गुरुमाऊली चित्र चारोळी स्पर्धेसाठी
1)
हातामंदी घेऊनी पाईप राणी
करी कीटकनाशकाची फवारणी
येईल पिक उद्या मोत्यावाणी
आस आहे तिच्या ध्यानीमनी
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
2)
आधुनिकतेची करून शेती
स्वकष्टाने ती उभी रहाती
काळ्याआईची करुनि पूजा
आईवडिलांचा आधार बनती
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
3)
पाठीवर पंप हातात पाईप
करीते फवारणी पिकांची
मुलगा मुलगी एक समान
दाखवी लेक आई-वडिलांची
➖➖➖➖➖➖➖
*✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*
No comments:
Post a Comment