✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 01/08/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- ॥ १ ऑगस्ट दिनविशेष ॥ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी - भारत. घडामोडी १९९६ - मायकेल जॉन्सनने २०० मीटर अंतर १९.३२ सेकंदात धावून विश्वविक्रम रचला. 💥 जन्म :- १९२० - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे १९१० - मोहम्मद निसार, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९५२ - यजुर्वेन्द्रसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९५५ - अरूणलाल, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९२० - बाळ गंगाधर टिळक, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक, वृत्तपत्र संपादक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *रायगड - आंबेनळी घाट दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना पंतप्रधान निधीतून 2 लाख रुपयांची मदत, रायगड जिल्हाधिकारी कार्यालयास मिळाले पत्र.* --------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली - दिवाळखोरी आणि कर्जबाजारीपणा कोड विधेयक (दुसरी घटना दुरुस्ती) 2018 लोकसभेत मंजूर* --------------------------------------------------- 3⃣ *मुंबई : अकरावी प्रवेशाची तिसरी यादी जाहीर, १ लाख १७ हजार २३४ विद्यार्थ्यांपैकी ५४ हजार ७२७ विद्यार्थ्यांना प्रवेश.* --------------------------------------------------- 4⃣ *राज्य मागासवर्ग आयोगाची 3, 4 ऑगस्टला बैठक, पाच संस्थांच्या आलेल्या माहितीचं होणार विश्लेषण* --------------------------------------------------- 5⃣ *मुंबई- परराज्यातील गुंतवणूकदार महाराष्ट्रात यावेत, यासाठी राजाराम महाराजांनी प्रयत्न केले- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* --------------------------------------------------- 6⃣ *बीड - अभिजीत देशमुखच्या कुटुंबीयांना सरकारकडून 10 लाखांची मदत आणि कुटुंबातील एकाला नोकरी* --------------------------------------------------- 7⃣ *World Badminton Championships 2018 : किदम्बी श्रीकांतची विजयी सलामी* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *हमें तो लूट लिया* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2016/12/blog-post_7.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *लोकमान्य टिळक* लोकमान्य बाळ गंगाधर हे थोर भारतीय नेते,भगवद्गीतेचे आधुनिक भाष्यकार व प्राच्यविद्या पंडित. त्यांचा जन्म रत्नागिरीस झाला. त्यांचे जन्मनाव केशव; परंतु बाळ हेच नाव पुढे रूढ झाले. टिळक कुटुंबाचे मूळ गाव चिखली (ता. दापोली, जि. रत्नागिरी). चिखलगावची खोतीदारी त्यांच्याकडे होती. पणजोबा केशवराव यांनी पेशव्यांच्या काळात मानाची जागा मिळवली होती. आजोबा रामचंद्रपंत यांनी उत्तर आयुष्यात संन्यास घेतला. टिळकांचे वडील गंगाधरपंत व आई पार्वतीबाई. गंगाधरपंतांना कौटुंबिक अडचणीमुळे इंग्रजी शिक्षण सोडून पुण्याहून गावी जावे लागले. पुढे त्यांनी मराठी शाळेत शिक्षकाची नोकरी केली. बाळ गंगाधऱ टिळकांचे पारंपरिक संस्कृत अध्ययन घरातच झाले. १८६६ मध्ये गंगाधरपंतांची बदली पुण्यास झाल्यामुळे टिळक आपल्या मातापित्यांबरोबर पुण्यास आले. पुण्यास आल्यावर थोड्याच दिवसांत टिळकांची आई मरण पावली आणि गंगाधरपंतांची बदलीही ठाण्यास झाली. तथापि पुण्यात राहूनच ते १८७२ मध्ये मॅट्रिक झाले. तत्पूर्वी १८७१ मध्येच त्यांचा कोकणातील लाडघर गावच्या बल्लाळ बाळ कुटुंबातील सत्यभामाबाई (माहेरचे नाव तापीबाई) यांच्याशी विवाह झाला. त्यांना तीन मुली आणि विश्वनाथ, रामभाऊ व श्रीधर असे तीन मुलगे होते. त्यांचे नातू ज. श्री. टिळक हे केसरीचे विद्यमान संपादक असून खासदार आहेत. गंगाधरपंत १८७२ मध्ये निधन पावले. मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी काही रक्कम ठेवली होती. त्यामुळे टिळकांनी डेक्कन कॉलेजमध्ये नाव घालते. महाविद्यालयातील पहिल्या वर्षी नियमित व्यायाम करून प्रकृती सुदृढ व निकोप राखण्यावर त्यांनी भर दिला. या कमावलेल्या शरीराचा पुढे दगदगीच्या राजकीय जीवनात व कारावासात त्यांना फार मोठा उपयोग झाला. १८७६ मध्ये ते बी.ए. पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. एम्. ए. मात्र होऊ शकले नाहीत. अखेर त्यांनी एल्एल्.बी. ही पदवी घेतली. डेक्कन कॉलेजमध्येच टिळक आणि आगरकर यांचा स्नेह जमला. दोघांनी देशकार्याला वाहून घेण्याचा संकल्प केला. याच सुमारास निबंधमालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी सरकारी नोकरी सोडून शाळा काढण्याचे ठरविले होते; तेव्हा टिळक व आगरकर दोघेही त्यांना मिळाले. १ जानेवारी १८८० रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली. टिळकांनी विनावेतन शिक्षकी पेशा पतकरला. चिपळूणकर, टिळक व आगरकर यांनी १८८१ मध्ये आर्यभूषण छापखाना काढला आणि केसरी (मराठी) व मराठा(इंग्रजी) ही दोन वृत्तपत्रे सुरू केली. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= स्वार्थरहीत आणि खरीखुरी सेवा हीच खरी प्रार्थना. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) लॉर्डस हे मैदान कोणत्या खेळाशी संबधित आहे ?* क्रिकेट *२) चौथी महत्त्वाची शासन शाखा म्हणून कशाचा उल्लेख होतो ?* वृत्तपत्रसंस्था *३) पिकातील भुसा स्वच्छ करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात ?* उफणणी *४) ड्यूस, बॅक, हँड, डबल फॉल्ट या संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?* लॉन टेनिस *५) 'मरीनर-९' हे मंगळयान मंगळ ग्रहाकडे कधी झेपावलं ?* ३० मे १९७१ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 मंगेश हनवत्ते 👤 गोविंद पाटील जाधव 👤 एकनाथ डुमणे 👤 शिवसांब गणाचार्य 👤 संजीवकुमार हामंद 👤 शिनू दर्शनवाड 👤 बंडू पाटील मोरे 👤 आनंद पेंडकर 👤 मुखीत अहमद 👤 पवनकुमार भाले 👤 शादूल शेख 👤 विश्वनाथ चन्ने 👤 नागेश टिपरे 👤 दिलीप साळुंके 👤 साईनाथ पाटील मोकलीकर 👤 बालाजी गायकवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *गाजरं* बारा महिने कोणी खात नाही बाजरं दाखवून काय होणार लाल लाल गाजरं पहायला मिळण्या पेक्षा खायला मिळालं पाहिजे बारा महिने कोणी काही खात नाही कळालं पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *कोणताही माणूस दुस-या माणसाला का फसवतो? विश्वासघात का करतो? कारण आहे त्या सुखात, आहे त्या समाधानात माणूस राहू शकत नाही. माणसाला थोडंफार सुख-समाधान मिळत असतंच. पण त्याची जगण्याची, विचार करण्याची बैठक पक्की नसते, कसं जगायचं, हे एकदा निश्चित ठरवलं की आहे त्या सुखा-समाधानातही माणूस छान राहू शकतो.* *आहे त्या आनंदात समाधान न मानणारी माणसे स्वत:ला आणि इतरांनाही छळत असतात. सुख, समाधान कधी कुणाला मिळालेच नाही असे होत नाही. संकटे आली की माणूस म्हणतो, हे माझ्याच वाट्याला काय आले. एक! दु:खाच्या ठोकरीने तो सुखाच्या जागा विसरून जातो. सुखाशी कृतघ्न होतो. पण तो विसरतो, संकटे येण्यापूर्वी तो पावसात भिजला होता. त्याने सुर्योदय पाहिला होता. फुलांनी बहरलेली झाडं पाहिली होती. उन्हाळ्यात जांभळं खाताना एकमेकांना वाकुल्या दाखविल्या होत्या. सुखाच्या जागा आपल्याजवळच असतात.* 🌹 *॥ रामकृष्णहरी ॥*🌹 🍁🍁🍁🍁🍁🍁 *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= संकटकाळात आपल्या मदतीस सर्वात प्रथम धावून येणारा जर कोणी असेल तर तो म्हणजे आपला जीवलग मित्र. मित्राशी आपले मैत्रीचे नाते अगदी जीवाभावाच्या पलिकडे असते. कौटुंबिक नाते हे जरी रक्ताचे असले तरी मैत्रीचे नाते आपण निर्माण केलेले असते. या मैत्रीमध्ये एकमेकांच्या सुखदुःखाची जवळीकता साधलेली असते. ती निरपेक्षवृत्तीनेच जोपासलेली असते. कोणत्याही कामासाठी कुठलाही विचार न करता पहिल्यांदा आपण आपल्या ओठांवर नाव असते ते मित्राचे. इतरांवर आपण विश्र्वास एकवेळ ठेवणार नाही, परंतु मित्रावर अधिक विश्वास ठेवतो. मित्रही अशीच निवडायचे की, तो आपल्या जीवनात कधीही, कितीही बिकट परिस्थिती निर्माण झाली तरी तो आपल्या मदतीला धावून आला पाहिजे आणि आपण त्याच्या मदतीला धावून गेले पाहिजे. मैत्रीमध्ये व्यवहार हा नसतोच. असतो तो एकमेकांचे सुखदुःख जाणून घेऊन त्यातून सोडवण्यासाठी सदैव मदतीचा हात पुढे करण्यासाठी. अशाच मित्रांशी मैत्रीचे नाते जोडून आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत टिकवून ठेवून मैत्री या नात्यात अतूट संबंध प्रस्थापित करण्यास सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजे. तरच मैत्रीच्या नात्याला अर्थ प्राप्त होईल. स्वार्थापुरती मैत्री काही कामांची नाही किंवा अशा स्वार्थी नात्याला मैत्रीही म्हणता येणार नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= व्यवहार - Behavior =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *संत बहिणाबाई* बहिणाबाई या विख्यात महिला संत होऊन गेल्या.एकदा त्या आपल्या बगीच्यात लावलेल्या रोपट्यांना पाणी घालत होत्या. त्यावेळी ४ विद्वान त्यांचेकडे आले आणि म्हणाले, "आम्ही या जिज्ञासेने तुमच्याकडे आलो आहोत कि आम्ही वेदांचाही अभ्यास केला आहे, विविध शास्त्रांचाही अभ्यास केला आहे. परंतु त्याचा आम्ही उपयोग करण्यास आम्ही असमर्थ आहोत. आम्ही देशाच्या प्रगतीसाठी काही तरी करू इच्छितो. जेणेकरून देशात सर्वत्र सुख,समाधान, विकास होईल. पण हे लक्ष्य गाठण्यासाठी काय करायला हवे हे आम्हाला समजत नाही." बहिणाबाईनी चारही विद्वानांकडून त्यांच्या लक्ष्य प्राप्तीच्या बाबतीत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पहिला विद्वान म्हणाला, मी देशातील सर्वाना साक्षर आणि सभ्य पाहू इच्छितो, तर दुसरा विद्वान म्हणाला,"मी सर्वाना सुखी आणि संपन्न करू इच्छितो" तिसरा विद्वान म्हणाला,"मी सर्वाना एकत्रित करून राष्ट्रऐक्य घडवू इच्छितो" तर चौथा विद्वान म्हणाला,"मला माझा देश प्रगतीशील आणि शक्तिशाली, बलाढ्य राष्ट्र झालेला बघायची इच्छा आहे. तर आता तुम्ही आम्हाला सांगा कि आम्ही काय करू जेणेकरून आमच्या चौघांच्या प्रयत्नाने देश प्रगती करेल." बहिणाबाई म्हणाल्या,"तुम्ही चौघे मिळून शिक्षणाचा प्रसार करा." विद्वान हैराण झाले कि आपण देशाच्या प्रगतीचे बोलतो आहोत आणि बहिणाबाई शिक्षणाबद्दल बोलत आहेत हे कसे होऊ शकते. तेंव्हा त्यांची झालेली वैचारिक कोंडी जाणून बहिणाबाई म्हणाल्या,"शिक्षणाने ज्ञान आणि विवेकाची प्राप्ती होते, शिक्षणाने उद्योगशीलता वाढते, त्यातून देशाची आवक वाढते, आर्थिक सक्षमता आल्याने एकता प्रस्थापित होते, तेंव्हा राष्ट्र शक्तिशाली बनते." बहिणाबाई यांचा संदेश आपल्या हृदयात साठवून चौघे चार दिशेला शिक्षण प्रसार करण्यास निघून गेले. *तात्पर्य- शिक्षणाने सर्व काही साध्य होते, "शिकाल तर टिकाल "* 〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ ( शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 31/07/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९७५ - अमेरिकेतील टीम्स्टर युनियन चा नेता जिमी हॉफा गायब. १९८१ - पनामाचा हुकुमशहा ओमर तोरिहोसचा विमान अपघातात मृत्यू. १९८७ - कॅनडातील एडमंटन शहरात एफ.४ टोर्नेडो. २७ ठार, ३३ कोटी डॉलरपेक्षा जास्त मिळकतीचे नुकसान. 💥 जन्म :- १९१२ - मिल्टन फ्रीडमन, अमेरिकन अर्थतज्ञ. १९१९ - लेफ्टनंट कर्नल हेमु अधिकारी, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९५३ - जिमी कूक, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू. १९४१ - अमरसिंह चौधरी, गुजरातचा मुख्यमंत्री. 💥 मृत्यू :- १९७२ - पॉल-हेन्री स्पाक, बेल्जियमचा पंतप्रधान. १९८० - मोहम्मद रफी, भारतीय पार्श्वगायक. १९९३ - बॉद्वां पहिला, बेल्जियमचा राजा. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे लोकपालावर ठाम, 2 ऑक्टोबरपासून राळेगणसिद्धीमध्ये करणार आंदोलन* --------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली - क्रिमीनल लॉ (घटना व दुरूस्ती) सुधारणा विधेयक 2018 लोकसभेत मंजूर* --------------------------------------------------- 3⃣ *औरंगाबाद- आंदोलनाला हिंसक वळण देऊ नये, मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांचं आंदोलनकर्त्यांना आवाहन* --------------------------------------------------- 4⃣ *मुंबई - मराठा, मुस्लीम, धनगर, महादेव कोळी, लिंगायत समाजाच्या आरक्षणाच्या मागणीबाबत काँग्रेस आमदारांच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट* -------------------------------------------------- 5⃣ *शिर्डी - गुरुपौर्णिमेला साईचरणी कोट्यवधीचे दान, चार दिवसांत 6 कोटी 66 लाख रुपयांचे दान* --------------------------------------------------- 6⃣ *मुंबई : प्रो-कबड्डी लीगच्या यंदाच्या मोसमाला 5 ऑक्टोबरपासून होणार सुरुवात, प्रो-कबड्डी लीगचा हा सहावा हंगाम असून तीन महिने सामने चालू राहणार* --------------------------------------------------- 7⃣ *कोलंबो : भारतीय युवा (19-वर्षांखालील) संघाचा श्रीलंकेतील कसोटी मालिकेनंतर एकदिवसीय सामन्यातही दणदणीत विजय* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *नजर हटी, दुर्घटना घटी* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा http://nasayeotikar.blogspot.com/2018/07/blog-post_29.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *मोहम्मद रफी* मोहम्मद रफी हे लोकप्रिय भारतीय पार्श्वगायक होते. त्यांनी हिंदी,भाषा, उर्दू, पंजाबी, मराठी आणि तेलुगू भाषांमधून गाणी गायली, पण ते आपल्या हिंदी चित्रपटांतील गाण्यांसाठी अतिशय प्रसिद्ध आहेत. त्यांची गाणी भारतात, तसेच भारताच्या बाहेर स्थायिक असलेल्या भारतीयांमध्ये लोकप्रिय आहेत. मुकेश, किशोर कुमार, मन्ना डे, महेंद्र कपूर, हेमंत कुमार मुखोपाध्यायआणि तलत मेहमूद यांच्याप्रमाणेच ते हिंदी चित्रपटांच्या १९५० ते १९८० च्या दशकांमधले एक प्रमुख पार्श्वगायक होते. पुरस्कार आणि सन्मान - पुण्यात रफीच्या नावाची मोहम्मद रफी आर्ट् फाऊंडेशन नावाची संस्था आहे. ती दरवर्षी अंदाज-ए-रफी नावाचा कार्यक्रम करते आणि एखाद्या गायकाला पुरस्कार देते. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= *स्वार्थरहीत आणि खरीखुरी सेवा हीच खरी प्रार्थना.* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) स्वतंत्र भारताचे पहिले भू-दल सेनापती कोण होते ?* जनरल के.एम.करिअप्पा *२) कोणत्या नदीला 'बिहारचे अर्शू' असं संबोधलं जातं ?* कोसी *३) झरिया हे शहर कशासाठी प्रसिद्ध आहे ?* कोळशाच्या खाणीसाठी *४) संम्पूर्णानन्द संस्कृत विश्वविद्यालय कोठे आहे ?* वाराणसी *५) उद्याने, शेती आणि खाद्यान्न उत्पादने घेण्याच्या दृष्टीने केल्या जाणार्या कृषिव्यवसायाला काय म्हणतात ?* मिर्श शेती *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= * नागनाथ इळेगावे * देवेंद्र लाड * प्रशिक नंदूरकर * मनोज बुंदेले * कैलास गायकवाड * दिलीप सोळंके * प्रीतम नावंदीकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *सुगंध* ईर्षा असणारा स्वतःची महानता सांगत असतो सुगंध असो की दुर्गंध आपोआप पांगत असतो मी चांगला म्हणायची सुगंधाला आवश्यकता नाही निरीक्षणाने समजतात की गोष्टी ब-याच काही शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *नातेसंबंध टिकविण्यासाठी एकमेकांना समजून घेण्याची व प्रेमाची आवश्यकता असते. संत कबीर म्हणतात-"प्रेमाची अडीच अक्षरे ज्याला कळाली तो पंडित झाला." थोडे तारतम्य बाळगले, जीवनात शिस्त व करूणा आणली, तर सर्व आवडीच्या व्यक्तींशी आनंदाने नाते फुलवता येते. हे तारतम्य सुटले, अहंभाव जागवला, एकमेकांकडे दुर्लक्ष करून स्वार्थाचाच विचार केला, तर भरल्या घरात रितेपणा येऊन अशांती येते.* *सफल प्रेम हे फळासारखे असते, ते हळूहळू पक्व होत जाते. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. आई-वडील, पत्नी-मुले, भाऊ-बहीण, मित्र ही नाती जपणे व फुलवणे ही एक साधनाच असते. त्यासाठी त्यागाची गरज असते, अहंकाराला तीलांजली देऊन, स्पर्धा न करता, एकमेकांना न डिवचता, स्वातंत्र्य देत, मैत्रीचे दार उघडे ठेवले तर कुठलेही नाते अभंग राहील. म्हणून वडिलधा-यांच्या आठवणीतून घराण्याचे महाभारत ऐकावे, पत्नी नावाच्या श्रमदेवतेचे 'नवरात्रौत्सव' घरात साजरे करावे, समाजात पसायदानाच्या ओव्या कानी पडण्याकरिता प्रयत्नशील राहावे.* •••● ‼ *रामकृष्णहरी* ‼●••• 🌷🌷🌷🌷🌷 *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= संकटकाळात आपल्या मदतीस सर्वात प्रथम धावून येणारा जर कोणी असेल तर तो म्हणजे आपला जीवलग मित्र.मित्राशी आपले मैत्रीचे नाते अगदी जीवाभावाच्या पलिकडे असते.कौटुंबिक नाते हे जरी रक्ताचे असले तरी मैत्रीचे नाते आपण निर्माण केलेले असते.या मैत्रीमध्ये एकमेकांच्या सुखदुःखाची जवळीकता साधलेली असते.ती निरपेक्षवृत्तीनेच जोपासलेली असते.कोणत्याही कामासाठी कुठलाही विचार न करता पहिल्यांदा आपण आपल्या ओठांवर नाव असते ते मित्राचे.इतरांवर आपण विश्र्वास एकवेळ ठेवणार नाही, परंतु मित्रावर अधिक विश्वास ठेवतो.मित्रही अशीच निवडायचे की,तो आपल्या जीवनात कधीही,कितीही बिकट परिस्थिती निर्माण झाली तरी तो आपल्या मदतीला धावून आला पाहिजे आणि आपण त्याच्या मदतीला धावून गेले पाहिजे.मैत्रीमध्ये व्यवहार हा नसतोच.असतो तो एकमेकांचे सुखदुःख जाणून घेऊन त्यातून सोडवण्यासाठी सदैव मदतीचा हात पुढे करण्यासाठी.अशाच मित्रांशी मैत्रीचे नाते जोडून आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत टिकवून ठेवून मैत्री या नात्यात अतूट संबंध प्रस्थापित करण्यास सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजे.तरच मैत्रीच्या नात्याला अर्थ प्राप्त होईल.स्वार्थापुरती मैत्री काही कामांची नाही किंवा अशा स्वार्थी नात्याला मैत्रीही म्हणता येणार नाही *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *संपत्ती - Wealth* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *घामाचा पैसा* धन्नाशेटचा मुलगा राम अगदीच आळशी. घरांत गडगंज संपत्ती. एकुलता एक लाडाचा. काम कधी करावंच लागलं नाही. आता २१ वर्षाचा झाला. शेठजींना काळजी पडली. याचे कसे होणार साठलेला पैसा किती दिवस पुरेल. दुसरे दिवशी त्यांनी मुलाला बोलावले व म्हणाले हे बघ आज तू सकाळीच बाहेर जा. काहींतरी काम करून पैसे मिळवुन आण तरच तुला जेवायला मिळेल' मुलाला काहीच कळेना. तो बहिणीकडे गेला तिने त्याला एक रूपया दिला. शेठजींनी तो विहीरीत फेकून दिला. दुसर्या दिवशी आईकडून घेतला तिसर्या दिवशी मात्र कोणीही पैसे द्यायचे नाहीत हे उमजल्यावर स्वारी घराबाहेर पडली स्वारी घराबाहेर काम शोधायला निघाली. पण काय काम करणार ? बारा वाजे पर्यंत हिंडला. काम मिळेना. पोटात कावळे कोकलायला लागले. स्टेशनवरून एक जड बॅग घेऊन येणारा माणूस दिसला त्याला हमाल हवा होता. हा धावत पुढे गेला. 'साहेब, इकडे आणा'. ती बॅग त्याने डोक्यावर उचलली. घामाघूम झाला. साहेबांनी आठ आणे हातावर ठेवले. घरी आला. शेठजींच्या हातावर आठ आणे ठेवले. दोन दिवसाप्रमाणेच शेठजींनी ते विहीरीत फेकले हा चवताळून उठला. 'बाबा अहो तेवढे आठ आणे मिळवायला मला किती वणवण करावी लागली आणि तुम्ही ते फेकून दिलेत ?' शेठजींनी त्याला जवळ घेतले. पाठीवरून हात फिरवला, 'बाळा आता मला काहीं काळजी नाहीं कारण खर्या कष्टाची किंमत तुला आज कळली. दोन दिवस ह्याच्या दुप्पट रक्कम फेकली पण तुला राग आला नव्हता कारण त्या मागे कष्ट नव्हते.' स्वकष्टाची कमाई तीच खरी कमाई. *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ ( शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 30/07/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- २००६ - इस्रायेली वायुसेनेच्या हल्ल्यात १६ बालकांसह २८ असैनिकी व्यक्ती ठार. २०१४ - पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळून ५० पेक्षा अधिक ठार. 💥 जन्म :- १९७३ - पार्श्वगायक, सोनू निगम. 💥 मृत्यू :- १९९४ - मराठी साहित्यातील कथा लेखक शंकर पाटील *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *देशवासियांनी एकदा तरी पंढरपूरच्या वारीचा अनुभव घ्यावे, पंढरपूरची वारी म्हणजे अद्भूत यात्रा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४६ व्या 'मन की बात ' मधून जनतेशी साधला संवाद* --------------------------------------------------- 2⃣ *मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार्या आंदोलक तरुणांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.* --------------------------------------------------- 3⃣ *अपघातातील कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर वारसांना शासकीय नोकरीत सामावून घेणार, पालकमंत्री रवींद्र वायकर यांची माहिती* --------------------------------------------------- 4⃣ *उत्तर प्रदेश : मुसळधार पावसामुळे 65 जणांचा मृत्यू, 57 जण जखमी* --------------------------------------------------- 5⃣ *यवतमाळ : जिल्ह्यातील २४ शाळांचे मुख्याध्यापक, संस्थाचालक फौजदारी कारवाईच्या कचाट्यात. बोगस पटसंख्या दाखवून शासकीय योजना लाटल्याचा आरोप* --------------------------------------------------- 6⃣ *भारताच्या स्मृती मंधानाने महिलांच्या क्रिकेट सुपर टी-20 लीगमध्ये जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम अखेर नावावर केला* --------------------------------------------------- 7⃣ *Russian Open Badminton 2018 : भारताच्या सौरभ वर्माने यंदाच्या मौसमातील पहिल्या जेतेपदाला गवसणी घातली.* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= दैनिक जनशक्ती मध्ये प्रकाशित लेख *अध्ययन निश्चिती तपासणी मोहिम* http://epaper.ejanshakti.com/m5/1755626/Mumbai-Janshakti/30-07-2018#page/4/1 पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *सुलोचना दीदी* मराठी चित्रपटातील सात्विक, सुंदर, सोज्वळ नायिका, आई, वहिनी, जिजाबाई म्हणजे अभिनेत्री सुलोचना दिदी. वहिनीच्या बांगड्या, माझं घर माझी माणसं, अन्नपूर्णा, एकटी, मराठा तितुका मेळवावा असे कितीतरी मराठी चित्रपट त्यांनी आपल्या अभिनयाने सजवले. हिंदीमधल्या अनेक हिरोंची आई त्यांनी पडद्यावर साकारली.आज ३० जुलै २०१८ सुलोचना दिदींचा ९० वा वाढदिवस आहे.आणि त्यांच्या अभिनय कारकिर्दीला ७५ वर्षं पूर्ण होत आहेत. हा एक सुंदर योग आहे. अतिशय साधं, निगर्वी, समाधानी कृतार्थ व्यक्तिमत्त्व म्हणजे सुलोचना दीदी. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= *गरिबी असूनही दान करतो तो खरा दानशूर.* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) चित्रपट दिग्दर्शक यश चोप्रा यांचा पुतळा कोणत्या देशात उभारण्यात आला आहे ?* स्वित्झर्लंड *२) चोल राजघराण्याचा संस्थापक कोण ?* राजा विजयालय *३) एफटीआयआयच्या संचालकपदी नुकतीच कोणाची नियुक्ती झाली ?* भूपेंद्र कँथोला *४) 'महिलांना मग-२१ विमान उडवण्याची भीती वाटते' असे विधान करणारे खासदार कोण ?* अर्जुन राम मेघवाल *५) यंदा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणार्या मराठी गायकाचे नाव काय ?* महेश काळे *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 नागनाथ इळेगावे 👤 सचिन गादेवार 👤 प्रवीण कॅटरवाड 👤 विजय कुऱ्हाडे 👤 प्रियांका घुमडे 👤 शेख नवाज 👤 निलेश कोरडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *उमेद* ध्येय तेच गाठतात ज्यांच्यात उमेद आहे ध्येय गाठणे अशक्य जर वागण्यात भेद आहे ध्येय गाठायचे तर उमेद असली पाहिजे खडतर प्रयत्ना मध्ये कुरकूर नसली पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *खरंतर 'स्त्री व पुरूष' माणूस म्हणून सारखेच असतात. पण स्त्रियांच्या वाट्याला येतं नव्या नात्यांना समजून घेण्याचं दडपण. त्यातून घडणारं वर्तन, आणि त्या वर्तनावर अवलंबून असतं तिचं अस्तित्व. या अस्तित्वाला असतात रोजचे धक्के नि अडथळे. कोण देतं हे धक्के ? बोलायला जावं अनावर आवेगात..... उत्कटपणे ज्याच्याशी .....तो असतो निर्विकार, कधी बेदरकार, कधी मुकाट, कधी घर डोक्यावर घेऊन चालता होणारा.. न बघता,न ऐकता,न समजून घेता...!* *कधी माहेरच्या आठवणींनी झाली व्याकूळ.....वाटलं कधी बोलावं भरभरून तर.....कोण आहे ही भावनांची आंदोलनं समजून घेणारं ? कोणाजवळ बोलायचं आपल्या आतलं...खोल खोल तळातलं..?* *" पुरूषांना येतो का असा अनुभव? जीव गुदमरण्याचा, घुसमटण्याचा? आपलं अस्तित्वं गमावल्याचा... आपलं विश्व तुटल्याची वेदना भळभळण्याचा.....? "* •••●💥‼ *रामकृष्णहरी* ‼💥●••• 🚩🚩🚩🚩🚩🚩 *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= तुमच्या जीवनात येणारी वेळ आणि येणारी संधी ती येणारच. तिची वाट पाहत बसू नका. कारण तिच्या वाट पाहण्यात आजचा वेळ वाया घालवू नका. आजचा वेळ जर तुम्ही वाट पाहण्यात घालवला तर तुम्ही ठरवलेले काम पूर्ण होणार नाही. विनाकारण तुमचा वेळ वाया जाईल आणि हातात घेतलेले काम अर्धवटच राहील. येणारी संधी ही संधीच राहील एखाद्या मृगजळासारखी. म्हणून आज घेतलेले काम मन लावून पूर्ण करा आणि ते काम बाजूला सारा. जेव्हा तुमचा तुम्हाला काम झाल्याचा पूर्ण विश्वास होईल तेव्हा उद्याची वेळ आणि संधी तेवढीच तुम्हाला चांगल्या यशाकडे आणि पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रेरीत करेल. अन्यथा यशाऐवजी अपयशाकडे नेण्यासाठी आपणच कारणीभूत होऊ शकतो. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *अर्धवट - Partial* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रयत्नांती यश* थोमस अल्व्हा एडिसन यांची ही कथा.आपल्या अनेक शोधांनी अवघ्या मानवजातीचे आयुष्य उजळवून टाकणारा ,ते सुखमय करणारा हा संशोधक . सतत कसले ना कसले प्रयोग करीत प्रयोगशाळेत दिवसभर संशोधन करणे हाच त्यांचा दिनक्रम असे .अनेक वर्षे संशोधन करणे,हाच त्यांचा दिनक्रम असे .अनेक वर्षे संशोधन केल्यावर त्यांना दिव्याचा शोध लागला .त्यावेळी भेटावयास ,त्यांचे कौतुक करावयास आलेल्या व्यक्तींनी त्यांना विचारले,'या शोधासाठी तुम्हाला किती प्रयोग करावे लागले ?"'एक हजार ...' एडिसनम्हणाला .त्यांना पुन्हा विचारण्यात आले ,'आपण एक हजार वेळा प्रयोग केलेत .परत्येक वेळी आलेल्या अपयशानंतर खरतर आज लाभलेल्या यशाबद्दल आपणाला काय वाटते? तुमची प्रतिक्रिया काय ?' यावर एडिसन म्हणाला ९९९ प्रयोगांनी दिवा बनवता येत नाही ,हेच मला कळल.' *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 〰〰〰〰〰〰〰 🌺🍁जीवन विचार🍁🌺 〰〰〰〰〰〰〰 जो आपणास ज्ञानाशी एकरुप करून टाकतो त्यास गुरू म्हणतात.गुरू म्हणजे सतत उचंबळणारा ज्ञानसागर होय. नम्रता आणि सेवा हे ज्ञानप्राप्तीचे खरे मार्ग आहेत. जो सर्व भूतकाळ दाखवितो वर्तमानकाळाची ओळख करून देतो, भविष्यकाळाची दिशा सांगतो, 🙏गुरू म्हणजे संपूर्ण ज्ञानाचं आगरच होय. आपल्या जीवनाचे भांडे जेवढं मोठं असेल त्या मानानं गुरूकडून ज्ञान घेता येईल. ज्ञान अनंत असतं हे ओळखूनच न्यूटन म्हणतो , ' माझ ज्ञान सिंधूत बिंदू आहे .' सॉक्रेटिस म्हणतो , ' मला काय समजत नाही एवढच मला समजतं.' 🙏 गुरू म्हणजे अनंत ज्ञानाची मूर्तीच , तळमळ , सत्याचा प्रयोगाची उत्कटता असते.🙏 ================== 🙏🏼शब्दांकन /संकलन🙏🏼 ✍ प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे) जि.प.प्रा.शा. गोजेगाव, ता.हदगाव, जिल्हा नांदेड. http://www.pramilasenkude.blogspot.in 〰〰〰〰〰〰〰
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 25/07/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९०७ - कोरिया जपानच्या आधिपत्याखाली आले. १९०८ - किकुने इकेदाने मोनोसोडियम ग्लुटामेट(आजिनोमोटो)चा शोध लावला. १९०९ - लुई ब्लेरियोने प्रथम विमानातून इंग्लिश खाडीपार केली. १९१७ - कॅनडात आयकर लागू १९२५ - सोवियेत संघाची वृत्तसंस्था तासची स्थापना १९३४ - ऑस्ट्रियाच्या चान्सेलर एंगेलबर्ट डॉलफसची हत्या. १९४३ - दुसरे महायुद्ध - इटलीत बेनितो मुसोलिनीचीहकालट्टी. १९५२ - पोर्तोरिकोने नवीन संविधान अंगिकारले. १९५६ - अमेरिकेची प्रथम सागरी अणुचाचणी बिकीनी बेटांनजीक घेण्यात आली. १९७३ - सोव्हिएत संघाचे मार्स ५ हे अंतराळयान प्रक्षेपित. १९८४ - सोव्हिएत संघाची स्वेतलाना साव्तोस्कायाअंतराळात चालणारी प्रथम महिला अंतराळवीर १९९७ - के.आर. नारायणन भारताच्या राष्ट्राध्यक्षपदी. १९९९ - लान्स आर्मस्ट्रॉँगने आपली पहिली टुर दि फ्रांस सायकल शर्यत जिंकली. २००७ - प्रतिभा पाटील भारताच्या राष्ट्रपतीपदी. 💥 जन्म :- ११०९ - अफोन्सो पहिला, पोर्तुगालचा राजा. १५६२ - केटो कियोमासा, जपानी सामुराई. १८४८ - आर्थर बॅलफोर, युनायटेड किंग्डमचे ३३वे पंतप्रधान १९०८ - बिल बोव्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९२९ - सोमनाथ चटर्जी, भारतीय राजकारणी. १९७८ - लुईस ब्राऊन, पहिली मानव टेस्टट्यूब बेबी 💥 मृत्यू :- ३०६ - कॉन्स्टान्शियस क्लोरस, रोमन सम्राट. १४०९ - मार्टिन पहिला, सिसिलीचा राजा. १४९२ - पोप इनोसंट आठवा.१९३४ - एंगेलबर्ट डॉलफस, ऑस्ट्रियाचा चान्सेलर १९७३ - लुई स्टीवन सेंट लोरें, कॅनडाचा १२वा पंतप्रधान. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *सोलापूर : राज्यातील मंत्र्यांच्या घराची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात येणार, सोलापुरातील पोलीस सूत्रांनी दिली माहिती* --------------------------------------------------- 2⃣ *मराठा आरक्षण - आंदोलनादरम्यान जाळपोळ, हिंसा करु नका - शरद पवार यांचे अवाहन* --------------------------------------------------- 3⃣ *औरंगाबाद - वारकऱ्यांच्या परतीच्या प्रवासाच्या अडचणीमुळे मराठा क्रांती मोर्चाचे कायगाव टोका येथील आंदोलन स्थगित* --------------------------------------------------- 4⃣ *पिंपरी - पिंपरी चिंचवडचे महापौर नितीन काळजे आणि उपमहापौर शैलजा मोरे यांचा राजीनामा* --------------------------------------------------- 5⃣ *ऑगस्टा वेस्टलँड प्रकरण- न्यायालयानं कार्लो गेरोसाच्या विरोधात केलं अजामीनपात्र अटक वॉरंट जारी* --------------------------------------------------- 6⃣ *आकाशवाणीच्या प्रसिद्ध निवेदिका सुधा नरवणे यांचे निधन* --------------------------------------------------- 7⃣ *सोलापूर : राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत सोलापूरच्या कौस्तुभ तळीखेडेला गोल्ड मेडल* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *हेडफोन पासून दूर रहा* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2016/12/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= सोमनाथ चॅटर्जी सोमनाथ चॅटर्जी हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी नेते आहेत. ते १४ व्या लोकसभेचे सभापती होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७१ च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल राज्यातील बरद्वान मतदारसंघातून आणि इ.स. १९७७ आणि इ.स. १९८० च्या लोकसभा निवडणुकांत पश्चिम बंगाल राज्यातील जादवपूर मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले होते. इ.स. १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा काँग्रेस पक्षाच्या उमेदवार ममता बॅनर्जी यांनी जादवपूर लोकसभा मतदारसंघात पराभव केला. त्यानंतर ते इ.स. १९८५ मध्ये पश्चिम बंगाल राज्यातील बोलपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. पुढे, इ.स. १९८९, इ.स. १९९१, इ.स. १९९६, इ.स. १९९८, इ.स. १९९९ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी त्याच मतदारसंघातून विजय मिळवला. अभ्यासू वृत्ती,आपला मुद्दा कौशल्याने मांडायची हातोटी आणि इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व यामुळे त्यांनी लोकसभेच्या कामकाजावर आपला प्रभाव पाडला.. जुलै इ.स. २००८मध्ये मनमोहन सिंह सरकारवरील विश्वासदर्शक ठरावादरम्यान त्यांनी लोकसभा अध्यक्षपदाचा राजीनामा न देता सभाध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली. त्या कारणावरून त्यांचे कार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाशी मतभेद झाले आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी इ.स. २००९ ची लोकसभा निवडणुक न लढवता सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= आपले सत्यस्वरुप सिध्द करण्यास सोन्याला अग्नीत शिरुन दिव्य करावे लागते व हिऱ्याला घणाचे घाव सोसावे लागते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) 'जातककथा'च्या अनुवादिका कोण ?* दुर्गा भागवत *२) व्ही.एस.एस.सी.चे विस्तारित रूप काय ?* विक्रम साराभाई स्पेस सेंटर *३) नायलॉन, प्लॅस्टिकचा शोध कोणी लावला ?* कराथर्स *४) पी. ए. संगमा यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली. ?* 'नॅशनल पीपल्स पार्टी' *५) र्जमन नॅशनल सोशालिस्ट पार्टीची स्थापना कधी झाली ?* ५ जानेवारी १९१९ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= * रामकुमार चिलकेवार * श्यामकुमार चिलकेवार * साईनाथ कामीनवार * श्रीधर चिंचोलकर * प्रा. सौ. संगीता भालसिंग * नरेंद्र राठोड * ऋचाली चंदेल बायस * लक्ष्मण सुरकार * अभिषेक येरावार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= @@ गुगली @@ *खरं सुख* जीवनात मानलं तर सुख आहे नाही तर क्षणोक्षणी कशातही दु:ख आहे खरं सुख हे मानण्यात असते मानलं नाही तर सारे दु:ख असते शरद ठाकर सेलू जि परभणी =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *उत्सवांनंतरची रात्र आवर्जून पहावी. उत्सवाच्या काळात ती पोरकी होती. आपण तिच्याशी प्रतारणा करून स्वैर हिंडत होतो, पण तिच्या अजरतेवर कशाचाही ओरखडा उमटलेला नाही. अंधाराच्या रेशमानं तिच्या तारूण्याला वेढून टाकलेलं आहे. अमावस्येची चाहूल लागल्यानं तिचं रेशीम आधिक गाढं, काळं, होत जाणार आहे. तिच्या अजर तारूण्यात आतुन वाहणारं चैतन्याचं पाणी इतकं प्रबळ आहे की उत्सवातल्या पोरकेपणाचा विषण्ण थर वाहून गेलाय.* *ही उत्सवानंतरची पहिली रात्र. कुठे कुठे तांबूस अभ्र आहेत, पण ती रात्रीशी विसंगत वाटत नाहीत. रस्त्यांवर केवळ दृष्टीला मदत करण्याइतकाच उजेड आहे. ही रात्र आहे, रात्रीसारखी. तिला असं पंधरवाड्याच्या विरामानंतर भेटणं किती विलक्षण. लांबच्या पाणवठ्यावरनं टिटवीचा ओरडा ऐकू येतोय. डोक्याच्या खूप वर, आंब्याच्या गचपणात वाघळाच्या पंखांची फडफड, माडाच्या झावळ्यांमधनं; पावसाचा भास जागवत वारा फिरतोय. एकेक प्रकाशमान खिडकी मालवून; पापण्या जडावलेली घरं अंथरूणाला पाठ टेकतायत. रात्र एखाद्या सखीसारखी माथ्यावरून हात फिरवत म्हणतीये....* *"खूप झालं जगणं, आता झोपायचं..."* *तिच्या स्पर्शानं उर भरून येतं. डोळे डबडबतात. माथ्यावरून रात्रीचा हात आणि अगदी खोलातून झोप येत असते.* *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्यांच्या अंगात, विचारात आणि कृतीत सर्व मानवतावादी मूल्ये रुजलेली आहेत ह्यांनाच आपण खरे विद्वान म्हणावे. केवळ वरवर ज्ञान मिळवून चार लोकांत आपलाच उदोउदो करुन घेणारे महाभागही या जगात पुष्कळ आहेत. त्यांच्या ओठांवर एक आणि पोटात एक असते. अशी माणसे तेव्हाच काळाबरोबर लुप्त होतात. ते कधीच नंतरच्या काळात टिकत नाहीत अर्थात ते अल्पायुषी ठरतात. ज्यांना काळाबरोबर आणि काळाप्रमाणे पुढे पुढे जायचे आहे ते मात्र कशाचाही विचार न करता जगतात. तेच खरे मानवतेची मूल्य जोपासत कोणत्याही कालप्रवाहात चिरंजीव असतात हे मात्र सत्य आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *मर्यादा - Limit* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *मैत्रीच्या मर्यादा* एका गावाच्या एका पेठेत एक कोळसेवाला राहात होता. जवळच एक धोबी राहावयास आला. त्या दोघांची चांगली ओळख झाली. कोळसेवाल्याला वाटले, 'धोबी फार चांगला मनुष्य आहे. आपल्या अर्ध्या घरात तो राहीला तर सोबत होईल नि हळुहळू परस्परांची मैत्रीही वाढत जाईल.' एक दिवस कोळसेवाल्याने धोब्याला आपल्या मनातील विचार बोलून दाखविले. कोळसेवाला पुढे म्हणाला, 'या महागाईच्या दिवसांत आपल्या खर्चात तेवढीच बचत होईल. शिवाय एकमेकांना सोबतही होईल!' 'फार फार आभारी आहे. तुम्ही खरोखरच फार चांगले आहात!' धोबी त्याला नम्रपणे म्हणाला. 'बाकी सर्व ठीक आहे हो, पण तुमचं आमचं एकत्र राहाणं जमायचं नाही. कारण मी जीवाचा आटापीटा करून जे जे स्वच्छ करीत जाईन, ते ते एका क्षणांत काळंकुट्टं होईल, तुमच्या शेजारानं! माफ करा!!' तात्पर्य - चांगल्या हेतूने होणा-या मैत्रीलाही परिस्थितीच्या नैसर्गिक मर्यादा असतात. *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 24/07/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९४३ - दुसरे महायुद्ध - दोस्त राष्ट्रांच्या विमानांनी जर्मनीतील हांबुर्ग शहरावर तुफान बॉम्बफेक सुरू केली. १९६५ - व्हियेतनाम युद्ध - उत्तर व्हियेतनामने अमेरिकेचे लढाउ विमान पाडले. 💥 जन्म :- १९१७ - जॅक मोरोनी, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू. १९४५ - अझीम प्रेमजी, भारतीय उद्योगपती. 💥 मृत्यू :- १९७० - पीटर दि नरोन्हा, भारतीय उद्योगपती. १९८० - पीटर सेलर्स, ब्रिटीश अभिनेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी एकादशीनिमित्त वर्षा येथील शासकीय निवासस्थानी केली सपत्नीक विठ्ठलपूजा* --------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथीन फरझाना या महिलेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून निकाह हलाला संपुष्टात आणण्याची केली मागणी* --------------------------------------------------- 3⃣ *पटणा - लालूप्रसाद यादव यांच्या राजद पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शंकर चरण त्रिपाठी यांची पक्षातून हकालपट्टी, मोदींसोबतच्या गळाभेटीवरुन राहुल गांधींवर केली होती टीका.* --------------------------------------------------- 4⃣ *पटणा - बिहार विधानसभेत दारुबंदी विधेयक मंजूर, मुख्यमंत्री नितिशकुमार यांनी केले सडेतोड भाषण.* --------------------------------------------------- 5⃣ *नवी दिल्ली - राजर्षी शाहू महाराज यांना भारतरत्न सन्मान द्या, खासदार धनंजय महाडिक यांची लोकसभेत मागणी* --------------------------------------------------- 6⃣ *राज्य शासनाकडून ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार डॉ. किसन महाराज साखरे यांना जाहीर.* --------------------------------------------------- 7⃣ *श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेवर 199 धावांनी विजय मिळवत दोन कसोटी सामन्यांची मालिका 2-0 अशी खिशात टाकली.* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *छडी लागे ( ना ) छम छम ....!* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://epaper.ejanshakti.com/m5/1747581/Mumbai-Janshakti/24-07-2018#page/4/1 आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *अझीम हशिम प्रेमजी* अझीम हशिम प्रेमजी (जन्म २४ जुलै १९४५) हे भारतीय उद्योगपती व विप्रो कंपनीचे अध्यक्ष आहेत. फोर्ब्सने जाहीर केलेल्या भारतीय श्रीमंतांच्या यादीमध्ये ते तिसऱ्या स्थानावर आहेत व जगातील श्रीमंतांच्या यादीमध्ये ४१ व्या स्थानावर आहेत. गेल्या चार दशकात त्यांनी विप्रो कंपनीचा विविध क्षेत्रात विस्तार केला व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी म्हणून उदयास आणली. २००० साली एशियावीक ने त्यांची जगातील २० सर्वाधिक शक्तिशाली पुरुषांच्या यादीत निवड केली. टाईम नियतकालिकाने दोनदा त्यांचा जगातील १०० सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत स्थान देऊन गौरव केला. २००५ साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. तसेच २०११ साली त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) अलाहाबाद कोणत्या संगमावर वसले आहे ?* गंगा-यमुना संगम *२) आकाशस्थ ग्रहगोलातील अंतर मोजण्याचे एकक कोणते ?* प्रकाश वर्ष *३) अन्नाचे रक्तात रूपांतर करण्यासाठी मदत करणार्या पाचक द्रव्यांना काय म्हणतात ?* एन्झिम *४) मेंदूकवटीशास्त्रात कशाचा अभ्यास केला जातो ?* मेंदू आणि कवठी रचनाशास्त्राचा *५) कोर्बिलियन कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?* टेबल टेनिस *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 संतोष लवांडे 👤 विष्णू रामोड, धर्माबाद 👤 गोविंद कोकुलवार, नांदेड 👤 राजेश पाटील मनूरकर 👤 सचिन टेकाळे, कुपटी, 👤 संतोष मुलकोड, 👤 धिरजसिंग चौहान 👤 दीपक पांचाळ 👤 प्रमोद फुलारी 👤 कल्याण बागल *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ======== *सावज* सावज थकलं की शिकार करता येते थकलेल पाहून आशा धरता येते सावज मिळे पर्यंत काही शाश्वती नसते काहींची महत्वाकांक्षा फार मोठी असते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'सहजस्थिती किंवा नीजस्थिती' कशी असते यासाठी एक साधे मोटारचे उदाहरण घेऊन स्पष्ट करू. मोटार चालकापाशी क्लच, ब्रेक, आणि अॅक्सिलेटर या तीन गोष्टी महत्वाची भूमिका बजावत असतात. चालकाचे काम संतुलित, संयमित मोटर चालविणे हे असते. त्याच्या पायाखालच्या अॅक्सिलेटरमुळे गाडीचा वेग वाढतो. आपल्या आयुष्यात सुखकारक, आनंददायक घटना घडल्या की आपल्या चित्तवृत्ती उचंबळून येतात. मन था-यावर रहात नाही... आणि प्रतिकूल, क्लेशकारक, घटना घडली की तेच मन काळवंडते, कोमेजते, मलूल, उदास आणि खिन्न होते. गाडीसमोर कोणी अनपेक्षित आले की आपण कचकन् ब्रेक दाबतो. तेव्हा होते तशी ही अवस्था असते.* *पण गाडी तर चालू राहिली पाहिजे आणि इंजिनशी तिचा असलेला थेट संबंध काही इच्छित काळापुरता तुटला पाहिजे, तेव्हा आपण क्लच दाबतो. ही जी अवस्था ती स्थिर, शांत, आणि समधात अवस्था. म्हणजे आपण जिवंत आहोत आणि आपले मन स्वच्छ, नितळ, पारदर्शी, भाव-विकाररहित झाले आहे. लिंग-देह-सुख-दु:ख यांच्या पलिकडील ही अवस्था. यावेळी आपल्याला येणारी आनंदाची अनुभूती केवळ शब्दातीत - ती चिदानंद स्वरूपाची. हे क्षण प्राप्त व्हावे, असे वाटत असल्यास सर्व संतानी सांगितलेला उपाय म्हणजे नामस्मरण...* *'नामापरते सुख नाही रे सर्वथा !'* *--हाच तो सदगुरूपदेश...* ••●⚜‼ *रामकृष्णहरी* ‼⚜●•• 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्यांच्या अंगात,विचारात आणि कृतीत सर्व मानवतावादी मूल्ये रुजलेली आहेत ह्यांनाच आपण खरे विद्वान म्हणावे.केवळ वरवर ज्ञान मिळवून चार लोकांत आपलाच उदोउदो करुन घेणारे महाभागही या जगात पुष्कळ आहेत.त्यांच्या ओठांवर एक आणि पोटात एक असते.अशी माणसे तेव्हाच काळाबरोबर लुप्त होतात.ते कधीच नंतरच्या काळात टिकत नाहीत अर्थात ते अल्पायुषी ठरतात.ज्यांना काळाबरोबर आणि काळाप्रमाणे पुढे पुढे जायचे आहे ते मात्र कशाचाही विचार न करता जगतात.तेच खरे मानवतेची मूल्य जोपासत कोणत्याही कालप्रवाहात चिरंजीव असतात हे मात्र सत्य आहे *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *सुगंध - Fragrance* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *गुरू ,परीक्षा ,शिष्य* गुरुकुलातून तीन शिष्य उत्तीर्ण होणार होते. त्यांच्या अंतिम परीक्षा सुरू होत्या. गुरू म्हणाले, “एक परीक्षा तुम्हाला न सांगता होईल. तीच तुमची खरी अंतिम परीक्षा असेल.. आणि या परीक्षेत तुम्ही पास झाला तर तुमचे जीवन यशस्वी व सत्कारणी लागेल. आता आपल्या गुरुकुलातल्या सगळ्या परीक्षा झाल्या. ती विशेष परीक्षा काही झाली नाही. गुरुकुलात सत्कार सोहळाही झाला. प्रथेप्रमाणे तिन्ही विद्यार्थी पुढील जीवनातील आयुष्य यशस्वी करण्यासाठी बाहेर पडले. एके दिवशी ते संध्यासमयी जंगलातुन जात होती.आणखी काही क्षणांमध्ये काळोख पसरणार होता .राञ होणार अंधार पडणार आणि त्या काळोखातुन त्यांना जंगल पार करून गावी परतायचे होते . झपझप चालून पुढचं जंगल पार करायचं होतं, मुक्कामाचं गाव गाठायचं होतं. अचानक पुढे चालणारा विद्यार्थी थबकला. वाटेत एक काटेरी झुडूप आडवं पडलं होतं. तो दोन पावलं मागे आला आणि धावत पुढे जाऊन त्याने एका झेपेत ते झुडुप पार केलं. दुसऱ्याने अंदाज घेतला आणि रस्ता सोडून खाली उतरून त्याने काटे पार केले आणि तो पलीकडच्या बाजूला पुन्हा वाटेवर आला.. तिसरा मात्र थांबून काटे वेचू लागला. बाजूला एका छोट्या खड्ड्यात ते लोटू लागला. दोघे मित्र म्हणाले, “अरे, ही काटे वेचायची वेळ आहे का? कोणत्याही क्षणी अंधार पडेल.आता सांज होत आहे.अशा या संध्यासमयी आपल्याला लवकरात लवकर मुक्कामाचं गाव गाठायचं आहे. रस्त्यात कुठे वाट चुकलो, तर जंगलात भटकत राहू. चल लवकर.. तिसरा युवक म्हणाला, अंधार पडणार आहे, म्हणूनच हे काटे वेचले पाहिजेत. आपल्याला ते दिसले तरी. आपल्यामागून जो वाटसरू येईल, त्याला काटे दिसणारच नाहीत. त्याच्या पायात काटा घुसला तर त्याची इथे या भयाण जंगलात काय अवस्था होईल, विचार करा. तुम्ही पुढे निघा. मी हे काटे बाजूला करून गाठतोच तुम्हाला धावत.. ते दोघे पुढे निघतात, तोच शेजारच्या झाडामागून गुरू बाहेर आले आणि म्हणाले, तुम्हा दोघांना पुन्हा गुरुकुलात यावं लागेल तुमचं शिक्षण अजून अपूर्ण आहे. तात्पर्य : अंतिम परीक्षा ज्ञानाची नव्हती, प्रेमाची होती,भावनिकतेची होती , अनुकंपेची होती, सहवेदनेची होती,दुःख वाटून घेण्याची होती.तुम्ही दोघेजण ज्ञान खूप शिकलात, प्रेम अजून शिकणं बाकी आहे.भावनिकतेची जोपासना होणे बाकी आहे.बस तेवढी जोपासयला शिका.मगच जीवनात सर्वोतोपरी यशस्वी व्हाल *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*आमची पंढरी* ज्ञानीयाची पंढरी आहे आमची शाळा फुलतो तिथे नित्य बालकांचा मळा विठुराया सारखे बालक आहेत आमचे सावळे आणि गोजीरे फुलतात त्यांच्यानी आनंदाचे मळे कसे साजीरे ज्ञानदानाने, प्रेमाने करुया त्यांची पूजा आणि भक्ती विठुरायाचा दर्शनाची हीच आहे बघा युक्ती पंढरीचा विठूबाचे दर्शन आम्हा होणार सकाळ सकाळी हसरे चेहरे फुलणार विद्या आमची माऊली विठोबाची सावली चिमुकल्यांचा रुपात अशी आम्हास भावली. 🙏🌹🌹🌹🙏 〰〰〰〰〰〰 ✍ ©प्रमिलाताई सेनकुडे हदगाव जिल्हा नांदेड ➖➖➖➖➖➖➖
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 21/07/2018 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९७० - ईजिप्तमध्ये आस्वान धरणाचे बांधकाम पूर्ण. १९७२ - आयर्लंडच्या बेलफास्ट शहरात दहशतवाद्यांनी २२ बॉम्बस्फोट घडवून आणले. ९ ठार, १३० जखमी. १९७६ - आयर्लंडमधील ब्रिटीश राजदूताची हत्या. 💥 जन्म :- १९३४ - चंदू बोर्डे, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९४७ - चेतन चौहान, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९६१ - अमरसिंग चमकीला, पंजाबी गायक. 💥 मृत्यू :- २००१ - शिवाजी गणेशन, तमिळ अभिनेता. २००२ - गोपाळराव बळवंतराव कांबळे, मराठी चित्रकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली - मोदी सरकार विरोधात दाखविलेला अविश्वास प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मविश्वासाने जिंकला* --------------------------------------------------- 2⃣ *नागपूर : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक मंजूर, जळगाव विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी यांचे नाव* --------------------------------------------------- 3⃣ *कोल्हापूर - राधानगरी धरणाचे ३ व ६ नंबर दरवाजे उघडले, विद्युत विमोचकासह ४४५६ क्युसेक विसर्ग सुरू.* --------------------------------------------------- 4⃣ *नाशिक - जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराजवळील संरक्षण भिंतीलगत असलेले गुलमोहराचे झाड कोसळल्याने दोन कारचे नुकसान.* --------------------------------------------------- 5⃣ *नागपूरः राज्य सरकारने दूध दरवाढीसंबंधी घेतलेला निर्णय स्वागतार्ह दूध दरवाढीचे आंदोलन मागे - राजू शेट्टी यांची घोषणा* --------------------------------------------------- 6⃣ *झामन आणि इमाम उल हक या पाकिस्तानच्या सलामीवीरांनी 304 धावांची भागीदारी रचत विश्वविक्रमाला घातली गवसणी* --------------------------------------------------- 7⃣ *हॉकी 2017च्या आशिया चषक विजेत्या भारतीय संघाला सलामीच्याच सामन्यात यजमान इंग्लंडचा करावा लागणार सामना* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= आंतरराष्ट्रीय पालक दिनाच्या निमित्ताने ....... *गरज पालकांची शाळा भरवायची* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://epaper.ejanshakti.com/m5/1743658/Mumbai-Janshakti/21-07-2018#page/4/1 आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *सिकंदर* महान अलेक्झांडर, अर्थात तिसरा अलेक्झांडर, मॅसेडोन (अन्य नावे : अलेक्झांडर द ग्रेट, सिकंदर ) हा मॅसेडोनियाचा राज्यकर्ता होता. जागतिक इतिहासात तो सर्वांत यशस्वी व कुशल सेनापतींपैकी एक गणला जातो. तत्कालीन ग्रीक संस्कृतीला त्या काळात ज्ञात असलेले संपूर्ण जग त्याने जिंकले आणि त्यामुळे तो जगज्जेता म्हणूनही ओळखला जातो. आपल्या कारकिर्दीत त्याने इराण, सीरिया, इजिप्त, मेसोपोटेमिया, फिनीशिया, जुदेआ, गाझा, बॅक्ट्रिया तसेच भारतातील पंजाबपर्यंतचा प्रदेश जिंकला. फारसी दस्त ऐवजांनुसार त्याला एस्कंदर-इ-मक्दुनी(मॅसेडोनियाचा अलेक्झांडर) म्हटले जाते. तर उर्दू आणि हिंदी दस्तऐवजांत त्याला सिकंदर-ए-आझम म्हटले गेले आहे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= सत्य पालन हाच धर्म बाकीचे सर्व अधर्म आहेत. - महात्मा ज्योतिबा फुले *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *०१) जगात एकूण किती खंड आहेत ?* सात *०२) जगात एकूण किती महासागर आहेत ?* पाच *०३) जगात सर्वात मोठा खंड कोणता ?* आशिया *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 वृषाली शिंदे 👤 शशी खांडाळकर 👤 व्यंकटराव तोटावाड 👤 विजय वाठोरे सरसमकर 👤 रामचंद्र कडलवार 👤 कवयित्री सोनाली चंदनशिवे 👤 शिवराज मोराडे 👤 रविकांत कुलकर्णी 👤 संजीव गंजगुडे 👤 चिंतामणी जाधव *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *संकल्प स्वच्छतेचा* चला सारे स्वच्छतेचा मनी संकल्प करू स्वच्छता तिथे आरोग्य नेहमी ध्यानी धरू लक्षात ठेवा स्वच्छता असेल जिथे तिथे आनंद अन् आरोग्य नांदेल तिथे तिथे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *सत्याला 'सत्य' म्हणून ओळखा आणि असत्याला 'असत्य' म्हणून, असा संदेश गौतम बुद्धांनी दिला. सत्य या शाश्वत मूल्याचा वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातील आचारासाठी माणसाचं विवेकी मन हाच मूलाधार असतो. वस्तुत: माणसाला सत्य सहज कळतं. सत्य पाहण्याची, बोलण्याची वा कृती करण्याची रूची स्वाभाविक असते. माणूस आसक्तीत अडकला की खोट्या, असत्य, अप्रामाणिकपणाची पुटं मनावर चढतात. विवेक हरपतो. तोंडानं सत्याचा पुरस्कार परंतु आचरण मात्र असत्य. उच्चार-आचार यात पूर्णत: विसंगती. लग्नातील सातवी प्रतीज्ञा आहे, "सखा सप्तपदी भव" म्हणजे विवाहानंतर स्त्री व पुरूष यांच्यात मालक आणि नोकर असा भाव असता कामा नये. पती व पत्नी यांच्यात सख्याची -मैत्रिची भावना हवी. समानतेचा, कधीही न तुटणारा ऐक्याचा सख्य संबंध हवा. परंतु सत्यपालनाचे आचरण किती घडतं.* *सत्यनिष्ठेनं, सत्य आचरणानं खरंतर माणसाचं ह्रदय व्यापक होतं. अंत:करणात प्रेमभाव वाढतो. वैरभावनेचा लोप होतो. आत्म्याचा विकास होतो. सत्य हे सर्व समर्थ असल्यानं जगण्यातील विश्वास बळावत जातो. व्यापक अर्थानं सत्याचं पालन करण्याने स्वत:चं, कुटुंबाचं जगणं अर्थपूर्ण ठरतं, आनंददायी होतं.* *दुष्ट कर्म तुम्ही, अजिबात टाळा !* *पुढे नाही धोका, मुलांबाळा ॥* *सद्यस्थितीत देशात सत्य आचरणाच्या बाबतीत सर्वत्र अंधार दिसतो. सत्याचं पालन करणं हीच सर्वोत्तम समाजसेवा हा विचार रूझला तरच असत्याचा अंधार मिटून सत्याचा सूर्योदय नक्कीच होईल.* ••●🔅‼ *रामकृष्णहरी* ‼🔅●•• 🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆 *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= अज्ञानाला दूर घालवायचे असेल, दु:खाला दूर करायचे असेल, आपल्या मनातील रागावर नियंत्रण ठेवावे वाटत असेल, इतरांना आपलेसे करावे वाटत असेल, अवघड समस्येतून मार्ग काढायचा असेल आणि जीवन सुखी व समृद्ध व्हावे असे वाटत असेल तर त्यावर एक आणि एकच सर्वोत्तम मार्ग आहे तो म्हणजे ज्ञानाचा. ज्यांनी ज्ञानाचा मार्ग स्वीकारला आहे त्यांनी ह्या सा-या गोष्टीतून ज्ञानाच्या सहाय्याने सहज मारली काढून जीवन सुखी व समृद्ध केले आहे. ज्यांनी स्वीकारला नाही त्यांना त्यांच्या जीवनात कधीही सुखी होता आले नाही. ते जवळ असलेल्या सुखालाही मुकले आहेत कारण त्यांच्याजवळ ज्ञानाची जोड नव्हती म्हणून या जगात सर्वश्रेष्ठ जर काय असेल तर ते ज्ञान. जीवनातील अज्ञानाला दूर करण्याचे सामर्थ्य केवळ ज्ञानातच आहे हे कधीही विसरुन चालणार नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *अज्ञान - Ignorance* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *शासन* महाभारताच्या शांतीपर्वातील ही गोष्ट. शंख व लिखित नावंचे दोघे भाऊ यज्ञोपवित संस्कार झाल्यावर गुरूगृही विद्याध्यानासाठी गेले. संपूर्ण वेद वेदांगाचा अभ्यास करून गुरूची परवानगी घेऊन हे दोघे घरी परत आले. दोघांनीही दोन वेगवेगळया ठिकाणी आपले आश्रम बांधले. तिथे त्यांचे अध्यापनाचे काम सुरू झाले. बरेच दिवस झाले दोन्ही भावांची भेट नव्हती. लिखिताने शंखाकडे भेटीला जाण्याचे ठरवले. त्याप्रमाणे तो गेला पण शंख कामानिमित्त बाहेर गेला होता. निराश झालेला लिखित परत निघाला. दुपारी बाराची वेळ भूक लागली होती. समोर शंखाच्या आश्रमातील आंब्याच्या झाडाला खूप आंबे लागले होते. एक छानसा पिकलेला आंबा लिखिताने तोडला व पुढे चालू लागला. तेवढयात समोरून येणार्या शंखाने ते पाहिले व विचारले. 'आंबा कुठे मिळाला ?' शंख सहज म्हणाला 'अरे ! तुझ्याच झाडाचा छान पिवळा धम्मक दिसला तोडला'. शंख शांतपणे म्हणाला 'म्हणजे लिखिता तू चोरी केलीस झाडाच्या मालकाला न विचारता आंबा तोडलास' लिखिताला आपली चूक कळली. शरमेने त्याची मान खाली झुकली. 'शंखा माझ्या गुन्ह्याबद्दल मला हवी ती शिक्षा कर' 'काहीं गरज नाहीं त्याची जा आता पुन्हा असे घडणार नाही ह्याची खबरदारी घे' शंख एवढे बोलून निघून गेला. लिखित राजाकडे गेला. घडलेली सर्व हकीगत सांगितली. 'राजा मला शिक्षा कर' लिखित म्हणाला. ह्या विचित्र मागणीचे राजाला आश्चर्य वाटले. राजा म्हणाला 'लिखिता तू म्हणतोस ते खरंही असेल पण चोरीची फिर्याद कुणीच केलेली नाही. गुन्हा शाबीत झाला तर शिक्षा'. 'राजे पण गुन्हा शाबीत झाला तर ह्या गुन्ह्याला शिक्षा कोणती ?' लिखिताने विचारले, 'चोरी करणार्याचा हातच आम्ही कापतो' राजा म्हणाला. राजाच्या समोरच लिखिताने राजा शासन करत नाहीं म्हणून आपणच आपला हात कापून टाकला'. स्वत:च स्वत:ला शिक्षा करून घेणारी प्रजा उत्कृष्ट राज्य शासनाचे प्रतीक आहे. *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 20/07/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १४०२: तैमूरलंगने तुर्कस्तानमधील अंकारा शहर जिंकले. १८०७: निकेफोरे नीएपस यांना जगातील पहिल्या इंजिनसाठी पेटंट दिले गेले. १८२८: मुंबापूर वर्तमान हे मराठी वृत्तपत्र मुंबईत सुरू झाले. १८७१: ब्रिटिश कोलंबिया हा प्रांत कॅनडात विलीन झाला. १९०३: फोर्ड मोटर कंपनीतून पहिली मोटारगाडी बाहेर पडली. १९०८: बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांच्या पुढाकाराने बँक ऑफ बडोदा ची स्थापना झाली. १९२६: मेथॉडिस्ट चर्चने स्त्रियांना धर्मगुरू होण्याची परवानगी दिली. १९४४: दुसरे महायुद्ध – क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्गने केलेल्या प्राणघातक हल्ल्यातुन अॅडॉल्फ हिटलर बचावला. १९४९: इस्त्रायल व सीरीयाने शांतता करार केल्यामुळे १९ महिने सुरू असलेले युद्ध संपले. १९५२: फिनलंडची राजधानी हेलसिंकी येथे १५ व्या ऑलिम्पिक खेळांना सुरूवात झाली. १९६०: सिरिमावो भंडारनायके श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी. १९६९: नील आर्मस्ट्राँग हा चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव ठरला. १९७३: केनियाचे अर्थमंत्री ज्युलियस कियानो यांनी जाहीर केले की देशातील आशियाई लोकांचे उद्योग-धंदे वर्षअखेरीस सक्तीने बंद करण्यात येतील. १९७६: मंगळावर प्रथमच व्हायकिंग-१ हे मानवरहित अंतराळयान उतरले. १९८९: म्यानमारच्या सरकारने ऑँग सान सू कीला नजरकैदेत टाकले. २०००: अभिनेते दिलीपकुमार यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार जाहीर. २०१५: पाच दशकांनंतर अमेरिका आणि क्युबा यांच्यामध्ये राजनयिक संबंध पुन्हा सुरू झाले. 💥 जन्म :- १८२२: जनुकांची संकल्पना मांडणारा जर्मन जीवशास्त्रज्ञ ग्रेगोर मेंडेल १८३६: ज्वरमापीचा शोध लावणारे डॉक्टर सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट १८८९: बीबीसी चे सहसंस्थापक जॉन रीथ १९११: भारतीय क्रिकेट खेळाडू बाका जिलानी १९१९: माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक सर एडमंड हिलरी १९२१: बनारस घराण्याचे नामवंत तबलावादक पंडित सामताप्रसाद १९२९: हिन्दी चित्रपट अभिनेता राजेंद्रकुमार १९७६: भारतीय क्रिकेट खेळाडू देबाशिष मोहंती 💥 मृत्यू :- १९२२: रशियन गणितज्ञ आंद्रे मार्कोव्ह १९३७: रेडिओचे संशोधक गुग्लिएल्मो मार्कोनी १९४३: कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक वामन मल्हार जोशी १९५१: जॉर्डनचा राजा अब्दुल्ला (पहिला) १९६५: क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त १९७२: अभिनेत्री गीता दत्त १९७३: अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ज्ञ ब्रूस ली १९९५: शास्त्रीय गायक शंकरराव बोडस २०१३: भारतीय राजकारणी खुर्शिद आलम खान *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *दूधाच्या दरात वाढ करावी यासाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाची अखेर सरकारने दखल घेतली. दुधाला प्रतिलिटर २५ रुपये दर देण्याची सरकारतर्फे करण्यात आली घोषणा* --------------------------------------------------- 2⃣ *महाराष्ट्रातील आमदारांना 'अच्छे दिन' ! प्रवास भत्ता तिपटीने वाढला, अधिवेशानात सुधारणा विधेयक एकमताने करण्यात आला मंजूर* --------------------------------------------------- 3⃣ *राज्य सरकारमार्फत भरल्या जाणाऱ्या 72 हजार नोकरभरतीमध्ये 16 टक्के जागा मराठा समाजासाठी आरक्षित असणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली* --------------------------------------------------- 4⃣ *मुंबई - अविश्वास प्रस्तावादरम्यान शिवसेना मोदी सरकारच्या बाजूने करणार मतदान* --------------------------------------------------- 5⃣ *शनी शिंगणापूर देवस्थान आता सरकारच्या ताब्यात, राज्य सरकारकडून विधेयकाला विधानसभेत मंजुरी. शनैश्चर देवस्थान विश्वस्त विधेयक 2018 ला मंजुरी.* --------------------------------------------------- 6⃣ *मुंबई : शरीरसौष्ठवपटूंचे आश्रयदाते असलेल्या प्रशांत आपटे यांची महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेच्या अध्यक्षपदी एकमताने बिनविरोध निवड* --------------------------------------------------- 7⃣ *हॉकीच्या पहिल्या सामन्यात रुपिंदरसिंग पालच्या दोन गोलच्या जोरावर भारताने न्यूझीलंडवर 4-2 असा विजय मिळवला* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *बोलण्याचे संस्कार* आपल्यावर बोलण्याचे संस्कार आहेत काय ?असे कोणी विचारणा केली तर आपण संभ्रमात पडतो. बोलण्यासाठी कोणत्या संस्काराची गरज आहे ? किंवा तसे संस्कार करता येतात काय ? याविषयी आपण लहान असताना नकळत विचार करतो मात्र त्यास बोलण्याचे संस्कार.......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/10/blog-post_25.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *सर एडमंड हिलरी* सर एडमंड हिलरी हे शेर्पा तेनसिंग नोर्गेबरोबर सर्वप्रथम एव्हरेस्ट सर करणारे जगप्रसिद्ध गिर्यारोहक होते. त्यांनी २ मे १९५३ रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी ११.३० ला एव्हरेस्टचे ८८४८ मी. उंचीचे शिखर सर केले. ही कामगिरी त्यांनी एव्हरेस्टसाठीच्या नवव्या ब्रिटिश मोहिमेअंतर्गत केली. एव्हरेस्ट आणि हिमालयीन साहसमोहिमांव्यतिरिक्त त्यांनी स्नो-कॅटरने दक्षिण ध्रुवावर यशस्वी मार्गक्रमण केले, उत्तर ध्रुव पादाक्रांत केला आणि जेट बोटीने बंगालच्या उपसागरातून गंगा नदीच्या प्रवाहातून तिच्या उगमापर्यंत जाण्याचा पराक्रम केला. त्यांनी हिमालयातील साहस मोहिमांबरोबर तेथील लोकांसाठी अनेक कल्यणकारी प्रकल्प हाती घेतले आहेत. एडमंड हिलरी हयांचे भारताशी आणि भारतीयांशी अतूट नातेदेखील जोडले आहे. त्यांनी काही काळ भारतात 'हायकमिशनर' ह्या पदावर काम केले आहे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= जे स्वत: बलवान असूनही दुसऱ्यांचे अपराध सहन करतात त्यांनाच क्षमाशील म्हणतात - गौतम बुद्ध *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) भीमबेटका गुहा कोठे आहेत ?* मध्य प्रदेश *२) सामान्यत संसदेची किती अधिवेशने असतात ?* तीन *३) आशियायी खेळात पदक मिळवणारी पहिली भारतीय स्त्री कोण ?* कमलजीत संधू *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= * साईनाथ माळगे, प्र. केंद्रप्रमुख, धर्माबाद * व्यंकट चिलवरवार, सहशिक्षक * श्रीराम भंडारे * लक्ष्मण दावणकर * जय माचेवाड * बजरंग अर्गेलू * ज्ञानेश्वर कोकरे * दिनेश राठोड * राहुल लोखंडे * गंगाधर पालकृतवार, सहशिक्षक * नितीन पवार * साईकुमार ईबीतवार * दत्तात्रय तोटावाड * रवींद्र पांडागळे * मोहन कुलकर्णी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *जागतिक प्रश्न* जगावरचा अन्याय हल्ली स्वतःवरचा वाटू लागतो जगाशी भिडण्यासाठी कोणाशीही खेटू लागतो जगाचं दुःख होईल पण माय बापाचं काही नाही जागतिक प्रश्न सोडवत हे फिरतात दिशा दाही शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *मुंबईतच प्रवास करीत असताना रिक्षा सिग्नलला थांबली. बाजूच्या रिक्षात एक बोकड शांतपणे बसला होता. त्याच्या शेजारचा माणूस निर्विकार होता. 'विश्वासघात' हा असाच शांतपणे बसलेला असतो. समोरच्याला कल्पना नसते, आपल्या पुढ्यात काय वाढून ठेवले आहे. बोकडाला काय माहीत? आपला कर्दनकाळच आपल्या शेजारी बसला आहे.* *आयुष्यातही अनेकदा असेच घडते. आपल्या आजूबाजूला शांतपणे वावरणारी माणसेच आपल्याला अडचणीत आणत असतात. विश्वासघात, फसवणूक, खोटे बोलणे या सगळ्या गोष्टी अनेकजण सराईतपणे करत असतात. ठेच लागल्यावर आपल्याला कळते, कुणामुळे जखम झाली आहे. राजकारणात, समाजात, व्यक्तिगत आयुष्यातही सर्रासपणे असे घडते. माणूस हतबल होतो, अनेकदा माणसे त्यातून सावरत नाहीत. "अशावेळी शांतपणे आपली मनोवृत्ती स्थिर ठेवणे गरजेचे असतं."* ••●⚜‼ *रामकृष्णहरी* ‼⚜●•• ☀☀☀☀☀☀☀☀☀ *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= प्रत्येकाने असा संकल्प केला पाहिजे की, आपल्या जीवनात कोणत्याही बाबतीत हार मानायची नाही किंवा माघार घ्यायची नाही. कारण आपण ज्या गोष्टी साध्य करणार आहोत त्या गोष्टींसाठी मनात जिद्द ठेवून आणि यश मिळविण्याचे लक्ष आपल्यासमोर ठेवून समोर येणा-या आव्हानाला प्रयत्नाने आणि त्या प्रयत्नामध्ये सातत्याने साध्य करण्यासाठी सज्ज झालात तर यश हे तुमच्यापासून कधीच दूर जात नाही. तुमच्या मनात हारण्याचीदेखील भावना स्पर्श करणार नाही. सदैव तुम्ही दिवसेंदिवस यशाकडेच मार्गक्रमण करत राहणार. पण तुमच्या मनाचा थोडा जरी आत्मविश्र्वास कमी झाला तरी तुमच्या यशस्वी जीवनामध्ये बाधा निर्माण करुन तुम्हाला तुम्हीच अपयशाला कारणीभूत ठरु शकाल हे मात्र नक्कीच. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *संकल्प - Resolution* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *सदशिष्य* एकदा गुरुजी यात्रेसाठी जायला निघाले. त्यांचे हर्षल व गौतम नावाचे दोन शिष्य होते. जातांना त्यांनी दोघांनाही पाच पाच चणे दिले व ते जपून ठेवण्यास सांगितले व गुरुजी यात्रेला निघून गेले. हर्षलने ते चणे व्यवस्थित कागदाच्या पुडीत बांधून डबीत ठेवले. गौतमने ते चणे घेतले व तुळशी वृंदावनात टाकुन दिले. हर्षल रोज गुरुजींनी दिलेले चणे नीट आहेत की नाहीत बघून त्यांची पुजा करत असे. गौतम मात्र जेथे चणे टाकले होते नित्य नियमाने पाणी देत असे. सात आठ दिवसांत तुळशी वृंदावनात चण्यांची छान रोपं झाली. दिवसागणीक रोपं वाढली व त्याल चणे लागले. गौतमने ते चणे काढले व दुसर्या मोठया कुंडीत टाकले. नित्य नियमाने तो रोपांना पाणी टाकत असे व त्यांची काळजी घेत असे. आता ह्या वेळेला चणे बरेच। व निघाले. गौतमने ते चणे काढून पुन्हा शेतात टाकले. हळूहळू करता करता पाच चण्यांचे पोतंभर चणे झाले. एक दोन वर्षाने गुरुजी परत आले. दिलेल्या चण्यांबद्दल विचारले. हर्षलने पुजेत ठेवलेली चण्याची डबी उघडली व चणे गुरुजींच्या हातावर ठेवले. गौतमने पोतं आणून गुरुजींच्या पुढे ठेवलं, गुरुजी खुष झाले. गुरूजी हर्षलला म्हणाले 'जपून ठेवण्याचा खरा अर्थ गौतमला उमगला. तु मात्र नुसतीच पुजा करत राहिलास आतले चणे किड लागून खराब ही झाले असतील'. *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ ( शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 19/07/2018 वार - गुरुवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १६९२: अमेरिकेतील सेलम शहरात चेटकीण असल्याच्या आरोपाखाली स्त्रियांना फाशी देण्यात आली. १८३२: सर चार्ल्स हेस्टिंग्स यांनी ब्रिटिश मेडिकल असोसिएशन आणि सर्जिकल असोसिएशनची स्थापना केली. १९००: पॅरिस मेट्रोची पहिली सेवा सुरु झाली १९०३: मॉरिस गरीन यांनी पहिली टूर डी फ्रान्स स्पर्धा जिंकली. १९०५: लॉर्ड कर्झन यांनी बंगालच्या फाळणीची घोषणा केली. १९४०: दुसरे महायुद्ध – केप स्पादाची लढाई. १९४७: म्यानमारच्या सरकारचे नियोजित पंतप्रधान आंग सान त्यांच्या मंत्री आणि सहकाऱ्यांची गॅलॉन सॉ याने हत्या केली. १९५२: फिनलंड मधील हेलसिंकी येथे १५व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात. १९६९: भारतातील १४ मोठ्या बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. १९६९: नील आर्मस्ट्राँग, एडवीन ऑल्ड्रिन व मायकेल कॉलिन्स या अंतराळवीरांसह अपोलो ११ हे अंतराळयान चंद्राच्या कक्षेत पोहोचले. १९७६: नेपाळमधे सागरमाथा राष्ट्रीय उद्यानाची रचना करण्यात आली. १९८०: मॉस्को येथे २२व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली. १९९२: कवी मजरुह सुलतानपुरी यांना इक्बाल सन्मान पुरस्कार जाहीर. १९९३: डॉ. बानू कोयाजी यांना समाजसेवेसाठीचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर. १९९६: अमेरिकेतील अटलांटा येथे २६व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात. 💥 जन्म :- १८१४: अमेरिकन संशोधक सॅम्युअल कॉल्ट १८२७: क्रांतिकारक मंगल पांडे १८३४: फ्रेंच चित्रकार एदगार देगास १८९६: स्कॉटिश लेखक ए. जे. क्रोनिन १८९९: भारतीय डॉक्टर, लेखक, कवी आणि नाटककार बालाइ चांद मुखोपाध्याय १९०२: कवी, कोशकार, इतिहास संशोधक यशवंत केळकर १९०२: भारतीय गायक, निर्माता, निर्माता आणि पटकथालेखक समृतरा राघवाचार्य १९०९: भारतीय कवी आणि लेखक बाल्मनी अम्मा १९३८: सुप्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ आणि गणितज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर १९४६: रोमानियन टेनिसपटू इलि नास्तासे १९५५: क्रिकेटपटू रॉजर बिन्नी १९६१: भारतीय पत्रकार आणि लेखक हर्षा भोगले 💥 मृत्यू :- ९३१: जपानचे सम्राट उडा १३०९: संत नामदेव यांचे गुरू संत विसोबा खेचर समाधिस्थ १८८२: प्राण्यांच्या वर्गीकरणा विषयी मूलभूत संशोधन करणारे ब्रिटीश निसर्ग शास्त्रज्ञ फ्रान्सिस बाल्फोर १९६५: दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सिंगमन रही १९६८: बडोद्याचे महाराज प्रतापसिंग गायकवाड १९८०: तुर्कस्तानचे पंतप्रधान निहात एरिम २००४: जपानचे पंतप्रधान झेन्को सुझुकी *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली - लोकसभेत विरोधक आणि टीडीपीने मांडलेल्या अविश्वास प्रस्तावाला लोकसभा अध्यक्षांकडून मंजुरी.* --------------------------------------------------- 2⃣ *नागपूर - तोट्यातील महामंडळे बंद करणार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत घोषणा* --------------------------------------------------- 3⃣ *महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पासाठी केंद्राची महत्त्वाकांक्षी योजना, 3 लाख 77 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी* --------------------------------------------------- 4⃣ *गोव्यात आयात करण्यात येणाऱ्या मासळीवर बंदी. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची माहिती.* --------------------------------------------------- 5⃣ *हिंगोली : पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे उत्तम असोले तर उपसभापती शिवसेनेचे नामदेव राठोड यांची निवड* --------------------------------------------------- 6⃣ *नवी दिल्ली - सोन्याच्या किंमतीत 600 ते 800 रुपयांनी घट, सोन्याचा कालचा दर होता 30,500 रुपये* --------------------------------------------------- 7⃣ *नवी दिल्ली - एक ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या तीन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची निवड, भुवनेश्वर कुमारला विश्रांती तर ऋषभ पंतला मिळाली संधी* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *फ्रेश शालेय परिपाठ* PDF मध्ये पाहण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://goo.gl/mmT6K2 *साभार : दैनिक दलितवाणी* आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= डॉ. जयंत विष्णू नारळीकर डॉ. जयंत विष्णू नारळीकर हे भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक आहेत. नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे १९ जुलै १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्यागणित शाखेचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. इ.स. १९५७ साली त्यांनी विज्ञानात पदवी (B.Sc.) प्राप्त केली.या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडी च्या पदव्या मिळाल्या. शिवाय, रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे मिळाली. १९६६ साली नारळीकर यांचा विवाह मंगला सदाशिव राजवाडे (गणितज्ञ) ह्यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत - गीता, गिरिजा व लीलावती. १९७२ साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले. १९८८साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. डॉ. नारळीकर यांच्या पत्नी मंगला नारळीकर ह्या ’नभात हसते तारे’ या पुस्तकाच्या सहलेखिका आहेत. ’पाहिलेले देश भेटलेली माणसं’ हे त्यांनी स्वतंत्रपणे लिहिलेले पुस्तक आहे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= एकत्र येणे ही सुरवात, एकामेकांसोबत राहणे ही प्रगती आणि एकामेकांसोबत काम करणे म्हणजे यश.... *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) हिंदू पुराणांची एकूण संख्या किती आहे ?* अठरा *२) 'शुल्बसूत्र' ग्रंथ कोणत्या विषयाशी निगडित आहे ?* भूमिती *३) 'स्वाजीलँड' या देशाचं नवीन नाव काय आहे ?* किंग्डम ऑफ इस्वातीनी *४) 'शेरशाह का मकबरा' ही वास्तू कुठे आहे ?* सासाराम, बिहार *५) 'दीपशिखा' हा काव्यसंग्रह कोणाचा आहे ?* महादेवी वर्मा *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= * मनोज बढे * अनिकेत पडघन * अमोल पाटील सावंत * गजानन शिराळे * श्रीनिवास मुरके * स्वप्नील शेंडगे * जगजीत ठाकूर * दीपक चामे * अमोल कदम * दीपक कांबळे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *ईच्छा* छोटा असो की मोठा प्रत्येकाला हाव आहे चोरालाही वाटते आपण साव आहे एक झाली की एक ईच्छा कुठे पुर्ण होते अती झालं की मग कधी तरी अजीर्ण होते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *लोकांनी आपल्या कार्यक्रमाला गर्दी करावी असं प्रत्येक कलावंताला वाटत असतं. लोक नाही जमले तर कलावंत नाराज होऊन संयोजकांना खडे बोल सुनावतात. कुमार गंधर्व एकदा म्हणाले होते, सभागृहात पाहून मी गातोच कुठं, मी आत पाहूनच गातो. लोक किती होते किंवा होते की नव्हते, याने मला काय फरक पडतो ? खरा कलावंत आत पाहून आपली कला सादर करतो. गायक स्टुडिओत रेकाॅर्डिंग करतात तेव्हा कुठे श्रोते असतात ?* *आपली आई जेंव्हा जात्यावर गाणं म्हणायची, तेव्हा कोण होता तीचा श्रोता ? कुणाकडं पाहून, कोणाच्या समाधानासाठी ती गाणं म्हणायची ? कुणाच्या टाळीची तीला आपेक्षा होती ? कुमार गंधर्व जसे आत पाहून स्वत: साठी गायचे तशीच जात्यावर गाणारी प्रत्येक आई त्या चार भिंतीच्या आत आणि गडद अंधारात जे गाणं म्हणायची ते गाणंच तिच्यासाठी आयुष्यातला सगळ्यात मोठा 'उजेड' होता. माणसानं त्या उजेडासाठी कविता म्हटली पाहिजे, गाणं गायलं पाहिजे.* 🎪 *॥ रामकृष्णहरी ॥* 🎪 🎄🎄🎄🎄🎄🎄 *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= वेळ ही भुतकाळाचा काहीच विचार न करता शांत राहते, वर्तमानात क्रियाशील असते तर भविष्यात जे काही होईल ते आपण स्वीकारु अशा तत्त्वाने काळानुसार चालते. पण माणसाचे तसे नाही. माणूस भुतकाळात जे काही घडून गेले त्या गोष्टीवर विचार करुन वर्तमानात लक्षपूर्वक काळजी घेऊन चालत असतो आणि भविष्यात आपण आजच्यापेक्षा ही अधिक चांगल्या प्रकारे जीवन कसे सुधारता येईल या अपेक्षेने तो जगण्याचे स्वप्न पाहत असतो. हे सारे माणसाने वेळेकडूनच शिकले आहे. वेळ ही आपल्यासाठी आहे आपण वेळेसाठी नाही.त्यामुळे वेळ ही स्वतः च्याच पध्दतीने काळानुसार मार्गक्रमण करीत असते आणि आपण त्या त्या नुसार जीवनात मार्गक्रमण करतो आणि करायला शिकले पाहिजे तरच जीवन सुखी व समृद्धी होईल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *समृद्ध - Prosperous* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *मनाची एकाग्रता* पांडुरंग *' मनाची एकाग्रता कशी करावी '* या विषयाचा अभ्यास करत बसला होता. त्याला जो कोणी भेटावयास येई, त्याच्याकडे तो दुर्लक्ष करायचा. आपल्याच चिंतनात मग्न असायचा. एकदा त्याचे गुरु सहदेव महाराज त्याच्याकडे आले. पाहतात तर पांडुरंग शून्यात नजर लावून बसलेला ! पांडुरंगाचे आपल्या गुरुकडे लक्षही नव्हते. सहदेव महाराज मात्र न रागावता तेथेच थांबले. त्यांनी एक वीट आणली आणि दिवसभर ती वीट एका दगडावर घासत बसले. शेवटी न राहवून पांडुरंगाने महाराजांना विचारले, '' महाराज आपण हे काय करता आहात ? '' सहदेव म्हणाले, '' मला या विटेचा आरसा बनवायचा आहे.'' पांडुरंग म्हणाला, '' महाराज, या विटेला घासून कधी आरसा होईल का ? जीवनभर घासत बसले तरीही विटेचा आरसा होणार नाही.'' ते ऐकून सहदेव हसले. म्हणाले, '' मग तू तरी काय करत आहेस ? वीट जर आरसा होत नसेल, तर मनाचे तरी काय ? मनावरील धूळ जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत साधना करुन तरी काय उपयोग ? मनाची एकाग्रता साधून जे कार्य केले जाते ते सर्वोत्तम असते. *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 17/07/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १८०२: मोडी लिपीतून पहिल्यांदाच मुद्रण करण्यात आले. १८१९: अॅडॅम्स-ओनिस करारानुसार फ्लोरिडा हे राज्य अमेरिकेने स्पेनकडुन ५ दशलक्ष डॉलर देऊन विकत घेतले. १८४१: सुप्रसिद्ध पंच या विनोदी साप्ताहिकाचा पहिला अंक प्रकाशित. १९१७: किंग जॉर्ज (पाचवा) यांनी फतवा काढून जाहीर केले की त्यांच्या वंशातील पुरुष मंडळी विंडसर हे आडनाव लावतील. १९४७: मुंबईते रेवस जलवाहतूक करणाऱ्या रामदास या फेरीबोटीला जलसमाधी मिळून सुमारे ७०० लोक मृत्युमुखी. १९५५: वॉल्ट डिस्ने यांनी कॅलिफोर्निया येथे डिस्नेलँड सुरू केले. १९७५: अमेरिकेचे अपोलो रशियाचे सोयुझ ही दोन अंतराळयाने एकमेकांस जोडली गेली. १९७६: कॅनडातील मॉन्ट्रिअल येथे २१ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात. १९९३: तेलुगू भाषेतील तेलुगू थल्ली हा पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना प्रदान. १९९४: विश्वकप फूटबॉलच्या अंतिम सामन्यात ब्राझिलने इटालीला पेनल्टी शूटआऊटमधे हरवले. २०००: अभिनेत्री नृत्यांगना वैजयंतीमाला बाली यांना भरतनाट्य शिखरमणी पुरस्कार जाहीर. २००४: तामिळनाडुतील कुंभकोणम गावात एका शाळेला लागलेल्या आगीत ९० विद्यार्थी मृत्यूमुखी पडले. 💥 जन्म :- १९१७: भारतीय अभिनेते, गायक आणि पटकथालेखक बिजोन भट्टाचार्य १९१९: संगीतकार स्नेहल भाटकर १९२३: कूपर कार कंपनी चे सहसंस्थापक जॉन कूपर १९३०: दलित साहित्यिक बाबूराव बागूल 💥 मृत्यू :- १९९२: अभिनेत्री शांता हुबळीकर १९९२: बंगाली हिंदी चित्रपटातील अभिनेत्री आणि गायिका कानन देवी २०१२: समाजवादी नेत्या आणि ६ व्या लोकसभेच्या सदस्य मृणाल गोरे २०१२: भारतीय-इंग्रजी राजकारणी मार्शा सिंह *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नागपूर : वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशातील केंद्रीय कोटाच्या 15 टक्के जागांमध्ये ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल, अशी कृती करण्यास हायकोर्टाने केली मनाई, त्यामुळे प्रवेश यंत्रणेला पुढे जाण्यापूर्वी आवश्यक काळजी घ्यावी लागणार* --------------------------------------------------- 2⃣ *कोकण विभागीय बोर्डाची 9018 घरांची लॉटरी निघणार ; 18 जुलैपासून भरता येणार अर्ज, 19 ऑगस्टला घरांसाठी सोडत* --------------------------------------------------- 3⃣ *दुधाची नासाडी टाळत दूध उत्पादकांचं अनोखं आंदोलन, कुठे वारकऱ्यांना मोफत दूध ; तर कुठे विद्यार्थ्यांमध्ये केलं दुधाचं वाटप; आंदोलकांकडून दूध सत्कारणी* --------------------------------------------------- 4⃣ *मुंबई : खड्डे बुजवले जाईपर्यंत टोल वसूल करू नका, सार्वजनिक बांधकाम विभागाची सरकारला शिफारस* --------------------------------------------------- 5⃣ *नागपूर : पावसाळ्यात ताडोबा पूर्ण बंद ठेवण्याची विनंती हायकोर्टाकडून अमान्य, बफर झोनमध्ये पर्यटन राहणार सुरु* --------------------------------------------------- 6⃣ *नाशिकचे गंगापूर धरण पंधरवड्यात 75 टक्के भरल्याने गोदापात्रात विसर्ग सुरु, पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस* --------------------------------------------------- 7⃣ *श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडिमल दोन कसोटी आणि चार एकदिवसीय सामन्यांसाठी निलंबित* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *जसे चारित्र्य तसे जीवन* वरील लेख पूर्ण ऐकण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://m.facebook.com/story.php?story_fbid=1599966110130157&id=100003503492582 आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *बाबुराव रामजी बागूल* बाबुराव बागूल (जुलै १७, १९३० - मार्च २६, २००८) हे दलित साहित्यासाठी ओळखले जाणारे मराठी लेखक, कवी होते. विद्रोही दलित कथांचे प्रमुख उद्गाते आणि प्रखर वास्तववादी कादंबरीकार तसेच शोषित, उपेक्षित, झोपडपट्टीतील, फुटपाथवरील भणंग जनजीवणाचे भेदक चित्रण करणारे लेखक म्हणून त्यांची ओळख होती. प्रभावी व विद्रोही भाषाशैली, जिवंत प्रसंगचित्रण, कारूण्य आणि क्रुरता रेखाटन हे त्यांच्या लेखनाचे विशेष गुण होते. बाबुराव बागुल यांचा जन्म १७ जुलै १९३० रोजी महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील ‘विहितगाव’ नावाच्या खेड्यात झाला. दलित जातीत जन्मल्यामुळे जातीय विषमतेचे अनुभव त्यांनी लहानपणापासूनच घेतले. बागुलांच्या आधीची भावंडे जगली नाहीत; तेव्हा ते तरी जगावेत या विचाराने बागुलांच्या वडिलांनी त्यांना मुंबईला माटुंग्याच्या लेबर कँपात राहणाऱ्या मावशीकडे पाठवून दिले. तेथील महानगरपालिकेच्या शाळेतच ते शिकू लागले. त्या सुमारास वाढू लागलेल्या आंबेडकरवादी विचारांचा परिणाम शालेय वयात असलेल्या बागुलांवरही झाला. चौथ्या इयत्तेत असतानाच त्यांनी एक आंबेडकरगीत लिहिले. आर्थिक परिस्थितीमुळे मॅट्रिकनंतर त्यांना शिक्षण थांबवावे लागले. नोकरीच्या शोधात असलेल्या बागुलांवर त्यादरम्यान मुंबईत बळावू लागलेल्या कामगार चळवळीचा प्रभाव पडला. माटुंग्याच्या लेबर कँपातच राहत असलेल्या अण्णाभाऊ साठेंच्या संपर्कातून ते कामगार चळवळीत सहभागी झाले. या काळात त्यांनी साम्यवादी विचारवंतांच्या साहित्याचा अभ्यास केला. बेरोजगारी, आर्थिक-सामाजिक विषमता यांविरुद्ध या कालखंडात त्यांनी रचलेल्या कवितांमधून या विचारांचा प्रभाव जाणवतो. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= समाजाचा विकास केवळ सत्तेने होत नाही तर तो आदर्श शिक्षकांमुळे होतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) मुस्लीम लीगची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ?* १९०६ *२) वंगभंग चळवळीचे नेतृत्त्व कोणी केले ?* सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंदमोहन बोस, रवींद्रनाथ टागोर *३) अब्दुल लतीफ यांनी बंगालमध्ये कोणत्या संस्थेची स्थापना केली ?* द मोहमेडन लिटररी सोसायटी *४) लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या कारावासात कोणता ग्रंथ लिहिला ?* गीतारहस्य *५) सविनय कायदेभंगाची चळवळ गांधीजींनी कोणत्या वर्षी मागे घेतली ?* १९३४ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= * माधव गैनवार, * अनिलकुमार बिंगेवार * रामचंद्र गादेवार * दिगंबर कदम * पुरुषोत्तम केसरे * मधुकर फुलारी * विशु पाटील चंदापुरे * अरिफा शेख * आनंद पंगेवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *बढाई* काम कमी अन् श्रेयासाठी लढाई असते काम नकरणाराचीच जास्त बढाई असते काम करणाराचे काम झाकल्याने झाकत नसते बढाया मारणारांच्या पदरात कोणी काही टाकत नसते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'पंढरीची वारी' हा वारक-यांचा 'आचारधर्म' आहे. वारकरी म्हणजे वारी करणारा, शिवाय वार करणारा, घाल घालणारा. या शिकवणूकीतूनच शिवकाळात वारक-यांची एक भक्कम सेना उभी झाली.* *आम्ही विठ्ठलाचे वीर ।* *फोडू कळी काळाचे शीर ।।* *तेराव्या शतकाच्या अस्ताला ज्ञानेश्वर महाराजांसारख्या प्रज्ञावंतानं भागवत धर्माची पताका महाराष्ट्र देशी उभारली आणि सतराव्या शतकात तुकारामाच्या रूपानं विठ्ठल भक्तीचा मोठा उमाळा या मातीतून वर आला.* *ज्ञानदेवे रचिला पाया !* *तुका झालासे कळस' !!* *इथपर्यंतचा प्रवास या मातीने डोळाभरून पाहिला. "आकाशाकडे झेपावणारा महाकवी म्हणूनच 'तुका आकाशाएवढा' असं म्हटलं जातं."* ••●🔔‼ *रामकृष्णहरी* ‼🔔 ●•• 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= मानवी जीवन म्हटले की, त्याला त्याच्या दैनंदिन जीवनात कुठे ना कुठेतरी अडचण येणारच. अशावेळी त्या अडचणींवर काहीतरी उपाय अथवा पर्याय शोधून काढावाच लागतो. अडचण आली म्हणून स्तब्ध बसता येणार नाही किंवा काहीच न करता शांत ही बसता येणार नाही. असे जर केले तर अडचणींवर मातही करता येणार नाही. त्यावर काही ना काही उपाय शोधून काढावेच लागणार आहे. अशावेळी स्वत:ला जर काही सुचत नसेल तर आपल्या जवळच्या विश्वासू माणसांकडून किंवा अनुभवी माणसांकडून त्यावर सल्ला घ्यावा व आपली अडचण दूर करुन घेऊन सुलभ जीवन जगण्याचा मार्ग काढावा यातच खरे जीवन जगण्याचे कौशल्य आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *विश्वास - Believe* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *मित्रांची कथा* एक जंगल. जंगलात दोन वाघ. दोघेजण अगदी जवळचे आणि जुने मित्र असतात. लहानाचे मोठे एकत्र झाले, खूप काही शिकले, जंगल पाहिले, जंगलाचे कायदे-समजून घेतले, एकत्र शिकार केली ... खूप काही, पण एक दिवस एका फालतू कारणामुळे त्यांच्यात भांडण होवून आणि दोघे वेगळे होतात. बरीच वर्षे जातात दोघांनाही त्यांची जीवनसाथी मिळते मुले होतात. एकदिवस त्यातील एका वाघाचे विवळणे दुसऱ्याला ऐकू येते. दुसरा त्या दिशेने जातो पाहतो तर काही कुत्र्यांनी त्याच्या परिवारावर हल्ला केलेला असतो आणि त्यामध्ये तो परिवाराला वाचवण्याच्या नादात गंभीर जखमी झालेला असतो. दुसरा वाघ त्या कुत्र्यांना केळीची साल फाडल्यासारखं फाडतो आणि घरी जातो. त्याचा मुलगा त्याला विचारतो "पप्पा तो आता तुमचा मित्र नाही तुमची भांडणं झाली, मग तुम्ही त्याच्या मदतीला का धावून गेला?". वाघ म्हणतो, "बाळा मैत्री एवढी पण कमजोर असू नये की कुत्र्यांना पण ती बळ देईल". *तात्पर्य :-* "फालतू कारणांमुळे किंवा गैरसमजुतीमुळे वाघासारख्या मित्रांना दूर नका करू जेणेकरून कुत्र्यांना बळ येईल". *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 17/07/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १८०२: मोडी लिपीतून पहिल्यांदाच मुद्रण करण्यात आले. १८१९: अॅडॅम्स-ओनिस करारानुसार फ्लोरिडा हे राज्य अमेरिकेने स्पेनकडुन ५ दशलक्ष डॉलर देऊन विकत घेतले. १८४१: सुप्रसिद्ध पंच या विनोदी साप्ताहिकाचा पहिला अंक प्रकाशित. १९१७: किंग जॉर्ज (पाचवा) यांनी फतवा काढून जाहीर केले की त्यांच्या वंशातील पुरुष मंडळी विंडसर हे आडनाव लावतील. १९४७: मुंबईते रेवस जलवाहतूक करणाऱ्या रामदास या फेरीबोटीला जलसमाधी मिळून सुमारे ७०० लोक मृत्युमुखी. १९५५: वॉल्ट डिस्ने यांनी कॅलिफोर्निया येथे डिस्नेलँड सुरू केले. १९७५: अमेरिकेचे अपोलो रशियाचे सोयुझ ही दोन अंतराळयाने एकमेकांस जोडली गेली. १९७६: कॅनडातील मॉन्ट्रिअल येथे २१ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात. १९९३: तेलुगू भाषेतील तेलुगू थल्ली हा पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना प्रदान. १९९४: विश्वकप फूटबॉलच्या अंतिम सामन्यात ब्राझिलने इटालीला पेनल्टी शूटआऊटमधे हरवले. २०००: अभिनेत्री नृत्यांगना वैजयंतीमाला बाली यांना भरतनाट्य शिखरमणी पुरस्कार जाहीर. २००४: तामिळनाडुतील कुंभकोणम गावात एका शाळेला लागलेल्या आगीत ९० विद्यार्थी मृत्यूमुखी पडले. 💥 जन्म :- १९१७: भारतीय अभिनेते, गायक आणि पटकथालेखक बिजोन भट्टाचार्य १९१९: संगीतकार स्नेहल भाटकर १९२३: कूपर कार कंपनी चे सहसंस्थापक जॉन कूपर १९३०: दलित साहित्यिक बाबूराव बागूल 💥 मृत्यू :- १९९२: अभिनेत्री शांता हुबळीकर १९९२: बंगाली हिंदी चित्रपटातील अभिनेत्री आणि गायिका कानन देवी २०१२: समाजवादी नेत्या आणि ६ व्या लोकसभेच्या सदस्य मृणाल गोरे २०१२: भारतीय-इंग्रजी राजकारणी मार्शा सिंह *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नागपूर : वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशातील केंद्रीय कोटाच्या 15 टक्के जागांमध्ये ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल, अशी कृती करण्यास हायकोर्टाने केली मनाई, त्यामुळे प्रवेश यंत्रणेला पुढे जाण्यापूर्वी आवश्यक काळजी घ्यावी लागणार* --------------------------------------------------- 2⃣ *कोकण विभागीय बोर्डाची 9018 घरांची लॉटरी निघणार ; 18 जुलैपासून भरता येणार अर्ज, 19 ऑगस्टला घरांसाठी सोडत* --------------------------------------------------- 3⃣ *दुधाची नासाडी टाळत दूध उत्पादकांचं अनोखं आंदोलन, कुठे वारकऱ्यांना मोफत दूध ; तर कुठे विद्यार्थ्यांमध्ये केलं दुधाचं वाटप; आंदोलकांकडून दूध सत्कारणी* --------------------------------------------------- 4⃣ *मुंबई : खड्डे बुजवले जाईपर्यंत टोल वसूल करू नका, सार्वजनिक बांधकाम विभागाची सरकारला शिफारस* --------------------------------------------------- 5⃣ *नागपूर : पावसाळ्यात ताडोबा पूर्ण बंद ठेवण्याची विनंती हायकोर्टाकडून अमान्य, बफर झोनमध्ये पर्यटन राहणार सुरु* --------------------------------------------------- 6⃣ *नाशिकचे गंगापूर धरण पंधरवड्यात 75 टक्के भरल्याने गोदापात्रात विसर्ग सुरु, पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस* --------------------------------------------------- 7⃣ *श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडिमल दोन कसोटी आणि चार एकदिवसीय सामन्यांसाठी निलंबित* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *जसे चारित्र्य तसे जीवन* वरील लेख पूर्ण ऐकण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://m.facebook.com/story.php?story_fbid=1599966110130157&id=100003503492582 आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *बाबुराव रामजी बागूल* बाबुराव बागूल (जुलै १७, १९३० - मार्च २६, २००८) हे दलित साहित्यासाठी ओळखले जाणारे मराठी लेखक, कवी होते. विद्रोही दलित कथांचे प्रमुख उद्गाते आणि प्रखर वास्तववादी कादंबरीकार तसेच शोषित, उपेक्षित, झोपडपट्टीतील, फुटपाथवरील भणंग जनजीवणाचे भेदक चित्रण करणारे लेखक म्हणून त्यांची ओळख होती. प्रभावी व विद्रोही भाषाशैली, जिवंत प्रसंगचित्रण, कारूण्य आणि क्रुरता रेखाटन हे त्यांच्या लेखनाचे विशेष गुण होते. बाबुराव बागुल यांचा जन्म १७ जुलै १९३० रोजी महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील ‘विहितगाव’ नावाच्या खेड्यात झाला. दलित जातीत जन्मल्यामुळे जातीय विषमतेचे अनुभव त्यांनी लहानपणापासूनच घेतले. बागुलांच्या आधीची भावंडे जगली नाहीत; तेव्हा ते तरी जगावेत या विचाराने बागुलांच्या वडिलांनी त्यांना मुंबईला माटुंग्याच्या लेबर कँपात राहणाऱ्या मावशीकडे पाठवून दिले. तेथील महानगरपालिकेच्या शाळेतच ते शिकू लागले. त्या सुमारास वाढू लागलेल्या आंबेडकरवादी विचारांचा परिणाम शालेय वयात असलेल्या बागुलांवरही झाला. चौथ्या इयत्तेत असतानाच त्यांनी एक आंबेडकरगीत लिहिले. आर्थिक परिस्थितीमुळे मॅट्रिकनंतर त्यांना शिक्षण थांबवावे लागले. नोकरीच्या शोधात असलेल्या बागुलांवर त्यादरम्यान मुंबईत बळावू लागलेल्या कामगार चळवळीचा प्रभाव पडला. माटुंग्याच्या लेबर कँपातच राहत असलेल्या अण्णाभाऊ साठेंच्या संपर्कातून ते कामगार चळवळीत सहभागी झाले. या काळात त्यांनी साम्यवादी विचारवंतांच्या साहित्याचा अभ्यास केला. बेरोजगारी, आर्थिक-सामाजिक विषमता यांविरुद्ध या कालखंडात त्यांनी रचलेल्या कवितांमधून या विचारांचा प्रभाव जाणवतो. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= समाजाचा विकास केवळ सत्तेने होत नाही तर तो आदर्श शिक्षकांमुळे होतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) मुस्लीम लीगची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ?* १९०६ *२) वंगभंग चळवळीचे नेतृत्त्व कोणी केले ?* सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंदमोहन बोस, रवींद्रनाथ टागोर *३) अब्दुल लतीफ यांनी बंगालमध्ये कोणत्या संस्थेची स्थापना केली ?* द मोहमेडन लिटररी सोसायटी *४) लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या कारावासात कोणता ग्रंथ लिहिला ?* गीतारहस्य *५) सविनय कायदेभंगाची चळवळ गांधीजींनी कोणत्या वर्षी मागे घेतली ?* १९३४ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= * माधव गैनवार, * अनिलकुमार बिंगेवार * रामचंद्र गादेवार * दिगंबर कदम * पुरुषोत्तम केसरे * मधुकर फुलारी * विशु पाटील चंदापुरे * अरिफा शेख * आनंद पंगेवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *बढाई* काम कमी अन् श्रेयासाठी लढाई असते काम नकरणाराचीच जास्त बढाई असते काम करणाराचे काम झाकल्याने झाकत नसते बढाया मारणारांच्या पदरात कोणी काही टाकत नसते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'पंढरीची वारी' हा वारक-यांचा 'आचारधर्म' आहे. वारकरी म्हणजे वारी करणारा, शिवाय वार करणारा, घाल घालणारा. या शिकवणूकीतूनच शिवकाळात वारक-यांची एक भक्कम सेना उभी झाली.* *आम्ही विठ्ठलाचे वीर ।* *फोडू कळी काळाचे शीर ।।* *तेराव्या शतकाच्या अस्ताला ज्ञानेश्वर महाराजांसारख्या प्रज्ञावंतानं भागवत धर्माची पताका महाराष्ट्र देशी उभारली आणि सतराव्या शतकात तुकारामाच्या रूपानं विठ्ठल भक्तीचा मोठा उमाळा या मातीतून वर आला.* *ज्ञानदेवे रचिला पाया !* *तुका झालासे कळस' !!* *इथपर्यंतचा प्रवास या मातीने डोळाभरून पाहिला. "आकाशाकडे झेपावणारा महाकवी म्हणूनच 'तुका आकाशाएवढा' असं म्हटलं जातं."* ••●🔔‼ *रामकृष्णहरी* ‼🔔 ●•• 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= मानवी जीवन म्हटले की, त्याला त्याच्या दैनंदिन जीवनात कुठे ना कुठेतरी अडचण येणारच. अशावेळी त्या अडचणींवर काहीतरी उपाय अथवा पर्याय शोधून काढावाच लागतो. अडचण आली म्हणून स्तब्ध बसता येणार नाही किंवा काहीच न करता शांत ही बसता येणार नाही. असे जर केले तर अडचणींवर मातही करता येणार नाही. त्यावर काही ना काही उपाय शोधून काढावेच लागणार आहे. अशावेळी स्वत:ला जर काही सुचत नसेल तर आपल्या जवळच्या विश्वासू माणसांकडून किंवा अनुभवी माणसांकडून त्यावर सल्ला घ्यावा व आपली अडचण दूर करुन घेऊन सुलभ जीवन जगण्याचा मार्ग काढावा यातच खरे जीवन जगण्याचे कौशल्य आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *विश्वास - Believe* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *मित्रांची कथा* एक जंगल. जंगलात दोन वाघ. दोघेजण अगदी जवळचे आणि जुने मित्र असतात. लहानाचे मोठे एकत्र झाले, खूप काही शिकले, जंगल पाहिले, जंगलाचे कायदे-समजून घेतले, एकत्र शिकार केली ... खूप काही, पण एक दिवस एका फालतू कारणामुळे त्यांच्यात भांडण होवून आणि दोघे वेगळे होतात. बरीच वर्षे जातात दोघांनाही त्यांची जीवनसाथी मिळते मुले होतात. एकदिवस त्यातील एका वाघाचे विवळणे दुसऱ्याला ऐकू येते. दुसरा त्या दिशेने जातो पाहतो तर काही कुत्र्यांनी त्याच्या परिवारावर हल्ला केलेला असतो आणि त्यामध्ये तो परिवाराला वाचवण्याच्या नादात गंभीर जखमी झालेला असतो. दुसरा वाघ त्या कुत्र्यांना केळीची साल फाडल्यासारखं फाडतो आणि घरी जातो. त्याचा मुलगा त्याला विचारतो "पप्पा तो आता तुमचा मित्र नाही तुमची भांडणं झाली, मग तुम्ही त्याच्या मदतीला का धावून गेला?". वाघ म्हणतो, "बाळा मैत्री एवढी पण कमजोर असू नये की कुत्र्यांना पण ती बळ देईल". *तात्पर्य :-* "फालतू कारणांमुळे किंवा गैरसमजुतीमुळे वाघासारख्या मित्रांना दूर नका करू जेणेकरून कुत्र्यांना बळ येईल". *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 16/07/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *जागतिक सर्प दिवस* 💥 ठळक घडामोडी :- ६२२: प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी मदिनेहून प्रयाण केले. इस्लामिक हिजरी कॅलेंडरची या दिवसापासून सुरुवात झाली. १६६१: स्वीडिश बँकेने युरोपमधील पहिल्या नोटा जारी केल्या. १९३५: ओक्लाहोमा मध्ये जगातील पहिले पार्किंग मीटर बसवण्यात आले. १९४५: अमेरिकेच्या पहिल्या अणुबॉम्बची चाचणी. १९६५: ईटली व फ्रान्सला जोडणार्या माँट ब्लँक बोगद्याचे उद्घाटन झाले. १९६९: चंद्रावर पहिला मानव उतरवणाऱ्या अपोलो-११ अंतराळयानाचे फ्लोरिडा येथून प्रक्षेपण. १९९२: भारताचे ९वे राष्ट्रपती म्हणून डॉ. शंकरदयाळ शर्मा यांची निवड झाली. १९९८: गुजरातमध्ये शाळेतील प्रवेशाच्या वेळी पाल्याच्या नावानंतर आईलाही नाव लावण्याच्या अधिकाराचा निर्णय. 💥 जन्म :- १९०९: स्वातंत्र्यसेनानी. भारतरत्न (मरणोत्तर) अरुणा आसीफ अली १९१३: ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी शांतानंद सरस्वती १९१४: मराठी साहित्यिक वा. कृ. चोरघडे १९१७: नाटककार व लेखक जगदीशचंद्र माथूर १९२३: भूदल प्रमुख के. व्ही. कृष्णराव १९२६: नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन जीवशास्त्रज्ञ इर्विन रोझ १९३९: भारतीय अभिनेते आणि निर्माते शृंगी नागराज १९४३: लेखक आणि इंग्रजीचे प्राध्यापक प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे १९६८: भारतीय हॉकीपटू धनराज पिल्ले १९६८: विकिपीडिया चे सहसंस्थापक लैरी सेन्जर १९७३: दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेटपटू शॉन पोलॉक १९८४: हिंदी चित्रपट अभिनेत्री कतरिना कैफ 💥 मृत्यू :- १९८६: इतिहासकार वासुदेव सीताराम बेंद्रे तथा वा. सी. बेन्द्रे १९९३: रामपूर साहसवान घराण्याचे ख्यालगायक उ. निसार हुसेन खाँ १९९४: नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ जुलियन श्वाइंगर *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *तिरुपती बालाजी मंदिराचा मोठा निर्णय; भक्तांना दर्शनासाठी नो एंट्री, पहिल्यांदाच मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला असून, 11 ते 17 ऑगस्ट या सहा दिवसांत भाविकांना घेता येणार नाही दर्शन* ----------------------------------------------------- 2⃣ *चेन्नई : केंद्र सरकारच्या 'एक भारत, एक निवडणूक'च्या प्रस्तावाला तमिळनाडू राज्यातून विरोध केला जात असला तरी मात्र, दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी प्रस्तावाला दर्शवला पाठिंबा* ----------------------------------------------------- 3⃣ *लांबपल्ल्याच्या गाड्यांमधून एसीचा प्रवास करणाऱ्यासांठी एक वाईट बातमी, लवकरच एसीचा प्रवास महागण्याची शक्यता* ----------------------------------------------------- 4⃣ *उद्योगपती मुकेश अंबानी बनले आता आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती* ----------------------------------------------------- 5⃣ *दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा भारतावर 86 धावांनी विजय* ----------------------------------------------------- 6⃣ *थायलंड ओपन विश्व टूर सुपर ५०० टूर्नामेंटच्या महिला एकेरीच्या फायनलमध्ये पी. व्ही. सिंधूला करावा लागला पराभवाचा सामना* ----------------------------------------------------- 7⃣ *Wimbledon येथील सेंटर कोर्टवर रंगलेल्या विम्बल्डन पुरूष एकेरी स्पर्धेत नोव्हाक जोकोव्हिचने अंतिम लढतीत दक्षिण आफ्रिकेचा केव्हिन अँडरसनवर 6-2, 6-2, 7-6 ( 7-3) असा सहज विजय मिळवित 13 वे ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावले* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *शिक्षणाचा काय फायदा ?* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/05/blog-post_67.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *अरुणा असफ अली* अरुणा असफ अली यांचा जन्म १६ जुलै१९०८ साली झाला. मूळच्या त्या अरुणा गांगुली. इ.स. १९४२ सालच्या चले जाव मोहिमेत गांधीजीनी राष्ट्रास "करो वा मरो" चे आव्हान केले. त्या वर्षी ८ ऑगस्ट रोजी मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर भरलेल्या सभेत अरुणा असफ अलींनी काँग्रेसचा झेंडा फडकवला होता. यासाठी त्यांची खास आठवण ठेवली जाते. अरुणा असफ अली यांच्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील कार्यासाठी १९९७ मध्ये मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= खिशातल्या हजार रुपयांची किंमत सुद्धा लहानपणी आईने गोळ्या खाण्यासाठी दिलेल्या एक रुपयापेक्षा कमीच असते.. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) 'ब्रोकन विंग' कादंबरी कुणी लिहिली आहे ?* खलिल जिब्रान *२) सध्याचे लष्करप्रमुख कोण आहेत ?* ज. बिपिन रावत *३) जागतिक रेडक्रॉस दिवस कधी साजरा केला जातो ?* ०८ मे *४) जालियनवाला बाग हत्याकांडाला जबाबदार अधिकारी कोण होता ?* जनरल डायर *५) 'अप्पर कट' ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?* बॉक्सिंग *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= * जयवंत हंगरगे, सहशिक्षक, धर्माबाद * संगीता संगेवार, धर्माबाद * कपिल भाऊ * मारोती गाडेकर * सुरेश भाग्यवंत *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *"रूची "* न आवडणाराला वाटते हे काही धड नाही साखर खाऊ घातली तरी वाटते गोड नाही रूची असल्या शिवाय निर्माण होत नाही आवड रूचीहीन कशाला कोण काढील सांगा बरं सवड शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'नकार' साधा नसतो. त्याची एक किमंत असते. ती कधी अत्यंत स्वस्त असते तर कधी अत्यंत महाग. रामायण आणि महाभारताने असे अनेक नकार आपल्यासाठी उदाहरणे म्हणून ठेवले आहेत. रामायणात न दिलेले 'नकार' आदर्श निर्माण करतात. तर महाभारतात 'नकार' दु:ख आणि विध्वंस घडवतात.* *रामाने वनवासात जाण्यास नकार दिला असता तर पितृवचनी राम असा आदर्श राहिला नसता. एका धोब्याच्या टिकेवर रामाने विश्वास ठेवण्यास नकार दिला असता, तर जनहित जपणारा 'राजा' म्हणून रामाचे नाव झाले नसते. या प्रत्येक नकाराने पुढे अनंत यातनांना जन्म दिला, पण शेकडो वर्ष टिकणारे 'आदर्श' जन्माला घातले.* *महाभारतात पावलोपावली शक्तिशाली नकार दिसतात व सामान्यांना आधार देणारे आदर्श निर्माण करतात. कुंतीचा कर्णाला स्विकारण्यास नकार, दुर्योधनाचा पांडवांना राज्य देण्यास नकार, द्रौपदीचा दुर्योधनास नकार हे सर्व विध्वंसक ठरले.* *"अर्जुनाने युद्धाला नकार दिला नसता तर 'भगवद्-गीता' जन्माला आली नसती. आम्ही 'गीते'ला मुकलो असतो."* ••●🔻‼ *रामकृष्णहरी* ‼🔻●•• ⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜ *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= आपण केलेल्या कर्माप्रमाणे प्राप्त झालेले फळ हे दैव समजावे, कर्माप्रमाणे जे काही करु त्याची प्रचिती ताबडतोब मिळते त्याला वाट पहावी लागत नाही, परंतु काहीच न करता दैवाप्रमाणे जे काही मिळते ते योगायोगाने मिळाले असे समजावे आणि ते मिळेलच असे ठामपणे सांगता येत नाही.म्हणून दैवापेक्षा आपल्या कर्मावर अधिक विश्वास ठेवायला हवा. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपकार - Thank You* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *दुसऱ्यांचे उपकार* एकदा एका जंगलामध्ये एक लांडगा राहत होता. तो अत्यंत खादाड आणि दुष्ट होता. त्याला एकदा खूप जोर्याची भूक लागली, त्याने जंगलातले अनेक प्राणी मारून खाल्ले. पण इथेच तो अडकला. एका प्राण्याला मारल्यानंतर त्याला खाताना त्याच्या घशात त्या प्राण्याचे हाड अडकले. त्याने ते हाड काढायचा खूप प्रयत्न केला, परंतु त्याला यश मिळाले नाही. त्याच्या त्या प्रयत्नांनंतर त्याला खूप त्रास सुरू झाला. त्याला नेमके काय करावे हेच समजत नव्हते. त्याने सुरुवातीला भुरपुर पाणी पिले, परंतु त्याला यश मिळाले नाही. मग त्याने आपल्या इतर मित्रांना आपल्या घशातले हाड काढण्यास सांगितले. परंतु त्याच्या साऱ्या मित्रांनी त्याच्याकडे पाठ फिरवली. शेवटी त्याला त्याच्या डोक्यावरून एक बगळा उडत जाताना दिसला. त्याने त्या बगळ्याला आपली व्यथा सांगितली. तो म्हणाला बगळ्या तू तुझ्या त्या लांब चोचीने जर माझ्या घशात अडकलेले हे हाड काढलेस तर मी तुला बक्षीस देईन, तुझे ते उपकार मी कधीही विसरणार नाही. बगळ्याला त्याची दया आली. त्याने लांडग्याला मदत करण्याचे ठरवले. तो त्या लांडग्या जवळ आला आणि त्याने त्या लांडग्याच्या घशात आपली चोच घालून आपल्या चोचीने ते अडकलेले हाड काढले. यानंतर त्या बगळ्याने त्याला आपले बक्षीस मागितले, परंतु त्या धूर्त लांडग्याने त्या बगळ्याला चकमा देत तो तेथून फरार झाला. यानंतर काही दिवसांनंतर पुन्हा एकदा त्या लांडग्याच्या घशात हाडाचा एक तुकडा अडकला, त्याला पुन्हा बगळा दिसला, परंतु बगळ्याने यावेळेस त्याला मुळीच मदत केली नाही कारण यापूर्वी त्याच्यावर केलेल्या उपकारांना तो लांडगा विसरला होता. म्हणून लक्षात ठेवा कधीही दुसऱ्यांनी केलेल्या उपकारांना विसरू नका. *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 14/07/2018 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १७८९: फ्रेंच क्रांतीची सुरवात. १८६७: आल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइट या स्फोटकाचे यशस्वी परीक्षण केले. १९५८: इराकमध्ये राजेशाही विरुद्ध उठाव. अब्दुल करीम कासम सत्तेवर. १९६०: चिंपांझींचा अभ्यास करण्यासाठी जेन गुडॉल टांझानियातील अभयारण्यात दाखल झाल्या. ४५ वर्षे त्यांनी संशोधन केले. १९६९: अमेरिकेने $500, $1,000, $5,000 व $10,000 च्या नोटा चलनातुन काढुन टाकल्या. १९७६: कॅनडात मृत्युदंडाच्या शिक्षेवर बंदी घालण्यात आली. २००३: जागतिक बुद्धिबळ महासंघद्वारा सन्दीप चंदा यांना ग्रँडमास्टर पुरस्कार मिळाला. २०१३: डाकतार विभागाची १६३ वर्षांपासूनची तार सेवा बंद झाली. 💥 जन्म :- १८५६: थोर समाजसुधारक तसेच केसरीचे पहिले संपादक गोपाल गणेश आगरकर १८६२: ऑस्ट्रियन चित्रकार गुस्टाफ क्लिम्ट १८८४: महानुभाव वाङमयाचे नामवंत संशोधक यशवंत खुशाल देशपांडे १८९३: भारतीय कवी आणि लेखक गारिमेला सत्यनारायण १९१०: टॉम अँड जेरीची चित्रे काढणारे चित्रकार विल्यम हनी १९१७: संगीतकार राजेश रोशन १९२०: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण १९४७: मॉरिशसचे ३रे व ६वे पंतप्रधान नवीन रामगुलाम १९६७: श्रीलंकेचे क्रिकेटपटू हशन तिलकरत्ने 💥 मृत्यू :- १९०४: दक्षिण आफ्रिकेचे क्रांतिकारी आणि ५वे राष्ट्राध्यक्ष पॉल क्रुगर १९३६: भारतीय वंशाचे लेखक आणि विद्वान धन गोपाळ मुखर्जी १९६३: योगी व आध्यात्मिक गुरू स्वामी शिवानंद सरस्वती १९७५: संगीतकार मदनमोहन १९९३: करवीर संस्थानच्या महाराणी श्रीमंत विजयमाला राणीसाहेब १९९८: मॅकडॉनल्डचे सहसंस्थापक रिचर्ड मॅकडोनाल्ड २००३: हिंदी चित्रपट अभिनेत्री लीला चिटणीस २००३: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ४ थे सरसंघचालक प्रो. राजेंद्र सिंग ऊर्फ रज्जू भैय्या २००८: सर्वोच्च न्यायालयाचे १६ वे सरन्यायाधीश यशवंत विष्णू चंद्रचूड *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नागपूर : नाणार प्रकल्प लादणार नाही; चर्चा करून निर्णय घेऊ - नाणार बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवेदन* ----------------------------------------------------- 2⃣ *लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची कन्या मरियम यांना लाहोर विमानतळावर अटक.* ----------------------------------------------------- 3⃣ *ठाणे - डोंबिवली आणि परिसरात जाणवले 2.8 मॅग्निट्युट तीव्रतेचे भूकंपाचे धक्के* ----------------------------------------------------- 4⃣ *नागपूर - महाराष्ट्र सरकारने 6 व्या वर्गाच्या भूगोलाच्या पुस्तकात केला गुजराती भाषेचा वापर, विरोधकांचा गोंधळ* ----------------------------------------------------- 5⃣ *जळगाव : राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांनी मनपा निवडणुकीच्या तयारीबाबत व्यक्त केली तीव्र नाराजी.* ----------------------------------------------------- 6⃣ *2022ची फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 21 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर या कालावधीत खेळवण्यात येणार* ----------------------------------------------------- 7⃣ *विम्बल्डन 2018 : मॅरेथॉन लढतीत अँडरसनची बाजी, इस्नरला नमवून गाठली अंतिम फेरी* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *शनिवारची दप्तरमुक्त शाळा* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://goo.gl/5seL7t आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= डाॅ. शंकरराव भाऊराव चव्हाण डॉ. शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे चाैथे मुख्यमंत्री आणि भारत सरकारचे केंद्रीय मंत्री होते. त्यांचा शेतकरी कुटूंबात पैठण येथे जन्म झाला. प्राथमिक शिक्षण पैठण येथे घेऊन पुढे उस्मानिया (हैदराबाद) विद्यापिठातून ते बी.ए., एल् .एल्. बी. झाले. 1945 मध्ये त्यांनी वकिलाची सनद मिळवली. पण रामानंद तीर्थ यांच्या सल्ल्याने ते हैदराबाद मुक्तिसंग्रामात सहभागी झाले. पुसद तालुक्यातील उमरखेड हे गाव त्यांच्या कार्याचे केंद्र होते. 13 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान भारतात सामील झाले आणि शंकररावांच्या कर्तुत्वाचे एक पर्व पूर्ण झाले. 1960 मध्ये पाटबंधारे व वीज खात्याचे ते मंत्री झाले आणि नंतर 1972 पासून फेब्रूवारी 1975 पर्यंत ते कृषिमंत्री होते. 21 फेब्रूवारी 1975 रोजी ते महराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. पाटबंधारे मंत्री म्हणून त्यांनी भरीव कामगिरी केली. कृष्णा-गोदावरी पाणी तंटयात त्यांची भूमिका वाखाणण्यासारखी आहे. गोदावरी, पूर्णा आणि मांजरा या धरणांमुळे मराठवाडयाचा विकास झाला. जायकवाडी धरण हे शंकररावजींच्याच प्रयत्नांचे मोठे फळ आहे. मितभाषी व कर्तव्यदक्ष प्रशासक आणि अभ्यासू वृत्ती हे त्यांचे गुणविशेष. २६ फेब्रुवारी २००४ रोजी त्यांचे निधन झाले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= जीवनात आपले ध्येय कितीही दूरचे असले, तरी त्याच्याकडे जायचे म्हणजे प्रथम एक पाऊल टाकूनच प्रारंभ करावा लागतो व तसेच करीत गेले म्हणजे हळूहळू आपण ध्येयाजवळ पोहोचतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) रामायण कोणी लिहिलं आहे ?* महर्षी वाल्मिकी *२) पंजाबची राजधानी कोणती ?* चंदीगड *३) 'जायकवाडी धरण' कोणत्या राज्यात आहे ?* महाराष्ट्र ( औरंगाबाद ) *४) 'भारुडे कोणाची प्रसिद्ध आहेत ?* संत एकनाथ *५) लीळा चरित्र कोणी लिहिले ?* श्री चक्रधर स्वामी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= * मिलींद व्यवहारे, नांदेड * धनंजय गुम्मलवार, नांदेड * नितीन काळे * भगवान अंजनीकर, नांदेड * नागेश स्वामी * आकाश यडपलवार, धर्माबाद * नंदकिशोर मोरे * चंद्रकांत वाडगे * शंकर कंदेवाड * इरवंत जामनोर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= "पेरणी " पेरून ठेवले तेच उगवुन येत असते चांगले पेरलेले ते वाया जात नसते पेरतांना कधी ही पेरून ठेवा चांगले चांगले पेरल्यावर उगवेल कसे वागले शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *अनेक वेळा जावा-जावा, भाऊ-भाऊ, सासू-सुना, मित्र-मैत्रिणी अशा मानवी नातेसंबंधात रूसण्यामुळे घरं दुभंगली आहेत. रूसण्याच्या वर्तुळाचा विचार केला तर छोट्या छोट्या गोष्टीत रूसवे-फुगवे होतात. ज्यांच्यात भांडायची ताकद नसते ते रडत बसतात, दु:खी होतात. बिनबुडाची भांडणं असतात. दुस-याचा रूसवा-फुगवा किती ताणायचा यालाही काही मर्यादा असतात.* *रूसव्यातला फोलपणा कळला तर राग राहात नाही. आपणही निवळत गेले पाहिजे. रूसवे-फुगवे प्रत्येक नात्यात असतात, म्हणून काय संबंध बिघडावयचे का? सहजगत्या रूसवा निघाला तर ठिक नाहीतर प्रत्येकाचे रस्ते वेगवेगळे असतात. आपण चालत राहायचे. अनाथ असलेला मुलगाही 'नारायण सुर्वे' होऊ शकतो.* *"कुणावाचून कुणाचे अडत नाही.* *आपल्या रस्त्याने हसत पुढे निघायचे."* *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= आपण केलेल्या कर्माप्रमाणे प्राप्त झालेले फळ हे दैव समजावे, कर्माप्रमाणे जे काही करु त्याची प्रचिती ताबडतोब मिळते त्याला वाट पहावी लागत नाही,परंतु काहीच न करता दैवाप्रमाणे जे काही मिळते ते योगायोगाने मिळाले असे समजावे आणि ते मिळेलच असे ठामपणे सांगता येत नाही.म्हणून दैवापेक्षा आपल्या कर्मावर अधिक विश्वास ठेवायला हवा. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *दैव - Fortune* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *मनःशांती* एकदा संत एकनाथांना कोणी दोन प्रश्न विचारले. एक, त्याच्या स्वत:च्या भविष्याबध्दल, आणि दुसरा, एकनाथ स्वभावाने एवढे शांत आणि निर्द्वेषी कसे राहू शकतात याच्याबद्दल . एकनाथ हसले; आणि, 'केंव्हातरी याची उत्तरे देईन', म्हणून त्यांनी सांगीतले. काही दिवसांनी, एकनाथांची त्या गृहस्थाशी भेट झाली. तेंव्हा त्याला बाजूला नेऊन एकनाथ म्हणाले, "तुझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची वेळ आली आहे, कारण, दुर्दैवाने, तू आता आठ दिवसांच्या आत मरणार आहेस." तो गृहस्थ सुन्न झाला, गोठला ! एकनाथ समोरून निघून गेले, तेंव्हा तो बधीर मनाने परतला. जगलो तर एकनाथांसारख्या संतांच्या सदिच्छेने जगू, अशी त्याला भावना निर्माण झाली. ती त्याने सार्थ केली. आयुष्यातले आठ दिवस पूर्ण करून नवव्या दिवशी, एकनाथांच्या दर्शनाला तो गेला. एकनाथांना हात जोडून म्हणाला, "तुमच्या कृपेने वाचलो." एकनाथ मान डोलवित म्हणाले, "आता मी तुम्हाला दुस-या प्रश्नाचे उत्तर देणार आहे. गेले आठ दिवस तुम्ही कसे वागलात ? इतरांच्यावर किती रागावलात?" तो गृहस्थ उत्साहाने म्हणाला, "कसला हो रागावतो? अगदी छान, शांत आठ दिवस गेले. शांत म्हणजे, मरणाच्या भितीने बेचैन होतो, पण दुस-यावर रागावण्यासाठी ती बेचैनी नव्हती. घरात बायकोशी कधी भांडलो नाही. मुलांना मारले नाही. वाटायचे की, आता अखेरचे आठ दिवस उरले. बायका-मुले पुन्हा दिसणार नाहीत; त्यांना का दुखवावे? अहो, शेजा-याचे जमिनीवरून चार पिढयांचे भांडण होते. त्याला स्वत:च्या हाताने हवा तो तुकडा तोडून दिला. देणे होते ते देऊन टाकले. ज्यांच्याकडून येणे होते, त्यांच्यापैकी जे गरीब होते, त्यांचे येणे सोडून दिले. काही पैसे गमावले, पण शांती कमावली. खूप खूप शांत असे आठ दिवस त्या दृष्टीने गेले." एकनाथ समोरच्या माणसाच्या पाठीवर हात थोपटून म्हणाले, "हे तुझ्या दुस-या प्रश्नाचे उत्तर. आठ दिवसांत जग सोडून जायचे आहे, अशा कल्पनेने मी सदाच वावरतो. म्हणून मी शांत वाटतो." *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 13/07/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *महाकवी कालिदास दिन* 💥 ठळक घडामोडी :- १६६०: पावनखिंडीतील लढाई. १८३७: राणी व्हिक्टोरिया बकिंगहॅम पॅलेस मध्ये राहायला गेली. तेव्हापासून ते इंग्लंडच्या राजाचे/राणीचे अधिकृत निवासस्थान बनले. १८६३: सक्तीच्या सैन्यभरती विरोधात न्यूयॉर्क शहरात दंगा झाला. १९०८: ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये स्त्रियांना भाग घेण्यास परवानगी. १९२९: जतिंद्रनाथ दास यांनी लाहोर तुरुंगात आपले आमरण उपोषण सुरू केले. या उपोषणातच त्यांचा मृत्यू झाला. १९५५: २८ वर्षीय रुथ एलिसला प्रियकराचा खून केल्याबद्दल फाशी दिली. ग्रेट ब्रिटनमधली स्त्रीकैद्याची अखेरची फाशी ठरली. २०११: मुंबई शहरात बॉम्बस्फोटांत २६ जण ठार, तर १३० जण जखमी 💥 जन्म : १८९२: जयपूर-अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका केसरबाई केरकर १९४२: अमेरिकन अभिनेता हॅरिसन फोर्ड १९४४: रुबिक क्यूब चे निर्माते एरो रुबिक १९५३: वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू लॅरी गोम्स १९६४: भारतीय क्रिकेट खेळाडू उत्पल चॅटर्जी 💥 मृत्यू :- १६६०: पावनखिंड लढवून बाजीप्रभू देशपांडे यांनी स्वराज्यासाठी दिले आपल्या प्राणाचे बलिदान १७९३: फ्रेंच क्रांतिकारी ज्याँपॉल मरात १९६९: तत्त्वज्ञ, विचारवंत, योगी, स्वातंत्र्य सैनिक आणि लेखक महर्षी न्यायरत्न धुंडिराजशास्त्री विनोद १९८०: बोत्स्वानाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सेरेत्से खामा १९९०: क्रीडा समीक्षक व समालोचक अर्देशिर फुर्दोरजी सोहराबजी ऊर्फ बॉबी तल्यारखान १९९४: धृपद गायक, संगीतकार शिक्षक पं.के. जी. गिंडे २०००: साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवयित्री व लेखिका इंदिरा संत २००९: हिंदी मराठी चित्रपट अभिनेते निळू फुले २०१०: सुप्रसिद्ध सॅक्सोफोन वादक मनोहारी सिंग *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *राज्यात वर्ष २०१२ पासून शिक्षकांची भरती बंद असल्यामुळे राज्यात २४ हजार शिक्षकांची पदे रिक्त असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत दिली* ----------------------------------------------------- 2⃣ *महाराष्ट्रातील विशेषत मुंबई, नवी मुंबई, नागपूर, पूणे, चंद्रपूर, सोलापूर या शहरासह१७ शहरे प्रदूषित पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची माहिती* ----------------------------------------------------- 3⃣ *प्रसिद्ध अध्यात्मिक गुरू आणि साधू वासवानी मिशनचे संस्थापक दादा वासवानी यांचे आज पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९९ वर्षाचे होते.* ----------------------------------------------------- 4⃣ *चाइल्ड राइटस अँण्ड यू (क्राय) या प्रख्यात एनजीओच्या अहवालानुसार देशात १५ ते १८ वयोगटातील तब्बल २ कोटी ३0 लाख मुले 'कामगार' असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.* ----------------------------------------------------- 5⃣ *नागपूर- यशोमती ठाकूर यांना उत्कृष्ट महिला आमदार पुरस्कार प्रदान* ----------------------------------------------------- 6⃣ *भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक* ----------------------------------------------------- 7⃣ *क्रोएशियाने इंग्लंडवर २-१ अशी मात करत पहिल्यांदाच फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दिली धडक* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *लिहिण्याला पर्याय नाही* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/WZziPziK7uA आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *बाजीप्रभू देशपांडे* बाजीप्रभू देशपांडे हे एक मराठा साम्राज्याचे शूर योद्धे होते. घोडखिंडीतील लढाईत यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला व शिवाजीराजे विशाळगडापर्यंत पोचेपर्यंत शत्रुसैन्याला खिंडीत रोखून ठेवले. बाजीप्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मावळातले पिढीजात देशपांडे होते. बाजीप्रभू हे हिरडस मावळचे वतनदार असणाऱ्या बांदलांचे दिवाण होते. परंतु बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपलेसे करून घेतले. बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा शिवाजीराजांना समर्पिली. बाजीप्रभू देशपांडे हे पराक्रमी लढवय्ये तर होतेच, तसेच ते त्यागी, स्वामिनिष्ठ, करारी, कोणत्याही आमिषाला बळी न पडणारे असे होते. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= केवळ योगायोग असे काहीही नाही. जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) ग्लोबल पीस इंडेक्समध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे ?* १३६ वा *२) अंतराळवीर कल्पना चावला यांचे जन्मगाव कोणतं ?* कर्नाल, हरियाणा *३) सोयुझ टी-११ हे कोणत्या देशाचे अवकाशयान आहे ?* रशिया *४) कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक शतके कोणाच्या नावावर आहेत ?* सचिन तेंडूलकर *५) एअरफोर्स अँकॅडमी कुठे आहे ?* अँडमला (केरळ) *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 सुनील जंजाळ 👤 रवी येलमोड 👤 शेख अहमद 👤 श्रीनिवास मोरे 👤 गणेश पांडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= " विकृती " हल्ली समाजात विकृती वाढत आहे घडोघडी कुठेही अपराध घडत आहे अपराध्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे शिक्षा पाहून पुन्हा चूक नाही केली पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *खरंतर मनाच्या कुपीत अत्तरासारखा जपून ठेवावा, असा अनमोल ठेवा असतो 'घर.' परस्परांशी लळा लागला की जुळून आलेले जन्माचे ऋणानुबंध घराला घरपण देतात. मग घरच मंदिर होऊन जातं. एकमेकांच्या स्वप्नांसाठी प्रार्थनेच्या स्वरांनी भरलेली घरं कुणालाही हवीहवीशी वाटतात. काही घरांची दारं मात्र सदैव बंद असतात. मनाची कवाडं जिथं बंद असतील, तिथं घराची कवाडं कशी उघडतील? अशा घरांच्या उंचीवरून घरातल्या रास्त आनंदाची मोजदाद होत नसते. तर आनंद हाच घरांचा, तिथल्या माणसांच्या उंचीचा मापदंड असतो. ज्या घरात कटुतेच्या भारानं मनं गुदमरलेली असतात, त्या घरातला प्रपंच सुखाचा कसा होईल?* *कृत्रिम वस्तूंच्या, बेगडी जगण्याच्या मायावी जाळ्यात अडकत चाललो आहोत का आपण? हे जाळं भल्याभल्यांना मोहवतं. घर जर आपुलकीवर, माया-ममतेच्या भिंतींवर उभं असेल तर येत्या जात्या वाटसरूंनाही ते आपलं वाटतं. जिथं तृप्तीची वीणा झंकारत असते. माझ्या घरातली सारी माणसं माझी आहेत ही भावनाच सा-यांना जोडून ठेवते. अशा मनस्वी माणसांच्या अस्तित्वाचं सर्वांना आकर्षण असतं, चुंबकासारखं. सुखी संसार त्याचीच परिणती असते. ही अथांग तृप्तीची गोळाबेरीज संपत्तीच्या पलिकडची असते.* *"साधे गवत फुलण्याला सुख म्हटले मी* *सहज भेटलेल्या जगण्याला सुख म्हटले मी* *अवती भवती झगमगती नक्षत्रे होती* *पण वातीच्या जळण्याला सुख म्हटले मी"* ••●☀‼ *रामकृष्णहरी* ‼☀●•• ☀☀☀☀☀☀☀☀☀ *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= मनुष्य जीवन जगण्यासाठी काही ना काहीतरी धडपड करत असतो. त्या धडपड करण्यातून त्याला आपल्या जीवनासाठी काहीतरी साध्य करायचे असते. धडपड करणे हा मानवी स्वभाव आहे. जीवनात चांगले साध्य करण्यासाठी अंत:करणातून आपले चांगले हित साध्य करत करत दुस-याला दु:ख होणार नाही याचे देखील भान असू द्यावे. तरच आपल्या धडपड करण्याचा फायदा होईल. अन्यथा आपली केलेली धडपड वाया जाण्याची दाट शक्यता असते. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *स्वभाव - Temperament* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *एक छोटीशी संधी* एकदा एका मंदिराच्या पुजाऱ्याच्या गावात पूर येतो. लोक गाव सोडून जायला सुरुवात करतात. जेव्हा ते त्याला आपल्याबरोबर यायला सांगतात तेव्हा तो नाकारतो. तो त्यांना सांगतो, कि त्याचा त्याच्या देवावर विश्वास आहे आणि देव त्याचं नक्की रक्षण करेल. पाणी वाढतं आणि अख्खा गाव त्यात वाहून जातो. एक पट्टीचा पोहोणारा माणूस पुजार्याच्या घरा जवळून पोहत जात असतो. तो पुजार्याला पाठीवरून वाहून न्यायची तयारी दाखवतो; पण पुजारी ते नाकारतो. थोड्या वेळाने एक होडी येते; पण तो त्यातही बसत नाही. शेवटी एक हेलिकाॕप्टर येत आणि त्याच्याकडे शिडी टाकत पण तो तेही नाकारतो. शेवटी पुराचं पाणी वाढतं आणि त्याचं घर बुडतं व तो मरतो. तो पुण्यवान गृहस्थ असल्यामुले सरळ स्वर्गात जातो. देव भेटल्या भेटल्या तो त्याच्याकडे तक्रार करतो, कि त्याचा एवढा भक्त असूनही त्याने त्याला वाचवलं नाही. तेव्हा देव हसून म्हणाला, " मी तुझ्याकडे एक माणूस, एक होडी आणि एक हेलीकाॕप्टर पाठवलं होतं. तू दिलेल्या संधीचा फायदा घेतला नाहीस." पुजार्याने आपल्या हट्टीपणामुळे सर्व संधी गमावल्या होत्या. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात अशा असंख्य संधी येऊन जात असतात पण त्या क्षणाला तुम्हाला त्याची कल्पनाच नसते. एक छोटीशी संधी तुमच्या आयुष्याला एक चांगली कलाटणी देऊ शकते. म्हणून योग्य संधी कधीच हातची जाऊ देऊ नका. *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 12/07/2018 वार - गुरुवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १६७४: शिवाजी महाराजांनी इंग्रजांशी मित्रत्त्वाचा तह केला. १७९९: रणजित सिंग यांनी लाहोर ताब्यात घेतले आणि पंजाबचे सम्राट झाले. १९३५: प्रभातचा चन्द्रसेना हा मराठी चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला. १९६१: पानशेत, खडकवासला ही धरणे फुटल्यामुळे पुण्यातील पुरात २,००० लोक मृत्यूमुखी, १,००,००० लोक विस्थापित झाले. १९८२: राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची (NABARD) स्थापना झाली. १९८५: पी. एन. भगवती भारताचे १७ वे सरन्यायाधीश झाले. १९९५: अभिनेते दिलीपकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. १९९८: १६ व्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत यजमान फ्रान्सने गतविजेत्या ब्राझिलचा ३-० असा पराभव करुन विश्वकरंडक जिंकला. १९९९: महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार सुनील गावसकर यांना प्रदान. २००१: कृषीशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना टिळक पुरस्कार प्रदान. 💥 जन्म :- १८१७: अमेरिकन लेखक व विचारवंत हेन्री थोरो १८६४: अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर १८६४: इतिहासाचार्य वि. का. राजवाडे १९०९: प्रथितयश दिग्दर्शक बिमल रॉय १९१३: इंग्रजी लेखक मनोहर माळगावकर १९२०: सर्वोच्च न्यायालयाचे १६ वे सरन्यायाधीश यशवंतविष्णू चंद्रचूड १९४७: भारतीय क्रिकेट खेळाडू पूचिया कृष्णमूर्ती १९६१: भारतीय अभिनेते, गायक आणि निर्माते शिव राजकुमार १९६५: क्रिकेटपटू संजय मांजरेकर 💥 मृत्यू :- १६६०: बाजी प्रभू देशपांडे १९९४: हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतील पटकथाकार वसंत साठे १९९९: हिन्दी चित्रपट अभिनेता राजेंद्र कुमार २०००: मराठी कवयित्री इंदिरा संत २०१२: मुष्टीयोद्धा आणि अभिनेता दारासिंग २०१३: चित्रपट अभिनेता प्राणकृष्ण सिकंद ऊर्फ प्राण २०१३: बोस कॉर्पोरेशन चे स्थापक अमर बोस *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मेडिकल केंद्रीय कोटयात ओबीसी आरक्षण देण्याच्या प्रकरणात हायकोर्टाने केंद्र व राज्य सरकारला बजावली नोटीस* ----------------------------------------------------- 2⃣ *पीक कर्जापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही - सहकार मंत्री सुभाष देशमुख* ----------------------------------------------------- 3⃣ *आषाढीसाठी येणाऱ्या भक्तांना मिनरल वॉटरची सोय, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षांची माहिती* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबई : पावसाचा अंदाज घेऊन शाळांनी सुट्टीचा निर्णय घ्यावा - शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे* ----------------------------------------------------- 5⃣ *महावितरणला 30 हजार कोटी रुपयांचा तोटा. ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता.* ----------------------------------------------------- 6⃣ *जम्मू-काश्मीर- कुपवाडामध्ये दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत लष्कराचा एक जवान शहीद* ----------------------------------------------------- 7⃣ *हॉकीला अच्छे दिन... केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या मिशन ऑलिम्पिक सेलने भारतीय पुरूष हॉकी 18 सदस्यीय संघातील प्रत्येक खेळाडूला 50 हजारांचा मासिक भत्ता देण्याचे केले जाहीर* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *छडी लागे ( ना ) छम छम* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/07/blog-post_11.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *कवयित्री इंदिरा संत* इंदिरा संत या मराठी कवयित्री आणि कथालेखक होत्या. शिक्षकीपेशा स्वीकारलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. १९५० च्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. आई, पत्नी, मुलगी या नात्यांतून भारतीय स्त्रीचे दिसणारे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडले आहे. इंदिरा संत आणि त्याचे पती ना. मा. संत या दोघांच्या कवितांचा एकत्रित असा संग्रह 'सहवास' या नावाने १९४० ला प्रसिद्ध झाला. दुर्दैवाने ना. मा. संत यांचे १९४६ साली निधन झाले. वेळीच सावरून या घटनेचा इंदिरा संत यांनी आपल्या कवितेवर परिणाम होऊ दिला नाही. विशुद्ध रूपातील इंदिरा संत यांची कविता टीकाकार तसेच काव्यरसिकांनी उचलून धरली. आजमितीस इंदिरा संत यांची सुमारे पंचवीस पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. रमेश तेंडुलकर यांनी इंदिरा संत यांच्या निवडक कविता 'मृण्मयी' नावाने १९८२ साली संपादित करून प्रसिद्ध केल्या आहेत. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= "तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करित असाल तर नक्किच समजा तुमची प्रगती होत आहे." *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) ग्लोबल पीस इंडेक्समध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे ?* १३६ वा *२) अंतराळवीर कल्पना चावला यांचे जन्मगाव कोणतं ?* कर्नाल, हरियाणा *३) सोयुझ टी-११ हे कोणत्या देशाचे अवकाशयान आहे ?* रशिया *४) कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक शतके कोणाच्या नावावर आहेत ?* सचिन तेंडूलकर *५) एअरफोर्स अँकॅडमी कुठे आहे ?* अँडमला (केरळ) *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= * दत्ताहरी जगदंबे, सहशिक्षक * हरिहर धुतमल, पत्रकार * माधव उमरे * साई गादगे, सहशिक्षक * दादाराव जाधव * अभिजित राजपूत * नागेश पडकूटलावार * नंदकुमार कौठकर, सहशिक्षक * प्रवीण दाभाडे पाटील, सहशिक्षक * वैभव सकनुरे * हणमंत गुरुपवार * शिल्पा जोशी, साहित्यिक * अविनाश पांडे * सुनील देवकरे * नमन यादव *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= "विचारपुर्वक " जरा काही झालं की लगेचच भिडतात विचार करत पुन्हा खुप वेळ रडतात भिडण्यापूर्वी जरा विचार केला पाहिजे विचारपुर्वक निर्णय अमलात आला पाहिजे =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= ••••●⚜‼ *विचार धन* ‼⚜●•••• *घर..ज्याची अनिवार, आंतरिक ओढ असते माणसाला. संध्याकाळ झाली की पावलं आपोआप वळतात घराकडे. काही अनुबंध जुळलेले असतात. घराशी एक उत्कट नातं असतं, जीव गुंतलेला असतो प्रत्येकाचा, पण घरा-घरामध्ये अंतर असतं. जमीन अस्मानाचं. काही घरं प्रसन्न वाटतात. लहान असो, मोठे असो. प्रश्न घराच्या आकाराचा नसतो. कुणाची झोपडी असो, महाल असो, घर मातीचं असो की विटांचं. काय फरक पडतो ? प्रश्न घरातल्या माणसांचा... त्यांच्यातल्या कटु-गोड नात्यांचा असतो. विचारांची, सुखदु:खांची जिथं मोकळेपणाने देवाणघेवाण असते, ती घरं प्रसन्नतेचं दान देतात. संवादानं आयुष्यातले चढउतार सहज पार होऊन जातात...* *माणसं प्रेमळ असली की झोपडीचा ताजमहल होऊन जातो. एकमेकांच्या आधारानं, वात्सल्याची कस्तुरी जणू घराच्या भिंतीमध्ये मिसळून गेलेली असते. कधीकधी मोठमोठे राजवाडे माणसाला भुरळ पाडतात. पण जवळ गेले की अंतर्बाह्य उदास-भकास वाटतात. सुखचैनीचे चंद्रतारे घरात टांगलेले असताना तिथले चेहरे ताणतणावांनी कोमेजलेले असतात. सुखाचा संबंध संपत्तीशी असतोच कुठे? सुखाचा बाजारही नसतो, ते विकत आणायला. तरीही संपत्तीसाठी का तुटतात परिवार? परिवार जिथे गुण्यागोविंदाने नांदतो त्यालाच तर घर म्हणतात. घर म्हणजे जिथं ह्रदयाच्या तारा जुळून आलेल्या असतात, संसाराच्या सुरेल गाण्यासाठी !* ••●⚜‼ *रामकृष्णहरी* ‼⚜●•• ⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜ *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जीवनात अनेक प्रश्न गुंतागुंतीचे असतात. असे प्रश्न आपण कितीही सोडवण्याचा प्रयत्न केला तरी ते सुटत नाहीत. अशावेळी आपण हतबल होतो. त्यातून आपली सुटका व्हावी.काहीतरी मार्ग निघावा असे वाटते. मग आपण जिथे यावर तोडगा निघणार आहे, आपल्या मनाला समाधान मिळणार आहे. अशा ठिकाणी जाऊन आपण आपला संसारुपी भवसागर तरुण जाण्यासाठी कुणाचातरी धावा करतो अर्थात परमेश्वराचा. पण परमेश्वर काही येत नाही. परंतू परमेश्वराने आपला प्रतिनिधी म्हणून आपल्याकडे गुरुला पाठविले. जीवनाला योग्य दिशा मिळावी म्हणून ज्यांचे आढळाचे स्थान आपल्या जीवनात आहे. ज्यांच्यावर आपली नितांत श्रद्धा आहे अशा ईश्वररुपी गुरुच्या सानिध्यात राहून त्यांचे मार्गदर्शन घेतो आणि आपल्या जीवनाचे कल्याण करुन घेतो. या जगात सर्वात जास्त आणि आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारे गुरू हेच आपले परमेश्वर आहेत. हे कधीही विसरुन चालणार नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *श्रद्धा - Reverence* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *एक छोटीशी संधी* एकदा एका मंदिराच्या पुजाऱ्याच्या गावात पूर येतो. लोक गाव सोडून जायला सुरुवात करतात. जेव्हा ते त्याला आपल्याबरोबर यायला सांगतात तेव्हा तो नाकारतो. तो त्यांना सांगतो, कि त्याचा त्याच्या देवावर विश्वास आहे आणि देव त्याचं नक्की रक्षण करेल. पाणी वाढतं आणि अख्खा गाव त्यात वाहून जातो. एक पट्टीचा पोहोणारा माणूस पुजार्याच्या घरा जवळून पोहत जात असतो. तो पुजार्याला पाठीवरून वाहून न्यायची तयारी दाखवतो; पण पुजारी ते नाकारतो. थोड्या वेळाने एक होडी येते; पण तो त्यातही बसत नाही. शेवटी एक हेलिकाॕप्टर येत आणि त्याच्याकडे शिडी टाकत पण तो तेही नाकारतो. शेवटी पुराचं पाणी वाढतं आणि त्याचं घर बुडतं व तो मरतो. तो पुण्यवान गृहस्थ असल्यामुले सरळ स्वर्गात जातो. देव भेटल्या भेटल्या तो त्याच्याकडे तक्रार करतो, कि त्याचा एवढा भक्त असूनही त्याने त्याला वाचवलं नाही. तेव्हा देव हसून म्हणाला, " मी तुझ्याकडे एक माणूस, एक होडी आणि एक हेलीकाॕप्टर पाठवलं होतं. तू दिलेल्या संधीचा फायदा घेतला नाहीस." पुजार्याने आपल्या हट्टीपणामुळे सर्व संधी गमावल्या होत्या. मित्रांनो 👉तुमच्या आयुष्यात अशा असंख्य संधी येऊन जात असतात पण त्या क्षणाला तुम्हाला त्याची कल्पनाच नसते. एक छोटीशी संधी तुमच्या आयुष्याला एक चांगली कलाटणी देऊ शकते. म्हणून योग्य संधी कधीच हातची जाऊ देऊ नका. *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 11/07/2018 वार - बुध =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *जागतिक लोकसंख्या दिन* 💥 ठळक घडामोडी :- २००३ - १८ महिने बंद असलेली लाहोर-दिल्ली बस सेवा पुनः सुरू. २००४ - सी.आय.ए.च्या निदेशक जॉर्ज टेनेटने राजीनामा दिला. २००६ - मुंबईत उपनगरी रेल्वे गाड्यांमध्ये स्फोट. १००हून अधिक ठार. 💥 जन्म :- १९१६ - गॉफ व्हिटलॅम, ऑस्ट्रेलियाचा २१वा पंतप्रधान. १९३० - जॅक अलाबास्टर, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू. १९५० - जिम हिग्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १८०४ - अलेक्झांडर हॅमिल्टन, अमेरिकेचा अर्थमंत्री. १९५९ - चार्ली पार्कर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९८९ - सर लॉरेंस ऑलिव्हिये, ब्रिटीश अभिनेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *माए साई - गेल्या 15 दिवसांपासून नौदल कर्मचारी व डायव्हर्स यांची सुरू असलेली मोहिम आज फत्ते झाली. थायलंडच्या गुहेत अडकलेल्या 12 मुलांची सुटका करण्यात आली आहे.* ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली- केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयानं व्यवसाय सुलभतेत आंध्र प्रदेशला दिला नंबर एकचा क्रमांक* ----------------------------------------------------- 3⃣ *मुंबई- जलयुक्त शिवार योजनेची स्वतंत्र चौकशी करून ऑडिट करा, माजी कुलगुरू व तज्ज्ञांची कमिटी नेमून पाहणी करा, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबई- दूध भुकटी निर्यातदार संघांना 50 रुपयांचं अनुदान, दूध निर्यातदार संघांना 5 रुपये अनुदान, दूध संघासाठी सरकारचा निर्णय* ----------------------------------------------------- 5⃣ *अकरावी प्रवेशांना पुन्हा मुदतवाढ, विद्यार्थ्यांना 11 जुलै सायंकाळी 5 पर्यंत प्रवेश निश्चिती करता येणार* ----------------------------------------------------- 6⃣ *नागपूर - शेतकऱ्यांना तुरीचे तुकारे 15 दिवसांत दिले जाणार, सहकारमंत्री सुभाष देशमुखांची विधान परिषदेत माहिती* ----------------------------------------------------- 7⃣ *आय सी सी टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वीच भारतीय महिला क्रिकेट संघाला धक्का, भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक तुषार आरोठे यांनी आपल्या पदाचा दिला राजीनामा* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *जागतिक लोकसंख्या दिन* 11 जुलै 1987 रोजी जगात 5 अब्ज अपत्य जन्माला आले तेव्हापासून हा दिवस `जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून जगभर पाळला जात आहे. वाढत असलेली लोकसंख्या ही जगासमोर .......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/07/blog-post_9.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *गीतकार शांताराम नांदगावकर* शांताराम नांदगावकर हे मराठी गीतकार, कवी होते. त्यांनी अनेक भावगीते आणि काही मराठी चित्रपटांसाठी गाणी लिहिली. पार्श्वगायिका सुहासिनी नांदगावकर त्यांची सून आहे. मूळचे कोकणातील कणकवलीच्या नांदगावाचे होते. लहानपणी ते मुंबईत आले. मुंबईत परळ येथील शिरोडकर हायस्कुलात त्यांचे शिक्षण झाले. पुढे मराठी चित्रपटांसाठी त्यांनी विपुल प्रमाणात गीते लिहिली. अशी ही बनवाबनवी, अष्टविनायक, गंमत जंमत, तू सुखकर्ता, धुमधडाका, नवरी मिळे नवऱ्याला, पैजेचा विडा यांसारख्या मराठी चित्रपटांसाठी नांदगावकरांनी गीतलेखन केले पुढे इ.स. १९८५ साली ते शिवसेनेकडून महाराष्ट्र विधानपरिषदेवर निवडून गेले होते. उतारवयात ते मधुमेह व अल्झायमराने आजारी होते. जुलै ११, इ.स. २००९ रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत कायमस्वरुपी किती सदस्य आहेत ?* पाच *२) जगातील पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या ?* सरिमाओ भंडारनायके *३) ब्राझीलने आतापर्यंत फुटबॉल वर्ल्डकप किती वेळा जिंकला आहे ?* पाच *४) जागतिक दृष्टिदान दिन कधी असतो ?* 10 जून *५) इंडियन नेव्हल अकॅडमी कुठे आहे ?* एडमला (केरळ) *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 अवधूतवार साईकिरण, बोधन 👤 अनुपमा अजय मुंजे 👤 शिवाजी सूर्यवंशी, सहशिक्षक 👤 प्रभू देशमुख 👤 संतोष चौहान 👤 नरेश गौतम 👤 प्रमोद मंगनाळे 👤 प्रकाश नाईक *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *खरं सुख* जीवनात मानलं तर सुख आहे नाही तर क्षणोक्षणी कशातही दु:ख आहे खरं सुख हे मानण्यात असते मानलं नाही तर सारे दु:ख असते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= ••••●🚩‼ *विचार धन* ‼🚩●•••• *मानवाचं मन... अनेक प्रकारचे सुखदु:खात्म प्रसंग, विवंचना, काळजा, आसूया, स्पर्धा, द्वेष, मत्सर, उत्सुकता आणि कुतूहल...यांनी सदैव त्याचे मन 'पिसाट' झालेले. अप्राप्याचा ध्यास म्हणजे आपल्याकडे जे नाही ते मिळवण्याचा अथक प्रयत्न आपण सारे करीत असतो; पण 'मन:शांती' चा शोध घ्यायला नेमके विसरतो. 'मन:शांती' हे महत्वाचे जीवनसूत्र आहे, हेच आपण या सा-या धबडक्यात हरवून जातो. 'निरंजनी आम्ही बांधियेले घर' असे संतवचन आहे. ही निरांजनावस्था महत्वाची. जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाला सतत काही ना काही करावे लागते. यातून त्याची सुटका नाही. मनाची सर्वार्थाने मुक्तता तशी कठीणच. कारण वैयक्तिक भावभावना, विकार-विचार आणि अहंकार यापासून स्वत:ला अलग करणे जवळजवळ अशक्यप्राय.* *पाण्यात पडले म्हटले की कोणीही ओलाचिंब होणारच. मात्र एखादा खडक त्या जलाशयात असेल तर तो पाण्यात राहून अलिप्तच की ! अशी अलगता संसारात राहून साधायची, म्हणजे शरीरक्रिया चालू आहे पण मन मात्र अलिप्त आहे. त्याच्या पृष्ठभागावर कोणत्याच लहरी नाहीत, तरंग नाहीत. मनाच्या समधात अवस्थेचे वर्णन संत ज्ञानेश्वरांनी 'नुरोनिया ठेला' असे केले आहे. म्हणजे बाह्यस्वरूपी तो इतका निश्चल की जिवंत आहे का, हा इतरांना प्रश्न पडावा, आणि तो जिवंत असला तरी जणूकाही जिवंत नाही, असे वाटावे असा... त्याच्या मनाच्या या अवस्थेला 'सहजस्थिती किंवा 'निजस्थिती' असेही त्यांनी म्हटले आहे. हे क्षण प्राप्त व्हावे, असे वाटत असल्यास संतानी सांगितलेला उपाय म्हणजे नामस्मरण...' नामापरते सुख नाही रे सर्वथा !' हाच तो सद्रगुरूपदेश...* ••●🚩‼ *रामकृष्णहरी* ‼🚩●•• 🚩‼🚩‼🚩‼🚩‼🚩 *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= सत्याची बाजू कधीच कमकुवत नसते. ती कधीच कुबड्याचा आधार घेत नाही किंवा इतरांना बोलायला संधीही देत नाही. उलट असत्य मात्र वेळोवेळी कुणाची ना कुणाची मदत किंवा आधार घेऊन आपली बाजू बळकट करण्याचा प्रयत्न करत असते तरीही यशस्वी होता येत नाही. जर असे असेल तर कशाला असत्याची बाजू घेऊन अपमानित जीवन जगता ! त्यापेक्षा सत्याचा स्वीकार करा आणि स्वाभिमानाने जीवन जगा. हाच मार्ग तुम्हाला यशाकडे घेऊन जातो. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उत्कर्ष - Flourish* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *विद्या विनियेनं शोभते* राजा ज्ञानसेनच्या दरबारात दररोज शास्त्रार्थ केला जात असे. विद्वान लोक तेथे शास्त्रासंबंधी चर्चा करण्यासाठी येत असत. जे विद्वान लोक शास्त्रात पारंगत किंवा वादविवादात जिंकत असत ते विजयी म्हणून घोषित केले जात असत त्यांना राजा धन आणि मान देऊन सन्मानित करत असे. एक दिवस राजा ज्ञानसेनाच्या दरबारात असाच शास्त्रार्थ चालला होता. त्या सभेत पंडित भारवी याला विजयी घोषित करण्यात आले. राजाने त्याचा भरसभेत सत्कार केला व मान देण्यासाठी त्याची हत्तीवरून मिरवणूक काढली. त्याच्या विद्वत्तेच्या सन्मानार्थ राजा स्वत: त्याला चव-या ढाळत त्याला घरापर्यंत सोडण्यास आला. भारवी एवढ्या मोठ्या सन्मानाने घरी आला हे पाहून भारवीच्या आईवडीलांना आकाश ठेंगणे झाले. घरी आल्याबरोबर भारवीने मातेला साष्टांग नमस्कार केला पण पित्याला मात्र उपेक्षेने उभ्याउभ्याच नमस्कार केला. त्याच्या वर्तनात हे साफ दिसून येत होते की जणू काही पित्याला हे सुचवित होता बघा माझा किती सन्मान झाला आहे, माझ्या ज्ञानाला किती किंमत मिळते आहे, स्वत: राजा हत्तीवर चव-या ढाळत मला सोडायला घरी आला आहे. पित्याने त्याच्या त्याही नमस्काराचा स्वीकार केला आणि त्याला चिरंजीवी भव असे म्हटले. गोष्ट इथेच संपली असे नाही. मात्यापित्यांला हे भारवीचे वागणे खटकले. ते दोघेही उदास राहू लागले. भारवीच्या यशाने ते जेवढे आनंदी राहायला पाहिजे होते तितके ते आनंदी नव्हते. याचे कारणही स्पष्ट होते की भारवीला यश पचविता आले नव्हते व तो ते आईवडीलांना दर्शवित होता. तो यशाच्या धुंदीत शिष्टाचार आणि विनम्रतेला विसरून गेला होता. थोड्या दिवसांनी माता आणि पित्याला उदास पाहून भारवीने मातेला याचे कारण विचारले असता माता म्हणाली,’’ तू विजयी होऊन आलास हे ठीक आहे, पण तू विजयी होण्यासाठी तुझ्या वडीलांनी घेतलेले परिश्रम तू विसरलास. तू शास्त्रार्थ करायला जाणार होतास त्याआधी दहा दिवस तुझ्यासाठी निर्जळी उपवास केले होते व त्या काळात ते परमेश्वराकडे एकच मागणे मागत होते माझ्या मुलाला यश मिळवून दे. लहानपणापासून केवळ तुझ्या यशासाठी त्यांनी कितीतरी स्वत:च्या इच्छा दाबून ठेवल्या व तुला शास्त्रपंडीत बनविले आणि केवळ एकाच यशाने उन्मत्त होऊन तू त्यांची उपेक्षा केलीस हेच आम्हा दोघांच्या खिन्नतेचे कारण आहे.’’ हे ऐकताच भारवीला आपली चूक समजली त्याने मातापित्याच्या चरणावर अक्षरश: लोळण घेतली. अनेकवेळा क्षमायाचना केली व आयुष्यात पुन्हा कधीही त्याने मातापित्यांची सेवा करण्यात कसूर केली नाही. तात्पर्य :- आयुष्यात आपल्याला कितीही मोठी यशाची शिखरे पादाक्रांत करण्यास मिळाली तरी त्यापाठीमागे आपल्या आईवडीलांची पुण्याई असते हे प्रत्येकानेच समजून घेतले पाहिजे. यश कितीही मिळाले तरी उन्मत्त होऊ नये कारण विद्या ही नेहमी विनय असणा-यांकडेच शोभून दिसते. *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 10/07/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १८०० - कोलकाता येथे फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना. २००० - नायजेरियात फुटलेल्या तेलवाहिकेत स्फोट. त्यातून गळणारे पेट्रोल भरण्यासाठी जमलेल्यांपैकी २५० व्यक्ती ठार. 💥 जन्म :- १९१३ - पद्मा गोळे, आधुनिक मराठी कवियत्री. १९२३ - गुरूनाथ आबाजी कुलकर्णी, कथाकार. १९४९ - सुनील गावसकर, विक्रमवीर भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९६९ - डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर, गोव्याचे इतिहास संशोधक. २००५ - जयवंत कुलकर्णी, मराठी गायक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *निर्भया प्रकरणातील दोषींची फाशीची शिक्षा कायम, सुप्रीम कोर्टानं पुनर्विचार याचिका फेटाळली.* ----------------------------------------------------- 2⃣ *न्यूयॉर्क - जगातील सर्वात शक्तिशाली 25 देशांची यादी जाहीर, यात अमेरिका प्रथम क्रमांकावर तर रशिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. चीन तिसऱ्या स्थानावर असून भारताचा 15 वा नंबर आहे* ----------------------------------------------------- 3⃣ *पावसामुळे मुंबईतील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची घोषणा* ----------------------------------------------------- 4⃣ *अकरावी ऑनलाईन ऍडमिशन पहिल्या गुणवत्ता यादीतील प्रवेश घेण्यासाठी एक दिवसाची मुदतवाढ* ----------------------------------------------------- 5⃣ *'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील डॉक्टर हंसराज हाथी यांची भूमिका साकारणारे विनोदी अभिनेते कवि कुमार आझाद यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाले निधन* ----------------------------------------------------- 6⃣ *पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांना नुकतंच ब्रिटनच्या संसद सभागृहात इंडो ब्रिटिश ऑल पार्टी पार्लिमेंटच्या वतीने त्यांच्या संगीत आणि सामाजिक क्षेत्रातील अभूतपूर्व योगदानाबद्दल गौरविण्यात आले.* ----------------------------------------------------- 7⃣ *सेरेना विल्यम्सने विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मिळविला सहज प्रवेश* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *दप्तरमुक्त शाळेतील आनंद* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/07/blog-post_7.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *पद्मा गोळे* पद्मा गोळे ह्या मराठी कवयित्री, लेखिका आणि नाटककार आहेत. त्या कवयित्री 'पद्मा' या नावाने काव्यलेखन करत असत. त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रितीपथावर हा १९४७ साली प्रकाशित झाला. कविता संग्रहांशिवाय त्यांनी रायगडावरील एक रात्र, स्वप्न, नवी जाणीव या नाटिकाही लिहिल्या. त्यांनी लिहिलेली वाळवंटातील वाट नावाची कादंबरीही प्रकाशित झाली. याशिवाय स्वप्न (१९५५), समिधा (१९४७), नीहार (१९५४), स्वप्नजा (१९६२) व आकाशवेडी (१९६८) हे त्यांचे काव्यसंग्रह. प्रितीपथावर या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहावर तांब्यांचा प्रभाव असला, तरी अनुकरणाचा हा टप्पा लवकरच ओलांडून त्यांच्या कवितेने पृथगात्म रूप धारण केले. स्वत:च्या उत्कट अनुभवांशी प्रामाणिक राहिल्याने त्यांची कविता परिपक्व आणि समृद्ध होत गेली. एका संवेदनाशील, अंतर्मुख स्त्रीमनाचे विविध विलोभनीय आविष्कार त्यांच्या कवितेत आढळतात. त्यांच्या रसिक,चिंतनशील आणि स्वप्नदश्री व्यक्तिमत्त्वाचा प्रत्यय त्यांतून येतो. स्निग्ध सूर,संपन्न निसर्ग प्रतिमा आणि शालीन संयम ही त्यांच्या कवितेची काही लक्षणीय वैशिष्ट्ये. स्वप्नजा या त्यांच्या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र राज्य शासनाचे प्रथम पारितोषिक मिळाले, तसेच त्यांच्या रायगडावरील एक रात्र व इतर नाटिका या बालनाट्यांच्या पुस्तकालाही महाराष्ट्र राज्य शासनाचे पारितोषिक मिळाले आहे. पद्मा गोळे यांचे १२ फेब्रुवारी १९९८ रोजी निधन झाले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= अपयश म्हणजे संकट नव्हे; आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) अभियंता दिन कधी साजरा केला जातो ?* १५ सप्टेंबर *२) सुप्रसिद्ध झुकता मनोरा कोठे आहे ?* पिसा (इटली) *३) मोर्ले-मंटो सुधारणा कायदा कधी करण्यात आला ?* १९०६ *४) फुलांचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते ?* अँथॉलॉजी *५) जहाजबांधणी व्यवसायात अग्रेसर असलेला देश कोणता ?* जपान *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 नागनाथ वाढवणे, सहशिक्षक 👤 महेश लबडे, सहशिक्षक 👤 युवराज माने 👤 साई गायकवाड 👤 मिलिंद चावरे 👤 प्रकाश येलमे 👤 लक्ष्मण मुंडकर, सहशिक्षक 👤 शिवाजी वासरे 👤 ज्ञानेश्वर जगताप, सहशिक्षक 👤 गणेश अंगरवार 👤 चरणसिंग चौहान 👤 बालाजी दुसेवार 👤 प्रियंका घुमडे 👤 मन्सूर शेख 👤 पिराजी चन्नावार 👤 दगडू गारकर, सहशिक्षक 👤 लक्ष्मीकांत पलोडे 👤 विठ्ठल रामलू चिंचलोड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *खरे ज्ञान* कसे जगावे माहित असणे खरे ज्ञान आहे जे चांगले जगतात त्यांना जगात मान आहे शिकून सवरून माणसाला चांगले जगता यावे चार माणसांत माणसाला माणसा सारखे वागता यावे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *रंग, शब्द, स्वरास एकाग्रचित्ताची समाधी लागली की, अवीट सौंदर्याचा आविष्कार घडतो. राष्ट्रे मोठी होतात ती एकाग्रचित्तानं, प्रामाणिकपणे काम करणा-या माणसांच्या बळावर; आळशी माणसांवर नव्हे. जीवन सुखाने जगण्यासाठी, आनंदासाठी, हसण्यासाठी, गाण्यासाठी, खेळण्यासाठी आहे; रडण्यासाठी नव्हे. आळशी माणसांवर रडण्याची वेळ येते. आळसाची सवय झाली की, माणूस आळशीपणाचा गुलाम बनतो. खरंतर आळशी माणूस बंद पडलेल्या घड्याळासारखाच असतो. परमेश्वराने माणसाला दोन हात आणि एक तोंड दिले आहे. याचाच अर्थ, दोन हातांनी काम करा आणि तोंडाची भूक भागवा.* *माणसाच्या हाताची पाच बोटे म्हणजे एक सुंदर महाकाव्यच ! बोटांचा जिथं स्पर्श होईल तिथं स्वर्ग निर्माण होईल. यासाठी आळसाला कायमची सुट्टी द्या. आळशीपणा हेच अनेक दुर्गुणांचं उगमस्थान असतं. प्रेमाने प्रेम वाढते, द्वेशाने द्वेष, यशाने यश, विश्वासाने विश्वास वाढतो; तसे आळसाने आळस वाढतो. आपल्यासाठी कोणीतरी काम करावे आणि आपल्याला आरामात जगता यावे, ही आळशी माणसाची वृत्ती. आळशीपणाने सतत आराम करण्यात वेळ घालवणे म्हणजे जिवंतपणी आत्महत्या करण्यासारखे आहे. आळस माणसाच्या मनाला जडलेला कर्करोग आहे, असे हेडवूड नावाच्या विचारवंताने म्हटले आहे. 'दैव देईल ते मी घेईल' असे म्हणणारे लोक आळशीच. कष्ट करून मला मिळेल ते घेईन असे म्हणणारे लोक उद्योगी असतात.* *'हे ईश्वरा माझे हाती काम दे* *परी ते करण्याची शक्ती दे.'* ••●⚡‼ *रामकृष्णहरी* ‼⚡●•• ⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡ *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= दुस-याला दोष देणे किंवा नाव ठेवणे फार सोपे आहे. दुस-याला दोष देताना स्वत:ला मोठेपणा वाटून घेण्यात धन्यता मानतो. आपल्यातले दोष दुस-याला समजले तर आपला अपमान झाल्यासारखे वाटते आणि लगेच त्याला प्रतिउत्तर देतो. असे करण्याने आपल्यातल्या दोषांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करतो. अर्थात आपल्या दोषाला खतपाणी घालते ते आहे. त्यामुळे दिवसेंदिवस जर आपण असे ठरवले तर आपली प्रगती होणे अशक्य आहे. पहिल्यांदा आपल्यामध्ये दोष दूर करण्याचा प्रयत्न करावा आणि मगच इतरांच्या होणा-या चूका असतील तर त्यांचा अपमान न करता त्याची होणारी चूक लक्षात आणून देऊन सुधारणा करण्यासाठी प्रवृत्त करावे. तो निश्चितच स्वीकार करेल कारण तुम्ही त्यांच्यासाठी आदर्श असाल. तुमच्या विचारांचा नि उपदेशाचा नक्कीच स्वीकार करेल. " केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे " याप्रमाणे आपण आधी कृती करावी मग इतरांना करायला सांगावी. म्हणजे आपल्यातील आणि इतरांतील दोष कमी होण्यास मदत होईल व आपण आपल्या जीवनात काहीतरी केल्याचे समाधान वाटेल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *निश्चित - Fixed* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *एक निरुद्योगी माशी* एकदा एक मधमाशी आपल्या मनाशीच विचार करू लागली की, 'मी सारखं कामाला जुंपलेलं असावं असं का? ही फुलपाखरं पहा ! किती आनंदात वेळ घालवतात. मीसुद्धा त्यांच्यासारखं का होऊ नये ?' त्या दिवसापासून तिने काम करायचं सोडले. इतर मधमाशांनी तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण तो फुकट गेला. असे होता होता पावसाळा आला व पाऊस पडू लागला तेव्हा ती मधमाशी पोळ्याजवळ आली, पण त्याची सर्व दारे बंद झाली होती. शेवटी भुकेने व थंडीने ती मरण पावली. *तात्पर्य - स्वतःच्या पोटाकरता कसलातरी उद्योग करणे योग्य.* *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 09/07/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १८७३: मुंबई शेअर बाजार सुरू झाला. १८७७: विंबल्डन चॅम्पियनशिप सुरु झाली. १८९३: डॉ. डॅनियल हेल यांनी जगातील पहिली यशस्वी ओपन हार्ट शस्त्रक्रिया शिकागो येथे केली. १९५१: भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली. २०००: अमेरिकेच्या पीट सॅम्प्रस यांनी विम्बल्डन टेनिस स्पर्धा सातव्यांदा जिंकत तेरावे ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावून रॉय इमर्सन यांचा बारा ग्रँड स्लॅम विजेतेपदांचा विक्रम मागे टाकला. २०११: सुदान राष्ट्रातून दक्षिण सुदान या नवीन देशाची निर्मिती. 💥 जन्म :- १६८९: फ्रेंच लेखक अॅलेक्सिस पिरॉन १७२१: जर्मन लेखक योहान निकोलॉस गोत्झ १८१९: शिवणयंत्राचे संशोधक एलियास होव १९२१: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक रामभाऊ म्हाळगी १९२५: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते वसंतकुमार शिवशंकर पदुकोण ऊर्फ गुरूदत्त १९२६: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ बेन मॉटलसन १९३०: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक के. बालाचंदर १९३८: हिंदी अभिनेते हरी जरीवाला ऊर्फ संजीव कुमार १९४४: भारतीय-इंग्रजी इतिहासकार आणि शैक्षणिक जूडिथ एम. ब्राउन यांचा जन्म. 💥 मृत्यू :- १८५६: इटालियन रसायनशास्त्रज्ञ अॅमेडीओ अॅव्होगॅड्रो १९३२: अमेरिकन संशोधक आणि उद्योजक किंग कँप जिलेट १९६८: सार्थ ज्ञानेश्वरी चे लेखक प्रा. ह. भ. प. शंकर वामन उर्फ सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर २००५: महाराष्ट्राचे नगरविकासमंत्री डॉ. रफिक झकारिया *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *शाळांत यापुढे मुलांना छडी न मारण्याचे, कोणतीही शिक्षा न करण्याचे आदेश शिक्षण खात्याने काढले आहेत.* ----------------------------------------------------- 2⃣ *10 जुलैला मुंबई, कोकणासह मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा.. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पाऊस तर मराठवाड्यात लातूर, परभणी, हिंगोली, औरंगाबाद, नांदेडमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज* ----------------------------------------------------- 3⃣ *विधानपरिषद निवडणूक : भाजपचे उमेदवार पृथ्वीराज देशमुख उमेदवारी अर्ज उद्या मागे घेण्याची शक्यता, अर्ज मागे घेतल्यास निवडणूक बिनविरोध होणार* ----------------------------------------------------- 4⃣ *अहमदनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस, नगर शहर, शेवगाव, पाथर्डी, पारनेर आणि सुप्यात पाऊस, तर जामखेड, श्रीगोंद्यात ढगाळ वातावरण* ----------------------------------------------------- 5⃣ *जळगाव : अमळनेर येथील अंबर्षी टेकडीवर ११११ वृक्षांची लागवड करण्यात आली.* ----------------------------------------------------- 6⃣ 'हीट मॅन' रोहित शर्माच्या नाबाद शतकाच्या जोरावर भारताने तिसऱ्या टी-20 लढतीत इंग्लंडवर सात विकेट्स राखून मिळविला विजय* ----------------------------------------------------- 7⃣ *तुर्की - विश्व चॅम्पियन चषक स्पर्धेत भारतीय जिम्नॅस्टिक दीपा कर्माकरने सुवर्णपदक जिंकले.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *पोशाख म्हणजे व्यक्तीची ओळख* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://epaper.ejanshakti.com/m5/1728108/Mumbai-Janshakti/09-07-2018#page/4/1 आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *कवयित्री इंदिरा संत* इंदिरा संत या मराठी कवयित्री आणि कथालेखक होत्या. शिक्षकीपेशा स्वीकारलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. १९५० च्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. आई, पत्नी, मुलगी या नात्यांतून भारतीय स्त्रीचे दिसणारे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडले आहे. इंदिरा संत आणि त्याचे पती ना.मा. संत या दोघांच्या कवितांचा एकत्रित असा संग्रह 'सहवास' या नावाने १९४० ला प्रसिद्ध झाला. दुर्दैवाने ना.मा. संत यांचे १९४६ साली निधन झाले. वेळीच सावरून या घटनेचा इंदिरा संत यांनी आपल्या कवितेवर परिणाम होऊ दिला नाही. विशुद्ध रूपातील इंदिरा संत यांची कविता टीकाकार तसेच काव्यरसिकांनी उचलून धरली. आजमितीस इंदिरा संत यांची सुमारे पंचवीस पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. रमेश तेंडुलकर यांनी इंदिरा संत यांच्या निवडक कविता 'मृण्मयी' नावाने १९८२ साली संपादित करून प्रसिद्ध केल्या आहेत. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= आपण काहीही करू शकतो पण, सर्वकाही नाही करू शकत. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) महाराष्ट्राचा कोणत्या खनिज साठ्यात भारतात प्रथम क्रमांक लागतो?* 👉 मॅगनीज *२) मदर तेरेसा यांचे संपूर्ण नाव काय?* 👉 मेरी तेरेसा बोझॉंक्झ्यु *३) दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे?* 👉 सिंकदराबाद *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 श्रीकृष्ण राचमाळे 👤 घनश्याम सोनवणे 👤 साईनाथ विश्वब्रम्ह 👤 बाबुराव नरवाडे 👤 अनिल उडतेवार 👤 पंडीत पवळे 👤 गौतमीपुत्र वाघमारे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *डावपेच* राजकारणात प्रत्येकाच वेगळा डाव असतो आपणच भाग्यविधाते असलाच आव असतो पडद्या आड केलेले डावपेचही लक्षात येतात अंधारातले डावपेच एक दिवस उजेडात येतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *मानवी जीवन अनमोल आहे. पण ते फुकट मिळालेलं आहे. न मागता आणि फुकट मिळालेल्या गोष्टीची किंमत कुठे असते ! आपण केवळ श्वास घेत राहतो सवयीनं. दिवस येतात, जातात. जीवन मात्र अडगळीत असतं. खरंतर माणूस जगतो कशासाठी? तर जगण्यासाठीच ! जीवन जटील नाहीच. पण व्यवस्थेच्या बाजारात हे जगणंच का हरवून बसतो आपण? का आयुष्यभर इतरांशी तुलना करत... त्याचं वैभव, त्याची प्रतिष्ठा बघत स्वत:ला ठेंगणं करून घेतो. माणूस वयानं जसजसा वाढू लागतो, तसतसा एक मुखवटा चढत राहतो त्याच्या चेह-यावर. साध्यासुध्या आयुष्यात किती भटकतो आपण जगरहाटीच्या वाळवंटात ! एवढं सुंदर जीवन हातात असताना झूटया भविष्याची झूल पांघरून चालतो. ही झूल कधी पद-प्रतिष्ठेची तर कधी धनदौलतीची असते.* *माणूस धावत राहतो अखेरच्या श्वासापर्यंत. सारी शक्ती पणाला लावून आयुष्य गमावत रहायचं. मन कधी तृप्त होत नाही. समृद्धही होत नाही. या धापाधापीत जीवन वजा होतं आणि माणूस खंगतो. जीव गुदमरून टाकणा-या या चढाओढीत सिकंदर होता येईल माणसाला, डोक्यावर सम्राटाचा मुकुट असलेला. पण जगण्याचे सोनेरी क्षण कुठे हातात असतात ! काळ मोठा कठोर असतो. मृत्यूच्या उंबरठ्यावर सम्राटाचा मुकुट उतरवून ठेवावा लागतो आणि सोबत रिकाम्या हातांचे प्रायश्चित्त असते. सारा अहंकार गळून पडतो. या शेवटच्या प्रवासात एकाही पावलापुरता सुखशांतीचा सिकंदर नाही होता येत माणसाला.* ••●♦‼ *रामकृष्णहरी* ‼♦●•• 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= सर्वसामान्यपणे माणसाच्या मनाला भुरळ पाडणा-या काही गोष्टी आहेत.त्या मनाला विचलीत करतात,त्याच्याबद्दलचे आकर्षण अधिक वाढते,नात्यात कधी दूरावा आणतात किंवा द्वेषही निर्माण करतात.त्या गोष्टी म्हणजे पैसा, संपत्ती, सौंदर्य आणि गर्व ह्या आहेत.या गोष्टी आपल्या मनाला विचलीत तर करतातच त्यासोबत आपल्या आयुष्याची दिशाही बदलून टाकतात.म्हणून शक्यतो यापासून जास्त मोहात न पडता दूर राहिलेलेच बरे.या गोष्टींचा अतिरेक व्हायला नको.अतिरेक झाला तर आपल्याला जीवनातून हद्दपार करण्यास कारणीभूत ठरु शकतात. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *गर्व - Pride =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रोधाला संयमाने जिंकणे* एकदा भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि सात्यकी हे तिघे जंगलातून जात असताना रात्रीच्या वेळी काहीच न कळाल्याने रस्ता चुकले. जंगल घनदाट होते, तेथे न पुढे जाण्याचा मार्ग दिसत होता ना मागे येण्याचा. तेव्हा तिघांनीही असा निर्णय घेतला आता येथेच एखादी सुरक्षित जागा पाहून विश्राम करायचा आणि सकाळी उठून मार्गस्थ व्हायचे. तिघेही दमलेले होते पण प्रत्येकाने थोडा थोडा वेळ पहारा देण्याचे ठरवले. पहिली पाळी सात्यकीची होती. सात्यकी पहारा करू लागला तेव्हाच झाडावरून एका पिशाच्चाने हे पाहिले की एक माणूस पहारा करतो आहे आणि दोनजण झोपले आहेत. पिशाच्च झाडावरून खाली उतरले व सात्यकीला मल्लयुद्धासाठी बोलावू लागले. पिशाच्चाने बोलावलेले पाहून सात्यकी संतापला व क्रोधाने पिशाच्चावर धावून गेला. त्याक्षणी पिशाच्चाचा आकार बदलला व तो मोठा झाला. दोघांत तुंबळ मल्लयुद्ध झाले. पण जेव्हा जेव्हा सात्यकीला क्रोध येई तेव्हा तेव्हा पिशाच्चाचा आकार मोठा होई व ते सात्यकीला अजूनच जास्त जखमा करत असे. एका प्रहरानंतर बलराम जागे झाले व त्यांनी सात्यकीला झोपण्यास सांगितले. सात्यकिने त्यांना पिशाच्चाबदल काहीच सांगितले नाही. बलरामांनाही पिशाच्चाने मल्लयुद्धास निमंत्रण दिले. बलराम पण क्रोधाने पिशाच्चाशी लढायला गेले तर त्याचा आकार हा वाढलेला त्यांना दिसून आला. ते जितक्या क्रोधाने त्याला मारायला जात तितका त्या पिशाच्चाचा आकार मोठा होत असे. शेवटी तोही प्रहर संपला व आता पहा-याची पाळी भगवान श्रीकृष्णाची होती. पिशाच्चाने मोठ्या क्रोधाने श्रीकृष्णांना आव्हान दिले पण श्रीकृष्ण शांतपणे मंदस्मित करत त्याच्याकडे पहात राहिले. पिशाच्च अजून संतापले व मोठमोठ्याने ओरडून श्रीकृष्णांना बोलावू लागले पण श्रीकृष्ण मंदस्मित करत शांत भाव जपत राहिले व एक आश्चर्य झाले ते म्हणजे जसे जसे पिशाच्चाला क्रोध येऊ लागला तसतसा त्याचा आकार लहान होत गेला. रात्र संपत गेली अन पहाट झाली शेवटी आकार लहान होत होत पिशाच्चाचा एक छोटासा किडा झाला व श्रीकृष्णांनी अलगद त्याला आपल्या उपरण्यात बांधून ठेवले. सकाळी सात्यकी व बलरामांनी रात्रीची कहाणी सांगताच श्रीकृष्णांनी तो किडा त्यांना दाखविला व म्हणाले,’’ तुम्ही क्रोधाने याला कधीच जिंकू शकत नव्हता कारण हे क्रोधाचे पिशाच्च होते. त्याला शांती हेच औषध आहे. क्रोधाने क्रोध वाढतो मात्र त्याचा प्रतिकार हा केवळ शांतभाव प्रकटीकरणाने होतो. मी शांत राहिलो म्हणून हे पिशाच्च बघा कसे आता या किड्यासारखे लहान होऊन बसले आहे.’’ तात्पर्य : क्रोधावर संयमानेच विजय मिळविता येतो. क्रोधाला क्रोधाने मारता येऊ शकत नाही तर शांतपणे, प्रेमानेच कमी करता येते. *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 06/07/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १८९२ - दादाभाई नौरोजींची ब्रिटीश संसदेचे सर्वप्रथम भारतीय सभासद म्हणून निवड. १९६४ - मलावीला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य. १९६६ - मलावी प्रजासत्ताक झाले. १९६७ - नायजेरियाने बियाफ्रावर आक्रमण केले. 💥 जन्म :- १८३७ - डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, थोर प्राच्यविद्या संशोधक, संस्कृत पंडित भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक. १८८१ - गुलाबराव महाराज, विदर्भातील संतपुरूष. १८९७ - व्यंकटेश दिगंबर माडगूळकर, मराठी कथाकार आणि कादंबरीकार. १९०१ - डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, भारतीय जनसंघाचे पहिले नेते . १९०५ - लक्ष्मीबाई केळकर, भारतीय समाजसेविका, राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका. १९३९ - मनसूद, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९८६ - जगजीवनराम, भारतीय राजकारणी. २००२ - धीरूभाई अंबानी, भारतीय उद्योगपती. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी राज्यातील शेतकऱ्यांना दिली 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी* ----------------------------------------------------- 2⃣ *नागपूर: आघाडी सरकारच्या काळात प्रकल्पग्रस्तांना जमिनीचे वाटप - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* ----------------------------------------------------- 3⃣ *मुकेश अंबानींकडून जिओ फोन-2 ची घोषणा; नव्या फोनमध्ये चालणार व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि यु ट्यूब* ----------------------------------------------------- 4⃣ *डॉ. वि.ल.धारूरकर यांची त्रिपुरा येथील केंद्रीय विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड.* ----------------------------------------------------- 5⃣ *मुंबईत आठवडाभर मुसळधार पावसाची शक्यता, तर रायगडमध्ये पुढील 4 तासांत अतिवृष्टी होण्याची शक्यता. हवामान विभागाचा इशारा.* ----------------------------------------------------- 6⃣ *मुंबई - मुंबईतील मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या हद्दीतील पुलांचे शुक्रवारपासून स्ट्रक्चरल ऑडिट, अंधेरी येथील दुर्घटनेनंतर मनपा आणि रेल्वे प्रशासनाला आली जाग* ----------------------------------------------------- 7⃣ *इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन - भारताच्या सायना नेहवालचे आव्हान संपुष्टात, दुसऱ्या फेरीत चीनच्या चेन युफेई कडून पत्करावा लागला पराभव* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *परिपाठ म्हणजे शाळेचा आत्मा* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/07/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *नटसम्राट* कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर याच्या काव्यात्म, प्रगल्भ प्रतिमेतून साकारलेली एक उत्तुग शोकात्मिका. नटसम्राट हे विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी लिहिलेले मराठी भाषेतील नाटक आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग दि गोवा हिंदू असोशिएशन, कला विभाग या संस्थेने २३ डिसेंबर, इ.स. १९७० रोजी बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई येथे सादर केला. या नाटकातील नटसम्राट गणपतराव ऊर्फ अप्पासाहेब बेलवलकर ही प्रमुख भूमिका डॉ. श्रीराम लागू यांनी अनेक वर्षे रंगवली. ही भूमिका करण्याची संधी मिळणे ही मराठी नाट्याभिनेत्यांची उत्कट इच्छा असते. ही भूमिका करणे म्हणजे शिवधनुष्य पेलणे असे समजले जाते. श्रीराम लागूंनंतर सतीश दुभाषी, उपेंद्र दाते, यशवंत दत्त, चंद्रकांत गोखले, दत्ता भट, मधुसूदन कोल्हटकर, राजा गोसावी हेही नटसम्राट अप्पासाहेब बेलवलकर झाले होते.नटसम्राट हे नाटक मुळात विल्यम शेक्सपियरच्या अजरामर कलाकृतींवर बेतले होते. मूळ नाटकाचे ते भाषांतर किंवा रूपांतर नाही. असे असले त्या कथानकांना वि.वा.शिरवाडकरांनी आपल्या प्रतिभेने विस्तारले आणि मराठीत एक एकमेवाद्वितीय नाटक अवरतरले. या नाटकाला रंगभूमीवर येऊन दशके लोटली, पण नाटकाचे नावीन्य अजून ओसरलेले नाही. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= रस्ता सुंदर असेल तर नक्की विचारा तो कोठे जातो, पण ध्येय सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे हे बघू नका त्या रस्त्यावर चालत रहा. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) पहिला फॅक्टरी अँक्ट कोणी बनवला ?* लॉर्ड रिपन *२) 'पद्मावत' हे काव्य कोणी लिहिलं आहे ?* मलिक मुहम्मद जायसी *३) रक्त गोठण्याला कोणतं व्हिटॅमिन सहाय्यक ठरतं ?* व्हिटॅमीन के *४) क्लोरोफ्लुरो कार्बनचं वैज्ञानिक नाव काय ?* फ्रेऑन *५) जेनेटिक्सचे पितामह कोणाला म्हणतात ?* ग्रेगर जॉन मेंडेल *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 संतोष मानेलू, सहशिक्षक, धर्माबाद 👤 सुभाष इमनेलू 👤 व्यंकट चन्नावार 👤 मोहन भूमकर, सहशिक्षक, धर्माबाद 👤 अशोक इमनेलू,सहशिक्षक, धर्माबाद 👤 शंकर सोनटक्के, सहशिक्षक, धर्माबाद 👤 साजीद शेख,सहशिक्षक, बिलोली 👤 शिवाजी जिंदमवार, सहशिक्षक, नायगाव 👤 आबासाहेब उस्केलवार, सहशिक्षक, धर्माबाद 👤 श्रीकांत पुलकंठवार 👤 अतुल बागडे, सहशिक्षक, धर्माबाद 👤 शंकर स्वामी 👤 मधुकर कांबळे 👤 अरफत इनामदार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *खोटं पण रेटून* चारचौघात बोलायचं खोटं पण रेटून गुपचूप पाय धरायचे अंधारात भेटून अंधारात पाय धरलेले जगाला दिसत नाहीत चारचौघात बोललं म्हणून कोणी मोठे असत नाहीत शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *जर विहिरीमध्ये खारट पाणी असेल तर वरचे खारट पाणी काढून टाकले आणि जास्त खोल खणले, तर एखादे वेळी गोड्या पाण्याचा झरा लागण्याचा संभव असतो. मग त्या विहिरीचे पाणी गोड होईल.* *तसेच ज्याला 'निंदा' आवडते त्याच्या अंत:करणामध्ये निंदेची घाण असणारच, निंदा करणे हिन पणाचे लक्षण आहे. जर आपण निंदा बंद केली, अभिमान टाकला आणि अंतर्मुख होऊन भगवंताचा शोध घेतला, तर त्याच्या प्रेमाचा झरा लागून आपले अंतःकरण त्या प्रेमाने भरून जाईल. माणसाच्या बोलण्यावरून त्याच्या अंत:करणाची परिक्षा होते. आपल्याकडे अशी म्हणच आहे की -* *"जे आडात आहे तेच पोह-यात येणार."* ⛳ *॥ रामकृष्णहरी* ॥ ⛳ 🌻🌻🌻🌻🌻🌻 *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जी व्यक्ती आपल्या मनात दुस-यांचे वाईट व्हावे आणि आपले चांगले व्हावे अशी भावना ठेवून काम करत असेल तर ते कदापिही त्या कामात यशस्वी होऊ शकत नाही. आपल्या मनात कधीही कुणाविषयी मनात वाईट विचार किंवा वाईट भावना ठेवून काम करण्याचे ठरवले तर ते पहिल्यांदा आपलेच बिघडून जाते. त्यापेक्षा नेहमी आपल्या मनात आपलेही काम चांगले व्हावे आणि आपल्या कामाबरोबरच इतरांचेही काम चांगले व्हावे अशी शुद्ध भावना मनात ठेवली तर ती व्यक्ती आपल्या जीवनात सदैव यशस्वी तर होतोच. इतरांच्या बाबतीत आपल्यासारखा सदैव विचार मनात ठेवला तर जीवन सुखावहच होईल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी -इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *अतिवृष्टी - Heavy rain* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *आत्मविश्वास* एक व्यावसायिक कर्जात बुडाला होता आणि त्यातून बाहेर पडण्याचा कुठलाही मार्ग त्याला सुचत नव्हता. धनको त्याच्या घरी वारंवार चकरा मारीत होते आणि पुरवठादार बिलाच्या रकमेचा तगादा लावून होते. असाच तो एका बगिच्यातील बेंचावर डोके हातांनी धरून बसला होता. या कर्जाच्या सापळ्यातून वाचण्यासाठी काहीतरी चमत्कार घडावा, असे त्याला खूप वाटत होते.अचानक एक वृद्ध त्याच्यासमोर उभा झाला. मला वाटते तू खूप अडचणीत आहेस, मला वाटते मी तुला मदत करू शकतो.वृद्धाने त्याला नाव विचारले आणि एक चेक लिहून त्याच्या हाती दिला. हे पैसे घे. आजपासून बरोबर एका वर्षानंतर मला याच ठिकाणी भेट आणि त्यावेळी ही रक्कम मला परत करशील, असे म्हणून तो वळला आणि वेगाने दिसेनासा झाला.व्यावसायिकाने हातातील चेककडे पाहिले. तो 5 लाख डॉलर्सचा होता. खाली सही होती जॉन डी. रॉकफेलर, जगातील सर्वांत श्रीमंतापैकी एक. या रकमेतून माझे कर्ज चुटकीसरशी संपेल, व्यावसायिक पुटपुटला. परंतु त्याऐवजी व्यावसायिकाने तो चेक न वटविता तसाच ठेवून दिला. आता आपल्याजवळ 5 लाख डॉलर्सची रक्कम केव्हाही तयार आहे, या आत्मविश्वासाने तो कामाला लागला. नव्या उमेदीने तो कारभार बघू लागला. त्याने आधीच्या करारांना पुन्हा वाटाघाटी करून फायदेशीर करून घेतले आणि पैसे देण्याची मुदतही वाढवून घेतली. काही मोठे करार रद्द केले. काही महिन्यातच, तो कर्जाच्या सापळ्यातून बाहेर आला आणि पुन्हा कमाई करू लागला.बरोबर एका वर्षानंतर तो त्याच बागेत न वटविलेला चेक घेऊन आला. ठरल्याप्रमाणे तो वृद्ध तिथे पुन्हा उपस्थित झाला. व्यावसायिक त्याला त्याचा चेक देणार आणि आपली यशाची गाथा सांगणार तेवढ्यात एक नर्स तिथे धावत धावत आली आणि तिने त्या वृद्धाला घट्ट पकडले. चला, शेवटी तुला पकडलेच, ती ओरडून व्यावसायिकाकडे बघून ती नर्स म्हणाली, ययाने तुम्हाला जास्त त्रास तर नाही ना दिला? हा नेहमी मनोरूग्णालयातून पळून जात असतो आणि लोकांना सांगतो की मी जॉन रॉकफेलर आहे म्हणून तिने त्या वृद्धाला ओढत नेले. व्यावसायिक थक्क होऊन हे सर्व बघत होता. त्याला काहीच कळेनासे झाले. गेले वर्षभर आपल्याजवळ ५ लाख डॉलर्स रक्कम केव्हाही तयार आहे, या थाटात तो करार करीत होता.अचानक त्याच्या लक्षात आले की, त्याचे आयुष्य बदलवून टाकणारी ही किमया खऱ्या किंवा अस्तित्वात नसलेल्या त्या रकमेची नव्हतीच. तो त्याला नव्याने गवसलेला आत्मविश्वास होता. त्यानेच त्याला कर्जाचा डोंगर उपसण्याची शक्ती दिली होती. तात्पर्य- आत्मविश्वासाने कोणतेही कार्य केल्यास यश हे हमखास मिळते. *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 04/07/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= स्वातंत्र्यदिन - अमेरिका 💥 ठळक घडामोडी :- १७७६ - अमेरिकेने स्वतःला इंग्लंडपासून स्वतंत्र जाहीर केले. 💥 जन्म :- १८९८ - गुलजारीलाल नंदा, भारतीय पंतप्रधान. १९३० - जॉर्ज स्टाइनब्रेनर, अमेरिकन उद्योगपती. १९४३ - हराल्डो रिव्हेरा, अमेरिकन पत्रकार. 💥 मृत्यू :- १९०२ - स्वामी विवेकानंद, भारतीय तत्त्वज्ञ. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *देशातील सर्व वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या बदल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाला विचारल्या शिवाय करू नये सर्वोच्च न्यायालयाने दिला आदेश* ----------------------------------------------------- 2⃣ *बोंडअळीसाठी आत्तापर्यंत १८ लाख १६ हजार ५५७ शेतकर्यांच्या खात्यात त्यासाठीच्या विम्याची रक्कम जमा झाली असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले* ----------------------------------------------------- 3⃣ *अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ रुळांवर पादचारी पुलाचा भाग कोसळल्याची घटना दुर्दैवी असून, चौकशीचे आदेश दिल्याची माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली.* ----------------------------------------------------- 4⃣ *एटीएममधून पैसे काढण्यावर लागणार अधिक शुल्क, पहिले फ्री ट्रांजेक्शन संपल्यावर वसूल केल्या जाणार्या शुल्कात १८ रूपयांऐवजी २३ रुपए अशी वाढ होण्याची शक्यता* ----------------------------------------------------- 5⃣ *हवामान विभागाने मुंबईत बुधवार, गुरुवार दोन दिवसांत मुसळधार पावसाची वर्तवली शक्यता.* ----------------------------------------------------- 6⃣ *ऋषभ पंत आणि मयंक अग्रवाल यांच्या आक्रमक खेळीमुळे भारत 'अ' ने इंग्लंड लायन्सवर पाच गड्यांनी मात करीत तिरंगी मालिका जिंकली* ----------------------------------------------------- 7⃣ *फिफा विषवचषक 2018 - मेक्सिकोला मात देत ब्राझिल उपांत्यपूर्व फेरीत दाखल* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *शिक्षण म्हणजे जीवन जगण्याची कला* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/05/32.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *स्वामी विवेकानंद* विचारवंत स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी, १८६३ रोजी झाला. तरुणपणीच ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झाले आणि रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. जगामध्ये रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आहेत. भारत सरकारतर्फे विवेकानंदांचा जन्मदिवस हा युवक दिन म्हणून साजरा केला जातो. उत्तर कलकत्त्यातील सिमलापल्ली येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे नाव नरेंद्र ठेवण्यात आले. ११ सप्टेंबर १८९३ साली अमेरिकेतील शिकागो शहरातील शिकागो आर्ट इन्स्टिट्यूट येथे सर्वधर्मीय परिषदेला विवेकानंद गेले. तेथे त्यांनी अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो अशी भाषणास सुरुवात केली आणि सभेसाठी जमलेल्या सुमारे सात हजार लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला, जो दोन मिनिटे अखंड चालू होता. जिने जगाला सहिष्णुता आणि वैश्विकतेचा स्वीकार करण्याची शिकवण दिली. या परिषदेत विवेकानंदांनी भारतीय संस्कृतीवर व्याख्यान दिले. जगातील सर्व धर्मांचे सारतत्त्व एकच आहे, असे प्रतिपादन त्यांनी करून अमेरिकन नागरिकांची मने जिंकली. आपल्या विचारांनी त्यांनी अमेरिकेतील वृत्तपत्रांचे लक्ष वेधून घेतले. या वृत्तपत्रांनी स्वामींचे वर्णन भारतातून आलेला एक वादळी व्यक्तिमत्त्वाचा संन्यासी, असे केले. पुढे वेदान्त आणि योग या विषयावर त्यांनी अमेरिका, इंग्लंड आणि इतर काही युरोपीय देशांमध्ये व्याख्याने दिली. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= जर तुम्ही रोजच्या जीवनात कोणती जोखीम घ्यायला तयार नसाल तर, तुम्हाला सामान्य आयुष्य जगावे लागणार आहे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) शांतीवन हे कुणाच्या समाधीचं नाव आहे ?* जवाहरलाल नेहरू *२) इकेबाना हा प्रकार कशाशी संबंधित आहे ?* फुलांच्या सजावटीशी *३) कर्नाटक संगीताचे पितामह कुणाला म्हणतात ?* पुरंदरदास *४) फॅदोमीटरने काय मोजलं जातं ?* समुद्राची खोली *५) 'सारे जहां से अच्छा' या गीताचे गीतकार कोण आहेत ?* कवी इक्बाल *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 बंडोपंत लोखंडे, सहशिक्षक, नांदेड 👤 बंडू अंबटकर, सामाजिक कार्यकर्ता 👤 कमलाकर जमदाडे, बिलोली 👤वृषाली सानप काळे, साहित्यिक 👤 नवनाथ मुसळे 👤 राजकुमार बिरादार 👤 बालाजी मंडाळेकर 👤 गणेश मंडाळे 👤 प्रभाकर भादेकर 👤 श्रीधर जोशी 👤 परमेश्वर मेहेत्रे 👤 गोविंद कवळे 👤 प्रभाकर शेळके 👤 उदय स्वामी 👤 श्याम उपरे 👤 अविनाश खोकले *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *पाऊस* सगळ्यांचीच आता पावसाकडे नजर आहे ये रे ये पावसा फक्त हाच एक गजर आहे पावसा तु आता असा मनमोकळा ये पशु पक्षी प्राण्यांना तू समाधान दे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *सुगरणीची गोष्ट सर्वांना माहित असेल. सुगरणीचा नक्षीदार खोपा नर बांधतो. सुगरण या खोप्यात आनंदाने राहते. अंडी घालते आणि नंतर दुस-यासोबत उडून जाते. अशी बेवफाई जिव्हारी लागते. खेड्यापाड्यतल्या अनेक म्हातारा-म्हातारींची अवस्था अशीच आहे. ज्यांच्याकडे बघत स्वप्नांचे झुले बांधले ती अंगाखांद्यावर खेळलेली पाखरं पंख फुटल्यावर बेईमान होऊन कायमची उडून गेली खोप्याला मागे सोडून. जख्खड चोचीने भरवलेला दाणा, दुष्काळी झळांमध्ये चोचीत थेंब-थेंब ओतलेलं पाणी, कसं विसरून गेले सारं..!* *या पाखरांना घरच्यांनीच मुभा दिली होती, दूरदेशी जाऊन चार दाणे चोचीत भरून आणतील या आशेवर भरवंसा होता. पण एकदा उडालेले पंख परतून माघारी फिरले नाहीत. म्हातारपण आजही त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलं आहे. हे त्यांचं वाट बघणं वेदनादायी आहे. सकाळी रानात सोडलेली गाय सांजेला दावणीला आली नाही तर तिच्या ओढीने व्याकूळ वासरू टिपं गाळत हंबरतं. ते काळीज पिळवटून टाकतं, तसंच यांचं मूकपणे वाट पाहणं, हुंदका गिळून गहिवरणं. आपल्याच माणसांनी झोळीत टाकलेलं लाचारपण घेऊन निराधाराचे रडगा-हाणे कोणाला सांगणार ? आपल्या मोडक्या, गळक्या कुडाची इज्जत गहाण ठेवून थकलेले, भागलेले हताश पाय कशीबशी वाट चालतात. पाखरांची परतीच्या दिवसाची खुळी आशा मनात घेऊन वाट पाहता पाहता पडक्या घराच्या मुंडारीवर उगवलेले गवत वाळुन जाते पण पाखरं ...परततच नाहीत...???* 😢😌 ••●🌿 ‼ *रामकृष्णहरी* ‼🌿●•• 🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂 *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्या माणसाजवळ जे ज्ञान आहे आणि त्या ज्ञानाचा उपयोग आपल्या स्वत:साठीच करतो त्याला ज्ञानी म्हणताच येत नाही. कारण त्याच्याजवळ असलेल्या ज्ञानाचा प्रसार न झाल्याने ते त्याच्यापुरतेच मर्यादित राहते. त्यापेक्षा त्याचा प्रसार केल्यास चांगल्या विचारांची देवाणघेवाण होऊन स्वत:च्याही ज्ञानात अधिक वाढ होते व इतरांनाही आपण काहीतरी नवे ज्ञान दिल्याचे समाधान वाटते. हा ज्ञान असल्येल्या माणसाने विचार करायला हवा. जर इतरांसाठी ज्ञानदानाचे कार्य करत नसेल तर ज्ञानी असूनही अज्ञानीच म्हणायला हवे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रसार - Spread* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *मांजराच्या गळ्यात घंटा* वाऱ्यावर लाथा मारून काही उपयोग होत नसे. तसेच कल्पना या कितीही चांगल्या असल्या तरी जोपर्यंत त्या अंमलात येण्याजोग्या असल्या तरचत्यांचा योग्य तो उपयोग होऊ शकतो , जस हे बघा ... मांजरापासून कसं वाचायचं ,यासाठी सर्व उंदरांनी एक सभा घेतली .त्या सभेचा विषय होता .मांजरापासून कसं वाचायचं , तेव्हा प्रत्येक उंदीर आपापल्या कल्पना सांगू लागले .अस करूया,तस करूया.तेव्हा एक तरुण उंदीर जोशाने म्हणाला की, जर आपण त्या मांजराच्या गळ्यात घंटा बांधली तर कसं राहील.म्हणजे बघा न त्या घंटेचा आवाज आला की, आपल्याला सावध होता येईल . मग ठरलं तर मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची .ही सुंदर कल्पना तिथे बसलेला एक वृध्द उंदीर ऐकत होता . तो उठून उभा राहिला आणि म्हणाला, ''ठीक आहे , ही कल्पना फार सुंदर आहे ,पण जरा विचार केला काय ? *ही घंटा बांधणार कोण?''.* *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 03/07/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- ॥ ३ जुलै दिनविशेष ॥ घडामोडी १८५२ - महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली. २००४ - थायलंडची राजधानी बँगकॉकची भुयारी रेल्वे सुरू. २००६ - २००४ एक्स.पी.१४ हा लघुग्रह पृथ्वीच्या जवळून (साधारण चंद्राइतक्या अंतरावरून) गेला. 💥 जन्म :- १९०९ - भाऊसाहेब तारकुडे, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, कायदेतज्ज्ञ. १९२४ - सेल्लप्पन रामनाथन, तमिळवंशीय सिंगापुरी राजकारणी, सिंगापुराच्या प्रजासत्ताकाचा ६वा राष्ट्राध्यक्ष. १९८० - हरभजनसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १३५० - संत नामदेव (पंढरपूर येथे समाधिस्थ). १९१८ - महमद पाचवा, ओट्टोमन सम्राट. १९३३ - हिपोलितो य्रिगोयेन, आर्जेन्टीनाचा राष्ट्राध्यक्ष. १९३५ - आंद्रे सिट्रोएन, फ्रेंच अभियंता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मुंबई : एसबीआय लाईफ चे माजी सीईओ अर्जित बसू यांची स्टेट बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती* ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली - इंधनाचे दर पुन्हा वाढणार, खनिज तेलाच्या दरात वाढ* ----------------------------------------------------- 3⃣ *दहा दिवसांत लोकपाल नियुक्त करा, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश* ----------------------------------------------------- 4⃣ *उत्तराखंड: आठ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा, नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन.* ----------------------------------------------------- 5⃣ *पुणे - प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत राज्यातील प्रत्येक शाळा डिजिटल करणार शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली माहिती* ----------------------------------------------------- 6⃣ *भारतीय क्रिकेट संघाचा 'द वॉल' म्हणजेच माजी कर्णधार राहुल द्रविडचा आयसीसीच्या प्रतिष्ठित 'हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश, हा सन्मान मिळवणारे राहुल द्रविड बनले पाचवे भारतीय खेळाडु* ----------------------------------------------------- 7⃣ *आयर्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेत २-० ने विजय मिळवताच भारतीय संघाने टी-२० क्रमवारीत दुसर्या स्थानी घेतली झेप* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *सर्वांना मोफत शालेय गणवेष द्यावे* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/06/blog-post_30.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *आळस* आलसस्य कुतो विद्या, अवद्यस्य कुतो धनम। अधिनस्य कुतो मित्रम, अमित्रस्य कुत सुखम॥ अर्थ - आळस हा माणसाचा शत्रू आहे असं म्हटलं जातं. लहानपणापासून ही शिकवण मनावर रूजवण्याचा प्रयत्न केला जातो. तरिही आळशी लोकांची संख्या कमी दिसत नाही. वर दिलेल्या संस्कृत श्लोकामध्ये आळशी लोकांना कोणत्या दुष्परिणामांचा सामना करावा लागतो, याचं सुंदर विवेचन केलं आहे. आळशी माणूस नीट शिक्षण घेऊ शकत नाही. योग्य ज्ञान न मिळाल्यानं अशा व्यक्तीला सर्वांगिण प्रगती साधता येत नाही. पुरेसं ज्ञान, पुरेशी शैक्षणिक योग्यता नसल्यामुळे अशा व्यक्तीला उत्तम कारकिर्दीपासून वंचित रहावं लागतं. साहजिक उत्तम कारकिर्द नसल्यानं ही व्यक्ती उत्तम धन मिळवू शकत नाही. त्याला आर्थिक पातळीवरही समाधान प्राप्त होत नाही. या शिवाय अशी कोणतीच योग्यता नसलेल्या व्यक्तीला वाईट प्रसंगी साथ देणारे चांगले मित्र लाभू शकत नाहीत. त्यामुळे एकटेपण वाट्याला येतं. प्रतिकूल परिस्थितीत खंबीर साथ देणारे, प्रसंगी योग्य सहकार्य तसेच मार्गदर्शन करणारे जिवाभावाचे मित्र नसल्यानं जीवनात एक प्रकारची पोकळी जाणवते. ही सारी परिस्थिती केवळ आळसामुळे निर्माण होते. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= जो काळानुसार बदलतो तोच नेहमी प्रगती करतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) जगातील सगळ्यात छोटा पक्षी कोणता ?* हमिंगबर्ड *२) पहिली अखिल भारतीय किसान सभा कुठे आयोजित केली होती ?* लखनौ *३) रामकृष्ण शिनची स्थापना कुणी केली होती ?* स्वामी विवेकानंद *४) आम आदमी पार्टीची स्थापना कधी झाली ?* २६ नोव्हेंबर २०१२ *५)'गदर पार्टी'चं मुख्यालय कुठे आहे ?* सॅन फ्रान्सिस्को *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 लंके विजय 👤 श्रीराम पाटील 👤 गोविंद सागर 👤 बालाजी मुंडलोड 👤 उत्तमराव नरवाडे 👤 सविता सावंत 👤 संतोष नलबलवार 👤 दिगंबर माने 👤 साहेबराव कांबळे 👤 लक्ष्मीकांत गिरोड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *अफवा* हल्ली अफवांचे पेव खुप फुटले आहेत चोर सोडून संन्याशीच जास्त लुटले आहेत खरं काय खोटं काय पडताळा घेतला पाहिजे मगच काय तो सारा गोंधळ घातला पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= ••••●☀‼ *विचार धन*‼☀●•••• *जसा एखाद्या देशाला शत्रू असतो तसा प्रत्येक माणसालाही असतो. खरंतर माणूसच स्वत:चा एकमेव शत्रू असतो. आळस हा त्याचा सर्वात मोठा शत्रू. आळसाला जिंकल्याशिवाय माणसाची प्रगती होत नाही. त्यासाठी प्रत्येक काम वेळेवर करावे. 'एकच ध्यास, एकच ध्येय' मनात बाळगून धडपडणारी माणसं आशावादी असतात. अवगुणी माणसे आळशी असतात. जिथं अवगुण तिथं फजिती. संत तुकोबा म्हणतात,'अवगुणांचे हाती आहे अवघी फजिती.' आळशी माणसे आपल्या हातांनी स्वत:ची फजिती करून घेतात. ती ध्येयशून्य तसेच समाजवृक्षावर उगवलेली बांडगुळं असतात.* *माणसांच्या जीवनातील खरा आनंद म्हणजे एखाद्या मोठ्या ध्येयासाठी चाललेली अखंड धडपड. त्यासाठी अंतरीचा ज्ञानदीप सतत तेवत ठेवावा लागतो. सोहिरोबा अंबिये सांगतात की, 'अंतरीचा ज्ञानदीप मालवू नको रे' आपल्या अंतरंगात उत्कटतेला, भव्यतेला, उदात्ततेला आणि उत्तुंगतेला महापूर आला की, त्यामध्ये आळसाचे महावृक्ष कोसळून वाहत जातात. ध्येयप्राप्तीसाठी प्रयत्न करणारांना परमेश्वरसुद्धा मदत करतो. ध्येयासक्त माणसांच्या हाती माती दिली तर त्याचे तो सोने करून दाखवितो. मात्र, आळशी माणसाच्या हाती सोने दिले तर तो त्याची माती करून टाकतो. खरे उद्योगी विश्रांती घेण्याचे विसरतात. आळशी माणसे इतकी आळशी असतात की, ते आळशीपणा करायलाही आळस करतात.* ••●☀‼ *रामकृष्णहरी* ‼☀●•• ☀☀☀☀☀☀☀☀☀ *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= सुख आणि दुःख हे प्रत्येक मानवी जीवनातले दोन वेगवेगळे रंग आहेत.सुखाच्या रंगात सारेच मिसळून जातात.त्यात एवढे रंगून जातात की,दुस-याची आठवणसुद्धा येत नाही.इतरांना आपल्यामध्ये सामावून घेण्याच्या प्रयत्नातही नसतात.एवढा अपार आनंद होतो.पण दु:खाचे तसे नाही.दु:खात मात्र त्याला सगळ्यांचीच आठवण येते.आपल्याला अशावेळी आपल्याजवळ कुणीतरी यावं आणि दिलासा द्यावा असं वाटतं.दु:ख पचविण्याची ताकत त्याच्यामध्ये कमी असते.म्हणून अशावेळी आपल्या मदतीला कुणीतरी यावं यासाठी धावा करतो.अशावेळी मात्र आपल्यापासून आपले आणि इतरही लोक दूर जातात.परंतू एक लक्षात ठेवायला हवे,सुखाच्यावेळी आपण कुणाला विचारले नाही मग दु:खाच्यावेळी कसे बरे विचारतील ? म्हणून माणसाने सुख असो वा दु:ख असो दोन्ही समान मानून सदैव पाठीशी रहावे.एकमेकांच्या मदतीला धावून जावे.हाच सुखदु:खाचा मानवी जीवनव्यवहार आहे.हा व्यवहार आपल्या व इतरांच्या जीवनात समानतेने व्हावा एवढेच ज्ञात असावे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रगत - Advanced* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *कोल्हा आणि नाग* एक कोल्हा एकदा त्याला राहण्यासाठी एक बीळ खणीत होता. खणत असताना तो बराच खोल गेला तर तेथे एक म्हातारा नाग त्याला दिसला. त्याला पाहाताच कोल्ह्याला फार भीती वाटली. तो नम्रपणे नागास म्हणाला, 'आजोबा, आपली मी झोपमोड केली याबद्दल मी आपली क्षमा मागतो. पण आपण इथं जे रात्रंदिवस बसून राहता त्यात आपल्याला काय सुख मिळतं ?' नाग त्यावर म्हणाला, ' बाबा, माझं नशीबच तसं त्याला काय करणार ?' कोल्हा म्हणाला, 'पण इथे खूप धन असूनही तुम्हाला चैन करताना मी पाहात नाही, किंवा आपण एक पैसासुद्धा कोणाला देत नाही. तर या धनाचा उपयोग काय?' नाग म्हणाला, 'ते मला समजत नाही. पण मला त्याचं रक्षण करायला देवानं सांगितलं आहे. नशिबात असेल ते भोगल्यावाचून सुटका नाही.' कोल्हा म्हणाला, 'तर मग मी धनवान नाही हे देवाचे माझ्यावर मोठे उपकारच आहेत. कारण तुमच्या इतका दुःखी प्राणी सगळ्या जगात कोणी नसेल !' *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 02/07/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- २००० - मेक्सिकोमध्ये ७० वर्षे पार्तिदो रेव्होल्युसियोनारियो इन्स्तित्युसियोनाल या पक्षाच्या सत्तेचा अंत होउन पार्तिदो ॲक्सियाँ नॅसियोनाल पक्षातर्फे व्हिसेंते फॉक्सची राष्ट्राध्यक्षपदी निवड. २००१ - ॲबिकोर स्वयंचलित हृदयाचे सर्वप्रथम आरोपण. २००२ - स्टीव फॉसेट हा उष्णहवेच्या फुग्याद्वारे पृथ्वीप्रदक्षिणा करणारा सर्वप्रथम व्यक्ती झाला. २०१० - काँगोच्या लोकशाही प्रजासत्ताकात ट्रकचा स्फोट होउन किमान २३० व्यक्ती ठार. 💥 जन्म :- १८७७ - हेर्मान हेस, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन लेखक. १८८० - गणपतराव बोडस, मराठी संगीत नाटकांतील गायक-अभिनेता. 💥 मृत्यू :- १९२८ - नंदकिशोर बल, उडिया भाषेतील कवी, कादंबरीकार. १९३२ - मनुएल दुसरा, पोर्तुगालचा राजा. १९६३ - सेट बार्नेस निकोल्सन, अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ. १९९६ - राजकुमार, हिंदी अभिनेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *वृक्षारोपण हा केवळ एक शासकीय कार्यक्रम नाही तर ते एक मोठे आंदोलन झाले आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली वन विभागाच्या १३ कोटी वृक्षारोपण महामोहिमेची प्रशंसा* ----------------------------------------------------- 2⃣ *केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून (सीबीडीटी) पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्यासाठी 31 मार्चपर्यंतची मुदतवाढ* ----------------------------------------------------- 3⃣ *अनुदानित आणि विनाअनुदानित सिलेंडरच्या दरात वाढ, अनुदानित सिलेंडरच्या दरात २.७१ पैसे वाढ तर ५५.५० पैशांनी विनाअनुदानित सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे* ----------------------------------------------------- 4⃣ *एसटी महामंडळातील कर्मचार्यांचा २०१६ ते २०२०च्या वेतनकराराला राज्य सरकारने दिली मंजुरी* ----------------------------------------------------- 5⃣ *दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारताच्या अनेक भागांमध्ये जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के* ----------------------------------------------------- 6⃣ *जम्मू-कश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोसळणार्या पावसामुळे अमरनाथ यात्रेवर अस्मानी संकट* ----------------------------------------------------- 7⃣ *दुबई मास्टर्स कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने तुल्यबळ प्रतिस्पर्धी इराणचे आव्हान ४४-२६ असं मोडून काढीत पटकावले विजेतेपद* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= तीन लेख एकाच पानावर वाचा *प्लॉस्टिक बंदी, शिक्षकांचा काय दोष, निरोगी जीवनासाठी योग्य* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://dainikyashwant.com/epaper/edition/239/july/page/4 आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *गुळ खाण्याचे फायदे* रोज गुळ खाल्ल्याने पचन क्रिया सुरळीत राहते , तसेच तुमच्या पोटात कधीच गॅस होणार नाही. रोज गुळाचे सेवन केल्याने त्वचेला तेज येते आणि चेहऱ्यावरील पुरळ सुद्धा कमी होऊ लागतात. सर्दी, खोकला येत असेल तर गुळाचा लाडू बनवून किंवा चहा मध्ये गुळ टाकून पिल्याने आराम मिळतो. गुळ खाल्ल्याने तुम्हाला थकवा कधीच नाही जाणवणार. आणि शरीरात नेहमी ऊर्जा राहील. गुळात कुठल्याही ऍलर्जी विरुद्ध लढणारी तत्व असतात. दम्याच्या पेशंटला गुळाचा खूप फायदा होतो. गुळाला आल्या सोबत गरम करून खाल्ल्याने गळ्याचे आजार दूर होतात. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= भविष्य उज्वल त्यांचे आहे ज्यांना त्यांच्या स्वप्नांच्या सौंदर्यावर पूर्ण विश्वास आहे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) दुसरी गोलमेज परिषद कधी पार पडली ?* १९३१ *२) भारतातील पहिल्या महिला बॅरिस्टर कोण ?* कार्निलिया सोराबजी *३) खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती ?* आयसीआयसीआय *४) एव्हरेस्ट शिखर सर करणारी सर्वात तरूण महिला कोण ?* डिक डोमा *५) देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण ?* अजित डोवाल *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 शिवानंद सिध्दप्पा चौगुले, विशेष कार्यकारी अधिकारी, चिंचवड 👤 विक्रांत दलाल, नांदेड 👤 पंडित दगडगावे,सहशिक्षक, धर्माबाद 👤 श्याम जाधव 👤 सतीश संजू 👤 शैलेश तरले 👤 वसंत घोगरे पाटील 👤 श्रीनिवास पुल्लावर 👤 जेजेराव सोनकांबळे 👤 चिमणाजी हिवराळे 👤 मारोती जाधव 👤 साईनाथ सावंत 👤 बाबू हातोडे 👤 शिवा पांचाळ 👤 गोपाळ पामस्कर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *आदेश* आदेशावर आदेश कृतीचा पत्ता नसतो त्याच त्या आदेशांचा पुन्हा पुन्हा कित्ता असतो आदेश मिळाला की काम व्हावे जोमाने आदेशाला महत्व येते केलेल्या कामाने शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *शांतता खूप बोलते. आधी कानांचा ताबा घेते, मग मनाचा. सर्व काही 'शांत' असते तेव्हा खूप काही 'आवाज' मूकपणे आपल्याभोवती फिरतात. शांततेत समुद्राची गाज हितगुज करते, माडामाडातून फोफावणारा वारा संवाद साधतो. शांततेत कधी आत्ममग्नतेची समाधी लागते तर कधी उत्तुंग विचारांच्या लाटांची भरती येते. दुपारच्या शांततेत घामाचे नितळ थेंब ओथंबलेले असतात तर संध्याकाळच्या कातरवेळच्या शांततेत एकाकीपणाची हुरहुर आठवणींचा कानोसा घेते. मध्यरात्रीच्या शांततेतून कधी असंख्य दुष्ट-सुष्ट विचारांची संगत पंगतीने बसते, तर कधी आयुष्याच्या उजळणीचे पाढे अंधारातून संततधारेसारखे प्रकटतात.* *शांतता सर्वत्र व्यापून आहे, तरीही तिचा शोध घ्यावा लागतो. शहरातली दुर्मिळ शांतता एखाद्या खेड्यात मुबलक सापडेल. शहरात गर्दीचा आवाजच कधी कधी शांततेची हौस पुरवतो. शांततेची ओळखही कान विसरतात. गर्दीतला आवाज सहज होता येते, मात्र शांततेत मूकपणे सहभागी व्हावं लागते. पण माणूस शांततेत सहभागी होण्याऐवजी तो ती भंग करण्यात धन्यता मानतो. एखाद्या शांत देवळात प्रथम घंटा वाजते. आपले अस्तित्व तो असे जाणवून देतो. क्वचित काही मंदिरात शांतता उदबत्तीच्या अस्तित्वात धीराने उभी असते. तिथे जिज्ञासू भक्तांचा मेळावा शांततेचा विलक्षण शोध घेत असतो. हीच शांतता काही चर्च व मशीदीतही सापडते, तेव्हा तिथे 'ईश्वरचा' अंश मुक्तपणे वावरत असतो.* ••●★‼ *रामकृष्णहरी* ‼★●•• ☀☀☀☀☀☀☀☀☀ *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे, अज्ञाताकडून ज्ञाताकडे, नकाराकडून सकाराकडे जीवन समृद्ध करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे शिक्षण. शिक्षण हे जीवनाला आकार देण्याचे, संस्कारक्षम बनवण्याचे, यश मिळवून देण्याचे,समाजात मानसन्मान मिळवून देण्याचे आणि जीवन समृध्द करण्याचे काम तसेच आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी बळ देण्याचे काम शिक्षणच करते. त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनात शिक्षणासारखा दुसरा कोणताही दिशादर्शक आणि प्रभावी मार्ग नाही. म्हणून शिक्षणप्रवाहात नेहमी असायला हवे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रभावी - Effective* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *विश्वासाचा सुगंध* चित्तरंजन हे अतिशय हुशार परंतु कट्टर नास्तिक गृहस्थ म्हणून सर्वजण त्यांना ओळखत. म्हणूनच सहदेव महाराजांच्या कीर्तनाला त्यांना आलेले पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. सहदेव महाराज तर धर्माची, ईश्वराच्या अस्तित्वाची महती सांगणारे. आणि अशा धार्मिक विषयाशी संबंधित कार्यक्रमाला चित्तरंजन कसे काय आले ? हे कसे काय शक्य आहे ? म्हणून सर्वत्र मित्र काहीसे अचंबितच झाले. त्यांच्यापैकी एकाला न राहवल्याने त्याने अखेर चित्तरंजन यांना विचारलेच, '' भक्तिमार्गाची प्रवचने, कीर्तने ऐकायला जाणे आपल्याला पटते का ? आपल्या तत्त्वात ते बसते का ? नसेल तर आज येथे येण्याचे कारण काय ?'' चित्तरंजन म्हणाले, '' त्याचे असे आहे की, सहदेव महाराज आपल्या प्रवचनात जे सांगतात, त्यावर माझा मुळीच विश्वास नाही. परंतु आपण जे जे बोलतो, त्यावर महाराजांचा दृढ विश्वास आहे. आणि ज्याचा स्वतःच्या बोलण्यावर दृढ विश्वास आहे, अशा व्यक्तीचे बोलणे समजून घ्यायला मला आवडते.'' *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*निरोप* दाटला मनीचा कंठ निरोप सर्वांचा घेतांना भेटणार काय पुन्हा सहवास त्यांचा परततांना अनमोल आठवणी घेऊन सख्या माझ्या भेटेन गेलेल्या क्षणा क्षणाचा विसर कसा पडेन निरोप घेत मैत्रीचा नयनअश्रु ओसरेल दाटल्या भावनांचा बांध मनी फुटेल हसून सारे जीवन मैत्रीत गेले विसरून सुखदुःखाचे धागेदोरे घेतले होते जुळवून सहा सोबतीनी आम्ही नजरेत प्रेम सदा बरसावे विखुरलेल्या पंखानसमवे जीवन गाणे गात जावे 〰〰〰〰〰〰 ✍ प्रमिलाताई सेनकुडे हदगाव जिल्हा नांदेड. 🌹🌹🌹🌹🌹🌹
Subscribe to:
Posts (Atom)