थोरांचे बोल



01. सर्वात मोठे पाप म्हणजे अन्यायाशी तडजोड करणे. -नेताजी सुभाषचंद्र बोस.


02. ईश्र्वर एकच व निर्गुण-निराकार आहे...
ईश्र्वराच्या भक्तीसाठी कोणालाही कोणत्याही मध्यस्थाची गरज
नाही... धार्मिक कर्मकांडावर विश्र्वास ठेवू नका !! -क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले.



03. सर्व प्रकारच्या अंधश्रध्दा आणि धर्माच्या नावाखाली केला जाणारा वेडाचार
नष्ट करा. - नेताजी सुभाषचंद्र बोस.



04. जातीभेद एक मनाचा रोग आहे. मनाने तो मानला नाही की, तो झटकन बरा होतो. -विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.



05. रात्रीच्या अंधाराला घाबरू नका, पहाटेचा इंतजार करा. एक दिवस तुमचाही उजाडेल. - सिंधुताई सपकाळ.



06. असत्याच्या बाजूने जरी बहुमत असले तरी ते स्विकारू नये. -संत तुकोबाराय.



07. प्रसन्न हवापाणी ऋतु । हाचि विवाहाचा मुहूर्त। बाकीचें
झंजट फालतू । समजतों आम्ही ॥
दिवस पाहावा सुंदर । हावापाणी सोयीस्कर ।
सर्वांसि होईल सुखकर । म्हणोनिया ॥
लग्नासाठी कर्ज करावे । जन्म भर व्याज भरीत जावे ॥
पैश्या साठी कफल्लक व्हावे । कोन्या देवे सांगितले ॥
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.



08. आपले हक्क आपल्या कर्तव्या पेक्षा श्रेष्ठ असू शकत नाही... आपण आपली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्‍या पार पाडत असतो.. तोपर्यँत आपले हक्क आणि अधिकार अबाधित राहतात..हे आपण लक्षात घेतलं पाहिजे...--जॉन. एफ. केनेडी.



09. भाषा ही मनुष्याच्या मनोवृत्तीचा व हदयवृत्तीचा उदगार होय. -विष्णुशास्त्री चिपळूणकर.



10. घर ही गोष्ट दगडविटांनी बांधली जात नाही, जिव्हाळयाच्या व प्रेमाच्या धाग्यांनी बांधले जाते तेच खरोखर घर. -वि. वा. शिरवाडकर.



11. स्वच्छ घरात परमेश्वर येतो, स्वच्छ हदयात परमेश्वर येतो. -साने गुरुजी.



12. निराशा ही मनुष्याचे असलेले हातपाय मोडते, परंतु आशाही परमानंद माधवाच्या कृपेप्रमाणे लंगड्या माणसालाही गिरीचे उल्लंघन करण्याला प्रवृत्त करते. -शि. म. परांजपे.



13. जी व्यक्ती स्वत:ची सुधारणा स्वत: करून घेते ती व्यक्ती लांबलचक भाषणे देणाऱ्या पुढाऱ्यापेक्षा जास्त सुधारणा समाजात घडवून आणते. -लेवेटर.



14. एक डाव हुकला म्हणून सर्वच डाव हुकतात असं कशावरून ? आणि ते तसे हुकू दिले तर खेळणाऱ्याचे चातुर्य काय ? - ना. घो. ताम्हणकर.



15. "शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती नाही, असे
इतिहास सांगतो. अज्ञानात बुडून गेलेल्या देशात उत्तम
मत्सुद्दी व लढवय्ये वीर कधीही निपजणार नाहीत.
म्हणूनच सक्तीच्या व मोफत
शिक्षणाची भारताला अत्यंत गरज आहे."
- राजर्षी छत्रपती शाहू महाराज.



16. हे दिन दुबळ्यांचे हात कष्ट मेहनत करून ते स्वतः जगतात व
इतरांना जगवतात. गरिबांच्या कष्टावरच सर्व व्यवहार
चालत असतात. त्यांच्या मेहनतीला नेहमी फळ येते.
ती जगतात आणि जगवतात !!
- सत्यशोधक विचारवंत आण्णा भाऊ साठे.



17. ज्या देशातील तरुण केवळ देव धर्मा मागे धावत राहतो ,
त्याला मी केवळ नामर्द हाच शब्द योग्य आहे असे म्हणेन.
स्वतः चे हात पाय चालवता येत नाहीत म्हणून देवापुढे
हात जोडत असलेल्या तरुणाच्या हातात देश गेल्यास तिथे
काहीही साध्य होने शक्य नाही.
- शहीद भगतसिंग.



18. हरल्यावर का हरलो याचे स्पष्टीकरण द्यावे लागते. मात्र जिंकल्या स्पष्टीकरणाचा एकही शब्द बोलावे लागत नाही. -एडॉल्फ हिटलर.



19. असत्याकडून सत्याकडे होणारी वाटचाल वेगाने होण्यास ज्ञान मदत करते. -टी. फुलर.


20. माणसाने निदान स्वत:ला तरी नीट समजून घावे. -जोश मलिहाबादी.



21. कित्येक संकटे येतात आणि जातात; परंतु या संकटांना न्याय आणि सत्याचा पाठपुरावा करीत जो समोर जातो तोच खरा शूर. -प्रेमचंद.


22. स्वच्छ दृष्टीने जगाकडे पहा, आपोआप अनेक सत्यांचा उलगडा होत जाईल. -स्वामी विवेकानंद.



23. बुद्धिमान व्यक्तीबरोबर एक वेळ स्पर्धा केली तरी चालेल, पण मुर्खाबरोबर मित्रत्वही योग्य नाही. -स्वामी विवेकानंद.



24. लोकात फार मोठ्या प्रमाणात बुद्धिमत्ता वसत आहे. ती फक्त दडपून टाकण्यात आली आहे. तिच्या अविष्काराला संधी दिली पाहिजे. -लेनिन.



25. मानवी जीवन हे नेहमी भावी अस्तित्वाच्या आशेने उजळले पाहिजे. -कांट.



26. सेवाधर्माचे एकनिष्ठ आचरण करा. प्रथम स्वयंसेवक व्हा, देश-सेवक व्हा, मग तुम्ही देशाचे स्वामी आपोआप व्हाल. -स्वामी विवेकानंद.



27. मोठा माणूस स्वत: मोठमोठी कामे करतो तसेच इतर माणसांना मोठी कामे करायला शिकवतो. -बेर्गसॉ.



28. निसर्ग नियमबद्ध आहे. हे आपले काम शिस्तबद्धपणे बजावीत असतात. -जहीर.



29. सामान्य लोक आपण वेळ कसा घालवावा याचा विचार करतात, पण बुद्धिमान लोक त्याचा उपयोग करण्यचा प्रयत्न करतात. -स्कॉपन हॉवर.



30. माणूस हे निसर्गाचेच अपत्य आहे. त्याला निसर्गापासून खूप शिकता येण्यासारखे आहे. त्याने निसर्गाची उपेक्षा करू नये. -युकेन.



31. जगातील सर्वात मौल्यवान हिऱ्याहूनही 'ज्ञान' अधिक मौल्यवान आहे, सुंदर आहे. -म. गांधी.

1 comment: