घोषवाक्ये प्रभातफैरी

प्रभातफेरीसाठी घोषवाक्ये

: एक दोन तीन चार
मुला-मुलींना शिकवू छान
[
: मुलगा मुलगी एकसमान
दोघांनाही शिकवू छान
[
: एक दोन तीन चार
 जि.प.शाळा छान छान
[
‬: चला चला शाळा झाली सुरू,
नका नका घरी आता राहू.
[
 सुंदर छान माझी शाळा.             गावाचा अभिमान माझी शाळा.🙏🏻🙏🏻
[
‬: चला जाऊ शाळेला
नव्या गोष्टी ऐकायला
[
 जि.प.शाळेची मुले न्यारी
गुणवत्तापूर्ण शिक्षण घेई
[
छान छान छान किती छान
नव्या पिढीचा मी अभिमान
[
 लहान मुले देवाघरची फुले अशीच माझ्या शाळेतील बाळे
[
‬: मला जायचंय शाळेला
नवं काहीतरी शोधायला
[
 लहान मुलांना लावी लळा
जि.प.ची मराठी शाळा  ।।
[
‬: एक दोन तिन चार
मराठी शाळेची मुले हुशार।।
[
 सब पढ़े सब बढे
अज्ञान से हम लडे
[
शाळा माझी सजली रे सजली रे,                                   मुले खेळ गाण्यात रमली रे रमली रे.
[
: करु नका लेकरांच्या जीवनाचा घाटा.     मुलगा असो की मुलगी  शाळेत नाव टाका.
[
: जिप शाळेची मुले लय भारी,
ज्ञानरचनावादाने शिकतात सारी ।
[
: आई आई मला आता शिकू दे,    सावित्री ताराराणीचा वसा मला चालवू दे.
[
चला शिकू या,पुढे जावू या
जिल्हा परिषद शाळेत,प्रवेश घेऊ या

गीत

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
.......... *मोगरा फुलला*...........
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

मोगरा फुलला
हिरव्या हिरव्या पालवीला
मोगरा फुलला
सामाजिक न्याय दिनाला
सुगंध दरवळला
गं बाई बाई
मोगरा फुलला

मोगरा फुलला
सफेद रंग त्याला
मैत्रीचे प्रतिक दावुनी
समतेचा संदेश दिला
गं बाई बाई
मोगरा फुलला

मोगरा फुलला
सांगतो समाजाला
समान वागा सर्वांशी
द्या तडा भेदभावाला
गं बाई बाई
मोगरा फुलला

मोगरा फुलला
सुंदर फुले पालवीला
विभोर मन होई
पाहुनी त्याला
माळते गजरा केसाला
गं बाई बाई
मोगरा फुलला

मोगरा फुलला
बाई माझ्या अंगणी गं
फुले फुलली रोपट्याला
परिसर सारा गंधीत होवुन
सुगंध देई घराला
गं बाई बाई
मोगरा फुलला
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
✍ संकलित

पंढरीगाथा

*होय होय वारकरी। पाहे पाहे रे पंढरी॥*

वार म्हणजे दिवस, प्रत्येक दिवस जो वारी करतो तो वारकरी.

वारी कुठली? तर *पाहे पाहे रे पंढरी...*

पंढरीला पहाणे हीच खरी वारी व जो दररोज पंढरीला पहातो तो खरा वारकरी.

*शुद्ध परमार्थ केवळ पहाण्यात आहे हे वर्म उमजले नाही तर सर्व परमार्थ पाण्यात.*
                -  सदगुरु श्री वामनराव पै

*पंढरीला पहायचे कसे हे जे शिकवितात ते खरे सदगुरु...*

संत सांगतात,
*काया ही पंढरी। आत्मा हा विठ्ठल।*
*नांदतो केवळ। पांडुरंग।।*

*देह ही पंढरी। प्रेम पुंडलिक।*
स्वभाव सन्मुख। चंद्रभागा।
विवेकाची वीट। *आत्मा पंढरीराव।।*

शरीररुपी पंढरीत, प्रेम हे पुंडलिक असून स्वभावरुपी वाहणा-या चंद्रभागेत विवेकाच्या विटेवर आत्मरुपी विठ्ठल उभा आहे.

*अनंत रुपे अनंत वेषे। देखिले त्याशी।*
बापरखुमा देवीवरु। खुण बाणली ऐशी।।

म्हणजेच घरात व विश्वात देहरुपाने असणारी प्रत्येक व्यक्ती, वस्तू, प्राणीमात्र इ. सर्वांच्या रुपाने हा विठ्ठल प्रगट आहे.

म्हणूनच *सदगुरु श्री वामनराव पै* सांगतात,
*परमेश्वर*
*विश्व रुपाने समोर,*
*शरीर रुपाने जवळ,*
*सच्चिदानंद स्वरुपात हृदयात* आहे.

देवाला पहाण्याची वारी करता करता म्हणजेच देवाला पहाता पहाता पाहणं दूर सरतं व पाहणारा विठ्ठलच प्रगट होऊन आपणच देव होतो.

*देव पहाया गेलो। तेथे देवची होऊन ठेलो।।*

*तुका म्हणे धन्य झालो। आजि विठ्ठला भेटलो।।*

म्हणूनच संत म्हणतात,
*होय होय वारकरी। पाहे पाहे रे पंढरी।।*

🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂

🙏🏾

कथा क्रमांक २०३

*🌷🌷🌷कथा🌷🌷🌷*
*📚अभ्यास कथा भाग २०३*
〰〰〰〰〰〰〰
*🌺 थोड जगुया समाजासाठी*🌺〰〰〰〰〰〰〰
तीन वाटसरू एका धर्मशाळेत एका रात्रीसाठी एकत्र आले असतात. तिथे स्वयंपाकासाठी एकच चूल आणि एकच भांडं असतं. तिघांनाही भूक लागलेली असते. मग ते एकत्र स्वयंपाक करायचा असं ठरवतात. चुलीवर भांडं ठेवून त्यात पाणी उकळायला ठेवतात आणि त्यात प्रत्येकानं आपापल्या जवळच्या तांदुळाची एक एक मूठ टाकायची असं त्यांचं ठरतं.

पाण्याला उकळी फुटल्यावर त्यात तांदूळ टाकायची वेळ येते. पहिला वाटसरू विचार करतो तसंही बाकीचे दोघं एक एक मूठ तांदूळ टाकतीलच, तेवढा भात तिघांना पुरेल. मी कशाला माझे तांदूळ वाया घालवू? म्हणून तो स्वतःच्या पिशवीत हात घालून रिकामीच मूठ घेऊन येतो आणि पातेल्यावरचं झाकण बाजूला सारून तांदूळ आत टाकल्याचं नाटक करतो. गंमत म्हणजे exactly असाच विचार बाकीचे दोघंही करतात आणि पातेल्यात तांदूळ टाकल्याचा नुसता अभिनयच करतात.

थोड्या वेळानं ते झाकण दूर करून बघतात तेंव्हा अर्थातच पातेल्यात फक्त गरम पाणी असतं, भाताचा पत्ताच नसतो !!! तिघांनाही चडफडत आणि एकमेकांना शिव्या देत उपाशीच झोपायला लागतं.

तात्पर्यः

आपण वेळ, पैसा किंवा कष्ट अशी कोणत्याही प्रकारची तांदुळाची मूठ contribute न करता,
ह्या समाजातले सर्व प्रश्न, इतर कोणाच्या तरी प्रयत्नातून आपोआप सुटतील असं ज्यांना वाटतं त्यांनी आपला हा भ्रम दूर सारून आपलीही मदत समाजात कशी उपयोगी येईल त्यानुसार समाजाच्या उपयोगी येण्याचा प्रयत्न करावा.
*-----------------------------------*
*📝 संकलन*

कथा क्रमांक २०२

*🌷🌷🌷कथा🌷🌷🌷*
*📚अभ्यास कथा भाग २०२.*
〰〰〰〰〰〰〰
       *🌺श्रमाचे महत्त्व*🌺
〰〰〰〰〰〰〰
"धनासेठचा मुलगा  खूपच आळशी होता. घरात गडगंज संपत्ती व एकुलता एक लाडाचा त्यामुळे काम कधी करावंच लागलं नाही. तो आता २१ वर्षाचा झाला होता. शेठजींना काळजी पडली. याचे असे दे हरी पलंगावरी किती दिवस चालणार कसे होणार साठलेला पैसा किती दिवस पुरेल.

दुसऱ्या दिवशी, त्यांनी मुलाला बोलावले व म्हणाले, 'हे बघ राम आज तू सकाळीच बाहेर जा. काहींतरी काम करून पैसे मिळवुन आण तरच तुला जेवायला मिळेल.'

मुलाला काहीच कळेना. तो बहिणीकडे गेला तिने त्याला एक रूपया दिला. त्याने तो शेठजींचा हातावर ठेवला तर शेठजींनी तो विहीरीत फेकून दिला.

दुसर्‍या दिवशी, आईकडून त्याला एक रूपया मिळाला. त्याने तो शेठजींचा हातावर ठेवला तर शेठजींनी पुन्हा तो विहीरीत फेकून दिला.

तिसर्‍या दिवशी, मात्र कोणीही पैसे द्यायचे नाहीत हे उमजल्यावर स्वारी घराबाहेर काम शोधायला पडली. पण काय काम करणार? बारा वाजेपर्यंत हिंडला. काम मिळेना. पोटात कावळे कोकलायला लागले.

स्टेशनवरून एक जड बॅग घेऊन येणारा प्रवासी माणूस  दिसला, त्याला हमाल हवा होता. हा धावत पुढे गेला. 'साहेब, इकडे आणा'.

ती बॅग त्याने डोक्यावर उचलली. घामाघूम झाला. साहेबांनी आठ आणे हातावर ठेवले. घरी आला. शेठजींच्या हातावर आठ आणे ठेवले. दोन दिवसाप्रमाणेच शेठजींनी ते विहीरीत फेकले हा चवताळून उठला. 'बाबा अहो तेवढे आठ आणे मिळवायला मला किती वणवण करावी लागली आणि तुम्ही ते फेकून दिलेत ?'

शेठजींनी त्याला जवळ घेतले. पाठीवरून हात फिरवला, 'बाळा आता मला काही काळजी नाही कारण खर्‍या कष्टाची किंमत तुला आज कळली आहे.

दोन दिवस ह्याच्या दुप्पट रक्कम मी फेकली पण तुला राग आला नव्हता, कारण त्या मागे तुझे कष्ट नव्हते.'

तात्पर्य : स्वकष्टाची कमाई तीच खरी कमाई.श्रमाचे महत्त्व तेव्हाच कळते जेव्हा आपण स्वतः कमवतो. "
*-----------------------------------*
*📝 संकलन*

कथा क्रमांक २०१

गुरू  चे माहात्म्य
एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला   विचारले, "गुरुची कृपा किती होऊ शकते?" तो माणूस 🙁त्या वेळी एक सफरचंद 🍎खात होता. त्याने एक सफरचंद माझ्या हाती ठेवले आणि विचारले, "सांगा पाहू यांत किती बिया असतील?"
सफरचंद 🍎कापून मी त्यांतील बिया मोजल्या आणि म्हणालो, "यात तीन बिया आहेत"
त्याने त्यातील एक बी आपल्या हाती घेतली आणि मला विचारले, "या एका बियेमध्ये किती सफरचंदे🍎🍎 असतील असे तुला वाटते?"
मी मनातल्या मनातच हिशोब करू लागलो,एका ह्या बियेपासून एक झाड, त्या झाडावर अनेक सफरचंदे लागणार, त्या प्रत्येक सफरचंदांत पुन्हा तीन बिया, त्या प्रत्येक बियेमधून पुन्हा एक झाड, त्या झाडांना पुन्हा तशीच तीन बिया असणारी फळे लागणार. अबब! ही प्रक्रिया चालूच राहणार! कसा सांगू मी त्या बियेमध्ये असलेल्या भावी फळांची संख्या?. मी चक्रावलोच.
माझी अशी अवस्था पाहून तो माणूस मला म्हणाला, " अशीच गुरुची कृपा आपल्यावर बरसत असते. आपण फक्त भक्तीरूपी एकाच बीजाचा उदय आपल्या मनांत करवून घेण्याची गरज आहे."

गुरु एक तेज आहे. गुरूंचे एकदा आगमन झाले की मनातील संशयरूपी अंधःकार कुठल्याकुठे पळून जातो.
गुरु म्हणजे एक असा मृदंग आहे की ज्याच्या एका झंकाराने अनाहत नाद ऐकू यायला सुरुवात होते.
गुरु म्हणजे असे ज्ञान की ज्याची प्राप्ती झाल्याबरोबर मनातील भयाची सगळी भावनाच लोप पावते.
गुरु ही एक अशी दीक्षा आहे की ज्याला गुरुदीक्षा प्राप्त झाली तो हा भवसागर तरून गेलाच म्हणून समजा.
गुरु ही एक अशी नदी आहे जी सतत आपल्या प्राणांतून वाहत असते.
गुरु म्हणजे असा सत् चित् आनंद आहे जो आम्हाला आमची खरी ओळख करून देतो.
गुरु म्हणजे एक बासरी आहे जिच्या नुसत्या मंजुळ आवाजानेच आपले मन आणि शरीर आत्मानंदात मग्न होऊन जाते.
गुरु म्हणजे केवळ अमृतच. ह्या अमृताच्या सेवनाने तहान कायमची आणि पूर्णपणे शमते.
गुरु म्हणजे एक अशी कृपाच असते जी केवळ कांही भाग्यवान आणि सत्पात्री शिष्यांनाच प्राप्त होते आणि काहींना अशी कृपा मिळूनही ती मिळालेली त्यांना समजत नाही.
गुरु कुबेराचा अक्षय्य खजिनाच आहे आणि त्या खजिन्याचे मोल होऊच शकत नाही.
गुरू म्हणजे एक प्रसाद आहे. ज्याच्या भाग्यात असेल त्याला कांहीच मागण्याची इच्छाउरत नाही.

कथा क्रमांक २००

बोधकथा
*खरे स्वरूप*
फार वर्षापूर्वीची गोष्‍ट आहे. एक राणी ओले केस सुकवण्यासाठी  राजवाड्याच्‍या छतावर गेली होती. तिने आपला मौल्‍यवान हार काढून बाजूला ठेवला व केस विंचरू लागली. इतक्‍यात तिकडून एक कावळा आला. कावळयाला तो गळ्यातील हार   म्‍हणजे काहीतरी खाण्‍याची गोष्‍ट वाटली व तो हार घेऊन कावळा उडून गेला. एका झाडावर बसून त्‍याने कंठा खाण्‍यासाठी प्रयत्‍न केले. मौल्‍यवान अशा कंठ्यामध्‍ये हिरे जडलेले होते. कठोर अशा हि-यांवर चोच मारून मारून तो थकला व त्‍याने ते खाण्‍याचा नाद सोडून दिला. तो कंठा तसाच झाडावर लटकत ठेवून त्‍याने आकाशात भरारी मारली ते अन्नाचा शोध घेण्‍यासाठी. इकडे राणीने केस विंचरले व तिच्‍या लक्षात एक गोष्‍ट आली की आपला मौल्‍यवान कंठा गायब झाला आहे. इकडेतिकडे शोध घेऊनही तिला तो सापडेना शेवटी ती रडत रडत राजाकडे गेली व म्‍हणाली,'' महाराज माझा प्राणप्रिय असा कंठा चोरीला गेला आहे. तुम्‍ही त्‍याचा शोध घेण्‍याचे आदेश द्या.'' राजा म्‍हणाला,'' दुसरे इतरही दागिने आहेतच की तुला. तोच कंठा कशाला पाहिजे.'' राणीने ऐकले नाही व तोच कंठा पाहिजे म्‍हणून हट्ट धरून बसली. राजाने कंठा शोधण्‍याचे आदेश दिले. सर्वजण तो शोधू लागले पण कोणाला काही तो कंठा सापडेना. राजाने कोतवालाला बोलावून सांगितले की आजच्‍या आज तू, सर्व शिपाई, सैनिक, प्रजा सगळे मिळून त्‍या हाराचा शोध घ्‍या. जो कोणी तो हार आणून देईल त्‍याला आपण अर्धे राज्‍य बक्षीस म्‍हणून देऊ अशी घोषणाही त्‍याने त्‍यावेळी केली. अर्धे राज्‍य बक्षीस मिळेल या आशेने सर्वजणच कामाला लागले. सगळीकडे शोधयंत्रणा सुरु झाली. शोधता शोधता अचानक कुणाला तरी तो हार सापडला. एका घाणेरड्या पाण्‍याच्‍या नाल्‍यामध्‍ये त्‍याला तो हार दिसला. पाणी इतके घाणेरडे होते की जवळून जातानासुद्धा किळस यावी, दुर्गंध सर्वत्र पसरला होता. पण त्‍या पाण्‍यात तो हार पडलेला दिसून येत होता. हार दिसताक्षणी अर्धे राज्‍य बक्षीसाच्‍या आशेने एका सैनिकाने त्‍या पाण्‍यात उडी मारली. सगळीकडे शोधले त्‍याने पण हार काही मिळाला नाही. हार जणू गायबच झाला. सैनिकाने मारलेली उडी पाहून कोतवालाच्‍या मनातही लोभ निर्माण झाला. त्‍यानेही अर्धे राज्‍य मिळविण्‍यासाठी त्‍या नाल्‍यात उडी मारली. पण हार पुन्‍हा गायब झाला. त्‍या दोघांना जसा हार दिसला तसा इतर प्रजाजनांनाही तो हार दिसला व सगळेजण बक्षीसाच्‍या आशेने त्‍या घाण पाण्‍यात उड्या मारू लागले पण हार कुणाच्‍याच हातात येत नव्‍हता. सगळेजण उडी मारताहेत पाहून मंत्री, सरदारही, मुख्‍य प्रधानजी यांनाही अर्ध्‍या राज्‍याची हाव सुटली व तेही घाणेरड्या पाण्‍यात उड्या मारू लागले. पण हार काही सापडेना. जेव्‍हा कोणी उडी मारे तेव्‍हा हार गायब होऊन जाई. हार सापडत नाही हे लक्षात आले की तो मनुष्‍य त्‍या पाण्‍याच्‍या वास सहन न झाल्‍याने पटकन पाण्‍यातून निघून बाहेर येई व तो बाहेर पडता क्षणी हार पुन्‍हा दिसू लागे. मंत्री, सरदार, मुख्‍य प्रधान यांनी घाणेरड्या पाण्‍यात उड्या मारून हार शोधण्‍यासाठी प्रयत्‍न केले हे राजाच्‍या कानावर गेले व त्‍याला वाटले की यांनी जर हार शोधला तर मला माझे अर्धे राज्‍य गमवावे लागेल. त्‍यासाठी राजाही तेथे आला व त्‍याने आपली राजवस्‍त्रे उतरवली आणि त्‍यानेही त्‍या नाल्‍यात उडी मारली. त्‍याचवेळेस तिथून एक संत जात होते. राजाला उडी मारलेली पाहिली आणि तो मोठमोठ्याने हसू लागले. त्‍यांनी विचारले हे काय चालले आहे.? सगळेजण असे चिखलात, घाणीत का माखला आहात?. राजा असणारा माणूस असल्‍या घाणेरड्या पाण्‍यात का उडी मारतो आहे? लोकांनी उत्तर दिले, राणीचा हार पाण्‍यात पडला आहे म्‍हणून सर्वजण पाण्‍यात उड्या मारत आहेत पण उडी मारताक्षणी कसा कोण जाणे तो हार गायब होतो आहे. संत अजूनच मोठ्याने हसू लागले. लोकांनी त्‍याना विचारले काय झाले? संत त्‍यावर म्‍हणाले,'' अरे वेड्यांनो तुम्‍ही ज्‍या हाराकडे पाहून पाण्‍यात उड्या मारत आहात तो हार झाडावर आहे आणि पाण्‍यात दिसते आहे ते त्‍याचे प्रतिबिंब आहे. खरा हार हा झाडावर आहे आणि तुम्‍ही प्रतिबिंबाला हार समजून पाण्‍यात शोधत आहात.'' लोकांच्‍या लक्षात खरा प्रकार आल्‍यावर लोक शरमिंदा झाले.

तात्पर्य :- मानवी जीवनाची   पण आज त्‍या लोकांप्रमाणेच अवस्‍था झाली आहे. जे आपल्‍याला पाहिजे आहे त्‍याच्‍या प्रतिरूपाकडे, प्रतिबिंबाकडे पाहून आपण ते मिळविण्‍याचा प्रयत्‍न करत आहोत. खरे सुख, समाधान, शांती, मनस्‍वास्‍थ्‍य हे शोधण्‍यापेक्षा आपण त्‍याची प्रतिरूपे, प्रतिबिंबे जवळ करत आहोत. यातून काही मिळण्‍यापेक्षा आपण कितीतरी गोष्‍टी गमावित आहोत.

कथा क्रमांक १९९

*🌷🌷🌷कथा🌷🌷🌷* http://www.pramilasenkude.blogspot.in
*📚अभ्यास कथा भाग १९९*
〰〰〰〰〰〰〰
*🌺भविष्यातील यशस्वीता*🌺
〰〰〰〰〰〰〰
एकदा स्वप्न आणि सत्य यांचे जोरदार भांडण झाले. विषय होता भविष्य घडविण्यात सर्वाधिक सहभाग कोणाचा ? दोघे ही खुप भांडले, झगडले पण निर्णय काही होईना. शेवटी या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ते आपल्या मानसपित्याकडे- ब्र्म्हदेवाकडे गेले. ब्र्म्हदेवाने त्यांना सांगितले, "ज्या कोणाचे हात आभाळाला टेकतील आणि तरीही ज्याचे पाय जमिनीवर आसतील, त्याचा भविष्या घडविण्यात निर्णायक सहभाग असतो". दोघेही परत आले. स्वप्नाने आधी प्रयत्न केला. एकच उडीत त्याचे हात आभाळाला टेकले, पण त्याचे पाय जमिनीपसुन केंव्हाच उचलले गेले होते. सत्याने नंतर प्रयत्न केला. त्याचे पाय कायम जमिनीवर होते, पण त्याचे हात आभाळापर्यंत कधीच पोचु शकले नाहीत. दोघांनीही खुप प्रयत्न केले, पण दोघांपैकी कोणीच यशस्वी होऊ शकले नाही. थकुन परत एकदा ते ब्रम्हदेवाकडे गेले, आणि या वेळेस ब्रम्हदेवाने त्यांना सांगितले, "भविष्य घडविण्यात सत्य, आणि स्वप्न या दोघांचाही सहभाग तितकाच मोलाचा असतो. खर्‍या अर्थाने यशस्वी भविष्य घडवायचे असेल, तर स्वप्नाला सत्याच्या खांद्यावर उभे राहयला हवे !.
*-----------------------------------*
*📝 संकलन*

जीवन विचार




*""नशीब""आकाशातून पडत नाही.*
*किंवा "जमिनीतून""उगवत"नाही.*
*"नशीब"आपोआप "निर्माण"होत नाही.*
*तर, केवळ "माणूसच" प्रत्यक्ष स्वतःचे नशीब स्वत:च "घडवत" असतो....*
*नशीबात असेल तसे "घडेल" या "भ्रमात" राहू नका.*
*कारण "आपण" जे "करू" त्याप्रमाणेच "नशीब घडेल" यावर "विश्वास"ठेवा....*



जीवन विचार

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
   🌺🍁जीवन विचार 🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰
आजच्या जगात जी विषमता दिसते , दुःखे , पापे दिसतात ती कां ?
त्याचे कारण हे आहे की मणुष्याने श्रमाचे स्थान पैशाला दिले आहे. पैशामुळे स्पर्धा निर्माण झाली आणि त्यातूनच तंटे निर्माण झाले.
प्रसिद्ध रशियन लेखक टाँल्स्टाय लिहितो ,  " जोवर नाणी चालत राहतील , तोवर जगात शांतता असणार नाही."
श्री शंकराचार्य म्हणतात ,  'अर्थमनर्थ भावय नित्यम्.'
अर्थाला म्हणजे पैशाला अनर्थ माना.हे तंटे नाहीसे करावयाचे असतील , तर भूक लागते त्या प्रत्येकाने शरीरश्रमाचे व्रत घेतले पाहिजे.कर्म केल्याशिवाय उत्पादन होत नाही आणि जीवनही चालत नाही हे सगळ्यांना ठाऊक आहे.

      कर्म न करता जे चिंतन होते ते माणसाला योग्य मार्गाला लावत नाही , अयोग्य मार्गाला लावते,  विकासा ऐवजी विनाशाकडे घेऊन जाते. 'Empty mind devil's  workshop '  अशी म्हणच आहे.
श्रमाने बुद्धी अधीक सात्त्विक व तेजस्वी होते.
दुसऱ्याचे शोषण न करता आपल्या स्वतःच्या श्रमाने मिळवलेले खाद्यच शुद्ध , पवित्र आहार होय. तोच मानवाच्या नैतिक , आत्मिक उन्नतीला पोषक असतो.
〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼
✍  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰

जीवन विचार

🔰🌸🔰🌸🔰🌸🔰🌸
*🌷🌷 जीवन विचार*🌷🌷
〰〰〰〰〰〰〰
प्रकाश आणि अंधार ही सृष्टीची दोन रुपे आहे.अगदी परस्परविरोधी गुणधर्माने त्यांनी सर्व सृष्टीचा चराचराला व्यापले आहे आणि अशा युगायुगाचा काळ्यापांढर्या वाटेचा माणूस प्रवाशी आहे.युग संपतात पण अंधार उजेडाचा प्रवास माञ चालूच राहतो.एक पिढी दुसऱ्या पिढीला मार्ग मोकळा करून देते.खरे तर माणसाच्या यशपयशाची , सुखदुःखाची ही प्रतीके मानवी कर्तृत्वाला गती निर्माण व्हावी यासाठीच त्यांची निर्मिती झाली असेल.काहीजरी असले तरी माणसाची तेजस्वी बुद्धी आणि मनगट कधीच खचता कामा नये प्रयत्नांच्या काटेरी वाटा बिनधास्तपणे ओलांडून आपल्या आयुष्यातील ध्येय गाठायची असतात.

*तेची म्हणावे दीप जे*
*वादळातही टिकतात*
*अंधाराशी लढा देत*
*जळत राहणे शिकतात.*

जे प्रतिकुलतेवर मात करून आकाशाकडे भरारी घेतील तेच टिकतील.जे संकटाला घाबरून वादळाला भिऊन दरीतील अंधाराला पाहून जागीच  बसतील ते संपले.
आव्हानाचा वादळांना जे स्वीकारतील त्यांचीच स्वप्ने प्रत्यक्षात उतरतील.
〰〰〰〰〰〰〰〰
🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸
*✍शब्दांकन /संकलन*

आरोग्य म्हणी संकलित

*आरोग्य म्हणी*

१.
खाल दररोज गाजर-मुळे,
तर होतील सुंदर तुमचे डोळे.

२.
सकाळी नाश्ता करावा मस्त,
मोड आलेले धान्य करावे फस्त.

३.
डाळी भाजीचे करावे सूप,
अखंड राहील सुंदर रूप.

४.
तराट्याच्या भाजीला म्हणू नका स्वस्त,
आरोग्य तुमचे ती राखेल मस्त.

५.
जवळ करा लिंबू संत्री,
दूर होईल पोटातील वाजंत्री

६.
पपई लागते गोड गोड,
पचनशक्तीला नाही तोड.

७.
पालेभाज्या घ्या मुखी;
आरोग्य ठेवा सदा सुखी.

८.
भेसळयुक्त अन्न खाऊ नका;
आरोग्य धोक्यात आणू नका.

९.
रोज एक फळ खाऊ या;
आरोग्याचे संवर्धन करू या.

१०.
भोजनोत्तर फळांचा ग्रास;
थांबवेल आरोग्याचा ऱ्हास.

११.
प्रथिने, जीवनसत्वे आणि क्षार;
आहारात यांचे  महत्व फार.

१२.
हिरवा भाजीपाला खावा रोज;
राहील निरोगी आरोग्याची मौज.

१३.
जेवणानंतर केळी खा;
पचनशक्तीला वाव द्या.

१४.
साखर व तूप यांचे अति सेवन करु नका,
मधुमेह व लठ्ठपणाला आमंत्रण देऊ नका.

१५.
खावी रोज रसरशीत फळे;
सौंदर्यवृद्धीसाठी नको प्रसाधन आगळे.

१६.
गालावर खेळते सदा हास्य,
फळे व भाज्यांचे आहे ते रहस्य.

१७.
पपई, गाजर खाऊ स्वस्त,
डोळ्यांचे आरोग्य ठेवू मस्त.

१८.
सुका मेवा ज्यांचे घरी,
प्रथिने तेथे वास करी.

१९.
भाज्या जास्त वेळ शिजवू नका,
जीवनसत्वांचा नाश करु नका.

२०.
जो घेईल सकस आहार,
दूर पळतील सारे आजार.

२१.
भाजीपाल्याचं एकच महत्व,
स्वस्तात मिळेल भरपूर सत्व.

२२.
शेंगामध्ये शेंग, शेवग्याची शेंग,
तिचा पाला तिच अंगं, सत्व आहे तिच्या संगं.

२३.
कळणा कोंडा खावी नाचणी,
मजबूत हाडे कांबीवाणी.

🌿🌱🍏🍎🍐🍊🍋🍌🍉🍇🍓🍈🍒🍑🍍🍅🍆🌶🌽🌿

पाऊस कविता संकलित

पाऊस

पाऊस तसा पहिला
अवचितच येतो
हवाहवशा मृदगंधाने
आसमंत दरवळतो

पाऊस तुझा माझा
जेव्हा असा बरसतो
कगदाच्या होडिवर
अजून जीव लोभतो

पाऊस जेव्हा केव्हा
मुसळधार कोसळतो
तुझ्या आठवणींचा घन
माझ्या मनी बरसतो

पाऊस गर्द रात्री
मनसोक्त बरसतो
विजांचा कडकडाट
माझ्याच मनात चालतो

मनामनाचा कोपरा
पाऊस जातो उजळून
इंद्रधनुचे रंग
आभाळभर उधळून

पाऊस जातो जिवाला
उगाच हुरहूर लावून
आभाळाच रितेपण
रहातं मन व्यापून

     संकलित 

कविता संकलित

. . .  जगण्यातच शान आहे . . .

जगून घे गड्या तू
जगण्यातच शान आहे
नसल्यावर तू जगी या
कोण तुला देणार मान आहे

फाटले जरी हे केवळ
जीवनाचे एकच पान आहे
अवघे आयुष्य थाटले समोर
जगण्यातच शान आहे

बघ त्या वठलेल्या वृक्षाला
पालवी पुन्हा फुटली आहे
तु तर मनुष्य का तुझी
आशा खुटली आहे

पाय रोव तू खंबीरतेने
ही केवळ लाट आहे
काळोख्या रात्रीनंतर उजाडणार
एक तेजोमय पहाट आहे

अभिनंदन ,कौतुक हा एक
केवळ आभास आहे
आई वडीलांच्या जीवनाचा
तू तर खरा श्वास आहे

शुन्यातून विश्व निर्मिले ज्यांनी
ती गाथा थोर आहे
सुरूवात ही जीवनाची
हीच का तुझी हार आहे

घे नव्याने पुन्हा भरारी आकाशी
माझी तुला आण आहे
जगून घे वेड्या जरा
जगण्यातच खरी शान आहे

✍ संकलित

जीवन विचार

🔰🌸🔰🌸🔰🌸🔰🌸
*🌷🌷 जीवन विचार*🌷🌷
*〰〰〰〰〰〰〰〰*
कर्तृत्वाला कल्पकतेची जोड मिळाली म्हणजे अदभूत कार्य घडतात.आपल्या जीवनप्रवासात अनेकदा संधी येते.संधीची ही पाऊलवाट पकडून माणसाला आपल्या जीवनाचा राजमार्ग शोधता येतो फक्त त्यासाठी आपणास योग्य त्या संधीची निवड करून पुढं चालण्याच सामर्थ्य आपल्याला उमजलं पाहिजे.सर्वोत्तम माणूस तोच म्हटला पाहिजे जो आपल्या जीवनात आलेल्या योग्य संधीच सोनं करतो अशा योग्यमय संधीचा फायदा घेऊन आपलं जीवन यशस्वी करतो.
 *संधी* म्हणजे काळाच्या भुमीत कर्माचं बीज पेरणं होय. त्या बीजाचा वृक्ष होईल तेव्हा तो सर्वांना सावली आणि फळे देईल.
*संधी* आपल्याला नवं ज्ञान , नवी दिशा दाखविते.
*चालणाऱ्याला त्याचं नशीब भेटतं.थांबणार्याचं नशीबही थांबतं.*
*संधी* म्हणजे निराश माणसाला भेटलेली हिंमत होय.
म्हणून माणसाने कोणत्याही प्रसंगाला न डगमगता निराशावादी न राहता आलेल्या योग्य संधीचा फायदा करून घ्यावा व आपल्या जीवनात यशस्वी व्हावे.
〰〰〰〰〰〰〰〰
🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸
*✍शब्दांकन /संकलन

कथा क्रमांक १९८

*🌷🌷🌷कथा🌷🌷🌷*
*📚अभ्यास कथा भाग १९८*
〰〰〰〰〰〰〰
*🌺जगात आईवडीलांचे प्रेम अनमोल*🌺
〰〰〰〰〰〰〰
मुलाच्या वाढदिवशी रात्री दीड वाजता आईने फोन केला. म्हणाली, बाळा, वाढदिवसाच्या शुभेच्छा.... मुलगा वैतागला. चिडूनच म्हणाला, "अगं, ही काय वेळ आहे फोन करायची ? सकाळी फोन करता आला नसता का ?" शुभेच्छांचा स्वीकार न करता मुलाने फोन ठेऊन कट केला..
          काही वेळाने त्याच्या खास मैत्रिणीचा फोन आला, तब्बल दोन तास बोलला. नंतर मैत्रिण फोन ठेवते बोलली, सकाळी बोलु बोलली तरी तिची ईच्छा नसतानाही अजुन जबरदस्तीनं दहा मिनिटं जास्तच बोलला, शेवटी तिनंच फोन कट केला..
            नंतर एवढा वेळ फोन व्यस्त लागुनही वडिलांनी फोन केला. आता तो मुलगा रागवत नाही, पण शांतपणाने म्हणतो, "बाबा, सकाळी करायचा ना फोन ... आताच आईचा फोन येऊन गेला. तिने ..."            
        वडील म्हणाले, "मी तुला हेच सांगायला फोन केलाय, की तुझी आई खरंच वेडी आहे, मूर्ख आहे जिनं तुला तुझा वाढदिवस म्हणून फोन करून तुझी झोपमोड केली. खरं तरं ती पंचवीस वर्षांपूर्वीपासूनच अशी वेडी, मूर्ख झालेली आहे. पंचवीस वर्षांपूर्वी जेव्हा डॉक्टरानी तिला सांगितले होते, की तातडीनं ऑपरेशन करून मूल अॅबाॅर्ट करावं लागेल तेव्हा आई जगू शकेल. पण तेव्हा ती मरायलासुद्धा तैयार झाली होती. तुला जन्म द्यायचाच ही भावना होती तिची. रात्री दीड वाजता तुझा जन्म झाला बाळा. संध्याकाळी सहा वाजल्यापासून तिला प्रसववेदनांनी त्रास होत होता. त्यावेळी खरंच ती जीवन मृत्यूच्या उंबरठ्यावर होती असह्य वेदना सहन करत ! पण तुझा जन्म झाला आणि ती सगळ्या वेदनाच विसरून गेली. डॉक्टरांनी तर आधीच आमच्याकडून लिहून घेतले होते की तिच्या जीवाचं काही बरंवाईट झालं तर डाॅक्टर जबाबदार नाहीत म्हणून ...
तुझा जन्म सुखरूप झाला आणि तिच्या आनंदाला पारावार राहिला नाही.
    आज तुला रात्री दीड वाजता फोन करून तुझी झोपमोड केली त्याबद्दल तिला माफ कर. एक सांगायचंय, तुझी आई पंचवीस वर्षांपासून मला रोज रात्री दीड वाजता उठवते आणि अभिमानाने सांगते, आपल्या बाळाचा जन्म याचवेळी झाला होता बरं का .... फक्त हेच सांगण्यासाठी तुला फोन केला होता. असं सांगून वडिलांनी फोन ठेऊन दिला.
       मुलगा हे सगळे ऐकून सुन्न झाला होता. सकाळीच तो वडिलांच्या घरी पोहोचला. आईचे पाय धरून त्यांची त्याने माफीही मागितली. वडील म्हणाले , "ती नेहमी म्हणायची, आपला मुलगा आहे, त्यामुळे आपल्याला कसलीही चिंता नाही. आता मी तिला सांगेन जशी आधीपण काळजी घेतली, तशीच तुझी काळजी मी यापुढे घेईन." आई म्हणाली, "असू द्या हो .... माफ करा त्याला ...."
      आई वडिलांना आपली धन दौलत, सम्पत्ती नव्हे तर आपले प्रेम हवं असतं. तुम्ही त्यांची काळजीही करावी अशी त्यांची अपेक्षा नसते पण तुमच्यामध्ये त्यांच्याप्रति जाणीव जरी दिसली तरी त्यांना धन्य वाटते. तुम्ही आई-वडिलांना वेळ द्यावा अशीही त्यांची इच्छा नसते पण त्यांना वेळ दिलात तर त्यांना समाधान वाटते कारण त्या दोघांचं प्रेम जगात अनमोल आहे.
*-----------------------------------*
*📝संकलन*

ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in

जीवन विचार

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
〰〰〰〰〰〰〰〰
   🌺🍁जीवन विचार  🍁🌺
〰〰〰〰〰〰〰
आपलं जीवन अनमोल आहे.आपलं जीवन निर्भय, निष्काम, प्रसन्न आणि आनंदी ठेवण्यातच खरं यश आहे.
जीवनात आनंदाचे डोही आनंद तरंग निर्माण करण्यातच खरं मर्म आहे.
          यासाठी माणसांना सतसंगतीची गरज असते. माणसाला जर सतसंगती लाभली तर त्याला परोपकाराचा आणि सदवर्तनाचा धडा शिकवून जाते.दुसऱ्याशी प्रेमानं कसं वागावं हे शिकवते आपण निःस्वार्थी राहून कार्य कसं करावं हे सांगते. सुख-दुःखात आपण मनाचा समतोल कसा राखावा हे समजावते.

    सज्जनांच्या संगतीत एखादा दुर्जन मनुष्य आला तर सज्जन आपले सारे गुण त्याच्यावर बहाल करत असतो.चंदनाच्या झाडावर कु-हाड कोसळली तरी चंदन आपल्या सुंगधाने ती कु-हाड देखील सुगंधीत करून सोडत असतो.या विचाराच मर्म ओळखून माणसानं दुर्जनापासून दूर राहावं.

  🙏 समर्थ रामदासांनी म्हणूनच सांगितले की,
   
' घडीने घडी सार्थकाची करावी l सदा संगती सज्जनाची धरावी ll
====================
🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼
✍〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in

कविता संकलित

💥💥 सत्य आणि स्वप्न 💥💥

स्वप्न आणि सत्य
दोघे परं मित्र
भविष्य घडवण्यासाठी
सर्वात कोण समर्थ?

स्वप्न म्हणाला सत्याला
मी नसेल तर
अर्थच मुळी नसेल
तुझ्या जगण्याला

सत्य म्हणाला स्वप्नाला
का उगाच स्वप्नात जगतोस?
भ्रमाच्या जाळ्यात
का उगाच गुरफटतोस?

माझ्या अस्तित्वाचे मोल
तुला ठरवेल फोल
आत्मविश्वासाची धरावी कास
यश मिळेल हमखास


दोघांचेही झाले खूप भांडण
 देवाकडे गेले घेऊन प्रकरण
देव म्हणाले दोघांना
स्वप्न आणि सत्य   दोघांनी करावे प्रयत्न

 सत्याने केला प्रयत्न
जमिनीवर पाय टेकले
हात मात्र आकाशाला
ठेकेनासे झाले

मग केला स्वप्नाने प्रयत्न
आकाशाला हाथ टेकले
मनातून आनंदले
पाय मात्र जमिनीवर उंच उडाले

दोघांनाही चूक कळली
भविष्य घडवायचे असेल तर
स्वप्नांना सत्याच्या खांद्यावर बसवायला हवे
स्वप्न, आणि सत्याची साथच खरी असायला हवे

संकलित 

कविता संकलित

त्या मृगाला या मातीचा
निरोप सांगा गडे .....
त्याच्यासाठी विरह र्‍हदयी
भरले अत्तर घडे ....

स्पर्श तयाचा पहिला होता
दरवळ वार्‍यावरी .....
पुलकीत होईल रोमरोम अन्
शहारा अंगावरी
थेंबथेंब तो पिऊन घेता
मन होईल वेडे ...
त्या मृगाला या मातीचा
निरोप सांगा गडे

सृजनबीज ते बघ कधीचे
सुप्त निजले आहे
तु येण्याचा निरोप ऐकून
किती गजबजले आहे
मिलनाच्या कल्पनेनेचं
अंगी रोमांच होती खडे
त्या मृगाला या मातीचा
निरोप सांगा गडे

तू यावे वेळेवर अन्
बरसावे मनमुराद
अतृप्त जीवाची ऐक ना रे
केविलवाणी साद
कुणाकडे मी यासाठी
घालू बरे साकडे ?
त्या मृगाला या मातीचा
निरोप सांगा गडे

नैऋत्येतून म्हणे निघाला
मोसमी वार्‍यावरी
निरोप कळता हे मनही
कुठेयं थार्‍यावरी
मेघांच्या पालखीत बसूनी
ये आधी इकडे
त्या मृगाला या मातीचा
निरोप सांगा गडे

मिलनघटीका जवळ येता
धडधडे र्‍हदय बाई
विद्युल्लतेची आतापासूनी
मनात रोषणाई...
अंबराच्या अंगणी ढगांचे
वाजतील सनई चौघडे ...
त्या मृगाला या मातीचा
निरोप सांगा गडे

आतूरले रे गंध उधळण्या
हे भरले अत्तर घडे ...... !
✍ 🙏🙏