✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 07 जुलै 2025💠 वार - सोमवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/15s2mLnVD7/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वर्षातील 188 वा दिवस 🔹 महत्त्वाच्या घटना:• १९२८ – स्लाईस ब्रेड (स्लीस करून विकली जाणारी ब्रेड) प्रथमच विक्रीस आली. ही घटना "The best thing since sliced bread" या प्रसिद्ध वाक्याशी संबंधित आहे.• १९८३ – भारताने INS Virat या विमानवाहू नौकेची खरेदी केली.• २००५ – लंडनमध्ये चार आत्मघातकी बाँबस्फोट झाले, ज्यात ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.🎂 जन्मदिवस / जन्म:• १८६५ – डॉ. अन्‌बेसेन्ट – भारतात होऊन गेलेल्या प्रसिद्ध थिऑसॉफिस्ट, शिक्षणतज्ज्ञ व महिला हक्कांच्या समर्थक.• १९०१ – व्ही. बी. कांबळे – दलित चळवळीतील एक विचारवंत व नेते.• १९५२ – महेंद्र कपूर – प्रसिद्ध पार्श्वगायक. (तारीख कधी कधी ९ जानेवारीही नमूद केली जाते.)• १९८५ – रवींद्र जडेजा – भारतीय क्रिकेटपटू.⚰️ मृत्यू:• १९९९ – कॅ. विक्रम बत्रा – कारगिल युद्धातील शहीद वीर योद्धा, परमवीर चक्र सन्मानित.• २००१ – सत्यजित राय – प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक (जन्म: १९२१) – काही संदर्भांत तारीख वेगळी असते.🗓️ अन्य दिनविशेष:🌹 जागतिक चॉकलेट दिन ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गरिबांसाठी शिक्षण झाले महाग*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सपत्नीक महापूजा; राज्याच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *येत्या 8 आणि 9 जुलै रोजी, अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी हजारो शिक्षक मुंबईच्या आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यासाठी एकत्र येतील*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! PM किसान योजनेचा 20 वा हप्ता 18 जुलै रोजी जमा होण्याची शक्यता !*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *दलाई लामा यांच्या 90 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या शुभेच्छा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सार्वजनिक वाहनामध्ये बसाविणार पॅनिक बटन, मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *एका आठवड्यात पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादी होणार जाहीर - डॉ. महेश पालकर अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडला 336 रणने हरवून मालिका 1-1 बरोबरीत आकाशदीपचे सहा बळी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* ● दत्ताहारी पाटील कदम बेलगुजरीकर, भाजपा तालुका उपाध्यक्ष, धर्माबाद● प्रज्ञा घोडके, साहित्यिक● रमेश चांडके, हैद्राबाद● ऋषीकेश देशमुख, साहित्यिक● सय्यद युनूस, मा. मुख्याध्यापक, उर्दू हायस्कुल● संदीप डोंगरे● महेश जोशी, पत्रकार, धर्माबाद ● श्रीकांत माने● प्रकाश गोरठकर● विजय पाटील रातोळीकर● माधव कांबळे● आशिद लाव्हाळे● ज्वालासिंह घायाळे● दिगंबर पांचाळ● हरी ओम राठोड● व्यंकट ताटेवाड● लक्ष्मण कांबळे● पिराजी कटकमवार● हणमंत जाधव● जगन्नाथ पुलकंठवार● बालासाहेब पेंडलोड● साईनाथ वाघळे● गजानन काठेवाडे, PSI, बरबडा ● साईनाथ हामंद, शिक्षक, धर्माबाद ● शंकर रामलू बलीकोंडावार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 19*पाण्यातून होतो माझा जन्म आणि पाण्यातच जातो मी मरून,जेवणाशी आहे माझं जवळच नातं. ओळखा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - कोळसा ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ताठ उभे रहा, ताठ बसा आणि आपल्या एकूण एक कामात व्यवस्थित आणि निर्मळ रहा. ही सर्व कामे तुमच्या आंतरिक स्थितीचे निदर्शक होऊ द्या. - महात्मा गांधी*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) नऊ रंगाचा असलेला पक्षी कोणता ?२) एका कसोटीत द्विशतक आणि शतक झळकविणारे भारतीय फलंदाज कोण ?३) पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे ?४) 'विनामूल्य पाणी मिळण्याचे ठिकाण' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) कोकण रेल्वे कोणत्या साली सुरू झाली ? *उत्तरे :-* १) भारतीय पिट्टा, नवरंग, Indian Pitta २) सुनील गावस्कर, शुभमन गील ३) H2O ४) पाणपोई ५) सन १९९८*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *रिएन्फोर्समेंट* 📙छपरावर टाकलेला पत्रा पन्हाळीचा का असतो ? स्कूटरच्या पत्र्याला विविध गोलांवर आतून जोड का दिला जातो ? ट्रकचा व मोटारचा पुढचा बंपर इंग्रज सी आकाराचाच का बनवतात ? घराच्या कॉलम व तुळ्यांमध्ये सिमेंट काँक्रिटमध्ये सळ्या का घालतात ? पोलादी गर्डरचा आकार इंग्रजी I प्रमाणे का असतो ?या सर्वाचे उत्तर एकच आहे. ताण सहन करण्यासाठी कमकुवत जागी विशेष आधार म्हणजेच रिएन्फोर्समेंट (reinforcement) द्यायला या गोष्टी केलेल्या असतात. घरावरचा पत्रा सरळ असता, तर त्यावर कोणी पाय दिला तर तो त्या जागी वाकला असता. पन्हाळीच्या आकाराने तो वाकू शकत नाही. तीच गोष्ट स्कूटरच्या पत्र्याची. अन्यथा साधी जोरात बुट्टी मारली, तरी त्याला कोच आला असता. बंपरचा आकार इंग्रजी सीप्रमाणे केल्याने कितीही जोरात धडक बसली तरी तो वाकू शकत नाही. 'आय'चा आकार असलेला पोलादी गर्डर तर कित्येक टनांचे वजन लीलया पेलू शकतो.काँक्रिटच्या बाबतीत जरा वेगळी परिस्थिती आहे. सिमेंट काँक्रीटचा ठोकळा केवळ वरून दाब दिला, तर कित्येक टनांचा दाब सहन करतो. पण समजा, काँक्रिटचा लांबुळका ठोकळा दोन बाजूंनी पकडून ओढायला सुरुवात केली; तर तो तडे जाऊन तुटायला वेळ लागत नाही. याउलट लोखंडाचे आहे. लोखंडावर प्रचंड दाब दिल्यास त्याचा आकार कदाचित बदलेल, पण लोखंड, सळई प्रचंड ताण सहन करू शकते. मग या दोन गोष्टी एकत्र केल्या तर ?नेमके तेच बांधकामशास्त्रात रिइन्फोर्स्ड काँक्रिट बनवून तयार केले आहे. सर्व प्रकारचा दाब काँक्रिट सहन करते, तर सर्व प्रकारचा ताण आतील लोखंडी सळ्या सहन करतात. कितीही उंच बांधकाम असो किंवा कितीही लांब अंतराची काँक्रिटची तुळई असो; रिएन्फोर्सड काँक्रिट वापरले असले की, चिंता करायचे कारणच राहत नाही.निसर्गातसुद्धा हे रिइन्फोर्समेंटचे तत्त्व कित्येक ठिकाणी अमलात आलेले दिसते. फक्त त्यादृष्टीने बघायची नजर मात्र पाहिजे. शंख बघा किंवा शिंपला; जिथे वक्राकृती आकार येतो, तिथे आतील बाजूने बारीक जाड रेषांनी रिइन्फोर्समेंट दिलेली असते.उंच वाढणारे मोठ्या बुंध्याचे कोणतेही झाड बघा, त्याच्या जमिनीपासून दोन तीन फूट उंचीचा बुंधा हा उलट्यासुलट्या दिशेने पन्हाळीप्रमाणे आकार घेऊन मगच जमिनीत शिरलेला दिसतो. म्हणजेच वाऱ्याचा ताण सहन करण्यासाठी या पन्हाळीमुळे बुंध्याला पूर्ण ताकद मिळत जाते.याच रिएन्फोर्समेंटच्या तत्त्वानुसार भरीव लोखंडी कांबीपेक्षा पोकळ लोखंडी कांब वजनाने हलकी असून जास्त ताकदवान असते, हे तुम्ही अनेकदा वाचले असेलच.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••इंद्रायणी कांठी देवाची आळंदी | लागली समाधी ज्ञानेशाची || धृ ||ज्ञानियांची राजा भोगतो राणीव | नाचती वैष्णव मांगे पुढे || १ ||मागे पुढे दाते ज्ञानाचा उजेड | अंगणात झाड कैवल्याचे || २ ||उजेडी राहिले उजेड होऊन | निवृत्ती सोपान मुक्ताबाई || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चांगल्या विषयावर चिंतन व मनन करावे. चिंतन व मनन केल्याने विचारशक्तीला चालना मिळते.यामुळे आपले काहीच नुकसान होत नाही उलट चांगले विचार करण्याची आपल्याला सवय लागत असते आणि त्याच सवयीमुळे आपल्यात परिवर्तन सुद्धा तेवढेच होत असते. आणि नवीन दिशा सुद्धा सापडत असते. त्यामुळे आपलाच विकास होत नाही तर त्यामुळे इतरांना ही त्यातून प्रेरणा मिळत असते.म्हणून ह्या प्रकारची सवय लावावी जेणेकरून आपली लक्ष इकडे, तिकडे जाणार नाही. आणि आपला अनमोल वेळ ही वाया जाणार नाही.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुरु शिष्य भ्रमंतीला निघाले होते. फिरता फिरता ते एका जंगलात येवून पोहोचले. जंगलात काही अंतरावर एक झरा वाहत होता. गुरुजींना तहान लागली होती. त्यांनी शिष्याच्या हाती कमंडलू दिले आणि त्याला पाणी घेवून येण्यास सांगितले. शिष्य झऱ्या पाशी गेला आणि त्याला असे दिसले कि तेथून नुकतेच बैल गाड्या गेल्या आहेत, बैल पाण्यातून गेल्याने पाणी खूप गढूळ झाले आहे. पाण्यात झाडाची पाने पडलेली आहेत. त्याने विचार केला असे घाण झालेले पाणी गुरूंसाठी नेणे योग्य नाही. तो तसाच परत गुरूंकडे गेला आणि म्हणाला,"गुरुजी, पाणी खूप गढूळ आहे, आपल्याला दुसरी काही तरी व्यवस्था पहावी लागेल." गुरुजी म्हणाले," अरे त्यापेक्षा तू असे कर पुन्हा त्या झऱ्यापाशी जा आणि पुन्हा पाणी आणण्याचा प्रयत्न कर." शिष्य गेला, त्याला पुन्हा पाणी गढूळ दिसले, तो परत आला, गुरुनी त्याला परत पाठवले, असे चार पाच वेळेला झाले. शेवटी शिष्य कंटाळला, त्याच्या चेहऱ्यावर नाराजीचे आणि कंटाळलेले भाव दिसू लागले पण शिष्य गुरुज्ञा मोडायला तयार नव्हता. गुरुनी त्याला परत पाणी आणायला पाठवले. आताच्या वेळी त्याला मात्र आश्चर्य वाटले कारण या वेळी पाणी अगदी नितळ, स्वछ नि निर्मळ होते. त्याने ते पाणी कमंडलू मध्ये भरले आणि गुरूंसाठी घेवून आला. गुरुनी पाणी प्राशन केले आणि शिष्याला म्हणाले,"वत्सा ! आपल्या मनात सुद्धा असेच कुविचारांचे बैल धिंगाणा घालत असतात. ते मनाची निर्मळता कमी करून मनाला मलिन करण्याचा प्रयत्न करतात. पण आपण त्यापासून सावध राहिले पाहिजे. कुविचारांचा प्रभाव आपल्या मनावर होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे. मनाच्या झरयातील पाणी शांत होण्याची प्रतीक्षा जर आपण केली तर मनात कायम स्वच्छ, चांगले विचार येतील. भावनेच्या भरात कधीही निर्णय घेवू नये."तात्पर्य - भावनेच्‍या भरात कोणतेही निर्णय घेऊ नयेत. मनात कायम स्‍वच्‍छ, चांगले विचार कसे येतील हेच पाहावे•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment