*🙏 मायेची उब*🙏 मातेच्या ममतेत सारे देवगण न्हाऊन गेले जन्माला येण्यास तिच्या पोटी सारे धरञीवर आले अशी मायेची ममता काय वर्णु मी तिची गाथा तिचा संगे हो राहता स्वर्गही फिका भासे मज आता माऊली तुझ्या चरण स्पर्शाची उणीव भासते क्षणाक्षणात तुझ्या आठवणीने कंठ ही दाटते किती झिजली तुझी काया दिलास तु आधार चौफेर तुझ्या यातनाला नाही तोड तु नाही जगी जरी या प्रेमस्वरूप वात्सल्याचा सिंधू आहेस माता तू ठेवीला चरणी माता तुझ्या आशीर्वाद दिलास तू जगी या सर्वश्रेष्ठ आहेस तु माऊली तुझ्याच आशीर्वादाची मिळाली मज सावली 〰〰〰〰〰 ✍ प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰 🙏🙏🙏🙏🙏🙏
*महाराष्ट्र दिनानिमीत्त काव्य* महाराष्ट्र आहे माझा पराक्रमाची खाण त्यातच आहे जीव माझा तोच माझा अभिमान .. वार झेलले कित्येकांनी आपल्या छातीवरती... असेच वीर जन्मले या महाराष्ट्राच्या भुमीवरती.. महाराष्ट्र आहे माझी शान साधूसंताची भूमी महान अभिमानाने गातो आम्ही शिवरायांचे गुणगाण.... पुण्यभूमीत महाराष्ट्राचा कृष्णा कोयना गोदावरी संगम आहे नद्यांचा... गंगा ,जमूना कावेरी.. सह्याद्रीच्या कडेकपारीत घुमतो पराक्रमाचा आवाज शिवरायांचे मावळे आम्ही महाराष्ट्राचा ताज... 〰〰〰〰〰〰 ✍प्रमिलाताई सेनकुडे हदगाव (जिल्हा नांदेड)
Subscribe to:
Posts (Atom)