*🌷जीवन विचार🌷*〰〰〰〰〰〰मनुष्याच्या संग्रही वृत्तीला मर्यादा नाही.माणसाचा भयंकर शञू जर कोणी असेल तर तो आहे लोभ.लोभ हा सर्व सद्गूणांचा नाश करतो.गीतेत माणसाच्या नरकाची व्दारेच काम, क्रोध ,लोभ ही सांगितलेली आहेत. माणसाच्या लोभाची बरोबरी दुसरे कोणी करु शकत नाही.सर्व जिवात्म्यांमध्ये मनुष्यच असा प्राणी आहे की तो संग्रहवृत्तीने जगतो.मनुष्य कितीही क्रोधीही झाला तरी तो वाघाइतका क्रोधी होऊ शकत नाही आणि कितीही कामी झाला तरी तो चक्रवाक पक्ष्याइतका कामी होऊ शकत नाही असे म्हणतात.पशूंना द्रव्याची इच्छा नसते,परंतु तीच इच्छा माणसाला पशू बनविते.मानवाच्या अंगी जी लोभी प्रवृत्ती आहे त्याची बरोबरी कोणी करु शकत नाही.म्हणूनच धनाचा संचयाच्या मागे लागलेल्या लोभी प्रवृत्तीचा मनुष्यास साध्या व्यवहाराची शिकवण दिली...*संत कबीर सांगून गेले "पानी वाढो नाव में, घरमें बाढो दाम l दोनों हात उलीचिये , यही सयानो काम ll"*माणसाला धनाची गरज आहे पण घरात नाही समाजात पाहिजे.नावेतील पाण्याने जसा धोका होतो तसा घरातील धन वाढल्याने धोका होतो.〰〰〰〰〰〰〰*'आपल्या श्रमाचे फळ, हीच जगातील सर्वोत्तम संपत्ती आहे.'*〰〰〰〰〰〰〰🌷🌷🌷🌷🌷🌷🌷*🙏शब्दांकन/संकलन*🙏*✍श्रीमती प्रमिला सेनकुडे*जि.प.प्रा.शा.गोजेगावता.हदगाव, जि. नांदेड.

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 20/04/2023💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :-● १९४६: राष्ट्रसंघ ही संस्था बरखास्त करून पुढे याचेच संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेमध्ये (United Nations) रूपांतर झाले.● १९९२ : खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी जगातील सर्वात मोठी व भारतातील पहिली अ‍ॅंटेना पुणे जिल्ह्यातील नारायणगाव जवळील खोडद येथे उभारली गेली.● १९७२ - अंतराळयान अपोलो १६ चंद्रावर उतरले💥 जन्म :-● १८८९ - एडॉल्फ हिटलर जर्मन हुकुमशहा.● १८९६: सार्थ ज्ञानेश्वरीचे लेखक प्रा. ह. भ. प. शंकर वामन उर्फ सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर● १९१४ - गोपीनाथ मोहांती, उडिया लेखक.● १९५० : एन. चंद्रबाबू नायडू, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री💥 मृत्यू :-● १९६० : सुप्रसिध्द बासरीवादक पन्नालाल घोष.● १९७० - शकील बदायूॅंनी, हिंदी आणि उर्दू गीतकार.● १९९९ - कमलाबाई कृष्णाजी ओगले, रुचिरा पुस्तकाच्या लेखिका.● २०१७ - प्रा. रामनाथ चव्हाण, मराठी लेखक आणि संशोधक*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यातील CBSE, ICSE शाळांसाठी मराठी विषयांचे मूल्यांकन अ, ब, क, ड श्रेणी स्वरुपात, राज्य शासनाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *खुल्या गटातील महिलांकरीता आरक्षित पदावरील निवडीकरीता तसेच सर्व मागास प्रवर्गातील महिलांना नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्राची अट शिथील करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *जगात लोकसंख्येत चीनला मागे टाकत भारत अव्वल स्थानी, भारताची लोकसंख्या आता 1,428.6 दशलक्ष आहे, तर चीनची लोकसंख्या 1,425.7 दशलक्ष आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यातील जनता उकाड्यामुळं हैराण, अनेक शहरातील उन्हाचा पारा 40 च्यावर, वीजेच्या मागणीत रेकॉर्ड ब्रेक वाढ; महाराष्ट्रात 29 हजार 116 मेगावॅट विजेची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *आता दुपारी 12 ते सायंकाळी 5 दरम्यान, मोकळ्या जागेवर कोणताही सार्वजनिक कार्यक्रम नाही; खारघर उष्माघात दुर्घटनेनंतर सरकारला जाग*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महाबळेश्वरात ढगफुटीसदृश्य पाऊस, तुफान वाऱ्यासह मुसळधार पाऊस,  राज्यात पुन्हा अवकाळीचा इशारा, तर दुसरीकडं तापमानाचा पारा वाढणार; हवामान विभागाचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *केंद्राच्या धर्तीवर आता राज्यातही दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी चार टक्के आरक्षण लागू, राज्य मंत्रीमंडळाचे मोठा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• कपड्याना अत्तराने सुंगधित करता येते, त्यामुळे आपल्या अंगाचा वास येत नाही असा विचार करून आपण अधुनमधून वास घेत असतो. म्हणजे आपल्या मनात कुठे तरी शंका येत राहते. पण दूसरा एक व्यक्ती असतो ज्याच्या अंगावरचे कपडे सुंगधित तर नाहीत शिवाय खुप महागडे सुध्दा नाहीत तरी लोक त्यांच्या मागे धावतात कारण त्यांच्या कर्तबगारीचा सुगंध इतराना आकर्षित करीत असतो.*( स्वलिखित )*साहित्य वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*प्रा. रामनाथ चव्हाण*प्रा. रामनाथ चव्हाण मराठी लेखक आहेत. दलित साहित्य आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील महत्त्वाचे लेखक म्हणून यांचा उल्लेख केला जातो. त्यांनी कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका, व्यक्तिचित्रे, भटक्या-विमुक्तांच्या संदर्भातले संशोधनात्मक लेखन असे विविध साहित्य प्रकार हाताळलेले आहेत. ते पुणे विद्यापीठात अण्णाभाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख होतेे. रामनाथ चव्हाण यांचा दलित साहित्य आणि सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भात संशोधनपर लिखाण करून नाटक, कादंबरी, कथा, एकांकिका आणि व्यक्तिचित्रे या साहित्यप्रकारांत त्यांनी मौलिक योगदान दिले आहे. 'भटक्या-विमुक्तांची जातपंचायत' हे पाच खंडात प्रसिद्ध झालेले त्यांचे लिखाण हा मराठीतील महत्त्वाचा दस्तावेज आहे. 'जाती व जमाती' हेही त्यांचे एक महत्त्वाचे पुस्तक आहे. या पुस्तकाचा जपानी भाषेतही अनुवाद झाला आहे. याचबरोबर भटक्या विमुक्तांचे अंतरंग, पारध, बिनचेहऱ्याची माणसं, गावगाडा : काल आणि आज, घाणेरीची फुलं, जगण्यासाठी, निळी पहाट, पुन्हा साक्षिपुरम, वेदनेच्या वाटेवरून, दलितांचा राजा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हीही त्यांची पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.आज त्यांची पुण्यस्मरण दिवस त्यानिमित्ताने विनम्र अभिवादन*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*समोरच्या व्यक्तीने आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच आपली खरी कमाई आहे**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) आयपीएल ( IPL ) खेळणारी पिता - पुत्राची पहिली जोडी कोणती ?२) हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग कोणत्या दोन शहरादरम्यान आहे ?३) विदेशात स्थायिक झालेल्या भारतीय वंशाच्या लोकांना भारत सरकारकडून दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार कोणता ?४) देशातील ट्रॅक्टर क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ?५) यकृत हा सर्वात महत्त्वाचा अवयव शरीरात कोठे असतो ?*उत्तरे :-* १) सचिन व अर्जुन तेंडूलकर २) नागपूर ते शिर्डी ३) प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार ४) केशुब महिंद्र ५) छातीत उजव्या बरगळ्यात *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 साईनाथ मुलकोड, येवती👤 कु. श्रावणी महेंद्र ढगे, नांदेड👤 माजिद सय्यद👤 विनोदकुमार मोकमोड👤 रमेश हातोडे👤 विलास इंगळे👤 दिलीप सहस्त्रबुद्धे👤 विठ्ठल कल्याणपाड👤 स्वप्नील सूर्यवंशी👤 गंगाधर गुरलोड👤 राहुल सोनकांबळे👤 प्रकाश भेरजे👤 एस. के. शेख*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विठोने शिरी वाहिला देवराणा। तया अंतरी ध्यास रे त्यासि नेणा॥ निवाला स्वये तापसी चंद्रमौळी। जिवा सोडवी राम हा अंतकाळीं ॥८४॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*परिस्थिती कितीही कठीण असली तरी तोंड लपवून, मस्तक झुकवून जगू नका. दु:खांचे युग आले तरी हसतमुख राहून जगा. प्रसंग कितीही वाईट असला तरी हिंमतीने सामोरं जाता आलं पाहिजे....*             *न मुंह छुपाके जियो*             *और न सर झुकाके जियो...*             *गमोंका दौर भी आये*             *तो मुस्कुरा के जियो...**ढगांनी झाकले गेले तरी तारे नष्ट होत नाहीत. संकटांच्या अंधाररात्री ह्रदयाचे दिप उजळून जगा. जीवनातील कुठला क्षण मृत्यूची ठेव म्हणून आरक्षित झाला आहे हे कोणीही जाणू शकत नाही, म्हणून प्रत्येक क्षण आनंदाने जगा. मानवी जीवन अखंड प्रवाही असून ते कोणत्याही टप्प्यावर कायमचे थांबू शकत नाही. म्हणून प्रत्येक मुक्कामानंतर पुढे पुढे जातच जीवन जगलं पाहिजे....!*             *ये जिंदगी किसी मंजिल पे*             *रूक नही सकती.....*             *हर एक मकाम के आगे*             *कदम बढा के जियो...*.               ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नवीन नाते जोडताना जुन्या नात्यांना विसरु नका. असे होऊ नये की, नव्या नात्यात गुरफटून जाऊन आपल्या रक्ताच्या नात्यांना किंवा नातेसंबधांना पार विसरुन जाऊन त्यांच्याकडे सगळ्याच बाबतीत दुर्लक्ष करुन त्यांच्याबद्दलची सहानुभूतीसुद्धा मनात ठेवत नाही. मग अशावेळी नवीन नाते जपण्यात काय अर्थ आहे. नाते असे टिकवा की, त्यात  आपल्याही नात्यांना व नवीनही नातेसंबंधानांसही घेऊन चालायला शिकले पाहिजे. त्यातच तुमच्या जीवनाचे खरे कौशल्य आहे. नात्यामध्ये दुरावा न आणता संबंध अधिक दृढ कसे करता येईल याचा विचार नेहमी केला पाहिजे. कारण कुणाचेही मन न दुखवता सा-यांच्या जीवनात आनंदाचे, सुखाचे आणि समाधानाचे वातावरण नेहमीसाठी असायला हवे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सचोटी*एका साधूला पितळेच्‍या धातूचे सोन्‍यात रूपांतर करण्‍याची कला अवगत होती. पण याचा उपयोग तो गरजुंना करण्‍यासाठीच करत होता. एकेदिवशी एक गरीब ब्राह्मण त्‍याच्‍याकडे आला. त्‍याला मुलीच्‍या लग्‍नासाठी पैशांची आवश्‍यकता होती. साधूने त्‍याची अडचण ओळखून त्‍याला एका पितळेच्‍या भांड्याचे रूपांतर सोन्‍यात करून दिले. ब्राह्मण सोनाराकडे गेला. सोनाराला त्‍याच्‍याकडे सोन्‍याचे भांडे पाहून मनात संशय आला. सोनार राजाकडे गेला. राजाने त्‍याची चौकशी केली केली तेव्‍हा ब्राह्मणाने खरी घटना सांगितली. राजाच्‍या मनात लोभाची भावना उत्‍पन्न झाली. त्‍याने साधूला ती विद्या शिकविण्‍याचे फर्मान काढले. साधूने राजाला ठामपणे नकार सांगितला. राजाने साधूला 15‍ दिवसांची मुदत दिली अन्‍यथा फासावर लटकावेन अशी धमकी दिली. राजा त्‍याच्‍याकडून काय उत्तर येते यासाठी दूत पाठवित असे पण साधू काही होकार देईना. हे पाहून राजाने वेश पालटला व तो साधूच्‍या येथे राहून त्‍याची सेवा करू लागला. साधूने राजाच्‍या सेवेवर प्रसन्न होऊन त्‍याला पितळापासून सोने तयार करण्‍याची विद्या शिकविली. राजा महालात परतला. पंधराव्‍या दिवशी साधूला बोलावून त्‍याला विद्या शिकविण्‍याची आज्ञा केली. साधूने परत नकार दिला. तेव्‍हा राजा गर्वाने म्‍हणाला,  साधू तू मला कला शिकवली नसती हे मी जाणून होतोच पण मी ही हट्टी आहे. मी पण तुझ्याजवळ राहून ती कला शिकून तयार झालो आहे. साधू म्‍हणाला, महाराज तुम्‍ही माझी सेवा करून ती कला शिकला आहात, धमकी देऊन नाही. ज्ञानासाठी गुरुची मर्जी सांभाळावी लागते.*तात्पर्य :- ज्ञान सचोटीने प्राप्त होते, धमकावून नये.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 19/04/2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :-● १९७५ : भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट याचे प्रक्षेपण.💥 जन्म :-● १८९२ : ताराबाई मोडक, भारतातील सुप्रसिध्द बालशिक्षणतज्ज्ञ.● मुकेश अंबानी, सुप्रसिद्ध उद्योगपती● १९७७ - अंजू बॉबी जॉर्ज, भारतीय खेळाडू.● १९८७ - मारिया शारापोव्हा, रशियन टेनिस खेळाडू.💥 मृत्यू :-● १९१० : अनंत लक्ष्मण कान्हेरे, भारतीय क्रांतिकारक● १९९३: स्वातंत्र्यसैनिक डॉ. उत्तमराव पाटील● १९९८: उद्योगपत्‍नी सौ. विमलाबाई गरवारे● २००८: लेखिका, संतसाहित्याच्या अभ्यासिका व राजकारणी सरोजिनी बाबर● २००९: मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्या अहिल्या रांगणेकर● २०१०: लेखक आणि टीकाकार मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष● २०१३-वृत्तपत्रउद्योजक सिवंती आदीतन*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुंबई लोकलचा प्रवास होणार सुस्साट, एमयूटीपी ३ अ' प्रकल्पसंचासाठी ७ हजार कोटी रुपयांच्या कर्जउभारणीला शिंदे-फडणवीस सरकारने मंजुरी दिली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *देशात उष्णता वाढली, अनेक शहरात पारा 40 अंशाच्या पुढं, उत्तर प्रदेशातील हमीरपूर आणि प्रयागराज इथं 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची  नोंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *चंद्रकांत पाटलांची मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी करा, मराठा क्रांती मोर्चाची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कर्नाटकातील सत्तेच्या चाव्या लिंगायत-वोक्कलिंग समाजाच्या हाती; 32 टक्के मतांसाठी सर्वच पक्षात चढाओढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *भांडुपच्या जलबोगद्याचं काम 18 दिवसांत पूर्ण, मुंबईतली पाणीकपात रद्द होण्याची अपेक्षा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बिल्किस बानो प्रकरणातील दोषींच्या सुटकेवर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे; गुजरात सरकारलाही सुनावले खडे बोल*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2023 - हैदराबाद : दमदार अष्टपैलू कामगिरी करत कॅमेरून ग्रीन हा मुंबई इंडियन्ससाठी विजयाचा शिल्पकार ठरला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*हुश्य .....! संपली परीक्षा*https://m.facebook.com/story.php?story_fbid=1497988893661213&id=100003503492582&mibextid=Nif5ozलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*उष्माघातापासून असे करा स्वत:चे रक्षण*दरवर्षी उन्हाळ्यात उष्माघाताच्या बातम्या येत असतात. उन्हाळ्यात काळजी न घेतल्यास उष्माघात होऊन मृत्यू होण्याची शक्यता असते. काल निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना शासनातर्फे महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी लाखो नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाला आलेल्या काही श्रीसेवकांना उष्माघाताचा त्रास जाणवू लागला. यातच ११ लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे उन्हापासून संरक्षण करणे गरजेचे आहे. उष्णतेच्या लाटेपासून बचाव करणयासाठी काय उपाय केले पाहिजे किंवा त्याची लक्षणे काय आहेत हे जाणून घेऊया.....*उष्माघात म्हणजे काय?*उष्माघात म्हणजे नक्की काय तर उन्हाळ्यात सूर्याच्या उष्णतेमुळे मानवी शरीराच्या तापमानात ४० अंश सेल्सिअसहून अधिक वाढ होऊ लागते. ज्यामुळे संबंधित व्यक्तीच्या महत्त्वाच्या अवयवांवर विपरित परिणाम होऊन त्यांच्या कार्यात बिघाड होतो. यालाच उष्माघात म्हटलं जातं. उन्हाळ्यात शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी झाल्यानंतर उष्माघात होण्याचा धोका अधिक असतो. प्रचंड उष्णतेमुळे होणाऱ्या अशा उष्माघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी किंवा त्यावर मात करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीनं आवश्यक ती खबरदारी घेणं आवश्यक बनलं आहे. उष्माघाताची लक्षणेचक्कर येणे त्वचा लालसर होणेउलट्या, मळमळ होणेसुस्त वाटणेडोकं दुखणेह्रदयाचे ठोके वाढणे*उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काय कराल-*भरपूर पाणी आणि शरबत प्यावेउन्हात जाताना छत्री, टोपी किंवा रुमाल आदींचा वापर कराल.उन्हाळ्यात सैल कपडे घालावेआवश्यकता नसल्यास दुपारी घराबाहेर पडणे टाळावे.मद्यपान टाळा*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दिशादर्शक आणि मार्गदर्शक योग्य असतील तर मार्ग चुकण्याचा प्रश्नच येत नाही..* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतात सर्वात कमी वयात नेत्रदान झालेल्या व्यक्तीचे नाव काय ?२) जागतिक यकृत दिन केव्हा साजरा केला जातो ?३) सागरी संपत्ती असलेल्या थोरियमचा उपयोग कोठे केला जातो ?४) एकपेशीय सजीवांची दोन उदाहरणे सांगा ?५) 'व्हायब्रंट व्हीलेज' या केंद्र सरकारच्या योजनेतील पहिले गाव कोणते ?*उत्तरे :-* १) अर्जुन संदीप चावला, उत्तराखंड, वय - ७ दिवस २) १९ एप्रिल ३) अणुऊर्जा निर्मिती ४) अमिबा, पँरामेशियम ५) किबिथू, अरुणाचल प्रदेश*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   👤 संतोष पुरणशेट्टीवार, धर्माबाद👤 अझहर शेख👤 मनोज रामोड👤 संदीप बोलचेटवार, धर्माबाद👤 हर्षवर्धन घाटे, पत्रकार, बिलोली👤 कृष्णा राय👤 संदीप कातमवाड👤 सचिन कनोजवार👤 बालाजी पोरडवार👤 भक्ती जठार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जेणे जाळिला काम तो राम ध्यातो। उमेसी अती आदरें गूण गातो॥ बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथें। परी अंतरी नामविश्वास तेथें ॥८३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*एका शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कुत्रा या विषयावर निबंध लिहायला सांगितला. अनेक विद्यार्थ्यांनी छान ओळी लिहिल्या होत्या. एका विद्यार्थ्याने कुत्र्याचं अवघं जीवन सुंदर शब्दात रंगवलं होतं. या इमानदार प्राण्याला अनेक ठिकाणी कसं हलाखीचं जीवन जगावं लागतं..? 'कुत्र्याच्या मौतीनं मेला' हा वाक्प्रचार कसा तयार झाला हेही त्यानं लिहिलं. कुणीही निबंध वाचला असता, तर डोळ्यांत पाणी आलं असतं. शिक्षक त्याच्यावर फार खुश झाले.**शाळेतून सुटल्यावर तो मुलगा आपल्या मित्रांसोबत घरी चालला होता. काही अंतरावर ते शिक्षकही चालले होते. बाजूने एक कुत्री आपल्या दोन-तीन पिल्लांसह चालली होती. मुलं त्या पिल्लांना दगड मारत होती. पिल्ल केकाटत होती. त्यांच्या केकाटण्याचा सूर ऐकुण मुलं चेकाळून आणखी दगड मारत होती व हसत होती. हे सर्व करण्यामध्ये तो उत्तम निबंध लिहिणारा मुलगा आघाडीवर होता. हे सारं शिक्षकांनी पाहिलं. त्यांना विषाद वाटला. दुस-या दिवशी त्या मुलाला बोलावून घेतले. "तुला कुत्र्या विषयीचं ज्ञान चांगलं आहे, ते तुझ्या निबंधात दिसलं; पण तुझी कृती त्या ज्ञानाप्रमाणे नाही हे मी काल स्वत:च पाहिलं. निष्पाप कुत्र्याच्या पिल्लांना दगड मारून तू हसत होतास." त्यानं आपली चूक कबूल केली.**"मुलाला ज्ञान होतं, पण त्याचं ज्ञान कर्मशील झालं नाही. त्याचं कर्म ज्ञानवान नव्हतं, हे शिक्षकांनी दाखवून दिलं."*               ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकालाच वाटतं की,माझ्यावर कुणीतरी प्रेम करावं,आपल्याशी चांगले संबंध ठेवावेत ; परंतु आपल्यावर प्रेम करणारं कुणीच नाही असं जेव्हा आपल्याला कळायला लागतं तेव्हा थोडा तुम्ही तुमच्याच मनाला एकांतात प्रश्न विचारा की, असं काय झालं की,मला आपुलकीनं विचारणारी, माझ्यावर प्रेम करणारी माणसं मला का भेटत नाहीत ?याचं उत्तर तुम्हाला तुमचं मनच देऊ शकेल.मग मनच सांगायला लागेल की,तू तुझ्या आतल्या अंतःकरणात डोकावून पहा.आपण जर थोडा स्वार्थ जर सोडला आणि इतरांना आपलसं केलं, त्यांच्याशी आपुलकीची नातं जोडलं,त्यांच्याशी प्रेमानं नातं जोडून त्यांच्या सुखदुःखाशी जवळीकता साधली आणि निस्वार्थपणे त्यांच्याशी प्रामाणिकपणे व्यवहार केला तर सारेच आपल्यावर प्रेम करायला लागतील.असं जेव्हा तुमच्या मनाला पटेल तेव्हा सारेच लोक तुमच्यावरही प्रेम करायला लागतील.तुमचा तो एकाकीपणाही दूर होईल,संबंधही दृढ होतील आणि नातेही अगदी घट्ट व्हायला लागतील यात शंका येण्याचे कारणही राहणार नाही.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *❃ मूर्तीपूजेचे महत्त्व ❃*        स्वामी विवेकानंद भ्रमंती करत असेच एकदा उत्तरेकडील अलवार संस्थानात गेले. त्यांचे प्रवचन ऐकायला गेलेल्या त्या संस्थानच्या दिवाणाने प्रभावित होऊन त्यांना राजवाड्यावर नेले आणि त्यांची राजा मंगलसिंह यांची भेट घडवून आणली. राजाचे आयुष्य चैनीत चालले होते. शिवाय त्याच्या मनात राजेपणाचा अहंकारही होता. विवेकानंदाना पाहून त्याला वाटले, बोलून चालून हा एक तरुण संन्याशी ! इंग्रजीत प्रवचन करत असला, तरी याचा अनुभव तो किती असणार ? आपण याची फिरकी घ्यावी, असा विचार करून तो म्हणाला, 'स्वामीजी, मूर्तीपूजा म्हणजे शुद्ध अडाणीपणा आहे, असे मी मानतो. एखाद्या मूर्तीला हळदकुंकू आणि फुले वाहतांना तसेच तिच्यापुढे हात जोडतांना लोकांना पाहिले की, मला त्यांची कीव येते. याबाबतीत तुमचे काय मत आहे ?' राजाच्या या प्रश्नाला सरळ उत्तर न देता स्वामी दिवाणजींना म्हणाले, 'दिवाणजी, या भिंतीवर टांगलेल्या चित्रावर थुंकून येता का ?' स्वामींच्या तोंडचे हे वाक्य ऐकून दिवाणजींना कापरेच भरले.   रागाने लालबुंद झालेल्या राजाच्या चेह-याकडे एकवार चोरट्या नजरेने बघून दिवाणजी म्हणाले, ' स्वामी काय बोलता हे ? ते महाराजांचे दिवंगत वडील आहेत !' विवेकानंद म्हणाले, 'दिवाणजी, तो तर काळ्या शाईने रंगवलेला एक जाड कागद आहे'. एवढे बोलून ते राजाला उद्देशून म्हणाले, 'राजेसाहेब, त्या चित्रात अस्थी, मांस आणि जीव असलेले आपले वडील नाहीत; म्हणून त्याला केवळ काळ्या रंगाने रंगवलेला जाड कागद असे म्हणणे जेवढे अविचाराचे आहे, तेवढेच मूर्तीत प्रत्यक्ष देव नसतांना तिला देव मानून तिची पूजा करणार्यांची कीव करणे अविचाराचे आहे.' स्वामी पुढे म्हणाले, 'मूर्ती म्हणजे देव नव्हे, हे त्या मूर्तीची पूजा करणारे ज्ञानी भक्त जाणतात; परंतु निर्गुण, निराकार परमेश्वराची ध्यानधारणा करणे, ही सर्वसामान्यांना जमणारी गोष्ट नसल्याने, त्यांना ईश्वरभक्ती करता यावी, यासाठी मूर्तीपूजा ही प्रारंभीची पायरी आहे. यातूनच पुढे तो परमेश्वराशी एकरूप होण्याचे ध्येय साध्य करू शकतो'.हे ऐकून राजा अंतर्मुख होऊन विचारात पडला.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18/04/2023💠 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :-● १७२० - शाहू छत्रपती यांच्याकडून पहिले बाजीराव पेशवे यांना पेशवाईची वस्त्रे मिळाली● १८५३ - मुंबईहून ठाण्यापर्यंत रेल्वे सेवा नियमितपणे सुरू झालीकरण्यात आला.● १९२४ - सायमन व शूस्टर यांनी पहिले शब्दकोड्यांचे पुस्तक प्रकाशित केले● १९३६ - पुण्यातील शनिवारवाडा पुरातत्त्व विभागाकडे सुपूर्त करण्यात आला● १९५० - आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली खेड्यातील भूदानाने विनोबा भावे यांची भूदान चळवळ सुरू झाली● १९७५ - भारताचा पहिला भूस्थिर उपग्रह आर्यभट्टचे प्रक्षेपण.💥 जन्म :-● १८५८ - महर्षी धोंडो केशव कर्वे, भारतरत्न, स्त्रीशिक्षण आणि विधवा विवाह पुरस्कर्ते समाजसुधारक● १९१० - विश्वनाथ नागेशकर, भारतीय,गोवेकर चित्रकार.● १९१६ - ललिता पवार, हिंदी व मराठीतील चरित्र अभिनेत्री● १९६२ - पूनम धिल्लन, हिंदी चित्रपट अभिनेत्री💥 मृत्यू :-● १८५९ - रामचंद्र पांडुरंग तथा तात्या टोपे, १८५७ च्या युद्धातील सेनापती● १९५५ - अल्बर्ट आइनस्टाइन, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.● १९७२ - महामहोपाध्याय भारतरत्‍न डॉ. पांडुरंग वामन काणे, कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक,● १९९५ - पंडित धुंडिराजशास्त्री ऊर्फ अण्णा लक्ष्मण दाते, पंचांगकर्ते आणि ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक.● २००२ - शरद दिघे, महाराष्ट्र विधान सभेचे अध्यक्ष*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पाटोदा ग्रामपंचायतीनं देशपातळीवर कार्बन न्युट्रल ग्रामपंचायत श्रेणीत पटकावला दुसरा क्रमांक, पुरस्कारातून ४ कोटींची कमाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सीबीएसई दहावी, बारावी परीक्षेचा निकाल एकाच दिवशी लागण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *यंदाची जनगणना जातीनिहाय करा, 2011 च्या जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी देखील जाहीर करा, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महागाई विरोधात केलेल्या आंदोलन प्रकरणातील गुन्ह्यात माजी आमदार खेडकर व इतर आंदोलकांचे जामीन मंजूर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा अनुदानासाठीची कागदपत्रे जमा करण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी, 20 एप्रिलपर्यंत कागदपत्रे जमा करण्याच्या शासनाच्या सूचना*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नाशिकमध्ये 01 मे रोजी महाराष्ट्रदिनी 51 सर्वधर्मीय जोडप्यांच्या सामुदायिक सोहळ्याचे आयोजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आरसीबीच्या घरच्या मैदानात चेन्नईचा विजयी डंका, चेन्नईने आरसीबीवर आठ धावांनी मात केली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आयुष्य सुंदर आहे*https://m.facebook.com/story.php?story_fbid=3649684281824986&id=100003503492582&mibextid=Nif5ozसाहित्य वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*महामहोपाध्याय डॉ. पांडुरंग वामन काणे*(जन्म : पेढे परशुराम , तालुका चिपळूण , जिल्हा : रत्‍नागिरी, ७ मे १८८०, - मृत्यू : १८ एप्रिल १९७२) हे एक उल्लेखनीय भारतशास्त्रज्ञ, संस्कृत विद्वान, भारतीय कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक होते. १९६३ मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न प्राप्त झाला त्यांच्या अभ्यासपूर्ण कार्यासाठी ४० वर्षांपेक्षा जास्त सक्रिय शैक्षणिक संशोधन ज्याचा परिणाम धर्मशास्त्राच्या इतिहासाच्या ६,५०० पृष्ठांवर झाला. इतिहासकार राम शरण शर्मा म्हणतात: "पांडुरंग वामन काणे, एक महान संस्कृतशास्त्रज्ञ, ज्याने सामाजिक सुधारणेचा विवाह केला, त्यांनी विद्वत्तेची पूर्वीची परंपरा चालू ठेवली. विसाव्या शतकात पाच खंडांमध्ये प्रकाशित "धर्मशास्त्राचा इतिहास" हे त्यांचे स्मारक कार्य आहे. प्राचीन सामाजिक कायदे आणि रीतिरिवाजांचा ज्ञानकोश. हे आपल्याला प्राचीन भारतातील सामाजिक प्रक्रियांचा अभ्यास करण्यास सक्षम करते." त्यांच्या पन्नासाव्या स्मृतिदिनानिमित्त राजभवन महाराष्ट्र इथे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते टपाल तिकिटाचे प्रकाशन झाले.कोकणातील वेदशास्त्रपारंगत व विद्वत्तेची मोठी परंपरा असलेल्या अशा मध्यमवर्गीय कुटुंबात काणे यांचा जन्म झाला. त्यांचे पणजोबा उत्तम ज्योतिषी आणि पंचांगकर्ते, तर आजोबा वैदिक पंडित, ज्योतिषी आणि उत्तम वैद्य होते. वडील वामनरावांना वेद, उपनिषदे, भगवद्गीता यांचे सखोल ज्ञान होते. महत्त्वाचा असा ऋग्वेद तर त्यांचा तोंडपाठ होता. वामनराव पुढे वकिलीची परीक्षा उत्तीर्ण होऊन, न्यायालयात इंग्रजीतून कामकाज करणारे पहिलेच वकील ठरले. म्हणजे परंपरागत भारतीय ज्ञान आणि आधुनिक इंग्रजी भाषेतील कायद्याचे ज्ञान असा मिलाफ असलेले असे त्यांचे वडील वामनराव ! डॉ. पां. वा. काणे यांचे दुसरे आजोबा म्हणजे आईचे वडीलही वैदिक पंडित आणि वैद्यकीचे उत्तम ज्ञान असलेले असे होते.पां.वा. काणे यांना अमरकोशातील सर्व श्लोक लहानपणीच तोंडपाठ होते. लहान वयातच त्यांनी विविध नियतकालिकांतून आधी मराठीतून आणि नंतर इंग्रजीतून लेखन सुरू केले. त्यांच्या ज्ञान आणि विद्वत्तेचा आलेख सतत वरच चढत गेला. बी.ए. आणि संस्कृतमधून एम.ए. करतानाच त्यांनी अनेक विषयांमध्ये संशोधन सुरू केले. संस्कृत, मराठी, हिंदी इंग्रजी या भाषांबरोबरच त्यांनी फ्रेंच आणि जर्मनसह अनेक भाषांवर प्रभुत्व मिळवले. अश्या रीतीने त्यांनी अतिशय मेहनतीने स्कॉलरशिप मिळवत आणि एकीकडे शिकवत राहून खूप विद्या संपादन केली. संस्कृत भाषेवर अतिशय प्रेम, त्यामुळे बी.ए.ला संस्कृतमध्ये सर्वप्रथम आले. त्याबद्दल त्यांना भाऊ दाजी पारितोषिक मिळाले. मग एल्‌‍एल.बी. झाले. नंतर झाला वेदान्त पारितोषिकासह ते मुंबईच्या विल्सन महाविद्यालय येथून एम.ए. झाले. त्यानंतर ’हिंदू-मुसलमान कायदा’ घेऊन एल्‌एल.एम. झाले. या परीक्षेत त्यांना व्ही.एन. मंडलिक सुवर्णपदक मिळाले. त्यांना मराठी, हिंदी,इंग्रजी खेरीज संस्कृत, जर्मन, फ्रेंच इ. भाषा अवगत होत्या.काणेंनी १९०४ साली रत्‍नागिरी जिल्ह्यातील एका शाळेत शिक्षक म्हणून कामास सुरुवात केली. नंतर ते एल्फिन्स्टन हायस्कूल, मुंबई येथे नोकरीवर होते. मुंबईच्याच गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्येसुद्धा त्यांनी शिकवले होते. मुंबई विद्यापीठाचे ते सन १९४७ ते १९४९ दरम्यान कुलगुरू होते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकमेकांची प्रगती साधते तीच खरी मैत्री*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'Statue of Liberty'* हा स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा कोणत्या देशात आहे ?२) कृत्रिम बुद्धिमत्ता ( AI ) आधारित 'आभासी भिंत' तयार करणारा देशातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता ?३) इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाचे पदसिध्द कुलपती कोण असतात ?४) देशातील पहिले खाजगी विमानतळ कोणते ?५) हवामान म्हणजे काय ?*उत्तरे :-* १) अमेरिका २) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर ३) राष्ट्रपती ४) दुर्गापूर, पश्चिम बंगाल ५) एखाद्या प्रदेशातील हवेची दीर्घकालीन सरासरीची स्थिती होय.*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 गझलकार शेखर गिरी👤 कु. मधुरा हणमंत पडवळ, लातूर👤 सचिन कुलकर्णी, लातूर👤 योगेश मरकंटी👤 मनोज कुंटे👤 देवराव पाटील कदम👤 राजू मेकाले👤 चंद्रकांत तालोड👤 चंद्रशेखर अनरे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बहु नाम या रामनामी तुळेना। अभाग्या नरा पामरा हे कळेंना॥ विषा औषधा घेतले पार्वतीशे। जिवा मानवा किंकरा कोण पुसे ॥८२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*नवरा-बायकोमध्ये मतभेद असतातच. तसं पाहिलं तर 90% जोडप्यांमध्ये दोघांचेही स्वभाव परस्परविरोधी असतात, त्यामुळे वाद होणं, खटके उडणं स्वभाविकच आहे. परंतु एकाने समंजसपणा दाखवला पाहिजे. कारण वाद टोकाला जाऊन नवरा-बायको विभक्त होणार असतील तर त्या संपूर्ण कुटुंबाची वाताहात होते.**'लिव्ह-इन' मध्ये नात्याची कमिटमेंट नसते. त्यामुळे त्यात गांभीर्य नसते. एकत्र राहण्यातली नवलाई संपली की त्या नात्याचा कंटाळा येऊ लागतो. कमिटमेंट नसल्यामुळे दोघंही एकमेकांना बांधील नसतात. अंतिमत: अशा नात्याचा शेवट दोघांच्या विभक्त होण्याने होतो. आपल्यावर कुटुंबातल्या इतर सदस्यांबरोबर 'अॅडजस्ट' करण्याचे संस्कार झालेले असतात. वैवाहिक सुखही तसं क्षणिकच असतं, लग्नाची नवलाई संपली की सगळं चाकोरीबद्ध होऊन जातं. पण नवरा-बायको एकमेकांचे मित्र असतील तर त्यांच्या नात्यात सतत एक सकारात्मकता झिरपत असते.*               ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणत्याही नात्यामध्ये एकमेकाबद्दलचा विश्वास आणि प्रेम असेल तर ते नाते अधिक घट्ट बनते. कामापुरते किंवा आपमतलबासाठी निर्माण केलेले नाते कधीच जास्त काळ टिकत नाही.उलट अशा नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊन जोडलेल्या नात्यामध्ये एकमेकांबद्दल   तिरस्काराची भावना उत्पन्न होते.तेव्हा नाते जर टिकवायचे असेल तर निःस्पृह भावनेने व आपुलकीने नाते निर्माण करुन ते शेवटपर्यंत कसे टिकतील यासाठी जपले पाहिजे. हीच ख-या जीवनाची यशोगाथा आहे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कोरडी सहानभुती*एक कोल्हा एका विहिरीत पडला व त्याच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागले. तो आपले डोके मोठ्या मुष्कीलीने पाण्याबाहेर ठेवू शकत होता. इतक्यात एक लांडगा त्या ठिकाणी आला व विहिरीत पडलेला कोल्हा पाहून मोठ्या कळवळ्याने त्याला म्हणाला, अरेरे ! मित्रा तूच का आत पडला आहेस ? तिथे तुला फारच थंडी वाजत असेल, आणि तू पडलास तरी कसा विहिरीत ? तुझी स्थिती पाहून मला फार वाईट वाटतं हे कसं काय झालं ते तरी मला कळू दे. त्यावर कोल्हा म्हणाला, मित्रा, तू कृपा करून जर एखादी दोरी आत सोडशील तर तुझ्या या शाब्दिक कळकळीपेक्षा ती मला या वेळी अधिक उपयोगी पडेल. विहिरीतून वर येण्यासाठी तू मला मदत कर, म्हणजे मी माझी हकीगत तुला सांगतो.*तात्पर्य*एखाद्या संबंधाने नुसत्या शब्दांनी खूप कळकळ दाखविण्या पेक्षा त्याला थोडी जरी प्रत्यक्ष मदत केली तरी त्याची किंमत फार मोठी आहे.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 17/04/2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :-● १९५२ - पहिली लोकसभा अस्तित्वात आली.● १९७० : चांद्रयान अपोलो १३तील अंतराळवीर सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले💥 जन्म :-● १४७८ - संत सूरदास, हिंदी कवी, कृष्णभक्त● १८९१ : यशवंत रामकृष्ण दाते, नामवंत मराठी कोशकार.● १९१६ - सिरीमाओ बंदरनायके , श्रीलंकेच्या व जगातील पहिल्या महिला पंतप्रधान.● १९२७ - चंद्रशेखर, भारताचे पंतप्रधान.💥 मृत्यू :-● १९७५ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, भारताचे दुसरे राष्ट्रपती● १९९८ - विजय सिप्पी, हिंदी चित्रपट निर्माते● २००४ - सौंदर्या, दक्षिण भारतीय अभिनेत्री.● २०११ - वि.आ. बुवा, मराठी विनोदी साहित्यिक.● २०१२ - वसंत दिवाणजी, कन्नड लेखक.● २०१२ - नित्यानंद महापात्रा, भारतीय पत्रकार आणि राजकारणी.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *ज्येष्ठ निरूपणकार डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं, पुरस्काराचं मानधन दिलं मुख्यमंत्री सहायता निधीला*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अवकाळी काही पाठ सोडेना; नाशिकसह जिल्ह्यात पुन्हा वादळी वाऱ्यांसह गारपिटीचा तडाखा, मराठवाड्यात 23 एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सह्याद्री फार्म्सकडून कर्मचाऱ्यांंसाठी खूशखबर ! 461 कर्मचाऱ्यांना 70 कोटीचे शेअर्स*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महिलांना दरमहा दोन हजार, मोफत वीज; राहुल गांधी यांची कर्नाटकच्या जनतेला चार आश्वासने*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अखेर छत्रपती संभाजीनगरमध्ये 24 एप्रिल रोजी होणार बीआरएस पक्षाची सभा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *Femina Miss India 2023 : राजस्थानची नंदिनी गुप्ता ठरली 'मिस इंडिया'*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आयपीएल 2023 - मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट या सामन्यात मुंबई इंडियन्सने आपल्या होम ग्राउंडवर कोलकाताचा पाच विकेटनी केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कथा :- परीक्षा गुरुजींची*http://kathamaala.blogspot.com/2017/04/blog-post_3.htmlलघुकथा वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सूरदास हे हिंदीच्या ब्रज बोलीभाषेत लिहिणारे एक भक्तकवी होते. हे त्यांच्या सूरसागर या ग्रंथासाठी ते प्रसिद्ध आहेत.सूरदास यांचा जन्म इ.स. १५४०मध्ये रुणकटा नावाच्या गावात झाला. हे गाव मथुरा-आग्रा मार्गालगत वसलेले आहे. काही विद्वानांचा असा विश्वास आहे की सूरचा जन्म सिही नावाच्या खेड्यातल्या एका गरीब सारस्वत ब्राह्मण कुटुंबात झाला होता. तो खूप विद्वान होता, त्याच्या लोकांची आजही चर्चा आहे. सूरदास यांचे वडील रामदास गायक होते. सूरदासच्या जन्माबद्दल मतभेद आहेत. सुरुवातीला सुरदास आग्राजवळील गौघाट येथे राहत होता. तेथे असताना त्यांनी श्री वल्लभाचार्य यांची भेट घेतली आणि त्यांचे शिष्य झाले. वल्लभाचार्य यांनी पुष्तीमार्गामध्ये त्यांची दीक्षा घेतली आणि कृष्णालीला पद गाण्याचे आदेश दिले. त्यांचे आयुष्य आग्र्याजवळच्या गऊघाट व मथुरेजवळच्या गोवर्धन या गावांत गेले. वल्लभाचार्यांनी त्यांना श्रीकृष्णभक्तीचा उपदेश दिला. सूरसागर या ग्रंथात श्रीकृष्णाच्या जीवनाचे वर्णन आहे. त्यातील काव्य व गानसौंदर्यामुळे ते तत्कालीन समाजात प्रसिद्ध झाले. सूरदासांची प्रसिद्धी ऐकून तानसेनाच्या मध्यस्थीने अकबर बादशहा त्यांना भेटायला आला. तेव्हा अकबराच्या सांगण्यावरून सूरदासांनी त्याची स्तुतीकवने लिहीण्यास नकार दिला अशी आख्यायिका आहे. या प्रसंगानंतरही अकबराने सूरसागराचा फारसी अनुवाद करवला. सूरसागरातील भ्रमरगीत हा भाग साहित्यिक दृष्टीने विशेष महत्त्वाचा मानला जातो. या ग्रंथाने हिंदी भाषेचे सौंदर्य वाढवले असे म्हटले जाते. आधुनिक काळात सूरसागराचे प्रकाशन वाराणसीच्या नागरी प्रचारिणी सभेने १९५० मध्ये केले. २०१५ मध्ये सूरसागराचे इंग्लिश भाषांतर हार्वर्ड विद्यापीठाने प्रकाशित केले.सूरसागराशिवाय सूरदासांनी सूरसारावली, साहित्यलहरी, नलदमयन्ती अशा इतर ग्रंथांचेही लिखाण केले.१५८०मध्ये गोवर्धन जवळच्या परसौली गावात सूरदास यांचा मृत्यू झाला.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणसानं मनात काही ठेवू नये,नाहीतर डोक्यावर परिणाम होतो.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणत्याही एका विषारी वनस्पतीचे नाव सांगा ?२) शुद्ध पाण्याचा सामु ( PH ) किती असतो ?३) PH चा Full Form काय आहे ?४) वैदिक वाङ्मययातील कोणता मूळ ग्रंथ मानला जातो ?५) जपानचे दुसरे नाव काय आहे ?*उत्तरे :-* १) धोतरा २) सात ३) पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन ४) ऋग्वेद ५) निप्पोन*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 हिंदुजा शिवाजी अन्नमवार, नांदेड👤 शिवकन्या पटवे, उपक्रमशील शिक्षिका, बिलोली👤 सुभाष टेकाळे, कुपटी, माहूर👤 मोईन आर. शेख👤 आनंद बाबासाहेब त्रिभुवन👤 म. सलमान👤 विनायक शिंदे👤 अनुजकुमार मुंडे👤 जया इगे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना मत्सरे नाम सांडूं नको हो। अती आदरे हा निजध्यास राहो॥ समस्तांमधे नाम हे सार आहे। दुजी तूळणा तूळितांही न साहे ॥८१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*इतरांसारखाच मीसुद्धा एका छोट्या खेड्यात लहानाचा मोठा झालो. तिथं मरण येईपर्यंत राबणा-या बाया पाहिल्या. त्यात आई नावाचीही बाई होती. दिवसभर काम एके काम, हिच त्यांची दैनंदिनी. घर आवर, रोज टोपलंभर भाकरी बडव, घर-गोठा स्वच्छ कर, रांजण-घागरी भरून ठेव, गायी वासरांची देखभाल कर..आणि शेतावर जा. लेकरांना जेऊ घाल..न्हाऊ घाल..पुरूषांना ताटं लाव..मग स्वत: उशीरानं जेव. बाई अशी पुरूषप्रधान कर्फ्यूखाली सतत का करपत गेलीयं ?**माती आणि माता काही मागत नाही, पण भरभरून सारं देतात. माया, जिव्हाळा, प्रेम, आधार, सहारा आणि भाकर देणा-या माती आणि माता या श्रेष्ठ विश्वसंस्थाच आहेत, ज्या निर्मोही आहेत. विशाल आणि पवित्र आहेत. पण बाईपणाच्या झिजण्याचं मोल जगात झालं नाही. त्यावर महाकाव्य लिहून झाली असतील, पण 'माय' हा शब्दांपलिकडचा महान ग्रंथ म्हणून शिल्लकच उरणार आहे. " पोलिसांचा कर्फ्यू एक वेळ परवडला, पण परंपरेचा परवडत नाही."*               ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जेव्हा तुम्ही एकांतामध्ये असता तेव्हा तुमच्या मनामध्ये खूप वेगवेगळे विचार येतात आणिमनाला गोंधळून टाकतात. अशावेळी आपल्याला काय करावे नि काय करु नये अशी मनाची द्विधा मनस्थिती होते. काय करावे काही सुचत नाही. मग अशी परिस्थिती असते तेव्हा एकच करायचे.मनाला स्थिर ठेवण्यासाठी तुम्हाला नेहमी आवडणा-या गोष्टीकडे लक्ष घाला त्यात तुमचे मन रमले की, आपोआपच तुमची द्विधा असलेली मनस्थिती पूर्ववत होण्यास मदत होते आणि तुमच्या मनातला चाललेल्या गोंधळाला विराम मिळतो. दुसरी एक गोष्ट करा की,ज्यातून तुम्हाला काही पर्याय शोधण्यास मदत होते.काही संस्कारक्षम, आदर्श विचार, संतांची, थोर व्यक्तींची व विचारवंताची उपदेशात्मक ग्रंथ, पुस्तके किंवा विचार वाचण्यासाठी हातात घ्या. ज्यातून तुम्हाला काही ना काही पर्याय शोधून काढण्यास मदत मिळेल व गोंधळलेल्या मनाला स्थिर ठेवता येईल.कारण हेच ज्ञान आपल्या मनाला स्थिर ठेवण्यासाठी व प्रसन्न ठेवण्यासाठी मदत करतील. मग पुढील कामासाठी जोमाने लागू शकाल.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *महत्‍व मानवसेवेचे*एक प्रसिद्ध संत होते. त्‍यांच्‍याकडे शिक्षण घेण्‍यासाठी दूरदूरवरून शिष्‍यगण येत असत. त्‍यांच्‍या शिष्‍य परिवारातील दोन शिष्‍य त्‍यांना खूप प्रिय होते. कारण ते दोघेही धार्मिक वृत्तीचे होते. दोघेही पहाटे लवकर उठून स्‍नान करून पूजापाठ करण्‍यात मग्‍न होते. चार तासांच्‍या पूजेनंतर ते दोघे थेट गुरुजवळ जात व आश्रमात येणा या रूग्‍णांची सेवा करण्‍यास ते गुरुला मदत करत. त्‍या संतमहात्‍म्‍याने तर मानव सेवेचे व्रतच घेतले होते त्‍यामुळे स्‍वत पुढाकार घेऊन पीडित,दीनदुबळ्यांची सेवा करत असत. गरीब मुलांना निशुल्‍क शिक्षण देत असत. गरीब कुटुंबाला ते अन्न,वस्‍त्र, निवारा उपलब्‍ध करून देत. असहाय, अनाथ व आजारी नागरिकांना आश्रय देऊन त्‍यांच्‍या उपचारांची व्यवस्‍था करत असत. एकेदिवशी त्‍यांचे दोन्‍ही शिष्‍य त्‍यांच्‍या दीर्घपूजेत व्‍यग्र होते. त्‍याचवेळी गुरुजींचे बोलावणे आले. कारण त्‍यादिवशी आश्रमात रुग्‍णांची संख्‍या जास्‍त होती. परंतु दोन्‍ही शिष्‍य पूजा अर्धवट सोडून गेले नाहीत. गुरुजींनी थोडा वेळ वाट पाहून पुन्‍हा निरोप धाडला. त्‍यावर त्‍या दोघांनी नाराजी व्‍यक्‍त केली व तेथे येऊन ते गुरुजींशी वाद घलू लागले. तेव्‍हा गुरुजींनी त्‍यांना पुढील शब्‍दात मार्गदर्शन केले,''वत्‍सांनो, मी तर व्‍यक्तिपूजेसाठी बोलावणे धाडले होते. पूजा, प्रार्थना तर देवतादेखील करतात. परंतु सेवा ही केवळ मनुष्‍यच करतो. सेवा ही प्रार्थनेच्‍या बरोबरीची असते. कारण ती निस्‍वार्थी आणि परोपकारी असते.'' यानंतर त्‍या दोन्‍ही शिष्‍यांचे डोळे उघडले.                     *तात्पर्य*ईश्‍वराची जिवंत कलाकृती म्‍हणजे माणूस त्‍याची सेवा म्‍हणजे साक्षात ईश्‍वराची पूजा असते व त्‍या सेवेपेक्षा अन्‍य कोणतीही पूजा ही मोठी नाही.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15/04/2023💠 वार - शनिवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :-● १९९४ : भारताने गॅट करारास मान्यता दिली.💥 जन्म :-● १४५२ : लियोनार्दो दा व्हिंची, इटालियन गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, चित्रकार💥 मृत्यू :-● १८६५ : अब्राहम लिंकन, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे राष्ट्राध्यक्ष*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती राज्यभर विविध कार्यक्रमाने साजरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *विदर्भात उष्णतेची लाट, चंद्रपूरमध्ये सूर्य तळपला, 43.2 अंशसेल्सिअस जगातील सर्वाधिक तापमानाची नोंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं तुकडेबंदीबाबतची पुनर्विलोकन याचिका फेटाळली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *जळगावात सोन्याच्या भावात रेकॉर्ड ब्रेक वाढ; गेल्या 24 तासात 700 रुपयांची वाढ,  प्रतितोळा दर 63 हजारांच्या पार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सांगली, सोलापूर, जळगाव, धुळे, नंदुरबार, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये वेगळ्या ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जगातील सर्वात प्रभावी १०० लोकांची यादी जाहीर; शाहरुख खान आणि एस. एस. राजमौली यांचा समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2023 - सनरायजर्स हैद्राबादने केकेआर ला 23 धावानी केले पराभूत*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आत्महत्या : एक चिंतन*https://m.facebook.com/story.php?story_fbid=1493759750750794&id=100003503492582&mibextid=Nif5ozलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोकण विभागकोकण विभाग हा महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेली मुंबई त्याच प्रमाणे मुंबई उपनगर हे देखील कोकण विभागमध्येच येतात.क्षेत्रफळ : ३०,७४६ किमी जिल्हे :मुंबई शहर – मुंबई उपनगर – ठाणे – पालघर – रायगड – रत्नागिरी – सिंधुदूर्गसाक्षरता: ८१.३६%इतिहासब्रिटिश काळात कोकण विभाग हा मुंबई इलाख्यातील उत्तर किंवा गुजरात विभागात मोडत होता.  ब्रिटिश काळात कोकण विभागात ठाणे, कुलाबा, रत्नागिरी हे तीनच जिल्हे होते. १९६१ मध्ये कोकण विभाग हा नव्याने स्थापित झालेल्या महाराष्ट्राचा भाग बनला. १९८१ साली सत्नगिरी जिल्यापासून सिंधुदुर्ग जिल्याची निर्मिति झाली. कुलाबा जिल्याचे रायगड असे नामांतर करण्यात आले २०१४ मध्ये ठाणे जिल्ह्यावरील प्रशासकीय कारभार कमी करण्यासाठी ठाणे जिल्ह्यापासून पालघर जिल्याची निर्मिति करण्यात आली.चतुःसीमा: कोकण विभागाच्या पश्चिमेस अथांग पसरलेला अरबी समुद्र आहे तर पूर्वेस पुणे विभाग आहे ज्याला पश्चिम महाराष्ट्र असेही संबोधले जाते. उत्तरेस गुजरात राज्य तर दक्षिणेस गोवा राज्य आहे.कोकण विभागातील मुंबई हा सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा तर सिंधुदुर्ग हा सर्वत कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जोड़ीदार सुंदर नाही तर काळजीकरणारा पाहिजे…*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ऑस्कर विजेत्या 'द एलिफंट व्हीस्परर्स' या लघुपटात हत्तीची काळजी घेणारे दाम्पत्याची नावे काय आहेत ?२) आयपीएलमध्ये एका संघाकडून २०० सामने खेळणारा पहिला कर्णधार कोण ठरला आहे ?३) घानेंद्रियाची क्षमता तपासण्यासाठी शास्त्रज्ञांनी कोणते उपकरण विकसित केले आहे ?४) ज्ञानवापी मज्जिद कोणत्या राज्यात आहे ?५) १९२७ चा वन कायदा बदलून कोणत्या वर्षी वन संवर्धन कायदा करण्यात आला ?*उत्तरे :-* १) बेली व बोम्मन २) महेंद्रसिंग धोनी ३) अल्फॅक्टोमीटर ४) वाराणसी, उत्तरप्रदेश ५) १९८०*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 सुधीर गुट्टे, विस्तार अधिकारी      पंचायत समिती माहूर👤 सौ वैशाली क्रांतिकुमार भुक्तरे, नांदेड👤 दत्ताहरी जाधव👤 प्रा. श्रीराम गोविंद गव्हाणे, संपादक👤 मुकुंद एडके👤 रामकिशोर झवर👤 चंद्रकांत देवके, सेवानिवृत्त शिक्षक धर्माबाद👤 बलकेवाड योगेश👤 संदीप पारने👤 सुनील पलांडे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••धरा श्रीवरा त्या हरा अंतराते। तरा दुस्तरा त्या परा सागराते॥ सरा वीसरा त्या भरा दुर्भराते। करा नीकरा त्या खरा मत्सराते॥८०॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*'परमार्थ' साधण्यासाठी मोठी उदार वृत्ती आवश्यक आहे. थोर मनाच्या माणसालाच परमार्थ साधतो. जो पंत असेल तोच संत बनेल. प्रापंचिक माणसाने घरामध्ये असलेले सर्वच्या सर्व देऊन टाकू नये ही गोष्ट खरी, पण प्रसंग आला तर सर्व देण्याची मनाची तयारी पाहिजे हेही खरे.**भगवंताला 'सर्व' देण्यापेक्षा 'स्व' द्यायला शिका. 'स्व' दिल्यावर 'सर्व' नाही दिले तरी चालेल, कारण ते आपले, आपल्या मालकीचे रहातच नाही. उलट 'सर्व' देऊन 'स्व' द्यायचा राहिला, तर 'सर्व' दिल्याचे समाधान मिळत नाही.**"भगवंताला 'स्व' देणे म्हणजे 'मी त्याचा आहे' ही जाणीव रात्रंदिवस मनामध्ये ठेवणे होय."*               ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सत्याच्या मार्गावर चालणारी माणसे कधीच कुणाला घाबरत नाहीत. कारण सत्य हेच त्यांचे असत्याला दूर करणारे प्रभावी शस्त्र आहे.की ज्यामुळे असत्याचा सत्यापुढे काहीच चालू शकत नाही.म्हणून केव्हाही सत्याच्याच मार्गाने चालावे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *युक्ती*सूर्य आणि वारा या दोघांची आपापल्या पराक्रमाबद्दल एकदा पैज लागली . जवळच एक वाटसरू बसला होता . त्याच्या अंगावरची घोंगडी काढून ठेवण्यास त्यास जो भाग पाडील तो खरा पराक्रमी समजावा, असे त्यांनी ठरविले . प्रथम वार्याने फार जोराने वाहून वाटसरूच्या अंगावरील घोंगडी उडविण्याचा पुष्कळ प्रयत्न केला . परंतु वार्यामुळे जसजशी अधिक थंडी वाजू लागली तसतसा तो वाटसरू आपली घोंगडी अधिकच बळकट  धरू लागला.शेवटी वारा दमला आणि स्वस्थ बसला . मग सूर्याने आपला पराक्रम दाखवण्यास सुरुवात केली . प्रथमतः आकाशात जे ढग आले होते ते त्याने दूर घालविले. नंतर त्याने आपली प्रखर किरणे वाटसरूच्या अंगावर सोडली . ती उष्णता त्या वाटसरूस सहन न झाल्यामुळे त्याने आपल्या अंगावरची घोंगडी काढून ठेवली.*तात्पर्य*नुसत्या शक्तीच्या बळावर सगळीच कामे सिद्धीस जातील असे नाही.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13/04/2023💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी● १९१९ : जालियानवाला बाग हत्याकांड● १९३९ : भारतात हिंदुस्तानी लाल सेनेची स्थापना.● १९४८ : भुवनेश्वर ही ओरिसा राज्याची राजधानी करण्यात आली.● २००६: देवदासी प्रथेचे उच्चाटन करणारे ‘महाराष्ट्र देवदासी प्रथा’निर्मूलन विधेयक विधानसभेत मंजूर💥जन्म :-● १८९५: भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे वसंत रामजी खानोलकर● १९१३ : दत्ताजी ताम्हाणे, स्वातंत्र्यसेनानी आणि समाजवादी विचारवंत.● १९४०: राज्यसभा सदस्य नजमा हेपतुल्ला● १९५६: अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक💥मृत्यू● १९५१: औंध संस्थानचे अधिपती भवानराव श्रीनिवासराव तथा बाळासाहेब पंतप्रतिनिधी● १९७३: अभिनेता दिग्दर्शक बलराज सहानी● १९७३: भाषा व इतिहास संशोधक, लेखक, संपादक व समीक्षक अनंत काकबा प्रियोळकर● १९८८: महाराष्ट्र केसरी हिरामण बनकर● १९९९: कृषितज्ज्ञ आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. हिरोजी बळीरामजी उलेमाले● २०००: चित्रपट निर्माते व वितरक बाळासाहेब सरपोतदार● २००८ : दशरथ पुजारी, मराठी संगीतकार.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्रातील हापूस आंबे समुद्रामार्गे जपान अन् अमेरिकेत रवाना*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *भारतात पहिल्यांदाच पाण्याखालून धावणार मेट्रो; कोलकाता मेट्रोकडून लवकरच अंडरवॉटर मेट्रोची चाचणी होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शालेय शिक्षण क्षेत्रात लागू होणार गुण देण्याची नवी पद्धत; नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्कचा आराखडा जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सरकारच्या रद्द झालेल्या महाभरतीचं परीक्षा शुल्क परत करण्याचं काम सुरू, परीक्षार्थींना केवळ 65 टक्के फी परत मिळणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अवकाळीच्या मुद्द्यावर अजित पवार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये 50 मिनिटं चर्चा; अजित पवारांकडून हेक्टरी पन्नास हजारांच्या मदतीची मागणी, सरकार विशेष पॅकेजची घोषणा करणार ?*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कोरोनाचा धोका वाढला.. राज्यातील रुग्णसंख्या हजारपार, एकाच दिवसात 1,115 रुग्णांची नोंद, नऊ जणांचा मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2023 :- चिदंबरम स्टेडियमवर खेळलेल्या सामन्यात राजस्थानने चेन्नईवर पाच धावानी मिळविला विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*डॉ. आंबेडकरांसारखे होता येईल काय*खालील लिंक वर लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया ब्लॉग वरच लिहाhttp://nasayeotikar.blogspot.com/2017/04/blog-post_12.htmlडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*विदर्भ विभाग*विदर्भ हा महाराष्ट्र राज्याचा ईशान्य दिशेला असणारा प्रदेश आहे. विदर्भाचे दोन उपविभाग आहेत - (नागपूर आणि अमरावती). विदर्भात नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशिम, आणि गडचिरोली हे जिल्हे आहेत. विदर्भाचे क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या ३१.६ टक्के आहे, तर लोकसंख्या २१.३ टक्के. उर्वरीत महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भाची आर्थिक उन्नती कमी आहे.विदर्भाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषिप्रधान आहे. ह्या प्रदेशात कापूस, संत्रे आणि सोयाबीन ही उत्पन्न देणारी मुख्य पिके आहेत. तसेच ह्या प्रदेशात ज्वारी, बाजरी आणि तांदुळाची लागवड होते. विदर्भ म्हणजे वीर+तर्फ म्हणजेच वीर आणि त्यांचा प्रदेश विदर्भ ही मराठी सातवाहन,राष्ट्रकूट,वाकाटक,यादव राजवटीतील वीर पुत्रांची भूमी आहे. विदर्भ शब्दाचा अर्थ वीर आणि तर्फच अपभ्रंश होऊन विदर्भ झाले तर्फ म्हणजे प्रदेश या तरफचा दर्भ झाला आणि वीर मधला र गायब झाला आणि बनला वीरांचा प्रदेश विदर्भ जो महाराष्ट्र आहे त्याचे मूळ विदर्भ आहे.विदर्भ म्हणजेच आजचा पूर्ण महाराष्ट्र आहे आणि छत्तीसगड आहे.विपुल प्रमाणात दर्भ उगवणारा प्रदेश तो विदर्भ अशी याच्या नावाची व्युत्पत्ती आहे.विदर्भ हा प्रदेश गोंड या राजवटीखाली हाती होता. नागपूर ही गोंडवाना राज्यसंघातील गोंड घराण्याची राजधानी होती. गोंडवाना राज्य हे पूर्ण मध्य-पूर्व भारतात पसरलेले होतं. १८१८ च्या तिसरे इंग्रज-गोंड युद्ध पराभवानंतर गोंड प्रभाव फक्त चंद्रपूर - नागपूर विभागातच मर्यादित झाला. नंतर गोंड राजांचे राज्य इंग्रजी साम्राज्यात विलीन करण्यात आले. (१८६१).महाराष्ट्राला विदर्भातून आजवर चार मुख्यमंत्री व देशाला एक राष्ट्रपती देखील लाभले. हरितक्रांती व पंचायत राजचे जनक वसंतराव नाईक , जलसंधारणाचे जनक सुधाकरराव नाईक हे लोकप्रिय मुुुख्यमंत्री विदर्भाने दिले.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणत्याही समाजाची उन्नती त्या समाजातल्या शिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबून असते. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतातील पहिली वंदेभारत एक्स्प्रेस कोणती ?२) जगातील एकूण वाघांपैकी भारतात किती टक्के वाघ आहेत ?३) होमिपॅथीचे संस्थापक कोणाला मानले जाते ?४) मुदुमलाई व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?५) बाभूळच्या झाडाला इंग्रजीत काय म्हणतात ?*उत्तरे :-* १) नवी दिल्ली - वाराणसी वंदेभारत एक्सप्रेस ( १५ फेब्रु. २०१९ ) २) ७५ टक्के ३) डॉ. हॉनिमन, जर्मन चिकित्सक ४) तामिळनाडू ५) Acacia*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 चि.यश राजेश सब्बनवार, कुंडलवाडी👤 विठ्ठल वाघमारे, उमरी👤 अनिल लोकडे, चिकना👤 अक्षय वाघमारे👤 प्रसाद यादव👤 लक्ष्मण पनेवार👤 दर्शन जोशी👤 व्यंकट पाटील*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अहो ज्या नरा रामविश्वास नाहीं। तया पामरा बाधिजे सर्व कांही॥ महाराज तो स्वामि कैवल्यदाता। वृथा वाहणें देहसंसारचिंता ॥७८॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गीतेच्या दुस-या अध्यायात दुस-याच श्लोकात भगवंताने असे सांगितले आहे की, " मनुष्य जसा जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्र धारण करतो, त्याप्रमाणे आत्म्याचेही असते." याच विधानात आपल्याला नकारात्मकतेचे वस्त्र फेकून देत सकारात्मकतेचे वस्त्र परिधान करणा-यांना शोधावे, पाहावे लागेल.**गीतेतला हा विचार सर्वोच्चतेची भाषा बोलणारा आहे; पण जीवन बदलाच्या विचारात तो ताडून बघायला हवा. सामान्यपणे जीवनात दोन मनं कार्यरत असतात. एक चांगले आणि दुसरे वाईट. जर वाईट बाजू प्रबळ झाली, तर षङरिपु घेरू लागतात आणि माणूस इंद्रियसुखाच्या आहारी जातो. उलट चांगली बाजू बलवान झाली, तर व्यक्ती संतोषी, संयमी, निर्व्यसनी, स्थिरचित्त होऊन जीवनाच्या वळणवाटा सहज पार करू शकतो. अशा वळणवाटा सहजसाध्य होणे म्हणजे सुखी होणे. यालाच सुखाची व्यापक व्याख्या म्हणता येईल.*               ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुम्ही कुणावर विश्वास ठेवा अथवा ठेऊ नका पण तुम्ही तुमच्या मनातून काम करत असलेल्या कामावर विश्वास ठेवा.कारण मनातून केलेले काम हेच तुमच्या विश्वासाचे खरे प्रतिक आहे.तीच तुमच्या विश्वासाने केलेल्या कामाची पावती आहे.या तुमच्या कामावरच लोक विश्वास ठेवतात.तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवतीलच असे नाही परंतु तुम्ही मनातून केलेल्या तुमच्या कामावर नक्कीच विश्वास ठेवतील.हीच तुमची खरी ओळख व विश्वासाने केलेल्या  कामाची पावती आहे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *जीवनाचे रहस्‍य*एक माणूस जीवनाला कंटाळला होता. त्‍याला असे वाटत होते की, इतक्‍या मोठया जगात आपण एकाकी आहोत. त्‍याला कोणी जवळ करत नाही, तो कोणाच्‍या प्रेमास पात्र नाही, असा विचार करून दुखी राहायचा. वसंत ऋतु आला आणि चहूकडे सुगंधी फुले उमलल्‍याने सुवासाचा दरवळ पसरला होता. सगळीकडे आनंद आणि उत्‍साहाचे वातावरण असताना त्‍या व्‍यक्तिने स्‍वतला घरात कोंडून घेतले होते. अचानक एक छोटी मुलगी दरवाजा उघडून घरात आली व म्‍हणाली,'' तुम्‍ही उदास आहात असे दिसते. याचे कारण काय?'' तो म्‍हणाला,'' माझ्यावर कोणी प्रेम करत नाही.'' ती मुलगी म्‍हणाली,'' तुम्‍ही कोणावर प्रेम करता?'' त्‍याच्‍याकडे या प्रश्‍नाचे उत्तर नव्‍हते. तेव्‍हा ती मुलगी त्‍याला म्‍हणाली,'' बाहेर येऊन पहा! तुमच्‍या दारासमोरच प्रेमाचा किती दरवळ आहे.'' तिने त्‍याचा हात धरून बाहेर पसरलेल्‍या फुलांच्‍या ताटव्‍यात उभे केले. तुम्‍ही ज्‍या फुलांवर जितके प्रेम कराल तितके करा! ते तितकेच प्रेम तुम्‍हाला देतील.'' त्‍या मुलीच्‍या बोलण्‍याने त्‍याचा भ्रम दूर झाला आणि त्‍याचे जीवन आनंदी झाले.*तात्पर्य*जीवनाकडे पाहाण्‍याचा दृष्‍टीकोन बदलला की जीवन आनंदी होण्‍यास मदत होते.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 12/04/2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी● १९३५ - प्रभातचा चंद्रसेना हा हिंदी चित्रपट मुंबईच्या मिनर्व्हा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.● १९६१ : सोवियेत संघाचा युरी गागारिनअंतराळात जाणारा प्रथम माणूस झाला.● १९६७ - कैलाशनाथ वांछू भारताचे १०वे सरन्यायाधीश झाले● १९९७ : भारतीय पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचा राजीनामा.● १९९७ पूर्वप्राथमिक प्रवेशाकरिता पाल्य अथवा पालकांच्या मुलाखती घेण्यास मनाई करण्याची तरतूद असणारे विधेयक महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजूर करण्यात आले.💥जन्म● १८७१ : वासुदेव आपटे, आनंद या लहान मुलांच्या मासिकाचे संस्थापक व संपादक.● १९१० : पु.भा. भावे (पुरुषोत्तम भास्कर भावे) , मराठीतील प्रतिभासंपन्न लेखक.● १९१४: संवाद व गीतलेखक कॄष्ण गंगाधर दिक्षीत ऊर्फ कवी संजीव● १९१७: सलामीचे फलंदाज तसेच डावखुरे मंदगती गोलंदाज विनू मांकड● १९३२: श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री तामिळ नेते लक्ष्मण कादिरमगार● १९४३: केंद्रीय मंत्री सुमित्रा महाजन● १९८१ : तुलसी गॅब्बार्ड, अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात निवड झालेली पहिली हिंदू व्यक्ती.💥मृत्यू● १७२०: बाळाजी विश्वनाथ भट तथा पहिला पेशवा● १९१२: अमेरिकन रेड क्रॉसच्या स्थापक कारा बार्टन● २००१: हिंदकेसरी पै. चंबा मुत्‍नाळ● २००६: कन्नड चित्रपट अभिनेता तसेच गायक राजकुमार● २०१२-कवी आणि नाटककार मोहित चट्टोपाध्याय*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *यंदा देशात सरासरीच्या 96 टक्के पाऊस होणार, भारतीय हवामान विभागाचा अंदाज, महाराष्ट्रात मात्र सरासरीपेक्षा कमी पावसाचं भाकित*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात 4 मे ला सुनावणी, निवडणुका पावसाळ्यानंतरच होण्याची शक्यता वाढली*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *केंद्रानं सर्व राज्यांशी समन्वय साधून मासिक पाळीतील स्वच्छतेबाबत एकसमान राष्ट्रीय धोरण लागू केलं पाहिजे, सर्वोच्च न्यायालयानं दिले निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अंगणवाडी सेविकांना मिळणार नवीन मोबाईल; अनेक दिवसांपासूनची मागणी पूर्ण होणार, छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीने पावले उचलण्यास सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा धाराशिवमध्ये पालकमंत्री तानाजी सावंत यांच्यासह नुकसानग्रस्त भागाची पाहणी दौरा, तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत करण्याचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ * 'धनगड' हेच 'धनगर' असल्याच्या मुद्यावर मुद्देसूद पुरावे सादर करा; हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2023 - मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटलवर सहा विकेट राखून मिळविला विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *साहित्यिक आसाराम लोमटे*आसाराम लोमटे हे एक मराठी लेखक आणि पत्रकार आहेत. लोकसत्ता या दैनिक वर्तमानपत्राचे ते परभणी येथील वार्ताहर आहेत.आसाराम लोमटे यांची ‘होरपळ’ ही कथा ‘सत्याग्रही’मध्ये १९९५ साली प्रकाशित झाल्यापासून त्यांनी ग्रामीण कथा लिहिण्याचे ठरविले. ते म्हणतात, पूर्वी ग्रामीण कथांमधील ग्रामीण भागाचे चित्रण म्हणजे त्याचे गौरवीकरण होते. झुळझुळ पाणी वगैरे अशा संकल्पना त्यात रंगविल्या जायच्या. त्यात भडकपणा आणि बटबटीतपणा होता. म्हणून ते टाळून जगण्यातला संघर्ष कसा आहे, हे सांगणारी ग्रामीण कथा लिहिण्याचे लोमट्यांनी ठरविले. लघुकथांमध्ये न अडकता आपल्याला दीर्घकथा लिहिता येऊ शकते, हे १९९५ साली कळल्यानंतर त्यांच्या लेखनप्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झालीआसाराम लोमटे यांच्या आलोक आणि इडा पिडा टळो या दोन्हीही पुस्तकांमधील कथांचे कानडी, हिंदी भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. त्यांच्या पाच दीर्घ कथांचा कानडी भाषेतील अनुवाद ‘कोटेमने’ या नावाने प्रसिद्ध आहे. ‘इडा पिडा टळो’मधील ‘बेईमान’ या कथेवर ‘सरपंच भगीरथ’ हा चित्रपटही निघाला आहे. त्यांच्या साहित्यावर काही अभ्यासकांनी शोधप्रबंध सादर केले आहेत.आसाराम लोमटे यांचे वैचारिक लेख :-‘दुष्काळ झळा : निवडणुकीच्या रंगीबेरंगी सतरंजीखाली दडवलेला कचरा’ हा आसाराम लोमटे यांचा लेख २०१९ सालच्या एप्रिलमध्ये लोकसत्तेत प्रसिद्ध झाला. तेव्हा दुष्काळाच्या आणखीही वेगवेगळ्या पैलूंवर लिहावे असे त्यांच्या डोक्यात आले. हा लेख वाचूनच साप्ताहिक ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ यांनी दुष्काळावर 'साधना'चा एक पूर्ण अंकच काढला. या अंकात आसाराम लोमटे यांनी सर्वच म्हणजे आठ लेख लिहिले. हे लेख लिहिण्यापूर्वी असाराम लोमटे ह्यांनी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांना भेटी दिल्या. जिथून मध्य प्रदेशाची हद्द दिसते, अशा वरूड तालुक्यातल्या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या गावांपासून ते नेहमीच दुष्काळ सोसणाऱ्या माणदेशातल्या अनेक गावांपर्यंत या निमित्ताने ते फिरले.४५-४६ अंशापर्यंत तडकलेल्या चढत्या भाजणीच्या उन्हात जगण्याचा संघर्ष करणाऱ्या,व दुष्काळ सोसणाऱ्या आणि दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या रयतेशी त्यांना संवाद साधता आला. मराठवाड्यातल्या केज, धारूर, परांडा, मंठा, भूम विदर्भातल्या अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, रिसोड, लोणार, वाशीम; माणदेशातल्या आटपाडी, खटाव, जत, माण आणि खानदेशातल्या अमळनेर, चाळीसगाव, धरणगाव, पारवा, सांगोला अशा परिसरातल्या अनेक गावांना, तांडे-वाडी-वस्त्यांना भेटी देऊन असाराम लोमट्यांनी दुष्काळाची दाहकता समजून घेतली आणि 'साधना'त हे ८ लेख लिहिले.त्यांच्या आलोक या कथासंग्रहाला 2016 चा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाले. ~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ संकलन :- *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*छत्रपती संभाजी नगर विभाग*छत्रपती संभाजीनगर विभाग पूर्वीचे नाव औरंगाबाद विभाग महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे. मराठवाडा या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे.प्राचीन काळी हा मौर्य साम्राज्याचा एक भाग होता. नंतर हा भाग सातवाहन राजांच्या ताब्यात होता. नंतर छत्रपती संभाजीनगर विभाग हा मुख्यत्वेकरून इस्लामिक राजवटीखाली होता. इ.स. सन १७२४ ला निजामाने मराठवाडा, तेलंगण व सध्याच्या कर्नाटक राज्यातील काही भाग मिळून स्वतंत्र हैदराबाद राज्य स्थापन केले. नंतर १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इथल्या जनतेला स्वातंत्र्य मिळाले नाही. तर त्यांना मराठवाड्यासाठी वेगळा लढा द्यावा लागला. निजामावर जेंव्हा भारत सरकारने लष्करी कारवाई केली तेंव्हा मराठवाडा स्वतंत्र झाला. १९४८ मध्ये स्वतंत्र हैदराबाद राज्य अस्तित्वात आले. पुढे १९५६ मध्ये भाषावार प्रांतरचनेनूसार हे राज्य तीन भागात विभागले गेले. ज्यातील मराठवाडा हा भाग तेंव्हाच्या मुंबई राज्याला जोडण्यात आला आणि पुढे १९६० ला प्रामुख्याने मराठी भाषिक महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. या विभागात एकूण आठ जिल्हे आहेत - जिल्हे - छत्रपती संभाजीनगर जिल्हा, बीड जिल्हा, हिंगोली जिल्हा, जालना जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, धाराशिव जिल्हा, परभणी जिल्हा*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्याला आवडीचे कार्य करायला मिळते, तो भाग्यवान होय.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'नेस्ट मॅन ऑफ इंडिया' असे कोणाला म्हटले जाते ?२) २०२२ मध्ये झालेल्या व्याघ्र गणनेनुसार भारतातील वाघांची संख्या किती आहे ?३) प्रसिद्ध चित्रपट RRR यामध्ये असलेल्या एका नायकाचे पात्र कोणत्या गोंड क्रांतिकारी नेत्याच्या जीवन चरित्रावर प्रभावित आहे ?४) पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो ?५) भारतात सर्वात मोठी बैलगाडी शर्यत कोठे भरते ?*उत्तरे :-* १) राकेश खत्री ( २,५०,००० घरटी बनवली.) २) ३१६७ वाघ ३) कोमाराम भीम ४) सियाल ५) भाळवणी, ता. खानापूर, जि. सांगली*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   👤 आसाराम लोमटे, परभणीसाहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त👤 अरुणा कलेपवार, सहशिक्षिका, नांदेड👤 आसिफ शेख, धर्माबाद👤 गंगाधर पेंडपवार👤 बालाजी चुनुपवार, येवती👤 गजानन कुर्रेवाड, चिकना👤 मनोज दातार👤 आकाश वाघमारे👤 कलीम शेख👤 मिनाज सय्यद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••करी काम निष्काम या राघवाचे। करी रुप स्वरुप सर्वां जिवांचे ॥ करि छंद निर्द्वद्व हे गुण गातां। हरीकीर्तनी वृत्तिविश्वास होतां ॥७७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आपली सर्व धडपड कशासाठी असते ? प्रत्येकजण सुखासाठी खटपट करीत असतो. प्रपंचात सुख मिळावे असे सर्वांना वाटत असते, आणि त्यासाठी जो तो प्रयत्‍न करीत असतो. परंतु आजपर्यंत प्रपंचात कुणाला सुख मिळाले आहे का ? कुणी म्हणतो, मजजवळ संपत्ती आहे, पण संतान नाही, कुणी दारिद्र्य आहे म्हणून रडतो, कुणी काही, कुणी काही, सांगतच असतो, आपली हाव कधीच तृप्त होणे शक्य नाही. मृगजळ पिऊन कुणी कधी तृप्त झाला आहे का ?**प्रपंचच जिथे खोटा तिथे सुख कसले मागता ? याचा अर्थ असा नाही की प्रपंच सोडावा, पण तो सुखाचा कसा होईल हे पाहावे. तुम्हांला खात्रीने सांगतो की, प्रपंच जर सुखाचा करायचा असेल तर त्याला एकच उपाय आहे. तो अगदी सोपा आहे, पण आचरणात आणायला अत्यंत कठीण आहे. परमात्म्याची अगदी मनापासून प्रार्थना करावी. मग तो ठेवील त्या परिस्थितीमध्ये आपण अगदी आनंदात व सुखात राहू शकतो.*               ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••काही माणसांना स्वतःची काळजी नसते आणि जगाचं आता कसं होईल याची काळजी करत बसतात. अशी माणसे ही दिशाहीन असतात.केवळ काहीच न करता स्वतःचे जीवन सुधारु शकत नाहीत तर मग जगाच्या कल्याणाची काळजी करणे व्यर्थच आहे.अशी माणसे इतरांनाही काही करु देत नाहीत. अशा निरर्थकपणे जीवन जगणा-या माणसापासून अलिप्तच राहिलेले बरे.जगासाठी काहीतरी करणारी माणसे बोलण्यापेक्षा कृतीवर अधिक भर देतात.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मूल्य*एकदा एका माणसाने भगवान बुद्धांना जीवनाचे मूल्य विचारले. भगवान बुद्धांनी त्याच्या हातात एक चमकदार दगड ठेवला आणि सांगितले की बाजारात जाऊन याची किंमत विचारून ये. पण हा दगड तू विकायचा नाहीस. तो माणूस दगड घेऊन बाजारात गेला. पहिल्यांदा त्याला एक फळविक्रेता दिसला, त्याच्याकडे जाऊन त्याने दगडाची किंमत विचारली. फळविक्रेता म्हणाला, मी या दगडाची किंमत म्हणून तुला 12 संत्री देईन. तो माणूस मग एका भाजीविक्रेत्याकडे गेला. भाजी विक्रेत्याने सांगितले, या दगडाच्या बदल्यात मी एक पोते बटाटे तुला देईन. तो दगड घेऊन तो एका सोनाराकडे गेला. सोनार म्हणाला, मी तुला याचे पन्नास लाख रूपये देईन. नाहीतर असे कर. मी तुला दोन कोटी रूपये देतो, पण हा दगड मला दे. तो माणूस म्हणाला, माझ्या गुरूने हा दगड विकायचा नाही म्हणून सांगितले आहे. नंतर तो एका रत्नपारख्याकडे गेला. त्याने ओळखले की हा दगड साधासुधा नसून माणिक आहे. त्याने ते माणिक व्यवस्थित एका आच्छादनावर ठेवले. आणि म्हटले, तुला हे माणिक कुठे मिळाले. अख्ख्या ब्रह्मांडात याची किंमत कुणी करू शकणार नाही, इतके ते मूल्यवान आहे. तो माणूस हैराण होऊन भगवान बुद्धांकडे आला आणि म्हणाला, तुम्ही मला हा एक दगड दिलात पण त्याची किंमत प्रत्येकाने वेगळी सांगितली. भगवान बुद्ध म्हणाले, या दगडाची किंमत फळवाल्याने 12 संत्री सांगितली, तर रत्नपारख्याने त्याला मूल्यवान म्हटले. तुझ्या जीवनाचेही तसेच आहे. तू भलेही हिरा आहेस, पण समोरचा माणूस त्याच्या योग्यतेनुसार तुझे मूल्य, पात्रता ठरवणार हे लक्षात घे.*तात्पर्य* - प्रत्येकाने स्वत:ला ओळखले पाहिजे. आपण कसे आहोत हे इतरांकडून समजून घेण्यापेक्षा स्वत:च जाणले पाहिजे.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11/04/2023💠 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :- ● १९३० : पंडित मोतीलाल नेहरु यांनी आनंदभवन हे साडेचारशे दालने असलेले प्रासादतुल्य घर राष्ट्राला अर्पण केले.● १९९९ - अग्नी-२ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी.💥 जन्म :-● १८२७ : महात्मा जोतिबा फुले, भारतीय विचारवंत, समाजसुधारक● १९०४ - के.एल्. सैगल, हिंदी भाषा पार्श्वगायक● १९०६ - डॉ. सुमित्र मंगेश कत्रे, संस्कृत, प्राकृत, कोकणी या भाषांचे अभ्यासक.● १९०८ मासारू इबुका, सोनी कंपनीचे सहसंस्थापक.● १९३७ रामनाथन कृष्णन, भारतीय टेनिस खेळाडू.● १९५१ रोहिणी हट्टंगडी, भारतीय अभिनेत्री.● १९६३ - बिली बाउडेन, क्रिकेट पंच.💥 मृत्यू :-● १९७७ - फणीश्वर नाथ रेणू, भारतीय लेखक.● २००० - कमल समर्थ ऊर्फ कमल रणदिवे, भारतीय कर्करोग संशोधक.● २००३ - सेसिल हॉवर्ड ग्रीन, टेक्सास इन्स्ट्रूमेंट्सचे स्थापक.● २००९ - विष्णू प्रभाकर, भारतीय साहित्यिक.● २०१५ - हनुतसिंग राठोड, भारतीय सेनापती.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *यंदा देशभरात सरासरीच्या 94 टक्केच पाऊस पडणार; महाराष्ट्रात जूनमध्ये चांगला तर जुलै-ऑगस्ट महिन्यात कमी पाऊस , स्कायमेटचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयात मास्क अनिवार्य, अजूनही कोरोना संपलेला नाही, नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मॉकड्रील,*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *यंदाच्या वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार; प्रथम वर्षाला प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना मिळणार मल्टिपल चॉइसची संधी, शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा अंदाज, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पुन्हा गारपिटीची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला निर्णय, त्यासोबत ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस आणि सीपीआय या पक्षाचाही राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रकरणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2023 - चेन्नस्वामी स्टेडियममध्ये खेळलेल्या आरसीबी विरुद्ध लखनौ च्या सामन्यात लखनौने एक विकेटनी सामना जिंकला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नागोराव सा. येवतीकर लिखित दैनिक सकाळच्या ई - पेपर वरील*'मुलांची शाळा इंग्रजी असावी की मराठी'*या लेखावर आलेल्या 25 प्रतिक्रिया वाचा खालील लिंक वरhttp://nasayeotikar.blogspot.com/2017/04/blog-post_66.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*महात्मा ज्योतिबा फुले*जोतीराव गोविंदराव फुले (११ एप्रिल १८२७ - २८ नोव्हेंबर १८९०)महात्मा फुले नावाने लोकप्रिय, हे महाराष्ट्रातील भारतीय सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते. सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचे निर्मूलन, आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी कार्य केले. महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत. जोतिरावांनी १८४८ मध्ये पुण्यात तात्यासाहेब भिडे यांच्या निवासस्थानी किंवा भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. खालच्या जातीतील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या अनुयायांसह सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शोषित वर्गाच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या या संघटनेचे भाग सर्व धर्म आणि जातीचे लोक बनू शकत होते. महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून फुले यांची ओळख आहे. त्यांना १८८८ मध्ये महाराष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी सन्माननीय "महात्मा" (संस्कृत: "महान आत्मा", "पूज्य") पदवी प्रदान केली होती.महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असे म्हणतात.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कार्य करीत रहा, परिणामाचा विचार करू नका.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पिंपळाच्या झाडाला इंग्रजीत काय म्हणतात ?२) LED चा Full Form काय आहे ?३) 'विदर्भाचे दादा कोंडके' म्हणून कोणाला ओळखले जाते ?४) पहिला राष्ट्रीय सागरी दिवस केव्हा साजरा केला गेला ?५) १८८२ साली 'हंटर आयोगा'कडे सर्व मुलामुलींसाठी सक्तीच्या सार्वत्रिक शिक्षणाची मागणी कोणी केली ?*उत्तरे :-* १) Peepal / Bow Tree २) Light Emitting Diode ३) डॉ. परशुराम खुणे, ज्येष्ठ नाट्य कलावंत ४) ५ एप्रिल १९६४ ५) महात्मा ज्योतिराव फुले*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 दत्तात्रय दळवी👤 रामदास वाघमारे, संपादक👤 देविदास बस्वदे👤 विनोद चिलकेवार👤 युवराज पाटील👤 परमेश्वर नारवटे👤 माधव गंटोड👤 संजय मदनराव नागरे👤 प्रवीण कोडम, संपादक👤 सिध्देश रेवंतवार, धर्माबाद👤 साईनाथ हवालदार, येवती👤 माधव गंटोड👤 सुरेश दिवदेवार👤 शिवकुमार जाधव, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नव्हे कर्म ना धर्म ना योग कांही। नव्हे भोग ना त्याग ना सांग पाहीं॥ म्हणे दास विश्वास नामी धरावा। प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥७६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जन्माला येणारा नवजीव या सृष्टीतील पहिला अनुभव घेतो तो 'मातृस्पर्शाचा.' या स्पर्शातून दृढ होत जातं नातं एकमेकातलं आणि जोपासली जाते मातृत्वाची जाणीव... आजन्म कृतज्ञतेने..! पुढे त्याला वेगवेगळ्या स्पर्शांची ओळख होत जाते. विविधांगी स्पर्श देत जातात उभारी त्याच्या जीवनाला. कधी बंध गुंफला जातो माणसा माणसांशी !  जोडला जातो तो नवचैतन्यानं पशु-पक्षी, झाडं-फुलं या नैसर्गिक तत्वांशी ! वात्सल्याचे स्पर्श आजही मोरपीस फिरवतात मनावर, बाळाच्या जावळांचे स्पर्श आजन्म पिच्छा पुरवतात.. लक्षात राहतात असे स्पर्श..!**पण काही डंख मारणारे, नकोसे असलेले रस्त्यांवरचे स्पर्श थरकाप उडवतात. कधी कधी स्पर्श होतात विचारांचे, स्वातंत्र्याचे, अभासी जगातून वास्तवतेचा स्पर्श देणारे.  देऊन जातात भान कळत-नकळत मानवतेचे..! खुणावतात स्पर्श अवकाशात उंच भरारी घेण्याचे. असे स्पर्श हवेच असतात प्रत्येकाला... कुठल्याही गंधानं लिप्त नसणारे, फक्त अनुभूतीनं गोडी वाढवणारे नि संजीवनी ठरणारे...मानवी स्पर्श !!*               ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुष्ट प्रवृत्तीच्या माणसांची स्वप्ने आणि विचार वाईटच असतात.त्यांना इतरांचे घेणे देणे काहीच नसते.त्यांच्या मनात नेहमी वाईट विचार घोळत असतात.इतरांचे चांगले त्यांना कधीच पाहवत नाही.ते सदैव असूरी आनंदात जीवन जगत असतात.अशा असूरी आनंदी असणा-या लोकांपासून समाजाचे फार मोठे नुकसान होते.चांगली माणसे अशापासून चार पावले दूर असतात तर दुष्ट माणसे चांगल्या माणसांच्या सहवासात कधीही येत नाहीत.पण एक खरे आहे अशांचा सहवास कधीही नसावा.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *सिंहाची गुणज्ञता*एका सिंहाने एक हरिण मारले व त्यांस तो फाडून खाणार, इतक्यात त्या वाटेने एक चोर जात होता, तो त्यास म्हणतो, "अरे सिंहा, "या हरिणाचे अर्धे मांस तुझे व अर्धे माझे' हे ऐकून सिंह म्हणाला, "अरे निगरगट्ट माणसा, "तुझा येथे कोणत्याही प्रकारचा संबंध नसता, एकाकी पुढे होऊन, मी मारलेल्या सावजाचे अर्धे मांस तू मागतोस, या तुझ्या निर्लजपणाबद्दल मी तुला शिक्षा करण्यापूर्वी तू येथून चालता हो, नाही तर फुकट मरशील मात्र.' हे ऐकताच चोर भयाने पळून गेला. इतक्यात दुसरा एक भला माणूस त्या वाटेने आला व सिंहास पाहून, त्यास टाळण्यासाठी दुसऱ्या वाटेने जाऊ लागला. ते पाहून सिंह त्यास आदराने हाक मारुन म्हणाला, "अरे भल्या माणसा, भिऊ नकोस, तुझ्या चांगुलपणामुळे, या सावजाच्या मासांचा अर्धा भाग घेण्यास तू अगदी योग्य आहेस, इकडे ये आणि आपला वाटा घेऊन जा.' इतके बोलून सिंहाने त्या सावजाचे दोन भाग करुन एक भाग आपण खाल्ला व दुसरा त्या माणसाकरिता ठेवून तो अरण्यात गेला.                       *तात्पर्य*लोचटपणा करुन डोके उठविणाऱ्या माणसाचा लोकास कंटाळा येतो. पण जे सभ्य आणि भिडस्त आहेत, त्यांचा परामर्श लोक आपण होऊन घेतात.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 10/04/2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :-● १८७५ : स्वामी दयानंद यांनी आर्य समाजाचीस्थापना केली.● १९८२ - भारताच्या पहिल्या कृत्रिम उपग्रह इन्सॅट १एचे प्रक्षेपण💥जन्म :-● १८८० - सर सी.वाय. चिंतामणी, पत्रकार आणि उत्तरप्रदेशचे शिक्षणमंत्री● १८९४ - घनश्याम दास बिर्ला, भारतीय उद्योगपती.● १८९७ - प्रफुल्लचंद्र सेन, भारतीय राजकारणी.● १९०१ - डॉ. धनंजय रामचंद्र गाडगीळ, अर्थशास्त्रज्ञ, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू● १९३१ - किशोरी आमोणकर, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका.● १९५२ - नारायण राणे, भारतीय राजकारणी💥मृत्यू :- ● १३१७ - संत गोरा कुंभार.● १६७८ - वेणाबाई, रामदास स्वामींची शिष्या● १८१३ - जोसेफ लाग्रांज, इटालियन गणितज्ञ.● १९३१ - खलील जिब्रान, लेबेनॉनी-अमेरिकन साहित्यिक.● १९३७ - डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर, ज्ञानकोशकार.● १९६५ - डॉ. पंजाबराव देशमुख, स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री.● १९९५ - मोरारजी देसाई, भारताचे ४थे पंतप्रधान*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *" अयोध्येतील महाराष्ट्र भवनाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देणार" मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद करताना अयोध्येत भव्य दिव्य महाराष्ट्रभवन उभारणार अशी घोषणा केली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मराठवाड्यात अवकाळीचा तडाखा, वीज पडून चौघांचा मृत्यू ; लहान-मोठी 54 जनावरेही दगावली*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शिक्षणाचाच बाजार मांडला! बंगळूरमध्ये मॅनेजमेंट कोट्यातील काॅम्प्युटर सायन्सच्या एका जागेचा दर तब्बल 64 लाखांच्या घरात*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *देशात आज घडीला जगभरातील एकूण वाघांच्या संख्येपैकी 70 टक्के वाघ भारतात आहेत. ही संख्या दरवर्षी 6 टक्क्यांनी वाढत आहे. व्याघ्र प्रकल्पाला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पर्यटन, विद्यार्थ्यांसाठी अमेरिका वारी महागली! व्हिसासाठी आता अधिक पैसे मोजावे लागणार; 30 मे 2023 पासून नवीन दर लागू होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबईतील सुप्रसिद्ध 'द रॉयल ऑपेरा हाऊस'मध्ये नाट्य महोत्सवाला नाट्यरसिकांचा उत्तम प्रतिसाद*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *केकेआरचा स्टार खेळाडू रिंकू सिंह याने शेवटच्या ओव्हरमध्ये मारलेल्या 5 सिक्समुळे केकेआरने गुजरातला त्यांच्या होम ग्राउंडवरच पराभूत केले असून 3 विकेट्स राखून विजय मिळवला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*'मुलांची शाळा इंग्रजी असावी की मराठी'*हा विषय आपल्या सगळ्यांच्याच जवळचा.. प्रत्येक वर्षी आपल्या जवळपास एकदा तरी ही चर्चा ऐकू येतेच. मराठी शाळा आणि इंग्रजी शाळा या दोघांचेही काही फायदे आणि काही तोटे असू शकतात.. पण मुलांच्या भवितव्याचा विचार करता, आपण नेमकं काय निवडायचं ? मराठी की इंग्रजी ? तुम्हाला काय वाटतं ? आपले मत खालील क्रमांकावर जरूर कळवा. चांगल्या प्रतिक्रियाना प्रसिद्धी देण्यात येईल. ~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शिखांची काशी - नांदेड शहर*नांदेड शहर हे महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागात असलेले आणि नांदेड जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. या शहराला ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेला आहे. नंदागिरी उर्फ नंदीग्राम या प्राचीन किल्ल्याच्या नावावरून या शहराला प्रथम नंदीग्राम आणि कालांतराने अपभ्रंश होऊन नांदेड हे नाव पडले असल्याचे सांगण्यात येते.नांदेड शहरात शिखांचे दहावे आणि शेवटचे गुरू, गुरू गोविंदसिंह यांच्या समाधीस्थळी बांधलेला गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब आहे. इ.स. २००८ साली येथे शीख धर्माच्या 'गुरू-ता-गद्दी' हा गुरुग्रंथास धर्मगुरूचा सन्मान प्रदान केल्याच्या घटनेस तीनशे वर्ष पूर्ण झाल्याचा सोहळा संपन्न झाला. नांदेड हे मराठी कवी रघुनाथ पंडित आणि वामन पंडित यांचे जन्मस्थान आहे. कवी दे.ल. महाजन, कवी वा.रा. कांत, साहित्यिक नरहर कुरुंदकर, इतिहासाचार्य तात्यासाहेब तथा अंबादास कानोले, संगीत महर्षी अण्णासाहेब गुंजकराची ही कर्मभूमी. मध्ययुगीन काळातील धर्मपंडीत 'शेष'घराणे इथलेच. नांदेड जिल्ह्याला संस्कृत कवींचे शहर असेही म्हणतात. हे शहर 'गोदावरी नदीच्या' काठी वसलेले आहे. येथे नंदगिरी नावाचा किल्ला आहे. शहरालगत विष्णूपुरी धरण हा आशिया खंडातील सर्वात मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प येथे आहे. नांदेड जिल्ह्यात नांदेड सह १६ तालुके आहेत त्यांची नावे पुढीप्रमाणे मुखेड,मुदखेड, लोहा, नायगांव, बिलोली, देगलुर, धर्माबाद, कंधार, हिमायतनगर, हदगाव, , माहूर, किनवट, भोकर, उमरी, अर्धापूर, व नांदेड.महाराष्ट्राच्या आग्नेय सीमेवर, तेलंगणाच्या वायव्य सीमेजवळ आणि कर्नाटकच्या उत्तरेस नांदेड जिल्हा येतो. लातूर, परभणी, हिंगोली व यवतमाळ हे महाराष्ट्रातील जिल्हे, निजामाबाद, कामारेड्डी, निर्मल, आदिलाबाद तेलंगणातील आणि बिदर हा कर्नाटकातील जिल्हा नांदेडला जोडून आहेत.नांदेड येथून प्रवासासाठी बस, रेल्वेसह विमानाची व्यवस्था देखील आहे. *संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" ज्याला या ह्रदयीचे त्या ह्रदयी देता येते तोच खरा शिक्षक. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका सुधा मूर्ती यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?२) पोलीस पाटलाची नेमणूक कोणता विभाग करतो ?३) नाटोचे मुख्यालय कोठे आहे ?४) गुन्हेगारी आरोपांचा सामना करणारे अमेरिकेचे पहिले माजी अध्यक्ष कोण ठरले आहेत ?५) राष्ट्रीय सागरी दिन केव्हा साजरा करण्यात येतो ?*उत्तरे :-* १) पद्मभूषण २) महसुल विभाग ३) ब्रेसेल्स, बेल्जियमची राजधानी ४) डोनाल्ड ट्रम्प ५) ५ एप्रिल*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤  डॉ. शेख mwh, माध्यमिक शिक्षक, नांदेड👤 भाऊसाहेब आबा अहिरे👤 शिवराज सिताराम वडजे, सहशिक्षक, उमरी👤 तुळशीराम सिरमलवार, सहशिक्षक👤 टी. अशोक साईनाथ👤 विलास बोंबले👤 चंद्रकांत पोळ👤 प्रकाश बंडेवार👤 रामदास डुमणे👤 सुभाष बोडके👤 श्यामानंद लिंगमपल्ले👤 भाऊसाहेब अहिरे👤 नागेश तांबोली👤 सचिन पवळे👤 बालाजी मुपडे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समस्तामधे सार साचार आहे। कळेना तरी सर्व शोधुन पाहे॥ जिवा संशयो वाउगा तो त्यजावा। प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥७५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*खरंतर मरण्यासाठी शंभर बहाणे असले तरी जगण्यासाठी एक 'वजह' पुरेशी आहे. ही वजह सापडली की मनातील मळभ दूर होत जातं. इथेच संपतो माणसाच्या आत्मशोधाचा प्रवास. ही वजह उराशी कवटाळून जगणारी माणसं ख-या अर्थानं आनंदयात्रेमधील 'पाथेय' ठरतात. काळाच्या ओघात हे संदर्भ बदलतात नि पुन्हा सुरू होतो शोध नवीन कारणांचा नि जगण्याच्या नवीन वजहचा.**ब-याचदा ती वजह सापडतही नाही हातात..... पण माणूस वाट पाहतो विवशतेतही एक नवा आशावाद साठवून आणि उभा राहतो या अक्षयी नि निरंतर  फिरणा-या चक्राच्या मध्यभागी........*            *जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत !**एक कवी लिहून जातो.....*          *......सदियाॅ बित गयी टूटी*                     *हुई डोर को थामे*                   *शायद कोई वजह मिल*                     *जाए जिने की....!*               ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समाजात दुर्जन अथवा वाईट प्रवृत्ती असणा-या माणसांचे वर्चस्व राहू नये म्हणून सज्जन माणसे जन्माला आलेली असतात.त्यांच्या सद्विचारामुळे दुर्जनवृत्तीची माणसे वर तोंड काढू शकत नाहीत त्यामुळे अनेक होणारे अनर्थ टळू शकतात.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *❃ लांडगा आणि सिंह ❃*          एकदा एक लांडगा व एकू सिंह रानात हिंडत होते थांबा मी आता जवळच एका मेंढीचा आवाज ऐकला. त्यावरून इथे जवळच मेंढ्या चरत असाव्यात असं वाटतं. तेव्हा मी पटकन जाऊन एखादी मेंढी तुमच्याकरता घेऊन येतो. असे बोलून लांडगा आवाजाच्या दिशेने गेला. परंतु, तेथे मेंढ्यांच्या जवळच धनगर व कुत्रे उभे होते. ते पाहून लांडगा घाबरला व पळतच सिंहापाशी आला. तेव्हा सिंहाने विचारले,हे काय, तू काहीच आणले नाहीस ? तेव्हा लांडग्याने उत्तर दिले, 'महाराज, तिथे मेंढ्या आहेत खया, पण त्या इतक्या अशक्त आहेत की, त्या सगळ्या खाल्ल्यावरसुद्धा आपलं पोट भरणार नाही !    *तात्पर्य*जी वस्तु आपल्याला मिळणे कठीण, तिला नावे ठेवणे हा मनुष्यस्वभावच आहे.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 08/04/2023💠 वार - शनिवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *विश्व बंजारा दिवस* *अग्निशमन दिन*💥 ठळक घडामोडी● १९५० - भारत आणि पाकिस्तान यांच्यात लियाकत-नेहरू करारावर स्वाक्षऱ्या● १९२१ - वर्धा येथे विनोबा भावे यांनी पवनार आश्रमाची स्थापना केली💥जन्म● १९२४ - भारतीय शास्त्रीय गायक कुमार गंधर्व● १९२८ - प्रसिद्ध साहित्यिक रणजित देसाई● १९३८ - कोफी अन्नान, संयुक्त राष्ट्राचे सातवे प्रधान सचिव● १९७९ - भारतीय गायक अमित त्रिवेदी💥मृत्यू :-● १८५७ - क्रांतिकारक मंगल पांडे● १८९४ - बंकिमचंद्र चटोपाध्याय, बंगाली साहित्यिक● १९७३ - पाबलो पिकासो, स्पॅनिश चित्रकार● १९७४ - नानासाहेब फाटक, नटसम्राट● १९५३ - वालचंद हिराचंद दोशी, उद्योगपती● १९९९ - वसंत खानोलकर, कामगार नेते● २०१५ - जयकानधन, भारतीय पत्रकार व लेखक● २०१३ - मार्गारेट थँचर, ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय 60 वर्षं करण्यास मुख्यमंत्री अनुकूल, राजपात्रित अधिकाऱ्यांच्या बैठकीत शिंदेंचा सकारात्मक प्रतिसाद*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सीएनजी-पीएनजीचे दर कमी होणार! किरीट पारीख समितीच्या शिफारसी स्विकारल्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *अनुदान मिळवण्यासाठीच्या जाचक अटींमुळे कांदा उत्पादक अडचणीत, सरसकट अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *छत्रपती संभाजीनगर दंगलीतील नुकसान आरोपींकडून वसूल करणार, एकूण दीड कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *जेईई मेननंतर प्रवेशासाठी 75 टक्के गुणांचा पात्रता निकष का? मुंबई हायकोर्टाचा सवाल, आठवड्याभरात भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सावध राहा, काळजी घ्या; देशात गेल्या 24 तासांत 6 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद, नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मास्कचा वापर करावा; सांगली जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2023 - लखनौचा हैद्राबादवर पाच विकेट राखून विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••मुलांच्या आरोग्यदायी सवयीमुलांनो, आपले आरोग्य चांगले राहावे म्हणून आपण काय केले पाहिजे ? याचा कधी आपण विचार केला आहे काय ? सहसा आपण आपल्या आरोग्याच्या बाबतीत काहीच काळजी घेत नाही. त्यामुळे भविष्यात आपणास अनेक संकटाना तोंड द्यावे लागते. जसे की, आपल्या दिवसाची सुरुवात सकाळी उठल्यापासून होते. बरीच मुले सूर्यवंशी घराण्यातील असतात म्हणजे सूर्य उगल्यावर उशिरा उठतात. उत्तम आरोग्य मिळविण्यासाठी ही सवय घातक आहे. जी मुले सकाळी लवकर उठून अभ्यास करतात भविष्यात ते उत्तम प्रकारे काम करू शकतात. सकाळी उठल्यानंतर पहिले काम असते स्वच्छ दात घासणे आणि चूळ भरणे. यामुळे आपल्या दातांची योग्य निगा राखल्या जातो. आपल्या जीवनात उत्तम आरोग्यासाठी दात हे फार महत्वाचे आहेत. पण आपण त्यास कधी महत्व देत नाही. अनेक मुलाचे दात किडलेले दिसून येतात कारण लहानपणी ते खूप चॉकलेट खाल्लेले असतात. पालकांनी मुलांना शक्यतो चॉकलेट पासून दूर ठेवावे. तसेच रोज नियमित अंग घासून स्वच्छ स्नान करण्याची आपणास सवय असणे आवश्यक आहे. बहुतेक वेळा आपण स्नान करताना साबण वापरत नाही आणि मारोतीला पाणी टाकल्यासारखे अंगावरून पाणी ओतून घेतो. यामुळे कालांतराने त्वचेचे विकार होण्याची शक्यता असते. आपले आरोग्य उत्तम राहण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे जेवण. जेवण्याच्या बाबतीत आपल्या असंख्य तक्रारी असतात. जेवणात आवडीचे खाद्य दिसले की पोट भरून खायचे आणि नावडते खाद्य असले की अर्धवट पोटाने उठून जायाचे. यामुळे आपल्या शरीराला संतुलित आहार मिळत नाही आणि मग आपणास काही ना काही त्रास व्हायला सुरुवात होते. फळभाजी आणि पालेभाजी न खाणाऱ्या मुलांची संख्या सर्वाधिक आढळून येते. पण याच फळभाजी आणि पालेभाजी खाणारी मुले निरोगी असतात. ज्याचे पोट साफ असते त्यांना सहसा कोणतेच विकार दिसून येत नाही. पोट साफ होण्यासाठी सर्व प्रकारचे जेवण आवश्यक आहे. शक्यतो सायंकाळच्या वेळी एक तास तरी मैदानावरचे खेळ खेळावे. आजकालची मुले आपला वेळ मोबाईलच्या गेममध्ये किंवा टीव्हीवरील कार्टून पाहण्यात घालवितात. त्यामुळे ही मुले दिवसेंदिवस एकलकोंडी होत आहेत. चला तर मग आपले उत्तम आरोग्य मिळविण्यासाठी चांगल्या आरोग्यदायी सवयीचा अंगीकार करू या.लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *उस्मानाबाद जिल्हा* हा महाराष्ट्रातील मराठवाड्यातला एक जिल्हा आहे. जिल्हा मुख्यालय उस्मानाबाद शहर येथे आहे. जिल्ह्याचा बहुतेक भाग खडकाळ आहे. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७५१२ चौरस किलोमीटर आहे. त्यातील २४१ चौ.कि.मी भाग हा शहरी आहे. उस्मानाबाद जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १४,८६,५८६ (इ.स.२००१) इतकी असून त्यातील १५.६९ % शहरी आहे. जिल्ह्यातील 'तुळजापूर' येथील 'तुळजाभवानी' मातेचे मंदिर प्रसिद्ध आहे. तसेच तुळजाभवानी माता ही शिवाजी महाराजांची कुलदैवत आहे .जिल्हा बालाघाट डोंगररांगांनी वेढला असून हवामान मुख्यत: कोरडे आहे. पावसाळ्याचा कालावधी साधारणपणे जूनच्या मध्यापासून सप्टेंबर अखेरपर्यंत असतो. सरासरी पर्जन्यमान ६०० ते ७०० मिलिमीटर. आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबर हवामान दमटसर असते. डिसेंबर-जानेवारी शीत हवामानाचा काळखंड असतो. फेब्रुवारीपासून जूनपर्यंत हवामान अधिकाधिक कोरडे आणि तापमान उष्ण होत जाते. उन्हाळ्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचे तापमान हे मराठवाड्यामधील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी असते. ज्वारी, सूर्यफूल, हायब्रीड ज्वारी, तुरी, ऊस, कापूस, गहू आणि हरभरा ही मुख्य पिके आहेत.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" अचूकता पाहिजे असेल तर सराव महत्वाचा आहे. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) मोबाईलचा शोध केव्हा लागला ?२) पृथ्वीवर पिण्यायोग्य पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे ?३) नाटो म्हणजे उत्तर अटलांटिक करार संघटनाची स्थापना केव्हा झाली ?४) आयपीएलचे अध्यक्ष कोण आहेत ?५) आदिवासींच्या विकासासाठी लोकबिरादरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?*उत्तरे :-* १) ३ एप्रिल १९७३ २) ३ टक्के ३) ४ एप्रिल १९४९ ४) अरुण धुमल ५) गडचिरोली*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 ज्ञानेश्वर झगरे गुरुजी वाकदकर👤 सौ. जयश्री व्यंकटेश पुलकंठवार, नांदेड👤 बालाजी पांचाळ👤 गंगाधर कौडेवार, शिक्षक👤 बद्रीनाथ कुलकर्णी👤 जगन्नाथ लाभशेटवार, शिक्षक👤 निलेश कवडे, साहित्यिक*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समस्तामधे सार साचार आहे। कळेना तरी सर्व शोधुन पाहे॥ जिवा संशयो वाउगा तो त्यजावा। प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥७५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मान इच्छी तो अपमान पावे ।*       *अमंगळ सवे अभाग्याची ।।*       *एकाचिये अंगीं दुजियाचा वास ।*       *आशा पुढें नाश सिद्ध करी ।।**मान मागावा लागत नाही, तर तो मिळत असतो. त्यासाठी आवश्यकता असते ती पात्रतेची. आता पात्रता नसेल तर मान मिळण्याची इच्छा करून काय उपयोग? अपात्र माणसाला लोक मान कसा देतील? रिकाम्या माणसाला लोक खुर्ची देणार नाहीत. मला स्टेजवर पाहुणा म्हणून बसवा म्हणल्यानं लोक बसवणार तर नाहीतच; उलट 'काय हलकट माणूस आहे?' असं म्हणून अपमान करतील. पात्रतेवाचून मान मिळवण्याची इच्छा करणे म्हणजे अपमान करून घेणे होय. मुळात 'इच्छा' अपमान ओढवते. मानासाठी हापापलेली अनेक माणसं आपल्या अवती-भोवती पाहायला मिळतात. मान मिळाला नाही म्हणून 'बोहल्यावर' रुसून बसणारे नवरदेव आपण पाहिले असतील.**राजकीयच काय पण सामाजिक, धार्मिक स्टेजवरही मान-पानावरुन लोक हाणामारी करायलाही मागेपुढे पहात नाहीत. मानाची तीव्र इच्छा हे सर्व घडवत असते. तुकोबा म्हणतात, "जो लोकांकडून मान मिळवण्याची इच्छा करतो, तो यामुळं 'हलकट' ठरत असल्याने त्याचा अपमान होतो. असा हा अभागी माणूस जिथं जाईल तिथं त्याच्यासोबत अपयश असते." म्हणून, अपमान करून घ्यायचा नसेल तर मान मिळण्याची इच्छा करू नये. 'निरपेक्ष वृत्तीने' काम करत राहा. लोक स्वतःच तुम्हाला खुर्चीवरच काय डोक्यावर बसवतील.*               ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुष्ट प्रवृत्तीच्या माणसांची स्वप्ने आणि विचार वाईटच असतात.त्यांना इतरांचे घेणे देणे काहीच नसते.त्यांच्या मनात नेहमी वाईट विचार घोळत असतात.इतरांचे चांगले त्यांना कधीच पाहवत नाही.ते सदैव असूरी आनंदात जीवन जगत असतात.अशा असूरी आनंदी असणा-या लोकांपासून समाजाचे फार मोठे नुकसान होते.चांगली माणसे अशापासून चार पावले दूर असतात तर दुष्ट माणसे चांगल्या माणसांच्या सहवासात कधीही येत नाहीत.पण एक खरे आहे अशांचा सहवास कधीही नसावा.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *आचार्य विनोबा भावे*भूदान चळवळीच्‍या काळातील ही गोष्‍ट आहे. या चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे होते. त्‍यांची पदयात्रा सुरु होती. आपल्‍या काही शिष्‍यांसह विनोबाजी मीराजींच्‍या आश्रमात थांबले होते. अल्‍पशा विश्रांतीनंतर त्‍यांची पदयात्रा पुन्‍हा सुरु झाली. त्यावेळी ते हरिद्वारकडे चालले होते. विनोबाजींची प्रकृती थोडी ठीक नव्‍हती. त्‍यांची कंबर आणि पाय दुखत होते. त्‍यामुळे त्‍यांना खुर्चीत बसवून नेण्‍यात येत होते. मध्‍ये मध्‍ये खुर्चीतून उतरून पायी चालायचे. तेव्‍हा एक शिष्‍य त्‍यांच्‍याजवळ येऊन म्‍हणाला,'' बाबा, मला खूप राग येतो, मी काय करावे'' विनोबाजी म्‍हणाले,'' मी लहान असताना मलाही खूप राग यायचा, मग माझ्याजवळ मिश्री असायची ती मी तोंडात ठेवायचो, परंतु कधीकधी ती ही नसायची'' मग तुम्‍ही काय करत होता असे त्‍या व्‍यक्तीने विचारले. विनोबाजी म्‍हणाले,'' मी यावर खूप विचार केला, मग माझ्या मनात एक गोष्‍ट आली.              जेव्‍हा आपल्‍या मनाविरूद्ध एखादी गोष्‍ट आली जेव्‍हा आपल्‍या मनाविरूद्ध गोष्‍ट घडली तर लगेच नाराज होतो जर तो क्षणच आपण टाळला तर रागावर विजय मिळवू शकतो. आनंद आणि नाराजी यावर आपण तेव्‍हाच प्रकट करतो तो पहिलाच क्षण आपल्‍यावर वरचढ ठरू पाहतो. तो क्षण टाळणे कठीण आहे. पण मनन करून तो टाळता येतो. मी यावर खूप मनन केले, यामुळेच जीवनात कितीही मोठी आपत्ती आली तरी मी संयम ढळू दिला नाही.''तात्‍पर्य :- विचारपूर्वक उचललेले पाऊल आयुष्‍याला योग्‍य दिशा देते.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 06/04/2023💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी● १६५६ - शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यांचा पराभव करून रायगड किल्ला ताब्यात घेतला● १८९६ - पहिल्या आधुनिक ऑलिंपिक खेळांचे अथेन्समध्ये उद्घाटन.● १९१९ - महात्मा गांधींची सत्याग्रहाचे आवाहन .● १९८० - अटल बिहारी वाजपेयी यांच्या अध्यक्षपदाखाली भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली💥जन्म● १९०९ - जी.एन. जोशी, भावगीतगायक व संगीतकार.● १९१७ - हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु, मराठी कथाकार व कवी.● १९१९ - रघुनाथ विष्णू पंडित, कोंकणी कवी.● १९२७ - विष्णू महेश्वर ऊर्फ व्ही. एम. तथा दादासाहेब जोग, मराठी उद्योजक.● १९५६ - दिलीप वेंगसरकर, भारतीय क्रिकेटपटू व प्रबंधक.● १९७१ - संजय सुरी, चित्रपट अभिनेता, निर्माता.💥मृत्यू● १९८९ - पन्नालाल पटेल, ज्ञानपीठ पारितोषिक विजेते गुजराती कथा-कादंबरीकार.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करणे बंधनकारक आहे. त्यासाठी 30 एप्रिल ही शेवटची तारीख देण्यात आली आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सलग पाच दिवस पाऊस पडल्यास नैसर्गिक आपत्ती समजली जाणार; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *छत्रपती संभाजीनगरमधील मास कॉपीप्रकरणी त्रिस्तरीय चौकशी समितीची नियुक्ती, 24 तासात चौकशी अहवाल देण्याचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *हनुमान जन्मोत्सववेळी धार्मिक सलोखा बिघडवणाऱ्या घटकांवर लक्ष ठेवा, केंद्रीय गृहमंत्रालयाच्या राज्यांना सूचना*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *छत्रपती संभाजीनगरमधील मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणे काढले; सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कारवाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बाहेरील औषधं लिहून देण्यास पुण्यातील ससून हॉस्पिटलमधील डॉक्टरांना बंदी; सर्व औषधं मोफत मिळणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2023 - पंजाब विरुद्ध राजस्थान सामन्यात पंजाबचा राजस्थानवर पाच धावानी विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागतिक आरोग्य दिन 07 एप्रिल - प्रासंगिक लेख             *आरोग्यम धनसंपदा*वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2018/04/blog-post_6.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे. हे ज्योतिर्लिंग भारतातील बीड जिल्ह्यात असून परळी वैजनाथ हे दक्षिण मध्य रेल्वेवरील एक स्टेशनही आहे. परळी वैजनाथ हे परळी वैद्यनाथ म्हणूनही ओळखले जाते.परळी येथील वैद्यनाथ मंदिर प्रसिद्ध असून भारतातील १२ ज्योतिर्लिंगांत परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे, असे म्हणतात. पुण्यश्लोक राणी आहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायर्‍या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. इतरत्र कोठेही नाही, पण फक्त वैद्यनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत. मंदिरापासून जवळच तीन किलोमीटर अंतरावर ब्रह्मनदीच्या किनारी ३०० फूट उंचावरील जिरेवाडी येथे सोमेश्वर मंदिर आहे.जवळच्या अंबेजोगाईपासून परळी वैजनाथ २५ कि. मी. अंतरावर आहे. तर परभणीपासून ६० कि.मी. अंतरावर आहे. या ठिकाणांपासून वैजनाथला जाण्यासाठी वाहनाची सतत सोय आहे. परळी येथे एक औष्णिक विद्युतकेंद्र आहे. येथे औद्योगिक वसाहत आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*"ज्ञानाने मानाने आणि मनाने इतके मोठे व्हा कि भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजेल...."**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'म्हारी छोरिया छोरो से कम है के ?' हा संवाद कोणत्या चित्रपटातील आहे ?२) तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांचे मूळ नाव काय आहे ?३) आबेल पुरस्कार - २०२३ कोणाला जाहीर झाला आहे ?४) भारताचे पहिले अर्जुन पुरस्कार विजेते क्रिकेटपटू कोण ?५) राज्यघटनेच्या कितव्या तरतुदीनुसार संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांना संसद वेळोवेळी कायद्याने ठरवेल तसेच वेतन व भत्ते मिळण्याचा अधिकार आहे ?*उत्तरे :-* १) दंगल २) तेंझिन ग्यात्सो ३) लुईस काफारेली ४) सलीम दुर्रानी ५) कलम १०६*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 सय्यद रफिक👤 राजेश सुरकूटवार👤 मारोती कदम👤 दत्ताहरी कदम👤 पोषट्टी सिरमलवार👤 व्यंकट चन्नावार👤 लक्ष्मण दशरथ सावंत👤 अभिनंदन पांचाळ👤 सय्यद साजिद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बहुतांपरी संकटे साधनांची। व्रते दान उद्यापने ती धनाची॥ दिनाचा दयाळू मनी आठवावा। प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥७४॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *बहिणाबाई अशिक्षित, अडाणी पण प्रतिभासंपन्न होत्या. पैशानं गरिब मात्र विचारांची, भावनांची श्रीमंती प्रचंड होती. त्यांचा मुलगा सोपानला शाळेतील एका स्पर्धेत, स्वामी विवेकानंदाचा फोटो बक्षिस मिळाला. भगवी वस्त्र, भगवा फेटा, तेजपुंज चेहरा, पाणीदार डोळे, रूबाबदार उभं राहणं. गंमत म्हणून त्यानं आईला विचारलं, ओळख बरं कुणाचा आहे हा फोटो ? शेतात दिवसभर राबणारी एक स्त्री,, तिला कसं माहित असणार विवेकानंद ? तो फोटो बारकाईनं पाहिला व पटकन् म्हणाल्या..." देवाला कुणी रं फेटा बांधलाय ? झ्याक दिसतयं."**विवेकानंदाचं वर्णन यापेक्षा उत्तम शब्दांत दुसरं असूच शकत नाही. किती योग्य, किती नेमकं वर्णन ! खरंच, विवेकानंद देवंच होते आध्यात्मातले ! ते देवत्व नेमकेपणानं बहिणाबाई पाहू शकल्या याचं कारण त्यांची 'संवेदनशिलता.' ना शाळेचा परिचय, ना शहराची ओळख, साध्या खेड्यात राहणारी स्त्री. मात्र त्यांची प्रत्येक कविता म्हणजे मराठी भाषेच्या खजिन्यातलं रत्न; जणू कोहिनूर हिराच ! आचार्य अत्रेंनी बहिणाबाईच्या कवितांना 'मोहरांचा हंडा' म्हटलयं याचं कारण बहिणाबाईंचं 'संवेदनशिल मन !'*              ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुस-याच्या सहाय्याने जीवन जगणे म्हणजे एकप्रकारची गुलामीच आहे. कारण प्रत्येकवेळी तो म्हणेल त्याचपध्दतीने करावे लागणार.त्यामध्ये आपल्याला स्वत: काही नवे करण्याची इच्छा असेल तर ते काहीच करु शकत नाही. मग अशी गुलामी पत्करण्यापेक्षा केव्हाही मुक्तपणे स्वतंत्र राहणे चांगले.स्वतंत्रपणे राहून आपल्या मनातील अभिव्यक्तीला चालना देता येते, आपल्या संकल्पना साकार करता येतात, स्वतंत्र विचारसरणी असल्यामुळे आपल्या प्रगतीची दारे खुली असतात. आपल्या कोणत्याही सृजनशीलतेला बाधा येत नाही. आपल्याला मुक्तपणे जीवन जगण्याचा आनंद मिळतो.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *प्रयत्नांती यश*थोमस अल्व्हा एडिसन यांची ही कथा.आपल्या अनेक शोधांनी अवघ्या मानवजातीचे आयुष्य उजळवून टाकणारा ,ते सुखमय करणारा हा संशोधक . सतत कसले ना कसले प्रयोग करीत प्रयोगशाळेत दिवसभर संशोधन करणे हाच त्यांचा दिनक्रम असे .अनेक वर्षे संशोधन करणे,हाच त्यांचा दिनक्रम असे .अनेक वर्षे संशोधन केल्यावर त्यांना दिव्याचा शोध लागला .त्यावेळी भेटावयास ,त्यांचे कौतुक करावयास आलेल्या व्यक्तींनी त्यांना विचारले,'या शोधासाठी तुम्हाला किती प्रयोग करावे लागले ?"'एक हजार ...' एडिसनम्हणाला .त्यांना पुन्हा विचारण्यात आले ,'आपण एक हजार वेळा प्रयोग केलेत .परत्येक वेळी आलेल्या अपयशानंतर खरतर आज लाभलेल्या यशाबद्दल आपणाला काय वाटते? तुमची प्रतिक्रिया काय ?' यावर एडिसन म्हणाला ९९९ प्रयोगांनी दिवा बनवता येत नाही ,हेच मला कळल.' *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 03/04/2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी● १९४८: ओरिसा उच्च न्यायालयाची स्थापना झाली.💥 जन्म :-● १७८१ - स्वामीनारायण, भारतीय धर्मगुरू.● १९६२ - जयाप्रदा, प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री● १९६५ - नाझिया हसन, हिंदी पॉप गायिका.💥 मृत्यू :- ● १६८०: छत्रपती शिवाजी महाराज भोसले ● १९९१ - चार्ल्स गोरेन, अमेरिकन ब्रिज खेळाडू व लेखक*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *उद्धव ठाकरेंसारखा भला माणूस मी पाहिला नाही; वज्रमुठ सभेत अशोक चव्हाणांकडून तोंडभरून कौतुक*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पीपीएफ-सुकन्या समृद्धी योजनांच्या नियमांत मोठा बदल, पॅन कार्ड व आधार कार्ड आवश्यक, अर्थ मंत्रालयाकडून अधिसूचना जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *ठाण्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *विंग कमांडर गजानंद यादव यांनी दहा हजार फुटीवर उंचीवर G-20 चा फडकावला झेंडा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *बिहारमध्ये होत असलेला हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही - गृहमंत्री अमित शहा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बाराव्या राज्यस्तरीय आदिवासी भिल्ल साहित्य संमेलनाचे हेमंत काळमेघ यांच्या हस्ते बुलडाण्यात उदघाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *राजस्थानने आयपीएलच्या 16 व्या हंगामाची सुरुवात विजयाने केली. हैदराबादला पहिल्याच सामन्यात दारुण पराभव स्विकारावा लागलाय.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गोंदिया जिल्हा हा पूर्वी भंडारा जिल्ह्याचा एक भाग होता. गोंदिया जिल्हा  महाराष्ट्राच्या  ईशान्य दिशेला असून मध्य प्रदेश व छत्तीसगढ राज्यालगत आहे. गोंदियाचे क्षेत्रफळ ५,४३१ चौरस किलोमीटर, लोकसंख्या १२,००,१५१ असून साक्षरता ६७.६७% आहे. गोंदिया हा तुलनेने मागासलेला जिल्हा आहे. जिल्ह्याचा बराचसा भाग वनांनी व्यापलेला आहे. भात, ज्वारी, तेलबिया, गहू व तूर ही मुख्य पिके आहेत. वैनगंगा ही मुख्य नदी आहे. जिल्ह्यात अनेक भात सडण्याचे कारखाने (rice-mills) आहेत.जिल्ह्यातील काही प्रमुख पर्यटनस्थळे - नागझिरा वने, प्रतापगड किल्ला, इतियाडोह धरण, नवेगाव राष्ट्रीय उद्यान वगैरे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आयुष्यात काही शिकायचे असेल तर कठीण परिस्थितीतही शांत राहणं शिका.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) आशिया खंडातील सर्वात मोठी गुफा कोणती ?२) 'आंबेडकर - ए लाईफ' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?३) भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न कोणत्या वर्षी सुरू झाला ?४) सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला उपग्रह नाहीत ?५) लेझरचा शोध कोणी लावला ?*उत्तरे :-* १) कचारगड गुफा, सालेकसा ( गोंदिया ) २) शशी थरूर ३) सन १९५४ ४) बुध व शुक्र ५) गार्डन गोल्ड*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 रंगराव संभाजी वाकोडे, सहशिक्षक      तळ्याचीवाडी ता. हदगाव👤 भागवत जेठेवाड, सहशिक्षक, बरबडा👤 चंद्रकांत शिंदे👤 माधव धुप्पे👤 प्रकाश साखरे👤 तुकाराम पचलिंग👤 संतोष अंबलगोंडे👤 रंगराव वाकोडे👤 माधव शिराळे👤 आकाश पांचाळ👤 नागभूषण भूसा👤 कामाजी सरोदे👤 गंगाधर सुगावकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••न वेचे कदा ग्रंथचि अर्थ काही। मुखे नाम उच्चारितां कष्ट नाहीं॥ महाघोर संसारशत्रु जिणावा। प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥७२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *माणसाच्या आयुष्यात पैशाला किती महत्व असावं? एकजण पैशाला आयुष्य समजतो. आयुष्यभर 'पैसा-पैसा' अशी त्याची हाव चालू असते. दुसरा गरजेपुरता पैशाला महत्व देतो. जास्त हाव न करता आवश्यक तेवढा पैसा कमावला तरी जीवन सार्थकी लागल्याची त्याची भावना असते. तर तिसरा 'आहे तेवढ्यात' समाधानी राहतो. पैसा नसला काय अन् असला काय, त्याला काही फरक पडत नाही. या तीनपैकीच आपण एक असतो. पैशाविषयी विरक्त न राहता 'उत्तम व्यवहाराने' तो कमावलाच पाहिजे. अशी काहीशी भूमिका संतांच्या विचारातून व्यक्त होते. एक म्हणजे 'भिक्षापत्र अवलंबणे । जळो जिणें लाजिरवाणे ।।' तुकोबा म्हणतात, "हातात भिकेचं ताट घेऊन भीक मागण्याचा मार्ग स्वीकारणे, अशा लाजिरवाण्या जगण्याला आग लागो."**तुकोबा म्हणतात, 'जोडोनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारें वेच करी ।।' म्हणजे, "पैसा कमवायचा पण वाईट मार्गाने नाही, तर उत्तम मार्गाने कमवायचा. आणि तो साठवून नाही ठेवायचा तर, आवश्यक तिथं मोकळ्या मनाने खर्च सुद्धा जरूर करायचा." मी ऐकलं आहे, की 'पैसा चांगल्या माणसाने कमावला नाही, तर तो वाईट माणसाच्या हातात जाईल आणि त्याचा दुरुपयोग होईल.' म्हणून तो चांगल्याच्या हातात असणे आवश्यक आहे.. पैशाने आईवडील विकत घेता येत नाही हे जरी खरं असलं, तरी पैशामुळं शक्यतो बरीच कामं सोपी होतात व पैशाला पैसा ओढतो हेही तितकंच खरं.  तुकोबा म्हणतात, "श्रीमंताच्या घरी नोकर नाही तर त्याचा पैसाच ख-या अर्थाने त्याची चाकरी करत असतो." काम करणारी माणसे निमित्तमात्र असतात.*              ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जी व्यक्ती प्रयत्नामध्ये माघार घेत नाही ती व्यक्ती आपल्या जीवनात हाती घेतलेल्या कोणत्याही कामात यशस्वी होऊ शकते.एखाद्यावेळी एखाद्या प्रयत्नामध्ये यश मिळेलच असे नाही, परंतु स्वातंत्र्याने प्रयत्न केल्यास यश मिळाल्यावाचून राहत नाही हे निश्चित आहे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *विनम्रता*एक बार नदी को अपने पानी के प्रचंड प्रवाह पर घमंड हो गया।नदी को लगा कि मुझमें इतनी ताकत है कि मैं पहाड़, मकान, पेड़, पशु, मानव आदि सभी को बहाकर ले जा सकती हूँ।एक दिन नदी ने बड़े गर्वीले अंदाज में समुद्र से कहा - बताओ ! मैं तुम्हारे लिए क्या क्या लाऊँ ?मकान, पशु, मानव, वृक्ष आदि जो तुम चाहो, उसे मैं जड़ से उखाड़कर ला सकती हूँ।समुद्र समझ गया कि नदी को अहंकार हो गया है। उसने नदी से कहा यदि तुम मेरे लिए कुछ लाना चाहती हो तो, थोड़ी सी घास उखाड़कर ले आओ।नदी ने कहा बस ! इतनी सी बात ! अभी लेकर आती हूँ।नदी ने अपने जल का पुरा जोर लगाया पर घास नहीं उखड़ी। नदी ने कई बार जोर लगाया पर असफलता ही हाथ लगी।आखिर नदी हारकर समुद्र के पास पहुँची और बोली। मैं वृक्ष, मकान, पहाड़ आदि तो उखाड़कर ला सकती।जब भी घास को उखाड़ने के लिए पुरा जोर लगाती हूं तो वह नीचे की ओर झुक जाती है और मैं खाली हाथ उपर से गुजर जाती हूं।समुद्र ने नदी की पूरी बात ध्यान से सुनी और मुस्कुराते हुए बोला -जो पहाड़ और वृक्ष जैसे कठोर होते है, ये आसानी से उखड जाते है, किन्तु घास जैसी विनम्रता जिसने सीख ली हो, उसे प्रचंड आंधी तूफान या प्रचंड वेग भी नहीं उखाड़ सकता।*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~