✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 01 मार्च 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~समुहात add होण्यासाठी Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक नागरी संरक्षण दिन_**_ या वर्षातील ६१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९८:दाक्षिणात्य गायिका एम.एस. सुब्बलक्ष्मी यांना ’भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला.**१९९२:बोस्निया व हेर्झेगोविनाला युगोस्लाव्हियापासून स्वातंत्र्य मिळाले.**१९५४:प्रशांत महासागरातील बिकिनी अटोल येथे अमेरिकेने हायड्रोजन बॉम्बची दुसरी चाचणी घेतली. हा स्फोट हिरोशिमाच्या स्फोटापेक्षा ६०० पट जास्त शक्तिशाली होता.* *१९४८:गुवाहाटी उच्च न्यायालयाची स्थापना**१९४७:आंतरराष्ट्रीय नाणे निधिच्या कामकाजास सुरूवात झाली.**१९४६:’बँक ऑफ इंग्लंड’चे राष्ट्रीयीकरण झाले**१९३६:अमेरिकेतील महाकाय ’हूव्हर धरण’ बांधून पूर्ण झाले.**१९२७:रत्नागिरीस गांधीजींनी सावरकरांची भेट घेउन चर्चा केली.**१९०७:’टाटा आयर्न अँड स्टील कंपनी’ची स्थापना**१८७२:’यलो स्टोन नॅशनल पार्क’ या जगातील पहिल्या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झाली**१८०३:ओहायो हे अमेरिकेचे १७ वे राज्य बनले**१५६५:रिओ डी जानिरो शहराची स्थापना झाली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८८:संदीप लहू राठोड -- कवी**१९८४:विशाल भा.मोहोड -- प्रसिद्ध लेखक,कवी* *१९८३:मंगते चुंगनेजंग मेरी कोम-- सुप्रसिद्ध भारतीय बॉक्सिंगपटू* *१९८२:नंदिता पाटकर-- अभिनेत्री* *१९८०:विक्रम सोनबा अडसूळ -- राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक,लेखक**१९८०:शाहिद अफ्रिदी – पाकिस्तानी क्रिकेटपटू**१९७५:मनिषा टीकारामसिंग पाटील -- कवयित्री,लेखिका* *१९६८:चित्रा क्षीरसागर -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका* *१९६३:यशोधन बाळ-- मराठी अभिनेते* *१९५६:डॉ.सुरेश काशिनाथ हावरे -- प्रसिद्ध लेखक,विविध पुरस्कारांनी सन्मानित* *१९५१:अमित खन्ना-- भारतीय चित्रपट निर्माता,दिग्दर्शक,लेखक आणि पत्रकार* *१९५१:नितिशकुमार-- मुख्यमंत्री बिहार**१९५०:डॉ छाया प्रकाश कावळे-- प्रसिद्ध कथाकार**१९४७:शांताराम राजाराम हिवराळे -- प्रसिद्ध कवी,समीक्षक* *१९४७:बशीर मोमीन कवठेकर--- साहित्यिक ज्यांनी मराठी भाषेत लावणी,नाटक,धार्मिक भक्तिगीते,देशभक्तीपर गीते याबरोबरच विविध प्रकारची लोक गीते लिहिली (मृत्यू:१२ नोव्हेंबर २०२१)**१९४६:इलाही जमादार--- सुप्रसिद्ध गझलकार (मृत्यू: ३१ जानेवारी २०२१)**१९४५:शोभा फडणवीस-- माजी मंत्री तथा लेखिका* *१९४३:प्रा.डॉ.गजकुमार बाबुलाल शहा-- इतिहासतज्ज्ञ,संशोधक,साहित्यिक**१९४२:इंद्राणी मुखर्जी-- भारतीय चित्रपट अभिनेत्री* *१९३९:प्रा.विलास वाघ--मराठी लेखक, संपादक,प्रकाशक तसेच सामाजिक कार्यकर्ते (मृत्यू:२५ मार्च २०२१)* *१९३०:राम प्रसाद गोएंका – उद्योगपती (मृत्यू:१४ एप्रिल २०१३)**१९२३:शांताबाई कृष्णाजी कांबळे-- लेखिका (मृत्यू:२५ जानेवारी २०२३)**१९२२:यित्झॅक राबिन – इस्त्रायलचे ५ वे पंतप्रधान,संरक्षणमंत्री आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू:४ नोव्हेंबर १९९५)**१९१४:भानुदास श्रीधर परांजपे- कवी आणि नाटककार**१९१९:मधुकर(मधू) शंकर आपटे-- अभिनेता(मृत्यू:१३ मार्च १९९३)**१९११:जयशंकर दानवे-- नटश्रेष्ठ आणि नाट्य दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध(मृत्यू:३ सप्टेंबर १९८६)**१९०१:बालाजी देवराव पाटील बोरकर-- संस्थापक, सामाजिक कार्यकर्ते(मृत्यू:३० ऑगस्ट १९८०)**१८९६:श्रीधर बळवंत टिळक -- श्रीधरपंत म्हणून ओळखले जाणारे पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि मराठी लेखक(मृत्यू:२५ मे १९२८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१७:तारक मेहता-- गुजराती विनोदी लेखक,नाटककार व सदरलेखक(जन्म: डिसेंबर १९२९)* *२०१४:प्रफुल्ला दिलीप डहाणूकर-- मराठी चित्रकार(जन्म:१ जानेवारी १९३४)**२००३:गौरी देशपांडे – कादंबरीकार, लघुकथालेखिका आणि कवयित्री (जन्म:११ फेब्रुवारी १९४२)**१९९९:दत्तात्रयशास्त्री धुंडिराज तथा ’दत्तमहाराज’ कवीश्वर – वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक,वेदांती पंडित (जन्म:१३ फेब्रुवारी १९१०)**१९९४:मनमोहन देसाई--निर्माते,दिग्दर्शक (जन्म:२६ फेब्रुवारी १९३७)**१९९३:मनोहर शंकर ओक--कवी, कादंबरीकार (जन्म:२७ मे १९३३)**१९८९:वसंतदादा पाटील – महाराष्ट्राचे ५ वे व ९ वे मुख्यमंत्री,सहकारी साखर कारखानदारीचे आधारस्तंभ (जन्म:१३ नोव्हेंबर १९१७)**१९५५:नारायण सदाशिव मराठे तथा ’केवलानंद सरस्वती’ – महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी श्रेष्ठ संस्कृत पंडित, संस्कृतमीमांसाकोशाचे संपादक (जन्म:८ डिसेंबर १८७७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*वसंतराव बंडूजी पाटील*(१३ नोव्हेंबर १९१७ - १ मार्च १९८९) महाराष्ट्र राज्याचे पाचवे मुख्यमंत्री. वसंतदादांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. ते पदमाळे, जिल्हा सांगली येथील शेतकरी कुटुंबातील होते. वडील बंडूजी व आई रुक्मिणीबाई. दादांचे शिक्षण जेमतेम सातवीपर्यंत झाले. १९३७ मध्ये वसंतदादांनी राजकारणात प्रवेश केला. १९४० मध्ये महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रहाचा आदेश दिला. त्यात दादांनी भाग घेतला. त्यांना सहा महिन्यांची शिक्ष झाली. १९४२ च्या ‘छोडो भारत’ आंदोलनातही ते सहभागी झाले. ब्रिटिश सरकारने पकड वॉरंट (अधिपत्र) काढून त्यांना पकडण्यासाठी एक हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. अखेर दादा पकडले गेले; दोन वर्षांची शिक्षा झाली; परंतु त्याच दिवशी ते तुरुंगातून पोलिसांच्या बंदुका घेऊन आपल्या काही सहकाऱ्यांसह पळून गेले. त्यांना पुन्हा पकडण्यात आले आणि एकूण तेरा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. १९४६ मध्ये त्यांची मुदतपूर्व मुक्तता झाली. १९५२ मध्ये ते विधानसभेवर निवडून आले. १९६७ पर्यंत ते आमदार होते. १९४८ मध्ये त्यांनी सांगलीला शेतकरी सहकारी साखर कारखाना काढला. त्यानंतर त्यांनी सहकारी तत्त्वावर सूत गिरण्या आणि तेल गिरण्या उभारल्या.वसंतदादा पाटील हे महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष (१९६५), राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंधाचे संचालक व अध्यक्ष (१९७०-७२) व साखर निर्यात मंडळाचे अध्यक्ष (१९७०-७१) होते. यांशिवाय राज्य सहकारी बँक, राष्ट्रीय मिल मजदूर संघ आदी संस्थांचेही ते अनेक वर्षे अध्यक्ष होते. महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली (१९६७). १९६९ साली काँग्रेसचे विभाजन झाले. त्याच वर्षी डिसेंबरमध्ये मुंबईस काँग्रेसचे अधिवेशन झाले. त्यांनी स्वागताध्यक्ष म्हणून काम केले. दादा १९७१ मध्ये अमेरिका येथे भरलेल्या चौदाव्या आंतरराष्ट्रीय ऊस तज्ञांच्या परिषदेस भारतीय शिष्टमंडळाचे नेते म्हणून हजर राहिले. यापूर्वी तीन वेळा त्यांनी जागतिक प्रवास केला होता. त्या वेळचे मुख्यमंत्री श्री. वसंतराव नाईक यांनी आपल्या मंत्रिमंडळात दादांची पाटबंधारे मंत्री म्हणून नेमणूक केली. ते १९७२ मध्ये विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले. शंकरराव चव्हाणांच्या कारकीर्दीत वर्षभर पाटबंधारे मंत्री होते. पुढे त्यांचा मंत्रिमंडळात अंतर्भाव झाला नाही. त्यानंतर त्यांनी काही दिवस राजकारणातून संन्यास घेतला.महाराष्ट्रात मार्च १९७७ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत ४८ पैकी वीसच काँग्रेस सदस्य निवडून आले. म्हणून त्यांनी पुन्हा राजकारणात प्रवेश केला. १७ एप्रिल १९७७ रोजी दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मार्च १९७८ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर दादांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस व इंदिरा काँग्रेस यांचे संयुक्त मंत्रिमंडळ अधिकारारूढ झाले. तथापि हे संयुक्त मंत्रिमंडळ समाधानकारक कार्य करू शकत नाही, या कारणास्तव अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीने वसंतदादांना मंत्रिमंडळ बरखास्त करण्याचा आदेश दिला. त्यानुसार त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला (१७ जुलै १९७८).श्रीमती शालिनीबाई या त्यांच्या सुविद्य पत्नी सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान स्थापन केले असून या प्रतिष्ठानाद्वारे महाराष्ट्रात, विशेषतः ग्रामीण भागात, सुसज्ज रुग्णालये उभारण्याची योजना आहे. त्यांच्या कार्यास विनम्र अभिवादन.*संकलन : नासा येवतीकर*~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या 7 ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान सूर्योदय योजनेंतर्गत एक कोटी घरांना मिळणार मोफत वीज, खर्च होणार 75 हजार कोटी, सरकारचा मोठा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अर्थव्यवस्था सुस्साट; तिसऱ्या तिमाहीत GDP ८.४ टक्के, विकासाचा दर सर्वांच्या अंदाजापेक्षा अधिक*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *रिलायन्स अन् डिस्ने एकत्र येणार, देशातील सर्वात मोठ्या मनोरंजन कंपनीची कमान नीता अंबानींच्या हाती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *साखर कारखान्यांना मोठा दिलासा; अकरा हजार कोटी कर्जाची पुर्नबांधणी- केंद्राचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *आजपासून शालांत परीक्षेला प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सायकलस्वारी करताना ट्रॅक्सीची धडक, Intel कंपनीचे माजी अधिकारी अवतार सैनी यांचा मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *07 मार्च रोजी धर्मशाळा येथे होणाऱ्या पाचव्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गझल सम्राट ; पंकज उधास आपल्या मलमली आवाजाने गझल गायकीला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारे संगीत रसिकांचे आवडते गझल गायक पंकज उधास यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने संगीत विश्वातील आणखी एक तारा निखळून पडला. पंकज उधास हे भारतातीलच नाही तर जगातील एक प्रमुख गझल गायक म्हणून ओळखले जात होते. १९८६ साली आलेल्या नाम चित्रपटातील त्यांनी गायलेल्या चिठ्ठी आई है.... आई है...या गाण्याने ते घराघरात पोहचले. हे गाणे आजही तितकेच लोकप्रिय आहे. नाम चित्रपट यशस्वी होण्यात या गाण्याचा खूप मोठा वाटा होता. या गाण्यांनंतर त्यांनी हिंदी चित्रपटात अनेक गाणी गायली. घायल, साजन, ये दिल्लगी, फिर तेरी कहाणी याद आई, मोहरा यासारख्या चित्रपटातून त्यांनी गाणी गायली. त्यांनी गायलेले ना कजरे की धार, आज फिर तुमपे प्यार आता है, जिये तो जीये कैसे, और आहिस्ता अशी कितीतरी गाणी लोकप्रिय झाली.व ही सर्व गाणी गाजली ती त्या गाण्यातील अर्थपूर्ण शब्दांनी आणि पंकज उधास यांच्या मधुर आवाजाने. चित्रपटातील त्यांनी गायलेले गाणी लोकप्रिय झाली तरी त्यांची ओळख ही गझल गायक म्हणूनच राहिली. त्यांचे मोठे बंधू मनहर उधास हे देखील प्रख्यात गझल गायक आहेत त्यांनीच पंकज उधास यांना पहिल्यांदा स्टेजवर गझल गाण्याची संधी दिली. १९७१ साली त्यांनी कर्मा या चित्रपटात पहिल्यांदा पार्श्वगायन केले मात्र त्यांची दखल कोणी घेतली नाही त्यामुळे ते कॅनडाला निघून गेले. तिथे त्यांनी छोट्या मोठ्या समारंभात गाण्यास सुरुवात केली. तिथे ते स्टेज शो देखील करू लागले. त्यांचे स्टेज शो ही लोकप्रिय होऊ लागले. भारतात परतल्यावर त्यांनी अनेक स्टेज शो केले मात्र चित्रपटात त्यांना म्हणावी तशी संधी मिळत नव्हती कारण तो जमाना मोहंमद रफी आणि किशोर कुमार यांचा होता. १९७९ साली त्यांना जवाब या चित्रपटातील मितवा रे मितवा... हे गाणे गाण्याची संधी मिळाली या संधीचे त्यांनी सोने केले. हे गाणे लोकप्रिय झाल्यावर त्यांनी गझल क्षेत्रात करियर करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान त्यांनी अनेक गझल गायली. पंकज उधास यांनी एक से बढकर एक गझल गात रसिकांना मंत्रमुग्ध केले. १९८० साली त्यांच्या गाण्याचा पहिला अल्बम आला. त्यानंतर त्यांच्या गाण्यांचा धडाका सुरू झाला. १९८१ साली मुकर्रर, १९८२ साली तरनुम, १९८३ साली महाफिल, १९८५ साली नायाब हे त्यांचे अल्बम आले. या अल्बम मधील सर्व गाणी रसिकांना आवडली. त्यांच्या गझला इतक्या लोकप्रिय झाल्या की रसिकांनी त्यांना गझल सम्राट ही पदवी दिली. सारं काही विसरायला लावणाऱ्या त्यांच्या गझला आजही रसिक गुणगुणताना दिसतात. त्यांनी आपल्या आवाजाने गझल क्षेत्राला आणि गझल गायकीला ऊर्जितावस्था मिळवून दिली. गझल गायकी लोकप्रिय करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. गझल गायन आणि संगीत क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले. त्यांच्या याच योगदानासाठी भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा मानाचा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. त्यांच्या निधनाने संगीत आणि गायन क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. गझल सम्राट पंकज उधास यांना भावपूर्ण श्रद्धांजली!*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*९९२२५४६२९५••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••धनाचा लोभ हा माणुसकीला लागलेला कलंक आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'वाघाची मावशी'* असे कोणत्या प्राण्याला म्हणतात ?२) नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याची बाब भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहे ?३) सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण आढळत असल्यामुळे कोणत्या देशाला 'मधुमेहाची राजधानी' असे म्हटले जाते ?४) एकही वृक्ष नसलेला देश कोणता ?५) भीमा नदीच्या उपनद्या कोणत्या ? *उत्तरे :-* १) मांजर ( 🐈 ) २) मूलभूत कर्तव्ये ३) भारत ४) कतार ५) मुळा, मुठा, घोड, निरा, सिना, इंद्रायणी, कुकडी, कऱ्हा *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 आशा तेलंगे, मुंबई👤 साहेबराव बोने, देगलुर👤 अमोल अलगुडे, उमरगा👤 राहुल मॅडमवार👤 साहेबराव गुंजाळ👤 नरेश सुरकूटलावार👤 संजय रामराव पाटील कदम, धर्माबाद👤 संतोष चिद्रावार👤 प्रभाकर गोरे👤 सौ. मीनल भाऊसाहेब चासकर👤 रुद्र व्यंकटेश पुलकंठवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••उध्दरीले कुळ आपण तरला । तोचि एक झाला त्रेलोक्यात ॥१॥त्रेलोक्यत झाले द्वेतचि निमाले । ऐसे साधियले साधन बरवें ॥२॥बरवें साधन सुखशांती मना । क्रोध नाही जाणा तिळभरी ॥३॥तिळभरी नाही चित्तासि तो मळ । तुका म्हणे जळ गंगेचे ते ॥४॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणसाची ओळख जरी धनसंपत्ती व इतर गोष्टींमुळे होत असेल तरी खरी ओळख त्याच्यात असलेल्या माणुसकी मुळे,सहनशीलतेमुळे आणि खास करून दुसऱ्यांच्या विषयी आपुलकीने विचार करून संकट काळात धावून जाण्याने होत असते. अशा प्रकारची ओळख निर्माण करण्यासाठी पैसे मोजावे लागत नाही तर माणसात माणुसकी असावी लागते. म्हणून व्यर्थ गोष्टींच्या मोहात पडून पश्चाताप करण्यापेक्षा ज्या कार्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्याला समाधान मिळतो तेच कार्य आपण करण्याचा प्रयत्न करावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आयुष्याची खरी किंमत*एका नातवाने आपल्या आजोबांना प्रश्न विचारला आयुष्याची खरी किंमत काय असते हो? आजोबांनी त्याला एक दगड दिला आणि म्हणाले ह्या अगोदर तू ह्या दगडाची खरी किंमत कळावी अशी माझी इच्छा आहे. दगडाची फक्त किंमत काढून ये , विकू नकोस सर्वप्रथम नातवाने एका फळवाल्याला त्या दगडाची किंमत विचारली .तो त्या चकाकणाऱ्या दगडाला बघून म्हणाला -.या दगडाचा मोबदला म्हणून मी तुला एक डझन सफरचंदे देऊ शकतो. नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला, वाटेत त्याला एक भाजीवाला दिसला आणि त्याने त्याला त्या चकाकणाऱ्या दगडाची किंमत विचारली- मी तुम्हाला याच्या बदल्यात एक पूर्ण पोते भरून बटाटे देऊ शकतो. पुन्हा एकदा नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्या बद्दल त्याची माफी मागितली व निघाला. आता त्याला एका सराफाचे दुकान लागले. आत जाऊन त्याने तो चमकणारा दगड सराफाला दाखवून त्याची किंमत विचारली. आपल्या भिंगातून त्या खड्याचे निरीक्षण करताच तो सराफ उत्तरला -या खड्यासाठी मी तुम्हाला दश लक्ष रुपये देऊ शकतो. नातवंडाला फार आश्चर्य वाटले पण नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्या बद्दल त्याची माफी मागितली व निघाला. थोडे पुढे आल्यावर त्याला अतिशय दुर्मिळ रत्न आणि मणी विकणारे दुकान दिसले. त्याने तो दगड तिथल्या रत्नपारख्यास दाखवला. तो रत्नपारखी ह्या विषयात अतिशय निष्णात होता.त्याने अलगद तो दगड एका मखमली कापडावर ठेवला. त्या दगडाच्या अवती भोवती प्रदक्षिणा घालत तो म्हणाला -अहो, एवढा अमूल्य दुर्मिळ अनघड हिरा तुम्ही कुठून बरे आणला? मी माझे अख्खे दुकान जरी विकले तरी सुध्दा ह्या हिऱ्याची किंमत तुम्हाला देऊ नाही शकणार, आता मात्र नातू अतिशय चकित झाला आणि गोंधळलेल्या मनःस्तिथीत तो आजोबांकडे परतला, त्याचे सर्व अनुभव ऐकून आजोबा म्हणाले - मला वाटते फळवाला, भाजीवाला, सराफ आणि रत्नपारखी ह्यांच्या उत्तरावरून तुला आयुष्याच्या मोलाविषयी कळले असेल. तुम्ही जरी अतिशय दुर्मिळ अमूल्य हिरा असलात तरी सुध्दा लोक तुमची किंमत त्यांच्या सीमित समजुती, आकलनशक्ती,हेतू आणि कुवती नुसारच करणार. त्यामुळे आयुष्यात स्वतःची किंमत जाणून घेणे सर्वात महत्वाचे असते. स्वतःचा आदर करा.इतरांबरोबर कोण्यात्याही निरर्थक तुलने मध्ये गुंतू नका, कारण तुम्ही या विश्वातील एक अभिनव आणि अद्वितीय निर्मिती आहेत.*तात्पर्य - तुमच्या सारखे फक्त तुम्हीच आहात. हीच तुमच्या आयुष्याची खरी किंमत आहे. आपल्या सर्वांनाही स्वतःची खरी किंमत कळून स्वतःवर प्रेम करायला शिकू.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 29 फेब्रुवारी 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2018/03/01-26.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_२९ फेब्रुवारी लीप दिवस (लीप वर्ष)_* *_ या वर्षातील ६० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_पृथ्वीला सूर्याची प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी साधारणपणे३६५ दिवस लागतात. खगोलशास्त्रीय आकडेवारीनुसार नेमका कालावधी३६५.२४२ दिवस इतका असतो. दरवर्षी०.२४२दिवसाचा वाढीव कालावधी शिल्लक राहतो. चार वर्षांमधील हा वाढीव कालावधी एकत्रित करुन त्याचा एक दिवस पूर्ण केला जातो.फेब्रुवारी महिन्यात २८ दिवस असल्यामुळे त्याला जोडून ‘लीप दिवस’ साजरा केला जातो._**२०१२:६३४ मीटर उंचीच्या टोकियो स्काय ट्री या जगातील सर्वात उंच मनोऱ्याचे (इमारत नव्हे) बांधकाम पूर्ण झाले.**२००८:अर्थसंकल्पात चार कोटी शेतकऱ्यांसाठी साठ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी**२०००:शशिकिरण भारताचा ५ वा ग्रँडमास्टर बनला.**१९९६:क्रिकेट जगतात नवखा आणि दुबळा संघ म्हणून ओळखल्या जाणार्या केनियाच्या संघाने विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत दोन वेळच्या जागतिक विजेत्या वेस्ट इंडीज संघाला ७३ धावांनी पराभूत करून ऐतिहासिक विजय नोंदविला.**१७७६:इंग्रज आणि मराठे यांच्यात प्रसिद्ध पुरंदरचा तह* *_जन्मदिवस/ वाढदिवस/जयंती:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८४:अॅडम सिंक्लेअर-- हॉकी खेळाडू**१९७६:सुधाकर तेलंग -- प्रसिद्ध कवी तथा शिक्षण उपसंचालक* *१९५६:महमूद कादिर याकुब रखांडी -- लेखक**१९५२:सुहास पटवर्धन-- लेखक**१९३०:प्रा.डॉ.वसंत दामोदर कुलकर्णी -- लेखक* *१९४०:शरदचंद्र कोपर्डेकर - लेखक संपादक* *१९३६:विष्णू जयंत बोरकर -- कादंबरीकार, कथाकार* *१९०४:वत्सलाबाई आंबेगावकर -- बालसाहित्यिक,लेखिका* *१९०४:रुक्मिणीदेवी अरुंडेल --भरतनाट्यम नर्तिका (मृत्यू:२४ फेब्रुवारी १९८६)**१८९६:मोरारजी देसाई -- भारतरत्न,भारताचे ४ थे पंतप्रधान(मृत्यू:१० एप्रिल १९९५)**१८२८:नारायण दाजी लाड: रसायनशास्त्र सचित्र व औषधविद्या हे ग्रंथ विलक्षण गाजले* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••*१९५६:एल्पिडियो क्विरिनो-- फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष (जन्म:१६ नोव्हेंबर १८९०)**१९४०:एडवर्ड फ्रेडरिक-- इंग्लिश लेखक (जन्म:२४ फेब्रुवारी १९४७)**१९२०:नारायण तथा बापूराव बाळकृष्ण लेले -- ज्येष्ठ पत्रकार* *१५९२:अलेस्सांद्रो स्ट्रिजियो-- इटालियन संगीतकार*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बालपणीचे संस्कार*एकूण 27 भाग वाचण्यासाठी..... वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळ दौऱ्यावर, बचत गटाच्या अडीच लाख महिलांचा मेळावा, राज्यातल्या कोट्यवधींच्या विकासकामांचं उद्घाटन आणि लोकार्पण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *निलेश राणेंच्या मालमत्तेवर पुणे महापालिकेची कारवाई, पावणे चार कोटींची थकबाकी असल्याने कारवाईचा बडगा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *तलाठी भरती प्रक्रियेबाबत केलेल्या खोट्या आरोपानंतर रोहित पवारांवर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कार्यवाही सुरु; महसूलमंत्री विखेंची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बारावीची परीक्षा असल्याने 3 मार्चपर्यंतचे आंदोलन स्थगित, फक्त धरणे आंदोलन सुरू राहणार, मनोज जरांगेंची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *जहांगीर आर्ट गॅलरीत २८ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत प्रदर्शन, राज्यपालांच्या हस्ते ४७ राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांचा सत्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अशोक सराफ आणि रुतुजा बागवे यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *यशस्वी जैस्वालची गगनभरारी ! ICC Ranking मध्ये घेतली हनुमान उडी, विराटच्या जवळ पोहचला !*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *गरम पाण्याचे झरे* 📙हिमालयात प्रवासाला जाणारे परतल्यावर नेहमीच एक आश्चर्याचा किस्सा सांगतात. गंगोत्रीच्या वाटेवर वाटेत काही कुंडे लागतात. कुडकुडणारी थंडी, दूरवर डोंगरमाथ्यावर सफेद बर्फाचे थर आणि या कुंडातून मात्र पाण्यातून चक्क वाफा निघत असतात. हात बुडवला तर चटका बसतो. एवढेच नवे अनेक जण जवळचे तांदूळ त्या पाण्यात काहीवेळा कापडी पुरचुंडी बांधून धरतात व आयता शिजलेला भात खातात. हे पाणी काढून मनसोक्त आंघोळ करण्याचा मोहही कोणी आवरून धरत नाही. असाच पण जरा वेगळा अनुभव वज्रेश्वरीला महाराष्ट्रात येतो. पण येथील झऱ्यांचे पाणी गंधक मिश्रित उग्र वासाचे आहे. येथील उष्ण पाण्यात अंघोळ करून निसर्गोपचार करून घेणाऱ्यांचीही कायम गर्दी उसळलेली असते. जगात असे गरम पाण्याचे कित्येक झरे आहेत. तसेच फक्त वाफेचेही झरे आहेत. वाफेच्या झर्यातून फक्त जोरात वाफ उसळून एखाद्या प्रेशरकुकरप्रमाणे तेथे शिट्टीचा आवाजही येत राहतो. या सगळ्या प्रकाराचे मूळ भूगर्भात खोलवर घडणाऱ्या घडामोडीत आहे. सुमारे तीस एक किलोमीटर खोलीवर तप्त मध्यावरणाचा पाण्याच्या वाहत्या साठ्याशी संबंध येतो. तिथे वाफ कोंडू लागते. या वाफेच्या दाबाने जमिनीतील खडकातील काही भेगांतून मार्ग काढला जाऊ शकतो. त्यातूनच हे झरे निर्माण होतात. काही ठिकाणी ज्वालामुखीच्या मुखापासून काही ठराविक अंतरावर प्रथम वाफेचे व नंतर गरम पाण्याचे झरे सलगपणे आढळतात. पण अनेक ठिकाणी ज्वालामुखीचा अलीकडच्या ज्ञात काळात कधीच संबंध आलेला नसतो. हेही लक्षात घ्यायला लागेल. यातही एक मोठा फरक आहे. वाफेचे झरे मधूनमधून नाहीसे होतात, पण गरम पाण्याचे झरे मात्र सलगपणे वर्षानुवर्षे उकळताना दिसतात. काही झर्यांत गंधकाचा अंश सापडतो. ते नक्कीच ज्वालामुखीच्या उगमाशी संबंधित असावेत असा संशय घ्यायला जागा आहे.पृथ्वीचा गाभा अत्यंत गरम आहे मध्यावरणही अतितप्त आहे. पण बाह्यावरणाचा काही भाग बऱ्याच ठिकाणी भरपूर गरम आहे असेही लक्षात आले आहे. आईसलँड, न्यूझीलंड येथील काही भागात जेमतेम एक ते तीन किलोमीटर अंतर खोलवर बोअरिंगचे छिद्र पाडले असता भूगर्भातील गरम पाणी व वाफ मिळवता येते असा अनुभव आहे. जरी एवढे खोल छिद्र पाडणे अत्यंत महागडे असले तरी यातून मिळणारी ऊर्जा ही अनेक वर्षे पुरणार असल्याने हा खर्च परवडतो. हे गरम पाणी वा वाफ वापरून घरे उष्ण ठेवण्याचा वा विद्युतनिर्मिती उद्योग यातूनच केला जातो. येथेही गमतीचा भाग कसा आहे बघा. आइसलँड व न्यूझीलंडसारख्या थंड प्रदेशातही निसर्गाने ही सोय करून ठेवली आहे.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••धनाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती श्रेष्ठ.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'मेटा'चे संस्थापक कोण आहेत ?२) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 'बोधिसत्त्व' ही उपाधी कोठे प्रदान करण्यात आली ?३) अमेरिकेच्या पहिल्या व्यावसायिक अवकाश यानाचे नाव काय आहे ?४) एकही नदी नसलेला देश कोणता ?५) आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहानंतर अनेक तरुण - तरुणींना सुरक्षित निवारा देण्याच्या उद्देशाने राष्ट्रातील पहिले आश्रयस्थळ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमार्फत कोणत्या ठिकाणी उभारण्यात आले आहे ? *उत्तरे :-* १) मार्क झुकरबर्ग २) काठमांडू, नेपाळ ३) ओडिसिस ४) सऊदी अरब ५) वाई*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 आनंद बालाजी आनेमवाड, तंत्रस्नेही शिक्षक👤 सुरज आहेर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अहर्निश सदा परमार्थ करावा । पाय न ठेवावा आडमार्गी ॥१॥आडमार्गी कोणी जन ते जातील । त्यातुनि काढील तोचि ज्ञानी ॥२॥तोचि ज्ञानी खरा तारी दुजीयासी । वेळोवेळा त्यासी शरण जावे ॥३॥आपण तरेल नव्हे ते नवल । कुळे उध्दरील सर्वांची तो ॥४॥शरण गेलियाने काय होते फळ । तुका म्हणे कुळ उध्दरीले ॥५॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जेव्हा आपली परिस्थिती चांगल्याने सुधारते त्यावेळी लाखो रूपयाच्या घरात जुन्या सामानाची आपल्याला अडचण होत असते. वेळ आल्यावर त्याला बाहेर सुद्धा ठेवल्या जाते.तसंच परखडपणे बोलणाऱ्या किंवा विचार मांडणाऱ्याला बाजूला सारण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केले जाते. जेव्हा, गुलामगिरी पत्करली जाते व बुध्दी गहाण ठेवली जाते त्यावेळपासून जीवनाची दिशाच बदलून जाते. भलेही जुने सामान फेकल्याने आपली अडचण दूर होत असेल पण, स्पष्ट व सत्य बोलणाऱ्याला कितीही दूर सारण्याचा प्रयत्न जरी केले तरी काहीच फायदा होत नाही कारण तो, स्वयंप्रकाशित असतो. म्हणून सत्य नेमकं काय असते जाणून घेण्याचा सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे,असा सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्याने जीवनाचे सार्थक होण्यास मदत होईल. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एका अरण्याच्या मध्यभागी एक मोठे सागवानाचे झाड उंच आणि सरळ वाढले होते. ते नेहमी आपल्या मोठेपणाच्या गर्वाने आपल्या खाली वाढलेल्या लहान झाडांचा धिक्कार करत असे. त्या झाडांमध्ये एक काटेझाड होते. सागवानाच्या झाडाचा गर्विष्ठ स्वभाव न आवडल्याने त्याने एकदा त्याला स्पष्ट विचारले, 'बाबा रे, तू एवढा गर्व कशासाठी करतोस ?' त्यावर तो म्हणाला, 'मी सर्व झाडांमध्ये श्रेष्ठ शोभिवंत आहे. माझ्या फांद्या ढगांना भिडल्या आहेत. त्या सतत हिरव्या टवटवीत असतात व तुम्ही अगदीच क्षुद्र आहात, जो येईल तो तुम्हाला पायाखाली तुडवतो. माझ्या पानांवरून जे पावसाचे पाणी वाहते त्यात तुम्ही बुडून जाता.' हे ऐकून काटेझाड म्हणाले, 'ते सगळे काही असू देत, पण मी तुला एकच गोष्ट सांगतो, ती लक्षात ठेव. जेव्हा लाकूडतोड्या तुझ्या बुंध्यावर कुर्हाडीचा घाव घालायला येईल, त्या वेळी आमच्यातल्या अगदी हलक्या झाडांच्या स्थितीशीही तू आपल्या स्थितीची अदलाबदल करायला तयार होशील.*तात्पर्य - मोठेपणाच्या मागे अनेक दुःखे असतात, ती लहानपणा मागे नसतात, तेव्हा त्यांचा धिक्कार करू नये.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28 फेब्रुवारी 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://m.facebook.com/story.php?story_fbid=3514819611978121&id=100003503492582&mibextid=Nif5oz/2018/02/03.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_राष्ट्रीय विज्ञान दिन_**_ या वर्षातील ५९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००२:महाराष्ट्र शासनाचे महात्मा फुले जलभूमी संधारण अभियान सुरू* *१९३५:वॅलेस कॅरोथर्स या शास्त्रज्ञाने नायलॉनचा शोध लावला.**_१९२८:डॉ.सी.व्ही.रामन यांनी भौतिकशास्त्रातील एका परिणामाचा शोध लावला.त्याला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले. यामुळे हा दिवस 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणुन साजरा करण्यात येतो_**१९२२:इजिप्तला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१८४९:अमेरिकेच्या पूर्व आणि पश्चिम किनार्यांमध्ये नियमित जहाजसेवा सुरू झाली. न्यूयॉर्कहुन निघालेले एस.एस.कॅलिफोर्निया हे जहाज ४ महिने व २१ दिवसांनी सॅनफ्रान्सिस्कोला पोहोचले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१:प्रा.डॉ.दिपक सुभाषराव सूर्यवंशी -- लेखक* *१९७५:डॉ.बलवंत जेऊरकर-- साहित्य अकॅडेमी पुरस्कारप्राप्त अनुवादक,वक्ते, लेखक**१९७५:रत्ना यशवंत मनवरे-- कवयित्री* *१९६९:निर्मला सोनी -- कवयित्री* *१९६८:वर्षा उसगांवकर-- मराठी,हिंदी चित्रपटातील अभिनेत्री**१९६५:सिद्धार्थ कुलकर्णी-- कवी,लेखक* *१९६४:डॉ.अशोक गोविंदराव काळे -- प्रसिद्ध लेखक* *१९६२:अशोक सदाशिव चोपडे-- लेखक, संपादक**१९६०:प्रमोद जोशी -- कवी,लेखक* *१९५१:करसन घावरी – भारतीय क्रिकेटपटू**१९४८:विदुषी पद्मा तळवलकर – ग्वाल्हेर/किराणा/जयपूर घराण्याच्या ख्याल गायिका**१९४७:दिग्विजय सिंग--- मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री**१९४४:रविन्द्र जैन – संगीतकार व गीतकार(मृत्यू:९ ऑक्टोबर, २०१५)**१९४४:प्रा.सुरेश द्वादशीवार-- मराठी पत्रकार आणि प्रसिद्ध कादंबरीकार**१९४२:प्रा.डॉ.कुमुद दिनकर गोसावी-- प्रसिद्ध लेखिका* *१९४२:ब्रायन जोन्स – ‘द रोलिंग स्टोन्स‘चे संस्थापक,गिटार,हार्मोनिका आणि पियानो वादक (मृत्यू:३ जुलै १९६९)**१९३६:कुसुम रामचंद्र अभ्यंकर-- कादंबरीकार(मृत्यू:५ एप्रिल १९८४)**१९३४:जेनिफर केंडल-- इंग्लिश अभिनेत्री आणि पृथ्वी थिएटरची संस्थापक(मृत्यू:७ सप्टेंबर १९८४)**१९२७:कृष्णकांत – भारताचे १० वे उपराष्ट्रपती (मृत्यू:२७ जुलै २००२)**१९२४:वसंत वैकुंठ कामत --- नाटककार (मृत्यू:३ जुलै १९९४)**१९१४:त्रिंबक कृष्णराव टोपे -- चरित्रकार, लेखक (मृत्यू:२० फेब्रुवारी १९९४)* *१९१३:पंडित नरेंद्र शर्मा-- हिंदी भाषेतील भारतीय लेखक,कवी आणि गीतकार(मृत्यू:१२ फेब्रुवारी १९८९)**१९०९:जयंत देसाई (जयंतीलाल झिनाभाई देसाई)-- भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता(मृत्यू:१९ एप्रिल १९७६)**१९०२:त्र्यंबक विष्णू पर्वते -- चरित्रकार,कवी, पत्रकार* *१९०१:लिनस कार्ल पॉलिंग – रसायनशास्त्रज्ञ आणि अण्वस्त्रांच्या विरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते,नोबेल पारितोषिकाचे दोनदा विजेते [१९५४ - रसायनशास्त्र, १९६२ - शांतता] (मृत्यू:१९ ऑगस्ट १९९४)**१९००:मोरेश्वर दिनकर जोशी--शिक्षक, संस्थापक,संपादक(मृत्यू:३फेब्रुवारी १९७९)**१८९७:डॉ.शंकर दामोदर पेंडसे – मराठी ग्रंथकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक. पंढरपूर येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे (१९५५) ते अध्यक्ष होते. (मृत्यू:२३ ऑगस्ट १९७४)**१८९६:केशव वामन साठे -- नाट्यसमीक्षक (मृत्यू:८आगस्ट १९७५)* *१८७३:सर जॉन सायमन – स्वातंत्र्यपूर्व काळात भारताला राजकीय सुधारणा देण्यासाठी नेमलेल्या ’सायमन कमिशन’ या आयोगाचे अध्यक्ष.क्लेमंट अॅटली हे देखील या आयोगाचे एक सदस्य होते, जे पुढे इंग्लंडचे पंतप्रधान झाले. (मृत्यू:११ जानेवारी १९५४)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९५:कॄष्ण गंगाधर दिक्षीत ऊर्फ कवी संजीव –’सासरमाहेर’,’भाऊबीज’,’चाळ माझ्या पायांत’ या चित्रपटांचे त्यांनी कथा,संवाद व गीतलेखन केले होते.(जन्म:१२ एप्रिल १९१४)**१९८६:स्वीडनचे २६ वे पंतप्रधान ओलोफ पाल्मे यांची हत्या (जन्म:३० जानेवारी १९२७)**१९६६:उदयशंकर भट्ट – आधुनिक हिंदी नाटककार,एकांकिकाकार,कवी आणि कादंबरीकार.(जन्म:३ ऑगस्ट १८९८)**१९६३:डॉ.राजेन्द्र प्रसाद – भारताचे पहिले राष्ट्रपती (जन्म:३ डिसेंबर १८८४)**१९३६:कमला नेहरू – पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी (जन्म:१ ऑगस्ट १८९९)**१९२६:स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद – लहानपणीच तापामुळे कमरेखालील सर्व अंग लुळे पडून त्यांना कायमचे अपंगत्व आले,त्यामुळे त्यांचे शिक्षणही होऊ शकले नाही.कविता मात्र बालपणापासून करीत होते. स्वातंत्रवीर सावरकरांशी निकटचे संबंध आल्यानंतर त्यांच्या कवितेला उत्कट राष्ट्रभक्तीची आणि तीव्र स्वातंत्र्याकांक्षेची दिशा गवसली. (जन्म:९ फेब्रुवारी १८७४)* *_राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा_~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रासंगिक लेख*दुर्लक्षित विज्ञान विषय*..... डॉक्टर वा इंजिनिअर व्हायचे असेल तर विज्ञान शाखा निवडावी लागते त्याशिवाय डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होत नाहीत. तसं पाहिलं तर सर्वानाच विज्ञान या विषयाची आवड असतेच अशातला ही भाग नाही मात्र आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे या हेतूने अनेक विद्यार्थी दहावीनंतर अकरावी-बारावीसाठी विज्ञान निवड करतात. त्यातल्या त्यात या विज्ञान शाखेची शिकवण्याची भाषा ही इंग्रजी असल्याने ग्रामीण भागातील अनेक मुलांना अडचणी ला तोंड द्यावे लागत आहे, हे ही विशेष नोंद घेण्यासारखी आहे........... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा:सातारा जिल्ह्यातील कोयना येथे MTDC तून जागतिक दर्जाचे जल पर्यटन विकसित करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. तर विदर्भातील दुष्काळ दूर करण्यासाठी 2 हजार कोटींचा निधी, अर्थसंकल्पात अजित पवारांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मराठा आरक्षण विधेयकावर राज्यपालांची सही:कायद्यात रुपांतर, राजपत्रही जारी; 26 फेब्रुवारीपासून आता 10% आरक्षण झाले लागू*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध होणार:तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरणामुळे औंढा नागनाथच्या विकासाला चालना मिळणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *२८ फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण देशभर पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा होणार ! केंद्रशासनाचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *नामिबियाच्या जॉन निकोलने लॉफ्टी ईटन टी-२० क्रिकेट स्पर्धेत फक्त ३३ चेंडूत ११ चौकार आणि ८ षटकारांसह सर्वात वेगवान शतकाचा केला विक्रम*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••👨🏼⚕ *स्टेथोस्कोपमुळे डॉक्टरांना काय समजते ?* 👨🏼⚕ **************************स्टेथोस्कोप नसलेल्या डॉक्टरची कल्पनाही आपण करू शकत नाही. किंबहुना एखाद्या डॉक्टराने रुग्णाची तपासणी करताना स्टेथोस्कोप वापरला नाही तर रुग्णाच्या कपाळावर नक्कीच आठ्या पडतात व "काहीच तर तपासले नाही" असे उद्गारही तो काढतो. याचाच गंमतशीर प्रकार खेड्यात बघायला मिळतो. गुडघा दुखला तर गुडघ्यालाही स्टेथोस्कोप लावण्याची बिकट अवस्था डॉक्टरवर येऊ शकते वा क्वचित व्यवसायाच्या दृष्टीनेही तो तसे मुद्दाम करतो. या स्टेथोस्कोपमुळे डॉक्टरांना नेमके काय कळते, असा प्रश्न अनेकदा तुम्हाला पडला असेल. स्टेथोस्कोपमुळे डॉक्टरांना खूप काही कळते, हे जरी खरे असले तरी सगळेच काही कळते असे नाही.स्टेथोस्कोपचा छातीला लावण्याचा भाग, नळ्या व कानात ठेवायचे प्लग्ज असे तीन भाग पाडता येतील. छातीला लावण्याच्या भागास धातूची एक उघडी चपटी डबी व त्यावर एक पातळसा पडदा बसवलेला असतो. हा पातळ पडदा आवाजाची तीव्रता अनेक पटींनी वाढतो व त्यामुळे शरीरात निर्माण होणारे आवाज डॉक्टरांना ऐकू येतात. हृदय आकुंचन प्रसरण पावत असताना येणारे हृदयाचे ठोके, श्वास घेताना व सोडताना येणाऱ्या श्वसनाचे आवाज स्टेथोस्कोपच्या सहाय्याने ऐकता येतात. त्यांच्याच झालेल्या बदलामुळे हृदयाच्या झडपांचे आजार, फुप्फुसाचा न्युमोनिया, क्षयरोग, दमा अशा आजारांचे निदान करता येते. याखेरीज पोटाला स्टेथोस्कोप लावल्यास आतड्यांच्या आकुंचन प्रसरणामुळे येणारे आवाज ऐकता येतात. या आवाजामुळे आतडय़ांत अडथळा (obstruction) निर्माण झाला असल्यास त्याचे निदान होऊ शकते. गर्भवती स्त्रीच्या पोटावर स्टेथोस्कोप ठेवून तिच्या गर्भाशयातील बाळाच्या हृदयाचे ठोकेही मोजता येतात. मूल जिवंत आहे वा नाही, त्याला पुरेसा रक्तपुरवठा होतोय वा नाही हेही स्टेथोस्कोप ने कळू शकते. यावरून लक्षात येईल की स्टेथोस्कोपने अनेक रोगांचे निदान करता येते; पण डोके दुखण्यास डोक्याला, गुडघा दुखल्यास गुडघ्याला वा मान लचकल्यास मानेला स्टेथोस्कोप लावून काहीच उपयोग होणार नाही !*डॉ. जगन्नाथ दीक्षित**डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन०२० ६५२६२९५०👆🏼*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••यशस्वी होण्यासाठी कार्यमग्नता ही मनुष्याच्या जीवनाची एक अटळ अशी अवस्था असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *चिपको आंदोलन* कशाशी संबंधित आहे ?२) भारताबाहेरील किती व्यक्तींना 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ?३) पृथ्वीच्या अंतर्भागातील तापमान प्रत्येक ३२ मीटरला किती अंश सेल्सिअसने वाढते ?४) मराठा समाजाला किती आरक्षण देण्यासंबंधीचे विधेयक राज्य विधिमंडळात एकमताने संमत करण्यात आले ?५) महाबलीपुरमची स्थापना कोणी केली ? *उत्तरे :-* १) वृक्षतोड २) दोन - खान अब्दुल गफार खान - १९८७, नेल्सन मंडेला - १९९० ३) १° से. ४) १० टक्के ५) पल्लव*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 इंजि. साईनाथ सुरेश येवतीकर विजय नगर, नांदेड👤 राजेश्वर भंडारे, सहशिक्षक, धर्माबाद👤 आनंद आनेमवाड, लोकमत पुरस्कार प्राप्त शिक्षक👤 मारुती पाटील👤 प्रशांत चिखलीकर, सहशिक्षक, लातूर👤 शंकर गर्दसवार👤 श्रीकांत आदमवाड, सहशिक्षक👤 निर्मला सोनी, साहित्यिक, अमरावती👤 मुरलीधर राजूरकर, सहशिक्षक👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जन्माचें ते मूळ पाहिले शोधून । दु:खासी कारण जन्म घ्यावा ॥१॥पापपुण्य करुनि जन्मा येतो प्राणी । नरदेहा येवूनी हानि केली ॥२॥रजतमसत्व आहे ज्याचे अंगी । याची गुणी जग वाया गले ॥३॥तम म्हणजे काय नरकचि केवळ । रज तो सबळ मायाजाळ ॥४॥तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य । करावा परमार्थ अहर्निशी ॥५॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणूस जो पर्यंत जिवंत आहे तोपर्यंत काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, तिरस्कार, अभिमान, स्वार्थ आणि अशा बऱ्याच व्यर्थ भूतांच्या आधीन होऊन जगत असतो. जसं तोडांला आलं तसंच बोलून मोकळा होऊन जातो. एकाद्या व्यक्तीविषयी कितीही कपटकारस्थान रचण्याचा प्रयत्न केला तरी ते फक्त जिवंत असेपर्यंतच मर्यादित असते.बाकी एकदा ती,व्यक्ती निघून गेली की, मात्र त्या सर्व व्यर्थ भूतांना काहीही अर्थ नसतो. शेवटी वैऱ्याच्या सुद्धा डोळ्यात अश्रू येत असतात. म्हणून माणसासारखेच जगण्याचा प्रयत्न करावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *संगत*एक गोसावी रानातून आपल्या गुहेकडे चालला होता. वाटेत त्याला एक अस्वल कण्हताना दिसले. गोसावी त्याच्या जवळ गेला, त्याने पाहिले, अस्वलाच्या पायात काटा रुतला होता. त्याने तो काढला तेव्हा अस्वल म्हणाले, "महाराज मला वेदनेतून मुक्त करून माझ्यावर फारच उपकार केलेत. मला त्याची परतफेड म्हणून तुमच्याबरोबर राहून तुमच्या सेवेची संधी द्या. गोसावी म्हणाला, "अरे मी काही उपकार केले नाहीत, माझा धर्मच आहे तो. तरीही अस्वल आपला हट्ट सोडेना. शेवटी गोसावी त्याला आपल्याबरोबर गुहेत घेऊन गेला. गोसावी विश्रांतीसाठी झोपला तेव्हा त्याच्या तोंडावर माशा बसत होत्या. गोसाव्याची सेवा करावी म्हणून ते अस्वल या माशांना मारू लागले, हाकलू लागले. पण एक धटींगण माशी गोसाव्याच्या नाकावर पुन्हा पुन्हा बसत होती. त्या माशीचा राग येऊन अस्वलाने आपला पंजा माशीला एवढ्या जोराने मारला की माशीचा चेंदामेंदा झाला, पण गोसाव्याचे नाकही तुटले व त्याचा चेहरा विद्रूप झाला!तात्पर्य : शहाण्याचे सेवक व्हावे, पण मूर्खाचे मालक होऊ नये. काही वेळा चांगल्या संगतीचा वेगळाच परिणाम होतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 27 फेब्रुवारी 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2021/02/marathi-bhashaa-din.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_मराठी भाषा गौरव दिवस_**_ या वर्षातील ५८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००१:जमिनीवरून आकाशातील अनेक लक्ष्यांवर मारा करू शकणार्या ’आकाश’ या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चंडीपूर तळावर यशस्वी चाचणी**१९९९:पंधरा वर्षे सुरू असलेली लष्करी राजवट संपुष्टात येऊन नायजेरियात अध्यक्षीय निवडणूक**१९५१:अमेरिकेच्या राज्यघटनेत २१ वा बदल करण्य़ात आला ज्यायोगे एका व्यक्तिच्या राष्ट्राध्यक्षपदाचा जास्तीत जास्त कालावधी ८ वर्षे असा करण्यात आला.**१९४५:सोलापूर जिल्ह्यातील भंडारकवडे येथे साने गुरुजी वाचनालय सुरू* *१९००:ब्रिटन मधे मजूर पक्षाची (Labour Party) ची स्थापना**१८४४:डॉमिनिकन रिपब्लिकला (हैतीपासुन) स्वातंत्र्य मिळाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८६:संदीप सिंग-- प्रसिद्ध हॉकी खेळाडू* *१९८०:प्रा.डॉ.महेश बापुरावजी जोगी -- लेखक* *१९६७:प्रा.शुभांगी विकास रथकंठीवार -- कवयित्री,लेखिका* *१९६४:डॉ.सुभाष हरिभाऊ कटकदौंड-- प्रसिद्ध कवी,गझलकार,लेखक* *१९६१:रुजारिओ पास्कल पिंटो -- कवी, लेखक* *१९५७:नारायण जाधव -- लेखक,दिग्दर्शक, ज्येष्ठ रंगकर्मी* *१९५६:शिवाजी तांबे -- लेखक,विचारवंत तथा निवृत्त शिक्षण संचालक* *१९५२:प्रकाश झा-- भारतीय चित्रपट निर्माता, अभिनेता,दिग्दर्शक आणि पटकथा लेखक**१९४६:मारोती तुकाराम खिरटकर -- लेखक* *१९४३:बुकनाकेरे सिद्धलिंगप्पा येडियुरप्पा-- कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री* *१९४१:डॉ.ऊषा अरविंद गडकरी-- कवयित्री, लेखिका* *१९४१:श्याम मनोहर आफळे-- मराठी कथा-कादंबरीकार व नाटककार**१९३४:सुरेश दामोदर जोशी-- क्यूरेटर, लेखक(मृत्यू:१६ ऑक्टोबर २०१२)**१९३४:चंद्रशेखर व-हाडपांडे-- संतकवी,लोकशिक्षक,नाट्यलेखक (मृत्यू:२०१५)**१९३२:एलिझाबेथ टेलर – ब्रिटिश-अमेरिकन अभिनेत्री (मृत्यू:२३ मार्च २०११)**१९२६:ज्योत्स्ना देवधर – मराठी व हिन्दी लेखिका (मृत्यू:१७ जानेवारी २०१३)**१९२१:आचार्य पार्वती कुमार(पार्वतीकुमार)-- भारतीय नृत्य दिग्दर्शक,नृत्य गुरु (मृत्यू:२९ नोव्हेंबर २०१२)**_१९१२:विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ ’कुसुमाग्रज’ – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक,कवी व नाटककार (मृत्यू: १० मार्च १९९९)_**१८९६:मधुकर गंगाधर पेडणेकर(पी.मधुकर) -- हार्मोनिअम वादक,संगीतकार(मृत्यू:२० जुलै १९६७)**१८९४:कार्ल श्मिट – जर्मन रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू:१३ जून १८२२)**१८६०:वैजनाथ काशीनाथ राजवाडे-- वाग्वैद्य, निरुक्त अभ्यासक,व्युत्पत्तिशास्त्रज्ञ(मृत्यु:१७ डिसेंबर १९४४)**१८०७:एच.डब्ल्यू.लाँगफेलो – अमेरिकन नाटककार व कवी (मृत्यू: २४ मार्च १८८२)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९७:श्यामलाल बाबू राय ऊर्फ ’इंदीवर’ – गीतकार (जन्म:१९२४)**१९९१:प्रा.डॉ.रुपराव पांडुरंग पाजणकर-- लेखक,संपादक,समीक्षक (जन्म:१९ जुलै १९३०)**१९५६:गणेश वासुदेव मावळणकर-- लोकसभेचे पहिले अध्यक्ष(जन्म:१५ मे १९५२)**१९३६:इव्हान पेट्रोव्हिच पाव्हलॉव्ह – चयापचय प्रक्रियेविषयी महत्त्वाचे संशोधन करणारे नोबेल पारितोषिक विजेते (१९०४) (जन्म:२६ सप्टेंबर १८४९)**१९३१:क्रांतिकारक चंदशेखर आझाद-- काकोरी कट व लाहोर कट यातील पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू (जन्म:२३ जुलै १९०६)**१९८७:अदि मर्झबान – अभिनेते,दिग्दर्शक, नाटककार व संपादक* *१८९४:कार्ल श्मिट – जर्मन रसायनशास्त्रज्ञ (जन्म:१३ जून १८२२)**१७१२:बहादूरशाह जफर (पहिला) – मुघल सम्राट (जन्म:१४ आक्टोबर १६४३)* 💐💐 *_ मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐_*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मराठी राजभाषा गौरव दिन*त्यानिमित्ताने एकंदरीत इंग्रजी आणि मातृभाषा याचा विचार केल्यास प्राथमिक शाळेतील मुलांसाठी कोणत्या भाषेतुन शिक्षण घ्यावे ? हा मोठा प्रश्न आहे. अनेक विचारवंत आणि तज्ञ मंडळी या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणतात की, मुलांना आपल्या मातृभाषेत प्राथमिक शिक्षण द्यावे. कारण समजणाऱ्या भाषेत घेतलेले ज्ञान लवकर लक्षात येते आणि त्याचे आकलन ही होते. याउलट दुसऱ्या भाषेत शिक्षण घेतांना अनेक शब्द ओळखीचे नसतात त्यामुळे भाषा समजणे अवघड जाते तर संवाद करताना देखील अनंत अडचणी येतात.......संपूर्ण लेख व कविता वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *केंद्राने दिल्या सर्व राज्यांना सूचना, इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी किमान 6 वर्षे असावे वय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *केंद्र सरकारच्या अमृत भारत योजने अंतर्गत 554 रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *100% अनुदानाची मागणी:अंशतः अनुदानित शाळा महाविद्यालयातील 63 हजार शिक्षकांचा 10, 12 वीच्या उत्तर पत्रिका तपासणीवर बहिष्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मनोज जरांगेंचं आमरण उपोषण स्थगित, अंतरवाली सराटीत साखळी उपोषण सुरू राहणार, पुन्हा राज्यभरात फिरुन रान उठवणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *10 व्या गानसरस्वती महोत्सवाचा समारोप:पं. रघुनंदन पणशीकरांच्या गायनाने कार्यक्रमात रंगत; 'गानतपस्विनी' पुरस्कार पं. विश्व मोहन भट्ट यांना प्रदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ख्यातनाम गायक पंकज उधास यांचं प्रदीर्घ आजारानं निधन, वयाच्या 72व्या वर्षी मुंबईत घेतला अखेरचा श्वास*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत भारताचा दणदणीत विजय, पाच विकेट्स राखून इंग्लंडवर मात, पाच सामन्यांची मालिका 3-1 ने खिशात*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 अमीबा म्हणजे काय ? 📙 साऱ्या जगात किमान दहा लाख प्रकारचे प्राणी सापडतात. पण प्राणीशास्त्राबद्दल चर्चा सुरू झाली किंवा अभ्यास करायचे ठरवले की सर्वप्रथम नाव निघते ते अमीबाचेच. एकपेशीय प्राणी हे त्याचे वैशिष्ट्य.१६६५ साली रॉबर्ट हुक या इंग्लिश निसर्गप्रेमी शास्त्रज्ञाने पेशी (Cell) हा शब्द प्रथम वापरला. बुचाच्या अभ्यासामध्ये त्याला आढळलेल्या पेशींचे वर्णन त्याने त्यावेळी करून ठेवले आहे. त्यानंतर मायक्रोस्कोपखाली सर्वच गोष्टी न्याहाळल्या जाऊ लागल्या. स्वतंत्रपणे जगू शकणारा. पुनरुत्पादनाची क्रिया स्वतंत्रपणेच करणारा एकपेशीय असा हा अमीबा त्यानंतर प्रसिद्ध पावला. अमीबा दिसण्यासाठी मायक्रोस्कोपची तशी गरज नसते. काही प्रकारचे अमीबा अर्धा मिलिमीटरएवढे मोठे असतात. ते नुसत्या डोळ्यांनीही पाण्याच्या थेंबात दिसतात. साधे भिंग वापरले, तर त्यांची हालचालही न्याहाळता येऊ शकते. काही जाती मात्र अगदी सूक्ष्मदर्शक यंत्राखाली पाहाव्या लागतात. जेलीचा एखादा गोळा कसा असावा, तसा हा प्राणी सतत स्वतःचा आकार पालटत हालचाल करत असतो. भक्षाच्या शोधात भटकंती करताना अंगाची वेटोळी लांबुडकी पसरत हा भक्षाच्या दिशेने सरकतो. भक्ष्य आवाक्यात आले की त्याला चहूबाजूंनी प्रथम तो गुरफटून टाकतो. अर्थातच याचे भक्ष्य म्हणजे त्याच्या जीवाच्या आकारास साजेसेच असते. छोटे जीवाणू, प्राणिज व वनस्पती शैवाळ सतत गट्टम करत जाणे हा त्याचा नित्यक्रम.भक्ष्य गुरफटून मग पेशीतील पेशीद्रव्यामध्ये विरघळवण्याची क्रिया सुरू होते. यावर नियंत्रण असते पेशीकेंद्राचे. गरजेप्रमाणे पाणीपण शोषले जात असतेच. पचन पूर्ण झाल्यावर नको असलेला भाग व तत्सम द्रव्ये बाहेर टाकली जातात.साध्या पेशीविभाजन पद्धतीने यांची वाढ होत असल्याने यांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर वाढत असते. पाणी, मग ते कसलेही असो, अमीबाचा वावर तेथे आढळणारच. त्यातल्या त्यात साचलेले पाणी, डबकी, चिखल यांमध्ये यांची वाढ चांगली होते. वाहत्या पाण्यात त्या मानाने अमीबा कमी सापडतात. अमीबा या प्राण्याबद्दल माणसाला सतत जागरूक राहावे लागते. पिण्याच्या पाण्यातून माणसाच्या शरीरात अमीबाचा एकदा का प्रवेश झाला की त्याच्या शरीरात सर्वत्र संचार सुरू होतो. वाढही छान होते. सर्व पचनसंस्था पोखरून काढण्याची ताकद या एकपेशीय प्राण्यात आहे.पोटाचे विविध आजार, पोटदुखी, मोठ्या आतड्याचे आजार, यकृताची गंभीर दुखणी या अगदी लहान प्राण्यामुळे होतात. जेमतेम ३० वर्षांपूर्वी या दुखण्यांसाठी फारसे खात्रीचे उपायही नव्हते. आजकाल मात्र यांवर खात्रीची औषध उपलब्ध आहेत. जगाच्या पाठीवर सर्वत्र आढळ असलेला हा अमीबा भारतीय हवामानात सर्व प्रांतांत त्याचे राज्य पसरून आहे.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कंजूष म्हणजे तो व्यक्ती, जो श्रीमंत म्हणून मरण्यासाठी आयुष्यभर गरिबीत जगतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'मराठी भाषेचे शिवाजी'* म्हणून कोणास ओळखले जाते ?२) बार्डोली सत्याग्रहाचे नेता कोण होते ?३) छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्यात एकूण किल्ले किती ?४) भारतीय क्रिकेट संघाने कसोटी सामन्याच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय कोणत्या देशाच्या संघाविरुद्ध मिळवला आहे ?५) अमेरिकेतील निग्रो चळवळीला अर्पण केलेला महात्मा फुले यांचा ग्रंथ कोणता ? *उत्तरे :-* १) विष्णुशास्त्री चिपळूणकर २) सरदार वल्लभभाई पटेल ३) ३७० किल्ले ४) इंग्लंड ५) गुलामगिरी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गंगाधर मुटे, वर्धा👤 श्यामल पाटील👤 साई पांचाळ👤 कु. श्रावणी भुसेवार, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••इतरांच्या सुखदुःखात सहभागी होणे हा माणुसकी धर्म आहे. पण, तेथेच एकाद्या व्यक्तीविषयी नको त्या शब्दात बोलून स्वतः समाधान करून घेणे किंवा व्यर्थ बडबड करणे हा माणुसकी धर्म नाही तर आपलीच अनमोल वेळ वाया घालवणे होय.सोबतच आपल्यात असलेल्या गुणांकडे दुर्लक्ष करून वेळ वाया घालवणे होय. म्हणून असे कोणतेही व्यर्थ काम आपल्या कडून होणार नाही याची काळजी घ्यावी व जर चांगले करता येत असेल तर मात्र वेळ वाया घालवू नये.🌷🌷🌷🌷🌷 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *उंदीर कोंबडा आणि मांजर*एका उंदिराचे पिटुकले पहिल्यांदाच आपल्या बिळातून बाहेर पडले होते. ते इकडे तिकडे फिरून पुन्हा बिळात गेल्यावर आपल्या आईस म्हणते, "आई, ज्या या लहानशा जागेत लहानाचे मोठे केले, ती जागा सोडून आज मी अंमल बाहेर जाऊन आलो. तेथे मी जी फौज पाहिली, ती काही विलक्षणच. रस्त्याच्या बाजूने फिरत असता, मी दोन प्राणी पाहिले, त्यापैकी एक प्राणी फार गडबड्या स्वरुपाचा असून त्याच्या डोक्यावर तांबड्या रंगाचा तुरा आहे. तो प्राणी जेव्हा जेव्हा आपली मान हालवी, तेव्हा तेव्हा तो तुराही हालत असे. मी त्याची ही मौज पहात आहे, इतक्यात त्याने आपले दोन्ही हातही हालविले आणि असा काही कर्कश्श शब्द केला, की त्याने माझ्या कानठळ्याच बसून गेल्या आणि दुसऱ्या प्राण्याची गोष्ट ऐक. तो प्राणी फार सभ्य आणि शांत असून, त्याच्या अंगावर रेशमासारखी मऊ लोकर होती. तो चांगला देखणा असून त्याचे एकंदर वर्तन असे होते, की मला त्याच्याशी आपली मैत्री व्हावी असे वाटल्याशिवाय राहिले नाही.' हे भाषण ऐकून उंदरी त्यास म्हणाली, "वेड्या पोरा! तुला काडीचीही अक्कल नाही. नुसत्या दिखाऊपणावर जाशील तर फसशील, हे लक्षात ठेव. तू जो प्राणी पाहिला आहे तो लबाड व क्रूर मांजर आहे. उंदराच्या मांसाशिवाय दुसरा कोणताही पदार्थ त्याला फारसा आवडत नाही, हे लक्षात ठेव.तात्पर्य : बाह्य देखावा आणि सौंदर्य यावरुन माणसाच्या अंतरंगाची परीक्षा होणे शक्य नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26 फेब्रुवारी 2024💠 वार - सोमवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://m.facebook.com/story.php?story_fbid=1914047385388693&id=100003503492582&mibextid=Nif5oz••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ५७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००८:समुद्राखाली मारा करणा-या पहिल्या के-५ क्षेपणास्त्राची भारताने यशस्वी चाचणी केली.* *१९९९:आंतरराष्ट्रीय जनुक अभियांत्रिकी व जैवतंत्रज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ प्रा.जी.पी. तलवार यांची मानाच्या समजल्या जाणार्या मास्त्रोनी-सीगल पुरस्कारासाठी निवड**१९९९:आशिया खंडातील पहिले तरंगते हॉटेल अशी ख्याती असलेले ठाण्याच्या घोसाळे तलावातील ’अभिरुची हॉटेल’ आगीत भस्मसात झाले.**१९९८:परळी-वैजनाथ येथील औष्णिक केन्द्राने एका दिवसात १४.७०९ दशलक्ष युनिट विजेची निर्मिती करून वीजनिर्मितीचा (भारतातील व त्याकाळचा) नवा विक्रम नोंदवला.**१९९५:बारिंग्ज बँक ही इंग्लंडची सर्वात जुनी गुंतवणूक बँक दिवाळखोरीत निघाली.**१९८४:‘इन्सॅट-१-इ‘ हा संपूर्ण भारतीय बनावटीचा बहुउद्देशीय भारतीय उपग्रह राष्ट्राला समर्पित**१९७६:वि.स.खांडेकर यांना (ययाती कादंबरीसाठी) मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९२:चैतन्य सरदेशपांडे-- नाटककार* *१९७६:अशोक जाधव -- प्रसिद्ध चित्रकार, काष्ठ शिल्पकार* *१९६८:राजेश ओं.राजोरे -- लेखक,संपादक दै.देशोन्नती बुलडाणा आवृत्ती**१९६५:संजय ठिगळे-- लेखक* *१९६४:ऋता मिलिंद गोखले -- लेखिका* *१९६४:डॉ.मिलिंद दिगंबर पाटील-- लेखक* *१९५९:उषा दिनेश भालेराव -- कवयित्री, लेखिका* *१९५०:जयंत राळेरासकर--- ध्वनिमुद्रिका संग्राहक,लेखक**१९३७:मनमोहन देसाई – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक (मृत्यू:१ मार्च १९९४)**१९२८:गणाधीश वासुदेव खांडेपारकर-- चरित्रकार,संपादक**१९२८:शोभना लक्ष्मण गोखले--महाराष्ट्रातील प्रसिद्ध पुराभिलेखतज्ज्ञा आणि नाणकशास्त्रज्ञा.(मृत्यू:२२ जून २०१३)**१९२२:मनमोहन कृष्ण – चरित्र अभिनेता (मृत्यू:३ नोव्हेंबर १९९०)**१९०४: त्रिंबक गोविंद ढवळे-- लेखक, खगोलशास्त्राचे अभ्यासक (मृत्यू:१० जानेवारी १९६०)* *१८७४:सूरसिंह तख्तसिंह गोहिल ऊर्फ ’कलापि’ – प्रसिद्ध गुजराथी (सौराष्ट्र) कवी, त्यांचा ’कलापिनो केकारव’ हा काव्यसंग्रह खूप गाजला (मृत्यू:१९००)**१८६६:हर्बर्ट डाऊ – अमेरिकन उद्योगपती (मृत्यू:१५ आक्टोबर १९३०)**१८२९:लेव्ही स्ट्रॉस – अमेरिकन उद्योजक (मृत्यू:२६ सप्टेंबर १९०२)**१८०२:व्हिक्टर ह्यूगो – जागतिक कीर्तीचे फ्रेन्च कादंबरीकार,कवी आणि लेखक (मृत्यू:२२ मे १८८५)**१६३०:गुरू हर राय – शिखांचे ७ वे गुरू (मृत्यू:६ आक्टोबर १६६१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१५: इसाक मुजावर--हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीचा माहितीकोश समजले जाणारे,मराठी लेखक(जन्म:१९३४)**२०१०:चंडीकादास अमृतराव तथा नानाजी देशमुख – समाजसुधारक व संघप्रचारक, लोकसभा व राज्यसभा सदस्य,डी.लिट. (पुणे विद्यापीठ -१९९७), पद्मविभूषण. त्यांनी रचनात्मक ग्रामीण विकासाला वेगळी दृष्टी दिली.(जन्म:११आक्टोबर १९१६)**२००४:शंकरराव चव्हाण –माजी केंद्रीय अर्थमंत्री,गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री (जन्म:१४ जुलै १९२०)**२००३:राम वाईरकर – प्रख्यात व्यंगचित्रकार,(जन्म १९३६)* *२०००:बा.म.तथा ’रावसाहेब’ गोगटे – बेळगाव येथील उद्योगपती(जन्म:१६ सप्टेंबर१९१६)**१९६६:स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर-- महान क्रांतिकारक,प्रतिभासंपन्न कवी,नाटककार,प्रभावी वक्ते व लेखक (जन्म:२८ मे १८८३)**१९३७:एल.के.अनंतकृष्ण अय्यर – दक्षिण भारतातील जातिजमातींची सखोल पाहणी करुन माहिती गोळा करणारे मानववंशशास्त्रज्ञ (जन्म:६ जुलै १८६२)**१८८६:नर्मदाशंकर दवे ऊर्फ ’नर्मद’ – गुजराथी लेखक व समाजसुधारक, त्यांनी गुजराथी भाषेचा शब्दकोश सर्वप्रथम तयार केला. (जन्म:२४ ऑगस्ट १८३३)**१८७७:मेजर थॉमस कॅन्डी – कोशकार व शिक्षणतज्ञ, मराठीत विरामचिन्हे वापरण्यास त्यांनी प्रथम सुरूवात केली, इंडियन पीनल कोडचे त्यांनी मराठीत भाषांतर केले. (जन्म:१३ डिसेंबर १८०४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*परिक्षेपेक्षा जीवन महत्वाचे आहे*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *युवकांनी विक्रमी संख्येने देशासाठी मतदान करावे - शेवटच्या मन की बात मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *देशात भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायदा हे 3 नवीन कायदे एक जुलैपासून लागू होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राम मंदिराला एका महिन्यात 25 कोटी रुपयांची देणगी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *टोकाची भूमिका घेऊन आंदोलनाची दिशा बदलू नये; आमदार बच्चू कडू यांचा जरांगे पाटील यांना सल्ला*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गाईला राष्ट्रमातेचा दर्जा द्या:अमरावतीच्या गौकुंभात संत-महंतांची मागणी, अन्यथा मुंबई मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *30 लाखांच्या दंडाच्या नोटिसा:हिंगोली उपविभागात अवैध गौण खनिज वाहतूक करणारी बारा तासात पकडली 16 वाहने*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 145 धावांमध्ये गुंडाळला, अश्विन आणि कुलदीपच्या फिरकीने टीम इंडियाने बाजी पलटली; भारताला विजयासाठी 152 धावांची गरज*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 चक्रीवादळे का येतात ? 📙 उन्हाळ्याचे दिवस चालू असतात. भर दुपारी उन्हाचा कडाका अंगाची लाहीलाही करत असतो. जमीन अगदी चटके बसतील, अशी तापलेली व हवा अजिबात पडलेली. झाडाचे तर पानही हलत नाही आणि बघता बघता लांबवर कुठेतरी जमिनीवरची पडलेली पाने वाऱ्याने गोलगोल भिरभिरताना दिसू लागतात. बघता बघता तीच पाने उंचावर उचलली जातात. त्यांच्याबरोबरच धुळीचा लोटही उफाळताना, गरगरताना दिसतो. काही सेकंदातच वाऱ्याची वावटळ आपल्यालाही घेरून टाकते. हेलकावणारी झाडे, वाऱ्याचा सोसाट्याचा आवाज, नाकातोंडात जाणारी धूळमाती यांमुळे सारेच कसे भीषण वाटत असते. ही असते चक्रीवादळाची सुरुवात.चक्रीवादळ म्हणजे वातावरणातील एखाद्या विवक्षित ठिकाणी हवेचा दाब आसपासच्या काही मैलांच्या परिसरापेक्षा कमी अथवा जास्त झाल्याने दिसून येणारे वातावरणातील बदल. हे बदल फार मोठ्या वेगाने घडतात, त्यात वाऱ्याची फार मोठी ताकद सामावलेली असते. त्या विवक्षित ठिकाणी हवेचा दाब कमी होतो वाह वाढतो. तो चक्रीवादळाचा केंद्रबिंदूच असतो. दाब कमी झाल्यास तेथील हवेची पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न म्हणून वातावरणातील हवेत एक प्रकारचे भोवरे तयार होतात. याउलट दाब वाढला असल्यास त्या पट्टय़ातील हवा दाबामुळे केंद्राकडे खाली दाबली जात असते. याही क्रियेमध्ये वारे वाहणे वेगाने सुरू होते, पण त्यांची तीव्रता खूपच कमी असते. बहुतेक चक्रीवादळांचा केंद्रबिंदू समुद्रावरच सुरू होतो. कसलाही अडथळा वाटेत नसल्याने हे वादळ स्वतःभोवती फिरत वेगाने घोंगावत इकडे तिकडे हेलकावत राहते. पण समुद्री वार्यांमुळे हलके हलके जमिनीकडे येऊ लागते. सुरुवातीला जमिनीवरचा मोठा पट्टा त्यामुळे त्याच्या तडाख्यात सापडतो, पण त्याचबरोबर त्याचा वेग हळूहळू कमी होत पसरत जातो व काही काळाने ते संपूनही जाते. समुद्रपातळीपेक्षा जमिनीची वाढलेली उंची, वाटेत येणारे अडथळे व जमिनीवरील बरेचसे स्थिर तापमान यांमुळे या चक्रीवादळांचा वेग मंदावतो.चक्रीवादळ बहुधा स्वतःबरोबर सोसाटयाचा पाऊसही आणते. खूप मोठ्या आकारमानात हे पसरलेले असल्याने (चारशे ते सहाशे किलोमीटर) या सर्व भागातील निरनिराळे ढग यात ओढले गेलेले असतात. या ढगांचे एकत्रीकरण होताच त्यातील बाष्पही एकत्र येऊन त्यापासून पाऊस पडेल, असे मोठे बाष्पकण तयार होतात. सुरुवातीला प्रचंड वेगाने वाहणारे वारे, धुळीचे वातावरण व नंतरच्या पावसाचे तडाखे ही चक्रीवादळाची खासियतच म्हणायला हवी. चक्रीवादळांचा वेग जमिनीवर पोहोचल्यावर अनेकदा ताशी साठ ते ऐंशी किलोमीटर इतका असतो. समुद्रावरील वेग मोजण्याची पद्धत नाही, पण तो कदाचित यापेक्षाही जास्त असू शकतो. समुद्रावरील बोटी या वादळात सापडल्यास अनेकदा त्यांचे गंभीर नुकसान होण्याइतका त्यांना तडाखा बसलेला असतो. वादळाचा पट्टा ओलांडण्यास त्यांना एक ते चार दिवस लागत असल्याने तोवर राक्षसी लाटांचे तांडव असहाय्यपणे बघणे एवढेच त्यांच्या हातात असते. अनेकदा या लाटांची उंची तीस ते पस्तीस फुटांपर्यंतही असू शकते. ही वादळे सागरी अपघात व दुर्घटना यांचे एक मुख्य कारण असल्याने या वादळी टापूंची सतत माहिती घेऊन त्याप्रमाणे मार्ग आखणे, बदलणे बोटीच्या कप्तानाने कामच राहते. किनाऱ्यावर जेव्हा ही वादळे येतात, तेव्हा उंच झाडे उन्मळून पडणे, सागरी लाटा खोलवर घुसून त्यामुळे नुकसान होणे, घरांचे पत्रे उडणे या गोष्टी होतात. चक्रीवादळांची सूचना हल्ली उपग्रहांमुळे खूपच लवकर मिळू शकते. उपग्रहांमधून या सर्व वादळांचा नेमका प्रवास, हवेतील घडत जाणारे बदल यांचे फोटो मिळतात. या खेरीच एक मोठी विलक्षण पद्धत चक्रीवादळांच्या अभ्यासासाठी गेली २० वर्षे वापरली जात आहे. अत्यंत धोकादायक अशा पद्धतीत लष्करी जेट विमानातून संशोधक या चक्रीवादळाच्या केंद्रबिंदूकडेच प्रवास सुरू करतात. थेट केंद्रबिंदूचा वेध घेऊन विमान वर न्यावयाचे व त्या दरम्यान विविध शास्त्रीय निरीक्षणे करायची, अशी ही पद्धत आहे. निष्णात वैमानिक व जिवावर उदार झालेले संशोधक यांचा चमू हे काम करतो. या प्रकारात विमान पार वेडेवाकडे होऊन दोन तीन हजार फूट लांबवर एखाद्या खेळण्याप्रमाणे भिरकावलेही गेले आहे. तरीही सुखरूप उतरल्यावर नवीन चक्रीवादळाची सूचना कधी मिळते, इकडेच या चमूचे लक्ष असते.धाडस व जिज्ञासा यांचा संगम काय करू शकतो, याचे हे एक थरारक उदाहरण आहे.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••परिस्थिति गरीब असली तरी चालेल,पण विचार ‘भिकारी’ नसावेत…*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) शरद पवारांच्या राष्ट्रवादी गटाला निवडणूक आयोगाने कोणते नवीन चिन्ह बहाल केले आहे ?२) युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळाचे नामांकन कोणत्या दोन श्रेणीत केले जाते ?३) छत्रपती शिवाजी महाराजांनी 'सर्वात अभेद्य किल्ला' असे वर्णन कोणत्या किल्ल्याचे केले होते ?४) महाराष्ट्रातील एकूण आरक्षण आता किती टक्क्यांवर पोहोचले आहे ?५) आटाकामा वाळवंट कोणत्या खंडात आहे ? *उत्तरे :-* १) तुतारी २) सांस्कृतिक व नैसर्गिक श्रेणी ३) जिंजी, तामिळनाडू ४) ७२ टक्के ५) दक्षिण अमेरिका*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सौ. प्रिया पारसेवार जि. प. प्रा. शाळा देवणेवाडी ता. लोहा जि. नांदेड👤 राजेश सब्बनवार, कुंडलवाडी👤 मुकेश पद्मपल्ले👤 ऊत्तम गवळे👤 गंगाधर मुटे, सामाजिक कार्यकर्ते👤 श्यामल पाटील👤 साई पांचाळ👤 राजेश्वर भंडारे👤 मुरलीधर राजूरकर, शिक्षक, मुखेड👤 निर्मला सोनी, साहित्यिका, अमरावती👤 प्रशांत चिखलीकर, शिक्षक, लातूर👤 मारोती पाटील*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मनाची शते ऐकता दोष जाती। मतीमंद ते साधना योग्य होती॥ चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी। म्हणे दास विश्वासत मुक्ति भोगी॥२०५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आनंदाचे क्षण तर कधी चांगले वाईट प्रसंग जीवनात येत असतात. ते, खूप काही शिकवण देऊन जातात. फरक एवढाच की, त्यांना ओळखण्याची आपण संधी गमावून बसतो त्यामुळे ते सहसा कळत नाही. म्हणून आलेल्या प्रत्येक चांगले, वाईट, प्रसंगाला ओळखावे व त्यांना गुरू मानून त्यांचा सन्मान करावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकदा एका माणसाला त्याच्या घोड्यासमवेत एक नदी पार करायची असते. परंतु त्याला नदीची खोली माहीत नसल्याने तो तिथेच काठावर विचार करत बसतो. मदतीसाठी आजुबाजुला पाहत असताना त्याला तेथे एक लहान मुलगा दिसतो. तेव्हा त्या माणसाने लहान मुलाला नदीच्या खोलीबद्दल विचारले.मुलाने घोड्याकडे एकदा पाहीले आणि क्षणभर थांबुन तो विश्वासाने म्हणाला, " निश्चींतपणे जा, तुमचा घोडा नदी सहज पार करु शकेल".मुलाचा सल्ला मानुन त्या माणसाने नदी पार करण्यास सुरुवात केली. परंतु नदीच्या मध्यावर पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले की नदी खुप खोल आहे. आणि तो जवळ जवळ बुडायलाच आला.कसाबसा तो त्यातून सावरला आणि बाहेर येउन त्या मुलावर जोरात खेकसला. मुलगा पुरता घाबरला होता आणि घाबरत घाबरतच बोलला, "पण माझी बदके तर खुप लहान आहेत आणि ते दररोज नदी पार करतात. त्यांचे पाय तर तुमच्या घोड्यापेक्षा खुप लहान आहेत."*उगाच कोणाचाही सल्ला ऐकण्याआधी त्यांना खरोखरच काही माहीती आहे का ते जाणुन घ्या....* •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 24 फेब्रुवारी 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://m.facebook.com/story.php?story_fbid=1435523189907784&id=100003503492582&mibextid=Nif5oz••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक मुद्रण दिन_*••••••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील ५५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०१०:एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात द्विशतक करणारा सचिन तेंडुलकर हा पहिला खेळाडू बनला.**१९६१:मद्रास राज्याचे नाव बदलून तामिळनाडू असे करण्याचा सरकारने निर्णय घेतला.**१९५२:कर्मचारी राज्य विमा योजनेची (ESIC) सुरूवात झाली.**१९४२:’व्हॉइस ऑफ अमेरिका’ या रेडिओ केन्द्राचे प्रसारण सुरू झाले.**१९३८:ड्यु पाँ कंपनीने नायलॉनचा दात घासण्याचा ब्रश विकण्यास सुरुवात केली.**१९२०:नाझी पार्टीची स्थापना झाली.**१९१८:इस्टोनियाला (रशियापासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१८२२:जगातील पहिल्या स्वामीनारायण मंदिराचे अहमदाबाद येथे उद्घाटन झाले*१८१२:पुण्यात शनिवार वाड्यास मोठी आग लागली**१६७०:राजगड येथे छत्रपती राजाराम यांचा जन्म* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९३:आकाश ठोसर-- मराठी चित्रपट अभिनेता**१९८७:धनंजय वसंत पोटे-- लेखक* *१९८१: रामकृष्ण मारखंडी रोगे -- कवी* *१९७४:डॉ.सुवर्णा सुखदेव गुंड-- कवयित्री, लेखिका* *१९७४:रवींद्र विष्णू गोळे-- पत्रकार,संपादक लेखक*१९७०:अरविंद भैय्यालाल कटरे -- लेखक* *१९६८:प्रा.विकास जनार्दन पिल्लेवान -- लेखक* *१९६६:उदयनराजे भोसले-- राज्यसभेचे खासदार**१९६३:संजय लीला भन्साळी--- भारतीय चित्रपट दिग्दर्शक,निर्माता व लेखक* *१९५९:ॲड.विठ्ठल काष्टे -- कवी* *१९५८:समीर अंजान-- भारतीय गीतकार**१९५६:डी.व्ही.कुलकणी-- सुप्रसिद्ध साहित्यिक* *१९५५:स्टीव्ह जॉब्ज – अॅपल कॉम्प्युटर्सचा सहसंस्थापक (मृत्यू:५ आक्टोबर २०११)**१९४८:जे.जयललिता – माजी मुख्यमंत्री आणि दक्षिणेतील अभिनेत्री(मृत्यू:५ डिसेंबर, २०१६)**१९४०:सुरेश भार्गव मुळे-- लेखक* *१९३९:शशिकांत दशरथ मालपेकर -- लेखक**१९३९:जॉय मुकर्जी – चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक (मृत्यू:९ मार्च २०१२)**१९२४:तलत महमूद – पार्श्वगायक व अभिनेता,गझलचे बादशहा (मृत्यू:९ मे १९९८)**१९१४:विनायक चिंतामण देवरुखकर-- लेखक* *१९०६:प्राचार्य प्र.रा.दामले -- लेखक* *१६७०:राजाराम – मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती,शिवाजी महाराजांचे चिरंजीव (मृत्यू:२ मार्च १७००)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:सरदूल सिकंदर-- पंजाबी भाषेतील लोक आणि पॉप संगीताशी संबंधित भारतीय गायक(जन्म:१५ जानेवारी १९६१)* *२०१८:श्रीदेवी-- भारतीय चित्रपट अभिनेत्री(जन्म:१३ऑगस्ट१९६३)**२०११:अनंत पै ऊर्फ ’अंकल पै’ – ’अमर चित्र कथा’ चे जनक (जन्म:१७ सप्टेंबर १९२९)**१९९८:ललिता पवार – अभिनेत्री व चित्रपट निर्मात्या (जन्म:१८ एप्रिल १९१६)**१९९०:बाळकृष्ण रामचंद्र मोडक--लेखक 'मुलांचे मासिक' कार (जन्म:२१ फेब्रुवारी १८९८)**१९८६:रुक्मिणीदेवी अरुंडेल – भरतनाट्यम नर्तिका (जन्म:२९ फेब्रुवारी १९०४)**१९७५:निकोलाय बुल्गानिन – सोविएत युनियनचे अध्यक्ष (जन्म:३० मार्च १८९५)**१९३६:लक्ष्मीबाई टिळक –लेखिका, ’स्मृतिचित्रे’ हे त्यांचे आत्मचरित्र मराठी साहित्यात अजरामर झाले (जन्म:१ जून १८६८)**१८१५:रॉबर्ट फुल्टन – अमेरिकन अभियंते व संशोधक, वाफेच्या शक्तीवर चालणारी जहाजे त्यांनी शोधल्यामूळे शिडाच्या जहाजांचे युग संपुष्टात आले.(जन्म:१४ नोव्हेंबर १७६५)**१८१०:हेन्री कॅव्हँडिश – हायड्रोजन आणि आरगोन वायूंचा शोध लावणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ (जन्म:१० आक्टोबर १७३१)**१६७४:कोल्हापूरजवळील नेसरीच्या खिंडीत बहलोलखानाच्या फौजेवर हल्ला करताना सेनापती प्रतापराव गुजर व त्यांचे ६ सहकारी मारले गेले.या घटनेवरच कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी ’वेडात मराठे वीर दौडले सात’ हे काव्य लिहिले आहे.*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कॉपी म्हणजे एक कलंक*कॉपी करणे म्हणजे नकला करणे असा सारासार अर्थ घेतला जातो. परीक्षेचा काळ आला की कॉपी हा शब्द कानावर पडतो. वर्षभर अभ्यास न करणारे विद्यार्थी परीक्षेच्या काळात कॉपी करण्याचा विचार करतात. नकला मारण्यासाठी ही मुले नाना प्रकारच्या क्लृप्त्या किंवा योजना तयार करतात. नकला मारणे म्हणजे एक प्रकारे चोरी करण्यासारखेच आहे........... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुंबईतील शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्याचे आदेश, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्ट आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मनोज जरांगेंच्या 24 तारखेच्या आंदोलनावरुन हायकोर्टात खडाजंगी, गुणरत्न सदावर्ते आणि जरागेंच्या वकिलांचा टोकाचा युक्तिवाद, कायदा आणि सुव्यवस्थेती स्थिती निर्माण होऊ नये, हायकोर्टाचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *धनंजय मुंडे यांनी कृषिमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर २०२०, २०२१ आणि २०२२ करिताचे विभागनिहाय कृषी पुरस्कार जाहीर केले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन उभारणार:उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा, राज्यात लोकसंख्येच्या 4% लोक दिव्यांग*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मिळाले उद्या रायगडावर भव्य कार्यक्रम पार पडणार आहे. 'तुतारी' चिन्ह मिळाल्यानंतर रायगडावर चिन्हाचं लॉन्चिग होणार आहे. लोकसभा निवडणुकांसाठी रणशिंग फुकणार आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी जो रुटच्या शतकी खेळीने इंग्लंडचा डाव सावरला, सात बाद 302 पर्यंत मजल, भारताच्या आकाश दीपनं पहिल्याच कसोटीत घाम फोडला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अभिनेत्री श्रीदेवी स्मृतिदिन*१९७५ मध्ये फिल्म 'जूली'तून श्रीदेवीने डेब्यू केले. यात त्या चाइल्ड आर्टिस्टच्या रूपात दिसली होती. सुरुवातीच्या फिल्म्स मध्ये त्यांना फारसे यश मिळाले नाही. १९८३ मध्ये आलेल्या 'हिम्मतवाला'ने श्रीदेवीला स्टार बनवले. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.चित्रपट हिम्मतवालामधून श्रीदेवी यांनी बॉलीवुडमध्ये पदार्पण केले होते. श्रीदेवी शेवटी 'मॉम' या फिल्ममधून झळकल्या होत्या. मॉम फिल्म ७ जुलै २०१७ला प्रदर्शित झाली होती. त्याआधी २०१२ साली आलेल्या 'इंग्लिश-विंग्लिश' या चित्रपटातून श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले.बोनी कपूर यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर त्यांनी जुदाई सिनेमा केला. तेव्हापासून श्रीदेवी चित्रपटसृष्टीपासून दूर होत्या. त्यानंतर सहा वर्षानंतर श्रीदेवी यांनी मिसेस मालिनी अय्यर या मालिकेतून छोट्या पडद्यावर एंट्री केली. श्रीदेवीला दोन मुली असून ते म्हणजे जाह्नवी कपूर व खूशी कपूर. श्रीदेवीने 'सोलहवां सावन' (१९७८), 'हिम्मतवाला' (१९८३), 'मवाली' (१९८३), 'तोहफा' (१९८४), 'नगीना' (१९८६), 'घर संसार' (१९८६), 'आखिरी रास्ता' (१९८६), 'कर्मा' (१९८७), 'मि. इंडिया' (१९८७) यासह अनेक सिनेमात काम केले. याचबरोबर, त्यांनी हिंदी चित्रपटांसह तमीळ, तेलगू, मल्याळम, कन्नड चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले. २०१३ साली, अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल श्रीदेवी यांना भारत सरकारकडून पद्मश्री या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी त्यांचे दुबई, संयुक्त अरब अमिराती येथे निधन झाले. मृत्यूसमयी त्या ५४ वर्षाच्या होत्या. *संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" जो शाळेचे दरवाजे उघडतो तो तुरुंगाचे दरवाजे बंद करतो."**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) मिस वर्ल्ड २०२४ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार आहे ?२) मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे ?३) भारतात सध्या जागतिक वारसास्थळे किती आहेत ?४) गोदावरी नदीच्या उपनद्या कोणत्या ?५) सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते ? *उत्तरे :-* १) शिनी शेट्टी २) ज्ञानेश्वर मुळे ३) ४२ ( ३४ सांस्कृतिक, ७ नैसर्गिक, १ मिश्र वारसास्थळे ) ४) प्रवरा, दारणा, सिंधफणा, मांजरा, पूर्णा ५) दीनबंधू*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 नरेश जे. वाघ, बालरक्षक👤 साईप्रसाद वंगल👤 मन देविदास तारु👤 अहमद सुतार👤 संस्कृती मसुरे, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना संग हा सर्वसंगास तोडी।मना संग हा मोक्ष तात्काळ जोडी॥ मना संग हा साधना शीघ्र सोडी। मना संग हा द्वैत निःशेष मोडी॥२०४॥ ।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विरोध करणारे व त्याला अडविणारे हजारो संख्येने जरी जागोजागी साखळी तयार करून उभे राहत असतील तरी समोर नेणारा एकतरी जण जन्माला येत असतो. म्हणून कोणाला अडविण्याचा प्रयत्न करू नये. कारण समोर नेणाऱ्याचेच गुणगान केल्या जाते व अडविणाऱ्याला एकदिवस नको त्या परिस्थितीचा सामना करावा लागतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष संतोष मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*एकतेची शक्ती*एकदा एक कबुतराचा मोठा थवा आकाशात अन्नाच्या शोधासाठी उडत होता. ते एका घनदाट जंगलात गेले. एक कबुतर आपल्या बाकीच्या सहकाऱ्यांना बोलले ‘मित्रांनो, आपण खूप लांबच्या अंतरावरून येत आहोत. आपल्यातील सर्वच खूप थकलेले आहेत. तर, आपण थोडा वेळ येथे आराम करू या.’पण मध्यम वयीन कबुतर बोलला ‘तू जे बोलत आहेस ते खरे आहे, पण आपण सर्व भूकेलो आहोत.’ आणि जर आपण उशीर केला तर आपल्याला अन्न मिळणार नाही. बाकीच्या कबुतरांचे पण तेच म्हणणे होते. सर्व कबुतर बरोबर उडायला लागले. त्यांनी बघितले की जमिनीवर धान्य पसरलेले होते.ज्या कबुतराला आराम हवा होता तो बोलला ‘बघा! आपले धान्य! चला आपण ते वेचूया.’ सर्व कबुतर धान्य वेचण्यासाठी खाली उतरले. तिथे भरपूर प्रमाणात धान्य होते. सर्वात जास्त वयस्कर कबुतर बोलतो की ‘या, या लवकरात लवकर धान्य उचला व खा.’जेव्हा सर्व कबुतर धान्य खात होते तेव्हा अचानक एक जाळी त्यांच्या अंगावर येऊन पडली. सर्व त्यामध्ये अडकले.‘आता आपण काय करायचे?’ सर्व रडायला लागले. एक शिकारी झाडावर बसलेला होता त्याच्याकडे धनुष्य व बाण होते. त्यामुळे एक कबुतर बोलला ‘मित्रांनो, माझी एक युक्ती आहे आपण सर्व जण मिळून ताकद लावून एकाच वेळेस जाळीसह वरती उडू या व आपण सहजपणे यातून सुटू शकतो.’सर्व कबुतरांनी त्यांची सर्व ताकद पणाला लावून जाळीसह वरती उडायला लागले व ते खूप उंचावर उडले आणि त्यांची अवघड परिस्थितीतून सुटका झाली.हे बघून तो शिकारी आश्चर्य चकित होऊन व स्तब्ध झाला.एक कबुतर बोलला ‘आपण शिकाऱ्यापासून सुटलो आहोत, आता आपण आपल्या उंदिर मित्राकडे जाऊ तो आपल्याला मदत करेल.’ते कबुतर पुन्हा आपली शक्ती एकत्र करून उडायला लागतात व डोंगराच्या पायथ्याजवळ जातात. तेथील बिळात राहणाऱ्या उंदराला ते मदतीसाठी बाहेर बोलवतात. उंदिर त्यांना मदत करायला तयार होतो, व काही मिनिटांतच तो आपल्या तीक्ष्ण दातांनी ती जाळी कुरतडून टाकतो व कबुतरांची जाळीतून मुक्तता करतो.शेवटी कबुतर उंदराचे आभार मानून आपल्या घरी जातात.*तात्पर्य - एकतेतच बळ असते. एकतेमुळे अवघडातल्या अवघड परिस्थितीमधून आपली सुटका होऊ शकते. "*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23 फेब्रुवारी 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~समुहात जॉईन होण्यासाठी Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ५४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०००:संस्कृत पंडित रा. ना. दांडेकर आणि काश्मिरी कवी रेहमान राही यांना साहित्य अकादमीची फेलोशिप जाहीर**१९९६:कोकण रेल्वेच्या चिपळूण - खेड टप्प्यातील वाहतूकीचा शुभारंभ**१९६६:सीरियात लष्करी उठाव झाला.**१९६३:ब्रह्मदेशात बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.**१९६२:दिल्ली विद्यापीठाच्या कुलगुरू पदी सी.डी.देशमुख यांची निवड**१९५२:संसदेने कामगार भविष्य निर्वाह निधी विधेयक मंजूर केले.**१९४७:आंतरराष्ट्रीय मानक संस्थेची (ISO) स्थापना**१९४५:दुसरे महायुद्ध – इवो जिमाची लढाई - अमेरिकन नौदलाचे काही सैनिक (मरीन्स) प्रशांत महासागरातील माउंट सुराबाचीवर पोचले व त्यांनी तेथे अमेरिकन झेंडा उभारला.**१९४५:दुसरे महायुद्ध – अमेरिकन सैन्याने फिलिपाईन्सची राजधानी मनिला जपानी सैन्यापासून मुक्त केली.**१९४५:दुसरे महायुद्ध – पोलंडच्या पोझ्नान शहरात जर्मन सैन्याने शरणागती पत्करली.**१९४५:दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सच्या विमानांनी जर्मनीतील फोर्झेम शहर बेचिराख केले.**१९४१:डॉ.ग्लेन सीबोर्ग यांनी प्लूटोनिअम हे मूलद्रव्य प्रथमच वेगळे केले.**१७३९:चिमाजी अप्पाच्या वसई मोहिमेत मानाजी आंग्रे यांनी रेवदंड्यावर हल्ला चढवला.**१४५५:पाश्चिमात्य देशातील पहिले छापील पुस्तक ’गटेनबर्ग बायबल’ प्रकाशित झाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७४:हर्शेल हरमन गिब्स -- दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट प्रशिक्षक**१९७४:डॉ.पल्लवी परुळेकर-बनसोडे -- लेखिका,कवयित्री,संपादिका* *१९७३:रेखा व्यंकट कटरे -- कवयित्री**१९७१:डॉ.प्रज्ञा शरद देशपांडे-- कवयित्री, मराठी व संस्कृत भाषेतील लेखिका* *१९६९:भाग्यश्री पटवर्धन-- प्रसिद्ध भारतीय सिने-अभिनेत्री* *१९६९:अयुब खान-- अभिनेते**१९६८:कृतिका देसाई-- भारतीय चित्रपट, थिएटर आणि टेलिव्हिजन अभिनेत्री* *१९६५:हेलेना सुकोव्हा – झेकोस्लोव्हाकियाची टेनिस खेळाडू**१९६५:अशोक कामटे – मुंबईच्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस कमिशनर (मृत्यू:२६ नोव्हेंबर २००८)**१९५७:येरेन नायडू – तेलगु देसम पक्षाचे नेते (मृत्यू:२ नोव्हेंबर २०१२)**१९५२: सुमती साईनाथ लांडे -- प्रसिद्ध कवयित्री,लेखिका व प्रकाशक* *१९४८:मीना अनिल किनीकर-- लेखिका, अनुवादक* *१९४५:पुंडलिक चिंतामण गवळी -- प्रसिद्ध लेखक,कवी* *१९३६:डॉ.प्रल्हाद अमृतकर -- लेखक, अनुवादक* *१९२९:प्राचार्य डॉ.विष्णू बाळकृष्ण कुलकर्णी (मधू कुलकर्णी)-- कथालेखक* *१९१३:प्रफुल्लचंद्र तथा पी.सी.सरकार – जादूगार (मृत्यू:६ जानेवारी १९७१)**१९०२: कृष्णाजी गंगाधर कवचाळे -- कवी,इतिहासलेखक,संपादक (मृत्यू:६ जानेवारी १९६४)* *१८७६:संत गाडगे महाराज(गाडगे बाबा)-- महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार,संत आणि समाजसुधारक (मृत्यू:२० डिसेंबर १९५६)**१६३३:सॅम्युअल पेपिस – विख्यात इंग्रजी रोजनिशीकार व कुशल प्रशासक (मृत्यू:२६ मे १७०३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००९:प्रा.श्री.मा.कुलकर्णी-- प्रसिद्ध लेखक, संशोधक,संपादक (जन्म:१७ मे १९२७)**२००४:सिकंदर बख्त – माजी केन्द्रीय परराष्ट्रमंत्री,केरळचे राज्यपाल व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते (जन्म:२४ ऑगस्ट १९१८)**२००४:विजय आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक (जन्म:२२ जानेवारी १९३४)**२०००:वासुदेवशास्त्री धुंडिराज तांबे – वेदशास्त्राचे गाढे अभ्यासक* *१९९८:रमण लांबा – क्रिकेटपटू (जन्म:२ जानेवारी १९६०)**१९९०:अमृतलाल नगर-- प्रसिद्ध हिंदी लेखक(जन्म:१७ आगस्ट १९१६)**१९६९:मुमताज जहाँ बेगम देहलवी ऊर्फ मधुबाला – चित्रपट अभिनेत्री (जन्म:१४ फेब्रुवारी १९३३ )**१९४७:नारायण दासो बनहट्टी--लेखक, संपादक (जन्म:१८६२)**१९४४:लिओ हेन्ड्रिक आर्थर बेकेलँड – अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ(जन्म:१४ नोव्हेंबर १८६३)**१९०४:महेन्द्र लाल सरकार – होमिओपॅथ, समाजसुधारक व विज्ञानप्रसारक, (जन्म:२ नोव्हेंबर १८३३)**१७९२:सर जोशुआ रेनॉल्ड्स – ब्रिटिश चित्रकार व रॉयल अॅकॅडमीचे पहिले अध्यक्ष, व्यक्तिचित्रे काढण्याबद्दल त्यांची प्रसिद्धी होती. (जन्म:१६ जुलै १७२३)**१७७७:कार्ल फ्रेड्रिक गाऊस – जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ,आर्किमिडीज व न्यूटन यांच्या तोडीचे गणितज्ञ,इलिप्टीक फंक्शन्स व नॉन युक्लिडियन जॉमेट्री इ.विषयांवर त्यांचा मोठा अभ्यास होता.(जन्म:३० एप्रिल १७७७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा*संत गाडगे बाबा यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी विदर्भातील शेनगाव येथे झाला. गाडगेबाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे. संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी तर आईचे नाव सखुबाई असे होते. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे होते. त्यांच कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत.गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी कार्य करणारे समाजसुधारक होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशांतून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश असे.समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते नास्तिकापर्यंत, कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते. संत गाडगेबाबा यांचे दिनांक २० डिसेंबर १९५६ रोजी अमरावती येथे मृत्यू झाला. *संकलन :- नासा येवतीकर*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मॉर्निंग कन्सल्टने जगभरातील लोकप्रिय नेत्यांची यादी केली जाहीर, पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मध्य प्रदेश शालेय शिक्षण विभागाने 1ली ते 12 वी पर्यंतच्या शाळेत आठवड्यातून एक दिवस नो बॅग डे (No bag Day) ठेवण्याचा घेतला निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मार्डच्या मागण्यांवर कॅबिनेटमध्ये निर्णय होणार:उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही; निवासी डॉक्टरांना संप मागे घेण्याचे केले आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी रुग्णलयात दाखल, 10 महिन्यांपूर्वी झाला होता ब्रेन हॅमरेजचा त्रास*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *महाविकास आघाडीच्या 27 फेब्रुवारीच्या बैठकीत जागावाटपांवर शिक्कामोर्तब होणार,सूत्रांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ऊस शेती करणाऱ्यांसाठी एक गुड न्यूज, केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत ऊसाचा FRP 8% नी वाढवला (sugarcane at ₹340/quintal)*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *इंडियन प्रीमिअर लीग 2024 चं वेळापत्रक अखेर जाहीर, 22 मार्चला होणार CSK व RCB यांच्यात पहिला सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔍 *बोटांचे ठसे कसे मिळवतात ?* 🔍 आपल्या तळहातांनी आणि बोटांनी आपण अनेक वस्तू पकडतो. ती पकड सुलभ व्हावी यासाठी निसर्गानं या ठिकाणची कातडी वेगळ्या प्रकारची बनवलेली आहे. या कातडीवर केस उगवत नाहीत. शिवाय ही कातडी जर गुळगुळीत राहिली तर हातात धरलेल्या वस्तूंवर तिची पकड व्यवस्थित बसणार नाही. यासाठी या कातडीचं त्या वस्तूबरोबर घर्षण होईल आणि तसे होताना कातडीला इजा होणार नाही अशीही व्यवस्था केली आहे. त्यासाठी या कातडीवर निरनिराळ्या वळ्या पडतात. या वळ्यांच्या आत सतत घामाचा स्राव करणाऱ्या छिद्रांच्या रांगा असतात. त्या घामामुळं तळहाताला एक प्रकारचं वंगण मिळत राहतं. तसंच त्या छिद्रांना जोडलेल्या काही ग्रंथींमधून स्निग्ध पदार्थांचाही पाझर होत राहतो. जेव्हा एखाद्या वस्तूवर आपली बोटं टेकतात, तेव्हा हे घाम आणि स्निग्ध पदार्थ यांचं मिश्रण त्या वळ्यांमधून त्या वस्तूवर चिकटतं. तिथं त्या वळ्यांचा ठसा उमटतो. यालाच बोटांचा ठसा म्हणतात.बोटांवरच्या या घर्षणवळ्यांचा रचनाबंध प्रत्येक व्यक्ती जन्मतःच घेऊन येते. कोणाही दोन व्यक्तींचे अगदी एकसारख्या एक जुळ्यांचेही बोटांचे ठसे सारखे नसतात. त्यामुळे या बोटांच्या ठशावरून कोणाचीही निर्विवाद ओळख पटवणे सहज शक्य होतं. याच गुणधर्माचा उपयोग गुन्हेगारांची अशी ओळख पटवण्यासाठी केला जातो. त्याला न्यायालयाचीही मान्यता आहे. ज्या वस्तूला बोटांचा स्पर्श झालेला असेल त्या वस्तूवर बोटांच्या घर्षणवळ्यातील घाम आणि स्निग्ध पदार्थांचं मिश्रण चिकटतं; पण त्यापायी उमटलेला ठसा सुप्त स्वरूपातच असतो. तो डोळ्यांना सहजासहजी दिसत नाही. त्यासाठी खास प्रकाशलहरींचा वापर करावा लागतो. त्या प्रकाशझोतात तो दिसतो; पण तो डोळ्यांना सहज दिसावा यासाठी एका खास पावडरचा, भुकटीचा वापर केला जातो.बहुतेक भुजटींमध्ये रोझिन, काळ्या रंगाचं फेरीक ऑक्साइड आणि दिव्याची काजळी असते. इतर काही भुकटींमध्ये शिसं, पारा, कॅडमियम, तांबं, टायटॅनियम, बिस्मथ या सारखी रसायनंही असतात. ही भुकटी त्या वस्तूंवर शिंपडली की जिथे ठसा उमटला आहे तिथल्या घाम आणि स्निग्ध पदार्थांच्या मिश्रणाला ती चिकटून बसते. ब्रशनं हलक्या हातानं उरलेली भुकटी काढून टाकली की मग चिकटलेली पावडर म्हणजेच तो ठसा स्पष्ट दिसू लागतो. एक खास पॉलिएस्टरची पट्टी त्या ठिकाणी चिटकवली की तो ठसा त्या पट्टीवर उमटतो. त्याचं छायाचित्र घेता येतं, तसाच तो संगणकातही साठविता येतो.*बाळ फोंडके यांच्या 'कसं ?' या पुस्तकातून* 👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनातील अनुभवातून घेतलेले ज्ञान माणूस कधी ही विसरू शकत नाही. *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) उत्तर प्रदेशातील मुघल संग्रहालयाला कोणाचे नाव देण्यात आले आहे ?२) मिस वर्ल्ड २०२४ ही स्पर्धा कोणत्या देशात होत आहे ?३) भारत सध्या कोणत्या नावाचा अफाट ताकदीचा सुपर कॉम्प्युटर तयार करत आहे ?४) 'क्वाड' संघटनेत एकूण किती देश आहेत ?५) महाराष्ट्रात एकूण किती किल्ले आहेत ? *उत्तरे :-* १) छत्रपती शिवाजी महाराज २) भारत ३) परम शंख ४) ४ - भारत, अमेरीका, ऑस्ट्रेलिया, जपान ५) ३९० किल्ले*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 निलेश सितावार, धर्माबाद👤 मारोती बोईनवाड👤 डॉ. सचिन बी. कदम👤 सुनंदा पुलकंठवार, नांदेड👤 एकनाथ बोईनवाड👤 शेषराव विठ्ठल तालीमकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना सर्वही संग सोडूनि द्यावा। अती आदरे सज्जनाचा धरावा॥ जयाचेनि संगे महादुःख भंगे। जनी साधनेवीण सन्मार्ग लागे॥२०३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणसं वयाने, गुणाने, संपत्तीने लहानही असतात तसेच मोठे सुद्धा असतात. पण खऱ्या अर्थाने तेच माणसे मोठे असतात जे, रंजल्या, गांजलेल्यांना मान देऊन माणुसकी धर्म निभावून दाखवतात. त्यातच लहान माणसं तेच असतात ज्यांच्यापाशी सर्व काही असून सुद्धा स्वार्थी जीवन जगतात अशा जगण्याला भलेही मार्ग मिळत असले तरी ते, कोणाचेही मार्गदर्शक, प्रेरणास्थान बनू शकत नाही.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सोनेरी शिंगे* " एका जंगलात एक हरीण रहात होते. त्या हरणाला सोनेरी शिंगे होती त्यमुळे त्या हरणाला शिंगाचा खूप गर्व होता. पण तो कधीही आनंदी नसे. कारण त्याला वाटे की, आपले पाय खूप काटकुळे व विद्रूप आहेत. जेव्हा तो शिंगाकडे पाही तेव्हा तो खूप खूष असे. पण जेव्हा त्याचे आपल्या पायाकडे लक्ष जाई तेव्हा त्याला त्याचा खूप राग येत असे.एक दिवस हरिण जंगलातील एका झऱ्यावर पाणी पीत होते. पाणी पिता पिता त्याला पाण्यात त्याची सोनेरी शिंगे दिसली. सुंदर सोनेरी शिंगे पाहून त्याला खूप आनंद झाला. तेवढ्यात त्याला कसलातरी आवाज ऐकू आला आणि मागे वळून पाहतो तर समोरच त्याला एक शिकारी दिसला. शिकारी त्याच्यावर निशाणा साधत होता. शिकाऱ्याला पाहून हरिण घाबरले आणि जोरजोरात पाळायला लागले.शिकारी त्याचा पाठलाग करू लागला. हरणाचे पाय त्याला उत्तम साथ देत होते. त्या पायांमुळे तो इतका जोरात पळत होता. परंतु पळता पळता हरणाची शिंगे एका झाडाच्या फांद्यामध्ये अडकली. हरिण खूप प्रयत्न करतो पण शिंगे काही निघत नव्हती. शेवटी शिकारी आला आणि हरणाला पकडून घेऊन गेला.हरणाला रडायला येते आणि ती स्वत: शीच पुटपुटतो,अरे माझी सुंदर शिंगेच माझ्यासाठी आज संकट बनली. त्यांच्यामुळे शिकाऱ्याने आज मला पकडले*तात्पर्य- फक्त सौंदर्यच सर्व काही नसते.कुठल्याही गोष्टीचे गुण-दोष पण पारखले पाहिजेत."*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23 फेब्रुवारी 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~समुहात जॉईन होण्यासाठी Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ५४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०००:संस्कृत पंडित रा. ना. दांडेकर आणि काश्मिरी कवी रेहमान राही यांना साहित्य अकादमीची फेलोशिप जाहीर**१९९६:कोकण रेल्वेच्या चिपळूण - खेड टप्प्यातील वाहतूकीचा शुभारंभ**१९६६:सीरियात लष्करी उठाव झाला.**१९६३:ब्रह्मदेशात बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.**१९६२:दिल्ली विद्यापीठाच्या कुलगुरू पदी सी.डी.देशमुख यांची निवड**१९५२:संसदेने कामगार भविष्य निर्वाह निधी विधेयक मंजूर केले.**१९४७:आंतरराष्ट्रीय मानक संस्थेची (ISO) स्थापना**१९४५:दुसरे महायुद्ध – इवो जिमाची लढाई - अमेरिकन नौदलाचे काही सैनिक (मरीन्स) प्रशांत महासागरातील माउंट सुराबाचीवर पोचले व त्यांनी तेथे अमेरिकन झेंडा उभारला.**१९४५:दुसरे महायुद्ध – अमेरिकन सैन्याने फिलिपाईन्सची राजधानी मनिला जपानी सैन्यापासून मुक्त केली.**१९४५:दुसरे महायुद्ध – पोलंडच्या पोझ्नान शहरात जर्मन सैन्याने शरणागती पत्करली.**१९४५:दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सच्या विमानांनी जर्मनीतील फोर्झेम शहर बेचिराख केले.**१९४१:डॉ.ग्लेन सीबोर्ग यांनी प्लूटोनिअम हे मूलद्रव्य प्रथमच वेगळे केले.**१७३९:चिमाजी अप्पाच्या वसई मोहिमेत मानाजी आंग्रे यांनी रेवदंड्यावर हल्ला चढवला.**१४५५:पाश्चिमात्य देशातील पहिले छापील पुस्तक ’गटेनबर्ग बायबल’ प्रकाशित झाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७४:हर्शेल हरमन गिब्स -- दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट प्रशिक्षक**१९७४:डॉ.पल्लवी परुळेकर-बनसोडे -- लेखिका,कवयित्री,संपादिका* *१९७३:रेखा व्यंकट कटरे -- कवयित्री**१९७१:डॉ.प्रज्ञा शरद देशपांडे-- कवयित्री, मराठी व संस्कृत भाषेतील लेखिका* *१९६९:भाग्यश्री पटवर्धन-- प्रसिद्ध भारतीय सिने-अभिनेत्री* *१९६९:अयुब खान-- अभिनेते**१९६८:कृतिका देसाई-- भारतीय चित्रपट, थिएटर आणि टेलिव्हिजन अभिनेत्री* *१९६५:हेलेना सुकोव्हा – झेकोस्लोव्हाकियाची टेनिस खेळाडू**१९६५:अशोक कामटे – मुंबईच्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस कमिशनर (मृत्यू:२६ नोव्हेंबर २००८)**१९५७:येरेन नायडू – तेलगु देसम पक्षाचे नेते (मृत्यू:२ नोव्हेंबर २०१२)**१९५२: सुमती साईनाथ लांडे -- प्रसिद्ध कवयित्री,लेखिका व प्रकाशक* *१९४८:मीना अनिल किनीकर-- लेखिका, अनुवादक* *१९४५:पुंडलिक चिंतामण गवळी -- प्रसिद्ध लेखक,कवी* *१९३६:डॉ.प्रल्हाद अमृतकर -- लेखक, अनुवादक* *१९२९:प्राचार्य डॉ.विष्णू बाळकृष्ण कुलकर्णी (मधू कुलकर्णी)-- कथालेखक* *१९१३:प्रफुल्लचंद्र तथा पी.सी.सरकार – जादूगार (मृत्यू:६ जानेवारी १९७१)**१९०२: कृष्णाजी गंगाधर कवचाळे -- कवी,इतिहासलेखक,संपादक (मृत्यू:६ जानेवारी १९६४)* *१८७६:संत गाडगे महाराज(गाडगे बाबा)-- महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार,संत आणि समाजसुधारक (मृत्यू:२० डिसेंबर १९५६)**१६३३:सॅम्युअल पेपिस – विख्यात इंग्रजी रोजनिशीकार व कुशल प्रशासक (मृत्यू:२६ मे १७०३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००९:प्रा.श्री.मा.कुलकर्णी-- प्रसिद्ध लेखक, संशोधक,संपादक (जन्म:१७ मे १९२७)**२००४:सिकंदर बख्त – माजी केन्द्रीय परराष्ट्रमंत्री,केरळचे राज्यपाल व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते (जन्म:२४ ऑगस्ट १९१८)**२००४:विजय आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक (जन्म:२२ जानेवारी १९३४)**२०००:वासुदेवशास्त्री धुंडिराज तांबे – वेदशास्त्राचे गाढे अभ्यासक* *१९९८:रमण लांबा – क्रिकेटपटू (जन्म:२ जानेवारी १९६०)**१९९०:अमृतलाल नगर-- प्रसिद्ध हिंदी लेखक(जन्म:१७ आगस्ट १९१६)**१९६९:मुमताज जहाँ बेगम देहलवी ऊर्फ मधुबाला – चित्रपट अभिनेत्री (जन्म:१४ फेब्रुवारी १९३३ )**१९४७:नारायण दासो बनहट्टी--लेखक, संपादक (जन्म:१८६२)**१९४४:लिओ हेन्ड्रिक आर्थर बेकेलँड – अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ(जन्म:१४ नोव्हेंबर १८६३)**१९०४:महेन्द्र लाल सरकार – होमिओपॅथ, समाजसुधारक व विज्ञानप्रसारक, (जन्म:२ नोव्हेंबर १८३३)**१७९२:सर जोशुआ रेनॉल्ड्स – ब्रिटिश चित्रकार व रॉयल अॅकॅडमीचे पहिले अध्यक्ष, व्यक्तिचित्रे काढण्याबद्दल त्यांची प्रसिद्धी होती. (जन्म:१६ जुलै १७२३)**१७७७:कार्ल फ्रेड्रिक गाऊस – जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ,आर्किमिडीज व न्यूटन यांच्या तोडीचे गणितज्ञ,इलिप्टीक फंक्शन्स व नॉन युक्लिडियन जॉमेट्री इ.विषयांवर त्यांचा मोठा अभ्यास होता.(जन्म:३० एप्रिल १७७७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा*संत गाडगे बाबा यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी विदर्भातील शेनगाव येथे झाला. गाडगेबाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे. संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी तर आईचे नाव सखुबाई असे होते. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे होते. त्यांच कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत.गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी कार्य करणारे समाजसुधारक होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशांतून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश असे.समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते नास्तिकापर्यंत, कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते. संत गाडगेबाबा यांचे दिनांक २० डिसेंबर १९५६ रोजी अमरावती येथे मृत्यू झाला. *संकलन :- नासा येवतीकर*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मॉर्निंग कन्सल्टने जगभरातील लोकप्रिय नेत्यांची यादी केली जाहीर, पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मध्य प्रदेश शालेय शिक्षण विभागाने 1ली ते 12 वी पर्यंतच्या शाळेत आठवड्यातून एक दिवस नो बॅग डे (No bag Day) ठेवण्याचा घेतला निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मार्डच्या मागण्यांवर कॅबिनेटमध्ये निर्णय होणार:उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही; निवासी डॉक्टरांना संप मागे घेण्याचे केले आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी रुग्णलयात दाखल, 10 महिन्यांपूर्वी झाला होता ब्रेन हॅमरेजचा त्रास*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *महाविकास आघाडीच्या 27 फेब्रुवारीच्या बैठकीत जागावाटपांवर शिक्कामोर्तब होणार,सूत्रांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ऊस शेती करणाऱ्यांसाठी एक गुड न्यूज, केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत ऊसाचा FRP 8% नी वाढवला (sugarcane at ₹340/quintal)*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *इंडियन प्रीमिअर लीग 2024 चं वेळापत्रक अखेर जाहीर, 22 मार्चला होणार CSK व RCB यांच्यात पहिला सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔍 *बोटांचे ठसे कसे मिळवतात ?* 🔍 आपल्या तळहातांनी आणि बोटांनी आपण अनेक वस्तू पकडतो. ती पकड सुलभ व्हावी यासाठी निसर्गानं या ठिकाणची कातडी वेगळ्या प्रकारची बनवलेली आहे. या कातडीवर केस उगवत नाहीत. शिवाय ही कातडी जर गुळगुळीत राहिली तर हातात धरलेल्या वस्तूंवर तिची पकड व्यवस्थित बसणार नाही. यासाठी या कातडीचं त्या वस्तूबरोबर घर्षण होईल आणि तसे होताना कातडीला इजा होणार नाही अशीही व्यवस्था केली आहे. त्यासाठी या कातडीवर निरनिराळ्या वळ्या पडतात. या वळ्यांच्या आत सतत घामाचा स्राव करणाऱ्या छिद्रांच्या रांगा असतात. त्या घामामुळं तळहाताला एक प्रकारचं वंगण मिळत राहतं. तसंच त्या छिद्रांना जोडलेल्या काही ग्रंथींमधून स्निग्ध पदार्थांचाही पाझर होत राहतो. जेव्हा एखाद्या वस्तूवर आपली बोटं टेकतात, तेव्हा हे घाम आणि स्निग्ध पदार्थ यांचं मिश्रण त्या वळ्यांमधून त्या वस्तूवर चिकटतं. तिथं त्या वळ्यांचा ठसा उमटतो. यालाच बोटांचा ठसा म्हणतात.बोटांवरच्या या घर्षणवळ्यांचा रचनाबंध प्रत्येक व्यक्ती जन्मतःच घेऊन येते. कोणाही दोन व्यक्तींचे अगदी एकसारख्या एक जुळ्यांचेही बोटांचे ठसे सारखे नसतात. त्यामुळे या बोटांच्या ठशावरून कोणाचीही निर्विवाद ओळख पटवणे सहज शक्य होतं. याच गुणधर्माचा उपयोग गुन्हेगारांची अशी ओळख पटवण्यासाठी केला जातो. त्याला न्यायालयाचीही मान्यता आहे. ज्या वस्तूला बोटांचा स्पर्श झालेला असेल त्या वस्तूवर बोटांच्या घर्षणवळ्यातील घाम आणि स्निग्ध पदार्थांचं मिश्रण चिकटतं; पण त्यापायी उमटलेला ठसा सुप्त स्वरूपातच असतो. तो डोळ्यांना सहजासहजी दिसत नाही. त्यासाठी खास प्रकाशलहरींचा वापर करावा लागतो. त्या प्रकाशझोतात तो दिसतो; पण तो डोळ्यांना सहज दिसावा यासाठी एका खास पावडरचा, भुकटीचा वापर केला जातो.बहुतेक भुजटींमध्ये रोझिन, काळ्या रंगाचं फेरीक ऑक्साइड आणि दिव्याची काजळी असते. इतर काही भुकटींमध्ये शिसं, पारा, कॅडमियम, तांबं, टायटॅनियम, बिस्मथ या सारखी रसायनंही असतात. ही भुकटी त्या वस्तूंवर शिंपडली की जिथे ठसा उमटला आहे तिथल्या घाम आणि स्निग्ध पदार्थांच्या मिश्रणाला ती चिकटून बसते. ब्रशनं हलक्या हातानं उरलेली भुकटी काढून टाकली की मग चिकटलेली पावडर म्हणजेच तो ठसा स्पष्ट दिसू लागतो. एक खास पॉलिएस्टरची पट्टी त्या ठिकाणी चिटकवली की तो ठसा त्या पट्टीवर उमटतो. त्याचं छायाचित्र घेता येतं, तसाच तो संगणकातही साठविता येतो.*बाळ फोंडके यांच्या 'कसं ?' या पुस्तकातून* 👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनातील अनुभवातून घेतलेले ज्ञान माणूस कधी ही विसरू शकत नाही. *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) उत्तर प्रदेशातील मुघल संग्रहालयाला कोणाचे नाव देण्यात आले आहे ?२) मिस वर्ल्ड २०२४ ही स्पर्धा कोणत्या देशात होत आहे ?३) भारत सध्या कोणत्या नावाचा अफाट ताकदीचा सुपर कॉम्प्युटर तयार करत आहे ?४) 'क्वाड' संघटनेत एकूण किती देश आहेत ?५) महाराष्ट्रात एकूण किती किल्ले आहेत ? *उत्तरे :-* १) छत्रपती शिवाजी महाराज २) भारत ३) परम शंख ४) ४ - भारत, अमेरीका, ऑस्ट्रेलिया, जपान ५) ३९० किल्ले*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 निलेश सितावार, धर्माबाद👤 मारोती बोईनवाड👤 डॉ. सचिन बी. कदम👤 सुनंदा पुलकंठवार, नांदेड👤 एकनाथ बोईनवाड👤 शेषराव विठ्ठल तालीमकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना सर्वही संग सोडूनि द्यावा। अती आदरे सज्जनाचा धरावा॥ जयाचेनि संगे महादुःख भंगे। जनी साधनेवीण सन्मार्ग लागे॥२०३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणसं वयाने, गुणाने, संपत्तीने लहानही असतात तसेच मोठे सुद्धा असतात. पण खऱ्या अर्थाने तेच माणसे मोठे असतात जे, रंजल्या, गांजलेल्यांना मान देऊन माणुसकी धर्म निभावून दाखवतात. त्यातच लहान माणसं तेच असतात ज्यांच्यापाशी सर्व काही असून सुद्धा स्वार्थी जीवन जगतात अशा जगण्याला भलेही मार्ग मिळत असले तरी ते, कोणाचेही मार्गदर्शक, प्रेरणास्थान बनू शकत नाही.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सोनेरी शिंगे* " एका जंगलात एक हरीण रहात होते. त्या हरणाला सोनेरी शिंगे होती त्यमुळे त्या हरणाला शिंगाचा खूप गर्व होता. पण तो कधीही आनंदी नसे. कारण त्याला वाटे की, आपले पाय खूप काटकुळे व विद्रूप आहेत. जेव्हा तो शिंगाकडे पाही तेव्हा तो खूप खूष असे. पण जेव्हा त्याचे आपल्या पायाकडे लक्ष जाई तेव्हा त्याला त्याचा खूप राग येत असे.एक दिवस हरिण जंगलातील एका झऱ्यावर पाणी पीत होते. पाणी पिता पिता त्याला पाण्यात त्याची सोनेरी शिंगे दिसली. सुंदर सोनेरी शिंगे पाहून त्याला खूप आनंद झाला. तेवढ्यात त्याला कसलातरी आवाज ऐकू आला आणि मागे वळून पाहतो तर समोरच त्याला एक शिकारी दिसला. शिकारी त्याच्यावर निशाणा साधत होता. शिकाऱ्याला पाहून हरिण घाबरले आणि जोरजोरात पाळायला लागले.शिकारी त्याचा पाठलाग करू लागला. हरणाचे पाय त्याला उत्तम साथ देत होते. त्या पायांमुळे तो इतका जोरात पळत होता. परंतु पळता पळता हरणाची शिंगे एका झाडाच्या फांद्यामध्ये अडकली. हरिण खूप प्रयत्न करतो पण शिंगे काही निघत नव्हती. शेवटी शिकारी आला आणि हरणाला पकडून घेऊन गेला.हरणाला रडायला येते आणि ती स्वत: शीच पुटपुटतो,अरे माझी सुंदर शिंगेच माझ्यासाठी आज संकट बनली. त्यांच्यामुळे शिकाऱ्याने आज मला पकडले*तात्पर्य- फक्त सौंदर्यच सर्व काही नसते.कुठल्याही गोष्टीचे गुण-दोष पण पारखले पाहिजेत."*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 22 फेब्रुवारी 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2016/02/blog-post_20.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_आंतरराष्ट्रीय स्काउट दिवस_*••••••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील ५३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९९:पुण्याच्या काका पवार यांनी इन्फाळ येथील राष्ट्रीय स्पर्धेत कुस्तीतील सुवर्णपदक मिळविले* *१९७९:’सेंट लुशिया’ ला (ब्रिटनपासून) स्वातंत्र्य मिळाले**१९७८:श्री.यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी भारताचे १६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला. या पदावर सर्वात प्रर्दीघ काळ (२६९६ दिवस) त्यांनी काम केले**१९४८:झेकोस्लोव्हाकियामध्ये कम्युनिस्ट क्रांती**१९४२:दुसरे महायुद्ध – फिलिपाईन्समध्ये जपानी सैन्याकडुन पराभव अटळ दिसत असल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एफ. डी. रूझवेल्ट यांनी जनरल डग्लस मॅकआर्थरला माघार घ्यायचा हुकुम दिला**१८१९:स्पेनने फ्लोरिडा हा प्रांत अमेरिकेला ५० लाख डॉलरच्या मोबदल्यात विकला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९४:केतकी माटेगांवकर--- मराठी अभिनेत्री व गायिका**१९८१:इंद्रजित गणपत घुले-- कवी लेखक संपादक अनुवादक**१९७७:नामदेव भोसले-- आदिवासी समाजसेवक तथा साहित्यिक* *१९७४:प्रदीप शंकर सुतार -- लेखक* *१९६५:प्रा.डॉ तीर्थराज कापगते --- कवी, लेखक**१९६५:सूरज आर.बडजात्या-- प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माता* *१९६०:जयंत पवार--- पत्रकार,मराठी नाटककार आणि नाट्यसमीक्षक (मृत्यू:२९ ऑगस्ट २०२१)**१९५५:सुरेन्द्र पाथरकर -- लेखक* *१९५२:परशुराम खुणे-- झाडीपट्टीतील रंगभूमीचे कलाकार,पद्मश्री पुरस्काराने सन्मानित* *१९५०:नयना आपटे-- मराठी नाटक आणि चित्रपटांतील सुप्रसिद्ध अभिनेत्री**१९४९:विशाखा अनंत गुप्ते -- लेखक* *१९३६:रघुनाथ कृष्ण जोशी-- सुलेखनकार,डिझायनर, कवी आणि शिक्षक(मृत्यू:२० एप्रिल २००८)**१९३५:प्रा.चंद्रकुमार नलगे-- जेष्ठ साहित्यिक, विविध पुरस्काराने सन्मानित**१९२२:व्ही.जी.जोग – व्हायोलिनवादक (मृत्यू:३१ जानेवारी २००४)**१९२२:सुलोचना भीमराव खेडगीकर-- लेखिका* *१९२०:इफ्तिखार – चरित्र अभिनेता (मृत्यू:४ मार्च १९९५)**१९२०:कमल कपूर-- भारतीय अभिनेता आणि निर्माता(मृत्यू:२ऑगस्ट२०१०)**१९१०:रामचंद्रअनंत काळेले-- कवी,काव्यसमीक्षक(मृत्यू:१२ जून १९८१)**१९०८:न्या.राम केशव रानडे-- लेखक, विचारवंत,प्रवचनकार* *१९०६:पहारी सन्याल-- भारतीय अभिनेता आणि गायक(मृत्यू:१० फेब्रुवारी १९७४)**१९०२:फ्रिट्झ स्ट्रासमान – जर्मन भौतिकशात्रज्ञ (मृत्यू:२२ एप्रिल १९८०)**१८९८:कमला गोपाळ देशपांडे-- संस्थापक(मृत्यू:८ जुलै १९६५)**१८९०:नारायण केशव भागवत-- बौद्ध वाड्:मयाचे संशोधक,लेखक (मृत्यू:२०एप्रिल १९६२)**१८५७:हेन्रिच हर्ट्झ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू:१ जानेवारी १८९४)**१८५७:लॉर्ड बेडन पॉवेल – बालवीर (Scout) चळवळीचे प्रणेते (मृत्यू:८ जानेवारी १९४१)**१८३६:महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र ’न्यायरत्न’ भट्टाचार्य (मृत्यू:१२ एप्रिल १९०६)**१७३२:जॉर्ज वॉशिंग्टन – अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष (मृत्यू:१४ डिसेंबर १७९९)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००९:लक्ष्मण देशपांडे –’वर्हाड निघालंय लंडनला’साठी प्रसिद्ध असलेले लेखक, दिग्दर्शक व प्राध्यापक (जन्म:५ डिसेंबर १९४३)**२०००:विनायक सदाशिव तथा वि. स. वाळिंबे – लेखक व पत्रकार (जन्म:११ ऑगस्ट १९२८)**२०००:दामोदर दिनकर तथा मधुकाका कुलकर्णी – प्रकाशन व्यवसायात नवनवीन प्रयोगांसाठी ख्याती मिळवलेले प्रकाशक, ’श्री विद्या प्रकाशन’चे संस्थापक (जन्म:२३ आक्टोबर १९२३)**१९८२:जोश मलिहाबादी – ऊर्दू कवी (जन्म:५ डिसेंबर १८९४)**१९५८:मौलाना अबूल कलाम आझाद – स्वातंत्र्यचळवळीतील विद्वान नेते,भारताचे पहिले शिक्षणमंत्री,भारतरत्न (जन्म:११ नोव्हेंबर १८८८)**१९४४:कस्तुरबा गांधी यांचे पुण्यातील आगाखान पॅलेसमधे निधन (जन्म:११ एप्रिल १८६९)**१९२५:सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट – ज्वरमापीचा (Clinical thermometer) शोध लावणारे इंग्लिश डॉक्टर (जन्म:२० जुलै १८३६)**१८२७:चार्ल्स विल्सन पील अमेरिकन – चित्रकार, निसर्गवैज्ञानिक व सैनिक (जन्म:१५ एप्रिल १७४१)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••* शेतकऱ्यांना जगवायचे असेल तर . . . . *भारतातील जवळपास ७५ टक्के जनता खेड्यांत राहते. लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती म्हणूनच भारत देश कृषिप्रधान आहे असे म्हटले जाते. भारतातील संपूर्ण व्यवहार हा शेतीवरच अवलंबून आहे. शेतातून निघणा-या उत्पादनावरच भारताचा विकास अवलंबून आहे. इतरांना जगवणारा, उत्पादक असा शेतकरी मात्र फारच बिकट अवस्थेत दिसून येतो. कवी इंद्रजित भालेराव यांच्या कवितेतील ओळीनुसार शेतकरी हा उभ्या जगाचा पोशिंदा आहे........... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ फेब्रुवारीला यवतमाळ दौऱ्यावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *२००५ नंतरच्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना ‘पेन्शन योजना’ लागू करावी, सत्यजीत तांबे यांनी राज्य सरकारला केली मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यातील १०० महाविद्यालयांमध्ये ४ मार्चपासून 'कौशल्य विकास केंद्र' होणार सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *तिन्ही वीज कंपन्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन:सेवेत सामावून घेण्यासह पगारात 30% वाढ करण्याची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात भूमिका मांडल्याने अजय महाराज बारसकर यांची पक्षातून हकालपट्टी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष ‘गोल्डमॅन’ पंढरीनाथ फडके यांचं निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *NZ vs AUS T20 : अखेरच्या चेंडूवर न्यूझीलंडवर ऑस्ट्रेलियाचा रोमहर्षक विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎇 *कृष्णविवर कसं पाहतात ?* 🎇 आइन्स्टाइनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांतानुसार कृष्णविवराची घनता इतकी प्रचंड असते, की त्यापायी त्याच्या ठायी असलेल्या गुरुत्वाकर्षणाच्या बलातून कोणाचीही सुटका होत नाही. प्रकाशकिरण त्यात जखडून पडतात. ते तसे बाहेर न पडल्यामुळे अर्थात ते दिसण्याची शक्यता मावळते. मग ते एखाद्या ठिकाणी असल्याचं आपल्याला समजतच कसं ? एखाद्या कोळशाच्या वखारीत लपलेल्या काळ्या मांजराला बघण्याइतकंच हे कठीण आहे अशी मल्लीनाथी स्टीफन हॉकिंगनंच केली आहे.तरीही या विश्वात असलेल्या कितीतरी कृष्णविवरांचा छडा वैज्ञानिकांनी लावला आहे. हे साध्य करण्यासाठी चार निरनिराळी तंत्र उपलब्ध आहेत. त्यापैकी एकाचा वापर करून कृष्णविवर बघता येतं.जेव्हा एखाद्या ताऱ्याचा मृत्यू होऊन त्याचं कृष्णविवरात रूपांतर होतं, त्यावेळी त्याच्या गुरुत्वाकर्षणात कोणताही बदल होत नाही. ते पूर्वीइतकंच राहतं. त्यामुळे त्या तार्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या ग्रहांच्या कक्षेतही काहीही बदल होत नाही. ते पूर्वीसारखेच आणि पूर्वीच्या वेगानंच आपली भ्रमंती करत राहतात. त्यामुळे कोणताही तारा नसलेल्या केंद्रकाभोवती असं एखादं ग्रहमंडळ घिरट्या घालत असलेलं दिसलं की तिथं कृष्णविवर असण्याची शक्यता असते.कृष्णविवराच्या तीव्र गुरुत्वाकर्षणाच्या ओढीपायी आसपासचे वायू आणि वायुंचे ढग त्याच्याकडे जोराने खेचले जातात. ही खेच इतकी जोरकस असते की त्या वायूंचं तापमान मोठ्या प्रमाणावर वाढतं. त्यापायी मग त्या वायूंकडुन क्ष किरणांचं उत्सर्जन होतं. त्यांची नोंद घेऊन कृष्णविवराच्या अस्तित्वाचा थांगपत्ता लावता येतो.कृष्णविवराच्या घनतेपायी ते एखाद्या भिंगासारखं काम करतं. जर आपण एखादी वस्तू आणि आपले डोळे यांच्यामध्ये भिंग धरलं तर त्या वस्तूवरून येणार्या प्रकाशकिरणांचं त्या भिंगांकडून वक्रीभवन झाल्यानं ती वस्तू आहे त्यापेक्षा मोठी दिसते. तसंच जर एखादं कृष्णविवर एखादा तारा आणि आपण यांच्यामधून गेलं तर त्या ताऱ्याकडून येणार्या प्रकाशाचीही तीच गत होते आणि त्या ताऱ्याचं तेज आकस्मात वाढतं. त्यावरूनही कृष्णविवराची माहिती मिळते.कृष्णविवराची घनता प्रचंड असते. त्यामुळे लहानशा क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणावर अदृश्य वस्तुमानाची दाटीवाटी झालेली असते. त्यामुळे अवकाशातील वस्तुमानाचं मोजमाप करताना एखाद्या जागी जर अशी मोठ्या प्रमाणावर अदृश्य वस्तुमान असल्याची सूचना मिळाली, तर तिथं कृष्णविवर असल्याची शक्यता बळावते.*बाळ फोंडके यांच्या 'कसं ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अनुभव हा महान शिक्षक आहे पण तो मोबदला मात्र फार घेतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) शिवजयंती निमित्ताने महाराष्ट्र राज्याने *'राज्यशस्त्र'* म्हणून कोणते शस्त्र घोषित केले ?२) संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत असलेले ५ स्थायी देश कोणते ?३) राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली ?४) भारताचा पूर्व - पश्चिम अंतर किती किमी आहे ?५) भारतातील पहिल्या टेस्टट्यूब बेबीचे नाव काय आहे ? *उत्तरे :-* १) पट्टा किंवा दांडपट्टा २) अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया, चीन ३) हर्षवर्धन पाटील ४) २,९३३ किमी ५) कनुप्रिया अग्रवाल ( जगातली दुसरी )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शिवलिंग बेंडके, साहित्यिक, वसमत👤 शाहरूख शेख, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना गुज रे तूज हे प्राप्त झाले। परी अंतरी पाहिजे यत्न केले॥ सदा श्रवणे पाविजे निश्चयासी। धरी सज्जनसंगती धन्य होसी॥२०२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• स्वप्न तर सारेच पाहतात.स्वप्न पाहणेही काही गैर नाही.परंतू स्वप्न सत्यात उतरावयाचे झाल्यास त्यासाठी परिश्रमही करणे तितकेच महत्वाचे आहे. स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी शक्य झाल्यास त्याचे नियोजन करावे.अशक्य वाटत असेल तर स्वप्न म्हणूनच त्याला मागे टाकावे.त्याबद्दल त्याचा जास्त विचारही करु नये. कारण जास्त विचार केला तर आपल्या मनावर काही परिणाम होणार नाही याची दक्षता घ्यावी. जे आहे त्यात बदल होत असेल तर बदल करून जीवनात आनंद आणि समाधान मानावे. विनाकारण स्वप्नांच्या जास्त मागे धावू नये. नाही तर आहे ते ही सुख गमावून बसल्याचा पश्चाताप होईल.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चोर ते चोर अन वर शिरजोर*एका गावात एक पिठाची गिरणी होती. गिरणीचा मालक थोडासा लुच्चा इसम होता. तो गि-हाईकाच्या दळणातील थोडेसे धान्य अथवा पीठ काढून घेत असे. त्याची ही चोरी अनेकांच्या लक्षात येत असे पण गावात दुसरी गिरणी नसल्याने लोक गप्प बसत असत. एकेदिवशी धान्याच्या टोपलीत गिरणीमालकाला एक उंदीर सापडला. त्या उंदराला पकडून तो माणूस त्याच्या मांजराकडे देणार इतक्यात तो उंदीर विनवणीच्या सुरात त्या दळणक-याला म्हणाला, अहो मालक, मी चोर नाही. तुमच्याकडे येणा-या धान्यातील चारदोन दाणे खाऊन मी माझी भूक भागवितो आहे. तेव्हा मला कृपया तुम्ही सोडून द्यावे अशी माझी तुम्हाला विनंती आहे. त्याचे हे बोलणे ऐकून तो इसम त्याला म्हणाला,''अरे उंदरा धान्याचे चारदोन दाणे का होईना पण ते तू चोरून खातोसच ना. मग ही चोरीच आहे त्याबद्दल तुला शिक्षा झालीच पाहिजे.उंदीर म्हणाला, प्रत्येक दळणातले चारदोन दाणे खाणारा मी जरी चोर असलो तरी मी खूपच छोटी चोरी करतो तुम्ही तर प्रत्येक दळण दळण्याचे पैसेही घेता आणि वरून त्या दळणातील थोडे धान्य आणि थोडे पीठ अशी तिहेरी चोरी करता मग तुम्ही तर खूप मोठे चोर आहात. अशा या चोरीबद्दल तुम्ही स्वत:ला काय शिक्षा करून घेणार आहात. उंदराच्या या बोलण्याने माणूस खूपच संतापला व म्हणाला, चोरी करून ते करून वरून परत मलाच चोर ठरवतोस. काहीही झाले तरी माणूस आहे आणि माणूस हा पृथ्वीवरचा सर्वश्रेष्ठ प्राणी आहे. तो काय करतो, कुठे चुकतो, कुठे बरोबर असतो हे ठरवण्याचा अधिकार प्रत्यक्ष परमेश्वरालाही नाही. तू लहान का होईना चोरी केलीस आणि आता तू शिक्षेला पात्र आहेस असे म्हणून त्याने त्या उंदराला मांजराच्या स्वाधीन केले.*तात्पर्य - जगात लहान चोरांना शिक्षा मिळते आणि मोठ्या चोरांना प्रतिष्ठा मिळते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21 फेब्रुवारी 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://m.facebook.com/story.php?story_fbid=1431600076966762&id=100003503492582&mibextid=Nif5oz••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक मातृभाषा दिन_* ••••••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील ५२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••••*१९७५:जयश्री गडकर व बाळ धुरी यांचा विवाह झाला**१९५१:नेपाळ बंडखोराविरुध्द भारत व नेपाळची संयुक्त लढाई सुरू झाली**१९२५:’द न्यूयॉर्कर’ या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.**१९१५:लाहोर कट – लाहोर, बनारस व मीरत या ठिकाणी सशस्त्र क्रांतिकारी उठाव झाला.**१८७८:न्यू हेवन, कनेक्टिकट येथे पहिली टेलिफोन डिरेक्टरी प्रकाशित करण्यात आली.**१८४८:कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंजल्स यांनी साम्यवादाचा जाहीरनामा ’द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’ प्रकाशित केला.**१८४२:जॉर्ज ग्रीनॉ याला शिवणाच्या मशिनचे पेटंट मिळाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७८:मुरलीधर ईश्वरदासजी खोटेले-- झाडी बोलीचे प्रसिद्ध कवी* *१९६७:डॉ,मनोज केशवराव फडणीस-- लेखक* *१९६४:प्रा.डॉ.तनुजा नाफडे -- संगीततज्ज्ञ, लेखिका* *१९५९:हर्षा हरिष वाघमारे -- कवयित्री* *१९५१:प्रा.डॉ.शशिकांत लोखंडे--लेखक, समीक्षक**१९५०:विजयराव दामोदर रुम --- लेखक, सामाजिक कार्यकर्ते* *१९५०:मीना वांगीकर-- मराठी-कन्नड अनुवाद करणाऱ्या एक लेखिका(मृत्यू:२८ ऑक्टोबर २०१५)**१९४५:अनिरुद्ध अनंत कुलकर्णी -- लेखक* *१९४५:डॉ.मधुकर केशव वर्तक-- लेखक, संपादक* *१९४२:डॉ.भगवान रंगनाथ कोठेकर -- लेखक* *१९४२:जयश्री गडकर – प्रसिद्ध अभिनेत्री (मृत्यू:२९ ऑगस्ट २००८)**१९३७:सुलभा अरविंद देशपांडे--- हिंदी-मराठी नाटक-चित्रपटांत आणि दूरचित्रवाणी मालिकांत काम करणाऱ्या अभिनेत्री(मृत्यू:४ जून २०१६)**१९३३:रा.रा.जांभेकर -- लेखक**१९३१:वसंत दामोदर कुलकर्णी -- मराठी वाङ्मयाचे अभ्यासक व संशोधक,संपादक* *१९२१:विद्याधर भास्कर उजगरे-- लेखक* *१९११:भबतोष दत्ता – अर्थतज्ञ (मृत्यू:११ जानेवारी १९९७)**१८९९:सूर्यकांत त्रिपाठी "निराला"-- प्रसिद्ध भारतीय कवी,कादंबरीकार,निबंधकार आणि कथा-लेखक(मृत्यू:१५ऑक्टोबर१९६१)**१८९८:बाळकृष्ण रामचंद्र मोडक-- लेखक,'मुलांचे मासिक'कार(मृत्यू:२४ फेब्रुवारी १९९०)**१८९४:डॉ.शांतिस्वरुप भटनागर – वैज्ञानिक (मृत्यू:१ जानेवारी १९५५)**१८७५:जीन काल्मेंट – १२२ वर्षे आणि १६४ दिवस जगलेली फ्रेन्च महिला (मृत्यू:४ ऑगस्ट १९९७)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१९:श्रीधर माडगूळकर-- ग.दि. माडगूळकर यांचे पूत्र आणि ज्येष्ठ लेखक(जन्म:६ फेब्रुवारी २९४७)**१९९८:ओमप्रकाश बक्षी ऊर्फ ’ओमप्रकाश’ – चरित्र अभिनेते (जन्म:१९ डिसेंबर १९१९)**१९९१:नूतन बहल – चित्रपट अभिनेत्री (जन्म:४ जून १९३६)**१९८४:मिखाईल अलेकसांद्रोविच शोलोखोव-- श्रेष्ठ रशियन लेखक,नोबेल पारितोषिक विजेते (जन्म:२४ मे १९०५)**१९७७:रा.श्री.जोग – साहित्य मीमांसक,कवी व विचारवंत (जन्म:१५ मे १९०३)**१९७५:गजानन हरी तथा राजा नेने – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते व दिग्दर्शक(जन्म: १८ सप्टेंबर १९१२)**१९६५:’माल्कम एक्स’ – कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढणारे अमेरिकन नेते (जन्म:१९ मे १९२५)**१८२९:चन्नम्मा – कित्तूरची राणी (जन्म:२३ आक्टोबर १७७८)~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे, त्यानिमित्ताने सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांना फ्रेश मॉर्निंग बुलेटिन टीम कडून हार्दीक शुभेच्छा .........!.... Motivational Article .....*आयुष्यातील महत्वपूर्ण वळण...!*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के स्वतंत्र आरक्षण, राज्याच्या दोन्ही सभागृहात विधेयक एकमताने मंजूर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *26 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन:विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *आजपासून राज्यात बारावीच्या बोर्ड परीक्षेला सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजीत गोपछडे यांच्यासह सोनिया गांधी व जेपी नड्डांची राज्यसभेवर बिनविरोध निवड*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *'आप'चे कुलदीप कुमार चंडीगडचे नवे महापौर; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, निवडणूक अधिकाऱ्यावर खटला*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *शेतकरी आंदोलन: शेतकऱ्यांनी सरकारचा प्रस्ताव फेटाळला, 21 तारखेला दिल्लीकडे करणार कूच*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ, एकाचवेळी मनोज तिवारी, सौरभ तिवारी, वरुण अॅरोन, धवल कुलकर्णी आणि फैज फजल या पाच क्रिकेटर्सने केली निवृत्तीची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अंक / DIGIT* संख्यादर्शक चिन्हांना किंवा अक्षरांना ‘अंक’ म्हणतात. मोजण्याची. आवश्यकता मानवाला त्याच्या प्रारंभापासून स्वाभाविकपणेच भासली असावी. मानवजातीच्या बाल्यावस्थेत प्रत्येक मानवाला मी एक व हा दुसरा एवढे साधे ज्ञान असणार यात वाद नाही. म्हणजे दोन अंक मोजण्याइतपत त्याची प्रगती उपजतच असणार. त्याच्या पुढची पायरी म्हणजे त्याच्याजवळ असलेल्या वस्तूंची मोजदाद करावयास तो हळूहळू शिकला असेल. प्राथमिक अवस्थेमध्ये हाताची बोटे, गारगोट्या, झाडाची पाने, काठ्या यांचा उपयोग मोजण्यासाठी मानव करीत असे. जगातील बहुतेक जमाती प्राथमिक अवस्थेमध्ये सामान्यपणे अशाच तऱ्हेने अंकनिर्देश करीत असत. मानवास लेखनकला अवगत झाल्यावर तो एकेक अक्षराचा अंकासाठी उपयोग करू लागला. अशा तऱ्हेची पद्धती अॅरेमाइक, हिब्रू, खरोष्ठी, ब्राह्मी आणि ग्रीक लिपींत दिसून येते.मानवाने अंकाचा शोध लावला त्या वेळेस तो अंकांचे उच्चार कसे करीत असणार याविषयी गूढ वाटणे साहजिक आहे. वेदकालापासून सर्व ज्ञान एका पिढीपासून दुसऱ्या पिढीस मौखिक पद्धतीने शतकानुशतके दिले गेल्यामुळे भारतात अंकांचे उच्चार कोणते होते हे स्पष्ट होते; ते म्हणजे एक, द्वि, त्रि, चतुर्, पंचन्, षष्, सप्तन्, अष्टन्, नवन् आणि दशन् हे होत. या संस्कृत उच्चारांवरून पुढे मराठीत एक, दोन, तीन वगैरे संज्ञा अपभ्रष्ट स्वरूपात रूढ झाल्या.ईजिप्त : लेखनकलेचे सर्वांत प्रचीन नमुने ईजिप्तमध्ये सापडतात; तसेच अंकलेखनाचे नमुनेही (इ.स.पू.सु. ३४००) तेथेच सापडतात. तेथे एक ते नऊ ह्या अंकांसाठी उभ्या दंडांची योजना केलेली आढळते. ही रीत ⇨हायरोग्लिफिक लिपि-पद्धतीचा एक भाग आहे. दहा, शंभर, हजार ह्या संख्यांसाठी मात्र तेथे वेगळी चिन्हे वापरलेली आढळतात. लाखाकरिता बेडकाचे व दहा लाखाकरिता आश्चर्याचे बाहू पसरलेल्या मानवाचे चित्र काढले जाई. यानंतरच्या काळात ईजिप्तमध्ये हिअरेटिक अंक (इ.स.पू.सु. १२ वे शतक) आणि त्यापासून पुढे डेमॉटिक अंक (इ.स.पू.सु. ७ वे ते ३ रे शतक) उपयोगात आणले गेले. हिअरेटिक आणि डेमॉटिक अंकांतील फरक काटेकोरपणे दाखविणे कठिण असले, तरी हिअरेटिक अंकांपासून डेमॉटिक अंक विकसित झाले असावेत असे दिसते. जलद लेखनासाठी वरील दोन्ही पद्धती मूळ हायरोग्लिफिक पद्धतीपासून निघाल्या असाव्यात. हायरोग्लिफिक पध्दतीपेक्षा हिअरेटिक पद्धतीत अधिक चिन्हे असल्याने तीत लहानमोठ्या संख्या अधिक संक्षिप्तपणे दर्शविणे सोयीचे होते. हिअरेटिक अंकपद्धतीत आधी मोठ्या मूल्यांची चिन्हे आणि त्यानंतरत्यापुढे (उजवीकडे) कमी मूल्यांची चिन्हे लिहिली जात*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••खरी श्रीमंती शरीराची, बुद्धीची आणि मनाची असते. *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) IPL स्पर्धेतील *सार्वकालिक महान कर्णधार* म्हणून कोणाची निवड झाली आहे ?२) संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत एकूण किती देश आहेत ?३) लोकमतच्या वतीने दिला जाणारा 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार कोणत्या शिक्षकाला देऊन सन्मानित करण्यात आले ?४) राजा दशरथ यांनी बाणाने श्रवण कुमारला मारले त्या बाणाचे नाव काय होते ?५) २०२३ या वर्षाचा ५८ वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला प्राप्त झाला आहे ? *उत्तरे :-* १) महेंद्रसिंग धोनी, भारत २) १५ देश ( ५ स्थायी व १० अस्थायी ) ३) आनंदा आनेम वाड, डहाणू, जि. पालघर ४) शब्दवेधी बाण ५) प्रख्यात उर्दू कवी, गीतकार गुलजार व संस्कृतचे महापंडित जगद्गुरु रामभद्राचार्य*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सचिन मानधनी, धर्माबाद👤 विशाल चव्हाण, सहशिक्षक, धर्माबाद👤 संजय कासलोड👤 पियूष मुजळगे, धर्माबाद👤 एकनाथ पांचाळ👤 डॅनियल ग्राहम्बल, शिक्षक, देगलूर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कदा ओळखीमाजि दूजे दिसेना। मनी मानसी द्वैत काही वसेना॥ बहूता दिसा आपली भेट जाली। विदेहीपणे सर्व काया निवाली॥२०१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जो पर्यंत माणूस जिवंत असतो तो पर्यंत एकमेकांना आनंदाने , मिठी मारणे, हाताला , हात मिळवणे, सोबत मिळून, मिसळून खाणे, पिणे होत असते.पण, एकदा का त्या माणसाचा मृत्यू झाला की, लगेच त्यापासून पाच हात दूर रहाताना दिसतात. एवढेच नाही तर...त्या मृत शरिराला स्पर्श केल्यावर विटाळ मानून आंघोळ करून घेतात. तर कोणी साधं स्पर्श सुद्धा करत नाही. भलेही माणसाचे जीवन कितीही सुंदर असले तरी ते क्षणभंगुर आहे. म्हणून अति माजू नये व गर्वाच्या भोवऱ्यात अडकू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लेकीची माया*एका गावात एका माणसाचा मृत्यू झाला ,तिरडी तयार करून लोक ती अंत्ययात्रा घेऊन स्मशानभूमीकडे जाऊ लागले तोच एक व्यक्ती तिथे आली आणि तिरडी धरणाऱ्या पैकी एकाचा पाय धरून ओरडू लागला की मेलेला मनुष्य माझे 15 लाख रुप्ये देणे आहे , जोपर्यंत माझे क़र्ज़ मला परत नाही मिळत तोपर्यंत अंत्यसंस्कार करू नाही देणार....जमलेले सर्व लोक चाललेला तमाशा बघु लागलेतेवढ्यात मृत व्यक्तीची मूले बोलू लागली की आमच्या वडिलांनी कधी आम्हाला या कर्जाच्या बाबत सांगितले नाही त्यामुळे आम्ही हे कर्ज नाही देणार.तेव्हा मृत व्यक्तीचे भाऊ बोलले की मुले जबाबदारी नाही घेत तर आम्ही पण देऊ शकत नाही.आता सगळे उभे राहिले व याने तर प्रेतयात्रा अडवलेली...जेव्हा खूप वेळ झाली तोपर्यंत ही गोष्ट घरातील बायकांपर्यंत गेली,ही गोष्ट जेव्हा मृत व्यक्तीच्या एकुलत्या मुलीला कळाली तेव्हा तात्काळ तिने आपले दागिने व घरातील ठेवलेले किमती वस्तू,पैसे इ. त्या माणसाकडे पाठविल्या आणि सांगितले की हे सर्व विकून त्याचे पैसे तुमच्याकडे ठेवा ,,, पण माझ्या वडिलांची प्रेतयात्रा थांबवू नका..मी सर्व कर्ज फेडून टाकेन आणि बाकी रक्कम लवकरच पाठवून देईन .....आता तो माणूस उभा राहिला व सर्व उपस्थित लोकांना बोलू लागला ..की खरे पाहता गोष्ट अशी आहे की मेलेल्या माणसाकडून 15 लाख येणे नाही तर उलट मी त्याला देणे आहे,परंतु मी याच्या वारसदारांना ओळखत नव्हतो म्हणुन मी हा खेळ खेळला...आता मला कळाले की या मृत व्यक्तीचा वारस फक्त त्याची मुलगी असून इतर कोणी नाही, असे सांगून ती व्यक्ती निघून गेली,आता मुले व भाऊ मान खाली घालून फक्त हताशपणे उभे होते. .*आशय* ......मुली आपल्या आईवडिलांनाच आपली खरी दौलत समजतात.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 20 फेब्रुवारी 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://kathamaala.blogspot.com/2020/07/blog-post.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक सामाजिक न्याय दिवस_*••••••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील ५१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०१४:बर्याच गदारोळानंतर राज्यसभेतही आंध्र प्रदेशच्या विभाजनाचे विधेयक संमत झाल्याने ’तेलंगण’ हे भारताचे २९ वे राज्य बनले.**१९९९:भारत पाक दरम्यान दिल्ली ते लाहोर बस सेवेस प्रारंभ* *१९८८:महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून श्री कासू ब्रह्मानंद रेड्डी यांनी सूत्रे हाती घेतली* *१९८७:अरुणाचल प्रदेश स्थापना दिवस भारताच्या ईशान्य भागातील एक प्रमुख राज्य**१९८७:मिझोराम भारताचे २३ वे राज्य बनले**१९७८:शेवटचा ’ऑर्डर ऑफ व्हिक्टरी’ सन्मान लिओनिद ब्रेझनेव्ह यांना देण्यात आला.**१९७१:पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या अर्ध पुतळ्यांचे अनावरण उपराष्ट्रपती डॉ.गोपाळ स्वरूप पाठक यांच्या शुभहस्ते झाले.**१७९२:जॉर्ज वॉशिंग्टनने टपाल सेवा कायद्यावर सही केल्यामुळे अमेरिकेत टपाल खात्याची सुरूवात झाली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८५:प्रणाली शैलेश चव्हाटे-- कवयित्री, लेखिका* *१९७८:रचना-- लेखिका,कवयित्री* *१९७६:रोहन सुनील गावस्कर-- भारतीय क्रिकेटपटू**१९६९:विजय अर्जुन सावंत-- कवी,लेखक**१९६३:नागेश सूर्यकांतराव शेवाळकर-- प्रसिद्ध मराठी साहित्यिक**१९६२:मीना शेट्टे-संभू-- संपादिका,लेखिका* *१९५७:प्रा.बसवराज कोरे-- जेष्ठ लेखक**१९५६:अन्नू कपूर-- भारतीय चित्रपट अभिनेता* *१९५५:लखनसिंह कटरे-- प्रसिद्ध कवी,कथाकार,झाडीबोली साहित्य संमेलनाचे पूर्व अध्यक्ष* *१९५२:डॉ.रा.गो.चवरे-- कादंबरीकार, कथाकार**१९५१:गॉर्डन ब्राऊन – इंग्लंडचे पंतप्रधान**१९४१:प्रा.माधव थोरात -- कवी* *१९३७:सुसंगति महादेव गोखले -- बालसाहितिक* *१९२८:आबाजी नारायण पेडणेकर-- मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कथाकार,कवी, समीक्षक आणि भाषांतरकार.(मृत्यू:११ ऑगस्ट २००४)**१९०४:अलेक्सी कोसिजीन – रशियाचे पंतप्रधान (मृत्यू:१८ डिसेंबर १९८०)**१८४४:लुडविग बोल्टझमन – ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू:५ सप्टेंबर १९०६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३:बेला बोस- भारतीय नृत्यांगना आणि अभिनेत्री(जन्म:१८ एप्रिल १९४१)**२०१५:गोविंद पानसरे-- महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे विचारवंत व कम्युनिस्ट कामगार नेते(जन्म:२४ नोव्हेंबर १९३३)**२०१२:डॉ.रत्नाकर मंचरकर – संत साहित्याचे गाढे अभ्यासक,साक्षेपी समीक्षक व संशोधक (जन्म:६ आक्टोबर १९४३)**२००७:डॉ.किशोर शांताबाई काळे--- डॉक्टर व प्रसिद्ध लेखक.काळे यांचा वयाच्या ३७ व्या वर्षी अपघाती मृत्यू झाला.(जन्म:१ जून १९६८)**२००१:इंद्रजित गुप्ता – माजी केन्द्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते (जन्म: १८ मार्च १९१९)**१९९७:श्री.ग.माजगावकर–पत्रकार,लेखक ’माणूस’ साप्ताहिकाचे संपादक(जन्म:०१ अगस्त १९२९)**१९९४:त्र्यं.कृ.टोपे – घटनातज्ञ व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू* *१९७४:केशव नारायण काळे--- मराठीतील एक कवी,नाटककार,समीक्षक,चित्रपट निर्माते आणि नियतकालिकांचे संपादक(मृत्यू:२० फेब्रुवारी १९७४)* *१९५८:हरिश्चंद्र सखाराम भातावडेकर-- भारतात चित्रपट बनवणारे भारतीय(जन्म:१५ मार्च, १८६८)**१९५०:बॅ.शरदचंद्र बोस – स्वांत्र्यसेनानी, झुंजार पत्रकार,नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू (जन्म:६ सप्टेंबर १८८९)**१९१०:ब्युट्रोस घाली– इजिप्तचे पंतप्रधान (जन्म:१८४६)**१९०५:विष्णुपंत छत्रे – भारतातील सर्कस उद्योगाचे जनक (जन्म: १८४६)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कादंबरी - लक्ष्मी*मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व समाजाला कथेच्या माध्यमातून सांगावं तसेच लॉकडाऊन काळातील वेळेचा सदुपयोग व्हावा म्हणून दिनांक 01 जुलै 2020 रोजी लक्ष्मी या कादंबरी लेखनाला सुरुवात केली. आपल्या लेखन योग्य दिशेने जात आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी काही मित्रांना सोशल मिडियाद्वारे पाठवीत राहिलो. अनेक वाचकांना ही कथा पसंत येऊ लागली. काही वाचकांनी फोन करून लेखनास शुभेच्छा दिल्या. काही जणांनी ही कथा वास्तविक जीवनाशी निगडीत आहे, असे म्हटले. आमच्या जवळच्या एका शिक्षिकेने त्यांच्या जीवनात आलेल्या चढ-उताराची अनेक प्रसंग सांगून मन हलके केले. पुढचा भाग कधी येणार ? हा प्रश्न तर कित्येक वाचकांचा होता. आपल्या सर्वांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनामुळे मी लक्ष्मी कादंबरी पूर्ण करू शकलो. आपले प्रेम असेच कायम लिहिणाऱ्याच्या पाठीवर असू द्यावे म्हणजे साहित्याची नवनिर्मिती होऊ शकेल. पुनश्च एकदा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो.- नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769..... पूर्ण कादंबरी ( एकूण 10 भाग ) वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठा आरक्षणासंबंधी आज राज्य विधीमंडळाचं विशेष अधिवेशन, शिवजयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार, मराठ्यांना किती टक्के आरक्षण मिळणार ? याकडे राज्याचं लक्ष*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *'छत्रपती शिवाजी महाराज की जय' या जयघोषात किल्ले शिवनेरी दुमदुमली ! गल्लीपासून दिल्लीपर्यंत शिवजयंतीचा उत्साह*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शरद पवार गटाने चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज करावा, आयोगाने नियमानुसार चिन्ह द्यावं, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, तर पुढील आदेशापर्यंत पवार गटाला मिळालेले नाव कायम राहणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शिक्षकांनी निवडणुकीचं काम करु नये, कोण कारवाई करतं बघतोच, राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *केंद्रीय बैठकीत सरकारने धान आणि गहू व्यतिरिक्त मसूर, उडीद, मका आणि कापूस पिकांवर एमएसपी म्हणजेच हमीभाव देण्याचे केले मान्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *एक लाख उद्योजक घडवण्याचे ध्येय ठेवून काम करणार:अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 434 धावांनी पराभव केला अन् मालिकेत 2-1 ने मिळवली आघाडी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *हवेचा दाब कसा मोजतात ?* 📙 ***************************आपल्याकडे सभोवती सगळीकडे हवा आहे. वारा वाहतो तेव्हा हवा असल्याचं आपल्याला जाणवतं. एरवी ती आपल्याला दिसत नाही. त्यामुळे तिला काही वजन असेल याची कल्पनाही आपल्याला येत नाही. पण जमिनीपासून थेट आकाशात कितीतरी उंचीपर्यंत हवा असते. त्यामुळे जमिनीवर तिचा सतत दाब पडत असतो. जमिनीच्या एक चौरस मीटरच्या तुकड्यावर हवेचा असा जो स्तंभ उभा असतो, त्याचा जो दाब पडतो त्याला हवेचा दाब म्हणतात. हवामानखातं जेव्हा उद्याच्या किंवा पुढील आठवड्याच्या हवामानाचा अंदाज देतं तेव्हा निरनिराळ्या ठिकाणी असलेल्या हवेच्या दाबाची माहितीही दिली जाते. जेव्हा अनपेक्षितरित्या पाऊस येतो तेव्हा कोणत्यातरी ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पाऊस पडत असल्याचं सांगण्यात येतं. त्यावेळीच आपल्याला हवेचाही दाब असतो हे आठवतं. हवेचा हा दाब पास्कल किंवा बार या एककांमध्ये मोजला जातो. पण ते झालं वैज्ञानिक परिमाण. एरवी आपल्याला ओळखीचं असणारं परिमाण म्हणजे पाऱ्याची उंची. जसा रक्तदाब नळीतल्या पाऱ्याच्या उंचीत मोजला जातो तसाच हवेचा दाबही मोजला जातो. यासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्राला बॅरोमीटर असं म्हणतात. त्यात एका भांड्यात पारा ठेवून त्यात एक उलटी नळी ठेवलेली असते. त्या नळीतील हवा काढून घेतलेली असल्याने तिच्यात निर्वात पोकळी निर्माण झालेली असते. भांड्यातल्या पाण्यावर पडणाऱ्या हवेच्या दाबामुळे पारा त्या नळीत चढतो. नळीतल्या पार्याचं वजन आणि त्या भांड्यातल्या नळीच्या तोंडाच्या क्षेत्रफळाएवढ्या जागेवरच्या हवेचं वजन समान असतं. त्यामुळे नळीतल्या पाऱ्याची उंची ही त्या हवेच्या दाबाचं माप असल्याचं धरलं जातं. सामान्यत: समुद्रसपाटीवर पाऱ्याची उंची ७६० मिलिमीटर असते. तोच हवेचा दाब मानला जातो. एका चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळावरच्या हवेचा दाब एक किलोन्यूटन असतो.हे अर्थात अतिशय प्राथमिक स्वरूपाचं बॅरोमीटर झालं. हवेचा दाब मोजावयास सुरुवात झाली तेव्हा अशा यंत्राचा वापर होत असे. आजकाल याच तत्त्वावर आधारित पण अचूक मोजमाप करणारी इलेक्ट्रॉनिक बॅरोमीटर्स उपलब्ध आहेत. जसजसं उंचावर जावं तसतशी हवा विरळ होते. सहाजिकच तिथं हवेचा दाब घसरत जातो.*बाळ फोंडके यांच्या 'कसं ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) बुलढाणा जिल्ह्यातील खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवराची निर्मिती कशामुळे झाली ?२) महिला कसोटी इतिहासात सर्वात वेगवान द्विशतकाचा विक्रम कोणी केला ?३) 'सणांचे शहर' असे कोणत्या शहराचे टोपणनाव आहे ?४) श्रीरामांनी बालीला कोणत्या वृक्षामागे लपून बाण मारला होता ?५) अतिथंड हवामानात पाण्याचे नळ ( पाईप ) का फुटतात ? *उत्तरे :-* १) उल्कापात २) अँनाबेल सदरलॅण्ड, ऑस्ट्रेलिया, २४८ चेंडूत ३) मदुराई ४) साल वृक्ष ५) पाण्याचे बर्फ होतांना ते प्रसरण पावते.*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 नागेश सु. शेवाळकर, जेष्ठ बालसाहित्यिक, पुणे👤 डुमलवाड शंकर राजेन्ना, स.शि.प्रा.शा.शिरूर ता. उमरी जि. नांदेड.👤 अनाम मैनुद्दीन शेख, नांदेड👤 शिरीष गिरी, सहशिक्षक, धारूर👤 दिलीप लिंगमपल्ले, धर्माबाद👤 विठ्ठल डोनगिरे👤 बालाजी विठ्ठल उगले👤 नागेश काळे, लातूर👤 साहेबराव पाटील कदम👤 उत्तम कानींदे, सहशिक्षक, किनवट👤 संतोष कामगोंडे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कळे आकळे रुप ते ज्ञान होता।तेथे आटली सर्वसाक्षी अवस्था॥मना उन्मनी शब्द कुंठीत राहे।तो रे तोचि तो राम सर्वत्र पाहे॥२००॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा.....🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कष्ट करून मिळालेले समाधान जगावेगळे असते . व इतरांनाच्या विषयी कपट, कारस्थान करून, धोका देऊन मिळविलेला आनंद स्वतःचा तसेच मानव जातीचा अपमान केल्यासारखे होते. दोन्ही मध्ये जमीन आसमानचा फरक आहे. म्हणून कष्ट करून जर आनंद मिळवता येत नसेल तर इतरांचे वाईट करून निसर्गाच्या नियमाचे उलंघन करू नये.कारण निसर्गाचे डोळे झाकले नसतात. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🌅जीवनाचे सार* *एकदा एक शेतकरी देवावर खूप नाराज झाला. नाराजीचे कारणही तसेच होते कारण कधी पाऊस जास्त पडत असे तर कधी पूर्ण दुष्काळ, कधी ऊन जास्त तर कधी ढगाळ वातावरण, कधी गारा पडून पीकाचे नुकसान होई तर कधी वा-याने उभे पीक आडवे होत असे. एक दिवस वैतागून त्याने देवाला साद घातली व देवास सांगितले,''तुम्ही सर्वव्यापी प्रभू परमेश्वर असाल इतर सर्व गोष्टीतले तुम्हाला कळत असेल पण माझ्यामते तरी तुम्हाला शेतीतले काहीच कळत नाही. एक प्रार्थना तुम्हाला मी करतो की तुम्ही फक्त एक वर्षभर निसर्ग माझ्या ताब्या्त द्या मग बघा शेती कशी फुलते ते. घरोघरी मी धान्यांच्या राशी कशा घालतो ते पहाच तुम्ही..'' देव हसला आणि म्हणाला,''तथास्तू , तुझ्या म्हणण्या प्रमाणे आज, आतापासून मी निसर्गाचा लहरीपणा बंद करून तो तुझ्या ताब्यात मी देत आहे. तू तुला जसा पाहिजे तसा ऋतु बनवून घे व शेती कर'' इतके बोलून देव निघून गेला. शेतक-याने या वरदानाचा फायदा घेण्यासाठी गहू पेरले, जेव्हा त्याला जेवढे ऊन पाहिजे होते तेव्हा त्याने ऊन पाडले, जेव्हा त्याला पाणी द्यायचे होते तेव्हा त्याने पावसाचा वर्षाव केला. प्रचंड ऊन, गारा, पूर, सोसाट्याचा वारा याचा स्पर्शही कधी त्याने आपल्या् पीकांना होऊ दिला नाही. काळ निघून गेला आणि त्याची शेती बहरून आली. शेतक-याला मोठा आनंद झाला. कधी नव्हे् इतके पीक आले होते. शेतक-याने मनातल्या मनात विचार केला की आता देवाला कळेल की शेती कशी केली जाते, उगाचच तो शेतक-यांना कसा त्रास होईल ते वरून पाहत असतो. पीक कापणीस आले आणि शेतकरी मोठ्या आनंदाने, गर्वात पीक कापणीसाठी शेतात गेला. पीकाला हात लावून पाहिला आणि तो बेशुद्ध होऊनच खाली पडला. कारण गव्हाच्या ओंब्यांमध्ये एकही दाणा नव्हाताच मुळी. पीक नुसते आलेले दिसत होते पण एकही गव्हाचा दाणा भरला गेला नव्हता. थोड्यावेळाने तो शुद्धीवर आला आणि धाय ओकलून रडू लागला. त्याचे काळीज पिळवटणारे रूदन ऐकून परमात्मा परमेश्वर तेथे प्रकट झाला आणि म्हणाला,'' अरे वेड्या तुला काय वाटले, तू तुझ्या इच्छेेप्रमाणे जसा पाहिजे तसा वागला म्हणून पीक तसे येईल पण तसे होत नसते. त्या पिकाला तू कधीच संघर्ष करू दिला नाही. सोसाट्याच्या वा-यातच पिक उभे राहते तेव्हालाच त्याच्यात बळ येते. प्रचंड उन्हातही त्याच्यात जगण्याची इच्छा बळावते. संकटाशी जोपर्यंत सामना करत नाही तोपर्यंत त्याला त्याची कुवत कळत नाही. सगळे जर मनाप्रमाणे घडले तर कोणत्याच गोष्टीची किंमत राहत नाही. आव्हाने मिळाले नाही म्हणून तुझ्या पीकात दाणे भरलेच नाहीत. वारा सुटतो, गारा पडतात तेव्हाच त्या पिकात जगण्याची उमेद निर्माण होते आणि ते संघर्ष करून नवीन जीवन निर्माण करण्याचा प्रयत्न करते. तू हे कधीच होऊ दिले नाही म्ह्णून तुझे पीक हे पोकळ निघाले. सोन्याला सुद्धा चकाकी येण्यासाठी आधी आगीतून जावे लागते तेव्हाच ते चकाकते. हातोडीचे मार सोसावे लागतात तेव्हाच सोन्याचा उत्कृष्ट दागिना बनतो.'' आता शेतक-याला जीवनाचे सार उमगले होते.* *🧠थोडक्यात- जीवनात जर संघर्षच नसेल तर, आव्हाने नसतील तर मनुष्य अगदी खिळखिळा बनून राहतो.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 17 फेब्रुवारी 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2024/02/chatrpati-shivaji-maharaj.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ४८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००८:कोसोव्होने स्वातंत्र्य जाहीर केले.**१९६४:अमेरिकन काँग्रेसचे सगळे मतदारसंघ सारख्याच लोकसंख्येचे असले पाहिजेत असा निर्णय अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने दिला.**१९५२:नाना जोग लिखित 'भारती' या नाटकाचा प्रथम प्रयोग नागपूर नाट्य मंडळाने नागपूर येथे केला**१९४४:दुसऱ्या महायुद्धात जपानी जिंकलेली अंदमान निकोबार बेटे आजाद हिंद फौजेच्या स्वाधीन करण्यात आली**१९३३:अमेरिकेत दारुबंदी समाप्त झाली. १९२० साली ही दारुबंदी लागू झाली होतॊ.**१९२७:’रणदुंदुभि’ नाटकाचा पहिला प्रयोग झाला.**१९१२:राम गणेश गडकरी यांचे पहिले नाटक "प्रेम संन्यास" रंगभूमीवर आहे.**१८०१:अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत थॉमस जेफरसन व एरन बर यांना सारखीच मते मिळाली. हाउस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह्सनी जेफरसन यांना राष्ट्राध्यक्ष तर बर यांना उपाध्यक्ष केले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७८:प्रफुल्ल अंदुरकर-- कवी* *१९७५:प्रसाद ओक-- प्रसिद्ध अभिनेता* *१९६८:विनायक नारायण अनिखिंडी -- प्रसिद्ध कवी,लेखक**१९६५:सदानंद कदम-- प्रसिद्ध लेखक, संग्राहक* *१९६३:सुजाता मिलिंद बाबर -- लेखिका, संपादिका,अनुवादक**१९६१:संजीव वसंत वेलणकर -- लेखक,सोशल मीडियावर दैनंदिन लेखन**१९५७:हेमंत श्रीराम देशपांडे-- लेखक**१९५७:प्रफुल्ल मनोहरभाई पटेल-- माजी केंद्रीय मंत्री**१९५४:कल्वकुंतल चंद्रशेखर राव-- तेलंगणा राज्याचे पहिले मुख्यमंत्री* *१९५०:प्रा.जयंतकुमार गणपतराव बंड-- लेखक,संपादक* *१९५०:प्रा.उद्धव निंबा महाजन-- प्रसिद्ध कवी,लेखक**१९४३:डॉ.रूपचंद निखाडे-- लेखक**१९४२:प्राचार्य अनुराधा कृष्णराव गुरव --प्रसिद्ध लेखिका,कवयित्री,शैक्षणिक विचारवंत(मृत्यू:३०मे२०२०)**१९४०:गजानन जानोजी बागडे-- कवी (मृत्यू:१ सप्टेंबर २०१२)**१९३५:रवी टंडन-- भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता(मृत्यू:११ फेब्रुवारी २०२२)* *१९३२:सुहासिनी इर्लेकर---मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कवयित्री आणि समीक्षक(मृत्यू:२८ आॅगस्ट २०१०)**१९१८:कृष्ण भालचंद्र फडके -- लेखक* *१९०२:सीताराम गणपतराव मनाठकर-- कवी ( मृत्यू:मे १९४९)**१९०२:प्रभाकर वासुदेव बापट-- समीक्षक (मृत्यू:२६ जुलै १९४४)**१८७४:थॉमस वॉटसन – अमेरिकन उद्योगपती,आय.बी.एम.(IBM) चे अध्यक्ष (मृत्यू:१९ जून १९५६)**१८५४:फ्रेडरिक क्रूप्प – जर्मन उद्योगपती (मृत्यू:२२ नोव्हेंबर १९०२)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००१:चंद्रकांत मांडरे--- प्रसिद्ध मराठी अभिनेते(जन्म:१३ ऑगस्ट१९१३)**१९९५:प्रा.पां.कृ.सावळापूरकर--जुन्या पिढितील संशोधक,विचारवंत (जन्म:१ जुलै १९०७)* *१९९४:चिमणभाई पटेल -- गुजरात राज्याचे माजी मुख्यमंत्री(जन्म:३ जून १९२९)**१९९१:कृष्णाबाई हरी मोटे--कथाकार, कादंबरीकार(जन्म:२८ जुलै १९०३)**१९८६:जे. कृष्णमूर्ती – भारतीय तत्त्वज्ञ (जन्म:१२ मे १८९५)**१९७८:पुरुषोत्तम शिवराम रेगे – कादंबरीकार,नाटककार,कवी आणि समीक्षक (जन्म:२ ऑगस्ट १९१०)**१८८३:वासुदेव बळवंत फडके--राजकीय भूमिका घेऊन इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव करणारे क्रांतिकारकांचे मेरुमणी,काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना एडन येथे निधन (जन्म:४ नोव्हेंबर १८४५)**१८८१:लहुजी राघोजी साळवे ऊर्फ ’लहुजी वस्ताद’ – क्रांतीवीर,समाजसेवक (जन्म: १८११)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शिवजयंती निमित्ताने प्रासंगिक लेख*महाराष्ट्राचे स्फूर्तिस्थान :- छत्रपती शिवाजी महाराज*महाराष्ट्राचे आराध्य दैवत, सर्वांचे स्फूर्तिस्थान आणि रयतेचा जाणता राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचा इतिहास माहीत नाही असा एक ही व्यक्ती राज्यात शोधून ही सापडणार नाही. आपल्या राज्यातच नाहीतर देशातील अनेक राज्यात व जगातील काही देशांत शिवाजी महाराजांचे कार्य अनेकांना स्फूर्ती व प्रेरणा देत असते.................. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाहीच, 20 तारखेआधी निर्णय घ्या ; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठीचा सर्वेक्षण अहवाल मुख्यमंत्र्यांना सुपूर्द, विक्रमी वेळेत, अहोरात्र काम करून सर्वेक्षण पूर्ण केल्याबद्दल कौतुक*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *धनगर समाजाला धक्का, ST प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळल्या, ‘धनगर’ आणि ‘धनगड’ एकच नसल्याचंही नोंदवलं निरीक्षण*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अशोक चव्हाणांनी पक्ष सोडल्याचं दुःख, पण खासदार कॉंग्रेसचाच होणार; नांदेडच्या कार्यकर्त्यांचा निर्धार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *दादर मुंबई येथे 22 व 23 फेब्रुवारी रोजी ग्रंथोत्सवाचे आयोजन, सर्वाना विनामूल्य प्रवेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दयानंद घोटकर यांचा ‘प्रेम कवी' पुरस्काराने सन्मान:रंगत-संगत प्रतिष्ठानच्या काव्य विभागातर्फे पुरस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात आर. अश्विनने गाठला 500 बळीचा टप्पा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*उन्हाळ्यात का होते गारपीट, माहिती आहे का?*गारपीट होणं हे आपल्या महाराष्ट्रात नवं नाही. पावसाळ्याच्या तोंडावर किंवा अगदी ऐन उन्हाळ्यात अनेकदा गारपीट होते आणि आपण ती अनुभवतोसुद्धा विदर्भ असो, नाहीतर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र सगळीकडंच गारपीट होतेच. कधी ती जास्त प्रमाणात होते, तर कधी चुकून-माकून. यामुळे शेतीचं नुकसान होतं, हाताशी आलेली पिकं आडवी होतात. पण आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांमध्ये हे घडणं म्हणजे डोक्यालाच हात लावायची पाळी! त्यामुळेच या घटनेकडं वेगळ्या दृष्टिकोनातून पाहावं लागेल.हवामानशास्त्राच्या परिभाषेत सांगायचं तर गारा पडण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात. एक- हवा जास्त उंचीपर्यंत जायला हवी आणि दुसरी- या हवेत बाष्पाचं प्रमाण जास्त हवं. अशी परिस्थिती अवतरली की गारपीट होण्याची शक्यता वाढते.बाष्पाचं प्रमाण वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात ते पूर्वेकडून म्हणजे बंगालच्या उपसागरावरून येणारे किंवा कधीकधी अरबी समुद्रावरून येणारे वारे. ते येताना सोबत भरपूर बाष्प घेऊन येतात. तर हवा जास्त उंचीवर जाण्यासाठी कारणीभूत ठरतात - वाऱ्याचे जेट प्रवाह. ते अतिउंचावर असतात. साधारणपणे 9 ते 12 किलोमीटर उंचीवर. ते फेब्रुवारी-मार्च महिन्यात हिमालयाच्या आसपास असतात. काही कारणांमुळे ते दक्षिणेकडं सरकतात. त्यांचा प्रभाव महाराष्ट्रापर्यंत पोहोचतो. हे प्रवाह कोरडे असतात. त्यामुळे आता हे कोरडे प्रवाह वरच्या थरात आणि बाष्प असलेली आर्द्र हवा खालच्या थरात अशी स्थिती निर्माण होते. ही स्थिती हवामानात अस्थिरता निर्माण करते. या स्थितीत बाष्पयुक्त वारे भरपूर उंचापर्यंत पोहोचतात. ही स्थिती गारांच्या निर्मितीसाठी पूरक आहे. ही स्थिती अशीच दीर्घकाळ कायम राहिल्यास गारपीट तितक्या काळासाठी सुरू राहते.गारा घडताना या गारांचं विश्व भयंकर रंजक आहे. त्यांची निर्मिती, रचना, ढगात असणं, खाली पडणं सारं काही भन्नाट आहे. गारा म्हणजे नुसता बर्फाचा गोळा नव्हे. तिला कांद्यासारखे पापुद्रे असतात.हे पापुद्रे तिचा आकार वाढवतात. तिला मोठं, अधिक मोठं करतात. जितके पापुद्रे जास्त आणि जाड, तितकी गार मोठ्या आकाराची. गार कधी फोडली तर तिचे पापुद्रे पाहायला मिळतात.हे पापुद्रे का तयार होतात हे समजून घेण्यासाठी गारेची निर्मिती कशी होते ते माहीत करून घ्यावं लागेल. गार म्हणजे पावसाचाच एक प्रकार. फक्त पाण्याऐवजी गोठलेल्या स्वरूपात पडणारा. तसं होण्यासाठी बरंच रामायण घडावं लागतं. पाण्याचे थेंब गोठावे लागतात. त्यासाठी ढग इतक्या उंचीवर जायला हवेत की, जिथं त्यांच्यातून पडणारे पावसाचे थेंब गोठू शकतील. नाहीतर ढगातील पाणी गोठण्याची पातळी काही कारणामुळे खाली सरकावी लागते. हे घडतं, तेव्हाच गारा बनतात.गारेच्या अंतरंगात डोकावताना प्रचंड आकाराचा ढग. त्यात बाष्पाचे सूक्ष्म थेंब. हा ढग उंचावर जातो तेव्हा बाष्पाचे थेंब गोठायला लागतात. वाऱ्यामुळे हालचाल असेल, तर ते सैरावैरा धावतात. एकामेकांना चिकटतात आणि आकाराने मोठे होत जातात. एक थेंब मोठा झाला की त्याच्या भोवती इतर सूक्ष्म थेंब जमा होतात. ते गोठल्यामुळे गार तयार होते. हा झाला गारेचा गाभा, सर्वांत आतला भाग. ही गार वाऱ्यामुळे ढगात फिरत राहते. खाली-वर होत राहते. ती वर-खाली होते, तसे तिच्याभोवती बाष्पाचे थर तयार जमा होतात. हे थर म्हणजेच तिचे पापुद्रे. गार ढगात जितकी जास्त वेळ फिरेल, तितके जास्त थर तिच्याभोवती तयार होतात. तितका आकारही मोठा होतो. गारेचा हा वर-खाली होण्याचा खेळ अवलंबून असतो, दोन गोष्टींवर- गारेचं वजन आणि वरच्या दिशेने वाहणारा वारा. गारेचं वजन वाढलं की ती खाली पडायला लागते. पण वरच्या दिशेने वाहणारा वारा तिला परत वर भिरकावतो. तिचं वजन आणि या वाऱ्याची ताकत यांच्या चढाओढीत ती हेलकावे खात राहते. आकाराने मोठी होत जाते. या खेळात तिचं वजन वाऱ्यावर मात करतं, तेव्हा तिची ढगातून सुटका होते. ती खाली पडते. तिने ढगात कसे-किती हेलकावे खाल्ले आहेत, यावर तिचा आकार आणि तिची ओळख बनते. एवढ्यावरच हे संपत नाही. खाली येतानाही तिला अडथळे असतात. या जमिनीकडं येण्याच्या प्रवासात तिला तापमानाचा सामना करावा लागतो. त्याच्यामुळे ती वितळण्याची शक्यता असते. अनेकदा होतंही तसंच. ती ढगातून गार म्हणून पडायला लागते, पण पावसाचा थेंब म्हणून जमिनीवर पडते. उन्हाळी पावसात आपण पावसाचे टपोरे थेंब पाहतो. ते थेंब टपोरे का असतात, त्यामागचं हेच रहस्य असतं. ही सगळी दिव्यं पार केली तरच गार जमिनीवर पडते. पडल्यावरही कुतुहलाचा विषय बनते. एक मोठं कुतूहल असं की, गारा तासन् तास जमिनीवर पडून राहतात, लवकर विरघळत नाहीत. काही वेळा तर दुसऱ्या दिवशीसुद्धा त्या तशाच दिसतात. याची अनेक कारणं असतील, पण त्यापैकी मुख्य दोन. एकतर त्या पडल्यामुळे वातावरण थंडगार झालेलं असतं. दुसरं म्हणजे गारांचे पापुद्रे. गारेच्या या थरांमुळंसुद्धा त्या वितळण्याचा वेग कमी असतो. हवामान अभ्यासकांनी केलेली ही कारणमीमांसा. असं हे इवल्याशा गारेचं अनोखं विश्व. हवामान काय किंवा निसर्ग काय, त्याच्याकडं असं बारकाईने पाहिलं तर त्यात असलेली रंजकता उलगडता येते. गारेच्या निमित्ताने हा असाच एक प्रयत्न!बी.बी.सी मराठी*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••खूप हुशारीपेक्षा चिमुटभर विवेक श्रेष्ठ असतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'गणित म्हणजे सर्व विज्ञानांची राणी'* हे विधान कोणी केले ?२) गाय व बैल यांचे वय त्यांच्या शरीराच्या कोणत्या भागावरून ओळखतात ?३) गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?४) अंधारात चमकण्याच्या गुणधर्मास काय म्हणतात ?५) 'आशिया' या शब्दाची व्युत्पत्ती हिब्रू भाषेतील कोणत्या शब्दापासून झाली आहे ? *उत्तरे :-* १) कॉर्ल फ्रेडरिक गाउस, जर्मन गणितज्ञ २) दातांवरून ३) अमरावती ४) फॉस्फरसन्स ५) आसू*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुनील सामंत, ई साहित्य प्रकाशन, पुणे👤 अगस्ती भाऊसाहेब चासकर, 👤 साईनाथ अवधूतवार, धर्माबाद👤 रविकिरण एडके👤 विकास गायकवाड👤 लक्ष्मण गंगाराम होरके👤 अशोक इंदापुरे, विशेष मागास प्रवर्ग अभ्यासक सोलापूर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नभासारिखे रुप या राघवाचे।मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे॥तया पाहता देहबुद्धी उरेना।सदा सर्वदा आर्त पोटी पुरेना॥१९७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• इतरांना त्रास देऊन जर आपण आपले जीवन चांगल्याप्रकारे जगू म्हटले तर ते अयोग्यच आहे.कारण त्यांनी परिश्रमातून जे काही मिळवलेले असते ते गुण्यागोविंदाने जगण्याचे स्वप्न साकारत असतात.हे त्यांचे बघवत नाही आणि आपल्याने होत नाही म्हणून इतरांना त्रास देऊन त्यांचे सुख हिरावून घेणे हे वामवृत्तीचे लक्षणच म्हणावे.त्यामध्ये आपण सुखी होऊ शकतो का ? आपल्या बाबतीत इतरांनी असे केले तर आपणास कसे वाटेल ? ते आपल्या मनाला समाधान देते का ? ह्या सा-या गोष्टीचा आपण विचार केला तर नक्कीच त्याचे उत्तर सापडेल आणि पुन्हा आपण ती चूक करणार नाही याची नक्कीच जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.इतरांच्याही सुखस्वप्नात आपणही सहभागी व्हावे हाच आपला माणुसकीचा खरा धर्म आहे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *बढाईखोर माणूस*एक माणूस फार वर्षे प्रवास करून आपल्या घरी आला व आपण परदेशात असताना काय मौजा पाहिल्या हे त्याने आपल्या शेजार्यापाजार्यांना तिखट मीठ लावून सांगितले. आणि अगदी शेवटी एक थाप ठोकून दिली की, ‘मी अलकावतीला गेलो असता तेथील लोक पंधरा पंधरा हात उंच उड्या मारतात पण त्यांनी माझ्याशी पैज लावली असता माझ्याइतकी उंच उडी एकालाही मारता आली नाही.’ ऐकणार्या कोणालाही ही गोष्ट खरी वाटली नाही. तेव्हा त्यांची खात्री करण्यासाठी तो नाना प्रकारच्या शपथा घेऊन लागला. त्या वेळी त्या लोकातील एक माणूस त्याला म्हणाला, ‘अहो, अशा शपथा कशाला घेता. हातच्या काकणाला आरसा कशाला ? या वेळी तुम्ही अलकावतीला आहात असं समजून तिथे जशी उडी मारली तशी इथंही मारून दाखवा म्हणजे झालं.’ हे ऐकताच त्या बढाईखोर माणसाचे तोंड ताबडतोब बंद झाले.तात्पर्य – आपण प्रवासात पाहिलेल्या गोष्टी फुगवून सांगण्याची काही लोकांना सवय असते, पण एखादेवेळी त्यांचेच बोलणे त्यांच्या गळ्यात येऊन त्यांची फजिती झाल्याशिवाय राहात नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 16 फेब्रुवारी 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_6.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ४७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००८: प्रसिद्ध गायक नितीन मुकेश यांना मध्य प्रदेश सरकारकडून लता मंगेशकर पुरस्कार देण्यात आला.* *१९८५:लेबनॉनमध्ये हिजबोल्ला या कट्टरपंथीय शिया मुस्लिम संघटनेची स्थापना.**१९५९:फिडेल कॅस्ट्रो क्यूबाच्या अध्यक्षपदी**१९२७:भारत आणि नेपाळ यांच्यात रेल्वे वाहतूक सुरू**१९१८:लिथुएनियाने (रशिया व जर्मनीपासून) स्वातंत्र्य जाहीर केले.**१९१४:लष्करी वस्तू संग्रहालयाची अहमदनगर येथे स्थापना* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८६:साबिना थाॅमस फोस-- कवयित्री* *१९८३:कीर्ती विजय लंगडे-- कवयित्री,लेखिका**१९८१:चिन्मयी ऋषिकेश चिटणीस -- कवयित्री* *१९७८:वासिम जाफर – भारतीय क्रिकेटपटू**१९७५:प्रा.डॉ.वर्षा तोडमल -- कवयित्री लेखिका,संपादिका**१९६९:गजेंद्र विठ्ठल अहिरे-- मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक,लेखक आणि कवी**१९६२:जयंत राजाराम पाटील--माजी मंत्री**१९५७:मल्लिका अमर शेख(मल्लिका नामदेव ढसाळ)-- मराठी लेखिका**१९५६:सरोज नंदकिशोर भागवत-- प्रसिद्ध लेखिका**१९५४:प्रा.डॉ.विजय लक्ष्मीकांत धारुरकर -- प्रसिद्ध लेखक* *१९५४:मायकेल होल्डिंग – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू**१९५२:डॉ.सुमन नवलकर-- प्रसिद्ध बाल साहित्यिक* *१९४१:डॉ.वसुधा पांडे-- कवयित्री,लेखिका**१९३२:मनोहर गजानन काटदरे-- ज्येष्ठ नाटककार(मृत्यू:१० जुलै २०१४)* *१९२७:प्राचार्य राम डोके-- जेष्ठ विनोदी साहित्यिक (मृत्यू:१ एप्रिल २००८)**१९२४:उषा हरिश्चंद्र उजगरे -- लेखिका, प्रवासवर्णनकार (मृत्यू:१९ जून २००२)* *१९२०:इंद्र सेन जोहर (आय.एस.जोहर)-- भारतीय अभिनेता,लेखक,निर्माता आणि दिग्दर्शक(मृत्यू:१० मार्च १९८४)**१९११:डॉ.भालचंद्र गोपाळ बापट-- वृत्तपत्र संपादक व शिक्षणतज्ञ**१८८४:विनायक सदाशिव वाकसकर-- इतिहास अभ्यासक चरित्रकार**१८७६:रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे – भारतातील पहिले सिनिअर रँग्लर,फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य,पुणे विद्यापीठाचे कुलगुरू,मुंबई राज्याचे शिक्षणमंत्री(मृत्यू:६ मे १९६६)**१८१४:रामचंद्र ऊर्फ रघुनाथ पांडुरंग येवलेकर ऊर्फ तात्या टोपे-- सेनापती (मृत्यू:१८ एप्रिल १८५९)**१७४५:माधवराव बल्लाळ भट ऊर्फ ’थोरले’ माधवराव पेशवे – मराठा साम्राज्यातील ४ था पेशवा,१६ व्या वर्षी पेशवेपदावर विराजमान झालेला अत्यंत कर्तबगार पेशवा. पानिपतच्या युध्दानंतर विस्कटलेली मराठेशाहीची घडी त्यांनी बसविली.(मृत्यू:१८ नोव्हेंबर १७७२)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:प्राचार्य वामन ना. अभ्यंकर ऊर्फ भाऊ अभ्यंकर-- निगडी,पुणे येथील ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक(जन्म:१९४२)**२०१५:रावसाहेब रामराव पाटील(आर.आर. पाटील)- माजी उपमुख्यमंत्री (जन्म:१६ऑगस्ट १९५६)**२००१:रंजन साळवी – 'पिंजरा', 'सवाल माझा ऐका', 'केला इशारा जाता जाता' आदी मराठी चित्रपटांचे नृत्यदिग्दर्शक* *२०००:बेल्लारी शामण्णा केशवन – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ग्रंथालयशास्त्रज्ञ,पद्मश्री, ’इंडियन नॅशनल सायंटिफिक डॉक्युमेंटेशन सेंटर’चे पहिले संचालक**१९९६:आर.डी.आगा – उद्योगपती,थरमॅक्स उद्योगसमुहाचे संस्थापक* *१९९४:पं.निवृत्तीबुवा सरनाईक – जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक (जन्म:४ जुलै १९१२)**१९६८:नारायणराव सोपानराव बोरावके – कृषी शिरोमणी,पहिले मराठी साखर कारखानदार (जन्म:१७ आक्टोबर १८९२)**१९६४:आनंदराव कृष्णाजी टेकाडे--कवी, गीतकार(जन्म:५ एप्रिल १८९०)**१९५६:मेघनाद साहा – खगोल भौतिकशास्त्रज्ञ व संसदसदस्य(जन्म:६ आक्टोबर १८९३)**१९४४:धुंडिराज गोविंद ऊर्फ ’दादासाहेब’ फाळके – भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक, लेखक,छायाचित्रकार,दिग्दर्शक,संकलक, वेशभूषाकार,कलादिग्दर्शक इ.अनेक जबाबदार्या ते सांभाळत असत (जन्म:३० एप्रिल १८७०)**१९२३:रावबहादुर विष्णू मोरेश्वर महाजनी -- मराठीतील समीक्षक,कवी व नाटककार(जन्म:१२ नोव्हेंबर १९५१)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*एकच ध्यास ; वाचन विकास*शिक्षण प्रक्रियेतील वाचन हे एक प्रमुख कौशल्य आहे. ज्यावर विद्यार्थ्यांची भविष्यातील प्रगती अवलंबून असते. भाषा विकासातील श्रवण व भाषण यानंतरचा टप्पा म्हणजे वाचनकौशल्याचा. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ स्टुअर्ट रिची यांनी आपल्या संशोधनात असे म्हटले आहे की, मुलांची वाचन क्षमता आणि त्याला किती लहान वयात वाचन करता येते त्यावर त्याची पुढील प्रगती अवलंबून आहे. यासोबत ते पुढे असे म्हणतात की, आपल्या मुलांचा अभ्यास पक्का करायचा असेल तर तो शाळेतील पुस्तके वाचतो की नाही हे तर बघावेच, याशिवाय अन्य काही अवांतर पुस्तक वाचन करतो की नाही ................... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *तंत्रस्नेही शिक्षक आनंदा आनेमवाड यांना लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि इअर पुरस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *डॉक्टरांना माघारी पाठवलं, मनोज जरांगेंचे पुन्हा उपचार घेण्यास नकार... मुंबई हायकोर्टाने घेतली दखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांचाच, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निर्णय, पक्षात फूट नसल्यामुळे दोन्हीही गटाचे आमदार पात्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यसभेसाठी सर्व उमेदवारांचा उमेदवारी अर्ज दाखल ! महायुतीकडून अशोक चव्हाण, डॉ. अजित गोपछडे, मेधा कुलकर्णी, मिलिंद देवरांसह प्रफुल्ल पटेलांनी मानले दिग्गजांचे आभार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *इलेक्टोरल बाँड्स घटनात्मक दृष्ट्या अवैध ; सर्वोच्च न्यायालयाचा मोदी सरकारला धक्का*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5311 घरांच्या लॉटरी सोडतीचा मुहूर्त 24 फेब्रुवारीला*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *रोहित शर्मा, रवींद्र जडेजाची शतकं, सरफराजचं पदार्पणात अर्धशतक, इंग्लंडविरोधात तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसावर भारताचे वर्चस्व*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *हवेचा दाब कसा मोजतात ?* 📙 ***************************आपल्याकडे सभोवती सगळीकडे हवा आहे. वारा वाहतो तेव्हा हवा असल्याचं आपल्याला जाणवतं. एरवी ती आपल्याला दिसत नाही. त्यामुळे तिला काही वजन असेल याची कल्पनाही आपल्याला येत नाही. पण जमिनीपासून थेट आकाशात कितीतरी उंचीपर्यंत हवा असते. त्यामुळे जमिनीवर तिचा सतत दाब पडत असतो. जमिनीच्या एक चौरस मीटरच्या तुकड्यावर हवेचा असा जो स्तंभ उभा असतो, त्याचा जो दाब पडतो त्याला हवेचा दाब म्हणतात. हवामानखातं जेव्हा उद्याच्या किंवा पुढील आठवड्याच्या हवामानाचा अंदाज देतं तेव्हा निरनिराळ्या ठिकाणी असलेल्या हवेच्या दाबाची माहितीही दिली जाते. जेव्हा अनपेक्षितरित्या पाऊस येतो तेव्हा कोणत्यातरी ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पाऊस पडत असल्याचं सांगण्यात येतं. त्यावेळीच आपल्याला हवेचाही दाब असतो हे आठवतं. हवेचा हा दाब पास्कल किंवा बार या एककांमध्ये मोजला जातो. पण ते झालं वैज्ञानिक परिमाण. एरवी आपल्याला ओळखीचं असणारं परिमाण म्हणजे पाऱ्याची उंची. जसा रक्तदाब नळीतल्या पाऱ्याच्या उंचीत मोजला जातो तसाच हवेचा दाबही मोजला जातो. यासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्राला बॅरोमीटर असं म्हणतात. त्यात एका भांड्यात पारा ठेवून त्यात एक उलटी नळी ठेवलेली असते. त्या नळीतील हवा काढून घेतलेली असल्याने तिच्यात निर्वात पोकळी निर्माण झालेली असते. भांड्यातल्या पाण्यावर पडणाऱ्या हवेच्या दाबामुळे पारा त्या नळीत चढतो. नळीतल्या पार्याचं वजन आणि त्या भांड्यातल्या नळीच्या तोंडाच्या क्षेत्रफळाएवढ्या जागेवरच्या हवेचं वजन समान असतं. त्यामुळे नळीतल्या पाऱ्याची उंची ही त्या हवेच्या दाबाचं माप असल्याचं धरलं जातं. सामान्यत: समुद्रसपाटीवर पाऱ्याची उंची ७६० मिलिमीटर असते. तोच हवेचा दाब मानला जातो. एका चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळावरच्या हवेचा दाब एक किलोन्यूटन असतो.हे अर्थात अतिशय प्राथमिक स्वरूपाचं बॅरोमीटर झालं. हवेचा दाब मोजावयास सुरुवात झाली तेव्हा अशा यंत्राचा वापर होत असे. आजकाल याच तत्त्वावर आधारित पण अचूक मोजमाप करणारी इलेक्ट्रॉनिक बॅरोमीटर्स उपलब्ध आहेत. जसजसं उंचावर जावं तसतशी हवा विरळ होते. सहाजिकच तिथं हवेचा दाब घसरत जातो.*बाळ फोंडके यांच्या 'कसं ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कृतीपेक्षा शब्दाने शत्रू निर्माण होण्याची शक्यता जास्त असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २०२४ चा डॉ.मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?२) भारतीय हरितक्रांतीचे जनक, भारतरत्न डॉ.एम.एस.स्वामीनाथन यांचे पूर्ण नाव काय आहे ?३) अबुधाबी येथे sandstone चा वापर करून आखातातील सर्वात मोठ्या मंदिराचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले ?४) नागपूर ते गोवा हा धार्मिक स्थळांना जोडणारा शक्तीपीठ महामार्ग एकूण किती जिल्ह्यातून जात आहे ?५) फुटबॉलमध्ये आता रेड आणि यलो कार्डनंतर कोणत्या नविन कार्डचा समावेश करण्यात येणार आहे ? *उत्तरे :-* १) पद्मभूषण डॉ.सायरस पूनावाला २) मोनकोंबू शिवसांबन स्वामीनाथन ३) नरेंद्र मोदी, पंतप्रधान ४) ११ जिल्हे ५) ब्ल्यू कार्ड*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 कु. सानिका कुणाल पवारे, कुंडलवाडी👤 बाप्पा महाजन, आदर्श शिक्षक, नाशिक👤 प्रदीप वाघमारे, पुणे👤 सतीश चौहान, चौसाळा👤 प्रमोद हिवराळे, धर्माबाद👤 लता विष्णु वायाळ (स.शिक्षिका) भोकर👤 मारोती गंगाधर जाधव👤 बजरंग येमुल, नांदेड👤 शंकर छपरे👤 बालाजी पाटील जाधव👤 राजू इटलावार👤 महंमद सादिक खान👤 शंकर मासूनवार👤 डॉ. मुखत्यार आतार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नभी वावरे जा अणुरेणु काही।रिता ठाव या राघवेवीण नाही॥तया पाहता पाहता तोचि जाले।तेथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले॥१९६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••इतरांच्या विषयी नको त्या शब्दात बोलून स्वतःचे समाधान व आनंद मानण्यात किती सोपे आहे..? पण, खऱ्या अर्थाने आपल्या बोलण्यात किती तथ्य आहे.? याचा पडताळा आपण कधी तरी घेत असतो काय.? याचा साकल्याने विचार करण्याची गरज आहे.जर एखाद्याच्या विषयी चांगले बोलणे होत नसेल तर नको त्या शब्दात सांगून आपलीच वेळ वाया घालवू नये. भलेही आज स्वतःचा समाधान मानून घेण्यात जरी आनंद मिळत असेल तरी, ती व्यक्ती नसल्यावर ह्या सर्व गोष्टींना काहीही अर्थ नसतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *खरी नक्कल*भोजराजाकडे एक बहुरुपी गेला. राजाने त्याला आपले सोंग घ्यायला सांगितले. थोड्याच वेळात हुबेहुब त्या राजाप्रमाणे बनून, तो बहुरुपी राजसभेत शिरला.त्याचे त्याच्या कलेतील असामान्य कौशल्य पाहून खुष झालेल्या भोजराजाने त्याला एक मौल्यवान रत्नहार देऊ केला.भोजराजाचे सोंग घेतलेल्या त्या बहुरुप्याने तो रत्नहार तर स्विकारला नाहीच, पण राजाला साधा मुजरा करण्याचा शिष्टाचारही पाळला नाही. एवढंच नव्हे तर तो राजसभेत ज्या राजेशाही दिमाखांन आला, तशाच तऱ्हेनं निघून जाऊ लागला.दरबारी मंडळींना त्या बहुरुप्याचा हा उध्दटपणा आवडला नाही. त्यांच्यापैकी काहीजण राजाच्या कानात काहीतरी कुजबुजले. त्याबरोबर राजाने आपल्या सेवकांना त्या बहुरुप्याला पकडून, आपल्यापुढं हजर करण्याचा हुकुम सोडला.त्या बहुरुप्याला पकडून समोर आणताच राजा त्याला म्हणाला, ‘अरे उध्दटा ! तुला मी एवढा रत्नहार देऊ केला, पण तो तर तू स्वीकारला नाहीसच; पण मला मुजर करण्याचं साधं सौजन्यही न दाखवता, तू मला सरळ पाठ दाखवून निघून की रे गेलास ? तुझ्या या अपराधाबद्दल मी तुला आता कारावासाची शिक्षा ठोठावणार आहे.’बहुरुपी म्हणाला, ‘महाराज ! सोंग घेतलं असलं, तरी ते राजाधिराज भोजमहाराजांचं घेतलेलं आहे. तेव्हा इनाम म्हणून रत्नहार स्विकारणं, आपल्यापुढे वाकून मुजरा करणं किंवा आपल्याला पाठ न दाखविता उलटं चालत जाणं, या गोष्टी मी केल्या असत्या, तर आपला अपमान झाला असता, म्हणून मी हुबेहुब आपल्याप्रमाणे वागलो.’बहुरुप्यानं केलेल्या या खुलाशानं भोजराजा प्रसन्न झाला. त्याने त्याला दोन-तीन दिवस शाही पाहूणा म्हणून ठेवून घेतली आणि त्याल तो रत्नहार व एक हजार सुवर्ण मोहोरा इनाम म्हणून दिल्या•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15 फेब्रुवारी 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2024/02/kuldipak.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ४६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९०:महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून श्री सुब्रहण्यम यांनी सूत्रे हाती घेतली* *१९६०:परभणी येथील कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन* *१९४२:दुसरे महायुद्ध – सिंगापुरमध्ये ब्रिटिश सैन्याची शरणागती.८०,००० भारतीय,ब्रिटिश व ऑस्ट्रेलियन सैनिक युद्धबंदी.**१९३९:काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची निवड झाल्यावर मोठा पेचप्रसंग होऊन मतभेद झाले.त्यातून पंडित नेहरुंसह कार्यकारिणीच्या बारा सभासदांनी राजीनामे दिले.**१९३२:पुण्यात मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या वतीने नौरोसजी वाडिया महाविद्यालय सुरू झाले**१८७९:अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात स्त्री वकिलांना खटले लढवण्यास परवानगी मिळाली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८३:श्रावण सखुबाई रंगनाथराव भवर -- कवी**१९८२:सचिन आत्माराम पाटील-होळकर-- कृषितज्ज्ञ,लेखक* *१९७२:किशोर ज्ञानेश्वर कुळकर्णी-- पत्रकार, लेखक* *१९६७:रमेश परसराम बोपचे-- कवी**१९६७:संजीव शंकरराव अहिरे-- मराठी व हिंदी भाषेमध्ये लेखन करणारे लेखक,कवी* *१९६४:आशुतोष गोवारीकर-- प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक,अभिनेता,पटकथा लेखक आणि निर्माता* *१९५९:कलानंद जाधव(पुंजाराव दताराव जाधव)-- कवी,बालगीतकार,लेखक* *१९५६:विनायक महादेव गोविलकर -- जेष्ठ अर्थशास्त्रज्ञ,व्याख्याते,लेखक* *१९५६:डेसमंड हेन्स – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू**१९५४:राजेंद्र गजानन साळोखे -- लेखक* *१९५३:दत्तात्रय कडू लोहार-- कवी**१९४९:नामदेव लक्ष्मण ढसाळ – जेष्ठ साहित्यिक (मृत्यू:१५ जानेवारी २०१४)**१९४७:श्रीधर शंकरराव खंडापूरकर-- कवी,लेखक**१९४७:रणधीर राज कपूर-- भारतीय अभिनेता,चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक* *१९४६:महादेवराव नथुजी घाटुर्ले-- विदर्भातील कवी,लेखक**१९२८:शांता हरी मिसाळ-- जेष्ठ संगितसमिक्षक,कथाकार,कादंबरीकार(मृत्यू:७ मे २०१३)**१९१८:वसंत कृष्ण जोशी--संस्थापक संपादक-‘दक्षता’मासिक, लोकप्रिय पोलीस तपास कथाकार(मृत्यू:२० डिसेंबर २००४)**१९१७:गोविंद रामचंद्र आफळे-- मराठीतून कीर्तने करणारे परंपरागत कीर्तनकार(मृत्यू:१ नोव्हेंबर १९८८)**१८९६:रामचंद्र नारायण वेलिंगकर --ज्ञानेश्वरी शब्दकोशाचे कर्ते**१८७५:जनार्दन सखाराम करंदीकर-केसरी या वृत्तपत्राचे संपादक,लेखक (मृत्यू:१२ मार्च १९५९)**१८२४:राजेन्द्रलाल तथा राजा मित्रा – बंगालमधील प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष (१८८५),भारतीय चित्रकला,शिल्पकला,राजकीय आणि सामाजिक विषयांवरील भाष्यकार (मृत्यू:२६ जुलै १८९१)**१७१०:लुई (पंधरावा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू:१० मे १७७४)**_१७३९:थोर मानवतावादी संत श्री.सेवालाल महाराज-- जन्म तत्कालीन म्हैसुर प्रांतामध्ये सुवर्णकूप्पा येथे,आजीवन ब्रह्मचारी राहुन दीन दुःखीतांच्या सेवेसाठी व सर्व प्राणीमात्राच्या कल्याणासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले._**१५६४:गॅलेलिओ गॅलिली – इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू:८ जानेवारी १६४२)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२०:विनायक जोशी-- मराठी भावगीतांवर आधारित कार्यक्रम करणारे गायक(जन्म:११ मे १९६१)**२०१८:मनोहर मारोतीराव तल्हार-- प्रसिद्ध मराठी लेखक(जन्म:१४ अाॅक्टोबर१९३२)**२०१०:श्रीराम पांडुरंग कामत-- ज्येष्ठ विश्व चरित्रकोशकार (मृत्यू:१७ मे १९३४)**२००८:मनोरमा-- बॉलीवूडमधील भारतीय अभिनेत्री(जन्म:१६ ऑगस्ट१९२६)**१९८८:रिचर्ड फाइनमन – क्वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स मधील मूलभूत संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक (१९६५) मिळवणारे अमेरिकन पदार्थवैज्ञानिक (जन्म: ११ मे १९१८)* *१९८०:कॉंम्रेड एस.एस.मिरजकर – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) चे अध्यक्ष* *१९५३:सुरेशबाबू माने – किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक (जन्म:१९०२)**१९४८:सुभद्राकुमारी चौहान – हिन्दी कवयित्री (जन्म:१६ ऑगस्ट १९०४)**१८६९:मिर्झा ग़ालिब – ऊर्दू शायर (जन्म:२७ डिसेंबर १७९७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जीवनातील नैतिक मूल्ये सांगणारा कथासंग्रह कुलदीपक*या कथासंग्रहातील कथांमधून जीवनातील नैतिक मूल्ये, चारित्र्य, सद्गुण, सकारात्मकता हे संस्कार मोती सहज मिळतात. एकूणच या कथासंग्रहातील एकूण 17 कथा ह्या मुलांसाठी संस्कारक्षम असून सर्वच वयोगटातील वाचकांसाठी वाचनीय असून वाचल्यावर मानसिक समाधान देणारे आहेत............. पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.पुस्तक परिचय - मीना खोंड, हैद्राबाद, 7799564212~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *अबुधाबीतील मंदिराचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन, अरब जगतातील पहिल्या हिंदू मंदिराबद्दल प्रचंड उत्साह*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांना दिली उमेदवारी तर एकनाथ शिंदेंकडून मिलिंद देवरांना संधी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मनोज जरांगे आक्रमक होताच मंत्रिमंडळाचा निर्णय : मराठा आरक्षणावर चर्चेसाठी 20 फेब्रुवारीला होणार विधिमंडळाचे एक दिवसीय विशेष अधिवेशन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आस्तिक कुमार यांची पुण्याला बदली : अॅड. दिलीप स्वामी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *वैद्यकीय महाविद्यालयात इंटर्नशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा १८ हजार !*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *देशातील पहिली स्वच्छ भारत अकादमी ठाण्यात; स्वच्छ भारत अभियानाला मिळणार बळ*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *राजकोट येथे आजपासून भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा कसोटी सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय ?* 📙 घरात घर हरघडीला ट्रान्सफॉर्मर लागतो, तर घराबाहेर, विशेषतः औद्योगिक पुरवठ्यासाठीही ट्रान्सफॉर्मरशिवाय भागत नाही. पण या दोन्हींमध्ये महत्त्वाचा फरक आहे. घरात वापरला जातो, त्यामध्ये विजेचा दाब कमी करून तीन, सहा, नऊ व बारा व्होल्ट्स इतका ठेवला जातो. या कमी केलेल्या दाबाचा वापर करून मग छोटे दिवे, नाइट लॅम्प, रेडिओ ट्रांजिस्टर, रेकॉर्ड प्लेअर, खेळणी यांचा उपयोग केला जातो. याउलट कारखान्यांना लागणारी वीज, शहराला दूरवरुन केला जाणारा पुरवठा हा अतिउच्च दाबाचा असतो. यासाठी ठिकठिकाणी दाब वाढवणारे ट्रान्सफॉर्मर बसवलेले असतात. वीजकेंद्रांपासून वीज आणण्यासाठीही त्यांचा वापर केला जातो.ट्रान्सफॉर्मरमध्ये विजेचा दाब लहानाचा जास्त वा जास्तीचा लहान केला जातो. या दोन्हींसाठी पद्धत एकच वापरली जाते. ती म्हणजे दोन्ही लोखंडी पट्ट्यांच्या सांगण्यावर (core) शेजारीशेजारी तारांचे वेटोळे गुंडाळले जाते. एक असते प्राथमिक, तर दुसरे दुय्यम. विजेचा प्रवाह जितका कमी वा जास्त करावयाचा, दाब कमी वा वाढवायाचा, तितके वेटाळ्यातील वेढे कमी जास्त केले जातात. प्राथमिक वेटोळ्यापेक्षा दुय्यम वेटोळ्यामधील वेढे जास्त असले, तर प्रवाहदाब वाढतो. याउलट स्थितीत तो कमी होतो.खरे म्हणजे दोन्ही वेटोळी ही पूर्णतः वेगळी असतात. पहिल्या वेटोळ्यात विद्युतप्रवाह येतो व बाहेर पडतो. हा अर्थातच अल्टर्नेटिंग करंट वा AC असतो. यामुळे सांगाड्यात विद्युतचुंबकीय क्षेत्र निर्माण होते व त्याचा परिणाम होऊन शेजारील दुसऱ्या वेटोळ्यातून प्रवाह वाहणे सुरू होतो. याचा दाब वेटोळ्याच्या वेढ्यांच्या संख्येनुसार वाढतो वा कमी होतो.ट्रान्सफॉर्मर छोटा असो वा मोठा; ज्यावेळी दाब कमी होतो, तेव्हा प्रवाह वाढतो; याउलट दाब वाढला, तर प्रवाहाची शक्ती कमी होत जाते. पण याचा फायदा वीज वाहून नेण्याच्या तारांच्या आकारमानात बदल करता आल्याने होतो. प्रवाहाची शक्ती कमी झाल्याने अतिदाबाच्या तारांची जाडी खूपच कमी ठेवता येते.ट्रान्सफॉर्मरचा वापर झाल्याने अनेक बाबतीत सोय होऊ शकते. वाहनांमध्ये जेमतेम बारा व्होल्टचा प्रवाह निर्माण होतो; पण त्यावर संस्कार करून, अतिदाबाच्या प्रवाहाची निर्मिती करून ठिणग्या पाडण्याचे व वाहन चालवण्याचे काम केले जाते, याउलट लहान मुले खेळताना चुकूनही धक्का बसू नये, अशी खेळणी वीज प्रवाहाचा दाब अत्यल्प ठेवून बनवली जातात.‘सृष्टी विज्ञानगाथा या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••' जिंकण्याचा एकमेव मार्ग म्हणजे इतर सर्वांपेक्षा जलद गतीने शिकणं "*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) गोंदिया जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती चौकिमी आहे ?२) महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती चौकिमी आहे ?३) भारताचे क्षेत्रफळ किती चौकिमी आहे ?४) अंडर १९ क्रिकेट विश्वकप - २०२४ कोणत्या देशाने जिंकला ?५) 'द इनसाइडर' हे आत्मचरित्र कोणाचे आहे ? *उत्तरे :-* १) ५,४३१ चौकिमी २) ३,०७,७१२ चौकिमी ३) ३२,८७,२६३ चौकिमी ४) ऑस्ट्रेलिया ५) पी. व्ही. नरसिंहराव, माजी पंतप्रधान*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अशोक गायकवाड, पदवीधर शिक्षक 👤 दत्ता एम. भोसले, शिक्षक नेते, बिलोली 👤 जनाबाई निलपत्रेवार, शिक्षिका, धर्माबाद 👤 बाबूराव बोधनकर, सहशिक्षक, बिलोली👤 किरण गौड, धर्माबाद 👤 घनश्याम नानम, डाक घर, धर्माबाद 👤 रमेश सोनकांबळे 👤 गुलाब जाधव 👤 रमेश पाटील कदम 👤 अविनाश सातपुते 👤 गोविंद टेकुलवार, करखेली👤 प्रल्हाद घोरबांड, कवी व गो सेवक*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बसे हृदयी देव तो जाण ऐसा।नभाचेपरी व्यापकू जाण तैसा॥सदा संचला येत ना जात कांही।तयावीण कोठे रिता ठाव नाही॥१९५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अज्ञानाला दूर घालवायचे असेल, दु:खाला दूर करायचे असेल, आपल्या मनातील रागावर नियंत्रण ठेवावे वाटत असेल, इतरांना आपलेसे करावे वाटत असेल, अवघड समस्येतून मार्ग काढायचा असेल आणि जीवन सुखी व समृद्ध व्हावे असे वाटत असेल तर त्यावर एक आणि एकच सर्वोत्तम मार्ग आहे तो म्हणजे ज्ञानाचा. ज्यांनी ज्ञानाचा मार्ग स्वीकारला आहे त्यांनी ह्या सा-या गोष्टीतून ज्ञानाच्या सहाय्याने जीवन सुखी व समृद्ध केले आहे. ज्यांनी ज्ञान स्वीकारला नाही त्यांना त्यांच्या जीवनात कधीही सुखी होता आले नाही.ते जवळ असलेल्या सुखालाही मुकले आहेत कारण त्यांच्याजवळ ज्ञानाची जोड नव्हती म्हणून या जगात सर्वश्रेष्ठ जर काय असेल तर ते ज्ञान. जीवनातील अज्ञानाला दूर करण्याचे सामर्थ्य केवळ ज्ञानातच आहे हे कधीही विसरुन चालणार नाही. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद...९४२१८३९५९०. 🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शासन* महाभारताच्या शांतीपर्वातील ही गोष्ट. शंख व लिखित नावंचे दोघे भाऊ यज्ञोपवित संस्कार झाल्यावर गुरूगृही विद्याध्यानासाठी गेले. संपूर्ण वेद वेदांगाचा अभ्यास करून गुरूची परवानगी घेऊन हे दोघे घरी परत आले. दोघांनीही दोन वेगवेगळया ठिकाणी आपले आश्रम बांधले. तिथे त्यांचे अध्यापनाचे काम सुरू झाले. बरेच दिवस झाले दोन्ही भावांची भेट नव्हती. लिखिताने शंखाकडे भेटीला जाण्याचे ठरवले. त्याप्रमाणे तो गेला पण शंख कामानिमित्त बाहेर गेला होता. निराश झालेला लिखित परत निघाला. दुपारी बाराची वेळ भूक लागली होती. समोर शंखाच्या आश्रमातील आंब्याच्या झाडाला खूप आंबे लागले होते. एक छानसा पिकलेला आंबा लिखिताने तोडला व पुढे चालू लागला. तेवढयात समोरून येणार्या शंखाने ते पाहिले व विचारले. 'आंबा कुठे मिळाला ?' शंख सहज म्हणाला 'अरे ! तुझ्याच झाडाचा छान पिवळा धम्मक दिसला तोडला'. शंख शांतपणे म्हणाला 'म्हणजे लिखिता तू चोरी केलीस झाडाच्या मालकाला न विचारता आंबा तोडलास' लिखिताला आपली चूक कळली. शरमेने त्याची मान खाली झुकली. 'शंखा माझ्या गुन्ह्याबद्दल मला हवी ती शिक्षा कर' 'काहीं गरज नाहीं त्याची जा आता पुन्हा असे घडणार नाही ह्याची खबरदारी घे' शंख एवढे बोलून निघून गेला. लिखित राजाकडे गेला. घडलेली सर्व हकीगत सांगितली. 'राजा मला शिक्षा कर' लिखित म्हणाला. ह्या विचित्र मागणीचे राजाला आश्चर्य वाटले. राजा म्हणाला 'लिखिता तू म्हणतोस ते खरंही असेल पण चोरीची फिर्याद कुणीच केलेली नाही. गुन्हा शाबीत झाला तर शिक्षा'. 'राजे पण गुन्हा शाबीत झाला तर ह्या गुन्ह्याला शिक्षा कोणती ?' लिखिताने विचारले, 'चोरी करणार्याचा हातच आम्ही कापतो' राजा म्हणाला. राजाच्या समोरच लिखिताने राजा शासन करत नाहीं म्हणून आपणच आपला हात कापून टाकला'. स्वत:च स्वत:ला शिक्षा करून घेणारी प्रजा उत्कृष्ट राज्य शासनाचे प्रतीक आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 14 फेब्रुवारी 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ४५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००३: सुप्रसिद्ध नाटककार महेश एलकुंचवार यांची के.के. बिर्लाफांउंडेशनतर्फे दिल्या जाणार्या सरस्वती सन्मानासाठी निवड**२०००:अभिजित कुंटे हा भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रॅंडमास्टर बनला.**१९८९:भोपाळ दुर्घटनेबद्दल भारत सरकारला ४७,००,००,००० अमेरिकन डॉलर नुकसान भरपाई देण्याचे यूनियन कार्बाईडने कबूल केले**१८८१:भारतातील पहिल्या होमिओपाथिक कॉलेजची कोलकाता येथे स्थापना**१९६३:अणुक्रमांक १०३ असलेले लॉरेन्सिअम हे मूलद्रव्य प्रथमच तयार करण्यात आले.**१९४६:पहिला संगणक 'एनियाक' युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियात प्रदर्शित करण्यात आला.**१९४६:बँक ऑफ इंग्लंडचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले**१९४५:दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्स च्या विमानांनी तुफानी बॉम्बफेक करुन जर्मनीतील ड्रेस्डेन शहर बेचिराख केले.**१९४५:चिली, इक्वेडोर, पॅराग्वे व पेरू या देशांचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१८९९:अमेरिकेत निवडणुकांसाठी मतदान यंत्रे वापरण्यास सुरूवात झाली.**१८७६:अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल व एलिशा ग्रे यांनी एकाच दिवशी टेलिफोनच्या पेटंटसाठी अर्ज केला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७९: रेखा वाल्मिक पाटील-- कवयित्री* *१९६८:भाग्यश्री देसाई-- कवयित्री,अभिनेत्री, निर्माती**१९६२:विजय कोपरकर-- हिंदुस्थानी शास्त्रीय गायक* *१९६१:डॉ.माधुरी हेमंत वाघ-- कवयित्री, लेखिका**१९५९:प्रा.डॉ.सुनील विभुते -- प्रसिद्ध विज्ञान कथाकार* *१९५२:सुषमा स्वराज-- माजी केंद्रीय मंत्री (मृत्यू:६ ऑगस्ट २०१९)**१९५०:कपिल सिबल – सुप्रसिद्ध कायदे तज्ञ आणि माजी केंद्रीय मंत्री**१९३७: वसंतराव धोत्रे--माजी सहकार राज्य मंत्री,सहकार नेते,शिवाजी शिक्षण संस्थेचे पूर्व अध्यक्ष (मृत्यू:१०ऑगस्ट २०१८)**१९३३:मधुकर रामदास सोनार-- कवी, कथाकार (मृत्यू:१५ सप्टेंबर २००४)**१९३३:मुमताज जहाँ बेगम देहलवी ऊर्फ मधुबाला – अभिनेत्री (मृत्यू:२३ फेब्रुवारी १९६९)**१९३०:वृंदा रघुनाथ लिमये,-- कवयित्री लेखिका* *१९२६:डॉ.वसंत विठ्ठल पारखे -- लेखक संपादक**१९२५:मोहन धारिया –माजी केन्द्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते (मृत्यू:१४ आक्टोबर २०१३)**१९२२:प्रभाकर श्रीधर नेरूरकर-- ललित लेखक(मृत्यू:२९ जून १९९८)**१९१८:डॉ.मधुकर अनंत मेहेंदळे-- संस्कृत भाषा,ऋग्वेद,निरुक्त,महाभारत आणि अवेस्ता (पारशी धर्मग्रंथ) या विषयांचा सखोल अभ्यास असलेले आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रकांडपंडित(मृत्यू:१९ ऑगस्ट २०२०)**१९१६:संजीवनी मराठे – सुप्रसिद्ध कवयित्री (मृत्यू:१ एप्रिल २०००)**१९१४:जान निसार अख्तर – ऊर्दू शायर व गीतकार (मृत्यू:९ ऑगस्ट १९७६)**१४८३:बाबर – पहिला मुघल सम्राट, हिन्दुस्थानातील मुघल सत्तेचा संस्थापक (मृत्यू:२६ डिसेंबर १५३०)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९४:यशवंत नरसिंह केळकर--कवी, कोशकार, इतिहास संशोधक व इतिहासलेखक(जन्म:१९ जुलै १९०२)**१९७५:पी.जी.वूडहाऊस – इंग्लिश लेखक (जन्म:१५ आक्टोबर १८८१)**१९७५:ज्यूलियन हक्सले – ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ (जन्म:२२ जून १८८७)**१९७४:श्रीकृष्ण नारायण रातंजनकर – आग्रा घराण्याचे गायक,शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरू (जन्म:१ जानेवारी १९००)**१४०५:तैमूरलंग – मंगोलियाचा राजा (जन्म:८ एप्रिल १३३६)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *व्हॅलेंटाईन दिनानिमित्त प्रासंगिक लेख*शतदा प्रेम करावे .....!प्रेम म्हणजे काय असते? एकमेकांबद्दल असलेला जिव्हाळा, माया, ममता आणि लळा म्हणजे प्रेम. आपल्या आवडत्या व्यक्तीला त्रास होऊ नये म्हणून जे काळजी घेतली जाते तिथे प्रेम अनुभवयास मिळते. जीवनात प्रत्येक जण कुणावर नाही तर कुणावर प्रेम करतच असतो. आईचे मुलांवरील प्रेम असो किंवा बहिणीचे भावावरील प्रेम. काही जण आपल्या घरातील प्रत्येक सदस्यावर तर प्रेम करतातच त्याशिवाय घरातील पाळीव प्राण्यांवर देखील जीवापाड प्रेम करतात. या प्रेमापायी ते जनावर देखील त्यांच्यावर तेवढेच प्रेम करते. आमच्या बाजूला एकाच्या घरी कुत्रा होता. तो खूपच प्रामाणिक होता. त्याचे मालकांवर खूप प्रेम होते. मालकांचे देखील त्याच्यावर खूप प्रेम होते .................. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये केला प्रवेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *केंद्र सरकारचा मोठा निर्णय,बारावीपर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांना TET अनिवार्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *तिसऱ्या टर्ममध्ये भारताला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवणार असा विश्वास पंतप्रधान मोदींनी अबूधाबीमध्ये बोलताना व्यक्त केले*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुकेश अंबानींनी रचला इतिहास, रिलायन्स बनली देशातील पहिली 20 लाख कोटींची कंपनी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गणेश जयंती निमित्त पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट, दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासूनच गर्दी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *युनायटेड वर्ल्ड रेसलिंगचा मोठा निर्णय ! भारतीय कुस्ती महासंघावरील निलंबन घेतलं मागे*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL सोडा, आधी रणजी खेळा ; ईशान किशन, कृणाल पांड्या, दीपक चाहरला BCCI ची तंबी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बहुपयोगी खजूर*खजूर हे पूर्ण अन्न आहे. खजूर उष्ण हवामानात व प्रदेशात तयार होतो. तो पोटात गेल्याबरोबर पचायला सुलभ अशा गुणांचाच असतो. खजूर जशाचा तसा पूर्णपणे आतडय़ांनी ग्रहण केला जातो. पचायला बिलकूल जड नाही. खजूर उष्ण आहे अशी समजूत आहे. खजूर वात व पित्तशामक कार्य करतो. वजन वाढवतो. शरीराला तृप्ती आणतो. म्हातारपणा दूर ठेवतो. खजूर तुपाबरोबर घेतल्यास त्याचे गुण वाढतात. खजुरात ए, बी, सी व्हिटॅमिन व भरपूर साखर तसेच लोह आहे.खजूर सारक आहे. त्यामुळे पोट साफ होते. त्वचेच्या सुरकुत्या दूर होतात. कांती सुधारते, रक्त वाढते.खजुराचा विशेष फायदा, मेंदू, हृदय, वृक्क या अवयवांना बल देण्यात होतो. अतिकृश बालकांना वजन वाढवायला खजुराचा उपयोग होतो.दिवसाची उत्तम सुरूवात करूया ...*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" गौरव हा पडण्यात नाही; पडून उठण्यात आहे. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्रातील *गिधाडांचे संवर्धन* करण्यासाठी वनविभाग व BNHS ने कोणता प्रकल्प हाती घेतला आहे ?२) पहिल्या शिवसन्मान पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे ?३) महाराष्ट्र राज्याचे भाषा विभागाचे मंत्री कोण आहेत ?४) भारतामध्ये उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांची गुणवत्ता प्रमाणित करण्यासाठी 'नॅक'ची स्थापना कधी झाली ?५) महाराष्ट्र शासनाचा २०२४ चा पं. भीमसेन जोशी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ? *उत्तरे :-* १) जटायू संवर्धन २) नरेंद्र मोदी ३) दीपक केसरकर ४) सन १९९४ ५) शशिकांत मुळे *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 प्रा.डॉ. अभयकुमार दांडगे, उपसंपादक, दै. प्रजावाणी👤 सतीश कुरमे, सहशिक्षक, माहुर👤 धनराज जाधव, सहशिक्षक, वाशिम👤 विकास बडवे, सहशिक्षक👤 अभिनव भूमाजी मामीडवार👤 योगेश वाघ👤 रुचिता जाधव👤 शिवम चिलकेवार👤 ऋषिकेश उटलवार👤 चंद्रकांत गाडे👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वसे हृदयी देव तो कोण कैसा।पुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा॥देहे टाकिता देव कोठे पहातो ।परि मागुता ठाव कोठे रहातो॥१९४॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• आयुष्याची खरी सुरुवात तर तुमच्या वाडवडिलांच्या ख-या पुण्याईने सुरु झाली.जीवनाचा ' मध्य ' तर तुमच्या कर्तृत्वाने सिद्ध करायचा आहे.तो तुम्हाला चांगला करायचा आहे की,वाईट हे तुम्हालाच ठरवायचे आहे.कारण हे मात्र तुमच्या हातात आहे.यासाठी तुम्हाला कुणाच्या भरवशावर बसता येत नाही किंवा नशिबावर अवलंबून राहता येत नाही.म्हणून तुमच्या जीवनातला मध्यच महत्त्वाचा आहे.आणि शेवट मात्र आपल्या हाती नाही.भविष्यात केव्हा काय घडेल याचे काही ठामपणे सांगता येत नाही.म्हणून जे आज आणि आता तुमच्यासमोर आहे ते सत्य आहे ते स्वीकारा आणि त्याला कौशल्याने, धैर्याने आणि परिस्थितीनुरूप उत्तर द्यायला पुढे रहा.यातच तुमच्या जीवनाचे खरे सार आहे.*व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चांगल्या कर्माचे फलीत*एका जंगलामध्ये *एक म्हतारी* आणि तिची नात राहत होती .आणि त्याच जंगलामध्ये *चार दरोडेखोर* लुटमार करण्यासाठी येत असंत .एके दिवशी लुटमार करता करता संध्याकाळ झाली आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची सुरुवात झाली .ते चार दरोडेखोर जंगलामध्ये *आश्रयासाठी* सैरभैर पळु लागले .अचानक त्यांना म्हतारीची *झोपडी* दिसली .आणि ते म्हतारीच्या झोपडीकडे गेले. म्हतारीने त्यांना रात्री साठी आश्रय दिला.म्हतारीने जेवण बनवले सर्वजन जेवायला बसले आणि जेवता जेवता *पाप पुण्याचा विषय* निघाला.प्रत्येकजण आपल्या परीने विषय मांडत होता.शेवटी म्हतारीने *पैज लावली*. बाहेर विजा पडत आहेत प्रत्येकाने त्या समोरच्या झाडाला शिवुन पुन्हा झोपडीमध्ये यायचे *ज्याच्या अंगावर विज पडेल तो पापी आणि जो सुखरुप पुन्हा झोपडीत येईल तो पुण्यवान.*प्रथम १ ला दरोडेखोर गेला झाडाला शिवुन सुखरुप झोपडीत आला.असे दुसरा गेला ,तिसरा गेला, चौथा गेला. आणि सर्वजण सुखरुप झोपडीत आले.आता पाळी आली म्हतारी आणि तिच्या नातीवर म्हतारीला मनामध्ये प्रश्न पडला की हे चारही दरोडेखोर पुण्यवान निघाले आपण नक्कीच पापी आहोत, विज आपल्याच अंगावर पडणार असा विचार करत असतानातिने नातीला कडेवर घेतले आणी झोपडीच्या बाहेर पाऊल टाकले. त्याचक्षणी विजेचा कडकडाट होऊन विज त्या झोपडीवर पडली आणि क्षणार्धात ते चारही दरोडेखोर जागीच भस्मसात झाले.तात्पर्य :- एका पुण्यवान माणसाच्या आश्रयामूळे आजही चार पापी माणसं जगु शकतात. पण त्याने जर साथ सोडली तर ते चारही भस्मसात होऊ शकतात.म्हणून पुण्याचा वाटा नेहमी घेत रहा. ते कधी संकटाच्या वेळी आडवे येइल हे आपल्याला ही नाही समजणार.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13 फेब्रुवारी 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~समुहात join होण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे. Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक रेडिओ दिन_**_जागतिक सूर्यनमस्कार दिन_*••••••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील ४४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०१०:पुणे येथे दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात १७ ठार,६० जखमी**२००३:चित्रपट निर्माते,दिग्दर्शक यश चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान**१९८४:युरी आन्द्रेपॉव्ह यांच्यानंतर कॉन्स्टान्टीन चेरेनेन्को सोविएत संघाचे अध्यक्ष झाले.**१९८२:भारत आणि फ्रान्स यांच्या संरक्षण करा मिराज विमानाचा समावेश**१७३९:कर्नालची लढाई – पर्शियाच्या नादिरशहाने मुघलांच्या मुहम्मदशहावर तीन तासांत विजय मिळवला. या विजयामुळे नादिरशहाचा दिल्लीत येण्याचा मार्ग सुकर झाला.* *१६६८:स्पेनने पोर्तुगालच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.**१६३०:आदिलशाही आणि निजामशाही संपवण्याच्या उद्देशाने मुघल बादशहा शहाजहान मध्य प्रदेशातील बुर्हाणपूर येथे पोहोचला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७६:शरद कपूर-- भारतीय अभिनेता* *१९६४:रामदास ग.खरे-- कवी,लेखक* *१९६०:स्वाती विनय गाणू-- लेखिका**१९५९:डॉ.गिरीश प्रभाकर पिंगळे -- खगोलशास्त्रचे अभ्यासक,लेखक* *१९४९:चंद्रशेखर ठाकूर--ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ* *१९४५:विनोद मेहरा – अभिनेता (मृत्यू:३० आक्टोबर १९९०)**१९३७:प्रतिभा द्वारकानाथ लेले-- जेष्ठ लेखिका**१९२८:श्रीकृष्ण दामोदर पानवलकर --कथाकार(मृत्यू:१९ ऑगस्ट १९८५)**१९२७:मृणालिनी मधुसूदन जोशी-- ज्येष्ठ लेखिका (मृत्यू:२७ आक्टोबर २०२२)* *१९२१:निर्मला भालचंद बापट-- कवयित्री* *१९११:फैज अहमद फैज – लेनिन शांतता पुरस्कार विजेते ऊर्दू शायर (मृत्यू:२० नोव्हेंबर १९८४)**१९१०:दत्तात्रयशास्त्री धुंडिराज तथा ’दत्तमहाराज’ कवीश्वर – वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक,वेदांती पंडित (मृत्यू:१ मार्च १९९९)**१८९४:वासुदेव सीताराम तथा वा. सी. बेन्द्रे – इतिहासकार (मृत्यू:१६ जुलै १९८६)**१८७९:सरोजिनी नायडू – प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी,रौलेट कायदा, मॉन्टेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा,खिलाफत चळवळ,साबरमती करार,असहकार आंदोलन यांत त्यांचा सक्रिय सहभाग होता. (मृत्यू: २ मार्च १९४९)**१८३५:मिर्झा गुलाम अहमद – अहमदिया पंथाचे संस्थापक (मृत्यू:२६ मे १९०८)**१७६६:थॉमस माल्थस – प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ (मृत्यू:२३ डिसेंबर १८३४)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२:नरेंद्र लांजेवार--ज्येष्ठ साहित्यिक (जन्म:११मे १९६८)**२०१४:दिनकर त्रिंबक धारणकर--मराठी नाट्यकर्मीं,साहित्यिक व ‘सत्य प्रकाश’ या साप्ताहिका’चे माजी संपादक (जन्म:१९३६)**२०१२:अखलाक मुहम्मद खान उर्फ कवी शहरयार – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू कवी (जन्म:१६ जून १९३६)**२००८:राजेन्द्र नाथ – हिन्दी व पंजाबी चित्रपटांतील विनोदी अभिनेते (जन्म:१९३१)**२००७:वामन केशव लेले--भाषा अभ्यासक, समीक्षक(जन्म:२९ मे १९३३)**१९९४:यशवंत नरसिंह केळकर उर्फ य.न. केळकर-- इतिहासविषयक लेखन करणारे मराठी लेखक(जन्म:१९ जुलै १९०२)**१९७४:’सूर रंग’ उस्ताद अमीर खॉं – इंदौर घराण्याचे संस्थापक व गायक (जन्म:१५ ऑगस्ट १९१२)**१९६८:गोपाळकृष्ण भोबे – संगीत समीक्षक, गीतकार व कथालेखक(जन्म:६ आॅगस्ट १९२०)* *१९५६:धुंडिराज गणेश बापट-- वैदिक वाङ्मयाचे भाषांतरकार(जन्म:१५ नोव्हेंबर १८८२)**१९०१:लक्ष्मण बापूजी ऊर्फ ’भाऊराव’ कोल्हटकर – गायक नट (जन्म:९ मार्च १८६३)**१८८३:रिचर्ड वॅग्नर – जर्मन संगीतकार, संगीतसंयोजक व दिग्दर्शक (जन्म:२२ मे १८१३)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~ *👬 मैत्री 👬* ~~~~~मैत्री ही कापड्यातील धाग्यासारखे आहे. एका मित्राने आपले जीवन परिपूर्ण होतच नाही. अनेक धाग्यासारखे जीवनात अनेक मित्र असतात आणि त्याची आवश्यकता देखील पदोपदी जाणवत राहते. बालपणीच्या मित्रांपासून जी मैत्री चालू होते ते महाविद्यालयीन जीवनापर्यंत जाऊन पोहोचते. या सर्व कार्यकाळात असलेले मित्र सुख आणि दुःखाच्या प्रसंगी अधुनमधून जीवनात डोकावत असतात. नोकरीच्या ठिकाणी सुद्धा मैत्री होते पण ती काही ठिकाणी तात्पुरते बनते तर काही ठिकाणी ही मैत्री गट्ट दिसून येते. संकट काळात जो मदतीला धावून येतो तोच खरा मित्र असे म्हटले जाते. त्यासाठी जीवनात संकट यावे लागते हे ही सत्य आहे. आपल्या जीवनात संकटेच आली नाहीत तर खरी मैत्री देखील कळणार नाही.*मैत्री असावी जीवाभावाची**नसाव्यात कोरड्या शपथा**क्षणोक्षणी आठवावे आपुल्या**मैत्रीच्या आठवूणी कथा*लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा आणि आमदारकीचा दिला राजीनामा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *विश्वासदर्शक ठरावात नितीश कुमार पास, बिहार विधानसभेतून विरोधी आमदारांनी वॉक आऊट केल्यानंतर विश्वासदर्शक ठराव जिंकला*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *विदर्भ मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा कहर, हरभरा, गहू, तूर आणि कपाशीचं मोठं नुकसान, नुकसानभरपाई देणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आमरण उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास दिला नकार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *हिंगोली जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभाग ॲक्शन मोडवर:संथ काम करणाऱ्या 168 कंत्राटदारांना नोटीस, अनेक ठिकाणी कामेच बंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *13 वर्षांनतर सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरु:हिंगोलीत पहिल्याच दिवशी 500 क्विंटल कापूस खरेदी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी के एल राहुलऐवजी आता कर्नाटकच्या देवदत्त पड्डीकलला टीम इंडियात स्थान मिळण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *राष्ट्रीय महिला दिन National Women's Day in India*भारतात दरवर्षी 13 फेब्रुवारी हा राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. देशातील महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. भारताच्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कवयित्री आणि गानकोकिळा सरोजिनी नायडू यांचा जन्मदिवस राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सरोजिनी नायडू यांचे विशेष योगदान आहे. सरोजिनी नायडू यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 रोजी बंगाली कुटुंबात हैदराबाद येथे झाला. त्यांनी चेन्नई, लंडन आणि केंब्रिज येथे शिक्षण घेतले. 12 व्या वर्षापासूनच त्या कविता लिहायच्या. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. त्याचबरोबर महिलांच्या हक्कासाठी त्यांनी खूप संघर्ष केला. भारताच्या महिला राज्यपाल म्हणून काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. सरोजिनी नायडू यांनी साहित्य क्षेत्रात देखील योगदान दिले आहे. संकलन ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" ध्येय प्राप्तीसाठी एकाग्रता फार महत्वाची आहे. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या वतीने दिला जाणारा २०२३ या वर्षाचा *'विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार'* कोणाला जाहीर झाला आहे ?२) भारत व पाकव्याप्त काश्मीर यांच्या सीमारेषेला काय म्हणतात ?३) २०२४ साली 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?४) लोकशाही विकेंद्रीकरणाचा प्रथम प्रयोग कोणत्या राज्यात करण्यात आला होता ?५) LIC ( लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ) ची स्थापना कधी झाली ? *उत्तरे :-* १) डॉ. रवींद्र शोभणे २) एल. ओ. सी. ३) कर्पुरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी, पी.व्ही.नरसिंहराव, चौधरी चरण सिंह, डॉ.एम.एस.स्वामीनाथन ४) राजस्थान ५) १ सप्टेंबर १९५६*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 देवीसिंग ठाकूर, धर्माबाद👤 नागनाथ भद्रे, धर्माबाद👤 अशोक पाटील, धर्माबाद👤 संगीता ठलाल, लेखिका, गडचिरोली*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नव्हे जाणता नेणता देवराणा। न ये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा॥ नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा। श्रुती नेणती नेणती अंत त्याचा॥१९३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण जे, काही कार्य करत आहोत त्या कार्याविषयी आपल्याच माणसांना सहसा कळत नसेल किंवा त्याविषयी त्यांना पुरेपूर अनुभव नसेल तर त्यांच्याकडून विरोध होतच असते किंवा पाहिजे तेवढी त्यांच्याकडून आपल्याला साथ मिळत नाही. त्यावेळी आपण दु:खी होऊ नये. भलेही ते साथ देत नसतील तरी उशीरा का होईना हळूहळू सर्वकाही त्यांनाही कळायला लागते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *❃ एकाग्रता ❃* एकदा एक स्वामीजी काही मुलांचे निरीक्षण करत होते. ती मुले पुलावर उभे राहून नदीवर तरंगत जाणार्या अंड्याच्या टरफलावर बंदुकीने नेम साधण्याचा प्रयत्न करत होती. पाण्यामुळे ती टरफले वर-खाली होत होती. मुलांना त्यांच्यापैकी एकही टरफलावर नेम धरता आला नाही. त्यांनी अनेक वेळेला बंदूक झाडली पण प्रत्येकवेळी त्यांचा नेम चुकत राहिला. त्यांच्याकडे बराच वेळ स्वामीजींचे लक्ष होते. मुलेही हे पाहत होती. मुलांनी स्वामीजींना म्हटले," तुम्ही नुसतेच आमच्याकडे काय पाहत आहात? का आम्हाला नेम धरता येत नाही असे तुम्हाला वाटते? आणि असे असेल तर तुम्ही नेम धरून ती टरफले फोडून दाखवा. तुम्हाला जर असे वाटत असेल की तुम्हाला आमच्यापेक्षा अधिक चांगले जमते असे वाटते का?" स्वामीजी हसले आणि म्हणाले," मी प्रयत्न करून पाहतो." मुले म्हणाली," तुम्हाला वाटते तितके ते सोपे नाहीये." स्वामीजींनी बंदूक हातामध्ये घेतली आणि त्या अंड्याच्या टरफलावर नेम धरला, काही मिनिटे निश्चल राहिले, मग त्यांनी बंदूक चालवली, त्यांनी बारावेळा गोळ्या झाडल्या आणि बारावेळेला अंड्यांची टरफले उडविण्यात स्वामीजींना यश आले. त्या मुलांना फारच आश्चर्य वाटले,"एखादा माणूस पाण्यातील वाहणार्या अंड्याच्या टरफलावर इतका अचूक कसा नेम साधू शकतो?" असा प्रश्न त्यांना पडला. स्वामीजींनी मुलांच्या मनातील हे ओळखले, त्यांना ती मुले आवडली होती. ते म्हणाले,’’ जे काही तुम्ही करत होता त्यावर तुमचं मन एकाग्र करा. नेमबाजी करा किंवा अन्य काही. तुमचं लक्ष फक्त लक्ष्यावरच पाहिजे. तुमचा नेम कधीच चुकणार नाही. एकाग्रतेने बरेच काही साध्य करता येते. अवघड वाटणा-या गोष्टीसुद्धा या एकाग्रतेने सहजसाध्य होतात.’’ मुले स्वामींजींपुढे नतमस्तक झाली. *_🌀 तात्पर्य_ :~*ध्येय प्राप्तीसाठी एकाग्रता फार महत्वाची आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 12 फेब्रुवारी 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2019/02/blog-post_7.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ४३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••••*१९९३:एम. एन. वेंकटचलैय्या यांनी भारताचे २५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९७९:वसंत गोपाळ आपटे यांनी किर्लोस्करवाडी येथून "आपले जग" नावाचे साप्ताहिक सुरू केले**१९७६:पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते हडेक्की (केरळ) प्रकल्प देशास अर्पण.**१५०२:लिस्बन, पोर्तुगाल येथून वास्को-द-गामा भारताच्या दुसर्या सफरीवर निघाला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८३:नवनाथ रणखांबे-- कवी,लेखक* *१९८३:राजीव मासरूळकर-- कवी* *१९८०:भाऊसाहेब मिस्तरी(भाऊसाहेब वाल्मीक गवळे)-- कादंबरीकार,स्तंभ लेखन**१९७६:विजय ढाले-- कवी**१९६०:सुरेखा गावंडे -- प्रसिद्ध बालसाहित्यिक,कवयित्री* *१९५७:डॉ.तात्याराव पुंडलिकराव लहाने-- प्रसिद्ध नेत्रचिकित्सक* *१९५६:गिरीश चौक-- लेखक**१९५२:ई.झेड.खोब्रागडे-- निवृत्त सनदी अधिकारी* *१९५०:भास्कर चिंधूजी नंदनवार-- लेखक**१९४९:गुन्डाप्पा विश्वनाथ – शैलीदार फलंदाज**१९४८:डॉ.सुधाकर सोमेश्वर मोगलेवार-- कवी,लेखक**१९४३:सतीश काळसेकर-- मराठी साहित्यातील कवी,संपादक,अनुवादक, लघुनियतकालिकांच्या चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते(मृत्यू:२४ जुलै २०२१)**१९३९:अजितसिंग चौधरी-- भारतीय शेतकरी नेते,राष्ट्रीय लोक दलाचे संस्थापक(मृत्यू:६ मे २०२१)**१९३४:प्रा.डॉ.शरद काशिनाथ कळणावत-- प्रसिद्ध लेखक,कवी,वक्ते* *१९२९:दत्तात्रेय धोंडोपंत रत्नपारखी-- लेखक* *१९२९:प्राचार्य डॉ.गोपाळ श्रीनिवास बनहट्टी-- लेखक,नाटककार* *१९२०:कृष्ण सिकंद ऊर्फ ’प्राण’ – चित्रपट अभिनेता (मृत्यू:१२ जुलै २०१३)**१९१४:दत्तात्रय कृष्ण पेठे-- कवी* *१८८१:अॅना पाव्हलोव्हा – ’द डाइंग स्वान’ म्हणून प्रसिद्ध असलेली रशियन बॅलेरिना (मृत्यू:२३ जानेवारी १९३१)**१८७६:थुब्तेन ग्यात्सो – १३ वे दलाई लामा (मृत्यू:१७ डिसेंबर १९३३)**१८७१:चार्लस फ्रिअरी तथा दीनबंधू अॅन्ड्र्यूज – इंग्लिश मिशनरी,महात्मा गांधींचे जवळचे मित्र,समाजसेवक आणि भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते (मृत्यू:५ एप्रिल १९४०)**१८२४:मूळशंकर करसनदास तिवारी तथा स्वामी दयानंद सरस्वती – संस्कृत विद्वान आणि आर्य समाजाचे संस्थापक (मृत्यू:३१ आक्टोबर १८८३)**१८०९:चार्ल्स डार्विन – उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ (मृत्यू:१९ एप्रिल १८८२)**१८०९:अब्राहम लिंकन – अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू:१५ एप्रिल १८६५)**१८०४:हेन्रिक लेन्झ – जर्मन भौतिकशास्त्रज (मृत्यू: १० फेब्रुवारी १८६५)**१७४२:बाळाजी जनार्दन भानू उर्फ 'नाना फडणवीस' – पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी,पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी एक (मृत्यू:१३ मार्च १८००)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२:राहुल बजाज-- बजाज ग्रुप उद्योग समूहाचे चेरमन,माजी राज्यसभा सदस्य,पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित(जन्म:१० जून १९३८)**२०१६:वसंतराव राजूरकर-- ग्वाल्हेर घराण्याचे भारतीय शास्त्रीय संगीत गाणारे मराठी गायक(जन्म:२४ एप्रिल १९३२)**२०१२:प्रा.डॉ.रत्नाकर बापूराव मंचरकर तथा र.बा.मंचरकर-- मराठी साहित्याचे समीक्षक व संत साहित्याचे अभ्यासक(जन्म:६ आक्टोबर १९४३)**२००१:भक्ती बर्वे – अभिनेत्री (जन्म:१० सप्टेंबर १९४८)**२०००:विष्णुअण्णा पाटील – सहकार क्षेत्रातील नामवंत नेते* *१९९८:पद्मा गोळे – सुप्रसिद्ध कवयित्री (जन्म:१० जुलै १९१३)**१८०४:एमॅन्युएल कांट – जर्मन तत्त्ववेत्ता (जन्म:२२ एप्रिल १७२४)**१७९४:पेशवाईतील मुत्सद्दी महादजी शिंदे यांचे वानवडी येथे निधन (जन्म:१७३०)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••महर्षी मार्कंडेय जयंती निमित्ताने प्रासंगिक लेख*महर्षी मार्कंडेय : पद्मशाली समाजाचे कुलदैवत*ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हणजे भृगु महर्षी. या भृगु महर्षी आणि त्यांची पत्नी कयार्थी यांना भार्गवी, धाता आणि विधाता अशी तीन अपत्ये होती. भार्गवी म्हणजे लक्ष्मी ही विष्णूची पत्नी. धाता व अयाती यांना प्राणूडु नावाचा पुत्र होता. तर विधाता आणि नियती यांच्या पुत्राचे नाव होते मृकंड. भगवान शंकराचे परमभक्त असलेले मृकंडला एकही पुत्र नव्हते. त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी शंकर भगवानची कठोर तपस्या केली. त्यांच्या या कठोर तपश्चर्येला भगवान शंकर प्रसन्न झाले आणि............ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मध्यप्रदेश मधल्या झाबुआ इथे पंतप्रधानाच्या हस्ते 7300 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पाचं उदघाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *लोकांचं आरोग्य व्यवस्थित राहावं म्हणून केंद्र सरकारने आयुष्यमान भारत ही योजना सुरू - उपराष्ट्रपती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नाशिक :- राज्यातील पहिल्या वातानुकूलित बसस्थानकाचे लोकार्पण*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नांदेड जिल्ह्याला गारपीटीचा तडाखा, हाता तोंडाशी आलेल्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान, पंचनामे करून तातडीने मदत करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नमो महारोजगार मेळाव्यासाठी समन्वयाने काम करा : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे आवाहन ; विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *तलाठी संघटनेचे अधिवेशन : तलाठ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक ; महसूल मंत्री विखे पाटील यांची ग्वाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *U19 World Cup - ऑस्ट्रेलियाने भारताला 79 धावांनी हरवून विश्वकप जिंकला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🍖 *तुटलेली हाडं परत पूर्वीसारखी कशी होतात ?* 🍖 ***********************'उजव्या हाताच्या करंगळीचं फ्रॅक्चर झाल्यामुळे अनिल कुंबळेची कसोटीतून माघार' किंवा 'मनगटाचं फ्रॅक्चर झाल्यामुळे बोरिस बेकर विम्बल्डन खेळू शकणार नाही', अश्या बातम्या आपण वर्तमानपत्रांमधून वाचतो, त्यावेळी वाटतं की संपलं त्या खेळाडूंची कारकीर्द संपली. एवढंच नाही तर आता आयुष्यभर त्या तुटलेल्या अवयवानिशीच त्याला वावरावे लागणार आहे. पण नाही. दोन कसोटीनंतर अनिल कुंबळे आपल्या फिरकीची जादू घेऊन परत अवतरतो आणि बोरिस बेकर आपल्या झंझावाती सर्व्हिसेसने प्रतिस्पर्धी खेळाडूंना सळो की पळो करून सोडतो. मग साहजिकच प्रश्न पडतो की खरी जादू अनिल कुंबळेंनं नव्हे तर त्याच्या त्या मोडलेल्या हाडावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी केली तर केली नाही ?पण नाही जादू कोणी केलीच असेल तर ती निसर्गानं केली आहे. निसर्गानेच तुटलेली हाडं परत सांधण्याची व्यवस्था मुळातच करून ठेवली आहे. हाड टणक असते. त्यामुळे ते नखांसारखे निर्जीव आहे की काय असं वाटतं. पण तसं नाही. इतर कोणत्याही अवयवासारखा हाही चैतन्यानं सळसळणारा अवयव आहे. जेव्हा एखादं हाड तुटतं त्यावेळी त्याच्यातून जाणाऱ्या रक्तवाहिन्याही तुटतात. त्यांच्यामधून रक्त बाहेर सांडू लागतं. पण इतर जखमांप्रमाणेच तेही गोठतं आणि त्या ठिकाणी फ्रॅक्चर हॅमेटोमा तयार होतो. तो हाडाला स्थिर करून त्यांची तुटलेली टोकं परत सांधतील अशा जुळणीच्या स्थितीत आणून ठेवतो. गुठळी झाल्यामुळे त्या टोकांच्या वेड्यावाकड्या झालेल्या भागाला रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे ती झिजून जातात आणि परत सांधण्यासाठी गुळगुळीत पृष्ठभाग तयार होतो. त्या भागात नवीन रक्तवाहिन्या प्रस्थापित केल्या जातात. काही दिवसांनंतर तिथल्या पेशी नवीन स्नायूंचे धागे तसंच कुर्चा तयार करतो. त्यामुळे ती तुटलेली टोकं एकमेकांना बांधली जाऊ शकतात. त्या टोकांमध्ये तयार झालेली फट भरून काढण्याच्या दिशेने नवीन पेशी व उती तयार होऊ लागतात. आता आॅस्टीअोब्लास्ट या पेशी कामाला लागतात आणि त्या तिथं तयार झालेल्या उतीचं हाडांच्या पेशींमध्ये रूपांतर करू लागतात. थोडक्यात नवीन हाड तयार व्हायला लागतं. आता आजूबाजूच्या मांसल भागात आपलं स्थान पक्कं करण्याच्या दिशेने हाड कार्यरत होतं. मृत पेशीच आतल्या आत शोषल्या जातात आणि नवीन पेशी टणक होऊन दोन टोकांमधली फट भरून काढतात. हाड नव्यानं सांधलं जातं. कॅल्शियम आणि फॉस्फरसचा नव्यांनं पाझर होऊन त्या नवीन हाडाला पूर्वीचीच ताकद दिली जाते. बोरीस बेकरचे मनगट परत त्याच जोमाने चेंडू टोलवायला तयार होते.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" जी व्यक्ती तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकते, तीच तुमच्या आयुष्याला अर्थ देऊ शकते."**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पाण्याशिवाय वर्षभर जीवंत राहू शकणारे प्राणी कोणते ?२) निसर्गातील सफाई कामगार म्हणून ओळखला जाणारा पक्षी कोणता ?३) इतिहासात पहिल्यांदाच कोणत्या वर्षी ५ व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार घोषीत झाले आहे ?४) क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये अव्वल स्थान पटकावणारा जसप्रीत बुमराह हा जगातील कितवा वेगवान गोलंदाज ठरला आहे ?५) अंटार्क्टिकावर जाणारी भारतातील पहिली महिला कोण ? *उत्तरे :-* १) विंचू व कासव २) गिधाड ३) वर्ष २०२४ ४) पहिला ५) अदिती पंत*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 भागेश्री देशमुख👤 नवनाथ रणखांबे👤 निलेश पाटील👤 नागनाथ चंदे👤 रविंद्र डुबिले👤 हणमंत गुरुपवार👤 विनोदकुमार भोंग👤 विजयकुमार पवारे👤 अशोक शिलेवाड, पो. पा. येवती👤 सुनील कवडे, कुपटी, माहूर👤 जलील अब्दुल👤 सौ. मनिषा जोशी, विषय शिक्षिका, कन्या शाळा धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना ना कळे ना ढळे रुप ज्याचे। दुजेवीण तें ध्यान सर्वोत्तमाचे॥ तया खुण ते हीन दृष्टांत पाहे। तेथे संग निःसंग दोन्ही न साहे ॥१९२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷आजची विचारधारा......*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन जगत असताना माणसाला अन्न,वस्त्र, निवारा, पाणी, पैसे अशा बऱ्याच आवश्यक असलेल्या वस्तूंची गरज भासत असते. पण सर्वात जास्त अन्नाची व पाण्याची गरज असते. अचानक त्यावेळी कोणी आपुलकीने अन्नाचा ताट हातात देत असेल तर चुकीच्या मार्गाने जाऊन त्या अन्नाचा किंवा अन्न देणाऱ्याचा कधीही अपमान करू नये. कारण एकदा का त्या दोघांचा अपमान झाला की, परत पुन्हा त्याच आपुलकीने तो अन्न,किंवा पाणी मिळेलच असे नाही.म्हणून असे चुकूनही करू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••" उन्हाळ्याच्या दिवसात, एक सिंह, एका आंब्याच्या थंड छायेत सुस्त निजला होता; तिथे एक उंदीर येतो. तो उंदीर सिंहला खूप त्रास देतो. त्यामुळे जागा होऊन, सिंहने पंजात उंदीरला धरला आणि त्यास आता फाडून टाकणार इतक्यात, त्या उंदराने त्याची प्रार्थना केली, ‘महाराज, आपण थोर, सर्व श्वापदांचे राजे, मी आपल्यापुढे केवळ रंक, माझ्या रक्ताने आपले हात विटाळू नयेत. मला जीवदान दयावे, हेच आपणास उचित आहे.’ ते ऐकून सिंहास त्याची दया आली आणि त्याने त्यास सोडून दिले.पुढे एके दिवशी सिंह अरण्यात फिरत असताना आंब्याच्या झाडाजवळ जातो, त्याच आंब्याजवळ पारध्याने जाळे मांडले होते, त्यात सिंह सापडतो. त्यावेळी त्याने आपले सगळे बळ खर्चून फार धडपड केली. पण त्याची सुटका होईना. तेव्हा तो निराश झाला आणि मोठमोठयाने ओरडू लागला. ती ओरडणं ऐकून तो उंदीर त्या ठिकाणी आला आणि सिंहास म्हणाला, ‘राजा, भिऊ नको, स्वस्थ रहा. ’ इतके बोलून, त्याने आपल्या दातांनी ते जाळे कुरतडले व सिंहाची सुटका केली.*तात्पर्य:-* जे मोठे आहेत त्यांचेही एखादे मोठे काम लहानाच्या हातून, एखादे वेळी होते. यासाठी, कोणास क्षुद्र समजून त्याचा उपहास करू नये किंवा त्यास दुखवू नये. लहानाच्या हातूनही उपकार होऊ शकतात, हे लक्षात ठेवावे. वैभव कायम राहीलच, असा नेम नाही, यासाठी आपल्या चालत्या काळी, मनुष्याने लोकांवर उपकार करून ठेविले, तर पडत्या काळात तेच "•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 10 फेब्रुवारी 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2022/11/power-of-one-vote.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ४१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००५:उत्तर कोरियाने आपण अण्वस्त्रसज्ज असल्याचे जाहीर केले.* *१९९६:आय. बी. एम. (IBM) कंपनीने बनवलेल्या "डीप ब्लू" या महासंगणकाने बुद्धीबळात गॅरी कास्पारॉव्हचा पराभव केला.**१९४८:पुणे विद्यापीठाची स्थापना* *१९३३:न्यूयॉर्कमध्ये झालेल्या एका मुष्टियुद्ध लढतीत प्रिमो कार्नेरा याने अर्नी शाफ याचा १३ व्या फेरीत पराभव केला.या लढतीत अर्नी शाफचा मृत्यू झाला.**१९२९:जे.आर.डी टाटा हे पहिले अधिकृत भारतीय वैमानिक बनले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८३:प्रा.डॉ.गजानन कोर्तलवार-- लेखक* *१९७८:अल्पना देशमुख-नायक-- लेखिका* *१९७७:उत्पल वनिता बाबुराव-- कवी,लेखक,संपादक* *१९७६:सुरेश प्रभाकरराव फुलारी-- कवी* *१९७५:अॅड.सोमदत वसंतराव मुंजवाडकर -- कवी,गीतकार,लेखक* *१९७३:प्रमोद बबनराव खराडे-- गझलकार**१९७२:अर्चना हरबुडे-धानोरकर-- कवयित्री**१९५९:डॉ.जिवबा रामचंद्र केळुस्कर-- कवी,लेखक* *१९४९:मोहन शिवराम सोनवणे-- जेष्ठ कवी, लेखक* *१९४६:ओंकारलाल चैत्रराम पटले-- कवी,लेखक* *१९४५:राजेश पायलट –माजी केंद्रीय मंत्री (मृत्यू:११ जून २०००)**१९३४:चंद्रकांत महामिने--ज्येष्ठ विनोदी साहित्यिक(मृत्यू:२२ आगस्ट २०२१)* *१९३१:नंद रामदास बैरागी(बालकवी बैरागी) -- भारतातील हिंदी कवी,चित्रपट गीतकार (मृत्यू:१३ मे २०१८)**१९२९:प्रा.डॉ.ग.का.रावते-- प्रसिद्ध लेखक* *१९२४:श्रीकांत नारायण आगाशे -- कवी, कुमारसाहित्यकार (मृत्यू:५ नोव्हेंबर १९८६)**१९१०:दुर्गा भागवत – साहित्यिका व मानववंशशास्त्रज्ञ (मृत्यू:७ मे २००२)**१८९४:हॅरॉल्ड मॅकमिलन – इंग्लंडचे पंतप्रधान (मृत्यू:२९ डिसेंबर १९८६)**१८०३:जगन्नाथ ऊर्फ ’नाना’ शंकरशेठ – दानशूर व शिक्षणतज्ञ (मृत्यू:३१ जुलै १८६५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००१:गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर – जयपूर - अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका (जन्म:१५ जुलै १९०४)**१९८२:नरहर कुरुंदकर – विद्वान,टीकाकार आणि लेखक (जन्म:१५ जुलै १९३२)**१९७८:वालचंद रामचंद कोठारी---संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सक्रिय नेते, प्रतिभाशाली विचारवंत,प्रसिद्ध साहित्यिक आणि समाजहितैषी पत्रकार(जन्म:१३ सप्टेंबर १८९२)**१९७८:पंडित बाळाचार्य माधवाचार्य खुपेरकरशास्त्री --राष्ट्रीय पंडित,तत्त्वचिंतक, संस्कृत तज्ज्ञ(जन्म:१२ सप्टेंबर १८८२)**१९२३:विलहेम राँटजेन – नोबेल पारितोषिकविजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म:२७ मार्च १८४५)**१९१२:सर जोसेफ लिस्टर – निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बर्या होतात हे सिध्द करणारा ब्रिटिश शल्यविशारद (जन्म:५ एप्रिल १८२७)**१८६५:हेन्रिक लेन्झ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म:१२ फेब्रुवारी १८०४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *एका वोटची किंमत*ज्या ज्या वेळी आपण मतदार म्हणून निवडणुकीला तोंड द्यावे लागते त्या त्यावेळी आपल्या समोर एकच प्रश्न पडतो की, मतदार म्हणून मी काय करावे ? कोणत्या व्यक्तीला किंवा कोणत्या पक्षाला मतदान करावे ? आपण एक जागरूक मतदार असाल तर नक्कीच या प्रश्नाचे निराकरण स्वतःच्या मनाशी विचारून नक्की करू शकता. त्यासाठी स्वतः मतदार यांनी सर्वप्रथम कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये. छोट्या छोट्या आमिषाचा स्विकार करू नये. खाण्या-पिण्याच्या पार्टीला हजेरी लावू नये. बहुतांश वेळा निवडणुकीच्या काळात हे चित्र हमखास बघायला मिळते........... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पी.व्ही. नरसिंह राव, चौधरी चरण सिंह, एम.एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये देशातील एकूण मतदारांची संख्या ९७ कोटी तर यावेळी २.६३ कोटी नवे मतदारांची भर, केंद्रीय निवडणूक आयोगाने माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *परभणी परळी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी १०० कोटींचा निधी, मराठवाड्यात रेल्वेचा वेग वाढणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्यायला हवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मोठी मागणी!*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *वेरूळ-अजिंठाचा होणार कायापालट, केंद्राच्या स्वदेश दर्शन २.० या योजनेत समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जेष्ठ कॉंग्रेस नेते रोहिदास पाटील यांची प्रकृती चिंताजनक; कोल्हापुरात उपचार सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *तीन ही फॉरमॅट मध्ये 100 पेक्षा जास्त सामने खेळण्याच्या यादीत डेव्हिड वॉर्नर जगात तिसरा फलंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *वातावरणातील वायूंचे उपयोग* 📙 **************************हवेतील वायू माहिती असतातच. त्यांचे प्रमाण, टक्केवारी, गुणधर्म यांबद्दलची माहिती प्रयोगशाळेत व शैक्षणिक वर्गात नेहमीच घेतली जात असते. पण अनेकदा दैनंदिन वापरात या वायूंची माहिती आपण उपयोगात आणत आहोत, हे मात्र लक्षात येत नाही. हवा बंद बाटलीतील एरिएटेड कोल्ड्रिंक पिताना चुरचुरणारी चव व फसफसणारे पेय हवेहवेसे वाटते. आत विरघळवलेला, दाबाखाली असलेला कार्बन डाय ऑक्साइड हे काम करत असतो. हेच पेय उघडे ठेवले, तर दहा मिनिटांनी त्यातील हा वायू निघून गेल्यावरची चव चांगली असेल; पण जिभेला चुरचुरणारी, गार लागणारी गम्मत निघून गेलेली असेल. सिनेमाचे शूटिंग चालू आहे किंवा स्टेजवर डिस्को रंगात आला आहे, त्याच वेळी धुराचे लोट व धुक्याचा थर सर्वांना वेढून टाकण्याचा अभ्यास निर्माण करायचा आहे, याही वेळा कार्बन डाय ऑक्साइडच उपयोगी पडतो. कोरडा बर्फ या प्रकारातील घन कार्बन डायॉक्साईड जेव्हा वायुरूप होतो, तेव्हा हा आभास निर्माण होतो. टॉन्सिल्सचे ऑपरेशन करायचे झाले, तर याच कोरड्या बर्फाचा वापर करून क्रायोसर्जरी पद्धतीने रक्तहीन ऑपरेशन करण्याची पद्धत जपानी सर्जन वापरतात. आग विझवण्याच्या उपकरणात कार्बन डाय ऑक्साइड वापरला जातोच. त्याचा थर आगीवर पसरवून प्राणवायूचा पुरवठा तोडणे हा त्यातील मुख्य हेतू असतो. नायट्रोजनचा व्यवहारात वापर अनेक ठिकाणी केला जातो. फक्त त्याची जाणीव आपल्याला फार क्वचित होते. ज्वालाग्राही पदार्थ, ज्वालाग्राही तेले, जीवनोपयोगी औषधे, साठवणीची धान्य प्लास्टिकच्या बंद पिशव्यांत भरली जातात वा बंद डब्यात भरतात, तेव्हा मोकळी जागा नायट्रोजनने भरण्याची प्रथा आहे. एवढेच काय निर्वात केलेल्या विजेच्या दिव्यातही नायट्रोजन भरला, तर त्यांचे आयुष्य वाढते, अशी विजेच्या दिव्यांचा वापर सुरू झाला, तेव्हाची पद्धत होती. त्यानंतर मात्र अन्य वायूंचा वापर विविध रंग मिळवण्यासाठी सुरू झाला. प्रत्यक्ष नायट्रोजनचा वापर औद्योगिक निर्मितीत फार मोठ्या प्रमाणावर केला जातो. उदाहरणार्थ खते, रंग, स्फोटके, इतकेच काय पण भूल देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांतील एक म्हणजे नायट्रस ऑक्साइड हे नायट्रोजन व प्राणवायूचेच संयुग आहे. वातावरणातील मुख्य घटक नायट्रोजन असल्याने त्याची औद्योगिक निर्मिती वा साठवणही सहज शक्य होते. प्रयोगशाळेत व औद्योगिक वापरात याचा एक महत्त्वाचा वापर म्हणजे द्रव स्वरूपातील नायट्रोजन. एखादी गोष्ट अनंत काळपर्यंत टिकवायची असेल, तर याच्या तापमानाला ठेवायची व्यवस्था केल्यास ती नक्की टिकेल, असा विश्वास शास्त्रज्ञांना वाटतो. उदाहरणार्थ जिवंत पेशी या तापमानाला गोठवून पुन्हा पाहिजे त्या वेळी त्यांना नेहमीच्या तापमानात आणता येईल, या दिशेने सतत प्रयोग चालू असून त्यांना यश येत आहे. प्राणवायूशिवाय सजीव जगू शकत नाही. पण याच प्राणवायूचा अशुद्ध पदार्थ शुद्ध करायला गमतीदार वापर केला जातो. लोखंडापासून पोलाद बनवताना त्याची शुद्धता वाढवायला उकळत्या लोखंडाच्या रसात प्राणवायू सोडला जातो. त्याच्या सान्निध्याने अशुद्ध कण चक्क जळून नष्ट होतात, राहते ते शुद्ध लोखंड. हा सोपा उपाय अन्यही काही धातूंच्या शुद्धीकरणात वापरला जातो. शोभेची दारू व स्फोटके यांना हवेतील प्राणवायूचा पुरवठा कमी पडतो. त्यासाठी त्यातच ऑक्सिडायझर मिसळून त्यातून मोठ्या प्रमाणावर प्राणवायू पुरवण्याची व्यवस्था केली जाते. आजार्याला दिला जाणारा प्राणवायू तर सर्वांना माहिती आहेच. त्याचेच सुटसुटीत भावंड पाणबुडे व गिर्यारोहक वापरतात. हायड्रोजनचा वापर तेलापासून वनस्पती तूप व मार्गारीन बनवण्यासाठी केला जातो. तूप म्हणून वापरात असलेले डालडा हे वनस्पतिज तेलावरील हायड्रोजनेशन प्रक्रियेतून तयार होत. बलुन्समध्ये हेलियमचा वापर केला जातो. जखमा धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधासाठी म्हणजे हायड्रोजन पॅराॅक्साइडसाठी हायड्रोजनची गरज असतेच. हायड्रोजनचा वापर इंधन म्हणूनही करता येतो.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" मुलांवर प्रेम करा पण दुर्गुण पाठीमागे घालू नका. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) मेंदू कोठे असतो ?२) जिल्ह्याचा सर्वोच्च अधिकारी कोण असतो ?३) ६६ व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात किती भारतीयांना ग्रॅमी अवॉर्ड मिळाले ?४) उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?५) पर्शियन भाषेला अजून कोणत्या नावाने ओळखले जाते ? *उत्तरे :-* १) डोक्याच्या कवटीत २) जिल्हाधिकारी / कलेक्टर ३) पाच ४) पुष्कर सिंह धामी ५) फारसी भाषा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 जगन्नाथ दिंडे, सहशिक्षक, नांदेड👤 आमिन जी. चौहान, यवतमाळ👤 विजय रच्चावार, संपादक👤 बाबू बनसोडे, सहशिक्षक, नायगाव👤 राहूल कतूरवार, धर्माबाद👤 सुधाकर अपुलवाड👤 राजू गोडगुलवार👤 म. जावेद, उर्दू हायस्कुल, धर्माबाद👤 प्रशांत येमेवार, पोलीस निरीक्षक👤 डॉ. प्रकाश बोटलावार👤 अशोक श्रीमनवार, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नव्हे कार्यकर्ता नव्हे सृष्टिभर्ता। पुरेहून पर्ता न लिंपे विवर्ता॥ तया निर्विकल्पासि कल्पित जावे। परि संग सोडुनि सुखे रहावे॥१९०॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुसऱ्याला जेव्हा,आपणा कडून मदतीची गरज असते तेव्हा, आपण त्याकडे दुर्लक्ष करत असतो. अन् आपल्याला अडचण पडली की, मात्र त्याच व्यक्तीकडे सहकार्य करण्याची अपेक्षा आपण करत असतो. ज्यावेळी आपणच दुसऱ्याला मदत करत नाही तर दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवणे कितपत योग्य आहे. .? म्हणून मदत जरी करता नाही आली तर चालेल पण, त्या प्रसंगी एवढीही पाठ फिरवू नये की, दुसऱ्यांदा मदत मागण्यासाठी जागा नसेल.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*विश्वासघात*करढोक नावाचा एक पक्षी नदीकाठी राहून व पाण्यात बुड्या मारून मासे धरून खातो. या जातीचा एक पक्षी म्हातारा झाल्याने त्याला पाण्यातले मासे दिसेनासे झाले. त्यामुळे काहीतरी ढोंग करून आपला चरितार्थ चालवण्याचा त्याने विचार केला, 'तो ज्या कालव्याजवळ बसला होता, त्यातला एक मासा पाण्याच्या पृष्ठभागावर आला असता, तो म्हातारा करढोक त्याला म्हणाला, 'अरे, तुला तुझ्या स्वतःच्या नि तुझ्या भाऊबंदांच्या जिवाबद्दल जर थोडी-बहुत काळजी वाटत असती तर कालव्याचा मालक एकदोन दिवसात कालव्यातलं सगळं पाणी बाहेर सोडणार आहे, याकरता तुम्ही आपले जीव वाचविण्यासाठी काहीतरी उपाय करा.' हे ऐकून तो मासा पाण्याच्या तळाशी गेला आणि सगळ्या माशांची सभा भरवून तो करढोकाचा निरोप त्याने सांगितला. तो ऐकताच आपल्यावर येणार्या संकटाची सूचना देणार्या त्या करढोकाचे आभार मानण्याचा व या संकटातून मुक्त होण्यासाठी उपाय सुचविण्याविषयी त्याला विनंती करण्याचा ठराव त्यांनी केला व तो त्या करढोकास कळविण्याचे काम त्या निरोप घेऊन येणार्या माशावर सोपविले. त्याप्रमाणे त्याने करढोकास जाऊन आपला ठराव त्याला कळविला. तो ऐकताच करढोक त्याला म्हणाला, 'या संकटातून वाचण्याचा एकच मार्ग आहे. तुम्ही सर्वांनी पाण्याच्या पृष्ठभागावर यावं म्हणजे मी तुम्हाला माझ्या घराशेजारच्या तलावात नेऊन पोहचवीन. ती गोष्ट माशांनी कबूल केली. मग करढोकाने त्यांना एका उथळ पाण्याच्या तलावात नेऊन सोडले व थोड्याच दिवसात त्या सर्वांना गट्ट केले.तात्पर्य - शत्रूच्या गोड शब्दावर विश्वास ठेवून त्याच्या जाळ्यात सापडणे हा मूर्खपणा होय.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 09 फेब्रुवारी 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post_7.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ४० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००३:संगीतकार रवींद्र जैन यांना मध्यप्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.**१९७३:बिजू पटनायक ओरिसा विधानसभेचे विरोधी पक्षनेते बनले.**१९६९:बोइंग-७४७ विमानाचे पहिले चाचणी उड्डाण झाले.**१९५१:स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सुरू* *१९३३:साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना ’श्यामची आई’ या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली.* *१९००:लॉन टेनिस या खेळातील ’डेव्हिस कप’ या करंडकाची सुरूवात झाली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८६:कांचन अभिजित जाधव (बाबर)-- कथालेखिका**१९८६:राजश्री विजय कुलकर्णी -- कवयित्री* *१९७०:ग्लेन मॅकग्रा – ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज**१९६९:जितेंद्र दत्तात्रय पराडकर-- प्रसिद्ध लेखक* *१९६७:प्रा.गिरीश चत्रु पाटील-- कवी,लेखक**१९६२:किशोर मांदळे-- लेखक* *१९५८:अमृता सिंग-- भारतीय अभिनेत्री**१९५५:वैशाली मुलमुले -- कवयित्री* *१९५०:शोभा अशोक बडवे--मराठी कवयित्री, लेखिका**१९४८:प्रा.शरद देशमुख -- कवी,लेखक* *१९४८:भाऊ तोरसेकर उर्फ गणेश वसंत तोरसेकर-- राजकीय विषयांवर वृत्तपत्रीय आणि दिवाळी अंकातून लिखाण,मराठी लेखक* *१९४५:विश्वजीत दत्तात्रय तुळजापूरकर-- कवी* *१९३३:श्रीकृष्ण गणेश पोंक्षे -- कवी,लेखक* *१९२९:बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले-- माजी केंद्रीय अल्पसंख्यांक कार्य मंत्री व महाराष्ट्राचे आठवे माजी मुख्यमंत्री(मृत्यू:२ डिसेंबर २०१४)**१९२२:गजानन वासुदेव कवीश्वर-- वांड्:मय संशोधक तथा लेखक**१९२२:जिम लेकर – इंग्लिश क्रिकेट खेळाडू (मृत्यू:२३ एप्रिल १९८६)**१९१७:होमी जे.एच.तल्यारखान – गांधीवादी नेते,सिक्कीमचे पहिले माजी राज्यपाल,मंत्री व आमदार (मृत्यू:२७ जून १९९८)**१९१२: गजानन वासुदेव कवीश्वर--मराठी वाङ्मय संशोधक,लेखक**१९०४:दत्तात्रेय दामोदर जोशी-- बाल साहित्यिक**१९००:नारायणशास्त्री आंजलेॅकर जोशी-- लेखक* *१८७४:स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद – लहानपणीच तापामुळे कमरेखालील सर्व अंग लुळे पडून त्यांना कायमचे अपंगत्व आले,त्यामुळे त्यांचे शिक्षणही होऊ शकले नाही. कविता मात्र बालपणापासून करीत (मृत्यू:२८ फेब्रुवारी १९२६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:राजीव कपूर-- भारतीय अभिनेता, चित्रपट निर्माता,चित्रपट दिग्दर्शक(जन्म:२५ ऑगस्ट १९६२)**१९१२:ओ.पी. दत्ता-- भारतीय चित्रपट निर्माते आणि लेखक(जन्म:१९२२)**२००८:डॉ.मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे – कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक,लेखक (जन्म:२६ डिसेंबर १९१४)**२००४:वामन बाळकृष्ण भागवत-- लेखक, संस्कृत भाषातज्ज्ञ(जन्म:२४ जानेवारी १९१८)**२०००:शोभना समर्थ – चित्रपट अभिनेत्री व निर्माती (जन्म:१७ डिसेंबर १९१६)**१९८४:तंजोर बालसरस्वती – भरतनाट्यम नर्तिका (जन्म:१३ मे १९१८)**१९८१:एम.सी.छागला – न्यायाधीश,मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री (जन्म:३० सप्टेंबर १९००)**१९७९:राजा परांजपे – चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते (जन्म:२४ एप्रिल१९१०)**१९६६:दामूअण्णा जोशी – बालमोहन नाटक मंडळीचे संस्थापक.* *१८७१:फ्योदोर दोस्तोवस्की – रशियन कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ (जन्म:११ नोव्हेंबर १८२१)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जन्म मृत्यूची नोंदणी*युनिसेफच्या एव्हरी चाईल्ड ब्राईट ईनेकविट्स अँड बर्थ रजिस्ट्रेशन या नुकतेच प्रकाशित करण्यात आलेल्या 161 देशातील आकडेवारी विश्लेषणाचा अहवालानुसार भारतात प्रत्येक तीन मुलामागे एकाच्या जन्माचे कोणतीही नोंद नसते. पाच वर्षाखालील अशा अनोंदणीकृत मुलांची संख्या तब्बल 71 दशलक्ष असून जागतिक पातळीवर हीच संख्या दोनशे तीस दशलक्ष अशी आहे. यानुसार भारतात जन्म नोंदणीचे प्रमाण 41 टक्के आहे जी की जगात सर्वात कमी आहे. भारतातील हिंदू व मुस्लिम या दोन सर्वाधिक लोकसंख्येच्या समुदायात जन्म नोंदणीचे प्रमाण सर्वांत कमी असून याच्या तुलनेत अल्पसंख्यांक जैन व शीख समुदायात प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे............ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *प्री-प्रायमरी ते 4थी पर्यंतची शाळा सकाळी 9 नंतर भरवा :राज्यशासनाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सरकारचा गुगलबरोबर करार: प्रशासकीय कामात AI चा वापर होईल तर रोजगाराच्या असिमीत संधी येतील; देवेंद्र फडणवीसांचा विश्वास*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *लोकसभा अध्यक्षांनी खा. हेमंत पाटील यांचा राजीनामा फेटाळला, मराठा आरक्षणाला पाठींबा देत दिला होता राजीनामा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अमरावती :- श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयात 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' साजरा; भाषा संवर्धनाच्या दृष्टीने विविध कार्यक्रम संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *आरबीआयकडून पतधोरण जाहीर, सलग सहाव्यांदा रेपो रेट जैसे थे, व्याजदरात कोणताही दिलासा नाही, जीडीपी 6.7 टक्क्यावरुन 7.2 टक्के होण्याचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज्यसभेसाठी भाजपकडून तीन जागांसाठी नावं गुलदस्त्यात, नारायण राणे, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांच्यासह नऊ जणांची यादी दिल्लीला पाठवली*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *U19 World Cup च्या दुसऱ्या सेमी फायनल मध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 1 विकेटने केला पराभव, रविवारी भारतासोबत होणार फायनल*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 टेलिस्कोप म्हणजे काय ? 📙 खगोलदर्शनासाठी टेलिस्कोप वापरतात. अगदी सहज गंमत म्हणून गच्चीवरून तारे बघायचे असोत किंवा खगोलशास्त्राचा सखोल अभ्यास करावयाचा असो, यासाठीचे मुख्य माध्यम टेलिस्कोपच आहे. टेलिस्कोपचे दोन महत्त्वाचे प्रकार वापरले जातात. प्रकाश किरणांच्या भिंगातून वक्रीकरण करून बनवलेले टेलिस्कोप हे आकाराने खूपच लहान असतात व ते वापरणे सुटसुटीत असते. अर्थात यालाही अपवाद आहेतच. तब्बल एक मीटर व्यासाची बहिर्गोल भिंग वापरून अमेरिकेतील वेधशाळेतील टेलिस्कोप बनला आहे. मोठ्या भिंगातून एकत्रित केलेल्या किरणांची प्रतिमा प्रमाणबद्ध रीतीने दुसऱ्या डोळ्याजवळच्या भिंगातून बघितली जाते. डोळ्याजवळची भिंगे बदलून, त्यांची क्षमता वाढवून प्रतिमा लहान व मोठीही करता येते.प्रकाशकिरणांचे परावर्तन करणारे अंतर्गोल आरसे वापरणे हे जास्त सोयीचे पडते. आरशात प्रकाशाचे विश्लेषण होत नाही. प्रतिमा स्पष्ट राहते; कारण भिंगाची जाडी, वजन व त्यांना द्यावयाचा आधार यापेक्षा आरशाला आधार देऊन त्यातून परावर्तीत प्रतिमा दुसऱ्या आरशातून पुन्हा बघणे हे सोयीचे वाटते. यासाठी प्रचंड अंतर्गोल आरसे वापरले जातात व त्यातून परावर्तीत प्रतिमा साध्या अारशाद्वारे पुन्हा डोळ्याजवळील भिंगाकडे परावर्तित केली जाते. येथेही गरजेप्रमाणे डोळ्याजवळचे भिंग कमी जास्त ताकदीचे वापरता येते. रशियामध्ये सहा मीटर व्यासाचा आरसा वापरून जगातील सर्वात मोठा टेलिस्कोप बसवलेला आहे.मोठाले टेलिस्कोप हे यांत्रिक पद्धतीने हलविण्याची व्यवस्था केली जाते. नेमकी दिशा रोखण्यासाठी पूर्ण यांत्रिक व्यवस्था येथे आवश्यक असते. निरीक्षणासाठी बसणाऱ्या शास्त्रज्ञाला सोयीची बैठक व त्याच्या नजरेला समोरच दिसू शकेल, अशी दृश्य भिंगांची रचना यासाठी गरजेची ठरते. आकाशाकडे बघून निरीक्षण करणे येथे शक्यही नसते व अपेक्षितही नसते.काचेच्या भिंगांचा चष्मा करायचा वापर सुरू झाला, त्यानंतर टेलिस्कोपचा जन्म झाला असावा. नेमका कधी, कसा ते ज्ञात नाही, पण या बाबतीत *हॅन्स लिप्परशे* याचे नाव जनक म्हणून घेतले जाते. *गॅलिलिओ गॅलिली* यांनी व्हेनिसमध्ये १६०९ सालच्या सुमाराला टेलिस्कोप वापरला. यानंतरचा मुख्य शोध होता १६७२ मध्ये सर आयझॅक न्यूटनने परावर्तीत अंतर्गोल आरसा वापरून बनवलेल्या टेलिस्कोपचा.पृथ्वीवरून टेलिस्कोपद्वारे खगोलसंशोधन करताना वातावरणाच्या अडचणी येतात. मग यासाठी अंतराळात जाऊन निरीक्षण करणे जास्त सोयीचे, असे विचार मांडले गेल्याने त्या दिशेने संशोधन पुढे सरकत गेले. याच देशाची एक अवाढव्य निर्मिती म्हणजे हबल टेलिस्कोपची. २.४ मीटर व्यासाचा आरसा असलेला हा टेलिस्कोप १९९० साली अवकाशात पाठवला गेला आहे. पृथ्वीवरील निरीक्षणात दिसणारी अगदी स्पष्ट तारका यातून तब्बल पंचवीस पटींनी स्वच्छ बघता येते. हबमधील दुरुस्त्या करीत, तांत्रिक अडचणींवर मात करीत त्याने पाठवलेल्या असंख्य निरीक्षणांचे विश्लेषण सतत चालू असते. हे काम शास्त्रज्ञांना काही वर्षे पूरुन उरणार आहे.टेलिस्कोपचेच तत्त्व वापरून रेडिओलहरी गोळा करून त्याद्वारे खगोल संशोधन करण्याचाही प्रकार वापरला जातो. रेडिओलहरी, प्रकाशलहरी, क्ष-किरण, इन्फ्रारेड या साऱ्यांची 'जातकुळी' एकच असल्याने हे तत्त्वही सध्या वापरले जाते. पुणे जिल्ह्यातील नारायणगाव जवळच्या खोडद येथे या स्वरूपाचा एक मोठा जीएमआरटी प्रकल्प कार्यरत आहे.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" वयाने मान मिळतो पण आदर हा वर्तणुकीमुळे मिळतो. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतात सर्वप्रथम कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ?२) अंतराळात सर्वाधिक दिवस राहण्याचा जागतिक विक्रम कोणी केला ?३) भारतीय नौदलाने कोणते वर्ष 'नौदल नागरिकांचे वर्ष' म्हणून घोषित केले आहे ?४) दरवर्षी भारतातील जागतिक पुस्तक मेळावा कोठे भरवला जातो ?५) राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाकडे देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला ? *उत्तरे :-* १) तमिळ ( २००४ ) २) ओलेग कोनोनेंको, रशियन अंतराळवीर ३) वर्ष २०२४ ४) नवी दिल्ली ५) अजित पवार गट *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 राजेश मनुरे, संपादक, धर्माबाद👤 राष्ट्रपाल सोनकांबळे, येवती👤 शेख राजू पटेल👤 व्यंकट केक👤 वैभव जाधव👤 मारुती फाळके👤 रमेश कदम👤 दिनेश रेडे👤 श्रीनिवास सैबी, पुणे👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मही निर्मिली देव तो ओळखावा। जया पाहतां मोक्ष तत्काळ जीवा॥ तया निर्गुणालागी गूणी पहावे। परी संग सोडुनि सुखे रहावे॥१८९॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तोंडावर सर्वजण गोड बोलून आपली स्तुती करणारे असले तरी त्यातील सर्वजण पोटात गोड असतील असेही नाही. म्हणून अति गोड बोलणाऱ्याच्या नादी लागू नये. भलेही कटू सत्य बोलून मोकळे होणारे एकवेळचे दूर निघून जातात पण, केसाने गळा कापणारे आपल्या जवळ असून सुद्धा दृष्टीत पडत नाही म्हणून जरा सावध रहावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शेरास सव्वाशेर*एका शेतकर्याने पक्षी धरण्यासाठी एक जाळे मांडून ठेवले होते. त्यात एका पारव्यामागे लागलेली एक घार सापडली. जाळ्यातून सुटून जाण्यासाठी ती पंख फडफडावून धडपड करीत आहे, तोच शेतकरी त्या ठिकाणी आला व तिला धरून ठार मारू लागला. तेव्हा ती त्याची विनवणी करून म्हणाली, 'दादा, मला मारू नको, मी तुझा काही अपराध केलेला नाही. मी त्या पारव्याच्या मागे लागले होते. हे ऐकून शेतकरी तिला विचारू लागला, 'अग, मग त्या पारव्याने तरी तुझा कोणता अपराध केला होता?' असे म्हणून त्याने तिला ठार मारले.*तात्पर्य :-* जे लोक निरपराधी लोकांना विनाकारण त्रास देतात, त्यांना त्रास देणारा त्यांच्यापेक्षा बलिष्ठ असा भेटला म्हणजे ते अगदी दीन होऊन साधूत्वाचा आव आणतात, पण त्याचा काही उपयोग न होता, त्यांच्या वाईट कर्माची फळे त्यांना भोगावीच लागतात.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 08 फेब्रुवारी 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ३९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०००:छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारीस करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय.**१९७१:NASDAQ हा अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक सुरू झाला.**१९६०:पंजाबच्या खडकसिंह या मल्लाविरुद्ध गुणांवर विजय मिळवून गणपत आंदळकर ’हिंदकेसरी’ बनले.**१९४२:दुसरे महायुद्ध – जपानने सिंगापूर ताब्यात घेतले.**१९३६:१६ सप्टेंबर १९३५ रोजी नोंदणी झालेल्या ’बँक ऑफ महाराष्ट्र’चे कामकाज सुरू झाले.**१९३१:महादेव विठ्ठल काळे यांनी 'आत्मोद्धार' नावाचे पाक्षिक सुरू केले.**१८९९:रँडचा खून करण्यार्या चाफेकर बंधूंची नावे इंग्रज सरकारला सांगणार्या गणेश शंकर द्रविड व रामचंद्र शंकर द्रविड या बंधूंचा वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी गोळ्या झाडल्या**१७१४:छत्रपती शाहू महाराज (सातारा गादी) आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांच्यात वळवंड (लोणावळा) येथे तह झाला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९९:अॅड.संदीप सुधीर लोखंडे-- लेखक**१९९८:ऋषिकेश मठपती-- कवी* *१९८८:रुचा हसबनीस-जगदाळे-- भारतीय अभिनेत्री* *१९८८:प्रा.गणेश विठ्ठलराव मोताळे-- लेखक* *१९८८:सविता देविदास बांबर्डे-- लेखिका**१९६८:डॉ.ज्योती प्रदीप तुंडूलवार --लेखिका* *१९६३:मोहम्मद अजहरुद्दीन – भारतीय क्रिकेटपटू**१९५४:रेणू वामन देशपांडे -- कवयित्री, लेखिका* *१९४९:ज्योती सुभाष म्हापसेकर-- मराठी साहित्यिक,स्त्री मुक्ती संघटना या संस्थेच्या अध्यक्षा**१९४१:जगजीतसिंग – गझलगायक (मृत्यू:१० आक्टोबर २०११)**१९३९:सुधीर मोघे-- मराठी कवी,गीतकार व संगीतकार(मृत्यू:१५ मार्च२०१४)**१९३७:प्रा.यशवंत नारायण जोशी-- लेखक**१९३१:यशवंत गोविंद जोशी-- लेखक**१९२५:शोभा गुर्टू – शास्त्रीय गायिका (मृत्यू:२७ सप्टेंबर २००४)**१९२१:कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे-- मराठी कीर्तनकार आणि लेखिका(मृत्यू:११ सप्टेंबर २०१०)**१९११:प्रा.दया पटवर्धन -- लेखिका* *१९०९:प्रा.केशव विष्णू तथा ’बाबा’ बेलसरे – तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक,श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य (मृत्यू:३ जानेवारी १९९८)**१८९७:डॉ.झाकिर हुसेन – भारताचे ३ रे राष्ट्रपती,शिक्षणतज्ञ.पद्मविभूषण व भारतरत्न हे सन्मान त्य आले होते. (मृत्यू:३ मे १९६९)**१८४४:गोविंद शंकरशास्त्री बापट – भाषांतरकार(मृत्यू:६ मार्च १९०५)**१८३४:दिमित्री मेंदेलिएव्ह – रशियन रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू:२ फेब्रुवारी १९०७)**१८२८:ज्यूल्स वर्न – फ्रेन्च लेखक (मृत्यू:२४ मार्च १९०५)**१७००:डॅनियल बर्नोली – डच गणितज्ञ (मृत्यू:१७ मार्च १७८२)**१६७७:जॅक्स कॅसिनी – फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ (मृत्यू:१६ एप्रिल १७५६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९९:डॉ.इंदुताई पटवर्धन – आनंदग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका (जन्म:१४ मे १९२६)**१९९५:भास्करराव सोमण – भारताचे माजी नौदलप्रमुख, व्हाईस अॅडमिरल. १९६५ च्या भारत - पाक युद्धकाळात ते नौदलप्रमुख होते. (जन्म: मार्च १९१३)**१९९४:गोपाळराव देऊसकर – ख्यातनाम चित्रकार (जन्म:१९११)**१९९४:यशवंत नरसिंह केळकर – कवी, कोशाकार,इतिहास संशोधक,इतिहास लेखक, शाहिरी वाङ्मयाचे संग्राहक,संपादक व प्रकाशक (जन्म:१९ जुलै १९०२)**१९८९:रामचंद्र शंकर वाळिंबे--टीकाकार, समीक्षक (जन्म:९ नोव्हेंबर १९११)**१९७५:सर रॉबर्ट रॉबिनसन – वनस्पतिज रंग व अल्कलॉईड्सवर संशोधन करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते (जन्म:१३ सप्टेंबर १८८६)**१९७१:डॉ.कन्हैय्यालाल मुन्शी – मुंबईचे पहिले गृहमंत्री,हैदराबाद संस्थानात भारत सरकारचे एंजट जनरल,नामवंत साहित्यिक (जन्म:३० डिसेंबर १८८७)**१९२७:बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक (जन्म:७ सप्टेंबर १८४९)**१७२५:पीटर द ग्रेट (पहिला) – रशियाचा झार (जन्म:९ जून १६७२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *जगाला प्रेम अर्पावे .....!*प्रेम या अडीच अक्षरी शब्दात जादुई शक्ती आहे. प्रेमाशिवाय जीवन जगणे अशक्यच नाही तर असंभव आहे. प्रत्येक व्यक्ती जीवनात कुणावर नाहीतर कुणावर जीवापाड प्रेम करतो. जन्म देणाऱ्या आई-वडिलावर सर्वांचेच प्रेम असते कारण ते जन्मदाते असतात. भाऊ-बहिणींचा एकमेकींवर अतूट प्रेम असते, हे आपण सर्वचजण जाणतो. संसारातल्या विविध नातेसंबंधात आपणाला पदोपदी प्रेम दिसून येते. त्याशिवाय संबंध टिकूच शकत नाही. क्रोधी, रागीट किंवा तापट स्वभावाचा व्यक्तीला सुद्धा प्रेमाने जिंकता येते शत्रुचे मन प्रेमाने वितळवितात येते. प्रेमात एवढी प्रचंड शक्ती आहे की............... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *उत्तराखंड विधानसभेत समान नागरी कायदा विधेयक मंजूर, UCC लागू करणारे ठरले पहिले राज्य !*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यातील निवासी डॉक्टरांकडून संप माघार, राज्यातील आरोग्य क्षेत्रावरील संकट टळले*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शरद पवार गटाचं नाव ठरलं, "राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार" नवं नाव !*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मनसेचे तीन नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक, लोकसभेच्या निवडणुकीआधी मनसे महायुतीत सामील होणार असल्याची चर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *संभाजीराजे छत्रपती कोल्हापुरातूनच लोकसभा निवडणूक लढवणार, 11 फेब्रुवारीला घोषणा करण्याची शक्यता, सूत्रांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *रत्नागिरीहून मुंबईला येणारी खाजगी बस महाडजवळच्या सावित्री पुलाजवळ पेटली, विद्यार्थ्याच्या प्रसंगावधानामुळे 19 प्रवाशांसह 22 जण बचावले*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आयसीसी पुरुष कसोटी गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखादी फालतू वाटणारी गोष्टसुद्धा जगाला पुढे घेऊन जाऊ शकते. --------------------------------------- पियाँटिक ह्या जनरल मोटर्सच्या शाखेला एके दिवशी एक तक्रार आली. 'माझ्या गाडीला व्हॅनिला आईसक्रीम आवडत नाही' जनरल मोटर्सने साहजिकच ह्यातक्रारीकडे दुर्लक्ष केले. काही दिवसांनी पुन्हा त्या व्यक्तीने हीच तक्रार केली. ह्यवेळीजनरल मोटर्सने त्याची चौकशी करायची ठरवले. त्यांनी त्या व्यक्तिला त्याची तक्रार व्यवस्थित सांगण्यास सांगितले. व्यक्तीने उत्तरदिले की तो, त्याची पत्नी आणि मुले रोज जेवण केल्यावर आईसक्रीम खायला जातात. रोज वेगवेगळे फ्लेवर घेतात. पण ज्या दिवशी ते व्हॅनिला फ्लेवर घेतात त्या दिवशी त्यांची गाडी सुरु होत नाही. जनरल मोटर्सने असे होउच शकत नाही असा दावा केला आणि दुर्लक्ष केले. इतर लोकांनी आणि कंपन्यांनीसुद्धा त्या व्यक्तीची चेष्टा केली. काही दिवसांनी त्या व्यक्तीने परत हीच तक्रार केली. आता मात्र जनरल मोटर्सपुढे त्याची चौकशी करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यांनी आपला एक इंजीनिअर त्या व्यक्तिकडे पाठवला. इंजीनिअरने गाडी चेक केली. सगळे व्यवस्थित असल्यामुळे नाईलाजाने त्याला त्या व्यक्ती सोबत रहावे लागले. रात्री आईसक्रीम खायला जाताना इंजीनिअरपण सोबत गेला. आईसक्रीम खाऊन सगळे घरी आले. दुसऱ्या दिवशी परत आईसक्रीम खायला गेले. व्यक्तीने व्हॅनिला आईसक्रीम आणले आणि काय आश्चर्य त्या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे गाडी सुरुच झाली नाही. इंजीनिअरने परत गाडी चेक केली, पण सगळे नीट होते. शेवटी त्याने कंपनीला कळवले की व्यक्तीने सांगितलेली तक्रार खरी आहे. कंपनीने इंजीनियरला तिथेच राहून नीट लक्ष देण्यास सांगितले. त्याप्रमाणे इंजीनिअरने प्रत्येक गोष्टीची पाहणी करायला सुरवात केली. रोज त्या व्यक्तीबरोबर आईसक्रीम खायला गेल्यावरकाही दिवसानंतर इंजीनिअरच्या लक्षात आले की ती व्यक्ती जेव्हा बाकीचे फ्लेवर घेते तेव्हा त्याला गर्दीमुळे वेळ लागतो. पण व्हॅनिला फ्लेवरला जास्त मागणी असल्यामुळे त्याच्यासाठी वेगळे काउंटर होते आणि सर्विस पण तत्पर होती त्यामुळे तो ते घेऊन लवकर येतो आणि नेमकी हीच गोष्ट इंजीनिअरला पाहिजे होती. त्याने त्या गोष्टीवर खूप अभ्यास केला. तेव्हा लक्षात आले की ती व्यक्ति जेव्हा बाकीचे फ्लेवर घेते तेव्हा त्याला यायला वेळ लागतो. तोपर्यंत गाडीचे इंजिन थोडे गार होते आणि गाडी पुन्हा लगेच चालू होते. पण ती व्यक्ति जेव्हा व्हॅनिला फ्लेवर घेते तेव्हा तो लगेच परत येतो. त्यामुळे गाडीच्या इंजिनला गार होण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे इंजिन मधील पेट्रोलचे इव्हॅपरेशन होतेआणि ते ब्लॉक होते व परत चालू होत नाही. आणि मग गाडीच्या इंजिनला गार करण्यासाठी लागणारे संशोधन सुरु झाले. जगातील अग्रमानांकित कंपनी मर्सिडीजने कार्ल बेंझ व विलिअम मेयबैकच्या मदतीने १९०१ साली आपल्या मर्सिडीज ३५' साठी पहिला रेडिएटर बसवला जो आजही इंजिनचा अविभाज्य भाग आहे. एखादी फालतू वाटणारी गोष्टसुद्धा जगालाकिती पुढे घेऊन जाते हेच यातून सिद्ध होते.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" काहीच हाती लागत नाही तेंव्हा मिळतो तो अनुभव. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पॅरिस ऑलिम्पिक २०२४ साठी *मशालवाहक* म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?२) भारतातील किती भाषांना अभिजात भाषांचा दर्जा आहे ?३) 'AI' हा शब्द १९५५ मध्ये प्रथम कोणी वापरला ?४) मानवाने सर्वप्रथम कोणत्या धातूचा उपयोग केला ?५) गोंदिया जिल्हा परिषदेचे नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ? *उत्तरे :-* १) अभिनव बिंद्रा २) सहा - तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलगू, मल्याळम आणि ओरिया ३) जॉन मॅक्कार्थी, संगणक शास्त्रज्ञ ४) तांबे ५) एम. मुरूगानंथम*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुनील ठमके, नांदेड👤 शर्मिष्ठा शिवाजीराव देव्हामुख, वसमत👤 राजेश मनुरे, पत्रकार धर्माबाद👤 राष्ट्रपाल सोनकांबळे, येवती👤 रविंद्र भापकर, सहशिक्षक अहमदनगर👤 राजेश्वर ऐनवाड, सहशिक्षक, धर्माबाद👤 दिलीप खोब्रागडे👤 मारोती पिकलेकर👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देहेभान हे ज्ञानशस्त्रे खुडावे। विदेहीपणे भक्तिमार्गेचि जावे॥ विरक्तीबळे निंद्य सर्वै त्यजावे। परी संग सोडुनि सुखी रहावे॥१८८॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा.....🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपुलकीच्या नात्यातील संवाद एकाकी कधीच बंद होत नाही. पण, कधीकाळी एकाच्या मुखातून निघालेला भयंकर शब्द जेव्हा आतमध्ये प्रवेश करतो तेव्हा तो शब्द सर्वच संपवून टाकते. आणि मग तो चालू असलेला संवाद व ती आपुलकी आपोआप दिसणे बंद होऊन जाते.म्हणून कोणालाही बोलते वेळी दहा वेळा विचार करून योग्य शब्दांचा वापर करूनच बोलावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *स्वतःचे अस्तित्व जाणणे*एका बागेतील एका काजव्याने रात्रीच्या वेळी बागेतल्या वाड्यात दिवे पेटले असता त्याचा लखलखीत प्रकाश पाहून, स्वतःचा प्रकाश मिणमिणता आहे अशी कुरकुर चालविली. परंतु त्याच्या बरोबर असलेला काजवा शहाणा होता. तो म्हणाला, 'अरे, थोडा वेळ थांब, आणि काय मजा होते ते पहा.' काही वेळाने त्या वाड्यातील सर्व दिवे विझले व वाडा व काळोखाने भरून गेला. हे पाहून तो शहाणा काजवा आपल्या मत्सरी सोबत्याला म्हणाला, ' मित्रा, हे दिवे थोडा वेळ प्रकाश पाडतात, नि विझून जातात, पण आपली स्थिती तशी नाही. आपला प्रकाश थोडा असला तरी तो कधी नाहीसा होत नाही.'तात्पर्य :- एकदम श्रीमंती येऊन ती पुन्हा लवकर नाहीशी होण्यापेक्षा कायम टिकणारी मध्यम स्थिती फार चांगली. दुसऱ्याच्या दिखाऊ तात्पुरत्या असलेल्या बाबींवर दुर्लक्ष करून आपल्याकडे असलेल्या कायम बाबींवर लक्ष केंद्रित केलेले कधीही उत्तमच.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 07 फेब्रुवारी 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2015/11/blog-post_29.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ३८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००३:क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.**१९९९:युवराज अब्दुल्ला जॉर्डनच्या राजेपदी**१९७४:ग्रेनाडा हा देश (युनायटेड किंग्डमपासुन) स्वतंत्र झाला.**१९७१:स्वित्झर्लंडमधे महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.* *१९६५:मराठी नाटकात प्रथमच फिरत्या रंगमंचाचा वापर सुरू झाला.**१९४८:कसोटी क्रिकेटमधे शतक झळकवणारा नील हार्वे हा सर्वात लहान ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला.**१९२०:बाबूराव पेंटर यांच्या ’महाराष्ट्र फिल्म कंपनी’ने तयार केलेला ’सैरंध्री’ हा चित्रपट पुण्याच्या आर्यन सिनेमात प्रथम प्रकाशित झाला.**१९१५:गंगाधर नरहर ऊर्फ बापुसाहेब पाठक यांनी पुण्यातील 'आर्यन' हे पहिले चित्रपटगृह सुरु केले. तेथे प्रदर्शित झालेला पहिला मूकपट होता हिर्याची अंगठी**१८५६:ब्रिटिशांनी अवध साम्राज्य ताब्यात घेतले.सम्राट वाजिद अली शहा याला तुरुंगात टाकण्यात आले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९६५:बी.एल.खान-- कवी* *१९६४:नितीन आखवे-- मराठी गीतकार(मृत्यू:८ एप्रिल २०१२)**१९६३:डॉ.दिलीप नारायण पांढरपट्टे -- सुप्रसिद्ध गझलकार,सनदी अधिकारी* *१९५८:सुकुमार जयकुमार कोठारी -- मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये काव्य करणारे कवी* *१९५५:माधव रा.पवार -- प्रसिद्ध गीतकार, कवी* *१९५१:रवींद्र साठे-- मराठी चित्रपटांमध्ये व दूरचित्रवाणी मालिकांमध्ये पार्श्वगायन करीत असलेले पार्श्वगायक**१९४१:निळकंठ तुळशीराम रणदिवे -- लेखक, कवी**१९३८:एस.रामचंद्रन पिल्ले – कम्युनिस्ट नेते**१९३५:उषा वामन भट -- लेखिका* *१९३५:अशोक पुरुषोत्तम शहाणे-- लेखक, भाषातज्ज्ञ,संपादक,व प्रकाशक**१९३४:सुजित कुमार – चित्रपट अभिनेता व निर्माता (मृत्यू:५ फेब्रुवारी २०१०)**१९३२:माधव भीमराव थोरात -- लेखक* *१९२८:अनंत महादेव मेहंदळे-- महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नारदीय कीर्तनकार(मृत्यू:२४ एप्रिल १९९२)**१९२५:उषा वामन भट-- लेखिका* *१९२३:प्रा.डॉ.बापूसाहेब देवेंद्र खोत-- लेखक* *१८९८:रमाबाई भीमराव आंबेडकर ( मृत्यू २७ मे १९३५)**१८१२:चार्ल्स डिकन्स – इंग्लिश कादंबरीकार व लेखक (मृत्यू:९ जून १८७०)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१४: डॉ.शरद कोलारकर-- विदर्भातील एक ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ,लेखक,विदर्भ संशोधन मंडळाचे माजी कार्याध्यक्ष (जन्म:१७ आक्टोबर १९३७)**१९९९:हुसेन – नवविचारांचा पुरस्कार करुन पश्चिम आशियातील शांततेसाठी अथक प्रयत्न करणारे जॉर्डनचे राजे (जन्म:१४ नोव्हेंबर १९३५)**१९९०:वामनराव हरी देशपांडे-- महाराष्ट्रातील ख्यातनाम संगीतज्ञ,संगीतसमीक्षक व लेखक (जन्म:२७ जुलै १९०७)**१९४७:वासुदेव दामोदर मुंडले-- चरीत्रकार(जन्म:१८८०)**१९३८:हार्वे फायरस्टोन – अमेरिकन उद्योजक (जन्म:२० डिसेंबर १८६८)**१२७४:श्री चक्रधर स्वामी – महानुभाव पंथाचे संस्थापक (जन्म:४ सप्टेंबर १२२१)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *हसा आणि हसवा*जीवनात हसण्याचे महत्व सांगणारा लेख ....!..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *केंद्र सरकारची मोठी घोषणा, 29 रुपये किलोने मिळणार तांदूळ*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अंगणवाडी सेविकांना पेन्शन आणि पावणे दोन लाखांपर्यंत ग्रॅच्युईटी मिळणार, राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मराठा आरक्षणासाठी 15 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावण्याची शक्यता, राज्यातील 95 टक्के कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मंत्रिमंडळ बैठकीतील आणखी एक धडाकेबाज निर्णय, हायब्रिड ॲन्युईटी योजनेतून राज्यात 6 हजार किमी रस्त्यांची कामे होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्य परिवहन महामंडळाच्या ५ हजार डिझेल बसेसचे एलएनजीवर चालणाऱ्या वाहनामध्ये रूपांतर करण्यासाठी किंग गॅस कंपनीसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *शरद पवार यांना मोठा धक्का, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे; निवडणूक आयोगाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *U19 World Cup च्या सेमी फायनलमध्ये भारताचा 2 विकेटने विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *वसाहती अंतराळातील* 📙 ***********************विज्ञानकथाकारांना आकर्षक वाटणारी अंतराळ वसाहतींची कल्पना आता मुर्त ठरू पाहत आहे. १९५७ साली स्पुटनिकने अंतराळ तंत्रज्ञानाची सुरुवात झाली. १९६९ मध्ये मानव चंद्रावर गेला. तर १९८०-९० सालच्या दशकात अंतराळवीरांनी पृथ्वीभोवती चक्कर मारणार्या स्पेस शटलसदृश यानात जास्त वेळ राहण्याचे विक्रम सुरू केले. अंतराळ वसाहत म्हणजे अशाच पद्धतीने पृथ्वीभोवताली फिरणारी वसाहतच, जी अंतराळात मानवी जीवनासाठी लागणार्या सर्व सुविधा पुरवू शकेल. अंतराळातील वसाहतीत पृथ्वीपेक्षा सर्वात मोठा जाणवणारा फरक म्हणजे तेथील अतिसूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा. पृथ्वीच्या आकर्षणामुळे प्रत्येक वस्तूला वजन असते. आपल्या शरीराला, मेंदूला, मनाला ह्या वजनाची सवय झालेली असते. अमुक वजन पेलता यावे म्हणून स्नायूंचे गठन झाले असते. अंतराळात गुरुत्वाकर्षण जवळजवळ नसल्याने आपण वसाहतीत तरंगू, तसेच वर खालीचा फरक नाही ! पेल्यातला द्रव पेला उघडा केला तर खाली पडत नाही. तो झटकून काढला की, गोळ्याच्या स्वरूपात तरंगतो. अर्थात हे विचित्र अनुभव आपल्याला खातापिताना आणि देहधर्मांसाठी येणार ! अाणि अशा स्थितीत सतत राहिल्याने मानसिक परिणाम काय होतील, ते सतत अभ्यासले जात आहेत. अंतराळात वसाहत उभी करणे वाटते तितके अवघडही नाही; कारण 'वजन' हा गुण नसल्याने सिमेंट काँक्रीटचे भव्य प्रासाद बांधायची सूर नाही, हलके साहित्य चालेल. अशा घरबांधणीचे अर्थातच नवे शास्त्र असेल. शिवाय गुरुत्वाकर्षणाचा अभाव असल्याने द्रव ठेवायला पेला नको, तसेच दोन द्रवांचे मिश्रण अधांतरी करता येईल. अशा स्थितीचा फायदा घेऊन काही अतिशुद्ध औषधे बनवता येतील, ज्यांना भांड्याचा संसर्ग नाही. धातूंची मिश्रणे (नव्या प्रकारची) करणेसुद्धा अंतराळात शक्य होईल. गुरुत्वाकर्षणविरहित अवस्थेतील वैज्ञानिक प्रयोग इथे करता येतील. एकूण अंतर वसाहत हे आता स्वप्न राहिले नसून विज्ञान तंत्रज्ञानाच्या विकासातील एक संभाव्य टप्पा आहे. केवळ पृथ्वीवर जागा नाही म्हणून अंतराळात राहावे, असे कोणी म्हणणार नाही. उलट तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन लोकसंख्या काबूत आणणे अधिक व्यवहार्य आहे. परंतु जे औद्योगिक आणि वैज्ञानिक प्रकल्प गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवर राबवणे शक्य नाही, ते अशा वसाहतीत करता येतील, हे त्यांचे वैशिष्ट्यच. शिवाय अंतराळात जवळजवळ पोकळी असल्याने वसाहतीबाहेरच्या पोकळीतदेखील वेगळे प्रयोग करता येतील. त्यांच्यासाठी पृथ्वीवर कृत्रिम पोकळी निर्माण करणे खर्चाचे असेल.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" धैर्य हे प्रेमासारखे आहे. नुसत्या आशेच्या बळावर ते वाटेल तितके वाढते. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पर्वतीय मृदेस कोणती मृदा म्हणतात ?२) १६ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे ?३) कसोटी क्रिकेटमधील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे ?४) संजीवनी बुटी आणण्यासाठी हनुमान यांनी कोणता पर्वत उचलून आणला होता ?५) गोंदिया जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी कोण आहेत ?*उत्तरे :-* १) अपरिपक्व मृदा २) डॉ. अरविंद पनगडीया ३) मिचेल स्टार्क, ऑस्ट्रेलिया ( १६०.४ किमी प्रतीतास, २०१५ साली ) ४) द्रोणगिरी पर्वत ५) प्रजीत नायर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 पवन गट्टूवार, सहशिक्षक, कुंडलवाडी👤 संतोष कोयलकोंडे, सहशिक्षक, देगलूर👤 पोतन्ना चिंचलोड, येवती👤 विनायक गोविंदराव पारवे👤 खंडू येरकलवाड, बेळकोणी👤 साईनाथ येनगंटीवार👤 कवी बी. एल. खान👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भुते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे। परी सर्वही स्वस्वरुपी न साहे॥ मना भासले सर्व काही पहावे। परी संग सोडुनि सुखी रहावे॥१८७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *आजची विचारधारा......*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या कडून एखाद्याला अडीअडचणीच्या वेळी मदत होत असेल आणि त्याची वाईट परिस्थिती आपल्यामुळे चांगली होत असेल किंवा त्याच्या चेहऱ्यावर हसू येत असेल तर उत्तमच आहे ते,माणुसकीचे लक्षणे आहेत सोबतच तो माणुसकी धर्म आहे. पण,त्या केलेल्या मदतीचा दुरूपयोग जर त्या व्यक्तीकडून होताना आपल्याला बघायला मिळाले असेल तर मात्र, समोर मदत करताना त्या व्यक्तीला खोलवर जाऊन वाचणे आवश्यक आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *अंतःकरणातील दुःख*एका रानातल्या खडकावर दोन घोरपडी उन्ह खात बसल्या असता त्यापैकी एकजण दुसरीस म्हणाली, 'आमची स्थिती मोठी शोचनीय आहे ! आम्ही फक्त जिवंत आहोत एवढंच, बाकी सगळ्या जगात आमच्याकडे कोणी ढुंकूनही बघत नाही. आमच्या क्षुद्रतेचा धिक्कार असो ! यापेक्षा रानातल्या वार्यासारख्या उड्या मारणार्या हरणाचा जन्म मिळाला असता तर काय मजा आली असती !' हे बोलत असताच एक हरिणामागे लागलेल्या शिकारी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकू आला व धावून थकलेल्या हरणाचा जीव कुत्र्याने घेतलेला तिने प्रत्यक्ष पाहिला. त्यावेळी दुसरी घोरपड आपल्या स्थितीविषयी कुरकुरणार्या पहिल्या घोरपडीला म्हणाली, 'ज्या हरणाचं जीवन आपल्याला मिळावं अशी इच्छा तू करीत होतीस त्या हरणाची स्थिती किती भयंकर आहे, हे आता प्रत्यक्षच पाहा अन् ज्या मोठेपणाबरोबर अनेक दुःखही भोगावी लागतात तो मोठेपणा देवाने आपणास दिला नाही याबद्दल त्याचे आभार मान !'*तात्पर्य :- बाह्य रूपावर जाऊन फसू नये, कारण त्याच्या अंतर्यामी दुःख असण्याचीच शक्यता असते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 03 फेब्रुवारी 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://kathamaala.blogspot.com/2017/04/blog-post_53.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ३४वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९६६:सोव्हिएत रशियाने लूना-९ हे मानवविरहित अंतराळयान चंद्रावर उतरवले.**१९२८:'सायमन गो बॅक' या घोषणांनी सायमन कमिशनचा मुंबईत निषेध करण्यात आला.**१९२५:भारतात पहिल्यांदाच विजेवर चालणारी रेल्वे व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला या स्थानकांदरम्यान सुरू झाली.**१८७०:अमेरिकेच्या संविधानातील १५ वा बदल अमलात आला त्यामुळे मतदानातील वंशभेद संपुष्टात आले.**१७८३:स्पेनने अमेरिकेच्या स्वातंत्र्यास मान्यता दिली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९५:गणेश बाळासाहेब निकम -- लेखक* *१९७८:धिरज पाटील (धनराज) -- कवी**१९७५:हंसिनी अरविंद उचित -- कवयित्री, सामाजिक कार्यकर्त्या,विविध पुरस्कारांनी सन्मानित**१९७३:प्रा.डॉ.गिरीश खारकर-- सुप्रसिद्ध मराठी गजलकार,प्रतिभावंत लेखक, प्रकाशक,(मृत्यू:१७ आक्टोबर २०१९)**१९६९:महेश रघुनाथ पानसे-- कवी**१९६७:गजानन निमकर्डे-- कवी* *१९६३गंगाधर त्र्यंबक अहिरे -- कवी,लेखक, संपादक* *१९६३:अंजली चितळे -- कवयित्री* *१९६३:रघुराम राजन – भारतीय अर्थतज्ञ**१९६२:प्रा.भाऊ काशिनाथ(भाऊसाहेब) गोसावी -- प्रसिद्ध कवी,लेखक* *१९६२:डॉ.जयराम काळे-- कवी,लेखक* *१९५२:नारायण गणपतराव निखाते -- लेखक* *१९५०:प्रा.डॉ.सुदाम जाधव-- आदिवासी साहित्याचे अभ्यासक तथा लेखक* *१९४५:प्रा.डॉ.रामचंद्र कामाजी क्षीरसागर -- लेखक* *१९४२:अरुण कृष्णराव हेबळेकर-- प्रसिद्ध कथाकार,कादंबरीकार**१९३८:वहिदा रहमान-- प्रसिद्ध अभिनेत्री**१९३५:नारायण बाळकृष्ण ठेंगडी-- पत्रकार, कवी आणि कथाकार (मृत्यू:२५ मार्च १९८८)**१९३१:प्रा.चंद्रकांत भालेराव-- प्रसिद्ध कथाकार* *१९२७: अच्युत महादेव बर्वे--कथाकार, कादंबरीकार(मृत्यू:१६ एप्रिल १९८२)**१९२७:वसंत शंकर सरवटे-- ख्यातनाम महाराष्ट्रीय व्यंगचित्रकार तसेच लेखक(मृत्यू:२३ डिसेंबर २०१६)**१९०६:अवधूत महादेव जोशी--कथाकार, चरित्रलेखक,टीकाकार**१९००:तिरुवेंकट राजेंद्र शेषाद्री – रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू:२७ सप्टेंबर १९७५)**१८२१:डॉ.एलिझाबेथ ब्लॅकवेल – वैद्यकशास्त्रातील पहिली महिला पदवीधर (मृत्यू:३१ मे १९१०)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००७:हरी अनंत फडके-- संशोधक, अभ्यासक (जन्म:१३ ऑक्टोबर १९३२)**१९९१:प्रा.कुसुमताई साठे-- लेखिका, कवयित्री,संपादिका (जन्म:१६ डिसेंबर १९२१)**१९७९:मोरेश्वर दिनकर जोशी-- संस्थापक, व्यवस्थापक, संपादक(जन्म:२८ फेब्रुवारी १९००)**१९६९:सी.एन.अण्णादुराई – तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री (जन्म:१५ सप्टेंबर १९०९)**१९२४:वूड्रो विल्सन – अमेरिकेचे २८ वे राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते (जन्म:२८ डिसेंबर १८५६)**१८३२: उमाजी नाईक --पहिले क्रांतिकारक व स्वातंत्र्यसैनिक उमाजी नाईक यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली.(जन्म:७ सप्टेंबर १७९१)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - गुरुदक्षिणा* ..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील सानेगुरुजी नगरी येथे 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्य सरकारचा मोठा निर्णय; मनोज जरांगे यांना आता सरकारी सुरक्षा, 24 तास दोन पोलीस तैनात*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर; 2024-25 साठी 59 हजार 954 कोटी रुपयांची तरतूद*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबईतील कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं 19 फेब्रुवारीला उद्घाटन; पंतप्रधान मोदींच्या हस्ते 10 किलोमीटर मार्गाचं लोकार्पण*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नाशिक: सिन्नरमध्ये अग्नितांडव; मुसळगाव एमआयडीसीतील कारखान्यात भीषण आग, आगीमुळे कारखान्याचे लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पश्चिम उपनगरांसाठी मोठा दिलासा, गोखले पुलाचं 25 एप्रिलला लोकार्पण होणार, पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *शतकवीर यशस्वी जैस्वाल इंग्लंडविरोधात दिवसभर एकटाच लढला; टीम इंडियाचे धुरंदर पुन्हा अपयशी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••⭐ *ताऱ्यांचं अंतर कसं मोजतात ?* ⭐ **************************तारे आपल्यापासून कितीतरी दूर असतात. आपल्याला सर्वात जवळचा असलेला तारा म्हणजे आपला सूर्य. तोच मुळी पंधरा कोटी किलोमीटर दूर आहे. इतर तारे तर त्याच्या कितीतरी पटींनी दूर आहेत. तेव्हा त्यांच्या पर्यंतचं अंतर मोजण्यासाठी तशीच काहीतरी खास युक्ती योजायला हवी. आपण जेव्हा एखाद्या वस्तूकडे पाहातो तेव्हा आपले दोन डोळे जरा वेगवेगळ्या कोनांमधुन त्या वस्तूकडे पाहतात. त्यामुळे तिच्या दोन प्रतिमा आपल्या डोळ्यांमध्ये उमटतात आणि त्यांच्यामध्ये काही अंतर असतं. समजा आपण आपला एक डोळा मिटला आणि समोरच्या दाराच्या चौकटीच्या बरोबर समोर येईल अशा तर्हेनं एक बोट समोर धरलं. आता तो डोळा उघडून दुसरा मिटला आणि परत पाहिलं तर ते बोट हल्ल्याचं दिसून येईल. कारण त्या दोन डोळ्यांतल्या प्रतिमांमध्ये अंतर असतं. यालाच पॅरॅलॅक्स असं वैज्ञानिक भाषेत म्हणतात. जितकं त्या बोटाचं आपल्या डोळ्यांपासूनचं अंतर कमी तितका पॅरलॅक्स जास्त. उलटपक्षी जितकं बोटाचं अंतर जास्त तितका पॅरलॅक्स कमी. म्हणजेच कोणत्याही वस्तूचं आपल्यापासून असलेलं अंतर आणि तिच्या प्रतिमांमधला पॅरॅलॅक्स यांचं एक नातं असतं. जर पॅरॅलॅक्स मोजला तर गणित करून ते अंतर शोधता येतं. जमिनीचा सर्व्हे करणारे तज्ज्ञ याचाच उपयोग करतात. पण आपल्या दोन डोळ्यांमधलं अंतरच इतकं कमी आहे की दूरवरच्या तार्याचा पॅरॅलॅक्स शून्यवतच असतो. दोन डोळ्यांमधलं अंतर तर वाढवता येत नाही. पण दोन वेगवेगळ्या ठिकाणांवरून जर पाहिलं तर त्या दोन प्रतिमांमध्ये काही पॅरॅलॅक्स तयार होतो. तरीही दूरवरच्या ताऱ्यांकडे पाहण्यासाठी पृथ्वीवरची दोन टोकंही जरी गाठली तरी ते अंतर अपुरंच पडतं. यासाठी मग पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या परिभ्रमणाचा वापर करण्यात येतो. सूर्याच्या अलीकडून आणि पलीकडून जर आपण पाहू शकलो तर त्या कक्षेच्या व्यासाइतकं अंतर दोन 'डोळ्यांमध्ये' आपण पाडू शकतो. त्यासाठी मग वर्षातल्या दोन वेगवेगळ्या वेळी एकाच ताऱ्याच्या घेतलेल्या प्रतिमांमधला पॅरॅलॅक्स मोजून त्या ताऱ्याचं आपल्यापासून असलेलं अंतर मोजता येतं. अर्थात अशा दूरवरच्या ताऱ्यांकडे पाहण्यासाठी तसेच तेजस्वी 'डोळे' ही असणे गरजेचं असतं. ही गरज अतिशय शक्तिशाली दुर्बिण वापरून पूर्ण केली जाते.*बाळ फोंडके यांच्या 'कसं ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" जेव्हा कमजोरी शक्ती बनते, तेव्हा यश हमखास मिळते. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २०२३ चा *महाराष्ट्र भूषण* पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आले ?२) महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणता ?३) 'महाराष्ट्र भूषण पुरस्कारा'चे स्वरूप काय आहे ?४) प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जगात सर्वात वेगवान त्रिशतकवीर कोण ?५) "अहिंसा हे दुर्बलांचे नव्हे तर बलवानाचे शस्त्र आहे", असे कोण म्हणाले होते ? *उत्तरे :-* १) अशोक सराफ, अभिनेता २) महाराष्ट्र भूषण ३) २५ लाख व मानपत्र ४) तन्मय अग्रवाल, भारत ( १४७ चेंडू ) ५) महात्मा गांधी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 विजयकुमार वडेपल्ली, नांदेड 👤 हंसिनी उचित, साहित्यिक👤 गंगाधर धडेकर, पत्रकार, धर्माबाद👤 ऍड. मल्हार मोरे, भोकर👤 अर्शनपल्ली अजय👤 सुशील कुलकर्णी👤 राजेश पिकले👤 शिवकुमार देवकत्ते👤 विश्वास मापारी👤 ओमकार पाटील चोळाखेकर👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी। कृपाळु मनस्वी क्षमावंत योगी॥ प्रभु दक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणे। तयाचेनि योगे समाधान बाणे॥१८३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा ......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण करत असलेले कार्य पाहून बाहेरच्या लोकांकडून होणारा विरोध तेवढा भयानक नसतो. कधी शिकायला सुद्धा भाग पाडत असते पण जेव्हा त्याच कार्याला आपल्या जवळचेच माणसं आपुलकीचा ढोंग करून विरोध करतात तेव्हा मात्र त्या विरोधाचे मानसिक तणावात रूपांतर होत असते. म्हणून कोणाला साथ देता येत नसेल तर विरोधही करू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मुंग्याची शिकवण*उन्हाळ्याच्या दिवसात काही मुंग्या आपल्या वारुळाजवळ बसून मिळवून आणलेले दाणे उन्हात वाळवीत होत्या. इतक्यात भुकेने व्याकुळ झालेला एक टोळ त्या ठिकाणी येऊन व दीनवाणे तोंड करून त्यांना म्हणाला, 'बायांनो, यातला एखादा तरी दाणा मला देऊन जर माझा प्राण वाचवाल तर तुम्हाला मोठं पुण्य लागेल.' हे ऐकून त्यातल्या एका मुंगीने त्याला विचारले, 'अरे, सुगीच्या दिवसात आम्ही जसं धान्य जमवून ठेवलं, तसं तू का ठेवलं नाहीस ?' टोळ त्यावर उत्तरला, 'माझा सगळा वेळ खाण्यापिण्यात आणि मौजा मारण्यात गेला. पुढे आपला चरितार्थ कसा चालेल ही कल्पनाही माझ्या मनात त्यावेळी आली नाही.' हे ऐकून मुंगी म्हणते, 'अरे, अशा रीतीने मौजा मारण्यात ज्यांनी आपले दिवस घालविले, ते पुढे उपाशी मरणार हे ठरलेलं आहे. मग आता तुझ्या चरितार्थाची तजवीज आम्ही काय म्हणून करावी बरं ?'तात्पर्य : ज्यांनी आपले तारुण्य केवळ चैनबाजीत घालविले त्यांना बहुतेक वेळा म्हातारपणी दुःख भोगावे लागल्याशिवाय राहात नाही.'आयुष्य ही चैनीची वस्तू नसून कर्तव्याची भूमी आहे.'•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 02 फेब्रुवारी 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://kathamaala.blogspot.com/2017/04/blog-post_48.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक पाणथळ भूमी दिन_**_ या वर्षातील ३३वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *_१९७१:इराणमधील रामसर येथे पाणथळ भूमीचे महत्त्व या विषयावर एक परिषद आयोजित करण्यात आली होती. मानवी जीवनातील पाणथळ भूमीचे महत्त्व समजावे म्हणून दरवर्षी २ फेब्रुवारी हा दिवस जगभर ’जागतिक पाणथळ भूमी दिन’ म्हणून साजरा केला जावा असा त्या परिषदेत निर्णय घेण्यात आला._**१९७१:इदी अमीन हे युगांडाचे सर्वेसर्वा बनले.**१९५७:गोवा मुक्तीसंग्राम – नानासाहेब गोरे, मधू लिमये, जगन्नाथराव जोशी यांची गोव्यातील तुरूंगातुन मुक्तता.**१९४३:दुसरे महायुद्ध – स्टॅलिनग्राडच्या लढाईनंतर जर्मनीचे सैन्य सोवियेत संघाला शरण, जर्मन सैन्याच्या माघारीची सुरूवात**१९३३:अॅडॉल्फ हिटलरने जर्मनीची संसद बरखास्त केली.**१८४८:कॅलिफोर्निया गोल्ड रश – सोने मिळवण्याच्या उद्देशाने चिनी स्थलांतरितांचा पहिला जथा कॅलिफोर्नियात दाखल झाला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१:प्रज्ञा हंसराज बागुल --आंबेडकरी साहित्यामध्ये कथा लेखन करणाऱ्या लेखिका**१९८०:डॉ.बाळू दुगडूमवार -- कवी,लेखक* *१९७६:प्रा.अरुण विठ्ठल कांबळे-बनपुरीकर --- प्रसिद्ध कवी,लेखक* *१९७४:डॉ.श्रीकांत श्रीपती पाटील -- प्रसिद्ध साहित्यिक,सर्व साहित्य प्रकारांमध्ये विपुल लेखन,विविध पुरस्कारांनी सन्मानित* *१९७०:डॉ.देविदास तारु-- कवी,लेखक* *१९६८:प्रा.संतोष काळे-- कवी* *१९६५:छाया पाथरे --लेखिका**१९६२:मिलन मोहनीराज बसमतकर-कामोठे - प्रसिद्ध लेखिका* *१९५७:डॉ.अरुणा रामचंद्र ढेरे-- प्रसिद्ध मराठी भाषेतील लेखिका,कवयित्री**१९५३:डॉ.प्रदीप प्रभाकर गोखले--- कवी, लेखक व तत्त्वज्ञानाचे माजी प्राध्यापक**१९५१:प्रा.विमल गाडेकर-- विदर्भातील ख्यातनाम कवयित्री,लेखिका(मृत्यू:२६ मार्च २०२१)**१९४९:मंगला गोडबोले-- सामाजिक जाणीवेने लिहिणाऱ्या एक मराठी लेखिका**१९४८:राधिका भांडारकर -- कथा लेखिका**१९४२:रविकांत धोंडू मिरासी -- लेखक**१९४०:बाळ राणे --आत्मचरित्र,कादंबरी, ऐतिहासिक ग्रंथ,अध्यात्मिक ग्रंथ,समीक्षात्मक लेखन,कथा लेखन असे विपुल लेखन(मृत्यू:१२मे २०१६)* *१९४०:मनासाराम वंजी पाटील -- लेखक* *१९२६:वेणूबाई यशवंतराव चव्हाण-- महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पत्नी(मृत्यू:१ जून १९८३)**१९२३:ललित नारायण मिश्रा –माजी केंद्रीय रेल्वे मंत्री,पहिल्या,दुसर्या व पाचव्या लोकसभेचे सदस्य, राज्यसभा खासदार (मृत्यू:३ जानेवारी १९७५)**१९०८:वामन रावजी ढवळे-- कवी,संपादक, चरित्रकार(मृत्यू:३० जून १९८४)**१९०५:अॅन रँड – जन्माने रशियन असलेल्या अमेरिकन लेखिका व तत्त्ववेत्त्या (मृत्यू:६ मार्च १९८२)**१८८४:डॉ.श्रीधर व्यंकटेश केतकर – ज्ञानकोशकार.’महाराष्ट्रीय ज्ञानकोश’ हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे कार्य होय.(मृत्यू:१० एप्रिल १९३७)**१८५६:स्वामी श्रद्धानंद – स्वामी दयानंदांचे शिष्य,गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक, शिक्षणमहर्षी आणि आर्य समाजाचे प्रसारक (मृत्यू:२३ डिसेंबर १९२६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* •••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३:कासीनाधुनी विश्वनाथ -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक,पटकथा लेखक(जन्म:१९ फेब्रुवारी १९३०)**२००९:अजित सोमण-- प्रसिद्ध बासरीवादक,संगीतज्ञ,संहितालेखक, जाहिरातलेखक आणि इंग्रजी भाषेचे प्राध्यापक(जन्म:६ ऑगस्ट १९४७)**२००७:विजय अरोरा – हिन्दी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता (जन्म:२७ डिसेंबर १९४४)**१९८७:अनंत वामन वर्टी--संपादक, लेखक (जन्म:२ डिसेंबर १९११)**१९८७:अॅलिएस्टर मॅकलिन – स्कॉटिश साहसकथा लेखक (जन्म:२१ एप्रिल १९२२)**१९७०:बर्ट्रांड रसेल – ब्रिटिश गणितज्ञ, तत्त्वज्ञ आणि इतिहासकार (जन्म:१८ मे १८७२)**१९३०:वासुदेव गोविंद आपटे – लेखक, भाषांतरकार,पत्रकार,संपादक,अनुवादक, निबंधकार व कोशकार.त्यांनी लहान मुलांसाठी ’आनंद’ हे मासिक सुरू केले होते.(जन्म:१२ एप्रिल १८७१)**१९१७:महर्षी अण्णासाहेब पटवर्धन – लोकमान्य टिळकांचे स्नेही आणि विख्यात वैद्य यांनी देहत्याग केला. (जन्म:४ मे १८४७)**१९०७:दिमित्री मेंदेलिएव्ह – रशियन रसायनशास्त्रज (जन्म:८ फेब्रुवारी १८३४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *प्रामाणिक वसंता*प्रामाणिकपणा मुळे वसंताचे क्लेक्टरकडून कौतुक आणि पन्नास हजार रूपयाचे पारितोषिक आजच्या सर्वच पेपर मध्ये ही बातमी झळकली. खरोखरच वसंताने कामच असे केले होते म्हणून स्वतः कलेक्टर साहेबांनी त्याचे कौतुक केले. वसंता एक ऑटो ड्रायव्हर. गरीब मात्र प्रामाणिक. त्याने कधी ही पैश्याची हाव केली नाही. ऑटो चालविताना वाहतुकीचे नियम तोडला नाही की कोठे छोटा अपघात देखील केला नाही. प्रवाश्यासोबत नेहमी प्रेमळ वागत असतो. वयोवृध्द व्यक्तिना कमी पैश्यात त्यांच्या इच्छित स्थळी सोडत असे. एक-दोन रूपयासाठी त्याने प्रवाश्यासोबत कधी घासाघीस केली नाही. प्रवाशी हेच आपले दैवत असे तो समजायचा................ पूर्ण लघुकथा वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही, सात लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 केला सादर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *रेल्वेच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला 15 हजार 554 कोटी रुपयांची तरतूद, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी माध्यमांशी बोलताना दिली माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *महाराष्ट्राच्या धर्तीवर देशातील महिला उद्योजकांसाठी धोरण राबविण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार - विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मराठा आरक्षणासाठी दोन कोटी 12 लाखांहून अधिक घरांचं सर्वेक्षण, आज सर्वेक्षणाचा शेवटचा दिवस*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *क्राफ्ट इन्स्ट्रक्टर परीक्षेचा निकाल जाहीर; साताऱ्याची गौरी पाटील-पवार मुलींमध्ये राज्यात प्रथम*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 6 जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध होणार असल्याचा दावा, या प्रकरणी सत्ताधारी व विरोधकांत एकमत*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना आज विशाखापट्टनम येथे सुरू होणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 अणू म्हणजे काय ? 📙अणू म्हणजे मूलतत्त्वाचा सर्वात लहान कण. अणुबद्दल अनेक पुस्तकातून, अनेक अभ्यासक्रमांतून, अनेक वेळा आपण शिकत आलो आहोतच. मग येथे वेगळे ते काय वाचायचे ?अणूचे अंतरंग केंद्रकाने बनलेले असते, हे माहित आहेच, पण हे केंद्र किती छोटे असावे ? एखाद्या शाळेच्या हॉलमध्ये मध्यभागी एखाद्या साखरेचा दाणा तरंगत ठेवला तर तो म्हणजे केंद्रक व हॉलचा बाह्यभाग व भिंती म्हणजे इलेक्ट्रॉनचा फिरण्याचा परीघ होय. एवढ्यावरच ही तुलना थांबत नाही. बॉलपेनचा शाईचा एक ठिपका कागदावर उमटवा. या ठिपक्यामध्ये किती अणू मावतील, असे बघितले तर आकडा येतो चार अब्जाचा. म्हणजेच या चार अब्जांतील एकाचे केंद्र किती छोटे असेल ? पण या अणूचे सर्व वजन मात्र या केंद्रकातच सामावलेले असते. इलेक्ट्रॉन प्रचंड गतीने फिरत असतात. या केंद्रकातील प्रोटॉनची संख्या आणि केंद्रकाभोवती घिरट्या घालणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या समान असल्याने विजेने भारलेल्या कणांचा बनलेला असूनही एकूण भार शून्य असल्याने अणु विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. निसर्गात दिसणारी विविधता विविध प्रकारच्या अणूंच्या संयोगाने येते. उण्यापुऱ्या पन्नास मूळ अक्षरांतून सारे साहित्य निर्माण होते, तसेच हे अणू किती गतिमान आहेत, यावर पदार्थाची घन, द्रव, वायू वैगरे अवस्था ठरते.हायड्रोजन सर्वात हलका, युरेनियम खूपच जड; पण या दोघांचे अणूचे आकार मात्र सारखेच असतात. खरे म्हणजे जगातील जी काही शंभरच्या आसपास आढळणारी मुलद्रव्ये आहेत, त्या सर्वांच्या अणूचे आकार सारखेच असतात. फरक असतो तो त्यांच्या केंद्रकात असलेल्या न्यूट्रॉनचा व प्रोटॉनच्या संख्येत. प्रोटॉनच्या संख्येएवढी त्यांच्याभोवती फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या असते. पण हे प्रोटॉन व न्यूट्रॉन इलेक्ट्रॉनपेक्षा प्रत्येकी जवळजवळ दोन हजार पटींनी जास्त जड असतात. हायड्रोजनचा अणू सर्वात हलका, पण त्यात फक्त एक प्रोटॉनच असतो. पण नेमका त्याच आकाराचा युरेनियम घेतला तर त्यात ९२ प्रोटॉन व ९२ न्यूट्रॉन असतात. म्हणून तो विलक्षण जड होतो.मुलद्रव्ये मोजकीच आहेत. पण मग अनेकदा युरेनियमसारख्या मूलद्रव्याच्या संज्ञेपुढे विविध आकडे असलेले वाचायला मिळतात. मूलद्रव्यातील प्रोटाॅनचा आकडा हा त्याचा अणुक्रमांक सांगतो. पण एकाच मूलद्रव्याच्या अणूच्या प्रोटॉनची संख्या तीच राहून न्यूट्रॉनची संख्या वेगवेगळी असलेले प्रवाह असू शकतात. त्यांना 'आयसोटोप' असे म्हटले जाते. प्रोटॉन व न्यूट्रॉनची बेरीज म्हणजे आयसोटोप्सचा आकडा येतो. असाच प्रकार रेडियम, क्लोरिन, आयोडिन इत्यादी बहुसंख्य मुलद्रव्यांबाबत आढळतो. सारे जग अशा या अणूंपासूनच बनलेले आहे. अगदी आपले सारे शरीरसुद्धा ! सृष्टी विज्ञानगाथा या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शत्रूने केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) दुहेरीत ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू कोण ठरला आहे ?२) ७५ व्या प्रजासत्ताक दिनाची मुख्य संकल्पना काय होती ?३) हडप्पा संस्कृतीत कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे ?४) उत्तर अमेरिका खंडातील सर्वात मोठा देश कोणता ?५) बिहार राज्याची विधानसभा सदस्यसंख्या किती आहे ? *उत्तरे :-* १) रोहन बोपण्णा, भारत ( ४३ वर्षे ३२९ दिवस ) २) विकसित भारत व भारत: लोकशाहीची जननी ३) कालीबंगण ४) कॅनडा ५) २४३ सदस्य*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 रुखमाजी भोगावार, नगरपालिका, धर्माबाद👤 डॉ. देविदास तारू, साहित्यिक, नांदेड👤 पोतन्ना चिंचलोड, येवती👤 बालाजी गोजे, सहशिक्षक👤 विनोद गुंडेवार👤 किरण बासरकर👤 चेतन घाटे, धर्माबाद👤 राजू जगदंबे, धर्माबाद 👤 चक्रधर ढगे, चिरली👤 गजानन वासमकर👤 सुंदर व्ही माने👤 पोतन्ना लखमावाड, पत्रकार, धर्माबाद👤 विनोद गुंडेवार👤 शिवाजी कौटकर, सहशिक्षक, बिलोली👤 राजू जगदंबे, धर्माबाद👤 दत्ता लिंगमपल्ले👤 संजय ढगे, चिरली👤 साहेबराव वानखेडे👤 शंकर गोपतवाड, सहशिक्षक, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नव्हे वाउगी चाहुटी काम पोटी। क्रियेवीण वाचाळता तेचि मोठी॥ मुखे बोलिल्यासारिखे चालताहे। मना सद्गुरु तोचि शोधुनि पाहे॥१८२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷आजची विचारधारा ...🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••लहान्याची चूक होते तेव्हा, त्याच्या झालेल्या चुकीविषयी सर्वचजण त्याला बोलत असतात. पण जेव्हा वयाने मोठे असणारे चुकतात त्यांना मात्र कोणीही बोलत नाही. म्हणूनच म्हणतात ना की, पिकतात पण शिकत नाही. कधी, कधी वयाने लहान असणारे चुकतात पण, त्यांना त्यांची चूक उशीरा का होईना कळत असते. आणि जेव्हा मोठे माणसे सर्व समजून, उमजून सुद्धा चुका करतात तेव्हा मात्र लहान्यांचे जगणे कठीण होऊन जाते. म्हणून चूक झाली असेल तर त्यावर आपणच विचार करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करून बघावे पण, इतरांच्या सांगण्यावरून चुकीच्या मार्गाने जाऊन दुसऱ्याला त्रास देऊन स्वतः चा समाधान करू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*॥ कथा 3 मित्रांची॥* ज्ञान, धन, विश्वास हे चांगले मित्र होते. तिघांचे एकमेकांवर प्रेम होते. ते एकत्र रहात असत. पण एक दिवस..... त्यांना वेगळे होण्याची वेळ आली. अरेरे..... त्यांनी एकमेकांना शेवटचे प्रश्न विचरले.... "आता आपण परत भेटणार केव्हा? कुठे? ? ? ज्ञान :-मी विद्यालयात भेटेन... धन:-मी तर श्रीमंताकडे भेटेन... विश्वास मात्र शांत होता, त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते. "कारे... ? का रडतोस?" विश्वास हुंदके देत-- *"मी एकदा गेलो तर* .... *पुन्हा* *कधी नाही भेटणार*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Posts (Atom)