बक्षिस वितरण सोहळा

*🏆🏆🏆बक्षिस वितरण सोहळा🏆🏆🏆*
🌷🌹🌷 🌹 🌷🌹🌷 🏆👫👭👬👬👫👫🏆 आज दि.३१-०३-२०१७ रोजी आमच्या  *जि.प.प्रा.शाळा वाटेगाव*येथे बक्षिस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.

   विद्यार्थ्यांनी (जानेवारी) महिन्यात विविध स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या अंगी असलेल्या कलागुण व सुप्तगुणांना दाखवून स्पर्धा जिंकून बक्षिसपाञ झाले.सदरील स्पर्धा ह्या पहिली ते सातवी पर्यंतचा सर्व विद्यार्थ्यांसाठी होत्या.स्पर्धेत प्रथम व व्दितीय असे प्रत्येक इयत्तेमधून नंबर काढण्यात आले होते.
स्पर्धेतील या चिमुकल्यांसाठी गावकरी मंडळीकडून भरपूर रक्कम स्वखुशीने मिळाली होती. त्या अनुशंगाने आम्ही बक्षिसे म्हणून विद्यार्थ्यांना थंडपेय बाँटल, चिञकला वही, टिफिन, कंपासपेटी, कलर बाँक्स.अशा वस्तू आणून त्याचे वितरण शाळेचे मा.मु.अ.श्री चव्हाण सर व शाळेतील सर्व शिक्षकवृंदाचा हस्ते  केले.
सदरील कार्यक्रमाचे सूञसंचलन श्रीमती सेनकुडे मँडमनी केले तर आभार श्रीमती झाडे मँडमनी मानून अशा आनंदमय कार्यक्रमाची  सांगता केली.
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
🌹 *प्रेरणादायी संदेश* 🌹
*काही जिंकणं 👍बाकी आहे*
        *काही हरणं बाकी आहे*
*अजुनही आयुष्याचे पूर्ण सार बाकी आहे.*
*आपण चाललोय आपल्या ध्येयपूर्तीकडे*
*आपण पहिल्या पानावर आहोत*
    *अजून संपुर्ण पुस्तक📚 बाकी आहे.*
󞐰〰〰〰〰〰〰〰
*🙏 इहिवृत्त लेखन 🙏*
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (स.शी.)
जि.प.प्रा.शाळा वाटेगाव
ता.हदगाव जिल्हा नांदेड.
*〰〰〰〰〰〰〰*

कथा क्रमांक १८१

*माझी शाळा माझे उपक्रम*

*🌷🌷🌷कथा🌷🌷🌷*
*📚अभ्यास कथा भाग . १८१*
〰〰〰〰〰〰〰
🌺 *महानता*🌺
=================
कटकमध्‍ये जानकीनाथ बोस हे एक वकील होते. एका रात्री ते, त्‍यांची पत्‍नी व मुलगा सुभाष आपल्‍या घरात झोपले असता काही वेळाने त्‍यांच्‍या पत्‍नीला जाग आली व तिने पाहिले आपला मुलगा सुभाष जमिनीवर झोपला आहे. त्‍याला थंडी वाजेल अशी तिला भिती वाटू लागली. पत्‍नीने मुलाला जागे केले व विचारले,'' बेटा सुभाष, तुला असे जमिनीवर का झोपावेसे वाटले'' सुभाषने उत्तर दिले,''आई, आपले पूर्वज असणारे साधु संत,महात्‍मे, ऋषीमुनी हे सारेच जमिनीवर झोपत असत म्‍हणून मी ही जमिनीवर झोपणार आहे.'' आई म्‍हणाली,'' बेटा, ते महान होते आणि वयानेही मोठे होते. तुझे वय जमिनीची कठोरता सहन करणार नाही तू बाजेवर येऊन झोप.'' आई आणि मुलाच्‍या या चर्चेने जानकीनाथ बोस जागे झाले आणि त्‍यांनीही सुभाषला विचारले,'' सुभाष तुला जमिनीवर झोपायला कुणी शिकविले.'' सुभाष म्‍हणाला,''बाबा, गुरुजी सांगत होते साधु संत,महात्‍मे, ऋषीमुनी हे सारेच महापुरुष होते. तसेच ते जमिनीवर झोपत असत म्‍हणून मी ही जमिनीवर झोपणार आहे. मला महापुरुष व्‍हायचे आहे.'' जानकीनाथ बोस यांनी सुभाषला समजावले की,'' बेटा, जमिनीवर झोपून कुणी महान होत नसते तर कठोर तप, साधना आणि पीडीत मानवतेच्‍या सेवेतून व्‍यक्ती महान होते. आचरणात शुद्धता ठेवली तर मनुष्‍य महान होतो.'' सुभाषला वडीलांचे म्‍हणणे पटले व त्‍याने त्‍याचप्रमाणे वर्तन ठेवले व एक महान क्रांतीकारी हिंदूस्‍थानला मिळाला त्‍याचे नाव सुभाषचंद्र बोस. राष्‍ट्रासाठी संपूर्ण जीवन व्‍यतीत करून, समर्पण कसे असावे याचा संदेश देणारे जीवन त्‍यांनी जगले व वडीलांची शिकवण आचरणात आणली.
  *तात्पर्य*
त्‍याग आणि समर्पणातूनच देशहित जपले जात असते.
*-----------------------------------*
*📝 संकलन*

जीवन विचार

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

   *🌺 जीवन विचार* 🌺
〰〰〰〰〰〰〰
*ज्याचा वर्तमानकाळ प्रयत्नवादी आहे, त्याचा भविष्यकाळ उत्तम आहे.माणूस आयुष्यात प्रगतीसाठी अनेक कामे करत असतो. त्यासाठी प्रचंड मेहनत घेतो. कष्ट सहन करतो. अनेक प्रसंगांना त्याला सामोरं जावं लागतं. हे सर्व करत असताना प्रतिकूल परिस्थितीच्या माराणं जो खचत नाही, माघार घेत नाही, तोच जीवनात यशस्वी होतो. जे या परिस्थितीच्या बसणाऱ्या घावांना घाबरतात, मनानं खचून जातात, ते मात्र अपयशी होतात. त्यांची अवस्था घडवलेल्या आणि हिऱ्या सारख्या दिसणाऱ्या चमकत्या काचेच्या थोड्या-थोड्या आघाताने तडकणाऱ्या, चुरा होणाऱ्या कच्या वस्तुप्रमाणे होते.*

*जेवढा संघर्ष बिकट , तेवढेच यश अधिक उज्वल.म्हणून जेवढं तुम्ही सहन कराल, तेवढं तुम्ही यशस्वी व्हाल.*
〰〰〰〰〰〰〰

जागतिक जलदिन

💧 *22 मार्च हा "जागतिक जलदिन"* 💧


💧 *जल प्रतिज्ञा* 💧

मी प्रतिज्ञा करतो की,
पाणी हे जीवन असून,
त्याचा वापर गरजेपुरता व काटकसरीने करेन.
 मी पाण्याचा  अपव्यय व  गैरवापर करणार नाही. नेस्रगिक प्रवाह, जलाशय, कालवे व पाणीपुरवठ्याच्या पायाभूत सुविधांचे मी रक्षण करेन.
पाण्यविषयीचे कायदे व नियमांचे मी काटेकोरपणे पालन करेन.
पाण्याचे संवर्धन व जतन करण्याचा मी प्रयत्न करेन. पाण्याची स्वच्छता व  पावित्र्य जपणे ही माझी सामाजिक बांधिलकि मानून त्याचे सदैव पालन करेन.

जय हिंद! जय महाराष्ट्र ! !

💧 *"पाणी बचत म्हणजे पाणी निर्मिर्ती"* 💧

💧💧💧💧💧💧💧💧💧

जीवन विचार

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

   *🌺 जीवन विचार* 🌺
〰〰〰〰〰〰〰
*शिक्षणाचा उदात्त हेतू केवळ ज्ञान अपेक्षित करणे नसून तर त्या ज्ञानाचे कृतीत रुपांतर करणे हे आहे.खरी गुरुभक्ती ही ज्ञानभक्तीच असते. कारण शिष्याला जोपर्यंत ज्ञानाची तहान असते  तोपर्यंत या जगात गुरूभक्ती चाललेलीच असते.ज्ञान हे आपल्या मानवी जीवनाचे सार आहे असे म्हणायला काही हरकत नाही.*

   *आपलं जीवन सुंदर करणं, निष्काम करण ही तर फार मोठी विद्या आहे.जीवनातील ही विद्या आपण सद्गुरुकडून प्राप्त करून घेतो. सद्गुरु आपणांस नव वैचारिकता , सर्जनशीलता  यांना जन्म देतो.असे हे ज्ञान  आपण ज्यांच्याकडून प्राप्त करून घेतो त्यांस आपला गुरू मानावे.*

 *गुरु म्हणजे अनंत ज्ञानाची तळमळ असते.सत्याचा प्रयोगाची उत्कटता असते.गुरू हा आपल्या जीवनरुपी बागेचा माळी आहे.आणि आपल्या ज्ञानमृताने तो ती बाग फुलवीत असतो.अशा सर्व ज्ञानरुपी गुरुस शतशः वंदन*🙏👏
〰〰〰〰〰〰〰
*🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼*

कथा क्रमांक १८०

अभ्यास कथा क्रमांक १८०

संघर्ष

एका गावात एक शेतकरी देवावर खूप नाराज झाला.

नाराजीचे कारणही तसेच होते कारण कधी पाऊस जास्‍त पडत असे तर कधी पूर्ण दुष्‍काळ, कधी ऊन जास्‍त तर कधी ढगाळ वातावरण, कधी गारा पडून पीकाचे नुकसान होई तर कधी वा-याने उभे पीक आडवे होत असे.

एक दिवस वैतागून त्‍याने देवाला साद घातली व देवास सांगितले,''तुम्‍ही सर्वव्‍यापी प्रभू परमेश्‍वर असाल इतर सर्व गोष्‍टीतले तुम्‍हाला कळत असेल पण माझ्यामते तरी तुम्‍हाला शेतीतले काहीच कळत नाही. एक प्रार्थना तुम्‍हाला मी करतो तुम्‍ही फक्त एक वर्षभर निसर्ग माझ्या ताब्‍यात द्या मग बघा शेती कशी फुलते ते. घरोघरी मी धान्‍यांच्‍या राशी घालतो ते पहाच तुम्‍ही.''

देव हसला आणि म्‍हणाला,''तथास्‍तू, तुझ्या म्‍हणण्‍याप्रमाणे आज,आतापासून मी निसर्गाचा लहरीपणा बंद करून तो तुझ्या ताब्‍यात मी देत आहे. तू तुला जसा पाहिजे तसा ऋतु बनवून घे व शेती कर'' इतके बोलून देव निघून गेला.

शेतक-याने या वरदानाचा फायदा घेण्‍यासाठी गहू पेरले, जेव्‍हा त्‍याला जेवढे ऊन पाहिजे होते तेव्‍हा त्‍याने ऊन पाडले, जेव्‍हा त्‍याला पाणी द्यायचे होते तेव्‍हा त्‍याने पावसाचा वर्षाव केला.

प्रचंड ऊन, गारा,पूर, सोसाट्याचा वारा याचा स्‍पर्शही कधी त्‍याने आपल्‍या पीकांना होऊ दिला नाही.

काळ निघून गेला आणि त्‍याची शेती बहरून आली. शेतक-याला मोठा आनंद झाला. कधी नव्‍हे इतके पीक आले होते. शेतक-याने मनातल्‍या मनात विचार केला की आता देवाला कळेल की शेती कशी केली जाते, उगाचच तो शेतक-यांना कसा त्रास होईल ते वरून पाहत असतो.

पीक कापणीस आले आणि शेतकरी मोठ्या आनंदाने, गर्वात पीक कापणीसाठी शेतात गेला.

 पीकाला हात लावून पाहिला आणि तो बेशुद्ध होऊनच खाली पडला. कारण गव्‍हाच्‍या त्‍या लोंब्यांमध्‍ये एकही दाणा नव्‍हताच मुळी. पीक नुसते आलेले दिसत होते पण एकही गव्‍हाचा दाणा त्‍यात नव्‍हता.

थोड्यावेळाने तो शुद्धीवर आला आणि धाय मोकलून रडू लागला. त्‍याचे काळीज पिळवटणारे रूदन ऐकून परमात्‍मा परमेश्वर तेथे प्रकट झाला आणि म्‍हणाला,

'' अरे वेड्या तुला काय वाटले, तू तुझ्या इच्‍छेप्रमाणे जसा पाहिजे तसा वागला म्‍हणून पीक तसे येत नसते.

 त्‍या पिकाला तू कधीच संघर्ष करू दिला नाही. सोसाट्याच्‍या वा-यातच पिक उभे राहते तेव्‍हाच त्‍याच्‍यात बळ येते. प्रचंड उन्‍हातही त्‍याच्‍यात जगण्‍याची इच्‍छा बळावते. संकटाशी जोपर्यंत सामना करत नाही तोपर्यंत त्‍याला त्‍याची कुवत कळत नाही.

 सगळे जर मनाप्रमाणे घडले तर कोणत्‍याच गोष्‍टीची किंमत राहत नाही.

आव्‍हान मिळाले नाही म्‍हणून तुझ्या पीकात दाणे भरलेच नाहीत. वारा सुटतो, गारा पडतात तेव्‍हाच त्‍या पिकात जगण्‍याची उमेद निर्माण होते आणि ते संघर्ष करून नवीन जीवन निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न करते.

तू हे कधीच होऊ दिले नाही म्‍हणून तुझे पीक हे पोकळ निघाले.

सोन्याला सुद्धा चकाकी येण्‍यासाठी आधी आगीतून जावे लागते तेव्‍हाच ते चकाकते.

हातोडीचे मार सोसावे लागतात तेव्‍हाच सोन्‍याचा उत्‍कृष्‍ट दागिना बनतो.''

आता शेतक-याला जीवनाचे सार उमगले होते.

*तात्पर्य:-*

जीवनात जर संघर्षच नसेल तर, आव्‍हाने नसतील तर मनुष्‍य अगदी खिळखिळा बनून राहतो. त्‍याच्‍यात कोणतेच गुण येऊ शकत नाहीत. संकटेच माणसाला तलवार किंवा ढाल बनण्‍याची प्रेरणा देतात. कधी तलवार बनून वार करायचा आणि कधी ढाल बनून सामोरे जायचे हे संकटाकडूनच माणूस शिकतो. जीवनात जर कधी यशस्‍वी व्‍हायचे असेल तर संकटांपासून कधीच पळून चालणार नाही. संघर्ष केल्‍यानेच संकटे दूर होतात त्‍याच्‍यापासून दूर पळून नाही. 〰〰〰〰〰〰〰〰〰

कथा क्रमांक १७९

अभ्यास कथा क्रमांक १७९

उपकार

एकदा एक वाघ आणि वाघीण आपल्या पिलांना गुहेत सोडून शिकारीसाठी दूर जंगलात जातात. खूप दिवस पर्यंत ते परत आलेच नाही. इकडे पिलांना खूप भूक लागली. कलकल ऐकून एका बकरीला त्यांची दया  आली. तिने वाघिणीच्या पिलांना आपले दूध पाजले. पिलांच्या जीवात जीव आला. आता बकरी रोज येऊन त्यांना दूध पाजू लागली. एक दिवस पिले पोट भरल्यानंतर मस्ती करू लागली. तेव्हड्यात तिथे वाघ आणि वाघीण आले. बकरीला पाहून आयती शिकार मिळाल्याच्या आनंदात तिच्यावर वाघ झडप घालणार इतक्यात पिले म्हणाली, हिने आम्हाला दूध पाजून मोठे केलेय. ही नसती तर आम्ही मरून गेलो असतो. हिचे आपल्यावर खूप उपकार आहेत. तुम्ही तिला मारू नका. मुलांचे ऐकून वाघ खुश झाला आणि तिला कृतद्न्यतेने म्हणाला. आम्ही तुझे हे उपकार विसरणार नाही. आता तू स्वतंत्रपणे आनंदाने जंगलात एकटी सुद्धा वावरू शकतेस. तुला कुणीही त्रास देणार नाही.
आता बकरी मोठ्या धाडसाने जंगलात कुठेही वावरू लागली. एकदा तर बकरीला वाघाच्या पाठीवर बसून उंच झाडांची पाने खातांना एका पक्षाने पाहिले आणि कुतूहलाने त्याने बकरीला त्याबद्दल विचारले. बकरीने त्या मोठ्या पक्षाला सर्व हकीकत सांगितली. उपकाराचे महत्व पक्षाच्या लक्षात आले.
आपण पण असेच महान कार्य करायचे असे पक्षाने ठरवले.
एकदा पक्षी उडत असतांना त्याला काही उंदराची पिले दलदलीत फसलेली दृष्टीस पडतात. ती बाहेर पडायचा प्रयत्न करत असतात पण अधिकच खोल जात असतात. पक्षी त्यांना अलगद बाहेर काढतो. उंदराची पिले ओली झालेली असतात. थंडीने कुडकुडत असतात. पक्षी त्यांना आपल्या पंखात घेतो. चांगली ऊब देतो. थोड्या वेळाने आपल्या घरट्या कडे जाण्यासाठी निघतो. उंदराच्या पिलांचा निरोप घेतो. उडायचा प्रयत्न करतो पण काही केल्या त्याला उडता येईना कारण त्याचे पंख पिलांनी कुर्तडलेले असतात.
चरफडत चरफडत कसाबसा पक्षी तिथून निघतो.
बकरीला भेटून विचारतो, "तू पण उपकार केलेस मी पण उपकार केले. पण फळ दोघांना वेगवेगळे कसे मिळाले?"
बकरी हंसली आणि गंभीरपणे म्हणाली

 *"उपकार पण वाघासारख्यावर करावेत, उंदरा सारख्यावर नाही. कारण असे लोक नेहमी कामापूरते असून आपल्या स्वार्थाकरिता दूसरा पर्याया मिळाला कि ,सच्च्या व प्रमाणिक माणसाला ते विसरण्यातच त्यांची स्वभाव धन्यता मानतात आणि बहादूर लोक उपकार करण्या-याला लक्षात ठेवतात"*

_

कथा क्रमांक १७७


*🌷🌷🌷कथा🌷🌷🌷*
*📚अभ्यास कथा भाग . १७७*
〰〰〰〰〰〰〰
     *🌺 खरा न्याय*🌺
=================
  " एका गावात राम आणि शाम नावाचे दोन व्यापारी राहत असतात. ते एकमेकांचे खूप चांगले मित्र असतात. एक दिवस अचानक राम त्याची सर्व संपत्ती गमावतो. तो गरीब होतो. तो शामकडे मदतीसाठी येतो. शाम खूप दयाळू मनाने फार चांगला असतो. तो क्षणाचा हि विचार न करता,रामला आपल्या संपत्ती मधील अर्धा वाटा देऊन टाकतो.
शामच्या मदतीमुळे रामला फार आनंद होतो. तो शामला वचन देतो कि, जेव्हा कधी तुला मदत लागेल तेव्हा मी तुला अवश्य मदत करीन. खूप वर्षानंतर शाम गरीब बनतो. त्याला रामची आठवण येते आणि तो मदतीच्या अपेक्षेने रामकडे जातो. परंतु राम त्याला मदत न करता घरातून हाकलून देतो
शामला खूप वाईट वाटते . राम खूप बदललेला असतो.

 शामच्या एका नौकाराने हे सर्व ऐकलेले असते. तो राजाकडे जातो आणि राजाला सर्व गोष्ट सांगतो. राजा सगळे ऐकून घेतो. सगळी माहिती काढतो.
राजा शामला आणि रामला बोलावतो. राजा रामला त्याच्या वचनाची आठवण करून देतो. राजा लगेच रामला आदेश देतो कि, त्याने त्याची अर्धी मालमत्ता शाम बरोबर वाटून घ्यावी शामला योग्य तो न्याय मिळतो. शामने रामला अर्धी मालमत्ता दिली होती तशीच राम शामला देतो. आता खरा न्याय होतो.
*तात्पर्यःखरा न्याय करावा."*
*------------------------*
      📙   *संकलन*  📙

कथा क्रमांक १७६

अभ्यास कथा क्रमांक १७६

समाधान

जे असेल त्यात समाधानी असावे.
एकदा एक भुंगा गुंजारव करत फिरत होता. तेव्हा त्याला एक चिमणी म्हणाली, 'मूर्खा, तू जो एकसारखा एकच आवाज काढत बसतो तो कशासाठी? वसंतऋतूत गाणारी कोकिळा, हिरव्यागार झाडाच्या फांदीवर बसून गाणारा बुलबुल यांची बरोबरी तुला कधीतरी करता येईल का?

तसे जमत नाही तर भिकार सूर एकसारखा काढून तू लोकांना कंटाळा का आणतोस?' भुंगा म्हणाला, 'अगं चिमणे, परमेश्‍वराने या जगात प्रत्येक व्यक्तीत निराळेपणा ठेवला आहे. वैचित्र्य असणे हा जगाचा नियम आहे, दुसर्‍याचा हेवा न करता ज्याने त्याने आपापल्या शक्तीचा उपयोग केला तर त्यात वाईट काय? जेव्हा कोकिळेचे गाणे बंद पडते किंवा बुलबुल मुका होतो तेव्हा एखाद्या सुंदर बागेत निर्जनता भासू न देण्यात माझ्या गरीबाचा उपयोग होतो.'

* तात्पर्य:-* सर्व मनासारखे होत नाही, तर जे असेल त्यात समाधानी असावे.

कथा क्रमांक १७५

अभ्यास कथा क्रमांक १७५

स्‍वामी अखिलानंद

स्‍वामी अखिलानंद हरिद्वारमध्‍ये गंगेकाठी आश्रमात रोज रामायणावर प्रवचन देत असत. एकेदिवशी ते शिष्‍यांसोबत गंगेकाठी चालत होते. तेव्‍हा त्‍यांना आश्रमाच्‍या शेजारी असलेल्‍या झाडांवर दोन माणसे बसलेली दिसली. शिष्‍यांना विचारल्‍यावर शिष्‍य म्‍हणाले, ते दोघे ग्रामीण भक्त असून ते कथा ऐकायला येत असल्‍याचे सांगितले. त्‍यांचे फाटलेले कपडे पाहून स्‍वामीजी विचार करू लागले, ह्या अडाणी लोकांना काय रामायणाचे अन भक्तीचे मर्म समजणार? प्रसादाच्‍या आशेने येत असतील दोघे दुसरे काय? त्‍यांनी त्‍या दोघांना बोलावले आणि रामभक्तीचे महत्‍व विचारले, दोघेही अडाणी आणि अचानक बोलावणे आल्‍याने भांबावले, त्‍यामुळे ते दोघेही एक शब्‍द स्‍वामीजींपुढे बोलूच शकले नाही. स्‍वामीजी रागवत म्‍हणाले, तुम्‍हाला रामायण कळत नसेल तर येत जाऊ नका, उगाच गर्दी वाढवू नका, रामायण संपल्‍यावर या तुम्‍हाला प्रसाद द्यायची व्‍यवस्‍था मी करतो.'' दोघेही बिचारे मान अपमानाची पर्वा न करता स्‍वामीजींना नमस्‍कार करून निघून गेले. दुसरे दिवशी मात्र स्‍वामीजींना खरी भक्ती काय असते हे पुरेपुर समजले, कारण रात्रभर मुसळधार पाऊस पडला आणि नदी भरून वाहू लागली, यायला वाटही नाही, स्‍वामींच्‍या आश्रमातही पाय ठेवायला जागा उरली नाही इतके पाणी झाले. रामायण कथन करण्‍यासाठी स्‍वामीजी आले पण समोर कुणीच श्रोता नाही इतक्‍यात स्‍वामीजींचे लक्ष समोरच्‍या झाडाकडे गेले तर कालचेच दोघे ग्रामीण भक्त त्‍यांच्‍या रोजच्‍या जागेवर झाडावर भिजलेल्‍या अवस्‍थेत रामायण ऐकण्‍यासाठी येऊन बसलेले दिसले. स्‍वामीजींना राहवले नाही व त्‍यांनी त्‍या दोघांच्‍या समोर लोटांगण घातले व त्‍यांच्‍या रामभक्तीला नमस्‍कार केला.
                *तात्पर्य*
कुणालाही कमी समजू नये. कोण कुठल्या अधिकाराचा असेल ते सांगता येत नाही.                           〰〰〰〰〰〰〰

कथा क्रमांक १७४

अभ्यास  कथा क्रमांक १७४

सुभाषचंद्र बोस

कटकमध्‍ये जानकीनाथ बोस हे एक वकील होते. एका रात्री ते, त्‍यांची पत्‍नी व मुलगा सुभाष आपल्‍या घरात झोपले असता काही वेळाने त्‍यांच्‍या पत्‍नीला जाग आली व तिने पाहिले आपला मुलगा सुभाष जमिनीवर झोपला आहे. त्‍याला थंडी वाजेल अशी तिला भिती वाटू लागली. पत्‍नीने मुलाला जागे केले व विचारले,'' बेटा सुभाष, तुला असे जमिनीवर का झोपावेसे वाटले'' सुभाषने उत्तर दिले,''आई, आपले पूर्वज असणारे साधु संत,महात्‍मे, ऋषीमुनी हे सारेच जमिनीवर झोपत असत म्‍हणून मी ही जमिनीवर झोपणार आहे.'' आई म्‍हणाली,'' बेटा, ते महान होते आणि वयानेही मोठे होते. तुझे वय जमिनीची कठोरता सहन करणार नाही तू बाजेवर येऊन झोप.'' आई आणि मुलाच्‍या या चर्चेने जानकीनाथ बोस जागे झाले आणि त्‍यांनीही सुभाषला विचारले,'' सुभाष तुला जमिनीवर झोपायला कुणी शिकविले.'' सुभाष म्‍हणाला,''बाबा, गुरुजी सांगत होते साधु संत,महात्‍मे, ऋषीमुनी हे सारेच महापुरुष होते. तसेच ते जमिनीवर झोपत असत म्‍हणून मी ही जमिनीवर झोपणार आहे. मला महापुरुष व्‍हायचे आहे.'' जानकीनाथ बोस यांनी सुभाषला समजावले की,'' बेटा, जमिनीवर झोपून कुणी महान होत नसते तर कठोर तप, साधना आणि पीडीत मानवतेच्‍या सेवेतून व्‍यक्ती महान होते. आचरणात शुद्धता ठेवली तर मनुष्‍य महान होतो.'' सुभाषला वडीलांचे म्‍हणणे पटले व त्‍याने त्‍याचप्रमाणे वर्तन ठेवले व एक महान क्रांतीकारी हिंदूस्‍थानला मिळाला त्‍याचे नाव सुभाषचंद्र बोस. राष्‍ट्रासाठी संपूर्ण जीवन व्‍यतीत करून, समर्पण कसे असावे याचा संदेश देणारे जीवन त्‍यांनी जगले व वडीलांची शिकवण आचरणात आणली.
                      *तात्पर्य*
त्‍याग आणि समर्पणातूनच देशहित जपले जात असते.

कथा क्रमांक १७३

अभ्यास कथा क्रमांक १७३  

      *सज्जनपणा*  

                     महात्मा गांधी एकदा आगगाडीतून प्रवास करत होते. त्यांच्या शेजारी बसलेला माणूस गाडीत पचकन थुंकला .गांधीजींनी त्यांच्या जवळ असलेला कागदाचा कपटा घेऊन ती थुंकी पुसून टाकली. त्या प्रवासाला राग आला. थोडया वेळाने तो पुन्हा मुद्दाम थुंकला. पुन्हा गांधीजींनी ती जागा पुसून स्वच्छ केली. असं ब-याचदा झालं .दरवेळी काहीही न बोलता गांधीजी ती जागा स्वच्छ करत होते. आणि दरवेळी त्या उतारूच्या रागाचा पारा मात्र चढत होता. शेवटी तो उतारू थुंकून -थुंकून थकला  , ओशाळला. त्याने गांधीजीची माफी मागितलीआणि त्यांना विचारलं  , " मी पुन्हा पुन : थुंकत होतो  , तरी तुम्ही दरवेळी स्वच्छता करत राहिलात  , असं का केलंत  ? " यावर गांधीजी म्हणाले , तू तुझं काम करत होतास आणि मी माझं  ! "

✍ तात्पर्य  - जे चांगले वागतात  , ते नेहमी सज्जन असतात. त्यांच्यावर कितीही संकटं आली  , तरीही आपला सज्जनपणा ते कधीही सोडत नाही. पुण्य करीत राहणं  , हा त्यांचा स्वभाव गुणच असतो .

कथा क्रमांक १७२

अभ्यास कथा क्रमांक १७२
        *वेडे सांबर*
एक सांबर नदीत आपले रूप पाहत होते. पाहता पाहता ते मनाशी बोलू लागले, ''अहाहा, ही माझी शिंगे किती छानदार आहेत! ही किती शोभिवंत दिसतात! अशी चांगली शिंगे देवाने कोणालाही दिली नाहीत! पण हे पाय बाकी फारच वाईट आहेत! किती रोडके आणि घाणेरडे आहेत! अरेरे, यापेक्षा मला मुळीच पाय नसते तर किती बरे झाले असते!'' सांबर असा विचार करीत आहे तोच काही शिकारी तेथे आले! पावलांची चाहूल लागताच सांबर जीव घेऊन पुढे पळू लागले व पारधी मागे पाठलाग करू लागले. पळता पळता सांबराची शिंगे एका काटेरी झुडपात अडकली. सांबराने बरीच खटपट केली तरी शिंगे काही निघेनात! अखेर शिकारी लोकांनी येऊन सांबराला ठार मारले! मरताना ते बोलले, ''अरेरे, उगीच मी या पायाला नावे ठेवली! तेच बिचारे मला पळताना उपयोगी पडले! पण या शिंगांनी बाकी माझा जीव घेतला!''
                       *तात्पर्य*
जे वरून चांगले दिसते तेच चांगले नसते! जे उपयोगी पडते तेच खरोखर चांगले!
                 
     〰〰〰〰〰〰〰

कथा क्रमांक १७१



*🌷🌷🌷कथा🌷🌷🌷*
*📚अभ्यास कथा भाग १७१*
〰〰〰〰〰〰〰 *🌺परोपकाराची भावना*🌺
=================
एकदा नकळत
मुंगी तळ्यात पडली
स्वतःला वाचविण्यासाठी
झाडाचं पान आणि कबुतराची
वाट पाहू लागली

मीच का सतत हिला वाचवावे
हा कबुतराचा अहंकार आड आला
झाडावरच बसून
असहाय मुंगीला मरताना पाहू लागला

कबुतराने मदत करावी म्हणून
मुंगी जिवाच्या आकांताने ओरडली
कबुतर आपल्याच विचारात मश्गुल
मुंगी असहायतेमुळे गतप्राण झाली

कबुतर आपल्याच गर्वात गढून गेलं पारधी येणार हेच विसरून गेलं. पारध्यानेही याच संधीचा फायदा घेत मुंगीच्या अनुपस्थितीत डाव साधला.

कबुतर आणि मुंगी दुर्दैवीपणाने गेले. झाड मात्र त्या दिवशी खूप रडले. मुंगी, कबुतर मेल्याचं दुःख होतंच .....
पण त्याहूनही *परोपकाराची भावना मेल्याचं होतं.*

अहंकार नाशाकडे नेतो तर
सेवा ही आनंदी जिवनाचे सार्थक ठरते.
*-----------------------------------*
*📝 शब्दांकन/संकलन*

कथा क्रमांक १७०

एकदा एका राजाने दोन गरुडाचे पिल्लं आणले. त्यातला एक गरुड राजाने आपल्या हातावर घेतला आणि हाताला झटका देऊन त्याला आकाशात उडवले. लगेच तो आकाशात उंचच उंच झेप घ्यायला लागला, तर दुसरा मात्र आपल्या फांदीवर बसूनच होता. तो उडेचना. हे पाहून राजा फार दुःखी झाला.
   त्याने आपल्या राज्यात दवंडी पिटवली, की 'जो कोणी त्याच्या दुसऱ्या गरुडाला आकाशात उडायला लावील. त्याला सुवर्ण मोहरा बक्षीस म्हणून देण्यात येतील.'
   हे ऐकून बक्षिसाच्या मोहाने अनेक लोक आले, पण कोणीही गरुडाला उडवू शकले नाही. तेव्हा दवंडी ऐकून एक गरीब शेतकरी राजाकडे आला आणि मी गरुडाला उडवण्याचा प्रयत्न करतो अशी त्याने राजाला विनंती केली. अनेक रथी-महारथी थकले, तिथे हा फाटका काय करणार असा विचार राजाच्या मनात आला, पण गरुड उडणे आवश्यक होते, म्हणून त्याने त्याला संमती दिली.
   शेतकरी गरुडाकडे गेला आणि परत आला. राजाने विचारले, "काय रे, उडाला काय गरुड?" तेव्हा शेतकऱ्याने आकाशाकडे बोट दाखवले. राजाने बोटाच्या दिशेने आकाशाकडे बघितले आणि काय आश्चर्य! तो दुसरा गरुड आकाशात पहिल्यापेक्षा उंच भराऱ्या घेत होता. राजा आश्चर्यचकित होऊन बघतच राहिला!
   त्या धक्क्यातून सावरल्यावर त्याने शेतकऱ्याला विचारले, "अरे, तू हे कसे केलेस?"
   तेव्हा शेतकरी म्हणाला, "मी काही फार वेगळं केलं नाही. मी फक्त तो गरुड बसलेला होता, ती फांदी मोडून टाकली! त्याचबरोबर त्याने उंच आकाशात भरारी घेतली!!"
   आयुष्यात अनेक जण असेच कोणत्यातरी फांद्यांना चिकटून बसलेले असतात. कोणी त्यांच्या शेती-वाडीला, कोणी परंपरागत व्यवसायाला, तर कोणी छोट्या-मोठ्या नोकऱ्यांना! या छोट्या-मोठया फांद्यांना चिकटून राहून मिळेल त्यावर भागवण्याच्या नादात आपल्यातला गरुडच ते विसरून जात असतात!
   मिळेल ती नोकरी धरायची. मग घर घ्यायचं. मुलं झाली की, त्यांचं शिक्षण, मग त्यांचं सेटलमेंट, लग्न, हे सारं करत-करत निवृत्त व्हायचं, बस्स, संपलं आयुष्य! यालाच मध्यमवर्गीय कुपमंडुक मानसिकता म्हणतात!
   अरे कधीतरी स्वतःमध्ये डोकावून बघा! आयुष्य म्हणज फक्त इतकंच आहे काय? तुमची फांदी तोडायला कोणीही येणार नाही, हे लक्षात असू द्या. तुम्हाला जर आकाशात उंच उडायचं असेल, तर तुमची तुम्हालाच तोडावी लागेल ती फांदी! कधीतरी स्वतःच तोडून तर बघा! तुम्ही जितकं समजताय ना त्याहूनही अधिक करण्यासारखं खूप आहे हो आयुष्यात! जग खूप मोठं आहे. विशाल आहे, पण तुम्हीच स्वतःला पारंपरिक मध्यमवर्गीय मानसिकतेच्या चार भिंतींमध्ये कोंडून घेतलंय आणि त्याहूनही अधिक चिंतेची बाब म्हणजे त्या चार भिंतींनाच तुम्ही विश्व समजत आहात!
   ठीक आहे, तुम्ही जगला आणि जगत असाल असं, पण कृपया तुमच्या मुलांना तरी या फांद्यांना नका बांधून ठेवू! त्यांना तरी उडू द्या स्वच्छंद अन मनसोक्तपणे आकाशात. शक्य झालंच तर तुम्ही मोडून टाका त्यांच्या फांद्या!
मग बघा तुमच्या फांदीवरचा तो पक्षी कसा दिगंतराला जातो...

🦅

कथा क्रमांक १६९



*🌷🌷🌷कथा🌷🌷🌷*
*📚अभ्यास कथा भाग १६९*
〰〰〰〰〰〰〰
     *🌺 गैरसमज*  🌺
=================
एका जंगलात राम सावित्री नावाच एक जोडपं राहत असत,राम हा जंगलात जाऊन लाकूडे तोडायचा आणि ती जवळच्या शहरात जाऊन विकायचा...काही दिवसांनी त्यांच्या घरात एक सुंदर बाळ जन्माला येत.;
 एक दिवस त्याला जंगलात एक निरागस आणि घाबरलेल मुंगूसाच
पिल्लू दिसत जवळच  कोणत्यातरी जंगली श्वापदाच्या हल्ल्यात त्याची आई मरून पडली होती..राम त्या पिल्लाला घरी आणतो.थोड्या दिवसांतच ते पिल्लू त्या घरात एखाद्या
सदस्यां प्रमाणे रूळते...

एक दिवस राम नेहमीप्रमाणे जंगलात आपल्या कामासाठी न्याहारी करतो आणि  निघून जातो... नंतर थोड्या वेळाने  आपल्या बाळाला झोपवून  सावित्री  पाणी आणण्यासाठी निघून जाते.घरात फक्त बाळ आणि ते माणसाळलेल मुंगूस....
काही वेळातच त्या घरात एक भला मोठा साप शिरला आणि तो त्या बाळाकडे चाल करू लागला ...मुंगूसाने चपळाईने सापावर झडप मारली आणि सुरु झाली लढाई..साप पण बलाढ्य होता पण मुंगूसाने त्याच्यावर मात केली मुंगूसाचे   तोंड आणि पूर्ण शरीर सापाच्या रक्ताने
माखले होते...आता मुंगूस दारात उभे राहून सावित्रीची वाट बघत होते.....तेवढ्यात सावित्री डोक्यावर हंडा घेऊन आली आणि बघते तर काय मुंगूसाचे तोंड आणि पूर्ण शरीर रक्ताने  माखले होते सावित्रीच्या डोक्यात एकच विचारांच वादळ ऊटल की तीच्या बाळाचे लचके त्या मुंगूसाने तोडले आणि त्याला मारुन  टाकले...पण मुंगूस मात्र सावित्रीकडे खूप निरागसपणे बघत होते. मात्र त्याचवेळी सावित्रीने बाळाच्या नावाने एकच टाहो फोडला आणि क्षणार्धात डोक्यावरील हांडा तीने त्या मुंगूसाच्या अंगावर फेकला आणि घरात पळत सुटली पण घरात जाताच तीला चित्र वेगळंच दिसलं तीच बाळ अजूनही झोपलच    
होत आणि शेजारीच तो भयानक साप रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला....सावीत्री भानावर आली आणि सर्व प्रकार तिच्या लक्षात आला तशी ती चपळाईने उठली आणि बाहेर आली .पण  मुंगूस बिचारे जागेवर  ठार झालते.  सावित्रीने पुन्हा एकदा  टाहो फोडला पण यावेळी तीचे दोन्ही हात जोडलेले होते......

*तात्पर्यः जे दिसतय ते बघाव पण त्याचाआधी जे दिसत नाही ते शोधायचा प्रयत्न करावा*.
*कारण गैरसमज हे जवळच्या माणसांकडूनच होतात.नंतर माञ फक्त पश्चाताप होतो.*
*-----------------------------------*
.

माझी शाळा माझे उपक्रम

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
 *माझी शाळा माझे उपक्रम*
🌴💦☘🌿🌴💦☘🌴
   *🌍 जल प्रतिज्ञा* 🌍
〰〰〰〰〰〰〰
आज दि.२२-०३-२०१७  
*'जागतिक जल दिन '* जि.प.प्रा.शाळा वाटेगाव येथे साजरा करण्यात आला.
💧💦💧💦💧💦💧💧💦💧💦💧
*' जल है तो कल है '*
  सर्वप्रथम विद्यार्थ्यांना 'पाणी हेच जीवन आहे'  आणि त्याचा वापर काटकसरीने कसा करावा जर पाणी नसेल तर मानवी जीवन नष्ट होईल माणसांनाच नव्हे, तर  सर्व प्राणीमाञांना व निसर्गसृष्टीला पाण्याची नितांत गरज आहे.सर्व चराचराला टवटवी येते ती पाण्यामुळेच! अशाप्रकारे  पाण्याचे महत्त्व श्रीमती सेनकुडे मँडम व श्रीमती अबुलकर मँडम यांनी विद्यार्थ्यांना  समजावून सांगितले.

त्यानंतर *जल प्रतिज्ञा* माझा पाठोपाठ विद्यार्थ्यांच्या कडून म्हणून  घेण्यात आली.

*संदेश - जो आपल्या हिताचा निरपेक्ष विचार करतो, तो माणसाचा खरा मित्र असतो. या दृष्टीने विचार केला तर, निसर्गच माणसाचा खरा मिञ आहे.म्हणून 'झाडे लावा झाडे जगवा'*
🌳💦💧👱👨‍👨‍👧‍👦🕊🐁🦅🦆🕊🐁🦏🐘🐫🐟🐠🐍🐢🐝🕷🐜🌴🌿🦋
〰〰〰〰〰〰〰
*🙏🏼 शब्दांकन🙏🏼*
✍  श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in

जीवन विचार


☀ *माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं*

☀ *काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा*

☀ *कारण आपण  फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय*
 

जीवन विचार

🌺अश्रू कितीही प्रामाणिक असले तरी,
भूतकाळ परत आणण्याची ताकद त्यांच्यात नसते..🌺
झाली चूक माफ करण्यात मोठेपना असतो,

सारख्या सारख्या चूका गिरवुन काढल्यास गोड संबंधात सुद्धा फाटे फुटतात..🌺


म्हणुन चुका एकांतात सागांव्यात आणि कौतुक चारचौघात करावं नातं जास्त टिकतं.!!🌺
    

कथा क्रमांक १६८

*खरा न्याय*
  " एका गावात राम आणि शाम नावाचे दोन व्यापारी राहत असतात. ते एकमेकांचे खूप चांगले मित्र असतात. एक दिवस अचानक राम त्याची सर्व संपत्ती गमावतो. तो गरीब होतो. तो शामकडे मदतीसाठी येतो. शाम खूप दयाळू मानाने फार चांगला असतो. तो क्षणाचा हि विचार न करता,रामला आपल्या संपत्ती मधील अर्धा वाटा देऊन टाकतो.
शामच्या मदतीमुळे रामला फार आनंद होतो. तो शामला वाचन देतो कि, जेव्हा कधी तुला मदत लागेल तेव्हा मी तुला अवश्य मदत करीन. खूप वर्षानंतर शाम गरीब बनतो. त्याला रामची आठवण येते आणि तो मदतीच्या अपेक्षेने रामकडे जातो. परंतु राम त्याला मदत न करता घरातून हाकलून देतो
शामला खूप वाईट. राम खूप बदललेला असतो. शामच्या एका नौकाराने हे सर्व ऐकलेले असते. तो राजाकडे जातो आणि राजाला सर्व गोष्ट सांगतो. राजा सगळे ऐकून घेतो. सगळी माहिती काढतो.
राजा शामला आणि रामला बोलावतो. राजा रामला त्याच्या वचनाची आठवण करून देतो. राजा लगेच रामला आदेश देतो कि, त्याने त्याची अर्धी मालमत्ता शाम बरोबर वाटून घ्यावी शामला योग्य तो न्याय मिळतो. शामने रामला अर्धी मालमत्ता दिली होती तशीच राम शामला देतो. आता खरा न्याय होतो.
*तात्पर्य -*खरा न्याय करावा."

कथा क्रमांक १६७

अभ्यास कथा    भाग १६७
राजा आणि गरुड                      
एका राजाने दोन गरुड आणले आणि त्यांना शिकविण्यासाठी माणूस
ठेवला .

काही दिवस गेले . एक गरुड उंच भराऱ्या घेऊ लागला, अगदी बघत रहावे असे .

दुसरा मात्र उडेचना.
राजा काळजीत पडला ,
अगदी सारखे दोन पक्षी एक
भरारी घेतोय दुसरा थंड.
काय करावे.. काय करावे..?

राजाने दवंडी पिटविली,
गरुडाला कोणी उडवून दाखवावे म्हणून .

दुसऱ्या दिवशी पहाटेस
राजा बागेत आला,
बघतो तो दुसरा गरुड
पहिल्या पेक्षाही उंच
गेला होता आणि हवेत सुंदर संथ गिरक्या घेत होता .
राजाच्या आश्चर्यास पारावार उरला नाही.

हे अजब घडले कसे ?
आणि केले तरी कोणी !

एक सामान्यसा दिसणारा शेतकरी अदबीने पुढ्यात आला आणि म्हणाला, "महाराज मी केले."

राजा : अरे पण कसे ?
शेतकरी : मी फक्त तो गरुड ज्यावर बसला होता ती फांदी कापली,

दुसऱ्या क्षणी तो आकाशात झेपावला. बाकी तुम्ही बघत आहातच.

तात्पर्य :-
आपली फांदी कधीतरी सोडून बघा.

सतत सुखद मर्यादित कवचांमध्ये स्वतःला गुरफटवून ठेवू नका.
कदाचित बाहेर अधिक सुंदर
खुले समृद्ध आकाश तुमची वाट बघत असेल.

परीस्थीतीत जीवनाचा आनंद घ्या.
🙏🙏सागर खुमकर 🙏🙏

कथा क्रमांक १६६

अभ्यास कथा १६६
अनुकरण

 एकदा एका राजाचा हत्ती अचानक लंगडायला लागला. बरेच वैद्य, उपचार झाले पण हत्तीच्या चालण्यात काही फरक पडेना. राजा खूपच चिंताग्रस्त झाला. याच दरम्यान त्या नगरीत भगवान बुद्धांच्या भिक्खूसंघाचे आगमन झाले होते. त्यामुळे कोणीतरी राजाला हत्तीच्या लंगडण्याविषयी भगवान बुद्धांना भेटण्याचा सल्ला दिला. राजाने तथागतांची भेट घेतली.

भगवान बुद्धांनी परिस्थिती पाहिली आणि हत्तीचा माहुत बदलण्यास सांगितले. तथागतांचा उपदेश मानून राजाने माहुत बदलला आणि काय आश्चर्य? हत्ती व्यवस्थित चालू लागला. राजाला आश्चर्य वाटले. राजाने तथागतांना विचारले, तथागत अनेक वैद्यांच्या औषधोपचाराचा हत्तीवर परिणाम झाला नाही. मात्र आपल्या केवळ उपदेशाने हत्ती व्यवस्थीत चालू लागला याचे रहस्य काय? तेव्हा तथागत म्हणाले, "रहस्य काहीच नाही, या हत्तीचा जो माहुत तो लंगडत चालत होता. आणि हत्ती त्याचे अनुकरण करत होता. त्यामुळे हत्तीचा माहुत बदलणे गरजेचे होते.

आपली अवस्था अशीच आहे. आपण सद्‌सद्‌ विवेक बुद्धीने विचार न करता अशा अनेक बाबींचे अंधानुकरण करीत आहोत, त्यामुळेच आपली वाटचाल लंगड्या हत्ती प्रमाणे सुरू आहे. आपली वाटचाल सुव्यवस्थीत होण्यासाठी आपला माहुत सदाचारी असला पाहिजे



कथा क्रमांक १६५

*माझी शाळा माझे उपक्रम*

*🌷🌷🌷कथा🌷🌷🌷*
*📚अभ्यास कथा भाग .१६५
〰〰〰〰〰〰〰*
*🌺स्वकीयांकडून झालेला ञासाचे खरे दुःख* 🌺
=================                      
एक सोनार होता. त्याच्या दुकानासमोरच एका लोहाराचे दुकान होते. सोनार जेव्हा काम करत असे तेंव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज होत असे पण जेंव्हा लोहार काम करत असे तेंव्हा मात्र लोखंडाचे काम होत असल्याने मोठा आवाज होत असे. तो आवाज मोठा कर्णकर्कश असे. एके दिवशी सोनाराच्या दुकानातील एक सोन्याचा कण कसा कोण जाणे पण लोहाराच्या दुकानात जावून पडला. त्या सोन्याच्या कणाची भेट एका लोखंडाच्या कणाशी झाली. खूप दिवसांची ओळख असल्यासारखे ते एकमेकांशी बोलू लागले. सोन्याच्या कणाने लोखंडाच्या कणाला म्हंटले,"दादा, आपले दुःख तर खरे एकसमान आहे. दोघानाही आगीत तापवले जाते आणि हातोड्याने ठोकले जाते. मी तर बाबा चुपचाप हे सहन करतो, पण तुझे काय?" लोखंडाचा कण सोन्याच्या कणाकडे पाहून दुःखी स्वरात म्हणाला,"अरे ! तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. दोघानाही तापवणारी आग एकच आहे आणि ठोकणारा हातोडाहि एकाच धातूचा आहे. पण खरे दुःख याचे आहे कि तुला ठोकणारा हातोडा हा तुझा कोणीच लागत नाही पण मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा हा नात्याने माझा भाऊच लागतो. दुसऱ्याने दिलेल्या दुःखापेक्षा स्वकीयांनी दिलेला त्रास हा अगदी हृदयात वार करून जातो."
                               *तात्पर्य*
*आपल्या माणसांकडून होणारा त्रास हा कायमच दुःखदायक वाटतो.*
*-----------------------------------*
*📝 संकलन*

जीवन विचार

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

🌺 जीवन विचार🌺
〰〰〰〰〰〰〰
गंध आवडला फुलाचा 🌹🌹म्हणुन फुल🌹 मागायचं नसतं
गंध आवडला फुलाचा म्हणुन फुल मागायचं नसतं.

अशावेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं.

परक्यापेक्षा आपलीच माणसं आपल्याला नेहमी दगा देतात
एकमेकांच्या पाठीवर मग् नजरेआडुन होतात वार भळभळणार्या जखमेतुन विश्वास घाताच रक्त वाहतं छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा आपणचं पुसायचं असतं.
अशावेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं
आपलं सुख पाहण्याचा तसा प्रत्येकाला अधिकार आहे .

पण;दुसर्याला मारुन जगण
हा कुठला न्याय आहे माणुस म्हणुन माणसावर खरं प्रेम करायचं आपल्यासाठी थोडं दुसर्यासाठी जगायचं
जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बनवायचं असतं
अशावेळी आपणच आपल्या मनाला आवरायचं असतं.
〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼

कथा क्रमांक १६६

🌷🍀होळीची उत्पत्ती कथा🍀🌷


💐पूर्वी राक्षसकुळात हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस होता. तो स्वत:ला श्रेष्ठ समजत असे. देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता. त्याला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. प्रल्हाद बालपणापासून विष्णूचा (नारायणाचा) परमभक्त होता. प्रल्हाद दिवस-रात्र विष्णूच्या नावाचे नामस्मरण करीत असे. नेमके हेच हिरण्यकश्यपूला मान्य नव्हते. त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रत्येकवेळी तो अयशस्वी ठरला. अखेरीस कंटाळून हिरण्यकश्यपूने आपल्याच मुलाचा वध करण्याचा निर्णय घेतला. या कामात त्याने आपल्या बहिणीची मदत घेतली. होलिका हे तिचे नाव. ती राक्षसीप्रवृत्तीची आणि क्रूर होती. तिला अग्नीचे भय नव्हते. अग्नीपासून तिला कोणताच त्रास होत नव्हता. म्हणून हिरण्यकश्यपूने लाकडाची चिता रचली. त्यावर होलिकेला बसविले. आणि तिच्या मांडीवर प्रल्हादाला बसविले. परंतु, प्रल्हादाच्या भक्तिसाधनेमुळे उलटेच घडले. होलिका जळून खाक झालीआणि विष्णू भक्त असल्यामुळे प्रल्हादाला काहीही झाले नाही. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नृसिंह अवतार घेऊनहिरण्यकश्यपूचा वध केला.

💐💐मित्रांनो,होलिका वाईट प्रवृत्तीची असल्यामुळे तिचा अंतही जळून म्हणजेच वाईट पद्धतीने झाला. त्यामुळे वाईट आचार-विचारांना तिलांजली देणे आणि आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे अग्नीतजाळून राख करावी हाच होळी साजराकरण्यामागील खराउद्देश आहे. या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा संकल्प करूया आणि आपले जीवन आनंदी बनवूया.💐💐💐

जीवन विचार

_जंगलातील *हरिण* सकाळी_
   _उठल्याबरोबर विचार करते की,_
   _*मला खूप धावावे लागेल.*_
   _नाहीतर, सिंह मला मारून खाईल._

   _आणि *सिंह* सकाळी_
   _उठल्याबरोबर विचार करतो की,_
   _मला हरिणापेक्षा जास्त धावावे_
   _लागेल. नाहीतर, *मी उपाशी मरेन.*_

   _आपण सिंह असू किंवा हरिण,_
   _*जीवन चांगले जगण्यासाठी*_
   _*संघर्ष तर करावाच लागतो.*_

    _*"संघर्षाशिवाय जीवन नाही.*"_
           _*"संघर्ष हेच जिवन."*_

    

कथा क्रमांक १६४




 *प्रामाणिक* *मुलगा

एक मुलगा खूपच सरळमार्गी आणि प्रामाणिक होता. त्‍याच्‍यावर त्‍याच्‍या आईवडीलांनी चांगले संस्‍कार केले होते व त्‍या संस्‍कारांना अनुसरुन तो वागत होता. एकदा काही निमित्ताने तो शेजा-याच्‍या घरी गेला. शेजारी कुठेतरी बाहेर गेला होता. शेजा-याच्‍या नोकराने मुलाला बसायला सांगितले आणि नोकर निघून गेला. मुलगा जिथे बसला होता तिथे जवळ एका टोपलीत उत्तम दर्जाची सफरचंदे ठेवली होती. त्‍या मुलालाही सफरचंद खूप आवडत असत पण त्‍याने त्‍यांना हात लावला नाही. तो शेजा-याची वाट पाहात बसला होता. ब-याच वेळाने शेजारी घरी परतला त्‍याने पाहिले की मुलगा बसला आहे व त्‍याच्‍याशेजारी सफरचंदे असूनही तो त्‍यांना हातसुद्धा लावत नाही. मुलाला सफरचंद खूप आवडतात हे शेजा-याला माहित होते. शेजारी येताच मुलाने उठून नमस्‍कार केला, शेजा-याने त्‍याला जवळ घेतले व विचारले,''तुला सफरचंद तर खूप आवडतात ना, मग तरीसुद्धा एकही सफरचंद उचलून का खाल्‍ले नाहीस'' मुलगा म्‍हणाला,'' इथेच कोणीच नव्‍हते, मी दोन तीन सफरचंदे जरी उचलून घेतली असती तरी कुणालाच कळले नसते, कोणीच मला पाहात नव्‍हते पण कोणी पाहत नव्‍हते पण मी स्‍वत:ला ते पाहात होतो. परंतु मी स्‍वत:ला फसवू शकत नाही.'' शेजा-यास त्‍याच्‍या या बोलण्‍याचा आनंद वाटला. त्‍याने त्‍याला शाबासकी दिली व म्‍हणाला,'' आपण करतो ते आपला आत्‍मा पाहात असतो, आपण आपल्‍याला कधीच फसवू शकत नाही. दुस-याला लाख फसवू पण स्‍वत:शी खोटे बोलणे फार अवघड आहे. सर्वांनीच तुझ्यासारखे वर्तन केल्‍यास जग सुखी होईल.''


*तात्‍पर्य* :- लहानपणीच मुलांना खोटे वागणे, बोलणे यापासून दूर ठेवल्‍यास मुले भविष्‍यात योग्‍य वर्तन करतील. वाईट गुण घेण्‍यास क्षणाचाही विलंब लागत नाही पण चांगले शिकण्‍यास खूप काळ जावा लागतो. मुले वाईट वर्तनाची निघाल्‍यास त्‍याचा दोष आईवडीलांना येतो.





काव्य संकलन वाट

वाट

" वाटेला आलेल्या अनेक वाटा
      त्यातही एक वाट *आशेची*
  न उमललेल्या कोवळ्या *कळीची*
  अस्ताला जाणाऱ्या *सूर्याची*
  तर गर्भाला जपणाऱ्या *मातेची*"......

  हसता हसता *रडविणारी*
  आणि रडता रडता *हसविणारी*
  *एकट्याला* साथ देणारी
  तर समूहास *एकटे* करणारी
  असते एक *वाट* आशेची.......

   ना घाबरणारी *जगाला*
   ना पेलणारी *युगाला*
  *विश्वाला* फुलवणारी
   नव्या पिढीला जपणारी
   असते एक वाट *आशेची*
   वाटेला आलेल्या *अनेक* वाटा
   त्यातही एक वाट *आशेची*............

 
संकलन 

माणूस आणि माणूसकी

माणूस आणि माणुसकी
    *कुणीच कुणाच्या जवळ नाही*
*हीच खरी समस्या आहे*
*म्हणून जगण्यात पौर्णिमा कमी*
*आणि अमावस्या जास्त आहे* .

*हल्ली माणसं पहिल्या सारखं*
*दुःख कुणाला सांगत नाहीत*
*मनाचा कोंडमारा होतोय*
*म्हणून आनंदी दिसत नाहीत* .

*एवढंच काय*
*एका छता खाली राहणारी तरी*
*माणसं जवळ राहिलीत का ?*
*हसत खेळत गप्पा मारणारी*
*कुटुंब तुम्ही पाहिलीत का ?*

*अपवाद म्हणून असतील काही*
*पण प्रमाण खूप कमी झालंय*
*पैश्याच्या मागे धावता धावता*
*दुःख खूप वाट्याला आलंय*.

*नातेवाईक व कुटुंबातले*
*फक्त एकमेकाला बघतात*
*एखाद दुसरा शब्द  बोलतात*
*पण काळजातलं दुःख दाबतात*.

*जाणे येणे न ठेवणे , न भेटणे , न बोलणे*
*या गोष्टी कॅज्युअली घेऊ नका*
*गाठी उकलायचा प्रयत्न करा*
*जास्त गच्च होऊ देऊ नका*.

*धावपळ करून काय मिळवतो*
*याचा जरा विचार करा*
*बँकेचे अकाउंट भरण्या पेक्षा*
*आपल्या माणसांची मनं भरा* .

*एकमेका जवळ बसावं बोलावं*
*आणि नेहमी नेहमी*
*तिरपं चालण्याच्या ऐवजी*
*थोडं सरळ रेषेत चालावं*

*समुद्री चोहीकडे पाणी*
*आणि पिण्याला थेंबही नाही*
*अशी अवस्था झालीय माणसाची*
*यातून लवकर बाहेर पडा*.


*माणसं अन माणुसकी नसलेली घरे*
*अन देव नसलेले देव्हारे*
*कितीही पॉश असले*
*तरी त्याचा काय उपयोग ..✍🏻*

कथा क्रमांक १६३

मानवधर्म
 
     स्वामी  विवेकानंद अमेरिकेच्या दौऱ्यावर निघाले. त्यांचे  गुरु रामकृष्ण यांचे निधन झाले होते. म्हणून ते त्यांच्या पत्नीची  शारदादेवीची परवानगी घेण्यास गेले.
         "आई, आशीर्वाद द्या." असे म्हणून त्यांच्यासमोर उभे राहिले. "ठीक आहे; पण जरा थांब. आशीर्वाद देण्यापूर्वी ती पलीकडची  सुरी मला आणून दे." शारदादेवींनी सांगितले. विवेकानंदांना थोडे आश्चर्य वाटले; पण त्यांनी लगेच सुरी आणून दिली.
       सुरी हातात  घेतल्यानंतर देवीजी म्हणाल्या "जा तुझ्याकडून सर्वांचे कल्याण होईल."
      मघाशी दाबून ठेवलेले  आश्चर्य व्यक्त करीत वेवेकानंद म्हणाले,
    "माताजी, सुरी आणून देण्याचा व आशिर्वादाचा काही  संबंध होता का?" शारदादेवी  म्हणाल्या, "हो होता. तू सुरी कशी आणून देतोस ते मला पहायचे होते.
         स्वतःच्या हातात पाते धरून तू मूठ माझ्या हातात दिलीस. माझ्या  सुरक्षिततेची काळजी घेतलीस.'
        *स्वतःचा विचार न करता जो  अगोदर दुसऱ्याचा विचार करतो, दुसऱ्याची काळजी घेतो, तोच खऱ्या अर्थाने मानवधर्म पाळत असतो."*


होळी

होळी पौर्णिमा ...

आपल्या संस्कृतीने जे आपल्याला सणवार साजरे करायला शिकवते त्या मध्ये खूप मोठा अर्थ दडलेला असतो. तो आपण ज्यावेळी समजावून घेतो त्यावेळी आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो.

सर्वजण एकत्र येऊन गाव स्वच्छ करावा व शेणाच्या गव-यांचा धूर करावा जेणे करुन वातावरणातील विषारी जीव जंतू मरून गाव आरोग्य संपन्न व्हावा, हा उद्दात हेतू आपल्या संस्कृतीचा आहे.

त्याचप्रमाणे जीवनात जगताना हा होळी सण आपल्याला आनंदी जीवनाचा मार्ग देतो.

शारिरीक आरोग्याबरोबर मनाच्या ही आरोग्याचेही महत्त्व ही होळी पौर्णिमा शिकवते. मनामध्ये खूप घाण व कचरा साठलेला असतो.

अज्ञान, अंधश्रद्धा, जातियता, धर्मांधता, अस्पृश्यता, भ्रष्टाचार, प्रदूषण, पर्यावरणाचा -हास, स्त्री भ्रूणहत्या, घाणरेड्या व वाईट सवयी आणि व्यसन असा समाज मनाच्या ठायी साठलेला कचरा व

त्याच बरोबर द्वेष, मत्सर, तिरस्कार, हेवे-दावे, वैर भाव इ. सामजिक कच-याचे एकत्र येऊन ऐक्याच्या अग्नीच्या ज्वाळेत दहन करणे व राष्ट्र प्रगतीचा प्रकाश नविन पिढ्यांना देणे ही आहे होळीची उपासना.

संत सांगतात, भगवन्नाम ही ज्वाळा म्हणजेच अग्नी आहे. जी सर्व पातकांना भस्म करते.

त्याच बरोबर चिंता, काळजी, भयगंड, अनिष्ट व नकारात्मक विचार यांची सुद्धा आहूती मनचित्तात नामाग्नी प्रज्वलीत करून देणे म्हणजे ख-या अर्थाने होळी.

पोर्णिमा म्हणजे सुर्याचा संपुर्ण प्रकाश आपल्या अंगावर घेऊन विश्वाला देणारा चंद्र.

जसा कलेकलेने चंद्र वाढत जातो त्याप्रमाणे माणसाने सदगुरूंकडून मिळालेला  ज्ञानप्रकाश इतरांना देत देत एक दिवस पूर्ण पणे प्रकाश मान होणे म्हणजे पोर्णिमा.

जीवनात ख-या अर्थाने तनाचे, मनाचे व जनाचे आरोग्य राखणे व हाच आनंदाचा ज्ञानप्रकाश इतरांना देणे म्हणजेच होळी पौर्णिमा .

पोळीच्या पोटात जसे गोड पुरणाचे सारण असते त्याच प्रमाणे आपल्या पोटात म्हणजेच हृदयात आनंद रुपी गोविंद असतो.

ज्यावेळी साधक नामाग्नी व ज्ञानाग्नी चित्तात प्रज्वलीत करून अहंकार व अज्ञानाची आहूती देणे, आनंदाचा  प्रकाश इतरांना देणे म्हणजे होळी.

 अशा होळी पोर्णिमेच्या आपणास कोटी कोटी शुभेच्छा!!!

संकलित माहिती


🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

कथा क्रमांक १६२

*पूर्वसंचित आणि प्रारब्ध ...*
संत जनाबाई एकदा आपल्या पतीस जेवण वाढत होत्या, पहिला घास घेताच पतीने तावातावाने जनीला मारावयास सुरुवात केली. "भाजीत मीठ का नाही??" तिला हुंदका फुटला. विठ्ठल समोर उभा राहिला. "विठ्ठला, तू इथे असतानाही तुझ्या भक्ताला अशा परिस्थितीतून जावं लागतंय ... कां ??" विठ्ठलाने जनीच्या डोक्यावर हात ठेवला. जनीला तिच्या पूर्वजन्माचे स्मरण झाले आणि तो क्षण तिच्या डोळ्यासमोर आला. पूर्वजन्मातली जनी एक राजकन्या होती. गायीसमोर तिने घास ठेवला आहे. गाय ते खाण्यास नकार देते आणि जनीने छडी उचलली. तिने गायीवर वळ उठवले परंतु गायीने ते खाण्यास नकारच दिला ... विठ्ठलाने जनीच्या डोक्यावरून हात उचलला. जनी भानावर आली. *विठ्ठल म्हणाला, "जनी, पूर्वसंचित आणि कर्म फळ कुणाला चुकलेले नाही. हे सर्व भोगूनच ह्या भवसागरातून तरून जावे लागते. तुझी भक्ती ह्या जन्मातली आहे तेंव्हा तुझे सर्व पूर्वसंचित ह्या जन्मी फेडून, माझ्या चरणी, चिरंतन समाधीत विलीन होशील"*

*तात्पर्य*: त्याचे तसेच का किंवा मला असे का नाही हे रडण्यापेक्षा कर्मभोगाची पातळी आपणच निश्चित करावी. चांगले कर्म करूनही फळ मिळत नसले तर जनीच्या ह्या कथेने समर्पक उत्तर आपणास मिळेल, पण चांगले कर्म करणे सोडू नका. हेच तुमच्या जीवनाचे ध्येय असावे ...

तुकाराम महाराजांच्या ओवीने आपणास स्मरण राहील कि, "आपणाची तारी ।। आपणाची मारी ।। आपणाची उद्धारी ।। आपणया ।।"
जय हरी विठ्ठल

जीवन विचार

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*जागतिक महिला दिनाच्या सर्व सहेलींना शक्तीदायक शुभेच्छा!*💐💐👏👏💐💐👍👍
*〰〰〰〰〰〰〰
   *🌺 जीवन विचार* 🌺
〰〰〰〰〰〰〰
*स्त्री म्हणजे मूर्त कर्मसाधनाच आहे.पुस्तकांच्या पानातून जे शिकता येत नाही ते स्त्रीच्या शब्दातून शिकता येते.कारण स्त्रीच्या शब्दाला प्रेम सेवा आणि समर्पण वृत्तीचं तेज लाभलेल असतं.*
*आजच्या युगातील स्त्री ही काळानुसार बदलू पाहत आहे.गेल्या शतकातील स्त्री आणि आजची स्त्री यांत महदंतर आहे.आजच्या स्त्रीचा मार्ग जातो विकासाकडे, प्रगतीकडे आणि वैभवाकडे.*
*स्त्री शिक्षणाचे हे प्रगतीचे पाऊल म्हणजे भावी पिढ्यांच्या ज्ञानाची पाणपोईच होय.म्हणूनच म.धों कर्वे यांनी म्हटलं आहे "स्त्रीयांचे शिक्षण आणि राष्ट्रीय विकास यांचा जवळचा संबंध आहे".*
*ज्ञानप्राप्ती हा मानवधर्म आहे.ज्ञानाचा क्षेत्रात स्त्री पुरूषांना समान संधी हे अधिक श्रेयस्कर ठरत.*

*एक आदर्श स्त्री, पत्नी आणि माता म्हणून स्त्री  ही पुरुषाची खरीखुरी कर्मसंगिनी आहे.पुरूषाची जीवनसाथी, धर्माची रक्षक, गृहलक्ष्मी व देवत्वाकडे घेऊन जाणारी साधिका आहे.*
*प्रत्येक स्त्रीने मनातील भ्रम, दुःख आणि नेभळटपणा सोडून टाकून निर्भयपणे जीवन जगले पाहिजे.आता स्त्री अबला नाही, तर सबला आहे , सक्षम आहे ही क्षमता प्रत्येकीने जाणली पाहिजे तरच स्त्री ही समाजपरिवर्तनाची देवता ठरेल.*

*....पुनश्च एकदा जागतिक महिला दिनाच्या सर्व माता भगीनी व सहेलींना शक्तीदायक शुभेच्छा!*
〰〰〰〰〰〰〰
*🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼*

गीत संकलित

🍁🌹🍁🌹🍁🌹🍁

जोडावी अक्षरे, खोडाव्या चुका
हसावे सदा, लपवून दुःखा...

लावावा जीव, वाटावे प्रेम
जगावे खुलास, विचारावे क्षेम...

अंधार जगाचा, प्रकाशात नहावा
उघडावी मने, उजेड दिसावा...

मुखी साखरेचा, गोडवा असावा
मनी कुणाचा, कधी द्वेष नसावा...

जोडावी माणसे, जपावी नाते
विसरून व्यवहारी, फायदे तोटे...

क्षणांचे मणी, अलगद ओवावे
आनंदी सुरांनी, मनास छेडावे...
         🔅🔅✍संकलन🔅🔅
🍁🌹🍁🌹🍁🌹🍁

कथा क्रमांक १६१

💐कथा 💐
       
~~~~~~~~~~~~~~~~~
आत्मविश्वास

*चित्तरंजन हे अतिशय हुशार परंतु कट्टर नास्तिक गृहस्थ म्हणून सर्वजण त्यांना ओळखत. म्हणूनच सहदेव महाराजांच्या कीर्तनाला त्यांना आलेले पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. सहदेव महाराज तर धर्माची, ईश्वराच्या अस्तित्वाची महती सांगणारे. आणि अशा धार्मिक विषयाशी संबंधित कार्यक्रमाला चित्तरंजन कसे काय आले ? हे कसे काय शक्य आहे ? म्हणून सर्वत्र मित्र काहीसे अचंबितच झाले. त्यांच्यापैकी एकाला न राहवल्याने त्याने अखेर चित्तरंजन यांना विचारलेच, '' भक्तिमार्गाची प्रवचने, कीर्तने ऐकायला जाणे आपल्याला पटते का ? आपल्या तत्त्वात ते बसते का ? नसेल तर आज येथे येण्याचे कारण काय ?''*

*चित्तरंजन म्हणाले, '' त्याचे असे आहे की, सहदेव महाराज आपल्या प्रवचनात जे सांगतात, त्यावर माझा मुळीच विश्वास नाही. परंतु आपण जे जे बोलतो, त्यावर महाराजांचा दृढ विश्वास आहे. आणि ज्याचा स्वतःच्या बोलण्यावर दृढ विश्वास आहे, अशा व्यक्तीचे बोलणे समजून घ्यायला मला आवडते.''*

➖➖➖➖➖➖➖➖B
      *तात्पर्य --ज्याचा  स्वतः वर  विश्वास  असतो तो  खरच  महान*
   
🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻

जीवन विचार

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
〰〰〰〰〰〰〰
   *🌺जीवन विचार* 🌺
〰〰〰〰〰〰〰
सत्यनिष्ठेसाठी निर्भयतेची गरज असते आणि निर्भयतेसाठी स्वावलंबनाची गरज असते.नम्रता म्हणजे  'मी'  पणाचा आत्यंतिक क्षय. निर्भयतेने प्रगती करून घेता येते व नम्रतेने बचाव होतो.आपण स्वतःस वाचवु शकतो. नम्रतेच्या कोंदनातच अभय खुलून दिसते.आणि उदार  वृत्ती वाढीस लागते."नम्रता म्हणजे लवचिकपणा. यामध्ये जिंकण्याची कला आहे आणि शौर्याची पराकाष्ठा आहे ".

      *नम्रतेच्या उंचीला मोजमाप नाही*. 🙏 महात्मा गांधी नी म्हटलं आहे  " सत्याचा शोध घेऊ इच्छिणाऱ्याने धुळीच्या कणापेक्षाही नम्र झाले पाहिजे. नम्रता ही अहिंसेची तेजस्वी मूर्ती आहे ".

नम्र माणूस दुसऱ्याचा विचार करतो. पाणी ज्याप्रमाणे रस्त्यातला खड्डा भरून काढल्याशिवाय पुढे सरत नाही , त्याचप्रमाणे दुसऱ्याचे जीवन संपन्न केल्याशिवाय तो राहणार नाही.

म्हणूनच  कन्फ्यूशियसने म्हणले आहे  'फळांनी लहडलेल्या वृक्षांच्या शाखा ज्याप्रमाणे खाली वाकतात, त्याप्रमाणे महान लोक त्यांच्या महानतेने लीन बनतात.'

==================

जीवन विचार

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*🌺जीवन विचार*🌺
〰〰〰〰〰〰〰
दूध आणि पाणी एकत्र मिसळले असता त्यातील फक्त दूध प्राशन करणे आणि  पाणी टाकून देणं हा अत्यंत दुर्लभ गुण राजहंसाजवळ आहे.हा गुण मानवी मनाला मोहीत करून सोडतो.
 
       तसं पाहील तर राजहंस आणि  बगळा या दोन्ही पक्षांचा  रंग पांढरा असतो , परंतु दोघांच्या स्वभावधर्मात जमीन-आसमानचा फरक आहे.

  चांगल्याची निवड करणारा हंस कुठं  आणि  एका पायावर  उभा राहून क्षणात मासा गिळकृंत करणारा बगळा कुठं ? रंगाने सारखे असलेले हे दोन पक्षी स्वभावानं मात्र भिन्न आहेत .

या जगात गुण-दोष असलेली असंख्य माणसं आढळतात. माणसांच्या ठिकाणी असलेले गुण घ्यावेत  आणि अवगुण टाकून द्यावेत.
जीवनात माणसाला यशस्वी व्हायचे असेल तर नीरक्षीरविवेक बुद्धी बाळगली पाहिजे. समाजात वावरताना हंस आणि बगळे निवडता आले पाहिजेत. म्हणून अनुभवाच्या कसोटीवर माणसं पारखून घ्यावी लागतात.

==================

जीवन विचार

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
〰〰〰〰〰〰〰〰
*🌺  जीवन विचार* 🌺
〰〰〰〰〰〰〰〰
*जोवर प्रकृतीच्या वर उठण्याची धडपड करीत आहे तोवर माणूस हा माणूसच असतो.ह्या प्रकृतीतही अंतःप्रकृती व बहिःप्रकृती अशी दोन उभयविध भाग असते.बाह्य प्रकृतीला जिंकणे ही फार चांगली आणि फार मोठी बाब आहे ह्यात काही शंका नाही.पण आपली अंतःप्रकृती जिंकणे  ही खचितच त्याहीपेक्षा मोठी गोष्ट आहे.*
आपल्या ह्या उपयुक्तततावादी जीवनात आपले चांगले कर्मच आपल्या सोबत आपल्या अंतदायी स्वरुपात आपल्या दृष्टीआड कामी पडतील कारण आपल्या
जीवनाचा जाळ फार  मोठ्या विपरीत तान्या-बान्यानी विनला गेला आहे.जे दृष्टीगत होते ते वास्तविक नाही आणि जे आम्हाला दिसत नाही ज्याच्याशी आमचा संबंध नाही ते वास्तविक आहे.                          
     सत्य आहे दोन विपरीत किनाऱ्यांच्या मध्ये वाहनार्या नदीचे नाव जीवन सरीता आहे पूर्वेने पश्चिमेकडील याञेवर निघणाऱ्या सूर्याचे नाव🌞जीवन आहे .        
लोक उगवत्या 🌞सूर्याला तर🙏प्रणाम करतात.परंतु डुबत्या सूर्याला कोणी प्रणाम करत नाही.हीच जीवनाची भूल आहे.जन्म आणि मरणाच्या मध्ये जीवनाचे नीर वाहते,या दोन तटांमध्ये जीवनाची धारा वाहते.      

  जसे जन्माच्या सोबत मृत्यू आणि मृत्यूच्या सोबत जन्माची छाया चालते.
 सावलीला कोणी पण कधीही वेगळे करू शकत नाही.कोणाच्या सावलीवर पाय ठेवून उभे राहून जा सावली पायाच्या वरती येवून जाईल डोक्याच्या वरती येऊन जाईल परंतु नष्ट होणार नाही.मृत्यूची पण हीच स्थिती आहे.
आपण जेव्हापर्यंत संसारामध्ये कर्माच्या सूर्याच्या खाली चालत आहात.तेव्हापर्यंत जन्म मरणाच्या छायेचा अंत करू शकत नाही.
   म्हणून आपले चांगले कर्मच आपल्या कामी येतात.
"मनुष्याच्या रुपामुळे किंवा कुळामुळे त्याचा गौरव वाढत नाही.माणसाच्या कार्यामुळे,त्याच्या कर्तूत्वामुळेच त्याचा गौरव वाढत असतो."
*शेवटी 🙏'कर्माचा ध्वनी शब्दांपेक्षा मोठा असतो'*.
*'कर्मे ईशू भजावा'.*🙏
==================
🙏🏼शब्दांकन /संकलन🙏🏼