✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 01/03/2018 वार - गुरूवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= स्वांतत्र्य आंदोलन दिन - दक्षिण कोरिया. 💥 ठळक घडामोडी :- १९४६ - बँक ऑफ इंग्लंडचे राष्ट्रीयकरण. १९६२ - अमेरिकन एरलाइन्स फ्लाइट १ हे विमान न्यूयॉर्कजवळ कोसळले. 💥 जन्म :- १९६८ - सलिल अंकोला, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- २००३ - गौरी देशपांडे, मराठी लेखिका. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला आजपासून प्रारंभ* ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली: ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत जीडीपी दरात वाढ, देशाचा जीडीपी दर ७.२ टक्क्यांवर.* ----------------------------------------------------- 3⃣ *कांचीपुरम पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचं ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन.* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबई: अभिनेत्री श्रीदेवी पंचत्वात विलीन, पती बोनी कपूर यांनी दिला मुखाग्नी, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार* ----------------------------------------------------- 5⃣ *सोलापूर : विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन अखेर मागे; समितीचा अहवाल विधान परिषदेत सादर.* ----------------------------------------------------- 6⃣ *आम्हाला स्वेच्छामरणाची परवानगी द्या, एसटी कामगारांनी राज्यपाल - मुख्यमंत्र्यांची भेट घेत केली मागणी.* ----------------------------------------------------- 7⃣ *टी-20 मालिकेतील तिस-या आणि अखेरच्या सामन्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली आणि दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस यांनी 5.6 लाख रुपये ‘द गिफ्ट ऑफ द गिव्हर्स फाऊंडेशन’ला केले दान* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= 09 क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/09.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= गौरी देशपांडे (फेब्रुवारी ११, १९४२ - मार्च १, २००३) या मराठीतील लेखिका होत्या. कथा, कादंबरी, ललित लेख, स्फुट लेखन, ललितेतर लेखन, भाषांतर, कविता, संशोधन यासारखे बहुतांशी सगळे साहित्यप्रकार गौरी देशपांडे यांनी हाताळले आहेत. मराठीबरोबरच त्यांचे बरेचसे इंग्रजी लिखाण तसेच काही इंग्रजी -मराठी व मराठी- इंग्रजी अनुवादसुद्धा प्रकाशित झाले आहेत. प्रसिद्ध लेखिका, संशोधक इरावती कर्वे या गौरी देशपांडे यांच्या मातोश्री होत. दिनकर धोंडो ऊर्फ डी. डी. कर्वे हे त्यांचे वडील. जाई निंबकर या मराठीतील लेखिका त्यांच्या थोरल्या भगिनी. प्रसिद्ध समाजसुधारक व स्त्री-स्वातंत्र्याचे जनक महर्षी धोंडो केशव कर्वे हे डी. डी. कर्वे यांचे वडील व गौरी देशपांडे यांचे आजोबा होते. ’समाजस्वास्थ्य’ या लैंगिक शिक्षण देणार्या स्वातंत्र्यपूर्व काळातील मासिकाचे संपादक र. धों. कर्वे हे गौरी देशपांडे यांचे सख्खे काका.गौरी देशपांडे यांचे पुण्यातच प्रामुख्याने वास्तव्य राहिले आहे. काही काळ मुंबई, बऱ्याचशा परदेशवाऱ्या व विंचुर्णी, तालुका- फलटण येथेही त्यांचे वास्तव्य होते. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= दुसऱ्याच विचार करायला शिकला तोच खरा सुशिक्षित. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *01) ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कोठे लिहिली ?* नेवासे *02) महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते ?* गंगापूर जि. नाशिक *03) कोणत्या शहराला भारताचे पॅरिस असे म्हटले जाते ?* मुंबई *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 आशा तेलंगे, उपक्रमशील शिक्षिका, मुंबई 👤 अमोल आलगुडे, लातूर 👤 साहेबराव बोणे, मोबाईल टीचर, धर्माबाद 👤 विक्रम अडसूळ, संयोजक ATM *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *अपेक्षा* कर्तव्य शुन्य अन् अपेक्षांच ओझं असतं कर्तव्य न करताही मोठेपण माझं असतं कर्तव्य न करता अपेक्षा खरंच किती व्यर्थ आहे कर्तव्यावीना अपेक्षा याला काय अर्थ आहे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *आपण प्रत्येकाच्या घरीदारी सुख, शांती, समृद्धी नांदो अशीच प्रार्थना करीत असतो. एकमेकांना शुभेच्छा देतो. हीच गोष्ट जर पदोपदी जीवनभर आमच्या ठायी वसली, तर कष्टप्रद जीवनाचे आनंदवन व्हायला फार वेळ लागणार नाही. तशी प्रत्येकाला उजेडाची आस असते. म्हणून तो प्रकाश आणि सत्याची आस भाकतो, पण डोक्यात कुठल्या नं कुठल्या प्रकारचा अंधार असतो. जेव्हा हा अंधार पूर्णत्वाने दूर होतो, त्यावेळी ती व्यक्ती तेजाने उजाळते आणि अनेक पिढ्यांना प्रकाशमान करते. आपल्या मेंदूतले असे सारे अंधारे कोपरे उजळून निघावेत नि आपल्यातला माणूस तेजाने तळपू लागावा, यासाठी आपण दिपदान का मागू नये ?* *जळणं वा तेवणं हे जिवंत असल्याचं द्योतक. परंतु दिव्याचं जळणं हे कधी त्याच्यासाठी नसतं. ते इतरांना प्रकाश देण्यासाठीच जळत असतात. इतरांना उजाळण्यातच त्यांच्या जळण्याची सार्थकता असते. लहानपणी दिवाळसणाला तांड्यातल्या मुलींचे उजेडाचे गाणे ऐकले आहे. या मुली अंधारून आलेल्या अमावस्येला रात्रभर तांड्यातल्या प्रत्येक दारी हातात दिवा घेऊन प्रेम, जिव्हाळा व्यक्त करतात. हाच दिवा हातात घेऊन जळता ठेवण्याचं नि उजेडाचं गाणं आजन्म गाण्याचं वचन जर आम्ही प्रत्येकाने स्वत:ला दिले, तर ख-या अर्थाने अंधारावर उजेडाने आम्ही मात करू.!* ••●☆‼ *रामकृष्णहरी* ‼☆●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸 *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= समयसुचकतेनुसार आपल्या विचारांशी इतर लोक सहमत नसतील तर आपला विचार बदलायला काहीच हरकत नाही, त्याबाबतीत आपलीही भूमिका आग्रही असू नये. त्यात इतरांचे नुकसान होणार नाही याचीही दक्षता घ्यायला हवी.म्हणून आपलेच खरे म्हणण्यापेक्षा इतरांच्याही चांगल्या आणि योग्य विचारांना प्राधान्य देऊन त्यात दोघांचेही हित साधून जीवनव्यवहार व्यवस्थितपणे पार पाडता येईल याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..8087917063/9421839590. 🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= पालथ्या घागरीवर (घड्यावर) पाणी - केलेल्या उपदेशाचा काहीही परिणाम न होणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *नदी,मासा,युक्ती* एका नदीच्या तिरावर एक 👳🏽♀कोळी मासे 🐟🐠🐬🦈🐳🐋🐠🐟धरायला गेला. फार मोठे मासे नदीत सापडतील असे त्याला वाटले नाही 🕸म्हणून त्याने मोठे जाळे बरोबर घेतले नाही. त्याच्या मनात एक विचार आला आणि त्याने एका काठीच्या टोकाला एक बारीक दोरी बांधून गळ वर ओढू लागला, पण मासा 🐠बराच मोठा असल्याने गळ लवकर ओढला जाईना. कोळी बराच वेळ विचारात पडला.त्यानंतर त्याला सूचले की, गळ लवकर ओढला तर मासा आपल्या वजनाने व चळवळीने आपली बारीक दोरी तोडून पळून जाईल तेव्हा त्याने बराच वेळपर्यंत गळ पाण्यात राहू दिला व नंतर अगदी हळूहळू तो पाण्याच्या बाहेर काढला. तोपर्यंत मासा धडपड करून अगदी निर्बळ झाला होता. त्यामुळे दोरी तोडण्याची शक्ती त्यात उरली नव्हती. कोळ्याची ही युक्ती कामी आली. तात्पर्य :- युक्तीने सर्व प्रकारच्या अडचणीतून पार पडता येते.काही बाबीसाठी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते.आणि कमी वेळेत कार्य सार्थकी लागते. 〰〰〰〰〰〰 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 27/02/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *जागतिक मराठी राजभाषा दिवस* 💥 ठळक घडामोडी :- २००१: जमिनीवरून आकाशातील अनेक लक्ष्यांवर मारा करू शकणार्या आकाश या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चंडीपूर तळावर यशस्वी चाचणी. 💥 जन्म :- १९१२: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, कवी व नाटककार विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म, म्हणून आज मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. 💥 मृत्यू :- १९५६: भारतीय वकील आणि राजकारणी गणेश वासुदेव मावळणकर *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मुंबई : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, राज्यपालांच्या अभिभाषणाचा मराठीत अनुवाद नसल्यानं विरोधक संतप्त, सभागृहाबाहेर विरोधकांची प्रचंड घोषणाबाजी* ----------------------------------------------------- 2⃣ *गडचिरोली : राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीने कायाकल्प ही स्पर्धा घेतली जाते. यामध्ये गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयाने राज्यात प्रथम पुरस्कार पटकाविला आहे.* ----------------------------------------------------- 3⃣ *जळगाव : कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेच्या संपामुळे बारावीच्या 65 लाख उत्तरपत्रिका तपासणीअभावी पडून, बारावीचा निकाल लांबण्याची शक्यता.* ----------------------------------------------------- 4⃣ *सोलापूर : शासनाविरोधात सोलापूर जिल्हा परिषदेवर अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचा छत्री मोर्चा.* ----------------------------------------------------- 5⃣ *पुणे - गुंतवणूकदारांचे पैसे थकवल्या प्रकरणी डीएसके यांच्या ताब्यातील आलिशान गाड्या जप्त, पुणे पोलिसांनी केली कारवाई* ----------------------------------------------------- 6⃣ *औरंगाबाद - छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपशब्द वापरणाऱ्या श्रीपाद छिंदम याचं नगरसेवकपद रद्द* ----------------------------------------------------- 7⃣ *केप टाऊन - दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मॉर्ने मॉर्केलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका असेल मॉर्केलची शेवटची मालिका* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= शालेय विद्यार्थी आणि खुल्या गटासाठी *मराठी दिनानिमित्त हस्ताक्षर लेखन स्पर्धा* http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post_26.html आज सकाळी 09 ते सायंकाळी 06 पर्यंत ही स्पर्धा चालू राहणार आहे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *वि. वा. शिरवाडकर* विष्णु वामन शिरवाडकर,(२७ फेब्रुवारी, १९१२-१० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्न असे करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. मराठी आभिरुचीवर चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजविणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार व आस्वादक समीक्षक. प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतीकारक वृत्ती आणि शब्दकलेवरचे प्रभुत्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्यातल्या सखोल सहानुभूतीने त्यांना समाजाच्या सर्व थरांतील वास्तवाला भिडण्यासाठी आणि पौराणिक आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांमधील मानवी वृत्तीचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांच्यातल्या शोधक आणि चिकित्सक स्वभावाने त्यांना प्रत्यक्ष ईश्वरासंबंधी प्रश्न उपस्थित करायला आणि माणसाच्या समग्रतेचे आकलन करायला प्रवृत्त केले. त्यांचे समृद्ध आणि प्रगल्भ व्यक्तिमत्त्व वैविध्यपूर्ण आणि प्रसन्न रूपात त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झाले आहे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= कंजूष म्हणजे तो व्यक्ती, जो श्रीमंत म्हणून मरण्यासाठी आयुष्यभर गरिबीत जगतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *01) मराठी साहित्यात पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोण होते ?* वि. स. खांडेकर *02) कुसुमाग्रज या टोपणनावाने कविता कोण करत होते ?* वि. वा. शिरवाडकर *03) महाराष्ट्राची राजभाषा कोणती ?* मराठी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 गंगाधर मुटे, वर्धा 👤 श्यामल पाटील 👤 साई पांचाळ *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *जीव* मुठभर धान्यासाठी जातो कोणाचा जीव सामान्याविषयी कोणाला कुठे वाटत नाही कीव चुना लावून पळतात त्यांच कोण काय करतो चार घास मिळवण्यासाठी सामान्य माणूस मरतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *माणूस शरीराने थकतो कारण शरीर काळाशी बांधलेले असते. मृत्यू अटळ असला, तरी मृत्यूच्या आधी असे काही कर्तृत्व दाखवायला हवे, की पुढील भविष्यातही आपले स्मरण केले जाईल. मानवी जीवन हे नवीन आव्हाने स्विकारण्यासाठी आणि नवे काहीतरी शोधण्यासाठी आहे. त्यामुळे बदलांचा हसतमुखाने स्विकार करा. स्वत:ला छंदांमध्ये, वाचनात, कौटुंबिक आणि समाजकार्यात गुंतवा. दृष्टी आनंदी असेल, तर सृष्टी मोहक वाटते आणि प्रसन्नतेची वृष्टी होते.* *विन्स्टन चर्चिल म्हणतात, आशावादी व्यक्ती प्रत्येक संकटात संधी शोधते, तर निराशावादी व्यक्तिला प्रत्येक संधीत संकट दिसत असते.. प्रत्येक क्षण आपल्यासाठी काही ना काही घेऊन येतो. काहीवेळा दृष्टीकोन ही किरकोळ बाब वाटते. 'सकारात्मक दृष्टीकोन' हे फक्त सांगण्यापुरते आहे, असेही वाटते; परंतु हे तसे नाही. या दृष्टीकोनात जीवन घडविण्याची किंवा बिघडविण्याची क्षमता आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात,'जगात तुम्हाला तुमच्याशिवाय कोणीही दु:खी करू शकत नाही. तेव्हा आनंदी रहा... यशासाठी मधला मार्ग नाही.* ‼ *रामकृष्णहरी* ‼ 🍂🍂🍂🍂🍂🍂 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ईश्वराच्या नामस्मरणाने आपल्या चलबिचल झालेल्या मनाला स्थैर्य लाभते आणि नित्य चांगल्या कामामध्ये हात गुंतून राहिले तर तन आणि मन समाधानी होते.या दोन्ही मधून माणसाला सुखाने जीवन जगण्याचा खरा मार्ग सापडतो. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *पळसाला पाने तीनच* - कोठेही गेले तरी तीच परिस्थिती असणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *उंदीर कोंबडा आणि मांजर* एका उंदिराचे पिटुकले पहिल्यांदाच आपल्या बिळातून बाहेर पडले होते. ते इकडे तिकडे फिरून पुन्हा बिळात गेल्यावर आपल्या आईस म्हणते, "आई, ज्या या लहानशा जागेत लहानाचे मोठे केले, ती जागा सोडून आज मी अंमल बाहेर जाऊन आलो. तेथे मी जी फौज पाहिली, ती काही विलक्षणच. रस्त्याच्या बाजूने फिरत असता, मी दोन प्राणी पाहिले, त्यापैकी एक प्राणी फार गडबड्या स्वरुपाचा असून त्याच्या डोक्यावर तांबड्या रंगाचा तुरा आहे. तो प्राणी जेव्हा जेव्हा आपली मान हालवी, तेव्हा तेव्हा तो तुराही हालत असे. मी त्याची ही मौज पहात आहे, इतक्यात त्याने आपले दोन्ही हातही हालविले आणि असा काही कर्कश्श शब्द केला, की त्याने माझ्या कानठळ्याच बसून गेल्या आणि दुसऱ्या प्राण्याची गोष्ट ऐक. तो प्राणी फार सभ्य आणि शांत असून, त्याच्या अंगावर रेशमासारखी मऊ लोकर होती. तो चांगला देखणा असून त्याचे एकंदर वर्तन असे होते, की मला त्याच्याशी आपली मैत्री व्हावी असे वाटल्याशिवाय राहिले नाही.' हे भाषण ऐकून उंदरी त्यास म्हणाली, "वेड्या पोरा! तुला काडीचीही अक्कल नाही. नुसत्या दिखाऊपणावर जाशील तर फसशील, हे लक्षात ठेव. तू जो प्राणी पाहिला आहे तो लबाड व क्रूर मांजर आहे. उंदराच्या मांसाशिवाय दुसरा कोणताही पदार्थ त्याला फारसा आवडत नाही, हे लक्षात ठेव. तात्पर्य : बाह्य देखावा आणि सौंदर्य यावरुन माणसाच्या अंतरंगाची परीक्षा होणे शक्य नाही. वर्तमानपत्रातून संग्रहित 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*✍स्वरचित चारोळी* *स्वार्थ* १)स्वार्थाविना जीवन जगणे ह्यालाच आहे अर्थ नाहीतर सर्व जीवन असेल व्यर्थ. 〰〰〰〰〰〰〰 २) स्वार्थपणा कधी बाळगून वागू नये माणसाने माणुसकी सोडून कधी जगू नये. 〰〰〰〰〰〰 3) आई -वडिलांच्या मायेत नसतो कुठला स्वार्थ म्हणूनच मानतात त्यांना ईश्वर या अर्थ. 〰〰〰〰〰〰 ४) नात असो कुठलही नसावा त्यात स्वार्थ जगून घ्याव छान हाच संदेश सर्वार्थ. 〰〰〰〰〰〰 ५) स्वार्थाने राहू नकोस मानवा, कामात ठेव तुझा निस्वार्थ होईल सर्वांचे कल्याण हाच खरा परमार्थ. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 〰〰〰〰〰〰 *✍©श्रीमती प्रमिला सेनकुडे* हदगाव (नांदेड)
मंदिराच्या दरवाज्यावर लिहिलेले खूप सुंदर शब्द.. ::-सेवा करायची असेल तर, घड्याळात पाहू नका..! ::-प्रसाद घ्यायचा असेल तर, चव घेऊ नका..! ::-संत्सग ऐकायचा असेल तर, जागा पाहू नका..! ::-विनंती करायची असेल तर, स्वार्थ पाहू नका..! ::-समर्पण करायचे असेल तर, खर्च किती झाला हे पाहू नका..! ::-दान करायचे असेल तर, गरज पाहू नका..! 🌹
*आपली माणसं कशी ऒळखायची..?* या प्रश्नाचं शोधलेलं उत्तर अडचणीत ज्या व्यक्तीची आठवण येते ती व्यक्ती आपली असते... आपल्या घरात कुठेतरी काडी पेटी असते. ती कुठे आहे हे आपणाला माहीत पण असतं, ती जागेवर आहे इतकच आपण पाहतो आणि परत आपल्या कामाला लागतो किंवा आपली कामं करतो. आपलं रुटीन सुरु आहे, काडीपेटी तिच्या जागी आहे. तुम्ही तुमच्या जागी आहात. तुमच्या रोजच्या जीवनात त्या काडीपेटीचं फक्त अस्तित्व आहे. काम काहीच नाही पण अस्तित्व मात्र आहे, हे तुम्हालाही माहित आहे. कधी कधी काही वस्तू साफसुफ करताना आपण काडीपेटीलाही साफ करतो आणि परत जागेवर ठेवतो. आपल्या ध्यानी मनी नसताना कोणा एका रात्री अचानक लाईट जाते आणि डोळ्यासमोर गुडूप अंधार होतो. आपल्याकडे डोळे आहेत. ते उघडेही आहेत पण त्याचा काहीही उपयोग होत नाही म्हणून आपण पटकन डोळे बंद करतो आणि घरात आपण जिथे आहोत तिथून डोळे झाकून काडीपेटीच्या दिशेने पावलं टाकतो. हात पुढे करतो. आपल्या हातात काडीपेटी येते कारण ती कुठे आहे हे आपणास माहीत असते. आपण त्यातील एक काडी पेटवतो आणि घरात प्रकाश करतो आणि मेणबत्ती शोधतो आणि ती पेटवून चहुकडे कायम स्वरूपी प्रकाश करतो. आता आपण घटनेचे विश्लेषण करू या. 1) काडीपेटीची आवश्यकता नव्हती त्या काळात सुध्दा तिची काळजी घेतली. आवश्यक तेथे सुरक्षित ठेवली तशीच आपल्या अवती भोवती असणारे आपले मित्र, आपले नातेवाईक, शेजारी यांची काळजी घ्या त्यांची विचारपुस करा. आणि परत रिलेशन अपडेट ठेवा. हीच माणसं संकट समयी आपल्याला मदत करतात. 2)अंधार पडला तेव्हा तुमच्याकडे डोळे होते पण तरीही त्याचा काहीही उपयोग होत नव्हता. तसंच कधी कधी होतं, संकट किंवा समस्या आल्यानंतर तुमच्याकडे असणाऱ्या क्षमता चालत नाहीत किंवा कमी पडतात. 3) अंधार पडल्यानंतर आणि आपल्या क्षमतांचा उपयोग होत नाही म्हटल्या नंतर आपण डोळे बंद करून काडीपेटी पर्यंत पोहोचलो. इतका पक्का विश्वास आपणाला असतो की आपण हात पुढे केला आहे आणि भरलेली काडीपेटी तुमच्या हातात येते आपण काडी पेटवतो आणि मग डोळे उघडतो. इतका विश्वास त्या काडीपेटीचा आपणाला असतो. तसंच आपण जपलेली माणसं जर मनापासून जपलेली असतील तर अजिबात धोका होत नाही कारण आपण ती काळजी आपण रोज घेतलेली असते त्यामुळे आपण कॉन्फिडंट असतो. आता आपण पाहू या आपली माणसं कोण आणि त्यांना कुणी जपलं.? अ) आपणं रोज चालताना नमस्काराला कंजूषी करू नका. ब) लोकांशी भरपूर बोला संवाद करा. क) आपणही लोकांना छोट्या मोठ्या कामात मदत करा. ड) आणि आपली काडीपेटी किंवा काडीपेट्या जपून ठेवा त्यांची काळजी घ्या. त्यांचं अस्तित्व मान्य करा. 🙏संकलित.🙏
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 23/02/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९४७ - आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था(ISO)ची स्थापना. 💥 जन्म :- १९४० - पीटर फोंडा, अमेरिकन अभिनेता. 💥 मृत्यू :- २००४ - विजय आनंद, भारतीय चित्रपट दिग्दर्शक. २००४ - सिकंदर बख्त, भारतीय राजकारणी, केरळचा राज्यपाल. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *अहमदनगर जिल्ह्यासह उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये २३ फेब्रुवारीपासून पुढील ७२ तासांच्या कालावधीत वादळी वा-यासह गारपीट होण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.* ----------------------------------------------------- 2⃣ *कीटकनाशकामुळे शेतकरी मृत्यू प्रकरण : मृत शेतक-यांच्या कुटुंबियांना 4 लाखांची मदत द्या, मंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश* ----------------------------------------------------- 3⃣ *पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल अॅडमिशन प्रक्रियेत राज्याच्या कोट्याकरिता डोमिसाईल सर्टिफिकेटचा नियम रद्द ,मुंबई हायकोर्टाचा निर्णय.* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबई - मुंबई महानगरपालिका अधिनियम-1988, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम-1965 मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता* ----------------------------------------------------- 5⃣ *नवी दिल्ली - नोकरदार वर्गाला मोठा धक्का, पीएफवरील व्याजदरात मोठी कपात, 8.65 वरुन 8.55 टक्क्यांवर* ----------------------------------------------------- 6⃣ *पणजी - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी विधानसभेत मांडला अर्थसंकल्प* ----------------------------------------------------- 7⃣ *'खेळात करिअर करा, नवनव्या संधी निर्माण होताहेत'; असा सल्ला भारताचा विक्रमादित्य क्रिकेटवीर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दिला.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *पाप आणि पुण्य* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/16.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= मोहिनीआट्टम् : केरळमधील एक पारंपारिक शास्त्रीय नृत्यप्रकार. ⇨ कथकळि नृत्यदेखील केरळमधीलच आहे; पण तो केवळ पुरुषांनीच नाचायचा, तांडव (उद्धत प्रणाली) युक्त नृत्यनाट्यप्रकार आहे; तर मोहिनीआट्टम् म्हणजे केवळ स्त्रियांनीच करायचा लास्य (सुकुमार प्रणाली) युक्त नर्तनप्रकार आहे. पुराणांमध्ये अमृतमंथन व भस्मासुर वध या कथांमध्ये विष्णूने मोहिनीचे- अतिशय लावण्यवती स्त्रीचे-रूप घेतल्याचा उल्लेख आहे. या कथांच्या संदर्भात या शैलीकडे पाहिले असता, मोहिनीआट्टम् या शब्दातील मोहिनी हा शब्द मोहकतेचा द्योतक वाटतो. आट किंवा ‘आट्टम्’ म्हणजे नृत्य. या नृत्यशैलीस ही मोहकता, त्यामधील अंगाच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा गोलाकार व अर्धगोलाकार हालचालींमुळे प्राप्त होते. चेहऱ्यामध्येही ‘उत्क्षिप्त शिर’ (किंचित एका बाजूस झुकलेले डोके) व ‘साची दृष्टी’ (तिरका कटाक्ष) यांमुळे हाच परिणाम साधला जातो. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 *सहाय :- राजू भद्रे, बिलोली* =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= समाजासाठी सेवाभाव बाळगून नि:स्वार्थपणे काम करणाऱ्याच्या सेवेस सारे जग मदतीला येते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *01) कोकणातील मुख्य पीक कोणते ?* भात *02) तीन ही दलाचा सर्वोच्च प्रमुख कोण असतो ?* राष्ट्रपती *03) विमानाचा शोध कुणी लावला ?* राईट बंधू *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 डोखे विवेक मच्छिंद्र 👤 शशिकांत तालिमकर 👤 मारोती बोईनवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *लक्ष्य* सर्वस्व पणाला लावले की लक्ष्य गाठता येते कितीही मैलांचे अंतर जिद्दीने काटता येते सर्वस्व पणाला लावले की यश पदरात पडते असाध्य ते साध्य करिता सायास असेच काही घडते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'आनंद' आणि 'दिर्घायुष्य' यातले नाते शोधले पाहिजे. अलिकडे दिवाळी येते आणि जाते. समाजातील एका वर्गाला तर या सणाचे आकर्षणच वाटेनासे झाले आहे. कारण आम्ही राजे झालो आहोत आणि राजाला रोजच दिवाळी असते. वर्षभर पंचपक्वान्, ऋतुनुसार तेलं, क्रीम्स, अभ्यंग रोजचेच, कपडेच काय पण फर्निचरही वर्षाला नवीन, फटाकेही नेहमीचेच मग 'दिवाळी आनंद' वेगळा काय असतो ?* *'आनंद' हा दिर्घायुष्यासाठी प्रथम क्रमांकावर. वाणसामानाच्या सटरफटर गोष्टींसारखी दिर्घायुष्यासाठीच्या गोष्टींची यादी करून ती फडकवणारे पुष्कळ. पण अचानक त्यांचीच विकेट पडते. जगणे हीच शिकवणी असताना, आपण त्रास न करून घेणे ही दिर्घायुष्याची दुसरी पायरी. इतरांना त्यांच्या त-हेने जगू देणे एवढेच आपल्या हाती असल्याने त्यात आनंद मानता यायला हवा. इतरांना शिकवत बसण्यात अर्थ नसतो, त्यासाठी आपला जन्म असतो का ?* 🌹 *॥ रामकृष्णहरी ॥* 🌹 🍁🍁🍁🍁🍁🍁 *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= एखाद्यावेळी आपल्या कल्पनेने काढलेल्या रेखाटनामध्ये रंग भरते सोपे असते.कारण त्यात स्वातंत्र्य आणि कलात्मक दृष्टीकोन असतो.परंतु जीवनात रंग भरणे अतिशय कठीण असते.त्यात जीवनाचे अनेक रंग असतात.ते रंग कुठे आणि कसे भरायचे यासाठी आपले एक विशिष्ट कसब वापरावे लागते तेही समोरची व्यक्ती पाहून.ते एकदा त्याला जमले तर जीवन सुसह्य होते नाही तर आयुष्यभर असह्य होते.तेव्हा मात्र आपले कसब वापरण्यासाठी समोरच्यांच्या भावनिकतेचा विचार करावा लागतो.मग हे जमण्यासाठी अधिक मानसिकतेचा व आपल्या बुद्धीचातुर्याचा विचार करावा लागतो.तेव्हाच आपल्या नि इतरांच्या जीवनात रंग अधिक खुलून दिसतात व जीवन समृद्ध व्हायला मदत होते. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..9421839590/8087917063. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *न कर्त्याचा वार शनिवार* - अनेक सबबी सांगून कामाची टाळाटाळ करणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *बुड घागरी* बुड घागरी तो टोपी घालणारा उंदिरमामा आठवतोय? तो गेला एकदा जंगलात. तिथे त्याला एक माकड आणि मांजर भेटले. त्या तिघांची चांगली मैत्री जमली. एक दिवस त्या तिघा मित्रांनी खीर करण्याचे ठरविले. माकड म्हणाले 'मी आणतो साखर'. मांजर म्हणाले 'मी आणतो दूध'. उंदीर म्हणाला 'मी आणतो शेवया'. तिघांनी पातेलेभर खीर केली. मग माकड म्हणाले 'चला आपण आंघोळ करून येऊ आणि मगच खीर खाऊ'. इकडे मांजराच्या तोंडाला सुटले होते पाणी. ते अर्ध्या वाटेतूनच परत आले. त्याने सगळी खीर खाऊन टाकली. थोडया वेळाने माकड व उंदीर आले. पहातात तो काय, खिरीचे पातेले रिकामे ! त्यांनी मांजराला विचारले 'खीर कोणी खाल्ली?' मांजर म्हणाले, 'मला नाही माहीत.' मग माकडाने एक घागर घेतली व सर्वजण नदीवर गेले. माकडाने घागर पाण्यात पालथी घातली. त्यावर उभे राहून माकड म्हणाले ' हुप हुप करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी'. पण घागर काही बुडाली नाही. मग उंदीर घागरीवर उभा राहिला व म्हणाला 'चूं चूं करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी'. पण घागर काही बुडाली नाही. आता मांजराची पाळी आली. मांजर खरे तर घाबरले होते. कसेबसे ते घागरीवर उभे राहिले व म्हणाले ' म्यांव म्यांव करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी'. अन काय आश्चर्य, घागर पाण्यात बुडाली. चोरून खीर खाल्ल्याची मांजराला शिक्षा मिळाली. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 〰〰〰〰〰〰〰 *🌺जीवन विचार* 🌺 〰〰〰〰〰〰〰 माणुस जन्माला येतो तेव्हा त्याचं वजन अडिच किलोच्या आसपास असते.पण जेव्हा माणुस मरतो तेव्हा त्याच्या अस्थिंची राखही अडिच किलो भरत नाही. मग जन्म आणि मृत्यु या मधल्या काळात तो कोणत्या गोष्टींचं संचित करतो यावरुन त्याच्या जीवनाचा अर्थ उलगडतो. आयुष्यभर दुखः,चिंता,द्वेष,क्रोध,मोह, नकारात्मकता या गोष्टीत अडकुन राहण्यापेक्षा सुख,समाधान,आनंद,प्रेम, सकारात्मकता या गोष्टींनी आयुष्य बहरुन टाकायला नको का ???? जीवन छोटं असुनही त्याचा क्षणोक्षणी आनंद घेणारं फुलपाखरु हाच तर संदेश देतं. आयुष्य जगलात किती हे महत्वाचं नाही, तर आयुष्य जगलात कसं ? हे महत्वाचं!!.... 〰〰〰〰〰〰〰 🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼 ✍ *प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)* जि.प.प्रा.शा. वाटेगाव, ता.हदगाव, जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰〰 http://www.pramilasenkude.blogspot.in 💐🍀💐🍀💐🍀💐🍀
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 16/02/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १६५९: पहिला धनादेश ब्रिटीश बँकेतून काढण्यात आला, तो नँशनल वेस्टमिन्स्टर बँकेत जपून ठेवण्यात आला आहे. १७०४: औरंगजेबाने राजगड किल्ला जिं 💥 जन्म :- १८७६: भारतातील पहिले सीनियर रँग्लर आणि फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे 💥 मृत्यू :- १९४४: भारतीय चित्रपटाचे जनक धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी राबविलेल्या नो हॉर्न डे'चा उपक्रमाचे कौतुक करत हा उपक्रम महाराष्ट्रभर राबवणार असल्याची गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांची घोषणा* ----------------------------------------------------- 2⃣ *बीड - श्रीक्षेत्र नारायणगडावरील विविध विकासकामांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले उद्घाटन, पालकमंत्री पंकजा मुंडे, आ. विनायक मेटे होते उपस्थित* ----------------------------------------------------- 3⃣ *मुंबई - अस्वस्थ वाटू लागल्याने गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना लीलावती रुग्णालयात केले दाखल* ----------------------------------------------------- 4⃣ *नवी दिल्ली- पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरण, नीरव मोदी आणि गीतांजली शोरूमवर छापे, नीरव मोदीचे 5 हजार 100 कोटींचे हिरे जप्त करण्यात यश* ----------------------------------------------------- 5⃣ *बडोदा - मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला ग्रंथदिंडीस सुरुवात, साहित्यिकांसह बडोदेकर मराठी माणसांचा लक्षणीय सहभाग* ----------------------------------------------------- 6⃣ *शेर बहाद्दूर देबुआ यांनी नेपाळच्या पंतप्रधानपदाचा दिला राजीनामा, खडगा प्रसाद ओली होणार नवे पंतप्रधान.* ----------------------------------------------------- 7⃣ *आयपीएलच्या आगामी सत्राची ७ एप्रिलपासून सुरुवात होणार असून सलामीला गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा सामना चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होईल.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *एकच ध्यास ; वाचन विकास* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_6.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *धुंडिराज गोविंद फाळके* धुंडिराज गोविंद फाळके ऊर्फ दादासाहेब फाळके (एप्रिल ३०, १८७०; त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र - फेब्रुवारी १६, १९४४; नाशिक, महाराष्ट्र) हे चित्रपटनिर्मिती करणारे महाराष्ट्रातील व भारतातील पहिले चित्रपटनिर्माते होते आणि यासाठीच त्यांना भारतीय चित्रपटांचा जनक मानले जाते . १९१३ साली त्यांनी निर्मिलेला राजा हरिश्चंद्र हा चित्रपट मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट होय. १९३७ पर्यंतच्या आपल्या १९ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी ९५ चित्रपट व २६ लघुपटांची निर्मिती केली. त्यांच्या चित्रपटविषयक योगदानाबद्दल भारतीय चित्रसृष्टीतील सर्वांत मोठा पुरस्कार त्यांच्या नावाने दिला जातो. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= कृतीपेक्षा शब्दाने शत्रू निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= 1) कस्तुरबा गांधी यांची समाधी कोठे आहे ? पुणे 2) सूर्यग्रहण फक्त कोणत्या तिथीला होते ? अमावस्या 3) भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ? वाघ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 बाप्पा महाजन, नाशिक 👤 प्रदीप वाघमारे, पुणे 👤 सतीश चौहान, चौसाळा 👤 प्रमोद हिवराळे, धर्माबाद *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *यशाचा मंत्र* कठोर परिश्रमच यशाचा मंत्र आहे यशस्वी व्हायचे तेच एक तंत्र आहे कठीण परिश्रम घेईल त्याला यश मिळते परिश्रम करणारालाच यशाची किंमत कळते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *चित्ताचं चैतन्य चेतलं की ज्ञानसूर्याचा साक्षात्कार होतो. तो काही विवेकी संतासह विचारवंतानाही होतो. विवेकी संत माणसा-माणसात माणुसकीचे अर्थात दया-प्रेम-करूणेचे पूल बांधत असतात. परोपकारातून परमेश्वराशी त्यांचं नातं जुळवत असतात. दुसरा एक संत प्रकार आहे लहरीबाबांचा, सतत मौनाचं नाटक करून हजारोंना नादी लावण्यात कुशल असलेल्या बुवांचा, प्रवचनाचं संमोहन वापरून जणू तो ईश्वर मलाच कळला आणि माझ्यावरच भाळला असा बनाव निर्माण करणा-यांचा. या लोकांच्या चरणांशी सर्व सुखं शरण असतात. तिथं कनक-कांतांचा सुकाळ असतो. कित्येक मती मारलेले भक्त आपल्या लेकीसुना या 'पहुंचे हुए' लोकांच्या नादी लावतात. सत्तेतील 'सत्ते' आणि राजकारणातील 'पत्ते'ही त्यांच्या आशीर्वादासाठी टपून असतात.* *कृष्णकथा-रामकथा कानाशी बिलगल्यानं आपण ईश्वरप्रिय होतो असा कुणाचा गोड गैरसमज असेल तर तो भाबडेपणा आहे. ईश्वर समजण्यासाठी पराकोटीचा त्याग आणि कष्ट उपसावे लागतात. कबीर-ज्ञानोबा-तुकोबाइतकं आत्मबोधन अनुभवावं लागतं. हा मार्ग जनसामान्यांना परवडण्यासारखा नाही. म्हणूनच ते कर्मकांडांच्या थोतांडाला ब्रम्हांडाचा साक्षात्कार समजतात. ईश्वर कुणालाही दर्शन देत नाही. सूर्यकिरणांनी सूर्याचाच शोध घेण्यासारखा तो अज्ञानी प्रकार आहे. म्हणूनच रोज काही क्षण आत्मशोधात व्यतीत करीत राहिल्यानं कुठल्या तरी क्षणी आपण आपल्या सत्य-असत्यासह आत्मदर्पणापुढे येतोच!* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जीवनात एखादे चांगले ध्येय आपल्या मनात नाश्चित करुन ते पूर्ण करण्यासाठी अनेक बिकट प्रसंगाशी सामना करावा लागतो.त्याच्याशिवाय ध्येयाचा प्रवास पूर्ण होऊ शकत नाही.केवळ ध्येय मनात ठेवले आणि आपण काहीच प्रयत्न केले नाही तर आपण आपल्या जीवनात अपयशी ठरलो आहोत हे निश्चित समजावे.म्हणून ध्येय प्राप्तीसाठी कोणताही खडतर प्रवास करण्याची तयारी ठेवावी लागते. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *दैव देते, कर्म नेते* - अनुकूल परिस्थितीचा फायदा उठवता न येणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *खरी नक्कल* भोजराजाकडे एक बहुरुपी गेला. राजाने त्याला आपले सोंग घ्यायला सांगितले. थोड्याच वेळात हुबेहुब त्या राजाप्रमाणे बनून, तो बहुरुपी राजसभेत शिरला. त्याचे त्याच्या कलेतील असामान्य कौशल्य पाहून खुष झालेल्या भोजराजाने त्याला एक मौल्यवान रत्नहार देऊ केला. भोजराजाचे सोंग घेतलेल्या त्या बहुरुप्याने तो रत्नहार तर स्विकारला नाहीच, पण राजाला साधा मुजरा करण्याचा शिष्टाचारही पाळला नाही. एवढंच नव्हे तर तो राजसभेत ज्या राजेशाही दिमाखांन आला, तशाच तऱ्हेनं निघून जाऊ लागला. दरबारी मंडळींना त्या बहुरुप्याचा हा उध्दटपणा आवडला नाही. त्यांच्यापैकी काहीजण राजाच्या कानात काहीतरी कुजबुजले. त्याबरोबर राजाने आपल्या सेवकांना त्या बहुरुप्याला पकडून, आपल्यापुढं हजर करण्याचा हुकुम सोडला. त्या बहुरुप्याला पकडून समोर आणताच राजा त्याला म्हणाला, ‘अरे उध्दटा ! तुला मी एवढा रत्नहार देऊ केला, पण तो तर तू स्वीकारला नाहीसच; पण मला मुजर करण्याचं साधं सौजन्यही न दाखवता, तू मला सरळ पाठ दाखवून निघून की रे गेलास ? तुझ्या या अपराधाबद्दल मी तुला आता कारावासाची शिक्षा ठोठावणार आहे.’ बहुरुपी म्हणाला, ‘महाराज ! सोंग घेतलं असलं, तरी ते राजाधिराज भोजमहाराजांचं घेतलेलं आहे. तेव्हा इनाम म्हणून रत्नहार स्विकारणं, आपल्यापुढे वाकून मुजरा करणं किंवा आपल्याला पाठ न दाखविता उलटं चालत जाणं, या गोष्टी मी केल्या असत्या, तर आपला अपमान झाला असता, म्हणून मी हुबेहुब आपल्याप्रमाणे वागलो.’ बहुरुप्यानं केलेल्या या खुलाशानं भोजराजा प्रसन्न झाला. त्याने त्याला दोन-तीन दिवस शाही पाहूणा म्हणून ठेवून घेतली आणि त्याल तो रत्नहार व एक हजार सुवर्ण मोहोरा इनाम म्हणून दिल्या 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 15/02/2018 वार - गुरुवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- ३९९: सॉक्रेटिसला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली 💥 जन्म :- १९४९: दलित साहित्यिक नामदेव लक्ष्मण ढसाळ 💥 मृत्यू :- १८६९: ऊर्दू शायर मिर्झा गालिब *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मुंबईत मराठी भाषा भवनाच्या उभारणीसाठी समिती स्थापण्याचा निर्णय,मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.* ----------------------------------------------------- 2⃣ *मुंबई : बेस्ट कर्मचा-यांचा संप पुढे ढकलला, औद्योगिक न्यायालयाच्या आदेशानंतर संप स्थगित.* ----------------------------------------------------- 3⃣ *मराठवाड्यात गेल्या 3 दिवसांत झालेल्या गारपिटीमुळे 4 लाख 91 हजार 680 एकर पिकांचे नुकसान, 4 लाख 28 हजार एकरवरील पिकांचे 33 टक्के नुकसान* ----------------------------------------------------- 4⃣ *अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांनुसार मदत मिळणार; कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांची घोषणा.* ----------------------------------------------------- 5⃣ *पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबई शाखेत 10 हजार कोटींची घोटाळा* ----------------------------------------------------- 6⃣ *विद्यार्थ्यांच्या अवांतर वाचनासाठी निवडलेल्या ‘बाल नचिकेता’ व ‘भगवान वेदव्यास’ या पुस्तकांमध्ये कुठलाही अश्लील वा आक्षेपार्ह मजकूर नाही - शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे* ----------------------------------------------------- 7⃣ *पाचव्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मानं तोडला सचिन, सेहवाग आणि युवराजचा विक्रम* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *कमवा आणि शिका हेच उपयोगी* स्वतःच्या विकासावर कुटुंबाचे विकास अवलंबून असते. कुटुंबाच्या विकासावर गावाचा विकास आणि मग राज्य व देशाचा विकास होतो. या विकासासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. शिक्षणाशिवाय कोणाचेही विकास अशक्य आहे. शिक्षणामुळे दोन डोळ्याचे माणसे तिसऱ्या डोळ्याने डोळस होऊ शकतात. अन्यथा डोळे असून ही आंधळ्याची अवस्था होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगताना......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/06/blog-post_86.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *वसंत गोवारीकर* वसंत रणछोड गोवारीकर (२५ मार्च, इ.स. १९३३; पुणे, ब्रिटिश भारत - २ जानेवारी, इ.स. २०१५) हे भारतातील आघाडीचे शास्त्रज्ञ होते. ते इ.स. १९९१ ते इ.स. १९९३ या काळात भारताच्या पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार होते. वसंत गोवारीकर इ.स. १९९४ ते इ.स. २००० या काळात मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होते. ते ज्ञान प्रबोधिनी संस्थेशी दीर्घ काळ निगडीत होते. हराळी येथील ज्ञान प्रबोधिनीच्याशाळेतील विज्ञान प्रयोगशाळेला डॉ. गोवारिकरांचे नाव देण्यात आले आहे. वसंत गोवारीकर यांचा जन्म २५ मार्च, इ.स. १९३३ रोजी पुण्यात झाला. त्यांचे शालेय शिक्षण कोल्हापुरातल्या हरिहर विद्यालय, सिटी हायस्कूल या शाळांत झाले. कोल्हापुरातल्या राजाराम कॉलेजातून त्यांनी बी.एस्सी. आणि सैद्धान्तिक भौतिकीमध्ये एम.एस्सी. पूर्ण केले. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) भारत इतिहास संशोधन मंडळ कोठे आहे?* 👉 पुणे *२) वॉर ॲंड पिस हा ग्रंथ कोणी लिहिला?* 👉 लिओ टॉल्स्टॉय *३) कोणत्या पर्वतामुळे महाराष्ट्राच्या जलस्त्रोताचे दोन भाग झाले आहेत?* 👉 सह्याद्री *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 अशोक गायकवाड, सहशिक्षक, बिलोली 👤 दत्ता एम. भोसले, शिक्षक, बिलोली 👤 जनाबाई निलपत्रेवार, शिक्षिका, धर्माबाद 👤 बाबूराव बोधनकर, सहशिक्षक, करखेली 👤 किरण गौड, धर्माबाद 👤 घनश्याम नानम, धर्माबाद *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *थंडी* घराबाहेर पडायला मनात धुडधूडी आहे जिकडे तिकडे आता थंडीची हुडहुडी आहे थंडीच्या हुडहुडीत होतात सारे गपगार घरात बसतात सारे लावून खिडक्या दार शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *बहुतेक लोक त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी संतुष्ट नसतात. आपल्यात कशाची तरी उणीव असल्याची भावना त्यांना बोचत असते. आणि मग आजच्या ह्या स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी ते सेल्फ-हेल्प प्रकारातील पुस्तके वाचतात. वयक्तिक समुपदेशन करून घेतात, धार्मिक प्रवचने ऐकतात, योगसाधना करतात, फिट रहावे म्हणून जिमखान्यात जातात, आकर्षक दिसण्यासाठी मेक-ओव्हर करून घेतात.* *जीवनात यशस्वी होण्यासाठी सगळ्यांची सारखी धडपड सुरू असलेली आपण पाहतो. पण जीवनात यशाबरोबर अपेक्षित सुख प्राप्त होतेच असे नाही आणि वाढती समृद्धी हीदेखील असमाधानाचे एक कारण बनू शकते. म्हणून व्यक्तिमत्वाचा विकास शारीरीक गरजा भागवणे आणि मनाच्या आकांक्षा पूर्ण करणे एवढ्यापुरता मर्यादित राहू शकत नाही. शरीर आणि मनाबरोबर त्यात आत्माही आला पाहिजे. आपल्या आत्म्याचे पोषण आवश्यक आहे. आपली आत्मिक वाढ महत्वाची आहे. शरीर, मन आणि आत्मा ह्यांचे संतुलन राखणे गरजेचे आहे.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 💥💥💥💥💥💥💥💥💥 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= अज्ञानाला दूर घालवायचे असेल,दु:खाला दूर करायचे असेल,आपल्या मनातील रागावर नियंत्रण ठेवावे वाटत असेल,इतरांना आपलेसे करावे वाटत असेल,अवघड समस्येतून मार्ग काढायचा असेल आणि जीवन सुखी व समृद्ध व्हावे असे वाटत असेल तर त्यावर एक आणि एकच सर्वोत्तम मार्ग आहे तो म्हणजे ज्ञानाचा. ज्यांनी ज्ञानाचा मार्ग स्वीकारला आहे त्यांनी ह्या सा-या गोष्टीतून ज्ञानाच्या सहाय्याने सहज मारली काढून जीवन सुखी व समृद्ध केले आहे.ज्यांनी स्वीकारला नाही त्यांना त्यांच्या जीवनात कधीही सुखी होता आले नाही.ते जवळ असलेल्या सुखालाही मुकले आहेत कारण त्यांच्याजवळ ज्ञानाची जोड नव्हती म्हणून.या जगात सर्वश्रेष्ठ जर काय असेल तर ते ज्ञान. जीवनातील अज्ञानाला दूर करण्याचे सामर्थ्य केवळ ज्ञानातच आहे हे कधीही विसरुन चालणार नाही. ©व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद...९४२१८३९५९०. 🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी आणि त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *देव तारी त्याला कोण मारी ?* - देवाची कृपा असल्यावर कोणीही आपले वाईट करू शकत नाही, अशी भावना. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *शासन* महाभारताच्या शांतीपर्वातील ही गोष्ट. शंख व लिखित नावंचे दोघे भाऊ यज्ञोपवित संस्कार झाल्यावर गुरूगृही विद्याध्यानासाठी गेले. संपूर्ण वेद वेदांगाचा अभ्यास करून गुरूची परवानगी घेऊन हे दोघे घरी परत आले. दोघांनीही दोन वेगवेगळया ठिकाणी आपले आश्रम बांधले. तिथे त्यांचे अध्यापनाचे काम सुरू झाले. बरेच दिवस झाले दोन्ही भावांची भेट नव्हती. लिखिताने शंखाकडे भेटीला जाण्याचे ठरवले. त्याप्रमाणे तो गेला पण शंख कामानिमित्त बाहेर गेला होता. निराश झालेला लिखित परत निघाला. दुपारी बाराची वेळ भूक लागली होती. समोर शंखाच्या आश्रमातील आंब्याच्या झाडाला खूप आंबे लागले होते. एक छानसा पिकलेला आंबा लिखिताने तोडला व पुढे चालू लागला. तेवढयात समोरून येणार्या शंखाने ते पाहिले व विचारले. 'आंबा कुठे मिळाला ?' शंख सहज म्हणाला 'अरे ! तुझ्याच झाडाचा छान पिवळा धम्मक दिसला तोडला'. शंख शांतपणे म्हणाला 'म्हणजे लिखिता तू चोरी केलीस झाडाच्या मालकाला न विचारता आंबा तोडलास' लिखिताला आपली चूक कळली. शरमेने त्याची मान खाली झुकली. 'शंखा माझ्या गुन्ह्याबद्दल मला हवी ती शिक्षा कर' 'काहीं गरज नाहीं त्याची जा आता पुन्हा असे घडणार नाही ह्याची खबरदारी घे' शंख एवढे बोलून निघून गेला. लिखित राजाकडे गेला. घडलेली सर्व हकीगत सांगितली. 'राजा मला शिक्षा कर' लिखित म्हणाला. ह्या विचित्र मागणीचे राजाला आश्चर्य वाटले. राजा म्हणाला 'लिखिता तू म्हणतोस ते खरंही असेल पण चोरीची फिर्याद कुणीच केलेली नाही. गुन्हा शाबीत झाला तर शिक्षा'. 'राजे पण गुन्हा शाबीत झाला तर ह्या गुन्ह्याला शिक्षा कोणती ?' लिखिताने विचारले, 'चोरी करणार्याचा हातच आम्ही कापतो' राजा म्हणाला. राजाच्या समोरच लिखिताने राजा शासन करत नाहीं म्हणून आपणच आपला हात कापून टाकला'. स्वत:च स्वत:ला शिक्षा करून घेणारी प्रजा उत्कृष्ट राज्य शासनाचे प्रतीक आहे. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🌺सहशालेय उपक्रम🌺* 〰〰〰〰〰〰〰 *आज दिनांक १५/०२/२०१८ रोजी* *जि.प.प्रा. शाळा वाटेगाव* येथे *संत श्री जगतगुरु सेवालाल महाराज* यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.💐💐💐💐💐 👉शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री चव्हाण सर यांनी प्रतिमा पूजन केले. व शाळेतील आम्ही सर्वांनी व विद्यार्थ्यांनी प्रतिमा पूजन केले. 🌺🌸🌺🌸🌺🌸🌺 👉त्यानंतर श्रीमती सेनकुडे मॕडम, श्रीमती झाडे मॕडम ,श्री चव्हाण सर श्री राठोड सर यांनी विद्यार्थ्यांना संत श्री सेवालाल महाराज यांच्याविषयी माहिती सांगितली.👉तसेच श्री राठोड सर यांच्याकडून गोड चाॕकलेट खाऊ वाटप केला व अशाप्रकारे आज जयंती साजरी करण्यात आली आहे. 🙏🙏🙏🙏🙏🙏 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *✍वृत्तांत लेखन* श्रीमती सेनकुडे मॕडम (सह.शिक्षिका) जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰〰
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 14/02/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *व्हॅलेंटाईन दिन* 💥 ठळक घडामोडी :- १८८१: भारतातील पहिल्या होमिओपाथिक कॉलेजची कोलकाता येथे स्थापना. १९२४: संगणक तयार करणारी कंपनी आय.बी.एम ची स्थापना. १९६३: अणुक्रमांक १०३ असलेले लॉरेन्सिअम हे मूलद्रव्य प्रथमच तयार करण्यात आले. २०००: अभिजित कुंटे हा भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रॅंडमास्टर बनला. 💥 जन्म :- १९१६: कवयित्री संजीवनी मराठे १९२५: केन्द्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते मोहन धारिया 💥 मृत्यू :- १४०५: मंगोलियाचा राजा तैमूरलंग *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली- पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा लाभ घेणा-या 100हून अधिक महिलांची मोदींनी घेतली भेट* ----------------------------------------------------- 2⃣ *धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांना 54 लाखांचा मोबदला मिळणार; जिल्हाधिकाऱ्यांकडून उर्जा मंत्रालयात अहवाल सादर* ----------------------------------------------------- 3⃣ *नवी दिल्ली - बोफोर्स घोटाळा प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली, सर्वोच्च न्यायालयात 28 मार्चला सुनावणी.* ----------------------------------------------------- 4⃣ *हिंगोली - औंढा नागनाथ येथे काल भाविकांची शिवलिंगाच्या दर्शनासाठी रीघ, परिवहनमंत्री दिवाकर रावते, खा. राजीव सातव, आ. डॉ संतोष टारफे, तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी केली महापूजा* ----------------------------------------------------- 5⃣ *राज्यात रविवारपासून सुरू असलेल्या गारपीट व अवकाळी वादळी पावसाने हजारो हेक्टरवरील रबी पिकांना फटका* ----------------------------------------------------- 6⃣ *पोर्ट एलिझाबेथ - भारताने दक्षिण आफ्रिकेला ७३ धावांनी हरवले. मालिका खिशात* ----------------------------------------------------- 7⃣ *भारतीय महिला क्रिकेट संघानं दक्षिण आफ्रिकेचा टी-20च्या सामन्यात 7 विकेट्सनं केला पराभव* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *व्हॅलेंटाईन दिनानिमित्त प्रासंगिक लेख* जगाला प्रेम अर्पावे .....! वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *कवी संजीवनी मराठे* संजीवनी रामचंद्र मराठे ( १४ फेब्रुवारी, इ.स. १९१६ पुणे, महाराष्ट्र - १ एप्रिल, इ.स. २०००:पुणे) या एक कवितागायनासाठी प्रसिद्ध असलेल्या मराठी कवयित्री होत्या. संजीवनी मराठे यांचे शिक्षण पुण्यात झाले. शाळकरी वयातच त्यांनी कविता करावयास सुरुवात केली. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या त्या जी.ए. (गृहीतागमा) व एम. ए. होत्या. आयुष्याच्या उत्तरार्धात संजीवनी मराठे आणि त्यांचे पती खानापूर-बेळगाव सोडून सांगलीस गेले. सांगलीत राममंदिराजवळच त्यांचा रामकृपा नावाचा बंगला होता. संजीवनीबाईंनी काही दिवस सांगलीच्या शाळेत शिक्षिकेचे काम केले. संजीवनी मराठे यांना मिनी, भारती, अंजू या तीन मुली आणि प्रताप नावाचा मुलगा होता. प्रताप हा वैमानिक होता. अंजूने लग्नानंतर पाठविलेली पत्रे संजीवनी मराठे यांनी संपादित करून प्रकाशित केली. महाराष्ट्र शासनाने ’बरं का गं आई’, आणि ’हसू बाई हसू’ या कवितासंग्रहांना पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= गौरव हा पडण्यात नाही; पडून उठण्यात आहे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *1) सायना नेहवाल हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?* बॅडमिंटन *2) बुद्धचरित हे प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिले ?* कवी अश्वघोष *3) भारतात सर्वात पहिले कापड गिरणी कुठे सुरू झाली ?* नागपुर *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 सतीश कुरमे, सहशिक्षक, माहुर 👤 धनराज जाधव, सहशिक्षक, वाशिम 👤 विकास बडवे, सहशिक्षक *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *लाभार्थी* गारपीट म्हणजे काहींची मजा आहे शेतक-यांना मात्र निव्वळ सजा आहे संकटातही काही हात धुवून घेतात लाभार्थ्या पेक्षा दुसरेच माला माल होतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *महत्वाकांक्षा आणि अतिमहत्वाकांक्षा यातील फरक जाणून घेण्याची गरज आहे. उत्तुंगतेचा ध्यास जरूर घ्यायला हवा; परंतु त्यामागे उदात्त विचार असायला हवेत. आपले आणि समाजाचे जीवन समृद्ध करण्याची कळकळ असावी. त्याऐवजी केवळ स्वार्थाचा आणि मूठभरांच्याच हिताचा विचार असेल, तर त्यामागची महत्वाकांक्षा हिंसक बनते. अतिमहत्वाकांक्षा नकारात्मक असून, आपल्या अधोगतीला कारणीभूत ठरते. इतिहासात अशी असंख्य उदाहरणे आहेत. शेक्सपियरच्या नाटकातील नायक मॅकबेथही अतिमहत्वाकांक्षेचा शिकार आहे. स्काॅटलंडचा राजा डंकनच्या दरबारातील तो पराक्रमी उमराव. राजा होण्याची महत्वाकांक्षा त्याला असतेच; परंतु लेडी मॅकबेथ याबाबतच्या अतिमहत्वाकांक्षेने पछाडलेली असते. आपला नवरा राजा व्हावा म्हणून प्रसंगी ही दुष्ट बाई विद्यमान राजाचा खून करायलाही तयार होते.* *एका लढाईत विजय मिळविल्याबद्दल सन्मान करण्यासाठी राजा मॅकबेथच्या घरी येतो. पती-पत्नी त्यांचे आदरातिथ्य करतात. दिलेल्या शयनगृहात राजा झोपी जातो. मॅकबेथ महत्वाकांक्षी होता; पण त्यासाठी तो कोणाचा खून करायला तयार नव्हता. मात्र उद्याच्या राजवैभवासाठी तसे करणे आवश्यक असल्याचे सांगून लेडी मॅकबेथ राजाचा खून करायला भाग पाडते. मॅकबेथला राजपद मिळते; परंतु त्यानंतर उसळलेल्या जनप्रक्षोभाला, युद्धाला सामोरे जावे लागते. लेडी मॅकबेथ भ्रमिष्ट होऊन मरते आणि मॅकबेथलाही प्राणास मुकावे लागते. अतिमहत्वाकांक्षा विघातक असून -हासाला कारणीभूत ठरते.* ••●💥‼ *रामकृष्णहरी* ‼💥●•• *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= आयुष्याची खरी सुरुवात तर तुमच्या वाडवडिलांच्या ख-या पुण्याईने सुरु झाली.जीवनाचा ' मध्य ' तर तुमच्या कर्तृत्वाने सिद्ध करायचा आहे.तो तुम्हाला चांगला करायचा आहे की,वाईट हे तुम्हालाच ठरवायचे आहे.कारण हे मात्र तुमच्या हातात आहे.यासाठी तुम्हाला कुणाच्या भरवशावर बसता येत नाही किंवा नशिबावर अवलंबून राहता येत नाही.म्हणून तुमच्या जीवनातला मध्यच महत्त्वाचा आहे.आणि शेवट मात्र आपल्या हाती नाही.भविष्यात केव्हा काय घडेल याचे काही ठामपणे सांगता येत नाही.म्हणून जे आज आणि आता तुमच्यासमोर आहे ते सत्य आहे ते स्वीकारा आणि त्याला कौशल्याने, धैर्याने आणि परिस्थितीनुरूप उत्तर द्यायला पुढे रहा.यातच तुमच्या जीवनाचे खरे सार आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *दुरून डोंगर साजरे* - कोणतीही गोष्ट वा वस्तु लांबून चांगली दिसते, जवळुन तिचे खरे स्वरुप कळून येते. (मुख्य दोष कळून येतात.) *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *चांगल्या कर्माचे फलीत* एका जंगलामध्ये *एक म्हतारी* आणि तिची नात राहत होती . आणि त्याच जंगलामध्ये *चार दरोडेखोर* लुटमार करण्यासाठी येत असंत . एके दिवशी लुटमार करता करता संध्याकाळ झाली आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची सुरुवात झाली . ते चार दरोडेखोर जंगलामध्ये *आश्रयासाठी* सैरभैर पळु लागले . अचानक त्यांना म्हतारीची *झोपडी* दिसली .आणि ते म्हतारीच्या झोपडीकडे गेले. म्हतारीने त्यांना रात्री साठी आश्रय दिला. म्हतारीने जेवण बनवले सर्वजन जेवायला बसले आणि जेवता जेवता *पाप पुण्याचा विषय* निघाला. प्रत्येकजण आपल्या परीने विषय मांडत होता. शेवटी म्हतारीने *पैज लावली*. बाहेर विजा पडत आहेत प्रत्येकाने त्या समोरच्या झाडाला शिवुन पुन्हा झोपडीमध्ये यायचे *ज्याच्या अंगावर विज पडेल तो पापी आणि जो सुखरुप पुन्हा झोपडीत येईल तो पुण्यवान.* प्रथम १ ला दरोडेखोर गेला झाडाला शिवुन सुखरुप झोपडीत आला. असे दुसरा गेला ,तिसरा गेला, चौथा गेला. आणि सर्वजण सुखरुप झोपडीत आले. आता पाळी आली म्हतारी आणि तिच्या नातीवर म्हतारीला मनामध्ये प्रश्न पडला की हे चारही दरोडेखोर पुण्यवान निघाले आपण नक्कीच पापी आहोत, विज आपल्याच अंगावर पडणार असा विचार करत असताना तिने नातीला कडेवर घेतले आणी झोपडीच्या बाहेर पाऊल टाकले. त्याचक्षणी *विजेचा कडकडाट* होऊन विज त्या झोपडीवर पडली आणि क्षणार्धात ते चारही दरोडेखोर जागीच *भस्मसात* झाले. *तात्पर्य :-* *एका पुण्यवान माणसाच्या आश्रयामूळे* आजही चार पापी माणसं जगु शकतात. पण त्याने *साथ* सोडली तर ते चारही भस्मसात होऊ शकतात. म्हणून *पुण्याचा वाटा* नेहमी घेत रहा. ते कधी संकटाच्या वेळी आडवे येइल हे आपल्याला ही नाही समजनार. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
१) करंगळी 2)चवळी 3)आठळी 4)कवळी 5)केरळी 6)पन्हाळी 7)अळी 8 पळी 9होळी 10सुकेळी 11 चाफेकळी 12झोळी 13 भूपाळी 14टाळी 15विळी 16झावळी 17मासोळी 18 काळी 19टकळी 20कोळी 21गोळी 22मोळी 23लव्हाळी 24 25 कळी 26आंबोळी 27चारोळी 28पोळी 29बाळी 30 आरोळी 31रांगोळी 32पुरणपोळी 33कडबोळी 34 गवळी 35माळी 36दिवाळी 37नव्हाळी 38काळी 39खळी 40बळी
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 10/02/2018 वार- शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १२५८ - मोंगोल सरदार हुलागु खानने बगदाद लुटले व तेथील नागरिकांची हत्या केली. अंदाज १०,००० ते ८,००,०००. १९३१ - भारताची राजधानी कोलकात्याहुन नवी दिल्ली येथे हलवली. १९४८ - पुणे विद्यापीठाची स्थापना. २०१३ - महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने जमलेल्या गर्दीमध्ये अलाहाबाद रेल्वेस्थानकात चेंगराचेंगरी होउन ३६ ठार आणि किमान ३९ जखमी 💥 जन्म :- १८९४ - हॅरोल्ड मॅकमिलन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान. १९५० - मार्क स्पित्झ, अमेरिकन तरणपटू. 💥 मृत्यू :- १२४२ - शिजो जपानी सम्राट. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *शिक्षकांचा पगार मुंबै बँकेत जमा करू नका, हायकोर्टाचा शिक्षणमंत्री विनोद तावडेंना दणका* ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली - लोकसभेचं कामकाज 5 मार्चपर्यंत स्थगित.* ----------------------------------------------------- 3⃣ *यवतमाळ : जिल्ह्यातील आठ तालुक्यातील ६४ गावे टंचाई क्षेत्र म्हणून जाहीर. जिल्हा प्रशासनाच्या नैसर्गिक आपत्ती विभागाची घोषणा. १६३ गावांची भूजल पातळी दीड मीटरने घटली.* ----------------------------------------------------- 4⃣ *तुकाराम मुंढे यांनी स्वीकारला नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार, गणवेश घालून न आलेल्या अधिका-याला बैठकीतून काढलं बाहेर* ----------------------------------------------------- 5⃣ *बर्ड फ्ल्यूच्या भीतीमुळे सौदी अरेबियाने भारतातून कुक्कुटपालन उत्पादनाच्या आयतीवर बंदी घातली.* ----------------------------------------------------- 6⃣ *पेप्सिकोच्या अध्यक्ष आणि सीईओ इंद्रा नूयी यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलच्या पहिल्या संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.* ----------------------------------------------------- 7⃣ *विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील आदित्य ठाकरेचे अकोल्यात स्वगृही आगमन* ----------------------------------------------------- *आजची विशेष बातमी :- महंत परमपूज्य गुरू दौलतपुरी महाराज यांच्या 11 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त नांदेडच्या चौफाळा भागात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *हेडफोन पासून दूर रहा* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2016/12/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ* सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भारतातील एक प्रसिद्ध आणि अग्रणी विद्यापीठ आहे. मराठी भाषेच्या व संस्कृतीच्या अभ्यासाठी आणि संशोधनासाठी पुणे विद्यापीठाची स्थापना फेब्रुवारी १०, १९४८ मध्ये झाली. बॅ. डॉ. मुकुंद रामराव जयकर हे पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. ४६ शैक्षणिक विभाग आहेत.४७४ महाविद्यालये आणि सुमारे साडेपाच लाख विद्यार्थी संख्या आहे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= आपले विचार म्हणजे विचार, उच्चार आणि आचार यांचा एकात्म आविष्कार हवा. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= 1) अक्षय्य ऊर्जा दिवस म्हणून कोणता दिवस पाळला जातो ? 20 ऑगस्ट 2) रोमन संख्याचिन्हांत 50 या संख्येला काय लिहितात ? L 3) गौतम बुद्धाचे मूळ नाव काय होते ? सिद्धार्थ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 जगन्नाथ दिंडे, सहशिक्षक, बिलोली 👤 अमिन जी. चौहान, सहशिक्षक यवतमाळ 👤 विजय रच्चावार, संपादक, नांदेड 👤 बाबू बनसोडे, सहशिक्षक, बिलोली 👤 राहूल कतूरवार, धर्माबाद 👤 सुधाकर अपुलवाड 👤 राजू गोडगुलवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *बढाई* काम कमी अन् श्रेयासाठी लढाई असते काम नकरणाराचीच जास्त बढाई असते काम करणाराचे काम झाकल्याने झाकत नसते बढाया मारणारांच्या पदरात कोणी काही टाकत नसते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *उत्सवांनंतरची रात्र आवर्जून पहावी. उत्सवाच्या काळात ती पोरकी होती. आपण तिच्याशी प्रतारणा करून स्वैर हिंडत होतो, पण तिच्या अजरतेवर कशाचाही ओरखडा उमटलेला नाही. अंधाराच्या रेशमानं तिच्या तारूण्याला वेढून टाकलेलं आहे. अमावस्येची चाहूल लागल्यानं तिचं रेशीम आधिक गाढं, काळं, होत जाणार आहे. तिच्या अजर तारूण्यात आतुन वाहणारं चैतन्याचं पाणी इतकं प्रबळ आहे की उत्सवातल्या पोरकेपणाचा विषण्ण थर वाहून गेलाय.* *ही उत्सवानंतरची पहिली रात्र. कुठे कुठे तांबूस अभ्र आहेत, पण ती रात्रीशी विसंगत वाटत नाहीत. रस्त्यांवर केवळ दृष्टीला मदत करण्याइतकाच उजेड आहे. ही रात्र आहे, रात्रीसारखी. तिला असं पंधरवाड्याच्या विरामानंतर भेटणं किती विलक्षण. लांबच्या पाणवठ्यावरनं टिटवीचा ओरडा ऐकू येतोय. डोक्याच्या खूप वर, आंब्याच्या गचपणात वाघळाच्या पंखांची फडफड, माडाच्या झावळ्यांमधनं; पावसाचा भास जागवत वारा फिरतोय. एकेक प्रकाशमान खिडकी मालवून; पापण्या जडावलेली घरं अंथरूणाला पाठ टेकतायत. रात्र एखाद्या सखीसारखी माथ्यावरून हात फिरवत म्हणतीये....* *"खूप झालं जगणं, आता झोपायचं..."* *तिच्या स्पर्शानं उर भरून येतं. डोळे डबडबतात. माथ्यावरून रात्रीचा हात आणि अगदी खोलातून झोप येत असते.* ••●⚜‼ *रामकृष्णहरी*‼⚜●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸 *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= सुख आणि दुःख हे प्रत्येक मानवी जीवनातले दोन वेगवेगळे रंग आहेत.सुखाच्या रंगात सारेच मिसळून जातात.त्यात एवढे रंगून जातात की,दुस-याची आठवणसुद्धा येत नाही.इतरांना आपल्यामध्ये सामावून घेण्याच्या प्रयत्नातही नसतात.एवढा अपार आनंद होतो.पण दु:खाचे तसे नाही.दु:खात मात्र त्याला सगळ्यांचीच आठवण येते.आपल्याला अशावेळी आपल्याजवळ कुणीतरी यावं आणि दिलासा द्यावा असं वाटतं.दु:ख पचविण्याची ताकत त्याच्यामध्ये कमी असते.म्हणून अशावेळी आपल्या मदतीला कुणीतरी यावं यासाठी धावा करतो.अशावेळी मात्र आपल्यापासून आपले आणि इतरही लोक दूर जातात.परंतू एक लक्षात ठेवायला हवे,सुखाच्यावेळी आपण कुणाला विचारले नाही मग दु:खाच्यावेळी कसे बरे विचारतील ? म्हणून माणसाने सुख असो वा दु:ख असो दोन्ही समान मानून सदैव पाठीशी रहावे.एकमेकांच्या मदतीला धावून जावे.हाच सुखदु:खाचा मानवी जीवनव्यवहार आहे.हा व्यवहार आपल्या व इतरांच्या जीवनात समानतेने व्हावा एवढेच ज्ञात असावे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *दाम करी काम* - पैशाने सर्व कामे साध्य होणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= करढोक नावाचा एक पक्षी नदीकाठी राहून व पाण्यात बुड्या मारून मासे धरून खातो. या जातीचा एक पक्षी म्हातारा झाल्याने त्याला पाण्यातले मासे दिसेनासे झाले. त्यामुळे काहीतरी ढोंग करून आपला चरितार्थ चालवण्याचा त्याने विचार केला, 'तो ज्या कालव्याजवळ बसला होता, त्यातला एक मासा पाण्याच्या पृष्ठभागावर आला असता, तो म्हातारा करढोक त्याला म्हणाला, 'अरे, तुला तुझ्या स्वतःच्या नि तुझ्या भाऊबंदांच्या जिवाबद्दल जर थोडी-बहुत काळजी वाटत असती तर कालव्याचा मालक एकदोन दिवसात कालव्यातलं सगळं पाणी बाहेर सोडणार आहे, याकरता तुम्ही आपले जीव वाचविण्यासाठी काहीतरी उपाय करा.' हे ऐकून तो मासा पाण्याच्या तळाशी गेला आणि सगळ्या माशांची सभा भरवून तो करढोकाचा निरोप त्याने सांगितला. तो ऐकताच आपल्यावर येणार्या संकटाची सूचना देणार्या त्या करढोकाचे आभार मानण्याचा व या संकटातून मुक्त होण्यासाठी उपाय सुचविण्याविषयी त्याला विनंती करण्याचा ठराव त्यांनी केला व तो त्या करढोकास कळविण्याचे काम त्या निरोप घेऊन येणार्या माशावर सोपविले. त्याप्रमाणे त्याने करढोकास जाऊन आपला ठराव त्याला कळविला. तो ऐकताच करढोक त्याला म्हणाला, 'या संकटातून वाचण्याचा एकच मार्ग आहे. तुम्ही सर्वांनी पाण्याच्या पृष्ठभागावर यावं म्हणजे मी तुम्हाला माझ्या घराशेजारच्या तलावात नेऊन पोहचवीन. ती गोष्ट माशांनी कबूल केली. मग करढोकाने त्यांना एका उथळ पाण्याच्या तलावात नेऊन सोडले व थोड्याच दिवसात त्या सर्वांना गट्ट केले. तात्पर्य - शत्रूच्या गोड शब्दावर विश्वास ठेवून त्याच्या जाळ्यात सापडणे हा मूर्खपणा होय. *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 08/02/2018 वार - गुरूवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९३६: १६ सप्टेंबर १९३५ रोजी नोंदणी झालेल्या बँक ऑफ महाराष्ट्र चे कामकाज सुरू झाले. २०००: छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारीस करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय. 💥 जन्म :- १८९७: भारताचे ३ रे राष्ट्रपती, शिक्षणतज्ञ. पद्मविभूषण व भारतरत्न डॉ. झाकिर हुसेन 💥 मृत्यू :- १९९४: कवी, कोशकार, इतिहास संशोधक, इतिहास लेखक, शाहिरी वाङ्मयाचे संग्राहक, संपादक व प्रकाशक यशवंत नरसिंह केळकर *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीड तास दिले लोकसभेत भाषण* ----------------------------------------------------- 2⃣ *केंद्र शासनाने जाहीर केलेल्या ‘सर्वांसाठी घरे २०२२’ या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनांतर्गत कामठी तालुक्यातील मौजा तरोडी (खुर्द) येथील प्रस्तावित ९४२ घरांच्या प्रकल्पाला देण्यात आली मंजुरी* ----------------------------------------------------- 3⃣ *इलाहाबाद - गंगेच्या शुद्धिकरणासाठी 20 हजार कोटींची तरतूद, शुद्धिकरणाच्या 189 प्रकल्पांपैकी 47 प्रकल्प पूर्ण* ----------------------------------------------------- 4⃣ *चंद्रपूर : प्रदूषण ओकणाऱ्या घुग्घुस येथील लायड्स स्टील कंपनीला 48 तासात बंद करण्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आदेश. काही वेळापूर्वीच कंपनीला दिले पत्र.* ----------------------------------------------------- 5⃣ *नागालँड विधानसभा निवडणुकीसाठी 231 उमेदवारांनी दाखल केले उमेदवारी अर्ज* ----------------------------------------------------- 6⃣ *विराट कोहलीच्या झंझावाती शतकाच्या जोरावर भारताने तिसऱ्या वनडेत दक्षिण आफ्रिकेचा 124 धावांनी धुव्वा उडवत वनडे मालिकेत विजयी हॅटट्रिक साधली.* ----------------------------------------------------- 7⃣ *भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेचा उडवला 178 धावांनी धुव्वा, एकदिवसीय मालिकेत घेतली 2-0 अशी विजयी आघाडी* ----------------------------------------------------- *आजची विशेष बातमी - राज्याचे शालेय शिक्षण आयुक्त मा. नंदकुमार साहेब हे नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांशी साधणार संवाद* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *जगाला प्रेम अर्पावे .....!* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *डॉ. झाकिर हुसेन* (८ फ्रेब्रुवारी १८९७ – ३ मे १९६९ ). भारताचे तिसरे राष्ट्रपती व एक ख्यातनाम शिक्षणतज्ञ. त्यांचा जन्म अफ्रिडी अफगाण मुसलमान कुटुंबात हैदराबाद (सिंध) येथे झाला. त्यांचे वडील वकील होते; पण झाकिर हुसेन नऊ वर्षांचे होते, तेव्हा ते वारले. त्यामुळे शिक्षणासाठी त्यांस अनेक ठिकाणी हिंडावे लागले. इटावा, अलीगढ आणि बर्लिन या ठिकाणी शिक्षण घेऊन अखेर त्यांनी अर्थशास्त्र विषयात पीएच्.डी. ही पदवी मिळविली. ही पदवी मिळविण्यापूर्वी ते १९२० मध्ये जामिआ मिल्लिया इस्लामिया या शिक्षणसंस्थेकडे आकर्षित झाले होते. जर्मनीहून भारतात परत येताच, त्यांनी आपले सर्व जीवन या संस्थेस समर्पित केले. १९२५ मध्ये ही संस्था दिल्लीस हलविण्यात आली व तिचे झाकिर हुसेन १९२६ मध्ये कुलगुरू झाले. त्यांनी जवळजवळ बावीस वर्षे (१९२६–४८) या संस्थेचे कार्य केले व तिला एका अभिनव शिक्षणसंस्थेचे स्वरूप दिले. शैक्षणिक वाटचालीतील त्यांची स्फूर्तिस्थाने दोन होती : म. गांधी व जर्मन शिक्षणशास्त्रज्ञ केर्शेनस्टाइनर. विद्यापीठात बौद्धिक स्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य व भाषण स्वातंत्र्य पुरेपुर असावे आणि व्यासंगी विद्वानांचे ते सभास्थान व्हावे; कारण अशा वातावरणात विद्यार्थ्यांचे नीतिधैर्य विकास पावते अशी त्यांची धारणा होती. त्यांनी स्वयंशिक्षणावर भर देऊन नव्या शैक्षणिक कल्पना जामिआ मिल्लियामध्ये रुजविल्या. ते अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू झाले (१९४८–५६). १९५६ साली ते राज्यसभेवर निवडून आले. पुढे ते बिहारचे राज्यपाल झाले आणि नंतर उपराष्ट्रपती म्हणून निवडले गेले (१९६२). १९६७ मध्ये ते भारताचे राष्ट्रपती झाले. अनेक शैक्षणिक समित्यांवर त्यांनी काम केले. त्यांपैकी यूनेस्को, विद्यापीठ अनुदान आयोग, मध्यवर्ती माध्यमिक मंडळ, विद्यापीठीय शैक्षणिक आयोग ह्या काही महत्त्वाच्या संस्था होत. त्यांना अनेक परदेशीय आणि भारतीय विद्यापीठांनी डी. लिट्. ही सन्माननीय पदवी देऊन गौरविले. भारत सरकारने त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा यथोचित गौरव पद्मविभूषण (१९५४) आणि सर्वोच्च असा भारतरत्न (१९६३) हा पुरस्कार देऊन केला. महात्मा गांधींचे ते प्रथमपासून निष्ठावान अनुयायी होते. महात्माजींनी त्यांना मूलोद्योग शिक्षण समितीचे १९३७ मध्ये अध्यक्ष केले. आयुष्यभर त्यांनी या शिक्षणपद्धतीचा पुरस्कार केला. त्यांनी शिक्षण, अर्थशास्त्र वगैरे विषयांचे आपले विचार अनेक व्याख्यानांद्वारे मांडले. त्यांपैकी काही व्याख्याने द डायनॅमिक युनिव्हर्सिटी या नावाने प्रसिद्ध झाली आहेत. जर्मन भाषेमध्ये त्यांनी म.गांधींचे चरित्र लिहिले, तसेच प्लेटोच्या रिपब्लिकचे उर्दूत भाषांतर केले. लहान मुलांकरिता काही गोष्टीही त्यांनी लिहिल्या. स्फटिकांचा आणि चित्रविचित्र खड्यांचा संग्रह करणे, हा त्यांचा आवडता छंद होता. ते ग्रंथप्रेमी होते व त्यांचे ग्रंथालय नव्या नव्या ग्रंथांनी नेहमी भरलेले असे. राष्ट्रपती असतानाच नवी दिल्ली येथे ते हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावले. एक नेमस्त, चारित्र्यवान व शिक्षणतज्ञ असा राष्ट्रीय मुस्लिम नेता म्हणून त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे. संदर्भ : Noorani, A. G. Zakir Husain, Bombay, 1967. लेखक : मु. मा. घाणेकर स्त्रोत : मराठी विश्वकोश *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= काहीच हाती लागत नाही तेंव्हा मिळतो तो अनुभव *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *1) राज्याचे शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत ?* मा. विनोद तावडे *2) राज्याचे शालेय शिक्षण आयुक्त कोण आहेत ?* मा. नंदकुमार *3) राज्याचे शालेय शिक्षण सचिव कोण आहेत ?* मा. असीम गुप्ता *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 सुनील ठमके, नांदेड 👤 रविंद्र भापकर, सहशिक्षक अहमदनगर 👤 राजेश्वर ऐनवाड, सहशिक्षक, धर्माबाद 👤 दिलीप खोब्रागडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *काम क्रोध मोह* काम क्रोध मोह हे विनाशाचे द्वार आहेत जेवढे वाढतील तेवढे डोक्यावर भार आहेत काम क्रोध लोभाने डोक्यावर भार होतो अती झाले म्हणजे केवढाही गार होतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *जीवन जगताना माणसाला अनेक गोष्टींचे अवधान ठेवावे लागते. त्याला विचारांचे अधिष्ठान ठेवावे लागते. याच विचारांचे आचारांत रूपांतर होते. त्यामुळे मूळचे विचारांचे अधिष्ठान सकारात्मक ठेवल्यास अनेक गोष्टी सुकर होतात. संवादाचे गाणे होते आणि हालचाली लयदार होतात. आयुष्य उत्सव होऊन जाते. गौतम बुद्ध सांगतात.,'तुम्ही मनाने जेवढे सकारात्मक आणि खुले असाल, तितके आयुष्य सोपे होते.'* *ब्रिटीश महाकवी जाॅन मिल्टनच्या एका कवितेत दोन मनांमधील संवाद आहे. तो जीवनाचे तत्वज्ञानच सांगतो. कवितेच्या पहिल्या भागात कवीची दृष्टी गेल्यानंतर एक मन शंका व्यक्त करते, की आजपर्यंत ईश्वरावर प्रामाणिकपणे श्रद्धा ठेवून सेवा केली, तरीदेखील त्याची दृष्टी गेली. प्रमाणिक सेवेचे हेच फलित आहे काय ? त्याच क्षणाला दुसरे सकारात्मक मन वेगळा विचार मांडते. ते संयम बाळगण्याचा सल्ला देते. ते म्हणते, ईश्वराचे सामर्थ्य प्रचंड आहे. संपूर्ण विश्वाचा रथ तो चालवतो. कवीची ईश्वरावरची श्रद्धा ढळली, तर ईश्वराला काहीच फरक पडणार नाही. उलट ढळलेली श्रद्धा त्यालाच त्रासदायक होईल. पुढे कदाचित मिळणारे आशिर्वाद मिळणार नाहीत.* *याच मिल्टनने सकारात्मक दृष्टीकोनाच्या जोरावर दृष्टी गेल्यावर दोन महाकाव्य लिहीली. "सकारात्मक विचारांमुळे मानसिक शक्ती प्राप्त होते आणि अशक्य कार्य करणे शक्य होते."* ••●🍁‼ *रामकृष्णहरी* ‼🍁●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= शेतकरी शेतात बियाणे टाकून येणा-या किंवा उगवणा-या धान्याची वाट पाहणे हे सत्य आशा आहे. कारण त्याला त्याच्या केलेल्या कामावर, मेहनतीवर विश्वास आहे. तो कधीही राशीचक्रावरील राशीनुसार लिहिलेल्या भाकितावर विश्वास ठेवत नाही किंवा त्यानुसार चालतही नाही. जे राशीनुसार चालतात ते मात्र त्यावर विसंबून राहून आपल्याच जीवनात चांगल्याप्रकारे चाललेल्या संसारगाड्याला खीळ बसवतात. त्यामुळे व्हायची ती प्रगती होत नाही आणि करता येत नाही. म्हणून माणसाने कोणत्याही भाकितावर विश्वास न ठेवता आपण आपले काम प्रामाणिकपणे आणि सातत्याने जीव ओतून केले तर नक्कीच जीवनात यश मिळते तसेच जीवन सुखी व समृद्ध होते यात संशय नाही. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उधारीचे पोते, सव्वा हात रिते.* - उधारीने घेतलेला माल नेहमीच कमी भरतो. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *स्वतःचे अस्तित्व जाणणे* एका बागेतील एका काजव्याने रात्रीच्या वेळी बागेतल्या वाड्यात दिवे पेटले असता त्याचा लखलखीत प्रकाश पाहून, स्वतःचा प्रकाश मिणमिणता आहे अशी कुरकुर चालविली. परंतु त्याच्या बरोबर असलेला काजवा शहाणा होता. तो म्हणाला, 'अरे, थोडा वेळ थांब, आणि काय मजा होते ते पहा.' काही वेळाने त्या वाड्यातील सर्व दिवे विझले व वाडा व काळोखाने भरून गेला. हे पाहून तो शहाणा काजवा आपल्या मत्सरी सोबत्याला म्हणाला, ' मित्रा, हे दिवे थोडा वेळ प्रकाश पाडतात, नि विझून जातात, पण आपली स्थिती तशी नाही. आपला प्रकाश थोडा असला तरी तो कधी नाहीसा होत नाही.' तात्पर्य :- एकदम श्रीमंती येऊन ती पुन्हा लवकर नाहीशी होण्यापेक्षा कायम टिकणारी मध्यम स्थिती फार चांगली.दुसऱ्याच्या दिखाऊ तात्पुरया असलेल्या बाबींवर दुर्लक्ष करून आपल्याकडे असलेल्या कायम बाबींवर लक्ष केंद्रित केलेले कधीही उत्तमच. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
मुलांना अवांतर वाचनासाठी पुस्तके यादी ही पुस्तके मुलांनी वाचायलाच हवीत. क्र. पुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक 01 तोत्तोचान चेतना सरदेशमुख नॅशनल बुक ट्रस्ट 02 एक होता कार्व्हर वीणा गवाणकर राजहंस प्रकाशन 04 काडेपेट्यांची करामत भाग1 रेखा माजगावकर राजहंस प्रकाशन 05 आपला स्वातंत्र्य लढा वि.स. वाळिंबे राजहंस प्रकाशन 06 काडेपेट्यांची करामत भाग2 रेखा माजगावकर राजहंस प्रकाशन 07 गंमतशाळा भाग1 राजीव तांबे राजहंस प्रकाशन 08 गंमतशाळा भाग2 राजीव तांबे राजहंस प्रकाशन 09 गंमतशाळा भाग3 राजीव तांबे राजहंस प्रकाशन 10 थोडे विज्ञान थोडी गंमत कुलकर्णी राजहंस प्रकाशन 11 कोंबडू आणि इतर कथा राजीव तांबे राजहंस प्रकाशन 12 मोरू आणि इतर कथा राजीव तांबे राजहंस प्रकाशन 13 मांजरू आणि इतर कथा राजीव तांबे राजहंस प्रकाशन 14 मगरू आणि इतर कथा राजीव तांबे राजहंस प्रकाशन 15 गणित गप्पा भाग1 मंगला नारळीकर राजहंस प्रकाशन 16 गणित गप्पा भाग2 मंगला नारळीकर राजहंस प्रकाशन 17 किमयागार अच्युत गोडबोले राजहंस प्रकाशन 18 देनिसच्या गोष्टी भाग1 द्रागुन्सकी ऊर्जा प्रकाशन पुणे 19 देनिसच्या गोष्टी भाग2 द्रागुन्सकी ऊर्जा प्रकाशन पुणे 20 रानातला प्रकाश जी.ए. कुलकर्णी ऊर्जा प्रकाशन पुणे 21 डॉ. सुस ऊर्जा प्रकाशन पुणे 22 शेरलीकहोम्सच्या चातूर्य कथा (भाग 1 ते 6) भालबा केळकर 23 पाडस राम पटवर्धन मौज प्रकाशन 23 द ब्रेड विनर मेहता प्रकाशन 24 परवाना मेहता प्रकाशन 25 शौजिया मेहता प्रकाशन 26 आफ्रिकन सफारी ऊर्जा प्रकाशन 27 पंखा प्रकाश संत मौज प्रकाशन 28 वनवास प्रकाश संत मौज प्रकाशन 29 झुंबर प्रकाश संत मौज प्रकाशन 30 शारदा संगीत प्रकाश संत मौज प्रकाशन 31 द बॉय इन स्ट्राइप्ड पायजमा मेहता प्रकाशन 32 एकविशंती रविंद्रनाथ टागोर साहित्य अकादमी 33 हास्य चिंतामणी चिं. वि. जोशी 34 बनगरवाडी व्यंकटेश माडगूळकर मौज प्रकाशन 35 महाभारतानंतच्या कथा महाश्वेतादेवी 36 हजार चुराशीर मां महाश्वेतादेवी 37 मीठ महाश्वेतादेवी 38 आमचा काय गुन्हा रेणू गावसकर मनोविकास 39 अग्नीपंख कलाम राजहंस प्रकाशन 40 खारीच्या वाटा ल.म.कडू राजहंस प्रकाशन 41 विचार तर कराल नरेंद्र दाभोलकर राजहंस प्रकाशन 42 एका दिशेचा शोध संदीप वासलेकर राजहंस प्रकाशन 43 मेळघाटावरील मोहोर मृणालिनी चितळे राजहंस प्रकाशन 44 यक्षांची देणगी जयंत नारळीकर मौज 45 प्रेमळ भूत. भाग 1 राजीव तांबे रोहन प्रकाशन 46 प्रेमळ भूत. भाग 2 राजीव तांबे रोहन प्रकाशन 47 प्रेमळ भूत. भाग 3 राजीव तांबे रोहन प्रकाशन 48 प्रेमळ भूत. भाग 4 राजीव तांबे रोहन प्रकाशन 49 रस्टीचे पराक्रम रस्कीन बॉंड नॅशनल बुक ट्रस्ट 50 मालगुडी डेज आर के नारायण नॅशनल बुक ट्रस्ट 51 पक्षी जाय दिगंतरा मारूती चित्तमपल्ली 52 रावीपार गुलझार मेहता प्रकाशन 53 काळी आई पर्ल बक मेहता प्रकाशन 54 नाईट मेहता प्रकाशन 55 किलिंग फिल्डस् मेहता प्रकाशन 56 हॅनाची सुटकेस ज्योत्स्ना प्रकाशन 57 गुलाबी सई राजीव तांबे ज्योत्स्ना प्रकाशन 58 होय मी सुध्दा राजीव तांबे ज्योत्स्ना प्रकाशन 59 कार्यरत अनील अवचट मौज 60 ॲगाथा ख्रिस्ती भाग 1 ते 20 रेखा देशपांडे पद्मगंधा प्रकाशन 61 फेलूदा. भाग 1 ते 6 अशोक जैन रोहन प्रकाशन 62 नापासांची शाळा रोहन प्रकाशन 63 व्योमकेश बक्षी. भाग 1 ते 6 रोहन प्रकाशन 64 व्यक्ती आणि वल्ली पु. ल. देशपांडे मौज 65 हसवणूक फसवणूक पु. ल. देशपांडे मौज 66 निवडक पु ल देशपांडे मॅजेस्टिक प्रकाशन 67 जंगल बूक रुडयार्ड किपलींग साकेत 68 माणसं अनिल अवचट मौज 69 कुसुमगुंजा जी. ए. कुलकर्णी 70 बखर बिम्मची जी. ए. कुलकर्णी 71 मुग्धाची रंगीत गोष्ट जी. ए. कुलकर्णी 72 खेकडा रत्नाकर मतकरी मेहता प्रकाशन 73 माकड मेवा द.मा मिरासदार मेहता प्रकाशन 74 रारंग ढांग प्रभाकर पेंढारकर मौज 75 फिडेल चे आणि क्रांती अरुण साधू राजहंस प्रकाशन 76 आणि ड्रॅगन जागा झाला अरूण साधू राजहंस 77 माओनंतरचा चीन अरूण साधू राजहंस 78 माझं लंडन मीना प्रभू पुरंदरे प्रकाशन 79 चिनीमाती मीना प्रभू पुरंदरे प्रकाशन 80 रोमायन मीना प्रभू पुरंदरे प्रकाशन 81 बब्बड. भाग 1 ते 4 राजीव तांबे मेहता प्रकाशन 82 ससोबा हसोबा. भाग 1 ते 6 राजीव तांबे मेहता प्रकाशन 83 बंटू. भाग 1 ते 2 राजीव तांबे मेहता प्रकाशन 84 फ्रॅंकलीनच्या गोष्टी. भाग 1 ते 10 अनुवादित मेहता प्रकाशन 85 पंचतंत्र मेहता प्रकाशन 86 काबुलीवाला रविंद्रनाथ टागोर मेहता प्रकाशन 87 पोस्ट मास्तर रविंद्रनाथ टागोर मेहता प्रकाशन 88 इसापनीती मेहता प्रकाशन 89 निळावंती मारूती चित्तमपल्ली 90 मानजातीची कथा साने गुरुजी साधना प्रकाशन 91 चंदूकाका निलमकुमार खैरे ज्योत्स्ना प्रकाशन 92 लाट ज्योत्स्ना प्रकाशन 93 शिवाजी ज्योत्स्ना प्रकाशन 94 रामायण ज्योत्स्ना प्रकाशन 95 महाभारत ज्योत्स्ना प्रकाशन 96 अजबखाना विंदा करंदीकर पॉप्युलर प्रकाशन 97 समिधा साधना आ
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 05/02/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९५२: स्वतंत्र भारतात प्रथमच सार्वत्रिक निवडणुका झाल्या. 💥 जन्म :- १९३६: कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचा जन्म. 💥 मृत्यू :- २००३: ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व महात्मा गांधींच्या हरिजन या मराठी अंकाचे संपादक गणेश गद्रे २००८: योग गुरू महर्षी महेश योगी *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *गेल्या २ वर्षांत केंद्र सरकारमध्ये जवळपास अडीच लाख नोक-या निर्माण झाल्या, अशी माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली* ----------------------------------------------------- 2⃣ *तिजोरीत खडखडाट नाही खणखणाट आहे, राज्याची अर्थव्यवस्था रूळावर - वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार* ----------------------------------------------------- 3⃣ *जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट बोर्डावर नामुष्की, बीसीसीआयची वेबसाईट निघाली विक्रीला* ----------------------------------------------------- 4⃣ *औरंगाबाद - औरंगाबादेत ८ एप्रिल रोजी स्वतंत्र धर्मासाठी लिंगायत समाजाचा मोर्चा, लिंगायत समन्वय समितीच्या बैठीत निर्णय* ----------------------------------------------------- 5⃣ *भारताच्या फिरकीपुढे द. आफ्रिकेचे लोटांगण, विराटसेनेची २-० आघाडी* ----------------------------------------------------- 6⃣ *इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधुला उपविजेतेपद, अंतिम सामन्यात बिव्हेन झँगने केला पराभव. १८-२१, २१-११, २०-२२ अशा तीन सेटमध्ये सिंधूवर मात* ----------------------------------------------------- 7⃣ *डावखुरा फलंदाज मनजोत कालराच्या शानदार शतकाच्या बळावर भारताने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियावर आठ विकेट राखून विजय मिळवत चौथ्यांदा अंडर -19 वर्ल्डकप जिंकला.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *कथा - बदल्याचा बळी* वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_2.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= कर्करोग वा कॅन्सर हा शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे उद्भवणारा रोग आहे.प्रत्यक्षात कॅन्सर म्हणजे एक रोग नाही. दोनशेहून अधिक प्रकारचे कॅन्सर आज ठाऊक आहेत. कॅन्सर कोणत्याही पेशीमध्ये, कोणत्याही उतीमध्ये आणि अवयवामध्ये होऊ शकतो. सर्व कॅन्सर मधील समान दुवा म्हणजे अनिर्बंध पेशींची वाढ. सामान्यपणे पेशी विभाजन क्रमाक्रमाने व नियंत्रित पद्धतीने होते. शरीराच्या आवश्यकतेनुसार नव्या पेशी जुन्या पेशींची जागा घेतात. पेशी विभाजनाची ही नेहमीची पद्धत आहे. कधी कधी पेशी विभाजन नव्या पेशीँची आवशकता नसताना होत राहते. या अतिरिक्त पेशींचे गाठोडे म्हणजे अर्बुद किंवा ट्यूमर. अर्बुदाचे दोन प्रकार आहेत. बिनाइन ट्यूमर म्हणजे कर्करोगाची गाठ. ही गाठ सहज काढून टाकता येते. अशा बिनाइन ट्यूमरच्या पेशी बाहेर पडून नव्या अवयवामध्ये नव्याने कर्करोगाच्या गाठी तयार करीत नाहीत. बहुतेक बिनाइन ट्यूमर प्राणघातक नाहीत.मारक गाठी (मॅलिग्नंट) कर्करोग. कर्करोगाच्या अनियमित आणि अनिर्बंध वाढणार्या पेशींच्या गाठीपासून मारक गाठी बनतात. या गाठी सभोवतालच्या उती आणि अवयवामध्ये पसरतात. गाठीमधून बाहेर पडलेल्यापेशी लसिका संस्थेमार्फत किंवा रक्तवाहिन्यामधून इतर अवयवांमध्ये प्रवेशतात. त्यामुळे मूळ ज्या अवयवामध्ये मारक गाठी झालेल्या असतात त्याहून वेगळ्या अवयवामध्ये कर्करोग पसरतो. या प्रकारास कर्कप्रक्षेप म्हणतात. जेव्हा कर्करोग मूळ अवयवामधून दुसर्या अवयवामध्ये प्रक्षेपित होतो त्यावेळी दुसर्या अवयवामधील कर्करोग पेशी मूळ अवयवामधील कर्कपेशीप्रमाणेच असतात. उदाहरणार्थ फुफ्फुसाचा कर्करोग मेंदूमध्ये स्थालांतरित झाल्यास मेंदूमधील कर्कपेशी या फुफ्फुस कर्कपेशीच असतात. अशा आजारास प्रक्षेपित फुफ्फु्स-कर्करोग म्हणतात. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= तुमच्या जीवनाला वळण देण्याचा एक छोटा प्रयत्न म्हणजे ध्येयवेडा प्रवास *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) ३९वे मराठवाडा साहित्य संमेलन कोठे झाले?* 👉 बीड *२) राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री कोण आहेत?* 👉 पंकजा मुंडे *३) बीसीसीआयचे नवीन महाव्यवस्थापक कोण आहेत?* 👉 साबा करीम *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 सौ. रंजना जोशी, सहशिक्षिका, धर्माबाद 👤 सदाशिव मोकमवार, येताळा 👤 निलेश गोधने, सहशिक्षक, नांदेड 👤 भीमराव वाघमारे 👤 संदीप मुंगले, धर्माबाद 👤 श्याम राजफोडे 👤 विठ्ठल पेंडपवार, नांदेड 👤 बाळासाहेब कदम, सहशिक्षक, धर्माबाद 👤 अच्युत पाटील खानसोळे, सहशिक्षक, नांदेड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *जाहिरात* जाहिरातीत खोटं ते खरं असे ठसवले जाते खोट्याला खरं म्हणून डोक्यात बसवले जाते विश्वसनिय वाटणारीही जाहिरात फसवी असते जाहिरात म्हणजे फक्त खिसे उसवा उसवी असते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रतिकूल परिस्थितीत सहाय्य करणारी माणसं ते निरपेक्ष करत नाहीत. आपण सतत त्यांच्या ताटाखालचं मांजर राहावं, अशी त्यांची धारणा असते. आजन्म लीन राहिलो की, अशी माणसं खुश असतात. पैसा, साधनसंपत्तीच्या जोरावर व्यक्तिगत प्रतिष्ठा जोपासण्याचा उद्योग अत्यंत चिड आणणारा आहे. 'शिक्षकदिनी' संस्थेतर्फे शिपायापासून प्राचार्यापर्यंत त्यांच्याप्रती आदर म्हणून एक छापील प्रमाणपत्र व फूल देऊन अध्यक्षांच्या हस्ते सत्काराचा कार्यक्रम पाहिला. सत्कार स्विकारल्या नंतर शिपाई ते प्राचार्य सर्वजण अध्यक्षांच्या नतमस्तक झाले. मूळ कार्यक्रमच मुळी सर्वांना वार्षिक दीन करण्याचा होता.* *समाजव्यवस्थाच अशी बनून गेली आहे की, नोकरदारांना खिंडीत गाठून लीन, दीन, मलीन, अधीन करत ठेवायचे. त्याचं रूपांतर पाठीचा कणा नसलेला संप्रदाय आकाराला येऊ लागला आहे. त्यांना मन, मत, मनगट असून नसल्यासारखे आहे. 'खाल मान्या, हो नाम्या' असं जीणं त्यांनी आयुष्यभर जगायचं. काही कर्तृत्व नसताना संस्थापकांचा मुलगा, नातु, सून, मुलगी अध्यक्ष बनत राहतात, तर शिपाई, लिपीक, प्राध्यापक, प्राचार्य रोज कणाकणाने 'एक दर्जे का नीचे का इन्सान' बनत अस्तित्वशून्य होताहेत.* *"समाज घडविणारे घटक अस्तित्वशून्य होणं, समाजाचा बुद्धिजीवी वर्ग मतिहीन करणे, त्यांना मतहीन बनवणे यासारखे सामाजिक अध:पतन दुसरे कोणते असू शकते ?"* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्य अधिक मौल्यवान आहे.कारण बाह्यसौंदर्य अधिक दिसण्यासाठी नानाप्रकारचे सौंदर्य प्रसाधने व मूल्य देऊन निर्माण केले तरी ते जास्त काळ टिकत नाही किंवा टिकवता येत नाही.ते अल्पकालीन आहे. आंतरिक सौंदर्य असे आहे की,त्याची किंमतही मोजून आणता येत नाही आणि अन्य माध्यमांतून प्राप्तही करता येत नाही.असे सौंदर्य आपल्या अंतःकरणात उपजतच असते फक्त त्याला योग्यप्रकारे हाताळता आले पाहिजे.ह्या आंतरिक सौंदर्यामुळे अनेक नाती जोडून जीवनातला आनंद उपभोगता येतो न इतरांनाही आपल्या आनंदात व इतरांच्या आनंदात भर पाडता येते तसेच कोणत्याही प्रकारचे मूल्य न देता शेवटपर्यंत टिकवता येते.फक्त त्याच्यासाठी आंतरिक तळमळ असायला हवी. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🎑📝🎑📝🎑📝🎑📝🎑📝🎑 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *आपले नाक कापून दुसर्याला अपशकुन.* - दुसर्याचे वाईट व्हावे म्हणून अगोदरच स्वतः चे वाईट करून घेणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= एका बेडकाचे पोर नदीकाठी बसून तेथे एका वेताच्या जाळीकडे मोठ्या कौतुकाने पाहात होते. त्याची आई जवळच होती. तिच्याजवळ त्याने त्या वेताच्या हिरव्या पानांची व त्यांच्या भक्कम कांडांची फार स्तुती केली. काही वेळाने मोठे वादळ झाले आणि त्याच्या जोराने ती वेताची जाळी उपटली गेली व सगळे वेत नदीतून सैरावैरा वाहू लागले. त्यातला एक मोडका वेत त्या बेडकीच्या हाती लागला. तो आपल्या पोरास दाखवून ती म्हणाली, 'मघाशी जो वेत तुला इतका भक्कम दिसत होता, त्याची आता काय स्थिती झाली आहे ती पाहिलीस का ?' तात्पर्यः - नाम बडे दर्शन छोटे ! अशा वस्तू बर्याच असतात. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🖥🖥🖥🖥🖥🖥🖥 *100% तंत्रस्नेही शिक्षक 2018* *DIECPD नांदेड* दिनांक02/02/2018 ते 03/02/2018 या दोन दिवशीय रोजी झालेल्या DIECPD नांदेड येथे 3 तालुक्यातील प्रशिक्षकांचे तंञस्नेही प्रशिक्षण संपन्न झाले. प्रशिक्षणाच्या सुरुवातीला *जेष्ठ अधिव्याख्याता मा.आठवले मॅडम(DIECPD नांदेड)* यांनी उपस्थित शिक्षकांना *100%तंत्रस्नेही शिक्षक जिल्हा* करण्यामागची भूमिका स्पष्ट केली,तसेच 100 % तंत्रस्नेही जिल्हा करण्यामध्ये उपस्थित असलेल्या शिक्षकांची भूमिका खुप मोलाची आहे.आपण सर्व जण या इतिहासाचे साक्षीदार असणार आहात व या महान अशा कार्याचा एक भाग आपण आहात अशा शब्दात गौरव उदगार काढले व शुभेच्छा दिल्या.💐💐💐💐💐💐 या नंतर उपस्थित सर्वांचे DIECPD मार्फत स्वागत करण्यात आले.💐💐💐💐 त्यानंतर नियोजनाप्रमाणे दोन दिवसात (लेवल वन) चे मोडुल timetable नुसार उपयुक्त( app )ची माहिती video निर्मिती , online test, wps office.,,.,.....अशा विविध उपयुक्त app ची माहिती व सोबतच कृती मोबाईल व लॕपटाॕप वर सर्वांच्या कडून करून घेतली. *(विषयाचे कृतीयुक्त मार्गदर्शन*) करण्यात आले. 👉 या दोन दिवसीय कार्यशाळेमध्ये 👉श्री.संतोष केंद्रे सर,श्री हेमंत देशपांडे सर ,श्री.दीपक भांगे सर,श्रीमती 👉शबनम शेख मॕडम, अश्विनी क्षत्रिय मॅडम,शोभा तोटावाड मॕडम, 👉अनिल कांबळे सर ,कौशल्या करवेडकर मॕडम ,अनुप नाईक सर , या सर्वांनी सुलभकाची भूमिका उत्कृष्ट पार पाडली. ☘🌺🖥☘🌺🖥☘ *संदेश* *'विज्ञान तंञज्ञानाची धरु या कास , करू या देशाचा विकास'.* *〰〰〰〰〰〰〰* *✍संकलन/ वृत्तांत लेखन* *🌹प्रशिक्षणार्थी*🌹 *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (स.शि.)* *ता.हदगाव जिल्हा नांदेड* 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
Subscribe to:
Posts (Atom)