✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11 जुलै 2025💠 वार - शुक्रवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1989LZFxLJ/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वर्षातील 182 वा दिवस 🌍 महत्त्वाच्या घटना :- • १९७९ – अमेरिका देशाचे अंतराळ यान स्कायलॅब पृथ्वीवर कोसळले.• १९८७ – जगाची लोकसंख्या ५ अब्ज झाली, म्हणून हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून घोषित करण्यात आला.🎉 जन्मदिवस :- • १८९७ – नारायण माळी, प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक व समाजसेवक.• १९३४ – ज्योतीर्मयी सिकदर, भारताच्या सुवर्णपदक विजेत्या धावपटू (१९९८ आशियाई क्रीडा स्पर्धा).🕯️ मृत्यू :- • १९९६ – गोविंद निहलानी, प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक व छायाचित्रकार.• २००६ – मुम्बईमध्ये लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये सुमारे २०९ लोकांचा मृत्यू झाला.🌐 महत्त्वाचे दिन :- 🌏 जागतिक लोकसंख्या दिन (World Population Day)१९८९ पासून संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने साजरा केला जातो.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आज जागतिक लोकसंख्या दिन त्यानिमित्ताने प्रासंगिक लेख *लोकसंख्या शिक्षणात शिक्षकांची भूमिका*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *विकसित भारतासाठी शैक्षणिक धोरण महत्वाचे, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे वक्तव्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *गणेशोत्सव महाराष्ट्राचा महोत्सव म्हणून घोषित; भाजप नेते आशिष शेलारांची विधानसभेत घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राज्य जनसुरक्षा विधेयक विधानसभेत सादर; शहरी नक्षलवादाला लगाम बसणार, सार्वजनिक सुव्यवस्थेस किंवा राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या संघटनांवर कडक कारवाई होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबईत अधिवेशन सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गुपचूप दिल्ली गाठली, भाजपच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी; राजकीय वर्तुळात खळबळ*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावेंच्या जिल्ह्यातच यशवंत विद्यार्थी योजनेत भ्रष्टाचार; आता सावेंकडून प्रकरणाची गंभीर दखल; म्हणाले, सुविधा न देणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करू*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबई शिक्षण उपसंचालक संदीप सांगवे निलंबित, SIT चौकशी होणार; 5 कोटी घेऊन विधानसभा परिसरात फिरत असल्याचा आरोप*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *इंग्लंड - लॉर्ड्सच्या मैदानावर क्रिकेटच्या देवाचं पोट्रेट अनावरण, सचिन तेंडुलकरला आठवले 1989 चे दिवस; म्हणाला, माझ्यासाठी शब्दात व्यक्त न होता येणारा क्षण*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 प्रकाश नाईक, BDO, पंचायत समिती खुलताबाद👤 अनुपमा अजय मुंजे, शिक्षिका तथा साहित्यिक 👤 प्रभू देशमुख, मुख्याध्यापक, बिलोली 👤 स्वप्नील शिंदे 👤 इंजि. साईकिरण अवधूतवार, हैद्राबाद 👤 संतोष चव्हाण, शिक्षक👤 शिवाजी सूर्यवंशी, शिक्षक, हदगांव 👤 प्रमोद मंगनाळे, शिक्षक नेते, नांदेड *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 23*असा कोण आहे, जो आपली सगळी कामे हाताऐवजी नाकाने करतो ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - कॅलेंडर••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्ञान हे बाहेरून आत ओतण्याची वस्तू नसून आतून बाहेरून अभिव्यक्त होणारी एक शक्ती आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताची पहिली अम्पुटी जलतरणपटू कोण ?२) २१ एप्रिल १९४७ ला भारताचे पहिले गृहमंत्री सरदार पटेल यांनी नवनियुक्त प्रशासकीय अधिकाऱ्यांना संबोधताना नागरी सेवकांना काय संबोधले ?३) पहिला नागरी सेवा दिवस कोणत्या वर्षापासून साजरा केला जातो ?४) 'कुस्ती खेळण्याची जागा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) भारतातील नागरी सेवांचा पाया कोणी घातला ? *उत्तरे :-* १) शाश्रुती विनायक नाकाडे, ताडगाव, अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया २) भारताची पोलादी चौकट ३) २१ एप्रिल २००६ ४) आखाडा, हौद ५) वॉरन हेस्टिंग्ज*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌍 *पृथ्वीचा परीघ किती आहे ?* 🌍 ************************या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी आपल्याला आपली पृथ्वी एखाद्या चेंडूसारखी गोल, गरगरीत, वाटोळी आहे हे गृहित धरायला हवं. वास्तवात ती तशी नाही. दोन्ही ध्रुवांच्या इथे ती जराशी दबल्यासारखी आहे. उलट विषुववृत्ताच्या ठिकाणी ती जराशी फुगल्यासारखी आहे. स्वतःभोवती सतत ती गरगर फिरत असते, त्यामुळे तिच्या आकारात हा फरक झालेला आहे. तरीही तिचा परीघ किती आहे हे समजून घेण्यासाठी आपण ती गरगरीत आहे, असं समजल्यास फारसा फरक पडणार नाही. आता परीघ म्हणजे कोणत्याही एका ठिकाणाहून आपण पृथ्वीच्या पृष्ठभागाला धरून सरळ प्रवास करत निघालो तर परत त्याच ठिकाणी पोहोचेपर्यंत आपण किती मजल मारली असेल, याचं गणित आहे. तेव्हा अशा प्रवासासाठी असलेल्या साधनांवरूनच आपण या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू शकतो. पृथ्वीच्या काळी समुद्रावर प्रवास करणाऱ्या नावाड्यांना आपण कुठे आहोत, कुठे चाललो आहोत हे समजण्यासाठी फारशी साधने नव्हती. त्यामुळे आकाशातल्या ग्रहगोलांनाच विचारात त्यांची वाटचाल होत असे. उत्तर गोलार्धात ध्रुवतारा उत्तर दिशा दाखवत असे. त्याच्यानुसार मग इतर दिशा ओळखल्या जात. तसंच आपण किती मजल मारली आहे हे समजण्यासाठीही अशाच गणताची मदत घेतली जात असे. त्यातूनच नॉटिकल माईल म्हणजेच 'नौकायानातला मैल' मैल ही संकल्पना पुढे आली. याचंच संक्षिप्तीकरण होऊन 'नाॅट' हे एकक रूढ झालं आहे. त्यामुळे जहाजांचा वेग हा दर ताशी अमुक इतके नाॅट असा मोजला जातो. जमिनीवरून प्रवास करत असतानाही आपण मैल हे अंतर मोजण्याचे एक एकक पाळतो; पण नॉटिकल माईल आणि आपल्या नेहमीच्या ओळखीचा मैल यांच्यात फरक आहे, कारण त्या एककांची व्याख्याच वेगळी आहे. पृथ्वी गोलाकार असल्यामुळे त्या गोलाचे ३६० अंश संभवतात. या वर्तुळापैकी एक मिनिटाची आर्क म्हणजे एक नॉटिकल माईल अशी त्याची व्याख्या केली गेली आहे. म्हणजेच या वर्तुळाच्या एक अंशाच्या एक-साठांश इतक्या भागाचा प्रवास केल्यास एक नॉटिकल माईल अंतर कापलं जातं. तेव्हा संपूर्ण ३६० अंशांचा प्रवास करायचा झाल्यास ६० x ३६० म्हणजेच २१६०० नॉटिकल माईल इतकं अंतर होतं ; पण एक नॉटिकल मैल हा आपल्या जमिनीवरच्या मैलापेक्षा मोठा असल्यामुळे हेच अंतर २४८५७ मैल किंवा ४०००३ किलोमीटर इतकं भरतं.*डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातुन*👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वेढा वेढा रे पंढरी | मोर्चेवला भीमातीरी || १ ||चला चला संतजन | करू देवासी भांडण || २ ||लुटा लुटा पंढरपूर | धारा रखुमाईचा वर || ३ ||तुका म्हणे चला चला | घाव निशाणी घातका || ४ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुसऱ्याची वाट लावून आनंद घेण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. जो पर्यंत अंगात ताकद आणि हातात पैसे, धनसंपत्ती भरभरून असते तो पर्यंत ह्या सर्वच गोष्टी करायला ही जास्त वेळ लागत नाही. पण जेव्हा ह्या सर्वच व्यर्थ गोष्टी हळूहळू कमी व्हायला लागतात तेव्हा मात्र मुखातून एक शब्द सुद्धा बाहेर पडत नाही. कारण असा एक कोणीतरी असते तो दिसत नाही मात्र योग्य वेळ आल्यावर त्याची चालते त्यावेळी कितीही शक्तीशाली माणूस असेल तरी त्याच्यासमोर कोणाचे चालत नाही. म्हणून कोणाची वाट लावून आनंद घेण्यात किंवा समाधान मानण्यात सुंदर असे आयुष्य गमावू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*ऋषी अष्टावक्र*हिंदू धर्मशास्त्रामध्ये अष्टावक्र नावाचे एक विचारवंत होऊन गेले. असे म्हणतात की अष्टावक्र हे केवळ कुरुपच नव्हते तर त्यांचे शरीरही बेढब होते. त्यांचे शरीर आठ ठिकाणी वाकडे होते म्हणून त्यांना अष्टावक्र हे म्हटले जात होते. ही एक प्रसिद्ध कथा आहे. अष्टावक्र ऋषी एकदा राजा जनक यांच्या दरबारात गेले. दोन्ही बाजूंनी उंच आसनावर सभासद, ज्ञानी, पंडीत, ज्ञानकर्मी बसले आणि राजा जनकाचे सिंहासन होते. अष्टावक्र ऋषींना द्वारपालाने रोखले नाही. अष्टावक्र त्यावेळी किशोरवयीन होते. अष्टावक्राने जेव्हा राजा जनकाच्या मुख्य सभामंडपात प्रवेश केला तेव्हा त्याच्यावर नजर पडताच सर्वजण एकमेकांकडे पाहून हसू लागले होते. इतकेच नाही तर त्यांचे हसू थांबत नव्हते. हे पाहून अष्टावक्राला प्रथम काहीच समजले नाही, मात्र त्यानंतर त्याला आपल्यावर हे सर्वजण हसतात म्हणून लक्षात आले. हे पाहून तोही जोरजोरात हसू लागला. जनक राजाने सभेला शांत होण्याचे आवाहन केले, सभा शांत होताच राजा जनकाने अष्टावक्राला विचारले,'' हे साधू, हे लोक तुमच्यावर हसतात हे माझ्या लक्षात आले पण तुम्ही का हसता आहात हे समजले नाही'' अष्टवक्राने उत्तर दिले,'' महाराज, मला वाटले की राजा जनक जो ज्ञानी, विचारवंत आहे त्याच्या सभेत ज्ञानी, विचारवंत, हुशार लोक असतील पण इथे तर सर्वच जण कातडीकडे व बाह्य स्वरूपाकडे पाहणारे लोक आहेत. माझ्या रूपाकडे पाहून हे लोक मला हसत होते हे पाहून मला यांच्या बुद्धीची कीव आली व हसू फुटले.'' जनक राजासह सर्व सभा अष्टावक्र ऋषींच्या या उत्तराने शरमिंदी झाली. तात्पर्य - माणसाचे महत्व त्याच्या शरीरावर नाही तर त्याचे ज्ञान, परिश्रम आणि कर्मावर आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment