✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 01/08/2022 वार - सोमवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇. *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती* *लोकमान्य टिळक पुण्यतिथी* 💥 ठळक घडामोडी :-■ १९९४- भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी विमा योजना लागू झाली.जगातील अशा तऱ्हेची पहिली योजना.■ २००१-सोलापूर विद्यापीठाची स्थापना.■१९९६ - मायकेल जॉन्सनने २०० मीटर अंतर १९.३२ सेकंदात धावून विश्वविक्रम रचला.💥 *जन्म* :-◆ १८९९-कमला नेहरू, जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी.◆ १९१० - मोहम्मद निसार, भारतीय क्रिकेट खेळाडू.१९२० - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे◆ १९५२ - यजुर्वेन्द्रसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू.◆ १९५५ - अरूणलाल, भारतीय क्रिकेट खेळाडू.💥 *मृत्यू* :-● १९२० - बाळ गंगाधर टिळक, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक, वृत्तपत्र संपादक.●२००८-हर किशन सिंग सुरजित, मार्क्सवादी नेते.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 12 लाख टन अतिरिक्त साखर निर्यातीला मंजुरीची शक्यता, नुकत्याच झालेल्या मंत्रिगटाच्या बैठकीत साखर निर्यातीचा अतिरिक्त कोटा मंजूर करण्यात आला. यासंदर्भात लवकरच अधिसूचना जारी करण्यात येणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *भारतात ऑक्टोबरपासून 5G सेवा सुरु होणार, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *आयसिस कनेक्शनवरुन देशभरात एनआयएची छापेमारी, कोल्हापूरच्या हुपरीमधून एकजण ताब्यात*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना अखेर ईडीकडून अटक करण्यात आली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *आश्रमशाळांमध्ये अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनाही आता ‘जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण विचार’ या संकल्पनेंतर्गत प्रशिक्षण देण्यात येत आहे. विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बर्मिंगहम : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये आज भारत आणि पाकिस्तान यांच्या महिला संघाचा क्रिकेट सामना पार पडला. भारतीय संघानं या सामन्यात पाकिस्तानला पराभूत केलं आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून वेटलिफ्टर संकेत सरगरला तीस लाखांचे पारितोषिक जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••श्रावण मासारंभ निमित्ताने प्रासंगिक लेख *श्रावण पाळा ; आजार टाळा*हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अनन्यसाधारण असे महत्व आहे. या महिन्यात बहुतांश लोकं देव देव करण्याकडे वळतात. मांसाहार खाणारे ह्या महिन्यात वर्ज्य करतात. काही लोकं या महिन्यात केस कापणे देखील टाळतात. पूर्ण महिनाभर हिंदू धर्मातील मंडळी कोणतेही अधर्म होऊ नये याची काळजी घेतात. यामागे धार्मिकसोबत काही वैज्ञानिक कारणे आहेत. जसे की या महिन्यात मांसाहार वर्ज्य करणे........https://nasayeotikar.blogspot.com/2019/07/blog-post_31.htmlवाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷🍃 *काव्यांगण - रोज एक कविता* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••श्रावण हिरव्या हिरव्या गवततृणाचेलेऊन अलंकार मखमालीचेसजली ही अवघी वसुंधरा आला नाचत श्रावण हसरा...विविध सणांची घेऊन बरसातअंगणी बहरला हा पारिजातमादक,मोहक गंधाचा फुलोराआला नाचत श्रावण हसरा...हर्ष भरूनी मनी मानसीहितगूज चाले फुलापानांशीरिमझीम रिमझीम वर्षाधाराआला नाचत श्रावण हसरा...हिरवी हिरवी सजली सृष्टी सौंदर्याची देऊनी दृष्टी हर्षोल्हास भरूनी साराआला नाचत श्रावण हसरा...सौ. रूपाली गोजवडकरसहशिक्षिका जि.पकें.प्रा.शाळा वाजेगाव नांदेड.8007874965•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" एक मिनिट उशिरा येण्यापेक्षा तीन तास लवकर येणे चांगले.”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेस नुकताच कोणता आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे ?२) महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कोणत्या समाजातील आहेत ?३) २०४८ मध्ये कोणत्या देशाने ऑलिंपिक खेळ आयोजित करण्याची घोषणा केली आहे ?४) पाकिस्तान येथे नुकत्याच पहिल्या हिंदू महिला DSP कोण झाल्या आहेत ?५) तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?*उत्तरे :-* १) आंतरराष्ट्रीय IGEN IVD स्वयंसेवक पुरस्कार - २०२१ २) संथाल आदिवासी समाज ३) भारत ४) मनीषा रूपेता ५) एम. के. स्टॅलिन *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● सौ.कुसुम कवठाळे मॅडम कै.गं.पो.सब्बनवार मा.विद्यालय.● गोविंद पाटील जाधव रोशनगावकर● एकनाथ डुमणे, मुखेड● मंगेश हनवत्ते, नरसी● साईनाथ पाटील मोकलीकर● दिलीप साळुंके● नागेश टिपरे● विश्वनाथ चन्ने, कळमनुरी● बालाजी गायकवाड● शिवसांब गणाचार्य, नांदेड● यादव एकाले● पवनकुमार भाले, धर्माबाद● आनंद पेंडकर, माहूर● बंडू पाटील मोरे● संजीवकुमार हामंद, करखेली● मुखीत अहमद, नांदेड● सतीश दरबस्तेवार, कुंडलवाडी● शिनू दर्शनवाड, येवती*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*'दिवा' हा अशी एक शक्ती आहे ज्याशिवाय जग उजळून निघूच शकत नाही आणि उजाडल्याशिवाय वास्तवाचा प्रकाश पडत नाही. 'दिवा' हा वास्तवाची लख्ख जाणीव करून देणारा दृष्टीदाता, घनघोर अंधारातला विश्वासाचा सोबती असतो. तो प्रकाश देऊन सत्य उजागर करीत असतो. उजेडालाच एकमेव सत्याचा चेहरा लाभलेला आहे म्हणून प्रत्येकजण त्याचा याचक बनून आराधना करतो. सर्वच चांगल्या कार्याचा आरंभ करताना दिवे लावले जातात. ही गोष्ट हेच प्रतीत करते की, अजूनही आमच्या जगण्यातला अंधार पूर्णत्वाने नाहीसा झालेला नाहीये.., पण तो आम्हाला निश्चितपणे दूर करायचा आहे, या निश्चयाचे हे प्रतीक.**प्रत्येकाच्या मनातही असा उजेड निर्माण होण्यासाठी म्हणून माणुसकीचा दिप लावायला मात्र आम्ही सपशेल विसरून जातो. तशी तर प्रत्येकाला उजेडाची आस असते, पण डोक्यात कुठल्या न कुठल्या प्रकारचा अंधार असतो. जेव्हा हा अंधार पूर्णत्वाने दूर होतो, त्यावेळी ती व्यक्ती तेजाने उजळते आणि अनेक पिढ्यांना प्रकाशमान करते..आपल्या मेंदूतले असे सारे अंधारकोपरे उजळून निघावेत नि आपल्यातला माणूस तेजाने तळपू लागावा, यासाठी आपण 'दिपपूजन' का करू नये? जळणं वा तेवणं हे जिवंत असल्याचं द्योतक, परंतु दिव्याचं जळणं हे कधी स्वत:साठी नसतं. ते इतरांना प्रकाश देण्यासाठीच जळत असतात. इतरांना उजाळण्यातच त्यांच्या जळण्याची सार्थकता असते. आज-उद्या 'दिप अमावस्या आहे. व्यसनाधीन होऊन बेशुद्ध होण्यापलीकडेही आयुष्य असतं हे ठळकपणे दर्शवणारी 'दर्श-अमावस्या'! आपल्या ह्रदयात निरंतर ज्ञानाचा दिवा तेवत ठेवायला याहून उत्तम दिवस नाही..शुभेच्छा!* *॥ रामकृष्णहरी ॥*💡💡💡💡💡💡💡💡💡 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाईल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Learn Fruit Name फळांची नावे👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/vjhQPhdlH7M~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••जी व्यक्ती सातत्याने कष्ट करते त्या व्यक्तीमध्ये प्रामाणिकपणा, जिद्द, चिकाटी, नम्रता, आपल्या माणसांविषयी व इतराविषयी आत्मियता हे गुण नक्कीच असतात. तो कधीही इतरांची बरोबरी करत नाही. ती आपली सारी स्वप्ने आपल्या हातातच आहेत आणि त्या हातातून जे काही घडते तेच आपले प्रारब्ध आणि तेच आपले विश्व समजते. अशा व्यक्तीच्या मनामध्ये कधीही कुणाचे वाईट व्हावे आणि आपलेच चांगले व्हावे असे विचार आणत नाही. म्हणून अशा व्यक्ती जीवनात पूर्णतः समाधानी असतात.© व्यंकटेश काटकर,नांदेड.संवाद..९४२१८३९५९०.🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *तिहेरी फिल्टर*एके दिवशी एक व्यक्ती महान चाणक्याला भेटली आणि म्हणाली, 'मी तुमच्या मित्राबद्दल जे काय ऐकले ते तुम्हाला मी सांगूं का?'एक मिनिट थांबा' चाणक्यने उत्तर दिले. 'काही सांगण्यापूर्वी मी थोडीशी तुमची परीक्षा घेतो, परीक्षेत उत्तीर्ण झालात तरच सांगा, आपण याला.' ट्रिपल फिल्टर चाचणी असे म्हणू...... चालेल?ती व्यक्ती म्हणाली, 'तिहेरी फिल्टर?'ठीक आहे. चाणक्य पुढे म्हणाला. 'माझ्या मित्राबद्दल माझ्याशी बोलण्यापूर्वी, तुम्ही जे काय म्हणणार आहात, ते फिल्टर करणे चांगले आहे, म्हणूनच मी त्याला तिहेरी फिल्टर चाचणी म्हणतो, आता पहिला फिल्टर, तुम्ही जे सांगणार आहात, ते सत्य आहे का? 'थोडस थांबून ती व्यक्ती म्हणाली 'नाही,' 'खरंच मी त्याबद्दल ऐकले आणि .......' 'ठीक आहे,' चाणक्य म्हणाले तुम्ही जे मला सांगणार आहात ते खर आहे, याची खात्री नाही तुम्हाला?, आता दुसरा फिल्टर, आता चांगुलपणाचे फिल्टर वापरून पाहूया. आपण माझ्या मित्राबद्दल काहीतरी सांगणार आहात ते त्याच्या बद्दलचे चांगले विचार आहेत काय?'ती व्यक्ती म्हणाली 'नाही, उलट ........' 'मग, मधेच तोडत चाणक्य पुढे म्हणाले,' तू मला त्याच्याबद्दल काहीतरी वाईट सांगू इच्छित आहेस आणि ते खरे आहे की नाही याची शाश्वती नाही, ठीक आहे, आता उपयुक्तता फिल्टर हा शेवटचा फिल्टर..... जे तू मला माझ्या मित्राबद्दल सांगणार आहेस ती माहिती मला उपयोगी असणार आहे काय?''नाही, तशी तुम्हाला ती उपयुक्त खरंच नाही' ती व्यक्ती ओशाळत म्हणाली.'ठीक आहे,' म्हणजे 'जर तुम्ही मला सांगू इच्छिता, ते ना सत्य आहे,ना चांगले आहे , ना मला उपयोगी देखील आहे, तर मला ते का सांगता आहात?' प्रत्येक वेळी आपल्या जवळच्या प्रिय जनाबद्दल, मित्रा बद्दल ऐकताना या तिहेरी फिल्टरचा वापर करा. मैत्रीवर भरवसा ठेवा, हे तिहेरी फिल्टरचे शास्त्र खरोखर खूप उपयुक्त आहे. आपसातील गैरसमज दूर ठेवायचे असतील तर प्रत्येक व्यक्तीने हे तिहेरी फिल्टर आचरणात आणायला पाहिजे . हीच आहे चाणक्य-नीती.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बुलेटीन विषयी वाचकांची प्रतिक्रिया*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••सप्रेम नमस्कार,मी मधुकर चिंतामण पवार, प्रेरणा विद्यालय सोनावळे, ता.मुरबाड, जिल्हा ठाणे.सर्वप्रथम चार वर्षांचा प्रवास अविरत पूर्ण केल्या बद्दल "फ्रेश मॉर्निंग बुलेटीन "टिमचे मनपुर्वक अभिनंदन 🌹🌹 2 सप्टेंबर 2018 रोजी "फ्रेश मॉर्निंग बुलेटीन "गृपला जोडलो गेलो आणि वाचक बनलो."सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट".या वाक्याच्या अक्षरशः प्रेमात पडलो.शालेय परिपाठासाठी वाहून घेतलेल्या या गृपच्या सहवासात परिपाठाचं महत्व खर्या अर्थाने कळलं.गृपमधलं सर्व संकलन,निवेदन अगदी प्रमाणबद्ध व अर्थपुर्ण.नासाजिंच वृत्त निवेदन व स्तंभलेखन अप्रतीम.संतोषजिंच दिनविशेष संकलन,कुणालजिंच्या बातम्या संकलन,राजेंद्रजींची विशेष माहिती.सौ.भारतीजींचा फ्रेश सुविचार.संगीताजींची प्रश्नमंजुषा ,वाढदिवसाच्या शुभेच्छा..एकनाथजींच कबिरांचे बोल,व्यंकटेशजिंच विचारधन,प्रमिलाताईंची बोधकथा सारं सारं अप्रतीम.माझं महतभाग्य मी आपल्या गृपचा सदस्य आहे.पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 🙏💐🍫❤🌹🌷💛💚🧡👍•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) http://fmbuletin2019.blogspot.com/2022/07/30072022.html~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🎇 दि. 30/07/2022 वार - शनिवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇. *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-■ २०१४ - पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळून ५० पेक्षा अधिक ठार.■ २००१- राजस्थानातील अलवर येथील राजेंद्रसिंग यांना 'रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.छोटे बंधारे बांधून पाणी साठवण्यासाठी त्यांनी लोकसहभागातून काम केले आहे.■ २०००-चंदन तस्कर वीरप्पनने डॉ राजकुमार यांचे अपहरण केले.■ १९९७- गानकोकिळा लता मंगेशकर यांना 'राजीव गांधी राष्ट्रीय सदभावना पुरस्कार' जाहीर.💥 *जन्म* :-● १९४७ - आर्नोल्ड श्वार्झनेगर, ऑस्ट्रियाचा अभिनेता व कॅलिफोर्नियाचा गव्हर्नर.● १९७३ - सोनू निगम, पार्श्वगायक.💥 *मृत्यू* :-● १९४७ - जोसेफ कूक, ऑस्ट्रेलियाचा सहावा पंतप्रधान.● १९९४ - शंकर पाटील, मराठी लेखक.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *मराठा समाजाला पुन्हा धक्का ! इब्डल्यूएस आरक्षणाचा लाभ देणारा जीआर हायकोर्टाकडून रद्द*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *भारतीय ज्वेलर्सना परदेशातून सोने आयात करणे सोपे होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंज सुरू केले.*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून मागितली माफी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बायोलॉजिकल वडिलांच्या मृत्यूनंतर आई हीच मुलाची कायदेशीर आणि नैसर्गिक पालक असते. तिला आपल्या मुलाचे आडनाव ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *५ जी स्पेक्ट्रमच्या ९ फ्रीक्वेन्सी बँड्सचा सध्या लिलाव सुरू आहे, तिसऱ्या दिवसअखेर 5-जी स्पेक्ट्रमसाठीची बोली १.४९ लाख कोटींवर पोहोचले...असल्याची माहिती केंद्रीय दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *केंद्रीय कॅबिनेटने बीएसएनएल कंपनीला १.६४ लाख कोटी रुपयाच्या पॅकेजला दिली मंजुरी, कंपनी आपल्या नेटवर्क आणि सर्विसला सुधारण्यासाठी या पैशाचा वापर करणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *बर्मिंगहम : भारताच्या शिवा थापाने राष्ट्रकुल स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पाकिस्तानच्या बी. सुलेमानवर ५-० असा दणदणीत विजय साकारला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*🚀 काव्यांगण - रोज एक कविता 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••फ्रेश मॉर्निंग बुलेटिन मध्ये रोज एक कवी-कवयित्री यांची एक कविता 01 ऑगस्ट पासून प्रसारित करण्यात येणार आहे.*ऑगस्ट महिन्यातील पहिल्या सप्ताहाचा विषय आहे - श्रावण, पाऊस, सरी, नागपंचमी*सूचना - ◆ कविता 20 ओळीच्या वर नसावी◆ कवितेत कोणतेही इमोजी नसावे◆ कवितेखाली आपले नाव, जिल्हा व मोबाईल क्रमांक लिहावे◆ निवडक कविता *फ्रेश मॉर्निंग बुलेटिन* मध्ये प्रसारित करण्यात येतील.आपल्या कविता खालील क्रमांकावर whatsapp करावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ संयोजक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *कृष्णविवराचा शोध कोणी लावला ?* 📙तारे अमर नाहीत, त्यांचीही जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होत नाही. अर्थातच तार्‍यांची अखेर झाल्यानंतर त्यांची काय अवस्था होते, याविषयीच्या संशोधनाला चालना मिळाली. अंतरंगात धडधडत असणाऱ्या अणुमीलनाच्या भट्ट्यांपायी तारे स्वयंप्रकाशित होतात. हायड्रोजनच्या अणुंचं मीलन होऊन त्यापासून हेलियमचे अणू तयार होत असताना फार मोठ्या प्रमाणावर ऊर्जा बाहेर पडते. तीच प्रकाशाच्या रूपाने आपल्या नजरेला पडते. पण हायड्रोजनचं इंधन अमर्यादित नसतं. ते संपल्यावर हेलियम त्याचं स्थान घेतं. ते संपल्यानंतर चढत्या भाजणीनं कार्बन, नायट्रोजन यासारख्या अधिकाधिक जड मूलतत्त्वांचा इंधन म्हणून वापर होतो. एकदा का या प्रक्रियेतून लोहाची निर्मिती झाली, की ही प्रक्रिया थंडावते. आता कोणतंच इंधन शिल्लक राहिलेलं नसतं. त्यामुळे त्या ताऱ्यांच्या अंतरंगातून ऊर्जा बाहेर पडत नाही. सहाजिकच त्या ताऱ्यावर आतल्या दिशेनं आकुंचन पावायला लावणाऱ्या गुरुत्वाकर्षणाच्या बलाचा पगडा बसतो आणि तारा आकसायला सुरुवात होते. त्याचीच परिणती त्या ताऱ्यांचं अतिशय फिकुटलेला प्रकाश असणाऱ्या श्वेतबटूंमध्ये रूपांतर होतं, याची प्रचिती काही प्रमाणात मिळाली होती. कारण अवकाशात अशा प्रकारच्या श्वेतबटूंच्या अस्तित्वाचा पुरावा मिळालेला होता.त्यानंतर काय होतं याविषयी मात्र निश्चित सांगता येणे शक्य होत नव्हतं. पण ज्या अर्थी हे श्वेतबटू ताऱ्यांसारखेच स्थिर असल्याचं दिसतं त्यावरून हीच तार्‍यांची अंतिम अवस्था असावी, असा तर्क केला जात होता. मृत तार्‍यांचं कलेवर म्हणजेच श्वेतबटू, असाच समज प्रचलित होत होता. तरीही ते स्थिर कसे होतात ? हा प्रश्न अनुत्तरितच होता. कारण जर अंतरंगातल्या भट्ट्या थंड पडल्या असतील तर मग गुरुत्वाकर्षणाच्या ओढीला विरोध करणारं दुसरं बल असण्याची शक्यताच मावळते.पण क्वांटम मेकॅनिक्सच्या सूत्रांचा अवलंब करून डॉ. राल्फ फाउलर यांनी त्याचं तर्कसंगत स्पष्टीकरण दिलं होतं; पण ते पर्याप्त नाही, अशी भूमिका एका विशीतल्या भारतीय तरुणानं घेतली. त्यानं त्यावेळी नुकत्याच प्रकाशात आलेल्या आईन्स्टाइनच्या सापेक्षतावादाचा अवलंब करत, जर श्वेतबटू बनलेला तारा महाकाय असेल, म्हणजेच त्याचं वस्तुमान आपल्या सूर्याच्या दीडपटीहून जास्त असेल, तर श्वेतबटूही आतल्या आत कोसळतच राहील आणि त्याचं रूपांतर अपरिमित गुरुत्वाकर्षणाची ओढ असलेल्या एका सूक्ष्म अवस्थेत होईल, असं भाकीत केलं. त्या अवस्थेत गुरुत्वाकर्षणाची ओढ इतकी प्रचंड असेल की त्यातून प्रकाशकिरणही बाहेर पडू शकणार नाहीत, असा दावा त्यानं केला होता.त्यावेळचे खगोलमहर्षी त्या तरुणाचे गुरू अार्थर एडिन्गटन यांनी त्या प्रबंधाची जाहीर टिंगल केली. त्या तरुणाची हेटाळणीही केली. पण कालांतराने इतर प्रख्यात खगोलविदांनी त्या तरुणाचा सिद्धांतच बरोबर असल्याचं सप्रमाण दाखवून दिलं. त्या अवस्थेला मग इतर काहीजणांनी कृष्णविवर असं नाव दिलं. कृष्णविवरांच्या अस्तित्वाची प्रचिती देणारे असंख्य अप्रत्यक्ष पुरावे आता मिळाले आहेत. त्यामुळे कृष्णविवर केवळ कल्पनेचा खेळ नसून आपल्या विश्वातील एक सत्य घटक आहे हे सिद्ध झालं. कृष्णविवराचं भाकीत करणारा तो तरुण होता सुब्रह्मण्यम चंद्रशेखर. त्यांना या शोधाबद्दल १९८३ सालचा नोबेल पुरस्कार दिला गेला.*बाळ फोंडके यांच्या 'कोण ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••“संभाषणाचा सर्वात वाईट प्रकार म्हणजे वादविवाद.”*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) भारतातील पहिला प्रामाणिक हर घर जल जिल्हा कोणता बनला आहे ?२) विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ( भालाफेक ) नीरज चोप्रा या खेळाडूने किती मीटरचा थ्रोसह रौप्यपदक मिळविले ?३) महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शपथग्रहणवेळी कोणत्या प्रकारची साडी परिधान केली होती ?४) अलीकडेच कोणत्या देशाने उष्णतेच्या लाटांमुळे रेड अलर्ट जारी केला आहे ?५) कारगिल विजय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?*उत्तरे :-* १) बुरहानपूर, उत्तरप्रदेश २) ८८.१३ मीटर ३) संथाली साडी ४) इंग्लंड ५) २६ जुलै *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● नागनाथ इळेगावे● कु. नक्षत्रा सब्बनवार● सचिन गादेवार● प्रवीण चातरवाड● विजय कुऱ्हाडे● प्रियंका घुमडे● शेख नवाज● निलेश कोरडे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*प्रत्येक अस्वस्थ माणसाने थोड आत डोकावून पहावं. तिथं त्याला एक अतृप्त जीव येरझारा घालतांना सापडेल. माणूस लहान असो, मोठा असो, त्याला जे काही हवं आहे, ते मिळत नसल्याची नांगी सतत डंख मारीत असते. जी काही आपली पात्रता आहे, त्यानुसार आपल्याला जे हवं आहे, ते मिळत नाहीये, ही भावना त्याला छळत असते. शांतपणे जगू देत नाही. प्रत्येक छोट्यामोठ्या गोष्टींमागे एक सुप्त अहंकार असतो आणि जोपर्यंत हा असा अहंकाराचा जागता पहारा आहे, तोपर्यंत कुणाच्याही आशीर्वादाने कोणतीही शांती मिळणार नाही? औदासीन्य नाहीसं कसं होणार? अहंकारानं मन काठोकाठ भरलेलं असलं, तर आशीर्वादानं आत उतरायचं कसं? भांड रिकाम हवं, तरच ते भरता येईल.**कवी शांताराम आठवले यांनी एका ओळीत जे सांगितलंय, “जो हसला, तो अमृत प्याला” हे अत्यंत सार्थ आहे. अहंकार संपला रे.. संपला की स्वास्थ्य आणि आनंदा व्यतिरिक्त उरतं काय? आपल्या शांततेच्या आड आपण स्वतः च येतो. हा अडथळा दूर होणं महत्वाचं. कबीर यालाच 'सहजयोग' म्हणतात. हा अहंकार मिटला, तर जीवन प्रतिक्षणी पूज्य भावाने व्यापून जाईल. राहत्या वास्तूत प्रतिदिन गंगास्नान घडेल. तुम्ही जिथं जिथं विहार कराल, ते ते तीर्थस्थळ घडेल. अर्थात ही प्रचिती येण्यासाठी मुळ अहंकार गेला नाही तर.. प्रार्थना, पूजा, तीर्थयात्रा सगळं व्यर्थ आहे!* *॥ रामकृष्णहरी ॥*🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाईल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबिराचे बोल* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रेमभाव एक चाहिए , भेष अनेक बनाय |चाहे घर में वास कर , चाहे बन को जाए || अर्थ मानवाचा धर्म मानवता . मानवता जपायची तर मानवाच्या अंतरात प्रेमभावनेचे अधिष्ठान महत्वाचे आहे. त्या शिवाय मानवता व मानव्य कसं प्रवाहित होणार ? भौगोलिक व भौतिक परिस्थितीशी समायोजन साधण्यासाठी भिन्न वेष परिधान करा . विभिन्र प्रकारच्या (उपलब्धतेनुसार महालापासून झोपडीपर्यंत) वास्तूत किवा वनात वास्तव्य करा ते परिस्थितीनुरूप स्वाभाविक आहे. परंतु त्यात अवडंबर असता कामा नये. सत्य व प्रेमभाव हाच खर्‍या जीवनाचा मुलाधार आहे. त्यामुळे जीवनाची गोडी व सुंदरता वाढते म्हणून माणसाने अशाश्वत अवडंबराच्या व बुवाबाजीच्या नादी लागून जगण्याला विनाकारणच अंधानुकरणी व भंपक बणवू नये . ते मानवतेला पूरक असू शकत नाही. एकनाथ डुमणे, मुखेड📱 9096714317•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••जिद्द,मेहनत आणि प्रयत्न हे तुमच्या हाती घेतलेल्या कामासाठी वापरलेले कौशल्य आहे.यामुळे तुमचे काम अधिक चांगले व उत्कृष्ट दर्जाचे होण्यास मदत करते. कोणतेही काम जेव्हा हाती घ्याल तेव्हा ह्या तीन गोष्टी आपल्या अंगी बाळगणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामध्येच आपली प्रगती सामावलेली असेल.- व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..9421839590.•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अनमोल क्षण*प्रसिध्द लेखक कै. वि. स. खांडेकरांकडे अलोट गर्दी जमली होती. लोक हार घेऊन अभिनंदनासाठी तिष्ठत उभे होते. कॅमेरे सरसावुन फोटोग्राफर धावपळ करत होते. खांडेकरांना साहित्य ऍकेडमीचे पारितोषिक मिळाले तेव्हांचा प्रसंग.एका पत्रकाराने विचारले, 'आपल्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण कोणता ?' खांडेकरांनी दोन क्षण डोळे मिटले. प्रसंग त्यांच्या डोळयासमोर दिसु लागला. ते म्हणाले, 'आज सकाळीच एका अपरिचिताने येऊन माझ्या गळयात हार घातला. माझ्या पायावर डोकं ठेवलं मी विचारलं, 'कोण आपण? मी ओळखलं नाही'.'साहेब, आज मी आहे तो आपल्यामुळेच. फार फार वार्षापुर्वी मी एका तळयाच्या शेजारून फिरत असता अचानक तोल जाऊन मी पाण्यात पडलो. मला पोहता येत नव्हतं, मी गटांगळया खाऊ लागलो. माझी ती अवस्था आपण पाहिलीत आणि ताबडतोब पाण्यात उडी घेतलीत. घाबरलेला मी गळयाला मिठी मारली. आपण जोरात हिसका देऊन मिठी सोडवलीत व ओढतच मला पाण्याबाहेर काढलंत. कुठलीही ओळख न देता उपकाराची भावना प्रगट न करता आपण निघून गेलात. मागून मला कळले मला वाचवणारे सुप्रसिध्द लेखक खांडेकर होते. तेव्हांपासुन आपल्याकडे यायचे होते तो योग आज आला'.खांडेकर म्हणाले, 'कोणालातरी जगायला आपण मदत करू शकतो ही गोष्ट माझ्या दृष्टीने फार मोठी आहे. तोच क्षण माझ्या जीवनातला अनमोल क्षण होय'.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) http://fmbuletin2019.blogspot.com/2022/07/29072022.html~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🎇 दि. 29/07/2022 वार - शुक्रवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇. *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-◆ १९८७- भारताचे पंतप्रधान राजीव गांधी व श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष जे.आर.जयवर्धने यांनी भारत-श्रीलंका करारावर सह्या केल्या.◆ १९८५-मल्याळम लेखक टी. एस. यांना ज्ञानपीठ पुरस्कार.◆ १९५७- 'इंटरनॅशनल अँटॉमिक एनर्जी एजन्सी(IAEA) ची स्थापना.◆ १९४६-टाटा एयरलाइन्सचे 'एयर इंडिया' असे नामकरण करण्यात आले.💥 *जन्म* :-● १९२२ - बळवंत मोरेश्वर पुरंदरे, मराठी इतिहाससंशोधक, लेखक.● १९२५ - शिवराम दत्तात्रेय फडणीस, मराठी व्यंगचित्रकार.● १९५९ - संजय दत्त, हिंदी चित्रपट अभिनेता.💥 *मृत्यू* :-● २००८ - इश्मीत सिंग सोधी, भारतीय पार्श्वगायक. ● २००९- महाराणी गायत्री देवी ,जयपूरच्या राजमाता*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *आता 17 वर्ष पूर्ण झाल्यानंतर बनवा मतदार ओळखपत्र, वर्षातून चार वेळा नोंदवता येणार नाव, निवडणूक आयोगाचा निर्णय, पण मतदानाचा अधिकार मात्र 18 वर्षे पूर्ण झाल्यावरच*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाला सावरकरांचं नाव, राज्यपालांच्या सूचनेनुसार झालं नामकरण*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *ओबीसी आरक्षणास मंजुरी देण्याआधी जाहीर झालेल्या 365 जागांवरील निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय होणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने केले स्पष्ट*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *जुलैमध्ये सरासरीपेक्षा 300 मिमी अधिक पावसाची नोंद, खरीप पिकाचे सर्वात मोठे नुकसान*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुण्यातील बोगस शिक्षक भरती घोटाळ्याची 'ईडी' चौकशी; राजकीय नेत्यांपाठोपाठ शिक्षणसंस्थाही रडारवरबोगस शिक्षक भरतीचा हा घोटाळा उघडकीस आणणारे पुणे जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी किसन भुजबळ यांना 'ईडी'ने चौकशीसाठी बोलवले आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भारतीय संघाने वेस्ट इंडीजला त्यांच्याच भूमीत 3-0 च्या फरकाने मात दिली. यावेळी मालिकेतील तिन्ही सामन्यात भारताकडून दमदार खेळी करणाऱ्या शुभमन गिलला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारतीय फुटबॉल संघाने फिफा नेशन्स कप 2022 स्पर्धेसाठी यंदा पहिल्यांदाच पात्रता मिळवल्यानंतर पहिला-वहिला विजयही मिळवला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*✒️ काव्यांगण- रोज एक कविता 🖋️*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *काव्यांगण - रोज एक कविता*फ्रेश मॉर्निंग बुलेटिन मध्ये रोज एक कवी-कवयित्री यांची एक कविता 01 ऑगस्ट पासून प्रसारित करण्यात येणार आहे.*ऑगस्ट महिन्यातील पहिल्या सप्ताहाचा विषय आहे - श्रावण, पाऊस, सरी, नागपंचमी*सूचना - ◆ कविता 20 ओळीच्या वर नसावी◆ कवितेत कोणतेही इमोजी नसावे◆ कवितेखाली आपले नाव, जिल्हा व मोबाईल क्रमांक लिहावे◆ निवडक कविता *फ्रेश मॉर्निंग बुलेटिन* मध्ये प्रसारित करण्यात येतील.आपल्या कविता खालील क्रमांकावर whatsapp करावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ संयोजक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *ढगांचं बारसं कोणी केलं ?* 📙मे १७८३ पासून त्या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यापर्यंत बहुसंख्य युरोपीय देशांच्या आकाशात एक विलक्षण दृश्य पाहायला मिळत होतं. आईसलँडमधील एल्डेयार इथं तसंच जपानमधील असामा यामा इथं ज्वालामुखींचे उद्रेक झाले होते. त्यातून बाहेर पडलेली राख आणि राळ यांचं मिश्रण साऱ्या उत्तर गोलार्धामधील आकाशात पसरलेलं होतं. त्या दृश्यानं अनेकांना विस्मयचकित केलं होतं. कलाकारांनी त्याची चित्रं रंगवली होती. नियमित रोजनिशी लिहिणाऱ्यांनी त्याची तपशीलवार वर्णनं नोंदवून ठेवली होती. साहित्यिकांनी आपल्या कथा कादंबऱ्यांसाठी त्या आकाशदर्शनाची पार्श्वभूमी वापरली होती. त्यात भर पडली ती १८ ऑगस्टच्या रात्री एक धगधगता तेजस्वी अशनी त्या आकाशात चमकून गेला तेव्हा. सर्वांच्याच डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या त्या दृश्यानं एका अकरा वर्षांच्या मुलाच्या मनावर कायमची मोहिनी घातली नसती तरच नवल. त्या दिवसांपासून ल्युक हार्वर्डला आकाशदर्शनाचा छंद जडला. वास्तविक पुढील आयुष्यात त्यानं खगोलशास्त्राचा व्यवसाय म्हणून स्वीकार केला नव्हता वा त्या विषयाचा अभ्यासही केला नव्हता. वनस्पतीशास्त्रातली पदवी त्यानं मिळवली होती. तरीही आकाशदर्शनाचं त्याचं वेड काही कमी झालं नाही.त्याच सुमारास डेन्मार्कमधील वनस्पतीशास्त्रज्ञ कार्ल लिनायस यानं वनस्पतीचं वर्गीकरण करणारी एक प्रणाली विकसित केली होती. ती सर्वत्र गाजली होती. आजतागायत त्याच प्रणालीचा वापर होतो आहे. तरुण ल्युकवरही त्याचा प्रभाव पडला होता. त्या भरात त्यानंही त्या वर्गीकरणामध्ये आपल्या परीनं थोडी भरही घातली होती.वनस्पतीचं वर्गीकरण करता येतं, तर मग आकाशात नेहमीच दिसून येणाऱ्या ढगांचं वर्गीकरण का करता येऊ नये, असा विचार त्याच्या मनात घोळू लागला होता. त्याच सुमारास फ्रेंच वैज्ञानिक ज्याँ बातिस्त लमार्क यानं आकाशात दिसणाऱ्या ढगांची पाच ढोबळ वर्गांमध्ये विभागणी केली होती. तशी ती जुजबीच होती; पण तोवर तसा प्रयत्न कोणीच केला नसल्यानं लमार्कच्या वर्गीकरणालाही मान्यता मिळाली. त्यामुळे ल्युक हाॅवर्डला अधिक प्रोत्साहन मिळालं आहे आणि मग त्यानं अधिक तर्कसंगत अशी आपली प्रणाली सादर केली.त्याने एकंदरीत चार मार्ग प्रतिपादित केले होते. एक *क्युम्युलस* म्हणजे एखाद्या ढिगासारखे दिसणारे, दोन *स्ट्रॅटस* म्हणजे एकावर एक थर असणारे, तीन *सिर्रस* म्हणजे कुरळ्या केसांसारखे वेटोळेदार आणि लांबलचक असणारे आणि चौथे *निम्बस* म्हणजे पाण्याचा साठा असणारे पावसाळी ढग. या चार वर्गांमध्ये संकर होण्याची शक्यताही त्यानं वर्तवली होती. त्यानुसार पावसाळी पण ढिगासारखे असणारे ते *क्युम्युलोनिम्बस* कुरळ्या केसांचे थरावर थर असणारे सिर्रोस्ट्रॅटस वगैरे.अठराव्या शतकाची अखेर होता होता हाॅवर्डच्या या वर्गीकरणाला सर्व स्तरांमधून विस्तृत मान्यता मिळत गेली. आजही यांच वर्गीकरणाचा वापर केला जात आहे. ढगांचे गुणधर्मही या वर्गीकरणातून प्रतीत होतात याचीही प्रचिती आता मिळालेली असल्यामुळे तर या वर्गीकरणावर शिक्कामोर्तबच झाले आहे. म्हणून ल्युक हॉवर्डलाच ढगांचं बारसं केल्याचं श्रेय द्यायला हवं.*बाळ फोंडके यांच्या 'कोण ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••“संकटात सापडल्यावरच माणूस स्वतःला ओळखतो.”*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) 'वनांचा शेतकरी' ( The farmer of the forest ) कोणत्या पक्ष्याला म्हटले जाते ?२) विश्व अँथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ( भालाफेक ) पदक ( रौप्यपदक ) मिळवणारा दुसरा भारतीय खेळाडू कोण ?३) संथाली भाषेत अभिवादनासाठी कोणता शब्दप्रयोग केला जातो ?४) भारताचा राष्ट्रप्रमुख कोण असतो ?५) आतापर्यंत किती वेळा राष्ट्रपतीची बिनविरोध निवड झाली आहे ?*उत्तरे :-* १) धनेश ( Hornbill ) २) नीरज चोप्रा, भालाफेक ३) जोहार ४) राष्ट्रपती ५) एक वेळा, भारताचे सातवे राष्ट्रपती संजय नीलम रेड्डी, १९७७*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● सौ. गीता शिवा वसमतकर● सुनील कोल्हे● सुदीप दहीफळे● दलित सोनकांबळे● माधव मुस्तापुरे● संजय पंचलिंग*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*'घराच्या, शहराच्या आणि देशाच्या दुरवस्थेला दुसरा-तिसरा कोणी जबाबदार नसून, माझ्यातल्या 'मी' जबाबदार आहे. ' असे बाबासाहेब पुरंदरे एकदा म्हणाले होते. 'मी' हा एवढा मोठा असतो, की त्याचे सहजासहजी समाधान होत नाही. त्याला अहंकाराचा स्पर्श असतो. तो दुखावू नये, म्हणून काळजी घेतली जाते. 'मी हे का करावे','माझा याच्याशी काय संबंध' यासारखे प्रश्न विचारून आपल्यातला 'मी' अनेक सामाजिक कर्तव्यांपासून दूर जातो. एकदा का होईना 'मी'ने 'मी'चे ऐकले, तर व्यक्तीमत्वात सकारात्मक बदल होईल.**वाल्याने 'मी'चा खरा आवाज ऐकला. वाटमारी सोडली आणि तो वाल्याचा वाल्मिकी झाला. वाटमारी करणारा वाल्या पुढे भारतीय संस्कृतीचा वाटाड्या बनला. मी कोणाला दोष देणार नाही. माझ्याकडून होईल तेवढे सत्कार्य मी करेन माझ्या हातून चांगले होण्याची शक्यता नसेल, तेंव्हा मी कोणाचे वाईट करणार नाही. यासारखी छोटी छोटी सूत्रे प्रत्येकाने आचरणात आणली, तर समाजस्वास्थ्य सुधारेल. यात शंका नाही. 'मी' चूक करतो म्हणून 'आम्ही' चूक करायला धजावतो. 'मी' सुधारलो तर जग सुधारेल. सकल जीवन समृद्ध करण्यासाठी 'मी'वर चांगले संस्कार होणे आवश्यक आहे.* *॥ रामकृष्णहरी ॥*🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माणूस हा परिवर्तनशील जीव आहे. त्याच्यावर जेव्हढ्या लवकर परिणाम होईल तेव्हढा कुणावरही होणार नाही. म्हणून फक्त सकारात्मक विचार करावा. त्यातून 100% परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही.* *बाणभट्ट गुरुकुल आश्रमात शिक्षण घेतांना त्याला काहीच येत नव्हते, तो अभ्यासात सर्वात मागे असायचा, त्यामुळे एक दिवस तो आत्महत्या करायला निघाला.* *एका विहिरीजवळ आल्यावर त्याच्या असे लक्षात आले की पाण्याची बादली जिथून खाली वर येते तिथे एक चरा म्हणजे खोल जागा तयार झालेली दिसली.चमत्कार झाला--जर दगड साध्या दोराच्या सततच्या घर्षणाने झिजू शकतो तर जिवंत माणूस का नाही? आणि या प्रश्नाने हर्षाच्या राजवटीत बाणभट्ट हा प्रसिध्द कादंबरीकार जन्माला आला.* *ज्याला त्यावेळचा आणि आजचा समाज विद्वान म्हणून संबोधतो.* *आपणही जरा विचार करा जर सातत्याने एखादी अशक्य गोष्ट घडू शकते मग आपण प्रयत्न का सोडायचे?* *शेवटी म्हणतात ना ,प्रयत्ने वाळूचे कण रगडीता ,तेलही गळे**अशोक कुमावत* *( राष्ट्रपती पुरस्कार विजेते )*📱 9881856327•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जीवनातले सगळेच प्रश्न सहज मिटतील असे नाही.काही प्रश्न सहज प्रयत्न केल्यावर मिटतात तर काही अथक प्रयत्न करुनही मिटत नाहीत.अशावेळी मनुष्य आपला स्वत:चा आत्मविश्वास गमावून बसतो आणि आपलं नशिबच तसे आहे आता आपण काय करू शकतो अशा नकारात्मक विचारावर विश्वास ठेवतो.असे केल्याने प्रश्न मिटत नाहीत तर त्या प्रश्नांना ठामपणे समोर उभे राहून मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करुन जे काही आपल्यासमोर संकटं किंवा प्रश्न उभे राहतील त्याला तोंड देऊ आणि समर्थपणे जीवन जगू.असे विचार आणले तर जीवनाचा कोणताही प्रवास आनंदाने करु शकतो.कारण जीवनच संघर्ष आहे त्याला सामोरे गेलेच पाहिजे.हतबल होऊन किंवा विश्र्वास गमावून चालणार नाही.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *महती आईची*एकदा एका व्‍यक्तीने स्‍वामी विवेकानंदांना प्रश्‍न विचारला,'' स्‍वामीजी, संसारामध्‍ये जेवढी आईची महती गायली जाते तेवढे महत्व पित्‍याला का दिले जात नाही?मातेइतकाच पितासुद्धा महत्‍वाचा असूनसुद्धा पित्‍याला फारसे का महत्‍व दिले जात नाही याचा कृपया उलगडा करावा.'' स्‍वामीजी यावर काहीच बोलले नाही. ते त्‍या व्‍यक्तिपासून थोडे दूर गेले आणि एक मोठा दगड त्‍यांनी उचलला व त्‍या व्‍यक्तिच्‍या हाती देत ते म्‍हणाले,'' बंधू, हा दगड उद्या सकाळपासून तू पोटाला बांध आणि तुझी नित्‍यनेमाची सर्व कामे करत जा. तुझ्या प्रश्‍नाचे उत्तर तुला मिळून जाईल.'' दुस-या दिवशी सकाळी ओरडतच तो माणूस स्‍वामी विवेकानंदांकडे आला,'' स्‍वामीजी माझी कंबर, पोट दोन्‍हीही खूप दुखत आहे. एक प्रश्‍न काय विचारला मी, तुम्‍ही असे काय विचित्र उत्तर दिले त्‍याचे. माझी कंबर, पोट अगदी दुखून मी हैराण झालो आहे.'' स्‍वामी मंद स्मित करत म्‍हणाले,'' बंधू, तुझ्या प्रश्‍नाचे उत्तर तुला मिळाले नाही काय? अरे जिने नऊ महिने तुला पोटात घेऊन तुला वाढवले, तुझे कधीही तिला ओझे झाले नाही, तिने कधीही कंटाळा केला नाही. त्‍या मातेची महती ही तिन्‍ही लोकांत सर्वश्रेष्‍ठच आहे. ''*तात्‍पर्य :-**आईसारखे दैवत सा-या जगतामध्‍ये नाही.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🎇 दि. 28/07/2022 वार - गुरूवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇. *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-● १९४३ - दुसरे महायुद्ध - रॉयल एर फोर्सच्या जर्मनीतील हांबुर्ग शहरावरील बॉम्बफेकीत ४२,००० नागरिक ठार💥 *जन्म* :-★ १९३१ - जॉनी मार्टिन, ओस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.★ १९३६ - सर गारफील्ड सोबर्स, वेस्ट इंडियन क्रिकेट खेळाडू.★ १९३८ - आल्बेर्तो फुजिमोरी, पेरूचा राष्ट्राध्यक्ष.★ १९४५ - जिम डेव्हिस, अमेरिकन व्यंगचित्रकार💥 *मृत्यू* :-◆ ४५० - थियोडॉसियस, पवित्र रोमन सम्राट.◆ १०५७ - पोप व्हिक्टर दुसरा.◆ १७९४ - मॅक्सिमिलियें रॉबिस्पियरे, फ्रेंच क्रांतीकारी.◆ १८४९ - चार्ल्स आल्बर्ट, सार्डिनियाचा राजा.◆ १९३४ - लुइस टॅंक्रेड, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.◆ १९६८ - ऑट्टो हान, जर्मन रसायनशास्त्रज्ञ.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज पुन्हा आक्रमक, नव्या सरकारला 9 ऑगस्टपर्यंतचं अल्टिमेटम, अन्यथा उठाव करण्याचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *बीएसएनएलच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्राकडून 1.64 लाख कोटींच्या विशेष पॅकेजला मंजुरी निर्णय घेतला आहे. तसेच केंद्राकडून बीएसएनएल आणि बीबीएनएलच्या (भारत ब्रॉडबॅंड नेटवर्क लिमिटेड) मर्जरला देखील हिरवा कंदिल देण्यात आला आहे.*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *पुढचे तीन दिवस पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, तर बिहार आणि उत्तर प्रदेशात वीज काळ बनून कोसळली, एकूण 28 जणांचा मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अजित पवार उद्यापासून अतिवृष्टीग्रस्त विदर्भ, मराठवाड्याच्या दौऱ्यावर, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अकोल्यात रेल्वेसह भाजप खासदाराचं घरं बॉम्बने उडवण्याची धमकी; कॉल 'फेक' असल्याची अकोला पोलिसांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अनेक राजकीय नेते, बड्या उद्योजकांना तुरुंगवास घडवणाऱ्या PMLA कायद्याचं आज भवितव्य ठरणार, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताचा वेस्ट इंडीजवर 119 धावांनी मोठा विजय, 3-0 ने मालिका जिंकत दिला व्हाईट वॉश*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अन्न म्हणजे पूर्णब्रह्म*अन्न , वस्त्र आणि निवारा या माणसाच्या तीन मूलभूत गरजा आहेत. यातील अन्नाची गरज पूर्ण करण्यासाठी प्रत्येक सजीव धडपडत असतो. अश्मयुगीन काळातील लोक अन्नाच्या भटकंतीत अनेक वर्षे घातली. या अन्नाच्या शोधातच त्यांनी अग्निचा शोध लावला असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.........पूर्ण लेख खालील लिंकवर वाचण्यास मिळेल.https://nasayeotikar.blogspot.com/2019/05/blog-post_69.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *अन्नाशिवाय माणूस किती काळ जगेल ?* 📙या प्रश्नाचं एकच एक असं उत्तर देता येणं कठीण आहे. व्यक्ती व्यक्तीनुसार त्यात फरक पडू शकतो. कारण मुळात त्या व्यक्तीचं वजन किती होतं, त्याचं सर्वसाधारण आरोग्य कसं होतं, मधुमेह, रक्तदाब यांसारख्या विकारांचा प्रादुर्भाव होता की काय व मुख्य म्हणजे शरीरात कितपत पाणी होतं यावर हा काळ अवलंबून असतो. जोवर शरीरातील पाण्याचं प्रमाण योग्य राखलं जात आहे तोवर केवळ अन्नत्यागापोटी किती काळ काढता येईल, याविषयीची विश्वासार्ह आकडेवारी उपलब्ध नाही. वयाच्या ७४ व्या वर्षी महात्मा गांधींनी केवळ पाणी घेऊन २१ दिवस उपोषण केलं होतं. त्यापायी त्यांचं वजन जरी घटलं तरी आरोग्यावर तितकासा अनिष्ट परिणाम झाला नव्हता. मायकेल पील यांनी १९९७ साली 'ब्रिटिश मेडिकल जर्नल' मध्ये प्रकाशित केलेल्या एका शोधनिबंधात आणि २८,३६,३८ आणि ४० दिवस अन्नावाचून काढलेल्या व्यक्तींविषयीचा विश्वासार्ह अहवाल दिला होता. एवढे दिवस शरीर अन्नावाचून कसं काढू शकतं, याचं कारणही त्यात त्यांनी नमूद केलं होतं.शरीराचं नेहमीचं कार्य चालतं त्याला चयापचय म्हणतात. त्याचा कार्यवेग राखण्यासाठी आपल्याला पोषणाची म्हणजेच अन्नाची गरज भासते; पण जेव्हा या पोषणाची कमतरता भासते तेव्हा शरीर चयापचयाच्या कार्यवेगातही योग्य ते बदल करतं असं दिसून आलं आहे. थायरॉईड ग्रंथीतून होणार्‍या स्रावांचा वापर करून शरीर हे साध्य करतं. या बदलाचं प्रमाण प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळं असू शकतं. साहजिकच अन्नावाचून किती काळ काढता येईल हे या घटकावरही अवलंबून असतं.जोवर पाण्याच्या प्रमाणात लक्षणीय फरक पडलेला नाही तोवर अतिशय अल्प अन्नसेवनावर दीर्घकाळ काढल्याची कितीतरी उदाहरणं आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरच्या छळछावणीतील कित्येक जणांना जवळजवळ उपाशी अवस्थेत दिवस काढावे लागले होते. हा काळ काही महिन्यांपासून तीन चार वर्षांपर्यंतही होता. त्यापायी त्यांच्या शरीराचा जवळजवळ हाडांचा सापळा झाला होता. तरीही त्या स्थितीत त्यांच्या अंतर्गत अवयवांचं काम व्यवस्थित चालून ती मंडळी जिवंत राहिली होती. एवढेच नाही तर तिथून सुटका झाल्यानंतर ती पूर्वावस्थेत येऊ शकली होती.'अॅनोरेक्सिया नर्वोसा' या रोगानं पछाडलेल्या व्यक्ती जाणूनबुजून स्वतःची उपासमार करून घेतात. आपलं वजन कमी करण्याच्या अतिरेकी हट्टापायी काहीजणांना ही व्याधी जडते. अशा मंडळींचं वजन तब्बल ४० टक्क्यांनी घटतं. त्याहून अधिक घट मात्र ते सहन करू शकत नाहीत. कर्करोगाची बाधा झालेल्या व्यक्तींनी नेहमीइतकंच अन्नसेवन केलं तरी त्यातलं पोषण कर्करोगग्रस्त पेशी पळवत असल्यामुळे इतर शरीराला योग्य तितके उष्मांक मिळत नाहीत. त्यांच्याही बाबतीत वजन ४० टक्क्यांहून अधिक घटलं तर मृत्यू ओढवतो. वजनात तितकी घट होण्यास किती वेळ लागेल हे अर्थात व्यक्ती व्यक्तीवर अवलंबून असतं.*बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*Well beginning is the half done.* *( चांगली सुरूवात म्हणजे अर्धे काम झाल्यासारखे आहे. )**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) कैद्यांच्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने 'जिव्हाळा' कर्जयोजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे ?२) पश्चिम बंगाल राज्याचा सर्वोच्च पुरस्कार कोणता ?३) नवनिर्वाचित राष्ट्रपतीला राष्ट्रपतिपदाची शपथ कोण देतात ?४) पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने कोणता दिवस 'उज्ज्वला दिवस' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे ?५) भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ?*उत्तरे :-* १) महाराष्ट्र २) बंग विभूषण ३) सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ४) १ मे ५) एन. व्ही. रमना*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● चंद्रकांत पिलाजी● दिगंबर जैरमोड● बालाजी गुट्टे● अंकुश शिंदे● बाळू उपलेंचवार*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माणूस बर्‍याचदा ऐकीव आणि भ्रामक बाबींच्या मागे लागून जीवनातला अनमोल वेळ वाया घालवत असतो. अमृत प्राशन करणे, अमर होणे, संजीवनी अशा काही बाबी वारंवार चर्चेत येतात. या सर्व बाबींचा भौतिक विचार करून माणूस दमछाक करून घेतो. सर्व काही आपल्याच ठायी असणार्‍या कर्तृत्त्व, चिंतन, शांती व समाधानातून प्राप्त होणार्‍या या लौकिक बाबी ! मात्र माणूस वरवरचा विचार करून स्वतःची दमछाक करून घेतो. 'तुझं आहे तुजपाशी परि जागा चुकलाशी.' अशीच ही गत म्हणावी लागेल. कस्तुरी मृग कस्तुरीच्या सुगंधाने ऊर फुटेतो धाव धाव धावतो. 'कस्तुरी' स्वतःजवळ असूनही त्याचा अंत मात्र तिच्याच शोधात होतो. तसंच माणसाचं झालंय.**थोडसं पूर्वजांकडं डोकावून पाहिलं तर कोणीही अमरत्व गाठू शकले नाहीत. ज्यांनी ध्येयासाठी झपाटून आपल्या कर्तृत्तवाचा ठसा उमटवला. खरं तर त्यांनाच अमृताचा खर्‍या अर्थानं कुंभ सापडला! त्यांनी तो कर्माच्या रूपानं प्राशन केला. आज हजारो-शेकडो वर्षे लोटली. ते देहाने नसले तरी कार्य रूपानं अमर आहेत. त्यांच्या हयातीत कधी त्यांनी भ्रामक अमृताचा शोध घेतला नाही. त्यांनी कधी वेगळ्या स्वर्गाचा विचार केल्याचे ऐकीवात नाही. आपल्या कार्य क्षेत्रातच मनोभावे स्वर्ग निर्माण केला. ज्यांनी लौकिकता व नैसर्गिकपण नाकारलं. ते सर्व अवहेलनेचे धनी ठरले आहेत. प्रतिकांचा उथळ अर्थ घेवून धावपळ करून चालत नाही. चिंतन व मननातून शाश्वत सत्ये बाहेर पडतात. ती शोधली की माणूस अजरामर होतो. हे त्या मागचं रहस्य सांगताना संत कबीर म्हणतात, पर्वता पर्वतावर फिरून थकलो, दमलो, प्रसंगी रडलोही परंतु सहज अमर करणारी संजीवनी काही प्राप्त झालीच नाही. कर्मच माणसाला अमर करते. हे जीवनाचे फलित आहे. कर्मभूमीत हृदय आणि हृदयात कर्मभूमीला आसरा दिला की जीवनाचं नंदनवन होवून जातं.* *॥ रामकृष्णहरी ॥*🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाईल- 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खरे जीवन समजून घ्या.**एकदा एक काम करा, स्वतःलाच फोन लावून बघा, स्विच ऑफ, नो रेंज, व्यस्त असे अनेक प्रकार होतील पण फोन लागणार नाही.* *या जगात आपण सगळ्यांसाठी आहोत, वेळ पण देतो आणि स्वतःसाठी, बघा स्वतःसाठी आपण नेहमी व्यस्त आहोत, जगून घ्या,* *वागणं चांगल नसेल तर, साधी उचकीही लागत नाही. बोलणं गोड़ नसेल तर, महागडया मोबाइलवर घंटी पण वाजत नाही.**आणि घर मोठ असो वा लहान जर गोड़वा नसेल तर, माणूसच काय, मुंगीसुद्धा जवळ येत नाही. मग एवढा अभिमान कशापायी, खरे जीवन जगा ।**अशोक कुमावत* *(राष्ट्रपती पुरस्कार विजेते*)📱 9881856327•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येकाच्या जीवनात निराशा ही सवतीसारखी नेहमी मनाला छळत असते.ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने मनाला विचलीत करते.अशा स्थितीतून तिला हद्दपार करण्यासाठी काही ना काहीतरी करण्यासाठी तो आशेकडे धावतो आणि त्यातुन सुटका करून घेतो.अर्थात जीवनात निराशेने घर केले तर नक्कीच आशेचा शोध घेऊन निराशेला बाजूला सारतो आणि जीवन निराशेतून मुक्त करतो.निराशा जरी जीवनात आली तरी घाबरायचे नाही तिला हिमतीने तोंड देत आशेचा शोध घ्यायला शिकले पाहिजे आणि त्यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजे.हीच आपल्या जीवनाची खरी परीक्षा आहे.© व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रलोभनापासुन सावधपणे वागणे.*एका जंगलात मोठ्या संख्‍येने हरणांचा वावर होता. परंतु आपल्‍या सहका-यांची संख्‍या कमी होत चालल्‍याचे एका हरणाच्‍या लक्षात आले. त्‍याने आपल्‍या इतर सहका-यांना सावध केले परंतु कोणीच त्‍याच्‍याकडे लक्ष दिले नाही. त्‍या हरणाने आपल्‍या मित्राला सांगितले की डेरेदार व गच्च पानांनी भरलेल्‍या वृक्षांच्‍या फांद्यावर दडून शिकारी मचाण बांधतात. यासाठी आपण या वृक्षाखाली जाणेच न बरे. त्‍याचा मित्र त्‍याची गोष्‍ट ऐकून तेथेच थांबला. तिकडे त्‍या पानाआड दडलेल्‍या शिका-याने दोघांकडे फळे फेकण्‍यास सुरुवात केली. चतुर हरणास समजले की, झाडावर शिकारी बसलेला आहे. त्‍याने मित्राला सावध केले पण मित्र हरीण लोभाच्‍या बळी पडून फळे खाण्‍यासाठी पुढे गेला आणि शिका-याने त्‍याची लगेचच शिकार केली. चतुर हरणाला वाईट वाटले. पण मित्राने त्‍याचे म्‍हणणे ऐकायला हवे होते हे ही खरेच की नाही.*तात्‍पर्य :- आजच्‍या काळात कोणी जर आपल्‍याला प्रलोभन दाखवून जर फसवत असेल तर आपण सावध राहायला हवे किंवा कोणी जर सावध करत असेल तर त्‍याचे ऐकायला हवे.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🎇 दि. 27/07/2022 वार - बुधवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-■ १९९९- द्रव खनिज तेल वायूचा (LPG)वाहनांसाठी इंधन म्हणून वापर करण्याचा प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयाने मंजूर केला.■ २००१- सार्वजनिक ठिकाणी सिगारेट, तंबाखू व गुटखा सेवनावर व जाहिरातीवर बंदी चा महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा निर्णय.■ २०१२-लंडन येथे ३० व्या ओलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.💥 *जन्म* ● १८९९- पर्सी हॉर्नीब्रूक, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.● १९१५- जॅक आयव्हरसन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.💥 *मृत्यू°*◆ २००२ - कृष्णकांत, भारताचे उपराष्ट्रपती.◆ २००३ - बॉब होप, इंग्लिश अभिनेता. ◆ २०१५ - डॉ. अब्दुल कलाम यांचा स्मृतिदिन*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *कारगील विजय दिवसाच्या निमित्ताने पंजाब सरकारने घेतला मोठा निर्णय यापुढे शहीद जवानांच्या कुटुंबाला मिळणार एक कोटी रूपयांची*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *प्लॅस्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर बंदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निर्देशानंतर नियमामध्ये सुधारणा*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *राज्यसभेत गोंधळ, तृणमूलच्या सात जणांसह 19 खासदारांचं एका आठवड्यासाठी निलंबन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राजस्थानसह जम्मू काश्मिरमध्ये मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नैसर्गिक वायूचे प्रमाण आताच्या 6.3 टक्क्यांवरुन 15 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचं सरकारचं उद्दिष्ट : केंद्रीय राज्यमंत्री रामेश्वर तेली*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा जीडीपी 8.2 टक्क्यांवरून 7.2 टक्क्यांवर घसरेल असा अंदाज आंतराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) व्यक्त करण्यात आला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *वेस्ट इंडिज विरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी भारतीय टी-20 संघ त्रिनिदाद येथे दाखल. येत्या 29 जुलैपासून भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात टी-20 रंगणार मालिका*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*प्रश्न कमी पटसंख्येच्या शाळेचा ...*दोन वर्षाखाली दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जवळपास एक हजार चारशे शाळा बंद करण्यात आल्या होत्या आणि त्यात जास्तीत जास्त सरकारी शाळांचा समावेश होता. या शाळा बंद झाल्यामुळे या शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी यांचे जवळच्या शाळेत समायोजन करण्यात आले. शिक्षक काय कोठे ही जाऊन नोकरी करू शकतो ? त्याला त्याचे तेवढे दुःख नाही मात्र इयत्ता पहिली ते चौथी वर्गात शिकणाऱ्या सहा ते दहा वयोगटातील मुलांचे काय हाल होतात ? याचा जरा देखील विचार केला जात नाही याचे फार मोठे दुःख आहे. ......पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे. https://nasayeotikar.blogspot.com/2019/05/blog-post.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *इंटरनेटची मालकी कोणाकडे आहे ?* 📙अमेरिकेच्या संरक्षण खात्यासाठी संशोधन करणाऱ्या काही वैज्ञानिकांना सतत संपर्कात राहणं आणि एकमेकांना आपण वाचलेल्या किंवा लिहिलेल्या लेखांची, अहवालांची साद्यंत माहिती सतत देणं आवश्यक वाटलं. त्यावेळी उपलब्ध असलेल्या साधनांनी त्यांना समाधान मिळत नव्हतं, म्हणून त्यांनी आपापले संगणक एकमेकांना बिनतारी पद्धतीनं जोडून एक जाळं निर्माण केलं. याला त्यांनी 'अर्पानेट' असं नाव दिलं. त्याचा वापर त्यावेळी तरी मर्यादित होता; पण ती संकल्पना एका क्रांतीची उद्गाती ठरली. ही संकल्पनाच आजच्या इंटरनेटचा आत्मा आहे.त्यावेळी फक्त त्या संशोधकांचेच संगणक एकमेकांशी जोडले गेले होते. ते संशोधकही एकमेकांपासून फार दूर नव्हते; पण एकदा अशा प्रकारे बिनतारी पद्धतीने संगणक एकमेकांशी जोडता येतात हे समजल्यावर त्याचं एक जगड्व्याळ जाळं तयार व्हायला फार वेळ लागला नाही. ते जाळ बांधण्यासाठीच्या पायाभूत सुविधा प्रस्थापित करायला काय वेळ लागला असेल तेवढाच.त्या पायाभूत सुविधांमध्ये अनेक प्रणालींचा समावेश आहे. संगणक एकमेकांशी जोडता येण्यासाठी संगणकांमध्ये काही विशिष्ट इलेक्ट्रॉनिक घटकांचा अंतर्भाव करावा लागला. यांना इथरनेट कार्ड म्हणतात. पूर्वी ते स्वतंत्रपणे घेऊन संगणकाशी जोडावं लागत असे. आता ते संगणकातच अंतर्भुत केलेलं असतं. टेलिफोनद्वारे संगणकांची जोडणी करण्यासाठी काही व्यवस्था करावी लागते. आता तर राऊटर वापरून संपूर्ण घरात किंवा मोठ्या परिसरात इंटरनेट प्रमाण उपलब्ध होण्यात होईल अशी 'वायफाय' प्रणाली विकसित केली गेली आहे. संगणकातले संदेश एका ठिकाणाहून दुसरीकडे नेण्यासाठी उपग्रहांचा वापर होतो. आणि या सर्व प्रणाली व्यवस्थित आपापलं काम करतील यासाठी काही खास मंत्रावळी म्हणजेच सॉफ्टवेअरचीही निर्मिती केली गेली आहे. ही मंत्रावली वापराच्या दृष्टीने अधिकाधिक सुलभ व्हावी सर्व गरजांसाठी ती उपयोगी पडावी आणि संदेशवहन वेगवान व्हावं यासाठी नवनव्या सुधारित मंत्रावलीही सतत तयार होत असतात. त्याशिवाय जगभरची विविध प्रकारची माहिती साठवून ठेवण्यासाठीची व्यवस्थाही करावी लागते. पूर्वी अशा प्रकारची माहिती कागदावर लिहिली जाऊन त्याचं दप्तर कपाटांमध्ये साठवून ठेवलं जात असे. आता ते संगणकाद्वारे दृकश्राव्य फितींवर साठवून ठेवलं जातं. 'क्लाऊड कॉम्प्युटिंग' या नव्या संकल्पनाद्वारे तर ते आभासी साठवणुकीद्वारे सुरक्षित ठेवलं जातं. यापैकी प्रत्येक सुविधा महत्त्वाची असली तरी ती संपूर्ण जाळ्याचा एक छोटासा भागच आहे. त्या त्या भागांपुरती मालकी निरनिराळ्या व्यक्ती, उद्योग, संस्था, सेवाभावी संस्था, सरकारी यंत्रणा यांच्याकडे असली तरी संपूर्ण इंटरनेटवर कोणाचीही मालकी नाही. कोणी एक संस्था वा उद्योग इंटरनेटचा मालक नाही. त्यामुळे बलवान राष्ट्रांनाही इंटरनेट संपूर्णपणे बंद करण्यात यश मिळत नाही. इंटरनेट सुविधा आपल्याला पुरवणाऱ्या संस्थांवर बंदी घालून आपापल्या राज्यापुरती ती यंत्रणा बंद केली जाऊ शकते. इंटरनेटच्या वापरात सुसूत्रता आणणाऱ्या काही नियंत्रक संस्था आहेत. त्या आपल्याला निरनिराळे पत्ते किंवा ओळखपत्र मिळवून देण्याची व्यवस्था करतात; पण त्यांच्याकडेही संपूर्ण इंटरनेटची मालकी नाही. कोणीही मालक नसलेली आणि तरीही सुरळीत चाललेली 'इंटरनेट' ही एकमेव बहुपयोगी यंत्रणा आज अस्तित्वात आहे.*बाळ फोंडके यांचा 'कोण ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••“ज्या माणसाजवळ संयम आहे तो प्रत्येक गोष्टीचा धनी असतो.”*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) राष्ट्रपतींच्या वाहनावर क्रमांकाऐवजी काय असते ?२) सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या आयोगाच्या शिफारशी मान्य करत स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसींचे आरक्षण कायम ठेवले आहे ?३) पती-पत्नीस एकत्र जेवावयास बोलावले तर त्यास काय म्हणतात ?४) पंचायत राजचे तीन स्तर कोणी सुचविले ?५) पोलाद तयार करण्यासाठी कोणत्या खनिजाचा प्रामुख्याने वापर केला जातो ?*उत्तरे :-* १) राष्ट्रीय चिन्हाची पाटी २) बांठीया आयोग ३) मेहूण ४) बळवंतराय मेहता समिती ५) मॅगनीज *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● हणमंत पडवळ, उस्मानाबाद● उत्कर्ष मादसवार● शशिकला बनकर● मारोती ताकलोर● श्रीकांत क्यादरवाड*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*आपला चालताना तोल जातो, उठताना तोल जातो, बसताना तोल जातो, बोलताना तोल जातो, वागताना तर नेहमीच तोल जातो. कोणताही ताल नसताना तोल जातो. तोल सांभाळत जगण्याच्या प्रयत्नात आपण कधी बेताल होतो समजत नाही. खोटे आणि दिखाऊ वागणे नेहमीच धडपडते. खरे आणि अस्सल राहणे ठामपणे चालत जाते. कळपातील मेंढी वाघाचे कातडे अंगावर पडल्याने वाघासोबत चालू लागते, पण जेंव्हा डरकाळी फोडण्याची वेळ येते तेंव्हा ती मेंढी बें बें असाच आवाज करते. मग वाघांना तिचा फडशा पाडायला वेळ लागत नाही. तोलहीन आणि खोटेनाटे व्यवहार आपला केंव्हा फडशा पाडतील हे सांगता येत नाही.**माणसाच्या खोट्यानाट्या व्यवहारांनी बोरी-बाभळीच्या अंगावरसुद्धा काटे येतात,असे बहिणाबाई चौधरी लिहितात. 'जगण्यात हरवलेले जीवन कुठे आहे?' हे जीवन स्वत:शी प्रतारणा करून खोटेनाटे वागण्यात, स्वत:चा खोटा अहंभाव जपण्यात हरवून गेले आहे. दुस-याच्या समस्यांमध्ये स्वत:ला नि:स्वार्थीपणे गुंतवून घेणारा आणि त्या सोडविण्याची धडपड करणारा साहित्यिक असे कुसुमाग्रजांनी वि.स. खांडेकरांबद्दल लिहिले होते. आपण दुस-याच्या समस्यांमध्ये स्वत:ला गुंतवून घेतो का? ते करत असू तर जगण्यातले जीवन हरवले जाणार नाही. 'बुडती हे जन, न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणवुनी' असा तुकारामांनी सांगितलेला कळवळा जेंव्हा ह्रदयातून वाहत राहील तेव्हा जीवन जगण्यात हरवले जाणार नाही.* *॥ रामकृष्णहरी ॥*🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 *श्री. संजय नलावडे, मुंबई*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबिराचे बोल* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• हरिया जांणे रूखड़ा, उस पाणी का नेह ।सूका काठ न जानई,कबहूँ बरसा मेंह ॥सारांश वृक्षास कळे सिंचन जया प्रिय ते जीवन शुष्क काष्ठ काय जाणे ? थेंब मोतिया समानमहात्मा कबीर पटवून देतात की मनाच्या तयारीवर सर्वकाही अवलंबून असतं. पाण्याचं महत्त्व , त्याचा स्नेह व सिंचन केवळ हिरव्या वृक्षाला समजू शकतात. वाळलेल्या लाकडाला जवळून जाणारा जल प्रवाह किवा अमृतरूपी जलधारांच्या वर्षावाचं काय अप्रुप वाटणार आहे बरं ! मोत्यासम थेंबाचं त्याला काहीच महत्व नसतं. कारण त्याच्या ठायी असणारं भावनाशिल मन कधीच मेलेलं असतं. मुर्दाड मनाच्या माणसाला बाग, हिरवळ, प्रेम, आपुलकी, सहानुभुती संवेदना आदि भावना काय कळणार ? ते खरं तर दगडा समान निगर गट्ठ बनलेले असतं. त्याच्यावर कितीही जलधारांचा अभिषेक केला तरी दगड द्रवत नाही. तसे दगणडासमान निष्ठूर निर्दयी माणसासोबत एकतर्फी कितीही प्रेमळ वागलात तरी त्याच्या मुळ स्वभावात तीळमात्र स्नेहार्द्र भाव निर्माण होण्याची सुतराम शक्यता नसते. . त्यांचा स्वार्थ साधला की संपलं . खरं तर यांचं असणं नसणं नसण्यातंच जमा असतं. ओसाड निर्दयी मनामध्ये दयेचे निर्झर प्रवाहित होणं अशक्य आहे. एकनाथ डुमणे, मुखेड📱 9096714317•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••काहीवेळा काहींच्या बाबतीत मनुष्याचा स्वभाव समोरची परिस्थिती पाहून बदलत असतो.कधी कधी असेही वाटते की,आपण कमी वेळेत खूप काही करुन धनाढ्य व्हावे आणि आनंदाने जीवन जगावे.या वाईट मोहासाठी तो वेगवेगळ्या गैरमार्गाचा अवलंब करतो आणि संपत्ती अर्थात माया जमवण्याच्या मोहात पडतो.जी माया जमवली त्यात त्याला समाधान तर नसतेच अजूनही त्याच्यापेक्षा अधिक माया जमवण्यात वेळ खर्च करतो.परंतु हे त्याच्या लक्षात येत नाही की,आपण वाममार्गाला लागलो आहोत, दुस-याला लुटलो आहोत ही जी काही वाईट सवय लागली आहे ती आपल्या मनाला समाधान देणारी नाही.केवळ आपल्या मोहापायी, आपल्या स्वार्थासाठी इतरांच्या जीवाला त्रास देऊन आपल्या नको त्या गोष्टीच्या नादाला लागलो आणि हावरटपणाचा कहर केला. त्यामुळे आपले जीवन हे जीवन राहिले नसून आपण इतरांच्या नजरेत एक गुन्हेगार ठरलो आहोत आणि ते ही आपल्या स्वार्थी मोहापायी ?हा मोह काहीच कामाचा नाही.ज्यामुळे माणसातील माणुसकी नष्ट झाली.त्यापेक्षा मनाचा हावरटपणा सोडून द्यावा, भरपूर मेहनत करावी,आपल्या कृत्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी आणि आपले जीवन सुखासमाधात जावे.यापेक्षा आपल्या कोणत्याही अपेक्षा असू नयेत.हाच मंत्र चांगले जीवन जगण्यासाठी पुरेसा आहे.नाही तर नको त्या मोहात जाणे आणि आपल्याच हाताने जीवन दु:खमय जगणे यापेक्षा जीवनाचे वाईट चित्र काय असू शकेल ?© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कुत्रा आणि लांडगा*एक लांडगा फार दिवस उपाशी राहिल्यामुळे रोड झाला होता. काहीतरी खायला मिळाले तर पहावे म्हणून तो चांदण्या रात्री फिरत होता. तेव्हा त्याला एका झोपडीजवळ दारावर एक लठ्ठ कुत्रा बसलेला दिसला. त्याने त्याला रामराम करून त्याचा आदरसत्कार केल्यावर लांडगा त्याला म्हणाला, ''तू फार चांगला दिसतोस, तुझ्यासारखा देखणा व धष्टपुष्ट प्राणी आजपर्यंत मी पाहिला नाही. याचे कारण तरी काय? मी तुझ्यापेक्षा जास्त उद्योग करतो, पण मला पोटभर खायला मिळत नाही.'' कुत्रा म्हणाला, ''अरे, मी करतो ते तू करशील तर माझ्यासारखाच तूही सुखी होशील.''त्यावर लांडग्याने विचारले, ''तू काय करतोस?'' कुत्रा म्हणाला, ''दुसरे काही नाही. रात्रीच्या वेळी मालकाच्या दारापुढे पाहारा करून मी चोराला येऊ देत नाही.'' लांडगा म्हणाला, ''एवढंच ना? ते मी मनापासून करीन बाबा. अरे मी रानात भटकत थंडीवारा सोसतो तर मला घराच्या सावलीत बसून पोटभर अन्न मिळाल्यास दुसरे काय पाहिजे?'' याप्रमाणे दोघांमध्ये बोलणे चालले असता कुत्र्याच्या गळ्याला दोरीचा करकोचा पडलेला लांडग्याने पाहिला. तेव्हा तो कुत्र्याला म्हणाला, ''मित्रा, तुझ्या गळ्यात काय रे हे?'' कुत्रा म्हणाला, ''अं हं. ते काही नाही.'' लांडगा म्हणाला, ''तरी पण काय ते मला कळू देत.'' कुत्रा म्हणाला, ''अरे, मी थोडासा द्वाड आहे, लोकांना चावतो, म्हणून मी दिवसा झोपलो तर रात्री चांगला पहारा करीन म्हणून माझा मालक मला दोरीने बंधून ठेवतो पण दिवस मावळला की तो मला सोडतोच. मग मी वाटेल ते करतो, वाटेल तिकडे फिरतो. खाण्यापिण्याविषयी विचारशील तर माझा मालक आपल्या हाताने मला भाकरी खाऊ घालतो. घरची सगळीच माणसं मला मायेने वागवतात. पानावर उरलेली भाकरी माझ्याशिवाय दुसर्‍या कोणाला देत नाहीत. तेव्हा तू पहा, माझ्यासारखा वागशील तर तही सुखी होशील.'' ते ऐकताच लांडगा मागच्यामागे पळू लागला. त्याला हाका मारीत कुत्रा म्हणाला, ''अरे, असा पळतोस काय?'' लांडगा दुरूनच म्हणाला, ''नको रे बाबा मला ते सुख, ते तुझे तुलाच लाभो. स्वतंत्रपणे वाटेल तसे वागता येत असेल तर तसली गोष्ट मला सांग, तुझ्यासारखे बांधून ठेऊन जर मला कोणी राजा केले तर ते राजेपणदेखील मला नको!''तात्पर्य : स्वतंत्रपणा असताना गरिबीही चांगली. पण परतंत्रपणा असेल तर श्रीमंतीचाही काही उपयोग नाही.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 26/07/2022 वार - मंगळवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*विजय दिन - भारत* (कारगिल युद्धाची समाप्ती)💥 ठळक घडामोडी :-◆ १९६५ - मालदीवला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.◆ २००५ - मुंबई व परिसरात २४ तासात जवळजवळ १ मीटर (९९५ मिलीमीटर) पाउस. महापूरात शेकडो मृत्युमुखी.◆ २००८-अहमदाबाद शहरात २१ बॉम्बस्फोटात ५६ मृत्युमुखी तर २०० जखमी.◆ २०११ - मोरोक्कोमध्ये सी.१३० प्रकारचे विमान कोसळले. ७८ ठार.💥 *जन्म*◆१८८५-मुग्धा गोडसे,अभिनेत्री व मॉडेल.◆ १९२७ - जी.एस. रामचंद, भारतीय क्रिकेट खेळाडू.◆ १९४३ - मिक जॅगर, इंग्लिश संगीतकार, गायक. ◆ १९४९ - थक्शिन शिनावत्र, थायलंडचा पंतप्रधान.💥 *मृत्यू*◆ १८६७ - ओट्टो, ग्रीसचा राजा.◆ १९५२ - एव्हा पेरोन, आर्जेन्टिनाची गायिका.◆ २००९ - भास्कर चंदावरकर, मराठी संगीतकार.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *देशाच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी घेतली पद आणि गोपनियतेची शपथ, ''गरीबही स्वप्न पाहू शकतात'', द्रौपदी मुर्मू यांचे शपथविधीनंतर जनतेला संबोधितपर भाषणात म्हणाल्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मतदार ओळखपत्र आधारशी लिंक होणार; बोगस मतदारांना आळा घालण्यासाठी 1 ऑगस्टपासून राज्यात खास मोहीम, आधार-मतदार ओळखपत्र लिंकिंग विरोधातील काँग्रेसच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *विदर्भ, मराठवाड्यासह अतिवृष्टीग्रस्त भागात ओला दुष्काळ जाहीर करा ; अजित पवारांचं सरकारला पत्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शिक्षक भरती घोटाळ्यातील आरोपी पार्थ चॅटर्जी यांची सहकारी अर्पिताची डायरी ईडीच्या हाती, अनेक गौप्यस्फोट होणार ? अर्पिता मुखर्जीला ईडी कार्यालयात घेऊन जाणाऱ्या गाडीला अपघात*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *भारताने गेल्या 5 वर्षांत चीन सीमेजवळ 2088 किमी लांबीच्या रस्त्याचे केले बांधकाम, सरकारने संसदेत दिली माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *डिसले गुरुजींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, 'डॉ. ए पी जी अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया' पुरस्कार जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *एका वर्षात 78 वेळा वाढले पेट्रोलचे दर, आप खासदाराने विचारलेल्या प्रश्नाला केंद्र सरकारचे उत्तर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - भूक*https://storymirror.com/read/story/marathi/yk8b6w78/bhuuk/detailवाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *रक्तदान कोण करू शकत नाही ?* 📙 रक्तदान हे श्रेष्ठदान आहे यात शंकाच नाही. त्यामुळे रक्तदान करणाऱ्या कोणाचंही कौतुक करायला हवं. पण आपण एखादं दान देतो ते तेव्हा ते सत्पात्री असावं अशी खबरदारी जशी आपण घेतो तशीच ते दानही 'योग्य' आहे याचीही खातरजमा करून घेणं आवश्यक असतं. त्यामुळेच इच्छा असली तरी काही जणांना तात्पुरत्या काळाकरता तसंच इतर काही जणांना कायमचं रक्तदान करण्यापासून रोखलं जातं.ही नकारघंटा वाजवली जाणार्यांची यादी दात्याच्या आरोग्याची काळजी वाहण्यासाठी जशी बनवली जाते तशीच घेत्याच्याही आरोग्यावर लक्ष ठेवून बनवली जाते. म्हणूनच रक्तदान केल्यामुळे दात्याला कोणत्याही प्रकारच्या आरोग्यविषयक अडचणींचा सामना करावा लागू नये, याची काळजी घेणं आवश्यक ठरतं. त्या तत्त्वानुसारच, ज्यांच्यामध्ये सर्दी, पडसे, खोकला किंवा ताप यासारख्या कोणत्यातरी रोगजंतूचा उपसर्गाची लक्षणं दिसत आहेत त्यांना ती लक्षणं नाहीशी होईपर्यंत रक्तदान करता येत नाही. त्या रोगावर उपचारासाठी प्रतिजैविकांसारखी काही औषध दिली असतील तर त्यांचा असर नाहीसा होईपर्यंत रक्तदानाला मनाई करण्यात येते. एखाद्याला स्वतःलाच जर रक्त दिलं गेलं असेल तर त्या दानापासून एक वर्षांपर्यंत त्याला रक्तदान करता येत नाही. बाळंत झालेल्या स्त्रीला पुढचे सहा आठवडे रक्त देता येत नाही. ज्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे, ज्या स्त्रीला पाळी आलेली आहे, ज्या व्यक्तीने पुरुष अथवा स्त्री वेश्येशी समागम केला आहे, जिचा गर्भपात झाला आहे, अशांनाही काही काळापुरतं रक्तदानावरच्या बंदीला सामोरं जावं लागतं.पण ही झाली तात्पुरती बंदी. बंदीचा काळ उलटून गेल्यावर त्यांना रक्तदान करता येतं; पण काही व्यक्तींना तर रक्तदानापासून कायमचं दूर ठेवण्यात येतं. यात ज्यांनी रक्तवाहिनीवाटे नशील्या पदार्थांचं सेवन केलं आहे अशांचा समावेश होतो. मग ते त्यांनी एकदाच का केलेलं असेना. तसंच ज्यांना एड्सला कारक असलेल्या एचआयव्ही या विषाणूंची बाधा झालेली आहे, अशांचंही रक्त घेतलं जात नाही. हिमोफेलिया, थॅलेसेमियासारख्या रक्ताच्याच रोगांची लागण ज्यांना झालेली आहे अशांनाही रक्तदान करता येत नाही. वयाच्या अकराव्या वर्षांनंतर ज्यांना विशिष्ट प्रकारची कावीळ झालेली आहे, कर्करोग किंवा मल्टिपल स्क्लेरॉसिस या रोगांनी ग्रासले आहे, अशांनाही रक्तदान करण्यापासून परावृत्त केलं जातं. वेश्याव्यवसाय करणाऱ्या कोणालाही मग ती व्यक्ती स्त्री असो वा पुरुष रक्तदान करता येत नाही. ज्यांना हृदयविकाराचा झटका येऊन गेलेला आहे किंवा तो येऊ नये यासाठी ज्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, अशांनाही रक्तदान करता येत नाही. तीच बाब पक्षाघाताचा झटका येऊन गेलेल्यांनाही लागू होते. ही बंदी दात्यापेक्षा हे रक्त ज्याला दिलं जाण्याची शक्यता आहे अशा व्यक्तीच्या आरोग्याच्या काळजीतून घेतली जाते. कारण त्या व्यक्तीवर हे दान घेतल्यानंतर अनवस्था प्रसंग ओढवू शकतो. 'भीक नको पण कुत्रा आवर' अशी त्यांची परिस्थिती होऊन जाते.ही एवढी लांबलचक यादी असली तरी रक्तदानास पात्र असतात अशांची यादी याच्या कितीतरी पटींनी मोठी आहे. म्हणून रक्तपेढ्यांमध्ये सहसा रक्ताचा तुटवडा नसतो.*बाळ फोंडके यांच्या 'कोण ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••एका चुकीच्या शब्दाकडे लक्ष देण्याऐवजी केलेल्या हजार चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या.नात्यामध्ये आणि मैत्रीमध्ये कधीच दुरावा येणार नाही.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविद हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते ?२) सर्वाधिक अंतराने विजयी झालेले राष्ट्रपती कोण ?३) कोणत्या शाहिराने 'गर्जा महाराष्ट्र' हे गीत लिहिले आहे ?४) नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रपती निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांनी कोणाचा पराभव केला ?५) 'तारक मेहता का उलटा चष्मा' या मालिकेतील तारक मेहता यांचे वास्तव नाव काय आहे ?*उत्तरे :-* १) १४ वे २) राजेंद्र प्रसाद ( ९९.३ % , १९५७ ) ३) कृष्णराव साबळे ४) यशवंत सिन्हा ५) शैलेश लोढा*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● वैभव पाटील भोसले● रमेश मस्के● उदयकुमार केंद्रे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*डाॅ. राधाकृष्णन् यांनी आपल्या बोलण्यातून जगभर ख-या आणि शाश्वत धर्माची मूल्ये सांगितली. या निमित्ताने ते बोलत राहिले आणि सरोवरात कमलपुष्पे फुलत जावीत तसे त्यांचे बोलणे फुलत गेले. सत्ताधीशांचे स्तुतीपाठक खूप असतात. पण राजा तू चुकतो आहेस, असे बोलण्याची धमक असणारे क्वचित असतात. इष्ट असेल ते बोलणार, शक्य असेल ते करणार, असे म्हणणा-या गोपाळ गणेश आगरकरांना केवळ ३९ वर्षांचे आयुष्य लाभले. दारिद्र्य, दमा यांच्याशी झुंज देत धिक्कार व अपमान सोसूनही त्यांनी प्रबोधनाचा ध्यास घेतला आणि त्यासाठी काम केले.**ज्ञानी माणसाने जगाला मार्ग दाखवावा. आपण वेगळे आहोत असे वागू नये. आपले अलौकिकत्व लोकांसाठी असावे. असा मार्ग दाखिवण्याचे काम जसे संतांच्या लेखनातून होते, वर्तनातून होते तसे बोलण्यातूनही होते. मूर्ख व कृतिहीनांचा वाचाळपणा आणि शहाण्या व कर्मवीरांचे मौन समाजाला घातक असते. रामदासांनी मूर्खांची लक्षणे सांगितली आहेत. त्यामध्ये 'दुर्जनांचेनि बोलणारा, मर्यादा सांडून चालणारा' त्याचप्रमाणे 'आदरेविण बोलणारा, न पुसता साक्ष देणारा' मूर्ख म्हटला आहे. तर उत्तम लक्षणांमध्ये 'विचारेविण बोलो नये, विवंचणेविण चालो नये' हेही सांगितले आहे. आपल्याला आयुष्यात गोडी निर्माण करायची असेल तर आपले बोलणे मधुर हवे. त्यासाठी आपले अंतरंग मधुर हवे. मग सर्वच मधुर होऊन जाईल.* *॥ रामकृष्णहरी ॥*🐚🐚🐚🐚🐚🐚🐚🐚🐚 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल -9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबिराचे बोल* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• पत्ता बोला वृक्ष से ,सुनो वृक्ष बनराय |अब के बिछड़े न मिले , दूर पड़ेंगे जाय ||अर्थ : संघटनेचं विघटन झालं की उभारी घेणं अवघडच असतं. हे पटवून देताना महात्मा कबीरांनी निसर्गातला किती समर्पक दृष्टांत दिलेला आहे. पान झाडाला म्हणतं, ' हे तरूवर वृक्षराज तुम्ही ऐका तर खरं ! आज तुम्ही भक्कमपणे उभे आहात. या तुमच्या भक्कम पणासाठी आम्ही लक्षावधी पानांनी स्वतःला ऊन्हात सूर्यासोबत टक्कर देत त्याला न घाबरता अंगावर घेतलं. ऊन्हात राबून स्वतःचं नाजूकपण तुझ्या संगोपणात साकारण्यात विसरूनच गेलो. अन राठ होवून पिकत गेलो. आम्ही जुन्या दमाची परंतु अनुभवी तुझ्या स्वछंद बागडण्याला मुरड घालून ताळ्यावर आणू पाहाणारी तुला नकोशे वाटतोय. नव्या दमाची फौज तुला हवी. तिला जशी फुस दिली तशी ती उधळते. भूत भविष्याचा विचार न करता वर्तमानाच्या क्षणिक फसव्या मोहात पाडून तू त्या नव्या नाजूक पात्यांना फसवून स्वतःच वैभव आभाळी मिरवू पाहात आहेस. तुझे पाय त्या वटवृक्षावाणी मजबुतीनं कुठं घट्ट रोवलेले आहेत ? त्याच्या सोबतीला जुने नवे असे पानाचे अक्षौहिनी सैन्य खोडाआधी भक्कमपणे ऊन, वारा थंडीशी टकरायला तयार आहे. म्हणून तर वडाचं राज्य दीर्घकाल चालतं. तो आधार असणार्‍या पान अन मातीची नाळ वड तुटू देत नाही. तू मात्र "विद्या आली हाता अन गुरूला लाथा"असं वागून नवीन पिढी बिघडवत आहेस. ती पिढी बायका पोरं झाली की मायबापा पासून दुरावून स्वतःचा अधःपात करून ऊर फोडून घेत आहेत. तुला वैभव उंच आभाळी नेल्यासारखं वाटत असलं तरी वादळं वावटळी मध्ये सर्वात आधी ताडमाड उंचीची दिखाऊपणा करणारी भक्कम आधार नसलेलीच झाडंच आधी आडवी होतात. दुरावलेलं गळालेलं पान पुन्हा आधाराला कधीच जवळ येत नाही. ते नव निर्माणासाठी मातीशीच एकरूप होवून जातं ! सोबत्यांना (जनतेला) मारून नव्हे तर सोबत घेवून मोठं होता येतं. हे झाडांनी विसरता कामा नये. एकनाथ डुमणे, मुखेड📱 9096714317•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••जेव्हा एकाच बिंदूतून कितीतरी रेषा काढलेल्या आपण पाहिलेल्या आहेत तरीही त्या एकमेकांना एकाच बिंदूत छेदून पुढे सरळ मार्गाने निघून जातात आणि त्याच रेषा परत एकाच बिंदूत एकत्रीत येऊन मिळतानाही पाहिले आहे.असा जर आपण विचार केला तर आपले हृदय आणि मनही एकच आहे.आपणच आपल्या हृदयातून आणि मनातून अनेक माणसांना जोडण्याचे काम करत असतो.त्यात काहींना काही कारणाने जवळ करतो तर काही माणसे आपल्यापासूनच जवळ येऊन दूर जातात.जे दूर जातात त्यांचा विचार करु नका,कारण त्यांना स्वातंत्र्य आहे.परंतु जी माणसे तुमच्याजवळ येण्याचा प्रयत्न करतात त्यांना दूर करु नका कारण त्यांना तुमचे मन आणि हृदय कळलेले असते.तुम्ही त्यांचे केंद्रस्थानी आणि बिंदूस्थानी आहात.तुम्हीच त्यांचे आधारही आहात आणि त्यांची प्रेरणाही.सा-यांना जवळ करण्याचे बिंदूसारखेच काम करायला शिकले पाहिजे तरच जीवन समृद्ध होईल.© व्यंकटेश काटकर,नांदेड.संवाद..९४२१८३९५९०./८०८७९१७०६३.🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपल्या माणसाकडून मिळालेले दुःख*एक सोनार होता. त्याच्या दुकानासमोरच एका लोहाराचे दुकान होते. सोनार जेव्हा काम करत असे तेंव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज होत असे पण जेंव्हा लोहार काम करत असे तेंव्हा मात्र लोखंडाचे काम होत असल्याने मोठा आवाज होत असे. तो आवाज मोठा कर्णकर्कश असे. एके दिवशी सोनाराच्या दुकानातील एक सोन्याचा कण कसा कोण जाणे पण लोहाराच्या दुकानात जावून पडला. त्या सोन्याच्या कणाची भेट एका लोखंडाच्या कणाशी झाली. खूप दिवसांची ओळख असल्यासारखे ते एकमेकांशी बोलू लागले. सोन्याच्या कणाने लोखंडाच्या कणाला म्हंटले,"दादा, आपले दुःख तर खरे एकसमान आहे. दोघानाही आगीत तापवले जाते आणि हातोड्याने ठोकले जाते. मी तर बाबा चुपचाप हे सहन करतो, पण तुझे काय?" लोखंडाचा कण सोन्याच्या कणाकडे पाहून दुःखी स्वरात म्हणाला,"अरे ! तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. दोघानाही तापवणारी आग एकच आहे आणि ठोकणारा हातोडाहि एकाच धातूचा आहे. पण खरे दुःख याचे आहे कि तुला ठोकणारा हातोडा हा तुझा कोणीच लागत नाही पण मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा हा नात्याने माझा भाऊच लागतो. दुसऱ्याने दिलेल्या दुःखापेक्षा स्वकीयांनी दिलेला त्रास हा अगदी हृदयात वार करून जातो."*तात्पर्य- आपल्या माणसांकडून होणारा त्रास हा कायमच दुःखदायक वाटतो.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🛟 दि. 25/07/2022 वार - सोमवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 🛟. *दिनविशेष . 🛟* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••★ *गॅलिशिया दिन - गॅलिशिया(स्पेन)* ★ *संविधान दिन - पोर्तोरिको*★ *प्रजासत्ताक दिन - ट्युनिसीया*💥 ठळक घडामोडी :-◆ १९७८ - जगातील प्रथम टेस्ट ट्यूब बेबी लुईझ जॉय ब्राऊन चा इंग्लंडमधील लँकेशायर येथे जन्म.◆ १९९७ - के.आर. नारायणन भारताच्या राष्ट्राध्यक्षपदी.◆ २००७ - प्रतिभा पाटील भारताच्या राष्ट्रपतीपदी.💥 *जन्म*◆ १९२९ - सोमनाथ चटर्जी, भारतीय राजकारणी.◆ १९७८ - लुईस ब्राऊन, पहिली मानव टेस्टट्यूब बेबी💥 *मृत्यू*◆ १८८०-गणेश वासुदेव जोशी उर्फ 'सार्वजनिक काका' समाजसुधारक*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *भारताच्या 15 वे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आज शपथविधी सोहळा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आयसीएसई 12वीचा निकाल जाहीर, ठाण्यातील उपासना नंदी देशात पहिली*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *अविवाहित मातेचे मूलही देशाचा नागरिक, पालक म्हणून जन्म दाखल्यावर फक्त आईचे नाव लिहिण्याचा अधिकार, केरळ उच्च न्यायालयाचाआदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *जगभरात मंकीपॉक्स विषाणूचा वाढता संसर्ग पाहता जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपाक्सला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केले आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ * ब्रिटिन (UK) पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेले भारतीय वंशाचे ऋषी सुनक पिछाडीवर पडले असून परराष्ट्र सचिव लिझ ट्रस यांनी आघाडी घेतली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *हवामान खात्याच्या माहितीनुसार राज्यात पुन्हा पुढचे चार दिवस मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, मध्यमहाराष्ट्र, पूर्व विदर्भातील काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 2 गडी राखून शानदार विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - लिफ्ट*https://storymirror.com/read/story/marathi/rlufif6t/liphtt/detailवाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *पृथ्वीवरून पाठविलेला संदेश मंगळावर पोहोचायला किती वेळ लागेल ?* 📙भारताने चंद्राभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी पाठवलेल्या 'चंद्रयान' या अवकाशयानाशी संपर्क तुटल्यामुळे तो प्रकल्प अर्धवट सोडून द्यावा लागला होता. तरीही जे नऊ महिने ते यान आपलं आखून दिलेलं काम इमानेइतबारे पार पाडत होतं, त्या काळात निर्धारित कामापैकी ९० टक्के काम पार पडल्याचं आपल्या अंतराळविज्ञान विभागानं जाहीर केलं आहे. साहजिकच त्या यानाशी संपर्क साधण्याची, दळणवळणाची व्यवस्था कार्यक्षम होती यात शंका नाही. तरीही अशा यानाला जमिनीवरच्या नियंत्रण कक्षातून विशिष्ट कामगिरी पार पाडायचा आदेश त्याला मिळायला किती वेळ लागत असेल, हा एक उत्कंठा लावणारा प्रश्न मनात उभा राहतो. कारण एखादी कामगिरी त्या यानानं तात्काळ पार पाडावी असं वाटत असेल तर हा संदेश किती वेगाने त्याच्यापर्यंत पोहोचतो याला महत्त्व येतं.चंद्र त्या मानाने पृथ्वीच्या जवळ आहे. पण मानवांनं आता मंगळ, शुक्र, गुरू, शनी एवढंच काय, पण नेपच्यूनसारख्या अतिदूर असणाऱ्या ग्रहांवरसुद्धा यानं पाठवली आहेत. त्यांचं नियंत्रण जमिनीवरूनच केलं जात आहे आणि त्या यानांनी मिळवलेली माहिती नियंत्रण कक्षाकडे संग्रहितही होत आहे. या साऱ्या दळणवळणाला किती वेळ लागतो ? या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याला दोन बाबींची माहिती हवी. या संदेशांच्या प्रवासाचा वेग आणि त्या याना किंवा ग्रहापर्यंतच अंतर.जमिनीवरून संदेश पाठवले जातात ते रेडिओलहरींच्या माध्यमातून. उलट दिशेने येणारी माहितीही त्याच रूपात मिळवली जाते. आपल्या नजरेला भावणारा 'तानापिहिनिपाजा' या पट्टय़ातला दृश्य प्रकाश किंवा क्ष-किरणं किंवा मोबाइल फोनच्या दळणवळणासाठी वापरलं जाणारं मायक्रोवेव्ह प्रारण ही सर्व विद्युतचुंबकीय वर्णपटाचाच एक भाग आहेत. रेडिओलहरीही याच वर्णपटात मोडतात. त्यामुळे या सर्वांचा वेग सारखाच आहे. प्रकाशाचा वेग अचूक मोजला गेला आहे. तोच मग रेडिओलहरींचाही वेग ठरेल. तो आहे एका सेकंदाला तीन लाख किलोमीटर. त्या वेगाने हे संदेश आपली वाटचाल करत असतात.पृथ्वी आणि मंगळ दोन्हीही सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. या भ्रमणाचा दोन्हींचा वेगही वेगवेगळा आहे. त्यामुळे कधी हे दोन ग्रह सूर्याच्या दोन बाजूंना असतात, त्या वेळी त्यांच्यामधलं अंतर सर्वात जास्त असतं. इतर वेळेला तो ते सूर्याच्या एकाच बाजूला असतात, त्या वेळी त्यांच्यामधलं अंतर किमान असतं. मंगळ आणि पृथ्वी यांच्यामधलं किमान अंतर आहे ७.८ कोटी किलोमीटर. प्रकाशाच्या वेगाने पार करायला केवळ ४.३ मिनिटं लागतात; पण त्या दोघांमधलं कमाल अंतर आहे ३७.८ कोटी किलोमीटर. ते पार करायला मात्र रेडिओसंदेशांना तब्बल २१ मिनिटं लागतात.*बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••सूर्याच्या किरणांनी जशा बर्फाच्या राशी कोसळतात, तशाअहंकाराच्या राशी प्रेमाच्या ओलाव्याने विरघळतात.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) राष्ट्रपतिपदी निवडून आलेल्या द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी केव्हा आहे ?२) विरोधी पक्षाचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना किती टक्के मते मिळाली ?३) 'पूर्ण आंदोलन' चा नारा कोणी दिला ?४) कोणत्या नदीच्या खोऱ्याला 'संतांची भूमी' म्हणून संबोधले जाते ?५) 'हसविणारा वायू' ( Laughing Gas ) कोणत्या वायूला म्हटले जाते ?*उत्तरे :-* १) २५ जुलै २०२२ २) ३६ % ३) जयप्रकाश नारायण ४) गोदावरी नदी ५) नायट्रस ऑक्साइड*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● संगीता भालसिंग● साईनाथ कामीनवार, शिक्षक● रामकुमार चिलकेवार, शिक्षक● श्यामकुमार चिलकेवार, शिक्षक● श्रीधर चिंचोलकर, मुख्याध्यापक● अभिषेक येरावार● नरेंद्र राठोड● गजानन महाजन● रुचली चंदेल बायस● ज्ञानेश्वर पाटील● साईनाथ भोरे● गंगाधर मानगुर्ले● नागेश कोलोड● लक्ष्मण सुरकार● संतोष श्रीखंडी● गोविंद मानेमोड*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*आपण जे बोलायला हवे ते बोलत नाही. जे बोलू नये ते बोलून जातो. जे पोटी असते ते ओठी येते असे म्हणतात. काही वेळा पोटी काही नसताना भलतेच ओठी येते. अनवधानाचे ते बोलणे सावरण्यासाठी मग खूपच बोलणे सोसावे लागते. काही लोक खूपच बडबडतात. काहींचे मौन बोलके असते. शांतपणे अविरत श्रमाची कास धरणा-यांचे यशच खूप काही बोलून जाते. नाहीतर बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात असणा-यांची संख्या बरीच आहे. न्यायालयातील उलटतपासात साक्षीदाराने काय बोलावे यापेक्षा काय बोलू नये याला खूप महत्व आहे.**रामदासांनी शिवरायांचे मोठेपण सांगताना 'शिवरायांचे कैसे बोलणे' असा शब्दप्रयोग करून, त्यांच्या पदपथावर चालण्यास सांगितले. संतांच्या बोलण्याला अनुभूतीचा आधार असतो. महापुरूषांच्या बोलण्याला त्यांच्या जीवनकार्याची धार असते. चर्चिलच्या प्रभावी बोलण्याने दुस-या महायुद्धात ब्रिटनच्या लोकांना लढण्याचे धैर्य वाढले. अब्राहम लिंकनच्या बोलण्याने अमेरिकेची फाळणी टाळली गेली. मार्टिन ल्यूथर किंगच्या ''गुणवत्ता त्वचेच्या रंगावर नाही तर चारित्र्यावर ठरेल' या वक्तव्याने जगभर प्रभाव पाडला. गांधीजीचा 'चले जाव' , सुभाषबाबूंचा 'जयहिंद' आणि क्रांतीकारकांचा 'वंदे मातरम' ह्या एकाच शब्दाने इंग्रजांना पळता भुई थोडी झाली. नाहीतर,'बालिश बहु बायकात बडबडला' असे बडबडणारे तर अनेक असतात.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबिराचे बोल* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••नहाये धोये क्या हुआ , जो मन मेल न जाय |मीन सदा जल में रही , धोये बॉस न जाय ||अर्थ : नहाणे धुणे देखावागेला न मनीचा मळसदा पाण्यात मासळीदुर्गंध न काढी जळ महात्मा कबीर दिखाऊ पणाला फटकारतात. नहाणे , धुणे व सुंगधाने सजणे हा तर केवळ बाह्य देखावा आहे. जर मनाचीच सफाई झाली नाही तर विवेकी व निरामय जीवनशैली विकसित होणार नाही व त्याशिवाय विश्वात्मक भाव दृढ कसा होणार ? मासा सदा सर्वकाळ पाण्यात राहूनही अंगीचा दुर्गंध त्यागीत नाही. तिथे पाण्याचा काय दोष असणार आहे. बाह्य बदलापेक्षा आंतरिक बदल महत्त्वाचा असतो. तो अवगुण कायमचे दूर करतो. एकनाथ डुमणे, मुखेड📱 9096714317•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••दररोज एक चांगला विचार मनात आणला तर जीवनाला एका नव्या विचारांची संजीवनी भेटते.त्या एका चांगल्या विचारांमुळे आयुष्यात होणा-या चुका तर टळतीलच पण चांगला विचार केल्यामुळे वाईट विचारांची पुनरावृत्ती होणार नाही.जीवन चांगल्या विचारांमुळे अधिक समृद्ध बनते आणि त्यामुळेच ख-या जीवनाचे सार काय आहे ते कळते.आचार आणि विचारांमध्येही स्वत:च्या माणसातला माणूस घडवताना सतत प्रयत्न करताना दिसतो.म्हणून रोजच्या जीवनात एका चांगल्या विचारांची माणसाला भूक आणि गरजही असायला हवी.ती गरज सज्जनांच्या सहवासातून,ग्रंथ आणि पुस्तकांच्या सहवासातून पूर्ण करता येते.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद..९४२१८३९५९०🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आशेची थोरवी*एक भुकेलेला डोमकावळा एका उंबराच्या झाडावर बसला होता. तो वाट पाहात होता. उंबराची फळे अजून पिकली नाहीत. ती कधीतरी पिकतील याची वाट पाहात तो तिथेच बसून होता.हा डोमकावळा बराच काळ तिथेच बसला आहे, असे एका कोल्ह्याच्या लक्षात आले. तेंव्हा त्याने त्याला कारण विचारले.डोमकावळयाने कारण सांगितल्यावर कोल्हा त्याला म्हणाला, 'अरे वेडया, आशेने असा वाहून जाऊ नकोस. आशेमुळे माणसाला भ्रम तेवढा होतो. अशाने वाट पाहून कुणाचेच पोट भरत नाही.तात्पर्य - केवळ आशा करणे व्यर्थ आहे. प्रयत्न हवा.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~दि. 23/07/2022वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 . *दिनविशेष . * 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लोकमान्य टिळक जयंती* 💥 ठळक घडामोडी :-● १९६८ - अल ऍलच्या बोईंग ७०७ प्रकारच्या विमानाचे रोममधून अपहरण.●१९७० - ओमानमध्ये राजकुमार काबूस इब्न सैदने आपल्या वडिल, सैद इब्न तैमूरला पदच्युत करून सत्ता बळकावली.💥 जन्म :-◆१८५६ - बाळ गंगाधर टिळक, भारतीय स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी.◆१९०६ - चंद्रशेखर आझाद, भारतीय क्रांतिकारक.◆ १९१७ - लक्ष्मीबाई यशवंत भिडे (ऊर्फ माई भिडे), मराठी नाट्य-चित्रपट अभिनेत्री.◆१९७३ - मोनिका लेविन्स्की, व्हाइट हाउसमध्ये काम करणारी स्त्री.◆ १९७५ - सूर्य शिवकुमार, तमिळ अभिनेता.💥 मृत्यू :-■ १९९७ - वसुंधरा पंडित, भारतीय गायिका.■ २००४ - मेहमूद, हिंदी चित्रपट अभिनेता.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा, यात 'गोष्ट एका पैठणीची' या सिनेमाला 'सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा', तर अजय देवगणच्या 'तान्हाजी'ला 'लोकप्रिय हिंदी सिनेमा'चा पुरस्कार जाहीर झाला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *CBSE बारावी बोर्डाचा निकाल जाहीर, महाराष्ट्राचा निकाल 90.48 टक्के CBSE परीक्षेत मुलींची बाजी! तान्या सिंहने मिळवले 500 पैकी 500 गुण*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *उद्यापासून चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबईसह कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बत्तीस शिराळ्याच्या नागपंचमीवर राहणार ड्रोनची नजर, सुरक्षेसाठी जिल्हा प्रशासनाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबईसह 13 महापालिकांचे आरक्षण नव्यानं जाहीर होणार, सर्वसाधारण महिला प्रवर्गाचं आरक्षण रद्द*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ज्येष्ठ लेखक, कादंबरीकार अनंत उर्फ नंदा खरे यांचे आज पुण्यात निधन, वयाच्या 76 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि वेस्ट इंडिजच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा तीन धावांनी विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - ब्लू व्हेल*https://storymirror.com/read/story/marathi/p5b2dmy2/blu-vhel/detailवाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌍 *पृथ्वीच्या पोटात किती उष्णता असते ?* 🌍पृथ्वीचा जन्म झाला तेव्हा तो एक धगधगता तापलेला वायूचा गोळा होता, असं आपण नेहमी ऐकतो. ते खरंही आहे. वैज्ञानिकांच्या मनात त्याबद्दल दुमत नाही. जोवर तो असा तापलेल्या वायूंचा गोळा होता तोवर त्याला कोणतंही ठोस रूप नव्हतं ; पण जसजसा काळ उलटत गेला तो तापलेला गोळा थंड होत गेला. त्या गोळ्याला रूप येऊ लागलं. उंच सखल भूप्रदेश तयार झाले. सतत वाफेच्या रूपात असलेलं पाणी द्रवरूप झालं. त्याचे सागर झाले. हळूहळू पृथ्वीचा पृष्ठभाग निवला. इतका की सजीव सृष्टी त्यावर अवतरली, रुजली, फोफावली. तरीही पृथ्वीचा गाभा मात्र तापलेला राहिला आहे. तिथं असले उष्णता अजूनही कायम आहे. उन्हाळ्यात धरती तापते तेव्हा उन्हाच्या काहिलीपासून आपलं रक्षण करण्यासाठी काही प्राणी बिळात जाऊन बसतात. विशेषत: वाळवंटी प्रदेशात हे दिसून येतं. त्यामुळे पृथ्वीच्या पोटात थंडावा आहे असा समज होतो. पण तो खरा नाही. पृष्ठभागाला तापवणारा सूर्यप्रकाश मातीच्या काही थरांमुळे झाकला गेला की तापमान काहीसं घसरतं. पृथ्वीच्या पोटात जसजसे आपण शिरत जाऊ तसतसा तो भाग उष्णच असल्याचं स्पष्ट होतं.पृथ्वीच्या पोटात किती उष्णता आहे, याची माहिती वैज्ञानिकांनी मिळवलेली आहे. त्यानुसार पृथ्वीच्या गाभ्याचं तापमान ४०००अंश सेल्सिअस आहे. याचं नीट आकलन होण्यासाठी आपण काही तुलनात्मक आकड्यांचा विचार करू शकतो. सूर्याच्या पृष्ठभागाचं तापमान ५००० अंश सेल्सिअस आहे. म्हणजे पृथ्वीचा गाभाही साधारण तेवढाच तापलेला आहे. आपल्या नेहमीच्या अनुभवातले आकडे सांगायचे तर पाणी समुद्रसपाटीवर १०० अंश सेल्सिअसला उकळतं. साठ अंश सेल्सियसपेक्षा जास्त गरम असलेल्या पाण्यानं अंग भाजून निघू शकतं. आजवर पृथ्वीवर सर्वात जास्त नोंद झालेलं तापमान ५८ अंश सेल्सिअस आहे. १९२२ मध्ये लिबियामध्ये त्याची नोंद झाली होती.पृथ्वीचा गाभा लोह आणि निकेल या धातूंचा बनलेला आहे. लोहही साधारण १५३५ अंश सेल्सियसला वितळतं. मग पृथ्वीचा गाभा संपूर्णपणे द्रवरूप लोहाचा आहे, असा समज होईल; पण त्या लोहाला प्रचंड दाबही सहन करावा लागतो. जसजसा दाब वाढत जातो तसतसा कोणत्याही पदार्थाचा उत्कलनबिंदू चढत जातो, त्यामुळे ४००० अंश तापमान असूनही लोह वितळत नाही. मात्र ते अतिशय तापलेलं असतं. त्या गाभ्याच्या वरच्या थरातलं तापमान तुलनेने कमी असतं. त्यामुळे ४००० अंश तापमान हे सरासरी तापमान असावं आणि अगदी केंद्रबिंदूजवळ गेल्यास ते त्याहूनही अधिक असावं असं काही वैज्ञानिकांचं मत आहे.*बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••दुसऱ्याच्या चुकामधुन शिका, कारण स्वत:च्या चुकांमधुन शिकायला आयुष्य फार थोड असत - आर्य चाणक्य*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) भारताचे १५ वे नवनिर्वाचित राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली ?२) भारताची पहिली आदिवासी महिला राष्ट्रपती कोण ?३) भारताची दुसरी महिला राष्ट्रपती कोण ?४) देशाच्या स्वातंत्र्यानंतर जन्म झालेल्या पहिल्या राष्ट्रपती कोण ?५) एनडीएच्या राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून कोणाची निवड झाली होती ?*उत्तरे :-* १) मा. द्रौपदी मुर्मू २) मा. द्रौपदी मुर्मू ३) मा. द्रौपदी मुर्मू ४) मा. द्रौपदी मुर्मू ५) मा. द्रौपदी मुर्मू*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● उदयकुमार शिल्लारे● प्रदीप दळवी● संतोषसुवर्णकार● लक्ष्मण मलगिरे● जितेंद्र पाटील● वैभव पाटील● विक्की पाटील● अविनाश धुप्पे● शंकर बोईनवाड*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*माणूस जोवर जिवंत असतो, तेंव्हा त्याच्या अपेक्षा असतात. इच्छा असतात. त्या कुणाच्या गावाला पोहचत नाहीत. त्याच्या आकान्तहाका कुणाला ऐकू येत नाहीत. नंतर मात्र त्याच्या कौतुकाचे पाढे सुरू होतात, पोवाडे गायले जातात. जिवंतपणी त्याच्या हाकांचा कानोसा घेतला असता, तर नक्कीच त्याच्या जगण्याचे काही दिवस वाढले असते. भुकेल्याची अपेक्षा फार नसते, त्यास भाकर हवी असते, तहानलेल्याला पाणी, कष्टक-याला त्याच्या घामाचा मोबदला, कलाकाराला त्याच्या कलेची दाद, एवढीच तर अपेक्षा असते... फक्त एक सेकंद जगण्याची... पण त्याच्या हयातीत आपल्याला पकडता येत नाही त्याचा जिवंत सेकंद..**सोनं तोळ्यात मापतात. मात्र, त्याहीपेक्षा माणसाचा माणसासाठीचा कौतुकाचा, जिव्हाळ्याचा शब्द महागला आहे. माणसाचं अपयश हे की तो पैसे मिळविण्याचं तंत्र तर शिकलाच; तंत्रज्ञानालाही त्याने असे आत्मसात केले की तंत्रमानव म्हणून कुशल झाला. पृथ्वीवर तर त्याने सत्ता काबीज केलीच, पण आज तो इतर ग्रहावरही चढाई करतोय. मात्र जिवंत राहण्याचं तंत्र तो शिकू शकला नाही. जगण्या-मरण्यातल्या एका श्वासांचं अंतर जेव्हा माणसास कळेल तेव्हा त्याच्या आत माणुसकीचा दीप तेवून उठेल.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबिराचे बोल* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कबीर हरि सो हेत कर,कोरै चित ना लायेबंधियो बारि खटीक के,ता पशु केतिक आये।सारांशकबीरा हरी स्मरण करनको मनी कचर्‍याचा भरकसाया दारी बांधला पशूतया आयुष्याचा विचार कर महात्मा कबीर म्हणतात की ईश्वराशी नाते जोड. जो सर्वत्र भरून उरला आहे. तो वार्‍याच्या रूपाने तुझ्याशी संवाद साधतो. पाण्याच्या रूपाने तुझे तन मन शितल करतो. प्रकाशाच्या रुपाने तुझं अंतरंग उजळून टाकतो. मात्र तू तर वरवरच्या बाह्य प्रतिक रुपालाच भुलतो आहेस. तू स्वार्थाने अंध होऊन ईश्वराचं सर्वव्यापी रूपंच विसरून गेला आहेस. अशा वरवरच्या ढोंगी भक्तीने तुला ईश्वराचं सत्य स्वरूप कसं काय कळणार आहे? शिवरूप तर सर्वत्र भरून आहे. निसर्गाच्या आविष्कारात ते सामावलेलं आहे. ते कळलंच नाही तर सुंदराचा कसा साक्षात्कार होईल बरे ! पळापळाने आयुष्य मृत्यूकडे धाव घेत आहे. मानवी जन्म जणू कसायाच्या दारी बांधलेल्या पशूसमान आहे. त्या पशूवर कसाई कोणत्या क्षणी सुरी चालवील काय माहित ? आयुष्याची क्षणभंगुरताही तशीच आहे. तुझ्याकडे उपलब्ध वेळेचा सदुपयोग करून घे. तो सत्कारणी लाव. से प्रेम करो। अपने चित्तात भरलेला विकारांचा कचरा भिरकावून दे. शिवस्वरूप सत्याचा अंगिकार कर. जीवनातल्या सुंदरतेच्या जागा परमानंदाने भरून घे . एकनाथ डुमणे, मुखेड📱 9096714317•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••तुम्ही हाती घेतलेल्या कोणत्याही कामात सातत्याने करत असलेले प्रयत्न आणि त्यात मिळालेले यश हे तुमच्या मनाला समाधान देणारे आहे.प्रयत्नातून मिळालेला आनंद हा तुमच्या जीवनात अधिक महत्वाचा आहे.- व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद.9421839590•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मनशांती*एकदा संत एकनाथांना कोणी दोन प्रश्न विचारले. एक, त्याच्या स्वत:च्या भविष्याबध्दल, आणि दुसरा, एकनाथ स्वभावाने एवढे शांत आणि निर्द्वेषी कसे राहू शकतात याच्याबद्दल .एकनाथ हसले; आणि, 'केंव्हातरी याची उत्तरे देईन', म्हणून त्यांनी सांगीतले.काही दिवसांनी, एकनाथांची त्या गृहस्थाशी भेट झाली. तेंव्हा त्याला बाजूला नेऊन एकनाथ म्हणाले, "तुझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची वेळ आली आहे, कारण, दुर्दैवाने, तू आता आठ दिवसांच्या आत मरणार आहेस."तो गृहस्थ सुन्न झाला, गोठला ! एकनाथ समोरून निघून गेले, तेंव्हा तो बधीर मनाने परतला. जगलो तर एकनाथांसारख्या संतांच्या सदिच्छेने जगू, अशी त्याला भावना निर्माण झाली.ती त्याने सार्थ केली. आयुष्यातले आठ दिवस पूर्ण करून नवव्या दिवशी, एकनाथांच्या दर्शनाला तो गेला. एकनाथांना हात जोडून म्हणाला, "तुमच्या कृपेने वाचलो."एकनाथ मान डोलवित म्हणाले, "आता मी तुम्हाला दुस-या प्रश्नाचे उत्तर देणार आहे. गेले आठ दिवस तुम्ही कसे वागलात ? इतरांच्यावर किती रागावलात?"तो गृहस्थ उत्साहाने म्हणाला, "कसला हो रागावतो? अगदी छान, शांत आठ दिवस गेले. शांत म्हणजे, मरणाच्या भितीने बेचैन होतो, पण दुस-यावर रागावण्यासाठी ती बेचैनी नव्हती. घरात बायकोशी कधी भांडलो नाही. मुलांना मारले नाही. वाटायचे की, आता अखेरचे आठ दिवस उरले. बायका-मुले पुन्हा दिसणार नाहीत; त्यांना का दुखवावे? अहो, शेजा-याचे जमिनीवरून चार पिढयांचे भांडण होते. त्याला स्वत:च्या हाताने हवा तो तुकडा तोडून दिला. देणे होते ते देऊन टाकले. ज्यांच्याकडून येणे होते, त्यांच्यापैकी जे गरीब होते, त्यांचे येणे सोडून दिले. काही पैसे गमावले, पण शांती कमावली. खूप खूप शांत असे आठ दिवस त्या दृष्टीने गेले."एकनाथ समोरच्या माणसाच्या पाठीवर हात थोपटून म्हणाले, "हे तुझ्या दुस-या प्रश्नाचे उत्तर. आठ दिवसांत जग सोडून जायचे आहे, अशा कल्पनेने मी सदाच वावरतो. म्हणून मी शांत वाटतो." *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड.*ता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~📅 दि. 22/07/2022 वार - शुक्रवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पाय दिन (२२/७ =पाय π)*💥 ठळक घडामोडी :-१९४२ - दुसरे महायुद्ध - अमेरिकेत पेट्रोलचे रेशनिंग सुरू करावे लागले.१९४२ - ज्यूंचे शिरकाण - वॉर्सोतून ज्यूंना तडीपार करणे सुरू झाले.१९४३ - दोस्त राष्ट्रांनी इटलीचे पालेर्मो शहर जिंकले.💥 जन्म :-१९१८ - गोपाळराव बळवंतराव कांबळे, मराठी चित्रकार.१९२३ - मुकेश, पार्श्वगायक.१९३७ - वसंत रांजणे, भारताचा कसोटी क्रिकेट खेळाडू.*१९७० - देवेंद्र गंगाधर फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री*💥 मृत्यू :-१९१८ - ईंद्रलाल रॉय, भारतीय वैमानिक. २००३- उदय हुसेन,कुसे हुसेन ,सद्दाम हुसेनची मुले.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *राष्ट्रपतीपद निवडणुकीत द्रौपदी मुर्मूंचा विजय, यूपीएच्या यशवंत सिन्हा यांचा पराभव, राष्ट्रपतीपदी एनडीएच्या द्रौपदी मुर्मू बनल्या देशाच्या 15 व्या राष्ट्रपती, देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपदी होण्याचा मिळवला मान*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *गणेशोत्सव, दहीहंडी, मोहरम निर्बंधमुक्त, यंदा राज्यात गणेशोत्सव धूमधडाक्यात, सरकारनं दहीहंडीवरील सर्व निर्बंध हटवले, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *गुजरात निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री केजरीवाल यांची मोठी घोषणा, 300 युनिट वीज मोफत देण्याचे आश्वासन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी चौथ्या स्थानावर, बिल गेट्सना मागे टाकले*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *इटलीचे पंतप्रधान मारिओ द्राघी यांचा राजीनामा, विश्वासदर्शक ठरावावेळी मित्र पक्षाची अनुपस्थिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *kolhapu जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील तेरवाड येथील निकिता सुशील कमलाकरने आशियाई यूथ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक पटकावले*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला वनडे सामना सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का, लोकेश राहुलला करोना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - सरपंच*https://storymirror.com/read/story/marathi/baeglro2/srpnc/detailवाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🐝 *मधमाशा गुंजारव का करतात ?* 🐝मधमाशा अवतीभवती घोंघावयाला लागल्या की त्यांचा गूं गूं असा आवाज येत राहतो. इंग्रजीत यालाच 'बझिंग साऊंड' असं म्हणतात. जणू त्या तोंडानेच तसा आवाज करत राहतात, असं आपल्याला वाटतं. पक्षीही तोंडांनं आवाज करतात. प्रत्येक पक्ष्याचा आवाज वेगवेगळा असतो. त्या आवाजावरून पक्ष्याची ओळखही पटते; आणि तसा आवाज पक्षी का काढतात, याचीही माहिती आता मिळालेली आहे. एकमेकांशी दळणवळण साधण्यासाठी, संवादासाठी पक्षी आवाज काढतात. मधमाशाही तसाच एकमेकींशी संवाद साधण्यासाठी हा गुंजारव करत असतील, अशीच समजूत झाल्यास मग नवल नाही.प्रत्यक्षात मात्र मधमाशांचा हा आवाज त्यांच्या तोंडातून येत नाही. तो त्यांच्या पंखांचा फडफडाट असतो. त्या एकाच जागी स्थिर असताना, मोहोळात राहुन आपापलं काम करत असताना हा गुंजारव आपल्याला ऐकू येत नाही. त्या जेव्हा मोहोळातून बाहेर पडून उडायला लागतात तेव्हाच त्यांचा गुंजारव ऐकू येतो. त्यावरून हा त्यांच्या पंखांचा फडफडाट असावा, हे ध्यानात यायला हवं. उडणाऱ्या सर्वच कीटकांना आपले पंख फडफडावे लागतात. त्यामुळे तिथल्या हवेत कंपनं सुरू होतात. हवेच्या कंपन्यांमुळेच ध्वनी निर्माण होत असल्याने पंखांच्या या फडफडाटाचं रुपांतर आवाजात होत असतं. मात्र, तो आवाज आपल्याला ऐकू येणं हे त्या कंपनांच्या वेगावर आणि त्यात असलेल्या ऊर्जेवर अवलंबून असतं. निरनिराळ्या कीटकांच्या पंखांच्या फडफडण्याचा वेग मात्र वेगवेगळा असतो. फुलपाखरंही उडताना आपले पंख फडफडवत असतात. मात्र त्यांचा वेग मंद असतो. एका सेकंदाला फार फार तर सहा ते दहा वेळा त्यांचे पंख फडफडतात. त्यामुळे होणाऱ्या हवेच्या कंपनापोटी आपल्याला ऐकू येईल एवढा आवाज निर्माण होत नाही. डासांच्या पंखांचं फडफडणं मात्र वेगात होतं; पण ते अतिशय लहान असल्यामुळे त्यापोटी निर्माण होणाऱ्या हवेच्या कंपनांचा आवाज जर ते डास आपल्या कानाच्या अगदी जवळ असतील तरच ऐकू येतो. मधमाश्यांचे पंख त्या मानाने मोठे असतात आणि त्यांच्या फडफडण्याचा वेगही जास्त असतो. एका सेकंदात ३०० ते ४०० वेळा हे पंख फडफडतात. साहजिकच त्यापोटी हवेत उठणारी कंपनंही जोमदार असतात. त्यांचाच आवाज गुंजारवाच्या स्वरूपात आपल्या कानी पडतो.*डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••“आयुष्य सहज सोप जगायला शिका, तरच ते सुंदर होईल.”*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) कोणत्या पक्ष्याचे घरटे कमळावर असते ?२) संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव कोण आहेत ?३) जगातील एकमेव गाव कोणते जिथे कधीच पाऊस पडत नाही ?४) प्लास्टिकची निर्मिती कशापासून केली जाते ?५) २०२०-२१ चा राज्य सरकारचा अत्यंत प्रतिष्ठेचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?*उत्तरे :-* १) कमळपक्षी ( जकाना ) २) अँटोनियो गुटेरेस ३) पासीघाट, अरुणाचल प्रदेश ४) नेपथा / पेट्रोलियम पदार्थ ५) पं. हरिप्रसाद चौरसिया, प्रख्यात बासरीवादक*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● मा. श्री सुमंत भांगे, ● प्रल्हाद तुमेदवार● दामोदर साळुंखे● संजय कदम, पत्रकार, दै. देशोन्नती● अनुराधा हवेलीकर● धनराज वाघ● विश्वनाथ चित्रलवार● संतोषकुमार दुरगुडे● पद्माकर मुळे● अमोल गायकवाड● अल्ताफ शेख● श्रीनिवास वाघमारे● संतोष जाधव● महेश व्ही. जाधव बिजापूर● प्रल्हाद तुमेदवार*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*या जगात संपूर्ण निष्पाप कोण? तर एकही नाही. या पृथ्वीवर कोणीही नाही. उलट, पापालाच सुखाचे साधन मानणारे सर्वत्र आहेत. सर्व प्रार्थना मंदिरात रोज तथाकथित पुण्यचिंतनात वेळ घालवणारे किंवा भक्तीचे भस्म अंगाला फासणारे यापैकी कुणीही पूर्ण शुद्ध नाही. म्हणूनच की काय गीतापुरूष कृष्ण म्हणतात..... ब-या-वाईटासह अर्थात शिव-अशिवासह जो असतो तो पुर्ण पुरूष. प्रत्येकामध्ये काही ना काही दोष आहेतच, संपूर्ण निर्दोष असा माणूस सापडणे शक्य नाही. या दोषांनाच आपण पाप समजतो. बहुजनांच्या हितासाठी प्रसंगी खोटं बोलावं लागत असेल तर ते पाप नाही, असं सांगितलं जातं.**राष्ट्रभक्त सैनिकालाही शत्रूच्या तावडीत असताना सतत खोटं बोलून खरी माहिती लपवायची असते. त्यासाठी तो वाट्टेल ते हाल भोगायला सिद्ध असतो. पांडव ज्येष्ठ बंधू धर्मराजाला 'नरो वा कुंजरो वा' असे मोघम उत्तर हेतुपूर्वक द्यावे लागले. युद्धात आणि प्रेमात सारं काही माफ असतं म्हणतात. असो, आपला मुद्दा आहे जगी सर्व निर्दोष असा कोण आहे? कुणीही नाही. काही अतिजागृत देवस्थाने संपत्तीने तुडुंब भरत आहेत. दानातील नोटा आणि सुवर्ण मोजायला यंत्रे लावावी लागत आहेत. कुठून आला हा पैसा, देवळाबाहेर भुकेलं तान्हं घेऊन माय पेलाभर दूधासाठी लोकांच्या पायापोटी पडत आहे. तिला बाजूला हाकलून दगडाच्या देवाचे शुद्ध दूधाने अभिषेकांवर अभिषेक होत आहेत. माझ्या मते हेच महापाप आहे..* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••💥💥💥💥💥💥💥💥💥संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••हिन्दू कहें मोहि राम पियारा,तुर्क कहें रहमाना, आपस में दोउ लड़ी-लड़ी मुए, मरम न कोउ जाना।सारांश महात्मा कबीर चराचरात ईश्वर पाहतात. सर्वांठायी परमात्म्याचा अधिवास असतो. मानवाठायी असणारं चैतन्य म्हणजेच परमात्म्याचं रूप नाही का ? आमच्या उपासनेच्या पद्धती भिन्न आहेत. कोणत्याही धर्म पंथाचा माणूस असो त्याचा जन्म आणि मृत्यू भिन्न असतो का ? माणूस जन्माला आल्यानंतर त्याच्यावर त्या त्या धर्म पंथाचे संस्कार बिंबवले जातात. खरे तर माणूस जन्माला येतो माणूस म्हणूनच परंतु त्याच्यावर जाती, धर्माचे, पंथाचे जे संस्कार केले जातात ती सर्व कृत्रिमता आहे. ती कुठल्या तरी भितीपोटी, समुहाच्या वेगळेपणासाठी निर्माण केलेली ही वरवरची व्यवस्था आहे. तिला कुठलाही शाश्वत आधार नाही आहे. शाश्वत व अंतिम सत्य माणूस हा माणूस व मानवता हाच त्याचा धर्म आहे. सर्वांच्या निर्मिती पासून विसर्जनापर्यंत त्याचा माती हाच आधार आहे. हे शाश्वत सत्य सर्वांना कळतंय पण वळत नाही. अशी वास्तविकता आहे. जे स्वतःला हिंदू म्हणवून घेतात त्यांना राम प्रिय आहे. जे स्वतःस मुसलमान मानतात त्यांना रहिम प्यारा आहे. राम आणि रहिम हे दोन्ही मानव कल्याणासाठी झिजले. त्यांच्या कृर्तृत्वातून आदर्श जीवनाचा बोध मिळतो. त्यांनी माणसामाणसात भेदभाव केल्याचे इतिहास सांगत नाही. तरी त्यांच्या नावावरून दंगली घडणे मानवतेला अशोभनीय आहे. त्यांची नावं घेवून लढाया करणार्‍यांना विशाल अशा मानवता धर्माचं खरं स्वरूप व मानव कल्याणाचं मर्मच कळलेलं नाही.एकनाथ डुमणे, मुखेड📱 9096714317•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• धनाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती अधिक महत्वाची आहे.कारण धनाच्या श्रीमंतीने त्याच्यामध्ये जगातल्या उपभोग्य वस्तू खरेदी करुन तात्पुरता आनंद मिळवता येतो आणि तोही स्वत:साठी.दुसरे असे की,माणसे जोडण्याऐवजी तोडण्यातच तो यशस्वी होतो.एखादी कुणीजरी व्यक्ती आली तरी त्यांच्या मनात फक्त पैसे मागण्यासाठीच आला आहे अशी शंका निर्माण होते.त्यामुळे नातेसंबंध जोडण्याऐवजी तोडण्याचीच भूमिका त्यांच्या अंगी असते.अशा श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती ही सदैव इतरांच्या मनावर राज्य करत जीवन व्यवहार करण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण काम करते.एकमेकांची मने ओळखण्याचे काम, सुखदुःख जाणणे, संकटकाळी धाऊन जाणे,आपले मन कुठेतरी मोकळे करणे, नातेसंबंध दृढ करणे ह्या सा-या गोष्टी मनाच्या श्रीमंती असणा-यामध्ये सदैव वास करत असतात.अशी माणसे सदैव नवीन काहीतरी शोधत असतात की जे आपले आणि इतरांचे नाते दृढ करतात.अशा माणसांमध्ये स्वार्थ,मतभेद,दुरावा,गर्व,अशा प्रवृत्ती कधीही वास करत नाहीत.म्हणून मनाची श्रीमंती ही सर्वमान्य असून एक सशक्त समाज घडविण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे.© व्यंकटेश काटकर, नांदेड.संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चतुर बिरबल*बिरबलच्या चातुर्याची कीर्ती सर्वदूर पसरली होती. तेव्हा त्याला पाहण्यासाठी दरबारात एक पंडित आला होता. बादशहाच्या परवानगीने त्याने दोन प्रश्न बिरबलाला विचारलेपंडित : खरा ज्ञानी कोण व अज्ञानी कोण? बिरबल : ज्याच्याशी केलेली चर्चा फलदायी ठरते, तो ज्ञानी आणि निरर्थक ठरते तो अज्ञानी असतो.पंडित : सर्वांत उत्तम ऋतू आणि सर्वात वाईट ऋतू कोणती?बिरबल : पोटभर खायला, अंगभर ल्यायला आणि आपली जवळची माणसे प्रेम करायला असतील, तर सर्वच ऋतू उत्तम असतात. परंतु खायला अन्न नाही, ल्यायला वस्त्र नाही आणि कोणी प्रेम करणारेही नाही, अशी ज्याची स्थिती असेल, त्याला सर्वच ऋतू वाईट असतात.बिरबलाने दिलेली अशी उत्तरे ऐकताच तो पंडित बादशहाला म्हणाला, ''खाविंद, मला वाटले होते, त्यापेक्षा कितीतरी पटींनी बिरबलजी अधिक चतुर आहेत.''*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~📅 दि. 21/07/2022 वार - गुरूवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-★ इ.स.पू. ३६६ - जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेले इफेसूस येथील आर्टेमिसचे मंदिर आगीत जळून नष्ट.★ १८३१ - लिओपोल्ड पहिला (चित्रात) स्वतंत्र बेल्जियम देशाचा पहिला राजा बनला.★ १९६० - सिरिमावो भंडारनायके सिलोनची पंतप्रधान व जगातील पहिली महिला सरकारप्रमुख बनली.★ १९६९ - अपोलो ११चे अंतराळयात्री नील आर्मस्ट्राँग व बझ आल्ड्रिन चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले मानव ठरले.💥 जन्म :-★ १६९३ - थॉमस पेल्हाम-होल्स, ब्रिटनचा तिसरा पंतप्रधान.★ १८९९ - अर्नेस्ट हेमिंग्वे, अमेरिकन लेखक व साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेता.★ १९३० - आनंद बक्षी, भारतीय गीतकार.💥 मृत्यू :-★ १७९६ - रॉबर्ट बर्न्स, स्कॉटिश कवी.★ २००१ - शिवाजी गणेशन, प्रसिद्ध भारतीय अभिनेता*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *ओबीसींना बांठिया आयोगानुसार राजकीय आरक्षण लागू, दोन आठवड्यात रखडलेल्या निवडणुका जाहीर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ * महाराष्ट्रातील राजकीय पेच ; पुढील सुनावणी 1 ऑगस्ट रोजी होणार, 27 जुलैपर्यंत प्रतित्रापत्र आणि दस्तावेज दाखल करण्याचे निर्देश..*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *200 कोटी कोविड लसीकरणाचा आकडा गाठला! PM मोदींचे लस उत्पादकांना पत्र, भारताचा 200 कोटी कोरोना लसींचा विक्रम, बिल गेट्स यांच्याकडून अभिनंदन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती, 134 मतांनी विजयी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मतदान ओळखपत्राशी आधार कार्ड संलग्न करण्यासाठी 1 ऑगस्टपासून विशेष मोहीम, अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी दिली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दक्षिण आफ्रिकेत होणार मिनी आयपीएल; मुंबई, चेन्नईसह 6 संघामध्ये रंगणार टी-20 क्रिकेटचा थरार!*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना पंतप्रधान मोदींकडून विजयी मंत्, बर्मिंगहॅम येथे येत्या 28 जुलैपासून कॉमनवेल्थ गेम्सला सुरुवात होणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - भिजवणारा पाऊस*https://storymirror.com/read/story/marathi/y4627myp/bhijvnnaaraa-paauus/detailवाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *फ्ल्यू म्हणजे काय ?* 📙कोणी शिंकले, खोकले, ताप आला की 'फ्ल्यू' झाला असेल, असा सरसकट निष्कर्ष काढला जातो; पण तो खरोखर फ्ल्यू नसतोच. फ्ल्यू म्हणजे एन्फ्ल्युएंझा हा भयंकर रोग. एन्फ्लूएन्झा विषाणूंमुळे होतो. या विषाणूंचे तीन प्रकार असतात. दर काही वर्षांनी या रोगाच्या साथी येतात व त्या जगभर पसरतात. १९१८ मध्ये या रोगाने २ कोटींहून जास्त लोकांचे बळी घेतले. याच काळात भारतात ६० लाख लोक मृत्यूमुखी पडले. विषाणूच्या संरचनेत सदोदित होणाऱ्या बदलांमुळे या विषाणूसाठी प्रतिबंधक लस तयार करता येत नाही वा केलीच तर ती फार काळ उपयुक्त ठरत नाही. या रोगात थंडी वाजून ताप येणे, हातपाय दुखणे व खोकला अशी लक्षणे दिसतात. न्यूमोनिया नावाचा भयानक गुंतागुंतीमुळे अनेकजण मृत्युमुखी पडतात. या विषाणूवर औषधे उपलब्ध नाहीत व जी आहेत ती प्रभावी नाहीत. लस उपलब्ध आहेत, पण त्या वापरात येण्यापूर्वीच बऱ्याचदा बऱ्याच जणांना हा रोग झालेला असतो. श्वसनाच्या मार्गाने हा रोग एकापासून दुसऱ्याला होतो.एन्फ्लूएन्झाचा प्रतिबंध करण्याच्या उपायांना आजवर फार मर्यादित यश मिळाले आहे. लसीकरण हे सर्वात प्रभावी शस्त्र असले तरी प्रत्यक्षात त्याचा परिणामकारक उपयोग करण्यातच अडचणी येतात. त्यामुळे साथीच्या काळात घरातील वायूवीजन चांगले राखणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे, रुग्णांना रुमालाने चेहरा झाकण्यास सांगणे व घराबाहेर न पडण्याचा सल्ला देणे, हे उपाय करावे लागतात. असा हा महाभयंकर एन्फ्लूएन्झा. तुम्ही ज्याला चुकून फ्ल्यू म्हणता ते असते साधे सर्दी पडसे. उपचार घेतल्यास आठवड्यात व न घेतल्यास सात दिवसांत बरे होते ते !*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून, मनोविकास प्रकाशन *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*Confidence is a key to success.* *( आत्मविश्वास ही यशाची गुरूकिल्ली आहे. )**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) स्वतः ची इंटरनेट सेवा सुरू करणारे देशातील पहिले व एकमेव राज्य कोणते ?२) सिंगापूर ओपन महिला बॅडमिंटन स्पर्धा २०२२ चे जेतेपद कोणी पटकावले ?३) भारतातील पहिले कार्बन - न्यूट्रल विमानतळ म्हणून कोणते विमानतळ बांधले जात आहे ?४) नवी मुंबई विमानतळाचे कोणत्या नावाचे नामकरण करण्याचा निर्णय नुकताच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले ?५) दोनदा उपराष्ट्रपतिपदावर राहिलेले उपराष्ट्रपती किती व कोणते ?*उत्तरे :-* १) केरळ २) पी. व्ही. सिंधू , भारत ३) लेह विमानतळ ४) लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ ५) दोन - सर्वपल्ली राधाकृष्णन ( १९५२ - ६२ ) , मो. हमीद अन्सारी ( २००७ - १७ ) *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● संजीव गंजगुडे, अध्यक्ष, मराशिप बिलोली● श्रीकांत कांता विनायकराव● शशी खंडाळकर,रत्नागिरी● कवयित्री सोनाली चंदनशिवे● शिवराज मोरडे● विजय वाटोरे, हिमायतनगर● रविकांत कुलकर्णी, देगलूर● वृषाली शिंदे,मुंबई● चिंतामणी जाधव,मुंबई*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*उद्योगी पुरूषालाच लक्ष्मी पसंत करते. दुबळी माणसे दैवात नाही असे म्हणत राहतात. नशीबात नव्हते असे रडगाणे गात राहतात. दैवावर, नशीबावर मात करून आपल्या स्वकर्तृत्वाने सामर्थ्य गाजविणे त्यांना कधीच जमत नाही. प्रयत्न करूनही जर काहीही यश मिळाले नाही तर दोष कुणाचा ? अशावेळी तो तुझा दोष नाही असे संस्कृत सुभाषितकार सांगतात. बरेच लोक अपयशाचे खापर दुस-यावर फोडतात. स्वत:च्या चुकांकडे पहात नाही. प्रत्येकाने रोज आत्मपरीक्षण करावे. प्रत्येक दिवशी आपले वर्तन कसे झाले याचा विचार करावा. आज मी पशूसारखा तर वागलो नाही ना? आज माझे वर्तन सज्जन माणसासारखे झाले आहे ना? हे तपासून पहावे.**प्रत्येकाचे हातून कळत-नकळत चुका होत असतात. पण तारुण्याच्या उन्मादात, सत्तेच्या-पैशाच्या कैफात माणसाला त्याची जाणीव होत नाही. तसेच माणसाला आपल्यातील अवगुणांचीही जाणीव होत नाही. "कासया वर्णू इतरांचे दोष, माझे ठायी काय वाण असे?"असे संत तुकारामांनीही म्हटले आहे. वाईट माणसांच्या संगतीमुळे चांगली माणसे बिघडल्याची अनेक उदाहरणे आपणांस सांगता येतील. वाईट संगतीमुळे काही व्यसनाधीन होतात तर कधी कधी नैराश्याने आपले जीवनच संपवितात. धोक्याच्या वळणावर जागं करणारे फार क्वचितच भेटतात. 'जीवन कसं जगावं' याचं मार्गदर्शन करणारे 'दिपस्तंभ'सारखे असतात.* *॥ रामकृष्णहरी ॥*🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबिराचे बोल* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रेमभाव एक चाहिए , भेष अनेक बनाय |चाहे घर में वास कर , चाहे बन को जाए || अर्थ मानवाचा धर्म मानवता . मानवता जपायची तर मानवाच्या अंतरात प्रेमभावनेचे अधिष्ठान महत्वाचे आहे. त्या शिवाय मानवता व मानव्य कसं प्रवाहित होणार ? भौगोलिक व भौतिक परिस्थितीशी समायोजन साधण्यासाठी भिन्न वेष परिधान करा . विभिन्र प्रकारच्या (उपलब्धतेनुसार महालापासून झोपडीपर्यंत) वास्तूत किवा वनात वास्तव्य करा ते परिस्थितीनुरूप स्वाभाविक आहे. परंतु त्यात अवडंबर असता कामा नये. सत्य व प्रेमभाव हाच खर्‍या जीवनाचा मुलाधार आहे. त्यामुळे जीवनाची गोडी व सुंदरता वाढते म्हणून माणसाने अशाश्वत अवडंबराच्या व बुवाबाजीच्या नादी लागून जगण्याला विनाकारणच अंधानुकरणी व भंपक बणवू नये . ते मानवतेला पूरक असू शकत नाही. एकनाथ डुमणे, मुखेड📱 9096714317•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••जिद्द,मेहनत आणि प्रयत्न हे तुमच्या हाती घेतलेल्या कामासाठी वापरलेले कौशल्य आहे.यामुळे तुमचे काम अधिक चांगले व उत्कृष्ट दर्जाचे होण्यास मदत करते. कोणतेही काम जेव्हा हाती घ्याल तेव्हा ह्या तीन गोष्टी आपल्या अंगी बाळगणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामध्येच आपली प्रगती सामावलेली असेल.- व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..9421839590.•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मदतीचा हात*भगवान बुद्ध त्या काळात आपल्या शिष्यगणांसह गावोगावी जात होते. एका गावाच्या वेशीवर एक वृद्ध आपल्या मोठ्या टोपलीतून भाजी विकण्यास बसला होता.ती टोपली जड होती व त्याला तेथून दुसरीकडे जायचे होते म्हणून येणार्‍या - जाणार्‍या वाटसरुंना तो आपल्या डोक्यावर टोपली ठेवण्यास मदत करण्याची याचना करत होता. पण कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. ते शिष्यगणही मजा बघत होते. हे पाहताच भगवान बुद्ध स्वतः पुढे झाले व त्यांनी वृद्धाच्या डोक्यावर टोपली उचलून दिली. त्या वृद्धाने त्यांना ओळखले होते.तो म्हणाला, सार्‍या जगाच्या दृष्टीने ते कोणीही असोत, पण माझ्या दृष्टीने माझ्या मुलासारखे आहेत ! त्याचे बोलणे ऐकून शिष्य आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले, हे कसे शक्य आहे ? तो वृद्ध उत्तरला, जगात प्रत्येक मुलगा हा आपल्या मातापित्यांचा आधार असतो. त्यांचे कष्ट उपसण्यास नेहमीच मदत करत असतो.आज त्यांनीही मला मदत केली आहे. माझे कष्ट हलके केले आहेत. मग ते माझ्या मुलासमानच नाहीत का ? सार्‍या शिष्यांनी त्या वृद्धाचे पाय धरले व क्षमा मागितली. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~📅 दि. 20/07/2022 वार - बुधवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन* 💥 ठळक घडामोडी :-२०००-अभिनेते दिलीपकुमार यांना 'राजीव गांधी राष्ट्रीय सदभावना पुरस्कार' जाहीर.१९०३ - फोर्ड मोटर कंपनीने आपली पहिली कार विकायला पाठवली. १९६९-अपोलो -११या अंतराळयानातून गेलेला नील आर्मस्ट्राँग हा चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव बनला.१९४७ - भारतीय व्हाइसरॉय लुई माउंटबॅटनने जाहीर वक्तव्य दिले की वायव्य सरहद्दी प्रांतातील निवडणुकीत जनतेने पाकिस्तानात विलीन होण्याचा कौल दिला आहे.१९९२ - टी.यु. १५४ प्रकारचे विमान त्ब्लिसीजवळ कोसळले. ४० ठार.१९९६ - स्पेनमध्ये विमानतळावर दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला. ३५ ठार.💥 जन्म :-१९११ - बाका जिलानी, भारतीय क्रिकेट खेळाडू.१९१९ - सर एडमंड हिलरी, गिर्यारोहक.१९२९ - राजेंद्र कुमार, भारतीय अभिनेता.१९५० - नसीरुद्दीन शाह, भारतीय अभिनेता.१९७६ - देबाशिष मोहंती, भारतीय क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :-१९२३ - पांचो व्हिया, मेक्सिकन क्रांतीकारी.१९२७ - फर्डिनांड, रोमेनियाचा राजा.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *ब्रिटिश पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे अव्वल स्थानी आहेत. चौथ्या फेरीच्या मतदानात त्यांना 118 मते मिळाली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक, बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात ईडीची कारवाई*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *वर्धा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, भंडाऱ्यात पूरस्थिती कायम, जनतेचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचं आव्हान, उपमुख्यमंत्री चंद्रपूर, वर्ध्याला भेट देणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अग्निपथ योजनेवरील तीन याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, योजना रद्द करण्याची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *डॉलरच्या तुलनेत रुपया ऐंशीच्या उंबरठ्यावर, महागाईविरोधात काँग्रेसचं संसद भवनातील गांधी पुतळ्याजवळ आंदोलन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *प्रसिद्ध गजल गायक भूपिंदर सिंह यांचं निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, दीर्घकालीन आजारामुळे मुंबईतल्या रुग्णालयात सुरु होते उपचार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताने ५४ व्या आशियाई स्पर्धेत आपल्या पदकांचा धडाका कायम राखला. आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्राच्या डॉक्टर मंजिरी भावसारला कांस्यपदक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - साहस*https://storymirror.com/read/story/marathi/0gnisi1w/saahs/detailवाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ⏰ *एक सेकंद म्हणजे किती काळ ?* ⏰काळ मोठी अजब चीज आहे. ती एक अमूर्त कल्पना आहे. तरीही आपण तिचं मोजमाप करत असतो. वास्तविक दोन निरनिराळ्या घटनांमध्ये काही अवधी जावा लागतो आणि हा नेहमीच एकसारखा नसतो, हे ध्यानात आल्यानंतर त्या अवधीचं मोजमाप करण्याचं काहीतरी साधन असावं, असं वाटायला लागतं. त्यातूनच काळ या संकल्पनेचा उगम झाला. आपण मोजतो तो दोन नैसर्गिक घटनांमधला अवधी. त्या मोजमापाला काळ म्हणतो. म्हणजे मोजमाप होतं ते त्या अवधीचं, काळाचं नाही.तरीही काळ नावाची एक मोजपट्टी अमलात आणल्यानंतर त्याचं प्रमाणीकरण करणं आवश्यक झालं. दोन अवधीतल्या काळाची मात्रा किती हे समजणं आवश्यक होतं. त्यासाठी मग वरचेवर होणाऱ्या एका आवर्तनातून जाणाऱ्या घटनेची निवड करण्यात आली. त्या दोन आवर्तनातील अवधीला काळाचं एकक मानण्यात आलं. त्यातून मग सूर्योदयापासून सूर्यास्तपर्यंतच्या अवधीला एक दिवस मानण्यात येऊ लागलं. एकदा पूर्णचंद्र दिसल्यानंतर परत त्याचं दर्शन होईपर्यंत असे कितीतरी दिवस जावे लागतात, हे समजल्यानंतर त्या दिवसांचा एक महिना मानण्यात आला. त्याच सुत्राचं बोट धरत वर्ष या एककाची मात्रा ठरवण्यात आली.नंतर असं दिसून आलं, की आपल्या नेहमीच्या आयुष्यात अशा काही घटना घडतात, की त्यांच्यामधल्या अवधीचं मोजमाप करण्यासाठी दिवस हे एकक फार मोठं होतं. त्यापेक्षा लहान एककाची त्यासाठी गरज आहे. मग दिवसाचे लहान लहान भाग करून त्यांची एककं करण्याची कल्पना पुढे आली. त्यातूनच मग घटिका, तास, पळं किंवा तास, मिनिटं आणि सेकंद वगैरे एककांची निश्चिती करण्यात आली. तरीही एक तास म्हणजे नेमका किती अवधी किंवा एक सेकंद म्हणजे नेमका किती काळ, हे प्रमाणित करणं गरजेचं होतंच. तसं करायचं तर मग वरचेवर चक्राकार रितीनं होणाऱ्या घटनेचा शोध घ्यायला हवा होता. दिवसाचं प्रमाण ठरवताना पृथ्वीचं स्वतःभोवती होणारं चक्राकार परिभ्रमण विचारात घेण्यात आलं होतं. अशीच काही दिवसांत कितीतरी वेळा होणारी आवर्तनं आहेत काय, याचा शोध सुरू झाला. अणूंच्या अंतरंगातल्या रचनेचा उलगडा झाल्यानंतर त्यांची रचनाही सौरमालिकेसारखी असल्याचं स्पष्ट झालं. अणुकेंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन प्रदक्षिणा घालत असतात, हे दिसून आलं. त्यामुळे मग अणूंमधील आवर्तनांचा विचार होऊ लागला. त्यातूनच हे दिसून आलं की काही अणू आपल्या निरनिराळय़ा ऊर्जापातळींमध्ये सतत वर खाली जात असतात. एखाद्या नटखट मुलानं एक पायरी चढावं मग एक पायरी उतरावं, परत एक पायरी चढावं असा खेळ खेळावा तसे हे अणू एका ऊर्जा पातळीतून वरच्या पातळीत उडी घेतात आणि परत खालच्या पातळीत येतात. त्यांची ही आवर्तनं अविरत चालू असतात. त्या आवर्तनांवर थंडीवार्‍याचा हवेच्या दाबाचा कशाचाही परिणाम होत नाही. त्यामुळे मग त्यांचाच आधार सेकंदाचं प्रमाणीकरण करण्यासाठी घेण्यात आला. सिझियम या मूलद्रव्याचे अणू एका सेकंदात ९ अब्ज आवर्तनं पूरी करतात आणि त्यात काहीही बदल होत नाही, हे दिसून आल्यानंतर सेकंदाची व्याख्या त्या संदर्भातच करण्यात आली. अचूकपणे बोलायचं तर सीझियमच्या अणूची ९,१९२,६३१,७७० आवर्तनं पूर्ण होण्यासाठी लागणारा काळ म्हणजे एक सेकंद, हे आता जगभर मान्य झालं आहे.*बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••दुसऱ्याचे ओझे उतरविण्यासाठी जेव्हा तुम्ही पुढे होता तेव्हा तुमचे ओझे पुर्वीपेक्षा हलके होईल हे नक्की.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••१) 'कॉमनवेल्थ गेम्स २०२२' कोठे आयोजित करण्यात आले आहे ?२) झारखंड राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या ?३) केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने २०२२ या वर्षासाठी NIRP क्रमवारीत सर्वोत्कृष्ट शिक्षणसंस्था म्हणून कोणत्या शिक्षणसंस्थेने प्रथम क्रमांक पटकावला ?४) उस्मानाबादचे कोणते नामांतर करण्याचा निर्णय नुकताच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले ?५) उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधी पक्षाकडून कोणाची निवड करण्यात आली आहे ?*उत्तरे :-* १) इंग्लंड २) द्रौपदी मुर्मू ३) IIT मद्रास ४) धाराशिव ५) मार्गारेट अल्वा *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● साईनाथ माळगे● गंगाधर पालकृतवार● लक्ष्मण दावणकर● मोहन कुलकर्णी● दत्तात्रय तोटावाड● व्यंकट चिलवरवार● श्रीराम भंडारे● राहूल लोखंडे● दिनेश राठोड● सचिन पिसाळ● साईकुमार ईबीतवार● करुणा खंडेलोटे● ज्ञानेश्वर कोकरे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*'नकार' साधा नसतो. त्याची एक किमंत असते. ती कधी अत्यंत स्वस्त असते तर कधी अत्यंत महाग. रामायण आणि महाभारताने असे अनेक नकार आपल्यासाठी उदाहरणे म्हणून ठेवले आहेत. रामायणात न दिलेले 'नकार' आदर्श निर्माण करतात. तर महाभारतात 'नकार' दु:ख आणि विध्वंस घडवतात.**रामाने वनवासात जाण्यास नकार दिला असता तर पितृवचनी राम असा आदर्श राहिला नसता. एका धोब्याच्या टिकेवर रामाने विश्वास ठेवण्यास नकार दिला असता, तर जनहित जपणारा 'राजा' म्हणून रामाचे नाव झाले नसते. या प्रत्येक नकाराने पुढे अनंत यातनांना जन्म दिला, पण शेकडो वर्ष टिकणारे 'आदर्श' जन्माला घातले.**महाभारतात पावलोपावली शक्तिशाली नकार दिसतात व सामान्यांना आधार देणारे आदर्श निर्माण करतात. कुंतीचा कर्णाला स्विकारण्यास नकार, दुर्योधनाचा पांडवांना राज्य देण्यास नकार, द्रौपदीचा दुर्योधनास नकार हे सर्व विध्वंसक ठरले.**"अर्जुनाने युद्धाला नकार दिला नसता तर 'भगवद्-गीता' जन्माला आली नसती. आम्ही 'गीते'ला मुकलो असतो."* ••●🔻‼ *रामकृष्णहरी* ‼🔻●•• ⚜⚜⚜⚜⚜संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्ञान भक्ति वैराग्य सुखपीव ब्रह्म लौ ध़ायेआतम अनुभव सेज सुख,तहन ना दूजा जाये। ज्ञान भक्ति वैराग्य सुखजलद ब्रम्हानंद दायीआत्मानुभव प्राप्तीचीसर अन्यत्र कुणा न येई महात्मा कबीर अनुभव ज्ञानाची महत्ती विषद करताना म्हणतात , 'ज्ञान,भक्ति,वैराग्य सुख प्राप्तीद्वारे जलद गतीने ईश्वराचा साक्षात्कार होईल. ईश्वराची दिव्यताही अनुभवता येईल. हा मार्ग ईश्वरी लिला जाणून घेण्यासाठी महत्वपूर्ण ठरणारा आहे. मात्र आत्मानुभव आत्मा आणि परमात्म्याचंं मिलन घडवून आणतो. जेव्हा आत्माच परमात्म्याच्या रुपाशी एकरूप होऊन जातो. तिथे अन्य कुणाला प्रवेश कसा मिळणार बरे ! जीव आणि शिवाच्या एकरूपतेत मनाचाच मनाशी संवाद घडून येतो. विश्वातील नश्वरता व विकारांना त्याठायी यत्किंचितही स्थान उरत नाही. निसर्गाची सर्वव्यापकता व समदृष्टी त्या जीवात्म्याच्या ठायी स्थापित होते. हा स्थितप्रज्ञतेचा सर्वोत्कट आविष्कार असतो. त्याच्यावर कोणत्याही प्रलोभनाचा प्रभाव पडत नाही . कारण तो स्वतःच अविनाशी विश्वरूपाशी तादात्म्य पावलेला असतो. एकनाथ डुमणे, मुखेड📱 9096714317•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••जो माणूस जसा विचार करतो त्याच विचारानुसार जीवनात वागतो.जर चांगले विचार असतील तर त्यांचे परिणाम त्याच्या जीवनात आणि इतरांराच्याही जीवनात चांगलेच होतील. आपल्याला आणि इतरांना त्रास होणार नसतील, उपदेशात्मक असतील तर ते नक्कीच जीवनात फलदायी ठरु शकते.अशी माणसे स्वत:च्या आणि इतरांच्याही जीवनात नवे चैतन्य आणू शकतात.ते कधीही वाईट विचारांना आपल्या जीवनात थारा देत नाहीत,त्यांना कुणाचेही नुकसान होऊ नये असेच वाटते. परंतू वाईट विचार करणारी माणसे कधीच आपल्या जीवनात यशस्वी होत नाहीत आणि इतरांच्या चांगल्या चाललेल्या जीवनात बाधा आणल्याशिवाय राहत नाहीत.अशी माणसे दुष्ट प्रवृतीची असतात.त्यांना स्वत:चे आणि इतरांचे काय आणि किती नुकसान होत आहे याचे भान देखील राहत नाही.अशावृत्तीच्या माणसांपासून केव्हाही दूरच राहिलेले बरे.© व्यंकटेश काटकर,नांदेड.📲 9421839590•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*एकदा राजाने सेवकाला अचानक तीन प्रश्न विचारले.**१) ईश्वर कुठे राहतो ?**२) ईश्वर कसा मिळेल ?* *आणि**३) ईश्वर काय करतो ?* *अचानक हे प्रश्न ऐकून सेवक गडबडून गेला व म्हणाला या प्रश्नांची उत्तरे मी उद्या विचार करून देतो.* *सेवक घरी पोचला तेव्हा खुप उदास होता. ती उदासी पाहून त्याच्या मुलाने विचारले असता, सेवक म्हणाला ''मुला आज महाराजांनी मला एकावेळी तीन प्रश्न विचारले आहेत. त्याची उत्तरे मला सुचत नाहीत व उद्या त्याची उत्तरे द्यायची आहेत.* *सेवकाच्या मुलाने म्हटले ''पिताजी उद्या मला दरबारात घेवून चला, महाराजांना मी त्याची उत्तरे देईन. पुत्रहट्ट बघुन सेवक दुसऱ्या दिवशी त्याला दरबारात घेवून गेला. सेवकाला पाहून महाराजांनी म्हटले काल विचारलेल्या माझ्या प्रश्नांची उत्तरे दे.* *सेवक म्हणाला "महाराज आपल्या प्रश्नांची उत्तरे माझा मुलगा देईल "महाराजांनी मुलाला पहिला प्रश्न विचारला ''सांग, ईश्वर कुठे राहतो?"* *मुलाने विनंती केली की, महाराज, एक पेला दूध - साखर घालून आणा. दुध आणल्यावर मुलाने विचारले महाराज दूध कसे आहे महाराजांनी दूध चाखले व म्हणाले गोड आहे.* *परंतु महाराज यात साखर दिसते का ? महाराज म्हणाले नाही कारण ती दुधात विरघळून गेली आहे. बरोबर महाराज!* *तसा ईश्वर सुद्धा जगात सर्व ठिकाणी आहे पण जशी साखर दुधात विरघळली आहे तसा ईश्वर सगळीकडे चराचरातअसून तो दिसत नाही.* *महाराज आनंदीत होवून म्हणाले मग सांग ईश्वर कसा मिळतो ? मुलगा म्हणाला* *''महाराज थोडे दही मागवाल का?''महाराजांनी दही मागवले. मग पुत्र म्हणाला ''महाराज! यात लोणी दिसतो का? "महाराज म्हणाले "लोणी तर यात आहे पण मंथन केल्यावरच मिळेल" पुत्र म्हणाला "महाराज देवाचेही असेच आहे. त्यासाठी मंथन- साधना-तपश्चर्या करावीच लागेल,* *मंथुनी नवनीता।* *तैसे घे अनंता।।* *"महाराज खुश झाले व म्हणाले "आता अंतिम प्रश्न, ईश्वर काय करतो?"* *पुत्र म्हणाला महाराज! यासाठी आपल्याला मला गुरु म्हणून स्विकारावे लागेल'' महाराज बोलले - ''ठीक आहे, तुम्ही गुरू व मी तुमचा शिष्य'' पुत्र म्हणाला - ''महाराज गुरू तर उच्चासनावर बसतात व शिष्य खाली बसतो" महाराजांनी सिंहासन खाली केले व स्वतः खाली बसले. आणि तो पुत्र स्वतः सिंहासनावर् बसला व म्हणाला "हे आपल्या अंतिम प्रश्नाचे उत्तर आहे" महाराज म्हणाले "म्हणजे काय? मी समजलो नाही".* *बालक म्हणाला- ''महाराज ! ईश्वर हेच तर करतो, त्याने ठरविले तर तो क्षणात राजाचा रंक व रंकाचा राव करतो.* *तुका म्हणे नोहे* *काय त्या करिता!**चिंतावा तो आता विश्वांभर!* *"दुखी"रहना है तो, सब मे कमी खोजो,* *और**"प्रसन्न" रहना है, तो सब मे "गुण" खोजो.!* *...एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा* *एक "व्यक्तिमत्व" म्हणून जगा !* *कारण, व्यक्ती कधी ना कधी संपते,**पण व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~📅 दि. 19/07/2022 वार - मंगळवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शहीद दिन - म्यानमार*💥 ठळक घडामोडी :-१९९९-'मैत्रेयी एक्सप्रेस' या कोलकाता ते ढाका बससेवेचेतत्कालीन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी उदघाटन केले.१९६६-'शिवसेना'या राजकीय पक्षाची स्थापना झाली.१९८५ - ईटलीतील व्हाल दि स्लाव्हा धरण फुटले. पुरात २६८ ठार.१९८९ - युनायटेड एरलाइन्स फ्लाइट २३२ हे डी.सी. १० प्रकारचे विमान अमेरिकेतील सू सिटी शहराजवळ कोसळले. वैमानिकांच्या कौशल्यामुळे १८४ प्रवासी वाचले परंतु ११२ अन्य प्रवासी मृत्युमुखी.💥 जन्म :-१८९६ - ए.जे. क्रोनिन, स्कॉटिश लेखक.१९३४ - फ्रांसिस्को से कमेरो, पोर्तुगालचा पंतप्रधान.१९३८ - डॉ. जयंत विष्णू नारळीकर, भारतीय अंतराळ-भौतिकशास्त्रज्ञ.१९४७-सलमान रश्दी ,ब्रिटिश लेखक💥 मृत्यू :-१९४७ - ऑँग सान, म्यानमारचा स्वातंत्र्यसैनिक.१९६५ - सिंगमन र्‍ही, दक्षिण कोरियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष.१९८० - निहात एरिम, तुर्कस्तानचा पंतप्रधान.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *'संसद संवादाचं सक्षम माध्यम, जिथं खुल्या मनानं उत्तम चर्चा आवश्यक'; संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राष्ट्रपती निवडणुकीसाठी संसदेत 99.18 टक्के मतदान, राज्यातील 283 आमदारांनी बजावला अधिकार*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या अर्जाचा भाग 2 भरण्यासाठी 22 जुलै पासून सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *जायकवाडी धरणातून कुठल्याही क्षणी पाण्याचा विसर्ग ; गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सवात तीन लाख भाविकांनी घेतले दर्शन ; 5 कोटी 12 लाखाचे दान जमा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *गोदामाई हिरवाईने नटणार, नाशिक मनपा करणार एक लाख वृक्षारोपण, अभिनेते सयाजी शिंदेही होणार सहभागी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *इंग्लंडचा कसोटी संघाचा कर्णधार असणाऱ्या बेन स्टोक्सने घेतला अचानकपणे एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - जादूची पिशवी*https://storymirror.com/read/story/marathi/epuemarh/jaaduucii-pishvii/detailवाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *वादळाचं बारसं कोण करतं ?* 📙२००९ हे वर्ष सरता सरता महाराष्ट्राच्या किनारपट्टीला उद्ध्वस्त करणारं वादळ आठवतं ? त्यानं केलेल्या विध्वंसाच्या खुणा आजही तिथं जागोजागी दिसतात. त्या वादळाचं 'फयान' हे नाव तर तिथल्या नागरिकांच्या मनावर कायमचं कोरलेलं आहे. तीच गत अमेरिकेच्या दक्षिण किनाऱ्यावरील न्यू आॅर्लियान्स या शहराची. 'कत्रिना' हे नाव उच्चारलं तरी मंडळी चळाचळा कापायला लागतात. कारण २००५ साली त्या तुफानानं त्या शहराची केविलवाणी अवस्था करून सोडली होती.वादळ, तुफान, झंझावात, चक्रावर्त अशा अनेक नावांनी ही वादळं ओळखली जातात. इंग्रजीतही सायक्लॉन, टायफून, हरिकेन, स्टाॅर्म अशी नावं आहेत. तरीही त्यांना 'फयान' किंवा 'कत्रिना' याच्यासारखी विलक्षण नावं देतं कोण ? असा प्रश्न मनात येतोच. भूकंप हाही एक नैसर्गिक प्रकोपच आहे; पण भूकंपांना कधी अशी नावे दिलेली आढळत नाहीत. तर मग वादळांचंच असं बारसं कोण करतं ?जसजशी हवामान अंदाजाची यंत्रणा अधिक कार्यक्षम होत गेली, तसतशी वादळांची पूर्वसूचना मिळणे अधिक शक्य होत गेलं. त्यात हंगामामध्ये एकाहून अधिक वादळं एकाच प्रदेशात एकापाठोपाठ येऊन थडकत असतात. अशा वेळी त्यांची वेगवेगळी ओळख पटवण्याची गरज भासू लागली. त्यातूनच मग त्यांचं नामकरण करण्याची प्रथा अस्तित्वात आली.त्याची जबाबदारी मुख्यत्वे 'वर्ल्ड मीटिआॅराॅलॉजिकल ऑर्गनायझेशन' या संस्थेने उचललेली आहे. त्या संस्थेने जगातील तीन वेगवेगळ्या वादळप्रवण क्षेत्रांमध्ये विभागणी केली आहे. उत्तर हिंदी महासागर, उत्तर अटलांटिक महासागर आणि ईशान्य पॅसिफिक महासागर अशी ही ढोबळ विभागणी आहे. उत्तर हिंदी महासागरात उठणाऱ्या वादळांचं बारसं करण्याची जबाबदारी आठ देशांनी उचलेली आहे. यात भारत, पाकिस्तान, म्यानमार, बांगलादेश, मालदीव, श्रीलंका, थायलंड आणि ओमान हे देश येतात. त्यांनी सर्वांनी मिळून प्रत्येक देशाने आठ अशी चौसष्ट नावांची यादी बनवलेली आहे. त्यातून अनुक्रमाने भारतीय हवामान खाते या वादळाचे नामकरण करतं. 'फयान' हे नाव म्यानमारने सुचवलेलं होतं. यानंतर येणाऱ्या वादळाला ओमानने सुचवलेले 'वार्द' त्यानंतरच्या वादळाला पाकिस्ताननं सुचवलेलं 'लैला' अशी नावं यादीवर आहेत. यापूर्वीच्या वादळांना दिलेली नर्गिस (पाकिस्तान), रश्मी (श्रीलंका), कायमुख (थायलंड), बिजली (भारत), निशा (बांगलादेश) व ऐला (मालदीव) ही नावे होती. कोणाही व्यक्तीवरून ही नावे दिली जात नाहीत. एकदा एक नाव वापरल्यावर त्याचा परत वापर केला जात नाही. ही यादी संपायच्या आधी पुढची यादी तयार केली जाईल. इतर क्षेत्रांसाठी काही तपशील वगळता अशाच प्रकारची पद्धत वापर अवलंबली जाते. उदाहरणार्थ उत्तर अटलांटिक प्रदेशासाठी तीन वेगवेगळ्या याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत. अनुक्रमाने त्यांच्यामधील नावं वापरली जातात. तिथे एकाआड एक पुरुषी नाव तर एका आड एक बायकी नाव दिले जाते. पॅसिफिक महासागरातल्या वादळांना नावं देण्यासाठीही संबंधित राष्ट्रांनी अशाच प्रकारची यादी तयार केलेली आहे. तेव्हा वादळांचं बारसं मुख्यत्वे 'वर्ल्ड मीटियोरोलॉजिकल ऑर्गनायझेशन' संबंधित देशांच्या हवामान खात्यांच्या सहकार्यानं करत असते.*बाळ फोंडके यांच्या 'कोण ?' या पुस्तकातुन* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••संकटांना भिऊ नका, संकटांना संधी मानून त्यावर मात करा.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) मे २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या सनदी लेखापाल ( सीए ) च्या परीक्षेत देशात पहिला आल्याचा मान कोणी प्राप्त केला ?२) एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून कोणाची निवड झाली आहे ?३) 'जागतिक सर्प दिन' कधी साजरा केला जातो ?४) थोर समाजसेवक बाळशास्त्री जांभेकर यांचे जन्मस्थान कोणते ?५) औरंगाबादचे कोणते नामांतर करण्याचा निर्णय नुकताच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले ?*उत्तरे :-* १) मीत शहा, मुंबई २) जगदीप धनखड ३) १६ जुलै ४) पोंभुर्ले, रत्नागिरी ५) छत्रपती संभाजीनगर *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● रविकिरण बलूले● मनोज बडे● अमोल पाटील सावंत● अनिकेत पडघन● गजानन शिराळे● श्रीनिवास मुरके*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत संघर्ष आहे. हा संघर्ष आतल्या श्वासांबरोबर सुरू होतो आणि श्वासांबरोबरच संपतो. मी खूप दगदग केली आहे. तेलाच्या घाण्याला बैलाला जुंपावे तसे आयुष्याला जुंपलो आहे. आता थोडे आरामाचे क्षण आले आहेत. थोडा विश्राम करतो असे जर कुणी म्हणाले, तर हा विचार आयुष्याला पूर्णविरामाकडे नेतो. माणूस उद्यमशिल राहिला नाही तर त्याचे अस्तित्व संपते. बुद्धिने श्रमाचा ठेका धरला तर आयुष्याचे सप्तसुरात न्हाणे होईल.**कु-हाडीने लाकडे फोडणारा प्रचंड शारीरीक श्रम करीत असतो. रस्त्याकडेला झाडाखाली बसलेला चर्मकार दिवसभर अखंड कामात असतो. या कामाला बुद्धीची जोड मिळाली, तर श्रम कमी होतील, उत्पन्न वाढेल आणि कामात आनंद निर्माण करता येईल. त्यामुळे उद्योगशिल राहणे जितके गरजेचे असते तितकेच त्या उद्योगशिलतेला बुद्धिने दिशादर्शन करणेही आवश्यक असते. प्रतिकूलतेचे आव्हान स्विकारून ते अनुकूल करणारे श्रमर्षि थेट ब्रम्हांडनायक भास्करांनी नाते सांगतात. प्रतिभेला परिश्रमाची साथ मिळाली तर वाळवंटातही नंदनवन फुलत असेल, तर ही साथ घेऊन नंदनवनी असणारे आपण बहरून यायलाच हवे ना !* *॥ रामकृष्णहरी ॥*🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल-9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबिराचे बोल* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• परबत परबत मै फिरया, नैन गवाए रोई |सो बूटी पौ नहीं , जताई जीवनी होई || अर्थ माणूस बर्‍याचशा ऐकीव आणि भ्रामक बाबींच्या मागे लागून जीवनातला अनमोल वेळ वाया घालवत असतो. अमृत प्राशन करणे, अमर होणे, संजीवनी व बर्‍याच अशा काही बाबी वारंवार चर्चेत येतात. या सर्व बाबींचा भौतिक विचार करून माणूस दमछाक करून घेतो. सर्व काही आपल्याच ठायी असणार्‍या कर्तृत्त्व , चिंतन , शांती व समाधानातून प्राप्त होणार्‍या या लौकिक बाबी ! मात्र माणूस वरवरचा विचार करून स्वतःची दमछाक करून घेतो. 'तुझं आहे तुजपाशी पण जागा विसरलाशी.' अशीच ही गत म्हणावी लागेल. कस्तुरी मृग कस्तुरीच्या सुगंधानं ऊर फुटेतो धाव धाव धावतो. कस्तुरी स्वतःजवळ असूनही त्याचा अंत मात्र तिच्याच शोधात होतो. तसंच माणसाचं झालंय. थोडसं पूर्वजांकडं डोकावून पाहिलं तर सर्वच जण अमरत्व गाठू शकले नाहीत. ज्यांनी ध्येयासाठी झपाटून आपल्या कर्तृत्तवाचा ठसा उमटवला. खरं तर त्यांनाच अमृताचा खर्‍या अर्थानं कुंभ सापडलेला ! त्यांनी तो कर्माच्या रूपानं प्राशन केला. आज हजारो शेकडो वर्षे लोटली. ते देहाने नसले तरी कार्य रूपानं अमर आहेत. त्यांच्या हयातीत कधी त्यांनी भ्रामक अमृताचा शोध घेतला नाही. त्यांनी कधी वेगळ्या स्वर्गाचा विचार केल्याचे ऐकिवात नाही. आपल्या कार्य क्षेत्रातंच मनोभावे स्वर्ग निर्माण केला. 'नर करणी करे सो नारायण होय ।' याची प्रचिती दिली. ज्यांनी लौकिकता व नैसर्गिकपण नाकारलं. ते सर्व अवहेलनेचे धनी ठरले आहेत. प्रतिकांचा उथळ अर्थ घेवून धावपळ करून चालत नाही. चिंतन व मननातून शाश्वत सत्ये बाहेर पडतात. ती शोधली की माणूस अजरामर होतो. हे त्या मागचं रहस्य सांगताना महात्मा कबीर म्हणतात, पर्वता पर्वतावर फिरून थकलो , दमलो, प्रसंगी रडलोही परंतु सहज अमर करणारी संजीवनी काही प्राप्त झालीच नाही. कर्म गुटिकाच माणसाला अमर करते. हे जीवनातून फलित निघालं. कर्मभूमीत हृदय आणि हृदयात कर्मभूमीला आसरा दिला की जीवनच नंदनवन होवून जातं. एकनाथ डुमणे, मुखेड📱 9096714317•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• चांगल्या विचाराने आणि चांगल्या संगतीने खरा माणूस घडतो. आपल्या जीवनात नेहमी चांगला विचार करत राहिल्यास आपल्या प्रत्येक कामात यश मिळते आणि मनस्वी आनंद मिळतो.तो आनंद इतरांचे वाईट व्हावे आणि माझेच भले व्हावे असे विचार सतत आपल्या मनात असतील तर आपणच आपल्या पायावर दगड पाडून घेतल्यासारखे होईल.त्यात आपली प्रगती होण्यापेक्षा अधोगतीच होईल. तसेच चांगल्यांच्या सहवासात राहिले तर आपल्या मनातील वाईट विचारांना कधीच संधी मिळणार नाही.चांगली माणसे स्वत:साठी आणि इतरांसाठी नेहमी चांगलाच विचार करत असतात.सुसंगती सदा जोडावी ती म्हणजे चांगल्या सज्जनांची आणि पुस्तकांची तसेच ग्रंथांची.यांच्या सानिध्यात राहिल्यावर देखील आपले जीवन सुखी व समृद्ध बनेल.त्यामुळे आपण इतरांसमोर एक आदर्श म्हणून उभे राहू.© व्यंकटेश काटकर, नांदेड.📱९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.📚🌱📚🌱📚🌱📚🌱📚 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खोड मोडली*सखाराम नावाचा एक ‍मीठाचा व्यापारी होता. त्याच्याजवळ एक गाढव होते. ते फार आळशी होते. रोज सकाळी सखाराम गाढवाच्या पाठीवर मीठाच्या पिशव्या लादत असे. मग तो गाढवाला घेऊन शेजारच्या गावात मीठ विकायला जात असे. जाताना एक ओढा लागत असे. एके दिवशी ओढा ओलांडत असताना गाढवाचा पाय अचानक घसरला व ते पाण्यात पडले. त्यामुळे त्याच्या पाठीवरचे मीठाचे पोते पाण्यात भिजले.त्यातील मीठ विरघळल्याने ते हलके झाले. त्यामुळे गाढवाचे ओझे कमी झाले. त्याला चांगलाच आराम मिळाला. दुसर्‍या दिवशी गाढवाने मुद्दाम पाण्यात पडल्याचे नाटक केले. मीठ पुन्हा पाण्यात भिजल्याने त्यादिवशीही गाढवाला आराम मिळाला. मग तो सारखेच असे करू लागला. पण लवकरच सखारामला ही युक्ती लक्षात आली. त्याची खोड मोडण्यासाठी मग त्याने एके दिवशी त्याच्या पाठीवर कापसाचे ओझे ठेवले.ओढा लागताच गाढवाने पुन्हा पडल्याचे नाटक केले. मात्र, या वेळी पाटीवर मीठाऐवजी कापूस असल्याने तो भिजल्यावर चांगलाच जड झाला. त्यामुळे गाढवाला लवकर उठता येईना. त्याला त्या दिवशी अधिकच ओझे वाहावे लागले. त्याला चांगलीच अद्दल घडली. तेव्हापासून गाढवाने कधीच पाण्यात पडल्याचे नाटक केले नाही व कामचुकारपणा केला नाही.*तात्‍पर्य: कामातून पळवाट शोधणे केव्हाही वाईट.आळस,कामचुकारपणा केल्यास स्वतःचेच नुकसान होते.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~📅 दि. 16/07/2022 वार - शनिवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*जागतिक सर्प दिन* 💥 ठळक घडामोडी :-१९९८- गुजरातमध्ये शाळा प्रवेश करताना पाल्याच्या नावानंतर आईचे नाव लावण्याचा अधिकार असल्याचे शिक्षणमंत्री आनंदीबेन पटेल यांनी विधानसभेत माहिती दिली.१९९२-भारताचे ९वे राष्ट्रपती म्हणून डॉ शंकरदयाल शर्मा यांनी निवड ,झाली.१९६९-चंद्रावर पहिला मानव उतरवणाऱ्या'अपोलो-११'अंतराळायानाचे फ्लोरिडा येथून प्रक्षेपण.💥 जन्म :-१९०९ - अरुणा असफ अली,स्वातंत्रसेनानी१९६८ - लॅरी सँगर, विकिपीडियाचा सह-संस्थापक.१९७१ - महमद मकसूद् इनामदार नान्देड१९७३ - शॉन पोलॉक, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.१९८४ - कॅटरिना कैफ, हिंदी चित्रपट अभिनेत्री.💥 मृत्यू :-१८८२ - मेरी टॉड लिंकन, अब्राहम लिंकनची पत्नी.१९१६ - इल्या मेक्निकोव, नोबेल पारितोषिक विजेता रशियन जीवशास्त्रज्ञ.१९९३-उस्ताद निसार हुसेन खां-पदमभूषण*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *संसदेत काही असंसदीय शब्दांवर बंदी घातल्यानंतर आता आणखी एक नवा आदेश लोकसभा सचिवालयानं खासदारांना दिला आहे. संसद भवन परिसरात निदर्शनं, आंदोलनं उपोषणं करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *९२ नगरपरिषदांनंतर राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे.*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *सोमवार १८ जुलैपासून होणारे विधिमंडळाचे अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे. संसदीय कार्य विभागाने विधानमंडळ सचिवालयाला याबाबत सूचित केले आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर आता युकेच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांचं नाव आघाडीवर आहे. हुजूर पक्षाच्या अंतर्गत निवडणुकीच्या दुसऱ्या फेरीतही ऋषी सुनक यांनी आघाडी घेतली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबई विद्यापीठाने 14 आणि 15 जुलैला होणाऱ्या सर्व विभागांच्या परीक्षांना स्थगिती दिली होती. या परीक्षा आता 18 आणि 19 जुलैला घेण्याचा मुंबई विद्यापीठाने निर्णय घेतला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या नॅशनल इंस्टिट्यूशनल रॅंकिंग फ्रेमवर्क (NIRF)द्वारे महाविद्यालयांचे मानांकन घोषीत करण्यात आले आहे. या रँकिंगमध्ये दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस कॉलेजने प्रथम स्थान पटकावले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *सिंगापुर ओपन 2022 स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये पीव्ही सिंधूने एन्ट्री मिळवली असून प्रणॉय आणि नेहवाल यांना मात्र क्वॉर्टर फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - एक मत* https://storymirror.com/read/story/marathi/kpeg22xr/ek-mt/detailवाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌊 *भरती केव्हा येते ?* 🌊खरं तर प्रत्येक क्षणी जगात कुठे ना कुठे भरती येतच असते. आणि त्याच वेळेला दुसरीकडे कुठेतरी ओहोटीचा खेळ चालू असतो. त्यामुळे प्रश्न विचारायचाच झाला तर कोणत्याही एका विवक्षित ठिकाणी भरती केव्हा येते असा विचारायला हवा. म्हणजे मुंबईला किंवा रत्नागिरीला किंवा चेन्नईला भरती केव्हा येते असा.पण त्याआधी हे भरती ओहोटीचं चक्र का चालू असतं याचा विचार करायला हवा. जर आपल्याला चंद्र हा उपग्रह नसता तर भरती ओहोटी आली नसती. निदान आज जसा जाणवण्याइतका समुद्राच्या पातळीत जो चढउतार होतो तो झाला नसता. चंद्र पृथ्वीच्या मानानं आकारमानाने लहान आहे. पण तो सूर्यापेक्षा कितीतरी जवळ आहे. न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे कोणत्याही दोन वस्तूंमध्ये गुरुत्वाकर्षणाचं बल असतं. ते त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराच्या समप्रमाणात आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या अंतराच्या वर्गाच्या विषम प्रमाणात असतं. म्हणजेच जेवढं वस्तुमान जास्त तेवढं हे बलही जास्त. आणि जवळ अंतर कमी तेवढंही आकर्षण जास्त.पृथ्वीचं आकर्षण चंद्राला जाणवतं. आणि म्हणून तो पृथ्वीभोवती एका ठराविक कक्षेत प्रदक्षिणा घालत राहतो. तसंच चंद्राच्या आकर्षणाचाही प्रभाव पृथ्वीवर पडतो. पण चंद्राचं वस्तुमान पृथ्वीपेक्षा कमी असल्यामुळे पृथ्वीची भूमी तेवढी चंद्राकडे खेचली जात नाही. पृथ्वीवरचं पाणी मात्र द्रवरूप असल्यामुळे चंद्राच्या दिशेने खेचले जाते. साहजिकच त्या बाजूला समुद्राची पातळी वाढते. त्याचवेळी त्याच्या विरुद्ध बाजूला म्हणजेच १८० अंशावरच्या ठिकाणचे पाणी चंद्रापासून दूर असते. त्यामुळे चंद्राच्या आकर्षणाचे बल कमी होते. तिथले पाणी चंद्राकडे तसं खेचलं जात नाही. पण जमीन थोडीशी का होईना खेचली जाते. त्यामुळे तिथल्या समुद्राचीही पातळी वाढते.या दोन्ही ठिकाणी समुद्राच्या पाण्याला आलेल्या फुगवट्यामुळे त्याच्या काटकोनात म्हणजेच त्यापासून ९० अंशांवर असणाऱ्या ठिकाणचे पाणी किनाऱ्याच्या दिशेने खेचले जाते. सहाजिकच तिथे समुद्राच्या पाण्याची पातळी घटते. ओहोटीचा अंमल सुरू होतो. अशा रीतीने कोणत्याही क्षणी जगाच्या पाठीवर दोन ठिकाणी भरती तर दोन ठिकाणी ओहोटी येत असते.पण पृथ्वी स्वतःभोवती गिरकी मारत असते. त्यामुळे तिच्या पृष्ठभागावरचे वेगवेगळे प्रदेश चंद्राकडे मोहरा फिरवुन राहत असतात. साहजिकच भरती, आणि अर्थातच ओहोटी, येण्याच्या ठिकाणात बदल होत जातो. पृथ्वीची स्वतःभोवतीची गिरकी चोवीस तासात पूर्ण होत असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी दिवसातून दोन वेळा भरती येते, तर दोन वेळा ओहोटी येते.*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••यशाचे शिखर गाठण्यासाठी काही वेळेला अपयशाच्या पायऱ्या चढाव्या लागतात.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) उत्तराखंडमधील रुरकी येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या स्थापनेला १७५ वर्षे झाल्यानिमित्त केंद्र सरकार किती रुपयांचे विशेष नाणे जारी करणार आहे ?२) वार्षिक लैंगिक समानता अहवाल २०२२ नुसार जगातील सर्वाधिक समतावादी देश कोणता ?३) नथ्थुराम गोडसे यांनी कोणत्या तारखेला महात्मा गांधीची हत्या केली ?४) राष्ट्रीय दूध दिवस कधी साजरा केला जातो ?५) व्यंजन म्हणजे काय ?*उत्तरे :-* १) १७५ रू. चे नाणे २) आईसलँड ३) ३० जानेवारी १९४८ ४) २६ नोव्हेंबर ५) ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे करता येत नाही त्या वर्णांना व्यंजन म्हणतात. *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● जयवंत हंगरगे, मुख्याध्यापक● मारोती गाडेकर● सुरेश भाग्यवंत*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*एक भिकारी आयुष्यभर भीक मागत राहिला. भीक मागून मागून जमा करत राहिला. हे नाही ते नाही करत करत आधिक मागत राहिला. देवाला त्याची दया यायची. त्याने कधी कोणाला आयुष्यात काही दिले नाही तर त्याला आनंद व समाधान कसे मिळणार? देवही चिंतेत पडला. देण्याचा आनंद काय असतो हे प्रत्यक्ष समजावून सांगण्यासाठी देवच एक दिवस भिका-याच्या दारावर भीक मागायला उभा राहिला. त्याने आरोळी ठोकली. 'देssरे बाssबाss भिका-याला काहीतरी.' भिका-याच्याच घरी भीक मागायला भिकारी? त्याने कानाडोळा केला, नंतर त्याला समजावण्याचा व धमकावण्याचाही प्रयत्न केला. पण दारावरचा भिकारी हटला नाही. देssरे बाssबा च्या आरोळ्या काही थांबत नव्हत्या.**भिका-याचीही भीक मागायला निघायची वेळ झालेली. परंतु दारावरचा भिकारी हटायला तयार नव्हता. त्यापासून सुटका व्हावी म्हणून शेवटी भीक मागून जमा केलेल्या धान्याच्या ढिगातील एक दाणा उचलून तो भिका-याच्या कटो-यात टाकतो. एक दाणा का होईना भीक मिळाली म्हणून दारातील भिकारी निघून जातो. एक दाणा कमी झाला म्हणून भिकारी हळहळत ढिगा-याकडे बघतो. ढिगा-यावर काहीतरी चमकत आहे हे पाहून तो जवळ जातो. ती चमकणारी वस्तू सोन्याचा दाणा असतो. भीक दिलेला ढिगावरचा एक दाणा कमी न होता सोन्याचा झाला. संपूर्ण धान्याचा ढिगच भिका-याच्या कटो-यात टाकला असता तर..? आता भिका-याने संपूर्ण आयुष्यच देऊन टाकले आहे. पण माझ्यातल्या भिका-याचे काय? त्याला कळले आहे पण अजूनही 'वळले' मात्र नाही.* *॥ रामकृष्णहरी ॥*🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कबीर कलि खोटी भाई , मुनियर मिली न कोय | लालच लोभी मस्कारा , टिंकू आदर होई || अर्थ : हल्लीच्या सामाजिक भानाचं वर्णन करताना महात्मा कबीर ढोंगाला भुलणार्‍या अर्थात वास्तव न पाहता वरवरच्या सोंगालाच सत्य मानणार्‍या समाजमनाचं निरीक्षण नोंदवतात. भूगोल सांगतं पृथ्वीचं वय साडे चार अब्ज वर्षापेक्षा जास्त जास्त. भारतीयांच्या मानण्याप्रमाणे गतकाळ ते सांप्रत असे चार युग .१ कृत युग, २ त्रेता युग ,३ द्वापार युग, व ४ कली युग अशी काल विभागणी सांगितली जाते. हल्ली म्हणजे कलीयुगी पूर्वीपेक्षा खोटारडेपणा खूपच वाढलाय. हे युग महाभारताच्या लढाईपासून ते सांप्रतपर्यंत चालूच आहे.या युगी खरे खुरे मुनी , ऋषी , संत भेटणे कठीण झाले आहे. स्वार्थासाठी त्यांची नाटकं करणारे अनेक जण भेटतील. लालचीपणा, मोह यांनी ग्रासलेल्यांना हेच ढोंगी , पाखंडी , खरंं अध्यात्म सोडून थट्टा मस्करी करणारे, द्रव्य लुटणारे, वासनांधच साधू, मुनी म्हणून मिरवत आहेत. अन भक्तजण त्यांनाच डोक्यावर घेवून मिरवतात अन फसगत झाली की वैफल्यग्रस्त होतात. तेव्हा खरा साधून ओळखून त्याच्या ठायी लिन व्हायला सांगितलेला संतांचा कानमंत्र विसरू नये. म्हणजे झालं. एकनाथ डुमणे, मुखेड📱 9096714317•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••तुमची वाणी स्पष्ट, चारित्र्य पवित्र ,जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि जीवन व्यवहार चोख असतील तर तुम्ही इतरांच्या हृदयावर साम्राज्य सहजपणे करु शकाल. अन्यथा ह्या गोष्टी तुमच्या जीवनात नसतील तर तुम्हाला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकारही राहणार नाही.आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो आणि मनुष्य म्हणूनच जगणार आहोत हा विचार समोर ठेवून जगण्यासाठी वरील महत्वाच्या चार गोष्टींना जीवनात प्राधान्य द्यायलाच हवे आणि त्या गोष्टी सहज करता येऊ शकतात. सुरुवातीला कठीण जाईल एकदा का सराव झाला की,मग आपोआपच व्हायला लागतात.*व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३.•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अहंकार नसावा.*एकदा एक मूर्तिकार मूर्ती बनवण्यासाठी दगडाचा शोध घेत होता.तो रस्त्याने जात असतांना त्याला मोठे दोन दगड दिसले ,आणि मुर्तीकाराने ठरविले की या दगडाच्या छान सुबक दोन मुर्त्या तयार कराव्या.दगडाचे निरीक्षण करून मुर्तीकाराने कशी मूर्ती तयार करावी याबाबत मनात आराखडा तयार केला.आणि दोन्ही दगडाला सांगितले की, मी तुमच्यापासून छान मूर्ती तयार करणार आहे तेव्हा तुम्ही मला साथ द्यावी.छन्नी हातोडा घेऊन मूर्तिकार दगडाला आकार देत असतांना पहिला दगड म्हणाला मला त्रास होतो, माझ्यावर घाव करू नका. तेव्हा मुर्तीकाराने दगडाला समजविले की, मी हळूहळू घाव देणार तू तुझ्यातील कडकपणा कमी कर. थोडा नरम हो म्हणजे मला घाव घालायला त्रास होणार नाही व तुला पण जास्त त्रास होणार नाही.पहिला दगड स्वतःतील अहंपणा सोडायला तयार नव्हता.मुर्तीकाराने दुसऱ्या दगडाला समजविले दुसरा दगडाने स्वतःमधील कठीणपणा कमी करून नरमपणा घेतला व काही दिवसातच अतिउत्तम , सुंदर अशी राधाकृष्णची मूर्ती मुर्तीकाराने तयार केली.मूर्तीची स्थापना झाली तेव्हा बाजूला पडलेला कडक मोठा दगड बघून त्याचा उपयोग लोकांनी नारळ फोडण्यासाठी केला.मुर्तीकाराचे ज्या दगडाने ऐकले त्या दगडाची मूर्तीत रूपांतर झाले व सर्व लोक भक्तिभावाने पूजा करायला लागले. कुंकूम तिलक लावून हारापर्ण करतात, छान वस्त्र परिधान करतात आणि ज्या दगडाने स्वतःचा अहंकार सोडला नाही , मुर्तीकाराचे ऐकले नाही त्या दगडाला जीवनभर नारळाचे घाव सहन करावे लागते.पूजा करणारे लोक अंगावर पाय देऊन राधाकृष्णच्या मूर्तीची पूजा करायला जातात. त्यावेळी अहंकारी दगडाला खूप दुःख झाले पण वेळ गेलेली होती.*तात्पर्यः अहंकारपणाने वागल्यास स्वतःचेच नुकसान होते म्हणून अहंकार अंगी नसावा.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~📅 दि. 15/07/2022 वार - शुक्रवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-१९९७-पर्यावरणवादी कार्यकर्ते महेशचंद्र मेहता यांची रॅमन मॅगॅसेसे पुरस्कारासाठी निवड.१९५५-भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना 'भारतरत्न'हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.💥 जन्म :-१९४९-माधव कोंडविलकर,दलित साहित्यिक.१९३२-नरहर कुरुंदकर,विद्वान,टीकाकार आणि लेखक.१९२७-प्रा.शिवाजीरावभोसले,विचारवंत,कुलगुरू(डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ)१९०३-के.कामराज, स्वातंत्रसैनिक,खासदार व तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री.१६११-मिर्झा राजे जयसिंग.💥 मृत्यू :-२००४-डॉ बानू कोयाजी, सामाजिक कार्यकर्त्या.१९९९-इंदूताई टिळक,सामाजिक कार्यकर्त्या.१९९९-जगदीश गोडबोले,पर्यावरणवादी लेखकव सामाजिक कार्यकर्ते.१९७९ - गुस्तावो दियाझ ओर्दाझ, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *देशाच्या राष्ट्रपतीपदासाठी 18 जुलै रोजी मतदान होणार असून 21 तारखेला देशाला नवा राष्ट्रपती मिळणार आहे. देशातील सध्याचे राजकीय बलाबल पाहता एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांचे पारडं जड असून त्यांच्या रुपाने देशाला पहिला आदिवासी राष्ट्रपती मिळण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या उत्तर प्रदेशाला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान 28 महिन्यात पूर्ण झालेल्या बुंदेलखंड द्रुतगती महामार्गाचे करणार उद्घाटन*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शाळा देखील बंद आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं घेतला मोठा निर्णय, इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा 20 ऐवजी 31 जुलै रोजी होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबईच्या माय उडान ट्रस्टकडून मुंबई महापालिकेच्या शाळेत सुसज्ज कॉम्प्युटर लॅबचं उद्घाटन, पालिकेच्या भायखळा पश्चिमेच्या शाळेत झाली ही लॅब सुरू, पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना या माध्यमातून कॉम्प्युटरचं प्रशिक्षण तसंच कोडिंगही शिकवण्यात येणार आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सामान्यांच्या खिशाला बसणार झळ, चुरमूरे, पापड, दही, लस्सी, ताक गूळ, खांडसरी साखर याच्यावर 5 टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करण्याचा सरकारने घेतला निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *गुजरातमध्ये अतिशय दुर्मिळ EMM Negative रक्तगट असणारी देशातील पहिली आणि जगातील दहावी व्यक्ती असल्याचे समोर आले आहे. या व्यक्तींना रक्तदानही करता येत नाही किंवा इतरांचे रक्तही घेता येत नाही.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *राज्यातील 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगित! निवडणूक आयोगाची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - आईचे घर*https://storymirror.com/read/story/marathi/zv24dxqu/aaiice-ghr/detailवाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *इसीजी म्हणजे काय ?* 📙ईसीजी म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राम, याला आपण 'हृदयस्पंदनालेख' असेही म्हणू शकू.आजकाल एखाद्या व्यक्तीला अचानक चक्कर आली, डोळ्यासमोर अंधारी आली वा छातीत धडधडले, तर इसीजी काढून घेण्याचा सल्ला दिला जातो. चाळीशी ओलांडल्यानंतर दर दोन वर्षांनी इसीजी काढून घेणे श्रेयस्कर, असेही म्हणतात. इसीजी काढण्याच्या या वाढत्या प्रमाणामुळे, हृदयाबद्दलच्या जिज्ञासेमुळे, हृदयविकाराच्या भीतीमुळे आपल्याला इसीजी म्हणजे नेमके काय प्रकरण आहे, हे जाणून घेण्याची जिज्ञासा असेल. इसीजी म्हणजे काय हे आता पाहू.हृदयाच्या स्नायूंच्या आकुंचन प्रसारणात विद्युतलाटा व विद्युत प्रवाह तयार होतात. याची नोंद शरीराच्या विविध भागांवर (छाती, पाय इ.) संवेदनशील असे इलेक्ट्रोड ठेवून करता येते. कारण हे विद्युतप्रवाह हृदयापासून सर्व ठिकाणी पसरवले जातात. या विद्युतप्रवाहाच्या शक्तीनुसार एका यांत्रिक उपकरणांच्या सहाय्याने हृदयाच्या स्पंदनाचा आलेख काढता येतो. इसीजी हे डॉक्टरांसाठी वरदानच ठरले आहे. सर्वसामान्यपणे व्यक्तीच्या हृदयस्पंदनालेखात P,Q,R,S व T या विद्युतलाटा (Waves) असतात. त्यांचे निरोगी लोकांसाठीचे आकार (उंची, रुंदी इ.) तसेच एकमेकांतील (त्या लाटांचे) अंतर ठरलेले असते. हृदयाच्या वेगवेगळ्या विकारांवरून या आलेखात बदल घडून येतात व त्यावरून रोगाचे निदान करता येते. हृदयाचा आकार, हृदयाची गती, जास्तीचे ठोके वा न पडणारे ठोके, हृदयातील जवनिका, कर्णिका या कप्प्यांमधील सुसंवाद, हृदयाच्या स्नायूंचा रक्तपुरवठा इत्यादी अनेक गोष्टींची माहिती यामुळे मिळू शकते. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी काही बदल इसीजीमध्ये सापडू शकतात. अशा व्यक्तींनी वेळीच आहार, विहार यावर नियंत्रण ठेवले; तर पुढील अनर्थ टाळता येऊ शकेल. यावरून इसीजीचे महत्त्व आपल्या लक्षात येईल. इसीजी काढण्यासाठी येणारा खर्च लक्षात घेता तो काढण्यापूर्वी खरेच तो काढण्याची गरज आहे काय, याचा साधकबाधक विचार तज्ज्ञांच्या सल्ल्याने करणे श्रेयस्कर ठरते.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••ज्ञानी डोळ्याने जगतो, तर अज्ञानी कानाने जगतो.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) ब्रह्मांडाचे आतापर्यंतचे ( जुलै २०२२ ) सर्वोत्तम रंगीत चित्र नासाच्या कोणत्या दुर्बिणीने टिपले आहे ?२) 'मिल्कमॅन ऑफ इंडिया' असे कोणाला म्हटले जाते ?३) 'द फर्स्ट कपल टू वॉक अराउंड इंडिया' हा २०२२ चा राष्ट्रीय विक्रम कोणी केला ?४) भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिश पार्लमेंटने केव्हा संमत केला ?५) स्वरादी म्हणजे काय ?*उत्तरे :-* १) जेम्स वेब अंतराळ दुर्बीण २) डॉ. वर्गीज कुरियन, श्वेतक्रांतीचे जनक ३) बेनी कोट्टाराथील व मॉली बेनी, कोच्ची ४) १८ जुलै १९४७ ५) ज्या वर्णाच्या सुरुवातीस स्वर आहे त्यास स्वरादी म्हणतात. ( अं, अ: ) *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● श्रीकांत जोशी● राजेश्वर डोमशेर, मुख्याध्यापक● गंगाधर बिजेवार● बालाजी हिवराळे● शुभम बतुलवार● शंकर हांड्रे● संतोष ईबीतवार● आनंद गाजेवार● विष्णू शिंदे● नवाज शेख● वसंत सिरसाट● राजू कदम● उत्तम पाटील चोळाखेकर● विष्णुराज कदम● विजयकुमार पाटील घुळेकर● सचिन खंडगावे● पांडुरंग चंदवाड● प्रणित राखोंडे● वसंत बोनगिरे● सुनील बेंडे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सारा अंधारच प्यावा* *अशी लागावी तहान ॥* *एका साध्या सत्यासाठी* *देता यावे पंचप्राण ॥**असं जगावेगळ पसायदान कवी म.म.देशपांडे यांनी 'तहान' या कवितेत मागितलं आहे. त्याचं तीव्रतेने स्मरण व्हावं अशी परिस्थिती आज आपल्या देशात आहे. कोणत्याही क्षेत्राकडे जा सारा अंधार आहे. अपवाद वगळले तर वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातून सत्य हद्दपार झालेलं आहे. असत्याच्या अंधारात संवेदनशील मनाची घुसमट होत आहे. 'सत्यमेव जयते' ही या देशाची घोषमुद्रा आहे. तथापि समाजाचं, देशाचं नेतृत्व करणा-यांपासून तर रूग्णांची सेवा करण्याची शपथ घेतलेल्या डाॅक्टरांपर्यत सर्वांनी तिचे पदोपदी धिंडवडे काढले आहेत. सर्वच क्षेत्रात असत्यानं, अप्रमाणिक वृत्तीनं थैमान घातलं आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतमातेची दु:स्थिती आधिकच चिंतनीय झाली आहे. 'सत्य हे जीवनमूल्य लोप पावत आहे. 'असत्य' उजळ माथ्यानं वावरत आहे.**खरंतर सत्य, सत्याचा शोध, सत्याचा उद्धार आणि आचरण, सत्याचा पुरस्कार याला वैभवशाली परंपरा आहे. भीष्मनिती सांगते, 'सत्य हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे. माणसाचा सर्वश्रेष्ठ आधार आहे. शाश्वत कर्तव्य आहे. आसक्तीचं जाळ फक्त सत्यच तोडू शकतं. सत्य म्हणजेच अमरत्व. सत्यासाठी केलेला त्याग मानवी जीवनात सर्वश्रेष्ठ आनंदाचा उगम असतो. सदाचरणी माणूसच इतरांच्या हितासाठी दक्ष असतो आणि या मार्गानंच त्याचं स्वत:चही हित साधलं जातं. सत्यासारखं तप, पुण्य नाही. असत्यासारखं पाप नाही. ज्याच्या ह्रदयात सत्य असतं त्याच्या ह्रदयात परमशक्ती वास करते.*••● ‼ *रामकृष्णहरी* ‼●••🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆संजय नलावडे, मुंबई9167937040•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबिराचे बोल* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कबीर जीवन कुछ नहीं,खिन खारा खिन मीठकलहि अलहजा मारिया,आज मसाना ठीठ।सारांश जीवन क्षणभंगूर आहे. क्षणापूर्वी ते होते अन क्षणानंतर ते असेल अशी कोणीही खात्री देवू शकत नाही. जीवनाची नश्वरता पटवून देताना महात्मा कबीर म्हणतात, जीवन म्हणजे काहीही नाही. या क्षणाला ते खारट अनुभव देत असेल तर दुसर्‍या क्षणी ते कडवटपणाला गोडीमध्ये बदलू शकते. जीवनाचा मधूर अनुभव देवु शकतं. जो वीरयोद्भा काल युद्धामध्वे आपलं नैपुण्य पणाला लावून बाजी प्राणपणाने लढून आपल्या बाजूने ओढून आणण्यामध्ये यशस्वी झाला म्हणून त्याचे सर्वत्र कौतुक सोहळे साजरे झाले. सर्वांनी जयमाला गळ्यात घालून त्याचा जय जयकार केला गेला. ज्याने काल मैदान मारले तो स्वतःच आज चितेवर स्मशानी निपचित अचेतन पडला आहे. मृत्यूने भल्याभल्यांना सोडलेले नाही. तिथे सामान्य जीवांचं काय खरं आहे. घारीने भक्ष्यावर झडप घालावी तशी काळ कोणत्याही क्षणी झडप घालू शकतो, म्हणून माणसानं आपल्या हाती जे काही आयुष्य शिल्तक राहिले आहे. त्याचा सदुपयोग करून घ्यायला हवा व जीवन सत्कारणी लावायला हवे , म्हणजे सत्कर्माच्या किर्तीने मृत्यू पश्चातही जीवनाचा परिमल दरवळत राहातो. मृत्यू साक्षात पुढ्यात उभा राहिला तरी त्याचे भय राहात नाही एकनाथ डुमणे, मुखेड📱 9096714317•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••काळजी केल्याने कोणतेच प्रश्न मिटत नसतात तर अनेक प्रश्न तुमच्यासमोर उभे टाकतात.त्या काळजीमध्ये तुमच्या आजच्या कामावर लक्ष नसल्यामुळे तुमचे काम निकृष्ट दर्जाचे होऊ शकेल.त्यामुळे तुम्ही अधिक काळजी करायला लागाल.त्यापेक्षा काळजी न करणे सर्वात मोठा शहाणपणा आहे.ज्याची तुम्हाला काळजी वाटते त्याकडे लक्ष न घालणे सगळ्यात चांगले.आजच्या कामात अधिक लक्ष घातले आणि मन लावून काम केले तर त्या कामात गढून जाल.चांगले काम झाल्याचे समाधान तर वाटेलच आणि काळजी पण दूर होईल.काळजी कोणतीही असो.आजची असो की उद्याची.तो काळ तुमच्या काळजीमुळे थांबणार का ? नाही ना.मग आपले मन प्रसन्न ठेवा.येणा-या आणि हाती असलेल्या कामात अधिक लक्ष घाला मग तुम्हाला तुमचे समाधान मिळेल.समाधान हे काळजीला उत्तम पर्याय आहे हे कधीही विसरु नका.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद..९४२१८३९५९०.💠🌹💠🌹💠🌹💠🌹💠•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*हे विश्वची माझे घर, प्रेमातील व्यापकता*‘संत तुकाराम महाराजांनी देहू गावाबाहेरच्या एका ऊसाच्या मळ्याची काही दिवस राखण केली; म्हणून त्या मळ्याच्या मालकाने त्यांना पंचवीस-तीस उसांची एक मोळी दिली. दोरखंडाने बांधलेली ती मोळी खांद्यावर घेऊन संत तुकाराम महाराज घराकडे चालले असता वाटेत खेळणारी मुले त्यांना विचारू लागली, ‘‘तुकोबा, एवढे ऊस तुम्ही कोणासाठी घेतले हो ?’’ ते म्हणाले, ‘‘बाळांनो, अरे तुमच्यासाठीच. बंडू हा ऊस घे तुला, गुंडू हा तुला, धोंडू हा घे, तू पण.. हा, तू घे… हा, तू घे.’’ असे म्हणत तुकोबा ज्या वेळी त्यांच्या घरी पोहोचले, त्या वेळी त्यांच्या खांद्यावर एकच ऊस आणि त्याच्या भोवतीचे दोरखंडाचे भले मोठे वेटोळे एवढेच काय ते शिल्लक राहिले होते. तो प्रकार पाहून तुकाराम महाराजांची पत्नी आवळी भरपूर रागावली. आपल्याला मिळालेला सर्व ऊस लोकांच्या मुलांना देऊन आपल्या मुलांना काही आणले नाही; म्हणून ती तुकाराम महाराजांना नको नको, ते बोलली आणि रागाच्या झपाट्यात तिने तो उसाचा तुकडा खाली आपटला. त्यावेळी त्याचे तीन तुकडे होऊन एक तुकडा तिच्या हातात राहिला आणि दोन तुकडे जमिनीवर पडले. तेव्हा संत तुकाराम महाराज शांतपणे तिला म्हणाले, ‘‘आवळे, किती ग धोरणी तू ? आता तू सारखे वाटे केलेस. जो तुकडा तुझ्या हातात राहिला, तो तुझा आणि खाली जे पडले त्यांतील एक माझा अन् दुसरा मुलांचा !’’ ही त्यांची शांत वृत्ती पाहून बायकोला फार पश्चात्ताप झाला.तात्पर्य :- ‘हे विश्वची माझे घर’, असे वाटत असल्यामुळे संत तुकाराम महाराजांनी आपली आणि लोकांची मुले असा भेदभाव कधीच केला नाही*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~📅 दि. 12/07/2022 वार - मंगळवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जागतिक बाल कामगार निषेध दिन *आषाढी एकादशी निमित्ताने सर्वाना हार्दीक शुभेच्छा*💥 ठळक घडामोडी :-१९८२-NABARD ची स्थापना१९९९- 'महाराष्ट्र भूषण 'हा महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च पुरस्कार सुनील गावस्कर यांना प्रदान२००१-कृषीशास्त्रज्ञ डॉ एम एस स्वामिनाथन यांना 'टिळक पुरस्कार'जाहीर२००५ - आल्बर्ट दुसरा मोनॅकोच्या राजेपदी.💥 जन्म :-१८६४ - इतिहासाचार्य वि.का.राजवाडे, मराठी इतिहास संशोधक१८६४ - जॉर्ज वॉशिंगटन कार्व्हर, अमेरिकन शास्त्रज्ञ. (चित्रीत)१९२० - यशवंत विष्णू चंद्रचूड, भारताचे माजी सरन्यायाधीश.१९४७ - पूचिया कृष्णमुर्ती, भारतीय क्रिकेट खेळाडू.१९६५ - संजय मांजरेकर, भारतीय क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :-२००० - इंदिरा संत , मराठी कवयित्री. २०१२-दारा सिंग ,मुष्टियोद्द्धा व अभिनेता२०१३-प्राण ,हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *संसदेच्या नव्या इमारतीवर भव्य 'अशोक स्तंभ', पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *गुजरातप्रमाणे महाराष्ट्राशेजारील तेलंगणा राज्यातही पावसाचा धुमाकूळ सुरू आहे... पूरस्थितीमुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालंय. मुसळधार पावसानं नद्या दुथडी भरून वाहतायत. पुरामुळे अनेक पूल रस्ते पाण्याखाली गेल्यानं इथे अनेक गावांचा संपर्क तुटलाय*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *आमदार अपात्रता आणि अन्य याचिकांवरील सुनावणीबाबत अनिश्चितता, सुनावणीची तारीख निश्चित करण्यासाठी शिवसेनेचे वकील कोर्टात विनंती करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुढील 3-4 दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, कोकणासह, सातारा पुणे, चंद्रपूर, गडचिरोलीला रेड अलर्ट, राज्यातील धरणं भरण्यासही सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अमरनाथमधील ढगफुटीनंतर सुरक्षा दलांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, आत्तापर्यंत १६ भाविकांचे मृतदेह हाती, ४१ जण अजूनही बेपत्ता*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची महत्वपूर्ण घोषणा, नागपुरात धावणार ब्रॉडगेज मेट्रो ! रेल्वे बोर्डाची मंजुरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *रोमहर्षक सामन्यात नोवाक जोकोविच विजयी, ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसला हरवलं, सलग चौथ्यांदा पटकावलं विम्बल्डनचं जेतेपद8*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - फेसबुक मैत्री*https://storymirror.com/read/story/marathi/fn07z43i/phesbuk-maitrii/detailवाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌺 *फुल केव्हा फुलतं ?* 🌺**************************फुलांनी केवळ कवींनाच वेड लावलंय असं नाही; आपल्या सर्वांच्याच चित्तवृत्ती फुलांना पाहून फुलतात. त्यांचे मनमोहक रंग, त्यांचे आकार, त्यांची रचना, त्यांचा डौल खरोखरंच मोहून टाकणारे असतात. म्हणूनच असावं कदाचित, पण आपल्या आयुष्याच्या प्रत्यक क्षणाची साथ फुलं करतात. जन्म झाला म्हणून जशी फुलांची उधळण होते तशीच शेवटच्या प्रवासाला निघतानाही फुलांच्या माळांनी निरोप दिला जातो. प्रेयसीला भेट म्हणून गुलाब देता देताच त्या प्रणयाचं आयुष्याच्या साथीत रुपांतर करतानाही फुलांच्या माळांची देवाणघेवाण करून त्यावर शिक्कामोर्तब करण्यात येतं.हे असे आनंदाचे दिवस वर्षात केव्हाही येऊ शकतात. तरीही प्रत्येक वेळी आपल्याला फुलं मिळत राहतात. म्हणजे ती सदासर्वकाळ फुलतात असं समजायचं का ? तसं नाही. कारण काही फुलं ठराविक हंगामातच मिळतात. काही दिवसाउजेडीच उमलतात तर रातराणीसारखी काही रात्रीच्या वेळीच आपल्या सुगंधाने आसमंत दरवळून टाकतात. ब्रह्मकमळ तर एकदाच आणि तेही मध्यरात्रीच फुलतं. मग हे फुलं नेमकी फुलतात तरी कधी ?हे समजून घ्यायचं असेल तर आधी ती फुलतातच का, हे ध्यानात घ्यायला हवं. ती फुलतात ते आपल्याला आनंद देण्यासाठी नाही, तर वनस्पतींच्या पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेत फुलांचं उमलणं एक कळीची भूमिका बजावत असतं. फुलांमध्ये पुंकेसर आणि स्त्रीकेसर असे परागकण असतात. त्यांच्या मिलनातूनच बी तयार होतं आणि पुढच्या पिढीची नांदी म्हटली जाते. हे मिलन होण्यात कीटक आणि पक्षी मोलाची मदत करतात. त्या मदतगारांना त्यांचं काम करण्यासाठी प्रवृत्त करायचं तर काही आमिष दाखवायला हवं. त्यांना आधी आकर्षित करायला हवं. ते करण्यासाठीच फुलं फुलत असतात. त्यांची ती रंगीबेरंगी छबीही तेच काम करत असते. त्यामुळे ते जेव्हा आकर्षित होतील तेव्हा फुलण्यानेच कार्यभाग साधत असतो.तरीही निरनिराळ्या वनस्पतींची वर्गवारी करणाऱ्या कार्ल लिनैस यानं फुलांचीही त्यांच्या उमलण्यावरून तीन गटात विभागणी केली आहे. काही फुलं हवामानानुसार उमलतात काही कोमेजतात. त्यांना लिनैसनं 'मिटिअाॅरिची' असं म्हटलं आहे. काही दिवसाच्या लांबीनुसार आणि कार्यक्रम आखतात. म्हणजे हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात या वेळा बदलतात. त्यांना त्यानं 'ट्रॉपिची' हे नाव दिले आहे. उरलेली सगळी तिसऱ्या म्हणजेच इक्निनोक्टेल्स या गटात घातलेली आहेत. ती हवामानाची किंवा दिवसरात्रीच्या लांबीची पर्वा न करता दिवसाच्या ठरावीक वेळी फुलतात आणि ठरावीक वेळी कोमेजतात.ज्याँ बातिस्त लमार्क या फ्रेंच वैज्ञानिकाला असं दिसून आलं की फुलण्याच्या वेळी फुलांची उष्णता वाढलेली असते. आपल्या गंधाचा दूरदूरवर फैलाव करण्यासाठी ही वाढीव उष्णता कामी येते, असे त्यानं दाखवलं आहे. काही फुलं तर आसमंताच्या तापमानापेक्षा आपलं तापमान ३५-४० अंशांनीही वाढवू शकतात. तेव्हा फुलांचं तापमान वाढू लागलं की ती फुलतात असंही म्हणता येईल.*बाळ फोंडके यांचा 'केव्हा ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••प्रार्थना करणाऱ्या हातापेक्षा मदत करणारे हात जास्त पवित्र असतात.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) गिनीज बुकात नोंद झालेली जगातील सर्वात वृद्ध हवाईसुंदरी ( एअरहोस्टेज ) कोण ?२) जगातील पहिला मोबाईल कॉल कोणी केला ?३) जपानची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी माजी पंतप्रधान शिंजो आबे यांनी ज्या उपाययोजना केल्या त्यास काय नाव पडले ?४) मुळाक्षरे म्हणजे काय ?५) 'फोर्ट विल्यम' म्हणजेच आजचे कोणते शहर होय ?*उत्तरे :-* १) बेट नॅश ( ८६ वर्षे ) , अमेरिका २) मार्टिन कूपर , ३ एप्रिल १९७३ ३) आबेनॉमिक्स ४) अक्षरांचा समूह जो भाषेत वापरतात त्यांना मुळाक्षरे म्हणतात. ५) कोलकाता *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● दिलीप इंगळे● हरिहर धुतमल● हितेश माधवी● साई गाडगे● प्रवीण दबडे पाटील● शिल्पा जोशी● नागेश पडकूटलावार● अविनाश पांडे● नमन यादव● सुनील देवकरे● अमरजुल हुसैन● दादाराव जाधव● नंदकुमार कौठकर● अभिजित राजपूत● माधव उमरे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••• ●🚩🚩 ‼ *विचार धन*‼ ● 🚩🚩••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *टाळ वाजे....मृदंग वाजे..* *वाजे हरीची वीणा.....!* *माऊली निघाले पंढरपुरा..* *मुखाने विठ्ठल- विठ्ठल म्हणा.!**हा सगळा भक्तीसागर, विठु नामाच्या गजरात तल्लीन होऊन, नाचत-गाजत एकजीव होऊन माऊलीं सोबत दिवसभर पायी चालत संत स्वरूप वारकरी, आपल्या विठुच्या दर्शनाला पंढरीकडे चालत असतात. क्षणभर वाटतं की अथांग सागर संथ झाला. ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष करीत हा आषाढी वारी पालखी सोहळा पुढे सरकत असतो.**या वारीमध्ये असेही काही क्षण असतात जे मनाला सुखद प्रसन्नता देतात. विठ्ठल-विठ्ठल नामाचा अखंड गजर...भागवत धर्माचे प्रतीक असलेली आसमंतात फडकणारी पताका...चहूबाजूंनी उत्साहीत वैष्णवांचा भक्तीसागर... आणि वायुवेगाने धावणारा अश्व...अशा भक्तीमय वातावरणात लक्षावधी भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा एक क्षण म्हणजे...' रिंगण ' सोहळा..!* *दिंड्या गरूड टके पताकांचे भार ।* *होतो जयजयकार.... नामघोष ॥* 🚩 *॥ रामकृष्णहरी ॥*🚩 *विठ्ठल ॥ विठ्ठल ॥ विठ्ठल ॥*🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल-9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबिराचे बोल* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• पाहन पूजै हरि मिलैतो मै पूजूँ पहार ।ताते तो चक्की भलीपीसि खाय संसार ।सारांश : दगड-धोंडे पूजणार्‍यांचा समाचार घेताना महात्मा कबीर म्हणतात की दगाड-धोंडे पूजल्यामुळे इच्छित साध्य झालं असं होईल, मनोकामना पूर्ण होतील किवा देवाची प्राप्ती होणार असेल तर मी अख्खा पर्वतच पूजायला तयार आहे. त्यापेक्षा दगडापासून बनलेल्या जात्याची काळजी घ्यायला मला आवडेल. कारण हे जातं धान्य भरडण्याच्या कामी येतं. त्यापासून पीठ मिळतं. त्यामुळे जगातील जीवांची भूक तरी भागते. श्रद्धेच्या नावाखाली लोक दगडा-धोंड्याला पूजत राहातात. काही जण रंग फासलेले किंवा हळदी-कुंकू लावलेले दगड दिसताच हात जोडतात. गाडीवरून जाताना मंदिर येताच गाडीचा भोंगा वाजवतात. जसा काही मंदिरातला देव झोपलाय अन आवाज देवून हे त्याला जागं करित आहेत. पहावं ते नवलंच ! एकाचं बघून दुसरा करणार अन ती प्रथाच होणार. आज संगणक युगात वावरताना आंतरजालात दडलेलं जगाचं ज्ञान संगणकावर एका क्लिक मध्ये आपल्यासमोर येतं. संगणक माहिती आदान प्रदानाचं यंत्र आहे. .हे माहित असून सुद्धा त्याला चालू करण्यापूर्वी त्याची पूजा अर्चा करणारे . त्यावर धर्माचे सांकेतिक ठसे उमटवणारे, अज्ञानाचं जोखड वाहणारे ढोंगी बुवा, मौलवी यांचं विज्ञानानंच बणवलेल्या माईकवरून 'ये विज्ञान फिज्ञान सब झुट है । म्हणनं अन विज्ञान शिकलेल्या श्रोतृ समुदायाकडून माना हलवून प्रतिसाद देणं किती ढोंगी व भंकस पणाचा कळस आहे बरं हा ! अशी मानसिकता पाहिली की दया यायला लागते. कोणता संस्कार व शिकवण देत आहेत बरं आपल्या वर्तन अन करणीतून भावी पिढ्यांसाठी ! खरंच का जगू शकत नाही माणूस ढोंगाशिवाय ! का झिडकारत नाही अज्ञानाची काजळी ? विज्ञान आणि मानवतावादाचा मेळ घालत विचारचनं विवेकाचे दीप प्रज्वलित करता आले तर जीवनात दररोजच दिवाळी साजरी होईल. एकनाथ डुमणे, मुखेड📱 9096714317•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण आपले सुखी जीवन जगण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतो आणि सुखी जीवन जगण्यासाठी पैसा कमवतो.तो पैसा एवढा कमवतो की,त्या पैशापायी आपण काय करत आहोत हा समजायला मार्ग सापडत नाही.ज्या गोष्टींसाठी आपण पैसा मिळवला आहे त्यासाठी तर जरुर वापरायला पाहिजे.आपल्या सुखासाठी तर आपण कमवतोच पण आपल्यासारखे सुख इतरांनाही मिळावे असे वाटत असेल तर आपल्या कर्तृत्वाचे हात अशांसाठी पुढे करा की, त्यातून तुमम्हालाही समाधान वाटले पाहिजे.जे अनाथ,अपंग,अंध,निराधार,वृध्द आहेत त्यांना तुमच्याकडून कशाची तरी अपेक्षा आहे अशांना आपण आपल्या केलेल्या कमाईतून काहीतरी मदत करुन जीवनाचे सार्थक करावे.याही व्यतिरिक्त समाजकार्य, देशकार्यासाठीही जे शक्य आहे ते आपल्या परीने करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या आपण कमवलेल्या कमाईचे सार्थक होईल.केवळ आपण आपलाच स्वार्थ साधण्यासाठी पैसा कमावला तर त्यात आत्मिक समाधान लाभणार नाही.वेळ निघून गेल्यावर असे होऊ नये की,आपण एवढे कमावले आहे त्यातून आपण आपल्या स्वार्थासाठीच केले आहे पण इतरांसाठी काहीच केले नाही.अशा पश्चातापात पडण्यापेक्षा आपला हात अशांसाठी साठी पुढे करा की,खरी गरज त्यांना आहे.एक आपला हात पुढे केला तर अनेक तीर्थयात्रा करुनही पुण्य मिळणार नाही तेवढे पुण्य आणि समाधान मिळेल.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🌹🌱🌹🌱🌹🌱🌹🌱 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हेतल चा अनुभव*हेतल दुपारी शाळेतून घरी आली. घराला कुलूप होते. कारण तिचे आई बाबा लग्नाला गेले होते. तिने कुलूप उघडले व घरात आली. खिडक्या उघडल्या. गणवेश बदलला. ती हात पाय धुऊन खाऊ शोधु लागली. अचानक जोरदार पाऊस पडू लागला. तिने पटापट दारे खिडक्या बंद केल्या. तिचे लक्ष घड्याळ कडे गेले. बराच उशीर झाला आहे, असे म्हणून ती जवळच्या खुर्चीत बसली. तिला हळूहळू पावसाचे गाणे आठवू लागले. ती हळूहळू गुणगुणू लागली. आता पावसाचा आवाज कमी झाला व तिने खिडक्या उघडल्या. तरीपण रिमझिम रिमझिम पाऊस पडत होता. हळूहळू पाऊस थांबला. पानाआड लपलेले पक्षी बाहेर आले व त्यांनी आपल्या पंखाना झटकले. बाहेर लख्ख ऊन पडले. बाहेर कसं स्वच्छ सुंदर वाटत होते. आता संध्याकाळ झाली. दारावरची बेल वाजली +डिंग डाँग) आई आली असे म्हणतात हेतल पळत दाराकडे गेली. तिने दार उघडले. आणि आईबाबा तिचा समोर उभे होते. इतक्यावेळ कंटाळलेली हेतल आईला जाऊन बिलगली. हाच होता तिचा अनुभव.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~📅 दि. 11/07/2022 वार - सोमवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागतिक लोकसंख्या दिन*💥 ठळक घडामोडी :-१९९४- दिल्लीच्या माजी पोलीस महानिरीक्षक किरण बेदी (तुरुंग) यांना ' रॅमन मॅगॅसेसे पुरस्कार' जाहीर.२००१-आगरताळा ते ढाका या शहरादरम्यान बससेवा सुरू झाली.२००३ - १८ महिने बंद असलेली लाहोर-दिल्ली बस सेवा पुनः सुरू.२००४ - सी.आय.ए.च्या निदेशक जॉर्ज टेनेटने राजीनामा दिला.२००६ - मुंबईत उपनगरी रेल्वे गाड्यांमध्ये स्फोट. १००हून अधिक ठार.💥 जन्म :-१९२२-शंकरराव खरात,दलित साहित्यिक, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू.१९१६ - गॉफ व्हिटलॅम, ऑस्ट्रेलियाचा २१वा पंतप्रधान.१९३० - जॅक अलाबास्टर, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.१९५० - जिम हिग्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.१९५३-सुरेश प्रभू, माजी केंद्रीय मंत्री💥 मृत्यू :-१८०४ - अलेक्झांडर हॅमिल्टन, अमेरिकेचा अर्थमंत्री.१९५९ - चार्ली पार्कर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.१९८९ - सर लॉरेंस ऑलिव्हिये, ब्रिटीश अभिनेता.२००९-शांताराम नांदगावकर-गीतकार*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *नैसर्गिक शेतीचे सूरत मॉडेल संपूर्ण देशासाठी आदर्श बनेल - पंतप्रधान नरेंद्र मोदी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महापूजा केली. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, मुलगा खासगार श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे आणि नातू रुद्रांश शिंदे असं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं.*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *गडचिरोलीत मुसळधार पाऊस, आलापल्ली ते भामरागडसह अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *गेल्या चार दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. कोकणासह विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईतही मुसळधार पाऊस पडत आहे, आता पुढील दोन दिवसही मुंबईत ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. मुंबईत १२ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट असणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *केंद्र सरकारने सामाजिक आर्थिक जनगणनेची माहिती देशभरातील राज्यांना दिली असती तर ओबीसी समाज अडचणीत आला नसता, अशा शब्दात भुजबळ यांनी केंद्र सरकारवर केली टीका*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सूर्यकुमारचं शतक व्यर्थ, इंग्लंडला व्हाईट वॉश देण्याची संधी हुकली, 17 धावांनी भारत पराभूत तरी मालिका 2-1 ने जिंकली*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *रशियात जन्मलेल्या पण कझाकिस्तानचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एलेना रायबाकिनाने विम्बल्डन स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला. अंतिम लढतीत एलेनाने ट्यूनिशियाच्या ऑन्स जबेरवर 3-6, 6-2, 6-2 अशी मात केली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - कानमंत्र* https://storymirror.com/read/story/marathi/ohy3fxfi/kaanmntr/detailवाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌍 *पृथ्वीचा परीघ किती आहे ?* 🌍या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी आपल्याला आपली पृथ्वी एखाद्या चेंडूसारखी गोल, गरगरीत, वाटोळी आहे हे गृहित धरायला हवं. वास्तवात ती तशी नाही. दोन्ही ध्रुवांच्या इथे ती जराशी दबल्यासारखी आहे. उलट विषुववृत्ताच्या ठिकाणी ती जराशी फुगल्यासारखी आहे. स्वतःभोवती सतत ती गरगर फिरत असते, त्यामुळे तिच्या आकारात हा फरक झालेला आहे. तरीही तिचा परीघ किती आहे हे समजून घेण्यासाठी आपण ती गरगरीत आहे, असं समजल्यास फारसा फरक पडणार नाही.आता परीघ म्हणजे कोणत्याही एका ठिकाणाहून आपण पृथ्वीच्या पृष्ठभागाला धरून सरळ प्रवास करत निघालो तर परत त्याच ठिकाणी पोहोचेपर्यंत आपण किती मजल मारली असेल, याचं गणित आहे. तेव्हा अशा प्रवासासाठी असलेल्या साधनांवरूनच आपण या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू शकतो.पृथ्वीच्या काळी समुद्रावर प्रवास करणाऱ्या नावाड्यांना आपण कुठे आहोत, कुठे चाललो आहोत हे समजण्यासाठी फारशी साधने नव्हती. त्यामुळे आकाशातल्या ग्रहगोलांनाच विचारात त्यांची वाटचाल होत असे. उत्तर गोलार्धात ध्रुवतारा उत्तर दिशा दाखवत असे. त्याच्यानुसार मग इतर दिशा ओळखल्या जात. तसंच आपण किती मजल मारली आहे हे समजण्यासाठीही अशाच गणताची मदत घेतली जात असे. त्यातूनच नॉटिकल माईल म्हणजेच 'नौकायानातला मैल' मैल ही संकल्पना पुढे आली. याचंच संक्षिप्तीकरण होऊन 'नाॅट' हे एकक रूढ झालं आहे. त्यामुळे जहाजांचा वेग हा दर ताशी अमुक इतके नाॅट असा मोजला जातो.जमिनीवरून प्रवास करत असतानाही आपण मैल हे अंतर मोजण्याचे एक एकक पाळतो; पण नॉटिकल माईल आणि आपल्या नेहमीच्या ओळखीचा मैल यांच्यात फरक आहे, कारण त्या एककांची व्याख्याच वेगळी आहे. पृथ्वी गोलाकार असल्यामुळे त्या गोलाचे ३६० अंश संभवतात. या वर्तुळापैकी एक मिनिटाची आर्क म्हणजे एक नॉटिकल माईल अशी त्याची व्याख्या केली गेली आहे. म्हणजेच या वर्तुळाच्या एक अंशाच्या एक-साठांश इतक्या भागाचा प्रवास केल्यास एक नॉटिकल माईल अंतर कापलं जातं. तेव्हा संपूर्ण ३६० अंशांचा प्रवास करायचा झाल्यास ६० x ३६० म्हणजेच २१६०० नॉटिकल माईल इतकं अंतर होतं ; पण एक नॉटिकल मैल हा आपल्या जमिनीवरच्या मैलापेक्षा मोठा असल्यामुळे हेच अंतर २४८५७ मैल किंवा ४०००३ किलोमीटर इतकं भरतं.*डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातुन* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••जगात दुसऱ्याला हसणे सोपे पण, दुसऱ्यासाठी रडणे फार कठीण.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या निधनाबद्दल भारताने कोणत्या दिवशी राष्ट्रीय दुखवटा पाळला ?२) जगात व्हाट्सअप्पचा सर्वाधिक वापर कोणत्या देशात होतो ?३) वर्ण म्हणजे काय ?४) नाशिक येथे उदोजी वसतिगृह कोणी सुरू केले ?५) मुस्लीम लीगचे प्रथम अध्यक्ष कोण होते ?*उत्तरे :-* १) ९ जुलै २०२२ २) भारत ३) मूलध्वनी जो आपल्या मुखातून निघतो त्याला वर्ण म्हणतात. ४) छत्रपती शाहू महाराज ५) आगाखान*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● शिवाजी सूर्यवंशी● अनुपमा अजय मुंजे● प्रभुनाथ देशमुख● प्रमोद मंगनाळे● संतोष चव्हाण● नरेश गोट्टम● साईकिरण अवधूतवार● प्रकाश नाईक● स्वप्नील शिंदे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*गाण्याचा रियाज करावा तसा दु:खाचा रियाज करता येईल का? गाण्याच्या रियाजाने गायकांस त्याचा आवाज टिकवून धरता येतो. आवाजाची धार शाबूत राहते. त्याचं गाणं दिवसेंदिवस खुलत जातं. दु:खाच्या रियाजाने असं काही होईल का? दु:ख जर आणखीनच टोकदार होणार असेल तर दु:खाचा रियाज करायला कुणी धजणार नाही. कुणाला हवं आहे दु:खं ! नकोच आहे दु:खं. त्याच्यापासून सुटका व्हावी म्हणून पृथ्वीभर जेवढे काही देव आहे, त्यांना साकडे घालून होते. खुद्द देवालाच दु:खाच्या संदर्भात जाब विचारणा-या माणसाची कथा आपण ऐकलीच आहे.**माणूस देवाला म्हणतो की, 'देवा तू सुखात माझ्याबरोबर असतो. कारण तेंव्हा दोन माझी अन् दोन तुझी पावलं उमटलेली असतात. मात्र दु:खात तू माझ्यासोबत नसतोस, कारण तेंव्हा माझी एकट्याचीच पावलं उमटलेली असतात !' तेंव्हा देव त्यास म्हणतो,'अरे दु:खातही मी तुझ्याबरोबरच होतो! ज्या दोन पावलांची गोष्ट तू करतो आहेस, ती पावलं तुझी नसून माझीच आहे. मी तुला कडेवर उचलून घेतलं होतं.' तरी माणूस मान्य करणार नाही. हीच माणसाची मोठी समस्या आहे. माणूस दु:खाचा बाऊ फार करतो. दु:खाची सवय करून घ्यायची ..ही गोष्ट फार लांब राहिली. सुख पाहता जवापाडे । दु:ख पर्वताएवढे ॥ तुकाराम महाराजांनी सुखाचे आणि दु:खाचे माप आपल्यासमोर ठेवले आहे. सुख जवसाच्या 'बी' इतके लहान, तर दु:ख पर्वताएवढे विशाल आहे. जवसाच्या बी इतक्या छोट्या असलेल्या सुखाचे व्यवस्थापण आपण करीत असतो. मात्र, पर्वताएवढ्या दु:खाचे व्यवस्थापण आपण बिलकुलही करीत नाही. म्हणून ते कमी व्हायच्या ऐवजी वाढत जाते..इतके की जवसा एवढ्या सुखाचाही तेच चट्टामट्टा करून टाकते.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡ *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबिराचे बोल* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• नागिन के तो दोये फन,नारी के फन बीसजाका डसा ना फिर जीये, मरि है बिसबा बीस।सारांश महात्मा कबीर व्यभिचारी व दुराचारी स्त्री-लंपटाना वरील दोह्यातून सचेत करतात. सापिनीला तर केवळ दोनच दात असतात. तिचा दंश झाला तर वैद्याकडून विष उतरवून टाकता येईल. परंतु स्त्रिला वीस दात असतात. तिचा दंश ज्याला झाला त्यातला कोणीही जीवित सुरक्षित राहू शकत नाही. तिचा दंश जर वीस लोकांना झाला तर वीसचे वीस मरून जातील. काम भावना सीमित असली पाहिजे. तिचं संतुलन राखता आलं पाहिजे. काम भावनेचं संतुलन बिघडलं की ती माणसाच्या आवाक्यात राहात नाही. ती त्याला मन मानेल तशी नाचवते. परिणाम स्वरूप माणूस अधःपतित होतो. लोक लज्जेचा , हेटाळणीचा विषय होतो. मग ती ईश्वरांची रूप मानलेली पात्र असोत की सामान्य जण साबुत राहात नाहीत. शंकर , इंद्र, चंद्र, रावणाचे चारित्र्य या माया मोहिणीने डागाळून टाकले. तिथं सामान्यांची काय बात घेऊन बसला आहात. यावर चांगदेवांच्या पुढील ओळी फारच बोलक्या आहेत.वासनेच्या मागे नको धावू मनापहा त्या रावणा काय झालेचंद्रा पडली भगे इंद्र झाला काळानारद चुकला चाळा भजनाचा अगदी अलीकडे समाजानं ज्यांना डोक्यावर घेतलं होतं अशा संत म्हणवून घेणार्‍यांनी स्व-संतुलन हरवून वासनेच्या आहारी जावून आज ते गजाआड दुर्दशेचे भोग भोगत आहेत. भल्या भल्यांची मायेनं अशी वासलात लावून टाकलीय. मात्र ज्यांनी स्वतः वरील नियंत्रण ढळू दिलं नाही. अशी पात्रंही कमी नाहीत की जी अनुकरणास पात्र ठरलीत. शुक, भीष्म हे निश्चयाचे महामेरूच होते. जगद्गुरू तुकोबारायही माया मोहात गुरफटलेल्या जीवांना पाहून हताश होवून म्हणतात बुडती हे जण न देखवे डोळा ।येतो कळवळा म्हणोनिया । तेव्हा माणसानं आपण अवहेलनेचे धनी होणार नाहीत . याची जाणीव ठेवून वागण्याचा प्रयत्न करावयास हवा. तुकोबांनी सांगितलेलं 'पराविया नारी माऊली समान...' हे सुत्र कायम जपलं जपायला हवं. एकनाथ डुमणे, मुखेड📱 9096714317•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••ज्याप्रमाणे विद्यार्थीजीवनात विद्यार्थी मन लावून जिद्दीने आणि अभ्यासात सातत्य ठेवून परीक्षेत यश मिळवतो.त्याचप्रमाणे माणसाने जीवनात कोणत्याही कठीण प्रसंगावर विजय मिळवायचा असेल तर आपल्या मनाची तयारी,त्यासाठी लागणारी मनातून जिद्द आणि यश मिळेपर्यंत सातत्य ठेवायला हवे.समजा पहिल्याच प्रयत्नात अयशस्वी झाले तर तिथेच माघार न घेता आपण त्यात कुठे कमी पडलो याचा शोध घेऊन त्यात सुधारणा करण्याची तयारी करावी आणि आपले मन खचू न देता तेवढ्याच जोमाने तोंड देण्यासाठी सज्ज रहावे मग तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. मग तुमच्यासमोर कितीही आणि कोणताही कठीण प्रसंग असला तरी तुम्ही माघार घेणार नाहीत.©व्यंकटेश काटकर,नांदेड.संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सकारात्मकता* एके दिवशी एक बैल विहिरीत पडला. बैल जोराने ओरडत होता. आणि मालक विचार करत होता, याला बाहेर कसे काढायचे .त्याने विचार केला बाहेर काढणे अवघड आहे. नाहीतरी बैल म्हातारा आहे. त्याला वाचवून काही फायदा नाही, त्यापेक्षा त्याला विहिरीतच पूरून टाकू. मालकांने आजूबाजूच्या लोकांना मदतीला बोलावले. सगळेजण विहिरीत माती लोटत होते. बैल आणखीनच हंबरू लागला. थोडा शांत झाला. थोड्यावेळाने मालकांनी विहिरीत डोकावले, पाहतो तो काय बैलाच्या पाठीवर जशी माती पडत होती तसतसा ती माती झटकून तो मातीतून पाय काढून उभा राहत होता शेवटी विहीर बुजली. बैल विहिरीच्या बाहेर आला व वाट दिसेल तिकडे पळू लागला . तात्पर्य : तुमच्या आयुष्यात अनेकदा तुमच्यावर माती फेकली जाईल, वेगवेगळ्या प्रकारची घाण तुमच्यावर फेकली जाईल, पुढे जाण्यापासून तुम्हाला रोखले जाईल ,तुमच्यावर टीका होईल, तुमचे यश पाहून मत्सराने वाईट बोलतील ,अशावेळी खचून जायचे नाही. निराशेच्या विहिरीत पडून राहायचे नाही. धाडसाने अंगावरील घाण झटकून योग्य तो धडा घेऊन त्याचीच शिडी करून पुढे जायचे.त्यासाठी सकारात्मक विचार करा. सकारात्मक जगा.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~📅 दि. 09/07/2022 वार - शनिवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-१८७३ - मुंबई शेअर बाजार एका वडाच्या झाडाखाली सुरू झाला.१९५१ - भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली१९६९ - वाघाला भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यात आले.💥 जन्म :-१९२५ - गुरू दत्त, हिंदी चित्रपट अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक.१९३८ - संजीव कुमार, हिंदी चित्रपट अभिनेता.💥 मृत्यू :-२००५-डॉ रफिक झकारिया, महाराष्ट्राचे माजी नगरविकास मंत्री आणि लोकसभा सदस्य*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *राज्य निवडणूक आयोगाने 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम केला जाहीर, 18 ऑगस्टला मतदान तर 19 ऑगस्टला मतमोजणी होईल, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुख्यमंत्र्यांचा ताफा शहरातून जात असताना अन्य वाहतूक थांबवली जाणार नाही.. व्हीआयपींच्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल नको; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोलीस महासंचालक आणि आयुक्तांना निर्देश*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *राज्यात पुढचे चार ते पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापूरात रेड अलर्ट*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाराष्ट्रातील जनतेच्या खिशाला कात्री, महावितरणने इंधन समायोजन आकार अर्थात FAC मध्ये प्रचंड वाढ केल्याने ग्राहकांना जादा आकाराने खरेदी करावी लागणार वीज*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या, गोळीबारानंतर उपचारादरम्यान मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *वैष्णवमय झालं पंढरपूर, वारकऱ्यांना आस विठूरायाची, विठूमाऊलीच्या भेटीसाठी संतांच्या पालख्या पंढरीच्या वेशीवर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी भारतीय संघात मोठे बदल; विराट कोहली, ऋषभ पंत व रवींद्र जडेजा संघात परतणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - रेल्वेतील शाळा*https://storymirror.com/read/story/marathi/n96hoqhe/relvetiil-shaalaa/detailवाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *माणूस जास्तीत जास्त किती जगू शकतो ?* 📙'जीवेत शरद: शतम्' असा आशीर्वाद किंवा शुभेच्छा कोणालाही दिल्या जातात. माणसाचं आयुष्य शंभर वर्षांचं आहे अशी जी एक सर्वसाधारण समजूत आहे त्याचीच ही परिणती आहे; पण माणूस जास्तीत जास्त शंभर वर्षे जगू शकतो या समजुतीला कोणता आधार आहे ? कारण आजही शंभरी गाठलेल्या व्यक्तींची संख्या पूर्वीपेक्षा जास्त असली तरी एकूण लोकसंख्येच्या मानाने नगण्यच आहे. म्हणून तर शंभरी ओलांडलेल्या आलेल्या व्यक्तीकडे नवलाईने पाहिलं जातं.तेव्हा खरा प्रश्न हा आहे की माणसाचं सरासरी आयुर्मान किती आहे ? त्याला काही नैसर्गिक मर्यादा आहेत की नाही ? इतिहास पाहिला तर याचं उत्तर दे़ सोपं होत नाही. कारण माणसाचं सरासरी आयुर्मान वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या भौगोलिक स्थानी वेगवेगळं राहिलं आहे. अश्मयुगात ते जेमतेम २५ ते ३० वर्षांचं होतं. ब्राँझयुगात तर ते अठरापर्यंत घसरलं होतं. पण त्याच युगात स्वीडनसारख्या ठिकाणी ते त्याहून दुप्पट ते तिप्पट होतं. सिकंदर वयाच्या बत्तिसाव्या वर्षी निधन पावल्याचं इतिहास सांगतो; आणि आपण त्याला अल्पवयातच मृत्यू आल्याचं निदान करतो. पण ग्रीक संस्कृतीत काय किंवा रोमन संस्कृतीत काय सरासरी आयुर्मानच तिशीपेक्षा जास्त नव्हतं. विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाही पंचवीस ते तीस हीच सीमा त्यानं गाठली होती. आज जगातलं सरासरी आयुर्मान ७० वर्षांचं आहे. आपल्या देशातही परिस्थिती वेगळी नाही. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा म्हणजेच उण्यापुऱ्या साठ वर्षांपूर्वी देशातलं सरासरी आयुर्मान ३५ वर्षांचं होतं. आज ते ६७ झालं आहे.याचं कारणही स्पष्ट आहे. मृत्यूदरात झालेली लक्षणीय घट. ती तशी झाली कारण सार्वजनिक आरोग्यसुविधांमध्ये फार मोठा फरक पडला आहे. ज्या सांसर्गिक रोगाला माणूस बळी पडत असे त्यापैकी बहुतेक रोगांना आळा घालण्यात आपण यशस्वी झालो आहोत. त्या रोगांचा उपसर्ग होण्यास अटकाव करणाऱ्या प्रभावी लसी उपलब्ध झाल्या आहेत, तसंच लागण झाल्यानंतरही त्यावर मात करणारी शक्तिशाली औषधंही सहजगत्या मिळत आहेत. आहारात आणि त्यामुळे उपोषणातही वेगाने प्रगती झाली आहे. वाढत्या वयात मिळणाऱ्या सकस आणि पर्याप्त अन्नापायी माणूस सुदृढ बनत चालला आहे. उतारवयातही त्याचं स्वास्थ्य टिकून रहत आहे.ही जी वाढ झालेली आहे ती नैसर्गिक मर्यादा गाठण्यात ज्या काही अडचणी येत होत्या त्यांचं निराकरण झाल्यामुळे आलेली आहे. माणसाच्या जनुकीय साठय़ामध्येच त्याच्या एकंदर आयुर्मर्यादेचं इंगित दडलेलं आहे. २००९ सालचं नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या वैज्ञानिकांनी केलेले संशोधन या विषयाशीच निगडित आहे. त्यानुसार आपल्या यच्चयावत शारीरिक, शरीरक्रियाविषयक तसंच वर्तणुकीबाबतचेही गुणधर्म निर्धारित करणारी जनुकं च्या गुणसूत्रांमध्ये लपलेली असतात, त्या गुणसूत्रांच्या एका टोकाला असलेल्या टोपीमध्ये, टेलोमिअरमध्ये, आयुर्मर्यादा निश्चित करणाऱ्या जनुकांचा साठा असतो. ती जनुकं कार्यान्वित करणारं एक विकरही, टेलोमरेझ शोधुन काढलं गेलेलं आहे. तेच आयुर्मर्यादेची निश्चिती करत असतं. त्याचं कार्य नेमकं कसं चालतं याचं गुढ उकललं की मग माणूस जास्तीत जास्त किती जगू शकतो ? या प्रश्नाचं नेटकं उत्तर देणं शक्य होईल.*बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••वेळ आल्यावर आपल्या गरजा बदला पण आपल्या गरजेसाठी आपली माणसं बदलू नका.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) १९७३ मध्ये सार्वजनिक ठिकाणी पोर्टेबल मोबाईल फोन वापरणारे पहिले व्यक्ती कोण ?२) ब्रिटिश सरकारच्या 'चेव्हनिंग' या जागतिक प्रतिष्ठेच्या ४५ लाखांची शिष्यवृत्ती मिळविणारा देशातील पहिला वकील कोण ?३) संत तुकारामांच्या गाथेचा इंग्रजी अनुवाद प्रथम कोणत्या कवीने केला ?४) दादोबा पांडुरंगांनी मानवधर्म सभेची स्थापना कोठे केली ?५) संस्कृतात क्रियापदाला काय म्हणतात ?*उत्तरे :-* १) मार्टिन कूपर २) दीपक चटप , चंद्रपूर ३) कवी दिलीप चित्रे ४) सुरत ५) आख्यात*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● श्रीकृष्ण राचमाळे● पंडीत पवळे● बालाजी अनमूलवाड बेळकोणीकर● घनश्याम सोनवणे● महेश जाधव● साईनाथ विश्वब्रम्ह● अनिल उडतेवार*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*एकदा पंक्चर काढणा-याकडे उभा असताना एका टायरमधली हवा फस्सकन गेली. वाटले 'मृत्यू' असाच होत असणार. मृत्यूविषयी एक ऑब्सेशन अनेकांच्या मनात खोल असते. एका मित्राला सतत एक विचित्र समस्या छळत असते. त्याच्या अंत्यदर्शनाला येणारे लोक गाड्या कुठे लावतील ? त्या दिवशी पाऊस असेल का ? आता याची काळजी मागे राहिलेले घेतील की ! अशी सत्वहीन माणसं जगण्याला काही देत नाहीत आणि घेतही नाहीत.**दु:ख घेता येत नाही तर देऊ नये. 'सुख द्यावे आणि घ्यावे' हे सूत्र जगण्याचा 'तोल आणि ताल' संभाळते. कविराज विंदा करंदीकर यांनी कुणाकडून काय घ्यावे याची यादी दिलीय, पण.... असे घेता येते का ? काही जिंदादिल माणसे सतत देत राहतात, घेणे त्यांच्या गावी नसते. जिंदगी घोटा-घोटाने पिण्याचा 'अमृतरस' आहे. या रसाचे भोक्ते किती राहिलयं ते चुकूनही पहात नसले तरी त्यामुळे त्यांचे 'अक्षयपात्र' भरलेले राहते. तसे तुमचेही राहो, हिच आज 'अक्षयतृतीया'ची सर्वांना शुभेच्छा !*••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••☀☀☀☀☀☀☀☀☀ *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबिराचे बोल* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जहाँ न जाको गुन लहै, तहाँ न ताको ठाँव । धोबी बसके क्या करे, दीगम्बर के गाँव ॥ अर्थ : जिथे आपल्याला पात्रता व योग्यतेनुसार गुण व कौशल्य दाखवण्यासाठी कार्य कर्तृत्त्व करण्यास वावच नसेल तिथे राहून काय हशील होणार आहे ? तिथे राहाणे व्यर्थच आहे. ही बाब पटवून देताना महात्मा कबीर म्हणतात की, ज्या गावात सर्व दिगंबरच (कपडे विरहित लोक) राहातात तिथे राहून धोब्याला काय उपयोग होणार आहे ? कला ही जीवनाची सावली मानली जाते. 'कलेनेच माणसाची ओळख ।एरव्ही कोण पुसतो आणिक ?तुम्ही आहात राव की रंक ।आता कोणी पुसेना ।' असे राष्ट्रसंत तुकडोजी ग्रामगीतेत म्हणतात. कलावंतानं आपली कला जीवनाचा आधार केली व कलेचा अहंकार अंगी न बाळगता तिला विनयशीलतेची जोड दिली की सर्व जग आपलंस होवून जातं. आपलं कसब व कौशल्य अशा ठिकाणी दाखवायला हवं की ते आपल्या जीवनाला स्वावलंबनाकडे नेईल. एकनाथ डुमणे, मुखेड📱 9096714317•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••जेव्हा आपली वेळ वाईट असते तेव्हा आपल्याकडे लोक पाठ फिरवतात आणि जेव्हा आपली वेळ चांगली असते तेव्हा सगळेच जवळ येतात.परिस्थिती कशीही असली तरी प्रत्येकवेळी सुखदुःखात जे आपल्या पाठीशी असतात आणि आपण प्रत्येकवेळी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता पाठीशी असतो तीच खरी माणुसकी असते आणि तीच खरी अंत:करणातून एकमेकांबद्दलची खरी आत्मियता असते.© व्यंकटेश काटकर,नांदेड.संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शहाणा ग माझा राजा*मनू शाळेच्या पायऱ्या उतरत होता. अचानक त्याला मुसमुसण्याचा आवाज आला. त्याने इकडे तिकडे पाहिलं, तर पायरीच्या कडेला एक फुलपाखरू पडलं होतं. फुलपाखरू जखमी होतं. " अरे काय काय झालं तुला? " मनूनं विचारलं. " तो गणू दृष्ट आहे. त्यांना मला पकडले . माझे पंख फाटले”.“ अरे रे! "“ आता मी घरी कसा जाऊ? मला आई पाहिजे ना.?”“ कुठे आहे तुझं घर?”“ त्या सुर्यफुलाच्या शेतात.”“ चल. मी नेतो तुला तुझ्या घरी.”“ हळूचं हं ! " मनून फुलपाखराला हळूच ओंजळीत घेतलं आणि सूर्यफुलाच्या शेतात अलगद सोडलं. घरी गेल्यावर मनूनं आईला ही हकीकत सांगितली. आईन मनूला जवळ घेतलं. मनूचा लाड केला आणि म्हणाली, “ शहाणा ग माझा राजा तो.”तात्पर्य.. मुक्या प्राणिमात्रांची काळजी घ्यावी. कोणालाही आपला त्रास होणार नाही. आपल्यामुळे इजा पोहोचणार नाही ही दक्षता घ्यावी.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~📅 दि. 08/07/2022 वार - शुक्रवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-२०११-रुपयाचे नवीन चिन्ह (Rs.)असलेली नाणी प्रथमच चलनात आली.२००६-मुख्य निवडणूक आयुक्त असतांना केलेल्या कामगिरीबद्दल टी. एन.शेषन यांना" रॅमन मॅगॅसेसे पुरस्कार" जाहीर. १९९७-बीजिंग आशियाई महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत ४६किलो वजनी गटात कुंजुरांनी देवीने रौप्य पदक पटकावले१४९७ - वास्को दा गामाने भारताकडे समुद्रमार्गे प्रयाण केले.💥 जन्म :-१९०८ - वी. के. आर. वी. राव, भारतीय अर्थशास्त्रज्ञ.१९१६ - गोपाळ नीळकंठ दांडेकर, मराठी कादंबरीकार, चरित्रकार.१९५८ - नीतू सिंग, हिंदी चित्रपट अभिनेत्री.१९७२ - सौरव गांगुली, भारतीय क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :-२००६ - प्रा.राजा राव,तत्वज्ञानाचे प्राध्यापक.२००१ - उस्ताद बाळासाहेब मिरजकर, तबला विभूषण.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *गोदावरीचे वाहून जाणारे पाणी सिंचनासाठी वळवण्याबाबत प्रयत्न करा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अधिकाऱ्यांना सांगितले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर आता केंद्र सरकारने पिठाच्या निर्यातीवर घातले निर्बंध*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *आसाममध्ये गेल्या काही दिवसापासून मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत, आतापर्यंत 186 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक बेघर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा पंतप्रधानपदाचा राजीनामा ; नवीन पंतप्रधानांच्या नावाची घोषणा होईपर्यंत ते काळजीवाहू पंतप्रधान असणार, नवे पंतप्रधान म्हणून ऋषी सुनक यांचे नाव आघाडीवर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *संत तुकाराम महाराजांची पालखी पिराच्या कुरोली मुक्कामी; तर संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचा भंडीशेगाव येथे मुक्काम*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अन्नधान्य व खाद्य पदार्थावर नव्याने 5 टक्के जीएसटी, अंतिम बोजा ग्राहकांवर पडणार असल्याचा व्यापाऱ्यांचा आरोप, महागाई वाढण्याची भिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताच्या महिला क्रिकेट संघाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा पराभव करत मालिका 3-0 खिशात घातली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत...*लघुकथा - हाताची जादू ओळखणारा शिक्षक* Audio ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करावे.https://youtu.be/-R9ZpCSvOokलघुकथा वाचण्या साठी खालील लिंक वर क्लीक करावेhttps://storymirror.com/read/story/marathi/19r6650g/haataacii-jaaduu/detailवाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *सलाईन लावण्याचे काय फायदे होतात ?*'डागदर साहेब, दोन तरी सलाईन लावा बघा' किंवा 'एक बाटली सलाईन तरी लावावीच लागेल' अशी रुग्ण डॉक्टरांची वाक्ये नेहमीच ऐकायला मिळतात. सामान्य लोकांना सलाईन म्हणजे जणू संजीवनीच आहे असे वाटायला लागले आहे आणि साध्या इंजेक्शनपेक्षा सलाईन लावल्यावर जास्त पैसे मिळत असल्याने वैद्यक व्यावसायिकही सलाईनचा वापर सढळ हाताने करू लागले आहेत.सलाईन लावावे असे रुग्णांना व डॉक्टरांना दोघांनाही वाटत असले, तरी पण खरेच का सलाईन आवश्यक असते ? सलाईन म्हणजे सोडियम क्लोराइडचे मिठाचे पाण्यातील द्रावण ! हे शिरेतून द्यावे लागते. त्यामुळे ते लगेच रक्तात मिसळले जाते, एवढ्यात त्याचा फायदा. याउलट ते पोटातून दिले, तर रक्तात शोषण व्हायला एक ते दीड तास लागतो. मग सलाईन केव्हा द्यावे लागते ? संडास वा उलट्या जास्त झाल्यास शरीरातील पाणी खूप कमी होते. व्यक्ती बेशुद्धही होतो. अशा काही वेळेला सततच्या मळमळ व उलट्यांमुळे तोंडाने काहीच देता येत नाही. पोटाच्या शस्त्रक्रियेनंतरही तोंडावाटे काही काळ काहीच देता येत नाही. अशा काही विशिष्ट परिस्थितीमध्येच सलाइन लावणे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असते. इतर वेळी मात्र तोंडावाटे द्रवपदार्थ देणेच चांगले. कारण शिरेतून काहीही दिल्यास काही जणांना ताप येऊ शकतो. गंभीर वावड्याने रिअॅक्शन येऊ शकते. तसेच सुई वगैरे निर्जंतुक केलेली नसल्यास कावीळ, एड्स यासारखे रोगही होऊ शकतात. त्यामुळे होता होईस्तोवर सलाईन न घेणेच चांगले.सलाईन म्हणजे शिरेतून दिली जाणारी कोणतेही द्रवरूपातील औषधे असा साधारणत: अर्थ लोक घेतात पण प्रत्यक्षात सलाईनचा अर्थ मिठाचे पाणी असाच आहे ! सलाईन लावणे काही अवस्थांमध्ये प्राण वाचवू शकते, हे जरी खरे असले तरी उठसूट सलाईन लावणे आर्थिक दृष्ट्या पडण्याजोगी नसते व कधी कधी ते जीवावरही बेतू शकते.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••कुणाच्या नादात किंवा वादात पडण्यापेक्षा उद्योगात पडा, खुप प्रगती होईल*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'जग ही एक रंगभूमी आहे' हे प्रसिद्ध वाक्य कोणी म्हटले होते ?२) दलाई लामा यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे नाव काय ?३) छत्रपती शाहू महाराजांनी कोणत्या व्यक्तीला कोल्हापुरात चहाचे दुकान काढून दिले होते ?४) जगातील कोणत्या देशाने लोकशाहीचा प्रथम परिचय करून दिला ?५) जगातील पहिले तरंगते शहराची निर्मिती कोणत्या देशात साकारण्यात येत आहे ?*उत्तरे :-* १) शेक्सपिअर २) कुंदन ३) गंगाधर कांबळे ४) ग्रीस, इ. स. पूर्व ७०० ५) दक्षिण कोरिया*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● सुरेश तायडे● अनिल बेद्रे● मलेश भूमन्ना बियानवाड● आनंदराव नारायणराव सूर्यवंशी● लालू शिरगिरे● श्रद्धा कळसकर● अशोक पवार● दीपक वानखेडे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*तसे आयुष्यभर मागतच असतो या अर्थाने आपण भिकारीच असतो. हातात भिकेचा कटोरा दिसत नाही, म्हणून तो नसतोच असे नाही. अपेक्षेचे छोटे-मोठे कटोरे घेऊनच आपण फिरत असतो. या अपेक्षेचा कटोरा घेऊन भीक मागण्याची सुरूवात होते घरापासून, घराकडून अपेक्षा असते. आई-वडिल, बायको, मूल, बहिण, भाऊ सर्वांकडून अपेक्षा आहेत. उलटपक्षी त्यांनाही माझ्याकडून तेवढ्याच अपेक्षा आहेत. म्हणजे चित्र दिसत नसले, तरीही अपेक्षेच्या भिकेचे कटोरे घेऊन परस्परांसमोर उभे आहोत. एक भिकारी दुस-या भिका-यासमोर उभा आहे आणि दोघेही आरोळ्या ठोकताहेत,'देssरेss...बाssबा... काहीतरी.**मला त्यांच्याकडून प्रेम हवे आहे. स्नेह, विश्वास, माझ्या दुखल्या-खुपल्याबद्दलची विचारपुस हवी आहे. आस्था हवी आहे. सर्वच हवे आहे. ज्यांच्याकडून मला हे सर्व पाहिजे आहे, त्यांनाही माझ्याकडून हेच हवे आहे. अपेक्षेच्या कटो-यात त्यापैकी काही पडतही आहे. त्याने मी आनंदी नाही उलट जे नेमके त्यात पडले नाही त्यानेच आधिक दु:खी आहे. जे मिळाले त्याचा आनंद नाही पण जे मिळाले नाही त्याचा दु:खभारच आधिक आहे. मी फक्त मागतोच आहे. याच्याकडून, त्याच्याकडून, घराकडून-दाराकडून, नात्यांकडून-नात्याबाहेरच्या गणगोतांकडून, ओळखी-पाळखीकडून, एवढेच काय अनोळख्यांकडूनसुद्धा.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🥀🥀🥀🥀 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबिराचे बोल* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••कलि मंह कनक कामिनि,ये दौ बार फांदइनते जो ना बंधा बहि,तिनका हूॅ अमै बंद ।सारांश महात्मा कबीर सांगतात कलीयुगात जो माया मोहात अडकणार नाही. स्त्रियांच्या फंदात पडून जो स्वतःला बिघडवून घेणार नाही तोच या मायावी जगातून सुखरूप सुटेल. तो सर्वांच्या आदरास पात्र होईल. अन्यथा लोक टिकेला सामोरे जावे लागणार. अपमानाचे बोल सहन करावे लागणार. हे ठरलेलेच. म्हणून सन्मार्गावर चालणार्‍या माणसानं माया आणि कामिनी यांच्या मोहात पडणं म्हणजे स्वतःला अधोगतिच्या मार्गाला नेणं होय. रामायण घडण्यामागील मुख्य कारण स्त्री लालसेत सापडते, आर्य अनार्य संघर्षाच्या काळात आर्य पुत्र लक्ष्मणाकडून अनार्य कन्या शुर्पनखा या महाबली राजा रावनाच्या बहिणीला तपमानित केलं जाणं. तिला विद्रुप केलं जाणं. दुर्लक्षित कसं होणार ? ती काय गोरगरीबा घरची पोर थोडीच होती ? फूल हुंगून फेकून दिलं किवा तसाच त्याचा चोळामोळा केला तरी त्याची दखल कोण घेतंय ! मात्र इथ राज कुलाच्या इज्जतीचा पेच. सुडाग्निनं पेटलेल्या एका मानिनीनं दुसरीला संघर्षात ओढलं नाही तरंच नवल ! तिथं दोन्ही पैकी एका बाजुची राख रांगोळी होणं स्वाभाविकंच होतं. नेमकी न्यायाची बाजू कोणाची ? चिकित्सा करणारे करत राहतील .मात्र दोन स्त्रियांच्या पात्राभोवतीच हा महासंग्राम फिरत राहतो. महाभारत म्हणजे सत्ता, संपत्ती आणि सुंदरी यांच्या भोवती फिरणारी भावबंदकीच नव्हती का ! त्यातही अपरीमित हानी झालेली. महारती योद्धे माया, मोहिनीतच गारद केल्या गेलेले. आजही जागोजागी त्या बाबींची पूनरावर्त्ती होताना दिसते. अशा प्रकारापासून सावध व्हायला हवे. एकनाथ डुमणे, मुखेड📱 9096714317•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्यांना जीवन जगण्याची कला अवगत झाली तो कधीच कुणासमोर जीवन कसे जगावे असं विचारत नाही किंवा कोणतीच तक्रार कुणाकडे करीत नाही.तो कसेही आणि कोणतेही संकट असो त्याला तो आपल्या कलेने तोंड देऊन यशस्वी होतो.परंतु ज्यांना जीवन कसे जगावे किंवा जीवनात आलेल्या प्रसंगाला कसे आणि कोणत्या पध्दतीने तोंड द्यावे हे जमत नाही तो कधीच जीवनात यशस्वी होत नाही आणि होणारही नाही.तो दरवेळी काहीना काही बहाणे करुन आपल्या जीवनाला व जगण्याला दोष देत बसतो.आपल्या नशीबाला दोष देण्यापेक्षा हातपाय हलवून जीवन जगायला शिकले पाहिजे हा सकारात्मक विचार आपल्या डोळ्यांसमोर नेहमी ठेवायला शिकले पाहिजे तरच जीवन जगणे आनंददायी होईल अन्यथा दु:खच भोगावे लागतील यांत तीळमात्र शंकाच नाही .© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद ...‌9421839590/8087917063.🌹🌱🌹🌱🌹🌱🌹🌱🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *इसापची समयसुचकता*ग्रीस देशात झांथस या नावाचा एक मोठा माणूस होऊन गेला. त्याच्या घरी इसाप स्वैपाकी होता. एके दिवशी झांथसच्या घरी मेजवानी होती. म्हणून त्याने इसापला आज्ञा केली की, ‘सर्वांत उत्तम असे जे पक्वान्न असेल ते आज पाहुण्यांसाठी कर !’रात्री ठरलेल्या वेळी पाहुणे जमल्यावर सर्वजण जेवावयास बसले. इसापने नुसत्या बोकडाच्या जीभांचे निरनिराळे पुष्कळ पदार्थ तयार केले होते. ते खाऊन पाहुणे फार खूष झाले. तरीही जिभांशिवाय दुसरा कोणताही पदार्थ ताटात नसल्यामुळे झांथस यास थोडेसे आश्चर्य वाटले व रागही आला. तो इसापला म्हणाला, ‘अरे, सर्वांत उत्तम असं पक्वान्न तयार करायला सांगितलं असता तू नुसत्या जिभेचेच निरनिराळे पदार्थ काय तयार करून ठेवलेस ?’ त्यावर इसापने उत्तर दिले, ‘जिभेपेक्षा चांगला असा दुसरा पदार्थ आहे का?’विद्या, तत्त्वज्ञान यांचा उगम जिभेपासून झाला आहे. व्याख्यान, अभिनंदन, लग्न, व्यापार इत्यादी मोठमोठ्या घडामोडी, प्रतिज्ञा या सर्वांचे मुख्य साधन जीभच होय, तिची बरोबरी करणारा दुसरा पदार्थ नाही.’इसापचे हे समयसूचक भाषण लोकांना इतके आवडले की, त्यांनी त्याची फारच तारीफ केली. त्यावेळी झांथस पाहूण्यास म्हणाला, ‘अहो, आजच्याप्रमाणे उद्यासुद्धा रात्री तुम्ही माझ्याकडे जेवावयास यावं, अशी माझी विनंती आहे.’ मग तो इसापकडे पाहून म्हणाला, ‘अरे, आज जसे तू सर्वात उत्तम पक्वान्न तयार केलेस, तसे उद्या तुझ्या मते जे सर्वात वाईट पक्वान्न असेल ते तयार कर.’दुसरे दिवशी सर्वजण जेवायला बसले असता आदल्या दिवशीचेच सर्व पदार्थ जेवणात होते. तेच पदार्थ पाहून पाहुण्यास व झांथस यांना फार आश्चर्य वाटले. मग झांथस इसापला रागाने म्हणाला, ‘अरे, काल जे पदार्थ चांगले होते तेच आज सर्वात वाईट कसे काय झाले?’ त्यावर इसाप उत्तरला, ‘जिभांपेक्षा वाईट असा दुसरा कोणता पदार्थ आहे ? जगात तितकी म्हणून नीचपणाची कृत्ये होतात, त्या सर्वांच्या मुळाशी जीभच कारणीभूत असते. बंड, मारामारी, लबाड्या नि अन्याय यांच्या संबंधाच्या गुप्त बोलाचाली जिभेनेच होतात. त्याचे इशारेही जिभेनेच दिले जातात. मोठमोठी राज्यं, प्रचंड नगरं इतकं नव्हे तर फार दिवसांचे मित्रत्वाचे संबंधसुद्धा जिभेमुळेच नाश पावतात.’ इसापचे हे चातुर्याचे बोलणे ऐकून लोक अगदी चकित झाले.तात्पर्य: कोणत्याही वस्तूकडे निरनिराळ्या दृष्टीने पाहिले असता ती निरनिराळ्या प्रकारची दिसू लागते. त्याचप्रमाणे कोणत्याही वस्तूचा उपयोग जसा चांगल्या कामास होतो तसाच वाईट कामातही करता येतो.चांगले शोधून काढणे ही आपली सचोटी.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~📅 दि. 07/07/2022 वार - गुरूवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :-१८५४ - कावसजी दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली.१९३७ - दुसऱ्या चीन-जपान युद्धास प्रारंभ.💥 जन्म :-१९१४ - अनिल विश्वास, ज्येष्ठ संगीतकार.१९८१ - भारताचा यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी💥 मृत्यू :-१८५४ - गेऑर्ग झिमॉन ओम, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.१९९९ - एम. एल. जयसिंहा, माजी क्रिकेट खेळाडू फलंदाज*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *घरगुती गॅस सिलेंडर दरवाढीचा सर्वसामान्यांना झटका, घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी झाली वाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांचा राजीनामा, उपराष्ट्रपती किंवा राज्यपालपदी वर्णी लागण्याची शक्यता*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *शिवसेनेचे 11 खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती, भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी सेना खासदारांचं पत्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पावसाचा जोर कायम राहिल्यास कृष्णा, पंचगंगा नद्या धोक्याची पातळी ओलांडणार, जनावरांसह स्थलांतरासाठी तयार राहा, प्रशासनाच्या नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सूचना*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुढील 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा कोल्हापुरात रेड अलर्ट, एनडीआरएफच्या टीम्स तैनात*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ज्ञानोबांच्या पालखीचं खुडूस फाट्याजवळ दुसरं गोल रिंगण, तर तुकोबा रायांची पालखी बोरगाव मुक्कामी जाणार, माळीनगरमध्ये तुकोबांच्या पालखीचं उभं रिंगण*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; रोहित शर्माला विश्रांती, तर शिखर धवनकडं कर्णधारपद!*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - फेसबुक मैत्री*https://storymirror.com/read/story/marathi/fn07z43i/phesbuk-maitrii/detailवाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌺 *फुल केव्हा फुलतं ?* 🌺**************************फुलांनी केवळ कवींनाच वेड लावलंय असं नाही; आपल्या सर्वांच्याच चित्तवृत्ती फुलांना पाहून फुलतात. त्यांचे मनमोहक रंग, त्यांचे आकार, त्यांची रचना, त्यांचा डौल खरोखरंच मोहून टाकणारे असतात. म्हणूनच असावं कदाचित, पण आपल्या आयुष्याच्या प्रत्यक क्षणाची साथ फुलं करतात. जन्म झाला म्हणून जशी फुलांची उधळण होते तशीच शेवटच्या प्रवासाला निघतानाही फुलांच्या माळांनी निरोप दिला जातो. प्रेयसीला भेट म्हणून गुलाब देता देताच त्या प्रणयाचं आयुष्याच्या साथीत रुपांतर करतानाही फुलांच्या माळांची देवाणघेवाण करून त्यावर शिक्कामोर्तब करण्यात येतं.हे असे आनंदाचे दिवस वर्षात केव्हाही येऊ शकतात. तरीही प्रत्येक वेळी आपल्याला फुलं मिळत राहतात. म्हणजे ती सदासर्वकाळ फुलतात असं समजायचं का ? तसं नाही. कारण काही फुलं ठराविक हंगामातच मिळतात. काही दिवसाउजेडीच उमलतात तर रातराणीसारखी काही रात्रीच्या वेळीच आपल्या सुगंधाने आसमंत दरवळून टाकतात. ब्रह्मकमळ तर एकदाच आणि तेही मध्यरात्रीच फुलतं. मग हे फुलं नेमकी फुलतात तरी कधी ?हे समजून घ्यायचं असेल तर आधी ती फुलतातच का, हे ध्यानात घ्यायला हवं. ती फुलतात ते आपल्याला आनंद देण्यासाठी नाही, तर वनस्पतींच्या पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेत फुलांचं उमलणं एक कळीची भूमिका बजावत असतं. फुलांमध्ये पुंकेसर आणि स्त्रीकेसर असे परागकण असतात. त्यांच्या मिलनातूनच बी तयार होतं आणि पुढच्या पिढीची नांदी म्हटली जाते. हे मिलन होण्यात कीटक आणि पक्षी मोलाची मदत करतात. त्या मदतगारांना त्यांचं काम करण्यासाठी प्रवृत्त करायचं तर काही आमिष दाखवायला हवं. त्यांना आधी आकर्षित करायला हवं. ते करण्यासाठीच फुलं फुलत असतात. त्यांची ती रंगीबेरंगी छबीही तेच काम करत असते. त्यामुळे ते जेव्हा आकर्षित होतील तेव्हा फुलण्यानेच कार्यभाग साधत असतो.तरीही निरनिराळ्या वनस्पतींची वर्गवारी करणाऱ्या कार्ल लिनैस यानं फुलांचीही त्यांच्या उमलण्यावरून तीन गटात विभागणी केली आहे. काही फुलं हवामानानुसार उमलतात काही कोमेजतात. त्यांना लिनैसनं 'मिटिअाॅरिची' असं म्हटलं आहे. काही दिवसाच्या लांबीनुसार आणि कार्यक्रम आखतात. म्हणजे हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात या वेळा बदलतात. त्यांना त्यानं 'ट्रॉपिची' हे नाव दिले आहे. उरलेली सगळी तिसऱ्या म्हणजेच इक्निनोक्टेल्स या गटात घातलेली आहेत. ती हवामानाची किंवा दिवसरात्रीच्या लांबीची पर्वा न करता दिवसाच्या ठरावीक वेळी फुलतात आणि ठरावीक वेळी कोमेजतात.ज्याँ बातिस्त लमार्क या फ्रेंच वैज्ञानिकाला असं दिसून आलं की फुलण्याच्या वेळी फुलांची उष्णता वाढलेली असते. आपल्या गंधाचा दूरदूरवर फैलाव करण्यासाठी ही वाढीव उष्णता कामी येते, असे त्यानं दाखवलं आहे. काही फुलं तर आसमंताच्या तापमानापेक्षा आपलं तापमान ३५-४० अंशांनीही वाढवू शकतात. तेव्हा फुलांचं तापमान वाढू लागलं की ती फुलतात असंही म्हणता येईल.*बाळ फोंडके यांचा 'केव्हा ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••प्रार्थना करणाऱ्या हातापेक्षा मदत करणारे हात जास्त पवित्र असतात.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) सर्वात कमी वयात महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागली होती ?२) कसोटी क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावांचा विक्रम कोणी केला ?३) मोबाईल फोनचे जनक कोण ?४) 'समाजस्वास्थ्य' हे मासिक कोण चालवित होते ?५) जगात 'बिटकॉईन' या आभासी चलनाला कायदेशीर मान्यता देऊन 'बिटकॉईन सिटी' बनविण्याची योजना आखणारा पहिला देश कोणता ?*उत्तरे :-* १) शिवराज पाटील, ४२ व्या वर्षी, १९७८ साली २) जसप्रीत बुमराह, भारत ( २९ धावा ) ३) मार्टिन कूपर, अमेरिका ४) र. धो. कर्वे ५) एल. साल्वाडोर *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● दत्ताहारी पाटील कदम बेलगुजरीकर, भाजपा तालुका उपाध्यक्ष, धर्माबाद● प्रज्ञा घोडके, साहित्यिक● रमेश चांडके, हैद्राबाद● ऋषीकेश देशमुख, साहित्यिक● सय्यद युनूस, मुख्याध्यापक, उर्दू हायस्कुल● संदीप डोंगरे● महेश जोशी, पत्रकार● श्रीकांत माने● प्रकाश गोरठकर● विजय पाटील रातोळीकर● माधव कांबळे● आशिद लाव्हाळे● ज्वालासिंह घायाळे● दिगंबर पांचाळ● हरी ओम राठोड● व्यंकट ताटेवाड● लक्ष्मण कांबळे● पिराजी कटकमवार● हणमंत जाधव● जगन्नाथ पुलकंठवार● बालासाहेब पेंडलोड● साईनाथ वाघळे● गजानन काठेवाडे● साईनाथ हामंद● शंकर रामलू बलीकोंडावार*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••• ●🚩🚩 ‼ *विचार धन*‼ ● 🚩🚩••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *टाळ वाजे....मृदंग वाजे..* *वाजे हरीची वीणा.....!* *माऊली निघाले पंढरपुरा..* *मुखाने विठ्ठल- विठ्ठल म्हणा.!**हा सगळा भक्तीसागर, विठु नामाच्या गजरात तल्लीन होऊन, नाचत-गाजत एकजीव होऊन माऊलीं सोबत दिवसभर पायी चालत संत स्वरूप वारकरी, आपल्या विठुच्या दर्शनाला पंढरीकडे चालत असतात. क्षणभर वाटतं की अथांग सागर संथ झाला. ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष करीत हा आषाढी वारी पालखी सोहळा पुढे सरकत असतो.**या वारीमध्ये असेही काही क्षण असतात जे मनाला सुखद प्रसन्नता देतात. विठ्ठल-विठ्ठल नामाचा अखंड गजर...भागवत धर्माचे प्रतीक असलेली आसमंतात फडकणारी पताका...चहूबाजूंनी उत्साहीत वैष्णवांचा भक्तीसागर... आणि वायुवेगाने धावणारा अश्व...अशा भक्तीमय वातावरणात लक्षावधी भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा एक क्षण म्हणजे...' रिंगण ' सोहळा..!* *दिंड्या गरूड टके पताकांचे भार ।* *होतो जयजयकार.... नामघोष ॥* 🚩 *॥ रामकृष्णहरी ॥*🚩 *विठ्ठल ॥ विठ्ठल ॥ विठ्ठल ॥*🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल-9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबिराचे बोल* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• पाहन पूजै हरि मिलैतो मै पूजूँ पहार ।ताते तो चक्की भलीपीसि खाय संसार ।सारांश : दगड-धोंडे पूजणार्‍यांचा समाचार घेताना महात्मा कबीर म्हणतात की दगाड-धोंडे पूजल्यामुळे इच्छित साध्य झालं असं होईल, मनोकामना पूर्ण होतील किवा देवाची प्राप्ती होणार असेल तर मी अख्खा पर्वतच पूजायला तयार आहे. त्यापेक्षा दगडापासून बनलेल्या जात्याची काळजी घ्यायला मला आवडेल. कारण हे जातं धान्य भरडण्याच्या कामी येतं. त्यापासून पीठ मिळतं. त्यामुळे जगातील जीवांची भूक तरी भागते. श्रद्धेच्या नावाखाली लोक दगडा-धोंड्याला पूजत राहातात. काही जण रंग फासलेले किंवा हळदी-कुंकू लावलेले दगड दिसताच हात जोडतात. गाडीवरून जाताना मंदिर येताच गाडीचा भोंगा वाजवतात. जसा काही मंदिरातला देव झोपलाय अन आवाज देवून हे त्याला जागं करित आहेत. पहावं ते नवलंच ! एकाचं बघून दुसरा करणार अन ती प्रथाच होणार. आज संगणक युगात वावरताना आंतरजालात दडलेलं जगाचं ज्ञान संगणकावर एका क्लिक मध्ये आपल्यासमोर येतं. संगणक माहिती आदान प्रदानाचं यंत्र आहे. .हे माहित असून सुद्धा त्याला चालू करण्यापूर्वी त्याची पूजा अर्चा करणारे . त्यावर धर्माचे सांकेतिक ठसे उमटवणारे, अज्ञानाचं जोखड वाहणारे ढोंगी बुवा, मौलवी यांचं विज्ञानानंच बणवलेल्या माईकवरून 'ये विज्ञान फिज्ञान सब झुट है । म्हणनं अन विज्ञान शिकलेल्या श्रोतृ समुदायाकडून माना हलवून प्रतिसाद देणं किती ढोंगी व भंकस पणाचा कळस आहे बरं हा ! अशी मानसिकता पाहिली की दया यायला लागते. कोणता संस्कार व शिकवण देत आहेत बरं आपल्या वर्तन अन करणीतून भावी पिढ्यांसाठी ! खरंच का जगू शकत नाही माणूस ढोंगाशिवाय ! का झिडकारत नाही अज्ञानाची काजळी ? विज्ञान आणि मानवतावादाचा मेळ घालत विचारचनं विवेकाचे दीप प्रज्वलित करता आले तर जीवनात दररोजच दिवाळी साजरी होईल. एकनाथ डुमणे, मुखेड📱 9096714317•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण आपले सुखी जीवन जगण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतो आणि सुखी जीवन जगण्यासाठी पैसा कमवतो.तो पैसा एवढा कमवतो की,त्या पैशापायी आपण काय करत आहोत हा समजायला मार्ग सापडत नाही.ज्या गोष्टींसाठी आपण पैसा मिळवला आहे त्यासाठी तर जरुर वापरायला पाहिजे.आपल्या सुखासाठी तर आपण कमवतोच पण आपल्यासारखे सुख इतरांनाही मिळावे असे वाटत असेल तर आपल्या कर्तृत्वाचे हात अशांसाठी पुढे करा की, त्यातून तुमम्हालाही समाधान वाटले पाहिजे.जे अनाथ,अपंग,अंध,निराधार,वृध्द आहेत त्यांना तुमच्याकडून कशाची तरी अपेक्षा आहे अशांना आपण आपल्या केलेल्या कमाईतून काहीतरी मदत करुन जीवनाचे सार्थक करावे.याही व्यतिरिक्त समाजकार्य, देशकार्यासाठीही जे शक्य आहे ते आपल्या परीने करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या आपण कमवलेल्या कमाईचे सार्थक होईल.केवळ आपण आपलाच स्वार्थ साधण्यासाठी पैसा कमावला तर त्यात आत्मिक समाधान लाभणार नाही.वेळ निघून गेल्यावर असे होऊ नये की,आपण एवढे कमावले आहे त्यातून आपण आपल्या स्वार्थासाठीच केले आहे पण इतरांसाठी काहीच केले नाही.अशा पश्चातापात पडण्यापेक्षा आपला हात अशांसाठी साठी पुढे करा की,खरी गरज त्यांना आहे.एक आपला हात पुढे केला तर अनेक तीर्थयात्रा करुनही पुण्य मिळणार नाही तेवढे पुण्य आणि समाधान मिळेल.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🌹🌱🌹🌱🌹🌱🌹🌱 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हुशार कावळा*दुपारची वेळ होती, कडक ऊन पडले होते. एका कावळ्याला खूप तहान लागली होती. तो तहाने पोटी व्याकुळ झाला होता. तो इकडे तिकडे पाणीच शोधू लागला. दूर एक शेत होते. शेताच्या कडेला एक मडके होते. कावळा मडक्या जवळ गेला. मडक्याच्या तळाशी थोडे पाणी होते. कावळ्याने पाणी पिण्यासाठी आपले तोंड मडक्यात घातले, परंतु तरीही कावळ्याची चोच त्या पाण्यापर्यंत पोहोचत नव्हती. कावळ्याने थोडा विचार केला. इकडे तिकडे पाहिले. मग त्याला एक छोटीशी नळी दिसली. त्याने ती नळी चोचीत पकडली. व तो मडक्याजवळ गेला. एक नळीचे टोक मडक्यात बुडविले. चोचीने पाणी वर ओढले. हुशार कावळा पाणी प्याला. काव काव करत उडून गेला.तात्पर्यः कोणतेही काम समय सूचकतेने व युक्तिवादाने केले तर चांगले पार पडते.〰️〰️〰️〰️〰️〰️*✍संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~📅 दि. 05/07/2022 वार - मंगळवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-१९७५- 'देवी' या रोगाचे भारतातून समूळ उच्चाटन झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जाहीर केले.१९९६- संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार डॉ ए पी जे अब्दुल कलाम व अवकाश आयोगाचे सदस्य एन. पंत यांना 'आर्यभट्ट पुरस्कार'जाहीर२००४ - इंडोनेशियात प्रथमतः राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणुका.२००६ - उत्तर कोरियाने प्रतिबंधांना न जुमानता नोडाँग-२, स्कड व तेपोडाँग-२ ही क्षेपणास्त्रे प्रक्षेपित केली💥 जन्म :-१८८२ - हजरत इनायत खान, शास्त्रीय गायक. १९१६ - आर्चिक वेंकटेश गोपाळकृष्ण, कवि, वक्ते. धारवाड मध्ये. १९१६-के. करूणाकरन,केरळचे माजी माजी मुख्यमंत्री१९४६-रामविलास पासवान,केंद्रीय मंत्री💥 मृत्यू :-१६६६ - आल्बर्ट सहावा, बव्हारियाचा राजा.१९४५ - जॉन कर्टीन, ऑस्ट्रेलियाचा १४वा पंतप्रधान.२००४ - ह्यू शियरर, जमैकाचा पंतप्रधान.२००५-बाळू गुप्ते,लेग स्पिन गोलंदाज*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - आठवण गावाची*https://storymirror.com/read/story/marathi/li2r4x05/aatthvnn-gaavaacii/detailवाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🦅 *पक्षी केव्हा स्थलांतर करतात ?* 🦅रोटी, कपडा और मकान या मनुष्यप्राण्याच्या मूलभूत गरजा मानल्या जातात. यातला कपडा ही केवळ मनुष्यप्राण्याचीच गरज आहे. पण रोटी व मकान यांच्या गरजा मात्र प्राणिसृष्टीच्या प्रत्येक सदस्याला भासतात. त्यामुळे त्यांची जिथे चांगली सोय होईल तिथेच जास्तीत जास्त वास्तव्य करण्याकडे प्रत्येक प्राण्याचा कल असतो. तो प्रदेश हा त्या प्राण्याचा नैसर्गिक अधिवास बनतो. त्या क्षेत्रात त्याला मुबलक अन्न मिळतं, पाण्याची सोय होते, राहण्याची गुहा मिळतात किंवा घरटी बांधता येतात. आपलं पुनरूत्पादन करून पुढची पिढी जन्माला घालण्यासाठी सर्व प्रकारे योग्य वातावरण लाभतं. आपला कळप वाढवता येतो. पक्षी हे प्राणीसृष्टीचाच अविभाज्य भाग असल्यामुळे त्यांनाही हे लागू पडतं. परंतु या अधिवासातील पर्यावरण सतत तसंच राहत नाही. ऋतुमानानुसार त्यात फरक पडत जातो. तापमान बदलतं. पावसाचं प्रमाण कमी जास्त होतं. फळांचाही हंगाम असतो. तो ओसरला की तीही मिळेनाशी होतात. किडामुंगीही या बदलत्या पर्यावरणाला अनुसरुन आपल्या बिळात गडप होण्याची धडपड करतात. अन्नाची चणचण भासू लागते. तापमानही सुसह्य राहत नाही. अशा परिस्थितीला तोंड देत तगून राहण्यासाठी काही व्यवस्था करावी लागते. अशा वेळी ते स्थलांतर करतात. तरीही या स्थलांतरासाठी इतर काही घटना घडण्याची आवश्यकता भासते. पर्यावरण प्रतिकूल होत चाललं की पक्ष्यांच्या शरीरात काही विशिष्ट संप्रेरकांचा स्त्राव होऊ लागतो. तो त्यांना उडत जात दूरचा पल्ला गाठण्यासाठी आवश्यक ती प्रेरणा आणि ताकद देतो. तसंच हा दूरचा पल्ला गाठण्यासाठी शरीरही बळकट करावं लागतं. दीर्घ काळपर्यंत उडत राहण्यासाठी स्नायूंना बळकटी यावी लागते. त्यासाठी जेव्हा अन्न मुबलक प्रमाणात मिळत असतं तेव्हा ते खाउन शरीर लठ्ठ करावं लागतं. चरबीचा साठा करावा लागतो. तो पर्याप्त झाल्याशिवाय स्थलांतर करता येत नाही. बहुतांश पक्षी स्थलांतर करताना सहा ते आठ हजार मीटर उंचीवरुन उडत राहणं पसंत करतात. कारण त्या उंचीवरचं घसरलेलं तापमान सतत उडत राहण्यामुळं शरीरात जी उष्णता निर्माण होते तिचा निचरा करण्यासाठी उपयोगी पडतं. तसंच पक्षी एकेकटे कधीच स्थलांतर करत नाहीत. त्यांचा कळपच्या कळप या प्रवासावर निघतो. काही पक्षी तर हजारो किलोमीटर दूरवरच्या तात्पुरत्या अधिवासाच्या प्रदेशात स्थलांतर करतात. तो आपल्या विणीच्या हंगामासाठीही उपयुक्त आहे याची खातरजमा त्यांनी करून घेतलेली असते. त्याचा शोध त्यांनी पूर्वीच घेतलेला असतो व तिथं जाण्याची वाटही त्यांच्या आठवणीत साठवून ठेवलेली असते. त्यामुळं नेहमीच्या नैसर्गिक अधिवासातली परिस्थिती प्रतिकूल बनली, शरीरातल्या चरबीचं प्रमाण पुरेसं वाढलं, अंगात संप्रेरकांचा पाझर पर्याप्त झाला आणि सगळ्या कळपाची तयारी झाली की पक्षी स्थलांतर करतात.*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *Health is wealth.*(चांगले आरोग्य हीच खरी संपत्ती आहे.)*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1) *लोणार सरोवर कोणत्या राज्यात आहे ?* महाराष्ट्र2) *दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे ?* जम्मु काश्मीर3) *चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे ?* उडीसा4) *सांभर सरोवर कोणत्या राज्यात आहे ?* राजस्थान5) *वुलर सरोवर कोणत्या राज्यात आहे ?* जम्मू काश्मीर*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● डॉ. मनोज तानुरकर● गंगाधर कांबळे● गिरीश कहाळेकर● संतोष शेळके● फारुख शेख● नरेश शिलरवार● अजय चव्हाण● गजानन बुद्रुक● बालकिशन कौलासकर● रमेश अबुलकोड● किशन कवडे● सुधाकर चिलकेवार● बबलू दबडे● परमेश्वर अनिल कवडेवार● सुदर्शन पाटील● मोतीराम तोटलोड● नागनाथ भत्ते● मारोती कदम● अनिल गायकांबळे● चक्रधर ढगे● सुभाष कुलकर्णी● राजरेड्डी बोमनवाड*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*स्वत:वर खुश असणा-यांना लोक खूप घाबरतात. त्यांना या लोकांबद्दल खूप आसूया वाटते. सर्वसामान्य माणसे जगात सर्वाधिक नाराज जर कोणावर असतील, तर ती स्वत:वरच असतात. त्यांच्या हातुन चुका होतात. कधी कधी तर त्याच त्याच चुका परत परत होतात. नियतीचे फासे सततच असे पडत राहतात, की सारखेच हस्यास्पद व्हायची वेळ यावी. इतरांच्या हातात कायम राजे, एक्के आणि यांच्या हातात दुर्री-तिर्री, हे तर नेहमीचेच. यांनी चुका सुधारायच्या ठरविल्या तरी पटापट यांना त्या सुधारता येत नाही. त्याच त्याच बाॅलवर परत परत विकेट जात राहते.**काय केले म्हणजे आपल्याला प्रतिष्ठा मिळेल ? लोक आपल्याला महत्वाचे आणि सन्माननीय समजतील? याचा विचार करण्यात यांचे तासन् तास जातात. तरीही त्यांना असाच निष्कर्ष काढावा लागतो, की अजून आपल्याला खूपच मेहनत करावी लागेल. आणि मग स्वत:ला दोष देत, स्वत:ला सुधारण्याचा पुन:पुन्हा प्रयत्न करत ते जगत राहतात. अशा खचलेल्या आणि जगाच्या गणितात हुकलेल्या लोकांनी सगळा परिसर भरलेला असताना जर एखादा नखशिखांत स्वत:वर खुश असेल तर जगाला त्रास होणारच.**"परंतु जो स्वत:वर प्रेम करीत नाही, त्याच्यावर जग प्रेम करीत नाही."*संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••नागिन के तो दोये फन,नारी के फन बीसजाका डसा ना फिर जीये, मरि है बिसबा बीस।सारांश महात्मा कबीर व्यभिचारी व दुराचारी स्त्री-लंपटाना वरील दोह्यातून सचेत करतात. सापिनीला तर केवळ दोनच दात असतात. तिचा दंश झाला तर वैद्याकडून विष उतरवून टाकता येईल. परंतु स्त्रिला वीस दात असतात. तिचा दंश ज्याला झाला त्यातला कोणीही जीवित सुरक्षित राहू शकत नाही. तिचा दंश जर वीस लोकांना झाला तर वीसचे वीस मरून जातील. काम भावना सीमित असली पाहिजे. तिचं संतुलन राखता आलं पाहिजे. काम भावनेचं संतुलन बिघडलं की ती माणसाच्या आवाक्यात राहात नाही. ती त्याला मन मानेल तशी नाचवते. परिणाम स्वरूप माणूस अधःपतित होतो. लोक लज्जेचा , हेटाळणीचा विषय होतो. मग ती ईश्वरांची रूप मानलेली पात्र असोत की सामान्य जण साबुत राहात नाहीत. शंकर , इंद्र, चंद्र, रावणाचे चारित्र्य या माया मोहिणीने डागाळून टाकले. तिथं सामान्यांची काय बात घेऊन बसला आहात. यावर चांगदेवांच्या पुढील ओळी फारच बोलक्या आहेत.वासनेच्या मागे नको धावू मनापहा त्या रावणा काय झालेचंद्रा पडली भगे इंद्र झाला काळानारद चुकला चाळा भजनाचा अगदी अलीकडे समाजानं ज्यांना डोक्यावर घेतलं होतं अशा संत म्हणवून घेणार्‍यांनी स्व-संतुलन हरवून वासनेच्या आहारी जावून आज ते गजाआड दुर्दशेचे भोग भोगत आहेत. भल्या भल्यांची मायेनं अशी वासलात लावून टाकलीय. मात्र ज्यांनी स्वतः वरील नियंत्रण ढळू दिलं नाही. अशी पात्रंही कमी नाहीत की जी अनुकरणास पात्र ठरलीत. शुक, भीष्म हे निश्चयाचे महामेरूच होते. जगद्गुरू तुकोबारायही माया मोहात गुरफटलेल्या जीवांना पाहून हताश होवून म्हणतात बुडती हे जण न देखवे डोळा ।येतो कळवळा म्हणोनिया । तेव्हा माणसानं आपण अवहेलनेचे धनी होणार नाहीत . याची जाणीव ठेवून वागण्याचा प्रयत्न करावयास हवा. तुकोबांनी सांगितलेलं 'पराविया नारी माऊली समान...' हे सुत्र कायम जपलं जपायला हवं. एकनाथ डुमणे, मुखेड📱 9096714317•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••पैसा काहीवेळी कामाला येतो आणि त्यातून उपभोगण्यासाठी वस्तू खरेदी करता येतात परंतु आशीर्वाद हा आयुष्यभर पुरत असतो आणि कोणत्याही संकटातून दूर करण्यासाठी देवासारखा पाठीशी असतो...म्हणून कुणाच्या पैशाची अपेक्षा करु नका तर कुणाच्या आशीर्वादाची अपेक्षा करा यातच खरे समाधान आहे....©व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🌹🌱🌹🌱🌹🌱🌹🌱🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अहंकाराचे बीज विनाशकारी*एक गाय गवत चरायला जंगलात जाते. संध्याकाळच्या वेळेस तिच्या लक्षात आले की, एक वाघ तिच्याकडे दबक्या पावलाने येत आहे. ती भीतीने इकडे तिकडे पळू लागली. वाघ सुद्धा तिच्या पाठीमागे धावू लागला. धावता धावता गाय एका तलावापाशी पोहचली आणि घाबरलेली गाय त्या तलावात शिरली..वाघ देखील तिच्या पाठीमागे त्या तलावात शिरला. त्या दोघांनाही कळून चुकले की तलाव फारसा खोल नाही आणि त्यात पाणी सुद्धा कमी आहे ,मात्र चिखल जास्त आहे. त्या दोघांमधील अंतर तसे कमी होते परंतु ते दोघेही काही करू शकत नव्हते.गाय त्या चिखलात हळूहळू रुतायला लागली. वाघ तिच्या अगदी जवळ होता, परंतु तो सुद्धा त्यात रुतायला लागला होता. दोघेही अगदी गळ्यापर्यंत रुतलेली होती. दोघेही हलू शकत नव्हते.थोड्या वेळाने गाईने वाघाला विचारले, तुझा कोणी गुरू किंवा मालक आहे का ? वाघ घुश्यात म्हणाला , मी तर या जंगलाचा राजा आहे; माझा कोणी मालक नाही; मीच ह्या जंगलाचा मालक आहे. गाय त्याला म्हणाली ,परंतु तुझी शक्ती तुला याक्षणी काहीच उपयोगाची नाही. वाघ गायीला म्हणाला की, तुझे हाल देखील माझ्या सारखेच आहेत की . तेव्हा गाय त्याला हसून म्हणाली, बिलकुल नाही माझा मालक मला संध्याकाळ झाली अजून आली नाही म्हणून शोधत येईल आणि या चिखलातून मला काढून घेऊन जाईल.थोड्या वेळाने खरंच एक माणूस आला आणि गायीला चिखलातून बाहेर काढून घरी घेऊन गेला. जाताना गाय आणि मालक एकमेकांकडे कृतज्ञतेने पहात होते, त्यांच्या मनात असून सुद्धा ते वाघाला बाहेर काढू शकत नाही कारण त्यांच्या जीवाला धोका होता.आता या कथेतून बोध हा आहे की,गाय हे समर्पित हृदयाचे प्रतीक आहे.वाघ हे आपले अहंकारी मन आहे.मालक हे ईश्वराचे प्रतीक आहे ,तर चिखल हा संसार आहे आणि संघर्ष ही अस्तित्वाची लढाई आहे.कोणावर निर्भर असणे चांगली गोष्ट नाही ,परंतु मीच श्रेष्ठ आहे, मला कोणाची मदतीची गरज नाही, हाच अहंकार विनाशाचे बीज रोवते.〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ 🌺संकलन🌺*प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~📅 दि. 04/07/2022 वार - सोमवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-१९९९-लष्कराच्या१८व्या बटालियन ने कारगिलमधील द्रास सेक्टर मधील टायगर हिल्स हा लष्करीदृष्ट्या महत्त्वाचा टापू घुसकरांच्या तावडीतून मुक्त केला.१९९७-नासाचे 'पाथफाईंडर' हे मानवविरहीत यां मंगळावर उतरले.१७७६ - अमेरिकेने स्वतःला इंग्लंडपासून स्वतंत्र जाहीर केले. 💥 जन्म :-१८९८ - गुलजारीलाल नंदा, भारतीय पंतप्रधान.१९३० - जॉर्ज स्टाइनब्रेनर, अमेरिकन उद्योगपती.१९४३ - हराल्डो रिव्हेरा, अमेरिकन पत्रकार.💥 मृत्यू :-१९०२ - स्वामी विवेकानंद, भारतीय तत्त्वज्ञ.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - मुलगी*https://storymirror.com/read/story/marathi/ah72vg9p/mulgii/detailवाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *डायनासोरचा विनाश केव्हा झाला ?*पृथ्वीचं पर्यावरण सतत बदलत असतं. निसर्गाचा तो नियमच आहे. सजीवसृष्टीवर या बदलांचा प्रभाव पडतच असतो. त्यामुळे या बदलांशी मिळतंजुळतं घेत तगून राहण्याची क्षमता या सजीवांच्या प्रजातींमध्ये असते त्यांची वाढ होते, विकास होतो. ती प्रजाती तगडी होते. नैसर्गिक साधनसंपत्तीचा जास्त वापर तिच्याकडून होतो. सहाजिकच तुलनेने दुबळ्या असणाऱ्या प्रजातींची हळूहळू पिछेहाट होत कालांतराने ती प्रजाती नष्ट पावते. आजवर अशा अनेक प्रजातींचा उदय झाला, विकास झाला, काही काळ या पृथ्वीतलावर नांदल्या आणि हळूहळू विनाश पावल्या. आपण ज्या मनुष्यजातीत मोडतो त्या होमो सपायन्स या प्रजातीचा उदय होण्यापूर्वीही होमो इरेक्ट्स, निआनडर्थल वगैरे मानवासारख्या प्रजाती या भूमितलावर नांदत होत्या. पण त्या होमो सपायन्सइतक्या पर्यावरणाशी जुळवून घेण्याच्या बाबतीत तगड्या नसल्यामुळे विनाश पावल्या. निरनिराळ्या प्रजातींची उत्क्रांती करण्याचे असे प्रयोग निसर्गाकडून नेहमीच होत आले आहेत. त्यातले जे यशस्वी झाले त्या प्रजाती आज आपल्याला सभोवार दिसतात. जे प्रयोग अयशस्वी झाले त्या प्रजाती आता नष्ट झाल्या आहेत. डायनोसॉर ही अशीच एक प्रजाती होती. तिचा उदय निसर्ग नियमांनुसार झाला. तब्बल साडेसोळा कोटी वर्ष ती प्रजाती या भूमितलावर नांदली. त्या वेळेची ती सर्वात प्रबळ प्रजाती होती. पण कालांतराने तिचा विनाश झाला तो मात्र उत्क्रांतीच्या नियमानुसार झाला नव्हता. एका विलक्षण अपघातापोटी ती दुर्घटना झाली. अवकाशातून एक अजस्त्र लघुग्रह पृथ्वीवर येऊन आदळला. आज जिथे मेक्सिको आहे साधारण त्या प्रदेशात हा अाघात झाला. तो आघात इतका भयानक होता की तो लघुग्रह पृथ्वीचं कवच फोडून तिच्या पोटात घुसला. त्यातून मोठ्या प्रमाणावर धूळ, कचरा आकाशात फेकला गेला, आगी लागल्या, ज्वालामुखींचे उद्रेक झाले, त्सुनामी आली, प्रचंड वादळं झाली, तीव्र अाम्लवर्षा कोसळली. पृथ्वीच्या पर्यावरणात उलथापालथ होत सल्फ्युरिक आम्ल, नायट्रिक आम्ल यांचं प्रमाण वाढलं. स्फोटासारख्या त्या आघातामुळे उष्णतेची लाट पसरली. तिच्या मार्‍यात सापडलेले सजीव वाचू शकले नाहीत. त्याचबरोबर आकाशात पसरलेल्या धुळीच्या आवरणामुळे सूर्यप्रकाश अडवला गेला. पृथ्वीवरचं सरासरी तापमान घसरलं. वनस्पतींना वाढीसाठी सूर्यप्रकाशाची अत्यंत गरज असल्यामुळे त्यांचा विनाश होत गेला. पर्यावरणातल्या या अचानक आलेल्या बदलांशी मिळतेजुळते घेण्यासाठी आवश्यक तितका वेळही मिळाला नाही. त्यामुळे त्यात तगून राहण्याची क्षमता असलेले सजीवही नष्ट होत गेले. या अस्मानीसुलतानीपुढे डायनासाॅरसारख्या तगड्या प्रजातीचा टिकाव लागला नाही. ही घटना धरतीच्या इतिहासातील क्रेटेशियस कालखंडाच्या अखेरीस आणि टर्शरी कालखंडाच्या आरंभाच्या सुमारास म्हणजे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी झाली.*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••जो संपुर्ण वर्षाचा विचार करतो,तो धान्य पेरतो. जो पुढील दहा वर्षाचा विचार करतो, तो झाडे लावतो..जो आयुष्यभराचा विचारकरतो, तो माणूस जोडतो..आणि जो माणसं जोडतो, तोच आयुष्यात यशस्वी होतो....*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1) *कार्यक्रमाच्या शेवटी वंदे मातरम गाण्याची प्रथा कोणी सुरू केली ?* विष्णू दिगंबर पळसकर2) *राष्ट्रगीत प्रथम कोणत्या भाषेत लिहिले गेले ?* बंगाली3) *'चले जाव' ही घोषणा कोणी दिली ?* महात्मा गांधी4) *'आराम हराम है' ही घोषणा कोणी दिली ?* पं जवाहरलाल नेहरू5) *'शिका,संघटित व्हा,संघर्ष करा ' ही घोषणा कोणी दिली ?* डॉ बाबासाहेब आंबेडकर*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● बंडू अंबटकर● बंडोपंत लोखंडे● गोविंद कवळे● वृषाली सानप काळे● कमलाकर जमदाडे● प्रदीप यादव● अविनाश खोकले● श्याम उपरे● उदय स्वामी● प्रभाकर शेळके● परमेश्वर म्हेत्रे● श्रीधर जोशी● नवनाथ मुसळे● राजकुमार बिरादार● बालाजी मंडाळेकर● गणेश मंडाळे● प्रकाश भादेकर● शहेबास खुरेशी*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*कुटुंब संस्थेचा मध्यवर्ती केंद्रबिंदू म्हणजे घर. घराचे आकर्षण फक्त मानवालाच असते असे नाही, तर पहाटेपूर्वी आकाशात भरारी घेतलेले पक्षी, माळरानावर चरण्यासाठी गेलेली जनावरे सायंकाळी आपल्या घराकडे वळतात. घर हे माणसांइतकेच पशुपक्षी, जनावरांना हक्काचा निवारा वाटते. पूर्वीची घरे एकत्र कुटुंबपद्धतीला सामावून घेणारी होती. दोन-तीन पिढ्यांचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र रहायचे. लहान मुला-मुलींच्या किलबिलाटाने घराचे गोकुळ होऊन जात असे. घराच्या भिंती फक्त दगड मातीच्या नव्हत्या, तर त्या प्रेम, जिव्हाळ्याने रसरसलेल्या होत्या. नातेसंबंध नुसते नातेसंबंध नव्हते, तर नात्यात मायेची ऊब होती.**आज वृद्धांच्या समस्या 'आ' वासून उभ्या आहेत. मुलं परमुलखात गेल्यामुळे एकाकी पडलेली वृद्ध मंडळी एका बाजूला दिसतात, तर दुसरीकडे घरात मुलं, सुना, नातवंडे असूनही अवहेलनेने भरलेले एकाकीपण जगणारी वृद्ध मंडळी दिसत आहेत. समृद्ध संसारातील एक अडगळ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातंय. मुला-लेकरांच्या सुखासाठी तुफान होऊन झगडलेल्या माता पित्यांना 'थकलेल्या तुफानाला कुणी घर देता का घर...?' असं म्हणत भटकायची वेळ येते. अशी अनेक झुंजलेली तुफानवादळे रस्त्याकडेला, पुलाखाली, किंवा वृध्दाश्रमात नशिबाला दोष देत कण्हत पडलेली दिसतात.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••जहाँ न जाको गुन लहै, तहाँ न ताको ठाँव । धोबी बसके क्या करे, दीगम्बर के गाँव ॥ अर्थ : जिथे आपल्याला पात्रता व योग्यतेनुसार गुण व कौशल्य दाखवण्यासाठी कार्य कर्तृत्त्व करण्यास वावच नसेल तिथे राहून काय हशील होणार आहे ? तिथे राहाणे व्यर्थच आहे. ही बाब पटवून देताना महात्मा कबीर म्हणतात की, ज्या गावात सर्व दिगंबरच (कपडे विरहित लोक) राहातात तिथे राहून धोब्याला काय उपयोग होणार आहे ? कला ही जीवनाची सावली मानली जाते. 'कलेनेच माणसाची ओळख ।एरव्ही कोण पुसतो आणिक ?तुम्ही आहात राव की रंक ।आता कोणी पुसेना ।' असे राष्ट्रसंत तुकडोजी ग्रामगीतेत म्हणतात. कलावंतानं आपली कला जीवनाचा आधार केली व कलेचा अहंकार अंगी न बाळगता तिला विनयशीलतेची जोड दिली की सर्व जग आपलंस होवून जातं. आपलं कसब व कौशल्य अशा ठिकाणी दाखवायला हवं की ते आपल्या जीवनाला स्वावलंबनाकडे नेईल. एकनाथ डुमणे, मुखेड📱 9096714317•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••जेव्हा आपली वेळ वाईट असते तेव्हा आपल्याकडे लोक पाठ फिरवतात आणि जेव्हा आपली वेळ चांगली असते तेव्हा सगळेच जवळ येतात.परिस्थिती कशीही असली तरी प्रत्येकवेळी सुखदुःखात जे आपल्या पाठीशी असतात आणि आपण प्रत्येकवेळी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता पाठीशी असतो तीच खरी माणुसकी असते आणि तीच खरी अंत:करणातून एकमेकांबद्दलची खरी आत्मियता असते.© व्यंकटेश काटकर,नांदेड.संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *रेघ लहान झाली.*अकबर आणि बिरबल एकदा फिरायला गेले होते. चालता चालता बादशाह अचानक थांबला. बादशहाने वाळूत बोटाने एक रेघ मारली आणि बिरबलाला विचारले. “ही रेघ पाहिलीस? ही रेघ लहान करायची, पण पुसायची नाही, जमेल तुला?”बिरबलाने एकवेळ बादशहाकडे व एकवेळ रेघेकडे पाहिले. थोडा विचार केला. पटकन खाली वाकला. रेघेशेजारी दुसरी लांब रेघ मारली आणि म्हणाला, “झाली की नाही महाराज तुमची रेघ लहान?” बादशाह चकित होऊन पाहतच राहिला!*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.~~~~~~~~~~~~~~~~~~~