✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04 एप्रिल 2025💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/sLZfHuz1NoyP6od8/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🔆 *_ या वर्षातील ९४ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🔆 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔆••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९०: लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार**१९८४: भारताचा पहिला अवकाशयात्री राकेश शर्मा यांचे सोविएत अवकाशायन सोयुझ टी- ११ द्वारे उडान**१९६८: मेम्फिस,टेनेसी येथे जेम्स अर्ल रे याने मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर) यांची हत्या केली**१९६८: ’नासा’ने ’अपोलो-६’ चे प्रक्षेपण केले**१९४९: पश्चिम युरोपातील अकरा देश आणि अमेरिका अशा १२ देशांनी संरक्षणविषयक सामंजस्य करार करुन ’नाटो’ची (NATO) स्थापना केली.**१९४४: दुसरे महायुद्ध – ब्रिटिश व अमेरिकन फौजांनी रुमानियातील बुखारेस्टवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात ३००० नागरिक ठार झाले.*🔆 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🔆••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८८: विजय गंगाप्रसाद देवडे -- लेखक* *१९८०: शेख पीरपाशा ईसाक -- कवी* *१९७६: विजय निळकंठ वाटेकर -- कवी**१९७२: अजय देशपांडे -- लेखक, कवी, गझलकार, समीक्षक* *१९७१: हेरंब कुलकर्णी -- मराठी वैचारिक आणि शिक्षणविषयक लेखन करणारे लेखक**१९६९: पल्लवी जोशी -- भारतीय अभिनेत्री, लेखिका आणि चित्रपट निर्माती* *१९६८: बबन मारोतराव आव्हाड -- लेखक, कवी* *१९६६: स्मिता श्रीनिवास आपटे -- लेखिका**१९६१: डॉ. सुधीर अनंत काटे -- कवी, लेखक* *१९६०: राजेंद्र विश्राम देसले -- चरित्रकार, कथा लेखक* *१९५९: नामदेव राठोड -- कवी**१९५८: नारायण वामनराव जोशी -- लेखक, धडपड मंच संयोजक तथा निवृत्त शिक्षण उपसंचालक* *१९५८: अरुण धोंडिबा घोडे (देशमुख) -- प्रसिद्ध लेखक, चित्रकार , अनुवाद, पत्रकार**१९५६: प्रकाश (अप्पा) जाधव -- लेखक* *१९५५: प्रेमा नारायण -- अभिनेत्री-नर्तिका**१९५४: परवीन बाबी -- भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल (मृत्यू: २० जानेवारी २००५ )**१९५३: सुरेश माणिकराव कुलकर्णी -- मुक्त पत्रकार, लेखक**१९५२: चंद्रशेखर नार्वेकर(एन.चंद्रा) -- भारतीय निर्माता, लेखक आणि दिग्दर्शक* *१९४९: नंदकुमार जयराम मुरडे -- कवी, लेखक**१९४८: महावीर रामचंद्र जोंधळे -- प्रसिद्ध कवी, कथाकार, बालसाहित्यकार, पत्रकार**१९४७: मच्छिंद्र कांबळी -- मालवणी नटसम्राट मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते,प्रसिद्ध नाट्यनिर्माते (मृत्यू: ३० सप्टेंबर २००७ )**१९४६: प्रभाकर लक्ष्मण मयेकर -- मराठी नाटककार, कथाकार (मृत्यू: १८ ऑगस्ट २०१५ )**१९३०: निळू फुले -- प्रसिद्ध मराठी रंगभूमी व चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत अभिनेते (मृत्यू : १३ जुलै २००९ )**१९३८: किशोर दिपचंद हिवाळे -- लेखक* *१९३८: प्रा. डॉ.अजीज नदाफ -- मराठी साहित्यिक, मराठी शाहिरीचे अभ्यासक, पुरोगामी वैचारिक चळवळीतील कार्यकर्ते* *१९३३: रामचंद्र गंगाराम तथा ’बापू’ नाडकर्णी – डावखुरे मंदगती गोलंदाज (मृत्यू: १७ जानेवारी २०२० )**१९२६: प्रा. बाळ केशव सावंगीकर -- लेखक**१९२१: हरि कृष्ण लाल भगत -- माझी केंद्रीय मंत्री (मृत्यू: २९ ऑक्टोबर २००५ )**१९१९: भालचंद्र महाराज कहाळेकर -- व्यासंगी अध्यापक,कुशल संघटक,प्रभावी भाषोपासक (मृत्यू: २८ मे १९७५ )**१९०२: पं नारायणराव व्यास – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक (मृत्यू: १ एप्रिल १९८४ )**१८४२: एडवर्ड लूकास – फ्रेन्च गणिती (मृत्यू: ३ ऑक्टोबर १८९१ )**१८२३: सर कार्ल विल्हेम सिमेन्स – जर्मन/ब्रिटिश विद्युत अभियंता,(मृत्यू: १९ नोव्हेंबर १८८३ )* 🔆 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🔆••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००१: गोविंद मल्हार कुलकर्णी -- समीक्षक( जन्म: २१ डिसेंबर १९१४ )**२०००: नरेश कवडी -- भाषातज्ञ, कथाकार, समीक्षक, ज्ञानेश्वरीचे चिकित्सक अभ्यासक आणि अनुवादक (जन्म: ५ ऑगस्ट १९२२ )* *१९९६: आनंद साधले – संस्कृत वाङ्मयातील अनेक ग्रंथांचा मोठ्या रसाळ पद्धतीने मराठीत परिचय करुन देणारे साहित्यिक (जन्म: ५ जुलै १९२० )**१९८७: सच्चिदानंद हिरानंद वात्स्यायन तथा ’अज्ञेय’ – ज्ञानपीठ पारितोषिक (१९७८) व साहित्य अकादमी पुरस्कार (१९६४) विजेते हिन्दी लेखक व वृत्तपत्रकार (जन्म: ७ मार्च १९११ )**१९७९: पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष आणि ९ वे पंतप्रधान झुल्फिकार अली भूट्टो यांना फाशी (जन्म: ५ जानेवारी १९२८ )**१९६८: मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर) – कृष्णवर्णीयांचे गांधी म्हणून ओळखले जाणारे अमेरिकेतील मानवी हक्क कार्यकर्ते आणि नोबेल पारितोषिक विजेते यांची हत्या (जन्म: १५ जानेवारी १९२९ )**१९२३: जॉन वेन – ब्रिटिश गणितज्ञ (जन्म: ४ ऑगस्ट १८३४ )**१६१७: जॉन नेपिअर – स्कॉटिश गणितज्ञ, लॉगॅरिथम सारणीचे जनक (जन्म: १५५०)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मतदार राजा जागा हो ....!*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना मोठा झटका; दरकपातीला स्थगिती, 850 रुपयांचे वीजबिल 1000 रू. राहणार *•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अमेरिकेतील टॅरिफ टॅक्सप्रणालीचा जगभरातील देशांना शॉक; भारतावर डिस्काउंटेड रेसिप्रोकल टॅरिफ धोरणाचा होणार परिणाम*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सोलापूर जिल्ह्यात 3 ठिकाणी भूकंपाचे धक्के; 2.6 रेक्टर स्केलचा हादरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाराष्ट्रात वादळवारे.. राज्यातील अनेक जिल्ह्यात गारांसह अवकाळी पाऊस; भंडाऱ्यात दोन शेतमजूरांचा मृत्यू, फळबागा कोलमडल्या, जनावरं होरपळली*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशू कक्षात आग, सतर्कतेनं 66 बाळं सुखरुप*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सिंगापूरच्या धर्तीवर महाराष्ट्रात जागतिक कौशल्य केंद्र, रोजगाराच्या आंतरराष्ट्रीय संधी; ओंग मिंग फुंग यांची मुंबईला भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *सारा तेंडुलकर झाली मुंबई फँचायझीची मालकीण; सचिन तेंडुलकरच्या लेकीचं क्रिकेटच्या मैदानावर पहिलं पाऊल*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 हेरंब कुलकर्णी , शिक्षणतज्ञ👤 अंकुश शिंगाडे , साहित्यिक, नागपूर👤 भोजराज शंकर , जारीकोट👤 प्रताप रायघोळ 👤 रमेश येलमे मंगनाळीकर 👤 चंद्रकांत अमलापुरे, शिक्षक, नायगाव👤 बापूराव वाघमारे 👤 राजेंद्र देसले 👤 श्याम पांचाळ 👤 गणेश G. कोकुलवार, सामाजिक कार्यकर्ते, नांदेड👤 डूमणे शिलवंत 👤 शिवाजी भोसले 👤 श्याम लोलापोड 👤 राम गंगाधर नाइनवाड👤 प्रवीण पाटील *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 33*वळणावळणाची धरती मी वाट**पाय नाहीत तरी धावतो सुसाट**बदलून कपडे फिरतो सारे रान**घेतो मी चाहूल जरी नसतील कान**जेंव्हा मी बघतो उंचावून मान**सर्वच धावतात वाचविण्यास प्राण**ओळखा पाहू मी आहे कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - सौ. प्रभावती आनंदराव जवादवाड, विज्ञान शिक्षिका, जि. प. हा. नायगाव (बाजार) जि. नांदेड कालच्या कोड्याचे उत्तर - ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आलेल्या संधीचा योग्य फायदा घेणारे व्यक्ती जीवनात यशस्वी होते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) "हाथी घोडे, तोफ तलवारे, फौज तो तेरी सारी है, पर जंजिर मे जकडा राजा मेरा, अब भी सब पे भारी है!" या काव्यपंक्ती कोणत्या चित्रपटातील आहेत ?२) सन १९६९ मध्ये 'मिझो नॅशनल फ्रंट' ( MNF ) या संघटनेची स्थापना कोणी केली ?३) मुंबईत ११ जुलै १८५९ रोजी पहिली कापड गिरणी कोणी सुरु केली ?४) 'भाषण ऐकणारे' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) जम्मू काश्मीरला मिळणारी पहिली वंदे भारत ट्रेन केव्हापासून धावणार आहे ? *उत्तरे :-* १) छावा २) लालडेंगा ३) कावसजी दावर ४) श्रोते ५) १९ एप्रिल २०२५*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *पॅरॅसिटॅमॉल कशासाठी वापरतात ?* 📙 औषधांच्या दुकानात जाऊन बर्याचदा तुम्ही तापासाठीच्या गोळ्या आणल्या असतील. क्रोसिन, मेटॅसीन, पॅमाॅल अशा विविध नावांनी विकल्या जाणाऱ्या या गोळ्यांमध्ये 'पॅरॅसिटॅमॉल' नावाचे एक औषध असते हे तुम्हाला ठाऊक आहे काय ?पॅरासिटेमॉल हे औषध गोळ्यांच्या तसेच पातळ औषधाच्या स्वरूपात मिळते. या औषधामुळे ताप कमी होतो. मेंदूतील तापमानाचे संतुलन करणाऱ्या केंद्रावर या औषधामुळे परिणाम होतो व ताप कमी होतो. साहजिकच कोणत्याही तापासाठी पॅरासिटामॉल हे औषध घेतल्यास ताप कमी होतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी ताप हा रोग नाही तर ते केवळ रोगाचे लक्षण आहे. घरात मेलेल्या उंदराचा वास येत असेल तर अत्तर टाकून व सेंट फवारून काही काळ तो वास घालवता येईल; पण दुर्गंधी कायमची घालावयाची असल्यास मेलेला उंदीर शोधून तो फेकून देण्याखेरीज दुसरा उपाय नाही. तसेच ताप ज्या रोगामुळे होतो तो रोग बरा केल्याखेरीज ताप कायमचा बरा होणार नाही.ताप केव्हा येतो, किती वेळ राहतो, जास्त असतो वा कमी, यावर रोगांचे (जसे हिवताप, क्षयरोग) निदान अवलंबून असते. त्यामुळे ताप आल्या आल्या पॅरासिटेमॉलच्या गोळ्या घेतल्याने निदानात अडचण येऊ शकते. ताप आल्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याखेरीज औषध घेऊ नये. कोणतेही औषध दुष्परिणामरहित नसते. त्यामुळे आवश्यकता असल्यासच औषध घ्यावे. खरे तर अंग थंड पाण्याने पुसणे, कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवणे या घरगुती उपायांनीही ताप उतरतो. प्रसंगी या उपायांचा वापर करावा.सर्दी, खोकला अशा सामान्य रोगात येणार्या तापासाठी हे औषध घ्यायला हरकत नाही. ताप उतरण्याखेरीज हे औषध वेदनाशमनही करते व सूजही उतरवते.डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षितयांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देव दगडाचा भक्त हा मावेचा । संदेह दोघांचा फिटे कैसा ॥१॥ ऐसे देव तेहि फोडिले तुरकीं । घातले उदकीं बोभातीना ॥२॥ ऐसिया देवासी वाहिले टिळे डोळे । भक्त बाळे नागविले ॥३॥ ऐसीहि दैवतें नको दावूं देवा । नामा म्हणे केशवा विनवितसे ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणी आपल्याकडे रागाने बघण्याऐवजी आपल्याकडे बघून हसत असेल तर जास्त मनावर घेऊ नये.निदान ती व्यक्ती हसण्याचा तरी प्रयत्न करत असते. म्हणजेच त्या हसण्यामागे काहीतरी दडले असणार. ज्या व्यक्तीला या प्रकारचे गुण दिसत असतात ती समोरची व्यक्ती वाईट असेलच असेही नाही. म्हणून लहान, सहान गोष्टीवरून वाद करू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• एका राजाजवळ एक हत्ती होता. तो त्याला अत्यंत प्रिय होता. तो हत्ती स्वामीभक्तअसण्याबरोबरच चांगला योद्धा होता. जेंव्हा केंव्हा राजाने त्याच्यावर बसून युद्ध केले तेंव्हाराजा त्यात विजयी झाला. काही काळ लोटल्यानंतर हत्ती वृद्ध होतचालला त्यामुळे राजाने त्याला युद्धात घेवून जाणे बंद केले. मात्र राजाचे त्या हत्तीवरचे प्रेमकाही कमी झाले नाही. एके दिवशी तो हत्ती सरोवरामध्ये पाणी पीत होता. सरोवरामध्येपाणी कमी होते त्यामुळे हत्ती पुढे पुढे गेला आणि दलदलीत फसला. वृद्धावस्थेमुळे हत्तीला दलदलीतून निघणे शक्यनव्हते, त्यामुळे तो जोरजोरात ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून माहूत त्याच्याकडे धावतआले, परंतु सरोवरातून त्याला बाहेर काढणे कुणालाही जमेना. तेंव्हा त्यांनी त्याच्या शरीराला भाले टोचायला सुरुवात केली.कारण भाल्याच्या टोचण्याने तो सर्व शक्तीनिशी प्रयत्न करेल आणि बाहेर येईल, पणहत्ती बाहेर येऊ शकला नाही.भाल्याच्या टोचण्याने हत्तीच्या डोळ्यातून अश्रू येऊलागले. राजापर्यंत हि वार्ता गेली. त्याने तत्काळ त्या हत्तीच्या जुन्या आणि अनुभवी माहुताला बोलावणे पाठविले. माहूत आला,राजा शेजारीच उभा होता. त्याने राजाला असा सल्ला दिला, "महाराज! तत्काळ युद्धाचे नगारेवाजवा, सैन्य या सरोवराभोवती गोळा करा, आक्रमणाच्या घोषणा सैनिकांना द्यायला सांगा." राजाने त्याचे म्हणणे ऐकले आणि युद्धाचे नगारे वाजविण्याचा हुकुमदिला. मग काय म्हणता, नगारे वाजू लागले, सैनिकांच्या रांगा शिस्तबद्धपणे लागल्या, आक्रमणाच्या घोषणा ऐकू येवू लागल्या. त्याबरोबर हत्तीच्या अंगात वीरश्री संचारली आणि तो त्या दलदलीतून बाहेरपडला. त्याचे मनोबल हे युद्धासाठी तयार झाले होते.राजाने जुन्या माहुताचे आभार मानले आणि बक्षीस दिले. ध्यानात ठेवा निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचारसरणीअसल्यास प्रगती होते. जर नशीब काही 'चांगले' देणार असेल तर त्याची सुरुवात 'कठीण' गोष्टीने होते .. आणि नशीब जर काही 'अप्रतिम' देणार असेल तर त्याची सुरुवात 'अशक्य' गोष्टीने होते....!•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment