✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 01/02/2018 वार - गुरूवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९९२ - भोपाळच्या मुख्य न्यायाधीशांनी युनियन कार्बाइडचा मुख्य अधिकारी वॉरेन अँडरसनला फरारी घोषित केले.  २००३ - अंतराळातून परतताना स्पेस शटल कोलंबियाचा स्फोट. सात अंतराळवीर मृत्युमुखी.  २००४ - मक्केत हज चालु असताना चेंगराचेंगरीत २४४ ठार.  💥 जन्म :- १८८४ - सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, प्राच्यविद्यापंडित, मराठी कोशकार.  १९०४ - बा.रा.घोलप, शिक्षणमहर्षी  १९१० - जहांगीर खान, भारतीय क्रिकेट खेळाडू.  १९५८ - जॅकी श्रॉफ, भारतीय चित्रपट अभिनेता.  १९७१ - अजय जडेजा, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-   १९९५ - मोतीराम गजानन रांगणेकर, मराठी नाटककार  २००३ - स्पेस शटल कोलंबियातील अंतराळवीर - मायकेल पी. अँडरसन, डेव्हिड ब्राउन, कल्पना चावला, लॉरेल क्लार्क, रिक डी. हसबंड, विली मॅककूल, इलान रमोन *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣  *नवी दिल्ली- उपनगरीय रेल्वे-मेट्रोच्या डब्यांची लातूरमध्ये निर्मिती, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची माहिती* ----------------------------------------------------- 2⃣  *बिहार - पाटणा येथील फतुहा येथे गंगा नदीत बोट उलटून 5 जणांचा मृत्यू, 15 जण करत होते प्रवास, कुटुंबियांना 4 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा  बिहार सरकारने घेतला निर्णय* ----------------------------------------------------- 3⃣  *वॉशिंग्टन : ज्यांच्याकडे चांगलं शिक्षण आणि ज्यांची चांगली वर्तणूक आहे, अशांना 12 वर्ष अमेरिकेचे नागरिकत्व मिळणार - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं प्रतिपादन* ----------------------------------------------------- 4⃣  *उत्तर भारतात भूकंपाचा धक्का, दिल्ली-एनसीआर, जम्मू-श्रीनगरमध्ये जाणवले भूकंपाचे हादरे.* ----------------------------------------------------- 5⃣  *कोल्हापूर - आंबाबाई मंदिराचा 80 कोटींचा विकास आराखडा मंजूर* ----------------------------------------------------- 6⃣  *नवी दिल्ली- पंतप्रधान मोदींनी लाँच केला 'खेलो इंडिया' स्कूल गेम्स कार्यक्रम* ----------------------------------------------------- 7⃣  *पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू रमीझ राजाने भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडचे केले कौतुक.* ----------------------------------------------------- विशेष बातमी :-  *आज केंद्रीय अर्थसंकल्प होणार सादर* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *नासा येवतीकर* या blog ला भेट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://goo.gl/A2cY7L आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= कल्‍पना चावला (मार्च १७ इ.स. १९६२:कर्नाल, हरयाणा -- फेब्रुवारी १ इ.स. २००३:टेक्सासवर अंतराळात) ही अमेरिकन अंतराळवीर होती. ती भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथम महिला होती. कल्पना चावला यांचा जन्म १ जुलै 1962 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बनारसीलाल चावला असे होते. त्यांच्या आईचे नाव संयोगीता चावला असे होते. त्यांना एक भाऊ व एक बहिण होती. कल्पना चावला यांना मुलांच्या धांगडधिंगाण्यात आवड होती. नटणे, घरकाम यापेक्षा त्यांना मित्र मैत्रिणींबरोबर सायकलने ट्रीप ला जाण्यात रस वाटे. त्यांना बाहेरच्या जगात फिरण्यास खूप आवडे. त्या भावाबरोबर खूप मस्ती करायच्या. त्या सर्वात लहान व सर्वांच्या लाडक्या होत्या. त्यांना सर्वजण लाडाने ‘मोट’ असे म्हणत. त्यांचा भाऊ संजय हा त्यांचा लहानपणी आदर्श होता. त्याच्याबरोबर दंगामस्ती करण्यात लहान कल्पना पटाईत होत्या. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक  📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= आयुष्यपण एक रांगोळीच आहे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *1) भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?*           वाघ *2) भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ?*            मोर *3) भारताचा राष्ट्रीय फुल कोणते ?*            कमळ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 विठ्ठल चिंचोलकर, सहशिक्षक, धर्माबाद 👤 शिवानंद सूर्यवंशी 👤 शेख एम. बी. केंद्रप्रमुख, नांदेड 👤 कवी गजेंद्र ढवळापुरीकर, औरंगाबाद 👤 सादिक शेख 👤 अतुल भुसारे 👤 शिवम पडोळे 👤 शिवराज रंगावार 👤 राजेश हाक्के *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छ* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========             *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ=========     *कर्म* दोष देतात लोक  नेहमी फक्त धर्माला पण दोष असतो तो  आपल्या वाईट कर्माला वाईट कर्माचा परिणाम  कधीही वाईट असतो  चांगले काम करत रहा परिणाम राईट असतो      शरद ठाकर   सेलू जि परभणी   8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *आपल्या लहानपणचं गावं लहान होतं. शंभर-दोनशे उंब-यांचं.. तिथं मरीआईचं आणि मारूतीचं अशी दोन मंदिरं होती. गावात बहुतेक शेतकरी, कामकरी, कष्टकरी. गावात कधी वासूदेव यायचा; पोतराज, बहुरूपी, गारूडी, नंदीबैलवाला, जोगतिणी यायच्या; जादूगार, अस्वलं-माकडं घेऊन येणारे, कसरतपटू येत.  शिवाय डोंबारी..डोक्यावर लाल फेटा, पांढरा मळकट शर्ट, खाली धोतर, जुन्या फाटक्या चपला आणि गळ्यात ढोल अडकवून तो वाजवणारा कर्ता पुरूष, त्याची बायको आणि मुलांचा गोतावळा. नवरा-बायको सफाईने गुणिले(×) आकाराचे दोन दोन खांब मातीत घट्ट पुरायचे आणि त्यांना जोडणारा दणकट दोरखंड.*  *मग त्याची मुलगी हातात पाच-सहा फूट लांब काठी घेऊन दोरखंडावर एका टोकाला उभी रहायची. खाली तिचा ढोलकर बाप, आई लोकगीत म्हणत असे आणि लहान भावंडं मातीत खेळत असत. डोंबा-याच्या वाद्यातून येणारा आवाज आसमंत भारून टाकायचा. त्याच्या दिशेने मग गावातील आबालवृद्ध गोळा व्हायचे. मग ती दोरखंडावर उभी असलेली मुलगी हातांतली काठी आडवी करीत, आपला तोल सांभाळत, खांबाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत जायची. ती दोराच्या मध्ये जेव्हा यायची तेव्हा तिचा तोल जाऊन ती खाली पडणार की काय असे वाटायचे. प्रेक्षकांची ह्रदयं त्या दृश्यानं क्षणभर थांबल्याचा भास व्हायचा. पण दोरावरची मुलगी वाकबगार. तिचा बाप मग प्रेक्षकांतून तबक फिरवायचा.*  *"जसं ती मुलगी काठीच्या आधाराने तोल सांभाळते, संसारात आपण स्वत:ला असं सांभाळत गेलो की आयुष्याचं सार्थक झालं असं समजलं जातं."*     ••●🌷‼ *रामकृष्णहरी* ‼🌷●••            🌷🌷🌷🌷🌷🌷     *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= तुम्ही केलेला एक चांगला विचार तुम्हाला तर आनंद देतोच आणि त्या तुमच्या आनंदाबरोबरच इतरांनाही तुमच्या चांगल्या विचारांमुळे आनंद आणि प्रेरणा मिळते.म्हणजे तुम्ही केवळ तुमच्या आनंदी जीवनाचा विचार करत नाही तर इतरांच्याही आनंदी जीवनाचा विचार करत आहात हे लक्षात असू द्या. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही* - मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही.  *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= घोडा आणि नदी एकदा एका माणसाला त्याच्या घोड्यासमवेत एक नदी पार करायची असते. परंतु त्याला नदीची खोली माहीत नसल्याने तो तिथेच काठावर विचार करत बसतो. मदतीसाठी आजुबाजुला पाहत असताना त्याला तेथे एक लहान मुलगा दिसतो. तेव्हा त्या माणसाने लहान मुलाला नदीच्या खोलीबद्दल विचारले. मुलाने घोड्याकडे एकदा पाहीले आणि क्षणभर थांबुन तो विश्वासाने म्हणाला, " निश्चींतपणे जा, तुमचा घोडा नदी सहज पार करु शकेल". मुलाचा सल्ला मानुन त्या माणसाने नदी पार करण्यास सुरुवात केली. परंतु नदीच्या मध्यावर पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले की नदी खुप खोल आहे. आणि तो जवळ जवळ बुडायलाच आला. कसाबसा तो त्यातून सावरला आणि बाहेर येउन त्या मुलावर जोरात खेकसला. मुलगा पुरता घाबरला होता आणि घाबरत घाबरतच बोलला, "पण माझी बदके तर खुप लहान आहेत आणि ते दररोज नदी पार करतात. त्यांचे पाय तर तुमच्या घोड्यापेक्षा खुप लहान आहेत." उगाच कोणाचाही सल्ला ऐकण्याआधी त्यांना खरोखरच काही माहीती आहे का ते जाणुन घ्या.... 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 31/01/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .   *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-   १९५० - राष्ट्रपती म्हणून डॉ.राजेंद्रप्रसाद यांचे संसदेपुढे पहिले भाषण. त्यापूर्वी ते घटना समितीचे अध्यक्ष होते. 💥 जन्म :-  १८९६ - दत्तात्रय रामचंद्र बेंद्रे, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड महाकवी.  १९३१ - गंगाधर महांबरे, ज्येष्ठ संगीतकार  १९७५ - प्रिती झिंटा, हिंदी चित्रपट अभिनेत्री. 💥 मृत्यू :-   १९९४ - वसंत जोगळेकर, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक.  २००० - के.एन.सिंग, प्रसिद्ध चित्रपट अभिनेते.  २००४ - सुरैय्या, ज्येष्ठ गायिका व अभिनेत्री. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷   *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣  *श्रीमंत देशांमध्ये भारत सहाव्या स्थानावर, अमेरिका सर्वात श्रीमंत* ----------------------------------------------------- 2⃣  *कोल्हापूर - कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित वीरेंद्र तावेडला जामीन मंजूर.* ----------------------------------------------------- 3⃣  *वॉशिंग्टन - अमेरिकेच्या फेडरल ब्युरो आॅफ इन्व्हेस्टिगेशनचे (एफबीआय) उपसंचालक अ‍ॅन्ड्यू मॅकबेक यांनी पदाचा राजीनामा दिला* ----------------------------------------------------- 4⃣  *मुर्शिदाबाद- पश्चिम बंगालमधील बस दरीत कोसळून झालेल्या अपघातातील मृतांचा आकडा 42 वर* ----------------------------------------------------- 5⃣  *अलिबाग : आयकर विभागाकडून अभिनेता शाहरूख खानचं फार्महाऊस सील.* ----------------------------------------------------- 6⃣  *चंद्रदर्शनाचा आज तिहेरी योग, खग्रास चंद्रग्रहण, सुपरमून आणि ब्ल्यूमून यांचे साध्या डोळ्यांनी रात्रीच्या प्रारंभी पूर्व आकाशात दर्शन होणार असल्याचे खगोल अभ्यासक, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.* ----------------------------------------------------- 7⃣  *अंडर 19 वर्ल्ड कप - भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, 69 धावांवर पाकिस्तान ऑल आऊट, भारताचा अंतिम सामन्यात प्रवेश.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========           *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ=========                     *व्यसन* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.  http://kathamaala.blogspot.com/2017/05/blog-post_10.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃    *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= सुरैया (१५ जून १९२९ – ३१ जनवरी २००४) भारतीय सिनेमा की गायिका और अभिनेत्री थीं। उन्होंने ४० और ५० के दशक में हिन्दी सिनेमा में अपना योगदान दिया। उन्हें उनकी प्रतिभा के लिए उपमहाद्वीप की मलिका-ए-तरान्नुम से नवाज़ा गया। ३१ जनवरी २००४ को सुरैया का निधन हो गया। *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक  📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========                *"" फ्रेश सुविचार ""* =========ஜ۩۞۩ஜ========= माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात..एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *1) राष्ट्रगीत कोणी लिहिले ?* 👉🏼 रवींद्रनाथ टागोर *2) वंदे मातरम कोणी लिहिले ?* 👉🏼 बंकिमचंद्र चॅटर्जी *3) खरा धर्म ही कविता कोणी लिहिली ?* 👉🏼 साने गुरुजी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 विनायक हिरवे, सहशिक्षक, कोल्हापूर 👤 बालाजी पुलकंठवार, सहशिक्षक, धर्माबाद 👤 हिलाल पाटील *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ=========     *कर्म* दोष देतात लोक  नेहमी फक्त धर्माला पण दोष असतो तो  आपल्या वाईट कर्माला वाईट कर्माचा परिणाम  कधीही वाईट असतो  चांगले काम करत रहा परिणाम राईट असतो      शरद ठाकर   सेलू जि परभणी   8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *जन्माला आल्यापासून आपल्या शरीराचे आणि मनाचे भरणपोषण तर करायचे आणि कोणत्याही गोष्टींचा अतिरेक टाळायचे अतिशय अवघड कार्य आपल्याला करायचे असते. विकारांचे हे मोहमयी विश्व आपल्याला सतत आकर्षित करून घेत असते. अशावेळी डोंबा-याच्या खेळातील दोरावरच्या मुलीच्या हातातील काठीकडे आणि तिच्या हालचालींकडे पाहायचे किती शिताफीने ती आपले संतुलन साधत असते. पण अशावेळी आपण संभ्रमित होतो. कोणताही अचूक निर्णय आपल्याला घेता येत नाही.*  *आयुष्याच्या या खेळात हजारदा बाद होण्याच्या शक्यता उद्भभवतात. मग महाभारतातल्या युद्धक्षेत्रावर प्रारंभी गलितगात्र झालेल्या अर्जुनासारखी आपली अवस्था होते. भगवद् गीता इथे उपयोगी पडते. शंकाकुल अर्जनाच्या एकेक प्रश्नाचे उत्तर श्रीकृष्ण देतो आणि त्याला जाणता अर्जुन, आपला प्रिय शिष्यत्तोम बनवतो. भगवद् गीतेच्या प्रारंभी भेटणारा अर्जुन आणि शेवटी भेटणारा ज्ञानी अर्जुन. यात श्रीकृष्णाने स्व-स्वरूपाची जाणीव करून त्याला ज्ञाता अर्जुन केलेले. जणू श्रीकृष्णाचे ते दुसरे रूपच. आपण मात्र श्रीकृष्णाची वाट पाहत स्वयं अध्ययनाने आपला मार्ग शोधायचा..!*    ••●🍁‼ *रामकृष्णहरी* ‼🍁●•                 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ=========     या जगात कोणताही जीव जन्माला आला की,त्याचा जीवनप्रवास ख-या अर्थाने सुरू होतो.त्याला त्याचे जीवन कसे जगायचे यासाठी परमेश्वराने त्यांच्यासोबत मन आणि बुद्धी ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी त्याला म्हणजे विशेष करुन मानवाला आयुष्याच्या शेवटपर्यंत पुरेल अशी भेट म्हणून बहाल केली आहे. ह्याचा आधार घेऊनच जीवन कसे जगायचे याचे तंत्र तो शिकतो.त्यानंतर तो आपल्या मनाचा आणि बुध्दीचा चांगला सदुपयोग केला तर नक्कीच जीवनाचा प्रवास सुखावह करतो आणि जर का दुरुपयोग करायला लागला तर जीवनप्रवास दु:खमय व्हायला लागतो.ह्या दोन गोष्टी मन आणि बुद्धी यावरच अवलंबून आहेत.मग मानवरुपी जीवाने आपले जीवन कसे जगायचे आणि आपले जीवन जगण्यासोबत इतर जीवांना आपण न दुखवता कसे जगवायचे हे जरी कौशल्य मनाच्या आणि बुध्दीच्या सृजनशील कौशल्याने हाताळायला आले तरी परमेश्वराने दिलेल्या जन्माचे नक्कीच सार्थक झाल्याचे समाधान वाटेल.हा जन्म परत येणार नाही हे तर संत्र्याच्या आहेच.यानंतर आपले शरीररुपी अस्तित्व संपणार आहे पण आपण आपल्या जीवनात केलेले चांगले कार्य येणा-या जीवांच्या जीवनासाठी प्रेरणा ठेवून जाणार आहे अर्थात तुम्ही तुमच्या कार्याने अमर राहणार आहेत हे लक्षात असू द्यावे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *आंधळं दळत अन कुत्र पिठ खातं* - परिश्रम एकाचे, फायदा दुसर्‍याचा.  *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ= ======== 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *समयसुचकता* एकदा अरण्याचा राजा सिंह याने आपल्या प्रजाजनांना दरबारात हजर राहण्याचा हुकूम सोडला. त्याप्रमाणे बहुतेक प्राणी सिंहाच्या दरबारी आले. अस्वलाला सिंहाच्या स्वयंपाक घरातून येणारा वास सहन न झाल्याने त्याने आपले नाक दाबून धरले. हा त्याचा उद्धटपणा पाहून सिंह रागावला व त्याने आपल्या पंजाच्या एका तडाख्यात अस्वलाला मारले. हा भयंकर प्रकार पाहून माकड भितीने थरथर कापू लागले. मग काहीतरी बोलायचे म्हणून ते सिंहास म्हणाले, 'राजेसरकारांच्या स्वयंपाक घरातून येणारा सुवास निरनिराळ्या उंची मसाल्याचा आहे. तो त्या मूर्ख अस्वलाला सहन झाला नाही. हे त्याचं दुर्दैव होय. राजे सरकारांचे पंजे तर फारच सुंदर आहेत, तसे इतर कोणाचेही नसतील.' माकडाचे हे बोलणे ऐकून सिंहाचे समाधान तर झाले नाहीच पण तो इतका चिडला की, एका क्षणात त्याने त्या माकडाच्या चिंधड्या उडविल्या. नंतर तो कोल्ह्याकडे वळून त्याला म्हणाला, 'कसे काय कोल्हेदादा ? माझ्या स्वयंपाकघरातून येणारा वास कशाचा असावा असं तुला वाटतं ?' त्यावर तो कोल्हा धूर्तपणे म्हणाला, 'महाराजाधिराज, नुसत्या वासावरून तो वास कशाचा आहे हे सांगता येण्याइतकं माझं नाक आधीच तीक्ष्ण नाही त्यातून मला आज पडसं झालेलं असल्यामुळे आपल्या घरातून येणार्‍या वासासंबंधाने अभिप्राय देण्याचं धाडस मी करत नाही.' तात्पर्य प्रसंगावधान व समयसूचकता या गुणांच्या बळावर माणुस वाटेल तसल्या संकटातून मुक्त होऊ शकतो. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 29/01/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-   १७८० - जेम्स ऑगस्टस हिकी यांनी कोलकाता येथे 'कलकत्ता जनरल ऍडव्हर्टायझर' या नावाने साप्ताहिक वर्तमानपत्र सुरु केले. हिकीज बेंगाल गॅझेट नावाने ओळखले जाणारे हे वर्तमानपत्र म्हणजे भारतीय पत्रकारितेची सुरुवात. २००६ - शेख सबाह अल-अहमद अल-जबर अल-सबाह कुवैतच्या अमीरपदी. 💥 जन्म :-  १८७१ - चंद्रशेखर शिवराम गोर्‍हे, बडोदा संस्थानचे राजकवी.  💥 मृत्यू :-   १९५० - अहमद अल-जबर अल-सबाह, कुवैतचा अमीर. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली- आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होतेय. 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यांत चालणार आहे- सुमित्रा महाजन* ----------------------------------------------------- 2⃣ *जकार्ता : भारताची फुलराणी सायना नेहवालचा इंडोनेशिया मास्टर्सच्या अंतिम फेरीत झाला पराभव* ----------------------------------------------------- 3⃣ *दिल्लीच्या राजपथावर फडकला भगवा, प्रजासत्ताक दिनी राजपथावर अवतरलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला मिळाला प्रथम क्रमांक* ----------------------------------------------------- 4⃣ *ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये या वर्षी नव्या शब्दाच्या रूपात 'आधार' ला  मिळाली जागा* ----------------------------------------------------- 5⃣ *मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या कामाला गती द्या; मुख्य सचिवांच्या उच्चाधिकार समितीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश.* ----------------------------------------------------- 6⃣ *यवतमाळ : उमरखेड येथे राज्यस्तरीय आंबेडकरी साहित्य संमेलनाला सुरुवात. खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं उद्घाटन.* ----------------------------------------------------- 7⃣ *दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरच्या कसोटी सामन्यात भारताने आफ्रिकेवर 63 धावांनी मात करत मालिकेचा अखेर गोड केला आहे.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ=========       *जनसेवेतच ईश्वराचीही सेवा* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_8.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= थॉमस पेन (अंग्रेज़ी: Thomas Paine, जन्म: 9 फ़रवरी 1737, देहांत: 8 जून 1809) एक लेखक, अविष्कारक, बुद्धिजीवी, क्रांतिकारी और संयुक्त राज्य अमेरिका के राष्ट्रपिताओं में से एक थे। उनका जन्म इंग्लैण्ड के नॉर्फ़ककाउंटी (ज़िले) के थ़ॅटफ़र्ड शहर में हुआ था और सन् 1774 में वे इंग्लैण्ड छोड़ अमेरिका में जा बसे। उन्होंने सन् 1776 की अमेरिकी क्रांति में अहम भूमिका निभाई। उन्होने अमेरिका में क्रांति की उठती लहर को अपनी लिखाई के ज़रिये अपनी राजनैतिक सोच का ढाँचा दिया। उनकी दो सब से प्रभावशाली लिखईयाँ थीं - "आम सूझबूझ" (Common Sense, कॉमन सॅन्स) नाम की पुस्तिका जिसमें अमेरिका की ब्रिटेनसे आज़ादी की दलील दी गई"अमेरिकी बवंडर" (The American Crisis, द अमॅरिकन क्राइसिस) नाम की पत्रिकाएँ जो 1776-1783 तक चलीं और जिनमें अमेरिका की क्रांति की भारी हिमायत की गई "कॉमन सॅन्स" अमेरिका में स्वतंत्रता के लिए जागरूकता लाने में इतनी कामयाब हुई के जॉन ऐडम्स (अमेरिका के दूसरे राष्ट्रपति) ने कहा के "कॉमन सॅन्स के लेखक की क़लम के बिना वाशिंगटन का तलवार उठाना बेकार जाता"। *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक  📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *"" फ्रेश सुविचार ""* =========ஜ۩۞۩ஜ========= मोठा विचार केला तरच मोठे बनू शकाल *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१)मुंडा आदिवासी जमात अधिक वास्तव्य असणारे राज्य कोणते?* 👉   झारखंड *२)  दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगातून तयार होणाऱ्या पदार्थाला काय म्हणतात?* 👉    संयूग  *३)संयूगात असणाऱ्या घटक मूलद्रव्यांच्या सौजन्या व अणूंची संख्या यांच्या साहाय्याने संयूगाच्या केलेल्या लेखनास काय म्हणतात?* 👉   रेणूसुत्र  *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 सुनील वानखेडे, सहशिक्षक, किनवट 👤 वीरभद्र कारे 👤 कोंडीराम केशवे 👤 नरेंद्र जोशी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *झाड लावणारा* झाड लावणाराच आज उन्हात उभा आहे  नवख्या माणसाचा  झाडावर ताबा आहे  झाड न लावता फळाची  काही आशा धरतात झाड लावणाराला  हळूच बाजूला करतात       शरद ठाकर     सेलू जि परभणी     8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *जन्माला आल्यापासून आपल्या शरीराचे आणि मनाचे भरणपोषण तर करायचे आणि कोणत्याही गोष्टींचा अतिरेक टाळायचे अतिशय अवघड कार्य आपल्याला करायचे असते. विकारांचे हे मोहमयी विश्व आपल्याला सतत आकर्षित करून घेत असते. अशावेळी डोंबा-याच्या खेळातील दोरावरच्या मुलीच्या हातातील काठीकडे आणि तिच्या हालचालींकडे पाहायचे किती शिताफीने ती आपले संतुलन साधत असते. पण अशावेळी आपण संभ्रमित होतो. कोणताही अचूक निर्णय आपल्याला घेता येत नाही.*  *आयुष्याच्या या खेळात हजारदा बाद होण्याच्या शक्यता उद्भभवतात. मग महाभारतातल्या युद्धक्षेत्रावर प्रारंभी गलितगात्र झालेल्या अर्जुनासारखी आपली अवस्था होते. भगवद् गीता इथे उपयोगी पडते. शंकाकुल अर्जनाच्या एकेक प्रश्नाचे उत्तर श्रीकृष्ण देतो आणि त्याला जाणता अर्जुन, आपला प्रिय शिष्यत्तोम बनवतो. भगवद् गीतेच्या प्रारंभी भेटणारा अर्जुन आणि शेवटी भेटणारा ज्ञानी अर्जुन. यात श्रीकृष्णाने स्व-स्वरूपाची जाणीव करून त्याला ज्ञाता अर्जुन केलेले. जणू श्रीकृष्णाचे ते दुसरे रूपच. आपण मात्र श्रीकृष्णाची वाट पाहत स्वयं अध्ययनाने आपला मार्ग शोधायचा..!*    ••●🍁‼ *रामकृष्णहरी* ‼🍁●••              🍁🍁🍁🍁🍁🍁     *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ=========  जर प्रत्येकाने आपल्या कामाचे नियोजन पूर्वनियोजित आणि विचारपूर्वक केले तर ते काम यशस्वीपणे पार पडेल. अन्यथा कामामध्ये व्यवस्थितपणा राहणार नाही. कामाचा दर्जाही घसरेल, मनाची घालमेल होईल, कामामध्ये लक्ष राहत नसल्यामुळे आणि एकाग्रता नसल्यामुळे स्वत:मध्ये चिडचिडेपणा येऊन आपला राग समोरच्या व्यक्तीवर काढायला लागतो. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आपल्या कामात पूर्वनियोजन करायला हवे.तरच आपल्याला मानसिक समाधान मिळेल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे - प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी अधिकार गाजवण्याची संधी मिळतेच.  *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ=========               *प्रत्यक्ष अनुभव* *साप, डोक,शेपुट* (तीन शब्दांवरुन कथा) एकदा एका सापाच्या शेपटाने त्याच्या डोक्याविरुद्ध बंड उभारले. ते म्हणाले, 'कोणत्याही प्राण्याच्या एकाच शेपटानं वाटेल तिकडं जावं अन् दुसर्‍या शेपटाला त्याच्या मनाविरुद्ध आपल्या बरोबर ओढत न्यावं ही मोठ्या लाजेची व जुलुमाची गोष्ट आहे.' हे शेपटाचे बोलणे ऐकून डोक्याने त्याची समजूत घालण्याचा खूप प्रयत्‍न केला. ते म्हणाले, 'शेपटाला डोळे नाहीत, मेंदू नाही. यामुळेच त्याला वाटेल तिकडे जाण्याचे स्वातंत्र्य नाही.' पण डोक्याचा हा युक्तिवाद शेपटास आवडला नाही. त्याने आपला हट्टीपणा तसाच चालू ठेवला. ते पाहून डोक्यास फार राग आला. त्याने त्यास वाटेल तिकडे जाण्याची परवानगी दिली. मग शेपटाने आपल्या इच्छेप्रमाणे फिरावयास सुरुवात केली. साप शेपटाकडून मागे सरपटत चालला असता एका उंच कड्यावरून खाली घसरला व त्यामुळे त्याच्या सर्व अंगाला फारच लागले. आपल्या मूर्खपणामुळे असे घडले हे पाहून शेपटास फार लाज वाटली व डोक्याशी स्पर्धा करण्याचे त्याने अजिबात सोडून दिले. तात्पर्य प्रत्यक्ष अनुभवाशिवाय स्वतःची किंमत व कर्तबगारी काय आहे हे मनुष्यास समजत नाही. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 *माझी शाळा माझे उपक्रम* 🌺 *जीवन विचार* 🌺 ➖➖➖➖➖➖➖ *आपल जीवन अनेकदा युध्दक्षेञ बनत असतं.त्यावेळी मनात मोठा संघर्ष चालू असतो.मनात विसंवादाच वादळ सुरू असतं तेव्हा आपल्या मनात सुसंवाद स्थापन करण्याचा प्रवृत्तीस विवेक असं म्हणावं !* *विवेक आपल्या मनाचं सुकाणू आहे तर विचार आपल्या मनाचं शीड आहे.सुकाणू आणि शीड नीट जागेवर राहून काम करत असतील तर समुद्रात इकडं - तिकडं सुरक्षितपणे फिरता येईल नाहीतर क्षणार्धात जलसमाधी मिळेल.विवेक ही मर्यादशील शक्ती आहे.समुद्राला मर्यादा असते.* pramila senkude *मर्यादा ही मनाच्या कुंपणासारखी असते. संयमाचा लगाम हाती असल्यानंतर जीवन अश्व इकडं - तिकडं कसा उधळेल?* *ज्याप्रमाणे फळावरुन झाडाला ओळखतात, सोन्याला कस लावून सोन्याची पारख करतात, आवाजावरुन घंटेची किंमत ठरवतात; त्याप्रमाणे मनुष्याच्या मनुष्यत्वाची पारख त्याच्या विवेकावरुन करतात.* 〰〰〰〰〰〰〰〰 *🙏🏼शब्दांकन/संकलन🙏* ✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)* जि.प.प्रा.शा. वाटेगाव, ता.हदगाव, जिल्हा नांदेड. http://www.pramilasenkude.blogspot.in 〰〰〰〰〰〰〰

*🌹🌷🌹सस्नेह* *निमंत्रण*🌹🌷🌹 💃💃💃💃💃💃 🇮🇳 उत्सव नृत्याचा , आनंदाचा , जोशाचा , ताशाचा , बलशाली , आनंदीत , हर्शीत होण्याचा नवनवोन्मेष घेण्याचा 🇮🇳 💃💃💃💃💃💃 जिल्हा परिषद *प्राथमिक* *शाळा वाटेगाव* शाळेत *बालमहोत्सव* सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मनोरंजन, समाजप्रबोधन आणि मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे. 🙏🙏 ठिकाण- *जिल्हा* *परिषद* *प्राथमिक* *शाळा वाटेगाव* *वेळ* - *सकाळी ठीक* *10 ..वा* *दि* *25/01/2018* *🙏🏻विनीत*🙏🏻 *शाळा* *व्यवस्थापन* *समिती* तथा *मुख्याध्यापक* व *सर्व* *शिक्षक* *वृंद* *जिल्हा* *परिषद* *प्राथमिक* *शाळा* वाटेगाव. (श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे.) धन्यवाद 🙏 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 25/01/2018 वार - गुरूवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  राज्याचा दर्जा मिळाला व ते भारताचे १८ वे राज्य बनले. १९८२: आचार्य विनोबा भावे यांना भारतरत्‍न प्रदान. १९९१: मोरारजी देसाई यांना भारतरत्‍न प्रदान. २००१: स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईनवाझ बिस्मिल्ला खाँ यांना भारतरत्‍न प्रदान. 💥 जन्म :- १८६३: सेवा सदन च्या संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या रमाबाई रानडे 💥 मृत्यू :-  १६६५: सोनोपंत डबीर १९८०: सोलापूरचे दाते पंचांग कर्ते लक्ष्मणशास्त्री दाते १९९६: रंगभूमी व चित्रपट अभिनेते प्रशांत सुभेदार २००१: भारतीय जनता पक्षाच्या नेत्या विजयाराजे शिंदे २०१५: ज्येष्ठ समीक्षक मधुकर दत्तात्रय तथा म. द. हातकणंगलेकर *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नागपूर मेट्रो येत्या मार्चपासून रुळावर धावणार, नागपूरकरांची प्रतीक्षा संपली.* ----------------------------------------------------- 2⃣ *नांदेड : शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या वसतिगृहात रॅगिंग झाल्याची पोलीसात तक्रार. दोषींवर कारवाईसाठी विद्यार्थ्यांनी पुकारला बंद.* ----------------------------------------------------- 3⃣ *रांची : चारा घोटाळ्याच्या तिस-या प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षांचा कारावास.* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबई : राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोव्यात ‘पद्मावत’ सिनेमा प्रदर्शित करणार नाही, मल्टिप्लेक्स असोसिएशनचा निर्णय* ----------------------------------------------------- 5⃣ *नवी दिल्ली - 38 जम्मू-काश्मीर पोलिसांना यंदाचा शौर्य पुरस्कार जाहीर* ----------------------------------------------------- 6⃣ *मेलबर्न - रॉजर फेडररची उपांत्य फेरीत धडक, उपांत्यपूर्व लढतीत थॉमस बर्डिचवर ७-६(१), ६-३, ६-४ अशा फरकाने केली मात* ----------------------------------------------------- 7⃣ *जोहान्सबर्ग कसोटी - भारताचा पहिला डाव १८७ धावांवर आटोपला, विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराची अर्धशतके* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त* राष्ट्रीय मतदार राजा जागा हो....! इंग्रजांच्या दीडशे वर्षे गुलामगिरीच्या नंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाले. त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी देश प्रजासत्ताक झाले. भारतात लोकशाही पद्धतीने राज्यकारभार चालविला जातो. जगात सर्वात यशस्वी लोकशाही....... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_22.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========                  *रमाबाई रानडे* रमाबाई रानडे (जानेवारी २५, इ.स. १८६२ : देवराष्ट्रे, सातारा जिल्हा, महाराष्ट्र, भारत – २६ एप्रिल, इ.स. १९२४) या स्त्री हक्क आणि समान अधिकार चळवळीच्या खंद्या पुरस्कर्त्या होत्या. त्यांनी या क्षेत्रात केलेले भरीव कार्य हे भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे. स्त्री चळवळ आणि सामाजिक सुधारणा या क्षेत्रातील त्या अग्रणी होत्या. रमाबाई रानडे म्हणजे पूर्वाश्रमीच्या यमुना कुर्लेकर. रमाबाई रानडेंचा जन्म २५ जानेवारी इ.स. १८६२ रोजी साताराजिल्ह्यातील एका लहानशा खेड्यात झाला. रमाबाईंना माहेरी असताना अक्षर ओळख झाली नव्हती. वयाच्या ११व्या वर्षी त्यांचा महादेव गोविंद रानडे यांच्याशी विवाह झाला. स्त्री शिक्षण हे त्या काळात सामाजिकदृष्ट्या वर्ज्य गोष्ट होती. महादेव रानडे हे सामाजिक चळवळ आणि नवविचारी मतवादाचे खंदे पुरस्कर्ते होते. घरच्यांच्या आणि समाजाच्या विरोधाला झुगारून महादेव रानडे यांनी आपल्या पत्‍नीस शिक्षित केले. रमाबाईंनी उत्तम गृहिणी धर्मासोबतच आपल्या पतीच्या सामाजिक कार्यात मदत करून मोलाची भर घातली. स्त्रियांना समान अधिकारांसोबतच शिक्षणाचा अधिकारही समाजाने नाकारला होता. लग्नानंतर रमाबाईंच्या शिक्षणाची सुरुवात झाली. रमाबाईंनी मराठी, हिंदीआणि बंगाली या भाषांमध्ये विशेष प्रावीण्य संपादन केले. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन असण्यात खूप फरक असतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा करतात ? * 👉 28 फेब्रुवारी *२) राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन कधी साजरा करतात ?* 👉 11 मे *३) राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा करतात ?* 👉 29 ऑगस्ट *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 प्रा. वैशाली देशमुख, कुही नागपूर साहित्य स्पंदन समूह, संचालिका 👤 ललेश पाटील मंगनाळीकर 👤 राजीव सेवेकर 👤 महेबूब पठाण 👤 अंबादास कदम 👤 राहुल आवळे 👤 नरेश दंडवते *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ=========   *परिपक्व* काही काही लोक नुसते बकत रहातात चांगल्या वाईटातून काही शिकत रहातात जिथून शिकता येईल तिथून शिकत रहावं जेवढ  होता येईल तेवढ परिपक्व व्हावं    शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *कवी कुसुमाग्रज, अब्दुल कलाम, आगरकर किंवा तुकोबा यांना काय म्हणावं, ही खरंच वेगळी माणसं होती का? 'वेडी' होती का? आणि हे 'वेड' असलंच तर ते कोणत्या प्रकारचं होतं? ही एवढी बुद्धिमान, कर्तबगार माणसं पण 'अर्थप्राप्ती' ला त्यांच्या जीवनात नगण्य स्थान होतं. 'जोडोनिय धन उत्तम व्यवहारे' हे त्यांना कळलं नसेल का?* *जगरहाटी वेगळी असते. लिओ टाॅलस्टाॅय यांची 'हाऊ मच लँड डज ए मॅन नीड?' ही कथा आहे. पाखोम हा शेतकरी तीचा नायक. त्याला जमीन घेण्याचं वेड आहे. शेवटी त्याची बश्कीर समुदायाच्या लोकांशी ओळख होते. ते पाखोमला अत्यल्प किंमतीला जमीन विकायला तयार होतात. मात्र एक अट असते. पाखोमने सूर्योदयाला धावायला सुरूवात करायची आणि सूर्यास्ताला थांबायचे. त्या दरम्यान जितकी जागा तो चालेल, तेवढी त्याला मिळेल. दुस-या दिवशी पाखोम धावू लागतो. सूर्यास्तापूर्वी तो मूळ जागेवर बश्कीरना भेटायला आणि आपण किती अंतर तुडवले हे सांगायला परततोही. बश्कीरांना तो ते सांगतोही. पण अतिश्रमाने तो कोसळतो.* *वर उल्लेखिलेल्या ध्येय वेड्यांच्या अगदी विरूद्ध टोकाची वृत्ती पाखोमची. माणसाला जन्मत:च काही मूलभूत वृत्ती प्राप्त झालेल्या असतात. काही स्वत:साठी झटतात; काही दुस-यांसाठी. अनंत काणेकरांनी 'दोन मेणबत्त्या' नावाचा सुंदर लघुनिबंध लिहिला आहे. त्यात रात्रभर तेवत राहून इतरांना प्रकाश देणारी एक आणि जिचा काहीच उपयोग न झाल्याने सडून, कुरतडून गेलेली दुसरी अशा मेणबत्त्यांचे सुरेख दर्शन घडवले आहे. शेवटी ज्याने त्याने आपली मेणबत्ती कोणती हे ठरवायचे आहे !*     ••●🔶‼ *रामकृष्णहरी* ‼🔶●••               🔶🔹🔶🔹🔶🔹     *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= या जगात सर्वात जास्त वेगवान आणि गतीमान जर कोण असेल तर या प्रश्नांचे उत्तर अनेकजण वेगवेगळ्या प्रकारे देऊ शकतील.पण माझ्या मते सगळ्यात जास्त वेगवान आणि गतीमान जर कोणी असेल तर फक्त मानवी मनच आहे.पहा ह्या मनाची आतापर्यंत कुणीही वेग आणि गती मोजली नाही.बहिणाबाईंच्याच शब्दांत सांगायचे झाले तर मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं,किती हाकला हाकला फिरी येतं पिकांवर......मन पाखरू पाखरू तयाची काय सांगू मात आता व्हतं भूइवर गेलं गेलं आभायात... अशा या मनाची गती एवढी आहे की ती मोजता येणेच अवघड आहे.अशा या मनाला जर का आपण आपल्या जीवनात आपल्या वशमध्ये ठेवले तर तो यशस्वी होतो आणि नाही ठेवले तर जीवन जगण्यात अपयशी ठरतो. अशा सर्वश्रेष्ठ मनाला आपल्या वशमध्ये ठेवण्याचा अधिक प्रयत्न करायला हवा.म्हणजेच आपल्या जीवनाचा खरा अर्थही कळेल आणि सुखही मिळेल. *©व्यंकटेश काटकर, नांदेड.* संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🏹🌸🍃🏹🌸🍃🏹🌸🍃🏹🌸🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *गरज सरो, वैद्य मरो* - आपले काम संपताच उपकारकर्त्याला विसरणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *कृती महत्वाची* स्वावामीजींच्या प्रवचनासाठी गावोगावहून लोक आले होते. स्वामीजी आपल्या श्रोत्यांना उत्तम उपदेश करत. या उपदेश सभेला ‘सत्संग‘ म्हणत. एकदा स्वामीजींना काही लोकांनी सत्संगासाठी निमंत्रित केल होत. दिवस थंडीचे होते. येणारे लोक शाली, स्वेटर घालून तसेच मफलर बांधून आले होते. त्यात काही काही उच्चभ्रू श्रीमंतही होते. मात्र, स्वामीजींचा वेश साधाच. अंगावर घाबळी पांघरलेली. एका मोठया प्रशस्त दिवाणखान्यात सभा सुरू झाली आधी एक भजन सुरू होते. मग स्वामीजींचा उपदेश. तेवढ्यात एक याचक त्या दिवाणखान्याच्या दाराशी आला. उघडाबंब थंडीने कुडकुडत, हातात कटोरा घेऊन उभा होता. दिनवाण्या मुद्रेने त्याने आत पाहिल. भजन सुरूच होत. स्वामीजी उठून त्या याचकाकडे गेले. आपल्या अंगावरची घाबळी त्याच्या अंगावर पांघरली आणि शिष्याला खूण केली. शिष्याने काही नाणी त्याच्या कटो-यात टाकली आणि मग तो गरीब याचक निघून गेला. हे सर्व दृष्य सर्वच लोक बघत होते. भजन संपलं. सत्संग सूत्रसंचालक म्हणाला, ‘आता स्वामीजी आपल्याला उपदेश करतील. आपले कान त्यासाठी आतुरले आहेत‘. पण स्वामीजी काही बोलेनात. बराच वेळ झाला तरी ते स्वस्थच बसून होते. श्रोत्यांमध्ये चुळबूळ सुरु झाली. अखेर सूत्रसंचालक म्हणाला, ‘स्वामीजी, आपण आम्हाला उपदेश देताय ना?‘ ‘मी उपदेश दिला आहे,‘ स्वामीजी खणखणीत आवाजात म्हणाले.  ’आपण काहीच बोलला नाहीत,‘ सुत्रसंचालक म्हणाला. ‘अस्स! म्हणजे तुम्हाला फक्त शब्दांचा उपदेश हवा आहे; कृती नको. त्या थंडीत कुडकुडणा-या माणसाची अवस्था तुमच्या ध्यानी नाही आली? मी केलेली कृती हाच माझा उपदेश! सर्व श्रोते थक्क झाले. *तात्पर्यः केवळ कोरड्या शब्दांपेक्षा कृती महत्वाची असते.* 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*माझी शाळा माझे उपक्रम* 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 *🌺आनंदनगरी*🌺 〰〰〰〰〰〰〰 *दि.२२जानेवारी २०१८ आमच्या जि.प.प्रा.शाळा वाटेगाव* येथे आनंदनगरी हा उपक्रम घेण्यात आलेला आहे. 👭👭👭👬👬👭👭 सर्वांनी आनंदाने भाग घेतला.विविध पदार्थ व त्यामधून मिळणारा आनंद याचा आस्वाद बालचिमुकल्यांनी व आम्ही सर्वांनी घेतला. 👉 *उद्दिष्ट* वस्तूंची देवाणघेवाण व व्यवहारी ज्ञान प्राप्त होणे. खरेदी विक्री नाणी नोटा यांचा वापर जमा शिल्लक परत हे समजणे. 〰〰〰〰〰〰〰 *✍शैक्षणिक चारोळी* *"छोट्या छोट्या उपक्रमातुन*, *मिळतो आनंद आणि ज्ञान* *जि.प.शाळेचा आहे आम्हांस अभिमान*" 〰〰〰〰〰〰 ✍ वृत्तलेखन/आयोजक श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे जि.प.प्रा.शा.वाटेगाव (स.शिक्षिका) ता.हदगाव जिल्हा नांदेड. 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 23/01/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९९६ - संगणक भाषा जावाचे सर्वप्रथम प्रकाशन. 💥 जन्म :- १८९७ - भारतीय क्रांतिकारक, नेताजी सुभाषचंद्र बोस १९२६ - मराठी राजकारणी, शिवसेना पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे 💥 मृत्यू :-  ११९९ - याकुब, खलिफा. १५६७ - ज्याजिंग, चिनी सम्राट. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सन 2017-18 या वर्षीचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त मान्यवर कलाकारांची नावे केली घोषित* ----------------------------------------------------- 2⃣ *गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल आज मध्य प्रदेशच्या राज्यपाल म्हणून घेणार शपथ* ----------------------------------------------------- 3⃣ *अखिल भारतीय नाट्य परिषद निवडणूक - मोहन जोशींचा अध्यक्षपदाचा अर्ज अपात्र.* ----------------------------------------------------- 4⃣ *शेअर बाजाराची घौडदौड सुरूच. शेअर बाजार 35 हजार 650 वर पोहचला. शेअर बाजार 36 हजारांवर पोहचण्याची चिन्ह.* ----------------------------------------------------- 5⃣ *पुणे : डीएसकेंना पुन्हा एकदा तात्पुरता दिलासा, 25 जानेवारीपर्यंत 50 कोटी भरण्याचा आदेश.* ----------------------------------------------------- 6⃣ *सहा वेळचा चॅम्पियन नोवाक जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर* ----------------------------------------------------- 7⃣ *मुंबई - 6 एप्रिलला रंगणार आयपीएल 11 चा उदघाटन सोहळा, राजीव शुक्ला यांनी दिली माहिती* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *बालविवाह कसे रोखता येतील ?* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/05/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *नेताजी सुभाषचंद्र बोस* सुभाषचंद्र बोस (जानेवारी २३, इ.स. १८९७ - ऑगस्ट १८, इ.स. १९४५ ) हे  भारतीय  स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते होते. हे नेताजी  या नावाने ओळखले जातात. दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली होती. त्यांनी दिलेला जय हिन्द चा नारा हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे. १९४४ मध्ये अमेरिकन पत्रकार लुई फिशर ह्यांच्याशी चर्चा करताना महात्मा गांधींनी नेताजींचा देशभक्तांचा देशभक्त असा उल्लेख केला होता. सुभाषचंद्र बोस यांचा जन्म जानेवारी २३, १८९७रोजी ओडिशा मधील कटक शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ आणि आईचे नाव प्रभावती होते. जानकीनाथ बोस हे कटक शहरातील नामवंत वकील होते. आधी ते सरकारी वकील म्हणून काम करत होते पण नंतर त्यांनी आपली स्वतः ची वकिली सुरू केली होती. कटक महापालिकेत ते काही काळ काम करत होते तसेच बंगालचे विधानसभेचे सदस्य ही होते. इंग्रज सरकार ने त्यांना रायबहाद्दर हा किताब दिला होता. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा जास्त महत्वाची आहे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना कधी झाली?* 👉 १९८९ *२) दिल्लीत १९७६ मध्ये महिला दक्षता समितीची स्थापना कोणी केली?* 👉 प्रमिला दंडवते *३) शिक्षण संक्रमण हे मासिक कोण प्रकाशित करते?* 👉 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 संतोष बोधनकर, नांदेड 👤 भालचंद्र गावडे, सोलापूर 👤 दिनेश चिंतावाड, नांदेड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *अपेक्षा* काटा काट्या सारखं वागला म्हणून फुलाने तसे वागावे का? शहाण्या माणसाने म्हणून मुर्खा सारखे जगावे का? काटा काट्या सारखं वागेल चांगली अपेक्षा धरू नका काट्या कडून फुला प्रमाणे वागण्याचा हट्ट करू नका शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *आपली सर्व धडपड कशासाठी असते ? प्रत्येकजण सुखासाठी खटपट करीत असतो. प्रपंचात सुख मिळावे असे सर्वांना वाटत असते, आणि त्यासाठी जो तो प्रयत्‍न करीत असतो. परंतु आजपर्यंत प्रपंचात कुणाला सुख मिळाले आहे का ? कुणी म्हणतो, मजजवळ संपत्ती आहे, पण संतान नाही, कुणी दारिद्र्य आहे म्हणून रडतो, कुणी काही, कुणी काही, सांगतच असतो, आपली हाव कधीच तृप्त होणे शक्य नाही. मृगजळ पिऊन कुणी कधी तृप्त झाला आहे का ?* *प्रपंचच जिथे खोटा तिथे सुख कसले मागता ? याचा अर्थ असा नाही की प्रपंच सोडावा, पण तो सुखाचा कसा होईल हे पाहावे. तुम्हांला खात्रीने सांगतो की, प्रपंच जर सुखाचा करायचा असेल तर त्याला एकच उपाय आहे. तो अगदी सोपा आहे, पण आचरणात आणायला अत्यंत कठीण आहे. परमात्म्याची अगदी मनापासून प्रार्थना करावी. मग तो ठेवील त्या परिस्थितीमध्ये आपण अगदी आनंदात व सुखात राहू शकतो.* •••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••• 🍁🍁🍁🍁🍁🍁 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= तुमचे जीवन योग्य दिशेने जाण्यासाठी एका विशिष्ट ध्येयाची किंवा योग्य दिशेची निवड करा आणि त्यानुसार मार्गक्रमण करा.म्हणजे तुमचे जीवन सुखी, समृद्ध आणि संपन्न होईल.याचा आनंद तुम्हालाही मिळेल आणि इतरांनाही मिळेल.त्यातून चांगले जीवन जगण्यासाठी प्रेरणाही मिळेल.नाही तर सागरातल्या भरकटलेल्या जहाजासारखे होईल. जर एखाद्यावेळी जहाजामध्ये दिशादर्शक होकायंत्र अचानक बंद पडले तर त्या जहाज चालविणा-या माणसाला आपले जहाज कुठे चालले आहे याचा अंदाजच लागत नाही.अर्थात भरकटलेल्या जहाजासारखीच आपल्याही जीवनाची दिशाहीन आणि ध्येयहीन वाटचाल होईल. यासाठी आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित करा आणि त्यानुसार मार्गक्रमण करा मग तुमच्या जीवनात कधीच अडथळे येणार नाहीत आणि जर का आलेच तर योग्य प्रकारे हाताळण्यात यश मिळेल.‌ *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *आयजीच्या जीवावर बायजी उदार, सासुच्या जीवावर जावई उदार* - दुसर्‍याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *चल रे भोपळया टुणुक टुणुक* एक होती म्हातारी. एकदा ती आपल्या लेकीकडे जायला निघाली. लेक रहायची दुसर्‍या गावाला.रस्त्यांत होते मोठे जंगल. म्हातारी काठी टेकत, टेकत रस्त्याने निघाली. वाटेत तिला भेटला कोल्हा. तो म्हणाला 'म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो'. पण म्हातारी होती हुषार. ती म्हणाली 'मला खाऊन तुझे पोट भरणार नाही. त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते , तूपरोटी खाते, लठ्ठ मुठ्ठ होते, मग मला खा.' कोल्ह्याला म्हातारीचे म्हणणे पटले.म्हातारी पुढे निघाली. तिला भेटला वाघ. तो म्हणाला 'म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो'. त्याने डरकाळी फोडली. म्हातारी त्याला म्हणाली 'मला खाऊन तुझे पोट भरणार नाही.त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते , तूपरोटी खाते, लठ्ठमुठ्ठ होते, मग मला खा. ' वाघाची अशी समजूत काढून म्हातारी पुढे निघाली.लेकीकडे ती खूप दिवस मजेत राहिली. खाऊन पिऊन लठ्ठमुठ्ठ झाली. आपल्या घरी परत येताना तिने एक मोठा लाल भोपळा घेतला. त्यात बसून ती भोपळयाला म्हणाली ' चल रे भोपळया टुणुक टुणुक'. भोपळा रस्त्याने निघाला. वाटेत वाघाने भोपळा पाहिला. तो म्हणाला 'म्हातारे, म्हातारे थांब!' आतून म्हातारी म्हणाली 'कशाची म्हातारी आणि कशाची कोतारी. चल रे भोपळया टुणुक टुणुक'. त्याबरोबर भोपळा जोरात पळू लागला. पुढे गेल्या भेटला कोल्हा. कोल्ह्यानेही भोपळयाला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण म्हातारी आतून म्हणाली 'चल रे भोपळया टुणुक टुणुक!'. पुन्हा भोपळा जोरात पळू लागला. अशी होती म्हातारी हुषार. कोल्हा आणि वाघाच्या तावडीत ती काही सापडली नाही. भोपळयात बसून ती सुखरूप आपल्या घरी पोचली. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🌹🌹🌹🌹🌹🌹 *🌺जीवन विचार*🌺 *〰〰〰〰〰〰〰* *"प्रयत्न तो देव जाणाव"* *"देवासकट सर्वकाही प्राप्त करून देण्याच"* *सामर्थ्य प्रयत्नात आहे म्हणून* *प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ होय".* *प्रयत्न हा प्रकारच इतका प्रभावी आहे की , *प्रयत्न करण्याच्या प्रक्रियेत प्रयत्न करणाऱ्याला प्रकाश दिसू लागून त्या प्रकाशातूनच त्याला प्रभूचा प्रसाद प्राप्त होतो.थोडक्यात प्रयत्न करीत रहाणे हे मानवी जीवनाचे अविभाज्य घटक असून त्रिकालबाधित निसर्गनियमांशी ते सुसंगत आहे. "प्रयत्न करून यश मिळणे हा नियम आहे" हे सत्य माणसाने सदैव लक्षात ठेवले पाहिजे. मात्र प्रयत्न योग्य दिशेने होण्यासाठी ते अभ्यासपूर्वक झाले पाहिजेत . नुसते कष्ट केल्याने किंवा प्रयत्न केल्याने यश मिळत नसते . अधिकारी व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली योग्य दिशेने अभ्यासपूर्वक प्रयत्न केल्याने माणसाला यशाचे शिखर लवकर गाठता येते.* *थोडक्यात अभ्यासपूर्वक व प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याने माणसांना जे धन व यश प्राप्त होते , ते त्यांना सुख शांती , समाधान , यश व समृद्धी प्राप्त करून तर देतेच शिवाय त्याचा इष्ट प्रभाव इतरांवरही पडत असतो. कोणतीही गोष्ट सातत्याने प्रयत्नपूर्वक केली असता यश नक्कीच प्राप्त होते.* 〰〰〰〰〰〰〰 *🙏🏼शब्दांकन/संकलन🙏* ✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)* जि.प.प्रा.शा. वाटेगाव, ता.हदगाव, जिल्हा नांदेड *~~~~~~~~~~~~~~* http://www.pramilasenkude.blogspot.in ~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 22/01/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  २००७ - बगदादमध्ये दोन कारबॉम्बच्या स्फोटात ८८ ठार. 💥 जन्म :- १९१५ - टॉम बर्ट, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू. १९२०: संतसाहित्याचे अभ्यासक प्रा. ह. श्री. शेणोलीकर १९२१ - अँड्रु गंतॉम, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू. १९६६ - निशांत रणतुंगा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  १६६६ - शाह जहान, मोगल सम्राट. १९९९ - ग्रॅहाम स्टेन्स, भारतातील ख्रिश्चन धर्मप्रसारक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *ठाणे जिल्ह्यातील माळशेज घाटाचे सौंदर्य खुलविण्यासाठी बांधणार पारदर्शक स्काय वॉक, पहिल्या टप्प्यातील ५ कोटींचा प्रस्ताव सादर* ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली - ओम प्रकाश रावत देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त* ----------------------------------------------------- 3⃣ *नवी दिल्ली- आप पक्षाच्या 20 आमदारांचं सदस्यत्व रद्द, निवडणूक आयोगाच्या शिफारशीला राष्ट्रपतींची मंजुरी* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तीन दिवसाच्या दावोस (स्विर्त्झलँड) दौऱ्यावर; वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या कार्यक्रमात होणार सहभागी* ----------------------------------------------------- 5⃣ *नवी दिल्ली : ऐतिहासिक लाल किल्ल्यावर महानाटय 'जाणता राजा'चे 6 ते 10 एप्रिल दरम्यान होणार प्रयोग* ----------------------------------------------------- 6⃣ *मुंबई: इथिओपियाचा सॉलोमन डेकसिसा 'मुंबई मॅरेथॉन'चा विजेता: दोन तास ९ मिनिटं ३३ सेकंदात पूर्ण केली शर्यत* ----------------------------------------------------- 7⃣ *दिल्ली : अंध विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकणा-या भारतीय संघाने प्रत्येकाला आपल्या खेळातून प्रेरणा दिली, त्यांचा देशाला अभिमान आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *पाऊलवाट : शिक्षण क्षेत्रातील एक दिशादर्शक पुस्तक* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2016/11/blog-post_23.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *संत नामदेव* संत नामदेव (इ.स. १२७० - जुलै ३, इ.स. १३५०) हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. ते मराठी भाषेमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी पंजाबी व व्रज भाषांमध्येही काव्ये रचली. शिखांच्या गुरू ग्रंथसाहिबात त्यांच्या बासष्ट काव्यरचना समाविष्ट आहेत. नामदेव हे ‘मराठी’तील पहिले चरित्रकार व आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ=========  चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) भारतीय पूर्व किनारपट्टीवरील सागरजलाची क्षारता किती टक्के आहे?* 👉 34% *२) सयुंक्त राष्ट्रसंघाने जागतिक शैक्षणिक वर्ष कधी घोषित केले होते?* 👉 १९७० *३) इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची स्थापना कधी झाली?* 👉 २० सप्टेंबर १९८५ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 स्वप्नील ईबीतवार, येवती 👤 हरीश बल्केवाड, येवती 👤 महेश मुदलोड, येवती 👤 नरेश मुंगा पाटील 👤 हुशन्ना मुदलोड, येवती *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *तडजोड* अन्यायाशी तडजोड सर्वात मोठे पाप आहे अन्याय सहन करणं म्हणजे उलटं माप आहे योग्य वेळी अन्यायाला वाचा फुटली पाहिजे अन्यायग्रस्त व्यक्ती त्यातून सुटली पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *धावणे ही आजची कमालीची गरज झाली आहे. महानगरी, चाकरमाणी असो की खेड्यातला शेतकरी, 'कशासाठी पोटासाठी' करीत तो सकाळपासून रात्रीपर्यंत अविश्रांत धावतो. असाध्य ते साध्य करणे हे त्याचे पोटाच्या पुढचे ध्येय असते. प्रपंचाच्या जबाबदा-यांचे पालन करता करता त्याला धावण्याची एवढी सवय होते की तो थांबणे विसरूनच जातो. 'पाॅज' नावाची मनाला आणि शरीराला उभारी देणारी, ताजेपणा देणारी युक्ती आपणही स्वीकारू शकतो, हेच त्याच्या स्मरणापलीकडे जाते.* *'जीवन फार धकाधकीचे झाले आहे' हे वा अशाप्रकारची वाक्य आता गुळगुळीत झालीत. कारण त्यातील अर्थ सर्वमान्य झाला आहे. मात्र, हे धकाधकीचे जीवन अल्पकालीन ठरू नये, यासाठी 'चार युक्तीच्या गोष्टी' मधील एक गोष्ट 'क्षणभर विश्रांती' ची आहे, हे लक्षात घेऊन त्याचा अंगिकार होणे आवश्यक आहे.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 *-संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= प्रत्येक व्यक्ती हा आपल्या विशिष्ट ध्येयाकडे जात असताना प्रत्येक पावलागणिक विचार करत असतो.आपले काम यशस्वीपणे पार पडणार का ?जर पार पडत नसेल तर अजून काही करावे लागते का? असे जेव्हा अनेक प्रश्न पडतात तेव्हा आपल्या मनात कुठेतरी आत्मविश्वास कमी आहे असे वाटायला लागते.असा आत्मविश्वास कमी असल्याचा भास कमी होऊ देऊ नका.कारण तुम्हालाच तुमचे काम पूर्ण करायचे आहे तेव्हा तुमचा आत्मविश्वास ढळू देऊ नका किंवा डळमळीत होऊ देऊ नका.मी हे काम पूर्ण करणारच आणि पूर्ण झाल्याशिवाय सर्वार्थ बसणार नाही असा सकारात्मक दृष्टिकोन आपल्या डोळ्यासमोर आणि प्रत्येक पुढे पाऊल टाकताना करा.नक्कीच तुम्हाला त्यात यश मिळेल यात शंकाच नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *गोगलगाय नि पोटात पाय* - एखाद्याचे खरे स्वरुप न दिसणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *कोल्हा आणि नगारा* एकदा एक कोल्हा भुकेने व्याकूळ होऊन जंगलात इकडे तिकडे फिरत होता. तेवढ्यात त्याला मोठा आवाज ऐकू येऊ लागला. त्या आवाजाने कोल्हा चांगलाच घाबरला. पण तो आवाज कोणता प्राणी काढतोय या उत्सुकतेपोटी दबकत दबकत आवाजाच्या दिशेने जाऊ लागला. तर त्याच्या नजरेस एक मोठा नगारा पडला. त्या नगार्‍यावर एका झाडाची फांदी वार्‍यामुळे आपटत होती. त्यामुळे तो मोठा आवाज येत होता. हे कोल्ह्याच्या लक्षात आल्यावर कोल्हा नगार्‍यावर आपला पंजा मारून लागला. तेवढ्यात त्याच्या लक्षात आले की नगार्‍याचे कातडे गुंडाळले आहे. ते ओरबाडले तर आत भरपूर मांस असेल. त्यामुळे निदान दोन दिवसांची तरी भूक शमेल. देवाची कृपा समजून त्याने नगार्‍याचे कातडे कुरतडून फाडले तर... आत काहीच नाही. नुसता पोकळ नगारा बघून कोल्हा दु:खी झाला, पण कातडे कुरतडताना त्याच्या दाढाही दुखावल्या. उपदेश : प्रसंग आनंदाचा किंवा भीतीचा असला तरी जो शहाणा माणूस मागचा पुढचा विचार करून वागतो त्याला पश्चात्ताप करण्याची पाळी येत नाही. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 20/01/2018 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *महर्षी मार्कंडेय ऋषी जयंती* 💥 ठळक घडामोडी :-  १९९८: संगीत क्षेत्रातील नोबेल समजला जाणारा पोलार संगीत पुरस्कार विख्यात सतारवादक पं. रविशंकर यांना जाहीर. १९९९: गिरीश कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर. 💥 जन्म :- १८७१: टाटा घराण्यातील उद्योगपती सर रतनजी जमशेटजी टाटा  १९०६ - ऍरिस्टॉटल ऑनासिस, ग्रीक उद्योगपती. १९३० - बझ आल्ड्रिन, अमेरिकन अंतराळवीर.   💥 मृत्यू :-  १९३६ - जॉर्ज पाचवा, युनायटेड किंग्डमचा राजा. भारतात पंचम जॉर्ज नावाने प्रख्यात. १९५१: समाजसेवक अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ठक्कर बाप्पा  *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *जागतिक बॅंकेच्या अर्थसहाय्याने राबविण्यात येणाऱ्या ‘नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्पा’चा आराखडा अंतिम, मराठवाडा, विदर्भातील 5149 गावांना होणार फायदा; राज्याला मिळणार 2800 कोटी रुपयांची मदत* ----------------------------------------------------- 2⃣ *दिल्ली: 'आप'च्या २० आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाईला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार.* ----------------------------------------------------- 3⃣ *मुंबई विद्यापीठाच्या ४०२ परीक्षांपैकी १२९ परीक्षांचे निकाल जाहीर, एकूण ६ हजार १६७ विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर.* ----------------------------------------------------- 4⃣ *वणी (यवतमाळ) येथे 66 व्या विदर्भ साहित्य संमेलनाला ग्रंथदिंडीने प्रारंभ.* ----------------------------------------------------- 5⃣ *पुणे : इंजिनिअरिंग, फार्मसी आणि अ‍ॅग्रिकल्चर या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथमवर्ष प्रवेशासाठी येत्या १० मे रोजी प्रवेश पूर्वपरीक्षा (सीईटी) होणार आहे* ----------------------------------------------------- 6⃣ *पुण्याच्या शनिवार वाड्यावर खासगी कार्यक्रमांना बंदी, पुणे महापालिका प्रशासनाचा निर्णय.* ----------------------------------------------------- 7⃣ *आयसीसी अंडर 19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियानं आपली विजयी घोडदौड कायम ठेवत, झिम्बाब्वे विरुद्ध दहा विकेटनं मिळवला दणदणीत विजय* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *मार्कंडेय जयंती विशेष लेख* *महर्षी मार्कंडेय : पद्मशाली समाजाचे कुलदैवत* ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हणजे भृगु महर्षी. या भृगु महर्षी आणि त्यांची पत्नी कयार्थी यांना भार्गवी, धाता आणि विधाता अशी तीन अपत्ये होती. भार्गवी म्हणजे लक्ष्मी ही विष्णूची पत्नी. धाता व अयाती यांना प्राणूडु नावाचा पुत्र होता. तर विधाता आणि नियती यांच्या पुत्राचे नाव होते मृकंड. भगवान शंकराचे परमभक्त असलेले मृकंडला एकही पुत्र नव्हते. त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी शंकर भगवानची कठोर तपस्या केली. त्यांच्या या कठोर तपश्चर्येला भगवान शंकर प्रसन्न झाले आणि इच्छित वर मागण्यास सांगितले. तेव्हा मृकंड यांनी पुत्रप्राप्तीची इच्छा व्यक्त केली. तेव्हा  भगवान शंकर म्हणाले, " तुमच्या भाग्यात पुत्रप्राप्ती नाही, परंतु माझी एवढी कठोर तपश्चर्या केल्यामुळे, मी आपणास एक पुत्र देत आहे. मात्र त्याचे आयुष्य फार....... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_17.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *श्री रतनजी टाटा* रतन टाटा चांदीचा चमचा घेऊन जन्माला आले, हे खरे असले, तरीही त्यांचे बालपण मात्र अतिशय अवघड परिस्थितीमध्ये गेले. अवघ्या सहा वर्षांचे वय असताना, त्यांचे आई-वडील विभक्त झाले आणि रतन टाटा व त्यांच्या भावाचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांच्या आजीवर येऊन पडली. त्यांच्या वडिलांनी आपला राहता बंगलाही विकून टाकला. चॅम्पियन स्कूलमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर आर्किटेक्‍ट होण्याची मनीषा बाळगून रतन टाटा अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठामध्ये दाखल झाले. आपले टाटा हे नाव विसरून आपण आपल्या पायावर उभे राहून शिक्षण पूर्ण करायचे, या ध्येयाने झपाटलेल्या रतन टाटा यांनी अमेरिकेतील आपल्या दहा वर्षांच्या मुक्कामामध्ये हॉटेलमध्ये भांडी घासण्यापासून ते कारकुनाच्या नोकरीपर्यंत सर्व काही केले. कॉर्नेल विद्यापीठातील शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून मॅनेजमेंटची पदवीही घेतली. याच काळात टाटा समूहाचे तत्कालीन प्रमुख जे. आर. डी. टाटा यांच्याशी त्यांची भेट झाली. टाटा समूहाचे संस्थापक असलेल्या जमशेदजी टाटांचा नातू अशा पद्धतीने धडपड करतो आहे हे पाहून जे. आर. डी. प्रभावित झाले. आजीची तब्येत बिघडल्यामुळे तिला भेटायला भारतात आलेल्या रतन यांना जे. आर. डी. यांनी टाटा उद्योगसमूहामध्ये येण्याचे निमंत्रण दिले. इ.स. १९६२ च्या डिसेंबर महिन्यात रतन टाटा समूहात दाखल झाले; मात्र समूहाच्या परंपरेनुसार ६२ ते ७१ त्यांना विविध कंपन्यांमध्ये काम करण्यास सांगण्यात आले. जमशेदपूरच्या टाटा स्टीलमध्ये अगदी कोळसा उचलण्यापासून ते भट्टीपाशी काम करण्यापर्यंतचे सर्व अनुभव घेतल्यानंतरच इ.स. १९७१ मध्ये त्यांच्याकडे टाटा समूहातील नेल्को या कंपनीची धुरा सोपविण्यात आली. नेल्को ही तोट्यात चालणारी कंपनी होती. रेडिओ आणि टेलिव्हिजनचे उत्पादन करणारी ही कंपनी पुढील तीन वर्षांमध्ये स्वतःच्या पायावर उभी करण्यात रतन टाटा यांनी यश मिळविले. संपूर्ण बाजारपेठेतील नेल्कोचा हिस्सा दोन टक्‍क्‍यांवरून वीस टक्के झाला; पण देशात आणीबाणी जाहीर झाली. पाठोपाठ आलेल्या मंदीमध्ये नेल्कोला आपल्या कामगारांच्या मागण्या मान्य करण्यात अपयश आले आणि ही कंपनी बंद पडली. रतन टाटा यांना अनुभवाला आलेले ते पहिले अपयश होते. इ.स. १९७७ मध्ये रतन टाटांवर एम्प्रेस मिल या टाटा समूहातील बंद पडावयास आलेल्या मिलची जबाबदारी सोपविण्यात आली. एम्प्रेस मिलच्या यंत्रसामग्रीमध्ये अनेक वर्षांमध्ये गुंतवणूक करण्यात आली नव्हती. कामगारांची संख्याही मोठी आणि त्याच्या तुलनेत उत्पादन तूटपुंजे असे चित्र असलेल्या या मिलमध्ये पन्नास लाख रुपयांची गुंतवणूक करण्याची विनंती रतन टाटा यांनी टाटा उद्योगसमूहाला केली; पण नानी पालखीवाला, अजित केरकर आणि रुसी मोदी या संचालकांनी त्याला विरोध केल्याने अखेर ही मिलही बंद करण्यात आली. रतन टाटांच्या नावावर दुसरे अपयश जमा झाले. या सर्व प्रकारामुळे रतन टाटा चांगलेच दुखावले गेले होते; पण त्याचबरोबर अनुभवाच्या शाळेमध्ये बरेच काही शिकले होते. इ.स. १९८१ मध्ये जे. आर. डी. टाटा यांनी त्यांच्याकडे टाटा इंडस्टीजची सूत्रे सोपविली. त्याच वेळेस ते त्यांचे वारसदार आणि टाटा उद्योगसमूहाचे भावी प्रमुख असणार हे स्पष्ट झाले होते. इ.स. १९९१ मध्ये जे. आर. डी. यांनी स्वतःच उद्योगसमूहाची सर्व सूत्रे रतन टाटांकडे सोपवून निवृत्ती पत्करली. त्यानंतर सुरू झालेली यशाची मालिका आणि नवे विक्रम अजूनही सुरूच आहेत. कोरस, जग्वार, टेटली सारख्या जगातल्या नामांकित कंपन्या टाटांनी खरेदी केल्या. या भरारीनं देशातल्या तरूणांना नवी ऊर्जा दिली.` मोठी स्वप्न पाहाणं आणि ती प्रत्यक्षात आणणं ` हा रतन टाटांचा स्वभाव. याच स्वप्नांमधून इंडिगो आणि नॅनो ची निर्मिती झाली आणि कुठलीच गोष्ट अशक्य नााही हे टाटांनी सिद्ध केलं. हे यश मिळवत असतांना टाटांनी कधीच आपल्या मुल्यांशी तडजोड केली नाही. यामुळंच सचोटी, गुणवत्ता म्हणजे टाटा हे समिकरण तयार झालंय. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) हिमनदी वाहताना आपल्याबरोबर गाळ वाहून आणते त्या गाळाला काय म्हणतात?* 👉 हिमोढ *२) मृत समुद्राच्या पाण्याची क्षारता किती टक्के आहे?* 👉 332% *३) कोणत्या दोन देशाच्या सीमेवर मृत समुद्र आहे?* 👉 जॉर्डन व इस्त्राईल *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 किशोर पाटील, युनिक कॉम्प्युटर्स, धर्माबाद 👤 अहमद लड्डा, पत्रकार, धर्माबाद 👤 शंकर बेल्लूरकर 👤 संतोष शेटकार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *मातीचे पाय* कितीही मोठे व्हा पण मातीचे पाय असू द्या मोठे झाल्याचा मनात पण अहंकार नसू द्या मोठं होऊनही असतात ज्यांचे मातीचेच पाय त्यांच्या पेक्षा मोठे जगात कोणीच नाय शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *धावणे ही आजची कमालीची गरज झाली आहे. महानगरी, चाकरमाणी असो की खेड्यातला शेतकरी, 'कशासाठी पोटासाठी' करीत तो सकाळपासून रात्रीपर्यंत अविश्रांत धावतो. असाध्य ते साध्य करणे हे त्याचे पोटाच्या पुढचे ध्येय असते. प्रपंचाच्या जबाबदा-यांचे पालन करता करता त्याला धावण्याची एवढी सवय होते की तो थांबणे विसरूनच जातो. 'पाॅज' नावाची मनाला आणि शरीराला उभारी देणारी, ताजेपणा देणारी युक्ती आपणही स्वीकारू शकतो, हेच त्याच्या स्मरणापलीकडे जाते.* *'जीवन फार धकाधकीचे झाले आहे' हे वा अशाप्रकारची वाक्य आता गुळगुळीत झालीत. कारण त्यातील अर्थ सर्वमान्य झाला आहे. मात्र, हे धकाधकीचे जीवन अल्पकालीन ठरू नये, यासाठी 'चार युक्तीच्या गोष्टी' मधील एक गोष्ट 'क्षणभर विश्रांती' ची आहे, हे लक्षात घेऊन त्याचा अंगिकार होणे आवश्यक आहे.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 *-संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जेथे विचारांना अनुभवाचे खतपाणी घातले की, जीवनातल्या वेलीवर सौंदर्याची आणि आनंदाची फुले अधिक जोमाने फुलायला लागतात आणि त्यांचा सुगंध इतरत्र दरवळायला लागतो.त्या दरवळणा-या सुगंधामुळे इतर लोकही धुंद होऊन जातात. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक* - एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागेल. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *पारधी व कबूतर* एका गावाच्या हद्दीबाहेर एक मोठे वडाचे झाड होते. त्या झाडावर बरेच पक्षी घरटे बांधून राहात होते. तिकडून येणारे जाणारे लोकसुद्धा त्या वडाच्या सावलीत बसून विश्रांती घेत होते. त्या झाडावर लघुपतनक नावाचा कावळा रहात होता. एकदा खाण्यसाठी काही मिळते का हे बघण्यसाठी लघुपतनक गावाकडे उडत जात होता. एवढ्यात त्याच्या नजरेस काळाकभिन्न पारधी जाळे घेऊन जात असलेला दिसला. ते बघून कावळ्याला वाटले, ''हा दुष्ट पारधी वडाच्या झाडाकडेच चालला असणार. म्हणजे आपल्या पक्षी बांधवांवर कदाचित संकट येणार तर....! कावळा तसाच वडाच्या झाडावर परत आला. आणि सर्व पक्षांना म्हणाला, '' हा दुष्ट पारधी धान्य टाकून तुम्हाला जाळ्यात अडकवण्यास येत आहे. तुम्ही धान्य खाण्याच्या मोहाने जर गेलात तर त्या जाळ्यात अडकाल!'' पारधी थोड्यावेळातच त्या झाडाजवळ आला आणि जाळं टाकून बाजूला बसला. तेवढ्यात चित्रगीव नावाचा कबूतरांचा राजा आपल्या परिवारासमवेत अन्नाच्या शोधासाठी आकाशातून उडत होता. त्याच्या नजरेस पारध्याने टाकलेले धान्य दिसले. तेव्हा लघुपतनक त्या चित्रग्रीवाला 'नको नको' म्हणत असतानाही चित्रग्रीव आणि कुटुंबीय त्या धान्यावर तटून पडले. खरं म्हणजे चित्रग्रीव स्वत: ‍अतिशय हुशार आणि चाणाक्ष पण चित्रग्रवीच्या नशिबातच संकट असल्यास त्याला तो तरी काय करणार? चित्रग्रीव आपल्या कुटुंबीयांसकट त्या जाळ्यात अडकला. बरीच कबुतरे जाळ्यात अडकल्याचे बघून पारधी खूष झाला. त्या कबुतरांना मारण्यासाठी पारधी काठी घेऊन धावत आला. त्या बरोबर चित्रग्रीवाने सर्व कबुतरांना जोर करून जाळ्यासकट उडण्याचा आदेश दिला. त्याबरोबर जाळ्यासकट कबुतरांनी आसमंत गाठला. पारधी त्यांचा पाठलाग करू लागला, तशी कबुतरे वेगाने उडू लागली. शेवटी पारधी स्वत:च्या नशिबाला दोष देत मागे फिरला. पारध्याच्या संकटातून पार पडल्याचे लक्षात येताच चित्रग्रीव म्हणाला, ''हिरण्यक नावाचा एक उंदीर माझा मित्र आहे. आपल्याला मोकळं करण्यासाठी त्याची मदत होईल.'' हिरण्यक एका टेकडीच्या बिळात रहात होता. तिकडे पोहोचल्यावर चित्रग्रवाने हिरण्यकाला मदतीची हाक दिली. त्याबरोबर हिरण्यक धावत आला. चित्रग्रीवाने घडलेली हकीगत सांगून जाळ्याचे पाश तोडण्याची विनंती केली. हिरण्यकाने मित्रप्रेमखातर आणि संकटात सापडलेल्यास मदत करण्याच्या वृत्तीने चित्रग्रीवास मोकळा करू लागला. तेव्हा चित्रग्रीवाने हिरण्यकास सांगितले की, ''आधी माझ्या परिवारचे पाश तोड. आपल्या प्रजेला संकटात ठेवून राजाने सर्वांच्या आधी संकटमुक्त होणे योग्य ठरणार नाही. म्हणून मी सांगतो त्याप्रमाणे कृती कर.'' हिरण्यकाला चित्रग्रीवाचे विचार ऐकून खूप आनंद झाला. हिरण्यकाने चित्रग्रीवाच्या परिवाराला आधी मोकळे केले आणि नंतर चित्रग्रीवास मोकळे केले. चित्रग्रीवाने हिरण्यकाचे आभार मानले असता, हिरण्यक उद्गारतो, ''कधी संकट आले तर मला जरूर हाक मार. मी मदतीला धावून येईन.'' तात्पर्य : संकटसमयी जो मित्र धावून येतो तोच खरा मित्र. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*✍बहोत कुछ सिखाया जिंदगी के सफर ने अंजाने मे।* *वो किताबोंमे दर्ज थाही नही जो सबक सिखाया जमाने ने। 🙏🙏

स्त्री स्त्री सिर्फ तब तक तुम्हारी होती है जब तक वो तुमसे रूठ लेती है,लड लेती है आंसू बहा बहाकर , और दे देती है दो चार उलाहना तुम्हे। कह देती है जो मन में आता है उसके बिना सोचे,बेधडक लेकिन जब वो देख लेती है उसके रूठने का, उसके आंसुओं का कोई फर्क नहीं है तुम पर तो एकाएक वो रूठना छोड देती है रोना छोड देती है। मुस्कुराकर देने लगती है जवाब तुम्हारी बातों पर, समेट लेती है वो खुद को किसी कछुए की तरह अपने ही कवच में , और तुम समझ लेते हो कि सब कुछ ठीक हो गया है। तुम जान ही नही पाते कि ये शांत नही है मृतप्राय हो चुकी है, कहीं न कहीं गला घोंट दिया है उसने अपनी भावनाओं का , और अब जो तुम्हारे पास है, वो तुम्हारी होकर भी तुम्हारी नहीं है। क्योंकि स्त्री , सिर्फ तब तक तुम्हारी होती है जब तक….

संकलित

🙏🏻🌹 नमस्कार मंडळी 🌹🙏🏻 मला एकदा एका इंग्रजाळलेल्या माणसाने हिणवण्याच्या स्वरात म्हटलं "अरे काय त्या मराठीत टाइप करता रे तुम्ही... किती वेळ लागतो... बोअरिंग काम... इंग्रजित कसं पटापट टाईप होतं... तुमचं मराठी म्हणजे......" मी त्याला सांगितलं, "अरे बाबा श्रीमंत आणि गरिबामध्ये तेवढा फरक असणारच". तो खुश होऊन म्हणाला "चला म्हणजे मराठी गरीब हे तू मान्य केलंस तर"?? मी म्हटलं "मित्रा चुकतोयस तू.. इंग्रजी भाषेत वर्णाक्षरं किती..?" तो म्हणाला २६.. मी म्हटलं "मराठीत याच्या दुप्पट ५२ आहेत.. इंग्रजिच्या दुप्पट मालमत्ता आहे आमची.. आता सांग, कोण गरीब आणि कोण श्रीमंत? केवळ जीन्स घालून बाहेर पडणारी स्त्री पटकन तयार होऊ शकते.. पण भरजरी कपडे घालून सर्व दागदागिने धालून बाहेर पडणारी स्त्री जास्त वेळ घेणारच.. आमची मराठी भाषा काना, मात्रा, वेलांट्या, उकार यांचे दागदागिने लेऊन समोर येते.. म्हणुनच ती समोर आल्यावर तिला यायला लागणारा वेळ कोणी बघत नाही, तिचं सौंदर्य बघून सर्व धन्य होतात." 👌👌👌👌👌👌👌👌👌👌 मराठी भाषेतील स्वल्पविराम, अनुस्वार आदिंचा वापर करुन लिहिलेली कविता नेटवर सापडली. कुणी लिहिली हे कदाचित विकी'पीडी'या लाच ठाऊक असेल. वाचाच, मस्त आहे..! 🌹 *शृंगार मराठीचा* _*अनुस्वारी*_ शुभकुंकुम ते भाळी सौदामिनी | _*प्रश्नचिन्ही*_ डुलती झुमके सुंदर तव कानी | नाकावरती _*स्वल्पविरामी*_ शोभे तव नथनी | _*काना*_-काना गुंफुनी माला खुलवी तुज मानिनी | _*वेलांटी*_चा पदर शोभे तुझीया माथ्याला | _*मात्रां*_चा मग सूवर्णचाफा वेणीवर माळला | _*उद्गारा*_चा तो गे छल्ला लटके कमरेला | _*अवतरणां*_च्या बटा मनोहर भावती चेहर्‍याला | _*उ*_काराचे पैंजण झुमझुम पदकमलांच्यावरी | _*पूर्णविरामी*_ तिलोत्तम तो शोभे गालावरी ॥ *अनामिका* 🌹मराठी भाषेचा श्रृंगार

संकलित

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 19/01/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९५६ - देशातील सर्व विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा राष्ट्रपतींचा वटहुकुम. त्यांचेच एकत्रित स्वरुपात आयुर्विमा महामंडळ झाले. १९६६ - इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधानपदी. १९९६ - ज्येष्ठ तबलावादक उस्ताद अल्लारखा खाँ यांची शास्त्रीय संगीतासाठीच्या मध्य प्रदेश सरकारच्या कालिदास सन्मानासाठी निवड. तसेच प्रसिद्ध मल्याळी लेखक एम.टी. वासुदेवन नायर यांची १९९५ च्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड २००७ - सरदार सरोवर धरणावरील साडेचौदाशे मेगावॉट क्षमतेचा वीजनिर्मिती प्रकल्प गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला अर्पण केला. 💥 जन्म :- १८९२ - चिंतामण विनायक जोशी, विनोदी लेखक व पाली भाषेचे अभ्यासक. १९०६ - मास्टर विनायक, मराठी चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते. 💥 मृत्यू :-  १९०५ - देबेन्द्रनाथ टागोर, भारतीय तत्त्वज्ञानी. १९५१ - अमृतलाल विठ्ठल ठक्कर, महात्मा गांधींचे अनुयायी. १९६० - दादासाहेब तोरणे, मराठी चित्रपटाचे आद्य प्रवर्तक. १९९० - रजनीश, भारतीय तत्त्वज्ञानी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *जी एस टी मध्ये पेट्रोल-डिझेलबाबत कोणताही निर्णय नाही, सामान्यांची निराशा* ----------------------------------------------------- 2⃣ *29 वस्तूंवरील कर माफ तर 49 वस्तूंवरील कर कपात, जीएसटी परिषदेच्या बैठकीत निर्णय* ----------------------------------------------------- 3⃣ *संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित, बहुप्रतीक्षित व रिलीज होण्यापूर्वीच वादात सापडलेला पद्मावत' सिनेमा सर्व राज्यांमध्ये होणार प्रदर्शित, सुप्रीम कोर्टाचा निर्णय* ----------------------------------------------------- 4⃣ *एमपीएससीचा अर्ज भरण्यास मुदतवाढ; २२ जानेवारीपर्यंत भरता येणार आनलाईन अर्ज* ----------------------------------------------------- 5⃣ *रहस्यमय 'राक्षस' या मराठी चित्रपटाचा टीजर लाँच, 23 फेब्रुवारीला होणार प्रदर्शित* ----------------------------------------------------- 6⃣ *उत्तर प्रदेश येथे सुरू असलेल्या 16 वर्षांखालील सब ज्युनिअर राष्ट्रीय हॉकी स्पर्धेच्या महाराष्ट्र  संघात तेजस मंगेश चव्हाण याची निवड* ----------------------------------------------------- 7⃣ *वर्षभर 'विराट' कामगिरी करणा-या विराट कोहलीला ICC चा प्रतिष्ठेचा 'क्रिकेटर ऑफ द इयर' पुरस्कार* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *हमें तो लूट लिया* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2016/12/blog-post_7.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *चिंतामण विनायक जोशी*  *चिंतामण विनायक जोशी* (जानेवारी १९, १८९२:पुणे, महाराष्ट्र - नोव्हेंबर २१, १९६३:पुणे) हे विनोदी साहित्याकररि प्रसिद्ध असलेले मराठी लेखक होते. पाली भाषेचा त्यांचा विशेष अभ्यास होता. बडोदे महाविद्यालयात ते पाली विषयाचे प्राध्यापक होते. त्यांचे वडील विनायक रामचंद्र जोशी हे शिक्षक होते तसेच आगरकर यांच्या सुधारक या वृत्तपत्राचे त्यांनी काही काळ संपादनही केले होते. सार्वजनिक काका म्हणून ओळखले जाणारे गणेश वासुदेव जोशी हे देखील जोश्यांच्याच घराण्यातले होते. त्यांचे बहुतांशी लेखन हे विनोदी वाङ्मय असले तरी ते व्यावहारिक जीवनात धीरगंभीर प्रवृत्तीचे गृहस्थ होते. त्यांच्या मुलाचा अकाली मृत्यू झाला होता, त्यामुळे ते दु:खी असत. दूरचित्रवाणीवरची ’चिमणराव-गुंड्याभाऊ’ ही मालिका खूप गाजली. मालिकेत चिमणरावांचे काम दिलीप प्रभावळकरांनी, गुंड्याभाऊचे बाळ कर्वे यांनी केले होते. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= विचार असे मांडा कि तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) भारतातर्फे राष्ट्रकुलस्पर्धेत कोणत्या कुस्तीपटूने सुवर्णपदक पटकाविले?* 👉 सुशीलकुमार *२) देशातील पहिला हरीत रेल्वेमार्ग कोणता?* 👉 रामेश्वरम-मनामदुराई *३) दतमहात्म्य' हा सात हजा ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहिला?* 👉 वासुदेव बळवंत फडके *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 अजय कोंडलवाडे, सहशिक्षक, बिलोली 👤 अजय परगेवार उमरेकर 👤 माधव चपळे 👤 शिवशंकर स्वामी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *गाजरं* बारा महिने कोणी खात नाही बाजरं दाखवून काय होणार लाल लाल गाजरं पहायला मिळण्या पेक्षा खायला मिळालं पाहिजे बारा महिने कोणी काही खात नाही कळालं पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *आपण व्यक्ति म्हणून समाजाचे काही देणे लागतो. आपले कुणाकडेही लक्ष नसले, तरी समाजाचे आपल्याकडे लक्ष असते. त्यामुळे आपल्या जगण्या-वागण्यावर अनेकदा मर्यादा येतात. आपण कुठेही आणि कसेही वागू शकत नाही. सामाजिक उत्तरदायित्व नावाची गोष्ट सतत आतुन ढुसण्या देत असते. त्यामुळे आपले वर्तन हे सामाजिक जीवनाला साजेसे असावे लागते, कारण व्यक्ति जर यशाच्या शिखरावर जात असेल, तर लोकांच्या नजरा त्याच्यावर खिळलेल्या असतात. तो जे सांगतो त्या उपदेशापेक्षा तो जे वागतो त्याचे अनुकरण समाज करतो.* *एक साधा दृष्टांत असा आहे की, कोणतेही नितीशास्त्र पुस्तकामधून शिकविल्यानंतर ते जेवढे रूजते त्यापेक्षा ते आधिक एखाद्याच्या वर्तनातून दिसले, तर परिणामकारक ठरते. त्यामळेच संत ज्ञानेश्वरांपासून अनेकांनी वर्तनावर भर दिला आहे. ज्ञानेश्वर म्हणतात, 'मार्गाधारे वर्तावे' संत तुकाराम म्हणतात, "बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले' याचाच अर्थ व्यक्ति जीवनात वर्तनाला महत्व आहे. समाजातले प्रतिष्ठित, थोर लोक जे आचरण करतात, त्यांच्या अनुकरणाचे प्रतिबिंब जागोजागी पडत असते.* ••●‼ *रामकृष्णहरी*‼●•• 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= मनुष्याने आपल्या जीवनात परिस्थिती वेगवेगळी रूपे घेऊन आपली परीक्षा घेत असते.त्या परीक्षेत जीवनात कधी दु:खाचे,कधी सुखाचे तर कधी न सुटणारेही अवघड प्रश्न येतात आणि त्याच्या मानसिकतेनुसार, अनुभवानुसार सोडविण्याचा प्रयत्न करतात.जर समजा प्रयत्न नाहीच केला तर जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होता येत नाही.जर व्हायचेच असेल तर समोर येणा-या कोणत्याही प्रश्नांना उत्तरे देण्याची मानसिकता तयार करावी लागेल आणि न घाबरता ,न डगमगता मन संयमीत ठेऊन सदविवेक बुध्दीने सारासार विचार करून धैर्याने आणि हिंमतीने हाताळायला शिकले तरच जीवनाच्या ख-या परीक्षेत यशस्वी होता येईल हे तितकेच सत्य आहे. ©व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 💕🌱💕🌱💕🌱💕🌱💕🌱💕 =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ* - आपलाच माणूस आपल्या नुकसानीस कारण होणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *एका गाढवाची गोष्ट* एक धोबी आपल्या गाढवाकडून दिवसभर ओझी वाहण्याचे काम करून घेई आणि रात्री तो त्याला गावाबाहेर चरायला सोडून देई. रात्रभर गवत, नाही तर कुणा ना कुणाच्या शेतातली धान्याची रोपे पोटभर खाऊन झाल्यावर पहाटे पहाटे ते गाढव आपल्या घरी जाई. या रात्रीच्या भ्रमंतीत त्याची एका कोल्ह्याशी ओळख झाली. एके रात्री पुनवेचे पिटूर चांदणे पडले असताना ते गाढव म्हणाले, 'कोल्होबा, या चांदण्यांमुळे मन कसे प्रफुल्लित झाले आहे. मी थोडा वेळ गाऊ का?' कोल्हा म्हणाला, 'मामा, तुम्ही आणि गाणार? म्हणजे प्रलयच धडकला म्हणायचा!' 'का रे, मला गाण्याची माहिती नाही, असे का तुला वाटते?' असा प्रश्न विचारून ते गाढव स्वर किती, सप्तके किती व राग किती वगैरे माहिती देऊन त्या कोल्ह्याला म्हणाले, 'आता तरी माझ्या रागदारीच्या ज्ञानाबद्दल तुझ्या मनात संशय उरला नाही ना? कोल्हा म्हणाला, 'नुसते ज्ञान असणे वेगळे आणि गाण्याचा आवाज वेगळा. त्यातून कुणी, कुठे व कसे वागायचे याबद्दल मार्गदर्शक असे काही नियम आहेत. उदाहरणच द्यायचे झाले, तर या जगात सुरळीतपणे जगण्याची इच्छा असेल, तर खोकला झालेल्याने व जो झोपाळू आहे त्याने चोरी करण्याच्या फंदात पडू नये व रोगग्रस्ताने जिभेचे चोचले पुरवू नयेत. खोकला झालेला जर कोणी चोरी करायला गेला आणि चोरी करता करता त्याला खोकला आला, तर ज्याप्रमाणे घरमालकाकडून मार खाण्याचा त्याच्यावर प्रसंग येईल, त्याचप्रमाणे तुम्ही जर या रात्रीच्या वेळी गाऊ लागलात, तर ज्याच्या शेतातली कोवळी कणसे आपण चोरून खात आहोत, तो शेतकरी जागा होईल आणि आपल्या दोघांनाही चोप देईल.' गाढव म्हणाले, 'कोल्होबा, तू अगदीच अरसिक कसा रे? तो स्मशानात राहणारा रुक्ष मनोवृत्तीचा शंकर जर त्या रावणाने सुकवलेल्या स्नायूंपासून तयार केलेल्या तंतुवाद्यातून रागदारीचे मधुर स्वर काढताच त्याच्यावर प्रसन्न झाला, तर माझे गोड गाणे ऐकून त्या शेताची रखवाली करणारा माणूस मला मारणे शक्य आहे का? उलट तो माझा सन्मानच करील.' हा आपले ऐकण्याचे लक्षण दिसत नाहीसे पाहून तो कोल्होबा त्या शेताच्या कुंपणाबाहेर पडून दूर उभा राहिला आणि त्या गाढवाने टिपेत गायला प्रारंभ केला. त्याबरोबर त्या शेताच्या जाग्या झालेल्या राखणदाराने त्याला बेदम मार दिला. त्या माराने ते गाढव मूच्र्छा येऊन जमिनीवर कोसळताच त्या राखणदाराने त्याच्या गळय़ात दोरखंडाने एक उखळ बांधले. एवढे करून तो पहारेकरी आपल्या झोपडीत जाताच शुध्दीवर आलेले ते गाढव गळय़ात बांधण्यात आलेल्या उखळासह कसेबसे घराकडे जाऊलागले, तेव्हा दूर उभा राहिलेला कोल्हा त्याला म्हणाला, 'गाढवमामा, तुमचा दिव्य गायनावर बेहद्द खूष होऊन त्या पहारेकर्‍याने तुमच्या सन्मानार्थ हा 'भव्य मणी' तुमच्या गळय़ात बांधला का?' पण लाजेने चूर झालेले ते गाढव एकही शब्द न बोलता निघून गेले. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे* जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*🙏👏सस्नेह नमस्कार* 🏆🏆🏆🏆🏆🏆🏆 *बक्षिस वितरण सोहळा* 〰〰〰〰〰〰 (श्री संत नंदी महाराज पुण्यतिथी व याञा महोत्सवानिमित्त) *मौजे कवाना ता.हदगाव जिल्हा नांदेड* *दि.१० जानेवारी २०१८* *〰〰〰〰〰〰* वरील आयोजित भव्य शालेय लेझीम स्पर्धेत आमच्या जि.प.प्रा.शाळा वाटेगाव येथील संघाला *पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक (३,१११रु).* मिळाले आहे. 👉त्या अनुषंगाने आम्ही शाळेतील बालचिमुकल्यांसाठी उत्तम दर्जाचे *(Lunch box ,bottle )*बक्षिस म्हणून आज दि.१७-०१-२०१८ रोजी खाऊ वाटप करून करण्यात आले आहे. या यशस्वीपणे राबविल्या जाणाऱ्या उपक्रमास वाटेगाव नगरीचे मा.शि.वि.अ.श्री पि.वाय.जाधव साहेब , शा.व्य.स.चे श्री जाधव साहेब तसेच शाळेचे मा.मु.अ.साहेब श्री चव्हाण सर व गावकरी मंडळी व शाळेतील सर्व शिक्षकवृंद,विद्यार्थी यांच्या उपस्थितीत हा हर्षमय कार्यक्रम पार पडला. सर्वांनी केलेल्या कौतुकाने व अभिनंदनीय💐💐 शुभेच्छारुपी आशीर्वादाने शाळेतील सर्व बाल चिमुकले विद्यार्थी व आमच्या सर्व गुरूजणांची मने आनंदाने भारावून गेली. 👭👬👭👬👭 =============== *माझा नाविण्यपूर्ण सामाजिक उपक्रम* मी राबवित असलेल्या अनेक शैक्षणिक व सामाजिक नाविण्यपूर्ण उपक्रमापैकीचा हा उपक्रम 👇👇👇👇👇👇 *मौजे कवाना येथे दरवर्षी घेण्यात येत असलेल्या भव्य लेझीम स्पर्धेच्या ठिकाणी* *माझे स्वर्गीय आईवडील* *(सौ.लक्ष्मीबाई कुंडलीक सेनकुडे)* *यांच्या पावन स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या स्मरणार्थ म्हणून स्पर्धासाठी आलेल्या तेथील प्रेक्षकांना व बालचिमुकले विद्यार्थी यांना पुढील वर्षीपासून दरवर्षी सावलीसाठी मंडप उपलब्ध करून देण्याचे तिथेच मी देऊ(जाहीर)केले.〰〰〰〰〰〰* 🙏आईवडिलांचा आशीर्वादरुपी वरदहस्त आणि तुमच्या सर्वांचा प्रेरणेमुळे मला हे सर्व कार्य करण्याचे बळ मिळत आहे. *🙏धन्यवाद*🙏 ✍आपलीच सहकारी *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे* *(स.शिक्षिका)* (लेझीम पथक प्रमुख व मार्गदर्शक) जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव जि.नांदेड 〰〰〰〰〰〰

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 17/01/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९५६ - बेळगाव - कारवार आणि बिदर जिल्ह्यांतील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्याची घोषणा. २००१ - मध्य प्रदेश सरकारचा शास्त्रीय नृत्यासाठीचा कालिदास सन्मान रोहिणी भाटे यांना जाहीर. अपारंपारिक उर्जा क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा सूर्या पुरस्कार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.एम.जी.ताकवले यांना जाहीर. 💥 जन्म :- १८९५ - विठ्ठल दत्तात्रय घाटे, मराठी लेखक, शिक्षणतज्ञ. १९०५ - दत्तात्रय रामचंद्र कापरेकर, भारतीय गणितज्ञ. १९०६ - शकुंतला परांजपे, भारतीय समाजसेविका. 💥 मृत्यू :-  २००० - सुरेश हळदणकर, जुन्या पिढीतील गायक आणि अभिनेते. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *जीएसटी परिषदेच्या 18 जानेवारीला होणा-या बैठकीत जीएसटीमध्ये रिअल इस्टेट क्षेत्राचा समावेश करण्यावर चर्चा होण्याची शक्यता.* ----------------------------------------------------- 2⃣ *हज यात्रेचं अनुदान यंदापासूनच बंद, केंद्र सरकारचा निर्णय* ----------------------------------------------------- 3⃣ *सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला न्यायाधीश बी एच लोया यांच्या मृत्यूशी संबंधित सर्व कागदपत्रे याचिकाकर्त्याला देण्याचे निर्देश दिले.* ----------------------------------------------------- 4⃣ *भारताच्या अंडर 19 च्या संघाने पापुआ न्यू गिनियावर (PNG) 10 विकेट्स राखून मोठा विजय.* ----------------------------------------------------- 5⃣ *पुणे : विधान परिषदेचे माजी सभापती ना. स. फरांदे यांचे निधन.* ----------------------------------------------------- 6⃣ *तिस-या कसोटीसाठी दुखापतग्रस्त वुद्धीमान सहाच्या जागी दिनेश कार्तिकची निवड.* ----------------------------------------------------- 7⃣ *सेंच्युरियन कसोटी -दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव २५८ धावांवर आटोपला, भारतासमोर विजयासाठी २८७ धावांचे आव्हान* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *साहित्यसेवा हेच खरे काम* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_76.html पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करावे. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *शकुंतलाबाई परांजपे* शकुंतलाबाई परांजपे या महाराष्ट्रातील समाजसेविका होत्या. त्यांनी भारतात, विशेषतः महाराष्ट्रात, कुटुंबनियोजनाचा पुरस्कार केला. त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून गणितात अधिस्नातक पदवी मिळवली होती. जन्म- १७ जानेवारी १९०६ पुणे मृत्यू- ३ मे २००० जोडीदार - युरा स्लेप्टझॉफ अपत्ये सई परांजपे पुरस्कारपद्मभूषण(१९९१) *व्यक्तिगत माहिती* रँग्लर परांजपे हे त्यांचे वडील होते. सई परांजपे ही त्यांची कन्या आहे. शकुंतलाबाई परांजपे या लेखिकाही होत्या. यांनी काही पुस्तके आणि नाटकेही लिहिली आहेत. *शकुंतलाबाई परांजपे यांनी लिहिलेली पुस्तके* अरे संसार संसार, काही आंबट काही गोड, दुभंग, निवडक शकुंतला परांजपे (संपादन - विनया खडपेकर), भिल्लिणीची बोरे *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) भारतातील पहिल्या इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना कोठे झाली?* 👉 पुणे *२) आयसीसी क्रमवारीत रोहित शर्मा कितव्या स्थानावर आहे?* 👉 पाचव्या *३) आयसीसी क्रमवारीत प्रथम स्थानावर कोणता खेळाडू आहे?* 👉 विराट कोहली *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 जयप्रकाश भैरवाड, धर्माबाद 👤 शेखर घुंगरवार 👤 सचिन पाटील पार्डीकर 👤 धम्मपाल कांबळे 👤 यश चेलमेल 👤 राम घंटे 👤 मन्मथ भुरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *संगत* ज्यांची असते सदा असंगाशी संग ते होतात नेहमी असंगाने तंग तंग व्हायचे नसेल तर संगत चांगली करा आनंदी रहायचा हा मार्ग आहे खरा शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *या पृथ्वीतलावर पर्वत, नद्या , स्थावर-जंगम आहे तोवर लोकसमूहात रामायणाची कीर्ती गाजत राहणार आहे.. या शब्दांत महर्षि वाल्मिकींनी रामायण कथेची कालातीत स्थिरता कोरून ठेवली आहे. या भूतलावरील प्रत्येक मानवी वृत्ती व प्रवृत्तीचं प्रातिनिधिक रूप या महाकाव्यात रंगविलं आहे. आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श सेवक, आदर्श राजा अशा आदर्शांचा प्रतिनिधी म्हणून श्रीरामाचं चरित्र आपल्यापुढं येतं. संतानी, भक्तांनी, कवींनी त्याला देवत्वाला पोहोचवलं आहे.* *रामायणातील अगतिकता नि वेदनांच्या आंतरिक संघर्षाच्या तळाशी पोहचल्याशिवाय श्रीरामाच्या मानव ते 'मर्यादा पुरूषोत्तम प्रभूराम' या देवत्वरूपाशी तादात्म्य पावताच येणार नाही. गदिमांनी गीतरामायणात प्रभूरामाच्या जीवनपटाचा माणूस म्हणून सारांश मांडताना अतिशय उत्कटतेने वलयांकित केलेले-* *'दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा* *पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.'* *हे श्रीरामाचं रूप आधिक यथार्थ वाटतं..* •••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••• 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्यांचे मन आणि बुद्धी सक्षम असतील तर त्यांनी करत असलेले विचारही सक्षम असतात कारण की,अशा विचारांमुळे स्वत:च्या जीवनाबरोबर इतराच्यांही जीवनाचा सकारात्मक विचार करायला तो तयार असतो.त्याच्या मनात इतरांबद्दल वाईट भावना कधीच येत नाहीत.पण ज्यांचे मन आणि बुद्धी जर सक्षम नसतील तर ते मन आणि बुद्धी वाईट विचार करायला लागते.त्यातस्वत:चे आणि इतरांचे चांगले होत आहे की वाईट होत आहे ह्याचा विचारही त्याच्या मनाला आणि बुध्दीला स्पर्श करत नाही. अशावेळी भरकटलेल्या मनाला आणि बुध्दीला आपल्या वशमध्ये ठेवण्यासाठी शांत आणि संयमी वृत्ती जोपासायला हवी.हा स्वभाव जर विकसित केला आणि जोपासला तर आपले मन आणि विचार सकारात्मक दृष्टिकोनाच्या मार्गाने मार्गक्रमण करत आहेत असे समजावे. अशामुळे स्वत:चे आणि इतरांचेही कल्याण होईल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *कामापुरता मामा* - गरजेपुरते गोड बोलणारा ; मतलबी माणूस. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *घामाचा पैसा* धन्नाशेटचा मुलगा राम अगदीच आळशी. घरांत गडगंज संपत्ती. एकुलता एक लाडाचा. काम कधी करावंच लागलं नाही. आता २१ वर्षाचा झाला. शेठजींना काळजी पडली. याचे कसे होणार साठलेला पैसा किती दिवस पुरेल. दुसरे दिवशी त्यांनी मुलाला बोलावले व म्हणाले हे बघ आज तू सकाळीच बाहेर जा. काहींतरी काम करून पैसे मिळवुन आण तरच तुला जेवायला मिळेल' मुलाला काहीच कळेना. तो बहिणीकडे गेला तिने त्याला एक रूपया दिला. शेठजींनी तो विहीरीत फेकून दिला. दुसर्‍या दिवशी आईकडून घेतला तिसर्‍या दिवशी मात्र कोणीही पैसे द्यायचे नाहीत हे उमजल्यावर स्वारी घराबाहेर पडली स्वारी घराबाहेर काम शोधायला निघाली. पण काय काम करणार ? बारा वाजे पर्यंत हिंडला. काम मिळेना. पोटात कावळे कोकलायला लागले. स्टेशनवरून एक जड बॅग घेऊन येणारा माणूस दिसला त्याला हमाल हवा होता. हा धावत पुढे गेला. 'साहेब, इकडे आणा'. ती बॅग त्याने डोक्यावर उचलली. घामाघूम झाला. साहेबांनी आठ आणे हातावर ठेवले. घरी आला. शेठजींच्या हातावर आठ आणे ठेवले. दोन दिवसाप्रमाणेच शेठजींनी ते विहीरीत फेकले हा चवताळून उठला. 'बाबा अहो तेवढे आठ आणे मिळवायला मला किती वणवण करावी लागली आणि तुम्ही ते फेकून दिलेत ?' शेठजींनी त्याला जवळ घेतले. पाठीवरून हात फिरवला, 'बाळा आता मला काहीं काळजी नाहीं कारण खर्‍या कष्टाची किंमत तुला आज कळली. दोन दिवस ह्याच्या दुप्पट रक्कम फेकली पण तुला राग आला नव्हता कारण त्या मागे कष्ट नव्हते.' स्वकष्टाची कमाई तीच खरी कमाई. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 16/01/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९९६ - भारतीय कापड गिरणी कामगार नेता दत्ता सामंतची हत्या. १९९८ - ज्येष्ठ उर्दू कवी व लेखक अली सरदार जाफरी यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर. २००८ - टाटा मोटर्सच्या नॅनो या एक लाख रुपये किंमतीच्या 'पीपल्स कार'चे अनावरण 💥 जन्म :- १९४६ - कबीर बेदी, भारतीय अभिनेता. मृत्यू १९०१ - महादेव गोविंद रानडे, भारतीय समाजसुधारक, धर्मसुधारक, न्यायाधीश, अर्थशास्त्रज्ञ १९०५ - दत्तात्रेय रामचंद्र कापरेकर १९५४ - बाबूराव पेंटर, भारतीय चित्रपटनिर्माता, चित्रकार, शिल्पकार. १९८८ - लक्ष्मीकांत झा, भारतीय अर्थशास्त्रज्ञ. २००१ - पंडितराव बोरस्ते, भारतीय क्रीडा संघटक, शिवछत्रपती पुरस्कार विजेता. २००३ - रामविलास जगन्नाथ राठी, भारतीय उद्योगपत 💥 मृत्यू :-  १९३८: बंगाली साहित्यिक शरदचंद्र चटोपाध्याय १९५४: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, चित्रकार, शिल्पकार आणि कलामहर्षी बाबूराव पेंटर  *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========  🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *आता चेहऱ्याद्वारे होणार आधारकार्डची पडताळणी. बोटांचे ठसे न उमटल्यास चेहरा ग्राह्य धरला जाणार.* ----------------------------------------------------- 2⃣ *भारताच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन 17 जानेवारीला सुखोई-30 मधून उड्डाण करणार.* ----------------------------------------------------- 3⃣ *सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि सरन्यायाधीशांमधील वाद मिटला - मनन मिश्रा, बार काऊन्सिलचे अध्यक्ष.* ----------------------------------------------------- 4⃣ *हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनाला दाखवला हिरवा कंदिल.* ----------------------------------------------------- 5⃣ *ठाणे- जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या मंजुषा जाधव तर राष्ट्रवादीचे मुरबाड येथील सुभाष पवार उपाध्यक्ष बिनविरोध  विजयी. 36 सदस्यांच्या पाठबळावर शिवसेना- राष्ट्रवादी सत्ता स्थापन.* ----------------------------------------------------- 6⃣ *नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री रघुनाथ झा यांचं राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये निधन.* ----------------------------------------------------- 7⃣ *सेंच्युरियन- भारत वि.दक्षिण आफ्रिका दुसरी कसोटी. कॅप्टन विराट कोहलीचं दमदार शतक. कारकीर्दीतील 21 वं शतक. खेळ थांबेपर्यंत दक्षिण आफ्रिकेकडे 96 धावांची आघाडी* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ=========       *प्रत्येक शाळेला संरक्षणभिंत हवे* प्रत्येक गावात स्थानिक स्वराज्य संस्थेची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असते. पूर्वीच्या शाळा कोणाच्या घरात, ओसरीवर किंवा झाडाखाली भरविली जात असे आणि सर्वाना शिकवायला एकच शिक्षक असायचा. मात्र ...... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_15.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========       *दत्तात्रेय रामचंद्र कापरेकर* द.रा. कापरेकर (जन्म : डहाणू-ठाणे जिल्हा, महाराष्ट्र, १७ जानेवारी १९०५; मृत्यू : १९८६) हे देवळाली(नाशिक)मध्ये राहणारे एक जागतिक कीर्तीचे गणितज्ञ होते. त्यांच्या महाविद्यालयीन काळात त्यांना गणितातले रँग्लर परांजपे पारितोषिक मिळाले होते. ते नाशिकजवळच्या देवळाली येथे शिक्षक होते आणि १९६२मध्ये निवृत्त झाले. त्यांची राहणी अत्यंत साधी होती. धोतर, कोट, टोपी हा त्यांचा नित्याचा वेश होता. नोकरीच्या काळात आणि निवृत्तीनंतरही कापरेकरांचा गणितातील आकड्यांशी खेळ चालूच होता. नोकरीच्या काळात त्यांची यासाठी हेटाळणी होत असे. महाविद्यालयीन स्तरावर अनेक संशोधनपर लेख प्रसिद्ध होतात, पण शालेय स्तरावर आणि शाळा मास्तरांकडून असे लेख लिहिले जाणे अतिशय अपवादात्मक असते. दत्तात्रेरय रामचंद्र कापरेकर यांचे लेख हे त्यांतले एक होते. १९७५ साली अमेरिकेतील प्रा. मार्टिन गार्डिनर यांनी कापरेकरांच्या संशोधनाची दखल घेतली आणि त्यांच्या संशोधनावर आधारित Mathematical Games या सदराखाली Scientific American या मासिकात लेख लिहिला, आणि द.रा. कापरेकर भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध झाले. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१)  मतदानसक्तीचे प्रस्ताव देणारे देशातील पहिले राज्य कोणते?* 👉      गुजरात *२)  अमेरिकेमध्ये लॉस वेगास इथे आयोजित मिस युनिव्हर्स २०१७ चा पुरस्कार कोणाला मिळाला?* 👉    डनी ले नेल *३)  नीरज व्होरा यांनी कोणत्या चित्रपटातून अभिनयाचा श्रीगणेशा केला?* 👉   होली *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 साईनाथ सायबलू, सहशिक्षक, धर्माबाद 👤 सचिन होरे, धर्माबाद 👤 किरण शिंदे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ=========     *स्वप्न* कागदाची नाव करून समुद्र पार करता येत नाही स्वप्न पाहून सत्य होईल असे गृहीत धरता येत नाही स्वप्न सत्यात उतरवायचे तर प्रयत्न करावे लागतात स्वप्न त्यांचेच पुर्ण होते जे नेहमी प्रयत्नपूर्वक वागतात     शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *स्वत:वर विश्वास असणे फार महत्वाचे आहे. तो नसल्यास न्यूनगंड निर्माण होतो. मानवी जीवन सुंदर आहे, यावर विश्वास ठेवल्यास मनात जगण्यासाठी नवी उमेद निर्माण होते. आशावदी दृष्टीकोन हा विश्वासाचाच अविभाज्य भाग आहे. आशावाद मानवी मनाला प्रेरणा देऊन कर्तव्य पार पाडण्यासाठी लागणारी ऊर्जा पुरवतो. विश्वासाचा संबंध व्यक्तीच्या ह्रदयाशी, मनाशी असतो. तो दृश्य स्वरूपात नसून अदृश्य स्वरूपाचा असतो. तो समजून घ्यायचा असेल, तर आपल्या आत डोकवावे लागेल.* *याच विश्वासाची गळचेपी होत असल्याचे आज पावलोपावली जाणवते. मुलांचा आईवडिलांवरील, आई-वडिलांचा मुलांवरील, पती-पत्नीच्या नात्यातील,  विद्यार्थ्यांचा गुरूजनांवरील, रूग्णांचा डाॅक्टरांवरील, मित्र-मैत्रिणींचा एकमेकावरील, जनतेचा राजकारण्यांवरील विश्वास कमी होत चाललाय...त्याला तडा जात असल्याचे आपल्याला दिसते. याचे कारण स्वार्थधुंदीत आपण माणूसपण विसरू लागलो. औपचारिकता आणि आधुनिकतेच्या नावाखाली नावाखालीही विश्वासाला नख लावणे सुरू झाले. मॅथ्यू अरनाॅल्ड हा कवी मानवी जीवनातील विश्वासाची व्याप्ती व खोली स्पष्ट करण्यासाठी समुद्राची प्रतिमा वापरतो. भूतकाळात विश्वासाची व्याप्ती समुद्राएवढी होती. प्रत्येकाच्या ह्रदयात विश्वासाला महत्वाचे स्थान होते. अशीच परिस्थिती चालत राहिली, तर भविष्यात विश्वासाची अवस्था केविलवाणी होईल. मानवी समाजात विश्वासाची जागा संशय घेईल व सर्वत्र सावळागोंधळ निर्माण होईल. चला तर..अंतस्थ विचार बदलून विश्वासाला पात्र बनू या..*          ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••     🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼     *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= इतरांना त्रास देऊन जर आपण आपले जीवन चांगल्याप्रकारे जगू म्हटले तर ते अयोग्यच आहे.कारण त्यांनी परिश्रमातून जे काही मिळवलेले असते ते गुण्यागोविंदाने जगण्याचे स्वप्न साकारत असतात.हे त्यांचे बघवत नाही आणि आपल्याने होत नाही म्हणून इतरांना त्रास देऊन त्यांचे सुख हिरावून घेणे हे वामवृत्तीचे लक्षणच म्हणावे. त्यामध्ये आपण सुखी होऊ शकतो का ? आपल्या बाबतीत इतरांनी असे केले तर आपणास कसे वाटेल ? ते आपल्या मनाला समाधान देते का ? ह्या सा-या गोष्टीचा आपण विचार केला तर नक्कीच त्याचे उत्तर सापडेल आणि पुन्हा आपण ती चूक करणार नाही याची नक्कीच जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.इतरांच्याही सुखस्वप्नात आपणही सहभागी व्हावे हाच आपला माणुसकीचा खरा धर्म आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी* - एक तर विलासी जीवन उपभोगता येईल तेवढे उपभोगणे किंवा कंगाल स्थितीत जगणे - यापैकी एकाचीच निवड करणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ=========                 *सुंदर माझे घर* सुंदर माझे घर बिट्टी बेडकुळी कितीतरी वेळ कमळाच्या पानावर लोळत होती. वरून पावसाच्या धारा येत होत्या. सगळया तळयात 'टिप...टिप..' आवाज येत होता, हवा कशी गार गार झाली होती. बिट्टीला मजेत गाणे गावेसे वाटत होते. तिने त्याप्रमाणे तोंड उघडलेही. इतक्यात पलीकडच्या झाडावरून मंजुळ स्वर ऐकू आले. बिट्टीने तिकडे पाहिले. एक छोटीशी मुनिया आपले घरटे विणीत होती. नाजुक, नाजुक काडयांचे विणकाम करताना मधेच गाणे गुणगुणत होती. आता मात्र बिट्टीला राहवले नाही. एका उडीतच तिने पलीकडचा काठ गाठला. म्हंटले 'माझे घर पाहिले कां केवढे मोठे आहे ते?आत कशी रंगीबेरंगी कमळे फुललीत. 'ती कौतुकाने तळयाकडे पाहत म्हणाली. 'शी! हे कसले सुंदर घर? आत भरला आहे गाळ अन् चिखल!' मुनिया नाक मुरडत म्हणाली. बिट्टी मग टुणटुणत पुढे निघाली. आज सगळीकडे कसा मऊ मऊ चिखल पसरला होता. त्यात घसरगुंडी खेळाविशी वाटत होती. बिट्टीला एक भलामोठा दगड दिसला. त्यावर उडी मारताच आतून आवाज आला, 'कोण आहे?' पाठोपाठ कासवदादा मान बाहेर काढून इकडेतिकडे पाहू लागले. 'अगबाई! कासवदादा तुम्ही त्यात राहता वाटते?' बिट्टीने विचारले. 'तर काय! हेच माझे घर!' पुन्हा आत शिरत ते म्हणाले. मजाच आहे नाही? बिट्टी मनाशी विचार करत पुढे जाऊ लागली. वाटेत झाडावर एक मधाचे मोठ्ठे पोळे लोंबत होते. त्याभोवती मधमाशा उडत होत्या. काही जात होत्या, तर काही येत होत्या. 'बायांनो! तुम्ही इतक्याजणी ह्या छोटयाशा घरात कशा ग राहता?' बिट्टीने विचारले. 'छोटेसे आहे कां ते? आत कशा षट्कोनी खोल्याच खोल्या आहेत! अगदी आरामात राहता येते सर्वांना!'. बिट्टीभोवती गुणगुणत एका माशीने उत्तर दिले. बिट्टी तिथेच थांबून इकडची तिकडची मजा बघत होती. किती गंमतीदार घरे आहेत नाही प्रत्येकाची, ती स्वत:शी म्हणत होती. रस्त्यावर फळांनी लगडलेले एक भलेमोठे झाड होते. त्यावर सुगरणींची लोंबती घरे होती. वाऱ्याने ती इकडून तिकडे हलत! सुगरणबाई उडत येऊन खालून वर जात होत्या. आपल्या इवल्याशा चोचीने विणकाम करत होत्या. बापरे! एवढया वा-यावादळातही घर कसे पडत नाही? बिट्टी वर पाहत असताना जवळून आवाज आला. 'माझे घर कित्ती छान आहे! खाऊच्याच घरात मी राहते.' बिट्टीने ह्या टोकाकडून त्या टोकाकडे डोळा फिरवत शोधाशोध केली.शेजारी एक भलामोठा पेरू पडला होता. त्यातून एक अळी डोके बाहेर काढून बिट्टीशी बोलत होती. 'हो! हे बाकी खरेच!' बिट्टीने मान डोलावली. इतक्यात आभाळातून पुन्हा गडाड-गुडूम आवाज आला व पाऊस पडू लागला. समोर एक भली मोठी छत्री उगवली होती. बिट्टी पळत पळत जाऊन त्याखाली उभी राहिली. आता मात्र तिला पुन्हा एकदा गाणे म्हणावेसे वाटले व त्या आनंदात ती गाऊ लागली. 'गार गार वारा अन् पावसाच्या धारा, भिजलेली राने अन् पानोपानी गाणे, झुळझुळणा-या पाण्यात थेंबांची नक्षी, फांदीवर डुलतात भिजलेले पक्षी, ओल्या मातीत सुगंधाची भर, सगळयात सुंदर सुंदर माझेच घर !! 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*माणूस होशील का* ज्ञानपीठ विजेत्या लेखिका कै. महाश्वेता देवी यांची एक सुंदर कविता आणि कुणीतरी त्याचं केलेलं मराठीकरण .... आलास..? ये, दार उघडंच आहे ...आत ये पण क्षणभर थांब....!! दारातील पायपुसण्यावर अहंकार झटकून ये...!! भिंतीला बिलगून वर चढलेल्या मधुमालतीच्या वेलावर नाराजी सोडून ये...!! तुळशीपाशी मनाचे सारे ताप सोडून ये... बाहेरच्या खुंटीला सारे व्याप टांगून ये...!! पायातल्या चपलांबरोबर मनातली नकारात्मकताही काढून ठेव ..!! बाहेर खेळणाऱ्या मुलांकडून थोडा खेळकरपणा मागून आण.. गुलाबाच्या कुंडीतलं थोडं हसू चेहेऱ्याला लावून आण...!! ये... तुझी सारी दुःखं, सारे प्रश्न माझ्यावर सोपव... तुझ्या दमल्या-भागल्या जीवाला प्रेमाच्या चार गोड शब्दांचे विंझणवारे घालते...!! ही बघ.... तुझ्यासाठीच ही संध्याकाळ अंथरली आहे मी.. सूर्य क्षितिजाला बांधलाय आणि आकाशी गुलालाची उधळण केलीयं... अन प्रेम आणि विश्वासाच्या मंदाग्नीवर चहा उकळत ठेवलाय... तो घोट घोट घे.... ऐक ना ... इतकंही अवघड नाहीये रे जगणं ...! फक्त...... तू *माणूस* बनून ये... 🙏🙏🙏 संकलन

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 15/01/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९१९ - राजर्षी शाहू महाराजांनी आदेश काढून स्पृश्य-अस्पृश्य विद्यार्थ्यांना एकाच शाळेत शिक्षण देण्याची व्यवस्था केली. १९४९ - भारताच्या स्वातंत्र्यानंतर फिल्डमार्शल के.एम. करिअप्पा यांनी पहिले लष्करप्रमुख म्हणून सूत्रे स्विकारली. हा दिवस लष्करदिन म्हणून ओळखला जातो. १९९९ - ज्येष्ठ गायिका ज्योत्स्ना भोळे यांना राज्य सरकारच्या वतीने गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान. 💥 जन्म :- १९५६ - उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती 💥 मृत्यू :-  १९७१ - दीनानाथ दलाल महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार यांचे मुंबईत निधन. १९९८ - गुलझारीलाल नंदा, भारतीय पंतप्रधान, स्वातंत्र्यसैनिक व गांधीवादी कार्यकर्ते. २००२ - विठाबाई भाऊ नारायणगावकर, राष्ट्रपतीपदक विजेत्या तमाशा कलावंत. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांचं दिल्लीत झाले आगमन, ते सहा दिवसांच्या भारत दौ-यावर आहेत* ----------------------------------------------------- 2⃣ *दिल्ली: २६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट; तीन दहशतवादी दिल्लीत घुसल्याची माहिती.* ----------------------------------------------------- 3⃣ *सांगली - मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळणार - मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सवाल* ----------------------------------------------------- 4⃣ *सातारा : ‘उपरा’कार लक्ष्मण माने रुग्णालयात दाखल, बेमुदत उपोषणादरम्यान प्रकृती बिघडली* ----------------------------------------------------- 5⃣ *सद्भावना एकता रॅलीनंतर चक्कर येऊन मृत झालेल्या शाळकरी मुलीच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  जाहीर केली पाच लाखाची मदत.* ----------------------------------------------------- 6⃣ *आयसीसी अंडर 19 वर्ल्डकपच्या स्पर्धेत भारतानं ऑस्ट्रेलियाला धूळ चारत मिळवला विजय* ----------------------------------------------------- 7⃣ *भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटीत दुसऱ्या दिवसअखेर भारताच्या 5 बाद 183 धावा* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *मकर संक्रांती निमित्त लेख* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_12.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *गुलजारीलाल नन्दा* गुलजारीलाल नन्दा  (4 जुलाई, 1898 - 15 जनवरी, 1998) भारतीय राजनीतिज्ञ थे। उनका जन्म सियालकोट, पंजाब, पाकिस्तान में हुआ था। वे १९६४ में प्रथम भारतीय प्रधानमंत्री जवाहर लाल नेहरू की मृत्युपश्चात् भारत के प्रधानमंत्री बने। कांग्रेस पार्टी के प्रति समर्पित गुलज़ारी लाल नंदा प्रथम बार पंडित जवाहरलाल नेहरू की मृत्यु के बाद 1964 में कार्यवाहक प्रधानमंत्री बनाए गए। दूसरी बार लाल बहादुर शास्त्री की मृत्यु के बाद 1966 में यह कार्यवाहक प्रधानमंत्री बने। इनका कार्यकाल दोनों बार उसी समय तक सीमित रहा जब तक की कांग्रेस पार्टी ने अपने नए नेता का चयन नहीं कर लिया। *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात..एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) भारत इतिहास संशोधन मंडळ कोठे आहे?* 👉 पुणे *२) वॉर ॲंड पिस हा ग्रंथ कोणी लिहिला?* 👉 लिओ टॉल्स्टॉय *३) कोणत्या पर्वतामुळे महाराष्ट्राच्या जलस्त्रोताचे दोन भाग झाले आहेत?* 👉 सह्याद्री *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 साईनाथ अन्नमवार, नांदेड 👤 नामदेव हिंगणे 👤 सलीम शेख 👤 बौद्धप्रिय धडेकर 👤 व्ही. एम. पाटील 👤 बालाजी ईबीतदार 👤 एकनाथ पावडे 👤 दत्ता बेलूरवाड 👤 कोमल ए. रोटे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *तत्त्व* तत्त्वाला कधीही खुप महत्व आहे पण पुस्तकातच सारे तत्व आहे बोलतांना सा-यांचे तत्वाचे बोल असतात आचरणात आनणारे शुन्या इतके गोल असतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची संक्रांत ही काही निराळी नाही. दरवर्षी संक्रांत येते, जाते. पण क्रांती मात्र व्हायची तशीच राहते. ज्यावेळेला तुम्ही काळाची क्रांती मोजता, त्यावेळी फक्त ढोबळ रूपाने क्रांती लक्षात येते. या सापेक्ष जगामध्ये 'क्रांती' काळरूप करून चालणार नाही; तर संज्ञारूप करायला हवी. 'संज्ञा' म्हणजे नुसती व्याख्या नव्हे, तर तुम्हाला चांगलं ज्ञान झालं पाहिजे. संक्रांतीच्या दिवशी, 'तिळगुळ घ्या', याचा अर्थ, तिळा तिळाने माणूस जमवा. माझं ह्रदय दुसर्‍यासाठी तीळ-तीळ तुटलं पाहिजे. दुसरा चुकतो कसा, आणि मी डंख कसा मारतो... विंचवाच्या जिभा करून आम्ही जर वागलो, तर काय उपयोग आहे सगळ्याचा?* *एका तिळगुळाच्या वडीवर वर्षभर गोड बोलायला सांगत असाल तर काही अर्थ नाही. ते प्रतीक आहे. - गूळ म्हणजे गोडीचं, एकत्र बांधून ठेवण्याचं; आणि तीळ हे स्नेहाचं. प्रतीकात्मक आहे ते. त्याप्रमाणे वर्तन करा. प्रत्येक दोषी माणसाला त्याचे दोष चांगलेच माहीत असतात. दुसर्‍याने काही दाखवायचंच असेल, तर गुण दाखवायचे असतात. आपण थोडं एकमेकाला सांभाळून घेऊ शकलो, तर काय होईल? 'संक्रांत' याचा अर्थ,'सम+क्रांत' असा सुद्धा आहे. क्रांती केव्हा होते? समतेने होते.* *एका कवीने सांगून ठेवलंय ते लक्षात ठेवा-* *"दुर्दम्य होतील आशा आकांक्षा* *होतील संग्राम गीते पुरी।* *देशार्थ होतील त्यागी विरागी* *होईल संक्रांत तेव्हा खरी ॥"* *नुसत्या तीळगुळाने, हलव्याने होणार नाही. 'स्वत:च्या मनाला हलवा', असं ज्यावेळी मी स्वत:ला सांगेन, त्या दिवशी खरी संक्रांत साजरी होईल.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌟✨🌟✨🌟✨🌟✨🌟 *मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा !!!*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎯. विचारवेध.........✍🏼 ------------------------- रंग कितीही वेगवेगळ्या प्रकारचे असले तरी रंगांना कधीच भेदभाव,जातियता, प्रांतियता किंवा विषमता नाही.त्यांना कुठेही कॅनव्हासवर,कागदावर किंवा भिंतीवर वापरा कधीच काही म्हणत नाहीत.कितीही आणि कुठेही वापरले किंवा मिसळले तरी त्यांच्या वेगवेगळ्या छटा सौंदर्यात भर टाकतात आणि पाहणा-याच्या दृष्टीत अगदी सहज भरुन जातात.पाहाराही थक्क होऊन जातो तो विचार करायला लागतो की, वेगवेगळे असूनही एकात्मतेचे दर्शन घडवतात हे त्यांच्याकडून खरेच शिकायला हवे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *खाण तशी माती* (बाप तसा बेटा, कुंभार तसा लोटा) - आईवडिलां प्रमाणे मुलांची वर्तणूक असणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *चतूर न्यायमुर्ती* एका गृहस्थाने आपली विहिर शेजा-याला विकली. नवा मालक या विहिरीचे पाणी काढायला गेला असता, विहिरीचा पहिला मालक त्याला पाणी भरु देईना. आश्चर्यचकीत झालेल्या नव्या मालकानं त्याला विचारलं, 'अरे ! मी पूरेपूर पैसे मोजून तुझी जमीन विकत घेतली असताना, तू मला तिचे पाणी का भरु देत नाहीस?' जुना मालक म्हणाला, 'मी तुला केवळ विहीर विकली आहे. तिच्यातलं पाणी काही विकलेलं नाही. तेव्हा त्या पाण्यावर तुझा बिलकूल हक्क नाही.'  या अजब तर्कटाने संतापलेला त्या विहिरीचा नवा मालक न्यायालयात गेला. न्यायमुर्तींनी त्या विहीरीच्या नव्या व जुन्या दोन्ही मालकांना बोलावून घेतलं आणि त्या जुन्या मालकाला विचारलं, 'तू तुझी विहीर या तुझ्या शेजा-याला विकलीस हे खरे आहे काय?' जुना मालक - होय. पण विहिरीचं जे विक्रीखत झाले आहे त्यात मी माझी फ़क्त विहिरच काय ती याला विकली असल्याचा उल्लेख केला असल्याने, त्या विहिरीतील पाण्यावर या माझ्या शेजा-याचा बिलकूल हक्क नाही. न्यायमुर्ती - तुझं म्हणणं अगदी शंभर टक्के बरोबर आहे.  जुना मालक - (आनंदून) न्यायमुर्ती ! आपल्यालासुध्दा माझं म्हणण रास्त वाटत आहे ना ? वाटणारच. पण असं असूनही हा माझा शेजारी, केवळ ती विहिर विकत घेतली, म्हणून तिच्यातील पाण्यावर हक्क सांगतो आहे ! न्यायमुर्ती - ते त्याचं म्हणणं चूक आहे, पण त्याचबरोबर, तू तुझी विहीर विकली असूनही पाणी ठेवण्यासाठी तिचा वापर करतोस. तेव्हा आता त्या विहिरीचा असा वापर करीत राहीपर्यंत दर दिवशी पन्नास रुपये भाडे त्या विहिरीचा आता मालक झालेल्या तुझ्या शेजा-याला दिले पाहिजेस.' न्यायमुर्ती असे म्हणताच, तो खट मनुष्य़ त्यांना शरण गेला व केल्या अपराधाबद्दल क्षमा मागून, त्याने ती विहिर शेजा-याला पाण्यासह विकत दिल्याचे मान्य केले. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*अतिशय छान आहे एकदाच वाचा* *देवाचा मित्र* एक छोटा मुलगा रणरणत्या उन्हात फुलांचे गजरे विकत होता. ऊन खूप होते. तो मुलगा घामाघूम झाला होता. त्याचे अनवाणी पाय भाजत होते. सारखा तो पाय वर-खाली करत होता. तरीही चिकाटी न सोडता तशा रखरखत्या उन्हात पाय भाजत असताना तो गजरे विकत होता. त्याचे भाजणारे पाय बघून एका सज्जन माणसाला फारच वाईट वाटले. त्याने समोरच असलेल्या दुकानातून त्या मुलासाठी एक चप्पल खरेदी केली आणि त्या मुलाला दिली. त्या मुलाला तो म्हणाला ही चप्पल घाल. तुला मी भेट देतोय. यामुळे तुझे पाय भाजणार नाहीत. मुलगा लहान होता. त्याला त्याचे अप्रूप वाटले. त्याने लगेचच चप्पल घालून बघितली. त्याला खूप छान वाटले. तो आनंदी झाला. आनंदात त्या मुलाने त्या माणसाचा हात धरला व त्याला म्हणाला, ""काका, तुम्ही देव आहात का?‘‘ या प्रश्नावर तो सज्जन गृहस्थ आपले दोन्ही हात कानाला लावून म्हणाला, ""अरे नाही रे बाबा, मी देव नाही.‘‘ मुलगा पुन्हा तसाच निरागस हसला म्हणाला, ""काका - तुम्ही देव नाही मग नक्कीच देवाचे मित्र असणार.‘‘ मी कालच देवाला प्रार्थना केली होती. माझे पाय खूप भाजतात. मला चप्पल हवीय. देवानेच तुम्हाला पाठवले. तुम्ही देवाचे मित्रच असणार, हे वाक्य ऐकताच त्या सज्जन माणसाने त्या मुलाला जवळ घेऊन दोन वाक्ये बोलून तेथून त्या मुलाचा निरोप घेतला. संपूर्ण वाटेत त्या सज्जन माणसाच्या मनात एवढाच विचार घोळत होता, आपल्याला देव होता येत नाही; पण देवाचा मित्र होणे मात्र सहज शक्य आहे. खरोखर मित्रांनो आपल्यापैकी कुणीही देवाचा मित्र होऊ शकतो. . *स्वामी विवेकानंद म्हणायचे ज्याला चालत्या-बोलत्या माणसातला देव कळत नाही, त्याला दगडातला देव काय कळणार?* *देवाचा मित्र व्हा* 💐💐💐💐💐💐💐💐💐

⛳🌻🌷🌻🌷🌻⛳✍ *सहशालेय उपक्रम* *🌹जयंती सोहळा🌹* *जि. प. उच्च प्राथ. शाळा वाटेगाव येथे दि.१२ जानेवारी २०१८ रोजी राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली*. 👉 🎤 विद्यार्थ्यांची भाषणे व🎤 गीते झाली. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरिञावर माहिती श्रीमती सेनकुडे मँडम,श्री चव्हाण सर,श्री राठोड सर , श्रीमती झाडे मँडम इत्यादींनी विद्यार्थ्याना सांगितली. 🎤कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार *कु.विजया चव्हाण,कोमल मानेगोविंदवाड (सातवी)* हीने केले.याप्रसंगीचे काही क्षणचिञे👇👇👇👇 *==================* ✏वृत्त लेखन ✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे. (स. शि.)* जि .प .उच्च प्राथ शाळा वाटेगाव ता. हदगाव जी.नांदेड . 🌺♻🌺♻🌺♻🌺

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 13/01/2018 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९३० - मिकी माउसची चित्रकथा प्रथम प्रकाशित. 💥 जन्म :- १९४८ - गज सिंघ, जोधपूरचा राजा. 💥 मृत्यू :-  १७६६ - फ्रेडरिक पाचवा, डेन्मार्कचा राजा. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *गोव्यात मंगळवारपासून विज्ञान चित्रपट महोत्सव, १0 हजारांहून अधिक विद्यार्थी घेणार भाग* ----------------------------------------------------- 2⃣ *डोंबिवली - राष्ट्रीय शिक्षण संस्थे चा स्वामी विवेकानंद पुरस्कार अविनाश धर्माधिकारी याना प्रदान.* ----------------------------------------------------- 3⃣ *माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत याचा आप पक्षात प्रवेश* ----------------------------------------------------- 4⃣ *इस्त्रोच्या शंभराव्या उपग्रहाचं प्रक्षेपण. 3 भारतीय, 28 परदेशी उपग्रहांचं प्रक्षेपण.* ----------------------------------------------------- 5⃣ *चार न्यायमूर्तींच्या पत्रकार परिषदेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद यांच्याशी बातचित, सूत्रांची माहिती.* ----------------------------------------------------- 6⃣ *नांदेड : जातीचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे सिद्ध झाल्याने देगलूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता माधव शंखपाळे बडतर्फ* ----------------------------------------------------- 7⃣ *महाराष्ट्र कुस्ती लीगची घोषणा. ९ मार्चपासून सुरु होणार दंगल* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *तरुण भारत देश* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2016/08/blog-post_27.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *राकेश शर्मा* हे अंतरिक्षात जाणारे पाहिले भारतीय आहेत. भारताचा पहिला आणि जगाचा १३८ वा अंतराळवीर बनण्याचा सन्मान विंग कमांडर राकेश शर्मा यांनी पटकावला तो २ एप्रिल १९८४ रोजी भारत-रशिया अवकाश संशोधन मंडळ कार्यक्रमांतर्गत रशियाच्या सोयूझ टी-२ यानातून दोन रशियन अंतराळ संशोधकासमवेत राकेश शर्माने अवकाश सफरीचा अनुभव घेऊन या क्षेत्रात प्रगतीचे नवे दालन भारतीयांसाठी खुले केले. राकेश शर्मा पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी अंतराळातून बोलत होते. अंतराळातून भारत कसा दिसतो, या प्रश्‍नाला त्यांनी "सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ताँ हमारा' असे अभिमानी उत्तर दिले होते. पटियाला येथे जन्मलेले राकेश भारतीय वायू दलात वैमानिक होते. नंतरच्या काळात त्यांचा अशोक चक्र देऊन सन्मान केल्या गेला. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही..आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) डिसेंबरमध्ये इराणमधील कोणत्या बंदराचे उद्घाटन झाले?* 👉 चाबहार *२) इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड झाली?* 👉 रोहित पवार *३) इंडियन शुगर मिल्स असोसिएशनची स्थापना कोणत्या झाली?* 👉 १९३२ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 माधव सोनटक्के, सहशिक्षक, बिलोली 👤 व्यंकटेश भांगे, सहशिक्षक, धर्माबाद 👤 विजयकुमार चिकलोड 👤 बालाजी देशमाने *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *मी अन् माझं* जिकडे तिकडे फक्त मी अन् माझं आहे मी साठी किती बरं अपेक्षांच ओझं आहे कुठेही असावं वाटतं फक्त मी महत्वाचा विचार कोण करतो सांगा इथे तत्त्वाचा शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'मानवी' नात्यांमधील ओलावा हा जन्मजात असतो. तो सगळ्यांच्याच मनात झिरपत असतो. पण बरेचदा आम्हीच अनेक आवरणांचे थर लेपून त्यात प्रतिबंध तयार करतो. इथूनच 'मानवी' नात्यांमधील दुरावे, विसंवाद प्रसवतात. स्वत:कडे दोष घेऊन नाते जपण्याची क्रिया आत्मशुद्धीकडे नेणारी असते.* *बरेचदा आपल्या पुढाकारातून व घडलेल्या संवादातून दुभंगलेली मने सांधली जातात पण त्याकरिता मुखवटे उतरवून माणूस वाचता यायला हवा. मनात क्षमाभाव जागृत ठेवायला हवा. निर्मळ, शुद्ध प्रेमभाव बाळगल्यास वाट्याला येणारी निराशा गळून पडल्याशिवाय राहणार नाही. हीच भावना जीवनदर्शी महाकवी 'मिर्झा गालिब' अगदी सहजपणे सांगून जातात.....* *" कुछ इस तरह मैने* *जिंदगी को आसान कर दिया,* *किसी से मांग ली माफी,* *किसी को माफ कर दिया !"* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 💥💥💥💥💥💥💥💥💥 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= शब्द हे शस्त्रापेक्षाही धारदार असतात.शस्त्राची जखम शरीरावर होते नि काही काळ राहून ती मिटूनही जाते. परंतु एखादा शब्द जर आपण विचार पूर्वक न वापरला तर तो थेट काळजाला जाऊन लागतो आणि त्याची एवढी जखम होते की,ती आयुष्यभर तशीच काळजाला चिकटून राहते कधीच कमी होत नाही. म्हणून दैनंदिन जीवनव्यवहारात वावरत असताना मोजक्या आणि योग्य शब्दांचा,कुणालाही न लागणा-या शब्दांचा वापर करून आपण आणि इतरांनाही समाधानी रुपात रहावे.जेणेकरुन दोघांच्याही जीवनात आनंद आणि एकमेकांविषयी प्रेम निर्माण झाले पाहिजे.केवळ तुम्ही विचार न करता बोललेल्या एकाच शब्दाने वैरत्वाची भावना निर्माण होते तर त्याच एका शब्दाने इतरांची मने जिंकून जगावर राज्य करण्याची ताकद निर्माण होते. म्हणून शस्त्रापेक्षाही शब्दांना आपल्या जीवनात अधिक जास्त जपले पाहिजे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *असंगाशी संग प्राणाशी गाठ* - अयोग्य माणसाशी संगत केल्याने प्रसंगी आपले प्राण गमवावे लागतात. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *आरसा* एका गुरूंच्‍या घरी एक शिष्‍य मनोभावे गुरुंची सेवा करून शिक्षण घेत होता. त्‍याच्‍या या सेवेमुळे गुरु त्‍याच्‍यावर प्रसन्न होते. शिक्षण् पूर्ण झाल्‍यावर विद्यार्थी घरी जाण्‍यासाठी निघाला तेव्‍हा गुरुंकडे त्‍याने जाण्‍याची आज्ञा मागितली  तेव्‍हा गुरुंनी त्‍याला आशीर्वाद म्‍हणून एक आरसा भेट दिला व सांगितले की, हा दिव्‍य आरसा (दर्पण) असून यात मानवी मनात चालणारे विचार प्रगट होऊन दिसतात. विद्यार्थी मोठा आनंदीत झाला. हा आरसा खरेच कार्य करतो की नाही याची शहानिशा करण्‍यासाठी त्‍याने लगेच आपल्‍या गुरुंसमोर हा आरसा धरला व गुरुंच्‍या मनात कोणते भाव आहेत, दुर्गुण आहेत हे पाहू लागला आणि गुरुंच्‍या समोर आरसा धरताच त्‍याच्‍या चेह-यावरचा रंग पार उडाला कारण तो आरसा गुरुंच्‍या अंतकरणात मोह, अहंकार, क्रोध आदि विकार दाखवित होता. त्‍याला याचे फारच दु:ख झाले की आपण ज्‍या गुरुची मनोभावे पूजा केली, ज्‍यांना पूर्ण ईश्र्वराचा दर्जा दिला त्‍यांच्‍या मनातही विकार आहेत, ते सुद्धा मानवी विकारापासून अजून सुटलेले नाहीत याचे त्‍याला वैषम्‍य वाटले. तो गुरुंना काहीच न बोलता तो आरसा घेवून गुरुकुलातून निघाला. रस्‍त्‍यात भेटणा-या प्रत्‍येकाच्‍या मनातील भाव पाहणे हे त्‍याचे कामच झाले होते. गावी परत जाताच त्‍याने आपल्‍या प्रत्‍येक परिचिताबरोबर हा प्रयोग करून पाहिला. त्‍याला प्रत्‍येकाच्‍या मनात कोणता ना कोणता दुर्गुण दिसून आला. शेवट त्‍याने आपल्‍या जन्‍मदात्‍या आई वडीलांच्‍या समोरही हा आरसा ठेवला. ते दोघेही पण त्‍यातून सुटले नाहीत. त्‍यांच्‍या हृदयात पण त्‍याला काही ना काही दुर्गुण दिसले. शेवटी या गोष्‍टीचा त्‍याला मनोमन राग आला व तो गुरुकुलातील गुरुंकडे धावला. गुरुंपाशी जाऊन तो म्‍हणाला,’’ गुरुदेव, मी आपण दिलेल्‍या या आरशातून प्रत्‍येकाच्‍या मनात, हृदयात, अंत:करणात डोकावून पाहिले आणि मला असे जाणवले की प्रत्‍येकाच्‍याच मनात काही ना काही विकार आहेच, काही ना काही दोष आहे. एखाद्याच्‍या मनात कमी तर कुणाच्‍या मनात जास्‍त असे विकार, दोष भरून राहिले आहेत. हे पाहून मी फार दु:खी झालो आहे, कृपया मला मार्गदर्शन करा.’’ गुरुंनी काहीच न बोलता तो आरसा फक्त त्‍याच्‍याकडे केला आणि काय आश्र्चर्य त्‍याला त्‍याच्‍या मनाच्‍या प्रत्‍येक कोप-यात राग, द्वेष, अहंकार, क्रोध, माया आदि दुर्गुण भरून राहिलेले दिसले. गुरुजी म्‍हणाले,’’ वत्‍सा, हा आरसा मी तुला तुझे दुर्गुण पाहून ते कमी करण्‍यासाठी दिला होता पण तू दुस-यांचे दुर्गुण पाहत बसलास आणि नको तितका वेळ खर्च केलास, अरे याच वेळेत जर तू स्‍वत:चे अवलोकन केले असते तर तुला तुझ्यातील दुर्गुण सुधारता आले असते. याच काळात तु एक असामान्‍य व्‍यक्ती झाला असता. मानवाची ही कमतरता आहे, कमजोरी आहे की तो दुस-यातील दुर्गुण पाहत बसतो आणि स्‍वत:ला सुधारण्‍याचा प्रयत्‍नही करत नाही. हेच या आरशातून मला तुला शिकवायचे होते. जे तुला शिकता आले नाही.’’ *तात्‍पर्य : आपण नेहमीच दुस-या व्‍यक्तीचे दुर्गुण बघतो, त्‍यावर टीका करतो पण आपल्‍यातील दुर्गुणांवर आपले कधीच लक्ष जात नाही. कधीतरी जर आपण आत्‍मनिरीक्षण केले तर आपल्‍यालाही आपले दुर्गुण सापडतीलच.* 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

☘☘☘☘☘☘☘ *भव्य शालेय लेझीम स्पर्धा* (श्री संत नंदी महाराज पुण्यतिथी व याञा महोत्सवानिमित्त) *मौजे कवाना ता.हदगाव जिल्हा नांदेड* *दि.१० जानेवारी २०१८* *स्पर्धा संयोजकः श्री सादुलवार सर.* *〰〰〰〰〰〰* वरील आयोजित भव्य शालेय लेझीम स्पर्धेत आमच्या जि.प.प्रा.शाळा वाटेगाव येथील संघाला *पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक (३,१११रु).* मिळाले आहे. 💐🌹💐🌹💐🌹 👉शाळेतील या यशस्वीपणे राबविल्या जाणाऱ्या उपक्रमास वाटेगाव नगरीचे मा.शि.वि.अ.श्री जाधव साहेब तसेच शाळेचे मा.मु.अ.साहेब श्री चव्हाण सर व सर्व गावकरी मंडळी यांनी केलेल्या कौतुकाने व अभिनंदनीय💐💐 शुभेच्छारुपी आशीर्वादाने शाळेतील सर्व बाल चिमुकले विद्यार्थी व आमच्या सर्व गुरूजणांची मने आनंदाने 😃भारावून गेली. 👭👬👭👬👭👬 *लेझीम पथक प्रमुख व मार्गदर्शकः* 👉 श्रीमती सेनकुडे मँडम 👉 श्रीमती झाडे मँडम 🌿☘🌿 *सहकार्यः* 👉 श्री चव्हाण सर ,राठोड सर,श्रीमती लोने मँडम,श्री रामटेके सर, काकडे मँडम. 👭👭👭👭👭👭 👍Dare to Dream..👍Dare to challenge..👍Dare to win...👍👍👍👍 *🙏धन्यवाद 🙏* *==================* *टीपः सदरील पारितोषिकाचा बक्षिस वितरण सोहळा पुढील सप्ताहात आयोजित केला आहे.* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *✍वृत्तलेखन* *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे* *(स.शिक्षिका)* *(लेझीम पथक प्रमुख व मार्गदर्शक)* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव जि.नांदेड* 〰〰〰〰〰〰〰

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 10/01/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १६६६: सुरत लुटून शिवाजी महाराज राजगडाकडे निघाले. १७३०: पुण्यातील शनिवारवाड्याच्या बांधकामास सुरुवात झाली. 💥 जन्म :- १९०१: इतिहास संशोधक डॉ. गणेश हरी खरे १९१९: संस्कुत अभ्यासक आणि रामायणातील शाप आणि वर, महाभारतातील कुमारसंभव या ग्रंथांचे लेखक श्री. र. भिडे १९२७: तमिळ अभिनेते शिवाजी गणेशन १९४०: पार्श्वगायक व संगीतकार के. जे. येसूदास 💥 मृत्यू :-  १९९९: स्वातंत्र्य सैनिक व समाजवादी विचारवंत आचार्य श्रीपाद कृष्ण केळकर  *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *चित्रपटगृहात राष्ट्रगीताची सक्ती नाही, सुप्रीम कोर्टाचा सुधारित आदेश, मात्र राष्ट्रगीत लावल्यास प्रेक्षकांना उभे राहावेच लागेल* ----------------------------------------------------- 2⃣ *नगराध्यक्षाच्या खुर्चीला अभय, अडीच वर्षे अविश्वास ठराव घेता येणार नाही* ----------------------------------------------------- 3⃣ *अहमदनगर : महिला बचतगटांच्या उत्पादनांचे सरकार करणार ब्रॅंडिंग- पंकजा मुंडे* ----------------------------------------------------- 4⃣ *पाकिस्तान : क्वेटामध्ये बलुचिस्तान विधानसभा परिसरात बॉम्बस्फोट, सहा जणांचा मृत्यू.* ----------------------------------------------------- 5⃣ *नांदेड : किनवट नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी भाजपाचे श्रीनिवास नेम्मानीवार यांची बिनविरोध निवड* ----------------------------------------------------- 6⃣ *उत्तर भारतात थंडीमुळे रेल्वे सेवा विस्कळीत, वाहतूक सेवा 17 ते 20 तास उशिरानं.* ----------------------------------------------------- 7⃣ *क्रिकेटपटू युसुफ पठाण उत्तेजक चाचणीत दोषी. पाच महिन्यांसाठी निलंबन. उत्तेजक चाचणीत प्रतिबंधीत घटक आढळल्याने दोषी.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *राष्ट्रगीत आणि राष्ट्रभक्ती* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *गणेश हरी खरे* गणेश हरी खरे ‍‌‍‍‍‍‍‍‍‍(जन्म १० जानेवारी १९०१ - मृत्यू०५ जून १९८५)  हे महाराष्ट्रातील इतिहाससंशोधक होते. दक्षिणेचा मध्ययुगीन इतिहास, शिवकालीन महाराष्ट्र, महाराष्ट्रातील दैवते, मूर्तिविज्ञान इ. विषयांवर त्यांनी संशोधनपर स्वरूपाचे विपुल लेखन केले आहे. तसेच मराठी, फार्सी इत्यादी भाषांतील ऐतिहासिक काळातील कागदपत्रांची संपादनेही केली आहेत. संशोधकाचा मित्र, मूर्तिविज्ञान, महाराष्ट्राची चार दैवते इ. त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) नुकतेच निधन झालेले नीरज व्होरा कोणत्या क्षेत्राशी निगडित होते?* 👉 चित्रपट *२) दादाभाई नौरोजीनी कोणता सिध्दांत मांडला?* 👉 संपत्तीचे अपहरण *३) नुकताच कोणत्या देशाने चित्रपटगृहावरून बंदी उठवली आहे?* 👉 सौदी अरेबिया *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 श्रीनिवास रेड्डी, धर्माबाद 👤 साईनाथ सोनटक्के 👤 राजेश कुंटोलू 👤 गणेश वाघमारे 👤 शत्रूघन झुरे 👤 स्वरूप खांडरे 👤 आकाश क्षीरसागर, सालेगाव *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *विचार* वेळ प्रसंगी माणसं अश्रू ढाळतं असतात दिला शब्द कोणाचा कधी पाळत नसतात वेळ प्रसंगी डोळ्यात अश्रू आला पाहिजे पण अश्रू का आला हा विचार झाला पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *गीतेच्या दुस-या आध्ययात दुस-याच श्लोकात भगवंताने असे सांगितले आहे की, " मनुष्य जसा जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्र धारण करतो, त्याप्रमाणे आत्म्याचेही असते." याच विधानात आपल्याला नकारात्मकतेचे वस्त्र फेकून देत सकारात्मकतेचे वस्त्र परिधान करणा-यांना शोधावे, पाहावे लागेल.* *गीतेतला हा विचार सर्वोच्चतेची भाषा बोलणारा आहे; पण जीवन बदलाच्या विचारात तो ताडून बघायला हवा. सामान्यपणे जीवनात दोन मनं कार्यरत असतात. एक चांगले आणि दुसरे वाईट. जर वाईट बाजू प्रबळ झाली, तर षङरिपु घेरू लागतात आणि माणूस इंद्रियसुखाच्या आहारी जातो. उलट चांगली बाजू बलवान झाली, तर व्यक्ती संतोषी, संयमी, निर्व्यसनी, स्थिरचित्त होऊन जीवनाच्या वळणवाटा सहज पार करू शकतो. अशा वळणवाटा सहजसाध्य होणे म्हणजे सुखी होणे. यालाच सुखाची व्यापक व्याख्या म्हणता येईल.* •••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••• 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्याप्रमाणे प्रत्येक फुलाचा आकार, रंग आणि सुगंध वेगवेगळा असतो त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तींची शारिरीक रचना,आचार आणि विचार हे वेगवेगळे असतात.याचे कारण जरी वेगळे असले तरी आपण एकमेकांना आपल्या जीवनात स्वभावानुसार समजाऊन घेऊन आपले जीवन व्यवहार अगदी व्यवस्थितपणे हाताळण्याचा प्रयत्न करायला हवा.काही अंशी कमी-जास्त असलेतरी ते आपण आपल्या स्वभावानुसार आणि विचारानुसार ओळखून जीवनात एकोप्याने राहण्यातच आपले खरे कौशल्य आहे.म्हणून कुणालाही आपल्यापेक्षा कमी लेखून आपले वर्चस्व इतरांवर लादू नये.त्यातील एखादा आपल्याला हवा असलेला गुण शोधून आपल्या जीवनात आचरणात आणून एकमेकांना समजावून घेऊन आपल्या जीवनाबरोबर घेऊन आनंदी जीवन जगण्यात धन्यता मानावी. हाच आपला व आपल्या माणुसकीचा खरा धर्म आहे. ज्या विविधतेत एकता असते त्या एकमेकांच्या भावना दुखावण्यात नसते.तेव्हा आपण वेगवेगळे जरी असलो तरी अनेक विचारांना एकत्रीत बांधून एकतेचे दर्शन घडवू शकतो.हा विचार नित्यासाठी आचरणात आणायला हवा.त्यात आपल्यातही दडलेल्या चांगल्या विचारालासुध्दा इतरांमध्ये सामावून घेण्याची संधी मिळेल.एकमेकांना हीन समजून 'मी 'चे अस्तित्व वृध्दिंगत करणे अयोग्य आहे. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌻🌺🌸🌼🌹🌷🌻🌺🌸🌼🌹 =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *कर नाही :त्याला डर कशाला ?* - ज्यांच्याकडून गुन्हा घडलेला नाही :त्याला कशाचीही भीती बाळगण्याचे कारण नाही. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= (तीन शब्दांवरुन)कथा *गुरू ,परीक्षा ,शिष्य* गुरुकुलातून तीन शिष्य उत्तीर्ण होणार होते. त्यांच्या अंतिम परीक्षा सुरू होत्या. गुरू म्हणाले, “एक परीक्षा तुम्हाला न सांगता होईल. तीच तुमची खरी अंतिम परीक्षा असेल.. आणि या परीक्षेत तुम्ही पास झाला तर तुमचे जीवन यशस्वी व सत्कारणी लागेल. आता आपल्या गुरुकुलातल्या सगळ्या परीक्षा झाल्या. ती विशेष परीक्षा काही झाली नाही. गुरुकुलात सत्कार सोहळाही झाला. प्रथेप्रमाणे तिन्ही विद्यार्थी पुढील जीवनातील आयुष्य यशस्वी करण्यासाठी बाहेर पडले. एके दिवशी ते संध्यासमयी जंगलातुन जात होती.आणखी काही क्षणांमध्ये काळोख पसरणार होता .राञ होणार अंधार पडणार आणि त्या काळोखातुन त्यांना जंगल पार करून गावी परतायचे होते . झपझप चालून पुढचं जंगल पार करायचं होतं, मुक्कामाचं गाव गाठायचं होतं. अचानक पुढे चालणारा विद्यार्थी थबकला. वाटेत एक काटेरी झुडूप आडवं पडलं होतं. तो दोन पावलं मागे आला आणि धावत पुढे जाऊन त्याने एका झेपेत ते झुडुप पार केलं. दुसऱ्याने अंदाज घेतला आणि रस्ता सोडून खाली उतरून त्याने काटे पार केले आणि तो पलीकडच्या बाजूला पुन्हा वाटेवर आला.. तिसरा मात्र थांबून काटे वेचू लागला. बाजूला एका छोट्या खड्ड्यात ते लोटू लागला. दोघे मित्र म्हणाले, “अरे, ही काटे वेचायची वेळ आहे का? कोणत्याही क्षणी अंधार पडेल.आता सांज होत आहे.अशा या संध्यासमयी आपल्याला लवकरात लवकर मुक्कामाचं गाव गाठायचं आहे. रस्त्यात कुठे वाट चुकलो, तर जंगलात भटकत राहू. चल लवकर.. तिसरा युवक म्हणाला, अंधार पडणार आहे, म्हणूनच हे काटे वेचले पाहिजेत. आपल्याला ते दिसले तरी. आपल्यामागून जो वाटसरू येईल, त्याला काटे दिसणारच नाहीत. त्याच्या पायात काटा घुसला तर त्याची इथे या भयाण जंगलात काय अवस्था होईल, विचार करा. तुम्ही पुढे निघा. मी हे काटे बाजूला करून गाठतोच तुम्हाला धावत.. ते दोघे पुढे निघतात, तोच शेजारच्या झाडामागून गुरू बाहेर आले आणि म्हणाले, तुम्हा दोघांना पुन्हा गुरुकुलात यावं लागेल तुमचं शिक्षण अजून अपूर्ण आहे. *तात्पर्यः* अंतिम परीक्षा ज्ञानाची नव्हती, प्रेमाची होती,भावनिकतेची होती , अनुकंपेची होती, सहवेदनेची होती,दुःख वाटून घेण्याची होती.तुम्ही दोघेजण ज्ञान खूप शिकलात, प्रेम अजून शिकणं बाकी आहे.भावनिकतेची जोपासना होणे बाकी आहे.बस तेवढी जोपासयला शिका.मगच जीवनात सर्वोतोपरी यशस्वी व्हाल 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*तयास मानव का म्हणावे ?* ज्ञान नाही विद्या नाही ते घेणेची गोडी नाही बुध्दी असुनि चालत नाही तयास मानव का म्हणावे ?||१|| दे हरी पलंगी काही पशुही ऐसे बोलत नाही विचार ना आचार नाही तयास मानव का म्हणावे ? ||२|| बाईल काम करीत राही ऐतोबा हा खात राही पशू पक्षात ऐसे नाही तयास मानव का म्हणावे ? ||३|| दुसर्‍यास मदत नाही सेवा त्याग दया माया ही जयापाशी सदगुण नाही तयास मानव का म्हणावे ? ||४||  पशुपक्षी माकड माणुसही जन्ममृत्यु सर्वानाही याचे ज्ञान जराही नाही तयास मानव का म्हणावे ?||५ || *कवयित्री- सवित्रीबाई फुले*

संकलित

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 09/01/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  २००१: नव्या सहस्त्रकातील पहिल्या महाकुंभमेळ्याला अलाहाबाद येथे प्रारंभ झाला. २००१: नव्या सहस्रकातील पहिले खग्रास चंद्रग्रहण दिसले. २००२: महात्मा गांधी भारतात परतल्या बद्दल ९ जानेवारी हा भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा करण्याचे योजण्यात आले. २००७: स्टीव जॉब्स यांनी पहिला आयफोन प्रकाशित केला. 💥 जन्म :- १९२२: जन्माने भारतीय असलेले अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते हरगोबिंद खुराना  १९३४: पार्श्वगायक महेंद्र कपूर  💥 मृत्यू :-  १९२३: पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS) सत्येंद्रनाथ टागोर  २००३: गीतकार व कवी कमर जलालाबादी  *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ न्यू यॉर्क- अमेरिकेतल्या ट्रम्प टॉवरला लागली आग, कोणतीही जीवितहानी नाही, ट्रम्प टॉवरमध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचंही निवासस्थान आहे. ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली - उत्तर प्रदेशात प्रशासनाची परवानगी न घेतलेल्या धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवण्यात येणार* ----------------------------------------------------- 3⃣ *शेअर बाजाराची उसळी, सेन्सेक्स 178 अंकांनी वर, निफ्टीनेही साडेदहा हजारांचा टप्पा ओलांडला.* ----------------------------------------------------- 4⃣ *नवी दिल्ली- सर्वोच न्यायालयानं राजकीय पक्ष बनवणं आणि पक्षाचं कोणतंही पद घेण्यास बंदी घालण्यात आलेल्या प्रकरणातील सुनावणी 12 फेब्रुवारीपर्यंत केली स्थगित* ----------------------------------------------------- 5⃣ *चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष हू जिंताओ यांचं निधन* ----------------------------------------------------- 6⃣ *काश्मीर- पाकिस्तानानं भारताच्या 147 मच्छीमारांची केली सुटका, वाघा बॉर्डरमार्गे मच्छीमारांनी केला भारतात प्रवेश* ----------------------------------------------------- 7⃣ *केपटाऊन कसोटीत भारताचा 72 धावांनी पराभव, फिलँडरचे सहा बळी* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *जनसेवेतच ईश्वराचीही सेवा* माणसाच्या आयुष्यात संकटे आली की, त्याला कुणाचा तरी आधार हवा असतो. हा आधार शारीरिक जरी नसला मानसिक असला तरी त्यांना ते पुरेसे असते. त्यामुळे दुःखी, कष्टी माणसे देवाचा धावा करता......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_8.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *महेन्द्र कपूर* (९ जनवरी १९३४-२७ सितंबर २००८) हिन्दी फ़िल्मों के एक प्रसिद्ध पार्श्वगायक थे। उन्होंने बी आर चोपड़ा की फिल्मों हमराज़, ग़ुमराह, धूल का फूल, वक़्त, धुंध में विशेष रूप से यादगार गाने गाए। संगीतकार रवि ने इनमें से अधिकाश फ़िल्मों में संगीत दिया। महेंद्र कपूर का जन्म अमृतसर में हुआ था। पार्श्वगायन में कैरियर बनाने के लिए वे कम उम्र में ही मुंबई आ गए थे। 1953 की फिल्म ‘मदमस्त’ के साहिर लुधियानवी के गीत आप आए तो खयाल-ए-दिल-ए नाशाद आया से उन्होंने फिल्मी करियर की शुरुआत की थी। २७ सितंबर २००८ को बीमारी से लड़ने के पश्चात उनका देहावसान हो गया। *पुरस्कार और सम्मान* 1963 - फिल्मफेयर पुरस्कार (पुरुष पार्श्वगायन) - चलो इक बार फ़िर से (ग़ुमराह) 1967 - फिल्मफेयर पुरस्कार (पुरुष पार्श्वगायन) - नीले गगन के तले (हमराज़) 1974 - फिल्मफेयर पुरस्कार (पुरुष पार्श्वगायन) - नहीं नहीं (रोटी कपड़ा और मकान) *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) महाराष्ट्रात ऊस संशोधन केंद्र कोठे स्थापन झालेले आहे?* 👉 पाडेगाव *२) कोणत्या क्रिकेटपटूने तीनवेळा द्विशतक झळकाविण्याचा पराक्रम केला?* 👉 रोहित शर्मा *३) जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक कोण करतो?* 👉 राज्यपाल *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 सुहास अनिल देशमुख 👤 अजित राठोड 👤 भीमाशंकर भालेकर 👤 माधव नरवाडे 👤 राजेश रामगिरवार 👤 गजानन सोनटक्के 👤 माधव नरवाडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *खोटं* लोक खोटं पण रेटून बोलतात मनात अढी ठेवून भेटून डोलतात केळ सोलल्यावर जसं बाहेर पडतं नकळतपणे त्या माणसाचं तसंच घडतं शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *एका शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कुत्रा या विषयावर निबंध लिहायला सांगितला. अनेक विद्यार्थ्यांनी छान ओळी लिहिल्या होत्या. एका विद्यार्थ्याने कुत्र्याचं अवघं जीवन सुंदर शब्दात रंगवलं होतं. या इमानदार प्राण्याला अनेक ठिकाणी कसं हलाखीचं जीवन जगावं लागतं..? 'कुत्र्याच्या मौतीनं मेला' हा वाक्प्रचार कसा तयार झाला हेही त्यानं लिहिलं. कुणीही निबंध वाचला असता, तर डोळ्यांत पाणी आलं असतं. शिक्षक त्याच्यावर फार खुश झाले.* *शाळेतून सुटल्यावर तो मुलगा आपल्या मित्रांसोबत घरी चालला होता. काही अंतरावर ते शिक्षकही चालले होते. बाजूने एक कुत्री आपल्या दोन-तीन पिल्लांसह चालली होती. मुलं त्या पिल्लांना दगड मारत होती. पिल्ल केकाटत होती. त्यांच्या केकाटण्याचा सूर ऐकुण मुलं चेकाळून आणखी दगड मारत होती व हसत होती. हे सर्व करण्यामध्ये तो उत्तम निबंध लिहिणारा मुलगा आघाडीवर होता. हे सारं शिक्षकांनी पाहिलं. त्यांना विषाद वाटला. दुस-या दिवशी त्या मुलाला बोलावून घेतले. "तुला कुत्र्या विषयीचं ज्ञान चांगलं आहे, ते तुझ्या निबंधात दिसलं; पण तुझी कृती त्या ज्ञानाप्रमाणे नाही हे मी काल स्वत:च पाहिलं. निष्पाप कुत्र्याच्या पिल्लांना दगड मारून तू हसत होतास." त्यानं आपली चूक कबूल केली.* *"मुलाला ज्ञान होतं, पण त्याचं ज्ञान कर्मशील झालं नाही. त्याचं कर्म ज्ञानवान नव्हतं, हे शिक्षकांनी दाखवून दिलं."* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जीवनात जशी चांगल्या विचारांची गरज आहे तशीच चांगल्या माणसांच्या सहवासाची गरज आहे.हे दोघेही आपल्या जीवनाचे खरे मार्गदर्शक असून ते आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत.यांना कधीही अंतर देऊ नका. त्यांची आपल्याला कोणत्याही कठीण प्रसंगी सामोरे जाण्यासाठी गरज लागते.परंतु गरजेपुरता वापर करत असताल तर ते तुमच्यासाठी आणि तुमच्या भविष्यासाठी कठीण होऊन बसेल.त्यांना आपल्या नात्यांप्रमाणे जपायला हवे. तरच तुमचे जीवन कृतार्थ बनेल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= * इकडे आड, तिकडे विहीर - दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *छोटी-छोटी बातें* पूर्व काल में घोडे का बहुत महत्व था। घोड़ों के पैरों मे नाल ठोंका करते थे। एक बार एक सवार ने कुछ दुर्लक्ष किया। उसके घोड़े की एक नाल का एक कीला निकल गया था। वह कुछ ही क्षणों का छोटा सा काम था; परन्तु उसने वह नहीं किया। संयोगवश उस दिन उसे एक महत्वपूर्ण संदेशा पहुंचाने का कार्य दिया गया। शत्रु सेना पर एक ही समय दोनों तरफ से आक्रमण करना निश्चिनत हुआ। किस समय किस ढंग से सेना का दूसरा भाग आक्रमण करेगा, इसकी विस्तृत सूचना लिखकर वह लिफाफा इस सवार को दिया गया। उसे वह दूसरे सेनापति को पहुंचाना था। वह लिफाफा लेकर घोड़े पर सवार हुआ। उसने अपने घोडे को बहुत तेजी से दौड़ाया। आधा अंतर उसने पार कर लिया होगा, तभी एकाएक नाल की और दो कीलें ढीली हो गयीं और नाल सर्र से बाहर निकल आयी। घोड़ा पूर्ण वेग से दौड रहा था। बाहर निकली हुई नाल किसी वृक्ष मूल में अटकी और घोडा अपने सवारी सहित धड़ाम् से गिर पडा। घोड़े के मर्मस्थल पर चोट लगने से वह वहीं मर गया। सवार घायल हुआ। बेहोश भी हुआ। थोडी देर के बाद उसे होश आया। घोडे को मरा पा कर उसे बहुत दुख हुआ। वह उठा और लंगडाते-कराहते भागने लगा। उसे महत्वपूर्ण संदेशा जो पहुंचाना था, उसने बहुत प्र यास किया परन्तु वह निर्धारित स्थान पर ठीक समय पर नहीं पहुंच सका। अतः व्यूह रचना असफल हुई। उसका देश युद्ध में हार गया, एक छोटी सी कील के कारण। कील न ठुकाई, घोडा मरा। स्वार न पहुंचा देश हारा॥ अतः हमें छोटे-छोटे कामों में भी सुव्यवस्था और तत्परता रखनी चाहिये। 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

​​मैत्रिणी.....​​ दुःख वाटून घेणाऱ्या सुख वाटत जाणाऱ्या सल्ला देणाऱ्या सल्ला घेणाऱ्या खूप दूर असल्या तरी खूप जवळ असणाऱ्या आपआपल्या संसारात मग्न असल्या तरी मनाने आपल्याशी सतत संलग्न असणाऱ्या स्वतःचे भरले डोळे लपवून आपले अश्रु पुसणार्या. शाबासकीची पहीली थाप पाठीवर देणाऱ्या . खूप सुखात आहे ग मी म्हणून हळूच डोळे पुसणार्या. मैत्रिणी आयुष्याला मिळालेलं एक वरदान. जागेपणीचं स्वप्न छान पुस्तकातलं मोरपीस जपणारं पान. सप्तरंग उधळणारी इंद्रधनूची कमान मनातल्या फुलपाखराची इवली भिरभिर हळूवार हात पुसतात डोळ्यातले नीर उपसून काढतात हृदयात घुसलेला तीर मैत्रिणी गातात नाचतात खाऊ घालतात प्रेमाने चटणी भाकरी ते गुलाबजाम. त्या सुगरण असोत नसोत. प्रत्येक घास वाटतो अमृताहून गोड. मैत्रित नसतो भेदभाव गरीबी श्रीमंती लहान थोर शहर गाव. मैत्री असते एक सरीता या हृदयापासून त्या हृदयापर्यंत वहाणारी. ,, मैत्री.... ​​माझ्या सगळ्या मैत्रिणीसाठी समर्पित...​​

*माकडा , कोल्हा व जंगल* (प्राणी) एकदा एक 🐒वानर व कोल्हा 🐕यांची जंगलात 🌳☘🌿🌱🍃🍀🌳🌴🍂🍁☘🌿🌱🌴🌳🌳 भेट झाली तेव्हा माकड🐒 कोल्ह्याला म्हणाला, 'अरे, तुझ्या झुपकेदार शेपटाचा काही भाग तू मला देतोसका तर तो मी लावून वार्‍यापासून माझं रक्षण करीन. मला त्याचा उपयोग होईल.तुझे शेपूट खूप झुबकेदार आहे.तुला पुरून उरण्यासारख आहे. नाही तरी तू ते धुळीत मळवतोस. तर त्यातलं थोडं मला दिलस तर तुझी फारशी अडचण होणार नाही अन् माझंही काम होईल. हे ऐकून कोल्हा म्हणाला, 'अरे माकडा तू म्हणतोस त्याप्रमाणे माझं शेपूट कदाचित मोठं असलं, तरी ते मी जन्मभर असंच धुळीत मळवीन पण त्यातला एक केसही तुला देणार नाही.' तात्पर्यः काही स्वार्थी प्रवृत्तीचा माणसांजवळ सर्व असून पण ते दुसऱ्याचा उपयोगी येत नाही.खर तर माणसाने इतरांच्या मदतीला कसे जाता येईल हा विचार नेहमी ध्यानीमनी ठेवून जगावे. 〰〰〰〰〰〰〰 श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे जि.प.प्रा.शाळा वाटेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰〰

प्रेम आणि द्वेष...! प्रेम आणि द्वेष... यात काय फरक असतो...! फरकापेक्षा त्यात... साम्यचं अधिक असतं...! दोघांचीही अक्षरे अडीच... दोघांचाही उगम एकच.. दोघेही मनातच वसतात..! मनांतन भावना बनतात..! दोघांची कक्षा अनंत...! दोघांनाही नसे अंत...! दोघेही नजरेत येतात..! दोघेही आसवांत भिजतात...! प्रेम आणि द्वेष... यात फरक इतकाच असतो...! एकात माणुस मनात बसतो... दुसऱ्यात मात्र नजरेतुन उतरतो..!

यमु आजीचं वयाच्या १६व्या वर्षी लग्न झालं. घर मध्यमवर्गी पांढरपेशी. घरात छोटी छोटे दीर नणंदा. वहिनी वहिनी करून भोवती रुंजी घालणा-या. पण घरात सास-यांची कडक शिस्त. आणि त्या काळाचे आता विचित्र वाटणारे दंडक. त्या काळी बाई माणसाने दुकानात जाऊन " shopping करायची पध्दत नव्हती. वर्षाकाठी दोन लुगडी . एक दांडीवर आणि दुसरं .........वर. तीही दुकानदार चार पाच लुगडी घरी पाठवायचा आणि त्यातलं निवडावं लागायचं. त्याप्रमाणे लुगडी घरी आली. षोडश वर्षीय यमुनानं आपल्या भावभावनांना अनुसरून गुलाबी आणि अबोली रंग निवडले. संध्याकाळी सास-यांनी घरी आल्यावर लुगडी पाहिली आणि त्यांनी गर्जना केली, " हे कसले रंग निवडलेत? धुवायला साबण किती लागेल कल्पना आहे का ? उद्या ही लुगडी दुकानी पाठवून द्या आणि मळखाऊ रंगाची लुगडी मागवा. " अल्लड सुनेचा उतरलेला चेहरा सासुबाईच्या नजरेतून सुटला नाही. माजघरातून त्यांनी सगळ ऐकलेलेच होतं . रात्री त्यांनी दोनही लुगडी पाण्यात भिजवली. कारण पूर्वी नवकोर वस्त्र भिजवल्याखेरीज नेसण्याची पध्दत नव्हती. दुस-या दिवशी सास-यांनी बाहेर पडताना सासुबाईंना लुगडी द्यायला सांगितल्यावर चेहरा शक्य तेवढा कावराबावरा करून खाल मानेनं त्या पुटपुटल्या ," अग बाई, परत का करायची होती लुगडी ? मी ती रात्रीच भिजवली. मला बापडीला काय कल्पना. चुकलंच बरीक माझं. '' आपल्या सासूचा हा समंजसपणा सांगताना आज ८९व्या वर्षीही यमु आजींचा चेहरा तरुण यमुसारखाच कृतज्ञ होतो. हे जे शहाणपण आहे ते महत्त्वाचं नाही का? म्हणजे आजींच्या शब्दात सांगायचं झालं तर " सासुबाईनी माझंही मन जाणलं पण त्याचवेळी मामंजींनाही दुखवलं नाही. आणखीही एक प्रसंग सांगताना यमु आजी खुसूखुसू हसतात. त्यांच दंतविहीन बोळकं लहान मुलासारखच निरागस वाटतं. यमु कुठेशी बाहेर गेली होती. परतायला थोडासा वेळ झाला. उंबरठ्याशी येताच मामंजींनी फर्मान सोडलं, " आत पाऊल टाकायचं नाही. बाहेरच रहा. " पुढे बोलायची कोणाचीही प्राज्ञा नव्हती. त्यामुळे यमु वाड्याच्या अंगणात मुकाट्याने उभी राहिली. नेहमी कामात असलेली वहिनी बाहेर कशी म्हणून मुलं विचारायला लागली, " वहिनी तुम्ही बाहेर का उभ्या ? घशाशी येणारा आवंढा गिळत यमु म्हणाली, " अरे, तुमचा खेळ बघतेय. " बराच वेळ गेला तसा सास-यांचा राग शांत झाला. तशा सासूबाई तडक यमुकडे येऊन मोठ्याने म्हणाल्या, " काय ग करतेस अंगणात इतक्या वेळ ? पानं नाही का घ्यायची ? " तोवर सास-यांचाही राग शांत झाला होता आणि कोणाला काहीही पत्ता न लागता यमु परत घरात नेहमीसारखी वावरायला लागली. हे जे कोणालाही न दुखावता योग्य मार्ग काढायचं शहाणपण आज आपल्यापैकी किती जणात आहे? आम्ही आपल्या हक्कांबद्दल जागरूक असतो., पण त्याचवेळी दुस-याच्या मनाचा कितीसा विचार करतो? आपण आपला मुद्दा पटवण्यासाठी जीवाचा आटापिटा करतो. आपले आवाजही कधी कधी गगनाला भिडतात. पण ही नि:शब्द जपवणूक खूप काही शिकवून जाते.

*नक्की वाचा खुप सुंदर आहे* एकदा एका कुटुंबाच्या समोरच्या घरात नविन भाडेकरु राहायला येतात. खिड़कीतून त्यांचे दोरीवर वाळत घातलेले कपडे पाहुन बायको नवर्याकडे तक्रार करते की, "लोक खुप चांगले आहेत पण ते कपडे स्वच्छ धुवत नाहीत". नवरा म्हणतो साबण संपला असेल. दुसर्‍या दिवशी वाळत घातलेले कपडे पाहुन बायको परत तेच वाक्य म्हणते की, "लोक खुप चांगले आहेत पण ते कपडे स्वच्छ धुवत नाहीत" कदाचित तिला कपडे चांगले धुता येत नसतील. नवरा फक्त ऐकून घेतो. असे रोजच चालते. एक दिवस पहाते तर काय चमत्कार एकदम स्वच्छ धुतलेले कपडे पाहुन बायको नवर्‍याला म्हणते "अहो ऐकलंत का? समोरच्या वहिनी सुधारल्या. त्यांना कुणीतरी कपडे धुवायला शिकवलेले दिसते. आज कपडे अगदी चकाचक धुवून वाळत घातलेत" तेवढयात नवरा बोलतो "राणी, मी आज सकाळी लवकर उठलो आणि आपल्या खिडक्या साफ केल्या. काचा आतून आणि बाहेरून ओल्या फडक्याने पुसून घेतल्या त्यामुळे तुला ते कपडे स्वच्छ दिसतात. समोरचे रोजच कपडे स्वच्छ धुवत होते. परंतु आपल्या खिडकीच्या काचा खराब असल्यामुळे त्यांची कपडे तुला खराब दिसत होती. समोरचे नाही आपणच सुधारलोय. आपला दृष्टीकोन स्वच्छ ठेवून आपण दुसर्‍या कडे पाहिले पाहिजे. नेहमी नजर चांगली ठेवा, जग खुप सुंदर आहे. "मातीने" एकी केली तर विट बनते.., "विटेनी" एकी केली तर भिंत बनते.., आणि जर एकी "भिंतीनी" केली तर "घर" बनते. या निर्जीव वस्तु जर एक होऊ शकतात, आपण तर माणसं आहोत...नाही का...❔🍂 . . "विचार" असे मांडा की , तुमच्या विचारांवर कुणीतरी . "विचार" *केलाच पाहिजे*

आई वडील आम्ही काय तुम्हांला जन्मभर पुरणार आहोत का? अस आई सहज म्हणून गेली ऐकून हे माझ्या काळजात आरपार एक कळ निघून गेली... त्रिवार सत्य होत पण पटतच नव्हते मनाला कधीच विसरणार नाहीत आपण त्यांच्या सोबतच्या क्षणांला आई बोलुन गेली पण वडील पाहून हसत होते खर सांगु का तेव्हा ते दोघेही मला विठ्ठल रुक्मिणीच वाटत होते... लेकरांच्या सुखातच त्यांच सुख असत दडलेल..... आपण सुंदर शिल्प असतोत त्यांच्याच हातुन घडलेल... मी म्हणाले आईला तु कीती सहज बोलून गेलीस तुमच्या शिवाय जगण्याची तु कल्पनाच कशी केलीस जग दाखवले तुम्ही आम्हांला कीती छान बनवलंत अनेकदा ठेच लागण्यापासुन तुम्हीच तर सावरलत... तुमच्या चेहर्यावर हसु पाहण्या साठी आम्ही काहीही करू तुमच्या स्वप्नातील चित्रात आम्ही यशाचेच रंग भरु.... आई वडील म्हणजेच घरातील चालता बोलते देव आहेत हे देव नैवेद्या पेक्षा फक्त प्रेम व आधाराचेच भुकेले आहेत... कल्पवृक्षाखाली बसले होते फळेफुले माझ्यावरच पडत होती आई वडिल अनमोल आहेत असे प्रत्येक पाकळी सांगत होती थकलीय आज आई प्रत्येकाची वडीलही थकले आहेत.... घरट्यातल्या पिल्लाने उडु नयेत फक्त एवढ्याच त्यांच्या अपेक्षा आहेत. .... माझ्या या विचाराने आई खुप खुप सुखावली होती वडिलांची नजर न बोलताही सारे काही सांगुन जात होती.......

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 07/01/2018 वार - रविवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १७८९: अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन निवडून आले. १९७२: कन्याकुमारी येथील विवेकानंद केन्द्राचे काम पूर्ण झाले. 💥 जन्म :- १८९३: स्वातंत्र्य वीरांगना जानकीदेवी बजाज १९२०: लोकसाहित्याच्या अभ्यासक सरोजिनी बाबर १९२१: अभिनेते चंद्रकांत गोखले १९२५: स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कन्या प्रभात १९४८: विदुषी व लेखिका शोभा डे 💥 मृत्यू :-  २०००: विद्यार्थी सहायक समितीचे संस्थापक व स्वातंत्र्यसैनिक डॉ. अच्युतराव आपटे  *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मॅग्नेटिक महाराष्ट्र जागतिक गुंतवणूक परिषदेच्या लोगोचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले उद्घाटन. 18 व 19 फेब्रुवारीला बीकेसीमध्ये होणा-या परिषदेचं पंतप्रधान करणार उद्घाटन.* ----------------------------------------------------- 2⃣ *कांजूरमार्ग सिने विस्टा स्टुडिओला भीषण आग. अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल.* ----------------------------------------------------- 3⃣ *चारा घोटाळाप्रकरणी लालूप्रसाद यादव यांना साडेतीन वर्षांची शिक्षा, रांची कोर्टाचा निकाल.* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबईतील नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी अभिनेता अक्षय कुमारचा पुढाकार. पालिका आयुक्त अजोय मेहता यांची विनंती मान्य करीत स्वच्छतेसाठी काम करण्याची दर्शवली तयारी.* ----------------------------------------------------- 5⃣ *महाराष्ट्रातील एसटीच्या ३१ विभागीय कार्यालयात कर्मचाऱ्यांना नवीन तयार गणवेश वितरण सोहळा कार्यक्रमाला सुरुवात झाली.* ----------------------------------------------------- 6⃣ *मुख्यमंत्र्यांकडून सुभाष देसाईंना प्रशस्तीपत्र, उद्योग विभागाचा यशाचा दर अन्य विभागांपेक्षा 20 टक्के अधिक.* ----------------------------------------------------- 7⃣ *भारत वि द आफ्रिका पहिली कसोटी- दुसऱ्या दिवस अखेर दक्षिण आफ्रिका 2 बाद 65 धावा. दक्षिण आफ्रिकेकडे 142 धावांची आघाडी.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ=========         *एकच ध्यास ; वाचन विकास* शिक्षण प्रक्रियेतील वाचन हे एक प्रमुख कौशल्य आहे. ज्यावर विद्यार्थ्यांची भविष्यातील प्रगती अवलंबून असते. भाषा विकासातील श्रवण व भाषण यानंतरचा टप्पा म्हणजे वाचनकौशल्याचा. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ स्टुअर्ट रिची यांनी आपल्या संशोधनात असे म्हटले आहे की, मुलांची वाचन क्षमता आणि त्याला किती लहान वयात वाचन करता येते त्यावर त्याची पुढील प्रगती अवलंबून ........... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_6.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *चंद्रकांत रघुनाथ गोखले* चंद्रकांत रघुनाथ गोखले (जानेवारी ७, इ.स. १९२१, मिरज, सांगली संस्थान - जून २०, इ.स. २००८, पुणे, महाराष्ट्र) हे मराठी नाट्यअभिनेते, चित्रपट अभिनेते आणि गायक होते. मराठी अभिनेत्री कमलाबाई गोखले या यांच्या आई होत्या. यांचे पुत्र विक्रम गोखले हे देखील अभिनेते आहेत. यांनी वयाच्या नवव्या वर्षी ’पुन्हा हिंदू’ या नावाच्या मराठी नाटकाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. ७ दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत यांनी साठाहून अधिक मराठी नाटकांतून व साठाहून अधिक मराठी चित्रपटांतून अभिनय केला आहे. त्यांनी भूमिका केलेल्या नाटकांपैकी  भावबंधन,  राजसंन्यास,  पुण्यप्रभाव, बेबंदशाही, राजे मास्तर, बॅरिस्टर, पुरुष  ही प्रमुख नाटके होत. मराठीशिवाय त्यांनी काही हिंदी चित्रपटांमधूनदेखील भूमिका रंगवल्या. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे?* 👉 शेकरू *२) औरंगाबादला किती दरवाज्याचे शहर म्हणून ओळखल्या जाते?* 👉 ५२ *३) जागतिक जलदिन म्हणून कधी साजरा केल्या जातो?* 👉 २२मार्च *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 कुणाल पवारे, शिक्षक तथा पत्रकार       सामना, कुंडलवाडी शहर प्रतिनिधी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ=========    *लेखणी* सामान्याचे दुःख मांडते तुमच्या हातची लेखणी शब्दांना त्या धार येऊन ती अधिकच होते देखणी शब्दांना धार आणायचे सामर्थ्य तुमच्या हाती आहे सत्य उजेडात आणणारी लेखणी म्हणजे ज्योती आहे     शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *अलीकडे असण्यापेक्षा दिसण्यावर लोक जास्त लक्ष देतात. सुंदर दिसण्याचा मार्ग सुंदर असण्यातून जातो; हे न कळल्यामुळे दर महिन्याचा काॅस्मेटिकवरचा खर्च आतोनात वाढलेली कुटुंबे सर्वांच्या आसपास मोठ्या प्रमाणात आहेत. मेकअपपेक्षा मनाच्या मेकओव्हरची गरज आहे; हे त्यांना कुणीतरी सांगायला हवे. योगासने केल्याने, पालेभाज्या, फळे खाल्ल्याने आणि सकारात्मक दृष्टी ठेवल्याने तुम्ही दिवसभर तजेलदार राहता. एक सात्विक उर्जा कायम आपल्या आत दर क्षणी नव्याने जन्म घेत असते. मग कोणत्याही काॅस्मेटिकची गरज पडत नाही. तारूण्य सतत आपल्या आत उमलते; परिणामी आपण कांतिमान दिसतो.* *तेजस्वीता, तत्परता आणि तन्मयता हे तारूण्याचे तीन 'त' कार असतात. या तीन गोष्टी ज्याच्याकडे आहे. तो 'तरूण'! आज लौकिक अर्थाने तरूण असणा-यांकडे या तीन गोष्टी दिसतात का ? या प्रश्नाचे उत्तर शंभर टक्के, ठामपणे कुणालाही देता येणार नाही; कारण तशी परिस्थिती नाही. पिझ्झा-बर्गर हेच पूर्णान्न मानणा-या पिढीकडून तेजस्वीपणाची अपेक्षा ठेवणे वेडेपणाचे आहे.*          ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••     🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟    *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎯  विचारवेध.............✍🏼 ***************************** सोन्यासारख्या मौल्यवान धातूंच्या सानिध्यात लोखंडासारखा एखादा तुकडा जरी आला तरी त्या तुकड्याला सोन्याचाच तुकडा समजायला लागतात.कारण सहवास सोन्याचा असतो म्हणून. अशाचपध्दतीने सज्जनांचा सहवासात साधारण माणसे जर आली तर त्यांच्यातील असणारे दुर्गूण सज्जनांच्या सहवासाने काही प्रमाणात कमी होऊन तेही सज्जन होण्यास कारणीभूत ठरतात. म्हणून आपल्यातील काही दुर्गूण असतील तर ते दूर होण्यास सज्जनांची संगतच हवी.जीवनात दुर्जनांच्या संगतीत राहण्यापेक्षा सज्जनांच्या संगतीत राहणे केव्हाही चांगले. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *अंथरूण पाहून पाय पसरावे* - ऐपतीच्या मानाने खर्च करावा. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ=========                         *स्वतः मध्ये बदल* *कोकिळ पक्षी कधी स्वतः घरटे बांधत नाही. अंडी घालायची वेळ आली म्हणजे कोकिळा आपली अंडी एखाद्या कावळ्याच्या घरट्यात घालते. पिल्ले बाहेर पडून उडू लागेपर्यंत कावळा त्यांचे रक्षण करतो. एकदा एक कोकिळा एका घुबडाजवळ येऊन त्याला म्हणाली, 'घुबडदादा, हे कावळे किती दुष्ट आहेत पहा ! माझी अंडी पूर्ण विश्वासाने मी त्यांच्या स्वाधीन करतो. पण याबद्दल ते मला काय बक्षीस देतात पहा ! मी कुठेही एकटी सापडले तर ते माझा पाठलाग करून जीव नकोसा करतात. ही काय त्याची रीत झाली ?' घुबड म्हणाले, 'अग कृतघ्न कोकिळे, तुझ्या पिल्लांना तू टाकून दिलंस, त्यावेळी ज्या कावळ्यांनी मायेने त्यांना वाढवलं, त्यांचे उपकार तू विसरून जातेस, त्या अर्थी कावळे तुला टोचतात हेच योग्य.'* *तात्पर्य:- दुसर्‍याला उपदेश करण्या अगोदर आपल्यातील दोष दूर करून वागणूकीत बदल केलेला  कधीही चांगले असते.* 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 06/01/2018 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९२४ - वि.दा. सावरकर यांची जन्मठेपेतून सुटका. 💥 जन्म :- १८१२ - दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर १९५९ - कपिलदेव निखंज, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *भारतीय तटरक्षक दलाचे जहाज C-161 सेवेत दाखल, गुजरातच्या पोरबंदर येथे झाला कार्यक्रम.* ----------------------------------------------------- 2⃣ *लालू प्रसाद यादव यांच्या वकिलाचा रांची विशेष सीबीआय न्यायालयात याचिका, तब्बेतीच्या कारणामुळे कमीत कमी शिक्षा सुनावण्याची मागणी, आज सुनावल्या जाणार शिक्षा* ----------------------------------------------------- 3⃣ *मध्य प्रदेश- कडाक्याच्या थंडीमुळे पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या शाळांना 6 ते 13 जानेवारीपर्यंत सुट्टी* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबईः विद्यापीठाच्या चार अधिकार मंडळाच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर. ७ फेब्रुवारीला होणार निवडणूक.* ----------------------------------------------------- 5⃣ *ठाणे : विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंतराव डावखरे यांचे निधन* ----------------------------------------------------- 6⃣ *भारत विरुद्द दक्षिण आफ्रिका पहिला कसोटी सामना - दक्षिण आफ्रिका 286 धावांवर गारद.* ----------------------------------------------------- 7⃣ *ऱाष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुषांनी दहा वर्षांनंतर मारली बाजी* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *आचार्य बाळशास्त्री जांभेकर* बाळ गंगाधर शास्त्री जांभेकर अर्थात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक असे म्हणतात. त्यांचा जन्म दिनांक ६ जानेवारी १८१२ रोजी कोकणातील राजापूर तालुक्यातील पोंभूर्ले या गावी एका गरीब ब्राम्हण घरात झाला. लहानपणापासूनच ते अतिशय हुशार, चुणचुणीत  व कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. म्हणूनच त्यांनी अगदी लहान वयातच अनेक विषयातील शिष्यवृत्ती मिळवली आणि संशोधन सुद्धा केले. त्यांना माहित होते कि, ब्रिटिशांना भारतातून हाकालायचे असेल तर लोकांना जागरूक करणे अत्यंत करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी वर्तमानपत्र हे माध्यम सर्वात चांगले आहे. म्हणून त्यांनी गोविंद कुंटे व भाऊ महाजन यांच्या सहकार्याने वयाच्या विसाव्या वर्षी म्हणजे ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण ‘ नावाचे वर्तमानपत्र प्रकाशन करण्यास सुरुवात केली........... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_5.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *कपिलदेव निखंज* कपिल देव हे एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहेत. यांच्याच नेत्रुत्वात भारताने इंग्लंड मध्ये आपला पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. == क्रिकेट क्षेत्रातील योगदान ==कपिल देव हे एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहेत. यांच्याच नेत्रुत्वात भारताने इंग्लंड मध्ये आपला पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. भारताचा सर्वश्रेष्ठ अष्टपैलू खेळाडू कपिल देव आज त्रेपन्नाव्या वर्षात पदार्पण करतो आहे (जन्म १९५९, चंडीगढ) . रामलाल निखंज आणि पूर्वाश्रमीच्या राजकुमारी लाजवंती यांच्या सात अपत्यांमधील कपिल हे सहावे अपत्य. रावळपिंडीनजीकच्या एका खेड्यातून फाळणीच्या वेळी रामलालजी चंडीगढला येऊन राहिले होते आणि बांधकाम साहित्य व लाकडे पुरविण्याचा व्यवसाय ते करीत होते. वयाच्या बाराव्या वर्षी कपिल देशप्रेम आझादांचा चेला बनला. नोव्हेंबर १९७५ मध्ये कपिल सर्वप्रथम हरयाणासाठी खेळला आणि सहा बळी मिळवले. त्या हंगामात ३ सामन्यांमधून १२ बळी त्याने मिळवले. १९८२-८३ च्या हंगामात गावसकरला विश्रांती देण्यात आल्याने कपिलवर कर्णधारपदाची जबाबदारी टाकण्यात आली. वेस्ट इंडीज दौर्‍यापासून तो नियमित कर्णधार बनला आणि त्या दौर्‍यावर त्याच्या संघाची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे वेस्ट इंडीजला एका एकदिवसीय सामन्यात हरविणे! गावसकरने या सामन्यात ९० तर कपिलने ७२ धावा केल्या होत्या आणि ४७ षटकांमध्ये २८२ धावा करून भारतीयांनी त्या राखल्या होत्या. १९८३ च्या विश्वचषकातील अजिंक्यपद हा कपिलच्या कारकिर्दीचा कळसाध्याय होता. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) भारतीय आंतरविद्यापीठ ॲथलेटिक्स स्पर्धेत कोणत्या महिलेने सुवर्णपदक पटकाविले?* 👉 संजीवनी जाधव *२) भारतीय आंतरविद्यापीठ ॲथलेटिक्स पुरुषांच्या स्पर्धेत कोणी सुवर्णपदक पटकाविले?* 👉रणजीतकुमार *३) मोबाईल इंटरनेटचा स्पीडमध्ये सर्वाधिक आघाडीवर असलेला देश कोणता?* 👉 नॉर्वे *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 अभिषेक अडकटलवार 👤 साईनाथ जगदमवार 👤 भगवान चव्हाण 👤 रितेश जोंधळे 👤 बजरंग माने 👤 सुदर्शन कोंपलवार 👤 श्रीनिवास गंगुलवार 👤 मोहन घोसले *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *संकल्प स्वच्छतेचा* चला सारे स्वच्छतेचा मनी संकल्प करू स्वच्छता तिथे आरोग्य नेहमी ध्यानी धरू लक्षात ठेवा स्वच्छता असेल जिथे तिथे आनंद अन् आरोग्य नांदेल तिथे तिथे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रतिबिंबांचं देखणेपण आधिक भावतं माणसाला. म्हणूनच बाहेर पडण्याआधी, एखाद्या समारंभाला जाण्याआधी आपण आरशातील आपलं प्रतिबिंब पुन्हा पुन्हा निरखून पाहत असतो. मनाची खात्री झाल्यावर दर्पणाच्या मोहातून मुक्त होत असतो. हे आपण असं का करीत असतो तर स्वत:सह इतर बघ्यांनाही बरं वाटावं म्हणून.* *स्त्रियांप्रमाणे पुरूषांनाही असं नीट-नेटकंपण राखून समूहात मिरवायला आवडत असतं. अशावेळी महिलांना महिलांकडून मिळणा-या दादेपेक्षा एखाद्या नजरेत भरणा-या अनोळखी पुरूषानं नजरेनं वा उदगारानं दिलेली दाद स्त्रियांनी दिलेल्या दादेपेक्षा खूप हुरळून टाकणारी असते. त्यावेळी ती स्त्री धन्यतेने कधी स्वत:कडे तर कधी त्या पुरूषाच्या नजरेकडे नजर सोडवत पाहत असते. अशावेळी स्वत:कडे पुन्हा पुन्हा कौतुकानं निरखून पाहणं हे आरशातील प्रतिबिंबाकडे पाहण्याच्या अनेकपट सुंदर असतं. ज्या उद्देशानं आरशात वारंवार पाहून ती व्यक्ती बाहेर पडलेली असते, त्याची मनभावक फलश्रुती त्या व्यक्तीने अनुभवलेली असते. हेच पुरूषांच्या बाबतीतही घडतं. पण या मनाच्या सहजधर्म व्यवहारात पुरूषाला महिलेनं द्यावयाची दाद जरा संभाळून द्यायची असते. कारण पुरूषी नजर सळसळून तिच्या नजरेवर रेंगाळायला फार काळजी घेत नाही. लवकरच ती नजर 'आपलीशी' वाटायला लागते. कारण स्त्रियांइतका पुरूषी संकोच सावध नसतो.* *मुक्त मनाच्या अशा तरलतरंगी लहरी-लहरा प्रत्येक जण अनुभवत असतो. म्हणून स्त्री-पुरूषानं, त्याहीपेक्षा पती-पत्नीनं परस्परांच्या प्रतिबिंबाला जपावं. ते इतरांच्या नजरेत खुपावं असं काही घडू नये.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 👁👀👁👀👁👀👁👀👁👀 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎯 विचारवेध.............✍🏼 ***************************** सोन्यासारख्या मौल्यवान धातूंच्या सानिध्यात लोखंडासारखा एखादा तुकडा जरी आला तरी त्या तुकड्याला सोन्याचाच तुकडा समजायला लागतात.कारण सहवास सोन्याचा असतो म्हणून. अशाचपध्दतीने सज्जनांचा सहवासात साधारण माणसे जर आली तर त्यांच्यातील असणारे दुर्गूण सज्जनांच्या सहवासाने काही प्रमाणात कमी होऊन तेही सज्जन होण्यास कारणीभूत ठरतात. म्हणून आपल्यातील काही दुर्गूण असतील तर ते दूर होण्यास सज्जनांची संगतच हवी.जीवनात दुर्जनांच्या संगतीत राहण्यापेक्षा सज्जनांच्या संगतीत राहणे केव्हाही चांगले. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= * आधी पोटोबा मग विठोबा - आधी स्वतः च्या पोटापाण्याचा (स्वार्थाचा) विचार करणे व नंतर अन्य (परमार्थाचे) काम करणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *हुशार गोनू* मिथिला नगरीत राहणार्‍या गोनूच्या हुशारीमुळे राजाची त्याच्यावर अतिशय मर्जी बसली होती. दरबारातल्या काही जणांना हे सहन होत नव्हते. अशांपैकी एक असलेला असूयानंद शास्त्री हा एकदा राजाच्या कानात कुजबुजला, 'महाराज, तसे पाहता चातुर्यात आम्ही इतर दरबारी मंडळीही काही कमी नाही, पण गोनूप्रमाणे उठल्या-बसल्या आपल्या चातुर्याचे प्रदर्शन करणे आम्हाला आवडत नसल्याने आपली मर्जी त्या गोनूवर कारण नसता जडली आहे. गोनू जर खरोखरच चतुर असेल, तर चिंचोळय़ा तोंडाच्या साधारण मोठय़ा मडक्यात बरोबर मावेल एवढय़ा आकाराचा काळा भोपळा ते मडके न फोडता भरून दाखवायला त्याला सांगा.' शास्त्रीबुवांच्या सुचनेनुसार एके दिवशी राजा गोनूला म्हणाला, 'गोनू, अद्यापपर्यंत मी तुला बरीच इनामे दिली, पण आता मला तुझ्याकडून एक भेट हवी आहे. ते बघ तिथे चिंचोळय़ा तोंडाचे मडके व मध्यम आकाराचा काळा भोपळा आहे. तू ते मडके न फोडता त्या मडक्यात तो भोपळा भरून आणून दे. माझी मागणी सामान्य आहे ना? करशील ती पूर्ण तू?' गोनू म्हणाला, 'का नाही पुरी करणार? अवश्य करीन, पण सध्या मी एका धार्मिक ग्रंथाचे पारायण करायला घेतले असल्याने येत्या दोन-तीन महिन्यांत मला कशी ती सवड नाही. त्या पारायणातून मोकळा झालो रे झालो की, आपल्याला हवी असलेली भेट मी घेऊन येईन, मात्र तोवर ते मडके मी माझ्या घरी नेऊन ठेवून येतो, म्हणजे मला आपल्या मागणीचा विसर पडणार नाही.' आपली विनंती राजाने मान्य करताच गोनू ते मडके घेऊन घरी गेला. त्याच दिवशी कुणाच्या लक्षात येणार नाही अशा तर्‍हेने ते मडके झाकून घेऊन तो जवळच असलेल्या खेड्यातील एका ओळखीच्या शेतकर्‍याकडे गेला. त्याच्या झोपडीच्या गवताने शाकारलेल्या छपरावर काळय़ा भोपळय़ाचा वेल चढला होता व त्या वेलावर मूठ मूठ आकाराचे कोवळे कोवळे भोपळे लागले होते. स्वत: गोनू त्या मडक्यासह त्या छपरावर चढला आणि त्याने एक मूठभर आकाराचा भोपळा त्याच्या वेलासकट त्या पक्क्या मडक्याच्या चिंचोळय़ा तोंडातून आत ढकलला. एवढे झाल्यावर त्याने त्या शेतकर्‍याला ती गोष्ट पूर्णपणे गुप्त ठेवायला सांगून त्याचा निरोप घेतला. तो भोपळा प्रतिदिवशी मडक्यातल्या मडक्यात थोडाथोडा वाहू लागला. त्याच्यावर नजर टाकण्यासाठी गोनू आठवड्यातून एक फेरी त्या शेतकर्‍याकडे मारत होताच. दोन-अडीच महिन्यांत जेव्हा त्या भोपळय़ाने त्या मडक्याचा बहुतांश अंतर्भाग व्यापून टाकला, तेव्हा 'आता अधिक दिवस हा भोपळा अशाच स्थितीत राहू दिला, तर हा मडके फोडून टाकेल, असा विचार करून गोनूने तो देठात कापला आणि एके दिवशी तो ते मडके दरबारात घेऊन गेला. आपण दिलेल्या पक्क्या मडक्याचे तोंड एवढे चिंचोळे असताना त्यात एवढा मोठा भोपळा गोनूने कसा घातला? असा पेच राजापुढे पडला. त्याने गोनूला 'तू हा चमत्कार कसा केलास?' अशी पृच्छा केली. आपण अवलंबिलेल्या युक्तीची कल्पना गोनूने देताच राजा त्याच्यावर प्रसन्न झाला. त्याला १,000 मोहरा देत तो त्याला म्हणाला, 'गोनू, या तुझ्या चातुर्यावर प्रसन्न होऊन मी तुला १,000 मोहरा तर देत आहेच, शिवाय तुझ्यावर जळणार्‍या ज्या असूयानंद शास्त्रांनी तुला या पेचात टाकण्याचा मला सल्ला दिला, त्या शास्त्रीबुवांनीही तुला ५00 मोहरा द्याव्यात, अशी मी त्यांना आज्ञा करीत आहे.'  〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*चालू घडामोडी 2017 महत्त्वाच्या नेमणूका* 1) राष्ट्रपती = रामनाथ कोविंद ( 14 वे ) 2) उपराष्ट्रपती= व्यंकय्या नायडू ( 13 वे ) 1) पंतप्रधान = नरेंद्र मोदी (14 वे ) 4) राज्यपाल = सी. विद्यासागर राव (18 वे ) 5) मुख्यमंत्री = देवेंद्र फडणवीस (18 वे ) 6) विधानसभापती= हरिभाऊ बागडे 7) विरोधी पक्षनेते = राधाकृष्ण विखे पाटील 8) विधान परिषद अध्यक्ष= रामराजे नाईक निंबाळकर 9) विधान परिषद उपाध्यक्ष = माणिकराव ठाकरे 10) विरोधी पक्षनेते= धनंजय मुंडे 11) मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश= मंजुला चेल्लुर (दुसऱ्या महिला) 12) भारताच्या सर्वाच्च न्यायालयाचे न्यायाधीश= दिपक मिश्रा ( 45 वे ) *महान्यायवादी = k.k. वेणुगोपाल* 13) महालेखापाल= सायंतानी जाफा 14) महाधिवक्ता = रणजित कुमार 15) राज्याचे माहिती आयुक्त = रत्नाकर गायकवाड 16) राज्याचे मुख्य सचिव = सुमित मलिक 17) राज्याचे लोकायुक्त = मदनलाल टहलियानी 18) उपलोकायुक्त = जॉनी जोसेफ 19) पोलीस महासंचालक = सतीश माथुर (40 वे ) 20) मुंबई पोलीस आयुक्त = दत्तात्रय पडसलगीकर 21) केंद्रीय माहिती आयुक्त = आर.के.माथूर ( 8 वे ) 22) नीती आयोगाचे उपाध्यक्ष = राजीव कुमार ( 2 रे ) 23) नीती आयोगाचे सचिव = अमिताभ कांत 24) राज्य निवडणूक आयुक्त = जे. एस.सहारिया 25) केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त = अचलकुमार ज्योति (21 वे) 26) सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष= ए.के.माथुर 27) 14 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष= वाय.व्ही.रेड्डी 28) इस्रोचे अध्यक्ष= एस.किरण कुमार 29) नरेंद्र मोदी चे सचिव= नृपेंद्र मिश्रा 30) महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा = विजया रहाटकर 31) राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा = ललिता कुमारमंगलम 32) राष्ट्रीय मानवी हक्क आयोग अध्यक्ष = न्या. H.L.दत्तु 33) महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग अध्यक्ष = न्या. बन्नूरमठ 34) राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग अध्यक्ष = सईद गैरूल हसन 35) राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग अध्यक्ष = राम शंकर कथेरिआ 36) राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग अध्यक्ष = नंदकुमार साई 37) राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग अध्यक्ष = न्या. ईश्वरैय्या 38) अनुऊर्जा आयोग अध्यक्ष = डॉ. शेखर बसू 39) राष्ट्रीय हरित न्यायालय अध्यक्ष = न्या स्वतंत्रकुमार 40) RBI चे गव्हर्नर = उर्जित पटेल ( 24 वे ) 41) राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार = अजित डोवाल 42) आधार UIDAI CEO = जे. सत्यनारायन 43) कृषि व मूल्य आयोग अध्यक्ष = अशोक गुलाटी 44) २१ व्या विधी आयोगाचे अध्यक्ष = बलवीरसिंह चौहान 45) राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग अध्यक्ष = स्तुती नारायण कक्कड ------------------------------- *लष्कर 👮 प्रमुख* 1) भुदल प्रमुख = बिपीन रावत (26 वे ) 2) हवाई दल प्रमुख = बि. एस.धनोवा (25 वे) 3) नोदल प्रमुख = सुनिल लांबा ( 23 वे ) *संसदीय 🎓 पदाधिकारी* 1) लोकसभेचे अध्यक्ष = सुमित्रा महाजन ( दुसऱ्या महिला ) 2) लोकसभेचे उपाध्यक्ष = एम. थुबीदुराई 3) राज्यसभा अध्यक्ष = व्यंकय्या नायडू 4) राज्यसभा उपाध्यक्ष = पी.जे. कुरियन 5) राज्यसभेचे विरोधी पक्षनेते= गुलाब नबी आझाद.

*अध्यापनाची खरी पद्धत...* _(प्रत्येक शिक्षकाने अवश्य वाचावे...)_ एकदा आम्हा शिक्षकांचे असेच एक प्रशिक्षण होते. त्यात एक निवृत्त शिक्षक पण आले होते. आम्ही दिवसभर व्याकरण कोणत्या पद्धतीने शिकवायचे? स्पेलिंग पाठ करावेत की नाही? कविता कशी शिकवायची? अध्यापन करताना शैक्षणिक साहित्य कोणते वापरायचे? याचा काथ्याकूट करीत होतो. संध्याकाळी ५ वाजले. सर्वांना जाण्याची घाई होती. आम्ही उठू लागताच ते निवृत्त शिक्षक बोलायला उठले आणि म्हणाले, *_"मी फक्त ३ मिनीटे बोलणार आहे."_* वैतागाने आम्ही सारे खाली बसलो. ते शिक्षक म्हणाले, _"दिवसभर तुमची सर्व चर्चा मी ऐकली. मी एक छोटे उदाहरण सांगतो. ते जर तुम्ही नीट समजून घेतले तर तुम्ही चांगले शिक्षक व्हाल."_ 'आता आणखी काय उपदेश ऐकायचा' अशा भावनेने आम्ही ऐकू लागलो... ते म्हणाले की, _"एका डोंगराच्या पोटाला एक झोपडी आहे. तिथे एक आदिवासी नवरा बायको राहतात. त्यांना एक ६ महिन्याचं मूल आहे. आजूबाजूला एक ही घर नाही. एकदा संध्याकाळी नवर्‍याला अचानक गावाला जावे लागले. पत्नी आणि मूल एकटेच आहेत. रात्री दोघे झोपले आणि अचानक मध्यरात्री ते मूल किंचाळून रडायला लागले._ _ती आई काय करेल?_ _सांगा ना काय करेल?_" ते आम्हाला विचारू लागले. आम्ही सारे शांत झालो. कुणीच काही बोलेना. ते शिक्षक पुन्हा आम्हाला विचारू लागले, _"ती आई बालमानसशास्त्राची पुस्तके उघडून पाहील का? की मुलांना कसे हाताळावे याच्या वेबसाईट उघडून पाहील?"_ _"सांगा ना... काय करेल यातलं?"_ आम्हाला मुद्दा कळला होता. ते किंचित हसले आणि पुढे म्हणाले, _"ती यातले काहीच करणार नाही. ती तिला जे सुचेल ते करील. ती त्याला कडेवर घेईल. छातीशी कवटाळेल... त्याच्यापुढे ताटली आणि चमचा वाजवेल, त्याच्यापुढे नाचून दाखवील, गाणी म्हणेल, त्याला दूध पाजील, त्याला झोपडीबाहेर आणून चंद्र दाखविल. हे सारं सारं ती तिथपर्यंत करील की जोपर्यंत ते मूल शांत होत नाही."_ ते पुढे म्हणाले की, _"हे सारे ती का करील?"_ _"हे तिला सारे का सुचेल?"_ *_"कारण ते तिचे मूल आहे म्हणून...!!!"_* त्या शिक्षकांनी क्षणभर सगळीकडे बघितले बोलताना क्षणभर थांबले आणि म्हणाले, _"त्या बाईसारखे तुमच्यासमोर बसलेले मूल तुम्हाला तुमचे वाटते आहे का? तितके प्रेम तुम्हाला जर त्याच्याबद्दल वाटणार असेल तर माझ्या मित्रांनो, तुम्ही जे काही वर्गात कराल, तेच उपक्रम असतील, तीच अध्यापनाची पद्धती असेल. तुम्ही हातात जे काही घ्याल तेच शैक्षणिक साहित्य असेल आणि तुम्ही जो विचार कराल तेच शैक्षणिक तत्वज्ञान असेल."_ _"यापलीकडे शिक्षण नावाचे काहीही नसते...!"_ आणि ते शिक्षक शांतपणे खाली बसले. आम्ही थक्क झालो... सुन्न झालो...!

*तीन शब्दावरून गोष्ट तयार करणे* १) *कासव , ससा , डोंगर* २) *लाकुडतोडया , कुराड , परी* ३) *सिंह, उंदीर , जाळ* ४) *कावळा , तहान , माठ* ५) *शिकारी , कबुतर ,मुंगी* ६) *गाढव , मीठ ,व्यापारी* ७) *राजा , परीस , राजकुमारी* ८) *धनगरांचा मुलगा , लांडगा , मेंढया* ९) *सिंह , कोंबडा , गाढव* १०) *शेतकरी , चार मुले , काठी* ११) *बहिणभाऊ , भाऊबीज ,भोपळा* १२) *आजी , जंगल , भोपळा* १३) *माकड , मांजरे , लोणी* १४) *माकड , मांजर , घागर* १५) *कावळा , चिमणी , पाऊस* १६) *माकड , मगर ,काळीज* १७) *लांडगा , करडू , खडक* १८) *सिंह , उंदीर , जाळे* १९) *चिमण्या , शिकारी , जाळे* २०) *राजा , परीक्षा , दगड* २१) *पारधी , कबुतर , जाळे* *२२)आई, घर ,शाळा* *२३)बाहुली ,आजी, मुलगी* *२४)पाऊस, पूर ,शाळा* *२५)जंगल, प्राणी ,दोन मूले*. 〰〰〰〰〰〰〰

🌹कविता🌹 विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही..... पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही...ll छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मला, अजुन अशी भिंत नाही .. माझी झोपडी जाळण्याचे, केलेत कैक कावे.. जळेल झोपडी अशी, आग ती ज्वलंत नाही.. रोखण्यास वाट माझी, वादळे होती आतूर.. डोळ्यांत जरी गेली धूळ, थांबण्यास उसंत नाही.. येतील वादळे, खेटेल तुफान, तरी वाट चालतो.. अडथळ्यांना भिवून अडखळणे, पावलांना पसंत नाही .... संकलित 🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻

👧👧 *लेक शिकवा अभियान* 👧👧 👧👧👧 *घोषवाक्ये* 👧👧👧 १.मुलीला शिकू द्या, वाढू द्या, माणूस म्हणून जगू द्या. २.मोळी विक, पण शाळा शिक. ३.उतरणार नाही मातणार नाही, मुलगी आहे म्हणून अन्याय सहन करणार नाही. ४.मुलींचे शिक्षण, प्रगतीचे लक्षण. ५.आपल्या मुली जर शिकल्या छान, होईल आपल्या देशाचे कल्याण. ६.जन्म दिला मातेने पालन केले पित्याने, मुलीचा उद्धार झाला शिक्षणाने. ७.मुलगी झाली म्हणून डोळ्यात आणू नका पाणी, शिक्षण देऊन बनवू तिला झाशीची राणी. ८.आई बाबा मला शिकू द्या, घाई नको लग्नाची, मी शिकेन-कुटूंबाला शिकवेन, मुलगी मी जिद्दीची. ९.आता मनाशी ठरवा पक्कं, शिक्षण हा मुलींचाही हक्क. १०.मुलगा मुलगा दोघे समान, दोघांनाही शिकवू छान. ११.मुलींचे शिक्षण, स्त्रीशक्तीचे विकसन. १२.बंधनांची भिंत फोडू, अज्ञानाचा अंत करू. १३.शिक्षण घेऊन होऊ विचारी, घेऊ आम्ही उंच भरारी. १४.घडविण्या राष्ट्राचा विकास, मुलींच्या शिक्षणाचा हवा ध्यास. १५.कळी उमलणार नाही जीवनरसावाचून, मुली बहरणार नाहीत शिक्षणावाचून. १६.लडका शान है, तो लडकी सम्मान है । १७.शिक्षण करा गं धारण, सर्वसिद्धिचे कारण. १८.सोडून द्या वाईट चालीरीती, आता मुलींच्या शिक्षणाला देऊया गती. १९.लडकी होने का गम नहीं, लडकी लडके से कम नहीं । २०.आता होऊया दक्ष, मुलींचे शिक्षण हेच लक्ष्य. २१.नियमितपणाची धरूया कास, मुलींना शिकवू एकच ध्यास. २२.हम भारत की किशोरियॉं, फूल भी है और चिंगारियॉं। २३.जब तक सुरज चॉंद रहेगा, ज्ञान बेटीयों का सम्मान बढायेगा । २४.सुटला झुळझुळ वारा दरवळला सुगंध, मुलींचे शिक्षण हाच खरा आनंद. २५.जिच्या हाती पेन्सिल पाटी, तीच सुखाचे मंदिर गाठी. २६.अंकुर फूलला कलिकेचा जन्म झाला, अहोभाग्य म्हणूनी शिक्षण घेते ही बाला. २७.काळ बदलला तूही बदललीस, चूल-मूल ची चाकोरी सोडून प्रगती पथावर निघालीस. २८.शिक्षणाच्या दानाने बंधनाचा सोडवला फास, मुली घेत आहेत आता मोकळा श्वास. २९.भाग्यविधात्या भारतभूची सुंदर आहे सृष्टी, मुलींना देऊया शिक्षणाने नवदृष्टी. ३०.मुलासह मुलीलाही देता शिक्षण, जीवनी त्यांच्या येतील आनंदाचे क्षण. ३१.शिक्षणाचा झाला आता कायदा, त्यामुळेच होईल मुलींचा फायदा. ३२.कण्वऋषींचा आश्रम शकुंतलेचे माहेर, मुलींना करा शिक्षणाचा आहेर. ३३.नको पैसा नको सोने चांदी, मुलींनाही द्या शिकण्याची संधी. ३४.बेटा-बेटी आहे समान, दोघांनाही शिकवून करूया महान. ३५.सावित्रीच्या लेकी आम्ही आता नाही नमणार, डोईवरचा पदर आता कमरेला खोचणार. ३६.मंत्र आहे नव्या युगाचा, मुलीलाही हक्क आहे प्रगतीचा. ( *घोषवाक्य स्त्रोत: विकासपीडिया, सामाजिक जागृती विभाग*)

सुंदर बोधकथा आहे, आवडल्यास इतरांनाही सांगावी अशी ..... एक दिवस एक कावळा आणि त्याचा मुलगा झाडावर बसले होते. कावळ्याचा मुलगा वडिलांना म्हणाला "मी आजपर्यंत सगळ्या प्रकारचे मांस खाल्ले... पण, दोन पायांच्या माणसाचे मांस कधीच खाल्ले नाही.बाबा, कसा स्वाद असतो हो या दोन पायांच्या जीवाच्या मांसाचा?" वडील कावळा म्हणाला "आजपर्यंत मी जीवनात ३ वेळा माणसाचे मांस खाल्ले आहे. खूपच चविष्ट असते ते!" मुलगा कावळा लगेच हट्ट करू लागला कि त्याला पण माणसाचे मांस खायचे आहे. वडील कावळा म्हणाला, "ठीक आहे, पण थोडा वेळ वाट पहावी लागेल आणि मी जसे सांगेन तसे तुला करावे लागेल. माझ्या वाडवडिलांनी मला हि चतुराई शिकवून ठेवली आहे ज्यामुळे आपल्याला खाणे मिळू शकेल." मुलगा कावळा "होय" म्हणाला. त्यानंतर वडील कावळ्याने मुलाला एका जागी बसवले व तो उडून निघून गेला आणि परत येताना मांसाचे २ तुकडे तोंडात घेवून आला. एक तुकडा स्वतःच्या तोंडात धरला व दुसरा तुकडा मुलाच्या तोंडात दिला, तुकडा तोंडात घेता क्षणी मुलगा म्हणाला, "शी बाबा, तुम्ही कसल्या घाणेरड्या चवीचे मांस आणले आहे. असले खाणे मला नको." वडील कावळा म्हणाला, "थांब, तो तुकडा खाण्यासाठी नसून फेकण्यासाठी आहे. हा एक तुकडा टाकून आपण आता मांसाचे ढीग तयार करणार आहोत. उद्या पर्यंत वाट बघ. तुला मांसच मांस खायला मिळेल आणि ते सुद्धा माणसाचे." मुलाला हे काही कळले नाही कि एका मांसाच्या तुकड्यावर मांसाचे ढीग कसे काय निर्माण होणार ? पण त्याचा त्याच्या वडिलावर विश्वास होता. थोड्या वेळाने कावळा वडील एक तुकडा घेवून आकाशात उडाला आणि त्याने तो तुकडा एका मंदिरात टाकला आणि परत येवून दुसरा तुकडा उचलला व तो दुसरा तुकडा एका मशिदीच्या आत टाकला. मग तो झाडावर येवून बसला. वडिल कावळा मुलाला म्हणाला, "आता बघ उद्या सकाळपर्यंत मांस खायला मिळते कि नाही ते?" थोड्याच वेळात सगळीकडे गलका झाला, ना कुणाला कुणाचे ऐकू येत होते, ना कोणी कोणाचे ऐकून घेत होते. फक्त धर्म भावना विखारी झाली होती. धर्माच्या नावाखाली रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या.... आई, मुलगा, बहिण, भाऊ, वडील, काका, शेजारी, मित्र असे कोणतेच नाते लक्षात न घेत फक्त धर्म बघून एकमेकांवर वार चालू होते. आमच्या धर्माचा अपमान झाला त्याचा बदला घेतलाच पाहिजे असे दोघेही म्हणत होते आणि यात निरपराध मारले जात होते. खूप वेळ यातच निघून गेला आताशा गाव शांत होवू लागले होते कारण रस्त्यावर फक्त आणि फक्त रक्तच सांडलेले दिसत होते. विशेष म्हणजे ते रक्त लाल रंगाचे होते... त्यात कुठल्याच धर्माची छटा नव्हती. ते फक्त एकच धर्म पाळत होते ते म्हणजे प्रवाही पणाचा.. गांव निर्मनुष्य भकास झाले होते.... सर्वत्र भयाण शांतता पसरली होती. या धुमश्चक्रीतून फक्त २ जीव सुटले होते ते म्हणजे झाडावरचे कावळे. आता कावळ्याचे पोर माणसाची शिकार करायला शिकले होते. कावळ्याच्या पोराने बापाला प्रश्न विचारला, "बाबा, हे असेच नेहमी होते का? आपण भांडणे लावतो आणि माणसाच्या लक्षात कसे येत नाही?" कावळा म्हणाला, "अरे या मुर्ख माणसाना कधीच आपला धर्म कळला नाही. माणुसकी हा धर्म सोडून ते नको त्या गोष्टी करत बसले आणि आपल्यासारखे कावळे त्यांचा फायदा घेवून जातात, हे त्यांच्या लक्षातही येत नाही. माणूस म्हणून जगण्यापेक्षा यांनी जात आणि धर्म यांचेच जास्त प्रस्थ माजविले आहे.आणि त्याचा गैरफायदा इतर तिसरे कोणी तरी घेवून जातात." इतके बोलून दोघे बाप-लेक मांस खाण्यासाठी उडून गेले.

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 03/01/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *बालिका दिन* 💥 ठळक घडामोडी :-  १९५० - पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे उदघाटन. १९५२ - स्वतंत्र भारतातपहिल्या राष्ट्रीय निवडणुका. १९५७ - विद्युत घाटांवर चालणारे पहिले घड्याळ बाजारात. 💥 जन्म :- १८३१ - सावित्रीबाई फुले, आधुनिक भारतातील प्रथम स्त्री शिक्षिका, समाजसुधारक, महात्मा जोतीराव फुले यांची पत्नी. १८८८ - कागदी स्ट्रॉचा वापर सुरू. १९१७ - कर्तारसिंग दुग्गल, पंजाबी साहित्यिक. १९२२ - चोइथराम बाबाणी, सिंधी साहित्यिक. १९३१ - यशवंत दिनकर फडके, मराठी लेखक, इतिहास संशोधक. 💥 मृत्यू :-  १९७५ - ललित नारायण मिश्रा, भारतीय रेल्वेमंत्री, राजकारणी. १९९४ - अमरेंद्र गाडगीळ, मराठी बाल-कुमार लेखक. १९९८ - केशव विष्णू बेलसरे, मराठी तत्त्वज्ञानी. २००१ - सुशीला नायर, भारतीय आरोग्यमंत्री, भारतीय राजकारणी. २००२ - फ्रेडी हाइनिकेन, डच बियर उद्योगपती. २००२ - सतीश धवन, भारतीय अंतराळशास्त्रज्ञ. २००५ - जे.एन.दिक्षित, भारतीय राजकारणी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *भीमा कोरेगाव प्रकरण - सरकारच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदचं आवाहन - प्रकाश आंबेडकर* ----------------------------------------------------- 2⃣ *मुंबई- आज स्कूल बस न चालवण्याचा निर्णय, महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर संघटनेचा निर्णय* ----------------------------------------------------- 3⃣ *नवी दिल्ली : रॉचे माजी प्रमुख राजिंदर खन्ना यांची उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्तीला कॅबिनेटने दिली मंजुरी.* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबई - महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आज शाळांना सुट्टी नाही, सुट्टी देण्यास शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नकार दिल्याची माहिती मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी दिली* ----------------------------------------------------- 5⃣ *कोळसा खाण घोटाळा : झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेला दिल्ली न्यायालयाकडून स्थगिती.* ----------------------------------------------------- 6⃣ *नांदेड : जिल्हाधिका-यांची गाडी फोडली, शिवाजीनगर परिसरातील घटना, सुदैवानं गाडीत कुणीही नव्हतं.* ----------------------------------------------------- 7⃣ *चंद्रपूर - 220 केव्ही वीज उपकेंद्रात भीषण आग, आगीमुळे परिसरातील 35 गावांचा वीजपुरवठा ठप्प.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= सावित्रीबाई फुले जयंती निमित्त प्रासंगिक लेख *मी सावित्री बोलतेय* नमस्कार ..... मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले, माझा जन्म 03 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगांव येथे झाला. वयाच्या नवव्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी माझा विवाह झाला. मला शिक्षणाचा अजिबात गंध नव्हता. पण माझे पती महात्मा फुले यांनी मला शिकविले आणि घडविले. पुण्यात भिडेच्या वाड्यात मुलींसाठी त्यांनी पहिली शाळा काढली. पण तिथे मुलींना शिकविण्यासाठी कोणीही तयार होत नव्हते. तेंव्हा ज्योतिबानी मला याठिकाणी शिकविण्यासाठी............. वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *यशवंत दिनकर फडके* यशवंत दिनकर फडके (जानेवारी ३, १९३१ - जानेवारी ११, २००८) हे मराठी चरित्रलेखक, इतिहाससंशोधक होते. ते २०००  साली  बेळगाव  साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांचा जन्म सोलापूर येथे जानेवारी ३, १९३१  रोजी झाला. त्यांचे वडील स्वातंत्र्य चळवळीत  उतरले होते. स्वातंत्र्य चळवळीमुळे वडिलांचे कुटुंबाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे फडक्यांना शिक्षणासाठी बरीच धडपड करावी लागली. सोलापुरातील ’हरीभाऊ देवकरण हायस्कूल’ शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले. शालेय शिक्षण चालू असताना त्यांनी द्वा.भ. कर्णिकांच्या ’संग्राम’ वृत्तपत्रातून लेखनही केले. १९४७ साली मॅट्रिक परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षणाकरता ते पुण्यास गेले. राज्यशास्त्र हा विषय घेऊन पुणे विद्यापीठातून त्यांनी बी.ए. (१९५१) व एम्‌.ए. (१९५३) या पदव्या मिळवल्या. पुढे १९७३ साली त्यांनी मुंबई विद्यापीठाकडून पीएच्‌.डी. पदवी मिळवली. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= स्वत:शी प्रामाणिक असलेला माणूस स्वत:च एक खणखणीत नाणं असतो. ~ वपु काळे | इतर *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) रिडल्स इन हिंदुइझम हा ग्रंथ कोणी लिहिला?* 👉 डॉ. आंबेडकर *२) भीमा व कृष्णा खोरी कोणत्या डोंगररांगामुळे विभक्त झाली आहेत?* 👉 महादेव *३) दूरदर्शनने सुरू केलेली सर्वात पहिली मालिका कोणती?* 👉 श्वेतांबरा *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 ज्ञानेश्वर विजागत, सहशिक्षक, सोलापूर 👤 विठ्ठल सुवर्णकार, धर्माबाद 👤 रतन बहिर, भीर, महाराष्ट्र 👤 शुभांगी परळकर, नांदेड 👤 माधव पवार, पत्रकार, नायगाव 👤 संदीप जाधव, देगलूर 👤 प्रशांत बोड्डेवाड, येवती 👤 वीरेंद्र डोंगरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *कमकुवत* नव वर्षाची सुरवात कोणाची शनी दर्शनाने कमकुवत असतात कोणी कोणी मनाने हे कमजोर मनाचे जातात कुठेही शरण डोळे झाकून लवायचे एवढेच त्यांचे धोरण शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *एका मुलाने काहीतरी खोडी केली म्हणून शेजारच्या बाईने त्याला एक चापट मारली. त्याबरोबर त्या मुलाने मोठे भोकाड पसरले आणि त्या बाईला शिव्या देऊ लागला. ते ऐकून त्याची आई बाहेर आली आणि तिने त्याला चांगलाच झोडपला. परंतु आईच्या हातचा इतका मार खाऊनसुद्धा तो मुलगा फारसा ओरडला नाही किंवा त्याने आईला उलट शिव्यापण दिल्या नाहीत.* *तसेच आपल्यावर येणारी संकटे ही भगवंताने आणली आहेत अशी निष्ठा असेल, तर आपल्याला त्यांचा त्रास होईल, पण त्यांनी आपली शांती बिघडणार नाही. भगवंताचा विसर आपल्याला पडला की आपली शांती बिघडते.* *ज्या दातांनी सिंह मोठ-मोठे प्राणी मारतो त्याच दातांनी तो आपल्या पिल्लांना इजा न करता उचलून एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी नेतो, हे लक्षात असू द्यावे.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= बोलणारी आणि बोलण्याप्रमाणे कृती करणारी व्यक्ती ही अतिशय संवेदनशील आणि कर्तव्यतत्पर समजली जाते. अशा व्यक्ती फार कमी प्रमाणात पहायला मिळतात. अशा व्यक्तींच्या सहवासात राहिले तर आपल्यातील आळशीपणा आणि कामामध्ये टाळाटाळ करण्याच्या वृत्तीला लगाम घातल्या जाऊन आपल्यामध्ये सुप्त असलेल्या क्रियाशिलतेला अधिक प्राधान्य मिळते व जीवनात चांगले जीवन जगण्यासाठी योग्य दिशा मिळते. © व्यंकटेश काटकर नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🎄🌸🎄🌸🎄🌸🎄🌸🎄🌸🎄 =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *अती शहाणा त्याचा बैल रिकामा* - जो माणूस फार शहाणपणा करायला जातो, त्याच्या हातून काम बिघडते. *संकलक :- छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *गाढव आणी निर्दय मालक* एक खूप गरीब गाढव होते. त्याचा मालक त्याच्याकडून खूप काम करून घेत असे आणि त्याला पोटभर खायलाही देत नसे. असेच ते गाढव म्हातारे झाले. एके दिवशी मालकाने त्याच्या पाठीवर खूप मोठे ओझे लादले. रस्ता अवघड आणि खांचखळग्यांचा होता. त्यामुळे गाढव धडपडून पडले व त्याच्या पाठीवर लादलेली मातीची भांडी फुटून त्यांचे तुकडे तुकडे झाले. मालक खूप चिडला आणि दुष्टपणाने त्याला मारू लागला. तेव्हा, गाढव मान वर करून म्हणाले, 'अरे, दुष्ट माणसा, हे सगळं नुकसान तुझ्याचमुळे झालं. तू जर मला नीट खाऊ घातलं असतंस तर मी चांगला शक्तिवान झालो असतो आणि हे ओझं मी सहज उचलू शकलो असतो.' तात्पर्य - काही लोक कृतघ्न आणि दुष्ट असतात की ते प्रामाणिक आणि गरीब माणसांना छळण्यासही कमी करीत नाहीत.  〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🙏🙏🙏 नमस्कार. 🙏🙏🙏 " स्वच्छ विद्यालय , स्वच्छ महाराष्ट्र" मोहीम उद्यापासून शाळेत सुरु होणार त्यासाठी खास ... घोषवाक्ये, 1) स्वच्छता आली अंगणात, समाज का अंधारात. 2) स्वच्छतेचे संदेश ध्यानी धरु, आरोग्य आपले निरोगी बनवू. 3) पाण्याचे भांडे नेहमी स्वच्छ धुवा, डासांची अंडी पळवुन लावा. 4) पिण्यासाठी हवे शुध्द पाणी, नाहीतर होईल आरोग्याची हानी. 5) नका बसु उघड्यावर संडासाला ,संधि मिळेल रोगाराई पसरण्याला. 6) सांडपाण्याची योग्य विल्हेवाट, गावात येईल आरोग्याची पहाट. 7) पिण्याचे पाणी घ्या ओगराळ्याणे , दूषित करू नका तुमच्या हाताने. 8) स्वच्छता व शुद्ध पाणी हे आहे तंत्र , ग्रामीण आरोग्याचा हाच कानमंत्र. 9) ज्याचे घरी सदैव स्वच्छता, नांदेल तेथे आरोग्य सुबता. 10) रंग भगवा त्यागाचा, मार्ग स्विकारू स्वच्छतेचा. 11) पाणी शुद्धिकरण नियमित करू, सर्वांचे जीवन आरोग्य संपन्न करू. 12) पाण्याच्या स्वच्छेते विषयी दक्षता घेव़ू, सर्व रोगराईना दूर पळवू . 13) स्वच्छते विषयीची प्रत्येक कृती, देईल सामाजिक आरोग्याला गती. 14) " स्वच्छता" माणसाचे आत्मदर्शन घडविते. 15) वैयक्तिक स्वच्छतेची महती, रोगापासुन मिळेल मुक्ति. 16) हातात मोबाईल घरात फोन , उघड्यावर शौचाला बसलयं कोण. 17) जेवणापूर्वी धुवा हात, जेवणानंतर धुवा दात. 18) नखे कापा बोटाची , नाही होणार व्याधि पोटाची. 19) असेल दृष्टी , तर दिसेल स्वच्छ सृष्टि. 20) संडास बांधा घरोघरी , आरोग्य नांदेल त्याच्या दारी. 21) सांडपाण्याला आळा , रोगाराई टाळा. 22) स्वच्छ सुंदर परिसर , जीवन निरोगी निरंतर. 23) स्वच्छ शाळा करा हातांनी , सुंदर गाणी गाऊ मुखांनी. 24) स्वच्छ सुंदर परिसरातनुच , सुंदर सुसंस्कृत नागरिक घडतात. 25) गावकरी मिळुन एक काम करू, शौचालयाचा वापर करू. 26) शौचालय असेल जेथे , खरी प्रतिष्ठा येईल तेथे. 27) संडास बांधण्या नाही म्हणू नये, शौचाला लोटा घेऊन जाऊ नये. 28) स्वच्छ घर , सुंदर परिसर , शोष खड्याचा करुया वापर. 29) कचरा कुंडिचा वापर करू , ल सुंदर परिसर निर्माण करू. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

*🌺वाचावीत अशी १०० पुस्तके🌺* 📚✍🏻📕📗🗞📖🗃 *०१) ययाती* = वि. स. खांडेकर *०२) वळीव* = शंकर पाटील *०३) एक होता कार्वर* = वीणा गवाणकर *०४) शिक्षण* = जे. कृष्णमूर्ती *०५) अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम* = शंकरराव खरात *०६) शिवाजी कोण होता*- गोविंद पानसरे *०७) बनगरवाडी* = व्यंकटेश माडगुळकर *०८) तीन मुले* = साने गुरुजी *०९) तो मी नव्हेच* = प्र. के. अत्रे. *१०) आय डेअर* = किरण बेदी *११) तिमिरातुन तेजाकड़े*- डॉ. नरेंद्र दाभोलकर *१२) मृत्युंजय* = शिवाजी सावंत *१३) फकिरा* = अण्णाभाऊ साठे *१४) जागर* - *१५) अल्बर्ट एलिस* - अंजली जोशी *१६) प्रश्न मनाचे* - डॉ. हमीद आणि नरेंद्र दाभोलकर *१७) समता संगर*- डॉ. नरेंद्र दाभोलकर *१८) निरामय कामजीवन* = डॉ. विठ्ठल प्रभू *१९) ठरलं डोळस व्हायचं*- डॉ. नरेंद्र दाभोलकर *२०) मी जेव्हा जात चोरली* - बाबुराव बागुल *२१) गोपाळ गणेश आगरकर* = ग. प्र. प्रधान *२२) कुमारांचे कर्मवीर* - डॉ. द. ता. भोसले *२३) खरे खुरे आयडॉल*- यूनिक फीचर्स *२४) सत्याचे प्रयोग* = मो. क. गांधी *२५) प्रकाशवाटा* - प्रकाश आमटे *२६) अग्निपंख*- डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम *२७) लज्जा* - तसलीमा नसरीन *२८) दैनंदिन पर्यावरण* - दिलीप कुलकर्णी *२९) रणांगण* = विश्राम बेडेकर *३०) बटाट्याची चाळ* = पु.ल.देशपांडे *३१) श्यामची आई* = साने गुरुजी *३२) माझे विद्यापीठ ( कविता )* = नारायण सुर्वे *३३) बि-हाड* - अशोक पवार *३४) व्यक्ति आणि वल्ली* = पु.ल.देशपांडे *३५) माणदेशी माणसं* = व्यंकटेश माडगुळकर *३६) उचल्या* = लक्ष्मण गायकवाड *३७) अमृतवेल* = वि.स.खांडेकर *३८) नटसम्राट* = वि.वा.शिरवाडकर *३९) हिरवा चाफा* = वि.स.खांडेकर *४०) क्रोंचवध* = वि.स.खांडेकर *४१) झोंबी* = आनंद यादव *४२) इल्लम* = शंकर पाटील *४३) ऊन* = शंकर पाटील *४४) झाडाझडती* = विश्वास पाटील *४५) नाझी भस्मासुराचा उदयास्त* = वि.ग. कानिटकर *४६) बाबा आमटे* = ग.भ.बापट *४७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर* = शंकरराव खरात *४८) इस्त्राइलची शेती*- *४९) बहाद्दुर थापा* - संतोष पवार *५०) सेकंड सेक्स* - सिमोन *५१) आई* = मोकझिम गार्की *५२) स्वभाव , विभाव* = आनंद नाडकर्णी *५३) बलुत* = दया पवार *५४) कर्ण , खरा कोण होता* = दाजी पणशीकर *५५) स्वामी* = रणजीत देसाई *५६) वपुर्झा ( भाग १-२ )* = व. पु. काळे *५७) पांगिरा* = विश्वास पाटील *५८) पानिपत* = विश्वास पाटील *५९) युंगंधर* = शिवाजी सावंत *६०) छावा* = शिवाजी सावंत *६१) श्रीमान योगी* = रणजीत देसाई *६२) जागर खंड – १* = प्रा. शिवाजीराव भोसले *६३) जागर खंड – २* = प्रा. शिवाजीराव भोसले *६४) वावटळ*- व्यंकटेश माडगुळकर *६५) ग्रेटभेट* - निखिल वागळे *६६) भारताचा शोध* = पंडित जवाहरलाल नेहरू *६७) गोष्टी माणसांच्या* = सुधा मूर्ती *६८) वाईज अंड आदर वाईज* *६९) उपेक्षितांचे अंतरंग* = श्रीपाद महादेव माटे *७०) माणुसकीचा गहिवर* = श्रीपाद महादेव माटे *७१) यश तुमच्या हातात* = शिव खेरा *७२) आमचा बाप अन आम्ही* = डॉ. नरेंद्र जाधव *७३) कोसला* = भालचंद्र नेमाडे *७४) गांधीनंतरचा भारत*- रामचंद्र गुहा *७५) आधुनिक भारताचे निर्माते*- रामचंद्र गुहा *७६) नापास मुलांची गोष्ट* = अरुण शेवते *७७) एका कोळियाने* = अन्रेस्ट हेमींग्वे *७८) महानायक* = विश्वास पाटील *७९) आहे आणि नाही* = वि. वा. शिरवाडकर *८० ) चकवा चांदण* – एक विनोपनिषद = मारुती चितमपल्ली *८१) मिरासदार*- द. मा. मिरासदार *८२) सुरेश भट यांचे* सर्व कविता संग्रह *८३) ग्रामगीता* = राष्ट्रसंत तुकडोजी महाराज *८४) स्पर्धा काळाशी*- अरुण टिकेकर, अभय टिळक *८५) बदलता भारत*- भानु काळे *८६) कोल्हाटयाचं पोरं*- किशोर काळॆ *८७) साता उत्तराची कहानी*- ग. प्र. प्रधान *८८) मध्ययुगिन भारताचा इतिहास*- मा. म. देशमुख *८९) तोत्तोचान* = तेत्सुको कुरोयानागी *९०) शिक्षक असावा तर …?* = गिजुभाई *९१) समग्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर*- चांगदेव खैरमोडे *९२) समग्र महात्मा फुले*- राज्य सरकार *९३) झोत*- रावसाहेब कसबे *९४) ओबामा* - संजय आवटे *९५) एकेक पान गळावया*- गौरी देशपाडे *९६) आई समजुन घेताना*- उत्तम कांबळे *९७) छत्रपति शाहू महाराज* - जयसिंगराव पवार *९८) अमृतवेल*- वि. स. खांडेकर *९९) महात्म्याची अखेर*-जगन फडणीस *१००) बुद्ध आणि त्याचा धम्म*- डॉ. बाबासाहेब आंबेडकर