कथा क्रमांक १३६

*माझी शाळा माझे उपक्रम*

*🌷🌷🌷कथा🌷🌷🌷*
*📚अभ्यास कथा भाग १३६.*
*🌺सहकार्याची भावना🌺*
〰〰〰〰〰〰〰
एका गावात _एक पोस्टमन_ पत्रवाटप करायचा. एके दिवशी एका घरासमोर उभा राहून त्याने आवाज दिला, *"पोस्टमन ssssss"*
आतून एका मुलीचा आवाज आला,. *"जरा थांबा, मी येतेय.."*
दोन मिनिटे झाली, पाच मिनिटे झाली. दार काही उघडेना. शेवटी पोस्टमन वैतागला. आणि जोरात म्हणाला, *"कुणी आहे का घरात ? पत्र द्यायचे आहे.."*
आतून मुलीचा आवाज आला, *"काका, दाराच्या खालच्या फटीतून पत्र सरकवा,मी नंतर घेते.."*
पोस्टमन, *"तसे चालणार नाही, रजिस्टर पत्र आहे. सही लागेल."*
पाच मिनिटे पुन्हा शांतता. आता पोस्टमन रागावून पुन्हा आवाज देणार इतक्यात दार उघडले. _दारातली मुलगी पाहून पोस्टमन शॉक्ड !! दोन्ही पायाने अपंग असलेली एक तरुण मुलगी दारात उभी होती._ काठीच्या आधाराने चालत यायचे असल्याने तिला वेळ लागला होता. हे सगळे पाहून तो पोस्टमन वरमला. पत्र देऊन, सही घेऊन तो निघून गेला.

असेच अधून मधून तिची पत्र यायची, आता मात्र पोस्टमन न चिडता तिची वाट पाहत दारासमोर उभा राहत असे. असेच दिवस जात होते. दिवाळी जवळ आलेली.. तेव्हा एकदा मुलीने पाहिले की आज _पोस्टमन अनवाणी पायानेच आलाय._ ती काही बोलली नाही. मात्र पोस्टमन गेल्यावर _दाराजवळच्या मातीत पोस्टमनच्या पावलाचे ठसे उमटले होते, त्यावर कागद ठेवून तिने ते माप घेतले._ नंतर काठी टेकत टेकत तिने गावातील चांभाराकडे तो कागद देऊन _एक सुंदर चप्पल_ जोड खरेदी केली.

रिवाजाप्रमाणे पोस्टमनने गावात इतरांकडे _"दिवाळी पोस्त" (म्हणजे बक्षिशी)_ मागण्याची सुरुवात केली. अनेकांनी त्याला बक्षिशी दिली. असे करता करता तो त्या मुलीच्या घराजवळ आला. हिच्याकडे काय बक्षिशी मागणार ? _बिचारीवर आधीच अपंगत्वाचे दुःख आहे._ पण आलोच आहोत तर सहज भेटून जाऊ, असा विचार करून त्याने तिला आवाज दिला. मुलीने दार उघडले. तिच्या हातात सुंदर पॅकिंगचा बॉक्स होता. तो तिने त्याला दिला आणि सांगितले, ही माझ्याकडून बक्षिशी आहे. पण घरी जाऊन बॉक्स उघडा"
घरी येऊन त्याने बॉक्स उघडला. त्यात सुंदर चप्पला, त्याही त्याच्या मापाच्या पाहून _त्याचे डोळ्यातून पाणी वाहू लागले._

दुसऱ्या दिवशी पोस्टमन नवीन चप्पल घालून त्याच्या ऑफिसात साहेबांकडे गेला. आणि म्हणाला, *" मला फंडातून  कर्ज हवे आहे"*
साहेब म्हणाला,  *"अरे आधीच तुझ्यावर कर्ज आहे. पुन्हा आता कशाला ?*
पोस्टमन म्हणाला, *"मला जयपूर फूट (लाकडी पाय) घ्यायचे आहेत. त्यासाठी हवे आहेत."*
साहेब : *"पण तुझा मुलगा तर धडधाकट आहे. जयपूर फूट कुणासाठी?*
पोस्टमन : *"साहेब, जे माझ्या धडधाकट मुलाला उमजले नाही, ते एका परक्या अपंग मुलीला उमजले आहे. माझे "अनवाणी" दुःख तिने कमी केले आहे. तिच्यासाठी मी किमान कर्जाने ना का होईना पण पाय घेऊन देऊ शकतो. म्हणून कर्ज हवे आहे."*

_साहेबासह सर्व स्टाफ निशब्द !! सारेच गहिवरलेले!!_
                                              *तात्पर्यः*
 *_नाती ही केवळ रक्ताची असून भागत नाही..!         तर नात्याची भावना रक्तात असावी लागते.                   ती ज्याच्या अंगी, (मग भले ही तो कुटुंबातला नसला तरी) तो आपला नातेवाईक मानायला हरकत नाही !_*
*-----------------------------------*
*📝 शब्दांकन/संकलन*

कथा क्रमांक १३४

एक माणूस परीस ( पारस ) शोधायला निघाला.... त्यासाठी रस्त्यात जो दगड
येईल तो घ्यायचा, गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा असा त्याचा
दिनक्रम सुरू झाला दिवस गेले... महिने लोटले... वर्षे सरली.... पण
त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही ....दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि मग
तो फेकून द्यायचा....
शेवटी तो माणूस म्हातारा झाला.... आणि ज्या क्षणि
तो आपले शेवटचे श्वास मोजत होता त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्या
गळ्यातील साखळीकडे गेले...
ती साखळी सोन्याची झाली होती.....
दगड
घ्यायचा, साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा या नादात त्याचे साखळीकडे
लक्षच गेले नाही....
तात्पर्य:
प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी
परीस येत असतो...कधी आई- वडिलांच्या रूपाने, तर कधी भाऊ-बहीनीच्या
नात्याने...तर कधी मित्राच्या मैत्रिणीच्या नात्याने .....तर कधी मार्गदर्शकाच्या नात्याने..... कोणत्या ना कोणत्या रूपात तो आपल्याला भेटत
असतो... आणि आपल्यातल्या
लोखंडाचे सोने करीत असतो...... आपण जे काही
असतो किवा बनतो त्यात त्यांचा बराच हातभार असतो .......
पण फार कमी
लोक या परीसाला ओळखू शकतात .......

कथा क्रमांक १३४

*बोधकथा*

एका गावात एक शेतकरी देवावर खूप नाराज झाला.

नाराजीचे कारणही तसेच होते कारण कधी पाऊस जास्‍त पडत असे तर कधी पूर्ण दुष्‍काळ, कधी ऊन जास्‍त तर कधी ढगाळ वातावरण, कधी गारा पडून पीकाचे नुकसान होई तर कधी वा-याने उभे पीक आडवे होत असे.

एक दिवस वैतागून त्‍याने देवाला साद घातली व देवास सांगितले,''तुम्‍ही सर्वव्‍यापी प्रभू परमेश्‍वर असाल इतर सर्व गोष्‍टीतले तुम्‍हाला कळत असेल पण माझ्यामते तरी तुम्‍हाला शेतीतले काहीच कळत नाही. एक प्रार्थना तुम्‍हाला मी करतो तुम्‍ही फक्त एक वर्षभर निसर्ग माझ्या ताब्‍यात द्या मग बघा शेती कशी फुलते ते. घरोघरी मी धान्‍यांच्‍या राशी घालतो ते पहाच तुम्‍ही.''

देव हसला आणि म्‍हणाला,''तथास्‍तू, तुझ्या म्‍हणण्‍याप्रमाणे आज,आतापासून मी निसर्गाचा लहरीपणा बंद करून तो तुझ्या ताब्‍यात मी देत आहे. तू तुला जसा पाहिजे तसा ऋतु बनवून घे व शेती कर'' इतके बोलून देव निघून गेला.

शेतक-याने या वरदानाचा फायदा घेण्‍यासाठी गहू पेरले, जेव्‍हा त्‍याला जेवढे ऊन पाहिजे होते तेव्‍हा त्‍याने ऊन पाडले, जेव्‍हा त्‍याला पाणी द्यायचे होते तेव्‍हा त्‍याने पावसाचा वर्षाव केला.

प्रचंड ऊन, गारा,पूर, सोसाट्याचा वारा याचा स्‍पर्शही कधी त्‍याने आपल्‍या पीकांना होऊ दिला नाही.

काळ निघून गेला आणि त्‍याची शेती बहरून आली. शेतक-याला मोठा आनंद झाला. कधी नव्‍हे इतके पीक आले होते. शेतक-याने मनातल्‍या मनात विचार केला की आता देवाला कळेल की शेती कशी केली जाते, उगाचच तो शेतक-यांना कसा त्रास होईल ते वरून पाहत असतो.

पीक कापणीस आले आणि शेतकरी मोठ्या आनंदाने, गर्वात पीक कापणीसाठी शेतात गेला.

 पीकाला हात लावून पाहिला आणि तो बेशुद्ध होऊनच खाली पडला. कारण गव्‍हाच्‍या त्‍या लोंब्यांमध्‍ये एकही दाणा नव्‍हताच मुळी. पीक नुसते आलेले दिसत होते पण एकही गव्‍हाचा दाणा त्‍यात नव्‍हता.

थोड्यावेळाने तो शुद्धीवर आला आणि धाय मोकलून रडू लागला. त्‍याचे काळीज पिळवटणारे रूदन ऐकून परमात्‍मा परमेश्वर तेथे प्रकट झाला आणि म्‍हणाला,

'' अरे वेड्या तुला काय वाटले, तू तुझ्या इच्‍छेप्रमाणे जसा पाहिजे तसा वागला म्‍हणून पीक तसे येत नसते.

 त्‍या पिकाला तू कधीच संघर्ष करू दिला नाही. सोसाट्याच्‍या वा-यातच पिक उभे राहते तेव्‍हाच त्‍याच्‍यात बळ येते. प्रचंड उन्‍हातही त्‍याच्‍यात जगण्‍याची इच्‍छा बळावते. संकटाशी जोपर्यंत सामना करत नाही तोपर्यंत त्‍याला त्‍याची कुवत कळत नाही.

 सगळे जर मनाप्रमाणे घडले तर कोणत्‍याच गोष्‍टीची किंमत राहत नाही.

आव्‍हान मिळाले नाही म्‍हणून तुझ्या पीकात दाणे भरलेच नाहीत. वारा सुटतो, गारा पडतात तेव्‍हाच त्‍या पिकात जगण्‍याची उमेद निर्माण होते आणि ते संघर्ष करून नवीन जीवन निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न करते.

तू हे कधीच होऊ दिले नाही म्‍हणून तुझे पीक हे पोकळ निघाले.

सोन्याला सुद्धा चकाकी येण्‍यासाठी आधी आगीतून जावे लागते तेव्‍हाच ते चकाकते.

हातोडीचे मार सोसावे लागतात तेव्‍हाच सोन्‍याचा उत्‍कृष्‍ट दागिना बनतो.''

आता शेतक-याला जीवनाचे सार उमगले होते.

*तात्पर्य:-*

जीवनात जर संघर्षच नसेल तर, आव्‍हाने नसतील तर मनुष्‍य अगदी खिळखिळा बनून राहतो. त्‍याच्‍यात कोणतेच गुण येऊ शकत नाहीत. संकटेच माणसाला तलवार किंवा ढाल बनण्‍याची प्रेरणा देतात. कधी तलवार बनून वार करायचा आणि कधी ढाल बनून सामोरे जायचे हे संकटाकडूनच माणूस शिकतो. जीवनात जर कधी यशस्‍वी व्‍हायचे असेल तर संकटांपासून कधीच पळून चालणार नाही. संघर्ष केल्‍यानेच संकटे दूर होतात त्‍याच्‍यापासून दूर पळून नाही.
🙏🙏🙏 〰〰〰〰〰〰〰〰〰

जीवन विचार

🕴हारण्याची पर्वा कधी केली नाही,
जिंकन्याचा मोह ही केला नाही,
नशिबात असेल ते मिळेलच

पण प्रयत्न करने मी सोडणार नाही..
 हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
पण, एकच गोष्ट

अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की,
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू
शकत नाही..
  आणि ती असते..
      *"आपलं आयुष्य"..*
          *म्हणूनच..*
    *....मनसोक्त जगा..*
     

जीवन विचार

🔰🌸🔰🌸🔰🌸🔰🌸
*🌷🌷 जीवन विचार*🌷🌷
〰〰〰〰〰〰〰
*〰〰〰〰〰〰〰〰*
 *माणूस वाईट नसतो*,
*माणसावर येणारी परिस्थिती वाईट असते*.
        *चांगल्या कर्माने ती बदलता येते*.
   *वाईट परिस्थितीत साथ देणारी माणसं*
            *नात्याची असोत वा नसोत*,
    *तीच खरी "आपली " माणसं असतात*.

    *मनुष्य लहान आहे ; पण त्याच्याजवळ असणारी माणुसकी मोठी आहे.माणुसकी म्हणजे प्रेम,  माणुसकी म्हणजे जाणीव,-*
       *_माणुसकी म्हणजे माणसाने_*
          *_माणसाची केलेली कदर,_*
*_समोरच्या व्यक्तीचा केलेला आदर,_*
   *_माणूसकी म्हणजे निस्वार्थपणे_*
     *_माणसातील माणुस ओळखून पुढे_*
         *_केलेला मदतीचा हात._*
 *"मनुष्य निसर्गाचा अनुचर आणि नियतीचा दास आहे".*        
〰〰〰〰〰〰〰〰
🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸

कथा क्रमांक १३५

🌹🌹 बोधकथा 👌👌👌
   एका बेडकाला कोमट पाण्यात ठेवण्यात आले. अपेक्षा होती की बेडूक टुणकन उडी मारून बाहेर येईल.

 पण तसे काही झाले नाही. मग हळू हळू ते पाणी गरम करण्यात येऊ लागले.

 जसजसे पाण्याचे तापमान वाढू लागले, आतातरी बेडूक टुणकन उडी मारून बाहेर येईल असे वाटू लागले. पण तसे काही घडेना.

शेवटी पाणी उकळू लागले तरी पण बेडूक बाहेर येईना. शेवटी त्या बेडकाला जेव्हा उकळत्या पाण्यातून बाहेर काढले तेव्हा तो बेडूक मेलेला आढळला.

तुम्हाला वाटेल की बेडूक उकळत्या पाण्यामूळे भाजून मेला.

पण तसे नव्हते.

पाण्याच्या तापमानाप्रमाणे आपल्या शरीराचे तापमान ऍडजेस्ट करायची एक खास देणगी बेडकाला मिळाली आहे.

कारण बेडूक ज्या पाण्यात रहातो त्याचे तापमान नेहमीच कमी जास्त होत असते. बेडकाला कोमट पाण्यात टाकल्यावर बेडकाने आपल्या शरीराचे तापमान पाण्याच्या तापमानाप्रमाणे ऍडजेस्ट करायला सुरवात केली.

 पुढे जस जसे पाण्याचे तापमान वाढू लागले बेडकाने तोच प्रयोग चालु ठेवला. पण यामध्ये बेडकाची बरीच ताकद खर्च झाली.

 ज्यावेळी पाणी उकळू लागले व बेडकावर टुणकन उडी मारून पाण्याबाहेर पडण्याची वेळ आली तेव्हा उडी मारायला बेडकाकडे ताकदच शिल्लक राहीली नाही.

त्यामूळे बेडकावर मरण ओढवले. जर ज्या वेळी ताकद होती त्यावेळी बेडूक उडी मारून बाहेर पडला असता तर नक्कीच वाचला असता.

आपले पण असेच असते. आपण अनेकवेळा संकटे, अडथळे, अडचणी, दुःख, उदासीनता, स्वप्नभंग, निराशा यामूळे वेढले गेलेलो असतो. तसेच आपल्याला पुष्कळवेळा आपल्याला कमी लेखणारी, आपला अपमान करणारी, आपले शारिरीक, मानसीक, भावनीक व आर्थिक शोषण करणारी माणसे भेटत असतात.

अशा परिस्थितीला व माणसांना तोंड देण्यासाठी देवाने आपल्याला एक आगळी वेगळी शक्ती बहाल केली आहे. ती म्हणजे सोशीकता, सहन करण्याची ताकद किंवा सहिष्णुता. आपण नेहमीच आलेल्या परिस्थितीला ऍडजेस्ट व्हायचा प्रयत्न करत असतो.

 उगीच कशाला वाकड्यात शिरायचे म्हणून आपल्याला जी वेडी वाकडी माणसे भेटत असतात त्यांच्याशी पण आपण ऍडजेस्ट करायचा प्रयत्न करत असतो.

खरे म्हणजे यातून लवकर सुटका कशी करून घेता येईल याचे मार्ग आपल्याला दिसत असतात व समजत पण असतात. पण सहिष्णुतेच्या नावाखाली आपण याकडे दुर्लक्ष करत असतो.

 पण यामध्ये आपली बरीच ताकद खर्च होत असते हे आपल्याला कळत नसते. पण जेव्हा डोक्यावरून पाणी वाहू लागते व यातून आपली सुटका करून घेण्याची वेळ येते तेव्हा सुटका करून घेण्यासाठी लागणारी ‘एनर्जी’ च आपल्याकडे शिल्लक रहात नाही.

 आपण मग त्यात कायमचे अडकून पडतो व दैवाला दोष देण्यापलीकडे फारसे काही करू शकत नाही.
सहनशिलता किंवा सहिष्णुता हा चांगला गुण आहे पण त्याचा अतीरेक झाला तर तो दुर्गुणच ठरतो.

 गुणांचे सद्गुण व दर्गुण असे दोन प्रकार आहेत. पण अनेक वेळा दुर्गुण हे सद्गुण ठरत असतात तर सद्गुण हे दुर्गुण ठरत असतात.

तुम्ही कोणालाही तुमचे शारिरीक, मानसीक, भावनीक व आर्थिक शोषण करू देऊ नका.

पाणी गरम होत असताना जोपर्यंत आपल्याकडे उडी मारून बाहेर पडण्याची ताकद आहे तोपर्यंत उडी मारून बाहेर पडणे शहाणपणाचे ठरते.

💥तात्पर्य:- तुमच्याकडे असलेल्या सहनशीलतेचा किंवा सहिष्णुतेचा उपयोग कसा करायचा हे तुमचे तुम्हीच ठरवायचे...

जीवन विचार


*माझी शाळा माझे उपक्रम*

 🌺 *जीवन विचार* 🌺
➖➖➖➖➖➖➖➖
*आपल जीवन अनेकदा युध्दक्षेञ बनत असतं.त्यावेळी मनात मोठा संघर्ष चालू असतो.मनात विसंवादाच वादळ सुरू असतं तेव्हा आपल्या मनात सुसंवाद स्थापन करण्याचा प्रवृत्तीस विवेक असं म्हणावं !*

*विवेक आपल्या मनाचं सुकाणू आहे तर विचार आपल्या मनाचं शीड आहे.सुकाणू आणि शीड नीट जागेवर राहून काम करत असतील तर समुद्रात इकडं - तिकडं सुरक्षितपणे फिरता येईल नाहीतर क्षणार्धात जलसमाधी मिळेल.विवेक ही मर्यादशील शक्ती आहे.समुद्राला मर्यादा असते.*

      *मर्यादा ही मनाच्या कुंपणासारखी असते. संयमाचा लगाम हाती असल्यानंतर जीवन अश्व इकडं - तिकडं कसा उधळेल?*
*ज्याप्रमाणे फळावरुन झाडाला ओळखतात, सोन्याला कस लावून सोन्याची पारख करतात, आवाजावरुन घंटेची किंमत ठरवातात; त्याप्रमाणे मनुष्याच्या मनुष्यत्वाची पारख त्याच्या विवेकावरुन करतात.*
〰〰〰〰〰〰〰〰


http://www.pramilasenkude.blogspot.in

जीवन विचार

*ज्या पायरीचा सहारा घेऊन आपण पुढची पायरी गाठली आहे,त्या पायरीला कधीच विसरू नये.कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर आपण पुढची  पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो...!*  
        
            *या जगात सर्वात...*
           *मोठी संपत्ती "बुध्दी"*
      *सर्वात चांगल हत्यार "धैर्य"*

      *सर्वात चांगली सुरक्षा "विश्वास"*
      *सर्वात चांगले औषध "हसू"*      
        *आणि आश्चर्य म्हणजे हे*

         *"सर्व विनामुल्य आहे".*
🌼🌸🌷🌼🌸🌷🌼🌸
      *।। नेहमी आनंदी रहा।।*

जीवन विचार

*ऊजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते,*
       *झोपुन स्वप्न पाहत रहा....*
       *किंवा ऊठुन स्वप्नाचा पाठलाग करा.....*
       *पर्याय आपणच निवडायचा असतो....*

       *पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो.,*    
       *त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडते..*
 
 *नशीबापेक्षा...*
  *...कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा...*
        *...कारण उद्या येणारी वेळ...*
      *...आपल्या नशीबामुळे नाही...*
          *...तर कर्तृत्वामुळे येते...*

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

आरोग्य म्हणी संकलित

*आरोग्य म्हणी*

१. खाल दर रोज गाजर-मुळे, तर होतील सुंदर तुमचे डोळे.

२. सकाळी नाश्ता करावा मस्त,
मोड आलेले धान्य करावे फस्त.

३. डाळी भाजीचे करावे सूप,
अखंड राहील सुंदर रूप.

४. तराट्याच्या भाजीला म्हणू नका स्वस्त,
आरोग्य तुमचे ती राखेल मस्त.

५. जवळ करा लिंबू संत्री,
दूर होईल पोटातील वाजंत्री

६. पपई लागते गोड गोड,
पचनशक्तीला नाही तोड.

७.पालेभाज्या घ्या मुखी;
आरोग्य ठेवा सदा सुखी.

८. भेसळयुक्त अन्न खाऊ नका;
आरोग्य धोक्यात आणू नका.

९. भो रोज एक फळ खावू या;
आरोगयाचे संवर्धन करु या.

१०. भोजनोत्तर फळांचा ग्रास;
थांबवेल आरोग्याचा ह्रास.

११. प्रथिने, जीवनसत्वे आणि क्षार;
आहारात  यांचे  महत्व फार.

१२. हिरवा भाजीपाला खावा रोज;
राहील निरोगी आरोग्याची मौज.

१३. जेवणा नंतर केळी खा;
णपाचनशक्तीला वाव द्या.

१४. साखर व तूप यांचे अति सेवन करु नका,
मधुमेह व लठ्ठपणाला आमंत्रण देऊ नका.

१५. खावी रोज रसरशीत फळे;
सौंदर्यवृद्धीसाठी नको प्रसाधन आगळे.

१६. गालावर खेळते सदा हास्य,
फळे व भाज्यांचे आहे ते रहस्य.

१७. पपई, गाजर खाऊ स्वस्त,
डोळ्यांचे आरोग्य ठेवू मस्त.

१८. सुखा मेवा ज्यांचे घरी,
प्रथिने तेथे वास करी.

१९. भाज्या जास्त वेळ शिजवू नका,
जीवनसत्वांचा नाश करु नका.

२०. जो घईल सकस आहार,
दूर पळतील सारे आजार.

२१. भाजीपाल्याचं एकच महत्व,
स्वस्तात मिळेल भरपूर सत्व.

२२. शेंगामध्ये शेंग, शेवग्याची शेंग,
तिचा पाला तिच अंग, सत्व आहे तिच्या संग.

२३. कळणा कोंडा खावी नाचणी,
मजबूत हाडे कांबी वाणी.

🌿🌱🍏🍎🍐🍊🍋🍌🍉🍇🍓🍈🍒🍑🍍🍅🍆🌶🌽🌿

प्रजासत्ताक दिन

२६ जानेवारी
==================
२६ जानेवारी पासून भारतात संविधान लागू करण्यात आले. भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २ वर्षे ११ महिने १७ दिवस सतत सखोल अभ्यास करून भारतीय संविधानाची लिहले. संविधान लिहितांना डॉ . बाबासाहेबांनी आपल्या स्वतःच्या तब्येतीची सुद्धा काळजी केली नाही.
डॉ.बाबासाहेबांनी जगातील सर्व प्रगत राष्ट्रांच्या घटनांचा अभ्यास करून भारताची राज्यघटना बनविली . त्या घटनेप्रमाणे २६ जानेवारी १९५० ला भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनले. स्वातंत्र्य ,समता व बंधुता या त्रयींवर आधारलेले लोकशाही राज्य म्हणून भारत हे राष्ट्र जगाच्या पाठीवर उभे राहिले .

सर्व देशातील लोकांचा समान दर्जा असला पाहिजे आणि स्वतः ची सर्वांगीण प्रगती घडवून आणण्यासाठी त्यांना समान संधी मिळाली पाहिजे , यासाठी बाबासाहेबांनी कलमे तयार केली . अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा व्हावा ,म्हणून घटनेत एक कलम घालणे त्यांनी सभासदांना पटवून दिले. मागासलेल्या वर्गांना , विशेषतः अस्पृश्य व वन्य जाती यांना व स्रियांना घटनात्मक हक्क मिळणे हे जरूरी आहे आणि त्याबद्दलची देखील कलमे त्यांनी लिहून काढली .हजारो वर्षे दलित जातींचे शेकडो जीवनमरणांचे प्रश्न जे होते त्यांना देशाच्या राज्यघटनेत स्थान मिळवून देण्याचे अजरामर कार्य बाबासाहेबांनी केले.

भारताची राज्यघटना इतर देशातील राज्यघटनेपेक्षा आकाराने मोठी असूनही फार कमी काळात ती तयार करण्यात आली आहे.
१) अमेरिकेच्या घटनेला( ४ ) महिने लागले .
२) कॅनडा च्या घटनेला( २ ) वर्षे ५ महिने लागले .
३ ) ओस्ट्रेलियेच्याघटनेला (९ )वर्षे लागले .
४ ) दक्षिण आफ्रिकेच्या घटनेला (१ )वर्ष लागले.

भारताची राज्यघटना २ वर्षे ११ महिने १७ दिवसात लिहिल्या गेली .तिच्यामध्ये ३९५ कलमे ,७ परिशिष्टे आहेत त्याचप्रमाणे घटनेच्या कामकाजासाठी ११ सत्रे झाली. १४१ बैठका झाल्या . ७६३५ दुरुस्त्या सुचविल्या . त्यापैकी २४७६ मंजूर केल्या गेल्या . ११४ दिवस घटनेवर चर्चा चालली . १६५ दिवस कामकाज चालले . त्यासाठी ६३ लाख ९६ हजार ७२९ रुपये इतका खर्च झाला. घटनेचे प्रथम प्रकाशन १९५२ साली झाले. तिच्या १००० प्रती छापण्यात आल्या होत्या . मुळ प्रती इंग्रजीत आहेत इतर १४ भाषेत त्यांचे भाषांतर केले आहे .त्यावर ४४२ सदस्यांच्या सह्या असून ३१ व्या क्रमांकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भीमराव आंबेडकर अशी मराठी सही आहे.

२६ जानेवारी १९५० पासून भारत देश प्रजासत्ताक झाला. म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील प्रत्येक नागरिकाला एका मताचा अधिकार दिला. आणि मताच्या आधारेच " प्रजेची सत्ता निर्माण केली." स्वतंत्र पूर्वी भारतात "राजा" हा राणीच्या पोटातून जन्म घेत असे. परंतु प्रजासत्ताक दिनापासून गणराज्य हे मताच्या पेटीतून जन्म घेते...
एवढे मोठे परिवर्तन भारतरत्न, विश्वविभूषण , भारतीय संविधानाचे शिल्पकार, समस्त भारताचे उद्धारक थोर महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी घडवून आणले .

२६ जानेवारी संविधान दिन चिरायू होवो.
collected.......

कथा क्रमांक १३२

अभ्यास कथा भाग १३२
  माणुसकी
एका बर्फाच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीची ही गोष्ट आहे.

कामाचा वेळ संपत आला होता सगळे घरी जाण्यासाठी तयार होते.
तेवढ्यात कंपनीमध्ये थोडा तांत्रिक बिघाड झाला. म्हणून तो व्यक्ति तो बिघाड दुरुस्त करायला गेला. त्याला काम करण्यात खुप उशीर लागला.
तोपर्यंत प्लांट बंद झाला.
लाइट बंद करून दरवाजे सील करण्यात आले.
अशा परस्थितित त्याचा बर्फ आणि थंडी ने जिव जाणे,
निश्चित होते.

त्या माणसाला काही सुचेनासं झालं,
पण तासा भरात एक चमत्कार झाला. आणि कोणी तरी दरवाजा उघडला.
तो समोर पाहतो तर सुरक्षा रक्षक हातात टॉर्च घेऊन
उभा होता.
त्याने त्याला बाहेर काढून त्याचा जिव वाचवला.

प्लांट बाहेर आल्यावर त्याने सुरक्षा रक्षकाला विचारले,
"तुम्हाला कसे कळले की मी आत अडकलोय."
सुरक्षा रक्षक म्हणाला,
"या प्लांट मध्ये जेवढे लोक काम करतात त्यात तुम्ही एकटेच असे
आहात की जे रोज मला येताना नमस्कार आणि जाताना राम राम बोलता
आणि आज सकाळी तुम्ही कामावर आलात पण
संध्याकाळी गेला नाहीत.
म्हणून माझ्या मनात शंका आली आणि मी पाहायला आलो."

त्या व्यक्तीला कधी वाटले देखील नव्हते की त्याचे
एखाद्याला एवढा छोटा सन्मान देणे,
एक दिवस त्याचा जिव वाचवेल.
म्हणून नेहमी लक्षात ठेवा,
जेव्हा कधीही कोणाला भेटाल तेव्हा त्याच्या सोबत हसून सन्मान पूर्वक बोलून मग पुढे जा.
माणूसकीच तुम्हांला शेवट पर्यंत साथ देईल...
म्हणून सर्वांबरोबर माणूसकीने वागा...


कथा क्रमांक १३१

```
एका गावात एक विद्वान अर्थतज्ज्ञ रहात होता . त्याची ख्याती सर्वदूर पसरलेली होती ...

तिथल्या स्थानिक राजाने एकदा चर्चा करायला त्याला बोलवले,

भरपूर वेळ चर्चा झाली मग राजा  म्हणाला " महाशय
तुम्ही अर्थशास्त्रात खरेचं फार विद्वान आहात पण मग तुमचा मुलगा असा बावळट का ?

काही त्याला शिकवा.

त्याला सोने आणि चांदी यात
जास्त मुल्यवान काय इतके सुध्दा कळत नाही "

आणि

मोठ्याने हसू लागला ....

हे ऐकून त्या विद्वानाला फार वाईट वाटले ...

तो घरी गेला ....

त्याने मुलाला विचारले
" बाळा मुल्यवान काय आहे सोने का चांदी ? "

" सोने " क्षणाचाही विलंब न लावता मुलगा उत्तरला

" हो तुझे उत्तर बरोबर आहे . मग तो राजा असा का हसला ?

म्हणाला तुला सोने आणि चांदी यात मुल्यवान काय माहीत नाही ..!

 माझी चार लोकात खिल्ली उडवली जाते ..

तुला माहीत आहे मुल्यवान काय आहे..!!

मुलगा म्हणाला
राजा रोज त्याच्या वाड्याजवळ छोटा दरबार भरवतो ...

रोज मी शाळेत जातो त्या रस्त्यातचं राजाचा वाडा आहे

मी दिसताचं राजा मला बोलावून घेतो ..

त्याच्या सोबत गावातील
सारे लोकं प्रतिष्ठीत तिथेचं असतात ....

राजा एका हातात
सोन्याचे नाणे आणि एका हातात चांदीचे नाणे माझ्या समोर
धरतो आणि मला सांगतो यातले सगळ्यात किमती नाणे उचल ..

आणि

मी चांदीचे नाणे उचलतो ..

त्यामुळे तिथे असलेले सगळे
मोठ्याने हसतात ...

सार्यांना मजा वाटते .......

असे रोज घडते

मुलाला सोने चांदी यातला फरक कळतो तरी हा रोज असे का करतो

चांदीचे नाणे मुल्यवान म्हणून उचलतो हे मात्र त्याला उमगले नाही

न राहून त्याने मुलाला विचारले " मग तु सोन्याचे नाणे का उचलत नाही ?

असल्या मुर्खपणा करुन माझी अब्रु चार लोकात का काढतो ?"

मुलगा जरा हसला मग विद्वानाचा हात धरुन त्याला आत घेवून गेला
कपाटातून त्याने एक पेटी काढली आणि उघडली. ती पेटी चांदीच्या
नाण्यांनी भरलेली होती ...

हे पाहून विद्वान अवाकचं झाला ..

मुलगा म्हणाला
 " ज्या दिवशी मी सोन्याचे नाणे उचलेल त्या दिवशी हा खेळ बंद होईल ..

 त्यांना मला मुर्ख सिध्द करुन मजा येत असेल
तर येवू द्या ..

पण जेव्हा मी हुशार होईल तेव्हा मला काहीचं मिळणार नाही.

मुर्ख असणे वेगळे आणि मुर्ख समजणे वेगळे "

सोन्याची एक संधी साधण्या पेक्षा प्रत्येक संधीचे सोने करा !!!
काय वाटते ?

समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो.

काहीजण त्यातुन मोती उचलतात,

काहीजण त्यातुन मासे घेतात तर काहीजण फक्त आपले पाय ओले करतात.

हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे फक्त तुम्ही त्यातुन खूप छान मेसेज आहे```

कथा क्रमांक १३०

*माझी शाळा माझे उपक्रम*

*🌷🌷🌷कथा🌷🌷🌷*
*📚अभ्यास कथा भाग .१३० 📚*
〰〰〰〰〰〰〰
      *🌺न्याय* 🌺
================
लोकांचे धान्य दळून देणार्‍या एका माणसाने एके दिवशी आपल्या धान्याच्या टोपलीत एक उंदीर पकडला व त्यास आपल्या आवडत्या मांजरास खाऊ घालण्याचा विचार केला. त्यावेळी तो उंदीर दीनवाणें तोंड करून त्याला म्हणाला, 'बाबारे लोकांचं धान्य चोरावं हा माझा धंदा नाही.' लोकांच्या घरातून मी जे अन्न घेतो, ते केवळ पोटापुरतेच घेतो,' ही सबब ऐकून तो माणूस म्हणाला, 'अरे, मी तरी तुला जी शिक्षा करणार आहे, ती सार्वजनिक हितासाठीच करतो आहे.

 कारण तुझ्यासारख्या चोराला शिक्षा करणं हे प्रत्येक नागरिकाचं काम आहे,' हे ऐकून उंदीर म्हणाला, 'बरं तर, तू आणि मी दोघंही एकाच वर्गात मोडतो याचा विचार कर. आपण दोघेही धान्यावरच आपला चरितार्थ चालवतो. अंतर इतकंच की दळायला आलेल्या धान्यातला एक दाणा जर मी चोरला तर त्यातले हजार दाणे तू चोरतोस.' तो माणूस रागावून त्यावर म्हणतो, 'प्रामाणिक माणसाने शांतपणे ऐकून घेण्याजोगे हे तुझे बोलणे नाही.' व लगेच त्याने त्या उंदरास आपल्या मांजरीस देऊन टाकले.

तात्पर्य - ज्या व्यंगाबद्दल आपण दुसर्‍यास नावे ठेवतो, तेच व्यंग आपल्या अंगी आहे असे दाखवून दिले, तर त्याचा आपल्याला राग येतो, पण हा काही न्याय नव्हे.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

http://www.pramilasenkude.blogspot.in

जीवन विचार

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
〰〰〰〰〰〰〰
   🌺🍁 *जीवन विचार* 🍁🌺
〰〰〰〰〰〰〰
*श्रध्दा* म्हणजे स्वभावानुसार, मनुष्याला होणारी त्या प्रकारची सहज प्रेरणा, जीला मनुष्य विश्वासाने चिकटून राहतो.श्रध्देमध्ये महान प्रेरकशक्ती आहे.सेवेच्या मुळाशी श्रद्धा हवी.असामान्य श्रध्देच्या व्यक्ती निघतात व एखादा चांगला विचार समाजात रुजावा म्हणून सातत्याने प्रयोग करतात व समाजाला पुढे नेतात.

      🙏 *विनोबाजींनी सूर्याचे 🌞 उदाहरण दिले.ते म्हणतात सूर्य 🌞 जळत असतो तेव्हा कोठे जगण्यापुरती *९८**डिग्री उष्णता आपल्या अंगात राहते.
समाजात वैराग्याचे धगधगीत  जळते सूर्य 🌞 निर्माण होतात, श्रध्देने परिस्थिती झुगारुन ध्येयाकाशात जेव्हा ते भरा-या मारु लागतात तेव्हा कोठे संसारोपयोगी अल्पस्वल्प वैराग्य आपणात येते.

  *श्रध्दा*आणि *बुद्धी* यांचे विषय अलग अलग आहेत , ज्याप्रमाणे कान 👂आणि 👁 डोळा यांचे विषय अलग अलग आहेत , त्यांचा एक दुसऱ्याशी विरोध नाही.

श्रध्देच्या बरोबर बुद्धी असली पाहिजे. *श्रध्दा*कर्मशक्ती आहे तर *बुद्धी* दिशासूचक आहे.

==================
e.blogspot.in

कथा क्रमांक १२९

*👉🏻मंथन*
एक खेकडा समुद्र किना-यावर फिरताना स्वत:च्या पायांमुळे होणारी नक्षी पहात होता.
तेव्हढ्यात समुद्राच्या लाटेने ती नक्षी पुसली गेली.

ते पाहुन खेकडा लाटेस म्हणाला, *"मी तर तुला माझी जवळची मैञिण समजत होतो आणी तरीही तू माझी छान नक्षी पुसून टाकलीस."*

त्यावर लाट म्हणाली , *"अरे या नक्षीच्या मागावरच मासेमार तुला शोधुन पकडेल म्हणून मी नक्षी पुसली.."*

🙏मैञीच नातं हे कल्पना शक्तीच्या बाहेरील नातं आहे.
नात्याला किंमत द्या व नात्यावर मनापासून विश्वास ठेवा... 🌺🌺

कन्यादान

*कन्यादान*

बाप  आणि लेक हे नाते शब्दांत मांडणे कठीण..


बाबा हा शहाळ्यासारखा असतो ...

बाहेरून कितीही कठोर असला तरी ....

आतून मात्र नितळ आणि मधुर पाण्याचा झरा असतो. ...

कुठलीही मुलगी...

जर डोळे  झाकून  एखाद्या पुरुषावर  विश्वास  ठेवू  शकते....तर तो फक्त तिच्या वडिलांवर …

लेक जर घराचे सौख्य असेल तर...
 त्या सौख्याचे पावित्र्य तिचा बाबा असतो....

संस्कार देणारी आई असली तरी...
 ते संस्कार जपणारा बाबा असतो.

संयम देणारी आई असली तरी...

 खंबीर बनवणारा बाबाच असतो...

बोट धरून चालायला शिकवणारा बाबाच असतो ...

 लेकीच्या हट्टासाठी घोडा होणाराही  बाबा असतो...

कामावरून येताना रोज न चुकता खाऊ आणणाराही  बाबाच असतो...

पिकनिकसाठी पण पैसे बाबाच देतो...

shopping करताना आईने कमी  किमतीचा dress काढला तर....
 हळूच लेकीला विचारून भारी किमतीचा dress घेणारासुद्धा बाबाच असतो. ...

आईने काही काम सांगितले तर.... तिला दटावणारासुद्धा बाबाच असतो....

लेकीचे पहिले बोबडे बोल , तिने टाकलेले पहिले पाऊल , तिचे लाडिक वागणे,
 तिची घरभर पैंजणांची छुमछुम हे सगळे पाहून सुखावतो तो बाबा असतो आणि ....

लेकीला नाजूक कळीसारखा सांभाळणारा ....
आणि प्रसंगी रागे भरणारा पण बाबाच असतो....

पण त्यात त्याची लेकीसाठी तळमळ असते, तिच्यासाठीची काळजी असते....

लेकीच्या प्रत्येक सुखासाठी झटणाराहि बाबाच !!!

आणि शेवटी मुलगी म्हणजे परक्याचे धन हे कटू सत्य पचवणाराही बाबाच !!!

ज्या लेकीला २०-२५ वर्षे जीवाच्या पलीकडे सांभाळले तिला एका क्षणात परक्याच्या हातात देताना त्याचे हृदय काय तुटत असेल ह्याची कल्पनाही करता येणार नाही. ..
आर्त धागे तुटल्याची ती वेदना कोणीच नाही समजू शकणार.

आपल्या लेकीला माहेरचा उंबरठा ओलांडून...
 सासरी जाताना पाहताना ढसाढसा रडणाराही बाबाच असतो....

आपल्या लेकीचा हात परक्याच्या हाती देताना... आतून तुटणारा बाबाच असतो...

"दिल्या घरी सुखी रहा  म्हणताना "
... मनातून खचलेलाही बाबाच असतो...

असा हा बाबा त्याच्या लेकीचे सर्वस्व असतो...

आणि फक्त लेकच तिच्या बाबाचे मन ओळखू शकते. ...

लेकीचा स्वतःपेक्षा  जास्त विश्वास तिच्या बाबावर असतो....

लग्नानंतर मुलीचे नाव जरी बदलले तरी....
तिचे बाबा बरोबरचे नाते कधीच बदलत नाही ....

ती शेवटपर्यंत तिच्या बाबाची छोटी परीच असते....

एक गोंडस परी …
                                                     *आज जागतिक कन्या  दिन*....ज्यांना कन्यारत्न आहेत अशा सर्वांना जागतिक कन्या दिनाच्या सर्वांना मनस्वी शुभेच्छा!!

   👏👏लक्षात ठेवा..👏👏

मुलगा वारस आहे.....मुलगी पारस आहे..

मुलगा वंश आहे........मुलगी अंश आहे.....

मुलगा आन आहे........मुलगी शान आहे...

मुलगा तन आहे........... मुलगी मन आहे....

मुलगा संस्कार आहे... मुलगी संस्कृती आहे

मुलगा आग आहे.......  मुलगी बाग आहे....

मुलगा दवा आहे.........मुलगी दुऑ आहे....

मुलगा भाग्य आहे......मुलगी सौभाग्य आहे

मुलगा शब्द आहे........मुलगी अर्थ आहे....

मुलगा गीत आहे........तर मुलगी संगीत आहे..

👩लेक वाचवा.....
👩लेक वाढवा....
👧लेक घडवा....

*ज्याना मुलगी नाही त्यानी* *सुनेला जीव लावा,*


कथा क्रमांक १२८

*एकदा एका जंगलात एक हरीणी बाळाला जन्मं देणार असते.*

*पण ती ज्या ठीकाणी बसलेली असते तिथे जवळच एक वाघ तिच्यावर नजर ठेवून असतो.*

*एका बाजूला एक शिकारी तिच्यावर बंदूक रोखून उभा असतो. आणि जवळच जंगलात वणवा पेटलेला असतो.*

*सगळ्या बाजूने दिसणार्या या संकटांपैकी एकतरी संकट तिला गिळून टाकेल याची तिला खात्री असते.*

*तो शिकारी बंदुकीतून गोळी सोडतो....
वाघ जोरात झेप घेतो...
आणि तितक्यात वीज चमकते...
त्या शिकार्याचं लक्षं वेधलं जातं... आणि ती गोळी त्या वाघाला लागते...वीज चमकून गडगडाट होतो आणि पाऊस सुरु होतो... त्यामुळे वणवाही विझतो...*

*आणि*

*या सगळ्या गोष्टी होत असताना ती हरिणी हळूच एका लहानश्या हरणाला जन्मं देते...*

*माणसाचं आयुष्य हे असंच असतं...*

*त्याच्या हातात काहीच नसतं...*

*आपण फक्तं प्यादी असतो या पटावरची...*

*कर्ता करविता असतो तो ईश्वर...*

*एक एक वाटत असताना कुठल्या क्षणी काय होईल काहीच सांगता येत नाही...*

*मारणाराही तोच असतो आणि तारणाराही तोच...*

*कर्माचा सिद्धांत हा कीतीही खरा असला तरी शेक्सपिअरचं एक वाक्यं खूप काही सांगून जातं...*

*'Behind every misfortune there is a crime... But behind every crime there is a misfortune...!'*

*आयुष्य हे असंच असतं... कुणाला दोष द्यावा आणि कुणाचं कौतुक करावं... दोन्ही एकाच रथाची चाकं...*

*कुठलं खड्डयात अडकणार आणि कुठलं वर टांगून राहणार हे ठरवणारा मात्र तोच...*

*'समुद्रात बुडून त्याचा म्रुत्यु झाला'...पण त्याच्या मनातून समुद्राकडे तो त्याक्षणी कसा ओढला गेला? कोण सांगेल?*

*'चाळीस घरांच्या ढिगार्याखाली गाडलं गेलेलं सहा महीन्यांच बाळ, 30 तासांनंतरही तसच छान हसत खेळत सापडतं'...*

*त्याला    त्या ढिगार्यातही कुशीत घेणारं कोण असतं?*

*'नेहमीच्याच रस्त्याने जाणारी एक बस अचानक एक दिवस दरीत कोसळते.'
तिला दरीत ढकलणारं असतं कोण? वारा? की ड्रायव्हर? की ड्रायव्हरच्या डोळ्यासमोर अचानक आलेला अंधार? कोण सांगेल?*

*एका मुलाच्या रोजच्या नेहमीच्या ट्रेनमधे बाम्बस्फोट होतो... पण तो त्यादिवशी ऑफिसला गेलेलाच नसतो... त्यामुळे तो वाचतो...*

*ऑफिसला न जाण्याची इच्छा त्याला त्याच दिवशी का होते? कोण सांगेल?*

*त्या हरिणीच्या बाळाचा जन्मं होताना अचानक वीज का चमकली?
कोण सांगेल? कोण सांगेल कोण??
कुणीच नाही...*
*हे असंच असतं... भक्तीने रुजवलेलं ... प्रेमाने सावरलेलं... आसक्तीने बुडवलेलं... कर्माच्या चक्रात अडकलेलं...
ईश्वराने लिहीलेलं ... आपलं आयुष्यं...!*

*मोर नाचताना सुद्धा रडतो... आणि..
राजहंस मरताना सुद्धा गातो....*

*दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही...
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.*

*यालाच जीवन म्हणतात.*

*किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावे ते हसून-खेळून
कारण या जगात उद्या काय* *होईल
ते कोणालाच माहित नसते...!!*
 *नशिबाने दिलेल्या पदाचा गैरवापर करू नका.....*
*कोणाचा  अपमान करू नका आणि* *कोणाला कमीही लेखू नका.....*
*-  तुम्ही खूप शक्तिशाली असाल,*
*पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे.....*
*- कोणी कितीही महान झाला असेल,*
*पण निसर्ग कोणाला कधीच* *लायकीपेक्षा महान बनण्याचा क्षण देत नाही.......*
*स्वतःवर कधीही अहंकार करू नकोस......*
*देवाने तुमच्या-माझ्यासारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं......*

              🌹 *-स्वामी विवेकानंद*🌹

माझी शाळा माझे उपक्रम

🔰🌹 🔰🌹🔰🌹🔰🌹
  🙏 *सस्नेह नमस्कार*🙏

*भव्य शालेय लेझीम स्पर्धा* ⛳स्पर्धा आयोजकः 🙏श्रीसंत नंदी महाराज संस्थान, कवाना *ता.हदगाव जिल्हा नांदेड*
👉स्पर्धा संयोजकः श्री सादुलवार सर.
👉दि.२० जानेवारी २०१७.
*ता.हदगाव केंद्र ( कन्या) जि.नांदेड*
 या केंद्राअंतर्गत सहभागी शाळा  मानांकन व स्पर्धेत बक्षिस मिळाले  ➡💐💐
➡जि.प.प्रा.शाळा वाटेगाव (चतुर्थ क्रमांक )💐💐

आमच्या चिमुकल्यांनी या स्पर्धेत सहभागी होऊन अतिशय आनंदाने व उत्साहाने कलागुण दाखविले त्यांच्या ह्या
यशस्वी वाटचालीस सदैव 👍👍आम्ही सज्ज राहु हेच ध्येय मनी ठेवून कार्य आम्ही करु.
*प्रेरणादायी संदेश👉"जिंकणे म्हणजे नेहमी पहीला येणे असे नसते.एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे."*👍 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
 🙏 ✒शब्दांकन 🙏
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे
जी.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव जि.नांदेड.

कथा क्रमांक १२७

*श्रद्धा...*


हॉस्पिटलच्या ऑपरेशन वॉर्ड समोर एका बाईच्या येरझारा चालू होत्या. ऑपरेशन रूम मधून डॉक्टर बाहेर पडताच तिचं मन अगदी सैरभैर झालं. डॉक्टर आता काय सांगणार?
माझ्या मुलाला काय झालंय?
तो बरा होईल नं?

बाहेर येताच तिने त्या ज्युनियर डॉक्टरांना थांबवून विचारले. डॉक्टरलाही वस्तुस्तिथी लपवता आली नाही. आलेले शब्द बाहेर पडू नये म्हणून त्याचा आटापिटा चालू होता पण सत्य परिस्थिती सांगावीच लागणार होती.

हृदयातील गुंतागुंतीमुळे लहानग्याचा जीव टांगणीला लागला होता. आता काही दिवस, आठवडे हाताशी आहेत असं सांगताना त्याने पुसटसा प्रकाश दाखवला, तो म्हणजे शहरातील ह्या गुंतागुंतीवर शस्त्रक्रिया करण्यात प्रख्यात असणाऱ्या डॉक्टरांना दाखवणे.

ज्युनियर डॉक्टरांनी तिच्या मुलासाठी स्वतःचं वजन वापरून मोठ्या डॉक्टरांशी सल्लामसलत केली. केसची गुंतागुंत बघून त्या डॉक्टरांनी ही केस हातात घ्यायचं आश्वासन दिलं.

ओपन हार्ट शस्त्रक्रिया करावी लागणार होती. ऑपरेशन रूमच्या बाहेर त्या माउलीचं मन काही शांत बसत नव्हतं. सतत तेच विचार... आपल बाळ परत चांगलं होईल नं?

आत जाणाऱ्या त्या प्रख्यात डॉक्टरांना तिने थांबवून हाच प्रश्न केला. तेव्हा डॉक्टरांकडेही 'आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न करू' ह्या शिवाय काहीच उत्तर नव्हतं.

गुंगीचं औषध देण्याअगोदर त्या लहानग्याला डॉक्टर म्हणाले, “पठ्ठ्या, घाबरू नकोस. आता हे ऑपरेशन झालं की तू एकदम बरा होशील!”

वास्तविक ऑपरेशन मधील यशाची हमी अगदी धूसर होती. पण डॉक्टरांनाही काय सांगावं काहीच कळत नव्हते.

डॉक्टर हे बोलताच मुलाचा प्रश्न, "डॉक्टर मी बरा होईनच. पण माझी एक सूचना आहे, *माझ हृद्य तुम्ही उघडणार तेव्हा एक काळजी घ्या की माझ्या हृदयात देव आहे त्याला धक्का नको बसायला.* माझी आई सांगते देव माझ्या हृदयात आहे!”

मुलाचं हे बोलणं ऐकून डॉक्टरांनाही अश्रू आवरले नाहीत. शस्त्रक्रियेच्या वेळी आपला अवघा अनुभव पणाला लावूनही हृदयातील रक्तस्त्राव थांबत नव्हता. शेवटी डॉक्टरांनी शस्त्रक्रिया अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला.

आता काही मिनिटे आणि एक जीव निघून जाईल ह्या विचारात डॉक्टर असताना अचानक नर्स ने रक्तस्त्राव थांबला अशी सूचना दिली. त्या नंतर पुन्हा एकदा शस्त्रक्रियेला सुरूवात करून डॉक्टरांनी ती यशस्वी केली.

मुलगा शुद्धीवर आल्यावर त्याचा पहिला प्रश्न ह्याच डॉक्टरांना होता, *"डॉक्टर तुम्ही देवाला पाहिलं नं, तो कसा दिसत होता?"*

त्याच्या ह्या प्रश्नावर डॉक्टर निरुत्तर झाले. आपल्या अनुभवाने सुद्धा रक्तस्त्राव कसा थांबला अचानक ह्याचं उत्तर त्यांना मिळत नव्हते. जिकडे विज्ञानाची कास धरणारा एक डॉक्टर एका माउलीच्या श्रद्धेपुढे हरला होता. त्याच क्षणी डॉक्टर स्वतःला सावरून म्हणाले,

*"तो नं ह्याच माउली सारखा होता...!"*

विज्ञान जिकडे तोकडे पडते, तिथे सुरूवातीस काही प्रश्नाची उत्तरं आपण त्याच्यावर सोडतो. त्याला काही नाव द्या.... देव, डॉक्टर, मसीहा, एंजल, गुरु किंवा अजून काही.

जी काही असते ती *श्रद्धा!*

कोणती तरी एक शक्ती माझ्या आकलनाच्या पलीकडे कार्यरत आहे, ती सगळं समजून घेईल आणि सगळं सुरळीत होईल.

जीवन- मरणाचा प्रश्न असो वा आयुष्यातील कठीण निर्णयांचा आपल्यातील एक श्रद्धेचा भाग खूप मोठा न दिसणारा रोल करत असतो. ज्याची उत्तर कोणत्याही विज्ञान किंवा गणिताने देता येत नाही.

आस्तिक असो वा नास्तिक पण ती श्रद्धा जर मनापासून असेल तर नक्कीच उत्तरं मिळतात.    

आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात की जिकडे काहीच सुचत नाही. पुढचं काहीच दिसत नाही. मागे जावं तर काहीच सापडत नाही. अश्या वेळी आपण तुटतो. डळमळीत होतो. कधी कधी तर कोसळतो. पण श्रद्धेवर विश्वास असेल तर अश्या गोष्टीतून तारून जाता येते.

आपल्याच मनासारखं होईल असं नाही. पण जे समोर येईल त्याला सामोरी जायची शक्ती श्रद्धेतून मिळते. ती कमी- जास्त असेलही पण ती मिळते हे मात्र नक्की.

कोणत्याही हॉस्पिटलच्या दरवाज्याशी बसवलेला गणपती हा दगडाचा असो वा फोटोचा, कातळाचा असो वा संगमवराचा. तो सगळ्यांना मदत करतो का ते माहित नाही. पण त्याच्यावरील श्रद्धा मात्र त्या कठीण प्रसंगाला तोंड देण्याची सगळ्यांना हिंमत देते ह्यात शंका नाही.


कथा क्रमांक १२६

आज परत एकदा नकळत
मुंगी तळ्यात पडली
स्वतःला वाचविण्यासाठी
झाडाचं पान आणि कबुतराची
वाट पाहू लागली

मीच का सतत हिला वाचवावे
हा कबुतराचा इगो आड आला
झाडावरच बसून
असहाय मुंगीला मरताना पाहू लागला

कबुतराने मदत करावी म्हणून
मुंगी जिवाच्या आकांताने ओरडली
कबुतर आपल्याच विचारात मश्गुल
मुंगी असहायतेमुळे गतप्राण झाली


कबुतर आपल्याच प्रेमात गढून गेलं
पारधी येणार हेच विसरून गेलं
पारध्यानेही याच संधीचा फायदा घेत
मुंगीच्या अनुपस्थितीत डाव साधला


कबुतर आणि मुंगी दुर्दैवीपणे गेले
झाड मात्र त्या दिवशी खूप रडले
मुंगी, कबुतर मेल्याचं दुःख होतंच
पण त्याहूनही परोपकाराची भावना मेल्याचं होतं.. 😔

जीवन विचार

🔰🌸🔰🌸🔰🌸🔰🌸
*🌷🌷 जीवन विचार*🌷🌷
〰〰〰〰〰〰〰

*जीवन म्हणजे संग्राम आहे , यज्ञ  आहे , सागर आहे.जखमांशिवाय संग्राम असत नाही.ज्वाळांशिवाय यज्ञ होत नाही . लाटांशिवाय सागर असत नाही. हे सर्वकाही हसतमुखानेच स्वीकारायला हवे.कारण जीवन हा हास्य* *आणि अश्रू यांचा सुरेख संगम आहे.*

*माणसाच्या जीवनाचं सार दोनच शब्दात सांगता येईल.*
*' आला आणि गेला .' काही माणसं मरत - मरत जगत असतात तर काही माणसं जगत - जगत मरत असतात.जन्मकाळाप्रमाणे मरणकाळ हा देखील एक आनंदसोहळा आहे. कारण शरीर पिंजऱ्यातून आत्म्याचा पक्षी मुक्त होऊन अनंतात विलीन होतो.*

*हे सार जग नियतीच्या अंगा - खांद्यावर खेळत असतं. नियती कधी हसते , कधी रडते. माणसाचं जीवन म्हणजे नियतीचं हास्य होय.माणसाचं मरण म्हणजे नियतीचं रुदन होय. ' जीवन सरे मरण उरे '  हे सूत्र जगताना ध्यानात ठेवावं लागतं.*
〰〰〰〰〰〰〰〰
🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸
*✍शब्दांकन /संकलन*

जीवन विचार

🌻🌸🌺🌹🌷💐🌹🌷🌺🌸🌻

          *सत्य सांगण्यासाठी कुणाच्याही,*
                 *शपथेची गरज नसते...*

          *नदीला वाहण्यासाठी कुठल्याही,*
                *रस्त्याची गरज नसते..
.*
                *जे आपल्या हिंमतीच्या,*
               *जोरावर जीवन जगतात...*

         *त्यांना ध्येयाकडे पोहचण्यासाठी,*
        *कुठल्याही रथाची गरज नसते...!!!*

      

कथा क्रमांक १२५

*माझी शाळा माझे उपक्रम*

*🌷🌷🌷कथा🌷🌷🌷*
*📚अभ्यास कथा भाग १२५*
〰〰〰〰〰〰〰
*🌺आत्मपरीक्षण*🌺
=================
एक तरुण मुलगा पब्लिक फोन ठेवलेल्या दुकानात येतो.
*तरुण*(अदबीने) : दुकानदार काका, मी एक फोन करू का ?
तरुणाचे आदबशीर वागणे पाहून दुकानदार खुश होतो. तो तरुण फोन नंबर फिरवून रिसिव्हर कानाला लावतो. (डायलवाला जुन्या काळाचा फोन असल्याने पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीचा आवाज इकडे इतरांना देखील अस्पष्ट ऐकू यायचा !! तसे ते बोलणे दुकानदार हळूच ऐकू लागला)
***
*तरुण* : बाईसाहेब, तुमच्या बागेच्या सफाईचे काम मला द्याल का ? मी माळीकाम खूप छान करतो.
*महिला* : (तिकडून बोलतेय) नको. मी एक महिन्यापूर्वीच एकाला ठेवले आहे.
*तरुण*: बाई, प्लिज, मला फार गरज आहे हो, आणि तुम्ही त्याला जितका पगार देता त्याच्या निम्म्या पगारात काम करायला मी तयार आहे !!
*महिला* : पण माझ्याकडे जो आहे, त्याच्या कामावर मी समाधानी आहे. मग त्याला का काढून टाकू ?
*तरुण* : बाई, बाग कामासोबतच मी तुमच्या घरातले सफाईचे काम फ्री करेन. प्लिज मला कामावर घ्या न !!
*महिला* : तरीही नको बाबा !! दुसरीकडे काम पहा !! माझ्याकडे नाही !!
*तरुण*: हसत हसत फोन ठेवून निघाला. दुकानदाराने त्याला थांबवले. आणि विचारले की, "तू प्रयत्न केलास पण नोकरी मिळाली नाही ना ? मला तुझा स्वभाव आवडला. कष्ट करण्याची तयारी आवडली. वाटल्यास तू माझ्या दुकानात नोकरी करू शकतोस"
यावर पुन्हा हसून तो तरुण म्हणाला, "मला नोकरी नकोय. नक्की नकोय."
*दुकानदार* : मग आत्ता तर त्या फोनवर इतक्या विनवण्या करत होतास न ?
*तरुण* : मी खरेतर त्या बाईंना काम मागत नव्हतो तर स्वतःचे काम तपासत होतो. मीच त्या बाईंच्या बागेचे काम करतो. मी करत असलेले काम माझ्या मालकाला आवडतेय की नाही ? हे चेक करत होतो"
असे म्हणून तो तरुण निघतो, दुकानदार त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे *चकित होऊन* पाहत राहतो.

 *तात्पर्य* : अधूनमधून आपण स्वतःच स्वतःचे *आत्मपरीक्षण* करणे गरजेचे आहे. *तुम्ही नोकर असा की मालक*. ते महत्वाचे नाही तर तुम्ही करत असलेले काम चांगले होतेय का हे महत्वाचे आहे. आणि ते सर्वात जास्त कोण ओळखू शकतो तर *आपण स्वतः* !!

*जो स्वतःला तटस्थपणे पाहून परीक्षण करू शकतो, तो नक्कीच इतरांपेक्षा पुढे जातो*
*-----------------------------------*

जीवन विचार

*माझी शाळा माझे उपक्रम*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

➖➖➖➖➖➖➖
     🌺🍁 *जीवन विचार* 🍁🌺
➖➖➖➖➖➖➖
काळाच्या उदरातुन ऋतू जन्म घेतात आणि जातात. या सार्या जगाला व्यापून राहीलेला हा *काळ* कधी संपतच नाही. मानवी मनाला  अनेकदा असं वाटतं की संध्याकाळच्या वेळी पश्चिमेकडील आकाशात उधळलेल्या सप्तरंगाची छटा बघतच रहावे !  पण क्षणार्धात *काळ*  त्या रंगाना गिळून टाकतो!

    आपण जेव्हा जीवनाचं सुरेल गाणं गात असतो तेव्हा काळ आपल्या जीवनसतारीच्या तारा केव्हा तोडतो तेच समजत नाही. हा कठोर *काळ*  म्हणजे साक्षात  मृत्यू होय.

*''काळ फिरला की सुवर्ण मेरूही मातीचा बनतो".*

अशा अनंत आणि अपरिमित काळाचं मोजमाप करन कशाने कराव तेच कळत नाही.
  म्हणून *मानवाने उद्याचा भविष्यकाळ आजच्या चांगल्या  कर्मातून निर्मावा.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
        *🌻जय महाराष्ट्र🌻*

कथा क्रमांक १२४ संकलन

अभ्यास कथा भाग १२४
🐦🐦🐦चिमणीचे मन
*चिमणीचे सगळे काम आटोपले, ती जरा निवांत झाली आणि तेव्हा तिच्या लक्षात आलं की अरेच्च्या! आपण अजून कावळ्यासाठी दारच उघडलेलं नाही. तिला विलक्षण अपराधी वाटलं. तिनं बंद दारामागचा कानोसा घेतला. दाराबाहेर शांतता होती. ती शांतता चिमणीला असह्य झाली. तिनं तत्परतेनं दार उघडलं. दाराबाहेर कावळा नव्हता. तिने आजू बाजूला फिरून पाहिलं, कावळा कुठेही नव्हता. 'गेला असेल कुठेतरी... येईल परत' …. तिने स्वत:च्या मनाची समजूत काढली. मात्र, रात्र मावळली... दिवस उगवला, संध्याकाळ झाली आणि परत रात्र आली तरी कावळ्याचा काही पत्ताच नव्हता. चिमणीचं मन आज कशातच रमेना … बाळाला न्हाऊ घालण्यातही नाही आणि बाळाला गंध-पावडर करण्यातही नाही … कारण एव्हाना तिला सवय झाली होती …. कावळ्याने बंद दारावर केलेल्या टकटकीची …… तो आवाज असा काही कानात साठला होता की दिवसातून अनेक वेळा तिने दारावर टकटक झालीय असं समजून दार उघडलं होतं आणि बाहेर कोणी नाही हे पाहून निराशेने बंद केलं होतं... अनेक दिवस उलटली.... चिमणीच्या मनातून काही कावळा जाईना. मग तिने कावळ्याचा शोध घ्यायचाच असं ठरवून घरट्याबाहेर पाऊल ठेवलं. मजल दरमजल करत फिरताना थकून एका झाडाच्या फांदीवर विश्रांती घेण्यासाठी ती थांबली. एवढ्यात त्याच झाडाच्या दुसऱ्या फांदीवरून चिरपरिचित आवाज तिच्या कानावर पडला... तो 'कावळ्याचा' आवाज होता. तो आवाज ऐकून चिमणीला कोण आनंद झाला. सारा थकवा, सारा शीण कुठल्या कुठे पळाला. तिने मोठ्या उत्साहाने त्या फांदीच्या दिशेने झेप घेतली. पहाते तर काय! कावळा आपल्या घरट्यात आपल्या पिल्लांसोबत आनंदाने मौज मस्ती करत होता. कावळ्याचं लक्ष चिमणीकडे गेलं. चिमणीला पाहून त्याला फार आनंद झाला. तो आनंदाने म्हणाला, 'या या चिमणाबाई. तुमचं स्वागत आहे आमच्या घरट्यात. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. बोला, काय करू तुमच्यासाठी?' कावळ्याचं ते अगत्य पाहून चिमणी खूप ओशाळली. म्हणाली,*
- तुला राग नाही आला माझा?'
- का यावा?
- मी माझ्यात विश्वात गुंग होते म्हणून?
- छे छे! प्रत्येकाचं आपलं असं स्वतंत्र विश्व असतं.. जसं तुझं होतं. तुला त्यात माझी गरज कधीच नव्हती माझी ती गरज होती म्हणून मी तुझ्या दाराशी आलो. पण नंतर मला माझी चूक कळली. माझी गरज भागवण्यासाठी तू तुझ्या विश्वातून बाहेर येउन मला साथ देणं किंवा तुझ्या विश्वात मला प्रवेश देणं या दोनीही गोष्टी 'अतिक्रमणा सारख्याच' घडल्या असत्या नाही का? आणि कुणाच्याही वस्तूवर, अधिकारावर, भावविश्वावर 'अतिक्रमण' करण चूकच नाही का? म्हणून मग मी स्वत:च वजा व्हायचं ठरवलं आणि निघालो एकटाच …. तुझ्या विश्वापासून दूर.
- मला एकट करून? अरे, मला सवय झालीय आता तुझी.
- चिमणाबाई, या जगात एकट कोणीच नसतं. जेव्हा आपण एकट आहोत असं वाटतं ना तेव्हा तो एकांतच असतो आपला सोबती जो दाखवत असतो आपल्याला वाट आयुष्यातल्या पुढच्या प्रवासाची . मलाही दाखवली त्याने आणि बघ ……. आज मी किती आनंदी आहे … माझ्या 'घरट्यात'… माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या 'माझ्या माणसांमध्ये'
चिमणी नि:शब्द होऊन तिथून निघाली तेव्हा कावळा तिला एवढंच म्हणाला -
- चिमणाबाई, माझ्या घरट्यात तू केव्हाही येऊ शकतेस हो. तुझी टकटक ऐकून मी लगेच दार उघडेल *… क्षणाचाही विलंब न करता.चिमणीचे डोळे पाणावले... भरल्या कंठाने निरोप घेऊन तिने परतीची झेप घेतली आपल्या घरट्याकडे... पण आज तिच्या पंखात पूर्वीइतक बळ राहिलं नव्हतं....*

*आपल्या सगळ्यांचीच अवस्था ना थोड्याफार प्रमाणात त्या चिमणाबाई सारखी झालीय.*
- म्हणजे ?
*- म्हणजे कुणीतरी आपलं माणूस आर्तपणे आपल्याला साद घालतंय हे आपल्या गावीच नसतं. ह्या आपल्या माणसांमध्ये भाऊ, बहिण, मित्र, आई, वडील बऱ्याचदा पोटची मुलंही असू शकतात... त्यांची आर्त साद आपल्याला ऐकूच येत नाही …. म्हणजे ते पोटतिडकीने साद घालतात आणि आपण म्हणतो …'थांब मला जरा करिअर करुदे.... थांब जरा मला आता घर घ्यायचय... थांब जरा मला आता कार घ्यायचीय … थांब जरा मला आता ….' आणि मग ही जंत्री वाढतच जाते.*
*त्यांची सहन शक्ती संपते … ते त्यांचं वेगळं विश्व तयार करतात... त्या विश्वात आपल्याला स्थान नसतं... आपल्या ते गावीही नसतं आणि जेव्हा येतं तेव्हा …. आपण फार एकटे झालेले असतो.... !!*
- *आणि असं होऊ नये असं वाटत असेल तर?*
- *वेळीच 'टकटक ' ऐकायला शिका.*

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

कथा क्रमांक १२३

*अभ्यास कथा भाग १२३
आत्मपरीक्षण*

एक तरुण मुलगा पब्लिक फोन ठेवलेल्या दुकानात येतो.
*तरुण*(अदबीने) : दुकानदार काका, मी एक फोन करू का ?
तरुणाचे आदबशीर वागणे पाहून दुकानदार खुश होतो. तो तरुण फोन नंबर फिरवून रिसिव्हर कानाला लावतो. (डायलवाला जुन्या काळाचा फोन असल्याने पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीचा आवाज इकडे इतरांना देखील अस्पष्ट ऐकू यायचा !! तसे ते बोलणे दुकानदार हळूच ऐकू लागला)
***
*तरुण* : बाईसाहेब, तुमच्या बागेच्या सफाईचे काम मला द्याल का ? मी माळीकाम खूप छान करतो.
*महिला* : (तिकडून बोलतेय) नको. मी एक महिन्यापूर्वीच एकाला ठेवले आहे.
*तरुण*: बाई, प्लिज, मला फार गरज आहे हो, आणि तुम्ही त्याला जितका पगार देता त्याच्या निम्म्या पगारात काम करायला मी तयार आहे !!
*महिला* : पण माझ्याकडे जो आहे, त्याच्या कामावर मी समाधानी आहे. मग त्याला का काढून टाकू ?
*तरुण* : बाई, बाग कामासोबतच मी तुमच्या घरातले सफाईचे काम फ्री करेन. प्लिज मला कामावर घ्या न !!
*महिला* : तरीही नको बाबा !! दुसरीकडे काम पहा !! माझ्याकडे नाही !!
*तरुण*: हसत हसत फोन ठेवून निघाला. दुकानदाराने त्याला थांबवले. आणि विचारले की, "तू प्रयत्न केलास पण नोकरी मिळाली नाही ना ? मला तुझा स्वभाव आवडला. कष्ट करण्याची तयारी आवडली. वाटल्यास तू माझ्या दुकानात नोकरी करू शकतोस"
यावर पुन्हा हसून तो तरुण म्हणाला, "मला नोकरी नकोय. नक्की नकोय."
*दुकानदार* : मग आत्ता तर त्या फोनवर इतक्या विनवण्या करत होतास न ?
*तरुण* : मी खरेतर त्या बाईंना काम मागत नव्हतो तर स्वतःचे काम तपासत होतो. मीच त्या बाईंच्या बागेचे काम करतो. मी करत असलेले काम माझ्या मालकाला आवडतेय की नाही ? हे चेक करत होतो"
असे म्हणून तो तरुण निघतो, दुकानदार त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे *चकित होऊन* पाहत राहतो.

 *तात्पर्य* : अधूनमधून आपण स्वतःच स्वतःचे *आत्मपरीक्षण* करणे गरजेचे आहे. *तुम्ही नोकर असा की मालक*. ते महत्वाचे नाही तर तुम्ही करत असलेले काम चांगले होतेय का हे महत्वाचे आहे. आणि ते सर्वात जास्त कोण ओळखू शकतो तर *आपण स्वतः* !!

*जो स्वतःला तटस्थपणे पाहून परीक्षण करू शकतो, तो नक्कीच इतरांपेक्षा पुढे जातो*

कथा क्रमांक १२२

अभ्यास कथा भाग १२२

माणुसकीचा झरा

एकदा एक माणूस मॉर्नींग वॉकसाठी बाहेर पडला होता. परत येताना त्याला रस्त्यावरील एका खांबावर एक चिठ्ठी घडी करून अडकवून ठेवलेली दिसली. त्याने कुतुहलाने ती चिठ्ठी उलगडून वाचायला सुरवात केली. ती चिठ्ठी बर्याीच वेडावाकड्या अक्षरांमध्ये लिहिली होती. त्या चिठठीतील मजकूर असा होता.

‘माझी 50 रुपयांची नोट हरवली आहे. मी एक गरीब आणि वृद्ध महिला आहे. ही नोट इथेच कुठेतरी पडली असावी. मी ती नोट शोधायचा प्रयत्न केला पण मला काही ती नोट सापडली नाही. ज्या कुणाला ही नोट सापडेल त्याने ती नोट खालील पत्यावर पोचवण्याची कृपा करावी.’

त्या चिठ्ठीच्या शेवटी पत्ता दिला होता आणि ‘गणपतीच्या देवळाजवळ’ अशी खुण पण सांगीतली होती.

त्या माणसाला काय वाटले कोणास ठाऊक. तो पत्ता शोधत निघाला. हा पत्ता एका गरीब आणि दळिद्री झोपडपट्टीतला निघाला. त्याने त्या वस्तीतील गणपतीचे देऊळ शोधून काढले व त्या पत्यावरील घर पण शोधून काढले. ते घर म्हणजे एक चंद्रमौळी झोपडी होती. झोपडीचे दार बंद होते. त्याने दाराची कडी वाजवली. एका जख्ख म्हातारीने दार उघडले. त्या म्हातारीचे सर्वांग लटपटत होते. काठीचा आधार घेऊन ती कशीबशी उभी होती. शरीर खंगलेले, चेहेरा सुरकुतलेला, गालाची हाडे वर आलेली, अंगावर फाटके कपडे पण चेहेर्याावर स्वाभीमान असे तिचे रूप होते.

‘आजी मला तुमची 50 रुपयांची नोट सापडली! हे घ्या तुमचे पैसे!’ असे म्हणून त्याने खिशातील 50 रुपयांची नोट काढून आजींना दिली.

‘कमाल आहे! माझी हरवलेली 50 रुपयांची नोट देण्यासाठी आत्तापर्यंत 40 माणसे येऊन गेली. तु 41 वा आहेस!’ आजी म्हणाल्या.

‘तुला कोणी सांगीतले माझे पैसे हरवले आहेत म्हणून?’ आजींनी विचारले.

‘मी ते खांबावरच्या चिठ्टीमध्ये वाचले.’ त्या माणसाने उत्तर दिले.

‘एकतर माझे पैसे मुळीच हरवेले नाहीत! दुसरे म्हणजे ती खांबावरची चिठ्ठी मी लिहीलेली नाही. कारण एकतर मला नीट दिसत नाही त्यामूळे मी घरातून बाहेर पडत नाही. तसेच मला लिहीता वाचता पण येत नाही. कोणीतरी खोडसाळपणाने ती चिठ्टी लिहीली आहे. हे तुझे 50 रुपये परत घेऊन जा!’ आजी म्हणाल्या.

‘नको आजी! राहुदे हे पैसे तुमच्याजवळ! तुम्हालाच ते उपयोगी पडतील!’ तो माणूस म्हणाला.

‘कमाल आहे! आत्तापर्यंत जो जो माणूस माझे हरवलेले 50 रुपये परत द्यायला आला त्याला मी पैसे परत घे म्हणून सांगीतले तर प्रत्येकाने हेच उत्तर दिले!’ आजीबाई म्हणाल्या

‘माझे एक काम करशील?’ आजीबाईंनी विचारले.

‘हो सांगाना! तुमचे काम नक्की करीन!’ त्या माणसाने उत्तर दिले.

‘अरे बाबा! जाताना ती खांबावरची चिठ्ठी फाडून टाक. लोकांना उगीच त्रास होतो आणि भुर्दंड बसतो. मी सगळ्यांनाच ती चिठ्ठी फाडून टाकायला सांगीतली. पण अजून कोणी ते काम केलेले दिसत नाही. बहुतकरून विसरले असावेत. निदान तू तरी ते काम करून टाक’ असे म्हणून त्याला धन्यवाद देत त्या आजींनी त्यांच्या झोपडीचे दार बंद केले.

परत जाताना त्या माणसाला त्या खांबावरची चिठ्ठी दिसली. ती चिठ्ठी फाडण्यासाठी म्हणुन तो त्या खांबाजवळ आला आणि थबकला.

त्याच्या लक्षात आले की त्या एका चिठ्ठीमूळे माणुसकीचा झरा वाहू लागला आहे. त्या चिठ्ठीमूळे अनेक लोकांची मदत त्या गरीब आजीबाईंना मिळाली आहे. आपले 50 रुपये गेले पण एका गरजू माणसाला मदत केल्याचा आनंद व समाधान आपल्याला मिळाले. असेच समाधान त्या 40 लोकांना पण मिळाले असेल. ही चिठ्ठी जर आपण फाडून टाकली तर माणुसकीचा झरा आटून जाईल. त्याला ती चिठ्ठी लिहिणार्याच माणसाचे कौतूक वाटले आणि तो चिठ्ठी न फाडताच तेथुन निघुन गेला.

‘माणुसकी नाही! माणुसकी नाही!’ अशी हाकाटी आपण मारत असतो. ‘हल्ली माणुसकी शिल्लक राहीली नाही! माणसाला माणसाची पर्वा किंवा किंमत राहिली नाही’ अशी बोंब ठोकत आपण सगळीकडे फिरत असतो. पण समाजात माणुसकीचे असे ‘सुप्त’ झरे नेहमीच वाहत असतात. फक्त आपल्याला ते दीसत नसतात. माणुसकीचे हे झरेच समाजाला व माणसाला जिवंत ठेवत असतात. असे झरे हेच समाजाच्या जिवंतपणाचे लक्षण असते.

तुम्हाला सुद्धा माणुसकीच्या अशा एखाद्या झर्यामध्ये सामील होण्याची संधी मिळाली तर ती जरूर घ्या. इतरांना मदत केल्यामूळे जो काही आनंद किंवा समाधान मिळते याचा जरूर अनुभव घ्या!

शिकार की शिकारी

 वाचा


शिकार कि शिकारी

.......................................

कोलकात्याची मोठी  आणि नामवंत सर्कस..
 दीड -दोनशे कलावंत आणि पन्नासेक जनावरं..
पन्नास जनावरांमध्ये दहा वाघ..

 लहानपणापासून सर्कशीत वाढलेली ..
कालांतराने सर्कस चालेनासी झाली..

कलावंतांना आणि जनावरांना पोसणे सर्कशीच्या मालकाला अशक्यप्राय बनले..
 शेवटी दहाही वाघांना बंगालच्या जंगलात नेऊन सोडण्याचे ठरल.े

 ठरल्याप्रमाणे दहाही वाघांना पिंज-यांत कोंडून ते पिंजरे ट्रकमध्ये ठेवून वाघांना जंगलात सोडण्यात आले..

आठव्या दिवशी समजले की दहापैकी सात वाघांची जंगली कुत्र्यांनी शिकार करुन त्यांना ठार मारले आहे..


जन्मभर सर्कशीत राहिलेल्या वाघांना पिंज-यात रोज आयते मुर्दाड मांस मिळत गेल्याने ते शिकार करायचे पार विसरुन गेलेले..

याऊलट जंगलात जन्मलेल्या कुत्र्यांना शिकार केल्याशिवाय आपण जगूच शकत नाही हे समजल्यामुळे ते उत्कृष्ट शिकारी बनले आणि त्यांनी स्वतःचे पोट भरण्यासाठी चक्क वाघांचीही शिकार केली.


आपलंही असंच आहे..

स्वतःच्या जगण्याचा आनंद न घेता आयुष्यभर वणवण फिरत रहायचं..

माझ्या मुलांना मी बंगला बांधणार,
जमीन जायदाद घेणार, धन दौलत, पैसा अडका सारं सारं जमवून ठेवणार...
माझ्या माघारी माझ्या मुलांना कशाचीही कमतरता भासली नाही पाहिजे.
मुलं आयुष्यभर आनंदात जगली पाहिजेत म्हणून किती हा आटापिटा??


खरे तर आपण आपल्या मुलांना सारं सारं आयतं देऊन त्यांना करण्यासाठी काही कामच ठेवत नाही..
म्हणजे एक प्रकारे आपण त्यांना सर्कशीतले वाघच बनवत नाही का??


या उलट ज्यांच्या घरी तीन वेळेच्या जेवणाची मारामार असते अशी गरीब आणि सर्वसाधारण घरची मुले स्वबळावर शिकतात ,
टिकतात आणि संसार उभा करतात..


ज्या प्रमाणे जंगली कुत्र्यांना शिकारीशिवाय आपण जगूच शकत नाही याची खात्री पटते आणि तो तरबेज शिकारी बनतो
अगदी त्याच प्रमाणे सर्व साधारण घरची मुलेही
 'जे करायचं ते मलाच'
असे म्हणून तन मन धन ओतून अपार कष्ट करुन स्वतःचे आयुष्य घडवतात.


आयतोबा मात्र कधी ना कधी कोणाची तरी शिकार बनतात..


संततीसाठी संपत्ती निर्माण करण्यापेक्षा संपत्ती निर्माण करणारी संतती निर्माण करा...


आपणच ठरवा , आपण आपल्या मुलांना शिकारी बनवायचे की शिकार बनवायचे...??


अखेरचा डाव घटना संकलित

अखेरचा डाव....सत्य घटना आहे....

बेल वाजली. तिनं दार उघडलं! धाप आवरत तो घरात आला. तिनं पटकन आत जाऊन पाण्याचा ग्लास आणला.

तो पाणी पित असतांना तिनं खुणेनंच चहा विषयी विचारलं! त्यानं होकारार्थी मान हलविली.

आता त्याची धापही थांबली! त्यानं शर्ट काढला. तिथंच खुर्चीवर टाकला. त्याच खुर्चीवर रेलून पाय लांबविले आणि 'ऐ मेरी जोहराजबी तुझे मालूम नही...' ची मस्त शीळ देत डोळे मिटले.

"चहा घेतोस नं!"

तिच्या हाकेनं तो भानावर आला. त्यानं कप घेतला आणि चहाचे घोट घेऊ लागला.

ती समोरच्या खुर्चीवर बसून चहा घेऊ लागली आणि त्याच्या 'हॅपी मूड' मुळे सुखावली.

आजारपणामुळे त्याचं हास्य विरलंय हे तिला माहित होतं, त्यामुळेच त्याचा आजचा मूड पाहून तिला बरं वाटलं.

न राहवून तिनं विचारलंच,

"आज एकदम मूड चेंज, काय भानगड?"

"छे, भानगड-बिनगड काहीही नाही! असंच! बरं, पटकन आवर. बाहेर जायचंय. किशोरीच्या कार्यक्रमाची दोन तिकिटं आणलीत!"

तिच्या परवानगीची वाट न पाहता तो उठून आवरू लागला!

क्षणभर तिला काही कळेचना. तिनंही झटपट आवरलं! त्याला आवडणारी गुलाबी रंगाची साडी नेसून ती तयार झाली.

दोघेही रस्त्यावर आले. नेहमीप्रमाणे तिची पावलं बसस्टॉपकडे वळली, तोच "टॅक्सी" या त्याच्या हाकाऱ्याने ती उडालीच.

आज टॅक्सी!!!

दोघे टॅक्सीत बसले! तिला आज तो नेहमीपेक्षा वेगळा-वेगळा भासला! आज त्याचा मूड एकदम कसा काय बदलला?

थिएटरच्या गेटसमोर टॅक्सी उभी राहिली आणि तिची विचारांची श्रृंखला खंडित झाली.

त्यानं टॅक्सीवाल्याला पैसे दिले. तिच्या हातात कार्यक्रमाची तिकिटे देऊन तिला पुढे जाण्यास सांगितले.

तिकिटं घेऊन ती अँफी थिएटरच्या पाठीमागील बाजूस गेली. समोर उभ्या स्वयंसेवकाच्या हातात तिकिटं दिली.

"जरा तिकडे बघतेस...!" असं म्हणून त्यानं तिच्या केसांत मोगऱ्याचा गजरा माळला.

अपूर्वाईने मोहरलेल्या तिच्या श्‍वासांत मोगऱ्याचा गंध काठोकाठ भरला! ती त्याच्या चेहऱ्याकडे एकटक पाहू लागली.

तिची नजर चुकवत तो कार्यक्रम सुरू होण्याची वाट पाहू लागला!

तबलजीने तबला ठीक केला, तानपुऱ्यावरील मुलीनं तारांना ताण दिला. सतारीचे स्वर ठीक केले गेले आणि त्याच वेळी किशोरी मंचावर आल्या...

स्वरांच्या एकेक लडी उलगडल्या आणि मैफलीत रंग भरू लागला.

'जाईन विचारीत रानफुला...' किशोरींनी सुरू केलं आणि... वाह वाह च्या उत्स्फूर्त प्रतक्रिया उमटल्या!

त्यानंही तशीच दाद दिली. तल्लीन होऊन किशोरी ऐकत असताना त्यानं तिचा हात हातात घेतला आणि त्याच्या स्पर्शाचं गाणं तिच्याभोवती फेर धरून नाचू लागलं!

ती गाणं विसरली. भूतकाळात गेली. पाच वर्षांपूर्वी अखेरच्या स्टेजच्या कॅन्सरशी झगडत असताना 'तो' आयुष्यात आला!

घरातील सर्वांनी जेव्हा आपल्याला दूर लोटलं तेव्हा त्याने आधार दिला. जगण्याची उमेद जागवली. वर्षभर सेवा केली! मरण लांबवलं! सहवासानं ओढ वाढली!

एक दिवस चहाला म्हणून रेस्टॉरंट मध्ये गेलो, तेथे लग्नाविषयी विचारलं! स्वतःविषयी सांगितलं! दोन मुलं अमेरिकेत! त्यांना बापाची गरज नाही. नातवंडांसाठी आजोबा अनोळखी. पत्नी दहा वर्षांपूर्वीच गेली! घरी एकटाच राहतो. कॅन्सरग्रस्तांच्या रुग्णालयात सेवाभावी वृत्तीनं काम करतो आणि आता आधाराची गरज आहे.
"नाही म्हणूच शकले नाही!'

सहजीवन नव्याने सुरू झालं. सुखाचे दिवस आल्याचं वाटत असतांना 'त्याला'ही ब्रेन ट्यूमर असल्याचं समजलं आणि आशेच्या पालवीने नव्याने फुललेल्या झाडाला दुःखाची वाळवी लागली!

गेले वर्षभर दोघेही एकमेकांच्या आधाराने जगत अखेरच्या दिवसाची वाट पाहत असतांना... आज अचानक ???

टाळ्यांचा गजर झाला आणि तिची विचारमालिका भंगली.

दोघेही उठले... बाहेर आले...

त्यांच्या आवडीच्या रेस्टॉरंटमध्ये जेवले! तेथून बाहेर पडले आणि चालत चालत नदीकाठी आले.

नेहमीप्रमाणे अनेक जोड्या बसलेल्या.

दोघेही एका ठिकाणी बसले... बराच वेळ कोणीच काही बोलले नाही!

पाण्यावर उमटणाऱ्या तरंगावर चांदणं प्रकाशाचा खेळ रंगलेला....

तिनं मौनाला बोलतं केलं!

"काय विशेष? स्वारी आज एकदम वेगळ्या मूडमध्ये... घरात शीळ घालून गाणं काय?, येताना टॅक्सी, मग 'किशोरी' तीही पहिल्या रांगेत बसून, गजरा, रेस्टॉरंट आणि आता इथे... काय दोघांच्या मरणाची तारीख समजली की काय?"

तो काहीच बोलला नाही! फक्त नदी कडे पाहत राहिला!

"बोल ना काही तरी! नाही तर जाऊ या घरी..." म्हणून ती उठू लागली!

आता त्याचं मौन सुटलं! तो आश्वासक हसला!

"हसतोस काय? आपण अवघ्या काही दिवसांचे पाहुणे आहोत हे विसरलास की काय?"

"काहीही विसरलो नाही!" असं म्हणत त्यानं शर्टाच्या आतून छानसा गुलाब आणि एक पाकीट काढलं आणि तिच्या हाती दिलं, म्हणाला,

"हॅपी व्हॅलेंटाईन...!!!'

आता तिला दिवसभराच्या त्याच्या वागण्याचा अर्थ उमगला! तिचे डोळे भरले! जाता जाताही तो आपल्याला आनंदाचे क्षण देतोच आहे!

तिच्या तोंडून हुंदका बाहेर पडला!

बराच वेळ रडल्यानंतर तिनं डोळे पुसले आणि पाकीट फोडून पाहिले.

"कसली तिकिटं आहेत?"

"पुढच्या आठवड्यात आपण दोघेही लंडनला जातोय!"

"कशाला?"

"दोघांवरही शस्त्रक्रिया करायची आहे. दोघांचेही कॅन्सर शेवटच्या स्टेजला असले तरी होप्स आहेत! मग निदान जाता जाता दोघांसाठी एक डाव खेळून बघायला काय हरकत आहे? त्याचीच ही गिफ्ट! हॅपी व्हॅलेंटाईन!"

त्यानंतर दोघे कितीतरी वेळ भविष्याविषयी बोलत राहिले...

जीवन सुंदर आहे!
एकदाच मिळतं.

घ्या की जगून...

देव आहेच
बाकीचं बघायला...!!!

स्त्रीचा पदर माहिती संकलन

🍀🌾 स्त्रिचा पदर 🌾🍀

🍁  पदर  काय  जादुई  शब्द  आहे
               हो  मराठीतला !

काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही, अनुस्वार  नाही.  एक  सरळ  तीन
             अक्षरी  शब्द.

             पण  केवढं  विश्‍व
      सामावलेलं  आहे त्यात....!!

     किती  अर्थ,  किती  महत्त्व...
     काय  आहे  हा  पदर.......?

साडी नेसणाऱ्या  स्त्रीच्या  खाद्यावर
रुळणारा  मीटर  दीड मीटर  लांबीचा
भाग.......!!
तो   स्त्रीच्या   लज्जेचं   रक्षण   तर
करतोच,   सगळ्यात   महत्त्वाचं  हे
कामच   त्याचं.   पण,   आणखी   ही
 बरीच  कर्तव्यं  पार  पाडत  असतो.

 या   पदराचा   उपयोग  स्त्री  केव्हा,
    कसा  अन्‌  कशासाठी  करेल,
        ते  सांगताच  येत  नाही.

सौंदर्य   खुलवण्यासाठी   सुंदरसा
पदर   असलेली    साडी   निवडते. सण-समारंभात   तर   छान-छान
पदरांची   जणू   स्पर्धाच   लागलेली
असते.  सगळ्या  जणींमध्ये  चर्चाही
 तीच. .....!!

लहान  मूल  आणि   आईचा  पदर,
हे   अजब  नातं  आहे.  मूल  तान्हं
असताना   आईच्या   पदराखाली
जाऊन  अमृत   प्राशन  करण्याचा
 हक्क   बजावतं. .....!!

जरा  मोठं  झालं,  वरण-भात  खाऊ
 लागलं,  की  त्याचं  तोंड  पुसायला
आई  पटकन  तिचा  पदर  पुढे  करते
....

मूल   अजून   मोठं   झालं,   शाळेत
 जाऊ  लागलं,  की  रस्त्यानं  चाल-
ताना  आईच्या  पदराचाच  आधार लागतो.   एवढंच   काय,   जेवण
  झाल्यावर  हात  धुतला, की  टाॅवेल
ऐवजी  आईचा  पदरच  शोधतं आणि  आईलाही  या  गोष्टी   हव्याहव्याशा
वाटतात  मुलानं  पदराला  नाक  जरी
पुसलं,  तरी  ती  रागावत  नाही ...

त्याला  बाबा  जर रागावले, ओरडले
तर मुलांना पटकन  लपायला आईचा पदरच  सापडतो.....!!

महाराष्ट्रात  तो  डाव्या  खांद्या  वरून
 मागे   सोडला  जातो.....!!

तर  गुजरात,  मध्य प्रदेशात  उजव्या
 खांद्यावरून       पुढं     मोराच्या.
 पिसाऱ्यासारखा   फुलतो ....!!

काही   कुटुंबात   मोठ्या   माणसांचा
 मान  राखण्यासाठी   सुना  पदरानं
चेहरा  झाकून  घेतात ..
 तर  काही  जणी  आपला   लटका ,
राग     दर्शवण्यासाठी     मोठ्या
फणकाऱ्यानं   पदरच   झटकतात !

     सौभाग्यवतीची  ओटी  भरायची
ती  पदरातच  अन्‌  संक्रांतीचं   वाण
 लुटायचं   ते  पदर   लावूनच.

बाहेर   जाताना   उन्हाची   दाहकता
थांबवण्यासाठी  पदरच  डोक्यावर
ओढला  जातो,  तर  थंडीत  अंगभर
पदर   लपेटल्यावरच   छान   ऊब
मिळते....!!

काही   गोष्टी   लक्षात   ठेवण्यासाठी
पदरालाच   गाठ   बांधली   जाते .
अन्‌   नव्या   नवरीच्या   जन्माची
गाठ   ही   नवरीच्या   पदरालाच,
नवरदेवाच्या   उपरण्यासोबतच
बांधली   जाते.....!!

पदर   हा   शब्द   किती   अर्थांनी
           वापरला  जातो  ना.....?

नवी नवरी   नवऱ्याशी   बोलताना
पदराशी  चाळे  करते, पण संसाराचा
संसाराचा  राडा  दिसला,  की  पदर
कमरेला   खोचून   कामाला   लागते

देवापुढं आपण चुका कबूल  करताना म्हणतोच  ना .....?
माझ्या   चुका  " पदरात "  घे.‘

मुलगी मोठी  झाली,  की  आई  तिला
साडी   नेसायला   शिकवते,  पदर
सावरायला   शिकवते   अन्‌   काय
 म्हणते  अगं,  चालताना  तू  पडलीस
 तरी  चालेल. ....!!

पण,   " पदर "  पडू   देऊ   नकोस !
अशी  आपली  भारतीय  संस्कृती.

 अहो  अशा  सुसंस्कृत आणि सभ्य
मुलींचा   विनयभंग  तर  दुरच्  , ती रस्त्यावरून     चालताना     लोकं तिच्याकडे   वर  नजर  करून  साधे पाहणारही   नाहीत   उलटे   तिला  वाट  देण्यासाठी  बाजुला सरकतील एवढी  ताकत  असते  त्या  "पदरात" ....... !!


मराठी महिने गीत

चैत्र नेसतो सतरा साड्या
वैशाख ओढतो व-हाडाच्या गाड्या
ज्येष्ठ बसतो पेरित शेती
आषाढ धरतो छत्री वरती
श्रावण लोळे गवतावरती
भाद्रपद गातो गणेश महती
आश्विन कापतो आडवे भात
कार्तिक बसतो दिवाळी खात
मार्गशीर्ष घालतो शेकोटीत लाकडे
पौषाच्या अंगात उबदार कपडे
माघ करतो झाडी गोळा
फाल्गुन फिरतो जत्रा सोळा
वर्षाचे महिने असतात बारा
प्रत्येकाची न्यारीच त-हा।।

भावीपिढीला हिंदू महिने शिकवण्यासाठी एक मस्त गीत.
😉

कथा संकलन १२१

चिमणीचे सगळे काम आटोपले, ती जरा निवांत झाली आणि तेव्हा तिच्या लक्षात आलं की अरेच्च्या! आपण अजून कावळ्यासाठी  दारच उघडलेलं नाही. तिला विलक्षण अपराधी वाटलं. तिनं बंद दारामागचा कानोसा घेतला. दाराबाहेर शांतता होती. ती शांतता चिमणीला असह्य झाली. तिनं तत्परतेनं दार उघडलं. दाराबाहेर कावळा नव्हता. तिने आजू बाजूला फिरून पाहिलं, कावळा कुठेही नव्हता. 'गेला असेल कुठेतरी... येईल परत' …. तिने स्वत:च्या मनाची समजूत काढली. मात्र, रात्र मावळली... दिवस उगवला, संध्याकाळ झाली आणि परत रात्र आली तरी कावळ्याचा काही पत्ताच नव्हता. चिमणीचं मन आज कशातच रमेना … बाळाला न्हाऊ घालण्यातही नाही आणि बाळाला गंध-पावडर करण्यातही नाही … कारण एव्हाना तिला सवय झाली होती …. कावळ्याने बंद दारावर केलेल्या टकटकीची …… तो आवाज असा काही कानात साठला होता की दिवसातून अनेक वेळा तिने दारावर टकटक झालीय असं समजून दार उघडलं होतं आणि बाहेर कोणी नाही हे पाहून निराशेने बंद केलं होतं... अनेक दिवस उलटली.... चिमणीच्या मनातून काही कावळा जाईना. मग तिने कावळ्याचा शोध घ्यायचाच असं ठरवून घरट्याबाहेर पाऊल ठेवलं. मजल दरमजल करत फिरताना थकून एका झाडाच्या फांदीवर विश्रांती घेण्यासाठी ती थांबली. एवढ्यात त्याच झाडाच्या दुसऱ्या फांदीवरून  चिरपरिचित आवाज तिच्या कानावर पडला... तो 'कावळ्याचा'  आवाज होता. तो आवाज ऐकून चिमणीला कोण आनंद झाला. सारा थकवा, सारा शीण कुठल्या कुठे पळाला. तिने मोठ्या उत्साहाने त्या फांदीच्या दिशेने झेप घेतली. पहाते तर काय! कावळा आपल्या घरट्यात आपल्या पिल्लांसोबत आनंदाने मौज मस्ती करत होता. कावळ्याचं लक्ष चिमणीकडे गेलं. चिमणीला पाहून त्याला फार आनंद झाला. तो आनंदाने म्हणाला, 'या या चिमणाबाई. तुमचं स्वागत आहे आमच्या घरट्यात. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. बोला, काय करू तुमच्यासाठी?' कावळ्याचं ते अगत्य पाहून चिमणी खूप ओशाळली. म्हणाली,
- 'तुला राग नाही आला माझा?'
- का यावा?
- मी माझ्यात विश्वात गुंग होते म्हणून?
- छे छे! प्रत्येकाचं आपलं असं स्वतंत्र विश्व असतं.. जसं तुझं होतं. तुला त्यात माझी गरज कधीच नव्हती रादर माझी ती गरज होती म्हणून मी तुझ्या दाराशी आलो. पण नंतर मला माझी चूक कळली. माझी गरज भागवण्यासाठी तू तुझ्या विश्वातून बाहेर येउन मला साथ देणं किंवा तुझ्या विश्वात मला प्रवेश देणं या दोनीही गोष्टी 'अतिक्रमणा सारख्याच' घडल्या असत्या नाही का? आणि कुणाच्याही वस्तूवर, अधिकारावर, भावविश्वावर 'अतिक्रमण' करण चूकच नाही का? म्हणून मग मी स्वत:च वजा व्हायचं ठरवलं आणि निघालो एकटाच …. तुझ्या विश्वापासून दूर.
- मला एकट करून? अरे, मला सवय झालीय आता तुझी.
- चिमणाबाई, या जगात एकट कोणीच नसतं. जेव्हा आपण एकट आहोत असं वाटतं ना तेव्हा तो एकांतच असतो आपला सोबती जो दाखवत असतो आपल्याला वाट आयुष्यातल्या पुढच्या प्रवासाची . मलाही दाखवली त्याने आणि बघ ……. आज मी किती आनंदी आहे … माझ्या 'घरट्यात'… माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या 'माझ्या  माणसांमध्ये'
चिमणी नि:शब्द होऊन तिथून निघाली तेव्हा कावळा तिला एवढंच म्हणाला -
- चिमणाबाई, माझ्या घरट्यात तू केव्हाही येऊ शकतेस हो. तुझी टकटक ऐकून मी लगेच दार उघडेल … क्षणाचाही विलंब न करता.
चिमणीचे डोळे पाणावले... भरल्या कंठाने निरोप घेऊन तिने परतीची झेप घेतली आपल्या घरट्याकडे... पण आज तिच्या पंखात पूर्वीइतक बळ राहिलं नव्हतं....

 आपल्या सगळ्यांचीच अवस्था ना थोड्याफार प्रमाणात त्या चिमणाबाई सारखी झालीय.
- म्हणजे ?
- म्हणजे कुणीतरी आपलं  माणूस आर्तपणे आपल्याला साद घालतंय हे आपल्या गावीच नसतं अगं. ह्या आपल्या माणसांमध्ये भाऊ, बहिण, मित्र, आई, वडील बऱ्याचदा पोटची मुलंही असू शकतात... त्यांची आर्त साद आपल्याला ऐकूच येत नाही …. म्हणजे ते पोटतिडकीने साद घालतात आणि आपण म्हणतो …'थांब मला जर करिअर करुदे.... थांब जरा मला आता घर घ्यायचय... थांब जरा मला आता कार घ्यायचीय … थांब जरा मला आता ….' आणि मग ही जंत्री वाढतच जाते.
त्यांची सहन शक्ती संपते … ते त्यांचं वेगळं विश्व तयार करतात... त्या विश्वात आपल्याला स्थान नसतं... आपल्या ते गावीही नसतं आणि जेव्हा येतं तेव्हा …. आपण फार एकटे झालेले असतो.... !!
- आणि असं होऊ नये असं वाटत असेल तर?
- वेळीच 'टकटक ' ऐकायला शिका

शुभेच्छा मकर संक्रांतीचा

*तिळगुळ घ्या गोड गोड बोला 🌹🌹*

*मराठी अस्मिता, मराठी मन,*
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!

  *साजरे करु मकर संक्रमण*
करुण संकटावर मात
हास्याचे हलवे फुटुन
तिळगुळांची करु खैरात…
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!
         *नाते तुमचे आमचे*
 हळुवार जपायचे…
तिळगुळ हलव्यासंगे
अधिक दॄढ करायचे….
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!
🌹🌹🌹🌹💐💐🌹🌹🌹🌹
*मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा............*
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

गंंमतीशीर ट्रिक

*एक गंमतीशीर Trick एका वाक्यात महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्याची नावे लक्षात ठेवण्यासाठी.*

अग कमल उठ पाय धु , रस ,भजॆ ,चहा बनव.

अ:- अकोला, अमरावती,औरंगाबाद,अहमदनगर
ग:-गङचिरोलि, गोंदिया
क:- कोल्हापूर
म:- मुंबई
ल:- लातूर
उ:- उस्मानाबाद
ठ:- ठाणे
प:- पालघर, पुणे, परभणी
य:- यवतमाळ
धु :- धुळे
र:- रायगड, रत्नागिरी
स:- सांगलि, सातारा, सोलापूर, सिंधुदूर्ग
भ:- भंङारा
ज:- जळगाव, जालना
च:- चंद्रपूर
ह:- हिंगोली
ब:- बिड, बुलढाणा
न:- नांदेड, नागपूर, नाशिक,नंदुरबाद
व:- वर्धा, वाशिम

माझी शाळा माझे उपक्रम

⛳🌻🌷🌻🌷🌻🌷⛳
*🌹जन्मोत्सव व सत्कार सोहळा🌹*
*जि. प. उच्च प्राथ. शाळा वाटेगाव येथे स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून व राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली*.

     🌼याप्रसंगी  *शा.व्य.स.चे अध्यक्ष महोदय मा.श्री दिलिपराव जाधव तर केंद्राचे कें प्र.मा.श्री पी.वाय.जाधव साहेब व शाळेचे श्री मा.चव्हाण  सर (मु अ) यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले*.


    🌼याप्रसंगी  *लेक वाचवा लेक शिकवा*  या अभियाना अंतर्गत व जिल्ह्यातुन विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक शाळेचा आला असल्यामुळे शाळेतील  उल्लेखनीय कार्य करणाऱ्या *विद्यार्थ्यांचा तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य वाटेगाव मधील आम्ही  सर्व शिक्षकवृंद करीत असल्यामुळे शा.व्य.समिती चे मा.अध्यक्ष व मा.केंद्र प्रमुख साहेब,  मा.मु.अ.यांच्या कडून *शिक्षकवृंदाचा*सत्कार व बक्षिस वितरण सोहळा कार्यक्रम  घेण्यात आला.
👉 त्यानंतर 🎤 विद्यार्थ्यांची भाषणे व🎤 गीते झाली.
राजमाता जिजाऊ च्या जीवनचरित्रावर माहिती श्रीमती सेनकुडे मँडमनी , झाडे मँडमनी विद्यार्थ्याना सांगितली.

    🎤कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार *कु.प्रणाली नरवाडे (सातवी)* हीने केले.याप्रसंगीचे काही क्षणचिञे👇👇👇👇
*====================*
  ✏वृत्त लेखन
📝 *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे. (स. शि.)*
जि .प .उच्च प्राथ शाळा वाटेगाव
ता. हदगाव जी.नांदेड .
🌺♻🌺♻🌺♻🌺♻

स्वामी विवेकानंद की जीवन माहिती

*स्वामी विवेकानंद की प्रेरक जीवनी* – Swami Vivekananda Biography In Hindi

पूरा नाम    –  नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त
जन्म        – 12 जनवरी 1863
जन्मस्थान – कलकत्ता (पं. बंगाल)
पिता        – विश्वनाथ दत्त
माता        – भुवनेश्वरी देवी
शिक्षा       – 1884 मे बी. ए. परीक्षा उत्तीर्ण
विवाह      –  विवाह नहीं किया.

स्वामी विवेकानंद जन्मनाम नरेंद्र नाथ दत्त भारतीय हिंदु सन्यासी और 19 वी शताब्दी के संत रामकृष्ण के मुख्य शिष्य थे। भारत का आध्यात्मिकता से परिपूर्ण दर्शन विदेशो में स्वामी विवेकानंद की वक्तृता के कारण ही पहोचा। भारत में हिंदु धर्म को बढ़ाने में उनकी मुख्य भूमिका रही और भारत को औपनिवेशक बनाने में उनका मुख्य सहयोग रहा। विवेकानंद ने रामकृष्ण मठ और रामकृष्ण मिशन की स्थापना की, जो आज भी भारत में सफलता पूर्वक चल रहा है। उन्हें प्रमुख रूप से उनके भाषण की शुरुवात “मेरे अमेरिकी भाइयो और बहनों” के साथ करने के लिए जाना जाता है। जो शिकागो विश्व धर्म सम्मलेन में उन्होंने ने हिंदु धर्म की पहचान कराते हुए कहे थे।

उनका जन्म कलकत्ता के बंगाली कायस्थ परिवार में हुआ था। स्वामीजी का ध्यान बचपन से ही आध्यात्मिकता की और था। उनके गुरु रामकृष्ण का उनपर सबसे ज्यादा प्रभाव पड़ा, जिनसे उन्होंने जीवन जीने का सही उद्देश जाना, स्वयम की आत्मा को जाना और भगवान की सही परिभाषा को जानकर उनकी सेवा की और सतत अपने दिमाग को को भगवान के ध्यान में लगाये रखा। रामकृष्ण की मृत्यु के पश्च्यात, विवेकानंद ने विस्तृत रूप से भारतीय उपमहाद्वीप की यात्रा की और ब्रिटिश कालीन भारत में लोगो की परिस्थितियों को जाना, उसे समझा। बाद में उन्होंने यूनाइटेड स्टेट की यात्रा जहा उन्होंने 1893 में विश्व धर्म सम्मलेन में भारतीयों के हिंदु धर्म का प्रतिनिधित्व किया। विवेकानंद ने यूरोप, इंग्लैंड और यूनाइटेड स्टेट में हिंदु शास्त्र की 100 से भी अधिक सामाजिक और वैयक्तिक क्लासेस ली और भाषण भी दिए। भारत में विवेकानंद एक देशभक्त संत के नाम से जाने जाते है और उनका जन्मदिन राष्ट्रिय युवा दिन के रूप में मनाया जाता है।

प्रारंभिक जीवन, जन्म और बचपन – Swami Vivekananda Life History

Swami Vivekananda का जन्म नरेन्द्रनाथ दत्ता (नरेंद्र, नरेन्) के नाम से 12 जनवरी 1863 को मकर संक्रांति के समय उनके पैतृक घर कलकत्ता के गौरमोहन मुखर्जी स्ट्रीट में हुआ, जो ब्रिटिशकालीन भारत की राजधानी थी। उनका परिवार एक पारंपरिक कायस्थ परिवार था, विवेकानंद के 9 भाई-बहन थे। उनके पिता, विश्वनाथ दत्ता, कलकत्ता हाई कोर्ट के वकील थे। दुर्गाचरण दत्ता जो नरेन्द्र के दादा थे, वे संस्कृत और पारसी के विद्वान थे जिन्होंने 25 साल की उम्र में अपना परिवार और घर छोड़कर एक सन्यासी का जीवन स्वीकार कर लिया था। उनकी माता, भुवनेश्वरी देवी एक देवभक्त गृहिणी थी। स्वामीजी के माता और पिता के अच्छे संस्कारो और अच्छी परवरिश के कारण स्वामीजी के जीवन को एक अच्छा आकार और एक उच्चकोटि की सोच मिली।

loading...
युवा दिनों से ही उनमे आध्यात्मिकता के क्षेत्र में रूचि थी, वे हमेशा भगवान की तस्वीरों जैसे शिव, राम और सीता के सामने ध्यान लगाकर साधना करते थे। साधुओ और सन्यासियों की बाते उन्हें हमेशा प्रेरित करती रही। नरेंद्र बचपन से ही बहोत शरारती और कुशल बालक थे, उनके माता पिता को कई बार उन्हें सँभालने और समझने में परेशानी होती थी। उनकी माता हमेशा कहती थी की, “मैंने शिवजी से एक पुत्र की प्रार्थना की थी, और उन्होंने तो मुझे एक शैतान ही दे दिया”।

पढ़े :- स्वामी विवेकानंद के जीवन के 11 प्रेरणादायक संदेश

शिक्षा – Swami Vivekananda Education

1871 में, 8 साल की आयु में Swami Vivekananda को ईश्वर चन्द्र विद्यासागर मेट्रोपोलिटन इंस्टिट्यूट में डाला गया, 1877 में जब उनका परिवार रायपुर स्थापित हुआ तब तक नरेंद्र ने उस स्कूल से शिक्षा ग्रहण की। 1879 में, उनके परिवार के कलकत्ता वापिस आ जाने के बाद प्रेसीडेंसी कॉलेज की एंट्रेंस परीक्षा में फर्स्ट डिवीज़न लाने वाले वे पहले विद्यार्थी बने। वे विभिन्न विषयो जैसे दर्शन शास्त्र, धर्म, इतिहास, सामाजिक विज्ञानं, कला और साहित्य के उत्सुक पाठक थे। हिंदु धर्मग्रंथो में भी उनकी बहोत रूचि थी जैसे वेद, उपनिषद, भगवत गीता, रामायण, महाभारत और पुराण। नरेंद्र भारतीय पारंपरिक संगीत में निपुण थे, और हमेशा शारीरिक योग, खेल और सभी गतिविधियों में सहभागी होते थे।

नरेंद्र ने पश्चिमी तर्क, पश्चिमी जीवन और यूरोपियन इतिहास की भी पढाई जनरल असेंबली इंस्टिट्यूट से कर रखी थी। 1881 में, उन्होंने ललित कला की परीक्षा पास की, और 1884 में कला स्नातक की डिग्री पूरी की।

कथा क्रमांक १२०



अभ्यासकथा भाग १२०

       आरसा!

*एक गुरूंच्‍या घरी एक शिष्‍य मनोभावे गुरुंची सेवा करून शिक्षण घेत होता. त्‍याच्‍या या सेवेमुळे गुरु त्‍याच्‍यावर प्रसन्न होते. शिक्षण् पूर्ण झाल्‍यावर विद्यार्थी घरी जाण्‍यासाठी निघाला तेव्‍हा गुरुंकडे त्‍याने जाण्‍याची आज्ञा मागितली तेव्‍हा गुरुंनी त्‍याला आशीर्वाद म्‍हणून एक आरसा भेट दिला व सांगितले की, हा दिव्‍य आरसा (दर्पण) असून यात मानवी मनात चालणारे विचार प्रगट होऊन दिसतात. विद्यार्थी मोठा आनंदीत झाला. हा आरसा खरेच कार्य करतो की नाही याची शहानिशा करण्‍यासाठी त्‍याने लगेच आपल्‍या गुरुंसमोर हा आरसा धरला व गुरुंच्‍या मनात कोणते भाव आहेत, दुर्गुण आहेत हे पाहू लागला आणि गुरुंच्‍या समोर आरसा धरताच त्‍याच्‍या चेह-यावरचा रंग पार उडाला कारण तो आरसा गुरुंच्‍या अंतकरणात मोह, अहंकार, क्रोध आदि विकार दाखवित होता. त्‍याला याचे फारच दु:ख झाले की आपण ज्‍या गुरुची मनोभावे पूजा केली, ज्‍यांना पूर्ण ईश्र्वराचा दर्जा दिला त्‍यांच्‍या मनातही विकार आहेत, ते सुद्धा मानवी विकारापासून अजून सुटलेले नाहीत याचे त्‍याला वैषम्‍य वाटले. तो गुरुंना काहीच न बोलता तो आरसा घेवून गुरुकुलातून निघाला, रस्‍त्‍यात भेटणा-या प्रत्‍येकाच्‍या मनातील भाव पाहणे हे त्‍याचे कामच झाले होते. गावी परत जाताच त्‍याने आपल्‍या प्रत्‍येक परिचिताबरोबर हा प्रयोग करून पाहिला. त्‍याला प्रत्‍येकाच्‍या हृदयात कोणता ना कोणता दुर्गुण दिसून आला. शेवट त्‍याने आपल्‍या जन्‍मदात्‍या आई वडीलांच्‍या समोरही हा आरसा ठेवला. ते दोघेही पण त्‍यातून सुटले नाहीत. त्‍यांच्‍या हृदयात पण त्‍याला काही ना काही दुर्गुण दिसले. शेवटी या गोष्‍टीचा त्‍याला मनोमन राग आला व तो गुरुकुलातील गुरुंकडे धावला. गुरुंपाशी जाऊन मोठ्या विनम्रपणे तो म्‍हणाला,’’ गुरुदेव, मी आपण दिलेल्‍या या आरशातून प्रत्‍येकाच्‍या मनात, हृदयात, अंत:करणात डोकावून पाहिले आणि मला असे जाणवले की प्रत्‍येकाच्‍याच मनात काही ना काही विकार आहेच, काही ना काही दोष आहे. एखाद्याच्‍या मनात कमी तर कुणाच्‍या मनात जास्‍त असे विकार, दोष भरून राहिले आहेत. हे पाहून मी फार दु:खी झालो आहे, कृपया मला मार्गदर्शन करा.’’ गुरुंनी काहीच न बोलता तो आरसा फक्त त्‍याच्‍याकडे केला आणि काय आश्र्चर्य त्‍याला त्‍याच्‍या मनाच्‍या प्रत्‍येक कोप-यात राग, द्वेष, अहंकार, क्रोध, माया आदि दुर्गुण भरून राहिलेले दिसले. गुरुजी म्‍हणाले,’’ वत्‍सा, हा आरसा मी तुला तुझे दुर्गुण पाहून ते कमी करण्‍यासाठी दिला होता पण तू दुस-यांचे दुर्गुण पाहत बसलास आणि नको तितका वेळ खर्च केलास, अरे याच कालात जर तू जर स्‍वत:चे अवलोकन केले असते तर तुला तुझ्यातील दुर्गुण सुधारता आले असते. याच काळात तु एक असामान्‍य व्‍यक्ती झाला असता. मानवाची ही कमतरता आहे, कमजोरी आहे की तो दुस-यातील दुर्गुण पाहत बसतो आणि स्‍वत:ला सुधारण्‍याचा प्रयत्‍नही करत नाही. हेच या आरशातून मला तुला शिकवायचे होते. जे तुला शिकता आले नाही.’’*

*तात्‍पर्य – आपण नेहमीच दुस-या व्‍यक्तीचे दुर्गुण बघतो, त्‍यावर टीका करतो पण आपल्‍यातील दुर्गुणांवर आपले कधीच लक्ष जात नाही

कथा क्रमांक ११९

अभ्यासकथा भाग क्रमांक ११७.
सदाचार
सदाचारी असेल तरचं लक्ष्मी, दान यांचा वास असतो

महाभारतकालीन राजा सत्यदेव एक दिवस सकाळी उठले, तर त्यांना एक सुंदर स्त्री राजवाड्यातून बाहेर पडताना दिसली. राजाने आश्‍चर्यचकित होऊन त्या स्त्रीला हात जोडून नम्रपणे विचारले, ‘आपण कोण आहात ?’ त्यावर त्या स्त्रीने सांगितले, ‘मी लक्ष्मी आहे, आता या राजवाड्यातून मी जात आहे.’ तेव्हा राजाने तिला सांगितले, ‘तू जाऊ शकतेस.’ लक्ष्मी बाहेर पडली. नंतर लक्ष्मीच्या पाठोपाठ एका सुंदर पुरुषाला राजवाड्याबाहेर पडताना पाहून राजाने त्यालाही विचारले, ‘आपण कोण आहात ?’ त्याने उत्तर दिले, ‘माझे नाव ‘दान’ आहे. लक्ष्मी बाहेर गेल्यानंतर आपण दान करू शकणार नाही; म्हणून मीही तिच्यासह जात आहे.’ राजाने सांगितले ‘आपणसुद्धा राजवाडा सोडून जाऊ शकता.’ त्यानंतर त्याच्या पाठोपाठ तिसरा पुरुष ‘यश’ निघून गेला. त्यानंतर चौथा पुरुष प्रकट झाला अन् बाहेर पडू लागला. तेव्हा राजाने त्यालाही हात जोडून नम्रपणे त्याचे नाव विचारले. तो पुरुष म्हणाला, माझे नाव ‘सदाचार ! राजाने त्याला म्हटले, ‘मी तर तुझा कधीच त्याग केला नाही. तू मला सोडून का जात आहेस ? तुझ्यासाठीच मी लक्ष्मी, दान आदींचा त्याग केला आहे. मी तुला जाऊ देणार नाही. तू मला सोडून गेलास, तर माझे सर्वस्व जाईल !’ राजाचे हे बोल ऐकून सदाचार राजवाड्यातच थांबला. सदाचार बाहेर पडला नाही, हे पाहून बाहेर गेलेली लक्ष्मी, दान आणि यशही परत आले.

तात्पर्य :- सदाचाराने वागणे हेच आयुष्याचे सर्वस्व आहे. जीवनात सदाचार (नीतीमत्ता, धर्माचरण आदी) नसेल, तर दान, लक्ष्मी (श्रीमंती) आदींचा काहीच उपयोग नाही.

जीवन विचार

🔰🌸🔰🌸🔰🌸🔰🌸
*🌷🌷 जीवन विचार*🌷🌷
〰〰〰〰〰〰〰
*आदर्श माता  जिजाऊ जन्मदिन*

 *आणि भारतमातेचा आदर्श पुत्र स्वामी विवेकानंद जयंती*
*निमित्त विनम्र अभिवादन*
🙏💐💐💐💐💐🙏
*राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब*
 *आपल्या विचारांवर दुढविश्वास,अथक् प्रयत्नांची तयारी,क्रांतिकारक विचारांची कास,असामान्य धैर्य,सत्याची कास,उच्च कोटीची नीतीमत्ता....या मातेच्या जडणघडणीतील किती गुणसंपदा एक आदर्श स्त्री* , *एक आदर्श राजमाता !*
*🙏जय जिजाऊ जय शिवराय*🙏⛳🚩🚩🚩🚩

📚 📚🙏 *स्वामी विवेकानंद*
*'बाह्य जगाचे ज्ञान करून घेतल्याने धर्मज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही ; परंतु अंतर्मनाला अंतःकरणाला जाणून घेतल्याने ती होत असते.*
〰〰〰〰〰〰〰〰
🌺🌸🌺🌸

जीवन विचार

🌹 *शर्यतीत  पळणाऱ्या घोड्याला " विजय " काय असतो हे माहितीही नसतं.....  त्यावर बसलेल्या माणसाने दिलेल्या यातनांमुळे,
तो जिवाच्या आकांताने पळत असतो.*

*जेवढ्या यातना जास्त तेवढा घोड्याचा वेग जास्त.....आणि विजय पक्का.*

*त्याप्रमाणे तुमच्या जीवनात जेवढ्या अडचणी,
आणि जेवढ्या यातना जास्त तेवढाच तुमचा विजय पक्का......!!!!*


  

जीवन विचार

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

   🌺🍁 *जीवन विचार* 🍁🌺
〰〰〰〰〰〰〰
*आपण जेवढे बोलतो त्यापेक्षा दुप्पट एकले पाहिजे. पण हे तर स्थूल गणित झाले याहूनही आणखी दुसरे गणित आहे आपल्याला दोन कान दिले आहेत , पण दोन्ही कानाला काम फक्त ऐकण्याचे हे एकच दिले आहे*.

      *पण जीभ एकच आहे , तरी तिला बोलणे आणि रस चाखणे, (स्वाद घेणे) ही दोन  कामे दिली आहेत. म्हणून कानाने चौपट काम केले पाहिजे.*
*महाभारतातील धर्मराजाने सदोदित सतत ऐकण्याचे काम  केले. म्हणूनच महाभारतातील  वनपर्व आणि शांतीपर्व हे दोन्ही विशाल पर्व धर्मराजाचा श्रवणभक्तीची फळे आहेत.*
*तीच ती वस्तू पुनःपुन्हा ऐकल्यावर विचार दृढ होतो.म्हणून धर्मराज एवढा श्रवणाचा प्रेमी बनला होता.*

*श्रवण हाही वाणीचाच महीमाआहे.*
==================

जीवन विचार

🏻चिखलात पाय फसले तर नळा जवळ जावे... परंतु
नळाला पाहून चिखलात जावु नये.

तसेच जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करावा.
परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जाऊ नये...

अंधारासारख्या संकटाला दोष देत बसण्याऐवजी एक ज्योत पेटवण्याचे धाडस दाखवले तरच अंधार दूर होईल... आपला नशीबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा...

कारण
उद्या येणारी वेळ आपल्या नशीबामुळे नाही तर
कर्तृत्वामुळे
येते...!!

कढीपत्ता माहिती व उपयोग संकलन

कढीपत्ता : भारतीय वनांमध्ये आणि भारतीय स्वयंपाक घरातले एक महाऔषध
:::::::::::::::::::🐚🐋🌾
कढीपत्ता हा भारतीय आहारातला एक अविभाज्य घटक असून ते एक सुंदर आणि साधे औषध आहे ...पोह्यातला किंवा उपम्यातला कढीपत्ता वेचून बाहेर काढणारे लोक पाहिले त्यांच्या अज्ञानाची भयंकर कीव येते ....
:::::::::::::::::::🐚🐋🌾
कढीपत्त्याचे झाड बर्यापैकी मोठे आणि भारतीय सदाहरित वनांमध्ये सहज सापडते .. जंगलातला कढीपत्ता जास्त गडद रंगाचा आणि घमघमीत सुगंध असणारा असतो ...त्याला बर्याचदा बिया लागलेल्या सापडतात या बिया गोळा करून अंगणात लावल्या कि फार चांगल्या पद्धतीने रुजतात ....आणि झाड मोठे झाले कि त्याच्या बिया आजूबाजूला पडून नित्यनेमाने कंटाळा येईल इतकी खोलवर मुळे असलेली झाडे उगवतात .....
:::::::::::::::::::🐚🐋🌾
कढीपत्त्याचे आहार आणि औषध अशा अनुषंगाने उपयोग पाहूया :🐚🐋🌾
१) कढीपत्ता आपण आहारात एक विशिष्ट सुंगंधी चव यावी यासाठी वापरतो ... प्रत्यक्षात कढीपत्त्या मध्ये असलेले तेल हे जिभेवरच्या चवीची संवेदना वाढवते ... त्यामुळे जेवण रुचकर लागते ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
२) जुलाब लागले असता कढीपत्त्याच्या ताज्या पानांचा रस एक अर्धा कप पिला कि पोटातल्या वेदना आणि जुलाबाचे वेग वेगाने नियंत्रणात येतात ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
३) कढीपत्ता पचनास चांगली मदत करतो ज्यांना अजीरणाचा सारखा त्रास होतो , जेवल्यावर अस्वस्थ वाटते , पोटात ग्यास पकडतो ....त्यांनी जेवल्यावर कढीपत्त्याची दहा पाने चटणी करून सैंधव मीठ मिसळून खावीत ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
४) कढीपत्ता हा तारुण्य टिकवून ठेवणारा आहे .... नियमित कढीपत्ता खाणारे लोक लवकर म्हातारे होत नाहीत ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
५) मधुमेही रुग्णांनी कढी पत्त्याची दहा बारा कच्ची पाने दिवसातून तीनदा चावून खावीत याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहायला फार मदत होते ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
७) कोलेस्टेरॉल वाढले असेल कढीपत्त्याची अनशापोटी वीस पाने चावून खावीत ....
:::::::::::::::::::🐚🐋🌾
८) कढीपत्त्याची पाने वाळवून चूर्ण करून ती खोबरेल तेलात मिसळून लावावीत ...केस पांढरे होत नाहीत ...शिवाय केसांची गळती कमी होऊन केस लांब वाढायला मदत होते ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
९) कर्करोगाने पिडीत रुग्ण केमो आणि रेडियो थेरपी घेत असताना त्यांच्या शरीरातील सर्वसामान्य पेशींवर सुद्धा फार घातक परीणाम होऊन शरीराचे भयंकर नुकसान होते .... अशा रुग्णांना दिवसातून तीन वेळा कढीपत्त्याची दहा पाने खडीसाखर सोबत चावून खायला लावावीत ... रुग्णाला बराच आराम मिळतो
:::::::::::::::::::🐚🐋🌾
१०) सर्दी खोकल्या सारखे आजार सारखे होत असतील तर अशा लोकांनी सकाळी अनशापोटी कढीपत्त्याची पंधरा पाने चावून खावीत ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
११) यकृताच्या आजारात कढीपत्ता म्हणजे अमृत आहे ... कोणत्याही प्रकारच्या काविळीत कढीपत्ता चावून खाणे म्हणजे अगदी साधा घरगुती उपाय आहे ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
१२) अंगावर सारखे करट उठून त्रास होत असेल तर कढीपत्त्याची पोटातून कच्ची पाने चावून खाल्ल्यास आणि बाहेरून पानांची चटणी करून लावल्यास खूप आराम मिळतो ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
१३) पित्त वाढून सकाळी पित्ताची उलटी होत असेल तर मिरी, आले आणि सैंधव मिसळून कढीपत्त्याची पाने कुटून एकत्र करून खावे याने पित्त वाढत नाही आणि उलटी आणि मळमळ होत नाही ....
:::::::::::::::::::🐚🐋🌾
१४) कढीपत्ता नियमित सेवन केला तर डोळ्यांचे विकार कमी होतात ....
:::::::::::::::::::🐚🐋🌾
कढीपत्त्याबद्दल लिहावे तितके कमीच आहे ... असा हा बहुगुणी आणि आरोग्यसंपन्न कढीपत्ता आहारात नियमित ठेवा ... कच्चा चावून खा .... आरोग्य प्राप्ती होईलच यात शंका नाही.


कथा क्रमांक ११७

*माझी शाळा माझे उपक्रम*

*🌷🌷🌷कथा🌷🌷🌷*

*📚अभ्यास कथा भाग ११७*
〰〰〰〰〰〰〰
 🌺 *अडवणूक* 🌺
=================
〰〰〰〰〰〰〰
*एक कुत्रा गोठ्यातल्या गव्हाणीत बसला असता तेथे एक भुकेला बैल गवत खायला आला. पण तो कुत्रा त्याला गवत खाऊ देईना. तो त्याच्या अंगावर भुंकू लागला. तेव्हा बैल त्याचा धिक्कार करून त्याला म्हणाला, 'अरे. क्षुद्र प्राण्या, हे गवत तूही खात नाहीस नि मलाही खाऊ देत नाहीस.तु मला असे अडवून तुला ह्या गवताचा काय फायदा होणार.त्यापेक्षा माझे पोट मला भरु दे तु असा विनाकारण मला ञास देऊ नकोस, तुझ्या या अशा वागण्यामुळे तुला सदा दारिद्रय अवस्था येईल असे.*'

*तात्पर्य: काही लोक इतक्या छोट्या  मनाचे आणि दृष्ट विचारांची  असतात की एखाद्या वस्तूचा स्वतःला उपयोग नसला तरी दुसर्‍याला त्याचा उपयोग करू न देता ती अडवून ठेवतात.चांगल्या विचारातुनच चांगली कृती घडते.म्हणून विचार चांगले ठेवा.*
*-----------------------------------*

कथा क्रमांक ११८

आनंदी कावळा

       एक राज्यात एक कावळा असतो. नेहमी आनंदी , हसत ! कुठल्याच प्रकारचे दु:ख, कष्ट त्याच्या चेह-यावरचा आनंद हिरावून घेवू शकत नसतात. एकदा त्या राज्याच्या राजाला ही बातमी कळते .त्याला खूप आश्चर्य वाटते, हे अशक्य आहे ,त्याचे मन खात्री देते. मग तो आपल्या शिपायांना त्या कावळ्याला पकडून आणण्याची आज्ञा देतो . कैदेत ठेवल्यावर कसा आनंदी राहील पठ्ठया! राजा मनोमन आपल्या विचारावर खूश होतो . कावळ्याला कैद करून महीना लोटतो तरी तो हसतच !
राजा बेचैन होतो. " प्रधानजी, त्या कावळ्याला दु:खी करण्यासाठी काय करता येईल?"
" महाराज, आपण त्याला काट्यात टाकुया" प्रधान तत्परतेने उपाय सुचवतो.
लगेच राजाच्या आदेशाप्रमाणे शिपाई त्याला काट्यात टाकतात . तिथेही हा आपला आनंदाने शीळ घालतोय.
 " महाराज, आपण त्याला तापलेल्या तव्यावर टाकुया" राणी दुसरा मार्ग  सुचवते.
दुस-या दिवशी त्याला तापलेल्या तव्यावर टाकले जाते ,पण कितीही चटके बसले तरी त्याच्या चेह-यावरचे हसू काही मावळत नाही.
" ते काही नाही महाराज, आपण त्याला ऊकळत्या तेलात टाकू " सेनापती पुढची शिक्षा सुचवतात .
दुस-या दिवशी भल्यामोठ्या कढईत तेल ऊकळवून त्यात त्याला टाकले जाते. तरीही कावळा हसतोच आहे .राजाला भयंकरच राग येतो. मग तो शेवटचा जालीम उपाय करायचे ठरवतो आणि त्या कावळ्याचे पंखच छाटून टाकतो . पंख छाटलेला कावळा क्षीण हसतो आणि कायमचे डोळे मिटतो .........

     लहानपणी ही गोष्ट वाचताना खूप गंमत वाटायची. पण आता तिच्यातले मर्म काय ते कळते. आपण आनंदी आहोत , सुखी आहोत ,हसत आहोत ही बाब नापसंत असणारे किती 'राजे' आपल्या अवतीभोवती असतात ना! कधी आपले जवळचे आप्त, स्वकीय तर कधी परकीय . तुम्हाला कोणत्या गोष्टीनी त्रास होईल , कशाने यातना होतील, दु:ख होईल ? या गोष्टींचा विचार करण्यात आपली स्वत:ची शक्ती अकारण खर्ची पाडणारे आणि त्यासाठी  विविध युक्त्या योजून त्या आमलात आणणारे  ' प्रधान', 'सेनापती' यांची कमतरता नाही . गंमत म्हणजे या अशा योजना आमलात आणण्यासाठी आवश्यक शिपायांची भाऊगर्दीही कमी नाही .आणि अशाही सगळ्या परिस्थितीतही आपल्या चेह-यावरचे हसू टवटवीत ठेवणारे 'आनंदी कावळे' ही आहेतच !
      वास्तविक या जगात प्रत्येकचजण सुखाच्या, आनंदाच्या मागे धावत असतो. जगण्याची ही सगळी धडपड तो एक ' सुखी माणसाचा' सदरा मिळवण्यासाठीच चालू असते . तरीही दुस-याचा आनंद का सहन होत नाही आपल्याला ? आनंदाची इतकी संकुचित संकल्पना घेवून जगत असतो आपण की , फक्त मला स्वत:ला मिळाला तरच तो 'आनंद'; नाहीतर नाही. त्या दुस-या व्यक्तीनेही तो क्षणिक आनंद मिळवण्यासाठी खूप कष्ट घेतलेले असतात, अनेक त्रास सहन केलेले असतात, दु:ख भोगलेलं असतं ; तेव्हा कुठे त्याच्या वाट्याला तो आनंदाचा छोटासा ' कवडसा ' आलेला असतो , हा विचारच आपल्या मनाला शिवत नाही. इतरांच्या आयुष्यातील असे अनेक छोटे छोटे कवडसे आपणही तितक्याच आनंदाने उपभोगू शकलो तर आपल्या मनाच्या अंगणभर सुखाचे ऊन सदा हसत राहील, तिथे दु:खाच्या सावलीला जागाच राहणार नाही. सगळ्या जगाचं सोडा हो, आपल्या जवळच्या माणसांच्या बाबतीत तरी हे करून बघायला काय हरकत आहे ? कोणाचा आनंद कसा हिरावून घेता येईल याचा विचार करत बसण्यापेक्षा त्याच्यासोबत आपल्यालाही आनंदी होता येतंय का, हसता येतंय ते पहायला काय हरकत आहे ?
         सुदैवाने भेटलाच एखादा ' आनंदी कावळा ' तर त्याच्यासोबत चार मुक्त गिरक्या घेवून बघूया आकाशात .त्याचे पंख छाटून त्याला  संपवण्यापेक्षा ह्रृदयाच्या खोल खोल कप्प्यात कायमचा जपून ठेवूया ...... खूपच दूर्मिळ पक्षी आहे हो तो !

कथा क्रमांक ११६

कथा
कावडीवाला


एका गावात एक कावडीवाला राहत होता .तो रोज पाणी भरण्यासाठी कावडीचा उपयोग करत असे.कावडीला मातीच्या घागरी लावाल्या होत्या.कावडीवाला दररोज विहिरीवरून घरी पाणी आणत असे.एके दिवशी मातीच्या एका घागरीला छोटस छिद्र पडलं .त्यामुळे विहिरीवरून घरापर्यंत येताना पाणी छिद्रातून वाहून जात असे.या गोष्टीचे घागरीला खूप वाईट वाटले.ती घागर कावडीवल्याला म्हणाली की माझा तुम्हाला काहीही उपयोग होत नाही आहे तेव्हा तुम्ही मला का फेकून देत नाही .तेव्हा कावडीवाला म्हणाला की ज्या बाजूने पाण्याचे थेब पडत होते त्या बाजूने मी बी पेरले होते .आता त्या ठिकाणी रोपे उगवली आहे काही दिवसांनी फुले लागतील फळ लागतील .हे ऐकून घागरीला खूप आनंद झाला म्हणजे आपला सुद्धा उपयोग होतो .तात्पर्य- जीवनामध्ये सर्व जणांचा उपयोग होतो .कोणीही आपल्याला कमी लेखू नये.

कथा क्रमांक ११५


        *" राजा आणि संत"*
             ➖〰➖〰
एका वनात दोन संत राहत होते. एकांतात आपल्‍या तपश्‍चर्येत लीन राहत होते. कधीतरी यात्रेकरूंचा जत्‍था जायचा तेव्‍हा ते संत त्‍यांच्‍याशी बोलत असत. त्‍याच यात्रेकरूकडून त्‍यांना तेथील राजास त्‍या संतांबाबत माहिती मिळाली. तो या दोघांना भेटण्‍यास निघाला. जेव्‍हा संतांना ही गोष्‍ट कळाली.तेव्‍हा त्‍या दोघांना वाटले की आता राजा येणार व त्‍याने आपला चांगूलपणा पाहिला तर तो आपणास सतत भेटण्‍यास येईल, त्‍याच्‍याबरोबर अनेक माणसे येतील, त्‍यां माणसांच्‍या संगतीने अजून काही माणसे येतील व अशाने या वनातील शांती भंग पावेल व एकांत मिळणार नाही व एकांत नसल्‍याने आपणास ध्‍यानसाधना करता येणार नाही. राजा आम्‍हाला दोघांना सामान्‍य माणूस समजेल असे काहीतरी केले पाहिजे. राजाचा लवाजमा तेथे पोहोचला तेव्‍हा राजाने पाहिले की ते दोघेही संत हातात लाठ्याकाठ्या घेऊन एकमेकांशी भांडत होते. पहिल्‍या संताने दुस-याला म्‍हटले,'' तू स्‍वत:ला कोण समजतोस, मी इतके ज्ञान मिळविले आहे की ते तू सात जन्‍मातही मिळवू शकणार नाही.'' दुसरा संत त्‍यावर म्‍हणाला,'' अरे तू तर पक्का खोटारडा आहेस, तुझ्या ज्ञानाच्‍या गप्पा मारून तू लहान मुलाला फसवू शकशील पण मला नाहीस. तुझ्यापेक्षा जास्‍त ज्ञान मी माझ्या शिष्‍यांना दिले आहे.'' राजाने व त्‍याच्‍याबरोबरच्‍या लोकांनी हे भांडण पाहिले व विचार करू लागले हे साधू संत तर सामान्‍य माणसाप्रमाणेच भांडत आहेत व त्‍यांनी सर्वांनी असल्‍या साधूसंतांचा संग नको म्‍हणून वनातून जाणेच पसंत केले. राजा व लोक जाताच दोन्‍ही संतांनी एकमेकांकडे पाहून मंदस्मित केले व गळाभेट घेतली. दोन्‍हीही साधू आपल्‍या साधनेत रममाण झाले.

  💠 *तात्पर्य -*चांगली गोष्‍ट घडवून आणण्‍यासाठी कधीकधी चुकीच्‍या मार्गाचाही अवलंब करावा लागतो.
 〰➖〰➖〰➖〰➖〰


*

आयुष्याचा धागा

आज म्हटलं आयुष्य विणायला घेउया
जमतंय का ते बघुया
वाटलं अगदी सोपं असेल!
रंगसंगती जमून आली की आयुष्यही सुंदर दिसेल!

प्रश्न पडला धागे कोणकोणते घ्यायचे
एक दोनच की सगळेच वापरायचे!!
मग ठरवलं फक्त छान छानच धागे घेऊ
एक काय दोन काय सगळेच एकमेकांत विणू !

सुरुवात केली वात्सल्याच्या धाग्याने
धागा होता फार उबदार आणि मुलायम
म्हटलं छान आहे हा धागा
धाग्याने ह्या विण राहील कायम!

मग घेतला मैत्रीचा धागा
म्हणता म्हणता ब-याच भरल्या जागा!
थोडं थोडं आयुष्य आकार घेऊ लागलेलं
पण अजूनही बरंचस विणायचं बाकी रहिलेलं!

एक एक धागा आशेचा, सुखाचा आणि आनंदाचा घेतला!
प्रत्येक धाग्यात तो आपसूकच गुंफत गेला!
हळू हळू विण घट्ट होत होती
तरीदेखील कसली तरी कमी मात्र होती!

मग घेतला एक नाजुक प्रेमाचा धागा
धागा होता सुंदर आणि रेशमी
धाग्याने त्या आयुष्याला
अर्थ आला लागुनी!

एक एक घेतला धागा
यशाचा, कीर्तीचा आणि अस्तित्वाचा
आयुष्याला त्यामुळे एक नवा
उद्देश्य मिळाला!

सगळेच धागे छान, सुंदर आणि प्रसन्न होते!
तरीदेखील त्यांच्यातल्या एकसारखीपणाने मन मात्र खिन्न होते!

थोड़े धागे पडले होते
निवांत बसून असेच!
म्हटल बघुया तरी ह्यांच्यामुळे
आयुष्य होतंय का सुरेख!

मग घेतला एक धागा दुःखाचा एक निराशेचा
एक धागा अपयशाचा आणि एक धागा पराजयाचा!!
हे चारही धागे विणता एकमेकांमधे
आयुष्याला खरा अर्थ लाभला त्यांच्यामुळे!

अपयशाशिवाय यश नाही
दुःखाशिवाय सुख नाही!
पराजयाशिवाय जय नाही
आणि निराशेशिवाय आशा नाही!

महत्व पटलं आहे सर्व धाग्यांच आज मला
सुंदर सुंदर धाग्यांनीच फक्त मजा नसते आयुष्याला!

साध्या सुध्या लोकरीच्या विणकामातही
रंगसंगती ही लागतेच!
मग आयुष्य विणतानाच
आपल्याला भीती का वाटते?

सर्व धागे एकमेकांत विणूनच
एक परिपूर्ण आयुष्य बनतं!
कुठला धागा कुठे,
कसा वापरायचा
हे मात्र ज्याचं त्यान पाहाव

आई.कविता संकलन


      आई
"वाट पाहणारं दार"

प्रत्येक घराला एक
वाट पाहणार दार असतं।
खरच सांगतो त्या
दाराच नाव आई असतं।
उबदार विसाव्याचं ते
एकमेव स्थान असतं।
प्रत्येक घराला एक
वाट पाहणार दार असतं।

वाट पाहणाऱ्या या दाराला
आस्थेच महिरपी तोरण असतं।
घराच्या आदरातिथ्याच
ते एक परिमाण असतं।
नीतिमत्तेच्या उंबरठ्याआड
मर्यादेचं त्याला भान असतं।
प्रत्येक घराला एक
वाट पाहणार दार असतं।

दारिद्र्याच्या दशावतारात
हे दार कधीच मोडत नसतं।
कोत्या विचारांच्या वाळवीनं
ते कधी सडत नसतं।
ऐश्वर्याच्या उन्मादात
ते कधी फुगत नसतं।
प्रत्येक घराला एक
वाट पाहणार दार असतं।

सुना नातवंडांच्या आगमनाला ते
तुकडा पाणी घेऊन सज्ज असतं।
लेकीची पाठवणी करताना
अश्रूंना वाट करून देतं।
व्यसनात अडखळणाऱ्या पावलांना
ते जरबेनं ताळ्यावर आणतं।
प्रत्येक घराला एक
वाट पाहणार दार असतं।

मित्रांनो,
उभ्या आयुष्यात फक्त
एकच गोष्ट जपा।
उपहासाची करवत
या दारावर कधी चालवू नका।
मानापमानाचे छिन्नी हातोडे
या दारावर कधी मारू नका।
स्वार्थी अपेक्षांचे खिळे
या दारावर कधी ठोकू नका।
घराचं रक्षण करणाऱ्या या दाराला
कधीच मोडकळीला आणू नका।

कारण,
प्रत्येक घराला एक
वाट पाहणार दार असतं।
खरच सांगतो त्या
दाराचं नाव आई असतं।
उबदार विसाव्याचं ते
एकमेव स्थान असतं।
प्रत्येक घराला एक
वाट पाहणार दार असतं।
.🍁🍂🍃

जीवन विचार

*_लोक म्हणतात, "आयुष्य छोटं आहे_*
*_पण असं बिलकुल नाही_*

*_खरं तर आपण जगायला उशीरा सुरुवात करतो_*
*_क्षणाला क्षण अन दिवसाला दिवस जोडत_*

*_आयुष्य पुढे सरकत असते_*

*_कधी तरी, कुठे तरी, केव्हा तरी असा क्षण येतो_*
*_जो अख्खं आयुष्यच बदलुन टाकतो_*

*_फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे_*
*_यालाच "आयुष्य जगणे" म्हणतात_*
   

( कविता संकलन) कळलच नाही मला

कळलच नाही
वर्गातल्या मुली कुठं गेल्या....

संगी, मंगी, कपी, मंदी
हसायच्या फिंदी फिंदी

आणखीही बऱ्याच होत्या वर्गात
कळायचंच नाही
आम्ही वर्गात आहे कि स्वर्गात....

खेळायच्या बडबडायच्या,
बागडायच्या,नाचायच्या
म्हणलं तर खूप अल्लड होत्या

त्या फ्रॉक, पोलके,
चापून चोपून घातलेल्या वेण्यासकट
त्या डोळ्यासमोरून तरळून गेल्या ....

कळलचं नाही
वर्गातल्या मुली कुठं गेल्या.

आम्ही शेण पाणी आणायचो
त्या वर्ग सारवायच्या
शाळा सुटल्यावर
वर्गही त्याच अवरायाच्या

आम्ही वर्ग झाडायचो,
त्या बस्करं घालायच्या
आम्ही पटांगण झाडायचो,
त्या सडा मारायच्या...

त्या लंगडी लंगडी,
झिम्माड फुगडी घालायच्या,
सर्वांशीच मनमोकळं बोलायच्या..

अभ्यास मात्र मन लाऊन करायच्या
कवितेत तर खूप खूप रमायच्या
सातवी पर्यंत गावातल्या गावात
त्या आमच्या बरोबर शिकल्या ......

कळलच नाही
वर्गातल्या मुली कुठं गेल्या

सातवी नंतर घरात
असा काही नियम नव्हता

बाहेर गावी मुलींना
कोणीच पाठवत नव्हता

शाळा सुटली पाटी फुटली
मुली बसल्या घरात
आम्ही दिवटे चिरंजीव
शिकत राहिलो शहरात

अल्पवयातच त्या बोहल्यावर चढल्या ....
कळलच नाही
वर्गातल्या मुली कुठं गेल्या ...

मिसुरड फुटायचा आतच
आम्ही मामा झालो, काका झालो
त्या आई झाल्या,मावशी झाल्या
काकू झाल्या, सून झाल्या ,
नणंद झाल्या, भावजयी झाल्या
विहिरीवर पाण्याला गेल्या
रानात गेल्या, वनात गेल्या
काही स्टोव्हवर गेल्या,
काही शेगडीवर गेल्या,

काही परत आल्याच नाही
काही परतल्या
पण पार करपल्या
जळालेल्या भकारीसारख्या
व्यवस्थेच्या चारकात पिळल्या गेल्या ......

कळलच नाही
वर्गातल्या मुली कुठं गेल्या..

त्या सावित्री होत्या
त्यांना एकही फुले भेटला नाही

त्या जिजाऊ होत्या
पण एकही शहाजी भेटला नाही

त्या कस्तुरबा होत्या
एकही गांधी भेटला नाही

कुणी म्हणत
त्या परक्याचं धन झाल्या
कुणी म्हणत,
निर्माल्य होऊन जीवन गंगेत
वाहून गेल्या ....

मला वाटत
त्या नवीन प्रकारे सती गेल्या..
काही असो
त्या आता दिसेनाशा झाल्या .....

*कळलच नाही वर्गातल्या मुली कुठं गेल्या.....✍🏻*