✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 01 डिसेंबर 2023💠 वार - शुक्रवार______________________Link - https://nasayeotikar.blogspot.com/2020/06/blog-post_60.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक एडस प्रतिबंध दिन_*••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील ३३५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००१:ट्रान्स वर्ल्ड एअरलाइन्सचे शेवटचे उड्डाण. यानंतर ही कंपनी अमेरिकन एअरलाइन्समधे विलीन झाली.**१९९९:भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान (कै.) इंदिरा गांधी यांना ’वूमन ऑफ द मिलेनियम’ म्हणून मानांकित करण्यात आले.**१९९३:प्राच्यविद्या विशारद डॉ.रा.ना.दांडेकर, वेदविद्या पारंगत डॉ.चिं.ग.काशिकर आणि प्रसिद्ध साहित्यिक पु.ल.देशपांडे यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे सन्माननीय ’डी.लिट. पदवी’ जाहीर**१९९२:कलाक्षेत्रात केलेल्या प्रदीर्घ व अविस्मरणीय कामगिरीबद्दल गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा ’गदिमा पुरस्कार’ गायिका आशा भोसले यांना जाहीर**१९८१:AIDS विषाणूची प्रथमच ओळख पटली.**१९७६:अंगोलाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९७३:पापुआ न्यू गिनीला (ऑस्ट्रेलियाकडून) स्वातंत्र्य मिळाले.**१९६५:भारताच्या सीमांच्या संरक्षणासाठी सीमा सुरक्षा दलाची (Border Security Force) स्थापना**१९६४:मालावी, माल्टा आणि झांबियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९६३:नागालँड भारताचे १६ वे राज्य बनले.**१९४८:एस.एस.आपटे यांनी ’हिन्दुस्तान समाचार’ ही बहुभाषिक वृत्तसंस्था स्थापन केली.**१९१७:कोल्हापूरमधील पॅलेस थिएटरमधे श्रीपतराव काकडे,दामलेमामा,फत्तेलाल, बाबा गजबर,ज्ञानबा मेस्त्री,पंत धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत बाबूराव पेंटर यांनी ’महाराष्ट्र फिल्म कंपनी’ची स्थापना केली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८२:डॉ.गणेश जगन्नाथ मोगल- कवी* *१९८२:डॉ.शिवाजी नारायणराव शिंदे-- प्रसिद्ध कवी,लेखक तथा सहाय्यक कुलसचिव* *१९८०:मोहम्मद कैफ – भारतीय क्रिकेटपटू**१९७९:गणेश रामदास निकम-- लेखक* *१९६९:पद्मा विलासराव ठाकरे-- कवयित्री, लेखिका* *१९६५:संदीप सावंत-- मराठी चित्रपट दिग्दर्शक**१९६४:कल्पना अशोक टेंभुर्णीकर-- कवयित्री**१९६३:अर्जुन रानातुंगा-- श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू**१९५७:रविकिरण पराडकर -- निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त,लेखक* *१९५५:नारायण भानुदासराव बोरुळकर-- कवी,लेखक,संपादक* *१९५५:मोहनदास भामरे उर्फ भामरे बापू-- लेखक,कवी* *१९५५:उदित नारायण – प्रसिद्ध पार्श्वगायक**१९५४:राकेश बेदी-- भारतीय चित्रपट,रंगमंच आणि दूरदर्शन अभिनेता* *१९५३:बाजीराव शंकर निकम-- लेखक**१९५२:सूर्यकांत पंडितराव सराफ- प्रसिद्ध बालसाहित्यिक,नाट्यलेखक* *१९४९:प्राचार्य सुरेश प्रल्हाद खेडकर-- कवी, लेखक* *१९४७:विश्वनाथ शिरढोणकर-- सुप्रसिद्ध कवी,लेखक विविध पुरस्काराने सन्मानित* *१९४६:निळकंठ रामदास पाटील- प्रसिद्ध साहित्यिक* *१९४६:डॉ.वसुधा जयंत आठवले-- लेखिका* *१९४५:नरेंद्र सीताराम मारवाडे -- कवी,लेखक,संपादक* *१९४३:डॉ.शेषराव मारुती हराळे-- कवी* *१९४१:शामराव तुळशीराम बहेकर-- लेखक**१९४०:मोरेश्वर श्रीधर पटवर्धन-- लेखक**१९४०:प्रा.यशवंत भिमाले-- लेखक* *१९१७:सीताराम नानाजी कांबळे-- कादंबरीकार* *१९११:अनंत अंतरकर – 'हंस','मोहिनी', 'नवल' आणि 'सत्यकथा' या मासिकांचे संपादक (मृत्यू:४ आक्टोबर १९६६)**१९०९:बा.सी.मर्ढेकर – मराठी नवकाव्याचे प्रणेते (मृत्यू:२० मार्च १९५६)**१८८५:आचार्य दत्तात्रय बाळकृष्ण तथा ’काकासाहेब’ कालेलकर – गांधीवादी देशभक्त,शिक्षणतज्ञ,समाजसुधारक,इतिहासकार,गुजराथ विद्यापीठाचे कुलगुरू (१९२८), राज्यसभा सदस्य(१९५२ - १९५८),अनुसूचित जमातींच्या आयोगाचे अध्यक्ष (१९५३), (मृत्यू:२१ ऑगस्ट १९८१)**१८६२:परशराम गोविंद चिंचाळकर-- वेदांत विद्याविशारद,लेखक(मृत्यू:८ जानेवारी १९३४)**१७६१:मेरी तूसाँ – ’मॅडम तूसाँ वॅक्स म्युझियम’च्या संस्थापिका (मृत्यू:१६ एप्रिल १८५०)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१५:उस्ताद साबरी खां-- सारंगीवादक (जन्म:२१ मे १९२७)**२०१०:नलिनी आनंद साधले--संस्कृत पंडित, लेखक, अनुवादक, कृषितज्ज्ञ (जन्म:३ नोव्हेंबर १९३४)**१९९०:विजयालक्ष्मी पंडीत – राजदूत, मुत्सद्दी व राजकारणी(जन्म:१८ ऑगस्ट १९००)**१९८८:गंगाधर बाळकृष्ण तथा ‘गं. बा.‘ सरदार – विचारवंत व साहित्यिक,पुरोगामी चळवळीचे भाष्यकार,दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (१९७८), बार्शी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (१९८०) (जन्म:२ आक्टोबर १९०८)**१९८५:शंकर त्रिंबक तथा ’दादा’ धर्माधिकारी – स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक (जन्म:१८ जून १८९९)**१८६६:भारताचे सर्वेक्षण करणारे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट (जन्म:४ जुलै १७९०)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*नगरपालिका हद्दीतील सरकारी शाळा*सरकारी शाळा म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा होय. ग्रामीण भागातल्या शाळांना स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायतची थोडीफार मदत मिळू शकते त्यामुळे त्या शाळेचा भौतिक विकास होऊ शकतो. मर्यादित लोकसंख्या आणि मर्यादित क्षेत्र यामुळे ग्रामीण भागातील सरकारी शाळांना सध्या अच्छे दिन दिसत आहेत. बघायला गेलं तर येथे ही अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. यानंतर मनपाच्या शाळा म्हणजे महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या शाळा यांना सुद्धा मनपाचे सहकार्य मिळते. स्वतंत्र शिक्षण विभाग असतो आणि प्रत्येक कार्य स्वतंत्रपणे चालत असल्याने सर्वत्र लक्ष देणे शक्य आहे. मात्र नगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या सरकारी शाळा यांची स्थिती कोणी ही लक्षात घेत नाही त्यामुळे येथील शाळांची अवस्था धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशी झालेली पाहायला मिळते. नगरपालिका हद्दीतील सरकारी जिल्हा परिषद शाळांना फक्त शासनाची म्हणजे .......पूर्ण लेख वाचण्यासाठी लिंकवर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिशिंगणापूर येथे घेतले शनैश्वर मूर्तीचे दर्शन; चौथऱ्यावर जाऊन शनैश्वर मूर्तीस केला तैलाभिषेक*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्वाचे आहे, असे मत केंद्र सरकारच्या एचआरडी विभागाचे ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्यूकेशनचे उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे यांनी व्यक्त केले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *केंद्र सरकारनं मजुरांसाठी खास ओळखपत्र बनवण्याची केली घोषणा, कामगारांसाठी हे कार्ड गेम चेंजर ठरणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *भारतात 20 लाखांहून अधिक नवीन रोजगार निर्माण होणार, आयटी क्षेत्राला मिळणार चालना*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *आजपासून नवीन सीम कार्ड खरेदी करण्याबाबत कठोर नियम*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांसाठीचं मतदान पूर्ण झालं असून 3 डिसेंबरला निकाल हाती येईल.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *साऊथ अफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, के. एल. राहुल एकदिवसीय संघाचा नवा कर्णधार !*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 📙 *बायोगॅस* 📙 ******************अनेक प्रकारचे सेंद्रिय पदार्थ टाकाऊ म्हणून आपण फेकून देत असतो. गायीगुरांचे शेण कंपोस्ट खतासाठी अनेक वर्षे वापरले जात होते. पण त्या व्यतिरिक्त त्याचा उपयोग शक्य आहे, याचा विचार मात्र गेली ४० वर्षेच केला गेला. झाडांचा पालापाचोळा, वाया जाणारे अन्नपदार्थ, खरकटे, भाजीची देठे व टरफले या साऱ्यांचा उपयुक्त वापर करण्याची कल्पना सतत मांडली जात आहे. मात्र त्याचा पाठपुरावा करून संपूर्ण वापर केले जाणे मात्र आजही घडत नाही. या साऱ्यापासून बायोगॅसची निर्मिती सहज शक्य असते. हा गॅस घरातील गॅस शेगडीसाठी जसा वापरता येतो, तसाच मोठ्या प्रमाणावर तयार केल्यास छोट्या हॉटेलला पण पूरक म्हणून उपयोगी पडू शकतो. १९७० च्या दशकात गोबरगॅस या नावाने ओळखला जाणारा हा गॅस मुख्यत: गायीगुरांचे शेण व पालापाचोळा यातून निर्माण केला जात असे. घराजवळच गोठ्यालगत विटांच्या बांधकामातून गोल हौदवजा टाकी बांधून त्यात हा कच्चा माल घातला जाई. त्यावर टोपीप्रमाणे बसणारी पण दट्ट्याप्रमाणे खालीवर होऊ शकणारी यंत्रणा बसवून आतील कच्चा माल कुजून दिला जाई. या कुजण्याला मदत म्हणून स्लरी - विशिष्ट प्रकारचे जंतू असलेले पाणी - त्यात सोडल्यावर सुमारे चाळीस दिवसांनी रोजच्या गॅसचा पुरवठा सुरू होत असे. या कुजण्यातून निर्माण झालेला गाळ व पाणी हे खत म्हणून वापरता येई.या प्रकारची गोबरगॅस संयंत्र संपूर्ण भारतात अनेकांनी बसवली. त्यासाठी ग्रामोद्योग मंडळाने प्रशिक्षण व सहाय्यसुद्धा दिले. काही वर्षांनी त्यांच्या डागडुजीची वेळ आली, तेव्हा कुचराई केल्याने अनेक ठिकाणी ही संयंत्रे बंद पडत गेली. हौदाचा गिलावा उडून होणारी गळती व लोखंडी भाग गंजणे हे त्याचे महत्त्वाचे कारण होते. या गॅसमध्ये मुख्यत: मिथेन वायू असतो. ज्वलनासाठी उपयुक्त व प्रदूषणविरहित असे त्याचे स्वरूप आहे. छोट्या गावात, दूरवरच्या वस्तीमध्ये लिक्विड पेट्रोलियम गॅसचा पुरवठा सिलिंडरद्वारे करणे कठीण असल्यास या पद्धतीचा वापर अत्यंत उपयुक्त होता. चीनमध्ये या स्वरूपाची स्थानिक संयंत्रे बसवून वापरली जात आहेत, पण आपल्याकडे मात्र हा प्रयोग मागे पडला आहे.या गोबरगॅसच्या अवाढव्य जागा व्यापणाऱ्या व शेणाची गरज असलेल्या संयंत्रात बरेच सुटसुटीत बदल करून पुणे येथील 'आरती' (अॅप्रोप्रिएट रुरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट) या संस्थेचे वैज्ञानिक डॉक्टर आनंद कर्वे यांनी बायोगॅस निर्मितीचे संयंत्र बनवले आहे. प्लास्टिकच्या एकात एक बसणाऱ्या मोठ्या पंपाचा वापर करून हे बनले आहे. गच्चीत, अंगणात कुठेही ठेवून त्याचा वापर शक्य होतो. महत्त्वाची गोष्ट यासाठी खरकटे अन्न व आसपासच्या झाडांचा, बागेचा पालापाचोळा पुरतो. शेणाची गरज लागत नसल्याने हाताळताना नकोसे वाटत नाही. याचा कसलाही वास आसपास पसरत नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्लरी घातल्यापासून जेमतेम तीन ते चार दिवसांत गॅसनिर्मिती सुरू होते. याचा खर्चही सहज परवडण्याजोगा आहे. कारण स्वस्त प्लॅस्टिकचा वापर त्यात केला आहे. या संयंत्राला 'अॅश्डेन' हे संशोधनाबद्दलचे मानाचे पारितोषिक दिले गेले आहे. उसाची चिपाडे, उसापासून साखर तयार करताना निर्माण होणारी मळी यांचा वापर करून मोठय़ा प्रमाणावर बायोगॅस तयार करावा व त्यापासून वीजनिर्मिती करावी, अशा स्वरूपाचा विचार सध्या मांडला जात आहे. अर्थातच हे प्रकल्प व्यावसायिक तत्वावरचे व प्रचंड पैसा लागणारे आहेत.स्वस्त, स्वच्छ इंधन व कचर्याचे प्रदूषण टाळणारे इंधन म्हणून बायोगॅसकडे आपण पाहिले तर त्याची उपयुक्तता मोलाची ठरते.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*👆*संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*ज्यांचे डोळे चांगले ते जगाच्या प्रेमात पडतात, पण ज्यांची जीभ गोड असेल तर जग त्यांच्या प्रेमात पडते**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'जागतिक एड्स निर्मूलन दिवस'* केव्हा साजरा केला जातो ?२) लोकशिक्षण दिन केव्हा साजरा केला जातो ?३) भारतातील कोणत्या शहराला युनेस्कोने *'संगीताचे शहर'* म्हणून मान्यता दिली आहे ?४) महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला काय म्हणतात ?५) भारतीय सेनेचे तीन दल कोणते ? *उत्तरे :-* १) १ डिसेंबर २) १ डिसेंबर ३) ग्वाल्हेर ४) नाथसागर ५) भूदल, नौदल, वायुदल*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* ◆ श्याम दरबस्तेवार, शिक्षक◆ हेमंत भेंडे, शिक्षक◆ राजकुमार दाचावार, शिक्षक◆ श्याम नरवाडे◆ मारुती गिरगावकर, शिक्षक◆ विठ्ठलराव मुजळगे, शिक्षक◆ मारोती दिंडे◆ श्रीकांत लाडे◆ सुभाष सोनटक्के◆ शिवाजी पुरी◆ श्याम पाटील◆ विश्वनाथ पांचाळ◆ बालाजी कलकोटे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••महाभक्त प्रल्हाद हा कष्टवीला। म्हणोनी तयाकारणे सिंह जाला॥ न ये ज्वाळ वीशाळ संनधि कोणी। नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥१२१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्यांच्या मुखावाटे निघणारे शब्द जर अडखळत असतील तर त्या शब्दांमध्ये ठाम विश्वास नसतो किंवा मनातले विचार स्पष्टपणे मांडता येत नाहीत.अशी ज्यांची परिस्थिती झालेली असते तेव्हा एकतर मनातून खचलेला असेल किंवा कुणाच्यातरी दडपणाखाली असेल.अशा परिस्थितीतून बाहेर पडायचे असेल तर पहिल्यांदा आपल्या मनातली जी काही भीती असेल किंवा दडपण असेल ते काढून टाकायला हवे.अशावेळी आपला आत्मविश्वास आपणच वाढवला पाहिजे.माझ्या मनावर कुणाचेही दडपण नाही किंवा जरी असले तरी ते काहीच करु शकत नाही.आपण त्याला खंबीरपणे प्रत्युत्तर देऊ आणि आपण पूवस्थितीत येऊ अशी धारणा मनामध्ये उत्पन्न करुन पूर्वीसारखे जीवन जगू असा विश्वास जागृत करायला हवा तरच मग आपल्या मुखावाटे निघणारे शब्द स्पष्टपणे यायला लागतील आणि आपले जे काही विचार असतील ते समोरच्या व्यक्तीला समजायला लागतील यात काही संशय नाही.जर आपणच घाबरायला लागलो तर समोरची व्यक्तीही आपल्याला जास्तच घाबरून टाकेल आणि आपला जो काही आत्मविश्वास आहे तोही कमी करुन टाकेल.म्हणून परिस्थिती कशीही असो त्या परिस्थितीला घाबरुन न जाता त्याला तोंड द्यायला शिकले पाहिजे.© व्यंकटेश काटकर, नांदेड.संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*📿अहंकाराची शिक्षा📿*खूप घनदाट जंगल होतं. त्या जंगलात एक आंबा आणि पिंपळाचे झाड होते. एकदा मधमाशांचा थवा त्या जंगलात राहायला आला, पण मधमाशांच्या थव्याला राहण्यासाठी दाट झाडाची गरज होती. जेव्हा राणी मधमाशीची नजर त्या पिंपळाच्या झाडावर पडली तेव्हा राणी मधमाशी पिंपळाच्या झाडाला म्हणाली - हे पिंपळ भाऊ, मी तुझ्या या घनदाट झाडाच्या फांदीवर माझ्या कुटुंबासाठी पोळे बनवू शकते का ?पिंपळाला कोणी त्रास देणे हे पिंपळाला पसंत नव्हते. अहंकार व उद्धटपणामुळे पिंपळ राणी मधमाशीला रागाने म्हणाला, जा इथून जा आणि तुझे पोळे दुसरीकडे कर. मला त्रास देऊ नकोस. पिंपळाचे बोलणे ऐकून शेजारी उभ्या असलेल्या आंब्याचे झाड म्हणाले, पिंपळ भाऊ, बनवू द्या. पोळे करू द्या. हे तुमच्या शाखांमध्ये सुरक्षित राहतील. पिंपळ आंब्याला म्हणाला, तू तुझं काम कर, तुला एवढी काळजी आहे तर तू तुझ्या फांदीवर मधमाशाचे पोळे करायला का सांगत नाहीस ?यामुळे आंब्याचे झाड राणी मधमाशीला म्हणाले, राणी मधमाशी, तुला हवे असल्यास तू माझ्या फांदीवर तुझे पोळे करू शकतेस. यावर राणी मधमाशीने आंब्याच्या झाडाप्रती कृतज्ञता व्यक्त करत आंब्याच्या झाडावर आपले पोळे बांधले.वेळ निघून गेला आणि काही दिवसांनी काही लाकूडतोडे जंगलात आले. त्या लोकांना एक आंब्याचे झाड दिसले आणि ते आपापसात बोलू लागले की हे आंब्याचे झाड तोडून लाकूड घ्यावे. त्यांनी आपली हत्यारे घेतली आणि आंब्याचे झाड तोडायला सुरुवात केली, तेव्हा एकाने वर बघितले आणि दुसर्याला म्हणाला नाही, ते कापू नका. या झाडावर मधमाशांचे पोळे आहे, जर ते उठले तर आपल्याला वाचणे कठीण होईल. त्याचवेळी एक माणूस म्हणाला, आपण हे पिंपळाचे झाड का तोडत नाही. यामध्ये आम्हाला जास्त लाकूड मिळेल आणि आम्हाला कोणताही धोका होणार नाही.त्या सर्व लाकूडतोड्यानी मिळून पिंपळाचे झाड तोडण्यास सुरुवात केली. पिंपळाचे झाड वेदनेने जोरजोरात ओरडू लागले, वाचवा वाचवा. आंब्याच्या झाडाला पिंपळाच्या ओरडण्याचा आवाज आला, काही लोक मिळून ते पिंपळाला कापत असल्याचे पाहिले. आंब्याचे झाड मधमाशीला म्हणाले, आपण पिंपळाच्या झाडाचे प्राण वाचवले पाहिजे, जेव्हा आंब्याच्या झाडाने मधमाशीला पिंपळाच्या झाडाचे प्राण वाचवण्याची विनंती केली तेव्हा मधमाशांनी लाकूडतोड्यावर हल्ला केला आणि ते आपला जीव वाचवण्यासाठी जंगलातून पळून गेले. पिंपळाच्या झाडाने मधमाशांचे आभार मानले आणि आपल्या उध्दट वर्तनाबद्दल माफी मागितली. मग मधमाश्या म्हणाल्या, आमचे आभार मानू नका, आंब्याच्या झाडाचे आभार मान त्याने तुमचा जीव वाचवला आहे, कारण त्याने आम्हाला सांगितले होते की जर कोणी वाईट केले तर याचा अर्थ असा नाही की आपणही तेच केले पाहिजे. आता पिंपळाला आपल्या कृत्याचा पश्चाताप होत होता आणि त्याचा अहंकारही चक्काचूर झाला होता, पिंपळाच्या झाडालाही त्याच्या अहंकाराची शिक्षा झाली होती.*📍शिक्षण :*आपण कधीही अहंकार बाळगू नये. आपण लोकांना शक्य तितकी मदत केली पाहिजे, जेणे करुन जेव्हा वेळ येईल तेव्हा आपणही मदत मागू शकाल. जेव्हा आपण एखाद्याला मदत करतो तेव्हाच कोणीतरी आपल्याला मदत करेल.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 30 नोव्हेंबर 2023💠 वार - गुरुवार Link - https://nasayeotikar.blogspot.com/2016/11/a-i-d-s.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील ३३४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• _विजयी झाल्यावर दोन बोटांनी ’V' दाखवण्याची पद्धत इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी सर्वप्रथम लोकप्रिय केली. दुसर्या महायुद्धाची घोषणा झाल्यानंतर विन्स्टन चर्चिल यांनी संसदेत ऐतिहासिक भाषण केले. त्यात इंग्लंडचे अंतिम ध्येय फक्त विजय असेल हे सांगताना त्यांनी आवेशात दोन बोटे उंचावून 'V' हे विजयचिन्ह दर्शविले._ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०००:पाच अंतराळवीर आणि महाकाय सौरपंखे घेऊन ’एन्डेव्हर’ या अंतराळयानाने फ्लोरिडातील केप कॅनव्हेरॉल येथून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या दिशेने उड्डाण केले.**१९९६:ख्यातनाम साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना महाराष्ट्र सरकारचा पहिला ’महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ प्रदान.**१९९५:’ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म’ संपल्याची अधिकृत घोषणा**१९६६:बार्बाडोसला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९१७:कलकत्ता येथे ’आचार्य जगदीश चंद्र बोस इन्स्टिट्युट’ची स्थापना**१८७२:हॅमिल्टन क्रिसेंट,ग्लासगो येथे स्कॉटलंड व इंग्लंड यांच्यामधे जगातील पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळण्यात आला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९६७:राजीव दीक्षित – सामाजिक कार्यकर्ता (मृत्यू:३० नोव्हेंबर २०१०)**१९६४:अर्चना धनंजय देव-- प्रसिद्ध लेखिका**१९५५:संजीव परळीकर-- प्रसिद्ध लेखक**१९५२:चंद्रकांत भास्कर मेहेर-- लेखक**१९५२:अविनाश खर्शीकर-- ज्येष्ठ अभिनेते(मृत्यू:८ऑक्टोबर२०२०)**१९४१:प्रभाकर दत्तात्रय मराठे-- कादंबरीकार**१९४०:शुभदा भानुदास कुलकर्णी- लेखिका* *१९३९:डॉ.कल्याण इनामदार- मराठीतील सुप्रसिद्ध लेखक आणि बालकवी(मृत्यू:१९ नोव्हेंबर २०१३)**१९३६:सुधा मल्होत्रा-- भारतीय पार्श्वगायिका* *१९३५:आनंद यादव – मराठी लेखक काव्य, कथा,कादंबरी,समीक्षा,ललित अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले आहे (मृत्यू:२७ नोव्हेंबर २०१६)**१९३०:गीता बाली तथा हरिकीर्तन कौर-- १९५० आणि १९६० च्या दशकांतील हिंदी चित्रपट अभिनेत्री(मृत्यू:२१ जानेवारी १९६५)**१९१०:कविवर्य बा.भ.बोरकर ऊर्फ ’बाकीबाब’--मराठी आणि कोंकणी भाषांत कविता करणारे पद्मश्री पुरस्कारविजेते प्रसिद्ध कवी (मृत्यू:९ जुलै १९८४)**१८९८:वासुदेव दामोदर गोखले- कोशकार, चरित्रकार,संपादक (मृत्यू:१२ जून १९६४)**१८७४:विन्स्टन चर्चिल – दुसर्या महायुद्धकाळातील ब्रिटनचे पंतप्रधान, साहित्यिक,वृत्तपत्रकार,थोर राजकारणी आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू:२४ जानेवारी १९६५)**१८५८:जगदीशचंद्र बोस – नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ, वनस्पतींमधील प्रतिक्षिप्त क्रियांवर मूलभूत संशोधन (मृत्यू:२३ नोव्हेंबर १९३७)**१८३५:मार्क ट्वेन – विख्यात अमेरिकन विनोदकार आणि कादंबरीकार (मृत्यू:२१ एप्रिल १९१०)**१७६१:स्मिथसन टेनांट – हिरा हा कार्बनच असतो हे प्रयोगावरुन सिद्ध करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ.(मृत्यू:२२ फेब्रुवारी १८१५)**१६०२:ऑटो व्हॉन गॅरिक – वातावरणाबाबत मूलभूत सिद्धांत मांडणारे जर्मन पदार्थवैज्ञानिक (मृत्यू:२१ मे १६८६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२:नागनाथ लालूजीराव कोत्तापल्ले-- प्रसिद्ध लेखक,कवी,व समीक्षक आणि भारतीय शिक्षणतज्ज्ञ (जन्म:२९ मार्च १९४८)**२०१२:इंदर कुमार गुजराल – भारताचे १२ वे पंतप्रधान (जन्म:४ डिसेंबर १९१९)**२०१०:राजीव दीक्षित – सामाजिक कार्यकर्ता (जन्म:३० नोव्हेंबर १९६७)**१९७०:निना रिकी – जन्माने इटालियन असलेल्या फ्रेंच फॅशन डिझायनर (जन्म:१४ जानेवारी १८८३)**१९००:ऑस्कर वाईल्ड – आयरिश लेखक व नाटककार (जन्म:१६ आक्टोबर १८५४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जागतिक एड्स निर्मूलन दिवस निमित्ताने प्रासंगिक लेख*खबरदारी हाच सर्वोत्तम उपायसंपूर्ण जगात 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स निर्मूलन दिवस म्हणून साजरा केला जातो. ‘एड्स’ हा शब्द उच्चारताना किंवा ऐकताना काळीज धस्स करते. हा रोग कुणाला झाला असे कळाले की, अंगावर काटे उभे राहतात आणि त्या रुग्णला वेगळ्या नजरेने पाहिले जाते. पूर्वी कर्करोग म्हणजे कॅन्सर हा सर्वांत भयानक रोग असे मानले जात असे. कॅन्सर म्हणजे माणूस कॅन्सल असे बोलले जायचे. मात्र जसे ही ‘एड्स’ विषयी लोकांना कळायाला लागले तसे मोठ्या रोगाच्या यादीत वरच्या क्रमांकावर एड्सला पाहण्यात येऊ लागले. विज्ञानाच्या प्रगतीमुळे कॅन्सरवर आता इलाज शक्य झाले आहे. समाजात अनेक रुग्ण यातून वाचले आहेत असे आढळून येतात. वैद्यकीय उपचार किंवा शस्त्रक्रिया करून कॅन्सर बरा होऊ शकतो. मात्र एड्सचे तसे नाही त्यामुळे ...............पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील लिंकवर क्लीक करावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्रावर अवकाळीचे संकट, शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, 3 हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई देण्यात येईल*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यातील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या विकासासाठी मंत्रिमंडळाने 500 कोटींच्या निधीला दिली मान्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान. शाळांचे मूल्यांकन करणार. पहिल्या टप्प्यात ४७८ शाळा, पहिले पारितोषिक ५१ लाख, अभियानासाठी २० कोटी ६३ लाखांच्या खर्चास मान्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *हिंगोलीत अवकाळी पावसामुळे 500 मेट्रिक टन साखर भिजली; तब्बल दोन कोटींचे नुकसान*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *ISRO ची नव्या अंतराळ मोहिमेसाठी सज्ज! अंतराळात तिरंगा फडकणार! 2024 मध्ये भारतीय अंतराळवीर स्पेस स्टेशनवर पाठवण्याची तयारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जगातील सर्वात श्रीमंतांची यादी ब्लूमबर्गनं केली जाहीर, यादीत भारतातील सर्वातं श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी हे 13 व्या क्रमांकावर तर उद्योजक गौतम अदानींचा श्रीमंतांच्या 20 नावांमध्ये समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविडच; बीसीसीआयकडून शिक्कामोर्तब*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *डॉ. जगदीशचंद्र बोस*पूर्व बंगालमधील डाक्का जिल्ह्यातील राणीखल या खेडेगावात ३० नोव्हेंबर १८५८ रोजी जगदीशचंद्र बोस यांच्या जन्म झाला. त्यांचे वडील भगवानचंद्र बसू हे सरकारी नोकरीत सब डिव्हिजनला आॅफिसर होते. त्या काळी इंग्रजीत जसे ठाकूरचे टागोर झाले, राय आडनावाचे रे झाले तसेच बसू आडनावाचे इंग्रजी स्पेलिंग बोस झाले.जगदीशचंद्रांचे घराणे हे बंगाल प्रांतातील एक खानदानी घराणे होते. त्यांची आई साध्वी व सुशील होती. लहानपणापासूनच जगदीशचंद्र आजूबाजूचा निसर्ग पहायचे, त्याचे निरीक्षण करायचे. निसर्गातील अनेक गोष्टी पाहून त्या अशाच का, असा प्रश्न त्यांना पडे. भगवानचंद्र सुद्धा न कंटाळता छोट्या जगदीशने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत असे. सर्व झाडेएकाच वेळी का फुले देत नाहीत? एखाद्या झाडाची पालवी पोपटी हिरवी पण दुसर्याची तांबूस? असा फरक का पडतो असे त्यांना वाटे. झाडे, फुले, फुलपाखरे, भोवतीचा निसर्ग यांचे निरीक्षण करणे हा त्यांचा आवडता छंद होता.डॉ. जगदीशचंद्र बोस कोलकाता येथील सेंट झेवियर शाळा आणि त्याच नावाच्या महाविद्यालयात शिकले. त्यानंतर इंग्लंडच्या ख्राईस्ट चर्च महाविद्यालयातून भौतिकी, रसायन वनस्पतिशास्त्र आणि निसर्गविज्ञानाचा अभ्यास पुरा करून ते भारतात परत आले. या काळात त्यांना भौतिकशास्त्रज्ञ लॉर्ड रॅली यांचे मार्गदर्शन लाभले.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'मिरचीचे आगार'* म्हणून कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते ?२) नेपाळमधील जगप्रसिद्ध पशुपतीनाथ मंदिर कोणत्या नदीच्या तीरावर वसले आहे ?३) घटना समितीची शेवटची सभा केव्हा झाली ?४) केवोलादेव राष्ट्रीय उद्यान भरतपूर कोणत्या राज्यात आहे ?५) 'सरोवरांचा देश' असे कोणत्या देशाला म्हटले जाते ? *उत्तरे :-* १) नंदूरबार २) बागमती नदी ३) २५ नोव्हेंबर १९४९ ४) राजस्थान ५) फिनलँड*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 राजेश दरेकर, सहशिक्षक, गडचिरोली👤 राजेश्वर येवतीकर, येवती👤 विलास वाघमारे, भैसा, तेलंगणा👤 रवी बुगावार, धर्माबाद👤 देविराज पिंगलवार, भोकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विधीकारणे जाहला मत्स्य वेगीं।धरी कूर्मरुपे धरा पृष्ठभागी। जना रक्षणाकारणे नीच योनी। नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥१२०॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🎯 विचारवेध.........✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जेव्हा घराच्या दाराची कडी आतून लावलेली असते तेव्हा माणसाच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात.पण जेव्हा बाहेरुन दाराला कडी लावलेली असते तेव्हा त्याचा सरळ सरळ अर्थ माणूस समजून घेतो की,कुठेतरी बाहेर गेले असतील.अशा परिस्थितीत माणसाने जे डोळ्यासमोर दिसते ते सत्य आहे हे ठामपणे सांगायला हवे आणि डोळ्यांच्या माघारी जे काही आहे ते ठामपणे कुणालाही सांगता येत नाही.म्हणून सत्य परिस्थिती काय आहे हे पाहूनच निर्णय घ्यायला शिकले पाहिजे.व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद : ९४२१८३९५९०🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *ही कथा आहे विन्स्टन चर्चिलची*लहानपणी विन्स्टन एकदा विहिरीत पडला. त्याने ‘वाचवा वाचवा’ असा धावा केला. एका शेतकर्याने त्याला विहिरीतून बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचवला. एका अपघातातून आपण वाचलो म्हणून त्याने नि:श्वास तर टाकला, पण त्याला विहिरीतील जीव वाचवण्यासाठीची धडपड सदैव लक्षात राहिली. आयुष्यभर यशाशी संघर्ष करताना वडिलांनी शिकवलेले तत्त्व आठवायचे. त्या वेळेस विन्स्टनने मनोमन आपल्या वडिलांचे आभार मानले, कारण त्याच्या वडिलांनी त्याला एक अविरत प्रयत्न करण्याचे व कधीही माघार न घेण्याचे तत्त्व शिकवले होते. ते त्याला नेहमी आपल्या राजवाड्यासमोरील राजहंस दाखवायचे आणि म्हणायचे- ‘‘हा राजहंस पाण्यावर शांतपणे तरंगताना दिसतो. पण तेव्हाच तो पाण्याखाली तितक्याच जलद गतीने पायांची हालचाल करत असतो. लोकांना वरवर शांत दिसणारा राजहंस पाण्याखाली एखाद्या यंत्राप्रमाणे झपाटल्यासारखा काम करतो. तूही असाच झंझावात हो. जनसमुदायाला तू वरून जरी शांत दिसलास तरी त्यांच्या अपरोक्ष वादळासारखं काम करत राहा. आतून पेटून ऊठ आणि कार्याला लाग.’’ पुढे जीवनात अविरत काम करण्याचे तत्त्व बाळगल्यामुळे विन्स्टन चर्चिल इंग्लंडचे पंतप्रधान झाले. एकदा त्यांना ऑक्सफर्ड विद्यापीठात पदवी प्रदान सोहळ्यासाठी निमंत्रित केले होते. जेव्हा त्यांना व्यासपीठावर भाषणासाठी बोलावले तेव्हा ते त्या जनसमुदायासमोर ३० सेकंद नि:शब्द उभे राहिले. सभागृहात एकच शांतता पसरली. नेहमी उत्कृष्ट भाषण देणारे व्यक्तिमत्त्व बोलत का नाही, असा फ्रश्न सर्वांना पडला. तितक्यात विन्स्टन चर्चिलच्या तोंडातून शब्द बाहेर पडले- ‘‘माघार घेऊ नका. कधीही माघार घेऊ नका.’’ त्यांनी भाषणाला सुरुवात करताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. तेव्हा ते पुन्हा ३० सेकंदांसाठी नि:शब्द झाले आणि पुन्हा उद्गारले- ‘‘माघार घेऊ नका, कधीही माघार घेऊ नका.’’ क्षणभर त्यांनी सर्व प्रेक्षकांवर एक कटाक्ष टाकला. सर्वांशी ते नजरेने बोलले आणि धन्यवाद म्हणून त्यांनी व्यासपीठ सोडले. लोकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले आणि एका महान नेत्याचे सर्वात लहान, पण अत्यंत प्रभावी •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 29 नोव्हेंबर 2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील ३३३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०००:शास्त्रीय गायक गुलाम मुस्तफा खाँ आणि घटमवादक टी. एच. विक्कू विनायक राम यांना ’उस्ताद हफीज अली खाँ स्मृती पुरस्कार’ जाहीर**२०००:दक्षिण अफ्रिकेचे माजी अध्यक्ष डॉ. नेल्सन मंडेला व बांगलादेशच्या ग्रामीण बँकेस ’गांधी शांतता पुरस्कार’ जाहीर**१९९६:नोबेल पारितोषिकविजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांना त्यांची मायभूमी अल्बानियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ’गोल्डन ऑनर’ जाहीर**१९६३:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांनी जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येची चौकशी करण्यासाठी 'वॉरन समिती' नेमली.**१९४५:युगोस्लाव्हिया प्रजासत्ताक बनले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८४:नेहा पेंडसे-- मराठी आणि हिंदी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांतून अभिनय करणाऱ्या अभिनेत्री**१९७७:युनिस खान – पाकिस्तानी क्रिकेटपटू**१९५२:सुनिती मंगल धारवाडकर-- कवयित्री, लेखिका* *१९५०:रामकृष्ण विनायक अभ्यंकर-- लेखक**१९५०:प्रकाश ज्ञानेश्वर जडे-- प्रसिद्ध कवी, लेखक**१९४५:खुशाल डवरे- प्रसिद्ध लेखक**१९४२:नीला भागवत-- ग्वाल्हेर घराण्याच्या हिंदुस्थानी संगीतकार**१९३८:माला केकतपुरे-- कवयित्री,लेखिका**१९३३:श्रीराम आत्माराम खुणे-- लेखक**१९३१: रामचंद्र बापूजी मुंजवाडकर-- लेखक* *१९२६:प्रभाकर नारायण पाध्ये ऊर्फ भाऊ पाध्ये-- मराठी कादंबरीकार, कामगार चळवळकर्ते (मृत्यू:३० ऑक्टोबर १९९६)**१९१७: भगवंत रंगनाथ अक्कलकोटकर -- कादंबरीकार,बालसाहित्यिक* *१९०७:गोपीनाथ तळवलकर – बालसाहित्यिक,'आनंद’ मासिकाचे संपादक, आकाशवाणीच्या ’बालोद्यान’ कार्यक्रमातील ’नाना’ (मृत्यू:७ जून २०००)**१८९६:विनायक लक्ष्मण बर्वे-- कथाकार, कादंबरीकार,कवी,नाटककार (मृत्यू:२६ जानेवारी १९४८)**१८६९;अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ’ठक्कर बाप्पा’ – समाजसेवक (मृत्यू:२० जानेवारी १९५१)**१८६२:विष्णू गणेश नेने-- लेखक (मृत्यू:२३ जानेवारी १९२४)**१८३५:महादेव मोरेश्वर कुंटे-- मराठी कवी, संस्कृत भाषेतील विद्वान (मृत्यू:८ ऑक्टोबर १८८८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१२:आचार्य पार्वती कुमार किंवा पार्वतीकुमार-- भारतीय शास्त्रीय नृत्यांगना,शास्त्रीय नृत्य कोरिओग्राफर आणि विद्वान(जन्म:२७ फेब्रुवारी १९३१)**२०११:इंदिरा गोस्वामी--आसामी लेखिका, कवयित्री व संपादिका(जन्म:१४ नोव्हेंबर १९४३)**२००७: केशव तानाजी मेश्राम-- मराठी भाषेतील लेखक,कवी,नाटककार, समीक्षक(जन्म:२४ नोव्हेंबर १९३७)**२००१:जॉर्ज हॅरिसन – ’बीटल्स’चा गिटारवादक,संगीतकार,गायक आणि गीतलेखक (जन्म:२५ फेब्रुवारी १९४३)**१९९३:जहांगीर रतनजी दादाभॉय तथा ’जे.आर.डी.टाटा’ – भारतरत्न, उद्योगपती व वैमानिक,भारतीय नागरी विमान वाहतुकीचे जनक (जन्म:२९ जुलै १९०४)**१९९४:मृणालिनी प्रभाकर देसाई-- कादंबरीकार(जन्म:७ ऑक्टोबर १९२७)**१९५९:वाजू कोटक-- गुजराती लेखक, प्रकाशक,पत्रकार,भारतीय चित्रपट पटकथा लेखक(जन्म:३० जानेवारी १९१५)**१९५९:’रियासतकार’ गोविंद सखाराम सरदेसाई – मुसलमानी काळापासून ब्रिटिश अमदानीपर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास लिहीणारे इतिहासकार (जन्म:१७ मे १८६५)**१९५०: आनंदीबाई धोंडो कर्वे-- सामाजिक-शैक्षणिक कार्यकर्त्या(जन्म:२५ जानेवारी १८६३)**१९३९:माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ ’माधव जूलियन’ – कवी,कोशकार,छंदशास्त्राचे व्यासंगी आणि मराठी भाषाशुद्धीचे तत्त्वनिष्ठ पुरस्कर्ते (जन्म:२१ जानेवारी १८९४)**१९२६:कृष्णाजी नारायण आठल्ये – ग्रंथकार, संपादक, टीकाकार, कवी व चित्रकार, ’केरळ कोकिळ’ या मासिकाचे संस्थापक व संपादक (जन्म:३ जानेवारी १८५२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *शिक्षकांना शिकवू द्या ...* राज्यातील बहुउद्देशीय कर्मचारी म्हणजे शिक्षक. कोणत्याही सरकारी कामासाठी सहज उपलब्ध होणारा आणि सांगितलेले काम मुकाट्याने करणारा कर्मचारी म्हणजे शिक्षक. वास्तविक पाहता शिक्षकांचे...........वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_27.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *अवकाळी पावसाचा मराठवाड्याला मोठा फटका; 47 हजार 109 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबईतील दुकानांवर ठळक अक्षरात मराठी फलक लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानुसार महापालिकेने मंगळवारी १७६ दुकानांवर कारवाई केली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *संपूर्ण भारतात सिलेंडरचा दर 400 रुपये करा; सुप्रिया सुळेंची मोदी सरकारकडे मोठी मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *उत्तराखंड बचावकार्याला यश! 17 दिवसांनंतर बोगद्यातून 41 कामगारांची सुटका*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्यातील अवकाळीग्रस्त 99 हजार 381 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे तातडीने करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अजित पवारांनी मंत्रालयात घेतला खेड-आळंदीतील कामांचा आढावा:तीर्थक्षेत्र व बसस्थानकांच्या विकासाबाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *तिसऱ्या T20 सामन्यात भारताचा पाच विकेटने पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *म्हाताऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या का पडतात ?* 📙वृद्धावस्था आली की माणसात अनेक बदल होतात. डोक्यावरचे केस गळायला लागतात व टक्कल पडते. तोंडातील दात हलायला लागतात व नंतर तोंडाचे बोळके होते. बोटांना कंप सुटतो, दृष्टी अधू होते, उत्साह कमी होतो. अशा या बदलांमुळे व्यक्ती चिडचिडी होते. त्यात भर म्हणजे विस्मरणही व्हायला लागते. त्यामुळे वृद्धत्व म्हणजे एक रोग असे वाटायला लागते.चेहऱ्यावर सुरकुत्या का पडतात, याविषयी माहिती घेऊ. त्वचेखाली स्नायूंच्या आकुंचन व प्रसरणाच्या दिशेने काटकोनात त्वचेची हालचाल होत असल्याने त्वचेच्या वारंवार घड्या पडतात. व तेथे नंतर सुरकुत्या पडतात. चेहऱ्याच्या त्वचेखाली इतर शरीराच्या त्वचेखाली असणारा जाडसर थर (deep fascia) नसतो व स्नायू व त्वचेचे थर एकमेकांत जखडलेले असतात. त्यामुळेही त्वचेवर जास्त ताण येतो व सुरकुत्या पडतात.दुसरे म्हणजे त्वचेखालील मेद पदार्थांचे प्रमाण कमी होते. साहजिकच त्वचा सैल व ढिली होते. तिसरे म्हणजे स्नायूंमधील ताण वयोमानानुसार कमी होतो. त्यामुळे त्वचेमध्ये खोवले जाणारे स्नायू शिथिल होतात व त्वचाही सैल होते. सर्व इंद्रियांवर त्वचेची जीवनशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे या त्वचेची लवचिकता कमी होऊन ती सैल पडते. या सर्व गोष्टींमुळे सैल पडलेल्या त्वचेवर सुरकुत्या पडतात. तोंडातील दात पडल्याने जबड्याच्या हाडाची झीज झाल्याने चेहऱ्याचा आकारही बदलतो व त्वचा आणखीनच सैल होते. परिणामी वृद्ध व्यक्तींच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. सुरकुत्या सर्व शरीरावर पडतात परंतु चेहऱ्यावर ती बाब जास्त प्रकर्षाने जाणवते.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••"अनेक वेळा चांगले क्षण/ आशीर्वाद हे कठोर प्रसंगांच्या वेशभूषेत येतात."*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणत्या खेळाचे साहित्य *टोक, दांडी व मूठ* या तीन भागांचे बनलेले असते ?२) ब्लॅकबक राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?३) नुकतेच कोणत्या भारतीय खेळाडूचा 'ICC हॉल ऑफ फेम' मध्ये समावेश करण्यात आला आहे ?४) पाण्याखालील ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर कोणत्या देशाला अलीकडेच नवीन बेट मिळाले आहे ?५) कलिंगड या फळासाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे ? *उत्तरे :-* १) भालाफेक ( साहित्य - भाला ) २) गुजरात ३) वीरेंद्र सेहवाग, भारत ४) जपान ५) अलिबाग *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 साईनाथ बोईनवाड👤 योगेश खवसे👤 पोतन्ना गुंटोड👤 प्रमोद पाटील बोमले👤 किशोरी चौगुले, सहशिक्षिका*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अजामेळ पापी तया अंत आला।कृपाळूपणे तो जनीं मुक्त केला॥अनाथासि आधार हा चक्रपाणी।नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥११९॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🎯 विचारवेध..........✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जर तुम्ही भविष्याचे ओझे डोक्यावर घेऊन जगत असाल तर वर्तमानात दुःखाशिवाय काहीच मिळणार नाही.कारण भविष्याच्या सुखासाठी आजच्या वर्तमानातील सुखाला हरवत हातातले सुख दूर करुन जगायला लागले तर दुःख च भोगणार ना ...! म्हणून आजचे सुख भोगत असताना उद्याच्या भविष्याची काळजी करण्याचे कारण नाही.वर्तमान सुखाचा असेल तर भविष्यही सुखात जाणार .आजचे सातत्य उद्याही चालू ठेवले तर काळजी करण्याचे कारणच नाही.व्यंकटेश काटकर, नांदेड🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कासवाची चतुराई*एकदा एक कासव जंगलाकडे जायला निघाला. त्याला कोल्हा दिसला. कोल्हा त्याच्या दिशेनेच येत होता. कासव घाबरला. कासवाने आपली मान व पाय कवचात ओढून घेतले. कोल्ह्याने कवच पाहिले. आपल्या पायाने कवचाला ओरखडले. कोल्ह्याला वाटले," हा तर दगड आहे. “कोल्हा पुढे निघून गेला. कासवाने हळूच मान बाहेर काढली. ते पाण्यात शिरले. कासवाने कोल्ह्याला आवाज दिला.. कोल्ह्याने मागे वळून पाहिले. तो स्वतःशीच म्हणाला अरे! शिकार हातची गेली..*बोध: चतुराईने केलेले काम चांगलेच व उपयोगी असते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28 नोव्हेंबर 2023💠 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील ३३२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०००:तेलगू भाषेतील महाकवी गुर्रम जाशुवा यांच्या नावाने दिला जाणारा साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वे यांना जाहीर**१९७५:पूर्व तिमोरला (पोर्तुगालपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९६७:जोसेलिन बेल बर्नेल आणि अँटनी हेविश यांनी 'पल्सार’ तार्यांचे अस्तित्त्व सर्वप्रथम सिद्ध केले.**१९६४:नासा (NASA) चे मरीनर-४ हे अंतराळयान मंगळाच्या मोहिमेवर निघाले.**१९६०:मॉरिटानियाला (फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१८२१:पनामाला (स्पेनपासुन) स्वातंत्र्य मिळाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८८:यामी गौतम-- हिंदी चित्रपट आणि मालिकांची अभिनेत्री**१९७८:मिलिंद कपाळे -- लेखक* *१९६७:प्रा.डॉ.प्रेमा लेकुरवाळे - लेखिका, कवयित्री* *१९६७:डॉ.धनंजय राजाराम गभणे -- लेखक* *१९६५:प्राचार्य डॉ.अरविंद देशमुख-- लेखक* *१९५९:विश्वास महिपती पाटील-- सुप्रसिद्ध कादंबरीकार,कथाकार,निवृत्त सनदी अधिकारी**१९५५:प्रा.अशोक राणा -- प्रसिद्ध इतिहास संशोधक व लेखक**१९५१:डॉ.शुभदा दीपक शेळके-- लेखिका* *१९५०:गोपाळ दत्तात्रय पहिनकर -- कवी, लेखक तथा निवृत्त उपशिक्षणाधिकारी* *१९४४:मधु पोतदार -- मराठी लेखक. त्यांनी अनेक मराठी संगीत दिग्दर्शकांची चरित्रे लिहिली(मृत्यू:८ ऑक्टोबर २०२०)**१९४०:रमेश महिपतराम दवे-- तत्त्वज्ञानाचे अभ्यासक व व्याख्याते**१९३८:मल्लेशप्पा मदिवलप्पा कलबुर्गी -- कन्नड भाषेतील वचन साहित्याचे भारतीय अभ्यासक आणि कन्नड विद्यापीठाचे कुलगुरू(मृत्यू:३० ऑगस्ट २०१५)**१९३७:प्रतिभा कुलकर्णी - प्रसिद्ध लेखिका* *१९३६:संभाजीराव सखाराम पाटणे-- लेखक* *१८७२:रामकृष्णबुवा वझे – गायक नट, बलवंत संगीत मंडळी आणि ललित कलादर्श या नाटक कंपन्यांमधे त्यांनी गायनगुरु म्हणून काम केले. (मृत्यू:५ मे १९४३)**१८५७:अल्फान्सो (बारावा) – स्पेनचा राजा (मृत्यू:२५ नोव्हेंबर १८८५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१२:झिग झॅगलर – अमेरिकन लेखक (जन्म:६ नोव्हेंबर १९२६)**२००५: गजानन बाळकृष्ण पळसुले-- आधुनिक संस्कृत महाकवी(१ नोव्हेंबर १९२१)**२००३:शंकर पांडुरंग रामाणी-- आधुनिक मराठी कवी (जन्म:२६ जून १९२२)**१९९९:हनुमानप्रसाद मिश्रा – १९८८ चा संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते बनारस घराण्याचे सारंगीवादक (जन्म:१९१३)**१९८०:बिरेंद्रनाथ(बी.एन.सरकार) सिरकार-- भारतीय चित्रपट निर्माता आणि न्यू थिएटर्स कलकत्ता चे संस्थापक(जन्म:५ जुलै १९०१)**१९७८:लक्ष्मीबाई केळकर (मावशी केळकर)-- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्त्री-शाखेच्या संस्थापिका(जन्म:६ जुलै १९०५)**१९६८:एनिड ब्लायटन – बालसाहित्यासाठी प्रसिद्ध असलेल्या इंग्लिश लेखिका (जन्म:११ ऑगस्ट १८९७)**१९६७:पांडुरंग महादेव तथा ’सेनापती’ बापट – सशस्त्र क्रांतिकारक, तत्त्वचिंतक व लढाऊ समाजसेवक (जन्म:१२ नोव्हेंबर १८८०)**१९६३:त्र्यंबक शंकर शेजवलकर – इतिहासकार व लेखक (जन्म:२५ मे १८९५)**१९६२:कृष्ण चंद्र तथा’के.सी.’डे – गायक, संगीत संयोजक व अभिनेते (जन्म:ऑगस्ट १८९३)**१९५४:एनरिको फर्मी – न्यूट्रॉन कणांवरील संशोधनासाठी १९३८ चे पदार्थविज्ञानातील नोबेल पारितोषिक विजेते इटालियन अमेरिकन-भौतिकशास्त्रज्ञ (जन्म:२९ सप्टेंबर १९०१)**१८९३:सर अलेक्झांडर कनिंगहॅम – भारतातील पुरातत्त्व संशोधनाची मुहूर्तमेढ करणारे ब्रिटिश अधिकारी (जन्म:२३ जानेवारी १८१४)**_१८९०:जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ ’महात्मा फुले’ – श्रेष्ठ समाजसुधारक, विचारवंत, लेखक ,क्रांतिकारक (जन्म:११ एप्रिल १८२७)_*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *गोरगरीबांचे कैवारी : महात्मा फुले*भारतीय समाजसुधारणेत व स्वातंत्र्य चळवळीत ज्यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते ती व्यक्ती म्हणजे जोतीराव गोविंदराव फुले. जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्याना ‘महात्मा’ ही उपाधी दिली. त्यामुळे ज्योतिबा फुले हे महात्मा फुले या नावाने सर्वत्र ओळखले जाऊ लागले. महात्मा फुले यांच्या वडिलांचे नाव..........वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_26.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *दिवाळी सुट्ट्यानंतर आजपासून शाळांना प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यातील १५ लाख भाविकांना श्रीराम दर्शनासाठी अयोध्येत नेणार; चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *अवकाळी पावसाने पुन्हा फुटला शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध; विदर्भासह राज्यभरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *हिवाळ्यात पावसाळा,अधिवेशनातही घोषणांचा पाऊस, आंदोलनं आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारची विशेष तयारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *देशात 80 कोटी जनता ऐतखाऊ, रेशन व्यवस्था बंद करा; सदाभाऊ खोत यांची वादग्रस्त मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अखेर नाशिकच्या धरणातून जायकवाडीत पाणी सोडले, मराठवाड्याच्या 25 दिवसांच्या लढ्याला यश*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL - कॅप्टन गिल! शुभमन गिल गुजरात टायटन्सचा नवा कर्णधार, हार्दीक पांड्या मुंबई संघात परत*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*थंड हवेचे ठिकाण - चिखलदरा*चिखलदरा हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यातील एक हिल स्टेशन व एक नगर परिषद आहे.महाभारतच्या महाकाव्यात वैशिष्ट्यपूर्ण, या ठिकाणी अशी भीती होती की भीमा यांनी एका भयंकर चढाओवातील खलनायक किचकचा वध केला आणि नंतर त्याला खोऱ्यात फेकून दिले. अशा प्रकारे कोच्चरदा-चिखलदरा हे त्याचे भ्रष्टाचार आहे म्हणून ओळखले जाऊ लागले.परंतु चिखलदराला अजून बरेच काही आहे. विदर्भातील एकमात्र हिल रिसॉर्ट, हे 1118 मीटरच्या उंचावर सर्वोच्च व्हॅरेट पॉईंट 1188 मीटर असून हे महाराष्ट्रातील एकमात्र कॉफ़ी-वाढविणारे क्षेत्र असण्याचे जोडलेले आहे. चिखलदराचे वार्षिक पाऊस 154 सेंमी आहे. उन्हाळ्यात तापमान 39 से हिवाळ्यात 5 से बदलते. भेट सर्वोत्तम महिने ऑक्टोबर ते जून पर्यंत आहेतहे वन्यजीवन-व्याघ्र, पेंटर, आळशीपणा अस्वल, सांबर, जंगली डुक्कर आणि अगदी क्वचितच पाहिलेले जंगली कुत्री आहे. जवळील प्रसिद्ध मेळघाट टायगर प्रकल्प आहे ज्यामध्ये 82 वाघ आहेत.चिखलदराचे निसर्गरम्य सौंदर्य चक्रीवादळ, प्रॉस्पेक्ट पॉईंट, आणि देवी पॉईंट मधून आनंद घेऊ शकतात. इतर मनोरंजक मोहिमा गव्हिल्गड आणि नारनला किल्ला, पंडित नेहरू बोटॅनिकल गार्डन्स, आदिवासी संग्रहालय आणि सेमादोह लेक यांचा समावेश आहे.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्रातील पहिले गिधाड संवर्धन व प्रजनन केंद्र कोठे उभारण्यात येणार आहे ?२) घटना समितीची पहिली सभा केव्हा झाली ?३) कर्नाटक राज्यात 'म्हशींच्या शर्यत' हा खेळ कोणत्या नावाने ओळखला जातो ?४) दिवाळीच्या दिवशी २२ लाखांहून अधिक मातीचे दिवे जाळण्याचा विश्वविक्रम कोणत्या शहराने केला आहे ?५) जगात हॉकीचे एकूण प्रकार किती आहेत ? *उत्तरे :-* १) अंजनेरी, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक २) ९ डिसेंबर १९४६ ३) कंबाला ४) अयोध्या ५) पाच - मैदानी, आईस, रोलर, स्लेज, स्ट्रीट हॉकी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 राम चव्हाण, नांदेड👤 भैय्या कांबळे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गजेंदु महासंकटी वास पाहे।तयाकारणे श्रीहरी धांवताहे॥ उडी घातली जाहला जीवदानी।नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥११८॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जेव्हा रोज सकाळ ही नवीन सकाळ होऊन या जगात प्रवेश करते तेव्हा प्रत्येक सजीवांसाठी नवीन आशा पल्लवित करण्यासाठी.ती म्हणते काल जे काही चांगले-वाईट झाले त्यातील चांगले लक्षात ठेऊन त्याला सोबत घेऊन पुढे अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करा आणि जे काही तुमच्या जीवनात वाईट घडून गेले त्याला विसरुन जा.त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घ्या आणि आनंदाने जीवन जगा.ती म्हणते मी कधीच भूतकाळाला धरुन वर्तमानात जगत नाही आणि वर्तमानात जे काही जगते ते भविष्यकाळातही त्याचा विचार करत नाही.त्यामुळेच मी रोजच्यारोज टवटवीत, प्रसन्न आणि प्रफुल्लीत असते.असा जर मी तुमच्यासारखा विचार करायला लागले असते तर सगळ्या जीवसृष्टीला आवडले असते का ? नाही. म्हणून झाले गेले विसरा नि रोज तेवढ्याच प्रसन्न मनाने,प्रसन्न मुद्रेने माझ्यासारखं आनंदी रहायला शिका मग माझ्याप्रमाणेच रोज तुमचंही स्वागत करतील, तुमच्याबद्दल इतरांना आवड निर्माण होऊन तुमच्यावर प्रेम करायला लागतील.© व्यंकटेश काटकर, नांदेड.संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *प्रामाणिक लाकूडतोड्याची गोष्ट*एका गावामध्ये एक लाकूडतोड्या राहत होता. लाकूडतोडून आपला संसार चालत होता. एके दिवशी तो झाड शोधत एका नदीकाठी गेला त्याला एक मोठे झाड सापडले तो त्या झाडावर फांदी तोडण्यासाठी चढला आणि फांदी तोडू लागला.अचानक त्याच्या हातातून कुऱ्हाड खाली नदीत पडली.त्याच्याजवळ दुसरी कुराड घेणे इतपत ही पैसे नव्हते तो खूप निरास झाला आणि नदीकाठी येऊन रडू नदी उर्फ सरिता देवी त्याचे रडणे ऐकून प्रकट झाली आणि त्याला विचारू लागली की का रे तू रडत आहेस. लाकूडतोड्या सरिता देवीला आपली कुऱ्हाड नदीत पडली असे सांगतो.सरिता देवी लगेच नदीत बुडी घेऊन हातात सोन्याची कुऱ्हाड घेऊन प्रकट होते आणि लाकूडतोड्याला विचारते ही आहे का तुझी कुऱ्हाड. लाकूडतोड्या नम्रपणे म्हणतो देवी ही माझी कुऱ्हाड नाही मग देवी त्याला चांदीची खुराक दाखवणे तो परत मान हलवून ही देखील नाही कुऱ्हाड माझी देवीला सांग.आता देवी पुन्हा बुडी घेऊन नदीत जाते व लोखंडाची खुराक घेऊन प्रकट होते इतक्यात लाकूडतोड्या म्हणतो होय हीच माझी कुऱ्हाड आहे देवी. देवी म्हणते तू खूप प्रामाणिक आहे या प्रामाणिकपणामुळे या तीनही कुऱ्हाडी तुलाच बक्षीस स्वरूपात ठेव.*तात्पर्य:- नेहमी खरे बोलावे.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 03 नोव्हेंबर 2023💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ३०७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९८८:श्रीलंकेतून आलेल्या भाडोत्री तामिळ सैनिकांनी मालदीववर हल्ला केला. तेथील सरकारच्या विनंतीवरुन भारतीय सैन्याने तो मोडून काढला व सरकार वाचवले**१९५७:रशियाच्या ’स्पुटनिक-२’ या अंतराळयानातून गेलेली 'लायका’ नावाची कुत्री ही अंतराळभ्रमण करणारी पहिली सजीव प्राणी ठरली. मात्र प्रक्षेपणानंतर काही तासांतच ती मृत्यूमुखी पडली.**१९१८:पोलंड (रशियापासुन) स्वतंत्र झाला.**१९१३:अमेरिकेत ’आय कर’ सुरू झाला.**१९०३:पनामा (कोलंबियापासुन) स्वतंत्र झाला.**१८३८:’द टाइम्स ऑफ इंडिया’ हे जगातील सर्वाधिक खपाचे इंग्लिश दैनिक ’द बॉम्बे टाइम्स अँड जर्नल ऑफ कॉमर्स’ या नावाने मुंबईत सुरू झाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९०:सुभाषश्री गांगुली-- भारतीय अभिनेत्री,मॉडेल,पटकथा लेखिका* *१९७७:विद्या रामभाऊ भडके -- कवयित्री* *१९७७:संतोष जयराम वाटपाडे-- कवी* *१९७४:सोनाली कुलकर्णी-- मराठी चित्रपट अभिनेत्री,लेखिका* *१९७२:प्रा.राजेंद्र दशरथ सोनवणे -- कवी,लेखक* *१९६५:संतोष शरदराव हुदलीकर-- कवी,गीतकार**१९५३:अनिल शेंडे -- कवी,लेखक* *१९३७:लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर – चित्रपटसृष्टीत चार दशके लोकप्रिय संगीत देणार्या 'लक्ष्मीकांत-प्यारेलाल’ या जोडीतील संगीतकार (मृत्यू:२५ मे १९९८)**१९३६:प्रा.डॉ.लीला नारायण गोविलकर-- लेखिका* *१९३४:नलिनी आनंद साधले--संस्कृत पंडित, लेखक,अनुवादक,कृषितज्ज्ञ (मृत्यू:१ डिसेंबर २०१०)**१९३३:अमर्त्य सेन – कल्याणाभिमुख अर्थशास्त्र व सामाजिक पर्याय सिद्धान्त या विषयांतील कार्यासाठी नोबेल पारितोषिक विजेते (१९९८) अर्थशास्त्रज्ञ**१९३३:प्रा.म.श.वाबगावकर-- प्रसिद्ध लेखक (मृत्यू:१२ मार्च २०२०)**१९२८:बंधुमाधव मोडक-- कथा व कादंबरी लेखक**१९२६:माधव भास्कर आचवल-समीक्षक, ललित लेखक(मृत्यू:२१ जानेवारी १९८०)**१९२५:पंडित विजय राघव राव--भारतीय बासरीवादक,नृत्यदिग्दर्शक,संगीतकार,कवी आणि कथा लेखक(मृत्यू:३० नोव्हेंबर २०११)**१९२५:हेमंत विष्णू इनामदार--संतसाहित्याचे अभ्यासक(मृत्यू:२३ जून २००५)**१९२१:चार्ल्स ब्रॉन्सन – अमेरिकन अभिनेता (मृत्यू:३० ऑगस्ट २००३)**१९०१:पृथ्वीराज कपूर – अभिनेते,निर्माते व दिग्दर्शक (मृत्यू:२९ मे १९७२)**१६८८:सवाई जयसिंग – जयपूर संस्थानचा राजा (मृत्यू:२१ सप्टेंबर १७४३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:गुरुनाथ विष्णू नाईक -- रहस्यकथा लेखक व पत्रकार (जन्म:२ जून १९३८)**२०१४:नारायण वासुदेव गोखले -- चित्रकार, लेखक (जन्म:३ जून १९११)**२०१४:गणेशकुमार नरवाडे उर्फ सदाशिव अमरापूरकर-- मराठी नाट्य अभिनेते तसेच हिंदी,मराठी,ओरिया,हरियाणी,भोजपुरी, बंगाली व गुजराती भाषांतील चित्रपटांत काम करणारे अभिनेते(जन्म११ मे १९५०)**२०१२:कैलाशपती मिश्रा – गुजरातचे माजी राज्यपाल (जन्म:५ आक्टोबर १९२३)**२०००:प्रा.गिरी देशिंगकर – चीनविषयक तज्ञ आणि पूर्व आशियाई घडामोडींचे अभ्यासक* *१९९८:डॉआरसी.हिरेमठ – कन्नड साहित्यिक,कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू (जन्म:१५ जानेवारी १९२०)**१९९२:प्रेम नाथ – हिन्दी चित्रपटात नायक व खलनायकाच्या भूमिका गाजवणारे अभिनेते (जन्म:२१ नोव्हेंबर १९२६)**१९९०:मनमोहन कृष्ण – चरित्र अभिनेता (जन्म:२६ फेब्रुवारी १९२२)**१८१९:अनंत फंदी – शाहीर, ’फटका’कार, गोंधळी (जन्म:१७४४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*महाराष्ट्रातील संतांची माहिती*.... संत चोखामेळा .....संत चोखामेळा (चोखोबा) हे यादव काळातील नामदेवांच्या संतमेळ्यातील वारकरी संप्रदायातील कवी होते. चोखोबांचा जन्म विदर्भातील बुलढाणाजिल्ह्यात देऊळगाव राजा तालुक्यातील मेहुणा किंवा मेहुणपुरी या गावी झाला. संत चोखामेळांचे कुटुंब हे जातीने महार होते. चोखोबा मूळ वऱ्हाडातील आहेत असेही म्हटले जाते. त्यांची पत्नी सोयरा, बहीण निर्मळा, मेहुणा बंका व मुलगा कर्ममेळा हे सर्व प्रपंचाचे काबाडकष्ट उपसत असतानाच नित्यनेमाने व भक्तिभावाने पांडुरंगाचे नामस्मरण व गुणसंकीर्तन करीत होते. चोखॊबांचा मृत्यू गावकुसाच्या कामात दरड कोसळून झाल्याचे सांगितले जाते. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या हाडांतून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता, यावरून नामदेवांनी चोखोबांची हाडे ओळखून ती गोळा केली व पंढरपूरला विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी बांधली असे चरित्रकार सांगतात.संत चोखोबा हे एक, संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले संत होते. संत नामदेव हे त्यांचे गुरू होत. तत्कालीन सामाजिक विषमतेमुळे चोखोबा होरपळून निघाले. ते शूद्र-अतिशूद्र, गावगाडा, समाज जीवन, भौतिक व्यवहार, उच्चनीचता व वर्णव्यवस्था यांच्या विळख्यात अडकले.संत चोखामेळा हे प्रापंचिक गृहस्थ. ते उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत, पण ते विठ्ठलाच्या नामात सतत दंग असत. गावगाड्यातील शिवाशिवीच्या वातावरणात त्यांचा श्वास कोंडला जात होता. दैन्य, दारिद्रय, वैफल्य यांमुळे ते लौकिक जीवनात अस्वस्थ होते. परंतु प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना जवळ केले, त्यांना संतसंग लाभला. त्यांना मंदिरांत प्रवेश नव्हता. श्रीविठ्ठलाला त्यांना इतरांप्रमाणे उराउरी भेटावे असे खूप वाटत होते. परंतु ते सावळे, गोजिरे रूप महाद्वारातूनच पाहावे लागे, ही खंत त्यांच्या मनात होती.चंद्रभागा नदीच्या वाळवंटात आध्यात्मिक लोकशाही संत ज्ञानदेवांमुळे १३व्या शतकात उदयाला आली. म्हणून संत चोखोबा म्हणतात, ‘खटनट यावे, शुद्ध होऊनी जावे। दवंडी पिटीभावे डोळा।।’ ... असा पुकारा करून त्यांनी वारकरी संप्रदायातील अध्यात्मनिष्ठ, अभेद भक्तीचे लोण आपल्या उपेक्षित बांधवांपर्यंत नेऊन पोहोचवले. आत्मविकासाची संधी तत्कालीन समाजरचनेतील अगदी तळातील लोकांनाही मिळावी असे ज्ञानेश्र्वरादी सर्वच संतांना प्रांजळपणे वाटत होते. त्याच वेळी संत चोखोबांनी भक्तिमार्गाचा संदेश आपल्या अभंगांतून समाजबांधवांना दिला.संकलन :- नासा येवतीकर( वरील माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे. )~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठा आरक्षण : जरांगे पाटलांचं उपोषण मागे, सरकारला दोन महिन्यांची मुदत*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी RBI समोर रांगा, अचानक लोकांची गर्दी झाल्यानं तपास सुरु*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *एसटी महामंडळाला दिवाळीपूर्वी वेतनासाठी 378 कोटींची महाराष्ट्र सरकारकडून मदत, एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळीपूर्वी होण्याचा मार्ग मोकळा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबईत गेल्या 10 महिन्यात एक लाखांहून अधिक घरांची विक्री, राज्य सरकारच्या तिजोरीत 9,221 कोटींचा महसूल जमा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कांदा उत्पादकांना 35 ते 40 कोटी रुपयांचा फटका, दरात 800 ते 900 रुपयांची घसरण; कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सिंधुदुर्ग मालवण येथील राजकोट किल्ला परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळलेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा 302 धावानी केला पराभव, सलग सातवा विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बळवंत पांडुरंग किर्लोस्कर* बळवंत पांडुरंग किर्लोस्कर यांचा जन्म 31 मार्च 1843 साली धारवाड जिल्ह्यातील गुलहोसुर या गावी झाला.त्यांचे शिक्षण धारवाड,कोल्हापूर,पुणे येथे झाले.लहानपणापासून त्यांना कविता करण्याचा छंद होता.पुण्यात असतांना त्यांनी एक नाटक कंपनी काढली.पुढे काही काळ त्यांनी नाटक कंपनी चा नाद सोडला. बेळगावात आण्णा साहेबांनी काही दिवस शिक्षक म्हणून काम केले.पोलीस खात्यातही त्यांनी नोकरी केली.1880 साली पुण्यात एक पारशी कंपनी चे नाटक पाहून त्यांचे नाटक प्रेम जागृत झाले.त्यांनी कालिदासाच्या संस्कृत शाकुंतल या नाटकाचे मराठीत भाषांतर केले आणि ते रंगभूमी वर आणले. 31 ऑक्टोबर 1880 रोजी संगीत शाकुंतल या नाटकाचा पहिला प्रयोग पुणे येथील आनंद या नाट्यगृहात झाला.ज्याला आधुनिक अर्थांने नाटक म्हणता येईल असा नाट्यप्रयोग मराठी रंगभूमीवर प्रथमच झाला.अण्णासाहेबांनी सर्व पात्रांचे संभाषण व पदानसह संपूर्ण नाटक आधी लिहून काढले.त्याप्रमाणे भाषणे बोलून व अभिनय करून अनेकवेळा तालिमी घेतल्या व परिपूर्ण अवस्थेत नाटक सादर केले.लोकांना हा प्रकार नवीन होता.या नाटकास उत्तम यश व लोकप्रियता मिळाली.पुढे आण्णासाहेबांनी सौभद्र हे पौराणिक नाटक रंगभूमी वर आणले.या नाटकाने साऱ्या महाराष्ट्राला वेड लावले.हे नाटक व त्यातील संगीत हे आजही कालच्या इतकेच लोकप्रिय आहे.राजराज्य वियोग हे त्यांचे शेवटचे नाटक .शीघ्र कवित्व त्यांचे ठायी होते.ते कीर्तने ही उत्तम करीत.शिवाजी महाराजांवर त्यांनी 500 ओव्यांचे एक दीर्घ काव्य त्यांनी रचले आहे.त्यांच्या सर्व लिखाणाचा संग्रह "समग्र किर्लोस्कर" नावाने प्रसिद्ध करण्यात आला आहे. 2 नोव्हेंबर 1885 साली मराठी रंगभूमी वरील संगीत नाटकाचे नवयुग प्रवर्तक,नाटककार,शीघ्र कवी,हौशी नट बळवंत पांडुरंग किर्लोस्कर उर्फ आण्णासाहेब किर्लोस्कर यांचे निधन झाले . अश्या बहू आयामी , बहू पदरी कलावंताचे स्मृतीस विनम्र अभिवादन.*संकलन :- सुरेखा खोत, बुलढाणा*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आत्मविश्वासाचा अभावहेच अपयशाचे खरे कारण आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) संत्रीमध्ये कोणते व्हिटॅमिन असते ?२) संत गाडगेबाबा यांचे जन्म नाव काय होते ?३) राज्यसभा सदस्याचा कार्यकाल किती असतो ?४) पहिला जागतिक अन्न पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला ?५) विश्वचषक सामन्यात सर्वाधिक बळी घेणारा भारतीय खेळाडू कोण ? *उत्तरे :-* १) व्हिटॅमिन 'सी' २) डेबू ३) सहा ४) मनकोम्बू सांबशिवन उर्फ एम. एस. स्वामीनाथन ५) मोहंमद शम्मी *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संदीप पगारे👤 मयूर मधुकरराव महाजन👤 अंजली देशमुख घंटेवार, साहित्यिक*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जनी हीत पंडीत सांडीत गेले। अहंतागुणे ब्रह्मराक्षस जाले॥ तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे। मना सर्व जाणीव सांडुनि राहे॥११३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••म्हणतात ना की, आपली जर..एखाद्या वेळी चूक झाली असेल तर मोठ्या मनाने माफी मागितले पाहिजे. म्हणजेच त्यामध्ये नक्कीच काहीतरी चांगले दडलेले असेल. पण, एका अर्थाने चूक मान्य करण्यासाठी सुद्धा खूप मोठे काळीज असावे लागते व माफ करणारी व्यक्ती सुद्धा तेवढीच अनुभवी व समजदार असायला पाहिजे. कारण, माफी मागणारा तर निघून जातो पण, खूप काही शिकायला भाग पाडत असतो. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📗 *मुर्ख डोमकावळा*📗 *एका गरूडाने कुरणात चरत असलेल्या मेंढ्यांच्या कळपातील एका कोकरावर झडप घातली व त्या कोकराला पळवून नेले. त्याचे हे धाडस आणि सामर्थ्य पाहून रानातले सर्व पशुपक्षी त्या गरूडाकडे भीतीयुक्त आदराने पाहू लागले. 'गरूडाने पळवले त्यापेक्षाही मोठे कोकरू जर आपण पळवले तर गरूडापेक्षाही आपला मानसन्मान वाढेल, त्याच्याइतकीच प्रतिष्ठा आपल्याला लाभेल असे एका डोमकावळ्याला वाटले. त्यासाठी त्याने नजर ठेवून एका मोठ्या थोराड अशा कोकराच्या पाठीवर बसून त्याला उचलण्याचा प्रयत्न केला पण ते कोकरू उचलले जाण्याऐवजी, डोमकावळ्याचेच पाय कोकराच्या पाठीवरील लोकरीमध्ये अडकले व तिथून सुटण्यासाठी त्याने पंखांची केलेली फडफड व आरडाओरड मेंढपाळाच्या कानी गेली. तो तिथे आला व त्याने डोमकावळ्याला सोडविले व पिंज-यात कैद केले व त्याला स्वत:च्या मुलांच्या स्वाधीन केले. मुलांनी मेंढपाळाला विचारले,''बाबा या पक्ष्याचे नाव काय हो'' यावर तो मेंढपाळ हसून म्हणाला,'' या मूर्ख पक्ष्याला जर तुम्ही याचे नाव विचारले तर हा स्वत:ला गरूडापेक्षाही श्रेष्ठ असा पक्षी म्हणून स्वत:ची ओळख करून देईल पण प्रत्यक्षात हा मोठेपणाचा आव आणणारा एक भिकार डोमकावळा आहे.''**तात्पर्य :- काही काही लोकांना मोठेपणाचा आव आणण्याची प्रचंड सवय असते. यामध्ये त्यांनी कितीही जरी मोठेपणाचे सोंग घेतले तरी इतर सूज्ञ लोक हे त्यांची पात्रता जाणून असतात.*सौजन्य :- https://dnyaneshwarkapti.blogspot.com/p/blog-page_29.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 02 नोव्हेंबर 2023💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ३०६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९९:दाक्षिणात्य पार्श्वगायक एस.पी. बालसुब्रम्हण्यम यांची मध्यप्रदेश सरकारतर्फे दिल्या जाणार्या लता मंगेशकर पुरस्कारासाठी निवड. सुगम संगीतातील असाधारण कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो.**१९४०:दुसरे महायुद्ध – ग्रीस व ईटली यांच्यात युद्ध सुरू झाले.**१९१४:रशियाने ओट्टोमान साम्राज्याविरुद्ध युद्ध पुकारले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१:ईशा देओल-- भारतीय अभिनेत्री**१९७८:डॉ.विशाल इंगोले-- प्रसिद्ध कवी* *१९७५:दिपाली मुकुंद दातार-- कवयित्री, लेखिका**१९७४:डॉ.ज्योती कदम-- कवयित्री,लेखिका**१९६५:अरुण कदम-- मराठी अभिनेता**१९६५:शाहरुख खान – प्रसिद्ध अभिनेता व निर्माता**१९६२:मोहन मु. कुलकर्णी -- कवी* *१९६०:अनु मलिक – प्रसिद्ध संगीतकार**१९६०:प्रा.डॉ.अलका अविनाश बडगे -- लेखिका* *१९५८:विद्या भालचंद्र साताळकर-- कवयित्री,लेखिका**१९५८:कविता अरुण भालेराव-- प्रसिद्ध लेखिका**१९५८:डॉ.विद्याधर सीताराम करंदीकर -- कवी,बालनाटककार,मराठी आणि संस्कृत भाषेचे ते जाणकार(मृत्यू:१ आक्टोबर २०१६)**१९५२:प्रा.जैमिनी भाऊराव कडू-- पत्रकार व साहित्यिक (मृत्यू:१७ मार्च २०१८)**१९४६:जयश्री रमेश कुलकर्णी(देशमुख ) -- लेखिका**१९४१:सुभाष भालचंद्र देशपांडे--कथा व नाट्य लेखन**१९४१:अरुण शौरी –माजी केन्द्रीय मंत्री,पत्रकार व लेखक**१९३५:शशिकला चंद्रकांत मेहता-- लेखिका**१९२१:रघूवीर दाते – ध्वनीमुद्रणतज्ञ,हिन्दी, मराठी,गुजराती आणि उडिया भाषांतील सुमारे चाळीस चित्रपटांचे ध्वनीमुद्रण त्यांनी केले.* *१९१९:आशा श्रीराम परचुरे -- कथा,नाटक, एकांकिकेचे लेखन* *१८९७:सोहराब मेहेरबानजी मोदी – चित्रपट निर्माते,दिग्दर्शक व अभिनेते,दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित (१९७९), (मृत्यू:२८ जानेवारी १९८४)**१८८६:धीरेंद्रनाथ दत्ता – बांगलादेशी राजकारणी (मृत्यू:२९ मार्च १९७१)**१८८२:डॉ.के.बी.लेले – महाराष्ट्रातील जादूगारांचे आचार्य (मृत्यू: २ मे १९६३)**१८७३:अप्पाशास्त्री सदाशिवशास्त्री राशिवडेकर--आद्य संस्कृत वृत्तपत्रकार(मृत्यू:२५ ऑक्टोबर १९१३)**१८७१:काशीनाथ रघुनाथ मित्र (आजगावकर)-- मराठी लेखक,बंगाली साहित्याचे मराठी अनुवादक (मृत्यू: १९२०)**१८३३:महेन्द्र लाल सरकार – होमिओपॅथ, समाजसुधारक व विज्ञानप्रसारक, (मृत्यू:२३ फेब्रुवारी १९०४)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१५:टॉमी ओव्हरस्ट्रीट-- अमेरिकन गायक-गीतकार आणि गिटार वादक (जन्म:१९३७)**२०१२:येरेन नायडू –तेलगु देसम पक्षाचे लोकसभेतील नेते(जन्म:२३ फेब्रुवारी १९५७)**१९९०:भालचंद्र दिगंबर तथा आबासाहेब गरवारे – प्लॅस्टिक व नायलॉन उद्योगाचे जनक, महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासातील एक प्रमुख शिल्पकार,पद्मभूषण,डि. लिट.(पुणे विद्यापीठ),उद्योजक(जन्म:२१ डिसेंबर १९०३)* *१९५०:जॉर्ज बर्नार्ड शॉ – नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (LSE) सहसंस्थापक (जन्म:२६ जुलै १८५६)**१८८५:बळवंत पांडुरंग तथा ’अण्णासाहेब’ किर्लोस्कर–नाटककार (जन्म:३१ मार्च १८४३)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*महाराष्ट्रातील संतांची माहिती*.... संत गोरा कुंभार ....संत गोरा कुंभार हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते. ते संत नामदेव व संत ज्ञानेश्वरांचे समकालीन मानले जातात. संत गोरा कुंभार यांनी अनेक अभंग लिहिले आहेत. गोरा कुंभार हे विठ्ठलाचे मोठे भक्त होते.त्यांनी चैत्र कृष्ण त्रयोदशी, शके १२३९ (२० एप्रिल १३१७) रोजी समाधी घेतली. गोरा कुंभार यांना गोरोबा काका म्हणत. त्यांची समाधी समजले जाणारे संत गोरोबा काका मंदिर उस्मानाबाद जिल्ह्यात तेर नावाच्या गावी आहे. याशिवाय महाराष्ट्रात अनेक ठिकाणी संत गोरोबा काका यांची मंदिरे आहेत.“तेर" नगरीत गोराबा काका यांच्या घराण्याची परंपरा धार्मिक वृत्तीची व सदाचारी वृत्तीची होती. “तेर" येथील 'काळेश्वर’ या ग्रामदैवतांचे त्यांचे घराणे उपासक होते. दोघे नवराबायको कुंभारकाम व काबाडकष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. सदाचारी, सच्छिल वृत्तीमुळे तेर गावात माधव बुवांना संत म्हणून गावकरी ओळखत होते. माधवबुवांना आठ मुले झाली होती. त्यांना झालेली मुले जगत नव्हती. त्यांनी आपली ८ ही मुले काळेश्वराजवळील स्मशानातील गोरीत पुरली होती. माधवबुवा धार्मिक व सहिष्णु वृत्तीचे होते. काळेश्वरावर त्यांची निस्सीम श्रद्धा व भक्ती होती. सात मुले एका मागोमाग गेली परंतु आठवा मुलगा गोरोबा जिवंत राहिलेसंत गोरा कुंभार हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक थोर संत होते. पांडुरंगाचे निस्सीम भक्त असलेल्या गोरोबा काकांचे वीस अभंग आज आपल्याला पहायला मिळतात. संत मंडळींमध्ये संत गोरोबा काका हे ‘वडील’ होते, संत महात्म्यांना ते परम वंदनीय आणि आदरणीय होते. त्यामुळे सर्व संतांनी त्यांना “काका” ही उपाधी बहाल केली होती. गोरोबा काका हे विरागी पुरुष म्हणून ओळखले गेले, निर्गुण निराकार परब्रम्हाचे लौकिक रूप म्हणजे संत गोरा कुंभार. स्वतःचा परंपरागत कुंभार व्यवसाय करीत प्रपंच सांभाळून,संतत्व जपत त्यांनी भागवत धर्माचा प्रसार केला. आलेला दिवस परमेश्वराला स्मरून सार्थकी लावणारा खरा वारकरी असल्याची त्यांची धारणा होती.संकलन - नासा येवतीकर~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठा आरक्षण मिळेपर्यंत पाण्याला हात लावणार नाही :जरांगे पाटलांचा एल्गार, म्हणाले, सरकारविरोधात जनतेत रोष*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 48 तासांसाठी इंटरनेट सेवा बंद, जिल्हा प्रशासनाचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *1 नोव्हेंबर 2023 पासून अधिकृतपणे 19 किलेग्राम वजनाच्या व्यावसायिक एलपीजीच्या दरांत 101.50 रुपयांची वाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *देशाच्या तिजोरीत जीएसटी करातून 1.72 लाख कोटींची भर; महाराष्ट्रातून सर्वाधिक कर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा केल्या जाहीर, बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२४ रोजी तर दहावीची परीक्षा १ मार्च २०२४ रोजी सुरू होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबईच्या वानखेडे स्टेडियम मध्ये विक्रमादित्य सचिन तेंडुलकर यांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अनावरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *World Cup 2023 - पुण्यात खेळलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला 190 धावानी हरविले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बळवंत पांडुरंग किर्लोस्कर* बळवंत पांडुरंग किर्लोस्कर यांचा जन्म 31 मार्च 1843 साली धारवाड जिल्ह्यातील गुलहोसुर या गावी झाला.त्यांचे शिक्षण धारवाड,कोल्हापूर,पुणे येथे झाले.लहानपणापासून त्यांना कविता करण्याचा छंद होता.पुण्यात असतांना त्यांनी एक नाटक कंपनी काढली.पुढे काही काळ त्यांनी नाटक कंपनी चा नाद सोडला. बेळगावात आण्णा साहेबांनी काही दिवस शिक्षक म्हणून काम केले.पोलीस खात्यातही त्यांनी नोकरी केली.1880 साली पुण्यात एक पारशी कंपनी चे नाटक पाहून त्यांचे नाटक प्रेम जागृत झाले.त्यांनी कालिदासाच्या संस्कृत शाकुंतल या नाटकाचे मराठीत भाषांतर केले आणि ते रंगभूमी वर आणले.31 ऑक्टोबर 1880 रोजी संगीत शाकुंतल या नाटकाचा पहिला प्रयोग पुणे येथील आनंद या नाट्यगृहात झाला.ज्याला आधुनिक अर्थांने नाटक म्हणता येईल असा नाट्यप्रयोग मराठी रंगभूमीवर प्रथमच झाला.अण्णासाहेबांनी सर्व पात्रांचे संभाषण व पदानसह संपूर्ण नाटक आधी लिहून काढले.त्याप्रमाणे भाषणे बोलून व अभिनय करून अनेकवेळा तालिमी घेतल्या व परिपूर्ण अवस्थेत नाटक सादर केले.लोकांना हा प्रकार नवीन होता.या नाटकास उत्तम यश व लोकप्रियता मिळाली.पुढे आण्णासाहेबांनी सौभद्र हे पौराणिक नाटक रंगभूमी वर आणले.या नाटकाने साऱ्या महाराष्ट्राला वेड लावले.हे नाटक व त्यातील संगीत हे आजही कालच्या इतकेच लोकप्रिय आहे.राजराज्य वियोग हे त्यांचे शेवटचे नाटक .शीघ्र कवित्व त्यांचे ठायी होते.ते कीर्तने ही उत्तम करीत.शिवाजी महाराजांवर त्यांनी 500 ओव्यांचे एक दीर्घ काव्य त्यांनी रचले आहे.त्यांच्या सर्व लिखाणाचा संग्रह "समग्र किर्लोस्कर" नावाने प्रसिद्ध करण्यात आला आहे. 2 नोव्हेंबर 1885 साली मराठी रंगभूमी वरील संगीत नाटकाचे नवयुग प्रवर्तक,नाटककार,शीघ्र कवी,हौशी नट बळवंत पांडुरंग किर्लोस्कर उर्फ आण्णासाहेब किर्लोस्कर यांचे निधन झाले . अश्या बहू आयामी , बहू पदरी कलावंताचे स्मृतीस विनम्र अभिवादन.*संकलन :- सुरेखा खोत, बुलढाणा*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शुन्यालाही देता येते किंमत,फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभे रहा.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सिताफळमध्ये कोणते व्हिटॅमिन असते ?२) वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कोणत्या कलेमध्ये पारंगत होते ?३) विधानसभा सभापती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात ?४) २०२३ चा जागतिक अन्न पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला ?५) जगातील पहिल्या सिट्रस काँग्रेसच्या आयोजनाचा मान कोणत्या देशाला मिळाला आहे ? *उत्तरे :-* १) व्हिटॅमिन 'सी' २) पोहणे, अश्वरोहन, कुस्त्या इत्यादी ३) उपसभापती ४) हेडी कुहन, अमेरिका ५) भारत *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शंकरराव कामीनवार, सेवानिवृत्त शिक्षक, धर्माबाद👤 मारोती बोईनवाड👤 गोविंद देशमुख👤 छाया पुयड👤 महेश दुधाळकर👤 प्रवीण शिंदे👤 प्रणित जैस्वाल👤 मल्लेश धुलेवार, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जनीं सांगतां ऐकता जन्म गेला। परी वादवेवाद तैसाचि ठेला॥ उठे संशयो वाद हा दंभधारी। तुटे वाद संवाद तो हीतकारी॥११२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणाची जागा घेण्यासाठी नको त्या वाटेने जाऊन स्वतः मधील गुणांना कमी लेखू नये. कारण प्रत्येक व्यक्तीची योग्यता वेगळी असते. ज्या व्यक्तीविषयी आपण कटकारस्थान रचण्याचा प्रयत्न करतो किंवा कमी लेखतो आधी त्या व्यक्तीने आपल्या जीवनात किती वादळ, वारे, आपत्ती,सहन करून किती संघर्ष केला आहे ते,आधी जाणून घेतले पाहिजे. असे झाले तर कोणाची जागा घेण्याची किंवा चुकीच्या मार्गाने जाण्याची आवश्यकता पडणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 📗 *माणसातील देव*📗 *एका गावात एक चर्च होते. एक दिवस नदीला पूर आला. पाणी गावात गुडघ्यापर्यंत आले. चर्चच्या फादरना न्यायला एक जीप आली. माणसे म्हणाली, फादर चला. बहुतेक पाण्याने सगळे वाहून जाईल. फादर म्हणाले, 'मला माझा येशूच येऊन वाचवेल.' जीप निघून गेली. नंतर पाणी वाढल्यानंतर एक बोट आली. बोटीतील लोक फादरना न्यायला आले. फादरनी नकार दिला. पाणी इतके वाढले की फादरना चर्चच्या छप्परावर जावे लागले. मग एक हेलिकॉप्टर वरतून घिरट्या घालू लागले. त्यातून एक दोर आला. हेलिकॉप्टरमधले लोक म्हणाले, 'फादर आता तरी दोर पकडा आणि जीव वाचवा.' फादर म्हणाले, 'माझा येशूच मला येऊन वाचवेल.' यानंतर एकच मोठी लाट आली आणि फादर मृत्यमुखी पडले. स्वर्गात गेल्यावर त्यांनी येशूला विचारले, 'मी इतकी प्रार्थना केली, पण तू मला वाचवले नाहीस.' येशू म्हणाले, 'मी प्रथम जीप घेऊन आलो होतो. नंतर बोट आणि नंतर हेलिकॉप्टर. पण तूच मला काही ओळखले नाहीस.'**तात्पर्य :- देव काही प्रत्यक्ष येऊन मदत करत नाही. तो माणसातच शोधावा लागतो.*सौजन्य :- https://dnyaneshwarkapti.blogspot.com/p/blog-page_29.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Posts (Atom)