✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 12 जुलै 2025💠 वार - शनिवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~समूहात join होण्यासाठी Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9?mode=ac_c••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌟 महत्वाच्या घटना :-• १९०९ – भारतात ‘काळ्या कायद्यांविरुद्ध’ लढा देणारे ‘हिंद स्वराज’ हे महात्मा गांधींचं पुस्तक प्रथमच प्रकाशित झालं.• १९६२ – अमेरिकेने पहिला दूरसंचार उपग्रह "टेलस्टार-1" यशस्वीरित्या प्रक्षेपित केला.• १९९३ – महाराष्ट्रात मुंबई येथे भीषण पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली.🎉 जन्मदिवस :-• १८९५ – बकुळा रिव्हा (बौद्ध भिक्षुणी व भारतीय संसदीय सदस्य)• १९०४ – पाब्लो नेरुदा, नोबेल पुरस्कार विजेते चिलीचे कवी.• १९२७ – विलासराव देशमुख, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री.🕯️ स्मृतिदिन :-• १९२० – जोसफ रॉक, प्रसिद्ध वनस्पती शास्त्रज्ञ.• २००३ – बाळासाहेब देसाई, महाराष्ट्राचे शिक्षण व कायदा मंत्री.• २०१२ – राजेश खन्ना, बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••..... विशेष लेख वाचण्यासाठीhttps://nasayeotikar.blogspot.com येथे क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड, राजगड सह 12 किल्यांचा युनेस्कोच्या यादीत नाव*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *फिल्मफेअर 2025 च्या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून आदिनाथ कोठारे यांचा पाणी चित्रपटाची झाली निवड, तर अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीचा 'फुलवंती' ने बाजी मारली*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून १ जुलै ते १५ जुलै दरम्यान शोध मोहीम*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *जागतिक मानव संसाधन विकास परिषदेमध्ये महावितरणला मिळाले सहा पुरस्कार; सीएमडी लोकेश चंद्र यांना दोन पुरस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *टाटा पॉवर रिन्युएब्लने एप्रिल ते जून या तीन महिन्यात तब्बल ४५ हजार ५८९ घरांच्या छतावर उभारले रूफ टॉप सोलर पॅनल*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अमरनाथ यात्रा: आतापर्यंत 1.45 लाख भाविकांनी घेतले दर्शन, 7,307 यात्रेकरूंचा एक नवीन गट रवाना; बालटाल, पहलगाम मार्गे यात्रा सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *लॉर्ड्स - तिसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी इंग्लंड सर्व बाद 387 धावा तर भारत 3 बाद 147 धावा, राहुलचे अर्धशतक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शिल्पा जोशी, जेष्ठ साहित्यिक, मुंबई 👤 प्रवीण दाबाडे पाटील, शिक्षक तथा साहित्यिक, कन्नड👤 हरिहर धुतमल, पत्रकार, लोहा 👤 अविनाश पांडे 👤 माधव उमरे👤 दादाराव जाधव 👤 नागेश पडकुटलावार 👤 अभिजित राजपूत 👤 नंदकुमार कौठेकर 👤 साईनाथ पाटील गादगे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 24*दात आहेत पण चावत नाही, गुंता होतो काळ्या शेतात, सगळे माझ्यावर सोपवतात, सांगा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - हत्ती ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणतेही ध्येय घेतले तरी त्याच्या सिद्धीसाठी उद्योग करावा लागतो. ध्येय आपण होऊन निरुद्योगी माणसाच्या हातात येत नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २०२५ चा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?२) श्वसन क्रियेद्वारे दूषित हवा आत जात राहिल्याने कोणता रोग होतो ?३) उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती कोण आहेत ?४) 'कमी आयुष्य असलेला' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) 'कॅप्टन कूल' असे कोणत्या क्रिकेटपटूला म्हटले जाते ? *उत्तरे :-* १) महेश मांजरेकर, नामवंत अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता २) दमा ३) जगदीप धनखड ४) अल्पायू, अल्पायुषी ५) महेंद्रसिंग धोनी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *लेसर* 📙 लेसर या प्रकाशकिरणांभोवती एक गूढ वलय सामान्य माणसाच्या मनात असते. काही वर्षांपूर्वीपर्यंत लेसरचा वापर अगदी मर्यादित होता; पण आज मात्र तो अगदी सामान्य माणसांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. एखाद्या वस्तूच्या वेष्टनावरची किंमत, पुस्तकाचा क्रमांक किंवा क्रेडिट कार्डवरची माहिती वाचण्यासाठी लेसर किरणांचा वापर केला जातो. एवढेच काय, पण बाजारात नवीन आलेल्या कॉम्पॅक्ट डिस्क स्टिरिओमध्येही लेसरच वापरलेला असतो. डोळे व लेसर यांचे तर अतूट असे समीकरण होण्याइतका डोळ्यांच्या आजारात लेसरचा वापर वाढत आहे. त्यामानाने मेंदूतील कर्करोगात लेसर वापरणे अजून तितकेसे सुलभ झालेले नाही. हा वापर करताना लेसरचा एक महत्त्वाचा गुण वापरला जातो, तो म्हणजे लेसरच्या लहरी ठराविक वेगाने, ठरावीक काळाने एका मागोमाग अत्यंत सुसंघटितपणे वाहत असतात. नेमक्या जागी पाहिजे त्या आकाराचे, पाहिजे तितक्या लहान व्यासाचे लेसरचे किरण सोडता येतात व हे किरण अन्य प्रकाशाप्रमाणे पसरत नाहीत. एकाच तरंगलांबीच्या विद्युतचुंबकीय लहरी लेसरमध्ये असतात. त्यामुळे लेसरचा रंगही ज्या उद्गमातून लेसर निर्माण केला जाईल, त्यावर अवलंबून असतो. पण एका वेळी एकच रंग असतो. लेसर हे नाव नसून तो एक शोर्टफॉर्म आहे. लेझर (LASER) म्हणजे 'लाइट अॅम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड एमिशन ऑफ रेडिएशन'.लेसरच्या निर्मितीचे सध्या विविध प्रकार वापरले जातात. काहींमध्ये क्र्वार्ट्झचा वापर केला जातो, तर काहींमध्ये हवाबंद नळीतील इलेक्ट्रोड काही विशिष्ट वायूंमध्ये काम करतात. हेलियम, निऑन, कार्बन डायॉक्साइड यांचा वापर या ट्यूबमध्ये केला जातो. दोन इलेक्ट्रोड्समध्ये उच्चदाबाचा विजेचा प्रवाह खेळवल्यावर लेसर निर्माण करण्यासाठी वापरलेल्या द्रव्यातील अणुंना जी ऊर्जा मिळते, त्यामुळे त्यातून प्रकाशकिरण बाहेर टाकले जातात. दिलेली विद्युतऊर्जा बाहेर टाकल्या जाणाऱ्या प्रकाशकिरणांची एक साखळी प्रक्रियाच या द्रव्यात सुरू होते. या नळीच्या दोन्ही बाजूंना समोरासमोरच्या दोन आरशांतुन हे प्रकाशकिरण पुन्हापुन्हा पर परावर्तित होत असल्याने ही साखळीप्रक्रिया वाढतच जाते. या अारशांपैकी एका आरशाला ठेवलेल्या पाहिजे त्या व्यासाच्या छिद्रातुन लेसर बीम वा झोत नळीच्या बाहेर टाकला जातो. प्रत्येक अणूतून बाहेर पडणारे किरण हे एकाच तरंग लांबीचे असल्याने बाहेर पडणारा झोतही तसाच असतो. प्रकाशाचा झोत सलग जोडायचा की पुंजक्या पुंजक्यात, हे लेसरच्या निर्मिती प्रक्रियेवर अवलंबून ठेवता येते. बाहेर पडणाऱ्या सर्व किरणांचा संघटितपणा (coherence) हा लेसरला नेहमीच्या प्रकाशापेक्षा वेगळा ठरवतो. लेसरची वैशिष्टय़े या गुणधर्मातूनच संभवतात.लेसर किरणांचा विनाशक व उपयोगी असा दोन्ही प्रकारे भरपूर वापर केला गेला आहे. अनेक प्रकारची लष्करी अस्त्रे, आयुधे, विमाने लेसरचा वापर करतात, तर अनेक अत्याधुनिक कारखाने अत्यंत काटेकोरपणे कापाकापी वा जोडाजोडीसाठीही लेसरच वापरतात. डोळ्यांच्या आतील दृष्टीपटल निखळले असता ते पुन्हा चिकटवण्यासाठी लेसरचा वापर केला जातो. विविध कथा, सिनेमा व विज्ञान गोष्टींत मात्र लेसर काल्पनिक बंदुकीचा मुक्त वापर आढळतो. कसलाही आवाज न करणारी, पण पाहिजे त्याचा बळी घेणारी ही बंदूकच लेसरबद्दलचे गूढवलय सर्वांच्या मनात वाढत जाते.लेसरबद्दल एक विशेष बाब म्हणजे १९१७ साली आइन्स्टाइन यांनी या स्वरूपाचे किरण निर्माण होऊन त्यांचा वापर करता येईल, असे भाकीत वर्तवले होते. प्रत्यक्षात मात्र त्यासाठी १९६० साल उजाडले. थियोडोर मेमन यांनी पहिला लेसर त्या वर्षी वापरात आणला. त्यानंतरही अनेक वर्षांनंतर म्हणजे १९७५ सालच्या आसपास वैद्यकीय क्षेत्रात प्रगत देशात त्याचा वापर सुरू झाला. भारतात प्रमुख शहरात १९९० सालापासून लेसरचा वापर करून रुग्णांवर उपचार केले जातात. प्रामुख्याने ते डोळ्यांच्या बाबतीत असतात.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल | करावा विठ्ठल जीवभावे ||१||येणे सोसे मन झाले हावभरी | परत माघारी घेत नाही ||२||बंधनापासुनि उकलल्या गांठी | देता आले मिठी सावकाश ||३||तुका म्हणे देह भरीला विठ्ठले | कामक्रोध केले घर रिते ||४||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मनात नको त्या विकारांचा ओझा धरून फिरत राहल्याने नेहमीच अस्वस्थता, चिंता जाणवत असते आणि एक सेंकद सुध्दा मनमोकळ्या पणाने जगता येत नाही. अशा प्रकारच्या परिस्थितीत व्यक्तीला समाधान मिळत नाही. म्हणून जीवन जगत असतांना कितीही दुःख, संकटे आले तरी हसतमुखाने रहावे व मनमोकळेपणाने जगणे स्वीकारावे. कारण हसत राहल्याने चेहरा खुलून दिसतो सोबतच मनावरचा ताण, तणाव कमी होतो.म्हणून म्हणतात की, हसणे सुद्धा एकप्रकारचे जीवन आहे. 🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌷🌹🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आई-वडिलांचे प्रेम*एक तरुण बागेत काम करीत होता. सुर्य डोक्यावर आला तरी त्याचे बागकाम संपत नाहिसे पाहून त्याची आई घरातून ओरडली, ‘अरे गोविंदा ! ऊनं कोण रणरणतं आहे ! घरात ये ना ? वाटल्यास उरलेलं काम संध्याकाळी कर.’ दोन तीन वेळा सांगूनही आपला मुलगा आपल्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, असं पाहून त्या बाईने आपल्या चार-पाच वर्षांच्या नातवाला-म्हणजे उन्हात बागकाम करणाऱ्या मुलाच्या मुलाला उचललं आणि बागेत असलेल्या आपल्या मुलापाशी नेऊन ठेवलं.आपल्या मुलाला उन्हात आणून ठेवल्याचं पाहून त्याचा पिता आपल्या आईवर भडकून म्हणाला, ‘आई ! अगं ऊन कोण तापलयं ! आणि चंदूला तू इथे उन्हात आणून ठेवलसं ? त्याला उन्हाचा त्रास नाही का होणार?’ त्या तरुणाची आई मुद्दाम म्हणाली, ‘ऊन लागलं तर लागलं; त्यात विशेष काय आहे?’तो तरुण म्हणाला, ‘आई ! तो माझा मुलगा आहे. त्याल ऊन लागतयं म्हणून नुसता त्यालाचा त्रास होत नाही, तर त्याला होणाऱ्या त्रासामुळं माझ्याही जिवाची तगमग होऊ लागली आहे.’ यावर आई म्हणाली, ‘मग गोविंदा, तू अस विचार कर की, तुझ्या या मुलाला ऊन लागताच जशी तुझ्या जिवाची तगमग सुरु झाली, तशीच तगमग तू मघापासून उन्हात काम करीत असल्यामुळे माझ्याही जिवाची तगमग होत नसेल का ?’ वृध्द व प्रेमळ आईचा हा बिनतोड युक्तीवाद ऎकून गोविंदा निमूटपणे कुदळ, कोयती उचलून, बागेतून हसत हसत घरात गेला.तात्पर्य - स्वत:पालकाच्या भूमिकेत गेल्याशिवाय आईवडिलांचे प्रेम, माया, काळजी कळत नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment