✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 25 एप्रिल 2025💠 वार - शुक्रवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://summerknowledgepark.blogspot.com/2023/04/02.html?m=1••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌼 *_जागतिक मलेरिया दिवस_* 🌼••••••••••••••••••••••••••••••••••••🌼 *_राष्ट्रीय डीएन दिन _* 🌼••••••••••••••••••••••••••••• 🌼 *_ या वर्षातील ११५ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••• 🌼 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌼••••••••••••••••••••••••••••••••••••*२०००: वादग्रस्त आलमट्टी धरणाची उंची ५१९.६ मीटरपर्यंत (सध्याची उंची ५०६ मीटर) वाढविण्यास सर्वोच्‍च न्यायालयाने परवानगी दिली.यामुळे २५ वर्षे चालू असलेला न्यायालयातील वाद संपुष्टात आला**१९९२: मॉरिशसमध्ये दुसरी जागतिक मराठी परिषद भरविण्यात आली**१९८९: श्रीलंकेच्या संसदेने भारतीय वंशाच्या ३,३०,००० तमिळ जनतेला मताधिकार देण्याचा निर्णय घेतला.**१९८३: पायोनिअर-१० हे अंतराळयान सूर्यमालेच्या पलीकडे गेले.**१९६६: एका भूकंपामुळे ताश्कंद शहराचा मोठ्या प्रमाणावर विनाश झाला.**१९५३: डी.एन.ए.रेणूचे अंतरंग उलगडून दाखवणारा वॉटसन आणि क्रीक यांचा शोधनिबंध ’नेचर’ मासिकात प्रकाशित झाला.**१९०३: बॅरिस्टर मोहनदास गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेत वकिली व्यवसाय सुरू केला तसेच ब्रिटिश इंडियन असोसिएशनची स्थापना केली**१९०१: स्वयंचलित वाहनांना नंबर प्लेट सक्तीचे करणारे न्यूयॉर्क हे अमेरिकेतील पहिले राज्य बनले**१८५९: सुएझ कालव्याची पायाभरणी झाली.* 🌼 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🌼•••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८९: श्रीया सचिन पिळगांवकर -- सिने-अभिनेत्री* *१९८८: अनिकेत जयंतराव देशमुख -- कवी, स्तंभलेखक* *१९८७: सुरुची अडारकर -- भारतीय मराठी अभिनेत्री**१९७४: दयासागर बाबुराव बन्ने -- कवी, लेखक, समीक्षक* *१९७४: वैशाली सामंत -- भारतीय संगीतकार, गीतकार आणि पार्श्वगायिका**१९७३: बंडूकुमार श्रीरामजी धवणे -- लेखक, संपादक, प्रकाशक* *१९६८: डॉ. मार्तंड दिनकरराव कुळकर्णी -- संत साहित्याचे अभ्यासक,लेखक* *१९६५: अरुण शिवचरण मोडक -- कथा लेखक, वृत्तपत्रांतून नियमित लेखन* *१९६३: प्रा. डॉ. नंदा जयंत पुरी -- लेखिका, संस्कृत भाषा विषयतज्ञ* *१९६१: करण राझदान – अभिनेता, लेखक, दिग्दर्शक**१९५२: अरुण काळे --- मुक्त छंदात काव्य रचना करणारे मराठी कवी (मृत्यू: २० फेब्रुवारी २००८ )* *१९५१: नारायण गोविंदराव अंधारे -- प्रसिद्ध कवी**१९४५: मनोहर रणपिसे -- ज्येष्ठ गझलकार, कवी व लेखक* *१९४३: इ. मो. नारनवरे -- ज्येष्ठ कवी, आंबेडकरी विचारवंत**१९४०: अल पचिनो – हॉलिवूडमधील अभिनेता**१९२९: डॉ. विठ्ठलराव रामजी जीभकाटे -- ज्येष्ठ योगतज्ज्ञ तथा लेखक**१९२४: डॉ.वसंत कृष्ण नाईक -- चरित्रकार, लेखक* *१९१९: हेमवतीनंदन बहुगुणा -- उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री (मृत्यू: १७ मार्च १९८९ )**१९१८: शाहू मोडक – हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते (मृत्यू: ११ मार्च १९९३ )**१९१०: शंकर नारायण बर्वे -- सूचिकार (मृत्यू: २३ डिसेंबर १९९६ )**१८७४: गुग्लिएल्मो मार्कोनी – रेडिओचे संशोधक (मृत्यू: २० जुलै १९३७ )* 🌼 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🌼••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१: राजन मिश्रा -- बनारस घराण्याचे ज्येष्ठ गायक (जन्म: २८ ऑक्टोबर १९५१ )* *२००५: विश्वनाथ बागुल -- संगीत रंगभूमीवरील गायक,नट**२००३: लिन चॅडविक – ब्रिटिश शिल्पकार, लोखंड,पोलाद,पितळ,प्लॅस्टर,काच आदी माध्यमांचा उपयोग करुन त्यांनी शिल्पे घडविली. (जन्म: २४ नोव्हेंबर १९१४ )**२००२: इंद्रा देवी – लाटव्हियाच्या योगशिक्षिका (जन्म: १२ मे १८९९ )**१९९९: पंढरीनाथ रेगे – कथाकार, साहित्यिक (जन्म: २३ सप्टेंबर १९१८ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*उन्हाळी सुट्टी : ज्ञानाशी गट्टी*समर व्हॅकेशन उपक्रम *आजचा जिल्हा - अमरावती*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी व प्रश्न सोडविण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द; पुढील तीन दिवसांत सोडावा लागणार भारत देश, CCS चा कठोर निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा पुढे ढकलला; पहलगामच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पहलगामच्या दोषींना कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा होईल, दहशतवाद्याना मातीत गाडण्याची वेळ आली आहे - पंतप्रधान मोदी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग शक्तिपीठ महामार्गाला जोडले जाणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मेंढ्या चारताना अभ्यास अन् फिरत फिरत शिकला; UPSC परीक्षेत मेंढपाळ बिरदेव सिध्दापा डोणे झाला IPS*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महाराष्ट्रातील 500 पर्यटक मायभूमीत उतरले; उर्वरीत 232 प्रवाशांसाठी आणखी एका विमानाचे उड्डाण*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *RCB ने राजस्थानला 11 धावाने हरवले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्रीकृष्ण कतूलवार, शिक्षक, ढाणकी👤 अनिकेत देशमुख👤 शादुल्ला शेख, धर्माबाद👤 अनिल इबितदार 👤 पंडित कदम 👤 कांतराव राजरवार 👤 श्रीनिवास नरडेवाड, शिक्षक, धर्माबाद 👤 राजेश अवधूतवार 👤 चंद्रकांत तनमुदले*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 47*मांसभक्षक प्राणी विक्राळ रूप**गळ्याभोवती माझ्या असतात केस खूप* *शक्तीशाली पाय मजबुत जबडा* *खेचत नेतो प्राणी तगडा* *भोजनासाठी करतो शिकार ताजा* *संकटात आहे जंगलचा राजा*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - सौ. प्रभावती आनंदराव जवादवाड, विज्ञान शिक्षिका, जि. प. हा. नायगाव (बाजार) जि. नांदेड कालच्या कोड्याचे उत्तर - सफरचंद~~~~~~~~~~~~~~~~विज्ञान कोडेला प्रतिसाद नोंदविणारे वाचक उज्वला इंगळे, सिद्धार्थ शिरसे, भाग्यश्री बाभळीकर, प्रथमेश येवतीकर, सुरेश द्रोपतवार, लालन्ना गुडलावार, सुंदरसिंग साबळे, माधव तनमुदले, अर्चना नंदगावकर, सुनिता भुरे, श्रावणी भुसेवार, सौ. लिना सुपारे, प्रतिक उकलेमनःपूर्वक अभिनंदन ......!••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सर्व उदात्त कार्यामागे त्याहून उदात्त विचार व विचारप्रणाली हवी; प्रत्यक्ष कृती ही विचार व विचारप्रणालींहून अधिक उदात्त ठरते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २२ एप्रिल २०२५ ला पहलगाम मध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किती पर्यटक मृत्युमुखी पडले ?२) बौद्ध धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता ?३) महात्मा फुल्यांनी शेतकऱ्यांच्या दुःखाला वाचा फोडण्यासाठी कोणत्या ग्रंथाची रचना केली ?४) 'केलेले उपकार विसरणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) टेबल लँड या नावाने कोणता भाग ओळखला जातो ? *उत्तरे :-* १) २६ पर्यटक २) त्रिपीटक ३) शेतकऱ्यांचा आसूड ४) कृतघ्न ५) पाचगणी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *पर्वत कसे निर्माण झाले ?* 📙 टेकडी, डोंगर, शिखरे व पर्वत या प्रत्येक शब्दाला एक विशिष्ट अर्थ आहे. सपाटीच्या मधील एखादा उंचवटा म्हणजे टेकडी बनते. वालुकामय प्रदेशात अनेक टेकड्या असतात. खडकाळ प्रदेशातील जास्त उंच भागातही टेकड्या असतात. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर जर लाव्हारस एकाच मुखाभोवती साठला गेला तर हळूहळू उंच डोंगर बनू लागतो. क्वचित हा उद्रेक फार मोठा असेल, तर मैलोगणती पसरलेले डोंगरांचे स्वरूप असू शकते; पण शिखरे व पर्वत ही संज्ञा मात्र उंचच्या उंच पसरलेल्या पर्वतराजींनाच सहसा लावली जाते. याखेरीज पठार स्वरूपातही काही वेळा डोंगर आढळतात. ज्यावेळी एखादी भूगर्भीय हालचाल थोड्याच मर्यादेत खालीवर होऊन थांबते, तेव्हा ही अनाकलनीय पठारे तयार होतात. पाचगणीचे टेबललँडचे पठार हे असेच. तिबेटचे पठार याचीच फार मोठी आवृत्ती म्हणावी लागेल.जगातील खऱ्या पर्वतांत मोजक्यांचा समावेश होतो. सर्वात उंच, सर्वात लांबवर पसरलेली, सर्वात जास्त उंच शिखरे असलेली पर्वतराजी म्हणजे हिमालय काराकोरमची. याशिवाय आल्प्स, अँडीज व रॉकी या तीन पर्वतराजी या प्रकारात मोडतात. आंतरखंडीय भूकवचाच्या सरकण्याच्या प्रक्रियेत सरकणारा एक भूखंड (भारत) स्थिर भूखंडावर (आशिया) आदळला. हळूहळू जामीन वर उचलली गेली. त्यातून हिमालय पर्वत निर्माण झाला. अन्य पर्वतही असेच निर्माण झाले आहेत. चारही ठिकाणी ही प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या पर्वतराजींची उंची हळूहळू वाढतच आहे.लाव्हारसाच्या उद्भवातून निर्माण होणारे पर्वत म्हणजे इटलीतील व्हेसुव्हियस, जपानमधील फुजी, हवाईमधील मोनाक्रिआ ही प्रसिद्ध उदाहरणे. मोनाक्रिआबद्दल तर असे म्हणता येईल की, हा पाण्याखाली समुद्राच्या तळाशी सहा हजार मीटर खोल सुरू होतो व पाण्यावर चार हजार दोनशे पाच मीटर उंच आहे. उंची समुद्रसपाटीच्या वर मोजली जाते, अन्यथा याचीच उंची दहा हजार मीटरची भरावी. या प्रकारच्या पर्वतांचे वैशिष्ट्य म्हणजे महाकाय असे एकच शिखर व तेथून दूरवर पसरत गेलेला खडबडीत उतार. या उतारावर काही घळी आढळतात. पण त्या खूपच उथळ असतात.पर्वतांचे वैशिष्टय़ म्हणजे तेथील हवामान. पर्जन्यमान व वनराई. अफाट उंचीमुळे पावसाचे ढग अडतात. मोजक्या भागात खूप पाऊस पडतो. तो वेगाने वाहून जाताना स्वतःबरोबर खडकांचे कण व माती धुपून नेतो. या उलट दुसऱ्या बाजूला म्हणजे वाऱ्यांच्या उलट दिशेला उजाड वातावरण राहते. अल्प पर्जन्यमानाने हा भाग दुष्काळी बनतो. हिमालयामुळे अडणारे मान्सूनचे वारे गंगायमुना खोरे समृद्ध करतात, तर तिबेटचा पश्चिमेचा भाग अल्प पावसाचा, उजाडच ठेवतात. पर्वतांची उंची वाढते, तसे तापमान कमी होत जाते. एक वेळ अशी येते की त्या उंचीला सहसा शून्याच्या आसपास तापमान राहते. मग कायम ही शिखरे बर्फाच्छादित राहू लागतात. मग कितीही उष्ण प्रदेशात असली तरीही ही अवस्था कायम राहते. सहा ते सात हजार मीटरदरम्यान ही बर्फाची रेषा कायम बदलत राहते. यावरचे सर्वच भाग पूर्णतः उजाड असतात. वनस्पती व प्राणीजीवन या उंचीवर राहु शकत नाही.दोन पर्वतांमधील घळींमध्ये मात्र हिरवीगार जंगले, नद्यांचे प्रवाह व त्यांच्या आसपास मानवी वस्ती जगभर आढळते. मुख्यतः गुरे पाळणे, थोडीफार शेती, मेंढीपालन या जोडीला अलीकडच्या काळात वाढत चाललेला पर्यटन व्यवसाय हे या डोंगरखोऱ्यातील मुख्य जीवित साधन. भारतातील उत्तमोत्तम अशी पर्यटन स्थळे हिमालयाच्या कुशीत विसावलेली आहेत. अफाट उंचीवरून दूरवरचा दिसणारा निसर्गरम्य परिसर न्याहाळत मजेत वेळ घालवण्यापेक्षा दुसरा पर्यटनाचा आनंद तो कोणता ?‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मिथ्या मायाजाळ मृगजळ बाधा । लागलासे धंदा संसारीया ॥१॥आलेंरे आलेंरे हाकित टाकित । मूढा गिवसीत काळचक्रीं ॥२॥बंधनापासूनि बांधलासे पायीं । बुडतों मी डोहीं निर्जळा ये ॥३॥कोण भरंवसा धरिलासे जिवीं । बळीया सोडवी कदा काळीं ॥४॥पुत्रपत्नी बंधु म्हणसील झणी । धांवोनि निर्वाणीं पाव आतां ॥५॥नामा ह्मणे वेगीं सावधान व्हावें । शरणही जावें पांडुरंगा ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••लाख, करोड रुपयाच्या बंगल्यात जरी पंचपक्कवानाचे चविष्ट पदार्थ बणवले जात असले तरी त्याच पदार्थाचा डब्बा तयार करून जंगलात एखाद्या वृक्षाखाली निवांत बसून मोठ्या आवडीने जेवणाचा आनंद घेतला जातो. विशेष म्हणजे मनाला समाधान मिळते. कदाचित त्या वृक्षाची किंमत शानदार बंगल्यापेक्षा जास्त असू शकते. कारण ते स्थळ आणि वृक्ष जगावेगळे असू शकतात. ते कोणाच्याही मदतीविना कशाप्रकारे जगून दाखवतात व आपलेसे करतात त्या वृक्षाकडून शिकण्यासारखे बरेच काही असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *शपथ*कोकणातले लोक देवभोळे, श्रद्धावान खऱ्या खोट्याचा निर्णय देवळात लावणारे, देवापुढे शपथ घेऊन कोणी खोटे बोलू शकणार नाही असा विश्वास बाळगणारे त्या विश्वासास जागणारे.कोकणातल्या एका शेतकऱ्याची अवजारे गेली. शेतकऱ्याला वाटत होतं. ती चोरली शेतकामावर येणाऱ्या मजुरांनीच. पण चोरी केल्याचं कोणीच कबूल करीत नव्हतं. शेवटी देवळात देवासमोर शपथेवर तसं प्रत्येकानं सांगावं असं गावकऱ्यांनी ठरविलं. शेजारच्या गावात जागृत देवस्थान होतं. तिथं जाऊन शपथ घेण्याचा निर्णय सगळ्यांना मान्य झाला.प्रमुख गावकऱ्यांसह शेतकरी शेतकामगारांना घेऊन शेजारच्या गावात पोचला. त्यांना दवंडी पिटलेली ऐकू येऊ लागली. जवळ गेल्यावर सगळं स्पष्ट ऐकू आलं.‘एकाऽ हो ऐका, आपल्या गावातल्या देवळातील सुप्रसिद्ध घंटा चोरीला गेली आहे. जो कुणी चोर पकडून देईल, चोरी कुणी केली सांगेल त्याला मोठं बक्षीस दिलं जाईल.दवंडी ऐकून शहाणा शेतकरी बरोबरच्या लोकांना म्हणाला, आपण इथूनच परतू. देवासमोरची घंटा चोरीला गेली. तिचा शोध लागत नाही. चोर सापडत नाही. मग माझी अवजारं चोरणाऱ्या चोराचा पत्ता कसा लागणार ?देवावर कितीही श्रद्धा असली तरी आपले प्रश्न सोडविण्यात अंधश्रद्धा उपयोगी पडत नाहीच.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment