✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 29/11/2017 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९९६: नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांना त्यांची मायभूमी अल्बानियाचा सर्वोच्‍च नागरी पुरस्कार गोल्डन ऑनर जाहीर. २०००: शास्त्रीय गायक गुलाम मुस्तफा खाँ आणि घटमवादक टी. एच. विक्‍कू विनायक राम यांना उस्ताद हफीज अली खाँ स्मृती पुरस्कार जाहीर. २०००: दक्षिण अफ्रिकेचे माजी अध्यक्ष डॉ. नेल्सन मंडेला व बांगलादेशच्या ग्रामीण बँकेस गांधी शांतता पुरस्कार जाहीर. 💥 जन्म :- १९०७: प्रसिद्ध लेखक गोपीनाथ तळवलकर यांचा जन्म.  १९०८ - एन.एस. क्रिश्नन, तमिळ चित्रपट अभिनेता. १९३२ - जाक शिराक, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष. १९७७ - युनिस खान, पाकिस्तानचा क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  १९५९ - गोविंद सखाराम सरदेसाई - मराठी इतिहासकार १९९३: जे. आर. डी. टाटा तथा जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा यांचे निधन. भारतीय उद्योजग तसेच ते भारताचे पहिले वैमानिक व भारतीय विमान वाहतुकीचे जनक होते.  २०११ - इंदिरा गोस्वामी, आसामी साहित्यिक, कवयित्री, संपादिका. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *विकासासाठी महिला सशक्तीकरण आवश्यक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन* ----------------------------------------------------- 2⃣ *नाह्युल पेरेझ बिस्कियार्ट याला मिळाला बेस्ट एक्टरचा इफ्फी पुरस्कार, 120 बीपीएम सिनेमातल्या अभिनयासाठी मिळाला पुरस्कार* ----------------------------------------------------- 3⃣ *नवी दिल्ली - प्रदीप सिंह खरोला एअर इंडियाचे नवे प्रमुख आणि व्यवस्थापकीय संचालक* ----------------------------------------------------- 4⃣ *समाजसेवक अण्णा हजारे 23 मार्चपासून मोदी सरकारविरोधात आंदोलन करणार सुरु* ----------------------------------------------------- 5⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या हस्ते झालं हैदराबाद मेट्रोचं उद्धाटन.* ----------------------------------------------------- 6⃣ *नागपूर येथे भरणारे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या ११ डिसेंबरपासून सुरू होणार असून २२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.* ----------------------------------------------------- 7⃣ *आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजारा दुसऱ्या स्थानी तर कर्णधार विराट कोहली पाचव्या स्थानी* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ=========            *शिक्षकांना शिकवू द्या ...* शाळाबाह्य कामावर बहिष्कार टाकल्यामुळे 27 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई झाल्याची बातमी वाचण्यात आली. राज्यातील बहुउद्देशीय कर्मचारी म्हणजे शिक्षक. कोणत्याही सरकारी कामासाठी सहज उपलब्ध होणारा आणि सांगितलेले काम मुकाट्याने करणारा कर्मचारी म्हणजे शिक्षक. वास्तविक पाहता शिक्षकांचे........... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_27.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========       *गोपीनाथ गणेश तळवलकर* गोपीनाथ गणेश तळवलकर  (२९ नोव्हेंबर, इ.स. १९०७ - ७ जून, इ.स. २०००) हे मुलांच्या आनंद मासिकाचे संपादक व एक ख्यातनाम बालसाहित्यिक होते. प्रौढ साक्षरांसाठीही त्यांनी लिखाण केले. कणिका, खंडकाव्य, बालकविता असे विविध काव्यप्रकार हाताळूनही त्यांचे नाव झाले नाही. आकाशमंदिर, छायाप्रकाश, नंदिता या कादंबर्‍या, ज्ञानेश्वरीतील सौंदर्यविश्व हे रसग्रहण, तसेच मुलांसाठीची अनेक पुस्तके त्यांनी लिहिली होती. त्यांचे काही लिखाण ’गोपीनाथ’ या टोपणनावाने केलेले आहे. आकाशवाणीवरील बालप्रिय बालोद्यान या कार्यक्रमातील नाना म्हणजेच गोपीनाथ तळवलकर. तळवलकर हे पुणे केंद्रावर बालविभागप्रमुख होते. बालोद्यान हा मुलांचा कार्यक्रम ते आयोजत. दर रविवारी सकाळी दहा वाजता बालगोपाळांच्या गच्च उपस्थितीत हा कार्यक्रम होत असे. यास स्टुडियोचे दार जेमतेम बंद करता येण्याइतकी गर्दी होत असत. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= अनेक वेळा चांगले क्षण/ आशीर्वाद हे कठोर प्रसंगांच्या वेशभूषेत येतात. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१)  पिनकोडचे विस्तारीत रूप काय आहे?* 👉      postal Index Number *२)  पिनकोडमध्ये किती अंक असतात?* 👉      ६ *३)  भारतात पिनकोड कधीपासून सुरू झाला?* 👉      १५ ऑगस्ट १९७२ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 साईनाथ बोईनवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *डोक्यातला किडा* कोणा कोणाच्या डोक्यात वळवळता किडा असतो सर्वांच्या विचारा पेक्षा त्याचा विचार बडा असतो घाई गडबडीत तो त्याचा निर्णय घेतो घाईत निर्णय घेऊन तो परेशान होतो   शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *रोजची प्रसन्न सकाळ ही नवी उमेद देणारी देणगी असते. पूर्व दिशेची अद्भूत रंगांची उधळण ही रोजच नवी असते. पक्षांची रोज नवी नादमधूर सूरांची मैफील रंगते. पक्षांच्या सुरेल किलबिलाटानं मन प्रसन्न होतं. चालण्याच्या व्यायामानिमित्त नेहमीच दिसणारी तीच ती झाडं; पण रोजच कशी नवी, टलटवीत, हिरवीकंच दिसतात!  नयनरम्य फुलांचे घोस मनाला नवा तजेला देतात. कालच्या सुंदर घोसातील फुलं आज मात्र कोमेजून मातीत गळून पडली होती. झाडावरच्या घोसातील मुग्ध कळ्यांचं हळुवार उमलणं, उमलत्या पाकळ्यांची सुबक लकब मनाला मोहविणारी होती. मातीत गळून पडलेली कोमेजलेली फुलं आपला सुगंध घेऊन मातीत एकजीव होण्याची ही अदिम ओढ तर नसावी ना!* *फुलांचं फुलणं, झाडांचं डवरणं हे जितकं अद्भूत, सुंदर; पानांचं, फुलांचं गळून मातीत एकजीव होणंही तितकंच अदभूत आणि सुंदर. मातीसंबंधी कृतज्ञता व्यक्त करण्याचा किती विनम्र भाव. सृजनसोहळा मन प्रसन्न करणारा तसाच आणि तितकाच निर्वाण सोहळाही. ही तर निसर्गाचीच अद्भूत किमया. उदय, विकास, अंत या अवस्था अपरिहार्य, अटळ तशा स्विकाराहार्यही असाव्यात. पण माणूस प्राणी हा उदय-विकासाचे टप्पे मनापासून स्वीकारतो. अंताचा टप्पा स्वीकारणं हे मात्र अवघड, असह्य होतं. निसर्गातल्या प्रत्येक घटकाला निसर्गाचा हा नियम लागू आहे. बुद्धिमान, विवेकनिष्ठ माणसाला मात्र कळतं, पण वळत नाही.*             ‼ *रामकृष्णहरी* ‼    🌸🌸🌸 🌸 🌸 🌸 🌸🌸🌸      *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*         📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्यांच्या घरात संस्कार आणि संस्कृतीचे जतन केले जाते त्याचबरोबर आदर्श नैतिक जीवनमूल्यांची  जोपासना केली जाते अशा घरात नेहमी शांती, समाधान, स्थैर्य आणि समृद्धी लाभत असते.तेथे कधीही वादविवाद,दुरावा, भेद,मत्सर यांना वाव मिळत नाही.अशा घरातल्या शेजारी आपले घर आणि सहवास लाभला तर आपलेअहोभाग्य समजावे. *व्यंकटेश काटकर, नांदेड.*    संवाद..९४२१८३९५९०/              ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= ☀☀ सर्व श्रेष्ठ बळी ☀☀ सर्व श्रेष्ठ आहे जगी बळराजाचा हा मान । चाढ्यावर मूठ सदा काढी मातीतून सोन।।      कष्ट हे आयुष्य भर      समीकरण हेत्याचे ।      राब राबून शिवारी      जगन्याला वेचायचे ।। कीरती बळीराजाची आहे जगात चौफेर  । जगने फक्त जनासाठी प्रामाणिक तो विचार  ।।       चढ ऊतार हे जीवनी       येतात हे कधी कधी  ।       मात्र बळी राजाचीअसते       हमेशा मंदीत गाधी  ।। विचाराचे ते वादळ घोंगावत राही सदा । बळी फक्त सोशीतसे कधी सँल होईल ?मूद्दा ।।       आसा माझा बळी त्याला       राजा म्हणतात सगळे  ।       मासा नाही गावला तर       ऊडून जातात हे बगळे ।। ✍ सुभाष पांचाळ, परभणी...       9822431457 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ=========                      *वात्सल्य* एकदा देवांनी जाहीर केले की, सा-या पशूंमध्ये ज्याचे मूल सर्वात सुंदर दिसेल त्याला एक मोठे बक्षिस मिळेल. ही सूचना ऐकल्यावर सर्व पशु आपापल्या मुलांना घेऊन प्रतियोगितेंच्या ठिकाणी हजर झाले. त्यातच एक माकडीण होती. तिच्या हातांच्या झुल्यात ती आपले चिमुकले पिलू झुलवत होती. नकटया, चपटया नाकाचे, अंगावर केस असलेले ते पिलू मजेशीर दिसत होते. डोक्याचा कोबीचा कांदाच जणू! एकंदरीत ते ध्यान पाहता सारे पशु खदखदा हसू लागले. माकडिणीला जाणवत होते की तिची टर उडवित आहेत. माकडीणीने आपल्या चिमुकल्याला हृदयाशी अधिकच कवटाळून धरले आणि ती म्हणाली, 'सुंदरपणाचे बक्षिस देवांनी हवे त्याला द्यावे. पण मला मात्र माझे मूलच सर्वात सुंदर दिसते आणि तेच माझे सर्वात मोठे बक्षिस आहे...' तात्पर्य -  आपले मूल कसेही असले तरीही प्रत्येक आई त्याच्यावरून सारे जग ओवाळून टाकते.  *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 28/11/2017 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १०९५ - क्लेमोंटच्या सभेच्या शेवटच्या दिवशी पोप अर्बन दुसरा याने ले पो चा बिशप अधेमर व तुलुचा काउन्ट रेमंड चौथा यांना पहिल्या क्रुसेडचे नेता केले. १५२० - फर्डिनांड मॅगेलनने दक्षिण अमेरिकेची सामुद्रधुनी पार केली व अटलांटिक महासागरातून पॅसिफिक महासागरात जहाज नेणारा पहिला युरोपियन ठरला २०००: तेलगू भाषेतील महाकवी गुर्रम जाशुवा यांच्या नावाने दिला जाणारा साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वे यांना जाहीर. 💥 जन्म :- १८५३ - हेलेन मॅगिल व्हाइट, पी.एच.डी.ची पदवी मिळवणारी पहिली अमेरिकन स्त्री. १९११ - वाक्लाव रेंच, चेक कवी. १९५० - एड हॅरिस, अमेरिकन अभिनेता. १९५० - रसेल ऍलन हल्स, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ. 💥 मृत्यू :-  १८९० - महात्मा जोतीराव फुले, भारतीय समाजसुधारक. १९६७: सशस्त्र क्रांतिकारक पांडुरंग महादेव तथा सेनापती बापट  *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नक्षलवाद्यांनी रविवारी रात्री पोलीस दलाच्या तुकडीवर हल्ला केला. या चकमकीत एक जवान शहीद, तर दोन जवान गंभीर जखमी झाले.* ----------------------------------------------------- 2⃣ *मुंबईच्या प्रवाशांसाठी नाताळचे गिफ्ट, 25 डिसेंबरपासून सुरु होणा एसी लोकल - रेल्वेमंत्री पीयूष गोयल* ----------------------------------------------------- 3⃣ *जालना शहरातील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्यास सुरूवात. नगरपालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम. शहरातील १०९ ठिकाणचे अतिक्रमण हटविण्याची मोहीम.* ----------------------------------------------------- 4⃣ *गडचिरोली - घनदाट जंगलात फसलेल्या 60 जवानांना बाहेर काढण्यात सी-60 कमांडोंना यश.* ----------------------------------------------------- 5⃣ *नाशिक- लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या भावात घसरण. आज कांद्याला जास्तीत जास्त 3380 रूपये भाव.* ----------------------------------------------------- 6⃣ *दक्षिण आफ्रिकेची डेमी नेल पीटर्स यंदाची मिस युनिव्हर्स.* ----------------------------------------------------- 7⃣ *दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा श्रीलंकेवर एक डाव 239 धावांनी दणदणीत विजय, मालिकेत भारताची 1-0 आघाडी* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *गोरगरीबांचे कैवारी : महात्मा फुले* भारतीय समाजसुधारणेत व स्वातंत्र्य चळवळीत ज्यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते ती व्यक्ती म्हणजे जोतीराव गोविंदराव फुले. जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्याना ‘महात्मा’ ही उपाधी दिली. त्यामुळे ज्योतिबा फुले हे महात्मा फुले या नावाने सर्वत्र ओळखले जाऊ लागले. महात्मा फुले यांच्या वडिलांचे नाव.......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_26.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *सेनापती बापट* पांडुरंग महादेव बापट ऊर्फ सेनापती बापट (नोव्हेंबर १२, इ.स. १८८० - नोव्हेंबर २८, इ.स. १९६७) हे भारतीय क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक  होते. त्यांच्या आईचे नाव गंगाबाई. त्यांचे प्राथमिक शिक्षण व माध्यमिक आणि बी.ए. पर्यतचे उच्च शिक्षण मुख्यत्वे करून पुणे येथे झाले. अहमदनगरला मॅटिकची परीक्षा दिली, तेव्हा त्यांना संस्कृतची जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळाली. त्यांना बी.ए. परीक्षेत इ.स. १९०३ साली उत्तीर्ण झाल्यावर मुबंई विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळवून त इंग्लंडला गेले एडिंबरो येथे त्यांनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांचे मूळ गाव हे  अहमदनगर  जिल्ह्यातील  पारनेर हे आहे.  पारनेर  तालुक्यातील गणेशखिंड येथील गणपती मंदिरात ते राहत असत . या मंदिरापासून सेनापती बापटांचे पारनेर शहरातील मूळ घर यांदरम्यान मोठा भुयारी मार्ग आहे या मार्गाची सध्या पडझड झाली आहे त्यांचे पारनेर मधील घर सेनापती बापट स्मारक म्हणून ओळखले जाते *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) इस्त्रो या अंतराळ संशोधन संस्थेची स्थापना कधी झाली?* 👉 १५ ऑगस्ट १९६९ *२) इस्त्रोचे मुख्य कार्यालय कुठे आहे?* 👉 बंगळूरू *३) यासाठी कुठे अवकाशतळ कार्यान्वित केले?* 👉 श्रीहरीकोटा *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 राम चव्हाण, नांदेड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *खेळी* कोणा कोणाची कुटील खेळी असते त्या खेळीचा कोणी उगीच बळी असते कुटील खेळीत अशा जावो ना कोणी बळी कधी कोणी खेळू नये असली कुटील खेळी शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'मृत्यू' ही कल्पना अस्वस्थ करणारी असली, तरी अटळ आहे. " जिवासवे जन्मे मृत्यू, जोड जन्मजात" असे गीत रामायणात म्हटले आहे. माणसाच्या जन्माबरोबरच त्याच्या मृत्यूचाही जन्म होत असतो, हे अटळ सत्य कुणाला दु:ख देणारे, कुणाला भयभीत करणारे, कुणाला अंतर्मुख करणारे असते. मृत्यू अटळ असेलच तरी तो कसा यावा, त्यासाठी आपण काय करावे, कोणते संचित जमा करावे आणि जन्माचे सार्थक करावे याचा विचार मात्र माणूस करू शकतो.* *खुनी गुन्हेगाराला फाशीची शिक्षा होते आणि क्रांतीकारकांनाही फाशीची शिक्षा होते. दोघांचाही फाशीनेच मृत्यू होतो. पण क्रांतीकाराच्या मृत्यूने लाखो अंत:करणे विदीर्ण होतात आणि खुन्याच्या फाशीने विषण्णता आली तरी अनेकांना हायसे वाटते. याबाबतीत दोन पोपटांची गोष्ट बोलकी आहे. पहिला पोपट अपचन होऊन पोट फुगून मरण पावला, तर दुसरा पोपट मोकळा श्वास घेण्यासाठी उपाशीपोटी लढत राहिला अन् तोही मरण पावला. एकाच्या मृत्यूने विषाद निर्माण केला तर दुस-याच्या मृत्यूने बघणा-यांच्या मनात निषादस्वर उमटले. " विषाद आणि निषाद यातला कोणता मृत्यू चांगला ?"* ••●🛡‼ *रामकृष्णहरी* ‼🛡●•• ❤❤❤❤❤❤ *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*         📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्यांच्या घरात संस्कार आणि संस्कृतीचे जतन केले जाते त्याचबरोबर आदर्श नैतिक जीवनमूल्यांची जोपासना केली जाते अशा घरात नेहमी शांती, समाधान, स्थैर्य आणि समृद्धी लाभत असते. तेथे कधीही वादविवाद,दुरावा, भेद,मत्सर यांना वाव मिळत नाही. अशा घरातल्या शेजारी आपले घर आणि सहवास लाभला तर आपलेअहो भाग्य समजावे. *व्यंकटेश काटकर, नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *।।सुविचार।।* अल्पसंतूष्ट सदा सुखी हाव करी तो होई दु:खी। जे मिळाले गोड मानावे पळत्या पाठी न धावावे। कुणाशी न करावी तुलना स्वत:चीच होते अवहेलना। जन्मास आलो मी दिगंबर परमार्थास नका देऊ अंतर। व्यर्थ हव्यास करू नये तो नशीबास दोष देवू नये तो। जे मिळाले ते दिले रामाने अर्पिले रामास सारे प्रेमाने। वडिलधाऱ्यांची करू सेवा प्रपंचात करू नये हेवा। हाच असे मंत्र जगण्याचा ठेवा जपून साठा सुविचारांचा। सौ.मनिषा वाणी, सुरत ०९४२६८१०१०९. =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *लाख मोलाचा देह* एक भिकारी भीक मागता मागता एका श्रीमंत व्यापार्‍याच्या वाडयासमोर उभा राहून भीक मागू लागला. मालकाने सेवकाला त्याला वर बोलावयाला सांगितले. सेवक बोलवायला आलेला पाहून भिकार्‍याला खूप आनंद झाला. त्याच्या मनांत आशा निर्माण झाली की, वर बोलावलं म्हणजे बरच काही देणार असेल. वर गेल्यावर व्यापारी म्हणाला, 'हे बघ तुला मी पाचशे रूपये देतो पण त्याबद्दल देतो पण त्याबद्दल तु मला तुझे डोळे दे' 'छे ! छे ! हे कसं शक्य आहे ? डोळे दिले तर मी काहींच करू शकणार नाही.' भिकारी म्हणाला. 'बरं मग असं कर हात तरी देतोस कां?' व्यापारी म्हणाला. अशाप्रकारे व्यापारी प्रत्येक अवयवाची किंमत वाढवत होता पण भिकारी एकही अवयव द्यायला तयार नव्हता. व्यापारी म्हणाला 'बघ ५००-५०० रूपये म्हटले तरी तुझ्या देहाची किंमत लाखाच्यावर झाली. एवढा लाख मोलाचा धडधाकट देह असतांना भीक कां मागतोस ? कष्ट कर पैसे मिळवं'.  *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📚📚📚📚📚📚📚 *✍आज दि.२७/११/२०१७* रोजी जि.प.प्राथ. शाळा वाटेगाव ता.हदगाव जि.नांदेड येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 📚📚📚📚📚📚📚 यानिमित्ताने प्रथमतः डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मा.मु.अ.श्री चव्हाण सर , 🔸 विद्यार्थी व शिक्षक यांनी केले. 💐💐💐💐 त्यानंतर स.शि.श्री चव्हाण सरांनी ,श्री रामटेके सरांनी संविधानाविषयी माहिती सांगितली. 🔸श्रीमती सेनकुडे मँडम यांनी संविधान दिनाचा घोषणा, हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश विशद केला व वैशिष्ट्ये सांगितले. 🔸श्रीमती लोने ,काकडे मँडम , यांनी संविधान याबाबत मार्गदर्शन केले. 📚📚📚📚📚 *सर्व विद्यार्थी ,शिक्षक,अंगणवाडीताई यांनी एकञितपणे संविधानाचे वाचन केले.* ➖➖➖➖➖➖➖ *✍शब्दांकन* श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (स.शिक्षिका) जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव जि.नांदेड. 🙏🙏🙏🙏🙏🙏

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 27/11/2017 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९९५: गझलांच्या दुनियेतील स्वामी तलत महमूद यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर. २०१६: निको रोसबर्ग २०१६ फोर्मुला १ चा चाम्पियान बनला. 💥 जन्म :- १८८८: भारतीय लोकसभेचे पहिले सभापती गणेश वासुदेव मावळंकर यांचा जन्म. १८४३ - कॉर्नेलियस व्हान्डरबिल्ट तिसरा, अमेरिकन उद्योगपती. १९०३ - लार्स ऑन्सेगर, नोबेल पारितोषिक विजेता नोर्वेचा रसायनशास्त्रज्ञ. १९८६ - सुरेश रैना, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  १९७८ - लक्ष्मीबाई केळकर, भारतीय समाजसेविका, राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका. २००८: भारताचे ७ वे पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांचे निधन *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *आता शेतक-यांनाही समजलं आहे की पिकाची चिंता करायची असल्यास धरतीमातेची काळजी घ्यावी लागेल- पंतप्रधान नरेंद्र मोदी* ----------------------------------------------------- 2⃣ *आर्थिकदृष्टया सक्षम असतानाही आरक्षण मागणे ही माझ्या मते लाचारी आहे- सुशीलकुमार शिंदे* ----------------------------------------------------- 3⃣ *भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे, देशातील बँकिंग सेवा सर्वांसाठी आहे. इस्लामिक बँक आणण्याचा कोणताही प्लान नाही- मुख्यात अब्बास नक्वी, केंद्रीय मंत्री* ----------------------------------------------------- 4⃣ *औरंगाबाद : डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीच्या मतमोजणीत अभूतपूर्व गोंधळ* ----------------------------------------------------- 5⃣ *जकार्ता : इंडोनेशियामधील बाली बेटावरील एगंग पर्वतामधील ज्वालामुखीच्या हालचाली तीव्र वाढल्या असून, केव्हाही उद्रेकाची शक्यता रविवारी वर्तविण्यात आली आहे.* ----------------------------------------------------- 6⃣ *पुणेः मेट्रो रेल्वे स्टेशनच्या उभारण्यासाठी शिवाजीनगर येथील धान्य गोदामे आणि पुरवठा विभागाची पाच कार्यालये येत्या आठ दिवसांत हलवण्यात येणार* ----------------------------------------------------- 7⃣ *नागपूर कसोटी - तिसऱ्या दिवसाअखेरीस श्रीलंकेची धावसंख्या एक बाद 21, भारताकडे 384 धावांची आघाडी,  रोहत शर्माचे दमदार शतक* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *कथा - सुंदर* त्‍याचं नाव सुंदर, तसं त्‍याचं कामही सुंदर त्‍याप्रमाणेच मन ही सुंदरच होतं.  परंतु सारेच जण त्‍याला बंदर म्‍हणायचे.  कारण ही तसेच होते, मूळात तो दिसायचा आफ्रिका देशातील निग्रो लोकांसारखा एकदम काळाकुट्ट, अगदी बारीक नाक आणि गरगरीत लहान डोळे गालात खोल........ वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://kathamaala.blogspot.com/2017/05/blog-post_90.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *गणेश वासुदेव मावळणकर* गणेश वासुदेव मावळणकर (जन्म २७ नोव्हेंबर १८८८ रोजी बडोदा येथे झाला असून मृत्यू २७ फेब्रुवारी १९५६ रोजी ) अहमदाबादहे इ.स. १९५२ साली स्वतंत्र भारतात झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीद्वारे, तत्कालीन मुंबई प्रांतात असलेल्या अहमदाबादमधूनलोकसभेवर निवडून गेलेले संसद सदस्य होते. निवडणुकीनंतर बनलेल्या पहिल्या लोकसभेचे ते पहिले अध्यक्ष झाले. ग.वा. मावळंकर हे मराठी कुटुंबातील असून त्यांचे मूळ गाव हे तत्कालीन ब्रिटीश भारतातील मुंबईप्रांताच्या रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर जवळचे मावळंगे हे होय. त्यांचे प्राथमिक शिक्षण राजापूर येथे आणि उच्च शिक्षण अहमदाबाद येथे झाले. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *ज्यांचे डोळे चांगले ते जगाच्या प्रेमात पडतात, पण ज्यांची जीभ गोड असेल तर जग त्यांच्या प्रेमात पडते* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) देशी बनावटीचे पहिले विमान बनविणारे वैमानिक कोण?* 👉 अमोल यादव *२) देशात ४८वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोठे पार पडणार आहे?* 👉 दिल्ली *३) मृत्यूंजय कादंबरीचे लेखक कोण आहेत?* 👉 शिवाजी सावंत *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 गायत्री सोनाजे, साहित्यिक 👤 राहुल कुमार 👤 पंकज सेठिया 👤 ओंकार बच्चुवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *स्वाभिमान* लाथ मारून काही स्वतःहून चूकतात ज्याच्या पुढे नाही त्याच्या पुढे झुकतात लाथ लागू दिली नाही तर झुकायची गरज काय स्वाभिमानाने जगायचे तर जपून टाकावा पाय शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *एप्रिल महिन्याच्या मध्यातून सूर्याच्या तापण्याला गती प्राप्त होते नि बघता बघता वैशाखात तो रौद्र रूप धारण करतो. मानवी जीवनच नाही तर प्राणी, पक्षी एकूणच सर्व जीवसृष्टी त्याच्या प्रखरतेने कासावीस होते. होरपळून निघणा-या वसुंधरेला मृगधारांचा ध्यास लागतो. सागाची गळलेली पानं, करपलेली धरा, वाळलेली झुडपं....मनाला एक प्रकारची विषण्णता देऊन जातात. दाहीदिशांनी अंगावर येणारा हा आगडोंब झेलीत जीवसृष्टी आपलं अस्तित्व वाचविण्याचा प्रयास करीत असते.* *भाजून निघालेली वनश्री एखाद्या पावसाच्या शिडकाव्यानं शांत होत नाही तोच अचानक पेटलेला वणवा तिला कवेत घेतो. तो विझवताना मानवी सामर्थ्य किती दुबळं आहे याची प्रचीती येते. वातावरणातील दाहकतेपेक्षाही प्रखर अनुभूतीचा हा वैशाखवणवा मनामध्ये चेतवून काळाच्या उदरात संदर्भहीन झालेल्या अनेक गोष्टींचं अस्तित्व भस्मसात होतं, परंतु त्याची आचही आपल्याला लागत नाही न दिसतो पेटलेला वणवा.* *' बुझा सका है भला* *कौन वक्त के शोले* *ये ऐसी आग है जिसमें* *धुंआ नही मिलता...'* ••●🌸 ‼ *रामकृष्णहरी* ‼ 🌸●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*         📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ=========    जीवनात अनेक प्रश्न गुंतागुंतीचे असतात.असे प्रश्न आपण कितीही सोडवण्याचा प्रयत्न केला तरी ते सुटत नाहीत.अशावेळी आपण हतबल होतो. त्यातून आपली सुटका व्हावी.काहीतरी मार्ग निघावा असे वाटते. मग आपण जिथे यावर तोडगा निघणार आहे, आपल्या मनाला समाधान मिळणार आहे.अशाठिकाणी जाऊन आपण आपला संसारुपी भवसागर तरुण जाण्यासाठी   कुणाचातरी धावा करतो अर्थात परमेश्वराचा.पण परमेश्वर काही येत नाही. परंतू परमेश्वराने आपला प्रतिनिधी म्हणून आपल्याकडे गुरुला पाठविले. जीवनाला योग्य दिशा मिळावी म्हणून ज्यांचे आढळाचे स्थान आपल्या जीवनात आहे.ज्यांच्यावर आपली नितांत श्रद्धा आहे अशा ईश्वररुपी गुरुच्या सानिध्यात राहून त्यांचे मार्गदर्शन घेतो आणि आपल्या जीवनाचे कल्याण करुन घेतो.या जगात सर्वात जास्त आणि आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारे गुरू हेच आपले परमेश्वर आहेत.हे कधीही विसरुन चालणार नाही. *व्यंकटेश काटकर, नांदेड*   संवाद.८०८७९१७०६३/९४२१८३९५९०. =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= 🌺🌺प्रशंसा🌺🌺 प्रशंसा आवडे ना ऐसा व्यक्ती कोण हो जगात प्रशंसा केल्याविना देव पावतो का हो आम्हास देवादिकाची अभिलाषा तया प्रशंशेची ही आशा आमची जात माणसाची नको वाटे कधी निराशा एक प्रशंसाच खेळ करी नव्या बदलाचा बसे मेळ कधी चांगले कधी वाईट परिणामाची होईच भेळ प्रशंसा करता माणसाची तया आनंद मनी कितीक सारे काही जोशात करतो होई पक्के कामाचे बेशीक करावी प्रशंसा योग्यतेची नको दुराचारी दुष्कर्मची होईल बदल चांगला मग कास धरता सदा सत्याची पांचाळ आर. सी. हिंगोली 8180858079 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *उज्ज्वल भवितव्यासाठी* एका उद्योगपतीने आपल्या कारखान्यात उच्च तंत्रज्ञान घेऊन आलेल्या एका इंजिनीयरची नेमणूक केली. त्याने आल्यावर महिन्याभरातच सार्‍या मशिन्स ठाकठीक केल्या. मशिन्सची काळजी कशी घ्यायची याचेही प्रशिक्षण त्याने कामगारांना दिले. दोन - तीन महिने झाले. त्याला काही कामच नव्हते. तो मालकाला भेटला. म्हणाला, सर ! मला तुम्ही मला फुकट पगार का देता ? सर्व मशिन्स व्यवस्थित सुरु आहेत. आता मी नसलो, तरी कारखाना ठिक चालेल. मालक म्हणाले, ते सर्व ठिक आहे. आज कारखान्यातली यंत्रं व्यवस्थित आहेत पण उद्या यातलं एखादं जरी मशिन बिघडलं, तरी माझं लाखो रुपयांचं नुकसान होईल. त्यावेळी मी तुला कुठे शोधू ? म्हणूनच उद्या बिघडणार्‍या मशिन्सच्या दुरुस्तीसाठी मी तुझी आजच व्यवस्था करुन ठेवली आहे. मी काय मूर्ख आहे, तुला पैसा फुकट द्यायला !  *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 26/11/2017 वार - रविवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १८६३: अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी नोव्हेंबर २६ हा थँक्सगिव्हिंग डे म्हणून घोषित केला. १९४९: भारताची घटना मंजूर झाली. १९४९: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केलेल्या संविधानास मान्यता मिळाली. १९८२: दिल्ली येथे ९वी आशियाई क्रीडा स्पर्धा संपन्न झाली. १९९७: शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर. 💥 जन्म :- १९२१: भारतीय दुग्धोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक, अमूलचे संस्थापक, राष्ट्रीय दुग्धोद्योग विकास महामंडळाचे (NDDB) संस्थापक अध्यक्ष व्हर्गिस कुरियन यांचा जन्म.  💥 मृत्यू :-  १९८५: कवी यशवंत तथा दिनकर पेंढारकर यांचे निधन. १९९४: चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर यांचे निधन.  *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इजिप्तमध्ये मशिदीवर झालेल्या हल्ल्याचा केला निषेध, या हल्ल्यात 235 नागरिकांचा झाला मृत्यू* ----------------------------------------------------- 2⃣ *मुंबई : मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचं मुंबई विमानतळावर करण्यात आलं जल्लोषात स्वागत* ----------------------------------------------------- 3⃣ *औरंगाबाद ः मराठवाड्यातील पहिले यकृत प्रत्यारोपण यशस्वी, एम. जी. एम. रुग्णालयात झाले प्रत्यारोपण. शनिवारी शहरात आणखी एक अवयवदान. यकृत, मूत्रपिंड आणि नेत्र दान यशस्वी. मुंबईतील ग्लोबल रुग्णालयाच्या टीमने पार पाडली महत्वपूर्ण भूमिका.* ----------------------------------------------------- 4⃣ *भ्रष्टाचार निर्मूलनासाठी भगवत गीतेची शिकवण आवश्यक. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचं वक्तव्य.* ----------------------------------------------------- 5⃣ *नागनाथआण्णा नायकवडी यांच्या स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी १६ कोटी देणार - देवेंद्र फडणवीस.* ----------------------------------------------------- 6⃣ *हाँगकाँग सुपर सीरिज बॅडमिंटन, भारताच्या पी.व्ही.सिंधू अंतिम फेरीत प्रवेश.* ----------------------------------------------------- 7⃣ *नागपूर- भारत विरूद्ध श्रीलंका दुसरी कसोटी. दुसऱ्या दिवस अखेर भारताच्या 2 बाद 312 धावा. पहिल्या डावात भारत 107 धावांनी आघाडीवर. मुरली विजय, चेतेश्वर पुजाराचं शानदार शतक.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *भारतीय संविधान दिवस* देशाचा राज्य कारभार सुरळीत चालण्यासाठी तयार करण्यात आलेले कायदे ज्या ग्रंथात एकत्रित करण्यात आले त्यास भारताचे संविधान असे म्हणतात. संविधानास राज्यघटना असे सुध्दा म्हटले जाते. संविधानातील तरतुदी लेखी स्वरूपात आहेत. याच आधारावर देशांतील लोकप्रतिनिधी नियमांच्या चौकटीत राहून आपला कारभार करीत असतात. नागरिकांचे हक्क, शासन संस्थेची............ वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_24.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *व्हर्गीस कुरियन* डॉ. वर्गीस कुरियन (लेखनभेद : व्हर्गिज, व्हर्गीस, व्हर्गिस)मल्याळम: വർഗ്ഗീസ് കുര്യൻ ; रोमन लिपी: Verghese Kurien) (नोव्हेंबर २६, इ.स. १९२१; कोळ्हिकोड, मद्रास प्रांत, ब्रिटिश भारत - सप्टेंबर ९, इ.स. २०१२; नडियाद, गुजरात, भारत) हे भारतीय अभियंते, उद्योजक होते. भारतीय दुग्ध क्रांतीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुरियन यांची अमूल या दुग्धप्रक्रिया उद्योगाच्या घडणीत मोठा वाटा होता. मॅगसेसे पुरस्कार (इ.स. १९६३), पद्मश्री (इ.स. १९६५), पद्मभूषण (इ.स. १९६६), पद्मविभूषण(इ.स. १९९९), जीवनगौरव इत्यादी पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. वर्गीज कुरियन यांचा जन्म ब्रिटिश भारतातील(वर्तमान भारताच्या  केरळ  राज्यातील) कोळ्हिकोड गावातल्या सीरियन ख्रिस्ती कुटुंबात नोव्हेंबर २६, इ.स. १९२१ रोजी झाला. वर्गीज कुरियन इ.स. १९४० साली मद्रास येथील लायोला कॉलेज येथून पदवीधर झाले. त्यानंतर त्यांनी मद्रास विद्यापीठातून बी.ई. (यंत्र अभियांत्रिकी) ही पदवी मिळवली. त्यापुढे वर्गीज कुरियन यांनी टाटा स्टील टेक्निकल इन्स्टिट्यूट, जमशेदपूर येथूनही पदवी प्राप्त केली. उच्च शिक्षणासाठी वर्गीज कुरियन सरकारी शिष्यवृत्ती मिळवून अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठात दाखल झाले. तेथे ते विशेष गुणवत्ता श्रेणीत उत्तीर्ण होत एम.एस्‌सी. (यंत्र अभियांत्रिकी) झाले. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *दुसऱ्याला आनंदी बघायला आवडणं हें अतिशय निरोगी मनाचे लक्षण आहे !!!* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१). भारतात संविधान दिन कधी साजरा केला जातो?* 👉. २६ नोव्हेंबर *२). भारतीय संविधान अंमलात कधीपासून आले?* 👉. २६ जानेवारी १९५० *३). भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हटले जाते?* 👉 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 संतोष लक्ष्मणराव सज्जन 👤 अर्जुन यनगंटीवार 👤 मुरलीधर हंबर्डे पाटील 👤 संजय बोंटावार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *बोलके* हल्लीचे लोक तर फार बोलके आहेत खुप छान बोलतात जसे ढोलके आहेत दोन्ही बाजूने वाजते ते म्हणजे ढोलके शब्द न पाळणारे काय कामाचे बोलके शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *मानवी जीवन हे सुखदु:खाच्या वाटेवरूनच पुढे जात असतं. जीवन पटाचं वस्त्र सुख दु:खाच्या धाग्यांनी तयार होत असतं. ते सुंदर जरतारी व्हावं, असं वाटणं स्वभावधर्मच आहे. दु:खाचा सल जाणवल्याशिवाय सुखाचं मोल कळत नाही. तरूणपणी स्वत:च्या सौंदर्याची जाण झाल्यामुळे आपण तारूण्याच्या धुंदीत सौंदर्याचा, सुखाचा आनंद उपभोगतो.* *हे सुख शाश्वत नसतं. वय आपलं काम करतच असतं. जीवनाचं अखेरचं पर्व, वृद्धावस्था सुरू झाली की, या गोष्टीत आनंद मिळत नाही. आपल्या मायेच्या माणसांनी प्रेमाचं, आपुलकीचं वस्त्र आपल्या अंगावर घालावं असं वाटतं. अशा त-हेने बालपण, तरूणपण व वृद्धावस्था हे जीवनपटाचं तीन अंकी वस्त्र विणलं जातं. आपल्या वाटेला येणारं सुखदु:खाचं वस्त्र जरतारी मानून जीवन व्यतीत करणं हेच आपल्या हातात असतं.* ‼ *रामकृष्णहरी* ‼ ☀☀☀☀☀☀☀☀☀ *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*         📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= कोणतीही कृती करण्यापूर्वी तुमच्या मनात नकारात्मक विचार कधीही येऊ देऊ नका कारण नकारात्मक विचार हेच तुमच्या चांगल्या करणा-या कृतीमध्ये बाधा आणतात. तुम्ही तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार जागृत करा आणि मन एकाग्रतेने करुन सातत्याने काम करत रहा आणि मग पहा तुम्हाला तुमच्या कामात यश मिळते का नाही ते.आपणच आपल्या मनाची तयारी आणि आत्मविश्वास जागृत ठेवला तर कोणतेही काम यशस्वीपणे पूर्ण होऊ शकते हे निश्चित. *व्यंकटेश काटकर, नांदेड.* =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *इटुकला ससा* इटुकला ससा सांगतो कसा रडणे सोडा खुदुखुदु हसा... हास्याचे मोती अनमोल फार हळूहळू खातो गाजर चार... सर्वांना सांगतो हसा पोटभर हास्याचा प्याला प्यावा घोटभर... दुडुदुडु धावतो मोकळ्या रानी हास्यमंत्र सांगे साऱ्यांच्या कानी... प्यारा न्यारा गुबरा ससा सर्वांना देतो हास्याचा वसा... गंभीर होते जंगल सारे सश्याने भरले हसरे वारे... मनिषा कुलकर्णी आष्टीकर परभणी =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *🙏मानवसेवा हीच खरी ईश्वर सेवा.*🙏 एक प्रसिद्ध संत होते. त्‍यांच्‍याकडे शिक्षण घेण्‍यासाठी दूरदूरवरून शिष्‍यगण येत असत. त्‍यांच्‍या शिष्‍य परिवारातील दोन शिष्‍य त्‍यांना खूप प्रिय होते. कारण ते दोघेही धार्मिक वृत्तीचे होते. दोघेही पहाटे लवकर उठून स्‍नान करून पूजापाठ करण्‍यात मग्‍न होते. चार तासांच्‍या पूजेनंतर ते दोघे थेट गुरुजवळ जात व आश्रमात येणा-या रूग्‍णांची सेवा करण्‍यास ते गुरुला मदत करत. त्‍या संतमहात्‍म्‍याने तर मानव सेवेचे व्रतच घेतले होते त्‍यामुळे स्‍वत: पुढाकार घेऊन पीडित,दीनदुबळ्यांची सेवा करत असत. गरीब मुलांना नि:शुल्‍क शिक्षण देत असत. गरीब कुटुंबाला ते अन्न,वस्‍त्र, निवारा उपलब्‍ध करून देत. असहाय, अनाथ व आजारी नागरिकांना आश्रय देऊन त्‍यांच्‍या उपचारांची व्यवस्‍था करत असत. एकेदिवशी त्‍यांचे दोन्‍ही शिष्‍य त्‍यांच्‍या दीर्घपूजेत व्‍यग्र होते. त्‍याचवेळी गुरुजींचे बोलावणे आले. कारण त्‍यादिवशी आश्रमात रुग्‍णांची संख्‍या जास्‍त होती. परंतु दोन्‍ही शिष्‍य पूजा अर्धवट सोडून गेले नाहीत. गुरुजींनी थोडा वेळ वाट पाहून पुन्‍हा निरोप धाडला. त्‍यावर त्‍या दोघांनी नाराजी व्‍यक्‍त केली व तेथे येऊन ते गुरुजींशी वाद घालू लागले. तेव्‍हा गुरुजींनी त्‍यांना पुढील शब्‍दात मार्गदर्शन केले,''वत्‍सांनो, मी तर व्‍यक्तिपूजेसाठी बोलावणे धाडले होते. पूजा, प्रार्थना तर देवतादेखील करतात. परंतु सेवा ही केवळ मनुष्‍यच करतो. सेवा ही प्रार्थनेच्‍या बरोबरीची असते. कारण ती नि:स्‍वार्थी आणि परोपकारी असते.'' यानंतर त्‍या दोन्‍ही शिष्‍यांचे डोळे उघडले. तात्‍पर्य :- ईश्‍वराची जिवंत कलाकृती म्‍हणजे माणूस त्‍याची सेवा म्‍हणजे साक्षात ईश्‍वराची पूजा असते व त्‍या सेवेपेक्षा अन्‍य कोणतीही पूजा ही मोठी नाही. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 23/11/2017 वार - गुरुवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९९२: आयबीएम सायमन हा पहिला स्मार्टफोन प्रकाशित करण्यात आला. १९९९: नागपूरचे संस्कृत महाकवी व संस्कृत पत्रकार डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांना या क्षेत्रातील कठोर तपश्चर्येबद्दल अप्पाशास्त्री राशिवडेकर पुरस्कार प्रदान. 💥 जन्म :- १७५५: लॉर्डस क्रिकेट ग्राउंडचे संस्थापक थॉमस लॉर्ड १८८२: उद्योगपती वालचंद हिराचंद दोशी १८९७: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते बंगाली/इंग्लिश लेखक निराद सी. चौधरी १९२३: लेखक नागनाथ संतराम तथा ना. सं. इनामदार 💥 मृत्यू :-  १९३७: नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस १९५९: अभिनेते व निर्माते नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली : 15 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान संसदेचं हिवाळी अधिवेशन अधिकृत सुत्रांची माहिती* ----------------------------------------------------- 2⃣ *इम्मर्सन म्नांगवा होणार झिम्बाब्वेचे नवे राष्ट्रपती, शुक्रवारी घेणार शपथ* ----------------------------------------------------- 3⃣ *मुंबई - प्लास्टिक बाटल्या परत घेण्याची व्यवस्था करा, अन्यथा सरसकट बंदी घालणार, राज्य सरकारचा प्लास्टिक निर्माण करणाऱ्या कंपन्यांना आदेश* ----------------------------------------------------- 4⃣ *कर्नाटक विधानसभेने मंजूर केले अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक.* ----------------------------------------------------- 5⃣ *नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. रमजाण मुलानी यांची निवड.* ----------------------------------------------------- 6⃣ *सोलापूर : विठ्ठल- रूक्मिणी मूर्तीची पुरातत्व विभागाकडून पाहणी केल्यानंतर वज्रलेप करण्याचा निर्णय.* ----------------------------------------------------- 7⃣ *डोंबिवलीत भरणार फुलपाखरांच्या छायाचित्रांचे विनामूल्य प्रदर्शन : ८००हून अधिक विविध जाती-प्रजातींच्या फुलपाखरे, पतंग, किटकांच्या छायाचित्रांचा समावेश* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *स्मार्टफोनचा विळखा, वेळीच ओळखा* अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. पण कालांतराने या मूलभूत गरजामध्ये अजून कांही वस्तूची वाढ होत गेली त्यात प्रामुख्याने मोबाईलचा समावेश करणे अगत्याचे आहे. आज माणसाला एक वेळ अन्न, वस्त्र किंवा निवारा यांची कमतरता असेल तर चालून जाईल मात्र खिशात मोबाईल नसेल तर ती व्यक्ती जिवंत राहू शकत नाही, अशी परिस्थिती सर्वत्र निर्माण झाल्याचे............ वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_22.html जरूर वाचावे आणि आपले अभिप्राय द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *जगदीशचंद्र बोस* पूर्व बंगालमधील डाक्का जिल्ह्यातील राणीखल या खेडेगावात ३० नोव्हेंबर १८५८ रोजी जगदीशचंद्र बोस यांच्या जन्म झाला. त्यांचे वडील भगवानचंद्र बसू हे सरकारी नोकरीत सब डिव्हिजनला आॅफिसर होते. त्या काळी इंग्रजीत जसे ठाकूरचे टागोर झाले, राय आडनावाचे रे झाले तसेच बसू आडनावाचे इंग्रजी स्पेलिंग बोस झाले. जगदीशचंद्रांचे घराणे हे बंगाल प्रांतातील एक खानदानी घराणे होते. त्यांची आई साध्वी व सुशील होती. लहानपणापासूनच जगदीशचंद्र आजूबाजूचा निसर्ग पहायचे, त्याचे निरीक्षण करायचे. निसर्गातील अनेक गोष्टी पाहून त्या अशाच का, असा प्रश्न त्यांना पडे. भगवानचंद्र सुद्धा न कंटाळता छोट्या जगदीशने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत असे. सर्व झाडेएकाच वेळी का फुले देत नाहीत? एखाद्या झाडाची पालवी पोपटी हिरवी पण दुसर्‍याची तांबूस? असा फरक का पडतो असे त्यांना वाटे. झाडे, फुले, फुलपाखरे, भोवतीचा निसर्ग यांचे निरीक्षण करणे हा त्यांचा आवडता छंद होता. सचेतन आणि अचेतन वस्तूतील साम्य आणि भेद याचा त्यांनी अभ्यास केला.  स्नायू,  मज्जातंतू, सुखदु:ख आदी विकार यांचा वनस्पतीबाबत त्यांनी धांडोळा घेतला.  *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= काळजी केल्याने उद्याचे दुख: कमी होत नाही , तर आजच्या दिवसाची ताकत कमी होते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१). वाऱ्याचा वेग मोजण्याचे साधन कोणते?* 👉. ॲनिमोमीटर *२). भारतातील कोणते राज्य पर्वताचे राज्य म्हणून ओळखल्या जाते?* 👉. सिक्कीम *३). भारताची उद्यानगरी म्हणून कोणत्या शहराला ओळखल्या जाते?* 👉 बंगलोर *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 जुगलकिशोर बोरकर 👤 सुनील बंडेवार, धर्माबाद 👤 जगन्नाथ भगत 👤 आदित्य खांडरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= " शाहू " चोर ते चोर वर शिरजोर आहेत सारं काही करून बिनघोर आहेत चोरी करून ते आम्ही तसे नाही म्हणतात शाहू असल्या सारखे राजरोस बाता हाणतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *निराशावादी लोक टोकाचा नकारात्मक विचार करतात. छोट्या संकटाला आकाश कोसळले समजले जाणारे भित्र्या सशासारखे असतात. झाडाचं पान पडलं तरी आकाश कोसळल्याच्या भ्रमाने जीव मुठीत घेऊन पळतात. हताश, निराश, उदास माणसं स्वत: निष्क्रिय होतात व दुस-याला काळजीच्या दरीत लोटत राहतात. अशांना सहानुभूती देण्यापेक्षा धैर्य देणं महत्वाचं. उलटपक्षी वस्तुनिष्ठ माणसं ! 'जीवन त्यांना कळले हो' पठडीतील असतात. ती आशेने हुरळत नाहीत नि निराशेने हताश होत नाहीत. ती व्यक्तिगत भावभावनांच्या कल्लोळात स्वत:स ना विसर्जित करतात, ना हारतात. 'अत दीप भव' म्हणत ती स्वत: अंधा-या वाटेवर पणतीच्या उजेडात चालतात. त्यांच्या हातातल्या मेणबत्तीची मशाल कधी झाली हे त्यांचे त्यांनाही कळत नाही.* *अशी माणसं सतत अंतर्मुख होऊन सिंहावलोकन करत विहंगमावलोकनाने नवी स्वप्न कवटाळत ती सत्यात उतरवत राहतात. ते पूर्वग्रहदूषित असत नाहीत नि दुस-यावर विसंबतही नाहीत. वास्तवाचं भान हा त्यांच्या जगण्याचा आधार असतो. भावनेपेक्षा तर्कावर जगणारी ही माणसं खाली जमीन न वर आकाशाचं भान ठेवून जीवन घडवतात. 'मी' आणि 'तू' याच्या पलिकडे आपण असा सामूहिक सद्-भाव व सभ्यता जोपासणारी ही तटस्थ माणसं. त्यांच्या वेदना नि संवेदना दोन्ही क्षितिजे विश्वव्यापी. अशा माणसांना मग दगडातल्या देवापेक्षा माणसातली माणुसकी महत्वाची वाटते. 'जे जे आपणांसी ठावे, ते ते इतरांसी सांगावे, शहाणे करूनि सोडावे सकलजन' असा त्यांचा सार्वजनिक सत्यधर्म असतो.* ‼ *रामकृष्णहरी* ‼ 🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* *मोबाईल - 9167937040* =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= स्वप्न पहायला परिश्रम,वेळ आणि पैसा कधीच लागत नाही परंतु पाहिलेली स्वप्ने साकारण्यासाठी वेळ, परिश्रम आणि पैसा हा लागतोच तेव्हा कुठे स्वप्न पूर्ण होतात.केवळ स्वप्नांना कल्पनेत न ठेवता ती प्रत्यक्षात उतरावयाची असतील तर हे तुम्हाला करावेच लागेल.अन्यथा स्वप्न स्वप्नच राहतील. *व्यंकटेश काटकर नांदेड.* संवाद.९४२१८३९५९०. 🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *।। राष्ट्रीय प्रतिके ।।* मोर आपला राष्ट्रीय पक्षी त्याचे पंख किती नक्षीदार पावसाळ्यात नाचतो छान पिसारा फुलवितो डौलदार ।। कमळ आपले राष्ट्रीय फुल चिखल जेथे तिथे उगवतो कुठे पांढरा कुठे रंगीन असा हा प्रत्येकाला फार आवडतो ।। वाघ आहे आपला राष्ट्रीय पशू त्याला बघून होते सर्वांची थरकाप अंगावर आडव्या काळ्या पट्टया डोळ्यात दिसतो त्याच्या संताप ।। राष्ट्रीय फळ आहे आंबा त्याची चवच आहे न्यारी पाहुणे रावळे आले घरी  सरबराई करायला लई भारी ।। तिरंगा आपला राष्ट्रध्वज केसरी, पांढरा आणि हिरवा विविध रंगाचे आकर्षण प्रत्येकाना वाटतो हवाहवा ।। - नागोराव सा. येवतीकर प्राथमिक शिक्षक जि. प.प्रा. शाळा चिरली ता. बिलोली जि. नांदेड 9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ=========  . *यशाचे गमक* महान शास्त्रज्ञ न्यूटन बागेत विचार करीत बसला होता. तितक्यात त्याला नोकराने हाक दिली. महाराज ! न्यूटन विचारात दंग होता. नोकराने पुन्हा साद घातली. महाराज ! आता न्यूटनची नजर नोकराकडे वळली तसा तो नोकर म्हणाला, महाराज ! बाहेर एक गृहस्थ आपणाला भेटण्यासाठी आलेत. ते आपणाला काही प्रश्न विचारु इच्छितात. खूप लांबून आलेत. न्यूटन म्हणाला, पाठव त्यांना इकडे. ते गृहस्थ आत आले. न्यूटनला म्हणाले, क्षमा करा महाराज, मी अडाणी आहे. आपला लौकिक ऐकून आलोय. मला शहाणं व्हायचं आहे. मी काय करु ? न्यूटन म्हणाला, मित्रा, शहाणं होऊन तू काय करणार आहेस ? या प्रश्नावर तो गृहस्थ म्हणाला, मला तुमच्या यशाचं रहस्य जाणून घ्यायचं आहे. त्याचे उत्तर ऐकून न्यूटन म्हणाला, मित्रा ! एकच महामंत्र लक्षात ठेव. मन सैरभैर होऊ देऊ नकोस. तुला हवं ते ज्ञान मिळेल. पण त्यासाठी न चळणारं अवधान धारण करायला शिक. माझ्या यशाचं रहस्य हेच आहे. एकाग्र मनाला काहीही अशक्य नाही.  *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 24/11/2017 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९७१ - डी.बी. कूपरने नॉर्थवेस्ट ओरियेंट एरलाइन्सच्या विमानातून लुटीच्या दोन लाख अमेरिकन डॉलर सह पॅराशूटच्या साहाय्याने उडी मारली. कूपरचा मागमूस आजतगायत लागलेला नाही. १९७६ - तुर्कस्तानच्या पूर्व भागात झालेल्या भूकंपात ४,०००-५,००० मृत्युमुखी. 💥 जन्म :- १८७७ - कावसजी जमशेदजी पेटीगरा, भारतातील गुन्हे अन्वेषण शाखेचा (सी.आय.डी.) कमिशनर. १९५५ - इयान बॉथम, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९६१ - अरुंधती रॉय, भारतीय लेखक. १९७८ - कॅथरिन हाइगल, अमेरिकन अभिनेत्री. 💥 मृत्यू :-  १९६३ - मारोतराव कन्नमवार, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री १९६५ - अब्दुल्ला तिसरा अल-सलीम अल-साबाह, कुवैतचा अमीर १९९१ - फ्रेडी मर्क्युरी, ब्रिटिश संगीतकार २००९ - समाक सुंदरावेज, थायलंडचा पंतप्रधान *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली - चेकबुक बंद करण्याचा कोणताही विचार नाही : अर्थ मंत्रालय* ----------------------------------------------------- 2⃣ *सरकारने माजी केंद्रीय अर्थसचिव विजय केळकर यांची समिती नेमावी. या समितीने जीएसटी समितीशी संवाद साधून कररचनेत बदल करावेतः यशवंत सिन्हा* ----------------------------------------------------- 3⃣ *पुणे : गुतंवणूकदारांचे पैसे परत करण्याची डी. एस. कुलकर्णी यांना एका आठवड्याची मुदत.* ----------------------------------------------------- 4⃣ *औरंगाबादः सरकारी कार्यालयात प्लास्टिक बंद करण्यासाठी पालकमंत्री रामदास कदम यांचे आदेश. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन दिले आदेश.* ----------------------------------------------------- 5⃣ *गुजरात विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी, राष्ट्रवादी 8 ते 9 जागा लढवणार* ----------------------------------------------------- 6⃣ *पद्मावती 1 डिसेंबरला यूकेमध्ये होणार प्रदर्शित, ब्रिटीश बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशनचा पद्मावती चित्रपटाला हिरवा कंदिल.* ----------------------------------------------------- 7⃣ *भारताची युवा टेनिसपटू अंकिता रैनाने मुंबई ओपन डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेतील आपली घोडदौड कायम राखताना उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *मुलांच्या प्रगतीसाठी .........!* शाळेची गुणवत्ता खराब आहे किंवा शाळेतील मुलांना काही न येणे ह्यासाठी फक्त शिक्षक जबाबदार नाहीत असे यूनेस्कोने नुकतेच आपल्या न्यू ग्लोबल एजुकेशन मॉनिटेरिंग रिपोर्टमध्ये म्हटले आहे. शिक्षक हा एक .................... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_23.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *अरुंधती रॉय* अरुंधती रॉय ( जन्म: २४ नोव्हेंबर, इ.स. १९६१ - हयात ) या भारतीय विरोधी साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. द गॉड ऑव्ह स्मॉल थिंग्ज या रॉय यांच्या कादंबरीने इ.स. १९९७ यावर्षीचा बुकर पुरस्कार जिंकला होता. रॉय यांच्या दोन पटकथा आणि अनेक लेखसंग्रहही प्रसिद्ध आहेत. अनेक सामाजिक, पर्यावरणविषयक आणि राजकीय मुद्द्यांवर रॉय यांचे लेखन भारतात वादग्रस्त ठरले आहे. अरुंधती रॉय यांचा जन्म भारतात शिलाँग, मेघालययेथे झाला. त्यांचे हिंदूधर्मीय वडील रणजित रॉय हे चहामळ्याचे बागायतदार तर आई मेरी रॉय या मल्याळी ख्रिश्चन आणि स्त्रीवादी चळवळीतील कार्यकर्त्या होत्या. अरुंधती रॉय यांचे बालपण केरळमध्ये अयमानम येथे गेले. कोट्टायम आणि तमिळनाडूतील लव्हडेल येथे त्यांचे शालेय शिक्षण झाले. नवी दिल्लीतील स्कूल ऑफ आर्किटेक्चर येथे त्यांनी वास्तुविशारदाचा अभ्यासक्रम केला; तेथेच वास्तुविशारद गेरार्ड डाकुन्हा यांच्याशी त्यांची भेट झाली. ते त्यांचे पहिले पती होत. दुसरे पती चित्रपटनिर्माते प्रदीप किशन यांच्याशी रॉय यांची भेट इ.स. १९८४ मध्ये झाली. त्यावेळी त्यांनी किशन यांच्या मेसी साहब या पुरस्कारप्राप्त चित्रपटामध्ये एका ग्रामीण मुलीची भूमिका केली होती. द गॉड ऑव्ह स्मॉल थिंग्ज कादंबरीच्या यशानंतर व आर्थिक स्थैर्य प्राप्त होईपर्यंत त्यांनी अनेक ठिकाणी नोकरी केली, क्लासेस घेतले. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) ब्राम्हो समाजाची स्थापना कोणी केली?* 👉 राजा राममोहन रॉय *२) तत्वबोधिनी सभेची स्थापना कोणी केली?* 👉 देवेंद्रनाथ टागोर *३) परमहंस सभेची स्थापना कोणी केली?* 👉 दादोबा पांडुरंग तर्खडकर *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 खंडू मोरे, सहशिक्षक, नाशिक 👤 विक्रम कदम 👤 पंडित नालावडे 👤 व्ही. के. पाटील 👤 चरण इंदूर 👤 नागेश सब्बनवार, कुंडलवाडी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *" ताठा "* ताठा असलेले लोक कधीच वाकतं नाहीत स्वतः च काम असलं तरी ही झुकतं नाहीत ताठरपणाने त्यांची होत असते तणतण तणतण करून त्यांच नसते समाधानी मन शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *माणूस जाणतो की तो स्वार्थधुंदीत असत्याचा प्रयोग करीत आहे; पण सुखकर जगण्याच्या नादात त्याला अंतर्मनाविरूद्ध व्यवहार करावे लागतात. म्हणूनच आजही आपण पहातोच की जो 'नंबर दोन'चे धंदे करतो त्याच्याकडे संपत्ती-सुखे नांदताना दिसतात. आणि जो सत्य घेऊन बसला तो जागोजागी निराश, हताश होत दु:ख भोगताना दिसतो. कालपरवापर्यंत सामान्य जीवन जगणारा माणूस राजकारणात सत्तापदी पोहचताच पाहता-पाहता तो संपत्तीच्या राशीवर लोळताना दिसतो. मग 'सत्यमेव जयते'चे काय? सत्याचाच विजय होतो हे माणूस जाणत असूनही तो असत्याचा कैवारी का होतो? का होतोच नव्हे, तर होत आला, होत आहे आणि होत राहील.* *माणूस असा का वागतो? चोरी, भ्रष्टाचार ही पापकृत्य माहित असूनही तो का अंगीकारतो? त्याचे बाह्यमन अंतर्मनापासून अंतर ठेवून वागत असते तेव्हा ते बेडर आणि बेपर्वा झालेले असते. तेव्हा माणूस अपकृत्यात यशस्वी होणे ही अक्कलहुशारी समजून असत्याच्या नरकातील राज्यपद भोगत जातो. पण एक क्षण केव्हातरी त्याच्या जीवनात असा येतो की तो आपली असत्य कार्ये आपल्या अंतर्मनाजवळ मान्य करतो. कबुलीजबाब देतो. पश्चातापदग्ध होतो. परंतु काही लोक मरेपर्यंत अंतर्मनाशी संवाद करू शकत नाहीत. अशांना त्यांच्या पापकृत्यांची तमा नसेल तर त्यांचे अंतर्मनही मुक्ती मिळू देत नाही. कारण मुक्तीचा मार्ग हा अंतर्मनातून जातो.* ••●☀‼ *रामकृष्णहरी* ‼☀●•• ☀☀☀☀☀☀ *--संजय नलावडे,चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= चार अर्थपूर्ण वाक्य एकत्र आली की,सुंदर अर्थपूर्ण रचना किंवा परिच्छेद तयार होतो.अर्थात एक वाक्य दुस-यावर आधारीत असते त्यामुळेच एकमेकांचा एकमेकांशी सुसंगत अर्थ जुळतो. त्याचप्रमाणे चार माणसे एकत्र आली आणि एखाद्या चांगल्या आणि विधायक विषयावर चर्चा घडवून आणली तर एकमेकांचा जीवनव्यवहारही व्यवस्थितरित्या पूर्ण होऊ शकतो.म्हणून माणसाने एकत्र येऊन विचार विनिमय केल्यास जीवनविषयक असणारे प्रश्नही सहज सुलभतेने सोडविण्यासाठी मदत होईल.त्यासाठी माणसाने एकत्रीत येण्याची गरज आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *कोल्ह्याची बंडी...* एकदा काय झालं कोल्ह्याला भरली थंडी करकोच्यास तो म्हणाला शिवून दे बंडी कपडा काप करकर पाय हलव झरझर कर हिशोबही लगेच पैसे देतो भरभर बिचारा तो करकोचा शिवली त्याने बंडी मऊमऊ मस्त होती पळाली कोल्ह्याची थंडी शिलाई कधी देता सांगा हो कोल्हेभाऊ किती दिवस टिकते आधी ते पाहू दिवसामागे दिवस गेले शिलाई मिळाली नाही करकोचा मात्र आशेने उगीच वाट पाही फाटकी बंडी घेऊन कोल्हा आला घरी म्हणाला मोठ्या दिमाखात बंडीपेक्षा थंडीच बरी... मनिषा कुलकर्णी आष्टीकर परभणी =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *आशेची थोरवी* एक भुकेलेला डोमकावळा एका उंबराच्या झाडावर बसला होता. तो वाट पाहात होता. उंबराची फळे अजून पिकली नाहीत. ती कधीतरी पिकतील याची वाट पाहात तो तिथेच बसून होता. हा डोमकावळा बराच काळ तिथेच बसला आहे, असे एका कोल्ह्याच्या लक्षात आले. तेंव्हा त्याने त्याला कारण विचारले. डोमकावळयाने कारण सांगितल्यावर कोल्हा त्याला म्हणाला, 'अरे वेडया, आशेने असा वाहून जाऊ नकोस. आशेमुळे माणसाला भ्रम तेवढा होतो. अशाने वाट पाहून कुणाचेच पोट भरत नाही. तात्पर्य - केवळ आशा करणे व्यर्थ आहे. प्रयत्न हवा.  *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 25/11/2017 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  २०१२ - बांगलादेशच्या ढाका शहरात कपडे बनविणाऱ्या कारखान्यात आग लागून ११७ ठार. 💥 जन्म :- १८४४ - कार्ल बेंझ, जर्मन उद्योजक आणि अभियंता. १८८२ - सावळाराम लक्ष्मण हळदणकर, मराठी चित्रकार. १९५३ - जेफ्री स्किलिंग, एन्रॉनचा मुख्याधिकारी. 💥 मृत्यू :-  १९७४ - उ थांट, संयुक्त राष्ट्रांचा सरचिटणीस. १९८४ - यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *प्लस्टिक बंदीची काटेकोर अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामपंचायतींना विभागीय स्तरावर 5 लाख रुपयांचे बक्षीस देणार - पर्यावरण मंत्री रामदास कदम* ----------------------------------------------------- 2⃣ *इजिप्तमध्ये एका मशिदीत बॉम्बस्फोट आणि गोळीबार झाल्याचे वृत्त असून या हल्ल्यात 75 जण जखमी झाले आहेत* ----------------------------------------------------- 3⃣ *सिंधुदुर्ग : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ या कर्जमाफी योजनेत नव्याने १००६ शेतक-यांचा समावेश, यापूर्वी ४१५८ शेतक-यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती* ----------------------------------------------------- 4⃣ *पुणेः पुढील दोन दिवस थंडी वाढणारः हवामान खात्याचा अंदाज.* ----------------------------------------------------- 5⃣ *पुणे - पेट्रोलचे दर थोडे कमी करा - केन्द्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेन्द्र प्रधान यांचे गिरीश बापट यांना आवाहन.* ----------------------------------------------------- 6⃣ *सावंतवाडी : केंद्र सरकारच्या माध्यमातून आयुष मंत्रालय देशात शंभर योग सेंटर उभारणार. येत्या केंद्रीय अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली जाणार - केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांची माहिती.* ----------------------------------------------------- 7⃣ *नागपूर : भारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात श्रीलंकेच्या सर्वबाद 205 धावा. अश्विनचे चार बळी तर भारत 1 बाद 8 धावा* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *आपली कामे आपणच करावीत* मुलांनो, एखाद्या वेळी घरात आई किंवा बहीण नसेल तर आपली पंचाईत होते. जेवण करायचे असेल किंवा घरातील साफसफाईचा प्रश्न असेल, आपण सर्वस्वी आई किंवा बहिणीवर अवलंबून असतो. त्यामुळे आपणावर तसा प्रसंग ओढावतो. ज्यावेळी घरात वडील किंवा भाऊ नसतो, त्यावेळी तशीच काहीशी पंचाईत मुलींच्या बाबतीत सुध्दा घडते. कुटुंबातील प्रत्येक......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_59.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *यशवंतराव चव्हाण* यशवंतराव चव्हाण (मार्च १२, इ.स. १९१३:कराड, महाराष्ट्र - नोव्हेंबर २५, इ.स. १९८४) हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यांनी काही काळ भारताचे उपपंतप्रधान म्हणून काम केले होते. तर काही काळ ते भारताचे  संरक्षणमंत्री सुध्दा होते. यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म १२ मार्च, १९१३ रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात. ते प्रागतिक विचारसरणीचे होते. उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे. ते रसिक व साहित्यिकही होते. “युगांतर”, “सह्याद्रीचे वारे”, “कृष्णाकाठ”, “ऋणानुबंध” ही त्यांची साहित्यसंपदा आहे. पंचायत राजची सुरुवात त्यांनी केली. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= सकाळच्या वेळी तुम्ही झोपाल तर तुम्हाला बरे वाटेल, पण तुमचे यश देखील कायमचे झोपेल - कर्मवीर भाऊराव पाटील *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) सिध्देश्वर धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे?* 👉 पूर्णा नदी *२) येलदरी धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे?* 👉 येलदरी *३) इसापूर धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे?* 👉 पैनगंगा *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 विलास ढवळे, कार्यक्रमाधिकारी सर्व शिक्षा अभियान, नांदेड 👤 नितीन देशमुख, पत्रकार, धर्माबाद 👤 शिवाजी पाटील कदम 👤 अंकुश बल्लेवार 👤 नरसिंग येनद्रालवार 👤 शिवलिंग गंटोड 👤 महेश मुधोळकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= " अडथळे " आपल्याच माणसां कडून कामात अडथळे असतात आपूलकी मिळवण्यासाठी पुन्हा तेच गळे काढतात लक्षात येत नाही नेमकं अडथळा आणतं कोण चालू माणसांना असतात गाडूळां सारखे तोंड दोन शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'आपलं असं आहे की आपल्याला खोटं सहन होत नाही.' असं निक्षून सांगणारेही खोटं बोलतच असतात. कित्येकदा 'खोटं' हे ख-यापेक्षा सुंदर वाटतं. शतश: खरं किती लोक बोलत असतील हा संशोधनाचा विषय ठरेल. 'खोटं बोला पण रेटून बोला' असं म्हटलं जातं, ते व्यवहारात खूप खपत असतं; नव्हे त्याचीच जीवनाची दुकानदारी नफ्यात दिसते. सतत खरं बोलणारा, कल्पनाविश्वातही असत्याला न शिवणारा महात्मा किंवा संतही प्रसंगी असत्यासमोर हथप्रभ होतो. त्याच्या सत्यावर असत्य विजय धारण करून जातो.* *परंतु माणसाचं अंतर्मन हे सतत सत्य असते. तुम्ही केलेले कृत्य हे काय आहे ? पवित्र आहे कि अपवित्र आहे? खरे आहे कि खोटे आहे? हे फक्त अंतर्मनात नेहमीकरता 'सेव्ह' अर्थात सुरक्षित झालेले असते. मग लोक तुमच्या खोटे दडवून टाकण्याच्या नाटकीपणामुळे प्रभावित होऊन तुमचे खोटे खरे मानू लागले तरी तुमच्या 'इनर माइंड'ला ते मान्य नसते. ते तुम्हाला सतत आठवण करून देत असते की बाबा रे, जगाच्या नजरेत तू निर्दोष नाही हे तुला ठाऊक आहे. सत्यावर असत्याचा 'पेहराव' हा नाटकातील नटाने धारण केलेल्या पात्रासारखा असतो. तो सर्वकाळासाठी नसतो. नटाला नाट्यप्रयोग संपताच सामान्य म्हणजे सत्यस्थितीत परतावेच लागते.* ••● 🔸‼ *रामकृष्णहरी* ‼🔸●•• 🔹🔹🔹🔹🔹🔹 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= अज्ञानी राहून अंध:कारमय जीवन जगण्यापेक्षा शिक्षण घेऊन प्रकाशमय जीवन जगणे हे केव्हाही चांगलेच आहे. शिक्षणामुळे जीवनाला जगण्याची नवी दिशा मिळते.आपल्यातला अज्ञानपणा, मनातली भीती नष्ट होऊन नव्या उमेदीने, नवचैतन्याने आपले जीवन योग्य दिशेने जगता येते. तसेच आपल्या मनातल्या आकांक्षांना योग्य आकार देण्यासाठी शिक्षणासारखे आश्रय दुसरे माध्यम नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद....९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *अक्षरप्रकाश* उदार अंतकरणाने टाकावी पुस्तक कचराकुंडीत अन् लेखण्या भाजीमंडईत कचरा गोळा करणारे शिकावेत म्हणुन -- ज्ञानाची ज्योत घेवून जाव झोपडपट्टीत फुल्यांची सावित्री बनुन ज्ञानाचा झरा मिळाल्याचा आनंद , सर्वांच्या डोळ्यातुन सांडावा-- मानेवरचं जोखड फेकुन मानवी हक्कासाठी भांडावा -- मातीनं घ्यावा जातीचा सुड रुजलेली गुलामगिरी संपावी ओढावेत शब्दाचे आसुड-- अज्ञानाच्या अंधारात चाचपडणाऱ्या पावलांनी प्रकाशाकडे अन् विकासाकडे करावी वाटचाल-- पाझराव्या लेखण्या,अन् कोरे कागद व्हावे मालामालं ! स्वाती बंगाळे 8855908074 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *एकीचे बळ* एक गृहस्थ म्हातारपणामुळे बराच थकला होता. आयुष्यात चांगली कमाई करून आणि स्वत: चांगले जीवन जगूनसुद्धा त्याच्या पाच मुलांमध्ये सदान्-कदा चालणार्‍या भांडणांमुळे तो दु:खी होई. त्याने आपल्या मुलांना बराच उपदेश केला; पण उपड्या घडावर पाणी. एके दिवशी त्याने आपल्या पाचही मुलांना प्रत्येकी हातभर लांबीची एकेक काठी घेऊन यायला सांगितले. त्याप्रमाणे ती मुले एकेक काठी घेऊन आली. त्या गृहस्थाने त्यांच्यापैकी प्रत्येकाला आपापली काठी मोडण्यास सांगितले. वडिलांनी सांगितलेली ती गोष्ट प्रत्येक मुलाने लगेचच करून दाखवली. पुन्हा त्या गृहस्थाने त्या मुलांना तशाच प्रकारची एकेक काठी घेऊन यायला सांगितले. पाच जणांनी पाच काठ्या आणून वडिलांपुढे ठेवल्या. वडिलांनी त्या पाच काठ्यांची एका दोरीने मोळी बांधली आणि प्रत्येकाला ती मोडायला सांगितली. पाच काठ्या एकत्र असलेली ती मोळी आपल्या पाच मुलांपैकी कुणालाच मोडता येत नसल्याचे पाहून तो गृहस्थ त्यांना म्हणाला, बघितलंत ना ? एकीचे बळ किती असते ते ? वडील एवढेच बोलले; पण ते सूज्ञ मुलगे समजायचे ते समजले. तेव्हापासून एकजुटीने वागू लागले. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

गरूडभरारी म्हणजे काय ? (अतिशय सुंदर विचार) गरूडाचं आयुष्य असतं 70 वर्षाचं,पण तो 40 वर्षाचा होईपर्यंत त्याची चोच बोधट आणि वाकडी होते. त्याची नखं निकामी होतात. त्याच्या पंखातील बळ कमी होतं. सावज पकडणं त्याला जमत नाही. जीवनातील शौर्य संपलं . आता खाण्यापिण्याची भ्रांत अशी अवस्था होते. नखं नसलेला आणि आयाळ नष्ट झालेल्या म्हाता-या सिंहासारखं किंवा दात काढलेल्या सापासारखं जगणं पदरी येतं. कमालीचं नैराश्य जगणं असह्य होऊन जातं. पण गरूडाचं काळीज वेगळचं असतं. उंच उंच उडत गरूड एका पहाडावर जातो एकटाच. खडकावर चोच आपटून आपटून तो मोडून टाकतो. एखाद्या ऋषींनी तपश्चर्येला बसावं असे दिवस काढतो त्या पहाडावर. त्याला कुणी शिकवत नाही. हळूहळू पुन्हा अणकुचीदार चोच येऊ लागते; मग त्या चोचीनं तो स्वत:ची नखं उपसून काढतो. किती वेदना होत असतील; पण तो ते सहन करतो. नखं पुन्हा येतात तर त्या नखांनी तो स्वत: चे पंख उपसून फाडून काढतो. बिनपंखांचा गरड पुन्हा एकटा राहतो. काही काळानंतर त्याला पुन्हा पंख येतात, चोच तोवर मोठी होते, नखं धारदार होतात. आणि मग तो जगप्रसिध्द गरूड आकाशात उंच भऱारी मारतो. तितक्याच ताकदीनं आत्मविश्वास आणि शौर्यानं तो पुढील 30 वर्षॆ जगतो. स्वत:ची नखं उपसणं ही तपश्चर्या, वेदना परिवर्तनासाठी सहन करणं ही तितिक्षा (वेदना हसतमुखानं सहन करणं म्हणजे तितिक्षा) . एखाद्या योद्ध्याचं शौर्य आणि ऋषीचं तप अंगी बाळगणा-या त्या राजपक्ष्याची भरारी ही जगभऱ गरूडभऱारी म्हणून मानानं ओळखली जाते. ही कथा ऐकताना माझ्या अंगावर रोमाचं उभे राहिले. वाटून गेलं हा गुण माणसात आला तर माणसं दात काढलेल्या सापासारखं सरपटत बसणार नाहीत. नविन परिवर्तनाला सामोरं जाताना अंगावरून काय मुलायम मोरपीस फिरणार नाही तर त्या गरूडासारखं रक्तबंबाळ व्हावं लागेल हे माणसानं जाणलं पाहिजे. परिवर्तन हे तितिक्षेच्या झाडाला आलेलं फूल आहे हे समजलं पाहिजे. 🎭 *"रडतोस काय माणसा , बदलाला सामोरं जा. परिवर्तनाची तुतारी फुंक आणि भोग परिवर्तन . नवनिर्मितीचं बीजं तितिक्षेत असतात. तोड ती तुझी नैराश्याची बोथट झालेली चोच, उपट तुझी ती आळसानं बोथट झालेली नखं ; फाड तुझ्या त्या नाकर्तेपणाचे आणि पुन्हा एकटा वाट बघ. या सृष्टीचं सृजनत्व नक्कीच तुला नवसंजीवनी देईल. निराशेचं तुटलेलं मुंडकं हातात घेऊन शौर्याचं खड्ग पुन्हा एकदा तळपव त्या काळ्या खडकावर आणि सज्ज हो पुन्हा एकदा गरूडभरारी घ्यायला .

संकलित

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 22/11/2017 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९५६: ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न येथे १६ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली. १९६३: थुंबा या भारतीय अग्निबाण प्रक्षेपण केंद्राचे उद्‍घाटन. १९६३: अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या. 💥 जन्म :- १९३९: उत्तर प्रदेशचे ज्येष्ठ नेते मुलामसिंह यादव यांचा जन्म. १९४३: अमेरिकन लॉनटेनिस पटू बिली जीन किंग यांचा जन्म. १९६७: टेनिसपटू बोरिस बेकर यांचा जन्म. 💥 मृत्यू :-  १९६३: अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या. २००२: हैदराबाद मुक्तिसंग्रामचे अध्वर्यू गोविंदभाई श्रॉफ यांचे निधन. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *संयुक्त राष्ट्रात भारताचा मोठा विजय, दलवीर भंडारींना मिळाली 183 मतं.आंतरराष्ट्रीय कोर्ट ऑफ जस्टिसच्या न्यायाधीशपदी दलवीर भंडारी यांची निवड* ----------------------------------------------------- 2⃣ *झिम्बाव्बेचे राष्ट्रपती रॉबर्ट मुगाबे यांनी दिला राजीनामा.* ----------------------------------------------------- 3⃣ *डोंबिवली - आगरी कोळी महोत्सवाला रिंगण सोहळ्याने सुरुवात, डोंबिवलीला प्राप्त झाले प्रति पंढरपूरचे स्वरूप, डोंबिवलीत प्रथमच अशा प्रकारचे रिंगण.* ----------------------------------------------------- 4⃣ *जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी माजी मंत्री सुरेशदादा जैन गटाचे लक्ष्मण पाटील विजयी. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या गटाचे उमेदवार प्रभाकर पवार यांचा पराभव.* ----------------------------------------------------- 5⃣ *पुण्यात कंत्राटी बसचालकाचा संप, पीएमपीएमएलच्या 200 बसेस बंद.* ----------------------------------------------------- 6⃣ *मुंबई : नवोदित शरीरसौष्ठवपटूंचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या ‘नवोदित मुंबई श्री’ स्पर्धेचा थरार २४ नोव्हेंबरला लालबागमधील गणेशगल्ली येथे रंगणार, सुमारे २०० हून अधिक शरीरसौष्ठवपटूंनी या स्पर्धेत नोंदवला सहभाग*  ----------------------------------------------------- 7⃣ *चेन्नई : प्रदीर्घ कालावधीपासून राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याचे स्वप्न बघत होतो, पण भारतीय कसोटी संघात स्थान मिळणे माझ्यासाठी आश्चर्यचकित करणारे आहे, अशी प्रतिक्रिया तमिळनाडूचा अष्टपैलू विजय शंकरने व्यक्त केली* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *आपली कामे आपणच करावीत* मुलांनो, एखाद्या वेळी घरात आई किंवा बहीण नसेल तर आपली पंचाईत होते. जेवण करायचे असेल किंवा घरातील साफसफाईचा प्रश्न असेल, आपण सर्वस्वी आई किंवा बहिणीवर अवलंबून असतो. त्यामुळे आपणावर .................. वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_59.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *बोरिस बेकर* बोरीस बेकर 1990 के दशक के एक प्रमुख टेनिस खिलाड़ी थे। जर्मनी में जन्मे बेकर ने टेनिस जगत की चार सबसे बड़ी सालाना स्पर्धाओं (ग्रैंड स्लेम) में कुल 6 विजय प्राप्त की और अपने करिअर में कुल 49 प्रतियोगिताओं का फाइनल जीता। बेकर ने अपना पहला विंबलडन ख़िताब 1985 में 17 वर्ष की उम्र में जीता और इस तरह ये ख़िताब जीतने वाले वे सबसे युवा खिलाड़ी बने। बेकर का जन्म जर्मनी के लीमेन नमक गाँव में हुआ था। उसका माता का नाम लेिदय और उसका पिता का नाम रोबर्ट आंद्रेज मायेर है. वह उनके एकलौता पुत्र था। उसके मां और बाप कैथोलिक थे और उसे बी कैथोलिक धर्म के रूप से पाला था। उनके पिता एक आर्किटेक्ट थे और उसके पिता ने बलं-वेइस टेंनिस्कलुब टेनिस सेंटर बनाया था जहा पे बेकेर ने टेनिस खेल क़ो सीखा था।उन्होंने आठ वर्ष के उम्र से खेलना शुरू किया था। उन्होंने अपनी पढ़ाई दसवी कक्षा तक करके छोड़ दिया और वेस्ट जर्मन टेनिस फेडरेशन मै प्रशिक्षण लिया .  *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= जर तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवून आणणारा व्यक्ती शोधत असाल, तर स्वतःला आरशापुढे उभे करा तुम्हाला व्यक्ती शोधण्याची गरजच पडणार नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना कोणत्या दिवशी करण्यात आली?* 👉 २४ आक्टोबर १९४५ *२) संयुक्त राष्ट्र संघाचे किती सदस्य देश आहेत?* 👉 १९३ *३) संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कोठे आहे?* 👉 न्यूयॉर्क(अमेरिका) *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 अरुण पवार, सहशिक्षक 👤 पांडुरंग पुठ्ठेवाड, संपादक 👤 श्रीकृष्ण निहाळ, सहशिक्षक 👤 साईप्रसाद यनगंदेवार, सहशिक्षक 👤 मधू कांबळे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ======== *" शहाणे "* कधी कधी मुद्दाम वाद निर्माण करतात वाद निर्माण करून स्वतःचा गल्ला भरतात अशा पध्दतीनेही काही स्वतःचे गल्ले भरतात गल्ले भरणारेच आज इथे शहाणे ठरतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *मानवी संबंधांमध्ये एकमेकांशी बोलणं, संवाद साधणं, हास्यविनोद करणं, भांडण करणं, रडणं, ओरडणं या क्रिया घडण्यासाठी शब्दांची गरज असते, पण कधी कधी शब्दांपेक्षा शरीरभाषा तुलनेने आधिक प्रभावी ठरत असते. त्यातून 'शब्दांविण संवादु' या उक्तीप्रमाणे 'ये ह्रदयीचे ते ह्रदयी' भाव पोचवणं सहज साध्य होत असतं. या 'देहबोली'वरून समोरच्याच्या मनातील भावना समजून घेता येतात.* *अबोलपणे व्यक्त होणा-या देहबोलीत अनेक संकेत व संदेश दडलेले असतात. देहबोलीवरून समजून घेणं म्हणजे 'मनकवडा' असणं. समोरच्याची देहबोली ओळखून कोणाशी संबंध वाढवायचे व कोणाशी मर्यादित ठेवायचे हे ठरवता येते, सावध होता येते. ही देहबोली आत्मसात करण्यासाठी लोकांमध्ये मिसळायला हवं, संवाद साधता यायला हवा, निरीक्षण वाढवायला हवं. अनुभवाच्या आणि सरावाच्या कसोटीवर आपण समोरच्याची 'देहबोली' नक्कीच ऐकू व समजू शकू.* ~~‼ *॥ रामकृष्णहरी ॥* ‼~~ ⚜⚜⚜⚜⚜⚜ *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= सत्याची बाजू कधीच कमकुवत नसते.ती कधीच कुबड्याचा आधार घेत नाही किंवा इतरांना बोलायला संधीही देत नाही.उलट असत्य मात्र वेळोवेळी कुणाची ना कुणाची मदत किंवा आधार घेऊन आपली बाजू बळकट करण्याचा प्रयत्न करत असते तरीही यशस्वी होता येत नाही.जर असे असेल तर कशाला असत्याची बाजू घेऊन अपमानित जीवन जगता ! त्यापेक्षा सत्याचा स्वीकार करा आणि स्वाभिमानाने जीवन जगा.हाच मार्ग तुम्हाला यशाकडे घेऊन जातो. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०. 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *समाधानी वृत्ती* एका श्रीमंत माणसाजवळ अमाप धन होते. तरीही त्याला समाधान नव्हते. एके दिवशी एक साधू त्या गावात आला. श्रीमंत माणसाने त्याची बरीच कीर्ती ऐकली. तो त्याच्याकडे गेला. आपली मनोव्यथा त्याला सांगितली. 'मला सात पिढय़ा पुरेल एवढी संपत्ती हवी आहे,' अशी मागणी त्याने त्या योगी पुरुषाकडे केली. त्या संत पुरुषाने श्रीमंत माणसाला आपादमस्तक न्याहाळले व ते म्हणाले, 'तुझ्या घराजवळ एक झोपडे आहे. त्यात एक म्हातारी आजी राहते. त्या आजीला पुरेल एवढा शिधा फक्त तू नेऊन दे. तुझ्या संपत्तीत पाहिजे तेवढी वाढ होईल.' दुसर्‍या दिवशी सकाळी श्रीमंत माणूस त्या झोपडीत गेला व आजीला म्हणाला, 'तुझ्यासाठी मी पीठ, साखर, डाळ, तूप अशा वस्तू आणल्या आहेत. त्यांचा स्वीकार व्हावा.' आजीने नम्रतापूर्वक उत्तर दिले, 'आज खाण्यासाठी पुरेल एवढी सामग्री आमच्याकडे आहे. त्यामुळे तू देत असलेल्या खाद्य वस्तूंची आम्हाला गरज नाही.' मग आपण उद्यासाठी म्हणून त्याचा स्वीकार करावा.' श्रीमंत माणूस उद्गारला, 'अंगण साफ करणारी आजीची सून उद्गारली, 'आम्ही कोणत्याही गोष्टीचा संग्रह करून ठेवत नाही. उद्याची आम्हाला काळजी नसते. आमचे रोजचे जेवण आम्हाला व्यवस्थित मिळत राहते.' ते ऐकून श्रीमंत माणूस चकित झाला. 'उद्याची काळजी न करणारे हे लोक कोठे आणि सात पिढय़ांची काळजी करणारा मी कोठे?' असा विचार त्याच्या मनात आला. संतोष व समाधान हेच खरे धन, ही दृष्टी त्याला मिळाली.  थोडक्यात समाधानी वृत्ती ठेवून माणसाने आपले जीवन आनंदाने जगावे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*माझी शाळा माझे उपक्रम* *🌹👭सहल👭🌹* *〰〰〰〰〰〰〰* http://pramilasenkude.blogspot.in ➖➖➖➖➖➖➖ *आज दि.२१/११/२०१७ रोजी माझा जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव जि.नांदेड. येथील शैक्षणिक सहल व क्षेत्रभेट* 👉 ( *केदारनाथ* ) येथे आयोजित केली होती. 🍀🍀🌼🍀🍀🌼🌼🍀🍀 निसर्गाच्या सानिध्यात मुलांनी मनमोकळेपणाने आनंद घेतला.नाचले बागडले खूप खूप मज्जाच मज्जा केली.भोजनात वेग वेगळे पदार्थ आणि सोबतच जिलेबी व चिवडा याचीही भर.सर्व आटोपलेकी मग आम्ही तळेगावचे तळे याचीही पाहणी केली त्यानंतर धावती क्षेत्रभेट सहकारी साखर कारखाना सूर्यनगर हदगावची ही भेट घेतली. 👉त्यानंतर सर्वजण आनंदाने व तेवढ्याच उत्साहाने घरी परतले. सहलीसाठी मा.शि.वि.अ.जाधव साहेब,शा.व्य.स.अध्यक्ष मा.दिलिपराव जाधव साहेब,शाळेचे मु.अ. मा.चव्हाण सर यांनी दिलेल्या शुभेच्छासह 💐💐आम्ही शाळेतील 👉स.शि.श्री चव्हाण सर,श्री रामटेके सर,श्रीमती झाडे ,श्रीमती सेनकुडे ,श्रीमती लोने मँडम सहभागी झाले होते. 👭💃👬💃👭👬💃👭👬💃 *🌹प्रेरणादायी चारोळी*🌹 *"रोज रोज तेच तेच काहीतरी चेंज पाहिजे , मुलांसाठी नवोपक्रम अरेंज केले पाहिजे,उत्साहाने सर्वांनी राहिले पाहिजे ".*〰〰〰〰〰〰〰 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 *✍वृत्तलेखन* 🙏श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (सह.शिक्षिका)🙏 जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 21/11/2017 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९७१ - भारतीय वायु सैन्याची पाकिस्तानी सैन्याशी बांगलादेश मुक्ती युद्धांतील गरीबपुरच्या लढाईत पहिली चकमक. पाकिस्तानचा सपशेल पराभव. 💥 जन्म :- १६९४ - व्हॉल्तेर, फ्रेंच तत्त्वज्ञानी. १८५४ - पोप बेनेडिक्ट पंधरावा. १९१० - छ्यान चोंग्शू, चिनी भाषेमधील लेखक, अनुवादक. १९४३ - लॅरी महान, अमेरिकन काउबॉय. १९२७: नाटककार शं. ना. नवरे यांचा जन्म. 💥 मृत्यू :-  १८९९ - गॅरेट हॉबार्ट, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष. १९७० - सर सी.व्ही. रमण, भारतीय शास्त्रज्ञ. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहांना भेटणार, मंत्रिमंडळ विस्तारावर होणार चर्चा* ----------------------------------------------------- 2⃣ *अहमदनगर: एसटी संपात सहभागी झालेल्या जिल्ह्यातील चार हजार कामगारांच्या पगारातून २४ लाख रुपये एसटीने केले वसूल* ----------------------------------------------------- 3⃣ *मुंबई: शेतकरी कर्जमाफीचा ऑनलाइन घोळ कायम; आयटी मुख्य सचिवांच्या उचलबांगडीची शक्यता - सुत्रांची माहिती* ----------------------------------------------------- 4⃣ *नाशिक : अखेरीस नाशिकच्या विमान सेवेला 15 डिसेंबरचा मुहूर्त, मुंबई विमानतळावर स्लॉट मिळणार, केंद्र सरकारचे पत्र* ----------------------------------------------------- 5⃣ *सिंधुदुर्ग : जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांना विमा संरक्षण द्या, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या विशेष बैठकीत ठराव मंजूर.* ----------------------------------------------------- 6⃣ *नांदेड : ग्रंथालय कर्मचा-यांचे प्रश्न सोडवन्यासाठी राज्यात लवकरच होणार आंदोलन, विविध संघटनांनी एकत्र येत स्थापन केलेल्या राज्य ग्रंथालय महासंघातील निर्णय.* ----------------------------------------------------- 7⃣ *भारत-श्रीलंका कसोटी सामना अनिर्णीत, अपु-या प्रकाशामुळे भारताचा विजय हुकला, सामना थांबवला तेव्हा श्रीलंकेच्या सात बाद 75 धावा.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= पुस्तक - परिचय *' लखलखणारी शाळा '* लेखिका अनिता जावळे - वाघमारे वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_20.html प्रत्येक शिक्षकांनी हे पुस्तक वाचायलाच हवे एवढेच नाही तर एक वेळ या शाळेला प्रत्यक्षात भेट ही देण्याचा प्रयत्न करावा. आपले अभिप्राय जरूर द्यावे. °°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°° ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद*   9423625769 °°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°° =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *शंकर नारायण नवरे* शंकर नारायण नवरे उर्फ शन्ना (जन्म : २१ नोव्हेंबर, १९२७ - २५ सप्टेंबर, इ.स. २०१३) हे मराठी लेखक, नाटककार व पटकथाकार होते. मध्यमवर्गीय माणसाचे अनुभव व भावनाविश्व रेखणाऱ्या कथानकांसाठी ते ओळखले जातात. शन्नाडे या नावाने त्यांनी वृत्तपत्रांतूनही स्तंभलेखन केले आहे. त्यांचे एकूण २७ कथासंग्रह आहेत. शं.ना. नवरे यांनी जयवंत दळवी यांच्या महानंदा कादंबरीवरून ’गुंतता हृदय हे’ हे नाटक लिहिले आहे. हे नाटक अमाप गाजले. डोंबिवलीत झालेल्या २००३सालच्या नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांना लेखनातून मिळणाऱ्या पैशांचा मोठा हिस्सा ते पडद्यामागच्या कलाकारांसाठी खर्च करीत असत. कायम पडद्यामागे काम करणाऱ्या नाट्यकर्मींसाठी त्यांनी नाट्यसंमेलनातच ७५ हजार रुपयांचा धनादेश दिला होता. ते डोंबिवलीत रहात. त्यांच्या पत्नीचे नाव अंजली, मुलाचे अरुण, सुनेचे जान्हवी. मुलगी राधिका, नातू शंतनू आणि पणतू ओम. वयाच्या ८६व्या वर्षी शं.ना. नवरे यांचे निधन झाले. अरुण आणि जान्हवी हे दोघेही ॲडव्होकेट आहेत. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *जगातील सर्वात सुंदर रोपटे विश्वासाचे असते आणि ते कोठे जमिनीवर नाहीं तर आपल्या मनात रुजवावे  लागते..*    *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१). जागतिक महिला दिन कधी साजरा केला जातो?* 👉.     ८मार्च *२). जागतिक रेडक्रॉस दिन कधी साजरा केला  जातो?* 👉.    ८मे *३). जागतिक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो?* 👉       ८ सप्टेंबर *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 प्रशांत शास्त्री, बँक अधिकारी महाराष्ट्र ग्रामीण बँक, औरंगाबाद 👤 आबासाहेब विश्वनाथ पाटील, धर्माबाद 👤 इलियास बावानी, पत्रकार, माहूर 👤 विठ्ठल शिंदे 👤 शुभम सुर्या पाटील *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= " मुकी  वेदना " प्रत्येकाचीच एक मुकी वेदना असते मुकी वेदना जपणे हिही साधना असते प्रत्येक वेदना कधीच बोलकी होत नाही बोलकी झाल्याशिवाय ती हलकी होत नाही    शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *नातेसंबंध टिकविण्यासाठी एकमेकांना समजून घेण्याची व प्रेमाची आवश्यकता असते. संत कबीर म्हणतात-"प्रेमाची अडीच अक्षरे ज्याला कळाली तो पंडित झाला." थोडे तारतम्य बाळगले, जीवनात शिस्त व करूणा आणली, तर सर्व आवडीच्या व्यक्तींशी आनंदाने नाते फुलवता येते. हे तारतम्य सुटले, अहंभाव जागवला, एकमेकांकडे दुर्लक्ष करून स्वार्थाचाच विचार केला, तर भरल्या घरात रितेपणा येऊन अशांती येते.* *सफल प्रेम हे फळासारखे असते, ते हळूहळू पक्व होत जाते. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. आई-वडील, पत्नी-मुले, भाऊ-बहीण, मित्र ही नाती जपणे व फुलवणे ही एक साधनाच असते. त्यासाठी त्यागाची गरज असते, अहंकाराला तीलांजली देऊन, स्पर्धा न करता, एकमेकांना न डिवचता, स्वातंत्र्य देत, मैत्रीचे दार उघडे ठेवले तर कुठलेही नाते अभंग राहील. म्हणून वडिलधा-यांच्या आठवणीतून घराण्याचे महाभारत ऐकावे, पत्नी नावाच्या श्रमदेवतेचे 'नवरात्रौत्सव' घरात साजरे करावे, समाजात पसायदानाच्या ओव्या कानी पडण्याकरिता प्रयत्नशील राहावे.*    ••●🌷‼ *रामकृष्णहरी* ‼🌷●••            🌴🌴🌴🌴🌴🌴      *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*           📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= पलिकडचा किनारा कधीच अलिकडच्या किना-याला भेटू शकत नाही.त्याचप्रमाणे जीवनात जी गोष्ट आपल्याला हवी आहे ती कधीच भेटत नाही अशा गोष्टींबाबत आशा करणेही योग्य नाही.अशावेळी मनावर ताण आणून नैराश्यमय जीवन जगणे चुकीचेच आहे. आपल्याजवळ असलेल्या सुखाला दूर करुन दु:खाला आमंत्रण दिल्यासारखेच आहे.अशी जेव्हा जीवनात परिस्थिती निर्माण होते तेव्हा आपण दूर्लक्षच केलेले केव्हाही बरे.आशा करुन निराशा पदरी घेऊन जगणे हे चुकीचे आहे.जे आपणास शक्य आहे त्याचाच विचार करावा आणि त्याच मार्गाने मार्गक्रमण करावे म्हणजे जीवन सुखावह होईल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद...९४२१८३९५९०. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *चंदन* चंदन आस चंदनाचा सुवास वेड्या मनास अंगीचा ताप होतो क्षणात लोप चंदन लेप चंदन शांती देतसे सर्व अंगा प्रिय ते जगा वेडावे जीव् चंदनाचे अंगणा विसावा मना फिरती जीव चंदनाचे भोवती असता भीती सांगवी किती चंदनाची महती सर्व जगात देह चंदन दरवळे सुवास कष्टाचा खास ध्येय सहाण झिजविता हे खोड सार्थ जीवन होऊ जगती चंदनाचे सांगाती देण्या सुवास -एकनाथ डुमने सावरगाव ता.मुखेड =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ=========                  *सरळ रस्ता* एकदा एका अरब व्यापार्‍याने वाळवंटातून प्रवास करण्याकरिता आपल्या उंटावर बरेच सामान लादले. ते नीट घट्ट बांधून उंटाला जागेवरून उठवले. उंट मोठ्या कष्टाने उभा राहिला. व्यापार्‍याने उंटाचे तोंड गोंजारले आणि प्रेमाने विचारले: ''बोल मित्रा, आपण कोणत्या वाटेने जाऊया? टेकडीकडे चढण असलेल्या रस्त्याने की, टेकडीवरून उतार असलेल्या रस्त्याने?'' उंट मालकाच्या कानाला लागून म्हणाला: ''मालक आपण न्याल त्या रस्त्याने मला यायलाच हवे. परंतु आपण प्रेमानेच विचारता आहात म्हणून सांगतो. आपण आपले सरळ मार्गानेच जाऊया. सरळ मार्ग लांबचा असतो. परंतु त्या मार्गावर धोके कमी असतात.'' उंटाचे बोलणे खरोखरच शहाणपणाचे होते. अरब व्यापार्‍याने प्रेमाने त्याच्याकडे पाहिले आणि त्याचे म्हणणे मान्य करून तो उंटासोबत चालू लागला.  *तात्पर्यः जो सरळ मार्गाने साधेपणाने चालतो तिथे धोके कमी असतात.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*🌹जीवन विचार*🌹 *〰〰〰〰〰〰〰* http://pramilasenkude.blogspot.in ➖➖➖➖➖➖➖ *मानसाची खरी विद्या तिच आहे की जिच्यामुळे आपण आपल्या अंतरात्म्यास स्वतः स,ईश्वरास आणि सत्यास ओळखू शकतो.काळाच्या गतीप्रमाणे चालणारे जग फार मोठे (अफाट) आहे.जगाच्या या ज्ञानसागरात सर्वत्र सभोवताली ज्ञान अफाट पसरलेले आहे.ज्ञानामुळ का जगाव आणि कसं जगाव हे जस कळत तसच मनुष्य निखळ ज्ञानातुन निर्भय होतो.*smt.pramilatai senkude. *ज्ञानाची उपासना आयुष्यभर जरी केली तरी सागरातील थेंबाप्रमाणे होईल.खिन्न मनावर ज्याप्रमाणे नव्याने जीवन जगण्याची प्रेरणा* *आपल्याला पुस्तकातील वाचन केलेल्या ज्ञानामुळे मिळते.त्याचप्रमाणे दुःखाचा संकटाचा प्रसंगी सुद्धा ह्या ज्ञानाचा आपल्याला आधार होतो. मदत होते.* *पण त्यासाठी आपल्याला आपले कान व डोळे सदैव खुले ठेवावे लागते.आपली जीवन ज्योत सतत तळपत तेवत ठेवायची असेल तर आपल्याला ज्ञानाचा* *स्नेहाची नितांत गरज असते.ज्ञान अनंत असते ,ज्ञानाला समुद्राची सखोलता असते,* *आकाशाची अफाटता असते.सूर्याच तेज असते.* *जग हे माहितीचे ,ज्ञानाचे व अनुभवाचे ज्ञानसागर असून हे ज्ञान मिळवणारे प्राप्त करणारे ज्ञानोपासक म्हणजेच ज्ञानसागरात पोहणारे राजहंस होत.* 〰〰〰〰〰〰〰 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 ✍शब्दांकन / संकलन 🙏श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (सह.शिक्षिका)🙏 जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*🌺वाचावीत अशी १०० पुस्तके🌺* 📚✍🏻📕📗🗞📖🗃 *०१) ययाती* = वि. स. खांडेकर *०२) वळीव* = शंकर पाटील *०३) एक होता कार्वर* = वीणा गवाणकर *०४) शिक्षण* = जे. कृष्णमूर्ती *०५) अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम* = शंकरराव खरात *०६) शिवाजी कोण होता*- गोविंद पानसरे *०७) बनगरवाडी* = व्यंकटेश माडगुळकर *०८) तीन मुले* = साने गुरुजी *०९) तो मी नव्हेच* = प्र. के. अत्रे. *१०) आय डेअर* = किरण बेदी *११) तिमिरातुन तेजाकड़े*- डॉ. नरेंद्र दाभोलकर *१२) मृत्युंजय* = शिवाजी सावंत *१३) फकिरा* = अण्णाभाऊ साठे *१४) जागर* - *१५) अल्बर्ट एलिस* - अंजली जोशी *१६) प्रश्न मनाचे* - डॉ. हमीद आणि नरेंद्र दाभोलकर *१७) समता संगर*- डॉ. नरेंद्र दाभोलकर *१८) निरामय कामजीवन* = डॉ. विठ्ठल प्रभू *१९) ठरलं डोळस व्हायचं*- डॉ. नरेंद्र दाभोलकर *२०) मी जेव्हा जात चोरली* - बाबुराव बागुल *२१) गोपाळ गणेश आगरकर* = ग. प्र. प्रधान *२२) कुमारांचे कर्मवीर* - डॉ. द. ता. भोसले *२३) खरे खुरे आयडॉल*- यूनिक फीचर्स *२४) सत्याचे प्रयोग* = मो. क. गांधी *२५) प्रकाशवाटा* - प्रकाश आमटे *२६) अग्निपंख*- डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम *२७) लज्जा* - तसलीमा नसरीन *२८) दैनंदिन पर्यावरण* - दिलीप कुलकर्णी *२९) रणांगण* = विश्राम बेडेकर *३०) बटाट्याची चाळ* = पु.ल.देशपांडे *३१) श्यामची आई* = साने गुरुजी *३२) माझे विद्यापीठ ( कविता )* = नारायण सुर्वे *३३) बि-हाड* - अशोक पवार *३४) व्यक्ति आणि वल्ली* = पु.ल.देशपांडे *३५) माणदेशी माणसं* = व्यंकटेश माडगुळकर *३६) उचल्या* = लक्ष्मण गायकवाड *३७) अमृतवेल* = वि.स.खांडेकर *३८) नटसम्राट* = वि.वा.शिरवाडकर *३९) हिरवा चाफा* = वि.स.खांडेकर *४०) क्रोंचवध* = वि.स.खांडेकर *४१) झोंबी* = आनंद यादव *४२) इल्लम* = शंकर पाटील *४३) ऊन* = शंकर पाटील *४४) झाडाझडती* = विश्वास पाटील *४५) नाझी भस्मासुराचा उदयास्त* = वि.ग. कानिटकर *४६) बाबा आमटे* = ग.भ.बापट *४७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर* = शंकरराव खरात *४८) इस्त्राइलची शेती*- *४९) बहाद्दुर थापा* - संतोष पवार *५०) सेकंड सेक्स* - सिमोन *५१) आई* = मोकझिम गार्की *५२) स्वभाव , विभाव* = आनंद नाडकर्णी *५३) बलुत* = दया पवार *५४) कर्ण , खरा कोण होता* = दाजी पणशीकर *५५) स्वामी* = रणजीत देसाई *५६) वपुर्झा ( भाग १-२ )* = व. पु. काळे *५७) पांगिरा* = विश्वास पाटील *५८) पानिपत* = विश्वास पाटील *५९) युंगंधर* = शिवाजी सावंत *६०) छावा* = शिवाजी सावंत *६१) श्रीमान योगी* = रणजीत देसाई *६२) जागर खंड – १* = प्रा. शिवाजीराव भोसले *६३) जागर खंड – २* = प्रा. शिवाजीराव भोसले *६४) वावटळ*- व्यंकटेश माडगुळकर *६५) ग्रेटभेट* - निखिल वागळे *६६) भारताचा शोध* = पंडित जवाहरलाल नेहरू *६७) गोष्टी माणसांच्या* = सुधा मूर्ती *६८) वाईज अंड आदर वाईज* *६९) उपेक्षितांचे अंतरंग* = श्रीपाद महादेव माटे *७०) माणुसकीचा गहिवर* = श्रीपाद महादेव माटे *७१) यश तुमच्या हातात* = शिव खेरा *७२) आमचा बाप अन आम्ही* = डॉ. नरेंद्र जाधव *७३) कोसला* = भालचंद्र नेमाडे *७४) गांधीनंतरचा भारत*- रामचंद्र गुहा *७५) आधुनिक भारताचे निर्माते*- रामचंद्र गुहा *७६) नापास मुलांची गोष्ट* = अरुण शेवते *७७) एका कोळियाने* = अन्रेस्ट हेमींग्वे *७८) महानायक* = विश्वास पाटील *७९) आहे आणि नाही* = वि. वा. शिरवाडकर *८० ) चकवा चांदण* – एक विनोपनिषद = मारुती चितमपल्ली *८१) मिरासदार*- द. मा. मिरासदार *८२) सुरेश भट यांचे* सर्व कविता संग्रह *८३) ग्रामगीता* = राष्ट्रसंत तुकडोजी महाराज *८४) स्पर्धा काळाशी*- अरुण टिकेकर, अभय टिळक *८५) बदलता भारत*- भानु काळे *८६) कोल्हाटयाचं पोरं*- किशोर काळॆ *८७) साता उत्तराची कहानी*- ग. प्र. प्रधान *८८) मध्ययुगिन भारताचा इतिहास*- मा. म. देशमुख *८९) तोत्तोचान* = तेत्सुको कुरोयानागी *९०) शिक्षक असावा तर …?* = गिजुभाई *९१) समग्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर*- चांगदेव खैरमोडे *९२) समग्र महात्मा फुले*- राज्य सरकार *९३) झोत*- रावसाहेब कसबे *९४) ओबामा* - संजय आवटे *९५) एकेक पान गळावया*- गौरी देशपाडे *९६) आई समजुन घेताना*- उत्तम कांबळे *९७) छत्रपति शाहू महाराज* - जयसिंगराव पवार *९८) अमृतवेल*- वि. स. खांडेकर *९९) महात्म्याची अखेर*-जगन फडणीस *१००) बुद्ध आणि त्याचा धम्म*- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 19/11/2017 वार - रविवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९६९ - अपोलो १२तून चांद्रमोहिमेवर गेलेल्या पीट कॉन्राड आणि आणि ऍलन बीनचे चंद्रावतरण. १९९८ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटनवर महाभियोग सुरू. 💥 जन्म :- १८२८ - मणिकर्णिका तांबे तथा राणी लक्ष्मीबाई. १९१७ - इंदिरा गांधी, भारतीय पंतप्रधान. 💥 मृत्यू :-  १९३१ - शू चीमो, चिनी भाषेमधील कवी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *कोपर्डी निकाल - कोर्टाच्या निकालानंतर पीडितेला न्याय, कोर्टाने दोषींना जास्तीत जास्त शिक्षा करावी, शिक्षेनंतर कुणीही अत्याचाराला धजावणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* ----------------------------------------------------- 2⃣ *समृद्धी मार्ग करुन वेगळं राज्य निर्माण करणार असल तर समृद्धी मार्ग मध्येच तोडून टाकेल - राज ठाकरे* ----------------------------------------------------- 3⃣ *राज्यातील 734 ग्रामपंचायती साठी 26 डिसेंबरला होणार मतदान* ----------------------------------------------------- 4⃣ *भारताची मनुषी छिल्लर ठरली 'मिस वर्ल्ड-2017 ; तब्बल 17 वर्षांनी भारताला मिळाला बहुमान* ----------------------------------------------------- 5⃣ *लातूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांची 35 पथकांकडून शोध मोहीम.* ----------------------------------------------------- 6⃣ *बांदीपोरा हाजिन भागात चकमकीमध्ये सुरक्षा पथकाकडून पाच दहशतवादी ठार.* ----------------------------------------------------- 7⃣ *भारत-श्रीलंका पहिली कसोटी, श्रीलंकेच्या तिस-या दिवसअखेर 4 बाद 165 धावा तर भारताच्या पहिल्या डावात 172 धावा.* ----------------------------------------------------- *विशेष बातमी :- शिक्षणाची वारीचा आज लातूर विभागात शेवटचा दिवस, रविवार असल्यामुळे शिक्षकांची गर्दी राहण्याची शक्यता* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= जागतिक शौचालय दिनानिमित्त प्रासंगिक लेख *मोबाईल महत्वाचे की शौचालय* जगभरातील सुमारे एक अब्ज जनता आज ही उघड्यावर शौचास जाते आणि भारत देश यात अव्वलस्थानी असल्याचे मत संयुक्त राष्ट्राच्या तज्ञानी पिण्याचे पाणी व स्वच्छतेसंबंधीच्या एका अभ्यासाचा शुभारंभ करताना नुकतेच व्यक्त केले आहे. उघड्यावर मलमूत्र विसर्जन करण्याच्या बाबतीत बांग्लादेश आणि व्हिएतनाम सारख्या अनेक देशानी समाधान कारक प्रगती केली आहे. सबसहारन आफ्रिकेतील 26 देशानीही याबाबतीत चांगली कामगिरी केली आहे. याबाबत संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त केली आहे. उघड्यावर मलमूत्र विसर्जन केल्यामुळे ....... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_49.html *स्वच्छ भारत ; समृद्ध भारत* आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *श्रीमती इंदिरा गांधी* इंदिरा गांधी ( नोव्हेंबर १९,इ.स. १९१७ - ऑक्टोबर ३१,इ.स. १९८४ ) या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. बांग्लादेशच्या उभारणीवेळी त्यांची भूमिका आणि देशाला अणुशक्ती संपन्न बनविण्याचा त्यांचा निर्णय भारताला प्रगतीपथावर नेणारा होता. लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर पंतप्रधानपदाच्या प्राप्तीसाठी त्यांना मोरारजी देसाई यांच्याशी सामना करावा लागला. त्या १९६६ मध्ये देशाच्या पाचव्या पंतप्रधान (पहिल्या महिला पंतप्रधान) बनल्या. त्यांनी पोखरण येथे पहिली अणुचाचणी घडवून आणली. इंदिरा गांधींचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी अलाहाबाद येथे झाला. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी लहानपणापासूनच भाग घेतला. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी त्यांनी काही स्वातंत्र्यसैनिकांच्या मदतीने अलाहाबादेतील मुलांची १९३० साली "वानर सेना' नावाची संघटना स्थापन केली. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९५५ मध्ये त्या काँग्रेस कृती समितीच्या व सेंट्रल पार्लमेंटरी बोर्डाच्या सदस्य झाल्या. फेब्रुवारी १९५९ मध्ये त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून निवडून आल्या. केंद्रीय मंत्रिमंडळात त्या १९६४ साली प्रथम रुजू झाल्या. तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळात माहिती व नभोवाणी मंत्री म्हणून त्यांनी त्यावेळी कार्य केले. लालबहादुर शास्त्री यांचा ताश्कंद येथे १९६६ मधे मृत्यू झाल्यानंतर कॉँग्रेस अध्यक्ष कामराज याच्या पाठिंब्याने १८६ मतांनी मोरारजी देसाई यांचा पराभव करून त्या २४ जानेवारी १९६६ रोजी श्रीमती इंदिरा गांधी प्रधानमंत्री म्हणून विजयी झाल्या. १४ प्रमुख व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण आणि पोखरण येथे पहिली अणुचाचणी, ऑपरेशन ब्लू स्टार या त्याच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटना होत्या. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= आपले लक्ष्य, साध्य विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले तेवढ्यावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) आपल्या देशात विद्यार्थी दिन कधी साजरा करण्यात येतो?* 👉 ७ नोव्हेंबर *२) आपल्या देशात शिक्षण दिन कधी साजरा करण्यात येतो?* 👉 ११ नोव्हेंबर *३) आपल्या देशात बालदिन कधी साजरा केल्या जातो?* 👉 १४ नोव्हेंबर *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 कैलाश पाटील खरबाळे 👤 श्वेता नरसुडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *" पिकते तिथे "* पिकते तिथे विकत नाही विकते तिथे पिकत नाही पिकते तिथे विकले पाहिजे विकेल तिथे पिकले पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'पुनरपि जननं, पुनरपि मरणं' म्हणजेच पुन्हा जन्म आणि पुन्हा मृत्यू! ही जन्म-मरणाची वारंवार होणारी फेरी संपविणे म्हणजेच 'मुक्ती!' याचा अर्थ मुक्तीच्या आधी जन्म-मरणाचा फेरा आणि पुनर्जन्म आहे हे मान्य करावे लागेल. महाभारताच्या युद्धानंतर पांडव स्वर्गाच्या द्वाराकडे वाटचाल करू लागले ते कशासाठी? महायोद्धा रावण अखेरीस रामरायांना हात जोडून विनविता झाला कशासाठी? हे सारे प्रश्न 'मुक्तीसाठी' या एकमेव उत्तराकडे घेऊन जातात. आम्हाला पुन्हा जन्म नको, म्हणजे मग शिल्लक काहीही उरणार नाही. प्राप्त होईल ती केवळ 'मुक्ती आणि मुक्तीच!'* *'ज्ञानेश्वरी' लिहून ज्ञानेश्वरांनी अवतारकार्य संपविले, लोकांना उपदेशामृत पाजून तुकोबा वैकुंठाला गेले, नामदेवादि संतानीही हेच केले. पूर्वीच्या जन्माचे पडसाद म्हणून हा जन्म प्राप्त झाला. परंतु आता मात्र हे पुन्हा नको, हे या द्रष्ट्या पुरूषांनी निश्चित केले आणि प्राप्तही करून घेतले. सर्वसामान्य माणसाला या महामार्गावर एक-एक पाऊल पुढे सरकता आले तर निश्चितपणे मुक्तीचे लक्ष्य प्राप्त होईल.* ‼ *रामकृष्णहरी* ‼ 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= काळ हा कधीच कुणासाठी थांबत नाही.त्याचा प्रवास हा निरंतर चालत राहतो. काळाप्रमाणे आपणही चालायला शिकले पाहिजे. आपण जर नाही शिकलो तर आपल्या जीवनाचा चालणारा प्रवास कुठेतरी खंडित होऊन जगणे अवघड करून टाकतो. काळाला तोंड देण्याचा आपला सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर जीवन जगणे सुसह्य होईल आणि आपल्या जीवनात सातत्यपूर्ण,चांगले जीवन जगण्याचे मनोधैर्यही वाढेल. काळ असाही आला तरी काळाला भ्यायचे नाही तर त्याला टक्कर कशी द्यायची हे त्याच्याकडूनच शिकले पाहिजे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद...९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. 🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *|| निखारा ||* झाकून ठेव निखारा राखेसह दाखवू नको कोणास कैक येतील फुंकर मारायला क्षणभर घेतील उबारा अन निघूनही जातील काही क्षण धगधगेल निखारा कदाचित पेट घेईल वाऱ्यावर उडेल राख धूर डोळ्यात खुपेल अन झुंजावे लागेल निखाऱ्यास स्वःअस्तित्वासाठी पुन्हा पुन्हा पण होईल भ्रमनिरास न पाळणार कोणीच त्या पेटत्या निखाऱ्यास..!! सुनिल पवार, मुंबई =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *जिद्द* मंजूच्या बोटांना जन्मापासूनच आपल्या सारखी पेरं नव्हती. त्यामुळे तिला वस्तू धरतांना, लिहीतांना, बटण लावतांना अशी रोजची कामे करतांना खूपच त्रास व्हायचा. पण मंजू जिद्दीने स्वतःची कामे कोणाचीही मदत न घेता पूर्ण करायची. मंजूला चित्रकलेची खूपच आवड होती. चित्र काढतांना तिला वेळेचे भान राहत नसे. एका रविवारी सकाळी तीन तास बसून बागेचे सुंदर चित्र रंगवले. चित्र पाहताच आईने आनंदाने मंजूला जवळ घेत म्हटले,"मंजू, तुझ्या हातात कला आहे. त्याला अधिकाधिक वाढवायचा प्रयत्न कर". आईच्या बोलण्याचा मंजूवर खोलवर परिणाम झाला. त्या रात्री आईबाबांचे बोलणे मंजूच्या कानावर पडले. आई म्हणत होती,"अहो, आता शाळेत स्पर्धा आहेत. आपण मंजूला नवीन रंग आणि काही कागद घेऊन देऊ या का?". त्यावर बाबा वैतागलेल्या सुरात म्हणाले," अगं, महागई किती वाढलेली आहे. शिक्षणाच्या भविष्याच्या द्रुष्टीने कितीतरी पैसा साठवायचा आहे. रंगाचे पैसे खर्च करणे आपल्याला शक्य नाही. तसे ही हातामुळे मंजूला फार काळ चित्रकला करता येईल असे मला वाटत नाही." वडीलांचे हे शब्द ऐकून मंजूला रडूच कोसळले. सकाळी काढलेले चित्र तिने फाडून टाकले. दुसर्‍या दिवशी उठल्यावर मंजू आईला स्वयंपाकात मदत करायला आली. आईने आश्चर्याने तिला त्याबद्दल विचारले. मंजूने कालचे संभाषण ऐकल्याचे सांगितले. आईच्या डोळयात पाणी आले. तिने मंजूला कुशीत घेत म्हटले," मंजू आपल्या अपंगावर आपणच मात करायला शिकले पाहिजे. तुला माहिती आहे विल्मा रुडाल्फ ही अमेरिकन खेळाडू पोलिओमुळे दोन्ही पायांनी अपंग होती. पण मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तिने ऑलिंपिक स्पर्धेत तीन सुवर्ण पदके मिळवून जागतिक विक्रम केला होता. मंजू तुझी स्थिती तर ह्यापेक्षा कितीतरी चांगली आहे. तुझ्या ह्या वाटचालीत तुला अनेक अडचणी येणारच आहेत. त्यावर मात करायला शिक." आईच्या बोलण्याने मंजूला खूपच हुरुप आला. आईला घटट मिठी मारत मंजू म्हणाली " हो आई, जर विल्मा करु शकते तर मी का नाही."  *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 18/11/2017 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९२८: वॉल्ट डिस्‍ने यांच्या मिकीमाऊस या प्रसिद्ध कार्टूनचा स्टीमबोट विली या चित्रपटाद्वारे जन्म. १९३३: प्रभात चा पहिलाच रंगीत चित्रपट सैरंध्री प्रदर्शित झाला. १९५५: भाक्रा-नांगल धरणाच्या बांधकामास सुरूवात झाली. १९६२: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे उद्‍घाटन झाले. 💥 जन्म :- १९०१: चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते व्ही. शांताराम यांचा जन्म. १९१०: क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त यांचा जन्म 💥 मृत्यू :- १९९८: सातार्‍याच्या सामाजिक समाजसेवक रामकृष्ण नारायण तथा बन्याबापू गोडबोले यांचे निधन. १९९९: स्वातंत्र्यसैनिक रामसिंह रतनसिंह परदेशी यांचे निधन. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *बकिंघमशायर : आयल्सबरी जवळील वाडेसडोन टेकड्यावर एका विमानाची हेलिकॉप्टरसोबत हवेत टक्कर झाल्याने अनेक जण ठार* ----------------------------------------------------- 2⃣ *नागपूर : अयोध्या प्रकरणात सकारात्मक तोडगा निघेल असा विश्वास आहे, मी सकारात्मक दृष्टीने बघतो - श्री श्री रविशंकर* ----------------------------------------------------- 3⃣ *बीड : आॅनलाइन नोंदणी व इतर जाचक अटींमुळे शेतक-यांनी नाफेडच्या खरेदी केंद्राकडे फिरवली पाठ, १७ दिवसांत झाली केवळ २९९० क्विंटल खरेदी* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबई : मागण्या मान्य न झाल्यास इंटकच्या नेतृत्वातील एसटी कामगार संघटना २६ डिसेंबर रोजी संपाची नोटीस देणार; १४ जानेवारीपासून पुन्हा संपाची हाक.* ----------------------------------------------------- 5⃣ *सोलापूर - राज्यातील अप्पर जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या बदल्या, रामचंद्र शिंदे सोलापूरचे नवे अप्पर जिल्हाधिकारी* ----------------------------------------------------- 6⃣ *नवी दिल्ली - राष्ट्रीय हरित लवादाने आंध्र प्रदेशची नवी राजधानी अमरावतीच्या बांधकामासाठी दिली सशर्त परवानगी* ----------------------------------------------------- 7⃣ *भारत वि. श्रीलंका पहिल्या कसोटीत पावसाच्या व्यत्ययात पुजाराचा एकाकी संघर्ष, भारताच्या ५ बाद ७४ धावा* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *मरावे परी अवयवरूपी उरावे* जन पळभर म्हणतील हाय हाय ! मी जाता राहील कार्य काय ? गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या आवाजातील कविवर्य भा. रा. तांबे यांची कविता रेडियोवर ऐकताना मन एकदम भूतकाळात गेले. इयत्ता दहाव्या वर्गात शिकत असताना ............. वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_17.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *व्ही. शांताराम* शांताराम राजाराम वणकुद्रे म्हणजेच व्ही. शांताराम यांचा जन्म 18 नोव्हेंबर 1901 रोजी कोल्हापूर येथे झाला. हे एक मराठी-हिंदी चित्रपट निर्माते, आणि दिग्दर्शक होते. शांताराम आधी प्रभात फिल्म कंपनीत होते. मात्र त्यानंतर त्यांनी राजकमल कलामंदिर ही स्वत:ची चित्रपट निर्माती कंपनी काढली. दो आँखे बारा हात, झनक झनक पायल बाजे, डॉक्टर कोटनिस की अमर कहानी, गीत गाया पत्थरोने, नवरंग, पिंजरा, शेजारी ही त्यांची काही गाजलेली प्रमुख चित्रपट आहेत. व्ही शांताराम यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाने व्ही शांताराम फाउंडेशन नावाची एक संस्था काढली आहे. या फाउंडेशनने 'शतक महोत्सवी मराठी चित्रसंपदा' या नावाची एक मराठी चित्रपट सूची प्रकाशित केली आहे. या सूचीत १९१३ ते १९३१ या कालावधीत मराठी दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या ३७२ मूकपटांची नावे आहेत. त्या सूचीत 'अयोध्येचा राजा' या पहिल्या चित्रपटापासून ते २०१३ मधील 'डॉ. प्रकाश बाबा आमटे' या चित्रपटापर्यंतच्या २०० मराठी चित्रपटांचा समावेश आहे. कलाकार, तंत्रज्ञ, चित्रपटातील गीतांच्या ओळी अशा विशेष माहितीने ही सूची सजली आहे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ======== *१). महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत?* 👉. देवेंद्र फडणवीस *२). महाराष्ट्राच शालेय शिक्षणेमंत्री कोण आहेत?* 👉. विनोद तावडे *३) महाराष्ट्रा चे गृहराज्यमंत्री कोण आहेत?* 👉 दीपक केसरकर *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 अरविंद काळे, सहशिक्षक पीपल्स हायस्कूल, नांदेड 👤 नितीन रायपुरे, अकोला 👤 पिराजी भूमन्ना, धर्माबाद *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= "मऊ लागलं की " मऊ लागलं की लोक कोपराने खणतात जिथे नाही तिथे ते टोला हाणतात लाचारी वाटेल असा मऊपणा ही नसावा बोलण्यात अन् वागण्यात स्वाभिमान असावा शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ======== *गर्भाशयाच्या अंधार विवरातूनच मनुष्यप्राण्याचा जन्म होतो आणि अंधाराच्याच अथांग अवकाशात तो अखेर विलीन होतो. तरीही अंधार हा अप्रिय आणि अमंगल ठरतो, असे का? अंधाराला दु:खाशीही जोडलं जातं. आपण सहज बोलून जातो 'तो कसला सुखी? त्याच्या जीवनात नुसता अंधार आहे अंधार !' अंधाराचा सर्वच धिक्कार का करतात? समजा जगातून संपूर्ण अंधार नष्ट झाला तर...? तर विश्वनिद्रेचा नाश होईल, उजेडाचा वणवा दिसेल, जीवसृष्टीचे जीवप्राण कंठाशी येतील. पृथ्वीचा थरकंप वाढेल आणि अखेर प्रलय होईल.* *म्हणून अंधाराला समजून घेणं फार जरूरीचं आहे. तसा अंधार हा गरीब-श्रीमंत असा भेद पाळत नाही. पण उजेड पाळतो. म्हणूनच गरीबाचा मिणमिणता दिवा आणि श्रीमंताकडे दिव्यांचा झगमगाट! परंतु अंधार सर्वत्र सारखा असतो. अंधारच शाश्वत आहे, प्रकाश नाही. ब्रम्हांडाचा 90% भाग हा गर्द अंधार कणांनी भरलेला आहे. असं असूनही अंधार मानवी दुनियेत बदनाम आहे. अंधार निंदा थांबता थांबत नाही.* *'उजेडात होते पुण्य, अंधारात पाप'* *असं पाप-पुण्याच्या मार्केटिंगमध्ये बिंबवलं जातं. पाप-पुण्य या दोन्ही बाबी ब-याच प्रमाणात समाज, प्रदेश आणि धर्मसापेक्ष आहेत. एका समाजात प्राणीहत्या पाप, तर दुस-या समाजात ते धर्माचरण. असत्य पाप आहे तर, पुण्यशिल सत्याला सुळावर चढविले जाते.* ‼ *रामकृष्णहरी* ‼ 🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= एखाद्या कणखर दगडावर टाकीचे घाव घालून त्याला एखाद्या देवाचे रुप देऊन देव मानून नतमस्तक होतो. एखाद्या मातीच्या गोळ्याला आकार देऊन एखादी सुंदर मूर्ती बनवून कलेचा आस्वाद घेतो. तेवढेच अंत:करणातून प्रयत्न केले तर माणसातल्या माणुसकीला जागे करुन त्यांच्यातील मनुष्यत्व जागृत करुन त्यास आदर्श माणूस घडवून निर्माण केले आणि माणुसकीचे नाते जोडलेे गेले तर तुमच्या इतके सुखाने, समाधानाने व आपुलकीचे नाते जोडण्यासाठी अधिक मदत होईल.त्यांच्याशी नाते जोडले म्हणजे परमेश्वराशी नाते जोडल्यासारखेच होईल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद....९४२१८३९५९०. 🌸🌱🌸🌱🌸🌱🌸🌱🌸🌱 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *कविता- अबोल प्रित* तिला मी जाताना सहजच पाहिले हरिणीची डोळे तिचे ह्रदयात कोरले... वाटेवर तिच्या रोज डोळे माझे खिळे बघता क्षणी तिला मन माझे डोले ... रोज त्या वाटेवर काम नव्हते काही फक्त तिला पाहण्याचा बहाणा मात्र राही... रोज असे वाटे काही जाऊन तिला भेटावे मनातील गूज तिच्या कानी हळू सांगावे... असे करता करता अनेक दिवस गेली अबोल प्रीत माझी कधी बोलकी नाही झाली मनातील भाव माझे कधीच सांगता तिला नाही आले एके दिवशी जोडीदारसह पाहताच तिला डोळे माझे पाणावले... अशी राहीली माझी अबोल प्रित समजली नाही मला प्रेमाची रित गात बसलो विरह गीत मिळाला ना माझा मीत... *सौ. सुचिता नाईक, किनवट* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *चाणक्य कौटिल्य* आचार्य चाणक्याकडे म्हणे कोणीतरी एक चिनी प्रवासी आला होता. ज्यावेळी तो भेटायला आला त्यावेळी हा विष्णुगुप्त (चाणक्य कौटिल्य) लिहित बसलेला होता. त्याकाळी मोठे दिवे नव्हते, वीज नव्हती, आपल्याला ज्ञात आहे. तेलाचे दिवे लावलेले असत. त्या तेलाच्या दिव्यामध्ये विष्णुगुप्त लिहित बसलेला होता. संध्याकाळचा समय होऊन गेलेला होता. काही महत्वाची कागदपत्रे लिहित होता. लिहित असताना तो चिनी आला, त्याचेआचार्य चाणक्यानेस्वागत केले, त्याला बसवले, आणि मग आपल्या हातातले लेखन कार्य विष्णुगुप्ताने पूर्ण केले. पूर्ण केल्यानंतर त्याने काय केले? त्याच्यासमोर दोन दिवे होते. एक प्रज्वलित झालेला होता व एक तसाच होता. चाणक्याने प्रथम आपल्या समोरचा दिवा विझवला आणि दुसरा दिवा प्रज्वलित केला. त्यावेळी तो चिनी प्रवासी कुतुहलाने पाहू लागला. हे असे कशासाठी करतो आहे चाणक्य? त्याला असे वाटले की बहुधा भारतातील ही प्रथा असावी. पाहुणा आला की बहुधा असे करत असावेत. मग कुतुहलाने त्याने प्रश्न विचारला चाणक्याला, 'आपल्याकडे प्रथा आहे का की पाहुणा आला की असे करावे?' एक दिवा विझवायचा आणि दुसरा लावायचा?. तेव्हा चाणक्य म्हणाला, 'असे नाही. मी ज्या दिव्याच्या प्रकाशात आत्ता काम करत होतो ते माझ्या राज्याचे काम होते, माझ्या राष्ट्राचे काम होते आणि त्या दिव्यामध्ये जे तेल भरलेले होते ते राष्ट्राच्या पैशातून भरलेले आहे. आता मी तुमच्याशी संवाद करणार हा माझा व्यक्तिगत संवाद असेल. हा संवाद राष्ट्राचा नाही! ते राष्ट्राचे तेल वाया जाऊ नये म्हणून मी तो दिवा विझवला, आणि दुसऱ्यात माझ्या स्वकष्टाचे तेल घातले आहे. म्हणून तो दुसरा दिवा पेटविला.' *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 17/11/2017 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ=========      *आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन.* 💥 ठळक घडामोडी :-  १९९२: महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष हरी नरके यांना दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीची फेलोशिप जाहीर. १९९४: रशियाच्या मीर या अंतराळस्थानकाने पृथ्वीभोवती ५०,००० फेर्‍या पूर्ण करून नवा विक्रम केला. 💥 जन्म :- १९२५ - रॉक हडसन, अमेरिकन अभिनेता. १९२८ - कॉलिन मॅकडोनाल्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू. १९३८ - रत्नाकर मतकरी, मराठी लेखक, नाटककार. १९५६ - स्टॅन्ली डिसिल्व्हा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  १९२८: स्वातंत्र्यसेनानी पंजाब केसरी लाला लजपतराय यांचे निधन.  १९६१: साहित्यिक व समीक्षक कुसुमावती आत्माराम देशपांडे यांचे निधन. २०१२: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे निधन.  २०१५: विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल यांचे निधन. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *पुणे: महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे राज्यातील पहिल्या महाखादी विक्री केंद्राचे व राज्यातील कारागिरांनी तयार केलेल्या वस्तूंच्या संग्रहालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.* ----------------------------------------------------- 2⃣ *कृषीपंपाचे थकित वीजबिल भरण्यास 15 दिवसांची मुदतवाढ आजपासून 30 नोव्हेंबरपर्यंत वीज खंडित होणार नाही.* ----------------------------------------------------- 3⃣ *पुण्यात तापमानाचा पारा घसरला; किमान तापमान १३.८ अंश सेल्सिअसवर* ----------------------------------------------------- 4⃣ *नवी दिल्ली : दिल्लीमध्ये सरकार एक हजार मोहल्ला क्लिनिक सुरू करणार* ----------------------------------------------------- 5⃣ *पुणे येथील गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन एस उमराणी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरु पदावर नियुक्ती* ----------------------------------------------------- 6⃣ *मुंबई - पुणे प्रवास अवघ्या 20 मिनिटांत होणार, वाहतुकीसाठी हायपर लूप तंत्रज्ञान येणार, हायपर लूप वन आणि राज्य सरकार यांच्यात करार.* ----------------------------------------------------- 7⃣ *पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद हाफिजची गोलंदाजी शैली आक्षेपार्ह आढळली; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून हाफिजचे निलंबन* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *बालविवाह कसे रोखता येतील ?* विवाहासाठी आता वयाचा दाखला अनिवार्य करत असल्या बाबतचे वृत्त वाचून आनंद वाटला. याबाबतीत एनसीपीसीआर'चे सदस्य यशवंत जैन म्हणाले की, बालविवाह प्रतिबंधक कायद्याची स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतर अंमलबजावणी न होणे ही निश्‍चितच चिंतेची बाब आहे. त्यामुळे विवाह करताना वयाचा दाखला आता अत्यावश्यक करण्यात..... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/05/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========      *हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे* बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी  पुणे येथे झाला असुन मृत्यू 17 नोव्हेंबर 2012 रोजी मुंबई येथे झाले आहे. हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी, व्यंगचित्रकार, संपादक होते. सामना या मराठी दैनिकाचे हे संस्थापक, तसेच प्रमुख संपादक होते. २३ जानेवारी, इ.स. १९२७ मध्ये प्रबोधनाची परंपरा असणाऱ्या घरात, पुणे येथे बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला. त्यांचे वडील केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे त्या काळात आपल्या लेखनातून, वक्तृत्वातून तसेच कार्याच्या माध्यमातून लोकजागरणाची धुरा सांभाळत होते. प्रबोधनकार अन्यायकारक रूढी-परंपरांवर व जातिभेदात्मक वर्णव्यवस्थेवर कडाडून हल्ला चढवत होते. तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचे योगदानही महत्त्वपूर्ण होते. प्रबोधनाचा, पुरोगामी विचारांचा व आक्रमक वृत्तीचा प्रबोधनकारांचा वारसा बाळासाहेबांमध्येही कळत-नकळतपणे उतरला. सर्वप्रथम एक कलाकार म्हणून -एक व्यंगचित्रकार म्हणून- त्यांनी सामाजिक प्रश्र्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. इ.स. १९५० मध्ये ते 'फ्री प्रेस जर्नल’ मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. बाळासाहेबांनी 19 जून 1966  रोजी ‘शिवसेनेची स्थापना केली. शिवसेनेचा पहिला मेळावा 30 ऑक्टोबर 1966 रोजी शिवतीर्थ मैदानावर संपन्न झाला. या मेळाव्यास सुमारे ५ लाख लोकांनी गर्दी केली होती.  *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *फक्त कौतुक करणाऱ्या अनेक व्यक्तींपेक्षा*.. *प्रोत्साहित करणारी एक अशी व्यक्ती सोबत असावी जी आयुष्यातील सर्व नकारात्मकतेला पुरून उरेल* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१)  भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत?* 👉     नरेंद्र मोदी *२)  भारताचे परराष्ट्रमंत्री कोण आहेत?* 👉     सुषमा स्वराज *३)  भारताचे सरंक्षणमंत्री कोण आहेत?* 👉      निर्मला सितारमण *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 अनंत कदम, गीतकार, नांदेड 👤 गोविंद बैस 👤 संतोष भाले, कुंडलवाडी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= " पिचले आहेत " कोणी कशात तर कोणी कशात पिचले आहेत जे पिचले नाहीत असे कोणी वाचले आहेत आज प्रत्येक माणूस कशात तरी पिचला आहे देव जाणे नेमका कोणता माणूस यात वाचला आहे    शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *तसं पाहिलं तर आपल्यापैकी बहुतेकांचं जीवन साचेबद्ध असतं. घर आणि नोकरी किंवा घर आणि व्यवसाय अशा दोन विश्वांतलं आपलं जीवन. त्यामधील माणसांभोवती फेर धरणारं जगणं. आपण स्वत:साठी जगत असतो; परंतु आई-वडिल, भावंडे, पती-पत्नी आणि मुलं, मित्र-मैत्रिणी, सहकारी यांच्यासाठीही जगत असतो. शिकत असतो त्यावेळी उत्तम गुण मिळवून परिक्षा उत्तिर्ण होण्याचं स्वप्न असतं आपलं. शिक्षणानंतर स्वप्न असतं ते करिअरचं. नोकरी वा व्यवसायात स्थिरावण्याचं आणि त्यानंतर स्वत:च्या कुटुंबाचं, घराचं. लग्नाचं आणि मग मुला-मुलींना वाढवण्याचं. म्हटलं तर हे चक्रच. त्या-त्या काळातील आपली महत्वकांक्षा हे चक्र फिरवित असते.* *महत्वकांक्षा हे एक मानवी मूल्य आहे. विद्यार्जनासाठी, कर्तृत्वासाठी, स्वयंप्रेरणेसाठी ते आवश्यकच असते. महत्वाकांक्षा नसेल तर मग आपण कशाचा ध्यास घेणार आणि त्याच्या मागे धावणार? आपली इच्छा असो वा नसो, आपण स्पर्धेत ओढलो जातोच. महत्वाकांक्षा आपल्यामधील स्पर्धात्मकता वाढविते, कष्ट करायला प्रेरणा देते, चिकाटी निर्माण करते. निसर्गाकडून आपल्या प्रत्येकाला कमी'-आधिक प्रमाणात प्रतिभाशक्ती मिळालेली असते. वैयक्तिक जीवनात महत्वाकांक्षा जशी आवश्यक, तशी ती समाजजीवनातही गरजेची आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी, गांधीजींनी, नेहरूंनी देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्याची आकांक्षा बाळगली. देशवासियांना एकत्र करून त्यांनी त्याची पूर्ताताही केली. महत्वाकांक्षा समाजासाठी अशा प्रकारे उपयुक्त ठरते.*     ••● 🔸‼ *रामकृष्णहरी* ‼🔸●••              🔹🔹🔹🔹🔹🔹       *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*             📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= सत्याची बाजू कधीच कमकुवत नसते.ती कधीच कुबड्याचा आधार घेत नाही किंवा इतरांना बोलायला संधीही देत नाही.उलट असत्य मात्र वेळोवेळी कुणाची ना कुणाची मदत किंवा आधार घेऊन आपली बाजू बळकट करण्याचा प्रयत्न करत असते तरीही यशस्वी होता येत नाही.जर असे असेल तर कशाला असत्याची बाजू घेऊन अपमानित जीवन जगता ! त्यापेक्षा सत्याचा स्वीकार करा आणि स्वाभिमानाने जीवन जगा.हाच मार्ग तुम्हाला यशाकडे घेऊन जातो. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०. 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *कविता -परिभाषा त्यागाची* लहानपणी शिकवले जातात तूला ती परिभाषा त्यागाची हातातील खेळणे घेऊनी तूला म्हणतात बहिण आहेस त्या भावाची... घरातील सण-सभारंभ असो किंवा असोत उत्साह साजरा तूम्ही मागे रहा माझ्या ताईनों आणि म्हणे ठेवा चेहरा सदा हसरा... जेव्हा तू एक स्त्री होते मूलीची माप उलटूनी जाता सख्याच्या घरी प्रथमच तूझी ओळख करुन दिली जाते परिभाषा त्यागाची तूझ्या स्त्रीत्वाच्या अस्तित्वाची पत्नी आई आणि लक्ष्मी बनते दिलेल्या त्या घराची जन्म घेतलेले माहेरास विसरण्यास शिकतेस परिभाषा त्यागाची ... स्वःताच्या ना उरल्या आवडी निवडी ना छंद उरला तूला तूझ्या त्या साधनेची उसंत ना तूला घडीभरची नाते जपूनी परिभाषा त्यागाची का तूझीच अशी परिक्षा पर्वा ना कोणा तूझ्या त्या जीवाची मर्यादा ओलांडून सहनशक्तीची तू ही जपतेस परिभाषा त्यागाची... *सौ.सुचिता नाईक किनवट* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= 👉 _*तुमच्या आत दडलेल्या सिंहाला जागे करा!*_ जर जंगलाचा विचार केला तर... 1) कोणता प्राणी सगळ्यात मोठा आहे? उत्तर - हत्ती 2) कोणता प्राणी सगळ्यात उंच आहे? उत्तर - जिराफ 3) कोणता प्राणी सगळ्यात चपळ आहे? उत्तर - कोल्हा 4) कोणता प्राणी सगळ्यात वेगवान आहे? उत्तर - चित्ता असं असलं तरी सिंह जंगलाचा राजा आहे. वरीलपैकी एकही क्वालिटी नसताना सिंह जंगलाचा राजा आहे हे विशेष. असं का बरं? सिंह धैर्यवान आहे. तो कोणतीही गोष्ट आत्मविश्वासाने करतो. तो कशाचीही भीती बाळगत नाही, कधी घाबरत नाही. कोणत्याही परिस्थितीत सिंहाला कोणीही थांबवू शकत नाही. सगळ्यात जास्त जोखीम घेणारा सिंह आहे. सिंहाला विश्वास आहे की, कोणताही प्राणी त्याच्यासाठी अन्न होवू शकतो. सिंह कोणतीही संधी सहजा-सहजी सोडत नाही. तो शेवटपर्यंत प्रयत्न करत असतो. वरील गोष्टींचा विचार केला तर आपण सिंहाकडून काय शिकू शकतो. आपण वेगवान नसलो तरी काही फरक पडत नाही. आपण सगळ्यात हुशार नसलो तरी काही फरक पडत नाही. आपण सगळ्यात स्मार्ट नसलो तरी काही फरक पडत नाही. आपण बुद्धिवान नसलो तरी काही फरक पडत नाही. मग गरज कशाची आहे? तर तुमच्याकडे धैर्य असले पाहिजे. तुमच्याकडे प्रयत्न करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असली पाहिजे. तुमचा तुमच्या प्रयत्नांवर विश्वास असाला हवा. मी हे करू शकतो, हा तीव्र विश्वास तुमच्याकडे असला पाहिजे. महत्वाचं म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आत एक सिंह दडलाय. त्याला बाहेर काढण्याची गरज आहे. अंतप्रेरणेने कामाला लागा, स्वतःवर, स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा. तुमच्या प्रत्येक कृतीचा आनंद घ्या, तुम्हाला हवं ते तुम्ही नक्कीच प्राप्त करू शकता. *प्रेरणात्मक*🦁 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 16/11/2017 वार - गुरुवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *जागतिक सहनशीलता दिवस* 💥 ठळक घडामोडी :-  १९४५: युनेस्को (UNESCO) ची स्थापना झाली. १९८८: अकरा वर्षांनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुका जिंकुन बेनझीर भुट्टो पाकिस्तानच्या पंतप्रधान बनल्या. १९९६: कोकण रेल्वेच्या रत्‍नागिरी – मुंबई मार्गाचा शुभारंभ. १९९६: चतुरंग प्रतिष्ठान च्या पर्सन ऑफ प्राईड पुरस्कारासाठी मुख्य निवडणुक आयुक्त टी. एन. शेषन यांची निवड. 💥 जन्म :- १९२७: मराठी व हिन्दी चित्रपटांतील कलाकार डॉ. श्रीराम लागू यांचा जन्म. १९२८: मराठी संत साहित्यातील विद्वान डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचा जन्म. १९३०: इंग्लिश खाडी पोहुन जाणारे पहिले भारतीय मिहिर सेन यांचा जन्म. १९६३: अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री यांचा जन्म. १९७३: बॅडमिंटनपटू पुल्लेला गोपीचंद यांचा जन्म. १९७१ - वकार युनिस, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  १२७२ - हेन्री तिसरा, इंग्लंडचा राजा. २००६ - मिल्टन फ्रीडमन, अमेरिकन अर्थतज्ञ. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नाशिक : आयकर कार्यालयाचे उद्घाटन. आयकर विभागातील सर्व अधिका-यांनी आपल्या भावी पिढीला सक्षम आणि चांगले भविष्य देण्यासाठी स्वतः त्याग करण्याची तयारी ठेवावी - प्रधान मुख्य आयकर आयुक्त ए.सी शुक्ल* ----------------------------------------------------- 2⃣ *ठाणे : लोकशाहीर विठठ्ल उमप सातवा स्मृती संगीत समारोह रविवार 26 नोव्हेंबरला गडकरी रंगायतन येथे होणार आहे.* ----------------------------------------------------- 3⃣ *नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठच्या पदवीदान सोहळ्यात विविध विद्याशाखेत गुणवत्ता प्राप्त केलेल्यांना 74 सुवर्णपदके प्रदान करण्यात आले असून 22 विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.* ----------------------------------------------------- 4⃣ *रत्नागिरी - १५ डिसेंबरपर्यंत राज्यातील खड्डे बुजविले नाही तर आंदोलन करणार, एक जरी खड्डा दिसला तरी मंञ्यांना राज्यात फिरू देणार नाही, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा इशारा.* ----------------------------------------------------- 5⃣ *अहमदनगर- शेगावचं ऊसदर आंदोलन स्थगित, उसाला पहिली उचल 2525 रुपयांवर सहमती* ----------------------------------------------------- 6⃣ *योगाला खेळाचा दर्जा देण्याचा सौदी अरेबियाने घेतलेला ऐतिहासिक निर्णय* ----------------------------------------------------- 7⃣ *माजी क्रिकेटपटू आशिष नेहरा आगामी भारत वि. श्रीलंका कसोटीचे करणार समालोचन* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *कथा - वेळ नाही मला* मोहन आणि त्याची पत्नी कमला शेतात मोलमजुरी करून आपल्या चार लेकराला शिक्षण दिले. आमच्यासारखे खडतर जीवन लेकरांच्या नशिबी येऊ नये यासाठी त्यांनी स्वतःच्या दोन एकर जमीन मध्ये कष्ट केलेच त्याशिवाय वेळप्रसंगी इतरांच्या शेतात जाऊन मोलमजूरी केली. मुलगा हवाच बायकोच्या या हट्टापायी ............ वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_14.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *पुल्लेला गोपीचंद* पी. गोपीचंद यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1973 रोजी नालगोंडा, आंध्र प्रदेश येथे झाला. पुल्लेला गोपीचंद हे एक भारतीय बॅडमिंटनपटू आहेत तसेच ते प्रसिद्ध बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांचे प्रशिक्षक देखील आहेत. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= वाणी आणि पाणी जपून वापरा कारण वाणीमुळे तुमचा वर्तमानकाळ आणि पाणीमुळे तुमचा भविष्यकाळ सुरक्षित राहणार आहे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) एकपेशीय कवकांना काय म्हणतात?* 👉 किण्व *२) एल. पी. जी. (LPG) मध्ये कोणते घटक असतात?* 👉 ब्युटेन आणि आयसोब्युटेन *३) कोणत्या शहरात वायुगळतीमुळे लाखो लोक मृत्युमुखी पडले?* 👉 भोपाळ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 संतोष पेटेकर, प्राथमिक शिक्षक 👤 छोटू पाटील, बाभळी 👤 मोहन कानगुलवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= " विषय " पुन्हा पुन्हा तोच विषय कोणालाच नको वाटतो धुमसता विषय सांगा कोणाला कशाचा पटतो कोणत्याही विषयाचे एक घाव दोन तुकडे झाले पाहिजे जेंव्हाचे तेंव्हाच विषय हाता वेगळे केले पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *आपण प्रत्येकाच्या घरीदारी सुख, शांती, समृद्धी नांदो अशीच प्रार्थना करीत असतो. एकमेकांना शुभेच्छा देतो. हीच गोष्ट जर पदोपदी जीवनभर आमच्या ठायी वसली, तर कष्टप्रद जीवनाचे आनंदवन व्हायला फार वेळ लागणार नाही. तशी प्रत्येकाला उजेडाची आस असते. म्हणून तो प्रकाश आणि सत्याची आस भाकतो, पण डोक्यात कुठल्या नं कुठल्या प्रकारचा अंधार असतो. जेव्हा हा अंधार पूर्णत्वाने दूर होतो, त्यावेळी ती व्यक्ती तेजाने उजाळते आणि अनेक पिढ्यांना प्रकाशमान करते. आपल्या मेंदूतले असे सारे अंधारे कोपरे उजळून निघावेत नि आपल्यातला माणूस तेजाने तळपू लागावा, यासाठी आपण दिपदान का मागू नये ?* *जळणं वा तेवणं हे जिवंत असल्याचं द्योतक. परंतु दिव्याचं जळणं हे कधी त्याच्यासाठी नसतं. ते इतरांना प्रकाश देण्यासाठीच जळत असतात. इतरांना उजाळण्यातच त्यांच्या जळण्याची सार्थकता असते. लहानपणी दिवाळसणाला तांड्यातल्या मुलींचे उजेडाचे गाणे ऐकले आहे. या मुली अंधारून आलेल्या अमावस्येला रात्रभर तांड्यातल्या प्रत्येक दारी हातात दिवा घेऊन प्रेम, जिव्हाळा व्यक्त करतात. हाच दिवा हातात घेऊन जळता ठेवण्याचं नि उजेडाचं गाणं आजन्म गाण्याचं वचन जर आम्ही प्रत्येकाने स्वत:ला दिले, तर ख-या अर्थाने अंधारावर उजेडाने आम्ही मात करू.!* ••●☆‼ *रामकृष्णहरी* ‼☆●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= कलाकाराच्या जीवनात कितीही सुखदु:खाचे चढ उतार असलेतरी तो प्रेक्षकांना निखळ आनंद देतो.तो आपले दु:ख कधीच सांगत नाही.तो इतरांच्या जीवनात असलेले थोडेबहुत दु:ख आपल्या कलेच्या माध्यमातून दूर करण्याचे काम करतो.ही देखील एक सेवाच आहे. आपणही त्याचपद्धतीने आपापल्या परीने इतरांच्या जीवनातले दु:ख काही प्रमाणात दूर करण्याचा प्रयत्न केल्यासआपल्यालाही आत्मिक समाधान मिळते. काही तरी आपल्या जीवनात एक चांगले काम केल्याचे समाधान वाटेल.आपणही आपल्या जीवनाचे कलाकार आहोत.फक्त कोणती कला कुठे आणि कशी उपयोगात आणावी यांचे ज्ञान असणे महत्त्वाचे आहे.आपले दु:ख सांगण्यापेक्षा इतरांचे दु:ख दूर करण्यासाठी प्रयत्न करावे.ही देखील एक सेवाच आहे. *व्यंकटेश काटकर, नांदेड.* संवाद...९४२१८३९५९०. 🍁🍃🌹🍃🍁🍃🌹🍃🍁🍃🌹 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *कविता - झोपडी* आज त्या माऊलीला मी कुढताना पाहिलं झोपडीच दार लावून हंभरडा फोडताना पाहिलं... वाट पाहीत बसते रोज कोवळ्या त्या कळीची आस खोटी मनी बाळगूनी दुःख दूर सारण्याची... बघती रोज स्वप्न ती झोपडीच्या अंगणात जगणे पार विसरुनिया गेली भान नाही अजिबात .... कोणाचेही दिसते पोर म्हणते ती आहे माझी म्हणते चल माझ्या लेकरा वाट पाहते आहे झोपडी तूझी... कस काय समजावे कळत नाही त्या माऊलीला पोर तिची गेली बळी ना परतणाऱ्या मार्गाला... गेली तिची आसव वाळून डोळ्यांना पडल्या तिच्या खाचा झोपडीच्या दारात बसते गूमसूम बंदच झाली तिची वाचा... *सौ. सुचिता नाईक किनवट* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *संधी* एक दानशूर राजा होता.त्यानं एक दिवस जाहिर केलं की,उद्ध्या माझ्या महालाचा मुख्य दरवाजा उघडला जाईल.त्या . नंतर ज्याला जी वस्तू हवी असेल,त्यानं फक्त त्या वस्तूला हात लावायचा. दुसरा दिवस उजाडला,सर्व लोक राजवाड्यात शिरले,गर्दी जमली.प्रत्येकजण आपल्याला हवी असलेली वस्तू शोधायचा, कुणी सोने घेतले,कुणी पैसे,कुणी घोडा तर कुणी दुभती जनावरे. राजा एका कोप-यात थांबून हा सर्व प्रकार पाहात होता.अचानक,त्याचं लक्ष एका चिमुकलीवर गेलं.ती गर्दीतून वाट काढत हळूहळू राजाच्या दिशेने येत होती.राजा पहात असतानाच ती त्याच्याजवळ पोहोचली आणि तिने आपल्या नाजूक हातांनी राजाला स्पर्श केला.क्षणार्धात राजा तिचा झाला.राजाच तिचा झाल्यामुळे तिथल्या सर्व वस्तूदेखील तिच्या मालकीच्या झाल्या. 💐 विचार करा 💐 ज्या पध्दतीने राजाने लोकांना संधी दिली होती त्याच पध्दतीने परमेश्वर आपल्या प्रत्येकाला रोज संधी देतो.पण,त्या लोकांसारखीच आपली चूक होते,परमेश्वराऐवजी आपण,त्याने निर्मिलेल्या प्रापंचिक वस्तू निवडतो.पण,देवच जर आपला झाला तर संपूर्ण जगच आपले होईल, खरंय ना !!! *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 15/11/2017 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९८९ - सचिन तेंडुलकरने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 💥 जन्म :- १९५४ - आलेक्सांदेर क्वाशन्येफ्स्की, पोलंडचा तिसरा राष्ट्राध्यक्ष. १९६१ - झहीद अहमद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू. १९६८ - पीटर मार्टिन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  १९८२ - आचार्य विनोबा भावे महाराष्ट्र, भारत *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मुंबई - नारायण राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशाबाबत अद्याप निर्णय नाही, राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडल्याची सूत्रांची महिती* ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली : इंदूर-मनमाड रेल्वे प्रकल्पाला हिरवा कंदील; रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची माहिती* ----------------------------------------------------- 3⃣ *नवी दिल्ली : सांगली आणि नाशिक येथे ड्राय पोर्टला मान्यता, या भागातला शेतीमाल निर्यात करण्याची होणार सोय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषदेत घोषणा* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबई : बेस्टच्या भाडेवाढीविषयक सुधारणांना पालिकेत मंजुरी मिळाल्यास ४ किमीनंतर १ ते १२ रुपयांपर्यंत भाडेवाडीची शक्यता* ----------------------------------------------------- 5⃣ *अहमदनगर : जिल्हा बॅंकेच्या ३५० कोटी रुपयांच्या जुन्या नोटा अारबीअायने परत घेतल्या, बारा कोटी घेण्यास नकार* ----------------------------------------------------- 6⃣ *जालना : जिल्ह्यात ३६ कषी सेवाकेंद्राचे परवाने निलंबित. कषी विभागाने केली कारवाई.* ----------------------------------------------------- 7⃣ *६० वर्षात पहिल्यांदाच नामुष्की, चारवेळेचा चॅम्पियन इटली विश्वचषकाबाहेर, प्ले आॅफच्या दुस-या फेरीतील स्वीडनविरुद्ध सामना अनिर्णीत* ----------------------------------------------------- *विशेष बातमी - सोलापूरचे मधुकर माळी निर्मित शाळा अॅपचे काल झाले ऑनलाइन उद्घाटन* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *हेडफोनपासून दूर रहा* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2016/12/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *विनायक नरहरी भावे* विनायक नरहरी भावे (आचार्य विनोबा भावे) (सप्टेंबर ११, १८९५ - नोव्हेंबर १५, १९८२) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक व भूदान चळवळीचे प्रणेते होते. महात्मा गांधींनी १९४०मध्ये 'वैयक्तिक सत्याग्रह' पुकारला, त्यावेळीही पहिले सत्याग्रही म्हणून त्यांनी आचार्य विनोबा भावे यांची निवड केली. ब्रिटिश राजविरोधी या आंदोलनाचे पर्यवसान १९४२मध्ये 'छोडो भारत' आंदोलनात झाले. भावे पुढे सर्वोदयी नेते म्हणून प्रसिद्ध झाले. थोर गांधीवादी आचार्य व भूदान चळवळीचे प्रवर्तक. कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तहसिलातील गागोदे या गावी विनोबा तथा विनायक नरहरी भावे यांचा जन्‍म झाला. आजोबांचे नाव शंभुराव भावे. शंभुराव भावे यांचे जन्मगाव वाई. त्यांच्या अनेक पिढ्यांचे वास्तव्य वाई येथे होते. वाईच्या ब्राम्हणशाही या मोहल्ल्यात कोटेश्वर मंदिर आहे. हे भाव्यांच्या मालकीचे असून तेथे शंभुरावांनी अग्‍निहोत्र स्वीकारून अग्‍निहोत्र शाळा स्थापली होती. आजोबा आणि मातुश्रींपासून धर्मपरायणतेचे संस्कार विनोबांना मिळाले. त्यांचे वडील नरहरी शंभुराव भावे व आई रूक्मिणीबाई. वडील नोकरीच्या निमित्ताने बडोदे येथे गेले. विनोबांचे माध्यमिक आणि उच्च शिक्षण बडोदे येथेच झाले. १९१६ साली महाविद्यालयीन इंटरची परीक्षा देण्यासाठी ते मुंबईस जाण्यास निघाले; परंतु वाटेतच सुरतेस उतरून आईवडिलांना न कळविताच वाराणसी येथे रवाना झाले. त्यांना दोन गोष्टींचे आकर्षण होते. एक हिमालय व दुसरे बंगालचे सशस्त्र क्रांतिकारक, वाराणसी येथे हिंदु विश्वविद्यालयातील एका समारंभात महात्मा गांधीचे भाषण झाले. त्याचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. हिमालयातील अध्यात्‍म आणि बंगालमधील क्रांती यांच्या दोन्ही प्रेरणा महात्मा गांधीच्या उक्तीत आणि व्यक्तिमत्त्वात त्यांना आढळल्या. त्यांनी महात्मा गांधींशी पत्रव्यवहार केलाव गांधींची कोचरब आश्रमात ७ जून १९१६ रोजी भेट घेतली आणि तेथेच त्या सत्याग्रहश्रमात नैष्ठिक ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा करून जीवनसाधना सुरू केली. ऑक्टोबर १९१६ रोजी महात्मा गांधींची एक वर्षांची रजा घेऊन ते वाई येथे प्राज्ञपाठशाळेत वेदान्ताच्या अध्ययनाकरिता उपस्थित झाले. ब्रह्यविद्येची साधना त्यांचा जीवनोद्देश होता. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= समता ही आजची हाक आहे. ती आपणास आवडो वा नाआवडो, समता आजचा युगधर्म आहे याची जाणीव ठेवली पाहिजे. - विनोबा भावे *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१)महाराष्ट्रातील अहमदनगर या जिल्ह्यास एकूण किती जिल्ह्याच्या सीमा संलग्न आहेत?* 👉 आठ *२) महाराष्ट्रातील किती जिल्ह्याच्या सीमा "मध्यप्रदेश" या राज्याशी संलग्न आहेत?* 👉 आठ *३) महाराष्ट्रात सर्वाधिक अंतर धावणारी "महाराष्ट्र एक्सप्रेस" किती जिल्ह्यातून प्रवास करते?* 👉 चौदा *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 व्यंकटेश विरेश पाटील, येवती 👤 सुनील शिंदे, पांगरी 👤 राहुलकुमार सातव, कुपटी, माहूर 👤 भगवान भूमे, देगलुर 👤 अशोक चिंचोलीकर, धर्माबाद 👤 दिनेश येवतीकर, येवती 👤 कमलेश परब 👤 मारोती कानगुलवार, येवती 👤 गंगाधर मरकंठवाड, येवती 👤 सोनाली कडवईकर, रत्नागिरी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= " सुगंध " सुगंध वाटणाराचा हातही सुगंधी होतो तो वाटतांना जगण्याची नवी नवी धुंदी देतो माणूस नित्य नव्या धुंदीत जगला पाहिजे स्वतःसह दुस-याला आनंद मिळेल असा वागला पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= •••●⚜‼ *विचार धन* ‼⚜●••• *ग्रंथपारायणात रस नसलेलो आम्ही पुस्तकांची पानं फाडून, होड्या बनवून पावसात सोडायचो. काही दु:ख वाटायचं नाही उलट मौज वाटायची. पुस्तकाची किती पानं फाडलीत हे कुठं कळायचं, आई-बापांना ! अशा पुरात सोडलेल्या होड्या वाहुन समुद्राला गेल्या; पण डोळ्यातील स्वप्नांना मात्र त्यांनी बुडू दिलं नाही. पुस्तकांच्या पानांच्या होड्या, विमानं, पतंग बनवायला मिळतात म्हणून शाळेची वाट गोड. मजबुरीने धरलेल्या वाटेवर याच ग्रंथाच्या होडीने अथांग दर्यावर हुकूमत गाजवणारा नावाडी बघता बघता कधी बनवून टाकले, कळलेच नाही. तेंव्हा वाटले नव्हते, की या कागदी नावेला स्वप्नांची वल्हं आणि स्वप्नांचा अमर्याद धागा जोडला आहे ते.!* *आज ग्रंथांविषयी निराशापूर्ण वातावरण दिसते. ग्रंथांकडे समाज दुर्लक्ष करतोय, पण "किताबों पर धूल जम जाने से, कहानी थोडेही खत्म हो जाती है!" कुठल्याही काळात ही धूळ झटका, पुस्तकं पुन्हा भरभरून बोलतील. प्रत्येकाला ही कागदाची नाव आणि शाईचं इंधन पुरेसं आहे ; हा जीवनाचा अथांग दर्या तरून जायला.* ••●🌸 ‼ *रामकृष्णहरी* ‼🌸●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸 *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎯 विचारवेध...........✍🏼 +++++++++++++++++++++ जीवनात तुम्हाला चांगले जगायचे तर येणा-या कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी ठेवा.कारण कोणतीही परिस्थिती चांगली असतेच असे नाही.कधी कधी वाईट आणि बिकट परिस्थितीतून ही मार्ग काढून सुखी जीवन जगण्यासाठी एखादा आशेचा किरण सापडत असतो.पण आता आपल्याला आपल्या जीवनात दु:खच आहे आणि दुःखच भोगावे लागणार त्याच्याशिवाय आता दुसरा पर्यायच नाही असे जर म्हटले तर मग जीवनात दु:खाशिवाय दुसरे काहीच भोगायला मिळणार नाही. उलट जर तुम्हाला त्यातून बाहेर पडायचे असेल आणि सुखाने जीवन जगायचे असेल तर हातपाय तर हलवावेच लागतील. मेहनत करावी लागेल, काहीतरी काम शोधावे लागेल,आपले निराशावादी मन आशेकडे न्यावे लागेल, नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारांकडे न्यावे लागेल तर तुम्हाला सुखी जीवन जगण्याचा मार्ग सापडेल. अन्यथा मग आपल्या जीवनाच्या जीवनशैलीला आहे तसेच स्वीकारुन जीवनभर यातना,दु:ख यांना जवळ करावे लागेल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद...९४२१८३९५९०. 🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *कविता - बालगीत* माझे नाव चिंटू ईटूकूला पिंटू अभ्यासाचा येतो त्रास मला खूप परंतु... अक्षरांचे खेळ सारे इकडून तिकडे जाई वारे गणिताचे पाढे करतात माझी चाढे... इतिहासाची तासिका इतिहास जमा करते मला भूगोलातील पृथ्वीअभ्यास घोर लावी माझ्या जीवाला... विज्ञानाच्या पाठामध्ये अनेक पडतात रसायन मला मात्र तेव्हा आठवते शारीरिक शिक्षणातील शवासन... कधी तरी बाई मला स्वछंदी खेळूद्या दप्तराचे ओझे माझ्या पाठीवरचे उतरु द्या... प्रगत अप्रगत चा फेरा तूम्हास नाही चूकणार आवडीचे खेळ आमचे अभ्यासाने मूकणार... *सौ. सुचिता नाईक किनवट* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *तेनालीराम की चतुराई* एक बार राज दरबार में नीलकेतु नाम का यात्री राजा कृष्णदेव राय से मिलने आया। पहरेदारों ने राजा को उसके आने की सूचना दी। राजा ने नीलकेतु को मिलने की अनुमति दे दी। यात्री एकदम दुबला-पतला था। वह राजा के सामने आया और बोला- महाराज, मैं नीलदेश का नीलकेतु हूं और इस समय मैं विश्व भ्रमण की यात्रा पर निकला हूं। सभी जगहों का भ्रमण करने के पश्चात आपके दरबार में पहुंचा हूं। राजा ने उसका स्वागत करते हुए उसे शाही अतिथि घोषित किया। राजा से मिले सम्‍मान से खुश होकर वह बोला- महाराज! मैं उस जगह को जानता हूं, जहां पर खूब सुंदर-सुंदर परियां रहती हैं। मैं अपनी जादुई शक्ति से उन्हें यहां बुला सकता हूं।  नीलकेतु की बात सुन राजा खुश होकर बोले - इसके लिए मुझे क्‍या करना चाहिए? उसने राजा कृष्‍णदेव को रा‍त्रि में तालाब के पास आने के लिए कहा और बोला कि उस जगह मैं परियों को नृत्‍य के लिए बुला भी सकता हूं। नीलकेतु की बात मान कर राजा रात्रि में घोड़े पर बैठकर तालाब की ओर निकल गए। तालाब के किनारे पहुंचने पर पुराने किले के पास नीलकेतु ने राजा कृष्‍णदेव का स्‍वागत किया और बोला- महाराज! मैंने सारी व्‍यवस्‍था कर दी है। वह सब परियां किले के अंदर हैं। राजा अपने घोड़े से उतर नीलकेतु के साथ अंदर जाने लगे। उसी समय राजा को शोर सुनाई दिया। देखा तो राजा की सेना ने नीलकेतु को पकड़ कर बांध दिया था।  यह सब देख राजा ने पूछा- यह क्‍या हो रहा है?  तभी किले के अंदर से तेनालीराम बाहर निकलते हुए बोले - महाराज! मैं आपको बताता हूं?  तेनालीराम ने राजा को बताया- यह नीलकेतु एक रक्षा मंत्री है और महाराज...., किले के अंदर कुछ भी नहीं है। यह नीलकेतु तो आपको जान से मारने की तैयारी कर रहा है।  राजा ने तेनालीराम को अपनी रक्षा के लिए धन्यवाद दिया और कहा- तेनालीराम यह बताओं, तुम्हें यह सब पता कैसे चला ? तेनालीराम ने राजा को सच्‍चाई बताते हुए कहा- महाराज आपके दरबार में जब नीलकेतु आया था, तभी मैं समझ गया था। फिर मैंने अपने साथियों से इसका पीछा करने को कहा था, जहां पर नीलकेतु आपको मारने की योजना बना रहा था। तेनालीराम की समझदारी पर राजा कृष्‍णदेव ने खुश होकर उन्हें धन्‍यवाद दिया। *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*माझी शाळा माझे उपक्रम* *🌹👭बालदिन👭🌹* 〰〰〰〰〰〰〰 *आज दिनांक १४नोव्हेंबर २०१७ जि.प.प्रा. शा. वाटेगाव ता.हदगाव जि.नांदेड येथे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान श्री पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती बालक दिन म्हणून साजरी करण्यात आली.व त्यानिमित्याने बालसभेचेही आयोजन करण्यात आले.* 👭 👬 👭 👭 🌹🌹🌹🌹🌹🌹 *या कार्यक्रमाचे अध्यक्ष : मा.मु.अ.श्री चव्हाण सर* *प्रमुख पाहुणे.मा.शि.वि.अ.श्री जाधव साहेब,श्री चव्हाण सर*🌹 *प्रतिमा पूजन सर्व विद्यार्थी,शिक्षक ,पाहुणे यांनी केले.त्यानंतर* *सदरिल कार्यक्रमात इयत्ता १ ते ७ वी तील विद्यार्थ्यानी सुंदर भाषणे केली. व गीतांचे सादरीकरण केले.* 🌹🌹🌹🌹🌹🌹 *मा.शि.वि.अ.श्री पी.वाय.जाधव साहेब यांना विविध पुरस्काराने सन्माननीत केले असल्याने त्यांचे आमच्या शाळेच्या वतीने अभिनंदनीय स्वागत करण्यात आले.* *तसेच त्यांनी बालक दिनाचे महत्वही विद्यार्थ्यांना पटवून दिले.शाळेतील श्री चव्हाण सर,रामटेके सर,श्रीमती झाडे मँडम,सेनकुडे मँडम,लोने मँडम यांच्या उपस्थितीत व सहकार्याने आजचा हा बालदिनाचा कार्यक्रम गोड खाऊ वाटप करून आनंदाने पार पडला.* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *सदरील कार्यक्रमाचे सुत्रसंचालन : वर्ग ५,६, ७ वी तील कु.विजया,कोमल,तर आभार प्रदर्शन कु.शिवानी हिने मानले.* *➖➖➖➖➖➖➖* *✍🏻श🔶ब्दांकन* *🙏श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे* 🙏 *(सह.शिक्षिका*) 〰〰〰〰〰〰〰 *काही क्षणचिञे* 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 14/11/2017 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *बालदिन* 💥 ठळक घडामोडी :-  १९७१ - मरीनर ९ हे अंतराळयान मंगळाच्या कक्षेत पोचले. १९७५ - स्पेनने पश्चिम सहारातून पळ काढला. 💥 जन्म :- १८८९ - जवाहरलाल नेहरू, प्रथम भारतीय पंतप्रधान १९२४ - रोहिणी भाटे, मराठी कथकनर्तिका. १९४२ - इंदिरा गोस्वामी, आसामी साहित्यिक, कवयित्री, संपादिका. 💥 मृत्यू :- १९१४ - वेंगायिल कुन्हीरामन नयनार, मल्याळम लेखक, पत्रकार. १९७७ - ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, भारतीय तत्त्वज्ञानी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣*भारतात परिवर्तन घडवण्यासाठी आम्ही दिवस-रात्र मेहनत घेत आहोत - पंतप्रधान नरेंद्र मोदी.* ----------------------------------------------------- 2⃣ *चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील कोर्धा जि. प. शाळेतील 26 विद्यार्थ्यांना चंद्रजोतीच्या विषारी बिया खाल्ल्याने विषबाधा. विद्यार्थ्यांना प्रा.आ.केंद्र नवेगांव पांडव येथे उपचार सुरू.* ----------------------------------------------------- 3⃣*मुंबई : मराठी, इंग्रजी टायपिंग सर्टिफिकेट वेळेवर सादर न केल्याने अनुकंपावरील अनेकांना सेवा समाप्तीचे आदेश केले रद्द, संचालक मंडळाचा सदरच्या लिपिकांना नोकरीत घेण्याचा निर्णय* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबई - हिवाळी अधिवेशानापुर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर कोर कमिटीची बैठक, पंकाजा मुंडे, विनोद तावडे, खडसे यांची उपस्थिती* ----------------------------------------------------- 5⃣ *लंडन : संसदेत नवा कायदा केल्यासच युनायटेड किंग्डमला युरोपीयन युनियनमधून बाहेर पडता येईल: ब्रेक्झीट सचिव डेव्हिड डेव्हिस* ----------------------------------------------------- 6⃣ *जम्मू-काश्मीर - हंदवाडा येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान, शोधमोहीम सुरू* ----------------------------------------------------- 7⃣*औरंगाबाद: सी. के. नायडू क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाची दुसऱ्या डावात नऊ बाद १८७ अशी स्थिती; पंजाबची विजयाकडे वाटचाल* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *भारताचे शिल्पकार आणि जगाचे शांतीदूत - पंडीत जवाहरलाल नेहरू* http://nasayeotikar.blogspot.com/2017/10/blog-post_27.html वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. _चित्रांकन :- विनायक काकुळते, नाशिक_ _शब्दांकन :- नासा येवतीकर, धर्माबाद_ आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= आराम हराम है *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१). जागतिक बालदिन कधी साजरा केल्या जातो?* 👉. २० नोव्हेंबर *२) भारतात बालदिन कधी साजरा केल्या जातो?* 👉. १४ नोव्हेंबर *३). भारतात कोणाचा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा केल्या जातो?* 👉. पंडित जवाहरलाल नेहरू *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 सुहास चटने 👤 सुभाष चंदने 👤 शीतल चौगुले 👤 खंडू सोळंखे 👤 योगेश पाटील बादलगावकर 👤 विनोद पांचाळ 👤 मोहन लंगडापुरे 👤 भारत शेळके *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= " सत्य " चूकीच दिसूनही त्याच्यावर बोलता येत नाही सत्याच्या मार्गाने सहज कोणाला चालता येत नाही सत्याच्या मार्गा वरून माणूस कसातरी चालतो काही सत्य टाळतो अन् काही काहीच बोलतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *रोज सकाळी देवपूजा करून आपल्या कामाला लागणारी अगणित माणसे आपल्या अवतीभवती असतात. आपणही देवपूजा करीत रोजचे एक कर्म उरकत असतो. या सगळ्या क्रियेमध्ये भाव किती ? हा खरा आजचा प्रश्न आहे. संत ज्ञानेश्वरांनी असे म्हटले आहे की,* *भावेविण भक्ती। भक्तिविण मुक्ती।* *बळेविण शक्ती। बोलू नये॥* *या सगळ्या मुळाशी भाव ही गोष्ट मोलाची आहे. ती नसेल तर देवपूजा ही फक्त रोजच्या अनेकविध घटनांपैकी एक होऊन राहते. मन जर विकारांनी भरलेले असेल, तर तिथे भावशक्ती बळ धरू शकत नाही.* *संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास अथवा अलिकडचे संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज या सर्वांनाच समाजाने तत्कालीन कालखंडात जी वागणूक दिली ती बहुतांश नकारात्मकच होती, असे आपल्या लक्षात येईल. पण तरीही कोणत्याही परिस्थितीत या सर्वांनी आपल्या मनातला देवाबद्दलचा स्थायीभाव ढळू दिला नाही. आपल्या मनात असलेले कार्य भावनांच्या बळावर ते करीत राहिले, त्यामुळे ते संतत्वाला पोहचले. हे संतत्व आपल्याला आयुष्यात कळले पाहिजे. ते एकदा कळले, की समस्याग्रस्त आयुष्यही सुलभ वाटू लागते. हे सगळे वाटणे आयुष्यात उतरण्यासाठी आपली पहिली पायरी आपल्या हातुन रोज होणा-या 'देवपूजे'ची आहे. ती देवपूजा आपण मनोभावे करू या..!* ••●🌼‼ *रामकृष्णहरी* ‼🌼●•• 🌼🌼🌼🌼🌼🌼 *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*               📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= माणसाच्या जीवनात कितीही सुख असले तरी तो सुखी नाही.कारण जास्तीच्या सुखाच्या मोहापायी आहे ते सुख सोडून त्यांच्या मागे धावण्याची जणू काही स्पर्धाच करत आहे.त्या मोहापायी आपण काय करत आहोत याचे भानही राहिलेले नाही.अशा वृत्तीने जर जीवनात जगण्याचा प्रयत्न केला तर सुखापेक्षा दु:खच अधिक भोगावे लागेल हे निश्चित. सुखासाठी आपले मन हे समाधानी असेल आणि अपेक्षा मर्यादित असतील तर आहे त्या सुखाचा आनंद जीवनात समाधानाने घेता येतो. * व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. 🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *कविता -अ चे गाणे* अरे अरे अक्षरे अशी कुठ जाती अ चा अर्धा गोल अलगद खाली येशी अथक तूझ्या प्रयत्नाने अचूकता आली अविरत तूझ्या कार्याने अमूल्य अक्षरे वाचता आली अमूर्ताकडून मूर्ताकडे अशी तूझी वाटचाल असाध्य ते साध्य होई अतूल्य यश जीवनात येई *सुचिता नाईक किनवट* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *ज्ञानाचा दिवा तेवत ठेवा* द्रोण जेंव्हा गुरुकुलामध्ये वर्गात कौरव आणि पांडवांना शिकविण्यासाठी तेंव्हा ते अत्यंत प्रसन्न होते. द्रोण स्वतः परम गुरु होते. मात्र त्या एका दिव्य ज्ञानाचा अनुभव आला होता आणि तोच त्यांच्या सर्व अस्तित्वातून अभिव्यक्त होत होता. वर्गात गुरुदेव आल्याबरोबर त्यांनी तोच अनुभव विद्यार्थ्यांना सांगितला. त्यांनी सांगितले कि काल रात्री एक अशी घटना घडली कि, अर्जुन आश्रमात भोजन करीत होता. बाकी विद्यार्थ्यांचे भोजन आटोपले होते. रात्र बरीच झाली होती. अर्जुन एका दिव्याच्या भोजन करत होता. अचानक हवेची झुळूक आली आणि दिवा विझला. मात्र त्यानंतरहि अर्जुन भोजन करत राहिला अंधारातही त्याला भोजन करण्यास बाधा वाटली नाही. भोजन पूर्ण झाले आणि अर्जुन उठला आणि धनुर्भ्यास करू लागला. गुरुनी पुढे सांगितले, बाणांचा आवाज ऐकून मी बाहेर आलो तेंव्हा अर्जुनाने मला सांगितले कि भोजनादरम्यान मला अंधाराचे काही वाटले नाही तसेच बाण चालवितानाही मला अंधाराचा अडसर आला नाही. बघा गुरुवर्य ! आपल्या कृपेमुळे मला अंधारातही बाण लक्ष्यापर्यंत पोहोचविता येत आहेत. गुरुजी म्हणाले,"अर्जुनाचा हा प्रयत्न अनुकरणीय आहे. दिवा फक्त उजेडाचा प्रसार करतो पण अंधारात मात्र ज्ञानाच्या दिव्याने, हृदयातील आत्मज्योतीने जर सराव केला तर कोणतेच काम अशक्य नाही." तात्पर्य :- सरावानेच माणूस लक्ष्य प्राप्त करू शकतो. एक विशिष्ट उंची गाठण्यासाठी, यश प्राप्तीसाठी अंतरीच्या ज्ञान ज्योतीला जागृत करणे गरजेचे आहे.ज्ञानारुपी दिवा नेहमी तेवत ठेवत राहणे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

एखादा सूर असा यावा क्षितिजाचा पार दिसावा।। एखादा आलाप असा खुलावा सारा आसमंत उजळून जावा।। एखादी तान अशी बरसावी सारी तृष्णा मिटून जावी।। एखादी सरगम अशी लहरावी वा-यालाही भूल पडावी।। एखादी लय अशी जुळावी सारी जाणीव विरुन जावी।। एखादा ताल असा भरावा अंतापर्यंत तोल रहावा।। एखादी सम अशी पडावी जिवाशिवाची गाठ व्हावी।। एखादा राग असा फुलावा अनंताला जाऊन भिडावा।। एखादा ख्याल असा मांडावा यमुनातीरी ताज बनावा।। एखादी ठुमरी अशी रंगावी इंद्रधनूची कमान व्हावी।। एखादं गीत असं छेडावं शब्दांपलिकडे बोलकं व्हावं।। एखादं भजन असं गावं निर्गुणाचं कोडं सुटावं।। एखादा श्रोता असा मिळावा अद्वैताचा स्पर्श घडावा।। एखादा संवाद असा जुळावा गंगेवरती चंद्र झुलावा।। एखादी मैफिल अशी जमावी गाभा-यागत पुनीत व्हावी।। .......प्रभा अत्रे

*एक बच्चे को आम का पेड़ बहुत पसंद था।* *जब भी फुर्सत मिलती वो आम के पेड के पास पहुच जाता।* *पेड के उपर चढ़ता,आम खाता,खेलता और थक जाने पर उसी की छाया मे सो जाता।* *उस बच्चे और आम के पेड के बीच एक अनोखा रिश्ता बन गया।* *बच्चा जैसे-जैसे बडा होता गया वैसे-वैसे उसने पेड के पास आना कम कर दिया।* *कुछ समय बाद तो बिल्कुल ही बंद हो गया।* *आम का पेड उस बालक को याद करके अकेला रोता।* *एक दिन अचानक पेड ने उस बच्चे को अपनी तरफ आते देखा और पास आने पर कहा,* *"तू कहां चला गया था? मै रोज तुम्हे याद किया करता था। चलो आज फिर से दोनो खेलते है।"* *बच्चे ने आम के पेड से कहा,* *"अब मेरी खेलने की उम्र नही है* *मुझे पढना है,लेकिन मेरे पास फीस भरने के पैसे नही है।"* *पेड ने कहा,* *"तू मेरे आम लेकर बाजार मे बेच दे,* *इससे जो पैसे मिले अपनी फीस भर देना।"* *उस बच्चे ने आम के पेड से सारे आम तोड़ लिए और उन सब आमो को लेकर वहा से चला गया।* *उसके बाद फिर कभी दिखाई नही दिया।* *आम का पेड उसकी राह देखता रहता।* *एक दिन वो फिर आया और कहने लगा,* *"अब मुझे नौकरी मिल गई है,* *मेरी शादी हो चुकी है,* *मुझे मेरा अपना घर बनाना है,इसके लिए मेरे पास अब पैसे नही है।"* *आम के पेड ने कहा,* *"तू मेरी सभी डाली को काट कर ले जा,उससे अपना घर बना ले।"* *उस जवान ने पेड की सभी डाली काट ली और ले के चला गया।* *आम के पेड के पास अब कुछ नहीं था वो अब बिल्कुल बंजर हो गया था।* *कोई उसे देखता भी नहीं था।* *पेड ने भी अब वो बालक/जवान उसके पास फिर आयेगा यह उम्मीद छोड दी थी।* *फिर एक दिन अचानक वहाँ एक बुढा आदमी आया। उसने आम के पेड से कहा,* *"शायद आपने मुझे नही पहचाना,* *मैं वही बालक हूं जो बार-बार आपके पास आता और आप हमेशा अपने टुकड़े काटकर भी मेरी मदद करते थे।"* *आम के पेड ने दु:ख के साथ कहा,* *"पर बेटा मेरे पास अब ऐसा कुछ भी नही जो मै तुम्हे दे सकु।"* *वृद्ध ने आंखो मे आंसु लिए कहा,* *"आज मै आपसे कुछ लेने नही आया हूं बल्कि आज तो मुझे आपके साथ जी भरके खेलना है,* *आपकी गोद मे सर रखकर सो जाना है।"* *इतना कहकर वो आम के पेड से लिपट गया और आम के पेड की सुखी हुई डाली फिर से अंकुरित हो उठी।* *वो आम का पेड़ कोई और नही हमारे माता-पिता हैं दोस्तों ।* *जब छोटे थे उनके साथ खेलना अच्छा लगता था।* *जैसे-जैसे बडे होते चले गये उनसे दुर होते गये।* *पास भी तब आये जब कोई जरूरत पडी,* *कोई समस्या खडी हुई।* *आज कई माँ बाप उस बंजर पेड की तरह अपने बच्चों की राह देख रहे है।* *जाकर उनसे लिपटे,* *उनके गले लग जाये* *फिर देखना वृद्धावस्था में उनका जीवन फिर से अंकुरित हो उठेगा।* आप से प्रार्थना करता हूँ यदि ये कहानी अच्छी लगी हो तो कृपया ज्यादा से ज्यादा लोगों को भेजे ताकि किसी की औलाद सही रास्ते पर आकर अपने माता पिता को गले लगा सके !

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 13/11/2017 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९९५ : सौदी अरेबियाच्या रियाध शहरात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या ट्रक-बॉम्बस्फोटात पाच अमेरिकन व दोन भारतीय ठार. 💥 जन्म :- १८५५ : गोविंद बल्लाळ देवल, प्रसिद्ध मराठी नाटककार. १८७३ : बॅरिस्टर मुकुंद रामराव जयकर, पुणे विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू, भारतीय स्वातंत्र्यसैनिक. १९१७ : वसंतदादा पाटील, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री. १९५४ : स्कॉट मॅकनीली, सन मायक्रोसिस्टम्सचा सर्वोच्च अधिकारी. 💥 मृत्यू :- १२४० : रझिया सुलतान, गुलाम घराण्यातील कर्तबगार राजकर्ती. १७७० : जॉर्ड ग्रेनव्हिल,युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान. १८६७ : पोप निकोलस पहिला. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *माथेरान येथील मुख्य बाजारपेठेतील महात्मा गांधी रोडवर पहाटे लागलेल्या  आगीत चार दुकाने जळून खाक, आगीत जवळपास ७० ते ८० लाखांच्या  आसपास दुकानातील मालाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज* ----------------------------------------------------- 2⃣ *दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी फिलिपीन्सच्या तीन दिवसीय दौऱ्यासाठी झाले रवाना* ----------------------------------------------------- 3⃣ *मुंबई : तांत्रिक कामांसाठी मुंबई लोकलच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक. सकाळी १० ते ४.४५ दरम्यान वेगवेगळ्या लाईन्सवर करणार काम.* ----------------------------------------------------- 4⃣ *नाशिक : महिलांना स्वातंत्र्य द्या, महिला अत्याचार रोखण्यासाठी सांस्कृतिक परिवर्तन हवे. त्यासाठी गीता समजून घ्या. - खासदार सुब्रमण्यम स्वामी* ----------------------------------------------------- 5⃣ *नाशिक : जिल्हा परिषद सदस्याच्या गाडीच्या धडकेत समाधान वसंत वाघ (27) या शिक्षकाचा मृत्यू. जि.प.सदस्य गणेश अहिरे यांना अटक. सटाणा येथील घटना.* ----------------------------------------------------- 6⃣ *नाशिक गारठले : राज्यात सर्वाधिक थंडीचा कडाका, नाशिकचा पारा घसरला, कालचे किमान तापमान १०.४* ----------------------------------------------------- 7⃣ *बंगळूरुमध्ये आजपासून सुरु होणार्‍या ज्युनियर पुरूष हॉकी  राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी ३३ खेळाडूंची करण्यात आली घोषणा* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *लिहिण्याला पर्याय नाही* कोणत्याही भाषा विकासातील सर्वात शेवटचे आणि अत्यंत महत्वाचा टप्पा म्हणजे लेखन क्रिया. भाषा विकासात श्रवण, भाषण आणि वाचन या तीन मूलभूत क्रियेनंतर येणाऱ्या लेखन क्रियेकडे सर्वाचेच लक्ष असते. कारण लेखन प्रक्रियेतून आपली माहिती दीर्घकाळ जतन करू शकतो. अभ्यासासाठी देखील त्या लेखी......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/04/blog-post_15.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *वसंतदादा पाटील* महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला एक वेगळे, निर्णायक वळण देऊन विकास साधणारे नेते म्हणजे वसंतदादा बंडूजी पाटील होत. क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक ते विधायक कार्य करणारे, पक्ष संघटना वाढवणारे राजकीय नेते, प्रभावी मुख्यमंत्री व सहकार महर्षी - असा त्यांचा जीवन प्रवास आपल्याला थक्क करतो. त्यांचे वडील बंडूजी व आई रुक्मिणीबाई यांच्या पोटी जन्मलेल्या वसंतदादांचे शिक्षण जेमतेम सातवीपर्यंत झाले. सांगली जिल्ह्यातील, तासगाव तालुक्यातील पद्माळे या छोट्या गावी जन्मलेले वसंतदादा १९७७ ते १९८५ या काळात चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. एकूण सुमारे ४ वर्षे त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळले. ते काही काळ राजस्थानचे राज्यपालही होते. त्या आधी १९७२ मध्ये ते प्रथम मंत्री झाले होते. तसेच स्वतंत्र भारतातल्या पहिल्या निवडणुकीतच ते सांगलीतून आमदार म्हणून निवडून आले होते. पुढील काळात सुमारे २५ वर्षे त्यांनी सांगलीचेच प्रतिनिधित्व (विधानसभेत व लोकसभेत) केले. राजकीय जीवनात त्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, राष्ट्रीय मिल मजदूर संघ, व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आदी संस्था-संघटनांची अध्यक्षपदे सांभाळली. पक्ष कार्याला त्यांनी विशेष महत्त्व दिले. वसंतदादांनंतर काँग्रेस पक्ष संघटनेला एवढे बळ देणारा नेता पुढे काँग्रेसला महाराष्ट्रात मिळालाच नाही. (तसेच प्रामुख्याने ग्रामीण महाराष्ट्रात काँग्रेसचा प्रभाव कायम राहण्यात व वाढण्यात दादांचाच वाटा मोठा आहे,) असे राजकीय निरीक्षक म्हणतात. सत्तेची हाव नसलेला सत्ताधारी, असे दादांबद्दल म्हटले जाते. महाराष्ट्राचे नेतृत्व करताना दादांनी अनेक समाजहितकारक, दूरगामी परिणाम साधणारे निर्णय घेतले *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *_आपली चांगली वेळ जगाला सांगते की,_* *_आपण काय आहोत._* *_परंतु_* *_आपली वाईट वेळ आपल्याला सांगते की,_* *_जग काय आहे..._* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) सोलर कुकरची पेटी आतील बाजूस कोणत्या रंगाने रंगवलेली असते* 👉 काळा रंग *२) समुद्रातील कोणत्या प्राण्यापासून मोती मिळतो?* 👉 आयस्टर *३) भारतात विवाहाला मुलींसाठी किमान वय किती आहे?* 👉 १८वर्षे *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 दिनेश तोटावाड 👤 सागर सतिश मक्कम 👤 महेश बी. शेटकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *" वाईट "* कधी कधी रक्षक भक्षक बनतात असे झाले की लोक वाईट म्हणतात वाईट म्हणून घ्यायची कोणावर वेळ येऊ नये रक्षक कधीच कुठला कधीच भक्षक होऊ नये शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *असताना कोणीही दान करील, नसतानाही दान करता आले पाहिजे. स्वत: भुकेला राहून कुणाची भूक भागवाल तर ते उच्चकोटीचे दान. अशा दानात परम संतोष भरलेला असतो. दुस-याचं दु:खं आपलं वाटणं म्हणजे संवेदनशिलता. ती उसनी नाही घेता येत, ती असायला हवी नि असते. ती जाणिवेतून येते. 'चमडी देगा लेकिन दमडी नही,' म्हणणारी माणसं नुसती कंजुष असत नाहीत तर ती निष्ठुरही असतात. ती स्वत:च्या इच्छा, आकांक्षाचे बळी देऊन जे धन जोडतात, त्याचा पायाच मुळी हिंसक असतो मग त्याची परिणतीही हिंसक होते. तुमचे दातृत्व लोक गृहीत धरून काही सामाजिक संकल्प करत असतील, उपक्रम हाती घेत असतील तर दातृत्व तुमची वृत्ती झाली आहे, असे समजायला हरकत नाही. दुस-याचे होणे हे 'स्वविसर्जन' खरे उच्चकोटीचे दान.* *निसर्ग जसा असतो तसे माणसाने असायला हवे. 'देणा-याचे हात' घेण्याची कल्पना ही जगातली सर्वोत्तम कल्पना म्हणायला हवी. मिडास, कुबेर व्हायचं की कर्ण हे ठरवता आले पाहिजे. शत्रूवर हल्ला करताना आपण कदाचित मरू हे माहित असूनही जो सैनिक प्राणाची बाजी लावतो, तो आपल्या जीवनाचा हेतूपुर्वक बळी देतो, म्हणून बलिदान श्रेष्ठ असते. अनाथ, अंध, अपंगाना दान चांगलेच पण.. त्याहीपेक्षा त्यांना सनाथ करणे, प्रज्ञाचक्षु बनविणे लाख मोलाचे. आपणाला दुस-याचं कोणी होता आलं तर समजावं,'त्यांना जीवन कळले हो!' असं जीवनाचं आकलन होणं म्हणजे जीवन सार्थकी लागणं.*      ••●🔅‼ *रामकृष्णहरी* ‼🔅●••               📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= कोणतेही काम हाती घ्यावे आणि प्रामाणिकपणे ते पार पाडावे त्यामध्ये यश मिळणारच हा काम करणा-यांचा सर्वसाधारण नियम आहे आणि तेही बरोबरच आहे. काम करत असताना जर काही कामात कुचराई केली तर केलेल्या कामात यश कसे मिळेल याची अपेक्षाही करणे चुकीचे आहे.काम पुर्ण न होण्याची कारणे शोधून त्यावर उपाय काढावे.काम करत असताना मनात कोणतेही चलबिचल करुन टाकणारे विचार आणू नये. त्यामुळे कामात व्यत्यय निर्माण होतो. पण ते काम आळस झटकून,जीव ओतून व ईमान इतबारे केले तर ते चांगल्या दर्जाचे व आत्मिक समाधान देणारे ठरेल.ह्या सा-या गोष्टीला तिलांजली दिली नाही तर काम तरी कसे होणार ? *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०. 🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= होईन आई मी लेक तुझी लडिवाळ ! होऊन कुमाता नकोस तोडू नाळ... घेऊ दे मज नारी रूप तुझ्यासम अगं,जन्मू दे मज मी आता कळीसम... घेऊन जन्म मी फेडीन सारे पांग हे समजावूनी तू मूढ जनांना सांग... का नकोशी ? मी तुम्हांसी सांगा काही मी तर आहे या सृजनाची निर्माती... मजभोवती फिरती नात्यांचे हे बंध तरी पुत्र मोह का करतो तुजसी अंध... किती कपूत जन्मले सांग तुझ्या उदरात जे सोडून गेले तुजला वार्धक्यात... मजसाठी जागु दे तुझिया ठायी ममत्व मजविन कोठे या सृजनाला पूर्णत्व... घे समजून हे तू नकोस तोडू नाळ होईन आई मी लेक तुझी लडिवाळ... सौ प्रीती गोगटे 940437179 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *सुंदर बोधकथा* एकदा एका व्यक्तीवर लक्ष्मी रुसली आणि जाता जाता त्याला म्हणाली आता माझ्या जागी तुझ्याघरात दारिद्र्य येणार अाहे. परंतू मी तुला एक वरदान मागण्याची संधी देत अाहे. तुझी इच्छा असेल ते माग. माणूस खूप समजूतदार होता, तो म्हणाला जर दारिद्र्य येनारचं असेल तर त्याला कोणी थांबवू शकत नाही, बस्स फक्त त्याला म्हणावं माझ्या परिवारात एकमेकांत प्रेम आणि जिव्हाळा राहू दे. लक्ष्मी तथास्तु म्हणाली आणि निघून गेली. काही दिवसानंतर _ धाकटीसून स्वयंपाक बनवत होती, तिनं भाजीला मिठमसाला टाकला आणि दूसरं काम करायला निघून गेली. त्यानंतर मोठी सून आली न चाखताचं मिठ टाकलं आणि कामाला निघून गेली. त्याचप्रमाणे आणखी दोन सुनांनी न चाखताच भाजीत मिठ टाकून निघून गेल्या . जेव्हा माणूस आला आणि जेवायला बसला . तर भाजी इतकी खारट लागल्या नंतर तो समजुन गेला कि दारिद्र्य आलेलं आहे .त्यानं काही न बोलता जेवण केलं आणी निघून गेला. त्या नंतर मोठा मुलगा जेवायला बसला , तेव्हा खारट लागल्या नंतर विचारलं ? पप्पांनी जेवन केलं का ? तेव्हा बायकोनं हो म्हणाल्या नंतर त्यान विचार की जेव्हा वडील काही बोलले नाही तर मि कशाला बोलू. त्याचप्रमाने परिवारातल्या सगळ्या लोकांनी एकमेकांविषयी विचारलं आणी न काही बोलता सर्वांनी जेवण केलं. संध्याकाळी दारिद्र्य त्या माणसासमोर आलं आणि म्हणालं मि निघून चाललो आहे. माणूस म्हणाला का? दारिद्रय म्हणालं, तुम्ही लोकांनी अर्धा किलो मीठं खाल्लं तरीपण भांडण केलं नाही. ज्या घरात माझ्याइतक्या खारटपणा नंतर ही तुमची गोडी कमी झाली नाही, त्या घरात मी राहू शकत नाही. *तातपर्य* :- भांडण आणि इर्षा यामूळं दरिद्री आणि आपलं नुकसानचं होतं. ज्या घरात प्रेम शांती आणि आपूलकी असते तिथं लक्ष्मी राहत असते... *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🌸💐✍💐🌸 *🌹ध्येय🌹* शाळेच्या बाहेर पाऊस पडत होता. वर्गामध्ये शिक्षकांचा तास चालू होता. तेव्हा शिक्षकांनी मुलांना एक प्रश्न केला,"जर मी तुम्हाला प्रत्येकी १००-१००रु देऊ केले तर तुम्ही त्या पैशाचे काय कराल?" त्यावर कुणी म्हटले की आम्ही विडीव्हो गेम घेऊ. कुणी सांगितले की क्रिकेट बॅट घेऊ. काही मुलींनी सांगितले की आम्ही बाहुल्या घेऊ. कुणी सांगितले की आम्ही चाॅकलेट घेऊ. असं असताना एक मुलगा काही तरी विचार करताना आढळला त्याला त्यानीं विचारले," तू काय करणार आहेस या १००रु चे ?" त्या वर तो मुलगा म्हणाला, "सर, माझ्या आईला थोडं कमी दिसतं म्हणून माझ्या आईला मी या पैश्याचा नवीन चष्मा घेऊन देईन." सरांनी त्याला विचारले," तुझे बाबा नाहीत का ? तू चष्मा घेऊन देत आहेस ? वडील आईला चष्मा घेऊन देतील की ! तू का बरं तुझ्यासाठी काही नाही घेतं या पैश्याचं ?" त्यावर त्या मुलाने खिन्न स्वरात उत्तर दिले.ते उत्तर ऐकून शिक्षक जागीच स्तब्ध झाले. त्यांचे मन त्याचे हे उत्तर ऐकून भरुन आले.तो बोलला," सर, माझे वडील आता या जगात नाहीत.माझी आई लोंकांचे कपडे शिवून मला शिकवते आणि आता हळुहळु तिला कमी दिसायला लागले आहे. तिला आता कपडे शिवताना डोळ्यांचा ञास सहन करावा लागत आहे.ती कपडे बरोबर शिऊ शकत नाही. म्हणून मला तिला चष्मा घेऊन द्यायचा आहे कारण मी चांगला शिकू शकेन आणि मोठा माणूस बनून माझ्या आईला कायम सुखात ठेवु शकेन." त्यावर सर खुश होऊन बोलले," मला तुझे विचार अमुल्य वाटले." त्यावर त्यांनी त्याला आपल्या जवळचे १०० रु दिले आणि म्हणाले,"हे माझ्या वचनानुसार १०० आणि हे आणखी १००रु उधारी. जेव्हा तू स्वतः कधी कमवून आणशील तेव्हा मला परत कर. माझी ईच्छा आहे की तू खूप मोठा माणूस बन. त्या वेळी तुझ्या डोक्यावरुन माझाहात फिरु दे. मग मी धन्य झालो...." गेल्या १५ते १६ वर्षा नंतर बाहेर असाच पाऊस पडत होता. वर्गात तास चालु होता.आणि अचानक शाळेसमोर जिल्हाधिकाऱ्यांची गाडी येऊन थांबते.शाळेतील सर्व स्टाफ सावधान होतो. शाळेत सगळीकडे शांतता पसरते. आणि.... एक दृष्य पाहून सर्वच थक्क होतात. एक जिल्हाधिकारी एका वृध्द शिक्षकापुढे वाकून पायावर डोके ठेवतोे आणि विचारतो," ओळखलंत का सर मला, मी तुमचा विद्यार्थी. तुमचे घेतलेले उधार१००रु परत करायला आलो आहे." शाळेचा स्टाफ स्तब्ध होऊन पाहत होता.त्या सरानीं वाकलेल्या नवजवान अधिकाऱ्याला उठवलं आणि त्याला आपल्या मिठीत घेऊन भरभरून रडू लागले. तो अधिकारीसुद्धा गळ्यात गळा घालून रडू लागला आणि डोऴे पुसत म्हणाला .. *"सर,आम्ही तुमच्या दिलेल्या आत्मविश्वासाच्या आणि मेहनतीच्या पाठावर विश्वास ठेवून मार्गक्रमण केलं आणि आमचं भाग्य फळाला आलं. सर असेच् आशिर्वाद असु द्या..!!"

📚📚📚📚📚📚📚 *माझी शाळा माझे उपक्रम* ➖➖➖➖➖➖➖ *📚राष्ट्रीय शिक्षणदिन📚* *आज दि.११/११/२०१७ रोजी जि.प.प्रा.शाळा वाटेगाव* *ता.हदगाव जि.नांदेड* *येथे भारताचे पहिले शिक्षणमंञी प्रमुख राजकीय पुढारी मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती ''राष्ट्रीय शिक्षण दिन" म्हणून साजरी करण्यात आली.*त्यांचे मुळ नाव मोहीउद्दीन अहमद असे होते.अबुलकलाम ही वाचस्पती पदवी त्यांची ही पदवी होती. आझाद हे टोपणनावाची उपाधी त्यांना मिळाली होती. 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 👉 कार्यक्रमात प्रथम प्रतिमा पुजन शाळेचे मु.अ.मा.श्री चव्हाण सरांनी केले.त्यानंतर सर्वांनी पूजन करून घेतले. इयत्ता ५,६,७चाविद्यार्थींनी कु.सानिका,प्रांजली,कोमल,श्रद्धा यांनी मौलाना अबुल कलाम यांच्याविषयी माहिती सर्वांना सांगितली. 👉त्यानंतर शिक्षणा विषयी माहिती व महत्त्व थोडक्यात मी स्वतः सांगून आजचा हा जयंती सोहळा मोठ्या आनंदाने पार पडला. *संदेशः मानवी जीवनसंस्कृती राखण्यासाठी शिक्षणाची गरज असते.शिक्षणाचे अंतीम ध्येय सेवामय माणसं निर्माण करणं हेच असतं.*" ➖➖➖➖➖➖➖ *✍वृत्तलेखन* श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (सह.शिक्षिका) जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड. 📚📚📚📚📚📚📚

*🌹जीवन विचार*🌹 〰〰〰〰〰〰〰 http://www. pramilasenkude.blogspot.in ➖➖➖➖➖➖➖ *जो मनन करु शकतो त्याला मनुष्य म्हणतात.आपल्याला मननामुळेच सर्व ज्ञान प्राप्त होते.मनन हा जसा मनाचा गुण आहे.त्याप्रमाणेच माणसाच्या जीवनात प्रसन्नता ही मानवाला मिळालेली दैवी देणगी आहे.ज्या मानवात प्रसन्न वृत्ती आहे अशा प्रसन्न असणाऱ्या व्यक्तीची बुद्धी लवकर स्थिर होत असते.प्रसन्नतेमुळे आत्म्याला शक्ती मिळते.म्हणूनच कोणतेही कार्य हाती घेतले असता त्यात प्रसन्नता असले की ते कार्य हलके वाटते.* *प्रसन्नता ही माणसाच्या मनातून निर्माण होणारी क्रिया आहे.जसा दिव्यान दिवा लावता येतो तशी एका माणसाच्या मनातील प्रसन्नता अनेकांना हर्षउल्हासित करते.* smt.pramila senkude *यशस्वी जीवनासाठी प्रथमतः आपले मन आनंदी व प्रसन्न असायला हवे.ज्याप्रमाणे पारिजातक आपल्या फुलांच्या पडलेल्या सडा सुगंधाने सुगंधीत करून दुसऱ्याला आनंदी करतो त्याप्रमाणे माणसाच्या चेहऱ्यावरील झळकणार निर्मळ हास्य हे मन जिंकून घेत.* *म्हणूनच आपल्या जीवनातील जीवन जगण्यासाठीच ध्येयवाक्य असाव.' प्रसन्नतेचा एक एक क्षण पुरेसा,जोपासावा '.* *〰〰〰〰〰〰〰* ✍ शब्दांकन / संकलन 🙏श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे🙏 हदगाव (नांदेड) 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 11/11/2017 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *राष्ट्रीय शिक्षण दिन* 💥 ठळक घडामोडी :-  १९६८ - मालदीवमध्ये प्रजासत्ताक राष्ट्राची स्थापना. १९४७: पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यात आले. 💥 जन्म :- १८८८: स्वातंत्र्यचळवळीतील विद्वान नेते, भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्‍न मौलाना अबूल कलाम आझाद यांचा जन्म. १९२४ रुसी मोदी, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९६७ सोहेल फझल, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू. १९६९ मायकेल ओवेन्स, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू. १९७४ - लिओनार्डो डिकॅप्रियो, अमेरिकन अभिनेता. 💥 मृत्यू :-  १९१८ - जॉर्ज लॉरेंस प्राइस, पहिल्या महायुद्धाचा शेवटचा बळी. २००४ - यासर अराफात, पॅलेस्टाइनचा शासक, दहशतवादी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *177 वस्तूंवरील जीएसटी 28 वरुन 18 टक्क्यांवर, जीएसटी परिषदेच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय.* ----------------------------------------------------- 2⃣ *लखनऊ : उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कृषक समृद्धी आयोगाची केली घोषणा* ----------------------------------------------------- 3⃣ *नवी दिल्ली - दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी हेलिकॉप्टरमधून पाण्याचे फवारे मारण्यास पवनहंस हेलिकॉप्टर लिमिटेडने दर्शवली सहमती, सूत्रांची माहिती* ----------------------------------------------------- 4⃣ *कल्याण : शामसुंदर जोशी यांना मराठी भाषा संवर्धनसाठी याज्ञवल्क्य पुरस्कार, स्मिता कापसे यांना संशोधन व लेखनासाठी सुशिलाबाई एकलहरे पुरस्कार प्रदान; शाल, सन्मानचिन्ह आणि 21 हजार रोख रक्कम पुरस्कारचे स्वरुप.* ----------------------------------------------------- 5⃣ *फाईव्ह स्टार हॉटेल वगळता सर्व हॉटेलमध्ये फक्त 5 टक्के लागणार जीएसटी.* ----------------------------------------------------- 6⃣ *धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील अटेंभे प्र. वार्सा ग्रामपंचायत अंतर्गत १३ जि.प. शाळा राज्यात प्रथमच सौर शाळा करण्यात आल्या.* ----------------------------------------------------- 7⃣ *दिल्ली- शिक्षण बदलीविरोधातील याचिका फेटाळली. सुप्रीम कोर्टाने दोन शिक्षकांची याचिका फेटाळली. शिक्षण बदलीचे अधिकार राज्य सरकारलाच - सुप्रीम कोर्ट.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= आज स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती. संपूर्ण भारतात त्यांची जयंती " शिक्षणदिन " म्हणून साजरा केल्या जातो. त्यानिमित्त प्राथमिक शिक्षणाविषयी लेखप्रपंच.......              *प्राथमिक शिक्षणाचे महत्व* स्वतःच्या विकासावर कुटुंबाचे विकास अवलंबून असते. कुटुंबाच्या विकासावर गावाचा विकास आणि मग राज्य व देशाचा विकास होतो. या विकासासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. शिक्षणाशिवाय कोणाचेही.............. वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_10.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *मौलाना अबुल कलाम आझाद* मौलाना अबुल कलाम आझाद : ( ११ नोव्हेंबर १८८८–२३ फेब्रुवारी १९५८ ). भारताचे एक प्रमुख राजकीय पुढारी. त्यांचे मूळ नाव मोहिउद्दीन अहमद असे असून अबुलकलाम म्हणजे वाचस्पती ही त्यांची पदवी होती. पुढे ‘आझाद’ (स्वतंत्र) हे टोपणनावही त्यांना ही उपाधि मिळाली. त्यांचा जन्म मक्केला झाला. वडिलांबरोबर १८९० साली ते कलकत्याला आले. पारंपरिक मुसलमानी शिक्षणपद्धतीप्रमाणे मौ. आझादांनी फार्सी, उर्दू व अरबी या भाषांचे प्रथम अध्ययन करून नंतर तर्कशास्त्र, इस्लाम धर्म, तत्त्वज्ञान व गणित ह्यांचा अभ्यास केला. पुढे सर सय्यद अहमदखान ह्यांच्या लेखांचा परिणाम होऊन मौलानांनी इंग्रजीचा अभ्यास स्वतंत्रपणे सुरू केला.१९०८ मध्ये ईजिप्त, अरबस्तान, तुर्कस्तान, फ्रान्स इ. देशांना त्यांनी भेटी दिल्या. तेथील क्रांतिकारकांच्या संपर्कामुळे त्यांची राजकीय मते बदलू लागली आणि कलकत्त्यास परत येताच हिंदी मुसलमानांनी स्वातंत्र्यसंग्रामात पुढाकार घ्यावा, हे मत त्यांनी प्रतिपादिले. लोकजागृतीसाठी १९१२ साली कलकत्ता येथे त्यांनी अल्-हिलाल हे उर्दू साप्ताहिक सुरू केले. अनेक वृत्तपत्रांतून ‘आझाद’ ह्या टोपणनावाने ते लेखन करीत. अल्-हिलालमधील प्रखर राजकीय टीकेमुळे ब्रिटिश सरकारने त्यांच्याकडून १०,००० रुपयांचा जामीन मागितला. आझादांनी तो दिला नाही, म्हणून ते वृत्तपत्र बंद पडले. १९१५ साली त्यांनी अल्-बलाघ हे दुसरे वृत्तपत्र काढले. त्यामुळे आझादांना अनेक प्रांतांत जाण्यास बंदी घालण्यात आली; पुढे त्यांना सांचीला स्थानबद्ध करण्यात आले. मुसलमानांत त्यांच्या अटकेमुळे नवे वारे संचारले. १९२० साली त्यांची सुटका झाली. ते असहकाराच्या चळवळीत सामील झाले. १९२१ मध्ये पुन्हा त्यांना अटक करण्यात आली; पण एका वर्षानंतर त्यांना मुक्त करण्यात आले; १९२३ च्या दिल्ली येथील काँग्रेसच्या विशेष अधिवेशनाचे ते अध्यक्ष झाले. १९३० मध्ये त्यांना पुन्हा कैद झाली. ह्या वेळी मुसलमान जमातीस सत्याग्रहात सामील करून घेण्याचे मुख्य श्रेय आझादांनाच मिळाले. आझाद १९३९ ते ४६ पर्यंत काँग्रेसचे अध्यक्ष होते. १९४२ च्या चले जाव आंदोलनाच्या वेळी त्यांना पुन्हा तुरुंगवास भोगावा लागला. १९४५ साली सर्व नेत्यांबरोबर त्यांची सुटका झाली. १९४२ ची क्रिप्सयोजना, १९४५ ची वेव्हेलची सिमला परिषद व १९४६ मधील ब्रिटिश मंत्र्यांचे शिष्टमंडळ इ. प्रसंगीच्या सर्व वाटाघाटींत काँग्रेसतर्फे अध्यक्ष ह्या नात्याने त्यांनीच पुढाकार घेतला. स्वातंत्र्यानंतर ते केंद्रीय मंत्रिमंडळात सामील झाले आणि अखेरपर्येत शिक्षणमंत्री म्हणून राहिले. आझाद प्रभावी वक्ते होते. त्यांचे इंग्रजी, उर्दू, अरबी व फार्सी भाषांवर चांगले प्रभुत्व होते; त्यांनी अनेक वृत्तपत्रांतून स्फुट लेखन केले आणि उर्दूत काही पुस्तके लिहिली आहेत. त्यांतील तजकेरा,गुब्बारे खातिर्, कौले फैसल, दास्ताने करबला, तरजुमानुल कोरान ही प्रसिद्ध आहेत. तरजुमानुल कोरान म्हणजे कुराणचा सटीप उर्दू अनुवाद असून तो फार लोकप्रिय आहे. ह्याशिवाय त्यांचे इंडिया विन्स फ्रीडम (१९५९) हे आत्मचरित्र त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाले आहे;  मात्र त्यातील अप्रकाशित तीस पाने १९८८ मध्ये प्रसिद्ध करण्यात येतील. त्यांची भाषणेही पुस्तकरूपाने अलीकडे प्रसिद्ध झाली आहेत.  *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= माणसाला स्वतःचा फोटो काढायला वेळ लागत नाही पण स्वतःची प्रतिमा बनवायला वेळ लागतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधिशाची नेमणूक कोण करते?* 👉 राज्यपाल *२) कोणत्या कायदान्वये भारतात निवडणुकांचा पाया घातला गेला?* 👉 भारतीय परीषद कायदा १८९२ *३) भारतीय राज्यघटनेत सर्वसामान्यपणे अंदाजपत्रक हा शब्द कोणत्या कलमात नमूद करण्यात आला आहे?* 👉 कलम २६६ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 ऋषिकेश बेळकोणीकर, धर्माबाद 👤 शिवकुमार इबितवार, पदवीधर शिक्षक 👤 शेषराव पाटील 👤 बालाजी पांडागळे, नांदेड 👤 रणजित लोखंडे, नांदेड 👤 संतोष पेटेकर, प्राथमिक शिक्षक 👤 सूर्यकांत राखोंडे, धर्माबाद 👤 माधव तनमुदले, येवती 👤 हरीश देसाई 👤 दिवाकर आष्टेकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *" राग "* गरीब असो वा श्रीमंत राग येत असतो सहनशीलतेचा ही कधी अंत होत असतो गरीब असो वा श्रीमंत राग आला पाहिजे कधी राग ही प्रगतीचा भाग झाला पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *महत्वाकांक्षा आणि अतिमहत्वाकांक्षा यातील फरक जाणून घेण्याची गरज आहे. उत्तुंगतेचा ध्यास जरूर घ्यायला हवा; परंतु त्यामागे उदात्त विचार असायला हवेत. आपले आणि समाजाचे जीवन समृद्ध करण्याची कळकळ असावी. त्याऐवजी केवळ स्वार्थाचा आणि मूठभरांच्याच हिताचा विचार असेल, तर त्यामागची महत्वाकांक्षा हिंसक बनते. अतिमहत्वाकांक्षा नकारात्मक असून, आपल्या अधोगतीला कारणीभूत ठरते. इतिहासात अशी असंख्य उदाहरणे आहेत. शेक्सपियरच्या नाटकातील नायक मॅकबेथही अतिमहत्वाकांक्षेचा शिकार आहे. स्काॅटलंडचा राजा डंकनच्या दरबारातील तो पराक्रमी उमराव. राजा होण्याची महत्वाकांक्षा त्याला असतेच; परंतु लेडी मॅकबेथ याबाबतच्या अतिमहत्वाकांक्षेने पछाडलेली असते. आपला नवरा राजा व्हावा म्हणून प्रसंगी ही दुष्ट बाई विद्यमान राजाचा खून करायलाही तयार होते.* *एका लढाईत विजय मिळविल्याबद्दल सन्मान करण्यासाठी राजा मॅकबेथच्या घरी येतो. पती-पत्नी त्यांचे आदरातिथ्य करतात. दिलेल्या शयनगृहात राजा झोपी जातो. मॅकबेथ महत्वाकांक्षी होता; पण त्यासाठी तो कोणाचा खून करायला तयार नव्हता. मात्र उद्याच्या राजवैभवासाठी तसे करणे आवश्यक असल्याचे सांगून लेडी मॅकबेथ राजाचा खून करायला भाग पाडते. मॅकबेथला राजपद मिळते; परंतु त्यानंतर उसळलेल्या जनप्रक्षोभाला, युद्धाला सामोरे जावे लागते. लेडी मॅकबेथ भ्रमिष्ट होऊन मरते आणि मॅकबेथलाही प्राणास मुकावे लागते. अतिमहत्वाकांक्षा विघातक असून -हासाला कारणीभूत ठरते.* ••●🏝‼ *रामकृष्णहरी* ‼🏝●• 🏝🏝🏝🏝🏝🏝 *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= काही माणसांचा स्वभाव वरवर एवढा चांगला असतो की,आपल्याला वाटते तो आपलाच आहे.आपण त्यांच्याशी खूप मैत्री करावी आणि आपल्या मनातले सारे जे काही असेल ते सांगून मन मोकळे करावे.पण असे करण्यापूर्वी थोडा विचार करा.ही माणसं तुम्ही समजता तशी तेवढी सरळ नसतात.मनात एक आणि ओठात एक असते.एवढेच नाही तर ती स्वार्थी, जळावूवृत्तीची व आपमतलबीअसतात, आपल्या मनातले काढून घेऊन तुमचा फायदा घेतात आणि तुमचीच तुमच्यामागे तुमच्या नावाचा दिंडोरा वाजवून तुमची बदनामी करतात.अशा माणसांना सहजासहजी आपले समजू नका. नाही तर तुमचे नुकसानच होणार आहे.अशा माणसांपासून थोडे दूरच रहायला शिका.अशी माणसे जोडण्यापेक्षा दूर ठेवलेलीच बरी हे केव्हाही लक्षात ठेवा. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९० 🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *बालगीत* उठा माझ्या बालगोपालानों धरा सुर्य किरणांनी न्हाली उठा पटकन आळस झटका बघा शाळेची आता वेळ झाली शौचालयाचा करा आधी वापर निरोगी राहण्याचा एकच जागर साबण लावूनीया धूवा निर्मळ हात स्वच्छ आपुले घासा दात करुनी घ्या अंघोळ व्हा ताजेतवाने धूतलेलेच घाला कपडे प्रसन्न व्हा अंतरमनाने नाश्ता करुनी घ्या दूध पोळी काजू बेदाणे लागा पळायला आता शाळेत मोठ्या जोमाने दडपण नसते कधी शाळेत आता लिहूनी शिकूनी वाचा यशाची गाथा *सौ.सुचिता नाईक किनवट* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *दृढनिश्‍चय* श्रीपूर येथील राजा यांच्‍या निधनानंतर त्‍यांचा मुलगा राजवीरसिंह याला राज्‍यपदी बसविण्‍यात आले. राजवीर वडिलांसारखाच साहसी होता पण अनुभव पाठीशी कमी असल्‍यामुळे अनेकदा संकटात तो घाबरत असे. अशावेळी त्‍याची माता त्‍याला हिंमत देत असे व योग्‍य मार्गदर्शन करून संकटातून बाहेर काढत असे. शेजारच्‍या राज्‍यातील गंगानगरमधील राजा भीमसेन याची श्रीपूरवर नजर होती. एके दिवशी भीमसेनने श्रीपूरवर आक्रमण केले. दोन्‍ही सैन्‍ये एकमेकांना भिडली, तुंबळ युद्ध झाले. भीमसेनकडे सैनिक खूप प्रमाणात होते. आतापर्यत दिलीपसिंह याने कमी प्रमाणात सैनिक असूनसुद्धा भीमसेनविरोधात केवळ धाडसी व कल्‍पक वृत्‍तीने युद्धे जिंकली होती. परंतु राजवीरसिंह यात आपले सातत्‍य ठेवू शकले नाहीत. दोनच दिवसात भीमसेन यांनी चार मैल भागावर आपला ताबा मिळविला. राजवीरच्‍या तोंडून कमी सैनिकांमुळे आपल्‍याला हार पत्‍करावी लागली हे ऐकले तेव्‍हा राजमातेने मनातल्‍या मनात काही ठरवले. राजवीर झोपण्‍याआधी राजमातेचे दर्शन घेण्‍यासाठी आला तेव्‍हा राजमाता लहान लहान सहा लाकडाच्‍या काड्या एकत्र बांधून लोखंडाच्‍या मोठ्या तुकड्याला तोडण्‍याचा प्रयत्‍न करीत असलेली पाहिली. राजवीरने मातेला विचारले,’’आई, सहा लाकडाच्‍या काड्या एकत्र करूनही लोखंडाला तोडू शकत नाही’’ राजमाता म्‍हणाली,’’खरं बोललास, संख्‍येने मजबुतीला पराजित केले जाऊ शकत नाही त्‍याप्रमाणे आपले वीर सैनिक आणि तू या लोखंडासारखे मजबूत व्‍हा. शत्रूची कितीही संख्‍या तुम्‍हाला तोडू शकणार नाही अशी ताकद तुमच्‍यात आहे ती जागृत करा. तुमच्‍या मजबुतीसमोर शत्रू गुडघे टेकेल.’’ राजवीरने याप्रमाणे केले व त्‍याने भीमसेनाला हरवून युद्धात विजय संपादन केला. *तात्‍पर्य :-* दृढ मनोबलाने हारलेले युद्धही जिंकता येते. काही काही वेळेला दृढनिश्चय हेच इंगीत ठरते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*खरा कवी जाणणे* *एका राजाला त्याच्या खऱ्या कवीची नियुक्ती करायची होती. त्यासाठी त्याने दवंडी पिटवली. दवंडी ऐकताच राज्यभरातून हौशे-नौशे कवींची ही मोठी गर्दी राजाच्या महालात जमा झाली. महाल त्यामुळे भरून गेला. त्यातून खरा कवी कसा निवडावा हा एक गहन प्रश्न होता. थोडावेळ विचार केल्यावर राजाला एक युक्ती सुचली. त्याने प्रधानाला आज्ञा केली कि या सर्व कवींना चाबकाचे फटके मारा. राजाची आज्ञा ऐकताच निम्मे अधिक कवी तिथून पसार झाले. तरीही शेकडो कवी तेथे उरलेच होते. राजाने पुन्हा आज्ञा केली,"या सर्व कवींना अन्न पाण्याविना आठवडाभर उपाशी ठेवा."* *तरीही दहा वीस उरलेच. त्यातून खऱ्या कवीची निवड करण्यासाठी राजाने आज्ञा दिली कि या उरलेल्या कवींना तेलाच्या काहिलीत टाका. राजाची ती जीवघेणी आज्ञा ऐकताच एका कवीखेरीज बाकीचे सर्व कवी तेथून पसार झाले. उरलेला कवी मात्र त्याच्या काव्यलेखनात मग्न होता. तो इतका रममाण झाला होता कि त्याला या आज्ञाच मुळी ऐकू गेल्या नाहीत. राजाने त्याला राजकवी म्हणून घोषित केल्यावर विनयपूर्वक तो राजाला म्हणाला,"महाराज ! राजकवी व्हायला माझी काही हरकत नाही पण मी कुणाच्या मर्जीचा गुलाम असणार नाही. मला वाटेल तेंव्हा मी दरबारात येईन आणि वाटेल तेंव्हा दरबारातून निसर्गाच्या सान्निध्यात निघून जाईन. माझी ही अट मंजूर असेल तरच मी राजकवी होतो नाहीतर हे इतके लोक निघून गेले तसा मी पण जातो." राजाला कवीची ओळख पटली. त्याने त्याच्या कविता ऐकल्या व खुश होवून त्याच्या मर्जीनुसार सगळे मान्य करून त्याला 'राजकवी' म्हणून घोषित केले.* *तात्पर्य- खरा कलाकार हा कुणाच्या मर्जीचा गुलाम नसतो.*

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 09/11/2017 वार - गुरुवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९३७ : जपानने शांघाय शहर जिंकले. १९४७ : जुनागढ भारतात विलीन झाले. १९९४ : डार्मश्टाटियम या मूलतत्त्वाचा शोध. २०१३ : सुपर टायफून हैयान या प्रचंड चक्रीवादळाने फिलिपाइन्सचा किनारा गाठला. ताशी ३१५ किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह तुफान पावसात शेकडो मृत्युमुखी. 💥 जन्म :- १८७७ : मोहम्मद इक्बाल, भारतीयांच्या अभिमानाचे प्रतीक असलेल्या ‘सारे जहाँसे अच्छा’चे कवी. 💥 मृत्यू :-  २००३ - बिनोद बिहारी शर्मा, मैथिली भाषेतील लेखक, कवि. १९६२ : धोंडो केशव कर्वे, मराठी समाजसुधारक आणि भारतरत्न पुरस्कर्ते.१९६७ : बाबूराव पेंढारकर, मराठी रंगभूमीवरचे गाजलेले खलनायक व चित्रपट अभिनेते. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *देशभरातील ३७८ टोल प्लाझांवर येत्या १ डिसेंबरपासून ई-टोल वसुली सुरू करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज पत्रपरिषदेत केली.* ----------------------------------------------------- 2⃣ *भारताची जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार; ‘नोटाबंदी’तून होत आहे आगेकूच - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* ----------------------------------------------------- 3⃣ *नवी दिल्ली - इंग्लंडचे राजपुत्र चार्ल्स आणि त्यांची पत्नी केमिला पार्कर यांचे भारतात आगमन* ----------------------------------------------------- 4⃣ *नवी दिल्ली : वीमा काढण्यासाठीही आता आधार कार्डची सक्ती, वीमा प्राधिकरणाचा निर्णय.* ----------------------------------------------------- 5⃣ *सोलापूर विद्यापीठ नामांतर वाद चिघळला, सोमवारी सोलापूर बंदची हाक; सिद्धेश्वर भक्तांच्या बैठकीत धर्मराज काडादी यांची घोषणा* ----------------------------------------------------- 6⃣ *आशियाई महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या मेरी कोमने जिंकले सुवर्णपदक* ----------------------------------------------------- 7⃣ *राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सायना नेहवालला महिला एकेरीचे विजेतेपद* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *परावलंबी जीवन* समर्थ रामदास स्वामी यांनी म्हटले आहे की, जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. परावलंबी जीवनात कसल्याही प्रकारची प्रगती होत नाही. व्यक्ती आळशी बनतो, त्याला काही करावे असे मुळीच वाटत नाही. म्हणून स्वावलंबी जीवन जगण्याचा नेहमी........... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/10/blog-post_28.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *धोंडो केशव कर्वे* धोंडो केशव कर्वे (एप्रिल १८, इ.स. १८५८ - नोव्हेंबर ९, इ.स. १९६२) महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह यांसाठी आपले १०४ वर्षांचे जीवन वाहिलेल्या धोंडो केशव उर्फ अण्णासाहेब उर्फ महर्षी कर्वे यांचा जन्म १८ एप्रिल, इ.स. १८५८ साली रत्‍नागिरी जिह्याच्या खेड तालुक्यातील शेरावली या गावी एका निम्न मध्यमवर्गीय घरात झाला. . इ.स. १९०७ साली त्यांनी  महाराष्ट्रात  पुण्याजवळील हिंगण्याच्या माळरानावर एका झोपडीत मुलींची शाळा सुरू केली. रत्‍नागिरी जिल्ह्यातील मुरूड हे अण्णांचे गाव. शिक्षणासाठी त्यांना खूप पायपीट करावी लागली.इ.स. १८८१ मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्या कॉलेजातून त्यांनी गणिताची पदवी संपादन केली. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा राधाबाईंशी विवाह झाला. राधाबाई त्या वेळी ८ वर्षांच्या होत्या. वयाच्या २७व्या वर्षी, इ.स. १८९१ साली बाळंतपणात राधाबाईंचा मृत्यू झाला. त्याच वर्षी अण्णासाहेबांनी फर्ग्युसन कॉलेजात गणित शिकवायला सुरुवात केली. पुढे इ.स. १९१४ पर्यंत त्यांनी ही नोकरी केली. अण्णा गणिती होते. लोकमान्य टिळक हे फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे अध्यापन करीत होते. पण राजकारणाच्या रणधुमाळीत ते उतरल्यानंतर त्यांच्या रिकाम्या जागी गणित विभागाचे प्रमुख असणारे गोपाळ कृष्ण गोखले यांनी अण्णांना बोलावून घेतले. इ.स. १८९१ ते इ.स. १९१४ या प्रदीर्घ कालखंडात अण्णांनी गणित हा विषय शिकवला. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= हृदयात नेहमीच जे परोपकाराची भावना बाळगतात, त्यांना प्रत्येक पावलावर प्रगती यश आणि समृध्दी मिळते . *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे?* 👉 जन गण मन *२) हे राष्ट्रगीत कोणी रचले आहे?* 👉 रवींद्रनाथ टागोर *३) या गीतास राष्ट्रगीत म्हणून कधी मान्यता मिळाली?* 👉 २४ जानेवारी १९५० *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 श्रीपाद पटेल राउतवार, साहित्यिक मदनुर जि. निजामाबाद *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= "भूमिका " त्यांना भूमिका असू शकते आम्हाला नसू शकते का? त्यांची भूमिका दिसते तशी आमची दिसू शकते का? त्यांची भूमिका स्पष्ट दिसते तशी आमची दिसली पाहिजे प्रत्येकाची भूमिका शेवटी एकदम स्पष्टच असली पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *आयुष्यातील पहिल्या पंधरा, सोळा वर्षाचा कालावधी कमालीचा संवेदनशील असतो. या कालावधीत मुलांवर होणारे संस्कार महत्वाचे असतात. शारीरिक, भावनिक, बौद्धिक, आणि मानसिक विकासासाठी हा कालावधी महत्वाचा असतो. या दरम्यान मुलांसाठी सकारात्मक वातावरणाची पूर्तता करणे, ही पालकांची आणि समाजाचीही जबाबदारी असते. काही पालक त्यांच्या मुलांशी संवाद साधण्यात कमी पडतात. ए वन शाळा, काॅलेजात व क्लासमध्ये प्रवेश मिळवून देणे, आर्थिक बाबींची पूर्तता करणे, एवढीच जबाबदारी असल्यासारखे वागतात. स्वत: पैसे मिळविण्यासाठी धावत राहतात आणि मुलांवर आपल्या आपेक्षा लादून त्यांनाही आयुष्याच्या स्पर्धेत ढकलून मोकळे होतात.* *कौटुंबिक व सामाजिक परिस्थिती किंवा दैनंदिन वाईट सवयी युवकांच्या नैराश्याला कारणीभूत ठरतात. नकारात्मक प्रवृत्तींकडे आकर्षिले जाऊन वाईट सवयींचे शिकार बनतात. परिणामी सहका-यांशी, आई-वडिलांशी वाद होतात, त्याचे रूपांतर एकाकीपणात होते. एकाकीपण नैराश्याला निमंत्रित करते. नवनवीन गोष्टी शिकून घेण्याची उत्सुकता विकसित करायला हवा. निसर्गाशी संवाद साधता यायला हवा. जीवनमूल्यांचा अर्थ समजून घेऊन ती कृतीत उतरविणे जीवनात गरजेचे असते. विचार आणि आचार यांच्यात सुसंगती ठेवायला हवी. त्या त्या वयात सकारात्मक गोष्टी केल्याने व्यक्तिमत्व विकसित होते, आत्मविश्वास वाढतो, विवेकबुद्धी वाढते, निर्णयशक्ती वाढीस लागते. संत तुकाराम महाराज म्हणतात..मन प्रसन्न करू..मोकळेपणाने बोलू आणि सकारात्मक होऊ.!* ••● 🍁 ‼ *रामकृष्णहरी* ‼ 🍁 ●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁 *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जीवनात सुख आणि दुःख हे बरोबरच असतात.पण सुखासोबत दिवस कधी संपून जातात ते समजत नाही किंवा त्याचा कधी हिशोब ठेवणे नाही.पण नेमके दु:खालच्या बाबतीत तसे होत नाही.थोडे जरी दु:खूप झाले तरी त्याचा हिशोब आरडाओरडा करत लोकांना सांगत आणि स्वत: वेडेवाकडे तोंड करत सहन करत असतो.दु:खाचा जणू जगासमोर बाजारच मांडतो. सुखाचे तसे करत नाही.ते सहज कुणाला न सांगता एकटाच भोगत असतो.पण काही जरी असले तरी ते दोघेही जीवनात बरोबरीनेच राहतात हे विसरुन चालणार नाही.दोघांनाही जीवनात समानतेचा दर्जा आहे. कुणालाही कमी लेखू नये. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०. 🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *माझी शाळा* मनापासूनी आवडते मला माझी शाळा कारण माझ्या शाळेत असते खडू आणि फळा... माझ्या शाळेत आहे हिरवी हिरवी बाग सुंदर अशा बागेत पक्षी गातात अनेक राग... माझ्या शाळेतील वर्गात आहे रंगरंगोटी छान तंत्रज्ञानाची धरुनी कास घेतो आम्ही नव नविन ज्ञान... दररोज नवोपक्रम उपक्रमात ज्ञानरचनावाद फरशीवरती करुनी रेखाटन शिक्षक देतात नवीन ज्ञान... कसली भिती ना अभ्यासाची चिंता हसत खेळत गिरवतो कित्ता रोज थोडे ज्ञानकण करुनी गोळा भयमुक्त आम्ही गाऊ यशाची गाथा... लिहा रे वाचा रे आता झाले कालबाह्य आपण सगळे मिळून शिकूया गाठूया आपले ध्येय ... उठावाच्या नकाशात दिसतात किल्ले क्षेत्रिय भेटीत दिसतात आपले जिल्हे परीपाठात नैतिक मूल्य जिल्हा परिषद माझी शाळा आहे अमूल्य... *सुचिता नाईक किनवट* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *एक कवी व श्रीमंत माणूस* एकदा एक कवी श्रीमंत माणसाकडे गेला. त्याने आपल्या सर्व कविता गाऊन दाखविल्या कवीला वाटले आपल्याला काही तरी बक्षिस मिळणार परंतु तो श्रीमंत माणूस अतिशय चिकू होता. तो कवीला खुश करण्यासाठी म्हणाला तुमच्या कविता ऐकून मी फारच खुश झालो आहे. उद्या तुम्ही परत माझ्या घरी या म्हणजे मी हि तुम्हाला खुश करून टाकेन बक्षीस मिळाले नाही म्हणून कवीला वाईट वाटले. परंतु उद्या बक्षीस भेटेल या आशेवर कवी घरी निघून गेला दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळी न चुकता तो त्या श्रीमंत माणसाच्या घरी हजर झाला. परंतु बराच वेळ झाला तरी श्रीमंत त्याला बक्षीस देण्याचे नाव काढीना अखेर कवी घरी जाण्यासाठी उठला तेव्हा श्रीमंत म्हणाला कविराज आपण मला काल कविता ऐकवून खुश केलत तस तुम्ही उद्या माझ्या घरी या मी तुम्हाला खुश करून टाकेन असं म्हणून खुश केल प्रत्यक्षात तुम्ही मला काही दिल नाही. मी हि तुम्हाला काही दिल नाही आपला व्यवहार संपला या आता परत केव्हातरी बिचारा निराश होऊन निघून गेला एकदा संधी साधून घडलेली हकीकत बिरबलाला सांगितली बिरबलाने त्या श्रीमंत माणसाशी ओळख करून घेतली मैत्री वाढवली आणि एक दिवस त्याला आपल्या घरी जेवायला बोलवले कवीलाही त्याने आमंत्रण दिले सर्व मंडळी बिरबलाच्या घरी जमा झाली. तो कंजूष घरी येण्यापूर्वी सर्वांनी जेवून घेतले आणि ते गप्पा मारू लागले थोड्या वेळाने तो श्रीमंत हि घरी आला व त्या गप्पात सामील झाला. परंतु बराच वेळ झाला तरी बिरबल जेवनाच नाव घेईना न राहवून श्रीमंत म्हणाला जेवायचं नाही का ? त्यावर बिरबल म्हणाला आपल्याला फक्त खुश करण्यासाठी म्हणालो उद्या माझ्या घरी जेवायला या कंजूष श्रीमंत जे समजायचे ते समजला आणि काही न बोलता निघून गेला. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 08/11/2017 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  २०१६ - ५०० व १००० रूपयांच्या नोटावार बंदी 💥 जन्म :- १८५४ - योहान्स रिडबर्ग, स्वीडिश भौतिकशास्त्रज्ञ. १६६६ - हर्बर्ट ऑस्टिन, इंग्लिश कार उद्योगपती १९१९ - पु.ल. देशपांडे, मराठी साहित्यिक. १९२३ - जॅक किल्बी, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन विद्युत अभियंता. 💥 मृत्यू :-  १९६० : सुब्रतो मुखर्जी, भारताचे हवाई दलप्रमुख. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयाला आज एक वर्ष पूर्ण होत असून, त्यानिमित्ताने काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी ८ नोव्हेंबर हा काळा दिवस पाळण्याचे ठरविले आहे* ----------------------------------------------------- 2⃣ *पुणेः राज्यातील वाढत्या पार्किंग समस्येचा आढावा घेऊन नव्या पार्किंग धोरणासाठी राज्य सरकारने नेमली चार सदस्यीय समिती* ----------------------------------------------------- 3⃣ *ठाणे- जिल्हा परिषदेची निवडणूक 13 डिसेंबरला, 14 डिसेंबरला होणार मतमोजणी* ----------------------------------------------------- 4⃣ *सोलापूर - कार्तिकी यात्रेत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला पावणेदोन कोटींचे उत्पन्न* ----------------------------------------------------- 5⃣ *भारताची अर्थव्यवस्था आणि लोकशाहीसाठी आठ नोव्हेंबर काळा दिवस - माजी पंतप्रधान मनमोहन सिंग,* ----------------------------------------------------- 6⃣ *शेतक-यांना ३१ कोटी ५० लाखांचा फटका, भाताला क्विंटलमागे १२० रुपये कमी, रायगड जिल्ह्यातील धान खरेदीसाठी सरकारने तब्बल १ हजार ५५० रुपयांचा हमी भाव केला जाहीर* ----------------------------------------------------- 7⃣ *न्यूझीलंडविरुद्धच्या निर्णायक टी-20 सामन्यात भारताचा सहा धावांनी शानदार विजय, भारताचा जसप्रीत बुमराह ठरला सामनावीर, तर न्यूझीलंडचा ईश सोढी मालिकावीर* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *परीक्षा गुरुजींची* आज सदा पायमोडे गुरूजी फारच चिंताग्रस्‍त दिसत होते. त्‍यांचा चेहरा पूर्ण उतरलेला होता, काय करावे त्‍यांना कळतच नव्‍हते. कारण ही तसेच होते. आज शाळेत प्रगत शैक्षणिक महाराष्‍ट्र कार्यक्रम अंतर्गत सहामाहीची परीक्षा सुरू झाली आणि वर्गातील अर्धे मूले अनुपस्थित होते.  ज्‍यांना काहीच येत नाही ते नेमके......... वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/04/blog-post_69.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *पु. ल. देशपांडे* पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे (नोव्हेंबर ८, इ.स. १९१९ - जून १२, इ.स. २०००) हे लोकप्रिय मराठीलेखक, नाटककार, नट, कथा व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे म्हटले जायचे. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने पु. ल. म्हणून ओळखले जातात. गुळाचा गणपती या सबकुछ पु. ल. म्हणून गाजलेल्या चित्रपटात त्यांच्या प्रतिभेच्या विविध पैलूंचे दर्शन घडते. पु.ल.देशपांडे हे शिक्षक, लेखक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, विनोदकार, कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक, वक्ते, खवय्ये, आणि रसिक श्रोते असे सर्वगुणसंपन्‍न होते. त्यांनी आपल्या गुणांच्या जोरावर एकपात्री-बहुपात्री नाटक, चित्रपट, नभोवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व क्षेत्रांत अनेक आघाड्यांवर यश संपादन केले. दूरदर्शनच्या पहिल्यावाहिल्या प्रसारणासाठी पंडित नेहरूंची दूरदर्शनसाठी मुलाखत घेणारे पुलं हे भारतीय दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार होते.साहित्य अकादमी, संगीत नाटक अकादमी या दोहोंचे पुरस्कार मिळवणार्‍या मोजक्या प्रतिभावंतात पुलंचा समावेश होतो. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= विचारांच्या जोरावर अन् ताकदीच्या धारेवर जे लढतात त्यांच्यापासून विजयश्री कधीच दूर राहू शकत नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती?* 👉 मराठी *२) केरळची राज्यभाषा कोणती?* 👉 मल्याळी *३) मध्यप्रदेशची राज्यभाषा कोणती?* 👉 हिंदी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 नागभूषण दुर्गम, राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटना *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= " बोलायचे एक " बोलायचे एक अन् करायचे एक आहे लोकांना वाटते यांचा व्यवहार नेक आहे वरवर दिसतं तसं खरंच सगळं नसतं वरवर दिसतं त्यापेक्षा खुप सारं वेगळं असतं शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675   =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *मृत्यूपूर्वी आपण आपला मृत्यूदिन जाणू शकत नाही. मरण पावल्यानंतर आपली पुण्यतिथी, आपल्याकडे पाप्याचीही मेल्यावर पापतिथी नव्हे, पुण्यतिथीच कशी पार पडेल, हा प्रश्नच अर्थशून्य आहे. आप मर गये, दुनिया डुब गयी ॥ मृत्यू झाल्यानंतर मुक्ती मिळावी अशी तीव्र इच्छा असते. मरणापूर्वी एकदातरी देवाचे दर्शन व्हावे अशी भक्तांची आंतरिक ओढ असते. परंतु संत तुकारामांप्रमाणे सदेह स्वर्गात जाण्यासाठीचा स्वर्गाचा व्हिसा इतर कुणासही लागू नाही.* *पुण्यकर्मे केल्याने मोक्ष मिळतो का? अहो, एकदाचा सोक्षमोक्ष झाल्यावर कसला मोक्ष? भक्तिभावे सतत नामस्मरण केल्यानेही मृत्यू सुखद होतो काय? नाही...! तुम्ही देवभक्त आहात की दैत्यभक्त याच्याशी मृत्यूला कर्तव्य नाही. मृत्यू स्थितप्रज्ञ आहे. पापपुण्य, सुख-दु:ख, खरे-खोटे, राव-रंक सर्व मनुष्यनिर्मित आहेत. भूकंप आस्तिक-नास्तिक पाहात नाही. सर्वांना एकाच वेळी भुईत दफन करतो. तुफान सज्जन-दुर्जन असा भेद मुळीच ठेवत नाही. मृत्यू हाच एकमेव पूर्ण आणि अंतिम सत्य आहे. पण हा मृत्यू कसा अनुभवायचा? मृत्यूचा अनुभव सांगायला मृत व्यक्ति कुठे उपलब्ध असते. परंतु मृत्यू अनुभवत मृत्यूच्या सर्वोच्च परमानंदासह विश्वरूपाशी एकरूप होता येते, संत ज्ञानेश्वर, संत विनोबा भावे, स्वा. सावरकर हे या अनुभवांसह शून्यरूप झालेत.* ••●☀‼ *रामकृष्णहरी* ‼☀●•• ☀☀☀☀☀☀ *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जीवनात सर्वसाधारणपणे प्रत्येक केलेल्या कामातून काही ना काही कोणतीतरी अपेक्षा ठेवतो आणि त्यापध्दतीने काम करतो. परंतु प्रत्येक कामातून फळांची अपेक्षा करणेही चुकीचे आहे.एखाद्या कामातून मोबदला मिळाला नाही म्हणून दु:की व्हायचे नाही किंवा आता आपल्याला काहीच मिळत नाही म्हणून पुढे करणारे कामही थांबवायचे नाही.तर याही पुढे जाऊन आपण सातत्याने आपण आपले मन प्रसन्न व शांत ठेवून चांगले काम कसे होईल याकडे लक्ष देऊन जर का आपण जीवन जगलो तर आपण पुन्हा प्रत्येकवेळी फळांची अपेक्षा ही करणार नाही आणि आपले मनही त्या अपेक्षेने धावणार नाही.जीवनात सगळेच प्रयत्न यशस्वी होतात असे नाही. त्यापध्दतीने जीवनात रहायला शिकायला हवे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *कविता - विद्यादान* गुरुंना मिळाला ऐसा मान करण्या आपुले ज्ञानदान जगात नाही ऐसा काम महान विद्यादान आहे श्रेष्ठ दान... अशी आहे एकच गोष्ट कितीही वाटली तरी संपेना आत्मसात केली कितीही तरी ज्ञानाचा बिंदू गाठेना... एकट्या पूरते जो ठेवी ज्ञान बूद्धी त्याची गंजेल पार जो करी सदा विद्यादान बुध्दी होई त्याची तल्लख छान... विद्यार्थ्यांस देऊनी ज्ञान देऊया ऐसा कानमंत्र करुया सगळे विद्यादान शिकवूया सुसंस्काराचे तंत्र... *सौ. सुचिता नाईक किनवट* 9767513499 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *वेळेचे महत्त्व* क्रांतिकारकांच्या मालिकेत चाफेकर बंधूचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. तीनही भाऊ देशाच्या स्वातंत्र्याकरिता हंसत हंसत फासावर चढले. त्या दिवशी दामोदार चाफेकर यांना सरवरा जेलमध्ये फाशी देण्यात येणार होती. दामोदरांनी त्या दिवशी प्रसन्न व आनंदी होते. त्यांच्या हातात गीतेचे पुस्तक होते. ते गीतेचे वाचन करता करता शिक्षेकरता तयार झाले होते. फासीची वेळ होत होती पण इंग्रज अधिकारी सुस्त होते. इंग्रज अधिकारी दामोदरजींना फाशी देण्याच्या ठरल्या वेळेपेक्षा पाच सात मिनिटे उशीरांनी त्यांच्याजवळ आले. इंग्रज सरकारची ही बेपर्वाई दामोदरजींना खूपच खटकली. त्यांनी सहज शब्दांत त्यांची निर्भत्सना करत म्हटले, मी तर समजत होतो की इंग्रज सरकार वेळ पाळण्याच्या बाबतीत अतिशय काटेकोर आहे. पण माझी ही समजूत आज चुकीची सिद्ध झाली. फाशीच्या दिवसाची प्रतीक्षा करणार्‍या व्यक्तीला ठरल्या वेळेनंतरही वाट पहावी लागणेयाची इंग्रज सरकारला लाज वाटली पाहिजे. तो दिवस आता पार दूर नक्कीच नाही की ज्या दिवशी भारतीयांच्या हाती शासनाचा कारभार येईल. तेंव्हा इंग्रजी अधिकारी त्यांना स्पष्टीकरण देण्याचा खूप प्रयत्न केला. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 06/11/2017 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९४१ : दुसरे महायुद्ध - जोसेफ स्टालिनने आपल्या राजवटीत फक्त दुसर्‍यांदा सोवियेत संघाला उद्देशून भाषण केले सोवियेत संघाचे ३.५ लाख सैनिक ठार झाले असले तरी जर्मनीचे ४५ लाख सैनिक ठार झाल्याचा दावा केला १९४३ : दुसरे महायुद्ध - सोवियेत संघाने क्यीव परत घेतले. शहर सोडण्याआधी जर्मन सैनिकांनी तेथील जुन्या इमारतींची नासधूस केली १९६५ : क्युबा आणि अमेरिकेने क्युबाच्या अमेरिकेस जाण्यास तयार असलेल्या नागरिकांना हलविण्याचे सुरू केले. १९७१पर्यंत सुमारे अडीच लाख क्युबन यामार्गे अमेरिकेत आले १९८५ : कोलंबियामध्ये दहशतवाद्यांनी सर्वोच्च न्यायालयाची इमारत काबीज करून ११ न्यायाधीशांसह ११५ व्यक्तींना ठार मारले २००५ - म्यानमारच्या लश्करी राजवटीने राजधानी रंगूनहून प्यिन्मना शहरास हलवली 💥 जन्म :- १८७६ : अर्नी हेस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू १८९७ : जॅक ओ'कॉनोर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू १९१५ : दिनकर द. पाटील, चित्रपट कथाकार, दिग्दर्शक. १९४६ : सॅली फील्ड, अमेरिकन अभिनेत्री 💥 मृत्यू :-  १९८७ - भालबा केळकर, मराठी लेखक, नाट्यअभिनेते *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *अमेरिकेतील टेक्सास चर्चमध्ये गोळीबार, 27 जणांचा मृत्यू* ----------------------------------------------------- 2⃣ *सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचं नाव देणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात केली घोषणा* ----------------------------------------------------- 3⃣ *पुणे : संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ नेपथ्यकार बाबा पार्सेकर व ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती निर्मला गोगटे यांना जाहीर* ----------------------------------------------------- 4⃣ *मॉस्को - रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्याविरोधात आंदोलन केल्याने पोलिसांनी 380 जणांना केली अटक* ----------------------------------------------------- 5⃣ *उद्योगपती अनिल अंबानी यांची रिलायन्स कम्युनिकेशन  (आरकॉम)  कंपनी येत्या 1 डिसेंबरपासून 'व्हाइस कॉल सर्व्हिस' बंद करणार आहे.* ----------------------------------------------------- 6⃣ *ISIS च्या संशयिताला मुंबई विमानतळावर अटक; उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई* ----------------------------------------------------- 7⃣ *भारतीय महिला हॉकी संघाने जिंकला आशिया चषक, अटीतटीच्या झालेल्या अंतिम लढतीत केली चीनवर मात* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ=========                  *स्कुल चले हम* दिवाळीच्या सुट्या संपल्या आणि शैक्षणिक वर्षातील दुसऱ्या सत्रास आज प्रारंभ होत आहे. काही जिल्ह्यात महिन्याच्या एक तारखेपासून शाळा सुरु झाल्या आहेत. दिवाळीच्या सुट्यामुळे गेली 15-20 दिवस शाळा आणि त्याच्या परिसरात सुनसान होते. परंतु शाळा सुरु झाल्या आणि परत एकदा मुलांचा किलबिलाट सुरु झालेला आहे. दिवाळीच्या सुट्यात........ वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_5.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========               *भालबा केळकर* प्राध्यापक भालचंद्र वामन केळकर ऊर्फ भालबा केळकर (जन्म 23 सप्टेंबर 1920 - मृत्यू 06 नोव्हेंबर 1987 ) हे मराठी लेखक, नाट्यअभिनेते व रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांनी प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन ही नाट्यसंस्था स्थापली. ते पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात रसायनशास्त्राचे अध्यापन केले. भालबा केळकरांनी बालनाट्ये आणि नभोनाट्ये लिहिली. त्यांच्या बालनाट्यांमध्ये शास्त्रीय विषय रंजकतेने मांडलेले असत. इ.स. १९६१ साली प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन (पीडीए) संस्थेने रंगमंचावर आणलेल्या "प्रेमा तुझा रंग कसा'"’ या नाटकाचे दिग्दर्शन भालबा केळकरांनी केले होते. त्यातील ""प्रोफेसर बल्लाळ" हे पात्रही त्यांनी रंगवले होते. पीडीएच्या "वेड्याचे घर उन्हात", "तू वेडा कुंभार" या नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनीच केले. मात्र नाट्यनिर्मितीच्या प्रक्रियेदरम्यान भालबा केळकरांसारख्या मंडळींना महत्त्वाची वाटत असलेली उत्स्फूर्तता आणि श्रीराम लागूंसारख्या मंडळींना आवश्यक वाटणारी शिस्त यांवरून पुढील काळात पीडीएत मतभेद वाढत गेले . पीडीएतून लागू, तसेच जब्बार पटेल, सतीश आळेकर मोहन आगाशे इत्यादी मंडळी बाहेर पडली  *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= प्रगतीचा मार्ग चुकांच्या काटयाकुटयातून जातो  जो या काट्या-कुटयांना भितो त्याची प्रगती कधीच होत  नाही *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१)  भारत व पाकिस्तान  यांच्यामधील सीमारेषेचे नाव काय आहे?* 👉     रॅंडक्लिफ रेषा *२)  ही रेषा कोणी निश्चित केली होती?* 👉     सर रॅंडक्लिफ *३)  ही रेषा कधी निश्चित करण्यात आली?* 👉    १९४७ मध्ये *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 सुलभा कुलकर्णी, मुंबई 👤 सुनंदा पाटील 👤 शैलेंद्र मनसबदार 👤 योगी वैद्य 👤 दीपक माली 👤 महेश बल्फेवाड 👤 पवन नानी, म्हैसा 👤 श्रीकृष्ण सोप्पारी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= " माॅर्निंग वाॅक " आता गुलाबी थंडी पडू लागली आहे वाॅकिंग वाल्यांची संख्या वाढू लागली आहे गुलाबी थंडी आहे तोपर्यंत संख्या वाढते कडाक्याची पडली की मग अंथरूणात पडते    शरद ठाकर सेलू जि परभणी 📱 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *"जीवनसंगीत ऐका" असे अनेक विचारवंतानी सांगितले आहे. आपल्या ह्रदयाच्या गर्भगृहात होणारा महन्मंगल घंटानाद कुणाला ऐकू येत नाही. त्यामुळे इतरांच्या भावना-संवेदनांची बूज राखण्याचा भाग तर कोसो मैल दूर.* *पहाटेची मनरम्य प्रसन्नता आपल्या जगण्यात उतरली पाहिजे. रात्रीच्या वेळी ध्यानस्थ बसलेल्या आकाशस्थ चांदण्या म्हणजे मौनयोगाची सर्वोच्च घटना होय. तो 'मौनयोग' आपला 'जीवनयोग' होणे याचाच अर्थ 'जीवनसंगीत' ऐकणे. त्यासाठी गरज असते प्रामाणिक जीवनव्यवहाराची.* *आपल्याला आपल्या आत जाता आले पाहिजे, मग कुणाच्याही अंतर्मनात प्रवेश करणे शक्य होते. 'दु:ख हे फळ आहे' हे ज्याला कळले त्याचेच ह्रदय 'जीवनसंगीत' ऐकू शकते. त्याचीच स्पंदनवीणा जीवनझंकार निर्माण करते.*               •••●‼ *रामकृष्णहरी*‼●•••            🌴🌴🌴🌴🌴🌴     *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*         📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= चित्रांमध्ये जेव्हा अनेक रेषा,आकार आणि रंगछटा एकत्रीत आल्यानंतर जेव्हा एक सुंदर चित्र तयार होते तेव्हा त्याचा आनंद एकट्या चित्रकारालाच होतो असे नाही तर इतरांनाही कलेचा आनंद आणि आस्वाद घेता येतो.त्याचप्रमाणे आपण आपल्या जीवनातल्या स्वत:च्या आनंदाबरोबर इतरांनाही सामावून घेतले तर तुमच्या आनंदात अधिक भर पडेल आणि अधिकची माणसेही आपल्यामध्ये जोडण्यासाठी मदतही ठरेल.आपला आनंद इतरांनाही द्या म्हणजे त्यांच्या जीवनात असलेल्या दु:खाचा विसर होण्यास मदत होईल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९० 🌱🌸🌱🌸🌱🌸🌱🌸🌱🌸🌱 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *बालगीत* गेली दिवाळी संपल्या सुट्या फस्त केल्या लाडू कंरज्या... चला रे माझ्या मित्रा दोस्ता शाळेत करुया आत्ता नवी मज्जा... कोणी मामा कोणी काका कोणी गेले आजोळी बाई मात्र आत्ता म्हणतील लिहा अनूभव चार ओळी... सगळ्यांच्या ऐकूनी रंजक गोष्टी गाली हसू येईल खूदकूनी वर्गातील हसऱ्या वातावरणाने आंनद दाटेल मनोमनी... चित्रे रंगवा कोडी सोडवा आपल्या घरचा आकाश कंदील बनवा दिवाळीच्या त्या प्रकाशाने आमचा वर्ग आज सजला... *सौ. सुचिता नाईक किनवट* 📱 9767513499 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ=========                   *भगवान* एका फकिराला एकदा स्वप्न पडले. स्वप्नात तो स्वर्गात गेला. तेथे रस्त्यावर मोठी गर्दी झालेली त्याला दिसली. त्या गर्दीतील एकाला त्याने विचारले, एवढे लोक का जमले आहेत ? त्या व्यक्तीने सांगितले, आज भगवानांचा जन्मदिन आहे. ते येथून जाणार आहेत. फकिराला आपल्या भाग्याचा हेवा वाटला. साक्षात भगवानाचे दर्शन घडणार. थोड्या वेळाने एका उमद्या घोड्यावरुन एक राजबिंडा तरुण आला. त्याच्यामागे हजारो लोक होते. त्याला पाहून फकिराने विचारले, हेच का ते भगवान ? ती व्यक्ती म्हणाली, नाही हे भगवान नाहीत. हे राम आहेत. त्यांना मानणारे लोक त्यांच्यामागून जात आहेत... याच पद्धतीने येशू, बुद्ध, महावीर... सर्वजण येऊन गेले. भगवानांची वाट पाहता पाहता मध्यरात्र झाली. सारे लोक कंटाळून निघून गेले. आणि त्या निर्मनुष्य रस्त्यावरुन एक म्हातारा एकटाच आला. फकिराने त्याला विचारले, आपणच भगवान ? म्हातारा म्हणाला, हो. फकिराने विचारले, मग आपल्यामागून कोणीच कसे येत नाही ? डोळ्यात अश्रू आणत तो म्हातारा म्हणाला, सारे राम, महावीर, बुद्ध, येशूबरोबर गेले. जो कोणाबरोबर जात नाही, तोच माझ्याबरोबर येऊ शकतो. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🌸🌸 आळंदीहून निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ता ही चार भावंडं पहिल्यांदा ज्या वेळी पंढरपूरला आली त्या वेळी विठोबाचं दर्शन घेताना त्यांना खूप आनंद झाला...या आनंदाचं वर्णन करताना शेजारी उभ्या असलेल्या मुक्ताला ज्ञानदेव म्हणाले, "‘रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजणी..""मुक्ताला ते कौतुकानं साजणी म्हणत आहेत... त्यावर मुक्तानं विचारलं, "‘‘दादा, विठोबाचं रूप पाहून तुम्ही सुखी झाला तसं इतर लोकांना विठोबाचं दर्शन घेतल्यावर सुख का मिळत नाही...?"" तुम्ही म्हणता, ‘"तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा..’" तसं इतर लोकांना का वाटत नाही...? त्यावर ज्ञानोबा म्हणाले, ‘"‘मुक्ते, ‘बहुत सुकृतांची जोडी, म्हणूनी विठ्ठले आवडी..."" अगं मुक्ता ,""पूर्व जन्मीची पुण्याई असेल तरच ईश्वराची आवड उत्पन्न होते..."" म्हणजे नीती धर्माचे आचरण, ईश्वराची उपासना आणि शुद्ध मनाने जीवनाची वाटचाल केली असेल तरच या जन्मी ईश्वराची आवड उत्पन्न होईल...तुला सांगतो, ""सर्व सुखाचे आगर हा विठोबाच आहे... हा विठोबा केवळ मूर्तीत नसून चराचरात भरलेला आहे..."’’हा अनुभव ज्ञानेश्वरांनी घेतला, त्या वेळी ते म्हणतात, ‘"अजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घनू, हरी पाहिला रे हरी पाहिला रे.."" हे सुख काय आहे याची आपल्याला कल्पना नसते... तुकारामांना हा अनुभव आला त्या वेळी त्यांनी अभंग लिहिला, ‘"आनंदाचे डोही आनंद तरंग.."" नामदेवांना अनुभव आला त्या वेळी त्यांनी अभंग लिहिला, ‘"सुखाचे हे सुख श्रीहरी मुख, पाहता भूक तहान गेली...’" संत अमृतराय म्हणतात, ‘"अजी मी ब्रह्म पाहिले, अगणित सुरगण वर्णीति ज्यासी, कटीकर नटसम, चरण विटेवरी..."’ संत सेना महाराज... म्हणतात, ‘"जाता पंढरिसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताची...’" आपण पाहतो सर्व संतांना विठोबाला पाहून खूप आनंद होतो....असा आनंद आपल्याला मिळण्यासाठी, ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात, ‘"संतांचे संगती, मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती, येणे पंथे...""संतांची संगत, त्यांचे ग्रंथ, यामुळे मन निर्मळ होते आणि मन निर्मळ झाले की ईश्वराची आवड उत्पन्न होते...म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, "‘काय वानू मी या संतांचे उपकार, मज निरंतर जागविती....""

*शिक्षकांनी शिक्षकांसाठी केलेली फ्रेश मॉर्निंग बुलेटिनची सेवा* सोशल मीडिया मध्ये फेसबुकच्या नंतर व्हाट्सएप्पचा वापर खुप वाढला. परंतु लोक याचा चांगला वापर करण्याऐवजी रोज सकाळी सुप्रभात आणि संध्याकाळी शुभ रात्रीच्या पोस्ट टाकून परेशान करतात, अशी ओरड नेहमीच ऐकायला मिळते. ग्रुपमध्ये तर सांगायला सोय नाही काही महत्वाचे तर काही खुपच तकलादु पोस्ट पाहण्यास मिळतात. त्यामुळे सर्व सदस्य मंडळी कंटाळून जातात. ग्रुप सोडता ही येत नाही आणि संदेश स्वीकार केल्याशिवाय पर्याय नसतो. अश्या या विपरीत परिस्थितीत "नासा ग्रुप धर्माबाद" चे एडमिन असलेले प्राथमिक शिक्षक तथा स्तंभलेखक ना. सा. येवतीकर यांनी 15 ऑगस्ट 2015 रोजी म्हणजे भारतीय स्वातंत्र्य दिनी  *फ्रेश मॉर्निंग बुलेटिन* पोस्ट करण्यास सुरुवात केली. ज्यास नुकतेच दोन वर्ष पूर्ण झाले असून आज तिसऱ्या वर्षात पदार्पण करीत आहेत. शाळेतील शिक्षक आणि मुलांना उपयोगी पडेल अशी सेवा ते रोज सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत मोबाईलवर अविरतपणे पोस्ट करीत आहेत. *कशी चालू झाली ही बुलेटिन* याबाबत माहिती जाणुन घेतली असता मिळालेली माहिती अशी शाळेत परिपाठाच्या वेळी काही माहिती एकत्रित मिळत नाही तेंव्हा विद्यार्थी आणि शिक्षकांची खुप धावपळ होते. ती धावपळ कशी कमी करता येईल या उद्देश्याने ह्या बुलेटिनचा जन्म झाला. सुरुवातीला फक्त एका ग्रुपच्या मर्यादेत असलेली ही पोस्ट काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात पसरली. आज राज्यातील जवळपास 95 टक्के शिक्षकांच्या मोबाईलवर ही पोस्ट बघायला मिळते. या बुलेटिनचे अजून एक खास वैशिष्ट्य आहे ते म्हणजे ना. सा. येवतीकर आपल्या खास निवेदन शैलीत बुलेटिनची ऑडियो क्लिप तयार करतात आणि जणू आपण आकाशवाणी वरील सकाळच्या बातम्या ऐकत आहोत असा भास होतो. यामुळे प्रत्येकजण या बुलेटिनची सकाळी सकाळी आतुरतेने वाट पाहत असतात. या बुलेटिनमधून गोंदियाचे संतोष रहांगडाले ( दिनविशेष ), कुंडलवाडीचे कुणाल पवारे ( ठळक बातम्या ), रायगडचे सौ. भारती कुंभार ( सुविचार ), धर्माबादचे सर्पमित्र क्रांती बुध्देवार ( विशेष माहिती ),वसमतच्या साहित्यिका सौ. संगीता देशमुख ( प्रश्नमंजुषा ), नागोराव सा. येवतीकर ( माझा वाढदिवस ), सेलूचे कवी शरद ठाकर ( गुगली ), मुंबईचे संजय नलावडे ( विचारधन ), नांदेडचे व्यकंटेश काटकर (विचारवेध ), किनवटच्या कवयित्री सुचिता नाईक (काव्यसरिता ) आणि हदगावच्या श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ( बोधकथा ) याशिवाय गुगलयान असे अनेक उपक्रम या टीमकडून रोज राबविले जातात. तसेच या टीममधील सर्व सदस्य व्यवसायाने शिक्षक आहेत हे ही एक विशेष बाब आहे. म्हणजे सर्व शिक्षकांनी मिळून आपल्या शिक्षकांसाठी आवश्यक असलेली माहिती सोशल मिडियाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा ते प्रयत्न करतात. महाराष्ट्रात असे अनेक शिक्षक आहेत ज्यांचे ब्लॉग खुप सूंदर आणि माहितीपूर्ण आहेत त्यांची सर्व शिक्षक मंडळीना माहिती व्हावी यासाठी त्यांच्या ब्लॉगची लिंकसुद्धा या बुलेटिनमध्ये जोडण्यात येते. *बुलेटिन ऑनलाइन रेडियोवर* नाशिकच्या गुरुकुल रेडियोच्या शेखर ठाकुर यांच्याशी संपर्क करून सदरील बुलेटिनची ऑडियो गुरुकुल रेडियोवर प्रसारित करून संपूर्ण महाराष्ट्रात ही बुलेटिन पोहोचली. तसेच या बुलेटिनची शैक्षणिक बाबीसाठी महत्वपूर्ण अशी नोंद प्रसिध्द शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी दैनिक लोकमतच्या मंथन पुरवणीत " मोबाईल मुलांचा अभ्यासु दोस्त " या त्यांच्या लेखात घेतली हे विशेष.  आपल्या शाळेच्या अध्यापन कार्यानंतर राहिलेल्या वेळाचा सदुपयोग करताना त्यांनी छंद म्हणून सुरु केलेली सेवा आज अत्यावश्यक झाली आहे. काही कारणास्तव एखाद्या दिवशी बुलेटिन पोस्ट झाली नाही तर लगेच अनेक वाचक " आज बुलेटिन का आले नाही " असे प्रश्न विचारून त्यांना भंडावुन सोडतात. शब्दांकन : कुणाल पवारे, सहशिक्षक जि. नांदेड

💦🍀💦🍀💦🍀💦*स्वच्छतेची घेऊया आण*सख्यासोबत्यांनो या हो यास्वच्छता करूया मिळूनियास्वच्छ भारत सुंदर भारत अभियान राबवू या.सुंदर स्वच्छ गाव बनऊयाअभिमान गावाचा वाढवूयाया हो या हो बालजवानांनोसुंदर भारत स्वच्छ भारत करुया.स्वच्छतेचे दूत आपण आरोग्याचे धडे देऊयारोगराईला पळववून लावूनीनिरोगी गाव करुया.घरी बांधूनीया शौचालय वापर त्याचा करुया अभिमान बाळगूनी गावाचास्वाभिमानाने जीवन जगूया.कचरा कचरा वेचूया विल्हेवाट त्याची लावूयाजाणूनी घेऊया पर्यावरणाचे संवर्धन प्रदूषणाला आळा घालूया.या हो या हो सख्यासोबत्यांनोया हो या हो बाल जवानांनो सारेच सारे या हो याहोदूत स्वच्छतेचे बनूयाआण आपण घेऊयास्वच्छ भारत करुया.🍀🌱🍀🌿🍀🌿🍀 *स्वरचित काव्य*✍ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ( स.शि.)जि.प.प्रा.शाळा वाटेगावता.हदगाव जि.नांदेड.

*📚माझी शाळा माझे उपक्रम* *👭बालसभा👬* *वर्ग: तिसरी* *अध्यक्षः कु.तन्वी जाधव**मार्गदर्शकः कु.ज्योती , ईश्वरी जाधव**प्रमुख अतिथीः साईनाथ तलवारे,गणेश, पंजाब,दुर्गा,जाधव वर्ग चौथीतील कु.तेजस्विनी, दिनेश...**विषयः पाण्याचे महत्त्व*.💧💦🌍🌳🍀🌴🌱🌿💦💧💦💧*आज माझा वर्ग तिसरीतील विद्यार्थ्यांनी बालसभा आयोजित करून प्रथमतः प्रतिमा पुजन केले.*💐💐💐💐*व त्यानंतर सर्वांचे स्वागत करून झाल्यावर पुढील कार्यक्रमास सुरूवात केली.**पाण्याचे महत्त्व ह्या विषयावर माहिती सांगितली.पाण्याचे उपयोग , स्तोञ,वापर इत्यादी ....**कु.सृष्टी, दुर्गा हिने स्वरचित कविता म्हणून दाखविली.**उद्देशः मुलांना खूप उत्साह आनंद वाटला.आनंददायी वातावरणात मनोरंजकता निर्माण झाली.*🌻🌻🌻🌻🌻🌻✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (वर्गशिक्षिका)🙏🏻*जि.प.प्रा.शाळा वाटेगाव,ता.हदगाव, जि.नांदेड.

*📚माझी शाळा माझे उपक्रम* *🌹उपक्रम🌹*💎 *उपक्रमाचे नाव:**१) गौरीगणपतीचा उत्सव* *🌻गौरीचापुजनास ठेवलेले पदार्थ(गोड,तिखट), फळे, समोर ठेवलेला साज (प्राणी , पक्षी, धान्य राशी,शोभेचा वस्तू इतर साहीत्य इत्यादी ...*💎 *वर्ग: तिसरी* दि.२९-०८-२०१७ रोजी माझा वर्गातील विद्यार्थ्यांना गौरीपुजनाचा सण तुमच्या घरी कसा साजरा करतात ते तुमच्या शब्दात लिहून आणा असे सूचविले होते.ज्यांचेकडे तो सण घरी साजरा करत नाही पण शेजारील घरी ,नातेवाईक यांच्याकडे जाऊन साजरा करत आहे त्यांनी लिहा किंवा तोंडी माहिती सांगा.🌻🌻🌻🌻🌻🌻त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या व तद्वतच ह्या सणाविषयी माहिती सांगितले . मुलांनी अतिशय छान माहिती लिहून आणली.अशा आनंदरुपी वातावरणात गौरीपुजनाचा सण साजरा केला. *🌻उद्देशः*🌻🌹आनंददायी वातावरण🌹ग🌹सर्व साहित्याची माहिती.👉या उपक्रमातुन अशा प्रकारे मुलांचे लेखन झाले. काही क्षणचिञे.👇👇👇👇 ➖➖➖➖➖➖➖🌻🌻🌻🌻🌻🌻🌻✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे 🙏🏻*जि.प.प्रा.शाळा वाटेगाव,ता.हदगाव, जि.नांदेड.

*📚माझी शाळा माझे उपक्रम* *👭बालसभा👬* *वर्ग: तिसरी* *अध्यक्षः कु.तन्वी जाधव**मार्गदर्शकः कु.ज्योती , ईश्वरी जाधव**प्रमुख अतिथीः साईनाथ तलवारे,गणेश, पंजाब,दुर्गा,जाधव वर्ग चौथीतील कु.तेजस्विनी, दिनेश...**विषयः पाण्याचे महत्त्व*.💧💦🌍🌳🍀🌴🌱🌿💦💧💦💧*आज माझा वर्ग तिसरीतील विद्यार्थ्यांनी बालसभा आयोजित करून प्रथमतः प्रतिमा पुजन केले.*💐💐💐💐*व त्यानंतर सर्वांचे स्वागत करून झाल्यावर पुढील कार्यक्रमास सुरूवात केली.**पाण्याचे महत्त्व ह्या विषयावर माहिती सांगितली.पाण्याचे उपयोग , स्तोञ,वापर इत्यादी ....**कु.सृष्टी, दुर्गा हिने स्वरचित कविता म्हणून दाखविली.**उद्देशः मुलांना खूप उत्साह आनंद वाटला.आनंददायी वातावरणात मनोरंजकता निर्माण झाली.*🌻🌻🌻🌻🌻🌻✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (वर्गशिक्षिका)🙏🏻*जि.प.प्रा.शाळा वाटेगाव,ता.हदगाव, जि.नांदेड.

*📚माझी शाळा माझे उपक्रम* *🌹उपक्रम🌹*📚 *उपक्रमाचे नाव:**१)चिठ्ठी उचला माहिती तोंडी सांगा व त्यानुसार कमीतकमी पाच प्रश्न विचारा व लिहा.* 〰〰〰〰〰〰〰भाजीवाली मावशी,फळेवाले,टेलर,काका कंड्याक्टर,पोस्टमन,अंगणवाडीताई,फुगेवालामामा,गँरेजवाले चाचा,शेतकरीदादा,फोटोग्राफर,डाँक्टर,अँटोवाले,सुतारमामा,खिचडीवालेमामा,ट्र्ँफीकवालेमामा,ईस्ञीवालेमामा(प्रेस),किराणादुकानदार,लोहारमामा,मदतनीसमावशी,इलेक्ट्रिक वस्तू विक्रेता.*🌻*💎 *वर्ग: तिसरी* दि.२०/०९/२०१७ आज माझा वर्गातील विद्यार्थ्यांना गोल बसवूनवरील दिलेल्याप्रमाणे विस चिठ्ठ्या पटसंख्येप्रमाणे तयार केल्या व विद्यार्थ्यांनी एक एक उचलून चिठ्ठी वाचली.व त्याप्रमाणे थोडक्यात माहिती पण सांगितले.ज्यांना ज्या नावाची जी चिठ्ठी आली त्यानुसार त्यांनी प्रश्न विचारले व लेखनही केले. 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻*🌻उद्देशः*🌻वेगवेगळ्या कामाविषयी माहिती मिळते प्रश्न निर्मिती कौशल्य निर्माण होणे. तसेच जे विद्यार्थी ह्या कौशल्यात मागे आहेत त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न व सराव होतो.*विद्यार्थ्यांची आनंदीवृत्तीची जोपासना करणे.नाविण्यता निर्माण करून आपल्या निकषाकडे वळणे.*👇👇👇👇 ➖➖➖➖➖➖➖🌻🌻🌻🌻🌻🌻🌻✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (वर्गशिक्षिका)🙏🏻*जि.प.प्रा.शाळा वाटेगाव,ता.हदगाव, जि.नांदेड.

*🌹जीवन विचार🌹*〰〰〰〰〰〰〰http://www.pramilasenkude.blogspot.in〰〰〰〰〰〰〰*जीवनात स्वच्छता, आचार-विचारात स्वच्छता ही आजच्या काळाची गरज आहे.*ज्या भांड्यात पाणी ठेवायचे आहे ते भांडे स्वच्छ असावे लागते.त्याप्रमाणे जीवनाची उभारणी जिच्यावर करायची ती श्रद्धा निर्मळ असली पाहिजे.म्हणजे आपल्याकडून कोणाचेही वाईट होणार नाही चांगलीच कर्म घडतील.आपली बुद्धी स्वच्छ आणि स्पष्ट असेल तरच आपण नेमका निर्णय घेऊ शकतो.माणसाने भोगलालसा आणि सत्ताभिलाषा यांचे आवरण काढून आपली बुद्धी स्वच्छ व सात्त्विक ठेवली पाहिजे.🌻🌻🌻🌻🌻🌻🌻*〰〰〰〰〰〰〰**✍शब्दांकन/ संकलन*श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे जि.प.प्रा.शा.वाटेगावता.हदगाव जि.नांदेड 〰〰〰〰〰〰〰

📙📚 *गाणे मुळाक्षरांचे*📚📙🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷कमळातील क पाण्यातच राहिलाख चा खटारा आम्ही नाही पाहिला ग च्या गळ्यात घालायची माळ घ च्या घरात रांगते बाळच च्या चमच्यामध्ये औषध हे घेऊछ ची छत्री घेऊन पावसात जाऊ ज च्या जहाजात बसू कधीतरी झ च्या झबल्यात दिसेल न मी परीट चे टरबूज गोल गोल फिरतेठ च्या ठशामध्ये शाई कोन भरते ड चा डमरू वाजे किती छान ढ चे ढग वाटे कापसाचे रानन च्या नळावर पाणी पिऊ चलाण चा बाण कसा आभालात गेला त च्या हातामध्ये मोठी तलवार थ चा मोठा थवा जाई दूर फारद च्या दरवाजात आहे कोण उभाध च्या धरणात पाणी किती बघा प चा पतंग ऊंच ऊंच फिरे फ च्या फणसात गोड गोड गरेब च्या बगळ्याची ऊंच ऊंच मानभ चे भडंग लागते छान म म मगर ही पाण्यातच राही य यमक कवितेत येईर च्या रथाला चार चार घोडेल चे लसून भाजीत टाकू थोडे व च्या वजनाचे आकारच वेगळे श चे शहाम्रुग मोठे मोठे बगळेष च्या षटकोनाला बाजू कोन सहास च्या सशाचे मोठे कान पहा ह चे हरिण चाले तुरू तुरू ळ च्या बाळाला नका कोणी मारूक्ष चा क्षत्रिय पराक्रमी वीरज्ञ चे ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर पाठांतर सोपे झाले मुळाक्षरांचे चला रे गाऊ या हे गाणे अक्षरांचे.

*📚सहशालेय उपक्रम📚* *👭बालसभा👬* *वर्ग: १ ली ते ७वी**विषयः स्वच्छतेचे महत्त्व*🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *अध्यक्षः वर्ग चौथीतील कु.तेजस्विनी तलवारे**प्रमुख अतिथीः वर्ग तिसरीतील ईश्वरी जाधव वर्ग पाचवीतील सानिका जाधव ...**मार्गदर्शन व सुञसंचलन* *वर्ग सातवीतील कु.विजया कदम, कु.कोमल मानेगोविंदवाड*.💧💦🌍🌳🍀🌴🌱*आज दि. २३/०९/२०१७ रोजी वर्ग पहिली ते सातवी पर्यंतचा सर्व विद्यार्थ्यांची सामुहीक बालसभा आयोजित केली होती.*💐💐💐💐💐💐स्वच्छतेचे महत्त्व ह्या विषयावर बालसभेतील सहभागी मान्यवर विद्यार्थ्यांनी माहिती सांगितली.तसेच काही विद्यार्थ्यांनी घोषवाक्ये, स्वरचित स्वच्छतेवरील कविता, शौचालयाचा वापर, परिसर स्वच्छता ह्यावर सविस्तर चर्चा व महत्त्व सांगितले *उद्देशः स्वच्छतेचे महत्त्व जाणणे, बालसभेत मुलांना खूप उत्साह आनंद वाटणे.*💐💐💐💐💐💐💐*वैशिष्ट्यपूर्ण*मु.अ.श्री चव्हाण सर, स.शि.श्री एस.बी.चव्हाण सर तसेच शाळेतील आम्ही सर्व सहकारी यांनी परिपाठातील सहभागी उत्कृष्ट ,उत्साही, गुणवंत विद्यार्थी यांचा पेन देऊन अभिनंदनपर सत्कार केला.🌻🌻🌻🌻🌻🌻〰〰〰〰〰〰〰✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (स.शि.)🙏🏻*जि.प.प्रा.शाळा वाटेगाव,ता.हदगाव, जि.नांदेड

*माझी शाळा माझे उपक्रम* *🌹उपक्रम🌹*उपक्रमाचे नावः*📚माझा शब्दसंग्रह*📚विषयः मराठी〰〰〰〰〰〰〰आज दि.०५/१०/२०१७रोजी माझा तिसरीचा वर्गातील विद्यार्थ्यांना 'माझा शब्दसंग्रह' ह्या उपक्रमांतर्गत बाराखडीप्रमाणे बालभारती या पुस्तकातील शब्द प्रत्येकाने शोधून लिहात्यानंतर जोडाक्षर/जोडशब्द प्रत्येकी एकएकलिहावयास लावले.मूलांनी शब्द मन लावून शोधून काढले आणि लेखन केले.〰〰〰〰〰〰〰उद्दिष्टः 👉शोधून शब्द काढल्यामुळे बाराखडीचा नियमाने लेखन व वाचन झाले.👉 शब्दसंपत्तीत वाढ 〰〰〰〰〰〰〰*संदेशः 📚"शिक्षणाच्या उदात्त हेतूत केवळ ज्ञान अपेक्षित नसून कृतीदेखील अपेक्षित असते."*🍀🍀🍀🍀🍀🍀🍀➖➖➖➖➖➖➖✍ संकल्पना लेखन वर्गशिक्षिकाश्रीमती प्रमिलाताई सेनकुडेजि.प.प्रा.शा.वाटेगावता.हदगाव जि.नांदेड.