✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 10 जुलै 2025💠 वार - गुरुवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link -https://www.facebook.com/share/p/1BFknE7oeM/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वर्षातील 181 वा दिवस 🗓️ महत्त्वाच्या घटना :-• १९२५ – महात्मा गांधींनी 'हरिजन सेवक संघ' स्थापन केला.• १९९१ – बोरिस येल्त्सिन रशियाचे पहिले लोकनियुक्त अध्यक्ष बनले.• २००२ – भारताचा ‘अग्नि-I’ क्षेपणास्त्राचा यशस्वी चाचणी झाली.🎉 जन्मदिन :-• १८७१ – मार्सेल प्रुस्त, प्रसिद्ध फ्रेंच कादंबरीकार.• १९२० – मुल्क राज आनंद, इंग्रजी लेखक (भारत).• १९४९ – सुनील गावसकर, भारतीय क्रिकेटपटू व प्रसिद्ध फलंदाज.• १९५१ – कौशल्या फडके, मराठी लेखिका.🕯️ पुण्यतिथी :-• १९२० – निकोला टेस्ला, महान शास्त्रज्ञ आणि संशोधक.• २००६ – राजेश पायलट, भारतीय राजकारणी.• २०१९ – गोपीनाथ मुंडे, भारतीय राजकारणी व महाराष्ट्रातील लोकप्रिय नेता.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्रासंगिक लेख *आई माझा गुरु*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *टप्पा अनुदानाचा प्रश्न सुटणार, शिक्षकांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक संपन्न, शिक्षकांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक निर्णय घेणार - मंत्री गिरीश महाजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *केंद्रीय गृह मंत्रालय मराठीतून आलेल्या पत्रांना आता मराठी भाषेतूनच उत्तर देणार; संसदीय राजभाषा समितीच्या बैठकीत निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नामिबिया येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नामिबियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यातील हॉटेल उद्योग धोक्याच्या उंबरठ्यावर, शासनाच्या करवाढीमुळे पर्यटनावर परिणाम होण्याची शक्यता, आहार संघटनेकडून चिंता व्यक्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *भारतीय वंशाचे सबीह खान होणार 'अँपल'चे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी, ते जेफ विल्यम्स यांची जागा घेतील*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *शेत जमिनीचे भूसंपादन करताना शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *'आयर्नमॅन 2025' ही स्पर्धा स्वीडनच्या जोनकोपिंग येथे पार पडली, त्यात अभिनेत्री सैयामी खेरने ट्रायथलॉन यशस्वीरीत्या पूर्ण करून वर्षभरात दुसऱ्यांदा रचला जबरदस्त रेकॉर्ड*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 महेश पांडुरंग लबडे, शिक्षक, छत्रपती संभाजीनगर👤 युवराज माने, शिक्षक तथा साहित्यिक, अंबाजोगाई👤 दत्तात्रय धूळशेट्टे, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी, नांदेड 👤 मिलिंद चवरे, शिक्षक, मनपा, नांदेड 👤 लक्ष्मण मुंडकर, शिक्षक, बिलोली 👤 नागनाथ वाढवणे, शिक्षक, नायगाव बा.👤 ज्ञानेश्वर जगताप, शिक्षक, नांदेड 👤 सुरेश सावरगावकर, शिक्षक, नांदेड 👤 दगडू गारकर, शिक्षक, लातूर 👤 चरणसिंह चौहान 👤 अभिजित वऱ्हाडे 👤 पिराजी चन्नावार 👤 भागवत गर्कल 👤 बालाजी दुसेवार 👤 संतोषकुमार यशवंतकर👤 गणेश अंगरवार 👤 प्रकाश येलमे, धर्माबाद👤 विठ्ठल रामलू चिंचलोड, हैद्राबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 22*अशी कोणती गोष्ट आहे, जी वर्षातून तुम्ही एकदाच विकत घेता, आणि वर्ष संपला कि फेकून देता ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - टाईपरायटर••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अज्ञानाची फळे नश्वर असतात. ती सकाळी जन्मतात आणि संध्याकाळी नष्ट होतात. - शंकराचार्य*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणते प्रदूषक जलप्रदूषणासाठी जबाबदार आहेत ?२) एका कसोटीत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज कोण ?३) तथागत गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली तो बोधिवृक्ष सध्या कोणत्या राज्यात आहे ?४) 'बातमी सांगणारा / सांगणारी' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) जगातील सर्वात मोठा आईस्क्रीमचा निर्यातदार देश कोणता ? *उत्तरे :-* १) प्लॅस्टिक कचरा २) शुभमन गील, ४३० धावा ३) बिहार ४) वृत्तनिवेदक / वृत्तनिवेदिका ५) जर्मनी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔬 *सूक्ष्मदर्शक यंत्र कसे कार्य करते ?*🔬 जीवशास्त्राचे प्रयोग दाखवताना तुम्हाला सरांनी सूक्ष्मदर्शक यंत्र दाखवले असेलच. सूक्ष्मदर्शक यंत्रातून पहिल्यावर पेशी किंवा इतर सूक्ष्म जीव कित्येक पटीने मोठे असलेले आपल्याला दिसतात. हे कसे होते ते आता पाहू. साधे काचेचे भिंग घ्या. त्या भिंगातून वर्तमानपत्रातील अक्षरांकडे पाहा. अक्षरे मोठी झालेली दिसतात. सूक्ष्मदर्शक यंत्र याच तत्त्वावर काम करते. सूक्ष्मदर्शक यंत्रांमध्ये भिंगे अशा प्रकारे बसवलेली असतात की त्यांच्या एकत्रित परिणामांमुळे आपल्याला वस्तू हजारो पट मोठ्या दिसतात.पेशी, सूक्ष्म जीवजंतू आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसू शकत नाहीत. कारण त्यांचे मोजमाप १ मी.मी. च्या हजाराव्या भागाच्या प्रमाणात केले जाते. विषाणू तर याहूनही लहान असतात. त्यामुळे हजारो पट मोठे केल्यानंतरच हे जीव वा पेशी आपल्याला दिसू शकतात. पेशी व सूक्ष्म जीवजंतुच्या परीक्षणामुळे रोगाची अवस्था समजते आणि व्यक्ती रोगी आहे का ते कळते. रोग बरा होतो आहे काय तेही समजते. क्षयरोग, हिवताप, कुष्ठरोग, कॉलरा, हगवण आदी रोगांमध्ये तसेच रक्तक्षय, रक्ताचा कर्करोग, इतर कर्करोग यातदेखील सूक्ष्मदर्शकद्वारे केलेल्या तपासणीमुळे रोगाचे निदान होते व उपचार करण्यास मदत होते.असे हे सूक्ष्मदर्शक यंत्र म्हणजे सूक्ष्म जीवांच्या अजब गुहेत प्रवेश करण्यासाठी मानवाला लाभलेला जादूचा दिवाच बनले आहे.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आज सोनियाचा दिनू | वर्षे अमृताचा धनु || १ ||हरी पहिला रे हरी पहिला रे |सबाह्यअभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी || २ ||दृढविटे मन मुळी | विराजित वनमाळी || ३ ||बरवा संतसमागमू | प्रगटला आत्मारामु || ४ ||कृपासिंधु करुणाकरू | बणररखुमादेवीवरू || ५ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समोर उभी दिसणारी व्यक्ती गरीब असेल म्हणजे ती लाचार असेलच असेही नाही. बरेचदा त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन हा आपला वेगळा असतो म्हणून ती तशीच दिसत असते आणि तिथेच श्रीमंत दिसणाऱ्या व्यक्तीकडे आपण मोठ्या आदराने बघून मानसन्मान देतो कधीकाळी आपल्या याच वागणुकीमुळे लाचार बनण्याची आपल्यावर वेळ येत असते. म्हणून गरीब असेल त्याला लाचार समजू नये आणि श्रीमंत दिसणाऱ्या व्यक्तीला डोक्यावर घेऊन फिरू नये.कारण ज्याला डोक्यावर घेऊन फिरल्याने लाचार बनण्याची वेळ येते अन् एखाद्याला हिनवल्याने आपल्यातील माणुसकी नावाची संपत्ती त्या क्षणातच संपत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*खरे दुःख*एक सोनार होता. त्याच्या दुकानासमोरच एका लोहाराचे दुकान होते. सोनार जेव्हा काम करत असे तेंव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज होत असे पण जेंव्हा लोहार काम करत असे तेंव्हा मात्र लोखंडाचे काम होत असल्याने मोठा आवाज होत असे. तो आवाज मोठा कर्णकर्कश असे. एके दिवशी सोनाराच्या दुकानातील एक सोन्याचा कण कसा कोण जाणे पण लोहाराच्या दुकानात जावून पडला. त्या सोन्याच्या कणाची भेट एका लोखंडाच्या कणाशी झाली. खूप दिवसांची ओळख असल्यासारखे ते एकमेकांशी बोलू लागले. सोन्याच्या कणाने लोखंडाच्या कणाला म्हंटले,"दादा, आपले दुःख तर खरे एकसमान आहे. दोघानाही आगीत तापवले जाते आणि हातोड्याने ठोकले जाते. मी तर बाबा चुपचाप हे सहन करतो, पण तुझे काय?" लोखंडाचा कण सोन्याच्या कणाकडे पाहून दुःखी स्वरात म्हणाला,"अरे ! तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. दोघानाही तापवणारी आग एकच आहे आणि ठोकणारा हातोडाहि एकाच धातूचा आहे. पण खरे दुःख याचे आहे कि तुला ठोकणारा हातोडा हा तुझा कोणीच लागत नाही पण मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा हा नात्याने माझा भाऊच लागतो. दुसऱ्याने दिलेल्या दुःखापेक्षा स्वकीयांनी दिलेला त्रास हा अगदी हृदयात वार करून जातो."तात्पर्य- आपल्या माणसांकडून होणारा त्रास हा कायमच दुःखदायक वाटतो. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment