✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 08 जुलै 2025💠 वार - मंगळवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/16qqX9M8vD/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वर्षातील 189 वा दिवस 🔹 महत्वाच्या घटना :-• १४९७ – वास्को-द-गामा आपल्या पहिल्या भारतवारीसाठी पोर्तुगालमधून निघाला.• १८८९ – वॉल स्ट्रीट जर्नल या प्रसिद्ध आर्थिक वृत्तपत्राचा पहिला अंक प्रसिद्ध झाला.• १९६९ – भारताचे पहिले उपग्रह प्रक्षेपण केंद्र श्रीहरिकोटा येथे उभारण्यात आले.• २०११ – अमेरिकेच्या 'स्पेस शटल' कार्यक्रमाचा अंतिम (१३५ वा) उड्डाण 'अॅटलांटिस' द्वारे करण्यात आला.🔹 जन्म :-• १६२१ – जाँ द ला फाँतेन, प्रसिद्ध फ्रेंच कथालेखक.• १८३६ – जोसेफ चेंबरलेन, ब्रिटिश राजकारणी.• १९१८ – क्रेग स्टीन, अमेरिकन पदार्थवैज्ञानिक.• १९५८ – केविन बेकॉन, हॉलीवूड अभिनेता.• १९७२ – सौरव गांगुली, भारतीय क्रिकेटपटू व माजी कर्णधार.🔹 मृत्यू :-• १८२२ – पर्सी बिश शेली, इंग्रजी कवी.• १९९७ – चेतन आनंद, प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक.🔹 विशेष दिन :-• व्हिडिओ गेम डे••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सरकारी शाळेच्या व्यथेची कथा*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नागपूर व अमरावती जिल्ह्यातील वीज क्षेत्रातील पायाभूत सुविधाचीकामे गतीने करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *तिरुपती येथे भाविकांना दररोज दोन वेळा वडा मिळणार मोफत, तिरुमला तिरुपती देवस्थानम TTD चा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, नागपूरसह इतर 24 जिल्ह्याना ऑरेंज अलर्ट*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *यंदाच्या आषाढी वारीने मोडले सर्व विक्रम, पंढरीत 27 ते 28 लाख भाविकांची गर्दी, AI च्या सहाय्याने केली मोजणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अकोला - मनपाच्या ३१ शाळा लवकरच होणार डिजिटल ! शाळांसाठी ४ कोटींचा निधी मंजूर; डिजिटल बोर्ड, स्मार्ट बोर्ड सुविधा मिळणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 8 लघु पाटबंधारे प्रकल्प शंभर टक्के क्षमतेने भरले असून, त्यातूनही पाण्याचा विसर्ग होत आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ICC चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून संजोग गुप्ता यांची नियुक्ती, ICC अध्यक्ष जय शहा यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 मल्लेश भुमन्ना बियानवाड, धर्माबाद 👤 आनंदराव नारायणराव सूर्यवंशी 👤 अहमद मुजावर 👤 अनिल बेद्रे 👤 सुरेश तायडे👤 अशोक पवार *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 20*अशी कोणती गोष्ट आहे, जी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाते, परंतु एका ठिकाणावरून हलत नाही ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - मीठ ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सत्या पासून वेगळे सौंदर्य असू शकत नाही. सत्य हेच सौंदर्य, पण सर्व सौंदर्य सत्य स्वरूप असते असे मात्र नाही. - महात्मा गांधी*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) इंग्लंडमध्ये सध्या सुरू असलेल्या भारत व इंग्लंड कसोटी मालिकेसाठी कोणाचे नाव देण्यात आले आहे ?२) देशाचे पहिले अंध आयर्न मॅन कोण होते ?३) कोकण रेल्वे कोणत्या चार राज्यातून जाते ?४) 'बसगाड्या थांबण्याची जागा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) 'हवा' कोणत्या प्रकारचे द्रव्य आहे ? *उत्तरे :-* १) अँडरसन - तेंडूलकर करंडक क्रिकेट मालिका २) निकेत श्रीनिवास दलाल ३) महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ ४) बस-स्थानक ५) मिश्रण*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💉 *रक्त केव्हा गोठतं ?* 💉जेव्हा जेव्हा एखादी रक्तवाहिनी तुटते तेव्हा तेव्हा तिच्यातला रक्त बाहेर वाहू लागतं. रक्तस्राव सुरू होतो. हे अपघातापोटी घडतं किंवा शस्त्रक्रिया करताना जाणून बुजून केलेलं असतं. असा रक्तस्त्राव अनिर्बंधरित्या होऊ देणं शरीरात परवडणारं नाही. त्यामुळे शल्यविशारद चिमटा लावून लगेच त्या रक्तवाहिन्यांची उघडी तोंड बंद करतात, रक्तस्रावाला अटकाव करतात. पण अपघातांमुळे जखम होते तेव्हा काय होतं ? तेव्हा निसर्गच मदतीला धावतो. अश्या रक्तस्रावाचा बंद बंदोबस्त करणारी शरीरातली निसर्गदत्त प्रणाली कामाला लागते.रक्तामध्ये असलेल्या प्लेटलेट्स या नावांना ओळखल्या जाणाऱ्या इटुकल्या पेशींची या रक्त गोठण्याच्या क्रियेत कळीची भूमिका असते. त्या तुटलेल्या रक्तवाहिनीच्या तोंडाजवळ तातडीनं धावून जातात. त्याच वेळी एका रासायनिक प्रक्रियेनं या पेशींच्या बाह्य आवरणात बदल होऊन त्या चिकट होतात. रक्तवाहिनीच्या आतल्या भागाला त्या चिकटुन बसतात. तसंच एकमेकींशी चिकटून एक गुठळी बनवतात. पण ही गुठळी स्थिर करण्यासाठी फायब्रिन या प्रथिनाचं एक जाळंही तयार होतं. रक्तातल्या द्रव पदार्थात असलेलं प्रोथ्राॅम्बिन नावाचं प्रथिन कामाला लागतं. त्याच्या पासुन थाॅम्बिन नावाचं प्रथिन तयार होतं आणि त्याच्यापासुन पायरी पायरीनं फायब्रीन या धाग्यासारख्या प्रथिनाची निर्मिती होते.या सगळ्यात क्लाॅटिन्ग फॅक्टर्स या नावानं ओळखल्या जाणार्या नऊ घटकांचीही महत्वाची भुमिका असते. हे नऊ घटक एका विशिष्ट क्रमानं काही जीव रासायनिक प्रक्रिया घडवुन अाणतात. पहिल्या घटकानं कार्यान्वित केलेली प्रक्रिया पार पडेपर्यंत दुसर्या पायरीवरची प्रक्रिया सुरूच होऊ शकत नाही. तिच्याशिवाय तिसरी नाही. अशा आखुन दिलेल्या क्रमानंच या प्रक्रिया पार पडतात. त्यातली सर्वात शेवटची प्रक्रिया पार पडल्याशिवाय रक्ताची गूठळी तयार होत नाही. यापैकी कोणत्याही पायरीवरची घटना व्यवस्थित पार पडली नाही तर त्यांची साखळी तुटते आणि रक्त गोठत नाही. रक्तगळीचा म्हणजेच हिमोफेलियाचा विकार झालेल्या व्यक्तिंच्या शरीरात आठव्या क्रमांकाचा घटक तयारच होत नाही. तो तयार करण्याचा आराखडा ज्या जनुकाजवळ असतो ते जनुकच त्यांच्या शरीरातुन बेपत्ता असतं. त्यामुळे मग जराशी जखम झाली तरी त्यांचं रक्त जे वाहायला लागतं ते थांबतच नाही. आता कृत्रिमरित्या हा आठवा घटक तयार करण्याची पद्धती विकसित झालेली असल्यामुळे तो बाजारात मिळू शकतो. त्याच्या मदतीने या विकाराने ग्रस्त झालेल्या व्यक्तींना दिलासा देता येतो.आवश्यकता नसताना रक्त गोठणे हेही शरीराला घातक असतं. त्यासाठी यकृतातून हेपॅरीन नावाच्या रसायनाचा पाझर होत असतो. ते रक्ताची गुठळी न होता त्याचा प्रवाह व्यवस्थित होत राहील याची दक्षता घेतं. पण ज्यावेळी जखम होते त्यावेळी रक्तप्रवाहातून वाहणारं थ्राॅम्बोकायनेज हे विकर हॅपेरीनच्या कामात तात्पूरती बाधा आणून रक्त गोठवायला मदत करतं.*बाळ फोंडके यांचा 'केव्हा ?' या पुस्तकातून*👆🏼*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुझा माझा करे वैराकर देवा | दुःखाचे डोंगर दाखविसी || १ ||बळे बांधोनिया देशी काळाहाती | ऐसे काय चित्ती आले तुझ्या || २ ||आम्ही देवा तुझी केली होती आशा | बरवे ऋषिकेश काळो आले || ३ ||नामा म्हणे देवा करा माझी कीव | नाही तरी जीव माझा घ्याव्या || ४ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुसऱ्याची वाट लावून आनंद घेण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. जोपर्यंत अंगात ताकद आणि हातात पैसे, धनसंपत्ती भरभरून असते तो पर्यंत ह्या सर्वच गोष्टी करायला ही जास्त वेळ लागत नाही. पण, जेव्हा ह्या सर्वच व्यर्थ गोष्टी हळूहळू कमी व्हायला लागतात तेव्हा मात्र मुखातून एक शब्द सुद्धा बाहेर पडत नाही. कारण असा एक कोणीतरी असते तो दिसत नाही मात्र योग्य वेळ आल्यावर त्याची चालते त्यावेळी कितीही शक्तीशाली माणूस असेल तरी त्याच्यासमोर कोणाचे चालत नाही. म्हणून कोणाची वाट लावून आनंद घेण्यात किंवा समाधान मानण्यात सुंदर असे आयुष्य गमावू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कोंबडी आणि कोल्हा*एक कोल्हा एका खोपटात शिरून काही तरी खायला मिळविण्याच्या शोधात असता एक कोंबडी त्याच्या दृष्टीस पडली. पण ती उंच माळ्यावर बसली होती. यामुळे तिच्याजवळ त्याला जाता येईना. मग तिला युक्तीने खाली आणून मारून खावी या हेतूने कोल्हा तिला म्हणाला, ‘कोंबडीताई तुझी हाल हवाल कशी आहे? तू बरेच दिवस आजारी असून घरातच निजून असतेस असं समजलं. तेव्हापासून तुझ्या काळजीनं मला झोप येईना. खरंच ताई, आता तू बरी आहेस का? थोडावेळ खाली उतर म्हणजे मी तुझी नाडी तरी पाहीन.’ याप्रमाणे अघळपघळ बोलून कोल्हा तिची स्तुती करीत असता कोंबडी बसल्या जागेवरूनच म्हणाली, ‘खरच भाऊ, तू जी बातमी ऐकली ती अगदी खरी आहे. असा आजार मला कधीही झाला नव्हता. मी आता खाली उतरून तुझ्याकडे आले असते, पण वैद्याने मला अगदी बजावून सांगितले आहे की, तू आपली जागा सोडून कुठेही जाऊ नकोस. कारण अशक्तपणामुळे जागेवरून हालण्याचे श्रम माझ्याने सोसणार नाहीत, आणि म्हणून माझ्यानं खाली येववत नाही. तरी आता तू यावेळी जा. सध्या मी इतकी अशक्त आहे की, जर मी उतरून खाली असते तर माझे प्राणच जातील.’तात्पर्य – वाजवीपेक्षा अधिक अगत्य दाखवून एखादा माणूस दुसर्याची विनाकारण प्रशंसा करू लागला की, त्या माणसाला काही तरी स्वार्थ साधावयाचा आहे, असे समजून त्याच्या विषयी शक्य तितकी सावधगिरी ठेवावी.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment