✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 09 जुलै 2025💠 वार - बुधवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1YHW8n3mJe/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📌 महत्त्वाच्या घटना :-🗓 १८१६ – दु:खद उन्हाळा दरम्यान अमेरिकेत बर्फवृष्टी झाली, जी जागतिक हवामानातील बदलामुळे झाली होती.🗓 १८७५ – बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजची स्थापना झाली.🗓 १९९१ – भारताचे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली आर्थिक उदारीकरण प्रक्रिया सुरू झाली.🎉 जन्मदिवस :-👨‍🔬 १८५६ – निकोला टेस्ला, प्रसिद्ध वैज्ञानिक आणि विद्युत अभियंता (जन्म: क्रोएशिया).🎬 १९४६ – अमृता प्रीतम, पंजाबी साहित्यिक लेखिका.🎵 १९६४ – सोनू निगम, भारतीय गायक व अभिनेते.🕯 मृत्यू :- ⚰️ १९७४ – गुरुनाथ बेडेकर, मराठी साहित्यिक, समीक्षक.⚰️ २००२ – केशवसुत यांच्या पत्नी शारदा, ज्यांनी त्यांच्या कविता प्रसिद्ध केल्या.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*पावसाशी मारलेल्या गप्पा*जरूर वाचावे आणि आपल्या प्रतिक्रिया तेथेच comment करावे. ..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या आणि कामगार कायद्यांच्या विरोधात देशातील कामगार संघटनेने 9 जुलै रोजी केली भारत बंदची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *एक देश-एक निवडणूक संविधानाच्या मूलभूत रचनेचे उल्लंघन नाही, माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे संसदीय समितीला लेखी मत*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत बसमध्ये मोफत प्रवास योजेनेत बदल, ट्रान्सजेंडर आणि दिल्लीचे रहिवाशी असलेले महिलाच बसमध्ये मोफत प्रवास करू शकतील*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *डोनाल्ड ट्रम्प यांनी आता 14 देशांवर लादला कर, म्यानमारकडून आकारले सर्वाधिक शुल्क, 1 ऑगस्टपासून होणार अंमलबजावणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *महाराष्ट्रातील सर्वात मोठे APMC मार्केट नवी मुंबईतून स्थलांतरित करण्याचे आदेश; NMMC ने सुचवला 14 गावांचा पर्याय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भूषण गवई यांची सर न्यायाधीश पदी निवड झाल्या बद्दल त्यांचे विधानमंडळात सत्कार, भारताची राज्यघटना या विषयी ऐतिहासिक मार्गदर्शन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत विरुद्ध इंग्लंड - तिसरा कसोटी सामना उद्यापासून लॉर्ड्स मैदानावर खेळला जाणार.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 पंडित पवळे, सेवानिवृत्त, शिक्षक 👤 महेश जाधव 👤 साईनाथ विश्वब्रह्मा 👤 अनिल उडतेवार *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक *लिहतो पण पेन नाही, चालतो पण गाडी नाही, टिक टिक करतो पण घड्याळ नाही, सांगा बर मी कोण आहे?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - रस्ता ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आत्मसमर्पणाच्या भावनेने जे आपले जीवन घालवितात, त्यांना आपल्या पुढील मार्ग स्वच्छ दिसतो. - महात्मा गांधी*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगात एकूण अण्वस्त्रधारी देश किती आहेत ?२) १९ वर्षाखालील वनडे क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडू शतक झळकविण्याचा विक्रम कोणी केला ?३) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे ( MPSC ) मुख्यालय कोठे आहे ?४) 'बातमी आणून देणारा / देणारी' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) देशातील कोणते विद्यापीठ पहिले सहकार विद्यापीठ ठरणार आहे ? *उत्तरे :-* १) नऊ - रशिया, चीन, फ्रान्स, ब्रिटन, उत्तर कोरिया, भारत, पाकिस्तान २) वैभव सूर्यवंशी, भारत, ५२ चेंडू ३) बेलापूर, नवी मुंबई ४) वार्ताहर ५) त्रिभुवन सहकारी विद्यापीठ, गुजरात*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 एनिमा म्हणजे काय ? 📕शौचास होत नसेल, तर कधी रुग्णास शस्त्रक्रियेपूर्वी पोट साफ होण्यासाठी गुदद्वाराच्या मार्गाने काही औषधी मोठ्या आतड्यात सोडतात, यास 'एनिमा' असे म्हणतात. जेवणात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश नसल्यास व आहार समतोल नसल्यास बद्धकोष्ठाचा त्रास होतो. कधी कधी मळाचे खडेही तयार होतात. लहान मुलांना संडास होत नसेल, तर कागदाची पुंगळी करून त्याला साबण लावून ती गुदद्वारात सारल्यास संडास होते किंवा गोडेतेल सोडल्यासही मळाचे खडे सुटतात व न दुखता संडास होते. संडास होत नसल्यास पोटातून औषध घेण्यापेक्षा गुदद्वारातून उपचार करणे सोयीचे ठरते. एनिमामध्ये पाव लिटर, अर्धा लिटर साबणाचे पाणी रबरी नळीच्या साहाय्याने व्यक्तीच्या गुदद्वारातून आत सोडतात. नंतर मळाचे खडे सुटून संडास होते. विष्ठा गोळा करण्यासाठी भांड्याची सोयसुद्धा असते. आयुर्वेद चिकित्सापद्धतीमध्ये गुदद्वारावाटे औषधी प्रविष्ट करून चिकित्सा केली जाते. हथा चिकित्सेस बस्ती चिकित्सा म्हणतात. मळास बाहेर काढणे याशिवाय इतर अनेक व्याधींची चिकित्सा, औषधी काढे व तेल गुदद्वारावाटे देऊन केली जाते. एनिमाचा वापर वारंवार करण्यापेक्षा आहारात योग्य ते बदल घडवून आणणेच आरोग्यपूर्ण जीवनाच्या दृष्टीने चांगले.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिले आज || धृ ||भाग गेला शीण गेला, अवघा झाला आनंद || १ ||प्रेम रसे बैसली मिठी, आवडी लाठी मुखाशी || २ ||तुका म्हणे आम्हा जोगे, विठ्ठल घोंगे खरे माप || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मेहनतीचे फळ जेव्हा मिळते तेव्हा जगण्याचा खरा अर्थ कळत असतो. कारण मेहनत करताना आपला स्वाभिमान आणि सत्यता आपल्यात कायम असतो आणि यामुळेच समाधान तर मिळतोच सोबतच कोणासमोर मान खाली घालून राहण्याची आपल्यावर वेळ येत नाही म्हणून जे काही मिळवायचे असेल ते आपल्या मेहनतीने, स्वाभिमानाने मिळवावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*माणुसकी*इसाप हा एक गुलाम होता, पण आपल्‍या विद्वत्तेच्‍या जोरावर त्‍याने समाजात अत्‍युच्‍च स्‍थान निर्माण केले होते, ज्‍या धनाढ्याने इसापला विकत घेतले होते त्‍याचे नाव होते क्‍झेनथस, इसाप आपल्‍या आचरणातून क्‍झेनथसला सतत शिकवण देत असे.ज्‍या काळी रोममध्‍ये सार्वजनिक स्‍नानगृहे असत, सज्‍जन लोक सार्वजनिक स्‍नानगृहात जाऊन आंघोळ करत असत. एकदा क्‍झेनथसने इसापला स्‍नानगृहात गर्दी आहे की रिकामे आहे हे पाहून येण्‍यास सांगितले. इसापने जाऊन पाहिले तर तेथे बरेच लोक आंघोळीसाठी जमा झाले होते. तेवढयात त्‍याचे लक्ष स्‍नानगृहाच्‍या दारासमोर पडलेल्‍या एका मोठ्या दगडाकडे गेले. अनेक लोक त्‍या दगडाला अडखळून पडत होते, दगड रस्‍त्‍यात कसा म्‍हणून शिव्‍या देत होते. तेवढ्यात एक माणूस आला तोही त्‍या दगडाला अडखळून पडला, त्‍यानेही शिवी हासडली पण तो दगड त्‍याने उचलून दूर फेकला आणि मगच तो स्‍नानगृहात गेला.हे सर्व पाहून इसाप घरी गेला व मालकाला सांगितले की, स्‍नानगृहात फक्त एकच माणूस आंघोळीसाठी आला आहे. आंघोळीच्‍या पूर्ण तयारीनिशी क्‍झेनथस स्‍नानगृहात पोहोचला आणि पाहतो तर काय, तेथे तर प्रचंड गर्दी आहे. क्‍झेनथसने इसापला विचारले तू तर म्‍हणाला इथे फक्त एक माणूस आहे पण इथे तर प्रचंड गर्दी दिसते. इसाप उत्तरला,'' इथे रस्‍त्यात एक दगड पडला होता, येथे येणारा प्रत्‍येकजण दगडाला अडखळून पडत होता, शिव्‍या देत होता पण दगड उचलून टाकण्‍याचे शहाणपण फक्त एकानेच दाखविले. त्‍यामुळे फक्त एकच माणूस असल्‍याचे मी आपणास सांगितले.'' क्‍झेनथस निरूत्तर झाला.तात्‍पर्य - फक्त जीवंत असणे ही ओळख नसून जीवनाचा सदुपयोगच तुम्‍हाला स्‍वतंत्र ओळख देऊ शकते. आपल्‍या जीवनाचा इतरांनाही उपयोग व्‍हावा हेच खरे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment