जीवन विचार

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
➖➖➖➖➖➖➖➖
   *🌺 जीवन विचार* 🌺
〰〰〰〰〰〰〰
*जगातील सर्व माणसं सुखासाठी धडपडतात.अनेक संकटांना तोंड देतात.कधी हरतात ,तर कधी जिंकतात. जिंकण आणि हरणं हे शेवटी एका क्षणाचं असतं.हे जेव्हा कळतं तेव्हा माणूस अंतर्मुख होऊन विचार करतो.*

    *आपल्या आत्मयाचा आवाज परमात्मयापर्यंत घेऊन जाण्यासाठी तो देवापुढं काही मागणं मागतो.अस मागण म्हणजे तो प्रार्थना करतो.*👏🙏
*या प्रार्थनारुपी हाकेतून आत्म्याची निश्चित उत्कंठा करतो.प्रार्थना ही पण दोन प्रकारे केली जाते.सकाम आणि निष्काम प्रार्थना.जेव्हा आपण देवापुढ काही मागतो ते सकाम प्रार्थना आणि जेव्हा आपलं काही देवापुढ मागणं नसतं आहे त्यात समाधान मानने असते ही झाली निष्काम प्रार्थना.*

*प्रार्थना ही धैर्य आणि आत्मबलाची जननी आहे.आपले जैविक आणि आत्मबल वाढविण्याचे सामर्थ्य प्रार्थनेत* *आहे.स्वार्थारहित खरीखुरी सेवा हीच खरी प्रार्थना होय.*
 *संत तुकाराम म्हणतात , 'न लगे मुक्ती धनसंपदा ' संत तुकाराम महाराजांनी देवापुढं मुक्ती मागितली नाही तर भक्ती मागितली.ईश्वराविषयीचा उत्कट प्रेमातून प्रार्थना जेव्हा जन्म घेते तेव्हा ती खरीखूरी भक्तीमय प्रार्थना असते.*👏🙏
〰〰〰〰〰〰〰
*🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼*

जीवन विचार

🔰🌸🔰🌸🔰🌸🔰🌸
*🌷🌷 जीवन विचार*🌷🌷
*〰〰〰〰〰〰〰〰*
*एखादे काम करताना चित्त शांत असले म्हणजे ते काम अधिक सुंदर होत असते, चित्ताचे समत्व हा एक मोठाच गुण आहे.आणि समत्व हीच जीवनाची कला आहे.*

   *कोणतंही कर्म करणाऱ्याची मनोवृत्ती उच्च दर्जाची असावी लागते.खरं तर स्वतःसाठी केलेले कर्म सर्वसामान्य मध्यम प्रतीच असतं. दुसऱ्याच्या हितासाठी केलेले कर्म सर्वश्रेष्ठ असतं.समाजाच्या सेवेसाठी केलेलं कर्म हे उच्च दर्जाच असतं.अशा कर्मातूनच आपल्याला मुक्त होता येतं.*

कोणत्याही कर्माची श्रेष्ठता कर्म करणाऱ्याच्या मनावर अवलंबून असते.जगातील सर्व सुंदर गोष्टींची निर्मिती सुंदर विचारांनी नटलेल्या सुंदर कर्मातूनच होत असते.
*कर्म हे जीवनविकासाचे एकमेव साधन आहे.*
कर्माचा हेतू आनंदलब्धी आणि आनंदशुध्दी असा दुहेरी असायला पाहिजे.म्हणूनच टाँलस्टाँय यांच्या विचाराने कर्म म्हणजे कार्यमग्नता.
 *" कार्यमग्नता ही मानवी जीवनाची अटळ अशी व्यवस्था आहे ."* मानवाच्या संतोषासाठी केलेले कर्मच शुद्ध असते , सात्विक असते.
〰〰〰〰〰〰〰〰
🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸
*✍शब्दांकन /संकलन*

कथा क्रमांक १९७

🌹देव दगडात असतो कि नसतो?

☝एकदा स्वामी विवेकानंद यांना एका विद्वान(अतिहुशार) व्यक्तीने जेवणासाठी आमंत्रित केले.
👉जेवणाचा कार्यक्रम उरकल्यानंतर त्याने स्वामी  विवेकानंद यांना सहज हसत हसत म्हणटले की,
    " स्वामीजी बघाना काय मूर्ख लोक असतात, खुशाल दगडाचा देव बनवून त्याची पूजा करतात.
किती मूर्खपणा आहे.
मला तर देव या जगात अस्तित्वात असल्याचे वाटत नाही. सगळे थोतांड आहे.
तेहतीस कोटी काय या जगात एकही देव अस्तित्वात नाही."
     सगळा मूर्खपणा आहे. देव कुठे दगडाच्या मूर्तीमध्ये असतो का?❔
       आणि.....
तो व्यक्ती खदखदा हसू लागला. 👉हे सर्व स्वामी विवेकानंदांनी
शांतपणे ऐकून घेतले व त्या व्यक्तीला म्हणाले की,
 " तुमच्या पाठीमागे भितींवर लावलेला फोटो तुमच्या वडिलांचा आहे का? "
  त्या व्यक्तिने होकारार्थी मान डोलावून म्हटले "हो ते माझे वडील होते, दोन वर्षापूर्वी त्यांचा स्वर्गवास झाला आहे."
  ✨    स्वामीजी म्हणाले तुम्हांला कसे माहीत की तुमचे वडील स्वर्गातच गेले.
     तो व्यक्ती निरूत्तर झाला.
त्यानंतर स्वामी विवेकानंदांनी त्या व्यक्तीला तो फोटो समोर आणुन ठेवण्यास सांगितलं.
     त्याने त्याच्या वडिलांचा फोटो समोर आणुन ठेवला.
  स्वामी विवेकानंदानी त्याला सांगितले कि,
🌟आता एक काम करा, या फोटोवर थुंका.
       तो व्यक्ती विवेकानंदांकडे आश्चर्याने पाहून म्हणाला.  "काहीतरीच काय सांगताय स्वामीजी, मी माझ्या वडिलांवर कसा काय थुंकू शकतो."
          स्वामी विवेकानंद म्हणाले, " तो तर कागद आहे. ते थोडेच तुमचे वडील आहेत."
त्यावर तो व्यक्ति म्हणाला "मी या फोटोमध्येच माझ्या वडिलांना पाहतो. त्यामुळे मी त्यांचा अपमान करू शकत नाही."
 ✨🌟
यावर स्वामी विवेकानंद म्हणाले कि
👉 "जसे तुम्ही श्रद्धेने तुमच्या वडिलांना या फोटोमध्ये पाहता तसेच प्रत्येक व्यक्ती मूर्तीमध्ये परमेश्वर पाहत असतो. त्यामध्ये त्यांचा भक्तीभाव व श्रद्धा लपलेली असते."
 हे ऐकून तो व्यक्ती खुप खजील झाला व विवेकानंदांचे पाय पकडून माफी मागु लागला.

☝     परमेश्वर हा कणाकणांमध्ये सामावलेला आहे. कोणाला तो मातेच्या चरणामध्ये दिसतो तर कोणाला दिनदुबळ्यांमध्ये दिसतो.

  💐  संत तुकाराम महाराज म्हणतात.
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले ।
तोची साधु ओळखावा देव तेथेची जाणावा।
 
☝ देव जाणून घेण्यासाठी पैसा  नाही तर खरा भक्तिभाव लागतो.
  ☝देवाबद्दल अंधश्रद्धा अजिबात ठेवू नका पण देवावर श्रद्धा मात्र जरूर ठेवा.

मुलीचे आदर्श विचार

मुलीचे विचार
बाबा - " बाळा तुला हे स्थळ पसंत आहे ?"

मुलगी - हो बाबा छानच आहे.
नावं ठेवण्यासारखं काय आहे तिथं ?"
.
बाबा - हो, पण घर बघितलंस का, कसलं साधं आहे ? दगडमातीचं !
त्यातही नुसत्या दोनच खोल्या आहेत."
.
मुलगी - म्हणून काय झालं ?"
.
बाबा - त्यापेक्षा परवा आलेलं स्थळ काय वाईट आहे ?
एवढा मोठा बंगला, नोकर चाकर, दहावीस गाड्या !
नुसता आरामच आराम !"
.
"ते स्थळ नको."
.
"का ?"
.
मुलगी-  मी त्या मुलाशी बोललेय.
त्याचे काही प्लॅनच
नाहीत स्वतःच्या भविष्याविषयी.
तिथं गेले तर
माझ्या कर्तृत्वाला वाव मिळेलच असे नाही.
सगळं काही पूर्वजांनी करून ठेवलंय. नवीन काय करायचं
म्हटलं तर नवरा होय म्हणेल की नाही ही शंका !
त्याचं स्वतःचंच अजून काही ठरलेलं नाही..

त्याउलट आजचं स्थळ बघा ना !
सगळ्या गोष्टी अजून
प्राथमिक स्टेजला आहेत.
चांगलं घर नाही, घरात
कुठल्याही सुखसोयी नाहीत,
स्वतःला सिद्ध करण्यासाठी वावच वाव !"
.
बाबा - पण रोज सकाळी उठून म्हशीचं शेण काढावं लागेल.
धारा काढाव्या लागतील, गोबरगॅसमध्ये शेण घालावं लागेल."
.
मुलगी - मला आवडेल...
स्वतःचा संसार उभा करायचा तर
कामं ही करावी लागणारच.
यश आणि सुख हे
सहजासहजी मिळत नाही."
.
बाबा - अगं, पण सगळं सुख तुला तयार मिळेल ना,
परवाच्या स्थळाचा विचार केलास तर !"

मुलगी - तेच तर नकोय.
मी केवळ इतरांनी मिळवलेल्या
ऐश्वर्याचा उपभोग घेत राहिले तर माझं अस्तित्व कुठं राहिलं ? "
.
 बाबा - म्हणजे ?"
.
मुलगी - "मलाही श्रीमंत व्हायचं आहे पण ते स्वतः
प्रामाणिकपणे कष्ट करून आणि ही संधीही सर्वत्र मिळत नाही.
हा मुलगा चांगला आहे. निर्व्यसनी आहे. स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडणारा आहे.
लहानपणी वडील वारले ही खूप मोठी हानी झाली त्याची.
बापाचं छत्र नसतानाही तो डगमगला
नाही , भरकटला नाही. स्थिर राहिला.
एक दिवस जगात माझंही नाव करून दाखवीन म्हणाला.
सगळे माझे विचार.
एकमेकांचे विचार जुळले की संसार सुखाचाच होणार.
.
एक बैल कामसू आणि दुसरा आळशी झाला की चांगली मशागत कधीच होणार नाही.
तसंच संसाराचंही आहे.
आता त्याच्याकडे किंवा माझ्याकडे काहीच नाही.
पण दहावीस वर्षांनंतर आमच्याकडेही गाडी असेल, बंगला असेल ;
त्यावेळी आम्हांला अभिमानाने सांगता येईल की
यातली प्रत्येक काडी आणि प्रत्येक वीट आम्ही आमच्या कष्टाने
मिळवलेली आहे.
अभ्यास करून नंबर मिळवण्यात खरी
मजा असते !
नुसतं खाऊन पिऊन लोळणं याला जर कुणी सुख म्हणत असतील तर ते सुख मला नकोय . "


🙏🏼आवडलं तर नक्की पुढे पाठवा🙏🏼

बेटी

*बेटी...*👌🏼


एक बेटी ने अपने पिता से एक प्यारा सा सवाल किया कि पापा ये आंगन मे जो पेड़ है, उसे पीछे वाले बगीचे मे लगा दे तो ? पिता असमंजस मे और बोले बेटी ये चार साल पुराना पेड़ है नई जगह, नई मिट्टी मे ढल पाना मुश्किल होगा । तब बेटी ने जलभरी आंखो से पिता से सवाल किया कि एक पौधा और भी तो है आपके आंगन का जो बाईस बरस पुराना है क्या वो नई जगह पर ढल पाएगा ? पिता बेटी की बात पर सोचते हुए कहा कि यह शक्ति पुरी कायनात मे सिर्फ नारी के पास ही है जो कल्पवृक्ष से कम नही है। खुद नए माहौल मे ढलकर औरो कि सेवा करती है । ताउम्र उनके लिए जीती है ।
बेटी से ही मां, बहन व पत्नि है ।

जीवन विचार

*कामयाबी कभी बड़ी नहीं होती,*
         *पाने वाले हमेशा बड़े होते है !*
*दरार कभी बड़ी नहीं होती,*
        *भरने वाले हमेशा बड़े होते है !*
*सम्बध  कभी बड़े नहीं होते,*
         *निभाने वाले हमेशा बड़े होते है !...*

   बसमध्ये तुम्हाला हाक देवून तुमचा माजी विद्यार्थी तुम्हाला बसायला जागा देत असेल, तर तुम्ही राष्ट्रीय / राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकापेक्षाही श्रेष्ठ आहात. पण जर तुम्हाला बघून तो दुर्लक्ष करत असेल, तर तुम्ही आयुष्यात काय केलं आणि मिळवलं याचं गणित तुम्हाला दाखवणारा आरसा आहे.*
  

जीवन विचार

*पाण्यात आणि मनात साम्य ते काय?*
     *दोन्ही जर गढूळ असतील तर दोन्ही आयुष्य संपवू शकतात.*
    *दोन्ही जर उथळ असतील तर धोक्याच्या पातळी कडेच ओढतात.*
      *दोन्ही स्वच्छ असतील तर जातील तिथे आनंदवनच फुलवतात.*
      *पण पाण्यात आणि मनात मुख्य फरक तो काय ?*
     *पाण्याला बांध घातला तर पाणी "संथ" अन् मनाला बांध घातला तर माणुस "संत" होतो.*
  

कथा क्रमांक १९६

```
एका गावात एक विद्वान अर्थतज्ज्ञ रहात होता . त्याची ख्याती सर्वदूर पसरलेली होती ...

तिथल्या स्थानिक राजाने एकदा चर्चा करायला त्याला बोलवले,

भरपूर वेळ चर्चा झाली मग राजा  म्हणाला " महाशय
तुम्ही अर्थशास्त्रात खरेचं फार विद्वान आहात पण मग तुमचा मुलगा असा बावळट का ?

काही त्याला शिकवा.

त्याला सोने आणि चांदी यात
जास्त मुल्यवान काय इतके सुध्दा कळत नाही "

आणि

मोठ्याने हसू लागला ....

हे ऐकून त्या विद्वानाला फार वाईट वाटले ...

तो घरी गेला ....

त्याने मुलाला विचारले
" बाळा मुल्यवान काय आहे सोने का चांदी ? "

" सोने " क्षणाचाही विलंब न लावता मुलगा उत्तरला

" हो तुझे उत्तर बरोबर आहे . मग तो राजा असा का हसला ?

म्हणाला तुला सोने आणि चांदी यात मुल्यवान काय माहीत नाही ..!

 माझी चार लोकात खिल्ली उडवली जाते ..

तुला माहीत आहे मुल्यवान काय आहे..!!

मुलगा म्हणाला
राजा रोज त्याच्या वाड्याजवळ छोटा दरबार भरवतो ...

रोज मी शाळेत जातो त्या रस्त्यातचं राजाचा वाडा आहे

मी दिसताचं राजा मला बोलावून घेतो ..

त्याच्या सोबत गावातील
सारे लोकं प्रतिष्ठीत तिथेचं असतात ....

राजा एका हातात
सोन्याचे नाणे आणि एका हातात चांदीचे नाणे माझ्या समोर धरतो आणि मला सांगतो "यातले सगळ्यात किमती नाणे उचल" ..

आणि
मी रोज चांदीचे नाणेच उचलतो ..

त्यामुळे तिथे असलेले सगळे
मोठ्याने हसतात ...

सार्यांना मजा वाटते .......आणि असे रोज घडते

हे ऐकल्यावर विद्वानाला प्रश्न पडतो की आपल्या मुलाला सोने चांदी यातला फरक कळतो तरी हा रोज असे का करतो

चांदीचे नाणे मुल्यवान म्हणून का उचलतो हे मात्र त्याला उमगले नाही

न राहून त्याने मुलाला विचारले "मग तु सोन्याचे नाणे का उचलत नाहीस ? असला मुर्खपणा करुन माझी अब्रु चार लोकात का काढतो ?"

मुलगा जरा हसला मग विद्वानाचा हात धरुन त्याला घराच्या आत घेवून गेला
कपाटातून त्याने एक पेटी काढली आणि उघडली. ती पेटी चांदीच्या नाण्यांनी पुर्ण भरलेली होती ...

हे पाहून विद्वान अवाकचं झाला ..

मुलगा म्हणाला
 "पिताश्री ज्या दिवशी मी सोन्याचे नाणे उचलेल त्या दिवशी राजा हा खेळ बंद करेल ..

 त्यांना जर मला मुर्ख सिध्द करुन मजा येत असेल तर येवू द्या ..

पण जेव्हा मी हुशार होईल तेव्हा मला काहीचं मिळणार नाही.

मुर्ख असणे वेगळे आणि मुर्ख समजणे वेगळे "

सोन्याची एक संधी साधण्या पेक्षा प्रत्येक संधीचे सोने करा !!!

 काय वाटते ????

*समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो*

*काहीजण त्यातुन मोती उचलतात*,

काहीजण त्यातुन मासे घेतात तर काहीजण फक्त आपले पाय ओले करतात.

*हे विश्व पण सर्वांसाठी* सारखेच आहे फक्त तुम्ही त्यातुन काय घेता ते महत्वाचे..

उत्तर सूची

*🎀 उत्तरसूची 🎀*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
1⃣ मानवी लहान आतड्याची लांबी .... मीटर असते.

१) ५ ते ७
 २) ६ ते ८  ✅
 ३) ७ ते ९
 ४) ८ते १०

 2⃣ मानवाच्या उंचीचे नियंत्रण ...ही ग्रंथी करते.

१)  यकृत
२)  व्हेगस
३)  लसिका
४)  पियूषिका ✅

3⃣  इन्सूलीनचे इंजेक्शन कोणत्या रुग्णास देतात?
१) हृदयरोग
२)धमनीकाठिण्य
३) रक्तदाब
४) मधुमेह ✅
4⃣  मुत्रपिंडविकाराच्या रुग्णासाठी खालीलपैकी कोणती पध्दती वापरतात?
१) डायलँसिस ✅
२) अक्युपंक्चर थेरपी
३) रेडीओथेरपी
४) केमोथेरपी
5⃣ क्रिडामानसशास्ञ हे खेळाडूंच्या ....चा अभ्यास करणारे शास्त्र होय.

१ ) मनाचा
२) वर्तनाचा  ✅
३) बोधावस्थेचा
४) आत्म्याचा
6⃣पोलिओमूळे शरीराच्या कोणत्या भागास हानी पोहोचते?
१) मज्जासंस्था ✅
२) पचनसंस्था
३) त्वचा
४) हाडे
7⃣ अल्ट्राँसाँनिक तरंग लहरीच्या साहाय्याने खालीलपैकी कशाची खोली मोजतात?
१) विहीरीची खोली
२) तळ्याची खोली
३) कोळश्याच्या खाणीची खोली
४) समुद्राची खोली ✅
 8⃣ रेल्वेशी संबंधित असणारी ऊर्जा कोणती?

१) घर्षणजन्य
२) चुंबकीय
३) गतीजन्य ✅
४) स्थितीजन्य
9⃣ विलार्डने कोणत्या किरणांचा शोध लावला?

१ ) बिटा
२) गँमा  ✅
३) अल्फा
४) लेझर
 🔟 सूर्य व तारे यांमधील ऊर्जा कोणत्या प्रकारांमुळे निर्माण होते ?

१) अणुविघटन
२) अणुबंधन ✅
३) अणुस्फोट
४) अणुनिर्मीती

जीवन विचार

🔰🌸🔰🌸🔰🌸🔰🌸
*🌷🌷 जीवन विचार*🌷🌷
〰〰〰〰〰〰〰

*आजच्या वैज्ञानिक युगात मानवाचे प्रश्न फार व्यापक आणि कठीण झाले आहेत.प्रश्न हा सामाजिक असो,  व्यापाराचा असो की आणखी कोणता प्रश्न असो , त्यावर जलद निर्णय घेण्याची गरज उत्पन्न होते.अशावेळेस आपल्याला अचूक निर्णय घ्यावे लागतात. आपल्या जीवनात अचूक वेळेचं आणि कामातील कौशल्याचं महत्त्व  फार मोठ असतं.म्हणूनच कँनन फरार नावाचा एक विचारवंत सांगतो की, ' माणूस जे काम करतो त्यात अचूकता नसेल तर अपयश येणार.'*

    *आपल्या जीवनात यश मिळवायचे असेल तर आपण आपलं काम सर्व ताकद आणि कौशल्य पणाला लावून केल पाहिजे.कारण प्रत्येक काम हे जीवनमरणाइतकं महत्त्वाच समजून केल तर यश नक्कीच आपल्या वाट्याला येणार.कोणत्याही कामातील अचूकता , सुक्ष्मता आणि एकाग्रता हे ञिसूञ  जीवनात फार महत्त्वाचे आहे.अचूकता तर कामाचा आत्मा असतो.आणि स्वतःच्या अंतरात्म्याच्या आवाजानुसार आपण आपले वर्तन केले तर यश सहजतेने प्राप्त होते.*
〰〰〰〰〰〰〰〰
🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸
*✍शब्दांकन /संकलन*
*

जीवन विचार

🔰🌸🔰🌸🔰🌸🔰🌸
*🌷🌷 जीवन विचार*🌷🌷
〰〰〰〰〰〰〰
*〰〰〰〰〰〰〰〰*
*धैर्य* म्हणजे मनुष्याजवळ असणारे खरे शौर्य आहे.ज्याच्याजवळ धैर्य आहे म्हणजे आशावादी जीवनाची कला आहे अशी व्यक्ती कोणत्याही संकटाला , संघर्षाला घाबरत नाही.ज्यांना जीवनात काही ठोस करून दाखवायचे अशा व्यक्ती धैर्याने आपली वाटचाल करतात.

    धैर्य हे एक माणसाच्या हातातील एक मोठे साधन आहे.त्या जोरावरच मनुष्य समर्थपणे आपले जीवन जगू शकतो.जीवनातील संकटाचा समुद्र पार करण्यासाठी धैर्याच्या जहाजातूनच प्रवास करावा लागतो.जी व्यक्ती ध्येयध्यास सोडून मध्येच थांबते अशी व्यक्ती संपते.आपल्या सर्व इच्छा सफल व्हायचा असेल तर आपल्यात धैर्य आणि चिकाटी असली पाहिजे . धाडसी माणसाच्या श्रमापासून निर्माण होत असलेल्या प्रत्येक घामाच्या थेंबापासून कीर्तीरुप मोती तयार होतात.मशालीचे तोंड खाली केले तरी तिच्या ज्वाळा कधीही खाली जात नाहीत.तसेच धैर्यवान व्यक्ती
धैर्य असले की ञैलोक्यावर विजय मिळवू शकतो.

〰〰〰〰〰〰〰〰
🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸
*✍शब्दांकन /संकलन*

उत्तरसूची

⭐💧 उत्तर सूची  💧⭐*

1⃣  भोपाळ शहरात कोणत्या वायुमूळे दुर्घटना घडली होती?
१) फाँस्जिन
२) क्लोरिन
३) मिथिल आसोसायनाईट✅
४) हायड्रोजन डाय सल्फाइड

2⃣  शहरी भागातील लोक कोणत्या व्यवसायात गुंतलेले दिसतात?
१) शेती
२) व्यापार
३) नोकरी ✅
४) उद्योगधंदे

3⃣  इन्सूलीनचे इंजेक्शन कोणत्या रुग्णास देतात?
१) हृदयरोग
२)धमनीकाठिण्य
३) रक्तदाब
४) मधुमेह ✅

 4⃣  मुत्रपिंडविकाराच्या रुग्णासाठी खालीलपैकी कोणती पध्दती वापरतात?
१) डायलँसिस ✅
२) अक्युपंक्चर थेरपी
३) रेडीओथेरपी
४) केमोथेरपी

5⃣  अल्ट्राँसाँनिक तरंग लहरीच्या साहाय्याने खालीलपैकी कशाची खोली मोजतात?
१) विहीरीची खोली
२) तळ्याची खोली
३) कोळश्याच्या खाणीची खोली
४) समुद्राची खोली ✅

6⃣  प्राथमिक आधुनिकीकरणामागील प्रेरणाशक्ती ............लोकांची असते.
१) मध्यमवार्गीय ✅
२) कनिष्ठ वर्गीय
३) गरीब
४) श्रीमंत

7⃣  वैज्ञानिक दृष्टिकोन असण्याकरिता .........प्रमुख घटक आवश्यक आहे?
१) वस्तूनिष्ठता ✅
२) व्यक्तीनिष्ठता
३) सिध्दांत
४) उदगमणकरण

8⃣  भुकंपप्रवण क्षेत्रात खालीलपैकी कोणत्या प्रकारची घरे असू नयेत?
१) लाकडाची
२) प्लँस्टीकची
३)सिमेंट - क्राँक्रिटची
४) दगड-मातीची ✅

 9⃣  पोलिओमूळे शरीराच्या कोणत्या भागास हानी पोहोचते?
१) मज्जासंस्था ✅
२) पचनसंस्था
३) त्वचा
४) हाडे

🔟  भारतातील आधुनिकीकरण कोणत्या राष्ट्रांना आदर्श वाटते?
१) आफ्रिकेतील राष्ट्रे ✅
२)चीन
३) अमेरिका
४) आँस्ट्रेलिया
⭐💧⭐💧⭐💧⭐💧⭐
➖➖➖➖➖➖➖➖➖

जीवन विचार

🔰🌸🔰🌸🔰🌸🔰🌸
*🌷🌷 जीवन विचार*🌷🌷
〰〰〰〰〰〰〰
〰〰〰〰〰*
*आजच्या वैज्ञानिक युगात मानवाचे प्रश्न फार व्यापक आणि कठीण झाले आहेत.प्रश्न हा सामाजिक असो,  व्यापाराचा असो की आणखी कोणता प्रश्न असो , त्यावर जलद निर्णय घेण्याची गरज उत्पन्न होते.अशावेळेस आपल्याला अचूक निर्णय घ्यावे लागतात. आपल्या जीवनात अचूक वेळेचं आणि कामातील कौशल्याचं महत्त्व  फार मोठ असतं.म्हणूनच कँनन फरार नावाचा एक विचारवंत सांगतो की, ' माणूस जे काम करतो त्यात अचूकता नसेल तर अपयश येणार.'*

    *आपल्या जीवनात यश मिळवायचे असेल तर आपण आपलं काम सर्व ताकद आणि कौशल्य पणाला लावून केल पाहिजे.कारण प्रत्येक काम हे जीवनमरणाइतकं महत्त्वाच समजून केल तर यश नक्कीच आपल्या वाट्याला येणार.कोणत्याही कामातील अचूकता , सुक्ष्मता आणि एकाग्रता हे ञिसूञ  जीवनात फार महत्त्वाचे आहे.अचूकता तर कामाचा आत्मा असतो.आणि स्वतःच्या अंतरात्म्याच्या आवाजानुसार आपण आपले वर्तन केले तर यश सहजतेने प्राप्त होते.*
〰〰〰〰〰〰〰〰
🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸
*✍शब्दांकन /संकलन*

जीवन विचार

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
〰〰〰〰〰〰〰
   *🌺जीवन विचार*🌺
〰〰〰〰〰〰〰〰
*शिक्षण ही मानवी जीवनशक्तीची प्रेरणा असते.शिक्षणाची मूळ भूमिका प्रकृतीकडून संस्कृतीकडे जाण्याची असते.संपूर्ण मानव संस्कृती एकाच ध्येयान नटलेली असते.मानवी जीवनसंस्कृती राखण्यासाठी शिक्षणाची गरज असते.*
*मानवी जीवनात ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे.ज्ञानाइतके पवित्र,मंगल व उपयुक्त अन्य कांहीही नाही.🙏आईच्या कुशीतुन शिक्षणाला जी सुरूवात होते ती थेट अंत होईपर्यंत.म्हणूनच जीवनविद्या सांगते - 'शिक-क्षण','*📝
*"क्षणाक्षणाला शिकणे म्हणजे शिक्षण"📚थोडक्यात, जीवनात ज्ञानाला पर्याय नाही आणि म्हणूनच जीवनविद्या सांगते*--

*ज्ञान हे शस्त्र,अस्ञ व शास्त्र आहे ,ज्ञान हे शक्ती,बल व सामर्थ्य आहे,ज्ञान हे धन, संपत्ती व ऐश्वर्य आहे,ज्ञान हा देव,🙏ईश्वर व परमेश्वर* *आहे,म्हणून ज्ञानी 📝व्हा व धन्य व्हा.कारण ज्ञान आणि कर्म हे आपल्या जीवनाचे पंख आहेत.यामुळे आपण सुखरुपी आकाशात सहजतेने उडू शकतो. 🙏🙏*
==================
🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼
e.blogspot.in

कथा क्रमांक १९५

*🌷🌷🌷कथा🌷🌷🌷*
*📚अभ्यास कथा भाग १९५*
〰〰〰〰〰〰〰
*🙏🙏आईवडीलांचा आशीर्वाद*🙏🙏
=================
*जगात आईवडिलच सर्वात श्रेष्ठ असतात.*
*एका पित्याने अापल्या मुलीचे खूप चांगल्या प्रकारे संगोपन केलं. खूप चांगल्या प्रकारे तिचे शिक्षण केलं जेणेकरून मुलीच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यास मदत होईल.*
काही काळानंतर ती मुलगी एक यशस्वी व्यक्ती बनली आणि एका मल्टी नैशनल कंपनीचा सी.ई.ओ. झाली .उच्च पद ,भरपूर वेतन, सगळ्या सुख सुविधा तिला कंपनीकडून प्रदान झाल्या होत्या.
एके दिवशी असाच तिचा विवाह एका चांगल्या मुलाशी झाला तिला मुलंही झाली. तिचा आता आपला सुखी परिवार बनला.
वडील म्हातारे होत चालले होते. एक दिवस वडीलांना आपल्या मुलीला भेटायची इच्छा झाली आणि ते मुलीला भेटायला तिच्या ऑफिस मध्ये गेले. त्यांनी बघितलं की मुलगी एका मोठ्या व शानदार ऑफिसची अधिकारी बनलीय. तिच्या ऑफिसात हजारो कर्मचारी तिच्या अधीन राहून काम करत आहेत.
हे सगळं बघून वडीलांची छाती अभिमानानं फुलली !
ते म्हातारे वडील मुलीच्या कॅबिन मध्ये गेले व तिच्या खांद्यावर हात ठेवून उभे राहीले. आणि प्रेमानं त्यांनी आपल्या मुलीला विचारलं की,
"या जगात सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती कोण आहे "?
मुलगी स्मित हास्य करत आत्मविश्वासाने म्हणाली.
"माझ्याशिवाय कोण असू शकत बाबा ?"
वडीलांना तिच्याकडून ह्या उत्तराची अपेक्षा नव्हती.
त्यांना विश्वास होता की त्यांची मुलगी गर्वाने म्हणेल की,
" बाबा, ह्या जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती तुम्हीच आहात ज्यांनी मला एवढ्या योग्यतेच बनवलं!"
या विचाराने त्यांचे डोळे भरून आले. ते कॅबिनचा दरवाजा ढकलून बाहेर निघायला लागले. पण न राहून त्यांनी परत एकदा वळून मुलीला विचारलं की, परत सांग "या जगात सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती कोण आहे "?
मुलगी ह्या वेळेस म्हणाला की,
"बाबा, तुम्हीच आहात ह्या जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती!"
वडील हे ऐकून आश्चर्यचकित झाले व ते म्हणाले,
"अग,आताच तर तू स्वतःला जगातला सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती म्हणत होतीस आणि आता तू मला शक्तिशाली व्यक्ती म्हणून सांगते  आहेस " ?
मुलगी हसत त्यांना आपल्या समोर बसवत बोलली ,
"बाबा, त्यावेळी तुमचा हात माझ्या खांद्यावर होता.
ज्या मुलीच्या खांद्यावर किंवा डोक्यावर वडीलांचा हात असेल तर ती मुलगी जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तीच असेल ना ? हो की नाही बाबा " !
वडीलांचे डोळे परत भरून आले. त्यांनी आपल्या मुलीला घट्ट छातीशी धरून करकचून मिठी मारली."
खरंच आहे की, ज्याच्या खांद्यावर किंवा डोक्यावर वडीलांचा हात असेल तर ती व्यक्ती जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती असते.

*आपल्या प्रगती व उन्नतिने जेव्हा जग जळत असते.*
*तेव्हा फक्त "आई-वडीलच"आपल्या प्रगतीवर खुश असतात.जोपर्यंत आईवडीलांचा आशीर्वाद आपल्यावर असतो तोपर्यंत या विश्वातील कोणीही आपले वाईट करु शकत नाही.म्हणून प्रत्येकाने आपल्या आईवडीलांची काळजी घ्यावी तनमनाने त्यांची सेवा करावी.*🙏
*-----------------------------------*
*📝 🙏संकलन*🙏