✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 01/02/2020 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  ● १९९२ - भोपाळच्या मुख्य न्यायाधीशांनी युनियन कार्बाइडचा मुख्य अधिकारी वॉरेन अँडरसनला फरारी घोषित केले. ● २००३ - अंतराळातून परतताना स्पेस शटल कोलंबियाचा स्फोट. सात अंतराळवीर मृत्युमुखी. ● २००४ - मक्केत हज चालु असताना चेंगराचेंगरीत २४४ ठार. 💥 जन्म :- ● १८८४ - सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, प्राच्यविद्यापंडित, मराठी कोशकार. ● १९०४ - बा.रा.घोलप, शिक्षणमहर्षी ● १९१० - जहांगीर खान, भारतीय क्रिकेट खेळाडू. ● १९५८ - जॅकी श्रॉफ, भारतीय चित्रपट अभिनेता. ● १९७१ - अजय जडेजा, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ● १९९५ - मोतीराम गजानन रांगणेकर, मराठी नाटककार ● २००३ - स्पेस शटल कोलंबियातील अंतराळवीर - मायकेल पी. अँडरसन, डेव्हिड ब्राउन, कल्पना चावला, लॉरेल क्लार्क, रिक डी. हसबंड, विली मॅककूल, इलान रमोन *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *संसदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर, आर्थिक वर्षात विकासदर 6 ते 6.5 राहण्याचा अंदाज, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला कालपासून सुरुवात, केंद्रीय अर्थमंत्री आज 2020-21 साठीचा अर्थसंकल्प सादर करणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *देशातील सरकारी बँक कर्मचाऱ्यांचा दोन दिवसीय संप सुरु, वेतन सुधारणेच्या प्रलंबित मागणीसाठी संप, राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलनं, दोन दिवसात मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत बंदचा इशारा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *कोरोना व्हायरसचा धोका असलेल्या चीनमध्ये अडकलेल्या रत्नागिरीमधील तीन विद्यार्थिनी सुखरुप, जिल्हाधिकारी कार्यालयाची माहिती, चीनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरुप आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *ठाण्याच्या सिग्नलवर शिकणारी मुलं थेट इस्रोला जाणार, राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी पहिल्या दहामध्ये क्रमांक पटकावल्याने इस्रोमध्ये संधी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *कोरेगाव भीमा चौकशी आयोग कामकाज गुंडाळण्याच्या मनस्थितीत, राज्य सरकारकडून सहकार्य मिळत नसल्याचा माजी न्यायमूर्ती पटेलांचा आरोप* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पुणे : सावित्रीबाई फुले विद्यापीठातर्फे दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट महाविद्यालय, प्राचार्य आणि शिक्षक पुरस्कारांची घोषणा, या पुरस्कारांमध्ये बारा जणांचा समावेश आहे. विद्यापीठाच्या वर्धापनदिनी म्हणजे दि. १० फेब्रुवारी रोजी पुरस्कारांचे वितरण होणार आहे, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *टीम इंडियाचा न्यूझीलंडवर सलग चौथा 'सुप्पर' विजय, शार्दुल ठाकूर, लोकेश राहुलची जिगरबाज खेळी, पाच एकदिवसीय मालिकेत 4-0 अशी आघाडी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *मला शिक्षक का व्हावं असे वाटते ?* बालपणी शाळेत शिकत असतांना मोठी माणसं हमखास एक प्रश्न विचारायचं की, तुला मोठे होऊन काय बनायचं आहे किंवा तुझं स्वप्न काय ? तेंव्हा त्या बाळबोध वयात काही कळायचं नाही. मात्र...... पूर्ण लेख खालील लिंकवर वाचता येईल. https://shopizen.page.link/QNfw49ECPutfUpuX7 लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक* कन्या शाळा धर्माबाद जि. नांदेड 9423625769      ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌴🌳🌲झाडं बोलतात🌲🌳🌴 - प्रा. मीनल येवले , नागपूर मो. नं. 7774003877 झाडं बोलतात वाऱ्याशी आकाशातल्या ताऱ्यांशी झाडे अबोल नसतात कधी बोलत असतात साऱ्यांशी जगण्यासाठी फुलण्यासाठी पुरवून झाडे निकोप श्वास कंद , फळं , दाणे होऊन जीवमात्रांना देतात घास ऊन , वारा , वादळातही पाय रोवून उभी असतात पाखरांची इवली स्वप्ने झाडांच्याही डोळ्यात दिसतात हात पसरून कवेत घेतात मुक्त निळ्या नभाला मौनातून साद घालतात दाटून आल्या मेघांना माणसांसारखे द्वेष मत्सर झाडांमध्ये दिसत नाहीत फांदी तोडली तरी झाड कोणावरही रुसत नाही रंग , गंध सौंदर्याची वैविध्याची असती खाण सन्मानाने जगवू त्यांना टिकवू चांगले जीवनमान 🌾🌾🌾 *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" अपयश म्हणजे संकट नव्हे; आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'कोकणचा राजा' असे कोणत्या फळाला म्हटले जाते ?* हापूस आंबा 2) *पंढरपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे ?* भीमा 3) *भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते ?* कर्नाळा ( रायगड ) 4) *'महाराष्ट्राची काशी' असे कोणत्या नदीला म्हटले जाते ?* भीमा 5) *महाराष्ट्रात कृत्रिम पावसाचा प्रयोग प्रथम कोठे करण्यात आला ?* बारामती ( पुणे ) *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 डॉ. प्रा. यशपाल भिंगे मराठी विभागप्रमुख पीपल्स महाविद्यालय नांदेड 👤 शेख एम. बी. केंद्रप्रमुख 👤 नारायण गायकवाड 👤 शिवानंद सूर्यवंशी 👤 कवी गजानन काळे 👤 अतुल भुसारे 👤 शिवम पडोळे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दोन्ही हात एकत्र आले की 'नमस्कार' होतो. हा नमस्कार म्हणजे एक सोपस्कारही असतो. कधी कधी तो उजवा हात छातीला लावून स्मित करूनही केला जातो. या नमस्कारामागे एक प्रमुख भावना दडलेली असते, ती म्हणजे ज्येष्ठांचा 'आदर आणि स्वागत.' या नमस्कारामध्ये इतरही भाव दडलेले असतात. कधी चरणस्पर्श तर कधी अगदी गुडघ्यापर्यंत स्पर्श करून हे नमस्कार होतात. छोट्यांचे मोठ्यांना नमस्कार व मोठ्यांचे थोरांना नमस्कार यात फरक असतो. त्यात स्त्रीयांचे नमस्कार वेगळे व बालकांचे नमस्कार वेगळे. शरीराची अष्टांगे जमिनीला लावून साष्टांग नमस्कार केले जातात किंवा सुर्य नमस्कार होतात.* *देवाला केलेल्या नमस्कारात थोडा फरक पडतो. त्यात कृतज्ञतेची भावना येते. दोन्ही हात नम्रतेने जोडले जातात. डोळे अर्धोन्मीलित होतात. मन करूणात्मक याचकाच्या भुमिकेत जाते. हातात ओंजळभर फुले येतात, ओठ पुटपुटू लागतात, कदाचित श्लोक किंवा एखादे स्तोत्र सवयीने ओठांवर येते, एखादी आरती आठवते. कधी नवस बोलले जातात तर कधी ते फेडले जातात. अशा अनेक नमस्कारांची रांग लागते. यात मागण्याच जास्त असतात.*  *"भक्त परमेश्वराकडे असंख्य मागण्यांचा ओघ सुरू ठेवतो, हजारो नमस्कार देवाचरणी ठेवून निघून जातो."*       🔶 ‼ *रामकृष्णहरी* ‼ 🔶             🔹🔹🔹🔹🔹🔹     *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *अंधारा सारख्या संकटाला* *दोष देत बसण्याऐवजी* *एक ज्योत पेटवणयाचे धाडस दाखवले* *तरच अंधार दूर होईल* *आपल्या नशिबा पेक्षा* *कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा* *कारण उद्या येणारी वेळ* *आपल्या नशिबा मुळे नाही* *तर कर्तृत्वा मुळे येते.* *स्वाभिमानावर आघात झाल्याशिवाय स्वतःला सिद्ध करण्याची ईर्शा उत्पन्न होत नाही* *आणि स्वतःला सिद्ध करायच्या ईर्शेशिवाय कर्तृत्व घडत नाही.* *"महत्वकांक्षा" असल्याशिवाय* *माणूस "मेहनत"* *करित नाही आणि* *"मेहनत" केल्याशिवाय* *"महत्वकांक्षा" पुर्ण होत नाही...!* *ही जिद्द,महत्वकांक्षा पूर्ण केलीय ती* *मधु एनसी यांनी* *माणसाला एकदा ध्येयाने पछाडलं* *की, माणून त्या ध्येयाच्या* *हात धुवून मागे लागतो* *आणि यशस्वी होतो, याचं* *ताजं उदाहरण म्हणजे* *बेंगळुरूतील बस वाहक मधु एनसी.* *या बस कंडक्टरने केंद्रीय* *लोकसेवा आयोगाची* ( *यूपीएससी) परीक्षा उत्तीर्ण केली* *असून, त्याचे आयएएस* *होण्याचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे.* *केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, ही म्हण मधु यांनी आपल्या कृतीतून अगदी सार्थ ठरवली आहे.* *बेंगळुरूच्या मेट्रोपोलिटीन टान्सपोर्ट सेवेत मधु* *बस वाहकाचे काम करतात. मधु यांची यूपीएसी परीक्षेतील मुलाखत* *२५ मार्च रोजी होणार आहे.* *८ तास नोकरी आणि ५ तास अभ्यास* *आएएस होण्याचे उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मधु यांनी* *चिकाटी कधी सोडली नाही. दिवसभर ८ तासांची नोकरी* *आणि दैनंदिन कामातून वेळ काढत ते दररोज ५ तास* *यूपीएससीचा अभ्यास करीत होते. कर्नाटक प्रशासकीय सेवेची परीक्षा* *अनुत्तीर्ण झालेल्या मधु यांनी जिद्द सोडली नाही. यानंतर त्यांनी* *यूपीएससी परिक्षेची तयारी सुरू केली. गेल्या वर्षीच्या जून* *महिन्यात मधु यांनी यूपीएससीची पूर्व परीक्षा उत्तीर्ण केली* *होती. ही परीक्षा त्यांना कन्नड* या *आपल्या मातृभाषेतून दिली. पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर* *त्यांनी मुख्य परीक्षेसाठी जोरदार तयारी केली* *आणि मुख्य परीक्षा इंग्रजी भाषेतून दिली. यूपीएससी परीक्षेसाठी मधु* *यांनी राज्यशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध, नैतिक मूल्य,* *भाषा, सामान्य ज्ञान, गणित आणि निबंध लेखन या* *विषयांची विशेष तयारी केली. जानेवारी महिन्यात यूपीएससी* *परीक्षेचा निकाल लागला. त्या यादीत आपले नाव* *पाहिल्यावर मधु यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.* *मधु राज्यशास्त्र विषयात पदवीधर* *कर्नाटकमधील मंड्या जिल्ह्यातील मालावली या छोट्याश्या खेड्यात मधु* *राहतात. २९ वर्षीय मधु, कुटुंबात सर्वांत मोठे* *असल्याने घरची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर येऊन* *पडली. वयाच्या १९ वर्षी ते बस वाहक बनले. गरिबी आणि* *कठीण परिस्थितीशी दोन हात करत मधु यांनी आपले स्वप्न पूर्णत्वास* *आणले आहे. दूरस्थ शिक्षण प्रणालीतून त्यांनी आपले* *पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. मधु यांनी राज्यशास्त्र* *विषयात पदवी संपादन केली आहे.* *मी कोणती परीक्षा दिली आणि उत्तीर्ण झालो, याबाबत माझ्या* *पालकांना काहीच माहिती नाही. मात्र, मला मिळालेल्या यशाचा त्यांना* *आनंद झाला आहे. आमच्या घराण्यात एवढे शिक्षण घेतलेला मी* *एकटाच आहे, असे मधु यांनी सांगितले. परीक्षेचा अभ्यास* *करताना कामात कधीही कसूर केली नाही. कितीही गर्दी* *असली तरी सर्व प्रवाशांना तिकिटे मिळतील, याची खात्री केली.* *मुलाखतीच्या तयारीसाठी दररोज २ तास वेळ देत असून,* *मुलाखतही उत्तीर्ण होणार असल्याचा विश्वास मधु यांनी व्यक्त केला.* *आपणही प्रयत्न आणि जिद्दीच्या जोरावर यशोशिखरावर विराजमान* *होऊ शकतात.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सूर्यासारखी तेजस्विता आणि सक्रीयता, चंद्रासारखी शीतलता आणि शांतता, धरतीसारखी संयमता व सहनशिलता हे जसे गुण या तिघांमध्ये आहेत तसेच गुण आपल्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला तर आपणही त्यांच्यासारखे आपल्या  जीवनामध्ये यशस्वी स्थान निर्माण करुन इतरांच्या जीवनात आपले अढळ स्थान निर्माण करु शकतो हे निश्चितपणे सांगता येईल. ह्या गुणांचे अनुकरन करणे म्हणजे आपल्या जीवनासाठी एक ऊर्जाच आहे.ती ऊर्जा आपण आपल्या जीवनात कधीही कमी होऊ देऊ नये. - व्यंकटेश काटकर,नांदेड.   संवाद.9421839590. 🌎🌞🌝🌎🌞🌝🌎🌞🌎🌞 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वार्थीवृत्ती* एका कोळ्याने आपले जाळे नदीत टाकले आणि माशांना घाबरवून जाळ्यात आणावे म्हणून एका लांब काठीने तो नदीचे पाणी गढूळ करू लागला. शेजारी काही लोक राहात होते. त्यांपैकी एक म्हणाला, 'अरे, तू जर अशी पाण्यात खळबळ केलीस तर आमचं पिण्याचं पाणी गढूळ होईल ना ?' तेव्हा कोळी म्हणाला, 'मित्रा, मला फक्त एवढंच माहीत आहे की, हे पाणी गढूळ केल्याशिवाय मला मासे मिळणार नाहीत, म्हणून मला हे केलंच पाहिजे.' तात्पर्य - काही लोक इतके स्वार्थी असतात की, स्वतःच्या फायद्यासाठी दुस-याचे नुकसान झाले तरी ते पर्वा करीत नाहीत. फक्त स्वतःचाच फायदा पाहतात. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 31/01/2020 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :-   ◆ १९५० - राष्ट्रपती म्हणून डॉ.राजेंद्रप्रसाद यांचे संसदेपुढे पहिले भाषण. त्यापूर्वी ते घटना समितीचे अध्यक्ष होते. 💥 जन्म :-  ◆ १८९६ - दत्तात्रय रामचंद्र बेंद्रे, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड महाकवी.  ◆ १९३१ - गंगाधर महांबरे, ज्येष्ठ संगीतकार  ◆ १९७५ - प्रिती झिंटा, हिंदी चित्रपट अभिनेत्री. 💥 मृत्यू :-   ◆ १९९४ - वसंत जोगळेकर, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक.  ◆ २००० - के.एन.सिंग, प्रसिद्ध चित्रपट अभिनेते.  ◆ २००४ - सुरैय्या, ज्येष्ठ गायिका व अभिनेत्री. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *कोकणचा राजा हापूस आंबा नवी मुंबईतल्या एपीएमसीमध्ये दाखल झालाय. यावेळी आंबा दाखल व्हायला तब्बल २ महिने उशीर झाला. व्यापारी वर्गानं आंब्याचं पूजन करून कोकणच्या राजाचं केलंय स्वागत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई - महाराष्ट्र सरकारने राज्यातील रिक्त असलेली 70 हजार पदे भरण्याचा घेतला निर्णय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, त्यात हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात 1 लाख 70 हजार पदे रिक्त आहेत. गेल्या 5 वर्षांपासून यावर भरती करण्यात आलेली नाही.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *भारतातील कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण केरळात, खास वॉर्डात उपचार सुरु, हुआन विद्यापीठाचा विद्यार्थी असल्याची माहिती तर 'कोरोना'मुळे चीनमधील हुबे विद्यापीठात 27 भारतीय अडकले, 7 विद्यार्थी महाराष्ट्रातील, मदतीसाठी सरकारला विनंती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *आर्थिक स्थिती पाहता जिल्ह्यांचं विभाजन शक्य नाही, अर्थमंत्री अजित पवारांकडून स्पष्ट, तर देवेंद्र फडणवीस यांनी सुरु केलेल्या मराठवाडा वॉटर ग्रीडलाही ब्रेक लावण्याचे संकेत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर, आता रेल्वेच्याच तिकीटदरात मिळणार विमानाचं तिकीट, मुंबईतील तरुणांच स्टार्टअप असलेलं 'रेलोफाय' अॅप लॉन्च* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका आणि संपादक विद्या बाळ यांचं निधन, महिलांना पुरुषांबरोबरच्या समान हक्कांसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून त्यांची विशेष ओळख होती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *वसंत पंचमीच्या मुहूर्तावर विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह, सोहळ्याला राज्यभरातून हजारो भाविकांची पंढरपुरात गर्दी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *आरोग्यदायी चांगल्या सवयी* http://nasayeotikar.blogspot.com/2018/08/blog-post_54.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *' आभाळ '* कवी ज्ञानेश्वर बा.शिंदे अंचलगाव, ता.कोपरगाव, जि.अहमदनगर. 8308035082 बाप माझा रोज पाही निळ्या आभाळ छताला घाम पेरला शिवारी न्हावु घाल धरणीला. [१] दुःख बापाच्या मनीचं साऱ्या रानात पसरे कोणा गवसेल कसे ? घाव काळीज बोचरे [२] सारं आयुष्यच त्याचं उसवल मातीमधीं सांधायाला त्याला कधी नाही मिळालीच संधी. [३] नको करू हेळसांड तुझा भरवसा त्याला बरस तू मनसोक्त तुच आसरा एकला. [४] *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात..एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आजची प्रश्नमंजुषा* 1) *अल्युमिनियम हा धातू कोणत्या खनिजपासून तयार केला जातो ?* बाक्सईट 2) *दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात मोठा देश कोणता ?* ब्राझील 3) *भांगडा हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे ?* पंजाब 4) *आयुर्वेदाचा उगम कोणत्या देशात झाला ?* भारत 5) *जगातील सर्वात जास्त भाषा बोलणारा देश कोणता ?* भारत *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 विनायक हिरवे, सहशिक्षक, कोल्हापूर 👤 बालाजी पुलकंठवार, सहशिक्षक, धर्माबाद 👤 हिलाल पाटील *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *निसर्गाच्या सानिध्यात घालविलेले क्षण मनाला प्रसन्न करतात. उमललेल्या नाजूक फुलांचा बहर, हिरव्यागार रानातून मंद शिळ घालणारा प्रसन्न वारा या सर्वांमध्ये निसर्गाचं एक दैवी रूप दडलेलं आहे. ही सुंदर कलाकृती पाहून अचंबित व्हायला होतं. निसर्गाचं निरीक्षण केल्यावर जाणवतं की, या नाजूक फुलांवर सुंदर रंगाची उधळण कोणी केली असेल ?* *हिरव्या रंगाने नटलेल्या धरणीवर निळं आकाश पसरलेलं आहे. या अथांग आकाशावर सर्व दिशांना उजळून टाकणारा अलौकिक रंगाचा मनमोहक चित्रण करणारा चित्रकार कोण आहे ? आपल्या आजूबाजूला पसरलेल्या निसर्गाचा चमत्कार व सुंदरता बघायला मानवाकडे फक्त एक नजर आहे. पण तो अनामिक चित्रकार असंख्य नजरेने क्षितिजा पलिकडे पाहात आहे. निसर्गाचे हे सगुण व प्रेरणेने भरलेलं भव्य सृष्टी चित्र सुंदरतेने चित्रित करणा-या चित्रकाराला माझा सलाम !!!* ••● *॥ रामकृष्णहरी ॥* ●•• ⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐ *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *पोटापुरता पैसा पाहिजे* *नको पिकाया पोळी,* *देणाऱ्याचे हात हजारो* *दुबळी माझी झोळी.* *या दुनियेत देणारे खूप आहेत,त्यांची* *वानवा अजिबात नाही कारण तिरुपती बालाजी,आणि* *शिर्डीचे साईबाबा यांच्या दानपेटीत करोडो रुपयांचे रोज* *पडत असतात.* *या दानाच्या भानगडीत आपल्याला पडायचं नाही पण निसर्गाचा एक* *नियम आहे आपण जे जे वाटाल,जे जे पेराल, जे जे* *दुसऱ्याला द्याल ते लाख गुणांनी आपल्याला परत* *मिळाल्याशिवाय राहत नाही,हा निसर्गाचा मोठा चमत्कार म्हणावा* *लागेल ना?* *चमत्काराच्या शोधात दुनियेची वाटचाल चालू आहे. _"गिरसप्पाच्या* *धबधब्यापेक्षा आकाशाच्या अथांग उंचीवरून* *कोसळणार्‍या पावसाच्या धारा हा अधिक मोठा चमत्कार आहे,"_ असे* *महात्मा गांधी म्हणाले. एखादी वस्तू, नसलेल्या जागी निर्माण करणे,* *हा चमत्कार असेल, तर चमत्काराची सुरूवात सृष्टीपासून* *झाली, असे* *म्हणण्याइतपत कोडे विज्ञानालाही पडले आहे. छोट्यातून मोठी गोष्ट* *निर्माण होण्याचा चमत्कार कुठल्याहीपेक्षा* *शेतातच अधिक होतो. तुम्ही एक दाणा शेताला द्या* *आणि त्यावर थेंबथेंब पाणी सोडा.* *थोड्या दिवसात फांदी फांदीला हजार लोंब्या लोंबलेले घड* *अन् मणभर दाणे तुम्हाला शेत परत करते.* *हा चमत्कार, मिळालेले देऊन टाकले, म्हणून 'चमत्काराचा* *धबधबा' पाऊस म्हणून बरसला.* *कुठल्यातरी अज्ञात शक्तीने कुठल्या तरी अज्ञात तर्‍हेने, हे विश्व साकार* *केले. तुम्ही मातीला दिलेला एक छोटा दाणा लाखो आरशांच्या* *प्रतिबिंबांनी आणि अनेक रसांच्या रूचींनी सृष्टीने* *तुम्हाला परत केला. म्हणजे शक्ती वाढवण्याचा संदेश एकच आहे, "देत* *राहा. मिळत राहील."_* *जे जे आपणासी ठावे* *ते ते दुसऱ्याशी द्यावे* *शहाणे करून सोडावे* *सकलजन।* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• या जगात कोणताही जीव जन्माला आला की,त्याचा जीवनप्रवास ख-या अर्थाने सुरू होतो.त्याला त्याचे जीवन कसे जगायचे यासाठी परमेश्वराने त्यांच्यासोबत मन आणि बुद्धी ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी त्याला म्हणजे विशेष करुन मानवाला आयुष्याच्या शेवटपर्यंत पुरेल अशी भेट म्हणून बहाल केली आहे. ह्याचा आधार घेऊनच जीवन कसे जगायचे याचे तंत्र तो शिकतो.त्यानंतर तो आपल्या मनाचा आणि बुध्दीचा चांगला सदुपयोग केला तर नक्कीच जीवनाचा प्रवास सुखावह करतो आणि जर का दुरुपयोग करायला लागला तर जीवनप्रवास दु:खमय व्हायला लागतो.ह्या दोन गोष्टी मन आणि बुद्धी यावरच अवलंबून आहेत.मग मानवरुपी जीवाने आपले जीवन कसे जगायचे आणि आपले जीवन जगण्यासोबत इतर जीवांना आपण न दुखवता कसे जगवायचे हे जरी कौशल्य मनाच्या आणि बुध्दीच्या सृजनशील कौशल्याने हाताळायला आले तरी परमेश्वराने दिलेल्या जन्माचे नक्कीच सार्थक झाल्याचे समाधान वाटेल.हा जन्म परत येणार नाही हे तर संत्र्याच्या आहेच.यानंतर आपले शरीररुपी अस्तित्व संपणार आहे पण आपण आपल्या जीवनात केलेले चांगले कार्य येणा-या जीवांच्या जीवनासाठी प्रेरणा ठेवून जाणार आहे अर्थात तुम्ही तुमच्या कार्याने अमर राहणार आहेत हे लक्षात असू द्यावे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *युक्तिच सर्वश्रेष्ठ* नदीच्या तिरावर एक कोळी मासे धरायला गेला. फार मोठे मासे नदीत सापडतील असे त्याला वाटले नाही म्हणून त्याने मोठे जाळे बरोबर घेतले नाही. एका काठीच्या टोकाला एक बारीक दोरी बांधून गळ वर ओढू लागला, पण मासा बराच मोठा असल्याने गळ लवकर ओढला जाईना. कोळ्याने विचार केला की, गळ लवकर ओढला तर मासा आपल्या वजनाने व चळवळीने आपली बारीक दोरी तोडून पळून जाईल तेव्हा त्याने बराच वेळपर्यंत गळ पाण्यात राहू दिला व नंतर अगदी हळूहळू तो पाण्याच्या बाहेर काढला. तोपर्यंत मासा धडपड करून अगदी निर्बळ झाला होता. त्यामुळे दोरी तोडण्याची शक्ती त्यात उरली नव्हती. तात्पर्यः युक्तीने सर्व प्रकारच्या अडचणीतून मार्ग काढता येतो. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 30/01/2020 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *हुतात्मा दिवस* 💥 ठळक घडामोडी :-  ● १९४८ - नथुराम गोडसेने महात्मा गांधींचा पिस्तुलाने खून केला. ● १९९४ - पीटर लोको बुद्धिबळातील सगळ्यात लहान ग्रँडमास्टर झाला. ● २००२ - भारतातील गरीब मुलांवर जवळजवळ ५७ हजार प्लॅस्टिक सर्जरी करणारे अनिवासी भारतीय डॉक्टर शरदकुमार दीक्षित यांना एनआरआय ऑफ द इयर २००१ हा पुरस्कार जाहीर. 💥 जन्म :- ● १९१० - चिदंबरम् सुब्रमण्यम्, भारतीय राजकारणी. 💥 मृत्यू :- ● १९४८ - राष्ट्रपिता महात्मा गांधी. ● १९९६ - गोविंदराव पटवर्धन, हार्मोनियम व ऑर्गन वादक. ● २००० - आचार्य जनार्दन हरी चिंचाळकर, मानववंशशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते. ● २००१ - प्रा. वसंत कानेटकर, ज्येष्ठ नाटककार. ● २००४ - रमेश अणावकर, प्रसिद्ध गीतकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई : शैक्षणिक शुल्क वाढल्यामुळे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करण्यासंबंधी योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश राज्यमंत्री अल्पसंख्याक राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मध्य रेल्वेच्या पहिल्या लोकलचे आज होणार उद्घाटन. ही लोकल ट्रान्स हार्बर मार्गावर चालवली जाणार आहे. त्यामुळे या लोकांची उद्घाटनाची फेरी ही पनवेल पासून सुरू होईल ते ठाण्यापर्यंत येईल. सीएसएमटी स्टेशनवरून रिमोट कंट्रोलद्वारे रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात येणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *जेएनयू आणि अलीगड विद्यापीठातील वादानंतर मुंबई आयआयटीने विद्यार्थ्यांसाठी नवी नियमावली जारी केली आहे. राष्ट्रविरोधी घोषणा दिल्यास कारवाई होणार, नियमावली पाळणे विद्यार्थ्यांना बंधनकारक * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 31 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. परंतु हा त्यांचा अखेरचा अर्थसंकल्प असल्याचं म्हटलं जात आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई : माहुल येथे स्थलांतरित केलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनानंतर आता पालिकेने विविध प्रकल्पांमुळे बाधित रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी प्रत्येक परिमंडळामध्ये एक हजार सदनिका उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *ट्रिपल महाराष्ट्र केसरी आणि पोलीस उपअधीक्षक विजय चौधरी आज आयुष्यभरासाठी लग्नाच्या बेडीत अडकणार. पैलवान विजय चौधरी आणि कोमल भागवत यांचा विवाह आज सायंकाळी पावणेसहाच्या मुहूर्तावर नाशिकच्या गंगापूरमध्ये संपन्न होणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धचा टी-20 सामन्यात सुपर ओव्हरमध्ये पराभव केला आहे. रोहित शर्माने खेळलेली तुफानी खेळी निर्णायक ठरली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••              *खेड्याकडे चला* https://nasayeotikar.blogspot.com/2018/05/blog-post_25.html?m=1 लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🐥 एक पाखरु...* - मनोहर बडवे... ✍ यवतमाळ... 9623728778 एक लहानसं पाखरू🐤... उडुन गेल भुर भुर.... वाट कुठं दिसेना... खुप फिरलं दुर दुर.... वरती खाली झेप घेई... तहान लागली घशाला.... आकाशाकडे चोच करुनी... पाणी विचारी सशाला🐹... मग दिसले एक माकड🐒 झाडावरती झुलत होते.... विचारुन पाहिला घरचा पत्ता... त्यालाही काही कळत नव्हते... आठवन येता मायबाप.... पंखामधी बळ येई..... झेप घेई उंच ऊंच... 🦅 दिसेल का कुठे आई...? पाखराला कळलं आता... घरट्या जवळच खेळावं.. मुळुमुळु रडु लागलं.. आता घरटं कसं शोधावं... 🏠 दुर ऊडन्याच्या हट्टाची... चुक त्याला समजली होती... घरट्याच्या प्रेमाची... किंमत आता कळली होती... आता त्याच्या पंखामधी... मायेचं बळ आलं होत... झेप घेता खुप ऊंच... आता घरटं दिसलं होतं....🏠 *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *"मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ."* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *केरळ राज्याची बोलीभाषा कोणती ?* मल्याळम 2) *चवदार तळ्याचा सत्याग्रह कोठे झाला ?* महाड 3) *महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वाखाली झाला ?* डॉ बाबासाहेब आंबेडकर 4) *पोलीस दलात महिलांची नेमणूक करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?* महाराष्ट्र 5) *फिरते न्यायालय स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?* महाराष्ट्र *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 राजेश पटकोटवार, मोबाईल टीचर       गटसाधन केंद्र, धर्माबाद 👤 मगदूम अत्तार, सहशिक्षक, 👤 सुरज एडके 👤 सतीश गणलोड 👤 शिवकुमार माचेवार 👤 अंकुश निरावार 👤 👤 👤 👤 👤 👤 👤 👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जन्माला आल्यापासून आपल्या शरीराचे आणि मनाचे भरणपोषण तर करायचे आणि कोणत्याही गोष्टींचा अतिरेक टाळायचे अतिशय अवघड कार्य आपल्याला करायचे असते. विकारांचे हे मोहमयी विश्व आपल्याला सतत आकर्षित करून घेत असते. अशावेळी डोंबा-याच्या खेळातील दोरावरच्या मुलीच्या हातातील काठीकडे आणि तिच्या हालचालींकडे पाहायचे किती शिताफीने ती आपले संतुलन साधत असते. पण अशावेळी आपण संभ्रमित होतो. कोणताही अचूक निर्णय आपल्याला घेता येत नाही.*  *आयुष्याच्या या खेळात हजारदा बाद होण्याच्या शक्यता उद्भभवतात. मग महाभारतातल्या युद्धक्षेत्रावर प्रारंभी गलितगात्र झालेल्या अर्जुनासारखी आपली अवस्था होते. भगवद् गीता इथे उपयोगी पडते. शंकाकुल अर्जनाच्या एकेक प्रश्नाचे उत्तर श्रीकृष्ण देतो आणि त्याला जाणता अर्जुन, आपला प्रिय शिष्यत्तोम बनवतो. भगवद् गीतेच्या प्रारंभी भेटणारा अर्जुन आणि शेवटी भेटणारा ज्ञानी अर्जुन. यात श्रीकृष्णाने स्व-स्वरूपाची जाणीव करून त्याला ज्ञाता अर्जुन केलेले. जणू श्रीकृष्णाचे ते दुसरे रूपच. आपण मात्र श्रीकृष्णाची वाट पाहत स्वयं अध्ययनाने आपला मार्ग शोधायचा..!*    ••●🍁‼ *रामकृष्णहरी* ‼🍁●••              🍁🍁🍁🍁🍁🍁     *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *ऊबंटू चित्रपटातील प्रार्थना माणसाच्या जगण्यातील खरेखुरे मर्म* *सांगून जाते.* *हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे माणसाने माणसाशी* *माणसासम वागणे.* *ज्या परिसरात आपण* *राहतो,वागतो,वाढतो तो परिसर त्याग करून चालणार नाही.तेथील प्रत्येक* *गोष्टीबद्दल आपल्या मनात कृतज्ञता असायला हवी.* *माझ्या आयुष्यात आलेल्या इतर माणसांविषयी कृतज्ञता मानणे हा* *संस्कार आहे.* *मला तळमळीने शिकवणारे शिक्षक,माझे मार्गदर्शक, माझे शेजारी* *पाजारी, आपले फॅमिली डॉक्टर,माझा* *दूधवाला,पेपरवाला,सकाळी आठवणीने मेसेज पाठविणारे, कॉल* *करणारे, माझे वर्गमित्र, सहकारी कर्मचारी,नातेवाईक,* *ड्रायव्हर, कामवाली मावशी, कचरा घेऊन जाणारी बाई, बिल्डिंगचा* *वॉचमन अशा एक नाही अनेक व्यक्तींबद्दल जाणीवपूर्वक* *कृतज्ञता बाळगणे महत्वाचं नाही का?* *विचार करू लागलो आणि ही यादी लांबच लांब होऊ लागली. यातून एक* *जाणवलं की ज्या ज्या गोष्टींमुळे माझं जीवन सुसह्य झालं* *आहे, सुरळीत झालं आहे, सुखावह झालं आहे त्या त्या प्रत्येक* *वस्तू, व्यक्ती,* *परिस्थितीबद्दल मनात दररोज जो कृतज्ञताभाव निर्माण होईल त्यावरून* *त्यादिवशीचा कृतज्ञता निर्देशांक ठरवायचा. हा कृतज्ञता* *निर्देशांक मला दररोज जागृत ठेवणं इतकाच नाही तर वाढत ठेवायचा* *प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी मी एक उपाय शोधून* *काढला आहे. जी जी व्यक्ती माझ्या संपर्कात येईल त्या व्यक्तीला शक्यतो* *संधी शोधून "धन्यवाद" देण्याचा परिपाठ अमलात* *आणला आहे. सकाळच्या दुधवाल्यापासून ते दररोज रात्रीची* *शिटी वाजविणाऱ्या गुरखा पर्यंत सगळ्यांना* *ते जेव्हा समोर येतील तेव्हा "थँक यू" असं ठरवून* *म्हणण्याची सवय स्वतःला लावून घेतो आहे. अगदी कुठे जात असेन आणि* *रिक्षा केली तर उतरल्यावर पैसे देऊन झाल्यावर रिक्षावाल्याचा* *खांद्यावर हलके थाप मारून आवर्जून "थँक यू" म्हणण्याचा* *जाणीवपूर्वक प्रयत्न असतो.गंमत म्हणून अशा किती* *जणांना मी दिवसभरात "थँक यू" म्हटलं याची माझ्यापुरती नोंद ठेऊन* *त्यादिवशीचा कृतज्ञता निर्देशांक दररोज रात्री झोपण्यापूर्वी* मी *काढण्याचा प्रयत्न करतो. इतर कुठल्याही* *निर्देशांकासारखा दररोजचा हा आकडा कमी जास्त होतो खरा पण* *एकूण कृतज्ञता निर्देशांकाचा महिनाभराचा आलेख हा चढता* *असला पाहिजे याचा प्रयत्न मात्र जरूर करतो.* *या सगळ्या खटाटोपानंतर मला स्वतःला एक मोठा फायदा असा* *जाणवला की ज्यांना मी धन्यवाद देतो त्या व्यक्तींना बरं वाटत असेलही* *मनात, पण माझ्या दृष्टिकोनातून पाहता माझं मन एका* *अनामिक समाधानाने भरून जातं. पाय जमिनीवर राहतात, माणसं* *जपली जातात आणि सर्वात महत्वाचं की या सर्व* *व्यक्तीत वसणाऱ्या हृदयस्थ गुरूपर्यंत प्रत्येकवेळी माझं थँक यू* *आपोआपच पोहोचतं ...* *मेसेज वाचल्याबद्दल.* *सगळ्यांना पुन्हा थँक्स,* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जर प्रत्येकाने आपल्या कामाचे नियोजन पूर्वनियोजित आणि विचारपूर्वक केले तर ते काम यशस्वीपणे पार पडेल. अन्यथा कामामध्ये व्यवस्थितपणा राहणार नाही.कामाचा दर्जाही घसरेल,मनाची घालमेल होईल, कामामध्ये लक्ष राहत नसल्यामुळे आणि एकाग्रता नसल्यामुळे स्वत:मध्ये चिडचिडेपणा येऊन आपला राग समोरच्या व्यक्तीवर काढायला लागतो.या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आपल्या कामात पूर्वनियोजन करायला हवे.तरच आपल्याला मानसिक समाधान मिळेल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वतःचा विवेक जागृत ठेवून वागण्याची शिकवण* एकदा बुद्ध बाजारातून जात होते. त्यावेळी एक व्यक्ती त्यांच्याजवळ आली आणि बुद्धाना नमस्कार करून म्हणाली, “भगवान, येथील नगरशेठ तुमची सारखी निंदा-नालस्ती करत आहे. जर तुमची परवानगी असेल तर तो तुमच्याबद्दल काय म्हणाला ते सांगू का?” तेंव्हा बुद्ध म्हणाले, "प्रथम माझ्या तीन प्रश्नांची उत्तरं दे आणि मग नगरशेठ माझ्याबद्दल काय बोलला ते ऐकायचं की नाही बघूया!” बुद्धाने त्या व्यक्तीला विचारले, “नगरशेठ माझ्याबद्दल जे बोलला ते सत्य आहे का? तेंव्हा ती व्यक्ती म्हणाली, " नाही भगवंत, मला तर त्या माणसाच्या बोलण्यावर थोडा देखील भरवसा नाहीये. तो बोलला म्हणून मला तुम्हाला सांगावंसं वाटतंय.” बुद्धांनी दुसरा प्रश्न विचारला, "तुला असं वाटतं का, की जी गोष्ट तू मला सांगणार आहेस त्याने मला दु:ख होईल?” तेंव्हा ती व्यक्ती म्हणाली, "हो भगवंत, तो माणूस जे बोलला त्याने तुम्हाला दु:ख होऊ शकतं." त्यानंतर बुद्धांनी शेवटचा प्रश्न विचारला, "तुला असं वाटतं का, की जी गोष्ट तू मला सांगणार आहेस ती माझ्या कामाची आहे किंवा त्यापासून मला काही लाभ होणार आहे?” ती व्यक्ती म्हणाली, "नाही भगवंत, ह्या गोष्टी तुमच्या कामाच्याही नाहीत आणि त्यापासून तुम्हाला कोणताही लाभ होणार नाही." तेंव्हा बुद्ध म्हणाले, " हे बघ माझं हृदय एका शांत सरोवरासारखं आहे ज्यामध्ये मी प्रेम, दया आणि करुणेची फुलं ठेवतो. ज्या गोष्टींवर तुझा स्वतःचा विश्वास नाही, जी गोष्ट ऐकल्यानंतर मला दुःख होईल आणि जी गोष्ट माझ्या कामाची नाही, व्यर्थ आहे अशा गोष्टी ऐकून मी माझं शांत सरोवररुपी हृदय विनाकारण मलीन का करू?" बुद्धाचे हे विचार ऐकून त्या माणसाला धडा मिळाला, की ऐकीव गोष्टींवर नुसताच विश्वास ठेवणं योग्य नाही, तर स्वतःचा विवेक जागृत ठेवून अशा निंदाजनक बोलण्यापासून लांब राहणंच उत्तम आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 29/01/2020 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  ● १७८० - जेम्स ऑगस्टस हिकी यांनी कोलकाता येथे 'कलकत्ता जनरल ऍडव्हर्टायझर' या नावाने साप्ताहिक वर्तमानपत्र सुरु केले. हिकीज बेंगाल गॅझेट नावाने ओळखले जाणारे हे वर्तमानपत्र म्हणजे भारतीय पत्रकारितेची सुरुवात. ● २००६ - शेख सबाह अल-अहमद अल-जबर अल-सबाह कुवैतच्या अमीरपदी. 💥 जन्म :- ● १९७०-राज्यवर्धनसिंग राठोड,ओलीम्पिक रौप्यपदक विजेता भारतीय नेमबाज ● १८७१ - चंद्रशेखर शिवराम गोर्‍हे, बडोदा संस्थानचे राजकवी. 💥 मृत्यू :- ● २००१-राम मेघे ,महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री ● १९५० - अहमद अल-जबर अल-सबाह, कुवैतचा अमीर. ● १५९७-महाराणा प्रताप,मेवाडचे राजे *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *सर्व महाविद्यालयात यापुढे मराठी सूचना फलक अनिवार्य, सर्व महाविद्यालये विद्यापीठांच्या कार्यक्रमांची सुरुवात यापुढे राष्ट्रगीताने करणार - उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *राज्य शासनाची बहुचर्चित शिवभोजन थाळी योजना मोठ्या उत्साहात सुरु झाली. पुण्यात सलग तिसऱ्या दिवशीही या थाळीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं समोर आलंय, मनपा शेजारी असणाऱ्या निशिगंधा व्हेज मध्ये शिवभोजन थाळी सुरु करण्यात आली असून लोकांनी 10 रुपयात मिळणाऱ्या थाळीचं भरभरून कौतुक केलंय.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नवी दिल्ली : 1 फेब्रुवारी, 2020 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 2020-21 या आर्थिक वर्षाचं बजेट देशासमोर सादर करतील. यावेळी अनेक मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होणार असल्याचंही सांगितलं जात आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नेहमी आपल्या देशातील प्रतिभा व तंत्रज्ञानावर विश्वास ठेवा. त्यातून आपल्याला बळकट राष्ट्र निर्माण करता येईल पद्मविभूषण सन्मानप्राप्त आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ अनंत माशेलकर यांचे प्रतिपादन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *यवतमाळ : खासगी बाजारात कापसाचे भाव पडले, प्रती क्विंटल ४५०० चा दर. त्यामुळे यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीत कापूस गाड्यांची आवक वाढली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *सिडनी : युवा विश्वचषक (१९-वर्षांखीलील) स्पर्धेत भारताने ऑस्ट्रेलियावर ७४ धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीत मारली धडक, भारताच्या या विजयात वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागीने महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळे कार्तिकला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मध्यप्रदेश संघातील वेगवान गोलंदाज रवी यादवने रणजी सामन्यात उत्तर प्रदेश विरोधात खेळताना सामन्याच्या पहिल्याच षटकात करिअरचे पहिले षटक टाकताना पहिल्या तीन चेंडूंवर तीन विकेट्स घेतल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पहिल्याच षटकात हॅटट्रिक घेणारा तो भारताचा पहिला गोलंदाज ठरला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *'अति क्रोध करू नये'* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/14.html         लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कविता - माझी शाळा* स्वप्नील प्रकाश धने (स्वप्नचर) वैजापूर (औरंगाबाद) 8698388096 इवल्या इवल्या फुलांची भरली बघा शाळा नानारंगी फुलांनी हा उजळला छान मळा छान छान शाळा आमची त्याला निसर्गाचे अलिंगन फुलांनी भरले बघा कसे आमच्या शाळेचे हे अंगण इकडून तिकडे उडती फुलपाखरे अन् भ्रमर स्वच्छंद उडतात बघा या फुलांवरून त्या फुलांवर किलबिलाट पक्ष्यांचा अन् वाहे ज्ञानाची ही गंगोत्री करतो ज्ञानार्जन आवडीने बनतो आवडीचा विद्यार्थी *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *”आपलं दु:ख पाहुन कोणी हसले तरी चालेल, पण आपल हसणं बघुन कोणी दु:खी होता कामा नये..”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *कोणता असा एकमेव अन्नपदार्थ आहे जो कधीच खराब होत नाही ?* मध 2) *छत्तीसगड हे राज्य कोणत्या राज्यापासून वेगळे झाले आहे ?* मध्यप्रदेश 3) *पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण ?* ममता बॅनर्जी 4) *डास चावल्याने कोणता रोग होतो ?* मलेरिया 5) *महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी जंगले आढळणारा विभाग कोणता ?* मराठवाडा *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•• ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुनील वानखेडे, 👤 दत्ताहरी कदम 👤 मधुसूदन जाधव 👤 नरेंद्र जोशी 👤 कोंडीराम केशव 👤 वीरभद्र करे 👤 राजेश्वर सुरकूटवार 👤 आनंद जगमारा 👤 कु. आकांक्षा गंगाधर तोटलोड *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खरंतर मरण्यासाठी शंभर बहाणे असले तरी जगण्यासाठी एक 'वजह' पुरेशी आहे. ही वजह सापडली की मनातील मळभ दूर होत जातं. इथेच संपतो माणसाच्या आत्मशोधाचा प्रवास. ही वजह उराशी कवटाळून जगणारी माणसं ख-या अर्थानं आनंदयात्रेमधील 'पाथेय' ठरतात. काळाच्या ओघात हे संदर्भ बदलतात नि पुन्हा सुरू होतो शोध नवीन कारणांचा नि जगण्याच्या नवीन वजहचा.* *ब-याचदा ती वजह सापडतही नाही हातात..... पण माणूस वाट पाहतो विवशतेतही एक नवा आशावाद साठवून आणि उभा राहतो या अक्षयी नि निरंतर  फिरणा-या चक्राच्या मध्यभागी........*             *जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत !* *एक कवी लिहून जातो.....*           *......सदियाॅ बित गयी टूटी*                      *हुई डोर को थामे*                     *शायद कोई वजह मिल*                      *जाए जिने की....!*                       ‼ *॥ रामकृष्णहरी ॥* ‼            🔶🔶🔶🔶🔶🔶    *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *आई हवी,पत्नी हवी,बहीण हवी,* *आजी हवी,मावशी हवी,मैत्रीण हवी,* *पण मुलगी नको.असली तरी आपली आणि परक्याची हा भेद कधी* *संपणार. वरवर दिसलं तरी मनातून काय?* *दोन दिवसांपूर्वी पेपरमध्ये बातमी वाचली आणि पुन्हा ह्या भावना दाटून आल्या.* *गर्भात वंशाची पणती प्रवेशिता* *गर्भलिंगनिदानाचा धाक आहे.* *असलीस तू कळी उमलणारी* *जन्मा आधीच मृत्यूची हाक आहे.* *जन्मदाते आईबापच तुझे भक्षक आहेत .* *सांग सावित्रीच्या लेकी!!* *तू कूठे सूरक्षित आहेस?* *कारणही तसेच घडले आहे गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास* *लासलगाव रेल्वे स्थानकावर एका कोपर्‍यातील* *बाकड्यावर अज्ञात महिला की पुरुष हे देवाला माहिती यांनी* *आपली पोटची 7 दिवसाची मुलगी सोडून पलायन केले.* *नंदिग्राम एक्सप्रेस मधून उतरलेल्या 2 प्रवासी विद्यार्थ्यांनी या* *मुलीचा रडण्याचा आवाज ऐकून* *रेल्वे पोलिसांना याची माहिती* *दिली या पोलिसांनीही तत्परता दाखवत या अवघ्या सात* *दिवसाच्या मुलीला लासलगाव ग्रामीण रुग्णालयात आणले.* *लासलगाव येथील श्री संत जनार्दन स्वामी अनाथ आश्रमाचे संचालक* *दिलीप गुंजाळ व सौ संगीता गुंजाळ यादेखील तातडीने* *ग्रामीण रुग्णालयात हजर झाल्या.* *गोड ,गोंडस, गुटगुटीत, अत्यंत देखणी मुलगी ,पोटचा गोळा लोक टाकून निघून* *कसे जाऊ शकतात ? हा* *प्रश्न खूप* *सतावत होता. सौ संगीता गुंजाळ यांच्या मांडीवर अगदी गुपचूप पडून* *राहिलेली ही गोंडस कन्या खरोखर तिची काय चूक असेल* *का तीला आज रेल्वे स्टेशनवर सोडून तिच्या आई वडिलांना पळून जावे* *लागले असेल......* *फक्त ती एक...... मुलगी....... एवढेच* *ना.........* .. *सरकार यासंदर्भात खुप जनजागृती* *करतय ,मात्र तरीही* *असे प्रकार घडतच आहे याच खूप* *वाईट वाटतंय......अगदी हे* *लिहितानाही.......* *मुलींच्या बाबतीत असे का होते आहे,* *हाच मोठा प्रश्न* *जाणवतोय...... बस.......* *बाळ लडिवाळ, कोमल वाणी* *हास्याचे कारंजे, लेक माझी।।* *मायेचा पाझर,सुखाची झालर* *गोड निरागस, लेक माझी।।* *आईची छाया,बहिणीची माया* *घराची शोभा, लेक माझी।।* *लटके रूसणे,गालात हसणे* *आनंदी बागडे, लेक माझी।।* *मनी एक सपान,खूप मोठी व्हावी* *सूर्यापरी चमकावी,लेक माझी* *या ओळी फक्त बोलण्या, चालण्या* *साठी का?माणूस एव्हढा* *क्रूर कसा होऊ शकतो.* *एकीकडे डोळ्यासमोर येते ती सोडून* *जाणारी माता..... तर दुसरीकडे दिसते मांडीवर घेऊन* *बसलेली ती अनाथाश्रमातील सांभाळ* *करणारी माता.* *कुठे कुठे आर्त हाक मारावी तेच कळत नाही.* *विदयेचे पवित्र मंदीर आज ओंगळ वाटते आहे.* *आॅफीस, कार्यालयात तू गळाला लागते आहे.* *ऑटोरिक्षा, बस ,रेल्वेत जणू लपले तक्षक आहेत.* *सृष्टीची तू निर्माती आहेस* *तूच दुर्गा,तुच लक्ष्मी ,सरस्वती आहेस* *सावध रहा सदा या मायावी दुनियेत* *सावित्रीच्या सुजाण लेकी!!!* *तूच तुझी अंगरक्षक आहेस.* *काल तू होतीस म्हणून आज आम्ही* *आहोत माई..* *नाहीतर आम्हाला* *स्वयंपाकघर-न्हाणीघर-देवघर यापलिकडे अस्तित्वच नव्हतं..* *तू उंबरठा ओलांडला नसता तर आम्ही आजही उंबरठ्याआडच* *राहिलो असतो.. खिडकीतून* *दिसणार्‍या टीचभर आभाळात* *नशिबातील अमावस्या-पौर्णिमा मोजत बसलो असतो..* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जो माणूस जसा विचार करतो त्याच विचारानुसार जीवनात वागतो. जर चांगले विचार असतील तर त्यांचे परिणाम त्याच्या जीवनात आणि इतरांराच्याही जीवनात चांगलेच होतील. आपल्याला आणि इतरांना त्रास होणार नसतील, उपदेशात्मक असतील तर ते नक्कीच जीवनात फलदायी ठरु शकते.अशी माणसे स्वत:च्या आणि इतरांच्याही जीवनात नवे चैतन्य आणू शकतात.ते कधीही वाईट विचारांना आपल्या जीवनात थारा देत नाहीत, त्यांना कुणाचेही नुकसान होऊ नये असेच वाटते. परंतू वाईट विचार करणारी माणसे कधीच आपल्या जीवनात यशस्वी होत नाहीत आणि इतरांच्या चांगल्या चाललेल्या जीवनात बाधा आणल्याशिवाय राहत नाहीत. अशी माणसे दुष्ट प्रवृतीची असतात. त्यांना स्वत:चे आणि इतरांचे काय आणि किती नुकसान होत आहे याचे भान देखील राहत नाही. अशा वृत्तीच्या माणसांपासून केव्हाही दूरच राहिलेले बरे. © व्यंकटेश काटकर,नांदेड. 📲 9421839590 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *💐कर्म सिद्धांत 💐* डोळ्यांनी झाडावरचा आंबा पाहीला आणि खाण्याची ईच्छा जाग्रुत झाली ,डोळेतर फळ तोडू शकत नाहीत म्हणून पाय गेले फळ तोडायला ,पण जवळ पोहोचूनही पाय आंबा तोडू शकले नाहीत ,मग हात गेले आंबा तोडायला ,हाताने आंबा तोडला पण हात पाय व डोळे तो खाऊ शकले नाहीत .आंबा खाल्ला तोंडाने पण तो तोंडात राहीला नाही ,तो गेला पोटात , आता माळ्याने ते पाहीले आणि त्याने दांड्याने मार दिला पाठीवर, पाठ म्हणाली मला का मारता ? मी कुठे आंबा खाल्ला ? दांड्याने मार मिळाला पण अश्रू आले डोळ्यात कारण पहिला दोष डोळ्यांचा होता ,डोळ्यानी प्रथम आंबा पाहिला होता हाच आहे कर्म सिद्धांत *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 28/01/2020 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *लाला लजपतराय जयंती* 💥 ठळक घडामोडी :-  ● २००३ :- मराठी कवी मंगेश पाडगावकर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर 💥 जन्म :- ● १८६५ - लाला लजपतराय यांचा जन्म 💥 मृत्यू :- ● १९८४ - भारतीय चित्रपट दिग्दर्शक साहेबराव मोदी यांचे निधन *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *प्रजासत्ताक दिनी पाच किल्ल्यांवर फडकवला तिरंगा रायगड जिल्ह्यातील उरणच्या भेंडखळ इथल्या हर्षितीने इतिहास घडवला, सर्वात कमी वयातील गिर्यारोहक म्हणून तिच्या पराक्रमाकडे पाहिलं जात आहे. म्हणूनच वर्ल्ड बुक, आशिया बुक आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद होणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नेरूळ येथे उभे राहत असलेल्या मरिना सेंटर मधून सुटणाऱ्या बोटी अलिबागला फक्त एक तासात आणि मुंबईला अर्धा तासात पोहचणार आहेत. 111 कोटी रूपयांचा हा प्रकल्प असून एक वर्षात तो कार्यरत होणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मुंबईतील आझाद मैदानात शिक्षक समन्वय संघाच्यावतीने बेमुदत धरणे आंदोलन, मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी प्रतिक्रिया शिक्षकांनी दिलीए. आगामी दहावी आणि बारावी परीक्षांवर बहिष्कार घालत आहोत, त्याला सर्वस्वी शासन जबाबदार असेल, असा पवित्रा आंदोलक शिक्षकांनी घेतलाय.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शिवभोजन केंद्राच्या उदघाटन करण्यात आलं...* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *सर्व सुविधांनी युक्त अशा अत्याधुनिक बसस्थानकांचे आराखडा सादर करण्याचे निर्देश परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *सरकारने शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याऐवजी चिंताग्रस्त केलं, गिरीश महाजनांची टीका, महाविकास आघाडी सरकारने अद्याप शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम दिली. यावरून भाजप नेते गिरीश महाजन यांनी सरकारवर साधला निशाणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई: इंडियन प्रिमियर लीग अर्थात आयपीएल २०२० स्पर्धा २९ मार्चपासून सुरू होणार असून या स्पर्धेतील अंतिम सामना २४ मे रोजी मुंबईत होणार आहे. आयपीएलच्या १३ व्या हंगामासंदर्भात झालेल्या गव्हर्निग काऊसिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••           *कमवा आणि शिका* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.  http://nasayeotikar.blogspot.com/2017/06/blog-post_86.html    लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कविता - माकडाची शाळा* सौ.सविता जयंतराव धर्माधिकारी जि.प.कें.प्रा.शा.कासारखेडा ता.जि.लातूर मुले आली शाळेला घेऊन पाठीवर दप्तर माकड आले शाळेमध्ये झाडावरून चालत भरभर माकड म्हणाले, आज माझे ऐका तुम्ही मी सांगेन युक्त्या नामी माझ्या सारखी करा नक्कल बघा कशी वाढेल अक्कल दप्तर ठेवा बाजूला उड्या मारू चार मजा करू सारे यारे नाही मिळणार मार माझ्या मागे गाणी म्हणा हुप हुप हुप हुप हुप गाल कसे फुगले बघा आरशात बघा रूप झाडावरही चला सरसर फळे तोडू पटापट वही पेन पुस्तक पाटी कसलीच नव्हती कटकट *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" तुम्ही अपयशी झाले त्यापेक्षाही तुम्ही अपयशी झाल्यानंतर काय करतात याची मला जास्त काळजी वाटते."* ------------------------- अब्राहम लिंकन *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *जर्मनीचे चलन कोणते ?* मार्क 2) *'मार्श गॅस' असे कोणत्या वायूला म्हणतात ?* मिथेन 3) *इंग्लिश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय कोण ?* मिहीर सेन 4) *मणिपूर राज्याचे लोकनृत्य कोणते ?* मणिपुरी 5) *श्रीकृष्णाची जन्मभूमी कोणती ?* मथुरा ( उत्तरप्रदेश ) *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सोपान राव डोंगरे 👤 राम पाटील ढगे 👤 अनिल सोनकांबळे 👤 मोगलाजी मरकटवाड 👤 सलीम शेख 👤 श्रीनिवास सीतावार 👤 राजेश अर्गे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खात्या-पित्या घरातून उठून माणसे रस्त्यावर कशी येतात ? आणि रस्त्यावरची उठून वैभवाच्या शिखरावर कशी पोहचतात ? कोणी ढकलते की आपल्या पायांनी येतात जातात ? प्रश्नाचे उत्तर तसे कठीण असले तरी ढकलण्याचे ब-याचदा निमित्त होते. आर्थिक आघात, व्यसने, नादानी, जीवघेणे आजार, फसवणूक यातून माणसं विपन्नावस्थेत पोहचतात. पैसा यात मोलाची भुमिका बजावतो. त्याचे स्नोत वाहते असतील तर निभावता येते.* *एकदाच मिळणा-या आयुष्याची अशी वाताहत केव्हाही क्लेशदायी, पण ती ज्याची होते तोही ती रोखू शकत नाही. अंथरूण पाहून पाय पसरले, नमते घेतले तर असे प्रसंग टाळताही येतील, पण तशी बुद्धी व्हावी लागते. मग याच्या उलट घडून माणसे रस्त्यावरून वैभवाच्या शिखरावर जातात. "मानवी जीवनात दु:ख ऐसपैस असते तर सुख मुटकुळे करून असते."* ••● *॥ रामकृष्णहरी ॥* ●•• ☘☘☘☘☘☘☘☘☘ *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🙏सुप्रभात🙏* *मित्रांनो* *मैंने पुछ लिया जिन्दगी से, "क्यों* *इतना दर्द दिया ?" वो हंसी और* *बोली, "अरे पगले, मैं तो तुझे जीना* *सीखा रही थी.....!" लेकिन तु* *कल की फिक्र में हमेशा* *दर्द लेता रहा। याद रखना,* *आज से बेहतर कुछ नहीं* *क्योंकि कल कभी आता ही* *नहीं और आज कभी जाता* *नहीं....!* *मायकल जॅक्सनला हे पूर्ण द्यात होते,पण मरणावर विजय* *मिळविण्यासाठी त्याची धडपड चालू होती.* *ऊन एकटं कधीच येत नाही ते सावलीला घेऊनच येतं दु:खाचं अन* *सुखाचं हेच नातं असतं.* *मृत्यू अटळ आहे.हे मान्य करायला तयार असणारा माणूस लढणं सोडत* *नाही.* *आणि मृत्यूला घाबरणारा रडणं सोडत नाही.* *मग दोन्हीपैकी काय निवडायचे ते आपणच ठरवायचे.* *महत्वकांक्षा असल्याशिवाय माणूस मेहनत करित नाही. आणि मेहनत* *केल्याशिवाय महत्वकांक्षा पुर्ण होत नाही…! मायकल जॅक्सनला १५० वर्षे* *जगायचं होतं. कोणाशी हात मिळवायचा तर तो आधी हातात* *मोजे घालत असे. जेव्हा त्याला लोकांमध्ये जावं लागत* *असे तेव्हा तोंडावर तो आधी मुखवटा घालत असे. त्याची काळजी* *घेण्यासाठी त्याने त्याच्या घरी १२ डॉक्टर नियुक्त केले* *होते. हे डॉक्टर त्याच्या केसांपासून ते अगदी पायाच्या* *नखांपर्यंत सगळ्या अवयवांची रोज तपासणी करीत* *असत. त्याचे जेवणखाण प्रयोगशाळेत तपासल्यानंतरच त्याला* *खायला घातले जायचे. त्याच्याकडून व्यायाम करून* *घेण्यासाठी १५ लोक तैनात असायचे.* *मायकल जॅक्सन गोरा नव्हता. त्याने १९८७ मध्ये प्लॅस्टिक सर्जरी करवून* *घेत आपली त्वचा गोरी केली होती. गोरा झाल्यावर त्याने* *आपले काळे आईवडील, काळे मित्र यांना सोडलं आणि गोर्‍या* *आईवडिलांना भाड्याने घेतलं. मित्र जवळ केले ते ही त्यांचा गोरा रंग* *बघूनच. लग्न केलं ते ही गोर्‍या मुलींबरोबर.* *दीडशे वर्षे जगण्याचं उद्दिष्ट ठेवलेला मायकल नेहमी प्राणवायूच्या* *बिछान्यावर झोपत असे. त्याने स्वतःसाठी शरीराचे* *अवयव दान करणारे दाता तयार ठेवले होते. त्यांचा खर्च तो स्वतः करत असे* *म्हणजे त्याला गरज पडल्यावर मूत्रपिंड, फुप्फुस, डोळे* *किंवा इतर कुठलेही अवयव हे दाता येऊन त्याला देऊ शकतील.* *त्याला वाटायचं की तो पैसा आणि आपला प्रभाव यामुळे मृत्यूलाही* *चकवा देईल पण हे शक्य झालं नाही आणि २५ जून २००९ या* *दिवशी त्याची हृदयगती बंद पडू लागली. त्यावेळी त्याच्या घरी* *१२ डॉक्टर होते पण कोणीही परिस्थिती सावरू शकलं* *नाही. हे बघता शहरातील सगळे* *डॉक्टर त्याच्या घरी जमा झाले. या सगळ्यांनी प्रयत्न केले पण कोणीही* *त्याला वाचवू शकलं नाही.* *त्याने २५ वर्षे डॉक्टरांना विचारल्याशिवाय कधीही काहीही* *खाल्लं नाही. त्याचा शेवटचा काळ जसजसा जवळ येत गेला तसतशी* *त्याची शारीरिक स्थिती बिघडू लागली. ज्याला १५० वर्षे* *जगायचं होतं पण त्याची पन्नाशीतच शारीरिक अधोगतीकडे वाटचाल सुरू* *झाली. आयुर्मान* *वाढावं म्हणून त्याने जी काही सोय केली होती, त्याचा काहीही उपयोग* *झाला नाही.* *जेव्हा त्याच्या शवाचं विच्छेदन करण्यात आलं तेव्हा डॉक्टर म्हणाले* *की त्याचं शरीर म्हणजे फक्त हाडांचा सापळा झाला होता. तो* *टकला होता. त्याच्या बरगड्या, खांदा यांची हाडं तुटलेली होती.* *त्याच्या शरीरावर असंख्य सुई टोचल्याचे निशाण होते.* *प्लॅस्टिक सर्जरी केल्याने जो त्याला त्रास व्हायचा, त्यावर उपाय* *म्हणून त्याला रोजच्या रोज antibiotics ची अनेक injections* *घ्यावी लागत असे.* *मायकल जॅक्सनची अंत्ययात्रा २५० कोटी लोकांनी थेट प्रक्षेपणात* *पाहिली. ही आत्तापर्यंतची थेट प्रक्षेपणात सर्वात* *जास्त पाहिली गेलेली घटना आहे.* *मायकल जॅक्सन याच्या मृत्यूच्या दिवशी म्हणजेच २५ जून २००९ या* *दिवशी दुपारी ३.१५ वाजता विकिपीडिया, ट्विटर आणि AOL चं* *instant messenger हे सगळं क्रॅश झालं होतं. याच्या मृत्यूची बातमी* *येताच ८ लाख लोकांनी गुगलमध्ये मायकल जॅक्सन* *म्हणून शोधाशोध केली आणि ही शोध मोहीम फारच सुरू* *झाल्याने गुगलवर सगळ्यात मोठा ट्रॅफिक जॅम झाला आणि मग गुगलही* *क्रॅश झालं. त्यावेळी अडीच तास गुगल बंद राहिलं.* *मृत्यूला चकवा देण्याचा ज्यांचा विचार असतो, त्यांना मृत्यूच चकवतो, हेच* *खरं. चार दिवसांचा थाट, ऐश, पैसा, श्रीमंती आणि यामुळे* *येणारा माज..* *कशाला तो ! स्मशानात जाणार तेव्हा हाताची साधी मूठही रिकामीच* *असणार आहे. हे कधी समजणार लोकांना ! कदाचित कधीच* *नाही.* *जग जिंकणारा सिकंदर सुद्धा मरतेवेळी जमिनीवर मोकळे हात* *करून लोकांना संदेश देऊन गेला.* *खाली हात आया है,खाली हात जायेगा।* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्याप्रमाणे एखाद्या गीताला सुमधुर संगीतात संगीतबद्ध करायचे असेल तर त्यासाठी अनेक वाद्यांचे सुर एकत्रित आणावे लागतील आणि त्या वाद्यांना वाजवणारे किंवा चालवणारे अनेक कलाकार एकत्रीत आणून गीताला तालबद्ध आणि स्वरबद्ध करावे लागेल तेव्हा कुठे सुमधुर गीत ऐकण्यासाठी तयार होईल.अर्थात इतरांना त्या गीताचा आस्वाद घेता येईल.त्याचप्रमाणे एखादी चांगली कृती करण्यासाठी किंवा ती कृती सर्वमान्य होण्यासाठी सर्वांच्याच सहभागाची गरज असते आणि त्यात सर्वांचेच सहकार्य असेल तर ते नक्कीच एखाद्या सुमधुर गीतासारखेच सुसंस्कारीत बनेल आणि नक्कीच लोक अनुकरण करायला लागतील.कोणत्याही चांगल्या गोष्टींसाठी अनेकांचे सहकार्य असणे गरजेचे आहे त्यासाठी सर्वांनी एकत्रित, एकोप्याने राहणे गरजेचे आहे आणि तसे राहिल्यास सा-यांनाच चांगला फायदा होईल.नाहीतर एकटे राहून एकाकी जीवन जगण्याचा अट्टाहास केला तर त्या जगण्याला मीठविरहित जेवन केल्यासारखेच जीवन चवहिन होईल हे लक्षात असू द्यावे.जीवनात चांगल्या गोष्टींसाठी एकी आणि एकोपा असणे गरजेचे आहे. © व्यंकटेश काटकर,नांदेड 📲 ९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पाकोळी आणि कावळा* एक पाकोळी आणि एक कावळा स्वतःच्या सौंदर्यावरून आपआपसात भांडत होते. बोलता बोलता कावळा पाकोळीला म्हणाला, 'तुझं सौंदर्य फक्त उन्हाळ्यातच पहावं, माझं सौंदर्य सदासर्वदा सारखंच असतं त्यामुळे मी नेहमीच सुंदर दिसतो,' तात्पर्य - दोन सुंदर वस्तूंपैकी जिचे सौंदर्य जास्त टिकाऊ तीच अधिक उपयोगी म्हटली पाहिजे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 27/01/2020 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *महर्षी मार्कंडेय जयंती* 💥 ठळक घडामोडी :-  १९६७: महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना झाली. ही संस्था बालभारती या नावाने ओळखली जाते. 💥 जन्म :- १९०१: विचारवंत लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी १९२२: हिन्दी चित्रपटांतील खलनायक अजित खान ऊर्फ अजित १९२६: भारताचे १३ वे लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य 💥 मृत्यू :-  २००९: भारताचे ८ वे राष्ट्रपती आर. वेंकटरमण  *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *देशाच्या 71 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतल्या राजपथावर भारताच्या सामर्थ्यांचं दर्शन, भारतीय हवाई दलाकडून चित्तथरारक प्रात्याक्षिकं, राज्यांच्या संस्कृतीचंही दर्शन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *राज्यभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह, मुंबईत शिवाजी पार्कवर राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण, मुख्यमंत्र्यांची उपस्थिती, आरमार प्रमुख शूर कान्होजी आंग्रे यांची शौर्यगाथा सांगणाऱ्या चित्ररथाचं प्रदर्शन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या वर्षातील पहिल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात नोटबंदी, जीएसटीपासून ते स्वच्छता अभियानाचा उल्लेख केला. देशाच्या विकासासाठी सरकार करत असलेल्या अनेक निर्णयांचा उहापोहही केला. तसेच, नागरिकांनी मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे. हिंसा कुठल्याच प्रश्नाचं उत्तर असू शकत नाही, असेही मोदींनी म्हटले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *राज्यभरात 122 ठिकाणी शिवभोजन थाळी केंद्राची स्थापना, 10 रुपयांत गरजूंसाठी शिवभोजन थाळी, पुणे, नाशिक, कोल्हापूरसह अनेक ठिकाणी झालं उद्घाटन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *शरद पवारांच्या सुरक्षेत कपात नाही, दिल्ली पोलिसांचं स्पष्टीकरण, दिल्लीतल्या निवासस्थानी पुन्हा सहा सुरक्षारक्षक तैनात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नगरकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा, राहीबाई पोपेरे, पोपटराव पवार आणि क्रिकेटपटू जहीर खानला पद्मश्री मिळाल्याने अहमदनगर जिल्ह्यात आनंदाला उधाण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *दुसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडियाचा न्यूझीलंडवर सात विकेट्सनी विजय, पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडी, केएल राहुलची धमाकेदार खेळी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *महर्षी मार्कंडेय : पद्मशाली समाजाचे कुलदैवत* ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हणजे भृगु महर्षी. या भृगु महर्षी आणि त्यांची पत्नी कयार्थी यांना भार्गवी, धाता आणि विधाता अशी तीन अपत्ये होती. भार्गवी म्हणजे लक्ष्मी ही विष्णूची पत्नी. धाता व अयाती यांना प्राणूडु नावाचा पुत्र होता. तर विधाता आणि नियती यांच्या पुत्राचे नाव होते मृकंड. भगवान शंकराचे परमभक्त असलेले मृकंडला एकही पुत्र नव्हते. त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी शंकर भगवानची कठोर तपस्या केली. त्यांच्या या कठोर तपश्चर्येला भगवान शंकर प्रसन्न झाले आणि इच्छित वर मागण्यास सांगितले. ....... https://nasayeotikar.blogspot.com/2019/02/blog-post_7.html?m=1 लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• || लालपरी || - विलास सुर्यवंशी वडाळा , मुंबई . सोनुली छकुली इवली इवली बाहुली माझी छान गाल गोबरे सुंदर डोळे गोरी गोरी पान || लालपरीचे फ्राॅक गुलाबी चिमुकले हे कान कानामध्ये झुलती झुमके डुलु डुलु डोले छान || ओठावरती लालच लाली हसते खुदकन गाली इतकी सुंदर दिसते कोमल लालपरी पाकळी || बोबडी बोले डोलत चाले चाले ठूमकत ठूमकत खेळते माझ्यासंगे मजला येते भरपूर गंमत || *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'सत्यमेव जयते' हे कशातून घेतलेले आहे ?* मुंडक उपनिषदातून 2) *'क्रांतिकारकांचे बायबल' असे कोणत्या कादंबरीला म्हटल्या जाते ?* आनंदमठ 3) *हरिजन संघाची स्थापना कोणी केली ?* महात्मा गांधी 4) *महाराष्ट्रातील पहिले वायफाय शहर कोणते ?* पुणे 5) *स्वामी दयानंद सरस्वती यांचा कोणता वेदावरील ग्रंथ आर्य समाजाचा प्रमाण आहे ?* सत्यार्थ प्रकाश *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 दत्तराम बोमले *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जन्माला आल्यापासून आपल्या शरीराचे आणि मनाचे भरणपोषण तर करायचे आणि कोणत्याही गोष्टींचा अतिरेक टाळायचे अतिशय अवघड कार्य आपल्याला करायचे असते. विकारांचे हे मोहमयी विश्व आपल्याला सतत आकर्षित करून घेत असते. अशावेळी डोंबा-याच्या खेळातील दोरावरच्या मुलीच्या हातातील काठीकडे आणि तिच्या हालचालींकडे पाहायचे किती शिताफीने ती आपले संतुलन साधत असते. पण अशावेळी आपण संभ्रमित होतो. कोणताही अचूक निर्णय आपल्याला घेता येत नाही.* *आयुष्याच्या या खेळात हजारदा बाद होण्याच्या शक्यता उद्भभवतात. मग महाभारतातल्या युद्धक्षेत्रावर प्रारंभी गलितगात्र झालेल्या अर्जुनासारखी आपली अवस्था होते. भगवद् गीता इथे उपयोगी पडते. शंकाकुल अर्जनाच्या एकेक प्रश्नाचे उत्तर श्रीकृष्ण देतो आणि त्याला जाणता अर्जुन, आपला प्रिय शिष्यत्तोम बनवतो. भगवद् गीतेच्या प्रारंभी भेटणारा अर्जुन आणि शेवटी भेटणारा ज्ञानी अर्जुन. यात श्रीकृष्णाने स्व-स्वरूपाची जाणीव करून त्याला ज्ञाता अर्जुन केलेले. जणू श्रीकृष्णाचे ते दुसरे रूपच. आपण मात्र श्रीकृष्णाची वाट पाहत स्वयं अध्ययनाने आपला मार्ग शोधायचा..!*    ••●🍁‼ *रामकृष्णहरी* ‼🍁●••              🍁🍁🍁🍁🍁🍁     *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *_मित्रांनो,_* *👍सदाचार हा माणसाचा खरा अलंकार आहे.* *🤝🏻होठोपे सच्चाई रहती है।* *जहाँ दिलमे सफाई होती है।* *हम उस देशके वासीं है,जिस देशमे* *गंगा बहती है।* *अस असलं तरी 😃😁चेहरा न देखो दिलको देखो।* *😃चेहरे ने लाखोंको लुटा।* *दिल सच्चा और चेहरा झुटा।* *हे पण तितकेच महत्वाचे आणि खरे* *आहे.* *🏆मनुष्याचं चारित्र्य कमकुवत करणारे दोन मुख्य अवगुण म्हणजे--लोभ* *आणि असत्य.मोठमोठ्या गोष्टीविषयी* *असणारा लोभ पटकन लक्षात येतो.* *पण सूक्ष्म स्तरावर असणारा लोभ लगेच लक्षात येत नाही.* *या छोट्या आणि सूक्ष्म लालसा म्हणजे,समाजामध्ये,मित्रांमध्ये* *लोकप्रिय होण्याची इच्छा, इतरांच्या तोंडून आपली स्तुती व्हावी ही* *अपेक्षा, आपण जसे आहोत, त्यापेक्षाही अधिक सुंदर* *दिसावं,कष्टाविना सुखसुविधा प्राप्त व्हाव्यात अशा इच्छा.* *या लालसाच माणसाला अपराध करण्यासाठी प्रवृत्त करतात. तसेच* *खोट बोलायला भाग पाडतात. त्यामुळे आपल्या शब्दांची ताकद नाहीशी होते.* *झूठे इंसान की ऊंची आवाज सच्चे इंसान को खामोश कर देती हैं l परंतु* *सच्चे इंसान की खामोशी झूठे इंसान की बुनियाद हिला देती है l* *सत्य परेशान होता है, पराजित नही।* *हे लक्षात ठेवून मार्गक्रमण करावे.* *खरा माणूस पहायला मिळेल.* *अशोक कुमावत, नाशिक* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• इतरांना त्रास देऊन जर आपण आपले जीवन चांगल्याप्रकारे जगू म्हटले तर ते अयोग्यच आहे.कारण त्यांनी परिश्रमातून जे काही मिळवलेले असते ते गुण्यागोविंदाने जगण्याचे स्वप्न साकारत असतात.हे त्यांचे बघवत नाही आणि आपल्याने होत नाही म्हणून इतरांना त्रास देऊन त्यांचे सुख हिरावून घेणे हे वामवृत्तीचे लक्षणच म्हणावे. त्यामध्ये आपण सुखी होऊ शकतो का ? आपल्या बाबतीत इतरांनी असे केले तर आपणास कसे वाटेल ? ते आपल्या मनाला समाधान देते का ? ह्या सा-या गोष्टीचा आपण विचार केला तर नक्कीच त्याचे उत्तर सापडेल आणि पुन्हा आपण ती चूक करणार नाही याची नक्कीच जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.इतरांच्याही सुखस्वप्नात आपणही सहभागी व्हावे हाच आपला माणुसकीचा खरा धर्म आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *यशाचा घडा* वसिष्ठांची पत्नी अरूंधती ज्ञानी, विद्वान, पतिव्रता होती. एकदा सूर्य अग्नी व वरूणासह वसिष्ठांच्या आश्रमात आले. तेंव्हा अरूंधती पाण्याचा घडा घेऊन नदीवर जायला निघाली होती. तिने तिघांना बसायला आसन दिलं आणि म्हणाली, 'थांबा थोडं, आता नदीवरून एवढा घडा भरून आणते.' त्यावर सूर्यदेव म्हणाले, 'आई नदीवर कशाला? मीच मंत्रसामर्थ्याने देतो घडा भरून' एवढे म्हणून त्यांनी मंत्रसामर्थ्याने घडा भरला, पण तो घडा १/२ रिकामाच राहिला. शेवटी तो पूर्ण भरण्याचे काम अरूंधतीने केले. नंतर ती म्हणाली कोणत्याही यशाचा ३/४ वाटा देवदत्त असला तरी १/४ भाग भरण्यासाठी मानवी प्रयत्नच लागतात. निढळाच्या घामाने उरलेला १/४ घडा भरणे भाग आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

https://youtu.be/aJqb_HkKA48

*माझी शाळा माझे उपक्रम* 📚📚📚📚📚📚 जि.प.प्रा.शाळा गोजेगाव येथे घेण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांतर्गत आज (दि.२३- ०१-२०२०) रोजी आयोजित *👏मातृपूजन👏* आयोजकः श्रीमती सेनकुडे मॕडम ☘☘☘☘☘☘ *'ठेविला चरणी माथा, फिरे हात तोंडावरूनी, आशीर्वाद देता देता , येतो ऊर तिचा भरूनी, होऊदे बाळ मोठा, हाची धावा देवाचरणी स्वर्गही पडे फिका, माऊलीच्या चरण स्पर्शांनी'* आईचे महान स्थान व आपली आई ही आपल्यासाठी देवच असते. *मातृपूजन* ह्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आईची महती आजच्या विविध उपक्रमातून सांगण्यात आली. आयोजित सर्व कार्यक्रम बघून सर्व मातांना आनंद झाला. काही क्षणचिञे..👇👇👇👇 〰〰〰〰〰〰〰 *✍वृत्तांत लेखन* श्रीमती प्रमिला सेनकुडे.

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 25/01/2020 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *राष्ट्रीय मतदार दिवस* 💥 ठळक घडामोडी :-  ● १९७१ - हिमाचल प्रदेशला भारताचे १८वे राज्य म्हणून मान्यता. ● २००१ - स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईवादक उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च सन्मान जाहीर. ● २००४ - लेखिका अमृता प्रीतम, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर आणि माजी सरन्यायाधीश एम.एन. वेंकटचलय्या यांना पद्म विभूषण किताब जाहीर. तसेच दिग्दर्शक गुलजार, न्या.चंद्रशेखर धर्माधिकारी, जपानचे पंतप्रधान योशिरो मोरी, पत्रकार एम.व्ही. कामत, व्हायोलिनवादक एन. राजम यांना पद्मभूषण किताब जाहीर. 💥 जन्म :- ● १९३१ - डीन जोन्स, अमेरिकन अभिनेता. ● १९३३ - कोराझोन एक्विनो, फिलिपाईन्सची राष्ट्राध्यक्ष. 💥 मृत्यू :- ● २००१ - विजयाराजे शिंदे, भारतीय जनता पक्षाच्या नेत्या. ● १९८०-लक्ष्मणशास्त्री दाते, सोलापूरचे 'दाते पंचाग कर्ते *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *राज्य सरकारकडून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून राज्यात शासकीय-निमशासकीय सेवेतील मागासवर्गीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी पदोन्नतीत आरक्षण लागू करण्यात येण्याचे संकेत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *वंचितनं पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद, मुंबई औरंगाबादसह काही ठिकाणी हिंसक वळण, बंद यशस्वी तर दगडफेक करणारे कार्यकर्ते वंचितचे नसल्याचा प्रकाश आंबेडकरांचा दावा * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *केंद्र सरकारने शरद पवारांची सुरक्षा हटवली, केंद्र सरकारवर राष्ट्रवादीच्या नेत्यांचा घणाघात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पोलीस शिपाई आणि चतुर्थ श्रेणी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी म्हाडाची 10 टक्के घरे आरक्षित ठेवणार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *चीनमध्ये मृत्यूतांडवासाठी कारणीभूत कोरोना वायरसचा महाराष्ट्रात शिरकाव, परदेशातून आलेल्या दोन मुंबईकरांना संसर्ग, प्रादुर्भाव रोखण्याचं आव्हान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावर 31 जानेवारीपसून गारेगार प्रवास, ठाणे-वाशी आणि ठाणे-पनवेल मार्गावर 16 फेऱ्या, एसी लोकलचं सारथ्य महिलांकडे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *टीम इंडियाने पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टीत न्यूझीलंडचा सहा विकेट्सनी उडवला धुव्वा, श्रेयस अय्यर सामनावीर, राहुल आणि विराटची धडाकेबाज खेळी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *राष्ट्रीय मतदार दिवस निमित्ताने* *मतदार राजा जागा हो .......!* इंग्रजांच्या दीडशे वर्षे गुलामगिरीच्या नंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाले. त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी देश प्रजासत्ताक झाले. भारतात लोकशाही पद्धतीने राज्यकारभार चालविला जातो. जगात सर्वात यशस्वी लोकशाही देश म्हणून आपल्या देशाकडे पाहिले जाते. ही लोकशाही यशस्वी करण्यामागे येथील नागरिकांचा म्हणजे मतदारांचा अत्यंत महत्त्वाचा सहभाग आहे. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालविलेले राज्य. येथे मतदार आपल्या मतदानाव्दारे लोकप्रतिनिधींची निवड करत असतात. त्यामुळे प्रत्येक मतदारांनी आपले अमूल्य मत व्यक्त करणे खूप महत्वाचे ठरते. ........... https://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_22.html?m=1 लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आईचे ऐका* - भारती धुपद-सोळंके औरंगाबाद सखा तुका ऐंका रे जरा पोटभर जेवण घरचे करा वरण भात भाजी पोळी पिझ्झा बर्गरला मारा गोळी शेपू मेथी पालक भाजी खावी रोज ताजी ताजी आईचे भजी लय भारी खाऊ नका रे पाणीपुरी वडापाव खाऊन पोट दुखतं डॉक्टरकडे मग जावं लागतं डॉक्टर देतात औषधांचा डोस पाहून मग होता बेहोश आईचे सर्व काही ऐंकायचे बाहेरचे उघडे नाही खायचे आईच्या हाताला चवच न्यारी कधीच नाही पडणार आजारी *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन असण्यात खूप फरक असतो. *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *मुघल सत्तेचा संस्थापक कोण ?* बाबर 2) *वायुसेनेच्या प्रमुखाला काय म्हणतात ?* एअर चीप मार्शल 3) *जलसेनेच्या प्रमुखाला काय म्हणतात ?* एडमिरल जनरल 4) *अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष कोण होते ?* बराक ओबामा 5) *सस्तन प्राण्यांच्या हृदयात किती कप्पे असतात ?* 4 कप्पे *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 प्रा. वैशाली देशमुख, कुही नागपूर साहित्य स्पंदन समूह, संचालिका 👤 दत्ताहरी पाटील आवरे, धर्माबाद 👤 ललेश पाटील मंगनाळीकर 👤 राजीव सेवेकर 👤 महेबूब पठाण 👤 अंबादास कदम 👤 राहुल आवळे 👤 नरेश दंडवते, पत्रकार *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एक तरुण आपल्या विधवा आईला सोडून पळून आला आणि एका मठात तंत्र मंत्र साधना करू लागला, अनेक वर्षे लोटली, एके दिवशी त्याने आपले वस्त्र सुकविण्यासाठी टाकले आणि ध्यान करू लागला, डोळे उघडल्यावर पाहतो ते काय! एक कावळा त्याचे वस्त्र ओढत असल्याचे त्याला दिसले, हे पाहून तरुणाने त्या कावळ्याकडे क्रोधाने पाहिले.त्याक्षणी तो कावळा जळून खाक झाला. आपल्या सिद्धीचे यश बघून तो खुश झाला आणि अहंकाराने भिक्षा मागायला गेला. त्याने एका दारावर जावून आवाज दिला. पण कोणीच बाहेर आले नाही. त्याला फार राग आला. त्याने अनेक वेळेला आवाज दिला तेंव्हा एका स्त्रीने म्हटले," महाराज! थोडा वेळ थांबा! मी साधना समाप्त होताच आपल्याला भिक्षा वाढते." तरुणाने हे ऐकले आणि त्याचा पारा चढला. त्याने म्हटले,"दुष्टे! तू आम्हाला ओळखत नाहीस. आमची परीक्षा बघतेस काय? याचे किती वाईट परिणाम होतील हे माहित आहे काय?"* *हे ऐकताच घरातील स्त्री म्हणाली," माहित आहे! तुम्ही शाप द्याल. परंतु मी काही कावळा नाही जो आपल्या क्रोधाग्नीत भस्म होईल. मातेला एकटी सोडून मुक्ती मिळवू पाहणाऱ्या अहंकारी संन्याशा! तू माझे काही बिघडवू शकत नाही." तरुणाने हे ऐकले आणि त्याचा सगळा गर्व चक्काचूर झाला. त्याने बाहेरूनच क्षमा मागितली तेंव्हा गृहस्वामिनी घराबाहेर आली तेंव्हा त्याने तिला तुम्ही कोणती साधना करता ? असा प्रश्न केला. तेंव्हा ती म्हणाली,"आपली साधना तीच असते , आपण जी कर्मे करतो ती कर्म सोडून मुक्तीच्या मागे धावलं तर मुक्ती मिळणे दुरापास्त होते व यातूनच अहंकार निर्माण होतो. मी गृहस्थ धर्माची उपासना करते आणि त्यात कसूर करत नाही." हे ऐकून त्याने अहंकाराचा त्याग करून व सन्यस्त जीवन सोडून मूळ कर्तव्याचे पालन करण्यासाठी आईकडे परतला. प्रत्येकाने आपले विहित कर्तव्य योग्यपणे करावे याची जाणीव त्याला झाली.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *माणस अपयश का आलं यासाठी वेगवेगळी संरक्षण कवच वापरतांना* *आपण सगळ्यांनी बघितली आहे.* *इंसान जब हथेली की रेखाओं में* *भविष्य ढूंढने लगे,* *तब समझ लेना कि,* *उसकी बाजुओं में ताकत,* *और* *मन में विश्वास खत्म हो गया है..* *कारणं’ देणाऱ्यांना चपखल ’ उत्तर* *जीवनात अपयश येणं चुकीच नाही. पण प्रयत्नच न करणं हे मात्र चुकीचं* *आहे. वेळोवेळी कारणं देवून* *वेळ निभावून नेणारी माणसे आपण पाहिलीच असतील. ती नेहमी* *माझ्याकडे ‘काय कमी’ आणि दुसऱ्याकडे ‘काय जास्त’* *यातच मशगुल असतात.* *अशा विचासरणी त्यांना जीवनात पुढे जावू देत नाही. जीवनात* *अनेक उणीव असताना त्याचा विचार न करता* *यशाचं शिखर सर करणाऱ्या व्यक्ति कोण आहेत? ते जाणून घेऊयात...*_ : *माझ्याकडे असलेल्या छोट्या नोकरीत मी काहीही करु शकत नाही.* : *रिलायन्स उद्योगसमूहाचे जन्मदाते धीरुभाई अंबानी पेट्रोल पंपावर तेल* *भरण्याची लहानशी नोकरीच करायचे. त्यांनी पुढे* *मिळवलेले यश आपल्याला माहिती आहेच.* *मला वर्गात काहीच येत नाही.* *जगाला सापेक्षतावादाचा सिध्दांत देणारे अल्बर्ट आईनस्टाईन यांना तर* *अभ्यासात अजिबात गती नव्हती.* *मी अपंग आहे.* *प्रसिध्द नृत्यांगणा सुध्दा चंद्रन कृत्रिम पायाने नाचून यशस्वी झाल्या.* *जेसिका कॉक्सला हात नव्हते. तिने पायाने विमान उडवले. शरीरात* *हालचाल करण्याची क्षमता नसताना स्टीफन हॉकिंग फार मोठे* *संशोधक झाले. मार्क* *इंग्लिसला पाय नव्हते व अरुनिम्मा सिन्हाला अपघात पाय गमवावे* *लागले होते. ते दोघेही जगातील सर्वात उंच शिखर माऊंट* *एव्हरेस्टवर चढले.* *लहानपणीच माझे वडील वारले.* *ऑस्करविजेते संगीतकार ए. आर. रहमान यांच्या लहानपणीच त्यांचे* *वडील वारले होते.* *लहानपणीच कुटुंबाची जबाबदारी त्यांना सांभाळावी लागली.* *गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना सुध्दा त्यांच्या बालपणी त्यांच्या* *कुटुंबाची जबाबदारी सांभाळावी लागली होती.* *मला इंग्रजी येत नाही.* *प्रसिध्द उद्योगपती गौतम अदानी व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी* *इंग्रजीचा फार वापर करत नाही.* *तरीही ते यशस्वी आहेत.* *माझे शरीर खूप मोठे आहे.* *एकेकाळी अदनान सामीची ओळख त्याचे मोठे शरीर होते. आज त्याचा* *फिटनेस पाहून सर्वच अचंबित होतात.* *मी फारच किडकिडित आहे.* *महम्मद अली सुध्दा शरीराने* *किडकिडित होते. तरीही ते सात वेळा* *बॉक्सिंगचे विश्वविजेते झाले.* *मला कुणाचा वरदहस्त (गॉडफादर)* *नाही.* *वरील सर्व उदाहरणातील एकाही व्यक्तीला कोणीही वरदहस्त नव्हते.* *वरील उदाहरणे पाहिली तर कळते की, या लोकांनी आपल्या कमजोरीवर* *मात करुन यश मिळवले आहे. आपल्याकडे जे नाही* *त्याची ते व्यथा करत बसले नाहीत. जे आहे त्यात बेस्ट करण्याचा* *त्यांनी प्रयत्न केला. म्हणून आज त्यांचे नाव घेतले जाते.* *ग्रामीण, गरीब, श्रीमंत अशा* *सर्व प्रकारची माणसे यशस्वी* *होतात. ती शक्ती निसर्गाने* *त्यांना दिलेली आहे. त्या* *शक्तीला साकार करण्यासाठीचे मार्ग सापडले की झालं.* *प्रयत्न करा, यश तुमची वाट बघतय.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• या जगात सर्वात जास्त वेगवान आणि गतीमान जर कोण असेल तर या प्रश्नांचे उत्तर अनेकजण वेगवेगळ्या प्रकारे देऊ शकतील.पण माझ्या मते सगळ्यात जास्त वेगवान आणि गतीमान जर कोणी असेल तर फक्त मानवी मनच आहे.पहा ह्या मनाची आतापर्यंत कुणीही वेग आणि गती मोजली नाही.बहिणाबाईंच्याच शब्दांत सांगायचे झाले तर मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं,किती हाकला हाकला फिरी येतं पिकांवर......मन पाखरू पाखरू तयाची काय सांगू मात आता व्हतं भूइवर गेलं गेलं आभायात... अशा या मनाची गती एवढी आहे की ती मोजता येणेच अवघड आहे.अशा या मनाला जर का आपण आपल्या जीवनात आपल्या वशमध्ये ठेवले तर तो यशस्वी होतो आणि नाही ठेवले तर जीवन जगण्यात अपयशी ठरतो. अशा सर्वश्रेष्ठ मनाला आपल्या वशमध्ये ठेवण्याचा अधिक प्रयत्न करायला हवा.म्हणजेच आपल्या जीवनाचा खरा अर्थही कळेल आणि सुखही मिळेल. *©व्यंकटेश काटकर, नांदेड.* संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🏹🌸🍃🏹🌸🍃🏹🌸🍃🏹🌸🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *महत्‍वाच्‍या तीन गोष्‍टी* एका गावाजवळ एक अरण्य होते. त्‍या अरण्यात अनेक सुंदर व गोड गळ्याने गाणारे पक्षी येऊन निरनिराळे सुंदर आवाज काढत असत. एके दिवशी एका शेतक-याने एका पक्ष्‍याला पकडले. तो पक्षी सुरेख असा दिसत असून त्‍याचा आवाजही छान होता. पक्ष्‍याला पकडल्‍यावर तो शेतकरी म्‍हणाला,’’ मी तुला पिंज-यात ठेवून चांगले चांगले खायला घालेन आणि त्‍या बदल्‍यात तू मला गोड आवाजात गाणे म्‍हणून दाखवित जा.’’ पक्षी म्‍हणाला,’’ पिंज-यात तर मी जास्‍त दिवस जगणारच नाही. तर मी तुला कसे काय गाणे ऐकवू?” शेतकरी म्‍हणाला,’’ तर मग मी तुला मारून खातो.जसा तुझा आवाज गोड आहे तसेच तुझे मांसही अतिशय चवदार असणार याची मला खात्री वाटते.’’ पक्षी म्‍हणाला,’’ एवढ्याशा मला खाऊन तुझी भूक कशी काय शमणार?, त्‍या पेक्षा मी तुला महत्‍वाच्‍या तीन गोष्‍टी सांगतो. त्‍या तू कधीही स्‍मरणात ठेव. त्‍याने तुझा अपार फायदा होईल.’’ त्‍या पक्ष्‍याच्‍या गोड बोलण्‍यावर शेतक-याने विश्‍वास ठेवला व त्‍याला सोडून दिले. शेतक-याने सोडताच पक्षी झाडाच्‍या एका टोकावर जाऊन बसला व म्‍हणाला,’’ शेतकरीदादा, पहिली महत्‍वाची गोष्‍ट म्‍हणजे बंदिवासातून सुटण्‍यासाठी कैदी जी आश्‍वासने देतो त्‍यावर कधीही विश्‍वास ठेवू नकोस, दुसरी महत्‍वाची गोष्‍ट म्‍हणजे आपल्‍या हाती आलेल्‍या गोष्‍टीला विचार केल्‍याशिवाय कधीही सोडून देऊ नकोस, आणि तिसरी महत्‍वाची गोष्‍ट म्‍हणजे हातातून गेलेल्‍या क्षणाचा, किंवा झालेल्‍या चुकांबद्दल कधीही शोक करत बसू नकोस यातून तुझा काहीच फायदा होणार नाही.’’ एवढे बोलून पक्षी उडून गेला.. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 24/01/2020 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  ◆ १९७२ -गुआममध्ये १९४४पासून लपलेला जपानी सैनिक, शोइची योकोइ सापडला. याकोइला दुसरे महायुद्ध संपलेले माहिती नव्हते. ◆ १९८६ - अंतराळयान व्होयेजर २ युरेनसपासून ८१,५०० कि.मी. अंतरावर पोचले. 💥 जन्म :- ◆ १९१२ - केनेथ वीक्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू. ◆ १९१५ - जॉन ट्रिम, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू. ◆ १९१६ - व्हिक्टर स्टॉलमायर, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  ◆ १९६६ - होमी भाभा, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ. ◆ २०११ - पंडित भीमसेन जोशी, हिंदुस्तानी शास्त्रीय गायक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *वंचित बहुजन आघाडीकडून आज महाराष्ट्र बंद, नागरिकत्वासह केंद्र सरकारने अलीकडेच पारित केलेल्या नव्या कायद्याच्या विरोधात हा बंद आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुकारला आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *चीनमध्ये पसरलेल्या कोरोना विषाणूने आातपर्यंत १७ जणांचा बळी घेतला असून दोन शहरं जवळपास सील करण्यात आली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून लोकांना घराबाहेर पडण्यापासून बंदी घालण्यात आली आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *परभणी : पाथरीच्या साई जन्मस्थळाचा वाद आता उच्च न्यायालयात जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाजू मांडण्यासाठी पुरेसा वेळ न दिल्याने उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती पाथरी साई जन्मस्थळ कृती समितीचे अध्यक्ष बाबाजानी दुर्रानी यांनी दिली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *ठाकरे घराण्यातील आणखी एक चेहरा राजकारणात! अमित राज ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *औरंगाबाद- महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे देशासाठी पदके जिंकणाऱ्या व उच्च दर्जाच्या खेळाडूंना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देवून गौरव करण्यात येतो. मात्र, त्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारणी नोकरी मिळत नाही, त्यामुळे येत्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंनी आपला पुरस्कार शासनाला परत करणार असल्याचे निवेदन महापौर नंदकुमार घोडेले यांना दिले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *रणजीतसिंह देओल मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी रुजू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *खेलो इंडियात सर्वसाधरण विजेतेपद मिळवण्याची महाराष्ट्राची ही सलग दुसरी वेळ आहे. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी यंदा 78 सुवर्ण, 77 रौप्य आणि 101 कांस्य अशी 256 पदकांची केली कमाई* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••              *मुख्यालय* वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://kathamaala.blogspot.com/2017/04/blog-post_22.html कथा वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शाळा माझे मंदिर ...* - भीमराव मुरलीधर सोनवने मु .पो .वासडी . ता .कन्नड .जि .औरंगाबाद . भ्रमणध्वनी .९४०४५४९७८८. शाळा माझे मंदिर शिक्षक माझे गुरू मी छोटा भाविक विद्धेचा वाटसरू... रोज शिकवी मला जीवनाचा परिपाठ शिक्षक माझे दैवत थोपटे माझी पाठ ... आई देई जन्म मला गुरु करी ज्ञानदान पवित्र वाचा माझी गाता विध्या गुण .... शाळा माझे धाम शाळा माझे तीर्थ शाळा माझी काशी शिकवी जीवन अर्थ ... ह्या ज्ञानपंढरीचा मी एक वारकरी अध्ययन पताका माझ्या खांद्यावरी .... *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही..आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *ऊस उत्पादनात भारतातील कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो ?* उत्तरप्रदेश 2) *'पाचूचे बेट' या नावाने कोणत्या बेटास संबोधतात ?* श्रीलंका 3) *जगातील सर्वात कमी तापमानाचे ठिकाण कोणते ?* वोस्टोक ( Antartik ) 4) *जगातील सर्वात उष्ण ठिकाण कोणते ?* डेथव्हॅली ( अमेरिका ) 5) *जगातील विस्ताराने सर्वात मोठे बंदर कोणते ?* न्यूयॉर्क *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 राहुल तांबे, मुंबई 👤 सोनू राजेंद्र येरमलवाड 👤 प्रशांत उकिरडे, सहशिक्षक, बार्शी 👤 रेश्मा कासार, पुणे 👤 सिध्दांत मनूरकर, पाथर्डी 👤 योगेश फत्तेपुरे 👤 दीपक पाटील, नांदेड *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *असताना कोणीही दान करील, नसतानाही दान करता आले पाहिजे. स्वत: भुकेला राहून कुणाची भूक भागवाल तर ते उच्चकोटीचे दान. अशा दानात परम संतोष भरलेला असतो. दुस-याचं दु:खं आपलं वाटणं म्हणजे संवेदनशिलता. ती उसनी नाही घेता येत, ती असायला हवी नि असते. ती जाणिवेतून येते. 'चमडी देगा लेकिन दमडी नही,' म्हणणारी माणसं नुसती कंजुष असत नाहीत तर ती निष्ठुरही असतात. ती स्वत:च्या इच्छा, आकांक्षाचे बळी देऊन जे धन जोडतात, त्याचा पायाच मुळी हिंसक असतो मग त्याची परिणतीही हिंसक होते. तुमचे दातृत्व लोक गृहीत धरून काही सामाजिक संकल्प करत असतील, उपक्रम हाती घेत असतील तर दातृत्व तुमची वृत्ती झाली आहे, असे समजायला हरकत नाही. दुस-याचे होणे हे 'स्वविसर्जन' खरे उच्चकोटीचे दान.* *निसर्ग जसा असतो तसे माणसाने असायला हवे. 'देणा-याचे हात' घेण्याची कल्पना ही जगातली सर्वोत्तम कल्पना म्हणायला हवी. मिडास, कुबेर व्हायचं की कर्ण हे ठरवता आले पाहिजे. शत्रूवर हल्ला करताना आपण कदाचित मरू हे माहित असूनही जो सैनिक प्राणाची बाजी लावतो, तो आपल्या जीवनाचा हेतूपुर्वक बळी देतो, म्हणून बलिदान श्रेष्ठ असते. अनाथ, अंध, अपंगाना दान चांगलेच पण.. त्याहीपेक्षा त्यांना सनाथ करणे, प्रज्ञाचक्षु बनविणे लाख मोलाचे. आपणाला दुस-याचं कोणी होता आलं तर समजावं,'त्यांना जीवन कळले हो!' असं जीवनाचं आकलन होणं म्हणजे जीवन सार्थकी लागणं.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937940* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *मृत्यू अटळ आहे.हे मान्य करायला तयार असणारा माणूस लढणं सोडत* *नाही.* *आणि मृत्यूला घाबरणारा रडणं सोडत नाही.* *मग दोन्हीपैकी काय निवडायचे ते आपणच ठरवायचे.* *महत्वकांक्षा असल्याशिवाय माणूस मेहनत करित नाही. आणि मेहनत* *केल्याशिवाय महत्वकांक्षा पुर्ण होत नाही…! आयुष्यात स्वत:ला* *कधी उध्वस्त होऊ देऊ नका. कारण लोक* *ढासळलेल्या घराच्या वीटा सुद्धा सोडत नाहीत._* *ज्या दिवशी जबाबदारीचे आोझे खांद्यावर येते, त्या दिवशी थकायचा* *आणि रुसायचा अधिकार संपतो.* *दरवाजे छोटे ही रहने दो अपने दिल के, जो झुक के आ गया समझो वही* *अपना है ।* *आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते, फक्त विचार सकारात्मक* *पाहिजेत.* *माणसांचा संग्रह करणं इतकं सोपं नसतं, जितकं पुस्तकांचा संग्रह* *करणं, कारण पुस्तकांचा* *संग्रह करण्यासाठी पैशांची गुंतवणूक करावी लागते तर माणसांचा संग्रह* *करण्यासाठी भावनांची.* *माणुस हा बाह्य सौदर्या पेक्षा अंतरंगातील सौदर्याने श्रीमंत असला* *पाहिजे. कारण बाह्यसौदर्य हे वाढत्या वयाप्रमाणे कमी होत जाते* *पण अंतरंगातील सौदर्य मात्र माणसाला अखेरच्या* *श्वासापर्यंत माणुसकीने वागायला शिकवते.* *नात्यांच्या बागेत एक नाते कडुलिंबाचे पण लावा, जे अनुभव भले कडवे* *देईल,* *पण अडचणीत तेच उपयोगी येईल.* *आपण शब्दांना स्पर्श करू शकत नाही, मात्र मनाला स्पर्श करण्याची* *ताकद शब्दात असते.* *आयुष्य सरळ आणि साधं आहे,* *ओझं आहे ते फक्त गरजांचं.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुम्ही या जगात आलात आणि तुमची ओळख माणूस म्हणूनच झाली.जन्मानंतर आपल्या जीवनाचा खरा प्रवास सुरू होतो.तिथूनमात्र आपण आपल्यासाठी काहीना काही करायला लागतो आणि कशाच्यातरी मोहात पडतो.हे माझं ते माझं म्हणत म्हणत सारं आयुष्य संपवतो. शेवटी आपण जन्माला येताना सोबत काहीच आणले नव्हते आणि शेवटी जे काही मिळवले ते इथेच सोडून गेले.मग मनुष्य जन्माला येऊन काय केले ? असा जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा उत्तर काहीच सापडत नाही. याचे जर खरेच काही उत्तर मिळवायचे असेल तर आयुष्यात चांगले जगायचे असेल तर,आपल्या पश्चात इतरांसाठी काही ठेवायचे असेल तर पहिल्यांदा कोणत्याही गोष्टींचा मोह टाळायला शिका, आपल्यातला मीपणा नष्ट करा,एकटेपणात जीवन जगण्यापेक्षा इतरांमध्ये जगायला शिका.पैसा आणि संपत्तीच्या मोहापायी आपले सुंदर जीवन दु:खाच्या खाईत लोटू नका,इतरांमध्ये सामील होऊन सुखदु:खांदा मदतीचा हात पुढे करा, इतरांपेक्षा आपण जन्माला आलो आणि वेगळे काही करून आपला ठसा जनमानसावर उमटवा जेणेकरून तुम्ही मनुष्यजीवनाला येऊन आपल्या जीवनाचे सार्थक झाले असे म्हणता येईल. पुन्हा आपल्याला ही संधी कधीच मिळणार नाही हे लक्षात असू द्या.मग तुमच्याच लक्षात येईल की, आपणास काय करायचे आणि काय करावे लागणार याचा नक्कीच उलगडा होईल आणि अनेक मोहापासून आपली सुटका होईल.आपले जीवन अधिक सुसह्य होईल. *©व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लाख मोलाचा देह* एक भिकारी भीक मागता मागता एका श्रीमंत व्यापार्‍याच्या वाडयासमोर उभा राहून भीक मागू लागला. मालकाने सेवकाला त्याला वर बोलावयाला सांगितले. सेवक बोलवायला आलेला पाहून भिकार्‍याला खूप आनंद झाला. त्याच्या मनांत आशा निर्माण झाली की, वर बोलावलं म्हणजे बरच काही देणार असेल. वर गेल्यावर व्यापारी म्हणाला, 'हे बघ तुला मी पाचशे रूपये देतो पण त्याबद्दल देतो पण त्याबद्दल तु मला तुझे डोळे दे' 'छे ! छे ! हे कसं शक्य आहे ? डोळे दिले तर मी काहींच करू शकणार नाही.' भिकारी म्हणाला. 'बरं मग असं कर हात तरी देतोस कां?' व्यापारी म्हणाला. अशाप्रकारे व्यापारी प्रत्येक अवयवाची किंमत वाढवत होता पण भिकारी एकही अवयव द्यायला तयार नव्हता. व्यापारी म्हणाला 'बघ ५००-५०० रूपये म्हटले तरी तुझ्या देहाची किंमत लाखाच्यावर झाली. एवढा लाख मोलाचा धडधाकट देह असतांना भीक कां मागतोस ? कष्ट कर पैसे मिळवं'. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

*आमची शाळा आमचे उपक्रम* 📚📚📚📚📚📚 जि.प.प्रा.शाळा गोजेगाव येथे घेण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांतर्गत आज (दि.२३- ०१-२०२०) रोजी *🌻हळदीकुंकू कार्यक्रम , मातापालक मेळावा,मातृपूजन* आयोजक👉 सौ.कुंभारे मॕडम,हिवराळे मॕडम,सेनकुडे मॕडम यांनी आयोजित केला होता. *👏मातृपूजन👏* 👉आयोजकः श्रीमती सेनकुडे मॕडम *'ठेविला चरणी माथा, फिरे हात तोंडावरूनी, आशीर्वाद देता देता , येतो ऊर तिचा भरूनी, होऊदे बाळ मोठा, हाची धावा देवाचरणी स्वर्गही पडे फिका, माऊलीच्या चरण स्पर्शांनी'* आईचे महान स्थान व आपली आई ही आपल्यासाठी देवच असते. *मातृपूजन* ह्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आईची महती आजच्या विविध उपक्रमातून सांगण्यात आली. आयोजित सर्व कार्यक्रम बघून सर्व मातांना आनंद झाला. काही क्षणचिञे..👇👇👇👇 〰〰〰〰〰〰〰 *✍वृत्तांत लेखन* श्रीमती प्रमिला सेनकुडे

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 23/01/2020 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  ● १९७३-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी व्हीतनामबरोबर शांतता करार झाल्याचे जाहीर केले ● १८९७ - नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म भारताच्या ओडिशा राज्यातील कटक शहरात झाला. ● १९९६ - संगणक भाषा जावाचे सर्वप्रथम प्रकाशन. 💥 जन्म :- ● १८९७ - नेताजी सुभाषचंद्र बोस, भारतीय क्रांतिकारी. ● १९२६ - हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, मराठी राजकारणी, शिवसेना पक्षाचे संस्थापक. 💥 मृत्यू :- ● ११९९ - याकुब, खलिफा. ● १५६७ - ज्याजिंग, चिनी सम्राट. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अयोध्या दौऱ्यावर, सरकारच्या 100 दिवसपूर्तीला रामललाचं दर्शन घेणार, खासदार संजय राऊत यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *भंडारा : जिल्हाच्या तुमसर तालुक्यातील आंबागड आश्रम शाळेचा भोंगळ कारभार परत एकदा चव्हाट्यावर आलाय. शाळेने दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म न भरल्याने 34 विद्यार्थी परिक्षेपासून वंचित, यामुळे पालकांमध्ये संतापची लाट उसळली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *27 जानेवारीपासून मुंबई 24 तास सुरु राहणार, नाईट लाईफच्या प्रस्तावाला मंत्रीमंडळाची मंजुरी, मंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *शिवभोजन थाळीसाठी आधारकार्ड आणि फोटोची गरज, सरकारकडून नवीन नियमावली जारी, मुंबईत केईएम, नायर, कूपर हॉस्पिटलसह 15 ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरु करणार * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *थेट जनतेतून सरपंच निवड रद्द होणार, बाजार समिती निवडणुकीमधील शेतकऱ्यांचा मतदानाचा अधिकार रद्द, तर नगराध्यक्षांची निवड पूर्वीप्रमाणे नगरसेवकच करणार, फडणवीस सरकारच्या निर्णयाला ठाकरे सरकारकडून ब्रेक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या सौ. मंगाराणी अंबुलगेकर तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या पद्माताई सतपलवार यांची निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई : राज्यातल्या शाळांमध्ये आता मराठी विषय सक्तीचा होणार असून त्यासाठी सरकार हालचाली सुरू केल्या आहेत. शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्यासंदर्भातील कायदा येत्या अधिवेशनात मांडण्यात येईल, अशी माहिती मराठी भाषा विभाग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *विशेष बातमी :- महाराष्ट्र केसरी सदगीर नाशिक पालिकेचा सदिच्छादूत, पालिकेकडून सदगीरला 3 लाखांचं बक्षीस* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *बालविवाह कसे रोखता येतील ?* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/05/blog-post.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चांदोमामा चांदोमामा* सौ.आरती डिंगोरे, विषयसाधनव्यक्ती पं. स. दिंडोरी, जिल्हा नाशिक. चांदोमामा चांदोमामा येशील का? ढगांच्या गाडीतून नेशील का? ढगांची मऊ मऊ गाडी रे, हरणांची त्याला जोडी रे…….. ढगांच्या गाडीतून करेन हात, फिरूया आपण सारी रात…… चांदण्याच्या राज्यातून फिरायला, आवडेल तुझ्याशी खेळायला…… दंगा मस्ती धमाल गोष्टी, आकाशातून पाही हिरवी सृष्टी..... करूया गंमती विसरूनी भान, गाऊया गाणी छान छान छान…… सकाळ होताच सोडशील मला, आईच्या कुशीत लपायला….. *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा जास्त महत्वाची आहे. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'आझाद हिंद फौज'ची स्थापना कोणी केली ?* सुभाषचंद्र बोस 2) *'तुम मुझे खून दो, मै तुमहें आझादी दुगा' हे उद्गार कोणाचे ?* सुभाषचंद्र बोस 3) *'नेताजी' हे टोपणनाव कोणाचे आहे ?* सुभाषचंद्र बोस 4) *नेताजी सुभाषचंद्र बोस यांना 'देशभक्तांचा देशभक्त' असे कोणी म्हटले ?* महात्मा गांधी 5) *'जय हिंद' ही घोषणा कोणी केली ?* सुभाषचंद्र बोस *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संतोष बोधनकर, नांदेड 👤 भालचंद्र गावडे, सोलापूर 👤 दिनेश चिंतावाड, नांदेड *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपल्या मुलानं डाॅक्टर, इंजिनियर, मोठा उद्योगपती व्हावं, बख्खळ पैसा कमवावा आणि म्हातारपणांत सुखा-समाधानात जगता यावं असं प्रत्येक पालकाला वाटतं. पण आपल्या मुलानं 'कवी' व्हाव, असं एकाही पालकाला वाटत नाही. कारण 'कविता' लिहीणं करिअरमध्ये बसत नाही. वकील, डाॅक्टर, इंजिनिअर यांच्यापेक्षाही जास्त समाजाला कवीची गरज असते हे आपण विसरतो.* *संत तुकारामांच्या काळात' सत्ता आणि संपत्ती' उपभोगणारे तेव्हांचे हजारो पाटील आज कुणाला माहीतही नाहीत; पण पाटीलकी सोडून कवितेच्या नादी लागलेले तुकाराम चारशे वर्षानंतरही जगभर सर्वांना अवगत आहेत. तुकारामांना जीवन कळलेलं होतं व पाटलांना व्यवहार. तुकारामांशिवाय आज आपण समाजाचा विचार तरी करू शकतो काय ? म्हणूनच केशवसुत म्हणतात.....* *आम्हाला वगळा गतप्रभ* *झणी होतील तारांगणे* *आम्हाला वगळा विकेल* *कवडीमोलावरी हे जीणे!* *॥ रामकृष्णहरी ॥* 💥💥💥💥💥💥💥💥✨ *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *स्ववीर्य य: समाश्रित्य,* *समाह्रयती वै परान,।* *अभीतो युध्यते शत्रून,* *स वै पुरुष उच्चते।।* *ज्या व्यक्तीला स्वतःच्या शक्तीचा, ताकदीचा योग्य अंदाज आहे आणि* *त्यावरच अवलंबून राहून जो इतरांस आव्हान देतो आणि शत्रूशी* *प्राणपणाने लढतो,किंवा संकटे झेलून परतावून लावतो, तोच* *_खरा योद्धा वीरपुरुष म्हणणे योग्य होय!_* *काल अशाच दोन बाल योध्यांची वर्णी देशातील 22 मुलांच्या 2019 च्या* *राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने सन्मानित यादीत लागली.* *महाराष्ट्रात या 2 बाल वीरांना हा सन्मान मिळणार आहे.* *जो स्वतःसाठी जगला तो मेला,* *जो दुसऱ्यासाठी जगला तोच* *खऱ्याअर्थाने जगला असे म्हटले* *जाते. या दोन बहादुरांनी आपल्या* *प्राणाची पर्वा न करता अनेकांचे प्राण वाचविले.* *या मध्ये ऑगष्ट 2018 मघ्ये मुंबईच्या परळ भागात एका 17 मजली* *इमारतीला आग लागली.यात 16 व्या मजल्यावर* *राहणाऱ्या 10 वर्षीय झेन सदावर्ते हिने शाळेत शिकलेल्या गोष्टींचा* *प्रत्यक्ष वापर केला. तिने सर्वांना धीर* *दिला,सुरक्षित स्थळी* *हलविले,विजेचा सप्लाय स्विच ऑफ* *केला,अग्निशमन दलाच्या जवानांना फोन करून पाचारण* *केले.हे सगळे इतक्या साहसाने आणि* *धाडसाने केले म्हणून तिला* *17 लोकांचे प्राण वाचविता* *आले.या धाडसाने तिला* *मुंबई करांनी डोक्यावर घेतले* *आणि भारत सरकारने हा पुरस्कार जाहीर केला.* *दुसरीकडे औरंगाबाद जिल्ह्यातील हातमाळी या छोट्याशा गावातील* *आकाश खिल्लारे याने महिलेचा आरडाओरडा* *ऐकून तिकडे धाव घेतली. पाण्यात बुडत असलेल्या* *महिलेला आणि तिच्या लहान मुलीला जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी* *घेऊन त्यांचे प्राण वाचवण्यासाठी शर्थ केली* *आणि दोघींचा जीव वाचविला.* *या शौर्याची महाराष्ट्रभर चर्चा आणि कौतुक झाले.* *आज काही लोक रस्त्यातील अपघात पाहून मदत न करता कायद्याच्या* *धाकाने तेथून निघून जाणाऱ्या अमानवी वृत्तीसाठी एक* *धडा आहे.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुमचे जीवन योग्य दिशेने जाण्यासाठी एका विशिष्ट ध्येयाची किंवा योग्य दिशेची  निवड करा आणि त्यानुसार मार्गक्रमण करा.म्हणजे तुमचे जीवन सुखी, समृद्ध आणि संपन्न होईल.याचा आनंद तुम्हालाही मिळेल आणि इतरांनाही मिळेल.त्यातून चांगले जीवन जगण्यासाठी प्रेरणाही मिळेल.नाही तर सागरातल्या भरकटलेल्या जहाजासारखे होईल. जर एखाद्यावेळी जहाजामध्ये दिशादर्शक होकायंत्र अचानक बंद पडले तर त्या जहाज चालविणा-या माणसाला आपले जहाज कुठे चालले आहे याचा अंदाजच लागत नाही.अर्थात भरकटलेल्या जहाजासारखीच आपल्याही जीवनाची दिशाहीन आणि ध्येयहीन वाटचाल होईल. यासाठी आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित करा आणि त्यानुसार मार्गक्रमण करा मग तुमच्या जीवनात कधीच अडथळे येणार नाहीत आणि जर का आलेच तर योग्य प्रकारे हाताळण्यात यश मिळेल.‌ *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भावस्पर्श* सातारा ह्या गावी रहात असलेल्या आपल्या आईला तिच्या वाढदिवसानिमित्त पोस्टाने फुले पाठविण्यासाठी मुंबईत राहणारे शामराव फुले घेण्यास मंडई मध्ये गेले, तिथे गेल्यावर त्यांना एक छोटीशी मुलगी रडत असल्याचे दिसले, त्यावर त्यांनी विचारले, शामराव :- तू का रडत आहेस बाळ ? मुलगी :- मला माझ्या आईसाठी फुल घ्यायचे आहे, फुल १० रुपयाला आहे पण माझ्याकडे ४ च रुपये आहेत ........ शामराव :- एवढेचना चल मी तुला फुल घेऊन देतो ......... ( फुल घेऊन दिल्यावर ) चल मी तुला घरी सोडतो. मुलगी :- हो चालेल मला माझ्या आईजवळ नेऊन पोचवा (त्यावर ती गाडीत बसते ). शामराव :- कुठे सोडू तुला ? मुलगी :- इथून सरळ गेल्यावर उजव्या हाताला स्वर्ग आहे तिथे.  शामराव :- पण तिथे तर स्मशानभूमी आहे !!! मुलगी :- काका, " जिथे आई तोच स्वर्ग " ......... नव्हे का ??  शामरावांच्या हृदयाला तिच्या शब्दांनी स्पर्श केला ................ पोस्टाने सातार्याला फुले पाठविण्याच्या ऐवजी शामराव स्वतः सातार्याला आपल्या आईला भेटावयास गेले !!! तात्पर्य :- " हि गोष्ट वाचून तुमच्या हृदयाला जी भावना स्पर्श करते तेच भावस्पर्श आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 22/01/2020 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  ● २००७ - बगदादमध्ये दोन कारबॉम्बच्या स्फोटात ८८ ठार. ● २००१-'आय एन एस मुंबई' ही क्षेपणास्त्रवाहू नौका भारतीय नौदलात समारंभपूर्वक दाखल झाली. 💥 जन्म :- ● १९३४-विजय आनंद,हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक ● १९१५ - टॉम बर्ट, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू. ● १९२१ - अँड्रु गंतॉम, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू. ● १९६६ - निशांत रणतुंगा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ● १६६६ - शाह जहान, मोगल सम्राट. ● १९९९ - ग्रॅहाम स्टेन्स, भारतातील ख्रिश्चन धर्मप्रसारक. ● १९७२-स्वामी रामानंद तीर्थ,हैद्राबाद संस्थानातील स्वातंत्र चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षणतज्ञ *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सहायक प्राध्यापक पदासाठी आयोजित करण्यात आलेली 36 वी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) 28 जून 2020 रोजी होणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची मुदत आणखी आठवड्याने वाढवून ती 29 जानेवारी 2020 अशी करण्यात आली आहे, असे विद्यापीठ प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांसाठी घेतला मोठा निर्णय, शाळांमध्ये परिपाठात संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करण्याचा आदेश सरकारकडून देण्यात आहे. २६ जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *तुकाराम मुंढे नागपूर महापालिका आयुक्त तर अश्विनी भिडे यांच्याजागी रणजीतसिंह देओल यांची निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *वाडिया ट्रस्टमधील गैरकारभाराला राज्य सरकार आणि मुंबई महापालिकाच जबाबदार, ट्रस्टच्या कारभारावर संशय होता तर वेळीच चौकशी का नाही केली? हायकोर्टानं सुनावलं* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *बाबासाहेबांचं स्मारक दोन वर्षात शक्य होईल, फक्त ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी मनावर घ्यावं, इंदू मिल येथील कामाची पाहणी केल्यानंतर शरद पवारांचं मत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पहिली ते सातवी वर्गातील सर्व विषयांचं एकच पुस्तक, दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी नवा प्रयोग, पहिली ते सातवीपर्यंत सर्व विषयांचे एकच पुस्तक राहणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *प्रजासत्ताकदिनी दिल्या जाणाऱ्या शौर्य पुरस्कारची घोषणा; महाराष्ट्रातल्या 2 मुलांना राष्ट्रीय वीरता पुरस्कार, झेन सदावर्ते आणि आकाश खिलारेची निवड, देशभरातील 10 मुलींचा आणि 12 मुलांचा पुरस्काराने होणार सन्मान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *बोलण्याचे संस्कार* आपल्यावर बोलण्याचे संस्कार आहेत काय ?असे कोणी विचारणा केली तर आपण संभ्रमात पडतो. बोलण्यासाठी कोणत्या संस्काराची गरज आहे ? किंवा तसे संस्कार करता येतात काय ? याविषयी आपण लहान असताना नकळत विचार करतो मात्र त्यास बोलण्याचे संस्कार.......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/10/blog-post_25.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चिऊताई* सौ. भारती सावंत, मुंबई चिऊताई चिमणी गातेस गोड गाणी बाळाला खेळवतेस उडतेस दूरच्या रानी घरट्यात पाखरांना भरवतेस चिमणचारा बांधलेस छानसे घरटे पिलांसाठीचा निवारा काडी काडी जमवून आणतेस कापूस मऊ बिछाना हा पिलांसाठी ठेवतेस त्यांतुन खाऊ गोलाकार सुंदर घरटे कशी गं बाई बनवतेस कुणी शिकवलेय तुला चोचीनेच ते विणतेस हल्ली मात्र चिऊताई कुठे सांगा बरं हरवली घरट्याला तिच्या आता कोणी उरला नाही वाली येशील का गं परतून चिऊताई खूप दूरवरून बाळाला माझ्या खेळव गोड चिव चिव तू करून *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'कांगारूची भूमी' असे कोणत्या देशास म्हणतात ?* ऑस्ट्रेलिया 2) *ताग उत्पादनात भारतातील कोणत्या राज्याचा क्रमांक लागतो ?* पश्चिम बंगाल 3) *'जगाचे छप्पर' कोणत्या प्रदेशास म्हणतात ?* पामिरचे पठार 4) *कापूस उत्पादनात भारतातील कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो ?* गुजरात 5) *'काळे खंड' असे कोणत्या खंडाला म्हणतात ?* आफ्रिका खंड *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 स्वप्नील ईबीतवार 👤 हरीश बल्केवाड 👤 महेश मुदलोड 👤 नरेश मुंगा पाटील 👤 हुशन्ना मुदलोड *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *ग्रंथपारायणात रस नसलेलो आम्ही पुस्तकांची पानं फाडून, होड्या बनवून पावसात सोडायचो. काही दु:ख वाटायचं नाही उलट मौज वाटायची. पुस्तकाची किती पानं फाडलीत हे कुठं कळायचं, आई-बापांना ! अशा पुरात सोडलेल्या होड्या वाहुन समुद्राला गेल्या; पण डोळ्यातील स्वप्नांना मात्र त्यांनी बुडू दिलं नाही. पुस्तकांच्या पानांच्या होड्या, विमानं, पतंग बनवायला मिळतात म्हणून शाळेची वाट गोड. मजबुरीने धरलेल्या वाटेवर याच ग्रंथाच्या होडीने अथांग दर्यावर हुकूमत गाजवणारा नावाडी बघता बघता कधी बनवून टाकले, कळलेच नाही. तेंव्हा वाटले नव्हते, की या कागदी नावेला स्वप्नांची वल्हं आणि स्वप्नांचा अमर्याद धागा जोडला आहे ते.!* *आज ग्रंथांविषयी निराशापूर्ण वातावरण दिसते. ग्रंथांकडे समाज दुर्लक्ष करतोय, पण "किताबों पर धूल जम जाने से, कहानी थोडेही खत्म हो जाती है!" कुठल्याही काळात ही धूळ झटका, पुस्तकं पुन्हा भरभरून बोलतील. प्रत्येकाला ही कागदाची नाव आणि शाईचं इंधन पुरेसं आहे ; हा जीवनाचा अथांग दर्या तरून जायला.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *कसं होईल ह्या चिंतेत राहू नका *💯सगळं ठीक होणारचं* *ह्यावर विश्वास ठेवा* *रानात "तण" ,* *आणी मनात "ताण",* *कधीच ठेवु नये.* *रानातले "तण" पिकाचा "नाश" करते* *आणि* *मनातले "ताण"* *जगण्याचा "सर्वनाश" करते* *भारतातील कुटुंब व्यवस्था एकेकाळी जगातील सर्वश्रेष्ठ व्यवस्था होती.* *आयुष्याच्या संध्याकाळी आपल्या कुटुंबासमवेत निवांतपणानं जगता* *यावं नि जीवनाचं सार्थक व्हावं, अशी* *प्रत्येकाची मनोमन ईच्छा असते. आज मात्र एकाकीपणाच्या गर्तेत* *स्वत:ला कोंडून घेण्याची वेळ अनेकांवर येताना दिसत आहे.* *पाश्चात्य देशातून आलेल्या संस्कृतीनं गेली अनेक वर्षे आमच्या सामाजिक* *रचनेला हादरे दिल्याने आमच्या कुटुंबव्यवस्थेला तडे* *गेले आहेत.* *संयुक्त कुटुंबव्यवस्थेत अनेक अडचणी व भौतिक सुखांच्या अभावातही आत्मिक सुखासाठी जगणारी माणसं आज हरवून गेली आहेत. पडद्यावरील आजी-आजोबा आम्हांला भावतात, पण वास्तवात प्रत्येकाला कुटुंब हवं ते चौकोनात बांधलेलं. त्यात इतरांना जागाच उरलेली नाही.* *"काळाच्या बदलात आलेली ही स्थित्यंतरं अत्यंत वेदनादायी आहेत, पण ती स्विकाराणं ही आमची अपरिहार्यता...?* *आहे....?...की.....?"* *संस्कृतीचा सांभाळ करा,आपली माणस जपा.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येक व्यक्ती हा आपल्या विशिष्ट ध्येयाकडे जात असताना प्रत्येक पावलागणिक विचार करत असतो.आपले काम यशस्वीपणे पार पडणार का ?जर पार पडत नसेल तर अजून काही करावे लागते का? असे जेव्हा अनेक प्रश्न पडतात तेव्हा आपल्या मनात कुठेतरी आत्मविश्वास कमी आहे असे वाटायला लागते.असा आत्मविश्वास कमी असल्याचा भास कमी होऊ देऊ नका.कारण तुम्हालाच तुमचे काम पूर्ण करायचे आहे तेव्हा तुमचा आत्मविश्वास ढळू देऊ नका किंवा डळमळीत होऊ देऊ नका.मी हे काम पूर्ण करणारच आणि पूर्ण झाल्याशिवाय सर्वार्थ बसणार नाही असा सकारात्मक दृष्टिकोन आपल्या डोळ्यासमोर आणि प्रत्येक पुढे पाऊल टाकताना करा.नक्कीच तुम्हाला त्यात यश मिळेल यात शंकाच नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नाते मैत्रीचे* एक खेकडा समुद्र किना-यावर फिरताना स्वत:च्या पायांमुळे होणारी नक्षी पहात होता. तेव्हढ्यात समुद्राच्या लाटेने ती नक्षी पुसली गेली. ते पाहुन खेकडा लाटेस म्हणाला, *"मी तर तुला माझी जवळची मैञिण समजत होतो आणी तरीही तू माझी छान नक्षी पुसून टाकलीस."* त्यावर लाट म्हणाली , *"अरे या नक्षीच्या मागावरच मासेमार तुला शोधुन पकडेल म्हणून मी नक्षी पुसली.."* मैञीच नातं हे कल्पना शक्तीच्या बाहेरील नातं आहे. नात्याला किंमत द्या व नात्यावर मनापासून विश्वास ठेवा.. कारण मैत्रीचे नाते हे अनमोल असते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

आशा आशेचा किरण किरणांचा प्रकाश प्रकाशाची गती धरावी ही कशी जीवनात राम रामाचे राऊळ राऊळातला राम पावेल का कधी संसाराची परवड परवडीचा संसार संसारातील सार समजेल का कुणाला सगळी कडे पैसा पैशाचा सारा खेळ खेळातले खेळपन मावळले कधीच किरणांची पहाट पहाटेची किरणे नवं किरणांची आशा जागवावी कायमची . 〰〰〰〰〰〰 प्रमिलाताई सेनकुडे नांदेड

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 21/01/2020 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  ● १९७२ - मणिपूर व मेघालय या राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला. 💥 जन्म :- ● १९६३-गोविंदा,हिंदी चित्रपट अभिनेता ● १९५९-कृष्णम्मचारी श्रीकांत,क्रिकेटपटू भारत ● १८९४ - माधव ज्युलियन, मराठी कवी, कोशकार. ● १८९८ - मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर, अभिनेते, संगीतकार. ● १९२४ - प्रा.मधू दंडवते, माजी केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ समाजवादी नेते. 💥 मृत्यू :- ● १९४५ - रासबिहारी बोस, स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारक नेते. ● १९९८ - एस.एन.कोहली, माजी नौदलप्रमुख ॲडमिरल *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विद्यार्थ्यांशी संवाद, 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात राज्यातील 104 विद्यार्थी आणि 13 शिक्षक झाले होते सहभागी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *देशभरात 1 जूनपासून 'एक देश, एक रेशन कार्ड' योजना सुरु होणार, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची घोषणा, एकाच रेशनकार्डवर देशात कुठेही खरेदी करता येणार धान्य, जुनंही रेशन कार्ड ग्राह्य धरलं जाणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर शिर्डीकरांचं समाधान, बेमुदत आंदोलनही मागे, तर कोणत्याही तीर्थक्षेत्राच्या विकासाला विरोध नाही, भाजप आमदार राधाकृष्ण विखेंकडून स्पष्ट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अॅन्ड अॅग्रिकल्चर व गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम, दुबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 21 आणि 22 फेब्रुवारी रोजी दुबई इथं महाबीज परिषदेचे आयोजन करण्यात आलं* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *सीएए, एनआरसीविरोधात प्रकाश आंबेडकरांकडून 24 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक, 35 संघटनांचा बंदला पाठिंबा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *जगत प्रकाश नड्डा भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, अमित शाहांकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली, आगामी निवडणुकांचे जे पी यांच्यासमोर मोठे आव्हान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *U19 World Cup: भारतीय संघाची दमदार सुरूवात; श्रीलंकेवर 90 धावांनी मिळवला विजय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••              *सैनिक : देशाचा संरक्षक* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post_26.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आनंदवन* *-प्रभाकर तांडेकर 'प्रदत्त'* नागपूर *📞-९४२१८०३४९८ अंगणवाडी ही छान छान छान खुलून दिसते मुलांचे उद्यान सवंगड्यासंगे नित्य चाले खेळ सहज त्यांच्यात जुळे ताळमेळ खेळीमेळीतून घडे तन मन सात्त्विक घासाने फुलते जीवन *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• " विश्वास म्हणजे माणसाला जीवंत ठेवणारी शक्ती होय " *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *युरोप व आशिया या खंडांना कोणत्या संयुक्त शब्दाने ओळखतात ?* युरेशिया 2) *जपानचे चलन कोणते ?* येन 3) *महाराष्ट्रातील सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा कोणता ?* रत्नागिरी 4) *जगातील प्रथम कादंबरीकार लेखिका कोण ?* मुरासाकी शिकीबु 5) *कॉफी उत्पादनात भारतातील कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो ?* कर्नाटक *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 देवांश हेमंत गवळी 👤 विरभद्र बसापुरे, सहशिक्षक, धर्माबाद 👤 संतोष हेंबाडे, सहशिक्षक, धर्माबाद 👤 साईनाथ सायन्ना जगदमवार 👤 अनिल मुपडे 👤 ऋषिकेश पवार 👤 👤 👤 👤 👤 👤 👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *रोजची प्रसन्न सकाळ ही नवी उमेद देणारी देणगी असते. पूर्व दिशेची अद्भूत रंगांची उधळण ही रोजच नवी असते. पक्षांची रोज नवी नादमधूर सूरांची मैफील रंगते. पक्षांच्या सुरेल किलबिलाटानं मन प्रसन्न होतं. चालण्याच्या व्यायामानिमित्त नेहमीच दिसणारी तीच ती झाडं; पण रोजच कशी नवी, टलटवीत, हिरवीकंच दिसतात! नयनरम्य फुलांचे घोस मनाला नवा तजेला देतात. कालच्या सुंदर घोसातील फुलं आज मात्र कोमेजून मातीत गळून पडली होती. झाडावरच्या घोसातील मुग्ध कळ्यांचं हळुवार उमलणं, उमलत्या पाकळ्यांची सुबक लकब मनाला मोहविणारी होती. मातीत गळून पडलेली कोमेजलेली फुलं आपला सुगंध घेऊन मातीत एकजीव होण्याची ही अदिम ओढ तर नसावी ना!* *फुलांचं फुलणं, झाडांचं डवरणं हे जितकं अद्भूत, सुंदर; पानांचं, फुलांचं गळून मातीत एकजीव होणंही तितकंच अदभूत आणि सुंदर. मातीसंबंधी कृतज्ञता व्यक्त करण्याचा किती विनम्र भाव. सृजनसोहळा मन प्रसन्न करणारा तसाच आणि तितकाच निर्वाण सोहळाही. ही तर निसर्गाचीच अद्भूत किमया. उदय, विकास, अंत या अवस्था अपरिहार्य, अटळ तशा स्विकाराहार्यही असाव्यात. पण माणूस प्राणी हा उदय-विकासाचे टप्पे मनापासून स्वीकारतो. अंताचा टप्पा स्वीकारणं हे मात्र अवघड, असह्य होतं. निसर्गातल्या प्रत्येक घटकाला निसर्गाचा हा नियम लागू आहे. बुद्धिमान, विवेकनिष्ठ माणसाला मात्र कळतं, पण वळत नाही.* ‼ *रामकृष्णहरी* ‼ 🌸🌸🌸 🌸 🌸 🌸 🌸🌸 *--संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *एक कविमित्र अस म्हणतो की* *काय कुठे संपल्या वेदना ,* *पुन्हा नवा अवतार कशाला।* *जन्म दिला जर एकटीने,* *मग नेणारे हे चार कशाला।* *अतिशय विद्रोही पण समाज जीवनाचे* *वास्तव सत्य टिपायला तो* *घाबरला नाही.* *पण गाड्यांनो समाज तर माणसांनी* *बनला आहे,आणि* *आपल्याला त्यातच मोठे व्हायचे* *आहे, मग एक करा।* *खालील चिंतन करा.👇👇* ॥ *जो फक्त वर्षाचा विचार करतो ,* *तो धान्य पेरतो.* *जो दहा वर्षाचा विचार करतो ,* *तो झाडे लावतो.* *जो आयुष्य भरचा विचार करतो ,* *तो माणुस जोडतो.* *आणी जी माणस माणस जोडतात ,* *तिच आयुष्यात यशस्वी होतात.॥* ॥ *आपला दिवस आनंदात जाओ।।* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• चांगले विचार करणे,चांगले विचार करायला लावणे आणि चांगल्या विचारांचा योग्य ठिकाणी उपयोग करणे हे आपल्या बुद्धीचे काम आहे.आपली बुद्धी जर क्रियाशील असेल तर ह्या सा-या विचारांचा व्यवहार व्यवस्थितपणे पार पडतो.जर बुद्धीच काही काम करत नसेल तर सारे जीवन व्यवहारच ठप्प होतात. अशा बुद्धीला अधिक चांगले क्रियाशील ठेवायचे असेल तर प्रत्येक चांगल्या गोष्टींचे अवलोकन करणे.जे ज्ञात नाही ते ज्ञात करुन घेणे,जे आपल्या आणि इतरांच्या हिताचे आहे आणि त्याच्यापासून जगाचे कल्याण होणार आहे. या सा-या गोष्टींचे विचार सदैव करणे.अशा चांगल्या कृती करण्यासाठी आपल्या बुद्धीला सदैव चांगल्या विचारांचे खतपाणी घातले पाहिजे.अशा गोष्टी वृद्धींगत करण्यासाठी चांगल्या संस्काराचा  स्वीकार करणे,चांगल्या पुस्तकांच्या सहवासात राहणे,सज्जनांच्या सानिध्यात आणि जीवापेक्षाही जास्त प्रेम करणा-या चांगल्या मित्रांच्या संगतीत राहिले की, आपल्या चांगल्या बुद्धीचा विकास अधिक जोमाने होऊ शकतो हे निश्चित. - व्यंकटेश काटकर,नांदेड.   संवाद..9421839590. 📖📚📖📚📖📚📖📚📖📚 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वतःच्या कार्यसिध्दीतुन यश प्राप्त करणे.* *व्यवसायात काहीच प्रगती होत नसल्याने बॉस वैतागला होता,.* *ऑफिसमध्ये स्टाफ भरपुर होता पण काम होत नसे,.* *एके दिवशी त्यांनी सगळ्यांना एकत्र बोलावले अन सांगितले की मी तुमच्या सोबत एक खेळ खेळणार आहे,.* *यात जो जिंकेल त्याला फॉरेन टूरला पाठविले जाईल,.* *सर्व स्टाफ खुश झाला अन खेळ काय आहे,.* *हे जाणण्यास उत्सुक झाला..!* *बॉसने सर्वांच्या हातात एक फुगा दिला अन सांगितले की शेवटी ज्याच्या हातात फुगा असेल,. त्यालाच विजयी ठरविले जाईल आणि फॉरेन टूरला पाठविले जाईल..!* *एवढं सांगताच एकच कल्ला झाला,.* *जो तो आपल्या शेजारच्याचा फुगा फोडू लागला,.* *काही आपला फुगा कोणी फोडू नये म्हणून,.* *वाचविण्याचा प्रयत्न करू लागली पण कोणी ना कोणी ते फोडत असत,.* *असे करता करता सर्व फुगे फुटले कोणाच्याच हातात फुगा उरला नाही आणि कुणीच विजेता होऊ शकले नाही..!* *सर्व शांत झाल्यावर बॉसने सांगितले की,. शेवटी ज्याच्या हातात फुगा असेल,. तोच विजयी ठरेल, असे मी बोललो,. याचा अर्थ प्रत्येकाने दुसऱ्याचा फुगा फोडावा, असा होत नाही..!* *तुम्ही इतरांचा फुगा फोडला नसता तर,.* *प्रत्येकाच्या हातात आता फुगा असता आणि सर्वच विजयी ठरले असते..!* *तात्पर्य* :- *यश मिळविण्यासाठी व जिंकण्यासाठी इतरांना हरविणे गरजेचे नाही,.* *इतरांना हरविण्याच्या नादात आपण सर्वच हरवून बसतो..!* *इतरांना जिंकण्यास मदत करा, आपोआप सर्वजण जिंकू शकाल..!स्वतःच्या कार्यसिद्धीतुन यश प्राप्त करणे म्हणजेच जिंकणे.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

स्पर्धेसाठी चिञचारोळी गुलाब देतो हातात सुगंध असावा बागेत प्रेम राहू दे मनात मैत्री फूलु दे जीवनात. 〰〰〰〰〰〰

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 20/01/2020 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  ● २००९-अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा शपथविधी ● १९९९-गिरीश कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर 💥 जन्म :- ● १९०६ - ऍरिस्टॉटल ऑनासिस, ग्रीक उद्योगपती. ● १९३० - बझ आल्ड्रिन, अमेरिकन अंतराळवीर. 💥 मृत्यू :- ● २००२-रामेश्वरनाथ काओ, RAW या भारतीय गुप्तचर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ● १९३६ - जॉर्ज पाचवा, युनायटेड किंग्डमचा राजा. भारतात पंचम जॉर्ज नावाने प्रख्यात. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विद्यार्थ्यांसोबत 'परीक्षा पर चर्चा' कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी साधणार संवाद, या कार्यक्रमात विशेष करून दिव्यांग विद्यार्थ्यांना पंतप्रधान मोदींना भेटण्याची आणि प्रश्न विचारण्याची संधी मिळणार आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबईतील नाईट लाईफचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता, अपुऱ्या पोलीस यंत्रणेमुळे 26 जानेवारीपर्यंत अंमलबजावणी अशक्य, गृहमंत्री अनिल देशमुखांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *बेळगाव प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पांशी चर्चा करावी, संजय राऊत यांचा प्रस्ताव, कर्नाटकात मराठी भाषिकांवर अन्याय होत असल्याचाही पुनरुच्चार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *साईबाबा यांच्या जन्मस्थळाच्या वादावरुन शिर्डीकरांनी पुकारलेला बेमुदत बंद तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. शिर्डीच्या ग्रामस्थांकडून ग्रामसभेत याबाबत घोषणा करण्यात आली. त्यानुसार काल मध्यरात्रीपासून हा बंद मागे घेण्यात आले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *तुळजाभवानी मातेच्या सिंहासन पूजा शुल्कात वाढ, मंदिर संस्थानच्या विश्वस्तांचा निर्णय, शुल्क एक हजाराहून दीड हजारावर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *बेपत्ता गिर्यारोहक अरुण सावंत यांचा मृतदेह सापडला; कोकण कड्याच्या दरीत पडून दुर्दैवी मृत्यू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई मॅरेथॉनवर इथिओपियन धावपटूंचं वर्चस्व, डेरारा हरिसा ठरला विजेता तर महिलांच्या अर्धमॅरेथॉन शर्यतीवर मराठमोळ्या धावपटूंचा ठसा, ज्येष्ठ नागरिकाचा धावताना ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *क्रिकेटची बातमी - बंगळुरु येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहलीच्या दमदार खेळीच्या जोरावर टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाचा सात विकेट्सनी केला पराभव. या विजयासह भारतानं ही मालिका 2-1 अशी खिशात घातली.* •••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          विकासात शिक्षकांचे योगदान ( जनशक्ती )* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://www.ejanshakti.com/विकासात-शिक्षकांचेही-योग/     लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *।। मित्र ।।* - कु. साक्षी विलास आंबेवार वर्ग सहावा जि. प. प्रा. कन्या शाळा, धर्माबाद आपण सारे मित्र मिळून काढूया चित्र सकाळी लवकर उठू या दात स्वच्छ घासू या आपण सगळे बहीण भाऊ सगळे मिळून लाडू खाऊ देऊ या सगळ्यांना सुख घेऊ या सगळ्यांचे दुःख सल्ला घेऊनच काम करू पुस्तकांनाच मित्र बनवू बचत करायला शिकू या समाजाची सेवा करू या *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" छोट्या छोट्या गोष्टी केल्यामुळेच महान गोष्टी आकार घेत असतात."* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *कर्नाटकातील नृत्यप्रकार कोणता ?* यक्षगाण 2) *चीनचे चलन कोणते ?* युआन 3) *ताजमहल कोणत्या नदीच्या काठावर आहे ?* यमुना 4) *शाहू महाराजांचे मूळनाव काय होते ?* यशवंतराव 5) *'श्रीमानयोगी' या कादंबरीचे लेखक कोण ?* रणजित देसाई *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 किशोर पाटील, यूनिक कंप्यूटर 👤 अहमद लड्डा, क्रीडा शिक्षक 👤 संतोष शेटकर 👤 आदित्य कोंपलवाड *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *रोजची प्रसन्न सकाळ ही नवी उमेद देणारी देणगी असते. पूर्व दिशेची अद्भूत रंगांची उधळण ही रोजच नवी असते. पक्षांची रोज नवी नादमधूर सूरांची मैफील रंगते. पक्षांच्या सुरेल किलबिलाटानं मन प्रसन्न होतं. चालण्याच्या व्यायामानिमित्त नेहमीच दिसणारी तीच ती झाडं; पण रोजच कशी नवी, टलटवीत, हिरवीकंच दिसतात! नयनरम्य फुलांचे घोस मनाला नवा तजेला देतात. कालच्या सुंदर घोसातील फुलं आज मात्र कोमेजून मातीत गळून पडली होती. झाडावरच्या घोसातील मुग्ध कळ्यांचं हळुवार उमलणं, उमलत्या पाकळ्यांची सुबक लकब मनाला मोहविणारी होती. मातीत गळून पडलेली कोमेजलेली फुलं आपला सुगंध घेऊन मातीत एकजीव होण्याची ही अदिम ओढ तर नसावी ना!* *फुलांचं फुलणं, झाडांचं डवरणं हे जितकं अद्भूत, सुंदर; पानांचं, फुलांचं गळून मातीत एकजीव होणंही तितकंच अदभूत आणि सुंदर. मातीसंबंधी कृतज्ञता व्यक्त करण्याचा किती विनम्र भाव. सृजनसोहळा मन प्रसन्न करणारा तसाच आणि तितकाच निर्वाण सोहळाही. ही तर निसर्गाचीच अद्भूत किमया. उदय, विकास, अंत या अवस्था अपरिहार्य, अटळ तशा स्विकाराहार्यही असाव्यात. पण माणूस प्राणी हा उदय-विकासाचे टप्पे मनापासून स्वीकारतो. अंताचा टप्पा स्वीकारणं हे मात्र अवघड, असह्य होतं. निसर्गातल्या प्रत्येक घटकाला निसर्गाचा हा नियम लागू आहे. बुद्धिमान, विवेकनिष्ठ माणसाला मात्र कळतं, पण वळत नाही.* ‼ *रामकृष्णहरी* ‼ 🌸🌸🌸 🌸 🌸 🌸 🌸🌸 *--संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *प्रत्येकाला जीवनात यशस्वी व्हावे असे वाटते.आपलं एक नाव* *असावं,कुठेतरी ,कुणीतरी आपली आठवण काढावी असे वाटते.मग* *यासाठी माणूस जीवापाड मेहनत करून, सुखांना पारखे करून* *मार्गक्रमण करत असतो. मान-अपमान सहन करत,घोर संघर्ष* *करत आपली नौका पार करत असतो.* *पण हे करत असताना प्रमाणामध्ये सर्व काही असावे हे विसरून* *चालणार नाही.धुतराष्ट पुत्रप्रेमाने वेडा होतो,यातून महाभारत घडते.कैकयी याच अट्टाहासाने* *रामायण घडवून आणते.तर गोपिकाबाई या* *अतिमहत्वकांक्षे मुळे अभागी स्त्री म्हणून ओळखल्या जाते.आपल्या* *पती आणि मुलांचे मरण ती डोळ्यादेखत पाहते.* *महत्वाकांक्षा आणि अतिमहत्वाकांक्षा यातील फरक जाणून घेण्याची गरज* *आहे.* *उत्तुंगतेचा ध्यास जरूर घ्यायला हवा;* *परंतु त्यामागे उदात्त विचार असायला हवेत. आपले आणि* *समाजाचे जीवन समृद्ध करण्याची कळकळ असावी. त्याऐवजी केवळ* *स्वार्थाचा आणि मूठभरांच्याच हिताचा विचार असेल,* *तर त्यामागची महत्वाकांक्षा हिंसक बनते. अतिमहत्वाकांक्षा* *नकारात्मक असून, आपल्या अधोगतीला* *कारणीभूत ठरते. इतिहासात अशी असंख्य उदाहरणे आहेत.* *शेक्सपियरच्या नाटकातील नायक मॅकबेथही अतिमहत्वाकांक्षेचा शिकार* *आहे.* *स्काॅटलंडचा राजा डंकनच्या दरबारातील तो पराक्रमी उमराव.* *राजा होण्याची महत्वाकांक्षा त्याला असतेच; परंतु लेडी मॅकबेथ याबाबतच्या* *अतिमहत्वाकांक्षेने पछाडलेली असते.* *आपला नवरा राजा व्हावा म्हणून प्रसंगी ही दुष्ट बाई विद्यमान* *राजाचा खून करायलाही* *तयार होते.* *एका लढाईत विजय मिळविल्याबद्दल सन्मान करण्यासाठी राजा मॅकबेथच्या घरी येतो. पती-पत्नी त्यांचे आदरातिथ्य करतात. दिलेल्या शयनगृहात राजा झोपी जातो. मॅकबेथ महत्वाकांक्षी होता; पण त्यासाठी तो कोणाचा खून करायला तयार नव्हता. मात्र उद्याच्या राजवैभवासाठी तसे करणे आवश्यक असल्याचे सांगून लेडी मॅकबेथ राजाचा खून करायला भाग पाडते. मॅकबेथला राजपद मिळते; परंतु त्यानंतर उसळलेल्या जनप्रक्षोभाला, युद्धाला सामोरे जावे लागते. लेडी मॅकबेथ भ्रमिष्ट होऊन मरते आणि मॅकबेथलाही प्राणास मुकावे लागते. अतिमहत्वाकांक्षा विघातक असून -हासाला कारणीभूत ठरते.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• विचारामुळेच माणूस विचारशील बनतो.त्याच्या मनाचे चांगले विचार असतील तर त्याच्या कृतीमध्ये साकारताना दिसतात.मग ती कृती चांगली असेल तर त्याच्या वर्तनातही चांगले दिसायला लागते.ते त्याच्या जीवनामध्ये सकारात्मक विचार कृतीतून स्पष्ट होतात.ते त्याच्या स्वतःच्याही भल्यासाठी व इतरांच्याही भल्यासाठी इष्ट असतात.पण तेच विचार जर वाईट असतील तर ते त्याच्या जीवनासाठी व इतरांच्या जीवनासाठीही हानीकारकच ठरतात. त्यामुळे विचार हा नेहमी चांगलाच करायला हवा. त्यात स्वतःबरोबर इतरांचेही कल्याण होण्यास मदत होईल. - व्यंकटेश काटकर, नांदेड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *समाधान मानने* एकदा एक भुंगा गुंजारव करत फिरत होता. तेव्हा त्याला एक चिमणी म्हणाली, 'मूर्खा, तू जो एकसारखा एकच आवाज काढत बसतो तो कशासाठी? वसंतऋतूत गाणारी कोकिळा, हिरव्यागार झाडाच्या फांदीवर बसून गाणारा बुलबुल यांची बरोबरी तुला कधीतरी करता येईल का?  तसे जमत नाही तर भिकार सूर एकसारखा काढून तू लोकांना कंटाळा का आणतोस?' भुंगा म्हणाला, 'अगं चिमणे, परमेश्‍वराने या जगात प्रत्येक व्यक्तीत निराळेपणा ठेवला आहे. वैचित्र्य असणे हा जगाचा नियम आहे, दुसर्‍याचा हेवा न करता ज्याने त्याने आपापल्या शक्तीचा उपयोग केला तर त्यात वाईट काय? जेव्हा कोकिळेचे गाणे बंद पडते किंवा बुलबुल मुका होतो तेव्हा एखाद्या सुंदर बागेत निर्जनता भासू न देण्यात माझ्या गरीबाचा उपयोग होतो.' *तात्पर्य:- सर्व मनासारखे होत नाही, तर जे असेल त्यात समाधानी असावे.प्राप्त परिस्थितीत समाधानी असणे चांगले .* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 18/01/2020 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  ● १९५६ - संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईत ११४ वेळा गोळीबार. १० ठार, २५० जखमी, औद्योगिक विभागात दंगल वाढल्याने २४ तास कर्फ्यू. मुंबईच्या पाच काँग्रेस आमदारांचा राजीनामा 💥 जन्म :- ● १८४२ - न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, अर्थशास्त्रज्ञ,समाजसुधारक,राजनीतीज्ञ. ● १८८९ - नाट्यछटाकार दिवाकर लेखक. ● १८९५ - विठठ्ल दत्तात्रय घाटे प्रसिद्ध लेखक ● १९७२ - विनोद कांबळी, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ● १९८६ - प्राचार्य नारायण गोपाळ तवकर, शिक्षणतज्ज्ञ, इतिहासकार, सामाजिक कार्यकर्ते, लेखक ● २००३ - हरिवंशराय बच्चन, हिंदी साहित्यिक. ● १९४७ - कुंदनलाल सैगल, भारतीय अभिनेता, गायक. ● १९६७ - डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे, कृषितज्ज्ञ व क्रांतिकारक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *परीक्षेतला तणाव दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात देणार विद्यार्थ्यांना टिप्स* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबईत 26 जानेवारीपासून प्रायोगिक तत्वावर 'नाईट लाईफ' सुरु केली जाणार आहे. त्यानुसार मुंबईत अनिवासी भागातील सर्व थिएटर, मॉल्स, रेस्टॉरंटस् 24 तास खुले ठेवण्यास परवानगी दिली जाणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील बहुचर्चित होट्टल महोत्सवाचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते उदघाटन, उद्या होईल समारोप* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई, पुणे: शहर आणि परिसरासह उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका दोन दिवसांत वाढला असून अनेक ठिकाणी तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली घसरले. उत्तर महाराष्ट्राला शनिवारी थंडीच्या लाटांचा फटका बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे, तर आणखी दोन दिवस बोचऱ्या थंडीचा मुक्काम राहील असा अंदाज आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *निर्भया प्रकरणातील चारही आरोपींना 22 जानेवारी ऐवजी आता 1 फेब्रुवारीला सकाळी 6 वाजता फाशी देण्यात येणार आहे. निर्भयाच्या आईने मात्र फाशीला उशीर होत असल्याने नाराजी व्यक्त केली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *भारताचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू बापू नाडकर्णी यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन, 21 ओव्हरमध्ये एकही धाव न देण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आजही बापू नाडकर्णी यांच्या नावावर आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *राजकोट, 17 जानेवारी : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियानं दमदार कमबॅक केला. दुसऱ्या सामन्यात भारतानं 36 धावांनी विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1ने बरोबरी केली आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••           *एका शेतकऱ्याची आत्मकथा* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_25.html      लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आनंदवन* *-प्रभाकर तांडेकर 'प्रदत्त'* नागपूर *📞-९४२१८०३४९८ अंगणवाडी ही छान छान छान खुलून दिसते मुलांचे उद्यान सवंगड्यासंगे नित्य चाले खेळ सहज त्यांच्यात जुळे ताळमेळ खेळीमेळीतून घडे तन मन सात्त्विक घासाने फुलते जीवन *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच, कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *जपानमध्ये हिंद स्वातंत्र्य संघाची स्थापना कोणी केली होती ?* रासबिहारी बोस 2) *मानवी उदरातील लहान आतड्याची लांबी किती असते ?* 6 मीटर 3) *बिहारच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या ?* राबडी देवी 4) *शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता ?* यकृत 5) *मानवी छातीच्या पिंजऱ्यात किती बरगड्या असतात ?* 24 *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्रीमती विजया वाड, प्रसिद्ध साहित्यिक 👤 पी. आर. कमटलवार, धर्माबाद       जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी 👤 रामनाथ खांडरे, करखेली 👤 त्र्यंबक आडे, नांदेड 👤 महेश गोविंदवार, सहशिक्षक, माहूर 👤 कृष्णा कोकुलवार, नांदेड 👤 शैलेश मुखेडकर *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *महत्वाकांक्षा आणि अतिमहत्वाकांक्षा यातील फरक जाणून घेण्याची गरज आहे. उत्तुंगतेचा ध्यास जरूर घ्यायला हवा; परंतु त्यामागे उदात्त विचार असायला हवेत. आपले आणि समाजाचे जीवन समृद्ध करण्याची कळकळ असावी. त्याऐवजी केवळ स्वार्थाचा आणि मूठभरांच्याच हिताचा विचार असेल, तर त्यामागची महत्वाकांक्षा हिंसक बनते. अतिमहत्वाकांक्षा नकारात्मक असून, आपल्या अधोगतीला कारणीभूत ठरते. इतिहासात अशी असंख्य उदाहरणे आहेत. शेक्सपियरच्या नाटकातील नायक मॅकबेथही अतिमहत्वाकांक्षेचा शिकार आहे. स्काॅटलंडचा राजा डंकनच्या दरबारातील तो पराक्रमी उमराव. राजा होण्याची महत्वाकांक्षा त्याला असतेच; परंतु लेडी मॅकबेथ याबाबतच्या अतिमहत्वाकांक्षेने पछाडलेली असते. आपला नवरा राजा व्हावा म्हणून प्रसंगी ही दुष्ट बाई विद्यमान राजाचा खून करायलाही तयार होते.* *एका लढाईत विजय मिळविल्याबद्दल सन्मान करण्यासाठी राजा मॅकबेथच्या घरी येतो. पती-पत्नी त्यांचे आदरातिथ्य करतात. दिलेल्या शयनगृहात राजा झोपी जातो. मॅकबेथ महत्वाकांक्षी होता; पण त्यासाठी तो कोणाचा खून करायला तयार नव्हता. मात्र उद्याच्या राजवैभवासाठी तसे करणे आवश्यक असल्याचे सांगून लेडी मॅकबेथ राजाचा खून करायला भाग पाडते. मॅकबेथला राजपद मिळते; परंतु त्यानंतर उसळलेल्या जनप्रक्षोभाला, युद्धाला सामोरे जावे लागते. लेडी मॅकबेथ भ्रमिष्ट होऊन मरते आणि मॅकबेथलाही प्राणास मुकावे लागते. अतिमहत्वाकांक्षा विघातक असून -हासाला कारणीभूत ठरते.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो , कालच्या दिवसाच्या* *विचारात गुंतून पडू नका,आजच्या* *आनंदावर विरजन* *कशासाठी टाकता, जो* *काही काल होता,त्याची जाणीव स्व* *ला* *देखील करू नका,कारण* *काल विचारांमध्ये राहील *पण आज अस्तित्वात आहे तो* *हातातून जाऊ देऊ नका,* *So be happy* *अशोक कुमावत* *(राष्ट्रपती पुरस्कार विजेते*) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपले विचार लोकांपर्यंत पोहचवायचे असतील तर पहिल्यांदा आपल्या मनातला भित्रेपणा नष्ट करुन आत्मविश्वासाने बोलण्यासाठी किंवा विचार व्यक्त करण्यासाठी लोकांसमोर उभे राहिले पाहिजे.दुसरी गोष्ट आपण काय बोलणार आहोत त्यात सत्यता असली पाहिजे कारण लोक सत्य काय आहे आणि किती सत्य आहे ह्याकडे लोकांचे तुमच्याकडे लक्ष असते. आपल्यावर कुणीही आक्षेप घेणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. आपल्यामध्ये स्पष्टपणा आत्मविश्वास,सकारात्मक परिणामकारकता आणि सत्यता असल्यामुळे भ्यायची गरज नाही.मग आपोआपच आपल्यातला भित्रेपणा नष्ट व्हायला लागतो.भीती वाटते केव्हा आपल्या विचारात सत्यता नसेल,स्पष्टपणा नसेल आणि लोकांना आपण काहीतरी म्हणून फसवत आहोत तर भीती आपल्यामध्ये राज्य करते. मग ती कधीही आपल्याला पुढे जाऊ देत नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वृद्ध झालेला कुत्रा* एका कुत्र्याने आपल्या तरुणपणी फार जनावरांची शिकार करून आपल्या मालकाचा लोभ संपादन केला होता. त्यावेळी त्याचा मालक त्याला कुरवाळीत असे व चांगले पदार्थ खाऊ घालीत असे. पुढे त्या कुत्र्याला म्हातारपण आले, तेव्हा पूर्वीसारखे शिकारीचे काम त्याच्याकडून होईनासे झाले. अशा अवस्थेत एके दिवशी इतर सगळ्या कुत्र्यांच्या पुढे जाऊन त्याने एका सशाची तंगडी पकडली, परंतु म्हातारपणामुळे त्याच्या तोंडात दात नव्हते, त्यामुळे ससा धरावा तितक्या बळकटपणे धरता आला नाही व तो ओढाताण करून सुटून गेला. ते पाहून त्या मालकास फार राग आला. हातातील काठीने तो त्याला मारू लागला. तेव्हा तो कुत्रा त्याला म्हणाला, 'अरे कृतघ्न माणसा ! क्षणभर थांब आणि तुझी चाकरी मी किती वर्षे इमाने इतबारे केली आहे, याचा विचार कर. ससा धरण्याच्या कामी मी माझ्याकडून काहीही आळस केला नाही. पण माझे दात पडले त्याला माझा काय इलाज ? म्हातारपणामुळे माझ्याकडून काम होत नाही, यामुळे तुला राग येतो, पण जर तू माझ्या पूर्वीच्या चाकरीकडे लक्ष देशील, तर तुझा माझ्यावरचा राग बराच कमी होईल.' *तात्पर्य :ज्याने तारुण्यात आपली चाकरी इमानाने केली त्या नोकराला त्याच्या म्हातारपणात क्रूरपणे वागविणे हे कृतघ्नतेचे लक्षण आहे..* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

*सुंदर माझे गाव* नयनरम्य गर्द हिरवी पर्वतावर दाट झाडी तिथे वसलेले गाव छोटे वळणावरून जाती गाडी रस्ते आहेत झाडीतले हिरव्यागच्च पहाडीतले झरे दिसतात पाण्याचे वाहत जाते चोहीकडे कौलारुचे घरे वसली हिरवळ मखमलीची शाल पांघरली धरणी जशी सजून बसली प्रवास करती प्रवाशी लाल एसटी हवीहवीशी दाट झाडीतून पळती गाडी सुंदर दिसती पहाडी 〰〰〰〰〰〰〰 श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे. (जिल्हाअध्यक्षा नांदेड)

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 17/01/2020 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  ● १९५६ - बेळगाव - कारवार आणि बिदर जिल्ह्यांतील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्याची घोषणा. ● २००१ - मध्य प्रदेश सरकारचा शास्त्रीय नृत्यासाठीचा कालिदास सन्मान रोहिणी भाटे यांना जाहीर. अपारंपारिक उर्जा क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा सूर्या पुरस्कार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.एम.जी.ताकवले यांना जाहीर. 💥 जन्म :- ● १८९५ - विठ्ठल दत्तात्रय घाटे, मराठी लेखक, शिक्षणतज्ञ. ● १९०५ - दत्तात्रय रामचंद्र कापरेकर, भारतीय गणितज्ञ. ● १९०६ - शकुंतला परांजपे, भारतीय समाजसेविका. 💥 मृत्यू :- ●२००० - सुरेश हळदणकर, जुन्या पिढीतील गायक आणि अभिनेते. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई : राज्यात सत्तांतर होऊन महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पहिल्यांदाच एकाच वेळी २२ अखिल भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, प्रवीण दराडे यांची समाजकल्याण आयुक्तपदी बदली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील पहिली खासगी तत्त्वावरील तेजस एक्स्प्रेस आज धावेल. ही एक्स्प्रेस अहमदाबाद ते मुंबई सेंट्रल या स्थानकांदरम्यान धावणार आहे. रेल्वे मंत्रालय आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) यांच्या वतीने ही दुसरी खासगी एक्स्प्रेस धावणार आहे. तेजस एक्स्प्रेस देशातील पहिली खासगी गाडी ४ आॅक्टोबर २०१९ रोजी दिल्ली ते लखनऊ धावली होती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *दहा वर्षांत प्रथमच कमाल तापमान २५ अंश सेल्सियसपर्यंत घसरल्याचे हवामान खात्याने सांगितले, उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरींमुळे पुढील काही दिवस तापमानातील घट कायम राहणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नांदेडमध्ये दोन आयएएस अधिकाऱ्यांसह सहा अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर नांदेडच्या जिल्हा परिषदेत खळबळ उडाली असून परिसरात शुकशुकाट पसरला होता.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *वाडिया हॉस्पिटलसाठीच्या निधीवरुन हायकोर्टानं मुंबई महापालिका आणि राज्य सरकारला धरलं धारेवर, 24 तासांत वाडिया हॉस्पिटलसाठी निधी उपलब्ध न झाल्यास संबंधित सर्व अधिकाऱ्यांची कोर्टात परेड घेऊ, असं हायकोर्टानं सुनावलं आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI-Reserve Bank of India) ने एटीम कार्ड अर्थात डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डबाबत नवीन नियम जाहीर केले आहे. आरबीआयने सर्व बँकांना आदेश दिले आहे भारतात ग्राहकांना कार्ड देत असताना  एटीएम आणि PoS वर फक्त भारतात वापरता येईल असेच  डोमेस्टिक कार्डची परवानगी द्यावी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *आज राजकोट येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा दुसरा एकदिवसीय सामना; मालिकेत कायम राहण्याचे आव्हान कर्णधार विराट कोहली पुन्हा तिसऱ्या स्थानी खेळणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••             *साहित्यसेवा हेच खरे काम* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_76.html     लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🐸..बेडुकराव...🐸* © सौ. अनघा पतके. खंडाळा. जि. सातारा. बेडुकराव ...बेडुकराव करताय काय डराव डराव नेहमीच तुमचं अंग ओलं बुळबुळीत असं कशाने झालं डोक्यावर मोठ्ठे डोळे दोन वटारुन असे बघतय कोण.? पाण्यात चिखलात कसे राहता ? पाण्याखाली कसे काय बघता..? जीभेने किडे कसे पकडता? आणखी तुम्ही काय काय खाता..? तोंड तुमचे हसरे छान ..🐸 कोठे गेली तुमची मान..? पुढचे पाय अखूड छोटेसे मागचे पाय मग लांब कसे..? पाण्यात तुम्ही छान छान पोहता जमिनीवर टण टण उड्या मारता.. पावसाळ्यातच तुम्ही कसे दिसता.? उन्हाळ्यात हिवाळ्यात कोठे लपता..? रात्री बे चे म्हणता का पाढे.? दिवसा मग वाचता का धडे..? कोठे असते तुमची शाळा ? शाळेत तुमच्या असतो का फळा..? असतो तुमचा कुठे गाव..? बेडुकराव डराव डराव...🐸🐸 🐸⛱🐸⛱🌿🐸⛱🐸⛱🌿 🌧☔🌧☔🌧☔🌧☔ *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आजची प्रश्नमंजुषा* 1) *राज्य विधानसभेची कमाल सदस्यसंख्या किती असू शकते ?* 500 2) *राज्य विधानसभेचा सदस्य होण्यासाठी किती वर्षे वय पूर्ण असावे ?* 25 वर्षे 3) *धन विधेयक प्रथम कोठे सादर केले जाते ?* विधानसभा / लोकसभा 4) *राज्य विधानसभेच्या दोन अधिवेशना दरम्यान जास्तीत जास्त किती कालावधी असू शकते ?* 6 महिने 5) *महाराष्ट्राचे सध्याचे शिक्षणमंत्री कोण आहेत ?* वर्षा गायकवाड *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 जयप्रकाश भैरवाड, धर्माबाद 👤 शेखर घुंगरवार 👤 सचिन पाटील पार्डीकर  👤 धम्मपाल कांबळे 👤 यश चेलमेल 👤 राम घंटे 👤 मन्मथ भुरे 👤 माधव गडमवाड 👤 शरद दळवी *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आजच्या प्रसारमाध्यमांनी मनातल्या भावनांना बंदीस्त करुन टाकले आहे. मनातले विचार प्रकट करण्यासाठी संधीच उपलब्ध करून देत नसल्यामुळे माणसांच्या विचारांची देवाणघेवाण होत नाही. त्यामुळे चांगल्याही विचारांना मनातून बाहेर येण्यासाठी बांध घातला गेला आहे. त्यामुळे सुखी कोण..? आणि दुःखी कोण..? हे शोधणे अवघड होऊन बसले आहे. या सा-यांतून सुटका करायची असेल तर या प्रसारमाध्यमांपासून थोडे दूर राहून प्रचलित प्रसारमाध्यमांबद्दलचा मोह थोडा दूर ठेवला पाहिजे.* *त्याऐवजी थोडा संवाद, चर्चा, एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करुन आपुलकीचे, प्रेमाचे, स्नेहाचे संबंध जोडण्यासाठी प्रयत्नशील असायला हवे. तरच प्रत्येकाला एकमेकांबद्दलची मनातली असणारी ओढ पूर्वीसारखी कायमची राहील. माणूस माणसाला विचारायला लागेल आणि जीवनव्यवहार सुरळीत चालायला लागतील. हाच माणुसकीचा धर्म जीवंत राहील अन्यथा माणसांपासून माणूस दूर जावून माणसामध्ये दडून बसलेली विकृती जन्मास येऊन सर्वत्र नैराश्याचे वातावरण निर्माण होईल.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 *--संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सज्जनहो,* *मंजिले उन्हीको मिलती है,* *जिनके सपनोमे जान होती है।* *पंखोसे उडान नही होती,* *होसले बुलंद होने चाहीए।* *तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार.* *जीवनात येणारे प्रत्येक उदाहरण* *सोडवण्याचा प्रयत्न करा* *पण एका ठराविक वळणावर ते* *सोडून पण द्या.* *मात्र* *न थांबता मार्ग बदलून ध्येय साध्य* *करण्यासाठी पुढे चालत* *रहा,भले कितीही अडथळे येवोत.* *नदीचे ध्यान करा ती* *अडथळे अनेक येऊनही* *समुद्राला मिळाल्याशिवाय राहत* *नाही.* *हे सगळं करण्यासाठी स्वतःच्या* *विचारावर, भाषेवर,मनावर विश्वास* *ठेवा.* *प्रगतीचे विचार आणि वैज्ञानिक* *दृष्टिकोन बाळगा.* *अंतिम सत्य तेच आहे, नाहीतर* *मोठमोठाल्या मंदिरात सी.सी.कॅमेरे* *बसवण्याची वेळ* *कधीच आली नसती.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्यांना आपल्या स्वत:च्या रागावर नियंत्रण करता येते त्यांना जग जिंकणे काही अवघड नाही.जर रागावर नियंत्रण करता येत नसेल तर स्वत:चे जीवन स्वत:च्याच हाताने संपवल्यासारखेच आहे.म्हणून माणसाने कधीही राग आलातरी रागावर नियंत्रण ठेवायला शिकले पाहिजे. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मनशांती* एकदा संत एकनाथांना कोणी दोन प्रश्न विचारले. एक, त्याच्या स्वत:च्या भविष्याबध्दल, आणि दुसरा, एकनाथ स्वभावाने एवढे शांत आणि निर्द्वेषी कसे राहू शकतात याच्याबद्दल . एकनाथ हसले; आणि, 'केंव्हातरी याची उत्तरे देईन', म्हणून त्यांनी सांगीतले. काही दिवसांनी, एकनाथांची त्या गृहस्थाशी भेट झाली. तेंव्हा त्याला बाजूला नेऊन एकनाथ म्हणाले, "तुझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची वेळ आली आहे, कारण, दुर्दैवाने, तू आता आठ दिवसांच्या आत मरणार आहेस." तो गृहस्थ सुन्न झाला, गोठला ! एकनाथ समोरून निघून गेले, तेंव्हा तो बधीर मनाने परतला.  जगलो तर एकनाथांसारख्या संतांच्या सदिच्छेने जगू, अशी त्याला भावना निर्माण झाली. ती त्याने सार्थ केली. आयुष्यातले आठ दिवस पूर्ण करून नवव्या दिवशी, एकनाथांच्या दर्शनाला तो गेला. एकनाथांना हात जोडून म्हणाला, "तुमच्या कृपेने वाचलो." एकनाथ मान डोलवित म्हणाले, "आता मी तुम्हाला दुस-या प्रश्नाचे उत्तर देणार आहे. गेले आठ दिवस तुम्ही कसे वागलात ? इतरांच्यावर किती रागावलात?" तो गृहस्थ उत्साहाने म्हणाला, "कसला हो रागावतो? अगदी छान, शांत आठ दिवस गेले. शांत म्हणजे, मरणाच्या भितीने बेचैन होतो, पण दुस-यावर रागावण्यासाठी ती बेचैनी नव्हती. घरात बायकोशी कधी भांडलो नाही. मुलांना मारले नाही. वाटायचे की, आता अखेरचे आठ दिवस उरले. बायका-मुले पुन्हा दिसणार नाहीत; त्यांना का दुखवावे? अहो, शेजा-याचे जमिनीवरून चार पिढयांचे भांडण होते. त्याला स्वत:च्या हाताने हवा तो तुकडा तोडून दिला. देणे होते ते देऊन टाकले. ज्यांच्याकडून येणे होते, त्यांच्यापैकी जे गरीब होते, त्यांचे येणे सोडून दिले. काही पैसे गमावले, पण शांती कमावली. खूप खूप शांत असे आठ दिवस त्या दृष्टीने गेले." एकनाथ समोरच्या माणसाच्या पाठीवर हात थोपटून म्हणाले,  "हे तुझ्या दुस-या प्रश्नाचे उत्तर. आठ दिवसांत जग सोडून जायचे आहे, अशा कल्पनेने मी सदाच वावरतो. म्हणून मी शांत वाटतो."  *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

*चारोळी* वेलीचा पानावर दवबिंदू साचले गुलाबी थंडीने फुलही बहरले. 〰〰〰〰〰〰 *प्रमिलाताई सेनकुडे नांदेड

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 16/01/2020 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  ● १९९६ - भारतीय कापड गिरणी कामगार नेता दत्ता सामंतची हत्या. ● १९९८ - ज्येष्ठ उर्दू कवी व लेखक अली सरदार जाफरी यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर. ● २००८ - टाटा मोटर्सच्या नॅनो या एक लाख रुपये किंमतीच्या 'पीपल्स कार'चे अनावरण 💥 जन्म :- ● १९४६ - कबीर बेदी, भारतीय अभिनेता. ● १९२६-ओंकार प्रसाद तथा ओ पी नय्यर ,संगीतकार 💥 मृत्यू :- ● १९०१ - महादेव गोविंद रानडे, भारतीय समाजसुधारक, धर्मसुधारक, न्यायाधीश, अर्थशास्त्रज्ञ. ● १९५४ - बाबूराव पेंटर, भारतीय चित्रपटनिर्माता, चित्रकार, शिल्पकार. ● १९८८ - लक्ष्मीकांत झा, भारतीय अर्थशास्त्रज्ञ. ● २००१ - पंडितराव बोरस्ते, भारतीय क्रीडा संघटक, शिवछत्रपती पुरस्कार विजेता. ● २००३ - रामविलास जगन्नाथ राठी, भारतीय उद्योगपती. ● २००५ - श्रीकृष्ण हरी मेहेंदळे, मराठी संगीतकार. पेटीवाले मेहेंदळे म्हणून ख्याती. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *शिवडी-न्हावाशेवा जोडणाऱ्या ट्रान्स हार्बर प्रकल्पाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, मुंबई-उरण 2 तासांचं अंतर 20 मिनिटांवर येणार, सर्वात मोठा सागरी पूल 2022 पर्यंत पूर्ण होण्याची आशा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची उंची 100 फुटांनी वाढणार, स्मारक दोन वर्षात पूर्ण करणारच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्धार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा तोंडावर आल्या असताना शिक्षण विभागातील अशासकीय नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *फडणवीस आणि ठाकरे सरकारची शपथविधीच्या सोहळ्यांवर कोट्यवधींची उधळण, ठाकरे सरकारकडून रोषणाईसाठी पावणेतीन कोटींचा खर्च* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठण्याची शक्यता, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अधिकाऱ्यांमध्ये चर्चा, अवैध दारुविक्री-महसूल नुकसानीमुळे बंदी उठवण्याचा विचार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *शिर्डी साईंच्या जन्मस्थानावरुन नव्या वादाची शक्यता, परभणीतल्या पाथरीला मुख्यमंत्र्यांकडून 100 कोटींचा निधी, पाथरीला मूळ जन्मस्थान दर्जा देण्यास शिर्डीकरांचा मात्र विरोध* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *आयसीसीच्या पुरस्कारांमध्ये भारतीय क्रिकेटपटूंचाच बोलबाला; रोहित शर्मा, विराट कोहली, दीपक चहरचा गौरव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *प्रत्येक शाळेला संरक्षणभिंत हवे* प्रत्येक गावात स्थानिक स्वराज्य संस्थेची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असते. पूर्वीच्या शाळा कोणाच्या घरात, ओसरीवर किंवा झाडाखाली भरविली जात असे आणि सर्वाना शिकवायला एकच शिक्षक असायचा. मात्र ...... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_15.html        लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *थंडी ..* -हेमंत मुसरीफ पुणे 9730306996. मैत्रीण वाटते प्रथम गोड गुलाबी थंडी घालवी सारा थकवा जशी जादूची कांडी थंडीचा होता गारठा उडू लागे घाबरगुंडी अंगात घाला लवकर स्वेटर टोपडी बंडी शेकोटी लागती पेटू जशी थंडी बने चंडी उबदार सर्वात मात्र आई गं तुझीचं मांडी *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारताच्या पहिल्या अणुस्फोटाचे शिल्पकार कोण ?* राजा रामन्ना 2) *भारताचे संगणक क्रांतीचे प्रणेते कोण ?* राजीव गांधी 3) *भारतातील पहिली दगडी कोळशाची खाण कोणती ?* राणीगंज 4) *सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार कोणता ?* दादासाहेब फाळके पुरस्कार 5) *राज्य विधानसभेची किमान सदस्यसंख्या किती असू शकते ?* 60 *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 साईनाथ सायबलू, सहशिक्षक, धर्माबाद 👤 सचिन होरे, धर्माबाद 👤 किरण शिंदे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वत:वर विश्वास असणे फार महत्वाचे आहे. तो नसल्यास न्यूनगंड निर्माण होतो. मानवी जीवन सुंदर आहे, यावर विश्वास ठेवल्यास मनात जगण्यासाठी नवी उमेद निर्माण होते. आशावदी दृष्टीकोन हा विश्वासाचाच अविभाज्य भाग आहे. आशावाद मानवी मनाला प्रेरणा देऊन कर्तव्य पार पाडण्यासाठी लागणारी ऊर्जा पुरवतो. विश्वासाचा संबंध व्यक्तीच्या ह्रदयाशी, मनाशी असतो. तो दृश्य स्वरूपात नसून अदृश्य स्वरूपाचा असतो. तो समजून घ्यायचा असेल, तर आपल्या आत डोकवावे लागेल.* *याच विश्वासाची गळचेपी होत असल्याचे आज पावलोपावली जाणवते. मुलांचा आईवडिलांवरील, आई-वडिलांचा मुलांवरील, पती-पत्नीच्या नात्यातील,  विद्यार्थ्यांचा गुरूजनांवरील, रूग्णांचा डाॅक्टरांवरील, मित्र-मैत्रिणींचा एकमेकावरील, जनतेचा राजकारण्यांवरील विश्वास कमी होत चाललाय...त्याला तडा जात असल्याचे आपल्याला दिसते. याचे कारण स्वार्थधुंदीत आपण माणूसपण विसरू लागलो. औपचारिकता आणि आधुनिकतेच्या नावाखाली नावाखालीही विश्वासाला नख लावणे सुरू झाले. मॅथ्यू अरनाॅल्ड हा कवी मानवी जीवनातील विश्वासाची व्याप्ती व खोली स्पष्ट करण्यासाठी समुद्राची प्रतिमा वापरतो. भूतकाळात विश्वासाची व्याप्ती समुद्राएवढी होती. प्रत्येकाच्या ह्रदयात विश्वासाला महत्वाचे स्थान होते. अशीच परिस्थिती चालत राहिली, तर भविष्यात विश्वासाची अवस्था केविलवाणी होईल. मानवी समाजात विश्वासाची जागा संशय घेईल व सर्वत्र सावळागोंधळ निर्माण होईल. चला तर..अंतस्थ विचार बदलून विश्वासाला पात्र बनू या..*          ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••     🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼     *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 916793704011 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *आज अवतार सिनेमातील गाणे,जिंदगी* *मौज* *उडानेका नाम है,कयाम है।अशी* *स्थिती तरुणांची बघायला मिळतेय.* *जीवन एक संघर्षयात्रा आहे.* *जंग सिनेमात एक गाणं आहे,* *जिंदगी हर कदम एक नई जंग है।* *याचप्रमाणे अगदी* *लहानपणातच एकदा संकट झेलायची* *सवय लागली की* *मोठेपणी कितीही वादळे येवु* *द्या .माणसं टक्कर घ्यायला सज्य* *असतात. स्वतःच्या* *आयुष्याची स्वतः वाट निर्माण* *करणारेच यशश्वी होत असतात.संकट* *आपल्याला* *अडवायला कधीच येत नाहीत तर* *संकट आपली उंची वाढवायला* *येत असतात.* *परंतु* *तरुणाई कुठंतरी* *भटकतेय,दिशाहीन अवस्था काही* *ठिकाणी बघायला* *मिळते.जीवनाची आशा सोडता कामा* *नये.* *आशा नावाची साखळी पायात* *घातली की तिच्या आवजानेच यशाचा* *राजमार्ग सापडतो.* *आणि हो , हा राजमार्ग मिळण्यासाठी* *तिला निराशेचे* *अनेक खडतर डोंगर पार करावे* *लागतात.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्याप्रमाणे पायी जाणा-या माणसाला जर पायात काटा मोडला तर काटा कसा काढावा हे कळायला लागते.नाही काढले तर काटा मोडल्यानंतर वेदना कशा होतात ते कळायला लागतात आणि त्याचे होणारेही दु:ख कळायला लागते.म्हणून काहीही प्रयत्न करुन पायात मोडलेला काटा काढूनच टाकतो. त्याचप्रमाणे जीवनात कितीही आणि कशीही संकटं आली की,त्या संकटाला तोंड कसे द्यायचे हे ज्ञान ज्याला आहे तेव्हा तो आपल्या जीवनमय संकटातून मार्ग काढायला शिकतो.त्यातून बाहेर कसे पडता येईल हे आपोआपच शोधत असतो.जर मार्गच शोधला नाही तर तो अधिक संकटात सापडतो.नाही प्रयत्न केले तर जीवन जगणे असह्य होऊन जाते.म्हणून कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी माणसाने प्रयत्नवादी असायला हवे.या जगात हातपाय हलवल्याशिवाय कुणालाही काही प्राप्त झाले नाही. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०. 🎋🥀🎋🥀🎋🥀🎋🥀🎋🥀 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सुखाचा शोध*        फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. एका गावात, मारुतीच्या देवळात एक साधनी, तरुण ब्रह्मचारी असा साधू राहत असतो. एक दिवस त्या देवळापाशी एक सावकार त्याच्या लवाजम्यासहित येतो. त्याचे वैभव, त्याची वरवर करणारी माणसे पाहून या साधूला वाटते की अरे आपण सुख मिळावे म्हणून इतकी साधना करतो, पण हा सावकारच खरा सुखी दिसतो. तो जवळ जाऊन सावकाराला विचारतो,"आपण सुखी दिसता. याचे रहस्य काय?" तो सावकार यावर खिन्न मुद्रेने म्हणतो,"मी कसला सुखी बाबा! अरे, नुसतीच धन दौलत असून काय फायदा ! विद्वत्ता असेल तर समाजात मान असतो. तो शेजारच्या गावी विद्वान राहतो ना, तू त्याला जाऊन भेट." असे पाहता साधू त्या विद्वानाकडे जातो.      विद्वान खिन्न वदनाने म्हणतो,"मी कसला सुखी बाबा! हाडाची काडे करून हे ज्ञान मिळवले पण लोक विचारत नाहीत. सांगीतलेले ऐकत नाहीत. अधिकार जोडीला असेल तर विद्वत्तेचा उपयोग. तू असे कर, तो शेजारच्या गावात पुढारी आहे ना, त्याच्याकडे जा. तो विद्वानही आहे. लोक त्याचे ऐकतात. तोच सुखात असणार." असे पाहता साधू त्या पुढाऱ्याकडे जातो.      तो पुढारी खिन्न वदनाने म्हणतो,"अरे, मी कसला सुखी बाबा! सत्ता आहे सर्वकाही आहे. पण ज्या लोकांसाठी मी हे काम करतो, ते माझ्याविषयी काय वाट्टेल ते बोलत असतात. ती निंदा सहन होत नाही बघ. तुला खरा सुखी माणूस पाहायचा असेल तर तू शेजारच्या गावात मारुतीच्या देवळात राहणाऱ्या साधूला जाऊन भेट. तो ब्रह्मचारी आहे आणि सदा ईश्वरचिंतनात मग्न असतो. तोच खरा सुखी आहे." हे तर स्वतःचेच वर्णन आहे हे समजल्यावर त्या साधूला स्वतःचीच लाज वाटते, आणि तो परत जातो. (संदर्भ- 'गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय') --लिखाळ. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 15/01/2020 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मकरसंक्रांत* 💥 ठळक घडामोडी :-  ◆ १९१९ - राजर्षी शाहू महाराजांनी आदेश काढून स्पृश्य-अस्पृश्य विद्यार्थ्यांना एकाच शाळेत शिक्षण देण्याची व्यवस्था केली. ◆ १९४९ - भारताच्या स्वातंत्र्यानंतर फिल्डमार्शल के.एम. करिअप्पा यांनी पहिले लष्करप्रमुख म्हणून सूत्रे स्विकारली. हा दिवस लष्करदिन म्हणून ओळखला जातो. ◆ १९९९ - ज्येष्ठ गायिका ज्योत्स्ना भोळे यांना राज्य सरकारच्या वतीने गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान. 💥 जन्म :- ◆ १९५६ - उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती 💥 मृत्यू :-  ◆ १९७१ - दीनानाथ दलाल महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार यांचे मुंबईत निधन. ◆ १९९८ - गुलझारीलाल नंदा, भारतीय पंतप्रधान, स्वातंत्र्यसैनिक व गांधीवादी कार्यकर्ते. ◆ २००२ - विठाबाई भाऊ नारायणगावकर, राष्ट्रपतीपदक विजेत्या तमाशा कलावंत. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *तंत्रज्ञानानुसार शिक्षण पद्धतीत बदल होणे आवश्यक असून राज्यातील सर्व शाळांमध्ये 'व्हर्च्युअल क्लासरुम' उभारण्याबाबतचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने तातडीने सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल झालेल्या बैठकीत दिले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणच्या (ट्राय) वतीने जारी करण्यात आलेल्या निर्देशानुसार सॅटेलाईट टीव्ही चॅनेल्सना नवे सुधारित दर जाहीर करण्याची मुदत 15 जानेवारीपर्यंत आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातल्या स्मारकाचं काम तातडीनं सुरू व्हावं, या उद्देशानं राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणी तातडीनं सुनावणी करण्याची मागणी राज्य सरकारच्या वतीनं करण्यात आली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *दहा रुपये थाळी योजनेचा शुभारंभ 26 जानेवारीला, प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवभोजन योजनेचा शुभारंभ होणार, गरीब व गरजू व्यक्तींना स्वस्त दरात स्वच्छ, पोषक व पदार्थाची गुणवत्ता राखून ताजे भोजन दिले जाणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या बैठकीत वाडिया प्रकरणावर तोडगा निघाल्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा, वाडिया व्यवस्थापनाला 46 कोटी रूपये देण्याला संमती शर्मिला ठाकरे यांची माध्यमांना माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *जेपी नडड्डा भाजपाचे नवे अध्यक्ष बनणार, 20 जानेवारी रोजी औपचारिक घोषणा होणार, जेपी नड्डा सध्या भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई : डेव्हिड वॉर्नर आणि अॅरॉन फिंचच्या दमदार शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने मुंबईतल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा दहा विकेट्सनी केला पराभव, या विजयासह ऑस्ट्रेलियानं तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *दुःखद बातमी :- प्रसिद्ध चित्रकार प्रमोद दिवेकर यांचे आज पहाटे झाले निधन, आज दुपारी बारा वाजता नांदेड येथे होणार अंत्यसंस्कार* फ्रेश मॉर्निंग बुलेटीन टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली ........! ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••             *मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा* https://m.facebook.com/story.php?story_fbid=1848046445322121&id=100003503492582 लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मकरसंक्रांती* - सौ. रूपाली गोजवडकर जि. प. कें. प्रा. शाळा वाजेगाव ता. जि. नांदेड. तीळाची स्निग्धता नात्यात रुजावी गुळाची गोडी वाणीत पाझरावी. संस्कृतीची महती सर्वांनी स्मरावी भारतभूमी सदैव तेजाने उजळावी. संक्रांतीची संक्रमणे नित्यस्मरणात रहावी फिरुनिया पुन्हा मतमतांतरे न व्हावी. विसरूनी भेदभाव किल्मिषे सारी अंतःकरणी निरंतर प्रेमभावना जपावी. *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात..एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *शिलाँग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?* मेघालय 2) *अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ?* मेडल ऑफ फ्रीडम 3) *भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणी तयार केला ?* मादाम कामा 4) *गोबर गॅस ( बायो गॅस ) मध्ये कोणता वायू असतो ?* मिथेन 5) *'भारताचे पॅरिस' असे कोणत्या शहराला म्हणतात ?* मुंबई *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 साईनाथ अन्नमवार, नांदेड 👤 नामदेव हिंगणे 👤 सलीम शेख 👤 बौद्धप्रिय धडेकर 👤 व्ही. एम. पाटील 👤 बालाजी ईबीतदार 👤 एकनाथ पावडे 👤 दत्ता बेलूरवाड 👤 कोमल ए. रोटे 👤 पंजाबराव काळे पाटील *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आजची संक्रांत ही काही निराळी नाही. दरवर्षी संक्रांत येते, जाते. पण क्रांती मात्र व्हायची तशीच राहते. ज्यावेळेला तुम्ही काळाची क्रांती मोजता, त्यावेळी फक्त ढोबळ रूपाने क्रांती लक्षात येते. या सापेक्ष  जगामध्ये 'क्रांती' काळरूप करून चालणार नाही; तर संज्ञारूप करायला हवी. 'संज्ञा' म्हणजे नुसती व्याख्या नव्हे, तर तुम्हाला चांगलं ज्ञान झालं पाहिजे. संक्रांतीच्या दिवशी, 'तिळगुळ घ्या', याचा अर्थ, तिळा तिळाने माणूस जमवा. माझं ह्रदय दुसर्‍यासाठी तीळ-तीळ तुटलं पाहिजे. दुसरा चुकतो कसा, आणि मी डंख कसा मारतो... विंचवाच्या जिभा करून आम्ही जर वागलो, तर काय उपयोग आहे सगळ्याचा?* *एका तिळगुळाच्या वडीवर वर्षभर गोड बोलायला सांगत असाल तर काही अर्थ नाही. ते प्रतीक आहे. - गूळ म्हणजे गोडीचं, एकत्र बांधून ठेवण्याचं; आणि तीळ हे स्नेहाचं. प्रतीकात्मक आहे ते. त्याप्रमाणे वर्तन करा. प्रत्येक दोषी माणसाला त्याचे दोष चांगलेच माहीत असतात. दुसर्‍याने काही दाखवायचंच असेल, तर गुण दाखवायचे असतात. आपण थोडं एकमेकाला सांभाळून घेऊ शकलो, तर काय होईल? 'संक्रांत' याचा अर्थ,'सम+क्रांत' असा सुद्धा आहे. क्रांती केव्हा होते? समतेने होते.* *एका कवीने सांगून ठेवलंय ते लक्षात ठेवा-*          *"दुर्दम्य होतील आशा आकांक्षा*          *होतील संग्राम गीते पुरी।*          *देशार्थ होतील त्यागी विरागी*          *होईल संक्रांत तेव्हा खरी ॥"*  *नुसत्या तीळगुळाने, हलव्याने होणार नाही. 'स्वत:च्या मनाला हलवा', असं ज्यावेळी मी स्वत:ला सांगेन, त्या दिवशी खरी संक्रांत साजरी होईल.*           ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••     🌟✨🌟✨🌟✨🌟✨🌟     *मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा !!!*          📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *आलोच या उघड्या नागड्या जगात* *जगायचेच आहे,तर जगा बिनधास्त* *कधी दोन देत तर कधी दोन घेत.* *जीवन हे संघर्षाचे मैदान आहे.इथं पदोपदी अपमान तर कधी सन्मान हा* *होतच राहणार.* *मग अपमानीत झाला तर मैदान* *सोडून जायचे का?नाही अपमानाला* *सुद्धा मानात परावर्तित* *करण्याची ताकद ठेवा.* *हार जीत तो बहादूर के किस्मत के दो सीतारे होते है। हे ध्यानात ठेवा.* *आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्याला बदलू शकतो.* *नकारात्मक गोष्टींचा सकारात्मक कार्यासाठी वापर करणे, ही खूप मोठी* *ताकद आहे. याचे सुंदर उदाहरण पहा.* *टाटांचा पॅसेंजर कार उद्योग तोट्यात जात होता. तो विकण्याचा निर्णय* *टाटांनी घेतला. कार बिझनेस विकण्याच्या मिटींगसाठी फोर्ड* *कंपनीस भेटण्यासाठी गेले. त्याना विचारले गेले, तुम्हाला कार* *बनविताच येत नाही, तर हा उद्योग तुम्ही का सुरू केला?* *हा अपमान व त्यांचे शब्द रतन टाटांना झोंबले. टाटा कार युनिट न* *विकण्याचा निर्णय घेऊन ते परत आले. बरेच संशोधन व प्रयत्न करून* *टाटांनी स्वतःचा कार ब्रॅंड मोठ्या उंचीवर पोहचविला.* *पुढे काही वर्षांनी आंतरराष्ट्रीय लक्जरी कार ब्रॅंड जग्वार आणि लँन्ड* *रोव्हर विकत घेऊन विदेशी कार कंपन्यांना योग्य उत्तर दिले.* *मग यातून आपण काय धडा घ्यायचा ते ठरवा.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• रंग कितीही वेगवेगळ्या प्रकारचे असले तरी रंगांना कधीच भेदभाव,जातियता, प्रांतियता किंवा विषमता नाही.त्यांना कुठेही कॅनव्हासवर,कागदावर किंवा भिंतीवर वापरा कधीच काही म्हणत नाहीत.कितीही आणि कुठेही वापरले किंवा मिसळले तरी त्यांच्या वेगवेगळ्या छटा सौंदर्यात भर टाकतात आणि पाहणा-याच्या दृष्टीत अगदी सहज भरुन जातात.पाहाराही थक्क होऊन जातो तो विचार करायला लागतो की, वेगवेगळे असूनही एकात्मतेचे दर्शन घडवतात हे त्यांच्याकडून खरेच शिकायला हवे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हे विश्वची माझे घर, प्रेमातील व्यापकता* ‘संत तुकाराम महाराजांनी देहू गावाबाहेरच्या एका ऊसाच्या मळ्याची काही दिवस राखण केली; म्हणून त्या मळ्याच्या मालकाने त्यांना पंचवीस-तीस उसांची एक मोळी दिली. दोरखंडाने बांधलेली ती मोळी खांद्यावर घेऊन संत तुकाराम महाराज घराकडे चालले असता वाटेत खेळणारी मुले त्यांना विचारू लागली, ‘‘तुकोबा, एवढे ऊस तुम्ही कोणासाठी घेतले हो ?’’ ते म्हणाले, ‘‘बाळांनो, अरे तुमच्यासाठीच. बंडू हा ऊस घे तुला, गुंडू हा तुला, धोंडू हा घे, तू पण.. हा, तू घे… हा, तू घे.’’ असे म्हणत तुकोबा ज्या वेळी त्यांच्या घरी पोहोचले, त्या वेळी त्यांच्या खांद्यावर एकच ऊस आणि त्याच्या भोवतीचे दोरखंडाचे भले मोठे वेटोळे एवढेच काय ते शिल्लक राहिले होते. तो प्रकार पाहून तुकाराम महाराजांची पत्नी आवळी भरपूर रागावली. आपल्याला मिळालेला सर्व ऊस लोकांच्या मुलांना देऊन आपल्या मुलांना काही आणले नाही; म्हणून ती तुकाराम महाराजांना नको नको, ते बोलली आणि रागाच्या झपाट्यात तिने तो उसाचा तुकडा खाली आपटला. त्यावेळी त्याचे तीन तुकडे होऊन एक तुकडा तिच्या हातात राहिला आणि दोन तुकडे जमिनीवर पडले. तेव्हा संत तुकाराम महाराज शांतपणे तिला म्हणाले, ‘‘आवळे, किती ग धोरणी तू ? आता तू सारखे वाटे केलेस. जो तुकडा तुझ्या हातात राहिला, तो तुझा आणि खाली जे पडले त्यांतील एक माझा अन् दुसरा मुलांचा !’’ ही त्यांची शांत वृत्ती पाहून बायकोला फार पश्चात्ताप झाला. तात्पर्य :- ‘हे विश्वची माझे घर’, असे वाटत असल्यामुळे संत तुकाराम महाराजांनी आपली आणि लोकांची मुले असा भेदभाव कधीच केला नाही.’ *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 14/01/2020 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● भूगोल दिन /अयन दिन /संक्रमण दिन ● मकरसंक्रांत, उत्तरायण - भारत 💥 ठळक घडामोडी :-  ● १७६१ - पानिपतची तिसरी लढाई - मराठे व अहमदशाह अब्दाली मध्ये झालेले भीषण युद्ध. ● १९९३ - मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले. ● १९९८ - ज्येष्ठ गायिका एम.एस. सुब्बलक्ष्मी यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान जाहिर. ● २००० - ज्येष्ठ समाजसेवक व गांधीवादी विचारवंत बाबा उर्फ मुरलीधर देविदास आमटे यांना इ.स. १९९९चा गांधी शांतता पुरस्कार राष्ट्र्पतींच्या हस्ते प्रदान. 💥 जन्म :- ● १८८२ - रघुनाथ धोंडो कर्वे, संततिनियमन आणि लैंगिक शिक्षण या विषयी काम करणारे कृतिशील विचारवंत. ● १८९२ - दिनकर बळवंत देवधर , क्रिकेटमहर्षी ● १८९६ - डॉ. चिंतामणराव देशमुख. , भारताचे अर्थमंत्री ●१९०५ - दुर्गा खोटे, मराठी अभिनेत्री. ● १९०८ - द्वा.भ. कर्णिक , ज्येष्ठ पत्रकार आणि रॉयवादी विचारवंत. ● १९२६ - महाश्वेतादेवी , ज्ञानपीठ व इंदिरा गांधी एकात्मता पुरस्कार विजेत्या बंगाली लेखिका. 💥 मृत्यू :- ● १९३७ - जयशंकर प्रसाद, हिंदी साहित्यिक. ● १७६१-सदाशिवराव भाऊ ,पानिपतच्या तिसऱ्या युद्धातील सरसेनापती *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *व्हीआयपी सुरक्षेतून NSG कमांडो पूर्णत: हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, मुक्त झालेल्या 450 एनएसजी कमांडोंची नव्या ठिकाणी नियुक्ती * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *पालघर स्फोट प्रकरणात तातडीने चौकशी करा, गृहराज्य मंत्री सतेज पाटलांचे आदेश, गुन्हा दाखल करण्याच्याही पोलिसांना सूचना* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मुंबईतील टॅक्सींवर प्रवाशांच्या सोयीकरता तीन रंगाचे दिवे, 1 फेब्रवारीपासून होणार अंमलबजावणी, परिवहन आयुक्तांची माहिती * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मध्य रेल्वेने विनातिकीट रेल्वेने प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाने तब्बल 155 कोटी दंड म्हणून वसूल केले आहेत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *विद्यार्थ्यांचा वापर राजकीय विचार पसरवण्यासाठी नको, सीएएच्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा निर्णय, शिक्षण विभागाची शाळांना नोटीस* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *लहान मुलांसाठीचं वाडिया हॉस्पिटल कुठल्याही परिस्थितीत बंद होऊ देणार नाही, मनसेच्या शर्मिला ठाकरेंचं आश्वासन, बचावासाठी कर्मचाऱ्यांसह लाल बावटा कामगार संघटनेचं आंदोलन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा; रोहित शर्मा, मोहम्मद शमीचं कमबॅक, येत्या 24 जानेवारीला पहिला सामना* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *मकरसंक्रांत* https://shopizen.page.link/D1SNVNvjpxk6WVJs9      लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चला शाळेला जाऊया* - ज्ञानेश्वर गायके खामगावकर मो.९४०३३८४८८९ चला शाळेला जाऊया ज्ञान अमृत घेऊ या विद्येच्या या प्रांगणात आपण सारे खेळूया.. पहाटे उठून आपला अभ्यास पूर्ण करूया नियमित शाळेत जाऊन धडे सारे गिरवूया.. पाटी पेन्सील वही सोबत पोळीभाजी ही नेऊया सुट्टी होता जेवणाची सोबत सारे जेवूया.. वर्गात आपल्या गुरुजीचे बोलणे कान देऊन ऐकूया रामकृष्ण अन अर्जुनासम शिष्य आपण बनूया.. मायबापांच्या आशाआकांक्षा पूर्ण साऱ्या करूया माणूस म्हणुनी आलो जन्माला माणूस पहिले होऊया.. भारतभुचे आम्ही लेकरं उंच भरारी घेवूया प्रिय आमच्या भारतभूला विजयी सलामी देवूया... *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ ज्या माणसाजवळ संयम आहे तो प्रत्येक गोष्टीचा धनी असतो. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *मकरसंक्रांत दरवर्षी केव्हा साजरी केली जाते ?* 14 किंवा 15 जानेवारी 2) *तामिळनाडूला मकरसंक्रांत कोणत्या नावाने साजरा करतात ?* पोंगल 3) *'तिळगुळ घ्या , गोडगोड बोला' असे कोणत्या सणानिमित्त म्हटले जाते ?* मकरसंक्रांत 4) *भारतात कोणत्या राज्यात मकरसंक्रांतीला पतंगोत्सव साजरा केला जातो ?* गुजरात 5) *मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य कोणत्या राशीत प्रवेश करतो ?* मकर *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गजानन श्रीरामवार 👤 प्रविण जुन्नरकर 👤 आ. प्रकाश दादा सोळंके 👤 समाधान बदाडे 👤 राहुल शहाणे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *या जगात संपूर्ण निष्पाप कोण? तर एकही नाही. या पृथ्वीवर कोणीही नाही. उलट, पापालाच सुखाचे साधन मानणारे सर्वत्र आहेत. सर्व प्रार्थना मंदिरात रोज तथाकथित पुण्यचिंतनात वेळ घालवणारे किंवा भक्तीचे भस्म अंगाला फासणारे यापैकी कुणीही पूर्ण शुद्ध नाही. म्हणूनच की काय गीतापुरूष कृष्ण म्हणतात..... ब-या-वाईटासह अर्थात शिव-अशिवासह जो असतो तो पुर्ण पुरूष. प्रत्येकामध्ये काही ना काही दोष आहेतच, संपूर्ण निर्दोष असा माणूस सापडणे शक्य नाही. या दोषांनाच आपण पाप समजतो. बहुजनांच्या हितासाठी प्रसंगी खोटं बोलावं लागत असेल तर ते पाप नाही, असं सांगितलं जातं.* *राष्ट्रभक्त सैनिकालाही शत्रूच्या तावडीत असताना सतत खोटं बोलून खरी माहिती लपवायची असते. त्यासाठी तो वाट्टेल ते हाल भोगायला सिद्ध असतो. पांडव ज्येष्ठ बंधू धर्मराजाला 'नरो वा कुंजरो वा' असे मोघम उत्तर हेतुपूर्वक द्यावे लागले. युद्धात आणि प्रेमात सारं काही माफ असतं म्हणतात. असो, आपला मुद्दा आहे जगी सर्व निर्दोष असा कोण आहे? कुणीही नाही. काही अतिजागृत देवस्थाने संपत्तीने तुडुंब भरत आहेत. दानातील नोटा आणि सुवर्ण मोजायला यंत्रे लावावी लागत आहेत. कुठून आला हा पैसा, देवळाबाहेर भुकेलं तान्हं घेऊन माय पेलाभर दूधासाठी लोकांच्या पायापोटी पडत आहे. तिला बाजूला हाकलून दगडाच्या देवाचे शुद्ध दूधाने अभिषेकांवर अभिषेक होत आहेत. माझ्या मते हेच महापाप आहे..* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟 *--संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *आनंदाचे डोही आनंद तरंग।* *आनंदी आनंद गडे इकडे तिकडे* *चोहीकडे।* *प्रत्येक ठिकाणी आनंद शोधा, म्हणजे आनंद मिळतो.* *आनंदाच्या झाडाचं गणित* *कृष्णानं सत्यभामेच्या अंगणात लावलेल्या प्राजक्ताच्या झाडासारखं असतं...* *झाड सत्यभामेच्या अंगणात आणि फुलं मात्र पडायची रुक्मिणीच्या अंगणात !* *रुक्मिणीला झाडाचं मूळ काही शोधता नाही आलं पण, प्राजक्ताच्या* *सुगंधाचा आनंद मात्र मिळाला.* *सत्यभामेचा चडफडाट झाला तो झालाचं, कारण तिने शोधायचा प्रयत्न* *करुन ते फुलांचं टपटपणं थांबवायचा प्रयत्न केला. त्यामूळे* *अंगणात असणाऱ्या त्या झाडाच्या सहवासाचा तिला आनंद नाही उपभोगता आला.* *रुक्मिणीनं मात्र झाडाच्या मूळाचा शोध घेण्याचा नाद सोडला आणि अंगणात टपटपणाऱ्या फुलांचा आनंद* *घेतच राहिली.* *आनंदाचसुद्धा तसंच असतं. तो कुठून मिळतोय याचा शोध घेत राहिलात तर आनंदच संपून जातो आणि उरते ती* *फक्त बेचैनी !* *आनंद घ्यावा आणि द्यावा... प्रत्येक* *_क्षण महोत्सव करावा... तो_ कुणामुळे, कशामुळे याचा विचार* *शक्य झाल्यास नंतर करावा फक्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी* *म्हणून आनंद द्या* *आणि आनंद घ्या.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्याप्रमाणे एखाद्या गीताला सुमधुर संगीतात संगीतबद्ध करायचे असेल तर त्यासाठी अनेक वाद्यांचे सुर एकत्रित आणावे लागतील आणि त्या वाद्यांना वाजवणारे किंवा चालवणारे अनेक कलाकार एकत्रीत आणून गीताला तालबद्ध आणि स्वरबद्ध करावे लागेल तेव्हा कुठे सुमधुर गीत ऐकण्यासाठी तयार होईल.अर्थात इतरांना त्या गीताचा आस्वाद घेता येईल.त्याचप्रमाणे एखादी चांगली कृती करण्यासाठी किंवा ती कृती सर्वमान्य होण्यासाठी सर्वांच्याच सहभागाची गरज असते आणि त्यात सर्वांचेच सहकार्य असेल तर ते नक्कीच एखाद्या सुमधुर गीतासारखेच सुसंस्कारीत बनेल आणि नक्कीच लोक अनुकरण करायला लागतील.कोणत्याही चांगल्या गोष्टींसाठी अनेकांचे सहकार्य असणे गरजेचे आहे त्यासाठी सर्वांनी एकत्रित, एकोप्याने राहणे गरजेचे आहे आणि तसे राहिल्यास सा-यांनाच चांगला फायदा होईल.नाहीतर एकटे राहून एकाकी जीवन जगण्याचा अट्टाहास केला तर त्या जगण्याला मीठविरहित जेवन केल्यासारखेच जीवन चवहिन होईल हे लक्षात असू द्यावे.जीवनात चांगल्या गोष्टींसाठी एकी आणि एकोपा असणे गरजेचे आहे. © व्यंकटेश काटकर,नांदेड 📲 ९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वतःच्या ज्ञानाचा गर्व* रेल्वेने प्रवास करीत असताना, एका प्राध्यापकाला आपल्या बाजूला एक अडाणी माणूस बसला असल्याचं आढळून आलं. स्वत:च्या ज्ञानाची घमेंड बाळगणारा तो प्राध्यापक थोडय़ाच वेळात त्या आडाणी माणसाची थट्टा करून आजूबाजूच्या बसलेल्या लोकांची करमणूक करू लागला. थोडा वेळ ती थट्टा निमूटपणे सहन केल्यावर तो माणूस त्या प्राध्यापकाला म्हणाला, साहेब, काही झालं तरी तुम्ही ज्ञानी आणि मी अज्ञानी. तरीसुद्धा आपला गाडीतला वेळ चांगला जावा, म्हणून आपण एकमेकांना कोडी घालूया. मी आडाणी व गरीब असल्याने कोडं सोडवण्यात जर मी हरलो, तर मी तुम्हाला फक्त पाच रुपये द्यायचे आणि जर तुम्ही हरलात, तर तुम्ही मात्र मला पंचवीस रुपये द्यायचे. आहे कबूल? हे ऐकून तो प्राध्यापक आनंदला आणि अवतीभवतीच्या सहप्रवांशावर छाप मारायलाही सुसंधी आपल्याकडे आपणहून चालून आली आहे असा विचार करून त्या माणसाला म्हणाला, तुझी कल्पना मला मान्य आहे. पहिलं कोड, तू मला घाल. माणसाने विचारलं, ज्याला उडताना तीन पाय, चालताना दोन पाय आणि बसला असता फक्त एक पाय असतो, असा पक्षी कोणता? या कोडय़ाचं उत्तर देता न आल्यानं प्राध्यापक काहीसा ओशाळून म्हणाला, बाबा रे, मी हरलो. हे घे पंचवीस रुपये, आणि या कोडय़ाचं उत्तर तू मला सांग. प्राध्यापकानं दिलेल्या पंचवीस रुपयांपैकी वीस रुपये स्वत:च्या खिशात टाकून, उरलेले पाच रुपये त्या प्राध्यापकाच्या हाती देत तो शेतकरी म्हणाला, मला सुद्धा या कोडय़ाचं उत्तर देता येत नाही, म्हणून मी हरल्याचे पाच रुपये तुम्हाला देत आहे. एका अडाणी व्यक्तीने हातोहात चकविल्यामुळे फजिती पावलेला तो प्राध्यापक पटकन तिथून उठला व रेल्वेचा दुसर्‍या डब्यात गेला. तात्पर्यः ज्ञान हे वृद्धींगत करण्यासाठी असते.माणसाने स्वतःच्या ज्ञानाचा गर्व कधीच करु नये. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 13/01/2020 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  ● २००७- के जी बालकृष्णन यांनी भारताचे २७ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला. ● १९९६-पुणे-मुंबई दरम्यान 'शताब्दी एक्सप्रेस' सुरू झाली. ● १९३० - मिकी माउसची चित्रकथा प्रथम प्रकाशित. 💥 जन्म :- ● १९४८ - गज सिंघ, जोधपूरचा राजा. ● १९४९-राकेश शर्मा ,भारतीय अंतराळवीर ● १९१९- एम चेना रेड्डी,आंध्रप्रदेश चे ११वे मुख्यमंत्री,उत्तरप्रदेश चे माजी राज्यपाल 💥 मृत्यू :- ● १७६६ - फ्रेडरिक पाचवा, डेन्मार्कचा राजा. ● २०११-प्रभाकर पणशीकर,ख्यातनाम अभिनेते *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं समारोप, विविध 20 ठराव मंजूर, संमेलनाध्यक्षांनी जेएनयुबद्दल घेतलेल्या भूमिकेवर एकही ठराव नाही, वादाचे विषय पूर्णपणे टाळले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *कोलकाता पोर्ट ट्रस्टला श्यामाप्रसाद मुखर्जी असं नाव केल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *कर्नाटक सरकारची मग्रुरी; सीमाभागात होणाऱ्या साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्रातल्या साहित्यिकांना गावबंदी, महाराष्ट्रातील साहित्यिक निषेध सभा घेणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *सोलापूर जिल्हापरिषद निवडणुकीत भाजप समर्थक आघाडीला साथ दिल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या 6 जणांचं निलंबन, अरुण तोडकर, सुनंदा फुले, स्वरूपाराणी मोहिते-पाटील, शितलदेवी मोहिते-पाटील, गणेश पाटील, मंगल पाटील यांच्यावर जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे यांची कारवाई* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ * जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत फिरत असलेल्या पोलीस उपअधीक्षकाला अटक, पोलिसाच्या घरातून स्फोटकांसह हत्यारं जप्त* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबईतल्या परळमधील वाडिया हॉस्पिटल निधीअभावी बंद करण्याची प्रक्रिया सुरू, पालिका-राज्य सरकार आणि हॉस्पिटल प्रशासनाच्या वादाचा रुग्णांना फटका* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई : आगामी टी-20 आंतरराष्ट्रीय विश्वचषकासाठी महिला क्रिकेट संघात 15 महिला खेळाडूंची झाली घोषणा, टीम इंडियाच्या महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर तर मराठमोळी स्मृती मनधाना उपकर्णधार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *तरुण भारत देश* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://shopizen.page.link/PYiBvfDGcdTtuSQg7        लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नाद कुणाचे* - डाॅ. शरयू शहा, मुंबई. 9619013330 नाद कुणाचे ..कसे कोणते ? ऐक ..तरी तू .. काय भावते ? खळखळ खळखळ.. नदी वाहते झुळझुळ झुळझुळ जळी वाजते । सळ सळ सळ सळ..पान हालते खळबळ खळबळ ..मनी चालते ॥ सुर सुर सुर सुर ..कशी धावते कुरकुर कुरकुर ..खार चावते । भिरभिर भिरभिर फिरत राहते चुरु चुरु चुरु चुरु ताई बोलते ॥ छुम्..छुम् पैंजण ..छान वाजते हम..हम कपिला ..बघ हंबरते । छन् छन् नाणे, कसे घणघणते तन मन..कसले ..मग मोहरते ॥ *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही..आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'राष्ट्रीय युवक दिन' केव्हा साजरा केला जातो ?* 12 जानेवारी 2) *स्वामी विवेकानंदाचे मूळनाव काय होते ?* नरेंद्रनाथ 3) *11 सप्टेंबर 1893 ला अमेरिकेतील शिकागो येथे भरलेल्या जागतिक धर्मपरिषदेत भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले ?* स्वामी विवेकानंद 4) *राजमाता जिजाऊ यांचा जन्म केव्हा झाला ?* 12 जानेवारी 1598 5) *छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्रीचे नाव काय होते ?* राजमाता जिजाऊ *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 माधव सोनटक्के, सहशिक्षक, बिलोली 👤 व्यंकटेश भांगे, सहशिक्षक, धर्माबाद 👤 विजयकुमार चिकलोड 👤 बालाजी देशमाने *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपल्या सर्व संत मंडळींनी जे जीवनाचे सार आणि सार्थक सांगितले ते अध्यात्मविद्येच्या जोरावर सांगितले आहे. 'आधी संसार करावा नेटका, मग परमार्थ विवेका' असे जे समर्थांनी सांगितले ते फार खोलवर जाऊन आपण विचारार्थ ठेवले पाहिजे. संतानी सांगितलेले अध्यात्म हे वरवरचे नाही. ते गहन आहे. आपण आपले रोजच्या जगण्यातले एखादे काम जर तन्मयतेने करत असू तर तिथेही अध्यात्म प्रकट होत असते; त्यासाठी अध्यात्म या शब्दाचा व्यंगार्थ लक्षात घ्यावा लागेल.* *ज्याला या विद्येचे गमक कळले त्यालाच वैराग्य साधता येते. या संकल्पना दूर कुठेतरी जाऊन अनुसरणे कुणाला मान्य नाही. मी वर्गात जाऊन शिकवितो, त्यावेळी 'शिकविणे' या क्रियेशी मी किती तादात्य पावतो हा प्रश्न प्रत्येक शिक्षकाने स्वत:ला विचारला पाहिजे. आसपासच्या सगळ्या गोष्टी विसरून जर शिकविणे या एकाच क्रियेशी मी जोडला गेलो, तर माझ्याकडून होणारे काम पाहून विद्यार्थी तृप्त होतील. तीच तृप्तता मला अध्यात्माचा नवा धडा देणारी असेल. त्यातली अतृप्ती मला ज्या दिशेने घेऊन जाईल त्या स्थळीही मी स्वत:चा शोध घेतला पाहिजे, तरच वैराग्याचा अर्थ आकलनात येईल.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *--संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *प्रवाहात वाहून जाण्यापेक्षा प्रवाहाच्या विरोधात वाहण्याची ताकद सुद्धा* *अंगी बाळगा.* *कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असतांना जसजशी प्रगती सुरु होते तसतसा छुपा विरोध हा वाढू लागतोच; सुंदर वेलीच्या खोडावर बांडगुळ वाढावा तसा. हा निसर्गाचाच नियम आहे. पण आपल्याला त्याची पुसटशीही कल्पना नसते. मग तुमची प्रगती डोळ्यात सलते आणि डोक्यात भनाणु लागते तेव्हा कारस्थानांच्या बिया पेरल्या जातात. खुरटय़ा विचारांचे कावळे एकत्र जमू लागतात आणि व्रणार्त शिशूच्या पंखावर चोच मारण्याची संधी शोधू लागतात.* *मग तुमच्यावर आरोप होतात- गैर व्यवस्थापनाचे, गैर कारभाराचे, भ्रष्टाचाराचे ! तुम्ही भांबावता, हडबडून जाता. कारण हा हल्ला तुम्हाला अपेक्षित नसतो. आणि मग तुम्ही प्रत्युत्तराची तयारी करू लागता. शब्दाला शब्द वाढतात.... त्यांची धार तिखट होते.. विरोधकांना आयते खाद्य मिळते. आणि नेमक्या याच क्षणी तुमच्या हातून आजवर न झालेली गफलत होऊ शकते.* *सत्यनिष्ठ, प्रामाणिक लोक कामाच्या ओझ्याने दबून जात नाही ; पण मिथ्या आरोपांच्या हल्ल्यामुळे खचून जातात. त्यांच्या आत्मविश्वासाला तडा जातो आणि मग प्रत्युत्तरे देण्याच्या घाईगर्दीत तो आजवर सांभाळलेले संतुलन गमावून बसतो. नुकसान हे या क्षणाला होते.* *त्यामुळे जेव्हा तुम्ही अर्थशून्य नौटंकीला सामोरे जाल, विषारी टीकेचे फूत्कार ऐकावे लागतील, तुमच्याबद्दलची व्यक्त होणारी मते चुकीच्या मार्गावर दाखविलेल्या दिशांचे प्रतिबिंब ठरू लागतील, तेव्हा ताठ मानेने उभे राहायचे आणि एकही शब्द न बोलता तेथून निघून जायचे, यातच खरे शहाणपण आहे. हा पळपुटेपणा नाही. ही पाठ दाखविण्याची प्रवृत्तीही नाही.* *तर ही शहाणी, समंजस पणाची, सन्मानाची भूमिका आहे. प्रत्युत्तर देणे, आवाज चढवणे म्हणजे एका अर्थी होणाऱ्या आरोपांना स्वीकृती देण्यासारखेच ठरते. प्रत्येक प्रत्युत्तराची एक वेळ असते. अपमान विसरायचे नसतात, तर ते मनाच्या हळव्या कोपऱ्यात जपायचे असतात. त्यांची बोच रोज लागता कामा नये ; पण त्यांचा सल मात्र खोलवर दडलेला बरा. कारण तो पुढच्या वाटचालीला मार्गदर्शक ठरतो.* *यश पचविणे एक वेळ सोपे; पण आरोप रिचवणे खूप कठीण. ' हेचि फल काय मम तपाला ' ? याचा वारंवार मनाच्या खिडकीत येणारा प्रत्यय सहन करणे सोपे नाही.* *कोणत्याही मॅनेजमेन्ट स्कूलमध्ये हे शिकविले जात नाही. मग हे शिकायचे कसे? वेळ आणि अनुभव यापेक्षा मोठे गुरू नाहीत. आरडा ओरड करायला शक्ती लागत नाही, ती शांत राहायला लागते. अशावेळी बाळगलेले मौन हे तुमच्या दुर्बलतेची निशाणी नसून तुमच्या आत्मिक शक्तीचा तो साक्षात्कार आहे. आणि ही शक्ती एका दिवसात येत नाही. तिचा 'थेंबे, थेंबे' संचयच करावा लागतो. तुमच्या निघून जाण्यात तुमचा पराभव नसतो, तर ती तुमची प्रगल्भता असते.* *आरोप करणाऱ्यांचे पितळ उघडे पडतेच, आणि कालांतराने इतरांनाही सत्य समजते. तोपर्यंत तुम्ही बरीच प्रगती केलेली असते.* *शेवटी काय तर ''आपण प्रत्येकाच्या दृष्टीने चांगले असू शकत नाही,, ''पण आपण त्यांच्यासाठी उत्कृष्ट आहोत जे आपल्याला समजतात,, ''माणसाने स्वत:च्या नजरेत चांगलं असलं पाहीजे,, ''लोक तर निसर्गाला पण नाव ठेवतात.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• घराच्या दुसऱ्या मजल्यावर जेव्हा जातो तेव्हा आपले पहिले पाऊल हे पहिल्या पायरीवरच पडते आणि नंतर क्रमाक्रमाने दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या पायरीवर पडते. अशापद्धतीने एक एक पायरी चढत वरचा मजला गाठत आपले वरच्या मजल्यावर जाऊन थांबतो.एकदम दुसऱ्या किंवा तिसऱ्या पायरीवर पाऊल टाकत नाही कारण एखाद्या वेळेस धपकन पडण्याची शक्यता असते.त्याचपध्दतीने एखादे काम पूर्ण करायचे असेल तर क्रमाक्रमानेच काम करावे लागेल.एकाएकी पहिल्याच प्रयत्नात ते अशक्य असते.कोणत्याही क्षेत्रात किंवा कोणत्याही हाती घेतलेल्या कामात एकाएकी किंवा एकाच प्रयत्नात यश मिळेल असे नाही आणि अशी अपेक्षाही करु नये. आपल्याजवळ प्रयत्न, सातत्य,संयम आणि विश्वास ह्या चार गोष्टी असतील तर कोणतेही यश आपल्याला हुलकावणी देऊ शकत नाही किंवा आपल्याकडून कोणी ओढून घेऊ शकत नाही.त्यातून मिळालेले यश हे आपल्याला समाधान देणारे असते हे नक्की. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🎋🎍🎋🎍🎋🎍🎋🎍🎋🎍 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भेट* *एकदा एका राजाने खुश होऊन लोहाराला चंदनाची बाग भेट दिली. लोहाराला चंदनाच्या झाडांच्या किंमतीचे ज्ञान नव्हते त्यामुळे त्याने त्याचा कोळसा करून विकला. हळू हळू सम्पूर्ण बाग रिकामी झाली.* *एक दिवस असेच राजा त्याच्या घरा जवळून जात होता, राजाला वाटले लोहार आता खुप श्रीमंत झाला असेल. परंतु प्रत्यक्ष पाहिल्यावर लोहाराची परिस्थिति पहिल्या सारखीच आहे असे दिसले राजाला आश्चर्य वाटले.* *सत्य समजल्यानंतर राजाने त्याला विचारले तुझ्याकडे एखादे लाकुड़ शिल्लक आहे का ? तेव्हा लोहारने कुऱ्हाडीचा दांडा दाखविला.* *राजाने त्याला चंदनाच्या व्यापाऱ्या कडे पाठवले. तेंव्हां त्या छोटयाश्या तुकडयाचे त्याला खुप पैसे मिळाले. लोहार खुप रड़ू लागला, त्याने राजाला अजुन एक बाग देण्याची विनंती केली तेव्हा राजा म्हटला "अशी भेट वारंवार भेटत नाही."* *मित्रांनो आपले आयुष्य त्या लोहारा सारखेच आहे मानवी जीवनाच्या मुल्यांचे महत्व, आपल्याला जीवनाचे शेवटचे श्वास चालू असताना समजते.पण...* *त्यावेळेस आपण म्हणतो देवा मला अजुन थोड़ा वेळ दे, परंतु त्यावेळी वेळ मिळणे अशक्य असते.* *मानवी जीवन अनमोल आहे.* *असे जीवन परत मिळणार नाही.* *बोध* *या जगात दुर्लभ गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे, मनुष्य देह. हा देह ही आपल्या जीवनाची अमूल्य भेट आहे या देहाचा कोळसा करायचा की, चंदन हे आपले आपण ठरवायचे..* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 11/01/2020 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  ● १९२२ - मधुमेहाच्या रुग्णावर प्रथमतः इन्सुलिनचा प्रयोग केला गेला. ● १९४९ - लॉस ऍंजेलसमध्ये पहिल्यांदा हिमवर्षाव झाला. ● १९५५ - नेपानगरमध्ये पहिला भारतीय कागद कारखाना सुरू झाला. ● १९६० - चाडने स्वतःला स्वतंत्र घोषित केले. 💥 जन्म :- ● १८५८ - श्रीधर पाठक, हिंदी साहित्यिक. ● १८९८ - विष्णु सखाराम खांडेकर, मराठी साहित्यिक. ● १९४४ - शिबु सोरेन, भारतीय राजकारणी. ● १९५४ - बोनी कपूर, हिंदी चित्रपट दिग्दर्शक. ● १९७३ - राहुल द्रविड, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ● १९२१ - वासुदेवाचार्य केसर, कन्नड साहित्यिक. ● १९६६ - लाल बहादूर शास्त्री, भारताचे पंतप्रधान. ● १९८३ - घनश्यामदास बिरला, भारतीय उद्योगपती. ● २००८ - यशवंत दिनकर फडके, मराठी लेखक, इतिहाससंशोधक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *उस्मानाबाद :- प्रसिद्ध कवी पद्मश्री ना. धो. महानोर यांच्या हस्ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलानाचे उद्घघाटन, या प्रसंगी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो, माजी साहित्य संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे, डॉ. नागनाथ कोत्तापले, लक्ष्मीकांत देशमुख, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, पोलिस अधीक्षक राज तिलक रौशन आदी मान्यवर उपस्थित होते.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीमध्ये भव्य नागरी सत्कार, शहरातून शोभायात्रा, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, तर परळीत धनंजय मुंडे यांचाही भव्य सत्कार * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *हैदराबाद : आंध्र प्रदेश सरकारची महत्त्वाकांक्षी योजना 'अम्मा वोडी'ची घोषणा मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी केली, या योजनेंतर्गत शाळेतील मुलांच्या आईच्या बँक खात्यात दरवर्षी 15 हजार रुपये जमा करण्यात येणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई : खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर या काळातील सातव्या वेतन आयोगाची थकबाकी पाच हप्त्यांत देण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर पोटनिवडणुकांमध्येही भाजपला धक्का, मुंबई, नाशिक महापालिकेत महाविकासआघाडीचा डंका, पनवेलमध्ये भाजपला यश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांच्याविरोधात ईडीची मोठी कारवाई, मुंबईतल्या घरासह 78 कोटींच्या संपत्तीवर टाच* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *साताऱ्यातील मांढरदेवी गडावर काळुबाईची यात्रा, महाराष्ट्रासह कर्नाटकातून भाविकांची गर्दी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 🚀 *क्रिकेटची बातमी :- तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा श्रीलंकेवर 78 धावांनी विजय, मालिका 2-0 ने जिंकली, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने सामन्यात केली आणखी एका विक्रमाची नोंद, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने ११ हजार धावांचा टप्पा केला पूर्ण, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींगचा विक्रम काढला मोडीत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *शिक्षक आनंदी तर मुले आनंदी* देशाला घडविण्याचे सर्वात मोठे कार्य शिक्षकांच्या हातून होत असते. ज्ञान देणारे शिक्षक सर्वगुणसंपन्न असावे म्हणजे त्यांचे विद्यार्थी देखील तसेच सर्वगुणसंपन्न तयार होतील. चिमुकल्यांचं भविष्य उज्ज्वल करण्याचं काम करणाऱ्या शिक्षकांनी आनंदात राहून ज्ञानदानाचे काम करणे आवश्यक आहे, कारण शिक्षक आनंदी असेल तरच त्यांच्या समोरचे पाच-पन्नास चिमुकले आनंदी होतील.......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://shopizen.page.link/g1JPw8pNtqf2Sasr9          लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मुंगीताई...* ✍🏻 संदिप पाटोळे, नंदुरबार... 9421890770 मुंगीताई मुंगीताई घर किती खोल ? सवड काढ थोडी जरा माझ्याशी बोल घाई किती कामाची लांबच लांब रांग जमा करते अन्न पुरते किती सांग एकजूट तुमची किती असते बाई एवढंस पोट तुझं काही खातेस का नाही? कोणी केलाच हल्ला कडकडून घेते चावा घाबरून जातो हल्लेखोर आईच्या करतो धावा *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" मनुष्याजवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी केव्हा साजरी केली जाते ?* 11 जानेवारी 1966 2) *'जय जवान, जय किसान' हा नारा कोणी दिला ?* लालबहादूर शास्त्री 3) *लालबहादूर शास्त्री यांचे आडनाव काय होते ?* श्रीवास्तव 4) *भारताचे दुसरे पंतप्रधान कोण होते ?* लालबहादूर शास्त्री 5) *लालबहादूर शास्त्री यांचा जन्म केव्हा झाला ?* 2 ऑक्टोबर 1904 (वाराणसी) *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 बालाजी पुलकंठवार, सहशिक्षक, 👤 सिध्देश्वर मोकमपल्ले 👤 हणमंत पांडे 👤 राहूल ढगे, सहशिक्षक 👤 लोकेश येलगंटवार 👤 साई यादव, येवती *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खरंतर घरात छोट्या छोट्या गोष्टींची देवाणघेवाण सहज व्हायला हवी, ज्यासाठी पैसे नाही लागत , पण 'नातं' विणलं जातं, गुंफलं जातं त्यामुळे !* *यामुळे देणा-याला वाटतं आपण काहीच दिलं नाही नि घेणा-याला वाटतं आपल्याला किती मिळालं ?* *घर गुंफलं जाण्यासाठी सगळ्यांनीच टिव्हीपासून उठून एकमेकांच्यासमोर काहीवेळ तरी बसू या, दिवसभराबद्दल  बोलू या, जरा हसू या, कधी फुंकर मारू या, कसं छान हलकं-फुलकं वाटतं मग !*                  ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••     🌾🌱🌿🌾🌱🌿🌾🌱🌿     *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *चोखा डोंगा परि ,ऊस नोव्हे डोंगा* *काय भुललासी वरलिया रंगा।* *हे मानवी संतवचन,* *ऐसें कैसे झाले भोंदू* *कर्म करुनिया म्हणती साधू* *अंगा लाऊनीया राख* *डोळे झाकुनी करती पाप।* *हे वास्तव खऱ्या संतांनी मांडले आहे.* *होय_आम्ही_डावेच_आहोत* *नित्यानंद,ज्योतीगिरी,रामपाल,* *रामरहीम,आसाराम,* *नारायणसाई,चिन्मयानंद,कुलदीप* *सेंगर.* *हे सगळे उजवे क्रांतिकारक आहेत.* *यांनी जे काही चमत्कार आपापल्या मठांमध्ये केले. त्या विरोधात* *थोबाडाला फडक बांधून कुणीही त्यांना जाब विचारायला* *गेलेल नाही.* *परंतु कुणीतरी आपल्यापेक्षा ज्ञानी आहे. ज्ञानाने मोठ होतय.* *जेएनयूसारख्या जगदविख्यात विद्यापीठातून पदवी घेऊन अगदी* *नोबेल पुरस्कारापर्यंत जातय.* *विद्यापीठे म्हणजे विचार आणि ज्ञान या दोन गोष्टींवर चालणारी ज्ञानसंस्था.* *_मग तीच मोडून* *काढा._ अत्यंत धर्मांध आणि लाचार* *लोकांना ज्ञानी लोक नकोच असतात.* *मग ते काय करतात, तर तुकोबाची गाथा बुडवतात. ते तुकोबाला* *धर्मपीठापुढे उभं* *करतात. आणि निर्णय देतात की हा* *शूद्र कुणबट याला ज्ञानाचा* *अधिकार कुणी दिला? तीच गोष्ट* *नामदेवांची. हा शिंपी आहे जातीने. हा* *आमच्या* *अधिकारक्षेत्रात येणाऱ्या देवालयात* *किर्तन कसे काय करू शकतो. म्हणून मग नामदेवाला* *देवळाबाहेर काढलं* *जात. नामदेवांच्या 'नाचू कीर्तनाचे रंगी* | *ज्ञानदीप लावू जगी' ची इतकी* *ख्याती की लोक नामदेवांना* *बाहेर कीर्तन करायला सांगतात. लाखोंचा जनसमुदाय* *जमतो. आणि या* *नामदेवांच्या कृतीला लोक 'नामदेवानं* *देऊळ फिरवलं' असं* *म्हणून एक ऐतिहासिक नोंद करतात.* *तीच गोष्ट चोखोबांची. त्यांना तर* *अतिशूद्र म्हणून निर्दयपणे ठार* *मारल गेलं. तीच गोष्ट* *चक्रधरांचीही. एवढेच कशाला* *शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकालाही एक सर्वसामान्य* *शेतकरी घरातला पोरगा राजा होतो. हेही सनातन्यांना* *रूचत नाही. संभाजी* *महाराजांची तर अजूनही हे* *धर्मांध लोक बदनामीच करत आहेत. फार कशाला ज्ञानदान करते* *म्हणून सावित्रीबाई फुलेंवर शेणाचे गोळे* *फेकणारे हेच. ज्योतिबांवर मारेकरी घालणारे हेच. छत्रपती राजर्षी शाहूंची* *बदनामी करणारे हेच. बाबासाहेब आंबेडकर, म.गांधी,* *पं.नेहरू यांच्याबद्दलची विकृत अथवा खोटी माहिती* *पसरवणारे हेच.* *किती म्हणून सांगायचं यांच्याबद्दल.* *वरील ज्या ज्या आमच्या महापुरूषांची तुम्ही बदनामी* *करत आला आहात.* *ज्यांच्याबद्दल अत्यंत खोटी माहिती प्रसृत करत आला आहात. ते सगळेच* *आमच्यासाठी डावे आहेत. आणि आम्ही या आमच्या* *डाव्यांचे वारसदार.* *तुकोबा म्हणतात,* *आंधळ्यासी जग अवघेची आंधळे ।* *आपणासी डोळे दृष्टी नाही ।।१।।* *रोग्या विषतुल्य लागे हे मिष्टान्न ।* *तोंडासी कारण चवी नाही ।।२* ।। *तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण ।* *तया त्रिभुवन अवघे खोटे ।।* *३* ।। *कपाळाला गंधटिळा लावला. भगवी* *वस्रे नेसली. तुळशीमाळ* *गळा घातली म्हणून कुणी वारकरी होत नसतो. माझ्या आजोबांच्या* *गळ्यात कधीच तुळशीची माळ नव्हती की कधीही* *त्यांनी कपाळाला गंध लावला नाही. मंदिरात झोपायला* *असायचे. पण कधी माझ्या ग्रामदैवताचा रोकडोबाचा दिवा विझू* *दिला नाही. पंढरपुरचा विठोबा* *हे त्याच दैवत. तीच गोष्ट* *माझ्या वडिलांची दर पंधरा* *दिवसाला पंढरीत एकादशीला दर्शनासाठी असतात. कालच* *पंढरपुरात पोहोचलेत. त्यांच्याही* *गळ्यात माळ नाही. की कपाळाला गंधटिळा नाही. कुठलही भगवं वस्र* *कधी माहीत नाही. पण हे दोघेही हाडाचे वारकरी.* *तीच गत माझीही आहे.* *आमचा नित्यनेम हा विठ्ठल आहे. आणि तोच आमचा धर्म आहे.* *आणि तुम्ही सांगता तो धर्म आमचा* *नाही. आम्ही सदैव डाव्याच* *बाजूने चालत राहूत.* *आम्हा वारीला निघालेल्यांचा मार्ग सदैव डावाच असणार आहे. रस्त्याने* *चालताना उजवीकडून चाललात तर अपघात होणार. हे* *ठरलेलच आहे. म्हणून त्याही अर्थाने आम्ही डावेच आहोत. आणि राहूत.* *आणि इन्किलाब झिंदाबाद! म्हणत राहूत.* *यात कुणाचा द्वेष नाही,सगळ्या जाती* *धर्मात हे विचारांना गाडून* *टाकणारे कर्मठ आजही आहेत,सावध व्हा.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जी माणसे पदोपदी खोटे बोलतात ती माणसे मूळातच स्वार्थी असतात. अशा खोटे बोलणा-या व्यक्तीवर कुणीही विश्वास ठेवत नाही. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *योग्य वेळी केलेल्या युक्तीचा वापर* एका वनात दोन संत राहत होते. एकांतात आपल्‍या तपश्‍चर्येत लीन राहत होते. कधीतरी यात्रेकरूंचा जत्‍था जायचा तेव्‍हा ते संत त्‍यांच्‍याशी बोलत असत. त्‍याच यात्रेकरूकडून त्‍यांना तेथील राजास त्‍या संतांबाबत माहिती मिळाली. तो या दोघांना भेटण्‍यास निघाला. जेव्‍हा संतांना ही गोष्‍ट कळाली.तेव्‍हा त्‍या दोघांना वाटले की आता राजा येणार व त्‍याने आपला चांगूलपणा पाहिला तर तो आपणास सतत भेटण्‍यास येईल, त्‍याच्‍याबरोबर अनेक माणसे येतील, त्‍यां माणसांच्‍या संगतीने अजून काही माणसे येतील व अशाने या वनातील शांती भंग पावेल व एकांत मिळणार नाही व एकांत नसल्‍याने आपणास ध्‍यानसाधना करता येणार नाही. राजा आम्‍हाला दोघांना सामान्‍य माणूस समजेल असे काहीतरी केले पाहिजे. राजाचा लवाजमा तेथे पोहोचला तेव्‍हा राजाने पाहिले की ते दोघेही संत हातात लाठ्याकाठ्या घेऊन एकमेकांशी भांडत होते. पहिल्‍या संताने दुस-याला म्‍हटले,'' तू स्‍वत:ला कोण समजतोस, मी इतके ज्ञान मिळविले आहे की ते तू सात जन्‍मातही मिळवू शकणार नाही.'' दुसरा संत त्‍यावर म्‍हणाला,'' अरे तू तर पक्का खोटारडा आहेस, तुझ्या ज्ञानाच्‍या गप्पा मारून तू लहान मुलाला फसवू शकशील पण मला नाहीस. तुझ्यापेक्षा जास्‍त ज्ञान मी माझ्या शिष्‍यांना दिले आहे.'' राजाने व त्‍याच्‍याबरोबरच्‍या लोकांनी हे भांडण पाहिले व विचार करू लागले हे साधू संत तर सामान्‍य माणसाप्रमाणेच भांडत आहेत व त्‍यांनी सर्वांनी असल्‍या साधूसंतांचा संग नको म्‍हणून वनातून जाणेच पसंत केले. राजा व लोक जाताच दोन्‍ही संतांनी एकमेकांकडे पाहून मंदस्मित केले व गळाभेट घेतली. दोन्‍हीही साधू आपल्‍या साधनेत रममाण झाले. तात्‍पर्य : अनेक चांगल्या गोष्‍टी घडवून आणण्‍यासाठी अशा युक्तीचा मार्गाचा अवलंब करावा लागतो. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 🙏 🙏 ~~~~~~~~~~~~~~~~~~~

*चारोळी -- काय म्हणतील?* लोक काय म्हणतील? ह्याचा विचार नका करु चांगले तितके करा माञ वाईट कुणाचे नका करु..

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 10/01/2020 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  ● १९७२ - शेख मुजीबर रेहेमान हे पाकिस्तान च्या कारावासातून ९ महिन्यानंतर सुटून बांगलादेश मध्ये नवीन राष्ट्रपती म्हणून परतले. ● १९८९ - क्युबाने अँगोलातून सैन्य मागे घेण्यास सुरूवात केली. ● २००१ - विकिपिडीया न्यूपिडीयाचा एक भाग म्हणून सुरू झाला. पाच दिवसांनी त्याचे स्वतंत्र अस्तित्त्व निर्माण झाले. 💥 जन्म :- ● १८९६ - काकासाहेब तथा नरहर विष्णु गाडगीळ, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी साहित्यिक, वक्ता. ● १९२७ - शिवाजी गणेशन, तमिळ चित्रपट अभिनेता. ● १९४० - येशु दास, भारतीय पार्श्वगायक. ● १९७४ - ॠतिक रोशन, भारतीय चित्रपट अभिनेता. 💥 मृत्यू :- ● १२७६ - पोप ग्रेगोरी दहावा. ● १८६२ - सॅम्युएल कोल्ट, अमेरिकन संशोधक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त आणि चिंतामुक्त करणार, राज्यात येऊ घातलेल्या नव्या प्रकल्पात कामगार निर्मितीसाठी कौशल्य विकास केंद्रही उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. औरंगाबादेतल्या महाएक्स्पो प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *निर्भया प्रकरणातील एका दोषीची सुप्रीम कोर्टात सुधारित याचिका, विनय कुमार शर्माने फाशीला स्थगिती देण्याची केली मागणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *उस्मानाबाद येथे आजपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू होत असून या संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध साहित्यिक ना. धो महानोर यांच्या हस्ते होणार आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *2022 पर्यंत देशातील 40 कोटी तरुणांना कौशल्य विकास प्रशिक्षणाचे उद्धिष्ट, केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री डॉ.महेंद्रनाथ पांडे यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *ओबीसी नागरिकांची निश्चित आकडेवारी उपलब्ध नसल्याने आता होणाऱ्या जनगणनामध्ये जातीचा रकाना वाढवावा अशी शिफारस विधानसभा आणि विधान परिषदेतील सदस्यांनी सरकारकडे केली होती, तो प्रस्ताव दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पुणे : पाहुण्या श्रीलंकेविरुद्ध तिसरी व अंतिम टी२० लढत जिंकून तीन सामन्यांची मालिका २-० अशा फरकाने जिंकण्याचा निर्धाराने टीम इंडियाने प्रयत्न करणार तर, श्रीलंका बरोबरी साधण्याच्या निर्धाराने गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भिडतील.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *कर्णधार विराट कोहलीच्या टी-20 सामन्यांत जलद हजार धावा पूर्ण, धोनीसह अनेकांना टाकलं मागे, टीम इंडियाचा कर्णधार म्हणून टी-20 सामन्यात 1000 धावा पूर्ण करणारा विराट दुसरा खेळाडू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *विशेष बातमी :- नांदेड ते मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस रेल्वेचा नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते आज होणार उदघाटन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *राष्ट्रगीत आणि राष्ट्रभक्ती* शाळेत शिकत असताना गुरुजी मुलांना संगत की, राष्ट्रगीत चालू असताना सावधान स्थितीमध्ये स्तब्ध उभे रहावे, कसल्याही प्रकारचे हालचाल करू नये. तसे केल्यास राष्ट्रगीताचा अपमान समाजल्या जातो. या सूचनेचे पालन करीत मुले रांगेत उभे राहून सरळ समोर पाहत ताठ मानेने राष्ट्रगीत एका सुरात आणि तालबध्द पद्धतीने म्हणतात. अश्या या रोजच्या कृतीमुळे मुलांमध्ये........ वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://shopizen.page.link/61raQmghejBdrfiLA लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• दिवा ज्ञानाचा... - उमेश लक्ष्मण परवार, गोवा गुरू हा झरा ज्ञानाचा गुरू हा मार्ग प्रगतीचा... दाखवी अक्षरे फळ्यावर तेच शब्द ही मनावर... प्रतिमा देई आकार विद्यार्थाना गुरू होऊन ज्ञान संकटाना.... गुरू हा वाङमय शब्दाचा अर्थ लावी कवितेला आधाराचा..... दिवा ज्ञानाचा पेटला शाळेत विद्यार्थी खेळे सदैव स्पर्धेत.... *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *योजना आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?* पं जवाहरलाल नेहरू 2) *सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश कोण होते ?* हिरालाल केनिया 3) *महात्मा गांधींचे समाधीस्थळाचे नाव काय आहे ?* राजघाट 4) *भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?* राजस्थान 5) *'माउंट अबू' हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?* राजस्थान *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 👤 श्रीनिवास रेड्डी, धर्माबाद 👤 साईनाथ सोनटक्के 👤 राजेश कुंटोलू 👤 गणेश वाघमारे 👤 शत्रूघन झुरे 👤 स्वरूप खांडरे 👤 आकाश क्षीरसागर, सालेगाव *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आज सर्वत्र क्रांतीचे, शांतीचे जयघोष ऐकू येतात. कारण क्रांतीच्या अवस्थेत माणूस जागा होतो नि शांतीचा सूर आळवतो, तेंव्हा तो ख-या अर्थाने माणूस होतो. तसं पाहिलं तर क्रांती आणि शांती मानवी जगण्याचे दोन महत्वपूर्ण पैलू, त्यामुळेच माणसाला इतर प्राण्यांपेक्षा वेगळी ओळख मिळते. क्रांती आणि शांती वरकरणी परस्पर भिन्न वाटल्या तरी त्या परस्परावलंबी आहेत. क्रांती क्रोध निर्माण करते तर शांती विवेकाने विचार करायला लावते. अनाचार, अत्याचार, विषमता यांच्या विरूद्धचा एल्गार म्हणजे क्रांती. जी व्यक्तीला जीवनातल्या नितांत सुंदर स्वप्नवास्तवांकडे आकृष्ट करणारी सुप्त क्षमता असते. तर शांती ही सर्वच वैर आणि संघर्षाचा विराम असते.* *तथागत गौतम बुद्धांनी सांगितलं आहे, 'शांती ही आपल्या आतुन येते. मनातून क्रोधासारखी नकारात्मक भावना जाऊन करूणेची सकारात्मक भावना उत्पन्न झाली की शांती येते.' समस्या अनंत असतात. त्यावरील समाधान शोथताना क्रोथ आणि शांततेच्या पलीकडे जी घेऊन जाते ती क्रांती. हे क्रांती आणि शांतीचं खरं नातं. एकदा आचार्य रजनीश यांनी शांतीच्या मार्गाचा उपाय विचारणा-या व्यक्तीचं केलेलं समाधान असं होतं,'तू आधी तिथे जा, जिथे तुला अशांती मिळाली तेथूनच तुला शांतीचा मार्ग सापडेल. कारण अशांततेतच शांतता लपलेली असते.' शांती शोधताना अशांतीच्या कारणांच्या मूळापर्यंत न जाता शांतीची अपेक्षा करणं स्वत:ची दिशाभूल करण्यासारखे ठरेल.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *पठतो नास्ति मूर्खत्वं जपतो नास्ति पातकम्।* *मौनिनः कलहो नास्ति न भयं चास्ति जाग्रतः॥* *अभ्यास करणारे मूर्ख* *नसतात,नीटनेटका ,योग्य विचार* *करून काम करणारा असेल तर त्याची हानी होण्याचं काही कारण* *नाही. आणि सर्वात महत्त्वाचे हे की मौन वा शांती बाळगणाऱ्याना तक्रार* *करण्याचे कारण नाही,किंबहुना ते तक्रार करतही* *नाही.त्याशिवाय जागृत किंवा* *सचेतन राहणारा कधी कुणाला घाबरत नाही. त्याला कुठली भीती* *नसते.त्यामुळेच स्वभाव शांत ठेवा.* *लक्षात ठेवा शांतता बाष्फल नसते,वायफळ तर बिलकुल नसते.* *सुसंवादी विनम्र चेहरा हे शांततेचे लाडके अपत्य आहे.ही हवीहवीशी* *वाटणारी शांतता कोण भंग करत,आपणच ना?एकमेकांवर* *कुरघोडी करणं, वर्चस्व प्रस्थापित करणे, मीच शहाणा,मग* *माझंच ऐका या सर्व विकृतीतून वादाला तोंड फुटते आणि* *शांतता तेथून पळ काढते.* *अशा वेळी मन,मनगट,मेंदू सर्व* *विकारी होतात,थकतात. ते आपला* *जाहीर निषेध करतात.मग आपण परिस्थिती समोर हतबल होतो* *आणि तडफड करत शेवटी डोळे मिटून झाल्या* *प्रकाराने अश्रू ढाळत बसतो.* *मस्त सुगंधी संवादाला टाळी द्या,मेंदूला शांतपणे त्याचे काम* *करुदया.हे घडवायचे असेल,मनातील मळभ दूर करायचे* *असतील,झटकायचे असतील तर शांततेच्या मार्गाने जावे* *लागेल.मग खात्रीने मानसिक स्वास्थ्य मनाच्या चौरंगावर स्वार* *होईल.* *जगाला आवडेल ते कराल तर एक “product” म्हणून रहाल आणि जर स्वताला आवडेल ते कराल तर, एक “Brand” म्हणून जगाल* *तुमच्या विचारातून तुमचं व्यक्तिमत्त्व झळकत असत त्याकडे तुमचे नसले तरी इतरांचं लक्ष* *असते.तुमचे विचार समजले की तुम्ही समजलात।* *सुंदर विचार करा आणि सुंदर व्यक्तिमत्त्व घडावा.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्यातील अहंकाराने आपल्या  रागावर नियंत्रण कधीच ठेवता येत नाही आणि त्यामुळे आपल्या जीवनात अनेक कटू प्रसंग ओढवले जातात.त्या काळात काय होत आहे याचेही भान राहत नाही.जेव्हा आपल्यातील राग संपून जातो तरी अहंकारमात्र तसाच चिटकून राहतो. पुन्हा पुन्हा आपल्यातील अहंकार जागा होऊन तीच ती कृती करण्यासाठी प्रेरणा देतो.त्यामुळे आपल्या जीवनात खूप काही नुकसान सोसावे लागते.म्हणून आपला राग आणि अहंकार नष्ट करायचा असेल तर पहिल्यांदा आपल्यातील अहंकाराला तिलांजली द्यायला हवी नंतर आपोआपच आपल्यातील राग नष्ट होईल आणि हे दोन्ही आपल्या जीवनातून गेले की, जीवन सुखावह होईल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मनातील अहंकार नष्ट करणे* एकदा एक राजा एका चांगल्या सदगुणी, माणसाकडे सत्पुरुषाकडे गेला आणि म्हणाला, तुम्ही मागाल ती भेटवस्तू देण्याची माझी इच्छा आहे. बोला, काय पाहिजे ? माझा सारा खजिना, राजवाड्याचे वैभव, का माझे शरीर ? ते सत्पुरुष म्हणाले, खजिना, राजवाडा ह्या गोष्टी तुझ्या प्रजेच्या आहेत. त्यांचा तू केवळ रखवालदार आहेस. तुझ्या शरीरावर तुझ्या पत्नीचा, मुलाबाळांचा हक्क आहे. साधूचे ते बोलणे ऐकून राजा गोंधळला आणि म्हणाला, मग माझी स्वतःची अशी कोणती वस्तू आपणांस मी भेट देऊ ? तुम्हीच सांगा. तो महात्मा उद्गारला, तुझ्या मनातील अहंकार हा सर्वस्वी तुझाच आहे. त्याचे दान तू अवश्य करु शकतोस. अहंकाराचे तण सतत उपटून टाकून मनाची मशागत करावी लागते. माणसाच्या अंगी अहंकार कधीही नसावा. अहंकाराने आपली माणसे आपल्यापासून दूर होण्यास वेळ लागत नाही. तात्पर्यः हे शरीर नश्वर आहे.या नश्वररुपी शरीरातील मनाला कधीही अहंकाराचा वारा लागू देऊ नका. कारण जे आपले नाही त्यावर अहंकार बाळगणे व्यर्थ. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

*माझा परिचय* *नावः श्रीमती प्रमिला कुंडलीक सेनकुडे* पदः सहशिक्षिका कार्यरत शाळाः जि.प.प्राथमिक शाळा गोजेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड. शिक्षणः B.A.(Ded ) छंद व आवडः सामाजिक कार्याची आवड,वाचनाची आवड, संघटणात्मक कार्याची आवड, (काव्यलेखन, चारोळी, लेख) लिखाणाचीआवड,वृक्ष लागवड व जोपासना करणे, शालेय स्तरावर शैक्षणिक विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्याची आवड व गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याची आवड. तसेच रोटरी क्लब हदगाव तर्फे विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबविणे. त्याचप्रमाणे (माझे वैयक्तिक पातळीवरील विविध उपक्रम आहेत यामध्ये *सामाजिक वार्षिक उपक्रम* दरवर्षी.आई-बाबाची पुण्यतिथी (अनाथ आश्रमात व डिजिटलशाळेसाठी मदत म्हणून आर्थिक सहकार्य करणे.) तसेच लेझीम स्पर्धेत विशेष मंडप सहयोग दरवर्षी देणे.तसेच एका विद्यार्थ्यांचा शालेय खर्च करणे. 〰〰〰〰〰〰〰 *तंत्रज्ञानात्मक वाटचाल* *ब्लाॕग निर्मितीतुन , आणि युटुब चॕनल च्या माध्यमातून शैक्षणिक माहिती व उपक्रम राबविणे,फ्रेश शालेय परिपाठ या उपक्रमातून बोधकथा हे सदर* *प्रकाशित साहीत्य* *'वास्तव एक......सत्य' काव्यसंग्रह* दिवाळी अंक,विविध मासिके आणि वृतपञात कविता ,लेख प्रकाशित. *भुषवित असलेले पदे* १) म.रा.प्रा.शिक्षक महिला आघाडी संघ जिल्हासरचिटणीस नांदेड. ३) जिजाऊ ब्रिगेड कार्याध्यक्षा हदगाव २) रोटरी क्लब सदस्या हदगाव. ३) काव्यप्रेमी शिक्षकमंच जिल्हाध्यक्षा नांदेड. 〰〰〰〰〰〰 *आजपर्यंत मिळालेले पुरस्कार व सन्मानः* १) प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम शिक्षणाची वारी सन्मानपञ २) 'गुणी' शिक्षक गौरव पुरस्कार ३) आई गौरव पुरस्कार ४)कै.देवराव प्रभुजी पाटील सेवाभावी संस्था तर्फे शिष्यवृत्ती पुरस्कार ५) 'गौरव गुणवंताचा' पुरस्कार (सहकारी पतपेढी शिक्षण विभाग मर्यादित जिल्हा परिषद नांदेड.) ६) मुलींची १००% पटनोंदणी पुरस्कार ७) कुसुमताई चव्हाण 'महिला भूषण' पुरस्कार ८) म.अॕ.पॕनल(MAP) तर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार (संमेलन नाशीक) ९) रोटरी क्लब, हदगाव तर्फे (Nation Builder Award) १०) गुरुकुल महाराष्ट्र समूहातर्फे सन्मानपञक व गौरवचिन्ह ११) मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर तर्फे राज्यस्तरीय काव्य पुरस्कार १२) 'आम्ही सावित्रीचा लेकी' आयोजित राज्यस्तरीय उपक्रमशिल शिक्षिका पुरस्कार १३) स्वामी विवेकानंद शिक्षक पतसंस्था हदगाव/हिमायतनगर तर्फे दोनवेळेस सत्कार व सन्मानचिन्ह (२०१७ तसेच २०१८ ला) १४) मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर तर्फे 'गुरू गौरव' पुरस्कार १५) 'आस शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना' तर्फे ' राज्यस्तरीय अध्यापक पुरस्कार' १६) नांदेड भारत स्काऊटस आणि गाईडस सन्मानचिन्ह १७) गुरुगोविंदसिंघजी व राजे छञपती प्रतिष्ठान तर्फे प्रेरणा पुरस्कार नांदेड १८) राज्यस्तरीय हिरकणी साहित्यगौरव पुरस्कार जालना १९) विविध स्पर्धात्मक आॕनलाईन सन्मानपञे व व्हिडीओ निर्मिती प्रमाणपत्र २०) महाराष्ट्र शिक्षक पॕनल (MSP) तर्फे ('राज्यस्तरीय शैक्षणिक व्हाटस्अॕप ग्रूप) राज्यस्तरीय सेवासन्मान आदर्श शिक्षिका' सन्मानपञ २१) मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार (सेवाभावी संस्था गुरधाळ ता.देवणी जिल्हा लातूर.) २२)गुरू गौरव आदर्श शिक्षक पुरस्कार २३) काव्यरत्न पुरस्कार मराठीचे शिलेदार बहूउद्देशिय संस्था नागपूर २४) (जाहीर झालेला पुरस्कार १३ जानेवारी २०२०) राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार बोधी ट्री एज्युकेशन संस्था औरंगाबाद. 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

*चारोळी - सामंजस्य* *प्रेमाने,जिव्हाळ्याने, *सहकार्याने राहूया सारे* *नकोच व्देश,कपट भावना* *सामंजस्याने वागूया सारे.* 〰〰〰〰〰〰〰दि.०९-०१-२०२० *प्रमिला सेनकुडे

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 09/01/2020 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● भारतीय प्रवासी दिन ● शहीद दिन - पनामा 💥 ठळक घडामोडी :-  ● १८५८ - प्रजासत्ताक टेक्सासच्या पहिल्या अध्यक्ष ऍन्सन जोन्सने आत्महत्या केली. ● १८८० - वासुदेव बळवंत फडके- क्रांतिकारक यांना राजद्रोहाच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा. 💥 जन्म :- ● १९२२ - हरगोविंद खुराना, नोबेल-पुरस्कृत भारतीयवंशी जैव-रसायनशास्त्रज्ञ. ● १९२७ - रा.भा. पाटणकर- सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक ,समीक्षक. ● १९३४ - महेंद्र कपूर, भारतीय पार्श्वगायक. 💥 मृत्यू :- ● १९२३: पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS) सत्येंद्रनाथ टागोर  ● २००३: गीतकार व कवी कमर जलालाबादी  ● २००४ - शंकरबापू आपेगावकर- राष्ट्रीय ख्यातीचे पखवाजवादक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *केंद्राच्या धोरणांविरोधात देशभरात कामगार संघटनांचा बंद, कोल्हापुरात राजू शेट्टींच्या नेतृत्वात आंदोलन, औरंगाबाद, चंद्रपूर, नाशकात कामगारांचा मोर्चा, मुंबईत या बंदचा फारसा परिणाम नाही* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *इराणमध्ये युक्रेनचं प्रवासी विमान दुर्घटनाग्रस्त, विमानातील सर्व 180 प्रवाशांचा मृत्यू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *वाशिम, नंदुरबार, पालघर जिल्हा परिषदेत त्रिशंकू स्थिती, राज्यातील महाविकास आघाडीचा पॅटर्न झेडपीत राबण्याची शक्यता, अकोल्यात आंबेडकरांच्या भूमिकेकडे लक्ष* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नागपूर जिल्हा परिषदेत भाजपला मोठा धक्का, काँग्रेसकडून भाजपची धुळधाण, तर धुळे जिल्हा परिषदेवर काँग्रेसला धूळ चारत भाजपचं निर्विवाद वर्चस्व* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचं राजकारणात अधिकृत लाँन्चिग होणार, येत्या 23 तारखेला पक्षाच्या अधिवेशनात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *'छपाक'च्या रिलीजचा मार्ग मोकळा, सिनेमाच्या प्रदर्शनावरील स्थगितीची मागणी याचिकाकर्त्यांकडून मागे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हानिहाय पालकमंत्र्याची यादी केली जाहीर, आ. अशोक चव्हाण नांदेडचे तर आ. बच्चू कडू हे अकोल्याचे पालकमंत्री* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *जनसेवेतच ईश्वराचीही सेवा* माणसाच्या आयुष्यात संकटे आली की, त्याला कुणाचा तरी आधार हवा असतो. हा आधार शारीरिक जरी नसला मानसिक असला तरी त्यांना ते पुरेसे असते. त्यामुळे दुःखी, कष्टी माणसे देवाचा धावा करता......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://shopizen.page.link/orX5uTd2bzd8Jt9a9    लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चांदणे* - सावित्री गायकवाड/कांबळे उपशिक्षिका -शाळा दापोडी, ता. दौंड , जि . पुणे किती सुंदर चांदणे गोड भासे मज निळ्या नभाची निळाई पांघरून यावी नीज ॥१॥ नभी तारकांनी जणू वसविले नवे गाव वाट असेल कोठूनी त्याचा लागेल का ठाव ॥२॥ सूर्य ढगाआड लपे वर चांदोमामा आला आजी सांगूनीया गोष्ट घास भरवेल मला ॥३॥ ढगा वाऱ्यांच्या कुशीत चंद्र तारका खेळती मनोहर रूप त्यांचे मज खूप आवडती ॥४॥ *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *दक्षिण आफ्रिकेतील सर्वात मोठे वाळवंट कोणते ?* कलहरी 2) *UNO चे महासचिव कोण आहेत ?* एंटोनिओ गुटेरेस 3) *आशियातील ताज्या पाण्याचा सर्वात मोठा तलाव कोणता ?* वूलर तलाव 4) *भारतातील कोणत्या घटकराज्यास सर्वाधिक समुद्रकिनारा लाभला आहे ?* गुजरात ( 1600 km ) 5) *तिन्ही बाजूंनी पाणी व एका बाजूने जमीन असणाऱ्या भूप्रदेशास कोणती संज्ञा वापरतात ?* द्विपकल्प *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुहास अनिल देशमुख 👤 अजित राठोड 👤 भीमाशंकर भालेकर 👤 माधव नरवाडे 👤 राजेश रामगिरवार 👤 गजानन सोनटक्के 👤 माधव नरवाडे 👤 श्रीनिवास रेड्डी बाळापूर *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रतिबिंबांचं देखणेपण आधिक भावतं माणसाला. म्हणूनच बाहेर पडण्याआधी, एखाद्या समारंभाला जाण्याआधी आपण आरशातील आपलं प्रतिबिंब पुन्हा पुन्हा निरखून पाहत असतो. मनाची खात्री झाल्यावर दर्पणाच्या मोहातून मुक्त होत असतो. हे आपण असं का करीत असतो तर स्वत:सह इतर बघ्यांनाही बरं वाटावं म्हणून.* *स्त्रियांप्रमाणे पुरूषांनाही असं नीट-नेटकंपण राखून समूहात मिरवायला आवडत असतं. अशावेळी महिलांना महिलांकडून मिळणा-या दादेपेक्षा एखाद्या नजरेत भरणा-या अनोळखी पुरूषानं नजरेनं वा उदगारानं दिलेली दाद स्त्रियांनी दिलेल्या दादेपेक्षा खूप हुरळून टाकणारी असते. त्यावेळी ती स्त्री धन्यतेने कधी स्वत:कडे तर कधी त्या पुरूषाच्या नजरेकडे नजर सोडवत पाहत असते. अशावेळी स्वत:कडे पुन्हा पुन्हा कौतुकानं निरखून पाहणं हे आरशातील प्रतिबिंबाकडे पाहण्याच्या अनेकपट सुंदर असतं. ज्या उद्देशानं आरशात वारंवार पाहून ती व्यक्ती बाहेर पडलेली असते, त्याची मनभावक फलश्रुती त्या व्यक्तीने अनुभवलेली असते. हेच पुरूषांच्या बाबतीतही घडतं. पण या मनाच्या सहजधर्म व्यवहारात पुरूषाला महिलेनं द्यावयाची दाद जरा संभाळून द्यायची असते. कारण पुरूषी नजर सळसळून तिच्या नजरेवर रेंगाळायला फार काळजी घेत नाही. लवकरच ती नजर 'आपलीशी' वाटायला लागते. कारण स्त्रियांइतका पुरूषी संकोच सावध नसतो.* *मुक्त मनाच्या अशा तरलतरंगी लहरी-लहरा प्रत्येक जण अनुभवत असतो. म्हणून स्त्री-पुरूषानं, त्याहीपेक्षा पती-पत्नीनं परस्परांच्या प्रतिबिंबाला जपावं. ते इतरांच्या नजरेत खुपावं असं काही घडू नये.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 👁👀👁👀👁👀👁👀 *--संजय नलावडे , मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *हे जगणे अवघड झाले आता* *सोन्याचा होता धूर,* *आता नुसत्याच उरल्या बाता।* *चकाकत्या खोट्याला कवटाळीती* *सगळे।* *सत्याला इथे वाली न कुणी आता।* *हे विदारक दृश्य आपल्याला समाजात* *पदोपदी अनुभवायला* *मिळते.* *पण अंतिम सत्य काही वेगळेच* *असते.24 कॅरेट लाच नेहमी कस* *लागतो.* *समाजात जो सरळ व सत्याने वागतो* *त्याला नेहमीच अन्यायाचे* *घाव सोसावे लागतात.* *कारण....* *जंगलात लहान मोठी,* *वाकडी तिकडी* *अशी अनेक प्रकारची झाडे* *वाढलेली असतात.* *परंतु अशी झाडे कोणीच* *तोडत नाही.* *पण जी सरळ वाढलेली असतात* *त्यांना मात्र कुऱ्हाडीचे घाव* *सोसावे लागतात.* *रस्ता जर खड्डयांचा आणि कच्चा असला ना तर त्यावर लोड कमी* *असतो.पण तोच प्लेन आणि सुपर असुद्या सगळ्या गाड्या त्याच* *रोडवरून धावतील, त्याच्यावरच जोरजोराने आदळतील.* *तरीही निवड सत्याचीच करा.* *सगळ्यात महत्वाचे म्हणजे* *सत्य मेव जयते।* *सत्य परेशान होता है,पराजित नही।* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रगती ही अधोगतीच्या विरुद्ध प्रवास करत असते आणि अधोगतीला मागे टाकून पुढे जाते.अधोगतीचे तसे नाही,कारण अधोगती ही प्रगतीला मागे खेचण्याचे प्रयत्न करते आणि कधी-कधी ती यशस्वीही होते.याचे कारण असे आहे की,माणसाच्या विकृत मनावर ती प्रथम आघात करुन आपल्याकडे खेचते त्यामुळे अशा विकृत मनाला चांगले करावेसे वाटत नाही त्यामुळे जेवढे काही करायचे ते वाईटच होते हे अधोगतीला माहीत आहे.पण माणसाने एक लक्षात ठेवायला हवे की,अधोगतीने पदोपदी अपमान होते,अपयश मिळते आणि जीवनात यशस्वी होऊ शकत नाही.प्रगतीने यश प्राप्त होते,मन सशक्त होते, मनाला आशावादी आणि प्रयत्नवादी बनवते त्यामुळे माणसांमध्ये नवे काहीतरी करण्याची दिशा प्रगतीतून दिसायला लागते तसेच मान सन्मान मिळवून देते.म्हणून अधोगतीला कधीही आपल्या जीवनात स्थान देऊ नये. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *योग्य कार्यास शक्ती खर्ची घालणे* उपनिषदातील एक प्रसंग आहे. परमेश्‍वराने देवांवर कृपा केली आणि त्‍यांनी शक्तिशाली असुरांवर विजय मिळविला. विजयी झाल्‍यावर प्रत्‍येक देवतेला अहंकार निर्माण झाला. त्‍यातील प्रत्‍येक जण विजयाचे श्रेय स्‍वत:कडे घेत आणि दुस-याचे योगदान तुच्‍छ मानत असे. यामुळे देवतांमध्‍ये विनाकारण वाद चालु झाले. त्‍यातून कटूता निर्माण होऊ लागली. हे पाहून परमेश्‍वराने विचार केला की असेच जर होत राहिले तर असुर परत देवांवर चढाई करतील आणि यांच्‍यातील वैमनस्‍य यांना पराजित करेल. ही समस्‍या सोडविण्‍यासाठी ईश्‍वर एक विशाल यक्षाच्‍या रूपात देवतांच्‍या समोर हजर झाले. देवतांनी आश्‍चर्याने त्‍यांना पाहिले आणि त्‍यांचा परिचय करून घेण्‍यासाठी सर्वात प्रथम अग्नि देवतेकडे गेले. यक्षाने त्‍यांना विचारले,''आपण कोण आहात?'' अग्नि देवतेने स्‍वाभिमानाने उत्तर दिले,'' आपण मला ओळखत नाही? मी तेजस्‍वी अग्नि आहे. मी ठरवल्‍यास सारी पृथ्‍वी जाळून भस्‍म करून टाकीन.'' यक्षाने त्‍यांना एक वाळलेली गवताची काडी ती जाळण्‍यास सांगितले. परंतु अग्नी देवता ती जाळू शकले नाहीत. मग पवन देवता यक्षाचा परिचय जाणून घेण्‍यासाठी गेले. तेव्‍हाने यक्षाने त्‍यांनाही परिचय विचारला मग पवन देव म्‍हणाले,'' मी पवन आहे, मी ठरवले तर संपूर्ण ब्रह्मांड उडवून देईन.'' यक्षाने तीच वाळलेली काडी त्‍यांना उडवण्‍यास सांगितले. पण पूर्ण जोर लावूनसुद्धा पवनराज ती काडी उडवू शकले नाही. त्‍यानंतर इंद्र या देवतेकडे निघाले, तोपर्यंत यक्ष निघून गेले होते. आता तेथे पार्वती प्रकट झाली आणि इंद्राला यक्षरूपी परमेश्‍वराचा परिचय दिला. आता देवतांना त्‍यांच्‍या शक्तीचा अंदाज दिला होता आणि त्‍यांचा अहंकार नष्‍ट झाला.  तात्‍पर्य :- अहंकार आणि अहंका-याचे पतन निश्चितच होते. आपली शक्ती योग्‍य कार्याला लावल्‍यास सार्थक होत असते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

*पतंग* *बालसाहीत्य* (दि.०८-०१-२०२०) उंच नभात उडतो पतंग दोर राही जमीनीवर ध्येय बांधली जसे मनाशी स्वप्ने साकारले जसे उराशी रंगबिरंगी त्याचे अंग उडण्यात असतो दंग झेप घेता आकाशी फडफडतो कसा वार्याशी हवेचे झेलीत हेलकावे इकडूनतिकडे फडकावे वरवर चढीत जातो स्वप्न मनीचे साकारतो पतंगासम ध्येय असावे मधेच ना कुठे कटावे दोर बांधावा घट्ट असा सुटेलना धागा पुर्तीचा.

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 08/01/2020 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  ● जयपूर येथे राजस्थान विद्यापीठाची स्थापना. ● २००५ - अणुऊर्जावर चालणारी यु.एस.एस. सान फ्रांसिस्को (एस.एस.एन.०७७१) ही पाणबुडी पाण्याखाली पूर्णवेगात असताना समुद्रातील डोंगराशी धडकली. एक खलाशी ठार. पाणबुडी पृष्ठभागावर येण्यात यशस्वी. ● २०००- लता मंगेशकर यांची १९९९ साठीच्या एन.टी. रामाराव राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड. 💥 जन्म :- ● १९०९ - आशापूर्णादेवी- ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणार्‍या प्रथम लेखिका. ● १९४५ - प्रभा गणोरकर- मराठी लेखिका. ● १९४२- स्टीफन हाकिंग, इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ व लेखक 💥 मृत्यू :- ● १९६७ - श्रीपाद कृष्ण बेलवलकर- प्राच्यविद्यापंडित. ● १९७३ - नारायण भिकाजी परुळेकर ऊर्फ नानासाहेब परुळेकर, मराठी पत्रकार. ● १९७३ - स.ज. भागवत -तत्त्वज्ञ व विचारवंत. ● १९९२ - द.प्र. सहस्रबुद्धे- 'आनंद' मासिकाचे माजी संपादक. ● १९९५-मधू लिमये, स्वातंत्रसैनिक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *निर्भया प्रकरणातील आरोपींना 22 जानेवारीला फाशी, पटियाला कोर्टाचा महत्वाचा निकाल, 7 वर्षांची प्रतिक्षा संपली * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *जलयुक्त शिवारावरुन सरकार आणि भाजपमध्ये जुंपली, कामे थांबवल्यास तीव्र आंदोलनाचा भाजप आमदार जयकुमार रावलांचा इशारा, तर निधी न देण्याचे नाशिक विभागीय आयुक्तांचे आदेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *एल्गार परिषद आणि कोरेगाव-भीमा प्रकरणाचा तपास संशयाच्या भोवऱ्यात, पुणे पोलीस अडचणीत, गृहमंत्र्यांकडून कारवाईचे संकेत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नागपूर, अकोला, वाशिम, धुळे, नंदुरबार आणि पालघर जिल्हा परिषदेसाठी मतदान पूर्ण, आज लागणार निकाल, तर परभणीत महाराष्ट्र विकास आघाडी पॅटर्न यशस्वी, अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला विटेकर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *राज्यातील तरुणांना सरकारचं न्यू ईयर गिफ्ट, हजारो पदांसाठी भरती, विविध सरकारी पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या आखाड्यात झालेल्या अंतिम सान्यात नाशिकचा हर्षवर्धन सदगीर याने लातूरच्या शैलेश शेळकेवर मात करत मानाची चांदीची गदा उंचावली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने श्रीलंकेवर 7 गडी राखून मात केली आहे. या विजयासह भारताने तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••            *सेमी इंग्रजीची समस्या* राज्याचे शिक्षण सचिव मा. नंदकुमार यांनी नुकतेच बीड मध्ये प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शिक्षकांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, अजून दोन वर्षे या पदावर राहिलो तर सेमी इंग्रजी बंद करू कारण अर्धे हे अर्धे ते असे नको तर आपणास दोन्ही भाषा चांगल्या प्रकारे अवगत असणे गरजेचे आहे. सचिव साहेबांनी हा सेमी इंग्रजीचा मुद्दा खरोखरच विचारात घेणे आवश्यक आहे. कारण भविष्यात सेमी इंग्रजी ही एक समस्या बनून समोर येऊ नये.............. वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://shopizen.page.link/VAMMydeaRfpKJi1E7    लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गणपती* कवयित्री ©® श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड,जिल्हा. कोल्हापूर 9881862530 आले आले गणपती बाप्पा, नाचू गाऊ बागडू या. रोज रोज आनंदाने, आरती आता गाऊया . लाडू , मोदक प्रसादाला, नाही तोटा मौजमजेला. बाप्पा खूप छान झाले, सुट्टी मिळाली शाळेला. दुर्वा ,आघाडा रोज तुला, शोधून आणतो नियमाने. बांधून जुडी एकवीसची, देतो तुला काळजीने. आरास पाहून तुझी, जीव आमचा हरकला. रोज रोज तुझ्यासमोर, आवडते आम्हाला नाचायला. दू:ख एकच बाप्पा मला, पुराने सारे वाहून गेले. पावसाला विचार ना रे जरा, चुकीचे काय असे घडले ? *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *घटकराज्याचा घटनात्मक प्रमुख कोण असतो ?* राज्यपाल 2) *उपराष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे सादर करतो ?* राष्ट्रपती 3) *घटकराज्याच्या आणीबाणीला काय म्हणतात ?* राष्ट्रपती राजवट 4) *राष्ट्रीय पोलीस अकादमी कोठे आहे ?* हैदराबाद 5) *राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकांचे आयोजन कोण करते ?* निवडणूक आयोग *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 बालाजी पेटेकर, खतगावकर       साहित्यिक तथा चित्रकार 👤 शेख आसिफ, धर्माबाद 👤 मंगेश जाधव 👤 आकाश गाडे, येवती 👤 पोतन्ना मुदलोड, येवती 👤 आनंदा कुमारे 👤 मारोती गोडगे 👤 अनिल दिपके *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *पुण्यमयी दे आम्हा अक्षर वरदान*    *ज्ञान बनो कर्मशील, कर्म ज्ञानवान।* *ज्ञान आणि कर्म यांचा जीवन व्यवहारात अन्योन्य संबंध कसा असावा आणि त्यानं जीवनविकास कसा घडवावा, हा अर्थपूर्ण संदेश या गीतात आहे. ज्ञान आणि कर्म हे दोन वेगवेगळे मार्ग नाहीत, तर ज्ञानानं कर्मशील व्हावं आणि कर्मानं ज्ञानवान व्हावं, असा संदेश या गीतात आहे. सर्व विद्यामंदिरात ज्ञानसाधना कर्ममार्गानंच झाली पाहिजे, कर्ममार्गावर ज्ञानामृताचे झरे असले पाहिजेत, तरच ज्ञानाचा उपयोग जीवन उभारणीसाठी होईल.* *विज्ञानानं कितीही प्रगती केली, तरी जर विनाशाचा मार्ग दाखवला, तर ते विज्ञान आणि ती विज्ञानाची प्रगती नसलेलीच बरी. विज्ञानानं करूणेच्या चरणाशी नत व्हायला हवं; कारण करूणा हा सामाजिक, सामूहिक उत्थानाचा शांतीमार्ग असतो. या शांतीमार्गाने मानवतेच्या मंदिराची उभारणी करायची असेल, तर ' ज्ञान बनो कर्मशील, कर्म ज्ञानवान ' हा संदेश सर्वांनी अंगी बाणवला पाहिजे.*          ••●🌴‼ *रामकृष्णहरी* ‼🌴●••      🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴     *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *हे जीवन सुंदर आहे.प्रत्येक क्षणाला सुंदर करा.यासाठी भारतीय संस्कृतीत* *खूप सारे उत्सव आहेत.प्रत्येक सण ,* *उत्सवामघ्ये नाविन्याचा शोध घ्या व* *जीवन आनंदी करा.प्रत्येक नात्यात नवचैतन्य भरा आणि* *आनंदित रहा.* *कोणतेही नाते प्रत्येक क्रियेने उज्ज्वल करता येणे, ही खरी सार्थकता.* *परंपरेने किंवा संस्कृतीने जी सणावारांची यादी केली, त्या* *प्रत्येक सणाचा अन्वयार्थ नव्याने शोधायला हवा; तरच* *आनंद-परमानंद-ब्रम्हानंद या पाय-या चढता येतील. वाद आणि* *भांडणाच्या प्रकारात जो अडकतो त्याचा फास आधिकाधिक* *घट्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे* *स्नेहभावनेतून जग जोडले पाहिजे.* *भारतीय संस्कृतीत प्रत्येक दिवस स्नेहाद्रता पेरत येतो, म्हणून* *सण हे उत्सवांचे प्रतीक म्हणून साजरे व्हावेत.* *व्हाट्सएपच्या व फेसबुकच्या गराड्यात सण, उत्सव व नाती यांना* *लांब करू नका,प्रत्येकाशी बोलण्याचा आनंद मनाचा छानसा* *खुराक आहे हे विसरू नका.* *नात्यांचा, घटनांचा अर्थ लावत आपल्याला मनाचा स्वयंविकास जेव्हा साधता येईल, तेव्हाच सगळे सण-उत्सव प्रतीकरूप होतील. रोजचा दिवस येतो आणि जातो. रोजच्या कामात मग्न असणारे आपण काही नवीन करतो का, किंवा जे कुठलेही काम करतो त्याच्यात काही नवीन शोधतो का ? नसल्यास ते जमले पाहिजे. नित्यनूतनतेचा ध्यास जोवर लागत नाही, तोवर आयुष्यातून शिळेपणा जाणार नाही. प्रत्येक क्षणाचा उत्सव करणे हे आपले कर्तव्य आहे. या भावनेने जगण्याच्या अनेकविध अंगांकडे पाहता आले पाहिजे.* *मग करूया प्रत्येक क्षणाला सोनेरी आपला दृष्टिकोन बदलून सर्वत्र* *पाहूया.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्याप्रमाणे सुगंधीत असलेल्या फुलांना आम्ही सुगंधीत आहोत म्हणून तुम्ही आमच्याकडे या आणि सुगंध घ्या असं कधीच म्हणावं लागतं नाही.आपोआपच सुगंध असणा-या फुलांकडे लोक आकर्षित होतात. त्याचप्रमाणे सज्जन माणसे कधीच कुणाला म्हणत नाहीत की,तुम्हीआमच्याकडे आमच्या सहवासात या आणि आमचे सद्गुण घ्या. आपोआपच सर्वसामान्य माणसे सज्जनांच्या सहवासात जाऊन आपल्यातील असलेल्या दुर्गुणावर मात करुन सद्गुणी होण्याचा प्रयत्न करतात. तात्पर्य असा की सद्गुणांचा सहवास हाच दुर्गुणावर मात करु शकतो.त्यासाठी  आपली मानसिकता असावी  लागते. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌸🌱🌸🌱🌸🌱🌸🌱🌸🌱🌸 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वच्छतेची सवय* रामरावचा खानावळीचा व्यवसाय अगदी जोरात सुरु होता पण काही दिवसांनी दिनकररावने त्यांच्याच शेजारी नवीन भोजनालय सुरु केले आणि रामरावची खानावळ पार बसली. त्याला रोज ग्राहकांची वाट पाहावी लागे. एके दिवशी रामरावचा मित्र माधव त्याच्याकडे आला तर रामरव एकदम निराश बसलेला दिसला. त्याने कारण विचारताच रामरावने त्याला सर्व हकीकत सांगितली. त्यावर माधव त्याला म्हणाला, अरे, काही सांगतो त्यावरुन तू लक्षात घे, तुझे काय चुकले ते. तुझ्या खानावळीत जो चवीचा स्वयंपाक होतो तो दिनकररावच्या खानावळीत होत नसला तरी त्याच्या खानावळीची स्वच्छता आणि टापटीप ग्राहकाला खेचत आहे. तू देखील बदल केलास तर तुझी खानावळ पुन्हा जोरात चालेल, यात शंका नाही. रामरावला आपली चूक उमगली. तात्पर्य : स्वच्छता ही सर्वत्र असावी. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

*ऊब मायेची* (दि.०८-०१-२०२०) ऊब मायेची असावी अनाथास ती लाभावी घरट्यातला पिलांची माय पिलास दिसावी असा मायेचा ओलावा कुठ नाही फिटणारा त्याचा पाझराने जीव बाळाचा आतुरणारा सानुल्याची ग माय जशी असते दुधाची ग साय असा जीव वेडा सारा मायेचा असतो झरा न्यारा कोणा?कोणा? मी सांगू ऊब माऊलीची कशी? तिची सावलीही असते जगाहुनही न्यारी जशी 〰〰〰〰〰〰〰 *श्रीमती प्रमिला सेनकुडे*

*चारोळी - ऊब मायेची* ऊब मायेची असते न्यारी लेकरांची माया असते त्यातच सामावलेली अशी ही माय माऊली तिची प्रित निराळी. 〰〰〰〰〰〰 दि.०७-०१-२०२०

*उपक्रम* *चिञकला स्पर्धा* आज दिनांक ०७-०१-२०२० रोजी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव तसेच आनंद मिळण्यासाठी इयत्ता पहिली व दुसरी चा विद्यार्थ्यांची वर्गपातळीवर चिञकला स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतील इयत्ता पहीलीतील प्रथम क्रमांक *ओमकार संतोष चंद्रवंशी* इयत्ता दुसरीतील प्रथम क्रमांक *युवराज बाबुराव चंद्रवंशी* या दोन्ही विजेत्या बालचमूस बक्षिस देण्यात आले. व सर्वांचे अभिनंदन करण्यात आले. 🌹🌹🌹🌹🌹🌹 *संदेशः 'छान छान उपक्रम राबवूया,बालकाचा आनंद वाढवूया.'* 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 〰〰〰〰〰〰〰 ✍श्रीमती प्रमिला सेनकुडे (वर्गशिक्षिका)

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 07/01/2020 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  ● गुरूचे आयो,युरोपा,गॅनिमीड व कॅलिस्टो हे चार चंद्र गॅलिलिओ ने दुर्बिणीद्वारे शोधले ● सर्व्हेअर' हे अमेरिकेचे यान चंद्राच्या 'टायको' या विवराकाठी उतरले ● १७८९: अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन निवडून आले. ● १९७२- कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्राचे काम पूर्ण झाले* 💥 जन्म :- ● १९२० - सरोजिनी बाबर - लोकसाहित्याच्या अभ्यासक. ●१९२१ - चंद्रकांत गोखले, मराठी रंगभूमी नट व चित्रपट अभिनेता. ● १९४८ - शोभा डे, भारतीय लेखिका. ● १९५० - जॉनी लिव्हर, भारतीय अभिनेता. ● १९७९ - बिपाशा बासू, भारतीय चित्रपट अभिनेत्री. 💥मृत्यू ● १९८९ - मिचियोमिया हिरोहितो - जपानचे सम्राट. ● २००९-अच्युतराव आपटे,स्वातंत्रसैनिक, *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, 8 फेब्रुवारीला मतदान तर 11 फेब्रुवारीला निकाल, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिष्ठा पणाला * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई: पाच दिवसांचा आठवडा करावा या आणि इतर मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी येत्या ८ जानेवारी रोजी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या या संपाला राज्य राजपत्रित महासंघाने पाठिंबा दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदी भाजपची बाजी, जालन्यात मात्र माघार, तर अमरावतीमध्ये महाविकास आघाडीची सत्ता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पुणे सातारा महामार्गावरील  खेड- शिवापूर टोलनाका बंद करण्याची पुणे जिल्हाधिकाऱ्यांची शिफारस, महामार्गाचं काम वर्षानुवर्षे रखडल्यानं निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मातोश्रीबाहेर ताब्यात घेतलेल्या आंदोलक शेतकऱ्याची कृषीमंत्र्यांकडून दखल, महेंद्र देशमुखांना दादा भुसेंचं बोलावणं, तहसीलदारांसह बँक अधिकारीही बैठकीला, सकाळी ही तहसील कार्यालयात आंदोलन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मराठीच हवी...!  इंग्रजीत कागदपत्रे सादर केल्याने मुंबईत शिवसेना आमदार दिलीप लांडे यांचा संताप, अधिकाऱ्यांवर कागदपत्रे फाडून  फेकली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *महाराष्ट्र केसरी स्पर्धेत धक्कादायक निकाल, गतविजेत्यासह उपविजेत्याचं आव्हान संपुष्टात, बाला रफिक शेख आणि अभिजीत कटके स्पर्धेबाहेर, सोलापूरच्या माऊली जमदाडेची बालावर मात, तर हर्षवर्धन सदगीरकडून अभिजीत चितपट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *एकच ध्यास ; वाचन विकास* शिक्षण प्रक्रियेतील वाचन हे एक प्रमुख कौशल्य आहे. ज्यावर विद्यार्थ्यांची भविष्यातील प्रगती अवलंबून असते. भाषा विकासातील श्रवण व भाषण यानंतरचा टप्पा म्हणजे वाचनकौशल्याचा. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ स्टुअर्ट रिची यांनी आपल्या संशोधनात असे म्हटले आहे की, मुलांची वाचन क्षमता आणि त्याला किती लहान वयात वाचन करता येते त्यावर त्याची पुढील प्रगती अवलंबून ........... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.            https://shopizen.page.link/CcLgnaoifdooGqG76 लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बाप* - श्रीकृष्ण उबाळे छाया असतो राया असतो बाप घराचा पाया असतो कीव असतो निव असतो बाप घराचा जीव असतो नाक असतो चाक असतो बाप घराचा धाक असतो मेवा असतो हेवा असतो बाप घराचा ठेवा असतो आन असतो मान असतो बाप घराची शान असतो बाप खरंच हळवा असतो बाप घराचा तळवा असतो *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारताच्या केंद्रीय कायदेमंडळाचे नाव काय आहे ?* संसद 2) *घटकराज्याचा घटनात्मक प्रमुख कोण असतो ?* राज्यपाल 3) *भारतात आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार कोणाला असतो ?* राष्ट्रपती 4) *राष्ट्रपतीला गोपनीयतेची शपथ कोण देतात ?* सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश 5) *प्रधानमंत्री आपला राजीनामा कोणाकडे देतात ?* राष्ट्रपती *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 कुणाल पवारे, शिक्षक तथा पत्रकार       सामना, कुंडलवाडी शहर प्रतिनिधी 👤 सार्थक राजेंद्र बोडखे 👤 दीपक मालूसरे 👤 विश्वनाथ चौधरी 👤 अभय साबळे 👤 महेंद्र शिंदे 👤 विजय गायकवाड 👤 प्रथमेश घाडगे 👤 अशोकरावजी गावडे 👤 अमर नाईकवाडे 👤 वरद गजानन लोहेकर 👤 युवराज ढगे सौजन्य :- facebook Birthday Event *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एक पंडित होते. नावेतून रोज पलीकडच्या मंदिरात मंत्रोच्चार करीत देवदर्शनार्थ जात असत. नावाडी अडाणी होता. एक दिवस न राहून त्याने पंडितास विचारले,'तुम्ही रोज काय पुटपुटत असता, ते मला काही कळत नाही. सांगाल का? पंडित म्हणाले,'अरे मी संस्कृत मंत्र म्हणतो. तुला संस्कृत नाही येत? तुझं अर्ध आयुष्य वाया गेलं म्हणायचं.' हे ऐकूण नावाड्याला आपण आडाणी राहिलो याचे शल्य वाटत राहिले.* *असेच काही दिवस गेले. नदीला पूर आलेला. नावाडी नेहमीप्रमाणे पंडिताला पैलतीरी घेऊन निघालेला. नदीपात्राच्या मध्यावर असताना नावेची तळातील जीर्ण झालेली फळी पाण्याच्या जोराने उचकटली नि नाव बुडू लागली. नावाडी पंडित महोदयांना पाण्यात उडी टाका नि पोहायला लागा म्हणून समजावू लागला. पंडिताने विचारले,'पोहायचं म्हणजे काय करायचं?' नावाडी उडी टाकत म्हणाला,'तुम्हाला पोहायला येत नाही? मग तर तुमचं संपूर्ण आयुष्यच वाया गेलयं म्हणून समजा.'* *कोण ज्ञानी नि कोण अज्ञानी याचा आपण तपास करू लागू तर लक्षात येते की, प्रत्येक ज्ञानाचा संबंध जीवन जगण्याशी असतो. ज्ञान आहे, पण उपयोग नाही असे ज्ञान काय कामाचे? जीवनातील छोटी-मोठी कामे करणा-यांचे महत्व कमी झालेले नाही. समाजातील सर्व प्रकारची माणसे तितकीच महत्वाची असतात. ज्ञान हे पैसे मिळवायचे साधन की जगण्याची कला? याची फारकत होणे वर्तमानाची शोकांतिका आहे.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 *--संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल -- 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *आलोच या उघड्या नागड्या जगात* *जगायचेच आहे,तर जगा बिनधास्त* *कधी दोन देत तर कधी दोन घेत.* *जीवन हे संघर्षाचे मैदान आहे.इथं पदोपदी अपमान तर कधी सन्मान हा* *होतच राहणार.* *मग अपमानीत झाला तर मैदान* *सोडून जायचे का?नाही अपमानाला* *सुद्धा मानात परावर्तित* *करण्याची ताकद ठेवा.* *हार जीत तो बहादूर के किस्मत के दो सीतारे होते है। हे ध्यानात ठेवा.* *आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्याला बदलू शकतो.* *नकारात्मक गोष्टींचा सकारात्मक कार्यासाठी वापर करणे, ही खूप मोठी* *ताकद आहे. याचे सुंदर उदाहरण पहा.* *टाटांचा पॅसेंजर कार उद्योग तोट्यात जात होता. तो विकण्याचा निर्णय* *टाटांनी घेतला. कार बिझनेस विकण्याच्या मिटींगसाठी फोर्ड* *कंपनीस भेटण्यासाठी गेले. त्याना विचारले गेले, तुम्हाला कार* *बनविताच येत नाही, तर हा उद्योग तुम्ही का सुरू केला?* *हा अपमान व त्यांचे शब्द रतन टाटांना झोंबले. टाटा कार युनिट न* *विकण्याचा निर्णय घेऊन ते परत आले. बरेच संशोधन व प्रयत्न करून* *टाटांनी स्वतःचा कार ब्रॅंड मोठ्या उंचीवर पोहचविला.* *पुढे काही वर्षांनी आंतरराष्ट्रीय लक्जरी कार ब्रॅंड जग्वार आणि लँन्ड* *रोव्हर विकत घेऊन विदेशी कार कंपन्यांना योग्य उत्तर दिले.* *मग यातून आपण काय धडा घ्यायचा ते ठरवा.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• साखरेचा आकार आणि रंग कसाही असला तरी त्याची बाहेरुन आणि आतून असणारी चव ही गोडच असते.ती कधी चवीला आंबट,कडू, तुरट,खारट लागत नाही. त्याप्रमाणे माणूस दिसायला कसाही असू द्या.त्याच्या शारीरिक सौंदर्याचा संबंध नाही.परंतू त्याचा सर्वात महत्वाचा गुण म्हणजे स्वभाव हा आतून सुंदर असायला पाहिजे.तो इतरांशी आणि स्वत:च्या जीवनात कसा वागतो.तो सर्वांशी प्रेमाने, आनंदाने, निरपेक्ष भावनेने,मनात इतरांशी जळावू वृत्तीने न वागणे असा जर स्वभाव असेल तर नक्कीच माणूस साखरेसारखा गोड आहे असे समजेल आणि तसा असेल तरच तो सर्वांना आवडतो.केवळ वरुन गोड आणि आतून कडू असेल तर तो कधीच कुणाच्या हृदयावर राज्य करु शकत नाही.ते तेव्हाच कालबाह्य होऊन जातात. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अरण्यातील सिंह* एका अरण्यात एक सिंह राहात होता. त्या अरण्यात तो एकटाच शक्तीशाली असल्यामुळे वाटेल तसा वागत असे व तेच योग्य असे म्हणत असे. एकदा सर्व प्राण्यांना एकत्र बोलावून तो म्हणाला, 'प्रत्येकाने मला आपल्या शक्तीप्रमाणे खाद्य पुरवावं म्हणजे रोज शिकार करण्याचा माझा त्रास वाचेल.' सगळ्यांनी ही गोष्ट मान्य केली. पण हा कर कोणत्या धोरणाने बसवावा याबद्दल निश्चित पद्धति ठरे ना. वाघ उभा राहून म्हणाला, 'मला वाटतं, कोणी किती पाप केलं ते पाहून त्या मानाने त्याच्यावर कराची आकारणी करावी, प्रत्येकाने आपल्या शेजार्‍यावरील कराची आकारणी करावी म्हणजे फसवेगिरीला जागा राहणार नाही.' त्यावर हत्ती लगेच म्हणाला, 'छे, छे, वाघोबाची ही युक्ती निरुपयोगी आहे. त्यामुळे द्वेष, जुलूम वाढतील. माझ्या मते प्रत्येकाचे सद्‌गुणावर कर बसवावा व तो ज्याचा त्यानेच द्यावा. अशा योजनेने सरकारी तिजोरीत पुष्कळ भर पडेल.' तात्पर्यः स्वतःचे दुर्गुण असतील तर ते झाकून ठेवायचे असा जवळजवळ प्रत्येकाचा स्वभाव असतो. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

*आमची शाळा आमचे उपक्रम* आयोजकः श्री वनसागर सर कार्यवाहकः श्री पतंगे सर,सौ.कुंभारे मॕडम, सेनकुडे मॕडम,हिवराळे मॕडम. *विषयः इंग्रजी(शब्द लेखन)* इयत्ताः (पहिली ते सातवी) *कृतीः* विद्यार्थ्यांना परिपाठाचा अगोदरच दररोज दहा इंग्रजी शब्द लिहिण्यासाठी देणे व त्या शब्दाचे पाठांतर करण्यासाठी सांगणे. एक महिन्यानंतर शब्द लेखनावर स्पर्धा परीक्षा लेखन करून घेणे. *फलितः* शब्दसंपत्ती वाढते, उच्चार ,स्पेलींग सुधारते, इंग्रजी विषयाची आवड निर्माण होते. 〰〰〰〰〰〰 दिलेल्या वेळेत जास्तीत जास्त शब्द लिहीलेल्या विद्यार्थ्यांचा तीन क्रमांक व एक उत्तेजनार्थ म्हणून क्रमांक काढले व🏆बक्षिस वितरण सोहळा झाला. ✍ शब्दांकन श्रीमती प्रमिला सेनकुडे जि.प.प्रा.शा.गोजेगाव 〰〰〰〰〰〰〰

चिञचारोळी स्पर्धेसाठी (दि.०६-०१-२०२०)पोटाची खळगी भरण्यासाठी पोते सायकलवर वाहतोय घाम गाळुनी कष्टाचीच भाकरी कमवतोय. 〰〰〰〰〰

चारोळी *स्वप्नातील गाव* *विसावल्या नेञांना स्वप्नातील गाव दिसावा* *सुखावलेल्या क्षणांना* *ओलावा माञ असावा..

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 06/01/2020 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  = *पत्रकार दिन* 💥 ठळक घडामोडी :-  ● १९२४ - वि.दा. सावरकर यांची जन्मठेपेतून सुटका. 💥 जन्म :- ● १८१२ - दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर ● १९५९ - कपिलदेव निखंज, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  ● १९७१ - जादूगार पी सी सरकार यांचा मृत्यू *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *गृह, अर्थ खातं अखेर राष्ट्रवादीकडेच, शिवसेनेच्या दादा भुसेंकडे कृषी खात्याची धुरा, आदित्य ठाकरेंकडे पर्यावरण तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांकडे सार्वजनिक बांधकाम खातं * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *आमदार वर्षा गायकवाड राज्याचे नवे शालेय शिक्षण मंत्री* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *एक रुपयात संपूर्ण आरोग्य चाचणी लवकरच सुरु करणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *एकाचवेळी ८३६ मुलींच्या नामकरणाचा सोहळा बीडमधील कीर्तन महोत्सवात काल रंगला. स्त्री भ्रूण हत्येचा डाग लागलेल्या जिल्ह्यत असे चित्र आशादायी वाटत होते. या अभूतपूर्व नामकरण सोहळ्याने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद केली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मांढरदेव (ता.वाई) येथील यात्रेत करणी करण्याच्या नावाखाली झाडाला खिळे बिबे, लिंबू व काळ्या बाहुल्या फोटोसह ठोकणाऱ्यांवर व जादूटोणा करणाऱ्यांवर कायद्यानुसार गुन्हा दाखल करा, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *भारत-श्रीलंकेमधील पहिला टी20 सामना पावसाने धुतला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *न्यूझीलंडचा फलंदाज लिओ कार्टरने रविवारी क्रिकेटच्या इतिहासात विक्रम केला, एकाच षटकात सहा चेंडूवर सहा षटकार ठोकत लिओ कार्टरने आपलं नाव दिग्गज फलंदाजांच्या यादीत नोंदवलं आहे. अशी कामगिरी करणारा लिओ कार्टर क्रिकेटच्या इतिहासातला सातवा फलंदाज ठरला आहे. न्यूझीलंडमधील स्थानिक टी-२० क्रिकेट स्पर्धेत कार्टरने हा विक्रम केला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *आचार्य बाळशास्त्री जांभेकर* बाळ गंगाधर शास्त्री जांभेकर अर्थात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक असे म्हणतात. त्यांचा जन्म दिनांक ६ जानेवारी १८१२ रोजी कोकणातील राजापूर तालुक्यातील पोंभूर्ले या गावी एका गरीब ब्राम्हण घरात झाला. लहानपणापासूनच ते अतिशय हुशार, चुणचुणीत  व कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. म्हणूनच त्यांनी अगदी लहान वयातच अनेक विषयातील शिष्यवृत्ती मिळवली आणि संशोधन सुद्धा केले. त्यांना माहित होते कि, ब्रिटिशांना भारतातून हाकालायचे असेल तर लोकांना जागरूक करणे अत्यंत करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी वर्तमानपत्र हे माध्यम सर्वात चांगले आहे. म्हणून त्यांनी गोविंद कुंटे व भाऊ महाजन यांच्या सहकार्याने वयाच्या विसाव्या वर्षी म्हणजे ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण ‘ नावाचे वर्तमानपत्र प्रकाशन करण्यास सुरुवात केली........... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://shopizen.page.link/R6jE9oYXT2h1vVdv9             वरील लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मशाल होऊन जग* ........©® सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद असंख्य वेळा होते भावनांची घुसमट लपवून दुःख सारे हसत जगते जीवनपट वर्तमानात नसले अस्तित्व तरी भविष्यात असेल बघ स्वप्न उडण्याची उद्या आकाश तुझे असेल टाळणारे टाळणारच आपण लढावे अस्तित्व आपले आपण कर्तव्य करून सिद्ध करावे ढाल होऊन नाहीतर मशाल होऊन जग सोबती नसेल कुणी आज पण नाव तुझे असेल बघ *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *दोन नद्यांच्या दरम्यान असलेल्या भूमीस काय म्हणतात ?* दुआब 2) *भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप कोण करते ?* केंद्रीय सांख्यिकी संस्था 3) *भारतातील शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता ?* लॉर्ड कॅनिंग 4) *महाराष्ट्रातून राज्यसभेवर किती सदस्य निवडले जातात ?* 19 5) *लोकसभेत महाराष्ट्रातून किती सदस्य निवडले जातात ?* 48 *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अभिषेक अडकटलवार 👤 साईनाथ जगदमवार 👤 भगवान चव्हाण  👤 रितेश जोंधळे 👤 बजरंग माने 👤 सुदर्शन कोंपलवार 👤 श्रीनिवास गंगुलवार 👤 मोहन घोसले 👤 दत्तात्रय बंडावार 👤 अभिषेक नंदकिशोर अडकटलवार *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *समाज ज्या कारणांनी अधोगतीला गेला ती नष्ट करून समाजातल्या घटकांत नवचैतन्य जागे करण्यास मदत होईल याकरीता धरलेला आग्रह, त्यासाठी उचललेलं आंदोलनाचं पाऊल म्हणजे 'क्रांती' संबोधावे लागेल. जे शांतीपथावर घेऊन जाईल. जेंव्हा क्रांती आंदोलनाची लक्षवेधी आरोळी उठते तेंव्हा नक्कीच कुठे न् कुठे काहीतरी दुखतंय हे दुर्लक्षून चालणारं नाही. आज बेरोजगारी, भूक, गरिबी, गुलामी, आत्याचार यामुळे बहुसंख्य समाजघटकांत असंतोष निर्माण झालायं. त्यासाठी क्रांतीचा आवाज उठलाच पाहिजे. पण माणसांना माणसांचीच भिती वाटावी, ही ख-या क्रांतीची अवस्था नसावी.* *अर्थात, स्वार्थाच्या सोंगात क्रांती होत नसते, तर विध्वंसच आधिक होतो. त्याचप्रमाणे आक्रोशांच्या आरोळ्यांनी तथागत बुद्धांला अपेक्षित असलेली शांती नांदत नसते. जर लढा न्यायासाठीचा असेल तर हरएक चांगल्या-वाईट, गोष्टींचा त्याग आणि स्विकाराची सुरूवात स्वत:पासून झाली पाहिजे. अशीच क्रांती शांतीकडे घेऊन जाईल. आज भोवतालच्या ढवळलेल्या पर्यावरणावर भाष्य करताना, न्यायासाठी आंदोलन उभारून आपलं अवघं जीवन खर्ची घातलेल्या नेल्सन मंडेलांचा विचार लागू पडतो. ते म्हणतात,'जर कुठे शांती नाहीये तर याचे कारण हे आहे की, आम्ही विसरून गेलोत की आम्ही एक-दुस-यांचे कुणीतरी आहोत.' जे माणूस म्हणून कधीच विसरता येणार नाही !* *॥ रामकृष्णहरी ॥* ❤❤❤❤❤❤❤❤❤ *श्री. संजय नलावडे,मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *अगुणस्य हतं रूपं दुःशीलस्य हतं कुलम्।* *असिद्धस्य हता विद्या अभोगेन हतं धनम्।।* *अंगात चांगले गुण नसले तर रूपाला काही अर्थ नसतो, माणसाचे शील* *शुद्ध नसले तर त्याच्या कुळाला बट्टा लागतो,* *शिकलेल्या विद्येचा उपयोग केला नाही तर ती कांही कामाची नाही* *आणि संपत्तीचा उपभोग घेतला नाही तर ती तशीच वाया जाते. थोडक्यात* *सांगायचे तर आपल्याकडे जे कांही असेल त्याचा चांगल्या कामासाठी उपयोग करता* *आला पाहिजे.* *आपल्या मुखावाटे आपल्या शरीरात जे अन्न जाते, त्यावर आपण खूप* *नियंत्रण ठेवतो. आपण आपला आहार सदोदित संतुलित* *ठेवायचा प्रयत्न करतो. वैद्यकिय सल्ल्यानुसार आवश्यक ते पथ्य पाळतो. जेवायच्या आधी* *आपण दररोज स्वच्छ हात धुतो. शुद्ध पाणी पितो. वेळोवेळी आपण उपवास* *करतो. आपल्या तोंडातून जे काही आत जाते ते पोटात जाते* *आणि शेवटी ते शरीराबाहेर टाकले जाते. हे* *आपल्याला माहित असूनसुद्धा ही सगळी काळजी आपण घेतोच.* *पण आपल्या मुखावाटे बाहेर पडणा-या शब्दांची तशाच प्रकारची काळजी आपण घेत नाही. ज्या मुखातून आपण परमेश्वराचे गुणगान करतो, त्याच मुखातून आपण खुशाल अपशब्द उच्चारतो. ज्या झ-यातून केवळ निर्मळ पाणी झरले पाहिचे, तो झरा आपणच प्रदूषित करतो. आपल्या अमंगल वाणीने तो झरा आपणच विटाळून टाकतो.*जिभेची इजा सगळ्यातलवकर बरी *होते असं सायन्स म्हणते...* *पण* *जिभेने झालेली इजा आयुष्यभर बरी होत नाही असं अनुभव म्हणतो...!..* *** *जीभ नरम असते, कोमल असते आणि लवचिक असते. म्हणूनच ती अखेरपर्यत तोंडात सुरक्षित राहाते।* *याउलट दात कठोर असतात, तीक्ष्ण असतात, धारदार असतात म्हणूनच त्यांच्यापैकी एकही अखेरपर्यत तोंडात शिल्लक राहत नाही।।* *म्हणूनच रोजच्या जीवनात सर्वांशी बोलताना कोमल शब्द वापरा. कठोर शब्दांनी माणसं दुरावतात।।।* *नम्र रहा, आणि लवचिक बना...।* *तुम्ही आयुष्यात नेहमीच यशस्वी व्हाल...।* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण आपल्या दैनंदिन जीवनात काय केले आहे हे आपण जिथे नोंद करुन ठेवलेली असते.त्यात काल,आज आणि उद्या या तिन्ही काळाचा उलगडा केलेला असतो.आपण आपल्या जीवनात कसे वागलो आहोत त्याचीही नोंद केलेली असते.कधी आपल्याला विस्मरण झालेले असेल तर ते स्मरण करुन देण्याचे काम ती करते.आपण किती खरेखोटे जीवनात इतरांशी बोललो किंवा वागलो त्याचाही हिशोब ती आपणच नोंदवलेल्या शब्दांत आपल्यासमोर आरशासारखे काम करते.ती एक आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेली असते.तिला आपण कधीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी विसरु शकत नाही.एवढे प्रेम ती आपल्यावर करते आणि आपण तिच्यावर करतो.ती आपल्याला आपल्या जीवनात सतत प्रेरणा देते आणि आपल्या जीवनाला तिला पाहून, वाचून सावरतो अशी प्राणप्रिय वस्तू म्हणजे डायरी अर्थात आपली रोजनिशी.जी माणसे जीवनात खरे यशस्वी होतात ती आपल्या जीवनात घडलेल्या, घडून गेलेल्या आणि घडणाऱ्या घटनांची सत्यतेची नोंद करतात आणि त्यासाठी ती डायरी अत्यंत मोलाचे काम करते.तीच आपल्यासाठी कोणत्याही काळात न बदलणारी,सत्य उलगडून आपल्यातील दोष दूर करण्यासाठी जाणीव करून देणारी खरी मैत्रीण असते ती आपल्या जीवनात असायलाच हवी नाहीतर आपल्या जीवनातले दुसरे कोणीही एवढे काम करणार नाही. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०. 📚📝📚📝📚📝📚📝📚📝📚 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *न्याय* लोकांचे धान्य दळून देणार्‍या एका माणसाने एके दिवशी आपल्या धान्याच्या टोपलीत एक उंदीर पकडला व त्यास आपल्या आवडत्या मांजरास खाऊ घालण्याचा विचार केला. त्यावेळी तो उंदीर दीनवाणें तोंड करून त्याला म्हणाला, 'बाबारे लोकांचं धान्य चोरावं हा माझा धंदा नाही.' लोकांच्या घरातून मी जे अन्न घेतो, ते केवळ पोटापुरतेच घेतो,' ही सबब ऐकून तो माणूस म्हणाला, 'अरे, मी तरी तुला जी शिक्षा करणार आहे, ती सार्वजनिक हितासाठीच करतो आहे.  कारण तुझ्यासारख्या चोराला शिक्षा करणं हे प्रत्येक नागरिकाचं काम आहे,' हे ऐकून उंदीर म्हणाला, 'बरं तर, तू आणि मी दोघंही एकाच वर्गात मोडतो याचा विचार कर. आपण दोघेही धान्यावरच आपला चरितार्थ चालवतो. अंतर इतकंच की दळायला आलेल्या धान्यातला एक दाणा जर मी चोरला तर त्यातले हजार दाणे तू चोरतोस.' तो माणूस रागावून त्यावर म्हणतो, 'प्रामाणिक माणसाने शांतपणे ऐकून घेण्याजोगे हे तुझे बोलणे नाही.' व लगेच त्याने त्या उंदरास आपल्या मांजरीस देऊन टाकले. तात्पर्य - ज्या व्यंगाबद्दल आपण दुसर्‍यास नावे ठेवतो, तेच व्यंग आपल्या अंगी आहे असे दाखवून दिले, तर त्याचा आपल्याला राग येतो, पण हा काही न्याय नव्हे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 04/01/2020 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *आंतरराष्ट्रीय ब्रेल दिन* 💥 ठळक घडामोडी :-  १८८१ - लोकमान्य टिळकांनी केसरी वृत्तपत्र सुरू केले. २००४ - नासाची मानवरहित गाडी, स्पिरिट, मंगळावर उतरली. 💥 जन्म :- १९१४ - इंदिरा संत, मराठी कवियत्री १९३७ - सुरेंद्रनाथ, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  १८५१ - दुसरे बाजीराव पेशवे कानपूरजवळ ब्रह्मावर्त येथे निधन. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला चार दिवस उलटून गेल्यानंतर अखेर खातेवाटपाचा तिढा सुटला आहे. आज सकाळी किंवा दुपारपर्यंत खातेवाटप होईल अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे. त्यामुळं मंत्रिमंडळ विस्तारानंतर अखेर पाचव्या दिवशी खातेवाटप होणार असल्याचं आता निश्चित झालं आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *आमदार आणि आयएएस अधिकाऱ्यांना पगार न देता ते पैसे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरावेत, अशी मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *पनवेल-वसई-विरार असा हा नवीन रेल्वेमार्ग असून यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळानं रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठवला आहे. यासाठीच्या 997.88 कोटींच्या खर्चाला नीती आयोगाने मंजुरी दिली असून आता फक्त केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पिंपरी चिंचवडमधील सह्याद्री भुजबळ या चिमुकलीने सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेला दिसता क्षणी अंगावर काटा आणणारा तीन हजार फूट उंचीवरचा लिंगाणा किल्ला केला सर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *म्हाडाच्या कोकण मंडळाची ६,१३६ घरांची लॉटरी, जाहिरात लवकरच; माणकोली-भिवंडी, घणसोली, वसईतील घरांचा समावेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *शिवभोजन' योजनेची २६ जानेवारीपासून राज्यभर अंमलबजावणी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिलेत. आज मंत्रिमंडळ बैठकीत  'शिवभोजन' योजनेचा आढावा घेतला. २६ जानेवारीपासून योजनेची राज्यभर अंमलबजावणी सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *पुण्यात महाराष्ट्र शासनाच्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या 63 व्या पर्वाचं बिगुल आज वाजलं,पहिला दिवस पुण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाच्या पैलवानांचा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *विशेष बातमी :- कल व अभिक्षमता चाचणी म्हणजे काय याविषयी श्री बालासाहेब कच्छवे विभागीय समुपदेशक, एस एस सी बोर्ड लातूर यांचे मार्गदर्शन आज आकाशवाणी नांदेड केंद्रावरून आज सायंकाळी 06:30 वाजता गंमत जंमत या कार्यक्रमातून प्रसारित होणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  नमस्कार, मी नासा येवतीकर माझी डिजिटल साहित्य आणि प्रकाशनविश्वातील स्टोरीमिररच्या (https://storymirror.com) स्टोरीमिरर ऑथर ऑफ द इयर अवार्ड 2019 या सर्वोच्च पुरस्कार आणि मान्यतेसाठी माझे नामांकन झाल्याचे कळविताना खूप आनंद होत आहे. हा पुरस्कार जिंकण्यासाठी मला आपली मदत हवी आहे. कृपया खालील लिंकला भेट द्याः   https://awards.storymirror.com/author-of-the-year/marathi/author/abz2baot आणि माझ्या नावाखालील वोट या बटनावर क्लिक करा. मला वोट करण्यासाठी तुम्हाला स्टोरीमिररच्या वेबसाईटवर लॉगीन करावे लागेल. कृपया वोट करा आणि हा पुरस्कार जिंकण्यासाठी मला मदत करा. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *!! शाळा आमुची लाडकी !!* शाळा आमुची लाडकी चित्रे भिंतीत बोलकी शिकविति ज्ञान वाढविती मान पुस्तक आमचा दोस्त ज्ञान देतो मस्त पटकन सोडु गणित करुनी पाढे पाठ इतिहास आमुचा छान एकतो आम्ही देऊन कान मराठीची कविता छान सूरात करू गान भूगोलाचा तास भारी ग्रह चक्कर मारी विज्ञानात प्रयोग खरा रसायनांचा मोठा मारा जाऊन रोज शाळेत खेळू हो मजेत करू अभ्यास वर्गात राहू आम्ही मजेत काव्यरचना - संदिप नानासाहेब वाकडे रा. खेडा ता. कन्नड जि. औरंगाबाद 📲9766992776 *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री कोण आहेत ?* अमित देशमुख 2) *महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत ?* अनिल देशमुख 3) *महाराष्ट्राचे अर्थमंत्री कोण आहेत ?* अजित पवार 4) *रमन मॅगसेसे पुरस्काराचे पहिले भारतीय मानकरी कोण ?* विनोबा भावे 5) *भारतातील सर्वात मोठा लोहपोलाद प्रकल्प कोणता ?* बोकारो ( झारखंड ) *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 बालाजी डिगोळे, सहशिक्षक, अहमदपूर 👤 अंकुशराजे जाधव 👤 माधव बोइनवाड, येवती 👤 चंद्रभीम हौजेकर, पत्रकार, धर्माबाद 👤 राजेश कुकूटलवार 👤 निलेश आळंदे 👤 माधव सूर्यवंशी, मुंबई 👤 फरीद शेख 👤 योगेश बलकेवाड 👤 श्रीपती सुरवसे 👤 धनंजय रेड्डी यलगट्टे 👤 साईप्रसाद पुलकंठवार 👤 धीरज चामे, साहित्यिक *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अलीकडे असण्यापेक्षा दिसण्यावर लोक जास्त लक्ष देतात. सुंदर दिसण्याचा मार्ग सुंदर असण्यातून जातो; हे न कळल्यामुळे दर महिन्याचा काॅस्मेटिकवरचा खर्च आतोनात वाढलेली कुटुंबे सर्वांच्या आसपास मोठ्या प्रमाणात आहेत. मेकअपपेक्षा मनाच्या मेकओव्हरची गरज आहे; हे त्यांना कुणीतरी सांगायला हवे. योगासने केल्याने, पालेभाज्या, फळे खाल्ल्याने आणि सकारात्मक दृष्टी ठेवल्याने तुम्ही दिवसभर तजेलदार राहता. एक सात्विक उर्जा कायम आपल्या आत दर क्षणी नव्याने जन्म घेत असते. मग कोणत्याही काॅस्मेटिकची गरज पडत नाही. तारूण्य सतत आपल्या आत उमलते; परिणामी आपण कांतिमान दिसतो.* *तेजस्वीता, तत्परता आणि तन्मयता हे तारूण्याचे तीन 'त' कार असतात. या तीन गोष्टी ज्याच्याकडे आहे. तो 'तरूण'! आज लौकिक अर्थाने तरूण असणा-यांकडे या तीन गोष्टी दिसतात का ? या प्रश्नाचे उत्तर शंभर टक्के, ठामपणे कुणालाही देता येणार नाही; कारण तशी परिस्थिती नाही. पिझ्झा-बर्गर हेच पूर्णान्न मानणा-या पिढीकडून तेजस्वीपणाची अपेक्षा ठेवणे वेडेपणाचे आहे.*          ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••     🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟    *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *वेळ कुणाची वाट बघत नाही.आलेली संधी आणि वेळ एकदा हातातून गेली की तिला परत मिळविण्यासाठी* *अजून तरी कुठली व्यवस्था नाही.* *आपले व्यक्तिमत्त्व फुलवायचे असेल तर आपल्यातल्या सुप्त शक्तींना ओळखा, त्यांना जागा करून घ्या.* *आणि व्यक्तिमत्त्व प्रसन्न करा.* *बहुतेक लोक त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी संतुष्ट नसतात.* *आपल्यात कशाची तरी उणीव असल्याची भावना त्यांना बोचत* *असते. आणि मग आजच्या ह्या* *स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी ते सेल्फ-हेल्प प्रकारातील पुस्तके वाचतात.* *वैयक्तिक समुपदेशन करून घेतात,* *धार्मिक प्रवचने ऐकतात,* *योगसाधना करतात, फिट* *रहावे म्हणून जिमखान्यात* *जातात, आकर्षक दिसण्यासाठी* *मेक-ओव्हर करून घेतात.*  *जीवनात यशस्वी होण्यासाठी सगळ्यांची सारखी धडपड सुरू असलेली आपण पाहतो. पण जीवनात यशाबरोबर अपेक्षित सुख प्राप्त होतेच असे नाही आणि वाढती समृद्धी हीदेखील असमाधानाचे एक कारण बनू शकते. म्हणून व्यक्तिमत्वाचा विकास शारिरीक गरजा भागवणे आणि मनाच्या आकांक्षा पूर्ण करणे एवढ्यापुरता मर्यादित राहू शकत नाही. शरीर आणि मनाबरोबर त्यात आत्माही आला पाहिजे. आपल्या आत्म्याचे पोषण आवश्यक आहे. आपली आत्मिक वाढ महत्वाची आहे. शरीर, मन आणि आत्मा ह्यांचे संतुलन राखणे गरजेचे आहे.* *आपले मन,मनगट आणि मेंदू* *विकसित करण्यासाठी या सर्वांना मानसिक,शारीरिक, आणि सामाजिक* *स्वास्थ्याची गरज आहे.त्यांना पोषक ठरेल असे* *वातावरण तुम्ही स्वतःच निर्माण करू* *शकतात.तूच आहे तुझ्या* *जीवनाचा शिल्पकार.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• लेखक म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणारा कलाकारच आहे.तो आपल्या बुध्दीने आणि लेखणीने सर्व कलाकारांना कला सादर करण्यासाठी प्रेरणा देतो.वाचक,नट, दिग्दर्शक,संगीतकार अशा कितीतरी लोकांना आपल्या लेखणीतून जसे पाहिजे तसे आविष्कार सादरीकरण करण्यासाठी त्यांना संधी आणि व्यासपीठ उपलब्ध करुन देतो.एवढेच नाही तर सर्व नवरसांचे केंद्र जर कुणाकडे असेल तर ते देखील लेखकाकडेच असते.म्हणून लेखक असणे आणि होणे म्हणजे ईश्वराच्या नंतरची जी भूमिका साकारणारी व्यक्ती असेल तर ती लेखन करणारी लेखक मंडळीच आहे.अशा चतुरस्त्र आणि अष्टपैलू लेखकांना समाजामध्ये एक आगळेवेगळे स्थान आहे. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ 📚✍🏻📚✍🏻📚✍🏻📚✍🏻📚✍🏻 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *विश्वासघात करणे महापाप* एका लोककथेनुसार राम नावाच्‍या एका माणसाकडे एक उमदा आणि सुंदर घोडा होता. तो त्‍या घोड्याची काळजी घ्‍यायचा. त्‍यामुळे त्‍या दोघांचेही एकमेकावर प्रेम जडलेले होते. शाम नावाच्‍या एका घोड्याच्‍या व्‍यापा-याने तो घोडा पाहिला आणि त्‍याला तो घोडा फारच आवडला. शामने तो घोडा मिळविण्‍याचे कारस्‍थान रचले. शामने रामच्‍या रोजच्‍या येण्‍याजाण्‍याच्‍या रस्‍त्‍यावर भिका-याचे सोंग घेतले व आजारी असल्‍याचे नाटक करत बसला. दुसरीकडून राम घोड्यावर बसून येत होता तेव्‍हा शाम जोरजोराने विव्‍हळू लागला, गयावया करू लागला. रामने ते पाहिले व तो शामपाशी थांबला. शाम रामला म्‍हणाला,’’मी आजारी आहे मला तुझ्या घोड्यावरून पुढच्‍या गावापर्यंत नेशील का,’’ रामला त्‍याची दया आली, त्‍याने त्‍याला घोड्यावर बसविले, आणि स्‍वतः पायी चालू लागला. थोडे पुढे जाताच शाम त्‍याचा घोडा घेऊन पुढे गेला व त्‍याने पुढील गावी जाऊन तो घोडा विकून टाकला. दुस-या दिवशी शाम रामकडे आला व म्‍हणाला,’’ अरे मी तुझा घोडा जर विकत मागितला असता तर तू मला तो दिला नसतास म्‍हणून मला आजारी भिका-याचे सोंग घ्‍यावे लागले.’’ यावर राम शांतपणे शामला म्‍हणाला,’’ मित्रा, मी तुला मदत केली होती ही गोष्‍ट तू इथून पुढे कोणालाही सांगू नकोस कारण तुझी ही गोष्‍ट ऐकल्‍यावर जगात कोणीच गरीबांना, गरजूंना मदत करणार नाही. विश्‍वासघात करणे महापाप आहे’’ तात्‍पर्यः- मदत करावी पण खरोखरच गरज असेल तरच.कारण एखाद्या गरजूला मदत करण्‍यापूर्वी तो खरेच गरजवंत आहे याची खात्री करणे सूज्ञपणाचे ठरते. खोटे सोंग घेऊन मदत मागणे चुकीचे आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

चारोळी गंधीत वाटा मोगराही फुलून गेला गंधीत वाटा मोहकल्या सुगंधीत त्या वाटेतली भेट काळजात दाटली.

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 03/01/2020 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *ऑक्युपेशन थेरपी दिन* *सावित्रीबाई फुलेजयंती* *बालिका दिन* 💥 ठळक घडामोडी :- ● १९५० - पुणेयेथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे उदघाटन. ● १९५२ - स्वतंत्र भारतात पहिल्या राष्ट्रीय निवडणुका. ● १९५७ - विद्युत घाटांवर चालणारे पहिले घड्याळ बाजारात. 💥 जन्म :- ● १८३१ - सावित्रीबाई फुले, आधुनिक भारतातील प्रथम स्त्री शिक्षिका, समाजसुधारक, महात्मा जोतीराव फुले यांची पत्नी. ● १८८८ - कागदी स्ट्रॉचा वापर सुरू. ● १९१७ - कर्तारसिंग दुग्गल, पंजाबी साहित्यिक. ● १९२२ - चोइथराम बाबाणी, सिंधी साहित्यिक. ● १९३१ - यशवंत दिनकर फडके, मराठी लेखक, इतिहाससंशोधक. 💥 मृत्यू :- ●१९७५ - ललित नारायण मिश्रा, भारतीय रेल्वेमंत्री, राजकारणी. ● १९८२ - अब्राहम डेव्हिड, भारतीय अभिनेता. ● १९९४ - अमरेंद्र गाडगीळ, मराठी बाल-कुमार लेखक. ● १९९८ - केशव विष्णू बेलसरे, मराठी तत्त्वज्ञानी. ● २००१ - सुशीला नायर, भारतीय आरोग्यमंत्री, भारतीय राजकारणी. ● २००२ - फ्रेडी हाइनिकेन, डच बियर उद्योगपती. ● २००२ - सतीश धवन, भारतीय अंतराळशास्त्रज्ञ. ● २००५ - जे.एन.दिक्षित, भारतीय राजकारणी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *पोलिसांना सर्वोत्तम प्रशिक्षण अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र पोलीस वर्धापनदिनी आयोजित संचलन समारंभात बोलत होते* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ नाही, रोटेशन पद्धत असल्यानं प्रस्ताव नाकारल्याचं स्पष्टीकरण,  तर विरोधकांच्या राज्यांना डावलल्याचा सुप्रिया सुळे यांचा आरोप, केंद्र सरकार राजकारण करत असल्याची संजय राऊत यांची टीका * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *14 एप्रिल 2022 पर्यंत  इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम पूर्ण करणार, स्मारक स्थळाला  भेट दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आश्वासन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *बीडमध्ये सुरेश धस गटाच्या पाच सदस्यांचा मतदानाचा अधिकार उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नाकारला, बीड झेडपीच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीचा सस्पेन्स वाढला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *विदर्भ आणि मराठवाड्याला पुन्हा गारपिटीचा तडाखा, ज्वारी, गहू, कापसाचं मोठं नुकसान, दुष्काळ, अतिवृष्टीनंतर अवकाळी आणि गारपिटीनं शेतकरी देशोधडीला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ **आज ठाकरे सरकार मंत्रिमंडळाचे खातेवाटप होण्याची शक्यता, तर राष्ट्रवादीत गृहमंत्रिपद नको म्हणणारेच जास्त : शरद पवार यांचे प्रतिपादन** ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंच कडून ज्ञानदीप 2020 ई विशेषांकाचे राज्याध्यक्ष श्री नटराज मोरे, साहित्यिक तथा कवी श्री व्यंकटेश चौधरी आणि जिल्हाध्यक्ष श्री रमेश मुनेश्वर यांच्या हस्ते झाले ऑनलाईन प्रकाशन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सावित्रीबाई फुले जयंती निमित्त प्रासंगिक लेख              *मी सावित्री बोलतेय* नमस्कार ..... मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले, माझा जन्म 03 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगांव येथे झाला. वयाच्या नवव्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी माझा विवाह झाला. मला शिक्षणाचा अजिबात गंध नव्हता. पण माझे पती महात्मा फुले यांनी मला शिकविले आणि घडविले. पुण्यात भिडेच्या वाड्यात मुलींसाठी त्यांनी पहिली शाळा काढली. पण तिथे मुलींना शिकविण्यासाठी कोणीही तयार होत नव्हते. तेंव्हा ज्योतिबानी मला याठिकाणी शिकविण्यासाठी............. वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post.html             लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक नासा येवतीकर 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सावित्रीबाई* पहिल्या शिक्षिका आहेत सावित्रीबाई, त्या आहेत आम्हा सर्वांच्या आई... सावित्रीबाईंनी काढली मुलींसाठी शाळा, मुलींनाही लागला मग शाळेचा लळा.. सावित्रीबाईंना अनेकांनी दुखावले, तरीही त्यांनी मुलींना मात्र शिकवले... सावित्रीबाईंचे आडनाव होते फुले, त्यांना आवडायची शाळेतली मुले... महात्मा जोतिबा फुले होते त्यांचे पती, त्यांना वाटायची नाही कोणती भीती... मी त्यांच्या कार्याला करते सलाम, सावित्रीबाईंना कोटी कोटी प्रणाम.. -● अक्षदा नामदेव उंडे वर्ग-चौथा जि.प.प्रा.शाळा रायपूर ता.सेलू जि.परभणी *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्वत:शी प्रामाणिक असलेला माणूस स्वत:च एक खणखणीत नाणं असतो. ~ वपु काळे | इतर *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'बालिका दिन' केव्हा साजरा केला जातो ?* 3 जानेवारी 2) *'बालिका दिन' कोणत्या वर्षांपासून साजरा केला जातो ?* 1995 3) *'क्रांतीज्योती' म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो ?* सावित्रीबाई फुले 4) *सावित्रीबाई फुले यांचा जन्म केव्हा झाला ?* 3 जाने.1831 ( नायगाव, सातारा ) 5) *महाराष्ट्रातील पहिल्या मुख्याध्यापिका म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो ?* सावित्रीबाई फुले *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 ज्ञानेश्वर विजागत, सहशिक्षक, सोलापूर 👤 विठ्ठल सुवर्णकार, धर्माबाद 👤 रतन बहिर, भीर, महाराष्ट्र 👤 शुभांगी परळकर, नांदेड 👤 माधव पवार, पत्रकार, नायगाव 👤 संदीप जाधव, देगलूर 👤 प्रशांत बोड्डेवाड, येवती 👤 वीरेंद्र डोंगरे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *उतारवयात शारिरीक कष्टाची कामं कमी करावीत; परंतु आपला अनुभव, कौशल्य तुम्हाला जिथे वापरता येईल, अशी कामं शोधावी. पैशासाठी, पोटासाठी संसारासाठी करावी लागणारी कामं सोडून अन्य पद्धतीने समाजजीवनात भाग घ्यावा. यामुळं जीवनात काहीतरी नवीन केल्याचं समाधान मिळतं. तोच-तोच पणातुन येणारा कंटाळा कमी वहायला लागतो. वेगळ्या शब्दांत सांगायचं तर , दररोज नव्या पाटीवर सुरूवात केली तर दररोजच तुम्ही नव्यानं जन्माला आला आणि जगला असं होईल. माझे अनेक वयानं ज्येष्ठ मित्र आहेत. नोकरीत असेपर्यंत ते साठीपर्यंत ठणठणीत असतात; पण निवृत्त झाल्यावर एक-दोन वर्षातच १५-२० वर्षांनी वृद्ध झाल्यासारखे दिसतात.* *माणसानं स्वत:ला मोडीत काढणं ही मानसिक प्रक्रिया सगळ्यात वाईट आहे. यामुळेच हे असं होतं. मी कुचकामी झालो, हे एकदा मनाला स्वत: सांगितलं की माणूस म्हातारा व्हायला लागतो. त्यामुळे सर्वांना सांगणे आहे की, 'द मोमेंट यू रिटायर, यू मस्ट री-टायर.' म्हणजे तुम्ही तुमचे टायर बदलून पुन्हा नव्या जोमाने नव्या कामाला लागलं पाहिजे. आतापर्यंत जे काम करत होता ते जमत नसेल तर, तुम्हाला जमू शकेल असं काम शोधा आणि काम करत रहा. काम करत राहिल्यानेच माणसं सक्षम रहातात. माझ्या ओळखीच्या एका व्यक्तीने स्वत:च्या अमृत महोत्सवात बोलताना सांगितले की, 'मी ज्येष्ठ झालोय, म्हातारा नाही. आणि तरूण पिढीच्या खांद्याचा आधार घेऊन त्यांच्याशी बौद्धिक स्पर्धा करीतच राहणार आहे. 'माझ्यासाठी हाच 'कर्मसिद्धांत'आहे. आजच्या नवीन वर्षात आपणही कर्मसिद्धांताचा हाच 'संकल्प' करू या.* *॥ रामकृष्णहरी ॥* ⚡💥⚡💥⚡💥⚡💥⚡ *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *आत्महत्येचा कड्यावर ती उभी होती,* *कित्येक स्वप्नांचा अपेक्षाभंग करून तिने प्रत्येक श्वासातून दिनदलितांच्या मुलींना शिक्षणाची कवाडे खुली* *करून दिली.त्यांचे* *जीवन फुलविले.त्या सावित्रीबाई फुले यांना जन्मदिनी* *मानाचा मुजरा करतो.* *पुन्हा या सावित्रीच्या रूपाने एखादा पुरुष या वारश्याला आधुनिक फुलेंच्या रूपाने आज बघितला तर* *नवल वाटणारच.* *हो हा आधुनिक भगीरथ म्हणजे अधिक कदम हो अधिक कदमच.* *आयुष्यात एखादं वादळ आलं की* *सर्वकाही बिघडून जाते असे* *म्हणतात....!* *पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी* *आयुष्यात एखाद्या वादळाचं येण गरजेच असतं....*    *आरोग्य, शिक्षण, अनाथांचे पुनर्वसन आणि महिला सक्षमीकरण...हे* *वरकरणी सरकारी* *भासणारे प्रकल्प, परंतु* *प्रत्यक्षात काश्मिरातील काश्मीर व्हॅली येथील एका स्वयंसेवी संस्थेचा हा* *अजेंडा.हा ध्येयवेडा* *हाती झेंडा घेऊन आजही* *मरणाच्या खाईतून* *मार्गक्रमण करत आहे.* *राज्यशास्त्राचा अभ्यास करणारा १९ वर्षांचा पुण्यातला s.p. कॉलेजचा* *एक तरुण* *काश्मीरमधली खरी परिस्थिती जाणून घेण्यासाठी तिथे जातो काय, तिथल्या* *अनाथ मुलांची परवड पाहून व्यथित होतो काय* *आणि तिथेच राहून या उद्ध्वस्त मुलांचे आयुष्य सावरण्यासाठी 'बसेरा* *ए तबस्सुम' अर्थात आनंद* *निवास उभारतो काय, हे* *सगळेच अनाकलनीय. तेथील* *दहशतवाद्यांचा दररोज सामना करत अनाथ मुलींचा सांभाळ म्हणजे जणू* *मृत्यूशी लपंडाव खेळण्यासारखेच. काश्मीरचा* *निसर्गरम्य प्रदेश भारताला हवा आहे, पण तेथील लोकांचे काय? ते* *देशवासीयांना आपलेसे वाटतात का, या प्रश्नाने अधिक कदमला* *भंडावून सोडले आणि त्याने काश्मिरात राहून अनाथ* *मुलांसाठी काम करण्यास प्रारंभ केला. अधिक हा मूळचा श्रीगोंदा* *येथील एका शेतकरी कुटुंबातला. घरची परिस्थिती बेताची. १९९०च्या* *दशकात* *काश्मीरखोऱ्यात अस्थिरता शिगेला होती. त्याच सुमारास अधिक पुण्यात* *महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. त्यावेळी त्याच्या* *मित्रांमध्ये काश्मिरातील पंडित आणि मुस्लिमांचा समावेश* *होता. त्यांच्यातील वादांमुळे अधिकने काश्मीरमध्ये जाऊन वास्तव समजून* *घेण्याचा प्रयत्न केला. दहशतवादाबरोबरच आर्थिक* *प्रगतीची बंद कवाडे, भ्रष्टाचार आणि सरकारी अनास्था* *यामुळे काश्मिरातील अनाथ मुलांचे भवितव्य अंधारमय राहणार याची* *जाणीव त्याला झाली.येथील 14 ते 15 वर्षाचे मूल जेव्हा मानवी* *बॉम्ब बनून जनतेचे चिंधडे उडवीत,हे पाहून त्याचे मन* *हेलावून गेले. ही* *परिस्थिती बदलण्याच्या तळमळीतून 'बॉर्डरलेस र्वल्ड फाउंडेशन'चा जन्म* *झाला.* *जातीभेदाच्या भिंती उखडून अनेक संकटांचा सामना करत 22 वर्षांपासून* *अविरत संघर्ष करीत आज त्याने 250 अनाथ मुलींचा* *आश्रम सजविला. त्या अनेक* *जिल्ह्यात उच्च शिक्षण घेत आहे.* *अतिरेक्यांच्या तावडीतून अनेक वेळा प्राण वाचवुन सुद्धा तो* *मागे फिरला नाही.आज येथील* *लोकांचा शहेनशहा बनलेल्या* *अधिक कदमला मानाचा* *मुजरा.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• बोलणारी आणि बोलण्याप्रमाणे कृती करणारी व्यक्ती ही अतिशय संवेदनशील आणि कर्तव्यतत्पर समजली जाते. अशा व्यक्ती फार कमी प्रमाणात पहायला मिळतात. अशा व्यक्तींच्या सहवासात राहिले तर आपल्यातील आळशीपणा आणि कामामध्ये टाळाटाळ करण्याच्या वृत्तीला लगाम घातल्या जाऊन आपल्यामध्ये सुप्त असलेल्या क्रियाशिलतेला अधिक प्राधान्य मिळते व जीवनात चांगले जीवन जगण्यासाठी योग्य दिशा मिळते. © व्यंकटेश काटकर नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🎄🌸🎄🌸🎄🌸🎄🌸🎄🌸🎄 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्त्री स्वतःच पूर्णरुप !* ज्या रात्री गौतम बुद्धांनी घर आणि पत्नीला सोडले, त्याच रात्री त्यांना पुत्रप्राप्ती झाली. पुत्रप्राप्तीचा आनंद असतानाही पतीने घर सोडल्याची बातमी जेव्हा तिला समजली तेव्हा ती उध्वस्त झाली. पण तिने कुणाकडे ही तक्रार केली नाही. आणि जग ज्याच्याकडे अभिमानाने पाहिल, अशा पद्धतीने मुलाला वाढविण्याचे तिने ठरवले. सोडून गेलेल्या पतीला विसरून तिने नवे आयुष्य सुरु करावे,असे तिला सर्वांनी सुचवले. दुसरे लग्न करण्याची गळ घातली, तिने त्यास नकार दिला. आणि एका सुंदर सकाळी......... ते परत आले आणि तिच्या समोर उभे राहिले. तिने शांतपणे त्यांना विचारले, "आता तुम्हाला लोक 'बुद्ध 'म्हणून ओळखतात ना?" त्यांनी ही तितक्याच शांत पणे उत्तर दिले, "होय, मी देखील तसे ऐकले आहे. " तिने पुढे विचारले, "त्याचा अर्थ काय?" "जगण्याचा अर्थ कळला आहे, अशी व्यक्ती !"तेम्हणाले. ती किंचितशी हसली आणि मग शांत बसली. काही वेळाने ती म्हणाली, "आपण दोघेही काहीतरी नवे शिकलो आहोत, असे मला वाटते. तुम्ही जे शिकला आहात, त्यातून हे जग सम्रुद्ध होईल पण मी जे शिकले आहे, ते फारसे जगापुढे येणारच नाही." बुद्धांनी तिला विचारले, "तू काय धडा शिकलीस ?" तिचे डोळे चमकले. डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. "तो धडा म्हणजे धैर्य! स्त्रीला उभी रहाण्यासाठी कुणाचीही गरज लागत नाही. तिचे स्वतःचे व्यक्तिमत्व हे परिपूर्ण असते. ती न डगमगता कोणत्याही परिस्थितीतून खंबीरपणे मार्ग काढू शकते. " यशोधरेतील 'स्त्री'ला मनापासून नमस्कार ! *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🙍बालिका दिन🙍* 📚📚📚📚📚📚 स्त्री शिक्षणाची दारे फुले सावित्रीमायीने उघडली अनेक दुःख यातना कष्ट सोसूनी धडे तिने गिरवली ज्योतिबाची साथ सावित्रीमायीस लाभली आणि पुण्यात पहिली शाळा मुलींची उघडली अज्ञान अंधःकार नाहीसा तिने केला,अनिष्ट चालीरीती रुढी प्रथांचा प्रतिकार तिने करुन शिक्षणाचा प्रसार केला जाणून घेऊ बालिका दिनाचे महत्त्व, समजून घेऊ सावित्रीमायीचे तत्त्व सदैव ध्यानात ठेवू आपण जीवनात शिक्षणाचे महत्त्व ज्योतिबा सावित्रीचा वसा पुढे पुढे आपण चालवूया आधुनिक सावित्रीला तंञस्नेही माञ बनवूया. 〰〰〰〰〰〰 ✍प्रमिला सेनकुडे तालुका हदगाव जिल्हा नांदेड. 📚📚📚📚📚📚

बालिका दिन ज्ञानाची ज्योत फुले सावित्रीने पेटवली स्त्री शिक्षणाची महती बालिका दिनातून प्रकटली.

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 02/01/2020 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :- ● १९५५ - पनामाच्या राष्ट्राध्यक्ष होजे अँतोनियो रेमोनची हत्या. ● १९५९ - सोवियेत संघाने लुना १ या अंतराळयानाचे चंद्राकडे प्रक्षेपण केले. ● २०००-संत ज्ञानेश्वर यांची प्रतिमा असलेल्या चलनी नाण्याचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे हस्ते प्रकाशन. ● १९९८-डॉ सरोजिनी बाबर यांना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ वसंत गोवारीकर यांच्या हस्ते सन्माननीय डी. लिट.पदवी प्रदान. ● १९५४-भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉ राजेंद्रप्रसाद यांनी 'भारतरत्न'पुरस्काराची स्थापना केली. 💥 जन्म :- ● १९५९ - किर्ती आझाद, भारतीय क्रिकेट खेळाडू. ● १९६० - रमण लांबा, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ● १९४६ - ज्यो डार्लिंग, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू. ● १९९५ - सियाद बारे, सोमालियाचा राष्ट्राध्यक्ष. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *विनाअनुदानित सिलेंडरच्या किंमतीत 19 रुपयांची वाढ, मेल आणि एक्स्प्रेसच्या प्रवासी भाड्यात कालपासून वाढ, तर रेल्वेची भाडेवाढ लोकल प्रवासाला लागू नाही * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *खातेवाटपावर चर्चेचं गुऱ्हाळ सुरुच, दोन महत्वांच्या खात्यासाठी काँग्रेस आग्रही, तर मतभेद नसल्याचा राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचा दावा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *जानेवारी ते डिसेंबर 2019 या वर्षात साईंच्या दक्षिणा पेटीत 156 कोटी 49 लाख 2 हजार 350 रुपयांचे गुप्तदान झाले आहे, गेल्या वर्षभरात साईंच्या झोळीत 290 कोटींचं दान, तीन कोटींची वाढ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नववर्षाचं सर्वत्र जल्लोषात स्वागत, देवदर्शनानं नववर्षाची सुरुवात करण्याचा नवा ट्रेंड, शिर्डी, कोल्हापूर, पंढरपूर, गणपतीपुळे भाविकांनी फुललं* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *विजय मल्ल्याची जप्त केलेली संपत्ती लिलावाद्वारे विकून कर्जाची रक्कम वसूल करा ; मुंबईतील पीएमएलए कोर्टाचा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *केंद्र सरकारनं चांद्रयान-3 ला मंजुरी दिली असून यावर काम सुरु असल्याची माहिती के. सिवन यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *ट्रायने जारी केलेल्या नव्या आदेशांनुसार आता १३० रुपयांमध्ये २०० चॅनेल्स पाहता येणार, आतापर्यंत १३० रुपयांमध्ये १०० चॅनेल्स पाहता येत होती. आता ती दुप्पट होणार आहे. १ मार्चनंतर याची अंमलबजावणी होणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कमवा आणि शिका* स्वतःच्या विकासावर कुटुंबाचे विकास अवलंबून असते. कुटुंबाच्या विकासावर गावाचा विकास आणि मग राज्य व देशाचा विकास होतो. या विकासासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. शिक्षणाशिवाय कोणाचेही विकास अशक्य आहे. शिक्षणामुळे दोन डोळ्याचे माणसे तिसऱ्या डोळ्याने डोळस होऊ शकतात. अन्यथा डोळे असून ही आंधळ्याची अवस्था होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगताना......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/06/blog-post_86.html             लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बाल कविता - चांदोबा* - राधिका बापट, डोंबिवली चंदेरी पांढरा गोल आकाशामधे असतो चांदोबा रे चांदोबा हा छान छानच दिसतो..१ पौर्णिमेच्या रात्री नभी संपूर्ण रुप साकार रोज तुझा रे बदले असा कसा हा आकार ?..२ चमचमत्या चांदण्या करतात लुकलुक तूच तेजस्वी सर्वात म्हण त्यांना.. टुकटुक..३ मामा..येतो भेटायला मी यानामधे बसून दाखवशील ना नक्की फक्त एकदा हसून..४ *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो. *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *रेवदंडा ( अलिबाग ) येथे होणारे 33 वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाचे अध्यक्ष कोण ?* डॉ राजू कसंबे 2) *भारताचा पहिला व्हाइसरॉय कोण ?* लॉर्ड कॅनिंग 3) *सर्वाधिक उत्पन्न होणारे भारताचे दुसऱ्या क्रमांकाचे पीक कोणते ?* गहू 4) *साहित्य, शास्त्र, कला, समाजसेवा इ. क्षेत्रातील तज्ज्ञांमधून जास्तीत जास्त किती सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपती राज्यसभेवर करू शकतो ?* 12 5) *'दि कॉल ऑफ स्पॅरो' हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?* डॉ सलीम अली *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संदीप ढाकणे, साहित्यिक, औरंगाबाद 👤 मो. विखार, शिक्षक, धर्माबाद 👤 कविता जोशी, शिक्षिका 👤 साईनाथ ईबीतवार पांचाळ, येवती 👤 महेंद्रकुमार पद्मावार 👤 मोगरे शंकर 👤 श्रीकांत काटेलवार 👤 आनंदराव धोंड 👤 गणेश दहिफळे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बहुतेक लोक त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी संतुष्ट नसतात. आपल्यात कशाची तरी उणीव असल्याची भावना त्यांना बोचत असते. आणि मग आजच्या ह्या स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी ते सेल्फ-हेल्प प्रकारातील पुस्तके वाचतात. वयक्तिक समुपदेशन करून घेतात, धार्मिक प्रवचने ऐकतात, योगसाधना करतात, फिट रहावे म्हणून जिमखान्यात जातात, आकर्षक दिसण्यासाठी मेक-ओव्हर करून घेतात.*  *जीवनात यशस्वी होण्यासाठी सगळ्यांची सारखी धडपड सुरू असलेली आपण पाहतो. पण जीवनात यशाबरोबर अपेक्षित सुख प्राप्त होतेच असे नाही आणि वाढती समृद्धी हीदेखील असमाधानाचे एक कारण बनू शकते. म्हणून व्यक्तिमत्वाचा विकास शारीरीक गरजा भागवणे आणि मनाच्या आकांक्षा पूर्ण करणे एवढ्यापुरता मर्यादित राहू शकत नाही. शरीर आणि मनाबरोबर त्यात आत्माही आला पाहिजे. आपल्या आत्म्याचे पोषण आवश्यक आहे. आपली आत्मिक वाढ महत्वाची आहे. शरीर, मन आणि आत्मा ह्यांचे संतुलन राखणे गरजेचे आहे.*           ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••     💥💥💥💥💥💥💥💥💥      *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *समाजाच्या वास्तव परिस्थिती लक्षात घेता काही गोष्टी अर्जंट पाहिजेत.* *एक इलेक्ट्रिशियन पाहिजे,* *जो एकमेकांशी न* *बोलणाऱ्या दोन व्यक्तीमध्ये पुन्हा* *एकदा कनेक्शन जोडून देईल,* *एक ऑप्टिशियन पाहिजे,* *जो लोकांची दृष्टी आणि* *दृष्टीकोन नीट करून देईल* , *एक कलाकार पाहिजे,* *जो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मित* *हास्ययाचे रेषा रेखाटू शकेल* , *एक बांधकामगार पाहिजे,* *जो दोन शेजाऱ्यांमध्ये* *उत्तम सेतू उभारू शकेल,* *एक माळी काका पाहजे,* *जो चांगल्या विचारांच* *रोपण करू शकेल,* *एक प्लंम्बर पाहिजे,* *जो तुंबलेल्या मनांना* *मोकळं करू शकेल,* *एक शास्त्रज्ञ पाहिजे,* *जो एकमेकांबद्दलची* *ओढ शोधू शकेल,* *आणि सर्वात महत्वाचे म्हणजे,* *एक शिक्षक पाहिजे,* *जो एकमेकांशी संवाद कसा* *साधायचा ते शिकवू शकेल,* *आज सर्वांना* *याचीच नितांत गरज आहे..!!* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते* ) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• परमेश्वराने आपल्याला या जगात इतर जीवापेक्षा वेगळा जीव जन्माला घालून काहीतरी आपल्या हातून चांगले कृत्य घडावे म्हणून पाठवले आहे.मनुष्यजन्म हा इतर जीवजन्मापेक्षा सर्वश्रेष्ठ जन्म आहे हेही आपण नाकारू शकत नाही.कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपल्या हातून काहीतरी सत्कृत्य घडावे,इतर जीवांना आपण आपल्यासारखाच जीव मानावा,त्यांची अवहेलना करु नये, संकटकाळी त्यांच्या मदतीला धावून जावे,आपण जशी सुखासाठी धडपड करत असतो मग इतर जीवांना का दु:ख द्यावे.परमेश्वराने सगळ्याच जीवांना समान जीव देऊन स्वतंत्रपणे जगण्यासाठी स्वातंत्र्य दिले आहे त्यांचे स्वातंत्र्य आपण हिरावून घेऊ नये ही भावना आपल्या अंत:करणात सतत ठेवून जगायला शिकले पाहिजे,केवळ आपल्या स्वार्थासाठी जगणे नाही तर इतरांसाठी जगणे हा सर्वात मोठा उद्देश आपल्या मनुष्यजन्माचा आहे हे आपण लक्षात ठेऊन मनुष्यजन्माचे सार्थक करावे.ही मनुष्यजन्माची संधी पुन्हा प्राप्त होणार नाही.म्हणून मनुष्य जन्माला विशेष महत्त्व आहे.या चांगल्या, सुंदर जन्माला कलंक लागू न देता जीवन जगायला शिकले पाहिजे तरच परमेश्वराने आपल्याला दिलेल्या मनुष्यरुपी प्रतिनिधींचे कार्य पूर्ण झाल्याचे समाधान वाटेल.नाही तर " आला जन्माला आणि गेला वाराला " असेच होईल. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🌹🍃🍂🌹🍂🍃🌹🍃🌹🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *सहकार्याची भावना जागृत होणे* एका गावात _एक पोस्टमन_ पत्रवाटप करायचा. एके दिवशी एका घरासमोर उभा राहून त्याने आवाज दिला, *"पोस्टमन ssssss"* आतून एका मुलीचा आवाज आला,. *"जरा थांबा, मी येतेय.."* दोन मिनिटे झाली, पाच मिनिटे झाली. दार काही उघडेना. शेवटी पोस्टमन वैतागला. आणि जोरात म्हणाला, *"कुणी आहे का घरात ? पत्र द्यायचे आहे.."* आतून मुलीचा आवाज आला, *"काका, दाराच्या खालच्या फटीतून पत्र सरकवा,मी नंतर घेते.."* पोस्टमन, *"तसे चालणार नाही, रजिस्टर पत्र आहे. सही लागेल."* पाच मिनिटे पुन्हा शांतता. आता पोस्टमन रागावून पुन्हा आवाज देणार इतक्यात दार उघडले. _दारातली मुलगी पाहून पोस्टमन शॉक्ड !! दोन्ही पायाने अपंग असलेली एक तरुण मुलगी दारात उभी होती._ काठीच्या आधाराने चालत यायचे असल्याने तिला वेळ लागला होता. हे सगळे पाहून तो पोस्टमन वरमला. पत्र देऊन, सही घेऊन तो निघून गेला. असेच अधून मधून तिची पत्र यायची, आता मात्र पोस्टमन न चिडता तिची वाट पाहत दारासमोर उभा राहत असे. असेच दिवस जात होते. दिवाळी जवळ आलेली.. तेव्हा एकदा मुलीने पाहिले की आज _पोस्टमन अनवाणी पायानेच आलाय._ ती काही बोलली नाही. मात्र पोस्टमन गेल्यावर _दाराजवळच्या मातीत पोस्टमनच्या पावलाचे ठसे उमटले होते, त्यावर कागद ठेवून तिने ते माप घेतले._ नंतर काठी टेकत टेकत तिने गावातील चांभाराकडे तो कागद देऊन _एक सुंदर चप्पल_ जोड खरेदी केली. रिवाजाप्रमाणे पोस्टमनने गावात इतरांकडे _"दिवाळी पोस्त" (म्हणजे बक्षिशी)_ मागण्याची सुरुवात केली. अनेकांनी त्याला बक्षिशी दिली. असे करता करता तो त्या मुलीच्या घराजवळ आला. हिच्याकडे काय बक्षिशी मागणार ? _बिचारीवर आधीच अपंगत्वाचे दुःख आहे._ पण आलोच आहोत तर सहज भेटून जाऊ, असा विचार करून त्याने तिला आवाज दिला. मुलीने दार उघडले. तिच्या हातात सुंदर पॅकिंगचा बॉक्स होता. तो तिने त्याला दिला आणि सांगितले, ही माझ्याकडून बक्षिशी आहे. पण घरी जाऊन बॉक्स उघडा" घरी येऊन त्याने बॉक्स उघडला. त्यात सुंदर चप्पला, त्याही त्याच्या मापाच्या पाहून _त्याचे डोळ्यातून पाणी वाहू लागले._ दुसऱ्या दिवशी पोस्टमन नवीन चप्पल घालून त्याच्या ऑफिसात साहेबांकडे गेला. आणि म्हणाला, " मला फंडातून  कर्ज हवे आहे" साहेब म्हणाला,  "अरे आधीच तुझ्यावर कर्ज आहे. पुन्हा आता कशाला ? पोस्टमन म्हणाला, "मला जयपूर फूट (लाकडी पाय) घ्यायचे आहेत. त्यासाठी हवे आहेत." साहेब : "पण तुझा मुलगा तर धडधाकट आहे. जयपूर फूट कुणासाठी? पोस्टमन म्हणाला "साहेब, जे माझ्या धडधाकट मुलाला उमजले नाही, ते एका परक्या अपंग मुलीला उमजले आहे. माझे "अनवाणी" दुःख तिने कमी केले आहे. तिच्यासाठी मी किमान कर्जाने ना का होईना पण पाय घेऊन देऊ शकतो. म्हणून कर्ज हवे आहे." _साहेबासह सर्व स्टाफ निशब्द !! सारेच गहिवरलेले!!_                                               *तात्पर्यः*  नाती ही केवळ रक्ताची असून भागत नाही.  तर नात्याची भावना रक्तात असावी लागते. ती ज्याच्या अंगी, (मग भले ही तो कुटुंबातला नसला तरी) तो आपला नातेवाईक मानायला हरकत नाही. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~