✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 01/12/2018 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागतिक एड्स निर्मूलन दिवस* 💥 ठळक घडामोडी :- १९५८ - मध्य आफ्रिकेच्या प्रजासत्ताकला फ्रांसपासून स्वातंत्र्य. १९६३ - नागालँड भारताचे १६वे राज्य झाले. १९६५ - भारतात सीमा सुरक्षा दल (बॉर्डर सिक्युरीटी फोर्स) ची स्थापना. १९७३ - पापुआ न्यू गिनीला ऑस्ट्रेलियापासून स्वातंत्र्य. १९७४ - टी.डब्ल्यू.ए. फ्लाइट ५१४ वॉशिंग्टन डलेस ईंटरनॅशनल विमानतळाच्या वायव्येस कोसळली. ९२ ठार. 💥 जन्म :- १०८१ - लुई सहावा, फ्रांसचा राजा. १०८३ - ऍना कॉम्नेना, बायझेन्टाईन इतिहासकार. १९८० - मोहम्मद कैफ, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ११३५ - हेन्री पहिला, इंग्लंडचा राजा. १९७३ - डेव्हिड बेन गुरियन , इस्त्रायलचा पहिले पंतप्रधान. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *अर्जेंटिना - जी-20 संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई - मराठा आरक्षण विधेयकावर राज्यपालांनी केली स्वाक्षरी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नवी दिल्ली - विनाअनुदानित गॅस सिलेंडर 133 रुपयांनी स्वस्त, अनुदानित गॅस सिलेंडर 7 रुपयांनी महागला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई - आगामी शिक्षक भरतीमध्ये मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 1 जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू होणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबईत शिक्षणाची वारी उत्साहात संपन्न, तीन दिवस चालेलेल्या शिक्षणाच्या वारीत विविध शैक्षणिक बाबीची मिळाली माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई : विधानसभा उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या विजय औटी यांची बिनविरोध निवड, विधानसभा अध्यक्षांची घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त प्रासंगिक लेख खबरदारी हाच सर्वोत्तम उपाय https://goo.gl/9wZXYz आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *विजयालक्ष्मी पंडीत* १८ ऑगस्ट १९०० साली स्वरूप (विजयालक्ष्मी) यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव स्वरूपराणी व वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू असे होते. त्यांना एक बहिण व एक भाऊ होता. भावाचे नाव जवाहरलाल नेहरू व बहिणीचे कृष्णा नेहरू असे होते. पाच वर्षांच्या असताना त्या इंग्लंड येथे गेल्या तेथेही त्यांना शिकवण्यास शासिका नेमल्या. स्वरूप यांचे प्राथमिक शिक्षण घरीच अध्यापिकांद्वारे झाले. नंतर त्या शिक्षणासाठी स्वित्झलर्ंड येथे गेल्या. स्वरूप (विजयालक्ष्मी) यांचा राजकारणात प्रवेश झाला. त्यांचा भाऊ व त्यांचे वडील राजकारणातच होते. तेथे स्वरूप यांची भेट रणजीत पंडित यांच्याशी झाली.ते अतिशय कुशाग्र बुद्धीचे होते. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले आणि १० मे १९२१ साली स्वरूप व रणजीत यांचा विवाह झाला. त्यानंतर त्यांचे नाव स्वरुपचे विजयालक्ष्मी पंडित असे झाले.विजयालक्ष्मी पंडित या संसदपट्टू व उत्तम वक्त्या म्हणून प्रसिद्ध आहेत. २१ विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट ही पदवी देऊन गौरविले. त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल म्हणून १९६२ ते १९६४ पयर्ंत काम केले. १९५३ मध्ये त्या संयुक्त राष्ट्रांच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या. १९६४ मध्ये त्या फूलपूर लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आल्या *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या विषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल …, मन शांत ठेऊन पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल …!! *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) न्यूझीलंडची राजधानी कोणती ?* वेलिंग्टन *२) 'इंटरनॅशनल इयर ऑफ चाईल्ड' म्हणून कोणते वर्ष साजरे करण्यात आले ?* १९७९ *३) जॉर्जियातील प्रमुख नद्या कोणत्या ?* रिआन, कुर्हा - कंबोडिया *४) ग्रहगोल आणि सूर्यकुलाचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते ?* खगोलशास्त्र *५) अवकाशात अवकाशयानातून प्रवास करणारा पहिला भारतीय कोण ?* राकेश शर्मा *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● शिवराज गाडीवान ● योगेश जायशेठ ● विठ्ठलराव मुजळगे ● श्याम दरबसतेवार ● श्रीकांत लांडे ● सुभाष सोनक्के ● मारोती दिंडे ● हेमंत भेंडे ● मारुती गिरगावकर ● राजकुमार दाचावार ● श्याम नरवाडे ● शिवाजी पुरी ● बालाजी कलकोटे ● श्याम पाटील ● राजेंद्र पाटील ● विश्वनाथ पांचाळ *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• एखाद्या चरणी कोणी जेव्हा लिन होतो लिन झाल म्हणून कोणी थोडा दीन होतो लिन झालं म्हणून कोणी लाचार समजू नये लिन होतो म्हणजे दुबळे विचार समजू नये शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वत:वर खुश असणा-यांना लोक खूप घाबरतात. त्यांना या लोकांबद्दल खूप आसूया वाटते. सर्वसामान्य माणसे जगात सर्वाधिक नाराज जर कोणावर असतील, तर ती स्वत:वरच असतात. त्यांच्या हातुन चुका होतात. कधी कधी तर त्याच त्याच चुका परत परत होतात. नियतीचे फासे सततच असे पडत राहतात, की सारखेच हस्यास्पद व्हायची वेळ यावी. इतरांच्या हातात कायम राजे, एक्के आणि यांच्या हातात दुर्री-तिर्री, हे तर नेहमीचेच. यांनी चुका सुधारायच्या ठरविल्या तरी पटापट यांना त्या सुधारता येत नाही. त्याच त्याच बाॅलवर परत परत विकेट जात राहते.* *काय केले म्हणजे आपल्याला प्रतिष्ठा मिळेल ? लोक आपल्याला महत्वाचे आणि सन्माननीय समजतील? याचा विचार करण्यात यांचे तासन् तास जातात. तरीही त्यांना असाच निष्कर्ष काढावा लागतो, की अजून आपल्याला खूपच मेहनत करावी लागेल. आणि मग स्वत:ला दोष देत, स्वत:ला सुधारण्याचा पुन:पुन्हा प्रयत्न करत ते जगत राहतात. अशा खचलेल्या आणि जगाच्या गणितात हुकलेल्या लोकांनी सगळा परिसर भरलेला असताना जर एखादा नखशिखांत स्वत:वर खुश असेल तर जगाला त्रास होणारच.* *"परंतु जो स्वत:वर प्रेम करीत नाही, त्याच्यावर जग प्रेम करीत नाही."* •• ●‼ *रामकृष्णहरी* ‼● •• 🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कबीर माया पापिनी, फंद ले बैठी हाट । सब जग तो फंदे परा, गया कबीरा काट । सारांश महात्मा कबीर म्हणतात की, माया मोहात पाडणारी पापिनी आहे. माया माणसाला अलिप्त राहून कार्य करू देत नाही. एखाद्या कार्यात स्वतःला पूर्ण रुपाने झोकून देवून कार्य करू पाहताना मायेचे पाश माणसाला भ्रमित करून टाकतात. मायेची कित्येक रूपं आपल्या अवती-भवती वावरत असतात. पारध्यानं सावज आपल्या जाळ्यात अडकलं पाहिजे म्हणून न दिसणारे परंतु षड्विकारांनी युक्त अशी सावजाला हलूच देत नाही ती ! मायेजवळ मोहिनी अस्त्र असतं. कुणाला सत्ता, संपत्ती श्रीमंतीचा मोह, कुणाला विषय वासनेचा मोह तर कुणाला सौंदर्याचा मोह मोहित करीत असतो. मायेकडून एकदा का हे मोहिणीअस्त्र टाकल्या गेलं की माणसं स्वतःच्या मान-मर्यादा विसरून जातात. मायेहातचं बाहुलं बणून राहातात. सज्जन ,साधू मात्र अशा माया मोहावर विजय मिळवून असतात. ते मायेला , मोहाला जराही भुलत नाहीत. कधीच त्यांनी माया मोहाचे पाश तोडून टाकलेले असतात, राजपुत्र म्हणून वावरताना दुःखाची पुसटशी छायाही कधी त्याला स्पर्श केली नाही. मात्र हाच वैभवात वाढलेला सुखवस्तू राजपुत्र नगरातून फेरफटका मारताना माणसाचं दुःखमय जगणं पाहातो. माणसांचं जगणं दुःखमय असलं तरीही माणसांचं पुन्हा-पुन्हा त्यातंच गुरफटणं ! या सार्याचं त्या राजपुत्राकडून सखोल चिंतन होतं आणि दुःखाच्या निर्मितीची कारणं शोधणं सुरू होतं. दुःखाचं कारण लालसा, मोहात सापडतं ! सारे मोह मायेचे पाश तटातट गळून पडतात. जगाप्रति दयाभाव दाटून येतो. आणि राजसुखाचा त्याग करून सिद्ध होतात महाकारूणी तथागत गौतम बुद्ध ! संपूर्ण जगाला मानवता धर्माची शिकवण देतात व लोककल्याणाचा मार्ग दाखवतात. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• बरेवाईट,सुखदुःख, पापपुण्य, खरेखोटे,प्रामाणिक,सत्यवान,बेईमान, भाग्यवान या गोष्टींचा मानवी जीवनाशी अगदी निकटचा संबंध जोडला जातो.यातूनच कसे जीवन जगायला शिकले पाहिजे हे कळते. ज्या गोष्टी आपण आपल्या मनातून प्रामाणिकपणे करत असतो त्यातून आपल्या वृत्तीतून,कृतीतून इतरांना त्रास होणार नाही,आपल्यामुळे इतरांची मने दुखावली जाणार नाहीत, आपल्या वर्तणूकीमध्ये बेबनाव किंवा खोटेपणा नाही, दैनंदिन जीवनात आणि व्यवहारात नेहमी सतर्कपणे राहून समाधानाने जीवन जगतो तो खरा यशस्वी होतो यालाच आपण पुण्यवान, भाग्यवान, चारित्र्यसंपन्न, सदाचारी, सुखी, समाधानी समजतो.हे सारे गुण ज्यांच्यामध्ये आहेत ते खरेच माणूस म्हणून जगण्यास पात्र आहेत.त्यांच्या जीवनात खोट्याला,दुस-याला दु:ख देण्याला, स्वत:च्या स्वार्थाला कधीच थारा जीवनात दिलेला नसतो.त्यांचे हे गुण समाजासाठी प्रेरणा देतात. ज्या व्यक्तीमध्ये वरील कोणतेही गुण नाहीत अशा व्यक्तींचे जीवन म्हणजे सर्व अवगुण संपन्न, अहितकारक, समाजविघातक दुष्ट वृत्ती असलेली दुराचारी व्यक्ती म्हटले पाहिजे.ज्या अशा त्यांच्या वाईट वृत्तीमुळे किंवा वाईट कृतीमुळे समाजातले चांगले असलेले वातावरण बिघडल्या जातो.त्यांचे स्थान समाजामध्ये शून्य असते. ह्या वरील दोन्ही गोष्टींचा फरक जाणून खरे काय आहे आणि आपण कसे रहायला अथवा जगायला पाहिजे याचे ज्ञान ज्यांच्याजवळ आहे आणि ते ज्ञान घेऊन स्वाभिमानाने ,प्रामाणिकपणे जीवन जगतो तोच खरा जीवनात यशस्वी होतो. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद ..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भाग्यवान - Lucky* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मोठीच त्याची सावली* सूर्य नुकताच मावळत होता. एक कोल्हा त्याच्या गुहेतून आळसावत उठला. त्याला शिकारीला जाण्याची तशी घाई नव्हती. त्या जंगलात भरपूर गुबगुबीत हरणे व मांसल ससे होते. एखादा प्राणी कोल्हय़ाला सहज सापडायचा. कोल्हय़ाने आसपास नजर फिरवली तर सूर्याच्या किरणामुळे गुहेच्या भिंतीवर पडलेली त्याची सावली त्याला दिसली. स्वत:ची मोठी सावली पाहून कोल्हा खूश झाला व स्वत:शीच म्हणाला, '' वा! मी आकाराने किती मोठा आहे!! मी जर एवढा मोठा असेन तर त्या क्षुद्र सिंहाला मी का घाबरू? तो सिंह स्वत:ला जंगलाचा राजा समजतो. आज मी त्याला दाखवतो की जंगलाचा खरा राजा कोण आहे!'' कोल्हय़ाचे हे वाक्य हवेत विरते न विरते तोच त्याला एक जोरदार गर्जना ऐकू आली. मागोमाग कोल्हय़ाच्या मोठय़ा सावलीला त्याहीपेक्षा मोठय़ा सावलीने झाकून टाकले. ती सिंहाची सावली होती. त्याने एक पंजा कोल्हय़ाला मारताच कोल्हा धूळ चाटू लागला. ''आता सांग, जंगलाचा खरा राजा कोण आहे?'' ''आपणच आहात, हुजूर'' जखमी झालेला कोल्हा कण्हत म्हणाला. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 30/11/2018 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १८७२ - पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना स्कॉटलंड वि. इंग्लंड हा हॅमिल्टन क्रेसेंट, ग्लासगो येथे खेळला गेला. 💥 जन्म :- १८१७ - थियोडोर मोम्सेन, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन लेखक. १८५८ - जगदीशचंद्र बोस, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ. १८६९ - गुस्ताफ डालेन, नोबेल पारितोषिक विजेता स्वीडिश भौतिकशास्त्रज्ञ. १९१५ - हेन्री टॉब, नोबेल पारितोषिक विजेता कॅनडाचा रसायनशास्त्रज्ञ. 💥 मृत्यू :- २०१२ - विजय देवधर, मराठी लेखक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *पंतप्रधान मोदी जी20 परिषदेसाठी अर्जेंटिनात पोहोचले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण! सरकारचा कृती अहवाल सादर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *सावंतवाडी : परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटीचे खासगीकरण करण्याचा घाट घातला आहे. मात्र हा त्याचा डाव हाणून पाडल्या शिवाय राहणार नाही असा इशारा मनसे एसटी कामगार सेनेचे राज्य अध्यक्ष हरी माळी यांनी दिला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *आंध्र प्रदेश : श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग सॅटेलाइटचे (HysIS) होणार प्रक्षेपण.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *म्हाडाच्या घरांच्या किमती आणखी तब्बल १० टक्क्यांनी होणार कमी, अत्यल्प, अल्प, मध्यम गटातील अर्जदारांना मोठा दिलासा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *लाखो शेतकऱ्यांचा राजधानीत हल्लाबोल; आज घालणार संसद भवनाला घेराव !* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *पुणे ओपन आयटीएफ महिला टेनिस : अंंकिता रैना, करमन कौर यांना दुहेरी मुकुटाची संधी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शिक्षक-विद्यार्थी संबंध* http://nasayeotikar.blogspot.com/2018/05/blog-post_26.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• डॉ. सर जगदीशचंद्र बोस हे एक भारतीयजीवशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञतसेच पुरातत्त्वज्ञहोते. पूर्व बंगालमधील डाक्का जिल्ह्यातील राणीखल या खेडेगावात ३० नोव्हेंबर १८५८ रोजी जगदीशचंद्र बोस यांच्या जन्म झाला. त्यांचे वडील भगवानचंद्र बसू हे सरकारी नोकरीत सब डिव्हिजनला आॅफिसर होते. त्या काळी इंग्रजीत जसे ठाकूरचे टागोर झाले, राय आडनावाचे रे झाले तसेच बसू आडनावाचे इंग्रजी स्पेलिंग बोस झाले. जगदीशचंद्रांचे घराणे हे बंगाल प्रांतातील एक खानदानी घराणे होते. त्यांची आई साध्वी व सुशील होती. लहानपणापासूनच जगदीशचंद्र आजूबाजूचा निसर्ग पहायचे, त्याचे निरीक्षण करायचे. निसर्गातील अनेक गोष्टी पाहून त्या अशाच का, असा प्रश्न त्यांना पडे. भगवानचंद्र सुद्धा न कंटाळता छोट्या जगदीशने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत असे. सर्व झाडे एकाच वेळी का फुले देत नाहीत? एखाद्या झाडाची पालवी पोपटी हिरवी पण दुसर्याची तांबूस? असा फरक का पडतो असे त्यांना वाटे. झाडे, फुले, फुलपाखरे, भोवतीचा निसर्ग यांचे निरीक्षण करणे हा त्यांचा आवडता छंद होता. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या आचरणाचा प्रभाव आपल्या भाषणापेक्षा अधिक होतो . *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) कोंबडी संशोधन केंद्र कोठे आहे ?* हैदराबाद *२) पहिली कापड गिरणी कोठे आणि कधी सुरू झाली ?* मुंबई १८५४ *३) विदर्भातील प्रसिद्ध 'आनंद सागर' कोठे आहे ?* शेगाव *४) आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म कुठला ?* शिरढोण, जि.रायगड *५) 'भारताचे पॅरिस' ही कोणत्या शहराची ओळख आहे ?* मुंबई *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● शंकरराव कुंटुरकर ● राजेश्वर येवतीकर ● राजू दरेकर ● देवराव पिंगळेकर ● विलास वाघमारे ● रवी भुगावार ● उमेश खोकले *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *इमानी* मी शोधले सर्वत्र कुठे इमान आहे भेटलो इमानी म्हणून तोही बेईमान आहे वाटले इमानी जगाला तेही बेइमान आहेत असे हे सारे इमानी इथे गुमान आहेत शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माणसाने माणसांशी, सर्व प्राणीमात्रांशी आणि निसर्गाशी माणसासारखं वागावं ही आपल्या धर्माची शिकवण आहे. सृष्टीतलं चैतन्य म्हणजे ईश्वर ! सर्वसामान्य माणसाला देवाची उपासना करणं सोपं जाईल म्हणून सगुण साकार म्हणजेच मूर्तीची पूजा सुरू झाली. मंदिरातल्या मुर्तीचं पावित्र्य जपायचं असेल तर स्त्री-पुरूष कोणालाच गाभा-यात प्रवेश द्यायचा नाही, मुर्तीला स्पर्श करू द्यायचा नाही हे समजण्यासारखे आहे. मंदिरातल्या वातावरणाचं पावित्र्य राखलं जावं, कुठले कपडे घालून देवदर्शनाला मंदिरात जावं हे भान प्रत्येकाला असणं आवश्यक आहे. कालबाह्य रूढी-परंपरा सोडून दिल्या तरच पुढच्या पिढीला हा धर्म, ही संस्कृती आपली वाटेल.* *माणिक वर्मा यांनी गायलेलं, ' क्षणभर उघड नयन देवा !' हे गीत आठवतं. या रचनेत कवी देवाला डोळे उघडायला सांगत नाही, तर देवदर्शनासाठी आलेल्या एका अंध व्यक्तिसाठी ही प्रार्थना करीत आहे. त्या अंध व्यक्तिचे क्षणभर तरी डोळे उघडून त्याला तुझं दर्शन दे, अशी प्रार्थना कविराज करत आहे. स्त्रियांवर होणारे आत्याचार, अन्याय थांबव.. ते करणारांचे डोळे क्षणभर तरी उघड, अशी प्रार्थना नवरात्राच्या निमित्ताने दुर्गादेवीपाशी करावीशी वाटते.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 💥💥💥💥💥💥💥💥💥 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• निश्चल काल गरासही, बहुत कहा समुझाय । कहे कबीर मैं का कहुॅ, देखत ना पतियाय । सारांश जन्माला आलेल्या जीवाचा मृत्यू अटळ आहे. जन्माला आलेल्या कोणालाही चिरंजीविता अशक्य आहे. कुणाचा नंबर आज लागला तर कोणी उद्या निश्चित जाणार आहे. ही बाब महात्मा कबीर लक्षात आणून देतात. वारंवार मृत्यूची अटळता नजरेसमोर येवूनही लोक विश्वास करत नाहीत. मृत्यू कधी आणि कोणत्या रुपाने पुढ्यात उभा टाकेल ? हे सांगता येणं कठीण आहे, परंतु तो येणार आहे. तेव्हा आपल्याला मिळालेल्या जीवनाचा सदुपयोग केला . सत्कार्यानं खारीचा का होईना वाटा उचलून जीवनानंद निर्माण करता आला. तर आपल्या जगण्याचा सुगंध सर्वत्र दरवळेल. दुसर्याच्या जगण्यालाही उल्हसित करेल. माणूस देहरुपानं जरी गेला तरी त्याच्या विचारानं चिरंजिव राहू शकतो. आपल्या पश्चातही या विश्वात विचाराच्या चैतन्याचं चांदणं देत राहून दुःखी व अज्ञानी जीवाच्या जीवनातील अंधःकार नक्कीच नाहिसा करू शकतो. तेव्हा अमूल्य असा मानव जन्म सार्थकी लावणं सर्वतोपरि आपल्या हातात आहे. त्याचा योग्य सदुपयोग करून घेता आला पाहिजे. सन्मार्ग दाखवणं हे सज्जनाचं काम आहे.शेवटी काय साध्य करायचं ते आपआपल्या विचारधारेवर अवलंबून असतं. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मनुष्याच्या जीवनातला सर्वात मोठा, महत्त्वाचा आणि मौल्यवान जर कुठला दागिना असेल तर तो म्हणजे नम्रता हा आहे. ज्यांच्या अंगी नम्रता असेल ती व्यक्ती महनीय आणि वंदनीय असते.ती व्यक्ती केवळ नम्रतेमुळे इतरांच्या हृदयावर राज्य करु शकते. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नम्रता - Humility* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वार्थी मित्र* दोन मित्र एकदा एकाच गावाकडे जायला एकत्र निघाले होते. जंगलातून जात असताना त्यातील एकाची नजर रस्त्यात पडलेल्या एका रेशमी थैलीकडे गेली. त्याने ती लगेच उचलली. त्याने ती उघडून बघितली तर त्यात काही सुवर्ण मोहोरा होत्या. '' वा! काय नशीब आहे माझे!! मला चक्क सोन्याच्या मोहोरांनी भरलेली थैली सापडली आहे.'' त्याचा मित्र त्याला म्हणाला, '' मला सापडली असे म्हणू नको. आपल्याला सापडली, असे म्हण. जेव्हा दोन वाटसरू एकत्र जात असतात तेव्हा फायद्यात किंवा संकटात दोघांचा समान हिस्सा असतो.'' ''नाही, नाही'', थैली सापडलेला मित्र रागाने म्हणाला. ''ही थैली मला सापडली आहे. ती मी माझ्यापाशीच ठेवणार.'' दुसरा मित्र यावर काही बोलला नाही. ते दोघे काही अंतर चालून गेल्यानंतर त्यांना जंगलातील डाकूंनी घेरले. ज्याच्याजवळ सुवर्ण मोहोरांची थैली होती तो घाबरला व हळूच दुसर्या मित्राला म्हणाला, ''आता जर आपल्याला सापडलेली सोन्याच्या मोहोरांची थैली यांना सापडली तर आपली खैर नाही.'' दुसरा मित्र शांतपणे म्हणाला, ''नाही, नाही आपली नाही, तर तुझी खैर नाही, कारण काही वेळापूर्वी तूच म्हणालास की थैली माझीच आहे.'' *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 29/11/2018 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी : १७७७ - सान होजे, कॅलिफोर्नियाची एल पेव्लो दि सान होजे दि ग्वादालुपे या नावाने स्थापना. हे गाव वजा वस्ती अल्ता कॅलिफोर्नियातील (वरचे कॅलिफोर्निया) पहिली नागरी वस्ती होय 💥 जन्म :- १४२७ - झेंगटॉँग, चीनी सम्राट. १८०२ - विल्हेल्म हाउफ, जर्मन कवी. १८०३ - क्रिस्चियन डॉपलर, ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ. १८४९ - सर जॉन अँब्रोझ फ्लेमिंग, ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ. १८५६ - थियोबाल्ड फोन बेथमान हॉलवेग, जर्मनीचा पाचवा चान्सेलर. १८९५ - विल्यम व्ही.एस. टबमॅन, लायबेरियाचा १९वा राष्ट्राध्यक्ष. १८९८ - सी.एस. लुईस, आयरिश लेखक. १९०८ - एन.एस. क्रिश्नन, तमिळ चित्रपट अभिनेता. १९३२ - जाक शिराक, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष. १९६१ - टॉम साइझमोर, अमेरिकन अभिनेता. 💥 मृत्यू :- ७४१ - पोप ग्रेगोरी तिसरा. १२६८ - पोप क्लेमेंट चौथा. १३१४ - फिलिप चौथा, फ्रांसचा राजा. १९५९ - गोविंद सखाराम सरदेसाई - मराठी इतिहासकार २०११ - इंदिरा गोस्वामी, आसामी साहित्यिक, कवयित्री *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई - शिक्षणाची वारी चौथ्या टप्याला मुंबईत उत्साहात सुरुवात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मध्यप्रदेश आणि मिझोरममध्ये सरासरी 75 टक्के मतदान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नवी मुंबई : बाजारसमितीमधील माथाडी कामगारांसह व्यापाऱ्यांच्या मागण्या मान्य, पणनमंत्री थोड्यावेळात बाजारसमितीमध्ये येऊन करणार घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नवी दिल्ली- यूपीएसीच्या चेअरमनपदी अरविंद सक्सेना यांची नियुक्ती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *गोवा - आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पटकथाकार सलीम खान यांचा सन्मान; मुलगा अरबाजनं स्वीकारला पुरस्कार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *अरुणाचलमध्ये भूकंपाचे धक्के, 5.5 रेश्टर स्केल तीव्रतेची नोंद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *Hockey World Cup 2018 : भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गोलचौकार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जगाला प्रेम अर्पावे .....!* http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• इंदिरा गोस्वामी इंदिरा गोस्वामी ह्या आसामी लेखिका, कवयित्री व संपादिका होत्या. आसामी साहित्यातील त्यांचे योगदान साहित्य अकादमी पुरस्कार (इ.स. १९८३) व ज्ञानपीठ पुरस्कार (इ.स. २०००) देऊन गौरवण्यात आले. साहित्य वर्तळात या मामुनी रायसोम गोस्वामी या नावाने ओळखल्या जात. 'युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम' (उल्फा) आणि केंद्र सरकारदरम्यान शांतता-करार करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. इंदिरा गोस्वामी यांच्या पित्याचे नाव उमाकांत गोस्वामी आणि मातेचे अंबिकादेवी गोस्वामी. गोहत्तीतल्याच टी.सी. गर्ल्स हायस्कूलमधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. इ.स. १९६२ मध्ये त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले. इ.स. १९६५ मध्ये दाक्षिणात्य अभियंता माधवन रायसोम अय्यंगार याच्याशी त्यांनी विवाह केला. लग्नाच्या अठरा महिन्यांत त्याच्या पतीचे कार अपघातात निधन झाले. इ.स. १९६८ ते १९७१ मध्ये आसामातील गोलपारा सैनिकी शाळेत शिक्षिका म्हणून काम केले. १९७१ मध्ये दिल्ली विश्वविद्यालयाच्याआधुनिक भारतीय भाषा विभागात त्यांनी अध्यापनाचे काम चालू केले. तुलसीदासविरचित रामायण आणि आसामी भाषेतील माधव कंदली यांचे रामायण यांचा तौलनिक अभ्यास करून इ.स. १९७३ साली त्यांनी गोहत्ती विद्यापीठाची डॉक्टरेट मिळवली. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपले सत्यस्वरुप सिध्द करण्यास सोन्याला अग्नीत शिरुन दिव्य करावे लागते व हिऱ्याला घणाचे घाव सोसावे लागते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• १) 'तत्वबोधीनी सभा' या संस्थेचे स्थापना वर्ष कोणते? १८४० *२) अरवली आणि सातपुडा पूर्वघाटाच्या उत्तरेला आणि हिमालयाच्या पायथ्यापासून दक्षिणेला असणार्या भू-भागाला काय म्हणतात ?* मैदानी प्रदेश *३) १९५७ मध्ये तुर्भे येथे कोणत्या संस्थेची स्थापना झाली ?* भाभा अँटॉमिक रिसर्च सेंटर *४) दुसर्या पंचवार्षिक योजनेत कोणत्या क्षेत्राच्या विकासाला प्राधान्य देण्यात आलं होतं ?* अवजड उद्योग *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● योगेश खवसे ● साईनाथ बोईनवाड ● पोतन्ना गुंटोड ● प्रमोद पाटील बोमले *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खुळ* एखाद्याच्या डोक्यात एकच एक खुळ असते ते काही निघत नाही मनात पक्क मूळ असते मनातलं काढल्या शिवाय डोक्यातून जात नाही मन शांत झाल्या शिवाय समाधान होत नाही शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *या जगात संपूर्ण निष्पाप कोण? तर एकही नाही. या पृथ्वीवर कोणीही नाही. उलट, पापालाच सुखाचे साधन मानणारे सर्वत्र आहेत. सर्व प्रार्थना मंदिरात रोज तथाकथित पुण्यचिंतनात वेळ घालवणारे किंवा भक्तीचे भस्म अंगाला फासणारे यापैकी कुणीही पूर्ण शुद्ध नाही. म्हणूनच की काय गीतापुरूष कृष्ण म्हणतात..... ब-या-वाईटासह अर्थात शिव-अशिवासह जो असतो तो पुर्ण पुरूष. प्रत्येकामध्ये काही ना काही दोष आहेतच, संपूर्ण निर्दोष असा माणूस सापडणे शक्य नाही. या दोषांनाच आपण पाप समजतो. बहुजनांच्या हितासाठी प्रसंगी खोटं बोलावं लागत असेल तर ते पाप नाही, असं सांगितलं जातं.* *राष्ट्रभक्त सैनिकालाही शत्रूच्या तावडीत असताना सतत खोटं बोलून खरी माहिती लपवायची असते. त्यासाठी तो वाट्टेल ते हाल भोगायला सिद्ध असतो. पांडव ज्येष्ठ बंधू धर्मराजाला 'नरो वा कुंजरो वा' असे मोघम उत्तर हेतुपूर्वक द्यावे लागले. युद्धात आणि प्रेमात सारं काही माफ असतं म्हणतात. असो, आपला मुद्दा आहे जगी सर्व निर्दोष असा कोण आहे? कुणीही नाही. काही अतिजागृत देवस्थाने संपत्तीने तुडुंब भरत आहेत. दानातील नोटा आणि सुवर्ण मोजायला यंत्रे लावावी लागत आहेत. कुठून आला हा पैसा, देवळाबाहेर भुकेलं तान्हं घेऊन माय पेलाभर दूधासाठी लोकांच्या पायापोटी पडत आहे. तिला बाजूला हाकलून दगडाच्या देवाचे शुद्ध दूधाने अभिषेकांवर अभिषेक होत आहेत. माझ्या मते हेच महापाप आहे..* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 💥💥💥💥💥💥💥💥💥 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• हिन्दू कहें मोहि राम पियारा, तुर्क कहें रहमाना, आपस में दोउ लड़ी-लड़ी मुए, मरम न कोउ जाना। सारांश महात्मा कबीर चराचरात ईश्वर पाहतात. सर्वांठायी परमात्म्याचा अधिवास असतो. मानवाठायी असणारं चैतन्य म्हणजेच परमात्म्याचं रूप नाही का ? आमच्या उपासनेच्या पद्धती भिन्न आहेत. कोणत्याही धर्म पंथाचा माणूस असो त्याचा जन्म आणि मृत्यू भिन्न असतो का ? माणूस जन्माला आल्यानंतर त्याच्यावर त्या त्या धर्म पंथाचे संस्कार बिंबवले जातात. खरे तर माणूस जन्माला येतो माणूस म्हणूनच परंतु त्याच्यावर जाती, धर्माचे, पंथाचे जे संस्कार केले जातात ती सर्व कृत्रिमता आहे. ती कुठल्या तरी भितीपोटी, समुहाच्या वेगळेपणासाठी निर्माण केलेली ही वरवरची व्यवस्था आहे. तिला कुठलाही शाश्वत आधार नाही आहे. शाश्वत व अंतिम सत्य माणूस हा माणूस व मानवता हाच त्याचा धर्म आहे. सर्वांच्या निर्मिती पासून विसर्जनापर्यंत त्याचा माती हाच आधार आहे. हे शाश्वत सत्य सर्वांना कळतंय पण वळत नाही. अशी वास्तविकता आहे. जे स्वतःला हिंदू म्हणवून घेतात त्यांना राम प्रिय आहे. जे स्वतःस मुसलमान मानतात त्यांना रहिम प्यारा आहे. राम आणि रहिम हे दोन्ही मानव कल्याणासाठी झिजले. त्यांच्या कृर्तृत्वातून आदर्श जीवनाचा बोध मिळतो. त्यांनी माणसामाणसात भेदभाव केल्याचे इतिहास सांगत नाही. तरी त्यांच्या नावावरून दंगली घडणे मानवतेला अशोभनीय आहे. त्यांची नावं घेवून लढाया करणार्यांना विशाल अशा मानवता धर्माचं खरं स्वरूप व मानव कल्याणाचं मर्मच कळलेलं नाही. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्या व्यक्तीच्या मनात संशयाने घर केलेले असेल तर त्याचे जीवन जगणे अवघड होऊन बसते.त्याच्या मनात नेहमी कोणत्याही व्यक्तीबद्दल संशयी दृष्टीनेच पाहतो.अशा पाहण्याने स्वत:च्या जीवनाचे नुकसान तर होतेच पण इतरांच्या जीवनातही संशयाचे विष कालवून त्याचे मनही अस्थिर करुन टाकते.अशा परिस्थितीत मग चांगले जीवन जगायला अवघड जाते.अशा संशयी व्यक्तींच्या सानिध्यात न राहणेच योग्य ठरेल.संशय हा संशयी व्यक्तींचा मित्र असतो तर इतरांचा शत्रू.म्हणून अशा शत्रूला आपल्यापासून चार पाऊले दूरच ठेवायला हवे. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संशय - Doubt* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मानवतेचा धर्म* एकदा एका उंदराने हिरा गिळला. हिऱ्याच्या मालकाने त्या उंदिराला मारण्यासाठी एका शिकाऱ्याला कंत्राट दिले. शिकारी जेव्हा त्या उंदिराला मारण्यास पोहचला तेव्हा सगळे उंदिर एक घोळका करून एका दुसऱ्यावर चढून दाटीवाटीने बसले होते, पण एक उंदिर त्यांच्यापासून वेगळा बसला होता. शिकाऱ्याने सरळ जाऊन त्या वेगळ्या बसलेल्या त्याच उंदिराला पकडले ज्याने हिरा गिळला होता. हिरामालक आश्चर्यचकित झाला त्याने शिकाऱ्यास विचारले, तुम्ही हजारो उंदरातून ज्याने हिरा गिळलाय त्याच उंदराला कसे काय ओळखले? शिकाऱ्याने उत्तर दिले खूप सोपं काम होत, जेव्हा मूर्ख धनवान बनतो तेव्हा तो इतरांशी संपर्क तोडतो..! आयुष्यात धन, दौलत, ऐश्वर्य, संपत्ती,नाव आणि सगळं काही कमवा पण आपण ज्या समाजात वाढलो, जगलो, मोठे झालो, त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. आपण ह्या समाजामुळेच मोठे झालो हे कधीच विसरू नका.. नाहीतर त्या मूर्ख उंदिरामध्ये आणि आपल्यात काहीच फरक उरणार नाही..! माणसे जोडा मानवता हाच धर्म. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 28/11/2018 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १५२० - फर्डिनांड मॅगेलनने दक्षिण अमेरिकेची सामुद्रधुनी पार केली व अटलांटिक महासागरातून पॅसिफिक महासागरात जहाज नेणारा पहिला युरोपियन ठरला. 💥 जन्म :- १८५३ - हेलेन मॅगिल व्हाइट, पी.एच.डी.ची पदवी मिळवणारी पहिली अमेरिकन स्त्री. १९११ - वाक्लाव रेंच, चेक कवी. १९५० - एड हॅरिस, अमेरिकन अभिनेता. १९५० - रसेल ऍलन हल्स, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ. 💥 मृत्यू :- १८९० - महात्मा जोतीराव फुले, भारतीय समाजसुधारक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *इस्लामाबाद - सार्क संमेलनात सहभागी होण्यासाठी पाकिस्तान देणार पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण, पाकिस्तानमधील डॉन वृत्तपत्राचा दावा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुख्यमंत्र्यांच्या भेटीशिवाय मैदान सोडणार नाही; रिफायनरीविरोधात नाणारवासीय आक्रमक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नवी दिल्ली - जी-20 देशांच्या संमेलनात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारपासून जाणार अर्जेंटिनाच्या दौऱ्यावर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *दिल्लीच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी रणबीर सिंह* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई : राज्यात सध्या 50 टक्के आरक्षण आहे, 52 टक्के नाही, त्यामुळे एसईबीसीचं 2 टक्के आरक्षण जिवंत आहे - मुख्यमंत्री* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *बाॅलिवूडमधील ज्येष्ठ गायक मोहम्मद अझिझ यांचं निधन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई - भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू मिताली राज हिने प्रशिक्षक रमेश पोवार आणि सीओए सदस्य डायना एडलजी यांच्यावर केले गंभीर आरोप* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एकदा तरी अनुभववी शिक्षणाची वारी* https://nasayeotikar.blogspot.com/2018/11/blog-post_27.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जोतीराव गोविंदराव फुले मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली; शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली होती. ही पदवी त्यांना १८८८ या साली मिळाली. शेतकर्यांचे आसूड हा ग्रंथ त्यांनी लिहिला. त्यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. त्याच गावी महात्मा फुल्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाडयात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळ पेठेत १८५२ मध्ये शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण ते आपल्या भूमिकेवर ठाम असत. जोतीरावांनी पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय होते. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण महान गोष्टी करू शकत नाही तर, महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) कॅमेरूनची राजधानी कोणती?* याओंडे *२) कुवेतमध्ये कोणती राज्यपद्धती अस्तित्वात आहे?* राजेशाही *३) प्रवरा नदीच्या प्रवाहाची लांबी किती?* १५० कि.मी. *४) सागरेश्वर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे?* हरणांसाठी *५) आंतरराष्ट्रीय टेलिकम्युनिकेशन संघटनेची स्थापना कधी झाली?* १९६५ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● राम चव्हाण ● भैया कांबळे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रतिष्ठा* आपल्या पेक्षा आपल्या प्रतिष्ठेच वय जास्त असतं आपणच आपली प्रतिष्ठा सांभाळने रास्त असतं एका दिवसात कोणालाच प्रतिष्ठा मिळत नसते छोट्याशा चुकीनेही ती दूरदूर पळत असते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माणसाने माणसांशी, सर्व प्राणीमात्रांशी आणि निसर्गाशी माणसासारखं वागावं ही आपल्या धर्माची शिकवण आहे. सृष्टीतलं चैतन्य म्हणजे ईश्वर ! सर्वसामान्य माणसाला देवाची उपासना करणं सोपं जाईल म्हणून सगुण साकार म्हणजेच मूर्तीची पूजा सुरू झाली. मंदिरातल्या मुर्तीचं पावित्र्य जपायचं असेल तर स्त्री-पुरूष कोणालाच गाभा-यात प्रवेश द्यायचा नाही, मुर्तीला स्पर्श करू द्यायचा नाही हे समजण्यासारखे आहे. मंदिरातल्या वातावरणाचं पावित्र्य राखलं जावं, कुठले कपडे घालून देवदर्शनाला मंदिरात जावं हे भान प्रत्येकाला असणं आवश्यक आहे. कालबाह्य रूढी-परंपरा सोडून दिल्या तरच पुढच्या पिढीला हा धर्म, ही संस्कृती आपली वाटेल.* *माणिक वर्मा यांनी गायलेलं, ' क्षणभर उघड नयन देवा !' हे गीत आठवतं. या रचनेत कवी देवाला डोळे उघडायला सांगत नाही, तर देवदर्शनासाठी आलेल्या एका अंध व्यक्तिसाठी ही प्रार्थना करीत आहे. त्या अंध व्यक्तिचे क्षणभर तरी डोळे उघडून त्याला तुझं दर्शन दे, अशी प्रार्थना कविराज करत आहे. स्त्रियांवर होणारे आत्याचार, अन्याय थांबव.. ते करणारांचे डोळे क्षणभर तरी उघड, अशी प्रार्थना नवरात्राच्या निमित्ताने दुर्गादेवीपाशी करावीशी वाटते.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 💥💥💥💥💥💥💥💥💥 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कबीर माया पापिनी, फंद ले बैठी हाट । सब जग तो फंदे परा, गया कबीरा काट । सारांश महात्मा कबीर म्हणतात की, माया मोहात पाडणारी पापिनी आहे. माया माणसाला अलिप्त राहून कार्य करू देत नाही. एखाद्या कार्यात स्वतःला पूर्ण रुपाने झोकून देवून कार्य करू पाहताना मायेचे पाश माणसाला भ्रमित करून टाकतात. मायेची कित्येक रूपं आपल्या अवती-भवती वावरत असतात. पारध्यानं सावज आपल्या जाळ्यात अडकलं पाहिजे म्हणून न दिसणारे परंतु षड्विकारांनी युक्त अशी सावजाला हलूच देत नाही ती ! मायेजवळ मोहिनी अस्त्र असतं. कुणाला सत्ता, संपत्ती श्रीमंतीचा मोह, कुणाला विषय वासनेचा मोह तर कुणाला सौंदर्याचा मोह मोहित करीत असतो. मायेकडून एकदा का हे मोहिणीअस्त्र टाकल्या गेलं की माणसं स्वतःच्या मान-मर्यादा विसरून जातात. मायेहातचं बाहुलं बणून राहातात. सज्जन ,साधू मात्र अशा माया मोहावर विजय मिळवून असतात. ते मायेला , मोहाला जराही भुलत नाहीत. कधीच त्यांनी माया मोहाचे पाश तोडून टाकलेले असतात, राजपुत्र म्हणून वावरताना दुःखाची पुसटशी छायाही कधी त्याला स्पर्श केली नाही. मात्र हाच वैभवात वाढलेला सुखवस्तू राजपुत्र नगरातून फेरफटका मारताना माणसाचं दुःखमय जगणं पाहातो. माणसांचं जगणं दुःखमय असलं तरीही माणसांचं पुन्हा-पुन्हा त्यातंच गुरफटणं ! या सार्याचं त्या राजपुत्राकडून सखोल चिंतन होतं आणि दुःखाच्या निर्मितीची कारणं शोधणं सुरू होतं. दुःखाचं कारण लालसा, मोहात सापडतं ! सारे मोह मायेचे पाश तटातट गळून पडतात. जगाप्रति दयाभाव दाटून येतो. आणि राजसुखाचा त्याग करून सिद्ध होतात महाकारूणी तथागत गौतम बुद्ध ! संपूर्ण जगाला मानवता धर्माची शिकवण देतात व लोककल्याणाचा मार्ग दाखवतात. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण स्वत: केलेल्या कृतीतून मिळालेला अनुभव हा आपल्यासाठी खूप मोलाचा असतो.त्यातून आपल्याला बरेच काही शिकायला मिळते.आपण करत असलेल्या कृतीसाठी लागणारे साहित्य, कौशल्य, एकाग्रता, पूर्वानुभव आणि समयसुचकता या गोष्टी शिकायला व अनुभवायला मिळतात.हे आपल्याला दुस-याच्या करणा-या कृतीतून मिळत नाही.आपल्याला जो आनंद आणि कृती केल्याचे समाधान मिळते ते इतरांच्या कृतीतून मिळत नाही.यातून अजून एक आपल्याला स्वावलंबन कसे असते हेदेखील शिकायला मिळते. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बोडक्या डोक्याचा राजा* कोणे एकेकाळी सोनापूर राज्यावर एक मध्यम वयाचा राजा राज्य करत होता. त्याच्या दोन राण्या होत्या. थोरली राणी राजाप्रमाणेच वृद्ध होती तर धाकटी राणी अगदी तरुण होती. दोन्ही राण्यांचे राजावर अतिशय प्रेम होते. काळ उलटत गेला तसतसे राजाचे केस पांढरे होऊ लागले. थोरल्या राणीला त्याबद्दल काहीच वाटत नव्हते पण धाकटी राणी मात्र अस्वस्थ झाली. तिचा पती वृद्ध दिसणे तिला पसंत नव्हते. त्यामुळे जेव्हा-जेव्हा ती राजाबरोबर असे तेव्हा राजाचे केस विंचरण्याच्या बहाण्याने ती राजाचे पांढरे केस उपटत असे. या उलट थोरल्या राणीला राजाचे केस पांढरे होणे सुखावत होते. ती राजापेक्षा जास्त वृद्ध दिसू इच्छित नव्हती. त्यामुळे ती जेव्हा जेव्हा राजाबरोबर असे तेव्हा राजाचे केस विंचरताना ती राजाच्या काळ्या केसांना उपटून टाकत असे. आता हे सांगायला नको की, थोड्या कालावधीनंतर त्या बिचार्या राजाने आपल्या डोक्यावरील सर्व केस गमावले व तो चक्क बोडक्या डोक्याचा राजा बनला. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 27/11/2018 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक ठळक घडामोडी :- १९९५ - तलत महमूद यांना मध्यप्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर 💥 जन्म :- १८४३ - कॉर्नेलियस व्हान्डरबिल्ट तिसरा, अमेरिकन उद्योगपती. १९०३ - लार्स ऑन्सेगर, नोबेल पारितोषिक विजेता नोर्वेचा रसायनशास्त्रज्ञ. १९८६ - सुरेश रैना, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९७८ - लक्ष्मीबाई केळकर, भारतीय समाजसेविका, राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *राज्यस्तरीय गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेचा आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, 3 कोटी 38 लाख बालकांना लसीकरणाचे उद्दिष्ट; आरोग्यमंत्र्यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *29 नोव्हेंबरला दोन्ही सभागृहात मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक मांडणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नवी दिल्ली - मध्य प्रदेश आणि मिझोराममधील विधानसभा निवडणुकीचा प्रचार काल संध्याकाळी थांबला, 28 नोव्हेंबरला होणार मतदान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नवी दिल्ली: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांचे वय 25 वर्षांवरुन 18 वर्ष करण्याच्या मागणीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *विधीमंडळाचे कामकाज सुरु होताच विरोधक आक्रमक, दुष्काळग्रस्तांना तातडीनं मदत देण्याची मागणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुरबाडच्या हरिश्चंद्रगड गडावर अडकलेल्या 20 पर्यटकांची सुटका* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ * इंग्लंडने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेवर 3-0 ने मात करीत 55 वर्षांनंतर परदेशात प्रतिस्पर्धी संघाला दिली क्लीन स्विप* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://sharechat.com/post/OaJAj9J Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *धार्मिक स्थळी मोबाईलवर बंदी का ?* https://nasayeotikar.blogspot.com/2018/11/blog-post_26.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हरिवंशराय बच्चन* हरिवंशराय बच्चन हे हिंदीतील प्रथितयश कवी, साहित्यिक आहेत. हरिवंशराय यांचा जन्म अलाहाबादनजीकच्या प्रतापगड जिल्हय़ातील बाबूपट्टी या छोट्याशा गावात झाला. त्यांच्या पित्याचे नाव प्रताप नारायण श्रीवास्तव आणि आईचे नाव सरस्वतीदेवी होते. सरस्वतीदेवींच्या पोटी जन्मलेल्या या पुत्राला खरोखर सरस्वतीदेवी प्रसन्न होती, असेच म्हणावे लागेल. त्यांना लहानपणी 'बच्चन' असे म्हटले जात होते. याचा अर्थ 'बच्चा' किंवा 'अपत्य' असा होतो. नंतर मात्र याच नावाने ते ख्यात झाले. त्यांनी कायस्थ शाळेत प्रथम उर्दूमधून शिक्षण घेतले. तसेच प्रयाग विश्वविद्यालयातून इंग्रजीत एम.ए. आणि केंब्रिजमधून इंग्रजी साहित्यातील कवी डब्ल्यू. बी.यीट्स यांच्या कवितांवर संशोधन करून पीएचडीची पदवी घेतली. १९२६ मध्ये वयाच्या १९ व्या वर्षी त्यांचा विवाह श्यामा बच्चन यांच्याशी झाला. त्यावेळी त्या अवघ्या १४ वर्षांच्या होत्या. पण, श्यामा यांचे क्षयरोगाने निधन झाले आणि पाच वर्षांनी हरिवंशराय यांनी पंजाबी तरुणी तेजी सुरी यांच्याशी विवाह केला. त्याचवेळी त्यांनी कवितालेखनाला सुरुवात केली होती. त्यांना अमिताभ आणि अजिताभ असे दोन पुत्र झाले. तेजी बच्चन यांच्यात अभिनयाचा गुण होता. त्यांनी हरिवंशराय यांनी अनुवादित केलेल्या शेक्सपियर नाटकात काम केले होते. साहित्यात हरिवंशराय यांचे योगदान अमूल्य असे मानले जाते. त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवायही त्यांना अनेक सन्मान प्राप्त झाले. त्यांची 'मधुशाला' ही साहित्यकृती तर अजरामर ठरली आहे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) हंगामी राष्ट्रपतीचा कार्यकाळ किती असतो ?* सहा महिने *२) राज्य पुनर्रचना तत्त्वानुसार आंध्र राज्याची स्थापना कधी झाली ?* १ ऑक्टो.१९५३ *३) राज्यसभेत जास्तीत जास्त सभासद संख्या किती असते ?* २५० *४) प्रशासनाचा औपचारिक आणि घटनात्मक प्रमुख कोण ?* राष्ट्रपती *५) सर्वोच्च न्यायालयात न्यायदानाचे काम करणार्या न्यायाधीशांना वकिली करण्याचा किती वर्षांचा अनुभव आवश्यक असतो ?* 10 *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● अनिता जावळे - वाघमारे ● दीपक जाधव ● लिंगन्ना गुंटोड ● लोकडेश्वर बोमले ● पोषट्टी जाजेवार ● पंकज शेठिया ● ओंकार बच्चूवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भरोसा* आपल्या समस्येच आपणच निराकरण करू शकतो स्वतः वर नाही मग दुस-यावर कसा भरोसा धरू शकतो दुसरे फक्त आपल्याला सल्ला देऊ शकतात कोणाचं दु:ख थोडं कोणी वाटून घेऊ शकतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *या पृथ्वीतलावर पर्वत, नद्या , स्थावर-जंगम आहे तोवर लोकसमूहात रामायणाची कीर्ती गाजत राहणार आहे.. या शब्दांत महर्षि वाल्मिकींनी रामायण कथेची कालातीत स्थिरता कोरून ठेवली आहे. या भूतलावरील प्रत्येक मानवी वृत्ती व प्रवृत्तीचं प्रातिनिधिक रूप या महाकाव्यात रंगविलं आहे. आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श सेवक, आदर्श राजा अशा आदर्शांचा प्रतिनिधी म्हणून श्रीरामाचं चरित्र आपल्यापुढं येतं. संतानी, भक्तांनी, कवींनी त्याला देवत्वाला पोहोचवलं आहे.* *रामायणातील अगतिकता नि वेदनांच्या आंतरिक संघर्षाच्या तळाशी पोहचल्याशिवाय श्रीरामाच्या मानव ते 'मर्यादा पुरूषोत्तम प्रभूराम' या देवत्वरूपाशी तादात्म्य पावताच येणार नाही. गदिमांनी गीतरामायणात प्रभूरामाच्या जीवनपटाचा माणूस म्हणून सारांश मांडताना अतिशय उत्कटतेने वलयांकित केलेले-* *'दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा* *पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.'* *हे श्रीरामाचं रूप आधिक यथार्थ वाटतं..* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 💥💥💥💥💥💥💥💥💥 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आंधी आयी ज्ञान की, ढ़ाहि भरम की भीति । माया टाटी उर गयी, लागी राम सो प्रीति । सारांश जेव्हा ज्ञानाची भरती येते. तेव्हा अज्ञानाचे भ्रम चुटकीसरशी गळून जातात. ज्ञानामुळे प्रत्पेक गोष्टीमागील कार्यकारणभाव कळायला लागतात. प्रत्येक घडामोडीच्या मागे वैज्ञानिक दृष्टीने पाहिले तर भौतिक व रासायनिक क्रिया कारणीभूत असतात. त्यामागेच त्या क्रियेचं रहस्य दडलेलं असतं. हे सामान्य माणसाच्या विचार प्रक्रियेच्या बाहेरचं असलं तरी त्या मागील कारणं शोधत गेली तर कार्यकारण मिमांसा होते. प्रक्रियेमागील रहस्य उलगडताच तिच्या बाबतीत मनात निर्माण झालेले अज्ञानी व अचाट संभ्रम नाहिसे होतात. "चालता विज्ञानाची वाट तुटती अज्ञानपाश तटातट हो तसे तिमिरातूनी पहाट पुढे ज्ञानाचा लखलखाट, दाटून आलेल्या आभाळाने सगळीकडे अंधारून यावं ! विजांच्या चमचमाटाने आणि गडगडाटाने आसमंत थरारून टाकावा ! मात्र वार्याची झुळूक लागताच थेंबांचा अमृत वर्षाव होतो. आभाळ आसमंताला शितलता व नवचैतन्यानं भरून टाकावं. मग आभाळी दाटलेल्या मळभाची कणभरही तमा उरत नाही. तशीच अवस्था अज्ञानात चाचपडणार्याला ज्ञान प्राप्तीनंतर निर्माण होत असते. माया व अविचाराचा फसवा भास नाहिसा होतो. आपल्या सुंदर निसर्गाशी, ज्ञानाशी व चराचरारात भरून असलेल्या चैतन्यमय विश्वात्मक शक्तीशी समरस होत आनंदाची निर्मिती व्हायला लागते.. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्यांच्या मुखावाटे निघणारे शब्द जर अडखळत असतील तर त्या शब्दांमध्ये ठाम विश्वास नसतो किंवा मनातले विचार स्पष्टपणे मांडता येत नाहीत.अशी ज्यांची परिस्थिती झालेली असते तेव्हा एकतर मनातून खचलेला असेल किंवा कुणाच्यातरी दडपणाखाली असेल.अशा परिस्थितीतून बाहेर पडायचे असेल तर पहिल्यांदा आपल्या मनातली जी काही भीती असेल किंवा दडपण असेल ते काढून टाकायला हवे.अशावेळी आपला आत्मविश्वास आपणच वाढवला पाहिजे.माझ्या मनावर कुणाचेही दडपण नाही किंवा जरी असले तरी ते काहीच करु शकत नाही.आपण त्याला खंबीरपणे प्रत्युत्तर देऊ आणि आपण पूवस्थितीत येऊ अशी धारणा मनामध्ये उत्पन्न करुन पूर्वीसारखे जीवन जगू असा विश्वास जागृत करायला हवा तरच मग आपल्या मुखावाटे निघणारे शब्द स्पष्टपणे यायला लागतील आणि आपले जे काही विचार असतील ते समोरच्या व्यक्तीला समजायला लागतील यात काही संशय नाही.जर आपणच घाबरायला लागलो तर समोरची व्यक्तीही आपल्याला जास्तच घाबरून टाकेल आणि आपला जो काही आत्मविश्वास आहे तोही कमी करुन टाकेल.म्हणून परिस्थिती कशीही असो त्या परिस्थितीला घाबरुन न जाता त्याला तोंड द्यायला शिकले पाहिजे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नुकसान - Damage* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दृष्टी तशी सृष्टी* एकदा भगवान श्रीकृष्णाने मोठय़ा यज्ञाचं आयोजन केलं. त्यांनी धर्मराजाला बोलावून सांगितलं, या यज्ञात एका माणसाचा बळी द्यायचा आहे. त्यासाठी एखादा दुष्ट-दुर्जन माणूस शोधून काढ. आपण त्याचा बळी देऊ. नंतर कृष्णाने दुर्योधनाला बोलावले. श्रीकृष्ण त्याला म्हणाले, 'मी एक यज्ञ करतो आहे. या यज्ञात आपल्याला एका सज्जनाचा सत्कार करावयाचा आहे. तेव्हा शक्यतो एखादा पवित्र-सज्जन माणूस शोध. आपण त्याचा यथोचित सत्कार करू.' धर्मराज एका दुष्ट माणसाच्या शोधात निघाला आणि दुर्योधन एका सज्जन माणसाच्या शोधासाठी नघाला. धर्मराजाला एकही दुष्ट माणूस सापडला नाही. तो परत आला आणि म्हणाला, 'भगवान! आपल्या राज्यात कोणीही दुष्ट नाही. आपल्याला यज्ञात बळी द्यायला माणूस अत्यावश्यक असला तर तुम्ही मलाच बळीच द्या. तुमचा यज्ञ पार पडेल.' थोड्या वेळाने दुर्योधन आला आणि कृष्णाला म्हणाला, 'देवा! मी खूप शोध घेतला पण आपल्या राज्यात मी सोडता एकही सज्जन माणूस आढळला नाही. तेव्हा एक सज्जन व्यक्ती म्हणून माझा सत्कार करावा.' तात्पर्य : विचार तशी दृष्टी *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
*सस्नेह नमस्कार*🙏👏 〰〰〰〰〰〰 आज दिनांक १३-११-२०१८ रोजी रोटरी क्लब हदगाव तर्फे निराधार महिलांसाठी एक माणुसकी आणी मदतीचा हात देण्यासाठी दिवाळी आणि भाऊबीज ओवाळणी म्हणून साडी,फराळ साहित्य वाटप करण्यात आले.कार्यक्रमा मधे एकुण 17 निराधार महिलांना मायेची भेट देण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे तहसीलदार हदगाव मा. श्री कुळकर्णी साहेब आणि शिवसेना तालुका प्रमुख श्री श्यामराव चव्हाण .श्री संभाजी लांडगे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात रोटरी अध्यक्ष आदरणीय श्री बालासाहेब कदम. सचिव आदरणीय डॉक्टर श्री संजय पावार सर.,आदरणीय बालाप्रसद मुंदडा.मुनासेठ गट्टानी.कोनडलवाडे साहेब.जी डी तावडेसर.आदरणीय डॉक्टर. तावडे साहेब.विवेकानंद शाळेचे तावडे सर.आदरणीय डॉक्टर स्वप्निल अग्रवाल सर.वर्षा ताई देशमुख. प्रमिलाताई सेनकुडे.सौ. तावडे. कदम सर.प्रा.नागेश सर आणि शिल्पा चौधरी मॕडम व सर्व रोटरी सदस्य तसेच ,पत्रकार आ.गजानन गिरी, आ.हिमान्शू इंगोले.आदी उपस्थित होते.कार्यक्रमादरम्यान प्रमिलाताई सेनकुडे यांना गुरुगौरव पुरस्कार मिळाला म्हणून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. नागेश चौधरी सर यांनी केले. आजच्या कार्यक्रमाचे काही क्षणचिञे 👇👇👇👇 〰〰〰〰〰〰〰🙏🙏🙏🙏
🔰🌸🔰🌸🔰🌸🔰 *🌷🌷जीवन विचार*🌷🌷 〰〰〰〰〰〰 मनुष्याच्या संग्रही वृत्तीला मर्यादा नाही.माणसाचा भयंकर शञू जर कोणी असेल तर तो आहे लोभ.लोभ हा सर्व सद्गूणांचा नाश करतो.गीतेत माणसाच्या नरकाची व्दारेच काम, क्रोध ,लोभ ही सांगितलेली आहेत. माणसाच्या लोभाची बरोबरी दुसरे कोणी करु शकत नाही.सर्व जिवात्म्यांमध्ये मनुष्यच असा प्राणी आहे की तो संग्रहवृत्तीने जगतो.मनुष्य कितीही क्रोधीही झाला तरी तो वाघाइतका क्रोधी होऊ शकत नाही आणि कितीही कामी झाला तरी तो चक्रवाक पक्ष्याइतका कामी होऊ शकत नाही असे म्हणतात.पशूंना द्रव्याची इच्छा नसते,परंतु तीच इच्छा माणसाला पशू बनविते. मानवाच्या अंगी जी लोभी प्रवृत्ती आहे त्याची बरोबरी कोणी करु शकत नाही.म्हणूनच धनाचा संचयाच्या मागे लागलेल्या लोभी प्रवृत्तीचा मनुष्यास साध्या व्यवहाराची शिकवण दिली... *संत कबीर सांगून गेले "पानी वाढो नाव में, घरमें बाढो दाम l दोनों हात उलीचिये , यही सयानो काम ll"* माणसाला धनाची गरज आहे पण घरात नाही समाजात पाहिजे.कारण नावेत जर पाणी वाढले तर जसा धोका होतो तसे घरात धन वाढल्यामुळे धोका निर्माण होतो. म्हणून दानधर्म करण्याचे चांगले कार्य आपल्या हातुन घडावे ह्यातच मानवी जीवनाच भल आहे. आपण समाजाच काहीतरी देणं लागतो ही भावना ध्यानीमनी ठेवून आपण आपल्या कष्टाचा कमाईचा एक भाग जरी समाजातील गरजू लोकांच्यासाठी लावला तरी आपल्या जीवन जगण्याचे सार्थक झाले समजावे. 〰〰〰〰〰〰〰 🌺🌸🌺🌸🌺🌸🌺 *🙏शब्दांकन/संकलन*🙏 *✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)* ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 03/11/2018 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १८३८ - द टाइम्स ऑफ इंडिया ची द बॉम्बे टाइम्स ॲण्ड जर्नल ऑफ कॉमर्स या नावाने स्थापना २००७ - पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफनी देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशांची हकालपट्टी करून देशात आणीबाणी लागू केली १९८८ : श्रीलंकेतून आलेल्या तमिळ भाडोत्री सैनिकांनी मालदीववर हल्ला केला. तेथील सरकारच्या विनंतीवरुन भारतीय सैन्याने तो मोडून काढला व सरकार वाचवले १९९८ : पूर्वी धंदेवाईक पैलवान असलेल्या जेसी व्हेंचुराची मिनेसोटाच्या राज्यपालपदी निवड 💥 जन्म :- १६१८ : औरंगजेब, मोगल सम्राट १९३३ : अमर्त्य सेन, भारतीय अर्थतज्ञ १९३३ : मायकेल डुकाकिस, अमेरिकन राजकारणी १९५१ : अझमत राणा, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू 💥 मृत्यू :- १९७० - पीटर दुसरा, युगोस्लाव्हियाचा राजा १९९६ - ज्यॉँ-बेडेल बोकासा, मध्य आफ्रिकेच्या प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष २००४ - शेख झायेद बिन सुल्तान अल नहायान, संयुक्त अरब अमिरातीचा राष्ट्राध्यक्ष . *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *व्यापाऱ्यांना एका तासात 1 कोटींचं कर्ज मिळणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना ही नव्या कर्ज योजनेची केली घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *एक पैसाही न देता 'शिक्षकांची भरती' होणार, सरकार 4,738 जागा भरणार शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची मोठी घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *12 दिवसांपासून सुरू असलेला ओला, उबर चालकांचा संप अखेर मागे; परिवहन मंत्री दिवाकर रावतें सोबतच्या बैठकीत तोडगा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. उद्धव भोसलेंची नियुक्ती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई - DSK प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रकडून मराठे व गुप्ता यांना अधिकार बहाल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *सोलापूर - माळशिरस नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी मनीषा इंगळे तर उपाध्यक्षपदी डाॅ. मारुती पाटील यांची निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *आयसीसी क्रमवारीत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली अव्वल स्थानी तर हिटमॅन रोहित शर्मा दुसऱ्या स्थानी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://b.sharechat.com/yX3WyZ2YwR Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रतिलिपी दिवाळी अंक प्रकाशित झालय त्यातील माझी प्रकाशित......! *"कथा - भाऊबीज"* वाचा प्रतिलिपि वर https://marathi.pratilipi.com/story/qhzRZfB59oqg?utm_source=android&utm_campaign=content_share अमर्याद रचना वाचा, लिहा, आणि मित्रांसोबत शेयर करा आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अमर्त्य सेन* अर्थशास्त्रज्ञ अर्मत्य सेन यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९३३ रोजी झाला. त्यांना अतिशय प्रतिष्ठेचा नोबेल सन्मान मिळालेला आहे. ते हार्वर्ड विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. शिवाय जादवपूर विद्यापीठ आणि दिल्लीच्या स्कुल आँफ एकाँनाँमिक्स तसेच आँक्सफोर्ड विद्यापीठात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले आहे. एमआयटी, स्टेनफोर्ड, बर्कले व काँरनेल विद्यापीठांमध्ये त्यांनी सेवा दिली आहे. त्यांचा जन्म कोलकातामध्ये झाला. शांतीनिकेतनमध्ये शिक्षण पुर्ण झाल्यावर त्यांनी केंब्रिजच्या ट्ििनटी काँलेजमध्ये शिक्षण घेतले. त्यांनी काही काळ म्यानमारच्या मंडाले येथेही घालवला आहे. त्यांनी चाळीस वर्षात ३0 च्यावर पुस्तके लिहिली आहेत. १९७३ ते ७१ दरम्यान ते दिल्लीच्या स्कुल आँफ एकाँनाँमिक्समध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यावेळी माजी पंतप्रधान डाँ. मनमोहन सिंग यांच्यासह अनेक विद्वान अर्थशास्त्रज्ञ त्यांचे सहकारी होते. अर्थशास्त्रातील संशोधक म्हणून जादवपूर विद्यापीठातून त्यांची कारकिर्द घडली. अर्थशास्त्रातील संशोधनासाठी त्यांना १९९८ मध्ये सर्वोच्च असा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर केंद्र सरकारनेही त्यांना १९९९ मध्ये देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्वप्नं ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात, स्वप्नं ती की जी तुम्हाला झोपूच देत नाहीत. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) 'डेक्कन हेरॉल्ड' या वर्तमानपत्राचे प्रकाशन स्थळ कोणते ?* बेंगळुरू *२) डोळ्यांच्या बाबतीत महत्त्वाचे जीवनसत्त्व कोणते ?* अ जीवनसत्त्व *३) पेशीकेंद्राभोवती दोर्यासारखा सूक्ष्मतम असणार्या भागाला काय म्हणतात ?* रंगपरमाणू *४) भूपृष्ठाची मोजणी, वक्रता कोन मोजणारे उपकरण कोणते ?* थिओडोलाइट *५) अर्थशास्त्रातील संशोधनासाठी १९९८ मध्ये नोबेल पुरस्कार मिळविणारे भारतीय कोण ?* अमर्त्य सेन *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● एस पी जाधव ● संदीप पगारे ● मयूर महाजन *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सवय* गुलामीची सवय लागली की माणूस स्वतःची ताकत विसरतो याच्यात ताकतच नाही असा सर्वात गैरसमज पसरतो सवयीचे गुलाम न होता स्वतःच्या ताकतीची जाणीव व्हावी आपली सामर्थ्य आपण आपल्यात डोकावून पहावी शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन* ‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संत कबीर यांनी मानवी जगण्यातल्या खोटेपणावर प्रहार करीत ख-या भक्तीची जाणीव आपल्या रचनांमधून करून दिली. त्या रचना फारच दिलासा देणा-या आहेत. कुणाचीही वेदना ही आपली सहवेदना झाली पाहिजे यावर भर देत संतानी जो विचार मांडला तो अमूल्य जीवनाचा विचार आहे. गुरूस्वरूप असणा-या संताबद्दल कबीर म्हणतात....* *संगत संतनकी कर ले।* *जनमका सार्थक कछु कर ले।* *उत्तम नरदेह पाया प्राणी इसका* *हित कछु कर ले ॥* *या सांगण्यातून कबीरांनी जीवनाचे सार्थक कशात आहे, हेच सांगितले. त्या सार्थकतेच्या पाठीमागे आपण केव्हा आणि कधी जाणार आहेत, याचा विचार जितक्या लवकर करता येईल तितक्या लवकर करायला हवा. संत हे कृपादृष्टी करणारे असल्याने त्यांच्याकडून कधीही कठोर वागणूक मिळणे अशक्य आहे. त्यांनी दाखविलेला मार्ग ही प्रकाशवाट असते.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *क्रमांक 51* कबीर संगी साधु का, दल आया भरपूर । इन्द्रिन को तब बाँधीया, या तन किया धर । अर्थ : खर्या संतांच्या संगतीने माणसाच्या वर्तनात बदल होतो. संत संगतीमुळे मानवाला कल्याणकारी मार्ग सापडतो. संत द्वेष, माया, मोह ,विकार, वासना यापासून अलिप्त राहतात. संताचे ठायी विचार , विवेक, वैराग्य, दया, क्षमा, समता , निरामयता इ सद्गुणांची खाणंच असते. त्यांच्या कृपा कटाक्षाने सुद्धा काळीज फुटेतो धावणार्याला शांती मिळते व तो समाधानाच्या मार्गावर येतो. विज्ञानाचा पदवीधर असणार्या नरेंद्राच्या मस्तकी गुरू रामकृष्ण परमहंसांचा स्यर्श झाला. मनाची चंचलता नाहीशी होवून नरेंद्र अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालणारा पहिला तत्ववेत्ता ठरला. अध्यात्म व विज्ञानाने एकमेकांच्या हातात हात घेवून पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर मानवतेला विकासाची जोड मिळेल व विज्ञानाच्या बुद्धि प्रामान्यतेला सहृदयता मिळेल. हे संपूर्ण जगाला सांगणारा तो विज्ञाननिष्ठ संन्यासी 'स्वामी विवेकानंद' होतो . किती मोठी अद्भूत शक्ती संचरत असते, खर्या साधूंच्या ठायी ! खरे साधू भौतिक सुखांच्या सान्निध्यात वावरूनही त्यांची कधीच आस धरीत नाहीत. संन्यासी वृत्तीनं जगताना इंद्रीयांच्या अधिन असणार्या मनालाच हे संन्यस्त जिंकून घेतात. मनाला विकारी न होवू देता विवेकपूर्ण जगत निरामयतेचा अंगीकार करून हे दिव्यत्वानं जगालाच भारून टाकतात. त्यांचं क्षणभराचं सान्निध्यही माणसाला दिव्य दृष्टी बहाल करून जातं. खर्या संत, सज्जनाच्या सहवासाने जीवनाला मानवतेची जोड मिळते. माणूस विकारमुक्त होऊन विवेकानं जगायला लागतो. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• एखाद्या रेखाटलेल्या चित्रात कल्पनेने रंग देऊन चित्र रंगवून पूर्ण करणे सोपे असते, परंतु जीवनाच्या चौकटीत आखलेल्या चित्रात रंग देणे फार कठीण असते.त्यामध्ये जीवनात प्रसंगानुरूप येणारे वेगवेगळे सुखाचे, दु:खाचे,आनंदाचे,विरहाचे,नात्यांचे, जीवन व्यवहाराचे अनेक रंग कसे भरावे याचे कल्पक ज्ञान असणे आवश्यक आहे आणि वास्तव जीवनात ते साकारणे त्याहीपेक्षा जास्त अवघड जाते.कधी कधी आयुष्य संपते तरीही जीवनाच्या चित्रात रंग पूर्ण देणे होत नाही.जो कोणी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या कौशल्याने रंगवण्याचे काम विशिष्ट कलेने करतो तेव्हा त्याच्या जीवनाचे आदर्श चित्र रंगवतो आणि त्या रंगवलेल्या चित्रांचे इतर लोक अनुकरण करतात नि जीवनात एक वेगळा आनंद घ्यायला लागतात. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 📚🎊🎨🎊📚🎨🎊📚🎊 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वर्तणूक - Behavior* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दानधर्म* कानपूरमध्य़े गंगेच्या काठी बसून एक भिकारी भीक मागत होता. भिकेत त्याला जे मिळेल ते त्यातून तो आपला उदरनिर्वाह चालवित होता. त्याच्या हातात एक कटोरा असायचा. त्याला तो जाणा-या येणा-याच्या पुढे करायचा. ज्याला त्यात काही टाकावयाचे असेल ते टाकत होता. परंतु तो भिकारी तोंडाने काही मागायचा नाही. अन्य भिका-याप्रमाणे तो दीनवाणा होत नसे. एके दिवशी तिकडून एक श्रीमंत माणूस जात होता. भिका-याने पाहिले, श्रीमंताच्या अंगावर अत्यंत भारी कपडे होते, गळ्यात आणि अंगावर सोन्याचे दागिने चमकत होते. उंची राहणी ही त्याच्या वर्तनातून दिसून येत होती. श्रीमंत वाटतो म्हणून भिका-याने त्याच्याकडे कटोरा पुढे केला, ते पाहून त्या श्रीमंताच्या चेह-यावर तिरस्कार उमटला. त्याने खिशातून एक रूपायाचे नाणे काढले व त्या भिका-याकडे फेकले व छद्मी हसला. तो पुढे निघणार इतक्यात भिकारी जागेवरून उठला. त्याने त्या श्रीमंताचे उद्धट वर्तन व गरीबांसाठी असलेले तिरस्करणीय भाव पाहून ते रूपायाचे नाणे श्रीमंताकडे परत फेकले व म्हणाला,’’ घे सांभाळ तुझी दौलत, मला तुझ्यासारख्या गरीबाचा पैसा नको, ज्या दानामध्ये तिरस्काराचा भाव आहे असे दान स्वीकार करू नये असे मला सांगण्यात आले आहे. दान करतानासुद्धा शुद्ध मनाने, चांगल्या भावाने दान करावे जेणे करून घेणा-याला व देणा-याला समाधान लाभते.परमेश्वराने माणूस बनविताना जर काही फरक केला नाही तर तू तिरस्कार करून परमेश्वराचा अपमान करतो आहेस हे लक्षात ठेव. ’’ हे ऐकताच श्रीमंताला आपली चूक लक्षात आली. त्याने तात्काळ भिका-याची क्षमा मागितली. तात्पर्य :- दान सत्पात्री, प्रेमपूर्वक व नि:स्वार्थ भावनेने केल्यास त्याचे समाधान मिळते./ जगात सर्वजण समान आहेत. श्रीमंती आज आहे तर उद्या श्रीमंती नसेल याची जाणीव ठेवून वागले पाहिजे.माणसाने मनोभावे निस्वार्थीपणे दानधर्म करावा. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 02/11/2018 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९१४ : पहिले महायुद्ध रशियाने ऑट्टोमन साम्राज्याविरुद्ध युद्ध पुकारले १९७४ : सोलमध्ये नाइटक्लबला लागलेल्या आगीत ७४ ठार २००० : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (चित्रीत) पहिले रहिवासी पोचले 💥 जन्म :- १७९५ - जेम्स पोक, अमेरिकेचा अकरावा राष्ट्राध्यक्ष १८६५ - वॉरेन हार्डिंग, अमेरिकेचा २९वा राष्ट्राध्यक्ष १९६५ - शाहरुख खान, भारतीय अभिनेता 💥 मृत्यू :- १९५० - जॉर्ज बर्नार्ड शॉ, आयरिश लेखक १२८५ : पीटर तिसरा, अरागॉनचा राजा १३२७ : जेम्स दुसरा, अरागॉनचा राजा १९३५ : जेम्स कॅमेरोन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *धुळे व अहमदनगर महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले; 9 डिसेंबरला मतदान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबईः हिवाळी अधिवेशन 19 ते 30 नोव्हेंबरपर्यंत चालणार, अधिवेशनाचं कामकाज 9 दिवस चालणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *आज घडीला निवडणुका झाल्यास भाजपाच्या नेतृत्वाखालील भाजपाला 300 जागा मिळण्याची शक्यता एबीपी न्यूज आणि सी - व्होटरच्या सर्व्हेत वर्तवण्यात आली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *राज्य सरकारने 31 ऑक्टोबर रोजी 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर केल्यानंतर, काल 250 मंडळे दुष्काळ यादीत घेणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *ऑक्टोबर महिन्यात केंद्र सरकारच्या तिजोरीत एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त जीएसटी जमा झाल्याची माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नवोदितांना खेळाडूपेक्षा माणूस म्हणून घडवायचे आहे ‘तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकादमी’ च्या शुभारंभी सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आपले मत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *तिरुवनंतपुरम, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारताने पाचव्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर 9 विकेट्स राखून मिळविला दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने ही मालिका 2-1 अशी खिशात टाकली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://sharechat.com/post/MXN8y95 Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रतिलिपी दिवाळी अंक प्रकाशित झालय त्यातील माझी प्रकाशित......! *"कथा - वेळ नाही मला"* वाचा प्रतिलिपि वर https://marathi.pratilipi.com/story/GZ8q7b3fE2Uk?utm_source=android&utm_campaign=content_share अमर्याद रचना वाचा, लिहा, आणि मित्रांसोबत शेयर करा आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *थिमक्का* दगडाच्या खाणीत काम करणाऱ्या थिमक्काने लग्नानंतर मुलं झाली नाहीत म्हणून कर्नाटकातील एका रस्त्याच्या दुतर्फा 4 कि.मी.पर्यंत चक्क 284 वडाची झाडं लावली अन त्या झाडांवरच तिने मुलांसारखं प्रेम केलं. त्या झाडांना वर्षानुवर्षे रोज पाणी घालून वाढवलं अन आज त्या झाडांचं रूपांतर डेरेदार वृक्षामध्ये झालंय. थिमक्काच्या त्या नेत्रदीपक कार्याची दखल तिकडे अमेरिकेत घेतली गेलीय आणि पर्यावरणावर कार्य करत असलेल्या एका संस्थेचे नामकरण "थिमक्का रिसोर्सेस फॉर एनवायरनमेंट एज्युकेशन" असं करण्यात आलंय. प्रत्येकाने आयुष्यात एक जरी झाड लावलं आणि वाढवलं तर जगातील पर्यावरणाचे अर्धे अधिक प्रश्न सुटतील. तसं होत नाही म्हणून थिमक्का सारख्या अशिक्षित महिला अशी शेकडो झाडं लावून ती वाढवतात म्हणून पर्यावरण अजूनही समतोल राखून आहे. ज्या दिवशी असे लोक पर्यावरणाकडे दुर्लक्ष करतील तेव्हा पृथ्वीचा विनाश अटळ असेल. म्हणूनच माझं सर्वाना कळकळीचं आवाहन आहे तुम्हाला जर शक्य असेल तर आपल्या परिसरात एक तरी झाड अवश्य लावा अन त्याचा सांभाळ करा. थिमक्का जर 284 वडाची झाडं लावून वाढवू शकते तर तुम्ही एक तरी झाड नक्कीच लावून वाढवू शकता. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सामर्थ्य हे सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नसून, वेळ आल्यावर कृती करण्याची ती गोष्ट आहे *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) देशात डाळींचे सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य कोणते ?* मध्यप्रदेश *२) पश्चिम घाटात किती किलोमीटर लांब पर्वत आहे ?* १७०० किमी *३) 'बॉर्न अगेन ऑन द माउंटन' पुस्तकाचे लेखक कोण ?* अरुणमा सिन्हा *४) धातुशास्त्रावर संशोधन करणारी झारखंडमधील संस्था कोठे आहे ?* जमशेदपूर *५) देशातील पहिले अणुशक्ती केंद्र कोठे उभारण्यात आले ?* तारापूर *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● शंकरराव कामिनवार, धर्माबाद ● मारोती बोईनवाड ● गोविंद देशमुख ● छाया पुयड ● महेश धुळेकर ● प्रवीण शिंदे ● प्रणित जैस्वाल ● महेश दुधाळकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *विचार* नकारात्मक विचार विनाशाचे कारण आहे सतत नकारात्मकता हे काय धोरण आहे जसा विचार करता तसाच चेह-यावर दिसेल सकारात्मकता नाहीच तर मनात कुठून घुसेल शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संत कबीर म्हणतात..."बुरा जो देखन मै चला, बुरा न मिलीया कोय, जो दिल खोजा अपना, मुझसे बुरा न कोय." 'आदर्श व्यक्तिमत्व' एका दिवसात बनू शकत नाही. या जगात वाईटाचा शोध घेतला तर सर्वात वाईट आपण स्वत:च सापडतो.* *'शिल्पकार' जसा एखादे शिल्प घडविताना, त्यातील नकोसा भाग काढतो व हवासा भाग ठेवून एक देखणे शिल्प तयार करतो. तद्वतच आपल्यातील दोष शोधून,ते काढून टाकून एक 'यशस्वी व्यक्तिमत्व' बनण्याचा 'संकल्प' हिच खरी 'घटस्थापना.' हि विधायक 'घटस्थापना' झाली कि आपोआपच ह्रदयात 'मानवतेची प्रतिष्ठापना' झालीच म्हणून समजा.* •• ● ‼ *रामकृष्णहरी* ‼ ●•• संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *क्रमांक 50* जाति न पुछो साधु की पुछ लिजिए ग्यान । मोल करो तलवार का पडा रहने दो म्यान । अर्थ महात्मा कबीर ज्ञानविषयक विवेचनात सांगतात की, विद्वान जाती धर्म किवा कुळावरून ठरवू नये किवा त्याची जात, धर्म, कुळ विचारू नये. तलवारीचं श्रेष्ठत्त्व तिच्या धारेवरून ठरत असतं. तलवार ठेवण्यासाठी कोणतं म्यान वापरलं जातं. ते फार किमती आहे का? हे फार महत्वाचं नसतं. तलवारीला चमकण्यासाठी बाहेर काढावं लागतं. म्यान रिकामंच पडून राहातं. लोकबोलीत एक म्हण आहे. नदीचं मुळ आन ऋषीचं कुळ विचारू नये. किती विचारपूर्वक ही म्हण जपलीय बरं आपल्या पुर्वजांनी ! रामायणाचा रचियेता पूर्वायुष्यात वाटमारी करणारा लुटारू म्हणून हिणवल्या जायचा. एखादा प्रसंग जीवनात घडून जातो अन सुरू होतं जीवनाचं आरपार चिंतन. पार धुवून जातो लुटारूपणाचा कलंक. प्रकटला जीवन अन नात्यांच्या आदर्शत्वाची अनुभूती देत तत्वचिंतक वाल्मिकी . वेळेचा सदुपयोग करीत स्वतःला सदैव वाचन चिंतनात गुंतवून वर्षानुवर्ष गुलामीत खितपत पडलेल्या माणसांना स्वाभिमानाची जाणीव करून देणारा मानव मुक्तीचा एल्गार ही एक क्रांतीच होती. जीवनोद्धाराचा शिक्षण हाच महामार्ग सांगणारे प्रज्ञासूर्य डाॅ.भीमराव आंबेडकर जगाच्या औत्सुक्याचा विषय ठरणे ही जाती ,धर्म किवा कुळाची किमया नव्हती. तर ती विद्वतेची किमया होती. तलवारीला पाहाताना म्यानाला काढून टाकावंच लागतं तसं जातीचंही आहे. विद्वानाची उंची त्याच्या विद्वत्तेवरून पहावी लागते, जातीवरून नव्हे ! एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण एखाद्यावेळी अनवाणी पायाने पायी जाताना तळपायाला खडा रुतला तर डोळ्यांत टचकन पाणी येते आणि असह्य वेदना होतात.काही काळ आपण झालेले दु:ख खूप सहन करतो आणि पुढे चालायला लागतो पण मनात खडा टोचल्याचे शल्य राहतेच.पण तोच खडा दुस-याच्या पायाला टोचला तर त्याला आपण खाली पाहून चालू नये का असा सल्ला देतो.जो त्रास आपल्याला झाला आहे तो त्रास इतरांना होऊ नये असे ज्यांना मनापासून वाटते ते दुस-या चे कधीच वाईट चिंतीत नाहीत. अशी माणसे नेहमी आपल्या जीवनात असावीसी वाटतात.जे दुस-यांच्या चांगल्या गोष्टींचा विचार करतात ते कधी कधी स्वत:च्या जीवनात दु:ख झालेले कधीच कुणाला सांगत नाहीत.त्यांच्या मनात कधीही वाईट भावना निर्माण होत नाही.अशांचे आयुष्य हे एक दुस-यांसाठी प्रेरणादायी असते. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌴🌹🌴🌹🌴🌹🌴🌹🌴🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सुरक्षित - Safe* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जाणीव* बादशहाच्या गुलामांनी कधीच समुद्राची यात्रा केली नव्हती. त्यामुळे त्यांना कधीच समुद्र कसा असतो? त्याची खोली काय असते? याची माहिती नव्हती. बादशहा समुद्र यात्रा करत असे, मात्र गुलामांना कधीच समुद्रावर नेत नसे. एकदा बादशाहाने गुलामांना समुद्रयात्रा घडविण्याचे ठरविले, त्याप्रमाणे एका गुलामाला त्याने जहाजावर बरोबर घेतले, चहूदिशेला पाणीच पाणी बघून गुलाम भयभीत झाला आणि मोठमोठ्याने ओरडू लागला. जहाजावरील लोकांनी त्याला समजावून सांगितले कि घाबरण्याची काहीच गरज नाही. आपण जहाजावर सुरक्षित आहोत. परंतु त्याचा विश्वास बसेना. तो सतत ओरडत राहिला. हे पाहून बादशाहाने नाराज होऊन जहाजाच्या खलाश्यांना सांगितले, कि काहीही करा पण या गुलामाचे ओरडणे बंद करा. खलाश्यांनी पण त्याचे ओरडणे बंद व्हावे म्हणून प्रयत्न केले, समजावून सांगितले, वेगवेगळी आमिषे दाखविली, पण हा गुलाम काही गप्प बसेना. तेंव्हा जहाजावरील एक वृद्ध खलाशी बादशाहाकडे गेला आणि म्हणाला,"हुजूर! मला परवानगी द्या, मी याला गप्प बसवतो." बादशाहाने परवानगी दिली. त्या वृद्धाच्या सांगण्यावरून त्या गुलामाचे दोन्ही हात व पाय बांधण्यात आले व पायाला दोरी बांधून त्याला जहाजावरून पाण्यात लटकाविण्यात आले. काही क्षण पाण्यात घालायचे आणि दोरीने पुन्हा जहाजावर ओढून घ्यायचे असा प्रकार केला. ५-६ वेळेला गटांगळ्या खावून झाल्यावर त्याला जहाजावर घेतले, वर आल्यावर त्याला मुक्त केले पण तो गुलाम एका कोपऱ्यात जाऊन गप्प बसला. हे पाहून सर्वच चकित झाले. बादशाहाने वृद्ध खलाश्याला विचारले कि आता हा गप्प कसा झाला? खलाशी उत्तरला,"हुजूर! आधी तो समुद्रात बुडण्याचे दुःख काय असते हे जाणून घेत नसता नुसता ओरडत होता. पण त्याला आता बुडणे म्हणजे काय असते या प्रकाराची जाणीव झाली आहे म्हणून तो गप्प आहे.त्याच्या शांततेचे कारण त्याला झालेली दुःखाची जाणीव. त्या मानाने इथे त्याला सुख मिळत आहे ते तो अनुभवत आहे." *तात्पर्य-दुःखानंतर येणाऱ्या सुखाला किंमत असते. दुःख मिळाले नाही, सहन केले नाही तर सुख काय असते हे सांगून सुद्धा समजत नाही.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Posts (Atom)