✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~*नोट :- सोमवार दि. 17 ऑक्टोबर ते 08 नोव्हेंबर पर्यंत दिवाळी सुट्टी असल्याने दि. 09 नोव्हेंबर पासून पूर्ववत सुरू होईल.*~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 15/10/2022 वार - शनिवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*जागतिक विद्यार्थी दिन* *वाचन प्रेरणा दिन* *जागतिक हात धुवा दिवस* 💥 ठळक घडामोडी :-★ १९३२ - टाटा एअरलाइन्सच्या (नंतरचे एअर इंडिया) विमानाचे पहिले उड्डाण.★१९७० - एरोफ्लोत फ्लाइट २४४ या विमानाचे तुर्कस्तानला अपहरण.★ १९९७ - शनिकडे जाणाऱ्या कॅसिनी अंतराळयानाचे केप केनॅव्हरल येथून प्रक्षेपण.★ १९९७ - गॅलिलियो अंतराळयान गुरूच्या उपग्रह आयोपासून ११२ मैलांवरुन पुढे गेले.💥 जन्म :-◆१९२३ - गो. रा. जोशी, मराठी रंगभूमीचा चालताबोलता इतिहास असे नाट्यसमीक्षक.◆ १९३१ - डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम, भारताचे माजी राष्ट्रपती.💥 मृत्यू :-◆१९१८ - साई बाबा (शिर्डी).◆ १९६१ - सूर्यकांत त्रिपाठी, निराला,४४ ग्रंथ लिहिणारे हिंदी साहित्यिक.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *एसटी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सुत्रानुसार येत्या २० ऑक्टोबरपासून १० ते ३० टक्क्यापर्यत हंगामी भाडेवाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई : राज्य शासनातील अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना उत्सव अग्रीम १२ हजार ५०० एवढी रक्कम अग्रीम मंजूर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यात दरवाढीसाठी महावितरणने राज्य विद्युत नियामक आयोगाशी केली चर्चा, राज्यात पुन्हा एकदा वीज दरवाढ होणार असल्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबईत १ नोव्हेंबरपासून सहप्रवाशांना सीटबेल्टची सक्ती, अन्यथा मोठा दंड भरावा लागणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *केंद्रीय निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तारखांची केली घोषणा, 12 नोव्हेंबरला मतदान तर 8 डिसेंबरला मतमोजणी होईल.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अंनिसचे जेष्ठ कार्यकर्ते प्रा. प. रा. आर्डे यांचे निधन, ते 82 वर्षाचे होते, धार्मिक विधी न करता केलं देहदान!*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पोलीस भरतीचा मार्ग मोकळा, पोलिसांची 11 हजार 443 पदं भरतीला देण्यात आली मंजुरी देण्यात आली, लवकरच होणार पोलीस भरती*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🖥️ चरित्रात्मक माहिती 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••वाचन प्रेरणा दिन त्यानिमित्ताने .........*मिसाईल मॅन ते राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/6du7dSL9qdI~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *एम. डी. भोसले, सहशिक्षक, प्रा. शाळा मंगनाळी ता. धर्माबाद जि. नांदेड*📱9011200230~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 काव्यांगण ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••15 ऑक्टोबर - डॉ. ए पी जे अब्दुल कलाम जयंती निमित्ताने काव्यपुष्पांजली*।। वाचन प्रेरणा दिवस ।।*वाचनाने मिळते आम्हा ज्ञानज्ञानाने होतो आम्ही सज्ञानविचारवंतांची असे एकच भूखवाचनातून मिळते त्यांना सुखरिकामा वेळ वाचनात घालवीविचारांना फुटेल नवी पालवीवाचनाने होते लेखन समृद्धलहान असो वा असो वयोवृद्धवेड लागेल जेंव्हा पुस्तके वाचनाचीविसर पडेल तेंव्हा सर्व जगाचीदिसमाजी काही करावे चिंतनडोक्यात होईल ज्ञानाचे सिंचन~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ *नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा, धर्माबाद जि. नांदेड*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागतिक टपाल दिन*‘चिट्ठी आयी है, आयी है…’ या हिंदी सिनेमातील गाजलेल्या गाण्यातून पत्राचे महत्त्व वर्णन केलेले आहे. ही पत्रे वाटप करणार्‍या टपाल खात्याची ९ ऑक्टोबर १८७४ रोजी स्वित्झर्लंडमधील बर्न येथे ‘युनिव्हर्सल पोस्टल युनियन’ची स्थापना झाली होती, म्हणून आजचा दिवस ‘विश्‍व टपाल दिन’ म्हणून साजरा होत आहे. हा निर्णय टोकियोत १९६९ साली भरलेल्या युनियनच्या परिषदेत घेण्यात आला होता. जगभरची टपाल व्यवस्था सुरळीत नि तत्परतेने चालू रहावी, हा या युनियनच्या स्थापनेमागचा हेतू होता. गेल्या ३५ वर्षात ‘युनेस्को’च्या सहकार्याने प्रस्तुत संघटना या दिवशी तरुण मंडळींसाठी पत्रलेखन स्पर्धा आयोजित करते व विश्‍व टपालदिनी स्पर्धकांना बक्षीस वाटप करते. विविध देशातल्या शाळा-कॉलेजातील मुले स्पर्धेत भाग घेऊन ही बक्षीसे मिळवीत असतात. यंदाचे बक्षीस व्हिएतनामच्या शाळकरी मुलीने पटकाविले आहे. जगभरातील देशात टपालाची मुक्त, मोकळी ये-जा व्हावी हे पोस्टल युनियनचे उद्दिष्ट आहे. पूर्वीच्या काळी प्रवासी दूरदूरचा प्रवास करून टपाल वितरण करीत. १६०० ते १७०० च्या काळात अनेक देशांनी एकत्रित होऊन आपसात करार केले व टपाल वाटपाची योजना आखली. इ.स. १८०० च्या अखेरीस जगभर टपाल वितरणाचे बर्‍यापैकी जाळे निर्माण झाले होते. अर्थात त्यात त्रुटी होत्या, क्लिष्टता होती व भरवसा नव्हता. ‘युनिव्हर्सल पोस्टल युनियन’ची स्थापना झाल्यावर टपाल व्यवस्थेत लक्षणीय फरक पडला. आज टपाल व्यवस्थेला आधुनिकीकरण, नवतंत्रज्ञानाशी स्पर्धा आणि विस्तार या बाबींची दखल घ्यावी लागत आहे. नैरोबीला पोस्टल युनियनची दोन वर्षांपूर्वी एक परिषदेत या विषयी तीव्र पडसाद उमटले. पोस्टखात्याच्या उदासिन वृत्तीबद्दल या परिषदेतील चर्चासत्रात टीका झाली. या परिषदेत ११६ देशातील ५५० हून जास्त प्रतिनिधी हजर होते. इ.स. २००९ चा सोहळा हा पर्यावरणाशी निगडित होता व त्याची घोषणा होती ः ‘हरित प्रगतीसाठी टपालसेवेची बांधिलकी’ व तत्संबंधी परिषद पोर्तुगालमध्ये भरली होती. गतवर्षीची परिषद कातारला आयोजित करण्यात आली होती. पत्र लिखाण ही एक कला आहे. तो जगभरच्या साहित्याचा एक महत्त्वपूर्ण भाग बनून आहे. सध्याच्या इलेक्ट्रॉनिक संपर्क जाळ्यांच्या गराड्यात पत्र लिखाण नामशेष होत चालले आहे, ही खेदाची बाब आहे. पूर्वीच्या गुलाबी प्रेमपत्रांची सर सध्याच्या एस.एम.एस.ना काय येणार? पूर्वी प्रेमीजनांच्या नि नातलगांच्या पत्रांची वाट बघण्यात जी मजा यायची ती या ‘क्विक्’ संक्षिप्त संदेश प्रणालीने हरवून टाकली आहे. बर्‍याच लोकांना पोस्टाची तिकिटे गोळा करण्याचा छंद असतो. जागतिक टपालदिनी त्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन दिले जाते. परंतु सध्याचा पोस्टाचा गोंधळाचा कारभार बघता पूर्वीच्या काळी कबूतरांचा वापर होई, तशी वेळ तर येणार नाही ना, ही भीती उगाचच वाटते. *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही पण तुम्ही तुमच्या सवयी बदलू शकता आणि तुमच्या सवयी नक्कीच तुमचं भविष्य बदलतील." - डॉ. एपीजे अब्दुल कलाम**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) माजी राष्ट्रपती डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म केव्हा झाला ?२) 'वाचन प्रेरणा दिवस' केव्हा साजरा केला जातो ?३) 'जागतिक हात धुवा दिवस' केव्हा साजरा केला जातो ?४) 'जागतिक विद्यार्थी दिवस' केव्हा साजरा केला जातो ?५) राष्ट्रीय नवोन्मेष ( नवकल्पना ) दिन केव्हा साजरा केला जातो ? *उत्तरे :-* १) १५ ऑक्टोबर १९३१ २) १५ ऑक्टोबर ३) १५ ऑक्टोबर ४) १५ ऑक्टोबर ५) १५ ऑक्टोबर *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● गोविंद सखाराम पवळे● फारुख शेख, लोहा● मंगेश फड● संतोष मदनुरकर● मोहन भुसेवार● पृथ्वीराज राहेरकर● शिवराज काटेवाडे● सुभाष मेंटेवाड● संजय कदम● रमेश कामाडी*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*दोन पायांवर उभं राहून काटेरी बाभळीची छोटी छोटी पानं लुसूलुसू खाणारी बकरी पाहिलीत का तुम्ही? समोरचे दोन पाय बाभळीच्या झाडाला लावून मागच्या दोन पायांवर अवघड आसनात उभी असते. पोटातल्या भुकेमुळं त्या आसनावरची पकड मजबूत असते. त्यामुळं तोल जात नाही. उलट एक आकर्षक डौल तयार होतो. शिवाय काटे टाळून छोटी छोटी पानं खाण्याचं कसब खासच. एखाद्या योग्याला ध्यान लागावं तसं बकरीने या आसनात मन एकाग्र केलेलं असतं. डोंगराच्या अवघड कपारीत बरेचदा बकरी दिसते. त्या अवघड कपारीत बकरी जाते कशी? हा गहन प्रश्न आहे. त्या कपारीतून पाय घसरला तर खाली खोल दरी असते. म्हणजे त्या बकरीची शेवटची ब्या-ब्या ही कुणाला ऐकू येणार नाही. पण त्या जीवघेण्या कपारीत बकरी जाते, यामागे असते फक्त भूक !**भक्ष्यावर झेप मारणारा पक्षी किंवा वाळक्या पानांवर पायाचा आवाज न करता दबक्या पावलांनी चालणारा चित्ता डिस्कव्हरी चॅनलवर हमखास दिसतो. आभाळातून नेमकेपणानं भक्ष्य हेरून त्यावर झाप मारून भक्ष्याला अलगद उचललं जातं, यातलं वेळेचं नियोजन कमाल असतं. एक क्षण जरी इकडचा तिकडं झाला तरी शिकार निसटू शकते. पाण्यावर झाप मारून पाण्यातला मासा अलगद उचलणारा पक्षी तर अद्भूत असतो. जेंव्हा पोपट राघू गाभूळ्या कैरीवर उलटा होऊन कैरी टोकरतो..उलटं टांगून घेणा-या राघूची झेंड्यासारखी हलणारी शेपूट भुकेची पताका होऊन फडकत असते.* *"जेंव्हा जेंव्हा कोणी भुकेविरूद्ध संघर्ष करायला पाय रोवून उभा राहतो..तेंव्हा तेंव्हा तो सुंदर दिसू लागतो."* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••🦆🦆🦆🦆🦆🦆🦆🦆🦆 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• अहंकाररुपी माणूस सुरुवातीला दुसऱ्यावर आपला प्रभाव टाकायला जातो, परंतु सुरुवातीला लोकांना माहित नसते म्हणून त्याच्यातील वर्तनाकडे पाहून थोडे दुर्लक्ष करतात.पुन्हा पुन्हा जर असे वर्तन करत असेल तर त्याची प्रतिमा इतरात किंवा चारचौघात काय आहे हे चांगलेच ओळखायला लागतात आणि नंतर त्याच्याशी कोणतेही संबंध ठेवत नाहीत.जर स्वत:चेच तुणतुणे वाजवत असेल तर येणाऱ्या काही काळात त्याच्या अहंकाराचे डफडेच वाजवून टाकतात.त्यामुळे त्याची कोणतीच प्रतिष्ठा समाजामध्ये राहत नाही.मग तो जीवनात एकटा पडतो.इतरही लोक त्याच्यापासून दूर जायला लागतात.त्याच्या अहंकाराने त्याचे सगळे संपलेले असते.म्हणून माणसाने कधीही अहंकाराची भाषा करु नये.एकदा माणसाच्या अंगात अहंकाररुपी राक्षस शिरला की,त्यांचे सर्वस्व संपलेच आहे असे समजावे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हुबेहूब कला अवगत असणे.*एक मूर्तिकार मूर्ती व पुतळे अगदी हुबेहूब बनवी. ज्याची मूर्ती वा पुतळा तो तयार करी, ती व्यक्ती वा देव प्रत्यक्षच त्याच्या चित्रशाळेत अवतरल्याचा भास होई. त्याने खुर्चीवर बसलेल्या व एका हातात काठी घेतलेल्या रखवालदाराचा पुतळा तयार केला होता. त्या पुतळय़ाला तो दररोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या घराच्या पुढच्या फाटकापाशी नेऊन ठेवी. तो इतका हुबेहूब होता की, खराखुराच रखवालदार पहार्‍यावर बसला असल्याचा चोर-दरोडेखोरांचा समज होऊन ते त्या मूर्तिकाराच्या घराच्या आसपास फिरकण्याचा विचार सोडून देत.नामवंत कलावंत म्हणून त्याच्या पन्नाशीच्या, साठीच्या व पंचाहत्तरीच्या वेळी त्याचे अनेक शहरांतून सत्कार झाले होते. आता 'आपला शंभरीनिमित्त जंगी सत्कार व्हावा' एवढी एकच इच्छा त्याच्या मनात उरली होती, म्हणून तो प्रकृतीची फार काळजी घेत होता. यमदूताला हुलकावणी देण्यासाठी त्याने स्वत:चे नऊ पुतळे केले होते. अगदी हुबेहूब स्वत:सारखे.एकदा त्याला आपल्याला न्यायला आपल्या घराकडे काही यमदूत येत असल्याची चाहूल लागली. तो पटकन आपल्या चित्रशाळेत गेला व तिथे ठेवलेल्या आपल्या नऊ पुतळय़ांत दहावा पुतळा म्हणून निश्‍चलपणे बसून राहिला. यमदूत त्या चित्रशाळेत शिरले. पाहतात, तो तिथे एकासारखे एक असे दहा मूर्तिकार! काही म्हणजे काही फरक नाही! यातल्या कुणाला घेऊ जावे? हा त्यांच्यापुढे पेच पडला.तेवढय़ात त्यांच्यापैकी एक डोकेबाज यमदूत आपल्या सहकार्‍यांना मुद्दाम म्हणाला, 'बाबांनो, असे गोंधळून जाण्यासारखे काय आहे? कारण खर्‍या मूर्तिकारात जे एक व्यंग आहे, ते त्याच्या बाकीच्या नऊ पुतळय़ांत दाखवायचे राहून गेले आहे.त्या बुद्धिवान यमदुताच्या या विधानाने अपमानित झालेला तो मूर्तिकार पटकन उठून म्हणाला, 'उगाच जीभ आहे म्हणून काही तरी बडबडू नकोस. माझ्यात असलेला कोणता दोष तुम्हाला दिसला.हे मुर्तीकार आम्हांला माहिती होते तु बोलणार जर तुझ्याबद्दल मी काही बोललो नसतो तर आम्हाला चिञकार कोण ते ओळखायला आले नसते. चल आता आमच्याबरोबर तु.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )~~~~~~~~~~~~~~~~~~~🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 13/10/2022 वार - गुरूवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-◆ १९२३ - अंकारा (चित्रित) तुर्की देशाची राजधानी बनली.◆ १९८३ - अमेरिटेक मोबाईल कम्युनिकेशन्स (आता एटीअँडटी) यांनी अमरिकेतील शिकागो शहरात मोबाईल नेटवर्क सुरु केले.◆ २०१३ - दतिया, मध्य प्रदेश येथील रतनगढ माता मंदिरात चेंगराचेंगरी झाली ज्यात ११५ ठार आणि ११० हून अधिक जखमी झाले.💥 जन्म :-◆ १९११ - अशोक कुमार, भारतीय अभिनेता◆ १९४८ - नुसरात फतेह आली खान, पाकिस्तानी गायक💥 मृत्यू :-◆ १९११ - भगिनी निवेदिता, आयरिश-भारतीय सामाजिक कार्यकर्ती◆ १९३८ - इ. सी. सिगार, अमेरिकन व्यंगचित्रकार, पॉपाय कार्टून चा निर्माता◆ १९८७ - किशोर कुमार, भारतीय गायक, अभिनेता, दिग्दर्शक*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड, केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला 78 दिवसांचा बोनस देण्याचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *बडतर्फ ST कर्मचारी पुन्हा कामावर रुजू, सदावर्तेंच्या निवासस्थानी सेलिब्रेशन*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *चीनमध्ये शिक्षण घेणाऱ्या 3000 भारतीय विद्यार्थ्यांना दिलासा, चीनने भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *काँग्रेसचे खासदार राहुल गगांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या 'भारत जोडो यात्रे'चा काल 12 ऑक्टोबर रोजी 35 दिवस पूर्ण झाले असून आत्तापर्यंत 900 किमीचा प्रवास पूर्ण झाला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गेल्या सप्टेंबर महिन्यात महागाई दर 7.41 टक्क्यांवर गेला असून खाद्य पदार्थांचा महागाई दर 7.62 टक्क्यांवरून 8.60 टक्क्यांवर पोहोचला आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सर्वात मोठ्या गहू उत्पादक उत्तरप्रदेश व बिहार राज्यात गव्हाचा तुटवडा, किंमतीत 5 टक्क्यांची वाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *रोमहर्षक T-20 सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला चारली धूळ ; 2-0 ने मालिकेवरही केला कब्जा *•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Conversation संभाषण👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/Zu6FBgq1BbY~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे*मुलांनो, काम केल्यानेच मनुष्य मोठा होत असतो. रिकामा बसून किंवा फक्त बोलल्याने जीवनात काही प्राप्ती होत नाही. पंचतंत्रात असे म्हटले आहे की, मनुष्याच्या रूपामुळे किंवा कुळामुळे त्याचा गौरव वाढत नाही. तर माणसाच्या कर्तृत्वामुळे, त्याच्या कार्यामुळे त्याचा गौरव वाढतो. आपण जसे बोलतो त्याप्रमाणे वागले पाहिजे. अन्यथा कुणी आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाहीत. शब्दाला कृतीचे तारण नसेल तर शब्द वांझ ठरतात असे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. म्हणूनच दलितांच्या कल्याणासाठी त्यांनी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर नागपूरच्या पावन दीक्षा भूमीत हजारो अनुयायासोबत बौध्द धर्माची दीक्षा घेतली. त्यांच्या प्रत्येक शब्दाला कृतीची जोड होती म्हणून तर ते दलितांसाठी ईश्वरासमान झाले आहेत. साधी राहणी आणि उच्च विचारसरणीमुळे मानवी जीवन आनंदी होते असे म्हणताना राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आयुष्यभर साधेपणाने राहिले. देशातील अनेक लोकांना अंगभर कपडे मिळत नाहीत तेंव्हा मी पूर्ण कपड्यानिशी कसा राहू म्हणून त्यांनी कपड्याचा त्याग करून पंचा स्वीकारला आणि देशातील लोकांसाठी चरख्यावर सुत कातण्यास सुरुवात केली. गरीबातल्या गरीब व्यक्तीचा त्यांनी विचार केला. याचा अर्थ जे लोक फक्त बोलत नाहीत तर त्या नुसार कृती करतात आणि वागतात ते खरोखरच महान होतात. केवळ गडगडाट करणारे मेघ कधी पाऊस देत नाहीत म्हणूनच गर्जेल ते बरसेल काय ? असे म्हटले जाते ते काही चूक नाही. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांनी जसे बोलले तसे वागले आणि चालले म्हणून समाजात आज त्यांचे स्थान सर्वांच्या हृदयात आहे. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले असे संतानी सांगून ठेवले आहे. अस्पृश्यता पाळू नका असा संदेश देणारे संत एकनाथ महाराजानी तप्त तापलेल्या वाळूवरील हरिजन बालकांस कडेवर उचलून घेतले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी अस्पृश्य लोकांसाठी घरातील पाण्याचा हौद मोकळा केला. त्याचा परिणाम त्यांना भोगावे लागले परंतु त्याची त्यांना फिकीर नव्हती, कारण ते क्रियाना महत्त्व देणारे होते. विचाराला आचाराची जोड असली की आपल्या हातून चांगले कार्य होते. म्हणूनच समर्थ रामदास स्वामी म्हणतात की, क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे अर्थात काही ही न करता नुसते बोलणे काही कामाचे नाही.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*🐠9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *नलिकाविरहित ग्रंथी* 📙आपल्या शरीरात दोन प्रकारच्या ग्रंथी असतात. बहि:स्रावी ग्रंथीमध्ये तयार झालेला स्राव नलिकेद्वारे बाहेर पाठवला जातो. उदारणार्थ लाळग्रंथीत तयार झालेली लाळ तोंडात येते. याउलट अंत:स्रावी ग्रंथीत तयार झालेला स्राव ग्रंथीमधीलच रक्तवाहिन्यांत शोषला जातो. रक्तामध्ये शरीरात विविध भागांकडे पाठवला जातो. अशा अंतस्रावांस संप्रेरक, 'हार्मोन' असे म्हणतात. अशा नलिकाविरहित ग्रंथींना 'एंडोक्राइन' ग्रंथी असे म्हटले जाते.शरीरात घडणाऱ्या असंख्य चयापचयाच्या क्रिया व महत्त्वाचे जीवनव्यापार यांवरचे नियंत्रण या ग्रंथींद्वारे राखले जाते. प्रत्येक ग्रंथीमधील स्रावाचे कार्य एखाद्या विशिष्ट लक्ष्यावर काम करते. सर्वात जास्त परिणाम त्या लक्ष्यावर घडून येतो. नलिकाविरहित ग्रंथींच्या प्राकृत व विकृत अभ्यासाची अतिविशिष्ट अभ्यासशाखा मानली जाते (एंडोक्रायनाॅलॉजी ही सुपर स्पेशालिटी). डॉक्टर मंडळी त्यात प्रावीण्य मिळवून काम करतात.अशा नलिकाविरहित ग्रंथी म्हणजे शीर्षस्थ ग्रंथी. (पिट्युटरी), कंठस्थ (थायरॉइड), उपकंठस्थ (पॅराथायरॉइड), मूत्रपिंडावरील (अॅड्रिनल), स्वादुपिंडातील (लँगरहॅन्स आयलेट) या ग्रंथी स्त्री व पुरुषांत सारख्याच असतात. पुरुषात वृषण (टेस्टीज) व स्त्रीमध्ये राज:पिंडे (ओव्हरीज) या वेगळ्या असतात. यांतील प्रत्येक ग्रंथीतून स्रवणाऱ्या स्रावाला बहुदा त्या ग्रंथीच्या नावाने ओळखले जाते. उदाहरणार्थ पिट्युटरी हार्मोन.या ग्रंथीमधील सर्वात महत्त्वाची म्हणजे पिट्युटरी शीर्षस्थ ग्रंथी. अन्य सर्व ग्रंथींवर तर तिचे नियंत्रण असतेच, पण शरीरातील अत्यंत महत्त्वाच्या बाबी ती नियंत्रित करते. मूत्रपिंडाचे कार्य, हवेच्या तापमानाशी जोडून मुत्रनिर्मिती कमी वा जास्त राखणे व त्यानुसार शरीराला तहानेची जाणीव करून देणे हे काम तिच्याकडे आहे. स्नायूंवरचे नियंत्रण, विशेषत: गर्भाशयाचे स्नायू बाळाच्या जन्मासाठी कधी आकुंचित करायचे व आईचे दूध कधीपासून निर्माण करायला सुरुवात करायची, यांवरचे नियंत्रण ऑक्सिटोसीन व मॅमॅट्रोपिक हार्मोनने केले जाते. या सर्वांची निर्मिती शीर्षस्थ ग्रंथींच्या मागच्या भागातून होते. याशिवाय पुढील भागात अन्य ग्रंथींना उत्तेजक (ट्रोपिक) हार्मोनची निर्मिती केली जाते. थायरॉइडमधील स्रावांचे सतत नियंत्रण या हार्मोनने होत असते. नलिकाविरहित ग्रंथींचे नेतृत्वच शीर्षस्थ ग्रंथी करत असते. जेमतेम मोठ्या शेंगदाण्याएवढ्या असलेली ही ग्रंथी खरोखरीच जीवनाधार समजली जाते.थायरॉइड हार्मोन मुख्यतः आयोडिनयुक्त असते. खाण्यात, आहारात आयोडाइड्स कमी पडली तर हा स्राव कमी निर्माण होतो. शरीरातील चयापचयाची महत्त्वाची कार्ये व शरीराचे तापमान नियंत्रण आणि शक्तीसंपन्नता यांत ह्या हार्मोनचा महत्त्वाचा कार्यभाग असतो. गलगंड, मेंदूची अपूरी वाढ, मतिमंदत्व असे विकार होऊ नयेत, त्यांना प्रतिबंध करता यावा यासाठी मिठावाटे आयोडीनचा आवश्यक पुरवठा करावा, असे तज्ज्ञांना वाटते. रोज दोन चिमटी एवढेच मीठ आपण खात असल्याने नियंत्रित पुरवठा याद्वारे करणे शक्य होते. मिठाशिवाय जेवण, अळणी अन्नपदार्थ हा विचार आपल्या मनात तरी येतो का ? उपकंठस्थ वा पॅराथायरॉइड या कंठस्थ ग्रंथीमागे दोन छोट्या ग्रंथी असतात. कॅल्शिअम व फॉस्फरस या दोन्हींच्या चयापचयावर पॅराथाॅर्मोनचे नियंत्रण असते. हाडे, दात, शरीरातील सर्व स्रावांत या दोन्हींची गरज असते. त्यासाठी या ग्रंथीचे कार्य महत्त्वाचे ठरते.मूत्रपिंडावरील अॅड्रिनल ग्रंथी मूत्रपिंडावर छोट्या टोपीप्रमाणे असतात. त्यांचा गाभा (मेड्युला) व बाह्यभाग (कॉर्टेक्स) हे दोन वेगवेगळ्या हार्मोन्सची निर्मिती करतात. जीवनावश्यक व हृदयासारख्या महत्त्वाच्या इंद्रियावर नियंत्रण ठेवणारी अॅड्रीनॅलिन व नाॅर-अॅड्रीनॅलिन ही दोन हार्मोन्स गाभ्यात तयार होतात. 'मारा किंवा मरा', अशा समयी या स्रावांचे कार्य अवघ्या शरीराला जाणवते. स्नायूंचा रक्तपुरवठा वाढवणे, हृदयाची गती वाढवणे, रक्तदाबावर नियंत्रण ठेवणे, यकृतातील साखरेची म्हणजे ग्लायकोजेनची ग्लुकोज शर्करा बनवणे व अनिच्छावर्ती स्नायू शिथिल करणे ही मुख्य कामे या दोन स्रावांमुळे होतात. अॅड्रिनल ग्रंथीच्या बाह्य भागातून काॅर्टिकोस्टिराॅईड नावाची हार्मोन्स निर्माण होतात. यांतील अल्डोस्टिराॅन हे द्रव्य शरीरातील सोडियम व पोटॅशियम या घटकांच्या चयापचयावर नियंत्रण ठेवते. मज्जातंतूंचे कार्य, हृदयाचे कार्य, स्नायूंचे कार्य यांसाठी या दोन्हींची गरज असते. स्टिरॉइडमधील अन्य द्रव्ये पिष्टमय पदार्थांच्या चयापचयावर नियंत्रण राखतात. त्यांचे कार्य रक्तातील शर्करा जरुरीप्रमाणे वाढविण्याचे असते. प्रथिने व स्निग्ध यांच्या साठ्यांवरही त्यांचे नियंत्रण राहते. याशिवाय शरीरात कोठेही दाह झाल्यास यांचा दाहशामक म्हणूनही उपयोग होतो. विशेषतः सांध्यांचा दाह असल्यास स्टिरॉइडचा तोंडावाटे वा त्याजागी इंजेक्शन देऊन उपयोग होतो. अॅड्रिनल ग्रंथीचे कार्य अत्यंत महत्त्वाचे असते.स्वादुपिंडातील स्वादुरस पक्वाशयात नलिकेवाटे पोहोचवला जातो. मात्र लँगरहॅन्स आयलेट्स या पेशीसमूहातून इन्सुलिनची निर्मिती होऊन ती थेट रक्तात मिसळते. शक्ती व उष्णता उत्पन्न होण्यासाठी शरीरातील सर्व पेशीजालामध्ये प्राणवायूच्या साहाय्याने ग्लुकोज साखरेचे ज्वलन होते. यासाठी इन्सुलिनची मदत लागते. ती न मिळाल्यास रक्तातील साखरेच्या प्रमाणात वाढ होते. तसेच इन्शुलिनचे दुसरे कार्य म्हणजे रक्तातील जास्तीच्या साखरेचे रूपांतर ग्लायकोजेनमध्ये करून ती यकृतात साठवणे. या दोन्ही संदर्भात या ग्रंथीचे महत्त्व आहे.लैंगिक ग्रंथी पुरुष व स्त्रीमध्ये प्रत्येकी दोन असून त्यांना वृषण व राज:पिंड असे म्हणतात. वयात आल्यावर पुंबीजे व स्त्रीबीजे यांची यथायोग्य वेळी निर्मिती हे त्यांचे एक कार्य. दुसऱ्या कार्यात स्रावनिर्मितीचा म्हणजे हार्मोनचा सहभाग असतो. पुरुषातील टेस्टोस्टेरॉन हार्मोनमुळे जननेंद्रियांची वाढ, दुय्यम लैंगिक लक्षणे म्हणजे दाढी मिशा उगवणे, आवाज फुटणे, स्नायूंचा भरदारपणा यात पूर्णता येते. स्त्रियांच्या राज:पिंडातून इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन हे दोन स्राव स्रवतात. त्यामुळे मासिक पाळी सुरू होते. स्तनांची व नितंबाची गोलाई वाढते, जननेंद्रियांचा आकार पुरेसा वाढतो. गर्भधारणा, गर्भाची वाढ, दूध पुरेसे येणे व गर्भधारणेच्या काळातील अन्य शारीरिक बदल यांवरही याच हार्मोन्सचे नियंत्रण राहते.वयोमानानुसार लैंगिक ग्रंथींचे कार्य मंदावते. स्त्रियांमध्ये पन्नाशीनंतर, तर पुरुषात सत्तरीनंतर या ग्रंथी थकून जातात. त्याप्रमाणे स्त्रियांत रजोनिवृत्ती व पुरुषांत लैंगिक शैथल्य जाणवू लागते. मात्र जीवनाच्या अंतापर्यंत अन्य नलिकाविरहित ग्रंथी कार्यरत असतात. नलिकाविरहित ग्रंथींच्या कार्यकारणभावावर व त्यातील रोगांच्या उपचारांबद्दल आता खूपच प्रगती झाली असली, तरी प्रतिबंधक उपाय फारसे ज्ञात नाहीत.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" चांगले हस्ताक्षर हा चांगल्या शिक्षणाचा आरसा आहे. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) आल्फ्रेड नोबेल यांचा जन्म केव्हा झाला ?२) केंद्राच्या वार्षिक स्वच्छ सर्वेक्षणात देशातील सर्वात स्वच्छ शहर होण्याचा मान कोणत्या शहराने पटकावला ?३) महाराष्ट्रात शासकीय कार्यालयातील अभिवादन दूरध्वनी संभाषणाच्या सुरुवातीस कोणत्या दोन शब्दांनी व्हावे, या अभियानाचा प्रारंभ केव्हा व कोणाच्या हस्ते झाला ?४) 'भारताचा विंड मॅन' असे कोणाला म्हटले जाते ?५) ५ ऑक्टोबर २०२२ ला कितवा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला ?*उत्तरे :-* १) १३ ऑक्टोबर १८३३ २) इंदौर, मध्यप्रदेश ३) वंदे मातरम्, २ ऑक्टोबर २०२२, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ४) तुलसी तांती ५) ६६ वा *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● नागोराव कमलाकर● शिवलिंग बेंडके● अजय त्रिभुवन● योगेश चंबोले● किशोर यमेवार● शैलेश शहा● नरेश पत्राळे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*'मोगरा' साक्षात ईश्वराची निर्मिती. मोगऱ्यासारखं फुल म्हणजे ईश्वराने आपल्यावर केलेलं भरभरून प्रेमच जणू.. या मोगऱ्याचे किती वर्णन करावे... मोगरा म्हणजे प्रेम. त्याचा दरवळ म्हणजे आत्मानुभूती. निसर्गाचं सुगंधी वाण. मोगरा फक्त देणं जाणतो. दुसऱ्या फुलांना लाभलेले नेत्रसुखद रंग याला लाभले नसले म्हणून काय झालं? मनमोहक, स्वर्गीय असं सुगंधाचं लेणं याला लाभलेलं आहे, जे तो स्वतःकडे न ठेवता सगळ्यांना मुक्तहस्ते वाटत असतो. त्याला फक्त सुगंधीत होणं कळतं. त्याचा शुभ्र रंग आपल्याला संमोहित करतो. तरी रंगापेक्षाही गंधाकडेच आपण वळतो. म्हणजे काय रंग महत्वाचा, पण गंध त्याहूनही अधिक महत्वाचा...वरवरचं उथळ असं काहीही फार काळ टिकत नाही.**आपणही होऊ या नं मोगरा. कशाला हवाय बाह्य रंगाढंगाचा हेवा. करू या उधळण आपल्यातील गुणांची, हृदयात असलेल्या मायेची नं प्रेमाची, आपुलकीची अन माणुसकीची. आत्ममग्नता बाजूला सारून वाहू देऊ प्रेमाचा झरा. बरसू दे.. आत्मीयतेच्या धारा, दरवळू दे आसमंत सारा एकमेकांच्या सोबतीने. सुगंध देऊ या अन घेऊ या. आपली मनातील सद्-भावना सतत इतरांना जाणवू दे. आपल्यातील गोडव्याने भवताल चिंब चिंब होऊ दे, तुम्ही आणि मी सारेच होऊयात ना 'मोगरा !'* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••ज्याप्रमाणे परीसस्पर्शाने लोखंडाचे सोने होते त्याप्रमाणे सज्जनांच्या सहवासाने दुर्जन माणसांत असणारे वाईट गुण देखील हळूहळू लोप पावायला लागतात आणि चांगले गुण अंगी शिरुन तोदेखील सज्जन व्हायला लागतो.आपणच ठरवायचे की कुणाच्या सहवासात राहायचे आणि कुणाच्या नाही ? कुणाच्या सहवासात राहिल्याने आपले कल्याण होईल आणि जीवन कृतार्थ होईल याचा विचार करायला हवा.© व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जाणीव स्वत्वाची*एका जंगलात एक वाघाचे पिल्लू लहान असतानाच त्याच्या आईपासून व वाघाच्या समुदायातून दुरावते. रस्ता चुकल्यावर ते इकडे तिकडे फिरत असताना त्याला एक बकऱ्यांचा कळप दिसतो. ते त्या कळपामध्ये सामील होते. बकऱ्यांच्या कळपात बराच काळ वाघाचे पिल्लू राहते व त्याचे सर्व आचरण हे बकऱ्यासारखे होते.ते ना गर्जना करते किंवा धाडसी कृत्यही करीत नव्हते. कारण वाघांसोबत न राहिल्याने आपल्या जमातीतील प्राणी कसे वागतात याचे त्याला ज्ञान नव्हते. एके दिवशी बकऱ्या चरत असताना एक वाघ त्यांना पाहतो आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. सगळ्या बक-या शांतपणे चरत आहेत आणि त्यांच्या बरोबर एक वाघाचे पिल्लू पण हिंडत आहे. बकऱ्याना त्या पिल्लाची भीती वाटत नाही म्हणजेच ते पिल्लू त्यांच्यात वाढलेले आहे हे त्याच्या लक्षात येते. तो वाघ त्या बकऱ्याजवळ जातो आणि गर्जना करतो, त्याबरोबर जीवाच्या भीतीने सगळा कळप पळायला सुरुवात करतो तसे ते वाघाचे पिल्लू पण पळायला सुरुवात करते, पण मोठा वाघ त्याला अडवतो आणि म्हणतो," अरे! मी गर्जना केल्याबरोबर बकऱ्या पळाल्या हे ठीक आहे. पण तू का पळत आहेस? आणि माझ्या गर्जनेला तू प्रत्युत्तर न देता म्याव म्याव का ओरडत आहेस? बकऱ्या पळून जाणे साहजिक आहे पण मी थांब म्हंटल्यावर तू थांबला याचा अर्थ तुझ्यात कुठेतरी वाघ जिवंत आहे. तू बकरी नाही याचा पुरावा मी तुला देतो " असे म्हणून मोठा वाघ पिल्लाला घेवून पाण्याजवळ जातो तेथे त्याचे प्रतिबिंब दाखवून त्याला त्याच्यातील वाघ असण्याची जाणीव करून देतो. पिल्लाला आपल्या स्वत्वाची जाणीव होते व ते आपल्या वाघांच्या समुहात राहायला जाते.*तात्पर्य-स्वत्वाची जाणीव होणे हि मोठी गोष्ट आहे.आपण आपल्यातील आपल्याला जोपर्यंत ओळखत नाहीत तोपर्यंत आपली अवस्था वाघाच्या पिल्लाप्रमाणे राहते.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 12/10/2022 वार - बुधवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-◆१८७१ - भारतात ब्रिटिश सरकारने क्रिमिनल ट्राइब्स ॲक्ट या कायद्याद्वारे १६१ जाती व जमातींना गुन्हेगारी जमाती ठरविले. हा कायदा १९४९मध्ये रद्द केला गेला.◆१९८८ - जाफना विद्यापीठात एल.टी.टी.ई.च्या नेत्याला पकडण्यासाठी गेलेल्या भारतीय शांती सेनेच्या पथकावर गिनिमी काव्याने हल्ला. भारतीय पथकाचे अतोनात नुकसान.◆१९९९ - परवेझ मुशर्रफने मियाँ नवाझ शरीफचे सरकार उलथवून पाकिस्तानची सत्ता हस्तगत केली.💥 जन्म :-◆१९११ - विजय मर्चंट, भारतीय क्रिकेट खेळाडू.◆१९४६ - अशोक मांकड, भारतीय क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :-◆१९६७ - राम मनोहर लोहिया, भारतीय नेता.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उज्जैन मध्ये महाकाल कॉरिडोरचं उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *लोकसंख्या नियंत्रणासाठी सक्ती करावी लागेल, समान नागरी कायद्याची आवश्यकता - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *देशातील आयटी क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या इन्फोसिसचे अध्यक्ष रवी कुमार एस. यांनी दिला आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नागपुरात लवकरच होणार ड्रोनद्वारे पोस्टाची डाक पार्सल सेवा, यापूर्वी केंद्रीय मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार गुजरातमधील भूज तालुक्यात हा प्रयोग करण्यात आला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *चिपळून तालुक्यातील डेरवण येथे 13 ऑक्टोबरपासून राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेला होणार सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *विदर्भ- कोकण कन्या ठरल्या चॅम्पियन : योगासनात महाराष्ट्र महिला संघाला सुवर्ण; आर्टिस्टिक सांघिक गटात महिला संघ अव्वल*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताचा वर्ल्ड रेकॉर्ड... दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय, सामन्यासह मालिका जिंकली*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *शालेय संस्कार प्रार्थना*🎖️•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभू👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/Hwc8KjFmFnY~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *नासा येवतीकर, कन्या शाळा धर्माबाद*📱9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपली कामे आणि आपण*मुलांनो, एखाद्या वेळी घरात आई किंवा बहीण नसेल तर आपली पंचाईत होते. जेवण करायचे असेल किंवा घरातील साफसफाईचा प्रश्न असेल, आपण सर्वस्वी आई किंवा बहिणीवर अवलंबून असतो. त्यामुळे आपणावर तसा प्रसंग ओढावतो. ज्यावेळी घरात वडील किंवा भाऊ नसतो, त्यावेळी तशीच काहीशी पंचाईत मुलींच्या बाबतीत सुध्दा घडते. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आपापल्या कामाची विभागणी करून घेते. त्यामुळे असा प्रसंग निर्माण होऊ शकतो. त्यास्तव कामाची विभागणी न करता प्रत्येक व्यक्तीने सर्वच कामे करायला शिकणे अत्यंत महत्वाचे आहे. घरात झाडू मारणे, भांडे घासणे, कपडे धुणे, भाजी निवडणे, दळण आणणे, स्वयंपाक करणे ही कामे आई किंवा बहिणीनेच करावीत असा काही लिखित नियम नाही. ही कामे मुलांनी स्वतःहुन केलीच पाहिजेत तरच भविष्यात जेंव्हा शिक्षणासाठी घर सोडून बाहेरगावी राहण्याचा प्रसंग येतो त्यावेळी केलेल्या या कामाचा अनुभव कामाला येतो. बाजारातून भाजीपाला खरेदी करणे, किराणा सामान आणणे, कपडे इस्त्री करून आणणे, वृत्तपत्र आणणे इत्यादी घराबाहेर करावयाची कामे वडील किंवा भावंडांची कामे मुलींनी वेळ मिळेल तशी आवर्जून करावीत. ही कामे मुलांची आणि ती मुलींची असे कामाचे वर्गीकरण मुळात करूच नये. सकाळी झोपेतून उठल्यावर आई सांगण्याच्या अगोदर अंथरूण, पांघरूण घडी करून व्यवस्थित ठेवणे, जेवायला बसताना निदान स्वतःपुरते तरी ताट, वाटी आणि पाण्याने भरलेला ग्लास घेणे, जेवण संपल्यावर ताट नियोजित धुण्याच्या ठिकाणी ठेवणे, आपली पुस्तके, वह्या, पेन, दप्तर इत्यादी सर्व व्यवस्थित ठेवून घेणे यासारख्या लहानसहान कामाकडे गांभीर्याने लक्ष देऊन आपली कामे आपणच करायची सवय लहानपणापासून लावून घेणे अत्यावश्यक आहे. यासाठी उदाहरण म्हणू आपल्या सर्वांचे आवडते परमपूज्य साने गुरुजी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे जीवनचरित्र वाचल्यास आपली कामे आपण का करावीत याचे महत्व कळते. समर्थ रामदास स्वामी यांनी तर जो दुसऱ्यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला असा उपदेश दिला आहे. त्यामुळे आज नाही, आतापासूनच आपण आपली कामे करायला सुरुवात करू या.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *कॅलेंडरमध्ये रोज एका नक्षत्राचे नाव का लिहिलेले असते ?* 📙जानेवारी महिन्यामध्ये कॅलेंडरचा म्हणजे दिनदर्शिकांचा हंगाम जोरात सुरू असतो. महालक्ष्मी, दाते, कालनिर्णय अशा असंख्य दिनदर्शिका बाजारामध्ये येतात. प्रत्येकाच्या घरामध्ये या दिनदर्शिका भिंतीवर लटकलेल्या असतात. दिनदर्शिकेमधील सण उत्सवाच्या तारखा सोडल्या तर इतर माहितीबाबत सर्वसामान्य लोक अज्ञानी असतात. अर्थात हे काहीजणांच्या फायद्याचंही असतं म्हणा. अहो एवढंच काय, शाळेमध्ये दिनमान सांगण्यासाठी मुले येतात आणि अश्विन शुद्ध शके १९२४ असे काहीतरी म्हणत जातात. सांगणाऱ्या मुलांना या शब्दांचा यत्किंचितही अर्थ समजत नाही, आणि कोणी समजावून सुद्धा देत नाही. शाळेमध्ये असणाऱया फळ्यावर सुद्धा ही माहिती लिहिलेली असते. अहो एवढंच काय वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा हे दिनमान झळकत असतं. दिनदर्शिकेचे महत्त्वाचे काम तारीख समजणे हे आहे. परंतु हल्लीच्या दिनदर्शिकांमध्ये माहितीचा प्रचंड मारा आहे. त्यातील नक्षत्रांसंबंधी माहितीचा वेध घेत या प्रश्नाची सोडवणूक करूया.दिनदर्शिकेमध्ये रोज एक नाव लिहिलेलं असतं. प्रामुख्याने अश्विनी, भरणी, कृतिका, रोहिणी, मृगशीर्ष. . . . ते रेवतीपर्यंत अशी एकूण सत्तावीस नावं लिहिलेली असतात. रेवतीनंतर परत याच क्रमाने पुन्हा एकदा नावांची जंत्री सुरू होते. त्यात अजिबात खंड नसतो. ही नावं कशाची आहेत हे विचारलं तर अचूक उत्तर येतं, ते म्हणजे नक्षत्र ! पण नक्षत्र म्हणजे काय ? असं विचारलं तर मात्र अजिबात सांगता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. नक्षत्र म्हणजे काय ? आणि ती सत्तावीसच का ? याचा परामर्श आता आपण घेणार आहोत. नक्षत्र ही संकल्पना भारतीयांची आहे. भारतीयांच्या दृष्टीने चंद्राला फार महत्त्व आहे. रात्रीच्यावेळी आकाशामध्ये चंद्राबरोबरच असंख्य चांदण्यासुद्धा दिसतात. दिवसा सूर्य प्रकाशामुळे चांदण्या गायब होतात. पण त्या असतात एवढं मात्र नक्की. एक गोष्ट विसरू नका की, या चांदण्या म्हणजे प्रचंड मोठे आणि आपल्यापासून खूप दूर असलेले दुसरे सूर्य आहेत. या चांदण्याच्या पार्श्वभूमीवर चंद्र पृथ्वीभोवती फिरत असतो. या फिरण्यामुळे चंद्र रोज जागा बदलतो. चंद्राला पृथ्वीभोवती तीनशे साठ अंशांतून फिरायला सत्तावीस दिवस लागतात. त्यामुळे एका दिवसात तो अंदाजे बारा अंशाने पूर्वेकडे सरकतो. हे गणित करताना पृथ्वीसुद्धा सूर्याभोवती फिरते हे लक्षात घ्याव लागेल. चंद्र आज कोणत्या ठिकाणी आहे हे सांगण्यासाठी भारतीयांनी चंद्राच्या पाठीमागे असणाऱया चांदण्यांचा उपयोग केला. ज्याप्रमाणे शहरातून जाणाऱ्या बसच्या मार्गात विविध स्टॉप असतात. तसंच आकाशातून जाणाऱ्या चंद्राच्या मार्गात सत्तावीस स्टॉप करण्यात आले. हे स्टॉप म्हणजे आकाशातील सत्तावीस भाग. त्या भागांमध्ये या चांदण्या येतात. त्यांना कल्पनेनं जोडून एक काल्पनिक आकृती तयार केली गेली. या आकृतीला भारतीयांनी नक्षत्र हे नाव दिलं. नक्षत्र म्हणजे आकाशातील चांदण्यांचे समूह. हे समूह उघड्या डोळ्यांनी आकाशात दिसतात, फक्त आपण कधीही पाहण्याची तसदी घेतलेली नाही. मनोरंजनाच्या जमान्यामध्ये या चमचमणार्या ठिपक्यांकडे पाहण्यात अजिबात रस वाटत नाही. हो पण एक मात्र विशेष आहे की यावर आधारित कर्मकांडावर प्रचंड विश्वास ठेवण्यात आपणाला काहीही गैर वाटत नाही. थोडक्यात काय तर भारतीयांनी आकाशाचे सत्तावीस भाग केले. त्या भागातील चांदण्याच्या समूहाला नक्षत्र म्हणून संबोधलं. याचा अर्थ चंद्र रोज एका भागामध्ये अर्थात नक्षत्रात असतो. दिनदर्शिकेमध्ये आजच्या तारखेला अश्विनी लिहलेलं असेल, तर आपण समजायचं की आजचा चंद्र अश्विनी नक्षत्रात आहे. म्हणजे काय तर चंद्राच्या आसपासच्या चांदण्या म्हणजे अश्विनी नक्षत्र. किती सोपं आहे हे गणित. अर्थात पुर्वीच्या काळातील मानवाने हे असंख्य निरीक्षणं करून मांडलेले आहे हे विसरून चालणार नाही. त्याच्या निरीक्षणवृत्तीला सलामच केला पाहिजे. समजा आज कॅलेंडरमध्ये पुष्य लिहिलेलं आहे, तर याचा अर्थ असा होतो की आजचा चंद्र पुष्य नक्षत्रात आहे. आणि आज चुकून गुरुवार असेल तर एक फर्स्टक्लास योग येतो. त्याला गुरूपुष्यामृतयोग म्हणतात. सदर दिवशी पेपरमधून हमखास जाहीर होते 'सोने खरेदीचा भाग्याचा दिवस'. आता मला सांगा, तीस हजार रुपये तोळे सोने खरेदी करून कोणाचं भाग्य उदयाला येणार ? सोनाराचं की घेणाऱ्याचं !जवळपास तीन लाख चौर्‍यांशी हजार किलोमीटर अंतरावरील चंद्र, पाचशे वीस प्रकाशवर्ष अंतरावरील पुष्य नक्षत्र, आठवड्यातील एक दिवस गुरुवार, खाणीतून काढलेलं सोनं, ते विकणारा सोनार, विकत घेणारी व्यक्ती आणि तिचं भाग्य. याचा काही संबंध ? अर्थात विचार केला तरच असली अतार्किक मांडणी समजू शकते. अशा प्रकारची मांडणी व्यक्तीचा आत्मविश्वास, कष्ट करण्याची तयारी, शिक्षण, वैचारिक प्रगल्भता यांना छेद देते एवढं मात्र निश्चित.*डाॅ. नितीन शिंदे**'अंतराळ समजून घेताना' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ माणसाचा खरा शत्रू कोण असतो तर तो स्वतःच असतो. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) 'सिम्बॉल ऑफ नॉलेज' अशी ओळख कोणत्या महापुरुषांची आहे ?२) केंद्राच्या वार्षिक स्वच्छ सर्वेक्षणात सर्वोत्कृष्ट कामगिरीत कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला ?३) *सांची स्तूप कोणत्या राज्यात आहे ?* ४) 'इंडिया मोबाईल काँग्रेस २०२२' मध्ये देशातील ५ जी दूरसंचार सेवेचा प्रारंभ केव्हा व कोणी केला ?५) 'जागतिक पशुदिन' केव्हा साजरा केला जातो ?*उत्तरे :-* १) डॉ. बाबासाहेब आंबेडकर २) मध्यप्रदेश ३) मध्यप्रदेश ४) १ ऑक्टोबर २०२२, पंतप्रधान नरेंद्र मोदी ५) ४ ऑक्टोबर *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● संपन्न कुलकर्णी● अमित शिंदे● जगन कुलवंत● जरावाड सायारेड्डी● अशोक हाक्के● बालाजी लक्ष्मणराव सातपुते● संतोष शातलवार● माधवराव धुप्पे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*अन्याय्य मार्गाने मिळवलेला पैसा स्वत:च्या आणि परिवाराच्या अध:पतनास कारणीभूत होतो. कितीही प्रयत्न केले तरी असला पैसा व्यक्तीला वाममार्गालाच नेतो. अनैतिक वर्तणूकीने काही काळ यशस्वी होत असल्याचा भास निर्माण झाला तरी पापाचे भूत पिच्छा सोडत नाही. पैसा मिळवू नये असे नाही. पैसा हे मानवाचे सहावे इंद्रिय आहे. त्याच्याशिवाय मूळही पाच इंद्रिय काम करणार नाहीत हे खरे आहे. प्रश्न पैसे मिळविण्याचा नाही, किती मिळवायचा हा आहे. जो पैसा मिळविताना माणुसकीची सारी तत्वे पायदळी तुडविली जातात आणि ज्या पैशाचा विनियोग माणसाच्या खरेदी-विक्रीत होतो, त्या पैशाला काय अर्थ आहे?**ज्याप्रमाणे पैसा औषध विकत घेऊ शकतो; पण आरोग्य विकत घेऊ शकत नाही. पैसा सेवा विकत घेऊ शकला तरी माणूस विकत घेऊ शकत नाही. गैरमार्गाने आलेल्या संपत्तीला गैरमार्गाने जाण्यासाठीच पाय फुटतील ही काळ्या दगडावरची रेघ आहे. शेकडो वर्ष उलटली तरी आपण व्यास, वाल्मिकींना विसरलो नाही. राजघराण्यात जन्मल्यामुळे नव्हे, तर राजघराण्याचा त्याग केल्यामुळे वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांची नावे घेतली जातात. ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, कबीर यांची नावे प्रात:स्मरणीय झाली आहेत ती त्यांनी सांगितलेल्या माणुसकीच्या धर्मामुळे. आपले नाव जनतेच्या जीभेवर असावे असे वाटणे स्वाभाविक आहे त्यासाठी पैशांबरोबर आत्मियतेची गरज आहे.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥* ●•• 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• माणूस देहयष्टीने कसा आहे हे आपणास त्यांच्याकडे पाहिल्यावर लगेच समजते. त्याच्या सानिध्यात राहायची गरजच नाही, परंतु त्याचा स्वभाव कसा आहे हे जर पाहायचे झाले तर त्याच्या सान्निध्यात राहिल्याशिवाय समजत नाही. जेव्हा आपण इतरांशी संबंध ठेवतो तेव्हा काही काळ त्यांच्या संपर्कात राहून ठरवतो. त्याचे आणि आपले जर का संवादातून जमले तर पुढचे पाऊल टाकतो अन्यथा त्याच्याशी संबंध ठेवावे का नाही हा विचार करून ठरवतो.चांगले संबंध ठेवायचे ठेवायचे असतील तर त्यांच्या देहयष्टीकडे न पाहता स्वभावाकडे पाहावे आणि मगच संबंध जोडावे तरच दोघांचेही जीवनव्यवहार चांगल्या प्रकारे पार पडतील.© व्यंकटेश काटकर,नांदेड.संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चतुर बिरबल*बिरबलच्या चातुर्याची कीर्ती सर्वदूर पसरली होती. तेव्हा त्याला पाहण्यासाठी दरबारात एक पंडित आला होता. बादशहाच्या परवानगीने त्याने दोन प्रश्न बिरबलाला विचारलेपंडित : खरा ज्ञानी कोण व अज्ञानी कोण? बिरबल : ज्याच्याशी केलेली चर्चा फलदायी ठरते, तो ज्ञानी आणि निरर्थक ठरते तो अज्ञानी असतो.पंडित : सर्वांत उत्तम ऋतू आणि सर्वात वाईट ऋतू कोणती?बिरबल : पोटभर खायला, अंगभर ल्यायला आणि आपली जवळची माणसे प्रेम करायला असतील, तर सर्वच ऋतू उत्तम असतात. परंतु खायला अन्न नाही, ल्यायला वस्त्र नाही आणि कोणी प्रेम करणारेही नाही, अशी ज्याची स्थिती असेल, त्याला सर्वच ऋतू वाईट असतात.बिरबलाने दिलेली अशी उत्तरे ऐकताच तो पंडित बादशहाला म्हणाला, ''खाविंद, मला वाटले होते, त्यापेक्षा कितीतरी पटींनी बिरबलजी अधिक चतुर आहेत.''*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 11/10/2022 वार - मंगळवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-*आंतरराष्ट्रीय मुलगी दिन*💥 जन्म :-◆ १९४२ - अमिताभ बच्चन, भारतीय अभिनेता.💥 मृत्यू :-◆ १९६८ - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *सर्व केंद्रीय विद्यापीठांमध्ये, उच्च संस्थांमध्ये हिंदीचा वापर बंधनकारक करा, इंग्रजी भाषा पर्यायी ठेवा; अमित शाह समितीची शिफारस*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *स्टॉकहोम: यंदाच्या अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, बेन बर्नानके, डगलस डायमंड आणि फिलिप डायविग या अमेरिकेच्या तीन शास्त्रज्ञांना हा पुरस्कार जाहीर.*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नांदेड जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे पिकाचं नुकसान, शेतकरी हवालदिल*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आपल्याच विभागाकडे दुर्लक्ष; एक लाख विद्यार्थी 9 महिन्यांपासून विद्यावेतनापासून वंचित*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असं नाव वापरण्यास परवानगी दिलेली आहे. तर शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' असं नाव मिळालेलं आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नवी दिल्ली: समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन, ते ८२ वर्षांचे होते. *•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आयसीसी प्लेअर ऑफ दि मंथ पुरस्कार जिंकणारी पहिली महिला खेळाडू ठरली हरमनप्रीत कौर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*friut basket👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/y-VbWtmOi5E~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अति क्रोध करू नये*https://nasayeotikar.blogspot.comमुलांनो, आज आपण ज्याविषयी चर्चा करणार आहोत ते म्हणजे क्रोध. क्रोध म्हणजे राग किंवा संताप. एखादी मागितलेली वस्तू तुम्हाला जर पटकन मिळाली नाही तर लगेच तुम्हाला राग येतो. हवी असलेली वस्तू मिळविण्यासाठी कधीकधी रुसून बसता, तर कधी मौनव्रत धारण करून आई बाबांना भंडावून सोडता. काही मुले तर याहीपुढे जाऊन घरातील वस्तूची आदळआपट करून आपला राग व्यक्त करतात. क्रोध ही दुर्बलतेची निशाणी आहे असे दयानंद सरस्वती म्हणतात. त्यामुळे आपण क्रोधावर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. आपणाला लहानसहान गोष्टीवरून सुद्धा राग निर्माण होतो. जसे की टीव्हीवर कार्टूनचा वा इतर तुमच्या आवडीचा चांगला कार्यक्रम चालू असेल आणि आई-बाबा किंवा ताई दादांनी टिव्ही बंद केला की लगेच तुम्हाला राग येतो. खेळ रंगात येत असताना तुमचा खेळ बंद करून अभ्यासाचा तगादा लावला की राग येतो. कारण हे सर्व तुमच्या मनाविरुद्ध होते, म्हणूनच तुम्हाला राग येतो. त्याच प्रकारे आई-बाबांनी सांगितलेली बाब जर तुम्ही पूर्ण केली नाही तर त्यांनासुद्धा राग येतो की नाही ! गुरुजींनी सांगितलेला अभ्यास वा स्वाध्याय पूर्ण केला नाही तर त्यांनासुद्धा राग येतोच ना ! तुमच्यासारखेच आई बाबा व गुरुजी यांच्या मनाविरुद्ध काही घडल्यास त्यांनाही राग येतच असतो. त्यासाठी त्यांनी आपल्यावर रागावू नये आणि आपण त्यांच्याविरुद्ध राग निर्माण करून घेऊ नये असे जर वागलो तर जरूर याचा एकदा विचार केल्यास एकमेकांबद्दल राग ऐवजी प्रेम, लोभ, माया, ममता निर्माण होईल. त्याच्याऐवजी आपण आपली मनाची वेदना, मनातील दुःख स्पष्टपणे त्यांना सांगावे. असे जर केले नाही तर मनात अजून अधिक राग निर्माण होतो असे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटले आहे. कधीकधी आपला क्रोध एवढ्या टोकाला जातो की त्यापासून काही नुकसान सुद्धा होते जॉन वेबस्टर म्हणतात की निसर्गामध्ये क्रोध हीच एकमेव गोष्ट अशी आहे की जी माणसाला पशु बनविते, विकृत करते. त्यामुळे आपल्या मनात राग निर्माण करायचा नाही, असा ठाम निर्णय करावा. समर्थ रामदास स्वामी यांचे श्लोक नेहमी स्मरणात ठेवावेत. ते श्लोक म्हणजे ' अति क्रोध करू नये । जिवलगास खेदू नये । मनी वीट मानू नये। सिकवणेचा ।।रागाने कधीही कुणाचे भले झाले नाही✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया whatsapp द्वारे वरील क्रमांकावर कळवावे•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*निंदकाचे घर असावे शेजारी - संत तुकाराम*असे तुकोबारायांनी म्हटले आहे. संत तुकारामांचे हे म्हणणे अगदी खरे आहे, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, असे म्हणतात. मग ही स्त्री आई, पत्नी, बहीण, मैत्रीण, सहचरीण किंवा सेक्रेटरीच्या रूपातसुद्धा असू शकेल. त्या जर "सकारात्मक टीकाकार' असतील तर त्या पुरुषाची चांगली प्रगती होते."लोकांच्या डोळ्यातील कुसळ दिसते, पण आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही' अशी मराठीमध्ये म्हण आहे. याचा अर्थ आपल्याला आपल्यातील मोठे मोठे दोषसुद्धा दिसत नाहीत, पण इतरांच्यातील बारीक बारीक दोषसुद्धा दिसत असतात. कुसळ म्हणजे बारीक काटा, तो डोळ्यात गेला तर धोकादायकच असतो. तो वेळेवर काढला नाही तर डोळ्याला इजा होऊ शकते किंवा डोळा जाऊ पण शकतो. पण, आपल्या टीकाकारांनी आपल्या डोळ्यातील हे कुसळ शोधून काढले, याबद्दल खरे तर त्यांचे आभारच मानायला हवेत. आपल्यावर होणाऱ्या टीकेकडे व विरोधाकडे अशा प्रकारच्या "सकारात्मक' नजरेने पाहिले तर आपली खूप प्रगती होणे शक्‍य आहे.आपल्याला प्रगती करायची असेल तर आपल्या आजूबाजूला टीकाकार किंवा विरोधक असणे आवश्‍यक आहे. त्यांच्या टीकेकडे किंवा विरोधाकडे सकारात्मक नजरेने पाहिले तर आपल्यालाच आपल्यातील अनेक दोष किंवा उणिवा सापडतील व त्यावर योग्य ती उपाययोजना वेळीच करता येईल.म्हणूनच *"निंदकाचे घर असावे शेजारी'!* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" महान कारागीर हा काम सोपे करणारा असतो. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) सलग सहाव्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहर होण्याचा मान कोणत्या शहराने पटकावला ?२) भारतात सद्यःस्थितीला वाघांची संख्या किती आहे ?३) भारताचा सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून कोणाला मानले जाते ?४) इंग्रजांनी दक्षिण भारतातील आपली पहिली बखार/वखार इ. स. १६११ मध्ये कोठे स्थापन केली होती ?५) 'आंतरराष्ट्रीय संगीत दिवस' केव्हा साजरे केले जाते ?*उत्तरे :-* १) इंदौर शहर, मध्यप्रदेश २) २९६७ वाघ ( महाराष्ट्र - ४०० वाघ ) ३) एटर्नी जनरल / महान्यायवादी ४) मच्छलीपट्टणम ५) १ ऑक्टोबर *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● बाबाराव पाटील कदम● चंद्रकांत पाटील पांगरीकर ● रवीकुमार सितावार● प्रवीण वाघमारे● विजय केंद्रे● सुमीत बोधने● दिनेश करपे● अजय वाघमारे● संदीप बोंबले*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*माणूस निसर्गाच्या हातातील बाहुलं असला तरी माणसाचं शरीर ही निसर्गाची अद्भुत रचना आहे. विज्ञान युगातही अशी अद्भुत रचना तयार करता आलेली नाही. शरीर एक विशाल प्रयोगशाळेसमान असले तरी. निरोगी शरीर हेच पहिलं सुख. त्यातच निरोगी विचार वास्तव्य करतात. ते जीवनभर प्रभाव टाकतात. अशक्य ते शक्य करण्याचा चमत्कार घडवू शकतात. सकारात्मक विचारांच्या उर्जेची ताकद तुमच्या विचारात आणि विश्वासात इतका बदल घडवते की, त्यामुळे जीवनाला वेगळी दिशा मिळते. जीवनात खरे सुख, शांती आणि स्वास्थ्याची गती लाभते. मानसिक अवस्था व आत्मिक स्थिती पवित्र होते, त्यामुळे जीवनही आपोआप उन्नत होत जाते.**शरीर दोन गोष्टींमुळे कमजोर होते. एक आधिक आराम आणि दुसरी पराकोटीची चिंता. 'जान है तो जहाँ है' असे उगीचच म्हणत नाहीत. जीवनात पद, प्रतिष्ठा महत्वाची आहेच; परंतु त्यापेक्षा महत्वाचं शरीर. आपलं महत्व तोपर्यंतच, जोवर शरीर तंदुरुस्त आहे. भगवान गौतम बुद्धांनी म्हटलयं, 'आपलं शरीर आरोग्यपूर्ण ठेवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. त्याचं पालन केलं नाहीतर बुद्धि सतेज कशी राहील आणि मोक्षाच्या अंतिम ध्येयाप्रत आपण कसे पोहचणार? सर्व अवयवांवर माणसाचे नियंत्रण असते. तेव्हा स्वास्थ्यही त्याच्या हातात असते. त्यासाठी सकारात्मक ऊर्जा हवी. ती ठेवून कार्यरत राहिलं तरच शरीर आणि मनस्वास्थ्य राखता येईल.* ••● *॥ रामकृष्णहरी॥*●•• 🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰 *संजय नलावडे,मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••तुमच्या चेहऱ्यावर दिसणारी एक स्मित हास्याची छटा दुःखी आणि उदास असणा-या माणसाला खूप काही विसरून जाण्यासाठी प्रेरणा देऊन जाते. तुमच्या एका आनंदी जीवनाचे रहस्य त्याला उलगडायला लावते.तुमच्या आनंदी जीवनाचे रहस्य नक्कीच विचार करायला लावते. तुमच्याकडे पाहून तो स्वत:शीच म्हणायला लागतो की, हा माणूस अनेक कामांत व्यस्त असूनही कसलाही आणि कुठलाही ताण न घेता आनंदी राहतो आणि नेहमी पहावे तेव्हा यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य कसे दिसते ? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी तो स्वत: नक्कीच विचार करायला लागतो.ताणतणाव हे कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रत्येकाला असतातच, पण उदास आणि तोंड खाली पडून राहिल्याने कमी होणार आहेत का ? नाही ना ? उलट जास्त मानसिक तणाव निर्माण होऊन आपल्या जीवनाला अधिक दुःखात टाकल्यासारखेच आहे.मग त्यापेक्षा काम करत करत हसत रहायचे आणि हसत हसत काम करत रहायचे. अशा जीवन शैलीने जगत राहिलो तर आपल्याही चेहऱ्यावर स्मित हास्य फुलल्यावाचून राहणार नाही.तुमच्या चेहऱ्यावरच्या एका स्मित हास्याने तुम्ही ही आनंदीत रहालच आणि इतरांनाही आनंदीत राहण्यासाठी प्रेरणा द्याल हे नक्कीच.© व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३😟😕🙁😕🙁😟😂🤣😂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अनमोल क्षण*प्रसिध्द लेखक कै. वि. स. खांडेकरांकडे अलोट गर्दी जमली होती. लोक हार घेऊन अभिनंदनासाठी तिष्ठत उभे होते. कॅमेरे सरसावुन फोटोग्राफर धावपळ करत होते. खांडेकरांना साहित्य ऍकेडमीचे पारितोषिक मिळाले तेव्हांचा प्रसंग.एका पत्रकाराने विचारले, 'आपल्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण कोणता ?' खांडेकरांनी दोन क्षण डोळे मिटले. प्रसंग त्यांच्या डोळयासमोर दिसु लागला. ते म्हणाले, 'आज सकाळीच एका अपरिचिताने येऊन माझ्या गळयात हार घातला. माझ्या पायावर डोकं ठेवलं मी विचारलं, 'कोण आपण? मी ओळखलं नाही'.'साहेब, आज मी आहे तो आपल्यामुळेच. फार फार वार्षापुर्वी मी एका तळयाच्या शेजारून फिरत असता अचानक तोल जाऊन मी पाण्यात पडलो. मला पोहता येत नव्हतं, मी गटांगळया खाऊ लागलो. माझी ती अवस्था आपण पाहिलीत आणि ताबडतोब पाण्यात उडी घेतलीत. घाबरलेला मी गळयाला मिठी मारली. आपण जोरात हिसका देऊन मिठी सोडवलीत व ओढतच मला पाण्याबाहेर काढलंत. कुठलीही ओळख न देता उपकाराची भावना प्रगट न करता आपण निघून गेलात. मागून मला कळले मला वाचवणारे सुप्रसिध्द लेखक खांडेकर होते. तेव्हांपासुन आपल्याकडे यायचे होते तो योग आज आला'.खांडेकर म्हणाले, 'कोणालातरी जगायला आपण मदत करू शकतो ही गोष्ट माझ्या दृष्टीने फार मोठी आहे. तोच क्षण माझ्या जीवनातला अनमोल क्षण होय'.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 10/10/2022 वार - सोमवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-★ १८७१ - अंदाजे ९ चौरस किमी क्षेत्र व्यापून दोन दिवस चालणारी शिकागोची आग आटोक्यात आली.★ १९१३ - पनामा कालव्यावर (नकाशा चित्रित) मोठे बांधकाम पूर्ण झाले.★ १९७० - युनायटेड किंग्डमपासून फिजीला स्वातंत्र्य मिळाले.💥 जन्म :-★ १८३० - इसाबेला दुसरी, स्पेनची राणी.★ १९०२ - आर.के. नारायण, भारतीय लेखक★ १९५४ - रेखा, भारतीय चित्रपट अभिनेत्री💥 मृत्यू :-★ ८२७ - पोप व्हॅलेन्टाइन★ १९६४ - गुरुदत्त, भारतीय अभिनेता, दिग्दर्शक, निर्माते★ २००० - सिरिमावो भंडारनायके, श्रीलंकेची पंतप्रधान.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *निवडणूक आयोगाने शनिवारी मोठा निर्णय घेत शिवसेना पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण गोठवले, तसेच शिवसेना हे नाव शिंदे आणि ठाकरे गटाला वापरता येणार नाही, असा निर्णय घेतला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *कोल्हापूर जिल्ह्यातील नोव्‍हेंबर ते डिसेंबरअखेर मुदत संपणाऱ्या 475 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *विदेशी गुंतवणूकदारांकडून ऑक्टोबरमध्ये 2,400 कोटींचा व्यवहार, मार्केट स्थिर राहण्याचा तज्ज्ञांचा अंदाज *•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *भारतीय हवाई दलाची नवीन वेपन सिस्टिम ब्रांच, 3400 कोटी रुपयांची होणार बचत*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अल्पसंख्यांक समाजाला नोकऱ्यांमध्ये मिळायला हवा तेवढा वाटा मिळत नाही: शरद पवार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *त्र्यंबकेश्वरचे आनंद आखाड्याचे प्रमुख सागरानंद सरस्वतींचे निधन, मुख्यमंत्र्यांनी घेतलं अंत्यदर्शन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *श्रेयसचं दमदार शतक, ईशानची तुफान खेळी, भारताचा आफ्रिकेवर 7 गडी राखून विजय, मालिकेत 1-1 ची बरोबरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Occupation व्यवसाय ओळख👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/9mamp5qoB9o~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आराम हराम है*https://nasayeotikar.blogspot.com/2018/03/10.htmlमुलांनो खुप काम किंवा अभ्यास केल्यानंतर थकवा येतो आणि थकवा घालविण्यासाठी आपण आपल्या मनाला कोणत्या तरी विरंगुळ्यात टाकतो, लगेच मन प्रसन्न होते. जे काहीच काम करीत नाहीत त्यांना थकवा कसा येईल ? थकवा आलाच नाही तर विरंगुळ्याचा प्रश्नच नसतो. काम न करणाऱ्या माणसाला आळशी म्हटले जाते. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे, असे गौतम बुध्दांनी म्हटले आहे. त्यास्तव नेहमी कामात व्यस्त रहावे व त्यास परममित्र करावे. प्रसिध्द विचारवंत रस्किन म्हणतो की, परिश्रमातून, कष्टातून आनंद निर्माण होत असतो, क्रोधातून किंवा आळसातून नव्हे. सतत कामात राहिल्याने मनुष्या चे जीवन सुखी बनते. कधीकधी आपणास शाळेला जाण्याचा, अभ्यास करण्याचा कंटाळा येतो. म्हणजे थोडक्यात आपण त्या बाबतीत आळस करतो आणि तसा आळस केला की त्या दिवशीचा सर्व भार दुसऱ्या दिवसावर येऊन पडतो. मग आपले काम दुप्पटीने वाढते. म्हणूनच संत कबीर म्हणतात की," कल करे सो आज कर और आज करे सो अब " त्यांचे काव्य ध्यानीमनी ठेवल्यास आपल्या मनात कधीच आळस येणार नाही. आळस घालविण्यासाठी आपल्याकडे विरंगुळ्याची भरपूर साधने उपलब्ध आहेत. त्याचा यथायोग्य वापर करता येणे महत्वाचे आहे. गोष्टीचे पुस्तक वाचणे, शब्दकोडी सोडविणे, चित्रे रंगविणे, मित्रांसोबत खेळणे, व गप्पा मारणे, इत्यादी क्रियाद्वारे आपण आपला आळस घालवू शकतो. मात्र मुख्य काम बाजूला ठेवून विरंगुळ्याचेच काम करीत बसलो तर ते डोईजड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आळसाला तुम्ही आजचा दिवस बहाल केला की, तुमचा उद्याचा दिवस त्याने चोरलाच म्हणून समजा असे कोकिवल यांनी म्हटले आहे.त्यामुळे ' दे रे हरी पलंगावरी ' अशी अवस्था आपली कधीच होणार नाही, याची काळजी घ्यावी. सतत कामात व्यस्त राहिल्यामुळे आपणाला नवनवीन कामे, कल्पना सुचतात. नविन गोष्टी कळत राहतात आणि प्रगती होत राहते. आळस केला तर मात्र जेथे आहोत त्यापेक्षाही अधोगतीला जातो. वाहत्या नदीचे पाणी स्वच्छ, निर्मळ व छान वाटते, तर साचलेले किंवा थांबलेले पाणी अस्वच्छ आणि घाण वाटते तसेच त्या पाण्याची दुर्गंधी देखील येते. नित्य कामात राहणे म्हणजे नदीच्या वाहत्या पाण्यासारखे आहे, तर आळस म्हणजे साचलेले पाणी होय. त्यामुळेच आपण मुलांनी पंडीत जवाहरलाल नेहरू म्हणजेच आपल्या मुलांचे चाचा नेहरू यांचे ' आराम हराम है ' हे वाक्य नेहमी लक्षात ठेवावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *आंधळे लोक कसे परीक्षा देतात ?* 📙अंध व्यक्ती आजकाल उच्च शिक्षण घेताना आपल्याला दिसतात. पूर्वी मात्र ते शक्य नव्हते. कारण बघता येत नसल्याने अंध लोकांना ज्ञानाची सर्वा दालने बंद होती. सहाजिकच त्यांच्या जीवनात खर्या अर्थाने अंधार होता. अंध व्यक्ती दुसऱयांच्या उपकारावर, सहानुभूतीवर अवलंबून होत्या. त्यांना स्वतःचे कर्तृत्व दाखवायला, स्वतःच्या पायावर उभे राहायला संधी मिळत नव्हती. ब्रेलच्या संशोधनामुळे मात्र अंधांच्या जीवनात आशेच्या किरणांनी शिरकाव केला. अंध व्यक्तीचे स्पर्शज्ञान खूपच चांगले असते. या स्पर्श ज्ञानाच्या कौशल्याचा वापरच ब्रेल लिपीत केला जातो. यात प्रत्येक अक्षर हे कागदावर उंचवट्याच्या (सुई टोचून केलेल्या) स्वरूपात लिहिले जाते. या उंचवट्यांची संख्या, रचना स्पर्शाने लक्षात घेऊन अंधांना अक्षर ओळख करून घेता येते. याला ब्रेल लिपी असे म्हणतात. ब्रेल लिपीत लिहिलेल्या पुस्तकांच्या साहाय्याने अंधांना ज्ञानाच्या विविध दालनात प्रवेश करणे शक्य झाले आहे. त्यामुळेच आता आपल्याला पदवी वा पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या अंध व्यक्ती दिसतात.अंध व्यक्तींना सहानुभूती वा दयेपेक्षा संधी मिळण्याची गरज आहे. त्यांची गुणवत्ता व कौशल्य वाढवण्याचे काम ब्रेल लिपीने केलेले आहे. साहजिकच अंध लोक इतरांच्या बरोबरीने विकास साधू शकत आहेत. ब्रेल लिपीच्या आधारेच अंध व्यक्ती परीक्षा देतात. अशी ही ब्रेल लिपी जणू अंधांसाठी वरदानच ठरली आहे.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन०२० ६५२६२९५० *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ विचार न करता वाचन म्हणजे न पचवता खात सुटणे ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) कोणत्या पक्ष्यास 'माळरानाचा सम्राट' असे म्हटल्या जाते ?२) भारतातील पहिले टपाल कार्यालय केव्हा सुरू झाले ?३) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नोटबंधीचा निर्णय केव्हा जाहीर केला ?४) इंग्रजांनी आपली भारतातील पहिली वखार कोठे स्थापन केली होती ?५) 'जागतिक हृदय दिन' कधी साजरा केला जातो ?*उत्तरे :-* १) माळढोक २) १८३७ ३) ८ नोव्हेंबर २०१६ ४) सुरत ५) २९ सप्टेंबर *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••◆ राजेश्वर भुरे◆ संतोष खेडकर◆ राजेंद्र वाघमारे◆ श्याम देसाई◆ विशाल अन्नमवार◆ पोतन्ना चंदेवाड◆ सतीश बोधनकर◆ सतीश बड्डेवाड◆गंगाधर पापुलवार◆ गोविंद पाटील◆ विठ्ठल धुलेवार◆ कैलास सांगवीकर◆ प्रभू पाटील कदम◆ शरद घुबे◆ प्रमोद यादव◆ श्रीकांत पाटील शिंदे◆ तानाजी पाटील◆ शंकर बत्तीनवार◆ तुकाराम डोळे◆ राम गायकवाड◆ विनोद लोने◆ वसंत पाटील कदम◆ अरुण शंखपाळे◆ रोहित हिवरेकर*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*खरंच, काही 'उपकार' असे असतात, की त्यांची परतफेड होऊ शकत नाही. काही 'उपकार' सदैव स्मरणात ठेवायचे असतात व कोणतेच 'उपकार' विसरायचे नसतात. अलिकडे कृतज्ञतेची जाणिव तरी कितपत शिल्लक राहिलेली आहे ? ज्याचा आधार घेऊन माणूस पुढे सरकतो, त्या आधारालाच नंतर धक्का देऊन बाजूला केलं जातं. यालाच जगरहाटी म्हणण्याची हिणकसता ब-याचवेळी तुम्ही आम्ही आपण सारे स्विकारतो.**माझ्यावर झालेले माझ्या माता-पित्यांचे, गुरूंचे, व्यक्तिगत वाटचाल करीत असताना सभोवतीच्या असंख्य ज्ञात-अज्ञात लोकांचे 'उपकार' हे माझ्या स्मरणकप्प्यातील एक सुगंधी भाग आहे, ही अगदी सामान्य भावना सातत्याने तेवत ठेवणे, म्हणजेच आपण आपले 'माणूसपण' जिवंत ठेवणे होय. या भावनेचाच जर विसर पडणार असेल, तर आपण पाषाणवत झालो आहोत हे कोणी वेगळे सांगण्याची गरज नाही. 'उपकार' फेडायचे नाहीत, तर ते सदैव स्मरणात ताजे राहतील अशी व्यवस्था करायची, कारण पुढच्या क्षणाचे भविष्य कोण सांगू शकेल ?* ••●‼ *रामकृष्णहरी*‼●••🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••देह शुद्ध करण्यासाठी स्नान करावे लागते,मन शुद्ध करण्यासाठी देवाचे किंवा आदर्श अशा संतांचे आणि महापुरुषांचे नामस्मरण करावे लागते तर चांगले विचार करण्यासाठी चांगल्या ग्रंथांतील आदर्श नीतीमूल्ये, विचार यांचे अनुकरण आणि जीवनास प्रेरणा देणा-या पुस्तकांच्या सहवासात रहावे लागेल तरच आपल्या जीवनास परिपूर्ण आकार मिळू शकतो.अन्यथा आपल्या मानवीजन्माला अर्थच राहणार नाही.© व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हारजीत*एका महाविद्यालयात संजय नावाचा एक विद्यार्थी शिक्षण घेत होता. अभ्यासाबरोबरच तो खेळातही प्रवीण होता. तो एक उत्कृष्ट नेमबाज होता. चांगले गुण व विनम्रता यामुळे तो शिक्षकांमधेही प्रिय होता. एकदा महाविद्यालयात वार्षिक महोत्सव होता. यात नेमबाजीचीहि स्पर्धा ठेवण्यात आली होती. इतर ठिकाणाहूनही अनेक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला होता. प्राचार्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याशी परिचय करून घेताना दुसऱ्या महाविद्यालयातील गणेश नावाचा एक विद्यार्थी प्राचार्यांना मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाला,"सर! मी संजयपेक्षाही जास्त अचूकतेने नेम साधू शकतो. संजयला पराजित करणे हे माझे उद्दिष्ट आहे." प्राचार्य मंदसे हसले आणि पुढे गेले, कारण त्यांना माहित होते कि संजयला हरवणे इतके सोपे काम नाही. स्पर्धा सुरु झाली. स्पर्धेचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. एका धाग्याला एक लाकडी फळ बांधले होते, त्याचा वेध नेमबाजांनी घ्यायचा होता. सर्व नेमबाजांनी प्रयत्न करून पाहिले पण त्यांना यश मिळाले नाही. फक्त गणेश आणि संजय हे दोघेच मुख्य प्रतिस्पर्धी उरले. गणेशने यावेळी पुढाकार घेतला. त्याने पहिला नेम साधला तो अचूकपणे, दुसरा नेम त्याचा हुकला आणि तिसराही नेम योग्य पद्धतीने साधला. आता संजयची वेळ होती. संजय नेमबाजीला उभारला कि मुलांनी त्याला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. संजयने पहिला नेम मारला तो चुकला, दुसरा मारला तोही चुकला आणि तिसराही नेम त्याला मारता आला नाही. संजय पराजित झाला. सारी मुले, शिक्षक हिरमुसले झाले. संजय प्रथमच पराजित झाला होता. प्राचार्यांना व शिक्षकांना संजय हरला यावर विश्वास बसेना. त्यांनी त्याला एकटे बोलावून घेतले. अनेकांनी त्याला विचारले पण तो काही सांगायला तयार होईना. शेवटी प्राचार्यांनी त्याच्यावर दबाव टाकला तेंव्हा त्याने सांगितले,"सर ! गणेशला मी बाहेर त्याच्या मित्रांबरोबर बोलताना ऐकले कि त्याची परिस्थिती खूप गरिबीची आहे या पुरस्काराच्या रकमेतून त्याची फी तो भरणार आहे. मी या गोष्टीची अनेक मित्रांकडून खात्री केली. सर माझ्या हरण्याने जर कुणाचे आयुष्याचे कल्याण होत असेल तर मी कायम हरायला तयार आहे. सर माफ करा यामुळे आपल्या सर्वांचा अपेक्षाभंग झाला पण त्यातून एका विद्यार्थ्याचे आयुष्य उभारेल याचे मला समाधान आहे." या त्याच्या बोलण्याने सर्वच उपस्थित असणाऱ्यांनी टाळ्या वाजवल्या व प्राचार्यांनी संजयचे एक विशेष गुणवान विद्यार्थी म्हणून अभिनंदन केले.तात्पर्य-आपल्या सदवर्तन करण्याने कुणाचे ना कुणाचे चांगले कसे करता येईल याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 07/10/2022 वार - शुक्रवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-★१९१९-महात्मा गांधींनी 'नवजीवन'हे वृत्तपत्र सुरू केले.★१९१२-हेलसिंकी स्टॉक एक्सचेंज सुरू झाले.★ ख्रिस्त पूर्व ३७६१-हिब्रू दिनदर्शिकेनुसार जगाचा पहिला दिवस.💥 जन्म :-◆१९०७ - प्रागजी डोसा, गुजराती नाटककार, लेखक. ◆१९७८ - झहीर खान, भारतीय क्रिकेट खेळाडू. ◆१९५२-ब्लादिमिर पुतीन ,रशियाचे राष्ट्राध्यक्ष.💥 मृत्यू :-●१७०८ - गुरू गोबिंद सिंघ, शीख गुरू. ●१९९८-भाऊसाहेब वर्तक,महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *वेल डन इंडिया! कोरोना काळात गरीब देशांना मदतीचा हात, कोरोना महामारीमधील कामामुळे जागतिक स्तरावर भारताचं कौतुक*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सणासुदीच्या काळात गव्हाच्या किंमतीत वाढ तर तांदळाच्या किंमती घसरल्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शेवटच्या महिन्यात निधी खर्च करण्याची पद्धत बंद करा, उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला खडसावले*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबई - राज्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित सुमारे 7 हजार 649 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 13 ऑक्टोबर 2022 रोजी होणार प्रसिद्ध*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे याचा परिणाम आता भात शेतीवरती होत आहे. अंतिम टप्प्यात आलेली भात शेती वाया जाण्याची भीती असून काही ठिकाणी पावसाचा तडाख्यामुळे भात शेती जमिनीवर कोसळली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) माजी संचालिका जयश्री पाटील-चुयेकर (वय 78) यांचे निधन झाले. गोकुळचे संस्थापक अध्यक्ष आनंदराव पाटील यांच्या त्या पत्नी होत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *लखनऊ येथे खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा नऊ धावानी पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*आकाश कंदील बनवणे👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/AkP6No6xxAQ~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*शिक्षण म्हणजे विचार करण्याची कला*प्रसिद्ध विचारवंत टी. एडवर्ड यांच्या मतानुसार, शिक्षण म्हणजे जन्मापासून मरेपर्यंत सर्व वातावरणाचा परिणाम, सर्व प्रकारचे शिक्षण, शिस्त आणि संस्कृतीची बेरीज. म्हणूनच आपण आजीवन विद्यार्थी म्हणून जगत असतो. ........... पूर्ण लेख खालील लिंकवर वाचता येईल.https://nasayeotikar.blogspot.com/2018/05/32.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संघर्ष*गरुडाचे जीवनमान 70 वर्षांचे असते, परंतु तो जेव्हा 40 वर्षाचा होतो तेव्हा त्याला एक महत्वाचा निर्णय घ्यावा लागतो.त्या अवस्थेत त्याच्या शरीराचे 3 महत्वाचे अवयव निष्प्रभ होऊ लागलेले असतात, पंजे लांब आणि लवचिक होतात ज्यामुळे शिकार पकडतायेत नाही , चोच पुढील बाजूला वळते ज्यामुळे भोजन करता येत नाही, पंख जड होतात व छातीस चिकटल्यामूळे पूर्णपणे उघडत नाहीत, गरुड भरारी सीमित करतात. अन्न शोधणे, सावज पकडणे,अन्न खाणे या तिन्ही क्रिया त्याच्यासाठी अवघड बनून जातात. अशावेळी त्याच्याकडे तीन पर्याय असतात एक तर प्राण त्याग करणे आणि दुसरा आपली प्रवृत्ती सोडून गिधाडा प्रमाणे मृत अन्नावर गुजराण करणे आणि तिसरा पर्याय असतो आकाशाचा अनभिषिक्त सम्राट म्हणून स्वतः ला पुनर्स्थापित करणे !जिथे पहिले दोन पर्याय सोपे व सुलभ आहेत तिथे तिसरा अत्यंत कठीण आणि दुर्धर, गरुड तिसरा पर्याय निवडतो, एखाद्या उंच पहाडावर जातो एकांतात आपले घर बनवतो आणि स्वतः च्या पुनर्स्थापनेस प्रारंभ करतो सर्वप्रथम तो आपली चोच दगडावर मारून मारून तोडून टाकतो.एका पक्षासाठी चोच तोडण्याहून अधिक त्रासदायक दुसरे काय असेल? आणि प्रतीक्षा करतो चोच पुन्हा उगवून येण्याची, तसेच तो आपले पंजे तोडून टाकतो आणि प्रतीक्षा करतो पंजे पुन्हा उगवण्याची. नवीन चोच आणि पंजे आल्यानंतर तो आपल्या जड झालेल्या पंखांना एक एक करन उपसून टाकतो आणि वाट पाहतो नवे पंख फुटण्याची !150 दिवसाचा त्रास आणि प्रतिक्षे नंतर त्याला मिळते त्याची गरुड भरारी, या पुनरस्थापणे नंतर तो 30 वर्षे जगतो, ताकद आणि अभिमानाने !याच प्रकारे मानवाच्या आत्मविश्वास, सक्रियता आणि कल्पनाशक्ती या तिन्ही शक्ती दुर्बल होऊ लागतात. आपणही भूतकाळात अडकलेल्या बंधक अस्तित्वाचा त्याग करून कल्पनेची मुक्त उड्डाणे घेतली पाहिजेत !150 दिवस नाही, 60 दिवस द्या स्वतः ला पुनर्स्थापित करण्यासाठी ! जे शरीराला मनाला चिकटलेले आहे ते तोडताना आणि उचकटून काढताना यातना तर होणारच ! पण त्यानंतर जी उड्डाणे असतील ती उंच, अनुभवी आणि अनंताकडे झेपावणारी असतील !दररोज काही चिंतन करत रहा, तुम्ही असेएकमेव व्यक्ती आहेत जे स्वतः ला परिपूर्ण ओळखता, आणि तुम्हीच स्वतः मध्ये बदल घडवू शकता, गरज आहे ती लहान लहान गोष्टीतून बदलाची सुरुवात करण्याची.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ इतिहास म्हणजे उदाहरणांवरून शिकलेले तत्वज्ञान होय. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) २०२२ या वर्षाचा वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ? २) अयोध्येत राम जन्मभूमीकडे जाणाऱ्या मुख्य मार्गाजवळील 'नया घाट चौक' आता कोणत्या नावाने ओळखला जाणार आहे ?३) 'हायकू' काव्यप्रकार मराठीत कोणी आणला ? ४) तृणधान्यांची नावे सांगा.५) प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक २०२१ नुसार भारताचा कितवा क्रमांक आहे ?*उत्तरे :-* १) स्वांते पाबो, शास्त्रज्ञ, स्वीडन २) लता मंगेशकर चौक ३) शिरीष पै ४) गहू, बाजरी, तांदूळ, ज्वारी इत्यादी ५) ५४ वा *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● जादू पतंगे, वसमत● सुदर्शन कदम● दत्तात्रय देवकते● अभिषेक निगम● रवींद्र शेळके● सायरेड्डी चाकरोड● डॉ. रवी माळी● योगेश गाडे● दिपालीताई सतीश सावंत*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*माणूस जोवर जिवंत असतो, तेंव्हा त्याच्या अपेक्षा असतात. इच्छा असतात. त्या कुणाच्या गावाला पोहचत नाहीत. त्याच्या आकान्तहाका कुणाला ऐकू येत नाहीत. नंतर मात्र त्याच्या कौतुकाचे पाढे सुरू होतात, पोवाडे गायले जातात. जिवंतपणी त्याच्या हाकांचा कानोसा घेतला असता, तर नक्कीच त्याच्या जगण्याचे काही दिवस वाढले असते. भुकेल्याची अपेक्षा फार नसते, त्यास भाकर हवी असते, तहानलेल्याला पाणी, कष्टक-याला त्याच्या घामाचा मोबदला, कलाकाराला त्याच्या कलेची दाद, एवढीच तर अपेक्षा असते... फक्त एक सेकंद जगण्याची... पण त्याच्या हयातीत आपल्याला पकडता येत नाही त्याचा जिवंत सेकंद..**सोनं तोळ्यात मापतात. मात्र, त्याहीपेक्षा माणसाचा माणसासाठीचा कौतुकाचा, जिव्हाळ्याचा शब्द महागला आहे. माणसाचं अपयश हे की तो पैसे मिळविण्याचं तंत्र तर शिकलाच; तंत्रज्ञानालाही त्याने असे आत्मसात केले की तंत्र मानव म्हणून कुशल झाला. पृथ्वीवर तर त्याने सत्ता काबीज केलीच, पण आज तो इतर ग्रहावरही चढाई करतोय. मात्र जिवंत राहण्याचं तंत्र तो शिकू शकला नाही. जगण्या-मरण्यातल्या एका श्वासांचं अंतर जेव्हा माणसास कळेल तेव्हा त्याच्या आत माणुसकीचा दीप तेवून उठेल.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••म्हणतात ना स्वत:ची पाठ स्वत:ला कधीच दिसत नाही त्याचप्रमाणे आपल्यातील काही असलेले दोष आपल्याला लवकर कळत नाही.दुसरे जेव्हा आपल्यातील दोष काढायला लागतात तेव्हा आपल्याना त्यांचा खूप राग येतो आणि अशावेळी वाटायला लागते की,तो कोण आहे आपल्यातले दोष काढणारा ? आपल्यातला हा अहंपणा किंवा माझे तेच खरे आहे असा असणारा स्वभाव किंवा आपली मानसिकता यामुळे लोकांचे म्हणणे ऐकून घ्यायला तयार होत नाही त्यामुळे आपल्यातल्या दोषांवर आपणच पांघरुण घालतो आणि आपल्यातल्या लागणा-या दोषाला अधिक बळकटी देतो त्यामुळे आपल्या जीवनाचे खूप नुकसान होते,आपली चार माणसांमध्ये किंमत तर राहत नाही उलट आपल्यामध्ये थोडीबहुत जी काही माणुसकी आहे तीही संपून जाते.अशावेळी आपण आपल्यातील दोष दुसऱ्यांनी काढले म्हणून त्यांच्यावर रागावू नका किंवा त्यांच्याशी अबोलाही धरु नका.कारण तेच लोक आपल्यातील दोष जेव्हा दाखवतात यांचा अर्थ आपण समजून असा घ्यायचा की,आपल्याला सुधारणा करण्यासाठी संधी देत आहेत आणि त्याच संधीचा फायदा घेऊन आपल्या जीवनात असलेले दोष दूर करुन जीवन अधिक चांगल्या प्रकारे बनवून समृध्द करायला शिकले पाहिजे.उद्या आपणच त्यांच्यासमोर आदर्श म्हणून उभे राहू आणि आपल्या आदर्श विचारांचा स्वीकार करतील.अशावेळी आपले तेच म्हणण्यापेक्षा इतरांच्या ही विचारांचा विचार करायला हवा की,ज्यामुळे सगळ्यांचेच कल्याण होईल.© व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.📚🍃📚🍃📚🍃📚🍃📚 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *यशाचा घडा* वसिष्ठांची पत्नी अरूंधती ज्ञानी, विद्वान, पतिव्रता होती.एकदा सूर्य अग्नी व वरूणासह वसिष्ठांच्या आश्रमात आले. तेंव्हा अरूंधती पाण्याचा घडा घेऊन नदीवर जायला निघाली होती. तिने तिघांना बसायला आसन दिलं आणि म्हणाली, 'थांबा थोडं, आता नदीवरून एवढा घडा भरून आणते.' त्यावर सूर्यदेव म्हणाले, 'आई नदीवर कशाला? मीच मंत्रसामर्थ्याने देतो घडा भरून' एवढे म्हणून त्यांनी मंत्रसामर्थ्याने घडा भरला, पण तो घडा १/२ रिकामाच राहिला. शेवटी तो पूर्ण भरण्याचे काम अरूंधतीने केले. नंतर ती म्हणाली कोणत्याही यशाचा ३/४ वाटा देवदत्त असला तरी १/४ भाग भरण्यासाठी मानवी प्रयत्नच लागतात. निढळाच्या घामाने उरलेला १/४ घडा भरणे भाग आहे.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 06/10/2022 वार - गुरूवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-★ १९०८ - ऑस्ट्रिया-हंगेरीच्या दुहेरी राजतंत्राने ओस्मानी साम्राज्यच्या ताब्यातील बॉस्निया आणि हर्झगोव्हेना बळकावले.★ १९८१ - इजिप्तच्या राष्ट्राध्यक्ष अन्वर अल सादातची हत्या.💥 जन्म :-★ १९१४ - थॉर हायरडाल, नॉर्वेजियन मानववंशशास्त्रज्ञ व शोधक.★ १९३० - हफेझ अल-असाद, सिरीयाचा राष्ट्राध्यक्ष.💥 मृत्यू :-★ १६६१ - गुरू हर राय, सातवे शिख गुरू.★ १८९२ - आल्फ्रेड लॉर्ड टेनिसन, इंग्लिश कवी.★ १९७९ - दत्तो वामन पोतदार, मराठी इतिहाससंशोधक, लेखक*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर राष्ट्रीय राजकारणात केला प्रवेश,काल दुपारी केसीआर यांनी भारत राष्ट्र समिती या पक्षाची केली घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *ऑल्ट न्यूजचे सहसंस्थापक प्रतीक सिन्हा आणि मोहम्मद जुबेर यांना सन 2022 नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *भारतीय लष्कराच्या चित्ता हेलिकॉप्टरचा अरुणाचल प्रदेशमध्ये झालेल्या भीषण अपघातात पायलटचा मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *फैजाबाद छावणीचं नाव आता अयोध्या छावणी; संरक्षण मंत्रालयाने दिली मंजुरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबई: शिवसेनेतून गद्दारीं केली, मंत्रीपद काही वेळेपुरतंच आहे, पण गद्दार हा शिक्का कायमस्वरुपी आहे, तो शिक्का पुसता येणार नाही असा घणाघात शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नैसर्गिक शेती' संदर्भात आज पुण्यात कार्यशाळेचे आयोजन, या कार्यक्रमाला गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार उपस्थित*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवामध्ये करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात गर्दीचे आजवरचे विक्रम निघाले मोडित, मंदिरात नवरात्रीमध्ये 23 लाख 31 हजार 604 भाविकांनी दिली भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*The Loin & The Mouse👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/LUHDSa-9ZIM~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपले नशीब आपल्या हाती*https://nasayeotikar.blogspot.com/2019/10/blog-post.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *आपल्या सूर्यमालिकेतील ग्रहाची माहिती* 📙 ग्रहांबद्दल तशी थोडीफार माहिती प्रत्येकालाच असते. कधी ना कधी तरी त्यांच्याबद्दल कानावर पडत असतेच. डोळ्याने दिसोत वा न दिसोत, ज्योतिषांकडून तर ते सतत कानावर पडतात. सूर्यमालिका पाच अब्ज वर्षांपूर्वी अस्तित्वात आली, असे मानले जाते. सूर्याभोवती भ्रमण करणारे आठ ग्रह सध्या ज्ञात आहेत. त्यातील बुध, शुक्र, पृथ्वी व मंगळ हे घन वस्तूपासून बनले असून गुरु, शनि, हर्षल, नेपच्यून हे वायूंचे प्रचंड गोळे आहेत. सूर्यमालिका तयार होताना सूर्याकडे ९९ टक्के घनभाग आकर्षित झाला, तर उरलेला एक टक्का भाग आकाशात विखुरला गेला. यातूनच ग्रह बनत गेले. सूर्याच्या उष्णतेचा प्रभाव या प्रक्रियेत फारच मोठा होता. यामुळे सूर्यापासूनचे जवळचे ग्रह खडक व धातू यांपासून बनले. सूर्याने जड मुलद्रव्ये स्वतःजवळच्या परिभ्रमण कक्षेत खेचून घेतल्याचा हा परिणाम होता. ज्या पदार्थांचा गोठणबिंदू जास्त आहे, ते जवळच्या ग्रहात;९ तर ज्यांचा गोठणबिंदू कमी आहे ते लांबच्या ग्रहात दिसतात. जे ग्रह सूर्यापासून दूर राहिले, तेथवर उष्णता कमी पोहोचत होती. त्यामुळे तेथील वायूंचे बर्फात रूपांतर होत गेले. हलकी मुलद्रव्ये यामध्ये सामावत गेली. सूर्याभोवती भ्रमण करताना हे ग्रह स्वतःभोवतीही भ्रमण करू लागले. मंगळ व गुरू या दरम्यान असलेल्या काही घनांचा ग्रह बनला नाही. अशा दोन गोळ्यांना लघुग्रह अशीही उपाधी मिळाली. लघुग्रह असला, तरी त्यांतील सिरीजचा व्यास ९४० किलोमीटरचा आहे. यांना 'अॅस्टेराॅइड्स' म्हणून ओळखले जाते. सूर्यकक्षेत फिरणाऱ्या ग्रहांना काही उपग्रहही आढळतात. ग्रहमालिकेच्या उत्पत्तीमध्ये हे उपग्रह काही ठराविक अंतरावर घनाकृतीत रूपांतरित झाले व ग्रहांच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत अडकून त्यांच्याभोवती फिरू लागले. बुधावर लोहाचे प्रमाण खूपच जास्त आहे; तर शुक्र, पृथ्वी, मंगळ येथे लोह, निकेल, सिलिकेट व त्यापासून बनलेले खडक व माती यांचे प्रमाण जास्त आहे. नंतरचे ग्रह मात्र नायट्रोजन व मिथेन यांच्या घनरूपाने बनले आहेत. बर्फाळ अवस्थेत हे वायू घनरूप आढळतात. ग्रहांवरून सूर्यकिरण परावर्तित होतात म्हणूनच ते आपल्याला दिसतात. बुध सूर्याच्या खूपच जवळ असल्याने सूर्याच्या तेजापुढे दिसत नाही. शुक्र पृथ्वीला खूपच जवळ येत असल्याने सर्वात ठळक दिसतो. मंगळ रंगामुळे, तर शनि कड्यांमुळे लक्षात येतो. गुरू हा शुक्रानंतर लगेच डोळ्यात भरतो. हर्षल, नेपच्यून हे दुर्बिणीच्या सहाय्यानेच बघावे लागतात. ग्रहांचा प्रकाश हा स्थिरपणे दिसणारा प्रकाश असतो. यामुळेच लुकलुकणाऱ्या ताऱ्यांपासून त्यांचे वेगळेपण सहज जाणवते. ग्रहांबद्दलची काही आकडेवारी थोडक्यात अशी:बुध सूर्यापासून ५.८ कोटी किलोमीटर अंतरावर प्रदक्षिणा करतो. त्याचा व्यास ४,९०० किलोमीटरचा आहे, तर पृष्ठभागावरील तापमान चारशे डिग्री सेंटिग्रेड असते. सूर्याच्या विरुद्ध बाजूला रात्री तापमान उणे १७० डिग्री सेंटीग्रेडपर्यंत उतरते. याचा प्रदक्षिणा काळ ५९ दिवसांचा आहे. शुक्राचा आकार पृथ्वीपेक्षा थोडा लहान असून सूर्यापासून १०.८ कोटी किलोमीटरवर त्याची प्रदक्षिणा चालते. याचे तापमान ५०० अंश सेंटिग्रेड असते. पृथ्वीवर सजीवांची वस्ती आहे, वातावरण आहे, पाणी आहे. पृथ्वी सूर्याभोवती ३६५ दिवसांत प्रदक्षिणा करते. तापमान अधिक पन्नास ते उणे पन्नास सेंटिग्रेड आढळते.मंगळ सूर्यापासून २२.८ कोटी किलोमीटरवर आहे, व्यास ६,८०० किलोमीटरचा आहे. गोठलेला कार्बन डायऑक्साइड ध्रुवीय भागात आढळतो.गुरू ७७.८ कोटी किलोमीटरवर आहे. पृथ्वीच्या एक हजारपट मोठा आहे. हा सर्वांत मोठा ग्रह म्हणावा लागेल. शनी १४२.७ कोटी किलोमीटरवर असून त्याला सहा उपग्रह आहेत. याचा व्यास एक लाख वीस हजार किलोमीटरचा आहे. शनीभोवतीची कडी त्याची प्रदक्षिणा ज्या वर्तुळात होते त्या दिशेला कललेली राहतात. त्यामुळे ती आपल्याला वेगवेगळ्या कोनातून आढळतात. हर्षल म्हणजेच युरेनस २८७ कोटी किलोमीटर अंतरावरून भ्रमण करतो व त्याचा व्यास ५२,४०० किलोमीटरचा आहे. नेपच्यून ४४९.७ कोटी किलोमीटरवरून भ्रमण करतो व व्यास ४८,६०० किलोमीटर आहे. प्लुटो हा २४ ऑगस्ट २००६ पर्यंत सूर्यामालेतील एक ग्रह मानला जात होता. त्याचा शोध १९३० साली लागला. हा ग्रह आहे वा नाही, याविषयी ७५ वर्षात अनेक व वेळा चर्चा झाली होती. पण ७० देशातील ४५० उपस्थित खगोलशास्त्रज्ञांनी ग्रहाची व्याख्या तपासून प्लुटो हा ग्रह नाही असे २००६ मध्ये जाहीर केले. ग्रहाची व्याख्या अशी : जी खगोलीय वस्तू सूर्याभोवती भ्रमण करते. जी पुरेशा गुरुत्वाकर्षीय बलामुळे गोलाकृती झाली आहे आणि जिने आपल्या भ्रमणकक्षेच्या परिसरात असलेल्या सर्व लहान मोठ्या वस्तू दूर सारल्या आहेत, अशा वस्तूला ग्रह म्हणावे. या व्याख्येनुसार पहिल्या दोन अटी फक्त प्लूटो पूर्ण करतो. तिसरी अट मात्र पूर्ण होत नाही. प्लुटो काही वेळा नेपच्यूनच्या भ्रमणकक्षेच्या आत जातो. अशी परिस्थिती १९७९ ते १९९९ सालच्या दरम्यान उद्भवली होती. अशा ग्रहांना खुजा ग्रह (Dwarf planet) असे संबोधावे, असा निर्णय खगोलशास्त्रज्ञांनी घेतला आहे.प्लूटोची भ्रमणकक्षा सूर्यापासून फार मोठ्या प्रमाणात कमी जास्त होते. ४४० ते ७७० कोटी किलोमीटर या अंतरावर लंबवर्तुळाकार हे भ्रमण चालते. त्याचा व्यास जेमतेम चंद्राएवढाच आहे.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ भरभराटीच्या दिवसांमुळे आपण बिघडून जातो. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1) *'भारत माझा देश आहे' ही प्रतिज्ञा कोणी लिहिली ?* पेदेमरी व्यंकट सुब्बाराव,19622) *दूषित हवेमुळे शरीरातील कोणत्या अवयवावर दुष्परिणाम होतो ?* फुफ्फुसे3) *महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना कोणी केली ?* डॉ नरेंद्र दाभोलकर4) *बजरंग पुनिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?* कुस्तीपटू5) *जागतिक अंधश्रद्धा निर्मूलन दिवस केव्हा पाळला जातो ?* 21 सप्टेंबर*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● रामरेड्डी अरकलवार● श्वेता अंबडकर● दशरथ बोईनवाड● माधव हाक्के● संतोष जाधव किल्लारीकर● माधव अटकोरे● मारोती रेड्डी● संभाजी हिवराळे● सूर्यकांत मोळे● प्रकाश चरपिलवार● नागभूषण भालेराव*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*व्यक्तिमत्व फुलून यायचे असेल तर कौटुंबिक भावना जोपासायला हवी. यासाठी नात्यांची ऊब आवश्यक आहे. मग हे नाते कुटुंबातील असो अथवा मित्र-मैत्रिणींचे असो. आम्ही निसर्गरम्य पहाडात गेलो होतो. निर्जन दरीत फुललेली फुले चित्त प्रसन्न करीत होती. तिथे स्थानिक माणूस एकटाच बसला होता. त्याला आम्ही म्हणालो, 'ह्या निर्जनस्थळी ही निसर्गाची रूपे तुला किती संपन्नता देत आहेत. 'तो उत्तरला,'होय, पण त्याहीपेक्षा खूप दिवसांनी इथे कोणी माणूस आला आणि त्याच्याशी बोलता आले ही प्रसन्नता खूप मोठी आहे.' निसर्ग आणि विज्ञान याद्वारे प्राप्त होणारी संपन्नता जशी हवी आहे तशी नाती आणि अध्यात्म याद्वारे प्राप्त होणारी प्रसन्नताही गरजेचे आहे.**माणसांमधील प्रेमाची ऊब त्याच्या वेदना वाचायला शिकवते आणि त्या वेदनेवर फुंकर देते, त्याला आधार देते आणि एकमेकांवर सावली धरते. "मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले, घन गर्द सावल्यांनी आकाश वाकलेले." ना.धो.महानोर यांनी आकाशाने वाकून घनगर्द सावल्या देण्याची कल्पना किती सुंदर केली आहे. पु.ल.देशपांडे यांनी इरावती कर्वे यांच्याबद्दल लिहीलेल्या लेखात 'वृक्षासारखी नकळत सावल्या धरणारी ही माणसे' असे म्हटले आहे. छोटे असताना आपण सावली घ्यावी आणि मोठे झालो की सावली द्यावी. छोटे असताना चुलवणासारखी ऊब घ्यावी आणि मोठे झाल्यावर अशी चुलवणे व्हावे..* • • ● *॥ रामकृष्णहरी ॥*● • • 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 *श्री. संजय नलावडे,मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••ज्या माणसांना तुमच्यावर प्रेम करण्याचा अधिकार आहे त्या माणसांना तुमच्यावर रागावण्याचा,रुसण्याचा किंवा काही काळ अबोला धरण्याचाही अधिकार आहे.ह्या गोष्टी आपल्या मैत्रीत,नात्यात नसतील तर ते प्रेम कसले..?आपल्या माणसांना अधिक आपले नाते घट्ट करावयाचे असतील आणि त्यात काही काळापुरता आपला दुरावा निर्माण करायचा असेल तर आपणही थोडा काळ शांत रहावे त्यात आपल्या माणसांविषयी मनात कोणतेही वाईट विचार आणून नातेसंबंध तोडू नये.एकामेकांबद्दल अविश्वासही निर्माण करु नये. ह्या छोट्या छोट्या जीवनातल्या वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे मन शांत ठेवून द्यायची असतात. मग एकमेकांबद्दल आपोआपच कळायला लागते की,आपले काहीतरी चुकले आहे आणि मग तो पूर्वीसारखे च अधिकचे नाते दृढ करण्यासाठी पुढे येतो.म्हणून आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसांना आपलीच माणसे आहेत हे ओळखून आनंदाने,प्रेमाणे आणि मैत्रीने हसतखेळत जीवन जगायला शिकावे.हीच खरी जीवनशैली आहे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जाणीव*बादशहाच्या गुलामांनी कधीच समुद्राची यात्रा केली नव्हती. त्यामुळे त्यांना कधीच समुद्र कसा असतो? त्याची खोली काय असते? याची माहिती नव्हती. बादशहा समुद्र यात्रा करत असे, मात्र गुलामांना कधीच समुद्रावर नेत नसे. एकदा बादशाहाने गुलामांना समुद्रयात्रा घडविण्याचे ठरविले, त्याप्रमाणे एका गुलामाला त्याने जहाजावर बरोबर घेतले, चहूदिशेला पाणीच पाणी बघून गुलाम भयभीत झाला आणि मोठमोठ्याने ओरडू लागला. जहाजावरील लोकांनी त्याला समजावून सांगितले कि घाबरण्याची काहीच गरज नाही. आपण जहाजावर सुरक्षित आहोत. परंतु त्याचा विश्वास बसेना. तो सतत ओरडत राहिला. हे पाहून बादशाहाने नाराज होऊन जहाजाच्या खलाश्यांना सांगितले, कि काहीही करा पण या गुलामाचे ओरडणे बंद करा. खलाश्यांनी पण त्याचे ओरडणे बंद व्हावे म्हणून प्रयत्न केले, समजावून सांगितले, वेगवेगळी आमिषे दाखविली, पण हा गुलाम काही गप्प बसेना. तेंव्हा जहाजावरील एक वृद्ध खलाशी बादशाहाकडे गेला आणि म्हणाला,"हुजूर! मला परवानगी द्या, मी याला गप्प बसवतो." बादशाहाने परवानगी दिली. त्या वृद्धाच्या सांगण्यावरून त्या गुलामाचे दोन्ही हात व पाय बांधण्यात आले व पायाला दोरी बांधून त्याला जहाजावरून पाण्यात लटकाविण्यात आले. काही क्षण पाण्यात घालायचे आणि दोरीने पुन्हा जहाजावर ओढून घ्यायचे असा प्रकार केला. ५-६ वेळेला गटांगळ्या खावून झाल्यावर त्याला जहाजावर घेतले, वर आल्यावर त्याला मुक्त केले पण तो गुलाम एका कोपऱ्यात जाऊन गप्प बसला. हे पाहून सर्वच चकित झाले. बादशाहाने वृद्ध खलाश्याला विचारले कि आता हा गप्प कसा झाला? खलाशी उत्तरला,"हुजूर! आधी तो समुद्रात बुडण्याचे दुःख काय असते हे जाणून घेत नसता नुसता ओरडत होता. पण त्याला आता बुडणे म्हणजे काय असते या प्रकाराची जाणीव झाली आहे म्हणून तो गप्प आहे.त्याच्या शांततेचे कारण त्याला झालेली दुःखाची जाणीव. त्या मानाने इथे त्याला सुख मिळत आहे ते तो अनुभवत आहे."*तात्पर्य-दुःखानंतर येणाऱ्या सुखाला किंमत असते. दुःख मिळाले नाही, सहन केले नाही तर सुख काय असते हे सांगून सुद्धा समजत नाही.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 04/10/2022 वार - मंगळवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-◆२००१ - युक्रेनच्या सैन्याने सोडलेले एस-२०० प्रकारचे क्षेपणास्त्र चुकून सिबिर एरलाइन्सच्या तुपोलेव्ह टी.यु. १५४ प्रकारच्या विमानावर आदळले. विमान काळ्या समुद्रात कोसळून ७८ ठार.◆ २००४ - स्पेसशिपवन या अंतराळयानाने अन्सारी एक्स पारितोषिक मिळवले.💥 जन्म :-★ १८७७ - रेझर स्मिथ, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.★ १९१४ - म. वा. धोंड, मराठी समीक्षक.★ १९२० - जॉर्ज ट्राइब, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.★१९३१ - बेसिल डि'ऑलिव्हेरा, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.★१९६४ - डेव्हिड ब्रेन, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :-◆१९२१ - केशवराव भोसले, मराठी गायक.◆ १९८२ - सोपानदेव चौधरी, मराठी कवी.◆१९९३ - जॉन कावस, भारतीय-हिंदी चित्रपटअभिनेता.◆२००२ - भाई भगत, भारतीय वृत्तपट निवेदक.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *6 राज्यांच्या 7 विधानसभेच्या जागांसाठी 3 नोव्हेंबरला पोटनिवडणूक; तर 6 नोव्हेंबरला निकाल, निवडणूक आयोगाचे परिपत्रक जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *भारतीय वायुसेनेला आज स्वदेशी बनावटीचे १० लाईट कॉम्बॅक्ट हेलिकॉप्टर्स मिळणार आहेत... हे मल्टीफंक्शनल हेलिकॉप्टर विविध प्रकारची क्षेपणास्त्रे डागण्यास आणि शस्त्रे वापरण्यास सक्षम आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *दिवाळीच्या दिवसांत खाद्यतेलाचे दर नियंत्रित रहावेत म्हणून केंद्र सरकारनं आयात शुल्कात दिलेली सूट कायम ठेवण्याचा घेतला निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुणे नवरात्रौमहोत्सवात दरवर्षी दिला जाणारा ‘महर्षी’ पुरस्कार यंदा माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना शरद पवारांच्या हस्ते प्रदान करण्यात आला*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *ऐन दिवाळीत पुण्याहून विदर्भात जाणाऱ्या रेल्वे 19 ऑक्टोबर पर्यंत रद्द; रेल्वेने पर्यायही दिला नसल्याने नागरिकांची तारांबळ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *औरंगाबादकरांची 10 वर्षांची प्रतीक्षा संपली, रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते पीटलाइनचे भूमिपूजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आदिवासी, शेतमजूरांचा आवाज हरपला; ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कुमार शिराळकर यांचे निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Have Fun With Animal👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/9KASDoo5TWk~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *ठेविले अनंते तैसेचि राहावे*https://nasayeotikar.blogspot.com/2018/05/07.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *दूरचित्रवाणी (Television)* 📙दूरचित्रवाणीचे भारतात आगमन खूपच उशिरा झाले. केवळ दिल्लीपुरते 'दूरदर्शन' अनेक वर्षे वापरात होते. पण तेही 'दूरचित्रवाणी'च्या जागतिक वापरानंतर २० वर्षांनी १९५६ साली सुरू झाले. अन्य सर्व शहरात तर दूरदर्शनची सेवा १९७२ पासून मिळू लागली. आज बऱ्याच भागांत हे जाळे पसरले आहे व त्याने आता उपग्रहाद्वारे स्वतःचे हातपाय पक्के रोवायला सुरुवात केली आहे.१९२६ साली जॉन बर्ड याने टेलिव्हिजन हा प्रकार शोधला. १९३६ साली लंडनमध्ये बीबीसीने त्याचे कार्यक्रम सुरू केले, तर पहिले रंगीत प्रक्षेपण १९५१ मध्ये अमेरिकेत झाले. खरे म्हणजे रेडिओ सिग्नल्सद्वारेच प्रकाशचित्रे पण पाठवता येतील, याचा अंदाज शास्त्रज्ञांना १९०० सालीच आला होता. कल्पना वास्तवात यायला हा काळ जावा लागला.नेहमीच्या कॅमेऱ्यासारखा कॅमेरा. पण त्यात फिल्म न घालता प्रतिमा प्रकाशाला संवेदनक्षम अशा एका पृष्ठभागावर पडते. हा पृष्ठभाग वरपासून खालपर्यंत एका इलेक्ट्रॉन्सच्या झोताने न्याहाळला जातो. ही क्रिया होतानाच त्यातून ज्या रेडिओलहरी निर्माण होतात, त्यात जे बदल होतात, त्यासकट त्यांचे प्रक्षेपण केले जाते. याची पद्धत अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी माॅड्युलेशन (UHF) या नावाने ओळखली जाते. या लहरी थेट सरळ प्रवास करतात. म्हणूनच टीव्हीचा अँटेना व प्रक्षेपण मनोरा हे समोरासमोर असून मध्ये अडथळा चालत नाही. अर्थातच मनोऱ्याची उंची खूपच उंच असावी लागते. मुंबईचा वरळीचा मनोरा तीनशे मीटर उंच आहे, तर पुण्याचा सिंहगडावरच आहे. जगातील सर्वात उंच मनोरा आहे ६२८ मीटर उंचीचा, फार्गो, नॉर्थ डकोटा येथे अमेरिकेत.हे रेडिओ सिग्नल्स आपल्या घरातील अँटेना गोळा करतात. त्यांचे रूपांतर पिक्चर ट्युबमुळे पुन्हा इलेक्ट्रॉन झोतामध्ये होते. हा झोत फॉस्फरसचा थर दिलेल्या टीव्ही पडद्यावर आतून पडतो. ज्या ठिकाणी झोत पडेल तो भाग प्रकाशाने उजळून निघतो. ही क्रिया सतत झिगझॅग पद्धतीने चालू असते. त्यामुळे पडद्यावरील चित्र पूर्ण होऊन डोळ्यांना दिसते. पडद्यावरील चित्र हे आडव्या बारीकबारीक रेघांद्वारे आपल्यासमोर येते. प्रत्येक केंद्र स्वतःचे चित्र किती रेघांद्वारे प्रक्षेपित करायचे, ते ठरवते. अर्थात हा झाला त्याचा तांत्रिक भाग. तसेच दर सेकंदाला किती चित्रे प्रक्षेपित करायची, हेही प्रमाण एखाद्या चलतचित्राप्रमाणे ठरवले जाते. त्यामुळे समोरची स्थिर चित्रेच आपल्याला हालचाल करताना दिसू लागतात.१९८२ सालच्या एशियाडपासून रंगीत दूरचित्रवाणी 'दूरदर्शन' मार्फत भारतात आली. मूळ रंगा तीन. लाल, निळा, हिरवा यांचा वापर करून सर्व रंग बनतात, हे तत्त्व रंगीत टीव्ही वापरतो. पिक्चर ट्यूबमधून तीन प्रकारचे इलेक्ट्रॉन झोत पडद्यावर टाकले जातात. यांच्या मिश्रणातून आपल्याला परीपूर्ण रंगीत चित्र दिसू लागते. यात सर्व रंगांचे सुखद मिश्रण असते. नको असलेले रंगझोत टाळण्यासाठी पडद्यामागे एका विशिष्ट प्रकारची जाळी (shadow grid) असते. त्यामुळे नेमक्या जागी नेमका रंग हे मिश्रण साधले जाते. रंगीत प्रक्षेपणाच्या कॅमेऱ्यातून केलेले चित्रण कृष्णधवल टीव्हीवरही कृष्णधवल रंगात पाहता येते.दूरचित्रवाणीचा कॅमेरा हा चित्रण करताना त्यामागे बसवलेल्या छोट्या टीव्हीवर प्रत्यक्ष चित्रण कसे दिसेल, याचे स्वरुप जसेच्या तसे दाखवत असतो. त्यामुळे कॅमेरामन झटपट बदल करू शकतात. तसेच एका प्रसंगाचे चित्रण दोन वा अधिकही कॅमेरे करतात. त्यांतील नेमक्या कोणत्या चित्राचे प्रक्षेपण करायचे, ते संकलक ठरवतो. त्याच्यासमोर या सर्वांचे प्रक्षेपण एकाच ओळीत लावलेल्या पडद्यांवर दिसत असते. त्यामुळेच कधी जवळून, कधी वरून, कधी संपूर्ण दृश्याचे असे चित्रण आपण बघू शकतो.टीव्ही पडदा खूप मोठा करून एखाद्या ऑलिम्पिक स्टेडियममध्ये लावणे हे आता नवीन नाही. ऑलिम्पिक स्टेडियममधील प्रत्येक कार्यक्रम तेथील लोक प्रत्यक्ष व मोठ्या पडद्यावर ब्लोअप केलेला असाही बघू शकतात. पिक्चर ट्यूब व तिच्यामधून होणाऱ्या पडद्यावरच्या इलेक्ट्रॉन माऱ्यामुळे टीव्हीची जाडी वाढते. भिंतींवर तसबिरीप्रमाणे टांगता येणारा टीव्ही बनवायला त्यामुळे सतत अडचणी येत होत्या. पण आता जेमतेम तीन इंच जाडीचा तसबिरीसारखा टीव्हीपण वापरात आला आहे. स्टँडवरचा वा टिपाॅयवरचा टीव्ही आता भिंतीवरही जाऊ शकेल. फ्लॅट स्क्रीन, २१ इंच ते ७२ इंच या दरम्यानचे अनेक आकारांतील पडदे असलेले टीव्ही आता उपलब्ध आहेत. थेट एलसीडी प्रोजेक्टरचा वापर करून घरातील भिंतीवरही आपण चित्र पाहू शकतो. टीव्ही सुरू करणे, बंद करणे, कार्यक्रम संपल्यावर आपोआप बंद होणे व जागेवरूनच या गोष्टी घडवणे हेही रिमोट कंट्रोलमुळे शक्य झाले आहे. इन्फ्रारेड किरणांद्वारे टीव्हीच्या नियंत्रकाला दिलेल्या सूचना पाळल्या जाऊन या गोष्टी घडतात.टीव्ही हे करमणुकीचे माध्यम आहेच; पण खरे म्हणजे उत्कृष्ट शैक्षणिक व लोकजागृतीचे माध्यम आहे. सध्या विविध प्रकारच्या वाहिन्यांवरील विशिष्ट प्रकारचे कार्यक्रम देत आहेत. वार्तांकन, क्रीडा, करमणूक, सिनेमा, कार्टून, विनोदी, विज्ञान, प्राणीजगत अशा विविध कार्यक्रमांतून प्रेक्षक निवड करू शकतात. तेही त्यांच्या स्वतःच्या भाषेतून.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ मरण सोपे असते, जगण्यासाठी मात्र धैर्य लागते. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● संगीता भांडवले● बालाजी इप्तेकर● सुरेंद्र गाडेकर● धनराज शेट्टीगर● लक्ष्मण पंदोरे● ओमप्रकाश येवतीवाड● साईनाथ पोरडवार● विजय पळशीकर*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*अनेक उच्चपदस्थ, उच्चभ्रू म्हणवले जाणारे प्रतिष्टित सुर्यास्ताबरोबर स्वत:ला काचेच्या पेल्यात बुडवतात. तरूण मुला-मुलींपुढे कुठले आदर्श आपण ठेवणार आहोत ? कोवळी, मिसरूड फुटलेली मुलं अलिकडे व्यसनांच्या आहारी जात आहेत. त्यांना कुणीतरी थांबवलं पाहिजे. त्यांची शक्ती विधायक कार्यासाठी संघटित व्हायला हवी. जगाची दारं आज त्यांच्यासाठी खुली आहेत. त्यांनी त्या दारापर्यंत पोहोचायला हवं.**खरं म्हणजे आनंद-दु:ख, यश-अपयश व्यक्त करण्याची अनेक माध्यमं आहेत. मदिराप्राशन, हे माध्यम उचित ठरू शकत नाही. प्रत्येकानं मात्र आवडीचा छंद जोपासण्याची धुंदी चढू द्यावी. श्रमण्यातून मिळालेल्या यशाचा कैफ काही औरच असतो. दुस-याच्या दु:खानं गुंगी जरूर यावी नि, ती सोडविण्याचा अंमलही असावा. प्रेमाचा वर्षाव करत झिंगावं त्यानं आप्त-मित्रांसह, आणि जगण्याची खरी... नशा.. चढू द्यावी...!* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼ ●•• 🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰 *--संजय नलावडे, मुंबई* *मोबाईल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या अंगावरचे वस्त्र भारी नसले तरी चालेल हलके पण अंगभर असावे की, त्यातून अंगप्रदर्शन होऊ नये, वाणी कशीही असली तरी चालेल वाचा स्पष्ट असायला हवी कारण आपले विचार इतरांपर्यंत पोहोचले पाहिजे किंवा आपण काय म्हणतो ते कळले पाहिजे, आपल्या डोळ्यांना कमी जरी दिसायला लागले तरी दुसऱ्याबद्दल चांगल्याच दृष्टीने पहायला हवे परंतु काकदृष्टीने पाहू नये, अंत:करण एवढे शुद्ध ठेवावे की,दुसऱ्याच्या वाईट विचारांने आपल्या अंतःकरणाची चलबिचल अवस्था होऊन वाम मार्गाचा अवलंब करु नये. या आणि इतर गोष्टीच्या बाबतीत सतर्क राहून जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर आपण इतर लोकांसमोर आदर्श निर्माण करु शकतो आणि आपले मनापासून अनुकरण करायला शिकतील. जर आपणच चांगले वागलो नाही तर इतरांना चांगले बनवण्याचा आपल्याला अधिकारच नाही.©व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जीवनाची यशस्वीता*एकदा स्‍वप्‍न आणि सत्‍य यांचे जोरदार वाद झाला. वादाचा विषय होता ’भविष्‍य घडविण्‍यात सर्वाधिक सहभाग कोणाचा असतो’ दोघेही खूप भांडले, भरपूर वाद घातला पण निर्णय काही होईना. शेवटी दोघेही आपल्‍या पित्‍ याकडे गेले. पित्‍याला वादाचा विषय सांगितला. पिता म्‍हणाला,’’ज्‍या कोणाचे हात आभाळाला टेकतील पण तरीही पाय जमिनीवर असतील त्‍याचा भविष्‍य घडविण्‍यात निर्णायक सहभाग असतो.’’ दोघेही परत आले. सर्वप्रथम स्‍वप्नाने एकाच उडीत त्‍याचे हात आभाळाला टेकले, मात्र पाय जमिनीपासून केव्‍हाच उचलले गेले होते. मग सत्‍याने प्रयत्‍न केला मात्र त्‍याचे पाय कायम जमिनीवर टेकलेले होते पण हात आभाळाला पोहोचू शकले नाहीत. दोघांनीही खूप प्रयत्‍न केले पण दोघेही अयशस्‍वी राहिले. शेवटी थकून ते पुन्‍हा एकदा पित्‍याकडे गेले तेव्‍हा पिता म्‍हणाला,’’ भविष्‍य घडविण्‍यात सत्‍य आणि स्‍वप्‍न या दोघांचाही समान सहभाग असतो.’’ *तात्पर्यः* *खऱ्या अर्थाने भविष्य घडवायचे असेल तर स्वप्नाला सत्याच्या खांद्यावर उभे राहायला हवे.यशस्वी जीवनाचे हेच रहस्य मानवी मनास उलगडायला हवे.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 03/10/2022 वार - सोमवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-★१९९०-पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनी चे एकत्रीकरण झाले.★ १६७९- शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटले.💥 जन्म :-◆१९०३-स्वामी रामानंद तीर्थ ,हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते,समाजसुधारक आणि शिक्षणतज्ज्ञ.◆१९११ - सरोबिंदू नाथ बॅनर्जी, भारतीय क्रिकेट खेळाडू. ◆१९४९-जे पी दत्ता,चित्रपट दिग्दर्शक.💥 मृत्यू :-●२०१२-केदारनाथ सहानी,सिक्कीम चे राज्यपाल,दिल्लीचे महापौर.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *पुण्याच्या चांदणी चौकातला पूल जमीनदोस्त पूल पडला, रस्त्यावरील ढिगारे हटले, तब्बल 9 तासांनंतर वाहतूक सुरु*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *इंदूर सलग सहाव्यांदा सर्वात स्वच्छ शहर, राज्यांमध्ये मध्य प्रदेशची बाजी , 'सर्वोत्तम नागरिक अभिप्राय’ यामध्ये पिंपरी चिंचवड शहर देशात प्रथम, स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये बारामती नगरपरिषद देशात नववी *••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांना दिल्लीतील मेदांता हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राष्ट्रपती, पंतप्रधानांसह दिग्गजांकडून राजघाटावर महात्मा गांधीजींना अभिवादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *हॅलो ऐवजी 'वंदे मातरम्' म्हणा अभियान सुरु ; सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवारांची अधिकृत घोषणा, जीआरही निघाला*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्यात पहिल्यांदाच शासनाचा सहभाग, शाहू महाराजांच्या परवानगीने दीपक केसरकरांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *गुवाहाटी : दुसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंनी शानदार बॅटींगच्या बळावर दक्षिण आफ्रिकेचा 16 धावांनी केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*One & many वाचन👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/BGIbX3JzGFc~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मी गरीब नाही*https://nasayeotikar.blogspot.com/2018/05/31.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *दात आणि त्यांचे प्रकार* 📙दात आहेत म्हणूनच चणे खाता येतात. दातांशिवाय जीवन कठीण असते. मानवाने कवळी शोधून काढली आहे किंवा अन्नपदार्थात बदल करून शिजवून तो खाऊ शकतो. पण अन्य प्राणी मात्र दात अधू झाल्यास, पडल्यास जिवालाच मुकतात. कारण एकच उपासमार.दातांची ठेवण व शास्त्रीय माहिती अगदी पहिलीपासूनच दिली जाते. त्यातील काही मोजके उल्लेख म्हणजे दाताचा वरचा पांढरा भाग एनॅमल म्हणजे कवच हा शरीरातील सर्वात कठीण भाग असतो. यापेक्षा कठीण शरीरात अन्य काही नाही. त्याच्या आतील भाग म्हणजे हाडासारखाच डेटिंगचा भाग. हाही कठीणच असतो, पण त्यामध्येच रक्तवाहिन्यांचे जाळे व मज्जातंतू येऊन पोहोचतात. डेन्टिन जबडय़ाच्या हाडात खोलवर सिमेंटने पक्के बसलेले असते. दाताचा वर दिसणारा भाग हा जेमतेम असतो. हिरड्यांनी व हाडांनी झाकलेला भाग खाली खोलवर असतो.दातांचा कवचाचा भाग कितीही कठीण असला तरीही त्यावर खाण्यातील पदार्थातून तयार होणाऱ्या अाम्ल पदार्थांचा परिणाम होतोच. साखर, तोंडात अडकून राहिलेले पिष्टमय पदार्थ यांवर लाळेचा परिणाम होऊन हे कवच हळूहळू खराब होते व तेथे दात किडू लागतो. हीच कीड पुढे खोलवर जाऊन डेन्टिनपर्यंत व नंतर दाताच्या मुळापर्यंत पोहचते. दाताला ठणका लागणे, गार गरम गोड पदार्थ न खाता येणे हे याच वेळी सुरू होते. दातांतील कीड काढून त्या जागी चांदी भरणे हे दंतवैद्य करतात व त्यामुळे दात काढून टाकावे लागणे वाचू शकते. दात दुखू लागण्याचा यात हे सर्व करणे योग्य ठरते.माणसाला जन्मतः दात नसतात. पण सहाव्या महिन्यापासून दुधाचे म्हणजे पडणारे दात येऊ लागतात. सहाव्या वर्षांपर्यंत एकूण वीस दात आलेले असतात. प्रत्येक जबड्याचे दोन सारखे भाग केले तर दोन दाढा, एक सुळा व दोन पुढचे दात अशी पाचांची विभागणी होते. हे दात वयाच्या सात ते अकरा यादरम्यान पडून मग प्रत्येक बाजूला आठ दात अशी बत्तीशी पूर्ण होते. यामध्ये दोन दाढा, दोन उपदाढा, एक सुळा व दोन पुढचे दात अशी विभागणी होते. तिसरी दाढ अक्कल दाढ मात्र थोड्या सावकाशीने म्हणजे सोळा ते वीस वर्षादरम्यान उगवते. वेडेवाकडे दात नीट करणे, कृत्रिम दात बसविणे, खराब दात नीट करून पुन्हा बसवणे, दातात चांदी भरणे, कवळी बनवणे यांसारखी अनेक प्रकारची उपचारपद्धती सध्या दंतवैद्य वापरतात. दात व हिरड्या यांच्या रोगामुळे संपूर्ण पचनसंस्थाच बिघडून आरोग्य कायमचे बिघडू शकते. यासाठी आवश्यक तेव्हा दातांवर उपचार करणे रास्त ठरते. दात दुखत असल्यास उपचार सगळेच करतात पण फक्त हे पुरेसे नसते. किडलेल्या दातांवरील उपचार पद्धतीत आता अनेक पद्धती वापरल्या जातात. दातांच्या मुळापर्यंत गेलेली कीड काढून ती पोकळी चांदीने भरली जाते. मोडक्या दातांवर टोपी (कॅप) बसवुन तो नव्यासारखा बनवला जातो. एक वा अनेक दातांच्या जागी हाडामध्ये स्क्रूचा आधार बसवुन त्यावर कृत्रिम दात बसवला जातो. याला 'इम्प्लांट पद्धती' असे म्हणतात. या पद्धतीत कवळीऐवजी कृत्रिम दातांची पक्की व्यवस्थित व्यवस्था केली जाते. दंतोपचारात आता विविध शाखांचा विस्तार झाला आहे.मानवी दातांची ठेवण, जबड्यातून कृत्रिम दात यांचा शोध घेऊन अनेक गूढ गुपितेही उलगडली आहेत. मृतांची ओळख पटवणे, गुन्हेगार ओळखणे यांसाठी याचा उपयोग झाला आहे.दातांचा वापर जितका करावा, तितकी त्यांची ताकद टिकते, ही एक विशेष गोष्ट आहे. दातांवरील कवच, दातांचा रक्तपुरवठा, हिरड्या यांना दातांच्या वापरातूनच पक्केपणा मिळत असतो. यामुळेच केवळ शिजवलेले अन्न व फळांचे रस घेण्यामुळे दात कमकुवत होऊ शकतात. कच्ची फळे, भाज्या, कोशिंबिरी व भरपूर चावावे लागणारे, चोथा असलेले पदार्थ खाल्ल्यास दात पक्के राहण्यास मदत होते. अर्थात दातांनी अतिकडक पदार्थ खाण्याचा अट्टाहास करून फायदा होतो, असा मात्र याचा अर्थ नाही.शुभ्र, दाणेदार, सलग दंतपंक्ती असल्या तर ती व्यक्ती चारचौघांत नक्कीच उठून दिसते. केवळ चेहऱ्याचे सौंदर्य यासाठी असावे लागते, असे नव्हे. मुळचे दात कसे आहेत, ही बाब अलहिदा, पण दातांची निगा राखून आरोग्य मिळवणे हे तर सर्वांच्याच हाती आहे. *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ वाईट मार्गाने मिळवलेले वाईट मार्गानेच खर्च होते. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) वाघ, सिंह, चित्ता व बिबट असणारा जगातील एकमेव देश कोणता ?२) काँग्रेसमधून बाहेर पडलेले ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी कोणत्या नव्या पक्षाची स्थापना केली ? ३) सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ?४) काटेरी वनस्पतींची नावे सांगा.५) बॉलिहूडमधील कोणत्या अभिनेत्याला 'किंग खान' असे संबोधले जाते ?*उत्तरे :-* १) भारत २) डेमोक्रॅटिक आझाद पक्ष ( DAP ) ३) गुरू ४) करवंद, बोर, गुलाब, लिंबू इत्यादी ५) शाहरुख खान *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● रुपेश बालाजी सुंकेवार● पूर्वा श्यामसुंदर माडेवार● रणजित चंदावले● नागेश क्यातमवार● विश्वनाथ आरगुलवार● संदीप कडलग● साईनाथ राचेवाड● मारोती नरवाडे● पांडुरंग यलमलवाड ● शिवाजी मुटकुले ● दत्तप्रसाद ढगे ● शंकर ढगे ● नागनाथ लाड*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*नातेसंबंध टिकविण्यासाठी एकमेकांना समजून घेण्याची व प्रेमाची आवश्यकता असते. संत कबीर म्हणतात-"प्रेमाची अडीच अक्षरे ज्याला कळाली तो पंडित झाला." थोडे तारतम्य बाळगले, जीवनात शिस्त व करूणा आणली, तर सर्व आवडीच्या व्यक्तींशी आनंदाने नाते फुलवता येते. हे तारतम्य सुटले, अहंभाव जागवला, एकमेकांकडे दुर्लक्ष करून स्वार्थाचाच विचार केला, तर भरल्या घरात रितेपणा येऊन अशांती येते.**सफल प्रेम हे फळासारखे असते, ते हळूहळू पक्व होत जाते. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. आई-वडील, पत्नी-मुले, भाऊ-बहीण, मित्र ही नाती जपणे व फुलवणे ही एक साधनाच असते. त्यासाठी त्यागाची गरज असते, अहंकाराला तीलांजली देऊन, स्पर्धा न करता, एकमेकांना न डिवचता, स्वातंत्र्य देत, मैत्रीचे दार उघडे ठेवले तर कुठलेही नाते अभंग राहील. म्हणून वडिलधा-यांच्या आठवणीतून घराण्याचे महाभारत ऐकावे, पत्नी नावाच्या श्रमदेवतेचे 'नवरात्रौत्सव' घरात साजरे करावे, समाजात पसायदानाच्या ओव्या कानी पडण्याकरिता प्रयत्नशील राहावे.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼●•• *श्री. संजय नलावडे,मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••कोणत्या चित्रात कोणते आणि कसे रंग द्यायचे हे आपण आपल्या कल्पकतेने ठरवून ते चित्र पूर्ण करतो.पण जीवनाचे सुंदर चित्र बनवण्यासाठी कुठे,कसे रंग भरावे हे लवकर लक्षात येत नाही. जीवनाच्या चित्रात रंग भरण्यासाठी कल्पकतेबरोबर, कठोर परिश्रमाचीही आवश्यकता लागते, परिस्थितीनुसार कोणत्या वेळी कोणता रंग भरावा याचेही ज्ञान असावे लागते.कधीकधी घाई केली तर आपण ठरवलेल्या रंगांमध्ये एखाद्या रंगाचे प्रमाण कमीजास्त झाले तर त्या रंगाचा बेरंगही होऊन जातो.सांगण्याचा तात्पर्य हा की, परिस्थितीनुसार रंग बदलण्याचीही आपली तयारी ठेवायला हवी आणि समयसुचकतेनुसार विचार करुन जीवनाचे सुंदर चित्र काढायलाही आणि रंगवायलाही आले पाहिजे.नाहीतर जीवनच रंगहीन बनून जाईल. खरंच मूळातच जीवन सुंदर आहे आणि त्या सुंदर जीवनाला अधिक सुंदर बनवण्यासाठी वेगवेगळ्या रंगरुपी छटांचेही ज्ञान आणि कल्पकता ज्यांना अवगत आहे आणि ज्यांना साध्य करता येते त्यांना आपल्या जीवनाचे चित्र छान आणि सुंदर बनवता येते. हे मात्र खरे आहे.© व्यंकटेश काटकर,नांदेड.संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अनमोल जीवन**एकदा एका राजाने खुश होऊन लोहाराला चंदनाची बाग भेट दिली. लोहाराला चंदनाच्या झाडांच्या किंमतीचे नॉलेज नव्हते त्यामुळे त्याने त्या झाडांना कापून त्यांचा कोळसा करून विकला. हळू हळू सम्पूर्ण बाग रिकामी झाली.**एक दिवस असेच राजा त्याच्या घरा जवळून जात होता, राजाला वाटले लोहार आता खुप श्रीमंत झाला असेल. परंतु प्रत्यक्ष पाहिल्यावर लोहाराची परिस्थिति पहिल्या सारखीच आहे असे दिसले राजाला आश्चर्य वाटले.**सत्य समजल्यानंतर राजाने त्याला विचारले तुझ्याकडे एखादे लाकुड़ शिल्लक आहे का ? तेव्हा लोहारने कुऱ्हाडीचा दांडा दाखविला.**राजाने त्याला चंदनाच्या व्यापाऱ्या कडे पाठवले. तेंव्हां त्या छोटयाश्या तुकडयाचे त्याला खुप पैसे मिळाले. लोहार खुप रड़ू लागला, त्याने राजाला अजुन एक बाग देण्याची विनंती केली तेव्हा राजा म्हटला "अशी भेट वारंवार भेटत नाही."* *मित्रांनो आपले आयुष्य त्या लोहारा सारखेच आहे मानवी जीवनाच्या मुल्यांचे महत्व, आपल्याला जीवनाचे शेवटचे श्वास चालू असताना समजते.पण...**त्यावेळेस आपण म्हणतो देवा मला अजुन थोड़ा वेळ दे, परंतु त्यावेळी वेळ मिळणे अशक्य असते.**मानवी जीवन अनमोल आहे.* *असे जीवन परत मिळणार नाही.**बोध :-* *या जगात दुर्लभ गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे, मनुष्य देह त्या देहाचा कोळसा करायचा की, चंदन हे आपले आपण ठरवायचे.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~