✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 16/03/2020 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बोलण्याचे संस्कार* आपल्यावर बोलण्याचे संस्कार आहेत काय ?असे कोणी विचारणा केली तर आपण संभ्रमात पडतो. बोलण्यासाठी कोणत्या संस्काराची गरज आहे ? किंवा तसे संस्कार करता येतात काय ? याविषयी आपण लहान असताना नकळत विचार करतो मात्र त्यास बोलण्याचे संस्कार.......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/10/blog-post_25.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  ● २००५ - सम्राट कनिष्क या एअर इंडियाच्या विमानावर बॉम्बहल्ला करून ३२९ प्रवासी व कर्मचाऱ्यांना मारल्याच्या आरोपातून रिपुदमनसिंग मलिक व अजायबसिंग बागरी यांची कॅनडाच्या न्यायालयाने सुटका केली. ● १९९२ : सत्यजित रे यांना ऑस्कर पारितोषिक प्रदान करण्यात आले. ● २००१ : नेल्सन मंडेला यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते ‘गांधी शांतता पुरस्कार’ प्रदान ● २००० : हॉकीपटू धनराज पिल्ले आणि मध्य अंतराची धावपटू ज्योतिर्मय सिकदर यांना ’के. के. बिर्ला पुरस्कार’ जाहीर ● १९७६ : इंग्लंडचे पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन यांनी राजीनामा दिला. ● १९६६ : अमल कुमार सरकार यांनी भारताचे ८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला. ● १९४५ : दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने तुफानी बॉम्बफेक करून जर्मनीच्या वुर्झबर्ग शहराचा २० मिनीटांत विनाश केला. ● १९४३ : ’प्रभात’चा ’नई कहानी’ हा चित्रपट रिलीज झाला. ● १६४९ : शहाजीराजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी शहजादा मुराद (शहाजहानचा मुलगा) यास पत्र लिहीले. ● १५२८ : फत्तेपूर-शिक्री येथे राणा संग व बाबर यांचे घनघोर युद्ध होऊन राणा संग याचा पराभव झाला. [चैत्र शु. १४] 💥 जन्म :- ● १८७७ - मोहम्मद रझा शाह पेहलवी, इराणचा शहा. ●१९४१ - रॉबर्ट ग्वेई, कोटे दि'आयव्होरचा हुकुमशहा. राजपुतांच्या गृहिलोत वंशातील मेवाडचा राजा अमरसिंह. ● १९३६ : भास्कर चंदावरकर – संगीतकार (मृत्यू: २६ जुलै २००९) ● १९२१ : फहाद – सौदी अरेबियाचा राजा (मृत्यू: १ ऑगस्ट २००८) ● १९०१ : प्र. बा. गजेंद्रगडकर – भारताचे ७ वे सरन्यायाधीश (मृत्यू: १२ जून १९८१) ● १७८९ : जॉर्ज ओहम – जर्मन गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ६ जुलै १८५४) ● १७५१ : जेम्स मॅडिसन – अमेरिकेचे चौथे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २८ जून १८३६) ● १७५० : कॅरोलिन हर्षेल – जर्मन-ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ, ही प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ विल्यम हर्षेलची बहिण असुन तिने ८ धुमकेतू व ३ तारकासमुह शोधले आहेत. (मृत्यू: ९ जानेवारी १८४८) ● १६९३ : मल्हारराव होळकर – इंदूरच्या राज्याचे संस्थापक, मराठेशाहीतील पराक्रमी सेनापती व मुत्सद्दी (मृत्यू: २० मे १७६६) 💥 मृत्यू :- ● १९४५ - गणेश दामोदर सावरकर. ● २००७ : मंजुरूल इस्लाम – बांगला देशचा क्रिकेटपटू (जन्म: ४ मे १९८४) ● १९९९ : कुमुदिनी पेडणेकर – गायिका ● १९९९ : कुमुदिनी रांगणेकर – इंग्रजी लेखकांची मराठी वाचकांना ओळख करुन देणार्‍या लेखिका (जन्म: ? ? ????) ● १९९० : वि. स. पागे – स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी कार्यकर्ते, संत वाङ्‍मयाचे अभ्यासक, महाराष्ट्र विधानसभेचे सभापती, रोजगार हमी योजनेचे जनक (जन्म: २१ जुलै १९१०) ● १९४६ : ’गान सम्राट’ उस्ताद अल्लादियाँ खाँ – जयपूर -अत्रौली घराण्याचे संस्थापक व कोल्हापूर दरबारचे प्रसिद्ध गायक (जन्म: १० ऑगस्ट १८५५) ● १९४५ : गणेश दामोदर तथा ‘बाबाराव’ सावरकर – कट्टर हिंदुत्त्ववादी आणि ’अभिनव भारत’ संघटनेचे संस्थापक (जन्म: १३ जून १८७९) *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई : करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने राज्यातील सिनेमागृहे, म्युझियम व नाट्यगृहे बंद ठेवण्याचा आदेश दिल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी दिली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या अन्न-औषध प्रशासनाची मोठी कारवाई, 50 लाखांचं बनावट सॅनिटायझर जप्त* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मुंबईच्या कमाल तापमानात आता वाढ; पारा ३७ अंशावर, राज्याचा विचार करता येत्या २४ ते २८ तासांत उत्तर कोकणासह मुंबईचे कमाल तापमान ३६ ते ३८ अंशाच्या घरात नोंदविण्यात येईल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई : राज्यात कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनाचे 32 जण रुग्ण सापडले आहेत. यावेळी खबरदारीसाठी MPSCच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदी; पोलीस खात्याने घेतला महत्त्वाचा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबईः १९५६च्या दीक्षासोहळ्याप्रसंगी माजी उपमहापौर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांचे काल झाले निधन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *आयपीएल चे 13 वे सीझन लांबणीवर, 15 एप्रिलपासून सुरू होण्याची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माझा दोस्त* - विठ्ठल जाधव, शिरूर कासार जि. बीड 9421442995 संगणक माझा दोस्त मज ज्ञान देतो मस्त माउस खेळतो खेळ क्लीकने लावतो मेळ स्क्रिनवर दिसे कुत्रा सरचिंग करतो मित्रा करतो पेंटिंग भारी मजाच करतो सारी आता करीन शॉपिंग राहीन फुल्ल चार्जिंग जाऊ या का चंद्रावर मित्रा घेऊन बरोबर *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" दृष्टिकोन हा मनाचा आरसा आहे, तो नेहमी विचारच परावर्तीत करतो "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *नारळाचा मूळ देश कोणत्या देशाला मानले जाते ?* इंडोनेशिया 2) *'महाराष्ट्राचे मँचेस्टर' असे कोणत्या शहराला म्हटले जाते ?* इचलकरंजी 3) *कोणता पक्षी उलट्या दिशेने चालू शकतो ?* इमू 4) *पाण्याबाहेर जगू शकणारा मासा कोणता ?* ईल 5) *'विधवा विवाह कायद्याचे जनक' कोणाला म्हटले जाते ?* ईश्वरचंद्र विद्यासागर *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤  प्रा. डॉ. सुरेश तेलंग,      यशवंत महाविद्यालय, नांदेड 👤 अँड. कैलाश देशमुख गोरठेकर, उमरी 👤 अनिलकुमार जैस्वाल, कुपटी, माहूर 👤 अनिल कांबळे, लोहा 👤 कैलास एम. राखेवार, नांदेड 👤 शिवराज उर्फ बबलू भुसेवार, नांदेड 👤 शिवम भंडारे, येवती *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माणूस कशासाठी काय कमावतो आहे, अन् नेमकं मोलाचं काय गमावून बसतो आहे; काहीच कळेनासं झालयं. आईबापाला म्हातारपणाची काठी म्हणून मुलगा हवा. मुलाला मेलेल्या आईची पेन्शन हवी; म्हणून मेल्यानंतरही अंगठ्यापुरती आई ठेवतो तो जिवंत. आईबापाचं घर हवं म्हणून मुलगा आई वडिलांना नारळपाण्यात विष देऊन मारतो. आईबापांच्या अंत्यसंस्कारासाठी वेळ नाहीय पोरांकडे. म्हणजे नेमकं काय करताहेत ही मुलं? देशाला महासत्ता बनवण्याच्या कार्यात गुंतली की काय? तर तसंही म्हणता येत नाही. एवढीशी निरागस मुलं आत्महत्या करताहेत. त्यांना एवढ्यात कोणी कंटाळून सोडलय?* *पालकांना हवे आहेत आपल्या मुलाला सगळ्या विषयात आऊट ऑफ मार्क. आई सारखा आभ्यासाचा लकडा पाठीमागे लावते म्हणून तिची हत्या करून मुलगा फरार होतो. त्याला कुठला अभ्यास कयायचा आहे माहीत नाही. आताची पिढी वरकरणी आहे खूप स्मार्ट पण मूल्यांचा तपास घ्यायला जाल, तर भेदरवून सोडल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आता या मुलांना देऊ शकत नाही निबंध लिहिण्याची सूचना. ते एक अवाक्षरही कागदावर कोरणार नाही. त्यांनी निबंध लिहू नये हेच बरे! यास देशकालपरिस्थीती जितकी कारणीभूत आहे तितके आपणही , सगळ्यांनीच हिरावून घेतलेत निबंधाचे हळुवार कल्पकविषय आजच्या पिढीकडून.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाईल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सुप्रभात मित्रांनो, अवतार सिनेमातील एक गाणे आठवा, जिंदगी ये कैसी है,जैसे जियो वैसी है । त्यात राजेश खन्नानी जिंदगी जगण्याचे खूप छान मंत्र दिले आहेत. जीवनाचे गीत हे विविध चांगल्या छंदानी सजविले पाहिजे.आज युवापिढीला एका चांगल्या वाटाड्याची गरज आहे.उत्तम आदर्श त्यांच्यासमोर उभे करणे गरजेचे आहे. यशाची,संघर्षाची नशा त्यांना चढवेल अशा मद्याची मैफल त्याच्याभोवती पाहिजे. अनेक उच्चपदस्थ, उच्चभ्रू म्हणवले जाणारे प्रतिष्ठीत सुर्यास्ताबरोबर स्वत:ला काचेच्या पेल्यात बुडवतात. तरूण मुला-मुलींपुढे कुठले आदर्श आपण ठेवणार आहोत ? कोवळी, मिसरूड फुटलेली मुलं अलिकडे व्यसनांच्या आहारी जात आहेत. त्यांना कुणीतरी थांबवलं पाहिजे. त्यांची शक्ती विधायक कार्यासाठी संघटित व्हायला हवी. जगाची दारं आज त्यांच्यासाठी खुली आहेत. त्यांनी त्या दारापर्यंत पोहोचायला हवं. खरं म्हणजे आनंद-दु:ख, यश-अपयश व्यक्त करण्याची अनेक माध्यमं आहेत. मदिराप्राशन, हे माध्यम उचित ठरू शकत नाही. प्रत्येकानं मात्र आवडीचा छंद जोपासण्याची धुंदी चढू द्यावी. श्रमण्यातून मिळालेल्या यशाचा कैफ काही औरच असतो. दुस-याच्या दु:खानं गुंगी जरूर यावी नि, ती सोडविण्याचा अंमलही असावा. प्रेमाचा वर्षाव करत झिंगावं त्यानं आप्त-मित्रांसह, आणि जगण्याची खरी... नशा.. चढू द्यावी...! अशोक कुमावत, नाशिक (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• दैनंदिन जीवनात नाना प्रकारची माणसे सहवासात येतात.त्यापैकी काही माणसांचा सहवास नित्य हवासा वाटतो कारण त्यांच्याकडून काही ना काही आपल्याला शिकायला मिळते. ते उदार अंतःकरणाने कशाचीही अपेक्षा न करता देत असतात.ते कधीही गर्वाने किंवा कसल्याही अपेक्षेने कार्य करत नाही. ते स्वत:ही शांत आणि संयमी वृत्तीने वागत असल्याने जणू विशाल सागराप्रमाणेच रहाणे पसंत करतात.प्रत्यक्ष जीवनात इतरांनाही घेऊन चालतात.अशांचा सहवास लाभणे म्हणजे एक भाग्यच असावे लागते. तर काही माणसे अशी भेटतात की,त्यांचा सहवास नकोसा वाटतो.त्याचे कारणही तसेच असते. सतत काही ना काही काम नसताना निरर्थक बोलणारी,मी म्हणजेच सारे काही म्हणणारी अहंकाराने भरलेली,जे काही चालते ते माझ्यामुळेच अशी म्हणणारी, अशा माणसांचा स्वभाव म्हणजे एखाद्या उथळ पाण्यासारखा खळखळणारा असतो तो काही काळ खळखळ वाहतो आणि नंतर आवाज बंद होतो. अशा माणसांकडून काय अपेक्षा करणार आणि त्यांचा कोणता गुण घेणार असा प्रश्न उपस्थित राहतो.अशांचा सहवास आपल्या जीवनात कधीकधी घातक होऊ शकत़ो. म्हणून आपल्या जीवनाचे खरेच सार्थक करुन घ्यायचे असेल तर योग्य विचार करुनच योग्य सहवासाची निवड करावी व आपले जीवन चांगल्या पध्दतीने जगावे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *देतो तो देव* ही गोष्ट आहे विनोबा भावे यांची. विनोबाजी ना आई विनू म्हणायची, विष्णूच्या घरामागील परसामध्ये आंब्याची, फणसाची झाडे होती. झाडावरचा पिकलेला फणस काढून आईने कापला. त्यातील रसाळ गरे काढले. वेगवेगळ्या द्रोणांमध्ये भरून ठेवले. विनू पाहतच होता. रसाळ गऱ्यांचा पहिला द्रोन आपल्यालाच मिळणार याची त्याला खात्री होती. पण आईने त्यातले दोन द्रोन विनू च्या हातात दिले व शेजार्‍यांकडे पोहोचविण्यास सांगितले. विनूने दोन्ही घरी द्रोन नेऊन दिले. पण तो नाराज होऊन म्हणाला, " आपल्याच घरचे फळ नीआपल्याला मात्र सगळ्यात शेवटी." आई हसली आणि म्हणाली, " अरे आपल्या जवळ जे असतना त्या अगोदर इतरांना द्यावे आणि मग आपण घ्यावं. इतरांना विसरून आपण एकट्यानेच घेणे हे बरोबर नाही. लक्षात ठेव देतो तो देव आणि राखतो तो राक्षस. देणे हा देवाचा उत्तम गुण आणि फक्त स्वतःसाठीच राखून ठेवणे हा राक्षसांचा दुर्गुण आहे. आता तूच ठरव तुला देव व्हायचं आहे, की राक्षस? " विनू ची समजूत पटली. त्याने आनंदाने गरे खायला सुरुवात केली. तात्पर्यः स्वतःसाठी तर सर्वजण जगतात परंतु इतरांसाठी ही जगून पहावं. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 14/03/2020 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *डॉक्टर : देव की दानव* https://nasayeotikar.blogspot.com/2018/12/blog-post.html?m=1 लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  ● १९९४ - लिनक्सची १.० आवृत्ती प्रकाशित. ● १९९८ - इराणमध्ये रिश्टर मापनपद्धतीनुसार ६.९ तीव्रतेचा भूकंप. ● १९८८ : जपानमध्ये समुद्रांतर्गत रेल्वे वाहतुकीस प्रारंभ ● २०१० : ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या हस्ते ‘लोकसंस्कृती’चे उपासक आणि संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांना ‘पुण्यभूषण पुरस्कार’ पुण्यात देण्यात आला. ● २००१ : चोकिला अय्यर यांनी भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्रसचिव म्हणून सूत्रे हाती घेतली. त्या सिक्कीममधील आदिवासी समाजातील असून १९६४ च्या बॅचमधील आय. ए. एस. अधिकारी आहेत. ● २००१ : व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने ईडन गार्डन वर नाबाद २७५ धावा काढून या मैदानावरील सर्वोच्‍च धावांचा सुनील गावसकरचा विक्रम मोडला. तसेच एका डावात ४४ चौकार मारण्याच्या डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी केली. ● २००० : कलकत्ता येथील ’टेक्‍निशियन आय’ हा देशातील सर्वात जुना स्टुडिओ आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. ● १९५४ : दिल्ली येथे साहित्य अकादमीची स्थापना झाली. ● १९३१ : ’आलम आरा’ हा पहिला भारतीय बोलपट मुंबईतील नॉव्हेल्टी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. 💥 जन्म :- ● १९६५ - आमिर खान, हिंदी चित्रपट अभिनेता. ● १९७४ : साधना घाणेकर ऊर्फ ’साधना सरगम’ – पार्श्वगायिका ● १९३३ : मायकेल केन – ब्रिटिश अभिनेता ● १९३१ : प्रभाकर पणशीकर – ख्यातनाम अभिनेते (मृत्यू: १३ जानेवारी २०११) ● १८७९ : अल्बर्ट आइनस्टाईन – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन-अमेरिकन भौतिकशात्रज्ञ (मृत्यू: १८ एप्रिल१९५५) 💥 मृत्यू :- ● १८८३ - कार्ल मार्क्स, समाजवादी विचारवंत व लेखक. ● १८८३ कार्ल मार्क्स, समाजवादी विचारवंत व लेखक ● २०१० : गोविंद विनायक तथा ‘विंदा’ करंदीकर – लेखक, कवी, लघुनिबंधकार व टीकाकार.(जन्म: २३ ऑगस्ट १९१८) ● २००३ : कवी सुरेश भट (जन्म: १५ एप्रिल १९३२) ● १९९८ : दादा कोंडके – अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, संवादलेखक (जन्म: ८ ऑगस्ट १९३२) ● १९३२ : जॉर्ज इस्टमन – अमेरिकन संशोधक व इस्टमन कोडॅक कंपनीचे संस्थापक (जन्म: १२ जुलै १८५४) ● १८८३ : कार्ल मार्क्स – जर्मन तत्त्वज्ञ व कम्युनिझमचे प्रणेते (जन्म: ५ मे १८१८) *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *काही बँका बुडित निघाल्यानंतर आता राज्य सरकार खडबडून जागं झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर यापुढे सर्व सार्वजनिक संस्थांनी आपले पैसे राष्ट्रीयकृत बँकामध्येच ठेवावेत असे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई :- बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक भवन व कलादालनसाठी शासनाकडुन २५ कोटींचा निधी तर स्थानिक शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी प्रत्येकी साडे बारा लाख प्रमाणे ५० लाख निधी देण्याची दर्शवली तयारी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याकडून सर्व सरकारी डॉक्टर आणि आरोग्य अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या केल्या रद्द* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *एअर इंडियाकडून इटली, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, दक्षिण कोरिया, श्रीलंकेला जाणाऱ्या विमानांची उड्डाणं ३० एप्रिलपर्यंत रद्द* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *शासकीय निधीचा व्यवहार आता राष्ट्रीयीकृत बँकेतूनच ; १ एप्रिलपासून अंमलबजावणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *जम्मू - काश्मीर - जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांची नजरकैदेतून सुटका* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *कोरोनामुळे यंदाच्या आयपीएलचं आयोजन लांबणीवर, 29 मार्चपासून सुरु होणारी स्पर्धा आता 15 एप्रिलपासून, तर भारत-दक्षिण आफ्रिका वन-डे मालिका रद्द, कोरोनाच्या भीतीने 100वं अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन पुढे ढकलण्याचा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *"हसत-खेळत"* - धिरज उत्तमराव चामे, अहमदपूर जि. लातूर 8369504498 हसत-खेळत जगायचं उगाच रडायचं नाही रागावर ताबा ठेवायचा पटकन चिडायचं नाही मन मोठं ठेवायचं स्वार्थी बनायचं नाही सत्याची बाजू घ्यायची लबाडी करायचं नाही सर्वांशी प्रेमाने बोलायचं गर्वात राहायचं नाही कष्ट करायचे खूप हार मानायचं नाही छंद जपायचे आपले आळस करायचं नाही बालपण मजेत जगायचं बागडायला विसरायचं नाही *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" संस्कार म्हणजे आपल्या मनावर ताबा आणि दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *संस्कृत वाङ्ममयातील पहिला ग्रंथ कोणता ?* ऋग्वेद 2) *'क्रिकेट' या शब्दाची पहिली नोंद कोणत्या शब्दकोषात झाली ?* ऑक्सफर्ड 3) *इंद्राच्या हत्तीचे नाव काय होते ?* ऐरावत 4) *जगातील सर्वात क्रियाशील ज्वालामुखी कोणता ?* एटना 5) *'कांगारुचा देश' असे कोणत्या देशाला म्हटले जाते ?* ऑस्ट्रेलिया *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 डॉ. प्रशांत मुदकोंडवार 👤 विशाल यादव 👤 श्रावणी महादेव पाटील 👤 ओमकार नाईकनवरे 👤 डी. बी. पाटील होटाळकर 👤 आनंद जगताप 👤 विजय पवार 👤 वेदांत मनीष तारे 👤 धैर्यशील शशिकांत शिंदे 👤 प्रियांका जाधव *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आत्मशांती, आत्मशक्ती, आत्मसुख आणि आत्मानंद या शब्दांच्या अर्थ शोधार्थ कितीही ग्रंथ धुडाळले तरी हाती काही लागणार नाही. उलट, या शब्दांचा अर्थ अनुभूतीतून कळतो. म्हणून संत म्हणतात की, नाम घ्यावे आणि हा भवसिंधू तरून जावा. ज्ञानमार्ग, योगमार्ग, कर्ममार्ग हे सहज पेलता न येणारे विषय आहेत; तसे नाममार्गाचे नाही. नाम हाच धर्म व कर्म हे ज्याला कळले तो सहज नामसाधना करू शकतो. सद्गुरूंकडून मिळालेले नाम ह्रदयापासून आणि भौतिकतेचा विसर पडून जर आपण घेत राहिलो, तर त्यापासून येणारी अनुभूती ईश्वरासमीप नेते.* *नामामुळे व्यक्तीच्या ठिकाणी निरलस, निर्भय वृत्ती वस्तीला येते. अशा व्यक्तीच्या प्रत्येक चलनवलनात फक्त आणि फक्त देव आणि देशप्रेमच लपलेले असते. येता-जाता, उठता-बसता जर नामजप घडला, तर मन आणि प्राण एक होतील आणि चैतन्यस्वरूपाचा अविष्कार दिसेल. अविद्येचा म्हणजे अज्ञानाचा भेद नाम्मोच्चाराने दूर होतो. अहंकाराचा वारा त्याला स्पर्श करू शकत नाही आणि विरोधी लोकही त्याबद्दल आवाज उठवू शकत नाहीत. एखादा माणूस झोपेत असताना त्याला जर आपण त्याच्या नावाने आवाज दिला, तर तो खडबडून जागा होतो. तशी जाग आणण्याचे काम नाम करते. ज्याच्या मुखात नाम आहे तो विनम्रतेने जगात संचार करतो. हेच वेदपुराणे, उपनिषदे, महाकाव्य यांनी वेगवेगळ्या शब्दांत सुगमतेने सांगितले आहे. ह्रदयस्थित भगवंताला आपलेसे करण्याकरीता नामजपाशिवाय दुसरा सुलभ मार्ग नाही.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🐚🐚🐚🐚🐚🐚🐚🐚🐚 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सुप्रभात, मित्रांनो* *माणसानं कुंडीतल्या नाही, तर जमिनीत लावलेल्या झाडासारखं असावं* *कोणी पाणी घालेल या आशेवर राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीतील ओलावा शोषून घेत मोठं व्हावं* *उंच उंच वाढत राहावं*.... *संघर्ष करत असताना घाबरू नका* *कारण संघर्षाच्या वेळीचं* *माणूस एकटा असतो* *यश मिळाल्यानंतर सगळी* *दुनिया तुमच्या सोबत असते*..! *यासाठी उंच स्वप्ने बघावी लागतात.* *आपले आयुष्य तसे सामान्यच आणि स्वप्नेही तशीच; पण असामान्य* *व्यक्तींची 'स्वप्ने' लोकविलक्षणच असतात. संत* *एकनाथांना ज्ञानेश्वरांनी स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की,'अजानवृक्षाची मुळी* *माझ्या गळ्याभोवती वेढली गेली आहे. '* *एकनाथांनी मग आळंदीला जाऊन ज्ञानदेवांची समाधी शोधून काढली. तिचा जिर्णोद्धार केला. इतकेच नव्हे,* *तर ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली. तुकारामांच्या स्वप्नात* *संत नामदेव आले आणि त्यांनी आपली शतकोटी अभंगाची प्रतिज्ञा पूर्ण करावी, असे तुकोबांना* *सुचविले. जिजाऊंनी शिवरायांच्या राज्याभिषेकाचे स्वप्न मनोमन पाहून शिवरायांना स्वराज्याचे* *तोरण बांधण्याची प्रेरणा दिली होती.* *स्वामी विवेकानंदांनी कन्याकुमारी येथे खडकावर, ध्यानमग्न स्थितीत, दैदिप्यमान भारताचे स्वप्न पाहिले. 'देशवासियांच्या जाड्याभरड्या अन्नवस्त्राची तरी सोय व्हावयास हवी.' हे रामकृष्ण परमहंसांचे बोल त्यांच्या मनात गुंजत होते. बोधिवृक्षाखाली ध्यानस्थ बसलेल्या गौतम बुद्धांचे मनही उपेक्षित लोकांसाठी तळमळत होते. स्वत:पलिकडे लोककल्याणाचा ध्यास घेतलेल्यांची स्वप्ने भव्य-दिव्य असतात. संत कबीर यांनी प्रत्येक जीवाने सत्-चित् , आनंदरूप व्हावे, अशी आस बाळगली, तर तुकडोजी महाराजांनी भेदभावरहित सुखी भारताची आकांक्षा धरली.* *अशोक कुमावत, नाशिक* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• माणसाचे मन हे नेहमी उमलणा-या फुलाप्रमाणे प्रसन्न ठेवायला हवे.फुले ही स्वत: उमलतात ती दुस-यांच्या दु:खाला दूर करण्यासाठी.फुलांचे जीवन अल्पायुषी जरी असले तरी माणसांच्या मनावर जास्त काळ राज्य करुन जातात हे मात्र खरे आहे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आकाशात किती तारे आहेत बरे ?* एकदा गच्चीवर अकबर बादशहा आणि बिरबल गप्पा मारत होते. तेवढ्यात बादशहा बिरबलला म्हणाला, ''बिरबल, या आकाशात किती तारे असतील बरे?'' यावर बिरबलने जवळच उभ्या असलेल्या एका सेवकाला एक परातभर मोहर्‍या घेऊन येण्याचा हुकूम केला. सेवक जाताच आकाशाकडे पाहत बिरबल आपण जसे काही तारेच मोजीत आहेत, असे नाटक करू लागला. थोड्या वेळाने मोहर्‍या भरलेली परात आणून ती सेवकाने बिरबलाच्या पुढे ठेवली. मग तारे मोजण्याचे नाटक बंद करून ती परात बादशहापुढे ठेवीत तो म्हणाला, ''खाविंद, जेवढ्या मोहर्‍या या परातीत आहेत , बरोबर तेवढेच तारे या आकाशात आहेत. नेमके तारे किती आहेत, हे माहिती करून घ्यायचे असेल, तर या परातीतील एकेक मोहरी मोजीत, अशा सर्व परातभर मोहर्‍या मोजीत बसा, म्हणजे तुम्हाला तार्‍यांची संख्या समजेल. '' यावर बादशहा म्हणाला, ''बिरबल, त्याची काहीच गरज नाही. केवळ या मोहर्‍या मोजीत मला माझे उरलेले आयुष्य खर्च करायचे नाही. '' *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 13/03/2020 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जय जवान , जय किसान* https://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post_24.html?m=1 लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  ● १९९७: मदार तेरेसा यांच्या वारस म्हणून सिस्टर निर्मला यांची निवड करण्यात आली 💥 जन्म :- ● १९२६: ललित लेखक रवींद्र पिंगे  💥 मृत्यू :-  ● १८०० - नाना फडणवीस, पेशवे दरबारातील एक मंत्री ● १८९९: दत्तात्रेय कोंडो घाटे उर्फ कवी दत्त  *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *सर्व केंद्रीय मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, घाबरण्याऐवजी काळजी घेण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन, तर शासकीय कार्यक्रम रद्द करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *राज्यसभेसाठी शिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदी, भाजपकडून भागवत कराड तर दिग्गजांना बाजूला सारत काँग्रेसकडून राजीव सातव यांचं नाव निश्चित, चंद्रकांत खैरे, एकनाथ खडसे, संजय काकडेंची संधी हुकली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *देशात कोरोनाचे 73 तर महाराष्ट्रात 11 रुग्ण, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती, आरोग्य खात्याकडून विशेष खबरदारी, राज्यातील 11 रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे नसल्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *जेरुसलेम : चीनमधून संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसने घेतलेल्या बळींचा तसेच लागण झालेल्या रुग्ण संख्येतही झपाट्याने वाढ होत असून इस्रायलमधील शास्त्रज्ञांनी जीवघेण्या कोरोना व्हायरसवर लस विकसित केल्याचा दावा केला आहे. लवकरच याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *राज्यात शिवजयंती तिथीनुसार साजरी, मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण तर औरंगाबादेत राज ठाकरेंचं शिवरायांना अभिवादन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *कोरोनाचा हापूस आंब्यावर परिणाम, विमान वाहतूक बंद असल्यानं निर्यात बंद, शेतकरी चिंताग्रस्त, कोरोनामुळे शिर्डीत येणाऱ्या भक्तांची संख्या रोडावली, राज्यात अनेक यात्रा उत्सव रद्द, तर ताडोबा व्याघ्र प्रकल्पालाही फटका, 70 टक्के बुकिंग परदेशी पर्यटकांकडून रद्द* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *कोरोनामुळे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेदरम्यानचे पुढील दोन एकदिवसीय सामने प्रेक्षकांविना होणार, तर आयपीएलवरही कोरोनाचं सावट कायम* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आजा* - उत्तम सदाकाळ, जुन्नर, (पुणे) 9011016655 आजा आधाराचा वड आजा बळकट खोड दिशा देतो जगण्याला आजा संस्काराचे झाड आजा सांगतो कहाणी आजा गातो गोड गाणी मेळा जमतो मुलांचा रोज आजा भोवताली पाठी घेतो लेकरांना घोडा बनतो रे आजा हट्ट धरल्या लेकरांचे लाड पुरवितो आजा आजा असता घरात घर भरलेले वाटे तीर्थे सारी आजा ठाई देव आजामध्ये भेटे बदलत्या दुनियेत नसे किंमत नात्याला नातवांच्या हितासाठी जपा आपुल्या आजाला *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" अनेक वेळा चांगले क्षण, आशीर्वाद हे कठोर प्रसंगांच्या वेशभूषेत येतात."* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *आशिया खंडातील सर्वात लांब बोगदा कोणता ?* करबुडे 2) *भारताच्या मध्यभागातून कोणते वृत्त जाते ?* कर्कवृत्त 3) *जगातील सर्वात प्राचीन धर्मग्रंथ कोणता ?* ऋग्वेद 4) *कोणता रक्तगट सर्वांना चालतो ?* O+ 5) *कोणत्या वृक्षाला पन्नास वर्षांनी फळे येतात ?* ओक *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 प्रेरणाताई वरपूडकर 👤 सुरज माने 👤 भगवान कांबळे, पत्रकार, धर्माबाद 👤 रुस्तुम शेख *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आत्मशांती, आत्मशक्ती, आत्मसुख आणि आत्मानंद या शब्दांच्या अर्थ शोधार्थ कितीही ग्रंथ धुडाळले तरी हाती काही लागणार नाही. उलट, या शब्दांचा अर्थ अनुभूतीतून कळतो. म्हणून संत म्हणतात की, नाम घ्यावे आणि हा भवसिंधू तरून जावा. ज्ञानमार्ग, योगमार्ग, कर्ममार्ग हे सहज पेलता न येणारे विषय आहेत; तसे नाममार्गाचे नाही. नाम हाच धर्म व कर्म हे ज्याला कळले तो सहज नामसाधना करू शकतो. सद्गुरूंकडून मिळालेले नाम ह्रदयापासून आणि भौतिकतेचा विसर पडून जर आपण घेत राहिलो, तर त्यापासून येणारी अनुभूती ईश्वरासमीप नेते.* *नामामुळे व्यक्तीच्या ठिकाणी निरलस, निर्भय वृत्ती वस्तीला येते. अशा व्यक्तीच्या प्रत्येक चलनवलनात फक्त आणि फक्त देव आणि देशप्रेमच लपलेले असते. येता-जाता, उठता-बसता जर नामजप घडला, तर मन आणि प्राण एक होतील आणि चैतन्यस्वरूपाचा अविष्कार दिसेल. अविद्येचा म्हणजे अज्ञानाचा भेद नाम्मोच्चाराने दूर होतो. अहंकाराचा वारा त्याला स्पर्श करू शकत नाही आणि विरोधी लोकही त्याबद्दल आवाज उठवू शकत नाहीत. एखादा माणूस झोपेत असताना त्याला जर आपण त्याच्या नावाने आवाज दिला, तर तो खडबडून जागा होतो. तशी जाग आणण्याचे काम नाम करते. ज्याच्या मुखात नाम आहे तो विनम्रतेने जगात संचार करतो. हेच वेदपुराणे, उपनिषदे, महाकाव्य यांनी वेगवेगळ्या शब्दांत सुगमतेने सांगितले आहे. ह्रदयस्थित भगवंताला आपलेसे करण्याकरीता नामजपाशिवाय दुसरा सुलभ मार्ग नाही.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🐚🐚🐚🐚🐚🐚🐚🐚🐚 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सुप्रभात, मित्रांनो* *मला माणूस हवाय,मला माणूस* *हवाय।* *देताय ना शोधून ,नाही,राग मानू नका* *गर्दीत हरवलाय म्हणून म्हटलो.* *मोगऱ्याचं फूल ओंजळीत घेतलं...* *की त्याचा गंध मनाला... शरीराला प्रसन्न करून जातो..* *सहवासातील माणसाचं देखील असंच असतं...* *काही माणसं काही क्षणातच मनाला खूप आवडतात...* *आपली होऊन जातात...* *तर काही कितीही सहवासात राहिली तरी आतून ओढ नसतेच...* *चेहरा बघण्यापेक्षा...* *नेहमीच समोरच्याच्या मनात उतरून बघावं...* *शोधूनही तिथं माणूसपण सापडत नसेल तर...* *त्याचं सुंदर दिसणंही मग किळसवाण वाटतं....* *शरीराची सुंदरता वयाबरोबर संपते* *तर मनाची सुंदरता,* *टिकून राहाते शेवटपर्यंत...* *शरीराला वय असतं....* *मनाला ते कधीच नसतं...* *शेवटी काय आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो...* *शरीर तर असतं निमित्तमात्र...* *माणसाच्या स्वभावात गोडवा...* *शालीनता...* *प्रामाणिकपणा...* *आणि विनयशीलता असेल...* *तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली...* *तरी ती हवीहवीशीच वाटते...* *म्हणूनच बाहेर लक्ष दिव्याची सुंदर आरास असूनही,* *देवघरातील समईच्या तेजापुढं* *आपण नतमस्तक होतो...* *आयुष्यात अशी माणसं कधी भेटली तर...* *त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं...!* *आपल्या आवडत्या माणसाचं...* *आपल्यासोबत असणं...* *ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई...* *ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असं नाही...* *आजकाल अशी माणसं भेटतात तरी कुठे ?* *नशिबानं कधी भेटलीच...* *तर हळुवार जतन करून ठेवावीत...* *कदाचित पुन्हा भेटतील न भेटतील...?* *माणूस बनुया,माणस जपुया,* *अशोक कुमावत, नाशिक* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• या जगात आपल्याला श्रीमंत व्हायचे असेल तर पहिल्यांदा प्रामाणिकपणा अंगी बाळगायला हवा.कारण प्रामाणिकपणा अंगी बाळगल्यामुळे आपणास खोटे बोलण्याची सवय लागत नाही, आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढतो,कुणीही आपल्याकडे संशयीत भावनेने पाहत नाही, नातेसंबंध,मित्र आणि इतरांमध्ये प्रामाणिकपणा असल्यामुळे विश्वासाचा पाया मजबूत होतो, आपल्या प्रामाणिकपणाची वेळोवेळी इतरांना प्रचिती आल्यामुळे आपल्याकडे वाईट नजरेने किंवा वेगळ्या विचाराने पहायची हिम्मत कुणी करणार नाही.एवढेच नाही तर आपल्या जीवनात जीवन जगण्याचा पाया मजबूत होतो तर प्रामाणिकपणे जीवन जगण्याचे ध्येय आपल्या जीवनात सातत्याने ठेवल्यामुळे आपल्याला कुणापुढे मान खाली करून माफी मागायची गरज नाही.जीवनात प्रामाणिकपणा असणे म्हणजे आपल्या ताठ मानेने स्वाभिमानाने जगण्याचे मंत्र शिकले आहे असे होईल. आपण इतरांच्या जगण्याकडे पाहिले आणि आपल्या जीवन जगण्याच्या जीवनशैलीकडे पाहिले तर आपण फार श्रीमंत आहोत हे लक्षात येईल. © व्यंकटेश काटकर, नांदेड. 🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चूक कळली* एक होते तळे. त्यात होते बेडूक. बाजूला होते मैदान तेथे मुले खेळत. खेळ म्हणून तळ्यात दगड फेकत. पाणी उंच उडे. मुलांना गंमत वाटे. मुलांना आनंद होत होता. आणि ती आणखी पाण्यात दगड मारत होती. पण ती दगड बेडकांना लागत असे. मुलांचे पाण्यात दगड मारणे असे रोजच चालत असे. बेडूक घाबरून गेले. मग एकदा काय झाले पाण्यातून एक बेडूक पुढे आला. मुलांना विचारू लागला, " तुम्ही दगड का मारता?" मुले म्हणाली, " पाण्यात दगड मारणे हा आमचा खेळ आहे." आम्हाला त्यात आनंद वाटतो, आम्हाला खूप खूप मज्जा येते." बेडूक म्हणाला. " तुमचा खेळ होतो, पण आमचा जीव जातो". तुम्ही मारलेले दगड आम्हाला लागतात आणि आमच्या तील बेडकांना ती दगडं लागतात व आमचा जीव जातो. मुलांना हे ऐकून खूप वाईट वाटले. आपले चुकले हे मुलांना कळले. मुलांना आपली चूक कळली. त्या दिवशीपासून मुलांनी दगड पाण्यात मारणे हा खेळ सोडून दिला. तात्पर्यः आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही हि काळजी सर्वांनी घ्यायला हवी. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 12/03/2020 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मृत्यू : एक अटळ सत्य* http://nasayeotikar.blogspot.com/2019/03/blog-post_12.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~    *राष्ट्र दिन - मॉरिशियस* 💥 ठळक घडामोडी :-  ● १९३० : ब्रिटीश सरकारने भारतात तयार केलेल्या मीठावर लादलेल्या कराविरुद्ध महात्मा गांधींनी दांडी यात्रा सुरू केली. ● २००१ : राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही मूल्ये, सामाजिक आणि आर्थिक विकास या क्षेत्रांतील बहुमोल कामगिरीबद्दल देण्यात येणारा ’यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार’ ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व पर्यावरणवादी नेते सुंदरलाल बहुगुणा यांना प्रदान करण्यात आला. ● १९९९ : सरकारी नोटांवर यापुढे महात्मा गांधींचेच चित्र असेल असा सरकारतर्फे निर्णय घेण्यात आला. ● १९९९ : चेक प्रजासत्ताक, हंगेरी व पोलंड ’नाटो’ (NATO) मधे सामील झाले. ● १९९३ : मुंबई येथे झालेल्या १२ स्फोटांच्या मालिकेत ३०० हून अधिकजण ठार तर हजारो लोक जखमी. ● १९९२ : स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २४ वर्षांनी ब्रिटिश सत्तेची सर्व जोखडे झुगारुन देऊन मॉरिशस प्रजासत्ताक बनले. ● १९९१ : जेजुरी येथील खंडोबा मंदिरात चोरी ● १९६८ : मॉरिशस (इंग्लंडपासून) स्वतंत्र झाला. ● १९३० : ब्रिटिश सरकारने भारतात तयार केलेल्या मिठावर बसवलेल्या अन्यायकारक करामुळे महात्मा गांधी यांनी २०० मैलाच्या दांडीयात्रेला सुरूवात केली. ● १९१८ : रशियाची राजधानी सेंट पीट्सबर्ग येथून मास्को येथे हलविण्यात आली. ● १९१२ : कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी लिहीलेल्या ’संगीत मानापमान’ या नाटकाचा पहिला प्रयोग किर्लोस्कर नाटक मंडळीने मुंबईतील रिपन नाट्यगृहात केला. 💥 जन्म :- ● १८८१ - मुस्तफा कमाल अतातुर्क, तुर्कस्तानचा पहिला राष्ट्राध्यक्ष. ● १९१३ : यशवंतराव चव्हाण – भारताचे ५ वे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री (मृत्यू:२५ नोव्हेंबर १९८४) ● १९११ : दयानंद बाळकृष्ण ऊर्फ ’भाऊसाहेब’ बांदोडकर – गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे संस्थापक, उद्योगपती आणि दानशूर (जन्म: १२ ऑगस्ट १९७३) ● १८९१ : ’नटवर्य’ चिंतामणराव कोल्हटकर – अभिनेते व निर्माते ● १८२४ : गुस्ताव किरचॉफ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: १७ आक्टोबर १८८७) 💥 मृत्यू :- ● १८८९ - योहानेस चौथा, इथियोपियाचा सम्राट. ● १९९९ - यहूदी मेनुहिन, अमेरिकन-ब्रिटीश संगीतकार. ● २००१ : रॉबर्ट लुडलुम – अमेरिकन लेखक (जन्म: २५ मे १९२७) ● १९९९ : यहुदी मेनुहिन – प्रसिद्ध व्हायोलिनवादक व वाद्यवृंदसंचालक (जन्म: २२ एप्रिल १९१६) ● १९४२ : रॉबर्ट बॉश – जर्मन अभियंते आणि उद्योजक (जन्म: २३ सप्टेंबर १८६१) ● १९८० : सुप्रसिध्द तबलावादक वसंतराव आचरेकर *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई : कोरोना व्हायरसने पुण्यापाठोपाठ आता मुंबईत एन्ट्री केली आहे. मुंबईत कोरोनाचे 2 रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 7 वर पोहोचली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरु असलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळण्यात येणार आहे. राज्यात कुठल्याही प्रकारचा मोठा समारंभ होणार नसल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *आंतरराष्ट्रीय विमानतळासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार अनावरण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी संपतराव सकाळे यांची बिनविरोध निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *राज्यातील कोरोना रुग्णांची प्रकृती स्थिर, नागरिकांनी घाबरू नये, जनजागृतीसाठी सर्व गावांमध्ये ग्रामसभा घ्याव्यात; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मोबाईल पब्जी गेमचा मुलांच्या मानसिकतेवर खरंच दुष्परिणाम होतोय का? मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाला खुलासा करण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *20 एप्रिलपासून राज्यसरकारच्या मेगा नोकरभरतीला सुरुवात होण्याची शक्यता तर खासगी एजन्सीद्वारे नोकरभरती करण्यास आमदार रोहित पवार यांचा विरोध* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *आयपीएलचे फक्त सामने आयोजित करावेत, तिकीट विक्री करु नये, कोरोनावरील आढावा बैठकीत राज्य सरकारची भूमिका, तर हॅन्ड वॉश-मास्कची विक्री रेशन दुकानातून करण्याची भाजपच्या चंद्रकांत पाटील यांची मागणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अनुभवाकडून शिकावं* - अनिता दाणे जुंबाड, नांदेड. शिकता येत असेलं तर कुणाकडून ही शिकावं मुंग्याकडून शिकावा सांकव शिस्तीचा पालीकडून शिकावा ध्यास तत्वाला चिटकून राहण्याचा घर कसं सांभाळायचं शिकावं गोगलगायी कडून तसचं दप्तर कसं सांभाळायचं हेही शिकावं तिच्याचकडून शिकता येत असलं तर ते कुणाकडूनही शिकावं जगायचं कसं ते फक्त अनुभवाकडून शिकावं *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" विचार करण्याची पद्धत सुपाप्रमाणे असावी ..... दोष तेवढे काढून टाकायचे आणि गुण तेवढे शिल्लक ठेवायचे "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *हिमरू शालींकरिता महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते ?* औरंगाबाद 2) *मराठवाड्यातील सर्वात मोठे शहर कोणते ?* औरंगाबाद 3) *'बावन्न दरवाजांचे शहर' असे कोणत्या शहराला म्हटले जाते ?* औरंगाबाद 4) *बंगालचा उपसागर, हिंदी महासागर व अरबी समुद्र यांच्या संगमाच्या ठिकाणाला काय म्हणतात ?* कन्याकुमारी 5) *'सूर्याची कन्या' असे कोणत्या झाडाला संबोधतात ?* कपाशी *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 आ. राम विठ्ठल सातपुते सोलापूर विधानसभा 👤 शिवराम पेंडकर 👤 माधव पाटील दिग्रसकर 👤 आनंदा हंडावार 👤 मधुकर काठेवाडे 👤 विठ्ठल हिवराळे 👤 वसीम बाबू 👤 गणेश निकम 👤 श्रीकांत उर्फ पप्पू कांबळे 👤 अजय पार्टे 👤 रामलू लखमावाड, धर्माबाद 👤 दादाराव केंद्रे, वरीष्ठ पोलीस 👤 सचिन मुक्कावार 👤 स्वप्नील सुरेश देवकाते 👤 देवदास पिंगळे, लोकनेते 👤 शांताताई धुळे, औरंगाबाद *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अनेक उच्चपदस्थ, उच्चभ्रू म्हणवले जाणारे प्रतिष्टित सुर्यास्ताबरोबर स्वत:ला काचेच्या पेल्यात बुडवतात. तरूण मुला-मुलींपुढे कुठले आदर्श आपण ठेवणार आहोत ? कोवळी, मिसरूड फुटलेली मुलं अलिकडे व्यसनांच्या आहारी जात आहेत. त्यांना कुणीतरी थांबवलं पाहिजे. त्यांची शक्ती विधायक कार्यासाठी संघटित व्हायला हवी. जगाची दारं आज त्यांच्यासाठी खुली आहेत. त्यांनी त्या दारापर्यंत पोहोचायला हवं.* *खरं म्हणजे आनंद-दु:ख, यश-अपयश व्यक्त करण्याची अनेक माध्यमं आहेत. मदिराप्राशन, हे माध्यम उचित ठरू शकत नाही. प्रत्येकानं मात्र आवडीचा छंद जोपासण्याची धुंदी चढू द्यावी. श्रमण्यातून मिळालेल्या यशाचा कैफ काही औरच असतो. दुस-याच्या दु:खानं गुंगी जरूर यावी नि, ती सोडविण्याचा अंमलही असावा. प्रेमाचा वर्षाव करत झिंगावं त्यानं आप्त-मित्रांसह, आणि जगण्याची खरी... नशा.. चढू द्यावी...!*                ••●★‼ *रामकृष्णहरी* ‼ ★●••          🔰🔰🌺🌺🔰🔰     *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सुप्रभात मित्रांनो, विलोक्य संगमे रांग पश्चिमायांविवास्वत:।कृतं कृष्ण मुखं प्राच्या न हि नार्यो विणेरश्येय।। निसर्गाचं सूक्ष्म निरीक्षण करणं, त्यात मानवी कृती पाहणं, त्यावर मानवी भावना आरोपित करणं, याचा संस्कृत कवींना फार मोठा छंद होता. याचं एक उत्तम उदाहरण प्रस्तुत श्लोकात पाहायला मिळतं. सुर्यास्तसमयाचं वर्णनं, हा इथला विषय आहे सूर्य मावळला आहे. पश्चिम दिशेच्या बाहुपाशात त्यानं स्वतःला झोकून दिलं आहे. तिच्या गालावर जणू लाली पसरली आहे. पूर्व दिशेला साहजिकच अंधार पडू लागला आहे. ती काळी ठिक्कर पडत आहे. या नैसर्गिक स्तिथीवर कवीनं किती बहारदार रूपक बसवलं आहे! सूर्य हा प्रियकर. पूर्व दिशा ही दुसरी प्रियसी. दिवसा रंभी तो पूर्वीच्या प्रांगणात जातो. उत्साह आणि चैतन्य यांचं वातावरण सर्वत्र पसरतं. पूर्व दिशेला लालीचं लाली पसरते. तिच्या प्रीतीचीच ही लाली होय. प्रियेच्या प्रेमपाषा तो मशगुल होतो आणि मिलनाचा आनंद पुरेपूर उपभोगतो! रविराज या प्रेमभेटीनंतर कर्तव्यपालनासाठी नभ आक्रमू लागतो. पुर्वा ही प्रेयसी मातत्र एकटक त्याच्याकडे पाहत राहते. सूर्य पुढं पुढं जातो मध्य आल्यानंतर पश्चिमेच्या प्रांगणात प्रवेश करतो.पश्चिम क्षितिजवर आरूढ होतो.पश्चिमाही लालीनं रंगून जातो.पश्चिमेच्या क्षितिजावर मिलनाचा आनंदोत्सव सुरू होतो . "हा संगमे रागं" मिलनाचा रंग होय.आता सुर्यराज पूर्वेकडून दूर गेल्यामुळे पूर्वेला अंधार पडला आहे.काळिमा पसरला आहे. पश्चिमेला रंगोत्सव सुरू आहे.पूर्वेच मुख मात्र काळ ठिक्कर पडलं आहे. अशोक कुमावत, नाशिक (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येकजण आपल्या जीवनाच्या चित्रशाळेत स्वत:चे एक सुंदर जीवनाचे चित्र काढून रंगवण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो.जीवनाच्या चित्राचा आकार कसाही असला तरी त्यात रंग मात्र आपल्या कल्पक बुध्दीने भरण्याचा प्रयत्न करतो.त्यात असणारे रंग जरी वेगवेगळे असले तरी भरण्याचे कौशल्य ज्याला आहे तो आपल्या वेगळ्या पद्धतीने,कलेने भरुन जीवनाला आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करतो.ज्याला ही कला अवगत झाली नाही त्याच्या जीवनचित्रात रंगही भरता येत नसल्यामुळे जीवनचित्र रंगहिन व आकारहिन बनते.म्हणून जीवनाच्या जीवनचित्रशाळेत यशस्वी व्हायचे असेल,जीवनाला रंगरुप आकार द्यायचा असेल तर आपल्यातील कल्पकतेला,कौशल्याला आणि नवनिर्माण शिलतेला जागृत ठेवून जीवन सुंदर आणि आनंददायी निर्माण करायला शिकले पाहिजे.त्यातून स्वत:ला आणि इतरांना जगण्यासाठी एक नाविण्यपूर्ण कला अवगत होईल आणि आनंदाने जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळेल यात शंकाच नाही. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ 🌱🎨🌱🎨🌱🎨🌱🎨🌱 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *हरिण व कोल्हा* एका कोल्हयाला फिरण्याचा फार नाद होता, तो या गावाहून त्या गावाला सारखा फिरत राही, प्रवास करता करता तो एका गावाला आला. तिथे त्याला एका तलावात पाणी पीत असलेली काही हरणे दिसली. ती पाणी पितापिता मधेच अकाशाकडे पहात होती हे पाहून कोल्हयाने त्यांना असे करण्याचे कारण विचारले, तेव्हा हरणे म्हणाली, 'आम्ही देवाचे आभार मानतो देवाच्याच दयेनं हे पाणी प्यायला मिळतं आहे.' हरणांचे हे बोलणे ऐकून कोल्हयाला हसू आले व तो त्यांची टिंगल करू लागला. यावर त्यातले एक स्पष्टवक्ते हरीण कोल्हयाला म्हणाले, 'अरे कोल्होबा ज्याची त्याची श्रध्दा असते, अशी दुसऱ्याची टिंगल उडविणे वाईट आहे. आपले वागणे वाईट अशा विकृत दृष्टिकोन असलेल्या तुझ्याकडून समंजसपणाची अपेक्षा का करावी.' तात्पर्यः  'दुसऱ्याच्या श्रध्देविषयी टिंगल करणे हे असभ्यपणाचे लक्षण आहे.' *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 11/03/2020 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *उन्हाळ्यात घेऊ या काळजी* http://nasayeotikar.blogspot.com/2019/03/blog-post_26.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  ● २००७ - २००७च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे उद्घाटन. ● २०११ - जपानजवळ समुद्रात रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.९ तीव्रतेचा भूकंप. यात आणि यानंतरच्या त्सुनामीमध्ये शेकडो ठार. ● १८८६ पहिली भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना डॉक्टर ही पदवी मिळाली .भारतातील पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवणाऱ्या डॉ. आनंदीबाई जोशी यांना फ़िलाडेफ़िल्या विद्यापीठाची एस.डी. ही पदवी बहाल करण्यात आली ● २००१ : बॅडमिंटनपटू पी. गोपीचंदने तब्बल एकवीस वर्षानी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद भारतास मिळवून दिले. या आधी प्रकाश पदुकोण यांनी ते मिळवले होते. ● २००१ : कसोटी क्रिकेटमधे हॅटट्रिक घेणारा हरभजनसिंग हा पहिला भारतीय गोलंदाज बनला. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही कामगिरी केली. ● १९९३ : उडिया कवी व साहित्यिक रमाकांत रथ यांना उपराष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते ‘सरस्वती सन्मान’ पुरस्कार प्रदान. ● १८१८ : इंग्रज फौजांनी पुरंदरला वेढा घातला. 💥 जन्म :- ● १९८५ : अजंता मेंडिस – श्रीलंकेचा गोलंदाज ● १९१६ : हॅरॉल्ड विल्सन – इंग्लंडचे पंतप्रधान (मृत्यू: २४ मे १९९५) ● १९१५ : विजय हजारे – क्रिकेटपटू (मृत्यू: १८ डिसेंबर २००४) ● १९१२ : शं. गो. साठे – नाटककार ● १९८२ - हसन रझा, क्रिकेटपटू, वयाच्या १४व्या वर्षी कसोटीपटू झाला. 💥 मृत्यू :- ● १६८९: औरंगजेबाच्या कैदेमध्ये असलेल्या संभाजीराजांची अतिशय हालहाल करुन हत्या करण्यात आली. ● पेनिसिलीनचे शोधक सर फ्लेमिंग पुण्यतिथी. ● २००६ : स्लोबोदान मिलोसोव्हिच – सर्बिया व युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष (जन्म: २० ऑगस्ट १९४१) ● १९९३ : शाहू मोडक – हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते, (संत ज्ञानेश्वर, माझा मुलगा, माणूस, त्यांनी [जन्माने ख्रिश्चन असूनही] २९ चित्रपटांत कृष्णाची भूमिका साकारली) (जन्म: २५ एप्रिल १९१८ – अहमदनगर) ● १९७० : अर्ल स्टॅनले गार्डनर – अमेरिकन लेखक आणि वकील (जन्म: १७ जुलै १८८९) ● १९६५ : गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा ’धूमकेतू’ – गुजराथी कथाकार व कादंबरीकार. त्यांच्या ७ उत्कृष्ट कथांचा संग्रह ’सप्तपर्ण’ या नावाने प्रकाशित झाला आहे. (जन्म: १२ डिसेंबर १८९२) ● १९५५ : अलेक्झांडर फ्लेमिंग – नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ (जन्म: ६ ऑगस्ट १८८१) *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *महाराष्ट्रात कोरोनाचा शिरकाव ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बोलावली महत्त्वाची बैठक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मध्यप्रदेशात कमलनाथ सरकार अल्पमतात, 6 मंत्र्यांसह 20 आमदारांचा राजीनामा सुपूर्द तर ज्योतिरादित्य शिंदे यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा, भाजपाकडून राज्यसभेवर जाण्याची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *राज्यसभेचे उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपच्या संसदीय बोर्डाची संध्याकाळी बैठक, उदयनराजे भोसले, रामदास आठवले यांच्यासह तिसरा उमेदवार ठरणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पुण्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळल्यानं आरोग्य यंत्रणेसह राज्य सरकार सतर्क, सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचं विभागीय आयुक्तांचं आवाहन तर नाशिकच्या विपश्यना केंद्रातील शिबीरं अनिश्चित काळासाठी रद्द* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *राज्यभरात धुळवडीचा उत्साह, खासदार नवनीत राणांकडून मेळघाटात होळी साजरी, तर भिवंडीत कोळी बांधवांची 85 वर्षांची पारंपरिक होळी, मुंबईत धुलिवंदनाचा जल्लोष, ठिकठिकाणी होता पोलीस बंदोबस्त* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *अलिबाबा ग्रुपचे जॅक मा बनले आशियातील सर्वात धनाढ्य व्यक्ती ; मुकेश अंबानी आले दुसऱ्या स्थानावर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मेरी कोमचं टोकियो ऑलिम्पिकचं तिकीट निश्चित; मेरीसह सात भारतीय बॉक्सर्सची ऑलिम्पिकमध्ये धडक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *👫 रविवार 👫* - संदीप ढाकणे, औरंगाबाद 7588512467 खुशीत आला रविवार धमाल घेऊन मजा करू आनंदाने साजरा रविवारला देऊ सजा || कसा झाला उशीर सांग एकदा मला रोज यायचे सोडून आठवडयाने आला || बांधू आता रविवारला जाणार नाही पळून कितीही रडला तरी नाही दयायचे सोडून || कसा आला तावडीत सोडव गाणित आवडीने धडा लिही चार पाने सुट्टी मिळेल सवडीने || नको बसू रडतपडत अभ्यास थोडा करत जा आता देतो सोडून तुला रोज भेटायला येत जा || ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" पुरुष नावाच्या दगडाला आकार देण्याचं काम स्त्री नावाचं कलाकार करत असतो "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *देशातील पहिले वैश्विक आण्विक ऊर्जा केंद्र कोठे उभारले जात आहे ?* बहादूरगड 2) *2011 च्या जनगणनेनुसार राज्यातील सर्वाधिक साक्षर जिल्हा कोणता ?* ठाणे 3) *आसाम राज्याचे पूर्वीचे नाव काय होते ?* कामरू 4) *महाराष्ट्रातील लेण्यांचा जिल्हा कोणता ?* औरंगाबाद 5) *'प्रत्येक वस्तू अतिसूक्ष्म कणांनी बनलेली असते' ही संकल्पना कोणी मांडली ?* कणाद ऋषी *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 विठ्ठल फुलारी, पत्रकार 👤 सचिन कावडे, पत्रकार 👤 महेंद्र पाटील 👤 अक्षय चिले 👤 किरण आचारी 👤 वैभव पांढरे 👤 प्रशिल सचिन जाधव 👤 अशोक बाजारे, संचालक भिमाशंकर पतसंस्था 👤 रिया राज गायकवाड 👤 सुयोग योगेश पायघन 👤 रुपाली युवराज सूर्यवंशी *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अन्याय्य मार्गाने मिळवलेला पैसा स्वत:च्या आणि परिवाराच्या अध:पतनास कारणीभूत होतो. कितीही प्रयत्न केले तरी असला पैसा व्यक्तीला वाममार्गालाच नेतो. अनैतिक वर्तणूकीने काही काळ यशस्वी होत असल्याचा भास निर्माण झाला तरी पापाचे भूत पिच्छा सोडत नाही. पैसा मिळवू नये असे नाही. पैसा हे मानवाचे सहावे इंद्रिय आहे. त्याच्याशिवाय मूळही पाच इंद्रिय काम करणार नाहीत हे खरे आहे. प्रश्न पैसे मिळविण्याचा नाही, किती मिळवायचा हा आहे. जो पैसा मिळविताना माणुसकीची सारी तत्वे पायदळी तुडविली जातात आणि ज्या पैशाचा विनियोग माणसाच्या खरेदी-विक्रीत होतो, त्या पैशाला काय अर्थ आहे?* *ज्याप्रमाणे पैसा औषध विकत घेऊ शकतो; पण आरोग्य विकत घेऊ शकत नाही. पैसा सेवा विकत घेऊ शकला तरी माणूस विकत घेऊ शकत नाही. गैरमार्गाने आलेल्या संपत्तीला गैरमार्गाने जाण्यासाठीच पाय फुटतील ही काळ्या दगडावरची रेघ आहे. शेकडो वर्ष उलटली तरी आपण व्यास, वाल्मिकींना विसरलो नाही. राजघराण्यात जन्मल्यामुळे नव्हे, तर राजघराण्याचा त्याग केल्यामुळे वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांची नावे घेतली जातात. ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, कबीर यांची नावे प्रात:स्मरणीय झाली आहेत ती त्यांनी सांगितलेल्या माणुसकीच्या धर्मामुळे. आपले नाव जनतेच्या जीभेवर असावे असे वाटणे स्वाभाविक आहे त्यासाठी पैशांबरोबर आत्मियतेची गरज आहे.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥* ●•• 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सुप्रभात हमित्रांनो, लासलगावी एका कवी संमेलनात पाडगावकरांना जवळून ऐकण्याचा, पाहण्याचा योग आला. काल त्यांचा जन्मदिवस त्या निमित्ताने आठवणी जाग्या झाल्या. मी तिला विचारलं, तिनं लाजून होय म्हटलं , सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं... तुम्ही म्हणाल, यात विशेष काय घडलं ?त्यालाच कळेल, ज्याचं असं मन जडलं...’किंवा इतुके आलो जवळ जवळ की जवळपणाचे झाले बंधन छेडणार जर होत आपण गीत नवे तर हवेच होते वीणेच्या तारांतून अंतर धुंदपणी त्या अंधपणी त्या भान राहिले नाही हे पण इतुके आलो जवळ जवळ की.....’ किंवा हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे, हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दु:ख ठावे; तिरपा कटाक्ष भोळा, आम्ही इथे दिवाणे....मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे’ , नाहीतर, मी कुठे म्हणालो परी हवी,पण दिसायला जरा बरी हवी. असं म्हणणारे लोकप्रिय भावकवी मंगेश पाडगावकर . दहा मार्च १९२९ रोजी वेंगुर्ल्यात जन्मलेले मंगेश पाडगावकर हे अतिशय प्रतिभावंत कवी आणि गीतकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या आईमुळे त्यांना कवितेची गोडी लागली. त्यांची आई त्यांना केशवसुत, बालकवी, गोविंदाग्रज यांच्या कविता त्यांच्या लहानपणी वाचून दाखवत असे आणि ते बाळकडू मिळालेल्या पाडगावकरांनी वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच कविता लिहायला सुरुवात केली होती. त्यांच्या कविता मुख्यत्वेकरून प्रेम आणि निसर्ग याविषयीच्या असतात. हळुवार, स्वप्नील भाव त्यांच्या कवितेतून प्रकटतात. एकीकडे निसर्ग आणि प्रेमकविता लिहिणाऱ्या पाडगावकरांनी ‘सलाम’सारखी सामाजिक आणि राजकीय लांगुलचलनावर टीका करणारी कविता लिहिली आणि चक्क मिश्कील, झकास वात्रटिकासुद्धा लिहिल्या. कवितांबरोबरच त्यांनी बोलगाणी, गझल आणि भावगीतं हे प्रांत गाजवले. विंदा करंदीकर आणि वसंत बापट यांच्याबरोबर त्यांचं छान ट्युनिंग जमलं आणि या तिघांनी गावोगावी दौरे करून जवळपास चार दशकं काव्यवाचनाचे कार्यक्रम केले आणि गावोगावच्या लोकांना कवितांचा भरभरून आनंद दिला. त्यांच्या कवितांना एक सुंदर नाद किंवा गेयता असे.  कविता आणि गीतांखेरीज त्यांनी गद्यलेखनही केलं आहे. त्यांनी अनेक इंग्लिश पुस्तकांचे मराठी अनुवाद केले. बायबलसुद्धा मराठीत आणलं. शेक्सपिअरच्या ‘टेम्पिस्ट’ आणि ‘ज्युलियस सीझर’ नाटकांचे अनुवाद केले. कमला सुब्रह्मण्यम यांच्या महाभारत ग्रंथाचं दोन खंडी भाषांतर केलं. काही बालसाहित्यही लिहिलं आणि समीक्षापर लेखनही केलं.  २०१० साली भरलेल्या विश्व साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार, महाराष्ट्रभूषण पुरस्कार आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. ३० डिसेंबर २०१५ रोजी त्यांचं निधन झालं.  अशोक कुमावत, नाशिक (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• संकटे ही माणसांच्या जीवनात सशाच्या गतीने येतात नि कासवाच्या मंद गतीने हळुहळू जातात.पण त्यामधला जो काळ दुःखाचा आणि वेदना सहन करण्याचा आहे त्याला शांत आणि धैर्याने,हिंमतीने तोंड देऊन विजय मिळवतो तोच जीवनात यशस्वी होतो. - व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..9421839590. 🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सिंह आणि चित्ता* जंगलातील राज्यकारभार फार वाढल्यामुळे सिंहाने प्रधान नेमण्यासाठी सभा बोलावली होती, त्याने आलेल्या प्रत्येकाची मुलाखत घेतली आणि कोल्ह्याची नेमणूक केली. सर्वांना ती पसंत पडली. सर्व पशु निघून गेले, चित्ता तेथेच बसून राहिला. सिंहाने त्याला विचारले, “ काय रे ,काय हवे तुला? ” चित्ता म्हणाला, “ महाराज, तुम्ही कोल्ह्याची नेमणूक केली,हे चांगलं नाही केलं. त्याला ना रंग, ना रूप, मी बघा कसा आहे! माझा रंग बघा, माझे डोळे कसे आहेत बघा, माझे शेपूट बघा. माझ्यावर अन्याय झाला आहे .” सिंह म्हणाला, “ तू बोललास ते बरं झालं. मी मुलाखत घेतली, ती प्रधानाच्या पदासाठी. हा बुद्धिमान असावा लागतो. रूप नसलं तरी चालतं, हे तुला समजत नाही. हे तू सिद्ध केलंस. मी हे आधीच ओळखलं, म्हणून तुला नेमलं नाही.” चित्त्याला हे पटले, तो मुकाट्याने तिथून निघून गेला. तात्पर्य: आपली कुवत व बुद्धिमत्ता कितपत आहे, हे समजून आपली चूक मान्य करणे यातच खरे शहाणपण आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 09/03/2020 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *होळी आणि धुलिवंदन* https://nasayeotikar.blogspot.com/2019/03/blog-post_17.html?m=1 लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *होळी* 💥 ठळक घडामोडी :-  ● १९५९ - बार्बी या बाहुलीच्या विक्रीस सुरुवात. ● १९६७ - जोसेफ स्टालिनची मुलगी स्वेतलाना अलिलुयेवाने अमेरिकेला पळ काढला. ● १९५२ : पुणे येथे पेशवे उद्यान प्राणी संग्रहालयाचे उदघाटन ● १९८२ : सूर्यमालेतील सर्व ग्रह सूर्याच्या बाजूला आलेले असण्याचा अपूर्वयोग. ● १९९२ : कवी आणि लेखक डॉ. हरिवंशराय बच्‍चन यांना नवी दिल्ली येथे के. के. बिर्ला प्रतिष्ठानद्वारा आयोजित समारंभात पहिला ‘सरस्वती पुरस्कार’ उपराष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आला. ● १९९१ : युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष स्लोबोदान मिलोसोव्हिच यांच्याविरुद्ध राजधानी बेलग्रेड मधे प्रचंड निदर्शने. ● १९४५ : अमेरिकेच्या बी-२९ विमानांनी जपानच्या टोकियो शहरावर बॉम्बहल्ला केला. यात १ लाखाहुन अधिक लोक मृत्युमुखी पडले. 💥 जन्म :- ● १९२९ - डेसमंड हॉइट, गुयानाचा पंतप्रधान व राष्ट्राध्यक्ष. ● १९५६ : शशी थरूर – केन्द्रीय मंत्री व अर्थतज्ञ ●१९५१ : उस्ताद झाकिर हुसेन – तबलावादक ● १९४३ : रॉबर्ट जेम्स ऊर्फ ’बॉबी’ फिशर – अमेरिकन बुद्धिबळपटू व ग्रँडमास्टर (मृत्यू: १७ जानेवारी २००८) ● १९३४ : युरी गागारीन – पृथ्वीप्रदक्षिणा करणारा पहिला अंतराळवीर (मृत्यू: २७ मार्च १९६८) ● १९३० : डॉ. यु. म. पठाण – संतसाहित्याचे व्यासंगी अभ्यासक ● १८९९ : ’राजकवी’ यशवंत दिनकर पेंढारकर (मृत्यू: २६ नोव्हेंबर १९८५) ● १८६३ : लक्ष्मण बापूजी ऊर्फ ’भाऊराव’ कोल्हटकर – गायक नट (मृत्यू: १३ फेब्रुवारी १९०१) 💥 मृत्यू :- ● १८८८ - कैसर विल्हेम पहिला, जर्मनीचा सम्राट. ● १९७१ - के. आसिफ, हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, पटकथालेखक. ● १९७१ : के. आसिफ, हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, पटकथालेखक. ● २०१२ : जॉय मुकर्जी – चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक (जन्म: २४ फेब्रुवारी १९३९) ● २००० : उषा मराठे – खेर ऊर्फ ’उषा किरण’ – शंभराहून अधिक चित्रपटात व रंगभूमीवर अभिनेत्री, मुंबईच्या नगरपाल (जन्म: २२ एप्रिल १९२९) ● १९९४ : देविका राणी – अभिनेत्री, पद्मश्री, दादासाहेब फाळके व सोविएत लँड नेहरू पुरस्कारांनी सन्मानित (जन्म: ३० मार्च १९०८) ● १९९२ : मेनाकेम बेगीन – इस्त्रायलचे ६ वे पंतप्रधान व नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: १६ ऑगस्ट १९१३) ● १९७१ : के. असिफ – हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व पटकथालेखक (जन्म: १४ जून १९२२) ● १९६९ : सर होर्मुसजी पेरोशॉ तथा ’होमी’ मोदी – उद्योगपती, प्रशासक व संसदपटू (जन्म: २३ सप्टेंबर १८८१) ● १८८८ : विल्हेल्म (पहिला) – जर्मन सम्राट (जन्म: २२ मार्च १७९७) ● १८५१ : हान्स क्रिस्टियन ओरस्टेड – डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १४ ऑगस्ट १७७७) ● १६५० : संत तुकाराम यांचा वैकुंठवास *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने 7 महिलांकडे आपले सोशल मीडिया अकाउंट स्वाधीन केले. यामध्ये सामाजितक कार्यकर्त्या मालविका अय्यर यांचाही समावेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरस झपाट्याने पसरतो आहे. ताज्या माहितीनुसार इराणमध्ये दिवसभरात कोरोनानं ४९ जणांचा बळी घेतला आहे. इटलीतही कोरोनाच्या रुग्णांची संख्या झापाट्याने वाढत असून इटलीत आतापर्यंत २०० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मुंबई - आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी केली अटक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नवी दिल्ली :- माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि स्वातंत्र्य सेनानी राजकुमारी अमृत कौर यांना टाइमच्या ‘वुमन ऑफ द इयर’ यादीत स्थान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *येस बँक मधील 'सर्व खातेधारकाचे पैसे सुरक्षित, बँकेला वाचवण्यासाठी सरकार आणि आरबीआय एकत्र काम करत आहे' अर्थमंत्री निर्मला सीतारमण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *औरंगाबाद - महाविकास आघाडी सरकारमध्ये आदित्य ठाकरे यांनी पर्यटन मंत्रिपदाची धुरा सांभाळताच अर्थसंकल्पात नेहमीच दुर्लक्षित राहणाऱ्या पर्यटन खात्यासाठी यंदा १४०० कोटी रुपयांची केली तरतूद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *स्पोर्ट डेस्क- महिला टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताचा दारुण पराभव झाला. मेलबर्नमध्ये झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 185 धावांचे टार्गेट दिले होते. हे लक्ष गाठण्यासाठी मैदानात उतरलेला भारतीय संघ फक्त 99 धावांची मजल मारू शकला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *फुलपाखरू* - बाजीराव माधव केसराळीकर फुलपाखरू मी फुलपाखरू रंगीबेरंगी फुलपाखरू ॥ मऊ मखमली माझे अंग पाहुनी मजला मुले होती दंग अरे दिसताक्षणी मज पकडण्या तुम्ही धावता तुरुतुरु ॥ उडतो मी ह्या झाडावरुनी त्या झाडावर बागडतो मी दऱ्या ,खोऱ्या अन् डोंगर माथ्यावर अरे स्वच्छंद आहे माझे जगणे नका मजला तुम्ही कैद करु ॥ फुलपाखरु मी फुलपाखरु रंगीबेरंगी फुलपाखरु ॥ *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मनासारखी गोष्ट होत नसेल तर खचून जाऊ नका...आज तुमची वेळ नाही पण उद्या नक्कीच असेल* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *महाराष्ट्राची आद्यशिक्षिका कोण ?* क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले 2) *भारताची प्रथम महिला पंतप्रधान कोण ?* इंदिरा गांधी 3) *भारताची प्रथम महिला राष्ट्रपती कोण ?* प्रतिभाताई पाटील 4) *भारताची प्रथम महिला लोकसभा सभापती कोण ?* मीरा कुमार 5) *भारताची प्रथम महिला अर्थमंत्री कोण ?* निर्मला सीतारमन *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शिवा वसमतकर, वसमत 👤 शिवाजी साखरे 👤 अरविंद फुलसिंग आडे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आयुष्याच्या संध्याकाळी आपल्या कुटुंबासमवेत निवांतपणानं जगता यावं नि जीवनाचं सार्थक व्हावं, अशी प्रत्येकाची मनोमन ईच्छा असते. आज मात्र एकाकीपणाच्या गर्तेत स्वत:ला कोंडून घेण्याची वेळ अनेकांवर येताना दिसत आहे. पाश्चात्य देशातून आलेल्या संस्कृतीनं गेली अनेक वर्षे आमच्या सामाजिक रचनेला हादरे दिल्याने आमच्या कुटुंबव्यवस्थेला तडे गेले आहेत.* *संयुक्त कुटुंबव्यवस्थेत अनेक अडचणी व भौतिक सुखांच्या अभावातही आत्मिक सुखासाठी जगणारी माणसं आज हरवून गेली आहेत. पडद्यावरील आजी-आजोबा आम्हांला भावतात, पण वास्तवात प्रत्येकाला कुटुंब हवं ते चौकोनात बांधलेलं. त्यात इतरांना जागाच उरलेली नाही.*          *"काळाच्या बदलात आलेली ही स्थित्यंतरं अत्यंत वेदनादायी आहेत, पण ती स्विकाराणं ही आमची अपरिहार्यता...? आहे....?...की.....?"*                      😢 ‼ *रामकृष्णहरी* ‼ 😢     😰😰😰😰😰😰😰😰😰      *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सुप्रभात मित्रांनो, उत्तमो नितीवक्त स्याद अधमो बहू भाषेत। न ध्वनिस्तादृक नाहक कांस्ये प्रजायते।। माणसाच्या बोलण्यावरून त्याची प्रतवारी ठरवणाऱ्या या श्लोकात कवी म्हणतो, उत्तम प्रतीचा माणूस फार बोलणारा असत नाही. फार बडबड करणारा हलक्या प्रतीचा असतो. काशाच्या (भांड्यातून) जेवढा आवाज निघतो तेवढा सोन्याच्या (भांड्यातून) निघत नाही. बोलण्याची क्षमता ही मनुष्यजातीला निसर्गानं दिलेली मोठी देणगी आहे. आपल्या मनीचे भाव, विचार दुसऱ्याला कळण हे बोलण्याचं मूलभूत प्रयोजन. भाषेचा शोध हा मानवी संस्कृतीच्या विकासातला महत्त्वाचा टप्पा आहे. कालक्रमानं भाषेचं प्रयोजन दळणवळणापुरतं मर्यादित न राहता मानवाच्या कलात्मक अविष्काराचं एक महत्त्वाचं साधन म्हणून भाषा विकसित झाली. भौतिक विश्वाच्या पलीकडचं, माणसाच्या प्रतिभेनं निर्मिलेलं विश्वही भाषा साकार करू लागली. अशा रीतीनं समृद्ध झालेल्या भाषासृष्टीत वावरणारा माणूस साहजिकच या समृद्धीचा आस्वाद घेऊ लागला. आपल्या भावभावना अधिक प्रभावीपणे मांडू लागला. मात्र हे करत असताना माणसाच्या कुवतीनुसार भाषेच्या प्रयोगाच्या दोन तऱ्हा निर्माण झाल्या. मोजक्याच, परंतु परिणामकारक भाषेत आपला विचार मांडण्याची एक तऱ्हा आणि जास्तीत जास्त शब्दसंपत्ती उधळून पाल्हाळ लावीत विचार व्यक्त करण्याची दुसरी तऱ्हा. पहिला प्रकर म्हणजेच मितभाषित्व, माणसाच्या परिपक्वतेचं लक्षण मानलं जातं, तर दुसरा प्रकार हे माणसाच्या बालिशपणाचं लक्षण मानलं जातं. उथळ पाण्याला खळखळाट फार असतो. कासं हा धातू सोन्यापेक्षा हलक्या प्रतीचा असतो, म्हणून काशाच्या भांड्यावर आघात केला तर मोठा आवाज होतो .सोन्याच्या भांड्यातून मात्र कमी आवाज निघतो. बोलण्याची वाफ दवडून शून्य कृती करणाऱ्या वाविचारापेक्षा हवं तेवढचं नेमकं बोलून वाचलेली शक्ती कृती करण्यासाठी वापरणारा मितभाषी केव्हाही ग्रेटच असतो. अशोक कुमावत (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येक माणसाला एक हृदय असते आणि त्या हृदयात कठोर-मृदु भावना असतात.त्या भावना प्रसंगानुरुप व परिस्थितीनुरूप बदलतात.ज्या भावना परिस्थितीनुरूप किंवा प्रसंगानुरुप बदलतात त्यांचे हृदय मृदू असते.अशा परिस्थितीत ते इतरांच्या हृदयाचा किंवा भावनेचा विचार करतात कारण त्यांना कुणाचे मन दुखवायचे नसते किंवा त्यांना आपलेसे करुन जवळिकता साधून एक चांगले संबंध जोडायचे असतात.त्यांच्यासोबत संबंध चांगले जोडून आपुलकीचे नाते जोडून जीवन समृद्ध करायचे असते.अशा मृदू हृदयाची माणसे या जगात नव्वद टक्के पहायला मिळतात.तर दुसरीकडे कठोर हृदयाची माणसे मृदू हृदयाच्या माणसांच्या विरुद्ध वागताना पहायला मिळतात.त्यांना या जगाशी किंवा इतरांशी आपले काही देणेघेणे नाही,आपला काही संबंध नाही असे म्हणून तिरस्कार करतात.त्यांच्या हृदयात थोडादेखील मायेचा ओलावा नसतो.मी म्हणजे सर्वस्व आहे.चांगले कुणाचे व्हावे किंवा चांगले होऊ द्यावे असे कधीच वाटत नाही.केवळ त्यांच्या हृदयात इतरांना विरोध करणे, इतरांना मदतीच्याऐवजी त्रास देणे,स्वत:चेच भले व्हावे असा स्वार्थी विचार नेहमी करत असतात.अर्थात दुष्ट पवृत्ती पुरेपूर भरलेली असते.अशा माणसांना चांगल्या माणसांची संगत नको वाटते.अशा कठोर हृदयी माणसांचा सहवास मृदू हृदयी माणसांना नको असते.मग तुम्हीच ठरवून निर्णय चर्या किंवा तुम्हीच तुमच्या हृदयाचा शोध चर्या आपण कोणत्या हृदयाची आहोत.जर काही कमी जास्त प्रमाणात असेल तर त्या कठोर हृदयाचे रुपांतर मृदू हृदयात करुन माणूस म्हणून जीवन जगता येईल का याचाही विचार करायला संधी दर्या.नक्कीच हृदयपरिवर्तन होईल आणि जीवन सुखी व समृद्ध होण्यास मदत होईल. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद : ९४२१८३९५९० 💔💞💔💞💔💞💔💞💔💞 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चतुर कोकरू* एका कुरणात मेंढ्यांचा कळप चरत होता. कळपाची राखण करण्यासाठी काही कुत्रे होते. चरता चरता एक कोकरू कळपाच्या मागे राहिले. कळप पुढे निघून गेला. तिथे एक लांडगा कळपावर नजर ठेवून होता. एक कोकरु कळपाच्या'मागे राहिल्याचे त्याने पाहिले आणि तो त्या कोकराच्या मागे लागला. कोकरू धावू लागले. आपण आता लांडग्याच्या तावडीतून सुटत नाही हे त्याच्या लक्षात आले. मग ते धावण्याचे सोडून हसत लांडग्याला म्हणाले, “ लांडगेदादा, आनंदाने हसत हसत मरावे असे मला वाटते. म्हणून तुम्ही थोड्यावेळ बासरी वाजवा म्हणजे मला खूप आनंद होईल.” लांडग्याने कोकराचे हे म्हणणे मान्य केले. त्याने बासरी वाजवायला सुरुवात केली. बासरीचा आवाज कळपातील कुत्र्यांच्या कानी पडताच ते तेथे धावून आले. धावून आलेले कुत्रे पाहताच,लांडगा बासरी फेकून देऊन पळून गेला. अशाप्रकारे चतुर कोकराने मोठ्या चतुराईने आपले प्राण वाचवले. तात्पर्य: प्रसंगी आपल्या चतुराईने बुद्धीचा वापर करून आपल्यावर आलेल्या संकटावर मात करून सुटका करावी. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

*मुक्त मी......* प्रत्येकाच्या जीवनात आईची ममता असते जगण्याची उमेद देऊन पोराबाळांसाठी ती झिजते खडक भेदून चालण्याची हिम्मत तिच्यात आहे रूप तिचे निरनिराळे स्त्रीशक्ती ही अजरामरआहे नका समजू तिला अबला ति झाली आहे सबला करून अन्यायाचा प्रतिकार न्यायाचा बाजूने राहणार संकटास न डगमगता संघर्ष ती करते,धैर्य आणि साहसाने पुढे चालत ती सक्षम नारी म्हणून जगते दुःखावर मात करुनी स्वकर्तृत्वावर ती उभी राहते, अंधाऱ्या वाटेलाही ज्योत प्रकाशाची पेटविते स्त्री-पुरूष समानतेने जगण्याचा अधिकार आहे घेऊनी उत्तुंग भरारी ती प्रत्येक क्षेत्रात वावरत आहे सत्याचा मार्गाने चालून कठोर काळातही जगते नारीशक्ती कुठेच कमी नाही, जगास या दावते संकटास ठणकाऊनी आव्हान पेलूनी,कठोर काळासही सांगते मुक्त मी....जाहले मुक्त मी....जाहले... 〰〰〰〰〰〰 ✍ प्रमिला सेनकुडे ता.हदगाव जिल्हा नांदेड.

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 07/03/2020 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *शिक्षक दिन - आल्बेनिया* 💥 ठळक घडामोडी :-  ● १७७१ : हैदर आणि मराठे यांच्यात प्रसिध्द अशी मोती तलावाची लढाई झाली. ● १९८३ : नवी दिल्ली येथे सातव्या अलिप्त राष्ट्रपरिषदेस आजच्याच दिवशी सुरुवात झाली. ● २००९ : केपलर स्पेस ऑब्झर्व्हेटरी या संशोधन संस्थेची स्थापना. ● २००६ : लष्कर-ए-तैय्यबा या आतंकवादी संघटनेने वाराणसी येथे बॉम्बस्फोट घडवून आणले. ● १९३६ : दुसरे महायुद्ध – व्हर्सायचा तह धुडकावून जर्मनीने र्‍हाईनलँडमधे सैन्य घुसवले. ● १८७६ : अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल याला टेलिफोनचे पेटंट मिळाले. ● २००५ - स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळण्यासाठी कुवैतच्या संसदेसमोर निदर्शने. 💥 जन्म :- ● १९३४ : नरी कॉँट्रॅक्टर, भारतीय क्रिकेट खेळाडू. ● १९४२ : उमेश कुलकर्णी, भारतीय क्रिकेट खेळाडू. ● १९५५ : अनुपम खेर – चित्रपट अभिनेता ● १९५२ : सर विवियन रिचर्ड्‌स – वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू ● १९३४ : नरी कॉन्ट्रॅक्टर – भारताचा यष्टिरक्षक ● १९११ : सच्‍चिदानंद हिरानंद वात्स्यायन तथा ’अज्ञेय’ – ज्ञानपीठ पारितोषिक (१९७८) व साहित्य अकादमी पुरस्कार (१९६४) विजेते हिन्दी लेखक व वृत्तपत्रकार (मृत्यू: ४ एप्रिल १९८७ – नवी दिल्ली) ● १८४९ : ल्यूथर बरबँक – महान वनस्पतीतज्ञ (मृत्यू: ११ एप्रिल १९२६) ● १७९२ : सर जॉन विल्यम हर्षेल – ब्रिटिश गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ, रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचा संस्थापक (मृत्यू: ११ मे १८७१) ● १५०८ : हुमायून – दुसरा मुघल सम्राट (मृत्यू: १७ जानेवारी १५५६) 💥 मृत्यू :- ● १९५२ : परमहंस योगानंद, भारतीय तत्त्वज्ञ. ● २०१२ : रवि शंकर शर्मा ऊर्फ ’रवि’ – संगीतकार (जन्म: ३ मार्च १९२६) ● २००० : प्रभाकर तामणे – साहित्यिक व पटकथालेखक (जन्म: २९ आक्टोबर १९३१) ● १९९३ : इर्झा मीर – माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक (जन्म: २६ आक्टोबर १९००) ● १९६१ : गोविंद वल्लभ पंत – स्वातंत्र्यसैनिक, भारताचे दुसरे गृहमंत्री व उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री, भारताचे पहाडी पुरूष, प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष, भारतरत्‍न (१९५७), मागासवर्गीयांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी कुमाँऊ परिषदेची स्थापना केली. (जन्म: १० सप्टेंबर १८८७) ● १९२२ : गणपतराव जोशी – रंगभूमीवरील असामान्य अभिनेते, शेक्सपियरच्या नाटकांतील त्यांच्या भूमिका अतिशय गाजल्या होत्या (जन्म: १५ ऑगस्ट १८६७) ● १६४७ : दादोजी कोंडदेव – छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू ● १९५२ - परमहंस योगानंद, भारतीय तत्त्वज्ञ. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर, शेतकरी कर्जमाफी, महिला सुरक्षा, बेरोजगारीसाठी सरकारकडून कोट्यवधींचा निधी जाहीर, आमदार निधीत एक कोटीची वाढ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *पेट्रोल आणि डिझेल लीटरमागे एक रुपयाने महागणार, अर्थसंकल्पानंतर इंधनावर अतिरिक्त कर तर पुढील 2 वर्षांसाठीत मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांचा दिलासा, अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा, 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्यांनाही सवलत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *देशात कोरोना बाधितांची संख्या पोहोचली 31 वर, कोरोनामुळे अटारी बॉर्डरवर होणारा रिट्रीट सोहळा रद्द, दिल्लीतील नेमबाजी विश्वचषक, आयफा सोहळाही पुढे ढकलला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *येस बँक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, आरबीआयनं निर्बंध लादल्यानं खातेदार धास्तावले, तर कुणाचेही पैसे बुडणार नाहीत, केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून दिलासा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *गेल्या कित्येक दिवसांपासून ताटकळत असणाऱ्या थेट सरपंच निवड रद्द करण्याच्या कायद्यावर अखेर राज्यपालांनी केली स्वाक्षरी, या विधेयकावर स्वाक्षरी झाल्यामुळे राज्यातील १९ जिल्ह्यातील दीड हजार ग्रामपंचायतील सरपंचाची निवड थेट होण्याऐवजी ग्रामपंचायत सदस्यांमधून होणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राज आणि पुरुष संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धडक मारलेल्या भारतीय महिला संघाचे केले अभिनंदन, सचिन तेंडुलकरने दिला मोलाचा सल्ला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *विशेष बातमी :- शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईनच होणार, फडणवीस सरकारचा निर्णय कायम* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *ग्रामीण महिला व महिला दिन* https://nasayeotikar.blogspot.com/2019/03/blog-post.html?m=1 लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *झाडदादा* - शीला अम्भुरे बिनगे, परतुर, जालना झाडदादा झाडदादा का रे तू उभा असा ? शिक्षा का केली कुणी कंटाळत नाही कसा ? ऊनपाऊस वारा थंड दुखत नाही का घसा? फळे फुले छाया देतो देण्याचा तुझा वसा. उमटवलास माझ्यावरी दातृत्वाचा गोड ठसा. *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" परिवर्तन " हा निर्सगाचा नियम आहे, तो न घाबरता मान्य  करावा.. संघर्ष करायला घाबरणे, ही डरपोक माणसांची लक्षणे आहेत...* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री कोण ?* नाशिकराव तिरपुडे 2) *हेलिकॉप्टरचा शोध कोणी लावला ?* इगोर सिकोसकी 3) *ऑस्ट्रेलिया खंडाचा शोध कोणी लावला ?* जेम्स कुक , 1608 4) *महाराष्ट्र राज्याची पूर्व-पश्चिम लांबी किती किमी आहे ?* 800 km 5) *भारतीय रिझर्व्ह बँकेने कोणत्या रकमेच्या नोटा हे प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याचे ठरवले आहे ?* 10 रू *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 भीमराव रेणके 👤 मनोज घोगरे 👤 अविनाश मोटकोलू *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *काहीही विपरीत घडले की त्याबद्दल इतरांना जबाबदार धरण्याची एक सार्वत्रिक प्रवृत्ती असते. आपली चूक कबूल करण्याऐवजी त्याला इतर लोक कसे दोषी आहेत, हेच बहुतेक जण सांगत असतात. चूक कबूल करण्यात बहुतेकांना कमीपणा वाटतो. त्यामुळे आपले चूक असले, तरी ते योग्य आहे असाच हेका अनेकजण लावतात. सार्वजनिक पातळीवर तर हे चित्र आणखी गडद होते आणि समाजातील सर्वच वाईट गोष्टींसाठी शासन यंत्रणेला दोषी ठरविले जाते. जनकल्याणाचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या सरकारकडून मोठ्या अपेक्षा असतात आणि बहुतेकदा अपेक्षाभंग होतो.* *देश आपल्यासाठी काय करणार यापेक्षा आपण देशासाठी काय करणार असे जाॅन. एफ. केनेडी यांनी म्हटले होते. 'मी साधा माणूस, मी काय करणार' असे उत्तर प्रत्येक जण देऊ शकतो. मात्र साधा माणूस खूप काही करू शकतो. सार्वत्रिक नियमांचे पालन करणे, आपला परिसर स्वच्छ ठेवणे, अफवा न पसरविणे अशा अनेक गोष्टी आपण करू शकतो. चांगला नागरिक बनण्याची सुरूवात घरापासून होते. सार्वजनिक नियमांचा आदर राखण्याची प्रवृत्ती मुलांमध्ये विकसित केली तरी पुष्कळ. लहान मुले मोठ्यांचे अनुकरण करतात, याची जाणीव न ठेवता मोठी माणसे गैरवर्तन करतात. त्यामुळे पुढील पिढीही तेच शिकते.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल-9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सुप्रभात, मित्रांनो साम्नैव यत्र सिद्धिर्न तत्र दण्डो बुधेन विनियोज्य: पित्रं यदि शर्करया शाम्यति कोsर्थ: पटोलेन।। माणसांनी परस्परांमधले संघर्ष शक्यतो समजुतीने सोडवावेत, असा संदेश देणाऱ्या वरील सुभाषितात कवी म्हणतो - जे काम सामोपचारानं होण्यासारखं आहे तिथं समजूतदार माणसानं शरीरबळाचा वापर करू नये. पित्ताचं शमन जर सारखेनं होत असेल, तर त्यासाठी परवर आणायची गरज नाही. राजनीती साम, दाम, दंड आणि भेद या चार खांबावर उभी असते. समाजनीतीलाही हीच चार तत्वं लागू पडतात माणसामाणसांतले संघर्ष सोडवण्याचे हे चार मार्ग असून, त्यांचा ज्या क्रमानं उल्लेख केला आहे त्याच क्रमानं उल्लेख प्रयोग करायचा असतो. वादविवाद किंवा संघर्ष निर्माण झाला, तर तो आधी सामोपचारानं मिटवायचा प्रयत्न करावा. सामोपचाराने प्रयत्न अयशस्वी ठरले तरच क्रमानं दाम, दंड आणि सगळेच उपचार व्यर्थ ठरले, तर शेवटी भेदाचा अवलंब करावा. पंडितजींच्या मुलानं प्रगतीपुस्तक घरी आणलं आणि त्यातले गणिताचे गुण पाहताच पंडितजींच्या मनात संघर्षाची ठिणगी पडली. त्यांच्या स्वभावक्रमानुसार त्याला दंड करण्यासाठी त्यांचा हात वळवळू लागला आणि त्याची मुलाच्या पाठीशी भेट झाल्यावरच ती वळवळ थांबली. खरं तर मुलाची गोड शब्दांत कानउघाडणी करून आणि स्वतः त्याच्या अभ्यासात लक्ष घालून म्हणजेच सामोपचाराने त्यांना हा प्रसंग हाताळता येऊ शकला असता. अशोक कुमावत, नाशिक (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या दैनंदिन जीवनात अनेक स्वभावाची, अनेक त-हेची माणसे भेटतात.त्यातली कधी चांगली तर कधी वाईटही वृत्तीची असू शकतात.तुम्ही जर चांगलीच माणसे भेटावीत असा अट्टाहास करत असाल तर ते चुकीचे आहे.चांगली माणसे कधी कधी आपल्याला जीवनाला चांगली दिशा देऊन जातात असे वाटत असेल तर ते काही अंशी चुकीचे होऊ शकेल.कारण चांगली माणसे कधीच तुमच्यातले दोष सांगत नाहीत, परंतु वाईट माणसे तुमच्यात असणारे काही दोष नक्कीच काढतात आणि निघून जातात.त्या माणसांना आपण वाईट म्हणतो.असेही म्हणणे चुकीचे ठरेल.अशीही माणसे जेव्हा आपल्यातल्या होणा-या आणि दडलेल्या चुकांना सुधारण्याची जणू संधी देऊन जातो हे लक्षात असू द्या. आपल्या जीवनात कोणी जरी आले त्याबद्दल वाईट वाटू देऊ नका.प्रत्येकामध्ये कोणता ना कोणता गुण दडलेला असतो त्याचे सूक्ष्म निरीक्षण करा आणि प्रत्यक्ष जीवनात सुधारणा करून चांगले जीवन जगायला शिका.मग कोणतेही माणसे तुमच्या जीवनात आली तरी त्यांच्याबाबतीत आपण संयमाची भूमिका घेऊन चांगले वाईट न म्हणता आपल्या जीवनात ती योग्यच आहेत असे मानत रहा.जग कसे जरी असले तरी तुम्ही मात्र चांगले जीवन जगण्यासाठी समर्थ राहा. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शहाणा गं माझा राजा* मनू शाळेच्या पायऱ्या उतरत होता. अचानक त्याला मुसमुसण्याचा आवाज आला. त्याने इकडे तिकडे पाहिलं, तर पायरीच्या कडेला एक फुलपाखरू पडलं होतं. फुलपाखरू जखमी होतं. " अरे काय काय झालं तुला? " मनूनं विचारलं. " तो गणू दृष्ट आहे. त्यांना मला पकडले . माझे पंख फाटले”. “ अरे रे! " “ आता मी घरी कसा जाऊ? मला आई पाहिजे ना.?” “ कुठे आहे तुझं घर?” “ त्या सुर्यफुलाच्या शेतात.” “ चल. मी नेतो तुला तुझ्या घरी.” “ हळूचं हं ! " मनून फुलपाखराला हळूच ओंजळीत घेतलं आणि सूर्यफुलाच्या शेतात अलगद सोडलं. घरी गेल्यावर मनूनं आईला ही हकीकत सांगितली. आईन मनूला जवळ घेतलं. मनूचा लाड केला आणि म्हणाली, “ शहाणा ग माझा राजा तो.” तात्पर्य.. मुक्या प्राणिमात्रांची काळजी घ्यावी. कोणालाही आपला त्रास होणार नाही. आपल्यामुळे इजा पोहोचणार नाही ही दक्षता घ्यावी. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

*📚उपक्रम📚* 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 *विषयः मराठी* *इयत्ताः दुसरी* *उपक्रमाचे नावः शब्दचक्र तयार करणे.व त्याशब्दांपासून अर्थपूर्ण वाक्ये तयार करणे.* *📚उद्दिष्टेः* विद्यार्थ्यांना एका शब्दांशी निगडीत अनेक शब्द माहिती होणे. व नवनिर्मीती आणि सर्जनशिलतेला वाव मिळणे. *✍कार्यवाही* सुरुवातीला फळ्यावर एक गोलाकार वर्तुळ काढून त्या गोलात एक शब्द देणे.त्यानंतर त्या शब्दांशी निगडीत असलेले शब्द विद्यार्थी स्वतःच्या मताने विचार करून लिहीतील.त्या लिहीलेल्या शब्दापासून अर्थपूर्ण वाक्ये तयार करतील. असे प्रत्येक गोलात एक एक शब्द देणे किंवा त्यांच्याकडूनच शब्द विचारून घेणे व गोलात लिहीणे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना अनेक शब्द लिहीता येतील व वाक्ये बनवता येईल. ह्या शब्दचक्राचा सराव तोंडी आणि लेखी स्वरूपात घेता येईल. *📚फलितः* अनेक नविन शब्दांची माहिती होईल. वैचारिक क्षमता वाढेल. विचार करून लिहील्याने लेखणाची आवड निर्माण होईल. अर्थपूर्ण वाक्ये लिहीण्याची सवय लागेल. 〰〰〰〰〰〰〰 ✍ प्रमिला सेनकुडे जि.प.प्रा.शाळा गोजेगाव. 〰〰〰〰〰〰〰

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 06/03/2020 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *स्वांतत्र्य दिन - घाना* *अलामो दिन - टेक्सास* 💥 ठळक घडामोडी :-  ● १९५३ : मराठीतील श्रेष्ठ नाटककार आचार्य अत्रे यांनी ‘श्यामची आई’ हा चित्रपट पडद्यावर आणला. ● १८६९: दिमित्री मेन्डेलीफने मूलभूत घटकपदार्थांची आवर्त सारणी प्रकाशित केली. ● २००० : शहर निर्वाह भत्ता (CCA), महागाई भत्ता (DA) आणि घरभाडे भत्ता (HRA) म्हणून मिळणारी रक्‍कम करपात्र असल्याचे सर्वोच्‍च न्यायालयाचे शिक्‍कामोर्तब ● १९९९ : जगप्रसिद्ध खजुराहो मंदिर समुहाच्या सहस्राब्दी सोहळ्याचे राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते उद्‍घाटन ● १९९८ : विख्यात गझलगायक जगजितसिंग यांना मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा ’लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर ● १९९७ : स्वाध्याय परिवाराचे संस्थापक पांडुरंगशास्त्री आठवले यांची टेंपलटन पुरस्कारासाठी निवड ● १९९२ : ’मायकेल अँजेलो’ नावाचा संगणक विषाणू पसरण्यास सुरूवात झाली. ● १९७५ : इराण व इराक यांच्यात सीमाप्रश्नावर संधी झाली. ● १९५३ : जॉर्जी मॅक्सिमिलानोव्हिच सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले. ● १९४० : रशिया व फिनलंड मधे शस्त्रसंधी झाली. ● १८४० : बाल्टिमोर कॉलेज ऑफ डेंटल सर्जरी हे पहिले दंतवैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले ● १९६४ - कॉन्स्टन्टाईन दुसरा ग्रीसच्या राजेपदी. ● १९७५ - अल्जियर्सचा तह - ईराण व इराकने सीमाप्रश्नी संधी केली. 💥 जन्म :- ● १९५७ : अशोक पटेल, भारतीय क्रिकेट खेळाडू. ● १९६५ : देवकी पंडीत – गायिका ● १९४९ : शौकत अजिझ – पाकिस्तानी राजकारणी ● १४७५ : मायकेल अँजेलो – इटालियन शिल्पकार आणि चित्रकार (मृत्यू: १८ फेब्रुवारी १५६४) 💥 मृत्यू :- ● १९९२ : प्रसिध्द कादंबरीकार रणजित देसाई. कर्तबगार प्रशासक स.गो.बर्वे. ● २००० : नारायण काशिनाथ लेले – कृष्ण यजुर्वेद शाखेतील वेदमूर्ती ● १९९९ : सतीश वागळे – हिन्दी आणि मराठी चित्रपट निर्माते ● १९८२: रामभाऊ म्हाळगी – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक, जनसंघ या राजकीय पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले सरचिटणीस आणि विधानसभेतील पहिले आमदार, तसेच भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राचे पहिले प्रादेशिक अध्यक्ष ● १९८१ : गो. रा. परांजपे – मराठीतील आघाडीचे विज्ञान प्रसारक, नामवंत शास्त्रज्ञ, ’रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’चे पहिले भारतीय प्राचार्य ● १८९९ - व्हिक्टोरिया कैउलानी, हवाईची राजकुमारी. ● १९३२ - जॉन फिलिप सूसा, अमेरिकन संगीतकार. ● १९५० - आल्बेर लेब्रन, फ्रांसचा फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष. ●१९५४ - पॉल, ग्रीसचा राजा. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 30 वर, दिल्लीतील प्राथमिक शाळा 31 मार्चपर्यंत बंद, पंतप्रधान मोदींचा बेल्जियम दौरा रद्द तर घाबरुन न जाण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मास्क घातल्याशिवाय त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांना नो एण्ट्री, साई मंदिरात स्वच्छतेवर भर, पंढरीत जनजागृती फलक लावले तर अंबाबाई मंदिरात भाविकांच्या हातावर सॅनिटायझर देणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *दिल्लीतील निर्भयाच्या चारही गुन्हेगारांना 20 मार्चला पहाटे फाशीची शिक्षा, पटियाला हाऊस कोर्टाचं डेथ वॉरंट, आरोपींसमोरचे सर्व पर्याय संपले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर, दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर तर कर्जाचा बोजाही वाढला, अहवालानुसार उद्योग, सेवा क्षेत्र, रोजगार अशा सर्वच आघाड्यांवर राज्याची घसरण झाली आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *गोंधळ घातल्याप्रकरणी काँग्रेसच्या सात खासदारांचं निलंबन, उर्वरित सत्रात सहभाग घेता येणार नाही, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांचा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबई : औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, औरंगाबाद असे करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारतीय महिला संघाची पहिल्यांदाच टी 20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक, ऑस्ट्रेलियाशी 8 मार्चला होणार अंतिम मुकाबला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *जागतिक महिला दिन विशेष* *तिला मदत ......?* https://b.sharechat.com/imxWyG1XB4?referrer=copiedLink लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आभाळाच्या शाळेत* - राजेंद्र अत्रे, जळगाव आभाळाच्या शाळेत ढग सारे आले। शिकत - शिकत हळू - हळू पेंगायला लागले। वारे गुरुजींचा तास सुरू झाला जेव्हा ... मैदानात आणले त्यांनी खेळायला तेव्हा। विजेरी शिट्टी फुंकून हुकुम त्यांनी दिला। गुद्दागुद्दी खेळायचा सुरू केला। खेळता - खेळता ढग खूप घामेघूम झाले। थेंब - थेंब अंगातून ओघळायला लागले। ढगांचा घाम आला खाली जमीनीवर। नाचायला लागली मुले रिमझिम तालावर॥ *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" जिवाभावाची, जिवलग, जीवाला जीव देणारी माणसं म्हणजे आयुष्यातील खरी संपत्ती, पैसा तर काय आज आहे उद्या नाही ....! "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *आंध्रप्रदेशातील नृत्यशैली कोणती ?* कुचिपुडी 2) *जगातील पहिल्या स्वयंचलित गाडीचे निर्माते कोण ?* कार्ल बेंज 3) *मासे कोणत्या इंद्रियाद्वारे श्वसन करतात ?* कल्ले 4) *भारतातील पहिला लाटांवर आधारित विद्युत प्रकल्प कोणता ?* कांडला 5) *सापाच्या कातडीचा मृतपेशींच्या थराला काय म्हणतात ?* कात *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अशोक पाटील दगडे, सरपंच, चिरली 👤 माधव रामू गोटमवाड, गुरुकुल इंग्लिश स्कूल कंधार, 8379848078 👤 सुरेश बावनखुळे, सहशिक्षक, माहूर 👤 मीनल आलेवार 👤 अविनाश गायकवाड 👤 कैलास वाघमारे 👤 राजू कांबळे 👤 दत्ताहरी शिवलिंग दुड्डे 👤 प्रकाश राजफोडे 👤 शेख झुबेर *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हातात काय आहे? बरेचसे तर हाताबाहेरचे आहे. जन्म-मरण हातात नाही. पुढचा क्षण कसा असावा, ते हातात नाही. भूतकाळ मागे सुटलेला, असल्याच तर ब-या-वाईट आठवणी. भविष्याच्या गर्भात काय दडले, माहित नाही. त्यामुळे त्याची उत्सुकता आणि त्याच्या अनिश्चिततेतून वाटणारी असुरक्षितता. भविष्यातील असुरक्षिततेवर मात करण्यासाठी भविष्याविषयीचे स्वप्नरंजन करणे किंवा कल्पनेचे मनोरे बांधणे हाच काय तो उतारा. हाही उतारा कधी क्षणात उधळला जातो आणि कल्पनेचे मनोरे जमीनदोस्त होऊन जातात आणि उरते ती अगतिकता आणि असहायता.* *थोडाफार हातात म्हटल्यापेक्षा चिमटीत आहे तो आताचा वर्तमानातील क्षण. तोही क्षण चिमटीत आहे म्हणता म्हणता निसटतो आणि भूतकाळाच्या शवागारात जमा होतो. वर्तमान हातात असतो, तेव्हा आपण ब-याच वेळा भूतकाळात रममाण असतो. नाहीतर भविष्यातील स्वप्नरंजनात दंग असतो. त्यामुळे हातात असलेला क्षण तसाच सटकून निसटून जातो. क्षणाक्षणाला प्रवाही असलेला क्षण जगता आला पाहिजे. तोच क्षण माझा; ना भूतकाळ माझा. तो तर मेलेला. ना भविष्य माझे; ते तर स्वप्न. आहे ते वर्तमान. यात जगता आले तरच ते जगणे. यासारखी नितांत सुंदर गोष्ट नाही.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मित्रांनो सर्वस्या: सरितो वारि प्रयात्यायाति चाकरात देहनद्या: पुनस्त्वायुर्यात्येवायाति नो पुन:।। शरीर नाशवंत आहे हे सांगताना कवी म्हणतो ,सगळया नद्यांच पाणी वाहून जात आणि त्याच्या उगमाकडून (नवीन) पाणी येत राहत. देहनदीच आयुष्यरूपी पाणी मात्र वाहून जात, पुन्हा (नवीन पाणी) येत नाही. मनुष्यदेह हा कवींच्या ,संतांच्या चिंतनाचा विषय आहे. त्यावर अनेक रूपक केलेली आढळतात. कुणी देहाला देवाच देऊळ मानून त्यात आत्म्याच्या रुपात विठ्ठलाला पाहिलं, तर कुणी देहाची तिजोरी करून तिच्यात भक्तीचा ठेवा पहिला. प्राचीन तत्वचिंतकांनी देहाला रथाची उपमा दिली आणि आत्मा या रथाचा सारथी आहे, अस म्हटलं. या कवीन देहाला नदीच्या रुपात पाहिलं. पाणी वाहून नेणारी नदी आणि आयुष्य वाहून नेणारी देहरूपी नदी या दोघींमध्ये वाहत राहणार हे साम्य आहे. परंतु जलवाहिनी नदी चिरंतन असते. काळाच्या ओघात तिच पाणी सतत वाहत असत. जरा बारकाईने पाहिलं तर लक्षात येत, की प्रतिक्षणी तीच पाणी बदलत असत. पहिल पाणी वाहत वाहत सागराला जाऊन मिळत आणि त्याची जागा घ्यायला उगमाकडून नव ताज पाणी येत राहत. नदीची ही प्रवाहनित्यता तिला चिरतरुण बनवते. देहनदीच तस नसत. तीही काळाच्या ओघात वाहत असते .शैशव, तारुण्य, प्रौढत्व, वार्धक्य अशी ठिकाण घेत घेत अखेर ती काळसागराला मिळते .पण जसजशी पुढे वाहते तसतस मागे वाळवंट शिल्लक राहत .तिच्या खाणाखुणाही राहत नाहीत. काही नद्या मात्र मागे वाळवंटात आपल्या सत्कृत्यांची भव्य शिल्प कोरून उरतात. जीवन त्यांना कळले हो,समजून घ्या. अशोक कुमावत, नाशिक (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• चंदन आणि संत यामध्ये खूप काही साम्य आहे.ज्याप्रमाणे चंदनाच्या सहवासात राहिलो तर चंदनाचा सुगंध आपल्या अंगाभोवती असल्याचे किंवा अंगाला येत असल्याचे जाणवते व आपणच चंदन झालो आहोत असे वाटायला लागते.चंदन जेव्हा सहानेवर पाणी टाकून घासायला लागतो तेव्हा ते स्वत: झिजायला लागते आणि त्याचा गंध सर्वत्र दरवळायला लागते. चंदनाचा गुण जसा आहे तसाच संतांचाही आहे.संतांच्या सहवासात जर आपण राहिलो तर आपल्या जीवनातले सारे दुर्गूण नष्ट होण्यास मदत होते तर त्यांचा सहवास आपल्याला चंदनासारखा नेहमी हवासा वाटायला लागतो.संत हे स्वत: जगाच्या कल्याणासाठी अविरत आपला देह झिजवतात ते स्वत:साठी जगत नाहीत तर आपल्या ईश्वराप्रती प्रेम निर्माण व्हावे,आपण सन्मार्गाला लागावे,आपण मानवतेच्या दृष्टीने आपल्याकडून काहीतरी चांगले कर्म घडावे.आपल्यातला खरा माणूस जागा व्हावा.आपला जन्म इतरांच्या काही चांगल्या कारणी लागावा यासाठी नेहमी सांगत असतात झिजवत असतात.चंदन आणि संत हे दोघेही तितकेच मानवाच्या जीवनात महत्वाचे आहेत.म्हणून चंदन आणि संत यांच्यात साम्य आहे आणि यांचा सहवास नित्य राहिला तर नक्कीच आपले कल्याण होईल. © व्यंकटेश काटकर, नांदेड संपर्क.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ 🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कुणा ना व्यर्थ शिणवावे* एकदा महात्मा गांधींजीन कडे एक गृहस्थ आली होते. बोलता बोलता गांधींजींच्या लक्षात आले की त्या गृहस्थांच्या अंगातील सदऱ्याची बाही उसवली आहे. महात्मा गांधीजींनी त्यांच्या हे लक्षात आणून दिले. व त्या गृहस्थास हे लक्षात आल्यावर ते म्हणाले, " घरी गेल्यावर पत्नीकडून शिवून घेईन." यावर महात्मा गांधीजी म्हणाले, " एवढ्या साध्या गोष्टीसाठी कशाला त्यांना त्रास देता? " असे म्हणून महात्मा गांधींजींनी त्यांच्याकडे तो सदरा मागितला व सुई दोरा घेऊन स्वतः शिवून दिला. तात्पर्यः स्वतःची कामे स्वतः करावे. आपल्यामुळे कोणासही ञास होणार नाही, ही काळजी घ्यावी. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 05/03/2020 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *समता दिन* 💥 ठळक घडामोडी :-  ● १९३१ : महात्मा गांधीजीनी उभारलेल्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीनंतर गांधी आणि आयर्विन यांच्यामध्ये करार झाला. ● २००० : पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते कर्नाटकातील कैगा अणूवीजप्रकल्प (युनिट – २) राष्ट्राला अर्पण ● १९९९ : ’इंडियन फिजिक्स असोसिएशन’ तर्फे देण्यात येणार्‍या आर. डी. बिर्ला स्मृती पारितोषिकासाठी डॉ. जयंत नारळीकर व प्रा. अशोक सेन यांची निवड ● १९९८ : नेहमीच्या अस्त्रांबरोबरच कमी पल्ल्याची विमानभेदी क्षेपणास्त्रे सोडू शकणार्‍या, रशियाकडुन घेतलेल्या ’सिंधुरक्षक’ या पाणबुडीचे मुंबई येथे आगमन ● १९९७ : ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या सप्तशताब्दीच्या सांगतेनिमित्त राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते ज्ञानेश्वरांची प्रतिमा असणार्‍या टपाल तिकिटाचे प्रकाशन ● १९६६ : मैसूरचे माजी संस्थानिक जयचामराजेन्द्र वडियार यांचा बंगळूर येथील राजवाडा व त्यासभोवतालची जागा राज्य सरकारच्या ताब्यात घेण्याची परवानगी देणारे विधेयक कर्नाटक विधानसभेत संमत ● १९३३ : भयानक मंदीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांनी सर्व बँका काही दिवसांसाठी बंद केल्या व आर्थिक व्यवहारांवर बंदी घातली. ● १९३१ : दुसर्‍या गोलमेज परिषदेपुर्वी गांधी-आयर्विन करार झाला. ● १६६६ : शिवाजीमहाराजांनी राजगडावरून आग्र्यास प्रयाण केले. ● १८५१ : ’जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ची (GSI) स्थापना ● १५५८ : फ्रॅन्सिस्को फर्नांडीस याने धूम्रपानासाठी सर्वप्रथम तंबाखूचा वापर केला. ● १०४६ - पर्शियन कवी व प्रवासी नसीर खुश्रोने आपल्या सात वर्षांच्या मध्य-पूर्वेच्या भ्रमंतीची सुरुवात केल. या प्रवासाचे वर्णन त्याने सफरनामा या आपल्या पुस्तकात करून ठेवलेले आहे. ● २००१ - मक्केत हज सुरू असताना ३५ भाविकांचा चेंगरुन मृत्यू. 💥 जन्म :- ● १५१२ : भूगोलतज्ज्ञ, गणित आणि नकाशा शास्त्राचे जनक जेरार्डस मर्केटर. रामकृष्ण परमहंस. ● १९१६ : बिजू पटनायक – ओरिसाचे मुख्यमंत्री, केन्द्रीय पोलाद, खाणकाम आणि कोळसा मंत्री (मृत्यू: १७ एप्रिल १९९७) ● १९१३ : गंगूबाई हनगळ – किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका (मृत्यू: २१ जुलै २००९) ● १९०८ : सर रेक्स हॅरिसन – ब्रिटिश आणी अमेरिकन रंगभूमीवरील आणि हॉलिवूड चित्रपटांतील अभिनेते (मृत्यू: २ जून १९९०) ● १८९८ : चाऊ एन लाय – चीनचे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ८ जानेवारी १९७६) ● १५१२ : गेरहार्ट मरकेटर – नकाशाकार, गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ (मृत्यू: २ डिसेंबर १५९४) ● १९४२ - फेलिपे गॉन्झालेझ, स्पेनचा पंतप्रधान. ● १९५९ - वाझ्गेन सर्ग्स्यान, आर्मेनियाचा पंतप्रधान. 💥 मृत्यू :- ● १९६८ : मराठीचे संशोधक नारायण गोविंद चाफेकर. ● १५३९ - नुनो दा कुन्हा, भारतातील पोर्तुगीझ गव्हर्नर. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळांशी निगडीत शाळा सुरु करण्याचा फडणवीस सरकारचा निर्णय ठाकरे सरकारनं रद्द केल्याने, हा निर्णय एकतर्फी घेण्यात आल्याचा आरोप करत उस्मानाबाद जिल्ह्यातल्या दोन गावांमध्ये सरकारविरोधात आंदोलन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई : कोरोना व्हायरसच्या रुग्णांमधील मृत्यू दराचे प्रमाण 3.4 टक्के आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाझेशनने दिलेल्या माहितीनुसार मृत्यू दराचे प्रमाण वाढत असून जगात आतापर्यंत 3200 लोकांचा मृत्यू झाला आहे तर जगात 93 हजार पेक्षा जास्त लोकांना याचा संसर्ग झाला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *महाविद्यालयीन शिक्षकांचं मुंबईत आंदोलन, आंदोलनामुळे बारावीच्या निकालासाठी उशीर होण्याची चिन्ह, शिक्षकांची शंभर टक्के अनुदानित शाळेतील वाढीव पदांची मान्यता देण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मराठी चित्रपटांच्या तिकिटांवर असलेला १२ व १८ टक्के असा जीएसटी रद्द करावा, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची मागणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *ललित कला क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी महाराष्ट्रातील तेजस्विनी सोनवणे, सागर कांबळे, रतनकृष्ण शहा, दिनेश पांड्या या चार कलाकारांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय ललित कला अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *येत्या 01 एप्रिलपासून पूर्वीप्रमाणेच सर्व आश्रमशाळांना बी पी एल दराने अन्नधान्य पुरवठा करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारताचे माजी कसोटीवीर सुनील जोशी यांची बीसीसीआयच्या सीनियर निवड समितीच्या अध्यक्षपदी करण्यात आली नियुक्ती.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शिक्षण म्हणजे विचार करण्याची कला* http://nasayeotikar.blogspot.com/2018/05/32.html    लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• एक होती कळी - एकनाथ आव्हाड, मुंबई एक होती कळी जराशी ती खुळी गुपचूप बसायची मुळीच नाही हसायची वारा आला बोलायला पाखरू आलं खेळायला तिला पडली भूल कळीचं झालं फूल फूल लागले डोलायला चुरचुरू डोलायला *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• _*प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसतं, पण मीठ मात्र नक्की असतं…*"_ *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *अंतर मोजण्याचे एकक कोणते ?* किलोमीटर 2) *देशातील पहिलं महिलांचं पोलिसस्थानक कोणते ?* कालिकत 3) *'भारतीय शेक्सपिअर' असे कोणाला म्हटले जाते ?* कालिदास 4) *भारतीय हरितक्रांतीचे जनक कोण ?* एम. एस. स्वामिनाथन 5) *भारतातील सर्वात उंच मिनार कोणते ?* कुतूबमिनार *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 माणिक आहेर, सहशिक्षक, नाशिक 👤 गंगाधर मदनूरकर, सहशिक्षक 👤 बाळू भगत 👤 अशोक कहाळेकर 👤 गंगाधर नुकूलवार, सहशिक्षक, 👤बालाजी तिप्रेसवार, उमरी 👤 रमेश मेरलवार, करखेली 👤 समाधान शिंदे, कवी *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपले आयुष्य तसे सामान्यच आणि स्वप्नेही तशीच; पण असामान्य व्यक्तींची 'स्वप्ने' लोकविलक्षणच असतात. संत एकनाथांना ज्ञानेश्वरांनी स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की,'अजानवृक्षाची मुळी माझ्या गळ्याभोवती वेढली गेली आहे. ' एकनाथांनी मग आळंदीला जाऊन ज्ञानदेवांची समाधी शोधून काढली. तिचा जिर्णोद्धार केला. इतकेच नव्हे, तर ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली. तुकारामांच्या स्वप्नात संत नामदेव आले आणि त्यांनी आपली शतकोटी अभंगाची प्रतिज्ञा पूर्ण करावी, असे तुकोबांना सुचविले. जिजाऊंनी शिवरायांच्या राज्याभिषेकाचे स्वप्न मनोमन पाहून शिवरायांना स्वराज्याचे तोरण बांधण्याची प्रेरणा दिली होती.* *स्वामी विवेकानंदांनी कन्याकुमारी येथे खडकावर, ध्यानमग्न स्थितीत, दैदिप्यमान भारताचे स्वप्न पाहिले. 'देशवासियांच्या जाड्याभरड्या अन्नवस्त्राची तरी सोय व्हावयास हवी.' हे रामकृष्ण परमहंसांचे बोल त्यांच्या मनात गुंजत होते. बोधिवृक्षाखाली ध्यानस्थ बसलेल्या गौतम बुद्धांचे मनही उपेक्षित लोकांसाठी तळमळत होते. स्वत:पलिकडे लोककल्याणाचा ध्यास घेतलेल्यांची स्वप्ने भव्य-दिव्य असतात. संत कबीर यांनी प्रत्येक जीवाने सत्-चित् , आनंदरूप व्हावे, अशी आस बाळगली, तर तुकडोजी महाराजांनी भेदभावरहित सुखी भारताची आकांक्षा धरली.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाईल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मित्रांनो, केशवकुमारांची एक कविता आठवली एके दिनी परंतु, पिल्लास त्या कळाले, भय वेड पार त्याचे,वाऱ्यासवे पळाले पाण्यात पाहतांना, चोरुनिया क्षण, त्याचेच त्या कळाले, तो राजहंस एक। आपल्यातील भयभीत पणाला दूर करा ,कुठल्याही परिस्थितीत संकटांचा स्वीकार करायला शिका. स्वप्ने ती नसतात,जी झोपल्यावर पडतात,स्वप्ने ती असतात जी जागेपणी पडतात. कुठलंही स्वप्नं खूप मोठं नसतं आणि स्वप्नं पाहणारा लहान नसतो”. मोठी स्वप्नं फक्त तुमच्याच नाही तर इतर अनेकांच्या सकारात्मक बदल घडवून आणत असतात. त्यांना प्रेरित करत असतात. त्यामुळे मोठी स्वप्नं बघा, त्या दिशेने काम करा आणि इतरांना सुद्धा प्रेरणा द्या. कारण जगात काहीही अशक्य नाही!!! सर रॉजर बॅनिस्टर, चार मिनिटांपेक्षाही कमी वेळात एक मैल अंतर धावणारी जगातील पहिली व्यक्ती. १९५४मध्ये त्यांनी हा कारनामा केला होता. तोपर्यंत चार मिनिटांत एक मैल धावणे ही लोकांना अशक्य गोष्टच वाटत होती. त्यांना वाटायचे मानवी शरीराच्या मर्यादांमुळे कुठलाही माणूस एवढ्या वेगाने पळू शकत नाही. ही अशक्य अशी गोष्ट आहे. पण बॅनिस्टर यांनी सगळ्यांना खोटे ठरवले. त्यांनी स्वतःवर मेहनत घेतली. कठोर परिश्रम केले आणि महत्त्वाचं म्हणजे आपण हे करू शकतो हा विश्वास कायम ठेवला. महान लोकांची हीच तर खासियत असते. ही माणसं म्हणजे त्या मेणबत्तीसारखी असतात, जी स्वतः जळून इतरांचं जीवन प्रकाशमान करत असते. त्यांच्या जीवनात आशेचा आणि प्रेरणेचा नवीन किरण जागवत असते. मग जर ते करू शकतात, तर तुम्हाला का नाही जमणार? जर तुम्ही स्वयंशिस्त, चिकाटी या गोष्टी आत्मसात केल्या, आयुष्यात नवनवीन आव्हानं स्वीकारत गेलात, चालढकल करणे थांबवले, तर तुमची स्वप्नं साकार करण्यापासून तुम्हाला कुणीही थांबवू शकणार नाही. आणि या प्रवासात तुम्ही अनेक लोकांच्या आयुष्यातील असा प्रकाशाचा किरण बनाल, ज्याच्यामुळे अनेकांना यश मिळवण्याच्या मार्गावर चालना मिळते. अशोक कुमावत (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जी स्वप्ने स्वत:च्या बाबतीत पहाता त्यावेळी तुमचे स्वप्न साकार करण्यासाठी खूप प्रयत्न करता आणि जिद्दीने पूर्ण करुन आनंदाने स्वीकारता तो तुमचा यशस्वी प्रयोग आहे.जसे तुम्ही तुमच्याबाबतीत दुसऱ्यांनी हस्तक्षेप करु नये असे वाटते आणि त्याप्रमाणे तुम्ही प्रयत्न ही करता.असाही विचार इतरांच्या बाबतीत केला जावा अशी धारणा आपण जर मनात निर्माण केली तर इतरांचीही स्वप्ने पूर्णत्वास जातील.त्यांच्या बाबतीत मनात कोणताही वाईट विचार आणू द्यायचा नाही.कारण दुसऱ्यांनी देखील तुमच्याबाबतीत कोणताही वाईट विचार आणला नव्हता म्हणून तर तुमचे स्वप्न साकार झाले.जसे आपल्याबाबतीत चांगले चिंतितो तसे इतरांच्या बाबतीतही चांगलेच चिंतायला हवे तरच दोघांचेही त्यात समाधान आहे आणि दोघेही सुखासमाधानाने राहून जीवन जगू शकतात. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हुशार गाढव* रामू मटकी व विटा बनवत असे. त्याने गाढव व कुञा आहे प्राणी पाळले होते. कुत्रा घराची राखण करीत असे. गाढव स्वतःच्या पाठीवरून माती ,विटा वाहून नेत असे. रामू माठ बाजारात घेऊन जाताना कुत्र्याला सोबत नेत असे. त्यामुळे गाढवाला कुत्र्याचा खूप राग येई. त्याला वाटायचं, " हा कुत्रा कधी एक पैशाचं काम करत नाही की एक मातीचं पोत उचलत नाही. सारखा मालकाला मस्का मारत इकडेतिकडे फिरत राहतो." एक दिवस कुत्रा गाढवा जवळ आला आणि म्हणाला, " मला तुझी मदत हवी आहे. काल रात्री आपल्या अंगणातल्या झाडामागे एक जंगली कोल्हा लपला होता. अंधारात लुकलुकणारे त्याचे डोळे मी पाहिले. मी त्याच्यावर भुंकलो सुद्धा ! पण तो अजिबात भ्यायला नाही. उलट नख दाखवत माझ्यावरच गुरगुरला....... हे जर मालकाला कळलं तर तो माझी चटणी करेल." " पण मी काय मदत करणार?" गाढव म्हणाले. " गाढवाच्या खिंकाळण्याला जंगलातली कोल्हे जाम घाबरतात. गाढवं ओरडू लागले की, कोल्हे स्वतःचा जीव घेऊन पळू लागतात, अस मी ऐकलंय. म्हणून आज रात्री कोल्हा आला की मी तुला इशारा करेन. मग तू त्याच्याजवळ जाऊन जोरात खिंकाळलास की तो घाबरून धूम पळून जाईल आणि मालक मला शाबासकी देईल." कुत्र्याची लबाडी गाढवाचा लक्षात आली. तो म्हणाला, " असं कसं? काम मी करणार आणि मालकाची शाबासकी तुला मिळणार?" हे ऐकून कुत्रा खाली मान घालून निघून गेला. तात्पर्यः कोणी आपणास कितीजरी मूर्ख समजले तरी आपला हुशारीपणा योग्य वेळ आली की समोरच्याला दाखवायचा असतो. मग समोरचा किती जरी हुशार असला तरी त्याला खाली मान घालायची वेळ येईल. आपण केलेल्या मेहनतीचा कामाची शाबासकी स्वतः मिळवायची असते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 04/03/2020 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *औद्योगिक सुरक्षा दिवस* 💥 ठळक घडामोडी :-  ● १८६१ : अब्राहम लिंकन अमेरिकेचे १६ वे अध्यक्ष झाले ● १९६१ : भारतीय नौदलात १ ले विमानवाहू जहाज ‘विक्रांत’ दाखल झाले. ● १९८४ : महाराष्ट्रात वीजनिर्मितीचा नवा विक्रम याच दिवशी झाला. ● १९५१ : आशियायी सामन्यास प्रारंभ झाला. ● १९३० - दांडीयात्रेच्या सफलतेने प्रभावित भारतातील ब्रिटीश व्हाइसरॉय एडवर्ड फ्रेडरिक लिंडली वूड व महात्मा गांधींच्यात बैठक. भारतात देशी मिठाचा मुक्त वापर करू देण्याचा सरकारचा निर्णय तसेच दांडीयात्रेदरम्यान पकडललेल्या राजकैद्यांची मुक्तता करण्याचे आश्वासन. 💥 जन्म :- ● १९२२ - दीना पाठक, गुजराती व हिंदी अभिनेत्री. 💥 मृत्यू :- ● १९७१ : कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धन. ● २००७ : सुनील कुमार महातो, भारतीय संसदसदस्य. ● २०११ : अर्जुन सिंग, भारतीय राजकारणी. ● १९४८ : बाळकृष्ण शिवराम मुंजे, भारतीय-मराठी राजकारणी, हिंदू महासभेचे संस्थापक. ● ११८१ : टोरिन थॅचर, भारतीय अभिनेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *भारतात कोरोनाचा धोका वाढला, कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सहावर, प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारचे शर्थीचे प्रयत्न, नाशिकमध्ये आढळलेल्या दुसऱ्या संशयितावर उपचार सुरु* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुस्लिम आरक्षणावरुन ठाकरे सरकारमध्ये दुमत, अध्यादेश काढणार असल्याचा मंत्री नवाब मलिकांचा दावा तर अद्याप निर्णय नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर, आतापर्यंत 7 लाखांहून अधिक कर्जखात्यात 4 हजार 807 कोटींची रक्कम जमा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका, निवडणूक प्रतिज्ञापत्र प्रकरणी पुनर्विचार याचिका फेटाळली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *कालपासून दहावीच्या परीक्षेला प्रारंभ, जळगावात दहावीचा मराठीचा पेपर फुटला, परीक्षेत कॉपी बहाद्दरांचा सुळसुळाट, यवतमाळमध्ये भिंतीवर चढून कॉपी देण्यासाठी धडपड तर बीडमध्ये कॉपी पुरवण्यासाठी जीव धोक्यात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पुणेकरांना सार्वजनिक वाहतूकीकडे आकर्षित करण्यासाठी महापालिकेनं आणखी एक योजना आणलीय. PMPL बस मध्ये दहा रुपयात दिवसभर प्रवासाचा पास मिळणार, महापालिकेच्या वार्षिक अंदाजपत्रकात त्याची घोषणा करण्यात आलीये. * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *शंभर युनिट पर्यंत वीज मोफत देणे तसेच शेतकऱ्यांना दिवसा देखील चार तास वीज देण्याचे प्रस्तावित आहे, असे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विधान परिषदेत सांगितले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *शालांत परीक्षार्थींना शुभेच्छा* https://shopizen.page.link/ECzKbpKWAgvE6wio8 लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मी अंधाराला घाबरत नाही* - बालाजी मदन इंगळे, औरंगाबाद 9881823833. गच्च काळोख सगळीकडे किर्रर्रर्र करती रातकिडे चालताना मी चाचरत नाही || मी अंधाराला घाबरत नाही… भुंकणे कुत्र्यांचे सुरू होते भूत गोष्टीतले समोर दिसते तरी छाती धडधडत नाही || मी अंधाराला घाबरत नाही… सारे दोस्त लपून बसतात घरामध्ये दडून बसतात मी बिनधास्त फिरत राही || मी अंधाराला घाबरत नाही… अंधार म्हणजे पृथ्वीची सावली त्यात आलीय भिती कसली मी भिऊन घरी बसत नाही || मी अंधाराला घाबरत नाही… *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" कोणालाही नेहमीच दुःख होत नाही आणि कोणालाही नेहमीच सुख ही मिळत नाही "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *आहाराचे मोजमाप कोणत्या एककात होते ?* कॅलरी 2) *भगवान बुद्धाचे निर्वाण स्थळ कोणते ?* कुशीनगर 3) *आग विझविण्यासाठी वापरला जाणारा वायू कोणता ?* CO2 4) *पृथ्वीच्या जागतिक तापमान वाढीस कारणीभूत असलेला वायू कोणता ?* CO2 5) *उष्णता मोजण्याचे एकक कोणते ?* कॅलरी *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 मारोती छपरे, माध्य. शिक्षक 👤 मजहर सौदागर, सहशिक्षक  👤 साहेबराव पहिलवान, धर्माबाद 👤 अनिल गडाख  👤 ज्ञानेश्वर नाटकर 👤 कृष्णा सुधीर बुधावले 👤 गणेश राजपुरे 👤 राहुल जाधव 👤 कैवल्य धनराज पवार *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खूप हवे आहे. खूप गोष्टींचा हव्यास आहे. नाव पाहिजे. सन्मान पाहिजे. संपत्तीही हवीच आहे. समजा हे सर्व मिळाले तर त्यापेक्षा अधिक हवे आहे. पाहिजे ते मिळाले नाही तर स्वभाविकपणे निराशा आहे. मिळाले त्यापेक्षा अधिक मिळायला हवे होते. ते मिळाले नाही म्हणूनही निराशा आहे. अशा अवस्थेत,'ये सब मोह है, माया है' असे कोणी सांगतो. त्यातही दिलासा असतो. अखंड धडपड केल्यानंतरही कोल्ह्याला द्राक्ष मिळत नाहीत. त्याला कमालीची निराशा येते. त्या निराशेतून मुक्त होण्यासाठी मग तो त्या द्राक्षांनाच आंबट ठरवून मोकळा होतो. जे मिळत नाही ते 'आंबट' ठरवून मोकळे होणे काय किंवा त्याला 'मोह है, माया है' म्हणत बाद ठरविणे काय दोन्ही निराशेवर मात करण्यासाठी तेवढेच उपयोगी असतात.* *अशा ताणाच्या, निराशेच्या वेळी थोडासा 'भ्रम' किंवा थोडीशी 'भूल' माणसांना हवी असते का? ती 'देव' आणि 'धर्म' यातून मिळते का? म्हणून देवधर्माचे व्यापारी नाडवणूक, शोषण करतात. हे उघड सत्य आहे. धर्म ही 'अफूची गोळी' आहे, असे मार्क्स म्हणतो. ऑपरेशनची वेदना नको म्हणून त्या दरम्यान भूल दिली जाते. तेवढ्यापुरत्या का होईना वेदना सुसह्य होतात. 'जगणे ते मरणे' या दरम्यानच्या आयुष्याचे जे ऑपरेशन होत असते. त्यासाठी तर 'देव' आणि 'धर्म' या कल्पनांची आवश्यकता नसेल.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मित्रांनो सांगू तरी कसे मी भय कोवळे उन्हाचे, उसवून श्वास माझा, फसवून रात गेली. पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर, उठी उठी गोपाळा, अरुणोदय झाला, ही सकाळची,पहाटेची गाणी ऐकली की जीवनात पुन्हा खोलवर जाऊन यथेच्छ डुबाव वाटत. सुंदर सकाळ पुन्हा उगवल्याच्या आनंदाने असंख्य पक्ष्यांचा मंजुळ प्रभातराग वातावरणाला संगीतसाज चढवतो आहे. निरभ्र, निळ्याशार आभाळाच्या क्षितिजाशेजारच्या टोकावर धुक्याच्या पांढुरक्या रेघेने सीमारेख आखली आहे. पूर्वेकडचं तांबुडकं हळूहळू रूपेरी झाक घेऊ लागलंय आणि डोंगरांच्या निळ्या रांगा आपल्या मूळ रंगानिशी जाग्या होऊ लागल्या आहेत... ही वेळ मोठी वेगळीच असते. खरं तर ही जीवनासाठी घेऊन येणारा नवा दिवस साजरा करण्याची वेळ! पण त्या साजरेपणासाठी वेळ काढण्याएवढा निवांतपणा सगळ्यांकडे नसतो. आपण ज्याला ‘जागं होणं’ म्हणतो, ज्या किलबिलाटाला संगीत वगैरे म्हणतो, ते सारं, खरं म्हणजे नव्या दिवसासाठी जगण्याच्या धडपडीचीच एक सुरुवात असते. ती जाणीव मनाला शिवू न देता बाजूला ठेवून आपण त्याकडे पाहतो, म्हणून तीदेखील आपल्याला सुरम्य वगैरे वाटत असते... म्हणूनच, जगण्यासाठीचं ‘जीवन’ शोधण्यासाठी अज्ञाताच्या भरवशावर पिल्लांना फांदीवरच्या घरट्यात सोडून आकाशात भरारी घेणारी बगळ्यांची रांग पाहून आपल्याला आनंद होतो, कविताही सुचतात... पण या रांगेतल्या प्रत्येकाच्याच मनात, लवकरात लवकर अन्न शोधून पिल्लांच्या चोचीत घास भरविण्यासाठी घरी परतण्याचीच आस असते. झाडांच्या पानापानाआड किलबिलाट करून, मंजुळ स्वरात गाण्याचे आलाप आळवणारी चिमणी पाखरं, काही सदान् कदा केवळ प्रणयगीतेच गात बागडत नसतात... या सुरांनी जेव्हा आपल्या कानांना सुखाची आणि आनंदाची अनुभूती येते, तेव्हा त्यांच्या नजरा आणि चोची मात्र जगण्याचं आणि पिल्लांना जगविण्याचं साधन असलेल्या अन्नाच्या शोधातच भिरभिरत असतात! . आत्ता, क्षणापूर्वी, आभाळातून, अशीच एक बगळ्यांची माळ फुलली, बघता बघता क्षितिजावरच्या त्या पांढुरक्या रेषेत विरघळून गेली. तिथे बहुधा, पाणवठा असावा... आता ती माळ जमिनीवर मात्र अस्ताव्यस्त विसावेल. बकध्यान सुरू होईल... ...आणि पाण्यातले मासे, भयभरल्या नजरांनी पाण्यापलीकडे पाहत, स्वत:स वाचविण्याची पळापळ सुरू करतील! उजाडलेल्या नव्या दिवसाची संध्याकाळ पाहावयास मिळेल की नाही या भयाने!... सकाळ ही अशीच असते! नेहमीच! कुणी जगण्याचा आनंद साजरा करू लागतो, तेव्हा दुसरा कुणी जेमतेम जगण्याची धडपड सुरू करत असतो! तरीही आपण मात्र एकमेकांना म्हणतो, ‘शुभ सकाळ’! कारण आपण नेहमीच पहिल्या वर्गात स्वत:ला पाहत असतो! जगण्याचा आनंद साजरा करणाऱ्या वर्गात!... अशोक कुमावत (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• एखाद्या मंदिरात जाऊन देवाला फुलांचा हार घालून प्रसाद म्हणून नारळ फोडण्यापेक्षा एखाद्या वाचनालयासाठी हार नारळासाठी लागणा-या पैशापेक्षा त्याच पैशातून एखादे पुस्तक घेऊन वाचकांसाठी वाचनालयास भेट दिली तर चारजण वाचण्यासाठी प्रवृत्त होतील आणि ज्ञान घेतील की,ज्यामुळे चांगले जीवन जगण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळेल. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०. 📓📚📓📚📓📚📓📚📓 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आत्मपरीक्षणाची गरज* एक दिवस नेहमीप्रमाणे ऑफीसमध्ये आलेला प्रत्येक कर्मचारी समोरच्या बोर्ड वाचून आश्चर्य चकित होत होता. " तुमची प्रगती रोखणाऱ्या व्यक्तीचा काल मृत्यु झाला आहे, त्याच्या अंतयात्रेत नक्की सामिल व्हा. " सुरवातीला प्रत्येकाला कुठल्या न कुठल्या सहकाऱ्या बद्दल वाईट वाटल.पण नंतर उत्सुकता वाढली, माझी प्रगती रोखणारा नक्की कोण???? यासाठी प्रत्येकजण,शवपेटीच्या जवळ जाऊ,लागला. शवपेटीत डोकावून बघताच प्रत्येकाचे डोळे विस्फरले, शरीर स्तब्ध झाले, तोंडातून शब्द फुटेना. कारण शवपेटीत एक मोठा आरसा ठेवला होता. प्रत्येकजण त्यात स्वतःला बघत होता. शवपेटीच्या जवळच एक बोर्ड ठेवला होता, "या जगात तुम्हाला जर कोणी प्रगती पासून रोखु शकतो तर तो फक्त अन फक्त तुम्ही स्वतः" कंटाळा, आळस, नाकर्तेपणा, कारणे सांगणे, प्रत्येक गोष्टीमधून पळवाट काढणे हे फक्त तुम्ही फक्त स्वतःसाठी करत असता. तुमच आयुष्य कधीही मित्र, कंपनी, जॉब, बॉस बदलल्यामुळे बदलत नाही. ते बदलते फक्त आणि फक्त तुम्ही बदलता तेव्हाच.आयुष्याच्या शेवटापर्यंत दुसऱ्याला कितीही दोष दिला तरी तुमची परिस्थिती बदलणाार नाही. दुसऱ्याच्या आड़ तुमचा नाकर्तेपणा किती दिवस झाकाल? तुम्ही तेव्हाच मोठे होवू शकता; जेव्हा तुम्ही स्वतः मोठे व्हायचं ठरवाल.त्यासाठी तुम्हाला स्वतःला कष्ट,मेहनत, परिश्रम घेण्याची तयारी ठेवावी लागेल. अन्यथा या जन्मात तुम्हाला मोठे करणे कुणालाही शक्य नाही. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 03/03/2020 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागतिक वन्यजीव दिन* *हिनामात्सुरी - जपान* *शहीद दिन - मलावी* *मुक्ति दिन - बल्गेरिया*. 💥 ठळक घडामोडी :-  ● १९३९: मुंबई येथे मोहनदास गांधी यांनी भारतात हुकूमशाही नियम निषेध उपास सुरु केला होता. ● १९२३: वेळ नियतकालिक प्रथमच प्रकाशित झाले होते. ● १९९१- रेल्वे कर्मचाऱ्यांचे पहिले मराठी साहित्य संमेलन झाले ● १८८५: अमेरिकन टेलिफोन व तार कंपनी न्यू यॉर्क मध्ये समाविष्ट झाले। ● २००५ : स्टीव्ह फॉसेट यांनी ’ग्लोबल फायर’ या मुलुखावेगळ्या विमानातून एकट्याने आणि पुन्हा इंधन न भरता ६७ तासात पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली. ● २००३ : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणार्‍या ‘शरच्‍चंद्र चटोपाध्याय’ पुरस्कारासाठी ज्येष्ठ लेखिका डॉ. सरोजिनी वैद्य यांची निवड ● १९९४ : जयपूर येथील गिटारवादक पंडित विश्वमोहन भट यांना ’ग्रॅमी पुरस्कार’ प्रदान ● १९७३ : ओरिसात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. ● १९६६ : डॉ. धनंजयराव गाडगीळ पुणे विद्यापीठाचे सहावे कुलगुरू झाले. ● १९४३ : दुसरे महायुद्ध – लंडनमधे बॉम्बविरोधी आश्रयस्थानात घुसताना झालेल्या चेंगराचेंगरीत १४३ ठार ● १९३० : नाशिक येथील काळा राम मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला. ● १८८५ : अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनी (AT &T) ची स्थापना झाली. ● १८६५ : हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कार्पोरेशन (HSBC) ची स्थापना झाली. ● १८४५ : फ्लोरिडा हे अमेरिकेचे २७ वे राज्य बनले. इ. स. ७८ : शालिवाहन शकास प्रारंभ. 💥 जन्म :- ● १८३९- टेलिफोनचा जनक ग्रॅहॅम बेल यांचा जन्म ● १८६०- प्लेग प्रतिबंधक लस शोधणाऱ्या डॉ. हापकीन यांचा जन्म ● १९२८- अख्तर हुसेन यांचा जन्म ● १९७७ : अभिजीत कुंटे – भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रँडमास्टर ◆ १९७० : इंझमाम उल हक – पाकिस्तानी क्रिकेटपटू ● १९६७ : शंकर महादेवन – गायक व संगीतकार ● १९५५ : जसपाल भट्टी – विनोदी अभिनेते ● १९३९ : एम. एल. जयसिंहा – कसोटी क्रिकेटपटू, शैलीदार फलंदाज ● १९२६ : रवि शंकर शर्मा ऊर्फ ’रवि’ – संगीतकार ● १८४७ : अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल – स्कॉटिश – अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक, टेलिफोनचा संशोधक ● १८४५ : जी. कँटर – जर्मन गणितज्ञ ● १८३९ : जमशेदजी नसरवानजी टाटा – आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार व टाटा उद्योग समुहाचे संस्थापक 💥 मृत्यू :- ● २००० : रंजना देशमुख, मराठी चित्रपट अभिनेत्री. ● १९९५ : पं. निखिल घोष – तबलावादक ● १९८२ : रघुपती सहाय ऊर्फ फिराक गोरखपुरी – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू शायर ● १९६५ : अमीरबाई कर्नाटकी – पार्श्वगायिका व अभिनेत्री ● १९१९ : नारायण हरी आपटे – कादंबरीकार ● १७०७ : औरंगजेब – सहावा मोगल सम्राट ● १७०३ : रॉबर्ट हूक – इंग्लिश वैज्ञानिक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीचं वर्चस्व, सर्व 21 जागांवर विजय मिळवत भाजपचा केला दारूण पराभव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई महानगरपालिकेचा प्लास्टिक कारवाईचा पुन्हा धडाका, दोन दिवसांत 1028 किलो प्लास्टिक जप्त* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *दिल्ली निर्भयाच्या गुन्हेगारांची फाशी तिसऱ्यांदा लांबणीवर, पुढील आदेश मिळेपर्यंत शिक्षेला स्थगिती, पटियाला हाऊस न्यायालयाचा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नवी दिल्ली आणि तेलंगणात दोघांना कोरोना व्हायरसची लागण, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती, दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मराठा समाजाला न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरणार, खासदार संभाजीराजे छत्रपतींचा इशारा, तर मंत्रीमंडळ उपसमितीवरुन अशोक चव्हाणांना हटवण्याची आंदोलकांची मागणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नवी दिल्ली : केंद्र सरकारने होळीच्या आधी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कपात करुन सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. विनाअनुदानित एलपीजी सिलेंडर 53 रुपयांनी झाला स्वस्त* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा सात विकेट्सने पराभव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *प्रदूषण एक समस्या* http://nasayeotikar.blogspot.com/2018/12/blog-post_10.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *फुलपाखरू* रामकृष्ण पांडुरंग पाटील, 9408885775 फुलपाखरू फुलपाखरू गंमत तुझी रे भारी पान फुल वेली करत फिरतोस बाग सारी वेगवेगळ्या फुलांवर बसून तू आनंद घेई स्पर्श होताच तुला कसे रंग सोडुनी जाई मऊ मऊ पंख तुझे इवले इवले पाय पकडायला जाताच पटकन उडून जाय बारीक बारीक डोळे लुकलुक करत पाही रंगीबेरंगी रूप तुझे हे दुसऱ्या कुणा नाही *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *”आपलं दु:ख पाहुन कोणी हसले तरी चालेल, पण आपल हसणं बघुन कोणी दु:खी राहता कामा नये.”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *कोणत्या देशाच्या राष्ट्रध्वजावर AK-47 चे चित्र आहे ?* कांगो 2) *कोणार्क सुर्यमंदिर कोणत्या राज्यात आहे ?* उडीसा 3) *अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला ?* कोलंबस, इटालियन खलाशी 4) *नेपोलियनची जन्मभूमी कोणती ?* कारसिका 5) *जगातील क्षेत्रफळाने दुसऱ्या क्रमांकाचा देश कोणता ?* कॅनडा *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुरेश कटकमवार 👤 अनिल गड्डम 👤 गोविंद चव्हाण  👤 बालासाहेब इंगोले पाटील 👤 इरफान शेख 👤 जयश्री उमरीकर 👤 कैलास माधवराव गंगुलवार 👤 साईराज संकपाळ 👤 डॉ. नितीन हरकाळ 👤 गितेश गणपत पाटणे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सुरूवात आहे म्हणजे शेवट आहे. उदय आहे म्हणजे अपरिहार्यपणे अस्तही आहेच आहे. झाड आहे म्हणून सावली आहे. तद्वतच जन्म आहे म्हणून मृत्यूही आहे. जन्मासोबतच 'मरण'ही जन्म घेते. त्या अर्थाने मरणाला काही स्वतंत्र अस्तित्व नाही. सयामी जुळे असतात. ते एकमेकांना चिटकूनच जन्माला येतात. तसे हे 'जगणे' आणि 'मरणे' म्हणजे दोन जुळे भाऊच. पण या जगण्याला त्याच्यासोबतच जन्माला आलेले हे मरण नको असते. त्याचे स्मरण ही नको असते. तरीही 'मरण' झाकता येत नाही की टाळता येत नाही.* *जगण्यासोबतच मरणाचे वास्तव सोबत असताना 'अमरत्वाची' अवास्तव आकांक्षाही असतेच आणि मग सुरू होते अमरत्वाची मरमर'. त्यात कोणीतरी सांगतो, माणूस मरत नसतोच. मरते ते शरीर. आत्मा तर अमर असतो. आता हा आत्मा वगैरे आपण पाहिलेला नसतो. तरीही गोष्ट सोयीची असल्यामुळे दिलासा देऊन जाते. मग अशा सोयीच्या गोष्टींचाही बाजार मांडला जातो. अशा तत्वज्ञानाला मागणी असते. त्यामुळे मालाचा उठाव असतो, म्हणून त्याचे निर्माते आणि वितरकही भरपूर आपसूकच तयार होतात. मग मृत्यूच्या भयाचा व्यापार धर्माच्या नावाने केला जातो आणि तो तेजीतही असतो.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मित्रांनो कुणीतरी बोलावतय हृदयातून म्हणून जाण्यात मजा आहे. कुणीतरी ऐकतय प्राणातून म्हणून गाण्यात मजा आहे. आपलं कुठलंही काम हे आतून म्हणजे मनापासून केलं पाहिजे तरच त्यात रंग भरतो.लोकांनी आपल्या कार्यक्रमाला गर्दी करावी असं प्रत्येक कलावंताला वाटत असतं. लोक नाही जमले तर कलावंत नाराज होऊन संयोजकांना खडे बोल सुनावतात. कुमार गंधर्व एकदा म्हणाले होते, सभागृहात पाहून मी गातोच कुठं, मी आत पाहूनच गातो. लोक किती होते किंवा होते की नव्हते, याने मला काय फरक पडतो ? खरा कलावंत आत पाहून आपली कला सादर करतो. गायक स्टुडिओत रेकाॅर्डिंग करतात तेव्हा कुठे श्रोते असतात ?        आपली आई जेंव्हा जात्यावर गाणं म्हणायची, तेव्हा कोण होता तीचा श्रोता ? कुणाकडं पाहून, कोणाच्या समाधानासाठी ती गाणं म्हणायची ? कुणाच्या टाळीची तीला आपेक्षा होती ? कुमार गंधर्व जसे आत पाहून स्वत: साठी गायचे तशीच जात्यावर गाणारी प्रत्येक आई त्या चार भिंतीच्या आत आणि गडद अंधारात जे गाणं म्हणायची ते गाणंच तिच्यासाठी आयुष्यातला सगळ्यात मोठा 'उजेड' होता. माणसानं त्या उजेडासाठी कविता म्हटली पाहिजे, गाणं गायलं पाहिजे. अशोक कुमावत (राष्ट्रपती पुरस्कार विजेते)            📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• हजार चुकीचे मार्ग स्वीकारण्यापेक्षा एक सत्याचा मार्ग स्वीकारला तर स्वत:च्या जीवनाचे कल्याण तर होईलच आणि त्याबरोबरच इतर लोक आपल्या जीवनाचे कल्याण होईल म्हणून तुमचे अनुयायी बनतील यात शंकाच नाही. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद : ९४२१८३९५९०. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आता मी छान दिसतो!* गणू फार आळशी मुलगा होता. त्याला तोंड धुण्याचा कंटाळा होता. त्याला अंघोळीच्या कंटाळा होता. त्याला कपडे बदलायच्या कंटाळा होता. एकदा गणू शाळेत निघाला, तेव्हा त्याची आई म्हणाली, “गणू जरा थांब, आरशात बघ! ” गणूला आरशात काय दिसले? तोंडावर पाण्याचे ओघळ! केस विस्कटलेले!! अंगातला सदरा मळलेला!!! गणू मनात म्हणाला, “ किती घाणेरडा दिसतो मी!” गणूला स्वतःचीच फार लाज वाटली. गणूने साबण लावून तोंड धुतले. स्वच्छ धुतलेले कपडे अंगात घातले. विस्कटलेले केस नीट फिरवले. मग तो आपल्या आईकडे गेला आणि म्हणाला, “ बघ आई, आता मी कसा छान दिसतो!” मी बघ किती छान कपडे घातले, किती छान केसाचा भांग केला. आता बघ आई मी किती छान दिसतो! तात्पर्य: आपण आपले स्वतःचे तन आणि मन स्वच्छ ठेवले पाहिजे. आपण स्वतः सदैव स्वच्छता अंगी बाळगली पाहिजे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

*चिञचारोळी स्पर्धा * मनीमाऊ मनीमाऊ तु किती छान छान वाघाची मावशी तू आहे तुझा मानपान 〰〰〰〰〰 प्रमिला सेनकुडे नांदेड.

*किलबिल* प्रभात समयी किलबिल किलबिल पक्षी बोलती गाती सुस्वर चोहीकडे सांज होता उडून जायी लक्ष त्यांचे पिलांकडे... 〰〰〰〰〰〰 प्रमिलाताई सेनकुडे

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 02/03/2020 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  ● १९७२- अमेरिकेचे ’पायोनिअर-१०’ यानाचे गुरुच्या दिशेने उड्डाण झाले 💥 जन्म :- ● १९३१ - सोव्हिएत संघाचे शेवटचे अध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते मिखाईल गोर्बाचेव्ह ● १९७७ - इंग्लिश क्रिकेटपटू अँड्र्यू स्ट्रॉस 💥 मृत्यू :-  ● १५९८- संत मीराबाई. ● १९४९- सुप्रसिध्द कवयित्री, संयुक्त प्रांताच्या पहिल्या स्त्री गव्हर्नर सौ. सरोजिनी नायडू. ● १९८६- डॉ. काशिनाथ घाणेकर. ● १७००- छत्रपती राजाराम महाराज. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई: शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांची निवड, सामनाच्या पहिल्या महिला संपादक, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी 1988 मध्ये केली होती सामनाची सुरुवात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई : हिवाळ्यात देखील अवकाळी पाऊस झाल्यामुळे राज्यातील शेतकरी झाला हवालदिल, लातूर जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. रेणापूर, शिरूर अनंतपाळ, उदगीर तालुक्यात हलक्या आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा काढणीला आलेल्या हरभरा पिकाचे नुकसान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नवी दिल्लीः हिंदुस्थान एरोनॉटिक्‍स लिमिटेड (HAL)ने भारतीय सैन्यासाठी अत्याधुनिक 500 लढाऊ हेलिकॉप्टर बनवण्याच्या मेगा प्रोजेक्टवर काम सुरू केले आहे. 2027 पर्यंत हे अत्याधुनिक हेलिकॉप्टर तयार होईल, अशी माहिती HALचे प्रमुख आर माधवन यांनी दिली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *कर्जमाफीच्या यादीत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून होणार पैसे जमा. 1 लाख 25 हजार 449 शेतकऱ्यांच्या खात्याचे प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टी यांच्या वतीने जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी 01 एप्रिल ते 30 जून 2020 याला कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती बार्टी कडून देण्यात आली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *विरारच्या रसेल दिब्रिटो याने अवघ्या नऊ महिन्यांच्या तपश्चर्येनंतर ‘मुंबई-श्री’ या प्रतिष्ठेच्या किताबाला गवसणी घातली आहे. बॉडी वर्कशॉपच्या रसेलने विजेतेपदाचे दावेदार मानल्या जाणाऱ्या सुशील मुरकर आणि नीलेश दगडे यांचे आव्हान मोडून काढत ‘मुंबई-श्री’ किताबावर नाव कोरले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *यजमान न्यूझीलंड संघाचा दुसऱ्या कसोटी सामन्यातही विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु, भारताचा दुसरा डाव डाव १२४ धावांत गुंडाळल्यानंतर न्यूझीलंडला विजयासाठी १३२ धावांचं आव्हान, तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रापर्यंत न्यूझीलंडने एकही गडी न गमावता ४६ धावांपर्यंत मजल मारली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *वेळेचे नियोजन* http://nasayeotikar.blogspot.com/2019/08/blog-post.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चिऊताई* - राजेश जेठेवाड, नांदेड चिवचिव करत माझी चिऊताई फिरत होती इकडून तिकडे अन तिकडून इकडे उडत होती कुठे मिळेल पिल्लासाठी घास ती रानावनात शोधत होती सैरावैरा फिरून फिरून चिऊताई सारखी दमत होती दमून दमून ती पुन्हा आपल्या पिकांकडे जात होती कुठे ही मिळेना दानापाणी तवा डोळे भरून पिल्लांना पाहत होती *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• _* " एकदा वेळ निघून गेली की सर्व काही बिघडून जाते असे म्हणतात. पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो. "*_ *🙏🙏 शुभ सकाळ🙏🙏* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *हत्तीरोगाचा प्रसार कोणत्या डासांमुळे होतो ?* क्युलेक्स मादी 2) *नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे ?* खडकवासला 3) *क्षय ( T. B.) या रोगासाठी कोणती लस वापरतात ?* बीसीजी लस 4) *जगातील साखरेचे कोठार कोणते ?* क्युबा 5) *लीप वर्षात एकूण किती दिवस असतात ?* 366 दिवस *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गणेश पाटील हतनुरे, पत्रकार        👤 योगेश जी काटे, पत्रकार 👤 चिं. साई दीपक गायकवाड 👤 अभिजित बाळकृष्ण ढगे 👤 मुकुंद मोहन जाधव 👤 शुभम भोसले 👤 एकनाथ कणसे 👤 अविनाश साबरे 👤 राजू तायडे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• लोकांनी आपल्या कार्यक्रमाला गर्दी करावी असं प्रत्येक कलावंताला वाटत असतं. लोक नाही जमले तर कलावंत नाराज होऊन संयोजकांना खडे बोल सुनावतात. कुमार गंधर्व एकदा म्हणाले होते, सभागृहात पाहून मी गातोच कुठं, मी आत पाहूनच गातो. लोक किती होते किंवा होते की नव्हते, याने मला काय फरक पडतो ? खरा कलावंत आत पाहून आपली कला सादर करतो. गायक स्टुडिओत रेकाॅर्डिंग करतात तेव्हा कुठे श्रोते असतात ?*         *आपली आई जेंव्हा जात्यावर गाणं म्हणायची, तेव्हा कोण होता तीचा श्रोता ? कुणाकडं पाहून, कोणाच्या समाधानासाठी ती गाणं म्हणायची ? कुणाच्या टाळीची तीला आपेक्षा होती ? कुमार गंधर्व जसे आत पाहून स्वत: साठी गायचे तशीच जात्यावर गाणारी प्रत्येक आई त्या चार भिंतीच्या आत आणि गडद अंधारात जे गाणं म्हणायची ते गाणंच तिच्यासाठी आयुष्यातला सगळ्यात मोठा 'उजेड' होता. माणसानं त्या उजेडासाठी कविता म्हटली पाहिजे, गाणं गायलं पाहिजे.*                    🎪 *॥ रामकृष्णहरी  ॥* 🎪            🎄🎄🎄🎄🎄🎄      *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मित्रांनो दुःखाचे डोंगर चढून गेल्याशिवाय यशाची हिरवळ दिसत नाही. अपयश ही यशाची पहिली पायरी असते.ज्याने अपयश बघितले तोच पुढे यशाचा धनी होतो. अपयशातूनच मिळते दैदिप्यमान यश ही विलक्षण शौर्यकथा, इसवीसनापूर्वी पाचशे आठशेमध्ये घडली. रोमला, क्लुसियमच्या पोरसेना या राजाने वेढा घातला होता. त्यावेळी, म्युसियस नावाचा तरूण रोमन कैद केला गेला. कैद झाल्यावर, त्याने राजा पोरसेनाचा खून करण्याचा प्रयत्न केला. राजाला शंका होती की, त्याचे कोणी आणखी साथीदारही असतील. म्हणून त्याने म्युसियस, याचे हात जाळण्याचा हुकूम केला. अग्निकुंड पेटले, तेव्हा म्युसियस निर्भयतेने अग्निस्थंडिलापर्यंत आला. आणि त्याने शांतपणाने, आपला हात अग्नीच्या मुखावर धरला. जळत्या हाताची राख होत होती. राजा भयचकित् होऊन ते दृश्य पहात होता. आणि म्युसियस हसत होता. पोरसेना राजाच्या मनावर एवढा परिणाम झाला की, त्याने तरूण म्युसियसला मुक्त केलेच, पण रोमचा वेढाही उठवला. आता प्रश्न असा की, रोमला वेढा पडला, ते म्युसियसचे यश का अपयश? तो कैद झाला, तेव्हा त्याचे यश का अपयश? खुनाच्या प्रयत्नात तो धरला गेला, हे त्याचे यश का अपयश? त्याला हात जाळण्याची शिक्षा मिळाली, हे त्याचे यश का अपयश? हात जाळून बधत नाही असे पाहून त्याला संभाजीप्रमाणे सोलला असता तर? येथे विचारलेल्या पाच प्रश्नचिन्हांनंतर म्युसियसचे यश, इतिहासात नोंदले गेले. पण पूर्वीच्या पाच अपयशाच्या पायर्‍या नसत्या तर सहावी काही आकाशातून उगवली नसती! अशोक कुमावत (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुम्ही जेव्हा एखाद्या नवीन ठिकाणी जाता तेव्हा तुम्हाला तिथे काहीतरी नवीन पहायला किंवा अनुभवायला मिळणार त्याबद्दलची उत्सुकता लागून राहते आणि काहीतरी तेथून तुम्ही घेऊन येता.त्याचप्रमाणे तिथल्या लोकांनाही तुमच्याकडून काहीतरी नवीन अपेक्षा असतातच अर्थात तुमच्याजवळही असे एखादे त्यांना देण्याइतपत ज्ञान किंवा अनुभव असायला हवे जे की,तुमच्या भेटीतून त्यांनाही आनंद आणि समाधान मिळायला हवे.अशा देवाणघेवाणीतून तुमचे आणि नवीन ठिकाणचे नातेसंबंध अधिक दृढ होतील.केवळ आपण स्वार्थ साधण्यापुरते जर संबंध किंवा जवळिकता निर्माण केली तर त्यात काही अर्थ राहणार नाही.ज्याप्रमाणे आपली घेण्याची वृत्ती आहे त्याचप्रमाणे इतरांना काहीतरी देण्याचीही वृत्ती जोपासायला हवी तरच जीवनाला अर्थ राहील. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद...९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. 🎋🥀🎋🥀🎋🥀🎋🥀🎋🥀 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पैशात सुख शोधता येत नाही* एका नगरात एक व्यापारी राहत होता. तो राहत असलेल्या नगरमध्ये त्याचा व्यापार काहीच चालत नव्हता. कधीकधी तर दिवसभरातून एकही ग्राहक त्याच्याकडे यायचा नाही. त्याच्या कुटुंबाला कधीकधी उपाशी झोपावे लागत होते. अनेक दिवस असेच चालू राहिले आणि परिस्थितीही बदलली नाही. तेव्हा त्याच्या एका मित्राने त्याला दुसऱ्या नगरात जाऊन व्यापार करण्याचा सल्ला दिला. व्यापाऱ्याला मित्राचा सल्ला पटला. व्यापारी आपल्या पत्नी आणि मुलांना घरीच सोडून दुसऱ्या नगरात व्यापारासाठी गेला. नशिबाने त्याच्या मित्राचा सल्ला कामी आला आणि त्याला भरपूर फायदा होऊ लागला. तो अनेक दिवस दुसऱ्या शहरांमध्ये राहून व्यापार करू लागला. त्याने स्वतःच्या नगरात येऊन एक नवीन घर बांधले. पत्नी आणि मुलांना घेऊन नवीन घरात राहू लागला. तेव्हा पत्नी त्याला म्हणाली आता आपल्याकडे पर्याप्त धन जमा झाले आहे. यामध्ये आपण सुखी जीवन जगू शकतो. तुम्हाला आता इतर नगरांमध्ये जाऊन व्यापार करण्याची आवश्यकता नाही. मुलांनाही वेळ देण्याची आवश्यकता आहे. व्यापारी म्हणाला, मला आणखी धन कमावण्याची इच्छा आहे, ज्यामुळे तुम्हाला मी सर्व सुख-सुविधा देऊ शकेल, आपण जे दिवस पाहिले ते मला मुलांना परत दाखवायचे नाहीत. पत्नी म्हणाली, परंतु धन कमावण्यात जो वेळ निघून गेला आहे तो परत येणार नाही, आपण जीवनात सोबत राहण्याच्या आनंदापासून वंचित होत आहोत. व्यापारी म्हणाला, फक्त आणखी काही वर्ष व्यापार करू दे, आपण एवढे धन जमा करू की आपल्या पिढ्या सुखात जीवन व्यतीत करतील. व्यापारी पुन्हा व्यापार करण्यासाठी निघून गेला. काही वर्ष असेच निघून गेले. खूप धन जमा झाले. व्यापाऱ्याने पुन्हा नदीच्या काठावर एक सुदंर महाल बांधला. संपूर्ण कुटुंब त्या महालात राहू लागले. तो महाल एखाद्या स्वर्गाप्रमाणे होता. व्यापाऱ्याची मुलगी त्याला म्हणाली, बाबा आमचे सर्व बालपण निघून गेले परंतु आम्ही तुमच्यासोबत राहू शकलो नाहीत. आता आपल्याजवळ एवढे धन आहे की, पाच-सहा पिढ्या आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही. आता तुम्ही आमच्या सोबतच राहा. व्यापारी म्हणाला, मुली आता मीही थकलो आहे आणि आता तुमच्यासोबत काहीकाळ व्यतीत करण्याची इच्छा आहे. मी उद्या फक्त दोन दिवसांसाठी शेजारच्या गावात जाऊन काही वसुली करायची आहे तेवढी करून येतो. त्यानंतर मी येथेच तुमच्यासोबत राहणार आहे. संपूर्ण कुटुंब आनंदी झाले. दुसऱ्या दिवशी व्यापारी शेजाऱ्याच्या गावात गेला आणि त्याच दिवशी मुसळधार पाऊस सुरु झाला आणि ज्या नदीच्या काठावर व्यापाऱ्याने महाल बांधला होता तो पुरामध्ये वाहून गेला. त्या पुरताच त्याचे संपूर्ण कुटुंब वाहून गेले. व्यापारी परत आल्यानंतर सर्वकाही नष्ट झालेले होते.व्यापारी हताश झाला.निर्बल झाला. त्याला काय करावे हे सूचेनासे झाले. *तात्पर्यः पैशात सुख शोधता येत नाही.त्यासाठी आपल्या कुटुंबाला वेळ द्या. पैसा कमावणे आवश्यक आहे परंतु काळासोबत नाते आणि एकमेकांमधील प्रेमासाठी आपल्या लोकांसोबत वेळ व्यतीत करणेही आवश्यक आहे. कारण धन कोणत्याही वेळी मेहनत करू कमावले जाऊ शकते परंतु जो काळ निघून गेला आहे तो परत येत नाही. वर्तमानात राहा, नात्यांच्या आनंदाचे सुख घ्या.आणि आपल्या लोकांना वेळ द्या.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~