कथा क्रमांक ८९

📝📚📝📚📝📚📝
*माझी शाळा माझे उपक्रम*
==================
*🌍 कथेचे बाळकडू 🌏*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*📚अभ्यास कथा भाग ८९ 📚*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*♻  विस्टन चर्चिल* ♻
=========================
*✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
ही कथा आहे विन्स्टन चर्चिलची.
लहानपणी विन्स्टन एकदा विहिरीत पडला. त्याने ‘वाचवा वाचवा’ असा धावा केला. एका शेतकर्‍याने त्याला विहिरीतून बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचवला. एका अपघातातून आपण वाचलो म्हणून त्याने नि:श्‍वास तर टाकला, पण त्याला विहिरीतील जीव वाचवण्यासाठीची धडफड सदैव लक्षात राहिली. आयुष्यभर यशाशी संघर्ष करताना वडिलांनी शिकवलेले तत्त्व आठवायचे. त्या वेळेस विन्स्टनने मनोमन आपल्या वडिलांचे आभार मानले, कारण त्याच्या वडिलांनी त्याला एक अविरत प्रयत्न करण्याचे व कधीही माघार न घेण्याचे तत्त्व शिकवले होते. ते त्याला नेहमी आपल्या राजवाड्यासमोरील राजहंस दाखवायचे आणि म्हणायचे- ‘‘हा राजहंस पाण्यावर शांतपणे तरंगताना दिसतो. पण तेव्हाच तो पाण्याखाली तितक्याच जलद गतीने पायांची हालचाल करत असतो. लोकांना वरवर शांत दिसणारा राजहंस पाण्याखाली एखाद्या यंत्राप्रमाणे झफाटल्यासारखा काम करतो. तूही असाच झंझावात हो. जनसमुदायाला तू वरून जरी शांत दिसलास तरी त्यांच्या अफरोक्ष वादळासारखं काम करत राहा. आतून पेटून ऊठ आणि कार्याला लाग.’’
पुढे जीवनात अविरत काम करण्याचे तत्त्व बाळगल्यामुळे विन्स्टन चर्चिल इंग्लंडचे पंतप्रधान झाले. एकदा त्यांना ऑक्सफर्ड विद्यापीठात पदवीप्रदान सोहळ्यासाठी निमंत्रित केले होते. जेव्हा त्यांना व्यासपीठावर भाषणासाठी बोलावले तेव्हा ते त्या जनसमुदायासमोर ३० सेकंद नि:शब्द उभे राहिले. सभागृहात एकच शांतता पसरली. नेहमी उत्कृष्ट भाषण देणारे व्यक्तिमत्त्व बोलत का नाही, असा फ्रश्‍न सर्वांना पडला. तितक्यात विन्स्टन चर्चिलच्या तोंडातून शब्द बाहेर पडले- ‘‘ *माघार घेऊ नका. कधीही माघार घेऊ नका.’’ त्यांनी भाषणाला सुरुवात करताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. तेव्हा ते पुन्हा ३० सेकंदांसाठी नि:शब्द झाले आणि पुन्हा उदगारले- ‘‘ *माघार घेऊ नका, कधीही माघार घेऊ नका* ’’ क्षणभर त्यांनी सर्व प्रेक्षकांवर एक कटाक्ष टाकला. सर्वांशी ते नजरेने बोलले आणि धन्यवाद म्हणून त्यांनी व्यासपीठ सोडले. लोकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले आणि एका महान नेत्याचे सर्वात लहान, पण अत्यंत प्रभावी भाषण म्हणून या भाषणाचा उल्लेख केला जातो.    
〰〰〰〰〰〰
*📝 शब्दांकन /संकलन📝*
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌

महात्मा ज्योतिबा फुले

जोतीराव गोविंदराव फुले
टोपणनाव: जोतिबा, ज्योतीबा.
जन्म: एप्रिल ११, इ.स. १८२७
कटगुण , सातारा, महाराष्ट्र
मृत्यू: नोव्हेंबर २८, इ.स. १८९०
पुणे , महाराष्ट्र
प्रभावित: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
वडील: गोविंदराव फुले
आई: चिमणाबाई गोविंदराव फुले
पत्नी नाव: सावित्रीबाई फुले
अपत्ये: यशवंतबालपण आणि शिक्षण
जोतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील
कटगुण हे होते. त्याच गावी महात्मा फुल्यांचा
जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतिबांच्या
वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते.
वडिलांचा फुले विक्रीचा व्यवसाय होता. त्यामुळे
गोर्हे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते
फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ
झाले. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर
तालुक्यातील खानवडी येथे आला..
तेथे त्यांचे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे.
खानवडी येथे फुले व होले
आडनावाची बरीच कुटुंबे आहेत.
प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ
त्यांनी भाजी विक्रीचा
व्यवसाय केला. १८४२ ला माध्यमिक
शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन
हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला.
बुद्धी अतिशय तल्लख त्यामुळे पाच-सहा
वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला.सामाजिक कार्य
सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले
यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना
केली. तथाकथित उच्चवर्णीयांकडून
होणार्या अन्यायापासून, अत्याचारापासून व
गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची
मुक्तता करणे व त्यांना हक्काची
जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय
होते. 'सर्वसाक्षी जगत्पती ।
त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे या समाजाचे
घोषवाक्य होते. सत्यशोधक समाजाने
गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक
न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची
मागणी केली. या समाजातर्फे
पुरोहितांशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली.
मराठीत मंगलाष्टके रचली.
समाजातील विषमता नष्ट करणे व
तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे
सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. महात्मा फुल्यांच्या
कवितेच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्या
खालील ओळी प्रसिद्ध आहेत. -
“ विद्येविना मती
गेली। मतीविना
नीती
गेली।
नीतीविना
गती गेली।
गतीविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ
एका अविद्येने केले।। ”
जोतीरावांनी त्यांच्या पत्नी
सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास
प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ
झालेली भारतातील पहिली
महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे
स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे
महात्मा फुले पहिले भारतीय होत.
वाचनाची अतिशय आवड असल्यामुळे
शिवाजी महाराजांचे चरित्र व थॉमस पेन या
विचारवंताच्या ‘राईट्स ऑफ मॅन’ या ग्रंथाचा त्यांच्यावर विशेष
प्रभाव पडला. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्र्य आणि
समाजातील जातिभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ
होत असत. ही सामाजिक परिस्थिती
सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला. त्याप्रमाणे
आपल्या पत्नी सावित्रीबाईंना १८४८
साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील
भिडे यांच्या वाड्यात पहिली
मुलींची शाळा काढून
तेथील शिक्षिकेची
जबाबदारी सावित्रीबाईंवर
सोपविली. महाराष्ट्रातील
स्त्री शिक्षणाची ही
मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य
मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळपेठेत
१८५२ मध्ये शाळा स्थापन केली. त्यांच्या या
कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण
जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. समाज
सुधारण्याच्या कार्याला गती देण्यासाठी
व व्यापक करण्यासाठी १८७३ साली
त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची
स्थापना केली. ‘कोणताही धर्म
ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व
जातिभेद ही निर्मिती
मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्र
या विश्वाची निर्मिती
करणारी कोणती तरी
शक्ती आहे अशी
त्यांची (अस्तिक्यवादी)
विचारसरणी होती. मानवाने
गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी
लिहिलेल्या ‘शेतकर्याचा असूड’ या पुस्तकातून
महाराष्ट्रातील शेतकर्यांची विदारक
दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद
केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा
क्रांतिकारक म्हणून ही जोतीरावांचे
दर्शन होते. ‘नीती हाच
मानवी जीवनाचा आधार आहे’ हा
विचार मांडणारे जोतीराव एक तत्त्वचितक
व्यत्तिमत्त्व म्हणूनही आपल्यासमोर येतातसाहित्य आणि लेखन
' सार्वजनिक सत्यधर्म ' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण
ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून
' दीनबंधू' हे साप्ताहिक चालविले जात असे.
तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या
धर्तीवर त्यांनी अनेक 'अखंड'
रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. आपला
'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील
कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित
केला. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा
अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा
ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला.सन्माननीय
उपाधी
जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल
घेऊन लोकांनी त्याना ‘महात्मा’ ही
उपाधी दिली. त्यामुळे ज्योतिबा फुले
हे महात्मा फुले या नावाने ओळखले जाऊ लागले.
नाव साहित्यप्रकार लेखनकाळ
इशारा लेखसंग्रह इ.स. १८८५
गुलामगिरी लेखसंग्रह इ.स. १८७३
तृतीय
रत्न नाटक इ.स. १८५५
ब्राह्मणांचे कसब लेखसंग्रह इ.स. १८६९
राजे
छत्रपती
शिवाजी
राजे भोसले यांचा
पोवाडा
पोवाडा इ.स. १८६९
शेतकर्यांचा असूड लेखसंग्रह -
Align="Center"
सार्वजनिक
सत्यधर्म लेखसंग्रह इ.स. १८८९जीवनपट
इ.स. १८२७ - जन्म कटगुण , सातारा जिल्हा
इ.स. १८३४ ते १८३८ - पंतोजींच्या शाळेत
शिक्षण झाले.
इ.स. १८४० - सावित्रीबाईंशी विवाह.
इ.स. १८४१ ते १८४७ - स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये
इंग्रजी शिक्षण घेतले.
इ.स. १८४७- लहुजी वस्ताद साळवे दांडपट्टा व
इतर शारीरिक शिक्षण घेतले.
इ.स. १८४७ - थॉमस पेन यांच्या ' राईट ऑफ मॅन ' या ग्रंथाचा
अभ्यास.
इ.स. १८४८ - मित्राच्या विवाहप्रसंगी निघालेल्या
मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून
अपमान झाला.
इ.स. १८४८ - भारतातील
मुलींची पहिली शाळा सुरू
केली. बहुजन समाजाच्या
शिक्षणासाठी काम सुरू केले.
सप्टेंबर ७, इ.स. १८५१ - भिडे वाड्यात व रास्ता पेठेत
मुलींच्या शाळेची सुरुवात.
इ.स. १८५२ - पूना लायब्ररीची
स्थापना.
मार्च १५, इ.स. १८५२ - वेताळपेठेत
अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू
केली.
नोहेंबर १६, इ.स. १८५२ - मेजर कॅन्डी
यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश
सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार.
इ.स. १८५३ - ' दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द
एज्युकेशन ऑफ महार मांग ॲन्ड अदर्स ' स्थापन
केली.
इ.स. १८५४ - स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ
शिक्षकाची नोकरी
इ.स. १८५५ - रात्रशाळेची सुरुवात
केली.
इ.स. १८५६ - जोतिबांवर मारेकरी घालून हत्येचा
प्रयत्न झाला.
इ.स. १८५८ - शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून
निवृत्ती घेतली.
इ.स. १८६० - विधवाविवाहास साहाय्य केले.
इ.स. १८६३ - बालहत्या प्रतिबंधक गृहाची
स्थापना केली .
इ.स. १८६५ - विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप
घडवून आणला.
इ.स. १८६४ - गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला.
इ.स. १८६८ - दुष्काळ काळात राहत्या घरातील
हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.
इ.स. १८७३ - सत्यशोधक समाजची स्थापना
केली.
इ.स. १८७५ - शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध
खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर ).
इ.स. १८७५- स्वामी दयानंद
सरस्वतींची पुण्यात मिरवणूक
काढण्यास साहाय्य केले.
इ.स. १८७६ ते १८८२ - पुणे नगर पालिकेचे सदस्य होते.
इ.स. १८८० - दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध
केला.
इ.स. १८८० - नारायण मेघाजी लोखंडे यांना
'मिलहॅण्ड असोसिएशन' या देशातील पहिल्या
कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.
इ.स. १८८२ - 'विल्यम हंटर शिक्षण आयोगा' समोर निवेदन
दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत
देण्याची मागणी केली.
इ.स. १८८७ - सत्यशोधक समाजातर्फे नवीन
मंगलाष्टकांची व नवीन
पूजाविधीची रचना करून पुरोहिताशिवाय
विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली.
इ.स. १८८८- ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट
आणि सत्कार.
इ.स. १८८८ - मुंबईतील कोळीवाडा
येथे जनतेने रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते सत्कार करून
'महात्मा' ही पदवी प्रदान
केली.
२८ नोव्हेंबर, इ.स. १८९० - पुणे येथे निधन झाले.
विद्याध्यायानासाठी ज्यांचा सतत असे प्रयास,
त्यांचे अखंड जीवन म्हणजे, जणू एक खडतर
प्रवास.
परि स्त्री शिक्षण; हा एकची असे
ध्यास, हा एकची असे ध्यास,
या उक्तीप्रमाणे महात्मा ज्योतीराव
फुले यांनी आपले व्यक्तिमत्व स्वयंप्रेरणेने व
स्वतःच्या प्रयत्नांनी घडविले होते. त्यांचा पिंड हा
कृतीशील क्रांतिकारकाचा होता.
महाराष्ट्राच्या समाजसेवेसाठी ध्येयाने भरून
जाऊन आपले सर्व जीवन समर्पित करणारे ते
थोर पुरुष होते. आधुनिक भारतातले पहिले समाजक्रांतिकारक
म्हणून त्यांना ओळखले जाते. कारण ते
सामान्यांतील असले तरी विचाराने व
कर्तृत्वाने असामान्य होते. सामाजिक विषमतेविरुद्ध
ज्योतीबांनी बंड पुकारले. 'शिक्षण व
समता' या दोन शब्दातच त्यांच्या या कार्याचे यथोचित वर्णन
करता येईल. महाराष्ट्रातील
सर्वसामान्यांसाठी रात्रंदिवस झटणारे ते सेवक
होते.

महात्मा ज्योतिबा फुले.स्मृतीदिन विनम्र अभिवादन

*🙏 विनम्र अभिवादन*🙏
     🇮🇳~विचार महामानवांचे~🇮🇳
           "सामाजिक समतेचा"
               संदेश देणारे
            पहिले "समतावीर"..!

        शिक्षणाचा उपयोग करून
             सर्वांना खरे खुरे
          स्वातंत्र्य मिळवून देणारे
              आद्य "शिक्षणतज्ञ"..!

               स्री शिक्षणाच्या
           शैक्षणिक क्रांतीसाठी
     आपले जीवन अर्पण करणारे
               महान "तपस्वी"...!

    शेतकरी आणि बहुजन समाजाच्या
        समस्या केंद्रस्थानी मानुन
    त्या सोडवण्याच्या ध्यास घेतलेला
              "बहुजन नायक"..!

         पुरोहितांकडून होणाऱ्या      
    अन्यायापासून,अत्याचारापासून
              व गुलामगिरीतून
    तथाकथित शुद्रातिशूद्र समाजाची
               मुक्तता करून
             त्यांच्या हक्कांची
         जाणीव करून देणारा
              व तथाकथित
          सामाजिक परम्परेला
              "आड" येणाऱ्या
    चालीरीतीत स्वतःच्या वाड्यातील
         "आड" खुला  करणारा
                 "मुक्तिदाता..!

         "विद्येविना मती गेली,
          मतीविना निती गेली,
          नितीविना गती गेली,
           गतीविना वित्त गेले,
         वित्ताविना शूद्र खचले,
   इतके अनर्थ एका अविद्येने केले!!"
     अशाप्रकारे "विद्या"महत्वाचे
           समाजसूत्र मांडून
      तिचे महत्व पटवून देणारा
              "महाऋषी"..!

         विधवा पुनर्विवाहास
           सहाय्य करणारा,
     विधवांच्या केशवपनाविरुध्द
   न्हाव्यांचा संप घडवून आणणारा,
      बालहत्या प्रतिबंधग्रुहाची
          स्थापना करणारा,
   अशा अमानवी जाचक प्रथाविरुध्द
            "आसुड" ओढून
    त्या धुडकावून लावण्याची
          क्रुती करणारा
      "सामाजिक परिवर्तक"..!

       कामगारांच्या समस्या जाणून
          पहिली कामगार संघटना
    स्थापन करण्यास सहकार्य करणारा
                "श्रमप्रतिष्ठक"..!

               खऱ्या खुऱ्या
           स्वतंत्र भारताचे स्वप्न
           ज्यांनी प्रथम पाहिले
         असे थोर "स्वातंत्र्यवीर"..!

        सामाजिक न्याय,गुलामगिरी,
         भारतीय समाज रचनेचा
           कायापालट करणारा
             खरा "सत्यशोधक"..!

            स्वातंत्र्यवीर सावरकर
 ज्यांना "सामाजिक क्रांतिकारक" म्हणत
    असा विचारनिहाय आचरण करणारा
               "क्रांतीसूर्य"..!

         भारतीय स्त्रियांसाठीची
         साक्षात "स्वातंत्र्य मूर्ती"
         माझ्या सावित्रीमायीचा "पती"..!

          सामान्य माणसांसाठी,
     दुर्लक्षित समाजासाठी लढणारा
        एक असामान्य "महामानव"..!

     बाबासाहेब आंबेडकरासारख्या
           "भारतरत्नाचे गुरू"..!

            ज्यांचे कर्म पाहून
                 "महात्मा"
      हि पदवी जनतेने ज्यांना दिली
                   व पुढे
    गांधीजीसारख्या महात्म्यानेसुध्दा
           ती योग्यच ठरवावी
          असा थोर "युगपुरूष"..!

         सर्वप्रथम शिवरायांची
            समाधी शोधणारे,
           शिवरायांवर प्रथम
   पोवाडारूपी वास्तव लेखन करणारे,
       शिवजयंती सुरू करणारे
       पहिले डोळस "शिवभक्त"..!

           ज्यांचा वैचारिक
             वारसा घेऊन
        अगदी कणखर पणे
    आपली वाटचाल करणाऱ्या
      अनुयायांचा "दीपस्तंभ"..!

            महाराष्ट्रातील
          तरुण पिढीकडून
         आजच्या काळात
     ज्यांचा "वसा"चालवला जावा
    अशी अपेक्षा ठेवावी वाटणारा
     विचार-कृतीचा "मार्गदर्शक".
  एक सत्याच्या-न्यायाच्या-समतेच्या-मानवतेच्या
       मार्गातील वाटसरू
सामाजिक क्रांतिचे प्रणेते ,क्रांतिसूर्य *महात्मा ज्योतिराव फुले* यांच्या स्मृति दिनानिमीत्य विनम्र अभिवादन ! ----🙏👏👏🌹🌹💐💐🙏
*श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे  (शिंदे)*

कथा क्रमांक ८८

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
*🌍 कथा क्रमांक ८८ 🌏*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*📚अभ्यास कथा📚*
〰〰〰〰〰〰
*जोपासना चांगल्या विचारांचा एकनिष्ठतेची*
=========================
*✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
   एकदा तथागत गौतम बुद्ध एका ठिकाणी धम्म देसना देण्यासाठी गेले.समोर हजारो लोक बसलेले होते,तथागत काहीच न बोलता काही वेळ बसून राहिले व थोड्या वेळाने निघुन गेले. दुसऱ्या दिवशी परत धम्म देसना देण्यासाठी आले समोर पाचशे लोक बसलेले होते. परत तथागत काही वेळ काहीच न बोलता बसून राहिले व थोड्या वेळाने निघुन गेले.
   परत तिसऱ्या दिवशी जेंव्हा ते धम्म देसना देण्या साठी आले तेंव्हा फक्त वीस लोक समोर बसलेले होते,आणि त्या दिवशी तथागतांनी धम्म देसना दिली.
    जेंव्हा त्यांच्या शिष्याने त्यांना विचारले की पहिले दोन दिवस जास्त लोक असतांना तुम्ही धम्म देसना न देता तिसऱ्या दिवशी फक्त
वीस लोक असतांना का दिली?
   तथागतांनी खुप छान उत्तर दिले,"ज्या लोकांना खरच धम्म ऐकायचा होता ते तिसऱ्या दिवसा पर्यन्त आपल्या निश्चयावर ठाम राहिले व तिसऱ्या दिवशी उपस्थित राहिले.परन्तु जे मला फक्त बघण्या साठी आले होते व जे आपल्या निश्चयावर ठाम नव्हते ते अपोआपच कमी होत गेले.मला फक्त धम्म ऐकून घेणारे नकोत तर आचरणात आनणारे अनुयायी हवेत.म्हणून मी तिसऱ्या दिवशी योग्य अशाच अनुयायांना धम्म दिला."

*बोधःजो पर्यन्त चांगल्या विचारांशी एकनिष्ठ राहण्यावर आपण ठाम नसतो तो पर्यन्त आपल्याला त्यापासून मिळणारा लाभ मिळत नाही.किती आहेत यापेक्षा कसे आहेत हे महत्वाचे.*
〰〰〰〰〰〰〰〰〰
*📝   संकलन*  📝
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌

संविधान दिन माझी शाळा वाटेगाव

📒📕📗📘📙📔📘
*जि.प.प्रा.शा.वाटेगाव येथे संविधान दिन उत्साहात संपन्न*...
================
*आज दि. 26 नोव्हे. 2016 ला  भारतीय संविधान दिन* आनंदपूर्ण वातावरणात  शाळेत संपन्न झाला.

👉📝सकाळी गावातून प्रभातफेरी काढून संविधाना विषयी जनजागृती करण्यात आली.👫👭👬👬👬
 *' भारत माझी माऊली संविधान त्याची सावली '*,
*जबतक 🌞सुरज चाँद🌝 रहेगा , तबतक संविधान रहेगा*
*संविधान दिन-चिरायु होवो*
अशा घोषवाक्यानी वाटेगाव नगरी दुमदुमली.

👉📝याप्रसंगी मा.मु.अ.श्री चव्हाण सर यांनी संविधानाचे (प्रास्तविक) महत्त्व सांगितले व तसेच श्रीमती झाडे मँडम व इतर आम्ही शाळेतील  शिक्षकवृदांनी संविधानाचे महत्त्व व मार्गदर्शन पर माहिती विषद केली.त्यानंतर काही 👉🎤विद्यार्थ्यांची भाषणे झाली.
👫  👭   👭
📝 संविधान प्रास्तविका ची शपथ घेण्यात आली.
📒
🎤कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन  व आभार इयत्ता सातवीतील विद्यार्थी ( चमुने )  यांनी केले.
*================*🌷🍁🍁🍁🍁🍁🌷
वृत्तांकन लेखन
✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे*
जि.प .प्रा.शाळा वाटेगाव
ता.हदगाव जि.नांदेड

कथा क्रमांक ८५

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
*🌍 कथेचे बाळकडू 🌏*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*📚अभ्यास कथा भाग ८५ 📚*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*♻ मोह* ♻
=========================
*✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
एका नगरात एक पुजारीबाबा राहत होते. शेजारच्या गावातील पुजाऱ्याचे अकस्मात निधन झाल्याने या
पुजारी बाबाना त्या गावात पुजारी म्हणून नियुक्त केले गेले. त्यानंतर एकदा त्या गावी जाण्यासाठी पुजारी बाबा बसमध्ये चढले, त्यांनी कंडक्टरला पैसे दिले आणि ते आपल्या जागेवर जाऊन बसले.

कंडक्टरने तिकिटाचे पैसे घेतले व उरलेली रक्कम पुजारीबाबाना परत केली तेंव्हा त्यांच्या असे लक्षात आले कि त्यात १० रुपये जास्त आले आहेत. पुजारीबाबानी असा विचार केला कि आता कंडक्टर घाईत आहे तेंव्हा त्यांना थोड्या वेळाने पैसे परत करू या. काही वेळ झाला कंडक्टर अजूनही त्याचे तिकिटे देण्याचे काम करतच होता.

पुजारीबाबांच्या मनात एक विचार आला कि आता
तर कंडक्टर इतका घाईत आहे कि त्याला ते १० रुपये परत केले काय आणि नाही केले काय काय फरक पडणार आहे. सरकारी बस कंपनी इतके पैसे मिळवते प्रवाशांकडून मग इतक्या छोट्या रकमेने त्यांना काय होणार? लाखो रुपयांचे व्यवहार करणाऱ्या कंपनीकडून हे १० रुपये आपल्या सारख्या पुजाऱ्याला भेट मिळाले असेच आपण समजू. आपण याचा काही तरी सदुपयोग करू शकू.

पुजारीबाबांच्या मनात असे विचार चालू असतानाच त्यांचे उतरायचे ठिकाण आले. बसमधून उतरताना अचानक त्यांचा हात खिशाकडे गेला व त्यातून ती दहा रुपयाची नोट त्यांनी बाहेर काढली व कंडक्टरला परत दिली व म्हणाले,
"भाऊ !! .......तुम्ही मघाशी मला तिकिटाचे पैसे परत करताना घाईगडबडीत हे दहा रुपये जास्त दिले आहेत."

कंडक्टर हसून म्हणाला,"महाराज! तुम्हीच या गावाचे नवे पुजारी आहात का?"

पुजारीबाबा हो म्हणाले.

त्यावर कंडक्टर पुन्हा बोलू लागला," महाराज, माझ्या मनात तुमचे प्रवचन ऐकण्याची खूप इच्छा होती. तुम्हाला बसमध्ये चढताना पाहिले आणि मनात एक विचार आला कि चला आपल्याला या कामामधून वेळ मिळत नाही आणि तुमची भेट घडून येत नाही तेव्हा तुम्ही जसे प्रवचनात उपदेश करता ते आचरणात आणता काय याचा पडताळा घ्यावा म्हणून मी ते दहा रूपये तुम्हाला मुद्दाम जास्त दिले होते. पण मला आता कळून चुकले आहे की तुम्ही जसे बोलता तसेच तुमचे पवित्र आचरण आहे.

महाराज मला क्षमा करा.'' एवढे बोलून कंडक्टरने
गाडी पुढे जाण्यासाठी बेल वाजवली.

पुजारीबाबांना आता घाम फुटला होता, ते घाम
पुसत आकाशाकडे पहात म्हणाले,'' प्रभो, तुझी लीला अपरंपार आहे, दहा रूपयांचा मोह मला आत्ता किती महागात पडू शकला असता पण तुम्ही मला त्यातून वाचवले. देवा तू खरंच दयाळू आहेस. अचानक का होईना त्या दहा रूपयांच्या मोहातून तू मला बाहेर काढले व समाजात होणारी माझी बदनामी थांबवली.''

*तात्पर्यः*
मोह हा वाईट असतो, ज्याक्षणी मोहाने मन ग्रासते त्याक्षणीच मानव प्रगतीकडून अधोगतीकडे प्रवास करू
लागतो.
〰〰〰〰〰〰〰〰〰
*📝शब्दांकन/ संकलन/तथा समूह प्रशासक*📝
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
*©मराठीचे शिलेदार समूह*
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

कथा क्रमांक ८६

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
*🌍 कथेचे बाळकडू 🌏*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*📚अभ्यास कथा भाग ८६ 📚*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*♻  सत्कर्म* ♻
=========================
*✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)*
〰〰〰〰〰〰〰
 जगज्जेता अलेक्झांडर
जवळजवळ संपूर्ण जग जिंकून आपल्या सैन्यासह
माघारी आपल्या देशात परतत होता. परंतु जाताना तो अतिशय गंभीर आजारी झाला.
अनेक उत्कृष्ट उपाय करूनही आजारातून बरे होण्याची कोणतीही लक्षणे दिसत नव्हती.
जिंकलेले संपूर्ण साम्राज्य, एवढी मोठी शूर
सेना, आपली जगज्जेती तीक्ष्ण तलवार आणि अमाप संपत्ती, ह्या सर्वांचा त्याग करून आपणाला आता मृत्यूला सामोरे जावे लागणार
ह्याची त्याला जाणीव झाली. आपण आता कोणत्याही परिस्थितीत आपल्या मायदेशी जीवंत पोहचू शकत नाही हे त्याला कळून चुकले.
मृत्यूच्या शेवटच्या घटका मोजत असताना त्याने आपल्या सरदाराला पाचारण
केले आणि म्हणाला ” मी आता लवकरच हे जग
सोडून निघून जाणार आहे, माझ्या तीन इच्छा आहेत आणि त्या पूर्ण करण्याची सर्वस्वी तुमची जबाबदारी आहे."
सरदाराला साश्रूपूर्ण होय म्हणण्याशिवाय
गत्यंतर नव्हते.
अलेक्झांडर म्हणाला:

*१*. माझी पहिली इच्छा “
माझ्या खाजगी डॉक्टरनेच
माझी शवपेटी एकट्यानेच उचलून न्यावी”
*२*. माझी दुसरी इच्छा “
माझी शवपेटी स्मशानभूमीवर
नेण्याच्या संपूर्ण रस्त्यावर मी आतापर्यंत जिंकलेले सर्व सोने, चांदी, जडजवाहीर पसरून ठेवावे”
*३*. आणि माझी अंतिम इच्छा ” माझे
दोन्ही हात शवपेटीेच्या बाहेर काढून लोंबकळत ठेवावे.”
आपला राजा आपणाला
कायमचे सोडून जाणार, हे ऐकून सर्व सेना अतिशय दुःखी झाली.
सरदाराने इच्छा पूर्ण करण्याचे आश्वासन दिले,
तरी देखील हिम्मत करून प्रश्न विचारला,
” हे राजन, ह्या कसल्या विचित्र इच्छा."
राजाने एक दीर्घ श्वास
घेतला आणि म्हणाला,
“माझ्या आयुष्यात मी जे
काही आता शिकलो, ते सर्व जगाला माहीत व्हावे म्हणूनच ह्या तीन इच्छांची पूर्तता करणे
गरजेचे आहे”
माझ्या खाजगी डॉक्टरने
माझी शवपेटी एकट्यानेच उचलून न्यावी, ह्यातून मला जगाला एक संदेश
द्यावयाचा आहे की, जगातील कोणीही उत्कृष्ट डॉक्टर देखील तुम्हाला मरणापासून वाचवू शकत नाही
.मरण हे अंतिम सत्य आहे. त्यामुळे
जीवन हे गृहीत न धरता ते चांगल्या प्रकारे कोणालाही न दुखावता कसे जगता येईल
हा प्रत्येकाने प्रामाणिकपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे.
जगज्जेता म्हणून नावलौकिक प्राप्त करण्यासाठी मी आयुष्यभर सतत लढाया केल्या,
अपार संपत्ती गोळा केली,पण मरताना मात्र मी काहीच घेवून जाणार नाही,
म्हणूनच
माझी दुसरी इच्छा
“माझी शवपेटी स्मशानभूमीवर
नेण्याच्या संपूर्ण रस्त्यावर मी आतापर्यंत जिंकलेले सर्व सोने, चांदी, जडजवाहीर पसरून ठेवावे,केवळ संपत्ती कोणत्याही प्रकारे
जमविणे म्हणजेच जीवन नाही." हा संदेश
लोकांना मिळेल
आणि अशी संपत्ती मिळविण्यासाठी केलेली
धावाधाव म्हणजेच जीवनातील अमूल्य
वेळेचा कालापव्य.
जनतेला कळू द्या मी रिकाम्या हातानेच ह्या जगात आलो आणि रिकाम्या हातानेच हे
जग सोडून जात आहे,
म्हणून
 माझी तिसरी इच्छा
” माझे दोन्ही हात
शवपेटीेच्या बाहेर काढून लोंबकळत ठेवावे."
हे सर्व सांगून थोड्याच वेळात त्याचा मृत्यू झाला.

 *तात्पर्य*
*माणुस मरतांना शेवटी काहीच सोबत नेत नाही.फक्त कर्मच सोबत येते .म्हणजे जेव्हा काळाची उडी पडेल तेव्हा कोणीही वाचवू शकत नाही*.
*सगळं इथेच ठेवून जायचे आहे.*
*एक माणूस म्हणून या संसारात चांगले  वागावे, आणि  चांगली कर्मे करावीत*.
〰〰〰〰〰〰〰〰〰
*📝 संकलन / समूह प्रशासक*
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
*©मराठीचे शिलेदार समूह*
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

कथा क्रमांक ८७

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
*🌍 कथेचे बाळकडू 🌏*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*📚अभ्यास कथा भाग ८७ 📚*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*♻क्रोधावरील उपाय संयम* ♻
=========================
*✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
एकदा भगवान श्रीकृष्ण, बलराम
आणि सात्यकी हे तिघे जंगलातून जात
असताना रात्रीच्या वेळी काहीच
न कळाल्याने रस्ता चुकले.
जंगल घनदाट होते, तेथे न पुढे
जाण्याचा मार्ग दिसत होता न मागे येण्याचा.
तेव्हा तिघांनीही असा निर्णय
घेतला आता येथेच एखादी सुरक्षित जागा पाहून विश्राम करायचा आणि सकाळी उठून मार्गस्थ व्हायचे.
    तिघेही दमलेले होते पण प्रत्येकाने थोडा थोडा वेळ पहारा देण्याचे ठरवले.
पहिली पाळी सात्यकीची होती.
सात्यकी पहारा करू लागला

 तेव्हाच झाडावरून एका पिशाच्चाने हे पाहिले की एक माणूस पहारा करतो आहे आणि दोनजण झोपले आहेत. पिशाच्च झाडावरून खाली उतरले व सात्यकीला मल्लयुद्धासाठी बोलावू
लागले.
  पिशाच्चाने बोलावलेले पाहून
सात्यकी संतापला व क्रोधाने पिशाच्चावर धावून गेला. त्याक्षणी पिशाच्चाचा आकार बदलला व तो मोठा झाला. दोघांत तुंबळ मल्लयुद्ध झाले. पण जेव्हा जेव्हा सात्यकीला क्रोध येई तेव्हा तेव्हा पिशाच्चाचा आकार मोठा होई व ते सात्यकीला अजूनच जास्त जखमा करत असे.

एका प्रहरानंतर बलराम जागे झाले व
त्यांनी सात्यकीला झोपण्यास सांगितले.
सात्यकिने त्यांना पिशाच्चाबदल काहीच सांगितले नाही. बलरामांनाही पिशाच्चाने मल्लयुद्धास निमंत्रण दिले. बलराम पण क्रोधाने पिशाच्चाशी लढायला गेले तर त्याचा आकार त्यांना वाढलेला  दिसून आला. ते जितक्या क्रोधाने त्याला मारायला जात तितका त्या पिशाच्चाचा आकार मोठा होत असे. शेवटी तोही प्रहर संपला व आता पहा-याची पाळी भगवान श्रीकृष्णाची होती.

पिशाच्चाने मोठ्या क्रोधाने श्रीकृष्णांना आव्हान दिले पण श्रीकृष्ण शांतपणे मंदस्मित करत त्याच्याकडे पहात राहिले. पिशाच्च अजून संतापले व
मोठमोठ्याने ओरडून श्रीकृष्णांना बोलावू लागले पण श्रीकृष्ण मंदस्मित करत शांत भाव जपत राहिले
व एक आश्चर्य झाले ते म्हणजे जसे जसे पिशाच्चाला क्रोध येऊ लागला तसतसा त्याचा आकार लहान होत गेला. रात्र संपत गेली अन पहाट
झाली शेवटी आकार लहान होत
होत पिशाच्चाचा एक छोटासा किडा झाला व श्रीकृष्णांनी अलगद
त्याला आपल्या उपरण्यात बांधून ठेवले.
  सकाळी सात्यकी व बलरामांनी रात्रीची कहाणी सांगताच श्रीकृष्णांनी तो किडा त्यांना दाखविला व म्हणाले,
 "तुम्ही क्रोधाने याला कधीच जिंकू शकत नव्हता कारण हे क्रोधाचे पिशाच्च होते. त्याला शांती हेच औषध
आहे. क्रोधाने क्रोध वाढतो मात्र त्याचा प्रतिकार हा केवळ शांतभाव प्रकटीकरणाने होतो.
मी शांत राहिलो म्हणून हे पिशाच्च बघा कसे आता या किड्यासारखे लहान होऊन बसले आहे.

तात्पर्य : क्रोधावर संयमानेच विजय मिळविता येतो.
क्रोधाला क्रोधाने मारता येऊ शकत नाही तर शांतपणे, प्रेमानेच कमी करता येते, नष्ट करता येते.
क्रोधाचे हे पिशाच्च बाहेर कोठे नसून,  आपल्या विचारातच वसत असते.
〰〰〰〰〰〰〰〰〰
*📝 संकलन / समूह प्रशासक*
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
*©मराठीचे शिलेदार समूह*
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

विचारपुष्प क्रमांक १९१

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
     🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संघर्ष जेवढा बिकट , तेवढेच  यश अधिक उज्वल.*
*रेस मध्ये पळणार्या घोड्याला "विजय" काय असतो हे माहितीही नसतं...*
*त्यावर बसलेल्या माणसाने दिलेल्या यातनांमुळे,*
*तो जिवाच्या आकांताने पळत असतो...*
*जेवढ्या यातना जास्त तेवढा घोड्याचा वेग जास्त...*
*आणी विजय पक्का...*
*त्याप्रमाणे तुमच्या जीवनात जेवढ्या अडचणी,*
*आणि जेवढ्या यातना जास्त तेवढाच तुमचा विजय पक्का.*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
 *🙏🏼शब्दांकन/संकलन🙏*
 *समूह प्रशासक*
✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
http://www.pramilasenkude.blogspot.in
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
 *©मराठीचे शिलेदार समूह*
🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿

कथा क्रमांक ८४

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
*🌍 कथेचे बाळकडू 🌏*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*📚अभ्यास कथा भाग ८४ 📚*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*♻ मैत्रीची खरी ओळख* ♻
=========================
*✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
एक जंगल होते. गाय, घोड़ा, गाढव, आणि बकरी तेथे चरायला येत असत. त्या चौघांमध्ये मैत्री झाली. ते जेथे चरायला जात असत तेथे एका झाडाखाली सशाचे बीळ होते. एक दिवस सशाने त्या चौघांना एकत्र फिरताना पाहिले त्यांची मैत्री पाहिली आणि त्याला वाटले आपणही त्यांच्याशी मैत्री करावी. ससा त्यांच्यापाशी गेला व म्हणाला," तुम्ही चौघे जसे मित्र आहात तसेच मलाही तुमचा मित्र करून घ्या. त्यांनी सर्वांनी या गोष्टीला मान्यता दिली व त्याला मित्र करून घेतले. सशाला मोठा आनंद झाला. ससापण त्यांच्यासोबत फिरू लागला. एके दिवशी ससा त्यांच्याजवळ बसला होता. अचानक शिकारी कुत्रे जवळ आल्याची त्यांना सर्वाना जाणीव झाली, ससा गाईला म्हणाला,"तू मला तुझ्या पाठीवर बसव जेंव्हा शिकारी कुत्रे जवळ येतील त्यांना तू तुझ्या शिंगांनी मारून पळवून लाव." गाय म्हणाली,"आता तर माझी घरी परतण्याची वेळ झाली आहे." तेंव्हा ससा घोडयाकडे गेला आणि म्हणाला," तू मला तुझ्या पाठीवर बसव आणि माझा जीव वाचव" घोडा म्हणाला,"मित्र मी तुला पाठीवर घेतले असते पण मला खाली बसताच येत नाही मी तुला कसे पाठीवर घेवू?" तेंव्हा ससा गाढवाला म्हणाला,"मित्रा तू तरी मला मदत कर" गाढव म्हणाले" मी तर आता घरी चाललो तू बघ" मग शेवटी ससा बकरी कडे गेला व म्हणाला,"बकरीताई तू तुझ्या पाठीवर मला घेतेस काय?" बकरी म्हणाली,"अरे सशा, मीच शिकारी कुत्र्यांना घाबरते आणि तुला वाचावयाच्या नादात त्यांनी मलाच फाडून खातील. तेंव्हा तू तुझे बघ" एवढ्यात कुत्रे तेथे पोहोचले, ससा जीवाचा आकांत करून पळाला आणि एका झाडाच्या पाठीमागे जाऊन लपला. कुत्रे निघून गेले आणि ससा मरणापासून वाचला. त्याने मनात विचार केला,"असे मित्र असण्यापेक्षा मित्र नसलेले बरे!!"

*तात्पर्यः*
मिञाची खरी ओळख संकटात होते.खरे मिञ म्हणनारे संकटात सोडून जातात याचा अनुभव नेहमी येतोच.
〰〰〰〰〰〰〰〰〰
*📝शब्दांकन/ संकलन/तथा समूह प्रशासक*📝
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
*©मराठीचे शिलेदार समूह*
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

विचारपुष्प क्रमांक १९०

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
     🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*' संता नाही जाती शिंपल्यापोटी जन्मे मोती. '*
🙏🙏
*सज्जन म्हणजे थोर पुरुष.सज्जन या पृथ्वीतलावर🌎 उमललेल्या फुलाप्रमाणं 🌺 सर्वत्र आपल्या सद्गुणांचा सुगंध पसरवित असतात.परोपकारासाठीच त्याचा जन्म असतो.नम्रता हाच सज्जनाचा मुख्य अलंकार असतो.सज्जनाच्या ठायी दया , क्षमा आणि शांती सतत वास करीत असते.*
   
      *सज्जन हे कोणा एका जातीचे किंवा धर्माचे नसतात.ते सर्वांचे सारखे असतात.🌞सूर्य जसा सर्वांना प्रकाश देतो त्याप्रमाणं सज्जन सर्वांच्यावर प्रेमाचा पाऊस पाडतात.  ' चंद्र आणि चांदण्यापेक्षाही  शितल असतो सज्जनांचा सहवास'.  आणि अशा सज्जनांचा सहवास लाभला तर माणसाच्या जीवनाचं सोनं होत.*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
 *🙏🏼शब्दांकन/संकलन🙏*
 *समूह प्रशासक*
✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
http://www.pramilasenkude.blogspot.in
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
 *©मराठीचे शिलेदार समूह*
🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿

विचारपुष्प क्रमांक १८९

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
     🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*आपल जीवन अस्थीर आहे. क्षणभंगुर आहे. आज आहे तर उद्या नाही. माणसाचं चित्त आणि वित्तही चंचल आहे.माणसाचं जीवित आणि तारुण्यही चंचल आहे. फक्त माणसाचे कर्म आणि कीर्ती चिरकाल टिकणारी आहे.*

    *पण माणसं नाहक नको त्या गोष्टींच्या पाठीमागे लागून जीवन उद्ध्वस्त करतात. कस्तुरी मृगाच्या ठायी कस्तुरी असते पण तो कस्तुरीच्या शोधात इकडं तिकडं धावत असतो . आपणही जीवनभर धरसोड वृत्तीन जगत असतो.*
*आपल्या जीवनात जे मौल्यवान मोती आहेत त्याकडं न पाहता जगात विखुरलेल्या गारगोटीच्या पाठीमागे धावत असतो.*
*थोडक्यात आपल जीवन आनंदाच सरोवर आहे सदासर्वदा आनंदी रहा मन प्रसन्न ठेवा व चांगले कर्म करा.*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
 *🙏🏼शब्दांकन/संकलन🙏*
 *समूह प्रशासक*
✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
http://www.pramilasenkude.blogspot.in
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
 *©मराठीचे शिलेदार समूह*
🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿

उत्तरसुची विज्ञान प्रश्नमंजुषा

🙏🏻 नमस्कार 🙏🏻

*¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥*
*⚗ विज्ञान मैत्री प्रश्नमंजुषा ⚗*
*€€€€€€€€€€€€€€€€€€€€€€€€*
   *🏵 उत्तरसूची 🏵*
*¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥*
*प्रश्न 1 :*        
*पित्त हा विकार शरीरातील कोणत्या अवयवाशी संबंधित आहे ?*
अ)  यकृत   ✅✅
ब)  फुफ्फुस    
क)  स्वादुपिंड    
ड)  जठर
📯🏺📯🏺📯🏺📯🏺📯📯
*प्रश्न 2 :*
*मानवी विकासाची सुरूवात ...........येथून होते*      
अ)   गर्भधारणा    
ब)   अवयवांचे विभेदन  ✅✅
क)   दोन आठवड्यानंतर
ड)   चार आठवड्यानंतर
📯🏺📯🏺📯🏺📯🏺📯🏺
*प्रश्न 3 :*
 *मानवी लहान आतड्याची लांबी किती मीटर असते ?*      
अ)     ५ ते ७  
ब)      ६ ते ८  ✅✅
क)      ७ ते ९  
ड)      ८ते १०
📯🏺📯🏺📯🏺📯🏺📯🏺
*प्रश्न 4 :*
 *एक्झिमा रोगाचा प्रभाव मानवाच्या कोणत्या अवयवांवर होतो ?*      
अ)  डोळे    
ब)   कान        
क)   त्वचा   ✅✅        
ड)    नाक
📯🏺📯🏺📯🏺📯🏺📯🏺
*प्रश्न 5 :*
*अध्ययनाचे नियम ही कोणत्या मानसशास्त्रज्ञाची निर्मिती आहे ?*        
अ)  कोहलर    
ब)   फ्राईड        
क)  जे.बी.वैटसन  ✅ ✅      
ड)  थाँर्नडाईक
📯🏺📯🏺📯🏺📯🏺📯🏺
*प्रश्न 6 :*
*स्टार्च हा .....पदार्थ आहे*        
अ)  नत्रयुक्त    
ब)   लिपीड      
क)  स्निग्ध    
ड)   पिष्टमय   ✅✅
📯🏺📯🏺📯🏺📯🏺📯🏺
*प्रश्न 7 :*
*श्वेतपेशीचे प्रमुख कार्य कोणते ?*    
अ)  शरीररक्षण   ✅✅      
ब)   रक्त गोठणे      
क)  शरीराची वाढ    
ड)   कार्बनडायऑक्साइडचे वहन
📯🏺📯🏺📯🏺📯🏺📯🏺
*प्रश्न  8 :*
*उर्जा विमोचनाची पेशीतील क्रिया म्हणजे .....होय*          
अ)  पचन      
ब)   आभिसरण    
क)   श्वसन   ✅✅    
ड)   उत्सर्जन
📯🏺📯🏺📯🏺📯🏺📯🏺
*प्रश्न 9 :*
*विकर हे काय आहे ?*          
अ)  मेद      
ब)   प्रथीन   ✅✅      
क)  आम्ल      
ड)  जीवनसत्त्व
📯🏺📯🏺📯🏺📯🏺📯🏺
*प्रश्न 10 :*
*मानवी शरीरातील बहुतांशी आयोडीन कोणत्या ग्रंथीत साठवलेले असते ?*  
अ)  अधिवृक्ष ग्रंथी
ब)   परावटू ग्रंथी        
क)  अवटू ग्रंथी  ✅✅      
ड)   पियूषिका
📯🏺📯🏺📯🏺📯🏺📯🏺
*🍁संकलन/ समुह प्रशासक 🍁*
*प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*

*©मराठीचे शिलेदार समुह*

🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂

कथा क्रमांक ८४

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
*🌍 कथेचे बाळकडू 🌏*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*📚अभ्यास कथा भाग ८४ 📚*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*♻ मैत्रीची खरी ओळख* ♻
=========================
*✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
एक जंगल होते. गाय, घोड़ा, गाढव, आणि बकरी तेथे चरायला येत असत. त्या चौघांमध्ये मैत्री झाली. ते जेथे चरायला जात असत तेथे एका झाडाखाली सशाचे बीळ होते. एक दिवस सशाने त्या चौघांना एकत्र फिरताना पाहिले त्यांची मैत्री पाहिली आणि त्याला वाटले आपणही त्यांच्याशी मैत्री करावी. ससा त्यांच्यापाशी गेला व म्हणाला," तुम्ही चौघे जसे मित्र आहात तसेच मलाही तुमचा मित्र करून घ्या. त्यांनी सर्वांनी या गोष्टीला मान्यता दिली व त्याला मित्र करून घेतले. सशाला मोठा आनंद झाला. ससापण त्यांच्यासोबत फिरू लागला. एके दिवशी ससा त्यांच्याजवळ बसला होता. अचानक शिकारी कुत्रे जवळ आल्याची त्यांना सर्वाना जाणीव झाली, ससा गाईला म्हणाला,"तू मला तुझ्या पाठीवर बसव जेंव्हा शिकारी कुत्रे जवळ येतील त्यांना तू तुझ्या शिंगांनी मारून पळवून लाव." गाय म्हणाली,"आता तर माझी घरी परतण्याची वेळ झाली आहे." तेंव्हा ससा घोडयाकडे गेला आणि म्हणाला," तू मला तुझ्या पाठीवर बसव आणि माझा जीव वाचव" घोडा म्हणाला,"मित्र मी तुला पाठीवर घेतले असते पण मला खाली बसताच येत नाही मी तुला कसे पाठीवर घेवू?" तेंव्हा ससा गाढवाला म्हणाला,"मित्रा तू तरी मला मदत कर" गाढव म्हणाले" मी तर आता घरी चाललो तू बघ" मग शेवटी ससा बकरी कडे गेला व म्हणाला,"बकरीताई तू तुझ्या पाठीवर मला घेतेस काय?" बकरी म्हणाली,"अरे सशा, मीच शिकारी कुत्र्यांना घाबरते आणि तुला वाचावयाच्या नादात त्यांनी मलाच फाडून खातील. तेंव्हा तू तुझे बघ" एवढ्यात कुत्रे तेथे पोहोचले, ससा जीवाचा आकांत करून पळाला आणि एका झाडाच्या पाठीमागे जाऊन लपला. कुत्रे निघून गेले आणि ससा मरणापासून वाचला. त्याने मनात विचार केला,"असे मित्र असण्यापेक्षा मित्र नसलेले बरे!!"

*तात्पर्यः*
मिञाची खरी ओळख संकटात होते.खरे मिञ म्हणनारे संकटात सोडून जातात याचा अनुभव नेहमी येतोच.
〰〰〰〰〰〰〰〰〰
*📝शब्दांकन/ संकलन/तथा समूह प्रशासक*📝
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
*©मराठीचे शिलेदार समूह*
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

शब्दधन

!!शब्दधन!! शिकण्यासारखं जगात भरपूर काही आहे, पण भरपूर
काही शिकण्या आधी...
१. प्रवाहाच्या विरुद्ध एकटे उभे राहायला शिका
२. काळोखात जायला शिका
४. अन्याया विरुद्ध आवाज़ उठवायला शिका
५. आपले मत ठामपणे मांडायला शिका
६. नाही म्हणायला शिका
७. प्रश्न विचारायला शिका
८. मदत व सेवा करायला शिका
९. प्रेम करायला शिका
१०.मौन धरायला शिका
११. एकांतवासात राहायला शिका
१२. यात्रा करायला शिका
१३. स्वत:शी बोलायला शिका
१४. दुसर्यांचा विचार करायला शिका
१५. संघर्ष करायला शिका
१६. सुःख- दुःखाच्या वरती उठायला शिका
१७. जबाबदारी घेऊन ती पूर्ण करायला शिका
१८. स्वताःवर प्रगाढ़ विश्वास करायला शिका
१९. स्त्रीने पुरुषाचे व पुरुषाने स्त्रीचे महत्व जानून
घ्यायला शिका
२०. निसर्गाशी नातं जोडायला शिका
२१. सम्यक आहार, व्यायाम व
निद्रा घ्यायला शिका
२२ .ध्यान करायला शिका
२३. उच्चतम विचार करायला शिका
२४. अभ्यास करायला शिका
२५. वक्तृत्व, नेतृत्व व कर्तुत्व करायला शिका
२६. मोठे स्वप्न पहायला शिका
२७. कल्पना व आविष्कार करायला शिका
२८. वर्तमानात राहुन जीवनाचा आनंद घ्यायला शिका
२९. सगळ्यात शेवटी, माणूस म्हणून जगायला शिका
३०. शारीरिक मृत्यूच्या पलीकडे जीवन असेल तर
त्याचाही शोध घ्यायला शिका
मला माणसे जोडायला आवडतात,
माणसांशी नाती जोडायला आवडतात
जोडलेली नाती जपायला आवडतात,
कारण
माझा विश्वास आहे की, माझ्या मृत्यूनंतर
मी कमावलेली संपत्ती
मी माझ्याबरोबर घेऊन जाणार नाही,
परंतु
मी जोडलेल्या माझ्या माणसांच्या डोळ्यांतील
अश्रूंचा एक थेंब हाच
माझ्याकरिता लाखमोलाचा दागिना आणि हीच
माझी माझ्या आयुष्यातीलॊ खरी कमाई
असेल...
तुमचे आणि माझे हे नाते माझ्यासाठी अनमोल आहे ...
फुले नित्य फुलतात,
ज्योती अखंड उजळतात,
आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात.
तोडणं हा क्षणाचा खेळ असतो,
पण जोडणं हा संपूर्ण
आयुष्याचा मेळ असतो.
देवाने आपल्या शरीराची रचनाच अशी केलेली आहे की
आपण स्वतःची पाठही थोपटू शकत नाही आणि
स्वतःला लाथही मारू शकत नाही.
म्हणूनच..
माणसाच्या जीवनात
"हितचिंतकांची"
आणि
"निंदकांची" आवश्यकता आहे....
आयुष्यात असे लोक जोडा,
जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली अन् वेळेला तुमचा आरसा बनतील,........
कारण आरसा कधी खोटे बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही.,,,,

शुद्धशब्दमाला उपक्रम भाग क्रमांक ११ते२०

[10/3, 7:50 PM] प्रमिलाताई सेनकुडे: 💠⚜💠⚜💠⚜💠⚜💠⚜
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
        *♻ शुद्ध शब्दकोश ♻*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
       *☘शब्दमाला भाग क्र.: ११☘*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
        *🔹 अ🔹*

*🔰१) अनिमिष*


*🔰२) अनावृत्त*


*🔰३) अनिर्णीत*


*🔰४) अनिश्चित*


*🔰५) अनिवार्य*


*🔰६) अनुसूची*


*🔰७) अनपेक्षित*


*🔰८) अनावृष्टी*


*🔰९) अनिष्टापत्ती*


*🔰१०) अनामिका*


➖➖➖➖➖➖➖➖➖➖
    *🙏संकलन/समूह प्रशासक🙏*
    *✍प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
           📞9403046894
*जि.प.प्रा.शा.वाटेगाव*
*ता.हदगाव जि.नांदेड.*

http://www.pramilasenkude.blogspot.in

*©मराठीचे शिलेदार समूह*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
[10/3, 7:55 PM] प्रमिलाताई सेनकुडे: 💠⚜💠⚜💠⚜💠⚜💠⚜
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
        *♻ शुद्ध शब्दकोश ♻*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
  *☘शब्दमाला भाग क्र.: १२ ☘*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
        *🔹अ 🔹*

*🔰१) अनुभूती*


*🔰२) अनुभूति*


*🔰३) अनुप्रीता*


*🔰४) अनुपस्थिती*


*🔰५) अनुपस्थिति*


*🔰६) अनुपान*


*🔰७) अनुचर*


*🔰८) अनुकंपा*


*🔰९) अनुगृहीत*


*🔰१०) अनुग्रह*


➖➖➖➖➖➖➖➖➖➖
    *🙏संकलन/समूह प्रशासक🙏*
    *✍प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
           📞9403046894
*जि.प.प्रा.शा.वाटेगाव*
*ता.हदगाव जि.नांदेड.*

http://www.pramilasenkude.blogspot.in

*©मराठीचे शिलेदार समूह*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
[10/3, 8:00 PM] प्रमिलाताई सेनकुडे: 💠⚜💠⚜💠⚜💠⚜💠⚜
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
        *♻ शुद्ध शब्दकोश ♻*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
  *☘शब्दमाला भाग क्र.: १३ ☘*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
        *🔹अ 🔹*

*🔰१) अनुसरून*


*🔰२) अन्वित*


*🔰३) अन्वयार्थ*


*🔰४) अन्योक्ती*


*🔰५) अन्योक्ति*


*🔰६) अनौरस*


*🔰७) अनौचित्य*


*🔰८) अनुज्ञा*


*🔰९) अनृत*


*🔰१०) अनुस्यूत*


➖➖➖➖➖➖➖➖➖➖
    *🙏संकलन/समूह प्रशासक🙏*
    *✍प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
           📞9403046894
*जि.प.प्रा.शा.वाटेगाव*
*ता.हदगाव जि.नांदेड.*

http://www.pramilasenkude.blogspot.in

*©मराठीचे शिलेदार समूह*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
[10/3, 8:08 PM] प्रमिलाताई सेनकुडे: 💠⚜💠⚜💠⚜💠⚜💠⚜
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
        *♻ शुद्ध शब्दकोश ♻*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
       *☘शब्दमाला भाग क्र.: १४☘*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
        *🔹 अ🔹*

*🔰१) अभिक्रिया*


*🔰२) अपरीक्षित*


*🔰३) अभ्युत्थान*


*🔰४) अभूतपूर्व*


*🔰५) अभिसारिका*


*🔰६) अभिवृत्ती*


*🔰७) अभिवृद्धी*


*🔰८) अपरिहार्य*


*🔰९) अपकर्ष*


*🔰१०) अन्वीक्षण*


➖➖➖➖➖➖➖➖➖➖
    *🙏संकलन/समूह प्रशासक🙏*
    *✍प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
           📞9403046894
*जि.प.प्रा.शा.वाटेगाव*
*ता.हदगाव जि.नांदेड.*

http://www.pramilasenkude.blogspot.in

*©मराठीचे शिलेदार समूह*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
[10/3, 8:16 PM] प्रमिलाताई सेनकुडे: 💠⚜💠⚜💠⚜💠⚜💠⚜
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
        *♻ शुद्ध शब्दकोश ♻*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
  *☘शब्दमाला भाग क्र.: १५.☘*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
        *🔹 🔹*

*🔰१) अष्टाध्यायी*


*🔰२) अश्वत्थामा*


*🔰३) अशरीरिणी*


*🔰४ अर्थशून्य*


*🔰५) अलिप्त*


*🔰६) अर्धोन्मीलित*


*🔰७) अर्धांगवायू*


*🔰८) अमृतेश्वर*


*🔰९) अमृतवेश*


*🔰१०) अमृततुल्य*


➖➖➖➖➖➖➖➖➖➖
    *🙏संकलन/समूह प्रशासक🙏*
    *✍प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
           📞9403046894
*जि.प.प्रा.शा.वाटेगाव*
*ता.हदगाव जि.नांदेड.*

http://www.pramilasenkude.blogspot.in

*©मराठीचे शिलेदार समूह*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
[10/3, 8:17 PM] प्रमिलाताई सेनकुडे: 💠⚜💠⚜💠⚜💠⚜💠⚜
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
        *♻ शुद्ध शब्दकोश ♻*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
  *☘शब्दमाला भाग क्र.: १६☘*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
        *🔹 🔹*

*🔰१) अंतर्भूत*


*🔰२) अंतर्भाव*


*🔰३) अंतर्गत*


*🔰४) अंतर्यामी*


*🔰५) अतर्क्य*


*🔰६) अंतरात्मा*


*🔰७) अणू*


*🔰८) अणु*


*🔰९) अणुरेणू*


*🔰१०) अणकुचीदार*


➖➖➖➖➖➖➖➖➖➖
    *🙏संकलन/समूह प्रशासक🙏*
    *✍प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
           📞9403046894
*जि.प.प्रा.शा.वाटेगाव*
*ता.हदगाव जि.नांदेड.*

http://www.pramilasenkude.blogspot.in

*©मराठीचे शिलेदार समूह*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
[10/3, 8:22 PM] प्रमिलाताई सेनकुडे: 💠⚜💠⚜💠⚜💠⚜💠⚜
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
        *♻ शुद्ध शब्दकोश ♻*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
  *☘शब्दमाला भाग क्र.: १७. ☘*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
        *🔹 अ🔹*

*🔰१) अस्मिता*


*🔰२) अस्थिपंजर*


*🔰३) अस्तुरी*


*🔰४) अस्ताव्यस्त*


*🔰५) अस्तगंत*


*🔰६) अस्तनी*


*🔰७) अस्वस्थ*


*🔰८) अस्तित्वात*


*🔰९) अस्तित्व*


*🔰१०) अस्खलित*


➖➖➖➖➖➖➖➖➖➖
    *🙏संकलन/समूह प्रशासक🙏*
    *✍प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
           📞9403046894
*जि.प.प्रा.शा.वाटेगाव*
*ता.हदगाव जि.नांदेड.*

http://www.pramilasenkude.blogspot.in

*©मराठीचे शिलेदार समूह*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
[10/3, 8:27 PM] प्रमिलाताई सेनकुडे: 💠⚜💠⚜💠⚜💠⚜💠⚜
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
        *♻ शुद्ध शब्दकोश ♻*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
  *☘शब्दमाला भाग क्र.: १८ ☘*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
        *🔹अ 🔹*

*🔰१) अज्ञानवश*


*🔰२) असंदिग्ध*


*🔰३) अस्तुरी*


*🔰४) अंगुष्ठ*


*🔰५) अक्षौहिणी*


*🔰६) अक्षोभ*


*🔰७) अळीमिळी*


*🔰८) अहिराणी*


*🔰९) अहिनकुल*


*🔰१०) अहर्निश*


➖➖➖➖➖➖➖➖➖➖
    *🙏संकलन/समूह प्रशासक🙏*
    *✍प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
           📞9403046894
*जि.प.प्रा.शा.वाटेगाव*
*ता.हदगाव जि.नांदेड.*

http://www.pramilasenkude.blogspot.in

*©मराठीचे शिलेदार समूह*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
[10/3, 8:33 PM] प्रमिलाताई सेनकुडे: 💠⚜💠⚜💠⚜💠⚜💠⚜
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
        *♻ शुद्ध शब्दकोश ♻*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
  *☘शब्दमाला भाग क्र.: १९ ☘*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
        *🔹 अ 🔹*

*🔰१) अंत्यदशा*


*🔰२) अंत्यज*


*🔰३)अंतेवासी*


*🔰४) अंत्येष्ठी*


*🔰५) अंतःस्थ*


*🔰६) अंतःचक्षू*


*🔰७) अंतर्हित*


*🔰८) अंतर्यामी*


*🔰९) अंतःपुर*


*🔰१०) अंतःकरण*


➖➖➖➖➖➖➖➖➖➖
    *🙏संकलन/समूह प्रशासक🙏*
    *✍प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
           📞9403046894
*जि.प.प्रा.शा.वाटेगाव*
*ता.हदगाव जि.नांदेड.*

http://www.pramilasenkude.blogspot.in

*©मराठीचे शिलेदार समूह*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
[10/3, 8:38 PM] प्रमिलाताई सेनकुडे: 💠⚜💠⚜💠⚜💠⚜💠⚜
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
        *♻ शुद्ध शब्दकोश ♻*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
  *☘शब्दमाला भाग क्र.: २० ☘*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
        *🔹अ 🔹*

*🔰१) ॲडव्होकेट*


*🔰२) ॲप्लिकेशन*


*🔰३) ॲटलांटिक*


*🔰४) ॲग्रिकल्चर*


*🔰५) ॲक्युपंक्चर*


*🔰६) अंशुमाली*


*🔰७) अंबुधी*


*🔰८) अंधविश्वास*


*🔰९) अंधश्रध्दा*


*🔰१०) अंधःकार*


➖➖➖➖➖➖➖➖➖➖
    *🙏संकलन/समूह प्रशासक🙏*
    *✍प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
           📞9403046894
*जि.प.प्रा.शा.वाटेगाव*
*ता.हदगाव जि.नांदेड.*

http://www.pramilasenkude.blogspot.in

*©मराठीचे शिलेदार समूह*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸

जीवन जगायला शिकवणारे सत्य ( संकलन )

🙏 *जगायला शिकवणारे एक मानसशास्त्रीय  सत्य* 🙏

"खुप गोड बोलणारी,अति नम्रता दाखवणारी,पाया पडणारी,अति स्तुती करणारी,अतिआदर सत्कार करणारी,माणसं अत्यंत धोकादायक, दांभिक,आतल्या गाठीची, लबाड,बेरकी,संधीसाधू व विश्वासघातकी असतात.

तुमच्याच खांद्यावर हात ठेवून तुम्हालाच खांदा देण्याचे षडयंत्र ती रचत असतात.

याउलट,जी माणसं तोंडावर ,रागाने,कडवट,टिकात्मक,जहरी,फटकळ पण स्पष्ट बोलतात त्यांच अंतर्मन "वरच्या" प्रवृत्तींपेक्षा नक्कीच चांगल असावी विश्वासघात करणं,फसवणं त्यांच्या रक्तातच नसतं.ती खरच मनमोकळी व विश्वासु असतात..!

*म्हणून....जीवनांत आपण बाकी काही शिको अथवा ना शिको,पण "माणसं" वाचायला नक्की शिकलंच पाहिजे.* 👍🏾👍🏾

विचारपुष्प क्रमांक १८०

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
     🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं.*
*मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो.*
*मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो.*
*मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो.*
*मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात.*
*तुमचा चेहरा हा तुमच्या विचारांचा आरसा असतो.जसे तुमचे विचार तसा तुमचा चेहरा. त्यासाठी*

*माणसानं घडघड बोललं पाहिजे*
*खळखळून हसलं पाहिजे*
*दिलखुलास विनोद केले पाहिजेत*
*मनसोक्त रडलं पाहिजे!*
*थोडक्यात स्वतःचं व्यक्तिमत्व खुलवलं पाहिजे.*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
 *🙏🏼शब्दांकन/संकलन🙏*
 *समूह प्रशासक*
✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
http://www.pramilasenkude.blogspot.in
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
 *©मराठीचे शिलेदार समूह*
🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿

कथा क्रमांक ८३

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
*🌍 कथेचे बाळकडू 🌏*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*📚अभ्यास कथा भाग ८३ 📚*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*♻कोल्ह्याची चतुराई* ♻
=========================
*✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
📝🍃📝🍃📝🍃📝
 
*एका कोल्ह्याचे शेपूट लोखंडी सापळ्यात सापडले असता ते तोडून तो पळाला. प्रथम त्याला आनंद झाला की प्राणांवरचे शेपटीवर निभावले*
          *पण जेव्हा तो आपल्या मंडळीत जाऊ लागला, तेव्हा त्याला आपल्या लांडेपणाचे फार वाईट वाटून तो मनात म्हणाला, 'मी मेलो असतो तर बरं झालं असतं. पण ही अप्रतिष्ठा वाईट, पण जे झाले त्याला उपाय नाही. आता हेच कसं शोभवून नेलं म्हणजे झालं ! यासाठी काय बरं युक्ती करावी*?'
            *याचा तो विचार करीत असता त्याला एक युक्ती सुचली ती अशी की आपण सर्व कोल्हे मंडळींना एकत्र जमवून सांगावे की, 'माझी शेपटी मी तोडून टाकून ही भूषणाची नवी पद्धत काढली आहे. ही चांगली आहे अन् तुम्हीसुद्धा अवश्य करावं*.'
          *मग त्याने सगळ्या कोल्ह्यांना आपल्या घरी बोलावले व आपल्या युक्तीप्रमाणे त्यांच्यापुढे भाषण दिले. तो म्हणाला, 'अहो, या शेपटीपासून काहीच फायदा नाही. आपल्याला शेपटी म्हणजे ओझंच. शेपटी तोडून टाकल्यानं एक प्रकारचं सौंदर्य येऊन शिवाय पळण्यातली अडचण दूर होते. मी ह्या गोष्टीचा अनुभव घेतला आहे नि शेपटी तोडल्यापासूनघ सुखी आहे. हे सुख तुम्हाला प्राप्त व्हावं असं मला वाटलं*.'
          *इतके बोलून आपले कितीजण ऐकतात हे पाहण्यासाठी तो सगळ्यांकडे पाहू लागला. इतक्यात एक म्हातारा कोल्हा त्याची लबाडी ओळखून मान वाकडी करून म्हणाला, 'अहो, पंडित महाराज, आपली हुषारी पुरे. शेपटी काढल्यामुळे तुमचं कल्याण झालं असेल, यात शंका नाही. अन् आमच्यावर जेव्हा वेळ येईल तेव्हा आम्हीही आपली शेपटी कापून टाकू. तोपर्यंत तुम्ही आम्हाला आग्रह करू नये हेच बरं*.'
 〰〰〰〰〰〰
 *तात्पर्य* : - *आपली अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आपले दोष हे नसून गुण आहेत असे बरेचजण सांगतात पण शहाणे लोक त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाहीत.*
〰〰〰〰〰〰〰〰〰
*📝शब्दांकन/ संकलन/तथा समूह प्रशासक*📝
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
*©मराठीचे शिलेदार समूह*
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

विचारधन



*"आनंद" एक "आभास" है*
*जिसे हर कोई ढूंढ रहा है...*

*"दु:ख" एक "अनुभव" है*
*जो आज हर एक के पास है...*

*फिर भी जिंदगी में वही "कामयाब" है*
*जिसको खुद पर "विश्वास" हे..!!*


विचारधन

*सत्य को कहने के लिए,*
*किसी शपथ की जरूरत नहीं होती।*
*नदियों को बहने के लिए,*
*किसी पथ की जरूरत नहीं होती।*
*जो बढ़ते हैं जमाने में, अपने मजबूत इरादों पर,*
*उन्हें अपनी मंजिल पाने के लिए,*
*किसी रथ की जरूरत नहीं होती।*
    

विचारधन

जे शून्यातून विश्व निर्माण करू पाहतात त्यांना कधीच शून्यात आणायचा प्रयत्न करू नका, कारण त्यांना शून्यातून विश्व कसे निर्माण करतात हे या मातीत जन्मताच  माहीत असते.
जय युवाराष्ट्र🙏

अंधश्रध्दा गीत ( संग्रहीत )

अंधश्रध्दा

माणूस झाला दगड
दगड झाला देव...
मस्तक ठेवून बोलतो
मला सुखी ठेव..... १

दगडापाशी दूध ,दही
खोबरेची होते भेळ...
मंदिराच्या पायथ्याशी
भूकी जीवांचा मेळ... २

दगडच्या देवाला
नेसतात वस्र सारें...
देवाच्या पायथ्याशी
उघडी नागडी पोरे...३

ह्या विज्ञानयुगी
अंधश्रद्धेचा वाढला जोर...
दगडाच्या मंदिरापाशी
पुजारी बनला चोर...४

संग्रहित

विचारपुष्प क्रमांक १७९

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🌺 विचारपुष्प󠐼󞠼󞠊〰〰〰〰〰〰〰〰〰〰

"मानवप्राणी जसे कर्म करतो तसेच त्याचे फळ मिळते."

ह्या कर्मामुळेच प्राणी ह्या संसारातील मायाजाळामध्ये बांधलेला आहे आणि जेव्हा मृत्यू येतो त्यावेळी हे सर्व काही इथेच राहते.

     ह्या संसारात केवळ कर्मेच प्रमुख आहे.कर्माचेच फळ मणुष्याला मिळते.
म्हणून माणसाने दुसऱ्याचे सदैव चांगले सोचले पाहिजे आणि भले केले पाहिजे .
     
     'कर्मामुळे मणुष्य लहान मोठा बनतो.म्हणून चांगले कर्म करा.घृणा, क्रोध, लोभ, मोह यांचा त्याग करा.
👇👇👇👇
चांगल्या कर्माचे साथीदार आहेत.
   ज्याप्रमाणे
         "फुलांमध्ये सुगंध"🌹
       "तिळामध्ये  तेल"
"लाकडामध्ये आग"
"दुधामध्ये तुप"
         "ऊसामध्ये रस"
 ह्या वस्तू बाहेरून पाहून तुम्ही  त्यांच्या गुणांचा अंदाज लावू शकत नाही.

        कारण हे सर्व बाहेरून दिसत नाही.ह्या गुणांना केवळ विचारांनीच ओळखू शकतो.

त्याचप्रमाणे मानवी देहामध्ये आत्म्याचा निवास असतो.ह्याची ओळख केवळ विचारांनीच होऊ शकते.

🙏' चांगल्या कर्माच्या स्वरुपाचा विचार करावा.'

'चंदनापरी झिजावे, उपकार लोकी करावे.'
========================
🌻जय महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*🙏 शब्दांकन/ संकलन /समूह  प्रशासक🙏🏼*
✒ *प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,ता.
हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*©मराठीचे शिलेदार समूह*
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀
http://www.pramilasenkude.blogspot.in

विचारपुष्प क्रमांक १७७

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
     🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
------ *"प्रयत्न तो देव जाणाव"* -----

 *"देवासकट सर्वकाही प्राप्त करून देण्याच"*
     *सामर्थ्य प्रयत्नात आहे म्हणून*
 *प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ होय".*

         *प्रयत्न हा प्रकारच इतका प्रभावी आहे की , *प्रयत्न करण्याच्या प्रक्रियेत प्रयत्न करणाऱ्याला प्रकाश दिसू लागून त्या प्रकाशातूनच त्याला प्रभूचा प्रसाद प्राप्त होतो.थोडक्यात प्रयत्न करीत रहाणे हे मानवी जीवनाचे अविभाज्य घटक असून त्रिकालबाधित निसर्गनियमांशी ते सुसंगत आहे. "प्रयत्न करून यश मिळणे हा नियम आहे" हे सत्य माणसाने सदैव लक्षात ठेवले पाहिजे. मात्र प्रयत्न योग्य  दिशेने होण्यासाठी ते अभ्यासपूर्वक झाले पाहिजेत . नुसते कष्ट केल्याने किंवा प्रयत्न केल्याने यश मिळत नसते . *अधिकारी व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली योग्य दिशेने अभ्यासपूर्वक प्रयत्न केल्याने माणसाला यशाचे शिखर लवकर गाठता येते.*
*थोडक्यात अभ्यासपूर्वक व प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याने *माणसांना जे धन व यश प्राप्त होते , ते त्यांना सुख शांती , समाधान , यश व समृद्धी प्राप्त करून तर देतेच शिवाय त्याचा इष्ट प्रभाव इतरांवरही पडत असतो.*                                  〰〰〰〰〰〰〰〰〰〰
 *🙏🏼शब्दांकन/संकलन🙏*
 *समूह प्रशासक*
✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
http://www.pramilasenkude.blogspot.in
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
 *©मराठीचे शिलेदार समूह*
🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿

कथा क्रमांक ८१

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
*🌍 कथेचे बाळकडू 🌏*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*📚अभ्यास कथा भाग ८१ 📚*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*♻ संगतीचा परिणाम* ♻
=========================
*✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*एका उंदराची एका बेडकाशी फार ओळख होती. उंदीर एका घरातील कोठीत राहात होता व बेडकाचे घर एका नदीत होते. एकदा उंदराने बेडकाला आपले घरी जेवावयास बोलाविले होते. पुढे बेडकाने उंदराला आपले घरी बोलाविले. पण नदीतून उंदराला बेडकाचे घरी जाता येईना. कारण उंदराला मुळीच पोहता येत नाही. मग बेडकाने एक तोड काढली. उंदराचे पाय आपले पायास बांधले आणि आपण पोहू लागला. यामुळे उंदीर बुडाला नाही खरा; पण नाका-तोंडात फार पाणी जाऊ लागले आणि निंमे वाटेतच बिचारा उंदीर तडफडून मेला. परंतु उंदराचे पाय बांधले होते आणि बेडूक सारखा पोहत होता. यामुळे तो मेलेला उंदीर तळाशी बुडाला नाही. पण तसाच वर तरंगत होता. हे वरून एका गरुडाने पाहिले. लागलीच गरुडाने खाली झेप टाकली आणि तो उंदरास वर नेऊ लागला. पण बेडकाचे पायही उंदराला बांधलेले होते; यामुळे तोही उंदराबरोबर वर गेला. गरुडाने दोघांनाही घरी नेले आणि खाऊन टाकले*.

*पहा, भलती संगत केली यामुळे असे झाले. बेडूक नदीत राहणारा आणि उंदीर जमिनीवर राहणारा. यामुळे या दोघांची मेजवाणी एका बाजूस राहिली आणि गरुडाची  मेजवानी झाली*.

*तात्पर्य .....यासाठी संगत फार विचाराने करावी*.
〰〰〰〰〰〰〰〰〰
*📝शब्दांकन/ संकलन/तथा समूह प्रशासक*📝
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
*©मराठीचे शिलेदार समूह*
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

असे जगावे दुनियेमध्ये.कविता ( संकलन)


असे जगावे दुनियेमध्ये,
आव्हानाचे लावुन अत्तर,
नजर रोखुनी नजरे मध्ये,
आयुष्याला द्यावे उत्तर..

नको गुलामी नक्षत्रांची,
भीती आंधळी ताऱ्यांची,
आयुष्याला भिडतानाही,
चैन करावी स्वप्नांची..

असे दांडगी इच्छा ज्याची,
मार्ग तयाला मिळती सत्तर,
नजर रोखुनी नजरे मध्ये,
आयुष्याला द्यावे उत्तर..

पाय असावे जमिनीवरती,
कवेत अंबर घेताना,
हसू असावे ओठांवरती,
काळीज काढुन देताना..

संकटासही ठणकावुन सांगावे,
आता ये बेहत्तर,
नजर रोखुनी नजरे मध्ये,
आयुष्याला द्यावे उत्तर..

करुन जावे असेही काही,
दुनियेतुनी या जाताना,
गहिवर यावा जगास  सा-या,
निरोप शेवटचा देताना..

स्वर कठोर त्या काळाचाही,
क्षणभर व्हावा कातर कातर,
नजर रोखुनी नजरे मध्ये,
आयुष्याला द्यावे उत्तर...

विं. दा. करंदीकर.

विचारपुष्प


ज्ञानेश्वरीतील नावे........

" मी पणा " ची *निवृत्ती* व्हावी म्हणुन पहिला *निवृत्ती*

*निवृत्ती* झाल्याशिवाय ज्ञान नाही म्हणुन दुसरा *ज्ञानदेव*

*ज्ञान* प्राप्त झाले की जीवनमार्ग *सोपा* होतो म्हणुन तिसरा *सोपान*

ज्ञान सोप्या मार्गाने गेलं की आत्मा *मुक्त* होतो म्हणुन चौथी *मुक्ताई* .

*निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई ही चार नावे म्हणजेच मानवी मनाच्या चार अवस्था आहेत.*
🏻

आयुष्य




आपल्यापैकी सगळ्यांचेच आयुष्य मर्यादित आहे आणि जीवनाचा जेंव्हा शेवट होईल तेंव्हा इथली कोणतीच गोष्ट आपल्या सोबत नेता येणार नाही.!

मग जीवनात खुप काटकसर कशासाठी करायची ? आवश्यक आहे तो खर्च केलाच पाहिजे ज्या गोष्टींतुन आपल्यास आनंद मिळतो त्या गोष्टी केल्याच पाहिजेत.

शक्य असेल तेवढा दानधर्म करायला हवा. मुलांसाठी किंवा नातवंडांसाठी संपत्ती गोळा करुन साठवून ठेवायची गरज नाही. तसे केले तर पुढची काही वर्षे स्वतःकाही न करता ते नुसते बसून खातील आणि आपल्या मृत्युची वाट बघतील.

आपण गेल्यानंतर पुढे काय होणार याची मुळीच चिंता करु नका. कारण आपला देह जेंव्हा मातीत मिसळून जाईल तेंव्हा कुणी आपले कौतुक केले काय किंवा टीका केली काय ? जीवनाचा आणि स्वकष्टाने मिळवलेल्या पैशांचा आनंद घेण्याची वेळ निघून गेलेली असेल.!

तुमच्या मुलांची खुप काळजी करु नका. त्यांना स्वत:चा मार्ग निवडू द्या. स्वतःचे भविष्य घडवू द्या. त्यांच्या ईच्छा आकांक्षाचे आणि स्वप्नांचे तुम्ही गुलाम होऊ नका.

मुलांवर प्रेम करा, त्यांची काळजी घ्या, त्यांना भेटवस्तुही द्या. मात्र काही खर्च स्वतःवर, स्वतःच्या आवडीनिवडीवर करा.

जन्मापासून मृत्युपर्यंत नूसते राबराब राबणे म्हणजे आयुष्य नाही, हे देखील लक्षात ठेवा.
तुम्ही कदाचित आपल्या चाळीशीत असाल, पन्नांशीत किंवा साठीत, आरोग्याची हेळसांड करुन पैसे कमवण्याचे दिवस आता संपले आहेत. पुढील काळात पैसे मोजून सुद्धा चांगले आरोग्य मिळणार नाही.

या वयात प्रत्येकापुढे दोन महत्त्वाचे प्रश्न असतात. पैसा कमवणे कधी थांबवायचे आणि किती पैसा आपल्याला पुरेल.? तुमच्याकडे शेकडो हजारो एकर सुपीक शेतजमिन असली तरी तुम्हाला दररोज किती अन्नधान्य लागते ? तुमच्याकडे अनेक घरे असली तरी रात्री झोपण्यासाठी एक खोली पुरेशी असते !

एक दिवस आनंदाशिवाय गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही गमावला आहात. एक दिवस आनंदात गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही कमावला आहात, हे लक्षात असू द्या.

आणखी एक गोष्ट तुमचा स्वभाव खेळकर, उमदा असेल तर तुम्ही आजारातून बरे व्हाल, आणि तुम्ही कायम प्रफुल्लीत असाल, तर तुम्ही आजारी पडणारच नाहीत.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे आजूबाजूला जे जे उत्तम आहे उदात्त आहे त्याकडे पहा. त्याची जपणूक करा आणि हो! तुमच्या मित्रांना कधीही विसरु नका, त्यांना जपा. हे जर तुम्हाला जमले तर तुम्ही मनाने कायम तरुण रहाल आणि इतरांनाही हवेहवेसे वाटाल.

मित्र नसतील तर तुम्ही नक्कीच एकटे आणि एकाकी पडाल. म्हणूनच म्हणतो नं.. "आयुष्य खुप कमी आहे, ते आनंदाने जगा..!

प्रेम मधुर आहे,
त्याची चव चाखा..!

क्रोध घातक आहे,
त्याला गाडुन टाका..!

संकटे ही क्षणभंगुर आहेत,
त्यांचा सामना करा..!

डोंगराआड गेलेला सूर्य
परत दिसू शकतो, पण माथ्या आड गेलेला "जिवलग" परत कधीच दिसत नाही" ...........

आठवणी या चिरंतन आहेत, त्यांना ह्रदयात साठवून ठेवा.

कथा क्रमांक ८०

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
*🌍 कथेचे बाळकडू 🌏*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*📚अभ्यास कथा भाग ८० 📚*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*♻  सदाचार* ♻
=========================
*✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
महाभारतकालीन राजा सत्यदेव एक दिवस सकाळी उठले, तर त्यांना एक सुंदर स्त्री राजवाड्यातून बाहेर पडतांना दिसली. राजाने आश्चर्यचकित होऊन त्या स्त्रीला हात जोडून नम्रपणे विचारले, ‘आपण कोण आहात ?’ त्यावर त्या स्त्रीने सांगितले, ‘मी लक्ष्मी आहे, आता या राजवाड्यातून मी जात आहे.’ तेव्हा राजाने तिला सांगितले, ‘तू जाऊ शकतेस.’ लक्ष्मी बाहेर पडली. नंतर लक्ष्मीच्या पाठोपाठ एका सुंदर पुरुषाला राजवाड्याबाहेर पडतांना पाहून राजाने त्यालाही विचारले, ‘आपण कोण आहात ?’ त्याने उत्तर दिले, ‘माझे नाव ‘दान’ आहे. लक्ष्मी बाहेर गेल्यानंतर आपण दान करू शकणार नाही; म्हणून मीही तिच्यासह जात आहे.’ राजाने सांगितले ‘आपणसुद्धा राजवाडा सोडून जाऊ शकता.’ त्यानंतर त्याच्या पाठोपाठ तिसरा पुरुष ‘यश’ निघून गेला. त्यानंतर चौथा पुरुष प्रकट झाला अन् बाहेर पडू लागला. तेव्हा राजाने त्यालाही हात जोडून नम्रपणे त्याचे नाव विचारले. तो पुरुष म्हणाला, माझे नाव ‘सदाचार ! राजाने त्याला म्हटले, ‘मी तर तुझा कधीच त्याग केला नाही. तू मला सोडून का जात आहेस ? तुझ्यासाठीच मी लक्ष्मी, दान आदींचा त्याग केला आहे. मी तुला जाऊ देणार नाही. तू मला सोडून गेलास, तर माझे सर्वस्व जाईल !’राजाचे हे बोल ऐकून सदाचार राजवाड्यातच थांबला. सदाचार बाहेर पडला नाही, हे पाहून बाहेर गेलेली लक्ष्मी, दान आणि यशही परत आले.
*तात्पर्य : सदाचाराने वागणे हेच आयुष्याचे सर्वस्व आहे. जीवनात सदाचार (नीतीमत्ता, धर्माचरण आदी) नसेल, तर दान, लक्ष्मी (श्रीमंती) आदींचा काहीच उपयोग नाही*.
〰〰〰〰〰〰〰〰〰
*📝संकलन/ समूह प्रशासक*📝
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
*©मराठीचे शिलेदार समूह*
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

सेल्फी विथ गुरूजी ( संकलन)

*👀"सेल्फी विथ गुरुजी"*

थंडीमुळं हमखास आता
नाकात जमणार 'कुल्फी'
सरकारी फर्मान आलंय
गुरुजी काढणार 'सेल्फी'...!

मनगट चमकवीत आता
पोरं देतील 'पोज'
कॅमेऱ्याच्या 'साक्षी'नं
'शाळा' भरल रोज....!

'छडी' सुटली केंव्हाच
हातात सेल्फी 'स्टिक' आणणार
रडवेल्या तोंडानं गुरुजी
'स्माईल प्लिज' म्हणणार....!

सेल्फीमुळे म्हणे आता
पोरं येणार शाळेत
अर्ध्या हळकुंडाने सारे
आधीच पिवळे झालेत...!

गुरुजींची नोकरी हल्ली
म्हणजे आहे तारेवरची कसरत
व्याह्याचे घोडे सांभाळण्यात
गुरुजी अध्यापन चाललेत विसरत..!

'आचारी' करून झाला
गुरुजींचा फोटोग्राफर होणार
पाहात राहू अजुन बिचाऱ्यांचे
किती अच्छे दिन येणार....!

                    -अनामिक

शिवगीत ( संकलित )

⛳🐯शिवगीत🐯⛳*
*🚩जिजाऊच्या सुता तुला*
*महादेवाचे वरदान..!🚩*
*🚩एक मुखाने बोला*
*बोला जय जय शिवराय..!🚩*
*🚩दिव्य तुझी शिवभक्ति*
*दिव्य तुझी काया..!🚩*
*🚩बालपणी गेलासी तु*
*तोरणा जिंकाया..!🚩*
*🚩हादरले मोघल थरथरले आसमान मुखाने बोला*
*बोला जय जय शिवराय..!🚩*
*🚩मुरारबाजीला आली मूर्छा लागुनीया बाणं..!🚩*
*🚩दिल्ली साठी शिवा*
*तु केले प्रयाण..!🚩*
*🚩तळहातावर देवुन तुरी*
*घेवुनी आला पंचप्राण..!🚩*
*🚩एक मुखाने बोला*
*बोला जय जय शिवराय..!🚩*
*🚩शायीस्तेखानाचे शोधासाठी* *गाठलास लालमहालं..!🚩*
*🚩तिथे तलवारीचा*
*तु वाजविला डंका..!🚩*
*🚩मोगल खवळले सारे*
*परी हसले पठाण..!🚩*
*🚩एक मुखाने बोला*
*बोला जय जय शिवराय..!🚩*
*🚩हार तुला राज्यभिषेकाचा* *जिजाऊनी घातला..!🚩*
*🚩पाहीलेस फोडुन मोती*
*शिव कुठे आतला..!🚩*
*🚩उघडुनी निधडी छाती*
*दाखविले शिवराज्य..!🚩*
*🚩एक मुखाने बोला*
*बोला जय जय शिवराय..!🚩*
*🚩पन्हाळ गडाच्या वेडया मध्ये सापडलास शिवा..!🚩*
*🚩परी बाजीच्या पराक्रमाने*
*तोडलास वेडा..!🚩*
*🚩निष्ठुनी पन्हाळगड गाठला विशाळगड..!🚩*
*🚩एक मुखाने बोला*
*बोला जय जय शिवराय..!🚩*
*🚩तुझ्या भेटीसाठी*
*अफजलखान आला..!🚩*
*🚩प्रतापगडाच्या पायथ्याशी*
*कसा त्याला गाडला..!🚩*
*🚩पाहुनी तुझा पराक्रम हादरला औरंगजेब..!🚩*
*🚩एक मुखाने बोला*
*बोला जय जय शिवराय..!🚩*
*🚩आले किती गेले किती*
*संपला भरारा..!🚩*
*🚩तुझ्या परि नावाचा रे*
*अजुनी दरारा..!🚩*
*🚩धावत ये लवकरी*
*आम्ही झालो रे हैराण..!🚩*
*🚩एक मुखाने बोला*
*बोला जय जय शिवराय..!🚩*
*🚩धन्य तुझे शिवराज्यं..!*
*धन्य तुझी किर्ती...!🚩*
*🚩तुझे भक्त आम्ही सारे*
*विस्कटलो का शिवा...!🚩*
*🚩धावत या विरमराठी*
*करूनी दाखवा एकजुठी....!*
*🚩एक मुखाने बोला*
*बोला जय जय शिवराय...!🚩*
*🚩।। जय जिजाऊ ।।🚩*
*🚩।। जय शिवराय ।।🚩*
*सिंहाची चाल,*
*गरुडा ची नजर,*
*स्रीयांचा आदर,*
*शत्रूचे मर्दन,*
*असेच असावे मवाळ्यांचे वर्तन,*
*हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण..*
*🚩🚩जय शिवराय🚩🚩*
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
संकलन

गौतम बुध्द के सुविचार

*• गौतम बुद्ध के सुविचार •*

.... जो गुजर गया उसके बारे में मत सोचो और भविष्य के सपने मत देखो
केवल वर्तमान पे ध्यान केंद्रित करो ।
                   *– गौतम बुद्ध*

.... आप पूरे ब्रह्माण्ड में कहीं भी ऐसे व्यक्ति को खोज लें जो आपको आपसे ज्यादा प्यार करता हो, आप पाएंगे कि जितना प्यार आप खुद से कर सकते हैं उतना कोई आपसे नहीं कर सकता।
                   *– गौतम बुद्ध*

.... स्वास्थ्य सबसे बड़ा उपहार है, संतोष सबसे बड़ा धन और विश्वास सबसे अच्छा संबंध।
                  *– गौतम बुद्ध*

.... हमें हमारे अलावा कोई और नहीं बचा सकता, हमें अपने रास्ते पे खुद चलना है।
                    *– गौतम बुद्ध*

.... तीन चीज़ें ज्यादा देर तक नहीं छुपी रह सकतीं – सूर्य, चन्द्रमा और सत्य
                   *– गौतम बुद्ध*

.... आपका मन ही सब कुछ है, आप जैसा सोचेंगे वैसा बन जायेंगे ।
                   *– गौतम बुद्ध*

.... अपने शरीर को स्वस्थ रखना भी एक कर्तव्य है, अन्यथा आप अपनी मन और सोच को अच्छा और साफ़ नहीं रख पाएंगे ।
                   *– गौतम बुद्ध*

.... हम अपनी सोच से ही निर्मित होते हैं, जैसा सोचते हैं वैसे ही बन जाते हैं। जब मन शुद्ध होता है तो खुशियाँ परछाई की तरह आपके साथ चलती हैं ।
                    *– गौतम बुद्ध*

.... किसी परिवार को खुश, सुखी और स्वस्थ रखने के लिए सबसे जरुरी है - अनुशासन और मन पर नियंत्रण।
अगर कोई व्यक्ति अपने मन पर नियंत्रण कर ले तो उसे आत्मज्ञान का रास्ता मिल जाता है
                   *– गौतम बुद्ध*

.... क्रोध करना एक गर्म कोयले को दूसरे पे फैंकने के समान है जो पहले आपका ही हाथ जलाएगा।
                    *– गौतम बुद्ध*

.... जिस तरह एक मोमबत्ती की लौ से हजारों मोमबत्तियों को जलाया जा सकता है फिर भी उसकी रौशनी कम नहीं होती उसी तरह एक दूसरे से खुशियाँ बांटने से कभी खुशियाँ कम नहीं होतीं ।
                   *– गौतम बुद्ध*

.... इंसान के अंदर ही शांति का वास होता है, उसे बाहर ना तलाशें ।
                  *– गौतम बुद्ध*

.... आपको क्रोधित होने के लिए दंड नहीं दिया जायेगा, बल्कि आपका क्रोध खुद आपको दंड देगा ।
                  *– गौतम बुद्ध*

.... हजारों लड़ाइयाँ जितने से बेहतर है कि आप खुद को जीत लें, फिर वो जीत आपकी होगी जिसे कोई आपसे नहीं छीन सकता ना कोई स्वर्गदूत और ना कोई राक्षस ।
                  *– गौतम बुद्ध*

.... जिस तरह एक मोमबत्ती बिना आग के खुद नहीं जल सकती उसी तरह एक इंसान बिना आध्यात्मिक जीवन के जीवित नहीं रह सकता ।
                 *– गौतम बुद्ध*

.... निष्क्रिय होना मृत्यु का एक छोटा रास्ता है, मेहनती होना अच्छे जीवन का रास्ता है, मूर्ख लोग निष्क्रिय होते हैं और बुद्धिमान लोग मेहनती ।
                   *– गौतम बुद्ध*

.... हम जो बोलते हैं अपने शब्दों को देखभाल के चुनना चाहिए कि सुनने वाले पे उसका क्या प्रभाव पड़ेगा,
अच्छा या बुरा ।
                  *– गौतम बुद्ध*

.... आपको जो कुछ मिला है उस पर घमंड ना करो और ना ही दूसरों से ईर्ष्या करो, घमंड और ईर्ष्या करनेवाले लोगों को कभी मन की शांति नहीं मिलती ।
                   *– गौतम बुद्ध*

.... अपनी स्वयं की क्षमता से काम करो, दूसरों निर्भर मत रहो ।
                *– गौतम बुद्ध*

..... असल जीवन की सबसे बड़ी विफलता है हमारा असत्यवादी होना ।
                *–  गौतम बुद्ध.*

सुविचार

१) सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.

  २) आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.

  ३) प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान

  ४) जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही.

  ५) यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.

  ६) प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.

  ७) ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.

  ८) यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.

  ९) प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस !

  १०) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !

  ११) मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.

  १२) छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.

  १३) आपण जे पेरतो तेच उगवतं.

  १४) फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये.

  १५) उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो.

  १६) शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.

  १७) प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा.

  १८) आधी विचार करा; मग कृती करा.

  १९) आयुष्यत आई आणि वडील यांना कधीच विसरु नका,

  २०) फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास
तर जगलास !

  २१) एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.

  २२) अतिथी देवो भव ॥

  २३) अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.

  २४) दु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा.

  २५) आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका

  २६) निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही.

  २७) खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं
काहीतरी शिकण्याची संधी असते.

  २८) उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.

  २९) चुकीचा व्यवहार माणसं तोडतो म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा.

  ३०) नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.

  ३१) माणसाची चौथी मूलभूत गरज म्हण्जे पुस्तक.

  ३२) सत्याने मिळतं तेच टिकतं.

  ३३) जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो.

  ३४) परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय कुठलेही कार्य सिध्दीस जात नाही.

  ३५) हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे; मग ती एखाद्या माणसाची असो वा
पशुची !

  ३६) स्वप्न आणि सत्य यात साक्षात परमेश्वर उभा असतो.

  ३७) प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.

  ३८) खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची

  ३९) तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे.

  ४०) वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर
राजहंस !!

  ४१) जो गुरुला वंदन करत नाही; त्याला आभाळाची उंची लाभत नाही.

  ४२) गर्वाचं घर नेहमीच खाली असतं.

  ४३) झाडावर प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्नच असतो.

  ४४) माणसाचा सगळ्यात मोठा सदगुण म्हणजे त्याची माणुसकी

  ४५) क्रांती हळूहळू घडते; एका क्षणात नाही.

  ४६) सहल म्हणजे माणसिक आनंदाची सामुहिक क्रिडा

  ४७) मुक्या प्राण्यांवर सदैव प्रेम करा.

  ४८) आयुष्याच्या प्रवासात प्रवास अत्यावश्यक आहे.

 ४९) बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं.

  ५०) मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते

    ५१) तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.

    ५२) शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरा पालकच.

    ५३) मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल
सांगता येत नाही.

    ५४) आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.

    ५५) एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.

    ५६) परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी !

    ५७) खिडकी म्हणजे आकाश नसतं.

    ५८) जगण्यात मौज आहेच पण त्याहून अधिक मौज फ़ुलण्यात आहे

    ५९) वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन.

    ६०) भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचं फ़ूल कशासाठी जगायचं हे शिकवते.

    ६१) कविता म्हणजे भावनांचं चित्र!

    ६२) संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.

    ६३) तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक
पटीने देव तुम्हाला देईल.

    ६४) ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव !

    ६५) स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका; आणि स्वत:चा
वापर कुणाला करु देऊ नका.

    ६६) अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.

    ६७) तुलना करावी पण अवहेलना करू नये.

    ६८) समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.

    ६९) आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.

    ७०) मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही.

    ७१) चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो.

    ७२) व्यर्थ गोंष्टींची कारणे शोधू नका; आहे तो परिणाम स्वीकारा.

    ७३) आवडतं तेच करू नका; जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.

  ७४) तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.

  ७५) अश्रु येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे.

  ७६) विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.

७७) मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका.

७८) आयुष्यात प्रेम कारा ; पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.

७९) आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.

८०) प्रायश्चित्तासारखी दूसरी शिक्षा नाही.

८१) तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.

८२) सगळेच निर्णय मनाने घेऊ नका; काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.

८३) काळ्याकुट्ट रात्रीनंतर सुर्य उगवतोचं.

८४) लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहवं लागतं.

८५) चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते.

८६) तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका.

८७) भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो; भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद
देतो पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो.

८८) चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.

८९) आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा.

९०) उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही

९१) पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही.

९२) अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.

९३) मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो.

९४) रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय - मौन !

९५) अती अशा हे दुःखाचं मूळ कारण आहे.

९६) अंथरूण बघून पाय पसरा.

९७) कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत; ते मिळवावे लागतात.

९८) तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची
माहिती नाही त्या विषयी मौन पाळा.

९९) अतिशहाणा त्याचा बैल रिकामा.

१००) संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत आसताच.

 १०१) सन्मित्र शिंपल्यातल्या मोत्यासारखे असतात.

१०२) सौंदर्य हे वस्तूत नसते; पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.

१०३) शरीरमाध्यम खलु सर्वसाधनम ॥

१०४) सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत; काही सोडून दिले की आपोआप सुटतात.

१०५) विद्या विनयेन शोभते ॥

१०६) शीलाशिवाय विद्या फ़ुकाची आहे.

१०७) जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.

१०८) एकदा तुटलेलं पान झाडाला परत कधीच जोडता येत नाही.

१०९) कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही.

११०) आयुष्यात खरं प्रेम, खरी माया फ़ार दूर्मिळ असते.

१११) ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत त्या नष्ट करण्याचा आधिकार
आपल्याला नाही.

११२) कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.

११३) देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे
हात घ्यावे !

११४) आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही.

११५) मूर्खांना विवेक सागंणे हाही मूर्खपणाच !

११६) ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो.

११७) जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा.

११८) आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो
त्यांच्यावर प्रेम करा.

११९) रामप्रहरी जागा होतो त्यालाच प्रहरातला राम भेटतो.

१२०) जे आपले आहेत त्यांच्यावर कुणीही प्रेम करतं; पण जे आपले नाहीत
त्यांच्यावर प्रेम करणं हेच खरं प्रेम !

१२१) लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते.

१२२) कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर
जातात.

१२३) जे आपले नाही त्याच्यावर कधीच हक्क सांगू नका.

१२४) पुढचा आपल्याशी चांगला वागेल या अपेक्षेने त्याच्याशी चांगलं वागू नका.

१२५) आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात.

१२६) गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण होतं !

१२७) कुठल्याही कामाला अंतःकरणाचा उमाळा लागतो.

१२८) स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता !

१२९) ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला अस समजा.

१३०) जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो जगावर काय प्रेम करणार !

१३१) सृजनातला आनंद कल्पनेच्या पलीकडचा असतो.

१३२) श्रध्दा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसतो.

१३३) आनंदी मन, सुदृढ शरीर आणि अध्यात्मिक श्रध्दा ह्या तिनही गोष्टी लाभणं
म्हणजे अमृत मिळणं.

१३४) एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला
दृष्टीकोन व्यक़्त होतो.

१३५) प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमानेच जिंका.

१३६) आपण चुकतो तिथे सावरतो तोच खरा मित्र !

१३७) आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण असं
मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील !

१३८) स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात.

१३९) अश्रुंनीच ह्र्दये कळतात आणि जुळतात.

१४०) हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

१४१) आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.

१४२) बदलण्याची संधी नेहमी असते पण बदलण्यासाठी तूम्ही वेळ काढला का ?

१४३) कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल आणि प्राणाशिवाय शरीर !

१४४) टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नाही.

१४५) नेहमी तत्पर रहा; बेसावध आयुष्य जगू नका.

१४६) यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.

१४७) आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते; ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते
आणि ह्रदय हरूनदेखील जिंकलेलं असतं.

१४८) खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे. आपण कानांनी ऎकतो ते खोटं
आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.

१४९) जगी सर्व सुखी असा कोन आहे; विचारी मना तुच शोधूनी पाहे.

१५०) प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका; स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.

१५१) स्वातंत्र्य म्हणजे संयम; स्वैराचार नव्हे.

१५२) आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.

१५३) माणसाने आपल्या आयुष्यात सुख-दुःख मानापमान, स्फूर्ती-निंदा, लाभ हानी,
प्रिय-अप्रिय ह्या गोष्टी समान समजाव्यात.

१५४) जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.

१५५) तन्मयता नसेल तर; विद्वत्ता व्यर्थ आहे.

१५६) शिक्षण हे साधन आहे; साध्य नव्हे.

१५७) हसा, खेळा पण शिस्त पाळा.

१५८) आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा.

१५९) स्वतः जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या.

१६०) तूच आहेस तूझ्या जीवनाचा शिल्पकार !

१६१) काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट असतेच.

१६२) काळजाची प्रत्येक जखम भरून येते कारण काळ दुःखावर मायेची फुंकर घालत असतो.

१६३) एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो म्हणून नेहमी नवे विचार
मिळवत रहा.

१६४) हे देवा, मला खूप खूप आव्हानं दे व ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे !

१६५) उगवणारा प्रत्येक दिवस उमलणारा हवा.

१६६) या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे.

१६७) तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचंय ते आजच ठरवा....आत्ताच !

१६८) केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे.

१६९) दुसऱ्यांच्या गुणाचं कौतुक करायलाही मन मोठं लागतं.

१७०) माणूस म्हणजे गुण व दोष यांचे मिश्रण आहे.

१७१) प्रत्येक क्षण अपल्याला काही ना काही शिकवत असतो.

१७२) व्यायामामुळे बुध्दी आणि मन दोहोंचे सामर्थ्य प्रभावी होते.

१७३) काट्याविना गुलाबाचा कोमलपणा व्यर्थ असतो.

१७४) दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका; वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.

१७५) शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा. क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू
नका.

१७६) जग भित्र्याला घाबरवते आणि घाबरवणाऱ्याला घाबरते.

१७७) दुःख हे बैलालासुध्दा कोकिळेसारखं गायला लावतं.

१७८) शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही; तो स्वतःहून शिकतो.

१७९) जग हे कायद्याच्या भीतीने चालत नाही ते सद्विचाराने चालते.

१८०) परिस्थितिला शरण न जाता परिस्थितीवर मात करा.

१८१) ऎकावे जनाचे करावे मनाचे.

१८२) एका वेळी एकच काम आणि तेही एकाग्रतेने करा.

१८३) केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान
हवं.

१८४) बाह्यशत्रूपेक्षा बऱ्याच वेळी अंतःशत्रूचीच अधीक भीती असते.

१८५) चिंता ही कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही.

१८६) तलवारीच्या जोरावर मिळवलेलं राज्य तलवार असेतोवरच टिकतं.

१८७) दुःखातील दुःखिताला सुख म्हणजे त्याच्या दुःखातला सहभाग होय.

१८८) स्वातंत्र्य हा आपला जन्मसिध्द हक्क आहे पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं
हे आपलं आद्यकर्तव्य आहे.

१८९) स्वतःला पुर्ण ज्ञानी समजणाऱ्याचा विकास खुंटला.

१९०) त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे. नव्हे, त्रास कसा सहन करायचा हे
शिकणे हीच विद्या !

१९१) जगू शकलात तर चंदनासारखे जगा; स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या

१९२) दुबळी माणसे रडगाणी सांगण्यासाठीच जन्माला आलेली असतात.

१९३) पाप ही अशी गोष्ट आहे जी लपवली की वाढत जाते.

१९४) उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो.

१९५) जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.

१९६) मरावे परी कीर्तीरूपे उरावे.

१९७) आयुष्य जगून समजते; केवळ ऎकून , वाचून , बघून समजत नाही.

१९८) मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणे
योग्य.

१९९) बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.

२००) तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.

२०१) गरिबी असूनही दान करतो तो ख्ररा दानशूर.

२०२) स्वार्थरहीत आणि खरीखुरी सेवा हीच खरी प्रार्थना.

२०३) प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती.

२०४) आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.

२०५) जे घाईघाईने वर चढू पाहतात ते कोसळतात.

२०६) सदगुणांना कधीच वार्धक्य येत नाही.

२०७) उषःकाल कितीही चांगला असला तरी सूर्याला तिथे फार काळ थांबता येत नसतं.

२०८) लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे.

२०९) मोहाचा पहिला क्षण, ही पापाची पहिली पायरी असते.

२१०) जीवन नेहमीच अपूर्ण असते आणि ते अपूर्व असण्यातच त्याची गोडी साठवलेली
असते.

२११) सत्याला शपथांच्या टेकूची गरज नसते.

२१२) जगात सारी सोंगे करता येतात, पण पैशाच सोंग करता येत नाही.

२१३) संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात
असतं.

२१४) जूनी खपली काढून बुजलेल्या जखमा ताज्या करण्यात शहाणपणा नसतो.

२१५) सौंदर्य, सुस्वभाव यांची बेरीज करा, मैत्रीतून मत्सर वजा करा, प्रेमाला
शुध्द अंतःकरणाने गुणा, परमनिंदेचा लघुत्तम काढा, सुविचारांचा वर्ग करा, दया,
क्षमा, शांती, परमार्थ यांचे समीकरण सोडवा... हेच आपल्या सुखी आयुष्याचे गणित
आहे.

२१६) क्रांती तलवारीने घडत नाही; तत्वाने घडते.

२१७) जो गुरू असेल, तो शिष्य असेलच. जो शिष्य नसेल, तो गुरू नसेल.

२१८) जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार
करावेच लागतील.

२१९) जीवन ही एक जबाबदारी आहे. क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागतं.

२२०) वैभव त्यागात असते, संचयात नाही.

२२१) तुम्हाला सज्जन व्हावेसे वाटत असेल तर आधी तुम्ही वाईट आहात यावर विश्वास
ठेवा.

२२२) खोटी टीका करू नका, नाहीतर प्रतिटीका ऎकावी लागेल.

२२३) मनाविरूध्द गोष्ट, म्हणजे ह्रदयस्थ परमेश्वराविरूध्द.

२२४) पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही. आपले अंतरंग खुले करते. कधी चुकवत नाही
की फसवत नाही.

२२५) ह्रदयात अपार प्रेम असंल की सर्वत्र मित्र
 २२६) टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध
रहा.

२२७) प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल, पण शत्रू निर्माण करू नका.

२२८) मनाला आंनद देण्याचा कोणत्याही पदार्थाचा गुण म्हणजेच सौंदर्य.

२२९) भव्य विचार हा सुगंधासारखा असतो; तो पसरावावा लागत नाही; आपोआप पसरतो.

२३०) वाईट गोष्टींशी असहकार दाखवणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे.

२३१) त्याज्य वस्तू फूकट मिळाली तरी स्वीकारू नये.

२३२) शत्रूशीही प्रेमाने वागून त्याला जिंकता येते; पण त्यासाठी संयम असावा
लागतो.

२३३) कृतघ्नतेसारखे दुसरे पाप नाही.

२३४) बनू शकलात तर कृतज्ञ बना, कृतघ्न नको.

१३५) दुसऱ्याचे अनूभव जाणून घेणे हाही एक अनुभवच आसतो.

२३६) ओरडण्याने ओरडणे बंद होत नाही; स्वस्थ राहण्याने मात्र होते.

२३७) दुःख गरूडाच्या पावलाने येतं आणि मुगींच्या पावलांनी जातं.

२३८) जीवन जगण्याची कला हीच सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला आहे.

२३९) एकमेका साहय्य करू । अवघे धरू सुपंथ ॥

२४०) सुख हे दुःखाचे मोल देऊनच मिळते.

२४१) श्रीमंताचे बंगले चांगले असतात पण म्हणून कोणी आपल्या झोपड्या पाडत नाही.

२४२) राष्ट्र निर्माण करायचे असेल तर आधी राष्ट्रनिष्ठा निर्माण करायला हवी.

२४३) संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे.

२४४) असंभवनीय गोष्टी कधीच खऱ्या मानू नयेत.

२४५) उषःकालाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे रात्र.

२४६) ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये.

२४७) जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात, त्यांना स्वातंत्र्यात राहण्याचा
हक्क नही.

२४८) पुस्तकाइतका प्रांजळ आणि निष्कपटी मित्र दुसरा मिळणार नाही.

२४९) मनाला आंनद, संस्कार देणारी प्रत्येक वस्तू व कृती कलापूर्ण आहे.

२५०) दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो

मैत्रीणी

👭💃👯💁🙆🙎🙋🙅💇


*मैत्रिणी...*
*जीवा भावाच्या...*
*छे छे... ना जीवाच्या ना भावाच्या....*
*माझ्याच मैत्रिणी*
*जणू एकाच नाळेला जोडलेल्या सगळयाजणी..!!*

*मैत्रिणी..*
Lecture सुरु असताना
हळुचकन चिंचा ..पास करणाऱ्या...
lunch break मधे स्वतःपेक्षा, दुसरीचाच डबा आवडीने खाणाऱ्या..!

*मैत्रिणी..*
एकमेकींसोबत राहण्यासाठी
जगालाही बिनधास्त भीडणाऱ्या..!
शिक्षकांच्या सीरियस ओरडण्यालाही हसण्यावारी नेणाऱ्या..!

*मैत्रिणी..*
Late comers साठी जागा ठेवणाऱ्या..
चुकून दुसरं कुणी बसलंच
तर एकाच खुर्चीत दोघी बसून पूर्ण lecture adjust करणाऱ्या

*मैत्रिणी...*
समोर lectureसुरू असताना
बाकाखालून निरोप पाठविणा-या
सरांनी पकडलचं कधी तर...


पटकन वही लपविणा-या
ती मी नव्हेच भासविणा-या.......



*मैत्रिणी..*
ऐन परीक्षेच्यावेळी धावून येणाऱ्या..
notes काढतानाही सगळ्यांचा विचार करणाऱ्या..
group study च्या नावाने night out करणाऱ्या..
अभ्यासाच्या नावाखाली gossips करणाऱ्या..!

*मैत्रिणी..*                                            एक जरी नसली तरी आध्या- अधुऱ्या वाटणाऱ्या..
आजारपणात घरी जाऊन विचारपूस करणाऱ्या
आजारी मैत्रिणीला बाजूला ठेवून., Maggie वर ताव मारणाऱ्या..!

*मैत्रिणी..*
कधी लहान - मोठया मतभेदांनी दुरावणाऱ्या
"काय म्हणताहेत तुमच्या ...... मॅडम ?" असं तिसरीला विचारून,
नकळत चौकशी करणाऱ्या..
"हाह.! मला काहीच वाटत नाही तीच.."
असा उगाच आव आणणाऱ्या..!

 *मैत्रिणी..*
वाढदिवसाला एकत्र येऊन केक कापणाऱ्या.......
आता फक्त msgs वर एकमेकींना Happy Birthday wish करणाऱ्या...
लग्नाच्या शुभेच्छाही फ़ोनवरुनच देणाऱ्या...!

*मैत्रिणी..*
Pregnancy मधे 'काळजी घे ग.!' असं फोनवरच सांगणाऱ्या..
बाळाचे pics ही what's app वरच पाहून,
"कित्ती गोड आहे तुझं पिल्लू... *muaaahhaa*" असं म्हणणाऱ्या..!

*मैत्रिणी..*
आपापल्या संसारात गुंग असणाऱ्या
रोजच्या व्यापातून वेळ मिळालाच तर, group वर chat करणाऱ्या
"कशी आहेस .?" विचारलं तर संसाराचे गुणगान करणाऱ्या
मुळ प्रश्नाचे उत्तर नकळतच टाळणाऱ्या..!

*मैत्रिणी..*
आईकडे असेपर्यंत अस्तित्त्वाची लढाई लढणाऱ्या,
स्वछंद आयुष्य जगणाऱ्या,
आज घर,संसार,नोकरी,मूलं आणि चुकून आठवण झालीच तर स्वतःला सावरणाऱ्या..!

*मैत्रिणी..*
पुन्हा मागे वळून पाहता,
फुलपाखरासारख्या भिरभिरणाऱ्या,
एकमेकींच्या सहवासात पुन्हा फूलासारख्या फुलणाऱ्या..!                                           मला त्याच वाटेने जायचे आहे असे              खोटे बोलून घर पोच पोहचवणा-या...,...!

*मैत्रिणी..*
*जीवा भावाच्या,*
एकाच माळेत गुंफलेल्या,
दूर असल्यातरी,
नेहमीच जवळ वाटणाऱ्या..!
रागात असलो तरी दहा वेळा                         नाना प्रश्न विचारणा-या..,,,,!                     उत्तर मिळे पर्यंत पाठी लागणा-या,,,, !

*मैत्रिणी..*
*जीवा भावाच्या..*
छे..छे.. ना जीवाच्या ना भावाच्या..
फक्त माझ्याच मैत्रिणी....!!!
जणू एकाच नाळेला जोडलेल्या .......!
Friends, सख्या, सहेली, मैत्रिणी..
शाळेत/colg मधे भेटलेल्या आयुष्यभर साथ देणाऱ्या।
जणू एकाच नाळेला जोडलेल्या...!!!!