✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21 जुलै 2025💠 वार - सोमवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/19SHStPent/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :• १९२५ – सुरत येथील पहिली रेडिओ सेवा सुरू झाली. यामुळे भारतात प्रसारण सेवेला सुरुवात झाली.• १९४७ – भारताचा राष्ट्रीय ध्वज स्वीकारण्यात आला. हा निर्णय घटनेच्या अंमलबजावणीपूर्वीच झाला.• १९६० - सिरिमावो भंडारनायके सिलोनची पंतप्रधान व जगातील पहिली महिला सरकारप्रमुख बनली.• १९६९ - अपोलो ११चे अंतराळयात्री नील आर्मस्ट्राँग व बझ आल्ड्रिन चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले मानव ठरले.• २००२: वर्ल्ड कॉम - कंपनीने दिवाळखोरी घोषित केली.• २००८: राम बरन यादव - यांना नेपाळचे पहिले राष्ट्रपती घोषित करण्यात आले.• २०१२: एर्डन एरुस - यांनी जगातील पहिली एकट्याने मानव-शक्ती प्रदक्षिणा पूर्ण केली.• २०२२: द्रौपदी मुर्मू - यांची भारताच्या १५व्या राष्ट्राध्यक्षा म्हणून निवड.🎂 जन्म:• १६९३ - थॉमस पेल्हाम-होल्स, ब्रिटनचा तिसरा पंतप्रधान.• १८९९ - अर्नेस्ट हेमिंग्वे, अमेरिकन लेखक व साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेता.• १९३० - आनंद बक्षी, भारतीय गीतकार.🌹 मृत्यू:• १७९६ - रॉबर्ट बर्न्स, स्कॉटिश कवी.• १९८७ – संजय गांधी, भारतीय राजकारणी व इंदिरा गांधी यांचे पुत्र, विमान अपघातात निधन.• २००१ - शिवाजी गणेशन, प्रसिद्ध भारतीय अभिनेता••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*वाढदिवसाची मेणबत्ती विझवण्यापूर्वी ......!*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 23 जुलै ते 26 जुलै कालावधीत इंग्लंड व मालदीवचा दौरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अमरावती :- फेस, बायोमेट्रिक हजेरीविना कर्मचाऱ्याला यापुढे वेतन नाही, 1 ऑगस्टपासून जिल्ह्यात अंमलबजावणी करा - चंद्रशेखर बावनकुळे*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुणे - विज्ञान लेखक डॉ. दीपक शिकारपूर यांचा जीवन गौरवने सन्मान, जयंत नारळीकर स्मृती कार्यक्रमात तीन विज्ञान लेखकांना पुरस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *छ. संभाजीनगर - शिक्षक बदल्यांमध्ये गोंधळ, विन्सी कंपनीच्या चुकांमुळे अपात्र शिक्षकही अतिरिक्त ठरणार, प्रक्रिया थांबवण्याची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पीओपी मूर्तींवरील बंदी उठल्यानंतर नवी चिंता, राज्य सरकार 23 जुलैला जाहीर करणार विसर्जन धोरण; पर्यावरणवाद्यांचा विरोध*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *आता शाळेतूनच मिळणार करियरचे धडे, NCERT सज्ज, 500 प्रकारच्या रोजगारांची विद्यार्थ्यांना मिळणार माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ऑस्ट्रेलिया - भारतीय संघाची विक्रमी कामगिरी ! 66 व्या आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिंपियाडमध्ये जिंकली 3 सुवर्ण पदके*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संजय गंजगुडे, अध्यक्ष, बिलोली तालुका शिक्षक संघटना 👤 कवयित्री सोनाली चंदनशिवे 👤 शिवराज मोरडे 👤 विजय वाठोरे, पत्रकार, हिमायतनगर 👤 रविकांत कुलकर्णी 👤 वृषाली शिंदे, साहित्यिक, मुंबई 👤 चिंतामणी जाधव, मुंबई 👤 श्रीकांत विनायकराव *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 31*एका माणसाला बारा मुले, छोटी काही मोठी काही, काही तापट तर थंड काही, ओळखा पाहू मी कोण .....?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - लसूण ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आज या क्षणास प्रत्यक्ष कार्य करा. उद्यावर भिस्त ठेवून जीवन निष्क्रिय बनवू नका.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) RTI Act २००५ नुसार अतिशय तातडीच्या ( जीवन किंवा मृत्यूच्या ) परिस्थितीत किती कालावधीत माहिती देणे बंधनकारक आहे ?२) धातूंचे पत्रे बनवण्याच्या गुणधर्माला काय म्हणतात ?३) 'इन्कलाब जिंदाबाद' ही घोषणा कोणी दिली होती ?४) 'योजना आखणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) भारतातील भूजल पातळी कमी होण्याचे महत्त्वाचे कारण कोणते आहे ? *उत्तरे :-* १) ४८ तास २) वर्धनीयता ( Ductility ) ३) भगतसिंग ४) योजक ५) अतिरिक्त उपसा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *लाय डिटेक्टर* 📙नेहमीच्या जीवनात सकारण वा अकारण अनेकदा आपण खोटे बोलत असतो. काहीतरी दडवण्यासाठीही हे खोटेपण असते. पण दडवादडवी करताना मनावर एक प्रकारचा ताण असतोच. छोटेसे उदाहरण घ्या. गृहपाठ झाला नाही म्हणून शिक्षक रागावताना म्हणतात, 'टीव्हीवर सिनेमा बघितला असेल, म्हणून वेळ झाला नाही,' सिनेमा तर बघितलेला असतो, म्हणूनच वेळही झालेला असतो. पण हे कबूल करायला मात्र मन राजी होत नाही. मग उत्तर येते, 'नाही नाही घरी मला काम होते म्हणून गृहपाठ झाला नाही'. हे उत्तर देताना कुठेतरी हातपाय थरथरतात, डोळ्याला डोळा भिडणे चुकवले जाते, एखादाच खोल श्वास घेतला जातो. क्वचित हृदयाचा एखादा ठोकाही चुकतो.या होणाऱ्या बारीकसारीक शारीरिक बदलांची जाणीव बोलणाऱ्याला असते; पण बघणाऱ्याला होतेच, असे मात्र नाही. ही जाणीव सहज करून देणारे यंत्र म्हणजे लाय डिटेक्टर. या यंत्राचा शोध खरे म्हणजे फार पूर्वी म्हणजे १९२१ सालीच लागला. जॉन लार्सन यांनी अमेरिकेत हा शोध लावला. त्याला पॉलिग्राफ अशी तांत्रिक संज्ञा दिली जाते. वर्गात खोटे बोलणे, घरी फसवाफसवी करणे हे एक वेळ क्षम्य आहे; पण जर एखादा गुन्हेगार गंभीर गुन्हा करूनही कबुली द्यायचा नाकारत असेल, तर ? कोणीही साक्षीदार नसेल, तर यावेळी पॉलिग्राफ मशीन वापरण्याची सोय आहे. गुन्हेगार व साक्षीदाराच्या शारीरिक बदलांची कॉन्टॅक्ट लीडद्वारे पूर्ण नोंद करून हे यंत्र तो खरे बोलत आहे वा खोटे, याचा निवाडा करते. कायदेशीरदृष्ट्या या यंत्राचा निर्णय काही देशात पूर्ण प्रमाण मानला जातो, तर काही देशांत तो सहाय्यभूत मानला जातो.श्वसनाचा वेग, नाडीचे ठोके, रक्तदाब, त्वचेवरील येणारे घर्मबिंदू, जीभ कोरडी पडणे, अंगावरचे केस उभे राहणे, हातापायांना कंप, दृष्टीची स्थिरता अशा कित्येक गोष्टींची नोंद हे यंत्र करते व मग हा निर्णय दिला जातो. अर्थात अत्यंत निर्ढावलेला गुन्हेगार किंवा पूर्ण प्रशिक्षित तरबेज गुप्तहेर या चाचणीतूनही सहज सुटू शकतो. हे शास्त्रज्ञांनाही मान्य आहे. पण ही दोन्ही उदाहरणे फारच क्वचित सापडतात; कारण निर्ढावलेला गुन्हेगार हा ज्ञात असतो व गुप्तहेराच्या स्वरूपाचा पत्ता आधीच लागलेला असतो.लाय डिटेक्टरचा भारतात वापर अजून सरसकट केला जात नाही. ही यंत्रे आपल्या देशात थोडीच आहेत, हेही त्याचे महत्त्वाचे कारण आहे. 'सच का सामना' या रिअॅलिटी शोसाठी २००९ साली टीव्हीवर या मशिनचा सर्रास वापर आपण पाहिला आहे.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नाम गाऊ नाम घेऊ | नाम विठोबाला वाहू || १ ||आम्ही दैवाचे दैवाचे | दास पंढरीरायाचे || २ ||टाळ विना घेऊनि हाती | विठ्ठल नाम गाऊ गीती || ३ ||नामा म्हणे लाखोली सदा | सहस्त्र नामाची गोविंदा || ४ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्या प्रकारे आपण, आपल्या घराची मन लावून दैनंदिन साफसफाई करतो त्याच प्रकारे आपल्या मनाची सुद्धा स्वच्छता त्याच प्रकारे केली तर कोणत्याही विकारांना मुळात स्थान मिळणार नाही. मनाची स्वच्छता अशीच निर्मळ, नि:स्वार्थी व प्रामाणिकपणाची असायला पाहिजे. जेथे स्वछता चांगली असते तेथे प्रसन्नता आणि शांतता मिळते तसेच ज्याचे मन स्वच्छ असते त्या माणसाकडे बघून मन प्रसन्न होते व गहिवरून येते आणि त्या माणसाविषयी सदैव आपुलकी वाटत असते. आज अशाच सकारात्मक विचाराची व माणसांची खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दोन कवड्या*बादशहा अकबराच्या दरबारात कलाकारांना मानसन्मान दिला जात असे. तानसेनासारखा महान संगीतकार अकबराच्या दरबाराची शोभ होती. त्यावेळी तानसेनच्या तुलनेत दुसरा कोणीच संगीतकार नव्हता. त्यामुळे तानसेनला थोडा अहंकार झाला होता. त्यावेळी काही संगीतसाधकांनी आपल्या संगीत साधनेतून ईश्र्वराला लक्ष्य बनवले होते. हे लोक संगीताच्या माध्यमातून ईश्र्वराची उपासना लीन होऊन करत होते. यात अष्टछापचे कवी तसेच वल्लभ संप्रदायाचे काही आचार्य होते. एक दिवस तानसेन आचार्य विठ्ठलनाथ यांना भेटायला गेला. काही वेळ चर्चा केल्यावर तानसेनने विठ्ठलनाथांच्या सांगण्यावरून आपले गायन प्रस्तुत केले. विठ्ठलनाथांनी गायनाची स्तुती केली व तानसेनाला दहा सहस्त्र रूपये व दोन कवड्या इनामाच्या रूपात भेट दिल्या. तानसेनने कवडी देण्याचे कारण विचारले असता विठ्ठलनाथ म्हणाले,’’तुम्ही मुघल दरबाराचे प्रमुख गायक आहात त्यामुळे दहा हजारांचा इनाम देण्यात आला आहे आणि दोन कवड्या ही व्यक्तिगत माझ्या दृष्टीने तुमच्या गायनाची किंमत आहे.’’ तानसेनाला फार वाईट वाटले. तो जायला निघणार इतक्यात श्रीकृष्णाचे दुसरे भक्त गोविंद स्वामी तेथे आले आणि विठ्ठलनाथांच्या आग्रहावरून त्यांनी कृष्णाचे एक पद गायिले. ते ऐकून तानसेनच्या डोक्यात असलेला स्वत:च्या गायनाविषयीचा भ्रम कमी झाला व तो म्हणाला,’’ विठ्ठलनाथजी महाराज, माझ्या गायनाची वास्तवात खरेच किंमत दोन कवड्याइतकीच आहे. मी बादशहाला खुश करण्यासाठी गातो आणि तुम्ही ईश्र्वराला प्रसन्न करण्यासाठी गात असता. मखमल आणि गोणपाट यांची कधीच तुलना होऊ शकत नाही त्याप्रमाणे तुमचे गायन ईश्र्वरी आहे तर माझे मानवी आहे. आपण चांगले केले की माझा अहंकार तोडला’’ तात्पर्य - कोणतेही काम ईश्र्वरासाठी व ईश्र्वराचे कार्य मानुन केल्यास त्यात आपोआपच दैवी गुण प्रकट होतात. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment