*🌺जीवन विचार🌺* *〰〰〰〰〰〰〰* http://www.pramilasenkude.blogspot.in *"प्रयत्न तो देव जाणाव"* *"देवासकट सर्वकाही प्राप्त करून देण्याच"* *सामर्थ्य प्रयत्नात आहे म्हणून* *प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ होय".* *प्रयत्न हा प्रकारच इतका प्रभावी आहे की , प्रयत्न करण्याच्या प्रक्रियेत प्रयत्न करणाऱ्याला प्रकाश दिसू लागून त्या प्रकाशातूनच त्याला प्रभूचा प्रसाद प्राप्त होतो.थोडक्यात प्रयत्न करीत रहाणे हे मानवी जीवनाचे अविभाज्य घटक असून त्रिकालबाधित निसर्गनियमांशी ते सुसंगत आहे.* *Smt.Pramila Senkude.* *कोणतेही यश प्राप्त करावयाचे असल्यास ते यश आपण करीत असलेल्या प्रयत्नाला चिकटलेले असते. "प्रयत्न करून यश मिळणे हा नियम आहे" हे सत्य माणसाने सदैव लक्षात ठेवले पाहिजे. मात्र प्रयत्न योग्य दिशेने होण्यासाठी ते अभ्यासपूर्वक झाले पाहिजेत . नुसते कष्ट केल्याने किंवा प्रयत्न केल्याने यश मिळत नसते.* *थोडक्यात अभ्यासपूर्वक व प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याने माणसांना जे धन व यश प्राप्त होते , ते त्यांना सुख शांती , समाधान , यश व समृद्धी प्राप्त करून तर देतेच शिवाय त्याचा इष्ट प्रभाव इतरांवरही पडत असतो.अस म्हणतात 'प्रयत्न हा परीस आहे, प्रयत्नामुळे नरकाचे नंदनवन होते.' शून्यातुन विश्व निर्माण करण्याची जिद्द माणसामध्ये असली की त्याचे कर्तृत्व दरवळायला वेळ लागत नाही.त्यासाठी हवी असते प्रामाणिकपणे अभ्यास व कष्ट करण्याची तयारी व असाध्य गोष्टीही साध्य करण्याची धडपड. ही सततची प्रामाणिक श्रमरुपी,अभ्यासपूर्व केलेली धडपड म्हणजेच यशस्वी वाटचालीसाठी केलेले प्रयत्न होय.* 〰〰〰〰〰〰〰 *🙏🏼शब्दांकन/संकलन🙏* ✍ *श्रीमती प्रमिला सेनकुडे* जि.प.प्रा.शा. गोजेगाव, ता.हदगाव, जिल्हा नांदेड. *~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment