जीवन विचार

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
 *माझी शाळा माझे उपक्रम*

   *🌺 जीवन विचार* 🌺
〰〰〰〰〰〰〰
*मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना सस्नेह शुभेच्छा!*🙏👏💐📚

*संत तुकाराम महाराज  म्हणतात 'शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन l शब्द वाटू धन लोका ll '*

*शब्द हे भाषेचे अलंकार आहे कोणत्याही भाषेच सौंदर्य आणि सामर्थ्य शब्दांवर अवलंबून असतं.शब्दाचे सौंदर्य म्हणजे आत्मदेवाची भाषा होय.शब्दांचा पसारा हा मोरपिसार्यासारखा मनमोहक असतो.आपण आपल्या भाषेचे वैभव हे जपलेच पाहिजे मराठी भाषा हा आपला फार मोठा अनमोल ठेवा आहे.आपल्या मराठी भाषेचे हे वैभव अधिकाधिक समृद्ध होईल ह्यासाठी मराठी आमुचा श्वास ,ध्यास राहीला पाहिजे.मराठी भाषा ही सामर्थ्य संपन्न , विचारगर्भ प्रबोधनात्मक आणि आनंददायक आहे.*

   *माणसाच्या भाषेत वाणीत शब्दाचे सामर्थ्य , अनुभव आणि शब्दांनी सजविलेली वैभवशाली श्रीमंती असावी.*
*म्हणूनच समर्थ रामदासांनी मराठी भाषेचे सामर्थ्य ओळखून म्हटले आहे ' उत्तम पदार्थ निवडून द्यावा l शब्द निवडून बोलावा' ll*
〰〰〰〰〰〰〰
*🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼*

जीवन विचार

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
 *माझी शाळा माझे उपक्रम*

   *🌺 जीवन विचार* 🌺
〰〰〰〰〰〰〰
*जगातील सर्व माणसं सुखासाठी धडपडतात.अनेक संकटांना तोंड देतात.कधी हरतात ,तर कधी जिंकतात. जिंकण आणि हरणं हे शेवटी एका क्षणाचं असतं.हे जेव्हा कळतं तेव्हा माणूस अंतर्मुख होऊन विचार करतो.*

    *आपल्या आत्मयाचा आवाज परमात्मयापर्यंत घेऊन जाण्यासाठी तो देवापुढं काही मागणं मागतो.अस मागण म्हणजे तो प्रार्थना करतो.*👏🙏
*या प्रार्थनारुपी हाकेतून आत्म्याची निश्चित उत्कंठा करतो.प्रार्थना ही पण दोन प्रकारे केली जाते.सकाम आणि निष्काम प्रार्थना.जेव्हा आपण देवापुढ काही मागतो ते सकाम प्रार्थना आणि जेव्हा आपलं काही देवापुढ मागणं नसतं आहे त्यात समाधान मानने असते ही झाली निष्काम प्रार्थना.*

*प्रार्थना ही धैर्य आणि आत्मबलाची जननी आहे.आपले जैविक आणि आत्मबल वाढविण्याचे सामर्थ्य प्रार्थनेत* *आहे.स्वार्थारहित खरीखुरी सेवा हीच खरी प्रार्थना होय.*
 *संत तुकाराम महाराज  म्हणतात , 'न लगे मुक्ती धनसंपदा ' संत तुकाराम महाराजांनी देवापुढं मुक्ती मागितली नाही तर भक्ती मागितली.ईश्वराविषयीचा उत्कट प्रेमातून प्रार्थना जेव्हा जन्म घेते तेव्हा ती खरीखूरी भक्तीमय प्रार्थना असते.*👏🙏
〰〰〰〰〰〰〰
*🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼*

〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in

कथा क्रमांक १६०

अभ्यास कथा १६०

 मैत्री
एका बागेत एक लहान पोपट रहात असे. त्याची व एका चिमणीची मैत्री झाली. चिमणी बागेत इकडेतिकडे उडया मारून आपले भक्ष्य मिळवीत असे व वरचेवर येऊन त्या पोपटास भेटत असे. तिचा प्रेमळ स्वभाव पाहून पोपटास आनंद होत असे.
तो एकदा आपल्या आईस म्हणाला, ‘आई, ही चिमणी किती चांगल्या स्वभावाची आहे! इतकी चांगली मैत्रीण दुसर्‍या कोणास क्वचितच लाभली असेल.’ हे ऐकून त्याची आई म्हणाली, ‘आणि तुझ्यासारखा मूर्ख मुलगाही दुसर्‍या कोणास क्वचितच लाभला असेल! ‘अरे, ही चिमणी आज तुला इतकी चांगले वाटते आहे, पण उदया हिवाळा सुरू झाल्यावर तू जेव्हा थंडीत कुडकुडत बसशील, तेव्हा ही मात्र तुझ्यापासून लांब कुठेतरी मजा करीत असेल.’

*तात्पर्य* :- कोणत्याही माणसाशी मैत्री करण्याआधी त्याच्या स्वभावाची चांगली पारख करून घ्यावी.

 *संकलन*

जीवन विचार


माणसांच्या विकासात इतरांचा वाटा असतो,हे खरेच आहे आणि या वाटयाबद्दल प्रत्येकाने कृतज्ञ असायलाच हवे. परंतू मनामध्ये ही कृतज्ञता बाळगत असतांनाच माणसाने आपल्या विकासासाठी आपला प्रयत्न,आपला विवेक ,आपले ध्येय आपले जीवनविषयक दृष्टिकोन इ.घटकावरच अवलंबुन राहायला हवे.
               आईवडील जन्म देतात आणि इतर अनेक व्यक्ती आपली जडनघडन करतात ,हे खरे असले तरी आपल्या जीवनाचे ध्येय मात्र ज्याचे त्यालाच शोधावे लागते.तो प्रवास ज्याचा त्यालाच करावा लागतो.विशेषतः जीवनाची काही अंगे तर इतकी सूक्ष्म असतात ,की तिथे बाहेरच्या मदतीपेक्षा माणसाच्या मनाची भरारीच महत्वाची असते.क्लिला बाहेरून जबरदस्ती करून उमलवता येत नाही.अणुबॉंमचा उपयोग करून आपण एखादा पहाड उध्वस्त करू शकू ,पण एवढ्या प्रचंड शक्तीने देखील त्या कळीला उमलवता येणार नाही.ती कळी तिच्या अंतर्यामीच्या जीवनरसानेच उमलू शकते.बाहेरच्या वातावरणाची वा इतर घटकांची तिला मदत लागत नाही असे नव्हे.पण उमलायचे असते ते तिचे तिनेच .तुकारामांनी हा आत्मविश्वासाचा खडतर प्रवास केला  होता.त्यांनी स्वतःच स्वतःला घडवले होते.एकेका कणाचा प्रवास करून स्वतःच स्वतःला थोडे थोडे उंचावर नेणे ही खरी साधना असते .या प्रवासात क्षणाक्षणाला माणसाचा एक नवा जन्म होत असतो  आणि म्हणूनच या प्रत्येक जन्माच्यावेळी त्याला स्वतःलाच जणूकाही प्रसूतिवेदना भोगाव्या लागतात.त्या वेदनाही स्वतःच भोगायच्या  आणि स्वतःला लाभलेले नवे देखणे रूप पाहून क्षणाक्षणाला रोमांचित व्हायचे ,तेही आपले आपणच.प्रथमदर्शनी विसंगत वाटणाऱ्या तुकारामांच्या वचनामध्ये ही अशी अंतर्गत सुसंगती आहे.


जीवन विचार

*श्रेष्ठ वही है जिसमें...*
*दृढ़ता हो, जिद नहीं.*
*बहादुरी हो, जल्दबाजी नहीं.*
*दया हो, कमजोरी नहीं.*
*ज्ञान हो, अहंकार नहीं*
*करूणा हो, प्रतिशोध नहीं*
*निर्णायकता हो, असमंजस नहीं....*
*अगर लोग आपकी अच्छाई को आपकी कमजोरी समझने लगते हैं, तो यह उनकी समस्या है, आपकी नहीं...*

कथा क्रमांक १६० संकलन

एक ब्राह्मण दुपारी भिक्षा मागण्याकरीता एका दारात उभा राहीला , ''ॐभवती भिक्षांदेहि " अशी गर्जना केली.

घरात एकटीच म्हातारी होती, ती म्हणाली, "महाराज ! मी एकटीच आहे, घरात आमटी भात तयार आहे, चार घरात भिक्षा मागण्या पेक्षा आज इथेच जेवा."

ब्राह्मण "हो" म्हणाला

 ब्राम्हणाचे पोटभर जेवण झाले ब्राम्हणाने ताक मागीतले.

*भोजनांते तक्रं पिबेत* अस म्हणतात.

नेमकं म्हातारीच्या घरात त्या दिवशी ताक नव्हते.

ती म्हणाली, "थांबा महाराज मी आत्ता शेजारणी कडून ताक घेवुन येते."

तिने शेजारणीला ताक मागीतले , शेजारणीने भांडभर ताक दिले,

आजीने ब्राम्हणाच्या भातावर ताक घातले , ब्राम्हणाने भुरका मारला तो शेवटचाच.
ब्राह्मण तडकाफडकी मेला.

चित्रगुप्त आणि यमधर्माला प्रश्न पडला की, या कर्माचा भागीदार कोण?

 कारण ब्राम्हणाने आत्महत्या केली नव्हती.

म्हातारीने अतिथीधर्म पाळला होता तिने ब्राम्हणाला मारले नव्हते,दारात आलेल्या अतिथ्याला पोटभर जेवण दिले होते.

शेजारणीने शेजारधर्म पाळला होता कोणी दारात मागायला आले तर नाही म्हणू नये म्हणून तिने ताक दिले होते. आणि ताक पिवुन ब्राह्मण मेला होता कारण त्या ताकात विष होते आणि हे विष एका नागाच्या तोंडातून ताकात पडले होते.

यमधर्माने नागाला जाब विचारला, नाग म्हणाला यात माझा काय दोष ? घार मला पकडून आकाशमार्गे चालली होती,माझे तोंड खाली झाले होते त्यामुळे माझ्या तोंडातील गरळ त्या ताकात पडली म्हणून ब्राह्मण मेला.

यमाने घारीला जाब विचारला , घार म्हणाली यात माझा काय दोष ? सापाला पकडून खाणं हा माझा धर्म आहे.

प्रत्येकाने आपला धर्म पाळला होता मग आता कर्माचा भागीदार कोण ? कोणाच्या माथी मारायचे हे कर्म ?


चित्रगुप्त यमाला म्हणाला, "चला माझ्याबरोबर या कर्माचे भागीदार मी तुम्हाला दाखवतो."

 दोघेही गुप्तरूपाने ब्राम्हण मरून पडला होता तिथे आले.

 हा!हा! म्हणता संपूर्ण गावात बातमी पसरली की, म्हातारीच्या घरी ब्राह्मण जेवता जेवता मेला.

हळुहळु आळीतल्या बायका तिथं जमल्या.

 शांताबाई उज्वला ताईना म्हणाल्या, "काय हो उज्वलाताई ब्राम्हण कसा मेला कळले का हो ?"

 उज्वलाताई म्हणाल्या, "नाही हो"

 तेंव्हा शांताबाई म्हणाल्या, "आहो कसं सांगु s s s तुम्हाला , या ब्राम्हणाकडे भरपूर द्रव्य होते , म्हातारीने भोजनात विष घालून त्याला ठार मारले व त्याचे द्रव्य हडप केले."

 चित्रगुप्त यमाला म्हणाला पहिल्या क्रमांकावर हिचे नाव लिहा.

आणि तिथे जे जे या घटनेबद्दल बोलत होते त्यांची नावे रजिस्टर मधे लिहुन त्यांच्या माथी मारले गेले.

 थोडक्यात कर्माचा इतका सूक्ष्म विचार केला आहे. एखाद्या घटने बद्दल सत्य माहीत नसताना बोलणे हे सुद्धा पाप आहे.

म्हणून आजचा सुबोध दिला आहे.
प्रत्येकाच्या कानात आणि डोळ्यात देवाने चार बोटाचे अंतर ठेवले आहे.

 त्याचे कारण *जोपर्यंत एखादी घटना तुम्ही प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यांनी पाहत नाही तो पर्यंत कोणाच्या तरी तोंडून निघालेली बातमी कानाने ऐकून तुमच्या तोंडाने बोलू नका हे सुद्धा एक प्रकारचे पापच आहे.*


*" आयुष्य खुप सुंदर आहे "*.

जीवन विचार

*" हिरा आणि काचेत फरक* *ओळखायचा असेल तर उन्हात ठेवा,*
*जी गरम होते ती काच आणि जो थंड*
*राहतो तो हिरा.*
*आपल्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी थंड रहा,*
*कारण संकटात जो स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करतो तोच खरा हिरा ठरतो*


जीवन विचार

हरुन पण जिंकतो तोच बादशहा असतो
*जखमी वाघालाही उभे राहण्यासाठी संधी दिली की,*
*तो मरेपर्यंत लढू शकतो ...*
*कारण तो दाखवून देतो की,*
*आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण* *करतो..
✨💠✨🌸⚜
आत्मविश्वासाने केलेल्या
 . . कार्याला कोणत्याही
संकटाची भिती नसते,
 . .  . . . मुळात संकटे
आपल्या आत्मविश्वासाची
 . . . . परिक्षा घेण्यासाठीच
बनलेली असतात, या परिक्षेत
 . . . .  जो उत्तीर्ण होतो तो
 जिवनात यशस्वी होतोच.

कथा क्रमांक १५९

अभ्यास  कथा...... 🍁🍁
स्वामीभक्त हत्ती
🌼एका राजाजवळ एक हत्ती होता. तो त्याला अत्यंत प्रिय होता. तो हत्ती स्वामीभक्त असण्याबरोबरच चांगला योद्धा होता. जेंव्हा केंव्हा राजाने त्याच्यावर बसून युद्ध केले तेंव्हा राजा त्यात विजयी झाला.
काही काळ लोटल्यानंतर हत्ती वृद्ध होत चालला त्यामुळे राजाने त्याला युद्धात घेवून जाणे बंद केले. मात्र राजाचे त्या हत्तीवरचे प्रेम काही कमी झाले नाही. एकेदिवशी तो हत्ती सरोवरामध्ये पाणी पीत होता. सरोवरामध्ये पाणी कमी होते त्यामुळे हत्ती पुढेपुढे गेला आणि दलदलीत फसला.
वृद्धावस्थेमुळे हत्तीला दलदलीतून निघणे शक्य नव्हते, त्यामुळे तो जोरजोरात ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून माहूत त्याच्याकडे धावत आले, परंतु सरोवरातून त्याला बाहेर काढणे कुणालाही जमेना. तेंव्हा त्यांनी त्याच्या शरीराला भाले टोचायला सुरुवात केली.
कारण भाल्याच्या टोचण्याने तो सर्व शक्तीनिशी प्रयत्न करेल आणि बाहेर येईल, पण हत्ती बाहेर येऊ शकला नाही.भाल्याच्या टोचण्याने हत्तीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. राजापर्यंत हि वार्ता गेली. त्याने तत्काळ त्या हत्तीच्या जुन्या आणि अनुभवी माहुताला बोलावणे पाठविले. माहूत आला, राजा शेजारीच उभा होता.
त्याने राजाला असा सल्ला दिला,"महाराज! तत्काळ युद्धाचे नगारे वाजवा, सैन्य या सरोवराभोवती गोळा करा, आक्रमणाच्या घोषणा सैनिकांना द्यायला सांगा." राजाने त्याचे म्हणणे ऐकले आणि युद्धाचे नगारे वाजविण्याचा हुकुम दिला. मग काय म्हणता, नगारे वाजू लागले,
सैनिकांच्या रांगा शिस्तबद्धपणे लागल्या, आक्रमणाच्या घोषणा ऐकू येवू लागल्या. त्याबरोबर हत्तीच्या अंगात वीरश्री संचारली आणि तो त्या दलदलीतून बाहेर पडला.
त्याचे मनोबल हे युद्धासाठी तयार झाले होते. राजाने जुन्या माहुताचे आभार मानले आणि बक्षीस दिले.
ध्यानात ठेवा
निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते.
जर नशीब काही 'चांगले' देणार असेल तर त्याची सुरुवात 'कठीण' गोष्टीने होते ..
आणि नशीब जर काही 'अप्रतिम' देणार असेल तर त्याची सुरुवात 'अशक्य' गोष्टीने होते....🍁🍁

जीवन विचार

🌺🌺🌺
*वक्त  तो रेत है*
     *फिसलता  ही  जायेगा*
     *जीवन  एक  कारवां   है*
      *चलता  चला  जायेगा*
         *मिलेंगे  कुछ खास*
      *इस  रिश्ते  के  दरमियां*
      *थाम  लेना  उन्हें  वरना*
     *कोई  लौट  के  न  आयेगा*

*जिदंगी ' बेहतर ' तब होती है.*
         *जब आप खुश होते है...*

*लेकिन जिंदगी 'बेहतरीन' तब होती है ....*
        *जब आपकी वजह से*
           *लोग खुश होते है.. 

कविता

आईपण सरता सरत नाही.....



बाळाच्या पहिल्या श्वासाबरोबर,
जन्म घेते एक आई.
बाळ काही
कायम बाळ रहात नाही,
पण, आई मात्र
आयुष्यभर असते फक्त आई.
मायेची नाळ काही
आयुष्यभर तुटत नाही.

आईपण सरता सरत नाही.....



आता बाळचं असतं तिचे विश्व,
त्याचे हसणे, त्याचे रडणे,
त्याची भूक, त्याची झोप,
त्याची शिशी आणि त्याची शूशू,
याशिवाय तिला काहीच सुचत नाही.

आईपण सरता सरत नाही....



सोनुलं आता बसू लागतं,
रांगू लागतं, दुडूदुडू चालू लागतं.
आणि एक दिवस,
घराचा उंबरठा ओलांडून बाहेर पडतं.
बाहेरच्या जगाच्या भितीने
आईचे हृदय धडघडतं.
सोनुलं परत येईपर्यंत
तिच्या जिवाला काही शांतता नाही.

आईपण सरता सरत नाही.....



सुरवंटाचं आता फुलपाखरू होतं,
फुलपाखरासारखचं त्याला
जपायला लागतं.
आईची असते आता
तारेवरची कसरत.
लेकराशी नक्की कसं वागायचं,
तिला काही कळत नाही.

आईपण सरता सरत नाही......



कानात वारा शिरलेल्या वासरापरी
ते हुंदडत असतं,
रोज नविन उचापती करून
आईच्या हृदयाचा ठोका चुकवित असतं.
आईची परिक्षा काही संपत नाही.

आईपण सरता सरत नाही.....



आईच्या अंगाईशिवाय
झोप न लागणाऱ्या बाळाला,
आईचं बोलणं आता टोचू लागतं.
आईला काय कसंही वागवलं
तरी चालतं,
कारण तिला तर
गृहितच धरायच असतं
पण तिच्या प्रेमाचा झरा
काही केल्या आटत नाही.

आईपण सरता सरत नाही....



आपल्या पिल्लातच
विश्व बघणाऱ्या आईसाठी,
पिल्लाच्या विश्वात आता
जागाच नसते.
पिल्लाच्या पंखात आता
बळ आलेले असते,
आईची गरज आता
संपलेली असते.
आईला मात्र हे
कधी उमगतच नाही.

आईपण सरता सरत नाही......



पिल्लू आता
घरट्यातून उडून जाईल,
आकाशात उंच उंच भरारी घेईल.
दोनाचे चार होतील
आणि चाराचे सहा,
तेव्हा कदाचित आईचं मन
कळतय का ते पहा.
आईची वेडी आशा
काही संपत नाही.

आईपण सरता सरत नाही.....



ती कायम जपत रहाते
आपल्या लेकराचे इष्ट,
माहीत आहे ना आपल्याला,
काळीज काढून देणाऱ्या
आईची गोष्ट.
जित्याची खोड काही
मेल्यावाचून जात नाही.

आणि आईपण काही
मेल्यावाचून संपत नाही.....!

संकलन

कविता संकलन

तू कर यकीन खुद पर और रख हौसलों में जान,
बस थोड़ी सी और मेहनत फिर दुनिया देखेगी तेरी उड़ान,
.
तू क्यों घबराता है बन्दे हर शिखर पे है हक़ तेरा,
नाकामियों का अँधेरा चीरकर आएगा कामयाबी का नया सवेरा,
.
अरे चंद मुश्किलें आ भी गयीं तो क्या बुरा हो जाएगा,
लेकिन वक़्त एक बार निकल गया तो फिर दोबारा नही आएगा,
.
तो मत कर इस बात पे यकीन कि किस्मत ख़राब है तेरी,
कर सुनिश्चित ये बात कि मेहनत कामयाब हो तेरी,
.
बस जान ले ये बात कि तेरा भी वक़्त आएगा,
दूर होगी सब तकलीफे और सब ठीक हो जाएगा।.....

   ✍🏻.... संकलन

कविता संकलन

कविता

काळ आहे उत्तर
सार्यात बेहत्तर
काळ आहे इलाज
दुर्दर वेदनेवर

काळ आहे साथी
सोबतीस नियती
लक्ष द्या परमार्थी
नाम जपा अहोरात्री

देव होई सारथी
जीवनाच्या या रथी
जाल हो पैलतिरी
तरुनी भवसागरी

कथा क्रमांक १५८

🌺🍀🌺🍀🌺🍀🌺

    अभ्यास कथा

मोह

एक भिकारी दिवसभर पुष्कळ नामजप करायचा. देवाला त्याची दया आली. एक दिवस देव प्रगट झाला आणि त्याने भिका-याला ‘काय हवे ते माग’, असे सांगितले. भिका-याने सोन्याच्या मोहरा मागितल्या. देव म्हणाला, ‘‘मोहरा कशात घेणार ?’’ भिका-याने झोळी पुढे केली. मोहरा ओतण्यापूर्वी देव म्हणाला, ‘‘तू ‘पुरे’म्हणेपर्यंत मी मोहरा ओतत राहीन; पण एक अट – मोहरा झोळीतून भूमीवर पडता कामा नयेत. भूमीवर पडलेल्या मोहरेची माती होईल.’’ भिका-याने अट मान्य केली. देव भिका-याच्या झोळीत मोहरा ओतू लागला. हळूहळू झोळी भरत आली. भिका-याला सोन्याचा मोह आवरेनासा झाला. मोह-यांच्या भाराने आता झोळी फाटू शकते, हे लक्षात येऊनही भिकारी ‘पुरे’ म्हणेना. शेवटी व्हायचे तेच झाले. झोळी फाटली आणि सर्व मोहरा मातीमोल झाल्या !समाधानी वृत्ती नसलेला भिकारी दुर्दैवी ठरला

           *संकलन*




संत गाडगेबाबा माहिती संकलन

🔵 *संत गाडगेबाबा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा* 🔵
( डेबूजी झिंगराजी जानोरकर )

जन्म :- *२३ फेब्रुवारी १८७६* शेनगांव अंजनगाव, कोल्हट सुर्जी तालुका, अमरावती जिल्हा, महाराष्ट्र.

मृत्यु :- २० डिसेंबर १९५६. वळगांव, अमरावती, महाराष्ट्र.
               
१४ जुलै १९४१ ला गाडगे महाराजांची प्रकृति ठीक नव्हती. महानंद सामी नावाच्या त्यांच्या चाहत्याने मुंबईत आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना गाडगे बाबांची खबर दिली. बाबासाहेब तेंव्हा भारताचे कायदेमंत्री होते. आणि त्यांना संध्याकाळच्या ट्रेनने दिल्लीला रवाना व्हायचे होते. बाबांचा निरोप मिळताच त्यांनी सर्व कामे बाजूला ठेवली. दोन घोंगड्या विकत घेऊन ते महानंद सामीसह रुग्णालयात गेले. कोणाकडूनही काहीही न घेणाऱ्या बाबांनी बाबासाहेबांकडून दोन घोंगड्या स्विकारल्या. पण म्हणाले, "डॉ. तुम्ही कशाला आले?; मी एक फकीर. तुमचे एक मिनिट महत्त्वाचे आहे. तुमचा किती मोठा अधिकार आहे." तेंव्हा बाबासाहेब म्हणाले, "बाबा माझा अधिकार दोन दिवसांचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोण विचारणारच नाही. तुमचा अधिकार मोठा आहे. या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यांत अश्रू होते. कारण असा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे दोघेही जाणत होते.
               
१९५२ साली गाडगे बाबा आणि बाबासाहेबांची निपानी येथे भेट - मातीतला धर्म स्वीकारा.
       
त्यावेळी बाबासाहेबांना गाडगे बाबा म्हणाले, " बाबासाहेब तुम्ही शिकल्या सवरल्याली माणसं, तुम्ही कंचाबी धर्म स्वीकारा, आमच्या सारख्या अडाणी माणसांनी तुम्हाला बोलू नये बाबासाहेब. पण, बाबासाहेब धर्म असा स्वीकारा जो धर्म या मातीशी ईमान राखनारा धर्म असेल.

संत गाडगे महाराजांचे कार्य :-
➡ लोकशिक्षणाचे कार्य हॄनमोचन (विदर्भ) लक्ष्मी-नारायणाचे मंदिर बांधले.
➡ पूर्णा नदीवर घाट ( १९०८ )
➡ १९१७- पंढरपुर येथे धर्मशाळेचे निर्माण
➡ १९२५- मूर्तिजापुर येथे गोरक्षण धर्मशाळा व विद्यालयाचे निर्माण.
➡ मी कुणाचा गुरु नाही व् माझा कुणी शिष्य नाही असे म्हणून त्यांनी कुठल्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले.
➡ फेब्रु. ८, १९५२ रोजी श्री गाडगेबाबा मिशन स्थापन करुन महाराष्ट्रभर शिक्षणसंस्था व धर्मशाळा स्थापन.
➡ गाडगे महाराज जातीने परीट व गोधडे महाराज म्हणून ओळखले जात होते.
➡ १९३१- हॄनमोचन येथील सदावर्त संत गाडगे बाबांनी सुरु केले.
➡ गाडगे महाराजांनी किर्तनाद्वारे लोकजागृतिचा मार्ग अवलंबला.
➡ गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते.

➡ आचार्य अत्रे गाडगे बाबांबद्दल म्हणतात, " सिंहाला पहावे वनात, हत्तीला पहावे रानात, तर गाडगे बाबांना पहावे कीर्तनात!

➡ १९३१- वरवंडे येथे गाडगे बाबांच्या प्रबोधनातुन पशु हत्त्या बंद झाली.

➡ १९५४- जे-जे हॉस्पिटल धर्मशाळा ( मुंबई ) बांधली.

➡ गाडगे बाबांनी डॉ. पंजाबराव देशमुख व कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांच्या कार्यात मदत केली होती.

➡ डॉ. बाबासाहेब त्यांना गुरुस्थानी मानत.

➡ गाडगे बाबा कीर्तनात खुप दंगुन जायचे. त्यांचा मुलगा मरण पावला आहे, ही वार्ता घेऊन बाबांना कुणीतरी सांगितली. पण, गाडगे बाबांनी नाही कीर्तन थांबवले व नाही ते रडले. तेच संत गाडगे महाराज ज्यावेळी विश्वरत्न, बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं त्यावेळी ते धाय मोकळून रडत होते. व सतत १५ दिवस ते रडत राहिले व २० डिसेंबर १९५६ साली ज्याचा शिष्य या राष्ट्राचा निर्माता होता, अशा या महान फकीराचं म्हणजे संत गाडगे बाबा ( महाराज ) यांचं महापरिनिर्वाण पेढी नदीच्या काठावर वलगांव, अमरावती येथे झालं. गाडगे नगर येथे त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे

*संत गाडगे महाराज आणि त्याची कीर्तने* !!

गाडगेबाबा हे आधुनिक राष्ट्रीय संत म्हणून ओळखले जातात. संपूर्ण महाराष्ट्रात पदयाञा करून त्यांनी लोकशिक्षणाचे प्रबोधनाचे कार्य केले. स्वच्छता, करुणा आणि शिक्षण विवेकनिष्ठ मूल्ये समाजात रुजविण्याचे कार्य केले. बाबांचे काही वैचारिक कीर्तने..

*किर्तन १*

बाबा :-  देव किती?
श्रोते :-  एक.
बाबा :-  तुमच्या गावी खंडोबा आहे का?
श्रोते :-  आहे
बाबा :- मग देव किती झाले
श्रोते :- दोन
बाबा :- तुमच्या गावी भैरोबा आहे का?
श्रोते :- आहे
बाबा :- मग आता देव किती झाले?
श्रोते :-  तीन
बाबा :- तुमच्या गावी मरीआई आहे का?
श्रोते :- आहे
बाबा :- मग देव किती झाले
श्रोते :- चार
बाबा :- वेड लागले जगाला देव म्हणती धोंड्याला । बोला गोपाला गोपाला देव की नंदन गोपाला।

*किर्तन २*

बाबा :- श्रीखंड चांगले का बोकड?
श्रोते :- श्रीखंड
बाबा :- बासुंदी चांगली का बोकड?
श्रोते :- बासुंदी
बाबा :- दूध चांगले का बोकड?
श्रोते :- दूध
बाबा :- इथं असं बोलता अन् घरी जाऊन बोकडाचे मटण खाता. काय म्हणावं तुम्हाला? गुजराती मारवाडी कधी देवाला बकरे कापतात का?
श्रोते :- नाही
बाबा :- मग त्यांना देव कसा पावतो? अन् तुम्हाला का पावत नाही? एकेका गुजरातीच्या दहा दहा मजली इमारती आहेत अन् तुम्ही फूटपाथवर झोपता. शेटजीच्या बायकोचे पाच फुटी पातळ पाचशे रुपयांचे त्यातला परकर तीनशेचा अन् तुमच्या बायकोच्या नऊवारी पातळाची किंमत किती? पाच रुपये अन् पावली.

देवाला बकरे द्यायचे तर त्याच्या देवळात सोडून द्या त्याच्या पोटात सुरी कशाला खुपसता? तुम्ही त्याचा इकडे मसाला वाटता अन् यम तिकडे तुमचा मसाला वाटणार. बोला गोपाला गोपाला� देवकी नंदन गोपाला।

*किर्तन ३*

बाबा :- देव कसा आहे? जसं वारं.
वायु असे सकळ ठायी परि त्याचे बि-हाडची नाही ।
वारं आहे ना वारं पृथ्वीवर आहे घरात दारात झाडात जिकडे तिकडे वारं आहे. पण कोणी असं नाही सांगत की रात्री वा-याचा मुक्काम बंबईच्या ठेसनावर होता. सांगतं का कोणी?
श्रोते :- नाही
बाबा :- परवाच्या रोजी वारं साता-याच्या ठेसनावर होतं असं सांगत का कोणी?
श्रोते :- नाही
बाबा :- ते वारं लाल, हिरवं, पिवळं, काळं ते समजत नाही तसा परमेश्वर आहे. अन् तीर्थात देव बसवले ना जगन्नाथ रामेश्वर हे पोट भरण्याचे देव आहेत. जञा में फञा बिठाया तीरथ बनाया पाणी..
भटजी म्हणतो तांब्याभर पाण्याचे पंधरा रुपये.. दोन आणे चमचा तीर्थ घ्या तीर्थ मग सांगा जञेत देव कशाचा आहे?
श्रोते :- दगडाचा
बाबा :- तीर्थाले जाणे देवाचा संबंध नाही पैशाचा नाश खाना खराब आ�हे. गोपाला गोपाला देव की नंदन गोपाला।

*किर्तन ४*

बाबा :- देवळात देव नाही
नहीं मसजिद में नहीं देवलमे
देऊळ तयार झाले मूर्ती आणावी लागती का नाही?
श्रोते :- होय
बाबा :- बोला
श्रोते :- होय बाबा
बाबा :- मग मूर्ती इकात का फुकट?
श्रोते :- विकत
बाबा :- देव विकत भेटतो का? त्यापेक्षा सूर्यनमस्कार घ्यावा? जेवढे पैसे पडतील तेवढे पडूद्या. अन् आपल्या घरात आणून बसवून टाका. देव विकत भेटतो का? तो काय मेथीची भाजी आहे का कांदे बटाटे आहेत? हे ज्या माणसाले समजत नाही तो माणूस कसला? बरं आणले देव बसवले देवळात. तुमच्या देवाले अंग धुता येते का?
श्रोते :- नाही
बाबा :- ज्याले अंग धुवायची अक्कल नाही त्याला देव म्हणता? बरं तुमच्या देवाले धोतर नेसता येते का?
श्रोते :- नाही
बाबा :- ज्याले धोतरही नेसता येत नाही त्याला देव म्हणता? बरं तुमच्या देवाला निवद ठेवला अन् कुञ भिडलं तर त्याला हाणता येते का?
श्रोते :- नाही
बाबा :- अरे कुञाही हाणायची ताकद ज्याच्या अंगात नाही त्याला देव म्हणता? बरं तुमच्या देवाचा देवळापुरता तरी आत उजेड पडतो का?
श्रोते :- नाही
बाबा :- इजला दिवा मंडळी आली बापू दिवा लावा दिवा. मंडळी दर्शनाला आली. आणा दिवा. मग सांगा देव कोणी दावला?
श्रोते :- दिव्यानं दावला.
बाबा :- मग दिवा मोठा का देव?
श्रोते :- दिवा मोठा
बाबा :- मग कळलं ना देव देवळात नाही या जगात आहे तुमच्या माझ्यात आहे. जगाची सेवा करा?
बोला गोपाला गोपाला देव की नंदन गोपाला...
           
*किर्तन ५*

बाबा :- ब्रिटिश सरकारने आपल्यावर एक मोठं अरिष्ठ आणलं होतं. मग सत्याग्रह केला का नाही लोकांनी?
श्रोते :- होय केला
बाबा :- का कोणी देवळातले देव आले होते मदत कराले? वान्द्रयाचे राम, दादरचे इठोबा का वरळीचे पहिलवान मारूती आले होते?
श्रोते :- कोणी नाही आले
बाबा :- शिंगणापूरचे महादेव आले होते का?
श्रोते :- नाही
बाबा :- मग कोण सत्याग्रह आंदूलन केला?
श्रोते :-  माणसांनी केलं
बाबा :- कोणी कोणी ब्रिटिशाच्या गोळ्या झेलले?
श्रोते :- माणसांनी झेलले
बाबा :- मग त्या ब्रिटिशाले कोणी हाकलून लावले बप्पाहो?
श्रोते :- माणसांनी बाबा
बाबा :- मग देव कुठे राहतोय?
श्रोते :- माणसात
बाबा :- मग माणसाची सेवा करा बप्पाहो. एकवेळ पोटाले नाही मिळलं तरी चालेल पण पोरांना साळा शिकवा. देवा दगड धोंड्याच्य नादी नका लागू. आपला जवळपास घाणकचरा नको टाकू. परिसर चांगला ठेवा. हरामचं खाऊ नका. तानलेल्याला पाणी पाजा भूकेल्याला घास द्या बप्पाहो तेच देव हाये त्याचा आशिर्वाद घे. बोला गोपाला गोपाला देव की नंदन गोपाला..

मिञांनो किती आशयपूर्ण किर्तन बाबांनी मांडले आहे. अक्षर ओळख नसताना सुद्धा बाबांना खऱ्या देवाचा शोध लागला होता. चला, आपणही एक पाऊल अंधश्रद्धा निर्मूलनाच्या दिशेने टाकूया. देवळातल्या दगडापुढे आपण आपला माथा टेकवून लोकांना लाथा मारण्यापेक्षा पुरोगामी  भारताची निर्मिती करुया. तसेच आपला परिसर स्वच्छ ठेवूया.
संकलन

🙏🌴🌴🌴🙏

जीवन विचार

*ज्या पायरीचा सहारा घेऊन आपण पुढची पायरी गाठली आहे,त्या पायरीला कधीच विसरू नये.कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर आपण पुढची  पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो...!*            
            *या जगात सर्वात...*
           *मोठी संपत्ती "बुध्दी"*
      *सर्वात चांगल हत्यार "धैर्य"*
      *सर्वात चांगली सुरक्षा "विश्वास"*
      *सर्वात चांगले औषध "हसू"*      
        *आणि आश्चर्य म्हणजे हे*
         *"सर्व विनामुल्य आहे".*
🌼🌸🌷🌼🌸🌷🌼🌸🌷
         

जीवन विचार


दुसऱ्यावर उपकार करणे म्हणजे पुण्य.दुसऱ्याला त्रास देणे म्हणजे पाप.यापेक्षा पाप- पुण्याची दुसरी व्याख्या करता येणार नाही।।
सत्याने वागणे हा धर्म व असत्याने वागणे हा अधर्म आहे.यासारख दुसरं सूत्र नाही.।।
विठ्ठलाचे(विवेकाचे) नामस्मरण करने ही गती विठ्ठलाचे नाम न घेणे ही तर अधोगती।।
चांगल्या माणसांची संगत हा स्वर्गवास तर वाईट माणसांच्या संगतीत राहणे हा नरकवास।।
तुकाराम महाराज म्हणतात-
तुमचे हीत आणि अहित मी उघड करून सांगितले आहे. तुम्हाला योग्य वाटेल ते करा.।।

समाजात पाप -पुण्य,धर्म-अधर्म,स्वर्ग-नरक याबद्दलच्या कल्पना रंगवुन सांगितल्या जातात.प्रसारमाध्यमांचा आधार घेऊन त्या माणसांच्या मनात रुजवल्या जातात.त्यामुळे बहुजनांच्या मनामध्ये भय/भीती तयार केली जाते. त्यांची स्वतंत्रपणे विचार करण्याची शक्ती संपवली जाते. त्यांना मानसिक गुलमगिरीमध्ये जखडले जाते.
       म्हणून सर्वसामान्य माणसांना तुकाराम महाराजांनी या कल्पना अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितल्या आहेत.त्या आचरणात आणणे सुद्धा सोपे आहे.त्यामुळे बहूजणांच्या मनातील भीती,न्युनगंड कमी होण्यास,तसेच नष्ट होण्यास निश्चितच मदत होते.

🍃🌸🍃🌸

कथा क्रमांक १५७

*श्रद्धा...*

हॉस्पिटलच्या ऑपरेशन वॉर्ड समोर एका बाईच्या येरझारा चालू होत्या. ऑपरेशन रूममधून डॉक्टर बाहेर पडताच तिचं मन अगदी सैरभैर झालं. डॉक्टर आता काय सांगणार?
माझ्या मुलाला काय झालंय?
तो बरा होईल नं?

बाहेर येताच तिने त्या ज्युनियर डॉक्टरांना थांबवून विचारले. डॉक्टरलाही वस्तुस्तिथी लपवता आली नाही. आलेले शब्द बाहेर पडू नये म्हणून त्याचा आटापिटा चालू होता पण सत्य परिस्थिती सांगावीच लागणार होती.

हृदयातील गुंतागुंतीमुळे लहानग्याचा जीव टांगणीला लागला होता. आता काही दिवस, आठवडे हाताशी आहेत असं सांगताना त्याने पुसटसा प्रकाश दाखवला, तो म्हणजे शहरातील ह्या गुंतागुंतीवर शस्त्रक्रिया करण्यात प्रख्यात असणाऱ्या डॉक्टरांना दाखवणे.

ज्युनियर डॉक्टरांनी तिच्या मुलासाठी स्वतःचं वजन वापरून मोठ्या डॉक्टरांशी सल्लामसलत केली. केसची गुंतागुंत बघून त्या डॉक्टरांनी ही केस हातात घ्यायचं आश्वासन दिलं.

ओपन हार्ट शस्त्रक्रिया करावी लागणार होती. ऑपरेशन रूमच्या बाहेर त्या माउलीचं मन काही शांत बसत नव्हतं. सतत तेच विचार... आपल बाळ परत चांगलं होईल नं?

आत जाणाऱ्या त्या प्रख्यात डॉक्टरांना तिने थांबवून हाच प्रश्न केला. तेव्हा डॉक्टरांकडेही 'आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न करू' ह्या शिवाय काहीच उत्तर नव्हतं.

गुंगीचं औषध देण्याअगोदर त्या लहानग्याला डॉक्टर म्हणाले, “पठ्ठ्या, घाबरू नकोस. आता हे ऑपरेशन झालं की तू एकदम बरा होशील!”

वास्तविक ऑपरेशनमधील यशाची हमी अगदी धूसर होती. पण डॉक्टरांनाही काय सांगावं काहीच कळत नव्हते.

डॉक्टर हे बोलताच मुलाचा प्रश्न, "डॉक्टर मी बरा होईनच. पण माझी एक सूचना आहे, *माझ हृदय तुम्ही उघडणार तेव्हा एक काळजी घ्या की माझ्या हृदयात देव आहे त्याला धक्का नको बसायला.* माझी आई सांगते देव माझ्या हृदयात आहे!”

मुलाचं हे बोलणं ऐकून डॉक्टरांनाही अश्रू आवरले नाहीत. शस्त्रक्रियेच्या वेळी आपला अवघा अनुभव पणाला लावूनही हृदयातील रक्तस्त्राव थांबत नव्हता. शेवटी डॉक्टरांनी शस्त्रक्रिया अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला.

आता काही मिनिटे आणि एक जीव निघून जाईल ह्या विचारात डॉक्टर असताना अचानक नर्सने र
*रक्तस्त्राव थांबला* अशी सूचना दिली. त्या नंतर पुन्हा एकदा शस्त्रक्रियेला सुरूवात करून डॉक्टरांनी ती यशस्वी केली.

मुलगा शुद्धीवर आल्यावर त्याचा पहिला प्रश्न ह्याच डॉक्टरांना होता, *"डॉक्टर तुम्ही देवाला पाहिलं नं, तो कसा दिसत होता?"*

त्याच्या ह्या प्रश्नावर डॉक्टर निरुत्तर झाले. आपल्या अनुभवानेसुद्धा *रक्तस्त्राव कसा थांबला अचानक* ह्याचं उत्तर त्यांना मिळत नव्हते. जिकडे विज्ञानाची कास धरणारा एक डॉक्टर एका माउलीच्या श्रद्धेपुढे हरला होता. त्याच क्षणी डॉक्टर स्वतःला सावरून म्हणाले,

*"तो नं ह्याच माउलीसारखा होता...!"*

विज्ञान जिकडे तोकडे पडते, तिथे सुरूवातीस काही प्रश्नाची उत्तरं आपण त्याच्यावर सोडतो. त्याला काही नाव द्या.... देव, डॉक्टर, मसीहा, एंजल, गुरु किंवा अजून काही.

*जी काही असते ती *श्रद्धा!*

*कोणती तरी एक शक्ती माझ्या आकलनाच्या पलीकडे कार्यरत आहे, ती सगळं समजून घेईल आणि सगळं सुरळीत होईल.*

*जीवन- मरणाचा प्रश्न असो वा आयुष्यातील कठीण निर्णयांचा आपल्यातील एक श्रद्धेचा भाग खूप मोठा न दिसणारा रोल करत असतो. ज्याची उत्तर कोणत्याही विज्ञान किंवा गणिताने देता येत नाही.*

*आस्तिक असो वा नास्तिक पण ती श्रद्धा जर मनापासून असेल तर नक्कीच उत्तरं मिळतात.*  

*आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात की जिकडे काहीच सुचत नाही. पुढचं काहीच दिसत नाही. मागे जावं तर काहीच सापडत नाही. अश्या वेळी आपण तुटतो. डळमळीत होतो. कधी कधी तर कोसळतो. पण श्रद्धेवर विश्वास असेल तर अश्या गोष्टीतून तारून जाता येते.*

*आपल्याच मनासारखं होईल असं नाही. पण जे समोर येईल त्याला सामोरी जायची शक्ती श्रद्धेतून मिळते. ती कमी- जास्त असेलही पण ती मिळते हे मात्र नक्की.*

*कोणत्याही हॉस्पिटलच्या दरवाज्याशी बसवलेला गणपती हा दगडाचा असो वा फोटोचा, कातळाचा असो वा संगमवराचा. तो सगळ्यांना मदत करतो का ते माहित नाही. पण त्याच्यावरील श्रद्धा मात्र त्या कठीण प्रसंगाला तोंड देण्याची सगळ्यांना हिंमत देते ह्यात शंका नाही.*


कथा क्रमांक १५६

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

अभ्यास  *कथा*

   🌷*गुरुपदेश*🌷

एका गुरूकडे एक शिष्य रोज यायचा आणि म्हणायचा मला गुरुपदेश द्या. त्यावेळी गुरु म्हणायचा, ‘उद्या ये.’ तो उद्या आला की म्हणायचा, ‘उद्या ये.’ असे दहा दिवस झाल्यावर शिष्य म्हणाला, ‘द्या ना गुरुपदेश !’ त्यावेळी ते म्हणाले, ‘एकटा येरे, किती जणांना बरोबर आणतोस?’ तेव्हा तो चपापला. कारण कोणीच नसायचे बरोबर. दुसऱ्या दिवशी तेच ! तिसऱ्या दिवशी तेच! शेवटी त्याने धाडस करून विचारले, ‘महाराज, मी तर एकटाच येतो, किती जणांना बरोबर आणतोस असे का म्हणता?’ ते म्हणाले, ‘अरे, मनामध्ये काय आहे? काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, मद आहे, मत्सर आहे, दंभ आहे !’ समर्थांनी तर प्रपंचालाच सहावा रिपू मानला आहे. आता काय करायचे? ज्या प्रपंचाला आम्ही कवटाळून बसतो, तो सहावा रिपू म्हणतात समर्थ ! मग त्याला कळले की अरे हे सगळे काढले पाहिजे चित्तातून ! त्यावेळी गुरुपदेश मिळेल.

*तात्पर्य* :- आपले चित्त हे शुद्ध व्हायला पाहिजे. चित्तशुद्धीनंतर धर्माचरणाचा, सदाचाराचा खरा अर्थ कळतो आणि धर्माधिष्टीत अर्थ-काम सेवन केल्यावर मोक्षाचा लाभही अपरिहार्य ठरतो.

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

       *संकलन*

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

जीवन विचार

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*माझी शाळा माझे उपक्रम*

  *🌺 जीवन विचार*🌺
〰〰〰〰〰〰〰
*🙏🙏गेले सांगून गाडगेबाबा, गाव स्वच्छ ठेवा कचरा जाळा, रोगराई पळवा मुखाने बोला बोला देवकीनंदन गोपाला ll*

*जीवनात स्वच्छता , आचार -विचारात स्वच्छता ही आजच्या काळाची गरज आहे. म्हणून खराटा, केरसुणी, खापर आणि खोरं ही तर निर्मळतेची धन्य धन्य  साधनं आहेत. ही झाडूची भावडंच आहेत.*

*संत गाडगेबाबा, महात्मा गांधी आणि सेनापती बापट या महापुरुषांनी आपल्या हाती झाडू घेतला.*
*संत गाडगेबाबांचा खराटा मनुष्याच्या अंतर्बाह्य स्वच्छ जीवनाचे प्रतीक* *आहे.स्वच्छता , समता आणि बंधुत्व या ञिवेणी संगमावरील तीर्थस्थान होतं गाडगेबाबांचं* !
*स्वातंत्र्य,  स्वावलंबन, स्वाध्याय आणि स्वाभीमान ही स्वच्छतेच्या पुस्तकातील पाने आहेत.सार्वजनिक स्वच्छता अंधश्रद्धा निर्मूलन यासाठी संत गाडगेबाबांनी स्वतः सातत्याने प्रयत्न करून कार्य  केले.*
*प्रत्येक मनुष्याच्या जीवनात स्वच्छतेचे स्फुल्लिंग निर्माण झालं तर सुखी आणि संपन्न देशाचं भाग्य जवळ आलं अस*
*म्हटलं पाहिजे !!*

*' जनसेवा हीच ईश्वरसेवा' मानणारे संत गाडगेबाबा हे देवत्वाची जागृत रोकड  उदाहरण होत.*🙏👏💐🙏

कविता संकलन



*!!    थोड जगलं पाहिजे.........!!*

आयुष्याच्या अल्बममध्ये
आठवणींचे फोटो असतात,
आणखी एक कॉपी काढायला
निगेटिव्हज् मात्र शिल्लक नसतात.

गजर तर रोजचाच आहे
आळसाने झोपले पाहिजे,
गोडसर चहाचा घोट घेत
Tom & Jerry पाहिलं पाहिजे.

आंघोळ फक्त दहा मिनिटे?
एखाद्या दिवशी तास घ्या,
आरशासमोर स्वतःला
सुंदर म्हणता आलं पाहिजे.

भसाडा का असेना
आपल्याच सुरात रमलं पाहिजे,
वेडेवाकडे अंग हलवत
नाचण सुध्दा जमलं पाहिजे.

गीतेचा रस्ता योग्यच आहे
पण एखादा दिवस पाडगावकराना द्या,
रामायण मालिका नैतिक थोर
"बेवॉच" सुध्दा एन्जॉय करता आली पाहिजे.

कधी तरी एकटे
उगाचच फिरले पाहिजे,
तलावाच्या काठावर
उताणे पडले पाहिजे.

संध्याकाळी मंदिराबरोबरच
बागेत सुध्दा फिरलं पाहिजे,
"फुलपाखराच्या" सौंदर्याला
कधीतरी भुललं पाहिजे.

द्यायला कोणी नसलं
म्हणून काय झालं?
एक गजरा विकत घ्या
ओंजळ भरुन फुलांचा नुसता श्वास घ्या.

रात्री झोपताना मात्र
दोन मिनिटे देवाला द्या,
एवढया सुंदर जगण्यासाठी
नुसतं थँक्स तरी म्हणा..!!

पाहता पाहता मोठे झालो
सगळेच गणित बदलत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले ।।ध्रु ।।

आजीने घातलेल्या आंघोळीने
मन सुद्धा स्वछ होई
देवपूजा पाहताना तिची
देव सुद्धा मुग्ध होई

मायेन भरवलेल्या तिच्या घासांनी
दिवसभराची भूक भागे
तिच्या सुंदर गोष्टी-गाण्यांनी
शांत सुखाची झोप लागे

पाहता पाहता मोठे झालो
सगळेच गणित बदलत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || १ ||

७ वाजताच्या बातम्या पाहणे
हा आजोबांचा नियम असे
'बातम्या नको,कार्टून लावा'
असा आमचा गलका असे

बाजारातून घरी आल्यावर आजोबा
सारे त्यांच्याभोवती जमत असू
त्यांनी आणलेला खावू
सारे वाटून खात असू

आता फक्त आठवणी राहिल्या
ते दिवस भरभर सरत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || २ ||

खेळापेक्षा अभ्यास हि गोष्ट
महत्वाची वाटायची नाही
'खेळून झाल्यावर अभ्यास'
हि गोष्ट घरातल्यांना पटायची नाही

गल्लीमध्ये क्रिकेट खेळणे
म्हणजे मोठी धमाल असे
दोन दगडांच्या stumpa मध्ये
world cup ची मजl असे

सागरगोटे,पतंग,भोवरे
सोबती सारेच सोडून गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || ३ ||

शनिवारच्या सकाळी शाळेचे
आवरताना धांदल होई
आणि म्हणता म्हणता दंग्यांमध्ये
रविवार हळूच निघून जाई

वर्गातील भांडणे सोडवताना
शिक्षकांच्या नाकी दम येई
आम्हाला 'वळण' लावायच्या नादात
शेवटी घरातल्यांनाच 'बाक' येई !

आता फक्त वीकेंड आले
त्यातले निरागसपण संपून गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || ४ ||

स्पर्धेच्या जगातले सर्वात पहिले
दहावीचे वर्ष आले
पाहता पाहता सर्व सवंगडी
अभ्यासाच्या मागे लागले

क्लासेस, college, tution च्या गडबडीत
'परीक्षा' हेच उद्देश बनले
आणि बालपणीचे सुंदर दिवस
आयुष्याच्या डायरीत मागे पडले

पाहता पाहता मोठे झालो
सगळेच गणित बदलत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || ५ ||

आजच्या मोठ्या पगारामध्ये
साठवलेल्या भिशी ची मजा नाही
मधल्या सुट्टीच्या डब्याची चव
office च्या lunch -break ला नाही

आजच्या फोर व्हीलर long driveला
सायकल च्या डब्बल सीटची सर नाही
रात्रभर मारलेल्या गप्पांची गम्मत
आजच्या whatsapp chatting ला नाही

गुंफता गुंफता नात्यांचे बंध
किस्से सारे आठवत गेले
आज थोडे थांबून मागे पाहताना............

*अश्रू माझे ओघळून गेले ||*😥😥

जीवन विचार

*सहवासाचा परिणाम किती होऊ शकतो याचं सुरेख उदाहरण*...

*आचार्य विनोबा म्हणतात की*,
*आकाशातुन पडणारा पावसाचा थेबं हातावर झेलला तर तो पिण्यायोग्य असतो*.
*मात्र तोच गटारात पडला तर मात्र त्याची प्रतिष्ठा इतकी ढासळते की तो पाय धुण्याच्याही लायकीचा राहत नाही*.
*तोच थेबं गरम तव्यावर पडला तर त्यांच अस्तित्वच संपुन जाते*.
*कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमचम करतो आणि शिंपल्यात पडला तर प्रत्यक्ष मोतीच बनतो*...
*पहा गंमत, थेंब तोच परंतु कुणाच्या सहवासात येणार यावर त्याचं अस्तित्व व त्याची पतप्रतिष्ठा अवलंबुन असते*.
  

कथा क्रमांक १५५

एका जंगलामध्ये एक म्हतारी आणि तिची नात राहत होती .
आणि त्याच जंगलामध्ये चार दरोडेखोर लुटमार करण्यासाठी येत असंत .
एके दिवशी लुटमार करता करता संध्याकाळ झाली आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची सुरुवात झाली .
ते चार दरोडेखोर जंगलामध्ये आश्रयासाठी सैरभैर पळु लागले .
अचानक त्यांना म्हतारीची झोपडी दिसली .आणि ते म्हतारीच्या झोपडीकडे गेले. म्हतारीने त्यांना रात्री साठी आश्रय दिला.
म्हतारीने जेवण बनवले सर्वजन जेवायला बसले आणि जेवता जेवता पाप पुण्याचा विषय निघाला.
प्रत्येकजण आपल्या परीने विषय मांडत होता. शेवटी म्हतारीने पैज लावली .बाहेर विजा पडत आहेत प्रत्येकाने त्या समोरच्या झाडाला शिवुन पुन्हा झोपडीमध्ये यायचे  ज्याच्या अंगावर विज पडेल तो पापी आणि जो सुखरुप पुन्हा झोपडीत येईल तो पुण्यवान.
प्रथम १ ला दरोडेखोर गेला झाडाला शिवुन सुखरुप झोपडीत आला.
असे दुसरा गेला ,तिसरा गेला, चौथा गेला. आणि सर्वजण सुखरुप झोपडीत आले.
आता पाळी आली म्हतारी आणि तिच्या नातीवर म्हतारीला मनामध्ये प्रश्न पडला की हे चारही दरोडेखोर पुण्यवान निघाले आपण नक्कीच पापी आहोत विज आपल्याच अंगावर पडणार असा विचार करत असताना तिने नातीला कडेवर घेतले आणी झोपडीच्या बाहेर पाऊल टाकले त्याचक्षणी विजेचा कडकडाट होऊन विज त्या झोपडीवर पडली आणि क्षणार्धात ते चारही दरोडेखोर जागीच भस्मसात झाले.
*तात्पर्यः एका पुण्यवान माणसाच्या आश्रयामूळे आजही चार पापी माणसं जगु शकतात  पण त्याने साथ सोडली तर ते चारही भस्मसात होऊ शकतात.

जीवन विचार

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

   🌺जीवन विचार 🌺
〰〰〰〰〰〰〰〰
आपल्या जीवनात सुखासमाधानाचे रुतु जसे येतात तशी दुःखाची - वेदनेची पानगळही येत असते. आपण आपल्या सुखासाठी जसं धडपडत असतो तसं दुःखही चोर पावलांनी आपल्या मनात शिरत असतं.

         एकदा का आपण वेदनेच्या आहारी गेलो की जीवन उदास वाटतं.या जन्मात या जगात काहीच अर्थ नाही असं वाटतं. मग ती वेदना कोणतीही असो आपणास सतत पोखरत
राहते. एखादा किडा जसा लाकडाला पोखरत राहतो अगदी तसं !!

वेदनामुक्त जीवनात आनंदाची पहाट फुलत असते.चोखंदळ माणसांनी मुक्त जीवनाकडून
जीवन मुक्तीकडं जाण्याचा मार्ग चोखाळला पाहिजे.
वेदनेला मुळासकट उपटून टाकायचे असेल तर मनाच्या दुःखाचे दरवाजे बंद ठेवले पाहिजे.
वेदना ही शुगरकोटेड टँबलेट सारखी असते.वरुन गोड आणि आतून कडू. वेदना म्हणजे कडू औषधाचा घोटच. त्या औषधानं आपल्या मनाचा वैद्यच आपणाला रोगमुक्त-- वेदनामुक्त करत असतो.
==================
🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼

कथा क्रमांक १५४

*माझी शाळा माझे उपक्रम*

*🌷🌷🌷कथा🌷🌷🌷*
*📚अभ्यास कथा भाग १५४.*
〰〰〰〰〰〰〰   *🌺व्यापक दृष्टिकोन*🌺
=================
एकदा एक अनुभवी आणि वृध्द गुरू आपल्या शिष्याच्या तक्रारींना कंटाळून गेले होते.
         एके दिवशी सकाळी त्यांनी त्या शिष्याला थोडे मीठ आणायला सांगितले.

        तो शिष्य मीठ घेऊन परतला तेव्हा गुरूंनी त्या दुखी तरूणाला त्यातील मूठभर मीठ एका एका पाणी भरलेल्या पेल्यात टाकून ते पिण्यास सांगीतले.
         ’पाणी चवीला कसे लागले ?‘ गुरूंनी विचारले.
        ‘कडु’ असे म्हणून शिष्याने ते पाणी थुंकले.

         गुरूंनी मंद हास्य केलं आणि पुन्हा त्या शिष्याला मुठभर मीठ त्या तळयात टाकण्यास सांगितले. ते दोघे तळयाजवळ आले.

      शिष्याने मूठभर मीठ त्या तळयात मिसळल्यानंतर ते वृध्द गुरू म्हणाले, ‘आता या तळयातील पाणी पिऊन पहा.‘

         त्याच्या हनुवटीवरून पाणी खाली ओघळल्यावर गुरूंनी त्याला विचारलं, आता यापाण्याची चव कशी आहे ?‘

         ‘ताजी आणि मधुर !‘ शिष्याने सांगितले.

         ‘आता तुला मिठाची चव लागतेय ?‘
                  ‘नाही‘.

          गुरू त्या शिष्याच्या जवळ बसले आणि त्यांनी त्याचा हात आतात घेतला. ते म्हणाले, ‘आयुष्याची चवही अगदी मिठासारखीच असते.
       
         आयुष्यातील दुखही तेवढच असतं, परंतु आपण ते दुख कशात मिसळतो यावर त्याचा कडवटपणा अवलंबुन असतो. म्हणून जेव्हा आापण दुखात असतो तेव्हा आपण एकच गोष्ट करू शकतो. ती म्हणजे, आपण आपल्या भावना व विचार व्यापक ठेवल्या पाहिजेत. पेला होणं थांबवून तळं होण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
*-----------------------------------*
*📝 शब्दांकन/संकलन*

माझी शाळा माझे उपक्रम ( शिवजयंती )

*माझी शाळा माझे उपक्रम*
⛳🚩🚩🚩🚩🚩🚩⛳
      *🚩शिवजयंती*🚩
*जि.प.प्रा.शाळा वाटेगाव ता.हदगाव जि.नांदेड*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
 *"जिजाऊंचे पुत्र तुम्ही*
*निर्मिले स्वराज्य हिंदवी* 🚩
*बलाढ्य शत्रूंना चित करूनी*
*पताका फडकविली भगवी"* 🚩
  *छत्रपती शिवाजी महाराज* यांची जयंती  मोठ्या उत्साहाने व आनंदाने वाटेगाव नगरीत  पार पडली. सर्व प्रथम प्रतीमा पूजन व त्यानंतर
🎤 विद्यार्थ्यांनी उत्कृष्टे भाषणे  करून  शिवाजी महाराज यांच्या जीवनातील अनेक घडामोडी व कार्ये सांगितले.
🎤 तसेच गीते  गायन केली.
उप.सर्व गुरूजणांनी मार्गदर्शन केले.
अशाप्रकारे शिवजयंतीचा हा कार्यक्रम मोठ्या आनंदाने पार पडला.
🎤 सदरील कार्यक्रमाचे सूञसंचलन कु.वैष्णवी जाधव ने केले तर 🙏🎤आभार प्रदर्शन कु.कोमल मानेगोविंदवाड हीने केले.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*' गगनाला भिडली तुमची किर्ती*
*रयतेला वाली अशी तुमची ख्याती.'*
*🙏जय जिजाऊ जय शिवराय*🙏
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
     *🖋🙏शब्दांकन*🙏
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (स.शि.)
जि.प.प्रा.शाळा वाटेगाव
ता.हदगाव जि.नांदेड.

कविता संकलन

🌺🌼🌺🌼🌺🌼🌺

    कविता

पोरीची पसंती आली की
बापाचं काळीज धडधडतं
चिमणी घरटं सोडणार म्हणून
आतल्या आत खूप रडतं

हसरे खेळकर बाबा एकदम
धीर गंभीर दिसू लागतात
पोरीला पाणी मागण्या पेक्षा
स्वतःच उठून घेऊ लागतात

या घरातला चिवचीवाट आता
कायमसाठी थांबणार असतो
म्हणून बाप लेक झोपल्यावर
तिच्याकडे पाहून रडत असतो

अंबुच्या लिंबूच्या करत करत
मोठी कधी झाली कळलं नाही
बाप सांगतो तिलासोडून
मला पाणीही गिळलं नाही

दिवसातून एकदा तरी
मायेनं जवळ घ्यावं वाटतं
परक्याचं धन असलं तरी
द्यायला मात्र नको वाटतं

उठल्या पासून झोपे पर्यंत
बाबाची काळजी घेत असते
आज ना उद्या जाणार म्हणून
पोरगी जास्तच लाडाची असते

पोरगी जाणार म्हणलंकी
बाप आतून तुटून जातो
कळत नाही बैठकीतून
अचानक का उठून जातो ?

इकडे तिकडे जाऊन बाबा
गुपचूप डोळे पुसत असतात
लेकीचं कल्याण झालं म्हणून
पुन्हा बैठकीत हसत असतात

तिचा सगळा जीवनपट
क्षणाक्षणाला आठवत राहतो
डोळ्यात येणाऱ्या आसवांना
बाबा वापस पाठवत राहतो

बी. पी. ची गोळी घेतली का ?
आता कोण विचारील गं ?
जास्त गोड खाऊनका म्हणून
कोण कशाला दटवील गं ?

बाबा कुणाचं ऐकत नाहित पण
पोरीला नकार देत नाहीत
तिने रागात पाहिलं की मग
ताटात गुलाबजाम घेत नाहीत

एका अर्थानं पोरगी म्हणजे
काळजी करणारी आईच असते
पोटचा गोळा देणाऱ्याची
कहाणी फार वेगळी असते..
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

जीवन विचार

🎭 *कुणाच्या रंग रूपावर जाऊ नका,ते धोका देऊ शकतात,*
*कुणाच्या संपत्तीवर भाळु नका,ती कमी होऊ शकते..!*

*अशा व्यक्तीचा शोध घ्या,जिच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर हास्य उमटेल,*

*कारण तेच हास्य तुमच्या कोणत्याही वाईट दिवसाला सुद्धा चांगला दिवस बनवू शकते*🎭
     

जीवन विचार

*दु:ख* इतकं नशीबवान आहे की
ज्याला प्राप्त करून लोक...
आपल्या माणसांना *आठवतात*.

*धन* इतकं दुर्दैवी आहे की
ज्याला मिळवून लोक नेहमी...
आपल्या माणसांना *विसरतात*.

किती अजब आहे ना...??

माणसाच्या शरीरात 70% पाणी आहे,
पण जखम झाली की रक्त येतं....

आणि
माणसाचे हृदय रक्ताचे बनलेले असून
हृदय दुःखावलं की डोळ्यातून पाणी येतं.
   

कथा क्रमांक १५३

*पूर्वसंचित आणि प्रारब्ध ...*
संत जनाबाई एकदा आपल्या पतीस जेवण वाढत होत्या, पहिला घास घेताच पतीने तावातावाने जनीला मारावयास सुरुवात केली. "भाजीत मीठ का नाही??" तिला हुंदका फुटला. विठ्ठल समोर उभा राहिला. "विठ्ठला, तू इथे असतानाही तुझ्या भक्ताला अशा परिस्थितीतून जावं लागतंय ... कां ??" विठ्ठलाने जनीच्या डोक्यावर हात ठेवला. जनीला तिच्या पूर्वजन्माचे स्मरण झाले आणि तो क्षण तिच्या डोळ्यासमोर आला. पूर्वजन्मातली जनी एक राजकन्या होती. गायीसमोर तिने घास ठेवला आहे. गाय ते खाण्यास नकार देते आणि जनीने छडी उचलली. तिने गायीवर वळ उठवले परंतु गायीने ते खाण्यास नकारच दिला ... विठ्ठलाने जनीच्या डोक्यावरून हात उचलला. जनी भानावर आली. *विठ्ठल म्हणाला, "जनी, पूर्वसंचित आणि कर्म फळ कुणाला चुकलेले नाही. हे सर्व भोगूनच ह्या भवसागरातून तरून जावे लागते. तुझी भक्ती ह्या जन्मातली आहे तेंव्हा तुझे सर्व पूर्वसंचित ह्या जन्मी फेडून, माझ्या चरणी, चिरंतन समाधीत विलीन होशील"*

*तात्पर्य*: त्याचे तसेच का किंवा मला असे का नाही हे रडण्यापेक्षा कर्मभोगाची पातळी आपणच निश्चित करावी. चांगले कर्म करूनही फळ मिळत नसले तर जनीच्या ह्या कथेने समर्पक उत्तर आपणास मिळेल, पण चांगले कर्म करणे सोडू नका. हेच तुमच्या जीवनाचे ध्येय असावे ...

तुकाराम महाराजांच्या ओवीने आपणास स्मरण राहील कि, "आपणाची तारी ।। आपणाची मारी ।। आपणाची उद्धारी ।। आपणया ।।"

कथा क्रमांक १५२

*'अत्त दिप भव'*
〰〰〰〰〰〰
*एका घरात पाच दिवे जळत होते. एके दिवशी पहिला दिवा म्हणाला, "मी दिवसभर जळून लोकांना इतका प्रकाश देतोय, पण माझी कोणी कदरच करत नाही. म्हणून मी विझून जाणंच योग्य ठरेल"असं म्हणून तो दिवा विझला. पण हा दिवा साधासुधा नव्हता तर तो होता,  उत्साहाचं प्रतीक !*

*हे पाहून दुसरा दिवा, जो शांतीचं प्रतीक होता, तो म्हणाला, "मी शांतीचा प्रकाश सातत्याने देत असलो, तरी लोक हिंसा करतच आहेत. त्यामुळे मी प्रकाश देणं व्यर्थ ठरत आहे. म्हणून, मला विझायलाच हवं."*

*उत्साहाचा आणि शांतीचा दिवा  विझल्यानंतर हिमतीचा जो तिसरा दिवा होता तोही आपली हिंमत हरवून बसला , निराश झाला आणि विझला. आता उत्साह, शांती  आणि हिंमत न राहिल्याने चवथ्या समृध्दीच्या दिव्यानंही विझणं उचित समजलं.*

*आता चार दिवे विझल्यानंतर उरलेला एकमेव पाचवा दिवाच केवळ  प्रज्वलित होता. खरंतर पाचवा दिवा सर्वांमध्ये लहान असला तरीही तो निरंतरपणे जळत होता.*

तेवढ्यात त्या घरात एका मुलाने प्रवेश केला. त्यानं पाहिलं, *अरेच्चा !*
*"या घरात किमान एक दिवा तरी उजळत आहे" असा विचार करून तो आनंदीत झाला. विझलेले चार दिवे पाहून तो मुळीच निराश झाला नाही. कारण त्याच्या मनात एकच आशा होती  कमीत कमी एक दिवा तर जळत आहे! त्याने त्वरित तो जळत असलेला दिवा उचलून इतर चार दिवे प्रज्वलित केले. हा पाचवा अनोखा दिवा कोणता होता हे आपण जाणता का ?  तो होता आशेचा दिवा!*

*आता मनन करा, आपल्या ह्रदयाच्या गाभा-यात हा पाचवा दिवा प्रज्वलित आहे का ?  जर तो तेवत असेल तर, नेहमीसाठी प्रज्वलित राहावा म्हणून आपण काय कराल?*

*'अत्त दिप भव'* अर्थात विश्वास ठेवा, नवनिर्मिती करण्याची ताकद केवळ मनुष्यातच आहे. मनुष्य जेव्हा एखाद्या गोष्टींवर विश्वास ठेवतो,  तेव्हा तो विश्वास त्याचा वाणीत येतो, मग क्रियेत उतरतो, हेच आशेचं बळ आहे, म्हणून आशेला कधीही छोटं समजू नका, क्षुद्र लेखू नका.



✍✍✍

शिवतंञ

*घरातच शत्रू निर्माण केल्यामुळे*
*बाहेरचा शत्रू न लढताही जिंकतो...*

*म्हणून शिवतंत्र सांगते...*

" *जोडता नाही आले तर*
*जोडू नका*
*पण आपल्या लोकांना तोडू नका*"
 **कलम* नव्हते *कायदा* नव्हता
                तरीही सुखी होती *प्रजा*
कारण *सिंहासनावर* होता
  माझा *छत्रपती_शिवाजी_राजा*
शिवजयंतीचा शिवमय शुभेच्या

English words

 इंग्रजी शब्द.......                                   .        Air          म्हणजे           हवा
Pan        म्हणजे           तवा
New       म्हणजे           नवा
Bison     म्हणजे           गवा

Bowl        म्हणजे         वाटी
slate         म्हणजे        पाटी
stick         म्हणजे       काठी
Ruler         म्हणजे        पट्टी

Cat             म्हणजे     मांजर
Carrot         म्हणजे   गाजर
Sea              म्हणजे   सागर
crocodile     म्हणजे  मगर

Dog           म्हणजे      कु त्र
Friend        म्हणजे.    मित्र
Son             म्हणजे     पुत्र
Fromula      म्हणजे     सुत्र

Elephant     म्हणजे    हत्ती
husband      म्हणजे   पती
soil                म्हणजे   माती
speed           म्हणजे   गती

Fish             म्हणजे    मासा
Rabbit        म्हणजे     ससा
laugh          म्हणजे    हसा
How            म्हणजे    कसा

Goat         म्हणजे    शेळी
Bud         म्हणजे       कळी
Banana   म्हणजे      केळी
Dish         म्हणजे      थाळी

Head      म्हणजे       डोक
Box          म्हणजे      खोक
people    म्हणजे       लोक
Throw    म्हणजे        झोक

Ink           म्हणजे      शाई
mother    म्हणजे     आई
sister        म्हणजे     ताई
Jasmine   म्हणजे     जाई

Jug         म्हणजे       मगा
frock       म्हणजे       झगा
ballon      म्हणजे      फुगा
Brinjal      म्हणजे     वांगा

kite      म्हणजे          घार
Door    म्हणजे          दार
Cold      म्हणजे         गार    
day        म्हणजे         वार

List        म्हणजे          यादी
Women   म्हणजे       मादी
Bed         म्हणजे         गादी
River       म्हणजे          नदी

mango     म्हणजे      आंबा
pole          म्हणजे       खंबा
Tall            म्हणजे       लंबा
stop         म्हणजे        थांबा

Nose     म्हणजे       नाक
wheel    म्हणजे       चाक
Bench .   म्हणजे      बाक
Post        म्हणजे       डाक

Orange      म्हणजे     संत्री
Minister    म्हणजे      मंत्री
toilet .         म्हणजे     मुत्री
Scissors     म्हणजे     कात्री

peacock    म्हणजे     मोर
Thief           म्हणजे    चोर
force           म्हणजे    जोर
Rope          म्हणजे      दोर

Queen   म्हणजे            राणी
water      म्हणजे           पाणी
Loss        म्हणजे           हानी
sparrow  म्हणजे           चिमणी

Radish    म्हणजे            मुळा
school    म्हणजे            शाळा
Eye          म्हणजे             डोळा
Black       म्हणजे             काळा

Sheep    म्हणजे         मेंढी
sheaf         म्हणजे      पेंढी
lady finger  म्हणजे    भेंडी
Bank        म्हणजे         पतपेढी

Tight    म्हणजे           ताठ
Back    म्हणजे            पाठ
Edge      म्हणजे          काठ
Road        म्हणजे         वाट

umbrella   म्हणजे       छत्री
Iron           म्हणजे        इस्त्री
Beach       म्हणजे       कुत्री
mason      म्हणजे        मिस्त्री

Van        म्हणजे       गाडी
mare     म्हणजे        घोडी
Beard    म्हणजे        दाढी
Hen      म्हणजे         कोंबडी

washerman   म्हणजे    धोबी
key              म्हणजे         चाबी
cabbage    म्हणजे          कोबी
Navel          म्हणजे          बेंबी

Xerox        म्हणजे      नक्कल
Bow            म्हणजे    बक्कल
Common sense     अक्कल
Devisal      म्हणजे      शक्कल

Young     म्हणजे         तरुण
Pimple      म्हणजे       मुरुम
Garlic       म्हणजे         लसूण
Probe        म्हणजे        कसूण

zip        म्हणजे     चेन
Dung    म्हणजे     शेण,



संकलन 

शिवनेरी किल्ल्याची माहिती संकलन

शिवनेरी
उंची ३५०० फूट
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी मध्यम
ठिकाण पुणे जिल्हा, महाराष्ट्र
जवळचे गाव जुन्नर
डोंगररांग नाणेघाट
सध्याची अवस्था सर्वात चांगली
स्थापना ११७०

शिवनेरी हा महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर गावाजवळ, पुण्यापासून अंदाजे १०५ किलोमीटरवर आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.

१९ फेब्रुवारी १६३० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला होता.

या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.

या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे.

शिवनेरी अगदी जुन्नर गावात आहे. जुन्नरमधे शिरतानाच शिवनेरीचे दर्शन होते. किल्ला तसा फार मोठा नाही. १६७३मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉ. जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली होती. त्याने आपल्या साधनग्रंथात, या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षे पुरेल एवढी शिधासामुग्री आहे असा उल्लेख केला आहे.

इतिहास

‘जीर्णनगर’, ‘जुन्नेर’ म्हणजेच जुन्नर हे गाव इसवी सन पूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. ही शक राजा नहपानाची राजधानी होती. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग. या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे. यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील दुर्गांची निर्मिती करण्यात आली. सातवाहनांची सत्ता स्थिरावल्यानंतर त्यांनी येथे अनेक ठिकाणी लेणी खोदवून घेतली.

सातवाहनांनंतर शिवनेरी चालुक्य व राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता. ११७० ते १३०८ च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले. आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. नंतर इ.स. १४४३ मध्ये मलिक– उल–तुजार याने यादवांचा पराभव करून किल्ला सर केला. अशा प्रकारे किल्ला बहमनी राजवटीखाली आला. इ.स. १४७० मध्ये मलिक– उल–तुजारचा प्रतिनिधी मलिक महंमद याने किल्ला नाकेबंद करून पुन्हा सर केला. १४४६ मध्ये मलिक महंमदच्या वडिलांच्या मृत्यूनंतर निजामशाहीची स्थापना झाली. पुढे १४९३ मध्ये इथली राजधानी गडावरून अहमदनगरला हलवण्यात आली. इ.स. १५६५ मध्ये सुलतान मूर्तिजा निजामाने आपला भाऊ कासीम याला या गडावर कैदेत ठेवले होते.

यानंतर इ.स. १५९५ मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला. जिजाबाईंचे वडील जाधवराव यांच्या हत्येनंतर १६२९ मध्ये जिजामाता गरोदर असताना शहाजीने त्यांना ५०० स्वार त्यांच्या सोबत देऊन रातोरात शिवनेरीवर नेले. ‘शिवनेरी गडावर श्रीभवानी शिवाईस जिजाऊने नवस केला जर आपल्याला पुत्र झाला तर तुझें नाव ठेवीन. त्याउप्पर, शके १५५१ शुक्ल नाम संवत्सरे, फाल्गुन वद्य तृतीयेला, शुक्रवारी सूर्यास्तानंतर शिवाजीराजे यांचा जन्म जाला. तारीख होती १९ फेब्रुवारी, इसवी सन १६३०. इ.स. १६३२ मध्ये जिजाबाईने शिवाजीसह गड सोडला आणि १६३७ मध्ये किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. १६५० मध्ये मोगलांविरूद्ध येथील कोळ्यांनी बंड केले. यात मोगलांचा विजय झाला. पुढे इ.स. १६७३ मध्ये शिवनेरीचा किल्लेदार अजीजखान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्‍न शिवाजीने केला. इ.स. १६७८ मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा परत एकदा प्रयत्‍न केला, मात्र अपयश पदरात पडले. पुढे ३८ वर्षांनंतर १७१६ मध्ये शाहूमहाराजांनी किल्ला मराठेशाहीत आणला व नंतर तो पेशव्यांकडे हस्तांतरित करण्यात आला.

गाथा शिवाजी महाराजांची

निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ।।
नरपती, हयपती, गजपती। गडपती, भूपती, जळपती।
पुरंदर आणि शक्ति पृष्ठभागी।।
यशवंत, कीर्तीवंत, सामर्थ्यवंत।
वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत। जाणता राजा ।।
आचरशील, विचारशील, दानशील।
धर्मशील सर्वज्ञपणे सुशील। सकळाठाई ।।
धीर उदार गंभीर। शूर क्रियेसी तत्पर ।
सावधपणे नृपवर तुच्छ केले।।
देवधर्म गोब्राह्मण, करावया संरक्षण।।
हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली
या भूमंडळाचे ठाई, धर्मरक्षी ऐसा नाही।
महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणी।।
कित्येक दृष्ट संहारली। कित्येकासी धाक सुटला
कित्येकाला आश्रयो जाहला ।
शिवकल्याण राजा। शिवकल्याण राजा।।शिवकल्याण राजा छत्रपती शिवाजीमहाराजांचा विजय असो.॥

शिवकाव्य

*शिवनेरीवर तोफांचा गडगडाट* *झाला...*
*सनई-चौघडे वाजू लागले...*
*सारे आनंदी-आनंदी वातावरण* *पसरले...*
*भगवा अभिमानाने फडकू लागला...*
*सह्याद्री आकाशाच्या उंचीने* *दिल्लीकडे*
*... ... ताठ नजरेने पाहू लागली...*
*अवघा दक्खन मंगलमय झाला..*
*अन एक आरोळी सह्याद्रीच्या* *कडेकोपर्यात घुमली*
*"अरे  अरे अरे माझा राजा जन्मला...*
*माझा शिवबा जन्मला ...माझा शिवबा* *जन्मला*
*दीन-दलितांचा कैवारी जन्माला...*
*दृष्टांचा संहारी जन्मला...*
*अरे माझा राजा जन्मला..."*
*शिवजयंतीच्या सर्वांना मनपुर्वक* *हार्दिक शुभेच्छा...**

*⛳⛳⛳हर हर महादेव !!!*

जीवन विचार

🔰🌸🔰🌸🔰🌸🔰🌸
*🌷🌷 जीवन विचार*🌷🌷
〰〰〰〰〰〰〰
   *🚩शिव शुभेच्छा🚩*
सत्य , शौर्य आणि निर्धारानं पावलं पुढे टाकणारे छञपती शिवाजी महाराज एक तेजस्वी व्यक्तीमत्व होतं. सामान्य माणसाला देशभक्तीची प्रेरणा देऊन शिवाजी महाराजांनी  आपले सैन्य घडविले.
ज्यांनी शून्यातून राज्य निर्माण केले , राज्य हे प्रजेचे आहे ही भावना त्यांच्या मनात सतत होती. ज्यांना जीवनात काही ठोस करून दाखवायचं असतं ते धैर्यानं पाऊल पुढे टाकत असतात.

सध्याच्या परिस्थितीत जेव्हा एखाद्या कर्तूत्ववान  व्यक्तीमत्वाची उणीव भासते , तेव्हा भूतकाळातील कर्तव्यकठोर थोर व्यक्तीची आपल्याला प्रकर्षाने आठवण होते.
स्वच्छ राज्यकारभार , कर्तव्यदक्ष शासन , भ्रष्टाचारविरहित व्यवहार , उच्च सांस्कृतिक मूल्यांचे जतन आपल्या भारताची , महाराष्ट्राची शान म्हणजे राजे शिवाजी⛳🙏
 *स्वाती नक्षत्रातील पावसाचा एक थेंब शिंपल्यात पडला तर त्या  थेंबाचा मोती तयार होतो असं म्हणतात. तसं धाडसी माणसाच्या श्रमापासून निर्माण होणाऱ्या घामाच्या प्रत्येक थेंबापासून कीर्तिरुप मोती होतो.*आजच्या या युगात या पुण्यश्लोक महामानवाने पुन्हा अवतार घ्यावा हीच सदोदीत  मनोमनीची मनोकामना.🙏🙏
*सर्वांना 🚩शिवजयंतीचा हार्दिक हार्दिक शिवशुभेच्छा! 🙏'जय जिजाऊ जय शिवराय'🙏*💐💐💐💐 शुभेच्छूकः श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ( शिंदे )  म.रा.प्रा.शि.महिला आघाडी संघ जिल्हा सरचिटणीस नांदेड. 〰〰〰〰〰〰〰〰
🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸
*✍शब्दांकन*
http://www.pramilasenkude.blogspot.in

जीवन विचार

.
"‪हवेत झेप‬ घ्यायची असेल तर ‪‎पक्षासारखं बळ‬ हवं..
दरीत झेप‬ घ्यायची असेल तर ‪‎आकाशा एवढं धाडस‬ हवं... ‎
पाण्यात उडी‬ घ्यायची असेल तर ‪माशासारखी कला‬ हवी...
अन ‪साम्राज्य निर्माण‬ करायचे असेल तर शिवबाचचं काळीज हवं...!"

गीत संकलित

🚩किल्यांची करुणावस्था🚩

राजे तुम्ही परत जन्माला या
बघा, तुमच्या किल्यांची आवस्था.

सगळे  किल्ले  झाले  जीर्ण
किल्यावर राहिल्या  फक्त
आणि फक्त आठवणी.

किल्ले  पाहिले की राजे
तुमची आठवण येते .
किल्यांची दुरावस्था पाहून
आमचही रक्त सळसळत.

पण काय करणार  राजे
आवस्था  पाहून खुप  दुख होत.

सगळे जण तुमची जयंती पुण्यतिथी
साजरी  करतात पण..................
किल्याकडे मात्र दुर्लक्ष करतात.

तुम्ही इतक्या कष्टाने  बांधलेले किल्ले
नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

राजे,  पुढच्या पिढीने तुमचा इतिहास
कसा लक्षात ठेवायचा राजे??
कसा लक्षात ठेवायचा राजे ?????



शिवाजी महाराजांची माहिती संकलन

.छत्रपती शिवाजी राजे भोसले.
कालखंड :- 1642–1680.
पूर्ण नाव :- शिवाजी शहाजी भोसले.
कुळ :- क्षत्रियकुलावंत, कुल्वादी भूषण
जन्म :- १९ फेब्रुवारी 1630
जन्म ठिकाण :- शिवनेरी गड, पुणे, महाराष्ट्र, भारत.
मृत्यू :- ३ एप्रिल १६८०,मंगळवार.
मृत्यू ठिकाण :- रायगड.

महाराजांच्या धर्मपत्नी-
१. सई बाई (निंबाळकर)
२. सोयराबाई (मोहिते)
३. पुतळाबाई (पालकर)
४. लक्ष्मीबाई (विचारे)
५. काशीबाई (जाधव)
६. सगुणाबाई (शिर्के)
७. गुनवातीबाई (ईन्गले)
८. सकवारबाई (गायकवाड)

मुले - संभाजी, राजाराम,
मुली - सखुबाई निंबाळकर, राणूबाई जाधव, अंबिकाबाई महाडिक, दिपाबाई, राजकुंवरबाई शिर्के, कमलबाई पालकर

फितुर जन्मले ईथे
हि जरी या मातीची खंत आहे
तरी संभाजी राजे अजुन
मराठ्यांच्या छातीत जिवंत आह
मुंडके उडवले तरी चालेल
पण मान कुणापुढे वाकणार नाही l
डोळे काढले तरी चालेल
पण नजर कुणापुढे झुकणार नाही l
जीभ कापली तरी चालेल
पण प्राणाची भिक मागणार नाही l
हात कापले तरी चालेल
पण हात कुणापुढे जोडणार नाही l
पाय तोडले तरी चालेल
पण आधार कुणाचा घेणार नाही l
गर्व नाही माज आहे या मातीला
मर्द मराठा म्हणतात या जातीला l
" मरण आले तरी चालेल,
पण शरण जाणार नाही.
प्राण गेला तरी चालेल,
पण स्वधर्म धर्म सोडणार नाही. "

ll जय जिजाऊ ll
ll जय शिवराय ll

शिवाजी महाराजांचे निधन झाले
हि बातमी औरंगझेबाच्या खाजगी सचिवास
समजली. हि बातमी अत्यंत आनंदाची आहे, असे समजून
सचिव बादशहाच्या वैयक्तिय अभ्यासिकेत
सांगण्यासाठी गेला. ही बातमी ऐकून औरंगजेब
बादशहाने हातातील कुराण बंद करून
बाजूला ठेवले. तख्तावरून उठला. त्याने सचिवास
आनंद व्यक्त केल्याबद्दल
सजा दिली. व नमाजाची पोझिशन घेऊन त्याने
दोन्ही हात पसरून आभाळाकडे
अल्लाची प्रार्थना करण्यासाठी उंचावले
औरंगाजेबाने
प्रार्थना केली. तिचा मराठी अनुवाद -"हे
देवा माझे साचलेले पुण्य तुझ्या दरबारी आहे.ते
खर्ची घालून माझ्या प्रार्थनेचा स्वीकार
कर. आमच्या हिँदूस्थानातील महान
मानवतावादी व सर्वधर्म जातीतील
स्त्रियांचा रक्षणकर्ता छत्रपती शिवाजी मृत्यू
झाला आहे.कृपया त्यांच्या आगमनासाठी तुझ्या स्वर्गाची
सताड उघडी देव
संदभ-अहेकामे आलमगिरी
शत्रूंनी सुधा ज्यांचा गुणांचे पोवाडे गायले असे
एकच राजे छत्रपती शिवाजी माझे
छत्रपती शिवाजी महाराज कि जय!!
प्रत्तेकाने सदरची पोस्ट वाचून शेयर करा...हवं
असल्यास " हि आपली जबाबदारी समजा...धर्म समजा...!!"
माझ्याही शिवबांच एक राज्य होत,
जगाहून सुंदर अस ते स्वराज्य होत ll
सुख शांती समाधान नांदत जिथे,
अस ते एक बहूजन स्वराज्य होत ll
जाती धर्म पंथाचा भेदभाव नव्हता,
न्याय हा सर्वांसाठी एक समान होता ll
न्यायासाठी प्राण गेला तरी चालेल,
पण अन्याय कुणावर झाला नव्हता ll
राज्यांचा राज्य कारभार असा होता,
गवताची कडी सुद्धा गहाण नव्हती ll
स्वतःसाठी सारेच जगतात या जगी,
रयतेसाठी जगणारे शिवराय होते ll
स्वराज्यासाठी अर्पीले प्राण ज्यांनी,
अवघा महाराष्ट्र घडविला हो त्यांनी ll
कितीही गुणगान केले तरी कमीच,
असे अमुचे छत्रपती शिवराय होते ll

आपल्याला माहित असणे आवशक आहे..........की ,

आपल्या जिल्ह्यात किती किल्ले आहेत,

महाराष्ट्रातील जिल्हावार किल्ले:

अहमदनगर जिल्हा
1. अहमदनगरचाभुईकोट किल्ला
2. पेडगावचा बहादूरगड
3. रतनगड

औरंगाबाद जिल्हा
1. देवगिरी-दौलताबाद.
कुलाबा जिल्हा (रायगड जिल्हा)
1. अवचितगड
2. उंदेरी
3. कर्नाळा
4. कुलाबा
5. कोथळीगड (पेठचा किल्ला)
6. कोरलई
7. कौला किल्ला॑
8. खांदेरी
9. घोसाळगड
10. चंदेरी
11. तळेगड
12. तुंगी
13. धक
14. पेब
15. प्रबळगड
16. बिरवाडी
17. भिवगड
18. मंगळगड-कांगोरी
19. मलंगगड
20. माणिकगड
21. मानगड॑
22. रतनगड
23. रायगड
24. लिंगाणा
25. विशाळगड
26. विश्रामगड
27. सांकशी
28. सागरगड
29. सुरगड
30. सोनगिरी

कोल्हापूर जिल्हा
1. पन्हाळा
2. पावनगड
3. बावडा
4. भूधरगड
5. रांगणा
6. सामानगड

गोंदिया जिल्हा
1. गोंदियाचा प्रतापगड

चंद्रपूर जिल्हा
1. किल्ले चंद्रपूर
2. बल्लारशा

जळगाव जिल्हा
1. अंमळनेरचा किल्ला
2. कन्हेरगड
3. पारोळयाचा किल्ला
4. बहादरपूर किल्ला

ठाणे जिल्हा
1. अर्नाळा
2. अशीरगड
3. असावगड
4. अलिबाग
5. इंद्रगड
6. उंबरगांव
7. कल्याणचा किल्ला
8. कामनदुर्ग
9. काळदुर्ग
10. केळवे-माहीम
11. कोंजकिल्ला
12.गंभीरगड
13. गुमतारा
14. गोरखगड
15. जीवधन
16. टकमक
17. ठाणे किल्ला
18. डहाणू
19. तांदुळवाडी किल्ला
20. तारापूर
21. धारावी
22. दातिवरे
23. दिंडू
24. नळदुर्ग
25. पारसिक
26. बल्लाळगड
27. बळवंतगड
28. बेलापूर
29. भवनगड
30. भैरवगड
31. भोपटगड
32. मानोर
33. माहुली
34. व्ररसोवा
35. वसईचा किल्ला
36. शिरगांवचा किल्ला
37. संजान
38. सिद्धगड
39. सेगवाह

नागपूर जिल्हा
1. आमनेरचा किल्ला
2. उमरेडचा किल्ला
3. गोंड राजाचा किल्ला
4. नगरधन(रामटेक)(भुईकोट
किल्ला)
5. भिवगड
6. सिताबर्डीचा किल्ला

नाशिक जिल्हा
1. अंकाई
2. अचलगड
3. अंजनेरी
4. अलंग
5. अहिवंत
6. इंद्राई
7. कंक्राळा
8. कंचना
9. कन्हेरा
10. कर्हेगड
11. कावनई
12. कुलंग
13. कोळधेर
14. गाळणा
15. घारगड
16. चांदोर
17. जवळ्या
18. टंकाई
19. त्रिंगलवाडी
20. त्रिंबक
21. धैर
22. धोडप
23. पट्टा
24. बहुळा
25. ब्रह्मगिरी
26. भास्करगड
27. मार्किंडा
28. मुल्हेर
29. रवळ्या
30. राजधेर
31. रामसेज
32. वाघेरा
33. वितानगड
34. हर्षगड
35. हातगड

पुणे जिल्हा
1. कुवारी
2. चाकण
3.चावंड
4. जीवधन
5. तिकोना
6. तुंग
7. नारायणगड
8. पुरंदर
9. प्रचंडगड (तोरणा)
10. मल्हारगड
11. राजगड
12. राजमाची
13. विचित्रगड
14. विसापूर
15. लोहगड
16. शिवनेरी
17. सिंहगड
18. हडसर

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हे
1. अंजनवेल
2. आंबोळगड
3. आवर किल्ला
4. कनकदुर्ग
5. कुडाळचा किल्ला
6. कोट कामते
7. खारेपाटण
8. गोवळकोट
9. गोवा
10. जयगड
11. दुर्ग रत्नागिरी
12. देवगड
13. नांदोशी
14. निवती
15.पालगड
16. पूर्णगड
17. प्रचितगड
18. फत्तेगड
19. बाणकोट
20. बांदे
21. भगवंतगड
22. भरतगड
23.भवनगड
24. भैरवगड
25. मंडणगड
26.मनसंतोषगड
27. मनोहरगड
28. महादेवगड
29. महिपतगड
30. यशवंतगड
31. रसाळगड
32. राजापूरचा किल्ला
33. रायगड
34. विजयगड
35. विजयदुर्ग-घेरिय ा
36. वेताळगड
37. सर्जेकोट
38. साठवली
39. सावंतवाडीचा किल्ला
40. सिंधुदुर्ग
41. सुमारगड
42. सुवर्णदुर्ग

सांगली जिल्हा
1. तेरदाळ
2. दोदवाड
3. मंगळवेढे
4. शिरहट्टी
5. श्रीमंतगड
6. सांगली
7. येलवट्टी

सातारा जिल्हा
1. अजिंक्यतारा
2. कमालगड
3. कल्याणगड
4. केंजळगड
5. चंदन
6. जंगली जयगडतृ
7. गुणवंतगड
8. प्रचितगड
9. प्रतापगड
10. पांडवगड
11. बहिरवगड
12. भूषणगड
13. भोपाळगड
14. मकरंदगड
15. मच्छिंद्रगड
16. महिमंडणगड
17. महिमानगड
18. सज्जनगड
19. संतोषगड
20. सदाशिवगड
21. सुंदरगड
22. वर्धनगड
23. वंदनt I
24. वसंतगड
25.वारुगड
26. वैराटगड

संकलन

शिवाजी महाराजांची माहिती

.⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔

"आम्ही संपुर्ण जग फिरलो, संपुर्ण पृथ्वी आम्ही आमच्या अधिपत्याखाली आणली, पण या पृथ्वीवरील "भारत" देशावर आम्ही राज्यच कसं करू शकलो यावर आमचा विश्वास बसत नाही ! कारण या देशात *शिवाजी* जन्माला आला होता !"
           -- तत्कालिन ब्रिटिश पंतप्रधान अॅटली.

"जर *शिवाजी* हा इंग्लंडमध्ये जन्माला आला असता तर आम्ही पृथ्वीवरच काय पण परग्रहावरही राज्य केले असते !"
           -- लॉर्ड माउंटबँटन, इंग्लंड.

"भारताला जर स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेन तर एकच पर्याय आहे, *शिवाजी* प्रमाणे लढा !
                -- नेताजी सुभाषचंद्र बोस.

"नेताजी, तुमच्या देशाला स्वातंत्र्यासाठी कुठल्या 'हिटलर'ची गरज नाही, तर तुमच्याच देशात जन्माला आलेल्या *शिवाजी*च्या इतिहासाची गरज आहे !"
                   -- अॅडॉल्फ हिटलर.

"शिवाजी हे फक्त नाव नाही, तर *शिवाजी* ही आजच्या तरूण पिढीसाठी उर्जा आहे; जिचा वापर हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी होऊ शकतो !"
                 -- स्वामी विवेकानंद.

"जर *शिवाजी* आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही त्यास 'सुर्य' संबोधले असते !"
              -- बराक ओबामा, अमेरिका.

"जर *शिवाजी* महाराज अजून १० वर्षे जगले असते, तर इंग्रजांना पुर्ण हिंदुस्थानचा चेहरा सुध्दा पाहता आला नसता !"
                  -- इंग्रज गव्हर्नर.

"काबुल पासुन कंदहार पर्यंत माझ्या तैमुर खानदानाने मोघली सत्ता निर्माण केली. इराक, इराण, तुर्कस्तानच्या कित्येक नामांकित सरदारांना माझ्या तैमुर खानदानाने पाणी पाजलं ! पण हिंदुस्थानात मात्र आम्हाला *शिवाजी*ने रोखलं ! सर्व शक्ती मी शिवाजीचा पराभव करायला खर्च केली पण शिवाजी काही माझ्या हाती नाही आला ! या अल्लाह ! दुश्मन दिया भी तो कौण दिया? *सिवा भोसला* जैसा दिया. अपने जन्नत के दरवाजे खुले रखना खुदा क्योंकि दुनिया का सबसे बहादुर योध्दा और दिलदार दुश्मन तेरे पास आ रहा है !"
              -- औरंगजेब (छत्रपति शिवाजी महाराजांच्या मृत्यू नंतर नमाज पढताना काढलेले उदगार, संदर्भ- खाफिखानाची बखर)

"उस दिन *सिवा भोसला*ने सिर्फ मेरी उंगलियां नही काटी, बल्कि मेरी ताकद के घमंड को भी उतारा. मै अब निंद मे भी *सिवा भोसला* से मिलना नही चाहता !"
               -- शाहीस्तेखान, संदर्भ- खाफिखानाची बखर.

"क्या उस गद्दारे दख्खन से *सिवा* नाम का लोहा लाने के लिए एक भी मर्द नही है, इस दरबार में? लालत है ऐसी मर्दानगी पे !"
               -- बडी बेगम अलि आदिलशाह.

१७ व्या शतकात युरोप खंडात "लंडन गॅझेट" नावाचं आघाडीचं वृत्तपत्र होतं. जेव्हा महाराज आग्र्यावरून सहीसलामत सुटले, तेव्हा या वृत्तपत्राने पहिल्या पानावर जी पहिली बातमी छापली होती आणि त्यात महाराजांचा Shivaji, The King of India असा उल्लेख केला !

वरील उदाहरणावरून मी नेहमी जाणिवपुर्वक छत्रपती शिवरायांचा आंतरराष्ट्रीय किर्तीचे राजे म्हणुन उल्लेख करतो, जागतिक दर्जाचे योद्धे म्हणून शिवरायांची ओळख आहे ती यामुळेच ! महाराजांनी त्यांच्या ३० वर्षाच्या आयुष्यात ज्या ज्या सेनानींचा पराभव केला त्यामध्ये फक्त २ च भारतीय, बाकी सर्वजण हे परकिय सरदार आणि त्या त्या देशाचे नामांकित सरदार होते !

ज्या शाहीस्तेखानाची बोटे महाराजांनी लाल महालात छाटली आणि त्याच्या मनात शिवाजी या नावाचा खौफ निर्माण केला, तो शाहीस्तेखान साधासुधा मामुली सरदार नव्हता. तर तो अबू तालिबानचा नवाब होता, तुर्कस्तानचा नवाब होता ! प्रतिऔरंगजेब म्हणुन ओळखणारा हा शाहीस्तेखान औरंगजेबाचा सख्खा मामा होता. त्याने प्रचंड मोठा पराक्रम करून मोघलांना मोठा बंगाल प्रांत जिंकुन दिला होता. पण एका रात्रीत महाराजांनी लाल महालात घुसुन त्याची बोटे छाटली आणि काही कळायच्या आत पसार झाले ! परिणामी शाहीस्तेखानाने त्यानंतर शिवाजी या नावाची इतकी भिती घेतली की शिवाजीला आता मला स्वप्नात देखील भेटायचं नाही. असं त्याने औरंगजेबाला सांगितलं इतका खौफ या नवाबाच्या मनात निर्माण केला होता !

बेहलोलखान पठाण, सिकंदर पठाण, चिडरखाण पठाण इ. ज्यांना महाराजांनी रणांगणावर धुधु धुतलं, हे सर्व अफगाणिस्तानचे मातब्बर सरदार होते !

दिलेरखान पठाण, मंगोलियन सरदार, मंगोलिया देशाचा सर्वोत्तम योध्दा होता हा ! महाराजांनी याचा पराभव केला !

सिध्दी जौहर, सिध्दी सलाबत खान हे इराणी होते, इराणचे शुर सरदार होते ! महाराजांनी यांना रणांगणात पाणी पाजलं !

उंबरखिंडीत ज्याचा कोंडुन पराभव केला, तो कारतलब खान उझबेकिस्तानचा सरदार होता, म्हणजे आत्ताच्या रशियाचा ! या महाराजांच्या विजयाची नोंद साक्षात गिनिज बुकाने देखील घेतली. कमीत कमी सैन्याने जास्तीत जास्त सैन्याचा केलेला पराभव ! (१००० मावळे विरूध्द ३०,००० गनिम आणि या ३०,००० पैकी एकही जिवंत राहीला नाही. आणि १००० पैकि एक ही मावळा गमावला नाही....

"शिवछत्रपती"

कविता संकलन

शिवबा एकदा तु ये......

मानवता संपून गेली
राक्षसीवृत्ती उद्यास आली
माणुसकी जागवायला
शिवबा एकदा तु ये

आई-बहीण नाही सुटली
कोवळ्या कळीची इज्जत लुटली
नराधमाचा शिरच्छेद करायला
शिवबा एकदा तु ये...

सासरच्या जाचाला घाबरली
पोटात कळी खुडली
ममतेचे महत्त्व सांगायला
शिवबा एकदा तु ये...

"नात" बाप विसरू लागला
मुलीवर बलात्कार करू लागला
बापाचे "बापपण" सांगायला
शिवबा एकदा तु ये....

धर्मा-जातीवरुन दंगा झाला
दुष्काळाने जीव जाळला
सर्व-धर्म-सहिष्णूता सांगायला
शिवबा एकदा तु ये....
शिवबा एकदा तु ये....

         

सकारात्मक विचार

👍 सकारात्मक बना👍

   🌻 सकारात्मक दिवस हे तुमच्या आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी घडवून आणतात . मन दिवस _रात्र सकारात्मक विचारांनी भरलेलं असेल , मनात कोणाबद्दल द्वेष नसेल ,
कोणाचे वाईट व्हावं ही भावना नसेल आणि सतत परमेश्वरा बद्दल कृतज्ञता असेल तर तुमचं मन हे शुद्ध झालेलं असणार .
  अशा शुद्ध मनाने जे काय तुम्हाला हवं ते मागा .
   तुमची मागणी पूर्ण झाल्याची प्रचिती तुम्हाला येईल . पण हे मागणं सुध्दा सकारात्मक हवं .
🌻 नकारात्मक मागणीचा त्रास तुम्हालाच सोसावा लागतो . तेव्हा काय मागायचं ते आधी ठरवा . हे ठरवताना त्यात गोंधळ नको .
 स्पष्टपणे आणि नेमकं तेच मागा . 👍
तुमची इच्छा पूर्ण होईल अशी खात्री बाळगा😇
 मागून पाहा . सकारात्मक बना , नकारात्मक विचार सोडा .
सत्यमेव जयते !

कथा क्रमांक १५१

📝🍃📝🍃📝🍃📝🍃📝🍃📝

🚩 *माझी शाळा माझे उपक्रम* 🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अभ्यास कथा क्रमांक १५१
स्वतः मधील दुर्गुण
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
          *आपल्या समाजाच्या हिताविषयी* नेहमी झटणार्‍या शहाण्या हत्तीला असे वाटले की, प्राण्यांमध्ये कित्येक वाईट चाली असून त्या ताबडतोब सुधारल्या पाहिजेत. म्हणून त्याने सभा भरविली. त्या सभेत त्याने एक उपदेशपर असे मोठे भाषण केले. विशेष करून आळस, भयंकर स्वार्थ, दुष्टपणा, द्वेष, मत्सर या दुर्गुणांवर सविस्तरपणे टीका केली. श्रोत्यांपैकी बर्‍याच जणांना त्याचे भाषण शहाणपणाचे वाटले विशेषतः मनमोकळा कबुतर, विश्वासू कुत्रा, आज्ञाधारक उंट, निरुपद्रवी मेंढी व लहानशी उद्योगी मुंगी यांनी ते भाषण लक्षपूर्वक ऐकले. नेहमी कामात असलेल्या मधमाशीलादेखील ते भाषण आवडले, पण श्रोत्यांपैकी दुसर्‍या काहीजणांना फारच राग आला व त्यांना एवढे लांबलचक भाषण ऐकणे मुळीच आवडले नाही. उदा. वाघ व लांडगा यांना फार कंटाळा आला. साप आपल्या सर्व शक्तीनिशी फुसफुसू लागला व गांधील माशी व साधी माशी यांनी फार कुरकूर केली. टोळ तुच्छतेने सभेतून टुणटूण उडत निघून गेला. आळशी अजगराला राग आला व उद्धट वानराने तर तुच्छतेने वाकुल्या दाखविण्यास सुरुवात केली. हत्तीने ही गडबड पाहून आपला उपदेश खालील शब्दात संपवला, 'माझा उपदेश सर्वांना सारखाच उद्देशून आहे. पण लक्षात ठेवा की ज्यांना माझ्या बोलण्याने राग आला ते आपला अपराध कबूल करताहेत. निरुपद्रवी प्राणी मात्र माझं भाषण स्वस्थपणे ऐकताहेत.'
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎀 *तात्पर्य* : - *आपले दुर्गुण काय आहेत हे ऐकून घेणे माणसाला फारसे आवडत नाही.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
    🙏 *शब्दांकन/संकलन*🙏

जीवन विचार

 *"चंदन" पेक्षा "वंदन"*
*जास्त शीतल आहे.*

*"योगी" होण्यापेक्षा "उपयोगी"*
*होणे अधिक चांगल आहे.*

*"प्रभाव" चांगला असण्यापेक्षा*
*"स्वभाव" चांगला असणे महत्त्वाचे* *आहे.*..✍🏻

 *कुणाच्या रंग रूपावर जाऊ नका,ते धोका देऊ शकतात,*
*कुणाच्या संपत्तीवर भाळु नका,ती कमी होऊ शकते..!*

*अशा व्यक्तीचा शोध घ्या,जिच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर हास्य उमटेल,*

*कारण तेच हास्य तुमच्या कोणत्याही वाईट दिवसाला सुद्धा चांगला दिवस बनवू शकते*🎭
     

चारोळी संकलन

🚩*छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त काही चारोळ्या* 🚩
------------------------------------------------
शिवराजे तुम्ही झालात
चक्रवर्ती सम्राट
गनिमी काव्याने केलात
बलाढ्य शत्रूंचा नायनाट

धाडस अन किर्ती
साहस अन शौर्य
चित केले तुम्ही
अफजली क्रौर्य

शक्तीपेक्षा ठरली
श्रेष्ठ तुमची युक्ती
निनादो पृथ्वीवर
दिगंतर किर्ती

गगनाला भिडली
तुमची किर्ती
रयतेचा वाली
अशी तुमची ख्याती

स्वराज्यासाठी वेचिले
मावळ्यांनी प्राण
निर्मिले हिंदवी राज्य
व्यर्थ न गेले बलिदान

जिवाला जीव देणारे
तुमचे मावळे
स्वराज्यासाठी एकत्र
आले जमून सगळे

पराक्रम दाविला
शहाजीराजांच्या छाव्याने
सळो कि पळो केले
शत्रूला गनिमी काव्याने

अफाट चतुराईने
केली शत्रूंवर मात
शेकडो मावळ्यांनी केला
लाखो गनिमांचा निःपात
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

शिवाजी महाराज ( गीत संकलन)

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    *छत्रपती शिवाजी महाराज*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
 जिजाऊंचे पुत्र तुम्ही
निर्मिले स्वराज्य हिंदवी 🚩
बलाढ्य शत्रूंना चित करूनी
पताका फडकविली भगवी 🚩

स्वराज्याच्या स्थापनेची प्रतिज्ञा
केली रायरेश्वराच्या मंदिरात 🚩
'हे स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा '
आवाज घुमला असा गाभाऱ्यात

जिवाला जीव देणारे तुमचे मावळे
संकटसमयी मागे ना कधी हटले
लढले स्वराज्यासाठी गनिमी काव्याने
पराक्रमकेला शहाजीराजांच्याछाव्याने

मुरारबाजी बाजीप्रभू तानाजीमालुसरे
येसाजी शिवाकाशिद सूर्याजीसम हिरे
स्वराज्यासाठी प्राण त्यांनी वेचिले सह्याद्रीच्या कुशीतले हेच मानाचे तुरे

अफाट बुद्धी चातुर्याने
केली मात लाखो गनिमांशी
आईसम वागलात तुम्ही
पर स्री माता भगिनींशी

राज्याभिषेकाने झालात तुम्ही
सार्‍यांचे सार्वभौम राजा 👍
शोभतात तुम्हीच खरे
जनतेचा रयतेचा महाराजा 👍

नाव तुमचे घेताच फुगते
आजही  अभिमानाने छाती
युगानुयुगे घुमत राहो
तुमची निरंतर किर्ती 👍👍

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

जीवन विचार

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
〰〰〰〰〰〰〰
   *🌺जीवन विचार* 🌺
〰〰〰〰〰〰〰
सत्यनिष्ठेसाठी निर्भयतेची गरज असते आणि निर्भयतेसाठी स्वावलंबनाची गरज असते.नम्रता म्हणजे  'मी'  पणाचा आत्यंतिक क्षय. निर्भयतेने प्रगती करून घेता येते व नम्रतेने बचाव होतो.आपण स्वतःस वाचवु शकतो. नम्रतेच्या कोंदनातच अभय खुलून दिसते.आणि उदार  वृत्ती वाढीस लागते."नम्रता म्हणजे लवचिकपणा. यामध्ये जिंकण्याची कला आहे आणि शौर्याची पराकाष्ठा आहे ".

      *नम्रतेच्या उंचीला मोजमाप नाही*. 🙏 महात्मा गांधी नी म्हटलं आहे  " सत्याचा शोध घेऊ इच्छिणाऱ्याने धुळीच्या कणापेक्षाही नम्र झाले पाहिजे. नम्रता ही अहिंसेची तेजस्वी मूर्ती आहे ".

नम्र माणूस दुसऱ्याचा विचार करतो. पाणी ज्याप्रमाणे रस्त्यातला खड्डा भरून काढल्याशिवाय पुढे सरत नाही , त्याचप्रमाणे दुसऱ्याचे जीवन संपन्न केल्याशिवाय तो राहणार नाही.

म्हणूनच  कन्फ्यूशियसने म्हणले आहे  'फळांनी लहडलेल्या वृक्षांच्या शाखा ज्याप्रमाणे खाली वाकतात, त्याप्रमाणे महान लोक त्यांच्या महानतेने लीन बनतात.'

==================
🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼

कथा क्रमांक १५०

*माझी शाळा माझे उपक्रम*

*🌷🌷🌷कथा🌷🌷🌷*
*📚अभ्यास कथा भाग ११२*
〰〰〰〰〰〰〰
 *🌺 योग्य निवड*🌺
=================
*प्राचीन भारतात नागार्जुन नावाचे एक महान रसायन शास्रज्ञ होऊन गेले*.
   *त्यांना एका सहाय्यकाची आवश्यकता होती. दोन तरुण या कामासाठी त्यांच्या मुलाखतीला आले. आचार्यानी दोघात एक पदार्थ दिला. व त्यापासून एक विशिष्ट रसायन तयार करून आणायला सांगितलं*
    *या कामासाठी त्यांना तीन दिवसांचा अवधी दिला.दोघे उत्साहाने कामाला लागले. तीन दिवसांनी परत आले. आचार्यानी विचारले. कामात काही अडचणी आल्या तर नाही ना?*
      *पहिला  अभिमानाने म्हणाला, "आईला ताप होता. वडील पोटदुखीनं हैराण झाले होते. भाऊ पडल्यामुळे हाडाला मार लागला होता; पण माझी साधना मी सोडली नाही. व हे रसायन तयार करून आणलं आहे. "दुसरा म्हणाला, "आचार्य, क्षमा असावी. मी घरी जात असता वाटेत एक वृद्ध रुग्ण दिसला. निर्धन होता. बिचारा. त्याला औषधोपचार करून त्याची व्यवस्था लावण्यात वेळ गेला. त्यामुळे आपण दिलेलं काम मी पूर्ण करु शकलो नाही.कृपया आणखी दोन दिवसांची सवड द्यावी.*"
          *आचार्यांनी आपल्या सहाय्यक  म्हणून त्याचीच निवड केली.*

 *तात्पर्यः ज्ञान असून ते जर योग्य वेळेला उपयोगात नाही आणले तर त्याचा काय उपयोग. समाजविन्मुख ज्ञानाचा काय उपयोग?*
*-----------------------------------*
*📝 शब्दांकन/संकलन*

जीवन विचार

*जिंदगी के हर मोड़ पर*
                    *हमे*
         *वही करना चाहिये.....*
     *जो हमारा दिल हमसे कहे,*
                  *क्योंकि*

          *जो दिमाग कहता है*
        *वो  "मज़बूरी"  होती  है,*
   *और  जो  दिल  कहता  है  वो*
        *"मंजूरी" होती है....*

  *🌹🌹*

कविता संकलित

*सजा*

सुकून गेली आता
येथे ह्रुदयाची नाती !
प्रेमावीनाच भस्म
येथे काळजाच्या वाती !

नसते कुणी कुणाचे
असतो फक्त देखावा !
शर्ती चा खेळ स्वार्थ्यांनी
ह्रुदयाशीच का खेळावा !

उगाळून टाका ह्रुदय
द्या आहुती त्यागाची !
फुलत नाही तरीही
खोट्या मनात नाती !

ज्यांनी खरे प्रेम केले कुणावर
त्यांचीच व्हावी नित्य पुजा !
भक्तीचे ढोगं करणार्याला
कोणती द्यावी सांगा सजा !

कविता संकलित

"जमेल तसे प्रत्तेकाने ...
.....कुणावर तरी *प्रेम* करावे ...

कधी संमतीने ..कधी एकतर्फी ..
पण,दोन्हीकडे हि सेम करावे ..!!

प्रेम *सखीवर* करावे ..
*बहिणीच्या* राखीवर करावे ..!

*आईच्या* मायेवर करावे ..
*बापाच्या* छायेवर करावे ..!

प्रेम *पुत्रावर* करावे ..जमल्यास ,
दिलदार *शत्रूवर* हि करावे ..!

प्रेम *मातीवर* करावे ..
निधड्या *छातीवर* करावे ..!

*शिवबाच्या* बाण्यावर .*लताच्या* गाण्यावर
प्रेम *सचिन* च्या खेळावर आणि
 *वारकर्यांच्या* टाळाव र  हि करावे !

प्रेम पुलंच्या *पुस्तकावर* करावे ..
प्रेम *गणपतीच्या* मस्तकावर हि करावे ..!!

*महाराष्ट्राबरोबरच* *देशावर* ...आणि ,
अगदी ..न चुकता *स्वतःवर* ..जमेल तसे प्रेम
करावे .!!!!!!

जीवन विचार

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
〰〰〰〰〰〰〰
   *🌺 जीवन  विचार*🌺
〰〰〰〰〰〰〰
😊माणसानं जगाव कसं ?
माणसानं माणसातला 'माणूस' म्हणून जगावं.😊

निर्झरासारखं निर्मळ , नंदादीपासारखं सोज्वळ , 💦दवबिंदूसारखं स्वच्छ , वृक्षासारखं 🌳 परोपकारी, सूर्याच्यासारखं 🌞तेजस्वी , हिमालयासारखं उत्तुंग , सागरासारखं मर्यादाशील,  गंगेसारख निर्मळ, राजहंसासारखं विवेकशील, 🌹गुलाबासारखं प्रसन्न🌹 आणि मुंगीसारखं 🐜प्रयत्नशील !!

माणसांच्या जीवनात  ' आशा '  नावाची एक आश्चर्यकारक बेडी आहे. ज्यांच्या पायात ही बेडी असते ती माणसं सतत धावत असतात. ' आशा' हे माणसांच्या   समृद्ध जीवनाचे एक  सूञ आहे.
 सतत कणकण धान्य गोळा करणारी मुंगी आणि फुलाफूलातुन मध गोळा करणारी मधमाशी प्रयत्नवादी पुरुषांच प्रतीक आहे.

  जीवनाची वाट चालता - चालता ध्येयमंदिर गाठण्यातच आनंद आहे. हे ओळखूनच प्रिन्स विस्मार्क हा विचारवंत म्हणतो की , 'मला पुढील जन्म मुंगीचा मिळावा !
〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼
.in
💐🍀💐🍀💐🍀💐🍀

आदर्श विचार


!! *एका मुलीचे आदर्श विचार* !!

बाबा - " बाळा तुला हे स्थळ पसंत आहे ?"

मुलगी - हो बाबा छानच आहे.
नावं ठेवण्यासारखं काय आहे तिथं ?"
.
बाबा - हो, पण घर बघितलंस का, कसलं साधं आहे ? दगडमातीचं !
त्यातही नुसत्या दोनच खोल्या आहेत."
.
मुलगी - म्हणून काय झालं ?"
.
बाबा - त्यापेक्षा परवा आलेलं स्थळ काय वाईट आहे ?
एवढा मोठा बंगला, नोकर चाकर, दहावीस गाड्या !
नुसता आरामच आराम !"
.
"ते स्थळ नको."
.
"का ?"
.
मुलगी-  मी त्या मुलाशी बोललेय.
त्याचे काही प्लॅनच
नाहीत स्वतःच्या भविष्याविषयी.
तिथं गेले तर
माझ्या कर्तृत्वाला वाव मिळेलच असे नाही.
सगळं काही पूर्वजांनी करून ठेवलंय. नवीन काय करायचं
म्हटलं तर नवरा होय म्हणेल की नाही ही शंका !
त्याचं स्वतःचंच अजून काही ठरलेलं नाही..

त्याउलट आजचं स्थळ बघा ना !
सगळ्या गोष्टी अजून
प्राथमिक स्टेजला आहेत.
चांगलं घर नाही, घरात
कुठल्याही सुखसोयी नाहीत,
स्वतःला सिद्ध करण्यासाठी वावच वाव !"
.
बाबा - पण रोज सकाळी उठून म्हशीचं शेण काढावं लागेल.
धारा काढाव्या लागतील, गोबरगॅसमध्ये शेण घालावं लागेल."
.
मुलगी - मला आवडेल...
स्वतःचा संसार उभा करायचा तर
कामं ही करावी लागणारच.
यश आणि सुख हे
सहजासहजी मिळत नाही."
.
बाबा - अगं, पण सगळं सुख तुला तयार मिळेल ना,
परवाच्या स्थळाचा विचार केलास तर !"

मुलगी - तेच तर नकोय.
मी केवळ इतरांनी मिळवलेल्या
ऐश्वर्याचा उपभोग घेत राहिले तर माझं अस्तित्व कुठं राहिलं ? "
.
 बाबा - म्हणजे ?"
.
मुलगी - "मलाही श्रीमंत व्हायचं आहे पण ते स्वतः
प्रामाणिकपणे कष्ट करून आणि ही संधीही सर्वत्र मिळत नाही.
हा मुलगा चांगला आहे. निर्व्यसनी आहे. स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडणारा आहे.
लहानपणी वडील वारले ही खूप मोठी हानी झाली त्याची.
बापाचं छत्र नसतानाही तो डगमगला
नाही , भरकटला नाही. स्थिर राहिला.
एक दिवस जगात माझंही नाव करून दाखवीन म्हणाला.
सगळे माझे विचार.
एकमेकांचे विचार जुळले की संसार सुखाचाच होणार.
.
एक बैल कामसू आणि दुसरा आळशी झाला की चांगली मशागत कधीच होणार नाही.
तसंच संसाराचंही आहे.
आता त्याच्याकडे किंवा माझ्याकडे काहीच नाही.
पण दहावीस वर्षांनंतर आमच्याकडेही गाडी असेल, बंगला असेल ;
त्यावेळी आम्हांला अभिमानाने सांगता येईल की
यातली प्रत्येक काडी आणि प्रत्येक वीट आम्ही आमच्या कष्टाने
मिळवलेली आहे.
अभ्यास करून नंबर मिळवण्यात खरी
मजा असते !
नुसतं खाऊन पिऊन लोळणं याला जर कुणी सुख म्हणत असतील तर ते सुख मला नकोय .

जीवन विचार

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
〰〰〰〰〰〰〰
*🌺जीवन विचार🌺*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*'खरा तो एकची धर्म , जगाला प्रेम अर्पावे' या ओळी म्हणजे  प्रेमाचा मुकुट मस्तकावर  धारण करून या जगाला  आपल्याला 'आनंदवन'  करता येईल.*
प्रेम सेवामय असतं आणि सेवा प्रेममय असते. सेवेमुळं अर्थ प्राप्त होतो.
या प्रेमाचा कमळातूनच विश्वासाचा सुगंध पसरत असतो.माणुसकीचे दुसरे नाव प्रेम आहे.

 *'मी'* हा शब्द प्रेमात आणि भक्तीत उरत नाही.
 *' उजळावया आलो वाटा'*
अस म्हणतच सूर्य येतो.या जगात प्रेमळ प्रकाशाचा आनंद पसरतो.
  🌞 'सूर्यप्रकाश वाढू लागला की दवबिंदू 💧आपोआप नाहीसे होतात'.
  🌞 सूर्याच्या किरणांनी ज्याप्रमाणे बर्फाच्या राशी वितळतात, त्याप्रमाणे अहंकाराच्या राशी प्रेमाच्या ओलाव्याने वितळतात.

'अंधा-या वाटेवर क्षणभर विजेचा प्रकाश पडतो.वीज चमकून नाहीशी झाली की अंधार जास्त गडद होतो. मग काही काळ चालणं अवघड जातं.
चालणं,
 ठेचकाळणं,रक्तबंबाळ होणं, एकाकी पडणं,  संकटाचा दरीत कोसळणं, हे सगळं घडु दे. ते पण जीवनात महत्त्वाचे असते . नियती, प्रारब्ध हे अडथळे  मानू नकोस. ते आपल्या वाट्याला  आलेल सौभाग्य आहे.आगीतून जा.कचरा जळून जाईल.सोनं  उरेल.

*'अनुभव घेणारा प्रत्येकजण एकमेकांपेक्षा वेगळा असतो'.*

कलेचे पराक्रम, विद्येतील यश, लौकिक या सा-या गोष्टी कोंदणासारख्या आहेत. त्यात सफल झालेल्या *प्रेमाची हिरकणी* चमकत असेल तरच त्या  कोंदणाची शोभा वाढते.

म्हणून

*' माणुसकीचे दुसरे नाव प्रेम आहे.प्राणीमात्रावर  हृदयपूर्वक प्रेम करणे हीच खरी मानवता होय '.*

==================
🙏🏼 *शब्दांकन/संकलन*🙏🏼

कविता

"अडचणींशी लढताना
पाण्यासारखं व्हावं
बळ कमी पडत असेल
तर वळसा घालुन जावं

तोही मार्ग बंद झाला
तर थोडं थांबून घ्यावं
अन एके दिवशी अडचणीच्या डोक्यावरून जावं

मुठभरांची माणूसकी
जग चालवत असते
देणा-यांची दानत
ओंजळ भरत असते

अशांची कमतरता
नेहमी पडत असते
आयुष्याचीं लांबी रुंदी
कमी पडत असते

जमेल तेव्हड आपणही
ट्राय करून पहावं
पाण्यासारखं येइल त्याला ओलं करून जावं....

सकारात्मक विचार

*सकारात्मक विचारांचे सामर्थ*

*मित्रांनो आपलं संपूर्ण आयुष्य हे आपण कसा विचार करतो यावर अवलंबून आहे*

मनात दररोज (24 तासांत) 60 हजार विचार येतात. यातील 60 ते 70%  विचार हे नकारात्मक असतात. दर 15 ते 20 सेकंदाला नवीन विचार हे चक्र अव्हयातपणे चालू असतं.

*ज्यावेळेस आपण नकारात्मक विचार करतो त्यावेळेस विश्‍वात जेवढी नकारात्मक तरंग आहेत त्याच्याशी आपण जोडले जाऊन  नकारात्मक विचारांची गर्दी आपल्या भोवती उरते व उदासी - भय - यातून नैराश्याकडे वाटचाल सुरू होते*.

रेडिओ किंवा वाहिन्या ज्या ब्रँडवर आपण लावतो तेच प्रक्षेपण लगेच चालू होते. म्हणून नकारात्मक विचारांना - सकारात्मक करणे गरजेचे असते.

सकारात्मक विचार आपली शक्ती, आत्मविश्‍वास, मनोबल वाढवतात. नकारात्मक विचारांना - सकारात्मक करणे म्हणजे मनाचेच - मनाशी युध्द करणे होय. यालाच तुकाराम महाराज म्हणतात. ‘‘रात्रं दिनं आम्हां युदधाचा प्रसंग’’!

*थॉमस् अल्वा एडिसनने* 999 प्रयोग केले - हजाराव्या प्रयोगाच्या वेळेला विजेचा दिवा लागला. थॉमसला ज्यावेळेस पत्रकारांनी मुलाखतीत विचारलं. थॉमस 999 प्रमाणे फसले याबाबत तुला काय वाटले ?
थॉमस म्हणाला 999 प्रयोग फसले असे म्हणू नका. 999 वेळा मी हे सिध्द केलं, या मार्गाने विजेचा दिवा लागू शकत नाही. (सकारात्मक दृष्टीकोन)

*नेपोलियन* समुद्र किनार्‍यावर सैन्यासमोर जहाजातून उतरताना पाय चिखलावर घसरून छातीवर आडवा पडला, छाती चिखलाने माखली.  तेव्हा अंधश्रध्दाळू सैनिकांना वाटलं. आपला सेनापती आडवा झाला म्हणजे आज आपला पराभव होणार, आपली मुंडकी उडणार - सैनिक भयभत झाले. नेपोलियनने ही बाब हेरली. तो उठताना छातीत झटकत म्हणाला,  ‘मित्रांनो आजचे युध्द आपणच जिंकणार, जिथे जिथे आपण जाऊ तेथे - तेथे आपला विजय होणार’ कारण आल्या आल्या या भूमीने मला अलिंगन दिले आहे - मी तुझी आहे, मी तुझी आहे....
मित्रांनो सैनिकांचे मनोबल वाढले व सगळीकडे मोठी विजयश्री त्यांनी खेचून आणली.  हे घडलं सकारात्मक दृष्टीकोनामुळे.

टेबलावर एक ग्लास पाण्याने अर्धा भरला आहे. जर असा विचार केला की, अर्धा भरला आहे त्यामुळे मन समाधानी होतं. पण तो अर्धा रिकामा आहे म्हटलं की, नैराश्य, व्याकूळता, हताशपण येतं. सकारात्मक दृष्टीकोन मनाला प्रसन्न करून - अतिरिक्त ऊर्जा प्रदान करतो त्यामुळे कर्माला गती प्राप्त होते आणि आत्मविश्‍वास वाढतो. नकारात्मक विचार मनाला व शरीराला दुर्बल करतो. परिणामी कर्माची गती मंदावते - चुका होतात - हानी होते व यातूनच औदासिन्य (Depression) येते.

*गौतम बुध्दाजवळ* एक शिष्य धापा टाकत आला व म्हणाला भगवान ‘‘मला गावकर्‍यांनी शिवी दिली.’’ बुध्द म्हणाले ‘‘बरं झालं त्यांनी तुला मारलं नाही.’’ तो म्हणाला ‘‘भगवान नंतर त्यांनी मला मारलं सुध्दा’’  भगवान म्हणाले ‘‘या मारामुळे तुला काही जखम झाली का ?’’, शिष्य म्हणाला ‘‘भगवान माझं डोकं फुटलं आहे.’’ गौतम बुध्द म्हणाले ‘‘बरं झालं - तुझा मृत्यू झाला नाही.’’ हे ऐकून शिष्य शांतपणे बुध्दाच्या चरणाजवळ शांत बसला, बुध्दांना हेच सांगायचे होते की, *जी घटना घडली त्यापेक्षा वाईट घटना घडू शकली असती पण ती घडली नाही यामुळे समाधानी रहा*.

मी अस्वस्थ आहे, पण लोकं माझ्यापेक्षा जास्त अस्वस्थ आहेत असा विचार मनाची तात्कालीक अस्वस्थता बर्‍याच प्रमाणात नियंत्रीत करतो.

माजी राष्ट्रपती *अब्दुल कलामांना* नौदलात भरती होता न आल्यामुळे पुढे ते शास्त्रज्ञ व देशाचे राष्ट्रपती झाले.काही वेळा अपयश हे महान यशाचे पण सूचक असते.
म्हणून सकारात्मक विचार करा व आनंदी रहा.

*कोण म्हणतं जीवनात प्रत्येक वेळी काटेरी डंखच आहेत*
*डोळे उघडून बघा-प्रत्येकाला उडण्यासाठी-फुलपाखरासारखे पंख आहेत*😊😊🌹🌹🌹

जीवन विचार

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
〰〰〰〰〰〰〰
*🌺जीवन विचार🌺*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*'खरा तो एकची धर्म , जगाला प्रेम अर्पावे' या ओळी म्हणजे  प्रेमाचा मुकुट मस्तकावर  धारण करून या जगाला  आपल्याला 'आनंदवन'  करता येईल.*
प्रेम सेवामय असतं आणि सेवा प्रेममय असते. सेवेमुळं अर्थ प्राप्त होतो.
या प्रेमाचा कमळातूनच विश्वासाचा सुगंध पसरत असतो.माणुसकीचे दुसरे नाव प्रेम आहे.

 *'मी'* हा शब्द प्रेमात आणि भक्तीत उरत नाही.
 *' उजळावया आलो वाटा'*
अस म्हणतच सूर्य येतो.या जगात प्रेमळ प्रकाशाचा आनंद पसरतो.
  🌞 'सूर्यप्रकाश वाढू लागला की दवबिंदू 💧आपोआप नाहीसे होतात'.
  🌞 सूर्याच्या किरणांनी ज्याप्रमाणे बर्फाच्या राशी वितळतात, त्याप्रमाणे अहंकाराच्या राशी प्रेमाच्या ओलाव्याने वितळतात.

'अंधा-या वाटेवर क्षणभर विजेचा प्रकाश पडतो.वीज चमकून नाहीशी झाली की अंधार जास्त गडद होतो. मग काही काळ चालणं अवघड जातं.
चालणं,
 ठेचकाळणं,रक्तबंबाळ होणं, एकाकी पडणं,  संकटाचा दरीत कोसळणं, हे सगळं घडु दे. ते पण जीवनात महत्त्वाचे असते . नियती, प्रारब्ध हे अडथळे  मानू नकोस. ते आपल्या वाट्याला  आलेल सौभाग्य आहे.आगीतून जा.कचरा जळून जाईल.सोनं  उरेल.

*'अनुभव घेणारा प्रत्येकजण एकमेकांपेक्षा वेगळा असतो'.*

कलेचे पराक्रम, विद्येतील यश, लौकिक या सा-या गोष्टी कोंदणासारख्या आहेत. त्यात सफल झालेल्या *प्रेमाची हिरकणी* चमकत असेल तरच त्या  कोंदणाची शोभा वाढते.

म्हणून

*' माणुसकीचे दुसरे नाव प्रेम आहे.प्राणीमात्रावर  हृदयपूर्वक प्रेम करणे हीच खरी मानवता होय '.*

==================
🙏🏼 *शब्दांकन/संकलन*🙏🏼

जीवन विचार


*डोंगरावर चढणारा झुकूनच चालतो....*

पण जेव्हा तो उतरू लागतो तेव्हा ताठपणे उतरतो....
*हा निसर्गाचा नियम आहे....*

कोणी झुकत असेल तर समजावे की तो उंचावर जात आहे

आणि
*कोणी ताठ वागत असेल तर समजावे की तो खाली चालला आहे....*
      

जीवन विचार

🍀✍🍀✍🍀✍🍀✍🍀

*कधी कधी कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यावेत;*
*बरोबर ठरला तर खूप काही जिंकल्याचा आनंद मिळतो*

*आणि चुकला तर अनुभव मिळतो..*

*शिक्षण, डिग्री, पैसा यावरून माणूस कधीच श्रेष्ठ किंवा मोठा होत नसतो...*

*कष्ट, अनुभव व माणुसकी हिच माणसाचं श्रेष्ठत्व ठरवते...*              🌹🌹

जीवन विचार

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

🌹🌺 *जीवन विचार* 🌹🌺
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*शरदाचं चांदणं, वसंताचा बहर, श्रावणाची पालवी या सर्वांहून अधिक मनमोहक आकर्षक कोण?, असा प्रश्न विचारला असता... मैत्री हेच शब्द कानावर पडतील."*

*मैत्री म्हणजे एक रोपटं असतं जे जमिनीत पूर्णपणे रुजलेलं असतं वर दिसतं त्याच्या दुप्पट ते जमिनीत असतं ज्याचा गाभा शोधणं केवळ अशक्य असतं. जसा पाण्याचा रंग कोणता याचं उत्तर देता येत नाही, तसंच मैत्रीचं आहे. ती कशी असते, कधी होते कोणासोबत आणि का होते? हे कोणालाच कधीही कळत नाही. मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असतो  थेट.*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖
        *🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
 *🙏🏼शब्दांकन/संकलन🙏*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
http://www.pramilasenkude.blogspot.in

जीवन विचार

जिवाला स्पर्श करणारा सुविचार ...

"वेळ , तब्बेत आणि नाती ह्या अशा तीन गोष्टी आहेत की,त्यांना किंमतीचे लेबल नसते...
"पण"ह्या हरवल्या की समजते, त्यांची किंमत किती मोठी असते"    

"स्पष्ट बोला पण असे बोला कि समोरच्याला कष्ट होणार नाही अन् त्याचे आणि तुमचे नाते नष्ट होणार नाही..._*

         *जीवनाचे दोन नियम आहेत, बहरा फुलांसारखे आणि पसरा सुंगधासारखे,, 🌹
कुणाला प्रेम देणं, सर्वात मोठी भेट असते, 🌷
आणि कुणाकडून प्रेम मिळविणे, सर्वात मोठा सन्मान
असतो.....😊