✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 31/08/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९२० - डेट्रॉइटमध्ये पहिल्यांदा रेडियोवरुन बातम्या प्रसारित झाल्या. १९६८ - सर गारफील्ड सोबर्सने एका षटकात ६ षटकार फटकावले 💥 जन्म :- १५६९ - जहांगीर, मुघल सम्राट १९६९ - जवागल श्रीनाथ,भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९९७ - प्रिन्सेस डायना, ब्रिटीश राजकुमारी *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दहा सरकारी बँकांच्या विलिनीकरणाची पत्रकार परिषदेत केली घोषणा, 27 बँकाऐवजी आता राहतील.12 सरकारी बँका.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *आगामी दोन वर्षात भारत बनणार प्रमुख डिजीटल सोसायटी असणारा देश – पंडित दीनदयाळ पेट्रोलियम युनिवर्सिटीच्या दीक्षांत समारोहात मुकेश अंबानी बोलत होते* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *पुढील काही दिवसांमध्ये पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. गणपती बाप्पाच्या आगमनासह पाऊसही राज्यभरात विविध भागात दमदार हजेरी लावणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *आय टी रिटर्न भरण्याची तारीख वाढविण्यात आली असून ती ३० सप्टेंबरपर्यंत आहे, हा मेसेज अफवा आहे, असे केंद्रीय आयकर विभागाकडून स्पष्ट करण्यात आले असून रिटर्न भरण्याची आज शेवटची तारीख आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *यंदा बजेट जुलै महिन्यात सादर झाल्याने काही नियम हे 1 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. हे नियम टीडीएस, पॅनकार्ड आणि आधारकार्डाशी संबंधीत असल्याने सामान्य लोकांवर याचा परिणाम होणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *आर्थिक वर्षातील पहिल्या त्रैमासिकात जीडीपी 5 टक्क्यांवर घसरला, देशाची अर्थव्यवस्था कोलमडली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *वेस्ट विंडीजचा बाहुबली रहकीम कॉर्नवॉलचे कसोटी सामन्यात पदार्पण, दुसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकत वेस्ट विंडीजची प्रथम गोलंदाजी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बुलेटीन audioमध्ये ऐका खालील लिंकवर https://b.sharechat.com/y83PmqLzAZ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नजर हटी, दुर्घटना घटी* https://nasayeotikar.blogspot.com/2018/07/blog-post_29.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सिद्धेश्वर मंदीर - बारामती* बारामती (पुणे) : बारामतीचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिध्देश्वर मंदिरास नुकतीच 840 वर्षे पूर्ण झाली. शहाजी राजे, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांपासून ते कविवर्य मोरोपंतापर्यंत अनेक युगपुरुषांच्या पावनस्पर्शाने पुनित झालेले हे मंदिर बारामतीच्या वैभवशाली ऐतिहासिक परंपरेचे आजही साक्षीदार बनलेले आहे. इ.स.पूर्व 1137 मध्ये राज रामदेवराव यादव यांनी या मंदिराच्या उभारणीचे काम हाती घेतले, चाळीस वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर महादेवाचे श्री सिध्देश्वर मंदिर साकारले. अखंड लिंग व अखंड दगडातील अत्यंत सुंदर नंदी हे या मंदीराचे वैशिष्टय. नंदीचे सर्व दागिनेही दगडातच कोरलेले आहेत, समोरुन नंदीकडे पाहिले तर त्याचा एक कान तुमच म्हणण ऐकतो आणि दुसरा कान महादेवाकडे आहे, जणू तुमच्या मनातील इच्छा महादेवापर्यंत पोहोचविण्याचे कामच तो करतो असा भास होतो. या मंदिराच्या कळसामध्ये एक गुप्त लिंग होते व एक पाण्याच्या टाकीची सोय आहे. गुप्त लिंग आता तेथून काढून ठेवण्यात आले आहे, मात्र त्या काळातही वास्तूकला किती आधुनिक होती हे मंदीराकडे पाहिल्यावर जाणवते. औरंगजेबाच्या काळात शहाजी महाराजांकडे व त्यांच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर त्यांच्याकडे हे मंदिर होते. त्या नंतर पहिले बाजीराव पेशवे यांनी पांडुरंग दाते यांच्याकडे या मंदिराची व्यवस्था सुपूर्द केली. तेव्हापासून दाते कुटुंबिय आजतागायत सिध्देश्वर मंदिराची दैनंदिन व्यवस्था पाहतात. सन 1723 मध्ये बाळाजी विश्वनाथ भट यांनी मोडी भाषेत एक सनद लिहून ठेवली होती, जी आजही उपलब्ध आहे. त्यात मंदिराचा इतिहास नमूद आहे. संत ज्ञानेश्वर या मंदीरात नेहमी येत असत. त्यांनी येथे एका गणपती मूर्तीची स्थापना केली, त्यांच्या हातांचे व बोटांचे ठसे असलेला एकमेव दगड या मंदीरात आजही आहे. संत तुकाराम महाराजांचेही वास्तव्य येथे होते, या शिवाय कविवर्य मोरोपंत व श्रीधरस्वामींनी या मंदीराच्या आवारात बसून विपुल लेखन केलेले आहे. पूर्वी तुकाराम महाराजांच्या पालखीचे वास्तव्य याच मंदीरात असे. मंदिराची वैभवशाली परंपरा... बारामतीचे श्री सिध्देश्वर मंदीर ही वैभवशाली ऐतिहासिक परंपरा आहे, याचे जतन करण्याचा आम्ही प्रयत्न सातत्याने करतो. सर्वांची यात आम्हाला साथ मिळते आहे. .. विश्वस्त, श्री सिध्देश्वर मंदीर, बारामती. *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ आरोग्य आणि आनंदीपणा एकमेकास पूरक असतात. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● रत्नाकर कदम चोळखेकर ● सुभाष जाधव ● संतोष पाटील साखरे ● सचिन वाघ ● उदय मोहिते ● अशोक जायवाड ● साईनाथ वाघमारे ● अशोक मुदलोड ● प्रकाश कल्याणकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *'स्तुती' कोणाला आवडत नाही? सर्वांना आवडते, देवांनाही आवडते. म्हणून तर 'आरती' हा प्रकार जन्माला आला. देवाची स्तुती सामुदायिक, एकत्रीत, तालासुरात करता यावी म्हणून तर संगीतमय आरतीचा शोध लागला असावा. त्या म्हणताना उच्चारांपेक्षा त्यातली भावना आधिक महत्वाची. आरत्यांना आरती म्हणण्याचे कारण म्हणजे, देवाची शब्दातून केलेली आर्त प्रार्थना हेच आहे. या आर्ततेमुळे त्या स्थितप्रज्ञ परमेश्वरास पाझर फुटून तो आपल्यावर कृपा करील, ही एकमेव आशा भक्ताला असते.* *माणसांबाबत या आरतीला तालासुरांची गरज नाही. चार मोजक्या शब्दांत केलेली स्तुती समोरच्या व्यक्तीला हरभ-याच्या झाडावर चढवायला खूप होते. ही झाडे स्तुतीच्या रूपाने विविध क्षेत्रात फोफावलेली जाणवतात. राजकारणात तर त्यांचे वटवृक्ष झाले आहेत. 'साहेब, तुम्ही आहात म्हणून सर्वकाही आहे.' ही आरती तर 'सुखकर्ता दुखहर्ता' यापेक्षाही लोकप्रिय आहे. शिवाय जोडीला 'घालीन लोटांगण, वंदिन चरण' ही समारोपाची प्रार्थना तर राजकारणात सुरूवातीलाच म्हटली जाते. कधी कमी तर कधी अमाप स्तुतीने या आरत्या आपले काम चोख करीत असतात.* *"आरतीसमोर सहजी प्रसन्न होत नाही तो 'देव' आणि अगदी स्वस्तात पटतो तो 'माणूस' हा फरक आहे."* *~~‼॥ रामकृष्णहरी ॥‼~~* 🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *जो हात हालवणार नाही तो पाण्यात* *कधीच पोहू शकणार नाही.* *जो पाय उचलू शकत नाही तो कधीच* *चालू शकणार नाही.* *ज्याच्या डोक्यात नाही हा शब्द घर* *करतो तो कधीच कुठलंही आव्हानात्मक काम करूच शकत नाही.* *चुकी त्यांच्या हातूनच होते* *जे काम करतात* *बिना कामाचे लोकांचे जीवन तर* *दुसऱ्यांच्या चुका* *काढण्यातच संपून जातात....!* *एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते,* *आणि जास्त वापरली तर झिजते..* *काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे..* *मग कोणाच्याही उपयोगात न येता,* *गंजण्यापेक्षा*, *इतरांच्या सुखासाठी झिजणे* *केव्हाही उत्तमच…!!* *तर मग उठा आणि कामाला लागा।* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• वाहत जाणा-या पाण्याच्या प्रवाहाबरोबर अनेक जीवजंतू,केरकचरा आणि इतर अनावश्यक वस्तूंना पाणी सोबत घेऊन जाते असे पाहणा-यांना वाटते. परंतू पाणी ह्या सा-यांना जेव्हा सोबत घेऊन जाते तेव्हा काही काळापर्यंतच.कारण हे सारे सतत वाहणा-या प्रवाहाबरोबर तग धरु शकत नाहीत.त्यांना माहित असते की,आपण निकामी आहोत आपला काही उपयोग नाही आणि इतरांच्या फायद्याचे आपण नाहीत.त्यामुळे काही अंतरावर गेल्यानंतर तोच प्रवाह आपल्याला बाजूला टाकून पुढे पुढे जाणार आहे.अर्थात पाण्याचा प्रवाह हाच इतरांच्या जीवनासाठी उपयोगी येणार आहे.जे इतरांच्या उपयोगी येणार आहे तेच शेवटपर्यंत टिकून राहू शकते.पाणीजसे सर्वांसाठी संजीवन आहे त्याचप्रमाणे चांगली सज्जन माणसे देखील समाजातील आपल्या चांगल्या विचारांबरोबर इतरांना घेऊन जीवनाचा प्रवास सुखकर करत असतात.जी कच-याप्रमाणे अर्थात वाईट वर्तन असणारी माणसे सज्जनांच्या सहवासात मिळण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना ते जमत नाही आणि जुळवूनही घेत नाहीत ती माणसे आपोआपच बाहेर पडतात.अशा कचरारुपी वाईट माणसांना आपल्या प्रवाहात घेऊनही जर सुधारत नसतील तर त्यांना बाजूलाच ठेवून पुढे जाणे हे केव्हाही चांगले. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माणुसकीचे फळ* एका बर्फाच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीची ही गोष्ट आहे. कामाचा वेळ संपत आला होता सगळे घरी जाण्यासाठी तयार होते. तेवढ्यात कंपनीमध्ये थोडा तांत्रिक बिघाड झाला. म्हणून तो व्यक्ति तो बिघाड दुरुस्त करायला गेला. त्याला काम करण्यात खुप उशीर लागला. तोपर्यंत प्लांट बंद झाला. लाइट बंद करून दरवाजे सील करण्यात आले. अशा परस्थितित त्याचा बर्फ आणि थंडी ने जिव जाणे, निश्चित होते. त्या माणसाला काही सुचेनासं झालं, पण तासा भरात एक चमत्कार झाला. आणि कोणी तरी दरवाजा उघडला. तो समोर पाहतो तर सुरक्षा रक्षक हातात टॉर्च घेऊन उभा होता. त्याने त्याला बाहेर काढून त्याचा जिव वाचवला. प्लांट बाहेर आल्यावर त्याने सुरक्षा रक्षकाला विचारले, “तुम्हाला कसे कळले की मी आत अडकलोय.” सुरक्षा रक्षक म्हणाला, “या प्लांट मध्ये जेवढे लोक काम करतात त्यात तुम्ही एकटेच असे आहात की जे रोज मला येताना नमस्कार आणि जाताना राम राम बोलता आणि आज सकाळी तुम्ही कामावर आलात पण संध्याकाळी गेला नाहीत. म्हणून माझ्या मनात शंका आली आणि मी पाहायला आलो.” त्या व्यक्तीला कधी वाटले देखील नव्हते की त्याचे एखाद्याला एवढा छोटा सन्मान देणे, एक दिवस त्याचा जिव वाचवेल. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा कधीही कोणाला भेटाल तेव्हा त्याच्या सोबत हसून सन्मान पूर्वक बोलून मग पुढे जा. माणूसकीच तुम्हांला शेवट पर्यंत साथ देईल… म्हणून सर्वांबरोबर माणूसकीने वागा… *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
*प्रमिला ताई सेनकुडे यांना मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर https://vicharsanghasharvindkumar1111blogspo.blogspot.com/2019/08/blog-post_19.html#.XVp499s64_s.whatsappXVlqvYTfwuw.whatsapp👆🏻 *वरील बातमी वाचण्यासाठी दिलेल्या लिंक ला टच करा अधिक बातम्या वाचण्यासाठीwww.vicharsangharsh. com या या वेबसाईटला भेट द्या जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क करा 91 30 73 10 28 विचार संघर्ष ऑनलाईन न्यूज पोर्टल मुख्य संपादक अरविंद कुमार भोरे*
*💐आमची शाळा आमचे उपक्रम💐* अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांमधील कौशल्यांचाही विकास होणे गरजेचे असते त्यावर आधारीत *जि.प. प्रा.शाळा गोजेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड येथे* प्लॅस्टर आॅफ पॅरीसचे गणपती पर्यावरणास घातक असून मातीपासून बनवलेले गणपती पर्यावरणास पूरक आहेत हे पटवून देण्यात आले. 🌳🌳🌳🌳🌳🌳 या उपक्रमात विद्यार्थ्यांनी हिरीरीने भाग घेऊन कौशल्य वाढवण्याचा प्रयत्न केला व अतिशय सुंदर बैलजोडी तसेच गणपती बाप्पा च्या मूर्ती बनवल्या. 🌸🌸🌸🌸🌸🌸 आमच्या चिमुकल्यांचा छोटासा प्रयत्न...(30-08-2019)👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 30/08/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ● १५७४ - गुरू रामदास सर्वोच्च शीख गुरू पदी. 💥 जन्म :- ● १९३० - दशरथ पुजारी, मराठी संगीतकार. ● १९३४ - बाळु गुप्ते, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ● १९४७- नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी 'बी' ● १४८३ - लुई अकरावा, फ्रांसचा राजा. ● १६१९ - शिमाझु योशिहिरो, जपानी सामुराई. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 *9604481084* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी. येत्या काळात पोटखराबा आणि जिरायत असलेले हजारो हेक्टर क्षेत्र आता बागायती खाली येणार, राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला असून राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आता याचा फायदा होणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे १७ जुलै ते ३० जुलै २०१९ या कालावधीत घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल आज एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'फिट इंडिया' मोहिमेचा शुभारंभ; दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर पार पडला सोहळा, 'फिट इंडिया' अभियानात उद्योग, चित्रपटसृष्टी आणि क्रीडाविश्वासह इतर क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी सुब्रमण्यम स्वामींनी सुचवला उपाय, म्हणाले- 'पाककडे जाणारी जहाजं थांबवून, व्यापार बंद करावा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे करणार भाजपमध्ये प्रवेश, तसेच ते आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षही भाजपमध्ये विलिन करणार असल्याची माहिती खुद्द स्वत: राणे यांनीच दिली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पॅरालिम्पियन दीपा मलिकला राजीव गांधी खेलरत्न तर क्रिकेटर रवींद्र जडेजा आणि रेसलर पुजा ढांडालासहित 19 जणांना अर्जुन अवॉर्ड पुरस्कार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई : 15 सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिके आणि भारत यांच्यात सुरू होणाऱ्या तीन टी-20 सामन्यांसाठी भारतीय संघाची करण्यात आली घोषणा, महेंद्रसिंग धोनी, जलद गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश नाही.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बैलांचा सण : पोळा* बैलाच्या ताकदीवर तो शेतातील सर्व कामे करून घेतो. शेताची नांगरणी, वखरणी, पेरणी किंवा शेतातून घराकडे मालाची ने-आण करण्यासाठी या बैलांचा वापर केला जातो. पूर्वी दळणवळणाची सुविधा एवढी विकसीत झाली नव्हती तेव्हा शहरात जाण्या-येण्यासाठी बैलगाडीतून प्रवास करावा लागायचा. सायकल नावाची........ पूर्ण खालील लिंकवर मिळेल.....! https://nasayeotikar.blogspot.com/2019/08/blog-post_29.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *कर्करोग / कॅन्सर म्हणजे काय ?* 📙 कर्करोग किंवा कॅन्सर हा शब्द अंगावर शहारे आणतो. कॅन्सरचा आणि मृत्यूचा कोठेतरी संबंध आहे, हे मनात दडलेले असते हे याचे कारण. कर्करोगापेक्षा कॅन्सर हाच शब्द सहजगत्या वापरला जातो, नाही का ? कॅन्सरविरोधी लढाई ही खरे म्हणजे हरणारी लढाई असते, असा प्रचलित समज आहे. रक्ताचे काही कॅन्सर, कातडीचे काही कॅन्सर, स्तनाचे व गर्भाशयमुखाचे काही कॅन्सर लवकर लक्षात आले तर ही लढाई जिंकता येते, हे अलीकडे आकडेवारीने सिद्ध झाले आहे. पण अन्यथा या बाबतीत डॉक्टर शब्द वापरतात 'सर्व्हायवल रेट' हा म्हणजेच ते रोगाच्या राहिलेल्या वर्षांचा हिशोबच उलगडत असतात. आपल्या शरीरातील असंख्य प्रकारच्या पेशी त्यांना दिलेली कामे निमूटपणे करत असतात. पण अचानक त्यांतील काही बंड करतात. त्यांचा आकार वेडावाकडा वाढू लागतो. त्यांना नेमून दिलेली कामे होईनाहीशी होतात. त्यांची शरीराला अडचण होऊ लागते. अन्य अवयवांचे काम करायला त्यांचा अडथळा येऊ लागतो. या अडथळ्यांचाच एक परिणाम म्हणजे वेदना. जसजसे विविध प्रमुख अवयवांचे अडथळे वाढतात, तसतसे शरीर साथ देईनासे होते. यातुनच मृत्यू ओढवतो. आपल्या शरीरात रक्तरस म्हणजे लिम्फ नावाचा रस सर्वत्र रक्तरसवाहिन्यांतून वाहत असतो. कॅन्सरच्या पेशींचा या वाहिन्यांतून फैलाव सगळ्या शरीरभर होऊ शकतो. जेथे फैलाव होईल, तेथे त्यांची पुन्हा वाढ होऊ लागते. ज्यावेळी यकृत, फुप्फुस, प्लीहा, मेंदू या जागा या पेशींनी व्यापल्या जातात, तेव्हा संपूर्ण शरीराचेच कार्य बंद पडू लागते. शरीरातील पेशी अशा का बंड करून उठतात, याचा अजून आपल्याला पत्ता नाही. पण त्यांना बंड करायला प्रवृत्त करणाऱ्या वस्तूंना आपण कार्सिनोजन्स व कॅन्सरकडे प्रवृत्त करणाऱ्या गोष्टी म्हणून संबोधतो. उदारणार्थ, डांबर व त्यापासून बनणाऱ्या पदार्थाने कातडीचे कॅन्सर होतात, क्ष-किरणांमुळे कातडीचे व रक्तातील पेशींचे कॅन्सर होतात, तंबाखूमुळे तोंडातील कॅन्सर होतात, तर धूम्रपानामुळे फुप्फुसाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. पण येथे एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. सारख्याच वातावरणात त्याच वस्तूच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला कॅन्सर होतोच, असे नव्हे; तर त्या वातावरणात न येणाऱ्यांपेक्षा या गटातील लोकांना कॅन्सर होण्याचे प्रमाण जास्त असते. आज घटकेला जगातील अनेक प्रमुख संशोधन संस्थांतून कॅन्सरविरोधी औषधांबद्दल संशोधन केले जात आहे. त्यासाठी अक्षरश: पाण्यासारखा पैसाही ओतला जात आहे. पण नेमका प्रतिबंध व नेमका इलाज सापडणे खूपच दूर आहे. सध्या उपलब्ध असलेल्या व वापरात असलेल्या इलाजांमध्ये मुख्यत: बंड करणाऱ्या पेशींवर औषधाचा मारा करून त्यांचा नाश करण्याची उपाययोजना आखली जाते. पण अनेकदा या इलाजामध्ये निरोगी पेशीही नष्ट होतात. त्यामुळे रुग्णाची तब्येत अधिकच त्रास देऊ लागते. कॅन्सरविरोधी इलाज म्हणून एका औषधाकडे आशेने पाहिले जाते. ते म्हणजे इंटरफेराॅन. रक्तातील गॅमाग्लोब्युलिनपासून हे औषध तयार करून वापरले जाते. पण त्याची किंमत व निर्मिती हा त्याच्या वापरातील प्रमुख अडथळा आहे. काही वर्षांपूर्वी फक्त कॅन्सरच्या पेशी टाकू काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करणे एवढाच इलाज होता. त्यानंतरचा इलाज म्हणजे क्ष किरणांचा एकत्रित मारा ठराविक डोसमध्ये करणे. यानंतर कोबाल्ट किरणांचा मारा करण्याची पद्धत सुरू झाली. पण नंतर प्रगत औषधे जशी उपलब्ध झाली आहेत, तसे शरीरभर पसरत गेलेल्या कॅन्सरपेशींवर नियंत्रण घालणे शक्य होऊ लागले. विशेषत: रक्ताचा कॅन्सर, रक्तामार्फत पसरणारे कॅन्सर यांवर ही औषधे वापरणे आता सुरू झाले आहे. कॅन्सरच्या संदर्भात नवनवीन औषधांचा वापर करताना त्याच्या दुष्परिणामांची माहिती रुग्णांना दिली जाते. त्यांची परवानगी घेतली जाते व मगच इलाज केले जातात. यामध्ये अनेकदा औषधांचा वापर प्रथम करण्याची वेळ येते व रुग्णांना प्रथमच वापरले जाणारे औषध त्याचे दुष्परिणाम किंवा मृत्यू यातील एकाची निवड करावयाची असते. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ साधे जीवन जगणे ही जगातील सर्वात चांगली गोष्ट आहे. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारताचे कृषिमंत्री कोण आहेत ?* मा. राधामोहन सिंह 2) *'देवीची लस' कोणी शोधून काढली ?* एडवर्ड जेन्नर 3) *रक्तगट कोणी शोधून काढले ?* कार्ल लँडस्टेनर 4) *भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हणतात ?* लोकमान्य टिळक 5) *पी व्ही सिंधू ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?* बॅडमिंटन *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● नागभूषण मॅकावाड ● अरुण चव्हाण ● गणेश बोळसेकर ● दिलीप झरेकर ● कृष्णा श्याम दाभडकर ● माधुरी हातनुरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *"सहजीवन म्हणजे काय? खरंच काय लिहायचं सहजीवनाबद्दल? आणि कोणा-कोणाबद्दल लिहायचं? फक्त पती आणि पत्नीचंच सहजीवन असतं का? आई-वडील, बहीण, भाऊ, काका, मामा, आत्या यांच्याबरोबर घालवलेले लहानपणीचे सोन्यासारखे दिवस हे सहजीवन नाही का ? मला तरी एकाबरोबर घालवलेलं ते सहजीवन असं मर्यादित स्वरूपात नाही मांडता येणार. ज्या ज्या माणसांनी मला भले आणि बुरेही अनुभव देऊ केले त्या सगळ्यांबरोबर जीवन जगलो ते सहजीवनच वाटतं.’’सहजीवन म्हणजे नेमकं काय? बरोबर राहणं की जोडीनं राहणं? एकत्र एका घरात राहणं की कुठेही असलं तरी जवळ असल्याची भावना वारंवार उचंबळून येणं? माणूस कंपू करून, टोळी बनवून किंवा गर्दी करून राहतो त्याला सहजीवन म्हणायचं की प्राणी एकत्र कळपानं किंवा झुंडीनं राहतात त्याला सहजीवन म्हणायचं?* *आजकालच्या धकाधकीच्या आणि न संपणाऱ्या प्रवासानंतर घरी जाऊन बोलायला वेळ नाही म्हणून एकमेकांशी दूरध्वनीवरून किंवा संदेश पाठवून सगळ्या भावना व्यक्त करतो त्याला सहजीवन म्हणायचं? काहीच कळत नाही, की काही कळून घ्यायचं नाही आणि जोपर्यंत काही होत नाही, घडत नाही तोपर्यंत आपलं मस्त चाललंय.. म्हणून खोटय़ा निर्धास्त भावनेनं आला दिवस गेल्या दिवसापेक्षा बरा निघेल म्हणून एकाच छपराखाली राहायचं, त्याला कुटुंब असं नाव द्यायचं आणि जगण्याचं एक चोवीस तास चालणारं आणि हमखास बेरंग करणारं नाटक आपण प्रमुख पात्र म्हणून अभिनय करून पुढे चालू ठेवायचं?* *"कोणत्याही दोन नात्यांमधील सहजीवन हे व्यवहारीक असू शकते तसेच भावनिक सुध्दा असू शकते परंतु एखाद्या पती-पत्नीचे सहजीवन हे भावनिकच असावयास हवे अन्यथा तेथे राग, द्वेष, तिरस्कार, घृणा, मत्सर हे जरूर असणार जे त्या सहजीवनाला सुरुंग लावल्याशिवाय राहणार नाही ...म्हणूनच पती-पत्नीच्या सहजीवनाला वेगळा अर्थ आहे."* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सज्जनहो,* *राष्ट्रसंत तुकडोजी महाराज* *काय होत या माणसाकडे,* *फक्त वाटणे,देण्यापलीकडे काहीच* *नव्हतं.* *म्हणून ते राष्ट्रसंत* *झाले.* *ते म्हणत* * *राजा सजी महाली,सौख्य कधी* *मिळाली।* *ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत* *माझ्या।* *जाता तरी सुखे जा, येता तरी सुखे* *या।* *कोणावरी ना बोझा, या झोपडीत* *माझ्या।* *अरे बाबांनो आलोच ना भूमीवर ,मग* *सगळं तिचच आहे,सांभाळून काय करता, वाटून बघा किती पटीने वाढत ते* *सांगा,मोजदाद करता येणार नाही.* *या सृष्टीने एक नियम केला आहे, अलिखित आणि चिरंतन---* *जे वाटले ते शेकडो पटीने पुन्हा परत मिळत, मग वाटायला काय हरकत आहे.* *अन्न द्या ,कधी भुकेले राहणार नाही.* *सन्मान करा, कधी मान खाली घालायची वेळ येणार नाही.* *तिरस्कार करा,आयुष्यात कधी कुणी जवळ येणार नाही.* *अपमान करा,करोडो रुपये खर्चूनही कुणी चांगलं म्हणणार नाही.* *धन वाटा, कधी कुणाकडे हात पसरावा लागणार नाही, सदैव मदत तयारच.* *ज्ञान वाटा, जगात तुमच्यासारखा ज्ञानीच प्रत्येकाच्या मनात घर करून* *बसेल,व तुम्ही किर्तीवंत व्हाल* *प्रेम करा,अवघी सृष्टी तुमचीच* *असेल, जगण्याची मजा काही औरच मिळेल.* 🤝🏻 *चला मग वाटताय ना ,शक्य होईल ते तरी *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुम्ही कुणावर विश्वास ठेवा अथवा ठेऊ नका पण तुम्ही तुमच्या मनातून काम करत असलेल्या कामावर विश्वास ठेवा.कारण मनातून केलेले काम हेच तुमच्या विश्वासाचे खरे प्रतिक आहे.तीच तुमच्या विश्वासाने केलेल्या कामाची पावती आहे.या तुमच्या कामावरच लोक विश्वास ठेवतात.तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवतीलच असे नाही परंतु तुम्ही मनातून केलेल्या तुमच्या कामावर नक्कीच विश्वास ठेवतील.हीच तुमची खरी ओळख व विश्वासाने केलेल्या कामाची पावती आहे. - व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद.9421839590/ 8087917063. 🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भेटवस्तू न स्वीकारणे* अब्दुल कलाम यांचा वडिलांची शिकवण स्वातंत्र्यानंतर अब्दुल कलाम यांच्या वडिलांना ग्रामसभेचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. त्यांनतर एके दिवशी एक व्यक्ती त्यांना भेटायला आले. त्यावेळी कलामांचे वडील घरी नव्हते आणि कलाम अभ्यास करत होते. कलामांचे वडील घरी नसल्याचे पाहून तो इसम म्हणाला, ‘मी तुझ्या बाबांसाठी भेटवस्तू आणली आहे. ते जेव्हा येतील तेव्हा ही भेटवस्तू त्यांना दे.’ काही वेळाने कलामांचे वडील घरी आल्यावर त्यांना ती भेटवस्तू दिसली. चांदीच्या ताटात ठेवलेल्या त्या भेटवस्तू पाहून त्यांनी कलामांना विचारले, ‘बेटा या भेट वस्तू कुठून आल्या.’ तेव्हा कलाम म्हणाले, ‘तुम्ही घरी नसताना एक व्यक्ती घरी आला होता, त्यानेच हे दिले.’ त्यांच्या वडिलांनी त्या भेटवस्तू उघडून पाहिल्या तर त्यात, महागडे कपडे, चांदीचे पेले आणि मिठाई होती. हे पाहिल्यावर ते रागवले. कलाम घरी असूनही त्या व्यक्तीने या भेटवस्तू घरी ठेवल्या आणि कलामांनी त्याला नाकारले नाही, या गोष्टींचा त्यांना राग आला. रागावर अनावर झाल्याने त्यांनी कलामानां जोरात चापट दिली आणि घरात येर-झऱ्या घालू लागले. थोड्यावेळाने कलामांच्या वडिलांना लक्षात आले की आपण रागाच्याभरात कलामवर जास्त ओरडलो आणि उदास झालेल्या कलामांना जवळ बोलवून त्यांच्या डोक्यावर हात फिरवत समजावले. ते म्हणाले, ‘बाळ इथून पुढे माझ्या परवानगीशिवाय कोणतीही भेटवस्तू स्वीकारु नकोस. देव जेव्हा एखाद्याला पद देतो तेव्हा त्यासोबत येणाऱ्या गरजाही पूर्ण करतो. देवाने दिलेल्या गोष्टींपेक्षा जास्त घेणे चुकीचे असते.’ अगदी प्रेमाने समजवत कलामांचे वडील त्यांना म्हणाले, भेटवस्तू स्वीकारणे चांगले लक्षण नाही. भेटवस्तू देण्याच्या मागे देणाऱ्याचा काही हेतू नक्कीच असतो. भेटवस्तू स्वीकारताना काळजी घेतली पाहिजे, अन्यथा त्यावरुन विषाची परीक्षा देण्याची वेळ येऊ शकते. वडिलांनी सांगितलेली ही गोष्ट कलामांच्या डोक्यात पक्की बसली आणि त्यानंतर ते भेटवस्तूच्या मोहात पडले नाहीत. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 29/08/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राष्ट्रीय क्रीडा दिन* 💥 ठळक घडामोडी :- ◆ १८९८ - गुड इयर कंपनीची स्थापना ◆ १९४७ - डॉ. बाबासाहेबआंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना समितीची स्थापना करण्यात आली ◆ १९७४ - चौधरी चरणशिंग यांनी भारतीय लोक दल या राजकीय पक्षाची स्थापना केली 💥 जन्म :- ◆१८८० - लोकनायक बापूजी अणे (माधव श्रीहरी अणे), भारतीय स्वातंत्र्यसैनिक. ◆१९०१ - सहकार महर्षी विठ्ठलराव विखे पाटील, भारतातील सहकार चळवळीतील अग्रणी. ◆१९०५ - भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद ◆१९२३ - हिरालाल गायकवाड, भारतीय क्रिकेट खेळाडू. ◆१९५८ - मायकेल जॅक्सन, अमेरिकन गायक, संगीतकार. ◆१९५९ - अक्किनेनी नागार्जुन, दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेता. 💥 मृत्यू :- ◆१९०६ - बाबा पदमनजी (बाबा पदमनजी मुळे), मराठीतील ख्रिस्ती साहित्यिक. ◆१९५१ - अण्णासाहेब चिरमुले, भारतीय विमा उद्योजक. ◆१९६९ - शाहीर अमर शेख, मराठी शाहीर. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 *9604481084* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *'स्टॅचू ऑफ युनिटी' या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सर्वात उंच ( 597 फुट ) पुतळ्याचा जगातील 100 महान ठिकाणामध्ये झाला समावेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *भारत पाच ट्रिलिअन डॉलरची अर्थव्यवस्था तेव्हाच बनू शकतो जेव्हा देशाची राष्ट्रीय सुरक्षा अबाधित राहील, असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ **मुंबई : विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयांना २० टक्के अनुदान ; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय, २० टक्के अनुदान असणाऱ्या शाळा, महाविद्यालयांना ४० टक्के अनुदान देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय ; शिक्षक आंदोलनानंतर सरकारचा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नवी दिल्ली : चंद्राच्या जवळ पोहोचले चांद्रयान-२, इस्रोकडून आणखी एक कठीण ऑपरेशन यशस्वी, भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने बुधवारी चांद्रयान-२ ला चंद्राभोवतीच्या नव्या कक्षेत स्थापित केले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *महाराष्ट्र शासनाने यावर्षीचे आदर्श शिक्षक राज्यपुरस्कार केले जाहीर, नांदेड जिल्ह्यातून सावित्रीबाई फुले पुरस्कार फारुकी आखेला नदीम - जि.प.हा. अर्धापूर, मुख्याध्यापक म्हणून चव्हाण गोविंद चंदर - जि.प.हा.कन्या, मुखेड, प्राथमिक शिक्षकातून सिराज अन्वर- जि.प.हा.तामसा, आणि आदिवासी विभागातून रमेश मुनेश्वर - किनवट यांना जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पॅरा बॅडमिंटनपटू मानसी ही जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. तिने एसएल ३ गटाच्या अंतिम सामन्यात तीन वेळच्या विश्वविजेत्या पारुल परमारचा २१-१२, २१-७ असा पराभव केला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *अनोख्या शैलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाजांना जाळ्यात पकडणार्या श्रीलंकन फिरकीपटू अजंथा मेंडीसने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नवृत्ती स्विकारली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भारतीय क्रीडा दिवस त्यानिमित्ताने प्रासंगिक लेख* *खेळाकडे ही लक्ष द्यायला हवे* मैदाने ही मुलांच्या खेळासाठीच असावेत, खेळाचे महत्व शाळेपासूनच विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवले पाहिजे. अभ्यासक्रमामध्ये खेळ या विषयाचा समावेश करायला हवा त्यामुळे खेळाचा चांगल्याप्रकारे प्रसार होऊ शकेल. सध्याची पिढी मैदानाऐवजी मोबाईलवर जास्त दिसत आहे........... पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे. https://nasayeotikar.blogspot.com/2018/05/28.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *एन्डोस्कोपी म्हणजे काय ?* 📙 मानवी शरीराची बाह्यत: तपासणी सहज शक्य असते. काही भागांत छोटेसे उपकरण घालून अंतर्भागातील काही गोष्टी तपासणेही गेली अनेक दशके प्रचारात होतेच. उदाहरणार्थ, घशामध्ये लॅरिंगोस्कोप घालून स्वरयंत्रापर्यंतचा भाग बघणे वा गुदद्वारातून प्रोक्टोस्कोप घालून पाइल्सची तपासणी, योनिमार्गात व्हजायनोस्कोप घालून गर्भाशयमुखापर्यंतच्या भागाची तपासणी करून आजाराचे निदान वा इलाज करणे चालूच होते. संपूर्ण शरीराच्या आतील भागाची क्ष किरण वा अल्ट्रा साऊंडद्वाराही तपासणी करणे काही दशके डॉक्टर्स करीत होतेच. पण या साऱ्यामध्ये एक उणीव कायम जाणवत होती, ती म्हणजे प्रत्यक्ष अवयवाचा तपासायचा भाग डोळ्यांनी पाहता येत नव्हता. त्या जागेपर्यंत पोहोचून त्याचा छोटासा भाग तपासणीसाठी बाहेर काढता येत नव्हता. या अडचणीमागचे महत्त्वाचे कारण होते, प्रकाश हा फक्त सरळ रेषेतच प्रवास करीत असल्याने दृश्यमान करण्याच्या भागात पोहोचताना आलेले कोणतेही वळण, बाक हा अडथळा ठरत होता. या सार्यावर उपाय सापडला, तो फायबरऑप्टिक तंत्रज्ञानाचा सरसकट वापर सुरू झाला त्यावेळी. कोठेही कशीही वळू शकणारी, शरीरातील प्रमुख रंध्रातून वा भोकातून प्रवेश करू शकणारी फायबर ऑप्टिक वायर, तिच्या तोंडाशी असणारा प्रखर उजेड टाकणारा दिवा व या साऱ्यांच्या मदतीने दृश्यमान होणाऱ्या प्रतिमा फायबर ऑप्टिकमुळे दुसऱ्या टोकापर्यंत सहज पोहोचू लागल्या. त्यांना भिंगाद्वारे मोठे करून साध्या डोळ्यांनी तर पाहता येऊ लागलेच, पण आता डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे याच सर्व प्रतिमा शेजारी ठेवलेल्या टीव्हीच्या पडद्यावर प्रत्यक्ष रुग्ण व त्याचे सर्व डॉक्टर्सही पाहू लागले आहेत. गरजेनुसार याचे कॉम्पॅक्ट डिस्कवर आरेखन करून ठेवता येते व दुसर्या कोण्या तज्ज्ञाचे मत घ्यायचे असेल, तर त्यालाही पाठवता येते. याचा महत्त्वाचा फायदा झाला, तो म्हणजे तोंडापासून गुदद्वारापर्यंत लांबलचक असलेल्या काही मीटरच्या अन्नमार्गाचे संपूर्ण परीक्षण आता शक्य झाले आहे. अन्ननलिकेची सूज, जठरातील व्रण, छोट्या आतड्यातील अंतस्त्वचेतीलन बदल, मोठ्या आतड्यातील अडथळे एवढेच नव्हे, तर पित्ताशयाची तपासणीही यामुळे शक्य झाली. फुफ्फुसांकडे हवा पोहोचवणाऱ्या नलिकांची तपासणी, तेथे साचलेल्या कफाची विल्हेवाट लावणेही या पद्धतीने शक्य झाले आहे. या तंत्रज्ञानात भर पडली, ती लॅप्रोस्कोपी या शल्यप्रकाराची. फायबर ऑप्टिक प्रकाशाचा वापर करून शरीरातील विविध पोकळ्यांमधील कोणत्याही अवयवावर शस्त्रक्रिया करणे आज सहज शक्य झाले आहे. आत घातलेल्या नळीतूनच कात्री, चिमटा, रक्त थांबवणारी इलेक्ट्रिक कॉटरी - जिचा वापर करून तीव्र उष्णतेने रक्तवाहिन्यांची तोंडे बंद केली जातात - इत्यादी उपकरणे थेट अवयवांपर्यंत पोहोचतात. शरीरावर म्हणजेच मुख्यत्वे पोटावर पूर्वी चार ते पाच इंचाचा छेद घेऊन करावी लागणारी अनेक शस्त्रकर्मे आता केवळ दोन वा तीन करंगळीच्या आकाराच्या नळ्या आत सारुन केली जातात. अर्थातच रुग्णाचा बरे होण्याचा काळ जखमा मोठ्या नसल्याने खूपच कमी होतो. पूर्वी ज्या शस्त्रकर्मानंतर किमान पंधरा दिवस रुग्णालयात खाटेवर राहणे गरजेचे होते, तो काळ आता या पद्धतीने जेमतेम एक ते तीन दिवसांपर्यंत येऊन पोहोचला आहे. याही पुढचा टप्पा म्हणजे छोट्या कॅप्सूलच्या आकाराचा 'बग' म्हणजे छुपा कॅमेरा रुग्ण गिळतो. त्याद्वारे पाठवल्या जाणाऱ्या चित्रणाच्या संदेशांचे टीव्हीवर वर मोठ्या पडद्यावर सतत प्रक्षेपण होत राहते. सोळा ते अठरा तासांनंतर हा 'बग' शरीराबाहेर टाकला जातो. आज जरी महागडी व प्रयोगाव्यवस्थेतील ही तपासणी असली, तरी काही वर्षात जगभर तिचा वापर जरूर सुरू होईल. साधी डॉक्टरी तपासणी जर दोन तीनशे रुपयात होत असेल, क्ष किरण व अल्ट्रासाऊंडसाठी चार पाचशे रुपये पडत असतील तर एन्डोस्कोपीसाठी मात्र दोन ते तीन हजार रुपये खर्च येतो. त्याचे कारण सरळच आहे. वापराव्या लागणाऱ्या सामग्रीची किंमत काही लाखांच्या घरात असते. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• Good handwriting is the mirror of good learning.* *( चांगले हस्ताक्षर हा चांगल्या शिक्षणाचा आरसा आहे. )* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *महाराष्ट्राचे कृषिमंत्री कोण आहेत ?* मा. सदाशिव खोत 2) *आनंदवनाची स्थापना कोणी केली ?* बाबा आमटे 3) *मुलींची पहिली शाळा कोणी काढली ?* महात्मा फुले 4) *'पोलिओची लस कोणी शोधून काढली ?* साल्क 5) *कर्नाटक या राज्याचा राज्यपक्षी कोणता ?* नीलकंठ *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● योगिता सुरेश येवतीकर ● रवी शिंदे, कुंडलवाडी ● शिवराज पाटील चोळाखेकर ● गणेश राऊत ● रवींद्र केंचे ● गणेश येडमे ● ईश्वर शेटीये ● सचिन बावणे ● विनायक कुंटेवाड ● अनिरुद्ध खांडरे ● योगेश पाटील ढगे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपण चंद्र सूर्य यांच्या आकाराचे चित्र पटकन काढू शकू; पण त्यांच्यातल्या प्रकाशाचे अंग, म्हणजेच त्यांचे प्राणतत्व, आपल्या हाती लागत नाही. 'प्रकाशाचे अंग' हाती यावे, अशी इच्छा बाळगणा-यांना प्रकाशाचे चटके सोसण्याची तयारी ठेवावीच लागते. प्रकाशाची संजीवकता अनुभवताना त्यातली दाहकताही अनुभवावीच लागते. कोणत्याही कलेत ' प्रकाशाचे अंग' हाती लागावे, म्हणून मोठी साधना करावी लागते. ना.ग.गोरे यांनी 'दिगंबर' कथेमध्ये एका मूर्तिकाराच्या निर्मितीप्रक्रियेचा प्रवास रेखाटला आहे.* *कथानायक अरिशिनेमी हा एक कसबी पाथरवट असतो. त्याने अनेक मंदिरे, प्रासाद घडवलेले असतात. मात्र एकाच प्रकारच्या कामामुळे तो अस्वस्थ झालेला असतो. बारा वर्षे तो काम न करता घालवतो. नंतर जेव्हा त्याला देऊळ बांधायचे बोलावणे येते, तेव्हा ते मंदिर 'बिनखांबाचं, बिनदाराचं, बिनमंडपाचं असणार!' असं तो ठरवतो. तो खूप भटकतो. खूप मंदिरे पाहतो. तो परत येतो, तेव्हा एका प्रचंड विजेच्या लोळामुळे एक शिलाखंड उजळून निघालेला तो पाहतो. तेव्हा तो ठरवतो की मूर्तीला टेकडी हेच आसन असेल आणि दिशांचा मंडप असेल ! त्यानंतर काही काळानंतर त्याच्याकडून जगप्रसिद्ध अशी श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराची मूर्ती उभी राहिली. या कथेतून कलावंतांच्या आयुष्यात चाकोरीबाहेरच्या निर्मितीचे बीज सुचण्याचा, स्फूर्तीचा, क्षण किती ताणलेल्या प्रतीक्षेनंतर उगवू शकतो, कलावंतासाठी अस्वस्थता हे वरदान का ठरते, हे कळते.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡ *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *हम होंगे कामयाब,* *हम होंगे कामयाब,* *एक दिन* । *हो मनमे है,विश्वास,* *पुरा है विश्वास,* *हम होंगे कामयाब, एक दिन।* *खर आहे,---* - *म्हणतात ना मनी वसे ते स्वप्नी दिसे।* *आणि या मनाला सुद्धा सुंदर स्वप्न* *पडू द्या. जे मन सतत काहीतरी* *नाविन्याचा शोध घेते तेच नाविन्याची निर्मिती सुद्धा करते.* *"ज्या माणसाला सतत शुभ आणि आशावादी विचार करण्याची सवय असते त्याचे मन नेहमी आनंदाने व उत्साहाने भरलेले राहते* *आणि* *उत्साही मनाच्या माणसाला नेहमीच यशप्राप्ती होते..* *म्हणून सकारात्मक , आशावादी आणि आनंदी विचार हीच यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे."* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येकाने प्रत्येकाच्या जीवनात आपल्या जीवनाचे सुंदर स्वप्न पाहू शकतो आणि तसा पाहण्याचा हक्कही आहे.पण जे काही सुंदर स्वप्न पाहतो ते प्रत्यक्षात साकारण्यासाठी खूप काही मेहनत घ्यावी लागते तेव्हा कुठे ते स्वप्न पूर्ण होऊ शकते.केवळ स्वप्न पाहणे आणि प्रत्यक्षात काहीच न करणे म्हणजे जीवनात आपल्याच हाताने नैराश्य आणून घेणे होय. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..9421839590. 🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जोपासना चांगल्या विचारांचा एकनिष्ठतेची* ========================= एकदा तथागत गौतम बुद्ध एका ठिकाणी धम्म देसना देण्यासाठी गेले.समोर हजारो लोक बसलेले होते,तथागत काहीच न बोलता काही वेळ बसून राहिले व थोड्या वेळाने निघुन गेले. दुसऱ्या दिवशी परत धम्म देसना देण्यासाठी आले समोर पाचशे लोक बसलेले होते. परत तथागत काही वेळ काहीच न बोलता बसून राहिले व थोड्या वेळाने निघुन गेले. परत तिसऱ्या दिवशी जेंव्हा ते धम्म देसना देण्या साठी आले तेंव्हा फक्त वीस लोक समोर बसलेले होते,आणि त्या दिवशी तथागतांनी धम्म देसना दिली. जेंव्हा त्यांच्या शिष्याने त्यांना विचारले की पहिले दोन दिवस जास्त लोक असतांना तुम्ही धम्म देसना न देता तिसऱ्या दिवशी फक्त वीस लोक असतांना का दिली? तथागतांनी खुप छान उत्तर दिले,"ज्या लोकांना खरच धम्म ऐकायचा होता ते तिसऱ्या दिवसा पर्यन्त आपल्या निश्चयावर ठाम राहिले व तिसऱ्या दिवशी उपस्थित राहिले.परन्तु जे मला फक्त बघण्या साठी आले होते व जे आपल्या निश्चयावर ठाम नव्हते ते अपोआपच कमी होत गेले.मला फक्त धम्म ऐकून घेणारे नकोत तर आचरणात आनणारे अनुयायी हवेत.म्हणून मी तिसऱ्या दिवशी योग्य अशाच अनुयायांना धम्म दिला." *बोधःजो पर्यन्त चांगल्या विचारांशी एकनिष्ठ राहण्यावर आपण ठाम नसतो तो पर्यन्त आपल्याला त्यापासून मिळणारा लाभ मिळत नाही.किती आहेत यापेक्षा कसे आहेत हे महत्वाचे.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 28/08/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- *१९३७-'टोयोटा मोटर्स' ही स्वतंत्र कंपनी बनली* 💥 जन्म :- ◆१९६६-प्रिया दत्त,लोकसभा खासदार. ◆ १९२८ - एम. जी. के. मेनन, भारतीय पदार्थवैज्ञानिक. 💥 मृत्यू :- ◆१९६९ - रावसाहेब पटवर्धन, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत. ◆ २००१ - व्यंकटेश माडगूळकर, मराठी लेखक, चित्रकार, शिकारी, पटकथाकार. ◆१६६७-मिर्झा राजे जयसिंग *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मोदी सरकारचा बिग प्लॅन, पुढील 10 वर्षात देशातील 50 लाख हेक्टर नापीक जमीन होणार सुपीक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *ट्रॅफिकचे नवीन नियम 01 सप्टेंबरपासून होणार लागू, हेल्मेट न वापरल्यास रद्द होणार लायसन्स* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांना तीन महिन्यांची मुदतवाढ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *भारतीय वायुसेनेच्या विंग कमांडर एस धामी यांनी फ्लाइंग युनिटच्या पहिल्या महिला फ्लाइट कमांडर ठरण्याचा मिळविला मान, महत्वाची जबाबदारी मिळालेल्या देशातील पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई- विनाअनुदानित शिक्षकांचे सुरू असलेल्या आझाद मैदानावरील आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण मिळालं. मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आक्रमक झालेल्या शिक्षकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यानंतर आमदार विक्रम काळे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आंदोलनस्थळी जाऊन शिक्षकांना दिला पाठिंबा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *डेहराडून : देशाच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कंचन चौधरी भट्टाचार्य यांचे निधन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *नवी दिल्ली : येथील फिरोजशहा कोटला मैदान आत्ता अरुण जेटली स्टेडियम या नावाने ओळखले जाणार, दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनने घेतला निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ वरील बुलेटीनची ऑडिओ 📢* ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करावे. https://b.sharechat.com/uKQAMkRzvZ ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भारतीय क्रीडा दिवस - 29 ऑगस्ट* https://nasayeotikar.blogspot.com/2019/08/blog-post_27.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *एन्फ्लुएंझा (फ्लू, बर्डफ्लू, स्वाइन फ्लू) म्हणजे काय ?* 📙 'फ्लू' या नावाने आपण याला ओळखतो. हा अति-संसर्गजन्य असा आजार आहे. जगाच्या पाठीवर अनेकवेळा या आजाराने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. गेली काही दशके प्रतिजैवक औषधे उपलब्ध झाल्याने या आजारातून गंभीर स्वरूप धारण करणाऱ्या अन्य उपद्रवांवर जरासा ताबा आपण मिळवला आहे, एवढेच. मात्र फ्लूवर आजही नेमके औषध उपलब्ध नाही. त्याचा प्रतिबंध करणारी लस शोधण्याचे अनेक प्रयत्न निरुपयोगी ठरलेले आहेत; कारण ज्या विषाणूमुळे हा आजार होतो, त्याच्या असंख्य प्रजाती अस्तित्वात असल्याने व त्यांतही सतत नवीन भर पडत असल्याने प्रतिबंधक लस तयार करून तिचा उपयोग होत नाही. फ्लूची साथ एखाद्या प्रदेशात पसरली की, अक्षरश: घराघरांतून आलटूनपालटून प्रत्येकाचा आजाराशी संबंध येतोच. सारे घर फ्लूने भेटले आहे, अशीही उदाहरणे जुन्या काळात भरपूर आहेत. सर्दी, पडसे, नाक गळणे, खोकला, तीव्र डोकेदुखी, सर्वांग दुखणे, अतिशय थकवा, भूक मंदावणे, ताप ही प्रमुख लक्षणे या आजारात दिसतात. मात्र सर्दी, पडसे जसे पटकन बरे होते तसे न होता आजार गेला तरी थकवा खूप दिवस राहतो. प्रत्यक्ष फ्लू धोकादायक नसून त्या विषाणूंच्या प्रादुर्भावानंतर श्वासनलिका, फुप्फुसे, त्यांची आवरणे यांमध्ये आलेल्या दुर्बलतेचा फायदा घेऊन अन्य जंतूंचा प्रवेश होतो. त्यातून न्युमोनिया, ब्राँकायटिस, प्लुरसी यांसारख्या गंभीर आजारात रूपांतर होते. गेल्या शतकात १९१८ साली सुरू झालेल्या फ्लूच्या साथीमध्ये अनेकांचा मृत्यू झालेला आहे. भारतात १९५७ साली फ्लूची शेवटची मोठी साथ येऊन गेली. फ्लुवरचे उपचार व निदान यांसाठी शक्यतो डॉक्टरी सल्ला घेतलेला बरा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे साथ नसताना फ्लूचे निदान करणे तज्ज्ञ डॉक्टरांचे काम बनते. साथीच्या वेळी रुग्ण पटकन लक्षात येतो. पण अन्यथा किरकोळ लक्षणांमुळे आजाराकडे दुर्लक्ष होऊ शकते. विश्रांती, पोषक आहार, वेदनाशामक औषधे, भरपूर पेयद्रव्ये यांचा वापर या आजाराच्या उपचारात आवश्यक ठरतो. नंतरचा थकवा व दौर्बल्यावर शक्तिवर्धक औषधे, प्रथिनांचा पूरक वापर उपयोगी पडतो. सध्या गेली काही वर्षे आपण ऐकत असलेला 'बर्ड फ्लू' हा आजार नामसाधर्म्याने सारखाच असला व तोही विषाणूजन्य असला, तरी त्याचा प्रादुर्भाव मुख्यतः कोंबड्या व पक्षी यांच्यात होतो. क्वचितच माणसांना त्याची लागण होते. त्यावेळी फुप्फुसदाह व तीव्र ताप ही लक्षणे माणसात दिसतात. अर्थात पक्षी हाताळताना वा त्यांची विल्हेवाट लावताना प्रतिबंधक काळजी आवश्यक ठरते. नाक तोंड झाकणारे मास्क व हातमोजे गरजेचे ठरतात. पक्षांमध्ये होणारा हा आजार फार झपाट्याने पसरतो. खुराड्यातील सर्व पक्षी याला पटकन बळी पडू शकतात. मात्र अशी कोंबडी वा पक्षी खाण्यायोग्य राहत नाहीत. त्यामुळे बर्डफ्लुचा प्रादुर्भाव झाल्यास त्या भागातील सर्व पक्षी नष्ट करणे - मुख्यतः खुराड्यातील व पाळीव - हाच एक प्रतिबंधक उपाय ठरतो. त्यांची जाळून वा खोल जमिनीत गाडून विल्हेवाट लावावी लागते. भारतात २००६ साली या रोगाने कुक्कुट- पालनाच्या व्यवसायाला फार मोठा तडाखा दिला आहे. मात्र याच काळात बर्डफ्ल्यूने आजारी झालेल्या माणसांची संख्या जेमतेम हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच आहे, हेही ध्यानात ठेवायला हरकत नाही. 'स्वाईन फ्ल्यू' या नावाने २००९ साली जगभर धुमाकूळ घातलेल्या आजाराची मेक्सिकोमध्ये सुरुवात झाली. साऱ्या जगभर त्याचा विलक्षण वेगाने प्रसार झाला. फ्लुच्या विषाणूतील H1N1 या एका जातीने हा आजार होतो. फ्लूसारखी अन्य लक्षणे असली, तरी सुमारे एक टक्का रुग्णांत जुलाब, उलट्या याही सुरू होतात. एक हजारांत चार रुग्ण दगावत असल्याने ही साथ गंभीर मानली गेली आहे. मात्र टॅमिफ्लू औषधाचा वापर केल्यास स्वाईन फ्लूची तीव्रता खूप कमी होते, असेही लक्षात आले आहे. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ चिंता पाहुणा म्हणून येते आणि लवकरच मालक बनून राहते. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *श्वसनासाठी आपण कोणता वायू घेतो ?* ऑक्सिजन 2) *ऑलिम्पिक खेळ दर किती वर्षांनी होतात ?* 4 3) *शरीराच्या हालचालीवर कोण नियंत्रण ठेवतो ?* मेंदू 4) *कथकली हे कोणत्या राज्याचा नृत्यप्रकार आहे ?* केरळ 5) *गौतम बुद्धाची जन्मभूमी कोणती ?* लुम्बिनी ( नेपाळ ) *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● सुनीता महाडिक, मुंबई ● डी एस पी पाटील ● गणेश घुले ● संजय बंटी पाटील ● चंद्रकांत रामदिनवार ● अशोक मामीडवार ● लक्ष्मण कामशेट्टी ● तिरुपती अंगरोड ● साईनाथ गोणारकर ● आनंद आवरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चित्ताचं चैतन्य चेतलं की ज्ञानसूर्याचा साक्षात्कार होतो. तो काही विवेकी संतासह विचारवंतानाही होतो. विवेकी संत माणसा-माणसात माणुसकीचे अर्थात दया-प्रेम-करूणेचे पूल बांधत असतात. परोपकारातून परमेश्वराशी त्यांचं नातं जुळवत असतात. दुसरा एक संत प्रकार आहे लहरीबाबांचा, सतत मौनाचं नाटक करून हजारोंना नादी लावण्यात कुशल असलेल्या बुवांचा, प्रवचनाचं संमोहन वापरून जणू तो ईश्वर मलाच कळला आणि माझ्यावरच भाळला असा बनाव निर्माण करणा-यांचा. या लोकांच्या चरणांशी सर्व सुखं शयण असतात. तिथं कनक-कांतांचा सुकाळ असतो. कित्येक मती मारलेले भक्त आपल्या लेकीसुना या 'पहुंचे हुए' लोकांच्या नादी लावतात. सत्तेतील 'सत्ते' आणि राजकारणातील 'पत्ते'ही त्यांच्या आशीर्वादासाठी टपून असतात.* *कृष्णकथा-रामकथा कानाशी बिलगल्यानं आपण ईश्वरप्रिय होतो असा कुणाचा गोड गैरसमज असेल तर तो भाबडेपणा आहे. ईश्वर समजण्यासाठी पराकोटीचा त्याग आणि कष्ट उपसावे लागतात. कबीर-ज्ञानोबा-तुकोबाइतकं आत्मबोधन अनुभवावं लागतं. हा मार्ग जनसामान्यांना परवडण्यासारखा नाही. म्हणूनच ते कर्मकांडांच्या थोतांडाला ब्रम्हांडाचा साक्षात्कार समजतात. ईश्वर कुणालाही दर्शन देत नाही. सूर्यकिरणांनी सूर्याचाच शोध घेण्यासारखा तो अज्ञानी प्रकार आहे. म्हणूनच रोज काही क्षण आत्मशोधात व्यतीत करीत राहिल्यानं कुठल्या तरी क्षणी आपण आपल्या सत्य-असत्यासह आत्मदर्पणापुढे येतोच!* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *विंदा करंदीकर लढवय्या जीवनाचं* *चित्र रंगावतांना म्हणतात,* *असे जगावे छाताडावर,आव्हानांचे लावून अत्तर।* *नजर रोखुनी नजरेमध्ये,आयुष्याला* *द्यावे उत्तर* । *खरंच आहे,जीवन जगतांना अनेक* *संकटे येत असतात,त्यांना* *जर घाबरलं तर ते* *पिच्छा सोडत नाही.ते* *रडणाऱ्याला भीक घालत नाहीत,तर* *ती लढणाऱ्याला* *घाबरून पळून जातात हेच विंदा* *सांगतात.* *आजपर्यंत आपण तेच केले,भूत* *म्हटलं की पळालो,पण* *एकदा तरी त्या* *समस्यारूपी भूताकडे वळून डोळे* *वटारून बघा तर ,काय* *चमत्कार होतो, अहो भूत तर* *जाऊद्या, साक्षात यशश्री खेचून* *आणल्याचा अनुभव आल्याशिवाय* *राहणार नाही,ही* *खात्री देतो.* N *मग बघताय ना संकटाकडे डोळे* *वटारून,बघाच* *एकदा,जगण्यात मजा येईल.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* *इगतपुरी, नाशिक* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण जर आपल्या हाताने मुठभर रेती घेतली तर ती मुठभर रेती काही वेळच राहील.त्यानंतर मुठीत असलेली रेती हळूहळू मुठीतून बाहेर निसटून जाईल आणि त्यानंतर बाकीची हाताला चिकटून राहील.जी चिकटून राहते ते माणसाच्या दु:खासारखे समजायचे.कारण सुखाचे दिवस मुठीतल्या रेतीसारखे निसटून जाणारे असतात तर दु:ख मुठीत चिकटून राहणा-या रेतीसारखे हृदयाच्या कप्प्यात घट्ट करून राहतात आणि सतत ते आपल्या मनाला आठवण करून देतात.मग त्यांचे पडसाद आपल्या दैनंदिन जीवनावर होत असतात.अशावेळी झालेल्या दु:खाचे मंथन करुन त्यातून सुख शोधून काढून जीवनाला आनंदाने जगण्यासाठी प्रोत्साहन द्यायला शिकले पाहिजे.दु:खाची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आयुष्याची खरी किंमत* *एका नातवाने आपल्या आजोबांना प्रश्न विचारला " आयुष्याची खरी किंमत काय असते हो?"* *आजोबांनी त्याला एक दगड दिला आणि म्हणाले "ह्या अगोदर तू ह्या दगडाची खरी किंमत कळावी अशी माझी इच्छा आहे. दगडाची फक्त किंमत काढून ये , विकू नकोस . " सर्वप्रथम नातवाने एका फळवाल्याला त्या दगडाची किंमत विचारली. तो त्या चकाकणाऱ्या दगडाला बघून म्हणाला - ".या दगडाचा मोबदला म्हणून मी तुला एक डझन सफरचंदे देऊ शकतो." नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला . वाटेत त्याला एक भाजीवाला दिसला आणि त्याने त्याला त्या चकाकणाऱ्या दगडाची किंमत विचारली - " मी तुम्हाला याच्या बदल्यात एक पूर्ण पोते भरून बटाटे देऊ शकतो. " पुन्हा एकदा नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला. आता त्याला एका सराफाचे दुकान लागले. आत जाऊन त्याने तो चमकणारा दगड सराफाला दाखवून त्याची किंमत विचारली. आपल्या भिंगातून त्या खड्याचे निरीक्षण करताच तो सराफ उत्तरला - " या खड्यासाठी मी तुम्हाला दश लक्ष रुपये देऊ शकतो." नातवंडाला फार आश्चर्य वाटले पण नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला. थोडे पुढे आल्यावर त्याला अतिशय दुर्मिळ रत्न आणि मणी विकणारे दुकान दिसले. त्याने तो दगड तिथल्या रत्नपारख्यास दाखवला. तो रत्नपारखी ह्या विषयात अतिशय निष्णात होता.त्याने अलगद तो दगड एका मखमली कापडावर ठेवला. त्या दगडाच्या अवती भोवती प्रदक्षिणा घालत तो म्हणाला - " अहो, एवढा अमूल्य दुर्मिळ अनघड हिरा तुम्ही कुठून बरे आणला? मी माझे अख्खे दुकान जरी विकले तरी सुध्दा ह्या हिऱ्याची किंमत तुम्हाला देऊ नाही शकणार ." आता मात्र नातू अतिशय चकित झाला आणि गोंधळलेल्या मनःस्तिथीत तो आजोबांकडे परतला . त्याचे सर्व अनुभव ऐकून आजोबा म्हणाले - *"मला वाटते फळवाला, भाजीवाला, सराफ आणि रत्नपारखी ह्यांच्या उत्तरावरून तुला आयुष्याच्या मोलाविषयी कळले असेल. तुम्ही जरी अतिशय दुर्मिळ अमूल्य हिरा असलात तरी सुध्दा लोक तुमची किंमत त्यांच्या सीमित समजुती, आकलनशक्ती, हेतू आणि कुवतीनुसारच करणार."* *त्यामुळे आयुष्यात स्वतःची किंमत जाणून घेणे सर्वात महत्वाचे असते.* *स्वतःचा आदर करा.* *इतरांबरोबर कोण्यात्याही निरर्थक तुलने मध्ये गुंतू नका.कारण तुम्ही या विश्वातील एक अभिनव आणि अद्वितीय निर्मिती आहेत.* *तुमच्या सारखे फक्त तुम्हीच आहात. हीच तुमच्या आयुष्याची खरी किंमत आहे.* *आपल्या सर्वांनाही स्वतःची खरी किंमत कळून स्वतःवर प्रेम करायला शिकू....* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 27/08/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ◆ १९६२ - नासा चे मानव-विरहित यान मरिनर २ चे शुक्राकडे प्रस्थान 💥 जन्म :- ◆१९२५ - नारायण धारप, मराठी लेखक ◆ १९७२ - दिलीप सिंग राणा उर्फ द ग्रेट खली, भारतीय मल्ल. ◆ १९७४ - मोहम्मद युसुफ, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू ◆१९८० - नेहा धुपिया, भारतीय अभिनेत्री 💥 मृत्यू :- ●१९७६ - मुकेश, भारतीय पार्श्वगायक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून लोकशाहीचा पाया अधिकाधिक मजबूत करून खेड्यांचा विकास झाल्यास आपोआप देशाच्या विकासाला हातभार लाभेल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी कॉफी टेबल बूक प्रकाशन करतानाबोलत होते.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *दोन्ही देशांकडे आण्विक शक्ती, त्याचा वापर केल्यास जगात हाहाकार माजेल- इम्रान खान यांचे प्रतिपादन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नवी दिल्ली - माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या सीबीआय कोठडीत 4 दिवसांची वाढ, चिदंबरम यांना दिलासा नाही* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *ठाणे : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या दिपाली दिलीप पाटील यांची बिनविरोध निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *सोन्याच्या दराने गाठला ऐतिहासिक उच्चांक ; प्रतितोळा सोन्याचा दर 40 हजारांच्या पुढे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पालघरचे सहाय्यक फौजदार सुरेश सुभाष शिवदे यांनी दाखविले औदार्य, पूरग्रस्तांसाठी दिले एक महिन्याचे वेतन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *वेस्ट इंडीज विरुद्ध मिळविलेल्या विजयामुळे भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी घेतली झेप* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ AUdio ऐकण्यासाठीयेथे क्लिक करावे https://b.sharechat.com/PK0GpvIVtZ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *तुम्ही आम्ही पालक* अतिशय दर्जेदार आणि वाचनीय असा *तुम्ही आम्ही पालक* मासिकाचा सप्टेंबरचा 2019 चा अंक *निसर्गाचा प्रकोप* प्रकाशित झाला. कोल्हापूर सांगलीच्या महापुराच्या आणि महापालक सन्मान सोहळ्यानिमित्त झालेल्या कार्यक्रमाची माहिती असलेला अंक जरूर वाचा. https://saadmanuski.blogspot.com/2019/08/2019.html अंकाची वार्षिक वर्गणी 700 रुपये असून मासिकाचे वर्गणीदार आणि अधिक माहितीसाठी संपर्क :- ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ संपादक हरीश बुटले 9422001560 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *ऊर्जा म्हणजे काय ?* 📙 ऊर्जा म्हणजे सजीवाच्या प्रत्येक गोष्टीकरता लागणारी मूलभूत गरज आहे. ऊर्जेलाच एनर्जी असे म्हणतात. अचल वा अचेतन वस्तूची कोणतीही हालचाल घडवण्यासाठीसुद्धा उर्जा लागतेच. पृथ्वीवर कोणतीही ऊर्जा तयार होत नाही वा कोणतीही ऊर्जा पूर्णत: नष्ट होऊ शकत नाही. फक्त ऊर्जेचे नेहमीच रूपांतर होत असते. हे झाले ऊर्जेबद्दलचे थोडक्यात ज्ञान. व्यवहारात ऊर्जेबद्दलचे गैरसमज शास्त्रीय प्रगतीला फार मोठी खीळ घालण्याची शक्यता अनेकदा निर्माण झाली आहे. त्यांतील आपल्या देशातील मोजक्या काहींचा येथे उल्लेख करून प्रत्यक्ष स्थिती काय आहे, हे जाणून घेऊ या. धरणाचे पाणी वीजनिर्मितीकेंद्राने वापरून नदीत सोडले तर ते शेतीला उपयुक्त ठरत नाही, हा गैरसमज; कारण पाण्याची 'पॉवर' गेलेली असते, हे त्यामागच्या प्रचाराचे कारण. पाण्याचा वापर फक्त गुरुत्वाकर्षणाच्या वेगाने मिळणाऱ्या ताकदीचा वापर करून जनित्राचे टर्बाइन फिरवणे एवढाच केलेला असतो. यात पॉवरचा दुरान्वयानेही संबंध येत नाही. एखाद्या खडकावर पाणी आदळावे तसेच येथे टर्बाईनवर आदळते व पुढे जाते. या गोष्टी अगदी सरळ वाटल्या तरीही किमान पंचवीस ते तीस वर्षे आपल्या देशात असे पाणी शेतकऱ्यांनी नाकारले आहे, ही सत्यस्थिती आहे. गोबरगॅस वापरला असता स्वयंपाकघरात वास सुटुन हवा दूषित होते हा गैरसमज. गॅस जळतो, तेव्हा फक्त कार्बन डाय ऑक्साइड हवेत राहतो. गोबर गॅस फक्त जळण्यापुरताच स्वयंपाकघरात येतो व ज्वलनानंतर त्याचा कसलाही वास सुटणे, हवा दूषित होणे यांचे कारणच राहत नाही. प्रदूषणाचे तर कारणच नसते. शेगडी वा लाकडे जाळल्यावर जितका कार्बन डायाक्साईड पसरतो, त्याचा दहा टक्केही गोबरगॅस ज्वलनाने निर्माण होत नाही. धूर तर नसतोच. ज्वलनाला आच उत्तम मिळते, हे वेगळेच. तेव्हा गोबरगॅस वापरावा, हे उत्तम. 'अधिक चरबी, तेल तूप असलेले पदार्थ खाऊन ऊर्जा मिळते, ती जास्त पौष्टिक असते,' हा गैरसमज पसरण्याचे कारण तसेच आहे. पहेलवान मंडळी खुराक म्हणून अनेकदा भरपूर तूप, लोणी व चरबीयुक्त पदार्थ खात असतात. सामान्य माणूस त्याचेच आंधळे अनुकरण करू बघतो. स्निग्ध पदार्थातून जास्त ऊर्जा मिळते, हे अर्धेच बरोबर; कारण ही ऊर्जा लगेच उपलब्ध कधीच होत नाही, तर शरीरात चरबीच्या रूपात साठवली जाते. पहेलवान मंडळी अनेकदा थुलथुलीत दिसतात, त्याचे हेच कारण. संतुलित आहार प्रथिनयुक्त ऊर्जा घेतली, तर तिचा वापर लगेच केला जातो. जागतिक कीर्तीचे मल्ल बघितले तर त्यांच्या अंगावर चरबीचा कणही दिसत नाही, हे त्यामुळेच. ग्लुकोजची साखर खाल्ल्यामुळे तात्काळ खूप ऊर्जा मिळून तरतरी येते, हा एक गोड गैरसमज मुद्दाम पसरवला गेला आहे. ग्लुकोज, शुक्रोज, फ्रुक्टोज, माल्टोज या विविध साखरेच्या प्रकारांचे ग्लुकोजमध्येच रूपांतर होते. शिरेतून ग्लूकोज भरल्याने ताकद मिळते, हा एक भल्याभल्या शिकलेल्यांचाही गैरसमज आहे. पोटभर चौरस आहार हेच खरे ऊर्जेचे साधन होय. असे काही गैरसमज व ते दूर करायचा हा अल्पसा प्रयत्न. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ मोठेपणा आणि चांगुलपणा एका व्यक्तीत क्वचितच एकत्र दिसतात. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली व्यक्ती कोण ?* नील आर्मस्ट्राँग 2) *भारतात सर्वात शेवटी तयार झालेले राज्य कोणते ?* तेलंगाणा 3) *सर्वात जास्त लोकसंख्येचा देश कोणता ?* चीन 4) *सूर्य किरणांपासून कोणते जीवनसत्त्व मिळते ?* 'ड' 5) *लीप वर्षात किती दिवस असतात ?* 366 *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● संतोषजी बदरखे ● अतुल वैद्य ● दत्तप्रसाद सुरुकुटवार ● प्रशांत वीरभद्र रुईकर ● दिगंबर सोळंके *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपण चंद्र सूर्य यांच्या आकाराचे चित्र पटकन काढू शकू; पण त्यांच्यातल्या प्रकाशाचे अंग, म्हणजेच त्यांचे प्राणतत्व, आपल्या हाती लागत नाही. 'प्रकाशाचे अंग' हाती यावे, अशी इच्छा बाळगणा-यांना प्रकाशाचे चटके सोसण्याची तयारी ठेवावीच लागते. प्रकाशाची संजीवकता अनुभवताना त्यातली दाहकताही अनुभवावीच लागते. कोणत्याही कलेत ' प्रकाशाचे अंग' हाती लागावे, म्हणून मोठी साधना करावी लागते. ना.ग.गोरे यांनी 'दिगंबर' कथेमध्ये एका मूर्तिकाराच्या निर्मितीप्रक्रियेचा प्रवास रेखाटला आहे.* *कथानायक अरिशिनेमी हा एक कसबी पाथरवट असतो. त्याने अनेक मंदिरे, प्रासाद घडवलेले असतात. मात्र एकाच प्रकारच्या कामामुळे तो अस्वस्थ झालेला असतो. बारा वर्षे तो काम न करता घालवतो. नंतर जेव्हा त्याला देऊळ बांधायचे बोलावणे येते, तेव्हा ते मंदिर 'बिनखांबाचं, बिनदाराचं, बिनमंडपाचं असणार!' असं तो ठरवतो. तो खूप भटकतो. खूप मंदिरे पाहतो. तो परत येतो, तेव्हा एका प्रचंड विजेच्या लोळामुळे एक शिलाखंड उजळून निघालेला तो पाहतो. तेव्हा तो ठरवतो की मूर्तीला टेकडी हेच आसन असेल आणि दिशांचा मंडप असेल ! त्यानंतर काही काळानंतर त्याच्याकडून जगप्रसिद्ध अशी श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराची मूर्ती उभी राहिली. या कथेतून कलावंतांच्या आयुष्यात चाकोरीबाहेरच्या निर्मितीचे बीज सुचण्याचा, स्फूर्तीचा, क्षण किती ताणलेल्या प्रतीक्षेनंतर उगवू शकतो, कलावंतासाठी अस्वस्थता हे वरदान का ठरते, हे कळते.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡ *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हम होंगे कामयाब,* *हम होंगे कामयाब,* *एक दिन* । *हो मनमे है,विश्वास,* *पुरा है विश्वास,* *हम होंगे कामयाब, एक दिन।* *खर आहे,---* - *म्हणतात ना मनी वसे ते स्वप्नी दिसे।* *आणि या मनाला सुद्धा सुंदर स्वप्न* *पडूदया.जे मन सतत काहीतरी* *नाविन्याचा शोध घेते तेच* *नाविन्याची निर्मिती सुद्धा करते.* *"ज्या माणसाला सतत शुभ आणि आशावादी विचार करण्याची सवय असते त्याचे मन नेहमी आनंदाने व उत्साहाने भरलेले राहते* *आणि* *उत्साही मनाच्या माणसाला नेहमीच यशप्राप्ती होते..* *म्हणून सकारात्मक , आशावादी आणि आनंदी विचार हीच यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे."* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* *जि.प.शाळा--माणिकखांब* *ता.इगतपुरी, जि.नाशिक.* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• घर जेव्हा बांधलं जातं तेव्हा मुख्यत: पायाभरणीचा विचार केला जातो, नंतर भिंतीचा आणि त्यानंतर डोक्यावर असणा-या छताचा.हे जरी खरं असलं तरी यात प्रामुख्याने रेती, सिमेंट,वीटा,गजाळी आणि बांधकाम करणा-या कारागिरांचे कौशल्य लागते.केवळ कोणत्याही एका घटकावर घर पूर्ण होत नाही. त्याचप्रमाणे माणसांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे आहे.जर व्यक्तिमत्त्व विकासाचे पहायचे झाले तर लहानपणी घरात असणा-या आईवडिलांचे संस्कार, नंतर घरातल्या इतर रक्तातल्या नात्यातील लोकांचे संस्कार,परिसरातील मित्र,शेजारी यांच्या सहवासातून घडलेले संस्कार,शाळेतील शिक्षकांकडून घडवल्या गेलेले संस्कार आणि पुस्तकांच्या माध्यमातून वाचनातून मनावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष घडल्या गेलेले संस्कार या सर्व घटकातून मिळालेली उत्तम संस्कारांची पायाभरणी हीच खरी माणसांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी लागणारे घटक आहेत.यातील एखाद्या जरी घटकांकडून कमतरता भासली तर व्यक्तिमत्त्व विकास व्हावा तितका होऊ शकत नाही.हे सारे घटक माणसांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी लागणारे पायाभूत घटक आहेत.ज्याप्रमाणे घर मजबूत करण्यासाठी पायाभरणी आणि त्यासाठी लागणारे बांधकाम साहित्य उत्कृष्ट दर्जाचे असायला हवे तेव्हाच घर कुठे चांगले सुंदर बनू शकते त्याचप्रमाणे व्यक्तिमत्त्व विकासासाठी लागणारे वरील उल्लेखिलेल्या घटकांची नितांत गरज आहे.यातला एकजरी घटक कमी पडला तर माणसांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया कच्चा राहू शकतो.म्हणून यांना आपल्या जीवनात महत्त्वाचे खरे स्थान आहे हे विसरून चालणार नाही. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🏠🏕🏠🏕🏠🏕🏠🏕🏠🏕🏠 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *समर्पण* एक साधू भिक्षा मागत दारोदार फिरत होता. वृद्ध, असहाय अशा त्या साधूची दृष्टीही थोडी अधू होती. त्याने एका मंदिरासमोर जाऊन भिक्षेसाठी आवाज देण्यास सुरुवात केली. हे पाहून पांडुरंगाने त्याला म्हटले, '' महाराज, पुढे व्हा. तुम्हाला भिक्षा देईल अशा व्यक्तीचे हे घर नव्हे.'' साधू म्हणाला, '' जो कोणास काही देत नाही, असा या घराचा मालक आहे तरी कोण ?'' पांडुरंग म्हणाला, '' अहो, हे घरच नाही. हे मंदिर आहे. याचा मालक साक्षात परमेश्वर आहे. '' हे ऐकून त्या साधूने एकवार आकाशाकडे पाहिले. त्याचे हदय भरुन आले. त्याने आकाशाकडे पाहात हात पसरले. तेथेच उभा राहिला. पुढे मंदिराच्या दारात त्याला नाचतानाही पांडुरंगाने पाहिले. त्याचे डोळे अलौकिक तेजाने लकाकत होते. त्याच्या वृद्ध शरीरातून दिव्य प्रकाश पसरत होता. पांडुरंगाने त्याला आनंदाचे कारण विचारले. साधू म्हणाला, '' जो मागतो, त्याला मिळते. फक्त समर्पण करण्याची वृत्ती पाहिजे.'' *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 26/08/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ◆१९९४ : लोन टेनिसपटू रमेश कृष्णन आणि मध्यम पल्ल्याचा धावपटू बहादूर प्रसाद यांना के. के. बिर्ला फांउंडेशनचा पुरस्कार जाहीर 💥 जन्म :- ◆१९१० - मदर तेरेसा, समाजसेविका; 'नोबेल पारितोषिक' आणि 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित ◆१९२२ - गणेश प्रभाकर प्रधान, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी विचारवंत, पत्रकार व शिक्षणतज्ञ ◆ १९४४ : अनिल अवचट लेखक व सामाजिक कार्यकर्ते 💥 मृत्यू :- ◆१९४८ - कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, मराठी नाटककार, 'केसरी'चे संपादक ◆१९५५ - अ. ना. भालेराव, मुंबई मराठी साहित्य संघाचे संस्थापक ◆१९९९ - नरेंद्रनाथ, भारतीय टेनिसपटू ◆१९५५ - बालन के. नायर, मल्याळी चित्रपट अभिनेते ◆ २०१२ : ए. के. हंगल चित्रपट अभिनेते व स्वातंत्र्यसैनिक संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई : मध्य महाराष्ट्राला झोडपून काढल्यानंतर विश्रांतीवर गेलेला मान्सून आजपासून पुन्हा सक्रिय होणार आहे. २६ ते ३० आॅगस्टदरम्यान मध्य प्रदेश, उत्तर महाराष्ट्र, अहमदाबाद, केरळच्या काही भागांत पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *फ्रान्स- जी-7 ची बैठक कालपासून सुरू, सर्व सदस्य देशांचे राष्ट्राध्यक्ष उपस्थित* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नवी दिल्ली :- केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *चिखलदरा (अमरावती) : मुसळधार पावसामुळे रविवारी सकाळी 10 वाजता सेमाडोह ते माखला मार्गावर मोठ्या दगडासह दरड कोसळल्याने सहा गावांचा संपर्क तुटला. दरड कोसळताना वाहतूक नसल्याने मोठा अनर्थ टळला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *वेस्ट इंडिज दारूण पराभव; भारताने 100 वर केले ऑलआऊट, वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने दूसरा डाव अखेर 7 बाद 343 धावांवर घोषित केला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *अॅशेस 2019 : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस कसोटी मालिकेतील तिसरा सामना इंग्लंडने एक विकेटने जिंकला. बेन स्टोक्सने शतकी झुंज देत 135 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलिच्या तोंडातून विजयाचा घास खेचून आणला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा : भारताच्या पी. व्ही. सिंधूने अखेरीस अंतिम फेरीत तिने जपानच्या नोझोमी ओकुहाराला नमवून सुवर्णपदक आपल्या नावावर केले. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पी व्ही सिंधू ठरली पहिली भारतीय खेळाडू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माझा फळा-माझी लेखणी* हा उपक्रम राबविलेल्या शाळांच्या उपक्रमशील शिक्षकांच्या काही बोलक्या प्रतिक्रिया. ......... https://nasayeotikar.blogspot.com/2019/08/blog-post_25.html *संकल्पना - नासा येवतीकर* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग* -------------------------------------- सह्याद्रीच्या पूर्व पायथ्याशी असणारे हे तीर्थक्षेत्र नाशिक पासून २९ कि. मी. वर आहे. त्र्यंबकेश्वराचे मंदीर हे श्रीमंत बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांनी १७५५ ते १७८६ च्या दरम्यान बांधले. त्याकाळी हे मंदीर बांधण्यासाठी १६ लाख रूपये खर्च आला, आणि साधारणत: ३१ वर्षे मंदिराचे बांधकाम सुरू होते. चार प्रवेशद्वारे असलेल्या, फरसबंदी घातलेल्या एका भव्य आवारामधे ते दिमाखाने उभे आहे. उत्तरेच्या प्रवेशद्वारावर नगारखाना असून पश्चिम प्रवेशाजवळ (साठवणीची) कोठी आहे. मंदिराच्या महाद्वारा समोरच मोठी दीपमाळ आहे. प्रवेशानजिकच असलेल्या, सुबक कोरीव काम केलेल्या खाबांच्या घुमटामधे महानंदी विराजमान झाले आहेत. गर्भगृहासमोर चौसोपी मंडप आहे. *या मंदिरातील शिवलिंगाचे वैशिष्टय म्हणजे हे शिवलिंग बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग मानले जाते तसेच या लिंगाच्या शीर्षामधे सुपारीएवढया आकाराची तीन लिंगे आहेत.* ही लिंगे, ब्रह्मा, विष्णु आणि शिव, म्हणजे, विश्वाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या शक्तींची प्रतिके आहेत. ही लिंगे स्वयंभू असून पवित्र गंगा त्यांना अभिषेक करताना दिसते. हे पंचमुखी आराध्य दैवत इथे दिवसातून तीन वेळा पूजिले जाते. मुघलांकडून मिळवलेला पाचू-हिरे जडित मुकूट भाऊसाहेब पेशवे यांनी श्रीं चे चरणी अर्पण केला आहे. हा मुकूट मोघलांनी म्हैसूरच्या राजाकडून बळकावला होता. रुद्र, रुद्री, लघुरुद्र, महारुद्र किंवा अतिरुद्र यांचे पठन करुन त्र्यंबकेश्वरीचा हा शिव पूजला जातो. रुद्राक्षाला धार्मिक महत्व असून भगवान शिवाच्या गळयात रुद्राक्षांची माळ असते. रूद्राक्ष हे फळ असून त्याची झाडे त्र्यंबकेश्वर येथे आढळतात. *त्र्यंबकेश्वर येथील धार्मिक उत्सव :* १) सिंहस्थ कुंभमेळा : सर्वसाधारणपणे १२ वर्षांतून एकदा, जेंव्हा गुरू हा ग्रह सिंहराशीमधे, (लिओ) असतो. २) गोदावरी दिन : माघ (फेब्रुवारी) महिन्यातील शुध्द पक्षातील तेजस्वी चंद्रप्रकाशाचे, पहिले बारा दिवस. ३) निवृत्तीनाथ उत्सव : पौष मासातील तीन दिवस, सर्वसाधारणपणे, जानेवारीमधे हा उत्सव येतो. ४) त्र्यंबकश्वरची रथयात्रा : कार्तिक पौर्णिमेस, म्हणजेच त्रिपुरी पौर्णिमेस येणारी यात्रा. ५) महाशिवरात्री : माघ कृष्ण त्रयोदशीस. साधारणपणे मार्च महिन्यात येते. ---------------------------------- *त्र्यंबकेश्वरला कसे जाल?* ----------------------------------- हवाईमार्ग - जवळचे विमानतळ नाशिक. ३९ कि.मी. रेल्वेमार्ग - जवळचे रेल्वेस्थानक नाशिकरोड, मध्यरेल्वे पासून ४० कि.मी. अंतरावर. बसमार्ग - मुंबई- त्र्यंबकेश्वर १८० कि.मी, पुणे - त्र्यंबकेश्वर २०० कि.मी नाशिक-त्र्यंबकेश्वर २९ कि.मी. नाशिकच्या मध्यवर्ती बसस्थानकापासून नाशिक-त्र्यंबकेश्वर अशा एस. टी. महामंडळाच्या गाडया दर अर्ध्या तासाने चालू असतात. त्र्यंबकेश्वर हे नाशिकरोड रेल्वे स्टेशनपासून ४० कि.मी अंतरावर आहे. त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी बस व टॅक्सी उपलब्ध असतात. तेथे सोयी सुविधांनी युक्त अशा धर्मशाळा मिळतात. तसेच तेथील क्षेत्रोपाध्याय आवश्यकतेनुसार रहाण्याची व खाण्याची सोय करतात. *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ज्या माणसाजवळ संयम आहे तो प्रत्येक गोष्टीचा धनी असतो.”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *उडीसा या राज्याचा राज्यपक्षी कोणता ?* मोर 2) *शिवाजी महाराजाची समाधी स्थळ कोठे आहे ?* रायगड 3) *तापमापकामध्ये कशाचा वापर करतात ?* पारा 4) *तंबाखूमध्ये सर्वात जास्त विषारी पदार्थ कोणता ?* निकोटिन 5) *भारतीय खेळातील सर्वात मोठा पुरस्कार कोणता ?* राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● दिगंबर खपाटे बन्नाळीकर ● प्रशांत इबितवार येवती ● संदीप आवरे चिकना ● विशाल कन्हेरकर अमरावती ● नारायण शिंदे, रत्नागिरी ● प्रशांत कोकणे ● मधुकर बोईनवाड ● संदीप सोनकांबळे ● सुमेध वाघमारे ● मारोती ताकलोर ● दत्ता बोंदलवाड ● अभय रन्नावरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपल्या लहानपणी मुलांचं रडणं थांबविण्यासाठी कचकडी खुळखुळा होता. तो बाळाचे रडणे थांबवून त्याला हसरा करायचा. आता त्या खुळखुळ्याची जागा मोबाइलने घेतली आहे. कचकडी खुळखुळा बाळ लहान असेपर्यंत उपयोगी होता, मात्र हा नवा खुळखुळा माणसाच्या जन्मापासून मरेपर्यंत हाती राहतोय, असं दिसतयं. कचकडी खुळखुळ्यात नाद निर्माण करणारे खडे भरलेले असायचे. मोबाइलनामक खुळखुळ्यात नादाला लावणारे अॅप्स भरलेले असतात. हा खुळखुळा व्हिडीओ गेमचा नाद लावतो. हळूहळू फोन करायला शिकवतो, व्हाॅटस् अॅप शिकवतो, आठवीला गेला की 'मिस् काॅल' देऊ लागतो. युवापिढी रात्र-रात्र जागून चॅट करू लागते.* *माणूस कमवायला लागला की, मग तोंड लपवून 'फेसबुक' वर बाता मारू लागतो. लग्न झाले की, फेक अकाउंटवरून ह्रदय आणि मन मोकळं करत राहतो. कधी लाईक, कधी कमिंट, असं व्यक्त-अव्यक्त अभासी जगात जगू लागतो. गुड माॅर्निंग, गुड इव्हिनिंग, स्वीट ड्रीम, काँग्रॅट्स करत लक्षात येतं की, हे सारं झूट ! अवतीभवती संदेश, शुभेच्छा, सहवेदनांचा पाऊस; पण प्रत्यक्ष नक्षत्र मात्र कोरडंच ! अभासी जगात वाढलेली पिढी कोरडे जग जगताना आपण अनेकदा पाहतो. खरे पाहिले तर खुळखुळा, मोबाइल हे सारे त्या त्या काळातील अभासी भावच ! माणूस भावाचा भुकेला असतो. अभासी, भोगी संस्कृतीच्या जागी वास्तव, संवेदी, जीवाभावाची संस्कृती जपायची तर प्रसंगी जीव देऊन भाव, संबंध, नाते जपणे, जोपासणे म्हणजेच खरं जगणं !!!* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ☀☀ ☀ ☀ ☀ ☀☀☀ *श्री. संजय नलावडे,मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लहान मुले खरच निरागस असतात.* *आईला म्हणतात,* *रोज चांगली बुद्धी दे,* *सांगतो आपण ज्याला।* *सांग ना ग आई,* *कुणी पाहिलंय का देवाला.* *अशा वेळी निरागस बाळाला असे* *सांगा की--* *देवाने तर पहिलेच सांगून ठेवले* *आहे. माझ्याकडे मागून* *मिळालं असतं.* *तर, भिकाऱ्याला "भिक" आणि* *शेतकऱ्याला "पीक"* *कधीच कमी पडू दिलं नसतं.* *आणि बेरोजगाराना "नोकऱ्या" कमी पडू दिल्या नसत्या.* *निसर्गाचा नियम आहे जे पेरणार तेच उगवणार* *त्यासाठी माणसाने श्रमाने कष्ट करणे हेच कर्म आहे..!* *फक्त निवडलेला "रस्ता" जर "इमानदारीचा" व सुंदर विचाराने मंतरलेला असेल* *तर,"थकुन" जाण्याचा प्रश्नच "उरत" नाही.* *भले "सोबत" कुणी असो वा नसो..!* **पण... एक नक्की मनापासून* *कुठलही काम* *करण्यापूर्वी, आपल्या चांगल्या* " *कर्माची" आठवण काढा, प्रत्यक्षात* *निसर्ग तुमच्या पाठीशी** *असेल...!* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* *जि.प.शाळा--माणिकखांब,* *ता.इगतपुरी, जि. नासिक* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जीवनात दुःख किती जरी असले तरी ज्याच्यामध्ये सहन करण्याची क्षमता आहे तोच आपल्या जीवनात दुःखावर मात करुन यशस्वी होऊ शकतो . © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद - ९४२१८३९५९० 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *क्रोधाला संयमाने जिंका* एकदा भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि सात्यकी हे तिघे जंगलातून जात असताना रात्रीच्या वेळी काहीच न कळाल्याने रस्ता चुकले. जंगल घनदाट होते, तेथे न पुढे जाण्याचा मार्ग दिसत होता ना मागे येण्याचा. तेव्हा तिघांनीही असा निर्णय घेतला आता येथेच एखादी सुरक्षित जागा पाहून विश्राम करायचा आणि सकाळी उठून मार्गस्थ व्हायचे. तिघेही दमलेले होते पण प्रत्येकाने थोडा थोडा वेळ पहारा देण्याचे ठरवले. पहिली पाळी सात्यकीची होती. सात्यकी पहारा करू लागला तेव्हाच झाडावरून एका पिशाच्चाने हे पाहिले की एक माणूस पहारा करतो आहे आणि दोनजण झोपले आहेत. पिशाच्च झाडावरून खाली उतरले व सात्यकीला मल्लयुद्धासाठी बोलावू लागले. पिशाच्चाने बोलावलेले पाहून सात्यकी संतापला व क्रोधाने पिशाच्चावर धावून गेला. त्याक्षणी पिशाच्चाचा आकार बदलला व तो मोठा झाला. दोघांत तुंबळ मल्लयुद्ध झाले. पण जेव्हा जेव्हा सात्यकीला क्रोध येई तेव्हा तेव्हा पिशाच्चाचा आकार मोठा होई व ते सात्यकीला अजूनच जास्त जखमा करत असे. एका प्रहरानंतर बलराम जागे झाले व त्यांनी सात्यकीला झोपण्यास सांगितले. सात्यकिने त्यांना पिशाच्चाबदल काहीच सांगितले नाही. बलरामांनाही पिशाच्चाने मल्लयुद्धास निमंत्रण दिले. बलराम पण क्रोधाने पिशाच्चाशी लढायला गेले तर त्याचा आकार हा वाढलेला त्यांना दिसून आला. ते जितक्या क्रोधाने त्याला मारायला जात तितका त्या पिशाच्चाचा आकार मोठा होत असे. शेवटी तोही प्रहर संपला व आता पहा-याची पाळी भगवान श्रीकृष्णाची होती. पिशाच्चाने मोठ्या क्रोधाने श्रीकृष्णांना आव्हान दिले पण श्रीकृष्ण शांतपणे मंदस्मित करत त्याच्याकडे पहात राहिले. पिशाच्च अजून संतापले व मोठमोठ्याने ओरडून श्रीकृष्णांना बोलावू लागले पण श्रीकृष्ण मंदस्मित करत शांत भाव जपत राहिले व एक आश्चर्य झाले ते म्हणजे जसे जसे पिशाच्चाला क्रोध येऊ लागला तसतसा त्याचा आकार लहान होत गेला. रात्र संपत गेली अन पहाट झाली शेवटी आकार लहान होत होत पिशाच्चाचा एक छोटासा किडा झाला व श्रीकृष्णांनी अलगद त्याला आपल्या उपरण्यात बांधून ठेवले. सकाळी सात्यकी व बलरामांनी रात्रीची कहाणी सांगताच श्रीकृष्णांनी तो किडा त्यांना दाखविला व म्हणाले,’’ तुम्ही क्रोधाने याला कधीच जिंकू शकत नव्हता कारण हे क्रोधाचे पिशाच्च होते. त्याला शांती हेच औषध आहे. क्रोधाने क्रोध वाढतो मात्र त्याचा प्रतिकार हा केवळ शांतभाव प्रकटीकरणाने होतो. मी शांत राहिलो म्हणून हे पिशाच्च बघा कसे आता या किड्यासारखे लहान होऊन बसले आहे.’’ तात्पर्य : क्रोधावर संयमानेच विजय मिळविता येतो. क्रोधाला क्रोधाने मारता येऊ शकत नाही तर शांतपणे, प्रेमानेच कमी करता येते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 24/08/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ◆१९६६ - विक्रमवीर भारतीय जलतरणपटू मिहीर सेन यांनी जिब्राल्टरची सामुद्रधुनी पोहून पार केली. ◆१९९५ - मायक्रोसॉफ्टने विन्डोज ९५ ही संगणकप्रणाली प्रकाशित केली. 💥 जन्म :- ◆१८३३ - नर्मदाशंकर दवे, गुजराती साहित्यिक व समाजसुधारक. ◆१८७२ - न. चिं. केळकर (नरसिंह चिंतामण केळकर), मराठी साहित्यिक; 'मराठा', केसरी वृत्तपत्रांचे संपादक. ◆ १९०८ - हुतात्मा शिवराम हरी राजगुरु, भारतीय क्रांतिकारक. 💥 मृत्यू :- ◆१९२५ - डॉ. रा. गो. भांडारकर (रामकृष्ण गोपाळ भांडारकर), प्राच्यविद्या संशोधक, शिक्षणतज्ज्ञ ◆ १९९३ - प्रा. दि. ब. देवधर, भारतीय क्रिकेट खेळाडू ◆ २००८ - वै वै, चिनी भाषेमधील कवी, लेखक, पत्रकार. अहिल्याबाई होळकर , होळकर घराण्यातील राज्यकर्ती, परम शिवभक्त *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *भिवंडी : इरानी पाडा येथीच चार मजली इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली 10-15 जण अडकल्याची शक्यता, घटनास्थळी बचाव पथक दाखल.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *गोव्यात किमान दहा हजार ग्राहकांना सौर ऊर्जेकडे वळविण्याचे उद्दिष्ट असल्याचे गोव्याचे पर्यावरणमंत्री निलेश काब्राल यांनी सांगितले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *अनेक मोठ्या कंपन्यांना मंदीचं ग्रहण लागताना दिसतंय. हजारो कर्मचाऱ्यांची कपात केली जातेय. त्यामुळे जनताही धास्तावलीय, देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या १२ घोषणा!* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील पूर्व, दक्षिण भागात कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग झाला यशस्वी, सायंकाळी चार वाजता कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी विमानांनी ढगांवर रसायनाची फवारणी केली. त्यानंतर दमदार पावसाने हजेरी लावली आहे. दीड तास झालेल्या या पावसाने तालुक्यातील बंधारे ओसंडून वाहिले आहेत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *अनाथ मुलांच्या नोंदणीसाठी 'सरल पोर्टल' वर नवा पर्याय उपलब्ध; शासनाने काढलं परिपत्रक, सरल पोर्टलमध्ये अनाथ विद्यार्थ्यांसाठी आईवडील यांचे नाव माहित नसल्याने मधले नाव Not known अशी सुविधा होणार उपलब्ध* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *लंडन, अॅशेस 2019 : ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा पहिल्या डावात फक्त 67 धावांत उडविला खुर्दा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *अँटिग्वा, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पहिल्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणे पाठोपाठ अष्टपैलू रवींद्र जडेजाने अर्धशतक झळकावल्यामुळे भारताच्या पहिल्या डावात 297 धावा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सोशल मीडिया आणि आधार* https://nasayeotikar.blogspot.com/2019/08/blog-post_23.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया खालील क्रमांकवर जरूर द्यावे ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *उल्कापात म्हणजे काय ?* 📙 रात्रीच्या वेळी शिळोप्याच्या गप्पा रंगल्या असताना निरभ्र आकाशात अचानक एखादा चमकदार पदार्थ झळाळत निखळताना दिसतो. सगळ्यांचेच लक्ष तिकडे वळते. पण हा झळाळणारा पांढराशुभ्र चमकदार पदार्थ पृथ्वीच्या नजीक आल्यावर दिसेनासाही होतो. हा असतो उल्कापातातला एक छोटासा तुकडा. पृथ्वीवर दरवर्षीच अनेक वेळा लहान मोठ्या उल्का कोसळत असतात. त्यांच्याबद्दल विविध अंदाज व्यक्त होतात. पृथ्वीपर्यंत पोहोचणाऱ्या उल्कांचा आकडा लक्षात घेतला तर रोज एखाद दुसरी उल्का जमिनीपर्यंत पोहोचते. पण न पोहोचणाऱ्या त्यापेक्षा कितीतरी जास्त असतात. त्या वातावरणात होणाऱ्या घर्षणाने तापून प्रकाशमान होतात, वितळतात व नंतर त्यांची वाफ होऊन वातावरणातच नष्ट पावतात. खऱ्या अर्थाने एखादी मोठी उल्का येथे येऊन आदळण्याचे प्रकारही अनेकदा घडले आहेत. असा सर्वात मोठा ज्ञात प्रकार अॅरिझोना या अमेरिकेतील राज्यात घडला असावा. किमान पंचवीस हजार वर्षांपूर्वी घडलेल्या या उल्कापातातील उल्केचे वजन पन्नास हजार टन असावे. यामुळे निर्माण झालेला खळगाच मुळी सव्वा किलोमीटर व्यासाचा आहे. भारतात लोणारचे तळे याच पद्धतीने तयार झाले असावे, असा अंदाज व्यक्त केला जातो. उल्कापाताने निर्माण झालेले खड्डे हे चंद्रावर तर ठायीठायी आढळतात. ऑस्ट्रेलिया व ब्राझीलमध्ये असे मोठाले उल्कापात अलीकडच्या शतकात झाले आहेत. उल्कापातातील दगड हे पृथ्वीवरच्या दगडांपेक्षा एकदम वेगळे असल्याने त्याबद्दल शास्त्रज्ञांना कुतूहल वाटत आले आहे. काही पूर्णत: लोहाचे काही पूर्णत: शिलांचे तर काहींमध्ये मिश्रा असे हे दगड असतात. सूर्य व ग्रहमालिका तयार झाली त्या वेळी काही अवशेष अवकाशातच भिरभिरत राहिले. त्यांतील काही शिळा, काही धूर, तर काही वायूरूप अवस्थेत आहेत. ग्रहांच्या आकर्षणाने ते ज्यावेळी कक्षेत खेचले जातात तेव्हा उल्कापात घडतात. पृथ्वीचे परिभ्रमण चालू असताना काही वेळा एखाद्या अशा धुळीच्या लोटातून पृथ्वी जाते. अनेक छोटेमोठे उल्कापात या वेळी होतात. गारांचा सडा पडावा तशा या छोट्यामोठ्या उल्का वातावरणात येतात; पण त्यांतील बहुसंख्य तेथेच वितळून चकाकत नष्ट होऊन जातात. पृथ्वीवर समुद्रात कोसळणाऱ्या उल्कांचा तर पत्ताच लागत नाही व अशांचा आकडा फार मोठा असणार आहे. उल्कांचा संग्रह करणारे अनेकजण आहेत. हा एक तेजीत चालणारा व्यवसाय आहे. उल्का वा पृथ्वीवरच्या दगड ही जाण त्यासाठी असणे ही प्रमुख अट. येथेच बरेचजण गळतात. त्यानंतर यासाठी करावी लागणारी वणवण व त्याला लागणारा अफाट पैसा ही दुसरी अडचण. तिसरी अडचण विविध देशांचे कायदे. पण यावरही मात करून अनेकजण ही हौस भागवतात, तर काहीजण यातूनच पैसा करतात. मोठ्या आकाराच्या उल्केला कित्येक हजार रुपयांची मागणी सतत असते, हे विशेष. उल्कापाताचा एक मोठा अंदाज फार पुरातन काळी झालेल्या उलथापालथीशी नेहमीच जोडला जातो. या महाप्रचंड उल्कापातानेच पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात धूर, धूळ साचून सूर्यप्रकाश पोहोचायला अडथळा झाला असावा व येथील प्राणीजीवन खूपसे नष्ट झाले असावे, असे काहींचे म्हणणे आहे. डायनॉसॉर जातीचे महाकाय प्राणी किंवा सरपटणाऱ्या जाती यातच उपासमार होऊन नष्ट झाल्या असाव्यात, असे मानले जाते. या अंदाजाला पुष्टी देणारा त्या उल्कापाताचा मोठ्या आकाराचा पुरावा मात्र मिळत नाही, ही या अंदाजातील कमतरता म्हणावी लागते. तुम्ही राहता त्या गावातील संग्रहालयात एखादी उल्का आहे का याची चौकशी करा. नसल्यास कुठे बघायला मिळेल, याची माहिती संग्रहालयाच्या प्रमुखांना विचारा. चंद्रावरील आणलेले काही दगड नील आर्मस्ट्राँग यांनी आपल्या देशाला भेट दिले आहेत, हे ज्ञात आहे का ? *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ विश्वास हा जबरदस्तीने निर्माण करण्यासारखी गोष्ट नाही. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारतात केंद्रशासित प्रदेशांची संख्या किती आहे ?* 9 2) *'दासबोध' हा ग्रंथ कोणी लिहिला ?* समर्थ रामदास 3) *शिवाजीने स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा कोणत्या मंदिरात घेतली ?* रायरेश्वर मंदिर 4) *महाराष्ट्रातील शैक्षणिक शहर कोणते ?* पुणे 5) *पहिले सजीव कोठे निर्माण झाले ?* पाण्यात *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● श्याम ठाणेदार, पुणे ● श्रीकांत भुजबळ साहेब ● हणमंत बोलचेटवार ● संजय पाटील, पुणे ● ऋषिकेश शिंदे ● गोपाल ऐनवाले ● सुनीलकुमार बावसकर ● प्रितिष पाटील ● भाऊराव शिंदे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सारा अंधारच प्यावा* *अशी लागावी तहान ॥* *एका साध्या सत्यासाठी* *देता यावे पंचप्राण ॥* *असं जगावेगळ पसायदान कवी म.म.देशपांडे यांनी 'तहान' या कवितेत मागितलं आहे. त्याचं तीव्रतेने स्मरण व्हावं अशी परिस्थिती आज आपल्या देशात आहे. कोणत्याही क्षेत्राकडे जा सारा अंधार आहे. अपवाद वगळले तर वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातून सत्य हद्दपार झालेलं आहे. असत्याच्या अंधारात संवेदनशील मनाची घुसमट होत आहे. 'सत्यमेव जयते' ही या देशाची घोषमुद्रा आहे. तथापि समाजाचं, देशाचं नेतृत्व करणा-यांपासून तर रूग्णांची सेवा करण्याची शपथ घेतलेल्या डाॅक्टरांपर्यत सर्वांनी तिचे पदोपदी धिंडवडे काढले आहेत. सर्वच क्षेत्रात असत्यानं, अप्रमाणिक वृत्तीनं थैमान घातलं आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतमातेची दु:स्थिती आधिकच चिंतनीय झाली आहे. 'सत्य हे जीवनमूल्य लोप पावत आहे. 'असत्य' उजळ माथ्यानं वावरत आहे.* *खरंतर सत्य, सत्याचा शोध, सत्याचा उद्धार आणि आचरण, सत्याचा पुरस्कार याला वैभवशाली परंपरा आहे. भीष्मनिती सांगते, 'सत्य हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे. माणसाचा सर्वश्रेष्ठ आधार आहे. शाश्वत कर्तव्य आहे. आसक्तीचं जाळ फक्त सत्यच तोडू शकतं. सत्य म्हणजेच अमरत्व. सत्यासाठी केलेला त्याग मानवी जीवनात सर्वश्रेष्ठ आनंदाचा उगम असतो. सदाचरणी माणूसच इतरांच्या हितासाठी दक्ष असतो आणि या मार्गानंच त्याचं स्वत:चही हित साधलं जातं. सत्यासारखं तप, पुण्य नाही. असत्यासारखं पाप नाही. ज्याच्या ह्रदयात सत्य असतं त्याच्या ह्रदयात परमशक्ती वास करते.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *काही जण म्हणतात* *काय कुठे संपल्या वेदना।* *पुन्हा नवा अवतार कशाला,* *जन्म दिला जर एकटीने मग ,* *नेणारे हे चार कशाला।* *खर वाटत नेहमी-----* *_जन्मापासुन शेवटच्या क्षणापर्यंत नुसते राबराब राबणे म्हणजे आयुष्य नाही ..._* *_स्वतःच्या समाधानासाठी आनंदाने जगणे म्हणजे खऱ्या अर्थाने आयुष्य होय ..._* *_वयाला हरवायचे असेल तर आपले छंद जिवंत ठेवले पाहिजेत ..._* *_मानलं तर मौज ..._* *_नाहीतर समस्या रोज ...!!!_* *स्वप्ने अशी बघा की पंखांना बळ* *येईल* *मैत्री अशी करा की जग आपले* *होईल* *अपयश असे स्वीकारा की विजेता* *भारावून जाईल* *माणुस असे बना की माणुसकी* *नतमस्तक* *होईल..!* ! *वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार** *आणि पिके जळून गेल्यावर पडलेला* *पाऊस यांची किंमत सारखीच असते*. *डोळे बंद केले म्हणून*......... *संकट जात नाही .* *आणि संकट आल्या शिवाय ,..* *डोळे उघडत नाहीत.* *राग आल्यावर थोडं थांबलं,..* *आणि चूक झाल्यावर थोडं नमलं,..........* *तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात .....* *🙏अशोक कुमावत🙏* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• नाते असे तयार करा की,ती शेवटपर्यंत कायम टिकून राहिली पाहिजे.जर असे नाते बनवायचे असतील तर पहिल्यांदा आपल्या मनातील स्वार्थीपणाला तिलांजली द्यायला हवी आणि त्याबरोबरच प्रेम,जिव्हाळा,मैत्री, आपुलकी इ.गुणांना प्राधान्य देऊन खरे माणुसकीचे दर्शन निर्माण करुन जो काही एकमेकांतला असलेला दूरावा दूर करून एक अजोड आणि अतूट नाते निर्माण करायला शिकले पाहिजे तरच आपल्या मानवी जीवनाला खरा अर्थ प्राप्त होईल यात शंकाच नाही. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मानवता* जगाच्या मोहपाशातून विरक्त होऊन एक संत आपल्या कुटीत ईश्वराचे चिंतन करत कंदमुळे खाऊन आनंदात जगत होते. ते कुणालाही भेटत नसत किंवा त्यांच्याकडेही कुणी येत जात नसे. एके दिवशी संत खूप आजारी पडले लोकांनी त्यांच्यावर बरेच उपचार केले परंतु यश आले नाही. अखेरीस संतांनी देह ठेवला. मृत्यूनंतर ते जेव्हा स्वर्गात पोहोचले तेव्हा त्यांना सोन्याचा मुकुट घालण्यात आला. तसेच तेथे दुसरेही एक संत आले होते त्यांच्या डोक्यावर हिरेजडीत मुकुट होता. हे पाहून सोन्याचा मुकुट घालणा-या संताना खूप दु:ख झाले. त्यांनी देवदूताला विचारले की, मी संतत्वात कोणत्याच दृष्टीकोनातून कमी नाही तरीही मला सोन्याचा मुकुट व त्या संतांना हि-याचा मुकुट असा भेदभाव का? असा भेदभाव स्वर्गात तरी अभिप्रेत नाही. त्यांचे बोलून झाल्यावर देवदूत म्हणाला,’’ तुम्ही पृथ्वीवर हिरे माणके दिलेली नव्हती तेव्हा तुम्हाला इथे ती कुठून मिळतील?’’ संतांनी विचारले,’’त्या संतानी दिली होती काय?’’ देवदूताने होय असे उत्तर दिले. देवदूत पुढे म्हणाला,’’वास्तवात हिरे-माणकं म्हणजे अश्रू होते. जे त्यांनी संसार करताना गाळले होते. जगात घडणा-या प्रत्येक वाईट गोष्टीबद्दल त्यांना वाईट वाटले व त्याबद्दल त्यांच्या डोळ्यातून अश्रू ढळले होते. मात्र तुम्ही एक टिपूसही गाळला नाही.’’ संत म्हणाले,’’ मी कशाला अश्रू गाळू? मी तर ईश्वरभक्ती आणि स्नेह यातच खूप आनंदी होतो म्हणून मला कधी दु:ख जाणवलेच नाही.’’ देवदूत म्हणाला,’’ तुम्हाला ईश्वराचा स्नेह मिळाला म्हणूनच तुम्हाला ईश्वराचा सोन्याचा मुकुट देण्यात आला आहे.’’संताना स्वत:ची चुक समजली. ते स्वत:मध्येच मशगुल राहिले. त्यांना सभोवतालचे दु:ख कधीच दिसले नाही. *तात्पर्य :- ईश्वरभक्तीबरोबरच दु:खात इतरांना मदत करणे हीच मानवता होय.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 23/08/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ◆ २०१२- राजस्थानात अतिवृष्टीमुळे ३० जण ठार. ◆ १९६६- 'लुनार ऑरबिटर -१' या मानवरहीत अंतराळ यानाने चंद्रावरून पहिल्यांदाच पृथ्वीची छायाचित्रे पाठविले. ◆ १९१४ - पहिले महायुद्ध - जपानने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले व चीनच्या किंग्दाओ शहरावर बॉम्बफेक केली. ◆१९२९ - हेब्रॉन हत्याकांड - हेब्रॉन शहरात अरब दहशतवाद्यांनी सुमारे ६५ ज्यू व्यक्तींना ठार मारले व उरलेल्यांची हकालपट्टी केली. 💥 जन्म :- ◆१९७३ - मलाइका अरोरा, हिंदी चित्रपट अभिनेत्री. ◆ १९४४- सायरा बानू ,हिन्दी चित्रपट अभिनेत्री. ◆ १९१८- विदा करंदीकर, लेखक,कवी. 💥 मृत्यू :- ◆१९९४- आरती साहा, इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतरण पटू. ◆ १३८७ - ओलाफ चौथा, नॉर्वेचा राजा. ◆१८०६ - चार्ल्स ऑगुस्तिन दि कूलंब, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *सोलापूर : शहर पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांची नांदेड पोलीस अधीक्षकपदी बदली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *अॅमेझॉनच्या जंगलातील आग धुमसतीच, ब्राझीलमध्ये भरदिवसा अंधार, 2700 चौरस किमी क्षेत्र प्रभावित* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदित्य ठाकरेंनंतर आता खासदार सुप्रिया सुळे यांची यात्रा, 23 ऑगस्टपासून सुप्रिया यांचा राज्यव्यापी संवाद दौरा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *माजी पंतप्रधान मोरारजी देसाईंना दिलेला 'भारतरत्न' काढून घेण्याची मागणी करणारी याचिका 'अर्थहीन', मुंबई उच्च न्यायालयाने याचिका दाखल करणाऱ्या वकिलाला 50 हजारांचा ठोठावला दंड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *औरंगाबाद-जालना विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे अंबादास दानवे विजयी, आघाडीच्या बाबूराव कुलकर्णी यांचा 418 मतांनी पराभव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पुणे - बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज हाेणार जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *विक्रम राठोड होणार भारताचे नवीन फलंदाजी प्रशिक्षक, त्याबरोबर गोलंदाजी प्रशिक्षपदी भारत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदी श्रीधर यांना कायम ठेवण्यात आले आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एक रविवार : एक चित्रकार* अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लीक करावे. https://aksharmaanav.blogspot.com/2019/08/blog-post_22.html?m=1 *अक्षर मानव* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *ऊती किंवा पेशीजाल म्हणजे काय ?* 📙 जगातील सर्व सजीवांचे शरीर अतिशय सूक्ष्म अशा पेशींनी तयार झालेले असते. केवळ सूक्ष्मदर्शक यंत्राच्या साहाय्याने या पेशी आपण पाहू शकतो. एखादे घर जसे असंख्य चिरेबंदी दगड किंवा विटांनी बांधले जाते तसेच कार्य येथे पेशी करत असतात. प्रत्येक पेशी ही तीन घटकांनी संपन्न होते. पेशीचे आवरण, पेशीद्रव, केंद्रक हे ते घटक. वनस्पतीपेशीत आवरण जास्त घट्ट असलेल्या पेशीद्रवाचे बनते. तसे प्राणिजपेशीत आढळत नाही. प्रत्येक पेशीला अन्न, प्राणी व प्राणवायू लागतो. तसेच जन्म, वाढ, कार्य व ठरावीक काळाने मृत्यू हे चक्र ठरलेलेच असते. पेशींची पूर्ण वाढ झाली की केंद्रकाचे दोन भाग होतात व पेशींचे द्विभाजन सुरू होते. पेशीद्रव प्रत्येक तुकड्याभोवती गोळा होऊन ही क्रिया पूर्ण होते. पेशीविभाजन सतत चालू असल्याने प्राण्याच्या शरीराला पेशींचा सतत पुरवठा चालू राहतो. या पेशी विभाजनाला एकच अपवाद आहे. तो म्हणजे मेंदूच्या पेशी. त्यांची संख्या जन्मत:च निश्चित असते. त्यात वयानुसार फक्त घटच होत जाते. जरी प्राणी व मानव एकाच बीजाच्या फलितातुन जन्माला येत असला तरी बीजांडफलनाच्या क्षणी मूळ पेशी (स्टेम सेल) फलित अंड्याच्या अंतर्भागात अस्तित्वात असतात. त्यातून शरीरात निरनिराळी कार्य करणाऱ्या निरनिराळ्या आकारांच्या पेशींची निर्मिती केली जाते. अशा पेशींच्या विशिष्ट कार्य करणाऱ्या समूहाला ऊती किंवा 'पेशीजाल' असे म्हटले जाते. अस्थिपेशी, ग्रंथीपेशी, स्नायूपेशी, रक्तातील पांढऱ्या व तांबड्या पेशी, चरबीच्या पेशी, आच्छादक पेशी, संयोगी पांढरे तंतू, संयोगी लवचिक तंतू व मज्जापेशी अशी नावाप्रमाणेच विशिष्ट कार्ये या विशिष्ट पेशीजालाकडून पार पडतात. याखेरीज शरीरातील महत्त्वाचा अवयव म्हणजे डोळा, हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुप्फुसे, त्वचा यांची निर्मिती त्यांच्या कार्याला अनुरूप अशा पेशीजालातून केली जाते. उदाहरणार्थ, यकृतपेशी फक्त पित्तनिर्मिती करतात. मूत्रपिंडात नेफ्रॉन समूह मूत्रनिर्मिती करतो, हृदयाचे स्नायू जन्मापासून अखेरपर्यंत सतत कार्यरत राहतात. ऊती वा पेशीजालाच्या पुनर्निर्माणावर दोन पद्धतीत नियंत्रण असते. कुठेही इजा झाली, कापले व अंतर्गत इंद्रियांमध्ये बिघाड झाला, तर तेथील रक्तपुरवठ्याद्वारे यावर तातडीने मदतीला सुरुवात होते. कापल्याजागी खपली धरणे हे यांचे पहिले स्वरूप. नंतर यथावकाश त्वचेचा थर पुन्हा आच्छादला जातो. यकृताचे व त्वचेचे पेशीजाल या बाबतीत अत्यंत जागरूक असते. याउलट अस्थिपेशीजाल या पुनर्निर्मितीसाठी काही आठवडे घेतात. तुटलेली हाडे जोडायला शरीर सहा ते दहा आठवडे घेते, मात्र शस्त्रक्रियेनंतरचे टाके सातव्या दिवशीही काढता येतात. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायलाच हवी. फार मोठ्या पेशीजालाचा नाश झाल्यास त्यांची जागा तशाच ऊती वा पेशीजाल्याने कधीच भरली जात नाही. यावेळी फक्त अच्छादनाचे वा मुत्रपेशींची जागा भरून काढण्याचे काम विशिष्ट प्रकारचा तंतुयुक्त पेशींद्वारे केले जाते. शरीरावरचे मोठे कायम राहणारे व्रण, शरीरातील मोठा अवयव काढला तर त्या जागी भरून येणारे पेशीजाल हे विशिष्ट कार्य करीत नाही, तर फक्त जागा भरून काढते. एकाच प्रकारचे कार्य करणाऱ्या ऊतींचा संचय इंद्रियाचे कार्य करतो. संपूर्ण शरीरातील गुंतागुंतीची अनेक कार्ये विशिष्ट प्रकारच्या ऊती वा पेशीजालांनी सहजपणे पार पडतात; पण या साऱ्यांची निर्मिती मात्र काही मोजक्या मूळ पेशींतून होते, हे निसर्गाचेच एक गुपित आहे. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ ज्याला आवडीचे कार्य करायला मिळते तो भाग्यवान होय. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *समर्थ रामदासाचे मूळनाव काय होते ?* नारायण 2) *शिवाजीचे 'शिवाजी' हे नाव कशावरून ठेवले ?* शिवनेरी किल्यावर जन्म झाला म्हणून 3) *राष्ट्रध्वजावरील कोणता रंग त्यागाचे प्रतीक आहे ?* केशरी 4) *महाराष्ट्रातील सर्वात मोठा उद्योग कोणता ?* कापड 5) *भारतातील मानव निर्मित सर्वात मोठी वास्तू कोणती ?* ताजमहाल *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● सचिन बोरसे ● आनंद यादव ● अनिलकुमार शिंदे ● रामदास पेंडपवार, ● सुनील बेंडे ● भारत सर्वे ● भोजन्ना चिंचलोड ● बाबुराव पिराईवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खरंतर मनाच्या कुपीत अत्तरासारखा जपून ठेवावा, असा अनमोल ठेवा असतो 'घर.' परस्परांशी लळा लागला की जुळून आलेले जन्माचे ऋणानुबंध घराला घरपण देतात. मग घरच मंदिर होऊन जातं. एकमेकांच्या स्वप्नांसाठी प्रार्थनेच्या स्वरांनी भरलेली घरं कुणालाही हवीहवीशी वाटतात. काही घरांची दारं मात्र सदैव बंद असतात. मनाची कवाडं जिथं बंद असतील, तिथं घराची कवाडं कशी उघडतील? अशा घरांच्या उंचीवरून घरातल्या रास्त आनंदाची मोजदाद होत नसते. तर आनंद हाच घरांचा, तिथल्या माणसांच्या उंचीचा मापदंड असतो. ज्या घरात कटुतेच्या भारानं मनं गुदमरलेली असतात, त्या घरातला प्रपंच सुखाचा कसा होईल?* *कृत्रिम वस्तूंच्या, बेगडी जगण्याच्या मायावी जाळ्यात अडकत चाललो आहोत का आपण? हे जाळं भल्याभल्यांना मोहवतं. घर जर आपुलकीवर, माया-ममतेच्या भिंतींवर उभं असेल तर येत्या जात्या वाटसरूंनाही ते आपलं वाटतं. जिथं तृप्तीची वीणा झंकारत असते. माझ्या घरातली सारी माणसं माझी आहेत ही भावनाच सा-यांना जोडून ठेवते. अशा मनस्वी माणसांच्या अस्तित्वाचं सर्वांना आकर्षण असतं, चुंबकासारखं. सुखी संसार त्याचीच परिणती असते. ही अथांग तृप्तीची गोळाबेरीज संपत्तीच्या पलिकडची असते."साधे गवत फुलण्याला सुख म्हटले मी, सहज भेटलेल्या जगण्याला सुख म्हटले मी, अवती भवती झगमगती नक्षत्रे होती, पण वातीच्या जळण्याला सुख म्हटले मी"* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ☀☀☀☀☀☀☀☀☀ संजय नलावडे, मुंबई •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *जीवन तर युद्धभूमी आहेच हे* *सर्वानाच माहीत आहे .* *पण एक लक्षात ठेवा,* *जीवनात हजारो,लाखो, युद्ध जिंकून* *मजा नाही,विजय प्राप्त* *दुसऱ्यावर करण्यापेक्षा स्वतःवर प्राप्त* *करा, हे सर्वोत्तम ठरेल.* *आणि ही मिळवलेली जीत फक्त* *तुमचीच राहील.ही जीत* *तुमच्यापासून कुणीही हिरावून घेऊ* *शकत नाही.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• रस्ता कितीही अरुंद असला तरीही माणूस तो रस्ता पार करुन जातो त्याप्रमाणे जीवनात कितीही अडचण असली तरीही त्या अडचणीवर मात करुन जीवन जगण्याचा प्रयत्न करायला हवा.कारण जीवन हे सहजासहजी जगणे सामान्य माणसासाठी अवघडच आहे.अवघड आहे म्हणून सोडता येणार नाही किंवा निराश आणि हताशही होऊन बसता येणार नाही.स्तब्धपणे बसलात तर मार्ग काढणेही अवघड आहे.त्यातून काही ना काहीतरी युक्ती सुचता आली पाहिजे अन्यथा संकटं अंगावर झेलून लाखमोलाचे जीवन जगण्यात काही अर्थ राहणार नाही.प्रयत्न,सातत्य,सकारात्मक विचार ह्यातूनच जीवन जगण्याची आशा पल्लवीत होते. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०. 🍂🌹🍂🌹🍂🌹🍂🌹🍂🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *निर्मळता* गुरु शिष्य भ्रमंतीला निघाले होते. फिरता फिरता ते एका जंगलात येऊन पोहोचले. जंगलात काही अंतरावर एक झरा वाहत होता. गुरुजींना तहान लागली होती. त्यांनी शिष्याच्या हाती कमंडलू दिले आणि त्याला पाणी घेऊन येण्यास सांगितले. शिष्य झऱ्या पाशी गेला आणि त्याला असे दिसले कि तेथून नुकतेच बैल गाड्या गेल्या आहेत, बैल पाण्यातून गेल्याने पाणी खूप गढूळ झाले आहे. पाण्यात झाडाची पाने पडलेली आहेत. त्याने विचार केला असे घाण झालेले पाणी गुरूंसाठी नेणे योग्य नाही. तो तसाच परत गुरूंकडे गेला आणि म्हणाला,"गुरुजी, पाणी खूप गढूळ आहे, आपल्याला दुसरी काही तरी व्यवस्था पहावी लागेल." गुरुजी म्हणाले," अरे त्यापेक्षा तू असे कर पुन्हा त्या झऱ्यापाशी जा आणि पुन्हा पाणी आणण्याचा प्रयत्न कर." शिष्य गेला, त्याला पुन्हा पाणी गढूळ दिसले, तो परत आला, गुरूंनी त्याला परत पाठवले, असे चार पाच वेळेला झाले. शेवटी शिष्य कंटाळला, त्याच्या चेहऱ्यावर नाराजीचे आणि कंटाळलेले भाव दिसू लागले पण शिष्य गुरुज्ञा मोडायला तयार नव्हता. गुरूंनी त्याला परत पाणी आणायला पाठवले. आताच्या वेळी त्याला मात्र आश्चर्य वाटले कारण या वेळी पाणी अगदी नितळ, स्वछ नि निर्मळ होते. त्याने ते पाणी कमंडलू मध्ये भरले आणि गुरूंसाठी घेऊन आला. गुरूंनी पाणी प्राशन केले आणि शिष्याला म्हणाले,"वत्सा ! आपल्या मनात सुद्धा असेच कुविचारांचे बैल धिंगाणा घालत असतात. ते मनाची निर्मळता कमी करून मनाला मलिन करण्याचा प्रयत्न करतात. पण आपण त्यापासून सावध राहिले पाहिजे. कुविचारांचा प्रभाव आपल्या मनावर होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे. मनाच्या झऱ्यातील पाणी शांत होण्याची प्रतिक्षा जर आपण केली तर मनात कायम स्वच्छ, चांगले विचार येतील. भावनेच्या भरात कधीही निर्णय घेऊ नये." तात्पर्य :- भावनेच्या भरात कोणतेही निर्णय घेऊ नयेत. मनात कायम स्वच्छ, चांगले विचार कसे येतील हेच पाहवे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 22/08/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ◆ १९४४- दुसरे महायुद्ध,सोवियत युनियन ने रोमानिया जिंकले. 💥 जन्म :- ◆१९२० - डेंटन कूली, अमेरिकन डॉक्टर. ◆१९५५ - चिरंजीवी, तेलुगू चित्रपट अभिनेता. ◆१९६४ - मॅट्स विलँडर, स्वीडनचा टेनिस खेळाडू. 💥 मृत्यू :- ◆ १९९९-सूर्यकांत मांडरे,मराठी चित्रपट अभिनेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* *जि प शाळा बिरसी,जि गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा काश्मीरप्रश्नी भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी करण्याचा दिला प्रस्ताव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *आता डीजे वाजविल्यास होणार 5 वर्ष तुरुंवासाची शिक्षा, उत्तरप्रदेशमधील इलाहाबाद उच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषणासंदर्भात दिला एक मोठा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नवी दिल्ली - INX घोटाळ्याप्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सीबीआयने अखेर घेतले ताब्यात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *महापुरानंतर पंचगंगेची पूररेषा नव्यानं निश्चित करण्याचं काम सुरु, पूरबाधित क्षेत्रात नव्यानं बांधकामांना मंजुरी नाही, चालू बांधकामांवरही निर्बंध* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *सार्वजनिक गणेश मंडळांनी अधिकृत वीजजोडणी केल्यास कमी दरात वीज देण्यात येत असून मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घ्यावी तसेच गणेशोत्सवासाठी वीजसुरक्षेबाबत गांभिर्याने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात पहिल्या कसोटी सामन्यास होणार आजपासून सुरू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *बुलडाण्याच्या महिला पोलीस मोनाली जाधवचा चीनमध्ये विक्रम, जागतिक क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्ण पदकांसह तीन पदकं जिंकली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अक्षर मानव आयोजित* *नवोदित पटकथा लेखक व चित्रपट कथा लेखक यांच्यासाठी सुवर्णसंधी* || पटकथा कार्यशाळा || नावनोंदणी आणि प्रवेश फीच्या माहितीसाठी खालील लिंकवर क्लीक करावे. https://aksharmaanav.blogspot.com/2019/08/blog-post_21.html?m=1 अधिक माहितीसाठी संपर्क : सतीश इंदापूरकर, इंदापूरकर भवन, सुरभी हॉटेलशेजारी, जंगली महाराज मंदिराजवळ, जंगली महाराज रस्ता, शिवाजीनगर, पुणे. फोन : 9623114393 / 9552516513 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌈 *इंद्रधनुष्य म्हणजे काय ?* 🌈 पावसाळ्याच्या दिवसांत जेव्हा ऊन पावसाचा खेळ चालू असतो, तेव्हा अनेकदा इंद्रधनुष्य दिसते. खरे म्हणजे हा सप्तरंगांचा खेळ असतो. पण तो आकाशात प्रचंड धनुष्य कृतीच्या आकारात समोर उभा ठाकतो. एक टोक लांबवर जमिनीला भिडलेले तर दुसरे आकाशात उंच कुठेतरी अज्ञातात गेलेले. एवढे मोठे धनुष्य इंद्राशिवाय कोणाचे असणार ? म्हणूनच बहुधा याचे नाव इंद्रधनुष्य पडले असावे. जसजसा सूर्य मावळत जातो, तसे इंद्रधनुष्य दिसेनासे होत जाते किंवा समोर पडणारा पाऊस जसा थांबतो, तसे तेही अदृश्य होते. इंद्रधनुष्य दिसण्यासाठी उन्हाची तिरीप पाहिजे. सूर्य माथ्यावर असून उपयोग नाही. पाऊस कोसळत असून उपयोग नाही. तर त्याची भुरभुर पाहिजे. सूर्यकिरण आपल्यामागून येत असणे महत्त्वाचे, तर पाऊस आपल्यापासून पुढे लांबवर पडत असला पाहिजे. हे सगळे जर जमले तर मग इंद्रधनुष्याची रंगत जमली व बराच काळ टिकली असे नक्की समजावे. स्वच्छ प्रकाश हा सप्तरंगांचे मिश्रण असते. तेव्हा एखाद्या पाणी वा काच यांसारख्या माध्यमातून ते किरण प्रवास करतात. तेव्हा वक्रीभवनाची प्रक्रिया घडते. ही प्रक्रिया घडताना जांभळ्या व निळ्या रंगाच्या प्रकाशकिरणांचा, वक्रीभवनाचा कोन जास्त असतो, तर लाल रंगांचे किरण त्या मानाने कमी वक्र पावतात. किरणांचा वेग मंदावण्याने ही क्रिया घडते. ही गोष्ट जशी एखाद्या लोलकाच्या साहाय्याने आपण एखाद्या प्रकाशझोतात बघू शकतो, तशीच पावसाच्या थेंबाच्या रूपाने ही आकाशात घडते. पावसाचे थेंब असंख्य असल्याने प्रकाशकिरणांच्या वक्रीभवनातून हा एक सलग रंगपट्टाच तयार होतो व त्यालाच आपण इंद्रधनुष्याची उपमा देतो. इंद्रधनुष्य केवळ पावसात दिसते, असेच नव्हे, तर विरणाऱ्या धुक्यामध्येसुद्धा एखाद्या दरीच्या पोटातून निघून थेट पर्वतशिखरांना ओलांडून वर जाताना दिसते. किंबहुना अनेक वेळा इंद्रधनुष्य दिसण्याची जागा म्हणजे खोल दऱ्या व त्यांच्या आसपासची गिरीशिखरे होय. दरीतून वरवर जाणारे बाष्पकण व त्यांवर उतरणारे तिरके सूर्यकिरण हे सहजपणे इंद्रधनूचा खेळ दाखवून जातात. विमानातून खाली ढगांवर दिसणारे गोल चक्राकार इंद्रधनुष्य हाही एक अद्भुत प्रकार आहे. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" Hard times are the moments of reflection. "* *(कठीण परिस्थिती ही तुमच्यातील धैर्य/चिकाटी दाखवण्याची खरी वेळ आहे.)* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *गुजरात या राज्याचा राज्यपक्षी कोणता ?* रोहित 2) *फुलपाखराच्या अळीला काय म्हणतात ?* सुरवंट 3) *वाघाच्या निवाऱ्याला काय म्हणतात ?* गुहा 4) *वर्षातील कोणत्या दिवशी दिवस व रात्र सारखेच असते ?* 22 मार्च व 22 सप्टेंबर 5) *महानुभाव पंथाची स्थापना कोणी केली ?* श्री चक्रधर स्वामी *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● गजानन पाटील, हिंगोली ● शिवा गैनवार ● नागराज यंबरवार ● आशिष देशपांडे ● गुरुदास आकेमवाड, बरबडेकर ● शंकर गंगुलवार ● मुजीब शेख ● आकांक्षा नागेश तांबोळी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *देवाचे खरे मंदिर कोणते - जेथे त्याला बंद दरवाज्यामागे कडी-कुलपात सुरक्षित ठेवले जाते ते ? जेथे प्रवेशासाठी तिकीट काढावे लागते ते ? जेथे आधिक पैसे देऊन लवकर दर्शन घेता येते ते ? की आपल्या घरातलाच तो पवित्र राखलेला एक कोपरा, जेथे आरती म्हटली जाते ? ज्या परमेश्वराने आकाश व पृथ्वी निर्माण केली तो मानवी हातांनी बांधलेल्या मंदिरात रहात नाही. त्याला तशा मंदिरांची गरज नाही.* *परमेश्वराचे खरे मंदिर आपणच आहोत; कारण त्याचा पवित्र आत्मा आपल्यात राहतो. आपल्या ह्रदयातील भव्य उपासना- मंदिराच्या परमपवित्र स्थानांत सर्वांना, अगदी अनिर्बंधितपणे जाता यावे ही एक सुंदर कल्पना आहे आणि ती लवकर साकार व्हावी. पण त्याआधी आपल्या अंत:करणावर आपण काय लिहिले आहे तेही बघितले पाहिजे. असे न होवो की, आपल्या अंत:करणावरची 'प्रवेश बंद' ची पाटी वाचुन परमेश्वर बाहेरच उभा राहिला असेल.* •• ● ‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *स्वामी तिन्ही जगाचा आई विना* *भिकारी,* *जन्मदात्याले भोवला त्याले लेक* *म्हणू नही,* *पुत्र देई ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही* *लोकी झेंडा,* *_कुठे लागता पिलांना* *मांजरीचे___ दात,* *अशा अनेक रचना हृदयाला* *भिडतात,हृदय पिळवटून टाकतात.* *हे कितीही सत्य असलं तरी* *संतती लायक असेल तर कमवून ठेवण्याची काहीच गरज नाही, कारण ते स्वतः कमविल्या शिवाय रहाणार नाहीत. आणि संतती नालायक असेल, तर अजिबात कमवून ठेवण्याची गरज नाही. कारण आपल्या समोरच त्या संपत्तीला काडी लागल्याशिवाय रहाणार नाहीत. विठ्ठलपंत आणि रूक्मिणी मातेने देहांत शिक्षा घेतली, त्यावेळी निवृत्ती , ज्ञानदेव, सोपान व मुक्ताई यांचे वय काय होते ? त्या वयात निर्माण झालेली जबाबदारी विश्वाचे कल्याण करणारी ठरली. छत्रपती शिवरायांच्या हातात त्यांच्या चौदाव्या वर्षी पुणे जहांगीर सोपवली गेली . शहाजी राजांनी वयाच्या पाचव्या वर्षी इंदापूर जहांगीर सांभाळली. जबाबदारी जेवढ्या लहान वयात अंगावर पडते, तेवढे कर्तृत्व महान होते. म्हणून आपल्या मुलांना जबाबदारी घ्यायला शिकवा आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे करा.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्या सागरातून उसळणाऱ्या लाटा तीव्र गतीने किना-याकडे झेपावत येतात तेव्हा असे समजायचे की, नक्कीच किना-याचे नुकसान होणार आहे.त्यापासून सावध होण्याचा इशाराही दिला जातो.पण ज्या लाटा सागरातून किना-याकडे हळूहळू मार्गक्रमण करत येतात तेव्हा त्याच लाटा किना-याचे सौंदर्य वाढवतात आणि मानवी मनाला आल्हादकारक वाटतात. अशाच पध्दतीने मानवी मनाचेही लाटासारखेच आहे.काहीच विचार न करता अचानक एकाएकी घेतलेले निर्णय कधीकधी चालत असलेल्या चांगल्या जीवनाला नुकसान करु शकतात.असे निर्णय घेताना शांत चित्ताने आणि सारासार विचारपूर्वक घेतले तर सर्वांनाच फायदा होईल.असेच जीवनात सागरातल्या शांत लाटाप्रमाणे राहून जीवनालाही किना-यासारखे सुंदर बनवता येईल. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०. 🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नदी,मासा,युक्ती* एका नदीच्या तिरावर एक कोळी मासे धरायला गेला. फार मोठे मासे नदीत सापडतील असे त्याला वाटले नाही 🕸म्हणून त्याने मोठे जाळे बरोबर घेतले नाही. त्याच्या मनात एक विचार आला आणि त्याने एका काठीच्या टोकाला एक बारीक दोरी बांधून गळ वर ओढू लागला, पण मासा बराच मोठा असल्याने गळ लवकर ओढला जाईना. कोळी बराच वेळ विचारात पडला.त्यानंतर त्याला सूचले की, गळ लवकर ओढला तर मासा आपल्या वजनाने व चळवळीने आपली बारीक दोरी तोडून पळून जाईल तेव्हा त्याने बराच वेळपर्यंत गळ पाण्यात राहू दिला व नंतर अगदी हळूहळू तो पाण्याच्या बाहेर काढला. तोपर्यंत मासा धडपड करून अगदी निर्बळ झाला होता. त्यामुळे दोरी तोडण्याची शक्ती त्यात उरली नव्हती. कोळ्याची ही युक्ती कामी आली. तात्पर्य :- युक्तीने सर्व प्रकारच्या अडचणीतून पार पडता येते.काही बाबीसाठी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते.आणि कमी वेळेत कार्य सार्थकी लागते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 21/08/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ◆ १९९३-मंगळाच्या शोधमोहिमेसाठी पाठविण्यात आलेल्या 'मार्स आब्झर्व्हर'या यानाचा पृथ्वीशी (NASA)संपर्क तुटला. 💥 जन्म :- ◆ १९३४-सुधाकरराव नाईक,महाराष्ट्राचे १३ वे मुख्यमंत्री ◆१९८६- उसेन बोल्ट , जमैकाचा धावपटू ◆१७८९ - नारायण श्रीधर बेंद्रे, भारतीय/मराठी चित्रकार. ◆१९७३ - सर्गेइ ब्रिन, गूगलचा संस्थापक. 💥 मृत्यू :- ◆ १९७८ - विनू मांकड, भारतीय क्रिकेट खेळाडू ◆१९३१ - विष्णू दिगंबर पलुसकर, मराठी हिंदुस्तानी गायक. ◆ २००१ - शरद तळवलकर, मराठी चित्रपटअभिनेता ◆ २००६ - उस्ताद बिस्मिल्ला खाँ, ख्यातनाम भारतीय सनईवादक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* *जि प शाळा बिरसी ,जि गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर झालेल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात प्लॅस्टिक वापरावर बंदी घालण्याची घोषणा केली होती.त्या अनुषंगाने लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *चांद्रयान - 2 चा चंद्राच्या कक्षेत प्रवेश, मोहिमेतील दुसरा महत्वाचा आणि कठीण टप्पा पार, 7 सप्टेंबरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नवी दिल्ली : स्टेट बँक आॅफ इंडियाने पुढील पाच वर्षांत डेबिट कार्ड बंद करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. प्रत्येक आर्थिक व्यवहार डिजिटल व्हावा, यासाठी बँकने ही तयारी केल्याचे बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी दिली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आता 21 ऑगस्ट ऐवजी 22 तारखेला सुरू होणार, एक सप्टेंबरला होणार समारोप* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई - काल मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला, २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *देशाची अर्थव्यवस्था अत्यंत चिंताजनक; वर्षभरात १.१० कोटी व्यक्तींचा गेला रोजगार, दुचाकी वाहनांची विक्री १७ टक्क्याने व चारचाकी वाहनांची विक्री २३ टक्याने घटली, तर पाच लाख व्यक्ती बेरोजगार झाल्या.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारेची जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात झाली निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अक्षर मानव संवाद बारा* *अतिथी : रामदास फुटाणे* *दिनांक : १२ व १३ सप्टेंबर 2019* अधिक माहितीसाठी खालील लिंकवर भेट द्यावे. https://nasayeotikar.blogspot.com/2019/08/blog-post_20.html उपक्रम : संवाद सहवास •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🔭 *वैज्ञानिक दृष्टिकोण* 🔬 *प्रश्न - संमोहनाच्या प्रभावाखाली एखाद्या व्यक्तीस चोरी करावयास लावणे शक्य आहे काय?* *उत्तर-* ज्या व्यक्तीने पूर्व - आयुष्यात कधीही चोरी केलेली नाही वा चोरी करणे पाप आहे असा पक्का समज ज्या व्यक्तीचा आहे, अशा व्यक्तींकडून संमोहित अवस्थेत चोरी करून घेणे अशक्य आहे. संमोहन अवस्थेत व्यक्ती स्वतःला अनैतिक वाटणाऱ्या सूचना स्वीकारत नाही. अशा सूचना मिळाल्यास एकतर संमोहन अवस्थेतून ती जागृत अवस्थेत येते अथवा त्या अवस्थेत राहूनही त्या विशिष्ट सूचनांप्रमाणे वर्तन करणे नाकारते.समजा एखादा चोर आहे – त्याला संमोहन अवस्थेमध्ये नेल्यानंतर चोरी करण्याची सूचना दिली तर तो ती सूचना अमलात आणेल. कारण चोरी करणे अनैतिक आहे असे त्याला वाटत नसते. (परंतु याचाच अर्थ असा की, चोरी करण्यासाठी त्याला संमोहन अवस्थेत नेण्याची गरज नाही. जागृत अवस्थेमध्येही तो न ओशाळता, न घाबरता चोरी करेल. तीच गोष्ट तो संमोहन अवस्थेत करेल एवढेच.) संमोहनाच्या प्रभावाखाली हे दुष्कृत्य करण्यास तो धजावला, असा त्याचा अर्थ नाही. *डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे* *'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“जाळणाऱ्या मोठ्या अग्नीपेक्षा उब देणारा लहान अग्नी चांगला असतो.”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'टायगर स्टेट' असे कोणत्या राज्याला म्हणतात ?* मध्यप्रदेश 2) *शुद्ध हवेला काय नसते ?* रंग,वास,चव 3) *ज्ञानेंद्रिये किती व कोणते ?* 5 (डोळे,कान, नाक,जीभ,व त्वचा) 4) *'गुलामगिरी' हा ग्रंथ कोणी लिहिला ?* महात्मा फुले 5) *'राष्ट्रीय शिक्षण दिन' केव्हा साजरा केला जातो ?* 11 नोव्हेंबर *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● भूषण परळकर ● विश्वास बदापूरकर ● भीमाशंकर जुजगार ● साईनाथ राचेवाड ● दत्ता नरवाडे ● साईनाथ हवालदार ● संतोष गुम्मलवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खरेपणा, प्रामाणिकपणा, वास्तवता, अस्सलपणा आणि यथार्थपणा अशी आपल्या व्यक्तिमत्वाची ओळख ठेवणं चांगलं. हीच तर आपल्या जीवनाची खरीखुरी गुणसंपदा असते. माणसाने आपल्या ठायी असलेल्या गुणांची जाणीव विसरली तरी चालेल; परंतु आपल्या ठायी असलेल्या दोषांची चांगली जाणीव ठेवावी. जसं दगडातील नको असलेला भाग काढून टाकला की, सुंदर मूर्ती तयार होते, तसं आपल्या स्वभावातील दोष काढून टाकले की, निखळ आणि सुंदर व्यक्तिमत्व झळकत असतं. खरंतर गुणी माणसं लोखंडाचं सोनं बनविणा-या परिसासारखी असतात, ओसाड जमिनीचं नंदनवन करणारी असतात. म्हणून जीवनात यश मिळविण्यासाठी सत्य, पामाणिकपणा, कठोर परिश्रम, न्याय आणि चारित्र्याची गरज असते हे विसरता येणार नाही.* *सत्य म्हणजे सत्यवाणी, सत्य विचार, सत्य आचार आणि सत्य उच्चार होय. सत्य म्हणजे जीवन. असत्य म्हणजे मरण. अनेक माणसं अशी जगता जगता मरत असतात आणि अनेक माणसं मरूनदेखील जगत असतात. यासाठी आपण स्वत: सत्यभाषी झाले पाहिजे. समाज सत्याचा आदर करतो. प्रामाणिकपणाची कदर करतो. न्यायची चाड बाळगतो. श्रमाची महती गातो आणि चारित्र्याची पूजा करतो. आज 'सत्यमेव जयते' हाच आपल्या जीवनाचा मंत्र बनला पाहिजे. यासाठी सत्याचे महत्व आपल्या मनाच्या पाटीवर कायमचे कोरून ठेवले पाहिजे.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟 *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *आजकी मनकी बात* *सूनलो,समज जाओ,* *जेव्हा मन कमकुवत असतं,* *तेव्हा परिस्थिती धोका निर्माण करते,* *जेव्हा मन संतुलित असतं,* *तेव्हा परिस्थिती आव्हान निर्माण* *करते,* *जेव्हा मन मजबूत असतं,* *तेव्हा परिस्थिती संधी निर्माण करते,* *म्हणूनच मन आनंदी व खंबीर असेल,* *तर परिस्थितीवर निश्चित विजय* *मिळवता येतो.या सर्व* *अवस्थेत* *मनाला सांगा.* *माझ्या मना बन दगड.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्याप्रमाणे काट्यातून गुलाबाला फुलण्यासाठी काट्याशी टक्कर द्यावीच लागते तेव्हा कुठे गुलाबाला इतरांना आनंदी पाहता येते.जर इतरांना आनंद द्यायचा असेल तर आपले दुःख त्यांच्यासमोर मांडून चालणार नाही.जर मांडलेत तर त्यांना आनंदाने आपण पाहू शकणार नाही.उलट त्यांच्या आनंदावर विरजण टाकल्यासारखे होईल.इतरांना सुखात आणि आनंदात पहावयाचे असेल तर आपल्याला होत असलेले दु:ख बाजूला सारून त्यांना होणा-या दु:खावर फुंकर घालून सुखाचे काही क्षण देऊ शकतो आणि एवढी तयारी जर आपण ठेवली तर इतरांना जसा आनंद देता येईल त्या आनंदाबरोबरच आपल्या जीवनात आनंद लुटता येईल.नाही तर त्यांच्या डोक्यावर दु:खाचे ढग जसे दाटलेले पहायला मिळतील तसेच आपल्याही डोक्यावर दु:खाणे ढग अधिक गर्दी करुन राहतील.मग आपल्या सुखी जीवनाचे कोणतेही इप्सित साध्य होणार नाही.इतरांना दु:ख देण्यापेक्षा,मन दुखवण्यापेक्षा त्यांच्या चेहऱ्यावर हसू कसे फुलवता येईल याचा प्रयत्न करायला शिकले पाहिजे. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जबाबदारीने कार्य करणे.* राज्यकारभारापेक्षा इतर अवांतर गोष्टीत रस घेणाऱ्या एका राजाने आपल्या सेनापतीला दोन प्रश्न विचारले व उत्तरे देण्यासाठी त्याला एका आठवड्याची मुदत दिली. सेनापतीने आपल्याच चेहऱ्य मोहोऱ्याच्या आपल्या एका सेवकाला आपला पोषाख घालायला देऊन, आणि त्या प्रश्नांची उत्तरे पढवून, राजाकडे पाठविले. ‘हा आपला सेनापतीच आहे’ अशा समजुतीनं राजानं त्याला विचारलं, ‘काय सेनापतीसाहेब ? मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तयार आहेत का ?’ नकली सेनापती म्हणाला, ‘महाराज ! ते प्रश्न आपण पुन्हा विचारलेत तर बरे होईल.’ राजा – समोरच्या पर्वताची माती एकूण किती टोपल्या होईल ? नकली सेनापती – त्या पर्वताच्या एकूण क्षेत्रफ़ळाच्या एक दशांश आकाराची जर एक टोपली बनवली, तर त्या पर्वताची एकूण माती दहा टोपल्या होईल. राजा – वा: ! अगदी बरोबर आहे उत्तर. सेनापतीसाहेब ! आता माझ्या मनात काय आहे ते सांगा. नकली सेनापती – सध्या तुमच्या मनात तुम्ही सेनापतीशी बोलत आहात असं आहे; पण मी खरा सेनापती नसून, सेनापतीच्या सोंगात तुमच्याकडे आलेला सेनापतीसाहेबांचा नोकर आहे. राजा – मग तुम्ही दोघांनी मला असं का फ़सवलं ? नकली सेनापती – माझ्या धन्याचं असं म्हणणं आहे की, जे माणसं मोठ्या पदांवर आहेत, त्यांनी मनोरंजनाच्या भलत्यासलत्या गोष्टीत वेळ वाया घालवू नये. राजाचं कर्तव्य राज्य उत्तम त-हेनं चालविण हे आहे, तर सेनापतीचं कर्तव्य राज्याचं उत्तम त-हेनं रक्षण करणे हे आहे. अशा अशा स्थितीत आपण त्यांना नसते प्रश्न विचारुन त्यांच मन त्यांच्यापुढे असलेल्या मुख्य प्रश्नांवरुन उडवून भलत्याच प्रश्नांकडे वेधता. त्यांना आपलं हे वागणं मान्य नसल्यामुळे, त्यांनी आपल्या मामुली प्रश्नांची उत्तर देण्यासाठी माझ्यासारख्या मामुली सेवकाला सेनापतीचं सोंग घेऊन पाठविलं.’ नकली सेनापतीच्या या खुलाशानं राजा वरमला आणि मनोरंजनाच्या बाबींतून लक्ष काढून त्याने ते राज्यकारभारात घातले. साभार - इंटरनेट *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 20/08/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ◆ *भारतीय अक्षय ऊर्जा दिन* ◆ *सद्भावना दिन* ◆ *जागतिक डास दिन* 💥 ठळक घडामोडी :- ◆ २००८- कुस्तीगीर सुशीलकुमार याला बीजिंग ओलीम्पिक मध्ये ब्रॉंझ पदक मिळाले. ◆१९९७ - सूहाने हत्याकांड - अल्जिरियामध्ये ६० व्यक्ती ठार. १५ अधिक व्यक्तींचे अपहरण. 💥 जन्म :- ◆१९४४ - राजीव गांधी, भारताचे माजी पंतप्रधान. ◆ १९४६ - एन.आर. नारायण मुर्ती, भारतीय उद्योगपती. 💥 मृत्यू :- ◆ २०१३-नरेंद्र दाभोळकर ,अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक व थोर समाजसुधारक,विचारवंत यांची पुणे येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ◆ २०१३- जयंत साळगावकर, ज्योतिर्भास्कार,लेखक व उद्योजक. ◆१९९७ - प्रागजी डोसा, गुजराती नाटककार, लेखक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* *जि प शाळा बिरसी,जि गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली - जम्मू काश्मीर मुद्द्यावरुन भारत-पाक यांच्यातील संबंध ताणले असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये जवळपास ३० मिनिटे झाली चर्चा, त्यात द्विपक्षीय संबंध आणि सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाच्या मुद्द्यावर करण्यात आली चर्चा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *पूरग्रस्तांना दिलासा, एक हेक्टरवरील पूरग्रस्त शेतीचं पीककर्ज माफ, कोसळलेल्या घरांचीही पुनर्बांधणी करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत 98 टक्के मतदान, शिवसेनेचे अंबादास दानवे तर आघाडीचे बाबुराव कुलकर्णी रिंगणात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना अमिताभ बच्चन यांच्याकडून 51 लाखांची, तर रिलायन्स इंडस्ट्रीजकडून 5 कोटींची मदत, मुख्यमंत्र्यांकडून बिग बींना धन्यवाद * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई-पुणे रेल्वे सेवा कालपासून पूर्ववत, सर्व गाड्या वेळापत्रकानुसार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांकडून जम्मू-काश्मीरमध्ये विद्येचा प्रसार होण्याची शक्यता, पुण्यातील शैक्षणिक संस्थांचा पुढाकार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *बॉलिवूडचे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक मोहम्मद जहूर खय्याम यांचे वयाच्या 92 व्या वर्षी झाले निधन, त्यांना फ्रेश मॉर्निंग बुलेटीन कडून भावपुर्ण श्रद्धांजली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागतिक फोटोग्राफी दिन - 19 ऑगस्ट* https://nasayeotikar.blogspot.com/2019/08/blog-post_19.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप म्हणजे काय ?* 📙 सूक्ष्मदर्शक भिंगाचा वापर प्रथम लहान वस्तू बघण्यासाठी केला गेला. मग जिवाणूंचा शोध लावला गेला. त्यांच्याबद्दलचे संशोधन चालू असतानाच पेशींच्या अंतर्गत हालचालींबद्दल औत्सुक्य निर्माण झाले होते. पण सूक्ष्मदर्शक यंत्रांची ताकद कमी पडू लागली होती. पेशीतील न्युक्लियस दिसत होता; पण त्याच्या पुढे फारसे जाता येत नव्हते. याच सुमाराला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा शोध लागला. हा काम कसा करतो ? अतिशय काळजीपूर्वक व जास्तीत जास्त पातळ गोष्टींचे निरीक्षण करण्यासाठी याचा वापर करतात. अगदी पातळ असा केस या मायक्रोस्कोपखाली बघितल्यास जाड मनगटाएवढ्या दोरखंडासारखा दिसतो. सर्वसाधारणपणे १०,००० ते ५०,००० पट मोठी प्रतिमा करण्याची याची शक्ती असते. एका तीव्र स्रोतातून इलेक्ट्रॉनचा झोत चुंबकीय क्षेत्रातून एकवटून पाहावयाच्या गोष्टींवर सोडला जातो. तपासणी करावयाच्या वस्तूंमधील प्रत्येक अणूची दखल हा झोत घेतो व त्याचा एक आराखडा समोरच असलेल्या इलेक्ट्रॉन शोधकातर्फे टीव्हीच्या पडद्यावर दिसू लागतो. योग्य त्या पद्धतीत झोताचे केंद्रीकरण झाल्यावर गरजेप्रमाणे त्याचे फोटो घेता येतात. झोतातले इलेक्ट्रॉन्स नेमके काय करतात ? प्रकाश लहरींपेक्षा यांची पृथक्करण शक्ती कितीतरी पटींनी जास्त असल्याने वस्तूची प्रतिमा जवळपास एक लक्ष पट मोठी दिसू शकते. मुख्यत्वेकरून जेनेटिक्समधील संशोधन, डीएनए व आरएनए या संदर्भातील प्रयोग, विषाणूंचा शोध यांसाठी या मायक्रोस्कोपचा वापर केला जातो. भारतातील फार मोठय़ा शहरांतील मोजक्या प्रयोगशाळांत अत्यंत कुशल वैज्ञानिक यांचा उपयोग करतात. HIV वरचे संशोधन, H1 N1 या विषाणूने होणाऱ्या स्वाइन फ्लू बद्दलचे संशोधन हे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपशिवाय शक्य नव्हते. बायोटेक्नॉलॉजी संदर्भातही अनेक बाबतीत याचा वापर अत्यावश्यक ठरतो. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ चांगले पुस्तक म्हणजे मानवी आत्म्याचे अतिशुद्धी सार असते.”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *महाराष्ट्राचे राज्यफुलपाखरू कोणते ?* राणी पाकोळी 2) *घोड्याच्या निवाऱ्याला काय म्हणतात ?* तबेला 3) *जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण कोणते ?* मौसीनराम व चेरापुंजी (भारत) 4) *शुद्ध पाण्याला काय नसते ?* रंग,वास,चव 5) *पाण्याच्या अवस्था किती व कोणत्या ?* 3 ( स्थायू,द्रव, वायू ) *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● हरीश बुटले, पुणे ● इरेश्याम झंपलकर, कुंडलवाडी ● विजय दिंडे, हुनगुंदा ● गणेश येवतीकर ● शशांक बामनपल्ले, नायगाव ● दीपक पाटील ● सतीश दिंडे ● जयपाल दावनगीरकर ● विवेक सारडे ● प्रमोद मुधोळकर ● आदित्य रावजीवार ● कांतीलाल घोडके *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भारतभूमी संत-महंतानी, समाजसुधारकांनी पावन केली आहे. लोककल्याणासाठी चंदनासारखा देह झिजवत त्यांनी मानवता समृद्ध केली. काही अलौकिक प्रलोभनांमध्ये भोळ्याभाबड्या लोकांना अडकवून स्वत:ची वैभवी दुकानं थाटणं हे संतांचं ध्येय नसतं. त्यांच्या माणूसधर्माच्या शिकवणूकीचं आपल्याला मोल नसतं. संतांच्या जीवनात कुठलाच झगमगाट नसतो, चमत्कार नसतात. 'माणूस' घडवणं हेच त्यांचं ध्येय असतं. संतांना ना स्वत:ची जात असते, ना कोणता धर्म! कुठल्या विशिष्ठ विचारांचा त्यांच्यावर पगडा नसतो. ते स्वत:च्या वाटेवरुन स्वतंत्रपणे चालत राहतात.* *स्वर्ग-नरकाच्या जटील जाळ्यात संत अडकत नाहीत. कुणाला अडकवत नाहीत. जमिनीवरल्या सहज जगण्याचे व अंतरीच्या शाश्वत सुखाचे मंत्र ते देत राहतात. त्यांचं नातं केवळ सत्याशी असतं, सत्य कटू असतं. म्हणून आपण दगड मारतो सत्याच्या पुजा-यांना. यात संत असतात तसे वैज्ञानिक-विचारवंतही असतात. खरंतर या महामानवांच्या निमीत्तानं आपण सत्यालाच दगड मारत असतो. सत्याचा मार्ग गर्दीचा नसतो, पण खडतर असतो. म्हणूनच येशूला आपण क्रूसावर चढवलं. बुद्ध-महावीर यांना दगड मारले. एडिसनला मंदबुध्दी ठरवलं आणि गॅलिलिओला वेड्यात काढलं. विचारवंताना गोळ्या झाडणारेही आपणच. किती निष्ठुर आहोत आपण ! इमानाला सजा व दांभिकाची पूजा ! सत्याच्या मुखवट्यांना हार घालायचे, महानतेचे मुकुट चढवायचे ही आपली व्यवस्था, हे आपले करंटेपण.* *॥ रामकृष्णहरी ॥* ☀☀☀☀☀☀☀☀☀ *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *🏻संतांनी म्हटले आहे की ,* *निंदकाचे घर असावे शेजारी।* *तरीही आपण एक गोष्ट मनावर* *पक्की कोरून ठेवा की* *आईना बदलनेसे चेहरा नही बदलता।* *चेहरा बदलो आईना खुदही बदल* *जायेगा।* *यश पचविणे एक वेळ सोपे; पण* *आरोप रिचवणे खूप कठीण. '* *हेचि फल काय मम* *तपाला ' ? याचा वारंवार मनाच्या* *खिडकीत येणारा प्रत्यय सहन करणे* *सोपे नाही.* *कोणत्याही मॅनेजमेन्ट स्कूलमध्ये हे शिकविले जात नाही. मग हे शिकायचे कसे? वेळ आणि अनुभव यापेक्षा मोठे गुरू नाहीत. आरडा ओरड करायला शक्ती लागत नाही, ती शांत राहायला लागते. 🤭अशावेळी बाळगलेले मौन हे तुमच्या दुर्बलतेची निशाणी नसून तुमच्या आत्मिक शक्तीचा तो साक्षात्कार आहे. आणि ही शक्ती एका दिवसात येत नाही. तिचा 'थेंबे, थेंबे' संचयच करावा लागतो. तुमच्या निघून जाण्यात तुमचा पराभव नसतो, तर ती तुमची प्रगल्भता असते.* *आरोप करणाऱ्यांचे पितळ उघडे पडतेच, आणि कालांतराने इतरांनाही सत्य समजते. तोपर्यंत तुम्ही बरीच प्रगती केलेली असते. शेवटी काय तर ''आपण प्रत्येकाच्या दृष्टीने चांगले असू शकत नाही,, ''पण आपण त्यांच्यासाठी उत्कृष्ट आहोत जे आपल्याला समजतात,, ''माणसाने स्वत:च्या नजरेत चांगलं असलं पाहीजे,, ''लोक तर निसर्गाला पण नाव ठेवतात.* * *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जेव्हा एकाच बिंदूतून कितीतरी रेषा काढलेल्या आपण पाहिलेल्या आहेत तरीही त्या एकमेकांना एकाच बिंदूत छेदून पुढे सरळ मार्गाने निघून जातात आणि त्याच रेषा परत एकाच बिंदूत एकत्रीत येऊन मिळतानाही पाहिले आहे.असा जर आपण विचार केला तर आपले हृदय आणि मनही एकच आहे.आपणच आपल्या हृदयातून आणि मनातून अनेक माणसांना जोडण्याचे काम करत असतो.त्यात काहींना काही कारणाने जवळ करतो तर काही माणसे आपल्यापासूनच जवळ येऊन दूर जातात.जे दूर जातात त्यांचा विचार करु नका,कारण त्यांना स्वातंत्र्य आहे.परंतु जी माणसे तुमच्याजवळ येण्याचा प्रयत्न करतात त्यांना दूर करुन नका कारण त्यांना तुमचे मन आणि हृदय कळलेले असते.कारण तुम्ही त्यांचे केंद्रस्थानी बिंदूस्थानी आहात.तुम्हीच त्यांचे आधारही आहात आणि त्यांची प्रेरणाही आहात.सा-यांना जवळ करण्याचे बिंदूसारखेच काम करायला शिकले पाहिजे तरच जीवन समृद्ध होईल. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०./८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एकीचे बळ* एका वृद्धाने सदान्- कदा भांडणार्या आपल्या मुलांना हातभर लांबीची एकेक काठी मोडायला सांगणे एक गृहस्थ म्हातारपणामुळे बराच थकला होता. आयुष्यात चांगली कमाई करून आणि स्वत: चांगले जीवन जगूनसुद्धा त्याच्या पाच मुलांमध्ये सदान्-कदा चालणार्या भांडणांमुळे तो दु:खी होई. त्याने आपल्या मुलांना बराच उपदेश केला; पण पालथ्या घडावर पाणी. एके दिवशी त्याने आपल्या पाचही मुलांना प्रत्येकी हातभर लांबीची एकेक काठी घेऊन यायला सांगितले. त्याप्रमाणे ती मुले एकेक काठी घेऊन आली. त्या गृहस्थाने त्यांच्यापैकी प्रत्येकाला आपापली काठी मोडण्यास सांगितले. वडिलांनी सांगितलेली ती गोष्ट प्रत्येक मुलाने लगेचच करून दाखवली. वडिलांनी पाच काठ्यांची जुडी करून प्रत्येकाला ती मोडायला सांगितल्यावर एकालाही ती मोडता न येणे पुन्हा त्या गृहस्थाने त्या मुलांना तशाच प्रकारची एकेक काठी घेऊन यायला सांगितले. पाच जणांनी पाच काठ्या आणून वडिलांपुढे ठेवल्या. वडिलांनी त्या पाच काठ्यांची एका दोरीने मोळी बांधली आणि प्रत्येकाला ती मोडायला सांगितली. पाच काठ्या एकत्र असलेली ती मोळी आपल्या पाच मुलांपैकी कुणालाच मोडता येत नसल्याचे पाहून तो गृहस्थ त्यांना म्हणाला, बघितलंत ना ? एकीचे बळ किती असते ते ? वडील एवढेच बोलले; पण ते सूज्ञ मुलगे समजायचे ते समजले. तेव्हापासून एकजुटीने वागू लागले.संघटित राहून केलेल्या कार्यास यश नक्कीच प्राप्त होते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
*प्रमिला ताई सेनकुडे यांना मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर https://vicharsanghasharvindkumar1111blogspo.blogspot.com/2019/08/blog-post_19.html#.XVp499s64_s.whatsappXVlqvYTfwuw.whatsapp👆🏻 *वरील बातमी वाचण्यासाठी दिलेल्या लिंक ला टच करा अधिक बातम्या वाचण्यासाठीwww.vicharsangharsh. com या या वेबसाईटला भेट द्या जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क करा 91 30 73 10 28 विचार संघर्ष ऑनलाईन न्यूज पोर्टल मुख्य संपादक अरविंद कुमार भोरे*
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 19/08/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📷 *जागतिक छायाचित्रण दिन* 💥 ठळक घडामोडी :- ◆ १९८७ - युनायटेड किंग्डमच्या हंगरफोर्ड शहरात मायकेल रायनने सोळा व्यक्तींना गोळ्या घालून नंतर स्वतःचा जीव घेतला. ◆ १९९१ - सोवियेत संघाच्या राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्हला फोरोस येथे सुट्टीवर असताना नजरकैदेत घातले गेले. 💥 जन्म :- ◆१९०३ - गंगाधर देवराव खानोलकर, मराठी लेखक. ◆ १९२२ - बबनराव नावडीकर, मराठी गायक. ◆ १९८७ - आयलीना डिक्रुझ, हिंदी चित्रपट अभिनेत्री. 💥 मृत्यू :- ◆ १६६२ - ब्लेस पास्कल, फ्रेंच गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञानी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *जम्मू- काश्मीर - पाकिस्तानकडून पुन्हा एकदा कालसायंकाळी शस्त्रसंधीचे उल्लंघन ; भारतीय लष्कराकडून चाेख प्रतिउत्तर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *संत साहित्यांच्या अभ्यासकांनी आपल्या संशोधनांना आणि संत साहित्यांना माहिती तंत्रज्ञानाची जोड द्यावी. सरकार सहकार्य करेल असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे केले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *उत्तराखंड : उत्तरकाशी जिल्ह्यात पावसाचे थैमान ; आज सर्व सरकारी शाळांना सुट्टी जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *अमरावती : चांदूरबाजार तालुक्यातील बेलोरा येथील प्रख्यात कवी, गजलकार व साहित्यिक नितीन देशमुख यांना साहित्यक्षेत्रात अतिशय सन्मानाचा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ग.दि. माडगूळकर काव्यप्रतिभा पुरस्कार मिळाला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *जुलै, पृथ्वीवरील सर्वाधिक ‘ताप’दायक महिना ; जानेवारी ते जुलै २०१९ हा काळ तिसरा उष्ण काळ म्हणून नोंदविण्यात आला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ * मराठी, तामिळ, बंगाली यांना प्रादेशिक भाषा म्हणणे योग्य नाही. त्या राष्ट्रीय भाषाच आहेत, असे स्पष्ट मत प्रख्यात विचारवंत व हिंदी कवी अशोक वाजपेयी यांनी एका मुलाखतीत व्यक्त केले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *आशियाई व राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि पॅरा अॅथलिट दीपा मलिक यांना यंदाचा राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार तर रवींद्र जडेजाला अर्जुन पुरस्कार जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लघुकथा - कुलदीपक* शिल्पाला मुलगा झाला ही बातमी तिच्या सासूच्या कानावर गेली तशी तिची सासू कमलाबाई खूपच आनंदून गेली. वंशाला दिवा मिळाला म्हणून शेजारी पाजारी आनंदाने सांगत सुटली. शिल्पा सरकारी दवाखान्यात होती, सोबत तिचा नवरा दीपक देखील हजर होता. घरातील काम आटोपून कमलाबाई लगेच दवाखान्यात......... लघुकथा पूर्ण वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करावे. https://nasayeotikar.blogspot.com/2019/08/blog-post_16.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पिटूनिया* फुलझाडांपैकी (आवृतबीज, द्विदलिकित) या शास्त्रीय नावाच्या वंशातील काही जाती बागेत शोभेकरिता विशेषेकरून लावलेल्या आढळतात. एकूण जाती सु. ४० (ए.बी. रेंडेल यांच्या मते १४) असून त्यांचा प्रसार द. आणि उ. अमेरिकेतील उष्ण प्रदेशांत आहे. भारतात काही जाती बाहेरून आणून लावल्या आहेत. बागेतील शोभा वाढविण्यासाठी अनेक संकरज प्रकार आज उपलब्ध आहेत; तथापि त्या सर्वांचा उगम अर्जेंटिनातील पिटूनियाच्या निक्टॅजिनिफ्योरा, व्हायोलॅशिया, अक्सिलॅरिस व इंटिग्रिफोलिया या जातींच्या संकरात आहे. दुहेरी पाकळ्यांचे व अनेक भडक रंगांचे आधुनिक प्रकार संकरातून व निवडीने काढले गेले आहेत. मूळच्या जाती सु. ३०-४५ सेंमी. उंच, सरळ वाढणार्या, वर्षायू (एक वर्षपर्यंत जगणार्या) ओषधी [ ® ओषधि ] असून पाने साधी, मध्यम आकारमानाची, आयत, समोरासमोर आणि खोडाच्या टोकाकडे बिनदेठाची तर बुंध्याकडे लांब देठाची, कधी सर्वच आखूड किंवा बिनदेठाची असतात. सर्व भागांवर प्रपिंडीय (ग्रंथियुक्त) केस असतात. फुले एकेकटी, विविध रंगांची, तुतारीसारखी व कक्षास्थ (पानांच्याबगलेत) असतात; केसरदले पाच असून इतर सामान्य शारीरिक लक्षणे ð सोलॅनेसी कुलात (धोतरा कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. नवीन लागवड बिया अथवा दाब कलमांनी करतात. बी ऑगस्ट ते ऑक्टोबरात किंवा मैदानी प्रदेशात मार्च ते जूनमध्ये व डोंगराळ भागात मार्च ते एप्रिलमध्ये पेरतात; महिन्याने रोपे दुसरीकडे वाफ्यात (कडेने किंवा मध्ये) लावतात. दुहेरी पाकळ्यांच्या जातींची लागवड कलमांनी करतात. लावल्यापासून तीन ते चार महिन्यांनी फुले येऊ लागतात व ती बराच काळ येत राहतात. खिडकीजवळ केलेल्या वाफ्यांत ही झाडे अधिक शोभिवंत दिसतात; कुंड्यांतूनही लावतात. पिटूनिया हायब्रिडा हा संकरज प्रकार लोकप्रिय आहे. टोमॅटो व बटाट्याजवळ ही झाडे लावू नयेत कारण उपद्रवकारक अशा कीटकांपासून त्यांना इजा पोहोचणे शक्य असते *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" उत्तम चरित्र आणि प्रामाणिकपणा हे माणसाचे कधीच न संपणारे धन असते..! "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *मध्यप्रदेश या राज्याचा राज्यपक्षी कोणता ?* स्वर्गीय नर्तक 2) *कीटकाला किती पाय असतात ?* 6 ( डास, माश्या,झुरळ etc) 3) *गाईच्या निवाऱ्याला काय म्हणतात ?* गोठा 4) *जागतिक वारसा दिन केव्हा साजरा केला जातो ?* 18 एप्रिल 5) *महाराष्ट्राची राजभाषा कोणती ?* मराठी *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● उत्तम सदाकाळ, साहित्यिक ● संभाजी पाटील ● महेश हातझडे, गोंदिया ● शिवा टाले, नांदेड ● संदीपराजे गायकवाड, बिलोली ● योगेश मठपती ● प्रीती माडेकर, यवतमाळ ● संतोष कडवाईकर ● मन्मथ चपळे ● मोहन शिंदे ● विलास वाघमारे ● अमोल चव्हाण ● आकाश बोर्डे ● मोहनराव पाठक, पुणे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *तरूणपणी आईवडिलांचा, पुढे पत्नीचा आणि त्यानंतर पुत्रांचा विरह भगवान रामाला सहन करावा लागला. यात काय दु:ख नव्हते? इच्छामरणी असूनही आणि आयुष्यभर दु:खाशी संग्राम करूनही भीष्मांना अखेरीस शरपंजरी व्हावे लागले. कुटुंबातील यादवी आणि एकमेकांचे जीव घेणारे सोयरे पाहण्याची वेळ युगंधर कृष्णावर येते, आणि पारध्याच्या बाणाने आयुष्याची अखेर होते. रामायण आणि महाभारत यामधील अनेक पात्रे दु:खाने आणि वेदनेने वाहताना दिसतात. तरीही ही महाकाव्य जीवनाच्या विविध अंगाना स्पर्श करून दिव्यत्व जगविण्याची आणि जागविण्याची प्रेरणा देतात.* *लहानसहान गोष्टींपासून आपला त्रागा सुरू होतो आणि माझ्याच नशीबी हे का? हा प्रश्न पडतो. तुम्हाला जशा समस्या आहेत तशा दुस-यांनाही आहेत. त्यांचे स्वरूप वेगळे आहे. 'जगी सर्व सुखी असा कोण आहे' या समर्थ रामदासांच्या प्रश्नाला उत्तर मिळत नाही. त्या उत्तरासाठी सुखाचा सदरा आपणच तयार करायला हवा, आणि तो जसा परिधान करायला हवा तसा अंतर्मनातील दु:खाच्या अंधारावर चांदण्यांचा वर्षावही करायला हवा. आपणही दु:खाचे शंभर धागे मोजत बसणार की सुखाचा धागा धागा विणत जाणार? व्यक्तीगत दु:खापासून सार्वजनिक दुराचारापर्यंत आपण भ्रष्टतेचे, नष्टतेचे पोकळ शंख फुंकणे थांबविले पाहिजे आणि दिव्याने दिवा पेटणारा प्रकाश पेरला पाहिजे.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल-9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जीने की राह,या सिनेमातील एक छान गीत खूप काही सांगून जाते.* *एक बंजारा गाये।* *जीवनके गीत सुनाए।* *हम सब जीने वालोको, जीनेकीं राह बताए।* *गाण्यातच खूप सारा जीवनाचा अर्थ भरला आहे. माणसाच नेमकं उलट होत.* *त्याला खालील प्रमाणे करा।* *आयुष्य असावे *vvpat* सारखे* *सर्वाना मनमोकळे करून दाखवणारे* *माझ्या मनात काही नाही असे दाखवणारे....* *कुटुंब असावे ballet युनिट प्रमाणे* *कितीही असतील तरीही एकमेकांना जोडून असलेले.......* *आणि जीवन जगावे कंट्रोल युनिट प्रमाणे सर्व चांगल्या गोष्टीची सुरुवात आपल्यापासून करणारे.....* *आणि आपल्या मनातील दुःख* *असावे↑ * कंपार्टमेंट प्रमाणे कितीही दुस-याने पाहण्याचा प्रयत्न केला तरी नं दिसणारे.....* *🙏अशोक कुमावत🙏* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* *जि. प. शाळा--माणिकखांब* *ता.इगतपुरी, जि. नाशिक* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्या व्यक्ती अश्रूंचा सहारा घेऊन जगतात त्या जीवनात कुठेतरी पराभव पत्करलेल्या असतात किंवा त्यांच्या मनावर कुठेतरी आघात झालेला असतो किंवा कुणीतरी मनाविरुद्ध करण्यासाठी प्रवृत्त केलेले असते.हे जरी खरे असले तरी अशा व्यक्ती शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या कमकुवत झाल्याने त्यांना जीवनात जगण्याची काही अपेक्षा उरली नाही किंवा आता आपण जगून तरी काय करावे असा सतत विचार करत आणि डोळ्यांत अश्रू आणून कसेबसे जीवन जगतात.अशा दुबळ्या मनाने जीवन जगण्यापासून जीवनाला परावृत्त करायचे असेल तर जीवनात आणि आपल्यासमोर चांगले जीवन जगण्याची उमेद प्रथमत: नजरेसमोर ठेवायला हवी, नेहमी आपण काहीतरी असले तरी मी कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी सक्षम आहे असा उदात्त विचार करून जगायला शिकले पाहिजे,कुणीजरी आपले मन दुखवण्याचा प्रयत्न केलातरी मी त्याकडे दुर्लक्ष करीन असाही सकारात्मक विचार केला आणि मन घट्ट करून जगायला शिकले तर अश्रूंचा आधार घेऊन जगायची काही गरजच भासणार नाही.जीवन तर सुखदु:खाने भरलेले आहे ते कुणाच्या वाट्याला कमी-जास्त असणारच.सुख जास्त झाले म्हणून जास्तही त्या सुखाचा अतिरेक होऊ द्यायचा नाही आणि दु:ख झाले म्हणून अति दु:खी व्हायचे नाही.आपण सारेजण सुखदु:खाच्या चक्रव्युहात अडकलेलोच आहोत आणि त्या चक्रव्युहाला भेदूनच चांगले जीवन जगायचे आहे हे लक्षात ठेवायला हवे. व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९० 🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अधिकचा मोठेपणा सांगणे* एक इसम फार वर्षे प्रवास करून आपल्या घरी आला. व आपण परदेशात असताना काय मौजा पाहिल्या हे त्याने आपल्या शेजार्यापाजार्यांना तिखट मीठ लावून आणि अधिकाधिक मोठेपणा करून सांगितले. आणि अगदी शेवटी एक थाप ठोकून दिली की, 'मी अलकावतीला गेलो असता तेथील लोक पंधरा पंधरा हात उंच उड्या मारतात पण त्यांनी माझ्याशी पैज लावली असता माझ्याइतकी उंच उडी एकालाही मारता आली नाही.' ऐकणार्या कोणालाही ही गोष्ट खरी वाटली नाही. तेव्हा त्यांची खात्री करण्यासाठी तो नाना प्रकारच्या शपथा घेऊन लागला. त्या वेळी त्या लोकातील एक माणूस त्याला म्हणाला, 'अहो, अशा शपथा कशाला घेता. हातच्या कंकणाला आरसा कशाला ? या वेळी तुम्ही अलकावतीला आहात असं समजून तिथे जशी उडी मारली तशी इथंही मारून दाखवा म्हणजे झालं.' हे ऐकताच त्या बढाईखोर माणसाचे तोंड ताबडतोब बंद झाले. तात्पर्य - आपण प्रवासात पाहिलेल्या गोष्टी फुगवून सांगण्याची काही लोकांना सवय असते, पण एखादेवेळी त्यांचेच बोलणे त्यांच्या गळ्यात येऊन त्यांची फजिती झाल्याशिवाय राहात नाही. म्हणून माणसाने मोठेपणाचा जास्त आव आणून वागू नये आणि बोलू नये. वाजवीपेक्षा जास्त बढायी करणे म्हणजे फजीती करणे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 16/08/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ◆ २०१०-जपानला मागे टाकून चीन ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली. ◆१९८७ - नॉर्थवेस्ट एरलाइन्स फ्लाइट २५५ हे एम.डी. ८२ प्रकारचे विमान डेट्रोइट विमानतळावर कोसळले. १५५ ठार. चार वर्षांची बालिका वाचली. 💥 जन्म :- ◆१९७०-मनिषा कोईराला, अभिनेत्री. ◆ १९७०-सैफ अली खान,चित्रपट अभिनेता. ◆१९५७ - रणधीरसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ◆ २०१०-नारायण गंगाराम सुर्वे,कवी ◆ १९९७ - नुसरत फतेह अली खान,पाकिस्तानी सुफी गायक. ◆ १८८६ - श्री रामकृष्ण परमहंस, भारतीय तत्त्वज्ञानी. ◆ २०१८ - अटलबिहारी वाजपेयी, माजी पंतप्रधान *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* *जि प शाळा बिरसी,जि गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *कुटुंब नियोजन करणं म्हणजे देशाच्या विकासात योगदान देणं, छोटं कुटुंब असणं ही सुद्धा एका प्रकारची देशभक्तीच आहे' स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलं.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *समुद्राला मिळणारं पाणी गोदावरी खोऱ्यात; तेलंगणात जाणारं पाणी नळगंगेत - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *29 ऑक्टोबरपासून सरकारी बसमधून महिलांना मोफत प्रवास, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी रक्षाबंधनाच्या दिवशीच दिलं महिलांना मोठं गिफ्ट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *चीफ ऑफ डिफेन्स' पदाची घोषणा ; तिन्ही दलांचं नेतृत्त्व करणार, संरक्षण दलांच्या बळकटीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *कोल्हापूर : शिरोली मदरशात घडले माणुसकीचे दर्शन, गेली दहा दिवस 400 हून अधिक पूरग्रस्तांच्या राहण्याची केली व्यवस्था* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नवी दिल्ली - देशभरात 73 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *पोर्ट ऑफ स्पेन - विराटसेनेकडून देशवासियांना स्वातंत्र्य दिनाची विजयी भेट, भारताने वेस्ट विंडीजविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पौर्णिमा - अमावस्या* https://nasayeotikar.blogspot.com/2019/08/blog-post_15.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *आम्ल म्हणजे काय ?* 📙 चिंच कशी आंबट असते ? हिरवीगार चिंच खाल्ली, तर दात अगदी आंबून जातात. लिंबाचा आंबटपणा मात्र काही वेळा हवाहवासा वाटतो. विशेषतः उन्हाळ्यात तर तो आवडतोच. ताकाचा आंबटगोडपणा तर पाहिजेच असतो. अगदी मधुर ताक समोर आले, तर पिववत नाही. या सर्व आंबटपणाचे कारण काय असते ? या प्रत्येकात एक अाम्ल असते. आम्लाचे (Acid) विविध प्रकार आहेत. आज जगात शेकडो प्रकारची आम्ले शोधली गेली आहेत, वापरातही आहेत. आपल्या पोटातही एक प्रमुख अाम्ल सतत स्रवत असते. पोटातल्या आम्लाचे नाव हायड्रोक्लोरिक अॅसिड. फळांमध्ये असते ते सायट्रिक अॅसिड, तर दुग्धजन्य खाद्यपदार्थात तयार होते ते लॅक्टिक अॅसिड. या आम्लांची चव आंबटसर लागते. अर्थातच त्यांची तीव्रता जेव्हा कमी असते, तेव्हाच. अन्यथा चक्क जीभ भाजली जाते. जीभच काय पण एखादे तीव्र अंमल म्हणजे ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण अगदी अत्यल्प आहे, असे आम्ल जेव्हा कातडीच्या, कापडाच्या, लाकडाच्या किंवा लोकरीच्या संपर्कात येते, तेव्हा ती वस्तू चक्क त्यात विरघळून नष्ट होऊ लागते. तीव्र सल्फ्युरिक अॅसिडमुळे तर कातडी चक्क जळते. म्हणूनच त्याला तेजाब असे म्हणतात. सल्फ्यूरिक, नायट्रिक व हायड्रोक्लोरिक अशी तीन प्रमुख तीव्र आम्ले आहेत. आम्लपदार्थ म्हटल्यावर डोळ्यांसमोर फक्त द्रवच येतो. पण ते खरे नव्हे. कित्येक आम्ले घनरूपही असतात. मात्र एक गोष्ट महत्त्वाची - सर्व आम्लांमध्ये हायड्रोजनचा अणू असतोच. एखादे आम्ल जेव्हा धातूबरोबर संयुक्त पावते, तेव्हा हायड्रोजनचा अणू सुटा होऊन वायूरूप धारण करतो. एखादी वस्तू वा द्रव हा आम्लधर्मी असेल, तर लिटमसच्या कागदाच्या सहाय्याने तो पारखून बघता येतो. द्रवामध्ये लिटमस कागद बुडवला, तर निळा लिटमस लाल होतो. घन आम्ल असेल, तर कागद ओला करून वापरला जातो. आम्लाची तीव्रता ठरवण्यासाठी pH हे परिमाण ठरवले गेले आहे. ० ते ७ च्या दरम्यान सर्व आम्ल व ७ ते १४ या दरम्यान सर्व अल्क पदार्थ मोडतात. शुद्ध पाणी हे सात pH चे असते. सर्वात तीव्र आम्ल ० परिमाण दाखवते, तर अतितीव्र अल्क १४ परिमाणात मोडते. दोन्ही एकमेकांच्या विरुद्धगुणी असतात. उद्योगधंद्यांमध्ये सल्फ्युरिक अॅसिड प्रचंड प्रमाणावर वापरले जाते. खते, रंग, बॅटरीमधील पाणी, स्फोटके, साबण, प्लॅस्टिक या सर्वांसाठी त्याचा उपयोग होतो. नायट्रिक अॅसिडचा विविध स्फोटकांत वापर करतात. हायड्रोक्लोरिक अॅसिड तर पोटात सतत काम करतच असते. त्याचा साठा पोटात गरजेपेक्षा जास्त होऊ लागल्यास घशाशी जळजळते व आंबट व ढेकरा येतात. पण याच अाम्लामुळे खाल्लेल्या अन्नातील सर्व जंतूंचा प्रथम नाश होतो. अर्थातच शरीराला त्रास देऊ शकणारे सर्व अपायकारक घटक इथेच नष्ट केले जातात. मानवाला आम्ल पदार्थ अनेक वर्षांपासून माहित आहेत. कृत्रिमरीत्या तयार केलेली आम्ले जरी फक्त गेली काही शतकेच ज्ञात असली तरी पुरातन धातूयुगापासूनच नैसर्गिक आम्लपदार्थांंचे ज्ञान मानवाला असावे. तांबे, पितळ, लोखंड, ब्राँझ इत्यादी विविध धातूंच्या वस्तू चकचकीत ठेवणे, आकर्षक ठेवणे त्याशिवाय शक्यच झाले नसते. चांदीच्या वस्तूंना झळाळी देणे, सोन्याला चकाकी आणणे या प्रकारासाठीसुद्धा आम्लांचा उपयोग चालूच राहील. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ संभाषणाचा सर्वात वाईट प्रकार म्हणजे वादविवाद. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *पश्चिम बंगाल या राज्याचा राज्यपक्षी कोणता ?* खंड्या 2) *मुख्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतो ?* राष्ट्रपती 3) *महाराष्ट्रातील ऊसतोडणी कामगारांचा जिल्हा कोणता ?* बीड 4) *रेडिओचा शोध कोणी लावला ?* मार्कोनी 5) *सजीवांचे दोन गट कोणते ?* प्राणी व वनस्पती *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● निखीलदेवेंद्र खराबे, नागपूर ● नरेंद्र नाईक ● सुभाष पालदेवार ● सदानंद वतपालवाड ● जी के प्रसाद ● अशपाक सय्यद ● रमेश बारसमवार, ● मिथुन बिजलीकर ● के. राममोहन *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हसत दु:खाचा केला मी स्विकार,* *वर्षिले चांदणे पिऊन अंधार..* *प्रकाशाचे गाणे अवसेच्या रात्री,* *आनंदयात्री, मी आनंदयात्री !* *दु:खाचा स्विकारही हसत करायचा असतो. दु:खाला धैर्यानं सामोरे जायचे असते. दु:ख सत्वपरीक्षा घेतात. ज्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे ज्याच्या त्याच्या भाळी दु:ख असते. अशा दु:खाचा बागुलबुवा करून अंधारयात्री व्हायचे, की या दु:खातून माझे आयुष्य तावून सुलाखून पुन्हा झळाळायचे आहे असं म्हणत प्रकाशाचे गाणे गात आनंदयात्री व्हायचे?* *दु:खे समृद्ध अनुभवांची अनुभूती देतात.त्यामुळे खरं तर त्यांच्याबद्दल कृतज्ञ असायला हवे. कारण दु:खानंतरचे सुख आनंदाचा पारिजात फुलवते. जेवनातही विविध चवी हव्यात. चित्रातही अनेक रंग लागतात. गाण्यातही सप्तसूर. मग आयुष्य तरी एका चवीचे, एका रंगाचे, एका सुराचे का हवे? आपल्यात विश्व पाहणे आणि आपणच विश्व होणे. मग अणूरेणसारखे दु:ख आकाशाएवढे का करायचे? नसलेले दु:ख घेऊन का ऊर बडवायचे? वेदनेच्या कल्पनेने का हाय खायची? पायात वहाण नाही म्हणून शोक करणारी व्यक्ती जेंव्हा पाय नसलेल्या व्यक्तीला पाहते तेंव्हा तीचा शोक अनाठायी ठरतो. पाय गमावलेला सैनिक जेंव्हा सहजवानाचा मृतदेह पाहतो तेंव्हा त्याचे दु:ख कमी क्लेशदायी ठरते. जेंव्हा बागडायच्या वयातील छोटी मुले रूग्णालयात व्याधीग्रस्त होऊन मरणयातना भोगताना दिसतात, तेंव्हा वयाने वाढलेल्या आपल्या शरीराला आलेल्या सर्दी, ताप, खोकल्याचे दु:ख ते काय?* *॥ रामकृष्णहरी ॥* 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सुसंगती सदा घडो ,सुजन वाक्य* *कानी पडो।* *सहवासाचा परिणाम किती होऊ शकतो याचं सुरेख उदाहरण*... *आचार्य विनोबा म्हणतात की*, *आकाशातुन पडणारा पावसाचा थेबं हातावर झेलला तर तो पिण्यायोग्य असतो*. *मात्र तोच गटारात पडला तर मात्र त्याची प्रतिष्ठा इतकी ढासळते की तो पाय धुण्याच्याही लायकीचा राहत नाही*. *तोच थेबं गरम तव्यावर पडला तर त्यांच अस्तित्वच संपुन जाते*. *कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमचम करतो आणि शिंपल्यात पडला तर प्रत्यक्ष मोतीच बनतो*... *पहा गंमत, थेंब तोच परंतु कुणाच्या सहवासात येणार यावर त्याचं अस्तित्व व त्याची पतप्रतिष्ठा अवलंबुन असते*. *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* *जि. प.शाळा-माणिकखांब,* *ता.इगतपुरी, जि. नाशिक* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ईश्वराच्या नामस्मरणाने आपल्या चलबिचल झालेल्या मनाला स्थैर्य लाभते आणि नित्य चांगल्या कामामध्ये हात गुंतून राहिले तर तन आणि मन समाधानी होते.या दोन्ही मधून माणसाला सुखाने जीवन जगण्याचा खरा मार्ग सापडतो. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अंधारात कसा चढणार डोंगर* तरुण शेतकरी डोंगरावरच्या देवाच्या दर्शनासाठी निघाला होता. डोंगर त्याच्या खेडय़ापासून तसा फार लांब नव्हता. पण शेतीच्या कामांमुळे अनेक दिवस जाऊजाऊम्हणत जाणं काही झालं नव्हतं. दिवसभराचं काम संपलं. त्यानं भाकरीचं गाठोडं बांधून घेतलं. एका मित्राकडून कंदील उसना घेऊन निघाला डोंगराच्या दिशेने.... रात्रीच गावाची सीमा ओलांडली. अमावास्येची रात्र, अगदी गडद अंधार होता. तो डोंगराच्या पायथ्याशी जाऊन थांबला. हातात कंदील होता खरा, पण त्याचा प्रकाश तो किती? जेमतेम दहा पावले जाता येईल एवढाच! अशा परिस्थितीत तो मोठा डोंगर कसा बरं चढायचा? किऽर्रऽऽर्र अंधारात एवढासा कंदील घेऊन चढणे वेडेपणाचे होईल, असा विचार त्याने केला आणि मिणमिणणारा कंदील घेऊन उजाडायची वाट पाहात तो पायथ्याला बसून राहिला. बसून कंटाळा आला तसा उशाला एक दगड घेऊन मुंडासं पांघरून आभाळातल्या चांदण्या पाहात तो पडून राहिला. तांबडं फुटायची वाट पाहू लागला. कुणाच्या तरी पावलांची चाहूल लागली तसा शेतकरी चट्शिरी उठून बसला आणि अंधाराकडे डोळे ताणून पाहू लागला.... इतक्या अवेळी या आडवाटेला कोण बरं आलं? तेवढय़ात कानावर आवाज आला. 'राम राम पाव्हनं का असं निजलात?' म्हातारा आवाज होता. शेतकऱ्याने पाहिलं तो एक म्हातारा त्याच्याच दिशेने येत होता. त्याच्या हातात लहानसा कंदील होता. शेतकरी म्हणाला, ''राम राम बाबा, उजाडायची वाट पाहतोय. म्हणजे डोंगर चढून दर्शनाला देवळात जाईन.'' म्हातारा हसला.... म्हणाला, ''अरे जर डोंगर चढायचं ठरवलं आहेस तर मग उजाडायची वाट का पाहतोस. कंदील तर आहे की तुझ्यापाशी. मग कशासाठी इथं पायथ्यालाच आडून बसला आहेस?'' ''एवढय़ा अंधारात कसा चढायचा डोंगर. काय वेड लागलंय का तुम्हाला आणि हा कंदील केवढासा! अहो, कसंबसं आठदहा पावलं पुढचं फक्त दिसतंय याच्या प्रकाशात.'' तरुण शेतकरी म्हणाला. म्हातारा हसायला लागला आणि म्हणाला, ''अरे तू पहिली दहा पावलं तरी टाक. जितकं तुला दिसेल तेवढा तरी पुढे जा. जसा चालायला लागशील तसे तुला पुढचे पुढचे दिसायला लागेल. फक्त एक पाऊल टाकण्याएवढा जरी प्रकाश असला तरी त्या एकेका पावलाने पृथ्वीला प्रदक्षिणा घालता येते.'' म्हाताऱ्याचं बोलणं तरुण शेतकऱ्याला पटलं. तो उठला आणि चालायला लागला आणि कंदिलाच्या प्रकाशात सूर्योदयापूर्वी देवळात जाऊन पोहोचलासुद्धा! वाट पाहात बसून कशाला राहायचं? जो थांबतो तो संपतो. जो चालतो तो ध्येय गाठतो, कारण चालणाऱ्यालाच पुढचा रस्ता दिसतो. प्रत्येकाजवळ किमान दहा पावले चालण्याइतके शहाणपण आणि प्रकाश असतो आणि तो ध्येयपूर्तीसाठी पुरेसा असतो. फक्त जिद्द असावी लागते ध्येयापर्यंत पोहचण्याची. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 15/08/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भारतीय स्वातंत्र्य दिन* 💥 ठळक घडामोडी :- ◆१९४७ - भारताला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य. 💥 जन्म :- ◆ १८७२ - श्री ऑरोबिंदो, भारतीय तत्त्वज्ञानी. ◆१९४७ - राखी गुलझार, भारतीय अभिनेत्री. ◆ १९७५ - विजय भारद्वाज, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ◆ २००४ - अमरसिंह चौधरी, गुजरातचे मुख्यमंत्री. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* *जि व शाळा बिरसी,जि गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *कलम 370 हटवल्यामुळे जम्मू-काश्मीरला फायदाच होणार - स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केलं मत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *गेल्या 19 वर्षांत पहिल्यांदाच ऑटोमोबाईल क्षेत्रात आली मंदी, परंतु ऑटोमोबाईल कंपन्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही, कारण लवकरच वाहनाची मागणी वाढेल असा विश्वास पंतप्रधान मोदींनी एका मुलाखतीत व्यक्त केले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *Maharashtra Flood: पूरग्रस्तांच्या मदतीला धावला मुंबईचा बाप्पा ; लालबागच्या राजाकडून 25 लाखांची मदत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ * एक सप्टेंबरपासून आठवड्यातील पाच दिवस मुंबई-कोल्हापूर विमानसेवा राहणार सुरु* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *बालभारतीच्या कवितांचा धमाल आविष्कार; शिवाजी मंदिरात 17 ऑगस्ट पासून रंगणार कार्यक्रम, कार्यक्रमातील निवेदन, गायन, वाचन, नृत्य इथपासून ते वाद्यवृंदाची जबाबदारही 30 मुलांनी घेतली आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नवी दिल्ली: एअर स्ट्राइक करणाऱ्या पाच जिगरबाज वैमानिकांना शौर्य पुरस्कार तर बालाकोट एअर स्ट्राइकचे हिरो अभिनंदन वर्धमान यांचा वीर चक्रानं आज करण्यात येणार सन्मान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *लंडन : भारतीय संघाने दिव्यांगांसाठीच्या वर्ल्ड सीरिज क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावले. वॉसेस्टर येथील न्यू रोड स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने यजमान इंग्लंडवर 36 धावांनी मिळवला विजय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रतिक्रियासह शुभेच्छा संदेश ----- *फ्रेश मॉर्निंग बुलेटीनचे संघनायक ना.सा . येवतीकर यांचा स्तुत्य उपक्रम.* -डॉ हनुमंत भोपाळे https://fmbuletin2019.blogspot.com/2019/08/blog-post_13.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ *प्राचार्य डॉ. हनुमंत भोपाळे* शंकरराव चव्हाण महाविद्यालय, अर्धापूर 9767704604 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भारतीय राष्ट्रध्वज* भारतीय राष्ट्रध्वजात गडद भगवा , पांढरा व हिरवा ह्या तीन रंगांचे आडवे पट्टे आहेत. यामुळे या झेंड्याला पुष्कळदा तिरंगा असेही संबोधले जाते. मधल्या पांढर्या रंगात निळ्या रंगाचे २४ आर्यांचे अशोक चक्र आहे. मच्छलीपट्टणम जवळ जन्मलेल्या पिंगली वेंकय्या ह्यांनी तिरंग्याची रचना केली आहे. भारतीय 🇮🇳 राष्ट्रध्वजाच्या लांबी व उंचीचे प्रमाण ३:२ असे आहे, तसेच राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे. 🇮🇳 २२ जुलै १९४७ रोजी घटना समितीच्या बैठकीत 'तिरंगी ध्वज' भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकृत करण्यात आला. त्या संबंधीचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. एकाला एक लागून असलेल्या आडव्या समान प्रमाणाच्या तीन पट्ट्यांचा तो आहे. वरती गर्द केशरी, मध्यभागी पांढरा आणि खालच्या बाजूला गर्द हिरवा, अशा क्रमाने हे तीन रंग आहेत. मधल्या पांढर्या पट्ट्यावर निळ्या रंगाचे धम्मचक्र असून ते सारनाथ येथे असलेल्य सिंहमुद्रेवर असलेल्या अशोकचक्रासारखे आहे. चक्राला २४ आरे आहेत. डॉ. एस्. राधाकृष्णन् यांनी भारतीय राष्ट्रध्वजाच्या एकूण रचनेचे महत्त्व चांगल्या प्रकारे विशद केले आहे ध्वजात तीन समान आडव्या पट्ट्यांची रचना करण्यात आली आहे. - वरच्या भागात गडद केशरी रंग आहे.या रंगातून त्याग, धैर्य याचा बोध होतो. - मधल्या भागात पांढरा रंग आहे.या रंगातून प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांती, सत्य, व पावित्र्याचा बोध होतो. - खालील भागात गडद हिरवा रंग आहे. हा रंगातून निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवितो, निष्ठा व समृध्दीोचा बोध होतो.🇮🇳 - निळ्या रंगाचे अशोक चक्र हे सागराप्रमाणे अथांगता व कालचक्राच व त्यासोबत बदलत जाणारे जग सूचित करतो. जीवन गतिमान असावे व भारतीयांनी शांततापूर्ण आगेकूच करावी असे धम्मचक्र दर्शविते. मूलतः हे चक्र विश्वशांतीचा संदेश देणार्या बौद्ध धर्माचे धम्मचक्र आहे. त्याला ‘अशोकचक्र' या नावाने ओळखले जाते.त्यात भारतीय कला, तत्त्वज्ञान, इतिहास व संस्कृती यांचा सुरेख संगम झालेला दिसतो. *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• “जेथे स्वातंत्र्याचा वास असेल, तोच माझा देश.” *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारताला स्वातंत्र्य केव्हा मिळाले ?* 15 ऑगस्ट 1947 2) *आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते ?* वासुदेव बळवंत फडके 3) *आझाद हिंद फौजेची स्थापना कोणी केली ?* सुभाषचंद्र बोस 4) *संपूर्ण स्वराज्याची घोषणा केव्हा करण्यात आली ?* 1929 ( लाहोरच्या सत्रात ) 5) *दरवर्षी 15 ऑगस्टला लाल किल्यावर कोणाच्या हस्ते ध्वजारोहण होते ?* पंतप्रधान *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● मा. वसंतराव चव्हाण, आमदार, नायगाव ● अरविंद कुलकर्णी, अहमदनगर ● रामकिशन यंगलोड, माजी सभापती ● जगन्नाथ पांडुरंग गवळे ● भगवान शिवराम चिखले ● स्वराज ज्ञानेश्वर सोज्वळ ● शिवानंद सुरकूटवार, नांदेड ● आर. एन. मोरे, मुखेड ● कलीम खान ● लक्ष्मण मोळे ● लक्ष्मण बनवाड ● अन्सार शेख ● लक्ष्मण हंगिरगे ● रवी यादव ● दर्शन मुदलोड ● धम्मदीप कांबळे ● संतोष शिलेवाड ● बळवंत भुतावळे ● सत्यनारायण वाडे ● अशोक ढवळे ● राजवीर पाटील ● साईनाथ चपळे ● अच्युत रुद्रावार ● कमल पवार ● भारत शिंदे ● किशोर पायरे ● अक्षय मंडगे ● महादलिंग मठपती ● किरणकुमार नामेवार ● गजानन हुंडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *तसे आयुष्यभर मागतच असतो या अर्थाने आपण भिकारीच असतो. हातात भिकेचा कटोरा दिसत नाही, म्हणून तो नसतोच असे नाही. अपेक्षेचे छोटे-मोठे कटोरे घेऊनच आपण फिरत असतो. या अपेक्षेचा कटोरा घेऊन भीक मागण्याची सुरूवात होते घरापासून, घराकडून अपेक्षा असते. आई-वडिल, बायको, मूल, बहिण, भाऊ सर्वांकडून अपेक्षा आहेत. उलटपक्षी त्यांनाही माझ्याकडून तेवढ्याच अपेक्षा आहेत. म्हणजे चित्र दिसत नसले, तरीही अपेक्षेच्या भिकेचे कटोरे घेऊन परस्परांसमोर उभे आहोत. एक भिकारी दुस-या भिका-यासमोर उभा आहे आणि दोघेही आरोळ्या ठोकताहेत,'देssरेss...बाssबा... काहीतरी.* *मला त्यांच्याकडून प्रेम हवे आहे. स्नेह, विश्वास, माझ्या दुखल्या-खुपल्याबद्दलची विचारपुस हवी आहे. आस्था हवी आहे. सर्वच हवे आहे. ज्यांच्याकडून मला हे सर्व पाहिजे आहे, त्यांनाही माझ्याकडून हेच हवे आहे. अपेक्षेच्या कटो-यात त्यापैकी काही पडतही आहे. त्याने मी आनंदी नाही उलट जे नेमके त्यात पडले नाही त्यानेच आधिक दु:खी आहे. जे मिळाले त्याचा आनंद नाही पण जे मिळाले नाही त्याचा दु:खभारच आधिक आहे. मी फक्त मागतोच आहे. याच्याकडून, त्याच्याकडून, घराकडून-दाराकडून, नात्यांकडून-नात्याबाहेरच्या गणगोतांकडून, ओळखी-पाळखीकडून, एवढेच काय अनोळख्यांकडूनसुद्धा.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *🕺आपण एक छान गाणं नेहमी ऐकतो* *की ---झाले गेले विसरुनी* *जावे,* *🏃🏼♂पुढे पुढे चालावे जीवन गाणे गातच* *रहावे।* *😁खरे आहे,ज्याला आनंदी जगायचे* *त्याने काही पथ्य* *पाळावीत.* *💪🏻तात्वीक भांडण सर्वांशी होते ,पण "शत्रुत्व" कुणाशीचं ठेवू नये...* *खरं तर मतभेद एकमेकांशी असू शकतात, जरूर असावे, पण मनात कायम "भेद" ठेवू नये..* *🤝🏻एखाद्याशी वाद घालावा, पण वादावादी न करता क्षणात "सुसंवाद" साधवा.* *"अहंकार" हाच या सर्वाच मुळ आहे, तो विनाकारण "बाळगुन जगू" नये..* *शेवटी "मृत्यू" हे "सुंदर,शाश्वत वास्तव" आहे, त्याचे "स्मरण" असावे भय नसावे.* *👉आपण जन्माला आलोय ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर "उरलेल्या दिवसांचा "आनंद " उपभोग घेण्यासाठी याचे "स्मरण" ठेवू या.* *😁आपण किती आनंदात आहोत त्यापेक्षा आपल्यामुळे किती "जण आनंदात" आहेत याला खूप महत्व आहे.* *✌✌"एक हृदय" घेऊन आलोय जाताना "लाखो हृदयात" जागा करुन जाता आलं पाहिजे* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ईश्वर हा कुठे आहे हे मला माहीत नाही,पण त्याचे अस्तित्व मात्र कुठे ना कुठे आहे हे आपण आपल्या अंतःकरणात थोडे डोकावून पाहिले तर असे लक्षात येईल की,तो कुठेतरी,कोणत्यातरी माणसाच्या अंतरंगात स्थित आहे.म्हणूनच संकटाच्या वेळी नाव आपण ईश्वराचे घेतो पण तो काही येत नाही आणि येतो तो धावून माणूसच.मग ईश्वराच्या स्थानी संकटाच्यावेळी धावून येणा-या माणसालाच आपण म्हणतो की,बाबारे तू माझ्यासाठी देव म्हणून आलास.देव जरी नसला तरी देवरुपी माणसाला माणूसरुपी देव म्हटले तर वावगे ठरणार नाही.जो संकटाच्या वेळी धावून येतो तोच आपल्यासाठी देव असतो. तोच आपला ईश्वर असतो.तोच आपला तारणहार विधाता असतो.ईश्वराचे अस्तित्व माणसात आहे.ईश्वरानेच त्याला आपला प्रतिनिधी म्हणून आपल्याकडे मनुष्यरुपाने पाठवलेला असतो असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०. 🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *डॉ. एम. विश्र्वेश्वरैय्या* खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. भारतावर इंग्रजांचे राज्य होते. माणसांनी खच्चून भरलेली एक रेल्वे प्रवास करत होती. प्रवाशांमध्ये जास्तीत जास्त भरणा हा इंग्रजांचाच होता. एका डब्यात एक भारतीय गंभीर चेहरा करून बसलेला होता. सावळ्या रंगाचा, मध्यम उंचीचा हा मनुष्य साधारणप्रतीचे कपडे घालून प्रवास करत होता. त्याच्या रंगाकडे आणि एकूणच अवताराकडे बघून डब्यातील बहुतांश इंग्रज त्याची चेष्टामस्करी करत होते. त्याला खेडूत, अडाणी समजून त्याच्या अवताराची ते टिंगल करत होते. पण त्यांच्या त्या चेष्टामस्करीकडे, टिंगल करण्याकडे त्या भारतीयाचे लक्ष नव्हते. तो त्याच्या नादात मग्न होता. अचानक तो भारतीय उठला आणि त्याने रेल्वेची साखळी ओढली. वेगात धावणारी ती आगगाडी तात्काळ थांबली. गाडीतले प्रवासी त्याला काहीबाही बोलू लागले. थोड्याच वेळात गार्डही तेथे आला व त्याने विचारले,’’ कोणी साखळी ओढून ही रेल्वे थांबविली’’ त्या सावऴया रंगाच्या व्यक्तिने उत्तर दिले,’’ मी ओढली साखळी, मी थांबवली रेल्वे’’ गार्डने या कृतीचे कारण विचारले असता ती व्यक्ति उत्तरली,’’ माझ्या अंदाजानुसार इथून काही अंतरावर रेल्वे पट्ट्या खराब झाल्या आहेत.’’ गार्डने विचारले,’’ हे तुला कसे कळले’’ ती व्यक्ति म्हणाली,’’ माझ्या अनुभवानुसार रेल्वेच्या गतीमध्ये काही फरक पडला आहे आणि त्यामुळे रेल्वेचा जो विशिष्ट आवाज येतो तो न येता आवाज न येता वेगळा आवाज येऊ लागला आहे. असा आवाज फक्त रेल्वे पट्ट्या खराब असतानाच येतो हे माझे गणित आहे. आपण याची खात्री करून बघू शकता.’’ गार्डने याची खातरजमा करून बघण्यासाठी त्या व्यक्तिला बरोबर घेतले व पुढे जाऊन पाहतात तो काय, एका ठिकाणी खरोखरीच रूळाच्या पट्ट्या निसटून रूळ सटकले होते. तेथील नटबोल्टही तेथूनच बाहेर पडलेले दिसून येत होते. हे सर्व होत असतानाच रेल्वेत त्या माणसाची टिंगल करणारे प्रवासीही तेथे येऊन पोहोचले व हे सर्व पाहून ते आश्चर्यचकित झाले. केवळ त्या माणसाच्या ज्ञानामुळे आज त्यांचे प्राण वाचले होते हे जाणवून ते सर्व आता त्या माणसाची प्रशंसा व स्तुती करू लागले. गार्डने त्यांचे आभार मानले व विचारले,’’ सर, मी तुमचे नाव व हुद्दा जाणू शकतो काय’’ त्या माणसाने शांतपणे उत्तर दिले,’’ माझे नाव डॉ.एम. विश्र्वेश्वरैय्या असून मी व्यवसायाने इंजिनियर आहे.’’ त्यांचे नाव ऐकताच सगळेचजण स्तब्ध झाले. कारण त्याकाळात विश्र्वेश्वरैय्या यांना संपूर्ण देश एक हुशार इंजिनिअर म्हणून ओळखत होता. टिंगल करणा-या लोकांनी त्यांची क्षमा मागितली. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) *या बुलेटीनला आज चार वर्षे पूर्ण होत आहेत* 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 14/08/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ◆ १९२१ - तन्नु तुव्हा या राष्ट्राची रचना. ◆ १९४७ - पाकिस्तानची निर्मिती 💥 जन्म :- ◆ १९११ - वेदतिरी महारिषी, भारतीय तत्त्वज्ञानी. ◆ १८९७ - विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील ◆ १९२५ - जयवंत दळवी, मराठी लेखक, नाटककार. ◆ १९६८ - प्रवीण आम्रे, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ◆ १९८४ - खाशाबा जाधव, भारतीय कुस्तीगीर. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्रालयात प्रोटोकॉलला खूप महत्त्व आहे. मात्र, त्यांनी प्रोटोकॉलची परिभाषा बदलून ती पीपल्स कॉल अशी केली. त्यांनी जगभरातील भारतीय समुदायाला मदत केली - पंतप्रधान नरेंद्र मोदी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांसह जिल्ह्यामधील पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारने दिलेल्या पाच कोटी रुपयांच्या निधीचे वाटप* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नवी दिल्ली: दिल्लीतील आम आदमी सरकारने फ्री इंटरनेटची घोषणा केली होती. त्यातच आता पुन्हा मोठी घोषणा केली आहे. त्यांनी रिक्षा फिटनेस फी माफ करण्याचा घेतला निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांना देणार, औरंगाबाद जिल्ह्यातील दूध उत्पादक संघानं पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केले 25 लाख रुपये* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *औरंगाबाद : डीएड प्रमाणपत्र पडताळणीसाठी राज्यभरातून निवड झालेल्या टीईटी धारकांची औरंगाबाद जिल्हा परिषदेत गर्दी; तपासणी अधिकारी उपस्थित नसल्यामुळे त्यांच्यावर ताटकळत बसण्याची वेळ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *राष्ट्रकुल स्पर्धेत 24 वर्षांनंतर क्रिकेटची एन्ट्री ; बर्मिंगहॅम येथे 2022 मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *23 वर्षीय ऐश्वर्या पिस्सायची ऐतिहासिक कामगिरी ; मोटरस्पोर्टमध्ये वर्ल्ड कप जिंकणारी ही पहिलीच भारतीय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *डॉ विठ्ठलराव विखे पाटील जयंती विशेष* https://shikshakmitr.blogspot.com/2019/08/blog-post_13.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ संकलन *रवी ढगे, नांदेड* 9049931555 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *अनुवांशिकता म्हणजे काय ?* 📙 आमची वंशावळ' आमची जमात, अनुवांशिक रंगरूप व अनुवांशिक रोग इत्यादी गोष्टी सतत कानावर पडत असतात. काही वेळा चर्चेत येत असतात. अनुवांशिकी किंवा हेरिडिटी या संदर्भात महत्त्वपूर्ण संशोधन अॅबेट ग्रेगर जोहनान मेंडेल यांनी केले. मेंडलचे नियम म्हणून त्यांनी केलेले संशोधन जनुकशास्त्रात आजही आधारभूत मानले जाते. मेंडलचा पहिला नियम सांगतो की, विरुद्धगुणी शुद्ध बीजांचा संकर घडवला, तर त्यातील आक्रमक बीजाचे गुणधर्म पुढच्या पिढीत उतरतात. दुसऱ्या नियमानुसार एकापेक्षा जास्त जनुकांच्या जोडय़ा जर यात सामील असतील तर प्रत्येक जोडीतील आक्रमक जोडीचे संयुक्त गुणधर्म प्राधान्याने पुढच्या पिढीत दिसतात. याचाच एक सोपा अर्थ म्हणजे जसेच्या तसे संक्रमण होत नाही, तर त्यात प्राधान्यक्रम ठरवला जातो. या साऱ्या गोष्टी विविध वनस्पतींच्या रंगसंकरातून, उंच बुटक्या जातींतून मेंडेल यांनी सिद्ध केल्या. यानुसार अनुवंशिकीचा विचार माणसाच्या संदर्भात करायचा झाला तर एकाच बीजांडांचे विभाजन होऊन झालेली जुळी भावंडेच फक्त सारखी असू शकतात. अन्यथा पहिल्या पिढीतील सर्व गुणधर्म दुसऱ्या पिढीत कधीही आढळणार नाहीत. स्त्रीबीजांडात व पुरुष शुक्रजंतुत जर प्रत्येक २३ क्रोमोसोमच्या जोड्या असतील, तर विविध गुणोत्तरातून २^२३ म्हणजेच ८३,८८,६०८ इतक्या विविध प्रकारे (पणजोबा, आजोबा, वडील, मुलगा यांच्यात अनुवांशिकी गुणधर्म जसेच्या तसे येण्याची शक्यता ८३,८८,६०८ मध्ये एक एवढीच राहते.) अनुवंशिकी संक्रमण होऊ शकते. जगभरची सर्व माणसे जरी मूलतः आफ्रिकेत निवास करीत होती, तरीही चेहरेपट्टी, उंची, डोळ्यांचे रंग यात असंख्य बदल याच कारणाने विविध जाती जमाती आढळतात. याशिवाय हवामान, रहाणीमान, सूर्यप्रकाश यांचा परिणाम कातडीच्या रंगावर होत असतो, तो वेगळाच. त्यामुळेच जगातील असंख्य प्राणी, साडेसहाशे कोटी माणसे, विविध वनस्पती यांत विविध प्रकार आपल्याला सहजगत्या पाहावयास मिळतात. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ ज्या माणसाजवळ संयम आहे तो प्रत्येक गोष्टीचा धनी असतो. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *पेंच राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?* नागपूर 2) *शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केव्हा झाला ?* 6 जुन 1674 3) *'मराठी भाषेचे पाणिनी' म्हणून कोणाला ओळखले जाते ?* दादोबा पांडुरंग तर्खडकर 4) *सावित्रीबाई फुले यांचा जन्म केव्हा झाला ?* 3 जानेवारी 1831 5) *उत्तरप्रदेश राज्याचा राज्यपक्षी कोणता ?* सारस *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● गजानन रामोड ● राजू टोम्पे ● सुनील गुडेवार ● गजानन पाटील ● मुनेश्वर सुतार ● गणेश ईबीतवार ● किरण मुधोळकर ● राहुल तलाठी ● राम होले ● पवन लिंगायत *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कोणतेही नाते प्रत्येक क्रियेने उज्ज्वल करता येणे, ही खरी सार्थकता. परंपरेने किंवा संस्कृतीने जी सणावारांची यादी केली, त्या प्रत्येक सणाचा अन्वयार्थ नव्याने शोधायला हवा; तरच आनंद-परमानंद-ब्रम्हानंद या पाय-या चढता येतील. वाद आणि भांडणाच्या प्रकारात जो अडकतो त्याचा फास आधिकाधिक घट्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे स्नेहभावनेतून जग जोडले पाहिजे. भारतीय संस्कृतीत प्रत्येक दिवस स्नेहाद्रता पेरत येतो, म्हणून सण हे उत्सवांचे प्रतीक म्हणून साजरे व्हावेत.* *नात्यांचा, घटनांचा अर्थ लावत आपल्याला मनाचा स्वयंविकास जेव्हा साधता येईल, तेव्हाच सगळे सण-उत्सव प्रतीकरूप होतील. रोजचा दिवस येतो आणि जातो. रोजच्या कामात मग्न असणारे आपण काही नवीन करतो का, किंवा जे कुठलेही काम करतो त्याच्यात काही नवीन शोधतो का ? नसल्यास ते जमले पाहिजे. नित्यनूतनतेचा ध्यास जोवर लागत नाही, तोवर आयुष्यातून शिळेपणा जाणार नाही. प्रत्येक क्षणाचा उत्सव करणे हे आपले कर्तव्य आहे. या भावनेने जगण्याच्या अनेकविध अंगांकडे पाहता आले पाहिजे.* *॥ रामकृष्णहरी ॥* 💥💥💥💥💥💥💥💥 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एक फिल्मी गीत ऐकलं की डोक्यात सणक निघायची। वाटायचं एव्हढा* *अलौकिक जन्म* *मिळाला तो काय रडायला* *मिळाला का?* *ते अस,* " *दुनिया बनाने वाले ,काहेको दुनिया बनाई। तुने काहेको दुनिया बनाई।"* *मग लक्षात आलं।की अरे हा-- तुम्ही हारलात किंवा अपयशी झालात तर* *जवळचे सुद्धा लांब रहाण्याचा प्रयत्न करतात.जवळचा* *असूनही* *चुलत-चुलत वगैरे सांगतात.* *पण या उलट तुम्ही कुठल्याही क्षेत्रात* *उत्तुंग शिखर गाठा. मग* *कमाल बघा---अहो नाती नसतांना* *_सुध्दा संबंध जोडला_* *जातो,आहो माझा खूप* *क्लोज नातेवाईक आहे,मित्र* *आहे असं सांगितलं* *जातं.* *दुनियाच अशी आहे दोस्तो,तुम्ही गुणवान असलात की सगळे मूग* *गिळून बसणार। अन थोडका चुकीचं घडूद्या किंवा व्यंग सापडुदया की मुका सुद्धा* *बोलायला लागतो.* *म्हणून जगून घ्या, जग दोनही बाजू तपासत आणि त्यांच्या प्रमाणे विचार करत* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* *जि. प. शाळा.---माणिकखांब,* *ता.इगतपुरी, जि.नासिक* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹शुभेच्छा संदेश...🌹 ------------------- फ्रेश माॅर्निंग बुलेटिनचे चार वर्षे पूर्ण झाली असून पाचव्या वर्षात दमदार पदार्पण.... ------------------- एक चिंतनशिल व्यक्तिमत्व, अष्टपैलू आणि दमदार कोणत्याही विषयावर शिघ्र लेखन करणारे फ्रेश माॅर्निंग बुलेटिनचे संचालक माझे मित्र ना.सा.येवतीकर यांचे मनापासून अभिनंदन. या बुलेटिनच्या माध्यमातून शाळा,शिक्षक आणि विद्यार्थी यांना जोडणारे व विद्यार्थ्यांना सातत्याने शिक्षणप्रवाहात प्रवाहीत करण्याचे मनापासून प्रयत्न करण्याचे काम ना.सा.सरांनी केले. विद्यार्थी हा विद्यार्थी न राहता त्याला पुस्तकी ज्ञानाबरोबरच जनरल नॉलेजची आवड निर्माण व्हावी,जगात काय चाललंय यांचेही ज्ञान मिळावे, दिनविशेष,बोधकथा, विचार सुविचार, दैनिक वार्ता, व्यक्तीविशेष,वाढदिवस शुभेच्छा इ.चे स्वतंत्र टप्प्यात इत्यंभूत माहिती सदरील बुलेटिनमध्ये सातत्याने सादरीकरण करण्याचे उत्कृष्ट कौशल्य आणि आॅडिओ स्वरुपात बातमीपत्र सादरीकरण हे ना.सा.चे विशेष व्यक्तिमत्व त्यांच्यात आहे.त्या अख्या महाराष्ट्रात नावलौकिक मिळविला आणि ते ही न थकता,न थांबता अविरत ज्ञानाचा यज्ञ चालू आहे आणि असाच चालत राहणार आहे.यासाठी त्यांनी अनेक शब्द प्रभूंची साथ घेतली.काहींना माणसे तोडण्यात आनंद असतो तर काहींना माणसे जोडण्यात खूप आनंद वाटतो.तसेच ना.सा.हे अवलिया दुसऱ्या फळीचे आहेत.मी नेहमी संपर्कात राहतो मला आनंद वाटतो.आमच्या सारख्या छोट्या माणसांना जवळ केले आणि विद्यार्थ्यापर्यंत पोहचवले याचा आनंद खूप वाटतो.माझ्या विचारवेधला त्यांनी खूप दूरपर्यंत पोहोचवले यांचा आनंद आहे.मला सातत्याने लिहिण्याची प्रेरणा दिली.एखाद्या दिवशी मला जरी काही कारणास्तव विचार लिहिले नसलेतरी माझ्या विचारवेध या संग्रहीत पुस्तकातून ते बुलेटिन मध्ये घेत असतात.असा हा सगळ्यांना घेऊन जाणारा जिद्दी माणूस..! त्यांच्याकडून खूप काही घेण्यासारखे आहे.तो सदैव ज्ञानदानाचे कार्य करत असतो.अशा माझ्या मित्राला खूप यश मिळो आणि या बुलेटिन चे सातत्याने प्रगती होवो.पाच वर्षच काय पण अखंड प्रवास चालू राहण्यासाठी बळ मिळो हीच मनस्वी प्रार्थना.सगळ्यांनीच अशी साथ द्यावी व अधिक नावारुपाला यावे ही मनस्वी शुभेच्छा... शुभेच्छूक, व्यंकटेश काटकर,नांदेड ' विचारवेध ' संवाद..९४२१८३९५९०. 🌹🌹🙏🏻🙏🏻🌹🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• वस्तूचे मोल एके ठिकाणी एक रेशमाचा किडा होता. तो एके दिवशी आपला रेशमी कोश विणत होता. त्यावेळी शेजारी एक कोळी होता. तो मोठय़ा चपळतेने आपले जाळे विणत होता. तो कोळी त्या किड्याकडे तिरस्काराने पाहून त्याला म्हणाला, 'अरे, माझ्या जाळ्यासंबंधी तुझे काय मत आहे? हे जाळे मी आज सकाळी प्रारंभ केले व आता ते अर्धेअधिक पुरेसुद्धा झाले. एवढे मोठे व इतके सुंदर जाळे मी इतक्या थोड्या वेळात विणले तरी तू आपला रेंगाळतच बसला आहेस.' त्यावर रेशमाचा किडा शांतपणे उत्तरला, 'अरे, तू वाटेल तेवढी बढाई मारलीस तरी तुझ्या व माझ्या जाळ्यातील अंतर सगळ्यांना माहीत आहे. गरीब बिचार्या निरपराधी प्राण्यांना पकडण्यासाठी तू ते जाळे पसरले आहेस, त्याचे आयुष्य किती क्षणिक आहे बरे? एखाद्या मुलाने हे जाळे पाहिले तर तो एका क्षणात याचा नाश करून टाकेल. उलट माझ्या जाळ्यापासून जे रेशीम निघेल, त्याची वस्त्रं पुढे एखाद्या राजाच्याही अंगावर बघावयास मिळतील. तात्पर्य : कोणत्याही वस्तूची किंमत मोठ्या आकारावरून न ठरवता लहानशी वस्तू देखील अतिशय उपयुक्त आणि मौल्यवान असते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 13/08/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ◆ २००४ - नागपूरमध्ये संतापलेल्या स्त्रियांनी अक्कू यादव या गुंडाला न्यायालयाच्या आवारात घेरुन ठार मारले. ◆ २००४ - जगातील एक सर्वात पुरातन संस्कृती असलेल्या ग्रीसच्या राजधानी अथेन्समध्ये शतकातील पहिल्या ऑलिंपिकला जल्लोषात प्रारंभ झाला. 💥 जन्म :- ◆ १८९० - त्र्यंबक बापूजी ठोंबरे तथा बालकवी, मराठी कवी. ◆ १८९८ - आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, मराठी साहित्यिक. ◆ १८९८ - विश्राम बेडेकर, मराठी साहित्यिक. ◆ १९२३ - पंडित काशिनाथशास्त्री जोशी, भागवत अभ्यासक, प्रवचनकार. 💥 मृत्यू :- ◆१७९५ - अहिल्याबाई होळकर. ◆ १९८० - लेखक पुरुषोत्तम भास्कर भावे यांचे निधन. 'प्रथमपुरुषी एकवचनी' हे त्यांचे आत्मचरित्र. 'रक्त आणि अश्रू' हा लेखसंग्रह, 'विषकन्या', 'स्वामीनी', 'महाराणी पह्यिमी' ही त्यांची नाटके गाजली. ◆१९८८ - व दिग्दर्शक गजानन जागीरदार यांचे निधन. पुण्याच्या चित्रपट आणि दूरदर्शन प्रशिक्षण संस्थेचे ते पहिले प्राचार्य होते. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *कोल्हापूर आणि सांगलीतील पूर ओसरण्यास सुरुवात, आठवड्याभराने पुणे-बंगळुरु महामार्ग सुरु, पेट्रोल पंपावर कोल्हापूरकरांची भलीमोठी रांग* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *देशभरात बकरी ईद उत्साहात, सांगली-कोल्हापुरातील मुस्लीम बांधवांकडूव साध्या पद्धतीने ईद साजरी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *काश्मीरातील कलम 370 रद्द झाल्यानंतर वाघा-अटारी सीमेवर आज ईदच्या दिवशी पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय जवानांकडील मिठाई नाकारली, भारत-बांग्लादेश सीमेवर मात्र जल्लोष* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *रेल्वे रुळावर दरड कोसळल्याने बंद करण्यात आलेली मुंबई-पुणे रेल्वे सेवा पूर्ववत होईपर्यंत या मार्गावर एसटीच्या ज्यादा बसेस धावणार, प्रवाशांची गैरसौय टाळण्यासाठी एसटी महामंडळाचा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *येत्या 5 सप्टेंबर पासून जिओ गिगा फायबर सेवा होणार लाँच, ब्रॉडबँड इंटरनेट सोबतच सेट टॉप बॉक्सद्वारे टीव्ही चॅनलचाही आनंद घेता येणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *चांद्रयान-2 14 ऑगस्टला पहाटे साडे तीन वाजता पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राकडे झेपावणार; इस्त्रोची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारतीय संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर डकवर्थ लुईसनुसार 59 धावांनी विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीनं कारकिर्दीतले 42 वे शतक हे आजच्या खेळाचे वैशिष्ट्य* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वेळेचे नियोजन* वेळ ही एक अशी वस्तू आहे जे की कोणासाठी ही थांबत नाही. मग तो श्रीमंत असो की गरीब सर्वांसाठी वेळ सारखाच असतो. जो वेळेची कदर करतो वेळ त्याची कदर करते. जो वेळेला ओळखतो त्याला नंतर वेळ ओळखते. गेलेली वेळ किती ही पैसा खर्च केला तरी परत मिळत नाही. म्हणून...... पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे. https://nasayeotikar.blogspot.com/2019/08/blog-post.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *अँपिअर म्हणजे काय ?* 📙 विद्युतप्रवाह तारेतून वाहत असताना तो मोजण्याचे माप म्हणजे अॅम्पिअर (Ampere) होय. हे मोजण्याच्या साधनाला अॅमिटर (Ammeter) असे म्हणतात. फ्रेंच शास्त्रज्ञ आंद्रे ऍम्पीअर याने वीजप्रवाह कसा मोजायचा, ते शोधून काढले. त्याच्याच नावाने हे मोजमाप मग प्रचलित झाले आहे. विद्युत प्रवाह वाहतो म्हणजे तारेतील इलेक्ट्रॉन एका दिशेने वाहत असतात. विजेचा दिवा लावला असताना त्याच्या तारेतून एका सेकंदाला तीन मिलियन मिलियन मिलियन इतके इलेक्ट्रॉन वाहतात. एक मिलियन म्हणजे एक दशलक्ष. आकडा बरोबर लिहिण्यासाठीसुद्धा मिनिटभर लागेल. मग हे सारे सोप्या शब्दात व्यक्त करण्यासाठी आपण विद्युतप्रवाह अँपिअरध्ये मोजतो. याचा उच्चार थोडक्यात अँप असाही करतात. एक अँपिअर म्हणजे दर सेकंदाला ६ मिलियन मिलियन मिलियन इलेक्ट्रॉनचा प्रवाह होय. अॅमिटरने जेव्हा विद्युतप्रवाह मोजतात, तेव्हा हा अॅमिटर विजेच्या 'सर्किट'मध्ये जोडला जातो. त्यावरचा काटा किती वीजप्रवाह वापरला जात आहे, हे तात्काळ दर्शवतो. घरगुती वापरासाठी आपण अर्धा ते पाच अँपिअरचा वीजप्रवाह वापरत असतो. इस्त्री, विजेची शेगडी, पाणी तापवायचा गिझर यांन जास्त वीजप्रवाह लागतो. तर विजेचे दिवे, ट्यूबलाइट, पंखे यांना जेमतेम अर्धा ते एक अँपिअरचा प्रवाह लागतो. विजेचा प्रवाह जितका जास्त लागणार असेल तितकी विजेच्या तारांची जाडी वाढवावी लागते. एखाद्या कारखान्याच्या विजेच्या तारा घरातील तारांपेक्षा किती जाड असतात, ते लक्ष देऊन बघण्यासारखे असते. वीजप्रवाहाचा एक महत्त्वाचा गुणधर्म हा की त्यामुळे चुंबकसूची हलते म्हणजे चुंबक क्षेत्र निर्माण होते. दुसरा महत्त्वाचा गुणधर्म हा की वीजप्रवाहाने उष्णता निर्माण होते. जितका वीजप्रवाह जास्त तितकी त्याची उष्णता निर्माण करण्याची शक्ती वाढत जाते. वेल्डिंग मशीनमधील पन्नास ते तीनशे ॲम्पिअरचा प्रवाह धातु वितळवण्याइतकी सुद्धा उष्णता निर्माण करू शकतो. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ मरण सोपे असते, जगण्यासाठी मात्र धैर्य लागते. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *नांदूर-मधमेश्वर पक्षी अभयारण्य कोठे आहे ?* नाशिक 2) *माळढोक पक्षी अभयारण्य कोठे आहे ?* सोलापूर 3) *प्रसिध्द समाजसेवक अण्णा हजारे यांचे जन्मगाव कोणते ?* राळेगणसिद्धी ( अहमदनगर ) 4) *राजमाता जिजाऊ यांचे जन्मगाव कोणते ?* सिंदखेडराजा ( बुलढाणा ) 5) *शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ केव्हा घेतली ?* 1646 *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● सुयोग पेनकर ● प्रशांत सब्बनवार ● योगेश येवतीकर ● नरेंदर रेड्डी ● गणेश धाकतोडे ● नागेश गुर्जलवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वत:वर विश्वास असणे फार महत्वाचे आहे. तो नसल्यास न्यूनगंड निर्माण होतो. मानवी जीवन सुंदर आहे, यावर विश्वास ठेवल्यास मनात जगण्यासाठी नवी उमेद निर्माण होते. आशावदी दृष्टीकोन हा विश्वासाचाच अविभाज्य भाग आहे. आशावाद मानवी मनाला प्रेरणा देऊन कर्तव्य पार पाडण्यासाठी लागणारी ऊर्जा पुरवतो. विश्वासाचा संबंध व्यक्तीच्या ह्रदयाशी, मनाशी असतो. तो दृश्य स्वरूपात नसून अदृश्य स्वरूपाचा असतो. तो समजून घ्यायचा असेल, तर आपल्या आत डोकवावे लागेल.* *याच विश्वासाची गळचेपी होत असल्याचे आज पावलोपावली जाणवते. मुलांचा आईवडिलांवरील, आई-वडिलांचा मुलांवरील, पती-पत्नीच्या नात्यातील, विद्यार्थ्यांचा गुरूजनांवरील, रूग्णांचा डाॅक्टरांवरील, मित्र-मैत्रिणींचा एकमेकावरील, जनतेचा राजकारण्यांवरील विश्वास कमी होत चाललाय...त्याला तडा जात असल्याचे आपल्याला दिसते. याचे कारण स्वार्थधुंदीत आपण माणूसपण विसरू लागलो. औपचारिकता आणि आधुनिकतेच्या नावाखाली विश्वासाला नख लावणे सुरू झाले. मॅथ्यू अरनाॅल्ड हा कवी मानवी जीवनातील विश्वासाची व्याप्ती व खोली स्पष्ट करण्यासाठी समुद्राची प्रतिमा वापरतो. भूतकाळात विश्वासाची व्याप्ती समुद्राएवढी होती. प्रत्येकाच्या ह्रदयात विश्वासाला महत्वाचे स्थान होते. अशीच परिस्थिती चालत राहिली, तर भविष्यात विश्वासाची अवस्था केविलवाणी होईल. मानवी समाजात विश्वासाची जागा संशय घेईल व सर्वत्र सावळागोंधळ निर्माण होईल. चला तर..अंतस्थ विचार बदलून विश्वासाला पात्र बनू या..* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रानो* *अाकाशातील ग्रह पृथ्वीवरील माणसावर परिणाम करतात की नाही ते माहीत नाही... परंतु* *पृथ्वीवरील माणसे एकमेकांबद्दल जे ग्रह करून घेतात ते मात्र माणसाच्या जीवनावर निश्चित परिणाम करतात... *जे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी* *किंवा मोठेपणा साठी* *जवळची माणसे तोडतात*... *असे लोक छोट्या छोटया लुटूपुटूच्या लढाया जिंकतील* .... *पण अंतिम युद्ध कधीच जिंकू शकत नाहीत*. *कारण ..घरातच शत्रू निर्माण केल्यामुळे* *बाहेरचा शत्रू न लढताही जिंकतो*.. *म्हणून* *जोडता नाही आले तर जोडू* *नका*. **पण आपल्या लोकांना तोडू नका* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• शिक्षणामुळे केवळ माणूस शहाणा होत नाही तर त्याच्यामध्ये असणारा अज्ञानपणा,अयोग्य दिशेने जाणारे पाऊल,आपल्यात असलेला कमीपणा दूर करण्याचा मार्ग आणि जीवनात कसे जगायचे याचे शास्त्रशुध्द ज्ञान शिक्षणामुळे मिळते.तसेच सुखी व समृद्ध जीवन म्हणजे काय याबद्दलचीही जाणीव शिक्षणामुळे मिळते.म्हणून शिक्षणाचा खरा मार्ग आपल्या जीवनासाठी आपल्या प्रगतीचे केंद्र मानून स्वीकारणे काळाची गरज आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कर्णाची दानशुरता* कर्ण दुर्योधनाचा खास मित्र होता. तो दानशूर म्हणून प्रसिद्ध होता. आपल्याकडे आलेल्या याचकाला तो कधीही रिकाम्या हाताने जाऊ देत नव्हता. एकदाचा हा प्रसंग एकदा भगवान श्रीकृष्ण अणि अर्जुन गप्पा मारत बसले होते. बोलता बोलता कर्णाच्या दानशूरपणाविषयी बोलणे चालू झाले. कृष्णाने कर्णाच्या दानशूरतेचे कौतुक केले. श्रीकृष्ण म्हणाला, ''कर्णाइतकी उदार व्यक्ती दुसरी कुणीही नाही.'' या बोलण्याचे अर्जुनाला जरा आश्चर्यच वाटले. अर्जुन म्हणाला, ''श्रीकृष्णा, धर्मराजही दानशूर आहे.'' सर्वांत अधिक दानशूर कोण आहे ? यावर मग त्यांची चर्चा चालू झाली. श्रीकृष्ण नेहमीप्रमाणेच याही गोष्टीची प्रचीती आणून देण्यासाठी सिद्ध होता. श्रीकृष्ण म्हणाला, ''ठीक आहे, उद्याच आपण धर्मराज आणि कर्ण दोघांकडे जाऊन या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावून टाकू.'' पावसाळयाचे दिवस होते. दुसऱ्या दिवशी उजाडताच श्रीकृष्ण आणि अर्जुन धर्मराजाकडे गेले. धर्मराजाला आनंद झाला. त्याने त्या दोघांचे स्वागत केले. त्यांच्या येण्याचे कारण विचारले. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, ''राजधानीत एक महत्त्वाचे बांधकाम अचानक करावयाचे आहे. त्यासाठी लाकडे हवी आहेत.'' धर्मराजाने आपल्या सेवकांना बोलावले आणि बांधकामासाठी उत्तम प्रतीचे लाकूड आणण्याची आज्ञा केली. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. बराच वेळ झाला, तरी सेवक काही परतले नाहीत. बऱ्याच वेळाने सेवक परत आले, तेही खाली मान घालून. धर्मराज म्हणाला, ''काय झाले ? लाकडे मिळाली नाहीत का ?'' सगळीकडे पाऊस पडत असल्याने सारी लाकडे भिजलेलीी होती आणि त्यामुळे सेवक लाकडे आणू शकले नव्हते. नाईलाजाने धर्मराजाने अर्जुन आणि श्रीकृष्णाला लाकडे न मिळाल्याचे कारण सांगितले. श्रीकृष्ण आणि अर्जुन परत फिरले. त्यानंतर श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्णाकडे येण्यास सांगितले. त्याच्याकडे गेल्यावर कर्णाने त्यांना आदराने आसनावर बसवले. त्यांचे क्षेमकुशल विचारले. त्यावर अर्जुनाने लाकडांची तातडीने आवश्यकता असल्याचे सांगितले. कर्ण म्हणाला, "एवढेच ना, मग त्यात एवढी चिंता करण्यासारखे काय आहे ?'' असे म्हणून त्याने आपल्या सेवकांना लाकडे आणण्यासाठी पाठवले. थोड्या वेळाने परत आलेले सेवक त्याला म्हणाले की, पावसाच्या पाण्याने सारी लाकडे ओली झाल्याने लाकडे मिळू शकली नाहीत. सेवकांचे बोलणे ऐकताक्षणी कर्ण आत गेला. बराच वेळ होऊनही कर्ण बाहेर येत नाही, असे पाहून अर्जुन श्रीकृष्णाकडे बघायला लागला. श्रीकृष्ण त्याला समवेत घेऊन कर्णाच्या दालनात गेला. बघतो तर काय, कर्ण आपल्या पलंगाचे पाय कापत होता. आजूबाजूला इतर लाकडी सामान तोडून ठेवलेले होते. आता त्यांना कर्णाला वेळ का लागला, याचे कारण उमगले. अर्जुनाने विचारले, ''कर्णा, एवढ्यासाठी तू तुझे चंदनाचे कलात्मक लाकडी पलंग कशाला तोडलेस ?'' त्यावर कर्ण उद्गारला, '' या वस्तू काय पुन्हा बनवता येतील; पण कुणाला आपल्याला काही देण्याची वेळ यावी आणि आपण तो क्षण गमवावा, यासारखे दु:ख कोणते असेल ?'' पुढे याच कर्णाने आपली वरदान मिळालेली अंगभूत कवचकुंडलेही दान केली आणि आपल्या त्यागाचे मूर्तीमंत उदाहरण इतिहासात ठेवले. मुलांनो, दानशूर कर्णाची गोष्ट आपण पाहिली. आपल्याला आपली छोटीशी वस्तूही देण्याची इच्छा नसते. येथे तर त्याने आपली वरदान मिळालेली अंगभूत कवचकुंडलेही दान केली.केवढी ही महानता दानशुरता. आपल्यालाही आपल्या वस्तूंचा त्याग करता आला पाहिजे. आपणही समाजाचे देणे लागतो ह्या हेतूने जगावे.. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 10/08/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ◆१९९९-औषधांच्या दुकानांवर विकल्या जाणाऱ्या औषधात प्राणिज पदार्थ असल्यास त्याचा उल्लेख वेष्टणावर करणे अनिवार्य असल्याचा केंद्रसरकारच्या सामाजिक न्याय खात्याचा निर्णय. ◆१९८८ - दुसर्या महायुद्धात बेकायदेशीरपणे बंदिवासात टाकलेल्या जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना अमेरिकेने प्रत्येकी २०,००० डॉलर देण्याचे कबूल केले. ◆ १९९० - मॅगेलन अंतराळयान शुक्र ग्रहावर पोचले. 💥 जन्म :- ◆ १८९४- व्ही.व्ही. गिरी भारताचे चौथे राष्ट्रपती ◆१८६० - पंडित विष्णू नारायण भातखंडे, भारतीय संगीतकार, संगीततज्ञ. ◆१९६०-देवांग मेहता,भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्त्व. 💥 मृत्यू :- ◆१९४२-हुतात्मा शिरीषकुमार. ◆ १९४५ - रॉबर्ट गॉडार्ड, अमेरिकन रॉकेटतज्ञ. ◆१९७६ - बर्ट ओल्डफील्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई : पूरपरिस्थितीमुळे सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या 10, 11 आणि 12 ऑगस्टच्या सुट्ट्या करण्यात आल्या रद्द* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या नायब राज्यपालपदी विजयकुमार यांची नियुक्ती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नवी दिल्ली - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2019 जाहीर, 'भोंगा' चित्रपटाला सर्वोकृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई : राजपत्रित अधिकाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांना, साठ कोटी रुपये जमा होणार, मुख्यमंत्री सहायता निधी देणार रक्कम* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई- एमपीएससी परीक्षा देणाऱ्यांसाठी दिलासा, परीक्षा 11 ऑगस्टऐवजी 24 ऑगस्ट रोजी होणार, पुरामुळे घेतला निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नवी दिल्ली - माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात केले दाखल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *India vs West Indies ODI : भारताचा वेस्ट इंडिज विरुद्धचा पहिला सामना पावसामुळे सामना रद्द* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कमवा आणि शिका* सुमारे 60-70 दशकातील शिक्षणाचा विचार केला तर लक्षात येते की गावोगावी प्राथमिक शिक्षणाची देखील सोय नव्हती. उच्च शिक्षण घेणे तर दुरची गोष्ट. ज्याला शिक्षणाची गोडी लागली किंवा महत्त्व कळले असेल ते घरापासून कोसो दूर असलेल्या शाळेत घरदार सोडून शिक्षण घेतले त्यांचे जीवन खरोखरच सफल झाले. त्या काळातील शिक्षण पध्दतीचा विचार केल्यास आज ही अंगावर शहारे येतात......... पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर clik करावे. https://nasayeotikar.blogspot.com/2017/06/blog-post_86.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *अमीबा म्हणजे काय ?* 📙 साऱ्या जगात किमान दहा लाख प्रकारचे प्राणी सापडतात. पण प्राणीशास्त्राबद्दल चर्चा सुरू झाली किंवा अभ्यास करायचे ठरवले की सर्वप्रथम नाव निघते ते अमीबाचेच. एकपेशीय प्राणी हे त्याचे वैशिष्ट्य. १६६५ साली रॉबर्ट हुक या इंग्लिश निसर्गप्रेमी शास्त्रज्ञाने पेशी (Cell) हा शब्द प्रथम वापरला. बुचाच्या अभ्यासामध्ये त्याला आढळलेल्या पेशींचे वर्णन त्याने त्यावेळी करून ठेवले आहे. त्यानंतर मायक्रोस्कोपखाली सर्वच गोष्टी न्याहाळल्या जाऊ लागल्या. स्वतंत्रपणे जगू शकणारा. पुनरुत्पादनाची क्रिया स्वतंत्रपणेच करणारा एकपेशीय असा हा अमीबा त्यानंतर प्रसिद्ध पावला. अमीबा दिसण्यासाठी मायक्रोस्कोपची तशी गरज नसते. काही प्रकारचे अमीबा अर्धा मिलिमीटरएवढे मोठे असतात. ते नुसत्या डोळ्यांनीही पाण्याच्या थेंबात दिसतात. साधे भिंग वापरले, तर त्यांची हालचालही न्याहाळता येऊ शकते. काही जाती मात्र अगदी सूक्ष्मदर्शक यंत्राखाली पाहाव्या लागतात. जेलीचा एखादा गोळा कसा असावा, तसा हा प्राणी सतत स्वतःचा आकार पालटत हालचाल करत असतो. भक्षाच्या शोधात भटकंती करताना अंगाची वेटोळी लांबुडकी पसरत हा भक्षाच्या दिशेने सरकतो. भक्ष्य आवाक्यात आले की त्याला चहूबाजूंनी प्रथम तो गुरफटून टाकतो. अर्थातच याचे भक्ष्य म्हणजे त्याच्या जीवाच्या आकारास साजेसेच असते. छोटे जीवाणू, प्राणिज व वनस्पती शैवाळ सतत गट्टम करत जाणे हा त्याचा नित्यक्रम. भक्ष्य गुरफटून मग पेशीतील पेशीद्रव्यामध्ये विरघळवण्याची क्रिया सुरू होते. यावर नियंत्रण असते पेशीकेंद्राचे. गरजेप्रमाणे पाणीपण शोषले जात असतेच. पचन पूर्ण झाल्यावर नको असलेला भाग व तत्सम द्रव्ये बाहेर टाकली जातात. साध्या पेशीविभाजन पद्धतीने यांची वाढ होत असल्याने यांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर वाढत असते. पाणी, मग ते कसलेही असो, अमीबाचा वावर तेथे आढळणारच. त्यातल्या त्यात साचलेले पाणी, डबकी, चिखल यांमध्ये यांची वाढ चांगली होते. वाहत्या पाण्यात त्या मानाने अमीबा कमी सापडतात. अमीबा या प्राण्याबद्दल माणसाला सतत जागरूक राहावे लागते. पिण्याच्या पाण्यातून माणसाच्या शरीरात अमीबाचा एकदा का प्रवेश झाला की त्याच्या शरीरात सर्वत्र संचार सुरू होतो. वाढही छान होते. सर्व पचनसंस्था पोखरून काढण्याची ताकद या एकपेशीय प्राण्यात आहे. पोटाचे विविध आजार, पोटदुखी, मोठ्या आतड्याचे आजार, यकृताची गंभीर दुखणी या अगदी लहान प्राण्यामुळे होतात. जेमतेम ३० वर्षांपूर्वी या दुखण्यांसाठी फारसे खात्रीचे उपायही नव्हते. आजकाल मात्र यांवर खात्रीची औषध उपलब्ध आहेत. जगाच्या पाठीवर सर्वत्र आढळ असलेला हा अमीबा भारतीय हवामानात सर्व प्रांतांत त्याचे राज्य पसरून आहे. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ रागाच्या भारत माणूस जसे वागतो ते शेवटी लाजिरवाणे ठरते. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *जिल्हा परिषदेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?* 5 2) *जिल्हा परिषदेत कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते ?* 50 ते 75 3) *भारतरत्न पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण ?* महर्षी कर्वे 4) *महाराष्ट्रातील द्राक्षांचा जिल्हा कोणता ?* नाशिक 5) *पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ?* कोल्हापूर *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● हेमंत पापळे, अकोला ● गणेश मोहिते ● राहुल मगरे ● रामदास देशमुख ● तुकाराम यनगंदलवार ● अशोक मगरे ● व्यंकटेश पुलकंठवार ● माधव परसुरे ● अविनाश गायकवाड ● सचिन सुरबुलवाड ● दिगंबर भीमराव सावंत ● गोविंदराव शिवशेट्टे ● संतोष येवतीकर ● डॉ. चंद्रकांत पांचाळ ● नागराज आहिरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *निराशावादी लोक टोकाचा नकारात्मक विचार करतात. छोट्या संकटाला आकाश कोसळले समजले जाणारे भित्र्या सशासारखे असतात. झाडाचं पान पडलं तरी आकाश कोसळल्याच्या भ्रमाने जीव मुठीत घेऊन पळतात. हताश, निराश, उदास माणसं स्वत: निष्क्रिय होतात व दुस-याला काळजीच्या दरीत लोटत राहतात. अशांना सहानुभूती देण्यापेक्षा धैर्य देणं महत्वाचं. उलटपक्षी वस्तुनिष्ठ माणसं ! 'जीवन त्यांना कळले हो' पठडीतील असतात. ती आशेने हुरळत नाहीत नि निराशेने हताश होत नाहीत. ती व्यक्तिगत भावभावनांच्या कल्लोळात स्वत:स ना विसर्जित करतात, ना हारतात. 'अत दीप भव' म्हणत ती स्वत: अंधा-या वाटेवर पणतीच्या उजेडात चालतात. त्यांच्या हातातल्या मेणबत्तीची मशाल कधी झाली हे त्यांचे त्यांनाही कळत नाही.* *अशी माणसं सतत अंतर्मुख होऊन सिंहावलोकन करत विहंगमावलोकनाने नवी स्वप्न कवटाळत ती सत्यात उतरवत राहतात. ते पूर्वग्रहदूषित असत नाहीत नि दुस-यावर विसंबतही नाहीत. वास्तवाचं भान हा त्यांच्या जगण्याचा आधार असतो. भावनेपेक्षा तर्कावर जगणारी ही माणसं खाली जमीन न वर आकाशाचं भान ठेवून जीवन घडवतात. 'मी' आणि 'तू' याच्या पलिकडे आपण असा सामूहिक सद्-भाव व सभ्यता जोपासणारी ही तटस्थ माणसं. त्यांच्या वेदना नि संवेदना दोन्ही क्षितिजे विश्वव्यापी. अशा माणसांना मग दगडातल्या देवापेक्षा माणसातली माणुसकी महत्वाची वाटते. 'जे जे आपणांसी ठावे, ते ते इतरांसी सांगावे, शहाणे करूनि सोडावे सकलजन' असा त्यांचा सार्वजनिक सत्यधर्म असतो.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *बहिणाबाई नात्याबद्दल खूप छान* *सांगतात---जीची माया गेली* *सरी, तिले माय म्हणू नये,* *जन्मदात्याले भोवला त्याले लेक म्हणू* *नये।तसेच सुगरणीच आहे,* *खोपा इनला इनला जसा गिलक्याचा* *कोसा,* *पाखराची कारागिरी जरा देखरे* *माणसा।* *माणसाने माणसाजवळ यावं हे* *धर्म शिकवतो.* *ही* *माणसं जवळ आली की वेगवेगळी* *नाती तयार होतात.* *माझी एकच विनंती आहे, हे नाते* *विणतांना सुगरणी सारखी* *मायेची गुंफण घाला बघा मग त्याला* *काळालाही उसवण* *सहजासहजी जमणार नाही,मग ते* *नाते कोणतेही असूदया,* *एक गोष्ट नक्की ते फक्त तुमच्या* *आणि तुमच्याच स्वतःच्या* *हाती आहे.* *अशोक कुमावत* *(राष्ट्रपती पुरस्कार विजेते*) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जी एक गोष्ट तुम्हाला तुमच्या जीवनात पुढे जाण्यासाठी प्रवृत्त करते आणि तीच गोष्ट तुमच्या जीवनात मागे खेचण्यासाठी सतत प्रयत्नशील असते.ती म्हणजे तुमचे मन. जर तुमचे मन सतत चिंतनशील,प्रयत्नशील, कृतीशील आणि येणाऱ्या प्रत्येक वेळेला तुम्हाला धैर्य देऊन पुढे जाण्यासाठी प्रयत्न करते तसेच तुमच्या जीवनात नवे चैतन्य निर्माण करुन चांगले जीवन जगण्याची प्रेरणा देते त्या मनाची सकारात्मक बाजू बळकट करणे ही एक तुमच्या जीवनातल्या जमेची गोष्ट आहे.ही ऊर्जा जोपर्यंत तुमच्या जीवनात आहे तोपर्यंत तुम्हाला कधीच मागे खेचनार नाही.जर का तुमची काहीच काम करण्याची इच्छा होत नाही,काम करण्याची इच्छा असूनही तुम्हाला करावेसे वाटत नाही,आजचे काम उद्याला करु,आज नाही केले तर काय बिघडले अशी जेव्हा तुमच्या नकारात्मकतेची उर्जा तुमच्या जीवनात बळावते तेव्हा तुम्ही तुमच्या जीवनाला एका अधोगतीकडे घेऊन जात आहात हे सिद्ध होते.अशी जेव्हा तुमच्या जीवनात एकाच मनातल्या दोन बाजू जेव्हा तुमच्या जीवनात घालमेल करुन तुमची मानसिकता बदलून टाकतात अशावेळी आपण काही वेळ शांत रहावे आणि आपल्या हातून काही अनुचित घटना होणार नाही याचीही दक्षता घ्यावी.आपल्या जीवनाला कोणते मन चांगल्या प्रवाहाकडे घेऊन जाणार आहे त्याचा विचार करावा.मग आपल्या जीवनाचे जेथे कल्याण होईल त्या चांगल्या सशक्त मनाच्या गोष्टींचा जरुर विचार करावा आणि जीवन समृद्ध करावे.एखादी गोष्ट जरी नकारात्मक विचार करत असेल तर तुमच्या चांगल्या विचारांमुळे ती टिकून शकत नाही आणि मग तुम्ही सातत्याने चांगल्याच गोष्टींचा विचार जीवनात अमलात आणाल हे खात्रीने तुम्ही सांगू शकताल यात शंकाच नाही. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌱🌸🌱🌸🌱🌸🌱🌸 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लहानसे घर* सुप्रसिद्ध तत्ववेत्ता सॉक्रेटीस याने आपल्यासाठी एक अतिशय लहान घर बांधले.त्या घराचा तो लहान आकार पाहून त्याच्या एका ओळखीच्या माणसाने त्याला विचारले, "काय हो सॉक्रेटीस ? तुमचा मित्रपरिवार तर बराच मोठा आहे; मग तुम्ही एवढं छोटंसं का बांधलत ?' सॉक्रेटीस म्हणाला, 'बाबा रे ! माझे मित्र दिसायला बरेच असले, तरी प्रत्यक्षात ज्यांना सच्चे मित्र म्हणता येतील असे मित्र मला फारच थोडे आहेत. मी मोठं घर बांधलं असतं तर काय झालं असतं ? माझे सगळे सच्चे मित्र जरी एकाच वेळी घरात आले असते, तरी ते बरंचसं रिकामं राहिलं असतं. मग तूच मला विचारलं असतंस, 'हे काय ? तुमचे एवढेच मित्र ? सगळे मित्र येऊनही, तुमचं घर रिकामंच राहिलेलं दिसतयं !''पण आता मी घर एकदम लहान बांधल्यामुळं, त्या माझ्या थोडया मित्रांच्या येण्यानंही माझं घर पूर्णपणे भरुन जाईल, आणि तसं ते भरलेलं पाहून, तू मला म्हणशील, 'अरे वा !तुमचे मित्र बरेच आहेत की हो, तुमचं घर कसं अगदी भरुन गेलंय !' आणि बर घर जरी लहान असले तरी मन मात्र मोठ असाव हे ही तितकेच खरयं. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 09/08/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ★ *क्रांती दिन* ★ *आदिवासी दिन* ★ 💥 ठळक घडामोडी :- ◆१९२५ - भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल खनौजवळ काकोरी येथे रेल्वेगाडीची लूट 💥 जन्म :- ◆१९०९ - विनायक कृष्ण (व्ही.के.) गोकाक, कानडीभाषेतील लेखक ◆१९११ - खुरशेद मेहेरहोमजी, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ◆१९६२ - हर्मान हेस, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन लेखक. ◆१९६७ - ज्यो ऑर्टन, इंग्लिश लेखक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नव्या उपायांनी काश्मीर पुन्हा नंदनवन होईल; अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी दिली तसेच एकजुटीने साथ देण्याचे देशवासीयांना केले आवाहन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *पुणे : पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाच जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली असून कोल्हापूर आणि सांगलीतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर मराठवाड्यातील औरंगाबाद, अमरावती विभागात पाण्याचा ठणठणाट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून आज पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी होईल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *विदर्भालाही पावसानं झोडपलं, गडचिरोलीतील भामरागडला पुराचा वेढा तर अमरावतीतील दोन नद्या पात्राबाहेर, बैरागढ परिसरातील 27 गावांचा संपर्क तुटला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ‘भारतरत्न’ने सन्मानित; नानाजी देशभुख, भूपेन हजारिका यांचाही मरणोत्तर गौरव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *निवृत्तीच्या उंबरठ्यावरील अधिकाऱ्यांना निवडणुकीसंबंधी नियुक्ती नाही; निवडणूक आयोगाचे आदेश, तीन वर्षे पूर्ण झालेल्यां अधिकाऱ्यांच्या होणार बदल्या* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣*मुंबई : गणेशोत्सव काळात शाळांना पाच दिवसांची सुट्टी जाहीर करावी आणि या काळात विद्यार्थ्यांच्या कोणत्याही लेखी अथवा तोंडी परीक्षा घेण्यात येऊ नयेत, असे निर्देश शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी मुंबई उपसंचालकांना दिले आहेत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बोधकथा : बगळ्याचा ढोंगीपणा* ही कथा audio मध्ये ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे. https://b.sharechat.com/dNhXP0z2ZY बोधकथा ऐकून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ निवेदक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *अणू म्हणजे काय ?* 📙 अणू म्हणजे मूलतत्त्वाचा सर्वात लहान कण. अणुबद्दल अनेक पुस्तकातून, अनेक अभ्यासक्रमांतून, अनेक वेळा आपण शिकत आलो आहोतच. मग येथे वेगळे ते काय वाचायचे ? अणूचे अंतरंग केंद्रकाने बनलेले असते, हे माहित आहेच, पण हे केंद्र किती छोटे असावे ? एखाद्या शाळेच्या हॉलमध्ये मध्यभागी एखाद्या साखरेचा दाणा तरंगत ठेवला तर तो म्हणजे केंद्रक व हॉलचा बाह्यभाग व भिंती म्हणजे इलेक्ट्रॉनचा फिरण्याचा परीघ होय. एवढ्यावरच ही तुलना थांबत नाही. बॉलपेनचा शाईचा एक ठिपका कागदावर उमटवा. या ठिपक्यामध्ये किती अणू मावतील, असे बघितले तर आकडा येतो चार अब्जाचा. म्हणजेच या चार अब्जांतील एकाचे केंद्र किती छोटे असेल ? पण या अणूचे सर्व वजन मात्र या केंद्रकातच सामावलेले असते. इलेक्ट्रॉन प्रचंड गतीने फिरत असतात. या केंद्रकातील प्रोटॉनची संख्या आणि केंद्रकाभोवती घिरट्या घालणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या समान असल्याने विजेने भारलेल्या कणांचा बनलेला असूनही एकूण भार शून्य असल्याने अणु विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. निसर्गात दिसणारी विविधता विविध प्रकारच्या अणूंच्या संयोगाने येते. उण्यापुऱ्या पन्नास मूळ अक्षरांतून सारे साहित्य निर्माण होते, तसेच हे अणू किती गतिमान आहेत, यावर पदार्थाची घन, द्रव, वायू वैगरे अवस्था ठरते. हायड्रोजन सर्वात हलका, युरेनियम खूपच जड; पण या दोघांचे अणूचे आकार मात्र सारखेच असतात. खरे म्हणजे जगातील जी काही शंभरच्या आसपास आढळणारी मुलद्रव्ये आहेत, त्या सर्वांच्या अणूचे आकार सारखेच असतात. फरक असतो तो त्यांच्या केंद्रकात असलेल्या न्यूट्रॉनचा व प्रोटाॅनच्या संख्येत. प्रोटॉनच्या संख्येएवढी त्यांच्याभोवती फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या असते. पण हे प्रोटॉन व न्यूट्रॉन इलेक्ट्रॉनपेक्षा प्रत्येकी जवळजवळ दोन हजार पटींनी जास्त जड असतात. हायड्रोजनचा अणू सर्वात हलका, पण त्यात फक्त एक प्रोटॉनच असतो. पण नेमका त्याच आकाराचा युरेनियम घेतला तर त्यात ९२ प्रोटॉन व ९२ न्यूट्रॉन असतात. म्हणून तो विलक्षण जड होतो. मुलद्रव्ये मोजकीच आहेत. पण मग अनेकदा युरेनियमसारख्या मूलद्रव्याच्या संज्ञेपुढे विविध आकडे असलेले वाचायला मिळतात. मूलद्रव्यातील प्रोटाॅनचा आकडा हा त्याचा अणुक्रमांक सांगतो. पण एकाच मूलद्रव्याच्या अणूच्या प्रोटाॅनची संख्या तीच राहून न्यूट्रॉनची संख्या वेगवेगळी असलेले प्रवाह असू शकतात. त्यांना 'आयसोटोप' असे म्हटले जाते. प्रोटॉन व न्यूट्रॉनची बेरीज म्हणजे आयसोटोप्सचा आकडा येतो. असाच प्रकार रेडियम, क्लोरिन, आयोडिन इत्यादी बहुसंख्य मुलद्रव्यांबाबत आढळतो. सारे जग अशा या अणूंपासूनच बनलेले आहे. अगदी आपले सारे शरीरसुद्धा ! *सृष्टी विज्ञानगाथा या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ कामात मग्न असणाऱ्यांना अश्रू ढाळायला वेळ मिळत नाही. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *ग्रामसेवकाची नेमणूक कोण करतो ?* मुख्य कार्यकारी अधिकारी ( C E O ) 2) *पंचायत समिती सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?* 5 3) *जिल्हा परिषदेच्या लोकनियुक्त प्रमुखास काय म्हणतात ?* अध्यक्ष 4) *महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते ?* गंगापूर ( नाशिक ) 5) *राष्ट्रपतीपद भूषवणारी पहिली महाराष्ट्रीय व्यक्ती कोण ?* मा. प्रतिभाताई पाटील *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● शिवाजी अंबुलगेकर ● विलास कोळनूरकर ● व्यंकटेश पुलकंठवार ● उषाताई रहांगडाले तिरोडा ● पल्लवी साईनाथ यम्मेवार ● बालाजी तेलंग ● समाधान बोरुडे ● जयदीप पैठणे ● अशोक ईबीतवार ● राहुलराज वाघमारे ● सुशीलकुमार भालके ● ऋषिकेश जाधव ● सुरज कोकुलवार ● विलास पाटील करखेलीकर ● महेश सैद ● विनायक कुंटेवाड ● गणेश पांचाळ *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जगात प्रचंड विविधता आहे. किंबहुना, विविधता हेच जगाचे सौंदर्य आहे. तीच मानवतेची ताकद आहे; परंतु दुर्दैवाने विविधता आणि विषमता यातील फरक लक्षात न घेतल्यामुळे मानवा-मानवांत जात, पात, धर्म, पंथ यावरून गटतट पडले आहेत. समाजाला एकत्र ठेवण्याऐवजी, मतलबी मंडळींनी स्वार्थासाठी समाजात भांडणे लावून दिली आहेत. त्यातून अतिरेकी विचाराची माणसे निर्माण झाली आहेत. त्यातून हिंसाचार वाढीला लागला आहे. विवेकाचा आवाज दाबला जात आहे. सज्जनांची पीछेहाट आणि दुर्जनांचा विजय होताना दिसत आहे.* *भारताला साधुसंतांचा देश म्हटले जाते. प्रचंड मोठी सांस्कृतिक परंपरा असलेला भारतीय माणूस मूलत: विचारी आहे. त्यामुळे फोलपट बाजूला ठेवून सार ग्रहण करणे त्याला सहज शक्य आहे. दोन धर्मांच्या तत्वज्ञानात अंतर असू शकते. धर्माच्या भाषा वेगवेगळ्या असू शकतात; परंतु कोणत्याही धर्माचा हेतू वाईट असू शकत नाही. रजनीश एकदा म्हटले होते, की, इश्क, प्रेम आणि अहिंसा हे एकाच मनोवृत्तीसाठी वापरलेले वेगवेगळे शब्द आहेत. वरवर विचार करणा-याला ते पटत नाही; पण खोलवर विचार केला असता हे पटायला लागते. आपल्या शरीराची ठेवण अलग अलग असू शकते, भाषा वेगवेगळ्या असू शकतात, परंतु आपल्या ह्रदयाची ठेवण, रक्ताचा रंग हे मात्र एकच असते. हे आपण पक्के ध्यानात ठेवायला हवे. मनुष्यजन्म दुर्मिळ आहे, त्याचा सदुपयोग करायला हवा.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *समस्या आहे म्हणून उपाय सुचतात,* *उपाय आहे म्हणून मनुष्य जीवन* *सुखी आहे.मग संघर्ष *करून* *उपाय करायचा की गप्प** *बसून अपाय करून घ्यायचा* *ते आपल्या हाती आहे.* *बच्चनचे एक गाणे आहे--घरमे है* *प्रॉब्लेम, बाहरभी प्रॉब्लेम,* *अंदर,बाहर,आजू ,बाजू प्रॉब्लेम ही* *प्रॉब्लेम, मग चलातर* *आज एक नवीन धडा शिकूया.* *आपल्याला कुणी काहीही देऊद्या, शिव्या,शाप, दुवा,तिरस्कार ,चुपचाप स्वीकार करा, भले तो दगड* *विटा फेकून मारत* *असला तरी,* *🤝🏻प्रत्येक गोष्टीपासून एक सकारात्मक* *ऊर्जा घेऊन* *आयुष्याची भक्कम इमारत त्यातून* *उभी करूया,* *प्रत्येक गोष्टींचा कलेने वापर असा* *करा की मारून फेकणारा* *ही* *एक दिवस तुम्हालाच मुजरा करेल,* *अशोक कुमावत* *(राष्ट्रपती पुरस्कार विजेते*) *इगतपुरी,मो नं 9881856327* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुमची वाणी स्पष्ट, चारित्र्य पवित्र , जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि जीवन व्यवहार चोख असतील तर तुम्ही इतरांच्या हृदयावर साम्राज्य सहजपणे करु शकाल. अन्यथा ह्या गोष्टी तुमच्या जीवनात नसतील तर तुम्हाला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकारही राहणार नाही.आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो आणि मनुष्य म्हणूनच जगणार आहोत हा विचार समोर ठेवून जगण्यासाठी वरील महत्वाच्या चार गोष्टींना जीवनात प्राधान्य द्यायलाच हवे आणि त्या गोष्टी सहज करता येऊ शकतात. सुरुवातीला कठीण जाईल एकदा का सराव झाला की,मग आपोआपच व्हायला लागतात. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बगळ्याचा ढोंगीपणा* उन्हाळा वाढत चालला होता. नद्या, नाले, ओढे, डोंगरावरून पडणारे ओहोळ कोरडे पडू लागले. रानातील गवत सुकले. पाणथळ जागेच्या आश्रयाने पक्षी घरटी बांधू लागले. एक बगळा झाडाच्या शेंड्यावर बसला होता. सूर्य मावळत होता. बगळ्याची नजर दूरवर असलेल्या एका तळ्याकडे लागली होती. तळ्यात खूप मासे फिरत असलेले त्याला दिसत होते. आपल्याला ते कसे मिळतील या विचारात असता सूर्यास्त झाला. झाडावरच तो झोपी गेला. सकाळ झाली तशी बगळा उठला. पंख पसरून उडत उडत तो तळ्याकाठी आला. एकेक पाऊल टाकीत तो तळ्यात उतरला. एक पाय उचलून, चोच वर करून त्याने डोळे मिटले व "राम राम" म्हणू लागला. तळ्यात शिरता क्षणी काठावरचे मासे सुळकन तळ्यात गेले. थोड्यावेळाने एक बारीक मासा त्याच्याजवळ आला व धिटाईने त्याला म्हणाला, " अहो बगळेबुवा, तुम्ही आम्हाला खात कसे नाही?" त्यावर बगळा म्हणाला, "अरे, आता मी मासे खाणे सोडून दिले. मी फक्त पाण्यात उभे राहून ध्यान करतो व तोंडाने "राम राम" म्हणतो. बगळा आपल्याला खात नाही असे बघून मासे धीट झाले. ते त्याच्याजवळून पोहू लागले. काही दिवसांनी तो माश्यांना म्हणाला, "तुम्हाला माहीत आहे का? उन्हाळा वाढतो आहे. या तळ्याचे पाणी आटणार, मग तुमचे कसे होणार?" मग आम्ही जायचे कोठे? एक मासा म्हणाला. त्यावर बगळा म्हणाला, " माझे लक्ष आहे. या डोंगरापलीकडे एक मोठे तळे आहे. त्यात खूप पाणी आहे. लाटांवर लाटा उसळत असतात. त्यात मासे आहेत, कासवे आहेत, बेडूक आहेत. पण! "पण म्हणजे?" मासे म्हणाले. "तुम्ही त्या तळ्यात कसे जाणार? मी तुम्हाला तिकडे नेऊ शकेन, पण एका वेळी फक्त चौघांना. याल तुम्ही?" बगळा म्हणाला. "हो हो. आम्ही नक्की येऊ." मासे म्हणाले. दुसरे दिवशी बगळा तळ्यात उतरला. त्याच्या भोवती मासे जमले. त्याने आपल्या चोचीत चार मासे घेतले व तो आकाशातून उडत उडत जाऊ लागला. गाव ओलांडले, ओढा पार केला व डोंगर माथ्यावर आला. तो हळूहळू खाली उतरू लागला. मासे म्हणाले , "बगळेबुवा, आपले तळे कुठे आहे?" तशी बगळा म्हणाला, "कुठचे तळे, आणी कुठचे पाणी. मी आता तुम्हाला खाणार आहे." असे म्हणून त्याने एकेक मासा खडकावर आपटून खाऊन टाकला. उंच झाडावर बसून फांदीला आपली चोच पुसली व सायंकाळी त्याच झाडावर झोपला. दुसऱ्या दिवशी परत चार मासे खाल्ले. असे बरेच दिवस चालले. हे सर्व एक खेकडा गवतावर बसून पाहत होता. तिरका तिरका चालत तो त्याच्या जवळ आला व त्याचा पाय पकडून म्हणाला, " बगळेबुवा, मला केंव्हा नेणार मोठ्या तळ्यात?" बगळा मनात म्हणाला, "मी रोज मासे खातो आहे. चला आज खेकडा खाऊ." खेकडा म्हणाला नेणार ना? "चल, आज तुला नेतो." बगळा म्हणाला. खेकडा त्याच्या पायावरून चढत जाऊन त्याच्या पाठीवर बसला. त्याला घेऊन बगळा उडाला व नेहमीप्रमाणे डोंगरावर उतरू लागला. खेकड्याने खाली पाहिले. खेकड्याला त्याचा डाव कळला व म्हणाला, " बगळेबुवा, हा तर डोंगर आहे." त्यावर बगळा हसला व म्हणाला," कुठचे तळे व कुठचे पाणी. आता मी तुला खाणार आहे." खेकडा त्याच्या मानेवर उतरला व म्हणाला, "बऱ्या बोलानं मला माझ्या तळ्यात नेऊन सोड. नाहीतर तुझी मान कापीन." बगळा व खेकड्यामध्ये झटापट सुरू झाली. खेकडा त्याच्या मानेवर बसल्याने त्याला काहीच करता आले नाही. खेकड्याने आपल्या नांग्या त्याच्या मानेत रुतवल्या व त्याची मान कापली. दोघेही डोंगरावर आपटले. खेकडा तिरका तिरका चालत डोंगऱ्याच्या पायथ्याशी आला व रानातून चालत चालत परत आपल्या तळ्याच्या काठापाशी आला व डुबकन पाण्यात उतरला. त्याला पाहून मासे त्याच्या भोवती गोळा झाले. खेकडा माशांना म्हणाला, "अरे, तो बगळा पक्का ढोंगी होता. मी त्याला ठार मारले आहे. कितीही उन्हाळा वाढला तरी या तळ्यातील पाणी आटणार नाही. या तळ्यात भरपूर पाणी आहे." अशा रितीने बाकीचे मासे त्या तळ्यात पुन्हा आनंदाने नांदू लागले.तळ्यात माशांचा आनंद पाहून खेकडाही खूप आनंदी झाला आणि मनात म्हणाला बर झाल तो ढोंगी बगळा मेला नाहीतर त्याने तळ्यात हे ही मासे ठेवले नसते. सर्व खाऊन फस्त केले असते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 08/08/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ◆२००८- चीन मधील बीजिंग येथे २९ व्या ओलीम्पिक स्पर्धांना सुरुवात. ◆१९९८-संरक्षण संशोधन आणि विकाससंस्थेच्या (DRDO)सात प्रयोगशाळा औद्योगीक क्षेत्रासाठी खुल्या झाल्या. ◆१९४९ - भुतानच्या राष्ट्राची स्थापना. ◆१९६३ - इंग्लंडच्या बकिंगहॅमशायर काउंटीत दरोडेखोरांनी रेल्वेतून २६,००,००० ब्रिटीश पाउंड लुटले. 💥 जन्म :- ◆१९३२-दादा कोंडके,अभिनेते,निर्माते. ◆ १९२१ - वुलिमिरी रामलिंगस्वामी, भारतीय वैद्यकीयशास्त्रज्ञ. ◆ १९४० - दिलीप सरदेसाई, भारतीय क्रिकेट खेळाडू. ◆१९५२ - सुधाकर राव, भारतीय क्रिकेट खेळाडू. ◆१९६८ - अबेय कुरूविला, भारतीय क्रिकेट खेळाडू. ◆ १९८१-रॉजर फेडरर ,स्विस लान टेनिस खिलाळू. 💥 मृत्यू :- ●१९९९-गजानन नरहर सरपोतदार ,चित्रपट निर्माते व दिग्दर्शक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *राज्यातील पूरग्रस्तांना तातडीनं मदत करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना, महाजनादेश यात्रा सोडून मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी, एनडीआरएफ आणि नौदल-लष्कराकडून युद्धपातळीवर बचावकार्य* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *तब्बल 28 वर्षांनंतर होऊ घातलेल्या महाविद्यालयीन निवडणुका पुढे ढकलण्याचा राज्य सरकारचा निर्णय, विधानसभा निवडणुकीनंतर होणार निवडणुका* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *अयोध्येतील वादग्रस्त जमिनीच्या दस्तावेजाची सर्वोच्च न्यायालयाकडून मागणी, तर 1982तील दरोड्यात सर्व दस्तावेज चोरीला गेल्याचा निर्मोही आखाड्याचा दावा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *विद्यावेतन वाढीच्या मागणीसाठी मार्डचे डॉक्टर संपावर, 16 वैद्यकीय महाविद्यालयातील, साडेचार हजार डॉक्टर संपात सहभागी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *सलग चौथ्यांदा रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात 0.35 टक्क्यांपर्यंत कपात, कर्जावरील हफ्ते स्वस्त होणार, कर्जदारांना मोठा दिलासा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *कोल्हापूर आणि सांगलीतील पुराचा मुंबईकरांना फटका, पुरामुळे ठप्प झालेल्या वाहतुकीमुळे मुंबईकरांना मिळणार नाही दूध* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज अनंतात विलीन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, लालकृष्ण अडवाणींसह दिग्गज नेते गहिवरले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जय जवान, जय किसान* शेतीमध्ये काम करणाऱ्या लोकांची संख्या देखील भरमसाठ होती. त्या काळी उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी समजल्या जायचे. कामाच्या मोबदल्यात धान्य देण्याची त्या काळाची प्रथा सर्वाना सोईस्कर होती. म्हणूनच शेतीकाम करणाऱ्या लोकांना मान सन्मान मिळत होता. आत्महत्या म्हणजे काय असते हे तेंव्हाच्या शेतकऱ्यांना मुळी ओळखीचे नव्हते. यावरून आपण अंदाज बांधू शकतो की, किती चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना अच्छे दिन होते. .......... खालील ब्लॉगवर पूर्ण लेख वाचन करता येईल. https://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post_24.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया whatsapp करावे ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ संकलन *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *आपल्या शरीरात किती हाडे आहेत ?* 📙 या प्रश्नाचं उत्तर कोणताही शाळकरी विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी देऊ शकेल. कारण त्यांच्या पाठ्यपुस्तकात शरीरातल्या एकूण हाडांची संख्या दिलेली असते. ती आहे २०६. ते उत्तर तसं बरोबरही आहे. ते संपूर्णतया अचूक आहे असं मात्र म्हणता येणार नाही. कारण आपण जन्मतो तेव्हाची संख्या मोजली तर त ती सहज ३०० ते ३५० भरेल. जसजसं मूल वाढू लागतं तसतशी यातली काही हाडं एकमेकांमध्ये मिसळून जातात. ती अशी जोडली जातात, की त्यांचं आता एकच एक एकसंध हाड बनतं. आपल्या कवटीच्या हाडांमध्ये ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणात दिसून येते. मेंदूला संरक्षण देणारा जो कवटीचा भाग असतो त्यात जन्मतः २२ हाडं असतात. मूल चार वर्षांचं होईपर्यंत यातली बरीचशी एकमेकांशी सांधली जाऊन प्रौढ व्यक्तीच्या डोक्याच्या कवटीत फक्त आठ हाडं राहतात. आपल्या कंबरेच्या हातातही अशी सांधेजोड होत राहते. सरासरीने चार वर्षांवरील व्यक्तीच्या शरीरात २०६ हाडं राहतात. याला अर्थात काही अपवाद जरूर आहेत. काहीजणांच्या शरीरात अतिरिक्त फासळ्या असतात. त्याच्या छातीतला पिंजरा अधिक हाडांचा बनलेला असतो. काहीजणांच्या हाताला किंवा पायाला किंवा दोन्हींनाही सहा सहा बोटं असतात. त्यांच्या हाडांची संख्या साहजिकच जास्त भरते. काही जणांच्या मणक्यातही जास्त हाडं असतात. आपल्या हातांमध्ये आणि पायांमध्ये सर्वात जास्त हाडं असतात. एका बोटामध्ये तीन हाडं असतात आणि ती बोटं तळहाताला ज्या सांध्यानं जोडली जातात त्यात आणखी. त्यामुळे एका हातात किंवा पायात ३०-३० हाडं असतात. म्हणजे या चार अवयवांचीच मिळून १२० हाडं होतात. छातीच्या पिंजऱ्यातल्या २४ फासळ्या आणि त्यांना जोडणारं मधलं छातीचं हाड मिळून २५ होतात. तीच गत मणक्याची. माकडहाडापासून ते मानेपर्यंत एकूण २६ मणके असतात. म्हणजे यांचीच मिळून बहुतेक संख्या होते. बाकी मग फुटकळ पण महत्त्वाची हाडं आहेत. शरीरातलं सर्वात जास्त लांब हाड असतं मांडीचं. ते आपल्या एकूण उंचीच्या पावपट असतं. सर्वात लहान हाड आपल्या कानातलं. ते असतं केवळ २.५ मिलीमीटर लांबीचं; पण आपल्या कानाच्या पडद्यांवर तरंग उमटवण्याची फार मोठी भूमिका ते पार पाडतं. त्याच्याशिवाय आपल्याला ऐकूच येणार नाही. गंमत म्हणजे जिराफाची मान आपल्या मानेच्या दसपट लांब असली तरी दोन्हींमध्ये हाडांची एकूण संख्या सारखीच आहे. *डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" यशाची गुरुकिल्ली म्हणजे स्वतःला ओळखणे "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *राष्ट्रगीतात एकूण शब्द किती आहेत ?* 47 2) *भारतातील सर्वात जास्त साक्षरता असलेले राज्य कोणते ?* केरळ 3) *ग्रामपंचायतीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?* 5 4) *ग्रामपंचायतीचा सभांचा अध्यक्ष कोण असतो ?* सरपंच 5) *पंचायत समितीचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतो ?* गट विकास अधिकारी ( B D O ) *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● अरुण वि. देशपांडे, पुणे ● गजानन सावंत ● संतोष हसगुंडे ● चंदू नागुल ● अवधूत पाटील सालेगावकर ● बळीराम शिवाजी खांडरे ● शिलानंद बुद्धेवार ● बालाप्रसाद सूर्यवंशी ● रावजी मारोती बोडके ● रवी वाघमारे ● संतोष वाधवे ● लक्ष्मण कामशेट्टी ● नागेश कानगुलवार ● ऋषिकेश सोनकांबळे ● देवण्णा पाशावार ● अतुल उदाडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संत तुकाराम महाराज यांचा अतिशय सोपा दिसणारा अभंग आहे,'बोले तैसा चाले । त्याची वंदीन पाऊले ॥' येथे तुकोबा एक खूप मोठं मानसशास्त्रीय गूढ कमीत कमी शब्दांत उकलून देत आहेत. जसे बोलतो तसेच वागणारा माणूस भेटला तर त्याला मी वंदन करीन, असे तुकोबा म्हणतात. म्हणजे अशी माणसे दुर्मिळ आहेत का ? असा प्रश्न पडतो. माणसाचे आचरण त्याच्या चारित्र्याशी विसंगत असेल तर असण्यात आणि भासवण्यात एक दरी निर्माण होते. आपण ज्यांना चांगली माणसं म्हणतो त्यांच्याही असण्यात आणि दाखवण्यात व्यक्तिमत्वात दरी असतेच.* *असण्याच्या आणि भासवण्याच्या मध्ये केवढी दरी आहे हे पाहिले पाहिजे. ती जेवढी मोठी तेवढा माणूस लहान आणि ती जेवढी लहान तेवढा माणूस मोठा, असे एक समीकरण मांडता येईल. असे होण्याच्या मागे एक बाह्य कारण आहे. आपल्या कृतीचे समर्थन करणे ही मानवाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. अगदी गुन्हेगारही गुन्हा का करावा लागला याचं समर्थन करत असतो. म्हणूनच मग 'बोले तैसा चाले' अशी व्यक्ती दुर्मिळ असते. आणि अशी व्यक्ती सापडलीच तर तो परीस असतो, तो इतरांचेही सोने करू शकतो.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *बहिणाबाई नात्याबद्दल खूप छान* *सांगतात---जीची माया गेली* *सरी, तिले माय म्हणू नये,* *जन्मदात्याले भोवला त्याले लेक म्हणू* *नये।तसेच सुगरणीच आहे,* *खोपा इनला इनला जसा गिलक्याचा* *कोसा,* *पाखराची कारागिरी जरा देखरे* *माणसा।* *माणसाने माणसाजवळ यावं हे* *धर्म शिकवतो.* *ही* *माणसं जवळ आली की वेगवेगळी* *नाती तयार होतात.* *माझी एकच विनंती आहे, हे नाते* *विणतांना सुगरणी सारखी* *मायेची गुंफण घाला बघा मग त्याला* *काळालाही उसवण* *सहजासहजी जमणार नाही,मग ते* *नाते कोणतेही असूदया,* *एक गोष्ट नक्की ते फक्त तुमच्या* *आणि तुमच्याच स्वतःच्या* *हाती आहे.* *अशोक कुमावत* *(राष्ट्रपती पुरस्कार विजेते*) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• या जगात आतापर्यंत विद्वान माणसे शरीराने जरी या जगातून गेली असली तरी ती आपल्या विचारांनी अमरच झालेली आहेत.कारण त्यांचे विचार हे सर्वसामान्य माणसेही आपल्या जीवनात आदर्श विचार मानून त्या विचारांच्या मार्गावरुन चालतात म्हणजे विचार रुपाने ते सदैव आपल्या जीवनात पाठराखण करत असतात.म्हणतात ना ' मरावे परी कीर्तीरुपी उरावे ' म्हणजेच विद्वान माणसे आपल्या जीवनात सदैव आपल्या विचारांच्या,कार्याच्यारुपाने आपल्यामध्येच असतात हे ध्यानात ठेवून आपणही त्यांचा मार्ग अनुसरावा म्हणजे आपणासही विचाररुपी अमरत्व प्राप्त होईल. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..9421839590/ 8087917063. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रयत्नांची मर्यादा* एका शिकारी कुत्र्याने एका सशाचा पाठलाग सुरू केला. पण अखेर ससा पळून जाण्यात यशस्वी झाला. ते पाहून त्या कुत्र्याच्या मालकाने त्याला विचारले, ' एका सशाने पळण्यात तुला हरवावे?' यावर तो कुत्रा म्हणाला, " धनी , माझे धावणे हे पोटासाठी शिकार मिळविण्याकरिता होते, तर त्या सशाचे धावणे हे स्वतःचा जीव वाचविण्यासाठी होते. तेव्हा त्याची गती माझ्या गतीपेक्षा अधिक असणे हे सहाजिकच नाही का?" तो ससा त्याचा जीव वाचविण्यासाठी धावणारच हा त्याचा जीवाचा प्रश्न आहे हे त्याला कळून चुकले आणि तो अतोनात प्रयत्न करणार. *तात्पर्यः जेव्हा एखाद्याच्या जीवावर बेतते तेव्हा आलेल्या प्रसंगातून स्वतःला वाचविण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना मर्यादा नसते.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 07/08/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ◆ *राष्ट्रीय हातमाग उद्योग दिन* ◆ *स्वातंत्र्य दिन - कोट दि आयव्होर* ◆ *मुक्ती दिन - टर्क्स व कैकोस द्वीप* ● १९७६ - व्हायकिंग २ हे अंतराळयान मंगळाच्या कक्षेत आले. ● १९९१ - सामान्य माणसांना वर्ल्ड वाइड वेब उपलब्ध. 💥 जन्म :- ●१९२५ - एम.एस. स्वामीनाथन, भारतीय शेतीतज्ञ. ●१९६६ - जिमी वेल्स, विकिपिडीयाचा स्थापक. 💥 *मृत्यू* :- ●१९४१ - रवींद्रनाथ टागोर, बंगाली कवी, लेखक, नोबेल पारितोषिक विजेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुसळधार पावसामुळे कोल्हापूरमध्ये पूरस्थिती, कुठे वीजपुरवठा तर कुठे पाणीपुरवठा बंद, पंचगंगा नदीची पाणीपातळी 50 फूट 9 इंचांवर, सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ, कराडमध्ये जमावबंदी तर साताऱ्यात सलग तिसऱ्या दिवशी शाळांना सुट्टी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविण्याचे प्रस्तावित विधेयक सोमवारी राज्यसभेत करण्यात आले मंजूर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचे दिल्लीत झाले निधन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेला किल्ले शिवनेरीवरुन सुरुवात, पहिल्याच दिवशी 'शिवस्वराज्य' यात्रेत गटबाजीचं राजकारण असल्याचं चित्र* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकासाठी महापौर निवासस्थानापाठोपाठ 362 चौरस मीटरचा आणखी एक भूखंड आंदण, महापालिका सुधार समितीचं शिक्कामोर्तब* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *श्रीनगर - राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी घेतली जम्मू-काश्मीरचे राज्यपाल व्ही. पी. मलिक यांची भेट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *नवी दिल्ली : भारताच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्री हेच कायम राहणार असल्याचे वृत्त पुढे येत आहे. काही प्रसारमाध्यमांना सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयची सल्लागार समिती शास्त्री यांच्याकडेच प्रशिक्षकपदाची धुरा सोपवणार असल्याचे म्हटले जात आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राष्ट्रीय हातमाग दिवस* ज्याचे काम त्या॑नी करावे जसे की वारकांनी केस कापावी, वरटी लोकानी कपडे धूवावी ,चांभारानी चपला शिवाव्यात ,गुरवानी मंदिरांची देखभाल करावी, कुनब्यानी शेती करावी, साळयानी कपडे विणावी आणि रंगारी लोकानी त्यास रंग लावावी ही पद्धत लोकाना स्वावलंबी जीवन जगवायला शिकवायचे . मात्र इंग्रजानी भारतात व्यापार करण्यासाठी म्हणून आले आणि हळूहळू पाय पसरवीत संपूर्ण देशावर आपले वर्चस्व निर्माण केले. कपड्यांचा बाबतीत भारत हा स्वयंपूर्ण व संपन्न देश होता कारण येथील लोक फारच सुंदर कलाकूसर करून कपडे तयार करीत असत. आजही खादीचा कापड भारतात प्रसिद्ध आहे ......... पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे. https://nasayeotikar.blogspot.com/2018/08/blog-post.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌎 *पृथ्वीवर एकूण किती पाणी आहे ?* 🌎 ऊर्जेच्या बाबतीत विज्ञान आपल्याला सांगतं की ती कायमस्वरूपी आहे. तिचा नाशही होत नाही की ती निर्माणही केली जाऊ शकत नाही. फक्त तिचं स्वरूप तेवढं बदलत राहतं. जगातल्या पाण्याच्या साठ्याबाबतही तेच म्हणता येईल. तोही कायमस्वरूपी आहे. तो नव्यानं निर्माण केला जाऊ शकत नाही की त्याचा नाशही होत नाही. फक्त त्याचं स्वरूप बदलत राहतं; आणि हे सतत बदलत असतं. त्यामुळे जगात पाण्याचं एक चक्र निर्माण झालेलं आहे. ते या धरतीवर सजीवसृष्टी तगून राहायला मदत करत आहे. हा साठा किती आहे याचा विचार केला तर भोवंडून जायला होतं. धरतीवर भूभागापेक्षा जास्त भाग पाण्याने व्यापलेला आहे. जगात एकूण १२६ कोटी अब्ज लिटर पाणी आहे. म्हणजेच कितीतरी आहे. यातला जवळजवळ ७० टक्के हिस्सा महासागरांमध्ये आहे. ध्रुवप्रदेश तसंच उंचावरच्या हिमनद्यांमध्ये गोठलेल्या स्वरूपातही पुष्कळ पाणी आहे. तरीही आपण नेहमी पाण्याची चणचण आहे, टंचाई आहे, पाणी कपात करावी लागणार आहे, असं का ऐकत असतो ? त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, या एकूण पाण्यापैकी केवळ ३ टक्के पाणीच गोडं आहे. म्हणजेच साडेतीन चार कोटी अब्ज पाणी गोडं आहे. तेही पुष्कळ आहे; पण गोडं आहे याचा अर्थ ते सरळंच पिण्यायोग्य आहे असं नाही. कारण आपण हे नदी, तलाव यांच्यामधलं गोडं पाणी सतत प्रदूषित करत असतो, त्यामुळे ते पिण्यायोग्य राहत नाही. निसर्ग हे प्रदूषित पाणी परत शुद्ध करून पिण्यायोग्य कर करतच असतो. त्यालाच आपण जलचक्र म्हणतो. म्हणजे या पाण्याची वाफ होऊन ती आकाशात जाते. ती परत पावसाच्या रूपात शुद्ध पाणी होऊन जमिनीवर येते; पण हे पावसाचं पाणीही आपण व्यवस्थित साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत नाही. जे साठवलं जातं तेही निष्काळजीपणे वापरून परत प्रदूषित करत असतो. केवळ निसर्गावर अवलंबून न राहता हे प्रदूषित पाणी शुद्ध करून पिण्यायोग्य करण्याचे खंबीर उपाय आपण करत नाही. ते केल्यास पिण्यायोग्य गोड्या पाण्याचा साठा वाढेल. निसर्गानं जेवढं गोडं पाणी उपलब्ध करून दिलं आहे तेवढेही आपण परत पूर्ण केलं तरी आपली पाण्याची गरज नीट भागू शकेल. *डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *Prayer is the voice of faith.* *( प्रार्थना हे श्रद्धेचा आवाज आहे. )* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *गंगा नदीचा उगम कोठे झाला ?* गंगोत्री 2) *महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता ?* सिंधुदुर्ग 3) *एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण ?* सुरेंद्र चव्हाण 4) *तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ?* नंदूरबार 5) *उत्तरप्रदेश या राज्याची राजधानी कोणती ?* लखनऊ *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● श्रीनिवास मस्के, साहित्यिक ● दत्ता डांगे, प्रकाशक ● मनोज रापतवार ● रवींद्र चातरमल ● सिद्धार्थ शिरसे ● मोहन हडोळे ● मंगेश पेटेकर ● सतीश कदम ● तुकडेदास धुमलवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• काहीवेळा काहींच्या बाबतीत मनुष्याचा स्वभाव समोरची परिस्थिती पाहून बदलत असतो.कधी कधी असेही वाटते की,आपण कमी वेळेत खूप काही करुन धनाढ्य व्हावे आणि आनंदाने जीवन जगावे.या वाईट मोहासाठी तो वेगवेगळ्या गैरमार्गाचा अवलंब करतो आणि संपत्ती अर्थात माया जमवण्याच्या मोहात पडतो.जी माया जमवली त्यात त्याला समाधान तर नसतेच अजूनही त्याच्यापेक्षा अधिक माया जमवण्यात वेळ खर्च करतो.परंतु हे त्याच्या लक्षात येत नाही की,आपण वाममार्गाला लागलो आहोत, दुस-याला लुटलो आहोत ही जी काही वाईट सवय लागली आहे ती आपल्या मनाला समाधान देणारी नाही.केवळ आपल्या मोहापायी, आपल्या स्वार्थासाठी इतरांच्या जीवाला त्रास देऊन आपल्या नको त्या गोष्टीच्या नादाला लागलो आणि हावरटपणाचा कहर केला. त्यामुळे आपले जीवन हे जीवन राहिले नसून आपण इतरांच्या नजरेत एक गुन्हेगार ठरलो आहोत आणि ते ही आपल्या स्वार्थी मोहापायी ? हा मोह काहीच कामाचा नाही.ज्यामुळे माणसातील माणुसकी नष्ट झाली.त्यापेक्षा मनाचा हावरटपणा सोडून द्यावा, भरपूर मेहनत करावी,आपल्या कृत्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी आणि आपले जीवन सुखासमाधात जावे.यापेक्षा आपल्या कोणत्याही अपेक्षा असू नयेत.हाच मंत्र चांगले जीवन जगण्यासाठी पुरेसा आहे.नाही तर नको त्या मोहात जाणे आणि आपल्याच हाताने जीवन दु:खमय जगणे यापेक्षा जीवनाचे वाईट चित्र काय असू शकेल ? © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🏻🏻 *ज्ञान ही अशी शिदोरी आहे* *की ती माणसाला नेहमीच* *प्रत्येक क्षेत्रात एका ठराविक उंचीवर* *नेऊन ठेवते.* *अजून अस गुरुत्वाकर्षण तयार झालं* *नाही की ते ज्ञानाला* *नैसर्गिकरित्या आपल्याकडे खेचून* *घेईल.* *त्याला मिळविण्यासाठी प्रयत्न* *करावेच लागतात. एकदा मिळविले* *की कोणत्याही ब्रम्ह* *पंडितांची ताकद नाही की तो* *तुमच्याकडून हिसकावून घेईन.* *ह, एक मात्र नक्की की आता* *एकलव्य बनू नका.* *धर्माचा ,ज्ञानाचा ठेका घेतलेली* *मंडळी तुमच्या मार्गात अनंत अडचणी उभ्या करतात.* *स्वामी विवेकानंद यांना शिकागो येथे बोलण्यासाठीचे प्रमाणपत्र भारतीय* *शंकराचार्य यांनी दिले* *नाही,ते श्रीलंकेच्या बौध्द* *धर्मप्रसारक विद्वानांनी दिले.* *त्यांचे 5 मिनिटे कमी करून* *विवेकानंदांना दिले,आणि त्याच 5* *मिनिटांनी 1893 साली स्वामींनी* *जगभरात नावलौकिक* *मिळवला व आपली* *धर्म पताका जगभर* *फडकावली.* *अजूनही तो दैत्य* *उरात धडधड करतो.* *विनंती-ज्ञानाची भूक प्रचंड* *असुद्या। कुठेही, केव्हाही,कसेही* *फक्त रुचकर ज्ञान मिळेल त्याचे सेवन* *करा,नक्की सुदृढ व्हाल.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* *जि. प.शाळा--माणिकखांब,* *ता.इगतपुरी, जि. नाशिक* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बुद्धीला व्यवहाराची जोड हवी* पाणिनि हे संस्कृतचे महान व्याकरणकार. २००० वर्षापूर्वी त्यांनी हे आश्चर्यकारक काम केले. एकदा ते शिष्यांना व्युत्पत्तिविषयी शिकवीत होते. त्यावेळी एक वाघ माणसाच्या वासाने तिथे येत होता. शिष्य घाबरून झाडावर जाऊन बसले व आचार्यांनाही ते झाडावर चढायला सांगू लागले.पण 'व्याघ्र' या शब्दाची व्युत्पत्ति शोधण्यात ते गढून गेले होते. त्यांना व्युत्पत्ती सुचलीही. *'व्या जीघ्रति इती व्याघ्रः'* म्हणजे वास घेत चालतो तो वाघ........पण झाले काय वाघाने त्यांचीच शिकार केली. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 06/08/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ◆ १९६२ - जमैकाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य. ◆ १९६६ - ब्रॅनिफ एरलाइन्स फ्लाइट २५० हे विमान नेब्रास्कातील फॉल्स सिटीजवळ पडले. ४२ ठार. 💥 जन्म :- ◆ १९७० - एम. नाइट श्यामलन, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक. ◆ १९९० - जॉनबेनेट रामसे, अमेरिकन बालकलाकार. 💥 मृत्यू :- ◆ १९९१ - शापूर बख्तियार, इराणचा पंतप्रधान. ◆ २००२ - एड्सगर डिक्स्ट्रा, डच संगणकशास्त्रज्ञ. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *अखेर जम्मू काश्मीर, लडाख यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला, 370 कलम रद्द* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *इजिप्तमध्ये वाहनांचा भीषण अपघात; स्फोटामुळे हॉस्पिटलला लागली आग; 20 ठार, अपघातानंतर स्फोट झाल्याने हॉस्पिटलला बसल्या झळा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मुंबई - राज्याची आर्थिक स्थिती खालावल्याचा पहिला फटका बसला होमगार्ड विभागाला, तब्बल ५७ पदे करण्यात आली रद्द, वित्त विभागाने काटकसरीबाबत सुचविलेल्या धोरणानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे गृह विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *श्रीनगर - कलम 370 ला मंजुरी मिळताच काश्मीर खोऱ्यात मोठ्या कारवाईला झाली सुरुवात, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना अटक करण्यात आली असून महेबूबा मुफ्ती यांच्यावरही अटकेची कारवाई करण्यात आली आहे, कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी करण्यात आली कारवाई* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ * येत्या ७ व ८ ऑगस्टला कोल्हापूर, सातारा, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा हवामान विभागाने दिला इशारा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *अॅशेस मालिका : इंग्लंडच्या दुसऱ्या डावाला नॅथन लिऑनने सहा विकेट्स घेत खिंडार पाडले आणि ऑस्ट्रेलियाने 251 धावांनी हा सामना जिंकला, स्टीव्हन स्मिथ ठरला शिल्पकार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *फलंदाजांचा कर्दनकाळ समजला जाणारा दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने कसोटी क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती, स्टेनने 93 कसोटी सामन्यांमध्ये 439 बळी मिळवले होते.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एक पाऊल स्वच्छतेसाठी ......!* स्वच्छता आणि आरोग्य या दोन गोष्टी एकमेकांस पूरक आहेत. जेथे स्वच्छता असेल तेथे राहणाऱ्या लोकांचे आरोग्य देखील चांगलेच असते. मात्र आपण पाहतो की आजूबाजूला किती अस्वच्छता केली जाते. हे लोक असे का बरे वागत असतील ? याचा शोध घेतले असते असे दिसून येते की यांना शालेय जीवनात स्वच्छतेचे महत्व कोणी सांगितले नाहीत त्यामुळे ही मंडळी अशी गैरवर्तणुक करीत असतील कदाचित. म्हणून भविष्यात भारत स्वच्छ दिसावा यासाठी आजच्या शालेय मुलांना याबाबतीत माहिती देणे आवश्यक वाटते............ पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे......... https://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post_25.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌞 *सूर्याचं उर्वरित आयुष्य किती आहे ?* 🌞 सूर्य हा एक तारा असला तरी तो चिरंजीव नाही. त्याचाही एक ना एक दिवस मृत्यू होणार आहे. सूर्याचा जन्म अवकाशातील पोकळीत तयार झालेल्या एका धुलीकण आणि वायू यांच्या ढगातून - नेब्युलामधून झाला. त्याला आता जवळजवळ साडेचार अब्ज वर्षं झाली. सुरुवातीला या ढगाला रूप आकार का काहीही नव्हतं. काही लाख वर्षं उलटल्यानंतर त्या ढगामधल्या हायड्रोजन वायूनं पेट घेतला. त्याच्या अणूंचं मिलन होत त्यातून हेलियम अणूंची निर्मिती होऊ लागली. या नाभिकीय प्रक्रियेपायी सूर्य प्रचंड प्रमाणात ऊर्जा उत्सर्जित करू लागला. तो स्वयंप्रकाशित झाला. त्याचा तारा बनला. तेव्हापासून ही अणूसंमीलनाची प्रक्रिया सूर्याच्या अंतरंगात चालूच आहे. त्या ऊर्जा उत्सर्जनापायी सूर्याकडे केंद्रापसारी बल प्राप्त झाल्यामुळं ते त्याच्या केंद्रभागाकडे खेचणाऱ्या गुरुत्वाकर्षणाच्या बलाला विरोध करत सूर्याला स्थिर बनवत राहिलं आहे. सूर्याच्या अंतरंगातील हायड्रोजन वायूचा साठा अमर्यादित नाही. एक ना एक दिवस तो संपून जाईल. तसं झालं की त्याच्या अंतरंगातल्या अणुभट्ट्या विझतील. त्यानंतर त्यात साचून राहिलेलं हेलियम हे इंधन बनून त्याच्या अणूसंमीलनाची प्रक्रिया सुरू होईल. त्या वेळी सूर्याचं प्रसरण होईल. तो लाल राक्षसी तारा रेड जायंट बनेल. त्यावेळी त्याचा व्यास वाढल्यामुळे तो बुध आणि शुक्र यांना आपल्या कवेत घेईल. ते ग्रह जळून जातील. काही खगोलशास्त्रज्ञांच्या मते कदाचित आपल्या पृथ्वीचीही तीच गत होईल. हेलियमचा साठा ही कालांतराने संपुष्टात येईल. तसं झालं की परत एकदा अणूसंमीलनाच्या भट्ट्या बंद पडतील. त्या वेळी सूर्याच्या बाहेरच्या कडेवरचे पदार्थ उडून जातील आणि सूर्याचं श्वेतबटूत रूपांतर होईल. त्याच्या अंतरंगात फक्त कार्बनच असेल. एखाद्या हिर्यासारखं त्याचं स्वरूप होईल. त्यावेळी त्याचं आक्रमण आजच्या पृथ्वीइतकंच राहील. त्याच्या अंतरंगातली उष्णता त्याचा प्रकाश टिकवून ठेवील; पण अणुभट्ट्या बंद पडल्यामुळे ही उष्णता टिकून राहणार नाही. हळूहळू सूर्याचं तापमान कमी कमी होत जाईल आणि तो विझून जाईल. एक आकाशस्थ गोल म्हणून ही त्याची अखेर असेल. स्वयंप्रकाशित गोल म्हणजे तारा ही व्याख्या आपण प्रमाण मानली, तर ज्या क्षणी त्याचं श्वेतबटूत रूपांतर होईल त्याच क्षणी त्याची तारा म्हणून अखेर होईल. ही वेळ आजपासून साधारण पाच ते सात अब्ज वर्षांमध्ये येईल. अशी खगोलशास्त्रज्ञांची अटकळ आहे; पण तो संपूर्ण विझून जाईपर्यंतचा काळ ध्यानात घ्यायचा म्हटलं तर त्याची अखेर काही हजार अब्ज वर्षांनंतर होईल. *डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ श्रमातून जे फळ मिळते ते सर्व प्रकारच्या सुखात अत्यंत मधुर असते. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *जगातील सर्वात उंच पर्वत कोणते ?* हिमालय 2) *जगाचे नंदनवन कोणते ?* स्वित्झर्लंड 3) *इंग्रजीत स्वर किती आहेत ?* 5 4) *कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?* रायगड 5) *बिहार राज्याची राजधानी कोणती ?* पाटणा *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● नरसिंह पावडे देशमुख ● सुदर्शन पा. जोगदंड ● शंकरलाल जैस्वाल ● राजेंद्र पोकलवार ● गंगाधर दगडे ● दीपक पा. हिवराळे ● हर्ष पाटील ● इरेश वंचेवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *तुम्ही दु:खाचा स्विकार कराल तेंव्हाच सुखाच्या निकट पोहचाल. आयुष्याचा खरा अर्थ कळेल. राजपुत्र सिद्धार्थ दु:खाचा शोध घेतो, म्हणून ते तथागत गौतम बुद्ध होतात. हेच फार मोठं उदाहरण जगाच्या पाठीवर लिहून ठेवलं गेलंय, ते कुणीच पुसून टाकू शकत नाही. संकटातून, समस्यांतून बाहेर कसे पडायचे, हे विद्यापीठात शिकविले जात नाही. माणसाने स्वयंअध्ययनातून खूप काही शिकायचे असते. आजच्या नव्या पिढीला हे अध्ययन करू द्यायला हवे. मात्र, तसे होताना दिसत नाही. खुशी काही सेकंदांची असते. समाधान हे काही दिवसांचं असतं आणि ज्ञान अर्थात जीवन-जाणिवा ह्या आयुष्यभरासाठी असतात.* *दुर्दैवाने मुलांना पाच रूपयांची कॅडबरी देऊन किंवा पाच-पन्नास पैशांचं चाॅकलेट देऊन खुश करण्याचं काम घरादारातून जोरकसपणे सुरू आहे. दु:खापासून त्यांना दूर ठेवण्यात येत आहे. त्यांना दु:खाची तोंडओळख करून दिली जात नाही. एक सुरक्षाकवच त्यांच्याभोवती पालक उभे करताहेत. सहाजिकच मुलांना दु:खाचा सराव होत नाही. मग जराशा दु:खाने ही मुले हडबडून जातात अन् आत्महत्येचे अर्थही माहीत नसलेले हे कोवळे जीव मारणारा कवटाळून बसताहेत. म्हणून दु:ख कळण्यासाठी दु:खाची उदाहरणे त्यांच्यासमोर ठेवणे गरजेचे आहे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही, हे आपणांस ठाऊक, पण त्यांच्यापर्यंत ते पोहचत नाही. माणूस दु:खातून उभा राहून स्वत:चे अस्तित्व सिद्ध करतो. हीच दु:खाच्या रियाजाची सामुग्री आहे. तिचा अवलंब करणे म्हणजे दु:खाचा रियाज करणे होय.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *म्हणतात ना मनी वसे ते स्वप्नी दिसे।* *आणि या मनाला सुद्धा सुंदर स्वप्न* *पडूंदया.जे मन सतत काहीतरी* *नाविन्याचा शोध घेते तेच* *नाविन्याची निर्मिती सुद्धा करते.* *"ज्या माणसाला सतत शुभ आणि आशावादी विचार करण्याची सवय असते त्याचे मन नेहमी आनंदाने व उत्साहाने भरलेले राहते* *आणि* *उत्साही मनाच्या माणसाला नेहमीच यशप्राप्ती होते..* *म्हणून सकारात्मक , आशावादी आणि आनंदी विचार हीच यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे."* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* *जि. प.शाळा--माणिकखांब,* *ता.इगतपुरी, जि. नाशिक* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• लोक तुम्ही तुमच्या जात असलेल्या चांगल्या ध्येयाकडेही वेगळ्या दृष्टीने पाहत असतात आणि आपल्यामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्नही करतात,परंतु त्यांच्या अशा वृत्तीमुळे आपण आपले चांगले ध्येय सोडायचे नाही.लोक तर या जगात चांगल्यालाही नाव ठेवतात आणि वाईटालाही नाव ठेवतात.त्यांच्याकडे पाहून आपण काहीही करायचे नाही जे आपणास आणि आपल्या मनास योग्य आहे आणि लोकांना फायद्याचे आहे आपण निश्चित केलेल्या ध्येयापासून त्रास होणारे नसेल तर नक्कीच त्या ध्येयाकडे मार्गक्रमण करावे. तरच आपले आणि इतरांचे कल्याण होईल. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मासा आणि हंस* एका सरोवरात एक मासा राहत होता. तिथेच एक हंस येत असे. त्या दोघांची घनिष्ट मैत्री होती. दोघेही एकमेकांशी भरपूर गप्पा मारत असत. रात्र झाल्यावर मासा सरोवराच्या तळाला जात असे तर हंस जवळच्या झाडावर झोपत असे. सकाळ झाल्यावर हंस कुठेतरी जात असे आणि परत माशाला भेटावयास येत असे. एकेदिवशी माशाने हंसाला विचारले,"तू रोज सकाळी इथून उडून जातो हे मी पाहतो. पण तू कुठे जातो हे तू मला कधीच सांगितले नाहीस" हंस म्हणाला,"अरे मित्रा ! मी समुद्राकडे जात असतो. कारण समुद्रात भरपूर शिंपले असतात. त्या शिंपल्यातून निघणारे मोती मला हवे असतात. कारण माझे अन्नच मोती आहे. मी हंस आहे मी फक्त मोतीच खातो. त्यामुळे मला रोजच समुद्रावर जावे लागते." हे ऐकून मासा म्हणाला,"मित्रा ! मलाही एकदा समुद्र बघायचा आहे." मित्राची अशी इच्छा पाहून हंस म्हणाला,"येथून थोडे पुढे गेल्यावर एक नदी आहे, ती समुद्राला मिळते, तू त्या पोहोच." त्यावर्षी प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, सरोवराचे पाणी जावून नदीला मिळाले तसा मासाही नदीच्या पाण्यात पोहोचला. नदीचा प्रवाह फार जोरात असल्याने मासा अतिशय वेगाने समुद्राकडे वाहून गेला. माशाला समुद्रात त्याच्यासारखेच लाखो मासे दिसले, पण कुणीच तो आल्याची न दखल घेतली न कुणी बोलले. तो त्या समुद्रात एकटा पडला.त्याला राहून राहून आपल्या हंस मित्राची आठवण येत होती. पण आता पर्याय नव्हता. तेथून परतणे शक्यच नव्हते आणि आलेल्या प्रसंगाला तोंड देणे हेच त्याच्या प्रारब्धात लिहिले होते. *तात्पर्य :-* मोठ्या गोष्टी मिळवण्याच्या नादात आपण आपल्याला आनंद देणाऱ्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. त्याने आपल्याला मोठ्या गोष्टीही मिळत नाहीत आणि छोट्या गोष्टी आपण सोडलेल्या असतात. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 05/08/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नागपंचमी* 💥 ठळक घडामोडी :- १९१४ - जगातील पहिला विद्युतचलित वाहतूक नियंत्रक दिवा अमेरिकेच्या क्लीव्हलँड शहरात सुरू झाला १९८१ - अमेरिकेन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगनने संपावर असलेल्या ११,३८१ हवाई वाहतूक नियंत्रकांना नोकरीतून काढून टाकले 💥 जन्म :- १८९० - दत्तो वामन पोतदार, मराठी इतिहाससंशोधक, लेखक. १९६९ - वेंकटेश प्रसाद, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ८८२ - लुई तिसरा, फ्रांसचा राजा *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *प्रधानमंत्री आवास योजनेची ४ लाख २१ हजार घरे पूर्ण, राज्य सरकारची माहिती; १० लाख ५१ हजार ९० जणांनी केली होती नोंदणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *ओमर अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती नजरकैदेत; श्रीनगरमध्ये कलम १४४ लागू, जम्मू-काश्मीरमध्ये वेगवान हालचाली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *दोन लाख नोकऱ्यांवर गदा; वाहन क्षेत्रात दोन दशकांतील सर्वात मोठी मंदी, प्रवासी वाहनांच्या विक्रीत आठ महिन्यांत मोठी घसरण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *कोल्हा'पूर' ! कोयना, राधानगरी, अलमट्टीमधून विसर्ग सुरू; शाळा, महाविद्यालयांना सुट्टी, कोल्हापूर जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *दादासाहेब फाळके चित्रनगरी महामंडळातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना आता लागू होणार सातवा वेतन आयोग* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *सरकारी रुग्णालयांतील कर्मचारी १९ ऑगस्ट रोजी खासगीकरण विरोधात राज्यव्यापी संपावर जाण्याचा इशारा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *India vs West Indies: भारताचा वेस्ट इंडिजवर २२ धावांनी विजय; मालिकाही खिशात, तीन सामन्यांच्या मालिकेत भारताला २-० अशी आघाडी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सुरक्षित प्रवास करू या* आजकाल प्रत्येकजण जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. प्रवासाला निघलेला व्यक्ती सुखरूप घरी परत आल्यावर घरातले सर्व सदस्याचे जीव भांड्यात पडल्यासारखे होते. हायवेचे रस्ते तर जणू अपघाताचे माहेरघरच बनले आहेत. दररोज किती तरी अपघात होतात आणि कित्येक लोकांचे जीव जातात याची काही गिनती नसते. इकडे छोट्या रस्त्यावर सुध्दा अपघात......... https://nasayeotikar.blogspot.com/2018/04/blog-post_26.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *खडकाचं वय कसं मोजतात ?* 📙 जगातली सजीवसृष्टी कार्बनच्या मेरूदंडावर उभी राहिलेली आहे. त्यामुळे प्रत्येक सजीवाच्या प्रत्येक अवयवात कार्बनची रसायनं उपस्थित असतात. याचाच आधार घेऊन विलार्ड लिबी यांनी सजीवांच्या पुरातन अवशेषांचं वय शोधण्याची एक प्रक्रिया विकसित केली. त्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्कारही प्राप्त झाला. हवेतला कार्बन डायऑक्साइड शोषून घेऊन प्रकाशसंश्लेषणाच्या प्रक्रियेतून वनस्पती कार्बोदकं तयार करतात. प्रत्येक सजीवांच्या अन्नसाखळीची सुरुवात तिथूनच होते. हवेत कार्बनची दोन रूपं उपस्थित असतात. एक स्थिर आणि बहुसंख्य असलेलं बारा अणुभाराचं समस्थानिक आणि दुसरं अस्थिर व किरणोत्सर्गी असलेलं चौदा अणुभाराचं समस्थानिक. या दोन्हींच्या वस्तुमानात फरक असल्यामुळे त्यांची वेगवेगळी ओळख पटवणं सोपं जातं; पण त्यात दोन्हींचेही रासायनिक गुणधर्म सारखेच असल्याने हवेतून कार्बन डायऑक्साइड शोषून घेताना वनस्पती त्यांच्यात भेदभाव करत नाहीत. त्यामुळे हवेत या दोन रुपांचं आपापसात जे गुणोत्तर असतं तेच जिवंत वनस्पतींमध्येही दिसून येतं. कारण किरणोत्सर्गामुळे जरी त्यातल्या चौदा अणुभाराच्या रूपाचा थोडासा र्हास होत असला तरी सतत हवेतून त्याची भरपाई होत असल्यामुळे जोवर ती वनस्पती जिवंत आहे तोवर त्यांच्या अंगचं या दोन रूपांचं आपापसातलं गुणोत्तर हवेतल्या त्यांच्या गुणोत्तराइतकंच राहतं. ती वनस्पती मृत पावली की परिस्थिती बदलते. आता हवेतून नव्यानं कार्बनडायऑक्साइड अंगात शिरत नसल्याने त्यातल्या १४ अणुभाराच्या रूपाच्या र्हासाची भरपाई होत नाही. ज्या वेगानं तो क्षय होतो त्याच वेगानं त्यांचं गुणोत्तरही बदलत जातं. किरणोत्सर्गी रूपाचा र्हास त्याच्या अर्धायनात मोजला जातो. जेवढ्या काळात मूळ राशीतला पन्नास टक्के भागाचा र्हास होतो त्या कालावधीला त्या रूपाचं अर्धायन असं म्हणतात. चौदा अणुभाराच्या कार्बनचं अर्धायन ५७६० वर्ष आहे. म्हणजेच तेवढा कालावधी उलटला की त्या वनस्पतीच्या अवशेषातील बारा अणुभाराच्या रूपाची मात्रा तेवढीच राहते; पण चौदा अणुभाराच्या रूपाची मात्रा निम्मी होते. म्हणजेच गुणोत्तर दुपटीनं वाढतं. तसं झाल्यास त्या अवशेषाचं वय ५७६० वर्षे आहे, असं निदान करता येतं. या पद्धतीलाच रेडिओकार्बन डेटिंग असे म्हणतात. सर्वच पुरातन अवशेषांमध्ये कार्बन असतोच असं नाही. उदारणार्थ, खडकांसारख्या असेंद्रिय निर्जीव पदार्थांमध्ये कार्बन नसतो. शिवाय किरणोत्सारी कार्बनचं अर्धायन तेवढंसं जास्त नसल्यामुळे त्याच्या दसपटीने म्हणजेच साधारण ५० हजार वर्षांपूर्वीच्या अवशेषांच्या वयाचं निदान अचूकपणे करता येतं. त्याहून पुरातन असलेल्या पदार्थांबाबतच्या निदानात संदेह निर्माण होतो. एक स्थिर आणि एक किरणोत्सारी अशा दोन मूलद्रव्यांच्या जोड्या मिळाल्या तर हीच पद्धत अवलंबली जाऊ शकते. अशा अनेक जोड्या आता शोधून काढल्या गेल्या आहेत. युरेनियमची खनिजं खडकांमध्ये असतात. त्याच्या क्षयमालिकेत अशा जोड्या सापडतात. त्यांचा आधार घेऊन खडकांचं वय मोजण्याची रेडिओमेट्रिक डेटिंग पद्धत विकसित केली गेली आहे. तिची मदत घेऊन कोणत्याही खडकाचं वय किती हे आता अचूकपणे सांगता येणं शक्य झालं आहे. - *डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ साधे जीवन जगणे ही जगातील सर्वात चांगली गोष्ट आहे.”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आजची प्रश्नमंजुषा* 1) *उटी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?* तामिळनाडू 2) *शिवाजी महाराज यांच्या आईचे नाव काय होते ?* राजमाता जिजाऊ 3) *भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?* श्रीमती इंदिरा गांधी 4) *'जागतिक महिला दिन' केव्हा पाळला जातो ?* 08 मार्च 5) *भारतात डमडम हे राष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?* कलकत्ता *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● श्रीराम पा. जगदंबे ● सय्यद जाफर ● दत्तात्रय सितावार ● किरण सोनकांबळे ● साईनाथ जायेवाड ● देवराव कोलावाड ● मनोज मानधनी ● सचिन वसरणीकर ● शेख वाजीद ● विकास कांबळे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपण जे बोलायला हवे ते बोलत नाही. जे बोलू नये ते बोलून जातो. जे पोटी असते ते ओठी येते असे म्हणतात. काही वेळा पोटी काही नसताना भलतेच ओठी येते. अनवधानाचे ते बोलणे सावरण्यासाठी मग खूपच बोलणे सोसावे लागते. काही लोक खूपच बडबडतात. काहींचे मौन बोलके असते. शांतपणे अविरत श्रमाची कास धरणा-यांचे यशच खूप काही बोलून जाते. नाहीतर बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात असणा-यांची संख्या बरीच आहे. न्यायालयातील उलटतपासात साक्षीदाराने काय बोलावे यापेक्षा काय बोलू नये याला खूप महत्व आहे.* *रामदासांनी शिवरायांचे मोठेपण सांगताना 'शिवरायांचे कैसे बोलणे' असा शब्दप्रयोग करून, त्यांच्या पदपथावर चालण्यास सांगितले. संतांच्या बोलण्याला अनुभूतीचा आधार असतो. महापुरूषांच्या बोलण्याला त्यांच्या जीवनकार्याची धार असते. चर्चिलच्या प्रभावी बोलण्याने दुस-या महायुद्धात ब्रिटनच्या लोकांना लढण्याचे धैर्य वाढले. अब्राहम लिंकनच्या बोलण्याने अमेरिकेची फाळणी टाळली गेली. मार्टिन ल्यूथर किंगच्या ''गुणवत्ता त्वचेच्या रंगावर नाही तर चारित्र्यावर ठरेल' या वक्तव्याने जगभर प्रभाव पाडला. गांधीजीचा 'चले जाव' , सुभाषबाबूंचा 'जयहिंद' आणि क्रांतीकारकांचा 'वंदे मातरम' ह्या एकाच शब्दाने इंग्रजांना पळता भुई थोडी झाली. नाहीतर,'बालिश बहु बायकात बडबडला' असे बडबडणारे तर अनेक असतात.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रेरणादायी विचार *माणूस म्हणुनी जन्मा आलो,* *माणूस म्हणुनी जगेन मी।* *खर आहे,एक हिंदी गीत मला भावले.* *तू *हिंदू बनेगा ,न मुसलमान बनेगा।* *इन्सान की औलाद है।* *इन्सान बनेगा।* *बघा जमलं तर माणूसच बना.* *खूबसूरत चेहरा भी* *बूढ़ा हो जाता है* *ताकतवर जिस्म भी* *एक दिन ढल जाता है* *🤴ओहदा और पद भी* *एक दिन खत्म होता है।* *लेकिन एक अच्छा इंसान* *हमेशा अच्छा इंसान ही रहता है।* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते )* *जि. प.शाळा--माणिकखांब,* *ता.इगतपुरी, जि. नाशिक.* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• काही लोकांच्या बाबतीत पैसा म्हणजे सर्वस्व आहे आणि पैशामुळे काहीही मिळवता येते. पैशामुळे तुम्हाला तुमच्या भौतिक सुविधा मिळवता येतात परंतु इतरांचे मन मिळवता येत नाही.इतरांचे मन जिंकायचे असेल तर या ठिकाणी पैसा चालत नाही.त्यासाठी हवे तुमचे उदार अंतःकरण,तुमची दुस-याबद्दलची आत्मियता,प्रेम इतरांना दिलात तर तेही तुमच्यावर अधिक प्रेम करायला लागतील.यासाठी तुमच्या जवळ असलेल्या पैशाची गरज नाही.एवढे सत्य आहे पैशाने सारे काही खरेदी करता येईल पण जगात असलेल्या सर्व जीवांचे मन आणि प्रेम कधीच खरेदी करता येत नाही.मग तुमच्या जगण्याला काय अर्थ आहे ? © व्यंकटेश काटकर, नांदेड ९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कर्म हीच पूजा* एकदा एक बाई रामकृष्ण परमहंसाकडे आल्या आणि म्हणाल्या , " मला या संसाराचा विट आला आहे . मुलं मोठी झाली. आता प्रपंच सुटेल असे वाटले . पण नातवंडांच्या प्रेमात पडले . रोज त्याला सांभाळावे लागते . तेव्हा आता घर सोडायचा विचार आहे . " रामकृष्णांनी विचारले , " घर सोडून तुम्ही काय करणार ? " त्या बाई म्हणाल्या , " गंगेच्या तीरावर एक झोपडी बांधणार . त्यात श्रीकृष्णाची मूर्ती बसविणार . रोज त्या मूर्तीची पूजा करणार . कृष्णाला नेवैद्याने जेवू घालणार . कृष्णाला झोपेतून उठविणार, आंघोळ घालणार . " परमहंसांनी विचारले , " श्रीकृष्णाची मूर्ती दगडाची असणार न ? " तेव्हा त्याबाई ' हो ' म्हणाल्या . रामकृष्णांनी विचारले , " आपण दगडाच्या मूर्तीत श्रीकृष्ण पाहणार ? " त्या बाई ' हो ' म्हणाल्या . त्यावर रामकृष्ण म्हणाले . " आपण दगडाच्या मूर्तीत श्रीकृष्ण पाहणार , मग नातवंडामध्ये श्रीकृष्ण का पाहत नाहीत ? श्रीकृष्ण समजून नातवंडाला जेवू घाला. श्रीकृष्ण म्हणून आंघोळ घाला. श्रीकृष्ण म्हणून त्याला झोपवा. " तुम्ही तुमच्या नातवंडानाच तुमचा श्रीकृष्ण समजून वागा. मनातला भाव चांगला ठेवा म्हणजे तुम्हाला सर्वत्रच भगवंत दिसेल आवश्यक नाही मुर्तीतच देव पाहणे.तुम्ही तुमच्या नित्यकर्मात पण देवाचे दर्शन घेऊ शकता. *तात्पर्य : नित्य कर्मामध्ये भगवतभाव ओतला की ते कर्म नाम साधनेच्या दर्जाचे होते व तेच कर्म पूजा ठरते.* *'कर्मे ईशू भजावा.'* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 03/08/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ◆ *क्रांतिसिंह नाना पाटील जयंती* 💥 ठळक घडामोडी :- ■२००४-राज्यपाल महमंद फजल यांच्या हस्ते सोलापूर विद्यापीठाचे औपचारिक उद्घाटन झाले. ■ १९६० - नायजरला फ्रांसपासून स्वातंत्र्य. ■ १९७५ - बोईंग ७०७ प्रकारचे खाजगी विमान मोरोक्कोच्या अगादिर शहराजवळ कोसळले. १८८ ठार. ■ १९४८-भारतीय अणू ऊर्जा आयोगाची स्थापना झाली.(Indian Atomic Energy Commission) 💥 *जन्म* :- ●१९००-क्रांतिसिंह नाना पाटील,स्वातंत्र्य सैनिक ,समाजसुधारक. ● १९३९ - अपूर्व सेनगुप्ता, भारतीय क्रिकेट खेळाडू. ● १९५६ - बलविंदरसिंग संधू, भारतीय क्रिकेट खेळाडू. ● १९५७ - मणी शंकर, भारतीय चित्रपट दिग्दर्शक. ● १९६० - गोपाल शर्मा, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 *मृत्यू* :- ◆ १९९३ - स्वामी चिन्मयानंद, भारतीय तत्त्वज्ञानी. ◆ २००७ - सरोजिनी वैद्य, मराठी लेखिका, समीक्षिका. ◆ १९५७-देवदास गांधी,पत्रकार,हिंदुस्थान टाईम्स चे संस्थापक,महात्मा गांधींचे पुत्र. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *पत्रकार रवीश कुमार यांना यंदाचा 'रॅमन मॅगसेसे' पुरस्कार जाहीर, हिंदी टीव्ही पत्रकारितेतील योगदानाबद्दल गौरव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये राज्यात 100 टक्के पाऊस पडणार, हवामान विभागाचा अंदाज* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचा राज्य शासनाने घेतला निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *महाराष्ट्रातील उद्योगात भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये 80 टक्के प्राधान्य न दिल्यास कारवाई करणार, उद्योगमंत्री सुभाष देसाई आक्रमक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *ओबीसींच्या राजकीय आरक्षणात कपात, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळणार, सरकारच्या अध्यादेशामुळे नवा वाद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *ईव्हीएम-व्हीव्हीपॅट हटवा, लोकशाही वाचवा, असे म्हणत विरोधी पक्ष एकवटले, 21 ऑगस्टला मुंबईत विरोधकांचा सर्वपक्षीय मोर्चा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *IAAF World Race Walking Cup : सात वर्षानंतर भारताला जागतिक २० किमी चालण्याच्या शर्यतीच मिळालेे कांस्यपदक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सर सलामत तो ......* हिंदीत एक म्हण आहे सर सलामत तो पगडी पचास, त्यानुसार गाडी चालवताना आपल्या डोक्यावर हेल्मेट असेल तर यदाकदाचित अपघात झालाच तर डोक्याला मार लागत नाही. उपचाराच्या खर्चापेक्षा काळजीसाठी लागणारा खर्च खूप कमी असतो. आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे डोकं. कारण त्या डोक्यात मेंदू सुरक्षित असतो........ पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करावे.... https://nasayeotikar.blogspot.com/2019/02/blog-post_24.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *आपल्या शरीरात एकूण किती जनुकं आहेत ?* 📙 आपल्या यच्चयावत अनुवांशिक गुणधर्मांचा आराखडा डीएनए या रसायनाच्या रेणूंमध्ये सांकेतिक रूपात साठवलेला असतो. शरीरातल्या प्रत्येक पेशीच्या केंद्रात असलेल्या डीएनएमध्ये ही माहिती साठवलेली असते. या डीएनएची रचना दुहेरी गोफासारखी किंवा गोल गोल जिन्यांसारखी असते. या जिन्याच्या पायऱ्या समोरासमोरच्या कठड्यांना जोडलेल्या नायट्रोजनयुक्त घटक रेणूंच्या बनलेल्या असतात. प्रत्येक पायरी ही समोरासमोरच्या दोन रेणूंच्या जोडगोळीची बनलेली असते. या घटक रेणूंच्या अनुक्रमाक अनुवांशिक गुणधर्मांची माहिती साठवलेली असते. या माहितीचा एकक म्हणजे एक जनुक. आपल्या शरीरातल्या डीएनएमध्ये एकूण तीन अब्ज पायऱ्या म्हणजेच नायट्रोजनयुक्त घटक असतात. तीन पायऱ्या मिळून जो एक कोडाॅन होतो तो प्रथिनांच्या साखळीतील एका घटकाविषयीचा आराखडा सांकेतिक रूपात आपल्यात दडवून ठेवतो. याचा अर्थ झाला की असे किमान एक अब्ज कोडाॅनं आपल्या शरीरात असतात. जनुकं अशा काही कोडाॅनची बनलेली असतात. काही जनुकं थोड्याच कोडाॅनची असतात, तर काहींची लांबी त्याच्या कितीतरी पट असते. त्यामुळे शरीरात एकूण नक्की किती कोडाॅन आहेत याची माहिती नव्हती; पण एकूण कोडाॅनच्या संख्येवरून किमान एक लाख तरी जनुकं शरीरात असावीत, असा अंदाज केला गेला होता. मानवाच्या यच्चयावत जनुकसंचयाचं वाचन करण्याचा 'ह्युमन जीनोम' हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला. त्यापूर्वी मूषक वगैरेसारख्या काही प्राण्यांच्या जीनोमचं वाचन करण्यात आलं होतं. त्यातून त्या प्राण्यांच्या शरीरातल्या एकूण जनुकांच्या संख्येची माहिती मिळाली होती. त्यावरूनही हा अंदाज योग्य वाटत होता. पण प्रत्यक्षात जेव्हा मानवी जनुकसंचयाचं वाचन सुरू झालं आणि ते पूर्णत्वाकडे झुकू लागलं तसा वैज्ञानिकांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण ही संख्या अपेक्षेपेक्षा फारच कमी असल्याचं दिसून आलं. आजमितीला अशी चाळीस हजार जनुक असावीत असं या प्रकल्पात सहभागी झालेल्या बहुतेक वैज्ञानिकांचे मत आहे. ते सर्व मान्य आहे असं नाही. कारण ऐकून डीएनएपैकी कितीतरी भाग कोणत्याच प्रथिनाच्या उत्पादनात सहभागी नसल्याचं दिसून आलं आहे. याला जंक डीएनए किंवा इन्ट्राॅन असं म्हणतात. प्रथिनांच्या उत्पादनात सहभागी असलेल्या डीएनएला एक्झॉन असे म्हणतात. या दोन्हींची एकमेकांमध्ये गुंफण झालेली आहे. म्हणजे दोन एक्झॉनच्यामध्ये काही इन्ट्राॅन आहेत. तसंच एका जनुकामध्ये एकाहून अधिक एक्झॉन असतात आणि ते काही इन्ट्राॅनमुळे एकमेकांपासून अलग झालेले असतात, हेही दिसून आलं आहे. म्हणूनच काही वैज्ञानिक या ४० हजारांच्या आकड्याला मान्यता द्यायला तयार नाहीत. त्यांच्या मते खरी संख्या त्याहून कितीतरी अधिक असावी; आणि ७० ते ८० हजार जनुकं शरीरात असावीत, असा त्यांचा दावा आहे. जसजशी हय़ुमन जिनोमची अधिक तपशीलवार माहिती हाती येत आहे तसतसा यापैकी कोणता दावा खरा आहे यावर अधिक प्रकाश पडणार आहे. *डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" मोठेपणा आणि चांगुलपणा एका व्यक्तीत क्वचितच एकत्र दिसतात."* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारतात चंदनासाठी प्रसिद्ध असलेला राज्य कोणता ?* कर्नाटक 2) *हॉलीवूड ही जगप्रसिद्ध फिल्म इंडस्ट्री कोठे आहे ?* कॅलिफोर्निया 3) *भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता ?* डॉल्फिन 4) *नोबेल पारितोषिक मिळविणारे पहिले भारतीय कोण ?* रविंद्रनाथ टागोर 5) *भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर कोण ?* चिंतामणराव देशमुख *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● अजय बिरारी ● पोतन्ना चिंचलोड ● प्रदीप कार्ले ● उत्तमराव नरवाडे ● भवरसिंग *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *काहीही विपरीत घडले की त्याबद्दल इतरांना जबाबदार धरण्याची एक सार्वत्रिक प्रवृत्ती असते. आपली चूक कबूल करण्याऐवजी त्याला इतर लोक कसे दोषी आहेत, हेच बहुतेक जण सांगत असतात. चूक कबूल करण्यात बहुतेकांना कमीपणा वाटतो. त्यामुळे आपले चूक असले, तरी ते योग्य आहे असाच हेका अनेकजण लावतात. सार्वजनिक पातळीवर तर हे चित्र आणखी गडद होते आणि समाजातील सर्वच वाईट गोष्टींसाठी शासन यंत्रणेला दोषी ठरविले जाते. जनकल्याणाचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या सरकारकडून मोठ्या अपेक्षा असतात आणि बहुतेकदा अपेक्षाभंग होतो.* *देश आपल्यासाठी काय करणार यापेक्षा आपण देशासाठी काय करणार असे जाॅन. एफ. केनेडी यांनी म्हटले होते. 'मी साधा माणूस, मी काय करणार' असे उत्तर प्रत्येक जण देऊ शकतो. मात्र साधा माणूस खूप काही करू शकतो. सार्वत्रिक नियमांचे पालन करणे, आपला परिसर स्वच्छ ठेवणे, अफवा न पसरविणे अशा अनेक गोष्टी आपण करू शकतो. चांगला नागरिक बनण्याची सुरूवात घरापासून होते. सार्वजनिक नियमांचा आदर राखण्याची प्रवृत्ती मुलांमध्ये विकसित केली तरी पुष्कळ. लहान मुले मोठ्यांचे अनुकरण करतात, याची जाणीव न ठेवता मोठी माणसे गैरवर्तन करतात. त्यामुळे पुढील पिढीही तेच शिकते.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल-9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *हल्ली आपण गल्लीबोळात एक आवाज ऐकतो.-----काय, तर नाद करायचा नाय,नाहीतर --आमचा* *नादच खुळा।* *काय करणार हल्ली छंदाला मर्यादाच राहिल्या नाहीत.* *माणसाने छंद जरूर बाळगावा,पण छंदीफंदी असू नये ,अस सगळेच* *मानतात.पण* *मला मात्र वेगळे वाटते,* *मातीत खेळायचे पण अंगाला* *डाग लागू द्यायचा नाही.* *होळीचा रंग खेळायचा नाही,पण* *रंगीबेरंगी भावनांनी* *मोहरून यायचं.* *🧜♀पहिल्या पावसात भिजायचं,* *पण अंग ओल होता* *कामा नये.अशा सगळ्या अटी* *घातल्यासारखे आहे बघा।* *ज्यांना छंद होते, किंवा छंद वेडे होते तेच जगात नवीन काहीतरी घडवू* *शकले.* *🕺तर मग लागताय ना* **नादी एखादया* *छंदाच्या----सचिन बॅटींच्या नादी लागला जगविख्यात क्रिकेटर* **बनला,* *गाडगेबाबा** *सफाईच्या नादी लागले राष्ट्रसंत* *झाले.निलिमा मिश्रा गोधडीच्या नादी* *लागली रेमन मॅगेसेसे पुरस्कार* *मिळाला. सुरेखा पुणेकर* *लावणीच्या नादी लागून* *साता-समुद्रापार पोहचली.✈✈राईट बंधू विमानाच्या नादी लागले आणि शोध* *लावला.संत तुकाराम भक्तीच्या* *नादी लागले आणि भक्ती* *मंदिराचा कळस झाले.* *चला छंद जोपासूया।* *अशोक कुमावत, नाशिक* *(राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जीवनव्यवहारासाठी जसा सुखदुःखाचा,कामाचा आणि वेळेचा अनुभव पाठीशी असावा लागतो तसा आपल्या सर्वांगीण विकासासाठी ज्ञानाचा अनुभव पाठीशी असावा लागतो.ते ज्ञान मिळविण्यासाठी मनाची तयारी असायला पाहिजे. मनाच्या परिपक्वतेसाठी व माणूस म्हणून चांगले आणि संस्कारीत जीवन फुलवण्यासाठी ज्ञानाची कास धरायलाच हवी.ज्ञान हे जीवनाला योग्य दिशा देण्याचे आणि मानव कल्याणाच्या प्रगतीकडे नेण्याचे काम करते. - व्यंकटेश काटकर,नांदेड. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भेट* *एकदा एका राजाने खुश होऊन लोहाराला चंदनाची बाग भेट दिली. लोहाराला चंदनाच्या झाडांच्या किंमतीचे ज्ञान नव्हते त्यामुळे त्याने त्याचा कोळसा करून विकला. हळू हळू सम्पूर्ण बाग रिकामी झाली.* *एक दिवस असेच राजा त्याच्या घरा जवळून जात होता, राजाला वाटले लोहार आता खुप श्रीमंत झाला असेल. परंतु प्रत्यक्ष पाहिल्यावर लोहाराची परिस्थिति पहिल्या सारखीच आहे असे दिसले राजाला आश्चर्य वाटले.* *सत्य समजल्यानंतर राजाने त्याला विचारले तुझ्याकडे एखादे लाकुड़ शिल्लक आहे का ? तेव्हा लोहारने कुऱ्हाडीचा दांडा दाखविला.* *राजाने त्याला चंदनाच्या व्यापाऱ्या कडे पाठवले. तेंव्हां त्या छोटयाश्या तुकडयाचे त्याला खुप पैसे मिळाले. लोहार खुप रड़ू लागला, त्याने राजाला अजुन एक बाग देण्याची विनंती केली तेव्हा राजा म्हटला "अशी भेट वारंवार भेटत नाही."* *मित्रांनो आपले आयुष्य त्या लोहारा सारखेच आहे मानवी जीवनाच्या मुल्यांचे महत्व, आपल्याला जीवनाचे शेवटचे श्वास चालू असताना समजते.पण...* *त्यावेळेस आपण म्हणतो देवा मला अजुन थोड़ा वेळ दे, परंतु त्यावेळी वेळ मिळणे अशक्य असते.* *मानवी जीवन अनमोल आहे.* *असे जीवन परत मिळणार नाही.* *बोध* *या जगात दुर्लभ गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे, मनुष्य देह. हा देह ही आपल्या जीवनाची अमूल्य भेट आहे या देहाचा कोळसा करायचा की, चंदन हे आपले आपण ठरवायचे.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *बुलेटीन बाबत प्रतिक्रिया* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💐 *_फ्रेश मॉर्निंग बुलेटीनच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा_* 🌹 वाचनाला पर्याय नाही. समाज अप्रगल्भ राहू द्यायचा नसेल तर सातत्याने वाचन लेखन व्हायला पाहिजे. त्यावर चर्चा व्हायला पाहिजे. आजकाल फेसबुक वगैरे मुळे लोक पटकन कशावरही विश्वास ठेवतात व कमी कालावधीत अनेकापर्यंत पोहोचण्याचा उत्तम माध्यम आहे. आणि हे सर्व आपल्या ग्रुपच्या माध्यमातून होत आहे आणि मी ते दररोज वाचतो व हजारो मित्रांना शेअर करीत असताना मनस्वी आनंद होतो. महत्त्वाचे म्हणजे अनेकांचे अंधकारमय जीवन पुन्हा प्रकाशमय झाल्याचे उदाहरणे आहेत. एकंदरीत आपल्या समुहाच्या माध्यमातून एक उत्तम समाजसेवा करण्याची संधी प्राप्त झाली त्यामुळे श्री येवतीकर सरांसह सर्वांचे मनःपूर्वक आभार. पुढील वाटचलीस मंगलमय शुभेच्छा...🙏 ✍ _श्री शिवानंद चौगुले,चिंचवड_ _विशेष कार्यकारी अधिकारी_ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 02/08/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ◆ *वायु सेना दिन - रशिया*◆ 💥 ठळक घडामोडी :- ■ १७९०- अमेरिकेत पहिली जनगणना सुरू. ■ १९८५ - डेल्टा एरलाइन्सचे एल.१०११ प्रकारचे विमान अमेरिकेतील डॅलस आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोसळले. १३७ ठार. ■ १९९० - इराकने कुवैतवर आक्रमण केले. 💥 *जन्म* :- ◆१८६१-प्रफुल्लचंद्र रे,बंगालमधील प्रसिध्द रसायनशास्त्रज्ञ, ◆ १९३२ - पीटर ओटूल, आयरिश अभिनेता. ◆१९५८ - अर्शद अय्युब, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 *मृत्यू* :- ● १५८९ - तिसरा हेन्री, फ्रान्सचा राजा. ● १६११ - केटो कियोमासा, जपानी सामुराई. ● १९२३ - वॉरेन हार्डिंग, अमेरिकेचा २९वा राष्ट्राध्यक्ष. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *दुष्काळी भागातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची संपूर्ण परीक्षा फी माफ, शालेय शिक्षणमंत्र्यांचा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *शेतकरी जगवायचा असेल तर एमएसपी उत्पादन खर्चाच्या तिप्पटच हवा, पंजाब हायकोर्टनं ठणकावलं* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *आदित्य ठाकरेंची जन आशीर्वाद यात्रा आज लातूरमध्ये, उदगीरला जाताना शेतकऱ्यांसोबत पेरणीचा अनुभव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *शरद पवार हृदयात आहेत असं बोलणाऱ्यांचं हृदय तपासावं, शरद पवारांचा पक्षांतर केलेल्या नेत्यांना टोला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पुन्हा भोवळ, सोलापुरातल्या कार्यक्रमातील घटना, डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर नियोजित दौरा रद्द* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *अण्णाभाऊ साठेंवरील चित्रपटासाठी पुढाकार घेणार, मातंग समाजासाठी एक लाख घरे - मुख्यमंत्री* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *थायलंड ओपन बॅडमिंटन : साई प्रणीत उपांत्यपूर्व फेरीत, सायना नेहवाल, के. श्रीकांत पराभूत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रदूषण एक समस्या* मनुष्याचे सरासरी आयुष्य जे की पूर्वी शतकाची होती. ती आता हळूहळू कमी होत आहे. आत्ता माणसाचे आयुष्य सरासरी सत्तरच्या आसपास झाले आहे. विविध कारणामुळे मनुष्य आजारी पडत आहे आणि मृत्युमुखीदेखील पडत आहे. डॉक्टराना देखील निदान होणार नाहीत असे रोग जडत आहेत. एशोआरामच्या जिंदगीमुळे देखील माणसाचे आयुष्य घटत चालले आहे. यातच प्रदूषण ही एक महत्वपूर्ण समस्या जाणवत आहे. ....... पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे. https://nasayeotikar.blogspot.com/2018/12/blog-post_10.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *मूलभूत बलं किती आहेत ?* 📙 हे विश्व जेव्हा उदयाला आलं तेव्हा झालेल्या महाविस्फोटातून केवळ ऊर्जा रोंरावत बाहेर पडली; पण त्यानंतरच्या काही सेकंदांमध्येच त्या ऊर्जेनं कणांचं रूप धारण केलं. त्यातून जे मूलभूत कण बाहेर पडले त्यांच्या एकमेकांमध्ये काही प्रक्रिया करण्यासाठी त्यांना बांधून ठेवण्यासाठी त्यांच्यावर काही बलांचा प्रभाव पडला. त्या बलांनाच मूलभूत बलं असं म्हटलं जातं. अठराव्या शतकापर्यंत अशा तीन बलांचीच माहिती होती. विद्युतभारांना एकमेकांकडे आकर्षित करणारं विद्युतबल, चुंबकीय प्रभावाचा आविष्कार करणारं चुंबकीय बल आणि विश्वाच्या उदयाला कारणीभूत झालेल्या गुरुत्वाकर्षणाचं बल. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीअखेरीस आणि खरं तर विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा अणूंच्या अंतर्गत रचनेचा उलगडा झाला तेव्हा मग त्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सबल आणि दुर्बल, स्ट्राँग आणि वीक या बलांची माहिती मिळाली. एकूण मूलभूत बलांची संख्या पाच झाली. ऋण आणि धन विद्युतभारांना एकमेकांकडे आकर्षित करणारं विद्युतबल अनेक पदार्थांच्या रचनेत भाग घेऊन त्यांना आकार देतं, याची माहिती मिळाली होती. तसंच अवकाशात चमकणाऱ्या विद्युल्लतेच्या आविष्कारातही त्या बलाचा मोठाच सहभाग असतो, हेही माहीती झालं होतं; पण जेम्स क्लार्क मॅक्सवेल यानं त्या बलाची सांगड चुंबकीय बलाशी घालून दिली. एकाच बलाची ही दोन रूप आहेत. हे सिद्ध करणारी समीकरणं त्यांनी मांडली. आपल्याला दिसणारा प्रकाश त्याच्या दोन्ही बाजूंना असणारे अवरक्त आणि जंबुपार किरण आणि त्यांच्याही अलीकडे पलीकडे पसरलेल्या रेडिओलहरी, सूक्ष्मलहरी, क्ष- किरण, गामा किरण ही सारी विद्युत चुंबकीय लहरींची वेगवेगळी रूपे आहेत हेही दाखवून दिलं गेलं. त्यामुळे एकूण मूलभूत बलांची संख्या चारावर आली. एकोणिसशे सत्तरच्या दशकात स्टीवन वाईनबर्ग, शेल्डन ग्लॅशो आणि अब्दुस सलाम यांनी सैद्धांतिक भौतिकीतल्या काही समीकरणांद्वारे अणूंच्या अंतरंगातच कार्यक्षेत्र मर्यादित असलेल्या दुर्बल बलाची सांगड विद्युतचुंबकीय बलाशी घालून मुलभूत बलांची संख्या तीनवर आणून ठेवली आहे. तरीही ही सारी बलं एकाच महाबलाची वेगवेगळी रूपं आहेत, अशी भौतिकशास्त्रज्ञांची श्रद्धा आहे. त्या तिन्ही मुलभूत बलांची सांगड घालून त्या महाबलाची ओळख पटविण्याची धडपड गेले शतकभर चालूच आहे. आईनस्टाईननंही आपलं उत्तरआयुष्य या महाबलाचा वेध घेण्यात व्यतीत केलं होतं. त्यात त्याला यश मिळालं नसलं तरी भौतिकशास्त्रज्ञांनी आपले प्रयास चालूच ठेवले आहेत. त्यात ते यशस्वी होईपर्यंत तरी मूलभूत बलांची संख्या तीनच राहील. - *डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• “विश्रांती देणारे एकमेव औषध म्हणजे झोप.” *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *जगातील सर्वात लांब भिंत कोणती ?* चीनची भिंत (2415 km) 2) *स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झाली ?* 1जुलै 1955 3) *साने गुरुजी यांचा जन्म कोठे झाला ?* पालगड (रत्नागिरी) 4) *माउंट एव्हरेस्टची उंची सर्वप्रथम कोणी मोजली ?* सर जॉर्ज एव्हरेस्ट 5) *कोणताही हिंदी चित्रपट कोणत्या दिवशी प्रदर्शित होतो ?* शुक्रवार *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● दयानंद भुत्ते ● रवींद्र वाघमारे ● दिगंबर वाघमारे ● कैलाश चंदोड ● काशीनाथ उशकलवार ● जी. पी. मिसाळे ● आनंद पाटील धानोरकर ● शिलानंद गायकवाड ● प्रतीक गाडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गाण्याचा रियाज करावा तसा दु:खाचा रियाज करता येईल का? गाण्याच्या रियाजाने गायकांस त्याचा आवाज टिकवून धरता येतो. आवाजाची धार शाबूत राहते. त्याचं गाणं दिवसेंदिवस खुलत जातं. दु:खाच्या रियाजाने असं काही होईल का? दु:ख जर आणखीनच टोकदार होणार असेल तर दु:खाचा रियाज करायला कुणी धजणार नाही. कुणाला हवं आहे दु:खं ! नकोच आहे दु:खं. त्याच्यापासून सुटका व्हावी म्हणून पृथ्वीभर जेवढे काही देव आहे, त्यांना साकडे घालून होते. खुद्द देवालाच दु:खाच्या संदर्भात जाब विचारणा-या माणसाची कथा आपण ऐकलीच आहे.* *माणूस देवाला म्हणतो की, 'देवा तू सुखात माझ्याबरोबर असतो. कारण तेंव्हा दोन माझी अन् दोन तुझी पावलं उमटलेली असतात. मात्र दु:खात तू माझ्यासोबत नसतोस, कारण तेंव्हा माझी एकट्याचीच पावलं उमटलेली असतात !' तेंव्हा देव त्यास म्हणतो,'अरे दु:खातही मी तुझ्याबरोबरच होतो! ज्या दोन पावलांची गोष्ट तू करतो आहेस, ती पावलं तुझी नसून माझीच आहे. मी तुला कडेवर उचलून घेतलं होतं.' तरी माणूस मान्य करणार नाही. हीच माणसाची मोठी समस्या आहे. माणूस दु:खाचा बाऊ फार करतो. दु:खाची सवय करून घ्यायची ..ही गोष्ट फार लांब राहिली. सुख पाहता जवापाडे । दु:ख पर्वताएवढे ॥ तुकाराम महाराजांनी सुखाचे आणि दु:खाचे माप आपल्यासमोर ठेवले आहे. सुख जवसाच्या 'बी' इतके लहान, तर दु:ख पर्वताएवढे विशाल आहे. जवसाच्या बी इतक्या छोट्या असलेल्या सुखाचे व्यवस्थापण आपण करीत असतो. मात्र, पर्वताएवढ्या दु:खाचे व्यवस्थापण आपण बिलकुलही करीत नाही. म्हणून ते कमी व्हायच्या ऐवजी वाढत जाते..इतके की जवसा एवढ्या सुखाचाही तेच चट्टामट्टा करून टाकते.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡ *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सुख आणि दुःख ही मानवी जीवनाची नैसर्गिक प्रयोगशाळा आहे.* *जो सातत्याने प्रयत्न व पाठपुरावा* *करत राहील त्याचा* *प्रयोग यशस्वी होईल.* *संतानी म्हटले आहे, सुख जवापाडे,दुःख पर्वताएवढे।* *प्रत्येकाला आपले दुःख दुसऱ्यापेक्षा मोठे वाटते, दुःखाला आपला सच्चा मित्र बनवून* *बघा मग खरी जीवनाची मजा चाखायला मिळेल.* *जेव्हा जेव्हा दुःख जवळ येण्याचा प्रयत्न करीन तेंव्हा तेंव्हा त्याच्या समोरच तुम्ही प्रतिआव्हान म्हणून पाय रोवून उभे रहा.* *आणि जमलं तर एक सुंदर गीत गुणगुणत रहा* . *दुनिया मे कितना गम है।* *मेरा गम कितना कम है।* *लोगोका गम देखा तो,* *मैं अपना गम भूल गया।* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते* ) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येकजण आपल्या जीवनाबद्दल काही ना काही बोलत असतो.जेव्हा तो बोलत असतो तेव्हा त्याच्या जीवनात नव्वद टक्के नकारात्मक भूमिका असते.या जीवनात असे जीवन जगण्यात काय अर्थ आहे ? त्यापेक्षा न दिलेलेच बरे.आता जीवन जगणे असह्य आहे.असा जेव्हा विचार करतात त्यांनी जगण्याला आत्मविश्वास गमावलेला असतो.कोणतीही कृती न करता किंवा हातपाय न हलवता जीवन कसे सुखी बनेल ? हा विचार कधीच ते विसरुन बसले असणार आणि त्यामुळेच त्यांच्या जीवनात सदैव नैराश्याचे डोळ्यांसमोर काळे ढग दिसतात.अशी माणसे स्वत:ही जीवनाचा आनंद घेत नाहीत आणि इतरांच्या जीवनातला आनंदही त्यांना पाहवत नाही.अशा नैराश्ययुक्त व नकारात्मक विचार करणा-या माणसांनी थोडी डोळसपणे दुस-याच्या आनंदाने जीवन जगणाऱ्या माणसाकडे थोडा विचार करून पहायला हवे.त्यांची आत्मविश्वासाने व कृतीयुक्त शैलीने व आपल्यासमोर कितीही आणि कोणताही कठीण प्रसंग असो तो हसत हसत सामोरे जाऊन कसे जीवन जगतात याचे थोडे सूक्ष्म निरीक्षण करायला हवे.तसेच त्यांच्या जगण्याची जीवनशैली कशी आणि आपली जगण्याची जीवनशैली कशी हा प्रश्न स्वत:ला विचारुन पाहिला तर नक्कीच कळेल की,आपल्यामध्येच खरी त्रुटी आहे.आपणही त्यांच्यासारखे जीवन जगायला हवे.इतरांच्या जगण्यापेक्षा आपणही चांगले जीवन आपल्या कर्तृत्वाने, आत्मविश्वासाने जगू शकतो अशी शिकवण मिळाल्याशिवाय राहत नाही.नक्कीच चांगले बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करेल.मग तो नैराश्यमय जीवन जगणारे नाही अशी प्रेरणा घेऊन व कर्तृत्ववान लोकांचे नक्कीच चांगले जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळेल.मग तोच जगाला जीवन कसे जगायचे याचे ज्ञान देण्यासाठी तयार होई.म्हणून इतरांच्या लोकांचे चांगले अनुकरण घ्यायला काय हरकत असा सकारात्मक विचार निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संधी* एक दानशूर राजा होता.त्यानं एक दिवस जाहिर केलं की,उद्ध्या माझ्या महालाचा मुख्य दरवाजा उघडला जाईल.त्या . नंतर ज्याला जी वस्तू हवी असेल,त्यानं फक्त त्या वस्तूला हात लावायचा. दुसरा दिवस उजाडला,सर्व लोक राजवाड्यात शिरले,गर्दी जमली.प्रत्येकजण आपल्याला हवी असलेली वस्तू शोधायचा, कुणी सोने घेतले,कुणी पैसे,कुणी घोडा तर कुणी दुभती जनावरे. राजा एका कोप-यात थांबून हा सर्व प्रकार पाहात होता.अचानक,त्याचं लक्ष एका चिमुकलीवर गेलं.ती गर्दीतून वाट काढत हळूहळू राजाच्या दिशेने येत होती.राजा पहात असतानाच ती त्याच्याजवळ पोहोचली आणि तिने आपल्या नाजूक हातांनी राजाला स्पर्श केला.क्षणार्धात राजा तिचा झाला.राजाच तिचा झाल्यामुळे तिथल्या सर्व वस्तूदेखील तिच्या मालकीच्या झाल्या. 💐विचार करा💐 ज्या पध्दतीने राजाने लोकांना संधी दिली होती त्याच पध्दतीने परमेश्वर आपल्या प्रत्येकाला रोज संधी देतो.पण,त्या लोकांसारखीच आपली चूक होते,परमेश्वराऐवजी आपण,त्याने निर्मिलेल्या प्रापंचिक वस्तू निवडतो.पण,देवच जर आपला झाला तर संपूर्ण जगच आपले होईल, खरंय ना !!! *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Posts (Atom)