्युतभारीय क्लोरिन पाण्याच्या रेणूच्या दोन वेगवेगळ्या जागी चिकटतात. या गुणधर्मामुळेच पाणी हे एक उत्तम द्रावक झाले आहे. पाणी गोठते, तेव्हा पाण्याचे रेणू एकमेकांत घट्ट बसू शकत नाहीत; कारण सजातीय विद्युतभार एकमेकांना दूर ढकलतात. म्हणून त्यांची पिंजऱ्यासारखी पोकळ रचना तयार होते आणि ती पाण्याहून हलकी असते. बर्फ पाण्याहून जड करायचा असेल, तर हे सारे गुणधर्म बदलावे लागतील. मग पाणी उत्तम द्रावक राहणार नाही आणि शरीरात विरघळलेले सर्व पदार्थ 'साका' होऊन खाली बसतील आणि क्षणार्धात जीवसृष्टी खलास होईल.पाणी बर्फ होताना प्रसरण पावण्याचा फार मोठा तोटा म्हणजे सर्व प्रकारचे पाणी वाहून नेणारे पाइप हिवाळ्यात तडकून फुटण्याची शक्यता निर्माण होते. यासाठी काळजी म्हणून, पाइप जमिनीत खोल घातले जातात. तरीही ही तक्रार अनेक ठिकाणी उद्भवतेच. इंजिने गार राखण्यासाठी मोटार, ट्रक व अन्य वाहनांत पाणी वापरले जाते, तेही गोठते. यासाठी अलीकडे पाणी गोठू नये म्हणून अॅण्टीफ्रिज मिक्श्चर वापरले जाते. याचा वापर केल्यास पाण्याचा गोठणबिंदू खूपच खाली म्हणजे उणे बत्तीस डिग्री सेंटीग्रेड इतका उतरतो. मानवी प्रयत्नांनी, संशोधनाने या गोष्टीवर मात करायचा प्रयत्न सतत चालू असला, तरीही बर्फाने उद्भवणाऱ्या आणखी एका तोट्याच्या बाबतीत वा धोक्याच्या बाबतीत मानवी प्रयत्न अपुरेच पडतात. डोंगराच्या कड्यांना असलेल्या फटींतून आत जिरलेले पाणी गोठते व त्यामुळे अनेकदा कडे कोसळणे, दरडी कोसळणे हे अगदी अनपेक्षितरित्या घडते.डोंगरउतारावरचे स्केटिंग, बर्फाच्या मैदानावर हॉकी वा अन्य कसरती खेळ हा बर्फाचा एक गमतीदार गुण वापरून खेळले जातात. अर्थात या गुणांची जाणीव आपल्याला नंतर झाली. दाब दिल्यावर बर्फ वितळतो. स्केटचा दाब पडल्यावर तयार होणाऱ्या पातळ पाण्याच्या थरावरून स्केट वेगाने पुढे सरकते. काही सेकंदांतच मागे पुन्हा पाण्याचा बर्फ तयार होतो. अवजड सामान लादलेली स्लेड किंवा बर्फावरील ढकलगाडी मोजकेच कुत्रे मजेत ओढू शकतात. या गुणामुळेच.भारतात बर्फ नैसर्गिकरीत्या अचानक पहावयाला मिळतो, ते गारांच्या स्वरूपात. पावसाचे गोठलेले थेंब वजनाने गारांच्या स्वरूपात पृथ्वीवर पडतात. गारांचा पाऊस असे 'बर्फरूप' आपल्याला दाखवतो. बर्फामध्ये गाडले गेलेले प्राणी, मानव, अवशेष, अन्नपदार्थ अनेक वर्षांपर्यंत जसेच्या तसे उत्तम राहू शकतात. नुकताच एक आदिमानवी देह बर्फात गाडला गेलेला सापडला. त्याचे सर्व अवयव अगदी नुकताच मृत्यू झाल्याप्रमाणे सापडले, हे आश्चर्यकारकच होते. बर्फाळ प्रदेशाचे गूढरम्य आकर्षण मानवाला कायमच वाटत आले आहे. बर्फाने अनेकांना जीवानिशी गिळले असले, तरीही गिर्यारोहणाच्या छंदात कसलाही खंड पडेल असे वाटत नाही.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• तूं माझी जननी काय गे साजणी । विठ्ठले धांवोनि भेट देई ॥१॥ डोळे माझे शिणले पाहतां वाटोली । अवस्था दाटली ह्रदयामाजीं ॥२॥ मी तुझें पाडस गुंतलों भवपाशीं । माते धीर तुजसी कैसा धरवला ॥३॥ तूं माझी पक्षिणी मी तुझें अंडज । क्षुधें पीडिलों मज विसरशी ॥४॥ तूं माझी माउली मी तुझें वोरस । पुढती पुढती वास पाहतसे ॥५॥ नामा म्हणे विठ्ठले आस पुरवीं माझी । ओरसे वेळां पाजीं प्रेमपान्हा ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुसऱ्याची वाट लावून आनंद घेण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. जो पर्यंत अंगात ताकद आणि हातात पैसे, धनसंपत्ती भरभरून असते तो पर्यंत ह्या सर्वच गोष्टी करायला ही जास्त वेळ लागत नाही. पण, जेव्हा ह्या सर्वच व्यर्थ गोष्टी हळूहळू कमी व्हायला लागतात तेव्हा मात्र मुखातून एक शब्द सुद्धा बाहेर पडत नाही. कारण असा एक कोणीतरी असते तो दिसत नाही मात्र योग्य वेळ आल्यावर त्याची चालते त्यावेळी कितीही शक्तीशाली माणूस असेल तरी त्याच्यासमोर कोणाचे चालत नाही. म्हणून कोणाची वाट लावून आनंद घेण्यात किंवा समाधान मानण्यात सुंदर असे आयुष्य गमावू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *ही कथा आहे विन्स्टन चर्चिलची*लहानपणी विन्स्टन एकदा विहिरीत पडला. त्याने ‘वाचवा वाचवा’ असा धावा केला. एका शेतकर्याने त्याला विहिरीतून बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचवला. एका अपघातातून आपण वाचलो म्हणून त्याने नि:श्वास तर टाकला, पण त्याला विहिरीतील जीव वाचवण्यासाठीची धडपड सदैव लक्षात राहिली. आयुष्यभर यशाशी संघर्ष करताना वडिलांनी शिकवलेले तत्त्व आठवायचे. त्या वेळेस विन्स्टनने मनोमन आपल्या वडिलांचे आभार मानले, कारण त्याच्या वडिलांनी त्याला एक अविरत प्रयत्न करण्याचे व कधीही माघार न घेण्याचे तत्त्व शिकवले होते. ते त्याला नेहमी आपल्या राजवाड्यासमोरील राजहंस दाखवायचे आणि म्हणायचे- ‘‘हा राजहंस पाण्यावर शांतपणे तरंगताना दिसतो. पण तेव्हाच तो पाण्याखाली तितक्याच जलद गतीने पायांची हालचाल करत असतो. लोकांना वरवर शांत दिसणारा राजहंस पाण्याखाली एखाद्या यंत्राप्रमाणे झपाटल्यासारखा काम करतो. तूही असाच झंझावात हो. जनसमुदायाला तू वरून जरी शांत दिसलास तरी त्यांच्या अपरोक्ष वादळासारखं काम करत राहा. आतून पेटून ऊठ आणि कार्याला लाग.’’ पुढे जीवनात अविरत काम करण्याचे तत्त्व बाळगल्यामुळे विन्स्टन चर्चिल इंग्लंडचे पंतप्रधान झाले. एकदा त्यांना ऑक्सफर्ड विद्यापीठात पदवी प्रदान सोहळ्यासाठी निमंत्रित केले होते. जेव्हा त्यांना व्यासपीठावर भाषणासाठी बोलावले तेव्हा ते त्या जनसमुदायासमोर ३० सेकंद नि:शब्द उभे राहिले. सभागृहात एकच शांतता पसरली. नेहमी उत्कृष्ट भाषण देणारे व्यक्तिमत्त्व बोलत का नाही, असा फ्रश्न सर्वांना पडला. तितक्यात विन्स्टन चर्चिलच्या तोंडातून शब्द बाहेर पडले- ‘‘माघार घेऊ नका. कधीही माघार घेऊ नका.’’ त्यांनी भाषणाला सुरुवात करताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. तेव्हा ते पुन्हा ३० सेकंदांसाठी नि:शब्द झाले आणि पुन्हा उद्गारले- ‘‘माघार घेऊ नका, कधीही माघार घेऊ नका.’’ क्षणभर त्यांनी सर्व प्रेक्षकांवर एक कटाक्ष टाकला. सर्वांशी ते नजरेने बोलले आणि धन्यवाद म्हणून त्यांनी व्यासपीठ सोडले. लोकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले आणि एका महान नेत्याचे सर्वात लहान, पण अत्यंत प्रभावी.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 12 मार्च 2025💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1Y1ueW6qbu/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🛞 *_ या वर्षातील ७१ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🛞 *_महत्त्वाच्या घटना:_* 🛞•••••••••••••••••••••••••••••••••••• *२००१: राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही मूल्ये, सामाजिक आणि आर्थिक विकास या क्षेत्रांतील बहुमोल कामगिरीबद्दल देण्यात येणारा ’यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार’ ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व पर्यावरणवादी नेते सुंदरलाल बहुगुणा यांना प्रदान करण्यात आला**१९९९: सरकारी नोटांवर यापुढे महात्मा गांधींचेच चित्र असेल असा सरकारतर्फे निर्णय घेण्यात आला**१९९९: चेक प्रजासत्ताक, हंगेरी व पोलंड ’नाटो’ (NATO) मधे सामील झाले.**१९९३: मुंबई येथे झालेल्या १२ स्फोटांच्या मालिकेत ३०० हून अधिक जण ठार तर हजारो लोक जखमी**१९९२: स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २४ वर्षांनी ब्रिटिश सत्तेची सर्व जोखडे झुगारुन देऊन मॉरिशस प्रजासत्ताक बनले.**१९८६: केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देऊन शंकराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली**१९६८: मॉरिशस (इंग्लंडपासून) स्वतंत्र झाला**१९५४:साहित्य अकादमीची स्थापना**१९३०: ब्रिटिश सरकारने भारतात तयार केलेल्या मिठावर बसवलेल्या अन्यायकारक करामुळे महात्मा गांधी यांनी २०० मैलाच्या दांडीयात्रेला सुरूवात केली**१९१८: रशियाची राजधानी सेंट पीट्सबर्ग येथून मास्को येथे हलविण्यात आली.**१९१२: कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी लिहीलेल्या ’संगीत मानापमान’ या नाटकाचा पहिला प्रयोग किर्लोस्कर नाटक मंडळीने मुंबईतील रिपन नाट्यगृहात केला.* 🛞 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🛞 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८६: डॉ. राजकुमार बबन शेलार -- लेखक**१९८४: श्रेया घोषाल -- हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची पार्श्वगायिका**१९८२: मनोज कुलकर्णी -- लेखक* *१९८१: अनधा विनय तांबोळी -- कवयित्री, लेखिका**१९८१: बाळासाहेब धोंगडे -- प्रकाशक, संपादक**१९७३: राम पांडुरंग गायकवाड -- कवी* *१९६९: प्रा. कल्याण पांडुरंग राऊत -- कवी* *१९६९: फाल्गुनी पाठक -- भारतीय गायिका आणि संगीतकार**१९६१: डॉ.मालिनी अनिल अंबाडेकर -- कवयित्री* *१९५६: चंदन दास -- लोकप्रिय भारतीय गझल गायक**१९४३: डॉ.अविनाश बिनीवाले -- भाषाभ्यासक आणि बहुभाषाविद् लेखक* *१९४१: प्रा. जवाहर प्रेमराज मुथा -- ज्येष्ठ कवी, प्रसिद्ध लेखक, संपादक**१९४०: डॉ. श्रीकांत वामन चोरघडे -- बालरोगतज्ज्ञ व बालमानसशास्त्रज्ञ, लेखक, संपादक**१९३३: कविता विश्वनाथ नरवणे -- ज्येष्ठ मराठी लेखिका (मृत्यू २८ ऑगस्ट २०२०)**१९२६: सुमन पुरुषोत्तम बेहरे -- लेखिका**१९२३: गजानन रामचंद्र कामत -- मराठी साहित्यिक व हिंदी-मराठी चित्रपटकथालेखक (मृत्यु: ६ ऑक्टोबर २०१५ )**१९१५: डॉ. अ. ना.देशपांडे (अच्चुत नारायण देशपांडे) -- मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचे सिद्धहस्त लेखक वाङ्मयेतिहासकार (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९९० )**१९१३: यशवंतराव चव्हाण – भारताचे ५ वे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९८४ )**१९११: दयानंद बाळकृष्ण ऊर्फ ’भाऊसाहेब’ बांदोडकर – गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे संस्थापक, उद्योगपती (जन्म: १२ ऑगस्ट १९७३ )**१९०४: जगन्नाथ जनार्दन पुरोहित -- महाराष्ट्रातील एक प्रतिभावंत व नामवंत यशस्वी गायक व संगीताचार्य.(मृत्यू: २० ऑक्टोबर१९६८ )* *१८९१: ’नटवर्य’ चिंतामणराव कोल्हटकर – अभिनेते व निर्माते (मृत्यू: २३ नोव्हेंबर १९५९ )**१८२४: गुस्ताव किरचॉफ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: १७ ऑक्टोबर १८८७)* 🛞 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🛞 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: प्रा.मधुकर शंकर वाबगावकर (म.श.)-- लेखक, समीक्षक (जन्म:२३ जानेवारी १९३५ )**२००१: रॉबर्ट लुडलुम – अमेरिकन लेखक (जन्म:२५ मे १९२७)**१९९९: यहुदी मेनुहिन – प्रसिद्ध व्हायोलिनवादक व वाद्यवृंदसंचालक (जन्म: २२ एप्रिल १९१६ )**१९८१: मारुतीराव परब -- भारतीय अभिनेता आणि दिग्दर्शक (जन्म: १२ फेब्रुवारी १९२७ )**१९६०: विठ्ठल वामन हडप -- ऐतिहासिक कादंबरीकार,नाटककार(जन्म: १८ नोव्हेंबर १८९९ )**१९५९: जनार्दन सखाराम करंदीकर -- संपादक (जन्म: १५ फेब्रुवारी १८७५ )**१९४२: रॉबर्ट बॉश – जर्मन अभियंते आणि उद्योजक (जन्म: २३ सप्टेंबर १८६१ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शाळेची वेळ वाढविल्याने गुणवत्ता वाढेल का ?*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *स्त्रियांनी शिक्षणाच्या माध्यमातून आपले अस्तित्व निर्माण करावे, कळवण महाविद्यालयातडॉ. पगार यांचे आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *परीक्षा वेळापत्रकात बदल करण्यात यावा, भंडारा मुख्याध्यापक संघाची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुणे महसूल विभागाची कार्यशाळा, नागरिकांच्या हिताचे निर्णय वेळेत घ्या, तंत्रज्ञानाचा वापर वाढवा - विभागीय आयुक्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अकोला - जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; जि.प.च्या कर्मचाऱ्यांचे घंटानाद आंदोलन:काळ्याफिती लावून निषेध; मिनी मंत्रालयासमोर आंदोलन, 11 मागण्यांचा आग्रह*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *आता प्रार्थना स्थळ, मशिदीवरील भोंग्यावर होणार कारवाई; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा स्पष्ट इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *यावर्षी एप्रिल, मे महिन्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *सरकारने कुस्ती महासंघावरील निलंबन घेतले मागे, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी संघ निवड शक्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संजय भोसले, नांदेड👤 डॉ. प्रशांत मुदकोंडवार, नांदेड👤 किरण सोनटक्के👤 उत्तम सोनकांबळे👤 पार्थ पवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 15*रंग माझा लाल तांबडा**वाघ असो वा कोंबडा**प्रत्येक सजीवात राहतो**शरीराला मी उर्जा देतो*मी कोण ओळखा पाहू उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्ञानाची भूक ही माणसाची मूलभूत गरज आहे , ती माणसास पशू कोटीतून वर काढते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताने कितव्यांदा ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली ?२) ICC चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातील 'सामनावीर'चा किताब कोणी पटकावला ?३) जगात सर्वात जास्त वाघ असणारे प्रथम तीन देश कोणते ?४) 'क्षुधा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) भारतातील व्याघ्र प्रकल्पाची संख्या किती आहे ? *उत्तरे :-* १) तिसऱ्यांदा ( २००२, २०१३, २०२५ ) २) रोहीत शर्मा ( ७६ धावा ) ३) भारत ( ३,२६५ ), रशिया ( ५०८ ), बांगलादेश ( ४०० ) ४) भूक ५) ५८*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••☀ *उष्माघात म्हणजे काय ?* ☀ भारतामध्ये काही भागात तापमान ४९ सेल्सियस इतके जास्त असू शकते. उन्हाळ्यामध्ये दरवर्षी अनेक लोक उष्माघाताने वा या उच्च तापमानामुळे मरण पावतात. राजस्थान, ओरिसा तसेच महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाड्यातही उष्माघाताने मृत्यू होतात. उष्माघात याचा सोपा अर्थ उष्णतेचा आघात वा त्रास असा होतो. यात खूप ताप येणे, घाम न येणे, चक्कर येणे, लघवी न होणे, बेशुद्धी येणे अशी लक्षणे दिसून येतात. प्रसंगी मृत्यूही होतो. अति उष्णतेने शरीरातील प्रथिनांवर दुष्परिणाम होतात व पेशीमधील जीवनप्रक्रिया थांबते. शरीरातील सर्व पेशींमध्ये असेच होते व बहुतेक वेळा मेंदू सूज होऊन व्यक्ती मरते. आधी रुग्णास चक्कर येते, झटके येतात व दम लागतो. कधी कधी हृदयविकाराचा झटकाही येतो.उष्माघातावर तात्काळ उपचार करणे आवश्यक ठरते. रुग्णाला सावलीत नेऊन त्याच्या अंगावर ओली चादर टाकावी व त्याला वारा घालावा. थंडगार पाण्यात त्याला उभे केले तर फारच चांगले. रक्ताभिसरण सुधारण्यासाठी त्याचे हातपाय चोळावेत. त्याला क्षार व पाणी द्यावे. (लिंबू सरबत वैगरे पदार्थ) असे उपचार लवकर सुरू झाल्यास व्यक्ती बचावते. अन्यथा मृत्यू येण्याची शक्यता खूप जास्त असते. उष्माघात टाळण्यासाठी उन्हात जास्त वेळ फिरू नये, फिरायचे असल्यास डोक्यावर टोपी घालावी व पांढरे फडके बांधावे, थंडगार पाणी वारंवार प्यावे, वारंवार तोंड गार पाण्याने धुवावे. असे केल्याने उष्माघाताची शक्यता कमी करता येईल.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन 👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• तूं आकाश मी शामिका । तूं लिंग मी साळूंका । तूं समुद्र मी चंद्रिका । स्वयें दोन्ही ॥१॥ तूं वृंदावन मी चिरी । तूं तुळशी मी मंजिरी । तूं पांवा मी मोहरी । स्वयें दोन्ही ॥२॥ तूं चांद मी चांदणी । तूं नाग मी पद्मिणी । तूं कृष्ण मी रुक्मिणी । स्वयें दोन्ही ॥३॥ तूं नदी मी थडी । तूं तारूं मी सांगडी । तूं धनुष्य मी स्तविता । तूं शास्त्र मी गीता । तूं गंध मी अक्षता । स्वयें दोन्ही ॥५॥ नामा म्हणे पुरुषोत्तमा । स्वयें जडलों तुझ्या प्रेमा । मी कुडि तूं आत्मा । स्वयें दोन्ही ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जी व्यक्ती परिस्थितीवर मात करून हिंमतीने जगत असते तिला कशाचीही भीती वाटत नाही व कोणासमोरही न घाबरता परखडपणे बोलण्याचा प्रयत्न करत असते. कारण त्या परिस्थितीत असताना सुद्धा तिला जे, अनुभव आलेले असतात तेच अनुभव आधार बनून मार्गदर्शन करत असतात म्हणूनच म्हणतात ना की, अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो. आपणही त्या गुरूचे सदैव स्मरण करावे व पुन्हा एकदा नव्याने जगण्याचा प्रयत्न करावे कारण जीवन हे अनमोल आहे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *निश्चय*एका राजाजवळ एक हत्ती होता. तो त्याला अत्यंत प्रिय होता. तो हत्ती स्वामीभक्त असण्याबरोबरच चांगला योद्धा होता. जेंव्हा केंव्हा राजाने त्याच्यावर बसून युद्ध केले तेंव्हा राजा त्यात विजयी झाला. काही काळ लोटल्यानंतर हत्ती वृद्ध होत चालला त्यामुळे राजाने त्याला युद्धात घेवून जाणे बंद केले. मात्र राजाचे त्या हत्तीवरचे प्रेम काही कमी झाले नाही. एके दिवशी तो हत्ती सरोवरामध्ये पाणी पीत होता. सरोवरामध्ये पाणी कमी होते त्यामुळे हत्ती पुढेपुढे गेला आणि दलदलीत फसला.वृद्धावस्थेमुळे हत्तीला दलदलीतून निघणे शक्य नव्हते, त्यामुळे तो जोरजोरात ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून माहूत त्याच्याकडे धावत आले, परंतु सरोवरातून त्याला बाहेर काढणे कुणालाही जमेना. तेंव्हा त्यांनी त्याच्या शरीराला भाले टोचायला सुरुवात केली. कारण भाल्याच्या टोचण्याने तो सर्व शक्तीनिशी प्रयत्न करेल आणि बाहेर येईल, पण हत्ती बाहेर येऊ शकला नाही. भाल्याच्या टोचण्याने हत्तीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. राजापर्यंत हि वार्ता गेली. त्याने तत्काळ त्या हत्तीच्या जुन्या आणि अनुभवी माहुताला बोलावणे पाठविले. माहूत आला, राजा शेजारीच उभा होता.त्याने राजाला असा सल्ला दिला, ”महाराज! तत्काळ युद्धाचे नगारे वाजवा, सैन्य या सरोवराभोवती गोळा करा, आक्रमणाच्या घोषणा सैनिकांना द्यायला सांगा.” राजाने त्याचे म्हणणे ऐकले आणि युद्धाचे नगारे वाजविण्याचा हुकुम दिला. मग काय म्हणता, नगारे वाजू लागले, सैनिकांच्या रांगा शिस्तबद्धपणे लागल्या, आक्रमणाच्या घोषणा ऐकू येवू लागल्या. त्याबरोबर हत्तीच्या अंगात वीरश्री संचारली आणि तो त्या दलदलीतून बाहेर पडला. त्याचे मनोबल हे युद्धासाठी तयार झाले होते. राजाने जुन्या माहुताचे आभार मानले आणि बक्षीस दिले.नशीब जर काही ‘अप्रतिम’ देणार असेल तर त्याची सुरुवात ‘अशक्य’ गोष्टीने होते….!🚀•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11 मार्च 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://chat.whatsapp.com/DaK0QvLfzbe6E1coFTHAsC••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ♦️ *_ या वर्षातील ७० वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ♦️ *_महत्त्वाच्या घटना:_* ♦️••••••••••••••••••••••••••••••••••••*२०११: जपानमधील सेन्डाइच्या पूर्वेला झालेल्या ८.९ रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने त्सूनामीची प्रचंड लाट आली. यात जपानमधील हजारो लोक मृत्यूमुखी पडले.**२००१: बॅडमिंटनपटू पी.गोपीचंदने तब्बल एकवीस वर्षानी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद भारतास मिळवून दिले.या आधी प्रकाश पदुकोण यांनी ते मिळवले होते.**२००१: कसोटी क्रिकेटमधे हॅटट्रिक घेणारा हरभजनसिंग हा पहिला भारतीय गोलंदाज बनला.त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही कामगिरी केली**१९९३: उडिया कवी व साहित्यिक रमाकांत रथ यांना उपराष्ट्रपती के.आर.नारायणन यांच्या हस्ते 'सरस्वती सन्मान' पुरस्कार प्रदान.**१८८९: पंडिता रमाबाईंनी मुंबईत "शारदा सदन" ही विधवांसाठी व कुमारीकांसाठी शाळा सुरू केली**१८८६: अमेरिकेतील फिलाडेल्फिया विद्यापीठातून डॉक्टर होणारी पहिली भारतीय महिला आनंदीबाई गोपाळराव जोशी यांना पदवी प्रदान**१८१८: इंग्रज फौजांनी पुरंदरला वेढा घातला.*♦️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ♦️••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९०: शुभांगी सदावर्ते -- अभिनेत्री* *१९८५: अजंता मेंडिस – श्रीलंकेचा गोलंदाज**१९८१: भावना कुलकर्णी-भालेराव -- बालकथाकार, कवयित्री**१९७७: वृषाली हरीश कुलकर्णी -- कवयित्री, कथालेखिका* *१९७४: जान्हवी जगन्नाथ सारंग -- कवयित्री**१९६६: मोहित चौहान -- भारतीय गायक**१९६०: रमेश चिल्ले -- कवी, लेखक* *१९६०: डॉ. श्रीदेवी शंकरअप्पा कडगे(आनेराव) -- लेखिका**१९५८: पुरुषोत्तम गं. निकते -- कवी* *१९५४: विनोद दुआ -- भारतातील हिंदी टेलिव्हिजन पत्रकार आणि कार्यक्रम संचालक (मृत्यू: ४ डिसेंबर २०२१ )**१९५२: प्रा. डॉ. विश्वास किसन पाटील -- लेखक**१९४९: डॉ. लिना विलास मोहाडीकर -- लेखिका* *१९४५: डॉ अनधा केसकर -- कादंबरीकार, कथाकार**१९४०: दया डोंगरे -- ज्येष्ठ अभिनेत्री* *१९३८: प्रा. डॉ. सुनंदा देशपांडे -- लेखिका, समीक्षक* *१९३५: प्रा. डॉ. श्रीराम घनश्याम पंडित -- प्रसिद्ध लेखक, कवी तथा संस्कृत विषयाचे अभ्यासक**१९२९: मालती मोरेश्वर निमखेडकर -- कवयित्री, कथाकार (मृत्यू: २०१६ )**१९२३: मा. गो. उपाख्य बाबुराव वैद्य (माधव गोविंद वैद्य) -- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते,भाष्यकार,पत्रकार, संपादक, संस्कृत साहित्याचे अभ्यासक (मृत्यू:१९ डिसेंबर २०२०)**१९२२: सरोज अहंकारी -- बालसाहित्यिक कवयित्री, लेखिका**१९१७: धोंडो विठ्ठल देशपांडे -- लेखक, समीक्षक (मृत्यू: १९ जुलै १९९३ )* *१९१६: हॅरॉल्ड विल्सन – इंग्लंडचे पंतप्रधान (मृत्यू: २४ मे १९९५ )**१९१५: विजय हजारे – क्रिकेटपटू (मृत्यू: १८ डिसेंबर २००४ )**१९१२: शंकर गोविंद साठे -- मराठीतले कवी, कथालेखक आणि नाटककार(मृत्यू: २४ डिसेंबर २००० )*♦️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ♦️••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३: कमलाकर नाडकर्णी -- ज्येष्ठ मराठी नाट्यसमीक्षक (जन्म: १० जानेवारी १९३५ )**२०१३: ब्रिज मोहन व्यास -- बॉलीवूडचा एक भारतीय अभिनेता(जन्म: २२ ऑक्टोबर १९२० )**२००६: स्लोबोदान मिलोसोव्हिच – सर्बिया व युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष (जन्म: २० ऑगस्ट १९४१ )**१९९३: शाहू मोडक – हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते (जन्म: २५ एप्रिल १९१८ )**१९८०: अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे -- सर्वोदयी नेते व विचारवंत(जन्म: ७ ऑक्टोबर १८९७ )**१९७९: यशवंत कृष्ण उर्फ आप्पासाहेब खाडिलकर -- नवाकाळचे दुसरे संपादक (जन्म: १५ जानेवारी १९०५ )**१९७०: अर्ल स्टॅनले गार्डनर – अमेरिकन लेखक आणि वकील (जन्म: १७ जुलै १८८९ )**१९६५: गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा ’धूमकेतू’ – गुजराथी कथाकार व कादंबरीकार. (जन्म: १२ डिसेंबर १८९२ )**१९५५: अलेक्झांडर फ्लेमिंग – नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ (जन्म: ६ ऑगस्ट १८८१ )**१९४३: ॲड. यादव माधव उपाख्य अण्णासाहेब काळे -- विदर्भाच्या इतिहासाचे सखोल अभ्यासक (जन्म: १८ फेब्रुवारी १८८२ )**१६८९: छत्रपती संभाजी महाराज -- मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती (जन्म: १४ मे १६५७ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••**फ्रेश मॉर्निंग बुलेटिन* या समूहात join..... होण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *अजित पवारांनी सादर केला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प; बजेटमध्ये 36 हजार कोटींची तरतूद, पण लाडक्या बहिणींना 2100 रुपये नाहीच*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *दिल्ली: भारतीय जनता पक्षाचा पुढील राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून महिला नेत्याचे नाव लवकरच जाहीर करण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *जगातील ४०% मुलांना ते बोलू किंवा समजतील अशा भाषेत शिक्षण मिळत नाही - युनेस्कोचा अहवाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *जेजुरी देवस्थान ट्रस्टचा मोठा निर्णय; पाश्चिमात्य कपड्यांना मंदिरात बंदी, भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू, मराठमोळा पोशाख हवा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नवे शिक्षण धोरण आणि त्रिभाषिकतेवरून संसदेत गदारोळ, द्रमुक खासदार घोषणाबाजी करत शिक्षणमंत्र्यांकडे गेले*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज्याचे नवगृहनिर्माण धोरण योजना आणणार, आतापर्यंत 44 लाख 7 हजार घरकुले मंजूर, सरकारकडून अनुदानात 50 हजार रुपयांची वाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *निवृत्तीबात रोहित शर्मा स्पष्टच बोलला; जे काही आहे ते सुरु राहील, अफवांना हवा देऊ नका, मी वनडेतून आत्ताच निवृत्त होणार नाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 भाऊसाहेब उमाटे, इतिहास संशोधक, लातूर👤श्री प्रलोभ कुलकर्णी, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक जि. प. हा. वाघी जि. नांदेड.👤 विजय नागलवार, अभियंता, पुणे👤 सूर्यकांत सोनकांबळे👤 रमेश कवडेकर👤 संदीप दुगाडे👤 संतोष देवणीकर, शिक्षक, देगलूर👤 जब्बार मुलाणी*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 14*हा एक चमत्कारिक कागद**आम्ल अल्कलीत रंग बदलतो**पहा मुलांनो गंमत जवळून**जादूची हा कांडी फिरवतो*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - जीभ ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जे कार्य तडीस न्यायचे असते ते चिकाटीने केले तर त्यात नक्कीच यश मिळते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतीय लोक 'मॉरिशस' या देशाला संक्षिप्तमध्ये काय म्हणतात ?२) मॉरिशसमध्ये किती टक्के भारतीय लोक राहतात ?३) मॉरिशस हा देश केव्हा स्वतंत्र झाला ?४) मॉरिशस या देशाची राजधानी कोणती ?५) मॉरिशस या देशाची लोकसंख्या किती आहे ? *उत्तरे :-* १) मोरस २) ७० टक्के ३) १२ मार्च १९६८ ४) पोर्ट लुईस ५) १३ लाख*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुम्हाला हा प्रश्न कधी पडलाय का की सातारच्या पेढ्यांना कंदी पेढे असच कां म्हणतात?*अहो मग भिडू कशा साठी आहे? आम्ही सांगायलाच बसलोय.गोष्ट आहे दीडशे वर्षापूर्वीची. भारतात ब्रिटीश राजवट सुरु होती. साताऱ्यात छत्रपतींच्या संस्थानावर देखील ब्रिटीश रिजंट बसवण्यात आले होते. हे अधिकारी इंग्लंडवरून आलेले होते. त्यांना गोड खाण्याची सवय होती. मग ते कायम वेगवगेळ्या मिठाईच्या शोधात असायचे.सातारा जिल्ह्यातील जो पाटणकडचा डोंगराळ भाग आहे तिथे त्याकाळात शेतीच प्रमाण कमी होतं. लोकांच उपजीविकेच साधन मुख्यसाधन हे पशुधन होतं. तिथल्या गायी म्हैशीच वैशिष्ट्य म्हणजे त्या रानावनात वाढलेल्या होत्या. विकतचा चारा हा प्रकार तिथे नव्हता. यामुळे त्यांचं दुध घट्ट आणि अस्सल असायचं. शिवाय ते मुबलक प्रमाणात उपलब्ध होतं होतं. हे दुध जवळच मोठ शहर म्हणून सातारला पाठवून दिल जायचं.काहींनी या दुधाला कढईत उकळून त्यात साखर किंवा गुळ टाकली. हे मिश्रण घट्ट झाल्यावर त्याचे छोटे छोटे गोळे बनवले. ते एका करंडीमध्ये भरून ब्रिटीश अधिकाऱ्यांना पेश केले. ब्रिटीशांना ही मिठाई प्रचंड आवडली. त्यांना करंडी म्हणता येत नसल्यामुळे त्यांनी त्याला कँडी म्हणायला सुरवात केली. पुढे याच कँडीच आपल्या सातारकरांनी कंदी केलं. साधारण याच काळात छत्रपतींच्या नवव्या वंशजानी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील खडकलाट या गावातून काही मिठाई बनवणाऱ्या कुटुंबाना साताऱ्यात आणून वसवलं होतं. त्यांनी बनवलेले कंदी पेढे लोकप्रिय होत गेले. पुढे त्यांनाच लाटकर अस ओळखल जाऊ लागले. कंदी पेढ्याला सातासमुद्रापार नेलं ते मात्र तुळजाराम मोदी या हलवायांनी. त्यांनी सत्तरवर्षापूर्वी विमानात, लंडनमधील सुप्रसिद्ध ठिकाणी या कंदी पेढ्यांच्या जाहिराती लावल्या. त्यामुळेच हा पेढा कानाकोपऱ्यात पोहचला.आजही एवढ्या वर्षांनी एवढी तंत्रज्ञानात सुधारणा होऊनदेखील मोदी आणि लाटकर हलवाई मात्र कंदी पेढ्याचा खवा आजही कढईतच भाजतात व प्रत्येक पेढा हातावरच वळला जातो. खव्याची भाजणी विशिष्ट प्रकारे केल्यामुळे पेढ्याची पौष्टिकता, चव व टिकाऊपणा वाढतो. म्हणूनच गेली १०० वर्ष सातारच्या कंदी पेढ्यांची चव आणि गुणवत्ता तशीच टिकून आहे. भारतात अनेक ठिकाणचे पेढे प्रसिद्ध आहेत. पेढ्याची जन्मभूमीच मथुरा ही आहे. उत्तरेतून ठाकूरराम रतन सिंह यांनी हे पेढे दक्षिणेत धारवाड येथे आणले. त्यांना धारवाडी पेढे म्हणून ओळखल जात.महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणचे पेढे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. यात कोल्हापूरचे फिक्के पेढे, कुंथलगिरीचे पेढे, वाडीचे पेढे व खूप काही. मात्र इतर पेढ्यांच्या तुलनेत सातारचे पेढे हे खवा जास्त भाजल्यामुळे भुरकट दिसतात. कमी साखर हे या पेढ्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. परिणामी हा पेढा सहा ते आठ दिवस सहज टिकतो. सातारच्या कंदी पेढ्याची सिक्रेट रेसिपी म्हणजे हे पेढे डबल भाजलेले आहेत, हे पेढे सह्याद्रीतल्या रानातला चारा खाणाऱ्या गाई म्हैशीपासून बनलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे इथल्या पेढ्यांमधेय सातारच्या माणसांचा स्वॅग मिक्स झालाय. या सगळ्या मुळे सातारच्या पेढ्याचा ब्रँड जगात फेमस झालाय.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुवां येथें यावेम कीं मज तेथें न्यावें । खंती माझ्या जीवें मांडियेली ॥१॥ माझें तुजविण येथें नाहीं कोणी । विचारावें मनीं पांडुरंगा ॥२॥ नामा म्हणे वेगीं यावें करुणाघना । जातो माझा प्राण तुजलागीं ॥३॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन जगत असताना अनेक माणसं भेटत असतात. त्यातील सर्वजण एक सारखे विचाराचे असतील असेही नाही. सोबत ते आपल्याला समजून घेतीलच असेही नाही. त्यातील काही माणसं मार्गदर्शक, दिशादर्शक असतात तर काहीजण व्यावसायिक, चालाख व अति स्वार्थी व्यापारी असतात म्हणून जरा सावध रहावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *हरिण व कोल्हा*एका कोल्हयाला फिरण्याचा फार नाद होता, तो या गावाहून त्या गावाला सारखा फिरत राही, प्रवास करता करता तो एका गावाला आला. तिथे त्याला एका तलावात पाणी पीत असलेली काही हरणे दिसली. ती पाणी पितापिता मधेच अकाशाकडे पहात होती हे पाहून कोल्हयाने त्यांना असे करण्याचे कारण विचारले, तेव्हा हरणे म्हणाली, 'आम्ही देवाचे आभार मानतो देवाच्याच दयेनं हे पाणी प्यायला मिळतं आहे.' हरणांचे हे बोलणे ऐकून कोल्हयाला हसू आले व तो त्यांची टिंगल करू लागला. यावर त्यातले एक स्पष्टवक्ते हरीण कोल्हयाला म्हणाले, 'अरे कोल्होबा ज्याची त्याची श्रध्दा असते, अशी दुसऱ्याची टिंगल उडविणे वाईट आहे. आपले वागणे वाईट अशा विकृत दृष्टिकोन असलेल्या तुझ्याकडून समंजसपणाची अपेक्षा का करावी.'तात्पर्यः 'दुसऱ्याच्या श्रध्देविषयी टिंगल करणे हे असभ्यपणाचे लक्षण आहे.'•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 10 मार्च 2025💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://chat.whatsapp.com/DaK0QvLfzbe6E1coFTHAsC••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🛟 *_केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF) स्थापना दिवस_*••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🛟 *_ या वर्षातील ६९ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🛟 *_महत्त्वाच्या घटना:_* 🛟••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९८: भारतीय ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याला लिनारेस सुपर ग्रँडमास्टर बुद्धीबळ स्पर्धेत विजेतेपद**१९७७: सूर्यमालेतील युरेनस ग्रहाला शनीसारखी कडी असल्याचा शोध लागला.**१९७२: वेलकम थिएटर निर्मित, विजय तेंडुलकर लिखित व कमलाकर सारंग दिग्दर्शित ’सखाराम बाईंडर’ या नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर येथे झाला.**१९५२: केंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगीळ यांच्या हस्ते पिंपरी येथील हिंदुस्थान अॅंटिबायोटिक्स या पेनिसिलीन कारखान्याचा पायाभरणी समारंभ झाला**१९२२: प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल महात्मा गांधींना शिक्षा झाली.**१९१५: गांधीजींनी शांतिनिकेतन मध्ये स्वावलंबनाचे धडे सुरू केले* 🛟 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🛟 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९६: मंगेश गंगाधर सावंत -- कवी* *१९९४: गायत्री दातार -- मराठी टेलिव्हिजन अभिनेत्री**१९९३: प्रनूतन मोहनीस बहल -- अभिनेत्री* *१९९०: प्रितम सोन्याबापू पवळ(प्रेमकवी)-- प्रसिद्ध कवी, पत्रकार* *१९८७: चिराग संदीप पाटील -- अभिनेता**१९८६: गुलाब रमेश बिसेन -- लेखक**१९८२: कृष्णा प्रल्हाद शिंदे -- कवी**१९८१: प्रा. डॉ. सुधाकर पंडितराव बोथीकर -- लेखक**१९८१: सतीश दराडे -- मराठीचे प्रसिद्ध कवी आणि गझलकार (मृत्यू: ८ सप्टेंबर २०२४ )**१९७९: उत्तम भास्कर चारोस्कर -- लेखक**१९७८: चिन्मय कोल्हटकर -- हार्मोनियम वादक आणि संगीतकार*. *१९७७: शिल्पा तुळसकर --- मराठी आणि हिंदी चित्रपट तसेच दूरचित्रवाणी अभिनेत्री* *१९७६: रमेश शिवाजी इंगवले -- कवी* *१९७५: अजित परब -- भारतीय संगीत दिग्दर्शक आणि संगीतकार* *१९७४: प्रा. डॉ. घ.ना.पांचाळ -- कवी**१९७४: वीरभद्र गणपती मिरेवाड -- कवी लेखक* *१९७२: किरण विश्वनाथ भावसार -- कवी, बालसाहित्यिक**१९६६: संदिपान एकनाथ पवार -- कवी, लेखक**१९६६: डॉ. मुरारी सोपानराव काळे -- लेखक* *१९६४: प्रा. डॉ. विद्याधर देवदास बन्सोड -- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९५८: राजाराम सूर्यवंशी -- लेखक**१९५४: सदानंद भणगे -- प्रसिद्ध मराठी लेखक**१९५२: प्रा. अशोक बागवे -- मराठी भाषेतील सुप्रसिद्ध कवी, गीतकार लेखक* *१९४९: पदमा खन्ना -- भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना* *१९४९: न्यायमूर्ति हेमंत लक्ष्मण गोखले -- पूर्व मुख्य न्यायाधीश**१९४९: मनोहर सदाशिव नाईक -- लेखक व्याख्याते (मृत्यू: १९ ऑक्टोबर २०२० )**१९४५: माधवराव शिवाजीराव शिंदे – केन्द्रीय रेल्वे मंत्री, नागरी हवाई वाहतूक मंत्री, काँग्रेसचे नेते व ग्वाल्हेरच्या राजघराण्याचे वंशज (मृत्यू: ३० सप्टेंबर २००१ )**१९४४: स्वाती बाळकृष्ण सामक -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका* *१९३९: असगरअली इंजिनिअर -- ज्येष्ठ लेखक प्रख्यात विचारवंत (मृत्यू: १४ मे २०१३ )* *१९३६:अॅड. सूर्यकांत जागोबाजी डोंगरे -- महाराष्ट्र विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते ( मृत्यू: १९ जुलै २०१४ )**१९२९: कविवर्य मंगेश पाडगावकर -- मराठीतील नामवंत कवी (मृत्यू: ३० डिसेंबर २०१५ )**१९२६: सखाराम कृष्ण देवधर -- ज्ञानेश्वरीचे अभ्यासक (मृत्यू: ४ जानेवारी १९९७ )**१९१८: ’स्वरराज’ छोटा गंधर्व (मृत्यू: ३१ डिसेंबर १९९७ )**१९१६: शरदचंद्र गोपाळराव टोंगो -- विदर्भातील लेखक तसेच पत्रकार (मृत्यू: ५ नोव्हेंबर २००९ )* *१९१३: माधव गोपाळ देशमुख -- समीक्षक( मृत्यू: २४ जून १९७१ )**१९१०: मोहंमद सादिक -- ब्रिटिशकालीन भारतातले हिंदी चित्रपट दिग्दर्शक(मृत्यू: ३ ऑक्टोबर १९७१ )**१९०४: रघुनाथशास्त्री गोपाळ कोकजे-- लेखक (मृत्यू: १९७६ )**१८७१: नारायण दाजीबा वाडेगावकर -- संस्कृत, व्याकरणशास्त्राचे भाष्यकार (मृत्यू: १२ फेब्रुवारी १९५० )**१८६३: सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) – बडोद्याचे महाराज,सुधारणावादी संस्थानिक, पडदा पद्धती,विधवा विवाहाला संमती दिली.(मृत्यू: ६ फेब्रुवारी १९३९ )*🛟 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🛟 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३: श्रीकृष्ण बेडेकर -- ज्येष्ठ पत्रकार, लेखक संपादक (जन्म: ६ डिसेंबर १९४४ )* *_१९९९: विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ 'कुसुमाग्रज' – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, कवी व नाटककार (जन्म: २७ फेब्रुवारी १९१२ )_**१९९०: प्रा. बा. र. देवधर -- संगीत तज्ज्ञ, गुरुवर्य (जन्म: ११ सप्टेंबर १९०१ )* *१९८५: कॉन्स्टंटिन चेरेनेन्को – सोविएत रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सचिव (जन्म: २४ सप्टेंबर १९११ )**१९८४: इंदर सेन जोहर(आयएस जोहर) -- भारतीय अभिनेता, लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक (जन्म: १६ फेब्रुवारी १९२० )* *१९७१: सीताराम पुरुषोत्तम तथा कर्मवीर अप्पासाहेब पटवर्धन – कोकण गांधी (जन्म: ४ नोव्हेंबर १८९४ )**१९५९: बॅ. मुकुंद रामराव जयकर – कायदेपंडित, पं.मोतीलाल नेहरूंचे सहकारी, संसदपटू आणि पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू (जन्म: १३ नोव्हेंबर १८७३ )**_१८९७: सावित्रीबाई फुले –भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री, भारतातील पहिल्या महिला शिक्षिका (जन्म: ३ जानेवारी १८३१ )_**१८७२: जोसेफ मॅझिनी – इटालियन स्वातंत्र्यवीर (जन्म: २२ जून १८०५ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*फ्रेश मॉर्निंग बुलेटिन* समुहात join..... होण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट, २ कोटी ५२ लाख महिलांना हप्त्याचे वाटप*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *दिल्लीत पहिले ब्राह्मण भवन आणि वसतिगृह, गुढीपाडव्याला होणार समाजार्पण; 500 विद्यार्थ्यांसाठी राहण्याची सोय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *देशात पहिलं विवाहपूर्व समुपदेशन व संवाद केंद्र नाशिक मध्ये सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कुंभमेळ्यात खादी उत्पादनाची विक्रमी विक्री, 12 कोटीपेक्षा अधिक व्यवसाय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबई - राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मसूर डाळीवर 10 टक्के आयात शुल्क लागू, पिवळ्या वाटण्यास मुदतवाढ - केंद्र सरकारचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अंतिम सामन्यात न्यूझीलंडला 4 विकेट्स ने हरवून भारताने ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, कर्णधार रोहित शर्मा ठरला मॅन ऑफ दि मॅच*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 दत्तप्रसाद पांडागळे, नांदेड जिल्हाध्यक्ष, शिक्षक परिषद👤 शिवराज विठ्ठल सावंत, शिक्षक, सिंधुदुर्ग👤 वीरभद्र मिरेवाड, शिक्षक तथा कवी,नायगाव👤 तुळशीराम सिरमलवार, शिक्षक, धर्माबाद👤 विठ्ठल नवाथे, शिक्षक, बिलोली👤 नागनाथ लाड, शिक्षक, कुंडलवाडी👤 गायत्री यनगंदलवार, शिक्षिका, धर्माबाद👤 साईनाथ शिरपुरे, भाजपा कार्यकर्ते, धर्माबाद👤 शिवप्रसाद जाधव👤 माधव आप्पा पडोळे👤 ऍड. शिवाजी जाधव👤 रमेश यंगे👤 संतोष पवार👤 उमाकांत बनगडकर👤 पवन पाटील ढगे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 13*बत्तीस सैनिक तुटून पडतात**बारीक तुकड्यात पाणी मिसळते**एक महाराणी मात्र मजेत**आस्वाद त्यांचा आनंदाने घेते*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - दात••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अज्ञान , आळस आणि अंधश्रद्धा या तीन गोष्टीमुळे माणसाची अधोगती होते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) खाजगी क्षेत्रातील फेडरल बँकेने कोणाला पहिले 'ब्रँड ॲम्बेसेडर' नियुक्त केले आहे ?२) जगात सर्वात जास्त खजूर कोणत्या देशात पिकतो ?३) बीड जिल्ह्यातील कोणते गाव पूर्वी मोमिनाबाद म्हणून ओळखले जाई ?४) 'क्षय' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) 'जहागीर आर्ट गॅलरी' कोणत्या शहरात आहे ? *उत्तरे :-* १) विद्या बालन, अभिनेत्री २) इजिप्त ३) अंबाजोगाई ४) झीज, ऱ्हास ५) मुंबई*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *टेस्ट ट्युब बेबी म्हणजे काय ?* 📙**************************गर्भाशयाबाहेर कृत्रिम गर्भधारणा घडवुन आणल्याने वंध्यत्व असलेल्या बर्याच स्त्रियांना व त्यांच्या कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. कृत्रिम गर्भधारणा होऊन मुल जन्माला आले ते सर्वप्रथम इंग्लंडमध्ये. १९७८ मध्ये इंग्लंड येथे एडवर्ड आणि स्टेप्टो यांनी कृत्रिम गर्भधारणेने मुल जन्मल्याची माहिती जगाला दिली. १९८६ पर्यंत जगात ११००० मातांमध्ये यापद्धतीने गर्भधारणा झाली होती. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अशा पद्धतीने जन्माला येणार्या मुलांना टेस्ट ट्युब बेबी असे म्हटले जाते. या पद्धतीत काय करतात ते अाता पाहु. सर्वप्रथम स्त्रीच्या बिजांडातुन बीज काढले जाते. तिच्या पतीच्या शुक्राणुबरोबर नियंत्रित अशा प्रयोगशाळेतील परिस्थितीत त्या बीजाचा संयोग घडवुन आणला जातो. नंतर हे फलन झालेले अंडे स्त्रीच्या गर्भाशयात सोडले जाते. तेथे ते रुजते व त्यानंतर नैसर्गिकरीत्या जशी वाढ होते, त्याप्रमाणेच गर्भाची वाढ होते. प्रसूतीही नेहमीप्रमाणे होते. मूल ९ महिने ९ दिवस परीक्षानळीत वाढत नाही; हे आता तुमच्या लक्षात आले असेलच.मासिक पाळीच्या चक्रात बीजांडातुन स्त्रीबीज बाहेर येते. ते गर्भाशयाच्या दोन नलिकांद्वारे ओढुन घेतले जाते. नंतर या नलिकांमध्ये शुक्राणु व स्त्रिबीज यांचे मिलन होते. या नलिका जर रोगग्रस्त वा खराब झालेल्या असतील, तर स्त्रीला वंध्यत्व येते. अशा वंध्यत्वात टेस्ट ट्युब बेबी या पद्धतीचा खुपच उपयोग होतो व मातृत्वाला पारख्या होणार्या स्त्रियाही मुलाला जन्म देऊ शकतात.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुझ्या पायीं चित्त रंगलेसें माझें । नाहीं केशिराजें ऐसें केलें ॥१॥ उठवितां काय होईल संतोष । मज अभाग्यास मोकलीलें ॥२॥ प्रपंच कावाडी न घाली मज दृढ । नको वाडें कोड झणीं देवा ॥३॥ नामा म्हणे भावें विनंति समस्तां । नको भंगू आतां प्रेमपान्हा ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण करत असलेल्या नि:स्वार्थ कार्याविषयी व परखडपणे मत व्यक्त करताना आपल्या मागे, पुढे निंदा, चुगली,टिंगल, टवाळी होत असेल किंवा आपल्यावर मोठ्याने हसत असतील तर तो, आपल्यासाठी आशीर्वाद समजावा. कारण ते, सर्व कार्य करण्याची तसेच ह्या फालतू गोष्टी कडे लक्ष न देण्याची आपल्याला योग्य ती कला जमलेली असते. आणि एका अर्थाने बघितले तर..ते काम पाहिजे तेवढे सोपे नाही. आणि ती कला प्रत्येकाला जमेलच असेही नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *चोर आणि राजा*गौतम बुद्धा सोबत एक लहान मुलगा बसलेला असतांना त्यावेळेस तिथून एका चोराला काही शिपाई पकडून नेत होते, त्या मुलाने गौतम बुद्धाना विचारले "तो कोण आहे आणि त्याच्या भोवती शिपाई का आहेत?" बुद्ध म्हणाले"तो चोर आहे, त्याला पकडले आहे, त्याला आता शिक्षा होईल व तो तुरुंगात जाईल". थोड्या वेळा नंतर त्या नगरीचा राजा येत होता आणि त्याच्या भोवती पण शिपाई होते, त्यावेळेस मुलगा लगेच गौतम बुद्धानां म्हणाला " तो बघा आजून एक चोर आला", गौतम बुद्ध म्हणाले "तो राजा आहे." मुलगा गौतम बुद्धाना म्हणाला "काय फरक आहे? राजा भोवती पण शिपाई आहे आणि चोरा भोवती पण शिपाई आहे." गौतम बुद्ध म्हणाले "जमीन आसमानचा फरक आहे, त्या चोराच्या भोवती जे शिपाई होते त्यांच्या ताब्यात तो चोर होता, त्याला काहीही करायचे स्वतंत्र नाही, जिकडे नेतील तिकडे जायचं, जिथे ठेवतील तिथे राहायचे, देतील ते खायचं, त्याला स्वतच्या मनाच काहीच करता येत नाही." राजाच्या भोवती जे शिपाई आहेत ते राजाच्या ताब्यात आहेत, राजा सांगेन तिकडे नेतील, जे सांगणार ते करणार, राजा बोलला कि तुम्ही जा मला एकटे राहू देत, राजा मुक्त आहे." "आपले मन, आपल्या भावना आणि आपले विकार हे शिपाई आहेत', आपण त्यांच्या ताब्यात असलो तर आपण 'चोर' आहोत, ते आपल्या ताब्यात असले तर आपण 'राजा' आहोत. निवड तुमची आहे."•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 08 मार्च 2025💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1R3G1XFbNg/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🏵️ *_आंतरराष्ट्रीय महिला दिन_* 🏵️•••••••••••••••••••••••••••••••••••• 🏵️ *_ या वर्षातील ६७ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🏵️ *_महत्त्वाच्या घटना:_* 🏵️••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९३: दमानिया एअरवेज या खाजगी विमानवाहतुक कंपनीने आपल्या पहिल्या विमानाला ‘स्पिरीट ऑफ जे. आर. डी.’ असे नाव देण्याचे ठरविले**१९५७: घानाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९४८: फलटण संस्थान भारतीय गणराज्यात विलीन झाले**१९४२: जपानने म्यानमारची राजधानी रंगून जिंकली**१९११: आंतरराष्ट्रीय महिला दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.**१८१७: न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजची (NYSE)स्थापना**१६७३: शिवाजी महाराजांनी पन्हाळ्याचा किल्ला ताब्यात घेतला*🏵️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🏵️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८९: हरमनप्रीत कौर -- प्रसिद्ध भारतीय महिला क्रिकेट खेळाडू* *१९८०: सुनिता झाडे -- लेखिका, संपादिका* *१९७४: फरदीन खान – हिन्दी चित्रपट कलाकार**१९७२: सारिका राजेंद्र सोनजे -- कवयित्री, नाट्यकलावंत* *१९७१: वंदना निशिकांत ढवळे -- बाल साहित्यावर विपुल लेखन करणा-या लेखिका**१९६१: मालविका यशवंत देखणे -- प्रसिद्ध लेखिका* *१९५५: प्रा. डॉ. श्रीधर (राजा) दीक्षित -- प्रसिद्ध लेखक, ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ आणि विचारवंत, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे पूर्व अध्यक्ष व प्रमुख संपादक**१९५४: गणपत बलवंत व्यास -- कवी, लेखक* *१९५४: दिगंबर कामत -- गोव्याचे माजी मुख्यमंत्री* *१९५३: प्रा. गंगाधर गिते -- लेखक* *१९५३: वसुंधरा राजे शिंदे -- राजस्थान राज्याच्या पूर्व मुख्यमंत्री* *१९५३: विठ्ठल साठे -- लेखक, कादंबरीकार**१९५१: माधवी ओंकार घारपुरे -- प्रसिद्ध लेखिका* *१९३१: मनोहारी सिंग – पट्टीचे सॅक्सोफोन वादक (मृत्यू: १३ जुलै २०१० )**१९३०: चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ ’आरती प्रभू’ – साहित्यिक (मृत्यू: २६ एप्रिल १९७६ )**१९२८: प्रा. वसंत अनंत कुंभोजकर -- शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत आणि लेखक**१९२१: अब्दूल हयी ऊर्फ ’साहिर लुधियानवी’ – शायर व गीतकार (मृत्यू: २५ ऑक्टोबर १९८० )**१९१८: इंदुमती पारीख -- व्यवसायाने डॉक्टर , बुद्धिवादी सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका (मृत्यू: १७ जून २००४ )**१८९३: दामूअण्णा बापूशेठ मालवणकर -- मराठी चित्रपट-नाटकांतून विनोदी भूमिका करणारे नट(मृत्यू: १४ मे १९७५ )* *१८८१: पंडित अनंत(अंतुबुवा) मनोहर जोशी -- हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या ख्याल -शैलीचे भारतीय गायक (मृत्यू: १२ सप्टेंबर १९६७ )**१८७९: ऑटो हान – नोबेल पारितोषिकविजेते जर्मन शात्रज्ञ (मृत्यू: २८ जुलै १९६८ )**१८६४: हरी नारायण आपटे – प्रसिद्ध कादंबरीकार (मृत्यू: ३ मार्च १९१९ )**१८३३: विश्वनाथ मंडलिक -- मुंबईतील प्रख्यात, वकील, लेखक (मृत्यू: ९ मे १८९९ )* 🏵️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🏵️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१६: सर जॉर्ज मार्टिन -- संगीत निर्माते (जन्म: ३ जानेवारी १९२६ )**२०१५: प्रा. मधुकर नारायण लोही -- ज्येष्ठ साहित्यिक (जन्म: २४ मे १९२३ )**२००४: सुशांत रे तथा सिद्धार्थ रे - मराठी सिने-नाटकातील एक अभिनेता (जन्म: १९ जुलै १९६३ )**१९९४: देविका रानी -- हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री(जन्म: ३० मार्च १९०८ )**१९५७: बाळ गंगाधर तथा ’बाळासाहेब’ खेर – स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री (जन्म: २४ ऑगस्ट १८८८ )**१९४२: जोस रॉल कॅपाब्लांका – क्यूबाचा बुद्धीबळपटू (जन्म: १९ नोव्हेंबर १८८८ )**१७०२: विल्यम (तिसरा) – इंग्लंडचा राजा (जन्म: १४ नोव्हेंबर १६५० )* *_जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा_*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागतिक महिला दिनानिमित्त प्रासंगिक लेख*जागतिक महिला दिन आणि ग्रामीण महिला*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शेतकऱ्यांना दिवसा वीज, 1 कोटी 34 लाख ग्राहकांना मोफत घरगुती लाईट; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *शाहिरा सीमा पाटील यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील माता रमाई आंबेडकर पुरस्कार जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राहुल गांधींचा गुजरात दौरा, काँग्रेस कार्यालयात बैठक, नेते आणि वॉर्ड अध्यक्षांसोबत 9 तासांत 5 बैठका घेणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान विद्या लक्ष्मी शिक्षण योजनेला दिली मंजुरी, योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला दिले जाईल शैक्षणिक कर्ज*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *लाडक्या बहिणींना महिला दिनाच्या पूर्वसंध्येला योजनेची रक्कम मिळणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महाराष्ट्रात एक लाखा हुन अधिक होर्डिंग्ज हटवले - उदय सामंत यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *प्लेअर ऑफ दि मंथ पुरस्कारासाठी भारतीय खेळाडू शुभमन गिल यांना नॉमिनेशन*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 साहेबराव बोणे, विशेष शिक्षक, धर्माबाद👤 बालाजी पा. कदम चिरलीकर👤 विकास खानापूरकर, शिक्षक, धर्माबाद👤 श्रीनिवास पा. भुतावळे👤 शरणप्पा नागठाणे, साहित्यिक, लातुर👤 संभाजी पाटील , शिक्षक,चाळीसगाव👤 मारोती भोसले, शिक्षक, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 13*मी जन्मानंतर येतो**मृत्यूसोबत जातो**जेवताना मदत करतो**रागात घासला जातो**ओळखा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - सौ. लिना सुपारेजि. प. प्रा. शाळा सुरजखोड जि. नांदेडकालच्या कोड्याचे उत्तर - हवा, वायू••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या कोणत्याही गोष्टींचा त्रास इतरांना होणार नाही याची जाणीव सतत असावी.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) अनंत मुकेश अंबानी यांचा ड्रीम प्रोजेक्ट *वनतारा ( वन्यजीव संरक्षण केंद्र )* कोठे आहे ?२) नुकतेच वन्यजीव संरक्षण केंद्र 'वनतारा'चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले ?३) वन्यजीव संरक्षण केंद्र 'वनतारा' किती एकरमध्ये पसरलेला आहे ?४) अमेरिका या देशाची कोणती अधिकृत भाषा होणार आहे ?५) 'जागतिक महिला दिवस केव्हा साजरा केला जातो ? *उत्तरे :-* १) जामनगर, गुजरात २) नरेंद्र मोदी ३) ३००० एकर ४) इंग्रजी ५) ८ मार्च*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *समतोल आहार म्हणजे काय ?* 📙 **************************आपला आहार समतोल असावा, चौरस असावा हा उपदेश ऐकून आपले कान किटले असतील. 'समतोल' म्हणजे काय हा प्रश्न आपल्याला पडणे स्वाभाविक आहे.समतोल आहार म्हणजे काय ? हे समजण्यासाठी प्रथम आहारात कोणते घटक असणे आवश्यक असते, हे आपण पाहू. कार्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वे, क्षार, पाणी हे अन्नातील सहा प्रमुख घटक होत. कार्बोदके शरीराला ऊर्जा पुरवितात. प्रथिने शरीराच्या जडणघडणीसाठी आवश्यक असतात. स्निग्ध पदार्थांपासून ऊर्जा मिळते, तसेच शरीराच्या महत्त्वाच्या क्रियाप्रक्रियांना मदत होते. अ, ब, क, ड, इ तसेच के ही जीवनसत्त्वे आपल्याला अत्यंत अल्प प्रमाणात लागतात. पण ती मिळाली नाही तर अनेक आजारांना आपल्याला सामोरे जावे लागते. त्याचप्रमाणे सोडियम क्लोराइड सारखे हे क्षारही जगण्यासाठी आवश्यक असतात. पाणी हे तर साक्षात जीवनच ! शरीराच्या वचनांपैकी सुमारे ६४% वजन पाण्याचेच असते. हे सर्व घटक शरीराला योग्य प्रमाणात मिळाले नाही तर कुपोषण, रातांधळेपणा, मुडदूस, रोगप्रतिकारशक्तीचा अभाव, अशक्तपणा, गलगंड, रक्तक्षय इ. कमी पोषणामुळे होणारे आजार वा लठ्ठपणासारखे अतिपोषणामुळे होणारे आजार होऊ शकतात. हे टाळावयाचे असल्यास समतोल आहार घेणे आवश्यक ठरेल. ज्या आहारात वर वर्णन केलेले सर्व घटक योग्य प्रमाणात असतील त्यास समतोल आहार असे म्हणतात. योग्य प्रमाणात म्हणजे व्यक्तीला आवश्यक असलेली ऊर्जा त्यातून मिळाली पाहिजे. जीवनसत्वे, क्षार, पाणी मिळाले पाहिजे. खेरीज अनपेक्षित वा आकस्मित प्रसंगासाठी जसे आजार, अपघात यासाठी अतिरिक्त पोषणही त्याद्वारे मिळायला हवे. एकूण ऊर्जेपैकी ६५ ते ७०% कार्बोदकातून, १५ ते २५ % स्निग्ध पदार्थांतून तर ५ ते १५% प्रथिनांपासून मिळावी. समतोल आहाराचा आपण अंगीकार केला तर निरोगी जीवनाकडे आपली वाटचाल सुरू राहील.आपण रोजचा आपला आहार बघितला तर ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, नाचणी अशा कार्बोदके अधिक असलेल्या अन्नपदार्थांसोबत डाळी, भाजीपाला, तेल, तूप या गोष्टी; तसेच मांस, मासे, दूध, अंडी असे प्राणीज पदार्थ आपण वापरात आणत असतो. हे सर्व अन्नपदार्थ वेगवेगळे परिपूर्ण नसतात. परंतु यातील दोन तीन पदार्थ एकत्र वापरले तर या मिश्रणाचे पोषणमूल्य वाढते. उदाहरणार्थ नुसत्या भाताऐवजी वरण-भात, डाळ-तांदळाची खिचडी, वरण- भाकरी, इडली-सांबार इत्यादी पदार्थांमुळे आहार परिपूर्ण होतो.*डाॅ. अंजली दिक्षित व डाॅ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुझें प्रेम माझ्या दाखवीं मनातें । मग तुझ्या चरणातें न विसंबें ॥१॥ कासया शिणविसी थोडिया कारणें । काय तुझें उणें होईल देवा ॥२॥ चातकाची तहान पुरवी जळधर । काय त्याची थोरी जाऊ पाहे ॥३॥ चंद्र चकोराचा पुरवी सोहोळा । काय त्याच्या कळा न्य़ून होती ॥४॥ कूर्मीं अवलोकीं आपुलिया बाळा । काय तिच्या डोळां दृष्टि नासे ॥५॥ नामा म्हणे देवा तुझाचि भरंवसा । अनाथा कुंवसा होसी तूंचि ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखादी व्यक्ती, फार मोठ्या आजारातून बाहेर येते तेव्हा ती म्हणते की, मला पुनर्जन्म मिळाला आहे. कदाचित हे विचार योग्य असू शकतात. पण माणसाचा पुनर्जन्म खऱ्या अर्थाने त्याच दिवशी होतो ज्या वेळी त्याच्यासोबत धोका होतो आणि एवढेच नाही तर त्याला बाजूला करण्यासाठी कटकारस्थान रचले जाते ही सर्व परिस्थिती जाणून ती व्यक्ती, पुन्हा एकदा मोठ्या हिंमतीने जगून आपले विचार असोत किंवा कार्य नित्यनेमाने करत सत्याला समर्पीत होऊन जगत असते. आणि त्याच्या याच पुनर्जन्मामुळे आणि जगण्यातून अनेकांना नवी दिशा मिळत असते.म्हणून माणसाने प्रत्येक परिस्थितीचा सामना करायला शिकले पाहिजे. शेवटी फुलांवरून चालायला अनेकजण असतात मात्र काटेरी वाटेवर एकट्यालाच चालावे लागते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *हरिण व कोल्हा*एका कोल्हयाला फिरण्याचा फार नाद होता, तो या गावाहून त्या गावाला सारखा फिरत राही, प्रवास करता करता तो एका गावाला आला. तिथे त्याला एका तलावात पाणी पीत असलेली काही हरणे दिसली. ती पाणी पितापिता मधेच अकाशाकडे पहात होती हे पाहून कोल्हयाने त्यांना असे करण्याचे कारण विचारले, तेव्हा हरणे म्हणाली, 'आम्ही देवाचे आभार मानतो देवाच्याच दयेनं हे पाणी प्यायला मिळतं आहे.' हरणांचे हे बोलणे ऐकून कोल्हयाला हसू आले व तो त्यांची टिंगल करू लागला. यावर त्यातले एक स्पष्टवक्ते हरीण कोल्हयाला म्हणाले, 'अरे कोल्होबा ज्याची त्याची श्रध्दा असते, अशी दुसऱ्याची टिंगल उडविणे वाईट आहे. आपले वागणे वाईट अशा विकृत दृष्टिकोन असलेल्या तुझ्याकडून समंजसपणाची अपेक्षा का करावी.'तात्पर्यः 'दुसऱ्याच्या श्रध्देविषयी टिंगल करणे हे असभ्यपणाचे लक्षण आहे.'•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 07 मार्च 2025💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2024/03/world-womens-day.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔰 *_ या वर्षातील ६६ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🔰 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔰•••••••••••••••••••••••••••••••••••• *२००९: केपलर स्पेस ऑब्झर्व्हेटरी या संशोधन संस्थेची स्थापना.**२००६: लष्कर-ए-तैय्यबा या आतंकवादी संघटनेने वाराणसी येथे बॉम्बस्फोट घडवून आणले.**२००५: महिलांना मताधिकार मिळावा म्हणून कुवेत मध्ये संसदेसमोर प्रदर्शन* *१९४७: जयप्रकाश नारायण यांनी काँग्रेस कार्यकरणीचा राजीनामा दिला**१९३६: दुसरे महायुद्ध – व्हर्सायचा तह धुडकावून जर्मनीने र्हाईनलँडमधे सैन्य घुसवले**१८७६: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल याला टेलिफोनचे पेटंट मिळाले.* 🔰 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🔰••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९२: रोहन बेनोडेकर -- लेखक* *१९८८: आदर्श आनंद शिंदे -- मराठी गायक, भीमगीतांसाठी प्रसिद्ध* *१९८४: नितीन अरुण थोरात -- प्रसिद्ध कादंबरीकार, बालसाहित्यिक, स्तंभलेखक, पत्रकार, उपसंपादक, कथालेखक* *१९८२: नितीन साहेबराव वायाळ -- लेखक**१९७६: गणेश शिवाजी मरकड -- प्रसिद्ध कवी, लेखक तथा उपजिल्हाधिकारी* *१९६९: साधना सरगम -- भारतीय प्रसिद्ध पार्श्वगायिका**१९६४: छाया भालचंद्र उंब्रजकर -- कवयित्री, लेखिका* *१९५८: अनिल शर्मा -- प्रसिद्ध दिग्दर्शक**१९५५: अनुपम खेर – प्रसिद्ध चित्रपट अभिनेता**१९५५: ज्योत्स्ना आफळे --कवयित्री, लेखिका* *१९५२: सर विवियन रिचर्ड्स – वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू**१९४९: गुलाम नबी आझाद -- राजकारणी माजी केंद्रीय मंत्री* *१९४२: वसंत काशिनाथ गोडबोले -- संत साहित्याचे व्यासंगी अभ्यासक, हस्ताक्षरतज्ञ* *१९४०: प्रा. वसंत सुदाम वाघमारे -- कवी* *१९३८: मुरलीधर अनंता उर्फ बाबा शिंगोटे -- दैनिक 'पुण्यनगरी'चे संस्थापक-संपादक (मृत्यू: ६ ऑगस्ट २०२० )* *१९३४: नरी कॉन्ट्रॅक्टर – भारताचा यष्टिरक्षक**१९३३: आत्माराम कृष्णाजी सावंत -- मराठीतले लेखक, नट,नाटककार, दिग्दर्शक, पत्रकार (मृत्यू: ४ मार्च १९९६ )* *१९३१: प्राचार्य डॉ. मधुकर सुदाम पाटील -- समीक्षक* *१९२८: डॉ. केशव रामराव जोशी -- संस्कृत पंडित, तत्त्वचिंतक (मृत्यू: १२ जून २०१३ )**१९२५: रवींद्र केळेकर -- कोकणी भाषेतील प्रसिद्ध साहित्यिक,२००६ सालच्या ज्ञानपीठ पुरस्कार विजेते(मृत्यू: २७ ऑगस्ट, २०१० )**१९१८: स्नेहलता दसनूरकर -- मराठी लेखिका, शिक्षणतज्ज्ञ (मृत्यू: ३ जुलै २००३ )**१९१३: डॉ. सुमती बाळकृष्ण क्षेत्रमाडे -- व्यवसायाने डॉक्टर असतानाही,मराठीत कादंबरीलेखन करणाऱ्या लेखिका (मृत्यू: ८ ऑगस्ट १९९८ )**१९११: सच्चिदानंद हिरानंद वात्स्यायन तथा ’अज्ञेय’ – ज्ञानपीठ पारितोषिक (१९७८) व साहित्य अकादमी पुरस्कार (१९६४) विजेते हिन्दी लेखक व वृत्तपत्रकार (मृत्यू: ४ एप्रिल १९८७ )**१९०३: रामचंद्रशास्त्री दत्तात्रेय किंजवडेकर -- संस्कृत पंडित (मृत्यू: २० एप्रिल १९४१ )**१९०२: शंकर भास्कर जोंधळेकर -- लेखक* *१८९६: यशवंत गंगाधर लेले -- नाटककार, नाट्यसमीक्षक**१८७०: नारायण कृष्ण गद्रे -- मराठी लेखक आणि चरित्रकार ह्यांनी नाटक,कविता, कादंबरी, चरित्र, इतिहास अशा विविध साहित्यप्रकारांत लेखन केले आहे (मृत्यू: १४ जुलै १९३३ )**१८४९: ल्यूथर बरबँक – महान वनस्पतीतज्ञ (मृत्यू: ११ एप्रिल १९२६ )**१७९२: सर जॉन विल्यम हर्षेल – ब्रिटिश गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ, रॉयल अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचा संस्थापक (मृत्यू: ११ मे १८७१ )*🔰 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🔰••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१२: रवि शंकर शर्मा ऊर्फ ’रवि’ – संगीतकार (जन्म: ३ मार्च १९२६ )**२००३: योगीराज मनोहर हरकरे -- अध्यात्मिक क्षेत्रातील योगी पुरुष व वैदिक विश्वचे संपादक (जन्म: २२ डिसेंबर१९१४ )**२०००: प्रभाकर तामणे – साहित्यिक व पटकथालेखक (जन्म: २९ ऑक्टोबर १९३१ )**१९९६: नीळकंठ जनार्दन कीर्तने -- मराठ्यांच्या इतिहासाचे आद्य टीकाकार, चिकित्सक आणि साक्षेपी संशोधक (जन्म: १ जानेवारी १८४४ )**१९९३: इर्झा मीर – माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक (जन्म: २६ ऑक्टोबर १९०० )**१९६१: गोविंद वल्लभ पंत – स्वातंत्र्यसैनिक, भारताचे दुसरे गृहमंत्री व उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री,भारतरत्न (१९५७)(जन्म: १० सप्टेंबर १८८७ )**१९२२: गणपतराव जोशी – रंगभूमीवरील असामान्य अभिनेते, शेक्सपियरच्या नाटकांतील त्यांच्या भूमिका अतिशय गाजल्या होत्या (जन्म: १५ ऑगस्ट १८६७ )**१६४७: दादोजी कोंडदेव -- शिवाजी महाराजांचे बालपणाचे पालक, शिक्षक व मार्गदर्शक (जन्म: १५७७ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जागतिक महिला दिनानिमित्त* कर्तृत्ववान महिलांची संघर्षगाथाभारतातील पहिल्या महिला न्यायाधीश - फातिमा बीबी तसेचभारतातील दुसरी महिला राष्ट्रपती - महामहिम द्रौपदी मुर्मु ..... यासह विविध लेख व कविता वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर्षिल ट्रेकला दाखवला हिरवा झेंडा!*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *'नमो ड्रोन दीदी' योजनेचा लाभ नलिनी देवरे बनल्या आत्मनिर्भर शेतकरी मदतनीस !*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *महिला दिनानिमित्त राजस्थानमध्ये राहणाऱ्या महिलांना राज्य सरकारने दिले मोठे गिफ्ट, राजस्थान सरकारने संपूर्ण राजस्थानमध्ये रोडवेज बसमध्ये महिलांसाठी मोफत प्रवासाची केली घोषणा *•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सपा आमदार अबू आझमी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव आज विधानसभेत मंजूर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पशुधन आरोग्य आणि आजार नियंत्रण अभियानाला केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीत मुदतवाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बेल्जियमच्या राजकन्या अॅस्ट्रीड यांची भारत भेट । व्यावसायिक शिष्टमंडळासोबत महत्त्वपूर्ण करार!*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गोवर्धन शिंदे, शिक्षक, नांदेड👤 विश्वनाथ स्वामी👤 मारोती लोणेकर👤 मनोज घोगरे👤 शिवम जाधव👤 अविनाश मोटकोलू*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 12*मी सर्वत्र आहे, पण कोणाला दिसत नाही**माझ्याशिवाय कुणाचे पान ही हलत नाही**मी कोण ओळखा पाहू*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - सौ. लिना सुपारेजि. प. प्रा. शाळा सुरजखोड जि. नांदेडकालच्या कोड्याचे उत्तर - श्वास••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आत्मस्तुतीने माणूस स्वतःचीच फसवणूक करून घेत असतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आजचा क्रमांक - 1800 वा१) भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता ?२) भारतातील कोणत्या राज्यातील नद्यांमध्ये सर्वाधिक डॉल्फिन आहेत ?३) नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात भारतीय नद्यांमध्ये असणाऱ्या डॉल्फिनची संख्या किती आहे ?४) प्रसिद्ध गीर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ?५) तिबेटी भाषेत माऊंट एव्हरेस्टला काय म्हटले जाते ? *उत्तरे :-* १) डॉल्फिन २) उत्तरप्रदेश ३) ६,३२७ डॉल्फिन ४) गुजरात ५) माऊंट ऊमोलांग्मा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••⏰ *वेळ* ⏰ **************वेळ पाळणे, घड्याळाबरहुकूम चालणे, दिवसाच्या चोवीस तासांतील वेळेचा नेमकेपणा साधणे याची खरी गरज जगामधील संपर्कसाधने वाढली, त्यावेळीच वाटू लागली. अन्यथा तोपर्यंत स्वतःचे गाव, पंचक्रोशीतला परिसर व तेथील घडामोडी या एकमेकांच्या सोयीनेच व्हायच्या. गावातील, देवळातील वा चर्चमधील टोले हेच घड्याळ, आसपासच्या लोकांना मारलेल्या हाका व केलेली सामुदायिक कामे हेच दिवसातील वेळ पाळण्याचे बंधन शतकानुशतके चालू होते. घड्याळाची निर्मिती, वापर सुरू झाला, तरी त्याची गरज फारच मोजक्यांना वाटे. या गावाहून त्या गावाला जाणारी गाडी, तिच्या सुटण्याच्या व पोहोचण्याच्या वेळा यांतील अंतर कमी होत गेले; दूरध्वनी,, दूरचित्रवाणी, विमाने यांचा वापर सुरू झाला आणि वेळेबाबत जागरुकता वाढली गेली. याआधी जागरुकता होती; नव्हती, असेही नाही; पण त्याची गरज मोजक्यांनाच वाटत होती. त्यावर उपाय शोधला गेला १८८४ साली. सुर्याचे उगवणे मावळणे हे पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यावर अवलंबून आहे व त्याचे समान भाग केले, तर (दर पंधरा रेखांशांनंतर एक) एकूण चोवीस वेगवेगळ्या वेळांचे भाग निश्चित केले गेले. शून्य अंश रेखांशाची रेघ म्हणजे जागतिक वेळेचा भाग. 'ग्रीनविच मीन टाईम' (GMT) या नावाने हा स्टॅंडर्ड वेळेचा भाग ओळखला जातो. तर तेथपासून दोन्ही बाजूंना म्हणजे पूर्वेला जावे, तसे दर पंधरा रेखांशांनंतर एक तास घड्याळ पुढे जाते. याउलट पश्चिमेला प्रवास करताना एक तास घडय़ाळ मागे केले जाते. या पद्धतीने प्रवास कसाही केला - चालत, मोटारने, विमानाने, अंतराळयानाने पण रेखांशांची मर्यादा बदलली की, तेथील माणूस काय वेळ वापरत असेल, याचा नेमका अंदाज आपल्या स्वतःच्या हातातील घडाळ्यावरूनच बांधता येतो. भारतातील वेळ व पाकिस्तानातील वेळ यांत एक तासाचा फरक आहे. तसेच म्यानमार व बांगलादेश यांच्या वेळेत व भारताच्या वेळेतही एक तासाचा फरक आहे. आता एखादा विमानाने पृथ्वीप्रदक्षिणेलाच निघाला, तर त्याच्यासाठी आणखीन एक प्रश्न उभा राहत होता, तो म्हणजे केवळ घड्याळ मागे पुढे करून भागत नव्हते, तर दिवसच बदलत होता. हा प्रश्न सोडवायला १८० अंश रेखांशावर सोय करण्यात आली. येथे जमीन नव्हती, म्हणजे समुद्रावर कोणी राहण्याचा प्रश्नच नव्हता. या प्रदेशात पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवास करताना तारीख मागे करण्याची पद्धत पडली आहे किंवा याउलट केले जाते. घडाळ्यातील काटे दिवसातून दोनदा बाराची वेळ दर्शवतात; पण हा गोंधळ टाळण्यासाठी रेल्वे, विमाने ही एक ते चोवीस तासांची पद्धत वापरतात. म्हणजे सकाळचे आठ वा रात्रीचे आठ असा गोंधळ न होता आठ व वीस या पद्धतीनेच वेळ सांगितली जाते. इंग्रजीत ए.एम. व पी.एम. असे म्हटले जाते. याचा अर्थ अँटीमेरिडीयम व पोस्टमेरिडियम म्हणजे सूर्य मध्यान्हाला येण्यापूर्वी वा नंतर असा आहे. हल्ली दूरचित्रवाणीवरून क्षणार्धात प्रक्षेपण जगभर दिसू शकते. यामुळे वेळेचे भान अधिकच आवश्यक आहे. ऑलिम्पिक खेळ, फुटबॉलची मॅच. महत्त्वाचा प्रसंग कोणत्या देशात किती वाजता होणार आहे, ते कळते; तरीही त्याची आपल्या इथली वेळ जर आपण ठरवू शकलो नाही, तर त्याला साक्षीदार होण्याची संधी कायम घालवून बसू. दुपारी तीन वाजता आई अमेरिकेतील मुलीला फोन करून तिची चौकशी करू लागली, तर झोपमोड झालेली, पहाटे तीन वाजता फोन वाजल्याने त्रासलेली मुलगीच आईशी फोनवर बोलू लागेल. वेळेचे भान हे घराघरात यामुळेच आवश्यक होत चालले आहे. स्वनातीत विमानाने प्रवास केल्यास दुपारच्या जेवणानंतर लंडन सोडले, तर त्याच दिवशी सकाळच्या नाष्ट्याला न्यूयॉर्क गाठता येते. जागतिक प्रवाशाला वेळेचे भान राखणे त्यामुळेच अत्यावश्यक ठरते.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुझें प्रेम माझे ह्रदाय आवडी । चरण मी न सोडी पांडुरंगा ॥१॥ कशासाठीं शीण थोडक्याकारणें । काय तुज उणें होय देवा ॥२॥ चंद्र चकोराचा पुरवी सोहळा । काय त्याच्या कळा न्यून होती ॥३॥ नामा म्हणे मज अनाथा सांभाळी । ह्रदयकमळीं स्थिर राहे ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हवा अंगाला स्पर्शून जातो आणि त्याच्यामुळे आपण जिवंत आहोत. तरीही आपण त्याला बघू शकत नाही. कारण त्याला बघण्यासाठी आपल्याकडे तशी दूरदृष्टी नसते. तसंच समोर दिसणाऱ्या व्यक्तीच्या प्रती आपल्या मनात किती आदर, सन्मान आहे हे जाणून न घेता कोणाच्या सांगण्यावरून त्याचा अपमान करणे आपल्याला सहजपणे जमत असते.ही आजची वास्तविकता आहे. जसं वाऱ्याला बघण्यासाठी आपल्याकडे दूरदृष्टी नसते तशीच दूरदृष्टी त्या व्यक्तीला जाणून घेण्याची नसते.हीच कमतरता आपल्यातील काही गुणांचा अंत करत असते. म्हणून जीवन जगत असताना आपल्यातही तेवढीच सत्यात ठेवणे गरजेचे आहे कारण, सत्याच्या वाटेवर चालणारी व्यक्ती कोणाचाही अपमान करत नाही हेच त्याच्यात महत्वाचे गुण असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• जांभूळ आख्यान ही गोष्ट आहे द्रौपदीची..तिने आपद्धर्म म्हणुन पाच पतींशी विवाह केला..पण तरीही तिला पतिव्रता हा दर्जा दिला गेला..तिच्या पाच पतींनी आणखी वेगवेगळे विवाह केलेच..पण ते पुरुष होते त्यामुळे बहुपत्नीकत्व त्यांना परंपरेने बहाल केलं होतं.तर गोष्ट आहे द्रौपदीची..कुठल्या तरी समारंभाच्या वेळी कर्ण द्रौपदीच्या नजरेस पडला..तेव्हा तो पांडव आहे हे अर्थातच तिला माहिती नसणार.पण तरीही त्याचं देखणेपण पाहुन ती क्षणभर मोहीत झाली..आख्यानकार म्हणतात,” कर्णाला पाहुन द्रौपदीचं मन पाकुळलं ( पाघळलं).आख्यानकार आणखी पुढे म्हणतात की द्रौपदीला क्षणभर वाटुन गेलं की हा देखणा युवक सहावा पांडव असता तर?????आत्ता बारा महिन्यांची जशी विषम विभागणी झाली आहे त्याऐवजी ती सहा जणात दोन दोन महिने अशी झाली असती..अंतर्ज्ञानी कृष्णाच्या ही गोष्ट लक्षात आली..द्रौपदीच्या मनात परपुरुषाचा विचार येणं ही गोष्ट पांडवांच्या दृष्टीने धोक्याची होती..कारण द्रौपदी हे पांडवांना एकत्र बांधुन ठेवणारं सुत्र होतं.मग कृष्णाने वनविहाराचा बेत आखला..वनविहार झाल्यावर सर्वांना भूक लागली म्हणुन भीम फळं शोधण्यासाठी गेला..परंतु कृष्णाने आपल्या मायेने रानातली सर्व फळं नाहिशी केली..एका वृक्षावर एकुलतं एक जांभूळ शिल्लक होतं.भीमाने तेच तोडुन आणलं..त्या वनात कोणी एक ऋषी तप करीत होते..आणि बारा वर्षाचं तप पुर्ण झाल्यानंतर खाण्यासाठी म्हणुन त्यांनी ते जांभूळ राखुन ठेवलं होतं असं शुभ वर्तमान कृष्णाने सर्वांच्या कानी घातलं..आता पांडवांच्यात घबराट पसरली..जांभूळ जाग्यावर दिसलं नाही तर ऋषींचा कोप होणार..कृष्णाने सांगितलं,की तुमच्यापैकी ज्याचं मन स्वच्छ आहे ,ज्याच्या मनात कधीच परपुरुषाचा/परस्त्रीचा विचार आलेला नसेल त्याने मनापासुन प्रार्थना करावी.जांभूळ आपोआप झाडाला जाऊन चिकटेल..म्हणजे आता तिथे द्रौपदीपेक्षा योग्य व्यक्ती नाहीच कोणी.सगळ्यांच्या नजरा आता द्रौपदीकडे..द्रौपदी मनातुन खजील.भयभीत.जांभूळ चिकटलं नाही तर तिच्या पातिव्रत्यावरच घाला..कारण काही क्षणापुरता का होईना पण कर्णाचा विचार तिच्या मनात आलाच होता..तिने मनोमन कृष्णाची करुणा भाकली,पुन्हा अशी चूक होणार नाही अशी मनोमन कबुली दिली आणि हात जोडुन प्रार्थना केली आणि काय आश्चर्य ?जांभूळ परत झाडाला चिकटलं..पण उलट्या बाजुने..द्रौपदीला तिच्या चुकीची सतत आठवण रहावी यासाठी कृष्णाने केलेली ही योजना..म्हणजे एका अर्थी उलटं जांभूळ हे पापाचं प्रतीक..म्हणुन त्याला देवाच्या पुजेत ,उपासाच्या फळामधे स्थान नाही..आख्यानकार आणखीही सांगतो, की जांभूळ खाल्लेलं लपवता येत नाही..जीभ जांभळी करुन सोडतं ते..थोडक्यात - केलेलं पाप लपत नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 06 मार्च 2025💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2022/12/astronomy.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••⭕ *_राष्ट्रीय दंतचिकित्सक दिवस_* ⭕•••••••••••••••••••••••••••••••••••• ⭕ *_ या वर्षातील ६५ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ⭕ *_महत्त्वाच्या घटना:_* ⭕•••••••••••••••••••••••••••••••••••• *२०००: शहर निर्वाह भत्ता (CCA), महागाई भत्ता (DA) आणि घरभाडे भत्ता (HRA) म्हणून मिळणारी रक्कम करपात्र असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब**१९९९: जगप्रसिद्ध खजुराहो मंदिर समुहाच्या सहस्राब्दी सोहळ्याचे राष्ट्रपती के.आर. नारायणन यांच्या हस्ते उदघाटन**१९९८: विख्यात गझलगायक जगजितसिंग यांना मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा ’लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर**१९९७: स्वाध्याय परिवाराचे संस्थापक पांडुरंगशास्त्री आठवले यांची टेंपलटन पुरस्कारासाठी निवड**१९९२: ’मायकेल अँजेलो’ नावाचा संगणक विषाणू पसरण्यास सुरूवात झाली.**१९७५: इराण व इराक यांच्यात सीमाप्रश्नावर संधी झाली.**१९७५: मराठीतील पहिला राष्ट्रपती सुवर्णपदक विजेता चित्रपट "श्यामची आई" मुंबईत प्रदर्शित**१९५३: जॉर्जी मॅक्सिमिलानोव्हिच सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले.**१९४०: रशिया व फिनलंड मधे शस्त्रसंधी झाली**१९०५: शांतिनिकेतन येथे महात्मा गांधी व रवींद्रनाथ टागोर यांची पहिली भेट**१८४०: बाल्टिमोर कॉलेज ऑफ डेंटल सर्जरी हे पहिले दंतवैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले.**१७७५: सुरत येथे राघोबादादा उर्फ रघुनाथराव पेशवे आणि इंग्रज यांच्या तह झाला.* ⭕ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ⭕ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९७: जान्हवी कपूर -- हिंदी चित्रपटातील अभिनेत्री**१९८१: सौरभ गोखले -- मराठी अभिनेता**१९६८: लक्ष्मण महादेव घागस -- लेखक, कवी* *१९६६: मकरंद देशपांडे -- रंगभूमीवरचा तसेच रुपेरी पडद्यावरचा नावाजलेला कलाकार, लेखक, दिग्दर्शक**१९६५: देवकी पंडीत – शास्त्रीय गायिका**१९६५: दादाजी भुसे -- मंत्री, शालेय शिक्षण विभाग म.रा.**१९५९: लेविन शाहुराव भोसले -- प्रसिद्ध लेखक* *१९५३: माधुरी तळवलकर -- प्रसिद्ध मराठी लेखिका**१९५२: पंडित राजाराम उर्फ राजा काळे-- भारतीय गायक,संगीतकार आणि भारतीय शास्त्रीय,आणि भक्ती संगीताचे अभ्यासक* *१९४८: राज एन. सिप्पी(राज सिप्पी)-- भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता**१९४१: डॉ. हेमंत लक्ष्मण विंझे -- व्यवसायाने डॉक्टर असलेले कवी, लेखक* *१९३७: वासुदेव नरहर सरदेसाई -- प्रसिद्ध मराठी गझलकार* *१९३६: माणिकलाल कोंडबाजी बारसागडे -- कवी, लेखक* *१९३४: डॉ.शशिकला जयंत कर्डिले -- प्रसिद्ध लेखिका,अनुवादक* *१९३४: मुरलीधर कापडी -- प्रसिद्ध दिग्दर्शक (मृत्यू: १२ ऑक्टोबर २००६ )* *१९२५: नयनतारा देसाई -- लेखिका* *१९१६: वसंत अंबादासराव तुळजापूरकर -- कवी* *१९०१: डॉ.श्रीनिवास नारायण बनहट्टी (श्री.ना. बनहट्टी) -- संशोधक, समीक्षक, संपादक (मृत्यू: २२ एप्रिल १९७५ )**१८९९: शिवराम लक्ष्मण करंदीकर -- चरित्र लेखक(मृत्यू: १७ जानेवारी १९६९ )**१४७५: मायकेल अँजेलो – इटालियन शिल्पकार आणि चित्रकार (मृत्यू: १८ फेब्रुवारी १५६४ )* ⭕ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ⭕••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१: श्रीकांत मोघे -- भारतीय चित्रपट आणि थिएटर अभिनेता (जन्म: ६ नोव्हेंबर १९२९ )* *२०१८: वसंत नरहर फेणे -- कथाकार, कादंबरीकार (जन्म: २८ एप्रिल १९२८ )* *१९९९: सतीश वागळे – हिन्दी आणि मराठी चित्रपट निर्माते**१९९२: रणजित देसाई – सुप्रसिद्ध नामवंत मराठी साहित्यिक,’स्वामी’कार (जन्म: ८ एप्रिल १९२८ )**१९८७: इंदर राज आनंद -- हिंदी चित्रपटसृष्टीतील संवाद आणि पटकथा लेखक**१९८६: माधवराव खंडेराव बागल -- महाराष्ट्रातील सामाजिक-सुधारणा चळवळीतील कृतीशील कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक,विचारवंत,लेखक आणि चित्रकार (जन्म: २८ मे १८९५ )* *१९८२: रामभाऊ म्हाळगी – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक,जनसंघ या राजकीय पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले सरचिटणीस (जन्म: ९ जुलै १९२१ )**१९८२: अॅन रँड – जन्माने रशियन असलेल्या अमेरिकन लेखिका (जन्म: २ फेब्रुवारी १९०५ )**१९८१: गोपाळ रामचंद्र परांजपे – मराठीतील आघाडीचे विज्ञान प्रसारक,नामवंत शास्त्रज्ञ,’रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’चे पहिले भारतीय प्राचार्य( जन्म: १३ जानेवारी १८९७)**१९७३: पर्ल एस. बक – नोबेल पारितोषिक विजेत्या (१९३८) अमेरिकन लेखिका (जन्म: २६ जून १८९२ )**१९६७: स. गो. बर्वे – कर्तबगार प्रशासक (जन्म: २७ एप्रिल १९१४ )* *१९५७: अमिया चक्रवर्ती -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माता(जन्म: ३० नोव्हेंबर १९१२ )**१९०५: गोविंद शंकरशास्त्री बापट -- भाषांतरकार संस्कृतचे व्यासंगी पंडित (जन्म: ८ फेब्रुवारी१८४४ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सूर्यमाला आणि ग्रह*सूर्यमाला ही सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंनी बनलेली आहे. सूर्यमालेत आठ मुख्य ग्रह आहेत. सूर्यापासूनच्या अंतराप्रमाणे ग्रह असे आहेत - बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस (हर्षल) व नेपच्यून (वरुण). प्लूटो हा त्याच्या शोधापासून (म्हणजेच १९३० पासून) सूर्यमालेतील नववा ग्रह मानला जातो...... चित्रासह पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मनुष्यबळ विकासावर मोदी सरकारचा भर, AI, स्टार्टअप, पर्यटन आणि आरोग्यात मोठी गुंतवणूक*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, आता प्रतिज्ञापत्रासाठी 500 ₹ शुल्क माफ, नागरिकांना दिलासा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नाशिक विमानतळासाठी नवा अध्याय ! HAL कडून नवीन धावपट्टीसाठी 200 कोटीची मंजूर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाकडून दिलासा ! 30 वर्षे जुन्या प्रकरणातील शिक्षेला तात्पुरती स्थगिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्य बँकेला 500 कोटीचे बॉण्ड वितरित करण्यास रिझर्व्ह बँकेची परवानगी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *केंद्राने साखर कारखान्यांना नाबार्ड किंवा NCDC मार्फत चार टक्के व्याज दराने कर्ज पुरवठा करावा - राजू शेट्टी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ICC चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सेमिफायनलमध्ये न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा 60 धावाने केला पराभव, रविवारी भारतासोबत होणार अंतिम सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अशोक दगडे, सरपंच तथा पत्रकार बिलोली👤 सुरेश बावनकुळे, सहशिक्षक,भंडारा👤 गोविंद मानेमोड👤 अविनाश गायकवाड👤 दत्ताहरी शिवलिंग दुड्डे, धर्माबाद👤 माधव गोतमवाड👤 प्रा. सुरेश कटकमवार, नांदेड👤 राज शंकरोड👤 प्रकाश राजपोडे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 11*जन्म मरणाच्या चक्रामध्ये**आहे हा एक लहानसा शब्द**घेत राहिलो सदैव तर जगतो**बंद झाल्यास होतो निःशब्द *उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - हृदय••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वावलंबन, स्वाभिमान, स्वाध्याय आणि स्वातंत्र्य ही जीवनाची चतु:सूत्री आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) त्वचा खवल्यांनी आच्छादलेला असलेला एकमेव सस्तन प्राणी कोणता ?२) खवले मांजराला इंग्रजीत काय म्हणतात ?३) चीनच्या अंतराळ स्थानकाचे नाव काय आहे ?४) प्रतिष्ठेचा रणजी ट्रॉफी २०२५ कोणत्या संघाने पटकावले ?५) प्रसिद्ध तुळजाभवानी देवीचा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे ? *उत्तरे :-* १) खवले मांजर २) Pangolin ३) तियांगोंग ४) विदर्भ ( तिसऱ्यांदा ) ५) धाराशिव/उस्मानाबाद*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🛰 कृत्रिम उपग्रह व त्याचा मागोवा सेकंदगणिक 🛰रॉकेट्सचा जनक गोडार्ड याने पहिले रॉकेट आकाशात सोडले, तेव्हा ते कसेकसे जाते आहे, कुठे पडणार आहे, याचा मागोवा चक्क दुर्बिणीतून घेतला गेला होता. त्यातही दिवसाउजेडी दोन उंच गेलेले रॉकेट शोधणे कठीण पडत होते.१९५७ साली पहिला उपग्रह अवकाशात गेला; पण ज्यावेळी त्याची कक्षा पृथ्वीच्या दुसऱ्या बाजुस जाई, तेव्हा त्याच्याशी संपर्क तुटत असे. १९६० साली यावर तोडगा म्हणून अमेरिका व रशिया या दोघांनीही आपापल्या मित्र राष्ट्रांतून संदेशग्रहणकेंद्रे उभारली. या विविध केंद्रांतून या उपग्रहांवर लक्ष ठेवणे त्यामुळे शक्य होऊ लागले. पण कसे ? त्रिवेंद्रमहून दिल्लीला जाणारी गाडी सुरुवातीला पुण्यापर्यंत पोहोचेपर्यंत एक केंद्र लक्ष ठेवेल, तर त्यानंतर गुजरातेतील एखादे केंद्र लक्ष देईल, तर राजस्थानमध्ये शिरल्यावर तिसरेच केंद्र यावर लक्ष केंद्रित करेल. या पद्धतीत जाशी रिले शर्यत असते, तसे लक्ष ठेवले जाई. काही दिवस तर असंख्य हौशी ज्योतिर्विद मंडळींनी या नोंदी करायला खूपच मदत केली.या तुलनेत आजची परिस्थिती विश्वासच बसणार नाही अशी आहे. उड्डाणाचे सुरुवातीचे अर्धे मिनिट व प्रत्यक्ष वातावरणामध्ये शिरताना म्हणजे अवकाशयान उतरताना चार मिनिटे सोडली, तर सतत मुख्य केंद्राशी थेट संपर्क असतो; मग अवकाशयान चंद्रावर असो, किंवा मंगळाच्या जवळ किंवा ग्रहमालेच्या पलीकडे चाललेले असो ! व्हाॅयेजर दोनचे उड्डाण २० ऑगस्ट १९७७ ला झाले. आज जवळपास ८००० दशलक्ष किलोमीटर प्रवास करून सूर्यमालेबाहेरील अवकाशात त्याने प्रवास सुरू केला आहे, पण त्याचे संदेश सतत ग्रहण केले जात आहेत. अजून कमीत कमी २५ वर्षे त्याचे संदेश आपल्याला मिळणार आहेत. एवढी प्रचंड झेप संदेशवहनात घेणे शक्य झाले आहे, ते विविध ठिकाणी, विविध कक्षांत, विविध उंचीवर काम करणाऱ्या उपग्रहांमुळेच.या उपग्रहांतील सध्या वापरला जाणारा प्रमुख उपग्रह म्हणजे TDRSS किंवा 'ट्रॅकिंग अँड डाटा रिले सिस्टीम सॅटेलाईट' होय. या उपग्रहातून अवकाशयानाकडे सतत संदेश पाठवणे, येणारे संदेश ग्रहण करून कंट्रोल टॉवरकडे पाठवणे एकाच वेळी केले जात असते. अमेरिकेतील ह्युस्टन व रशियातील कॅलिनीग्राद या मॉस्कोजवळील भागात प्रमुख नियंत्रणकेंद्रे काम करतात. त्यांना मिशन कंट्रोल्स असे म्हटले जाते. भारतातील असे केंद्र हसन येथे आहे.अवाढव्य हॉलमध्ये असंख्य कॉम्प्युटरच्या जंगलात चोवीस तास काम करणारे हे शास्त्रज्ञ अक्षरश: दर सेकंदागणिक आवकाशातील प्रत्येक यानाचा मागोवा घेत असतात. येणाऱ्या माहितीचा ओघ साठवून तिचे विश्लेषण करणे हे काम इतरत्र चालूच असते.असे सांगितले जाते की जमा केलेली माहिती इतकी प्रचंड असते की, अवकाशयान परतल्यावर तब्बल दोन दोन वर्षे त्यावर अनेकांना काम करावे लागते.पृथ्वीभोवती कृत्रिम उपग्रहांची सध्या गर्दी झाली आहे. त्यांची संख्या नक्की करणे कठीण व्हावे, इतकी ती मोठी आहे. पण पहिला उपग्रह 'स्फुटनिक' १९५७ साली सोडला गेला. त्याआधी मात्र पृथ्वीला एकच उपग्रह होता, तो म्हणजे चंद्र. स्पुटनिक हा रशियाने सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह.यानंतर झपाट्याने प्रगती होत गेली. १९६२ साली 'टेलस्टार' या उपग्रहाने अटलांटिक सागरावरून पलीकडे टीव्हीची चित्र पोहोचवली. यानंतर उपग्रहांचा दळणवळणासाठी सर्रास उपयोग सुरू झाला. भारतात सर्वत्र दूरचित्रवाणीचे जाळे पोहोचवण्याचे काम इन्सॅटच्या मालिकेने केले आहे. ते जगभर हे काम 'जिओस्टेशनरी उपग्रह' करतात. या प्रकारचे उपग्रह ३६,०००० किलोमीटर उंचीवरून पृथ्वीभोवती भ्रमण करतात. त्यांचा पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्याचा काळ व पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा काळ सारखाच असतो, त्यामुळे हे या उंचीवर एकाच ठिकाणी असल्याप्रमाणे दिसतात. याचाच फायदा घेऊन या उपग्रहाच्या कक्षेतील सर्व शहरांकडे एका ठिकाणाहून पाठवलेले संदेश प्रक्षेपित केले जातात.उपग्रहांचा वापर दळणवळणाप्रमाणेच हेरगिरीसाठीही केला जातो. उपग्रहावरून घेतलेल्या फोटोमध्ये शंभर बाय शंभर मीटरमध्ये होणारे पृथ्वीवरील बदल स्पष्टपणे नोंदले जातात. स्वाभाविकच मोठी बांधकामे, अण्वस्त्रांच्या हालचाली, तटबंदी यांची पूर्ण नोंद करता येते; तीसुद्धा शत्रूच्या नकळत.उपग्रहांतर्फे पीक पाहणी, जंगल पाहणी, भूप्रदेश आराखडे तयार करणे ही कामे सहजगत्या पार पडतात. इन्फ्रारेड पाहणीमुळे आणखीही खूप गोष्टींचा खुलासा होतो. पिकांवर पडणार्या किडी, जमिनीखालील पाणी व प्रवाह यांचा सुद्धा खुलासा होऊ शकतो.उपग्रहांची निर्मिती ही तशी सहजशक्य असलेली गोष्ट झाली आहे, पण उपग्रह अवकाशात पाठवणे ही मात्र आजही मोजक्या राष्ट्रांचीच अखत्यारी आहे. काही हजार किलोंचे वजन अवकाशात पाठवण्याजोगे क्षेपणास्त्र तयार करणे ही त्यातील गोम आहे.उपग्रहांना मिळणारी ऊर्जा सौरऊर्जाच असते. उपग्रह अवकाशात स्थिर झाल्यावर त्याचे पंख उघडतात, या पंखांवर सौरऊर्जा ग्रहण करून वीज देणारे घटक असतात. अनेकदा हे पंख उघडण्यातच अपयश येते. हीच फार मोठी अडचण ठरून ऊर्जेविना उपग्रहाचे काम बंद पडते, पण सहज पंख उघडले, तर उपग्रह अनेक वर्षांपर्यंत बिनतक्रार काम देत राहतो.उपग्रहांचा मोठा फार मोठा उपयोग हवामान अंदाज व्यक्त करण्यासाठी झालेला आहे. जगभरचे ढगांचे फोटो, हवेतील दाबातील फरक उपग्रहांद्वारे झटकन समजतात. व त्यावरून धोक्याचा इशारे देता येतात. भारतीय दूरचित्रवाणीच्या विविध वाहिन्यांवर याच छायाचित्रांच्या सहाय्याने रोज रात्री हवामानखाते अंदाज व्यक्त करत असते.उपग्रहाच्या काम करणाऱ्या दुर्बिणी हा एक वेगळाच विषय आहे. गरजेप्रमाणे विविध पद्धतींने काम करणाऱ्या दुर्बिणी आजवर अवकाशात पाठवल्या गेल्या आहेत.उपग्रहांमार्फत काम करणाऱ्या काही प्रसिद्ध दुर्बिणी पुढील प्रमाणे :-क्ष किरण : उहुरू (१९७२)आइन्स्टाइन (१९७८)रोसॅट (१९८८)अतिनिल : कोपर्निकस (१९७३)अधोरक्त : आयरॅस (१९८३)दृष्यप्रकाश : हिप्पोर्कास (१९८९) हबल (१९९०)जेम्स वेब (आगामी टेलिस्कोप)‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुझें नाम म्हणतां सुलभ अनंता । दुर्लभ म्हणतां अंतकाळीं ॥१॥ तैसें तुवां मज केशवा करावें । ह्रदयीं भेदावें नाम तुझें ॥२॥ मुके पशु पक्षी वृक्ष आणि पाषाण । तया नारायणा गति कैसी ॥३॥ नामा म्हणे कैसें केशवा सांगणें । अज्ञानी ते नेणें कवणेंपरी ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपली ओळख कितीही मोठ्या माणसांशी जरी असेल तरी ती ओळख आणि आपल्या कार्याची किंमत आपली आर्थिक परिस्थिती किंवा आपले आरोग्य चांगले राहते तोपर्यंतच असते. जेव्हा आपले आरोग्य आणि आर्थिक स्थिती हळूहळू कमी व्हायला लागते तेव्हा,कितीही जवळचे लोक का असेनात क्षणात अनोळखी होऊन जातात. म्हणून ह्या सर्व व्यर्थ गोष्टींच्या भ्रमात किंवा गर्वाच्या भोवऱ्यात पडून कोणाचा अपमान करू नये. वेळ आल्यावर गरीबाच्याच घरी प्यायला पाणी मिळते आणि तिथेच आपले कितीही ओळखीचे जरी लोक असतील तरी आपल्याला कमी लेखतात असे अनेक चित्र याच समाजात बघायला मिळत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *दुकानदार व हत्ती* एका गावात एक पाळीव प्राणी हत्ती राहत होता. सर्व गावकरी त्या पाळलेल्या हत्तीची काळजी घेत व त्याला खाऊ घालत असत. सर्व गावकऱ्यांचा तो हत्ती लाडका होता आणि सर्व गावकरी त्यला जीव लावत असे. हत्ती रोज साकळी गावातील मंदिरात जात असे. रोज मंदिरात जाताना तो हत्ती एका फुलाच्या दुकानात थांबत असे. दुकानदार रोज फुले त्या हत्तीच्या सोंडेत देत असे. हत्ती तो फुले सोंडेत घेऊन मिरवत-मिरवत नेऊन मंदिरात जाऊन देवाच्या चरणी वाहत असे. हत्तीज्याप्रकारे फुले मिरवीत नेणे आणि मंदिरात जाणे लोक आनंदाने बघत असत.लोक हत्तीचे कौतुक करत असे. हत्तीची श्रद्धा हा सर्व गावकऱ्यांचा कौतुकाचा विषय झाला होता. एके दिवशी दुकानदार अत्यंत निराश अवस्थेत दुकानात बसला होता. रोजच्या सवयी प्रमाणे हत्ती दुकानात आला. निराश दुकानदाराने हत्तीला फुले देण्यावजी त्याच्या सोंडेला सुई टोचली. दुकानदारने कारण नसतानाही स्वताचा राग हत्तीवर काढला. हत्तीला फुले देण्याऐवजी हार ओवण्याची सुई जोरात टोचल्यामुळे हत्ती दुखवला गेला व त्याला त्या दुकानदाराचा राग आला. आपल्याला या दुकानदाराने विनाकारण छळले त्यामुळे हत्तीने दुकानदाराला धडा शिकविण्याचे ठरविले. दुसऱ्या दिवशी हत्तीने दुकानच्या जवळून वाहणाऱ्या ओढयाच्या पाण्यातून चिखलयुक्त पाणी सोंडेने भरून घेतले. हत्ती शांतपणे दुकानाजवळ आला .हत्तीने ते घाणरडे पाणी दुकानदार , फुले आणि हारांवर फवारले. दुकानदाराचा सगळा माल खराब झाला. त्याला स्वत:ची चूक कळून आली. मात्र त्यसाठी त्याला मोठी किमंत मोजावी लागली. तात्पर्य - जसास तसे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 05 मार्च 2025💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://chat.whatsapp.com/DaK0QvLfzbe6E1coFTHAsC••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🟤 *_ या वर्षातील ६४ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🟤 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟤••••••••••••••••••••••••••••••••••••*२०००: पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते कर्नाटकातील कैगा अणूवीजप्रकल्प (युनिट - २) राष्ट्राला अर्पण**१९९९: ’इंडियन फिजिक्स असोसिएशन’ तर्फे देण्यात येणार्या आर. डी. बिर्ला स्मृती पारितोषिकासाठी डॉ. जयंत नारळीकर व प्रा. अशोक सेन यांची निवड**१९९८: नेहमीच्या अस्त्रांबरोबरच कमी पल्ल्याची विमानभेदी क्षेपणास्त्रे सोडू शकणार्या, रशियाकडुन घेतलेल्या ’सिंधुरक्षक’ या पाणबुडीचे मुंबई येथे आगमन**१९९७: ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या सप्तशताब्दीच्या सांगतेनिमित्त राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते ज्ञानेश्वरांची प्रतिमा असणार्या टपाल तिकिटाचे प्रकाशन* *१९६६: मैसूरचे माजी संस्थानिक जयचामराजेन्द्र वडियार यांचा बंगळूर येथील राजवाडा व त्यासभोवतालची जागा राज्य सरकारच्या ताब्यात घेण्याची परवानगी देणारे विधेयक कर्नाटक विधानसभेत संमत**१९३३: भयानक मंदीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांनी सर्व बँका काही दिवसांसाठी बंद केल्या व आर्थिक व्यवहारांवर बंदी घातली.**१९३१: दुसर्या गोलमेज परिषदेपुर्वी गांधी-आयर्विन करार झाला.**१८५१: ’जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ची (GSI) स्थापना**१६६६: शिवाजीमहाराजांनी राजगडावरून आग्र्यास प्रयाण केले.**१५५८: फ्रॅन्सिस्को फर्नांडीस याने धूम्रपानासाठी सर्वप्रथम तंबाखूचा वापर केला.* 🟤 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟤••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७५: चंद्रकांत थावरु राठोड -- कवी, लेखक* *१९७४: हितेन तेजवानी -- दूरचित्रवाहिनी माध्यमातील भारतीय अभिनेता**१९७३: श्रीमंत सखाराम ढवळे -- कवी* *१९७२:प्रा. शर्मिला सुनील गोसावी -- कवयित्री, लेखिका* *१९७०: डॉ. मिलिंद विनायक बागुल -- कवी, लेखक, संपादक* *१९६७: अंजली सत्यपाल श्रीवास्तव -- कथा लेखिका* *१९६७: प्रा. डॉ. रामनाथ गंगाधर वाढे -- लेखक, संशोधक* *१९६५: गजानन माधवराव माधसवार -- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९६३: सौरभ शुक्ला -- भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक**१९५९: शिवराजसिंह चौहान -- केंद्रीय मंत्री,मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री**१९५८: म. नास्सर -- भारतीय अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, डबिंग कलाकार, गायक* *१९५७: संगीता बापट -- कवयित्री, गायिका, संगीततज्ञ* *१९५६: डॉ. मधुसूदन दत्तात्रेय गादेवार -- कवी, लेखक* *१९५२: प्रा. रामनाथ चव्हाण -- लेखक-संशोधक व नाटककार(मृत्यू: २० एप्रिल २०१७ )**१९४५: गोविंद गोडबोले -- प्रसिद्ध बालसाहित्यिक* *१९४४: डॉ. आनंद जोशी -- प्रसिद्ध लेखक, अनुवादक**१९२९: संतोष आनंद -- सुप्रसिद्ध भारतीय गीतकार**१९२९: राम उगावकर -- कवी, शाहीर, गीतकार (मृत्यू: ५ एप्रिल २०१३ )* *१९२८: अॅलिक पदमसी -- भारतीय थिएटर व्यक्तिमत्व आणि जाहिरात चित्रपट निर्माता(मृत्यू: १७ नोव्हेंबर २०१८ )**१९२५: वसंत पुरुषोत्तम साठे -- पूर्व केंद्रीय मंत्री (मृत्यू: २३ सप्टेंबर २०११ )* *१९१८: श्रीरंगा वासुदेव 'रंगा' सोहोनी -- भारतीय क्रिकेटपटू (मृत्यू: १९ मे १९९३ )**१९१७: आनंदीबाई विजापुरे -- आत्मचरित्रकार, कथाकार, कादंबरीकार (मृत्यू: २० ऑक्टोबर १९९९ )**१९१६: बिजू पटनायक – ओरिसाचे माजी मुख्यमंत्री, केन्द्रीय पोलाद, खाणकाम आणि कोळसा मंत्री (मृत्यू: १७ एप्रिल १९९७ )**१९१३: गंगूबाई हनगळ – किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका (मृत्यू: २१ जुलै २००९ )**१९११: सुब्रोतो मुखर्जी -- भारतीय वायुसेनेचे पहिले वायुसेना प्रमुख(मृत्यू: ८ नोव्हेंबर १९६० )**१९१०: श्रीपाद वामन काळे -- निंबंधकार. संपादक**१९०८: सर रेक्स हॅरिसन – ब्रिटिश आणी अमेरिकन रंगभूमीवरील आणि हॉलिवूड चित्रपटांतील अभिनेते (मृत्यू: २ जून १९९० )**१९०६: सुमंत मूळगावकर -- भारतीय उद्योगपती,टाटा मोटर्सचे आर्किटेक्ट(मृत्यू: १ जुलै १९८९ )**१९०५: हरिहर वामन देशपांडे -- लेखक (मृत्यू: २० एप्रिल १९६५ )**१८९८: चाऊ एन लाय – चीनचे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ८ जानेवारी १९७६ )**१८७३: लक्ष्मण नारायण जोशी -- मराठीतील ऐतिहासिक आख्यायिकांचे संग्राहक,लेखक, ग्रंथसंपादक व पत्रकार(मृत्यू: १ जुलै १९४७ )**१८५६: राव बहाद्दुर पुरुषोत्तम बाळकृष्ण जोशी -- मुंबई इलाख्याची दर्शनिका (गॅझेटियर) तयार करण्यात सहभाग असलेले मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासाचे अभ्यासक व कवी(मृत्यू: २६ मार्च, १९२९ )**१५१२: गेरहार्ट मरकेटर – नकाशाकार, गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ (मृत्यू: २ डिसेंबर १५९४ )* 🟤 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟤••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१३: ह्युगो चावेझ – व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २८ जुलै १९५४ )**१९९५: जलाल आगा – चरित्र अभिनेता (जन्म: ११ जुलै १९४५ )**१९८९: बाबा पृथ्वीसिंह आज़ाद – क्रंतिकारी स्वातंत्र्यसैनिक,गदर पार्टीचे एक संस्थापक* *१९८५: पु. ग. सहस्रबुद्धे –’महाराष्ट्र संस्कृती’कार(जन्म: १० जून १९०४)**१९६८: नारायण गोविंद चाफेकर – समाजशास्त्रज्ञ व ग्रंथकार (जन्म: ५ ऑगस्ट १८६९ )**१९६६: शंकरराव मोरे – समाजवादी व साम्यवादी विचाराचे व्यासंगी नेते, पुणे जिल्हा स्कूल बोर्डाचे अध्यक्ष**१९५३: जोसेफ स्टालिन – सोविएत रशियाचे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १८ डिसेंबर १८७८ )**१८२७: अलासांड्रो व्होल्टा – इटालियन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १८ फेब्रुवारी १७४५ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*फ्रेश मॉर्निंग बुलेटिन* समुहात join व्हावे..... त्याण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *अखेर अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर, राज्यपालांनी स्वीकारला राजीनामा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नवी दिल्ली - स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी ६ मे रोजी होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वनतारा वन्यजीव प्रकल्पाचे उदघाटन, अनंत अंबानीच्या कामाचे केले कौतुक*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुण्यात इलेक्ट्रिक बाईकच्या कंपनीला भीषण आग, 2000 दुचाकींचे साहित्य जळून खाक*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *97 व्या ऑस्कर पुरस्कारामध्ये अनोरा ची बाजी, तब्बल पाच पुरस्कारावर मोहोर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ICC चॅम्पियन्स ट्रॉफी च्या सेमीफायनलमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा 4 विकेट्सनी केला पराभव, 9 मार्च रविवारी होणार अंतिम सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गंगाधर मदनूरकर, सहशिक्षक, धर्माबाद👤 माणिक आहेर, सहशिक्षक, नाशिक👤 गंगाधर नुकलवार, सहशिक्षक, देगलूर👤 गीता ढगे, सहशिक्षिका, बिलोली👤 दिनेश चव्हाण👤 रावसाहेब वाघमारे👤 उमाकांत पाटील विभूते👤 पोषट्टी सिरमलवार👤 आकांक्षा निगुडकर👤 रमेश मेरलवार, करखेली👤 अशोक कहाळेकर👤 बालाजी तिप्रेसवार👤 प्रकाश पडकूटलावार👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 10*ऑक्सीजन घेतो**रक्त शुद्ध करतो**सुक्ष्म वाहिन्यांद्वारे**शरीराला पोहचवितो*कोण ....?उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - गोगलगाय••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सत्य, समता, स्वातंत्र्य यांचा मिलाफ आणि आचार, उच्चार विचार यांचे उगमस्थान म्हणजे शिक्षण होय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्रात स्ट्रॉबेरीचे सर्वात जास्त उत्पादन कोठे होते ?२) शिक्षण हक्क कायद्यानुसार ( RTE ) किती टक्के जागा आरक्षित असतात ?३) भारतातील पहिले ज्योतिर्लिंग कोणते ?४) 'चाणाक्ष' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) भारतातील सर्वात लहान रेल्वे मार्ग कोणता ? *उत्तरे :-* १) महाबळेश्वर - पाचगणी २) २५ टक्के ३) सोमनाथ, गुजरात ४) हुशार, चतुर ५) नागपूर ते अजनी ( ३ किमी )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *कावीळ म्हणजे काय ?* 📙 कावीळ किंवा कामला हा एक स्वतंत्र विकार मानण्यापेक्षा ते एक रोगलक्षण मानणे सयुक्तिक आहे. यकृतातून बाहेर जाणाऱ्या पित्तरसापेक्षा अधिक पित्तरस यकृतात तयार होऊ लागला म्हणजे कावीळ होते. जास्तीचा शिल्लक राहिलेला पित्ताचा भाग रक्तात मिसळला जातो व सर्व शरीरभर पसरतो. यातूनच डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा दिसू लागतो. त्वचेचा रंग पिवळसर होऊ लागतो. लघवी पिवळी होते व तीव्र काविळीत लालसर पिवळी दिसते. पित्त यकृतातून बाहेर पडताना पित्तनलिकेत किंवा प्रत्यक्ष यकृतांतर्गत अडथळा निर्माण झाला, तर शौचास पांढरेफिके होऊ लागते.कावीळ हे यकृतविकृतीचे किंवा रक्तातील तांबड्यापेशी जास्त नाश पावत असल्याचे चिन्ह होय. या रोगाचे निदान मुत्रपरीक्षेतून व रक्ताच्या चाचण्यांतून होते. नवजात बालकाला रक्तपेशींचे दान निसर्गाने जरा सढळपणे दिलेले असते. त्यामुळे जन्मानंतर काही दिवसांतच या जास्तीच्या पेशी नाश पावतात व मंद स्वरूपात कावीळ उद्भवते. पण ती आपोआपच थोड्याच दिवसांत नाहीशी होते. क्वचित ती तीव्र स्वरूपात व अगदी पहिल्या दुसऱ्या दिवशीच दिसल्यास त्या बालकाला फोटोथेरपी हा अल्ट्राव्हाॅयलेट किरणांचा उपचार दिला जातो. हिमोलायटिक ऍनिमिया या रक्तक्षयाच्या आजारातही रक्तपेशींचा नाश होत असल्याने कावीळ होते. मूळ कारण दूर झाल्यास ती बरी होते.आपण सहसा काविळीचा रुग्ण पाहतो, तो विषाणूजन्य पाण्यातून झालेल्या संसर्गाचा बळी असतो. तोंडावाटे पाण्यातून हे विषाणू शरीरात प्रवेश करतात व त्यामुळे यकृताला सूज येते, कार्यात अडथळा होतो. यकृताचे तांबड्या रक्तपेशी नष्ट करण्याचे काम नीट न झाल्याने कावीळ दिसू लागते. मळमळ, ओकारी, भूक मंदावणे, गुबारा धरणे, शरीराला कंड सुटणे, मलावरोध ही लक्षणे प्राधान्याने सर्वच रुग्णांत दिसतात. डोळ्यांचा, त्वचेचा व मूत्राचा रंग पिवळा होतो, तर शौचास पांढरट चिकणमातीसारखे होऊ लागते. पचनास आवश्यक पित्तरसाचा अभाव झाल्याने ही लक्षणे दिसतात. सामान्यपणे पाच ते दहा दिवसांत हा आजार बरा होतो.दुसऱ्या प्रकारच्या काविळीत म्हणजे रक्ताद्वारे संसर्ग होणाऱ्या काविळीत विषाणू एकाच्या रक्तातून दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करतात. इंजेक्शनच्या सुया, शस्त्रक्रियेच्या सुया वा रक्त यांच्याशी सतत संपर्क येणाऱ्या सिस्टर, डॉक्टर यांसारखी व्यक्ती, सर्जन यांना हा संसर्ग होण्याची शक्यता असते. ही कावीळ तीव्र स्वरूपाची असून बरी व्हायला खूप वेळ लागतो. काही वेळा यकृतदाह होऊन यकृताचे काम कायमचेच मंदावत जाते. यालाच 'लिव्हर सिर्हाॅसिस' असे म्हणतात. सिर्हाॅसिसमध्ये यकृत आक्रसत जाऊन त्याचे काम बंद पडत जाते. हा एक गंभीर रोग आहे. सध्या काविळीची लस (हेपॅटायटिस बी) टोचली जाते, ती या प्रकारच्या काविळीला प्रतिबंध करते. या प्रकारच्या काविळीवर उपचार नसल्याने प्रतिबंध हाच योग्य उपाय तर ठरतो.अंथरुणात पडून पूर्ण विश्रांती, तोंडावाटे भरपूर शर्करायुक्त पेयद्रव्ये, हलका कर्बयुक्त आहार घेतल्यास सर्वसामान्य कावीळ आपोआप नियंत्रणात येते. तीव्र लक्षणांत शिरेवाटे ग्लुकोज सलाईन देऊन रुग्णाच्या पचनसंस्थेला आराम देऊन मदत केली जाते.कावीळ हा विषाणूजन्य आजार असल्याने रुग्णाशी संपर्क आल्यास हात स्वच्छ धुणे, त्याची भांडी, अंथरूण, कपडे यांची वेगळी व्यवस्था करणे व अन्य लोकांनी पाणी उकळून पिणे हा प्रतिबंधाचा महत्त्वाचा मार्ग असतो.शेवटी पण महत्त्वाचे, काविळीची लक्षणे व प्रत्यक्ष संसर्ग होण्याची कारणे जरी दूर झाली, तरी रुग्णाच्या डोळ्यांचा रंग काही आठवडे पिवळसर राहतो व हळूहळू नेहमीसारखा होतो.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुझे पायीं माझ्या मनें दिली बुडी । इंद्रियें बापुडीं वेडावलीं ॥१॥ आतां विषयसुख जाणावें कवणें । जाणोनि भोगणें कवणें स्वामी ॥२॥ देह सहज स्थिति राहिले निष्काम । ह्रदयीं सदा प्रेम ओसंडत ॥३॥ नामा म्हणे देवा भक्तजनवत्सला । क्षण जीवावेगळा न करींज मज ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्याच्या मनात खऱ्या अर्थाने सकारात्मक विचार असतात. चांगल्या, वाईट परिस्थितीची जाणीव, श्रध्दा आणि स्वतः वर तेवढा विश्वास असतो.अशी व्यक्ती बिनधास्तपणे आपले कार्य सतत चालू ठेवत असते. अशी व्यक्ती चुकूनही कोणाचा अपमान करत नाही. कारण ह्या व्यर्थ गोष्टींकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नसतो. अशी व्यक्ती अभिमानाचे दुसरे नाव असते. अशाच व्यक्तीच्या आपण सहवासात रहावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *संस्कारीत मुलेच यशस्वी*नैतिक मूल्यांचे शिक्षण देणा-या एका शिक्षकाने मुलांसाठी चॉकलेटस मागवली होती. त्यांनी सगळ्या मुलांना रांगेत बसवले होते. शिक्षक चॉकलेटस वाटायला सुरुवात करणार इतक्यात शाळेचा शिपाई त्या वर्गात येऊन पोहोचला व म्हणाला,''सर तुम्हाला आताच्या आत्ता प्राचार्यांनी काही महत्वाचे सांगण्यासाठी त्यांच्या कार्यालयात बोलावले आहे.'' शिक्षकांनी चॉकलेटचा डबा हातातून खाली ठेवला व मुलांना म्हणाले,'' मुलांनो मला काही कामासाठी प्राचार्यांकडे जावे लागत आहे. खरेतर ही चॉकलेटस मला माझ्या स्वत:च्या हाताने तुम्हाला द्यायची खूप इच्छा होती. परंतु मला जावे लागणार आहे. पाहिजे तर तुम्ही हाताने चॉकलेटस घेऊ शकता. अन्यथा मी परत आल्यावर तुम्हाला देईन'' ही चांगली संधी आहे. असा काही विद्यार्थ्यांनी विचार केला व त्यांनी चॉकलेटस स्वत:च्या हाताने घेऊन खाल्ली तर काही विद्यार्थ्यांनी शिक्षकांची वाट बघण्यात वेळ घालविला. शिक्षक परत आले व त्यांनी मुलांना विचारले,'' मुलांनो ज्यांनी ज्यांनी स्वत:च्या हाताने चॉकलेटस खाल्ली त्यांनी आपले हात वर करा'' ज्यांनी चॉकलेटस खाल्ली होती त्यांनी हात वर केले. मग शिक्षकांनी उरलेल्या मुलांना प्रेमाने चॉकलेटस वाटली. काही वर्षानंतर त्या शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांची माहिती मिळविली तेव्हा त्यांना असे दिसून आले की ज्या मुलांनी स्वत:च्या हाताने चॉकलेटस घेतले होते ती मुले सामान्य स्वरूपातील कामे करून उदरनिर्वाह करत होते तर ज्यांना शिक्षकांनी चॉकलेटस दिली ते सर्व विद्यार्थी उच्च पदावर काम करत होते. ही सर्व संस्कारांची देणगी होती.तात्पर्य :- संस्काराने माणूस घडतो. मिळालेली संधी आणि तिचा योग्य वापर करणे हे मानवाच्या हाती आहे. चुकीच्या मार्गाने गेल्यास व संयम न पाळल्यास योग्य संधी मिळूनही तिचा वापर करता येत नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~📅 दि. 12/07/2022 वार - मंगळवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जागतिक बाल कामगार निषेध दिन *आषाढी एकादशी निमित्ताने सर्वाना हार्दीक शुभेच्छा*💥 ठळक घडामोडी :-१९८२-NABARD ची स्थापना१९९९- 'महाराष्ट्र भूषण 'हा महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च पुरस्कार सुनील गावस्कर यांना प्रदान२००१-कृषीशास्त्रज्ञ डॉ एम एस स्वामिनाथन यांना 'टिळक पुरस्कार'जाहीर२००५ - आल्बर्ट दुसरा मोनॅकोच्या राजेपदी.💥 जन्म :-१८६४ - इतिहासाचार्य वि.का.राजवाडे, मराठी इतिहास संशोधक१८६४ - जॉर्ज वॉशिंगटन कार्व्हर, अमेरिकन शास्त्रज्ञ. (चित्रीत)१९२० - यशवंत विष्णू चंद्रचूड, भारताचे माजी सरन्यायाधीश.१९४७ - पूचिया कृष्णमुर्ती, भारतीय क्रिकेट खेळाडू.१९६५ - संजय मांजरेकर, भारतीय क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :-२००० - इंदिरा संत , मराठी कवयित्री. २०१२-दारा सिंग ,मुष्टियोद्द्धा व अभिनेता२०१३-प्राण ,हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *संसदेच्या नव्या इमारतीवर भव्य 'अशोक स्तंभ', पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *गुजरातप्रमाणे महाराष्ट्राशेजारील तेलंगणा राज्यातही पावसाचा धुमाकूळ सुरू आहे... पूरस्थितीमुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालंय. मुसळधार पावसानं नद्या दुथडी भरून वाहतायत. पुरामुळे अनेक पूल रस्ते पाण्याखाली गेल्यानं इथे अनेक गावांचा संपर्क तुटलाय*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *आमदार अपात्रता आणि अन्य याचिकांवरील सुनावणीबाबत अनिश्चितता, सुनावणीची तारीख निश्चित करण्यासाठी शिवसेनेचे वकील कोर्टात विनंती करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुढील 3-4 दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, कोकणासह, सातारा पुणे, चंद्रपूर, गडचिरोलीला रेड अलर्ट, राज्यातील धरणं भरण्यासही सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अमरनाथमधील ढगफुटीनंतर सुरक्षा दलांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, आत्तापर्यंत १६ भाविकांचे मृतदेह हाती, ४१ जण अजूनही बेपत्ता*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची महत्वपूर्ण घोषणा, नागपुरात धावणार ब्रॉडगेज मेट्रो ! रेल्वे बोर्डाची मंजुरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *रोमहर्षक सामन्यात नोवाक जोकोविच विजयी, ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसला हरवलं, सलग चौथ्यांदा पटकावलं विम्बल्डनचं जेतेपद8*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - फेसबुक मैत्री*https://storymirror.com/read/story/marathi/fn07z43i/phesbuk-maitrii/detailवाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌺 *फुल केव्हा फुलतं ?* 🌺**************************फुलांनी केवळ कवींनाच वेड लावलंय असं नाही; आपल्या सर्वांच्याच चित्तवृत्ती फुलांना पाहून फुलतात. त्यांचे मनमोहक रंग, त्यांचे आकार, त्यांची रचना, त्यांचा डौल खरोखरंच मोहून टाकणारे असतात. म्हणूनच असावं कदाचित, पण आपल्या आयुष्याच्या प्रत्यक क्षणाची साथ फुलं करतात. जन्म झाला म्हणून जशी फुलांची उधळण होते तशीच शेवटच्या प्रवासाला निघतानाही फुलांच्या माळांनी निरोप दिला जातो. प्रेयसीला भेट म्हणून गुलाब देता देताच त्या प्रणयाचं आयुष्याच्या साथीत रुपांतर करतानाही फुलांच्या माळांची देवाणघेवाण करून त्यावर शिक्कामोर्तब करण्यात येतं.हे असे आनंदाचे दिवस वर्षात केव्हाही येऊ शकतात. तरीही प्रत्येक वेळी आपल्याला फुलं मिळत राहतात. म्हणजे ती सदासर्वकाळ फुलतात असं समजायचं का ? तसं नाही. कारण काही फुलं ठराविक हंगामातच मिळतात. काही दिवसाउजेडीच उमलतात तर रातराणीसारखी काही रात्रीच्या वेळीच आपल्या सुगंधाने आसमंत दरवळून टाकतात. ब्रह्मकमळ तर एकदाच आणि तेही मध्यरात्रीच फुलतं. मग हे फुलं नेमकी फुलतात तरी कधी ?हे समजून घ्यायचं असेल तर आधी ती फुलतातच का, हे ध्यानात घ्यायला हवं. ती फुलतात ते आपल्याला आनंद देण्यासाठी नाही, तर वनस्पतींच्या पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेत फुलांचं उमलणं एक कळीची भूमिका बजावत असतं. फुलांमध्ये पुंकेसर आणि स्त्रीकेसर असे परागकण असतात. त्यांच्या मिलनातूनच बी तयार होतं आणि पुढच्या पिढीची नांदी म्हटली जाते. हे मिलन होण्यात कीटक आणि पक्षी मोलाची मदत करतात. त्या मदतगारांना त्यांचं काम करण्यासाठी प्रवृत्त करायचं तर काही आमिष दाखवायला हवं. त्यांना आधी आकर्षित करायला हवं. ते करण्यासाठीच फुलं फुलत असतात. त्यांची ती रंगीबेरंगी छबीही तेच काम करत असते. त्यामुळे ते जेव्हा आकर्षित होतील तेव्हा फुलण्यानेच कार्यभाग साधत असतो.तरीही निरनिराळ्या वनस्पतींची वर्गवारी करणाऱ्या कार्ल लिनैस यानं फुलांचीही त्यांच्या उमलण्यावरून तीन गटात विभागणी केली आहे. काही फुलं हवामानानुसार उमलतात काही कोमेजतात. त्यांना लिनैसनं 'मिटिअाॅरिची' असं म्हटलं आहे. काही दिवसाच्या लांबीनुसार आणि कार्यक्रम आखतात. म्हणजे हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात या वेळा बदलतात. त्यांना त्यानं 'ट्रॉपिची' हे नाव दिले आहे. उरलेली सगळी तिसऱ्या म्हणजेच इक्निनोक्टेल्स या गटात घातलेली आहेत. ती हवामानाची किंवा दिवसरात्रीच्या लांबीची पर्वा न करता दिवसाच्या ठरावीक वेळी फुलतात आणि ठरावीक वेळी कोमेजतात.ज्याँ बातिस्त लमार्क या फ्रेंच वैज्ञानिकाला असं दिसून आलं की फुलण्याच्या वेळी फुलांची उष्णता वाढलेली असते. आपल्या गंधाचा दूरदूरवर फैलाव करण्यासाठी ही वाढीव उष्णता कामी येते, असे त्यानं दाखवलं आहे. काही फुलं तर आसमंताच्या तापमानापेक्षा आपलं तापमान ३५-४० अंशांनीही वाढवू शकतात. तेव्हा फुलांचं तापमान वाढू लागलं की ती फुलतात असंही म्हणता येईल.*बाळ फोंडके यांचा 'केव्हा ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••प्रार्थना करणाऱ्या हातापेक्षा मदत करणारे हात जास्त पवित्र असतात.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) गिनीज बुकात नोंद झालेली जगातील सर्वात वृद्ध हवाईसुंदरी ( एअरहोस्टेज ) कोण ?२) जगातील पहिला मोबाईल कॉल कोणी केला ?३) जपानची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी माजी पंतप्रधान शिंजो आबे यांनी ज्या उपाययोजना केल्या त्यास काय नाव पडले ?४) मुळाक्षरे म्हणजे काय ?५) 'फोर्ट विल्यम' म्हणजेच आजचे कोणते शहर होय ?*उत्तरे :-* १) बेट नॅश ( ८६ वर्षे ) , अमेरिका २) मार्टिन कूपर , ३ एप्रिल १९७३ ३) आबेनॉमिक्स ४) अक्षरांचा समूह जो भाषेत वापरतात त्यांना मुळाक्षरे म्हणतात. ५) कोलकाता *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● दिलीप इंगळे● हरिहर धुतमल● हितेश माधवी● साई गाडगे● प्रवीण दबडे पाटील● शिल्पा जोशी● नागेश पडकूटलावार● अविनाश पांडे● नमन यादव● सुनील देवकरे● अमरजुल हुसैन● दादाराव जाधव● नंदकुमार कौठकर● अभिजित राजपूत● माधव उमरे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••• ●🚩🚩 ‼ *विचार धन*‼ ● 🚩🚩••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *टाळ वाजे....मृदंग वाजे..* *वाजे हरीची वीणा.....!* *माऊली निघाले पंढरपुरा..* *मुखाने विठ्ठल- विठ्ठल म्हणा.!**हा सगळा भक्तीसागर, विठु नामाच्या गजरात तल्लीन होऊन, नाचत-गाजत एकजीव होऊन माऊलीं सोबत दिवसभर पायी चालत संत स्वरूप वारकरी, आपल्या विठुच्या दर्शनाला पंढरीकडे चालत असतात. क्षणभर वाटतं की अथांग सागर संथ झाला. ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष करीत हा आषाढी वारी पालखी सोहळा पुढे सरकत असतो.**या वारीमध्ये असेही काही क्षण असतात जे मनाला सुखद प्रसन्नता देतात. विठ्ठल-विठ्ठल नामाचा अखंड गजर...भागवत धर्माचे प्रतीक असलेली आसमंतात फडकणारी पताका...चहूबाजूंनी उत्साहीत वैष्णवांचा भक्तीसागर... आणि वायुवेगाने धावणारा अश्व...अशा भक्तीमय वातावरणात लक्षावधी भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा एक क्षण म्हणजे...' रिंगण ' सोहळा..!* *दिंड्या गरूड टके पताकांचे भार ।* *होतो जयजयकार.... नामघोष ॥* 🚩 *॥ रामकृष्णहरी ॥*🚩 *विठ्ठल ॥ विठ्ठल ॥ विठ्ठल ॥*🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल-9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबिराचे बोल* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• पाहन पूजै हरि मिलैतो मै पूजूँ पहार ।ताते तो चक्की भलीपीसि खाय संसार ।सारांश : दगड-धोंडे पूजणार्यांचा समाचार घेताना महात्मा कबीर म्हणतात की दगाड-धोंडे पूजल्यामुळे इच्छित साध्य झालं असं होईल, मनोकामना पूर्ण होतील किवा देवाची प्राप्ती होणार असेल तर मी अख्खा पर्वतच पूजायला तयार आहे. त्यापेक्षा दगडापासून बनलेल्या जात्याची काळजी घ्यायला मला आवडेल. कारण हे जातं धान्य भरडण्याच्या कामी येतं. त्यापासून पीठ मिळतं. त्यामुळे जगातील जीवांची भूक तरी भागते. श्रद्धेच्या नावाखाली लोक दगडा-धोंड्याला पूजत राहातात. काही जण रंग फासलेले किंवा हळदी-कुंकू लावलेले दगड दिसताच हात जोडतात. गाडीवरून जाताना मंदिर येताच गाडीचा भोंगा वाजवतात. जसा काही मंदिरातला देव झोपलाय अन आवाज देवून हे त्याला जागं करित आहेत. पहावं ते नवलंच ! एकाचं बघून दुसरा करणार अन ती प्रथाच होणार. आज संगणक युगात वावरताना आंतरजालात दडलेलं जगाचं ज्ञान संगणकावर एका क्लिक मध्ये आपल्यासमोर येतं. संगणक माहिती आदान प्रदानाचं यंत्र आहे. .हे माहित असून सुद्धा त्याला चालू करण्यापूर्वी त्याची पूजा अर्चा करणारे . त्यावर धर्माचे सांकेतिक ठसे उमटवणारे, अज्ञानाचं जोखड वाहणारे ढोंगी बुवा, मौलवी यांचं विज्ञानानंच बणवलेल्या माईकवरून 'ये विज्ञान फिज्ञान सब झुट है । म्हणनं अन विज्ञान शिकलेल्या श्रोतृ समुदायाकडून माना हलवून प्रतिसाद देणं किती ढोंगी व भंकस पणाचा कळस आहे बरं हा ! अशी मानसिकता पाहिली की दया यायला लागते. कोणता संस्कार व शिकवण देत आहेत बरं आपल्या वर्तन अन करणीतून भावी पिढ्यांसाठी ! खरंच का जगू शकत नाही माणूस ढोंगाशिवाय ! का झिडकारत नाही अज्ञानाची काजळी ? विज्ञान आणि मानवतावादाचा मेळ घालत विचारचनं विवेकाचे दीप प्रज्वलित करता आले तर जीवनात दररोजच दिवाळी साजरी होईल. एकनाथ डुमणे, मुखेड📱 9096714317•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण आपले सुखी जीवन जगण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतो आणि सुखी जीवन जगण्यासाठी पैसा कमवतो.तो पैसा एवढा कमवतो की,त्या पैशापायी आपण काय करत आहोत हा समजायला मार्ग सापडत नाही.ज्या गोष्टींसाठी आपण पैसा मिळवला आहे त्यासाठी तर जरुर वापरायला पाहिजे.आपल्या सुखासाठी तर आपण कमवतोच पण आपल्यासारखे सुख इतरांनाही मिळावे असे वाटत असेल तर आपल्या कर्तृत्वाचे हात अशांसाठी पुढे करा की, त्यातून तुमम्हालाही समाधान वाटले पाहिजे.जे अनाथ,अपंग,अंध,निराधार,वृध्द आहेत त्यांना तुमच्याकडून कशाची तरी अपेक्षा आहे अशांना आपण आपल्या केलेल्या कमाईतून काहीतरी मदत करुन जीवनाचे सार्थक करावे.याही व्यतिरिक्त समाजकार्य, देशकार्यासाठीही जे शक्य आहे ते आपल्या परीने करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या आपण कमवलेल्या कमाईचे सार्थक होईल.केवळ आपण आपलाच स्वार्थ साधण्यासाठी पैसा कमावला तर त्यात आत्मिक समाधान लाभणार नाही.वेळ निघून गेल्यावर असे होऊ नये की,आपण एवढे कमावले आहे त्यातून आपण आपल्या स्वार्थासाठीच केले आहे पण इतरांसाठी काहीच केले नाही.अशा पश्चातापात पडण्यापेक्षा आपला हात अशांसाठी साठी पुढे करा की,खरी गरज त्यांना आहे.एक आपला हात पुढे केला तर अनेक तीर्थयात्रा करुनही पुण्य मिळणार नाही तेवढे पुण्य आणि समाधान मिळेल.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🌹🌱🌹🌱🌹🌱🌹🌱 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हेतल चा अनुभव*हेतल दुपारी शाळेतून घरी आली. घराला कुलूप होते. कारण तिचे आई बाबा लग्नाला गेले होते. तिने कुलूप उघडले व घरात आली. खिडक्या उघडल्या. गणवेश बदलला. ती हात पाय धुऊन खाऊ शोधु लागली. अचानक जोरदार पाऊस पडू लागला. तिने पटापट दारे खिडक्या बंद केल्या. तिचे लक्ष घड्याळ कडे गेले. बराच उशीर झाला आहे, असे म्हणून ती जवळच्या खुर्चीत बसली. तिला हळूहळू पावसाचे गाणे आठवू लागले. ती हळूहळू गुणगुणू लागली. आता पावसाचा आवाज कमी झाला व तिने खिडक्या उघडल्या. तरीपण रिमझिम रिमझिम पाऊस पडत होता. हळूहळू पाऊस थांबला. पानाआड लपलेले पक्षी बाहेर आले व त्यांनी आपल्या पंखाना झटकले. बाहेर लख्ख ऊन पडले. बाहेर कसं स्वच्छ सुंदर वाटत होते. आता संध्याकाळ झाली. दारावरची बेल वाजली +डिंग डाँग) आई आली असे म्हणतात हेतल पळत दाराकडे गेली. तिने दार उघडले. आणि आईबाबा तिचा समोर उभे होते. इतक्यावेळ कंटाळलेली हेतल आईला जाऊन बिलगली. हाच होता तिचा अनुभव.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04 मार्च 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟢 *_राष्ट्रीय सुरक्षा दिन_* 🟢•••••••••••••••••••••••••••••••••••• 🟢 *_ लाईनमन दिवस_* 🟢••••••••••••••••••••••••••••••••• 🟢 *_ या वर्षातील ६३ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🟢 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟢••••••••••••••••••••••••••••••••••••*२००१: पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते गुरुदासपूर येथील रणजितसागर धरण देशाला अर्पण**१९९६: चित्रकार रवी परांजपे यांना ’कॅग हॉल ऑफ फेम’ हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर**१९८०: प्रचंड बहुमताने निवडणुका जिंकून रॉबर्ट मुगाबे हे झिम्बाब्वेचे पहिले कृष्ण्वर्णीय पंतप्रधान बनले.**१९६१: १९४६ मधे इंग्लंडमधे बनवलेली युद्धनौका भारतीय सैन्यदलात दाखल झाली व तिचे ’आय.एन.एस.विक्रांत’ असे नामकरण करण्यात आले. ही भारतीय आरमारात दाखल झालेली पहिली विमानवाहू नौका होती.**१९५१: नवी दिल्ली येथे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते पहिल्या आशियाई खेळांचे उद्घाटन झाले. या खेळांत ११ देशांतील ४८९ महिला व पुरुष स्पर्धकांचा सहभाग होता.**१९३८: सौदी अरेबियात प्रथमच खनिज तेल सापडले**१८६१: अब्राहम लिंकन अमेरिकेचे १६ वे अध्यक्ष झाले.**१७९१: व्हरमाँट हे अमेरिकेचे १४ वे राज्य बनले.*🟢 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟢••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९४: वीणा जगताप -- भारतीय अभिनेत्री**१९८७: श्रद्धा दास -- भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल**१९८०: रोहन बोपन्ना_ भारतीय टेनिस खेळाडू**१९७७: निता प्रफुल्ल अलेल्वार -- कवयित्री, लेखिका**१९७३: प्रा. डॉ. केशव पाटील -- लेखक, संपादक* *१९७२: रवींद्र केदा देवरे -- कवी* *१९७१: रसूल दादूसाहेब पठाण -- कवी**१९७१: वैशाली गावंडे-कोल्हे -- कवयित्री, लेखिका* *१९६७: डॉ. निर्मला पी. भामोदे -- चरित्रकार, वक्त्या* *१९५९: बबन ओंकार महामुने -- कवी , कथाकार* *१९४९: प्रा. डॉ. वामनराव जगताप -- कवी, लेखक**१९४४: शरद पुराणिक -- विज्ञान लेखक**१९३९: गोविंद मोघाजी गारे --आदिवासी संस्कृती,आदिवासी साहित्य,आदिवासी कला यांचे गाढे अभ्यासक,(मृत्यू: २४ एप्रिल २००६ )**१९३५: गणपती साबाजी सेलोकर - कवी* *१९३५: प्रभा राव -- राजस्थान व हिमाचल प्रदेश राज्यांच्या माजी राज्यपाल (मृत्यू: २६ एप्रिल २०१० )* *१९२९: प्रल्हाद बापूराव वडेर -- कथाकार, समीक्षक**१९२२: दीना पाठक – अभिनेत्री (मृत्यू: ११ ऑक्टोबर २००२)**१९२१: फणीश्वर नाथ 'रेणु'-- हिन्दी भाषेचे साहित्यकार(मृत्यू: ११ अप्रैल १९७७ )**१९०९: दामोदर अच्युत कारे -- गोमंतकीय मराठी कवी.हे बा.भ.बोरकरांचे समकालीन होते(मृत्यू: २३ सप्टेंबर १९८५ )**१९०६: फिशर इलेक्ट्रॉनिक्स चे निर्माते एवेरी फिशर यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १९९४ )**१८९५: दत्तात्रय केशव केळकर -- समीक्षक, लेखक (मृत्यू: ८ ऑगस्ट १९६९ )* 🟢 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟢••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२: रॉडनी विल्यम मार्श -- ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू(जन्म:४ नोव्हेंबर १९४७)**२०२१: जगन्नाथ केशव कुंटे -- लेखक (जन्म: १५ मे १९४३ )* *२०१६: पूर्ण ऐजिटक संगमा (पी.ए. संगमा) -- पूर्व लोकसभा अध्यक्ष (जन्म: १ सप्टेंबर १९४७ )**२०११: अर्जुन सिंग – केन्द्रीय मानव संसाधन मंत्री,३ वेळा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि पंजाबचे राज्यपाल (जन्म: ५ नोव्हेंबर १९३० )**२००९: बापू वाटवे -- चित्रपटविषयक लेखन करणारे एक प्रसिद्ध मराठी लेखक व चित्रपट दिग्दर्शक(जन्म: १९२४ )**२०००: गीता मुखर्जी – स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या,लोकसभा सदस्य (जन्म: ८ जानेवारी १९२४ )**१९९६: आत्माराम सावंत – नाटककार व पत्रकार(जन्म: ७ मार्च १९३३ )**१९९६: बिमल दत्ता -- लेखक आणि दिग्दर्शक(जन्म: २६ फेब्रुवारी १९२४)**१९९५: इफ्तिखार – चरित्र अभिनेता (जन्म: २२ फेब्रुवारी १९२० )**१९८५: पुरूषोत्तम गणेश सहस्रबुद्धेह -- मराठी गंथकार आणि विचारवंत.(जन्म: १० जून १९०४ )**१९७६: वॉल्टर शॉटकी – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: २३ जुलै १८८६ )**१९५२: सर चार्ल्स शेरिंग्टन – मज्जापेशीवर संशोधन करणारे नोबेल पारितोषिक विजेते (१९३२) ब्रिटिश जैवरसायनशात्रज्ञ (जन्म: २७ नोव्हेंबर १८५७ )**१९२५: ज्योतिरिंद्रनाथ टागोर – थोर बंगाली साहित्यिक,नाटककार,संगीतकार,चित्रकार व संपादक,रविंद्रनाथ टागोर यांचे वडील बंधू, त्यांनी लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्याचे बंगालीत भाषांतर केले (जन्म: ४ मे १८४९ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••**फ्रेश मॉर्निंग बुलेटिन* या समुहात join ..... होण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *लाडक्या बहिणींना फेब्रुवारीच्या हप्तासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *तिरुपतीप्रमाणेच पंढरीच्या विठुरायाचे टोकन दर्शन; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांचे हस्ते पहिले पूजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *गोपीचंद पडळकरांसह विधानपरिषदेच्या 5 रिक्त जागेवर निवडणूक कार्यक्रम जाहीर; 27 मार्च रोजी होणार मतदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *दिल्लीचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 24 ते 26 मार्चदरम्यान, सूचनांसाठी मेल आणि व्हॉट्सअप नंबर दिले, दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणाल्या, आम्ही प्रत्येक वचन पूर्ण करू*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *विद्यार्थ्यांना शाळेत स्मार्टफोन आणण्यास बंदी नाही, दिल्ली हायकोर्टाने म्हटले, शिक्षणासाठी तंत्रज्ञान आवश्यक, धोरणे बनवून त्यावर नियंत्रण ठेवा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीसह १६ मागण्यांसाठी लढा, ५ मार्चला राज्यभरातील आगारांसमोर निदर्शने; उग्र आंदोलनाचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ICC चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आज भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला सेमिफायनल सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤श्री गोवर्धन कोळेकर, ACP, औरंगाबाद👤 मारोती राचप्पा छपरे, माध्य. शिक्षक, जि. प. हा. धर्माबाद👤 मजहर सौदागर, सहशिक्षक 👤 साहेबराव पहिलवान, धर्माबाद👤 अनिल गडाख 👤 ज्ञानेश्वर नाटकर👤 गोविंद उपासे, सहशिक्षक👤 गोविंद कोंपलवार, सहशिक्षक👤 शिवाजी पाटील ढगे👤 शेख इस्माईल शेख लतीफ👤 लक्ष्मण बोधनकर, सहशिक्षक👤 लक्ष्मण कुमरवाड👤 सचिन पा. हंबर्डे धनंजकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 09*तिचे पोटात असतात पाय**हळूहळू ती सतत चालते**सोडत जाते चिकट स्त्राव**लहान मुलांना खूप आवडते*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - शीतसमाधी••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्या विद्येमध्ये स्वतंत्रपणे वस्तुनिष्ठ विचार करण्याची दृष्टी आहे, कर्तव्यशक्ती आहे ती विद्या विज्ञानातून मिळते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगात सर्वात पहिले रेल्वे केव्हा धावली ?२) भारतात सर्वात पहिले रेल्वे केव्हा धावली ?३) भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयीकरण केव्हा झाले ?४) रेल्वे इंजिनचा शोध कोणी लावला ?५) 'रेल्वेचे जनक' कोणाला म्हटले जाते ? *उत्तरे :-* १) सन १८२५ ( इंग्लंडमधील स्टॉकटन ते डार्लिंगटन ) २) सन १८५३ ( मुंबई ते ठाणे ) ३) सन १९५१ ४) जॉर्ज स्टीफनसन, इंग्लंड ५) जॉर्ज स्टीफनसन, सिव्हील इंजिनियर व मेकॅनिकल ( १७८१ - १८४८ )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📒 *आटवलेलं दूध पिवळसर का होतं ?* 📒दुधाचा समावेश आपण द्रवपदार्थांमध्ये करत असलो तरी ते पाण्यासारखं द्रव नाही. वैज्ञानिक भाषेत त्याला कोलॉइड किंवा कोलॉईडल सस्पेन्शन असं म्हणतात. कारण त्यातल्या पाण्यात निरनिराळे कण विहरत असतात. यातले काही कण प्रथिनांचे असतात. त्यातही कैसिन हे प्रथिन जास्त प्रमाणात असल्यामुळे त्याचे कण बरेच असतात. त्याशिवाय रिबोफ्लेविन हे जीवनसत्त्व असतं. याचा रंग पिवळा असतो. त्याच्या नावातच या रंगाचा उल्लेख आहे. लॅटिन भाषेत फ्लेवस म्हणजे पिवळा. त्यापासूनच रिबोफ्लेविन हे त्याचं नाव त्याला मिळालेलं आहे. हे मात्र त्या पाण्यात विरघळलेलं असतं पण त्याचं प्रमाण कमी असल्यामुळे त्याचा पिवळा रंग त्या पाण्याला मिळत नाही. याव्यतिरिक्त चरबीचे म्हणजेच मेदाम्लांचे कणही त्या पाण्यात विहरत असतात.केसिन या प्रथिनात कॅल्शियमची रेलचेल असते. त्यामुळेच दूध अतिशय पौष्टिक बनतं. या केसिनचा रंग पांढरा असतो. झालंच तर त्यातील मेदाम्लांचा रंगही पांढरा असतो. दुधातून जी साय निघते ती या मेदाम्लांची बनलेली असते. तिच्या रंगावरून त्यांच्या पांढऱ्या रंगाची कल्पना यावी. दुधात केसिनचं प्रमाण सगळ्यात जास्त असल्यामुळे त्याचेच कण पाण्यात जास्त विहरत असतात. त्यांच्यावरून परावर्तित होणारा प्रकाश दुधाला त्याचा पांढरा रंग देतो. त्यात भर पडते ती मेदाम्लांच्या कणांच्या सहभागाची. जितकं त्यांचं प्रमाण दुधात जास्त तितका त्याचा रंग पांढराशुभ्र होतो. सामान्य तापमानाला हे सारे कण सहजगत्या पाण्यात विहरत राहतात, ते खाली बसत नाहीत. त्यामुळे मग दुधाचा रंग पांढराच राहतो. शिवाय हे कण कमीत कमी प्रकाश शोषून घेतात. जास्तीत जास्त प्रकाश परावर्तित होतो. त्यामुळे त्याचा पांढरा रंगच आपल्याला दिसतो.आपण जेव्हा दूध आटवतो तेव्हा त्यातल्या पाण्याची वाफ होऊन ते उडून जातं. त्याचं प्रमाण कमी होतं. त्याचं आकारमान कमी झाल्यामुळे त्यातल्या रिबोफ्लेविनचं प्रमाण वाढतं. रिबोफ्लेविनची घनता वाढल्यामुळे आता त्या पाण्याला त्याचा रंग मिळतो. ज्या पाण्यात केसिन आणि मेदाम्लांचे कण विहरतात त्याचाच रंग पिवळा झाल्यामुळे तोच साऱ्या दुधाचा होतो. गाईच्या दुधात रिबोफ्लेविनचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते गोठवल्यावरही पिवळं होतं, कारण त्या पाण्याचे स्फटिक बनतात. उरलेल्या पाण्यातल्या रिबोफ्लेविनची घनता साहजिकच वाढते. त्यामुळे मग त्या पाण्याचा आणि परिणामी दुधाचाच रंग पिवळसर होतो.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुझे चरणीं चित्त रंगलें अनुरागें । बुह्जन्मीं वियोगें शिणलें होतें ॥१॥ आलाळलें पोळलें तापत्रयीं पीडिलें । तृष्णें विभांडिलें नानापरी ॥२॥ काम क्रोध लोभ दंभ मद मत्सर । इहीं निरंतर जाजावलें ॥३॥ बुडतिया अवचटें लाभे पैं सांगडी । ते जीवें न सोडी तैसें जालें ॥४॥ नामा म्हणे केशवा तूं कृपेचा सागर । झणीं माझा अव्हेर करिसी देवा ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चुका माणसाच्याच हातून न कळत सुद्धा होत असतात. पण, त्या चुकांविषयी समजावून सांगण्याच्या काही पद्धती असतात. म्हणून कोणालाही का असेना त्याची चूक जर लक्षात आणून द्यायची असेल तर आपणही तेवढेच प्रामाणिक असले पाहिजे. तेव्हाच कुठेतरी आपल्या विषयी विचार केला जातो.पण, बोलणे वेगळे, वागणे वेगळे आणि विचार वेगळे असतील तर मात्र आपल्याकडे ही बघणारे अनेकजण असतात. म्हणून एकाकी कोणालाही चुकीचे ठरवू नये.बरेचदा असं होतं की एखाद्याला न वाचता चुकीचे ठरविल्याने त्याच्या स्वाभिमानाला किंवा त्याच्या चरित्राला डाग लागत असते. त्यावेळी भलेही तो माणूस बोलत नसेल पण, त्याचे मन जेव्हा दुखते तेच दुखावलेले मन अनेक पिढ्यांना सुखाने जगू देत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *❃ परोपकार ❃* ••◆•◆•◆★◆•◆•◆•• "अनेक वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका गावात खूप उंदीर झाले होते. घरात, शेतात, दुकानात सगळीकडे नुसते उंदीरच उंदीर होते. त्यामुळे अन्न - धान्याचे नुकसान होत होते. कोणत्याही परिस्थितीत उंदरांचा नाश करायचा असे गावकरी ठरवतात. पण, अनेक उपाय करूनही उंदरांचा नाश होत नाही. त्यामुळे गावकरी खूप त्रस्त होतात. ही गोष्ट शेजारी राहणाऱ्या गावातील एका बासरीवाल्या मुलाला कळते. मग तो गावात येतो व गावकऱ्यांना सांगतो की, ‘मी या उंदरांचा बंदोबस्त करू शकतो पण त्या बदल्यात तुम्ही मला शंभर सुवर्णमुद्रा दयाव्यात.’ गावकरी तयार होतात. मग, तो बासरीवाला बासरी वाजवत गावात फिरू लागतो. त्याच्या बासरीच्या आवाजामुळे गावातील सर्व उंदीर त्याच्याकडे आकर्षित होतात व त्याच्यामागे धावू लागतात. तो मुलगा गावाबाहेरील नदीत जातो त्याच्याबरोबर उंदीरही पाण्यात जातात आणि पाण्यात बुडून मरतात. बासरीवाला मुलगा गावकऱ्यांकडे आपल्या कामाचा मोबदला मागतो परंतु गावकरी ठरल्याप्रमाणे त्याला शंभर सुवर्णमुद्रा दयायला नकार देतात. बासरीवाल्याला कळते की गावकरी लबाड आहेत. तो म्हणतो की, ‘आता मी तुम्हाला कशी अद्दल घडवतो ते बघा.’ तो पुन्हा गावात बासरी वाजवत फिरू लागतो. पण यावेळी बासरीच्या आवाजाने गावातील लहान मुले त्याच्याकडे आकर्षित होतात व तेही त्याच्यामागे धावू लागतात. गावकऱ्यांना भीती वाटू लागते की, बासरीवाला उंदराप्रमाणे आपल्या मुलांनाही नदीत घेऊन जाईल. त्यामुळे गावकरी त्याला थांबवतात व ठरल्याप्रमाणे शंभर सुवर्णमुद्रा देतात. *_🌀तात्पर्य_ ::~**जो आपल्यावर उपकार करतो त्याला कधीही विसरू नये. "**प्रत्येकाला त्याच्या कामाचा मोबदला मिळालाच पाहिजे*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~📅 दि. 12/07/2022 वार - मंगळवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जागतिक बाल कामगार निषेध दिन *आषाढी एकादशी निमित्ताने सर्वाना हार्दीक शुभेच्छा*💥 ठळक घडामोडी :-१९८२-NABARD ची स्थापना१९९९- 'महाराष्ट्र भूषण 'हा महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च पुरस्कार सुनील गावस्कर यांना प्रदान२००१-कृषीशास्त्रज्ञ डॉ एम एस स्वामिनाथन यांना 'टिळक पुरस्कार'जाहीर२००५ - आल्बर्ट दुसरा मोनॅकोच्या राजेपदी.💥 जन्म :-१८६४ - इतिहासाचार्य वि.का.राजवाडे, मराठी इतिहास संशोधक१८६४ - जॉर्ज वॉशिंगटन कार्व्हर, अमेरिकन शास्त्रज्ञ. (चित्रीत)१९२० - यशवंत विष्णू चंद्रचूड, भारताचे माजी सरन्यायाधीश.१९४७ - पूचिया कृष्णमुर्ती, भारतीय क्रिकेट खेळाडू.१९६५ - संजय मांजरेकर, भारतीय क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :-२००० - इंदिरा संत , मराठी कवयित्री. २०१२-दारा सिंग ,मुष्टियोद्द्धा व अभिनेता२०१३-प्राण ,हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *संसदेच्या नव्या इमारतीवर भव्य 'अशोक स्तंभ', पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *गुजरातप्रमाणे महाराष्ट्राशेजारील तेलंगणा राज्यातही पावसाचा धुमाकूळ सुरू आहे... पूरस्थितीमुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालंय. मुसळधार पावसानं नद्या दुथडी भरून वाहतायत. पुरामुळे अनेक पूल रस्ते पाण्याखाली गेल्यानं इथे अनेक गावांचा संपर्क तुटलाय*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *आमदार अपात्रता आणि अन्य याचिकांवरील सुनावणीबाबत अनिश्चितता, सुनावणीची तारीख निश्चित करण्यासाठी शिवसेनेचे वकील कोर्टात विनंती करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुढील 3-4 दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, कोकणासह, सातारा पुणे, चंद्रपूर, गडचिरोलीला रेड अलर्ट, राज्यातील धरणं भरण्यासही सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अमरनाथमधील ढगफुटीनंतर सुरक्षा दलांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, आत्तापर्यंत १६ भाविकांचे मृतदेह हाती, ४१ जण अजूनही बेपत्ता*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची महत्वपूर्ण घोषणा, नागपुरात धावणार ब्रॉडगेज मेट्रो ! रेल्वे बोर्डाची मंजुरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *रोमहर्षक सामन्यात नोवाक जोकोविच विजयी, ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसला हरवलं, सलग चौथ्यांदा पटकावलं विम्बल्डनचं जेतेपद8*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - फेसबुक मैत्री*https://storymirror.com/read/story/marathi/fn07z43i/phesbuk-maitrii/detailवाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌺 *फुल केव्हा फुलतं ?* 🌺**************************फुलांनी केवळ कवींनाच वेड लावलंय असं नाही; आपल्या सर्वांच्याच चित्तवृत्ती फुलांना पाहून फुलतात. त्यांचे मनमोहक रंग, त्यांचे आकार, त्यांची रचना, त्यांचा डौल खरोखरंच मोहून टाकणारे असतात. म्हणूनच असावं कदाचित, पण आपल्या आयुष्याच्या प्रत्यक क्षणाची साथ फुलं करतात. जन्म झाला म्हणून जशी फुलांची उधळण होते तशीच शेवटच्या प्रवासाला निघतानाही फुलांच्या माळांनी निरोप दिला जातो. प्रेयसीला भेट म्हणून गुलाब देता देताच त्या प्रणयाचं आयुष्याच्या साथीत रुपांतर करतानाही फुलांच्या माळांची देवाणघेवाण करून त्यावर शिक्कामोर्तब करण्यात येतं.हे असे आनंदाचे दिवस वर्षात केव्हाही येऊ शकतात. तरीही प्रत्येक वेळी आपल्याला फुलं मिळत राहतात. म्हणजे ती सदासर्वकाळ फुलतात असं समजायचं का ? तसं नाही. कारण काही फुलं ठराविक हंगामातच मिळतात. काही दिवसाउजेडीच उमलतात तर रातराणीसारखी काही रात्रीच्या वेळीच आपल्या सुगंधाने आसमंत दरवळून टाकतात. ब्रह्मकमळ तर एकदाच आणि तेही मध्यरात्रीच फुलतं. मग हे फुलं नेमकी फुलतात तरी कधी ?हे समजून घ्यायचं असेल तर आधी ती फुलतातच का, हे ध्यानात घ्यायला हवं. ती फुलतात ते आपल्याला आनंद देण्यासाठी नाही, तर वनस्पतींच्या पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेत फुलांचं उमलणं एक कळीची भूमिका बजावत असतं. फुलांमध्ये पुंकेसर आणि स्त्रीकेसर असे परागकण असतात. त्यांच्या मिलनातूनच बी तयार होतं आणि पुढच्या पिढीची नांदी म्हटली जाते. हे मिलन होण्यात कीटक आणि पक्षी मोलाची मदत करतात. त्या मदतगारांना त्यांचं काम करण्यासाठी प्रवृत्त करायचं तर काही आमिष दाखवायला हवं. त्यांना आधी आकर्षित करायला हवं. ते करण्यासाठीच फुलं फुलत असतात. त्यांची ती रंगीबेरंगी छबीही तेच काम करत असते. त्यामुळे ते जेव्हा आकर्षित होतील तेव्हा फुलण्यानेच कार्यभाग साधत असतो.तरीही निरनिराळ्या वनस्पतींची वर्गवारी करणाऱ्या कार्ल लिनैस यानं फुलांचीही त्यांच्या उमलण्यावरून तीन गटात विभागणी केली आहे. काही फुलं हवामानानुसार उमलतात काही कोमेजतात. त्यांना लिनैसनं 'मिटिअाॅरिची' असं म्हटलं आहे. काही दिवसाच्या लांबीनुसार आणि कार्यक्रम आखतात. म्हणजे हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात या वेळा बदलतात. त्यांना त्यानं 'ट्रॉपिची' हे नाव दिले आहे. उरलेली सगळी तिसऱ्या म्हणजेच इक्निनोक्टेल्स या गटात घातलेली आहेत. ती हवामानाची किंवा दिवसरात्रीच्या लांबीची पर्वा न करता दिवसाच्या ठरावीक वेळी फुलतात आणि ठरावीक वेळी कोमेजतात.ज्याँ बातिस्त लमार्क या फ्रेंच वैज्ञानिकाला असं दिसून आलं की फुलण्याच्या वेळी फुलांची उष्णता वाढलेली असते. आपल्या गंधाचा दूरदूरवर फैलाव करण्यासाठी ही वाढीव उष्णता कामी येते, असे त्यानं दाखवलं आहे. काही फुलं तर आसमंताच्या तापमानापेक्षा आपलं तापमान ३५-४० अंशांनीही वाढवू शकतात. तेव्हा फुलांचं तापमान वाढू लागलं की ती फुलतात असंही म्हणता येईल.*बाळ फोंडके यांचा 'केव्हा ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••प्रार्थना करणाऱ्या हातापेक्षा मदत करणारे हात जास्त पवित्र असतात.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) गिनीज बुकात नोंद झालेली जगातील सर्वात वृद्ध हवाईसुंदरी ( एअरहोस्टेज ) कोण ?२) जगातील पहिला मोबाईल कॉल कोणी केला ?३) जपानची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी माजी पंतप्रधान शिंजो आबे यांनी ज्या उपाययोजना केल्या त्यास काय नाव पडले ?४) मुळाक्षरे म्हणजे काय ?५) 'फोर्ट विल्यम' म्हणजेच आजचे कोणते शहर होय ?*उत्तरे :-* १) बेट नॅश ( ८६ वर्षे ) , अमेरिका २) मार्टिन कूपर , ३ एप्रिल १९७३ ३) आबेनॉमिक्स ४) अक्षरांचा समूह जो भाषेत वापरतात त्यांना मुळाक्षरे म्हणतात. ५) कोलकाता *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● दिलीप इंगळे● हरिहर धुतमल● हितेश माधवी● साई गाडगे● प्रवीण दबडे पाटील● शिल्पा जोशी● नागेश पडकूटलावार● अविनाश पांडे● नमन यादव● सुनील देवकरे● अमरजुल हुसैन● दादाराव जाधव● नंदकुमार कौठकर● अभिजित राजपूत● माधव उमरे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••• ●🚩🚩 ‼ *विचार धन*‼ ● 🚩🚩••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *टाळ वाजे....मृदंग वाजे..* *वाजे हरीची वीणा.....!* *माऊली निघाले पंढरपुरा..* *मुखाने विठ्ठल- विठ्ठल म्हणा.!**हा सगळा भक्तीसागर, विठु नामाच्या गजरात तल्लीन होऊन, नाचत-गाजत एकजीव होऊन माऊलीं सोबत दिवसभर पायी चालत संत स्वरूप वारकरी, आपल्या विठुच्या दर्शनाला पंढरीकडे चालत असतात. क्षणभर वाटतं की अथांग सागर संथ झाला. ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष करीत हा आषाढी वारी पालखी सोहळा पुढे सरकत असतो.**या वारीमध्ये असेही काही क्षण असतात जे मनाला सुखद प्रसन्नता देतात. विठ्ठल-विठ्ठल नामाचा अखंड गजर...भागवत धर्माचे प्रतीक असलेली आसमंतात फडकणारी पताका...चहूबाजूंनी उत्साहीत वैष्णवांचा भक्तीसागर... आणि वायुवेगाने धावणारा अश्व...अशा भक्तीमय वातावरणात लक्षावधी भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा एक क्षण म्हणजे...' रिंगण ' सोहळा..!* *दिंड्या गरूड टके पताकांचे भार ।* *होतो जयजयकार.... नामघोष ॥* 🚩 *॥ रामकृष्णहरी ॥*🚩 *विठ्ठल ॥ विठ्ठल ॥ विठ्ठल ॥*🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल-9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबिराचे बोल* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• पाहन पूजै हरि मिलैतो मै पूजूँ पहार ।ताते तो चक्की भलीपीसि खाय संसार ।सारांश : दगड-धोंडे पूजणार्यांचा समाचार घेताना महात्मा कबीर म्हणतात की दगाड-धोंडे पूजल्यामुळे इच्छित साध्य झालं असं होईल, मनोकामना पूर्ण होतील किवा देवाची प्राप्ती होणार असेल तर मी अख्खा पर्वतच पूजायला तयार आहे. त्यापेक्षा दगडापासून बनलेल्या जात्याची काळजी घ्यायला मला आवडेल. कारण हे जातं धान्य भरडण्याच्या कामी येतं. त्यापासून पीठ मिळतं. त्यामुळे जगातील जीवांची भूक तरी भागते. श्रद्धेच्या नावाखाली लोक दगडा-धोंड्याला पूजत राहातात. काही जण रंग फासलेले किंवा हळदी-कुंकू लावलेले दगड दिसताच हात जोडतात. गाडीवरून जाताना मंदिर येताच गाडीचा भोंगा वाजवतात. जसा काही मंदिरातला देव झोपलाय अन आवाज देवून हे त्याला जागं करित आहेत. पहावं ते नवलंच ! एकाचं बघून दुसरा करणार अन ती प्रथाच होणार. आज संगणक युगात वावरताना आंतरजालात दडलेलं जगाचं ज्ञान संगणकावर एका क्लिक मध्ये आपल्यासमोर येतं. संगणक माहिती आदान प्रदानाचं यंत्र आहे. .हे माहित असून सुद्धा त्याला चालू करण्यापूर्वी त्याची पूजा अर्चा करणारे . त्यावर धर्माचे सांकेतिक ठसे उमटवणारे, अज्ञानाचं जोखड वाहणारे ढोंगी बुवा, मौलवी यांचं विज्ञानानंच बणवलेल्या माईकवरून 'ये विज्ञान फिज्ञान सब झुट है । म्हणनं अन विज्ञान शिकलेल्या श्रोतृ समुदायाकडून माना हलवून प्रतिसाद देणं किती ढोंगी व भंकस पणाचा कळस आहे बरं हा ! अशी मानसिकता पाहिली की दया यायला लागते. कोणता संस्कार व शिकवण देत आहेत बरं आपल्या वर्तन अन करणीतून भावी पिढ्यांसाठी ! खरंच का जगू शकत नाही माणूस ढोंगाशिवाय ! का झिडकारत नाही अज्ञानाची काजळी ? विज्ञान आणि मानवतावादाचा मेळ घालत विचारचनं विवेकाचे दीप प्रज्वलित करता आले तर जीवनात दररोजच दिवाळी साजरी होईल. एकनाथ डुमणे, मुखेड📱 9096714317•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण आपले सुखी जीवन जगण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतो आणि सुखी जीवन जगण्यासाठी पैसा कमवतो.तो पैसा एवढा कमवतो की,त्या पैशापायी आपण काय करत आहोत हा समजायला मार्ग सापडत नाही.ज्या गोष्टींसाठी आपण पैसा मिळवला आहे त्यासाठी तर जरुर वापरायला पाहिजे.आपल्या सुखासाठी तर आपण कमवतोच पण आपल्यासारखे सुख इतरांनाही मिळावे असे वाटत असेल तर आपल्या कर्तृत्वाचे हात अशांसाठी पुढे करा की, त्यातून तुमम्हालाही समाधान वाटले पाहिजे.जे अनाथ,अपंग,अंध,निराधार,वृध्द आहेत त्यांना तुमच्याकडून कशाची तरी अपेक्षा आहे अशांना आपण आपल्या केलेल्या कमाईतून काहीतरी मदत करुन जीवनाचे सार्थक करावे.याही व्यतिरिक्त समाजकार्य, देशकार्यासाठीही जे शक्य आहे ते आपल्या परीने करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या आपण कमवलेल्या कमाईचे सार्थक होईल.केवळ आपण आपलाच स्वार्थ साधण्यासाठी पैसा कमावला तर त्यात आत्मिक समाधान लाभणार नाही.वेळ निघून गेल्यावर असे होऊ नये की,आपण एवढे कमावले आहे त्यातून आपण आपल्या स्वार्थासाठीच केले आहे पण इतरांसाठी काहीच केले नाही.अशा पश्चातापात पडण्यापेक्षा आपला हात अशांसाठी साठी पुढे करा की,खरी गरज त्यांना आहे.एक आपला हात पुढे केला तर अनेक तीर्थयात्रा करुनही पुण्य मिळणार नाही तेवढे पुण्य आणि समाधान मिळेल.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🌹🌱🌹🌱🌹🌱🌹🌱 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हेतल चा अनुभव*हेतल दुपारी शाळेतून घरी आली. घराला कुलूप होते. कारण तिचे आई बाबा लग्नाला गेले होते. तिने कुलूप उघडले व घरात आली. खिडक्या उघडल्या. गणवेश बदलला. ती हात पाय धुऊन खाऊ शोधु लागली. अचानक जोरदार पाऊस पडू लागला. तिने पटापट दारे खिडक्या बंद केल्या. तिचे लक्ष घड्याळ कडे गेले. बराच उशीर झाला आहे, असे म्हणून ती जवळच्या खुर्चीत बसली. तिला हळूहळू पावसाचे गाणे आठवू लागले. ती हळूहळू गुणगुणू लागली. आता पावसाचा आवाज कमी झाला व तिने खिडक्या उघडल्या. तरीपण रिमझिम रिमझिम पाऊस पडत होता. हळूहळू पाऊस थांबला. पानाआड लपलेले पक्षी बाहेर आले व त्यांनी आपल्या पंखाना झटकले. बाहेर लख्ख ऊन पडले. बाहेर कसं स्वच्छ सुंदर वाटत होते. आता संध्याकाळ झाली. दारावरची बेल वाजली +डिंग डाँग) आई आली असे म्हणतात हेतल पळत दाराकडे गेली. तिने दार उघडले. आणि आईबाबा तिचा समोर उभे होते. इतक्यावेळ कंटाळलेली हेतल आईला जाऊन बिलगली. हाच होता तिचा अनुभव.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23/01/2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जागतिक हस्ताक्षर दिवस*💥 ठळक घडामोडी :- १९९६ - संगणक भाषा जावाचे सर्वप्रथम प्रकाशन.💥 जन्म :-१८९७ - भारतीय क्रांतिकारक, नेताजी सुभाषचंद्र बोस१९२६ - मराठी राजकारणी, शिवसेना पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे💥 मृत्यू :- ११९९ - याकुब, खलिफा.१५६७ - ज्याजिंग, चिनी सम्राट.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *जुन्या पेन्शनविषयी राज्य सरकार सकारात्मक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचं आज होणार अनावरण, राज्य सरकारकडून ठाकरे कुटुंबाला निमंत्रण, सोहळा राजकीय असल्याची संजय राऊतांची टीका, तर उद्धव ठाकरे उद्या शिवसैनिकांना संबोधित करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुण्यात सकल हिंदू समाजाचा मोर्चा, लव्ह जिहाद, धर्मांतरविरोधी कायदा लागू करण्याची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नांदेडमधील शेतकऱ्याची लेक रेवा दिलीप जोगदंड हिची उत्तुंग भरारी! अमेरिकेच्या 'कमांडर ऑफ नेवल एअरफोर्स अकॅडमी'साठी निवड, अमेरिकन सरकारकडून मिळाली शिष्यवृत्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना 100 पाऊंडचा दंड, चालत्या कारमध्ये सीटबेल्ट न लावल्यानं स्थानिक पोलिसांनी दंड ठोठावला*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नाशिक शहरात 190 किलोमीटरचे इनर रिंगरोड, दहा हजार वृक्षांवर कुऱ्हाड*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *Hockey World Cup 2023: भारत विश्वचषकातून बाहेर, न्यूझीलंडने पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रॉसओव्हर सामना जिंकला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/ORst3MlDaR8~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागतिक हस्ताक्षर दिवस त्यानिमित्ताने प्रासंगिक लेख *सुंदर हस्ताक्षर : एक दागिना?*वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.https://m.facebook.com/story.php?story_fbid=1404197203040383&id=100003503492582&mibextid=Nif5ozलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *नेताजी सुभाषचंद्र बोस*सुभाषचंद्र बोस (जानेवारी २३, इ.स. १८९७ - ऑगस्ट १८, इ.स. १९४५ ) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते होते. हे नेताजी या नावाने ओळखले जातात. दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली होती. त्यांनी दिलेला जय हिन्द चा नारा हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे. १९४४ मध्ये अमेरिकन पत्रकार लुई फिशर ह्यांच्याशी चर्चा करताना महात्मा गांधींनी नेताजींचा देशभक्तांचा देशभक्त असा उल्लेख केला होता.सुभाषचंद्र बोस यांचा जन्म जानेवारी २३, १८९७रोजी ओडिशा मधील कटक शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ आणि आईचे नाव प्रभावती होते. जानकीनाथ बोस हे कटक शहरातील नामवंत वकील होते. आधी ते सरकारी वकील म्हणून काम करत होते पण नंतर त्यांनी आपली स्वतः ची वकिली सुरू केली होती. कटक महापालिकेत ते काही काळ काम करत होते तसेच बंगालचे विधानसभेचे सदस्य ही होते. इंग्रज सरकार ने त्यांना रायबहाद्दर हा किताब दिला होता.संकलन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा जास्त महत्वाची आहे.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतातील पहिला संविधान साक्षर जिल्हा कोणता ठरला आहे ?२) एकदिवसीय क्रिकेटमध्ये झालेल्या १० द्विशतकापैकी भारताकडून किती द्विशतके झाली आहेत ?३) संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने ( UNSC ) कोणाला जागतिक दहशतवादी घोषित केले आहे ?४) कर्नाटक राज्यातील सर्वात उंच शिखर कोणते ?५) पहिल्या भारतीय - अमेरिकन लेफ्टनंट गव्हर्नर कोण बनल्या आहेत ?*उत्तरे :-* १) कोल्लम, केरळ २) सात ३) अब्दुल रहमान मक्की ४) मुल्यणगिरी ५) अरुणा मिलर*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संतोष बोधनकर, नांदेड👤 भालचंद्र गावडे, सोलापूर👤 दिनेश चिंतावाड, नांदेड👤 नम्रता उभाळे👤 यदुराज ढगे, चिरली👤 शंकर नरवाडे👤 श्याम खंडेलोटे👤 सुनील बंडेवार, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना सर्वथा सत्य सांडूं नको रे। मना सर्वथा मिथ्य मांडूं नको रे॥ मना सत्य ते सत्य वाचे वदावे। मना मिथ्य तें मिथ्य सोडूनि द्यावें॥१९॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आपली सर्व धडपड कशासाठी असते ? प्रत्येकजण सुखासाठी खटपट करीत असतो. प्रपंचात सुख मिळावे असे सर्वांना वाटत असते, आणि त्यासाठी जो तो प्रयत्न करीत असतो. परंतु आजपर्यंत प्रपंचात कुणाला सुख मिळाले आहे का ? कुणी म्हणतो, मजजवळ संपत्ती आहे, पण संतान नाही, कुणी दारिद्र्य आहे म्हणून रडतो, कुणी काही, कुणी काही, सांगतच असतो, आपली हाव कधीच तृप्त होणे शक्य नाही. मृगजळ पिऊन कुणी कधी तृप्त झाला आहे का ?**प्रपंचच जिथे खोटा तिथे सुख कसले मागता ? याचा अर्थ असा नाही की प्रपंच सोडावा, पण तो सुखाचा कसा होईल हे पाहावे. तुम्हांला खात्रीने सांगतो की, प्रपंच जर सुखाचा करायचा असेल तर त्याला एकच उपाय आहे. तो अगदी सोपा आहे, पण आचरणात आणायला अत्यंत कठीण आहे. परमात्म्याची अगदी मनापासून प्रार्थना करावी. मग तो ठेवील त्या परिस्थितीमध्ये आपण अगदी आनंदात व सुखात राहू शकतो.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुमचे जीवन योग्य दिशेने जाण्यासाठी एका विशिष्ट ध्येयाची किंवा योग्य दिशेची निवड करा आणि त्यानुसार मार्गक्रमण करा.म्हणजे तुमचे जीवन सुखी, समृद्ध आणि संपन्न होईल.याचा आनंद तुम्हालाही मिळेल आणि इतरांनाही मिळेल.त्यातून चांगले जीवन जगण्यासाठी प्रेरणाही मिळेल.नाही तर सागरातल्या भरकटलेल्या जहाजासारखे होईल.जर एखाद्यावेळी जहाजामध्ये दिशादर्शक होकायंत्र अचानक बंद पडले तर त्या जहाज चालविणा-या माणसाला आपले जहाज कुठे चालले आहे याचा अंदाजच लागत नाही.अर्थात भरकटलेल्या जहाजासारखीच आपल्याही जीवनाची दिशाहीन आणि ध्येयहीन वाटचाल होईल. यासाठी आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित करा आणि त्यानुसार मार्गक्रमण करा मग तुमच्या जीवनात कधीच अडथळे येणार नाहीत आणि जर का आलेच तर योग्य प्रकारे हाताळण्यात यश मिळेल.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चल रे भोपळया टुणुक टुणुक*एक होती म्हातारी. एकदा ती आपल्या लेकीकडे जायला निघाली. लेक रहायची दुसर्या गावाला.रस्त्यांत होते मोठे जंगल. म्हातारी काठी टेकत, टेकत रस्त्याने निघाली. वाटेत तिला भेटला कोल्हा. तो म्हणाला 'म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो'. पण म्हातारी होती हुषार. ती म्हणाली 'मला खाऊन तुझे पोट भरणार नाही. त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते , तूपरोटी खाते, लठ्ठ मुठ्ठ होते, मग मला खा.' कोल्ह्याला म्हातारीचे म्हणणे पटले.म्हातारी पुढे निघाली. तिला भेटला वाघ. तो म्हणाला 'म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो'. त्याने डरकाळी फोडली. म्हातारी त्याला म्हणाली 'मला खाऊन तुझे पोट भरणार नाही.त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते , तूपरोटी खाते, लठ्ठमुठ्ठ होते, मग मला खा. ' वाघाची अशी समजूत काढून म्हातारी पुढे निघाली.लेकीकडे ती खूप दिवस मजेत राहिली. खाऊन पिऊन लठ्ठमुठ्ठ झाली. आपल्या घरी परत येताना तिने एक मोठा लाल भोपळा घेतला. त्यात बसून ती भोपळयाला म्हणाली ' चल रे भोपळया टुणुक टुणुक'. भोपळा रस्त्याने निघाला. वाटेत वाघाने भोपळा पाहिला. तो म्हणाला 'म्हातारे, म्हातारे थांब!' आतून म्हातारी म्हणाली 'कशाची म्हातारी आणि कशाची कोतारी. चल रे भोपळया टुणुक टुणुक'. त्याबरोबर भोपळा जोरात पळू लागला. पुढे गेल्या भेटला कोल्हा. कोल्ह्यानेही भोपळयाला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण म्हातारी आतून म्हणाली 'चल रे भोपळया टुणुक टुणुक!'. पुन्हा भोपळा जोरात पळू लागला.अशी होती म्हातारी हुषार. कोल्हा आणि वाघाच्या तावडीत ती काही सापडली नाही. भोपळयात बसून ती सुखरूप आपल्या घरी पोचली.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 17/02/2023💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :- १९९६ - महासंगणक डीप ब्ल्यू बुद्धिबळात गॅरी कास्पारोव्हकडून पराभूत.१९२७ : ’रणदुंदुभि’ नाटकाचा पहिला प्रयोग झाला.💥 जन्म :-१८१७ - विल्यम तिसरा, नेदरलँड्सचा राजा.१८९९ - बंगालचे प्रसिद्ध कवी जीवनानंद दास१९५४: तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चन्द्रशेखर राव 💥 मृत्यू :- १८८१: लहुजी राघोजी साळवे ऊर्फ ’लहुजी वस्ताद’ – क्रांतीवीर, समाजसेवक१८८३ - क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके१९६८: मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कैलाश नाथ काटजू १९७८: पुरुषोत्तम शिवराम रेगे – कादंबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक१९८६ - जे. कृष्णमूर्ती, भारतीय तत्त्वज्ञ *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिक्षक अधिवेशनात घोषणा; जुन्या पेन्शन योजनेवरही शिक्षण विभाग काम करत असल्याची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *विद्यापीठातील महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा एकदिवसीय लाक्षणिक संप, मागण्या पूर्ण न झाल्यास बेमुदत संपाचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *बंगळुरु जगातील दुसरं सर्वाधिक वाहतूक कोंडीचं शहर, तर पुणे सहाव्या क्रमांकावर; टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सची यादी जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *उस्मानाबादचं नामांतर 'धाराशिव' करण्यास हरकत नाही, मात्र औरंगाबादचा विचार सुरु; केंद्र सरकारची न्यायालयात माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *एसटी कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगार 24 तासात होण्याची शक्यता, एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी सरकारकडून 223 कोटी रुपये*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला, पुढील तारीख मात्र अद्याप निश्चित नाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मध्ये आजपासून भारत वि. ऑस्ट्रेलिया मध्ये दिल्लीत दुसरा कसोटी सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हर हर महादेव ! भारतातील 12 ज्योर्तिलिंगाचं घरबसल्या दर्शन.. खालील लिंकवरhttps://marathi.abplive.com/photo-gallery/news/india-mahashivratri-2023-12-jyotirlingas-in-india-twelve-jyotirlinga-images-with-name-and-place-1152141शनिवार, 18 फेब्रुवारी 2023 रोजी महाशिवरात्रीचा उत्सव संपूर्ण भारतात साजरा केला जाणार आहे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *आपले नशीब आपल्या हाती*वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/12.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/BgjVNBSFkuE~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जेंव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची..! *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतातील पहिला माळढोक पक्ष्यासाठी प्रजनन केंद्र कोठे सुरू करण्यात येणार आहे ?२) खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेचे थीम काय आहे ?३) ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आदर्श गावाचे नाव काय आहे ?४) शालेय पोषण आहार योजना केव्हा सुरू झाली ?५) भारतात प्रथमच कोणत्या ठिकाणी लिथियमचा साठा सापडलेला आहे ?*उत्तरे :-* १) जैसलमेर, राजस्थान २) हिंदुस्थान का दिल धडका दो ३) राळेगण सिद्धी ४) २२ नोव्हेंबर १९९५ ५) रियासी जिल्हा, जम्मू काश्मीर*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुनील सामंत, ई साहित्य प्रकाशन, पुणे👤 साईनाथ अवधूतवार, धर्माबाद👤 रविकिरण एडके👤 विकास गायकवाड👤 लक्ष्मण गंगाराम होरके*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना प्रार्थना तूजला एक आहे। रघूराज थक्कीत होऊनि पाहे॥ अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे। मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥३८॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*प्रत्येकालाच वाटतं की, माझ्यावर कुणीतरी प्रेम करावं, आपल्याशी चांगले संबंध ठेवावेत ; परंतु आपल्यावर प्रेम करणारं कुणीच नाही असं जेव्हा आपल्याला कळायला लागतं तेव्हा थोडा तुम्ही तुमच्याच मनाला एकांतात प्रश्न विचारा की, असं काय झालं की, मला आपुलकीनं विचारणारी, माझ्यावर प्रेम करणारी माणसं मला का भेटत नाहीत ? याचं उत्तर तुम्हाला तुमचं मनच देऊ शकेल. मग मनच सांगायला लागेल की, तू तुझ्या आतल्या अंतःकरणात डोकावून पहा.**आपण जर थोडा स्वार्थ सोडला आणि इतरांना आपलसं केलं, त्यांच्याशी आपुलकीचं नातं जोडलं, त्यांच्याशी प्रेमानं नातं जोडून त्यांच्या सुखदुःखाशी जवळीकता साधली आणि निस्वार्थपणे त्यांच्याशी प्रामाणिकपणे व्यवहार केला तर सारेच आपल्यावर प्रेम करायला लागतील. हे जेव्हा तुमच्या मनाला पटेल तेव्हा सारेच लोक तुमच्यावरही प्रेम करायला लागतील. तुमचा तो एकाकीपणाही दूर होईल, संबंधही दृढ होतील आणि नातेही अगदी घट्ट व्हायला लागतील यात शंका येण्याचे कारणही राहणार नाही.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••इतरांना त्रास देऊन जर आपण आपले जीवन चांगल्याप्रकारे जगू म्हटले तर ते अयोग्यच आहे.कारण त्यांनी परिश्रमातून जे काही मिळवलेले असते ते गुण्यागोविंदाने जगण्याचे स्वप्न साकारत असतात.हे त्यांचे बघवत नाही आणि आपल्याने होत नाही म्हणून इतरांना त्रास देऊन त्यांचे सुख हिरावून घेणे हे वामवृत्तीचे लक्षणच म्हणावे.त्यामध्ये आपण सुखी होऊ शकतो का ? आपल्या बाबतीत इतरांनी असे केले तर आपणास कसे वाटेल ? ते आपल्या मनाला समाधान देते का ? ह्या सा-या गोष्टीचा आपण विचार केला तर नक्कीच त्याचे उत्तर सापडेल आणि पुन्हा आपण ती चूक करणार नाही याची नक्कीच जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.इतरांच्याही सुखस्वप्नात आपणही सहभागी व्हावे हाच आपला माणुसकीचा खरा धर्म आहे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*इमानदारीचं फळ*सकाळची वेळ.शिल्पाने भाजीबाजाराच्या कडेला गाडी लावायला ड्रायव्हरला सागितलं आणि गाडीतून उतरुन ती एका भाजीच्या गाडीकडे निघाली.तिला असं सकाळी भाजी घ्यायला फार आवडायचं. कलेक्टर झाल्यापासून तिला वेळ फार कमी मिळायचा पण जमेल तेव्हा ती भाजी आणायला निघायची.भाजीच्या गाडीवर एक नऊ-दहा वर्षाची गोड चेहऱ्याची मुलगी बसली होती.भाजी घेऊन शिल्पाने तिला पर्समधून पैसे दिले.तेवढ्यात फोन वाजला तशी मोबाईलवर बोलता बोलता ती आपल्या गाडीकडे आली.बोलणं संपल्यावर ती गाडीत बसणार तेवढ्यात तिला मागून कोणीतरी स्पर्श केल्यासारखं जाणवलं.चमकून तिने मागे वळून पाहीलं तर भाजीवाली मुलगी उभी होती."काय झालं?पैसे तर दिलेना मी तुला?"त्यामुलीने काही न बोलता पर्स पुढे केली."तुमची पर्स.गाडीवर राहीली होती."शिल्पाने ती पर्स हातात घेऊन पाहीली.पैसे,क्रेडिट कार्ड्स, बँकेचे कार्ड्स जागच्या जागी होती.तिला त्या मुलीच्या इमानदारीचं कौतुक वाटलं."थँक्स बेटा.काय नाव तुझं?""सोनाली"तेवढ्यात फोन वाजला आणि शिल्पा बोलता बोलता गाडीत बसली.त्या मुलीने दुर जाणाऱ्या गाडीकडे क्षणभर बघितलं आणि मग ती आपल्या भाजीच्या गाडीकडे निघाली.संध्याकाळी आँफिसमधून परत आल्यावर चहाचे घोट घेता घेता शिल्पाला त्या भाजीवाल्या मुलीची आठवण झाली आणि दुसऱ्या क्षणाला तिला तिचा भुतकाळ आठवला.होय असंच तर घडलं होतं तिच्याबाबतीत! आणि तिच्या इमानदारीचं जे बक्षीस मिळालं होतं त्यामुळेच तर ती इथपर्यंत पोहोचली होती.सगळा जीवनपट शिल्पाच्या डोळ्यासमोरुन सरकू लागला. अठरा वर्षांपुर्वीची ती गोष्ट.शिल्पा तेव्हा पाचवीत होती.दुपारची वेळ.शाळा आटोपून शिल्पा आपल्या घराकडे चालली होती.चालता चालता अचानक तिला आपल्या पायाने काहीतरी उडाल्याचं जाणवलं.पुढे जाऊन पहाते तर एक पाकिट पडलेलं दिसलं.उत्सुकतेने तिने ते उचललं आणि उघडून पाहीलं.नोटांनी गच्च भरलेलं होतं ते पाकिट.तिचं ह्रदय धडधडू लागलं.आजच शाळेत बाई सांगत होत्या.ईमानदारीचं फळ गोड असतं म्हणून!ते पाकिट तिथंच टाकून द्यावं असं तिला वाटू लागलं.काय करावं काय नाही या संभ्रमात तिनं आजुबाजुला पाहीलं.एक माणूस आपल्या आलिशान कारला टेकून फोनवर बोलत होता.नक्कीच!नक्की त्याचंच असावं हे पाकिट.शिल्पा विचारातच त्याच्याजवळ पोहोचली.त्याच्या हाताला स्पर्श करुन तिने त्याचं लक्ष वेधून घेतलं."काय आहे?" बोलण्यात व्यत्यय आल्यामुळे त्याने थोडं चिडूनच विचारलं."हे पाकिट तुमचं आहे?"शिल्पाने पाकिट पुढे करत विचारलं.पाकिट पाहून तो चमकला.झटकन त्याचा हात पँटच्या मागच्या खिशाकडे गेला."हो माझंच आहे ते.कुठं सापडलं?""त्या तिथे पडलं होतं" शिल्पा पाकिट सापडलेल्या जागेकडे बोट दाखवत म्हणाली.त्याने पाकिट उघडून पाहीलं.सगळं जागच्या जागी असलेलं पाहून एक दिर्घ निश्वास सोडला.तेवढ्यात मागून दुसऱ्या गाडीचा हाँर्न वाजला.त्या माणसाने पटकन पाकिट खिशात कोंबलं आणि गाडीत बसून गाडी पुढे नेली.शिल्पाही आपल्या रस्त्याने पुढे निघाली.घरी पोहोचतांना शिल्पा खुप आनंदात होतीआपल्या इमानदारीचा तिला अभिमान वाटत होता.घरी जाऊन कधी एकदा आईला ही घटना सांगते असं तिला झालं होतं.ती घरी आली तेव्हा आई चुलीवर पोळ्या करत होती.तिचं ते झोपडीवजा घर धुराने भरलं होतं.शिल्पाने दप्तर एका बाजुला टाकून आईला मोठ्या अभिमानाने झालेली घटना सांगितली.तिला वाटलं आई तिला शाबासकी देईल.पण पोळ्या करणं सोडून आई उठली.शिल्पाला धरुन हातातल्या लाटण्यानेच तिला मारु लागली."कारटे.इथे खायला काही नाहीये आणि तू हातातली लक्ष्मी फेकून दिली.काय गरज होती तुला ते पाकीट परत करायची.टाकून द्यायचं होतं दप्तरात! तुझ्यावर कोणाला संशय आला असता?" बोलता बोलता आई शिल्पाला मारत होती.शिल्पा जोरजोरात रडत होती,आईला 'नको ना मारु आई'अशी विनवण्या करत होती.आईच्या हातातल्या बांगड्या फुटल्या तेव्हाच शिल्पाची सुटका झाली.संध्याकाळी तिचा बाप दारु पिऊन आला.शिल्पाचा रडवेला चेहरा पाहून त्याने काय झालं विचारलं.शिल्पा काही बोलायच्या आतच तिच्या आईने सगळी कहाणी त्याला सांगितली.शिल्पाला वाटलं बाप तरी तिला सहानभुती दाखवेल.पण त्याने तिच्याच दप्तरातील पट्टी काढून तिला मारायला सुरुवात केली.सोबतीला शिव्या होत्याच.शिल्पाला मारणं चालू असतांना तिचा लहान भाऊ एका कोपऱ्यात थरथर कापत रडत होता.इमानदारी दाखवली की काय होतं याची जणू शिकवणच त्याचे आईबाप त्याला देत होते.शिल्पाला मारुन थकल्यावर तिचा बाप दारुच्या नशेत बडबडत बसला.मार खाऊन थकलेली शिल्पा न जेवताच झोपून गेली.दुसऱ्या दिवशी झालेली घटना शिल्पाने शाळेतल्या मैत्रिणींना सागितली.तिच्यासारख्याच झोपडपट्टीत रहाणाऱ्या त्या मुली.त्यांनी शिल्पालाच दोषी ठरवलं. दोन दिवसांनी संध्याकाळी शिल्पा आपल्या झोपडीत ग्रुहपाठ करत असतांना तिला बाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला.पाठोपाठ दारावर टकटक ऐकू आली.तिची आई दार उघडून बाहेर गेली."शिल्पा बाहेर ये.हे कोण आलेत बघ"धडधडत्या छातीने शिल्पा बाहेर आली.समोर एका आलिशान कारजवळ एक माणूस उभा होता.होय.तोच तो माणूस ज्याला तिने पाकिट उचलून दिलं होतं.तिला पाहून तो हसला."हीच ती मुलगी."तो शिल्पाच्या आईला म्हणाला." बेटा त्या दिवशी तुला थँक्यू म्हणायचं आणि तुला बक्षीस द्यायचंही राहून गेलं.बोल काय पाहीजे तुला?"शिल्पा भांबावली.काय बक्षीस मागावं ते तिला कळेना." आईस्क्रीम चालेल?""हो आईस्क्रीम. मला आईस्क्रीम पाहीजे" शिल्पाच्या आधी तिचा बाहेर आलेला भाऊच आनंदाने ओरडला.शिल्पानेही मान डोलावली."चला तर मग.बसा गाडीत"त्या आलिशान गाडीत बसायच्या कल्पनेनेच दोघं हुरळून गेले आणि पटकन गाडीत जाऊन बसले.शिल्पाच्या आईने नाराजीनेच त्यांच्याकडे पाहीलं.या आईस्क्रीम ऐवजी या शेठजीने पाचशे हजार बक्षीस म्हणून दिले असते तर साचलेली उधारी कमी तरी करता आली असती असं तिला वाटून गेलंं.शेठजीने त्या दोघांना अगोदर भेळ,पाणीपुरी खाऊ घातली.मग नंतर पोट भरुन आईस्क्रीम.ते घरी परत आले तेव्हा शिल्पाचा बाप घरात बसला होता.एका मोडक्या खुर्चीवर शेठजी बसले." तुमची मुलगी खुप इमानदार आणि हुशारही आहे.आता गाडीत बसल्या बसल्या मी तिला बरेच प्रश्न विचारले.खुप छान उत्तरं दिलीत तिने.मला वाटतं तुम्ही तिला एखाद्या चांगल्या शाळेत टाकावं"" शेठजी आम्ही बांधकामावर मजुरी करणारी माणसं.आम्हाला ते कसं परवडणार?"शिल्पाचा बाप हात जोडत म्हणाला." तुम्ही काही काळजी करु नका.ते काम माझ्याकडे लागलं.तिच्या सर्व शिक्षणाचा खर्च मी करेन.मात्र एक गोष्ट. तिला या वस्तीवर ठेवता येणार नाही.आपण तिला होस्टेलवर ठेवू.त्याचाही खर्च मीच करेन."शिल्पाच्या बापाला हायसं वाटलं.खाणारं एक तोंड कमी होणार होतं.तो म्हणाला."मग तर आम्हाला काहीच अडचण नाही.पोरीचं भलं होतंय त्यातच आमचं सुख!" शेठजींनी चक्र फिरवली.नगरपालिकेच्या शाळेतून शिल्पा उच्चभ्रूंच्या शाळेत गेली.फाटके कपडे आणि तुटक्या चपलांच्या जागी कोराकरीत युनिफॉर्म आणि चकचकीत बुट आले.नवीकोरी पुस्तकं, आधुनिक स्कुलबँग आली.त्या इंग्लिश बोलणाऱ्या मुलांमध्ये गरीब शिल्पा अवघडून,बावचळून गेली.ती झोपडपट्टीतली आहे हे कळल्यावर बाकीची मुलंमुली तिला टोमणे मारायचे,टिंगलटवाळी करायचे.शिल्पा कोपऱ्यात जाऊन रडत बसायची.हे प्रकार तेव्हाच थांबले जेव्हा वार्षिक परीक्षेत शिल्पा वर्गातून पहीली आली . त्यानंतर शिल्पाने मागे वळून पाहीलं नाही.सातवीत स्काँलरशिप मिळवून तिने शेठजींवरचा आपला भार थोडा हलका केला.दहावीच्या परीक्षेत ती जिल्ह्यात पहीली आली तेव्हा तिच्या आईवडिलांसोबत शेठजींनाही खुप आनंद झाला.एका नामांकित काँलेजमध्ये त्यांनी तिचा प्रवेश करुन दिला.बारावीत तर शिल्पाने कमालच केली.राज्यात ती पहीली आली.ते कळताच शेठजींनी तिला मेडिकल काँलेजमध्ये प्रवेश घेण्याविषयी सुचवलं.पण तिला आय.ए.एस.करायचं होतं.तिचा निर्णय ऐकून शेठजींनी तिला विरोध केला नाही.पदवी मिळवल्यावर शिल्पाने युपीएससीचा अभ्यास सुरु केला.कोणतेही कोचिंग क्लासेस न लावता ती पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाली.एक झोपडपट्टीतील मुलगी कलेक्टर झाली. निकाल कळाल्यावर शेठजी तिला सन्मानाने आपल्या घरी घेऊन गेले.त्यांचा आलिशान बंगला पाहून तिचे डोळे दिपून गेले.बंगल्यापेक्षाही विशाल असलेल्या त्यांच्या मनाने शिल्पा भारावून गेली.शेठजींनी तिची सगळ्या परिवाराशी ओळख करुन दिली.' शिल्पा माझी मुलगीच आहे' असे ते सारखे म्हणत असतांना शिल्पाला अश्रु अनावर होत होते.तिच्या इमानदारीचं केवढं मोठं बक्षीस शेठजींनी तिला दिलं होतं.तिच्या कलेक्टर बनण्याच्या आनंदाप्रित्यर्थ शेठजींनी अख्ख्या झोपडपट्टीला जेवण दिलं.शिल्पाच्या आईवडिलांच्या तर आनंदाला पारावर उरला नव्हता. एक मुलगी शिकली की घरादाराचा स्वर्ग बनवते हे शिल्पाने सिध्द केलं.नोकरीला रुजू झाल्यानंतर एका वर्षातच तिने आईवडिल आणि भावाला झोपडपट्टीतून बाहेर काढून एका चांगल्या घरात हलवलं.भावाला चांगल्या काँलेजमध्ये घातलं.वयस्कर वडिलांना मजूरी सोडायला लावून दुकान उघडून दिलं. सकाळी शिल्पा परत बाहेर निघालेली पाहून तिच्या पोलिस अधिक्षक असलेल्या नवऱ्याला आश्चर्य वाटलं."आज परत सकाळी कुठे ?"त्याने विचारलं."काल माझी पर्स इमानदारीने परत करणाऱ्या त्या मुलीला आयुष्यभराचं बक्षीस द्यायला निघालेय" हे सांगतांना शिल्पाच्या चेहऱ्यावर आनंदासोबतच एक ठाम निश्चय दिसत होता.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 24 एप्रिल 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/GWa1vbjp8h2WrxSP/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक जलसंपत्ती दिन'_* *_भारतीय पंचायत राज दिवस_*•••••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील ११५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९३:७३ वी घटना दुरुस्ती महिलांना ३३% आरक्षण* *१९९३:इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाईट ४२७ या दिल्लीहून श्रीनगरला जाणार्या विमानाचे ३ अतिरेक्यांनी अपहरण केले. ब्लॅक कॅट कमांडोजनी केलेल्या कारवाईत तिन्ही अतिरेकी ठार झाले व सर्व १४१ प्रवाशांची सुखरुप मुक्तता झाली**१९९०:डिस्कव्हरी या अंतराळयानातुन हबल ही दुर्बिण सोडण्यात आली.**१९७०:गाम्बिया प्रजासत्ताक बनले.**१९६८:मॉरिशस संयुक्त राष्ट्रांचा (United Nations) सदस्य बनला.**१९६७:वेळेवर पॅराशूट न उघडल्यामुळे व्लादिमिर कोमारोव्ह हा मरण पावणारा पहिला अंतराळवीर ठरला.**१९२९:इंग्लंड आणि भारत दरम्यान पहिले विमान उड्डाण* *१९२०:पोलंच्या सैनिकांचे युक्रेनवर आक्रमण**१८००:अमेरिकेतील महाप्रचंड अशा लायब्ररी ऑफ काँग्रेसची (Library of Congress) स्थापना झाली. हे जगातील सर्वोत्तम ग्रंथालय आहे.**१७१७:[वैशाख व. ९, शके १६३९] खंडेराव दाभाडे यांनी अहमदनगर येथे मोगलांचा पराभव केला**१६७४:भोर-वाई प्रांतातील केंजळगड शिवाजी महाराजांनी स्वारी करुन जिंकला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१:मेघना सुधीर एरंडे-- भारतीय अभिनेत्री* *१९७८:प्रसाद रामचंद्र नामजोशी -- लेखक, दिग्दर्शक**१९७३:सचिन तेंडुलकर – महान क्रिकेटपटू, भारतरत्न**१९७०:डॅमियन फ्लेमिंग – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू**१९६३:डॉ.सुरुची सुधीर डबीर -- लेखिका* *१९४७:अरुण काकतकर-- दूरदर्शनचे प्रयोगशील निर्माते व लेखक* *१९५५:दिलीप मुरलीधर देशपांडे-- लेखक, ज्येष्ठ पत्रकार(विविध वृत्तपत्रामधून विविध विषयावर सातत्याने लेखन)**१९४३:पंडित श्रीराम शहापूरकर-- प्रसिद्ध हार्मोनियम वादक(मृत्यू:८ ऑक्टोबर २०१४)**१९४२:बार्बारा स्ट्रायसँड – अमेरिकन अभिनेत्री,गायिका,चित्रपट निर्माती व दिग्दर्शिका**१९३९:मीरा कोसंबी-- प्रख्यात भारतीय समाजशास्त्रज्ञ(मृत्यू:२६ फेब्रुवारी २०१५)* *१९३८:मॅक मोहन -- हिंदी चित्रपटांमधील अभिनेता(मृत्यू:१० मे २०१०)**१९३६:पद्माकर गोवईकर-- मराठी नाटककार व कादंबरीकार(मृत्यू:२२ जुलै २००१)**१९३५:डॉ.बिंदुमाधव दत्तात्रय पुजारी-- व्यवसायाने डॉक्टर असलेले लेखक**१९३०:बाळ ठाकूर (भालचंद्र श्रीराम ठाकूर)--महाराष्ट्रातील प्रख्यात मुखपृष्ठ चित्रकार (मृत्यू:८ जानेवारी २०२२)* *१९२९:राजकुमार – कन्नड चित्रपट अभिनेता व गायक (मृत्यू:१२ एप्रिल २००६)**१९२४:प्रल्हाद नरहर जोशी--- संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक,कादंबरीकार(मृत्यू:५ जून २००४)**१९१०:राजा परांजपे –चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते (मृत्यू:९ फेब्रुवारी १९७९)**१९०४:केशव नारायण काळे-- मराठीतील कवी,नाटककार,समीक्षक,चित्रपट निर्माते आणि नियतकालिकांचे संपादक(मृत्यू:२० फेब्रुवारी १९७४)**१८८९:सर स्टॅफोर्ड क्रिप्स – इंग्लिश राजकारणी (मृत्यू:२१ एप्रिल १९५२)**१८९६:रघुनाथ वामन दिघे – रसाळ लेखन करणारे कादंबरीकार.’पाणकळा’,’सराई’,’पड रे पाण्या’,’आई आहे शेतात’,’गानलुब्धा’, ’मृगनयना’ वगैरे त्यांच्या कादंबर्या अतिशय गाजल्या.(मृत्यू:४ जुलै १९८०)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०११:सत्यनारायण राजू ऊर्फ ’सत्य साईबाबा’ – आध्यात्मिक गुरू (जन्म:२३ नोव्हेंबर १९२६)**२००६:गोविंद मोघाजी गारे-- आदिवासी संस्कृती,आदिवासी साहित्य,आदिवासी कला यांचे गाढे अभ्यासक(जन्म:४ मार्च १९३९)**२००४: इंदुमती गंधे-- विदर्भातील बालसाहित्यिक,अनुवादक(जन्म:२० नोव्हेंबर १९२०)**१९९९:सुधेन्दू रॉय – चित्रपट व कला दिग्दर्शक (जन्म:१९२१)**१९९४:शंतनुराव किर्लोस्कर – पद्मभुषण पुरस्कार विजेते उद्योगपती,किर्लोस्कर उद्योगसमूहाचे आधारस्तंभ (जन्म:२८ मे १९०३)**१९९२:अनंत महादेव मेहंदळे-- महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नारदीय कीर्तनकार(जन्म:७ फेब्रुवारी १९२८)**१९७४:रामधारी सिंह ’दिनकर’ – देशभक्त व हिन्दी साहित्यिक (जन्म:२३ सप्टेंबर १९०८)**१९७२:जामिनी रॉय – चित्रकार (जन्म:११ एप्रिल १८८७)**१९६०:लक्ष्मण बळवंत तथा अण्णासाहेब भोपटकर – नामवंत वकील,महाराष्ट्र मंडळाचे एक संस्थापक,केसरीचे संपादक आणि हिंदू महासभेचे नेते (जन्म:१८६०)**१९४२:मास्टर दीनानाथ मंगेशकर – शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक व अभिनेते (जन्म:२९ डिसेंबर १९००)**१९३५:रघुनाथ पांडुरंग करंदीकर-- व्यासंगी कायदेपंडित,स्वातंत्र्य चळवळीतील प्रभावी नेते,साहित्यिक आणि लोकमान्य टिळकांचे सहकारी(मृत्यू:२१ ऑगस्ट१८५७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सचिन रमेश तेंडुलकर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री मुकुंद कुलकर्णी यांचा लेख*मास्टर ब्लास्टर भारतरत्न पुत्र*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *Lok Sabha Elections 2024: उष्णतेच्या लाटेमुळे मतदान होणार कमी? निवडणूक आयोगाने नेमली टास्क फोर्स*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मध्यम-श्रेणीच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या नवीन व्हेरिएंटचे यशस्वी प्रक्षेपण*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा, गारपिठीमुळे शेतीचे मोठं नुकसान*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *खालापूर येथील S.H. केळकर कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *देशातील मतदानाची टक्केवारी कमी होणे चिंताजनक काँग्रेस नेते माणिक ठाकरे यांचे पत्रकार परिषदेत प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून तब्बल ४७ लाख ६० हजार रुपयाची चोरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *चेन्नईने लखनऊ समोर ठेवले 211 धावाचे लक्ष्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *पॅथॉलॉजी म्हणजे काय ?* 📙 शरीरांतर्गत अनेक क्रिया प्रक्रिया जन्मल्यापासून चालू असतात. शरीरक्रियाविज्ञानामध्ये त्यांचा वेध घेतला जातो. या कोणत्याही क्रियेमध्ये बिघाड झाला म्हणजे तो बिघाड शोधण्याची प्रक्रिया पॅथालॉजीमध्ये सुरू होते. रक्त, लघवी, थुंकी, रक्ताचे विविध घटक व त्यांचे बदलते प्रमाण या साऱ्यांची तपासणी करून त्यावरून निदान करण्यासाठी या शास्त्राची मदत सारखीच लागत असते. एवढेच नव्हे तर वरवर निरोगी दिसणाऱ्या माणसाच्या पॅथॉलॉजिकल तपासण्या केल्यास अनेक गोष्टी उघडकीला येऊ शकतात. उदाहरणार्थ, नुकताच शरीरात प्रवेश केलेला मधुमेह किंवा सतत थकवा जाणवत असेल, तर आढळणारा रक्तक्षय हा सहसा तपासणीतून अचानक सामोरा येतो.शरीरातील विविध द्रवांच्या चाचण्या घेण्यासाठी सुमारे ३० वर्षांपूर्वी अनेक रासायनिक क्रिया करून मगच निष्कर्षाप्रत येता येत असे. या तंत्रामध्ये इलेक्ट्रॉनिक बायोमेडिकल उपकरणांमुळे झपाट्याने प्रगती होत गेली. रक्तातील तांबड्या, पांढऱ्या पेशी मोजण्यासाठी आता सेलकाऊंटरसारखे उपकरण उपलब्ध झाल्याने काही मिनिटांत संपूर्ण तपासणी अचूक पद्धतीत पूर्ण होऊ शकते. रक्तातील साखर, अल्बुमिन किंवा अनेक घटक काही सेकंदात मोजू शकणारी उपकरणे आता रुग्ण स्वतःच्या घरीही वापरू शकतो.शरीरातील नलिकाविरहित ग्रंथींचे (एंडोक्राइन ग्लँड) स्रावांचे प्रमाण मोजणे, विविध हार्मोन्सची शरीरातील पातळी मोजणे हे काही वर्षांपूर्वी अत्यंत त्रासाचे व गुंतागुंतीचे होते. ते आता विविध उपकरणे व त्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या आधीच रासायनिक प्रक्रिया केलेल्या पट्ट्या किंवा द्रावांमुळे कोणत्याही शहरातील प्रशिक्षित तंत्रज्ञ करू शकतो. असे तंत्रज्ञ करा तयार करण्याचे (DMLT / BM Tech) अभ्यासक्रम जवळपास प्रत्येक जिल्ह्याच्या गावीही सुरू झाले आहेत. डॉक्टरी पदवी घेतल्यावर ३ वर्षांचा विशेष अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर पॅथालॉजी व बॅक्टेरियॉलॉजी या विषयात तज्ज्ञ म्हणून काम सुरू करता येते. अधिक अनुभवानंतर शरिरातील कोणत्याही अवयवाचे सूक्ष्म तुकडे सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासून त्यांतील दोष निश्चित करता येतात. पेशींच्या रचनेचे बदल होऊन कॅन्सरची सुरुवात असेल असेल तर त्याचेही निदान तज्ज्ञ पॅथॉलॉजिस्टच करतात. शरीरातील द्रवात सापडणारे जंतू कृत्रिमरित्या वाढवून त्यांच्यावरील उपाययोजना सुचवणे हा बॅक्टेरियॉलॉजीचा भाग असतो.अनैसर्गिक मॄत्यू झाल्यास शवविच्छेदन करणे आवश्यक असते. अशा वेळी शरीरातील विविध भागांचे निरीक्षण करून मृत्यूचे कारण शोधून काढण्यासाठी तज्ज्ञ पॅथॉलॉजीस्टचीच मदत घेतली जाते.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सन्मानाने सुख प्राप्त करण्याचे साधन म्हणजे शिक्षण.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *जागतिक वसुंधरा दिवस - २०२४ ची थीम* काय आहे ?२) कांदा कापतांना कोणता वायू बाहेर पडतो ?३) पायी चाललेल्या वारकऱ्यांच्या समूहास काय म्हणतात ?४) 'अंगार' या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा.५) तानसा धरण कोणत्या नदीवर आहे ?*उत्तरे :-* १) प्लॅनेट विरुद्ध प्लास्टिक २) अमोनिया ३) दिंडी ४) निखारा ५) तानसा नदी, ठाणे *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 जगदीश पा. नवले, परभणी👤 भूमाजी मामीडवार👤 सौरभ कोटपल्लीवार👤 कवी विशाल मोरे👤 अझीझ पटेल👤 अनिरुद्ध उत्तरवार👤 महावीर जैन👤 दत्ता फत्तेपुरे, येवती*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वंदूं चरणरज सेवूं उष्टावळी । पूर्वकर्मा होळी करुनी सांडूं ॥१॥अमुप हे गांठीं बांधूं भांडवल । अनाथा विठ्ठल आम्हां जोगा ॥ध्रु.॥अवघे होती लाभ एका या चिंतनें । नामसंकीर्तनें गोविंदाच्या ॥२॥जन्ममरणाच्या खुंटतील खेपा । होईल हा सोपा सिद्ध पंथ ॥३॥गेले पुढें त्यांचा शोधीत मारग । चला जाऊं माग घेत आम्ही ॥४॥तुका म्हणे घालूं जीवपणा चिरा । जाऊं त्या माहेरा निजाचिया ॥५॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकांपाशी बळ असते. मग ते बळ पैशाचे असो किंवा जबरदस्त संगतीचे असो किंवा अफाट धन संपत्तीचे. त्या बळामुळे माणूस मनाप्रमाणेच सर्वच काही कमावू शकतो, वाटू शकतो.पण, ज्याच्याकडे खऱ्या दर्जेदार शब्दांची व सत्य समजून घेण्याची ताकद असते ती ताकद मात्र ह्या सर्व, व्यर्थ ताकद पेक्षा कितीतरी महान असते. ही ताकद पैशाने विकत मिळत नाही तर संघर्षातून अनुभव आल्यानेच येत असते. म्हणून तिचा उपयोग चांगल्या कार्यासाठी करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *अध्यात्म आणि व्यवहार*एकदा आद्यशंकराचार्य आपल्या शिष्यांसह चालले असता समोरून अचानकपणे एक पिसाळलेला हत्ती धावत येताना दिसला. अर्थातच इतरांच्याबरोबरच शंकराचार्यही हत्तीच्या मार्गातून दूर पळू लागले. त्यांच्या शिष्यवर्गात काही. खट्याळ, तरुण शिष्यही होते. त्यातील एकजण धाडस करून त्यांना म्हणाला, “तुम्हीच आजच्या प्रवचनात म्हणालात की केवळ ब्रह्म हे सत्य आहे व हे दृश्य जग मिथ्या आहे. म्हणजे हा हत्तीही मिथ्या आहे. मग आपण का पळताहात ?’शंकराचार्य लगेच म्हणाले, “पण माझं पळणं हेही मिथ्याच आहे ?” तो तरुण शिष्य ओशाळला. त्याने त्यांची क्षमा मागितली.होतं काय की, ‘ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या’ याचा चुकीचा अर्थ घेतल्याने अनेक घोटाळे होतात. व्यवहारात अध्यात्म आणू नये व अध्यात्मात व्यवहार आणू नये.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15 जुलै 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2021/07/hari-om-vitthala.html?m=1••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🟫 *_ या वर्षातील १९७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟫 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟫•••••••••••••••••••••••••••••••••*१९९७: पर्यावरणवादी कार्यकर्ते महेशचंद्र मेहता यांची रॅमन मॅगसेसे पुरस्कारासाठी निवड**१९९६: स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले यांना 'रॅमन मॅगसेसे' पुरस्कार जाहीर**१९६२: शिक्षणक्षेत्रातील महत्त्वपूर्ण व यशस्वी प्रयोग मानल्या जाणार्या ’ज्ञानप्रबोधिनी’ या संस्थेचा पुणे येथे प्रारंभ**१९५५: पंडित जवाहरलाल नेहरू यांना ’भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर**१९५५: आण्विक अस्त्रांवर बंदी घालणाऱ्या मैनाउ जाहीरनाम्यावर १८ नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांनी स्वाक्षऱ्या केल्या. नंतर आणखी ३८ नोबेल पारितोषिक विजेत्यांनी त्याला मान्यता दिली.**१९२७: समाजाला कुटुंबनियोजन आणि लैंगिक समस्यांसंबधी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने र. धों. कर्वे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुरु केलेल्या 'समाजस्वास्थ्य' या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.**१९२६: मुंबईत कुलाबा ते क्रॉफर्ड मार्केट अशी उपनगरी बस सेवा सुरू झाली.**१६६२: इंग्लंडमधे प्रतिष्ठित असलेल्या ’रॉयल सोसायटी’ची स्थापना*🟫 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟫•••••••••••••••••••••••••••••••••*१९८६: सुभाष आ. मंडले -- लेखक* *१९८१: प्रा.नंदकुमार शिवाजी शेडगे -- लेखक, कवी* *१९८०: राहुल धर्मसिंग चव्हाण (पालत्या)-- कवी, लेखक* *१९७५: आबा गोविंदा महाजन -- महाराष्ट्र सरकारच्या महसूल खात्यातील अधिकारी, मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध लेखक* *१९६८: सुरज थापर -- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेते* *१९६६: डाॅ. श्रीनिवास मेघ:श्याम आठल्ये -- लेखक, कवी**१९६०: प्रा.दिलीप नामदेवराव तितरमारे -- कवी* *१९५७: बळीराम रुपचंद जाधव -- लेखक**१९५६: डॉ. प्रभा दत्तात्रय वासाडे -- लेखिका* *१९५१: अनुराधा मराठे -- शास्त्रीय आणि सुगम संगीत गाणाऱ्या एक मराठी गायिका**१९५०: धनराज लहानुजी डाहाट -- कवी, लेखक, विचारवंत* *१९४९: प्रा.डॉ.अरुण चिंतामणराव प्रभुणे -- प्रसिद्ध लेखक, संपादक* *१९४९: विजय कोंडके -- चित्रपट दिग्दर्शक**१९४७: आशा वसंतकुमार वडनेरे -- लेखिका, अनुवादक**१९४७: विजय विठ्ठल देवधर -- मराठी लेखक(मृत्यू : ३० नोव्हेंबर २०१२)**१९४३: दत्तात्रय सदाशिव (द.स.) काकडे-- सुप्रसिद्ध कादंबरीकार* *१९४१: माधव गुणाजी कोंडविलकर -- ज्येष्ठ साहित्यिक,कवी, कादंबरीकार (मृत्यू:१२ सप्टेंबर २०२० )* *१९३७: विश्वनाथ शंकर मोरे-- संगीतकार(मृत्यू: ३१ जानेवारी १९८६ )**१९३७: प्रल्हाद नामदेव चेंदवणकर-- कवी (मृत्यू:१६ जुलै २००३ )**१९३२: प्राचार्य नरहर कुरुंदकर – प्रसिद्ध साहित्यिक,विद्वान,टीकाकार,संपादक (मृत्यू: १० फेब्रुवारी १९८२ )**१९३१: विठ्ठल उमप -- मराठी शाहीर व लोककलाकार( मृत्यू: २६ नोव्हेंबर, २०१० )**१९२७: प्रा.शिवाजीराव भोसले – विचारवंत, वक्ते व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू (मृत्यू: २९ जून २०१० )**१९१९: बापू चंद्रसेन कांबळे-- भारतीय राजकारणी,लेखक,संपादक,न्यायशास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते(मृत्यू: ६ नोव्हेंबर २००६ )**१९१८: चित्रा जयंत नाईक--भारतीय शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत आणि समाजसेविका(मृत्यू: १४डिसेंबर २०१० )**१९०५: चौधरी मुहम्मद अली – पाकिस्तानचे ४ थे पंतप्रधान (मृत्यू: २ डिसेंबर १९८० )**१९०४: गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर – जयपूर - अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका (मृत्यू: १० फेब्रुवारी २००१ )**१९०३: के. कामराज – स्वातंत्र्यसैनिक, खासदार व तामिळनाडुचे मुख्यमंत्री (मृत्यू: २ आक्टोबर १९७५ )**१८९९: दत्तात्रय लक्ष्मण गोखले-- मराठी कवी**१६११: मिर्झा राजे जयसिंग (मृत्यू: २८ ऑगस्ट १६६७ )*🟫 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟫•••••••••••••••••••••••••••••••••*२०१३: माधवी रणजित देसाई-- मराठीतील लेखिका (जन्म: २१ जुलै १९३३ )**२००४: डॉ. बानू कोयाजी – कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य करणार्या सामाजिक कार्यकर्त्या. त्यांना पद्मभूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, रामेश्वरदास बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार, पुण्यभूषण पुरस्कारांनी गौरविण्यात आले. (जन्म: २२ ऑगस्ट १९१८ )**१९९१: जगन्नाथराव जोशी – गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, वक्ते (जन्म: १९२० )**१९८०: गजानन विश्वनाथ केतकर -- निबंधकार, विचारवंत, गीतेचे अभ्यासक,(जन्म: ८ ऑगस्ट १८९७ )**१९६७: नारायण श्रीपाद राजहंस तथा ’बालगंधर्व’ –गायक व नट(जन्म: २६ जून १८८८ )**१९१९: एमिल फिशर – रासायनिक प्रक्रियेद्वारे शर्करा रेणूंच्या निर्मितीसाठी १९०२ मध्ये नोबेल पुरस्कार मिळालेले जर्मन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ९ आक्टोबर १८५२ )**१९०४: अंतॉन चेकॉव्ह – रशियन कथाकार व नाटककार. याने मॉस्को विद्यापीठातून वैद्यकीय पदवी घेतली होती मात्र वैद्यकीय व्यवसाय कधी केला नाही.(जन्म: २९ जानेवारी १८६० )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आषाढी एकादशी निमित्ताने काही रचनाहरी ओम विठ्ठला । नाम तुझे मुखी ।।एकच प्रार्थना देवा । ठेव सर्वाना सुखी ।।..... रचना वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्राला जगातील सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनवण्याचे माझे ध्येय आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई भेटीदरम्यान ३ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतांना म्हणाले*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *BRS पुन्हा महाराष्ट्रात कमबॅक करणार, विधानसभेला रंगत येणार, दोन पक्षांशी बोलणी सुरु*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सव्वालाख विद्यार्थी शाळाबाह्य ? यू-डायस प्रणालीमधील धक्कादायक नोंद, शिक्षण विभाग म्हणतो...विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड नोंदणीतील तफावतीमुळे हा गोंधळ*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रोहित आर्य यांचा भाजपमध्ये प्रवेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *टाटा-BSNL यांच्यात 15 हजार कोटींचा करार, जिओ, एअरटेलचं टेन्शन वाढणार ?*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *8 आमदारांची कॉंग्रेसमधून होणार हकालपट्टी ? विधानपरिषद निवडणुकीत पक्षादेश पाळला नाही, 19 जुलैला होणार मोठा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजेंड्स 2024 च्या अंतिम लढतीत भारताने पाकिस्तानला पाच गडी राखून हरविलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *इसीजी म्हणजे काय ?* 📙 **************************ईसीजी म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राम, याला आपण 'हृदयस्पंदनालेख' असेही म्हणू शकू. आजकाल एखाद्या व्यक्तीला अचानक चक्कर आली, डोळ्यासमोर अंधारी आली वा छातीत धडधडले, तर इसीजी काढून घेण्याचा सल्ला दिला जातो. चाळीशी ओलांडल्यानंतर दर दोन वर्षांनी इसीजी काढून घेणे श्रेयस्कर, असेही म्हणतात. इसीजी काढण्याच्या या वाढत्या प्रमाणामुळे, हृदयाबद्दलच्या जिज्ञासेमुळे, हृदयविकाराच्या भीतीमुळे आपल्याला इसीजी म्हणजे नेमके काय प्रकरण आहे, हे जाणून घेण्याची जिज्ञासा असेल. इसीजी म्हणजे काय हे आता पाहू. हृदयाच्या स्नायूंच्या आकुंचन प्रसारणात विद्युतलाटा व विद्युत प्रवाह तयार होतात. याची नोंद शरीराच्या विविध भागांवर (छाती, पाय इ.) संवेदनशील असे इलेक्ट्रोड ठेवून करता येते. कारण हे विद्युतप्रवाह हृदयापासून सर्व ठिकाणी पसरवले जातात. या विद्युतप्रवाहाच्या शक्तीनुसार एका यांत्रिक उपकरणांच्या सहाय्याने हृदयाच्या स्पंदनाचा आलेख काढता येतो. इसीजी हे डॉक्टरांसाठी वरदानच ठरले आहे. सर्वसामान्यपणे व्यक्तीच्या हृदयस्पंदनालेखात P,Q,R,S व T या विद्युतलाटा (Waves) असतात. त्यांचे निरोगी लोकांसाठीचे आकार (उंची, रुंदी इ.) तसेच एकमेकांतील (त्या लाटांचे) अंतर ठरलेले असते. हृदयाच्या वेगवेगळ्या विकारांवरून या आलेखात बदल घडून येतात व त्यावरून रोगाचे निदान करता येते. हृदयाचा आकार, हृदयाची गती, जास्तीचे ठोके वा न पडणारे ठोके, हृदयातील जवनिका, कर्णिका या कप्प्यांमधील सुसंवाद, हृदयाच्या स्नायूंचा रक्तपुरवठा इत्यादी अनेक गोष्टींची माहिती यामुळे मिळू शकते. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी काही बदल इसीजीमध्ये सापडू शकतात. अशा व्यक्तींनी वेळीच आहार, विहार यावर नियंत्रण ठेवले; तर पुढील अनर्थ टाळता येऊ शकेल. यावरून इसीजीचे महत्त्व आपल्या लक्षात येईल. इसीजी काढण्यासाठी येणारा खर्च लक्षात घेता तो काढण्यापूर्वी खरेच तो काढण्याची गरज आहे काय, याचा साधकबाधक विचार तज्ज्ञांच्या सल्ल्याने करणे श्रेयस्कर ठरते.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सत्याचे तीन भाग आहेतः प्रथम जिज्ञासा - जी सत्याची आराधना असते , दुसरे ज्ञान - जी सत्याची उपस्थिती असते. व तिसरा विश्वास - जो सत्याचा उपभोग आहे. ------ बेकन*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) विम्बल्डन टेनिस स्पर्धेची महिला एकेरीची चॅम्पियन कोण ठरली आहे ?२) 'विदर्भाचे नंदनवन' असे कोणत्या ठिकाणाला म्हटले जाते ?३) युरो चषक फुटबॉल स्पर्धा - २०२४ चा अंतिम सामना कोणत्या दोन संघादरम्यान झाला ?४) 'ठक' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) झिका विषाणू कोणत्या नावाच्या डासापासून पसरतो ? *उत्तरे :-* १) बार्बरा क्रिचिकोवा, झेक प्रजासत्ताक २) चिखलदरा, अमरावती ३) स्पेन व इंग्लंड ४) लबाड ५) एडिस*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 बालाजी हिवराळे, शिक्षक तथा पत्रकार👤 शुभम बतुलवार, धर्माबाद👤 राजेश्वर डोमशेर, उच्चश्रेणी पदोन्नत मुख्याध्यापक, नायगाव👤 श्रीकांत जोशी, शिक्षक, धर्माबाद👤 विठ्ठल नागोबा हिमगिरे, शिक्षक, धर्माबाद👤 वसंत बोनगिरे👤 शंकर हंड्रे, शिक्षक, देगलूर👤 सचिन खंडगावे👤 गंगाधर वि. बिज्जेवार, सेवानिवृत्त शिक्षक, सिडको, नांदेड👤 राजू कदम👤 विजयकुमार पाटील घुलेकर👤 संतोष ईबीतवार, येवती, धर्माबाद👤 विष्णुराज कदम, पांगरी, धर्माबाद👤 नवाज शेख👤 पांडुरंग चंदवाड👤 आनंद गाजेवार, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दस द्वारे का पिंजरा तामे पंछी पौन।रहने को अचरज नहीं जात अचम्भा कौन॥11॥अर्थ – इस शरीर को ही कबीर साहेब पिंजरा कहते है इसमें दस द्वार है , २ आँख , २ कान , २ नाक , १ मुँह , १ मल द्वार , १ मूत्र द्वार , कुल हुए ९ , और एक दसवा जो है जो की गुप्त है , उसी द्वार से इस शरीर में प्राण डाला जाता है और उसे बंद कर दिया जाता है , उसी द्वार को खोलने की चाभी सच्चे सद्गुरु के पास होता , जो भक्त सच्ची लगन से अभ्यास करता है , तो सद्गुरु की कृपा से वो १० वा द्वार खुलता है और वो स्वयं को जान पाता है और उस सत्यपुरुष को देख और जान पता है।।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वेळ सर्वांवर येते आणि एक दिवस निघून जाते. फक्त, त्या आलेल्या वेळेत हिंमत हारू नये. तर त्या बहुमूल्य वेळेचे आनंदाने स्वागत करावे. त्या वेळेत नेमकं काहीतरी विशेष असेल म्हणूनच वेळेचे येणे, जाणे आवश्यक असते असे म्हटल्या जाते. म्हणून त्या प्रसंगी स्वतः खंबीर रहावे व जगण्याचा प्रयत्न करावा. भविष्यात सांगता येत नाही त्याच वेळेपायी आपल्याला सर्वस्व काही मिळूही शकते. कारण राजाचा रंक आणि रंकाचा राव होण्यासाठी ती वेळच ठरवत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*एक डोळा असलेले हरीण* एका हरीणाचा एक डोळा फुटलेला होता , म्हणून ते, समुद्राच्या बाजूला आपल्याला मारायला कोणी येणार नाही ,' या विश्वासाने चरत असे , पण त्याची शिकार करण्यासाठी एक टपलेला शिकारी , होडीत बसून समुद्राच्या मार्गाने आला आणि त्याने 🔫 बंदुकीच्या गोळी ने त्याचा प्राण घेतला. मरतांना हरीण मनात म्हणाले , " अरेरे ! ज्या बाजूने धोका नाही असे वाटले त्या समुद्राकडून माझा घात झाला." *_🌀तात्पर्य_ ::~* *ज्याच्याबद्दल अतिशय विश्वास वाटतो, त्याच्याकडूनच बर्याच वेळा विश्वासघात होतो.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 01 जुलै 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://kathamaala.blogspot.com/2023/11/ek-tarikh.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_महाराष्ट्र कृषी दिन_**_राष्ट्रीय डॉक्टर दिन_* ••••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील १८३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९९७:शतकातील सर्वोत्कृष्ट वेटलिफ्टर्सच्या यादीत भारताच्या कुंजरानी देवीचा समावेश करण्यात आला.**१९६४:न.वि.गाडगीळ पुणे विद्यापीठाचे पाचवे कुलगुरू झाले.**१९६२:सोमालिया व घाना हे देश स्वतंत्र झाले.**१९६०:रवांडा व बुरुंडी हे देश स्वतंत्र झाले.**१९५५:’स्टेट बँक ऑफ इंडिया अॅक्ट १९५५’ अन्वये स्टेट बँक ऑफ इंडिया अस्तित्त्वात आली.**१९४९:त्रावणकोर व कोचीन ही दोन संस्थाने एकत्र करुन ’थिरुकोची’ संस्थान निर्माण करण्यात आले.याचेच पुढे केरळ राज्य बनले.**१९४८:बाजारपेठेतील व्यापार्यांचे नेतृत्त्व करणार्या ’पूना मर्चंट्स चेंबर’ या संस्थेची स्थापना**१९४७:फिलिपाइन्सच्या वायूदलाची स्थापना झाली.**१९०९:क्रांतिकारक मदनलाल धिंग्राने भारतमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक कर्नल विल्यम कर्झन वायली यांची इंपिरिअल इन्स्टिट्युटच्या ’जहांगिर हाऊस’मधे इंडियन नॅशनल असोसिएशनच्या सभेच्या वेळी गोळ्या झाडून हत्या केली.**१८८१:कॅनडातुन अमेरिकेत जगातील पहिला आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल करण्यात आला.**१८३७:जन्म,मृत्यू व विवाह यांच्या सरकारी नोंदणीस इंग्लंडमधे सुरूवात झाली.**_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८६:बाळासाहेब साहेबराव चन्ने -- लेखक कवी**१९८५:सहादेव पुरासे-- कवी**१९७९:विशाल सुधाकरराव कन्हेरकर-- कवी,लेखक* *१९७९:सुरेश मारोतराव हिवाळे-- कवी, लेखक* *१९७९:लीना भुसारी-खैरकर-- कवयित्री* *१९७८:रवींद्र उद्धवराव भयवाळ-- लेखक,समीक्षक,संपादक* *१९७८:लीलाधर रामेश्वरजी दवंडे--कवी, लेखक**१९७६:प्रा.डॉ प्रवीण श्रीकृष्ण बनसोड-- लेखक**१९७५:प्रा.डॉ.अनंता सूर-- प्रसिद्ध कवी लेखक,समीक्षक,संपादक* *१९७४:प्रा.डॉ.शिवाजी भिकाजीराव हुसे-- कवी,लेखक,संपादक* *१९७३:अशोक गोविंदरावजी इंजेगांवकर -- कवी,लेखक* *१९७३:गणेश शिवराम भाकरे -- प्रसिद्ध कवी* *१९७२:काशिनाथ (का.रा.) चव्हाण -- प्रसिद्ध कवी* *१९७२:अशोक पवार -- प्रसिद्ध लेखक* *१९७१:श्रीकांत बापूराव पेठकर-- लेखक कवी**१९७१:पंडित दिंगाबर कांबळे -- कवी, लेखक* *१९७१:सीमा गजानन भसारकर -- कवयित्री* *१९७०:परसराम रामा आंबी-- लेखक**१९६९:सुरेश महादेवराव देशमुख -- लेखक**१९६८:प्रा.धनंजय श्रीकृष्ण पटोकार -- कवी**१९६८:गौतम रामराव कांबळे-- कवी* *१९६७:विठ्ठल नागेश गावडे परवाडकर -- नाटककार,लेखक,कवी* *१९६७:संजय महिपती पाटील-- कवी,लेखक**१९६७:गोविंद चव्हाण-- नाट्य निर्माते (मृत्यू:१३ जुलै २०२०)**१९६६:उस्ताद राशिद खान – रामपूर- साहसवान घराण्याचे शास्त्रीय गायक**१९६५:उत्तम अमरसिंग राठोड-- कवी* *१९६४:अशोक सीतारामजी कोसरे - कवी, लेखक* *१९६३:रेखा अशोक ढोले-- कवयित्री* *१९६३:परमेश्वर श्रीराम व्यवहारे-- कवी, लेखक* *१९६३:अनिल मनोहर खोब्रागडे- प्रसिद्ध लेखक,कवी* *१९६३:डॉ सतीश पावडे-- लेखक,समीक्षक, नाट्यलेखक**१९६२:बा.बा.कोटंबे -- लेखक* *१९६२:जयकुमार चर्जन-- लेखक* *१९६२:गजानन श्रीराम निमकर्डे-- लेखक* *१९६१: वसंत नारायण चंन्ने-- कवी,लेखक* *१९६१:कल्पना चावला–भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर(मृत्यू:१ फेब्रुवारी २००३)**१९६०:सुदेश भोसले-- मिमिक्री आर्टिस्ट, प्रसिद्ध गायक* *१९६०:डॉ.किरण कृष्णराव नागतोडे-- प्रसिद्ध लेखिका* *१९६०:चुडाराम हिरामण बल्हारपुरे -- लेखक**१९६०:युवराज गंगाराम-- समीक्षक,लेखक, कवी* *१९५९:अमर हरसिंग राठोड -- लेखक तथा निवृत्त उपविभागीय अभियंता* *१९५८:रामचंद्र गोविंद कुलकर्णी- प्रसिद्ध कवी,लेखक तथा निवृत्त सनदी अधिकारी**१९५८:प्रा.डॉ.अविनाश आवलगावकर-- सुप्रसिद्ध साहित्यिक,समीक्षक* *१९५७:प्रा.डॉ.दिलीप व्यंकटेश अलोणे -- प्रसिद्ध लेखक,निवेदक* *१९५६:आदित्य राज कपूर-- अभिनेता,चित्रपट निर्माता,लेखक**१९५४:सुधीर जाधव -- लेखक* *१९५४:प्रा.डॉ.राम बोडेवार -- लेखक* *१९५३:डॉ.युवराज सोनटक्के--प्रसिद्ध कवी, लेखक**१९५३:नंदू होनप-- मराठी संगीतकार आणि व्हायोलिनवादक (मृत्यू:१७ सप्टेंबर २०१६)**१९५२:नरेश नारायण चव्हाण-- कवी* *१९५२:विठ्ठल पांडुरंग पाटील-- लेखक,कवी तथा निवृत्त शिक्षणाधिकारी* *१९५१:विठ्ठल उंदराची घोडे -- कवी,लेखक* *१९५०:प्रा.डॉ.सुभाष जगन्नाथ गढीकर -- लेखक,समीक्षक* *१९५०:डॉ श्रीपाल सबनीस-- सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष* *१९४९:वेंकय्या नायडू – माजी.उपराष्ट्रपती, भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष**१९४९:प्रा.यशवंत माळी-- सुप्रसिद्ध कथाकार**१९४९:मेहुल कुमार-- भारतीय चित्रपट निर्माता,चित्रपट दिग्दर्शक आणि कथा लेखक**१९४८:अनंत प्रभाकर देशमुख--समीक्षक**१९४८:उद्धव पिठूजी नारनवरे-- लेखक**१९४६:हिरामण लांजे-- प्रसिद्ध कवी, लेखक,झाडी बोली साहित्याचे गाढे अभ्यासक* *१९४५:विजय पुरूषोत्तम नाईक-- प्रसिद्ध लेखक,अनुवादक,सकाळ वृत्त समूहाचे दिल्लीस्थित सल्लागार संपादक**१९३९:दौलतभाई आयुब खा पठाण-- कवी, लेखक* *१९३८:पंडित हरिप्रसाद चौरसिया – बासरीवादक,पद्मविभूषण**१९३७:शामराव गोविंदराव लाघवे-- लेखक* *_१९१३:वसंतराव नाईक – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री,रोजगार हमी योजनेचे जनक,हरित क्रांतीचे प्रणेते राज्यात १९७२ साली पडलेल्या भीषण दुष्काळाला त्यांनी समर्थपणे तोंड दिले. राज्याला स्थैर्य दिले.रोजगार हमी योजना महाराष्ट्रात सुरू केली आणि नंतर ती देशपातळीवरही सुरू करण्यात आली (मृत्यू:१८ऑगस्ट १९७९)_**१९०७:प्रा.पा.कृ.सावळापूरकर -- लेखक,जुन्या पिढीतील संशोधक (मृत्यू:२७ फेब्रुवारी १९९५)**१८८७:कविवर्य एकनाथ पांडुरंग रेंदाळकर (मृत्यू:१९२०)**_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९९४:राजाभाऊ नातू – दिग्दर्शक, नेपथ्यकार,प्रकाशयोजक व नाट्य संघटक* *१९८९:प्राचार्य गणेश हरी पाटील – कवी, शिक्षणतज्ञ,बालगीतकार (जन्म:१९ आगस्ट १९०६)**१९६९:मुरलीधरबुवा निजामपूरकर – कीर्तनकार**१९६२:पुरुषोत्तम दास टंडन – स्वातंत्र्यसेनानी,भारतरत्न (१९६१), राष्ट्रभाषा हिन्दीचे समर्थक, (जन्म:१ ऑगस्ट १८८२)**१९३८:गणेश श्रीकृष्ण तथा 'दादासाहेब’ खापर्डे – प्रख्यात कायदेपंडित, विद्वान आणि राजकीय नेते,’वर्हाडचे नबाब’ (जन्म:२७ ऑगस्ट १८५४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लघुकथा - एक तारीख*गौरी आणि शंकर यांचा सुखाचा असा संसार होता. ना कोणाची कटकट ना कोणाची झिकझिक. महिन्याच्या एक तारखेला पगार झाला की शंकर घरी परत येत असताना बायकोसाठी गजरा घ्यायचा, लेकरांसाठी काही तरी खाऊ घ्यायचा आणि स्वतःसाठी .................. पूर्ण कथा वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्याच्या मुख्य सचिव पदी पहिल्या महिला अधिकारी सुजाता सौनिक यांची नियुक्ती *•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *भुशी धरणावर पर्यटनासाठी गेलेले ५ जण गेले वाहून त्यात ४ मुलं आणि एका महिलेचा समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नवीमुबंईतील बेलापूर व्हीलेज स्मार्ट होणार – आ. मंदा म्हात्रे*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *ओबीसी बांधवानो शांतता बाळगा – मनोज जरांगे यांचे आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *आरोग्य वारीच्या माध्यमातून वारकऱ्यांना पुणे ते पंढरपूर आरोग्य सुविधा पुरवण्यात येणार, महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे आणि रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत शुभारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *विराट कोहली आणि रोहित शर्मा पाठोपाठ रवींद्र जडेजानं देखील टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची केली घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *द. आफ्रिकेला 7 धावाने हरवून भारताने T20 वर्ल्ड कप केले आपल्या नावावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *ढगांचं बारसं कोणी केलं ?* 📙 *************************मे १७८३ पासून त्या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यापर्यंत बहुसंख्य युरोपीय देशांच्या आकाशात एक विलक्षण दृश्य पाहायला मिळत होतं. आईसलँडमधील एल्डेयार इथं तसंच जपानमधील असामा यामा इथं ज्वालामुखींचे उद्रेक झाले होते. त्यातून बाहेर पडलेली राख आणि राळ यांचं मिश्रण साऱ्या उत्तर गोलार्धामधील आकाशात पसरलेलं होतं. त्या दृश्यानं अनेकांना विस्मयचकित केलं होतं. कलाकारांनी त्याची चित्रं रंगवली होती. नियमित रोजनिशी लिहिणाऱ्यांनी त्याची तपशीलवार वर्णनं नोंदवून ठेवली होती. साहित्यिकांनी आपल्या कथा कादंबऱ्यांसाठी त्या आकाशदर्शनाची पार्श्वभूमी वापरली होती. त्यात भर पडली ती १८ ऑगस्टच्या रात्री एक धगधगता तेजस्वी अशनी त्या आकाशात चमकून गेला तेव्हा. सर्वांच्याच डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या त्या दृश्यानं एका अकरा वर्षांच्या मुलाच्या मनावर कायमची मोहिनी घातली नसती तरच नवल. त्या दिवसांपासून ल्युक हार्वर्डला आकाशदर्शनाचा छंद जडला. वास्तविक पुढील आयुष्यात त्यानं खगोलशास्त्राचा व्यवसाय म्हणून स्वीकार केला नव्हता वा त्या विषयाचा अभ्यासही केला नव्हता. वनस्पतीशास्त्रातली पदवी त्यानं मिळवली होती. तरीही आकाशदर्शनाचं त्याचं वेड काही कमी झालं नाही.त्याच सुमारास डेन्मार्कमधील वनस्पतीशास्त्रज्ञ कार्ल लिनायस यानं वनस्पतीचं वर्गीकरण करणारी एक प्रणाली विकसित केली होती. ती सर्वत्र गाजली होती. आजतागायत त्याच प्रणालीचा वापर होतो आहे. तरुण ल्युकवरही त्याचा प्रभाव पडला होता. त्या भरात त्यानंही त्या वर्गीकरणामध्ये आपल्या परीनं थोडी भरही घातली होती. वनस्पतीचं वर्गीकरण करता येतं, तर मग आकाशात नेहमीच दिसून येणाऱ्या ढगांचं वर्गीकरण का करता येऊ नये, असा विचार त्याच्या मनात घोळू लागला होता. त्याच सुमारास फ्रेंच वैज्ञानिक ज्याँ बातिस्त लमार्क यानं आकाशात दिसणाऱ्या ढगांची पाच ढोबळ वर्गांमध्ये विभागणी केली होती. तशी ती जुजबीच होती; पण तोवर तसा प्रयत्न कोणीच केला नसल्यानं लमार्कच्या वर्गीकरणालाही मान्यता मिळाली. त्यामुळे ल्युक हाॅवर्डला अधिक प्रोत्साहन मिळालं आहे आणि मग त्यानं अधिक तर्कसंगत अशी आपली प्रणाली सादर केली.त्याने एकंदरीत चार मार्ग प्रतिपादित केले होते. एक *क्युम्युलस* म्हणजे एखाद्या ढिगासारखे दिसणारे, दोन *स्ट्रॅटस* म्हणजे एकावर एक थर असणारे, तीन *सिर्रस* म्हणजे कुरळ्या केसांसारखे वेटोळेदार आणि लांबलचक असणारे आणि चौथे *निम्बस* म्हणजे पाण्याचा साठा असणारे पावसाळी ढग. या चार वर्गांमध्ये संकर होण्याची शक्यताही त्यानं वर्तवली होती. त्यानुसार पावसाळी पण ढिगासारखे असणारे ते *क्युम्युलोनिम्बस* कुरळ्या केसांचे थरावर थर असणारे सिर्रोस्ट्रॅटस वगैरे. अठराव्या शतकाची अखेर होता होता हाॅवर्डच्या या वर्गीकरणाला सर्व स्तरांमधून विस्तृत मान्यता मिळत गेली. आजही यांच वर्गीकरणाचा वापर केला जात आहे. ढगांचे गुणधर्मही या वर्गीकरणातून प्रतीत होतात याचीही प्रचिती आता मिळालेली असल्यामुळे तर या वर्गीकरणावर शिक्कामोर्तबच झाले आहे. म्हणून ल्युक हॉवर्डलाच ढगांचं बारसं केल्याचं श्रेय द्यायला हवं.*बाळ फोंडके यांच्या 'कोण ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" साथ देणारी माणसं कधी कारण सांगत नाहीत आणि कारण सांगणारी माणसं कधीही साथ देत नाहीत."* *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) टी - २० वर्ल्ड कप - २०२४ चा किताब कोणत्या संघाने जिंकला ?२) टी - २० वर्ल्ड कप - २०२४ च्या अंतिम सामन्याचा 'सामनावीर' कोण ?३) टी - २० वर्ल्ड कप - २०२४ चा 'मालिकावीर'चा किताब कोणी जिंकला ?४) टी - २० चा वर्ल्ड कप भारताने कितव्यांदा जिंकला ?५) टी - २० वर्ल्ड कप - २०२४ चा उपविजेता संघ कोणता ? *उत्तरे :-* १) भारत २) विराट कोहली ३) जसप्रीत बुमराह ४) दुसऱ्यांदा ५) दक्षिण आफ्रिका*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्रीमती प्रमिला सेनकुडे, उपक्रमशील शिक्षिका, हदगाव👤 लक्ष्मणराव मुपडे, शिक्षक, धर्माबाद👤 श्री. मोहन पवार, राळेगाव जि. यवतमाळ👤 गजानन कवळे, शिक्षक, उमरी👤 विशाल कन्हेरकर, साहित्यिक👤 श्रीकांत चरलेवार, मुख्याध्यापक, धर्माबाद👤 मारोती कांडले, शिक्षक, किनवट👤 पंढरीनाथ खांड्रे, करखेली👤 बालाजी भगनूरे, शिक्षक, देगलूर👤 दिगंबर नागलवाड, शिक्षक, उमरी👤 डॉ. हनुमंत भोपाळे, समुपदेशक, नांदेड👤 भूमन्ना अबुलकोड, विमा प्रतिनिधी, धर्माबाद👤 नागोराव रायकोड, धर्माबाद👤 विलास नंदूरकर👤 मधुसूदन पांचाळ, शिक्षक, धर्माबाद👤 विजय निलंगेकर, पत्रकार तथा गायक, नांदेड👤 सय्यद इलियास जुक्कलकर, देगलूर👤 व्यंकटेश बतुलवार, शिक्षक, धर्माबाद👤 तुकाराम मुंगरे, मुख्याध्यापक, नांदेड👤 संजीव वाठोरे, शिक्षक, नांदेड👤 हणमंतु देसाई, संपादक, धर्माबाद👤 मोरेश्वर गायधने, शिक्षक, भंडारा👤 रघुनाथ नोरलावार, धर्माबाद👤 चंद्रकांत कदम, शिक्षक तथा कवी, नांदेड👤 बाबासाहेब डोळे👤 मारोती आर. भुसेवार👤 राजू पांचाळ👤 बालाजी भाऊराव डाके पाटील👤 अशोक तुळशीराम कांबळे, सेवानिवृत्त शिक्षक, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बड़ा हुआ तो क्या हुआजैसे पेड़ खजूर। पंथी को छाया नहींफल लागे अति दूर।।(अर्थ- जिस प्रकार खजूर का पेड़ इतना ऊंचा होने के बावजूद आते-जाते राही को छाया नहीं दे सकता है और उसके फल तो इतने ऊपर लगते हैं कि आसानी से तोड़े भी नहीं जा सकते हैं। उसी प्रकार आप कितने भी बड़े आदमी क्यों न बन जाए लेकिन आपके अंदर विनम्रता नहीं है और किसी की मदद नहीं करते हैं तो आपका बड़ा होने का कोई अर्थ नहीं है।)।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समोरासमोर उभे राहून सत्य बोलण्याची, सत्य ऐकण्याची किंवा सत्य वाचण्याची ज्याच्यात हिंमत नसते. तीच व्यक्ती मागे राहून पाठीवर वार करण्यासाठी नेहमीच तरबेज असते. मग ते कशाच्याही माध्यमातून का असेना ? त्याला ते कार्य पूर्ण केल्याशिवाय चैन पडत नाही. असेही काही बोलते, चालते माणसे समाजात असतात. ते मुक्या प्राण्यांपेक्षा सुद्धा घातक असतात. त्यांना कधीही घाबरू नये. तसेच याच समाजात सुद्धा काही चांगलेही माणसं असतात ज्याच्याच खरी सत्यता असते. तीच व्यक्ती, सत्याला समर्पित असते अशा व्यक्तीच्या कायम सहवासात रहावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वकष्टाची प्रचिती मौलिक*एक श्रमिक होता. तो पर्वतावर दगड फोडत होता. फोडता फोडता त्याच्या मनात विचार आला. श्रम कमी आणि दाम भरपूर असा काही जीवनाचा मार्ग सापडला तर! डोंगरावर एक देवाची मूर्ती होती तिची तो रोज त्यासाठी पूजा, प्रार्थना करू लागला. त्याचा काही फायदा झाला नाही, या देवापेक्षाही श्रेष्ठ देवतांची पूजा करावी, असे त्याला वाटू लागले. आकाशात त्याने सूर्य पहिला. सूर्याची तो उपासना करू लागला. एके दिवशी त्याच्या लक्षात आले की, सूर्याला ढग झाकून टाकू शकतात,मग ढगाची आराधना करू लागला. त्यानंतर त्याच्या पाहण्यात असे आले की ढग पर्वताने अडवले जातात आणि पाऊस पडतो, पाऊस श्रेष्ठ असे त्याला वाटू लागले. परंतु पाऊस पडल्यानंतरही पर्वतावरचे दगड जसेच्या तसे असतात ते फोडण्याची शक्ती त्याच्यात नाही. ती शक्ती माझ्यात आहे. तेव्हा श्रमिकच सर्वात श्रेष्ठ! मला स्वतःलाच पुरुषार्थ जागवून महान बनले पाहिजे, याची त्याला जाणीव झाली. आत्मबल, आत्मश्रद्धा व् आत्मजागृती यांच्यामुळे पुरुषार्थाची प्रेरणा लाभते. पुरुषार्थ प्राप्त झालेला मनुष्य दुःखाला, संकटाला घाबरत नाही. सुखासाठी अधीर उतावळा बनत नाही*तात्पर्य* :- श्रमाचे, प्रयत्नाचे जीवन जगणे ही मनुष्य जीवनाची सार्थकता आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 03 ऑक्टोबर 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~🟡 *आजचा रंग - पिवळा* 🟡नवरात्र विशेष - तुळजापूरची तुळजाभवानीLink - http://nasayeotikar.blogspot.com/2024/10/tulajabhavani.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *घटस्थापना दिवस* ••••••••••••••••••••••••••••••••🟡 *_ या वर्षातील २७७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟡 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟡••••••••••••••••••••••••••••••••• *१९८४: भारतातील सर्वात लांबवर धावणारी हिमसागर एक्सप्रेस कन्याकुमारी ते जम्मूतावी दरम्यान सुरू* *१९९०: पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरण झाले.**१९३५: जनरल डी. बोनोच्या नेतृत्त्वाखाली इटलीने इथिओपिया पादाक्रांत केले.**१९३२: इराकला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१८८०: पहिली मराठी संगीत नाटक "शाकुंतल" चा प्रयोग**१७७८: ब्रिटिश दर्यावर्दी कॅप्टन जेम्स कूक अलास्का येथे पोहोचला.* 🟡 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟡 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७९: प्रा. संतोष गोनबरे -- लेखक**१९७५: शुभानन चिंचकर -- लेखक**१९७२: शिल्पा जितेंद्र खेर-- लेखिका**१९६९: सुखचंद वाघमारे -- कवी* *१९६८: डॉ. शीतल शिवराज मालुसरे -- लेखिका, कवयित्री,निवेदिका* *१९६७: पुलिंद चंद्रकांत सावंत -- लेखक, अनुवादक**१९६६: सुनील बर्वे -- मराठी-हिंदी-गुजराती नाट्य-चित्रपट अभिनेते**१९६४: प्रा. डॉ. गंगाधर विठोबाजी कायंदे-पाटील -- लेखक, विचारवंत* *१९६०: श्रीपाद अनिल गोरे -- लेखक* *१९४९: जे. पी. दत्ता – चित्रपट दिग्दर्शक**१९४५: मंजिरी ताम्हणकर -- लेखिका**१९४३: वामन नथुजी तिरबुडे -- लेखक* *१९४२: प्रा. प्रभाकर दत्तात्रय म्हारोळकर -- कवी, लेखक* *१९२८: प्रा.जनार्दन रा. कस्तुरे -- लेखक (मृत्यू: ६ ऑगस्ट २००६ )**१९२१: रे लिंडवॉल – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू (मृत्यू: २३ जून १९९६ )**१९१९: जेम्स बुकॅनन – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थतज्ञ (मृत्यू: ९ जानेवारी २०१३ )**१९०६: गोविंद विनायक देवस्थळी -- संस्कृत विषयाचे अभ्यासक,संशोधक(मृत्यू: १४ मार्च १९९४ )**१९०३: स्वामी रामानंद तीर्थ – हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ (मृत्यू: २२ जानेवारी १९७२ )**१९०२: नारायण माधव सरपटवार-- विदर्भातील जुन्या पिढीतील नामवंत कवी (मृत्यू: २२ मार्च १९८८ )**१९०२: केशव रावजी पुरोहित -- पत्रकार, कादंबरीकार (मृत्यू: १० फेब्रुवारी १९६१ )**१९००: श्रीपाद शंकर नवरे -- लेखक,संपादक(मृत्यू: ७ डिसेंबर १९७८ )* *१८९८: राधाबाई पांडुरंग आपटे -- कवयित्री, लेखिका* 🟡 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟡 •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०२१: घनश्याम नायक -- भारतीय नाटक,आणि दूरदर्शन अभिनेता (जन्म: १२ मे १९४४ )**२०२०: प्रा. पुष्पा भावे -- स्त्री चळवळीच्या कार्यकर्त्या, समीक्षक, रंगभूमीच्या भाष्यकार (जन्म: २६ मार्च, १९३९ )**२०१२: केदारनाथ सहानी – सिक्कीमचे माजी राज्यपाल,दिल्लीचे महापौर (जन्म: २४ आक्टोबर १९२६ )**१९९९: शामाचार्य नरसिंहाचार्य खुपेरकर (कालगावकर, अण्णाबुवा) -- समर्थ संप्रदाय, संस्कृत पंडित, संपादक (जन्म: १० जानेवारी १९०३ )**१९९९: अकिओ मोरिटा – सोनी कार्पोरेशनचे संस्थापक (जन्म:२६ जानेवारी १९२१)**१९७३: साधना बोस --- भारतीय अभिनेत्री आणि नृत्यांगना (जन्म: २० एप्रिल १९७३ )**१९६६: अनंत बाळकृष्ण अंतरकर -- हंस, मोहिनी, नवल या नियतकालिकांचे संस्थापक संपादक ( जन्म: १ डिसेंबर १९११ )**१९५९: दत्तात्रय तुकाराम तथा ’दत्तू’ बांदेकर ऊर्फ ’सख्याहरी’- विनोदी लेखक, विडंबनकार व स्तंभलेखक(जन्म: २२ सप्टेंबर १९०९ )**१९४३: विष्णुपंत पागनीस -- ज्येष्ठ अभिनेते, गायक (जन्म: १५ नोव्हेंबर १८९२ )**१८९१: एडवर्ड लूकास – फ्रेन्च गणिती (जन्म: ४ एप्रिल १८४२ )**१८६७: एलियास होवे– शिवणयंत्राचा संशोधक (जन्म: ९ जुलै १८१९ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतातील कर्तृत्ववान महिला*... झाशीची राणी लक्ष्मीबाई ...राणी लक्ष्मीबाई यांचे पूर्ण नाव लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर तर जन्मनाव मनकर्णिका असे होते. झाशीची राणी लक्ष्मीबाई, या एकोणिसाव्या शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या. १८५७ च्या पहिल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीची नायिका राणी लक्ष्मीबाई होत्या, ज्यांनी अगदी लहान वयातच ब्रिटीश साम्राज्याशी लढा दिला होता. त्यांच्या शौर्याने त्यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले आहे.राणी लक्ष्मीबाई यांच्या धाडसी कार्याने फक्त इतिहासच नाही रचला तर, सर्व स्त्रियांच्या मनात एक धाडसी ऊर्जा निर्माण केली.मेरी झांशी नहीं दूगी असे इंग्रजांना ठणकावून सांगणारी महाराणी लक्ष्मीबाई यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि त्यांच्या विजयाच्या गाथा इतिहासाच्या पानावर लिहिल्या गेल्या आहेत. झांसी या राज्याच्या स्वातंत्र्यासाठी राणी लक्ष्मीबाईंनी ब्रिटिश राज्याविरुद्ध लढा देण्याचे धाडस केले आणि नंतर त्यांना वीरगती प्राप्त झाली. लक्ष्मीबाईं यांच्या पराक्रमाचे किस्से आजही आठवतात. राणी लक्ष्मीबाई यांनी त्याग आणि धैर्याने केलेल्या कृतीतून केवळ भारत देशच नाही तर संपूर्ण जगातील महिलांचे नाव गर्वाने उच्च केले. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे जीवन अमरत्व, देशप्रेम आणि बलिदानाची एक अनोखी गाथा आहे.पुढील भागात :- राजमाता जिजाऊसंकलन by नासा येवतीकर~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आरती सरीन बनल्या AFMS ( भारतीय सशस्त्र दल वैद्यकीय सेवा ) च्या पहिल्या महिला महानिर्देशक*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *La Nina च्या प्रभावामुळे यंदा पडणार कडाक्याची थंडी, IMD ने दिला भारतीयांना हवामानाचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पश्चिम आशियात युद्धाचा भडका...इराणचा इस्त्रायलवर तब्बल 200 क्षेपणास्त्रांचा मारा, स्वसंरक्षणासाठी कारवाई असल्याचा इराणचा दावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *जागावाटपात अधिकच्या 10 जागा मिळण्यासाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रयत्न, थेट गृहमंत्री अमित शाहांसोबत खलबतं; प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी शाहांची दोनदा घेतली भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *लाडक्या बहिणींना बोनस, नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्येच मिळणार, 10 तारखेपर्यंत खात्यात पुन्हा 3 हजार जमा होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरात हेलिकॉप्टर कोसळलं, दोन वैमानिक आणि एका इंजिनिअरचा मृत्यू, दाट धुक्यामुळे अपघात*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *इराणी चषक स्पर्धेत सरफराज खानचा विक्रम, मुंबईचा पहिला द्विशतकवीर तर चौथा तरुण खेळाडू*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नवरात्रीच्या दिवसात आजचा रंग पिवळापिवळ्या रंगाबद्दल माहिती : - पिवळा हा मानवी इतिहासातला सर्वात जुन्या रंगांपैकी एक आहे. - पिवळा हा रंग सूर्यप्रकाशाचा असल्याने ऊर्जेशी संबंधित आहे. - पिवळा रंग लाल रंगाशी एकत्रितपणे उष्णता आणि उर्जेचे प्रतीक आहे. - पिवळा रंग आनंद आणि उर्जेचे प्रतीक आहे. - पिवळा रंग ज्ञान आणि शहाणपणाशी संबंधित आहे. - पिवळा रंग एकाग्रता आणि स्मरणशक्तीसाठी चांगला असतो. - पिवळा रंग तेजस्वी आणि शुद्ध असल्याने लक्ष वेधण्यासाठी प्रभावी आहे. - पिवळा रंग डिझाइनमधील महत्त्वाच्या घटकांना ठळक करण्यासाठी वापरला जातो. - पिवळा रंग अंधारात लवकर ओळखू येतो. - स्कुल बस पिवळ्या रंगाचीच असतात. - घरात आणि परिसरात आपणास अनेक पिवळे वस्तू दिसतात त्याची यादी करू या. उदा. हळद*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*Cef - Capital Expenditure Fund (in finance)*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••संकटांना जिद्दीने तोंड देणे याचेच नाव बुद्धिमत्ता. -- कार्लाइल*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) देशी गाईला *'राज्यमाते'* चा दर्जा देणारे भारतातील दुसरे राज्य कोणते ?२) देशी गाईला राज्यमातेचा दर्जा देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?३) नामिबिया हा देश कोणत्या खंडात आहे ?४) 'बैल' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) 'झोत' या पुस्तकाचे लेखक कोण ? *उत्तरे :-* १) महाराष्ट्र ( २०२४ ) २) उत्तराखंड ( २०१८ ) ३) आफ्रिका ४) वृषभ, पोळ, खोंड ५) डॉ. रावसाहेब कसबे, ज्येष्ठ साहित्यिक*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 चिं. रुपेश बालाजी सुंकेवार, देगलूर👤 कु. पूर्वा श्यामसुंदर माडेवार, पुणे👤 नागेश क्यातमवार, शिक्षक, नांदेड👤 साईनाथ राचेवाड, शिक्षक, बिलोली👤 संदीप कडलग, आरमुर, तेलंगणा👤 विश्वनाथ आरगुलवार, धर्माबाद👤 रणजित चांदवाले👤 पांडुरंग यलमलवाड👤 मारोती नरवाडे👤 शंकर पाटील👤 शंकर दरनगे👤 शिवाजी पांडुरंग मुटकुले👤 नागनाथ लाड, शिक्षक, कुंडलवाडी👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अंतकाळीं मी परदेशी । ऐसें जाणोनि मानसीं । म्हणोनियां ह्रषिकेशी । शरण मी तुज आलों ॥१॥ नवमास गर्भवासीं । कष्ट जाले त्या मातेसी । ते निष्ठुर जाली कैसी । अंतीं दूर राहिली ॥२॥ जीवीं बाळाची आवड । मुखीं घालूऊनि करी कोड । जेव्हां लागली येमवोढ । तेव्हां दुरी राहिली ॥३॥ बहिणी बंधूचा कळवळा । तें तूं जाणसी रे दयाळा । जेव्हां लागली यमशृंखळा । तेव्हां दुरी राहिली ॥४॥ कन्या पुत्रादिक बाळें । हे तंव स्नेहाचीं स्नेहाळें । तुझ्या दर्शनाहुन व्याकुळ । अंतीं दूर राहिलीं ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणाला अति सुख प्राप्त होते तर कोणी धन संपत्तीने मालामाल असतात. कोणाच्या पायाशी प्रसिध्दी लोळत असते तर कोणाच्या वाट्याला फक्त आणि फक्त माणसांची सेवा करण्याची संधी प्राप्त होते. यातील आपापल्या परीने योग्य असतात पण, शेवटपर्यत कोणतेही काहीच टिकून राहत नाही. कारण पाहिजे त्या प्रकारचे त्यातून समाधान मिळत नाही . म्हणून जेथून खऱ्या अर्थाने आपल्याला समाधान मिळतो तेच श्रेष्ठ असते. शेवटी मानव सेवा हीच खरी सेवा म्हटले जाते. ज्याला या प्रकारची सेवा करण्याची संधी मिळत असते. तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने श्रीमंत असतो ती ,श्रीमंती कधीच संपत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कुंभाराचे प्रेम स्वरूप*आज मदन लाकूड तोडण्यासाठी इकडे तिकडे फिरला, पण त्याला एकही सुकलेले झाड सापडले नाही. त्याला निसर्गाची इतकी ओढ होती की त्याने कुऱ्हाडीच्या वाराने हिरवीगार झाडे तोडली नाहीत. त्यांनी झाडे आणि वनस्पतींना पुत्र मानले आणि मनुष्य कधीही पुत्राला मारू शकत नाही. मदन खूप गरीब होता, घरात वृद्ध आई-वडील, पत्नी आणि दोन लहान मुले होती. त्यांचा उदरनिर्वाह मदनच्या कामावरच चालत असे. मदन दिवसभर जंगलात फिरून लाकूड गोळा करायचा आणि संध्याकाळपर्यंत बाजारात विकायचा आणि खाण्यापिण्याचे पदार्थ घरी आणायचा. त्यामुळे संपूर्ण घराला दोन वेळची भाकरी खायला मिळत होती. न जाणो तो असा कोणता दिवस होता की आज त्याला एकही सुकलेले लाकूड किंवा वाळलेले झाड सापडले नाही. दमून तो एका जागी बसला.आज घरी नेण्यासाठी इतर कशाची व्यवस्था होऊ शकली नाही याचे त्याला खूप वाईट वाटले. विचार करता करता तो बेशुद्ध झाला आणि तिथेच पडून राहिला. निसर्ग नेहमीच माणसाचे रक्षण करतो, मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि निसर्गाच्या पुत्राप्रमाणे माणसाचे पालनपोषण करतो. मदनची अशी अवस्था पाहून प्रकृतीतही दुःखाचे वातावरण होते. मग अचानक एक विचित्र घटना घडते, झाडांवरून थंड वारा वाहू लागतो. मदनला अचानक जाग आली तेव्हा त्याला त्याच्या जवळ कपड्यांचे बंडल दिसले. झाडांवरून वाहणाऱ्या वाऱ्याने हे बंडल मदनाच्या जवळ आला. या बंडलचे रहस्य असे होते – काही दिवसांपूर्वी जंगली डाकू एका भल्या माणसाला लुटून पळून जात असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो डोंगरातील दुर्गम दरीत पडला, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पडताना हा कपड्याचे बंडल दरोडेखोरांच्या हातातून निसटला आणि झाडाला लटकला. आज गरजेच्या वेळी मदनला त्या पैशातून मदत करता आली.नैतिक – जेव्हा तुम्ही एखाद्याला मदत करता तेव्हा निष्पाप लोकांना त्रास देऊ नका तेव्हा निसर्ग देखील तुम्हाला मदत करतो. जेव्हा तुम्ही निसर्गाची हानी करता तेव्हा निसर्गही तुमची हानी करतो, ही हानी दीर्घकालीन असते.••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 03 मार्च 2025💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟣 *_जागतिक वन्यजीव दिन_* 🟣•••••••••••••••••••••••••••••••••••• 🟣 *_ या वर्षातील ६२ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🟣 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟣••••••••••••••••••••••••••••••••••••*२००५: स्टीव्ह फॉसेट यांनी ’ग्लोबल फायर’ या मुलुखावेगळ्या विमानातून एकट्याने आणि पुन्हा इंधन न भरता ६७ तासात पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली**२००३: महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणार्या 'शरच्चंद्र चटोपाध्याय' पुरस्कारासाठी ज्येष्ठ लेखिका डॉ.सरोजिनी वैद्य यांची निवड**१९९४: जयपूर येथील गिटारवादक पंडित विश्वमोहन भट यांना ’ग्रॅमी पुरस्कार’ प्रदान**१९९१: रेल्वे कर्मचाऱ्यांचे पहिले मराठी साहित्य संमेलन दया पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे भरले**१९७३: ओरिसात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.**१९६६: डॉ. धनंजयराव गाडगीळ पुणे विद्यापीठाचे सहावे कुलगुरू झाले.**१९४३: दुसरे महायुद्ध – लंडनमधे बॉम्बविरोधी आश्रयस्थानात घुसताना झालेल्या चेंगराचेंगरीत १४३ ठार**१८८५: अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनी (AT &T) ची स्थापना झाली.**१८६५: हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कार्पोरेशन (HSBC) ची स्थापना झाली.**१८४५: फ्लोरिडा हे अमेरिकेचे २७ वे राज्य बनले.*🟣 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟣 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८९: श्रद्धा कपूर -- भारतीय सिने-अभिनेत्री**१९८९: मिलन ज्ञानेश्वर बडगे -- लेखक* *१९८६: सुरजकुमारी गौरीशंकर गोस्वामी -- कवयित्री**१९८१: मेघराज यादवराव मेश्राम -- कवी, लेखक**१९७७: अभिजीत कुंटे – भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रँडमास्टर**१९७७: अंकुश रा. शिंगाडे -- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९७५: लोकेश गुप्ते -- मराठी फिल्म अभिनेता, दिग्दर्शक* *१९७०: इंझमाम उल हक – पाकिस्तानी क्रिकेटपटू**१९६७: शंकर महादेवन – गायक व संगीतकार**१९६२: प्रा. डॉ. प्रकाश नारायण मोगले -- लेखक, कवी* *१९६१: प्रमोद पांडुरंग काकडे -- लेखक, कवी**१९५८: शुभांगी चंद्रशेखर पासेबंद -- प्रसिद्ध लेखिका* *१९५५: जसपाल भट्टी – विनोदी अभिनेते (मृत्यू: २५ ऑक्टोबर २०१२ )**१९५४: डॉ. प्रल्हाद गोविंदराव लुलेकर -- प्रसिद्ध साहित्यिक, ज्येष्ठ विचारवंत, व्याख्याते* *१९५३: सुधाकर विठ्ठल दिक्षीत -- प्रसिद्ध कथाकार**१९५१: डॉ. दिलीप गणेश देवधर -- आरोग्य विषयक लेखन करणारे लेखक**१९५०: अर्चना विनोद अलोणी -- लेखिका (मृत्यू: २९ जुलै २०२४ )* *१९४९: उत्तम धोंडू कोळगांवकर -- प्रसिद्ध कवी, बालसाहित्यिक* *१९४७: मृणालिनी माधव केळकर -- लेखिका, अनुवादक**१९४७: शंकर ऊर्फ काका बडे -- ज्येष्ठ मराठी कवी (मृत्यू:१ सप्टेंबर २०१६ )* *१९४३: माधवराव खाडिलकर -- लेखक, निर्माता, दिग्दर्शक, अभिनेते ( मृत्यू: ३ फेब्रुवारी २०२४)**१९४१: भालचंद्र शंकर देशपांडे -- प्रसिद्ध लेखक (मृत्यू: १३ ऑक्टोबर २०२४ )**१९४१: अनिल मेहता -- मेहता पब्लिकेशनचे संस्थापक**१९४१: गोविंद दिवाकर ठेंगडी -- कवी* *१९३९: एम. एल. जयसिंहा – कसोटी क्रिकेटपटू,शैलीदार फलंदाज (मृत्यू: ६ जुलै १९९९ )**१९३३: वामन गणपतराव इंगळे -- कवी, लेखक**१९३१: उस्ताद गुलाम मुस्तफा खान-- भारतीय शास्त्रीय संगीतकार (मृत्यू: १७ जानेवारी २०२१ )**१९२८: पुरुषोत्तम पाटील -- मराठी साहित्यातील ख्यातनाम कवी आणि संपादक. (मृत्यू: १६ जानेवारी २०१७ )**१९२६: रवि शंकर शर्मा ऊर्फ ’रवि’ – संगीतकार (मृत्यू: ७ मार्च २०१२ )**१९२३: सदाशिव नथोबा आठवले -- ललितलेखक, इतिहासकार (मृत्यू: ८ डिसेंबर २००१ )**१९०८: यज्ञेश्वरशास्त्री माधव कस्तुरे -- वेदान्ततीर्थ, संपादक, संस्कृत आचार्य, लेखक (मृत्यू: २४ ऑगस्ट २००६ )**१९०३: विनायक सदाशिव सुखटणकर -- कथाकार,संपादक (मृत्यू: १८ सप्टेंबर १९७७ )**१८४७: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल – स्कॉटिश - अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक, टेलिफोनचा संशोधक (मृत्यू: २ ऑगस्ट १९२२ )**१८४५: जी. कँटर – जर्मन गणितज्ञ (मृत्यू: ६ जानेवारी १९१८)**१८३९: जमशेदजी नसरवानजी टाटा – आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार व टाटा उद्योग समुहाचे संस्थापक (मृत्यू: १९ मे १९०४ )*🟣 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟣 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१४: विजय हरी वाडेकर -- लेखक (जन्म: २७ सप्टेंबर १९३९ )**२०११: रविंदर कपूर (गोगा कपूर) --भारतीय अभिनेता (जन्म: १५ डिसेंबर १९४० )**२०११: अनंत लाल -- भारतीय शास्त्रीय संगीतकार (जन्म: १९२७ )**२०००: रंजना देशमुख -- लोकप्रिय मराठी अभिनेत्री (जन्म:२३ जुलै १९५५ )**१९९५: पं. निखिल घोष – तबलावादक (जन्म: १९१९ )**१९८९: नारायण गोविंद कालेलकर -- प्रसिद्ध मराठी भाषाशास्त्रज्ञ(जन्म: ११ डिसेंबर १९०९ )**१९८२: रघुपती सहाय ऊर्फ फिराक गोरखपुरी – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू शायर (जन्म:२ ८ ऑगस्ट १८९६ )**१९६५: अमीरबाई कर्नाटकी – पार्श्वगायिका व अभिनेत्री (जन्म: १९०६ )**१९४८: बाळकृष्ण शिवराम मुंजे -- भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक नेते,हिंदुमहासभेचे अध्यक्ष आणि निष्ठावान टिळकानुयायी.(जन्म: १२ डिसेंबर १८७२ )**१९१९: हरी नारायण आपटे – कादंबरीकार (जन्म: ८ मार्च १८६४ )**१७०७: औरंगजेब – सहावा मोगल सम्राट (जन्म: ४ नोव्हेंबर १६१८ )**१७०३: रॉबर्ट हूक – इंग्लिश वैज्ञानिक (जन्म: १८ जुलै १६३५ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी, नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••**फ्रेश मॉर्निंग बुलेटिन* समुहात join ..... होण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नवी दिल्ली : वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी दिल्लीतील १५ वर्षांपेक्षा जुन्या वाहनांना ३१ मार्चनंतर पेट्रोल व डिझेल मिळणार नाही, अशी घोषणा पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी केली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *जुन्नर : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, ता. अलिबाग जि. रायगड यांच्या वतीने नारायणगाव परिसरात स्वच्छता अभियानातून काढला १४ टन कचरा !*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून होणार सुरू, 26 मार्चपर्यंत चालणार अधिवेशन, 10 मार्च रोजी अर्थसंकल्प सादर होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्य सरकारने केल्या १३ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, मनोज कुमार शर्मा यांची कायदा-सुव्यवस्था विभागाच्या विशेष महानिरीक्षकपदी नियुक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुणे : राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ( ITI ) शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून डिजिटल लायब्ररी सुरू करण्याचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबई : सुप्रसिद्ध कलावंत व व्याख्याते शरद पोंक्षे यांना ‘अभिनय कौस्तुभ’ पुरस्कार प्रदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ICC चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये भारताने न्यूझीलंडला 45 धावाने हरविले, 04 मार्च रोजी दुबईत ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार सेमी फायनल*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 दादाराव कदम, सहशिक्षक, धर्माबाद👤 दया घोडगे, सहशिक्षक, उमरी👤 सायन्ना नरावाड, सहशिक्षक, बिलोली👤 युनूस अली, सेवानिवृत्त मुख्याध्यापक, धर्माबाद👤 कैलास कासराळीकर👤 सुरज कुमारी गोस्वामी, साहित्यिक, हैद्राबाद👤 किशन जाधव👤 एकनाथ पाटील👤 जयश्री उमरीकर👤 अनिल गड्डम*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 08*बेडूकराव जमिनीत झोपतात**आठ महिने तेथेच राहतात**सांगा मुलांनो या निद्रेला**विज्ञानप्रेमी काय म्हणतात?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - साप••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पाणी तप्त लोखंडाची संगत धरतं. कमळाच्या पानाची सोबत धरणारे पाणी, मोत्यासारखं चमकतं जे शिंपल्यांची संगत धरतं त्याचं मोती होतं.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *जगातील दुसरे पुस्तकाचे गाव* कोणते ?२) महाराष्ट्रातील 'जंगल रेशीमचे गाव' कोणते ?३) प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात किती सफाई कर्मचाऱ्यांनी परिसर स्वच्छ करून वर्ल्ड रेकॉर्ड केले ?४) 'हिम' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) भारतातली सर्वात मोठी जीवनदायिनी नदी कोणती ? *उत्तरे :-* १) भिलार, सातारा २) उचाट, सातारा ३) १५ हजार ४) बर्फ ५) गंगा ( २,५२५ किमी )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 क्लोन म्हणजे काय ? 📙 आरशातील प्रतिमाच जर आपल्यासमोर उभी राहिली, तर ? असे प्रत्यक्ष घडणे अजून तरी शक्य नाही. पण त्या दिशेने अनुवंशशास्त्राचे प्रयत्न मात्र सतत चालू आहेत. स्वतःचे बीज पुनरुत्पादनासाठी राखून ठेवावे व अनंत काळाने त्यापासून वंश निर्माण करावा इथपर्यंतच आपली प्रगती थाटलेली आहे.क्लोन म्हणजे हुबेहूब जुळणारी, तंतोतंत तशीच निर्मिती. अनेकदा जुळी भावंडे आपल्याला वेगळी ओळखता येत नाहीत, अगदी तशीच एखाद्याची जुळी आकृती प्रत्यक्षात तयार करता आली तर त्याला क्लोन असे म्हणता येईल. यालाच प्रतिकृती म्हणता येईल काय ? निदान इथे तरी आपण तसे म्हणू यात.विश्वामित्राचा प्रतिसृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न फसल्याची पुराणात नोंद आहे. अद्यापतरी सर्व प्रयत्न तसेच फसत आहेत. मात्र वनस्पतींमध्ये तंतोतंत प्रकृत प्रतिकृती निर्माण करण्यात अनेक बाबतीत यश मिळालेले आहे. झाडाच्या फांदीचा छाट, झाडाचा कलमासाठी बांधलेला डोळा, पानफुटीचा तोडलेला तुकडा ज्याप्रमाणे झपाट्याने अगदी हुबेहूब मूळ प्रतिकृती तयार करतो, तसे प्राण्यांच्या बाबतीत करायचा मानवाचा प्रयत्न आहे. प्रयोगशाळेत या दिशेने यश बेडकांच्या बाबतीत मिळाले आहे. डॉक्टर गार्डन यांनी ऑक्सफर्डमध्ये १९६२ मध्ये बेडकांच्या अंड्यातील केंद्रक काढून घेतला व त्या जागी दुसऱ्या बेडकाच्या आतड्यातील अंतस्त्वचेच्या पेशी घातल्या. या पद्धतीने त्यांनी काही लहान लहान बेडूक तयार करण्यात यश मिळवले आहे. हे लहान लहान बेडूक अगदी एकसारखे व मोठ्या मूळ बेडकाची आठवण करून देणारे होते, कारण त्याच्याच जनुकांपासून त्यांची निर्मिती झाली होती.प्रतिकृती निर्माण करण्यातला मुख्य टप्पा म्हणजे मूळ आकृतीचे जीन्स व जनुके मिळवणे व त्यांची कृत्रिमरित्या वाढ करून त्यांपासून प्रतिकृती तयार करणे हा आहे. बीजांड फलित झाल्यावर निर्माण होणारा वंश एकतर स्त्री व पुरुष या दोघांपैकी एकासारखा असेल व दोघांचे थोडे थोडे रंगरूप घेतलेला असेल; पण प्रतिकृती निर्माण करताना फलित बीजांड वापरण्याची कल्पनाच मुळात नसते ! डॉली या नावाने प्रसिद्ध झालेल्या मेंढीची या पद्धतीने निर्मिती करण्यात शास्त्रज्ञांना यश आले. सस्तन प्राणिवर्गातील क्लोन पद्धतीच्या निर्मितीचा हा पहिला यशस्वी प्रयोग मानला जातो. मानवी निर्मिती अशाच पद्धतीने शक्य आहे, असे त्यानंतर अनेक शास्त्रज्ञांना वाटू लागले आहे. मात्र याच डाॅलीला काही वर्षांतच संधिवाताच्या आजाराने पछाडले. त्यामुळे अशा क्लोननिर्मिती प्राण्याच्या सक्षम जीवन जगण्याबद्दल प्रश्न उभे राहिले आहेत.निसर्गतः झाडांवर वाढणारे, पंख असलेले काही मोजके किडे (Aphids) या प्रकाराने स्वतःची निर्मिती करू शकतात. ही गोष्ट तशी अपघातानेच लक्षात आली आहे. या किटकातील एकाच वेळी निर्मितीसाठी नर वा मादी हे भेद अस्तित्वात नाहीत, हे लक्षात आले. तरीपण एकाच कीटकापासून जवळपास शंभर शंभर कीटक जन्माला येत असल्याचे नोंदले गेले आहे. यातूनच ही प्रतिकृती निर्माणाची बाब लक्षात आली. मानव सध्या जेनेटिक इंजिनिअरच्या साहाय्याने क्लोनची निर्मिती करू पाहत आहे.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• तूं माझी जननी काय गे साजणी । विठ्ठले धांवोनि भेट देई ॥१॥ डोळे माझे शिणले पाहतां वाटोली । अवस्था दाटली ह्रदयामाजीं ॥२॥ मी तुझें पाडस गुंतलों भवपाशीं । माते धीर तुजसी कैसा धरवला ॥३॥ तूं माझी पक्षिणी मी तुझें अंडज । क्षुधें पीडिलों मज विसरशी ॥४॥ तूं माझी माउली मी तुझें वोरस । पुढती पुढती वास पाहतसे ॥५॥ नामा म्हणे विठ्ठले आस पुरवीं माझी । ओरसे वेळां पाजीं प्रेमपान्हा ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तीनही ऋतूमध्ये थंडी, पाऊस आणि ऊन जर सारखेच पडत राहिले तर पाहिजे तसं शेतात पीक निघणार नाही. एवढेच नाही तर मानवी जीवनाला व पशुपक्ष्यांना देखील धोका होऊ शकतो म्हणून ते तीनही ऋतू आपापल्या योग्य वेळेत बदलत असतात आणि ते सर्वांना फायदेशीर ठरत असतात. तसंच माणसानी सुद्धा परिस्थिती बघून आपल्यात थोडाफार बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण हे सर्व काही करताना मात्र आपले सकारात्मक विचार व आपला स्वाभिमान कधीच सोडू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मदत*शंकर एक गरीब घरातील मुलगा होता. एके दिवशी जंगलातून लाकडे गोळा करून तो परत येत असताना त्याला झाडाखाली एक म्हातारा माणूस बसलेला दिसला. तो खूप थकलेला आणि भुकेलेला होता. शंकरने त्याची विचारपूस केली. पण त्याच्याकडे त्या म्हातार्याला द्यायला अन्न द्यायला नव्हते. तो तसाच पुढे गेला. पुढे एक हरिण दिसले. त्याला तहान लागलेली होती. पण शंकरकडे पाणीही नव्हते. शंकरला खूप वाईट वाटले पण त्याचा नाईलाज होता. तो तसाच पुढे गेला. पुढे गेल्यावर त्याला एक माणूस भेटला. त्याला शेकोटी पेटवायची होती पण त्याच्याकडे लाकडे नव्हती. शंकरने त्याला आपल्याकडची थोडी लाकडे दिली. त्या माणसाने त्याला आपल्याकडचे थोडे अन्न आणि पाणी दिले. शंकर ते घेऊन मागे फिरला. त्याने हरणाला पाणी पाजले आणि उरलेले पाणी आणि अन्न घेऊन तो भुकेलेल्या म्हातार्या माणसाकडे आला. त्याला अन्न दिले. काही दिवस गेले. शंकर असाच लाकडे गोळा करायला जंगलात गेला. अचानक वाघ समोर आला. वाघ झेप घेणार इतक्यात एका हरणाकडे त्याचे लक्ष गेले. त्या हरणाला शंकरने पाणी पाजले होते. वाघ हरणाकडे पाहतो आहे हे पाहून शंकर उठू लागला तेवढ्यात तेथे एक वृद्ध माणूस आला. त्याने शंकरला उचलून सुरक्षित ठिकाणी नेले आणि त्याचे प्राण वाचवले*तात्पर्य - आपण दुसर्याला मदत केली की आपल्यालाही मदत मिळते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Posts (Atom)