✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 29 नोव्हेंबर 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/144Rm71GuJ/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌐 *_ या वर्षातील ३३४ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🌐 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌐••••••••••••••••••••••••••••••••• *२०००: शास्त्रीय गायक गुलाम मुस्तफा खाँ आणि घटमवादक टी. एच. विक्कू विनायक राम यांना ’उस्ताद हफीज अली खाँ स्मृती पुरस्कार’ जाहीर**२०००: दक्षिण अफ्रिकेचे माजी अध्यक्ष डॉ. नेल्सन मंडेला व बांगलादेशच्या ग्रामीण बँकेस ’गांधी शांतता पुरस्कार’ जाहीर**१९९६: नोबेल पारितोषिकविजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांना त्यांची मायभूमी अल्बानियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ’गोल्डन ऑनर’ जाहीर**१९६३: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांनी जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येची चौकशी करण्यासाठी 'वॉरन समिती' नेमली.**१९४५: युगोस्लाव्हिया प्रजासत्ताक बनले.* 🌐 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*🌐 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९३: प्रथमेश परब -- मराठी चित्रपट अभिनेता* *१९८७: प्राजक्ता शुक्रे -- भारतीय गायिका**१९८४: नेहा पेंडसे -- मराठी आणि हिंदी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांतून अभिनय करणाऱ्या अभिनेत्री**१९७८: सुरेखा पुणेकर -- भारतीय लावणी नृत्यांगना**१९७७: युनिस खान – पाकिस्तानी क्रिकेटपटू**१९६३: प्रा. डॉ. संजीव कुलकर्णी -- लेखक**१९५२: सुनिती मंगल धारवाडकर -- कवयित्री, लेखिका* *१९५०: रामकृष्ण विनायक अभ्यंकर-- लेखक**१९५०: प्रकाश ज्ञानेश्वर जडे -- प्रसिद्ध कवी, लेखक**१९४५: खुशाल डवरे -- प्रसिद्ध लेखक**१९४३: अरविंद वैद्य -- लेखक, पत्रकार**१९४२: नीला भागवत -- ग्वाल्हेर घराण्याच्या हिंदुस्थानी संगीतकार**१९३८: माला केकतपुरे -- कवयित्री, लेखिका**१९३३: श्रीराम आत्माराम खुणे -- लेखक**१९३१: रामचंद्र बापूजी मुंजवाडकर -- लेखक* *१९१७: भगवंत रंगनाथ अक्कलकोटकर -- कादंबरीकार,बालसाहित्यिक* *१९०७: गोपीनाथ तळवलकर – बालसाहित्यिक,'आनंद’ मासिकाचे संपादक, आकाशवाणीच्या ’बालोद्यान’ कार्यक्रमातील ’नाना’ (मृत्यू: ७ जून २००० )**१८९६: विनायक लक्ष्मण बर्वे -- कथाकार, कादंबरीकार,कवी,नाटककार (मृत्यू: २६ जानेवारी १९४८ )**१८६९: अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ’ठक्कर बाप्पा’ – समाजसेवक (मृत्यू: २० जानेवारी १९५१ )**१८६२: विष्णू गणेश नेने -- लेखक (मृत्यू: २३ जानेवारी १९२४ )**१८३५: महादेव मोरेश्वर कुंटे -- मराठी कवी, संस्कृत भाषेतील विद्वान (मृत्यू: ८ ऑक्टोबर १८८८ )*🌐 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🌐••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१२: आचार्य पार्वती कुमार किंवा पार्वतीकुमार -- भारतीय शास्त्रीय नृत्यांगना,शास्त्रीय नृत्य कोरिओग्राफर आणि विद्वान(जन्म: २७ फेब्रुवारी १९३१ )**२०११: इंदिरा गोस्वामी -- आसामी लेखिका, कवयित्री व संपादिका (जन्म: १४ नोव्हेंबर १९४३ )**२००७: केशव तानाजी मेश्राम-- मराठी भाषेतील लेखक,कवी,नाटककार, समीक्षक(जन्म: २४ नोव्हेंबर १९३७ )**२००१: जॉर्ज हॅरिसन – ’बीटल्स’चा गिटारवादक, संगीतकार, गायक आणि गीतलेखक (जन्म: २५ फेब्रुवारी १९४३ )**१९९३: जहांगीर रतनजी दादाभॉय तथा ’जे.आर.डी.टाटा’ – भारतरत्न, उद्योगपती व वैमानिक,भारतीय नागरी विमान वाहतुकीचे जनक (जन्म: २९ जुलै १९०४ )**१९९४: मृणालिनी प्रभाकर देसाई-- कादंबरीकार (जन्म: ७ ऑक्टोबर १९२७ )**१९५९: वाजू कोटक -- गुजराती लेखक, प्रकाशक,पत्रकार,भारतीय चित्रपट पटकथा लेखक(जन्म: ३० जानेवारी १९१५ )**१९५९: ’रियासतकार’ गोविंद सखाराम सरदेसाई –महाराष्ट्राचा इतिहास लिहीणारे इतिहासकार (जन्म:१७ मे १८६५)**१९५०: आनंदीबाई धोंडो कर्वे-- सामाजिक-शैक्षणिक कार्यकर्त्या(जन्म: २५ जानेवारी १८६३ )**१९३९: माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ ’माधव जूलियन’ – कवी,कोशकार,छंदशास्त्राचे व्यासंगी आणि मराठी भाषाशुद्धीचे तत्त्वनिष्ठ पुरस्कर्ते (जन्म: २१ जानेवारी १८९४ )**१९२६: कृष्णाजी नारायण आठल्ये – ग्रंथकार, संपादक, टीकाकार, कवी व चित्रकार, ’केरळ कोकिळ’ या मासिकाचे संस्थापक व संपादक (जन्म: ३ जानेवारी १८५२ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पुण्यातील बाकरवडीचे जनक भाऊसाहेब चितळे यांची यशोगाथा..... वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *हेमंत सोरेन यांनी घेतली झारखंडच्या मुख्यमंत्री पदाची शपथ*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *लाडकी बहीणसाठी 58 हजार कोटी लागणार, सध्या राज्यावर नऊ लाख कोटींचं कर्ज; लोकसत्ताचे संपादक आणि जेष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांनी सांगितल्या सरकारच्या आर्थिक अडचणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यात थंडीची लाट! पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमान! IMD कडून अलर्ट, आणखी थंडी वाढणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नवी मुंबईची अंकिता दहिया ठरली ' यू एम बी मिस इंडिया - 2024'*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सणासुदीच्या काळात भारतीय रेल्वे मालामाल, तिकीट विक्रीतून कमावले 12 हजार कोटी रुपये*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ॲडलेडमध्ये गुलाबी चेंडूचा कसोटी सामना 6 डिसेंबर पासून होणार सुरू, रोहित आणि गिल संघात परतणार !*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📒 *ट्युबलाईटला कमी ऊर्जा का लागते ?* 📒भारनियमन सुरु झाल्यापासुन आणि त्याच सुमारास विजेचे दर वाढल्यावर विजेची बचत करण्याची निकड भासू लागली. सर्वच जण आपल्या नेहमीच्या बल्ब ऐवजी सीएफएलचे दिवे म्हणजे 'काॅम्पॅक्ट फ्लोरेसन्ट लॅम्प' वापरण्याचा सल्ला देऊ लागले. किमानपक्षी साध्या दिव्यांऐवजी ट्युबलाईट वापरावेत असंही सांगु लागले. ट्युबलाईटचा प्रकाशही जास्त मिळतो. सूर्यप्रकाशासारखाच असतो. तितक्याच वॅटच्या दिव्यापेक्षा तो कितीतरी अधिक दिप्तीमान असतो, हा अनुभव तर आपणही घेतो. पण कमी विजेचा वापर करून तो आपल्याला अधिक प्रकाश कसा देऊ शकतो, हा सवाल उरतोच.ट्युबलाईट उपलब्ध होण्यापुर्वी पिवळट प्रकाश देणारे काचेचे बल्बच सगळीकडे वापरले जात असत. त्यांचा शोध एडिसनने लावला होता. त्याला त्यानं 'इनकॅन्डिसन्ट बल्ब' असं दिलं होतं. कारण त्याचा प्रकाश हा त्याच्या आत असलेली तार तापल्यामुळं तिच्यातून बाहेर पडणार्या ऊर्जेच्या रुपात आपल्याला मिळतो. तार तर तापावी, प्रकाशमान होण्याइतकी तापावी; पण त्या उच्च तापमानालाही ती तुटु नये यासाठी टंगस्टन या धातुचा वापर केला जात असे. या धातूची तार कितीही तापली तरी ती तुटत नाही. तिच्यामधुन विजेचा प्रवाह वाहू लागला, की तिचं तापमान वेगानं चढत जातं आणि तिच्यामधुन प्रकाश बाहेर पडू लागतो. अशी तापलेली तार असणार्या त्या काचेच्या बल्बचं तापमानही वाढलेलं असतं. म्हणून तर तो आपल्याला हातात धरवत नाही.ट्युबलाईटपासुन मिळणारा प्रकाश वेगळ्या प्रक्रियेतुन आपल्याला मिळतो. त्या काचेच्या नळीच्या दोन टोकाला दोन विद्युताग्रे - इलेक्ट्रोड्स असतात. त्या दोन टोकांमधुन विजेचे स्फुल्लिंग उडत असतात. वेल्डिंग करताना जशा ठिणग्या उडतात तसे; पण त्या नळीच्या आतल्या पृष्ठभागावर स्फुरदिप्तीमान म्हणजेच फ्लोरोसेंट पदार्थाचा गिलावा दिलेला असतो. त्याशिवाय त्यार पार्याची वाफही असते. दोन टोकांना असलेल्या विद्युताग्रांना चेतवून त्यांच्यामधून स्फुल्लिंग बाहेर पडतील अशी व्यवस्था केली जाते. त्याच्या ठिणग्या पार्याच्या वाफेतून वाहु लागल्या की त्यातून जंबुपार किंवा अतिनील किरणे बाहेर पडू लागतात. ती आपल्याला दिसत नाहीत; पण ती त्या फ्लोरोसेंट पदार्थावर पडली की त्यातून आपल्याला दिसणारा दृश्य प्रकाश निर्माण होतो. विद्युताग्रांमधून विजेचे स्फुल्लिंग बाहेर पडण्यासाठी त्यांना जास्त तापवावं लागत नाही. त्यासाठी फारच कमी विजेची गरज भासते. प्रकाशाची निर्मिती त्यानंतरच्या इतर प्रक्रियांमधून होत असल्याने फारच कमी विजेची गरज भासते. तेवढीच दिप्ती निर्माण करण्यासाठी नेहमीच्या बल्बला लागणाऱ्या विजेपेक्षा कितीतरी कमी वीज लागते.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*CRPF - Central Reserve Police Force*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सत्य, समता, स्वातंत्र्य यांचा मिलाफ आणि आचार, उच्चार, विचार यांचे उगमस्थान म्हणजे शिक्षण होय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पाणीटंचाईमुळे कोणत्या देशात राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली ?२) संयुक्त राष्ट्र महासभेने २०२५ हे कोणते वर्ष म्हणून घोषित केले ?३) राज्यघटना देशाला अर्पण झाली त्यावेळी राज्यघटनेत किती कलमे, परिशिष्टे व भाग होते ?४) 'लढा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) जागतिक नाणेनिधीचे मुख्यालय कुठे आहे ? *उत्तरे :-* १) इक्वाडोर २) आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष ३) ३९५ कलमे, ८ परिशिष्टे, १२ भाग ४) लढाई, संघर्ष ५) वॉशिंग्टन*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 किशोरी चौगुले, राज्य शासन पुरस्कार प्राप्त शिक्षिका, कोल्हापूर👤 योगेश खवसे👤 साईनाथ बोईनवाड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आम्हीं शरणागतीं केलासी सरता । येर्हवीं अनंता कोण जाणे ॥१॥ वेदशास्त्र पुराणीं उबगोनि सांडिलासी । तो तूं आम्हीं धरिलासे ह्रदयकमळीं ॥२॥ चतुरा शिरोमणी अहो केशिराजा । अंगीकार तुझा केला आम्हीं ॥३॥ सहस्त्र नामें जरी जालासि संपन्न । तरी हेंहि भूषन आमुचेंचि ॥४॥ येर्हवीं त्या नामाची कवण जाणे सीमा । पाहें मेघश्यामा विचारोनि ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकाकी वैरता कोणासोबत होत नाही आणि स्वतःहून ते, कोणी करत नाही. नेहमीच सत्याच्या बाजूने राहिल्याने, परखड शब्दात बोलल्याने किंवा तसेच विचार व्यक्त केल्याने न कळताच आपोआप वैरता निर्माण झालेली बघायला मिळत असते. त्यात आपला काहीही दोष नसतो. म्हणून स्वतः ला दोष देऊ नये. जेथून मनाला विशेष समाधान मिळतो त्याच मार्गांवर चालण्याचा आपण प्रयत्न करावा.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *एकोपा*एक तळ्यात एक दोन तोंडाचा पक्षी राहत होता. एकदा त्याच्या तोंडाला रामफळासारखे गोड फळ मिळाले. तेव्हा दुसऱ्या तोंडाला त्याचा हेवा वाटला. त्याने पहिल्या तोंडाकडे अर्धे फळ मागितले. तेव्हा पाहिले तोंड त्याला म्हणाले, "तू खाल्लेस काय आणि मी खाल्ले काय... शेवटी पोट तर एकच ! तेव्हा अर्ध फळ मी आपल्या बायकोला देतो." हे ऐकून दुसऱ्या तोंडाला वाईट वाटले. त्या दिवसापासून ते निराश दिसे.एके दिवशी एक विषारी फळ दुसऱ्या तोंडाला मिळाले. ते पाहून पहिल्या तोंडाने ते न खाण्याचा सल्ला दिला. पण, मागच्या वेळच्या रागामुळे दुसऱ्या तोंडाने त्याचा सल्ला ऐकला नाही. त्याने ते फळ खाल्ले आणि अखेर व्हायचे तेच झाले. तो दोन तोंडी पक्षी मरण पावला. *तात्पर्य : एकोप्याने राहण्यातच गोडी असते. त्यात बेबनाव होऊ देऊ नये.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28 नोव्हेंबर 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/18McZArTT8/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 💮 *_ या वर्षातील ३३३ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 💮 *_महत्त्वाच्या घटना:_* 💮••••••••••••••••••••••••••••••••• *२००४: संपूर्ण स्वदेशी बनावटीचे बहुउपयोगी " सुखोई ३० " लढाऊ विमान हवाई दलात दाखल* *२०००: तेलगू भाषेतील महाकवी गुर्रम जाशुवा यांच्या नावाने दिला जाणारा साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वे यांना जाहीर**१९७५: पूर्व तिमोरला (पोर्तुगालपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९६७: जोसेलिन बेल बर्नेल आणि अँटनी हेविश यांनी 'पल्सार’ तार्यांचे अस्तित्त्व सर्वप्रथम सिद्ध केले.**१९६४: नासा (NASA) चे मरीनर-४ हे अंतराळयान मंगळाच्या मोहिमेवर निघाले.**१९६०: मॉरिटानियाला (फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१८२१: पनामाला (स्पेनपासुन) स्वातंत्र्य मिळाले.*💮 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 💮 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८८: यामी गौतम -- हिंदी चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांची अभिनेत्री**१९८६: प्रतीक बब्बर -- भारतीय अभिनेता* *१९७८: मिलिंद कपाळे -- लेखक* *१९६७: प्रा. डॉ. प्रेमा लेकुरवाळे -- लेखिका, कवयित्री* *१९६७: डॉ. धनंजय राजाराम गभणे -- लेखक* *१९६५: प्राचार्य डॉ.अरविंद देशमुख -- लेखक* *१९५९: विश्वास महिपती पाटील -- सुप्रसिद्ध कादंबरीकार,कथाकार तथा निवृत्त सनदी अधिकारी**१९५८: चंद्रलेखा प्रमोदकुमार जगताप - बेलसरे -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका**१९५५: प्रा. अशोक राणा -- प्रसिद्ध इतिहास संशोधक व लेखक**१९५१: डॉ.शुभदा दीपक शेळके -- लेखिका* *१९५०: गोपाळ दत्तात्रय पहिनकर -- कवी, लेखक तथा निवृत्त उपशिक्षणाधिकारी* *१९४६: सीमंतिनी जोशी -- कवयित्री**१९४४: मधु पोतदार -- मराठी लेखक. त्यांनी अनेक मराठी संगीत दिग्दर्शकांची चरित्रे लिहिली (मृत्यू: ८ ऑक्टोबर २०२० )**१९४०: रमेश महिपतराम दवे -- तत्त्वज्ञानाचे अभ्यासक व व्याख्याते**१९३८: मल्लेशप्पा मदिवलप्पा कलबुर्गी -- कन्नड भाषेतील वचन साहित्याचे भारतीय अभ्यासक आणि कन्नड विद्यापीठाचे कुलगुरू (मृत्यू: ३० ऑगस्ट २०१५ )**१९३७: प्रतिभा कुलकर्णी -- प्रसिद्ध लेखिका (मृत्यू: ११ जून २०२४ )**१९३६: संभाजीराव सखाराम पाटणे -- प्रसिद्ध लेखक* *१९२७: प्रमोद करण सेठी -- भारतीय ऑर्थोपेडिकसर्जन मॅगसेसे व पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ( मृत्यू: ६ जानेवारी २००८ )**१८७२: रामकृष्णबुवा वझे – गायक नट, बलवंत संगीत मंडळी आणि ललित कलादर्श या नाटक कंपन्यांमधे त्यांनी गायनगुरु म्हणून काम केले. (मृत्यू: ५ मे १९४३ )**१८५७: अल्फान्सो (बारावा) – स्पेनचा राजा (मृत्यू: २५ नोव्हेंबर १८८५ )*💮 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 💮••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१२: झिग झॅगलर – अमेरिकन लेखक (जन्म: ६ नोव्हेंबर १९२६ )**२००५: गजानन बाळकृष्ण पळसुले-- आधुनिक संस्कृत महाकवी (जन्म: १ नोव्हेंबर १९२१ )**२००३: शंकर पांडुरंग रामाणी -- आधुनिक मराठी कवी (जन्म: २६ जून १९२२ )**२००१: अनंत काणे -- निर्माता दिग्दर्शक ( जन्म: २८ जून १९३५ )**१९९९: हनुमानप्रसाद मिश्रा – १९८८ चा संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते बनारस घराण्याचे सारंगीवादक (जन्म: १९१३ )**१९८०: बिरेंद्रनाथज्ञ(बी. एन. सरकार ) सिरकार -- भारतीय चित्रपट निर्माता आणि न्यू थिएटर्स कलकत्ता चे संस्थापक (जन्म: ५ जुलै १९०१ )**१९७८: लक्ष्मीबाई केळकर (मावशी केळकर) -- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्त्री-शाखेच्या संस्थापिका (जन्म: ६ जुलै १९०५ )**१९६८: एनिड ब्लायटन – बालसाहित्यासाठी प्रसिद्ध असलेल्या इंग्लिश लेखिका (जन्म: ११ ऑगस्ट १८९७ )**१९६७: पांडुरंग महादेव तथा ’सेनापती’ बापट – सशस्त्र क्रांतिकारक, तत्त्वचिंतक व लढाऊ समाजसेवक (जन्म: १२ नोव्हेंबर १८८० )**१९६३: त्र्यंबक शंकर शेजवलकर – इतिहासकार व लेखक (जन्म: २५ मे १८९५ )**१९६२: कृष्ण चंद्र तथा ’के. सी. ’डे – गायक, संगीत संयोजक व अभिनेते (जन्म: ऑगस्ट १८९३ )**१९५४: एनरिको फर्मी – न्यूट्रॉन कणांवरील संशोधनासाठी १९३८ चे पदार्थविज्ञानातील नोबेल पारितोषिक विजेते इटालियन अमेरिकन-भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: २९ सप्टेंबर १९०१ )**१८९३: सर अलेक्झांडर कनिंगहॅम – भारतातील पुरातत्त्व संशोधनाची मुहूर्तमेढ करणारे ब्रिटिश अधिकारी (जन्म: २३ जानेवारी १८१४ )**_१८९०: जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ ’महात्मा फुले’ – श्रेष्ठ समाजसुधारक, विचारवंत, लेखक, क्रांतिकारक (जन्म: ११ एप्रिल १८२७ )_*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गोर गरिबांचे कैवारी : महात्मा फुले*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य - मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी प्रदेश काँग्रेसची राज्यव्यापी सह्याची मोहीम - नाना पटोले*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *विरोधकांच्या गदरोळामुळे दुसऱ्या दिवशी ही संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज ठप्प*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *एमपीएससीची नागरी सेवा पूर्व परीक्षा 1 डिसेंबरला, जुन्या प्रवेश प्रमाणपत्राच्या आधारे प्रवेश नाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *उत्तर मध्य महाराष्ट्रात भरणार हुडहुडी:तापमानात होणार तीव्र घट, हवामान विभागाकडून थंडीच्या लाटेचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्य बँकेचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते गौरव*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ICC क्रमवारीत जसप्रीत बुमराह नंबर वन तर यशस्वीची देखील क्रमवारीत गरुडझेप*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••#चिखलदराचिखलदरा हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यातील एक हिल स्टेशन व एक नगर परिषद आहे.महाभारतच्या महाकाव्यात वैशिष्ट्यपूर्ण, या ठिकाणी अशी भीती होती की भीमा यांनी एका भयंकर चढाओवातील खलनायक किचकचा वध केला आणि नंतर त्याला खोऱ्यात फेकून दिले. अशा प्रकारे कोच्चरदा-चिखलदरा हे त्याचे भ्रष्टाचार आहे म्हणून ओळखले जाऊ लागले.परंतु चिखलदराला अजून बरेच काही आहे. विदर्भातील एकमात्र हिल रिसॉर्ट, हे 1118 मीटरच्या उंचावर सर्वोच्च व्हॅरेट पॉईंट 1188 मीटर असून हे महाराष्ट्रातील एकमात्र कॉफ़ी-वाढविणारे क्षेत्र असण्याचे जोडलेले आहे. चिखलदराचे वार्षिक पाऊस 154 सेंमी आहे. उन्हाळ्यात तापमान 39 से हिवाळ्यात 5 से बदलते. भेट सर्वोत्तम महिने ऑक्टोबर ते जून पर्यंत आहेतहे वन्यजीवन-व्याघ्र, पेंटर, आळशीपणा अस्वल, सांबर, जंगली डुक्कर आणि अगदी क्वचितच पाहिलेले जंगली कुत्री आहे. जवळील प्रसिद्ध मेळघाट टायगर प्रकल्प आहे ज्यामध्ये 82 वाघ आहेत.चिखलदराचे निसर्गरम्य सौंदर्य चक्रीवादळ, प्रॉस्पेक्ट पॉईंट, आणि देवी पॉईंट मधून आनंद घेऊ शकतात. इतर मनोरंजक मोहिमा गव्हिल्गड आणि नारनला किल्ला, पंडित नेहरू बोटॅनिकल गार्डन्स, आदिवासी संग्रहालय आणि सेमादोह लेक यांचा समावेश आहे.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*BPL - Below Poverty Line *••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अखंड यशाने आपल्याला जीवनाची केवळ एकच बाजू कळते, दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची जरुरी असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २६ नोव्हेंबर २०२४ रोजी भारताच्या राज्यघटना निर्मितीला किती वर्ष पूर्ण होत आहेत ?२) अमेरिकेतील सर्वात मोठे राज्य कोणते ?३) विदेशात एका देशात सर्वाधिक १२ आंतरराष्ट्रीय शतके झळकवण्याचा विश्वविक्रम कोणी केला ?४) 'रंक' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला ? *उत्तरे :-* १) ७५ वर्षे २) कॅलिफोर्निया ३) विराट कोहली, भारत ( १२ शतके ऑस्ट्रेलियात ) ४) गरीब ५) २ फेब्रुवारी २००६*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्रीराम चव्हाण, माजी शिक्षणाधिकारी, नागपूरर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकीं तुझें ध्यान करितां त्यजिले प्राण । सांग ऐसें निर्वाण कवणें केलें ॥११॥ ऐसे मागें पुढें जाले असंख्यात । भक्तभागवत सखे माझे ॥१२॥ त्यांचिनि सरता झालासी त्रिभुवनीं । विचारी आपुल्या मनीं पांडुरंगे ॥१३॥ केलें उच्चारणें बोलतां लाजिरवाणें । हांसती पिसुणें संसारींची ॥१४॥ नामा म्हणे केशवा अहो विरोमणी । निकुरा जाला झणीं मायबापा ॥१५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकांच्या दैनंदिन जीवनात लहान, मोठ्या अडचणी असतात. पण,काहींच्या अडचणी दिसत नाही. व त्यातच कोणी आपल्या अडचणी कोणासमोर व्यक्त करत नाही. कारण समोरची व्यक्ती, त्या सांगितलेल्या अडचणी समजून घेईलच असेही नाही. म्हणून कोणाविषयी पूर्ण जाणून न घेता उगाचच बोलून वाईट होऊ नये. किंवा उगाचच कोणाला वाईट ठरवू नये. शेवटी ज्याचे त्यालाच माहीत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वभाव आणि छंद *' समानशीले व्यसनेषु सख्यम् ' हे सुभाषित आपण वारंवार ऐकतो आणि त्याचे प्रत्यंतर समाजात वावरताना आपणाला येते. याच सुभाषिताचा दाखला देणारी ही कथा. एका साध्या संवादातून हा बोध आपणाला मिळेल. एकदा प्रचंड महापुरात नदीच्या पात्रातून दोन भांडी वाहत होती. त्यापैकी एक होते पितळेचे, तर दुसरे होते मातीचे. त्या पुरातुन वाहत जातानाच त्यांच्यात संवाद चालला होता. पितळीचे भांडे मातीच्या भांड्याला म्हणत होते, "अरे, इतका दुरून का चालला आहेस? ये ना माझ्याजवळ. दोघेजण हातात हात घालून जाऊ. कशी मजा येईल बघ तरी. मला डोळे भरून पाहता येईल आणि या प्रचंड वेग असलेल्या पाण्यापासून तुझं संरक्षणही करता येईल." मातीच्या भांड्याने पितळेच्या भांड्याचे आभार मानून म्हटले, "कृपा करून कोणत्याही स्थितीत तू माझ्याजवळ येऊ नकोस. तुझीच मला सर्वात जास्त भीती आहे. तुझा थोडासा जरी धक्का मला लागला, तरी माझ्या ठिकऱ्या उडतील. तुझा माझा देहभाव भिन्न आहे."*तात्पर्य : भिन्न स्वभावाचे, छंदाचे लोक एकत्र कसे येणार ?*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 27 नोव्हेंबर 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/12Gu8nv8i5e/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🛟 *_ या वर्षातील ३३२ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🛟 *_महत्त्वाच्या घटना:_* 🛟•••••••••••••••••••••••••••••••••*१९९५: पाँडेचरीमधील ’व्हेक्टर कन्ट्रोल रिसर्च सेन्टर’ मधील शात्रज्ञांनी शोधलेले ’थोम्ब्रिनेज’ हे हृदयविकारावरचे आत्तापर्यंतचे सर्वोत्कृष्ट औषध ठरले. अमेरिकेने या औषधाचे पेटंट मंजूर केले.**१९९५: गझलांच्या दुनियेतील स्वामी तलत महमूद यांना मध्य प्रदेश सरकारचा ’लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर**१९४४: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सच्या स्टॅफोर्डशायर येथील शस्त्रसाठ्यात स्फोट होऊन ७० जण ठार झाले.**१८३९: बॉस्टन, मॅसॅच्युसेट्स येथे ’अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशन’ची स्थापना*🛟 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🛟••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०००: गिरीजा प्रभू -- मराठी अभिनेत्री**१९८६: सुरेश रैना – क्रिकेटपटू**१९७७: दीपक नागरगोजे -- लेखक तथा सामाजिक कार्यकर्ते**१९७५: सुचित्रा कृष्णमूर्ती -- भारतीय चित्रपट अभिनेत्री**१९७३: अर्जुन रामकिसन देशमुख -- कवी**१९६७: नितीन हिरवे -- प्रकाशक**१९५३: डॉ. पावालाल उत्तम पवार -- कवी, लेखक**१९५३: बप्पी लहिरी उर्फ़ अलोकेश लहिरी-- हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध संगीतकार (मृत्यू: १५ फेब्रुवारी २०२२ )**१९४७: जयप्रकाश झेंडे -- लेखक**१९५०: अनिल धवन -- भारतीय अभिनेता**१९४२: मृदुला सिन्हा -- गोवा राज्याच्या माजी राज्यपाल, प्रसिद्ध लेखिका (मृत्यू: १८ नोव्हेंबर २०२० )**१९४०: ब्रूस ली – अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ञ (मृत्यू: २० जुलै १९७३ )**१९४०: प्रा. डॉ. रमाकांत कोलते -- ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत* *१९४०: प्रा. विजय कृष्णाजी कारेकर -- मराठी लेखक, नाटककार,कवी आणि चित्रकार (मृत्यू: ८ एप्रिल २०२२ )**१९२७: बाबुरावजी मडावी- आदिवासी नेते (मृत्यू: १६ जून २००३ )**१९२१: प्रा. हरिहर मातेकर - लोक साहित्याचे गाढे अभ्यासक**१९१५: दिगंबर बाळकृष्ण तथा दि. बा. मोकाशी – प्रसिद्ध मराठी साहित्यिक (मृत्यू: २९ जून १९८१ )**१९०७: हरिवंशराय बच्चन – प्रसिद्ध हिन्दी कवी (मृत्यू: १८ जानेवारी २००३ )**१८८८: गणेश वासुदेव मावळणकर --- पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष (मृत्यू: २७ फेब्रुवारी १९५६ )**१८८१: डॉ. काशीप्रसाद जायस्वाल – प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ (मृत्यू: ४ ऑगस्ट १९३७ )**१८७४: चेम वाइझमॅन – इस्त्राएलचे पहिले राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ९ नोव्हेंबर १९५२ )**१८७०: दत्तात्रय बळवंत तथा द. ब. पारसनीस – इतिहास संशोधक (मृत्यू: ३१ मार्च १९२६ )**१८५७: सर चार्ल्स शेरिंग्टन – मज्जापेशीवर संशोधन करणारे नोबेल पारितोषिक विजेते (१९३२) ब्रिटिश जैवरसायनशात्रज्ञ (मृत्यू: ४ मार्च १९५२ )* 🛟 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🛟••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८: मुहम्मद अज़ीज़ -- भारतीय सिने पार्श्व गायक (जन्म: २ जुलै १९५४ )**२०१७: नारायणराव बोडस -- भारतीय शास्त्रीय गायक (जन्म: ३१ जानेवारी १९३३ )**२०१६: आनंद यादव -- प्रसिद्ध मराठी लेखक काव्य, कथा, कादंबरी, समीक्षा, ललित अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले आहे. (जन्म: ३० नोव्हेंबर १९३५ )**२००८: विश्वनाथ प्रताप सिंग – भारताचे ७ वे माजी पंतप्रधान,केन्द्रीय अर्थमंत्री व संरक्षणमंत्री, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री (जन्म: २५ जून १९३१ )**२०००: बाळकृष्ण दत्तात्रेय तथा बा. द. सातोस्कर – साहित्यिक,संशोधक,’दैनिक गोमंतक’चे पहिले संपादक (जन्म: २६ मार्च १९०९ )**१९९५: संजय जोग -- लोकप्रिय टीव्ही अभिनेते,चित्रपट अभिनेते (जन्म: २४ सप्टेंबर १९५५ )**१९९४: दिगंबर विनायक तथा नानासाहेब पुरोहित – स्वातंत्र्यसेनानी,समाजवादी विचारवंत,आमदार आणि 'रायगड मिलिटरी स्कूल’चे संस्थापक (जन्म: २८ मे १९०७ )**१९८४: असित बारन -- भारतीय अभिनेता, गायक (जन्म: १९ नोव्हेंबर १९१३)**१९७८: लक्ष्मीबाई केळकर – राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका (जन्म: ६ जुलै १९०५ )**१९७६: गजानन त्र्यंबक तथा ग. त्र्यं. माडखोलकर – कादंबरीकार, समीक्षक आणि पत्रकार (जन्म: २८ डिसेंबर १८९९ )**१९५२: शंकर रामचंद्र तथा ’अहिताग्नी’ राजवाडे – वैदिक धर्माचे पुरस्कर्ते,पाश्चात्य व पौर्वात्य तत्त्वज्ञानाचे अभ्यासक,मीमांसक व भाष्यकार (जन्म: २३ आक्टोबर १८७९ )**१७५४: अब्राहम डी. मुआव्हर – फ्रेन्च गणिती (जन्म: २६ मे १६६७ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वावलंबी जीवन*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *संविधानाचे 75 वे वर्ष सर्वांसाठी गौरवास्पद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा राजीनामा, शपथविधीकडे सर्वांच्या नजरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सरकार स्थापन झाल्यावर उपोषणाची तारीख जाहीर करणार, मनोज जरांगे यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राष्ट्रपतीच्या अभिभाषणवर सभागृहात चर्चा करण्याची विरोधकांची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुण्यात देशातील पहिली स्वदेशी 'अनामया' एमआरआय मशीनचे अनावरण, मेक इन इंडिया अंतर्गत एआय तंत्रज्ञान*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *एस्सार उद्योग समूहाचे सहसंस्थापक शशी रुईया यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ **•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भेंडी खा निरोगी रहा* विशेष चव तसेच चिकट आणि बुळबीळत गुणधर्मामुळे भेंडीची भाजी पाहिली की, अनेकजण नाक मुरडतात. पण, भेडी या फळभाजीत अनेक पोषक तत्वे असून, नियमित भेंजीचे सेवन केल्यास कॅन्सर सारख्या रोगापासून आपला बचाव होतो.भेंडी ही फळभाजी आरोग्यासाठी खुप लाभदायी आहे. भेंडीमध्ये अनेक प्रकराचे पोषक तत्व आणि प्रोटीन्स असतात. शरीराला निरोगी आणि तंदुरुस्त बनवण्यासाठी आवश्यक असलेले वसा, रेशा, कार्बोहाइड्रेट, कैल्शियम, फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि सोडियम यासारखे जीवनसत्वे भेंडीमध्ये आहेत.भेंडी कॅन्सर सारख्या रोगापासून आपला बचाव करते. आपल्या शरीरातील विषारी तत्वे नष्ट करण्याचे काम भेंडी करतेभेंडीत असलेले यूगेनॉलमुळे डायबिटीज या आजारापासून बचाव होतो. तर, यातील फाइबर रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रणात ठेवते.ज्या व्यक्तींना आपले वजन कमी करायचे आहे. त्यांनी नियमीत भेंडीचा आहार घ्यावा. भेंडीत असलेल्या फायबरमुळे आपल्या शरीरातील कॅलरी वाढत नाही आणि आपले वजन कमी होण्यास मदत होते.भेंडी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. यात व्हिटामीन सी हे जीवनस्तव असते. हे आपली इम्यूनीटी सिस्टमला ताकद वाढवून खोकला आणि थंडी पासून बचाव करते. तर, यातील व्हिटामीन ए हे जीवसत्व डोळ्यांना निरोगी ठेवते. *मधुमेहींसाठी औषध* दोन भेंड्या घ्या. त्यांची दोन्ही बाजूंचे शेवटचे तुकडे कापून टाका. मध्ये एक उभा छेद घ्या. एका ग्लासमध्ये पाणी घ्या व त्यात ह्या दोन्ही भेंड्या टाकून रात्रभर ग्लास झाकून ठेवा. सकाळी उठल्यावर भेंड्या काढून टाका व ग्लासमधील पाणी पिऊन टाका. हे पंधरा दिवस करुण पहा तुमच्या साखरेच्या प्रमाणात किती लक्षणीय घट होते ते पहा !.*भेंडीचे फायदे-* १. कँसर -भेंडी आपल्या आहारा नियमित घेतल्याने तुम्ही कँसरला दुर ठेवु शकता. कोलन कँसरला दुर ठेवण्यासाठी भेंडी खास फायदेशीर आहे. ही आतड्यांतील विषारी तत्त्व बाहेर काढण्यासाठी मदत करते, ज्यामुळे आतडे स्वस्थ राहतात आणि चांगल्या प्रकारे काम करता.२. हृदयभेंडी हृदयाला सुध्दा चांगले ठेवते. यामध्ये असलेले पैक्टिन, कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करतात, यासोबतच यामध्ये असणारा घुलनशील फायबर, रक्त आणि कोलेस्ट्रॉलला नियंत्रित करतो. ज्यामुळे हृदय रोगाचा धोका कमी होतो.३. डायबिटीजयामध्ये असणारे यूगेनॉल, डायबिटीजसाठी खुप फायदेशीर ठरते. हे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढण्यापासुन थांबवते, ज्यामुळे डायबिटीजचा धोका कमी होतो.४. अनीमियाभेंडी अनिमियासाठी खुप फायदेशीर असते. यामध्ये असलेले आयर्न हीमोग्लोबिन निर्माण करण्यात सहायक असतात. हे रक्त स्त्राव थांबवण्याचे काम करते.५. पचनतंत्रभेंडी ही भरपुर फायबर असलेली भाजी आहे. यामध्ये असलेले फायबर पचनतंत्रासाठी फायदेशीर आहे. यामुळे गॅस, बध्दकोष्ट आणि पोट दुखी यासारख्या समस्या होत नाहीत.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*BBC - British Broadcasting Corporation*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••यशाचे मधुर चांदणे हवे असेल तर, प्रयत्नांचा चंद्रमा अखंड तेवत ठेवला पाहिजे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ग्रामसभा कशाची मिळून बनते ?२) भारताचे राष्ट्रगीत 'जन - गण - मन' हे कोणत्या साली लिहिले गेले ?३) IPL इतिहासात सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला आहे ?४) जगातील सर्वोत्तम शहरांच्या यादीत कोणत्या शहराने अव्वल स्थान पटकावले ?५) एका बिंदूतून किती रेषा काढता येतात ? *उत्तरे :-* १) सर्व प्रौढ नागरिक ( गावकरी ) २) सन १९११ ३) ऋषभ पंत ( २७ कोटी, लखनौ संघ ) ४) लंडन, ब्रिटन ५) अनंत*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 मृदुला लगडे, कवयित्री👤 दीपक जाधव👤 गायत्री जिंतेंद्र सोनजे👤 अनिता जावळे, उपक्रमशील शिक्षिका, लातूर👤 पंकज सेठिया👤 नागेश्वर कुऱ्हाडे👤 ओंकार बच्चूवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••रावणा ऐसा बंधु सांडूनि सधर । ओळंगति परिवारा ब्रह्मादिकां ॥६॥ तें सांडोनि एकसरा आलासे धांवत । जाला शरणागत बिभीषण ॥७॥ हिरण्यकश्यपें तुझ्या वैर संबंधें । पाहे त्या प्रल्हादा गांजियेलें ॥८॥ अजगर कुंजर करितां विषपाना । परि तुझें स्मारण न संडीच ॥९॥ पति पुत्रस्नेह सांडोनि गोपिका । रासक्रीडे देखा भाळलिया ॥१०॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मन अशांत असेल तर आपल्या समोर कितीही आकर्षक वस्तू ठेवल्या असतील तरी त्याकडे आपले लक्ष जात नाही. कारण त्यावेळी, त्या वस्तूंचे महत्व सुद्धा शुन्य वाटत असते.पण, एक गोष्ट अवश्य लक्षात ठेवावे मन हे हवेपेक्षा वेगवान असते तो कुठेही घेऊन जात असतो.म्हणून कोणत्याही गोष्टीचा जास्त त्रास करून घेऊ नये.कारण तो होणारा त्रास स्वतःला भोगावा लागतो व पुन्हा एकदा अडचणी येण्यासाठी मार्ग मोकळा करून देत असतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मोठेपण*मॅक्समुल्लर हा जगप्रसिद्ध विद्वान, तत्त्ववेत्ता म्हणून ओळखला जातो. त्यांच्या आयुष्यातील ही कथा. मॅक्समुल्लर ज्या महाविद्यालयात शिकले, त्याच महाविद्यालयात पुढे त्यांची प्राचार्य म्हणून नियुक्ती झाली. आपण ज्या ठिकाणी महाविद्यालयीन शिक्षण घेतले तेथेच अध्यापनाचे पवित्र कार्य करायला मिळणार याचा साहजिकच त्यांना खूप आनंद झाला होता. त्या आनंदाच्या भरातच त्या दिवशी ते आपले पद स्वीकारायला गेले. ते महाविद्यालयात आले आणि ज्या खुर्चीसमोर येऊन उभे राहिले. क्षणभर त्या खुर्चीकडे पाहिले आणि शिपायांकडून दुसरी खुर्ची मागवून त्या खुर्चीशेजारी ठेवली व त्या दुसऱ्या खर्चीवर ते विराजमान झाले. त्यांनी विचार केला की, 'या खुर्चीवर आपले प्राचार्य बसत होते. अद्याप आपण तितके मोठे झालो नाही. अजून आपणाला खूप शिकायचे आहे.* तात्पर्य : कितीही मोठे झालात तरी तुमचे पाय जमिनीवर असू द्या. त्यामुळे तुमची विद्वत्ता, यश अधिक खुलते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26 नोव्हेंबर 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1DeSC3eTgy/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📋 *_“ भारतीय संविधान दिन ”_* 📋••••••••••••••••••••••••••••••••• 📋 *_ या वर्षातील ३३१ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 📋 *_महत्त्वाच्या घटना:_* 📋••••••••••••••••••••••••••••••••• 🔵 *उद्देशिका* 🔵 *_आम्ही भारताचे लोक, भारतास एक संपूर्ण प्रभुत्व-संपन्नसमाजवादी धर्मनिरपेक्ष लोकतंत्रात्मक गणराज्य बनविण्यास, तसेच त्याच्या समस्त नागरिकांना:सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय,विचार, अभिव्यक्ति,विश्वास,धर्मआणि उपासनाची स्वतंत्रता,प्रतिष्ठा आणि संधिची समताप्राप्त करण्यासाठीतसेच त्यासर्वांमध्येव्यक्ति ची गरिमा आणि राष्ट्राची एकताव अखंडता सुनिश्चित करणारी बंधुतावाढविण्यासाठीदृढसंकल्प होऊन आपल्या या संविधान सभेत आज दिनांक नोव्हेंबर २६,१९४९ ला एतद्द्वारे या संविधान ला अंगीकृत,अधिनियमीत आणि आत्मार्पित करीत आहोत._* •••••••••••••••••••••••••••••••••*२००८: पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटना 'लष्कर-ए-तैय्यबा’ने मुंबईत ठिकठिकाणी अतिरेकी हल्ले केले.**१९९९: विकीरण जीवशास्त्र (Radiation Biology) या विषयात महत्त्वपूर्ण संशोधन केल्याबद्दल इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) तर्फे जैववैद्यकीय संशोधनासाठी देण्यात येणार्या पुरस्कारासाठी डॉ.रावसाहेब काळे यांची निवड करण्यात आली.**१९९७: अवकाश आणि संरक्षण क्षेत्रात भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळवून देणारे शास्त्रज्ञ,तंत्रज्ञ आणि पंतप्रधानांचे विज्ञानविषयक सल्लागार डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना ’भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर**१९६५: अॅस्टॅरिक्स (A-1) हा फ्रान्सचा पहिला उपग्रह अल्जीरीयातून अंतराळात प्रक्षेपित करण्यात आला.**_१९४९ :डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केलेल्या संविधानास मान्यता मिळाली._* 📋 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 📋••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९१: प्रियांका पाटील -- लेखिका* *१९८४: दीपक जगन्नाथ गायकवाड -- लेखक**१९८१: डॉ. नितिन कळमकर -- लेखक* *१९७९: प्रा. डॉ. भालचंद्र माधव हरदास -- लेखक, वक्ते**१९७२: अर्जुन रामपाल – अभिनेता**१९७१: डॉ. स्मिता निशिकांत मेहत्रे -- कवयित्री, लेखिका* *१९७०: प्रभाकर ढगे -- प्रसिद्ध कवी, लेखक, संपादक**१९६६: प्रा. डॉ. प्रदीप रामकृष्ण राऊत -- कवी, लेखक* *१९६५: अनंत भोयर -- प्रसिद्ध कथाकार,कादंबरीकार शेती व साहित्य क्षेत्रात विविध पुरस्कारांनी सन्मानित* *१९६२: उषाताई प्रल्हाद आढागळे -- लेखिका**१९६०: सुभदा दिवाकर मुंजे -- कवयित्री* *१९५४: वेल्लुपल्ली प्रभाकरन – एल. टी. टी. ई. चे संस्थापक (मृत्यू: १८ मे २००९ )**१९५२: मुनव्वर राणा -- भारतीय उर्दू कवी आणि साहित्यात अकादमी पुरस्काराने सन्मानित (मृत्यू: १४ जानेवारी २०२४ )**१९५२: मधु नेने -- सज्जनगड मासिकाचे कार्यकारी संपादक व ज्येष्ठ पत्रकार* *१९४८: डॉ. यशवंत त्र्यंबक पाठक -- ललित लेखक ( मृत्यू: २३ मार्च २०१९ )**१९४८: वीणा विजय देव -- मराठी लेखिका व समीक्षक ( मृत्यू: २९ ऑक्टोबर २०२४)**१९३८: डॉ. भालचंद्र श्रीराम फडनाईक -- पूर्व अधिष्ठाता (पी.के.व्ही) प्रसिद्ध कवी, लेखक**१९३६: डॉ. रा. ह. उपाख्य रामभाऊ तुपकरी -- धातुशास्त्राचे अभियंता,लोखंड व पोलाद उत्पादनाचे विशेषतज्ञ, पूर्व तरुण भारतचे प्रबंध संचालक, लेखक, विचारवंत* *१९३३: गोविंद पानसरे -- महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे विचारवंत व कम्युनिस्ट कामगार नेते (मृत्यू : २० फेब्रुवारी २०१५ )**१९३३: चंद्रकांत कामत -- हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत पद्धतीमधले तबलावादक (मृत्यू: २८ जून २०१० )**१९२६: प्रा. यशपाल -- भारतीय शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ (मृत्यू: २४ जुलै २०१७ )**१९२३: राजाराम दत्तात्रय तथा राजा ठाकूर – चित्रपट दिग्दर्शक (मृत्यू: २८ जुलै १९७५ )**१९२१: व्हर्गिस कुरियन – भारतीय दुग्धोत्पादनातील -'धवल क्रांती’चे जनक, ’अमूल’चे संस्थापक, राष्ट्रीय दुग्धोद्योग विकास महामंडळाचे (NDDB) संस्थापक अध्यक्ष, पद्मश्री,पद्मभूषण,पद्मविभूषण,रॅमन मॅगसेसे पारितोषिक विजेते (मृत्यू: ९ सप्टेंबर २०१२ )**१८९०: सुनीतिकुमार चटर्जी – आधुनिक ऐतिहासिक भाषाशास्त्र व ध्वनीविचार यांच्या अभ्यासाची मुहूर्तमेढ रोवणारे भाषाशास्त्रज्ञ, साहित्य व संस्कृतीचे अध्यापक (मृत्यू: २९ मे १९७७ )**१८८५: देवेन्द्र मोहन बोस – वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधनाची सुरूवात करणारे भारतीय पदार्थवैज्ञानिक (मृत्यू: २ जून १९७५ )**१८८०: सत्यबोध बाळकृष्ण हुदळीकर -- मराठी लेखक, बालसाहित्यिक, जर्मन साहित्याचे अनुवादक आणि शिक्षणतज्ज्ञ* 📋 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 📋••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२: विक्रम गोखले --- भारतीय चित्रपट, दूरदर्शन आणि रंगमंच अभिनेते (जन्म: ३० ऑक्टोबर, १९४७ )**२०१९: सुधीर धर -- भारतीय सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार (जन्म: १४ मे १९३२ )**२०१०: विठ्ठल उमप -- मराठी शाहीर व लोककलाकार उमपांनी अनेक कोळी गीते आणि भीम गीते रचली व गायली(जन्म: १५ जुलै १९३१ )**२००८: हेमंत करकरे,अशोक कामठे,विजय सालसकर,तुकाराम ओंबाळे – मुंबई पोलिस दलातील अधिकारी**२००१: चंद्रकांत कृष्णाजी जगताप – शिल्पकार, पुणे रेल्वे स्थानकासमोरील महात्मा गांधींचा पुतळा, शनिवारवाड्यासमोरील सिंहाची प्रतिमा, सिंहगडावरील तानाजी मालुसरेंचा पुतळा ही त्यांनी घडवलेली काही प्रसिद्ध शिल्पे आहेते. याशिवाय त्यांनी तयार केलेली देवदेवतांची अनेक शिल्पे महाराष्ट्रात आहेत.* *१९९४: भालजी पेंढारकर – मराठी चित्रपटसृष्टी आणि समाजमनावर पाच तपे अधिराज्य गाजवणारे चित्रमहर्षी (जन्म: २ मे १८९९ )**१९८५: ’राजकवी’ यशवंत दिनकर पेंढारकर तथा कवी यशवंत – रविकिरण मंडळातील एक कवी,संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर त्यांना ’महाराष्ट्र कवी' म्हणून गौरविण्यात आले.(जन्म: ९ मार्च १८९९ )~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतीय संविधान आणि आपण*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *संसदेच्या हिवाळी अधिवेशनात गदारोळ, संसद बुधवार पर्यंत स्थगित*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *ईडीची राजधानी दिल्लीत मोठी कारवाई; ५०० कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी मारले छापे*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *हे शतक देशातील महिलांचे, राजकीय भाष्यकार नीरजा चौधरी यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *छायाचित्र क्षेत्रात पुण्याच्या शिरपेचात मनाचा तुरा, राहुल सचदेव आणि एम. एस रंगनाथन या छायाचित्रकारांचे जागतिक स्तरावर सन्मान*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *धर्म आणि विज्ञानाच्या समन्वयातूनच विश्व शांती नांदेल, आध्यात्मिक गुरू पं. विजयशंकर मेहता यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांचा सन्मान, 75 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या डॉपलर रडर विषयाच्या अभ्यासक्रमात यश*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पर्थ कसोटीत भारताचा ऑस्ट्रेलियावर 295 धावानी विजय, 5 कसोटी मालिकेत 1 - 0 ने पुढे*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुधी भोपळा........दुधी भोपळ्यामध्ये दुधाइतकेच शरीरास आवश्यक असे पोषक घटक आहेत म्हणूनच त्याचे नाव दुधी भोपळा पडले आहे. एक प्रकारे दुधी भोपळा हे वनस्पतिजन्य दूधच आहे. ‘यथा नाम तथा गुण’ या उक्तीप्रमाणे दुधी भोपळ्याची तुलना ही आईच्या दुधाशी केली आहे. एक शीत गुणाची औषधी गुणधर्म असलेली सौम्य भाजी ही सर्व आजारांमध्ये पथ्याची भाजी म्हणून वापरली जाते. लांबट बाटलीच्या आकाराची फिक्या हिरवट रंगाची, आतून पांढऱ्या स्पंजासारखी आणि लांब चौकोनी बियांनी युक्त ही फळभाजी सर्वानाच आरोग्यासाठी उपयुक्त आहे. संस्कृतमध्ये कर्कटी, इंग्रजीमध्ये बॉटल गार्ड, तर शास्त्रीय भाषेत कुकर बीटा मॅक्झिमा या नावाने ओळखला जाणारा दुधी भोपळा कुकर बिटेसी या कुळातील आहे. दुधी भोपळा ही वेल प्रकारातील वनस्पती असून या वनस्पतीची फुले पांढरी असतात.औषधी गुणधर्म० लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस ब जीवनसत्त्व प्रथिने, खनिजे, आद्र्रता, तंतूमय व पिष्टमय पदार्थ हे सर्व पोषक घटक दुधी भोपळ्यामध्ये असतात. आयुर्वेदानुसार दुधी भोपळा हा पित्तशामक व कफनाशक, हृदय, मूत्रल, सप्तधातूंचे पोषण करणारा व बलकारक आहे.उपयोग० दुधी भोपळ्यामध्ये कमी उष्मांक असल्याकारणाने तो हृदयरोग्यांसाठी एक वरदानच ठरला आहे. हृदयविकारामध्ये रक्त वाहिन्यांमध्ये वाईट कोलेस्ट्रॉल साठून रक्तपुरवठा सुरळीत होण्यास अडथळा निर्माण होतो. अशा वेळी रोज सकाळी अर्धा कप दुधी भोपळ्याचा रस, तुळशीची ७-८ पाने, पुदिन्याची ७-८ पाने, संधव, जिरे व काळी मिरी एकत्र करून रोज सकाळी हा रस प्यावा. यामुळे रक्तवाहिन्यांवरील अडथळा दूर होऊन रक्तपुरवठा सुरळीत होतो.० दुधी भोपळा हा धातुपुष्टीकर असल्याकारणाने गर्भवती स्त्रीने आहारामध्ये दुधीचे सेवन नियमित करावे. यामुळे गर्भवतीचे आरोग्य चांगले राहून गर्भाचे पोषणही व्यवस्थित होते. तसेच गर्भावस्थेमध्ये वारंवार होणारा मलावष्टांभाचा त्रासही दूर होतो.० उष्णतेमुळे शरीराची लाहीलाही होत असेल तर दुधीचा रस खडीसाखर घालून प्यावा. यामुळे उष्णतेचा त्रास कमी होतो.० स्थूल व्यक्तींनी वजन कमी करण्यासाठी रोज संध्याकाळी जेवणापूर्वी दुधीचे सूप प्यावे. या सूपाला संधव, जिरे, हळद, मीठ व गाईच्या तुपाची फोडणी द्यावी. यामुळे पोट भरल्याची भावना निर्माण होते व शरीरास सर्व पोषक घटकही मिळतात.० अति उष्णता, जुलाब, आम्लपित्त, मधुमेह, अति तेलकट खाणे यामुळे जर वारंवार तहान लागत असेल, तर अशा वेळी ग्लासभर दुधीचा रस चिमूटभर मीठ घालून घ्यावा. यामुळे घामातून शरीराबाहेर जाणारे क्षार कमी होतात. तहान लागणे कमी होते व थकवा जाणवत नाही.० शांत झोप येत नसेल तर अशा वेळी दुधी भोपळ्याच्या रसाने तयार केलेले तेल डोक्याला व तळपायाला लावावे. हे तेल बनविताना दुधी भोपळ्यासोबत त्याची पाने व फुलेही घ्यावीत. या तेलामुळे थंडावा निर्माण होऊन शांत झोप लागते.० लघवीला जळजळ होत असेल तर अशा वेळी ग्लासभर दुधीरस त्यामध्ये अध्रे िलबू पिळून घ्यावे. यामुळे मूत्रातील अतिरिक्त आम्लाचे प्रमाण कमी होते व साहजिकच शरीराची उष्णता कमी होऊन लघवीची जळजळ थांबते.० खूप ताप आला असेल तर अशा वेळी दुधी भोपळ्याचे सूप पिणे हे एक उत्तम औषध ठरते. यामुळे ताप कमी होण्यास मदत होते. तसेच ताप चढत असल्यास दुधी किसून कपाळावर लेप लावावा. असे केल्याने ताप उतरण्यास मदत होते.० पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना पित्ताचा तसेच उष्णतेचा त्रास होत असेल तर नियमितपणे आहारातून दुधीचे सेवन करावे. यामुळे शरीराला शीतलता प्राप्त होते.० दुधीचे बी औषध म्हणून उपयुक्त आहे. या बिया दुधात वाटून घेतल्यास मेंदूची कार्यक्षमता वाढून विस्मरण कमी होते. तसेच मस्तकातील उष्णता कमी होऊन मेंदूचा उत्साह वाढतो.० अति काळजीने मेंदूचा ताणतणाव वाढला असेल व त्यातून असहय़ तीव्र डोकेदुखीचा त्रास होत असेल, तर अशा वेळी १ कप दुधीचा रसामध्ये १ चमचा मध घालून घ्यावा. यामुळे डोकेदुखी थांबते.० अति उष्णतेमुळे डोळ्यांची आग होत असेल तसेच डोळ्यांची लाली वाढली असेल, तर अशा वेळी दुधीचा कीस कापसावर ठेवून तो कापूस डोळ्यांवर ठेवावा व शांतपणे पडून राहावे. यामुळे डोळ्यांची उष्णता कमी होते.० आजारपणामुळे अशक्तपणा जाणवत असेल व शरीर कृश झाले असेल, तर अशा वेळी दुधी भोपळ्याचा हलवा हा खडीसाखर, वेलदोडे, दूध, बदाम, मनुके घालून जेवणानंतर खावा. यामुळे काही दिवसांतच शरीराचा अशक्तपणा दूर होतो.० तळपायांना भेगा पडल्या असतील, तर अशा वेळी दुधीने सिद्ध केलेले तेल तळपायांना लावून पायात मोजे घालावे. यामुळे उष्णतेचा त्रास कमी होऊन भेगा भरून येतात.० आहारामध्ये नियमितपणे दुधीचा वापर करावा. अनेक जणांना तसेच लहान मुलांना दुधीची भाजी खाण्यास आवडत नाही. अशा वेळी कोिशबीर, थालीपीठ, पराठा, हलवा, सूप अशा अनेक स्वरूपांत दुधी भोपळ्यापासून पदार्थ बनवून त्याचा वापर करावा.सावधानतादुधी भोपळा हा नेहमी आहारात कोवळा व ताजा वापरावा. कोवळ्या भोपळ्यामध्ये औषधी पोषक गुणधर्म जास्त प्रमाणात असतात. त्याचबरोबर तो नेहमी उकडून किंवा शिजवून खावा. जुनाट दुधी भोपळा जास्त प्रमाणात किंवा कच्च्या स्वरूपात खाल्ल्यास पोट बिघडण्याची शक्यता जास्त असते.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*AIR - All India Radio*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वतःच्या अंतरात्म्याच्या संकेतानुसार चालल्याने कीर्ती सहजतेने प्राप्त होते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 'ग्रामगीता' या ग्रंथातील पहिल्या अध्यायाचे नाव काय ?२) नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभेत सर्वाधिक मताधिक्याने जिंकलेला आमदार कोण ?३) 'संरक्षण' हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो ?४) 'रोष' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) प्राणी जीवनाचा अभ्यास करणाऱ्या उपशाखेचे शास्त्रीय नाव काय ? *उत्तरे :-* १) देवदर्शन २) काशिराम पावरा, भाजप ( १,५९,०४४ मतांनी ) ३) संघसूची ४) राग ५) झूलॉजी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संजय माचेवार, वसमत👤 संतोष लक्ष्मण सज्जन, धर्माबाद👤 अर्जुन यनगंटीवार👤 संजय बोनटावार👤 मुरलीधर हंबर्डे पाटील*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आम्ही शरणागत परि सर्वस्वें उदार । भक्तीचे सागर सत्वशील ॥१॥ काय वाचा मनें अर्थ संपत्ति धन । दिधलें तुजलागुन पांडुरंगा ॥२॥ आम्हां ऐसें चित्त तुम्हां कैचें देव । हा बडिवा केशवा न बोलावा ॥३॥ सत्वाचा सुभट बळि चक्रवर्तित । पहा केवढी ख्याति केली तेणें ॥४॥ त्रिभुवनीचें बैभव जोडिलें ज्या लागुनि । तें शरीर तुझ्या चरणीं समर्पियेलें ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जेथे आपल्याला पोहोचायचे असते.त्या ठरलेल्या जागी पोहोचायला जास्त वेळ लागत नाही. कोणत्याही माध्यमातून आपण पोहोचत असतो. पण, एखाद्याला मागे टाकून पोहोचणे असेल तर मात्र समोर पोहोचून सुद्धा पाहिजे त्या प्रकारचे आपल्याला समाधान मिळत नाही. कारण दुसऱ्यांच्या मनात जागा केलेल्यांना कितीही बाजूला सारण्यासाठी प्रयत्न करून सुद्धा काढणे होत नाही. त्यासाठी माणूस म्हणून जगावे लागते व अशा कितीतरी मौल्यवान संपत्तीचा त्याग करावा लागतो. ते, प्रत्येकालाच जमत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*व्यंग*चेष्टा कसलीही करावी. पण, ती केवळ गंमत किंवा मस्करी म्हणूनच. एखाद्याच्या व्यंगावर चेष्टा करणे अथवा त्या व्यंगाचा उल्लेख करून चारचौघांत त्याचा अपमान करणे हे गैरच. ते सभ्यतेचे लक्षण नव्हे, पण एखाद्याने असे केलेच तर ती चेष्टा आपल्यावर उलटूही शकते, याचे भान ठेवावे. आपला पांडुरंग एकदा रस्त्यावरून ऐटीत चालला होता, तेवढ्यात समोरून किरण येताना दिसली. ती थोडीशी तिरळी होती. पांडुरंगचा स्वभाव मुळातच खवचट, त्यात तिरळे बघणारी किरण समोरून आलेली. पांडुरंग म्हणाला, "काय किरण ! कसं काय ठीक आहे ना? कुठं चाललीस? आणि तुला म्हणे एका वस्तूच्या दोन वस्तू दिसतात. खरं का?" किरणच्या लक्षात आले की, हा आपली चेष्टा करतोय, आपणाला हिणवतोय. म्हणून ती म्हणाली, "खरं आहे हे ! आता हेच बघ ना, तुला दोन पाय आहेत ना? पण मला तुला चार पाय असल्याचं दिसत आहे !"*तात्पर्य :* दुसऱ्याच्या व्यंगाला हसू नये. त्याचा उपहास करू नये.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 25 नोव्हेंबर 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1BCxuVmV4N/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚛️ *_ या वर्षातील ३३० वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ⚛️ *_महत्त्वाच्या घटना:_* ⚛️ •••••••••••••••••••••••••••••••••*२०००: सतारवादक उस्ताद अब्दुल हलीम जाफर खाँ यांना मध्यप्रदेश सरकारचा ’तानसेन सन्मान’ जाहीर**१९९९: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांना ’इंदिरा गांधी शांतता पुरस्कार’ जाहीर**१९९४: राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांना कलकत्ता येथील ’इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन’तर्फे देण्यात येणारा 'राज क्रिस्टो दत्त स्मृती पुरस्कार’ जाहीर**१९९१: कमल नारायण सिंग यांनी भारताचे २२ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९७५: सुरीनामला (नेदरलँड्सकडून) स्वातंत्र्य मिळाले.*⚛️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ⚛️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८८: रोशेल राव -- माॅडेल व अभिनेत्री**१९८३: संध्या ललितकुमार भोळे -- कवयित्री**१९८३: झुलन गोस्वामी -- भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू* *१९८१: संदीप विकास गुजराती -- कवी* *१९७८: राखी सावंत -- भारतीय अभिनेत्री**१९७७: गिरीश पांडुरंग कुलकर्णी -- भारतीय अभिनेता, लेखक आणि निर्माता**१९६९: जोस्ना दिलीप पाटील -- लेखिका**१९६६: रूपा गांगुली -- भारतीय अभिनेत्री, पार्श्वगायिका* *१९६६: सीताराम जगन्नाथ सावंत -- प्रसिद्ध लेखक**१९६३: विजया ज्ञानेश्वर भांगे -- लेखिका, कवयित्री**१९५९: प्रवीण श्रीराम देशमुख -- कवी, लेखक**१९५४: नीता सतीश शाह -- कवयित्री* *१९५०: सुधीर गाडगीळ -- प्रसिद्ध निवेदक, मुलाखतकार, लेखक, पत्रकार* *१९५०: नत्थू सीताराम खंडाईत -- लेखक* *१९५०: प्रा. ज्योती बाबुराव लांजेवार -- मराठी लेखिका, कवयित्री, समीक्षक आणि विचारवंत (मृत्यू: ८ नोव्हेंबर २०१३ )**१९३९: दिनकर गांगल -- लेखक, संपादक, पत्रकार* *१९३८: फकरुद्दीन हजरत बेन्नूर -- मुस्लिम समाजातील अभ्यासू आणि बुद्धिवंत समाजसुधारक (मृत्यू: १७ ऑगस्ट २०१८ )**१९३७: डॉ.अशोक दामोदर रानडे -- भारतीय शास्त्रीय संगीतविशारद, गायक, समीक्षक आणि लेखक (मृत्यू: ३० जुलै २०११ )**१९२९: सुरिंदर कौर -- भारतीय गायिका आणि गीतकार (मृत्यू: १४ जून २००६ )**१९२९: डॉ.गणेश मुकुंद नाशिककर -- कवी, लेखक* *१९२६: रंगनाथ मिश्रा – भारताचे २१ वे सरन्यायाधीश (मृत्यू: १३ सप्टेंबर २०१२ )**१९२१: भालचंद्र व्यंकटेश पेंढारकर ऊर्फ अण्णा पेंढारकर -- मराठी रंगभूमीवरील एक श्रेष्ठ नाट्य-अभिनेते, दिग्दर्शक, नाट्य-निर्माते आणि नेपथ्यकार ( मृत्यू: ११ ऑगस्ट, २०१५ )**१९०५: खंडेराव सावळाराम दौंडकर -- लेखक, संपादक (मृत्यू: १० जानेवारी १९६० )**१८९८: देबकीकुमार बोस -- भारतीय दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते (मृत्यू: १७ नोव्हेंबर १९७१ )**१८८२: सावळाराम लक्ष्मण हळदणकर – चित्रकार (मृत्यू: ३० मे १९६८ )**१८७९: साधू वासवानी – आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ (मृत्यू: १६ जानेवारी १९६६ )*⚛️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ⚛️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: दिएगो अरमांडो मॅराडोना -- अर्जेंटिनाचा प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू (जन्म: ३० ऑक्टोबर१९६० )**२०१४: सितारा देवी -- शास्त्रीय कथ्थक शैलीतील नृत्यांगना,गायिका आणि अभिनेत्री(जन्म: ८ नोव्हेंबर १९२० )**२०१३: लीला पोतदार तथा लीलावती भागवत – बालसाहित्यिका.ओघवती भाषा, चित्रमय वर्णन व बोलकी संवादशैली ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये (जन्म: ५ सप्टेंबर १९२० )**१९९८: परमेश्वर नारायण तथा पी.एन.हक्सर – प्रशासक व मुत्सद्दी,पंतप्रधानांचे मुख्य सचिव,योजना आयोगाचे उपाध्यक्ष (जन्म: ४ सप्टेंबर १९१३ )**१९९७: जवाहरलाल अमोलकचंद दर्डा -- भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते (जन्म: २ जुलै १९२३ )**१९८८: माधव वासुदेव पटवर्धन -- प्राध्यापक, समीक्षक,अभ्यासक, अनुवादक(जन्म: १ जानेवारी १९०६ )**१९८४: यशवंतराव चव्हाण – भारताचे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री (जन्म: १२ मार्च १९१३ )**१९७४: यू.थांट – संयुक्त राष्ट्रांचे तिसरे सरचिटणीस (जन्म: २२ जानेवारी १९०९ )**१९६२: गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ 'दासगणू महाराज' – आधुनिक संतकवी, ’भक्तिरसामृत’, ’भक्तकथामृत’ आणि ’संतकथामृत’ हे त्यांचे संतचरित्रात्मक ग्रंथ आहेत.(जन्म: ६ जानेवारी १८६८ )**१९६०: अनंत सदाशिव अळतेकर – प्राच्यविद्यापंडित (जन्म: २४ सप्टेंबर १८९८ )**१९२२: पांडुरंग दामोदर गुणे – प्राच्यविद्यासंशोधक,भाषाशास्त्रज्ञ व साहित्यसमीक्षक (जन्म: २० मे १८८४ )**१८८५: अल्फान्सो (बारावा) – स्पेनचा राजा (जन्म: २८ नोव्हेंबर १८५७ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अन्नाची नासाडी टाळू या ......!..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *15व्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सत्ता स्थापनेचा निर्णय लांबणीवर, स्पष्ट बहुमत असल्याने घाई न करण्याचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *आमच्या अपेक्षेप्रमाणे निकाल नाही, पण जनतेचा कौल आहे, निकालाविरोधात कोर्टात जाणार नाही, ईव्हीएमबाबत माहिती घेऊन बोलेन, निकालाच्या 24 तासानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *ज्या गावात जितका लीड त्या गावात तितकी झाडे लावणार, सांगोलाच्या शेकापच्या युवा आमदाराचा स्तुत्य उपक्रम*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *27 कोटी विषय क्लोज ! अवघ्या 10 मिनटात ऋषभ पंतने मोडला अय्यरचा विक्रम, आयपीएलच्या लिलावात इतिहासामधील ठरला सर्वात महागडा खेळाडू*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहलीच्या शतकानंतर बुमराह-सिराजचा धुमाकूळ, ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिली कसोटी जिंकण्यासाठी 7 विकेटची गरज ! 534 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची 3 बाद 12 अशी स्थिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📒 *सर्दी झाल्यावर अन्न बेचव का लागते ?* 📒अन्नाची चव आपण जिभेनं चाखतो असं म्हणतो; पण ते संपुर्ण खरे नाही. जिभेवर केवळ चार प्रकारच्या स्वादांना प्रतिसाद देणारे स्वादांकुर असतात. गोड, खारट, आंबट आणि तुरट. बाकी सगळ्या चवी या चार आणि वासाबी या नावानं ओळखल्या जाणार्या पाचव्या प्रकारच्या स्वादांकुरांच्या वेगवेगळ्या प्रकारे साथ देण्याच्या प्रक्रियांमधुन आपल्याला समजतात. या स्वादांकुराशी पदार्थांमधील स्वादरेणुंचा संबंध आला की त्यातुन उठणारे विद्युत रासायनिक तरंग मज्जातंतुकडुन मेंदुतील स्वादकेंद्राकडे पाठवले जातात. त्या तरंगांबरोबरच आपल्या घ्राणेंद्रियांकडुन येणारे अन्नाच्या गंधांचे आणि डोळ्यांकडुन येणार्या अन्नाच्या रंगांचे, आकारांचे तरंग मेंदुला येऊन भिडतात. या सर्वांचं तिथं. विश्लेषण होऊन त्यातुन मग त्या पदार्थाच्या खर्याखुर्या चवीची ओळख आपल्याला पटते. अर्थात या सार्या प्रक्रिया इतक्या वेगानं होतात की हे सारं सव्यापसव्य होत असल्याची जाणीवही आपल्याला होत नाही.तरीही यावरुन हे मात्र ध्यानात येईल की केवळ जीभ जे चाखते त्यावरुनच आपल्याला अन्नाची चव कळत नाही. त्यात डोळ्यांना दिसणार्या त्या अन्नाच्या स्वरुपाचा आणि नाकानं जोखलेल्या त्याच्या गंधाचाही तितकाच महत्वाचा सहभाग असतो.आंब्याचा रंग काळाकुट्ट आणि त्याचा आकार दगडासारखा ओबडधोबड असता, त्याचा गंध आपल्याला नाक मुठीत धरायला प्रवृत्त करणार्यांच्या जातकुळीतला असता तर आंबा आपल्याला तितकाच चविष्ट लागला असता की काय या प्रश्नाचं उत्तर स्वत:लाच देण्याचा प्रयत्न करा म्हणजे त्या चवीतल्या जिभेखेरीज इतर इंद्रियांच्या सहभागाचं आकलन होईल.तेव्हा कोणत्याही अन्नाची चव घेण्यासाठी जिभेबरोबरच आपली नजर आणि घ्राणेंद्रिये तितकीच जागृत असायला हवीत. जेव्हा आपल्याला सर्दी होते तेव्हा आपलं नाक चोंदतं. म्हणजेच नाकाद्वारे हवा आत शिरायला त्रास होतो. त्याचमुळे आपण अशावेळी तोंड उघडुन श्वासोच्छवास करत असतो. नाकावाटे हवा आत शिरत नसल्यामुळे त्या अन्नाचा सुटलेला दरवळ हवेतुन आपण आत घेऊ शकत नाही. त्यामुळे त्या गंधांच्या रेणुशी ज्यांचं संघटन जुळायचं त्या नाकातल्या ग्रहणकेंद्रांशी आवश्यक ती प्रक्रिया होतच नाही. त्यामुळे चव जोखण्यात असलेली आपली भुमिका नाक बजावु शकत नाही. साहजिकच चवीची ओळख पटवुन देण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो. त्यामुळे मग ते अन्न बेचव असल्याची भावना होते.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*CPU: Central Processing Unit*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतातील ५६ वा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात विकसित केला जाणार आहे ?२) महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोणत्या युतीला सर्वाधिक जागा मिळाल्या ?३) सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी - २० शतके झळकवणारा संघ कोणता ?४) नायजेरियाचा दुसरा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार 'ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर'ने कोणत्या भारतीय व्यक्तीला सन्मानित करण्यात आले ?५) VVPAT या यंत्राचा वापर कोणत्या साली प्रथम करण्यात आला ? *उत्तरे :-* १) छत्तीसगड २) महायुती, २३६ जागा ( भाजप - १३२ जागा ) ३) भारत ( २३ शतके ) ४) मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी ५) सन २०१३*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 विलास ढवळे, कार्यक्रमाधिकारी, जि. प. नांदेड👤 महेश मुधोळकर👤 नरसिंग एनद्गलवार, शिक्षक नेते, किनवट👤 शिवाजी पाटील कदम*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आम्ही तुझे असों एकचि त्या बोधें । नित्य परमानंदें वोसंडित ॥१॥ विठ्ठलचि घ्यावा विठ्ठचि गावा । विठ्ठचि पहावा सर्वाभूतीं ॥२॥ या परतें सुख न दिसे सर्वथा । कल्पकोटि येतां गर्भवास ॥३॥ नामा म्हणे चित्तीं विठठलांचें रूप । संकल्प विकल्प मावळले ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्यासोबत धोका तेव्हा होतो जेव्हा एखाद्या व्यक्तीवर आपण डोळे झाकून विश्वास करत असतो. ऐन त्याच वेळी जी कोणी व्यक्ती जे काही सत्य सांगत असते.त्यावेळी त्या व्यक्तीला सबूत मागितले जाते. अशा वेळी मात्र सांगणाऱ्या व्यक्तीला गप्प बसावे लागते.म्हणून आपल्या समोर जे काही दिसत असेल त्यावर डोळे झाकून विश्वास करू नये. किंवा आपले कान बंद करू नये. सत्य काय ते समजून घेतले पाहिजे.बरेचदा आपल्या एका चुकीमुळे आपली मेहनत,आपला स्वाभिमान,आपल्यात असलेली सत्यता यावर पडदा पडायला जास्त वेळ लागत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *अतिथी धर्म*शिवराज एका चोराचा पाठलाग करत होता. गावाच्या बोलबोळांतून पळणारा चोर अखेर शिवराजच्या नजरे आड झाला. तो चोर एका घरात घुसला होता. त्या घरातील माणसाने त्या गावच्या रिवाजाप्रमाणे अतिथी धर्म पाळला. त्या घरात घुसलेल्या चोराला आतल्या खोलीत लपविले. इतक्यात पाठलाग करणारा शिवराज तिथे आला. त्याने पळणाऱ्या व्यक्तीचे म्हणजे चोराचे वर्णन करून 'असा मनुष्य इथे आला होता का? त्याला आपण पाहिलेत का' असे विचारले. गावच्या रिवाजाप्रमाणे अतिथी धर्म पाळण्याकरिता तो कुटुंबप्रमुख खोटे बोलला व असा माणूस पाहिला नसल्याचे सांगितले. पण, त्या गृहस्थाच्या मुलाने मात्र शिवराजकडे पाहून आतल्या खोलीकडे खून केली. शिवराज काय ते समजला आणि त्याने आतल्या खोलीत घुसून त्या चोराला पकडले व तो त्या चोराला घेऊन गेला. त्या गृहस्थाला मुलाचा राग आला. कारण, त्याच्या मुलाने गावच्या रिवाजाप्रमाणे अतिथी धर्म पाळला नव्हता. त्या कथेपुरते त्या मुलाचे म्हणणे बरोबर होते.*तात्पर्य :* सत्याचा अर्थ, महत्व परिस्थितीनुसार बदलत असते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 22 नोव्हेंबर 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/15D4LkUCGK/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🧿 *_ या वर्षातील ३२७ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🧿 *_महत्त्वाच्या घटना:_ 🧿••••••••••••••••••••••••••••••••• *२०१३: भारताच्या विश्वनाथन आनंदला पराभूत करुन नॉर्वेचा २२ वर्षीय मॅग्नस कार्लसन हा सर्वात लहान वयाचा बुद्दीबळ विश्वविजेता बनला.**२००५: अँजेला मार्केल या जर्मनीच्या पहिल्या महिला चॅन्सेलर बनल्या.**१९९१: डहाणूजवळ ज्वालाग्राही रसायने वाहून नेणारा टँकर पेटून रॉकेल मिळण्याच्या आशेने आलेल्या ६१ आदिवासींचा होरपळून मृत्यू**१९६३: थुंबा या भारतीय अग्निबाण प्रक्षेपण केंद्राचे उद्घाटन**१९५६: ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न येथे १६ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**१९४८: मुंबई शहराला चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा**१९४३: लेबनॉन (फ्रान्सपासुन) स्वतंत्र झाला.**१८५८: कोलोराडो मधील डेनव्हर शहराची स्थापना* 🧿 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*🧿••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१: वैशाली किशोर भोयर -- कवयित्री**१९८०: पांडुरंग निवृत्तीराव पुठ्ठेवाड -- कवी, लेखक**१९७४: गीतांजली गणपतराव कमळकर -- बाल साहित्यावर लेखन करणाऱ्या कवयित्री, लेखिका**१९७३: अर्चना मोहनकर -- लेखिका, कवयित्री**१९७०: मार्वन अट्टापट्टू – श्रीलंकेचा क्रिकेट माजी कर्णधार**१९६८: संदिप वसंत देशपांडे -- कवी, लेखक**१९६७: बोरिस बेकर – ६ वेळा ग्रँड स्लॅम जिंकलेला जर्मन लॉन टेनिसपटू**१९५५: देवदत्त दामोदर साने -- कवी, लेखक, समीक्षक**१९५२: अजित बलवंत मुगदूम -- प्रसिद्ध लेखक, अनुवादक**१९४८: सरोज खान -- हिंदी चित्रपटसृष्टीतली नृत्य दिग्दर्शिका (मृत्यू: ३ जुलै २०२० )**१९४७: सुलभा अमृत चौधरी -- कवयित्री, लेखिका* *१९३९: मुलायमसिंग यादव – उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय संरक्षण मंत्री (मृत्यू: १० ऑक्टोबर २०२२ )**१९१९: त्र्यंबक विनायक सरदेशमुख -- मराठी कादंबरीकार,समीक्षक आणि कवी (मृत्यू: १२ डिसेंबर २००५ )**१९१७: वामन महादेव कुलकर्णी -- सौंदर्यशास्त्र अभ्यासक, समीक्षक (मृत्यू: २६ डिसेंबर २००९ )**१९१५: किशोर साहू – चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक(मृत्यू: २२ ऑगस्ट १९८० )**१९१३: डॉ. लक्ष्मीकांत झा – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ,कुशल प्रशासक, रिझर्व बँकेचे गव्हर्नर, जम्मू काश्मीरचे राज्यपाल व भारताचे अमेरिकेतील राजदूत (मृत्यू: १६ जानेवारी१९८८ )**१९०९: द. शं. तथा ’दादासाहेब’ पोतनीस – स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत,समाजसेवक आणि पत्रकार (मृत्यू: २७ ऑगस्ट १९९८ )**१९०३: दामोदर नरहर शिखरे --पत्रकार, चरित्रकार, कादंबरीकार(मृत्यू: ९ सप्टेंबर १९८० )**१८८५: हिराबाई पेडणेकर – पहिल्या स्त्री नाटककार, गायिका, संगीतकार (मृत्यू: १८ आक्टोबर १९५१ )**१८८०: केशव लक्ष्मण दफ्तरी – ज्योतिर्गणितज्ञ,संशोधक आणि बुद्धीप्रामाण्यवादी विचारवंत, वैदिक वाड:मय, वेदान्त तत्त्वज्ञान आणि होमिओपाथी हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते. अकरा उपनिषदांचे त्यांनी मराठीत भाषांतर केले.(मृत्यू: १९ फेब्रुवारी १९५६ )**१८७१: लक्ष्मण विनायक परळकर -- संत वाड्:मयाचे अभ्यासक, अनुवादक, चरित्रकार (मृत्यू: ७ मे १९५१ )**१८०८: थॉमस कूक – पर्यटन व्यवस्थापक (मृत्यू: १८ जुलै १८९२ )* 🧿 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🧿••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१९: नीळकंठ ऊर्फ निळूभाऊ खाडिलकर -- अग्रलेखांचा बादशहा" म्हणून ओळखले जाणारे,दैनिक नवाकाळ या वृत्तपत्राचे संपादक (जन्म: ६ एप्रिल १९३४ )**२०१२: पी. गोविंद पिल्लई – मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते (जन्म: २३ मे १९२६ )**२००८: रविंद्र सदाशिव भट – गीतकार (जन्म: १७ सप्टेंबर १९३९ )**२०००: डॉ. हरी जीवन तथा एच. जे. अर्णीकर – अणूरसायनशास्त्रज्ञ,प्राध्यापक (जन्म: ६ ऑक्टोबर १९१२ )**१९९०: ह. ह. अग्निहोत्री -- कोशकार, भाषाशास्त्राचे अभ्यासक,समीक्षक(जन्म: ३ जुलै १९०२ )**१९८०: मे वेस्ट – हॉलिवूडमधील अभिनेत्री, गायिका,संवादलेखिका व सौंदर्यवती (जन्म: १७ ऑगस्ट १८९३ )**१९७९: शीलवती श्रीधर केतकर -- अनुवादक (जन्म: १८८७ )**१९६३: अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या (जन्म: २९ मे १९१७ )**१९६३: अल्डस हक्सले – इंग्लिश लेखक (जन्म: २६ जुलै १८९४ )**१९५७: पार्श्वनाथ आळतेकर – नट,दिग्दर्शक व नाट्यशिक्षक (जन्म: १४ सप्टेंबर १८९७ )**१९२०: एकनाथ पांडुरंग रेंदाळकर – कवी व संपादक (जन्म: १ जुलै १८८७ )**१९०२: फ्रेडरिक क्रूप्प – जर्मन उद्योगपती (जन्म: १७ फेब्रुवारी १८५४ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*पाल्यांचा विकास साधताना .....!*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जारी, बारावी 11 फेब्रुवारी पासून तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी पासून होणार सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नांदेड परिक्षेत्रात एक महिन्यात तब्बल 16 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त, 9 हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई, मतमोजणीसाठीही मोठा पोलिस बंदोबस्त राहणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आप ची पहिली यादी जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिनी मुख्यमंत्री यांनी मुंबईतल्या हुतात्मा स्मारकास दिली भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *प्रसारभरती OTT मंचाचा गोव्याच्या मुख्यमंत्र्याच्या हस्ते प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *खासदार नारायण राणे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2025 सुरु होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! हार्दीक पांड्या वर पहिल्या मॅचसाठी लागला बॅन*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 शिलाखंड 📙 दगड गोट्यांकडे सहसा लक्ष द्यायला कोणाला वेळ नसतो. पण ज्यावेळी एखादा माणूस रमतगमत एखाद्या डोंगरावर फिरायला जातो, त्यावेळी त्याचे लक्ष आसपासच्या विस्तीर्ण शिलाखंडांकडे नक्कीच जाते. दगडांकडे एरवी दुर्लक्ष करणारा जेव्हा घरातील बांधणी व सजावटीचा विचार करू लागतो, तेव्हा तर प्रत्येक दगडाचा प्रकार त्याच्या हातातून व नजरेतून चौकसपणे जाऊ लागतो. पण तरीही हे शिलाखंड आहेत, याची पुरेशी जाणीव मनाला झालेली नसते.शनिवारवाडा व त्याची दगडी भिंत, राजस्थानातील किल्ले व त्यांच्या लाल दगडी भिंती, कोकणातील जांभ्या दगडाची देवळे, ताजमहालचा संगमरवरी दगड, शहाबादची फरशी ही सारी शिलाखंडांचीच विविध रूपे आहेत. इतकेच काय, 'गमभन' ज्यावर लिहिले जाते, ती पाटीसुद्धा एक प्रकारचा दगडच असतो.निसर्गामध्ये दगड मुख्यतः तीन प्रकारांत तयार होतात. ज्वालामुखीचा रस, तप्त लाव्हा, पृथ्वीअंतर्गत उष्णता यांतून निर्माण होणारे शिलाखंड हे अत्यंत कठीण शिळांचे स्वरूप असते. आपल्याला ठिकठिकाणी आढळणारे साधे तपकिरी, काळे, भुरकट दगड हे बेसाल्टचे असतात. शोभिवंत दगडांचे प्रकार म्हणजे ग्रॅनाइटचे. लाव्हा पृष्ठभागावर येऊन थंडा होतो, त्यातून बेसाल्टचा दगड निर्माण होतो. ग्रॅनाइट मात्र जमिनीतच घट्ट झालेला असतो. त्यामुळे क्वार्ट्झचे कणकण त्यात घट्ट होऊन त्याची नैसर्गिक शोभा वाढते. त्यांच्या रंगात अनेक प्रकार आढळतात.दुसऱ्या प्रकारात नदीच्या मुखाशी जमलेली गाळाची माती, वाळू, चुनखडी तिथेच किंवा समुद्राच्या तळाशी साचत जाते. वर्षानुवर्षे त्यावरचे वजन वाढत जाते व पाण्याचा अंश कमी होत जातो. क्वचित त्यावरील पाणीच दूरवर सरकते म्हणजे नदीचा प्रवाह बदलतो. कित्येक वर्षांनी हे कण एकत्रित घट्ट होतात व त्यांचेच दगड बनत जातात. बांधकामात खनिज दगड वापरतात, तो या प्रकारचा असतो. त्याला छिन्नीने तास पाडले जातात. या प्रकारच्या दगडाच्या खाणी ठिकठिकाणी आढळतात.तिसऱ्या प्रकारचे दगड हे साधारणपणे पृथ्वीअंतर्गत उष्णतेने रूपांतरित झालेले दगड असतात. पृथ्वीच्या पोटातील असंख्य खनिजे उष्णतेने विरघळतात. त्यातील जड भाग खाली राहतो. नको असलेला हलका भाग पोकळ बुडबुडय़ांच्या स्वरूपात वर राहतो. काही वेळा खनिजे एकमेकात मिसळली जातात. त्यातून विविध रंगांची मिश्रणेही तयार होत जातात. पण या निर्मितीतील मूळ महत्त्वाचा भाग असतो तो वाळू, चुनखडीचाच. संगमरवर, फरशी, कडप्पा या प्रकारांतील दगड थरांच्या स्वरूपात एखाद्या विवक्षित ठिकाणीच सापडतात. मूळ थर हळूहळू गाडले जाऊन त्यावर पृथ्वीच्या अंतर्गत उष्णतेचा परिणाम होऊन ते एकजीव होऊन ही निर्मिती होत गेलेली असते.दगड कोणताही असो, त्याला आकार द्या वा तसाच ठेवा, त्याला पॉलिश करून चकाकी आणा किंवा उन्हापावसाने अधिकच रापू द्या, पाषाणाचे एक वेगळेच सौंदर्य असते. अखंड शिलाखंडात कोरीव काम करून शिल्पाकृती उभा करण्याचा अट्टाहास व ध्यास घेऊन त्यासाठी आयुष्य वेचणारेही कलाकार आहेत.वेरुळची शिल्पे, श्रावणबेळगोळचा गोमटेश्वरांचा पुतळा ही साध्या काळ्या कुळकुळीत अखंड शिलाखंडांतूनच बनली आहेत; पण त्यांचे देखणेपण साऱ्या जगाला आकर्षून घेते.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*DP – Display Picture*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) डोमिनिका या देशाच्या कोणत्या पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित केले जाणार आहे ?२) डोमिनिका हा देश कोणत्या खंडात आहे ?३) डोमिनिका देशाची राजधानी कोणती ?४) डोमिनिका हा देश केव्हा स्वतंत्र झाला ?५) डोमिनिका या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ? *उत्तरे :-* १) डोमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर २) उत्तर अमेरिका ३) Roseau ( रोसेयू ) ४) ३ नोव्हेंबर १९७८ ५) डोमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 पांडुरंग पुठेवाड, संपादक, देगलूर👤 अरुण पवार, उपक्रमशील शिक्षक, उस्मानाबाद👤 विकास चव्हाण👤 श्रीकृष्ण निहाळ👤 साईप्रसाद यनगंदलवार, सेवानिवृत्त शिक्षक👤 मधू कांबळे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आम्हांपासीं काय मागसी तूं देवा । नाहीं भक्तिभाव भांडवल ॥१॥ भांडवल गांठीं देखोनि साचारा । सुदाम्याची फार पाठ घेसी ॥२॥ घेसी सोडुनियां पोहे मुठीभरा । हिडसावल्या करा नामा म्हणे ॥३॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणूस दिसायला जरी रंग आणि रूपाने वेगळा असेल तरी शेवटी तो, माणूसच असतो. म्हणून कोणत्याही माणसाचा अपमान करताना किंवा त्याची टिंगल, टवाळी करून आनंद घेताना स्वतःला धन्य समजू नये. कारण ज्या माणसासोबत आपण त्या प्रकारची वागणूक ठेवून जगत असतो. त्याच वागणुकीमुळे कुठेतरी आपलाही अपमान होत असतो. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*निर्णय क्षमता*अर्थशास्त्रात एक कथा सांगितली जाते. बुर्बेन्स नावाच्या गृहस्थांचे एक गाढव होते. त्यांचे एक भले मोठे शेत होते. दोन्ही बाजुंना भरपूर गवत असणारी एक पायवाट त्या शेतातून बाहेर पडत होती. सारे कसे सुखात चालले होते. एकदा हा बुर्बेन्स काही कामानिमित्त महिनाभर परगावी जाणार होता. त्याने विचार केला की, गाढवाच्या खाण्याची व्यवस्था करण्याची गरज काय ? गड्याने जरी त्याच्याकडे दुर्लक्ष केले तरी ते गाढव रस्त्याच्या दुतर्फा असणारे हिरवेगार गवत खाऊन सहज जगेल. बुर्बेन्स गावी गेला. महिनाभरानंतर परतला. पाहतो तर काय ? गाढव मरून पडलेले होते. असे कसे झाले ? याचा विचार त्याच्या मनात सुरू झाला. एवढे गवत असताना ते गाढव उपाशीपोटी का राहिला असावे ? त्याला कळेना. झाले होते असे, की गाढवाचा निश्चय होत नव्हता, की कोणत्या बाजूचे गवत प्रथम खावे ? या बाजूचे की त्या बाजूचे ? असे करता करता गाढवाने कुठलेच गवत खाल्ले नाही आणि त्याचा भूकबळी पडला! *तात्पर्य : निर्णय क्षमतेअभावी नुकसान ठरलेले असते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21 नोव्हेंबर 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~*शिक्षणाचा काय फायदा ?*Link - https://nasayeotikar.blogspot.com/2018/05/blog-post_67.html?m=1••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💢 *_जागतिक मच्छिमार दिन_* 💢•••••••••••••••••••••••••••••• 💢 *_भाषिक सुसंवाद दिन_* 💢•••••••••••••••••••••••••••••••••💢 *_जागतिक दूरदर्शन दिन_* 💢••••••••••••••••••••••••••••••••• 💢 *_ या वर्षातील ३२६ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 💢 *_महत्त्वाच्या घटना:_ 💢 ••••••••••••••••••••••••••••••••• *१९७२: दक्षिण कोरियाने नवीन संविधान अंगीकारले.**१९७१: बांगलादेश मुक्ती संग्राम – भारतीय सैन्य व बांगलादेश मुक्ती वाहिनी यांनी गरीबपूरच्या लढाईत पाकिस्तानी सैन्याचा दारुण पराभव केला.**१९६२: भारत चीन युद्ध – भारतीय प्रदेशावर आक्रमण करणार्या चीनने १९ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेली एकतर्फी युद्धबंदी अमलात आली.**१९४२: राजा नेने दिग्दर्शित ’दहा वाजता’ हा ’प्रभात’चा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.*💢 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 💢••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८७: ईशा करवडे – भारतीय बुद्धीबळपटू**१९८२: संतोष ग्यानिराम मेश्राम -- कवी**१९८२: आरती छाब्रिया -- भारतीय अभिनेत्री आणि माजी मॉडेल**१९८०: कार्तिक गुलाब हजारे -- लेखक**१९८०: चंदन विश्वासराव पवार-- कवी, लेखक**१९८०: प्रा. डॉ. राहुल अशोक पाटील -- लेखक (मृत्यू: २७ एप्रिल २०२१ )**१९६६: डॉ.राजेंद्र रंगराव राऊत -- महानुभाव साहित्याचे अभ्यासक, कथाकार**१९६६: विलास मंगलजी भोंगाडे -- लेखक* *१९५९: डॉ.राजन गवस -- कविता, कथा, कादंबरी, समीक्षा, ललितगद्य लेखन**१९५८: छाया कोरेगांवकर -- कवयित्री, लेखिका**१९५७: मंजुश्री गोखले -- मराठी लेखिका**१९५२: राजेंद्र जवाहरलाल दर्डा -- पत्रकार,माजी मंत्री म. रा.**१९५२: प्रा. शफाअत खान -- मराठी नाटककार**१९४७: गंगाधर गाडे -- आंबेडकरवादी राजकिय-सामाजिक कार्यकर्ते, माजी मंत्री (मृत्यू: ४ मे २०२४)**१९३८: हेलन अॅन रिचर्डसन खान (हेलन) -- भारतीय अभिनेत्री आणि नृत्यांगना**१९३५: प्रभाकर गणपतराव तल्लावार -- कवी, लेखक (मृत्यू: २४ ऑगस्ट २०२२ )**१९३४: आशा माथुर -- प्रसिद्ध अभिनेत्री**१९३२: दत्ता सामंत -- कामगार नेते (मृत्यू: १६ जानेवारी १९९७ )**१९३०: दिवाकर दत्तात्रेय भोसले -- ' चारुता सागर ' या नावाने कथालेखन तर धोंडू बुवा कीर्तनकार या नावाने कीर्तने केली (मृत्यू: २९ मे २०११ )**१९३०: मोहनदास श्रीपाद सुखटणकर -- मराठी नाट्य-चित्रपट अभिनेते (मृत्यू: ६ डिसेंबर २०२२ )**१९२९: दिगंबर विष्णू जोशी -- प्रसिद्ध मराठी साहित्यिक* *१९२९: डॉ. महादेव विनायक गोखले -- लेखक (मृत्यू: २८ ऑगस्ट २०१३ )**१९२७: शं. ना. नवरे – लेखक (मृत्यू: २५ सप्टेंबर २०१३ )**१९२६: प्रेम नाथ – हिन्दी चित्रपटात नायक व खलनायकाच्या भूमिका गाजवणारे अभिनेते (मृत्यू:ह३ नोव्हेंबर १९९२ )**१८९८: पांडुरंग विठ्ठलपंत वाळामे (रंगावधूत महाराज) -- दत्त संप्रदाय, स्वातंत्र्यसैनिक, संस्कृतज्ञ (मृत्यू: १९ नोव्हेंबर १९६८ )**१६९४: व्होल्टेअर – फ्रेन्च तत्त्वज्ञ व लेखक (मृत्यू: ३० मे १७७८ )* 💢 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 💢••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००२: गोविंददास मन्नुलाल श्रॉफ -- भारताचे स्वातंत्र्यसैनिक (जन्म: २४ जुलै १९११ )**१९९६: डॉ. मोहम्मद अब्दूस सलाम – भौतिकशास्त्रज्ञ,नोबेल पारितोषिक विजेते (१९७९) (जन्म: २९ जानेवारी १९२६ )**१९९२: स्वरूप किशन -- भारतीय कसोटी क्रिकेट पंच ( जन्म: १३ जुलै १९३० )**१९७०: सर चंद्रशेखर वेंकट रमण – नोबेल पारितोषिक (१९३०) विजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: ७ नोव्हेंबर १८८८ )**१९६३: चिं. वि. जोशी – विनोदी लेखक व पाली साहित्याचे संशोधक (जन्म: १९ जानेवारी १८९२ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शिक्षणाने माणसाच्या जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत मिळते. एखाद्या घटनेमागची कारणमीमांसा शिक्षणामुळे शोधू शकतो. मात्र आज समाजात पसरलेली अंधश्रद्धा पाहिली की या शिकलेल्या लोकांची कीव यायला होते. मनात प्रश्न पडतो की, या शिक्षणाचा काय फायदा ?..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत 288 जागांसाठी सायंकाळी पाच वाजेपर्यंत राज्यात 58.22 टक्के मतदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यात सर्वाधिक मतदान गडचिरोली जिल्ह्यात*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *बीडमध्ये मतदान केंद्रावर बीड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार असलेले बाळासाहेब शिंदे यांचा मृत्यू; कुटुंबीयांवर शोककळा, कार्यकर्त्यांना धक्का*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *देशातील कोट्यवधी सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी, नोव्हेंबर अखेर रेल्वेकडून 370 ट्रेनमध्ये 1000 नवीन जनरल डबे जोडले जाणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गयाना आणि बार्बाडोस या दोन्ही देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्याची केली घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सातारा येथे मतदान केंद्रावर मतदान करताना एका मतदारांचा हृदयविकार झटक्याने मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दिल्लीत वायू प्रदूषणामुळे 50 टक्के कर्मचारी वर्क फ्रॉम करणार, पर्यावरण मंत्री गोपाल रॉय यांचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📒 नखं कापताना वेदना का होत नाहीत? 📒सुई-दोरा घेऊन आपण सदऱ्याचं किंवा ब्लाऊजचं तुटलेलं बटण शिवत असतो. साधी सरळ सरावातली प्रक्रिया. त्यामुळे काही वेळा आपण आपली नजर त्या बटणावरून हलवत दुसरीकडे कुठंतरी पाहतो. हात मात्र शिवण्याची ती प्रक्रिया इमानेइतबारे पार पाडत असतात; पण आपलं लक्ष आता दुसरीकडे वेधलं गेल्यानं सुई कापडात शिरण्याऐवजी आपल्या बोटात शिरू पाहते. ती टोचताक्षणीच आपण ऊऽई करत किंचाळतो. कारण तेवढ्याशा त्या टोचण्यानंही आपल्याला वेदना होतात. कळ येते. मग अख्खं नख कापताना किंवा डोक्यावरचे केस कापून घेताना आपल्याला वेदना का होत नाहीत? एवढंच काय, पण डोक्याचं साफ मुंडण करून चमनगोटा करून घेतानाही आपल्याला वेदना होत नाहीत. दाढी करतानाही ती गुळगुळीत व्हावी म्हणून आपण गालावरचे केस जवळजवळ मुळापासून छाटून टाकत असतो आणि तरीही वेदना होत नाहीत. असं का, हा प्रश्न त्या टोचणाऱ्या सुईसारखा टोचत राहतो ना त्याचं उत्तर मिळवण्याआधी आपल्याला वेदना का होतात हे पाहिलं पाहिजे. शरीरातल्या जिवंत पेशींशी मज्जातंतू जोडलेले असतात. त्या पेशींची मोडतोड झाली, त्यांना इजा झाली की या मज्जातंतूंची टोकं चाळवली जातात. त्यांच्यामधून विद्युत्रासायनिक संदेश मेंदूपर्यंत पोहोचतो आणि वेदनेची जाणीव आपल्याला होते. जर हे मज्जातंतू चाळवलेच गेले नाहीत तर वेदना होणारच नाही. नखं आणि केस या मृतपेशी असतात. त्यामुळे त्यांच्याशी मज्जातंतू जोडलेले नसतात. साहजिकच नखं कापताना किंवा केस कापून घेताना वेदना जाणवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही; परंतु केसांची वाढ ज्या फॉलिकलमधून होते त्या जिवंत पेशी असतात. केस कापण्याऐवजी ते उपटले तर या पेशींना धक्का पोहोचतो. त्यांच्याशी जोडलेल्या मज्जातंतूंना त्याचा प्रभाव जाणवतो व आपल्याला वेदना होतात. नखांच्या बाबतीतही हीच परिस्थिती असते. नखं जर मृत पेशींची बनलेली असतात तर मग त्यांची वाढ कशी होते? हा प्रश्न आपल्याला पडायला हवा. प्रत्यक्षात नखांच्या मुळाशी असलेल्या पेशींची वाढ होते व नखांच्या मुळाशी एक नवी प्रत तयार होते. ती वरच्या मृत पेशींना वरच्या दिशेनं ढकलते. नखं वाढतात. कालांतरानं या नव्या प्रतीतल्या पेशीही मृत होतात आणि त्यांच्या मुळाशी एक नवी प्रत तयार होते. त्यामुळे नखांची वाढ होत असली किंवा केसांचीही, तरी त्या मृत पेशी असल्यानं त्यांची कापाकाप होताना अजिबात वेदना होत नाहीत. दाढीच्या बाबतीतही ही स्थिती असते. कितीही गुळगुळीत दाढी केली तरी ती करताना त्या केसांच्या फॉलिकलना धक्का पोहोचत नाही; पण इलेक्ट्रीक शेव्हरनं दाढी करताना काही वेळा त्यात अडकलेला दाढीचा केस ओढला जातो, उपटला जातो आणि वेदना होतात. गुळगुळीत दाढी करणारी ब्लेड जरा जोरानं ओढली जाऊन खालच्या कातडीला कापते. वाहणाऱ्या रक्ताबरोबर वेदनांचा प्रवाहही सुरू होतो.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*FYI – For Your Information*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस !*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणत्या फळाची बी फळाच्या बाहेर असते ?२) प्रत्येक गावातील जमीन धारकांच्या नोंदी कोण ठेवतो ?३) शिर्डी हे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे ?४) 'रात्र' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनाम्याचा मसुदा कोणी तयार केला ? *उत्तरे :-* १) काजू २) तलाठी ३) राहाता, अहमदनगर ४) रजनी, यामिनी, निशा, रात ५) थॉमस जेफरसन*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 प्रशांत शास्त्री, सेवानिवृत्त बँक अधिकारी, नांदेड👤 इलियास बावाणी, पत्रकार, माहूर👤 आबासाहेब विश्वनाथ पाटील, धर्माबाद👤 माधव हर्ष👤 विठ्ठल शिंदे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आम्हां सांपड्लें वर्म । करुं भागवतधर्म ॥१॥ अवतार हा भेटला । बोलूं चालूं हा विसरला ॥२॥ अरे हा भावाचाअ लंपट । सांडुनि आलासे बैकुंठ ॥३॥ संतसंगतीं साधावा । धरूनि ह्रदयीं बांधावा ॥४॥ नामा म्हणे केउता जाय । आमुचा गळा त्याचे पाय ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणसं वाईट नसतात. तर कधी, कधी परिस्थिती त्यांना तसं वागायला भाग पाडत असते.उदा.सत्य बोलत असेल तेव्हा तो इतरांच्या दृष्टीने वाईट होत असतो.स्वतः पेक्षा दुसऱ्यांचे विचार करून त्यासाठी काम करत असतो तेव्हा सुद्धा तो वाईट दिसत असतो. तर कधीकाळी परिस्थितीमुळे वाईट दिसत असतो. पण, खऱ्या अर्थाने त्याचे मन कसे असते व परिस्थिती कशी असते फक्त त्याच माणसाला माहीत असते.म्हणून एखाद्या माणसाला न वाचता कोणाच्या सांगण्यावरून त्याला वाईट ठरवू नये. तेथेच वरवर सज्जन दिसणारे माणसं तेवढे चांगले असतीलच असेही नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📗 *गाणारा पोपट*📗*एकदा एका फकिराने बादशाहाला एक पोपट भेट दिला. पोपट चांगल्या गाणाऱ्या जातीचा होता. बादशाहाने पोपटाकडून पुराणातील काही महत्वाचा भाग, उर्दू कविता आणि काही सुंदर वाक्य पाठ करवून घेतली होती. पोपटाच्या सेवेसाठी खास एका सेवकाची नेमणूक केली होती. पोपट सोनेरी पिंजऱ्यातल्या झोक्यावर झोके घेत असलेला पाहून बादशाहाला खूप आनंद होई. त्याच्या कडून उर्दू कविता ऐकण्यात बादशाहाला काही वेगळीच मजा वाटे. पोपट बादशाहाचा अतिशय आवडता होता. पोपटाला काही दुखले खुपले किंवा त्याच्या सेवेत काही कमी पडलेले बादशाहाला मुळीच आवडत नसे. लगेच तो सेवकाला दम भरीत असे.* *एका दिवसाची गोष्ट सेवक बादशहाला पोपटाची प्रकृती बरी नसल्या बद्दल सांगू लागला. बोलणे पूर्ण होण्याच्या आत त्याच्या मुस्काटीत भडकावली आणि तो म्हणाला " हे बघ पोपटाची देखभाल करण्यासाठी मी तुला नेमले आहे. पोपटाला काही होता काम नये पोपट मेला असे सांगण्यासाठी आला तर मी तुझे डोके उडवून टाकेन ...समजलं ! *सेवक घाबरला. तो पोपटाची चांगली काळजी घेऊ लागला परंतु पोपटाला काही न काही होत असे. सेवक मात्र घाबरून जाई. असेच दिवस जात होते एक दिवस पोपट आजारी पडला आणि त्याच्या घशातून आवाज निघेना. त्याने आपले पंख शरीरभोवती लपेटून घेतले त्याची चोच वाकडी झाली. सेवक त्याला औषधे देत होता. तरी पण पोपट बरा होत नव्हता बादशाहाही आपल्या काही महत्वाच्या कामात मग्न होता. त्याचे पोपटाकडे लक्ष नव्हते. बघता बघता पोपट पिंजऱ्यात उताणा पडला. त्याने आपले पंख ताणून पसरले. कच उघडली गेली. पोपट मेला असल्याचे सेवकाच्या लक्षात आले. परंतु पण राजाला हे सांगणे शक्यच नव्हते. सेवक घाबरला त्याने बिरबलाची भेट घेऊन सर्व हकिकत सांगितली. बिरबलाने सेवकाला धीर दिला. त्याने स्वत: पोपटाची परिस्थिती पाहिली.* *सेवकाच्या पाठीवर थोपटून तो म्हणाला ठीक आहे. मी बघतो सगळ तू घाबरू नकोस बिरबल बादशहाकडे आला आणि म्हणाला सरकार आपला गुणी पोपट अलीकडे गुणी झाला आहे. पहावा तेव्हा परमेश्वराचे ध्यान करत असतो. अहो आज तर केव्हापासून तो परमेश्वरच्या चिंतनात मग्न आहे चला आपण तरी एकदा पाहावं. बादशहा बिरबला समोर पोपटाच्या पिंजऱ्याजवळ आला पाहतो तर काय पोपट मरून पडलेला तो बिरबलाकडे वळून म्हणाला बिरबल तू तरी किती मूर्ख आहे अरे हा पोपट तर मरून पडला आहे. नाही सरकार पोपट मेलेला नाही परमेश्वरच्या चिंतन करता करता त्याचा आत्मा परमेश्वराकडे कायमचा निघून गेला. सेवकाला त्याला झाडाच्या बुंध्याशी पुरून गाढायला सांगा म्हणजे त्याच्या आत्मेला शांती भेटेल. बादशहाला बिरबलाची युक्ती लक्षात आली पोपट मेला असं सांगायला आलास तर तुझं डोक उडवीन असं सेवकाजवळ बोलल्याच त्याला आठवलं बिरबलान युक्तीने सेवकाचे प्राण वाचविले. बादशहा गालातल्या गालात हसला आणि बिरबल बरोबर निघून गेला.*सौजन्य :- https://dnyaneshwarkapti.blogspot.com/p/blog-page_29.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18 नोव्हेंबर 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2024/11/election-voting.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🪩 *_ या वर्षातील ३२३ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••• 🪩 *_महत्त्वाच्या घटना:_* 🪩 •••••••••••••••••••••••••••••••••*१९९३: दक्षिण अफ्रिकेत २१ राजकीय पक्षांनी नवीन संविधानाला मान्यता दिली.**१९९२: ललित मोहन शर्मा यांनी भारताचे २४ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९६२: डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे उद्घाटन झाले.**१९५५: भाक्रा-नांगल धरणाच्या बांधकामास सुरूवात झाली.**१९३३: ’प्रभात’चा पहिलाच रंगीत चित्रपट ’सैरंध्री’ प्रदर्शित झाला. मात्र चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याने ’प्रभात’ने पुन्हा रंगीत चित्रपट काढला नाही.**१९२८: वॉल्ट डिस्ने यांच्या ’मिकीमाऊस’ या प्रसिद्ध कार्टूनचा ’स्टीमबोट विली’ या चित्रपटाद्वारे जन्म**१९१८: लाटव्हियाने आपण (रशियापासुन) स्वतंत्र असल्याचे घोषित केले.**१९०५: लॉर्ड कर्झन यांनी राजीनामा दिल्यामुळे लॉर्ड मिंटो यांनी भारताचे १७ वे व्हॉइसरॉय व गव्हर्नर जनरल म्हणुन सूत्रे हाती घेतली.**१८८२: अण्णासाहेब किर्लोस्करांचे ’संगीत सौभद्र’ हे नाटक रंगभूमीवर आले.**१८०९: फ्रान्सच्या आरमाराने बंगालच्या उपसागरात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या आरमाराचा पराभव केला.* 🪩 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🪩 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९५: रोहित राऊत -- मराठी गायक**१९८४: डायना मरिअम कुरियन (नयनतारा) -- भारतीय अभिनेत्री**१९८२: समाधान रावसाहेब दहिवाळ -- कवी, लेखक**१९८२: नेहा भसीन -- भारतीय गायिका आणि गीतकार**१९६४: स्मिता धनराज बांगडे -- कवयित्री**१९६०: प्रतिमा प्रदीप दुरुगकर -- लेखिका* *१९५४: रंजन गोगोई -- माजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश* *१९५३: रवींद्र गजानन आवटी -- प्रसिद्ध लेखक तथा गीतकार**१९५३: विनोद दिनकर देशमुख -- प्रसिद्ध लेखक, पत्रकार* *१९५३: वर्षा विजय देशपांडे -- कवयित्री, लेखिका**१९४५: महिंदा राजपक्षे – श्रीलंकेचे ६ वे राष्ट्रपती, सैन्यप्रमुख**१९४१: आनंद अंतरकर -- मराठी लेखक आणि आणि संपादक (मृत्यू: २८ ऑगस्ट २०२१ )**१९४०: कृष्णाजी लक्ष्मण देशपांडे -- बालकथाकार* *१९३८: कुमुदिनी मोतिराम पावडे -- आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या (मृत्यू: ३१ मे २०२३ )**१९३७: अरविंद मुळगांवकर -- महाराष्ट्रातील ख्यातनाम तबलावादक व तबला क्षेत्रातील चिकित्सक व अभ्यासक (मृत्यू: १७ फेब्रुवारी २०१८ )**१९३४: तुळशीदास बोरकर -- भारतीय संगीतकार आणि हार्मोनियम वादक ( मृत्यू: २९ सप्टेंबर २०१८ )**१९३१: रामचंद्र महादेव बापट तथा राम बापट -- लोकाभिमुख विचारवंत आणि राज्यशास्त्राचे अभ्यासक (मृत्यू:२ जुलै २०१२ )**१९३१: श्रीकांत वर्मा – हिन्दी कवी,पत्रकार व समीक्षक,राज्यसभा सदस्य (मृत्यू: २५ मे १९८६ )**१९२५: मधुकर गोपाळ पाठक -- संवादलेखक (मृत्यु: २० मे २०११ )**१९२०: विमला आत्माराम जोशी -- लेखिका**१९१९: दत्तात्रेय सखाराम हर्षे -- लेखक**१९१६: मोरेश्वर राघव उपाख्य मोरुभाऊ मुंजे -- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य प्रचारक (मृत्यू: ८ डिसेंबर २००७ )* *१९१०: बटुकेश्वर दत्त – क्रांतिकारक (मृत्यू: २० जुलै १९६५ )**१९०१: व्ही. शांताराम – चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते (मृत्यू: ३० ऑक्टोबर १९९० )**१८९९: विठ्ठल वामन हडप -- ऐतिहासिक कादंबरीकार,नाटककार (मृत्यु: १२ मार्च १९६० )**१८८४: शंकर पुरुषोत्तम आघारकर -- भारतीय रूपशास्त्रज्ञ (मृत्यू: १ सप्टेंबर १९६० )* 🪩 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🪩 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: मृदुला सिन्हा -- भारतीय लेखिका आणि गोव्याच्या पहिल्या महिला राज्यपाल (जन्म: २७ नोव्हेंबर १९४२ )**२०१६: डॉ. डेंटन कुली -- हृदयरोपन शस्त्रक्रियाचे पाया घालणारे (जन्म: २२ ऑगस्ट १९२० )**२००६: ’काव्यतीर्थ’ हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु – मराठी कथाकार व कवी (जन्म: ६ एप्रिल १९१७ )**२००१: नारायण देवराव पांढरीपांडे तथा ‘नाडेप काका‘ – गांधीवादी विचारवंत व ’नाडेप’ कंपोस्ट खताचे जनक.(जन्म: १९१९ )**१९९९: डॉ. सुमन वैद्य -- इतिहास विषयाचे संशोधक व लेखिका (जन्म: ६ ऑगस्ट १९२४ )**१९९८: रामकृष्ण नारायण तथा बन्याबापू गोडबोले – सातार्याच्या सामाजिक, सांस्कृतिक,राजकीय,धार्मिक,आर्थिक, शैक्षणिक,वैद्यकीय अशा सर्वच क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे समाजसेवक* *१९९६: कॉम्रेड श्रीनिवास गणेश सरदेसाई – समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक, भारतातील कम्युनिस्ट चळवळीचे आरंभापासूनचे नेते (जन्म: १९०७ )* *१९९३: पु. रा. भिडे तथा स्वामी विज्ञानानंद – लोणावळा येथील मन:शक्ती प्रयोग केंद्राचे संस्थापक (जन्म: १९१८)* *१९७१: चांगदेव भवानराव खैरमोडे -- मराठी चरित्रकार, लेखक,अनुवादक आणि कवी (जन्म: १५ जुलै १९०४ )**१९६२: नील्स बोहर – अणूचे अंतरंग स्पष्ट करणार्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे डॅनिश पदार्थवैज्ञानिक (जन्म: ७ आक्टोबर १८८५ )**१७७२: माधवराव बल्लाळ भट ऊर्फ ’थोरले’ माधवराव पेशवे – मराठा साम्राज्यातील ४ था पेशवा (जन्म: १६ फेब्रुवारी १७४५ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सार्वत्रिक निवडणूक आणि मतदान*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपाचे नेते अनिल झा आप मध्ये सामील*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *दिवाळी सुट्यानंतर आजपासून द्वितीय सत्रातील शाळांना प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बदलापूरहुन 25 पर्यटकांना घेऊन तोरणा किल्याकडे निघालेली बस 100 फुट खोल दरीत कोसळली*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नागपुरात प्रियंका गांधी यांच्या रोड शो मध्ये काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आमने-सामने*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *निवडणूक प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, 20 नोव्हेंबरला होणार मतदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पर्थच्या कसोटीत दुखापतीमुळे शुभमन गिल बाहेर तर के एल राहुल ला संधी मिळण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *फुप्फुसे* 📙 ****************डावे व उजवे अशी दोन फुप्फुसे छातीच्या पोकळीत असतात. हृदयापूरती जागा सोडून अन्य सारी छातीची पोकळी त्यांनीच व्यापलेली असते. प्रत्येक फुप्फुसावर दुपदरी पातळ पिशवीसारखे आवरण असते. त्यालाच 'प्लुरा' असे म्हटले जाते. या आवरणाच्या आत दोन पदरांमध्ये बुळबुळीत पदार्थ असतो. त्यामुळे फुफ्फुसे आकुंचन प्रसरण पावताना घर्षण होत नाही. मात्र या दोन पदरांमध्ये निर्वात पोकळी अस्तित्वात असते. वातावरणातील हवा आपण फुप्फुसांत ओढून घेतो, त्याला त्याची मदत होते.नाकाने आत घेतलेली हवा प्रथम श्वसननलिकेद्वारे व त्यानंतर तिच्या झालेल्या असंख्य शाखांतून फुप्फुसांत पोहोचते. फुप्फुसांचा रंग भुरा करडा असतो. असंख्य वायूकोशांनी फुप्फुस बनते. प्रत्येक वायूकोशाला वेढणारी एक रक्तवाहिनी असते. प्रत्येक वायूकोशापर्यंत श्वासनलिकेची एक अत्यंत सूक्ष्म शाखा पोहोचलेली असते. वायूकोशाभोवती केशवाहिन्यांचे जाळे असते. त्यातील रक्तातील लाल पेशी प्राणवायू शोषून घेतात. कार्बन डायॉक्साइड किंवा कर्बद्विप्राणिल वायू व पाण्याची वाफ वायुकोशात सोडले जातात व उच्छवासाद्वारे ते बाहेर टाकले जातात. आपल्या श्वासातून वाफ बाहेर पडताना जाणवते, त्याचे हेच मूळ होय.वायूकोशांमधील स्थितीस्थापक तंतूंमुळे ते श्वास आत घेताना सहज फुगतात व पूर्वस्थितीला येताना उच्छ्वास बाहेर टाकतात. यामध्ये होणाऱ्या क्रियेलाच आपण प्राणवायू प्रदान असे म्हणतो. श्वास घेतला, तर सुमारे ५०० घन सेंटीमीटर हवा आपण आत ओढतो. त्यातील फक्त ३५० घन सेंटीमीटर हवाच वायूकोशात पोहोचते. अन्य हवा घसा, श्वासनलिका येथेच राहते. श्वास सोडल्यावरसुद्धा ३०० घनसेंटीमीटर हवा फुप्फुसांतच शिल्लक असते. दीर्घ श्वसन, प्राणायाम, भस्त्रिका यांच्या अभ्यासात या साचून असलेल्या हवेला आपण मुद्दाम बाहेर फेकतो. तसेच फुप्फुसांची स्थितीस्थापक क्षमताही या क्रियेत वाढते. म्हणून श्वसनाच्या आजारात त्यांचा उपयोग होऊ शकतो. निरोगी माणसाची श्वसनाची क्षमता वाढते. पाणबुडे, ऍथलेट, खेळाडू यांनी ही क्षमता कमावलेली असते.फुप्फुसांमध्ये जंतूंचा शिरकाव झाल्यास रुग्ण गंभीररित्या आजारी होतो. कारण फुप्फुस व फुप्फुसावरण दाहामध्ये शरीराचा प्राणवायू पुरवठा खंडित होऊ लागतो. अशा वेळी कृत्रिमरीत्या प्राणवायू देऊन किंवा तीव्र आजारात कृत्रिम श्वासोच्छ्वासाच्या यंत्राचा (व्हेंटिलेटर) वापर करून रुग्णाला मदत करणे आवश्यक ठरते.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*CID – Crime Investigation Department*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकाग्र चित्ताने केलेल्या कोणत्याही कार्याचे फलित म्हणजे यश होय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २०२४ चा 'बुकर पुरस्कार' कोणाला जाहीर झाला आहे ?२) ब्रिटिश लेखिका सामंथा हार्वे यांच्या कोणत्या कादंबरीला २०२४ चा बुकर पुरस्कार जाहीर झाला आहे ?३) VVPAT चा फुल फार्म काय आहे ?४) 'यान' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) थादाऊ जमात कोणत्या राज्यातील आहे ? *उत्तरे :-* १) सामंथा हार्वे, ब्रिटिश लेखिका २) ऑर्बिटल ( अंतराळातील आयुष्य सांगणारी ) ३) व्होटर व्हेरीफायबल पेपर ऑडिट ट्रेल ४) अंतराळवाहन ५) मणिपूर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अरविंद काळे, सहशिक्षक, पीपल्स हायस्कुल, नांदेड👤 अभिषेक बोधने👤 अनुराधा टल्लू👤 पिराजी भूमन्ना*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आतां होणार तें होवो पंढरीनाथा । न सोडी सर्वथा चरण तुझे ॥१॥ ह्रदयीं तुझें ध्यान वाचे जपें नाम । हाचि नित्यनेम सर्व माझा ॥२॥ आम्हीं तुझी देवा धरियेली कांस । न करी उदास पांडुरंगा ॥३॥ नामा म्हणे देवा भक्तजनवत्सला । क्षण जीवावेगळा न करी मज ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या विषयी कोणी एकाकी खोटे सांगत नाही. कारण त्या विषयी त्याला चांगल्याप्रकारे अनुभव आलेला असतो. म्हणून ते, दुसऱ्यांदा चुकीचे घडू नये यासाठी सावध करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून सांगणाऱ्या व्यक्तीला कोणाच्या सांगण्यावरून नको त्या शब्दात बोलून त्याचा अवमान करू नये.बरेचदा सत्य न ऐकून घेतल्याने आपलेच नुकसान होण्याची शक्यता असते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *जाणीव*बादशहाच्या गुलामांनी कधीच समुद्राची यात्रा केली नव्हती. त्यामुळे त्यांना कधीच समुद्र कसा असतो? त्याची खोली काय असते? याची माहिती नव्हती. बादशहा समुद्र यात्रा करत असे, मात्र गुलामांना कधीच समुद्रावर नेत नसे. एकदा बादशाहाने गुलामांना समुद्रयात्रा घडविण्याचे ठरविले, त्याप्रमाणे एका गुलामाला त्याने जहाजावर बरोबर घेतले, चहूदिशेला पाणीच पाणी बघून गुलाम भयभीत झाला आणि मोठमोठ्याने ओरडू लागला. जहाजावरील लोकांनी त्याला समजावून सांगितले कि घाबरण्याची काहीच गरज नाही. आपण जहाजावर सुरक्षित आहोत. परंतु त्याचा विश्वास बसेना. तो सतत ओरडत राहिला. हे पाहून बादशाहाने नाराज होऊन जहाजाच्या खलाश्यांना सांगितले, कि काहीही करा पण या गुलामाचे ओरडणे बंद करा. खलाश्यांनी पण त्याचे ओरडणे बंद व्हावे म्हणून प्रयत्न केले, समजावून सांगितले, वेगवेगळी आमिषे दाखविली, पण हा गुलाम काही गप्प बसेना. तेंव्हा जहाजावरील एक वृद्ध खलाशी बादशाहाकडे गेला आणि म्हणाला,"हुजूर! मला परवानगी द्या, मी याला गप्प बसवतो." बादशाहाने परवानगी दिली. त्या वृद्धाच्या सांगण्यावरून त्या गुलामाचे दोन्ही हात व पाय बांधण्यात आले व पायाला दोरी बांधून त्याला जहाजावरून पाण्यात लटकाविण्यात आले. काही क्षण पाण्यात घालायचे आणि दोरीने पुन्हा जहाजावर ओढून घ्यायचे असा प्रकार केला. ५-६ वेळेला गटांगळ्या खावून झाल्यावर त्याला जहाजावर घेतले, वर आल्यावर त्याला मुक्त केले पण तो गुलाम एका कोपऱ्यात जाऊन गप्प बसला. हे पाहून सर्वच चकित झाले. बादशाहाने वृद्ध खलाश्याला विचारले कि आता हा गप्प कसा झाला? खलाशी उत्तरला,"हुजूर! आधी तो समुद्रात बुडण्याचे दुःख काय असते हे जाणून घेत नसता नुसता ओरडत होता. पण त्याला आता बुडणे म्हणजे काय असते या प्रकाराची जाणीव झाली आहे म्हणून तो गप्प आहे.त्याच्या शांततेचे कारण त्याला झालेली दुःखाची जाणीव. त्या मानाने इथे त्याला सुख मिळत आहे ते तो अनुभवत आहे." *तात्पर्य-दुःखानंतर येणाऱ्या सुखाला किंमत असते. दुःख मिळाले नाही, सहन केले नाही तर सुख काय असते हे सांगून सुद्धा समजत नाही.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Posts (Atom)